\id REV - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h प्रकटीकरण \toc1 योहानाला झालेले प्रकटीकरण \toc2 प्रकटीकरण \toc3 प्रकट \mt1 योहानाला झालेले प्रकटीकरण \c 1 \s1 प्रस्तावना \p \v 1 ज्यागोष्टी लवकरच निश्चितच घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्यांनी आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहानाला ते कळविले. \v 2 योहानाने जे सर्व पाहिले त्याविषयी साक्ष दिली—ती म्हणजे, परमेश्वराचे वचन आणि येशू ख्रिस्ताची साक्ष. \v 3 जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे. \b \s1 शुभेच्छा आणि ईशगान \po \v 4 योहानाकडून, \po आशिया प्रांतातील सात मंडळ्यास: \po जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो \v 5 आणि जे विश्वसनीय साक्षीदार, मृतातील प्रथमफळ आणि पृथ्वीवरील राजांचे शासक आहेत त्या येशू ख्रिस्तापासून तुम्हास कृपा आणि शांती लाभो. \b \p त्यांना, जे आमच्यावर प्रीती करतात आणि ज्यांच्या रक्ताद्वारे आमची पापांपासून सुटका झाली आहे \v 6 आणि ज्या येशूंनी परमेश्वराची व त्यांच्या पित्याची सेवा करण्यासाठी आमची त्यांचे राज्य व याजक म्हणून निवड केली आहे, त्यांना सदासर्वकाळ गौरव व सामर्थ्य असो! आमेन. \q1 \v 7 “पाहा, ते मेघारूढ होऊन येत आहेत,” \q2 आणि “प्रत्येक नेत्र त्यांना पाहील,\f + \fr 1:7 \fr*\ft \+xt दानी 7:13\+xt*\ft*\f* \q1 स्वतः त्याला भोसकणारेही त्यांच्याकडे पाहतील” \q2 आणि तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक “त्यांच्यामुळे शोक करतील.”\f + \fr 1:7 \fr*\ft \+xt जख 12:10\+xt*\ft*\f* \qc असेच होणार! आमेन. \p \v 8 प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा\f + \fr 1:8 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa प्रारंभ आणि शेवट\fqa*\f*, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.” \b \s1 योहानाचा ख्रिस्ताविषयी दृष्टान्त \p \v 9 मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो. \v 10 प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला. \v 11 तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.” \p \v 12 माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले. \v 13 त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता. \v 14 त्यांच्या डोक्यावरील केस पांढर्‍या लोकरीसमान, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे भेदक होते. \v 15 त्यांचे पाय जणू काही भट्टीतून शुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्यांची वाणी गर्जना करणार्‍या धबधब्यासारखी होती. \v 16 त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता. \p \v 17-18 त्यांना पाहताक्षणीच मी त्यांच्या पायाशी मृतवत होऊन पडलो. पण त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेऊन म्हटले, “भिऊ नको! मी पहिला व शेवटचा, जिवंत असलेला तो मीच आहे; मी मृत होतो आणि पाहा, आता मी सदासर्वकाळ जिवंत आहे! आणि मृत्यूच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. \p \v 19 “तर तू जे पाहिले, जे आता आहे आणि यानंतर घडणार आहे, ते सर्व लिहून ठेव. \v 20 तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत\f + \fr 1:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa संदेष्टे\fqa*\f* आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.” \c 2 \s1 इफिस येथील मंडळीस \p \v 1 “इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: \b \pi1 जे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतात व जे सोन्याच्या सात समयांमध्ये चालतात, ते असे म्हणतात. \b \pi1 \v 2 तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्‍यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे. \v 3 माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे. \pi1 \v 4 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे. \v 5 तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन. \v 6 पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करता. \pi1 \v 7 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको. जो विजय मिळवितो, त्याला मी परमेश्वराच्या स्वर्गलोकात असलेल्या जीवनाच्या वृक्षाचे फळ खाण्याचा अधिकार देईन. \s1 स्मुर्णा येथील मंडळी \p \v 8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: \b \pi1 जे पहिले व शेवटचे, जे मरण पावले होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात. \b \pi1 \v 9 मला तुमचे दुःख आणि दारिद्र्य ठाऊक आहे, तरीपण तुम्ही धनवान आहात! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो. \v 10 तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन. \pi1 \v 11 ज्याला ऐकावयास कान आहेत तो आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसर्‍या मरणाची बाधा होणारच नाही. \s1 पर्गमम येथील मंडळीस \p \v 12 “पर्गमम येथील मंडळीच्या देवदूताला लिही: \b \pi1 ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात: \b \pi1 \v 13 तुम्ही कुठे राहता हे मला ठाऊक आहे, जिथे सैतानाचे आसन आहे तिथे. तुम्ही माझे नाव दृढ धरून राहिला आहात. माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुमच्या शहरामध्ये जिथे सैतान राहतो, तिथे ठार मारला गेला, त्या दिवसातही तुम्ही माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. \pi1 \v 14 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध काही गोष्टी आहेत: त्या या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाकाच्या शिक्षणानुसार इस्राएली लोकांपुढे असे अडखळण केले की, जेणे करून त्यांनी मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खावा व लैंगिक अनीती करावी. \v 15 याचप्रमाणे, निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुमच्यातही आहेत. \v 16 यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्‍या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन. \pi1 \v 17 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि ज्यावर नवे नाव लिहिलेले असेल तो पांढरा खडाही मी त्या व्यक्तीला देईन, जे तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही माहीत नसेल. \s1 थुवतीरा येथील मंडळी \p \v 18 “थुवतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: \b \pi1 ज्याचे नेत्र आगीच्या ज्वालेसारखे भेदक आहेत व ज्याचे पाय चकाकत्या कास्यासारखा आहेत, ते परमेश्वराचे पुत्र असे म्हणतात: \b \pi1 \v 19 तुमची सर्व कृत्ये मला ठाऊक आहेत आणि तुमची प्रेमळ वागणूक व विश्वास, तुमची सेवा व धीर ही सर्व मी जाणतो. आणि दिवसेंदिवस या सर्व गुणांमध्ये तुमची होत असलेली प्रगती देखील मला दिसते. \pi1 \v 20 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि लैंगिक अनीती करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलविते, तिचे तुम्ही सहन करता. \v 21 मी तिला वेळ दिला, पण आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याचे तिने नाकारले. \v 22 पाहा, मी तिला क्लेशमय अंथरुणावर खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्‍या लोकांनी तिचा मार्ग सोडून पश्चात्ताप न केल्यास तीव्र क्लेश देईन. \v 23 मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन. \pi1 \v 24-25 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत व सैतानाच्या गहन गोष्टी शिकला नाहीत, मी तुम्हाला सांगतो, की मी तुमच्यावर अधिक ओझे लादणार नाही, फक्त मी येईपर्यंत तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा. \pi1 \v 26 जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन. \v 27 आणि ते त्यांच्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवून मातीच्या पात्राप्रमाणे त्यांच्या ठिकर्‍या करतील;\f + \fr 2:27 \fr*\ft \+xt स्तोत्र 2:9\+xt*\ft*\f*— \v 28 ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्यांना पहाटेचा तारा देखील देईन. \v 29 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको. \c 3 \s1 सार्दीस येथील मंडळीस \p \v 1 “सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: \b \pi1 ज्यांच्याजवळ परमेश्वराचे सात आत्मे व सात