\id SNG - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h गीतरत्न \toc1 गीतरत्न \toc2 गीतरत्न \toc3 गीत \mt1 गीतरत्न \c 1 \p \v 1 हे गीतरत्न, शलोमोनाची रचना. \b \sp नायिका\f + \fr 1:2 \fr*\ft मुख्य नर आणि मादी वक्ते प्रामुख्याने संबंधित हिब्रू प्रकारांच्या लिंगाच्या आधारावर ओळखले जातात \ft*\fqa तो \fqa*\ft आणि \ft*\fqa ती \fqa*\ft मथळ्यांद्वारे सूचित केले जातात. इतरांचे शब्द म्हणून चिन्हांकित केले जातात. \ft*\fqa मित्र \fqa*\ft काही प्रकरणांमध्ये विभाग आणि त्यांचे मथळे वादग्रस्त आहेत.\ft*\f* \q1 \v 2 तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो— \q2 कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे. \q1 \v 3 तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे; \q2 तुझे नाव ओतलेल्या अत्तरासारखे आहे. \q2 तरुण कुमारी तुझ्यावर प्रेम करतात यात आश्चर्य नाही! \q1 \v 4 चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! \q2 राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. \sp मैत्रिणी \q1 आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ\f + \fr 1:4 \fr*\ft हिब्रू भाषेमध्ये एकवचनी आहे.\ft*\f*; \q2 आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. \sp नायिका \q1 त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे! \b \q1 \v 5 अहो यरुशलेमच्या कन्यांनो, \q2 मी सावळी असूनही सुंदर आहे, \q1 केदारच्या काळ्या तंबूसारखी, \q2 शलोमोनच्या डेर्‍याच्या पडद्यासारखी. \q1 \v 6 मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, \q2 कारण मी सूर्यामुळे काळवंडले आहे. \q1 माझ्या आईची मुले माझ्यावर रागावली \q2 आणि त्यांनी मला द्राक्षमळ्याची राखण करावयास लावले; \q2 पण मी स्वतःच्या द्राक्षमळ्याकडे दुर्लक्षित केले. \q1 \v 7 मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग, \q2 तुझा कळप तू कुठे चरावयास नेतो \q2 आणि मध्यानाच्या वेळी तू तुझ्या मेंढ्यांना कुठे विसाव्याला लावतोस. \q1 पडद्यात असलेल्या स्त्रीप्रमाणे \q2 तुझ्या सोबत्यांच्या कळपाच्या बाजूला मी का असावे? \sp मित्र \q1 \v 8 अगे स्त्रियांमधील परमसुंदरी, जर तुला ठाऊक नाही, \q2 तर कळपांच्या ठशांचे अनुसरण करत ये \q1 आणि मेंढपाळाच्या तंबूशेजारी \q2 तू आपली करडे चार. \sp नायक \q1 \v 9 माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी, \q2 मी तुझी तुलना करतो. \q1 \v 10 तुझे गाल कर्णभूषणासह, \q2 तुझा गळा दागिन्यांच्या साखळीसह किती सुंदर आहे. \q1 \v 11 आपण तुझ्यासाठी सोन्याचे, \q2 रुपेजडित असे कर्णभूषण घडवून घेऊ. \sp नायिका \q1 \v 12 राजा त्याच्या मेजाजवळ असता, \q2 माझ्या अत्तराचा सुगंध दरवळत होता. \q1 \v 13 माझा प्रियकर माझ्यासाठी माझ्या स्तनांमध्ये ठेवलेल्या \q2 गंधरसाच्या पुडीप्रमाणे आहे. \q1 \v 14 माझा प्रिय माझ्यासाठी जणू \q2 एन-गेदीच्या द्राक्षमळ्यात असलेल्या मेंदीच्या फुलांचा गुच्छच आहे. \sp नायक \q1 \v 15 माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! \q2 अहा, किती सुंदर! \q2 तुझे नयन कबुतरे आहेत. \sp नायिका \q1 \v 16 माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस! \q2 अहा, किती