\id NUM - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h गणना \toc1 गणनेचे पुस्तक \toc2 गणना \toc3 गण \mt1 गणनेचे पुस्तक \c 1 \s1 जनगणना \p \v 1 इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले: \v 2 “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा. \v 3 तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी. \v 4 प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी. \b \lh \v 5 “तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: \b \li1 “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर; \li1 \v 6 शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल; \li1 \v 7 यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन; \li1 \v 8 इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल; \li1 \v 9 जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब; \li1 \v 10 योसेफाचे पुत्र: \li2 एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; \li2 मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल; \li1 \v 11 बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान; \li1 \v 12 दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर; \li1 \v 13 आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल; \li1 \v 14 गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ; \li1 \v 15 नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.” \b \lf \v 16 हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते. \b \p \v 17 मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले, \v 18 आणि दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली. \v 19 याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली: \b \li1 \v 20 इस्राएलचा पहिला पुत्र रऊबेनच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, सैन्यात सेवा करण्यास सक्षम असणाऱ्या सर्व पुरुषांची नावे, त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 21 रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती. \b \li1 \v 22 शिमओनाच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली. \v 23 शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती. \b \li1 \v 24 गादच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 25 गाद गोत्रांची संख्या 45,650 होती. \b \li1 \v 26 यहूदाहच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 27 यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती. \b \li1 \v 28 इस्साखारच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 29 इस्साखार गोत्रांची संख्या 54,400. \b \li1 \v 30 जबुलूनच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 31 जबुलून गोत्रांची संख्या 57,400. \b \lh \v 32 योसेफाच्या पुत्रांमधून: \li1 एफ्राईमच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 33 एफ्राईमच्या गोत्रांची संख्या 40,500. \li1 \v 34 मनश्शेहच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 35 मनश्शेहच्या गोत्रांची संख्या 32,200 होती. \b \li1 \v 36 बिन्यामीनच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 37 बिन्यामीन गोत्रांची संख्या 35,400 होती. \b \li1 \v 38 दानच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 39 दान गोत्रांची संख्या 62,700 होती. \b \li1 \v 40 आशेरच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 41 आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती. \b \li1 \v 42 नफतालीच्या वंशजातून: \li2 वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. \v 43 नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती. \b \lf \v 44 मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच. \v 45 सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली. \v 46 एकूण संख्या 6,03,550 होती. \b \p \v 47 परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही. \v 48 याहवेहने मोशेला सांगितले होते: \v 49 “लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये. \v 50 परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा. \v 51 ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे. \v 52 इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे. \v 53 परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.” \p \v 54 याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले. \c 2 \s1 गोत्राच्या डेर्‍यांची व्यवस्था \p \v 1 याहवेहने मोशे आणि अहरोनाला म्हटले: \v 2 “इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.” \b \lh \v 3 पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने: \li1 यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा. \v 4 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 74,600 होती. \li1 \v 5 इस्साखारचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देणार. इस्साखारच्या लोकांचा पुढारी सूवाराचा मुलगा नथानेल असावा. \v 6 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 54,400 होती. \li1 \v 7 त्यानंतर जबुलूनचे गोत्र असणार. हेलोनचा पुत्र एलियाब हा जबुलूनच्या लोकांचा पुढारी आहे. \v 8 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 57,400 होती. \lf \v 9 यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे. \b \lh \v 10 दक्षिणेच्या बाजूस: \li1 रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे. \v 11 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 46,500 होती. \li1 \v 12 शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे. \v 13 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 59,300 होती. \li1 \v 14 त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे. \v 15 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 45,650 होती. \lf \v 16 रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्‍या रांगेत निघतील. \b \li1 \v 17 मग सभामंडप व लेव्यांची छावणी सर्व छावण्यांच्या मध्यभागी असणार. ज्या क्रमाने ते डेरा देऊन राहतात त्याच क्रमाने, आपल्या झेंड्याखाली आपआपल्या जागेवर त्यांनी निघावे. \b \lh \v 18 पश्चिमेच्या बाजूस: \li1 एफ्राईमच्या दलाने आपल्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. एफ्राईमच्या लोकांचा पुढारी अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा आहे. \v 19 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 40,500 होती. \li1 \v 20 मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे. \v 21 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 32,200 होती. \li1 \v 22 त्यानंतर बिन्यामीनचे गोत्र असणार. बिन्यामीन लोकांचा पुढारी गिदयोनीचा पुत्र अबीदान आहे. \v 23 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 35,400 होती. \lf \v 24 एफ्राईमच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,08,100 होते. ते तिसर्‍या रांगेत निघतील. \b \lh \v 25 उत्तरेच्या बाजूस: \li1 दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे. \v 26 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 62,700 होती. \li1 \v 27 आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे. \v 28 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 41,500 होती. \li1 \v 29 नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे. \v 30 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 53,400 होती. \lf \v 31 दानच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,57,600 होते. त्यांच्या झेंड्याखाली ते सर्वांच्या शेवटी निघतील. \b \lf \v 32 आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती. \v 33 याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती. \b \p \v 34 अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत. \c 3 \s1 लेव्यांची कर्तव्ये \p \v 1 सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती. \b \p \v 2 अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार. \v 3 अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती. \v 4 नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली. \p \v 5 याहवेह मोशेला म्हणाले, \v 6 “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर. \v 7 त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत. \v 8 सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी. \v 9 यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत. \v 10 याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.” \p \v 11 आणि याहवेह मोशेला म्हणाले, \v 12 “इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत, \v 13 कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.” \p \v 14 याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले, \v 15 “आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.” \v 16 याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली. \b \li1 \v 17 लेवीच्या पुत्रांची नावे ही: \li2 गेर्षोन, कोहाथ आणि मरारी. \li1 \v 18 गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: \li2 लिब्नी आणि शिमी. \li1 \v 19 कोहाथाची कुळे: \li2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल. \li1 \v 20 मरारीची कुळे: \li2 महली आणि मूशी. \b \lf त्यांच्या घराण्यानुसार लेवीची कुळे ही होती. \b \lh \v 21 लिब्नी व शिमी ही कुळे गेर्षोनापासून होती; ही गेर्षोनी कुळे होती. \li1 \v 22 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 7,500 होती. \li1 \v 23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा. \li1 \v 24 गेर्षोनी घराण्याचा प्रमुख लाएलचा पुत्र एलीआसाफ होता. \li1 \v 25 सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, \v 26 आणि अंगणाचे पडदे, निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा आणि दोर्‍या व त्याच्या वापराशी संबंधित जे सर्वकाही आहे यांची काळजी घ्यावी. \b \lh \v 27 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती. \li1 \v 28 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती. \li1 पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती. \li1 \v 29 कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते. \li1 \v 30 उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता. \li1 \v 31 कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाच्या सेवेत वापरली जाणारी उपकरणे, पडदा आणि त्यांच्या वापराशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यास ते जबाबदार होते. \li1 \v 32 अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती. \b \lh \v 33 महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती. \li1 \v 34 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती. \li1 \v 35 अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. \li1 त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते. \li1 \v 36 मरारी लोकांची नेमणूक निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, बैठका, त्याची सर्व उपकरणे आणि त्यांच्या वापरा संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी, \v 37 तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्‍या यावर करण्यात आली होती. \b \li1 \v 38 मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. \li1 इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. \li1 इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे. \b \lf \v 39 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते. \b \p \v 40 मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी. \v 41 आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.” \p \v 42 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली. \v 43 एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती. \p \v 44 याहवेह मोशेला आणखी म्हणाले, \v 45 “इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी लोकांना घे आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घ्यावे. लेवी लोक माझे असावेत. मीच याहवेह आहे. \v 46 273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी, \v 47 प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल\f + \fr 3:47 \fr*\ft अंदाजे 58 ग्रॅ.\ft*\f* घे; म्हणजेच वीस गेरा. \v 48 आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.” \p \v 49 मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले. \v 50 इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365\f + \fr 3:50 \fr*\ft अंदाजे 16 कि.ग्रॅ.\ft*\f* गोळा केले. \v 51 याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले. \c 4 \s1 कोहाथी \p \v 1 याहवेह मोशेला आणि अहरोनाला म्हणाले: \v 2 “लेवींच्या शाखेतील कोहाथी लोकांची त्यांच्या कुळांनुसार व घराण्यानुसार जनगणना करा. \v 3 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी. \p \v 4 “सभामंडपातील परमपवित्र वस्तूंची काळजी घेण्याचे काम कोहाथी लोकांचे आहे. \v 5 ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा. \v 6 मग त्यांनी तो पडदा टिकाऊ चर्माने\f + \fr 4:6 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa तहशाची कातडी\fqa*\f* झाकावा व त्यावर निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि कोशाचे दांडे त्याच्या जागी बसवावे. \p \v 7 “समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी. \v 8 त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत. \p \v 9 “यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे. \v 10 मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे. \p \v 11 “मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत. \p \v 12 “पवित्रस्थानाच्या सेवेसाठी वापरात आणली जाणारी सर्व पात्रे निळ्या कापडात गुंडाळावीत व त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि ती वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावी. \p \v 13 “कास्य वेदीवरील सर्व राख काढावी आणि वेदी जांभळ्या रंगाच्या कापडाने झाकावी. \v 14 मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत. \p \v 15 “नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत. \p \v 16 “दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.” \p \v 17 याहवेहने मोशे व अहरोन यांना म्हटले, \v 18 “कोहाथी गोत्राच्या कुळाचा लेव्यांमधून नाश होऊ नये, \v 19 आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे. \v 20 परंतु कोहाथी लोकांनी पवित्र वस्तू पाहण्यासाठी एक क्षणभरही आत जाऊ नये. नाहीतर ते मरण पावतील.” \s1 गेर्षोनी \p \v 21 याहवेह मोशेला म्हणाले, \v 22 गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी. \v 23 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी. \p \v 24 “वाहून नेणे व त्यांची इतर कामे करणे, ही गेर्षोनी कुळांची सेवा आहे: \v 25 त्यांनी निवासमंडपाचे पडदे, सभामंडप व त्याचे आच्छादन व त्याचे टिकाऊ चर्माचे बाहेरील आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा वाहून न्यावा. \v 26 निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, दोर्‍या आणि मंडपातील सेवा करण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे. या संबंधीच्या ज्यागोष्टी करण्याची गरज आहे, त्या गेर्षोनी लोकांनी कराव्‍यात. \v 27 गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे. \v 28 सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत. \s1 मरारी कूळ \p \v 29 “मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती करावी. \v 30 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती करावी. \v 31 सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या, \v 32 त्याचप्रमाणे सभोवतालच्या अंगणाचे खांब, त्यांच्या बैठका, मेखा, दोर्‍या, त्याची सर्व उपकरणे आणि त्याच्या वापरासंबंधीचे सर्व साहित्य न्यावे. ज्या पुरुषाने जी ठराविक वस्तू वाहून न्यावयाची आहे ती त्याला नेमून द्यावी. \v 33 अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.” \s1 लेव्यांच्या कुळांची गणती \li1 \v 34 मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्‍यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली. \li2 \v 35 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते, \v 36 त्यांची संख्या कुळांनुसार 2,750 होती. \v 37 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली. \b \li1 \v 38 गेर्षोनी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली. \li2 \v 39 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते, \v 40 त्यांचे कूळ व घराणे यानुसार ते 2,630 होते. \v 41 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली. \b \li1 \v 42 मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली. \li2 \v 43 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते, \v 44 त्यांच्या कुळानुसार ते 3,200 गणले गेले. \v 45 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व मरारी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली. \b \lf \v 46 मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्‍यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली. \v 47 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते, \v 48 त्यांची संख्या 8,580 भरली. \v 49 याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकाला आपले काम व त्यांनी काय वाहून न्यावे हे नेमून देण्यात आले. \b \p अशाप्रकारे याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाची गणती करण्यात आली. \c 5 \s1 छावणीची शुद्धता \p \v 1 याहवेहने मोशेला म्हटले, \v 2 इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग\f + \fr 5:2 \fr*\ft कातडीच्या वेगवेगळ्या आजारांसाठी हा शब्द वापरला जात असे.\ft*\f* आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे. \v 3 मग ते स्त्री असो किंवा पुरुष; त्यांना बाहेर पाठवावे. ज्या छावणीत मी तुमच्यामध्ये राहतो, ती त्यांच्यामुळे भ्रष्ट होऊ नये, म्हणून त्यांना बाहेर पाठवावे. \v 4 त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले; त्यांनी त्यांना छावणीबाहेर पाठविले. याहवेहने मोशेला सूचना दिली होती तसेच त्यांनी केले. \s1 अपराधाबद्दल भरपाई \p \v 5 याहवेह मोशेला म्हणाले, \v 6 “इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे. \v 7 त्यांनी केलेले पाप कबूल करावे. त्यांनी केलेल्या पापाची पूर्ण भरपाई करून द्यावी, त्यात त्याचा पाचवा भाग मिळवून ज्या व्यक्तीविरुद्ध पाप केला आहे त्याला द्यावा. \v 8 परंतु पापाची भरपाई करण्यासाठी त्या व्यक्तीचा कोणीही जवळचा नातेवाईक नसेल तर ती भरपाई याहवेहची असावी आणि पापासाठी प्रायश्चित करण्याच्या मेंढ्यासह ती याजकाकडे द्यावी. \v 9 सर्व पवित्र भेटी, ज्या इस्राएली लोक याजकाकडे आणतात त्या याजकाच्या व्हाव्या. \v 10 पवित्र वस्तू त्यांच्या मालकाच्या आहेत, परंतु ते जे याजकाला देतात, ते याजकाच्या मालकीचे होईल.’ ” \s1 अविश्वासू पत्नीसाठी परीक्षा \p \v 11 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 12 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जर एखाद्या मनुष्याच्या पत्नीचे वाकडे पाऊल पडले आणि ती त्याच्याशी अविश्वासूपणे वागली, \v 13 जेणेकरून दुसर्‍या पुरुषाचे तिच्याशी लैंगिक संबंध असले आणि हे तिच्या पतीपासून गुपित असेल आणि तिची अशुद्धता उघडकीस आली नाही (कारण तिच्याविरुद्ध कोणीही साक्षीदार नाही आणि ती त्या कृत्यात पकडली गेली नाही), \v 14 आणि जर तिच्या पतीला मत्सराची भावना झाली आणि तो आपल्या पत्नीवर संशय घेतो की ती अशुद्ध आहे—किंवा त्याच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली आणि ती जरी अशुद्ध नसली तरीही तो संशय घेतो— \v 15 तर त्याने आपल्या पत्नीला याजकाकडे न्यावे. त्याने तिच्या वतीने सोबत एक एफाचा दहावा भाग\f + \fr 5:15 \fr*\ft अंदाजे 1.6 कि.ग्रॅ.\ft*\f* जवाचे पीठ आणावे. त्याने त्यावर जैतुनाचे तेल ओतू नये किंवा त्यावर धूप ठेवू नये, कारण हे मत्सरासाठी केलेले अन्नार्पण आहे, अपराधाची आठवण देणारे स्मरणाचे अर्पण आहे. \p \v 16 “ ‘याजकाने त्या स्त्रीला आणावे आणि तिला याहवेहसमोर उभे करावे. \v 17 मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे आणि निवासमंडपाच्या भूमीवरील थोडी धूळ घेऊन त्या पाण्यात टाकावी. \v 18 नंतर याजकाने तिला याहवेहपुढे उभे केल्यानंतर, त्याने तिचे केस मोकळे सोडावे आणि तिच्या स्मरणाचे अर्पण, मत्सरासाठी केलेले अन्नार्पण तिच्या हातावर ठेवावे व त्याने शाप आणणारे कडू पाणी आपल्या हाती घ्यावे. \v 19 मग याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, “जर कोणी पुरुषाने तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत आणि तू आपल्या पतीशी विवाहित असताना निर्दोष असून वाकडे पाऊल टाकले नाही, तर या कडू पाण्यापासून मिळणारा शाप तुला अपाय न करो. \v 20 परंतु जर तू तुझ्या पतीशी विवाहित असतानाही वाकडे पाऊल टाकले आहे आणि आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवून स्वतःला भ्रष्ट केले आहेस— \v 21 यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो. \v 22 शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.” \p “ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.” \p \v 23 “ ‘तेव्हा याजकाने हे शापाचे शब्द एका गुंडाळीवर लिहून ते शब्द त्या कडू पाण्यात धुवावे. \v 24 ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल. \v 25 याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे. \v 26 त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे. \v 27 जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल. \v 28 पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील. \p \v 29 “ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा, \v 30 किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा. \v 31 तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ” \c 6 \s1 नाजीरासंबंधी नियम \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: एखादा पुरुष किंवा स्त्री याहवेहला समर्पित नाजीर होण्याचा एक विशेष नवस करू इच्छितात, \v 3 तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत. \v 4 जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये. \p \v 5 “ ‘नाजीरपणाच्या संपूर्ण काळात त्यांच्या डोक्यावर वस्तरा फिरवू नये. त्यांनी याहवेहला समर्पित केलेला नवसाच्या काळ संपेपर्यंत त्यांनी पवित्र असावे; त्यांनी आपले केस लांब वाढू द्यावेत. \p \v 6 “ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये. \v 7 त्यांचे स्वतःचे वडील किंवा आई किंवा भाऊ किंवा बहीण जरी मरण पावले, तरीही त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःला विधिपूर्वक अशुद्ध करू नये, कारण परमेश्वराला समर्पित केल्याचे प्रतीक त्यांच्या डोक्यावर आहे. \v 8 समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत ते याहवेहसाठी पवित्र आहेत. \p \v 9 “ ‘जर नाजीराच्या समक्षतेत कोणी अचानक मरण पावला, तर त्यांच्या डोक्यावरील केस, समर्पणाचे प्रतीक विटाळले जाते, त्यावेळी सातव्या दिवशी; शुद्धीकरणाच्या दिवशी त्यांनी आपले मुंडण करावे. \v 10 मग आठव्या दिवशी त्यांनी दोन कबुतरे किंवा पारव्यांची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी. \v 11 मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे. \v 12 आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले. \p \v 13 “ ‘आणि त्यांचा समर्पणाचा काळ संपल्यानंतर नाजीरांसाठी हा नियम असावा. त्यांना सभामंडपाच्या दाराशी आणावे, \v 14 त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्‍हा आणावा. \v 15 त्याबरोबर त्यांचे अन्नार्पण व पेयार्पण आणि एक टोपलीभर सपिठाची आणि बेखमीर भाकरी—जैतुनाच्या तेलात मळलेल्या जाड भाकरी व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी आणाव्या. \p \v 16 “ ‘याजकाने ही अर्पणे याहवेहसमोर सादर करून पापार्पण व होमार्पण करावे. \v 17 याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्‍हाचा यज्ञ करावा. \p \v 18 “ ‘मग नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ते सभामंडपाच्या दारात मुंडवावे. मग ते केस घेऊन त्यांनी शांत्यर्पणाखाली असलेल्या अग्नीत टाकावे. \p \v 19 “ ‘नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते मुंडण केल्यानंतर, याजकाने त्यांच्या हातात गोर्‍हाचा उकळलेला खांद्याचा भाग व खमीर न घालता बनविलेल्या दोन्ही, एक जाड व एक पातळ भाकर ठेवावी. \v 20 नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो. \p \v 21 “ ‘हा नाजीराचा नियम आहे, जे आपल्या समर्पणानुसार याहवेहला अर्पण करण्याचा नवस करतात, त्या खेरीज त्यांना परवडेल त्यानुसार आणावे. नाजीराच्या नियमानुसार केलेले नवस त्यांनी पूर्ण केले पाहिजे.’ ” \s1 याजकीय आशीर्वाद \p \v 22 याहवेह मोशेला म्हणाले, \v 23 अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे: \q1 \v 24 “ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो \q2 आणि तुमचे संरक्षण करो; \q1 \v 25 याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो \q2 आणि तुमच्यावर कृपा करो; \q1 \v 26 याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, \q2 आणि तुम्हाला शांती देवो.” ’ \p \v 27 “अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.” \c 7 \s1 निवासमंडपाच्या समर्पणाच्या वेळी दिलेली अर्पणे \p \v 1 जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली. \v 2 मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली. \v 3 त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले. \p \v 4 याहवेहने मोशेला म्हटले, \v 5 “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.” \p \v 6 तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले. \v 7 गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले. \v 8 आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते. \v 9 कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते. \p \v 10 जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली. \v 11 कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.” \b \lh \v 12 पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता. \li1 \v 13 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल\f + \fr 7:13 \fr*\ft अंदाजे 1.5 कि.ग्रॅ.\ft*\f* वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल\f + \fr 7:13 \fr*\ft अंदाजे 800 ग्रॅ.\ft*\f* वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 14 दहा शेकेल\f + \fr 7:14 \fr*\ft अंदाजे 115 ग्रॅ.\ft*\f* वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र. \li2 \v 15 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा; \li2 \v 16 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 17 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf ही अम्मीनादाबाचा पुत्र नहशोनाची अर्पणे होती. \b \lh \v 18 दुसर्‍या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली. \li1 \v 19 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 20 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 21 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 22 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 23 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf सूवाराचा पुत्र नथानेलाचे हे अर्पण होते. \b \lh \v 24 तिसर्‍या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख, हेलोनाचा पुत्र एलियाबाने आपले अर्पणे आणले. \li1 \v 25 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 26 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 27 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 28 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 29 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf हेलोनचा पुत्र एलियाबाचे हे अर्पण होते. \b \lh \v 30 चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले. \li1 \v 31 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 32 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 33 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 34 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 35 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf शेदेऊरचा पुत्र एलीसूराचे हे अर्पण होते. \b \lh \v 36 पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले. \li1 \v 37 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 38 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 39 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 40 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 41 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाचे हे अर्पण होते. \b \lh \v 42 सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले. \li1 \v 43 त्याचे अर्पण असे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 44 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 45 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 46 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 47 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf देउएलाचा पुत्र एलीआसाफाचे हे अर्पण होते. \b \lh \v 48 सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाने आपले अर्पण आणले. \li1 \v 49 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 50 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 51 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 52 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 53 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाचे हे अर्पण होते. \b \lh \v 54 आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले. \li1 \v 55 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 56 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 57 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 58 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 59 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे. \lf पदहसूरचा पुत्र गमलीएलचे हे अर्पण होते. \b \lh \v 60 नवव्या दिवशी बिन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा पुत्र अबीदान याने आपले अर्पण आणले. \li1 \v 61 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 62 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 63 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 64 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 65 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf गिदोनीचा पुत्र अबीदानाचे हे अर्पण होते. \b \lh \v 66 दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर याने आपले अर्पण आणले. \li1 \v 67 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 68 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 69 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 70 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 71 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजराचे हे अर्पण होते. \b \lh \v 72 अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख ओक्रानाचा पुत्र पगीयेल याने आपले अर्पण आणले. \li1 \v 73 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 74 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 75 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 76 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 77 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf ओक्रानाचा पुत्र पगीयेलाचे हे अर्पण होते. \b \lh \v 78 बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले. \li1 \v 79 त्याचे अर्पण हे: \li2 पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; \li2 \v 80 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र; \li2 \v 81 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा; \li2 \v 82 पापार्पणासाठी एक बोकड; \li2 \v 83 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. \lf एनानाचा पुत्र अहीराचे हे अर्पण होते. \b \li1 \v 84 जेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्‍यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: \li2 बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती. \v 85 चांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल\f + \fr 7:85 \fr*\ft अंदाजे 28 कि.ग्रॅ.\ft*\f* वजनाची होती. \v 86 धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल\f + \fr 7:86 \fr*\ft अंदाजे 1.4 कि.ग्रॅ.\ft*\f* वजनाचे होते. \li2 \v 87 होमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्‍हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली. \li2 \v 88 शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्‍हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती. \b \lf वेदीच्या अभिषेकानंतर तिच्या समर्पणाकरिता ही अर्पणे होती. \b \p \v 89 जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले. \c 8 \s1 दीपांची मांडणी \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.” \p \v 3 याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच अहरोनाने केले; त्याने दीपस्तंभाच्या समोरील बाजूस दिवे लावले. \v 4 दीपस्तंभ अशाप्रकारे घडविला गेला होता: जसे याहवेहने मोशेला दाखविले होते त्या नमुन्याप्रमाणेच तो त्याच्या बैठकीपासून त्याच्या फुलांपर्यंत सोन्याने घडविला होता. \s1 लेव्यांचे समर्पण \p \v 5 याहवेह मोशेला म्हणाले, \v 6 “लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर. \v 7 त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील. \v 8 मग त्यांनी एक गोर्‍हा घ्यावा व त्याबरोबरचे अन्नार्पण जे जैतुनाच्या तेलात मळलेले सपीठ आणावे; आणि पापार्पणासाठी आणखी एक गोर्‍हा आणावा. \v 9 लेव्यांना सभामंडपाच्या समोर घेऊन यावे व सर्व इस्राएल समुदायाला एकत्र करावे. \v 10 लेव्यांना याहवेहपुढे सादर करावे व इस्राएली लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत. \v 11 अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.” \p \v 12 मग लेव्यांनी गोर्‍ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्‍हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा. \v 13 मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे. \v 14 अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील. \p \v 15 तू लेवींना शुद्ध करून हेलावणीचे अर्पण म्हणून मला सादर केल्यानंतर, त्यांनी आपले काम करण्याकरिता सभामंडपात यावे. \v 16 इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे. \v 17 इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे. \v 18 आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे. \v 19 मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही. \p \v 20 मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले. \v 21 लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले. \v 22 नंतर लेवी लोक अहरोन व त्याच्या पुत्रांच्या देखरेखीखाली सेवा करण्यासाठी सभामंडपात आले. लेव्यांच्या संबंधी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे त्यांनी केले. \p \v 23 याहवेह मोशेला म्हणाले, \v 24 “लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे. \v 25 पन्नासाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या रोजच्या सेवेतून निवृत्त व्हावे व त्यानंतर काम करू नये. \v 26 त्यांनी सभामंडपात आपल्या बांधवांना त्यांच्या कार्यात मदत करावी; परंतु त्यांनी स्वतः काम करू नये. याप्रकारे तू लेवी लोकांची कामे नेमून द्यावी.” \c 9 \s1 वल्हांडण सण \p \v 1 इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा. \v 3 नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.” \p \v 4 तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले. \v 5 त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. \p \v 6 परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले. \v 7 आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?” \p \v 8 मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.” \p \v 9 मग याहवेहने मोशेला म्हटले, \v 10 “इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा, \v 11 परंतु त्यांनी तो दुसर्‍या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे. \v 12 त्यांनी दुसर्‍या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यातील काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्याचे एकही हाड मोडू नये. जेव्हा ते वल्हांडण पाळतात, तेव्हा त्यांनी सर्व नियम पाळावेत. \v 13 पण जो कोणी विधीनुसार शुद्ध असला आणि प्रवासात नसला, तरीही वल्हांडण पाळीत नाही तर त्यांना आपल्या लोकांतून काढून टाकले जावे, कारण त्यांनी नेमलेल्या वेळेस याहवेहला अर्पण सादर केले नाही. त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. \p \v 14 “ ‘तुमच्यामध्ये राहत असणार्‍या परदेशी व्यक्तीनेही विधी नियमानुसार याहवेहचा वल्हांडण पाळावा. परदेशी व स्वदेशी व्यक्तीसाठी सारखाच नियम असावा.’ ” \s1 निवासमंडपावरील मेघ \p \v 15 ज्या दिवशी निवासमंडप, कराराच्या नियमाचा मंडप उभारण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याला झाकून टाकले. संध्याकाळपासून सकाळपर्यंत निवासमंडपावरील मेघ अग्नीसारखे दिसू लागले. \v 16 आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले. \v 17 जेव्हा मंडपावरून मेघ वर जाई, तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; आणि जेव्हा मेघ थांबत असे, तिथे इस्राएली लोक तळ देत असत. \v 18 याहवेहच्या आज्ञेनुसार इस्राएली लोक प्रवासास निघत असत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत. जोपर्यंत निवासमंडपावर मेघ थांबत असे तोपर्यंत ते तळ देऊन राहत असत. \v 19 जेव्हा मेघ दीर्घकाळ निवासमंडपावर थांबून राहिला, तेव्हा इस्राएली लोक याहवेहची आज्ञा पाळीत व पुढे जात नसत. \v 20 कधीकधी मेघ काहीच दिवस निवासमंडपावर थांबत असे, तेव्हा याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देऊन राहत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. \v 21 कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी जेव्हा तो वरती घेतला जाई, लोक पुढे जात. तो दिवस असो किंवा रात्र, जेव्हा मेघ वरती घेतला जात असे, ते पुढे निघत असत. \v 22 निवासमंडपावर मेघ दोन दिवस थांबून राहो किंवा एक महिना किंवा एक वर्ष राहो, इस्राएली लोक आपल्या छावणीत राहत आणि पुढे जात नसत; परंतु जेव्हा मेघ वर घेतला जाई, ते पुढे जात. \v 23 याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले. \c 10 \s1 चांदीचे कर्णे \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले: \v 2 “तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर. \v 3 दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व समुदायाने सभामंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ तुझ्यापुढे एकत्र जमावे. \v 4 जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे. \v 5 जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे. \v 6 दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील \v 7 जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे. \p \v 8 “अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्‍या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा. \v 9 जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल. \v 10 तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” \s1 इस्राएली लोक सीनाय सोडतात \p \v 11 दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला. \v 12 तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करीत राहिले. \v 13 याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार ते पहिल्या प्रवासास निघाले. \p \v 14 यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता. \v 15 सूवाराचा पुत्र नथानेल हा इस्साखार वंशाच्या दलावर होता, \v 16 आणि हेलोनाचा पुत्र एलियाब जबुलून वंशाच्या दलावर होता. \v 17 मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले. \p \v 18 त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता. \v 19 सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता. \v 20 आणि देउएलाचा पुत्र एलीआसाफ हा गाद वंशाच्या दलावर होता. \v 21 मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा. \p \v 22 एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता. \v 23 पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता, \v 24 आणि गिदोनाचा पुत्र अबीदान हा बिन्यामीन वंशाच्या दलावर होता. \p \v 25 शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता. \v 26 ओक्रानाचा पुत्र पगीयेल हा आशेर वंशाच्या दलावर होता, \v 27 आणि एनानाचा पुत्र अहीरा हा नफताली वंशाच्या दलावर होता. \v 28 पुढे निघताना इस्राएली दलांच्या प्रवासाचा हा क्रम होता. \p \v 29 आणि मोशेचा सासरा मिद्यानी रऊएलचा पुत्र होबाबला मोशे म्हणाला, “आम्ही त्या ठिकाणाकडे जात आहोत, ज्याविषयी याहवेहने सांगितले की, ‘मी ते तुम्हाला देईन.’ तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुला चांगली वागणूक देऊ, कारण याहवेहने इस्राएली लोकांना उत्तम गोष्टींविषयी अभिवचन दिले आहे.” \p \v 30 तो त्याला म्हणाला, “नाही, मी येणार नाही; मी माझा देश आणि माझ्या लोकांकडे जात आहे.” \p \v 31 पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू. \v 32 तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.” \p \v 33 मग ते याहवेहचे पर्वत म्हणजेच सीनाय पर्वतापासून निघाले व तीन दिवसांचा प्रवास करीत गेले. याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्याचे ठिकाण पाहण्यासाठी त्या तीन दिवसांचा प्रवास करीत त्यांच्यापुढे गेला. \v 34 ते छावणीतून निघाले तेव्हा दिवसा याहवेहचा मेघ त्यांच्यावर होता. \p \v 35 जेव्हा कोश पुढे जात असे तेव्हा मोशे म्हणे, \q1 “हे याहवेह, सक्रिय व्हा! \q2 तुमच्या शत्रूंची पांगापांग होवो; \q2 तुमचे वैरी तुमच्यापुढून पळून जावोत.” \p \v 36 जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे, \q1 “हे याहवेह, परत या, \q2 इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.” \c 11 \s1 याहवेहपासून अग्नी \p \v 1 मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला. \v 2 जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला. \v 3 म्हणून त्या जागेचे नाव तबेरा\f + \fr 11:3 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa जळणे\fqa*\f* असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता. \s1 याहवेहकडून लावे पक्षी येतात \p \v 4 नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे! \v 5 इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते. \v 6 परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!” \p \v 7 मान्ना आकाराने धण्यासारखा असून रंगाने मोत्यासारखा होता. \v 8 लोक चोहीकडे जाऊन तो गोळा करीत असत आणि मग जात्यात दळीत किंवा उखळात कुटत असत. मग ते भांड्यात शिजवित किंवा त्याच्या भाकरी बनवित असत. त्याची चव जैतुनाच्या तेलात बनलेल्या भाकरीप्रमाणे असे. \v 9 रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे. \p \v 10 प्रत्येक घराण्यातील लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून रडत होते आणि याहवेहचा त्यांच्यावर अतिशय क्रोध आला होता त्यामुळे मोशे अस्वस्थ झाला. \v 11 मोशेने याहवेहला विचारले, “तुमच्या सेवकावर हे कष्ट तुम्ही का आणले? तुम्ही असंतुष्ट व्हावे असे मी काय केले की तुम्ही या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर लादावे? \v 12 मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता? \v 13 या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’ \v 14 मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे. \v 15 तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.” \p \v 16 याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे. \v 17 मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही. \p \v 18 “लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल. \v 19 तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस, \v 20 परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ” \p \v 21 पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’ \v 22 गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?” \p \v 23 याहवेहने मोशेला उत्तर दिले, “याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील.” \p \v 24 मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले. \v 25 मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही. \p \v 26 पण दोघे पुरुष ज्यांची नावे एलदाद व मेदाद छावणीतच राहिले होते. वडिलांच्या यादीत त्यांची नावे होती, परंतु ते बाहेर तंबूकडे गेले नाही. तरी त्यांच्यावरही आत्मा उतरला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली. \v 27 एका तरुण पुरुषाने धावत जाऊन मोशेला सांगितले, “एलदाद व मेदाद छावणीत भविष्यवाणी करीत आहेत.” \p \v 28 नूनाचा पुत्र यहोशुआ, जो तारुण्यापासून मोशेचा मदतनीस होता, तो म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना थांबवा!” \p \v 29 पण मोशे म्हणाला, “माझ्यासाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? माझी तर इच्छा आहे की, याहवेहचे सर्व लोक संदेष्टे असावेत आणि याहवेहने सर्व लोकांवर आपला आत्मा ठेवावा!” \v 30 नंतर मोशे व इस्राएलांचे वडीलजन छावणीकडे परतले. \p \v 31 मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात\f + \fr 11:31 \fr*\ft अंदाजे 90 सें.मी.\ft*\f* उंचीचा थर पसरला. \v 32 त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर\f + \fr 11:32 \fr*\ft अंदाजे 1.6 मेट्रिक टन\ft*\f* वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले. \v 33 परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले. \v 34 म्हणून त्या ठिकाणाचे नाव किब्रोथ-हत्ताव्वा\f + \fr 11:34 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa लालसेच्या कबरा\fqa*\f* असे पडले, कारण ज्यांनी इतर भोजनाची लालसा धरली त्या लोकांना त्या ठिकाणी पुरले. \p \v 35 किब्रोथ-हत्ताव्वा येथून लोकांनी हसेरोथकडे प्रवास केला आणि तिथे राहिले. \c 12 \s1 मिर्याम व अहरोनाचा मोशेला विरोध \p \v 1 मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता. \v 2 त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले. \p \v 3 (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.) \p \v 4 याहवेह लगेचच मोशे, अहरोन आणि मिर्यामला म्हणाले, “तुम्ही तिघेही सभामंडपाकडे बाहेर या.” तेव्हा ते तिघे बाहेर गेले. \v 5 मग याहवेह मेघस्तंभातून खाली आले; आणि निवासमंडपाच्या दाराशी उभे राहून अहरोन व मिर्याम यांना बोलाविले. जेव्हा ते पुढे गेले, \v 6 याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: \q1 “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, \q2 मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, \q2 स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो. \q1 \v 7 परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; \q2 तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे. \q1 \v 8 मी त्याच्याशी कोड्यात नाही, \q2 तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; \q2 तो याहवेहचे रूप पाहतो. \q1 माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास \q2 तुम्हाला भीती का वाटली नाही?” \p \v 9 मग याहवेहचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला आणि याहवेह त्यांना सोडून निघून गेले. \p \v 10 जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते, \v 11 तेव्हा तो मोशेला म्हणाला, “माझे स्वामी, मी तुला विनंती करतो, कृपया, आम्ही मूर्खपणाने केलेले पाप आमच्याविरुद्ध मोजू नको. \v 12 जसे एक तान्हे मृत बाळ आपल्या आईच्या उदरातून जन्माला येताच त्याचे अर्धे शरीर नष्ट झालेले असते, असे तिला राहू देऊ नको.” \p \v 13 तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला, “हे याहवेह कृपा करून तिला बरे करा!” \p \v 14 तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा पिता तिच्या तोंडावर थुंकला असता, तर तिला सात दिवस लाजेने घालवावे लागले असते की नाही? तिला सात दिवस छावणीच्या बाहेर वेगळे राहू दे, त्यानंतर तिला परत आणावे.” \v 15 मग मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर वेगळे ठेवण्यात आले आणि तिला पुन्हा छावणीत आणेपर्यंत लोक पुढच्या प्रवासास गेले नाही. \p \v 16 यानंतर त्यांनी हसेरोथ सोडले आणि पारान नावाच्या रानात तळ दिला. \c 13 \s1 कनान देशाची पाहणी \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.” \p \v 3 म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते. \b \lh \v 4 त्यांची नावे ही आहेत: \b \li1 रऊबेन गोत्रातील जक्कूरचा पुत्र शम्मुवा; \li1 \v 5 शिमओन गोत्रातील होरीचा पुत्र शाफाट; \li1 \v 6 यहूदाह गोत्रातील यफुन्नेहचा पुत्र कालेब; \li1 \v 7 इस्साखार गोत्रातील योसेफाचा पुत्र इगाल; \li1 \v 8 एफ्राईमच्या गोत्रातील नूनाचा पुत्र होशा; \li1 \v 9 बिन्यामीन गोत्रातील राफूचा पुत्र पालती; \li1 \v 10 जबुलून गोत्रातील सोदीचा पुत्र गाद्दीयेल; \li1 \v 11 मनश्शेहच्या गोत्रातील (योसेफाचे गोत्र) सुसीचा पुत्र गाद्दी; \li1 \v 12 दान गोत्रातील गमल्लीचा पुत्र अम्मीएल; \li1 \v 13 आशेर गोत्रातील मिखाएलचा पुत्र सेथूर; \li1 \v 14 नफताली गोत्रातील वोफसीचा पुत्र नाहबी; \li1 \v 15 गाद गोत्रातील माकीचा पुत्र गऊवेल. \b \lf \v 16 देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.) \b \p \v 17 जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा. \v 18 आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा. \v 19 ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे की वाईट आहे? कोणत्या प्रकारच्या नगरांमध्ये त्यांची वस्ती आहे? ते उजाड आहेत की तटबंदीची आहेत? \v 20 तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.) \p \v 21 मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला. \v 22 ते वरती नेगेवमधून गेले आणि हेब्रोनात आले, जिथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. (हेब्रोन हे इजिप्त देशातील सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले गेले होते.) \v 23 ते जेव्हा अष्कोल\f + \fr 13:23 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa घोस\fqa*\f* खोर्‍याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली. \v 24 त्या खोर्‍याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता. \v 25 देश हेरून चाळीस दिवसानंतर ते परत आले. \s1 हेरांचा अहवाल \p \v 26 पारान रानातील कादेश येथे मोशे आणि अहरोन व सर्व इस्राएली लोकांकडे ते परत आले. तिथे त्यांनी त्यांना व सर्व समुदायाला अहवाल दिला व त्या देशाची फळे दाखविली. \v 27 त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे. \v 28 परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले. \v 29 नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.” \p \v 30 तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.” \p \v 31 परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.” \v 32 आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत. \v 33 तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.” \c 14 \s1 लोकांचा विद्रोह \p \v 1 रात्रीच्या वेळी लोकसमुदायाचे सर्व सभासद आपला आवाज उंच करून मोठ्याने रडू लागले. \v 2 सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते! \v 3 आम्ही तलवारीने पडावे म्हणूनच या देशात याहवेह आम्हाला आणत आहेत काय? आमच्या स्त्रिया आणि लेकरांना गुलाम म्हणून नेण्यात येईल. आम्ही इजिप्तकडे परत जावे हे आमच्यासाठी बरे नाही काय?” \v 4 आणि ते एकमेकांना म्हणाले, “आपण एखाद्या पुढार्‍याची निवड करू आणि इजिप्त देशास परत जाऊ.” \p \v 5 तेव्हा सर्व इस्राएली समुदाय जो तिथे एकत्र जमला होता, त्यांच्यासमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. \v 6 नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब, जे त्यापैकीच देश हेरून आले होते तेही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली \v 7 आणि सर्व इस्राएली समुदायाला म्हणाले, “आम्ही ज्या देशातून फिरून आलो तो देश अतिशय चांगला आहे. \v 8 याहवेह जर आमच्याविषयी संतुष्ट असले तर त्या दूध व मध वाहत्या देशात ते आपल्याला घेऊन जातील आणि तो देश आम्हाला देतील. \v 9 मात्र याहवेहविरुद्ध बंड करू नका. आणि तेथील लोकांचे भय बाळगू नका, कारण आम्ही त्यांना नष्ट करणार. त्यांचे संरक्षण नाहीसे झाले आहे, परंतु याहवेह आमच्याबरोबर आहेत. त्यांचे भय बाळगू नका.” \p \v 10 परंतु सर्व समुदाय त्यांना धोंडमार करण्याविषयी बोलू लागले. तेव्हा सभामंडपावर सर्व इस्राएली लोकांना याहवेहचे तेज प्रकट झाले, \v 11 याहवेह मोशेला म्हणाले, “हे लोक कुठवर माझा तिरस्कार करणार? त्यांच्यामध्ये मी केलेले सर्व चमत्कार पाहूनही कुठवर माझ्यावर विश्वास ठेवण्यास ते नकार देतील? \v 12 मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.” \p \v 13 मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे. \v 14 आणि ते त्या देशात राहणार्‍यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता. \v 15 जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील, \v 16 ‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’ \p \v 17 “आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो: \v 18 ‘याहवेह मंदक्रोध, अत्यंत प्रीती करणारे, अन्याय व पापाची क्षमा करणारे आहेत. तरीही ते दोषीला निर्दोष सोडत नाहीत; तर तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततींना देतात.’ \v 19 आपल्या महान प्रीतीनुसार, जसे इजिप्त सोडले तेव्हापासून आतापर्यंत क्षमा केली, तसेच आताही त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करावी.” \p \v 20 मग याहवेहने उत्तर दिले, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. \v 21 परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे. \v 22 ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली; \v 23 त्यांच्यातील एकही व्यक्ती, जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखले आहे त्यातील कोणीही तो देश पाहणार नाही. \v 24 परंतु माझा सेवक कालेब याच्यावर वेगळा आत्मा आहे आणि तो संपूर्ण हृदयाने माझे अनुसरण करतो, म्हणून तो ज्या देशात गेला होता तिथे मी त्याला नेईन व त्याचे वंशज त्या देशाचे वतन पावतील. \v 25 अमालेकी व कनानी लोक खोर्‍यामध्ये राहतात म्हणून, उद्या तुम्ही माघारी फिरा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने जा.” \p \v 26 याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले: \v 27 “कुठपर्यंत हा दुष्ट समुदाय माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? या कुरकुर करणाऱ्या इस्राएली लोकांच्या तक्रारी मी ऐकल्या आहे. \v 28 म्हणून त्यांना सांगा, याहवेह म्हणतात, खचितच मी जिवंत आहे, जे काही तुम्ही बोलला आहात तेच मी तुम्हास करेन: \v 29 याच रानात तुम्ही सर्व मरण पावाल—तुमच्यापैकी प्रत्येक जे वीस वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत, ज्यांची जनगणनेमध्ये गणती झाली आणि ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली. \v 30 ज्या देशाविषयी मी हात उंच करून म्हटले की त्यात मी तुम्हाला वसवेन, त्या देशात तुमच्यापैकी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ यांच्याशिवाय कोणीही जाणार नाही. \v 31 ज्या तुमच्या लेकरांविषयी तुम्ही म्हणाला होता की, त्या देशात ते लूट असे होतील, त्यात मी त्यांना आणेन, अशासाठी की ज्या देशाचा तुम्ही धिक्कार केला त्याचा त्यांनी आनंद भोगावा. \v 32 परंतु तुमच्याविषयी तर असे की, तुमचे देह याच रानात पडतील. \v 33 तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील. \v 34 चाळीस दिवस तुम्ही देश हेरला त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला एक वर्ष अशी चाळीस वर्षे तुम्ही आपल्या पापाचे परिणाम भोगाल आणि माझ्या विरोधात जाणे कसे असते हे तुम्ही जाणाल. \v 35 मी याहवेह हे बोललो आहे आणि जे माझ्या विरोधात एकत्र आले आहेत त्या संपूर्ण दुष्ट समाजाला मी असे निश्चितच करेन. त्यांचा शेवट ते या रानातच पाहतील; ते येथेच मरण पावतील.” \p \v 36 म्हणून मोशेने ज्या पुरुषांना देश हेरण्यास पाठवले होते, ज्यांनी माघारी येऊन त्या देशाविषयी वाईट अहवाल पसरविला होता, संपूर्ण समाजाला मोशेविरुद्ध कुरकुर करण्यास भाग पाडले होते— \v 37 हे पुरुष जे त्या देशाबद्दल वाईट अहवाल पसरविण्यास जबाबदार होते, त्यांच्यावर पीडा आली व ते याहवेहसमोर मरण पावले. \v 38 देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी फक्त नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब हे वाचले. \p \v 39 जेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, त्यांनी मोठा शोक केला. \v 40 दुसर्‍या दिवशी पहाटेच ते डोंगराळ प्रदेशाकडे डोंगराच्या शिखराकडे असे म्हणत निघाले, “याहवेहने वचन दिलेल्या देशाकडे वर जाण्यास आम्ही तयार आहोत. खरोखरच आम्ही पाप केले आहे!” \p \v 41 परंतु मोशे म्हणाला, “तुम्ही याहवेहचा आज्ञाभंग का करता? यात तुम्हाला यश मिळणार नाही! \v 42 वर जाऊ नका, कारण याहवेह तुमच्यासोबत नाहीत. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल, \v 43 कारण अमालेकी व कनानी लोक तिथे तुम्हाला सामोरे येतील. कारण तुम्ही याहवेहपासून मागे फिरला आहात, ते तुमच्याबरोबर नाहीत आणि तुम्ही तलवारीने मरून पडाल.” \p \v 44 जरी त्यांनी डोंगराळ प्रदेशाच्या उंच शिखरापर्यंत जाण्याची धिटाई केली, तरी मोशे किंवा याहवेहच्या कराराचा कोश छावणीतून हलले नाहीत. \v 45 मग त्या डोंगराळ देशात राहणारे अमालेकी व कनानी लोक खाली आले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि होरमाहपर्यंत त्यांना मारत आले. \c 15 \s1 अर्पणांविषयी नियम \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: जो देश मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देत आहे त्यात तुम्ही प्रवेश कराल \v 3 आणि याहवेहसाठी सुवास म्हणून आपली खिल्लारे व गुरे यातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण कराल, मग ते होमार्पण किंवा यज्ञ असो, विशेष नवस असो किंवा स्वखुशीचे अर्पण किंवा सणाचे अर्पण असो. \v 4 अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन\f + \fr 15:4 \fr*\ft अंदाजे 1 लीटर\ft*\f* जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा\f + \fr 15:4 \fr*\ft अंदाजे 1.6 कि.ग्रॅ.\ft*\f* भाग सादर करावा. \v 5 होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा. \p \v 6 “ ‘मेंढ्याबरोबर एक एफाचे दोन भाग बारीक सपीठ, एकतृतीयांश हीन\f + \fr 15:6 \fr*\ft अंदाजे 1.3 लीटर\ft*\f* जैतुनाच्या तेलात मळून अन्नार्पण तयार करावे, \v 7 आणि अन्नार्पण म्हणून एकतृतीयांश हीन द्राक्षारस, हे सर्व याहवेहला सुवास म्हणून अर्पण करावे. \p \v 8 “ ‘जेव्हा तुम्ही होमार्पण किंवा यज्ञ म्हणून, याहवेहला विशेष नवस किंवा शांत्यर्पण म्हणून एक तरुण बैल तयार करता, \v 9 बैलाबरोबर एफाचे तीन दशांश\f + \fr 15:9 \fr*\ft अंदाजे 5 कि.ग्रॅ.\ft*\f* बारीक सपीठ, अर्धा हीन\f + \fr 15:9 \fr*\ft अंदाजे 1.9 लीटर\ft*\f* जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे. \v 10 आणि पेयार्पण म्हणून अर्धा हीन द्राक्षारस आणावा. हे याहवेहसाठी सुवासिक असे अन्नार्पण आहे. \v 11 प्रत्येक बैल किंवा मेंढा, प्रत्येक कोकरू किंवा तरुण बोकड अशा प्रकारे तयार करावे. \v 12 जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे. \p \v 13 “ ‘देशाच्या प्रत्येक रहिवासीने याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करताना या गोष्टी अशाच पद्धतीने कराव्या. \v 14 जेव्हा कोणी परदेशी किंवा तुमच्यामधील कोणीही इतर रहिवासी याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करतात, त्यांनीही तुम्ही ज्याप्रकारे करतात, त्याच पद्धतीने करावे, हे पुढील सर्व पिढ्यांपर्यंत असावे. \v 15 समुदायाने स्वतःसाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी सारखेच नियम पाळावे. येणार्‍या पिढ्यांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. तुम्ही व परदेशी याहवेहसमोर सारखेच आहात. \v 16 तुमच्यासाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी एकच नियम व कायदे असावेत.’ ” \p \v 17 याहवेह मोशेला म्हणाले, \v 18 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुम्ही जेव्हा जाल \v 19 आणि त्या भूमीचे फळ खाल, तेव्हा त्याचा एक भाग याहवेहसमोर सादर करावा. \v 20 तुमच्या मळलेल्या पिठाची पहिली भाकर सादर करावी आणि ती खळ्यातील अर्पण म्हणून सादर करावी. \v 21 तुमच्या मळलेल्या पिठाच्या पहिल्या भागाचे हे अर्पण तुम्ही याहवेहला तुमच्या भावी पिढ्यांपर्यंत करावे. \s1 नकळत केलेल्या पापाबद्दल अर्पणे \p \v 22 “ ‘आता जर तुम्ही एक समुदाय म्हणून याहवेहने मोशेला दिलेल्या या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा पाळण्यास नकळतपणे अपयशी ठरला— \v 23 ज्या आज्ञा याहवेहने मोशेद्वारे तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या दिवशी त्या दिल्या तेव्हापासून भविष्यातही येणार्‍या पिढ्यांसाठी त्या असतील— \v 24 आणि जर समुदाय जागृत नसताना हे नकळत घडले असेल, तर संपूर्ण समुदायाने एका तरुण गोर्‍ह्याचे याहवेहला सुवासिक होमार्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण आणि पापार्पणासाठी\f + \fr 15:24 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa शुद्धीकरणासाठी\fqa*\f* एक बोकड अर्पावा. \v 25 याजकाने सर्व इस्राएली समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल; कारण त्यांनी मुद्दाम पाप केले नव्हते आणि त्यांनी याहवेहला आपल्या पापाबद्दल अन्नार्पण व पापार्पण सादर केले आहेत. \v 26 सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते. \p \v 27 “ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी. \v 28 ज्या व्यक्तीने नकळत पाप केले आहे त्या व्यक्तीसाठी याजकाने याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे आणि जेव्हा प्रायश्चित केले जाईल, तेव्हा त्या व्यक्तीला क्षमा करण्यात येईल. \v 29 जे कोणी नकळत पाप करतील त्यांच्यासाठी हाच एक नियम लागू असावा, ती व्यक्ती जन्मतः इस्राएली असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशी असो. \p \v 30 “ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे. \v 31 कारण त्यांनी याहवेहच्या शब्दाला तुच्छ मानले आहे आणि याहवेहच्या आज्ञा मोडल्या आहेत, त्यांचे खचितच उच्छेदन करावे; त्यांचा दोष त्यांच्यावर राहील.’ ” \s1 शब्बाथ भंग करणार्‍यास मरणदंड \p \v 32 इस्राएली लोक रानात असताना, एक मनुष्य शब्बाथ दिवशी लाकडे गोळा करीत असताना सापडला. \v 33 तेव्हा ज्यांनी त्याला लाकडे गोळा करताना पकडले, त्यांनी त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळीसमोर आणले, \v 34 आणि त्यांनी त्याला ताब्यात ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी त्यांना काही स्पष्ट माहीत नव्हते. \v 35 मग याहवेह मोशेला म्हणाले, “त्या मनुष्याने मरावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर धोंडमार करावा.” \v 36 मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली. \s1 वस्त्रांना गोंडे \p \v 37 याहवेह मोशेला म्हणाले, \v 38 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: येणार्‍या सर्व पिढ्यांपर्यंत तुम्ही आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे, प्रत्येक गोंड्यावर निळा दोरा असावा. \v 39 ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये. \v 40 मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल. \v 41 तुमचा परमेश्वर व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले तो मीच याहवेह आहे. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” \c 16 \s1 कोरह, दाथान अबीराम यांचे बंड \p \v 1 लेवीचा पुत्र कोहाथ, त्याचा पुत्र इसहार, त्याचा पुत्र कोरह, आणि रऊबेन गोत्रातील काही लोक म्हणजे एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम व पेलेथाचा पुत्र ओन हे उन्मत्त झाले \v 2 आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते. \v 3 ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?” \p \v 4 जेव्हा मोशेने हे ऐकले, तेव्हा तो पालथा पडला. \v 5 मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील. \v 6 तर कोरहा, तू आणि तुझ्या सर्व अनुयायांनी असे करावे: धुपाटणे घ्या \v 7 आणि उद्या त्यात जळते निखारे व धूप टाकून ती याहवेहपुढे ठेवा. ज्याला याहवेह निवडतील तोच पुरुष पवित्र ठरेल. लेवींच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले आहे!” \p \v 8 मोशे कोरहाला हे सुद्धा म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो आता ऐका! \v 9 तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? \v 10 त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता. \v 11 तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?” \p \v 12 मग मोशेने एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम यांना बोलाविले. परंतु त्यांनी म्हटले, “आम्ही येणार नाही! \v 13 दूध व मध वाहत असलेल्या देशातून तू आम्हाला या रानात मारण्यास आणले ते पुरे नाही काय? आणि आता तुला आमच्यावर प्रभुत्व करावयाचे आहे! \v 14 त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्‍या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय\f + \fr 16:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa या माणसांना फसवितो\fqa*\f*? नाही, आम्ही येणार नाही!” \p \v 15 मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.” \p \v 16 पुढे मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तुला अनुसरणाऱ्या सर्वांना घेऊन तू येथे याहवेहसमोर ये. तू आणि ते व अहरोनही त्यावेळी हजर असेल. \v 17 प्रत्येकाने असे सर्व मिळून आपआपल्या दोनशे पन्नास धुपाटण्या धुपासह याहवेहसमक्ष घेऊन यावे. अहरोन त्याचे आणि तू तुझे धुपाटणे घेऊन हजर व्हावे.” \v 18 याप्रमाणे प्रत्येकाने आपले धुपाटणे घेतले, त्यात जळते निखारे व धूप टाकला आणि ते मोशे आणि अहरोन यांच्याबरोबर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबले. \v 19 जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले. \v 20 याहवेह, मोशे व अहरोन यांना म्हणाले, \v 21 “तुम्ही या लोकांच्या समुदायापासून दूर व्हा म्हणजे मी क्षणार्धात त्यांचा नाश करेन.” \p \v 22 पण मोशे आणि अहरोन याहवेहपुढे जमिनीवर पालथे पडले व विनंती करून म्हणाले “हे परमेश्वरा, सर्व जीवधार्‍यांना जीवनाचा श्वास प्रदान करणाऱ्या परमेश्वरा, एकाच मनुष्याने पाप केले तरी तुम्ही सर्व लोकांवर रागावणार काय?” \p \v 23 नंतर याहवेह मोशेला म्हणाले, \v 24 “कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या तंबूपासून सर्व समुदायाला दूर व्हावयाला सांग.” \p \v 25 तेव्हा मोशे दाथान व अबीराम यांच्या तंबूकडे धावत गेला. त्याच्यामागे इस्राएली पुढारीही गेले. \v 26 त्वरा करा, मोशे समुदायाला म्हणाला, “या दुष्ट माणसांच्या तंबूंपासून दूर व्हा. त्यांच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. नाहीतर त्यांच्या पापामुळे त्यांच्याबरोबर तुमचाही नाश होईल.” \v 27 मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले. \p \v 28 त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल: \v 29 जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही. \v 30 परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.” \p \v 31 त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली \v 32 आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले. \v 33 ते जिवंतपणीच अधोलोकात गेले आणि त्यांचा व त्यांच्या मालकीचे जे होते त्यांचा नाश झाला; मग जमीन पूर्ववत झाली, त्यांचा नाश होऊन ते सर्वजण समुदायातून नाहीसे झाले. \v 34 त्यांच्या आक्रोशामुळे, “पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील!” असे म्हणत इस्राएली लोक भीतीने ओरडत पळत सुटले. \p \v 35 नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्‍या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले. \p \v 36 याहवेह मोशेला म्हणाले, \v 37 “अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला अग्नीमधून सर्व धुपाटणी ओढून घेण्यास सांगावे. कारण ती पवित्र असून याहवेहला समर्पित केलेली आहेत. त्याचप्रमाणे त्याने तो जळका धूपही थोड्या अंतरावर विखरून टाकावा. \v 38 ज्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून पाप केले होते, त्या लोकांच्या धुपाटण्यांतील हा धूप विखरून टाकावा. नंतर वेदीला आच्छादन म्हणून त्या धुपाटण्याचे रुंद पत्रे तयार करावेत, कारण ती धुपाटणी याहवेहपुढे वापरली असल्यामुळे पवित्र आहेत. वेदीवरील हा पत्रा इस्राएली लोकांना या प्रसंगाचे चिन्ह म्हणून राहील.” \p \v 39 त्याप्रमाणे एलअज़ार याजकाने ती दोनशे पन्नास कास्याची धुपाटणी घेतली आणि ती ठोकून वेदीला आच्छादन करण्याकरिता त्यांचा पत्रा तयार केला. \v 40 कोरह आणि त्याचे सोबत्यांची जी दशा झाली, तशी वेदीपुढे अनाधिकृतपणे धूप जाळणार्‍या म्हणजे अहरोनाचा वंशज नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची होऊ नये, याची आठवण इस्राएली लोकांना देण्याकरिता ते वेदीवरील आच्छादन होते. याप्रमाणे याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळण्यात आल्या. \p \v 41 पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.” \p \v 42 लवकरच तिथे मोशे व अहरोनाच्या विरुद्ध समुदाय जमला. तेवढ्यात एकाएकी सभामंडपावर मेघ उतरून याहवेहचे गौरव पसरल्याचे त्यांना दिसले. \v 43 मोशे आणि अहरोन सभामंडपाच्या दाराशी येऊन उभे राहिले; \v 44 आणि याहवेह मोशेला म्हणाले, \v 45 “या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले. \p \v 46 नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.” \v 47 मोशेने सांगितल्याप्रमाणे अहरोनाने केले. तो लोकांमध्ये पळत गेला, कारण पीडा त्यांच्यामध्ये सुरू झाली होती. त्याने धूप जाळले आणि लोकांसाठी प्रायश्चित्त केले. \v 48 मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली. \v 49 परंतु त्याअगोदरच 14,700 लोक मरण पावले होते. आदल्याच दिवशी कोरहाबरोबर मेलेल्या लोकांव्यतिरिक्त हे आणखी लोक मरण पावले होते. \v 50 यानंतर अहरोन मोशेकडे सभामंडपाच्या दाराशी परत आला, कारण पीडा थांबली होती. \c 17 \s1 अहरोनाची काठी फुलते \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी अशा बारा काठ्या घे. प्रत्येक पुरुषाचे नाव त्याच्या काठीवर लिही. \v 3 लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्‍याची एक काठी असावी. \v 4 सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या. \v 5 ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.” \p \v 6 म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्‍यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती. \v 7 मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या. \p \v 8 दुसर्‍या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले. \v 9 मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्‍याने आपआपली काठी घेतली. \p \v 10 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्‍यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.” \v 11 याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले. \p \v 12 इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत! \v 13 जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?” \c 18 \s1 याजक व लेवी यांची कर्तव्ये \p \v 1 याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार. \v 2 तू व तुझे पुत्र कराराच्या नियमाच्या कोशापुढे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुझ्याशी जडून व तुला मदत करण्यासाठी लेवी वंशातील, तुझ्या पूर्वजांच्या गोत्रातील तुझ्या बांधवांना आपल्यासोबत आण. \v 3 ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल. \v 4 त्यांनी तुझ्याशी जडून सभामंडपाच्या सेवेसंबंधी—म्हणजेच मंडपातील सर्व कामासंबंधी जबाबदार असावे—आणि जिथे तू असणार तिथे इतर कोणीही जवळ येऊ नये. \p \v 5 “पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये. \v 6 इस्राएली लोकांतून सभामंडपातील सेवाकार्य करण्यासाठी, याहवेहसाठी समर्पित म्हणून लेवी वंशातील तुझे सोबती तुझ्यासाठी भेट म्हणून निवडले आहेत. \v 7 परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.” \s1 याजक व लेवी यांच्यासाठी दाने \p \v 8 याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे. \v 9 जो अग्नीपासून राखला जातो तो अर्पणातील परमपवित्र भाग तुझा व्हावा. परमपवित्र अर्पणे म्हणून ते माझ्यासाठी जे आणतात त्या सर्वांतून, ती अन्नार्पणे किंवा पापार्पणे किंवा दोषार्पणे असो, तो वाटा तुझा व तुझ्या पुत्रांचा आहे. \v 10 जसे परमपवित्र वस्तूतील, तसे ते खावे; प्रत्येक पुरुषाने ते खावे, ते तुम्ही पवित्र मानावे. \p \v 11 हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे. \p \v 12 जैतुनाचे सर्वोत्तम तेल आणि सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याच्या हंगामाचे प्रथमफळ म्हणून याहवेहला लोक देतात ते मी तुला देत आहे. \v 13 आपल्या भूमीचे सर्व प्रथमफळ लोक याहवेहकडे आणतात ते तुझे होईल. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध आहेत त्या प्रत्येकाने ते खावे. \p \v 14 इस्राएलात याहवेहला समर्पित केलेली प्रत्येक वस्तू तुझी होईल. \v 15 उदरातून जन्मलेले प्रत्येक प्रथम जन्मलेले संतान, जे याहवेहला अर्पिलेले आहेत, मग ते मनुष्याचे असो किंवा जनावरांचे, ते तुझे होतील. परंतु प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुत्राला व प्रत्येक अशुद्ध जनावराच्या नर वत्साला तू खंडणी भरून सोडवावे. \v 16 ते एक महिन्याचे झाल्यावर, पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ठरवलेली खंडणीची किंमत जी पाच चांदीचे शेकेल,\f + \fr 18:16 \fr*\ft अंदाजे 58 ग्रॅ.