तारे आहेत, ते असे म्हणतात: \b \pi1 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत, तुम्ही जिवंत आहात असे तुमच्याविषयी मत आहे, पण तुम्ही मेलेले आहात. \v 2 जागृत व्हा! जे उरलेले आहेत व मरणाच्या पंथास लागले आहे त्यांना बळकट करा, कारण तुमची कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत. \v 3 जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही. \pi1 \v 4 मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, असे थोडे लोक सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण ते त्यास पात्र आहेत. \v 5 जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. तर माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करेन. \v 6 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको. \s1 फिलदेल्फिया येथील मंडळीस \p \v 7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: \b \pi1 जे पवित्र व सत्य आहे, ज्यांच्याजवळ दावीदाची किल्ली आहे, ते जे उघडतात, ते कोणालाही बंद करता येत नाही आणि ते जे बंद करतात, ते कोणाला उघडता येत नाही, ते असे म्हणतात. \b \pi1 \v 8 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमची शक्ती कमी आहे, तरी तुम्ही माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. \v 9 जे सैतानाच्या सभास्थानातील असून स्वतःला यहूदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करेन. पाहा, ते तुमच्या पाया पडतील व मी तुमच्यावर प्रीती केली आहे हे ते स्वीकारतील. \v 10 धीर धरण्याविषयीच्या माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या आहेत, म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुम्हाला राखीन. \pi1 \v 11 मी लवकर येत आहे. तुमचा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुमच्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेवा. \v 12 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करेन. ते तिथून कधीही बाहेर जाणार नाहीत. माझ्या परमेश्वराचे नाव, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या परमेश्वराची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहेन. \v 13 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको. \s1 लावदिकीया येथील मंडळीस \p \v 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: \b \pi1 जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात. \b \pi1 \v 15 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते! \v 16 पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्ण नाही आणि थंडही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन. \v 17 तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही. \v 18 म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे. \pi1 \v 19 ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा. \v 20 पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल. \pi1 \v 21 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो. \v 22 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.” \c 4 \s1 स्वर्गातील सिंहासन \p \v 1 यानंतर मी पाहिले, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी रणशिंग ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्यागोष्टी यानंतर घडणार आहेत त्या मी तुला दाखवेन” \v 2 मी लगेच आत्म्यात संचारलो, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक राजासन ठेवलेले होते व त्यावर एकजण बसला होता. \v 3 आणि जो तिथे बसला होता तो हिर्‍यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते; \v 4 राजासनाभोवती चोवीस सिंहासने होती आणि त्यावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. \v 5 राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते. \v 6 त्याचप्रमाणे राजासनापुढे स्फटिकासारखे स्वच्छ आणि काचेच्या समुद्रासारखे दिसणारे असे काहीतरी होते. \p राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या भोवताली चार जिवंत प्राणी होते; त्यांना पुढे आणि मागे अंगभर डोळे होते. \v 7 या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा मनुष्याच्या मुखासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. \v 8 त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: \qc “पवित्र, पवित्र, पवित्र, \qc ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत!\f + \fr 4:8 \fr*\ft \+xt यश 6:3\+xt*\ft*\f* \qc जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.” \m \v 9 जे राजासनावर बसलेले आहेत आणि जे युगानुयुग जिवंत आहेत, त्यांचा त्या सजीव प्राण्यांनी ज्या ज्यावेळी गौरव केला, त्यांना बहुमान दिला आणि त्यांची उपकारस्तुती केली, \v 10 त्या त्यावेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले: \q1 \v 11 “हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा, \q2 गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात; \q1 कारण तुम्ही सर्व निर्माण केले. \q2 तुमच्याच इच्छेने सर्वकाही \q2 अस्तित्वात आले.” \c 5 \s1 ग्रंथपटाची गुंडाळी आणि कोकरा \p \v 1 जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली ग्रंथपटाची गुंडाळी मी पाहिली. ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती. \v 2 एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?” \v 3 पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता. \v 4 तेव्हा मी फार रडलो. कारण ती गुंडाळी उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणीही सापडला नाही. \v 5 पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदाह वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.” \p \v 6 मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्‍याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत. \v 7 कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली. \v 8 कोकर्‍याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्‍याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत. \v 9 ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: \q1 “ती गुंडाळी घ्यावयास व \q2 त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, \q1 कारण तुमचा वध करण्यात आला होता \q2 आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी \q2 प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे, \q1 \v 10 तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी \q2 याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.” \p \v 11 तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते. \v 12 ते मोठ्याने म्हणत होत: \q1 “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा \q2 सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव \q2 आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!” \p \v 13 मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: \q1 “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्‍याला \q2 उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य \qc सदासर्वकाळ असो!” \m \v 14 तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली. \c 6 \s1 सात शिक्के \p \v 1 कोकर्‍याने त्या सात शिक्यातील पहिला शिक्का फोडून उघडताना मी पाहिले. तेव्हा त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, गर्जनेसारख्या आवाजात म्हटले, “ये!” \v 2 मी पहिले तो माझ्यासमोर एक पांढरा घोडा आहे असे मला दिसले! घोडेस्वाराजवळ एक धनुष्य होते. त्याच्या डोक्यावर एक मुकुट ठेवण्यात आला. मग विजेता म्हणून जिंकण्याच्या उद्देशाने तो स्वार निघून गेला. \p \v 3 नंतर कोकर्‍याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्‍या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली. \v 4 यावेळी एक अग्निवर्ण घोडा बाहेर पडला. पृथ्वीवरील शांतता नष्ट करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला होता. लोक एकमेकांचा वध करू लागले. त्या स्वाराला एक मोठी तलवार देण्यात आली. \p \v 5 मग कोकर्‍याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजीव प्राणी, “ये” म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते. \v 6 मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक कि.