मोहक! \q2 आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे. \sp नायक \q1 \v 17 आमच्या घराच्या तुळया केदारच्या; \q2 व छपर देवदारूच्या लाकडाचे आहे. \c 2 \sp नायिका \q1 \v 1 मी शारोनाचा गुलाब आहे, \q2 खोर्‍यातील कमळ आहे. \sp नायक \q1 \v 2 खरेच, काट्यांमध्ये कमळ तशी \q2 इतर तरुणींमध्ये माझी प्रिया आहे. \sp नायिका \q1 \v 3 जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, \q2 तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. \q1 त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, \q2 आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते. \q1 \v 4 त्याने मला आपल्या मेजवानगृहात आणावे, \q2 त्याच्या प्रेमाचा ध्वज माझ्यावर असावा. \q1 \v 5 मनुक्यांनी मला बळ द्या, \q2 सफरचंदांनी मला ताजेतवाने करा, \q2 कारण प्रेमात मी दुर्बल झाले आहे. \q1 \v 6 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे, \q2 आणि त्याच्या उजव्या हाताने तो मला आलिंगन देतो. \q1 \v 7 यरुशलेमच्या कन्यांनो, \q2 तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, \q1 त्याची इच्छा आहे तोपर्यंत \q2 माझ्या प्रेमाला जागे करू नका. \b \q1 \v 8 ऐका! माझ्या प्रियांनो! \q2 पाहा! तो येत आहे, \q1 डोंगरामधून उड्या मारत, \q2 टेकड्यांवरून बागडत येत आहे. \q1 \v 9 माझा प्रियकर हरिणीसारखा किंवा तिच्या वत्सासारखा आहे. \q2 पाहा, तो तिथे आमच्या भिंतीआड उभा राहून, \q1 खिडक्यांतून न्याहळत आहे, \q2 जाळीतून डोकावीत आहे. \q1 \v 10 माझा प्रियतम मला म्हणाला, \q2 “माझ्या प्रिये, ऊठ, \q2 माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये. \q1 \v 11 पाहा! हिवाळा संपला आहे; \q2 आता पाऊससुद्धा होऊन गेला. \q1 \v 12 पृथ्वीवर फुले उमलली आहेत; \q2 गाण्याचा ऋतू आला आहे, \q1 कबुतरांचे गीत \q2 आमच्या देशात ऐकू येत आहे. \q1 \v 13 अंजिराच्या झाडाची फळे लागली आहेत; \q2 आणि द्राक्षवेलींच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. \q1 ऊठ, ये, माझ्या प्रिये; \q2 माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.” \sp नायक \q1 \v 14 डोंगराच्या कपारीत, \q2 कड्यांच्या गुप्त जागी राहणारी माझी कबुतरीण, \q1 मला तुझे मुख पाहू दे, \q2 मला तुझा स्वर ऐकू दे; \q1 कारण तुझा स्वर गोड \q2 आणि तुझा चेहरा मनोहर आहे. \q1 \v 15 कोल्हे व लहान खोकडे, \q2 जे द्राक्षमळ्यांची नासधूस करतात \q1 त्यांना आमच्यासाठी पकडा, \q2 कारण आमच्या द्राक्षमळ्यात आता बहर आला आहे. \sp नायिका \q1 \v 16 माझा प्रियतम माझा, आणि मी त्याची आहे; \q2 कमळांमध्ये तो आपला कळप चारीत आहे. \q1 \v 17 दिवस संपेपर्यंत \q2 आणि सावली जाईपर्यंत, \q1 खडतर पर्वतावरच्या\f + \fr 2:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa बेथेरचे पर्वत\fqa*\f* \q2 हरिणांसारखा किंवा \q1 लहान वत्सासारखा \q2 हे प्रियतमा, माझ्याकडे परत ये. \b \c 3 \q1 \v 1 रात्रभर माझ्या अंथरुणावर मी त्याला शोधत होते \q2 ज्याच्यावर माझे हृदय प्रेम करते; \q2 मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही. \q1 \v 2 मी आता उठेन आणि शहरभर फिरेन, \q2 त्याच्या रस्त्यावर आणि चौकात जाऊन; \q1 माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते त्याचा मी शोध करेन. \q2 मग मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही. \q1 \v 3 जे पहारेकरी नगरात गस्त घालतात \q2 त्यांना मी आढळले तेव्हा मी त्यांनाच विचारले, \q2 मी त्यांना विचारले, “माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते, तो तुम्हाला दिसला काय?” \q1 \v 4 पहारेकर्‍यांपासून जराशी दूर गेले \q2 आणि ज्यावर माझे हृदय प्रीती करते तो मला सापडला \q1 मी त्याला बिलगले आणि माझ्या आईच्या घरी, \q2 जिने माझे गर्भधारण केले \q2 तिच्या खोलीत आणेपर्यंत त्याला जाऊ दिले नाही. \q1 \v 5 यरुशलेमच्या कन्यांनो, \q2 तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, \q1 त्याची इच्छा आहे तोपर्यंत \q2 माझ्या प्रेमाला जागे करू नका. \b \q1 \v 6 हा धुराच्या स्तंभासारखे \q2 व्यापाऱ्यांच्या सर्व सुगंधित पदार्थांनी, \q1 ऊद आणि गंधरस यांनी सुगंधित, \q2 असा रानातून हा कोण येत आहे? \q1 \v 7 पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! \q2 इस्राएलातील निवडलेल्या \q2 साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे. \q1 \v 8 ते सर्व धनुर्धारी, \q2 आणि युद्धात अनुभवी आहेत. \q1 रात्री होणार्‍या आतंकासाठी सज्ज असलेले, \q2 प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे. \q1 \v 9 शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; \q2 स्वतःसाठी बनविली आहे. \q1 \v 10 त्याचे खांब चांदीचे आहेत, \q2 त्याचे तळ सोन्याचे आहे. \q1 त्यातील बैठक जांभळ्या वस्त्रांची आहे, \q2 तिच्या आतील भागाला यरुशलेमच्या कन्यांनी प्रेमाने वेलबुट्टीने मढविले आहे. \q1 यरुशलेमच्या तरुणीकडून प्रेमपूर्वक भेट. \v 11 अहो सीयोनच्या कन्यांनो, \q2 बाहेर या आणि पाहा, \q1 शलोमोन राजा कसा मुकुटमंडित आहे ते पाहा, \q2 त्याच्या विवाहाच्या दिवशी \q1 त्याच्या आईने त्याला तो घातला आहे, \q2 त्याचे हृदय आनंदित झाले तो हा दिवस. \c 4 \sp नायक \q1 \v 1 किती सुंदर आहेस तू, माझ्या प्रिये! \q2 आहा, किती सुंदर आहेस! \q2 तुझ्या पडद्याआड तुझे नयन कबुतरे आहेत. \q1 तुझे केस त्या शेरडांच्या कळपाप्रमाणे आहेत \q2 ज्या गिलआदाच्या टेकड्यांवरून झळकतात. \q1 \v 2 तुझे दात नुकत्याच \q2 धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत, \q1 प्रत्येकाला आपले जुळे आहेत; \q2 त्यापैकी कोणीही एकटे नाहीत. \q1 \v 3 किरमिजी सुताप्रमाणे तुझे ओठ आहेत; \q2 तुझे ओठ मनमोहक आहेत. \q1 ओढणीआड असलेले तुझे गाल \q2 डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत. \q1 \v 4 तुझी मान दावीदाने बांधलेल्या बुरुजाप्रमाणे आहे, \q2 जो शिलाकृतीने बांधला आहे; \q1 ज्यावर योद्धांच्या एक हजार ढाली \q2 लटकलेल्या आहेत. \q1 \v 5 तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत, \q2 जुळ्या मृगांसारखे \q2 ते मनोरम आहेत, कमळपुष्पांमध्ये चरतात \q1 \v 6 दिवस उजाडेपर्यंत, \q2 आणि छाया नाहीशी होईपर्यंत, \q1 मी गंधरसाच्या पर्वतावर \q2 व बोळाच्या टेकडीवर जाईन. \q1 \v 7 माझ्या प्रिये, तू सर्वांगी सुंदर आहेस; \q2 तुझ्यात काहीही उणीव नाही. \b \q1 \v 8 माझ्या वधू, लबानोनाहून तू माझ्यासोबत ये, \q2 लबानोनाहून माझ्यासोबत