\id ZEP - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h सफन्याह \toc1 सफन्याहची भविष्यवाणी \toc2 सफन्याह \toc3 सफ \mt1 सफन्याहची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्‍याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे: \b \s1 याहवेहचा संपूर्ण पृथ्वीसाठी न्यायाचा दिवस \q1 \v 2 “मी पृथ्वीतलावरून सर्वकाही \q2 झटकून नाहीसे करेन.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 3 “मी माणसे आणि जनावरे दोन्हीही नष्ट करेन; \q2 मी आकाशातील पक्षी नष्ट करेन \q2 आणि समुद्रातील मासेही— \q2 त्या मूर्ती ज्या दुष्टाच्या अडखळण्याचे कारण बनते.” \b \q1 याहवेह जाहीर करतात, \q2 “जेव्हा मी पृथ्वीवरून \q2 सर्व मानवजातीला नष्ट करेन, \q1 \v 4 तेव्हा मी यहूदीयातील \q2 आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन. \q1 या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन \q2 प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्‍यांच्या नावाचा— \q1 \v 5 जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात \q2 आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. \q1 जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, \q2 आणि मोलेख\f + \fr 1:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa मालकम\fqa*\f* दैवताचीही शपथ घेतात, \q1 \v 6 जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत \q2 आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.” \b \q1 \v 7 सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा. \q2 कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे; \q1 याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे; \q2 ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे. \b \q1 \v 8 याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी \q2 मी अधिपतींना आणि राजपुत्रांना \q1 आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्‍या \q2 सर्वांना शिक्षा करेन. \q1 \v 9 त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन \q2 जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात\f + \fr 1:9 \fr*\ft \+xt 1 शमु 5:5\+xt* पाहावे\ft*\f* \q1 जे त्यांच्या दैवतांची मंदिरे \q2 हिंसाचार व लबाडीने भरतात. \b \q1 \v 10 याहवेह जाहीर करतात, \q2 “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून \q1 एक मोठी आरोळी ऐकू जाईल, \q2 नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, \q2 आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल; \q1 \v 11 विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता, \q2 तुमचे सर्व व्यापारी, \q2 सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील. \q1 \v 12 त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन \q2 आणि जे बेफिकीर असतात, \q2 जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत, \q1 जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट \q2 असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन. \q1 \v 13 या लोकांची मालमत्ता लुटली जाईल, \q2 यांचीच घरे ढासाळून टाकली जातील, \q1 जरी त्यांनी घरे बांधली असतील, \q2 त्या घरात ते राहू शकणार नाहीत; \q1 जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल, \q2 द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.” \b \q1 \v 14 याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— \q2 तो वेगाने अगदी जवळ येत आहे. \q1 याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; \q2 सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील. \q1 \v 15 तो दिवस क्रोधाग्नीचा दिवस असेल— \q2 तो दिवस दुःखाचा व क्लेशाचा, \q3 तो दिवस अरिष्ट व उजाडतेचा, \q2 तो दिवस अंधकाराचा व उदासीनतेचा, \q3 तो दिवस अभ्रांचा व निबिड काळोखाचा— \q2 \v 16 तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध \q1 आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध \q2 रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल. \b \q1 \v 17 “मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्‍या \q2 एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, \q2 कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. \q1 त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल \q2 व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील. \q1 \v 18 त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी \q2 त्यांना याहवेहच्या क्रोधापासून \q2 वाचवू शकणार नाही.” \b \q1 त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने \q2 संपूर्ण पृथ्वी भस्म होईल, \q1 कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात \q2 त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील. \c 2 \s1 राष्ट्रांबरोबर यहूदीया आणि