\id PHM - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h फिलेमोन \toc1 पौलाचे फिलेमोनला पत्र \toc2 फिलेमोन \toc3 फिले \mt1 पौलाचे फिलेमोनला पत्र \c 1 \po \v 1 ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य, \po आमचा प्रिय मित्र आणि सहकारी फिलेमोन— \v 2 आमची बहीण अप्फिया आणि आमचा सहसैनिक अर्खिप—आणि जी मंडळी तुमच्या घरात एकत्र भेटतात त्यांना: \po \v 3 परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. \s1 उपकारस्तुती आणि प्रार्थना \p \v 4 मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो, \v 5 कारण त्यांच्या सर्व पवित्र लोकांवरील तुझी प्रीती आणि प्रभू येशूंवरील तुझा विश्वास याविषयी मी ऐकले आहे. \v 6 तुला ख्रिस्तात प्राप्त होणार्‍या सर्व चांगल्या गोष्टींचे सखोल ज्ञान होण्यासाठी तुझी आमच्याबरोबर विश्वासामध्ये असलेली भागीदारी कार्यरत व्हावी अशी मी प्रार्थना करतो. \v 7 तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे, कारण बंधू, तू प्रभूच्या लोकांची अंतःकरणे ताजीतवानी केली आहेस. \s1 पौलाची अनेसिमसाठी विनंती \p \v 8 यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे, \v 9 तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो. \v 10 माझी विनंती माझा पुत्र अनेसिम\f + \fr 1:10 \fr*\fq अनेसिम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa उपयुक्त\fqa*\f* जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे. \v 11 तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे. \p \v 12 तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे. \v 13 शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते. \v 14 परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे. \v 15 कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे. \v 16 परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे. \p \v 17 यास्तव जर तू मला भागीदार समजत असशील, तर जसे तू माझे स्वागत केले असते, तसेच त्याचे कर. \v 18 जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड. \v 19 हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही. \v 20 बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर. \v 21 तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे. \p \v 22 आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो. \b \b \p \v 23 ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो. \p \v 24 आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात. \b \p \v 25 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासह असो.