\id NEH - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h नहेम्या \toc1 नहेम्याह \toc2 नहेम्या \toc3 नहे \mt1 नहेम्याह \c 1 \s1 यरुशलेमसाठी नहेम्याहची प्रार्थना \p \v 1 हखल्याहचा पुत्र नहेम्याहची वचने: \b \b \p विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात असताना,\f + \fr 1:1 \fr*\ft पर्शियाचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या\ft*\f* \v 2 माझ्या यहूदी बांधवांपैकी हनानी नावाचा एक बंधू मला भेटण्यासाठी काही लोकांना बरोबर घेऊन यहूदीयाहून आला. बंदिवासातील अवशिष्ट यहूदाहचे व यरुशलेमचे कसे काय चालले आहे याची मी चौकशी केली. \p \v 3 त्यांनी उत्तर दिले, “जे बंदिवासातील उरलेले बंधू आहेत व त्या प्रदेशात राहू लागले आहेत, ते फारच कष्टात व निंदनीय परिस्थितीत आहेत. यरुशलेमचा तट पडलेल्याच अवस्थेत आहे आणि त्याच्या वेशी जाळून टाकलेल्या आहेत.” \p \v 4 हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो. \v 5 मग मी म्हणालो: \pm “हे महान व भयावह याहवेह, स्वर्गाच्या परमेश्वरा, जे तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांना तुम्ही प्रीतीने दिलेला करार पाळता, \v 6 तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो. \v 7 आम्ही तुमच्याविरुद्ध दुष्टतेचे आचरण केले आहे. तुम्ही तुमचा सेवक मोशेद्वारे आम्हाला दिलेल्या आज्ञा, नियम व आदेश पाळले नाही. \pm \v 8 “तुम्ही मोशेला काय सांगितले होते याची कृपा करून आठवण करा. तुम्ही म्हटले होते, ‘जर तुम्ही अविश्वासू व्हाल, तर मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन; \v 9 पण तुम्ही माझ्याकडे परत याल, माझ्या आज्ञा पाळाल, तर जगाच्या अगदी टोकाच्या कोपर्‍यातही बंदिवासात असलात, तरी मी तुम्हाला गोळा करून जे ठिकाण मी माझ्या नामाच्या निवासासाठी निवडले आहे तिथे आणेन.’ \pm \v 10 “ते तुमचेच सेवक व लोक आहेत, ज्यांना तुम्ही आपल्या महान शक्तीने व समर्थ हाताने सोडविले आहे. \v 11 हे प्रभू, कृपा करून माझ्या प्रार्थनेकडे व जे तुमच्या नामाचा सन्मान करण्यात आनंद मानतात, त्यांची प्रार्थना ऐका. मी राजाकडे एका मोठ्या कृपेची मागणी करण्यासाठी जात आहे; आता कृपा करून या मनुष्याच्या सानिध्यात माझ्याविषयी दया निर्माण होण्यासाठी मला यश द्या.” \p मी राजाचा प्यालेबरदार होतो. \c 2 \s1 अर्तहशश्त नहेम्याहास यरुशलेमाला पाठवितो \p \v 1 पुढे अर्तहशश्तच्या राजवटीच्या विसाव्या वर्षी, निसान महिन्यामध्ये एके दिवशी, राजाला द्राक्षारस देण्यात आला, तेव्हा मी प्याला भरला व राजाला दिला. आजपर्यंत मी राजाच्या उपस्थितीत कधीही दुःखी असा दिसलो नव्हतो. \v 2 म्हणून राजाने मला विचारले, “तू आजारी नसताना तुझा चेहरा एवढा खिन्न का दिसतो? तुझ्या मनात निराशा असल्याशिवाय असे होणार नाही.” \p मी घाबरलो, \v 3 पण मी राजाला उत्तर दिले, “महाराज, अनंतकाळ चिरंजीव राहोत! माझा चेहरा दुःखी का असू नये, कारण ज्या नगरामध्ये माझ्या पूर्वजांना पुरले आहे, त्या नगराचा विध्वंस झाला आहे व त्याच्या वेशी जाळून टाकल्या आहेत.” \p \v 4 राजाने मला विचारले, “तुझी काय इच्छा आहे?” \p स्वर्गातील परमेश्वराची मनात प्रार्थना करून मी उत्तर दिले, \v 5 “महाराज प्रसन्न असतील आणि त्यांचा सेवक शाही मर्जीतील असेल, तर जिथे माझ्या पूर्वजांना दफन केले आहे त्या नगराची पुनर्बांधणी करण्यासाठी महाराजांनी मला यहूदीयाला पाठवावे.” \p \v 6 नंतर राजाच्या शेजारी राणी बसलेली