ग्रॅ. गहू आणि तीन कि.ग्रॅ. जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.” \p \v 7 जेव्हा कोकर्‍याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!” \v 8 मग मी एक फिकट रंगाचा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराचे नाव मृत्यू होते आणि अधोलोक त्याच्यामागून आला. पृथ्वीवरील एक चतुर्थांश लोकांना युद्ध, दुष्काळ, पीडा आणि हिंस्र पशूद्वारे ठार मारण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता. \p \v 9 त्यानंतर त्याने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी एक वेदी पाहिली. त्या वेदीखाली परमेश्वराचे वचन सांगितल्यामुळे आणि विश्वासूपणे साक्ष दिल्यामुळे जिवे मारले गेलेल्या सर्व लोकांचे आत्मे होते. \v 10 त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?” \v 11 तेव्हा त्यातील प्रत्येकाला एकएक पांढरा झगा देण्यात आला. त्यांना सांगण्यात आले की त्यांचे सहकर्मी बंधू, हुतात्म्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, आणखी थोडा काळ थांबा. \p \v 12 मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला. \v 13 अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले. \v 14 एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले. \p \v 15 तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सर्वजण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले. \v 16 ते डोंगरटेकड्यांना उद्देशून ओरडून विनवू लागले, “आम्हावर पडून जे राजासनावर बसले आहेत, त्यांच्या नजरेपासून आणि कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा! \v 17 कारण त्यांच्या क्रोधाचा महान दिवस आला आहे, त्यात कोणाचा निभाव लागेल?” \c 7 \s1 एक लाख चव्वेचाळीस हजारांवर शिक्कामोर्तब \p \v 1 त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्‍यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्‍यांना थोपवून धरीत होते. \v 2 मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला, \v 3 “आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका.” \v 4 ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते. \b \li1 \v 5 यहूदाह वंशातून 12,000; \li1 रऊबेन वंशातून 12,000; \li1 गाद वंशातून 12,000; \li1 \v 6 आशेर वंशातून 12,000; \li1 नफताली वंशातून 12,000; \li1 मनश्शेह वंशातून 12,000; \li1 \v 7 शिमोन वंशातून 12,000; \li1 लेवी वंशातून 12,000; \li1 इस्साखार वंशातून 12,000; \li1 \v 8 जबुलून वंशातून 12,000; \li1 योसेफ वंशातून 12,000; \li1 बन्यामीन वंशातून 12,000. \s1 शुभ्र वस्त्र परिधान केलेला प्रचंड समुदाय \p \v 9 यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते. \v 10 ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते: \q1 “राजासनावर बसलेल्या \q1 आमच्या परमेश्वरापासून आणि \q1 कोकर्‍यापासून तारणप्राप्ती होत आहे.” \m \v 11 तेव्हा सर्व देवदूत राजासन व वडीलजन आणि चार सजीव प्राणी यांच्याभोवती उभे होते आणि राजासनासमोर दंडवत घालून उपासना करीत असताना \v 12 ते म्हणाले: \q1 “आमेन! \q1 आमच्या परमेश्वराला \q1 धन्यवाद, गौरव, सुज्ञता, \q1 उपकारस्तुती, मान, सामर्थ्य \q1 आणि पराक्रम सदासर्वकाळ असो. \q1 आमेन!” \p \v 13 मग या चोवीस वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “हे शुभ्र पोशाख घातलेले कोण आहेत व ते कुठून आले आहेत?” \p \v 14 मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” \p तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्‍याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत. \v 15 म्हणूनच, \q1 “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, \q2 त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, \q1 ते त्यांच्या सानिध्यात \q2 त्यांना आश्रय देतील. \q1 \v 16 त्यांना पुन्हा कधी भूक, \q2 किंवा तहान लागणार नाही; \q1 त्यांना सूर्याचा ताप,\f + \fr 7:16 \fr*\ft \+xt यश 49:10\+xt*\ft*\f* \q2 किंवा दाहक उष्णता बाधणार नाही. \q1 \v 17 कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा \q2 त्यांचा मेंढपाळ होईल, \q1 ‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍याजवळ नेईल,’ \q2 ‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’\f + \fr 7:17 \fr*\ft \+xt यश 25:8\+xt*\ft*\f*” \c 8 \s1 सातवा शिक्का आणि सोन्याची धूपदाणी \p \v 1 त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये अंदाजे अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली. \p \v 2 नंतर मी पाहिले जे सात देवदूत परमेश्वरासमोर उभे राहिले, त्यांना सात कर्णे देण्यात आले. \p \v 3 नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धूपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता. \v 4 त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला. \v 5 तेव्हा त्या देवदूताने वेदीवरील अग्नी धूपदाणीत भरून घेतला आणि त्याने खाली पृथ्वीवर टाकला. त्याबरोबर मोठा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या आणि प्रचंड भूमिकंप झाला. \s1 कर्णे \p \v 6 नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली. \p \v 7 पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले. \p \v 8-9 नंतर दुसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली. \p \v 10 मग तिसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला. \v 11 त्या तार्‍याचे नाव कडूदवणा\f + \fr 8:11 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa अपसन्तिनॉस \fqa*\ft एक कडू पदार्थ\ft*\f* असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले. \p \v 12 चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला. \p \v 13 मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.” \c 9 \p \v 1 मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्‍याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले. \v 2 तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले. \v 3 मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्‍या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते. \v 4 पृथ्वीवरील गवत, वनस्पती किंवा झाडेझुडूपे, यांना उपद्रव न करता ज्या लोकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही, त्यांच्यावर हल्ला करण्यास सांगण्यात आले होते. \v 5 त्यांना ठार मारण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे काम सोपविले होते. विंचू मनुष्याला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणार्‍या पीडेसारखी ती होती. \v 6 त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल. \p \v 7 पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते. \v 8 त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. \v 9 त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता. \v 10 त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्‍या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती. \v 11 अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे. \p \v 12 एक अनर्थ आता संपला आहे; पण आणखी दोन अनर्थ येणार आहेत. \p \v 13 नंतर सहाव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा परमेश्वराच्या राजासनासमोरील सोन्याच्या वेदीच्या चारही शिंगातून निघालेली एक वाणी मी ऐकली. \v 14 ज्या सहाव्या देवदूताजवळ रणशिंग होते त्याला ती म्हणाली, “यूफ्रेटीस नदीवर बांधून ठेवलेल्या चारही देवदूतांना मोकळे कर.” \v 15 आणि एकतृतीयांश मनुष्यजात ठार मारण्याकरिता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले. \v 16 घोडदळाची संख्या वीस कोटी होती. मी त्यांची संख्या ऐकली. \p \v 17 त्या दृष्टान्तात घोडे व स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नीसारखी लाल, गडद निळ्या रंगाची व गंधकासारखी पिवळ्या रंगांची ऊरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडामधून अग्नी, धूर व गंधक हे सर्व निघत होते, \v 18 आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली. \v 19 त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात. \p \v 20 त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडविलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, कास्याच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. \v 21 तसेच, त्यांनी केलेले खून, चेटके, जारकर्म, त्यांच्या चोर्‍या या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही. \c 10 \s1 देवदूत आणि लहानसा ग्रंथपट \p \v 1 मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते. \v 2 त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला. \v 3 मग त्याने सिंहगर्जनेसारखी एक मोठी गर्जना केली, तेव्हा सात मेघगर्जनांनी प्रत्युत्तर दिले. \v 4 त्या सात मेघगर्जनांनी उच्चारलेले शब्द मी लिहून ठेवणार होतो; तेवढ्यात स्वर्गातून एक वाणी मला म्हणाली, “थांब, लिहू नकोस. त्यांचे शब्द मोहरबंद कर, आताच ते प्रकट करावयाचे नाहीत.” \p \v 5 मग समुद्र व जमीन यावर उभे राहिलेल्या त्या बलवान देवदूताने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचाविला. \v 6 आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही! \v 7 पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.” \p \v 8 मग स्वर्गातील ती वाणी माझ्याशी पुन्हा बोलली, “जा आणि समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या त्या बलवान देवदूताकडून ती उघडलेली गुंडाळी घे.” \p \v 9 त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊन मी त्याला ती छोटी गुंडाळी मागितली. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ‘ती तुझ्या तोंडात मधासारखी गोड लागेल,’ पण ती गिळल्यावर ती तुझे पोट आंबट करेल.”\f + \fr 10:9 \fr*\ft \+xt यहे 3:3\+xt*\ft*\f* \v 10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून छोटी गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली. त्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या तोंडाला ती मधाप्रमाणे गोड लागली, पण ती गिळल्यावर माझे पोट आंबट झाले. \v 11 तेव्हा मला सांगण्यात आले, “अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे यांना तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे.” \c 11 \s1 दोन साक्षीदार \p \v 1 मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे. \v 2 पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील. \v 3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.” \v 4 “ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असलेले दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत. \v 5 आणि त्यांना कोणी अपाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या शत्रूंना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशाप्रकारे मारला जाणे आवश्यक आहे. \v 6 त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. \p \v 7 त्यांची साक्ष संपल्यानंतर, अथांग कूपातून येणारा पशू त्यांच्याविरुद्ध लढाई करेल आणि त्यांचा पाडाव करून त्यांना ठार करेल. \v 8 ज्या मोठ्या शहराला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि इजिप्त असे म्हटले आहे आणि ज्या शहरात त्यांच्या प्रभूला क्रूसावर खिळण्यात आले होते, त्या शहरातील रस्त्यांवर त्यांची प्रेते पडून राहतील. \v 9 सर्व लोक, वंश, भाषा आणि राष्ट्रे त्यांची प्रेते साडेतीन दिवस टक लावून पाहतील आणि त्यांना पुरण्यास नकार देतील. \v 10 उलट, आपला इतका छळ करणार्‍या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील. \p \v 11 पुढे साडेतीन दिवसानंतर परमेश्वरापासून येणारा जीवनदायी श्वास त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला. \v 12 मग स्वर्गातून एक मोठी वाणी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांनी ऐकली. ती म्हणाली, “इकडे वर या!” तेव्हा ते आपल्या शत्रूंच्या देखत मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले. \p \v 13 त्याच घटकेस एक प्रचंड भूमिकंप झाला आणि शहराचा एक दशांश भाग जमीनदोस्त होऊन, सात हजार लोक मरण पावले. तेव्हा भूमिकंपातून वाचलेल्या प्रत्येकाने भयभीत होऊन स्वर्गीय परमेश्वराचे गौरव केले. \p \v 14 दुसरा अनर्थ संपला; पण पाठोपाठ तिसरा अनर्थ लवकर येत आहे. \s1 सातवे रणशिंग \p \v 15 कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: \q1 “जगाचे राज्य \q2 आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, \q2 ते युगानुयुग राज्य करतील.” \m \v 16 तेव्हा परमेश्वरासमोर, आपल्या आसनांवर बसलेल्या चोवीस वडीलजनांनी परमेश्वरापुढे दंडवत करून त्यांची उपासना केली. \v 17 ते म्हणाले: \q1 “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. \q2 जे आहेत आणि जे होते, \q1 कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून \q2 तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे. \q1 \v 18 राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती; \q2 पण आता तुमचा क्रोध प्रगट झाला आहे. \q1 आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे, \q2 तुमचे सेवक संदेष्टे, तुमचे पवित्रजन \q1 आणि तुमच्या नावाचा आदर करणारे सर्व लहान व थोर— \q2 अशा सर्वांना पारितोषिके देण्याची, \q1 व पृथ्वीचा नाश करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.” \p \v 19 तेव्हा स्वर्गात परमेश्वराचे मंदिर उघडण्यात आले आणि मंदिरात असलेला परमेश्वराच्या करारांचा कोश दिसू लागला. विजा चमकू लागल्या, मेघगर्जना आणि गडगडाट होऊ लागला. भूमिकंप झाला आणि गारांचे मोठे वादळ झाले. \c 12 \s1 स्त्री व अजगर \p \v 1 मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुकुट होता. \v 2 ती गर्भवती होती आणि प्रसूतीची वाट पाहत प्रसूती वेदनांनी ओरडत होती. \v 3 तोच स्वर्गामध्ये दुसरे चिन्ह दिसले: एकाएकी सात डोकी आणि दहा शिंगे असलेला एक प्रचंड अग्निवर्ण अजगर दृश्यमान झाला. त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. \v 4 त्याने आपल्या शेपटाने एकतृतीयांश तारे ओढून घेतले आणि त्यांना पृथ्वीवर खाली लोटून दिले. मग तो अजगर, त्या स्त्रीचे मूल जन्मल्या बरोबर ते खाऊन टाकावे, या उद्देशाने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. \v 5 त्या स्त्रीने एका अशा मुलाला जन्म दिला, “की जो सर्व राष्ट्रांवर लोह-राजदंडाने राज्य करणार होता.”\f + \fr 12:5 \fr*\ft \+xt स्तोत्र 2:9\+xt*\ft*\f* त्या मुलाला परमेश्वरापुढे व राजासनापुढे उचलून नेण्यात आले. \v 6 ती स्त्री अरण्यात पळून गेली. तिथे तिचे 1,260 दिवस पोषण करण्याकरिता परमेश्वराने तिच्यासाठी एक जागा तयार करून ठेवली होती. \p \v 7 मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराविरूद्ध लढले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याच्या दूतांनी युद्ध केले. \v 8 पुरेसे सामर्थ्य नसल्यामुळे युद्धात त्यांचा पराजय झाला आणि ते स्वर्गातील त्यांचे स्थान हरवून बसले. \v 9 तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले. \p \v 10 तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली, \q1 “परमेश्वराचे तारण, सामर्थ्य \q2 व त्यांचे राज्य \q2 आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे; \q1 कारण आमच्या बंधुजनावर \q2 आरोप ठेवणार्‍याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे. \q2 तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे! \q1 \v 11 पण आमच्या बंधुजनांनी कोकराच्या रक्ताने \q2 आणि आपल्या साक्षीच्या वचनाने \q2 त्याचा पाडाव केला. \q1 स्वतःच्या जिवावर प्रेम न \q2 करता त्यांनी मरण सोसले. \q1 \v 12 म्हणून अहो स्वर्गांनो व स्वर्गातील नागरिकांनो, \q2 उल्लास करा! \q1 पण पृथ्वी व समुद्रा तुम्हाला हाय, हाय! \q2 कारण आता आपल्यासाठी अगदीच थोडका काळ बाकी आहे, \q1 हे ओळखून सैतान अतिशय क्रोधाविष्ट \q2 होऊन तुमच्याकडे आला आहे.” \p \v 13 आपल्याला पृथ्वीवर लोटून दिले आहे हे अजगराच्या लक्षात आले, तेव्हा जिने पुरुष संतानाला जन्म दिला होता, त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला. \v 14 पण तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या जागी तिने उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाच्या पंखांसारखे दोन पंख देण्यात आले. तिथे तिचे साडेतीन वर्षे पोषण व त्या अजगरापासून रक्षण व्हावयाचे होते. \v 15 तेव्हा त्या स्त्रीचा नायनाट करण्यासाठी त्या सर्पाच्या तोंडातून नदीच्या पाण्यासारखा एक महापूर बाहेर आला व तिच्या रोखाने जोरात वाहत गेला. \v 16 पण तेवढ्यात पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि तो महापूर गिळून घेऊन अजगरापासून त्या स्त्रीचा बचाव केला. \v 17 तेव्हा संतापलेला अजगर त्या स्त्रीच्या इतर मुलांना, म्हणजे जी सर्व मुले परमेश्वराच्या आज्ञा पाळीत आणि आपण येशूंचे आहोत अशी साक्ष देत असत, त्यांच्यावर हल्ला करण्यास सिद्ध झाला. \c 13 \s1 समुद्रातून येणारा पशू \p \v 1 तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्‍यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती. \v 2 हा पशू दिसावयास चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. अजगराने त्याला स्वतःचे सामर्थ्य, आसन व मोठा अधिकार दिला. \v 3 त्याच्या एका डोक्यावर प्राणघातक जखम झाल्यासारखे मला दिसले. पण ती प्राणघातक जखम बरी झाली. या चमत्काराने सारे जग आश्चर्यचकित झाले आणि त्या पशूला अनुसरले. \v 4 त्या अजगराने दुष्ट पशूला अधिकार दिले म्हणून लोक अजगराची आणि त्या दुष्ट पशूचीही उपासना करू लागले. त्यांनी उद्गार काढले, “याच्यासारखा महान कोणी आहे काय? याच्याशी युद्ध करण्यास कोणी समर्थ आहे काय?” \p \v 5 त्या पशूला गर्विष्ठ उद्गार काढणारे, दुर्भाषणे करणारे तोंड देण्यात आले होते. तसेच बेचाळीस महिने आपला अधिकार गाजविण्याचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आले होते. \v 6 तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्‍या सर्वांची निंदा करीत राहिला. \v 7 अजगराने त्याला परमेश्वराच्या पवित्र लोकांविरुद्ध लढून त्यांच्यावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य दिले. आणि प्रत्येक वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यावर सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार दिला. \v 8 पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील. \p \v 9 ज्याला ऐकावयास कान आहे, त्या प्रत्येकाने ऐकावे: \q1 \v 10 “जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, \q2 तर ते तुरुंगवासात जातील. \q1 जर एखाद्याला तलवारीने ठार मारणे आहे, \q2 तर तलवारीने ते मारले जातील.”\f + \fr 13:10 \fr*\ft \+xt यिर्म 15:2\+xt*\ft*\f* \m परमेश्वराच्या लोकांनी धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. \s1 पृथ्वीतून येणारा पशू \p \v 11 मग मी दुसरा एक पशू पाहिला. तो पृथ्वीतून वर येत होता. त्याला कोकर्‍याच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, पण त्याचा आवाज अजगरासारखा होता. \v 12 प्राणघातक जखम बरी झालेल्या त्या पहिल्या पशूच्या प्रतिनिधी सारखा सर्व अधिकार त्याने चालविला व सर्व जगास त्या पहिल्या पशूला नमन करविले. \v 13 त्याने महान चमत्कार केले, सर्वांच्या डोळ्यांदेखत आकाशातून पृथ्वीवर अग्निज्वाला आणल्या. \v 14 कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला. \v 15 या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्‍या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.” \v 16 त्याने असेही फर्मान काढले की लहान थोर, श्रीमंत व गरीब, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खूण गोंदून घ्यावी. \v 17 त्या पहिल्या पशूची खूण किंवा त्याच्या नावाचा सांकेतिक आकडा त्यांच्यावर असल्याशिवाय कोणालाही विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. \p \v 18 हे समजण्यासाठी सुज्ञतेची आवश्यकता आहे. कोणाजवळ अंतर्ज्ञान असेल, तर त्याने त्या पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका मनुष्याच्या नावाची सांकेतिक संख्या आहे. ती संख्या 666 अशी आहे. \c 14 \s1 कोकरा आणि 1,44,000 \p \v 1 नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते. \v 2 मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता. \v 3 लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते. \v 4 कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्‍याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते. \v 5 असत्य भाषण कधीही त्यांच्या मुखातून निघाले नाही; ते निष्कलंक आहेत. \s1 तीन स्वर्गदूत \p \v 6 नंतर मी अंतराळाच्या मध्यभागी दुसरा एक देवदूत उडतांना पाहिला. पृथ्वीवर राहणार्‍या सर्वांना, म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोकांना सांगण्यासाठी तो सर्वकालची शुभवार्ता घेऊन चालला होता. \v 7 तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.” \p \v 8 तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’\f + \fr 14:8 \fr*\ft \+xt यश 21:9\+xt*\ft*\f* ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.” \p \v 9 मग त्यांच्यामागून एक तिसरा देवदूत मोठ्याने घोषणा करीत आला: “समुद्रातील पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला जो कोणी नमन करेल आणि त्याचे चिन्ह आपल्या कपाळावर किंवा हातावर गोंदून घेईल, \v 10 त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल. \v 11 त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली. \v 12 कारण येशूंवर विश्वास ठेवणारे व अखेरपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळणार्‍या पवित्र लोकांना यामुळे धीराने प्रत्येक छळ सहन करण्याची आता आवश्यकता आहे.” \p \v 13 मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभूमध्ये मृत झालेले ते धन्य.” \p आत्मा म्हणतो, “होय, कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.” \s1 पृथ्वीवर कापणी आणि द्राक्षकुंड तुडविणे \p \v 14 मग मी पाहिले तो मला एक पांढरा मेघ दिसला, त्या मेघावर मनुष्याच्या पुत्रासारखे कोणी एक बसले होते. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व हातात धारदार विळा होता. \v 15 मग मंदिरातून एक देवदूत बाहेर आला व मेघावर बसलेल्यास उच्चस्वराने हाक मारून म्हणाला, “तुमचा विळा घ्या आणि कापणीस प्रारंभ करा, कारण पृथ्वीचे पीक तयार झाले आहे व कापणी करण्याची वेळ आली आहे.” \v 16 तेव्हा मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. \p \v 17 यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. \v 18 दुसरा एक देवदूत ज्याला अग्नीवर अधिकार होता तो वेदीतून बाहेर आला आणि विळा घेतलेल्या देवदूताला मोठ्याने म्हणाला, “पृथ्वीवरील द्राक्षवेलींना लागलेले द्राक्षांचे घोस, विळा चालवून कापून घे. कारण ते पिकले आहेत.” \v 19 तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर आपला विळा चालविला आणि द्राक्षे गोळा करून, रस काढण्यासाठी ती परमेश्वराच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकली. \v 20 ते द्राक्षकुंड शहराबाहेर तुडविण्यात आले, तेव्हा त्यातून रक्ताचा पाट वाहिला. हा पाट घोड्यांच्या लगामा एवढा उंच आणि तीनशे किलोमीटर लांब होता. \c 15 \s1 सात पीडा घेऊन सात देवदूत \p \v 1 आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिले: अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला. \v 2 मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या. \v 3 ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: \q1 “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! \q2 तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! \q1 हे राष्ट्रांच्या राजा, \q2 तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत! \q1 \v 4 हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही, \q2 आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही? \q1 कारण तुम्हीच पवित्र आहात! \q1 सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, \q2 कारण तुमची न्याय्य कृत्ये \q1 प्रकट झाली आहेत.” \p \v 5 मग मी पाहिले, तो स्वर्गातील मंदिराचे साक्षीचे परमपवित्रस्थान उघडलेले मला दिसले. \v 6 ज्यांना पृथ्वीवर सात पीडा ओतण्याचे काम नेमून देण्यात आले होते, ते सात देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्यांनी डागविरहीत आणि तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केली होती; त्यांच्या छातीवर सोन्याचे पट्टे बांधले होते. \v 7 त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, त्या सात देवदूतांना युगानुयुग जिवंत असणार्‍या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या सात सोन्याच्या वाट्या दिल्या. \v 8 त्यांचे गौरव व सामर्थ्य यातून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. सात देवदूतांचे सात पीडा ओतण्याचे काम संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही. \c 16 \s1 परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या \p \v 1 नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी सात देवदूतांना म्हणतांना ऐकली, “जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” \p \v 2 त्याप्रमाणे, पहिला देवदूत मंदिरातून निघाला. त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा ज्या लोकांवर पशूची खूण होती व ज्यांनी त्याच्या मूर्तीला नमन केले होते, अशा प्रत्येकाला चिघळलेले आणि क्लेशदायक फोड आले. \p \v 3 दुसर्‍या देवदूताने आपले वाटी समुद्रावर ओतली, तेव्हा समुद्राचे पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्तमय झाले आणि त्यातील सर्व जिवंत प्राणी मरण पावले. \p \v 4 तिसर्‍या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्‍यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले. \v 5 मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: \q1 “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, \q2 ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात. \q1 \v 6 कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, \q2 आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.” \m \v 7 नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: \q1 “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, \q2 तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.” \p \v 8 मग चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सर्व माणसांना सूर्याच्या अग्नीने भाजून काढण्याची परवानगी देण्यात आली. \v 9 माणसे तीव्र उष्णतेने करपून गेली, तेव्हा या पीडांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या परमेश्वराच्या नावाला शाप दिला, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि परमेश्वराचे गौरव केले नाही. \p \v 10 मग पाचव्या देवदूताने आपली वाटी समुद्रातील पशूच्या आसनावर ओतली. तेव्हा त्याचे संपूर्ण राज्य अंधकारमय झाले आणि त्याच्या प्रजाजनांनी असह्य वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या. \v 11 आपल्या वेदना आणि फोड याबद्दल त्यांनी स्वर्गातील परमेश्वराला शाप दिले. पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल पश्चात्ताप करण्याचे त्यांनी नाकारले. \p \v 12 सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्‍या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले. \v 13 नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले. \v 14 चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात. \b \mi \v 15 “पाहा! जसा चोर येतो तसा मी येईन! जे आपली वस्त्रे घालून तयार होऊन माझी वाट पाहत आहेत, ते धन्य! त्यांना नग्नावस्थेत आणि लज्जास्पद स्थितीत चालावे लागणार नाही.” \b \m \v 16 मग त्या तिघांनी जगातील सर्व राजांना, हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. \p \v 17 मग सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मंदिरात असलेल्या राजासनावरून एक मोठी वाणी निघाली. ती म्हणाली, “पूर्ण झाले आहे!” \v 18 मग मेघगर्जना, व आकाश दणाणून सोडणारा गडगडाट झाला. विजा चमकल्या आणि मानवी इतिहासात कधी झाला नव्हता इतका मोठा व तीव्र स्वरुपाचा भूमिकंप झाला. \v 19 त्या मोठ्या शहराचे तीन भाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त झाली. महान बाबिलोन नगरीचे परमेश्वराला स्मरण झाले व त्यांनी तिला त्यांचा क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला. \v 20 प्रत्येक बेट नाहीसे झाले; पर्वत सपाट झाले. \v 21 प्रत्येकी सुमारे पन्नास कि.ग्रॅ. वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या पीडांमुळे लोकांनी परमेश्वराला शाप दिले, कारण त्या गारांची पीडा फार भयानक होती. \c 17 \s1 बाबिलोन व पशूवर स्वार झालेली वेश्या \p \v 1 पीडांची वाटी ओतणार्‍या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन. \v 2 पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.” \p \v 3 नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली. \v 4 त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता. \v 5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते: \pc महान बाबिलोन, \pc पृथ्वीवरील वेश्यांची व \pc अमंगळ गोष्टींची माता. \m \v 6 मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. \p अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो. \v 7 तेव्हा देवदूत मला म्हणाले: “तू एवढा आश्चर्यचकित का झालास? ती स्त्री कोण आहे आणि ज्या सात डोक्यांच्या आणि दहा शिंगांच्या पशूवर ती स्वार झाली आहे, तो पशू कोण आहे, याचे रहस्य मी तुला सांगतो. \v 8 तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार. \p \v 9 “हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते. \v 10 त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल. \v 11 जो पशू आधी होता, पण आता नाही, तो आठवा राजा असून, सातापैकी एक आहे, नंतर त्याचाही नाश होईल. \p \v 12 “त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल. \v 13 त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील. \v 14 ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.” \p \v 15 तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत. \v 16 तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील. \v 17 कारण परमेश्वर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनात एक योजना घालेल. आपले सर्व अधिकार परमेश्वराचे वचन पूर्ण होईपर्यंत त्या शेंदरी पशूला देण्याचे ते एकमताने आपसात ठरवतील. \v 18 तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्‍या महानगरीचे दर्शक आहे.” \c 18 \s1 बाबेलच्या पतनाबद्दल शोक \p \v 1 त्यानंतर स्वर्गातून दुसरा एक देवदूत खाली उतरतांना मी पाहिला. त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या प्रखर तेजाने पृथ्वी उजळून निघाली. \v 2 तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला: \q1 “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’\f + \fr 18:2 \fr*\ft \+xt यश 21:9\+xt*\ft*\f* \q2 ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या \q1 अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, \q2 व सर्वप्रकारच्या गलिच्छ, \q2 ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे! \q1 \v 3 तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य \q2 सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. \q1 पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, \q2 आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.” \s1 बाबेलच्या न्यायापासून सुटून जाण्याचा इशारा \p \v 4 मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: \q1 “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’\f + \fr 18:4 \fr*\ft \+xt यिर्म 51:45\+xt*\ft*\f* \q2 तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, \q2 नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल. \q1 \v 5 कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे, \q2 आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे. \q1 \v 6 तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा; \q2 तिने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा. \q2 तिच्या प्याल्यात तिच्याच प्याल्यातून दुप्पट ओता.” \q1 \v 7 तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, \q2 आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. \q1 ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, \q2 “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. \q1 मी काही विधवा नाही. \q2 मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.” \q1 \v 8 म्हणूनच तिला मरण, \q2 शोक व दुष्काळ या सर्वांच्या पीडा एकाच दिवशी भोगाव्या लागतील. \q1 अग्नीने तिला जाळून टाकण्यात येईल. \q2 सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर तिचा न्यायनिवाडा करणार आहेत. \s1 पृथ्वीवर बाबेलसाठी विलाप \p \v 9 “पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील, \v 10 तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील: \q1 “ ‘हाय हाय! महान बाबिलोन नगरी, \q2 ती सामर्थ्यशाली नगरी! \q1 एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्‍हाड कोसळली आहे!’ \p \v 11 “पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्यास कोणीच उरले नाही: \v 12 सोने, चांदी, हिरे, रत्ने, तलम कापड, जांभळे आणि किरमिजी रेशमी कापड, सर्वप्रकारचे चंदनी व सुगंधी लाकूड, हस्तदंती माल, मोलवान लाकडाचे कोरीव नक्षीकाम, कास्य, लोखंड, संगमरवरी दगड, \v 13 तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम सपीठ व गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारे लोक. \p \v 14 “ते म्हणतील, ‘ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापासून घेतली गेली आहेत, सर्व विलास आणि वैभवी गोष्टी तुझ्यापुढून गेली आहेत; त्याचा तुला कधीच पुनर्लाभ होणार नाही.’ \v 15 जे व्यापारी तिला हे पदार्थ विकून श्रीमंत झाले, ते आता तिची पीडा बघून भयभीत होतील. दूर उभे राहून रडत व शोक करतील. \v 16 ते आक्रोश करून म्हणतील: \q1 “ ‘हाय! हाय! ही इतकी सुंदर महानगरी! \q2 जांभळ्या, किरमिजी तलम वस्त्रांनी सजलेल्या, \q2 सोन्यामोत्यांच्या अलंकारांनी नटलेल्या स्त्रीसारखी ही सुंदर महानगरी! \q1 \v 17 एका क्षणात तिची सर्व संपत्ती नष्ट झाली!’ \p “प्रत्येक जहाजाचे कप्तान आणि खलाशी व समुद्रापासून उत्पन्न मिळविणारे सर्वजण दूर अंतरावर उभे राहतील, \v 18 धुराच्या उसळणार्‍या लोटांकडे पाहत शोकाकुल होऊन ते रडत म्हणतील, ‘या महान नगरीसारखी दुसरी नगरी सर्व जगात शोधून तरी सापडेल काय?’ \v 19 मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतील: \q1 “ ‘हाय, हाय! किती महान नगरी होती ही! \q2 ज्या सर्वांकडे जहाजे होती \q2 ते तिच्यामुळेच श्रीमंत झाले, \q1 आणि आता ती एका तासात उद्ध्वस्त झाली!’ \b \q1 \v 20 “पण हे स्वर्गा! \q2 तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, \q2 परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! \q1 कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध \q2 परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.” \s1 बाबेलचा विनाश \p \v 21 मग एका बलवान देवदूताने, जात्याच्या तळीच्या आकाराचा एक मोठा दगड उचलून समुद्रात टाकला व तो ओरडून म्हणाला: \q1 “ते महान नगर बाबिलोन अशाच \q2 हिंसक रीतीने खाली फेकले जाईल व \q2 ते कायमचे नाहीसे होईल.” \q1 \v 22 त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी, \q2 यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही. \q1 तिथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे \q2 पुन्हा आढळणार नाहीत. \q1 तिथे गिरणीचा आवाज \q2 पुन्हा ऐकू येणार नाही. \q1 \v 23 दिव्यांचा प्रकाश यापुढे \q2 तुझ्यावर उजळणार नाही \q1 आणि वधूवरांची वाणी \q2 पुन्हा ऐकू येणार नाही. \q1 तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. \q2 सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती. \q1 \v 24 पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन, \q2 यांचे रक्त तिच्यामध्ये आढळले. \c 19 \s1 बाबेलच्या पतनाबद्दल तिप्पट जयोत्सव \p \v 1 यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: \q1 “हाल्लेलूयाह! \q1 तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत! \q2 \v 2 कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. \q1 ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, \q2 तिला त्यांनी दंड केला आहे \q1 आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.” \p \v 3 आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: \q1 “हाल्लेलूयाह” \q1 तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे. \p \v 4 तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, \q1 “आमेन! हाल्लेलूयाह!” \p \v 5 तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, \q1 “परमेश्वराचे भय \q2 बाळगणाऱ्या त्यांच्या \q1 सर्व लहान थोर सेवकहो, \q2 आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.” \p \v 6 नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, \q1 “हाल्लेलूयाह, \q2 कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात! \q1 \v 7 चला, आपण आनंदोत्सव करू, \q2 उल्लास करू व त्यांचे गौरव करू, \q1 कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. \q2 त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे. \q1 \v 8 तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र \q2 परिधान करावयास दिले आहे,” \m ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत. \b \p \v 9 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.” \p \v 10 तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्‍या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.” \s1 स्वर्गीय योद्धा पशूचा पराभव करतो \p \v 11 तेव्हा मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा व त्यावर जो बसला होता त्याचे नाव “विश्वासू आणि खरा” आहे. तो नीतीने न्याय आणि युद्ध करतो. \v 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही. \v 13 त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते. \v 14 स्वर्गातील सैन्य उत्तम, तलम, पांढरी स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि पांढर्‍या घोड्यांवर स्वार होऊन त्यांच्यामागून चालत होते. \v 15 “त्यांनी राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली.”\f + \fr 19:15 \fr*\ft \+xt स्तोत्र 2:9\+xt*\ft*\f* ते त्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ परमेश्वराच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड ते तुडवतील. \v 16 त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते: \pc राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. \p \v 17 नंतर मी एका देवदूताला सूर्यामध्ये उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणार्‍या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, परमेश्वराच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा! \v 18 या आणि राजांचे, कप्तानांचे व मोठमोठ्या सेनाधिकार्‍यांचे मांस खा! घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे, सर्व लहान, थोर, स्वतंत्र, दास यांचे मांस खावयास या.” \p \v 19 तेव्हा तो पशू, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये, जो घोड्यावर बसला होता त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्र होत असलेले मी पाहिले. \v 20 त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले. \v 21 जो घोड्यावर बसलेला स्वार होता त्याच्या मुखातून बाहेर येणार्‍या तलवारीने बाकी राहिलेले मारले गेले आणि सगळ्या पक्षांनी आधाशीपणे त्यांचे मांस खाल्ले. \c 20 \s1 एक हजार वर्षे \p \v 1 मग मी एक देवदूत स्वर्गातून खाली उतरतांना पाहिला. त्याच्याजवळ अथांग कूपाची किल्ली होती. त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता. \v 2 त्याने त्या अजगराला, त्या पुरातन सापाला, जो पिशाच्च किंवा सैतान आहे त्याला धरले आणि एक हजार वर्षांसाठी साखळदंडाने जखडून टाकले, \v 3 आणि अथांग कूपात टाकले. हा हजार वर्षांचा काळ पूर्ण होईपर्यंत अजगराने इतःपर कोणत्याही राष्ट्राला फसवू नये म्हणून त्याने अथांग कूप बंद केले आणि त्याला कुलूप लावून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्याला थोड्या काळासाठी मोकळे सोडण्यात येईल. \p \v 4 नंतर ज्यांना न्याय करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यांना