\id RUT - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h रूथ \toc1 रूथ \toc2 रूथ \toc3 रूथ \mt1 रूथ \c 1 \s1 नाओमीच्या पती आणि पुत्रांचा मृत्यू होणे \p \v 1 त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन\f + \fr 1:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्यायनिवाडा\fqa*\f* करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला. \v 2 त्या मनुष्याचे नाव एलीमेलेख, त्याच्या पत्नीचे नाव नाओमी आणि त्याच्या दोन मुलांची नावे महलोन आणि किलिओन. ते यहूदीयाच्या बेथलेहेम येथील एफ्राथी वंशाचे होते. ते मोआब या देशात गेले आणि तिथे राहिले. \p \v 3 आता नाओमीचा पती एलीमेलेख मरण पावला आणि ती तिच्या दोन पुत्रांसह एकटी राहिली. \v 4 त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर, \v 5 महलोन आणि किलिओन हे दोघेही मरण पावले आणि आता नाओमी तिचे दोन पुत्र आणि तिचा पती यांच्याशिवाय राहू लागली. \s1 नाओमी आणि रूथ बेथलेहेमला परत येतात \p \v 6 जेव्हा नाओमीने ऐकले की, याहवेह मोआब येथे त्यांच्या लोकांच्या मदतीला आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी अन्नाचा पुरवठा केला आहे, तेव्हा तिने आणि तिच्या सुनांनी त्यांच्या घराकडे परत जाण्याची तयारी केली. \v 7 ती ज्या ठिकाणी राहत होती ते तिने सोडले आणि तिच्या दोन सुनांना घेऊन ती त्या मार्गाने निघाली जो त्यांना परत यहूदीया देशाकडे नेत होता. \p \v 8 नंतर नाओमी तिच्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघीही तुमच्या आईच्या घरी परत जा. जशी तुम्ही तुमच्या मृत पतींवर आणि माझ्यावर दया दाखविली तशीच याहवेह तुमच्यावर दया करो. \v 9 याहवेह तुम्हा प्रत्येकीला तुमच्या दुसऱ्या पतींच्या घरी विश्रांती देवो.” \p नंतर तिने त्यांची चुंबने घेतली आणि त्या मोठ्याने रडू लागल्या \v 10 आणि त्या तिला म्हणाल्या, “आम्हीही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे परत जाऊ.” \p \v 11 परंतु नाओमी म्हणाली, “माझ्या मुलींनो, तुम्ही घरी परत जा. तुम्ही माझ्याबरोबर का यावे? मला आणखी पुत्र होणार आहेत काय, की ते तुमचे पती होऊ शकतील? \v 12 माझ्या मुलींनो, तुमच्या घरी परत जा; मी इतकी वृद्ध झाले आहे की मी दुसरा पती करू शकत नाही. समजा, मी तसा विचार केला तरी माझ्यासाठी आशा होती—जरी आज रात्री माझा नवरा असता आणि नंतर मी पुत्रांना जन्म दिला असता— \v 13 तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही वाट पाहत राहणार काय? नाही, माझ्या मुलींनो. तुमच्यापेक्षा मला हे फारच दुःख आहे, कारण याहवेहचा हात माझ्याविरुद्ध झाला आहे!” \p \v 14 त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली. \p \v 15 तेव्हा नाओमी म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या दैवतांकडे परत जात आहे. तू तिच्याबरोबर परत जा.” \p \v 16 परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील. \v 17 तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.” \v 18 जेव्हा नाओमीने हे पाहिले की, रूथने तिच्याबरोबर जाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे, तेव्हा तिने तिला आग्रह करण्याचे थांबविले. \p \v 19 त्या दोन्ही स्त्रिया बेथलेहेम येईपर्यंत चालत राहिल्या. जेव्हा त्या बेथलेहेम येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यामुळे ते संपूर्ण नगर गोंधळून गेले आणि स्त्रियांनी आश्चर्याने उद्गार काढले, “ही खरोखरच नाओमी आहे काय?” \p \v 20 नाओमीने त्यांना म्हटले, “मला नाओमी\f + \fr 1:20 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa माझा आनंद\fqa*\f* म्हणू नका, मला मारा\f + \fr 1:20 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa कडवट, दुःखी\fqa*\f* असे म्हणा, कारण सर्वसमर्थांनी माझे जीवन फार कडवट केले आहे \v 21 मी भरलेली गेले होते, परंतु याहवेहने मला रिकामे परत आणले आहे. मला नाओमी असे का म्हणता? याहवेहने मला दुःख\f + \fr 1:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa विरुद्ध साक्ष दिली\fqa*\f* दिले आहे; सर्वसमर्थांनी माझ्यावर हे दुर्भाग्य आणले आहे.” \p \v 22 अशाप्रकारे नाओमी, तिची मोआबी सून रूथ हिच्याबरोबर मोआब देशातून परत आली, त्या दोघी बेथलेहेमात पोहोचल्या, त्यावेळी सातूचा हंगाम सुरू झाला होता. \c 2 \s1 रूथ बवाज यांची शेतात भेट होते \p \v 1 नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते. \p \v 2 आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.” \p नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.” \v 3 तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता. \p \v 4 त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” \p त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!” \p \v 5 बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?” \p \v 6 त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. \v 7 ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्‍यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.” \p \v 8 तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा. \v 9 ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.” \p \v 10 त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?” \p \v 11 बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही. \v 12 तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.” \p \v 13 तेव्हा ती म्हणाली, “हे स्वामी, तुमच्याकडून माझ्यावर सतत कृपा होत रहावी, जरी मी तुमच्या एखाद्या नोकरांपैकी नाही तरी तुमच्या या दासीबरोबर दयाळूपणाने बोलण्याने मला समाधान झाले आहे.” \p \v 14 भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” \p जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते. \v 15 जेव्हा ती उरलेले धान्य जमा करण्यास उठली, तेव्हा बवाजाने त्याच्या माणसांना आज्ञा दिल्या, “तिला पेंढ्यांमधून राहिलेले धान्य गोळा करू द्या आणि तिला मनाई करू नका. \v 16 उलट पेंढ्यांतून काही ताटे ओढून तिला वेचण्यासाठी पडू द्या, आणि तिला धमकावू नका.” \p \v 17 अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा\f + \fr 2:17 \fr*\ft अंदाजे \ft*\fqa 13 कि.ग्रॅ.\fqa*\f* भरले. \v 18 ते घेऊन ती नगरात गेली आणि तिच्या सासूने पाहिले की तिने किती गोळा केले आहे. रूथने खाऊन राहिलेले अन्नसुद्धा आणले आणि ते तिला दिले. \p \v 19 तिच्या सासूने तिला विचारले, “धान्य गोळा करण्यासाठी आज तू कुठे गेली होतीस? तू कुठे काम केलेस? ज्याने तुझी एवढी काळजी घेतली, तो मनुष्य आशीर्वादित असो!” \p तेव्हा रूथने तिच्या सासूला त्याच्याबद्दल सांगितले ज्याच्या ठिकाणी ती काम करीत होती. ती म्हणाली, “ज्या माणसाबरोबर मी आज काम केले त्याचे नाव बवाज असे आहे,” \p \v 20 नाओमी तिच्या सुनेला म्हणाली, “याहवेह त्याला आशीर्वादित करो! त्याने जिवंतांना आणि मृतांना त्याचा चांगुलपणा दाखविणे थांबविले नाही.” ती पुढे म्हणाली, “तो मनुष्य आपला जवळचा नातेवाईक आहे; तो आम्हाला सोडविणाऱ्यांपैकी\f + \fr 2:20 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa सोडविणारा \fqa*\ft गंभीर परिस्थितीत असलेल्या नातेवाईकाला त्यातून सोडविण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द (\+xt लेवी 25:25‑55\+xt* पाहा).