\ft*\f* म्हणजेच वीस गेरा भरून त्यांची खंडणी भरावी. \p \v 17 गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे. \v 18 जसे ओवाळणीचा छातीचा भाग व उजवी मांडी तुझे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मांस सुद्धा तुझ्या वाट्याचे होईल. \v 19 इस्राएली लोक याहवेहसाठी जी पवित्र अर्पणे आणतात, त्यातील जे काही बाजूला काढून ठेवले जाते, ते मी तुला आणि तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना शाश्वत वाटा म्हणून देत आहे. हा याहवेहसमोर तुझ्यासाठी व तुझ्या संतानांसाठी सर्वकाळचा मिठाच्या करार\f + \fr 18:19 \fr*\ft जसे मीठ प्रत्येक भोजनाचा चिरस्थायी भाग आहे. त्याप्रमाणेच हा करारही चिरस्थायी असावा\ft*\f* आहे. \p \v 20 याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.” \p \v 21 लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे. \v 22 येथून पुढे इस्राएली लोकांनी सभामंडपाजवळ जाऊ नये, नाहीतर त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल व ते मरतील. \v 23 लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही. \v 24 त्याऐवजी इस्राएली लोक जो दशांश अर्पण म्हणून याहवेहला सादर करतात तो मी लेवींना वतन म्हणून देत आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मी म्हटले: “त्यांना इस्राएलमध्ये वतन नसणार.” \p \v 25 याहवेह मोशेला म्हणाले, \v 26 “लेवी लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘इस्राएलातून जो दशांश मी तुम्हाला तुमचे वतन म्हणून देतो, जेव्हा तो तुम्हाला मिळतो, त्या दशमांशातील दहावा हिस्सा याहवेहचे अर्पण म्हणून सादर करावा. \v 27 तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल. \v 28 याप्रकारे इस्राएलातून जो दशांश तुम्हाला मिळतो त्यातून तुम्ही सुद्धा आपले अर्पण याहवेहला सादर करावे. या दशमांशातील जो याहवेहचा वाटा तो तुम्ही अहरोन याजकाला द्यावा. \v 29 तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वस्तूतील सर्वोत्तम आणि अतिपवित्र भाग याहवेहचा भाग म्हणून तुम्ही सादर करावा.’ \p \v 30 “लेव्यांना सांग: ‘जेव्हा तुम्ही सर्वोत्तम भाग सादर करतात, ते तुमच्यासाठी खळ्यातील किंवा द्राक्षकुंडातील उत्पन्न गणले जाईल. \v 31 बाकीच्या अर्पणातून तू व तुझ्या घराण्याने कोणत्याही ठिकाणी खावे, कारण सभामंडपातील तुमच्या सेवेसाठी असलेले ते तुमचे वेतन आहे. \v 32 सर्वोत्तम भाग सादर केल्यामुळे तुम्ही याबाबतीत दोषी ठरणार नाही; मग तुम्ही इस्राएली लोकांची अर्पणे विटाळविणार नाही व तुम्ही मरणार नाही.’ ” \c 19 \s1 शुद्धीकरणाचे पाणी \p \v 1 याहवेह मोशे आणि अहरोनला म्हणाले: \v 2 “याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी. \v 3 ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा. \v 4 त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे. \v 5 एलअज़ार याजकादेखत ती कालवड; तिचे कातडे, मांस, रक्त व आतडे यासह जाळण्यात यावी. \v 6 याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा. \v 7 त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे. \v 8 जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. \p \v 9 “शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे. \v 10 जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा. \p \v 11 “जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे. \v 12 त्यांनी तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील. \v 13 मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो. \p \v 14 “एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे, \v 15 आणि दोरीने झाकण न बांधलेले प्रत्येक उघडे पात्र अशुद्ध असावे. \p \v 16 “जो कोणी मोकळ्या मैदानात तलवारीने मारलेल्या व्यक्तीच्या शवाला स्पर्श करतो किंवा कोणी नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला किंवा कोणी मानवी हाडाला किंवा कबरेला स्पर्श करतो, त्याने सात दिवस अशुद्ध राहावे. \p \v 17 “अशुद्ध व्यक्तीसाठी, जाळलेल्या शुद्धतेच्या अर्पणातून थोडी राख घेऊन ती एका पात्रात घेऊन त्यांच्यावर स्वच्छ पाणी ओतावे. \v 18 आणि जो मनुष्य विधीनुसार शुद्ध आहे, त्याने एजोबाची फांदी घेऊन ती पाण्यात बुचकळावी व ते तंबू व त्याची पात्रे आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर शिंपडावे. त्याचप्रमाणे ज्यांनी मानवी हाड किंवा कबर किंवा ज्याचा वध झाला किंवा नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला स्पर्श केला त्यांच्यावरही ते पाणी शिंपडावे. \v 19 जो मनुष्य शुद्ध आहे, त्याने अशुद्ध झालेल्या व्यक्तींवर तिसर्‍या व सातव्या दिवशी हे पाणी शिंपडावे आणि सातव्या दिवशी त्याने त्यांना शुद्ध करावे. ज्यांचे शुद्धीकरण होत आहे त्यांनी आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्या संध्याकाळी ते शुद्ध होतील. \v 20 पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत. \v 21 हा त्यांच्यासाठी कायमचा नियम आहे. \p “जो मनुष्य शुद्धतेचे पाणी शिंपडतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावीत आणि जो कोणी शुद्धतेच्या पाण्याला स्पर्श करतो तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \v 22 अशुद्ध व्यक्ती ज्या वस्तूला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल आणि जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करेल त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.” \c 20 \s1 खडकातून पाणी \p \v 1 पहिल्या महिन्यात सर्व इस्राएली लोकांचा समुदाय सीन अरण्यात आला आणि त्यांनी कादेश येथे तळ दिला. तिथे मिर्याम मरण पावली व तिला तिथेच पुरण्यात आले. \p \v 2 त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले. \v 3 लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते! \v 4 याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय? \v 5 इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!” \p \v 6 मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले. \v 7 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 8 “आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.” \p \v 9 मोशेने आपली काठी याहवेहच्या उपस्थितीपुढून घेतली आणि जसे आज्ञापिले त्याप्रमाणेच त्याने केले. \v 10 मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?” \v 11 मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले. \p \v 12 परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.” \p \v 13 हे मरीबाहचे\f + \fr 20:13 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa कलह\fqa*\f* पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले. \s1 एदोम इस्राएलला वाट नाकारतो \p \v 14 मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला: \pm “तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे. \v 15 आमचे पूर्वज खाली इजिप्तमध्ये गेले आणि पुष्कळ वर्षे आम्ही तिथे राहिलो. इजिप्तच्या लोकांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना अयोग्य वागणूक दिली, \v 16 पण आम्ही जेव्हा याहवेहचा धावा केला, तेव्हा याहवेहने आमचे रडणे ऐकले, त्यांनी एक दूत पाठवून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. \pm “आता आम्ही इथे तुझ्या सीमेवरील टोकावर, कादेश नगरात आहोत. \v 17 कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही किंवा कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. तुझी सीमा ओलांडून जाईपर्यंत आम्ही राजमार्गावरच प्रवास करू.” \p \v 18 पण एदोम म्हणाला: \pm “तुम्ही इथून पार जाऊ शकत नाही; जर तुम्ही प्रयत्न केला, तर आम्ही चाल करून तुमच्यावर तलवारीने हल्ला करू.” \p \v 19 इस्राएली लोकांनी उत्तर दिले: \pm “आम्ही महामार्गानेच जाऊ आणि जर आम्ही किंवा आमचे कळप तुमचे पाणी प्यालो, तर आम्ही त्याची किंमत भरू. आम्हाला केवळ पायी जायचे आहे; दुसरे काही नाही.” \p \v 20 त्यांनी पुन्हा उत्तर दिले: \pm “तुम्ही जाऊ शकत नाही.” \p तेव्हा एदोम मोठे व सामर्थ्यवान सैन्य घेऊन त्यांच्याविरुद्ध बाहेर आला. \v 21 एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले. \s1 अहरोनाचा मृत्यू \p \v 22 संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला. \v 23 एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले, \v 24 “अहरोन आपल्या लोकांशी जाऊन मिळेल. इस्राएली लोकांना मी जो देश देत आहे त्यात तो प्रवेश करणार नाही, कारण मरीबाहच्या पाण्याकडे तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केले. \v 25 अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा. \v 26 अहरोनाची वस्त्रे काढून ती त्याचा पुत्र एलअज़ारला घाल, कारण तो त्याच्या लोकांशी जाऊन मिळेल; तो तिथे मरण पावेल.” \p \v 27 जसे याहवेहने आज्ञापिले त्यानुसार मोशेने केले: सर्व समुदायादेखत ते होर पर्वतावर गेले. \v 28 मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरविली आणि एलअज़ारावर चढविली आणि अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मरण पावला. नंतर मोशे आणि एलअज़ार डोंगरावरून खाली आले, \v 29 आणि अहरोन मरण पावला असे जेव्हा समुदायाला समजले, तेव्हा सर्व इस्राएलने तीस दिवस शोक केला. \c 21 \s1 अरादचा नाश \p \v 1 इस्राएली लोक अथारीमच्या वाटेने येत आहेत असे नेगेवमध्ये राहत असलेला कनानी राजा अरादने जेव्हा ऐकले, तेव्हा त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला व काहींना कैद केले. \v 2 तेव्हा इस्राएलने याहवेहपुढे ही शपथ घेतली: “जर तुम्ही या लोकांना आमच्या हाती दिले तर आम्ही त्यांची शहरे पूर्णपणे नाश करू.” \v 3 याहवेहने इस्राएली लोकांची विनंती ऐकली आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले. त्यांनी त्यांचा व त्यांच्या नगरांचा पूर्णपणे नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव होरमाह\f + \fr 21:3 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa नाश\fqa*\f* असे पडले. \s1 कास्याचा सर्प \p \v 4 नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले; \v 5 ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.” \p \v 6 तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले. \v 7 लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. \p \v 8 तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.” \v 9 तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत. \s1 मोआबाकडे प्रवास \p \v 10 इस्राएली लोक प्रवास करीत पुढे निघाले आणि ओबोथ येथे तिथे त्यांनी तळ दिला. \v 11 नंतर ते ओबोथहून निघाले व पूर्वेकडे मोआबासमोर ईये-अबारीम रानात त्यांनी तळ दिला. \v 12 तिथून निघून त्यांनी जेरेद खोर्‍यात तळ दिला. \v 13 नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे. \v 14 यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे: \q1 “…सूफाहतील वाहेब\f + \fr 21:14 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa ज़ाहाब\fqa*\f* \q2 व आर्णोनाचे ओहोळ \v 15 आणि ओहोळांचा जो ओघ \q1 आर येथील वस्तीकडे वाहतो \q2 आणि मोआब प्रदेशालगत आहे.” \m \v 16 तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.” \p \v 17 मग इस्राएलने हे गीत गाईले: \q1 “हे विहिरी, उफाळून ये! \q2 त्याविषयी गा, \q1 \v 18 जी विहीर राजपुत्रांनी खोदली, \q2 की ज्यामध्ये लोकांचे सरदार— \q2 आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.” \m मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले, \v 19 मत्तानाहहून नाहालीयेल, नाहालीयेलपासून बामोथास, \v 20 आणि बामोथपासून मोआबामधील खोर्‍यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते. \s1 सीहोन व ओगचा पराजय \p \v 21 इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले: \pm \v 22 “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.” \p \v 23 परंतु सीहोन राजाने इस्राएलास त्याच्या सीमेमधून जाण्यास परवानगी दिली नाही. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला जमा केले व इस्राएला विरुद्ध बाहेर रानात गेला आणि याहस येथे पोहोचल्यावर तो इस्राएलाशी लढला. \v 24 परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती. \v 25 याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्‍यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली. \v 26 हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता. \p \v 27 म्हणूनच कवी म्हणतात: \q1 “हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या; \q2 सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या. \b \q1 \v 28 “हेशबोनमधून अग्नी निघाला, \q2 सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. \q1 त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील \q2 नागरिकांना भस्म केले आहे. \q1 \v 29 हे मोआबा, तुझा धिक्कार असो! \q2 कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! \q1 त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले \q2 व अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हाती \q2 आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले. \b \q1 \v 30 “पण आम्ही त्यांना पराजित केले आहे; \q2 दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे. \q1 मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत, \q2 आम्ही त्यांचा नाश केला आहे.” \p \v 31 याप्रमाणे इस्राएली अमोरी लोकांच्या देशात स्थायिक झाले. \p \v 32 मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले. \v 33 नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले. \p \v 34 याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.” \p \v 35 तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला. \c 22 \s1 बालाक बलामाला बोलावितो \p \v 1 नंतर इस्राएली लोक प्रवास करीत मोआबाच्या मैदानात आले, जे यार्देनच्या पलीकडे यरीहोच्या समोर आहे. \p \v 2 इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचे काय केले हे सर्व सिप्पोरचा पुत्र बालाकाने पाहिले. \v 3 इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला. \p \v 4 मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” \p तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता, \v 5 त्याने बौराचा पुत्र बलामला बोलवायला दूत पाठवले. तो त्यावेळी फरात\f + \fr 22:5 \fr*\fq फरात \fq*\ft ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते\ft*\f* नदीजवळ त्याच्या मातृभूमीत असलेल्या पथोर येथे होता. त्याला बालाक म्हणाला: \pm “इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे आणि आता माझ्यासमोर वसले आहेत. \v 6 तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.” \p \v 7 मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले. \p \v 8 बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले. \p \v 9 परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?” \p \v 10 बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे: \v 11 ‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ” \p \v 12 परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.” \p \v 13 सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.” \p \v 14 तेव्हा मोआबी सरदार बालाकाकडे परत गेले व म्हणाले, “बलामाने आमच्याबरोबर येण्यास नाकारले.” \p \v 15 नंतर बालाकाने दुसरे सरदार पाठवले, जे पहिल्यापेक्षा अधिक व आणखी प्रतिष्ठित होते. \v 16 ते बलामाकडे आले आणि म्हणाले: \pm सिप्पोरचा पुत्र बालाक असे म्हणतो: “माझ्याकडे येण्यासाठी तुला कोणतीही अडचण असू नये, \v 17 कारण मी तुला चांगले प्रतिफळ देईन आणि तू जे सांगशील ते करेन. तर आता ये आणि माझ्यासाठी या लोकांना शाप दे.” \p \v 18 परंतु बलामाने त्यांना उत्तर दिले, “बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही. \v 19 तरी आजची रात्र येथे राहा, म्हणजे याहवेह मला अजून काय सांगतात ते मला कळेल.” \p \v 20 त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.” \s1 बलामाची गाढवी \p \v 21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला. \v 22 परंतु तो निघाला त्यावेळी परमेश्वराचा राग पेटला आणि त्याला अडविण्यासाठी याहवेहचा दूत वाटेत उभा राहिला. बलाम आपल्या गाढवीवर स्वार होता व त्याचे दोन सेवक त्याच्याबरोबर होते. \v 23 जेव्हा याहवेहचा दूत उपसलेली तलवार हातात घेऊन वाटेत उभा आहे असे गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाटेतून वळून शेतात गेली. बलामाने तिला मारून पुन्हा वाटेवर आणले. \p \v 24 नंतर याहवेहचा दूत द्राक्षमळ्यांच्या मधील अरुंद वाटेवर उभा राहिला, त्याच्या दोन्ही बाजूंना भिंती होत्या. \v 25 जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, ती भिंतीला घसटली व बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने गाढवीला पुन्हा मारले. \p \v 26 नंतर याहवेहचा दूत पुढे जाऊन जिथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला. \v 27 जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले. \v 28 तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?” \p \v 29 बलाम गाढवीला म्हणाला, “तू मला मूर्ख बनविले! माझ्या हातात तलवार असती, तर मी आता तुला मारून टाकले असते.” \p \v 30 गाढवीने बलामाला म्हटले, “मी तुझी ती गाढवी नाही काय जिच्यावर तू आजपर्यंत बसत आलास? मी तुझ्याशी कधी अशी वागणूक केली काय?” \p तो म्हणाला, “नाही.” \p \v 31 तेव्हा याहवेहने बलामाचे डोळे उघडले आणि त्याने रस्त्यावर तलवार उपसून उभे असलेल्या याहवेहच्या दूताला पाहिले आणि तो नमन करून पालथा पडला. \p \v 32 याहवेहच्या दूताने बलामाला विचारले, “तू तुझ्या गाढवीला असे तीन वेळा का मारलेस? मी तुला अडविण्यास आलो कारण माझ्यासमोर तुझा मार्ग विपरीत आहे. \v 33 गाढवीने मला पाहिले व तीन वेळा माझ्यापासून ती वळली. ती जर वळली नसती, तर आतापर्यंत मी तुला जिवे मारले असते, परंतु त्या गाढवीला वाचविले असते.” \p \v 34 बलाम याहवेहच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. मला अडवावे म्हणून तुम्ही वाटेत उभे आहात हे मला समजले नाही. मग आता जर हे तुम्हाला आवडले नाही, तर मी माघारी जाईन.” \p \v 35 याहवेहच्या दूताने बलामाला म्हटले, “त्या पुरुषांबरोबर जा, परंतु जे मी तुला सांगेन तेच तू बोलावे.” म्हणून बलाम बालाकाच्या त्या सरदारांबरोबर गेला. \p \v 36 बलाम येत आहे, हे जेव्हा बालाकाने ऐकले, तेव्हा तो त्याला भेटण्याकरिता आर्णोनाच्या तीरावर, त्याच्या देशाच्या सीमेवर असलेल्या मोआबाच्या नगराकडे गेला. \v 37 बालाकाने बलामाला विचारले, “मी तुला तातडीचे बोलाविणे पाठवले नव्हते काय? तू माझ्याकडे का आला नाहीस? तुला बक्षीस देण्यास मी खरोखर समर्थ नाही काय?” \p \v 38 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “पाहा आता मी तुझ्याकडे आलो आहे, परंतु मला वाटेल ते मी बोलू शकत नाही, परमेश्वर माझ्या मुखात जे शब्द घालतील तेच मी बोलेन.” \p \v 39 मग बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हुसोथ येथे गेला. \v 40 तिथे बालाकाने गुरे व मेंढरे यांचे यज्ञ केले आणि त्यातील काही बलाम व जे सरदार त्याच्याबरोबर होते त्यांना दिले. \v 41 सकाळी बालाकाने बलामास वर बामोथ-बआल या ठिकाणी नेले आणि तिथून तो इस्राएली लोकांच्या छावणीचा शेवटचा भाग पाहू शकत होता. \c 23 \s1 बलामाचा पहिला संदेश \p \v 1 बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.” \v 2 बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्‍हा व मेंढा यांचे अर्पण केले. \p \v 3 मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला. \p \v 4 परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.” \p \v 5 तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.” \p \v 6 म्हणून बलाम परत बालाकाकडे आला. तेव्हा तो त्याच्या मोआबी सरदारांसह होमार्पणाजवळ उभा होता असे त्याने पाहिले. \v 7 तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला: \q1 “बालाकाने मला अरामाहून आणले, \q2 मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले. \q1 तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे; \q2 ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’ \q1 \v 8 ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही, \q2 त्यांना मी शाप कसा देऊ? \q1 ज्यांचा तिरस्कार याहवेहने केला नाही; \q2 त्यांचा तिरस्कार मी कसा करू? \q1 \v 9 खडकाच्या शिखरांवरून मी त्यांना पाहतो, \q2 उंच ठिकाणावरून मला ते दिसतात. \q1 वेगळे राहत असलेले लोक मी पाहतो \q2 राष्ट्रांबरोबर ते स्वतःला गणत नाहीत. \q1 \v 10 याकोबाची धूळ कोण मोजू शकेल, \q2 किंवा इस्राएलच्या चौथ्या भागाची तरी मोजणी कोण करणार? \q1 मला नीतिमानाचे मरण मरू दे, \q2 आणि माझा शेवट त्यांच्याप्रमाणे असो!” \p \v 11 बालाक बलामाला म्हणाला, “तू मला हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला आणले, पण तू तर आशीर्वाद दिल्याशिवाय काही केले नाहीस!” \p \v 12 बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?” \s1 बलामचा दुसरा संदेश \p \v 13 तेव्हा बालाक त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर दुसर्‍या ठिकाणी चल जिथून तू त्यांना पाहू शकशील; तुला ते सर्व दिसणार नाहीत तर केवळ त्यांच्या छावणीचा शेवटचा भाग मात्र दिसेल. तिथून त्यांना माझ्यासाठी शाप दे.” \v 14 त्याने बलामाला सोफिमाच्या मैदानाच्या पिसगाच्या डोंगरावर नेले, तिथे त्याने सात वेद्या बांधल्या आणि प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा व एक मेंढा अर्पण केला. \p \v 15 बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.” \p \v 16 याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.” \p \v 17 जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?” \p \v 18 नंतर त्याने हा संदेश सांगितला: \q1 “बालाका, ऊठ आणि ऐक; \q2 सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक. \q1 \v 19 परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, \q2 ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. \q1 याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? \q2 त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय? \q1 \v 20 आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे; \q2 याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही. \b \q1 \v 21 “याकोबात विपत्ती सापडली नाही, \q2 इस्राएलात क्लेश दिसत नाहीत. \q1 त्यांचे परमेश्वर याहवेह त्यांच्याबरोबर आहेत; \q2 राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये आहे. \q1 \v 22 परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले. \q2 रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. \q1 \v 23 याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही, \q2 इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही. \q1 याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल, \q2 परमेश्वराने काय केले आहे ते पाहा! \q1 \v 24 लोक सिंहिणीप्रमाणे उठतात; \q2 ते सिंहासारखे उभे राहतात \q1 जे त्याची शिकार खाईपर्यंत \q2 व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.” \p \v 25 मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.” \p \v 26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?” \s1 बलामाचा तिसरा संदेश \p \v 27 नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.” \v 28 आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले. \p \v 29 बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.” \v 30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्‍हा व मेंढा अर्पण केला. \c 24 \p \v 1 आता जेव्हा बलामाने पाहिले की इस्राएलास आशीर्वाद देण्यास याहवेहला बरे वाटले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे मंत्रतंत्र करावयाला गेला नाही, तर त्याने रानाकडे आपले तोंड वळविले. \v 2 जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला \v 3 आणि त्याने आपला संदेश सांगितला: \q1 “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, \q2 ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी, \q1 \v 4 जो याहवेहचा शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी, \q2 जो सर्वसमर्थाकडून दृष्टान्त पाहतो, \q2 जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत: \b \q1 \v 5 “हे याकोबा, तुझे तंबू, \q2 हे इस्राएला, तुझी राहण्याची ठिकाणे किती सुंदर आहेत! \b \q1 \v 6 “ते खोर्‍याप्रमाणे पसरतात, \q2 नदीकिनारी असलेल्या बागेप्रमाणे, \q1 याहवेहने रोपलेल्या जटामांसीसारखे, \q2 पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत. \q1 \v 7 त्यांच्या पोहर्‍यातून पाणी वाहेल; \q2 त्यांच्या बिजांना भरपूर पाणी मिळेल. \b \q1 “त्यांचा राजा अगाग राजापेक्षा महान असेल; \q2 त्यांचे राज्य गौरवित केले जाईल. \b \q1 \v 8 “परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले; \q2 रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. \q1 त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांचा ते नाश करतात \q2 आणि त्यांच्या हाडांचे ते तुकडे करतात; \q2 ते आपल्या बाणांनी त्यांना भोसकतात. \q1 \v 9 सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात, \q2 सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार? \b \q1 “जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील \q2 आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!” \p \v 10 तेव्हा बलामाविरुद्ध बालाकाचा राग पेटला. त्याने आपले हात एकत्र आपटले व त्याला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलाविले, पण या तीन वेळा तू त्यांना आशीर्वादच दिलास. \v 11 आता येथून चालता हो! आणि आपल्या घरी जा. मी तुझा मोठा सन्मान करेन असे मी म्हटले होते, परंतु याहवेहने तुला सन्मानापासून वंचित केले आहे.” \p \v 12 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “तू ज्या दूतांना माझ्याकडे पाठवले त्यांना मी सांगितले नव्हते काय, \v 13 ‘बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही मला वाटेल ते मी करू शकत नाही, याहवेहच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही; आणि याहवेह सांगतील तेच मी बोलणार’? \v 14 आता मी माझ्या लोकांकडे परत जात आहे, पण ये, हे इस्राएली लोक येणार्‍या दिवसात तुझ्या लोकांचे काय करणार त्याविषयी मी तुला चेतावणी देतो.” \s1 बलामाचा चौथा संदेश \p \v 15 मग त्याने हा संदेश दिला: \q1 “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, \q2 ज्याच्या नजरेस स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी, \q1 \v 16 जो परमेश्वराचे शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी, \q2 ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, \q1 ज्याला सर्वसमर्थाकडून दर्शन घडते, \q2 जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत: \b \q1 \v 17 “मी त्याला पाहतो, पण आता नाही; \q2 मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही. \q1 याकोबातून एक तारा उदयास येईल; \q2 इस्राएलातून एक राजदंड निघेल. \q1 तो मोआबाचे डोके व \q2 शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल. \q1 \v 18 एदोम जिंकला जाईल; \q2 इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल, \q2 पण इस्राएल बलवान होईल. \q1 \v 19 याकोबातून एक अधिकारी येईल \q2 आणि नगरातील उरलेल्यांचा नाश करेल.” \s1 बलामाचा पाचवा संदेश \p \v 20 नंतर बलामाने अमालेकाला पाहिले व आपला संदेश दिला: \q1 “अमालेक सर्व राष्ट्रांमध्ये प्रथम राष्ट्र होते, \q2 परंतु त्यांचा शेवट संपूर्ण विनाशात होईल.” \s1 बलामाचा सहावा संदेश \p \v 21 यानंतर त्याने केनी लोकांना पाहिले व आपला संदेश दिला: \q1 “तुझे वसतिस्थान सुरक्षित आहे, \q2 तुझे घरटे खडकात स्थिर आहे; \q1 \v 22 तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील \q2 तेव्हा तुझा नाश होईल.” \s1 बलामाचा सातवा संदेश \p \v 23 त्यानंतर त्याने हा संदेश दिला: \q1 “हाय हाय! परमेश्वर हे करीत असताना कोण जगू शकेल? \q2 \v 24 कित्तीमाच्या किनार्‍यावरून जहाजे येतील; \q1 ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, \q2 परंतु त्यांचाही नाश होईल.” \p \v 25 त्यानंतर बलाम उठून आपल्या घरी परतला व बालाकही आपल्या मार्गाने गेला. \c 25 \s1 मोआब इस्राएलला फितवितो \p \v 1 इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले, \v 2 त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले. \v 3 अशा प्रकारे इस्राएली लोक बआल-पौराशी जडले आणि याहवेहचा कोप त्यांच्याविरुद्ध भडकला. \p \v 4 याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.” \p \v 5 तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांनी म्हणाला, “तुम्ही स्वतःला बआल-पौराशी जोडले आहे, तुम्हा प्रत्येकाला जिवे मारावे.” \p \v 6 त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली. \v 7 जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला \v 8 आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली; \v 9 परंतु त्या पीडेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची संख्या चोवीस हजार होती. \p \v 10 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 11 “अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने इस्राएलवरील माझा क्रोध शांत केला आहे. कारण लोकांमधील माझ्या सन्मानाविषयी मी जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो सुद्धा होता म्हणून मी माझ्या ईर्षेने त्यांचा नाश केला नाही. \v 12 म्हणून त्याला सांग मी त्याच्याशी शांतीचा करार करीत आहे. \v 13 तो व त्याच्या वंशजासाठी हा सर्वकाळच्या याजकपणाचा करार असणार, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या सन्मानासंबंधी ईर्ष्यावान होता आणि इस्राएली लोकांसाठी त्याने प्रायश्चित केले.” \p \v 14 मिद्यानी स्त्रीबरोबर ज्या इस्राएली पुरुषाला जिवे मारण्यात आले, त्याचे नाव जिम्री होते, जो शिमओनी घराण्याचा पुढारी सालूचा पुत्र होता. \v 15 आणि ज्या मिद्यानी स्त्रीला जिवे मारण्यात आले होते तिचे नाव कजबी होते, जी मिद्यानी घराण्याच्या कुळाचा पुढारी सूरची कन्या होती. \p \v 16 याहवेह मोशेला म्हणाले, \v 17 “मिद्यानी लोकांना शत्रू समजून त्यांना जिवे मारा. \v 18 कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्‍याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.” \c 26 \s1 दुसरी जनगणना \p \v 1 पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले, \v 2 “इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.” \v 3 म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले, \v 4 “याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.” \b \lh इजिप्तमधून जे इस्राएली लोक बाहेर आले ते हे: \b \li1 \v 5 रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: \li2 हनोखपासून हनोखी कूळ; \li2 पल्लूपासून पल्लूवी कूळ; \li2 \v 6 हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; \li2 कर्मीपासून कर्मी कूळ. \lf \v 7 ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली. \li2 \v 8 पल्लूचा पुत्र एलियाब होता, \v 9 आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते. \v 10 ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते. \v 11 तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही. \b \li1 \v 12 शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 नेमूएलपासून नेमूएली कूळ; \li2 यामीनपासून यामीनी कूळ; \li2 याकीनपासून याखीनी कूळ; \li2 \v 13 जेरहपासून जेरही कूळ; \li2 शाऊलपासून शाऊली कूळ. \lf \v 14 ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली. \b \li1 \v 15 गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 जेफोनपासून जेफोनी कूळ; \li2 हग्गीपासून हग्गी कूळ; \li2 शूनीपासून शूनी कूळ; \li2 \v 16 ओजनीपासून ओजनी कूळ; \li2 एरीपासून एरी कूळ; \li2 \v 17 अरोदपासून अरोदी कूळ; \li2 अरेलीपासून अरेली कूळ. \lf \v 18 ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली. \b \lh \v 19 एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले. \li1 \v 20 यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 शेलाहपासून शेलानी कूळ; \li2 पेरेसापासून पेरेसी कूळ; \li2 जेरहपासून जेरही कूळ. \li2 \v 21 पेरेसचे वंशज हे होते: \li3 हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; \li3 हामूलपासून हामूली कूळ. \lf \v 22 ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली. \b \li1 \v 23 इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 तोलापासून तोलाई कूळ; \li2 पुवाहपासून पुनी\f + \fr 26:23 \fr*\fq पुनी \fq*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa पुन्नीह\fqa*\f* कूळ; \li2 \v 24 याशूबपासून याशूबी कूळ; \li2 शिम्रोनपासून शिम्रोनी कूळ. \lf \v 25 ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली. \b \li1 \v 26 जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 सेरेदपासून सेरेदी कूळ; \li2 एलोनपासून एलोनी कूळ; \li2 याहलीलपासून याहलेली कूळ. \lf \v 27 ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली. \b \lh \v 28 योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते: \lh \v 29 मनश्शेहचे वंशज: \li2 माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); \li2 गिलआदापासून गिलआदी कूळ. \li2 \v 30 हे गिलआदाचे वंशज होते: \li3 इएजेरपासून इएजेरी कूळ; \li3 हेलेकपासून हेलेकी कूळ; \li3 \v 31 अस्रिएलपासून अस्रिएली कूळ; \li3 शेखेमपासून शेखेमी कूळ; \li3 \v 32 शेमीदापासून शेमीदाई कूळ; \li3 हेफेरपासून हेफेरी कूळ. \li3 \v 33 (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.) \lf \v 34 ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली. \li1 \v 35 एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 शुथेलहपासून शूथेलाही कूळ; \li2 बेकेरपासून बेकेरी कूळ; \li2 तहनपासून तहनी कूळ. \li2 \v 36 शुथेलहाचे वंशज हे होते: \li3 एरानपासून एरानी कूळ. \lf \v 37 हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली. \lf हे त्यांच्या कुळानुसार योसेफाचे वंशज होते. \b \li1 \v 38 बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 बेलापासून बेलाई कूळ; \li2 आशबेलपासून अशबेली कूळ; \li2 अहीरामपासून अहीरामी कूळ; \li2 \v 39 शफूफामपासून\f + \fr 26:39 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa शेफूफाम\fqa*\f* शूफामी कूळ; \li2 हूफामपासून हूफामी कूळ. \li2 \v 40 आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: \li3 आर्दाचे आर्दी कूळ; \li3 नामान द्वारे नामीनी कूळ. \lf \v 41 ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली. \b \li1 \v 42 दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 शूहामपासून शूहामी कूळ. \lf ही दानची कुळे होती: \v 43 ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली. \b \li1 \v 44 आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 इम्नाहपासून इम्नी कूळ; \li2 इश्वीपासून इश्वी कूळ; \li2 बरीयाहपासून बरीयाह कूळ; \li2 \v 45 आणि बरीयाहच्या वंशजांपासून: \li3 हेबेरपासून हेबेरी कूळ; \li3 मालकीएलपासून मालकीएली कूळ. \lf \v 46 आशेरला सेराह नावाची कन्या होती. \lf \v 47 ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली. \b \li1 \v 48 नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: \li2 याहसेलपासून याहसेली कूळ; \li2 गूनीपासून गूनी कूळ; \li2 \v 49 येसेरपासून येसेरी कूळ; \li2 शिल्लेमपासून शिल्लेमी कूळ. \lf \v 50 ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली. \b \lf \v 51 इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली. \b \p \v 52 याहवेहने मोशेला म्हटले, \v 53 “त्यांना नावाच्या संख्येनुसार देश वतन म्हणून द्यावा. \v 54 मोठ्या गटाला मोठा वारसा द्यावा आणि लहान गटाला लहान वारसा द्या; ज्यांची नावे यादीत आहेत त्यानुसार प्रत्येकाला संख्येनुसार त्यांचा वारसा मिळावा. \v 55 जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा. \v 56 प्रत्येक वारसा मोठ्या आणि लहान गटांमध्ये चिठ्ठ्याद्वारे वाटप केला जावा.” \b \li1 \v 57 ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: \li2 गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; \li2 कोहाथापासून कोहाथी कूळ; \li2 मरारीपासून मरारी कूळ. \li1 \v 58 ही देखील लेवी लोकांची कुळे होती: \li2 लिब्नी कूळ, \li2 हेब्रोनी कूळ, \li2 महली कूळ, \li2 मूशी कूळ, \li2 कोरही कूळ. \li2 कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता; \v 59 अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला. \v 60 अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता. \v 61 परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले. \b \lf \v 62 एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही. \b \p \v 63 मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली. \v 64 सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता. \v 65 कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही. \c 27 \s1 सलाफहादच्या कन्या \p \v 1 योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील माखीरचा पुत्र गिलआदचा पुत्र हेफेरचा पुत्र सलाफहादच्या कन्या, ज्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह होती, त्या पुढे आल्या \v 2 आणि त्या मोशे, एलअज़ार याजक, पुढारी व सर्व मंडळीसमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या राहिल्या व म्हणाल्या, \v 3 “आमचे पिता रानात मरण पावले. ते कोरहाच्या अनुयायांपैकी नव्हते, ज्यांनी एकत्र येऊन याहवेहविरुद्ध बंड केले, परंतु ते आपल्याच पापामुळे मरण पावले आणि त्यांना पुत्र नव्हते. \v 4 त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.” \p \v 5 तेव्हा मोशेने त्यांचा वाद याहवेहपुढे आणला, \v 6 आणि याहवेह मोशेला म्हणाले, \v 7 “सलाफहादाच्या कन्या जे म्हणतात ते बरोबर आहे. तू खचितच त्यांना त्यांच्या पित्याच्या नातेवाईकामध्ये त्यांचा वाटा म्हणून द्यावे आणि त्यांच्या पित्याचे वतन त्यांना दे. \p \v 8 “इस्राएली लोकांना सांग, एखादा मनुष्य मरण पावला व त्यांच्यामागे त्याला पुत्र नाही, तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे. \v 9 आणि जर त्याला कन्या नसली, तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे. \v 10 आणि त्याला भाऊ नसला, तर त्याचे वतन त्याच्या पित्याच्या भावांना द्यावे. \v 11 जर त्याच्या पित्याला भाऊ नसले, तर त्याचे वतन त्याच्या कुळातील जवळच्या नातेवाईकाला द्यावे, म्हणजे ते त्याचे वतन होईल. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांस हा न्यायाचा नियम असावा.” \s1 यहोशुआ मोशेचा उत्तराधिकारी \p \v 12 नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “या अबारीम डोंगरावर जा आणि जो देश मी इस्राएली लोकांना दिला आहे तो पाहा. \v 13 तो पाहिल्यानंतर, जसा तुझा भाऊ अहरोन आपल्या लोकांत जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तू सुद्धा आपल्या लोकांना जाऊन मिळशील. \v 14 कारण सीन रानात पाण्याजवळ जेव्हा इस्राएली लोकांनी बंड केले, त्यावेळी त्यांच्या नजरेपुढे मला पवित्र म्हणून मानण्यास नाकारून तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेचा भंग केला.” (हेच सीन रानातील, कादेश येथील मरीबाहचे पाणी.) \p \v 15 मोशे याहवेहला म्हणाला, \v 16 “याहवेह परमेश्वर, जे सर्व जीवधार्‍यांना श्वास देतात, त्यांनी या समाजावर कोणा एकाची नेमणूक करावी \v 17 की त्याने त्यांच्यापुढे बाहेर जावे व आत यावे, जो त्यांना बाहेर नेईल व आत आणेल, जेणेकरून याहवेहचे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे होणार नाहीत.” \p \v 18 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “नूनाचा पुत्र यहोशुआ, ज्या पुरुषामध्ये पुढारीपणाचा आत्मा वसतो, त्याला घे व त्याच्यावर आपला हात ठेव. \v 19 एलअज़ार याजक व संपूर्ण मंडळीसमोर त्याला उभे करून त्यांच्या समक्षतेत त्याची नेमणूक कर. \v 20 तुझे काही अधिकार त्याला दे म्हणजे सर्व इस्राएली समाज त्याचे आज्ञापालन करतील. \v 21 त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.” \p \v 22 याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुआला एलअज़ार याजक व सर्व समाजापुढे उभे केले. \v 23 आणि याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात यहोशुआवर ठेवून त्याची नेमणूक केली. \c 28 \s1 दैनंदिन अर्पणे \p \v 1 याहवेहने मोशेला म्हटले, \v 2 “इस्राएली लोकांना ही आज्ञा दे व त्यांना सांग: ‘तुम्ही मला नेमलेल्या वेळी मला आवडेल असे सुवासिक अन्नार्पण मला निश्चितपणे सादर करावे.’ \v 3 त्यांना सांग: ‘जे अन्नार्पण तुम्ही याहवेहला सादर करावे ते हे: एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, जी दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून अर्पण करावी. \v 4 एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे. \v 5 त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग\f + \fr 28:5 \fr*\ft अंदाजे1.6 कि.ग्रॅ.\ft*\f* बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन\f + \fr 28:5 \fr*\ft अंदाजे 1लीटर\ft*\f* जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे. \v 6 सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे. \v 7 त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्‍याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे. \v 8 दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ” \s1 शब्बाथाची अर्पणे \p \v 9 “शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश\f + \fr 28:9 \fr*\ft अंदाजे 3.2 कि.ग्रॅ.\ft*\f* बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे. \v 10 नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय प्रत्येक शब्बाथ दिवसाचे हे होमार्पण आहे. \s1 मासिक अर्पणे \p \v 11 “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे होमार्पण म्हणून याहवेहसाठी अर्पण करावे, हे सर्व निर्दोष असावेत. \v 12 प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश\f + \fr 28:12 \fr*\ft अंदाजे 5 कि.ग्रॅ.\ft*\f* बारीक पीठ; आणि एका मेंढ्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशांश बारीक पीठ; \v 13 आणि प्रत्येक कोकर्‍याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे. \v 14 प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर अर्धा हीन\f + \fr 28:14 \fr*\ft अंदाजे 1.9 लीटर\ft*\f* पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन\f + \fr 28:14 \fr*\ft अंदाजे 1.3 लीटर\ft*\f*, व प्रत्येक कोकर्‍याबरोबर एक पाव हीन\f + \fr 28:14 \fr*\ft अंदाजे 1 लीटर\ft*\f* द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे. \v 15 नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा. \s1 वल्हांडण \p \v 16 “ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही याहवेहचा वल्हांडण पाळावा. \v 17 या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा; सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी. \v 18 पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतेही नियमित कामे करू नये. \v 19 याहवेहसाठी अन्नार्पण सादर करा, म्हणजेच दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावे. \v 20 प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ व मेंढ्याबरोबर दोन दशांश असे धान्यार्पण करावे. \v 21 व सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी, एफाचा एक दशांश अर्पावा. \v 22 आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा. \v 23 ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत. \v 24 अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत. \v 25 सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये. \s1 आठवड्याचा सण \p \v 26 “ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका. \v 27 याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा. \v 28 प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्‍ह्याबरोबर दोन दशांश; \v 29 आणि सात कोकर्‍यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. \v 30 तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा. \v 31 नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी. \c 29 \s1 कर्ण्यांचा सण \p \v 1 “ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे. \v 2 याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत. \v 3 गोर्‍ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश\f + \fr 29:3 \fr*\ft अंदाजे 5 कि.ग्रॅ.\ft*\f* बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश\f + \fr 29:3 \fr*\ft अंदाजे 3.2 कि.ग्रॅ.\ft*\f*; \v 4 आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी एफाचा एक दशांश.\f + \fr 29:4 \fr*\ft अंदाजे 1.6 कि.ग्रॅ.\ft*\f* \v 5 तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बोकड अर्पावा. \v 6 मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत. \s1 प्रायश्चित्ताचा दिवस \p \v 7 “ ‘याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक पवित्र सभा भरवा. तुम्ही स्वसुखाचा त्याग\f + \fr 29:7 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa उपास\fqa*\f* करावा व कोणतेही नियमित काम करू नये. \v 8 याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत; \v 9 गोर्‍ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे; \v 10 आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. \v 11 प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा. \s1 मंडपांचा सण \p \v 12 “ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र सभा बोलवा आणि त्या दिवशी कोणतीही नियमित कामे करू नये. हा सण तुम्ही याहवेहसाठी सात दिवस पाळावा. \v 13 आणि तुम्ही याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून तेरा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत. \v 14 या प्रत्येकी तेरा गोर्‍ह्यांबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक एफाचे तीन दशांश बारीक पीठ; व दोन मेंढ्यांबरोबर प्रत्येकी दोन दशांश; \v 15 आणि चौदा कोकर्‍यांबरोबर प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. \v 16 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 17 “ ‘दुसर्‍या दिवशी, बारा तरुण गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावे व हे सर्व निर्दोष असावेत. \v 18 गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. \v 19 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 20 “ ‘तिसर्‍या दिवशी अकरा गोर्‍हे, दोन मेंढे, व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी. हे सर्व निर्दोष असावेत. \v 21 गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. \v 22 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 23 “ ‘चौथ्या दिवशी दहा गोर्‍हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत. \v 24 गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. \v 25 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 26 “ ‘पाचव्या दिवशी नऊ गोर्‍हे, दोन मेंढे व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. \v 27 गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. \v 28 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 29 “ ‘सहाव्या दिवशी आठ गोर्‍हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. \v 30 गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. \v 31 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 32 “ ‘सातव्या दिवशी सात गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. \v 33 गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. \v 34 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 35 “ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये. \v 36 याहवेहसाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे सुवासिक अन्नार्पण म्हणजेच होमार्पण अर्पावे. हे सर्व निर्दोष असावेत. \v 37 गोर्‍हा, मेंढा व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. \v 38 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. \p \v 39 “ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ” \p \v 40 याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही इस्राएली लोकांना सांगितले. \c 30 \s1 नवसांविषयीचे नियम \p \v 1 मोशे इस्राएली लोकांच्या गोत्रांच्या पुढार्‍यांशी बोलला: “याहवेहने जे आज्ञापिले ते हे: \v 2 जेव्हा एखादा पुरुष याहवेहला नवस करतो किंवा शपथ घेऊन स्वतःला बांधील करण्याचे वचन देतो, तेव्हा त्याने त्याचा शब्द मोडू नये व बोलल्याप्रमाणे त्याने ते करावे. \p \v 3 “एखादी स्त्री अजूनही आपल्या पित्याच्या घरात राहून याहवेहस नवस करते किंवा वचन देऊन स्वतःला बांधील करते \v 4 आणि तिचा नवस किंवा शपथ याविषयी तिच्या पित्याने ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर ते वचन तिच्यावर कायम राहील. \v 5 परंतु ते ऐकून त्याने तिला मना केले तर तिचे नवस व शपथ यापैकी कोणतेही कायम राहणार नाही; कारण तिच्या पित्याने तिला मनाई केली, म्हणून याहवेह तिला क्षमा करतील. \p \v 6 “तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला \v 7 आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील. \v 8 पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील. \p \v 9 “विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील. \p \v 10 “आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते \v 11 आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील. \v 12 पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील. \v 13 तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल. \v 14 पण रोजच्यारोज जर तिचा पती त्याविषयी तिला काहीही बोलत नाही, तर तिने केलेले सर्व नवस व शपथ ज्यांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले आहे ते तो कायम करतो. तो काहीही बोलला नाही म्हणून तिने केलेले नवस तो कायम करतो. \v 15 पण ते ऐकल्यानंतर काही काळाने जर त्याने ते रद्द केले, तर तिचा दोष त्याला भोगावा लागेल.” \p \v 16 पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत. \c 31 \s1 मिद्यानी लोकांवर सूड \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”\f + \fr 31:2 \fr*\ft ही इब्री भाषाशैली आहे, ज्याचा अर्थ तू मरण पावशील\ft*\f* \p \v 3 तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील. \v 4 इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक हजार पुरुषांना युद्धासाठी पाठवा.” \v 5 तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले. \v 6 एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासाने आपल्याबरोबर पवित्रस्थानातील साहित्य व इशारा देण्यासाठी कर्णे घेतले होते, त्याच्यासह मोशेने प्रत्येक गोत्रातील एक हजार पुरुषांना युद्धात पाठवले. \p \v 7 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले. \v 8 ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले. \v 9 इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले. \v 10 मिद्यानी लोक ज्या नगरांमध्ये स्थायिक होते त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या. \v 11 त्यांनी सर्व लोक व जनावरे यासह सर्व लूट व मालमत्ता घेतली, \v 12 आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले. \p \v 13 मोशे, एलअज़ार याजक आणि समाजाचे सर्व पुढारी त्यांना भेटण्यास छावणीबाहेर गेले. \v 14 पण सेनाधिकारी जे हजारांवरचे सरदार व शंभरांवरचे सरदार—जे युद्धावरून परतले त्यांच्यावर मोशे रागावला. \p \v 15 मोशेने त्यांना विचारले, “तुम्ही सर्व स्त्रियांना जिवंत राहू दिले काय? \v 16 त्यांनीच बलामाच्या सल्ल्यानुसार पेओरच्या प्रकरणात इस्राएली लोकांना याहवेहशी अविश्वासूपणा करण्यास भाग पाडले आणि याहवेहच्या लोकांना पीडेने मारले. \v 17 तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका, \v 18 परंतु जिचा कधीही पुरुषाशी संग झाला नाही ती प्रत्येक मुलगी तुमच्यासाठी राखून ठेवा. \p \v 19 “जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे. \v 20 चामडे, बोकडाचे केस किंवा लाकूड या सर्व वस्तूंसह प्रत्येक वस्त्र शुद्ध करावे.” \p \v 21 यानंतर एलअज़ार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “याहवेहने मोशेला दिलेल्या नियमानुसार ही आज्ञा आहे: \v 22 सोने, चांदी, तांबे लोखंड, कथील, शिसे \v 23 आणि त्या प्रत्येक वस्तू ज्या अग्नीत टिकतात त्या अग्नीत टाकाव्या, मग त्या शुद्ध होतील. परंतु त्या शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध कराव्या. ज्या वस्तू अग्नीत टिकत नाहीत, त्या शुद्धीकरणाच्या पाण्यात घालून काढाव्या. \v 24 सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, मग तुम्ही छावणीत परत यावे.” \s1 लुटीची वाटणी \p \v 25 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 26 “तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी. \v 27 लुटीचे दोन समान भाग करावेत. एक भाग लढाईवर गेलेल्या सैनिकांना व दुसरा भाग समाजातील इतरांना द्यावा. \v 28 युद्धास गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून, मनुष्य असो किंवा गुरे, गाढवे किंवा मेंढरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पाचशेमागे एक याप्रमाणे ते वेगळे कर. \v 29 त्यांच्या अर्ध्या हिश्श्यातून ते घे व याहवेहचा वाटा म्हणून तो एलअज़ार याजक याला दे. \v 30 इस्राएली लोकांच्या अर्ध्या हिश्श्यातून माणसे असो किंवा गुरे, गाढवे, मेंढरे किंवा इतर जनावरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पन्नासापैकी एक याप्रमाणे ते वेगळे कर. व लेवी लोक, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार आहेत त्यांना द्यावे.” \v 31 म्हणून याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशे व एलअज़ार याजकाने केले. \p \v 32 युद्धात सैन्याने घेतलेल्या लुटीतून राहिलेली लूट 6,75,000 मेंढरे, \v 33 72,000 गुरे, \v 34 61,000 गाढवे \v 35 आणि 32,000 स्त्रिया ज्यांनी कधीही पुरुषांबरोबर संग केला नव्हता. \b \lh \v 36 युद्धात लढलेल्यांना मिळालेला अर्धा भाग हा होता: \b \li1 3,37,500 मेंढरे, \v 37 ज्यापैकी याहवेहची खंडणी 675 मेंढरे होती; \li1 \v 38 36,000 गुरे, ज्यापैकी 72 याहवेहची खंडणी होती; \li1 \v 39 30,500 गाढवे, ज्यापैकी याहवेहची खंडणी 61 होती; \li1 \v 40 16,000 लोक, ज्यापैकी याहवेहची खंडणी 32 होती. \b \p \v 41 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने याहवेहचा हिस्सा म्हणून एलअज़ार याजकाला खंडणी दिली. \p \v 42 युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला— \v 43 इस्राएल समाजाला मिळालेला अर्धा वाटा याप्रमाणे होता—3,37,500 मेंढरे, \v 44 36,000 गुरे, \v 45 30,500 गाढवे \v 46 आणि 16,000 लोक. \v 47 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते. \p \v 48 नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले \v 49 आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही. \v 50 म्हणून आम्ही आम्हाला लुटीतून जे सोन्याचे दागिने मिळाले त्यातून तोडे, कड्या, अंगठ्या, कुंडले व माळा; आमच्यासाठी प्रायश्चिताचे अर्पण म्हणून याहवेहसमोर आणले आहेत.” \p \v 51 मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले. \v 52 हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार यांच्याकडून स्वीकारलेले सोने जे मोशे व एलअज़ार याजकाने याहवेहला भेट म्हणून सादर केले, त्याचे वजन 16,750 शेकेल\f + \fr 31:52 \fr*\ft अंदाजे 190 कि.ग्रॅ.\ft*\f* इतके भरले. \v 53 प्रत्येक सैनिकाने स्वतःसाठी लूट घेतली होती. \v 54 मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले. \c 32 \s1 यार्देनेच्या पूर्वेकडील गोत्र \p \v 1 रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत. \v 2 म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले, \v 3 “अतारोथ, दिबोन, याजेर, निमराह, हेशबोन, एलिआलेह, सेबाम, नबो व बेओन; \v 4 हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.” \v 5 ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.” \p \v 6 मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय? \v 7 याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता? \v 8 मी तुमच्या पूर्वजांना कादेश-बरनेआपासून देश हेरायला पाठवले तेव्हाही त्यांनी असेच केले होते. \v 9 अष्कोलच्या खोर्‍यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले. \v 10 त्या दिवशी याहवेहचा क्रोध भडकला आणि त्यांनी ही शपथ वाहिली: \v 11 ‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही; \v 12 कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ मात्र तो पाहतील, कारण त्यांनी याहवेहला पूर्ण हृदयाने अनुसरले.’ \v 13 याहवेहचा क्रोध इस्राएलवर भडकला व ज्या पिढीने याहवेहच्या दृष्टीने दुष्टाई केली होती त्या सर्वांचा नाश होईपर्यंत याहवेहने इस्राएली लोकांना चाळीस वर्षे रानात भटकण्यास लावले. \p \v 14 “आणि पाहा, पातक्यांच्या पिल्लांनो, इस्राएलावर याहवेहचा राग आणखी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या पित्याच्या जागी उभे राहिला आहात. \v 15 जर तुम्ही याहवेहच्या मागे चालण्यापासून दूर फिराल, तर याहवेह या इस्राएली लोकांना पुन्हा रानात सोडून देतील व तुम्ही त्यांच्या नाशास कारणीभूत ठराल.” \p \v 16 नंतर ते मोशेकडे येऊन त्याला म्हणाले, “येथे आम्ही आमच्या गुरामेंढरांसाठी मेंढवाडे व आमच्या स्त्रिया व लेकरांसाठी नगरे बांधू. \v 17 परंतु आम्ही स्वतःला युद्धासाठी सशस्त्र करू व इस्राएली लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहचवेपर्यंत त्यांच्यापुढे जाऊ. तोपर्यंत आमच्या स्त्रिया व लेकरे देशातील रहिवाशांपासून तटबंदीच्या नगरात सुरक्षित राहतील. \v 18 प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपले वतन मिळेपर्यंत आम्ही आमच्या घरी परत जाणार नाही. \v 19 यार्देन नदीच्या पलीकडे त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही वतन घेणार नाही, कारण आमचे वतन आम्हाला यार्देनेच्या पूर्वेस मिळाले आहे.” \p \v 20 तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही हे कराल, म्हणजे जर तुम्ही याहवेहसमोर युद्धासाठी स्वतःला हत्यारबंद कराल \v 21 आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल; \v 22 तर जेव्हा याहवेहपुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही परत जा व याहवेहच्या व इस्राएलच्या कर्तव्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश याहवेहसमोर तुमचे वतन होईल. \p \v 23 “परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार. \v 24 तुमच्या स्त्रिया व लेकरांकरिता नगरे व तुमच्या गुरामेंढरांकरिता वाडे बांधा, परंतु तुम्ही वचन दिल्याप्रमाणे करा.” \p \v 25 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू. \v 26 आमची लेकरे, स्त्रिया, आमचे कळप आणि गुरे या ठिकाणी गिलआदाच्या शहरांमध्ये राहतील. \v 27 पण तुझे सेवक, म्हणजे युद्धासाठी हत्यारबंद झालेला प्रत्येक पुरुष, जसे आमचे प्रभू सांगतात त्याप्रमाणेच युद्धासाठी याहवेहपुढे पार जातील.” \p \v 28 नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली. \v 29 मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा. \v 30 पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.” \p \v 31 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे. \v 32 आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.” \p \v 33 तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्‍यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली. \p \v 34 गाद गोत्राच्या लोकांनी दिबोन, अतारोथ, अरोएर, \v 35 अटरोथ-शोफान, याजेर, योगबेहाह, \v 36 बेथ-निमराह व बेथ-हारान ही सर्व तटबंदीची नगरे बांधली व त्यांच्या कळपासाठी मेंढवाडे सुद्धा बांधले. \v 37 रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली, \v 38 याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली. \p \v 39 मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले. \v 40 म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले. \v 41 मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर\f + \fr 32:41 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa याईराची वस्ती\fqa*\f* असे ठेवले. \v 42 आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले. \c 33 \s1 इस्राएली लोकांच्या प्रवासातील टप्पे \p \v 1 मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक आपल्या तुकडीनुसार इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे टप्पे असे होते. \v 2 याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने त्यांच्या प्रवासाच्या टप्प्यांची नोंद केली. टप्प्यानुसार त्यांचा प्रवास असा होता: \b \pi1 \v 3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले, \v 4 त्यावेळी इजिप्तचे लोक आपल्या सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना ज्यांना याहवेहने जिवे मारले होते त्यांना दफन करीत होते; कारण याहवेहने त्यांच्या दैवतांवरही न्याय आणला होता. \pi1 \v 5 इस्राएली लोकांनी रामसेस सोडले व सुक्कोथ येथे तळ दिला. \pi1 \v 6 त्यांनी सुक्कोथ सोडले आणि वाळवंटाच्या काठावरील एथाम येथे तळ दिला. \pi1 \v 7 त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला. \pi1 \v 8 त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला. \pi1 \v 9 त्यांनी माराह सोडले व एलीम येथे गेले, त्या ठिकाणी पाण्याचे बारा झरे व खजुरीची सत्तर झाडे होती. तिथे त्यांनी तळ दिला. \pi1 \v 10 त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला. \pi1 \v 11 त्यांनी तांबडा समुद्र सोडून सीनच्या रानात तळ दिला. \pi1 \v 12 सीनचे रान सोडून त्यांनी दोफकाह येथे तळ दिला. \pi1 \v 13 त्यांनी दोफकाह सोडले व अलूश येथे तळ दिला. \pi1 \v 14 नंतर त्यांनी अलूश सोडले व रफीदीम येथे तळ दिला. या ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते. \pi1 \v 15 रफीदीम सोडल्यावर त्यांनी सीनायच्या रानात तळ दिला. \pi1 \v 16 मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला. \pi1 \v 17 नंतर त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा सोडले आणि हसेरोथ येथे तळ दिला. \pi1 \v 18 त्यांनी हसेरोथ सोडले आणि रिथमाह येथे तळ दिला. \pi1 \v 19 मग त्यांनी रिथमाह सोडल्यावर रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला. \pi1 \v 20 त्यांनी रिम्मोन-पेरेस सोडले व लिब्नाह येथे तळ दिला. \pi1 \v 21 मग त्यांनी लिब्नाह सोडले व रिस्साह येथे तळ दिला. \pi1 \v 22 त्यांनी रिस्साह सोडले आणि केहेलाथाह येथे तळ दिला. \pi1 \v 23 त्यांनी केहेलाथाह सोडले आणि शेफर पर्वतावर तळ दिला. \pi1 \v 24 नंतर त्यांनी शेफर पर्वत सोडला आणि हारादाह येथे तळ दिला. \pi1 \v 25 त्यांनी हारादाह सोडले आणि माखेलोथ येथे तळ दिला. \pi1 \v 26 माखेलोथ सोडल्यावर त्यांनी तहथ येथे तळ दिला. \pi1 \v 27 तहथ सोडून त्यांनी तेराह येथे तळ दिला. \pi1 \v 28 नंतर त्यांनी तेराह सोडले व मितखाह येथे तळ दिला. \pi1 \v 29 त्यांनी मग मितखाह सोडले व हशमोनाह येथे तळ दिला. \pi1 \v 30 त्यांनी हशमोनाह सोडले आणि मोसेरोथ येथे तळ दिला. \pi1 \v 31 त्यांनी मोसेरोथ सोडले आणि बेने-याकन येथे तळ दिला. \pi1 \v 32 त्यांनी बेने-याकन सोडले आणि होर-हग्गीदगाद येथे तळ दिला. \pi1 \v 33 त्यांनी होर-हग्गीदगाद सोडले आणि याटबाथह येथे तळ दिला. \pi1 \v 34 त्यांनी याटबाथह सोडले आणि आबरोनाह येथे तळ दिला. \pi1 \v 35 नंतर त्यांनी आबरोनाह सोडले आणि एजिओन-गेबेर येथे तळ दिला. \pi1 \v 36 त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला. \pi1 \v 37 त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला. \v 38 याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला. \v 39 अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता. \pi1 \v 40 कनानी अरादचा राजा कनानाच्या नेगेव येथे राहत होता, त्याने इस्राएली लोक आपल्या देशाकडे येत आहेत असे ऐकले. \pi1 \v 41 मग त्यांनी होर डोंगर सोडून जालमोनाह येथे तळ दिला. \pi1 \v 42 नंतर त्यांनी जालमोनाह सोडले व पूनोन येथे तळ दिला. \pi1 \v 43 पूनोन सोडल्यानंतर त्यांनी ओबोथ येथे तळ दिला. \pi1 \v 44 त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला. \pi1 \v 45 नंतर ईये-अबारीम सोडून त्यांनी दिबोन-गाद येथे तळ दिला. \pi1 \v 46 दिबोन-गाद सोडल्यावर त्यांनी आलमोन-दिबलाथाइम येथे तळ दिला. \pi1 \v 47 त्यांनी आलमोन-दिबलाथाइम सोडले व नबोजवळ अबारीम डोंगराजवळ तळ दिला. \pi1 \v 48 मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला. \v 49 तिथे मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ बेथ-यशिमोथापासून आबेल-शित्तीमपर्यंत तळ दिला. \b \p \v 50 मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ यरीहोजवळ याहवेह मोशेला म्हणाले, \v 51 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘यार्देन पार करून तुम्ही जेव्हा कनान देशात जाल, \v 52 तेव्हा तिथे राहणार्‍या लोकांना तुमच्यापुढून घालवून द्या, त्यांच्या सर्व कोरीव आकृत्या व ओतीव मूर्त्यांचा नाश करा व त्यांची सर्व उच्च स्थाने नष्ट करा. \v 53 देशाचा ताबा घ्या व त्यात वस्ती करा, कारण तुम्ही त्यात वस्ती करावी म्हणून हा देश मी तुम्हाला दिला आहे. \v 54 तुमच्या कुळानुसार चिठ्ठ्या टाकून जमीन वाटप करावी. संख्येने मोठ्या असलेल्या गटाला मोठे वतन व लहान गटाला लहान वतन. चिठ्ठीद्वारे जे निघेल ते त्यांचे वतन होईल. तुमच्या पूर्वजांच्या गोत्रानुसार त्याची वाटणी करावी. \p \v 55 “ ‘पण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तुम्ही जर घालवले नाही, व त्यांना तुम्ही तिथेच राहू दिले, तर ते तुमच्या डोळ्यांना कुसळांसारखे आणि तुमच्या कूशीला काट्यांसारखे होतील. ज्या देशात तुम्ही राहाल त्यामध्ये ते तुम्हाला त्रास देतील. \v 56 आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ” \c 34 \s1 कनान देशाच्या सीमा \lh \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांस आज्ञा देऊन सांग: ‘जो देश तुम्हाला तुमचे वतन म्हणून दिला जाणार आहे त्या कनान देशात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा त्याच्या सीमा अशाप्रकारे असाव्यात: \b \li1 \v 3 “ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी, \v 4 तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या\f + \fr 34:4 \fr*\fq अक्राब्बीम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa विंचू\fqa*\f* चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी. \v 5 आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल. \li1 \v 6 तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी. \li1 \v 7 तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी. \v 8 आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी. \v 9 जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल. \li1 \v 10 तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी. \v 11 तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ\f + \fr 34:11 \fr*\ft इब्री भाषेत \ft*\fqa गालील\fqa*\f* समुद्रापर्यंत पोहोचेल. \v 12 नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’ \b \lf “ ‘प्रत्येक दिशेने त्याच्या सीमा असलेला हाच तुमचा देश असेल.’ ” \b \p \v 13 मोशेने इस्राएली लोकांना ही आज्ञा दिली: “हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटप करावा. याहवेहने आज्ञा केली आहे की हा देश साडेनऊ गोत्रांना दिला जावा, \v 14 कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे. \v 15 या अडीच गोत्रांना त्यांचे वतन यरीहोजवळ, यार्देनच्या अलीकडे पूर्वेच्या बाजूला मिळाले आहे.” \p \v 16 याहवेह मोशेला म्हणाले, \v 17 “ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ. \v 18 आणि देश वाटणीच्या मदतीसाठी प्रत्येक गोत्रातून एक पुढारी नेमावा. \b \lh \v 19 “ही त्यांची नावे आहेत: \b \li1 “यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब; \li1 \v 20 शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल; \li1 \v 21 बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद; \li1 \v 22 दानच्या गोत्रातून, योगलीचा पुत्र बुक्की हा पुढारी होता. \li1 \v 23 योसेफाचा पुत्र मनश्शेह याच्या गोत्रातून, एफोदचा पुत्र हन्नीऐल हा पुढारी होता. \li1 \v 24 योसेफाचा पुत्र एफ्राईम याच्या गोत्रातून, शिफतनचा पुत्र कमुवेल हा पुढारी होता. \li1 \v 25 जबुलूनच्या गोत्रातून, परनाखचा पुत्र एलीजाफान हा पुढारी होता. \li1 \v 26 इस्साखारच्या गोत्रातून, अज्जानचा पुत्र पलतीएल हा पुढारी होता. \li1 \v 27 आशेरच्या गोत्रातून, शलोमीचा पुत्र अहिहूद हा पुढारी होता. \li1 \v 28 नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.” \b \lf \v 29 इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत. \c 35 \s1 लेवी लोकांना नेमून दिलेली शहरे \p \v 1 यरीहो समोर मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांना आज्ञा दे की त्यांना मिळालेल्या वतनातून लेवी लोकांना राहण्यासाठी त्यांनी नगरे आणि नगराभोवतालची कुरणेही द्यावीत. \v 3 म्हणजे त्यांना राहण्यासाठी नगरे व त्यांच्या मालकीची असणारी त्यांची गुरे मेंढरे व सर्व इतर जनावरांसाठी कुरणे असावीत. \p \v 4 “नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात\f + \fr 35:4 \fr*\ft अंदाजे 450 मीटर\ft*\f* असावी. \v 5 नगराबाहेर पूर्वेच्या दिशेने दोन हजार हात\f + \fr 35:5 \fr*\ft अंदाजे 900 मीटर\ft*\f*, दक्षिणेच्या दिशेने दोन हजार हात, पश्चिमेकडे दोन हजार हात व दोन हजार हात उत्तरेकडे मोजावे आणि नगर मध्यभागी असावे. हाच भाग त्यांच्या नगरांसाठी कुरण म्हणून असावा.” \s1 आश्रयाची शहरे \p \v 6 “लेवी लोकांना जी शहरे तुम्ही द्याल, त्यापैकी सहा शहरे आश्रयाची शहरे म्हणून असावीत, जर एखाद्या व्यक्तीने कोणाला जिवे मारले तर त्याने त्यात पळून जावे. त्याचबरोबर इतर बेचाळीस नगरे लेवी लोकांना द्यावीत. \v 7 अशी लेवी लोकांना त्यांच्या कुरणांसह एकंदर अठ्ठेचाळीस नगरे द्यावीत. \v 8 लेवी लोकांना जी नगरे तुम्ही द्याल ती इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राला मिळालेल्या वतनाच्या प्रमाणात: म्हणजे ज्यांना पुष्कळ नगरे मिळाली त्यांच्याकडून पुष्कळ, परंतु ज्यांना थोडी नगरे मिळाली त्यांच्याकडून थोडी नगरे घेऊन द्यावीत.” \p \v 9 नंतर याहवेह मोशेला म्हणाले: \v 10 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जेव्हा तुम्ही यार्देन पार करून कनानमध्ये जाल, \v 11 तुमच्यासाठी आश्रयनगरे व्हावी म्हणून तुम्ही काही शहरे निवडून ठेवा, म्हणजे कोणी एखाद्याला चुकून जिवे मारले तर त्याने तिथे पळून जावे. \v 12 सूड घेणार्‍यापासून आश्रय म्हणून ही नगरे तुमच्यासाठी असावीत, अशासाठी की खुनी असल्याचा दोष असणारा, मंडळीसमोर खटला होण्यापूर्वीच मारला जाऊ नये. \v 13 ही जी सहा नगरे तुम्ही द्याल ती तुमच्यासाठी आश्रयाची नगरे म्हणून असतील. \v 14 या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत. \v 15 ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे. \p \v 16 “ ‘जर कोणा व्यक्तीने लोखंडी वस्तूने एखाद्यावर घातक हल्ला केला, तर तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. \v 17 किंवा कोणी दगड घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. \v 18 किंवा कोणी लाकडी वस्तू घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; त्या खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. \v 19 रक्ताचा सूड घेणार्‍याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्‍याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्‍याने खुनी मनुष्याला जिवे मारावे. \v 20 जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले \v 21 किंवा जर वैरभावाने एखाद्याला बुक्की मारली व तो मेला, तर त्या व्यक्तीला मारून टाकले जावे; कारण तो खुनी आहे. रक्ताचा सूड घेणारा जेव्हा त्या खुनी व्यक्तीला भेटेल तेव्हा त्याने त्याला अवश्य जिवे मारावे. \p \v 22 “ ‘पण काही शत्रुत्व नसताना अचानक कोणी एखाद्याला ढकलतो किंवा चुकीने त्यांच्यावर एखादी वस्तू फेकतो \v 23 किंवा न पाहताच त्यांना मारून टाकू शकेल असा जड दगड त्यांच्यावर टाकेल, व तो व्यक्ती जर मेला, परंतु ज्याने मारले तो त्याचा शत्रू नव्हता व त्याने ती हानी मुद्दाम केली नाही, \v 24 म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा. \v 25 खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंडळीने रक्ताचा सूड घेणार्‍यापासून वाचवावे व तो ज्या आश्रयाच्या नगराकडे पळून गेला होता त्याकडे त्याला पाठवावे. पवित्र तेलाने अभिषेक झालेल्या मुख्य याजकाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी मनुष्याने तिथेच राहावे. \p \v 26 “ ‘परंतु आरोपी ज्या आश्रय नगरात पळून गेला आहे त्याच्या सीमेबाहेर गेला \v 27 आणि रक्ताचा सूड घेणार्‍याला तो शहराच्या बाहेर सापडला आणि रक्ताचा सूड घेणार्‍याने त्याला जिवे मारले तर त्या खुनासाठी तो दोषी ठरणार नाही. \v 28 कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे. \p \v 29 “ ‘हे सर्व तुमच्या येणार्‍या पिढ्यांसाठी तुम्ही जिथे वस्ती कराल तिथे तुमच्या न्यायाचे नियम म्हणून असावे. \p \v 30 “ ‘जो कोणी एखाद्याचा खून करतो त्याला केवळ साक्षीदाराच्या साक्षीनुसारच जिवे मारावे. परंतु केवळ एकाच साक्षीच्या आधारावर कोणाला जिवे मारू नये. \p \v 31 “ ‘खुनी व्यक्तीच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये, जो दोषी मरणास पात्र आहे त्याला अवश्य जिवे मारावे. \p \v 32 “ ‘जो आश्रयाच्या नगरात पळून गेला आहे, त्याने महायाजकाच्या मृत्यूच्या आधी आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहावे म्हणून त्याच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये. \p \v 33 “ ‘तुम्ही राहत असलेला देश भ्रष्ट करू नका. रक्तपाताने देश भ्रष्ट होतो आणि ज्या देशात रक्तपात होतो त्याच्यासाठी ज्याने रक्तपात केला त्याच्या रक्ताशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही. \v 34 ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ” \c 36 \s1 सलाफहादच्या कन्यांचे वतन \p \v 1 योसेफाच्या वंशाच्या कुळातील, मनश्शेहचा पुत्र माखीरचा पुत्र गिलआदच्या कुटुंबाचे कुलप्रमुख मोशे व पुढारी, म्हणजे इस्राएली कुटुंबाच्या पुढाऱ्यांपुढे येऊन बोलले. \v 2 ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे. \v 3 परंतु त्यांनी जर इस्राएलातील इतर गोत्रातील पुरुषांशी लग्न केले, तर त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या वतनातून काढून ज्या गोत्रात त्या लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या वतनाचा भाग काढून घेतला जाईल. \v 4 आणि जेव्हा इस्राएल लोकांचे योबेल वर्ष येईल, तेव्हा त्यांचे वतन ज्या गोत्रात ते लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल आणि त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या गोत्रातून काढून घेतले जाईल.” \p \v 5 नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. \v 6 सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा. \v 7 इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे. \v 8 इस्राएली लोकांतील कोणत्याही गोत्रातील ज्या प्रत्येक मुलीला वतन मिळाले असेल, तिने आपल्या पित्याच्या गोत्राच्या कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह करावा, यासाठी की प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे वतन मिळेल. \v 9 कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.” \p \v 10 याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले. \v 11 सलाफहादच्या कन्या म्हणजे महलाह, तिरजाह, होगलाह, मिल्काह व नोआहने त्यांच्या पित्याच्या चुलत भावांशी विवाह केला. \v 12 त्यांनी योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या गोत्राच्या कुळातच विवाह केला व त्यांचे वतन त्यांच्या पित्याच्या गोत्रात व कुळातच राहिले. \b \p \v 13 मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.