ये, \q1 अमानाह डोंगराच्या माथ्यावरून, \q2 सनीर व हर्मोनच्या शिखरावरून, \q1 सिंहाच्या गुहांपासून \q2 आणि चित्ते वावरतात त्या डोंगरावरून खाली उतरून ये. \q1 \v 9 अगे माझ्या भगिनी, माझी वधू; \q2 तुझ्या एकाच नजरेने \q1 तुझ्या माळेच्या एकाच मणीने \q2 तू माझे हृदय चोरून घेतले आहेस. \q1 \v 10 माझ्या भगिनी, माझ्या वधू, तुझे प्रेम किती हर्षित करणारे आहे! \q2 तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा कितीतरी उत्तम आहे, \q1 इतर सुगंधी द्रव्यांपेक्षा \q2 तुझ्या अत्तराचा सुगंध अधिक मनमोहक आहे. \q1 \v 11 माझ्या वधू, तुझे ओठ मधाच्या पोळ्याप्रमाणे मध गाळतात; \q2 दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहेत. \q1 तुझ्या वस्त्रांचा सुगंध \q2 लबानोनाच्या सुगंधासारखा आहे. \q1 \v 12 माझ्या भगिनी, माझ्या वधू तू एका बंद केलेली बाग आहेस; \q2 तू एक कुंपणाने घेरलेल्या झर्‍यासारखी, शिक्कामोर्तब कारंज्याप्रमाणे आहेस. \q1 \v 13 तुझी रोपे तर डाळिंबाचा मळा आहे, \q2 ज्यात सर्वोत्कृष्ट फळे, \q2 मेंदी आणि सुगंधी अगरू आहेत, \q2 \v 14 अगरू आणि केशर, \q2 वेखंड आणि दालचिनी, \q2 सर्व प्रकारची सुगंधी झाडे, \q2 तसेच गंधरस आणि जटामांसी \q2 आणि सर्व उत्तम मसाले आहेत. \q1 \v 15 या बागेतील पाण्याचा झरा, \q2 लबानोन पर्वतावरून खाली वाहणार्‍या \q2 वाहत्या पाण्याची विहीर अशी तू आहेस. \sp नायिका \q1 \v 16 उत्तरेच्या वार्‍या, जागा हो, \q2 आणि दक्षिणेच्या वार्‍या, ये; \q1 माझ्या बागेतील सुगंध चोहीकडे पसरावा, \q2 म्हणून माझ्या बागेवरून वाहत जा. \q1 माझ्या प्रियकराला त्याच्या बागेत येऊ द्या, \q2 आणि बागेतील सर्वोत्कृष्ट फळे खाऊ द्या. \c 5 \sp नायक \q1 \v 1 माझ्या भगिनी, माझ्या वधू, मी माझ्या बागेत आलो आहे; \q2 सुगंधी द्रव्यांबरोबर मी माझा गंधरसही गोळा केला आहे. \q1 मी मधाबरोबर आणि माझ्या मधाचे पोळे खात आहे. \q2 मी माझे द्राक्षारस आणि दूध प्यालो आहे. \sp मित्र \q1 माझ्या मित्रांनो, खा आणि प्या; \q2 प्रीतीच्या आनंदाने भरून जा. \sp नायिका \q1 \v 2 मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते. \q2 ऐका! माझा प्रियकर दरवाजा ठोकीत आहे: \q1 “माझ्यासाठी उघड, माझ्या भगिनी, माझ्या प्रिये, \q2 माझी कबुतरी, माझ्या सर्वांग सुंदरी. \q1 माझे डोके दवबिंदूने चिंब भिजले आहे, \q2 माझे केस रात्रीमुळे ओलसर झाले आहे.” \q1 \v 3 माझा पोशाख मी काढून ठेवला आहे— \q2 तो मी पुन्हा घालू काय? \q1 मी माझे पाय धुतले आहेत, \q2 ते मी पुन्हा मळवू काय? \q1 \v 4 माझ्या प्रियसख्याने बाहेरून हात घालून कडी उघडण्याचा प्रयत्न केला; \q2 तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी धडधडू लागले. \q1 \v 5 माझ्या प्रियकरासाठी दार उघडण्यास मी उठले, \q2 आणि दाराच्या कडीवर \q1 आणि माझ्या हातांतून गंधरसाचे अत्तर पाझरले, \q2 माझ्या बोटांतून गंधरस स्त्रवला. \q1 \v 6 माझ्या प्रियसख्यासाठी मी दार उघडले, \q2 पण तो तिथून निघून गेला होता; तेव्हा माझे हृदय गळून गेले. \q2 मी त्याला चोहीकडे शोधले, पण तो कुठेच सापडला नाही. \q1 मी त्याला हाक मारली, \q2 पण त्याने उत्तर दिले नाही. \q1 \v 7 पहारेकरी नगरात गस्त घालत असता \q2 त्यांना मी सापडले. \q1 त्यांनी