\id PRO - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h नीतिसूत्रे \toc1 नीतिसूत्रे \toc2 नीतिसूत्रे \toc3 नीती \mt1 नीतिसूत्रे \c 1 \s1 नीतिसूत्रांचा उद्देश व विषय \p \v 1 इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: \q1 \v 2 सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; \q2 अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी; \q1 \v 3 समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, \q2 जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; \q1 \v 4 जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, \q2 तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी— \q1 \v 5 शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, \q2 आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे— \q1 \v 6 ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा, \q2 प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील. \b \q1 \v 7 याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, \q2 परंतु मूर्ख\f + \fr 1:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa अनैतिक\fqa*\f* माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात. \ms1 प्रस्तावना: ज्ञान संपादन करण्यासाठी केलेला उपदेश \s1 पापी लोकांच्या आमंत्रणाविषयी सावधान \q1 \v 8 माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे \q2 आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस. \q1 \v 9 ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे \q2 आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे. \b \q1 \v 10 माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, \q2 तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. \q1 \v 11 जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; \q2 आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, \q2 चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या; \q1 \v 12 चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, \q2 आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू; \q1 \v 13 आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल \q2 आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू; \q1 \v 14 आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; \q2 लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”— \q1 \v 15 माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, \q2 तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस; \q1 \v 16 कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, \q2 ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात. \q1 \v 17 जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे! \q1 \v 18 ही माणसे स्वतःच्याच रक्तपातासाठी टपून बसतात; \q2 ते केवळ स्वतःवरच हल्ला करतात! \q1 \v 19 गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात, \q2 त्या सर्वांचे हे मार्ग आहेत; \q2 असे मिळविलेले धन, ते ज्यांच्या मालकीचे आहे त्यांचाच प्राण घेते. \s1 ज्ञानाचे आव्हान \q1 \v 20 बाहेर उघडपणे सुज्ञान मोठ्याने आव्हान करते\f + \fr 1:20 \fr*\ft ज्ञानाला स्त्रीची उपमा दिली आहे\ft*\f*. \q2 भर चौकात ती तिचा आवाज उंचावते; \q1 \v 21 भिंतीच्या उंचीवरून ती ओरडते \q2 शहराच्या वेशीजवळ ती भाषण करते: \b \q1 \v 22 “अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार? \q2 कुचेष्टा करणारे तुम्ही कुचेष्टा करण्यात किती वेळ आनंद करणार \q2 आणि मूर्खांनो, किती काळ तुम्ही ज्ञानाचा द्वेष करणार? \q1 \v 23 मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा! \q2 तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन, \q2 तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन. \q1 \v 24 परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, \q2 आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही. \q1 \v 25 कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. \q2 आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत, \q1 \v 26 यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; \q2 जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन— \q1 \v 27 जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, \q2 जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, \q2 जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील. \b \q1 \v 28 “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; \q2 ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही, \q1 \v 29 कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, \q2 आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही. \q1 \v 30 ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; \q2 आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून, \q1 \v 31 त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, \q2 आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील. \q1 \v 32 कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल, \q2 आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल; \q1 \v 33 परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, \q2 आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.” \c 2 \s1 ज्ञानाचा नैतिक लाभ \q1 \v 1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील \q2 आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील, \q1 \v 2 सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील, \q2 तुझे मन समंजसपणाकडे लावशील— \q1 \v 3 मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, \q2 आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील, \q1 \v 4 आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील \q2 आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील, \q1 \v 5 तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल \q2 आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. \q1 \v 6 कारण याहवेह सुज्ञान देतात; \q2 त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते. \q1 \v 7 नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, \q2 जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत. \q1 \v 8 कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात \q2 आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात. \b \q1 \v 9 तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, \q2 आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल. \q1 \v 10 सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, \q2 आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल, \q1 \v 11 तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, \q2 आणि सुज्ञता तुझे राखण करेल. \b \q1 \v 12 सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि \q2 शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील. \q1 \v 13 ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी \q2 सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत, \q1 \v 14 ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो \q2 आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात, \q1 \v 15 ज्यांचे मार्ग विकृत आहेत \q2 आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत! \b \q1 \v 16 सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, \q2 तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून, \q1 \v 17 जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, \q2 आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.\f + \fr 2:17 \fr*\ft किंवा \ft*\fq करार \fq*\fqa तिच्या देवाचा\fqa*\f* \q1 \v 18 निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते \q2 आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात. \q1 \v 19 तिच्याकडे जाणारा परत येत नाही \q2 किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही. \b \q1 \v 20 यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, \q2 आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील. \q1 \v 21 कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, \q2 आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील; \q1 \v 22 परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल \q2 आणि तेथील अविश्वासू लोकांचे उच्चाटन केले जाईल. \c 3 \s1 सुज्ञान कल्याण प्रदान करते \q1 \v 1 माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस, \q2 परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव; \q1 \v 2 कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील, \q2 आणि तुला शांती आणि समृद्धी देतील. \b \q1 \v 3 प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; \q2 त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, \q2 त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव. \q1 \v 4 तेव्हा तुला परमेश्वराकडून आणि मानवाकडून \q2 अनुग्रह आणि सत्कीर्ती प्राप्त होतील. \b \q1 \v 5 तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव; \q2 आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; \q1 \v 6 तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, \q2 आणि ते तुझे मार्ग सुकर\f + \fr 3:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुझे मार्गदर्शन\fqa*\f* करतील. \b \q1 \v 7 स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस; \q2 परंतु याहवेहचे भय बाळग आणि वाईटापासून दूर राहा. \q1 \v 8 हे तुझ्या देहाला आरोग्य देईल \q2 आणि तुझ्या हाडांना पोषकसत्व असे होईल. \b \q1 \v 9 तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी \q2 याहवेहचा सन्मान कर; \q1 \v 10 तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, \q2 आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील. \b \q1 \v 11 माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस; \q2 आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस; \q1 \v 12 कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो, \q2 याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात! \b \q1 \v 13 ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते \q2 व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य. \q1 \v 14 कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, \q2 आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते. \q1 \v 15 ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, \q2 तुला आवडणार्‍या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही. \q1 \v 16 तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे; \q2 आणि धन व सन्मान तिच्या डाव्या हातात आहेत. \q1 \v 17 तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत, \q2 आणि तिच्या सर्व पाऊलवाटांवर शांती आहे. \q1 \v 18 जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; \q2 जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील. \b \q1 \v 19 सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला, \q2 शहाणपणाने त्यांनी आकाशाची स्थापना केली; \q1 \v 20 त्यांच्या ज्ञानाने खोल जले दुभागली गेली, \q2 आणि मेघांनी दवबिंदू पाडले. \b \q1 \v 21 माझ्या मुला, सुज्ञान आणि शहाणपण तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस, \q2 खरे न्यायीपण आणि विवेक जपून ठेव; \q1 \v 22 तीच तुझ्यासाठी जीवन असतील, \q2 ती तुझ्या गळ्याला कृपेचा अलंकार असतील. \q1 \v 23 मग तू तुझ्या मार्गाने सुरक्षित चालशील, \q2 आणि तुझा पाय अडखळणार नाही. \q1 \v 24 तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही; \q2 जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल. \q1 \v 25 अचानक आलेल्या संकटाला तू भिऊ नकोस, \q2 किंवा दुष्टांचा नाश होत असला तरी भिऊ नकोस; \q1 \v 26 कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील \q2 आणि ते तुझा पाय पाशात अडकू देणार नाहीत. \b \q1 \v 27 ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले, \q2 तर ते करण्यास नाकारू नकोस. \q1 \v 28 एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना \q2 “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन” \q2 असे तुझ्या शेजार्‍याला म्हणू नकोस. \q1 \v 29 तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना, \q2 त्याचे वाईट करण्याचे योजू नकोस. \q1 \v 30 जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल, \q2 तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस. \b \q1 \v 31 हिंसा करणार्‍यांचा हेवा करू नकोस, \q2 किंवा त्यांच्या कोणत्याही मार्गाची निवड करू नकोस. \b \q1 \v 32 कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते, \q2 परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात. \q1 \v 33 याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो, \q2 परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात. \q1 \v 34 उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, \q2 परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात. \q1 \v 35 ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो, \q2 परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते. \c 4 \s1 कोणतीही किंमत देऊन ज्ञान प्राप्त कर \q1 \v 1 माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका; \q2 त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा. \q1 \v 2 मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो, \q2 म्हणून माझ्या शिक्षणाचा त्याग करू नका. \q1 \v 3 कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचा पुत्र होतो, \q2 अजूनही सुकुमार आणि आईच्या प्रेमात वाढलेला. \q1 \v 4 तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले, \q2 “तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव; \q2 माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल. \q1 \v 5 सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर; \q2 माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस. \q1 \v 6 सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; \q2 तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल. \q1 \v 7 सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव.