\id ZEC - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h जखर्‍याह \toc1 जखर्‍याहाची भविष्यवाणी \toc2 जखर्‍याह \toc3 जख \mt1 जखर्‍याहाची भविष्यवाणी \c 1 \s1 याहवेहकडे परतण्याचे आव्हान \p \v 1 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्‍याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले: \p \v 2 “याहवेह तुमच्या पूर्वजांवर अत्यंत क्रोधित झाले होते. \v 3 म्हणून लोकांना सांग: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुम्हाकडे परत येईन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \v 4 तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात. \v 5 तुमचे पूर्वज कुठे आहेत? आणि संदेष्टे, ते कायमचे जगतात का? \v 6 पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना? \p “तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ ” \s1 मेंदीच्या झुडूपांमधील मनुष्य \p \v 7 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी वर्षाच्या अकराव्या महिन्यातील चोविसाव्या दिवशी, शबात महिन्यात, संदेष्टा जखर्‍याह, बेरेख्याहचा पुत्र व इद्दोचा नातू याला याहवेहचे वचन प्राप्त झाले. \p \v 8 रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते. \p \v 9 मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” \p एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.” \p \v 10 मग मेंदीच्या झुडपांमध्ये उभे असलेल्या मनुष्याने सांगितले, “याहवेहने यांना संपूर्ण पृथ्वीवरून फेरी मारण्याकरिता पाठविले आहे.” \p \v 11 मग त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये उभ्या असलेल्या याहवेहच्या दूताला वृतांत सांगितला, “आम्ही सर्व पृथ्वीवरून फिरून आलो आहोत आणि संपूर्ण जगात विश्रांती व शांतता नांदत आहे.” \p \v 12 मग याहवेहच्या दूताने म्हटले: “हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?” \v 13 तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले. \p \v 14 मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे, \v 15 ज्या अन्य राष्ट्रांना सुरक्षित वाटते त्यांच्यावर मी फार क्रोधित झालो आहे, कारण आधी मी माझ्या लोकांवर थोडा नाराज होतो, पण त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार मिळालेली राष्ट्रे मर्यादेपलिकडे गेली.’ \p \v 16 “म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \p \v 17 “आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ” \s1 चार शिंगे व चार शिल्पकार \p \v 18 नंतर मी वर पाहिले तर मला चार शिंगे दिसली. \v 19 मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, “हे काय आहे?” \p त्याने उत्तर दिले, “ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली.” \p \v 20 नंतर याहवेहने मला चार शिल्पकार दाखविले. \v 21 तेव्हा मी विचारले, “हे काय करण्यासाठी आले आहेत?” \p तेव्हा याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “ही ती चार शिंगे आहेत ज्यांनी यहूदीयाची इतकी पांगापांग केली, की कोणीही आपले मस्तक वर उचलू शकले नाही, पण हे शिल्पकार त्या चार शिंगांना पकडून भयभीत करून व यहूदीयाविरुद्ध आपली शिंगे उंच करून तिच्या लोकांची पांगापांग करणाऱ्या राष्ट्रांना फेकून देण्यासाठी आले आहेत.” \c 2 \s1 मापनपट्टी घेतलेला मनुष्य \p \v 1 मग मी वर पाहिले, तेव्हा माझ्यासमोर हातात मापनपट्टी घेतलेला एक मनुष्य मला दिसला. \v 2 मी त्याला विचारले, “तू कुठे जात आहेस?” \p तो म्हणाला, “मी यरुशलेमेचे मोजमाप घेण्यासाठी चाललो आहे. ती किती लांब व किती रुंद आहे हे मला पाहावयाचे आहे.” \p \v 3 आणि पाहा, जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो जाऊ लागला, तेव्हा दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटण्यास आला. \v 4 व त्याला म्हणाला: “पळत जा आणि त्या तरुणाला सांग, की यरुशलेम तटबंदी नसलेले नगर होईल कारण तिथे असंख्य लोक व जनावरे असतील. \v 5 आणि मी स्वतः त्याभोवती अग्नीचा कोट होईन व आत त्या नगरीचे वैभव होईन,” असे याहवेह जाहीर करतात. \p \v 6 “चला! चला! उत्तरेकडील देशांमधून बाहेर पळा, कारण मी तुम्हाला स्वर्गातील वाऱ्याच्या चारही दिशांना विखुरले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. \p \v 7 “चल सीयोने! जी तू बाबेल कन्येत राहते!” \v 8 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, “गौरवशाली प्रभूने तुम्हाला लूटणाऱ्या राष्ट्राविरुद्ध मला पाठविले—जो कोणी तुम्हाला स्पर्श करतो, तो याहवेहच्या डोळ्यातील बुबुळाला स्पर्श करतो— \v 9 मी निश्चितच त्यांच्याविरुद्ध माझा हात उगारेन, म्हणजे त्यांचेच गुलाम त्यांची लुटालूट करतील.