मला मारहाण केली; मला जखमी केले; \q2 तटावरील पहारेकर्‍यांनी \q2 तर माझी ओढणी काढून घेतली! \q1 \v 8 यरुशलेमच्या कन्यांनो, मला हे वचन द्या, मी तुम्हावर एक कामगिरी सोपविते— \q2 जर तुम्हाला माझा प्रियकर सापडला, \q1 तर तुम्ही त्याला काय सांगाल? \q2 मी त्याच्या प्रेमासाठी झुरत आहे, असे सांगा. \sp मैत्रिणी \q1 \v 9 तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, \q2 हे परमसुंदरी? \q1 तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, \q2 की तू आम्हाला शपथ देऊन ही कामगिरी सोपवावीस? \sp नायिका \q1 \v 10 माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद, \q2 दहा हजारात श्रेष्ठ आहे. \q1 \v 11 त्याचे मस्तक शुद्ध सोन्यासारखे आहे; \q2 त्याचे केस कुरळे असून \q2 डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत. \q1 \v 12 ओढ्याच्या काठावर असलेल्या, \q2 कबुतरांप्रमाणे त्याचे डोळे आहेत, \q1 जसे ते दुधात धुतलेले, \q2 रत्नजडित केल्यासारखे आहेत. \q1 \v 13 त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे \q2 अत्तर दरवळणारे आहेत. \q1 त्याचे ओठ गंधरस गाळणार्‍या \q2 कमळपुष्पासारखे आहे. \q1 \v 14 त्याचे बाहू पुष्कराजाने \q2 सुशोभित केलेल्या सुवर्णस्तंभासारखे आहेत. \q1 त्याचे शरीर नीलम रत्नांनी सुशोभित करून \q2 उजळ केलेल्या हस्तिदंतासारखे आहे. \q1 \v 15 त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले \q2 संगमरवरी स्तंभच आहेत. \q1 त्याचे रूप लबानोनासारखे आहे, \q2 उत्तम देवदारूसारखे आहे. \q1 \v 16 त्याचे मुख परममधुर आहे; \q2 तो सर्वस्वी सुंदर आहे. \q1 यरुशलेमच्या कन्यांनो, \q2 हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे. \c 6 \sp मैत्रिणी \q1 \v 1 हे सर्व स्त्रियांमधील परमसुंदरी, \q2 तुझा प्रियकर कुठे गेला? \q1 कोणत्या मार्गाने वळला आहे, \q2 की तुझ्याबरोबर आम्हीही त्याला शोधू? \sp नायिका \q1 \v 2 माझा प्रियकर त्याच्या बागेत, \q2 आपल्या सुगंधी झाडांच्या वाफ्यात, \q1 तो कमळिनी शोधून \q2 गोळा करण्यास तो गेला आहे. \q1 \v 3 मी माझ्या प्रियकराची आहे, आणि माझा प्रियकर माझाच आहे; \q2 कमळिनीमध्ये तो फुले शोधित आहे. \sp नायक \q1 \v 4 माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस, \q2 जसे यरुशलेम मनोहर आहे, \q2 जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे. \q1 \v 5 माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; \q2 कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. \q1 तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्‍या \q2 शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत. \q1 \v 6 तुझे दात नुकत्याच धुतलेल्या \q2 मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत. \q1 प्रत्येकाला आपले जुळे आहेत, \q2 त्यात एकही उणा नाही. \q1 \v 7 ओढणीआड असलेले तुझे गाल \q2 डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत. \q1 \v 8 तिथे साठ राण्या, \q2 आणि ऐंशी उपपत्नी, \q2 आणि कुमारिका तर असंख्य असतील; \q1 \v 9 पण हे माझ्या कबुतरे, तू परिपूर्ण, व निराळी आहेस, \q2 तिच्या आईची एकुलती एक कन्या असून, \q2 जिने तिला जन्म दिला तिची लाडकी