\f + \fr 4:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa सुज्ञान सर्वश्रेष्ठ आहे; म्हणून ते मिळव\fqa*\f* \q2 जरी तुझ्याकडे जे आहे\f + \fr 4:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa सुज्ञान \fqa*\fqa जे काही तुला मिळेल\fqa*\f* ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव. \q1 \v 8 तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल. \q2 ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल; \q1 \v 9 ती तुझ्या मस्तकांवर फुलांचा मुकुट देईल, \q2 आणि एक सुशोभित मुकुट तुला सादर करेल.” \b \q1 \v 10 माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, \q2 आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील. \q1 \v 11 मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, \q2 आणि तुला सरळ वाटेने चालवितो. \q1 \v 12 जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; \q2 जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस. \q1 \v 13 बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; \q2 त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे. \q1 \v 14 दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, \q2 किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस. \q1 \v 15 त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, \q2 त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा, \q1 \v 16 कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; \q2 कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. \q1 \v 17 दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, \q2 आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात. \b \q1 \v 18 नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, \q2 दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे. \q1 \v 19 दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे; \q2 त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही. \b \q1 \v 20 माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे; \q2 माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव. \q1 \v 21 त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस; \q2 त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव; \q1 \v 22 कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत. \q2 आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात. \q1 \v 23 सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, \q2 कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते. \q1 \v 24 सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव; \q2 अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे. \q1 \v 25 तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; \q2 तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव. \q1 \v 26 तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार\f + \fr 4:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa मार्ग सपाट करणे\fqa*\f* कर, \q2 आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा. \q1 \v 27 उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; \q2 वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव. \c 5 \s1 व्यभिचाराविरुद्ध ताकीद \q1 \v 1 माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे, \q2 माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव; \q1 \v 2 म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल; \q2 आणि तुझी जीभ ज्ञानाचे रक्षण करेल. \q1 \v 3 कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, \q2 आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो; \q1 \v 4 परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, \q2 आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. \q1 \v 5 तिचे पाय मृत्यूकडे जातात; \q2 तिची पावले सरळ अधोलोकी नेतात. \q1 \v 6 जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; \q2 तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते. \b \q1 \v 7 मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; \q2 माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका. \q1 \v 8 तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, \q2 तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस, \q1 \v 9 असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्‍यांना द्यावा \q2 आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी, \q1 \v 10 तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये \q2 आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्‍याचे घर समृद्ध होऊ नये. \q1 \v 11 तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल \q2 तेव्हा तू दुःखाने विव्हळशील. \q1 \v 12 तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! \q2 माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली! \q1 \v 13 मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे \q2 किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे. \q1 \v 14 आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे \q2 गंभीर अडचणीत आलो.” \b \q1 \v 15 तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. \q2 तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी. \q1 \v 16 तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय, \q2 तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय? \q1 \v 17 ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, \q2 अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत. \q1 \v 18 तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; \q2 आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे. \q1 \v 19 प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— \q2 तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, \q2 तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस. \q1 \v 20 माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? \q2 आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस? \b \q1 \v 21 कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, \q2 आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात. \q1 \v 22 दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो; \q2 त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात. \q1 \v 23 कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल, \q2 आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील. \c 6 \s1 मूर्खपणाबाबत चेतावणी \q1 \v 1 माझ्या मुला, जर तू तुझ्या शेजार्‍याला जामीन राहिला आहेस, \q2 जर अनोळखी व्यक्तीचे कर्ज फेडण्यास तू वचनबद्ध झालास, \q1 \v 2 तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस, \q2 तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस. \q1 \v 3 म्हणून माझ्या मुला, स्वतःला सोडवून घेण्यासाठी तू असे कर, \q2 कारण तू तुझ्या शेजार्‍याच्या हाती सापडला आहेस: \q1 तर आता स्वतःला विनम्र करून त्याच्याकडे जा, \q2 आणि तुझ्या शेजार्‍याची झोप उडवून टाक! \q1 \v 4 तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस, \q2 तुझ्या पापण्यास डुलक्या घेऊ नयेत. \q1 \v 5 शिकार्‍याच्या हातातून निसटलेल्या हरिणासारखे, \q2 पारध्याच्या जाळ्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तू स्वतःला मुक्त कर. \b \q1 \v 6 अरे आळशा, मुंगीकडे जा; \q2 तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो! \q1 \v 7 तिला कोणीही अधिकारी, \q2 मुकादम किंवा अधिपती नाही, \q1 \v 8 तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते \q2 आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते. \b \q1 \v 9 परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील? \q2 तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस? \q1 \v 10 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी \q2 उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती— \q1 \v 11 आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल \q2 आणि हत्यारबंद मनुष्याप्रमाणे गरिबी येईल. \b \q1 \v 12 त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य, \q2 जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो, \q2 \v 13 तो आपले डोळे मिचकावितो, \q2 आपल्या पायांनी इशारे करतो, \q2 आणि आपल्या हाताच्या बोटांनी खुणावतो. \q2 \v 14 जो त्याच्या हृदयात फसवणुकीच्या दुष्ट योजना करतो— \q2 तो नेहमीच भांडणाला चेतावणी देतो. \q1 \v 15 म्हणून त्याच्यावर अचानक आपत्ती येईल; \q2 अकस्मात त्याचा नाश होईल, त्यावर कोणताही इलाज नसेल. \b \li1 \v 16 याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, \li2 त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो: \li3 \v 17 गर्विष्ठ नजर, \li3 खोटे बोलणारी जीभ, \li3 हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात, \li3 \v 18 हृदय, जे दुष्ट योजना करते \li3 पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात. \li3 \v 19 खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, \li3 आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो. \s1 व्यभिचाराविरुद्ध इशारा \q1 \v 20 माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ, \q2 आणि आपल्या आईचे शिक्षण सोडू नकोस. \q1 \v 21 त्यांचे उपदेश तू सतत आपल्या हृदयात बाळग; \q2 ते तुझ्या गळ्यात बांधून ठेव. \q1 \v 22 तू चालशील, तेव्हा ते तुला मार्ग दाखवेल; \q2 तू झोपशील, तेव्हा ते तुझे संरक्षण करतील; \q2 आणि तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलतील. \q1 \v 23 कारण ही आज्ञा एक दीपक आहे, \q2 आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; \q1 आणि ही सुधारणा व बोधवचने \q2 जीवनाचे मार्ग आहेत. \q1 \v 24 ते तुला तुझ्या शेजार्‍याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, \q2 वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात. \b \q1 \v 25 तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, \q2 किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस. \b \q1 \v 26 कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते, \q2 परंतु दुसर्‍या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते. \q1 \v 27 मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले, \q2 तर त्याची वस्त्रे जळून जाणार नाहीत काय? \q1 \v 28 मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास \q2 त्याचे पाय पोळणार नाहीत काय? \q1 \v 29 तो असा मनुष्य आहे जो दुसर्‍याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो; \q2 तिला स्पर्श करणार्‍या कोणाही मनुष्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. \b \q1 \v 30 भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो, \q2 त्याचा लोक तिरस्कार करीत नाहीत. \q1 \v 31 तरीही जर तो चोर सापडला जातो, तर त्याला सातपट भरपाई करावी लागते, \q2 त्याला त्याच्या घरातील सर्व संपत्ती विकावी लागते. \q1 \v 32 परंतु जो मनुष्य जारकर्म करतो त्याच्याकडे समज नसते; \q2 जो कोणी तसे करतो तो स्वतःचाच नाश करतो. \q1 \v 33 त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, \q2 आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही. \b \q1 \v 34 कारण मत्सर नवर्‍यास संतप्त करतो \q2 आणि जेव्हा तो सूड घेतो, तेव्हा तो दयामाया दाखविणार नाही. \q1 \v 35 तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही; \q2 कितीही मोठी लाच असली तरी ती तो घेण्यास नकार देईल. \c 7 \s1 व्यभिचारिणीपासून सावध राहणे \q1 \v 1 माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव, \q2 आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव. \q1 \v 2 माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील; \q2 तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर. \q1 \v 3 तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव; \q2 तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव. \q1 \v 4 “तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला, \q2 आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण. \q1 \v 5 म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील, \q2 वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील. \b \q1 \v 6 माझ्या घराच्या खिडकीच्या \q2 जाळीतून मी खाली पाहिले. \q1 \v 7 साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, \q2 तरुणांचे मी अवलोकन केले, \q2 तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला. \q1 \v 8 तो तिच्या रस्त्याच्या कोपर्‍याजवळून जात होता, \q2 सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता. \q1 \v 9 दिवसाच्या संधिप्रकाशात, \q2 संध्याकाळच्या अंधारात होता. \b \q1 \v 10 तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, \q2 तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती. \q1 \v 11 (ती बेशिस्त आणि उर्मट आहे, \q2 तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत; \q1 \v 12 आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे \q2 प्रत्येक कोपर्‍यावर ती लपून बसते.) \q1 \v 13 तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, \q2 आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली: \b \q1 \v 14 आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, \q2 आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे. \q1 \v 15 म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; \q2 मी तुला शोधले आणि तू मला सापडलास! \q1 \v 16 मी माझा पलंग इजिप्त येथील \q2 सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे. \q1 \v 17 ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी \q2 मी माझी शय्या सुवासिक केली आहे. \q1 \v 18 चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; \q2 आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ! \q1 \v 19 कारण माझे पती घरी नाहीत; \q2 ते दूर प्रवासाला गेले आहेत; \q1 \v 20 त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, \q2 आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत. \b \q1 \v 21 तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; \q2 गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले. \q1 \v 22 जसा बैल कापणार्‍याकडे जातो, \q2 तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, \q1 हरिण\f + \fr 7:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa मूर्ख\fqa*\f* जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते \q2 \v 23 तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, \q1 ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, \q2 त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे. \b \q1 \v 24 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, \q2 मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या. \q1 \v 25 तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका \q2 किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका. \q1 \v 26 कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे; \q2 होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे. \q1 \v 27 तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग, \q2 आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे. \c 8 \s1 सुज्ञानाची हाक \q1 \v 1 सुज्ञान हाक मारीत नाही काय? \q2 समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का? \q1 \v 2 रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर, \q2 जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते; \q1 \v 3 शहरात जाणार्‍या वेशीच्या बाजूला, \q2 प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते: \q1 \v 4 “अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते; \q2 सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते. \q1 \v 5 तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा; \q2 तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे\f + \fr 8:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमच्या मनांना ताकीद द्या\fqa*\f* लावा. \q1 \v 6 ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; \q2 योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते. \q1 \v 7 माझे मुख सत्य बोलते, \q2 कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात. \q1 \v 8 माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; \q2 त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत. \q1 \v 9 जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत; \q2 ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत. \q1 \v 10 चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, \q2 आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.” \q1 \v 11 कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे; \q2 तुला आवडणाऱ्या इतर कशाशीही तिची तुलना करता येणार नाही. \b \q1 \v 12 मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; \q2 ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत. \q1 \v 13 याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. \q2 गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, \q2 वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते. \q1 \v 14 सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत; \q2 माझ्याकडे अंतर्ज्ञान आणि शक्ती आहे. \q1 \v 15 माझ्याद्वारे राजे राज्य करतात, \q2 आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात; \q1 \v 16 माझ्याच साहाय्याने अधिपती, \q2 आणि थोर—पृथ्वीवरील सर्व नीतिमान शासक अधिकार चालवितात. \q1 \v 17 जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते, \q2 आणि जे माझा शोध घेतात त्यांना मी सापडते. \q1 \v 18 माझ्याजवळ समृद्धी आणि सन्मान, \q2 कायम टिकणारी संपत्ती आणि वैभव आहे. \q1 \v 19 माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे; \q2 आणि माझ्याद्वारे उत्पन्न झालेले उत्कृष्ट चांदीपेक्षा उत्तम आहे. \q1 \v 20 मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते, \q2 आणि न्याय्यमार्गाला धरून राहते, \q1 \v 21 माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते. \q2 आणि त्यांची भांडारे मी भरून टाकते. \b \q1 \v 22 याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये, \q2 त्यांच्या पुरातन कार्यापूर्वी सर्वप्रथम माझी रचना केली; \q1 \v 23 अनादिकालापासून माझी रचना केलेली होती. \q2 जेव्हा जग अस्तित्वात आले तेव्हाच. \q1 \v 24 जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता, \q2 तेव्हा ओसांडून वाहणारे झर्‍यांचे पाणीही नव्हते; \q1 \v 25 पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते, \q2 