यरुशलेमचा न्याय \s2 यहूदीयास पश्चात्तापासाठी आव्हान \q1 \v 1 हे निर्लज्ज राष्ट्रा एकत्र ये, \q2 स्वतःला एकवटून घे, \q1 \v 2 फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी \q2 आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी, \q1 याहवेहचा भयंकर संताप \q2 तुझ्यावर कोसळण्यापूर्वी, \q1 याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस, \q2 तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये. \q1 \v 3 या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, \q2 तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. \q1 धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; \q2 याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी \q2 कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल. \s2 फिलिस्तिया \q1 \v 4 गाझाचा त्याग करण्यात येईल \q2 आणि अष्कलोन ओसाड पडेल. \q1 भर दुपारी अश्दोद नगर रिकामे होईल \q2 आणि एक्रोन समूळ उपटले जाईल. \q1 \v 5 हे करेथीयाच्या लोकांनो, \q2 समुद्र किनार्‍यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो; \q1 कनान देशात राहणार्‍या पलिष्टी लोकांनो, \q2 याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे. \q1 ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन, \q2 की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.” \q1 \v 6 समुद्रकिनाऱ्याची भूमी एक कुरण बनेल \q2 मेंढपाळांसाठी विहिरी असलेले स्थान \q2 व मेंढरांसाठी मेंढवाड्याचे ठिकाण होईल. \q1 \v 7 ती भूमी यहूदीयाच्या वंशातील \q2 अवशेषाचे वतन होईल; \q2 तिथे त्यांची कुरणे असतील. \q1 संध्याकाळी ते अष्कलोन येथील घरात \q2 विश्रांती घेतील. \q1 याहवेह, त्यांचे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतील; \q2 त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत प्राप्त करून देतील.\f + \fr 2:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांचे बंदिवान मी परत आणेन\fqa*\f* \s2 मोआबी आणि अम्मोनी \q1 \v 8 “मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी \q2 आणि अम्मोनी लोकांचे टोमणे मी ऐकले आहेत, \q1 जे माझ्या लोकांचा उपहास करतात \q2 आणि त्यांच्या प्रदेशाविरुद्ध धमक्याही मी ऐकल्या आहेत. \q1 \v 9 म्हणून माझ्या जिवाची शपथ,” \q2 इस्राएलचे परमेश्वर, \q2 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \q1 “निश्चितच मोआब हा सदोमासारखा, \q2 अम्मोनी गमोरासारखा होईल \q1 तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे \q2 कायमची ओसाड ठिकाणे होतील. \q1 माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील; \q2 माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.” \b \q1 \v 10 त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे \q2 हे प्रतिफळ मिळेल. \q2 कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला. \q1 \v 11 जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील, \q2 तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील. \q1 दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर \q2 त्यांच्यापुढे नतमस्तक होतील. \s2 कूश\f + \fr 2:12 \fr*\ft कूश अर्थात् \ft*\fqa इथिओपिया\fqa*\f* \q1 \v 12 “अहो कूशी\f + \fr 2:12 \fr*\ft नाईल नदीच्या वरच्या भागातील भूमी\ft*\f* लोकांनो, \q2 तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.” \s2 अश्शूर \q1 \v 13 ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील \q2 आणि अश्शूरचा नाश करतील, \q1 निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड \q2 आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील. \q1 \v 14 कळप व मेंढरे \q2 सर्व राष्ट्रांचे प्राणी तिथे विश्रांती घेतील. \q1 तिथे वाळवंटातील घुबडे व कर्कश किंचाळणारी घुबडे \q2 तिच्या स्तंभावर निवारा घेतील. \q1 घुबडांची घूं घूं खिडक्यांमधून प्रतिध्वनित होईल, \q2 तिची प्रवेशद्वारे दगडविटांच्या तुकड्यांनी भरलेली असतील, \q2 देवदारूचे स्तंभ उघडे बोडके होतील. \q1 \v 15 ही नगरी चैनबाजी करणारी, \q2 सुरक्षितेत वसणारी होती. \q1 ती स्वतःशी म्हणत असे, \q2 “मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.” \q1 पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे, \q2 जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण! \q1 तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून \q2 त्यांचे डोके हलवितात. \c 3 \s2 यरुशलेम \q1 \v 1 हे जुलमी लोकांच्या नगरी, \q2 विद्रोही व भ्रष्ट नगरी, तुला धिक्कार असो! \q1 \v 2 ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही, \q2 ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही. \q1 ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही, \q2 ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही. \q1 \v 3 तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी \q2 गर्जना करणार्‍या सिंहासारखे आहेत; \q1 तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत \q2 ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत. \q1 \v 4 तिचे संदेष्टे अधर्म करणारे आहेत; \q2 ते विश्वासघातकी लोक आहेत. \q1 तिचे याजक मंदिर अपवित्र करतात \q2 ते आज्ञेचे उल्लंघन करतात. \q1 \v 5 परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत; \q2 ते काहीही अयोग्य करीत नाहीत. \q1 प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात, \q2 आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत, \q2 तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही. \s2 यरुशलेम पश्चात्ताप करणे नाकारते \q1 \v 6 “मी अनेक राष्ट्रांचा नाश केला; \q2 त्यांच्या गडांना उद्ध्वस्त केले आहे. \q1 मी त्यांचे रस्ते ओसाड केले आहेत \q2 तिथून कोणीही प्रवास करीत नाही. \q1 आणि त्यांची शहरे निर्जन केली आहेत; \q2 ते त्यागलेले व रिकामे झाले आहेत. \q1 \v 7 यरुशलेमबद्दल मी विचार केला, \q2 ‘निश्चितच तू माझे भय धरशील; \q2 आणि माझ्या सुधारणांचा स्वीकार करशील!’ \q1 तेव्हा तिचे आश्रयस्थान\f + \fr 3:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa तिचे पवित्रस्थान\fqa*\f* उद्ध्वस्त होणार नाही. \q2 माझ्या सर्व शिक्षा तिच्यावर येणार नाहीत, \q1 पण तरीही पूर्वीसारखीच \q2 भ्रष्टाचारी दुष्कर्मे करण्यास ती उत्सुक आहे.” \q1 \v 8 याहवेह जाहीर करतात, “म्हणून माझी वाट पाहा, \q2 त्या दिवशी मी दोषारोप करण्यास\f + \fr 3:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa लूट घेण्यास\fqa*\f* उभा राहीन. \q1 पृथ्वीवरील सर्व राज्ये व राष्ट्रे \q2 एकत्र करण्याचा मी निर्धार केला आहे \q1 आणि त्यांच्यावर माझ्या कोपाचा वर्षाव करेन; \q2 माझ्या अत्यंत तीव्र क्रोधाग्नीने \q1 आणि माझ्या ईर्षेच्या अग्नीने \q2 संपूर्ण विश्व जळून भस्म होईल. \s1 इस्राएलच्या अवशेषाचे पुनर्स्थापन \q1 \v 9 “मग मी त्यांच्या ओठांचे शुद्धीकरण करेन, \q2 असे की ते सर्व याहवेहच्या नामाचा धावा करतील \q2 आणि खांद्याला खांदा लावून त्यांची सेवा करतील. \q1 \v 10 कूश देशाच्या नद्यांपलीकडून \q2 माझे उपासक, माझे विखुरलेले लोक \q2 माझ्यासाठी अर्पणे आणतील. \q1 \v 11 त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस, \q2 त्याबद्दल तू लज्जित केली जाणार नाही, \q1 तेव्हा तू माझ्याविरुद्ध बंड करणारी अशी राहणारच नाहीस. \q2 कारण मी तुझ्यातील सर्व गर्वाने उन्मत्त झालेली माणसे काढून टाकेन. \q1 माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा कधीही \q2 गर्विष्ठपणा केला जाणार नाही. \q1 \v 12 मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन, \q2 असेच अवशिष्ट लोक ठेवेन. \q1 इस्राएलचे अवशिष्ट लोक असतील आणि ते \q2 याहवेहच्या नामात आश्रय घेतील. \q1 \v 13 इस्राएलमधील उरलेले कोणतेही दुष्कृत्य करणार नाहीत; \q2 ते असत्य बोलणार नाहीत. \q1 लबाडी करणारी जीभ \q2 त्यांच्या मुखात असणार नाही. \q1 ते अन्न सेवन करून विसावा घेतील \q2 आणि त्यांना कोणीही भीती दाखविणार नाही.” \b \q1 \v 14 हे सीयोनकन्ये, तू गीत गा; \q2 हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! \q1 अगे यरुशलेमकन्ये, \q2 अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर. \q1 \v 15 कारण याहवेहने तुझी शिक्षा काढून घेतली आहे, \q2 तुझ्या शत्रूचे सैन्य परत गेले आहे. \q1 याहवेह, इस्राएलचे राजा तुझ्यासह आहेत; \q2 यापुढे हानीचे भय तू बाळगणार नाही. \q1 \v 16 त्या दिवशी \q2 ते यरुशलेमला असे म्हणतील, \q1 “हे सीयोना, भिऊ नकोस, \q2 तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस. \q1 \v 17 महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत, \q2 ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत. \q1 त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो; \q2 तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत. \q2 त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील.” \b \q1 \v 18 “जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत, \q2 ते सण साजरे करता आले नाही म्हणून जे लोक शोक करतात, \q2 त्या सर्वांना मी तुझ्यामधून काढून टाकेन. \q1 \v 19 त्या समयी ज्यांनी तुझ्यावर जुलूम केला त्यांना मी अतिशय कडक शिक्षा करेन. \q2 त्या सर्वांचा मी जाब घेईन. \q1 जे लंगडे आहेत त्यांची मी सोडवणूक करेन; \q2 बंदिवासात गेलेल्यांना मी एकत्र करेन. \q1 जिथे ते लज्जित झाले त्या प्रत्येक भूमीवर \q2 त्यांना मी प्रशंसा व गौरव बहाल करेन. \q1 \v 20 त्यावेळी मी तुम्हा सर्वांना एकत्र गोळा करेन; \q2 त्यावेळी मी तुम्हाला घरी परत आणेन. \q1 जेव्हा मी तुमची संपन्नता तुम्हाला परत देईन \q2 तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये, \q1 स्वतःच्या दृष्टीसमोर \q2 मी तुम्हाला गौरव व प्रशंसा बहाल करेन,” \q2 असे याहवेह म्हणतात.