\f + \fr 2:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa मी त्यांना लूट असे देईन\fqa*\f* मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे. \p \v 10 “अगे सीयोनकन्ये, गीत गा आणि उल्हास कर! कारण मी येत आहे आणि मी तुम्हामध्ये वस्ती करेन,” याहवेह जाहीर करतात. \v 11 “त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे. \v 12 आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील. \v 13 हे सर्व मानवजाती, याहवेहपुढे स्तब्ध राहा, कारण ते आपल्या पवित्र निवासस्थानातून जागृत झाले आहेत.” \c 3 \s1 प्रमुख याजकासाठी निर्मळ वस्त्रे \p \v 1 नंतर प्रमुख याजक यहोशुआ हा याहवेहच्या दूतापुढे उभा असल्याचे दूताने मला दाखविले आणि सैतान\f + \fr 3:1 \fr*\fq सैतान \fq*\ft अर्थात् \ft*\fqa शत्रू\fqa*\f* ही तिथे दूताच्या उजव्या बाजूला होता आणि तो यहोशुआवर आरोप करीत होता. \v 2 तेव्हा याहवेह सैतानाला म्हणाले, “अरे सैताना, याहवेह तुला धमकावितात! यरुशलेमची निवड करणारे याहवेह तुला धमकावितात! अग्नीतून बाहेर ओढून काढलेल्या जळत्या कोलितासारखा हा मनुष्य नाही का?” \p \v 3 याहवेहच्या दूतासमोर उभ्या असलेल्या यहोशुआची वस्त्रे घाणेरडी होती. \v 4 तेव्हा तिथे उभे असलेल्यांना स्वर्गदूत म्हणाला, “त्याची घाणेरडी वस्त्रे काढा.” \p मग यहोशुआला तो म्हणाला, “पाहा, मी तुझी पापे दूर केली आहेत आणि आता मी तुला ही महायाजकाची वस्त्रे घालीत आहे.” \p \v 5 मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा.” तेव्हा याहवेहचा स्वर्गदूत तिथे उभा असताना त्यांनी त्याच्या डोक्याला एक स्वच्छ फेटा बांधला व वस्त्रे चढविली. \p \v 6 नंतर याहवेहच्या दूताने यहोशुआवर ही जबाबदारी सोपविली: \v 7 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘जर तू आज्ञाधारकपणे माझ्या मार्गांनी चालशील, तर तू माझ्या भवनावर शासन करशील आणि माझ्या न्यायमंदिरावर अधिकार चालवशील. ते पवित्र ठेवावेस म्हणून मी ते तुझ्या ताब्यात देईन; आणि इथे उभे असलेल्यांच्या बरोबरीने तू स्थान ग्रहण करशील. \p \v 8 “ ‘ऐक, हे प्रमुख याजका यहोशुआ, तू आणि तुझ्याबरोबर बसलेले तुझे सहकारी, जे भावी काळाची चिन्हे आहेत: मी माझा सेवक, शाखा आणणार आहे. \v 9 पाहा, मी यहोशुआसमोर एक दगड ठेवला आहे! या दगडाला सात नेत्र आहेत, मी त्यावर एक शिलालेख कोरणार आहे आणि या देशाची पापे एका दिवसात दूर करेन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \p \v 10 “ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्‍यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.” \c 4 \s1 सुवर्ण दीपवृक्ष व जैतुनाचे दोन वृक्ष \p \v 1 मग जो याहवेहचा स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, तो परत आला व त्याने मला जागे केले, जणू काय मी झोपेतच होतो. \v 2 त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?” \p मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई. \v 3 या कटोर्‍याच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे मला दिसतात.” \p \v 4 तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला मी विचारले, “माझ्या प्रभू, हे काय आहे?” \p \v 5 त्यावर देवदूताने उत्तर दिले, “हे काय आहे तुला माहीत नाही काय?” \p तेव्हा मी म्हणालो, “नाही, प्रभू.” \p \v 6 मग तो मला म्हणाला, “जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \p \v 7 “हे विशाल पर्वता, तू कोण आहेस? जरूब्बाबेलापुढे तू सपाट मैदान असा होशील. मग तो शिखरशिलेस बाहेर आणून प्रचंड गजर करेल, ‘याहवेह आशीर्वादित करो! याहवेह आशीर्वादित करो!’ ” \p \v 8 याहवेहकडून मला एक वचन मिळाले: \v 9 “जरूब्बाबेलाच्या हस्ते या मंदिराचा पाया घातला; आणि तोच स्वहस्ते ते पूर्ण करेल. तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वसमर्थ याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे. \p \v 10 “ही सुरुवात अगदी लहान असली तरी तिला तुच्छ मानण्यास कोण धजावेल, कारण याहवेहचे सात नेत्र संपूर्ण पृथ्वीभर फिरतात व जरूब्बाबेलाच्या हातात शिखरशिला आहे, हे पाहून हर्षाने प्रफुल्लित होतात?” \p \v 11 मग मी त्या दूताला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे का आहेत?” \p \v 12 मी पुन्हा त्याला विचारले, “तसेच तेल ओतणार्‍या सोन्याच्या दोन नळ्यांजवळ दोन जैतुनाच्या फांद्या का आहेत?” \p \v 13 त्यावर त्याने मला विचारले, “तुला हे काय आहे ते माहीत नाही काय?” \p मी म्हटले, “नाही, प्रभू.” \p \v 14 तेव्हा त्याने मला सांगितले, “अखिल पृथ्वीचे प्रभू आहेत, त्यांची सेवा करणारे हे दोन अभिषिक्त\f + \fr 4:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa तेल पुरविणारे\fqa*\f* आहेत.” \c 5 \s1 उडत्या चर्मपत्राची गुंडाळी \p \v 1 मी पुन्हा वर पाहिले आणि उडत असलेली एक चर्मपत्राची गुंडाळी मला दिसली. \p \v 2 त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” \p मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद\f + \fr 5:2 \fr*\ft अंदाजे 9 मीटर लांब व 4.5 मीटर रुंद\ft*\f* असावी.” \p \v 3 मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्‍या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल. \v 4 