डोंगर निर्माण होण्यापूर्वी माझा जन्म झाला होता, \q1 \v 26 त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती \q2 किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी, \q1 \v 27 त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, \q2 जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते, \q1 \v 28 जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली \q2 आणि पृथ्वीगर्भातील झर्‍यांना घट्ट बसविले, \q1 \v 29 जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या, \q2 जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. \q1 जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला, \q2 \v 30 तेव्हा मी सतत\f + \fr 8:30 \fr*\ft किंवा \ft*\fqa लहान मूल होते\fqa*\f* त्यांच्याभोवती होते; \q1 दिवसेंदिवस मी आनंदाने भरून गेले होते. \q2 नेहमी त्यांच्या उपस्थितीचा आनंद मी घेत होते, \q1 \v 31 त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे \q2 आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे. \b \q1 \v 32 “आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका, \q2 कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात. \q1 \v 33 माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा; \q2 त्याचा अव्हेर करू नका. \q1 \v 34 जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत, \q2 ते रोज माझ्या दारांवर लक्ष ठेऊन, \q2 माझ्या दारावर प्रतीक्षा करतात. \q1 \v 35 कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, \q2 आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते. \q1 \v 36 परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात; \q2 जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.” \c 9 \s1 सुज्ञानाचे आणि मूर्खपणाचे आमंत्रण \q1 \v 1 सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; \q2 तिने तिचे सात खांब तयार केले आहेत. \q1 \v 2 तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; \q2 तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे. \q1 \v 3 तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती \q2 नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते, \q2 \v 4 “जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” \q1 जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, \q2 \v 5 “इकडे या, माझे भोजन खा \q2 आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या. \q1 \v 6 तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; \q2 अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.” \b \q1 \v 7 जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; \q2 जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात. \q1 \v 8 टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, \q2 सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील. \q1 \v 9 सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील; \q2 नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील. \b \q1 \v 10 याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, \q2 आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय. \q1 \v 11 कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, \q2 आणि तू उदंड आयुष्य जगशील. \q1 \v 12 जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; \q2 जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील. \b \q1 \v 13 मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; \q2 ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही. \q1 \v 14 ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, \q2 तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते. \q1 \v 15 तिच्याजवळून जाणाऱ्या, \q2 जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते, \q2 \v 16 “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” \q1 जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, \q2 \v 17 “चोरलेले पाणी गोड लागते; \q2 गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!” \q1 \v 18 परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, \q2 आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत. \c 10 \ms1 शलोमोनाची नीतिसूत्रे \p \v 1 शलोमोनाची नीतिसूत्रे: \q1 शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो, \q2 परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो. \b \q1 \v 2 दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते \q2 परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. \b \q1 \v 3 याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, \q2 परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात. \b \q1 \v 4 आळशी हात दरिद्री आणतो, \q2 परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो. \b \q1 \v 5 जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय; \q2 परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो. \b \q1 \v 6 आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत, \q2 परंतु दुष्ट मनुष्याच्या मुखात हिंसाचार दडलेला असतो. \b \q1 \v 7 आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात,\f + \fr 10:7 \fr*\ft पहा \+xt उत्प 48:20\+xt*.\ft*\f* \q2 परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते. \b \q1 \v 8 सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो, \q2 परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो. \b \q1 \v 9 सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो, \q2 परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल. \b \q1 \v 10 जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो, \q2 परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो. \b \q1 \v 11 नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे, \q2 परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे. \b \q1 \v 12 द्वेष कलहास चेतावणी देतो; \q2 परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते. \b \q1 \v 13 बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते, \q2 परंतु विवेकहीन माणसाच्या पाठीला काठीच योग्य ठरते. \b \q1 \v 14 सुज्ञ ज्ञानाचा साठा करतात, \q2 परंतु मूर्खाचे तोंड नाश ओढवून घेते. \b \q1 \v 15 धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे, \q2 दारिद्र्य गरिबाचा नाश आहे. \b \q1 \v 16 नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे, \q2 परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत. \b \q1 \v 17 जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो \q2 परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो. \b \q1 \v 18 जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, \q2 आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय. \b \q1 \v 19 शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो; \q2 पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात. \b \q1 \v 20 नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते; \q2 परंतु दुष्टाच्या अंतःकरणास क्षुल्लक किंमत असते. \b \q1 \v 21 नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात; \q2 परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात. \b \q1 \v 22 याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते, \q2 त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत. \b \q1 \v 23 दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते, \q2 परंतु सुज्ञ मनुष्य सुज्ञानात आनंदित होतो. \b \q1 \v 24 दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; \q2 नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील. \b \q1 \v 25 वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो, \q2 परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो. \b \q1 \v 26 जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास, \q2 तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे. \b \q1 \v 27 याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते, \q2 परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील. \b \q1 \v 28 नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते, \q2 परंतु दुष्टाची आशा फोल ठरते. \b \q1 \v 29 याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, \q2 परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे. \b \q1 \v 30 नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत, \q2 परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत. \b \q1 \v 31 धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते; \q2 परंतु विकृत जिभेला शांत केले जाईल. \b \q1 \v 32 नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते, \q2 परंतु दुष्ट लोकांचे मुख फक्त विकृतीच जाणते. \b \c 11 \q1 \v 1 खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, \q2 परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो. \b \q1 \v 2 जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, \q2 परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते. \b \q1 \v 3 नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, \q2 परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो. \b \q1 \v 4 प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, \q2 परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते. \b \q1 \v 5 निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, \q2 परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात. \b \q1 \v 6 नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, \q2 परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात. \b \q1 \v 7 मर्त्य मानवांच्या\f + \fr 11:7 \fr*\fq मर्त्य मानवांच्या \fq*\ft किंवा \ft*\fqa दुष्ट माणसांच्या\fqa*\f* मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, \q2 त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने\f + \fr 11:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्यावर त्यांनी आशा ठेवली\fqa*\f* निष्फळ होतात. \b \q1 \v 8 नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, \q2 आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो. \b \q1 \v 9 भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्‍याचा नाश होतो, \q2 परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते. \b \q1 \v 10 जेव्हा नीतिमानांना यश मिळते, तेव्हा नगर आनंदित होते; \q2 जेव्हा दुष्टांचा नाश होतो, तेव्हा जयघोषाचा निनाद होतो. \b \q1 \v 11 नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते, \q2 परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो. \b \q1 \v 12 विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्‍याची निंदा करतो; \q2 परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो. \b \q1 \v 13 चहाडी करण्याने विश्वासघात होतो, \q2 परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही. \b \q1 \v 14 मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, \q2 परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो. \b \q1 \v 15 अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते, \q2 परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो. \b \q1 \v 16 दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते, \q2 परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो. \b \q1 \v 17 दयाळू मनुष्य स्वतःचे भले करतो, \q2 परंतु क्रूर माणसे स्वतःवर नाश ओढवून घेतात. \b \q1 \v 18 दुष्ट मनुष्याला मिळणारे वेतन फसवे असते; \q2 परंतु जो नीतिमत्तेचे बीज पेरतो त्याला निश्चितच बक्षीस मिळते. \b \q1 \v 19 खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते, \q2 परंतु दुष्कर्मांच्या मागे लागणारा मृत्यू ओढवून घेतो. \b \q1 \v 20 याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात, \q2 परंतु निर्दोष मार्गाने चालणारे त्यांना प्रसन्न करतात. \b \q1 \v 21 याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, \q2 परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल. \b \q1 \v 22 विवेकहीन सुंदर स्त्री जणू \q2 डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी. \b \q1 \v 23 नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो, \q2 परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते. \b \q1 \v 24 एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, \q2 दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो. \b \q1 \v 25 उदार मनुष्याची समृद्ध होईल; \q2 आणि जो दुसर्‍याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल. \b \q1 \v 26 जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात, \q2 परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात. \b \q1 \v 27 जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते, \q2 परंतु जो वाईटाचा शोध घेतो त्याला तेच प्राप्त होते. \b \q1 \v 28 जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, \q2 परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल. \b \q1 \v 29 जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा\f + \fr 11:29 \fr*\ft किंवा \ft*\fqa काहीच नाही\fqa*\f* मिळेल, \q2 आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल. \b \q1 \v 30 नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, \q2 आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो. \b \q1 \v 31 जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते, \q2 तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल! \b \c 12 \q1 \v 1 जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, \q2 परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय. \b \q1 \v 2 नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, \q2 पण दुष्ट योजना रचणार्‍या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात. \b \q1 \v 3 दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, \q2 परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही. \b \q1 \v 4 सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, \q2 परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे. \b \q1 \v 5 नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, \q2 परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो. \b \q1 \v 6 दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात \q2 परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते. \b \q1 \v 7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, \q2 परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते. \b \q1 \v 8 मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, \q2 परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो. \b \q1 \v 9 स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा \q2 सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे. \b \q1 \v 10 नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो, \q2 परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात. \b \q1 \v 11 जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, \q2 परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात, तो अक्कलशून्य असतात. \b \q1 \v 12 दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो, \q2 परंतु नीतिमानाचे मूळ टिकून राहते. \b \q1 \v 13 दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, \q2 आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो. \b \q1 \v 14 ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात, \q2 आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात. \b \q1 \v 15 मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; \q2 परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो. \b \q1 \v 16 मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, \q2 परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो. \b \q1 \v 17 प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, \q2 परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो. \b \q1 \v 18 निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, \q2 पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते. \b \q1 \v 19 सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते; \q2 लबाड जिव्हा