असताना, राजाने मला विचारले, “किती काळासाठी तुला जावे लागेल व तू केव्हा परत येशील?” मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले म्हणून मी माझ्या जाण्याची वेळ ठरविली. \p \v 7 पुढील गोष्टींसाठी देखील मी विनंती केली, “महाराज, आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर कृपा करून फरात\f + \fr 2:7 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीच्या पश्चिमेकडील राज्यपालांसाठी मजजवळ पत्रे द्यावी, म्हणजे त्यांनी मला त्यांच्या प्रांतातून यहूदीयाला सुखरुपपणे प्रवास करू द्यावा. \v 8 एक पत्र शाही जंगलाचा व्यवस्थापक आसाफ यांच्यासाठीही द्यावे. त्या पत्रामध्ये मंदिराशेजारी असलेल्या गढीच्या दरवाजांसाठी, शहराच्या कोटासाठी व माझ्या घराला लागणार्‍या तुळयांसाठी लाकूड देण्याबद्दल त्याला आज्ञा द्यावी.” माझ्यावर परमेश्वराची हस्तकृपा असल्यामुळे राजाने या विनंत्या मान्य केल्या. \v 9 मी फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतात पोहोचलो, तेव्हा मी राजाची पत्रे तेथील राज्यपालांना दिली. राजाने माझ्या संरक्षणासाठी लष्करी अधिकारी व घोडेस्वार सैनिक माझ्याबरोबर पाठविले होते. \p \v 10 पण होरोनी सनबल्लट व अम्मोनी अधिकारी तोबीयाह यांना हे जेव्हा समजले तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले, की कोणीतरी इस्राएलला मदत करण्यासाठी आले आहे. \s1 नहेम्याह यरुशलेमच्या तटबंदीची पाहणी करतो \p \v 11 यरुशलेमला पोहोचल्यावर तिथे तीन दिवस राहिल्यानंतर, \v 12 मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता. \p \v 13 आम्ही खोरेवेशीतून बाहेर पडलो आणि कोल्ह्याच्या\f + \fr 2:13 \fr*\fq कोल्ह्याच्या \fq*\ft अर्थात् सर्पाच्या\ft*\f* विहिरीवरून, उकिरडा वेशीतून, यरुशलेमच्या पडलेल्या भिंती व जळालेल्या वेशी पाहण्यास गेलो. \v 14 पुढे आम्ही झर्‍याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती. \v 15 म्हणून रात्र झाल्यावर आम्ही शहराला वळसा घातला आणि मी ओहोळाच्या वाटेने वर चढून कोटाचे निरीक्षण केले व परत खोरेवेशीने आत आलो. \v 16 शहरातील अधिकार्‍यांना, मी कुठे गेलो व काय केले याची गंधवार्ताही नव्हती, कारण आतापर्यंत मी माझ्या योजनांबद्दल यहूदी, याजक किंवा प्रतिष्ठित नागरिक वा अधिकारी या कोणाशीही बोललो नव्हतो. नव्हे. जे प्रत्यक्ष काम करणार होते, त्यांच्याशी देखील बोललो नव्हतो. \p \v 17 मग मी त्यांना सांगितले, “आपल्या शहराची दुर्दशा तुम्हा सर्वांना माहीतच आहे: यरुशलेम उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्याच्या वेशी जळालेल्या आहेत. आपण यरुशलेमच्या तटाची पुनर्बांधणी करू आणि आपल्यावरील हा कलंक धुऊन टाकू.” \v 18 परमेश्वराची हस्तकृपा माझ्यावर असून, तसेच माझे राजाशी झालेले बोलणे आणि माझ्या योजनेला त्याने दिलेली संमती, या गोष्टीही मी त्यांना सांगितल्या. \p त्यांनी उत्तर दिले, “आपण तटाची पुनर्बांधणी सुरू करू या.” आणि अशा रीतीने त्यांनी या सत्कार्याला सुरुवात केली. \p \v 19 पण होरोनी सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीयाह आणि गेशेम अरबी यांनी आमच्या या योजनेबद्दल ऐकले, तेव्हा ते आमची थट्टा व उपहास करून म्हणाले, “हे तुम्ही काय करीत आहात? राजाविरुद्ध बंड करता काय?” \p \v 20 पण मी उत्तर दिले, “स्वर्गाचे परमेश्वर आम्हाला यश देतील. आम्ही त्यांचे सेवक या तटाची पुनर्बांधणी करू, परंतु यरुशलेममध्ये वा त्यातील