\ft*\f* एक आहे.” \p \v 21 तेव्हा मोआबी रूथ म्हणाली, “तो मला असेही म्हणाला की, ‘जोपर्यंत ते माझ्या संपूर्ण धान्याची कापणी करीत आहेत, तोपर्यंत माझ्या कामकऱ्यांबरोबर राहा.’ ” \p \v 22 नाओमी तिची सून रूथला म्हणाली, “माझ्या मुली, त्याच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर जाणे हे तुझ्यासाठी हिताचे होईल, कारण दुसर्‍या कोणाच्याही शेतात तुझ्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे.” \p \v 23 म्हणून जव आणि गव्हाची कापणी संपेपर्यंत रूथ जव गोळा करीत बवाजच्या स्त्रियांच्या जवळच राहिली. ती तिच्या सासूसह राहिली. \c 3 \s1 रूथ आणि बवाज यांची खळ्यातील भेट \p \v 1 एके दिवशी रूथची सासू नाओमी तिला म्हणाली, “माझ्या मुली, जिथे तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल असे घर\f + \fr 3:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa विसावा\fqa*\f* मला तुझ्यासाठी शोधलेच पाहिजे. \v 2 ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल. \v 3 आंघोळ कर, सुगंधी अत्तर लाव आणि तुझी उत्तम वस्त्रे घाल. नंतर खाली खळ्यात जा, परंतु त्याचे खाणे आणि पिणे होईपर्यंत त्याला माहीत होऊ देऊ नकोस की, तू तिथे आहेस. \v 4 जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा तो कुठे झोपत आहे, हे पाहून ठेव. नंतर जा आणि त्याच्या पायांवरील पांघरूण काढ आणि तिथेच पडून राहा. काय करावयाचे तोच तुला सांगेल.” \p \v 5 रूथने उत्तर दिले, “तुम्ही जे काही सांगता ते मी करेन.” \v 6 तेव्हा ती खाली खळ्यात गेली आणि तिच्या सासूने जे सर्वकाही तिला करावयास सांगितले होते तसे तिने केले. \p \v 7 जेव्हा बवाजने खाणे आणि पिणे संपविले आणि तो आनंदात होता, मग तो झोपण्यासाठी धान्य रचून ठेवलेल्या ढिगाऱ्यांच्या शेवटी गेला. रूथ शांतपणे त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या पायांवरचे पांघरूण काढले आणि तिथेच पडून राहिली. \v 8 मध्यरात्री त्या मनुष्याला कशाचातरी धक्का लागला; त्याने वळून पाहिले—आणि त्याच्या पायाजवळ एक स्त्री निजली होती! \p \v 9 त्याने विचारले, “तू कोण आहेस?” \p “मी तुमची दासी रूथ आहे. तुमच्या वस्त्राचा कोपरा माझ्यावर पसरून टाका, कारण तुम्ही आमच्या कुटुंबाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहात.” \p \v 10 “माझ्या मुली, याहवेह तुला आशीर्वाद देवो,” त्याने उत्तर दिले. “जो दयाळूपणा तू आता दाखविला, तो पूर्वी दाखविला त्यापेक्षा अधिक आहे: गरीब असो वा श्रीमंत, पण तू अशा तरुण पुरुषांच्या मागे गेली नाहीस. \v 11 आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस. \v 12 ही गोष्ट खरी आहे की, मी आपल्या कुटुंबाचा सोडविणारा नातेवाईक आहे, परंतु माझ्याहीपेक्षा अधिक जवळचा संबंध असलेला असा दुसरा एकजण आणखी आहे. \v 13 आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.” \p \v 14 म्हणून ती सकाळपर्यंत त्याच्या पायाजवळ पडून राहिली, परंतु इतर कोणालाही कळण्याआधी ती उठून बसली, तेव्हा तो म्हणाला, “कोणालाही हे माहीत व्हायला नको की एक स्त्री या खळ्यात आली होती.” \p \v 15 तो असेही म्हणाला, “तू घातलेली ओढणी माझ्याकडे आण आणि ती उघडून धरून ठेव.” जेव्हा तिने तसे केले तेव्हा त्याने सहा मापे भरून जव त्यावर ओतले आणि ते गाठोडे बांधून तिच्या खांद्यावर दिले. नंतर तो परत नगराकडे निघून गेला. \p \v 16 जेव्हा ती घरी तिच्या सासूकडे आली, तेव्हा नाओमीने तिला विचारले, “माझ्या मुली, कसे काय झाले?” \p तेव्हा बवाजने तिच्यासाठी जे केले, ते तिने तिला सर्वकाही सांगितले, \v 17 आणि ती पुढे म्हणाली, “त्याने मला ही सहा मापे जव दिले व म्हणाला, ‘तुझ्या सासूकडे रिकामी हाताने परत जाऊ नकोस.’ ” \p \v 18 तेव्हा नाओमी म्हणाली, “माझ्या मुली, काय घडते हे समजेपर्यंत वाट पाहा, कारण तो मनुष्य या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत स्वस्थ राहणार नाही.” \c 4 \s1 बवाज रूथबरोबर विवाह करतो \p \v 1 त्या दरम्यान बवाज नगराच्या वेशीकडे गेला आणि तो तिथे बसला असताना तो सोडवणूक करणारा, ज्याच्याबद्दल त्याने सांगितले होते, तो मनुष्य पुढे आला. तेव्हा बवाज त्याला म्हणाला, “माझ्या मित्रा, इकडे ये आणि इथे बस.” तेव्हा तो तिकडे गेला आणि बसला. \p \v 2 नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले. \v 3 तेव्हा तो जबाबदारी घेऊन सोडवणूक करणाऱ्या मनुष्यास म्हणाला, “नाओमी मोआब देशातून परत आली आहे. ती आता ज्या जमिनीचा भाग विकत आहे, ती आपला नातेवाईक एलीमेलेख याच्या मालकीची आहे. \v 4 मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” \p तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,” \p \v 5 तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.” \p \v 6 यावरून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य म्हणाला, “असे असेल, तर मग मी ती सोडवू शकत नाही. कारण त्यामुळे माझी स्वतःची मालमत्ता धोक्यात येईल. तू स्वतःच ती सोडवून घे. मी हे करू शकत नाही.” \p \v 7 (इस्राएलमध्ये पूर्वीच्या काळात, मालमत्तेची सोडवणूक करणे आणि तिचे हस्तांतरण पक्के होण्यासाठी, एका पक्षाने त्याची चप्पल काढून ती दुसऱ्याला देणे ही इस्राएलमधील व्यवहार कायदेशीर करण्याची पद्धत होती.) \p \v 8 म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली. \p \v 9 तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे. \v 10 मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!” \p \v 11 तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस. \v 12 या तरुण स्त्रीपासून याहवेह तुला संतती देवो, तुझे कुटुंब तामार आणि यहूदाह यांचा पुत्र पेरेस यांच्यासारखे होवो.” \s1 नाओमीला पुत्रप्राप्ती होते \p \v 13 तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला. \v 14 तेव्हा स्त्रिया नाओमीला म्हणाल्या: “याहवेहची स्तुती असो, ज्यांनी या दिवशी तुझी जबाबदारी घेऊन सोडविणाऱ्याशिवाय तुला सोडले नाही. तो संपूर्ण इस्राएलमध्ये प्रसिद्ध होवो! \v 15 तो तुला नवजीवन देऊन तुझ्या वृद्धापकाळात तुला आधार देईल. कारण तुझी सून, जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी सात मुलांपेक्षा अधिक उत्तम आहे, तिनेच त्याला जन्म दिला आहे.” \p \v 16 तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली. \v 17 तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, “आता नाओमीला मुलगा आहे!” आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता. \s1 दावीदाची वंशावळ \lh \v 18 पेरेसाची वंशावळ अशी: \b \li1 पेरेस हा हेस्रोनचा पिता होता, \li1 \v 19 हेस्रोन हा रामचा पिता, \li1 राम हा अम्मीनादाबचा पिता, \li1 \v 20 अम्मीनादाब हा नहशोनचा पिता, \li1 नहशोन हा सल्मोन\f + \fr 4:20 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa सल्मा\fqa*\f* चा पिता, \li1 \v 21 सल्मोन हा बवाजचा पिता, \li1 बवाज हा ओबेदचा पिता, \li1 \v 22 ओबेद हा इशायचा पिता, \li1 आणि इशाय हा दावीदाचा पिता.