ही क्षणिक आहे. \b \q1 \v 20 दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते, \q2 पण शांतीची मसलत देणार्‍यांच्या हृदयात आनंद असतो. \b \q1 \v 21 न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही, \q2 परंतु दुष्ट लोक आपत्तींनी व्याप्त होतात. \b \q1 \v 22 असत्य बोलणार्‍या ओठांची याहवेह घृणा करतात, \q2 परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात. \b \q1 \v 23 सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, \q2 परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात. \b \q1 \v 24 उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील, \q2 पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल. \b \q1 \v 25 चिंता हृदयावर दबाव आणते, \q2 परंतु कोमल शब्द ते आनंदित करते. \b \q1 \v 26 नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, \q2 परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो. \b \q1 \v 27 आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, \q2 परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते. \b \q1 \v 28 नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो, \q2 व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते. \b \c 13 \q1 \v 1 सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, \q2 परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही. \b \q1 \v 2 मनुष्याला आपल्या मुखफळांनी उत्तम वस्तू प्राप्त होतील, \q2 परंतु कपटी माणसांना हिंसाचाराची भूक लागते. \b \q1 \v 3 जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो, \q2 परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो. \b \q1 \v 4 आळशी मनुष्याची भूक कधीही मिटत नाही, \q2 परंतु परिश्रमी मनुष्याच्या इच्छांचे पूर्णपणे समाधान केले जाते. \b \q1 \v 5 नीतिमान मनुष्य असत्याचा तिरस्कार करतो, \q2 परंतु दुष्ट मनुष्य स्वतःस दुर्गंधपूर्ण करतो \q2 आणि आपली बेअब्रू करून घेतो. \b \q1 \v 6 नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, \q2 परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते. \b \q1 \v 7 एखादी व्यक्ती श्रीमंतीचा दिखावा करते, परंतु त्याच्याकडे काहीच नसते; \q2 दुसरा एकजण गरीब असल्याचा दिखावा करतो, परंतु त्याच्याकडे खूप संपत्ती असते. \b \q1 \v 8 मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल, \q2 परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही. \b \q1 \v 9 नीतिमानाचा प्रकाश तेजाने चकाकतो, \q2 परंतु दुष्टांची ज्योत विझवली जाते. \b \q1 \v 10 जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, \q2 परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते. \b \q1 \v 11 कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो, \q2 पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो. \b \q1 \v 12 आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते, \q2 परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते. \b \q1 \v 13 जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल, \q2 पण जो आज्ञेचा मान राखतो, त्याला चांगले प्रतिफळ मिळेल. \b \q1 \v 14 सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे. \q2 तो मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवितो. \b \q1 \v 15 उत्तम बोधामुळे अनुकूलता मिळते, \q2 परंतु विश्वासहीनांचे मार्ग त्यांना नाशाकडे नेतात. \b \q1 \v 16 जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने\f + \fr 13:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa स्वतःचे रक्षण करतो\fqa*\f* वागतात, \q2 परंतु मूर्ख माणसे त्यांचा मूर्खपणा उघड करतात. \b \q1 \v 17 दुष्ट निरोप्या संकटात पडतो, \q2 परंतु विश्वासू राजदूत आरोग्य आणतो. \b \q1 \v 18 जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, \q2 पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल. \b \q1 \v 19 अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते, \q2 परंतु मूर्ख वाईटापासून वळण्याचा तिरस्कार करतात. \b \q1 \v 20 सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो, \q2 कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते. \b \q1 \v 21 अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते, \q2 परंतु नीतिमानांना कल्याण हे प्रतिफळ मिळेल. \b \q1 \v 22 चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो, \q2 परंतु पापी मनुष्याने साठविलेले धन नीतिमानांसाठी असते. \b \q1 \v 23 विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते; \q2 परंतु अन्याय ते हिरावून नेते. \b \q1 \v 24 जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात, \q2 परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात. \b \q1 \v 25 नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो, \q2 परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते. \b \c 14 \q1 \v 1 सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, \q2 परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते. \b \q1 \v 2 जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, \q2 परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो. \b \q1 \v 3 मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, \q2 पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात. \b \q1 \v 4 जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो, \q2 परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो. \b \q1 \v 5 खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही, \q2 परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात. \b \q1 \v 6 टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही, \q2 परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते. \b \q1 \v 7 मूर्खापासून दूर राहा; \q2 त्यांच्या बोलण्यातून तुला ज्ञान मिळणार नाही. \b \q1 \v 8 सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, \q2 पण मूर्खाची मूर्खता धोका आहे. \b \q1 \v 9 मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, \q2 परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात. \b \q1 \v 10 प्रत्येक अंतःकरणाला स्वतःचे दुःख माहीत असते; \q2 आणि इतर कोणीही त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही. \b \q1 \v 11 दुष्टांचे घर नाश केले जाईल, \q2 परंतु नीतिमानाचा तंबू समृद्ध होईल. \b \q1 \v 12 एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; \q2 परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो. \b \q1 \v 13 हसत असतानाही हृदयात वेदना असू शकते, \q2 उल्हासाचा अंत दुःखातही होऊ शकतो. \b \q1 \v 14 विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील, \q2 तसेच चांगल्या माणसांना त्यांच्या चांगुलपणाची. \b \q1 \v 15 साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. \q2 परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो. \b \q1 \v 16 सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो. \q2 परंतु मूर्ख तापट डोक्याचा आहे आणि तरीही त्याला सुरक्षित वाटते. \b \q1 \v 17 तापट मनुष्य मूर्खपणाच्या गोष्टी करतो, \q2 आणि दुष्टसंकल्पांची योजना करणाऱ्याचा तिरस्कार केला जाईल. \b \q1 \v 18 साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो, \q2 तर सुज्ञाला सुज्ञतेचा मुकुट मिळतो. \b \q1 \v 19 दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर, \q2 आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील. \b \q1 \v 20 गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात, \q2 परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात. \b \q1 \v 21 शेजार्‍यांचा द्वेष करणे पाप आहे; \q2 परंतु जे गरजवंतावर दया करतात ते धन्य! \b \q1 \v 22 वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? \q2 परंतु चांगल्या योजना करणार्‍यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो. \b \q1 \v 23 सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो, \q2 पण व्यर्थ बडबड भिकेला लावते. \b \q1 \v 24 सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो, \q2 परंतु मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच उत्पन्न करते. \b \q1 \v 25 सत्य सांगणारा साक्षीदार प्राण वाचवितो, \q2 परंतु खोटा साक्षीदार विश्वासघातकी आहे. \b \q1 \v 26 याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, \q2 आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते. \b \q1 \v 27 याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, \q2 ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते. \b \q1 \v 28 वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे; \q2 पण लोकच नसले तर अधिपती नष्ट होतो! \b \q1 \v 29 जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे; \q2 पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो. \b \q1 \v 30 शांत हृदय शरीर निरोगी ठेवते; \q2 परंतु ईर्षा हाडे कुजविते. \b \q1 \v 31 गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो; \q2 पण ज्यांना गरजवंताची दया येते, ते परमेश्वराचा सन्मान करतात. \b \q1 \v 32 नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. \q2 पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात. \b \q1 \v 33 सुज्ञता विवेकी माणसाच्या हृदयास विश्रांती आणते; \q2 पण मूर्खासही ती स्वतःची ओळख करून देते.\f + \fr 14:33 \fr*\ft किंवा \ft*\fqa परंतु मूर्खाचे अंतःकरण तिला ओळखत नाही\fqa*\f* \b \q1 \v 34 नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते. \q2 पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते. \b \q1 \v 35 सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो, \q2 परंतु निर्लज्ज सेवक राजास क्रोधिष्ट करतो. \b \c 15 \q1 \v 1 कोमल उत्तराने राग शांत होतो, \q2 परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात. \b \q1 \v 2 सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते, \q2 परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते. \b \q1 \v 3 याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, \q2 सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते. \b \q1 \v 4 सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, \q2 पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते. \b \q1 \v 5 मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, \q2 पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो. \b \q1 \v 6 नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, \q2 परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते. \b \q1 \v 7 सुज्ञ व्यक्तीचे मुख ज्ञान पसरवितात, \q2 पण मूर्खांचे ह्रदय सरळ नसते. \b \q1 \v 8 याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, \q2 पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते. \b \q1 \v 9 दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, \q2 पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात. \b \q1 \v 10 जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; \q2 आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील. \b \q1 \v 11 मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत— \q2 त्याअर्थी त्यांना मानवी हृदयाचे ज्ञान कितीतरी अधिक असेल! \b \q1 \v 12 उपहास करणार्‍यांना सुधारणेचा राग येतो, \q2 म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात. \b \q1 \v 13 आनंदी मन चेहरा उल्हासित करते, \q2 आणि शोकाकुल हृदयाने आत्मा खिन्न होतो. \b \q1 \v 14 सुज्ञ अंतःकरण ज्ञानाचा माग घेते, \q2 परंतु मूर्खाच्या मुखाचे मूर्खतेनेच पोषण होते. \b \q1 \v 15 पीडित मनुष्याचे सर्व दिवस क्लेशपूर्ण असतात, \q2 परंतु आनंदी अंतःकरणासाठी सर्व दिवस उत्सवाचे असतात. \b \q1 \v 16 अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, \q2 यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे. \b \q1 \v 17 तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा \q2 प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे. \b \q1 \v 18 तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, \q2 तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो. \b \q1 \v 19 आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात, \q2 परंतु नीतिमानाची वाट राजमार्ग असतो. \b \q1 \v 20 समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, \q2 परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो. \b \q1 \v 21 मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो, \q2 पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो. \b \q1 \v 22 उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; \q2 परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात. \b \q1 \v 23 समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो— \q2 योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे! \b \q1 \v 24 सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो \q2 तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो. \b \q1 \v 25 गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, \q2 परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात. \b \q1 \v 26 दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, \q2 परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात. \b \q1 \v 27 लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, \q2 परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल. \b \q1 \v 28 नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, \q2 परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो. \b \q1 \v 29 याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, \q2 पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात. \b \q1 \v 30 निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते, \q2 आणि शुभवार्ता हाडांना आरोग्य देते. \b \q1 \v 31 जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, \q2 तो सुज्ञांसह वास करेल. \b \q1 \v 32 जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात, \q2 परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो. \b \q1 \v 33 याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, \q2 आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते. \b \c 16 \q1 \v 1 अंतःकरणाच्या योजना मानव करतो, \q2 परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते. \b \q1 \v 2 मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, \q2 परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात. \b \q1 \v 3 तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, \q2 आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील. \b \q1 \v 4 याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात. \q2 दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे. \b \q1 \v 5 याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. \q2 याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. \b \q1 \v 6 दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते; \q2 आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते. \b \q1 \v 7 जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, \q2 तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात. \b \q1 \v 8 अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा \q2 प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे. \b \q1 \v 9 मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात \q2 परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात. \b \q1 \v 10 राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत, \q2 आणि त्याचे मुख न्याय-विसंगति करीत नाही. \b \q1 \v 11 प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत \q2 पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत. \b \q1 \v 12 राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो; \q2 कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते. \b \q1 \v 13 प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात; \q2 जे योग्य ते बोलतात त्याच्यावर ते प्रीती करतात. \b \q1 \v 14 राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत, \q2 परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल. \b \q1 \v 15 जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे; \q2 त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे. \b \q1 \v 16 सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे, \q2 आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे! \b \q1 \v 17 सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो; \q2 जे त्यांच्या मार्गांचे रक्षण करतात, त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते. \b \q1 \v 18 नाशापूर्वी गर्व \q2 आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते. \b \q1 \v 19 गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा \q2 दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. \b \q1 \v 20 जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते,\f + \fr 16:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa जे उत्तम ते त्यांना मिळते\fqa*\f* \q2 आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो. \b \q1 \v 21 सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते, \q2 आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन\f + \fr 16:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa चालू ठेवते\fqa*\f* मिळते. \b \q1 \v 22 सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; \q2 पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते. \b \q1 \v 23 शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते, \q2 आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते. \b \q1 \v 24 मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; \q2 ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात. \b \q1 \v 25 एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; \q2 परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो. \b \q1 \v 26 परिश्रम करणार्‍यांना भूक लागणे योग्य; \q2 भूक भागविण्यासाठी त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते. \b \q1 \v 27 अधम वाईट योजना करतो, \q2 आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते. \b \q1 \v 28 विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, \q2 आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते. \b \q1 \v 29 हिंसा करणारा आपल्या शेजार्‍याला मोहात पाडतो \q2 आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो. \b \q1 \v 30 जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो; \q2 जो कोणी त्याचे ओठ चावतो, तो वाईट प्रवृत्तीचा आहे. \b \q1 \v 31 पांढरे केस गौरवी मुकुट आहे; \q2 नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो. \b \q1 \v 32 योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, \q2 शहर जिंकून घेणार्‍यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम. \b \q1 \v 33 आपण पदरात नाणेफेक करतो, \q2 पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो. \b \c 17 \q1 \v 1 कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा \q2 शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे. \b \q1 \v 2 सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, \q2 आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील. \b \q1 \v 3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, \q2 परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात. \b \q1 \v 4 दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्‍याचे भाषण ऐकतो; \q2 लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो. \b \q1 \v 5 जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो; \q2 जो दुसर्‍यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. \b \q1 \v 6 वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत; \q2 आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत. \b \q1 \v 7 वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही— \q2 राजाने खोटे बोलणे कितीतरी अशोभनीय आहे! \b \q1 \v 8 लाच देणार्‍या माणसासाठी ती जादूच्या रत्नासारखी आहे; \q2 त्यांना वाटते की त्याने त्यांची कामे यशस्वी होतील. \b \q1 \v 9 जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; \q2 परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात. \b \q1 \v 10 मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा \q2 विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो. \b \q1 \v 11 वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात; \q2 मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल. \b \q1 \v 12 जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल, \q2 परंतु मूर्खपणाचा अट्टाहास करणाऱ्या मूर्खाची भेट नको. \b \q1 \v 13 जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, \q2 त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही. \b \q1 \v 14 भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; \q2 म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे. \b \q1 \v 15 दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— \q2 अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात. \b \q1 \v 16 जर ते समजू शकत नाहीत \q2 तर ज्ञानवर्धनासाठी मूर्खाच्या हातात पैसे का असावेत? \b \q1 \v 17 खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; \q2 आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो. \b \q1 \v 18 जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्‍याच्या कर्जफेडीची हमी घेतो, \q2 तो विवेकहीन मनुष्य आहे. \b \q1 \v 19 जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; \q2 जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो. \b \q1 \v 20 ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही; \q2 ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो. \b \q1 \v 21 जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो, \q2 आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही. \b \q1 \v 22 आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, \q2 पण खिन्न मन हाडे शुष्क करते. \b \q1 \v 23 न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी, \q2 दुष्ट मनुष्य गुप्त रीतीने लाच घेतो. \b \q1 \v 24 समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते, \q2 पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते. \b \q1 \v 25 मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, \q2 आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो. \b \q1 \v 26 निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे, \q2 तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे. \b \q1 \v 27 ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, \q2 आणि समंजस शांत स्वभावाचा असतो. \b \q1 \v 28 जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, \q2 आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात. \b \c 18 \q1 \v 1 मैत्रीहीन मनुष्य शेवटी स्वार्थ साधून घेतो \q2 आणि सर्व यथार्थ न्यायाविरुद्ध जाऊन भांडणे सुरू करतो. \b \q1 \v 2 मूर्ख समंजसपणामध्ये संतोष मानत नाहीत; \q2 परंतु स्वतःची मते प्रकट करण्यात आनंद करतात. \b \q1 \v 3 जेव्हा दुष्टता येते तिथे तिरस्कार येतो, \q2 आणि निर्ल्लजपणाबरोबर निंदा येते. \b \q1 \v 4 तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत; \q2 परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे. \b \q1 \v 5 न्यायाधीशाने दुष्टावर कृपा करणे \q2 आणि निरपराध्याला न्यायापासून वंचित करणे चुकीचे आहे. \b \q1 \v 6 मूर्खांच्या जिभा त्यांना कलहात पाडतात; \q2 आणि त्यांचे मुख माराला आमंत्रण देते. \b \q1 \v 7 मूर्खाचे मुख त्यांच्या विनाशाचे कारण होते, \q2 आणि त्यांच्या जिभेमुळे त्यांचे जीव सापळ्यात अडकतात. \b \q1 \v 8 अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; \q2 अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. \b \q1 \v 9 जो त्याचे काम करण्यात आळशी आहे, \q2 तो विध्वंस करणार्‍याचा भाऊ आहे. \b \q1 \v 10 याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; \q2 नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात. \b \q1 \v 11 धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे; \q2 ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत. \b \q1 \v 12 मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, \q2 परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते. \b \q1 \v 13 ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे— \q2 ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे. \b \q1 \v 14 मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो, \q2 पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो? \b \q1 \v 15 विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते. \q2 सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात. \b \q1 \v 16 उपहार तो देणार्‍याचा मार्ग मोकळा करते, \q2 तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल! \b \q1 \v 17 दुसरा कोणीतरी पुढे येऊन पक्ष मांडत नाही, \q2 तोपर्यंत न्यायालयात प्रथम बोलणार्‍याची बाजू योग्य वाटते. \b \q1 \v 18 नाणेफेक करून भांडण मिटवता येते, \q2 आणि प्रबळ प्रतिस्पर्ध्यांला दूर ठेवता येते. \b \q1 \v 19 चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. \q2 वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे. \b \q1 \v 20 त्यांच्या मुखफळाने मनुष्याचे पोट भरले जाते; \q2 त्यांच्या ओठांनी केलेल्या उत्पन्नामुळे त्यांचे समाधान होते. \b \q1 \v 21 जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. \q2 आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते. \b \q1 \v 22 ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. \q2 ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे. \b \q1 \v 23 गरीब दयेसाठी विनवण्या करतो \q2 आणि श्रीमंत त्याला क्रूरतेने उत्तर देतो. \b \q1 \v 24 ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, \q2 पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो. \b \c 19 \q1 \v 1 विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा, \q2 निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे. \b \q1 \v 2 योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही— \q2 घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात! \b \q1 \v 3 मनुष्य स्वतःच्याच मूर्खपणाने आपल्या नाशाकडे जातो, \q2 तरीही त्याचे हृदय याहवेहविरुद्ध संतापते. \b \q1 \v 4 संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते, \q2 परंतु अगदी जवळचा मित्रही गरिबाला सोडून जातो. \b \q1 \v 5 खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. \q2 आणि खोटे शब्द ओतणार्‍याची सुटका होणार नाही. \b \q1 \v 6 शासनकर्त्याची कृपा लाभावी म्हणून अनेकजण त्याचे स्तुतिपाठक बनतात, \q2 आणि प्रत्येकजण देणग्या देणाऱ्याचा मित्र असतो. \b \q1 \v 7 गरीब माणसांचे सर्व नातेवाईक त्याला टाळतात— \q2 तर त्याचे मित्र त्याला किती बरे टाळतील! \q1 गरीब मनुष्य गयावया करून कितीही त्यांच्यामागे गेला \q2 तरी ते कुठेही सापडत नाहीत. \b \q1 \v 8 जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो; \q2 आणि जो समंजसपणाची आवड धरतो, तो लवकर समृद्ध होतो. \b \q1 \v 9 खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, \q2 आणि खोटे शब्द ओतणार्‍याचा नाश होईल. \b \q1 \v 10 मूर्खाने ऐषारामात राहणे उचित नाही— \q2 तसेच गुलामाने राजपुत्रावर अधिकार गाजविणे योग्य नाही! \b \q1 \v 11 मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; \q2 आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते. \b \q1 \v 12 राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा असतो, \q2 परंतु त्याची कृपादृष्टी गवतावरील दवबिंदूसारखी असते. \b \q1 \v 13 मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. \q2 आणि भांडखोर पत्नी ही \q2 सतत ठिबकणार्‍या गळक्या छप्परासारखी आहे. \b \q1 \v 14 पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, \q2 परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते. \b \q1 \v 15 आळस मनुष्याला गाढ झोप आणतो \q2 आणि लक्ष्यहीन मनुष्य उपाशी राहतो. \b \q1 \v 16 जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात, \q2 परंतु जे आपल्या वर्तनाविषयी निष्काळजी असतात, ते मृत्युमुखी पडतात. \b \q1 \v 17 जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो, \q2 आणि त्यांच्या सत्कृत्याबद्दल याहवेह परतफेड करतील. \b \q1 \v 18 तुझ्या मुलांना शिस्त वेळेवर लाव, कारण त्यातच आशा आहे; \q2 परंतु शिस्त मर्यादे पलीकडे जाऊ नये, जेणेकरून त्यात त्याला मृत्युच येईल. \b \q1 \v 19 तापट मनुष्याला त्याच्या कृतीची शिक्षा भोगावीच लागते; \q2 त्यांना सोडविलेस, तर तुम्हाला पुन्हा तेच करावे लागेल. \b \q1 \v 20 बोध ऐका आणि शिक्षण स्वीकारा \q2 आणि शेवटी तुमची गणना सुज्ञ्यांमध्ये होईल. \b \q1 \v 21 मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, \q2 पण याहवेहची योजनाच यशस्वी होते. \b \q1 \v 22 मनुष्य इच्छा बाळगतो की त्याला अतूट प्रेम मिळावे\f + \fr 19:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa हाव मनुष्याची लज्जा आहे\fqa*\f*; \q2 लबाडी करण्यापेक्षा गरीब राहणे बरे. \b \q1 \v 23 याहवेहच्या भयाने जीवनप्राप्ती होते; \q2 तेव्हा अरिष्टाचा स्पर्शही न होता, एखादा समाधानाने विश्रांती घेतो. \b \q1 \v 24 आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; \q2 तो हात पुन्हा तोंडापर्यंत आणत नाही! \b \q1 \v 25 निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल; \q2 सुज्ञांना फटकारणी करा, म्हणजे ते अधिक सुज्ञ होतील. \b \q1 \v 26 जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात, \q2 ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते. \b \q1 \v 27 माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस, \q2 तर ज्ञानाच्या वचनापासून तू दूर जाशील. \b \q1 \v 28 भ्रष्ट साक्षीदार न्यायाची अवहेलना करतात; \q2 दुष्टांचे मुख दुष्टता गिळून टाकतात. \b \q1 \v 29 निंदकांसाठी शिक्षा \q2 आणि मूर्खांची पाठ फटक्यांसाठी निर्धारित केली आहे. \b \c 20 \q1 \v 1 मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; \q2 तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत. \b \q1 \v 2 राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे; \q2 जो त्याचा राग जागृत करतो त्याची प्राणहानी होते. \b \q1 \v 3 कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, \q2 परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो. \b \q1 \v 4 आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत; \q2 म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही. \b \q1 \v 5 मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, \q2 परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो. \b \q1 \v 6 पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, \q2 परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल? \b \q1 \v 7 नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो; \q2 त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात. \b \q1 \v 8 जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो \q2 तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो. \b \q1 \v 9 “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, \q2 मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल? \b \q1 \v 10 वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— \q2 या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे. \b \q1 \v 11 अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत \q2 ते त्यांच्या कृत्यांवरून ओळखली जात नाहीत काय? \b \q1 \v 12 पाहणारे डोळे व ऐकणारे कान— \q2 दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे. \b \q1 \v 13 तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील; \q2 जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील. \b \q1 \v 14 खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” \q2 नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो. \b \q1 \v 15 सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत, \q2 परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे. \b \q1 \v 16 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; \q2 जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे. \b \q1 \v 17 फसवणूक करून मिळविलेले अन्न स्वादिष्ट लागते, \q2 परंतु त्याचे मुख शेवटी खड्यांनी भरून जाईल. \b \q1 \v 18 सल्ला घेऊन योजना स्थापल्या जातात; \q2 म्हणून युद्ध करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन मिळव. \b \q1 \v 19 चहाड्या करणारा विश्वासघात करतो; \q2 म्हणून अतिशय बोलणार्‍यापासून दूर राहावे. \b \q1 \v 20 जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो, \q2 त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल. \b \q1 \v 21 वारसासंपत्तीसाठी उतावळेपणे समयापूर्व केलेला दावा \q2 शेवटपर्यंत आशीर्वादित राहत नाही. \b \q1 \v 22 “वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. \q2 याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील. \b \q1 \v 23 वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे \q2 आणि अप्रामाणिक वजनकाटे त्यांना प्रसन्न करीत नाहीत. \b \q1 \v 24 याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. \q2 तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल? \b \q1 \v 25 विचार न करता घाईघाईने समर्पण करणे \q2 आणि नंतर दिलेल्या शपथांचा विचार करणे, मनुष्यासाठी हा एक सापळा आहे. \b \q1 \v 26 सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो; \q2 तो मळणीचे चक्र त्यांच्यावर फिरवितो. \b \q1 \v 27 मनुष्याचा आत्मा\f + \fr 20:27 \fr*\ft किंवा \ft*\fqa शब्द\fqa*\f* याहवेहचा दीप आहे. \q2 तो मनुष्याच्या अंतःकरणावर प्रकाश टाकतो. \b \q1 \v 28 प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते; \q2 तर प्रीतीद्वारे त्याचे सिंहासन सुरक्षित केले जाते. \b \q1 \v 29 तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे. \q2 वृद्धांचे भूषण त्यांचे पांढरे केस आहेत. \b \q1 \v 30 बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते, \q2 आणि बसलेल्या फटक्यांनी अंतःकरण शुद्ध होते. \b \c 21 \q1 \v 1 याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, \q2 जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात. \b \q1 \v 2 माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, \q2 परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात. \b \q1 \v 3 अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व \q2 रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो. \b \q1 \v 4 गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण— \q2 दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात. \b \q1 \v 5 कष्ट करणार्‍यांच्या योजना भरभराटीस येतात, \q2 पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल. \b \q1 \v 6 लबाड बोलून मिळवलेली संपत्ती, \q2 म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे. \b \q1 \v 7 दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, \q2 कारण चांगले करण्यास ते नकार देतात. \b \q1 \v 8 दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, \q2 परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते. \b \q1 \v 9 भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा \q2 छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे. \b \q1 \v 10 दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात; \q2 आणि त्यांच्या शेजार्‍यांवर ते कधीही दया करीत नाहीत. \b \q1 \v 11 जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो; \q2 शहाण्या माणसांचे ऐकून ते ज्ञान मिळवितात. \b \q1 \v 12 नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात \q2 आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात. \b \q1 \v 13 जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, \q2 ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही. \b \q1 \v 14 गुप्तपणे दिलेले बक्षीस राग शांत करते; \q2 झग्यात लपवून दिलेला उपहार तीव्र क्रोध शांत करते. \b \q1 \v 15 जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो. \q2 पण दुष्ट कृत्ये करणार्‍यांना ते प्राणसंकटच वाटते. \b \q1 \v 16 शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य \q2 मृतांच्या मंडळीत विश्रांतीसाठी येतो. \b \q1 \v 17 भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; \q2 मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही. \b \q1 \v 18 दुष्ट नीतिमानांसाठी, \q2 आणि विश्वासघातकी सरळ लोकांसाठी खंडणी असतो. \b \q1 \v 19 भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्‍या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा \q2 वाळवंटात राहिलेले बरे! \b \q1 \v 20 शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो, \q2 पण मूर्ख मिळेल ते सर्व गिळून टाकतो. \b \q1 \v 21 जो कोणी नीतिमत्व आणि प्रीती मिळविण्याचा प्रयत्न करतो, \q2 त्याला जीवन, समृद्धी व सन्मान यांचा लाभ होतो. \b \q1 \v 22 सुज्ञ मनुष्य बलवानाच्या शहराविरुद्ध जाऊ शकतो \q2 आणि ज्या किल्ल्यावर ते भरवसा ठेवतात ते तो उद्ध्वस्त करतो. \b \q1 \v 23 जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात, \q2 ते संकटापासून दूर राहतात. \b \q1 \v 24 गर्विष्ठ, उद्धट ज्याचे नाव \q2 “टवाळखोर” आहे, तो तीव्र संतापाने वागतो. \b \q1 \v 25 आळशी मनुष्याची आशा त्याच्यासाठी मृत्यू ठरेल, \q2 कारण त्याचे हात काम करण्यास नकार देतात. \q1 \v 26 अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो, \q2 परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात. \b \q1 \v 27 दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे— \q2 तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल! \b \q1 \v 28 खोटा साक्षीदार नाश पावेल, \q2 परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल. \b \q1 \v 29 दुष्ट निर्भयतेचा आव आणतो, \q2 पण सरळ मनुष्य मात्र विचारपूर्वक मार्ग निवडतो. \b \q1 \v 30 मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना \q2 याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत. \b \q1 \v 31 लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, \q2 परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते. \b \c 22 \q1 \v 1 चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा \q2 व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. \b \q1 \v 2 श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; \q2 त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे. \b \q1 \v 3 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, \q2 परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. \b \q1 \v 4 याहवेहचे भय ही नम्रता आहे; \q2 त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे. \b \q1 \v 5 दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; \q2 परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात. \b \q1 \v 6 लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, \q2 म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत. \b \q1 \v 7 जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, \q2 तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो. \b \q1 \v 8 जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, \q2 आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल. \b \q1 \v 9 उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, \q2 कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात. \b \q1 \v 10 टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; \q2 भांडण आणि अपमान देखील बंद होतील. \b \q1 \v 11 जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो \q2 तो राजाचा मित्र होईल. \b \q1 \v 12 याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, \q2 परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात. \b \q1 \v 13 आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! \q2 तो मला भर चौकात ठार करेल!” \b \q1 \v 14 वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; \q2 ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात. \b \q1 \v 15 बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, \q2 परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल. \b \q1 \v 16 श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो \q2 आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील. \ms1 ज्ञानाची तीस नीतिसूत्रे \s2 प्रथम सूत्र \q1 \v 17 लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव; \q2 मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर, \q1 \v 18 जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील \q2 आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल. \q1 \v 19 म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, \q2 मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा. \q1 \v 20 सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी \q2 मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय? \q1 \v 21 प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय \q2 म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस \q2 त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील? \s2 दुसरे सूत्र \q1 \v 22 गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, \q2 आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका, \q1 \v 23 कारण याहवेह त्यांचा खटला लढतील \q2 आणि जीवनासाठी जीवन घेतील. \s2 तिसरे सूत्र \q1 \v 24 तापट माणसांची मैत्री करू नका, \q2 जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका, \q1 \v 25 नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, \q2 आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल. \s2 चौथे सूत्र \q1 \v 26 वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका \q2 किंवा कर्जाचे जामीन होऊ नका; \q1 \v 27 जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर \q2 ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील. \s2 पाचवे सूत्र \q1 \v 28 ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत \q2 त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका. \s2 सहावे सूत्र \q1 \v 29 आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? \q2 ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्‍यांसमोर नाही \q2 तर राजांसमोर सेवा करतील. \c 23 \s2 सातवे सूत्र \q1 \v 1 जेव्हा तू अधिकार्‍यांबरोबर भोजन करतोस, \q2 तेव्हा तुझ्यासमोर काय\f + \fr 23:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa कोण\fqa*\f* आहे हे चांगले लक्षात घे, \q1 \v 2 आणि जर तू खादाड असशील \q2 तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव. \q1 \v 3 त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस, \q2 कारण ते भोजन फसविणारे आहे. \s2 आठवे सूत्र \q1 \v 4 श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस; \q2 स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस. \q1 \v 5 तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते, \q2 कारण पंख उगवताच \q2 गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल. \s2 नववे सूत्र \q1 \v 6 कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस, \q2 त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस; \q1 \v 7 कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे \q2 जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो. \q1 तो तुला म्हणतो “खा आणि पी” \q2 परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते. \q1 \v 8 जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील \q2 आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल. \s2 दहावे सूत्र \q1 \v 9 मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस, \q2 कारण ते तुझ्या समंजस शब्दांचा तिरस्कार करतील. \s2 अकरावे सूत्र \q1 \v 10 पुरातन सीमारेखांसाठी असलेले दगड हलवू नकोस \q2 किंवा अनाथाची शेती बळकावू नकोस. \q1 \v 11 कारण त्यांना वाचविणारा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे; \q2 ते त्यांचा खटला तुझ्याविरुद्ध चालवितील. \s2 बारावे सूत्र \q1 \v 12 तुझे चित्त शिक्षणाकडे, \q2 आणि तुझे कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव. \s2 तेरावे सूत्र \q1 \v 13 मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस; \q2 जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत. \q1 \v 14 छडीचा वापर करून त्यांना शिक्षा कर \q2 आणि मृत्यूपासून त्यांचे रक्षण कर. \s2 चौदावे सूत्र \q1 \v 15 माझ्या मुला, जर तुझे अंतःकरण सुज्ञ असेल \q2 तर माझे मन खरोखरच आनंदी होईल; \q1 \v 16 जेव्हा तुझे ओठ न्यायपूर्ण शब्द बोलतील \q2 तेव्हा माझा अंतरात्मा उल्हास करेल. \s2 पंधरावे सूत्र \q1 \v 17 तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस, \q2 परंतु याहवेहचे भय बाळगण्यास सदैव आवेशी राहा. \q1 \v 18 कारण तुला तुझ्या भवितव्यामध्ये निश्चितच आशा आहे, \q2 आणि तुझी आशा नाश पावणार नाही. \s2 सोळावे सूत्र \q1 \v 19 माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो \q2 आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर: \q1 \v 20 जे अतिमद्यपान करतात \q2 किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको, \q1 \v 21 कारण मद्यपी व खादाड गरीब होतात, \q2 आणि गुंगीत असणार्‍यांना फाटके कपडे घालावे लागतील. \s2 सतरावे सूत्र \q1 \v 22 आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले, \q2 आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको. \q1 \v 23 सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको— \q2 सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव. \q1 \v 24 नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो; \q2 जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो. \q1 \v 25 तुझे वडील आणि आई आनंदी असावेत; \q2 आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो! \s2 अठरावे सूत्र \q1 \v 26 माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे \q2 आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी, \q1 \v 27 कारण व्यभिचारी स्त्री एक खोल खड्डा आहे, \q2 आणि परस्त्री म्हणजे एक अरुंद विहीर आहे. \q1 \v 28 एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते \q2 आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. \s2 एकोणविसावे सूत्र \q1 \v 29 कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे? \q2 कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत? \q2 कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत? \q1 \v 30 जे मद्यपानासाठी घुटमळतात, \q2 जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात. \q1 \v 31 जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, \q2 जेव्हा ते कपामध्ये चमकते, \q2 जेव्हा ते सहजपणे खाली उतरते! \q1 \v 32 शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते \q2 आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते. \q1 \v 33 तुझे डोळे विलक्षण दृष्ये पाहतील, \q2 आणि तुझे मन गोंधळलेल्या गोष्टींची कल्पना करेल. \q1 \v 34 तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा, \q2 जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील. \q1 \v 35 आणि तू म्हणशील, “त्यांनी मला मारले, परंतु मी जखमी झालो नाही! \q2 त्यांनी मला मारले, परंतु मला जाणवले नाही! \q1 जेव्हा मी जागा होईन, \q2 तेव्हा मी आणखी एक मद्याचा प्याला पिईन.” \c 24 \s2 विसावे सूत्र \q1 \v 1 दुर्जनांचा मत्सर करू नका, \q2 त्यांच्या संगतीची इच्छा धरू नका; \q1 \v 2 कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, \q2 आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात. \s2 एकविसावे सूत्र \q1 \v 3 सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, \q2 आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते; \q1 \v 4 ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या \q2 दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात. \s2 बाविसावे सूत्र \q1 \v 5 सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; \q2 आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात. \q1 \v 6 लढाईवर जाण्यासाठी निश्चितच तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते, \q2 कारण अनेक सल्लागारांद्वारे विजय प्राप्त होते. \s2 तेविसावे सूत्र \q1 \v 7 सुज्ञता मूर्खांच्या आवाक्याबाहेर असते; \q2 वेशीतील सभेत त्यांनी आपले तोंड उघडू नये. \s2 चोविसावे सूत्र \q1 \v 8 जे कोणी वाईट योजना करतात \q2 ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील. \q1 \v 9 मूर्खाच्या योजना म्हणजे पाप, \q2 आणि लोक टवाळखोर मनुष्याचा द्वेष करतात. \s2 पंचविसावे सूत्र \q1 \v 10 जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, \q2 तर तुमची