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्‍या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ” \s1 टोपलीमधील स्त्री \p \v 5 मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो पुढे आला आणि मला म्हणाला, “वर पाहा आणि बघ काय प्रगट होत आहे.” \p \v 6 मी विचारले, “ते काय आहे?” \p “त्याने उत्तर दिले, ती एक टोपली आहे.” तो पुढे बोलला, “ती संपूर्ण देशातील लोकांची पातके\f + \fr 5:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa लोकांचा देखावा\fqa*\f* आहेत.” \p \v 7 मग तिचे शिसाचे झाकण वर उघडले गेले आणि त्या टोपलीच्या आत बसलेली एक स्त्री मला दिसली! \v 8 याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “ती दुष्टाई आहे.” असे म्हणून त्याने तिला पुन्हा त्या टोपलीत ढकलले आणि त्या टोपलीचे शिसाचे झाकण बंद केले. \p \v 9 मग मी वर बघितले—आणि मला दोन स्त्रिया उडतांना दिसल्या, त्यांच्या पंखात वारा भरलेला होता! त्यांचे पंख करकोचाच्या पंखांप्रमाणे होते आणि त्यांनी ती टोपली आकाश व पृथ्वीच्या मध्ये उचलली. \p \v 10 तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता त्याला मी विचारले, “ती टोपली त्या कुठे नेत आहेत?” \p \v 11 त्याने उत्तर दिले, “शिनार\f + \fr 5:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa बाबिलोन\fqa*\f* देशात, तिच्याकरिता घर बांधण्यासाठी. जेव्हा घर तयार होईल, तेव्हा ही टोपली त्यामध्ये तिच्या ठिकाणी ठेवण्यात येईल.” \c 6 \s1 चार रथ \p \v 1 मग मी पुन्हा वर पाहिले, तो दोन पर्वतांमधून चार रथ येत असलेले मला दिसले. ते पर्वत कास्याचे होते. \v 2 पहिला रथ तांबडे घोडे ओढीत होते, दुसरा रथ काळे घोडे ओढीत होते, \v 3 तिसरा रथ पांढरे घोडे, तर चौथा रथ पंचरंगी घोडे ओढीत होते. \v 4 तेव्हा मी जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला विचारले, “प्रभू, हे काय आहेत?” \p \v 5 देवदूताने मला उत्तर दिले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या समोर उभे राहणारे हे चार स्वर्गीय आत्मे\f + \fr 6:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa वारा\fqa*\f* आहेत, ते तिथून बाहेर जात आहेत. \v 6 काळ्या घोड्यांचा रथ उत्तरेला जाईल आणि पांढर्‍या घोड्यांचा रथ पश्चिमेकडे,\f + \fr 6:6 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa त्यांच्या पाठीमागे\fqa*\f* पंचरंगी घोड्यांचा रथ दक्षिणेकडे जाईल.” \p \v 7 जेव्हा ते शक्तिशाली घोडे निघाले, ते संपूर्ण पृथ्वीवर जाण्यास आतुर झाले होते आणि तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण पृथ्वीवर जा!” तेव्हा ते संपूर्ण पृथ्वीवर गेले. \p \v 8 मग त्याने मला बोलाविले आणि तो मला म्हणाला, “जे उत्तरेला गेले, त्यांनी उत्तरेकडील भूमीला माझ्या आत्म्याची शांती दिली आहे.” \s1 यहोशुआसाठी मुकुट \p \v 9 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 10 “हेल्दय, तोबीयाह व यदायाह यांनी बाबेलमध्ये बंदिवासात असलेल्या यहूदी लोकांकडून आणलेले रुपे व सोने घे. त्याच दिवशी तू सफन्याहचा पुत्र योशीयाहच्या घरी जा. \v 11 रुपे व सोने घेऊन त्यांचा एक मुकुट तयार कर. मग तो मुकुट यहोसादाकाचा पुत्र, प्रमुख याजक यहोशुआच्या मस्तकावर ठेव. \v 12 त्याला सांग की सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हा तो पुरुष आहे, ज्याचे नाव “शाखा” आहे, जो त्याच्या ठिकाणापासून शाखा काढेल आणि याहवेहचे मंदिर बांधेल. \v 13 तो याहवेहचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली वस्त्र परिधान करेल आणि राजासनावर बसेल व राज्य करेल. तो त्याच्या सिंहासनावर याजक होईल आणि या दोघात समन्वय होईल.’ \v 14 हेलेम\f + \fr 6:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa हेल्दय\fqa*\f*, तोबीयाह आणि यदायाह आणि सफन्याहचा पुत्र हेन\f + \fr 6:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa दयाळू\fqa*\f*, यांना याहवेहच्या मंदिराचे स्मृतिचिन्ह म्हणून मुकुट देण्यात येईल. \v 15 दूरवर असलेले लोकही येतील व याहवेहचे मंदिर बांधण्यासाठी मदत करतील, तेव्हा तुला कळेल की सर्वसमर्थ याहवेहनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझे परमेश्वर याहवेह त्यांच्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तरच हे घडेल.” \c 7 \s1 न्याय आणि कृपा, उपवास नको \p \v 1 दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्‍याहला याहवेहकडून संदेश मिळाला. \v 2 बेथेल शहरात राहणार्‍या यहूदी लोकांनी राजाचा प्रमुख शासकीय अधिकारी शरेसर आणि रगेम-मेलेकच्या नेतृत्वाखाली लोकांचे एक पथक यरुशलेमच्या मंदिरात याहवेहचा आशीर्वाद मागण्यासाठी, \v 3 सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराच्या याजकांना आणि संदेष्ट्यांना विचारून, “मी इतकी वर्षे करत आलो त्याप्रमाणे मी पाचव्या महिन्यात शोक व उपवास करावा काय?” \p \v 4 मग सर्वसमर्थ याहवेहचे वचन मला आले: \v 5 “तुमच्या देशातील सर्व लोकांना आणि याजकांना हा प्रश्न विचार, ‘गेली सत्तर वर्षे तुम्ही पाचव्या आणि सातव्या महिन्यात जे उपवास आणि शोक करीत होता, ते खरोखर माझ्यासाठी उपवास करत होते काय? \v 6 आणि आता देखील तुम्ही मेजवान्या करता, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी करीत नाही का? \v 7 ज्यावेळी यरुशलेम आणि तिच्या सभोवतीची उपनगरात शांती व समृद्ध होती आणि नेगेव व दक्षिणेकडील तळवटीच्या प्रदेशातील लोकांचा तिथे जम बसला होता, त्यावेळीच याहवेहनी संदेष्ट्यांद्वारे लोकांना इशारा दिला नव्हता का?’ ” \p \v 8 जखर्‍याहला याहवेहकडून पुन्हा संदेश आला: \v 9 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘निष्पक्ष न्यायदान करा; एकमेकांशी करुणेने व दयेने वागा. \v 10 विधवा व अनाथ, परदेशीय व गरीब लोक यांच्यावर जुलूम करू नका. तसेच एकमेकांविरुद्ध दुष्ट कट रचू नका.’ \p \v 11 “पण त्यांनी माझ्या संदेशाकडे लक्ष देण्याचे नाकारले; त्यांनी हट्टीपणाने माझ्याकडे पाठ केली व आपल्या कानात बोटे घातली. \v 12 त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला. \p \v 13 “ ‘जेव्हा मी त्यांना हाक मारली, त्यांनी ऐकण्याचे नाकारले; म्हणून त्यांनी मला हाक मारली, की मी त्यांचे ऐकणार नाही, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \v 14 चक्रीवादळाप्रमाणे मी त्यांची दूरदूरच्या देशांत पांगापांग केली. त्यांनी मागे सोडलेला त्यांचा देश असा ओसाड झाला, की त्यातून कोणी प्रवासदेखील करेनासे झाले. एकेकाळचा तो रमणीय देश आता त्यांनी निर्जन केला.’ ” \c 8 \s1 यरुशलेमला आशीर्वादाचे याहवेहचे अभिवचन \p \v 1 सर्वसमर्थ याहवेहचे वचन मला प्राप्त झाले. \p \v 2 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “सीयोनेबाबत मला अत्यंत ईर्षा वाटते; मी तिच्याबद्दल ईर्षेने ज्वलंत झालो आहे.” \p \v 3 याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.” \p \v 4 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पुन्हा एकदा त्या नगरीतील परिपक्व वयाचे स्त्री व पुरुष यरुशलेमच्या रस्त्यांवर बसतील, प्रत्येकजण वयातीत असल्यामुळे आपल्या काठ्या टेकीत येतील, \v 5 आणि नगरातील रस्ते तिथे खेळणार्‍या मुलांनी व मुलींनी भरून जातील.” \p \v 6 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्यावेळी हे अवशिष्ट लोकांना अद्भुत वाटेल, परंतु मला ते अद्भुत वाटेल का?” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \p \v 7 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी माझ्या लोकांना पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सोडवून आणेन. \v 8 त्यांनी यरुशलेमात राहावे यासाठी मी त्यांना पुन्हा आणेन; आणि ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा विश्वासयोग्य आणि न्यायी परमेश्वर होईन.” \p \v 9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “आता हे शब्द ऐका, ‘तुमचे बाहू बलवंत करा, जेणेकरून मंदिर बांधून पूर्ण होईल.’ जेव्हा सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराचा पाया घातला, तेव्हा जे संदेष्टे तिथे हजर होते, त्यांनी तुम्हाला हे सांगितले होते. \v 10 त्या वेळेपर्यंत लोकांना कामासाठी मजुरी नव्हती किंवा जनावरे भाड्याने मिळत नव्हती. शत्रूच्या भयापायी कामधंदे करण्यास इतरत्र जाणे सुरक्षित नव्हते, कारण मी तुम्हा प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याविरुद्ध केले होते. \v 11 पण आधी मी वागलो तसे मी आता या अवशिष्ट लोकांशी वागणार नाही,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \p \v 12 “ते बियाणे चांगले वाढेल, द्राक्षवेली फळे देतील, भूमी पीक देईल, आणि आकाश त्याचे दव पाडेल. मी या लोकांच्या अवशिष्टास त्यांचा वारसाहक्क म्हणून हे सर्व देईन. \v 13 जसे तुम्ही, यहूदीया व इस्राएल सर्व राष्ट्रात शाप\f + \fr 8:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुम्ही शापाखाली होता\fqa*\f* म्हटले जात असत, तर मी तुम्हाला वाचवून तुम्हाला आशीर्वाद\f + \fr 8:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या नावाचा उपयोग केला जाईल\fqa*\f* असे करेन. तुम्ही भिऊ नका तर तुमचे बाहू बलवान करा.” \p \v 14 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जसा तुमच्यावर अरिष्ट आणण्याचा व तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला तेव्हा मुळीच करुणा न करण्याचा मी निर्धार केला, \v 15 तर आता मी यहूदीया व यरुशलेमचे परत भले करण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही भिऊ नका. \v 16 आता तुम्ही या गोष्टी करावयाच्या आहेत: एकमेकांशी सत्य बोला, सत्यता व शांततेने तुमच्या न्यायलयात योग्य निर्णय द्या; \v 17 एकमेकांविरुद्ध दुष्ट कारस्थान करू नका आणि खोटी शपथ घेण्याची आवड धरू नका. मला या सर्वाचा अतिशय तिरस्कार वाटतो,” असे याहवेह जाहीर करतात. \p \v 18 सर्वसमर्थ याहवेहकडून मला वचन आले. \p \v 19 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.” \p \v 20 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जगभरचे लोक व अनेक नगरांमधील रहिवासी येतील, \v 21 आणि एका नगरामधील रहिवासी दुसऱ्या नगरात जातील व त्यांना म्हणतील, ‘चला आपण याहवेहला विनंती करू व सर्वसमर्थ याहवेहचा शोध घेऊ. मी स्वतःच जात आहे.’ \v 22 आणि पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे देखील यरुशलेमला येतील व सर्वसमर्थ याहवेहकडे विनंती करतील.” \p \v 23 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्या दिवसात सर्व राष्ट्रांतील व सर्व भाषिक अशी दहा माणसे एका यहूदीच्या अंगरख्याच्या टोकास पकडून म्हणतील, ‘आम्हाला तुमच्याबरोबर येऊ द्या, कारण परमेश्वर तुम्हासोबत आहेत असे आम्ही ऐकले आहे.’ ” \c 9 \s1 इस्राएलच्या शत्रूवर दंडाज्ञा \p \v 1 ही एक भविष्यवाणी आहे: \q1 हद्राख देशाविरुद्ध याहवेहचे वचन आले, \q2 आणि याचा प्रभाव दिमिष्कवरही पडेल; \q1 कारण सर्व लोकांची व इस्राएलच्या सर्व कुळांची दृष्टी \q2 याहवेहवर लागलेली आहे;\f + \fr 9:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa याहवेहची नजर इस्राएलच्या सर्व कुळांवर आहे\fqa*\f* \q1 \v 2 सोर व सीदोनवर, \q2 आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत. \q1 \v 3 सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत; \q2 तिने रुपे धुळीच्या \q2 व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे. \q1 \v 4 परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील \q2 आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील, \q2 आणि ती अग्नीत भस्म होईल. \q1 \v 5 अष्कलोन हे पाहून भयभीत होईल; \q2 गाझा वेदनेने कळवळेल, \q2 व एक्रोन देखील निराशेने कोमेजून जाईल. \q1 गाझा नगरीच्या राजाला ठार करण्यात येईल \q2 आणि अष्कलोन नगरी ओसाड होईल. \q1 \v 6 मिश्रजातीचे लोक अश्दोदास व्यापून टाकतील, \q2 आणि मी पलिष्ट्यांच्या गर्वाचा अंत करेन. \q1 \v 7 मी त्यांच्या मुखातून रक्त व \q2 त्यांच्या दातांमधून अमंगळ अन्न बाहेर काढेन. \q1 जे अवशिष्ट लोक राहतील ते आपल्या परमेश्वराचे होतील \q2 आणि यहूदीयाच्या कुळात समाविष्ट करण्यात येतील \q2 पलिष्टी आणि एक्रोनचे पूर्वी जसे होते तसे हे लोक यबूसी लोकांप्रमाणे होतील. \q1 \v 8 परंतु लुटारूंच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी \q2 मी माझ्या मंदिराभोवती ठाण मांडेन. \q1 यापुढे माझ्या लोकांवर कोणीही जुलूम करणारे अधिकार गाजविणार नाहीत, \q2 आता मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन. \s1 सीयोनच्या राजाचे आगमन \q1 \v 9 सीयोनकन्ये, फार आनंद कर! \q2 यरुशलेमकन्ये, गर्जना कर! \q1 पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, \q2 तो नीतिमान व विजयी आहे, \q1 तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे \q2 होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे! \q1 \v 10 मी एफ्राईमचे रथ \q2 आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, \q2 आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. \q1 आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. \q2 त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत \q2 आणि फरात\f + \fr 9:10 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल. \q1 \v 11 तुमच्या बाबत बोलायचे तर, \q2 रक्ताने शिक्कामोर्तब करून तुमच्याशी केलेल्या करारामुळे, \q2 मी तुमच्या बंदिवानांना निर्जल गर्तेतील मृत्यूपासून सोडविणार आहे. \q1 \v 12 अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या; \q2 आता मी ही घोषणा करतो की, तुमची दुप्पटीने परतफेड करेन. \q1 \v 13 यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो \q2 आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन. \q1 अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना \q2 हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन, \q2 आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन. \s1 याहवेहचे दर्शन होईल \q1 \v 14 मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील; \q2 त्यांचे बाण विजेसारखे चमकतील. \q1 सार्वभौम याहवेह रणशिंग फुंकतील; \q2 ते दक्षिणेतील वादळातून चालतील, \q2 \v 15 आणि सर्वसमर्थ याहवेह त्यांचे रक्षण करतील. \q1 ते नष्ट करतील, \q2 आणि गोफणीच्या दगडांनी विजयी होतील. \q1 ते प्राशन करतील व मद्यपीसारखे गर्जना करतील; \q2 ते वाटीसारखे ओतप्रोत भरतील आणि \q2 वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडण्यासाठी उपयोगात येतील. \q1 \v 16 त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो, \q2 त्याप्रमाणे याहवेह त्यांचे परमेश्वर त्यांच्या लोकांना वाचवतील. \q1 मुकुटामध्ये बसविलेल्या रत्नांप्रमाणे \q2 ते त्यांच्या देशात चमकतील. \q1 \v 17 ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील! \q2 धान्य तरुणांची \q2 आणि नवा द्राक्षारस तरुणींची भरभराट