\id OBA - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h ओबद्याह \toc1 ओबद्याहाची भविष्यवाणी \toc2 ओबद्याह \toc3 ओब \mt1 ओबद्याहाची भविष्यवाणी \c 1 \s1 ओबद्याहचा दृष्टान्त \p \v 1 ओबद्याहचा दृष्टान्त हा. \b \b \p एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; \q1 आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: \q2 राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, \q1 “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.” \b \q1 \v 2 “पाहा, राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन; \q2 तुझा पूर्णपणे तिरस्कार करण्यात येईल. \q1 \v 3 तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, \q2 तुम्ही जे खडकांच्या\f + \fr 1:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa सेलाच्या कपारींमध्ये\fqa*\f* कपारीत राहता \q2 आणि तुमचे घर उंचावर बांधता, \q1 तुम्ही जे स्वतःला म्हणता, \q2 ‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’ \q1 \v 4 तू गरुडांप्रमाणे उंच भरार्‍या मारीत असलास \q2 किंवा आपले घरटे तार्‍यांमध्ये बांधत असलास, \q2 तरी तिथून मी तुला खाली आणेन,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 5 “जरी तुमच्याकडे चोर आले, \q2 जरी रात्री लुटारू आले तर \q1 पाहा, संकट कसे तुमची वाट पाहत आहे! \q2 त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय? \q1 जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, \q2 तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय? \q1 \v 6 परंतु एसावला लुटण्यात येईल, \q2 आणि त्याचा गुप्त खजिना हस्तगत केला जाईल! \q1 \v 7 तुझ्यासोबत करार केलेले सर्व मित्र राष्ट्रे तुला तुझ्या सीमेपर्यंत ढकलतील; \q2 तुझे मित्र तुला फसवतील आणि तुझा ताबा घेतील; \q1 जे तुझी भाकरी खातात, तेच तुझ्यासाठी सापळा रचतील, \q2 परंतु तुला ते कळणारही नाही.” \b \q1 \v 8 याहवेह असे जाहीर करतात, \q2 “त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा, \q2 एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय? \q1 \v 9 तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, \q2 आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण \q2 कापला जाईल. \q1 \v 10 तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे, \q2 तू लाजेने झाकून जाशील; \q2 आणि तुझा कायमचा नाश करण्यात येईल. \q1 \v 11 अनोळखी लोकांनी जेव्हा त्याची संपत्ती पळवून नेली \q2 त्या दिवशी तू अलिप्त राहिला \q1 आणि परदेशी लोक त्याच्या वेशीत शिरले \q2 आणि यरुशलेमसाठी चिठ्ठ्या टाकल्या, \q2 तेव्हा तू त्यांच्यापैकी एक होतास. \q1 \v 12 आपल्या भावाच्या दुःखाच्या दिवशी \q2 त्याच्याबद्दल आनंद करू नकोस, \q1 किंवा यहूदीयाच्या रहिवाशांवर \q2 आनंद मानू नकोस, \q1 त्यांच्या संकटाच्या दिवशी \q2 अधिक गर्व करू नकोस. \q1 \v 13 तुम्ही माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी \q2 माझ्या लोकांच्या नगरात प्रवेश करू नका, \q1 किंवा त्यांच्या आपत्तीच्या दिवशी \q2 त्यावर आनंद करू नका, \q1 किंवा त्यांच्या विपत्तीच्या दिवशी. \q2 त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवू नका. \q1 \v 14 त्यांच्या फरार झालेल्यांना मारण्यासाठी \q2 चौकात उभा राहू नको \q1 किंवा त्यांच्या संकटाच्या वेळी \q2 त्यांच्या शत्रूच्या स्वाधीन करू नको. \b \q1 \v 15 “सर्व राष्ट्रांसाठी \q2 नेमलेला याहवेहचा दिवस जवळ आला आहे. \q1 जसे तू केलेस, तसे तुझ्यासोबतही केले जाईल होईल; \q2 तुझ्याद्वारे करण्यात आलेली दुष्कर्मे तुझ्याच माथ्यावर उलटतील. \q1 \v 16 जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर प्याला, \q2 तसेच सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; \q1 ते पितील आणि पीत राहतील \q2 आणि जसे ते कधीच नव्हते तसे बनतील. \q1 \v 17 पण सीयोन पर्वतावर तारण होईल; \q2 ते पवित्र होईल, \q2 आणि याकोबास त्याचे वतन मिळेल. \q1 \v 18 याकोब अग्नीसारखा \q2 आणि योसेफ ज्वालासारखे असतील; \q1 एसाव उरलेल्या भुशासारखे होतील, \q2 आणि ते त्यांना जाळून नष्ट करतील. \q1 एसावच्या वंशजांपैकी \q2 कोणीही जिवंत राहणार नाही.” \q1 याहवेहने हे म्हटले आहे. \b \q1 \v 19 एसावाचा पर्वत \q2 दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील, \q1 आणि पलिष्टी लोकांच्या देशाला \q2 डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील. \q1 ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील \q2 आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील. \q1 \v 20 बंदिवान इस्राएल लोकांचा हा गट, जो कनानमध्ये आहे, \q2 तो कनानी लोकांचा सारेफथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतील; \q1 यरुशलेमेचे बंदिवान, जे सफारदात शहरात आहेत, \q2 ते नेगेवची शहरे ताब्यात घेतील. \q1 \v 21 सुटका करणारे एसाव पर्वतावर \q2 राज्य करण्यासाठी सीयोन पर्वतावर चढतील. \q2 आणि ते याहवेहचे राज्य असेल.