मी राजासनावर बसलेले पाहिले. आणि येशूंच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे आत्मे पहिले आणि त्यांनी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आपल्या कपाळावर व हातावर त्याची खूणही घेतली नव्हती. ते पुन्हा जिवंत झाले होते व त्यांनी ख्रिस्तासह एक हजार वर्षे राज्य केले. \v 5 हे पाहिले पुनरुत्थान होय. इतर मृत लोक हजार वर्षे संपेपर्यंत पुन्हा जिवंत झाले नाहीत \v 6 पहिल्या पुनरुत्थानात जे वाटेकरी होतात, ते धन्य आणि पवित्र आहेत, कारण दुसर्‍या मरणाची त्यांच्यावर सत्ता राहणार नाही. ते परमेश्वराचे व ख्रिस्ताचे याजक होऊन ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील. \s1 सैतानाचा न्याय \p \v 7 हा हजार वर्षांचा काळ संपल्यावर सैतानाला तुरुंगातून सोडण्यात येईल, \v 8 आणि तो पृथ्वीच्या चार कोपर्‍यातील गोग व मागोग राष्ट्रांस ठकविण्यास व त्यांना लढाईसाठी एकत्र करण्यास बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्र किनार्‍यावरील वाळूच्या कणांइतकी आहे. \v 9 त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र फिरून पवित्र जणांची छावणी व परमेश्वराला प्रिय असलेले नगर वेढले, परंतु स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना भस्म केले. \v 10 मग त्यांचा विश्वासघात करणार्‍या सैतानाला ज्या सरोवरात तो पशू आणि खोट्या संदेष्ट्यांना आधी टाकले आहे, त्या अग्नीच्या व जळत्या गंधकाच्या सरोवरात पुन्हा टाकण्यात येईल. तिथे त्यांना रात्रंदिवस, युगानुयुग यातना भोगाव्या लागतील. \s1 शेवटचा न्याय \p \v 11 मग एक भव्य शुभ्र राजासन व त्यावर बसलेला एकजण माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा पृथ्वी व आकाशांनी त्यांच्या समोरून पळ काढला आणि त्यांना कुठेही जागा मिळाली नाही. \v 12 मग मृत झालेले लहान थोर परमेश्वराच्या आसनासमोर उभे असलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली. आणखी एक पुस्तक उघडण्यात आले जे जीवनाचे पुस्तक होते. पुस्तकात लिहिल्यानुसार प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला. \v 13 जे लोक समुद्रात मरण पावले होते, त्यांना समुद्रांनी परत दिले. पृथ्वी व अधोलोक यांनीही आपल्यातील मृतांना बाहेर सोडले. त्या प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला. \v 14 मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आली. अग्नीचे सरोवर म्हणजेच दुसरे मरण होय. \v 15 जीवनाच्या पुस्तकात ज्या कोणाचे नाव लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. \c 21 \s1 नवे आकाश व नवी पृथ्वी \p \v 1 नंतर मी, “एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश”\f + \fr 21:1 \fr*\ft \+xt यश 65:17\+xt*\ft*\f* पाहिले, कारण पहिले आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र अस्तित्वात नव्हते. \v 2 तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. \v 3 राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील. \v 4 ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’\f + \fr 21:4 \fr*\ft \+xt यश 25:8\+xt*\ft*\f* दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत.” \p \v 5 जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.” \p \v 6 ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्‍याचे पाणी मोफत देईन. \v 7 जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील. \v 8 परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.” \s1 नवीन यरुशलेम, कोकराची वधू \p \v 9 मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्‍या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्‍याची पत्नी दाखवितो.” \v 10 तेव्हा मी आत्म्याने संचारित झालो आणि मला एका उंच व विशाल अशा पर्वतशिखरावर नेण्यात आले. तिथून मी ती पवित्र नगरी म्हणजे यरुशलेम, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली. \v 11 ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती. \v 12 तिचे तट रुंद व उंच होते. तिला बारा मोठमोठ्या वेशी असून त्यावर बारा देवदूत पहारा करीत होते. त्या वेशींवर इस्राएलच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. \v 13 उत्तरेकडे तीन, दक्षिणेकडे तीन, पूर्वेकडे तीन व पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. \v 14 नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती. \p \v 15 नगरी, वेशी व तटबंदी यांचे मोजमाप घेण्यासाठी देवदूताच्या हातामध्ये सोन्याची एक मोजकाठी होती. \v 16 ती नगरी चौरस होती. म्हणजे तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला 2,200 किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती. \v 17 मग त्याने भिंतीची जाडी मोजली. ती या टोकापासून त्या टोकापर्यंत 65 मीटर होती. देवदूताने मानवी परिमाणांत ही तटबंदी मोजली. \v 18 नगरीचा तट यास्फे रत्नाचा होता आणि ती शुद्ध काचेसारख्या पारदर्शक सोन्याची होती. \v 19 तिच्या तटाच्या पायाचे बारा थर होते. ते रत्नजडित शीलांनी बांधलेले होते. पहिला थर यास्फे रत्नाचा, दुसरा नीलमण्याचा, तिसरा स्फटिकचा, चौथा पाचूचा, \v 20 पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता. \v 21 बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेस एकाच मोत्याची होती. शहराचा विशाल राजमार्ग काचेसारखा पारदर्शक शुद्ध सोन्याचा होता. \p \v 22 नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते. \v 23 नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे. \v 24 राष्ट्रे त्यांच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील. \v 25 तिच्या वेशी दिवसा बंद होत नाहीत; तिथे रात्र नाहीच. \v 26 सर्व राष्ट्रांचे वैभव आणि प्रतिष्ठा, नगरीमध्ये आणण्यात येईल. \v 27 मात्र त्या नगरीत कोणतीही अपवित्र गोष्ट, लज्जास्पद किंवा असत्य आचरण करणाऱ्यांचा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यांची नावे कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच या नगरीत प्रवेश करतील. \c 22 \s1 एदेनाची पुनर्स्थापना \p \v 1 मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती. \v 2 राजमार्गाच्या मध्यावरून ती वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनदायी वृक्ष उभे होते, त्यांना वर्षातून बारा वेळा बहर येई. प्रत्येक महिन्याला त्यांना नवी फळे येत. त्यांची पाने राष्ट्रांना निरोगी करण्यासाठी औषध म्हणून वापरली जात. \v 3 तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील. \v 4 ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल. \v 5 तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील. \s1 योहान आणि देवदूत \p \v 6 नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.” \b \p \v 7 “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.” \b \p \v 8 मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो. \v 9 परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.” \p \v 10 नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. \v 11 अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.” \b \s1 समारोप: आमंत्रण आणि चेतावणी \p \v 12 “पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन. \v 13 मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे. \b \p \v 14 “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. \v 15 नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील. \b \p \v 16 “तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.” \b \p \v 17 आत्मा व वधू म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कोणतेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे. \b \p \v 18 या पुस्तकातील संदेश ऐकणार्‍या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल. \v 19 तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील. \b \p \v 20 ज्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत, ते जाहीरपणे म्हणतात, “होय, मी लवकर येत आहे!” \p आमेन! हे प्रभू येशू, या! \b \p \v 21 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराच्या लोकांवर असो. आमेन.