करेल. \c 10 \s1 याहवेह यहूदीयाचे संगोपन करतील \q1 \v 1 “वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; \q2 याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. \q1 तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात \q2 आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात. \q1 \v 2 मूर्ती लबाड बोलतात, \q2 दैवप्रश्न करणारे खोटे दृष्टान्त बघतात; \q1 ते जी स्वप्ने सांगतात ती खरी नसतात, \q2 त्यांनी केलेले सांत्वन व्यर्थ असते. \q1 म्हणून लोक मेंढपाळ नसल्यामुळे \q2 जुलमाच्या दबावाखाली मेंढराप्रमाणे भटकतात. \b \q1 \v 3 “माझा संताप मेंढपाळांविरुद्ध भडकतो, \q2 आणि मी पुढार्‍यांना शिक्षा करेन; \q1 कारण आपल्या कळपाची, यहूदीयाच्या लोकांची \q2 काळजी सर्वसमर्थ याहवेह करतील, \q2 आणि त्यांना युद्धातील कुशल घोड्यांप्रमाणे करतील. \q1 \v 4 यहूदातून कोनशिला येईल, \q2 त्याच्यातूनच तंबूचा खिळा, \q1 त्याच्यातूनच युद्धाचे धनुष्य, \q2 त्याच्यातूनच प्रत्येक अधिकारी येईल. \q1 \v 5 एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील \q2 ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील. \q1 ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत, \q2 आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील. \b \q1 \v 6 “मी यहूदाहला बलवान करेन \q2 आणि योसेफाच्या वंशास वाचवेन. \q1 मी त्यांची पुनर्स्थापना करेन \q2 कारण मी त्यांच्यावर करुणा करतो. \q1 ते असे होतील, जणू काही \q2 मी त्यांचा त्याग कधी केलाच नव्हता, \q1 कारण मी त्यांचा याहवेह परमेश्वर आहे \q2 आणि मी त्यांचा धावा ऐकेन. \q1 \v 7 एफ्राईमी योद्ध्यांसारखे होतील, \q2 द्राक्षारसाने व्हावे तसे त्यांचे हृदय आनंदित होईल. \q1 त्यांची मुलेसुद्धा हे पाहतील आणि उल्लास पावतील; \q2 त्यांची हृदये याहवेहच्या ठायी आनंदित होतील. \q1 \v 8 मी त्यांना संकेत देईन, \q2 आणि त्यांना एकत्र करेन. \q1 मी निश्चितच त्यांना सोडवेन; \q2 ते पुन्हा पूर्वीसारखेच असंख्य होतील. \q1 \v 9 जरी मी त्यांना लोकांमध्ये विखुरले आहे, \q2 तरी देखील त्या दूर देशी ते माझी आठवण करतील. \q1 ते व त्यांची सर्व मुलेबाळे जगतील, \q2 आणि ते परत येतील. \q1 \v 10 मी त्यांना इजिप्तमधून परत आणेन, \q2 आणि अश्शूरातून एकत्र गोळा करेन. \q1 गिलआद व लबानोनमध्ये त्यांचे पुनर्वसन करेन, \q2 आणि तिथे त्यांना जागा पुरेशी होणार नाही. \q1 \v 11 ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील; \q2 उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील \q2 आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल. \q1 अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल \q2 व इजिप्तचा राजदंड निघून जाईल. \q1 \v 12 मी याहवेहमध्ये त्यांना सामर्थ्यवान करेन \q2 आणि त्यांच्या नामामध्ये ते सुरक्षितपणे जगतील,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \c 11 \q1 \v 1 हे लबानोना, आपल्या वेशी उघड, \q2 म्हणजे अग्नी तुझ्या गंधसरूच्या वृक्षांना भस्म करेल! \q1 \v 2 अहो सनोवरच्या वृक्षांनो, गंधसरूच्या सर्व नष्ट झालेल्या वृक्षांसाठी आकांत करा; \q2 डौलदार वृक्ष उद्ध्वस्त झाले आहेत! \q1 बाशानातील एलावृक्षांनो, आकांत करा; \q2 घनदाट वने तोडून टाकली जात आहेत! \q1 \v 3 मेंढपाळांचा आकांत ऐका; \q2 त्यांची सुपीक कुरणे नष्ट झाली आहेत! \q1 सिंहाच्या गर्जना ऐका; \q2 यार्देनेच्या खोऱ्यातील गर्द झाडी उद्ध्वस्त झाली आहे. \s1 दोन मेंढपाळ \p \v 4 मग माझे परमेश्वर याहवेह असे म्हणाले: “कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा मेंढपाळ हो. \v 5 त्यांचे ग्राहक त्यांची कत्तल करतात आणि त्याबद्दल काहीही शिक्षा न होता निसटून जातात. जे त्यांना विकतात, ते म्हणतात, ‘याहवेहची उपकारस्तुती असो, मी श्रीमंत आहे!’ त्यांचे स्वतःचे मेंढपाळदेखील त्यांना दयामाया दाखवित नाहीत. \v 6 या देशातील लोकांची मी देखील गय करणार नाही,” असे याहवेह जाहीर करतात. “मी प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याच्या व त्यांच्या राजांच्या हाती देईन. ते देश उद्ध्वस्त करतील आणि मी त्यांच्यापासून कोणालाही सोडविणार नाही.” \p \v 7 तेव्हा मी कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा, विशेषतः कळपात अत्याचार होत असलेल्या मेंढरांचा मेंढपाळ झालो. मग मी मेंढपाळांच्या दोन काठ्या घेतल्या, एकीला मी कृपा व दुसरीला ऐक्य असे नाव दिले आणि मेंढरांचे राखण केले. \v 8 आणि एका महिन्यातच मी तीन मेंढपाळांना काढून टाकले. \p परंतु त्या मेंढरांना माझी घृणा आली, त्यामुळे मी त्रागलो, \v 9 आणि मी म्हणालो, “मी तुमचा मेंढपाळ राहणार नाही. जे मरत असतील, ते मरो आणि जे नाश होत असतील, ते नाश पावोत. जे उरलेले आहेत, ते एकमेकांचे मांस खावोत.” \p \v 10 मग मी कृपा नावाची माझी काठी घेतली आणि ती मोडली, सर्व राष्ट्रांशी मी केलेला करार रद्द केला. \v 11 त्या दिवशी तो करार रद्द झाला, आणि माझ्याकडे