शक्ती किती थोडी आहे! \q1 \v 11 ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा; \q2 जे लटपटणार्‍या पायांनी वध होण्यासाठी जात आहेत, त्यांना थांबव. \q1 \v 12 जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,” \q2 तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात? \q1 जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का? \q2 ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का? \s2 सव्विसावे सूत्र \q1 \v 13 माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे; \q2 आणि पोळ्यातून पाझरणारे मध तुझ्या जिभेला गोड लागेल. \q1 \v 14 त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे: \q2 जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे, \q2 आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही. \s2 सत्ताविसावे सूत्र \q1 \v 15 चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, \q2 त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको; \q1 \v 16 कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, \q2 परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात. \s2 अठ्ठाविसावे सूत्र \q1 \v 17 जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; \q2 जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये, \q1 \v 18 नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील \q2 आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील. \s2 एकोणतिसावे सूत्र \q1 \v 19 वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका. \q2 किंवा दुष्ट लोकांचा हेवा करू नका, \q1 \v 20 कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; \q2 आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल. \s2 तिसावे सूत्र \q1 \v 21 माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर \q2 आणि बंडखोर अधिकार्‍यांना सहभागी होऊ नकोस, \q1 \v 22 कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील, \q2 आणि कोणते संकट ते आणू शकतात हे कोणाला माहीत आहे? \ms1 सुज्ञ व्यक्तीची पुढील वचने \p \v 23 ही सुद्धा सुज्ञ माणसांची वचने आहेत: \q1 न्यायदान करताना पक्षपात दाखविणे हे चांगले नाहीच: \q1 \v 24 जो कोणी दुष्टाला “तू निर्दोष आहेस,” असे म्हणतो \q2 त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्याचा धिक्कार करतील. \q1 \v 25 परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील, \q2 आणि त्यांच्यावर विपुल आशीर्वाद येईल. \b \q1 \v 26 प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे \q2 म्हणजे ओठांवरील चुंबनासारखे आहे. \b \q1 \v 27 तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर \q2 आणि तुझे शेत तयार कर; \q2 त्यानंतर, तुझे घर बांध. \b \q1 \v 28 विनाकारण तुझ्या शेजार्‍याविरुद्ध साक्ष देऊ नकोस— \q2 गैरसमज करून देण्यासाठी तू तुझ्या जिभेचा उपयोग करावा काय? \q1 \v 29 असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; \q2 त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.” \b \q1 \v 30 एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो, \q2 ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही अशा माणसाच्या द्राक्षमळ्याच्या बाजूने मी गेलो; \q1 \v 31 सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती, \q2 आणि संपूर्ण भूमी तणाने झाकली गेलेली होती; \q2 त्याचे दगडी कुंपणही ढासळले होते. \q1 \v 32 जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो \q2 आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो: \q1 \v 33 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी \q2 उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती— \q1 \v 34 आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल \q2 आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल. \c 25 \ms1 शलोमोनाची आणखी काही नीतिवचने \p \v 1 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्‍यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत: \q1 \v 2 रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे; \q2 आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे. \q1 \v 3 जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली, \q2 तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही. \b \q1 \v 4 चांदीतील मळ काढला \q2 म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो; \q1 \v 5 राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका \q2 आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील. \b \q1 \v 6 राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, \q2 आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस; \q1 \v 7 त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा, \q2 यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल. \b \q1 तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे \q2 \v 8 ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, \q1 कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, \q2 तर शेवटी तू काय करशील? \b \q1 \v 9 जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर, \q2 दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस, \q1 \v 10 नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल \q2 आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल. \b \q1 \v 11 योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा \q2 चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे. \q1 \v 12 न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्‍या कानासाठी सुज्ञ \q2 म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे. \b \q1 \v 13 ज्याने विश्वासू सेवकाला पाठविले \q2 त्याच्यासाठी तो उन्हाळ्यातील शीतल पेयासारखा आहे; \q2 तो त्याच्या मालकाला ताजेतवाने करतो. \q1 \v 14 कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो, \q2 तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे. \b \q1 \v 15 सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, \q2 कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते. \b \q1 \v 16 तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा— \q2 जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल. \q1 \v 17 तुझ्या शेजार्‍यांकडे पाय क्वचितच टाक— \q2 अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील. \b \q1 \v 18 शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, \q2 जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे. \q1 \v 19 संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे \q2 म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे. \q1 \v 20 ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, \q2 एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, \q2 किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे. \b \q1 \v 21 तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या; \q2 तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे. \q1 \v 22 असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल, \q2 आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील. \b \q1 \v 23 जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो \q2 तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते. \b \q1 \v 24 भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा \q2 छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे. \b \q1 \v 25 दूरवरून आलेला शुभ संदेश \q2 तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे. \q1 \v 26 नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे, \q2 हे पाण्याचा झरा दूषित होणे किंवा जलकुंड गढूळ होण्यासारखे आहे. \b \q1 \v 27 जसे अति मध खाणे हानिकारक आहे \q2 आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते. \b \q1 \v 28 स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य \q2 तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा आहे. \c 26 \q1 \v 1 ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, \q2 त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही. \q1 \v 2 जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, \q2 तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही. \q1 \v 3 घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम \q2 आणि मूर्खाच्या पाठीला छडी पाहिजे! \q1 \v 4 मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, \q2 नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील. \q1 \v 5 मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, \q2 नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल. \q1 \v 6 मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे \q2 म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे. \q1 \v 7 मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, \q2 एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे. \q1 \v 8 मूर्खाचा सन्मान करणे \q2 म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे. \q1 \v 9 जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, \q2 तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने. \q1 \v 10 जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्‍या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. \q2 तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्‍या धनुर्धारीसारखा आहे. \q1 \v 11 जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो \q2 तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो. \q1 \v 12 आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? \q2 अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. \b \q1 \v 13 आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, \q2 एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!” \q1 \v 14 दार त्याच्या बिजागर्‍यांवर फिरते \q2 तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो. \q1 \v 15 आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; \q2 तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो. \q1 \v 16 स्वदृष्टीत शहाणा असणार्‍या आळशास वाटते कि तो \q2 यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे. \b \q1 \v 17 आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे \q2 एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्‍यासारखे असतात. \b \q1 \v 18 जसा एखादा माथेफिरू \q2 मृत्यूचे जळते बाण फेकतो, \q1 \v 19 तो अशा मनुष्यासारखा आहे, \q2 जो त्याच्या शेजार्‍यांना फसवितो \q2 आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!” \b \q1 \v 20 लाकूड नसले तर आग विझते; \q2 आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते. \q1 \v 21 जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, \q2 तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो. \q1 \v 22 अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; \q2 अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. \b \q1 \v 23 गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण \q2 चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे. \q1 \v 24 शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, \q2 परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात. \q1 \v 25 जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, \q2 कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते. \q1 \v 26 त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, \q2 त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल. \q1 \v 27 जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; \q2 जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल. \q1 \v 28 लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, \q2 आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते. \b \c 27 \q1 \v 1 उद्याविषयी आज बढाई मारू नका; \q2 कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही. \b \q1 \v 2 दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको; \q2 बाहेरील व्यक्तीला ती करू द्या, पण तुम्ही स्वतःच्या ओठांनी करू नये. \b \q1 \v 3 दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते, \q2 परंतु मूर्खाने दिलेली चिथावणी या दोन्हींपेक्षाही जड असते. \b \q1 \v 4 क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो; \q2 पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल? \b \q1 \v 5 उघडपणे कान उघाडणी करणे, \q2 गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे. \b \q1 \v 6 मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात, \q2 परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत. \b \q1 \v 7 एखाद्याला भरल्यापोटी मधसुद्धा बेचव लागतो, \q2 परंतु भुकेल्या मनुष्याला कडू अन्नसुद्धा गोड लागते. \b \q1 \v 8 घर सोडून भटकणारा मनुष्य \q2 घरटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे. \b \q1 \v 9 अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात, \q2 आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून \q2 मित्राचा आनंद उसळून येतो. \b \q1 \v 10 तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका, \q2 आणि संकटसमयी नातेवाईकांच्या घरी जावू नका— \q2 दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा जवळचा शेजारी बरा. \b \q1 \v 11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर; \q2 म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन. \b \q1 \v 12 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, \q2 परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. \b \q1 \v 13 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; \q2 जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे. \b \q1 \v 14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याला भल्या पहाटे ओरडून अभिवादन केले, \q2 तर ते त्याला शापासारखे वाटेल. \b \q1 \v 15 भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात \q2 गळक्या छप्परासारखी आहे. \q1 \v 16 तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्‍याला ताब्यात ठेवण्यासारखे, \q2 किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. \b \q1 \v 17 जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, \q2 त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्‍याला सुधारतो. \b \q1 \v 18 जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल. \q2 आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल. \b \q1 \v 19 पाणी जसे चेहर्‍याचे प्रतिबिंब दर्शविते, \q2 तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते, \b \q1 \v 20 मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही, \q2 तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे. \b \q1 \v 21 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, \q2 तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते. \b \q1 \v 22 मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला, \q2 मुसळात त्याला धान्यासारखे भरडले, \q2 तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही. \b \q1 \v 23 आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा, \q2 तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या; \q1 \v 24 कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही, \q2 आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो. \q1 \v 25 वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते \q2 आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते, \q1 \v 26 तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील, \q2 आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील. \q1 \v 27 तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी \q2 तुझ्याकडे शेळ्यांचे पुष्कळ दूध असेल. \b \c 28 \q1 \v 1 कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; \q2 पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात. \b \q1 \v 2 जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात, \q2 परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक\f + \fr 28:2 \fr*\fqa शासनकर्ता \fqa*\ft म्हणजे मनुष्य\ft*\f* सुव्यवस्था कायम ठेवतो. \b \q1 \v 3 गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष, \q2 संपूर्ण पीक वाहून नेणार्‍या घनघोर वृष्टिसारखा आहे. \b \q1 \v 4 नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात, \q2 परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात. \b \q1 \v 5 योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, \q2 परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते. \b \q1 \v 6 विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा \q2 प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा. \b \q1 \v 7 सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, \q2 परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो. \b \q1 \v 8 जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो, \q2 ती दुसर्‍याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल. \b \q1 \v 9 जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, \q2 तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात. \b \q1 \v 10 जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात, \q2 ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील, \q2 परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल. \b \q1 \v 11 श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; \q2 परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत. \b \q1 \v 12 नीतिमान यशस्वी झाला तर हर्षोल्हास केला जातो; \q2 पण दुष्ट प्रबल झाले असता लोक स्वतःस लपवून ठेवतात. \b \q1 \v 13 जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, \q2 परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते. \b \q1 \v 14 परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, \q2 परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो. \b \q1 \v 15 असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा \q2 गर्जणार्‍या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो. \b \q1 \v 16 जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो, \q2 परंतु जो कुमार्गाने मिळविलेल्या लाभाची घृणा करतो, तो पुष्कळ वर्षे राज्य करेल. \b \q1 \v 17 मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य \q2 कबरेमध्ये आसरा शोधेल; \q2 त्याला कोणीही थांबवू नये. \b \q1 \v 18 जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, \q2 परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल. \b \q1 \v 19 जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, \q2 परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल. \b \q1 \v 20 प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, \q2 पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही. \b \q1 \v 21 पक्षपात करणे हे चांगले नाही— \q2 तरीही भाकरीच्या एका तुकड्यासाठी मनुष्य चुकीची गोष्ट करतो. \b \q1 \v 22 कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात \q2 आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे. \b \q1 \v 23 खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, \q2 एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल. \b \q1 \v 24 जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो \q2 आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” \q2 तो नाश करणार्‍याचा भागीदार आहे. \b \q1 \v 25 लोभी मनुष्य भांडणे लावतो, \q2 परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल. \b \q1 \v 26 स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. \q2 पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील. \b \q1 \v 27 जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, \q2 परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्‍यांवर पुष्कळ शाप येतील. \b \q1 \v 28 जेव्हा दुर्जन सामर्थ्यवान होतात, तेव्हा लोक लपून बसतात; \q2 परंतु दुष्टांचा नायनाट झाला कि नीतिमान वृद्धी पावतात. \b \c 29 \q1 \v 1 अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो, \q2 त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल. \b \q1 \v 2 जेव्हा नीतिमानाची भरभराट होते, तेव्हा लोक हर्षोल्हास करतात; \q2 जेव्हा दुष्ट सत्ताधारी झाले की, लोक दुःखाने विव्हळतात. \b \q1 \v 3 ज्या मनुष्याला ज्ञान प्रिय आहे, तो त्याच्या वडिलांना आनंदी करतो, \q2 परंतु वेश्यांच्या सहवासात राहणारा आपले धन उधळतो. \b \q1 \v 4 न्यायाने राजा राष्ट्राला स्थैर्य देतो, \q2 परंतु ज्याला लाचेचा लोभ\f + \fr 29:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa लाच देतो\fqa*\f* असतो, तो ते कोसळून टाकतो. \b \q1 \v 5 जे लोक त्यांच्या शेजार्‍यांची खुशामत करतात, \q2 ते त्यांच्या पायासाठी सापळा पसरवितात. \b \q1 \v 6 दुष्ट कृत्ये करणारे स्वतःच्या पापामुळेच सापळ्यात अडकतात, \q2 परंतु नीतिमान आनंदाने गर्जना करतात आणि हर्षित असतात. \b \q1 \v 7 नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची काळजी असते, \q2 पण दुष्ट अशा गोष्टीची पर्वा करीत नाही. \b \q1 \v 8 टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात, \q2 परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात. \b \q1 \v 9 सुज्ञानी मनुष्य जर मूर्खाबरोबर न्यायालयात गेला, \q2 तर मूर्ख संतापतो आणि थट्टा करतो आणि तिथे शांतिभंग करतो. \b \q1 \v 10 हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो, \q2 आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो. \b \q1 \v 11 मूर्ख त्याच्या रागाच्या उद्रेकाला पूर्ण वाट करून देतो, \q2 परंतु सुज्ञ माणसे शेवटी शांती प्रस्थापित करतात. \b \q1 \v 12 जर राजा लबाड गोष्टी ऐकत असेल, \q2 तर त्याचे सर्व अधिकारी दुष्ट होतील. \b \q1 \v 13 गरीब मनुष्य व जुलमी मनुष्य यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे: \q2 ती म्हणजे याहवेह दोघांना दृष्टी प्रदान करतात. \b \q1 \v 14 जर राजा गरिबांना योग्य न्याय देतो, \q2 तर त्याचे सिंहासन दीर्घकाल टिकेल. \b \q1 \v 15 छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते; \q2 परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते. \b \q1 \v 16 जेव्हा दुष्टाची भरभराट होते, तेव्हा पापाचीही वाढ होते, \q2 परंतु नीतिमान दुष्टांचे पतन पाहतील. \b \q1 \v 17 तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील; \q2 ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील. \b \q1 \v 18 जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. \q2 परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो. \b \q1 \v 19 केवळ शब्दांनी नोकर सुधारू शकत नाहीत; \q2 जरी त्यांना समजते, तरी ते प्रतिसाद देणार नाहीत. \b \q1 \v 20 बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? \q2 मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे. \b \q1 \v 21 ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो, \q2 तर मोठेपणी तो उद्धट होईल. \b \q1 \v 22 क्रोधिष्ट मनुष्य भांडण सुरू करतो, \q2 आणि तापट मनुष्य अनेक पापे करतो. \b \q1 \v 23 अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो; \q2 परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो. \b \q1 \v 24 चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत; \q2 ते शपथ घेतात आणि सत्य सांगण्याचे धैर्य करत नाहीत. \b \q1 \v 25 मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, \q2 परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते. \b \q1 \v 26 पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात, \q2 परंतु योग्य न्याय याहवेहकडूनच मिळतो. \b \q1 \v 27 नीतिमान अप्रामाणिक माणसांचा द्वेष करतात; \q2 दुष्ट माणसे प्रामाणिक माणसांचा द्वेष करतात. \c 30 \ms1 आगूरची नीतिसूत्रे \p \v 1 मस्सा याकेहाचा पुत्र आगूराची आत्मप्रेरित वचने. \q1 या मनुष्याने इथिएल व उकाल यांना उद्देशून असे बोलले आहे: \b \q1 “परमेश्वरा, मी थकलो आहे, \q2 तरीही मी जिंकू शकतो. \q1 \v 2 मी फक्त पशुतुल्य आहे, मनुष्य नाही; \q2 मला मानवी समज नाही. \q1 \v 3 मी सुज्ञता शिकलो नाही, \q2 तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही. \q1 \v 4 वर स्वर्गात कोण चढून गेला आणि मग खाली उतरला आहे? \q2 वार्‍याला मुठीमध्ये धरलेला असा कोण आहे? \q1 अंगरख्यामध्ये कोणी पाणी बांधले आहे काय? \q2 पृथ्वीच्या सर्व सीमांची स्थापना कोणी केली आहे? \q1 त्याचे नाव काय आहे आणि त्याच्या पुत्राचे नाव काय आहे? \q2 तुम्हाला ते निश्चितच माहीत आहे! \b \b \q1 \v 5 “परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे; \q2 जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत. \q1 \v 6 त्यांच्या वचनात भर घालू नका. \q2 नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल. \b \q1 \v 7 “हे याहवेह, मी दोन कृपादानांची याचना करतो; \q2 माझ्या मरणापूर्वी मला नकार देऊ नका: \q1 \v 8 कपटी वागणे आणि असत्य बोलणे यापासून मला दूर ठेवा; \q2 मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नका; \q2 परंतु फक्त माझी रोजची भाकर मला द्या. \q1 \v 9 कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन \q2 आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’ \q1 किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन \q2 आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.” \b \q1 \v 10 दासाविरुद्ध त्याच्या धन्याकडे निंदानालस्ती करू नका; \q2 असे केल्यास तो तुम्हाला शाप देईल आणि तुम्ही दोषी ठराल. \b \q1 \v 11 असे काही लोक आहेत जे त्यांच्या वडिलांना शाप देतात, \q2 आणि त्यांच्या मातांनाही धन्यता देत नाहीत. \q1 \v 12 जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, \q2 तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते; \q1 \v 13 काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात, \q2 ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात; \q1 \v 14 पृथ्वीवरील गरिबांना \q2 आणि मानवजातीतील गरजूंना गिळंकृत करण्यासाठी, \q1 त्यांचे दात करवतीसारखे आहेत, \q2 आणि ज्यांच्या जबड्यामध्ये चाकू ठेवलेले आहेत. \b \q1 \v 15 “जळूला दोन मुली आहेत. \q2 ‘दे! दे!’ असे त्या ओरडतात. \b \li1 “अशा तीन गोष्टी आहेत त्या कधीही समाधानी नसतात, \li2 ‘पुरे झाले!’ असे कधीही न बोलणार्‍या चार गोष्टी आहेत: \li3 \v 16 अधोलोक \li3 आणि वांझ गर्भाशय; \li3 भूमी, जिचे पाण्याने कधीही समाधान होत नाही, \li3 अग्नी, जो कधीही म्हणत नाही, ‘पुरे झाले!’ \b \q1 \v 17 “आपल्या वडिलांचा चेष्टा करणारे डोळे, \q2 आणि वृद्ध आईचा तिरस्कार करणारे डोळे, \q1 दरीतील डोमकावळे टोची मारून बाहेर काढतील, \q2 त्यांची शरीरे गिधाडे खातील. \b \li1 \v 18 “मला फारच आश्चर्यचकित करणार्‍या तीन गोष्टी आहेत. \li2 चार गोष्टी मला समजत नाहीत: \li3 \v 19 गरुडाचा आकाशातील मार्ग, \li3 खडकावरून सरपटणारा साप, \li3 खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, \li3 पुरुषाचा तरुणीशी संबंध? \b \q1 \v 20 “व्यभिचारी स्त्रीचा मार्ग असा आहे: \q2 ती खाऊन तोंड पुसते, \q2 आणि म्हणते, ‘मी काहीच वाईट केले नाही.’ \b \li1 \v 21 “तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, \li2 चार गोष्टी ती सहन करू शकत नाही: \li3 \v 22 एक नोकर जो राजा होतो, \li3 देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते, \li3 \v 23 तिरस्करणीय स्त्री जी विवाहबद्ध होते, \li3 आणि एक मोलकरीण तिच्या मालकिणीची जागा घेते. \b \li1 \v 24 “पृथ्वीवर चार लहान जीव आहेत, \li2 तरी त्या अत्यंत बुद्धिमान आहेत: \li2 \v 25 मुंग्या, दुर्बल प्राणी आहेत, \li3 तरीही उन्हाळ्यात ते त्यांचे धान्य साठवून ठेवतात; \li2 \v 26 खडकातील ससे अगदी नाजूक प्राणी! \li3 तरी ते खडकात स्वतःचे घर बनवतात; \li2 \v 27 टोळांना त्यांचा राजा नसतो, \li3 तरी ते टोळीटोळीने एकत्र पुढे चाल करतात; \li2 \v 28 पाल, त्यांना हाताने पकडणे शक्य आहे, \li3 तरीपण त्या राजांच्या महालात सापडतात. \b \li1 \v 29 “तीन गोष्टी आहेत, ज्यांची चाल अत्यंत डौलदार असते, \li2 चार प्राणी ज्यांची हालचाल डौलदार असते: \li3 \v 30 सिंह, सर्व प्राण्यात सामर्थ्यशाली, तो कोणाही समोर मागे सरत नाही; \li3 \v 31 तोऱ्यात चालणारा एक कोंबडा, \li3 बोकड, \li3 आणि बंडखोरीविरुद्ध सुरक्षित असलेला राजा. \b \q1 \v 32 “जर तू आत्मप्रशंसेने फुगून मूर्खपणा केला असशील \q2 किंवा दुष्ट योजना आखली असशील, \q2 तर हातांनी आपले तोंड झाकून घे. \q1 \v 33 कारण जसे साय घुसळल्याने लोणी मिळते, \q2 व नाक पिळण्याने रक्त निघते, \q2 तसेच क्रोध भडकविल्याने कलह उत्पन्न होतात.” \c 31 \ms1 राजा लमुवेलची नीतिसूत्रे \p \v 1 राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत. \q1 \v 2 माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! \q2 माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक! \q1 \v 3 तुझी शक्ती\f + \fr 31:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa संपत्ती\fqa*\f* स्त्रियांच्या सहवासात घालवू नको. \q2 जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको. \b \q1 \v 4 हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— \q2 मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही \q2 किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही. \q1 \v 5 असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, \q2 आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे. \q1 \v 6 ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या, \q2 जे यातनेमध्ये आहेत त्यांना मद्य पिऊ द्या! \q1 \v 7 त्यांना पिऊ द्या आणि त्यांचे दारिद्र्य विसरू द्या, \q2 आणि त्यांच्या क्लेशाचे विस्मरण होऊ द्या. \b \q1 \v 8 जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल, \q2 जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल. \q1 \v 9 गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे; \q2 त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे. \ms1 समारोप: सद्गुणी पत्नीचे वर्णन \q1 \v 10 सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? \q2 तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे. \q1 \v 11 तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो, \q2 आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही. \q1 \v 12 आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते, \q2 त्याचे अहित करीत नाही. \q1 \v 13 ती लोकर व ताग मिळविते \q2 आणि कामात गर्क राहून ते पिंजते. \q1 \v 14 ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, \q2 तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते. \q1 \v 15 ती रात्र सरताच उठते; \q2 आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते \q2 आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते. \q1 \v 16 ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; \q2 तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते. \q1 \v 17 ती उत्साही व कष्टाळू आहे. \q2 कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत. \q1 \v 18 तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, \q2 आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही. \q1 \v 19 ती तिच्या हातांमध्‍ये चाती धरते, \q2 आणि ती बोटांनी चरकी चालविते. \q1 \v 20 ती गरिबांना उदारहस्ते देते \q2 आणि गरजूंना सढळ हाताने देते. \q1 \v 21 हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; \q2 कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात. \q1 \v 22 ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; \q2 ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते. \q1 \v 23 तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, \q2 जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो. \q1 \v 24 ती तागाची वस्त्रे करून विकते \q2 आणि व्यापार्‍यांना कमरबंद पुरविते. \q1 \v 25 बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. \q2 भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते. \q1 \v 26 तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. \q2 तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते. \q1 \v 27 घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; \q2 आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही. \q1 \v 28 तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; \q2 आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो: \q1 \v 29 “उत्कृष्ट कार्य करणार्‍या अनेक स्त्रिया आहेत, \q2 पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.” \q1 \v 30 मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, \q2 परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते. \q1 \v 31 तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, \q2 आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.