ऐतिहासिक कार्यात तुमचा काहीही सहभाग व अधिकार असणार नाही.” \c 3 \s1 तट बांधणारे लोक \p \v 1 मुख्य याजक एल्याशीब आणि इतर याजकांनी काम सुरू करून मेंढे वेस परत बांधली. ती समर्पित केली आणि तिला दारे लावली, हनानेल मनोऱ्यापासून शंभराचा बुरूज येथपर्यंत बांधकाम केले. \v 2 यरीहो शहराच्या लोकांनी त्याच्या पुढचे बांधकाम केले आणि त्यांच्या शेजारी इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले. \b \p \v 3 मासे फाटक हस्सनाहच्या पुत्रांनी बांधली. त्यांनी तुळया बसविणे, दरवाजे, कड्या व अडसर लावणे आणि गज बसविणे इत्यादी कामे केली. \v 4 हक्कोसचा पुत्र उरीयाह, त्याचा पुत्र मरेमोथाने तटाचा पुढचा भाग दुरुस्त केला. त्याच्या शेजारी मशुल्लाम, बेरेख्याहचा पुत्र, जो मशेजबेलचा पुत्र, त्याने दुरुस्ती केली आणि बाअनाहाचा पुत्र सादोक दुरुस्ती करीत होते. \v 5 त्यांचा पुढील भाग तकोवाच्या लोकांनी दुरुस्त केला. परंतु त्यांच्यातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या मुकादमाच्या देखरेखीखाली कोणत्याही कामाची जबाबदारी घेण्याचे टाळले. \b \p \v 6 येशनाह\f + \fr 3:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa जुने\fqa*\f* वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले. \v 7 त्यांच्या शेजारी, पश्चिम फरातच्या राज्यपालाच्या सत्तेखाली असलेल्या गिबोन व मिस्पाह येथील लोकांनी डागडुजीचे काम केले. गिबोनी मलतियाह व मेरोनोथी यादोन आले होते. \v 8 हरहयाहचा पुत्र उज्जीएल व्यवसायाने सोनार होता, त्यानेही पुढच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी अत्तरे तयार करणारा हनन्याह होता. त्यानेसुद्धा डागडुजी केली. या दोघांनी यरुशलेमातील रुंद भिंती पर्यंत डागडुजी केली. \v 9 यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हूरचा पुत्र रफायाहने त्यांच्या शेजारच्या तटाची डागडुजी केली. \v 10 हरूमाफाचा पुत्र यदायाहने आपल्या स्वतःच्या घरासमोरील तटाची डागडुजी केली आणि त्याच्या शेजारीच हशबन्याहचा पुत्र हट्टूशने डागडुजी केली. \v 11 यानंतर हारीमाचा पुत्र मल्कीयाह आणि पहथ-मोआबाचा पुत्र हश्शूब यांनी एका विभागाची आणि भट्टी मनोऱ्याची डागडुजी केली. \v 12 त्याच्या शेजारी यरुशलेमच्या दुसर्‍या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हल्लोहेशचा पुत्र शल्लूमाने व त्याच्या कन्यांनी डागडुजी केली. \b \p \v 13 हानून व जानोह येथील लोकांनी खोरे वेशीची डागडुजी केली. तिचे दरवाजे उभे करून त्यांना कड्या, अडसर व गजही लावले. नंतर त्यांनी उकिरडा वेशीपर्यंतच्या एक हजार हात\f + \fr 3:13 \fr*\ft अंदाजे 450 मीटर\ft*\f* लांबीच्या तटाची दुरुस्ती केली. \b \p \v 14 रेखाबाचा पुत्र मल्कीयाहने उकिरडा वेस दुरुस्त केली. मल्कीयाह हा बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी होता. ती वेस बांधल्यावर, त्याने तिचे दरवाजे उभे केले व त्यांना कड्या, अडसर व गज लावले. \b \p \v 15 कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह\f + \fr 3:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa सिलोम\fqa*\f* तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्‍यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली. \v 16 त्याच्या पलीकडे अजबुकाचा पुत्र नहेम्याह होता. तो बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. त्याने दावीद राजाच्या कबरस्तानापर्यंत, कृत्रिम