आहे. \q1 तरुण स्त्रियांनी तिला पाहून, धन्य म्हटले; \q2 राण्या व उपपत्नी यांनी देखील तिची प्रशंसा केली. \sp मित्र \q1 \v 10 जो पहाटेसारखा प्रसन्न, \q2 चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान, \q2 मिरवणुकीतील तार्‍यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे? \sp नायक \q1 \v 11 दर्‍याखोर्‍यात वाढत असलेली नवी झाडे, \q2 द्राक्षवेलींना आलेले अंकुर, \q1 आणि डाळिंबाला आलेली फुले \q2 पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो. \q1 \v 12 मला समजण्यापूर्वी, \q2 माझ्या इच्छेने मला माझ्या लोकांच्या शाही रथामध्ये स्थान दिले. \sp मित्र \q1 \v 13 परत ये, शुलेमकन्ये परत ये; \q2 आम्ही तुला न्याहाळावे म्हणून परत ये, परत ये! \sp मित्र \q1 महनाईमचे नृत्य पाहण्यासारखे \q2 तुम्ही शुलेमकन्येला का न्याहाळता? \b \c 7 \q1 \v 1 हे राजकन्ये, \q2 पायतणे घातलेले तुझे पाय किती सुंदर दिसतात! \q1 कुशल कारागिराने घडविलेल्या रत्नाप्रमाणे \q2 तुझ्या मांड्या वळणदार आहेत. \q1 \v 2 तुझी नाभी गोलाकार पेल्यासारखी असून, \q2 त्यात मसालेदार मद्याची कधीच वाण पडत नाही, \q1 तुझी कंबर कमळिनीपुष्पांनी वेढलेल्या \q2 गव्हाच्या राशीसारखे आहे. \q1 \v 3 तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत, \q2 जुळ्या मृगांसारखे ते मनोरम आहेत. \q1 \v 4 हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. \q1 तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या \q2 हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. \q1 तुझे नाक जणू काही लबानोन येथील, \q2 जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे. \q1 \v 5 तुझ्या मस्तकाने कर्मेल डोंगरासारखे तुला मुकुटमंडित केले आहे. \q2 तुझे केस जांभळ्या रंगाच्या शाही पडद्यासारखे आहे; \q2 या केशसंभारात राजा बंदिस्त झाला आहे. \q1 \v 6 माझ्या प्रिये, तू किती सुंदर आणि प्रसन्न करणारी आहेस, \q2 तू अत्यंत मनमोहक आहेस! \q1 \v 7 तू खजुरीच्या झाडासारखी सडपातळ आहेस. \q2 खजुरीच्या घोसासारखे तुझे स्तन आहेत. \q1 \v 8 मी म्हटले, मी खजुरीच्या झाडावर आरोहण करेन \q2 आणि त्याच्या घोसांना धरीन; \q1 तुझे स्तन द्राक्षवेलीमध्ये द्राक्षांच्या गुच्छासारखे होवोत, \q2 आणि तुझा श्वास सफरचंदासारखा सुवासिक होवो, \q2 \v 9 तुझे मुख उत्तम द्राक्षारसासारखे होवो. \sp नायिका \q1 द्राक्षारस ओठांवरून दातांना स्पर्श करून, \q2 थेट माझ्या प्रिये कडे जावो, \q1 \v 10 मी माझ्या प्रियकराची आहे, \q2 आणि तो माझीच कामना करतो. \q1 \v 11 माझ्या प्रिया, ये, चल, आपण रानावनात जाऊ, \q2 गावामध्ये\f + \fr 7:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa मेहेंदीच्या झुडपांमध्ये\fqa*\f* रात्र घालवू. \q1 \v 12 सकाळीच उठून आपण द्राक्षमळ्यात जाऊ; \q2 द्राक्षवेली मोहरल्या आहेत की काय, \q1 त्यांना कळ्या आल्यात की काय ते पाहू. \q2 डाळिंबाच्या झाडांना फुले आलीत काय ते पाहू. \q2 आणि तिथे मी माझ्या प्रीतीचा वर्षाव करेन. \q1 \v 13 त्या ठिकाणी दुदाफळाचे सुगंध दरवळत असतात, \q2 आणि दुर्मिळ फळे आमच्या दाराशीच उपलब्ध होतात \q1 नवीन आणि जुनीही फळे, \q2 ही सर्व माझ्या प्रियकरासाठी राखून ठेवली आहेत. \b \c 8 \q1 \v 1 किती बरे झाले असते जर तू माझ्या भावासारखा असतास, \q2 माझ्या आईच्या दुधाने त्याचे पोषण झाले! \q1 जर मी तुला बाहेर भेटले तर, \q2 मी तुझे चुंबन घेतले असते, \q2 आणि कोणीही माझा तिरस्कार केला नसता. \q1 \v 2 मी तुझे मार्गदर्शन केले असते \q2 आणि तुला माझ्या आईच्या घरी घेऊन गेले असते— \q2 तिने मला शिकविलेला \q1 मसालेदार द्राक्षारस मी तुला, \q2 माझ्या डाळिंबाचा रस पिण्यास दिला असता. \q1 \v 3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे, \q2 आणि त्याच्या उजव्या हाताने तो मला आलिंगन देतो. \q1 \v 4 यरुशलेमच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालते: \q2 इच्छा आहे तोपर्यंत \q2 माझ्या प्रेमाला जागे करू नका. \sp मित्र \q1 \v 5 ही कोण आहे जी वाळवंटातून \q2 आपल्या प्रियकरावर टेकून येत आहे? \sp नायिका \q1 जिथे तुझ्या आईने गर्भधारण केले ज्या सफरचंदाच्या झाडाखाली; \q2 तिथे तुझ्या मातेला प्रसूती वेदना होऊन तिने तुला जन्म दिला, \q2 त्या ठिकाणी मी तुला उत्तेजित केले. \q1 \v 6 तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव, \q2 मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव; \q1 कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे, \q2 तिचा हेवा\f + \fr 8:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa उत्साह\fqa*\f* कबरेप्रमाणे आहे. \q1 तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात, \q2 ते खरोखर आगीचे लोळच\f + \fr 8:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa याहवेहच्या अग्नीसारखा\fqa*\f* असतात. \q1 \v 7 प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही; \q2 नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही. \q1 एखाद्याने आपल्या घरातील \q2 संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी \q2 प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय. \sp मित्र \q1 \v 8 आमची एक लहान बहीण आहे, \q2 तिला अजून ऊरही फुटले नाहीत, \q1 तिच्या मागणीच्या दिवशी आम्ही \q2 आमच्या बहिणीसाठी काय करावे? \q1 \v 9 ती जर भिंत असती तर, \q2 आम्ही तिच्यावर चांदीचे बुरूज बांधू. \q1 ती जर दार असती तर आम्ही तिला, \q2 गंधसरूच्या फळ्यांनी झाकून टाकले असते. \sp ती \q1 \v 10 मी एक भिंत आहे, \q2 आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत. \q1 अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेत \q2 त्याला समाधान आणणारी झाले आहे. \q1 \v 11 बआल-हामोन येथे शलोमोनचा एक द्राक्षमळा होता; \q2 तो त्याने तेथील कुळांना खंडाने दिला. \q1 त्याचे फळ म्हणून प्रत्येकाने \q2 हजार चांदीची शेकेल\f + \fr 8:11 \fr*\ft अंदाजे 12 कि.ग्रॅ.\ft*\f* द्यायची होती. \q1 \v 12 परंतु माझ्याकडे स्वतःचा द्राक्षमळा आहे; \q2 शलोमोन, हजार शेकेल तुझीच आहेत, \q2 आणि मळ्याची देखरेख करणार्‍यांना मी दोनशे नाणी देईन. \sp नायक \q1 \v 13 बागेत राहणार्‍या माझ्या प्रिये, \q2 तुझ्या सख्या तुझ्या सेवेत हजर असतात, \q2 मला तुझा स्वर ऐकू दे! \sp नायिका \q1 \v 14 माझ्या प्रियसख्या, लवकर ये, \q2 आणि हरिणीसारखा हो, \q1 किंवा सुगंधाने भरलेल्या \q2 डोंगरावरील तरुण काळवीटा प्रमाणे हो.