पाहणाऱ्या अत्याचार होत असलेल्या मेंढरांच्या कळपास कळले की हे याहवेहचे वचन होते. \p \v 12 मी म्हणालो, “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझे वेतन द्या; पण तुम्हाला वाटत नसेल तर देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला चांदीची तीस नाणी दिली. \p \v 13 मग याहवेहने मला सांगितले, “ही नाणी कुंभारापुढे फेकून दे,” त्यांनी माझ्यासाठी किती भारी मोल ठरविले! मग मी ती चांदीची तीस नाणी घेतली व ती याहवेहच्या भवनातील कुंभारापुढे फेकली. \p \v 14 मग मी माझी ऐक्य नावाची दुसरी काठी मोडली, यहूदीया व इस्राएल यामधील कौटुंबिक ऐक्य भंग केले. \p \v 15 मग याहवेहने मला सांगितले, “परत जाऊन मूर्ख मेंढपाळाची अवजारे घे. \v 16 मी या राष्ट्रास एका अशा मेंढपाळाच्या हाती देईन, जो हरविलेल्या मेंढरांची काळजी घेणार नाही, कोकरांकडे लक्ष देणार नाही, जखमी मेंढरांना औषध देणार नाही किंवा सशक्त मेंढरांना चारा देणार नाही. त्याऐवजी तो पुष्ट मेंढरे खाऊन टाकील व त्यांची खुरे विदारून त्याचे तुकडे करेल. \q1 \v 17 “धिक्कार असो अशा कुचकामी मेंढपाळाला, \q2 जो कळपाला सोडून पळून जातो! \q1 तलवार त्याचा हात कापून व उजवा डोळा फोडून टाको! \q2 त्याचा हात पूर्णपणे निकामी होवो, \q2 आणि त्याचा उजवा डोळा पूर्णपणे अंध होवो!” \c 12 \s1 यरुशलेमच्या शत्रूंचा नाश होणे \p \v 1 एक भविष्यवाणी: इस्राएलच्या बाबत याहवेहचे वचन. \b \p याहवेह, ज्यांनी आकाश विस्तारले, पृथ्वीचा पाया घातला आणि मनुष्यांच्या अंतर्यामी आत्मा घातला, ते जाहीर करतात: \v 2 “मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल. \v 3 त्या दिवशी, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे एकत्र होतील, तेव्हा मी यरुशलेमला हालविता न येणारा खडक करेन. जे तिला हालविण्याचा प्रयत्न करतील, उलट ती राष्ट्रेच घायाळ होतील. \v 4 त्या दिवशी, मी प्रत्येक घोड्याला भयचकित करेन व त्याच्या स्वारांची मति भ्रष्ट करेन. मी यहूदीयाच्या लोकांवर लक्षपूर्वक नजर ठेवेन, पण इतर राष्ट्रांना आंधळे करेन,” असे याहवेह जाहीर करतात. \v 5 “मग यहूदाहची कुळे आपल्या मनात म्हणतील, ‘यरुशलेमचे लोक सामर्थ्यशाली आहेत, कारण सर्वसमर्थ याहवेह त्यांचे परमेश्वर आहेत.’ \p \v 6 “त्या दिवशी मी यहूदीयाच्या कुळांना, लाकडाच्या ढिगाऱ्यातील आगटीसारखे, पेंढ्यांमध्ये टाकलेल्या पेटत्या मशालीसारखे करेन; ती कुळे उजवीकडील व डावीकडील सर्व शेजारील राष्ट्रांना जाळून भस्म करतील. यरुशलेम मात्र अचल अशी राहील. \p \v 7 “याहवेह यहूदीयाच्या आवासाला प्रथम वाचवतील, जेणेकरून दावीदाच्या घराण्याचा व यरुशलेमच्या रहिवाशांचा आदर यहूदीयापेक्षा महान होणार नाही. \v 8 त्या दिवशी याहवेह यरुशलेमच्या रहिवाशांचे रक्षण करतील, जेणेकरून त्यांच्यातील अत्यंत दुर्बलदेखील दावीद राजासारखे होतील, महापराक्रमी ठरतील. आणि दावीदाचे राजघराणे परमेश्वरासारखे होईल, त्यांच्या अग्रभागी चालणार्‍या याहवेहच्या दूतासारखे होईल. \v 9 त्या दिवशी यरुशलेमवर हल्ला करणार्‍या सर्व राष्ट्रांना मी नष्ट करण्यास निघेन. \s1 विंधलेल्यासाठी शोक \p \v 10 “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील. \v 11 त्या दिवशी यरुशलेमातील आकांत इतका मोठा असेल, जसा मगिद्दोच्या खोर्‍यात ठार झालेल्या हदाद-रिम्मोनासाठी होता. \v 12 संपूर्ण इस्राएल राष्ट्र दुःखाने आक्रंदन करेल, प्रत्येक गोत्र, ते स्वतः व त्यांच्या पत्नींसहः दावीदाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, नाथानाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, \v 13 लेवी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, शिमी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, \v 14 आणि राहिलेले सर्व गोत्र व त्यांच्या पत्नी. \c 13 \s1 पापक्षालन \p \v 1 “त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल. \p \v 2 “त्या दिवशी, मी संपूर्ण देशातून मूर्तींच्या नावाचा समूळ उच्छेद करेन, ते त्यांच्या स्मरणातही राहणार नाही. सर्व खोट्या संदेष्ट्यांचा आणि अशुद्धतेच्या आत्म्याचा मी समूळ नाश करेन,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \v 3 “आणि जर कोणी पुन्हा खोटे भविष्यकथन करू लागला, ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याचे खुद्द आईवडीलच त्याला सांगतील, ‘तू मेलाच पाहिजे, कारण तू याहवेहच्या नावाने खोटे बोलत आहेस.’ ते भविष्यकथन करणाऱ्यास भोसकून जिवे मारतील! \p \v 4 “त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत. \v 5 प्रत्येकजण म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही; मी एक शेतकरी आहे; तारुण्यापासून भूमीची मशागत करणे माझ्या उपजीविकेचे साधन आहे.\f + \fr 13:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa एका शेतकरी मनुष्याने माझ्या तारुण्यात मला ती विकली\fqa*\f*’ \v 6 त्याला कोणी विचारले, ‘तुझ्या छातीवर आणि पाठीवर हे घाव कशाचे आहेत?’ तेव्हा तो म्हणेल, ‘माझ्या मित्राच्या घरी या जखमा मला दिल्या आहेत!’ \s1 मेंढपाळाचा वध, मेंढरांची दाणादाण \q1 \v 7 “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, \q2 माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” \q2 सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, \q1 “मेंढपाळावर प्रहार कर, \q2 म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, \q2 आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.” \q1 \v 8 याहवेह जाहीर करतात, “इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्रातील \q2 दोन तृतीयांश लोकांचा उच्छेद होईल व ते मरण पावतील, \q2 परंतु एकतृतीयांश लोक देशात उरतील. \q1 \v 9 हा तिसरा भाग अग्नीत घालून \q2 चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. \q2 आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. \q1 ते मला माझ्या नावाने हाक मारतील \q2 आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; \q1 मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ \q2 आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ” \c 14 \s1 याहवेह येतात आणि राज्य करतात \p \v 1 याहवेहचा दिवस येत आहे, ज्या दिवशी तुमची संपत्ती लुटली जाईल आणि तुमच्याच भिंतीच्या आत त्याची वाटणी केली जाईल. \p \v 2 मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील. \v 3 मग याहवेह बाहेर पडून लढाईच्या दिवशी करतात तसे, त्या राष्ट्रांशी युद्ध करतील. \v 4 त्या दिवशी त्यांचे पाय यरुशलेमच्या पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या पर्वतावर उभे राहतील आणि जैतूनांचा पर्वत पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे निर्माण होईल, अर्धा पर्वत उत्तरेकडे व अर्धा पर्वत दक्षिणेकडे सरेल. \v 5 तुम्ही माझ्या खोर्‍यातून पळ काढाल, कारण ते खोरे आझल नगरीच्या वेशीपर्यंत भिडेल. ज्याप्रमाणे अनेक शतकांपूर्वी तुमचे लोक, यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या काळात भूकंप\f + \fr 14:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa भूकंपामुळे होते त्याप्रमाणे पर्वताची खोरे अडविली जातील\fqa*\f* झाला होता तेव्हा निसटून गेले होते, त्याचप्रमाणे तुम्हीही निसटून जाल आणि मग याहवेह, माझे परमेश्वर येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व पवित्रजनही येतील. \p \v 6 त्या दिवशी सूर्यप्रकाश नसेल व थंड, धुक्याचा अंधकारही नसेल. \v 7 तो एक अद्वितीय दिवस असेल—फक्त याहवेहलाच माहीत असलेला तो दिवस असेल—दिवस व रात्रीत फरक राहणार नाही. संध्याकाळ झाली, तरीही प्रकाश असेल. \p \v 8 त्या दिवशी जीवनजल यरुशलेमातून बाहेर वाहील, त्यातील अर्धे पूर्व दिशेला मृत समुद्राकडे व अर्धे पश्चिम दिशेला भूमध्यसुमद्राकडे वाहतील, उन्हाळ्यात व हिवाळ्यात ते निरंतर वाहत राहतील. \p \v 9 तेव्हा याहवेह सर्व पृथ्वीचे राजा होतील. त्या दिवशी फक्त एकच याहवेह असतील व केवळ त्यांच्याच नामाची उपासना होईल. \p \v 10 यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील. \v 11 तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल. \p \v 12 जे लोक यरुशलेमविरुद्ध लढले, त्या सर्व लोकांवर याहवेह ही मरी पाठवतील: स्वतःच्या पायावर उभे असतानाच त्यांचे मांस सडत जाईल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचेत सडतील, आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातच सडतील. \v 13 याहवेहकडून आलेल्या भयंकर भीतीने त्यांना धडकी भरेल. त्यांची त्रेधा उडून ते एकमेकांवर हल्ला करतील. \v 14 यहूदीयाही यरुशलेमात लढेल. शेजारच्या सर्व राष्ट्रांची संपत्ती—सोने आणि रुपे व तलम कपडे यांचे मोठमोठे साठे जप्त केले जातील. \v 15 अशीच मरी घोडे, खेचरे, उंट, गाढवे यावर आणि शत्रूच्या ठाण्यातील इतर सर्व प्राण्यांवर पसरेल. \p \v 16 मग ज्यांनी यरुशलेमवर आक्रमण केले त्या सर्व राष्ट्रातून वाचलेले अवशिष्ट लोक प्रत्येक वर्षी वर यरुशलेमला राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची भक्ती करण्यास, मंडपाचा सण पाळण्यास व आराधना करण्यास जातील. \v 17 आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही. \v 18 जर इजिप्तच्या लोकांनी येण्याचे नाकारले तर त्यांना पर्जन्यवृष्टी मिळणार नाही. याहवेह त्यांच्यावर मरी पाठवतील, जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतात. \v 19 म्हणून इजिप्त व इतर राष्ट्रे जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतील, त्या सर्वांना ही शिक्षा करण्यात येईल. \p \v 20 त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्‍यांसारखी होतील. \v 21 यरुशलेम व यहूदीयातील प्रत्येक पातेले सर्वसमर्थ याहवेहला पवित्र वाटेल; आराधना करण्यासाठी येणारे लोक त्यातील पात्र घेऊन व त्यात त्यांची अर्पणे शिजवतील. यापुढे सर्वसमर्थ याहवेहच्या भवनात कोणीही कनानी\f + \fr 14:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa व्यापारी\fqa*\f* नसतील.