तळ्यापर्यंत आणि वीरांचे गृह या ठिकाणापर्यंत दुरुस्ती केली. \p \v 17 त्याच्या शेजारी लेवी बानीचा पुत्र रहूमच्या देखरेखीखाली डागडुजी करीत होता. त्याच्या शेजारी कईलाह जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्याह होता. त्याने आपल्या जिल्ह्यांच्या वतीने डागडुजी केली. \v 18 त्याच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिनुई\f + \fr 3:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa बव्वई\fqa*\f* च्या देखरेखीखाली लेव्याच्या वंशजांनी डागडुजी केली. हा बवई कईलाह जिल्ह्याच्या दुसर्‍या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. \v 19 त्यांच्या शेजारी येशूआच्या पुत्र मिस्पाहचा अधिकारी एजेरने एका भागात जिथे तट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते, तिथे डागडुजी केली. \v 20 त्यांच्या शेजारी जक्काईचा\f + \fr 3:20 \fr*\ft जक्काई काही हस्तलिखितांमध्ये \ft*\fqa ज़ब्बाई\fqa*\f* पुत्र बारूख होता. त्याने कोटाच्या वळणापासून थेट मुख्य याजक एल्याशीबच्या घराच्या दारापर्यंत उत्साहाने डागडुजी केली. \v 21 त्याच्या शेजारी हक्कोसचा पुत्र उरीयाहचा पुत्र मरेमोथने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून शेवटापर्यंतचा कोटाचा भाग दुरुस्त केला. \p \v 22 मग सभोवती राहणारे याजक आले व त्यांनीही पुढील दुरुस्ती केली. \v 23 त्यांच्या शेजारी बिन्यामीन व हश्शूब यांनी आपल्या घरासमोरील भागाची दुरुस्ती केली. त्यांच्या शेजारी मासेयाहचा पुत्र, जो अनन्याहचा पुत्र अजर्‍याहाने आपल्या घराजवळ डागडुजी केली. \v 24 त्यांच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिन्नुईने अजर्‍याहच्या घरापासून कोपर्‍यापर्यंतच्या कोटाचा भाग बांधला. \v 25 उजईचा पुत्र पलालने कोट कोपर्‍यापासून राजवाड्याच्या वरच्या माळाजवळील तुरुंगाच्या अंगणापर्यंत काम करून बुरुजाचीही डागडुजी केली. त्याच्या शेजारी पारोशाचा पुत्र पदायाहनेही डागडुजी केली. \v 26 ओफेलमध्ये राहणार्‍या मंदिराच्या सेवकांनी पूर्वेकडील पाण्याच्या वेशीपर्यंत कोटाची दुरुस्ती केली आणि बुरुजाचा पुढे आलेला भागही दुरुस्त केला. \v 27 तकोवा येथील लोकांनी मनोऱ्याच्या बुरुजाच्या समोर असलेला भाग आणि ओफेलाच्या तटापर्यंतचा भाग दुरुस्त केला. \b \p \v 28 याजकांनी घोडे वेशीपासून प्रत्येकाने आपल्या घरासमोरील कोटाचा भाग दुरुस्त केला. \v 29 इम्मेराचा पुत्र सादोकानेही आपल्या घरासमोरचा कोट परत बांधला, त्याच्या पलीकडे शखन्याहचा पुत्र शमायाह, जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता, त्यानेही डागडुजी केली. \v 30 त्याच्या शेजारी शेलेम्याहचा पुत्र हनन्याह, सलाफाचा सहावा पुत्र हानून यांनी दुरुस्ती केली, त्याच्यापुढे बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम होता. त्याने आपल्या घरासमोरची भिंत दुरुस्त केली. \v 31 सोनारांपैकी मल्कीयाहने मंदिराच्या सेवकांच्या व व्यापार्‍यांच्या घरांपर्यंतच्या निरीक्षण वेशीपर्यंतच्या आणि कोपर्‍यावरील वरच्या कोठडीपर्यंतच्या कोटाची दुरुस्ती केली. \v 32 इतर सोनारांनी आणि व्यापार्‍यांनी त्या कोपर्‍यापासून मेंढेवेशीपर्यंत कोटाची डागडुजी केली. \c 4 \s1 पुनर्बांधणीस विरोध \p \v 1 आम्ही कोटाची पुन्हा बांधणी करीत आहोत, हे सनबल्लटाला समजले, तेव्हा तो संतापला आणि अत्यंत कृद्ध झाला. त्याने यहूदी लोकांचा उपहास केला. \v 2 आपले सोबती व शोमरोनचे सेनाधिकारी यांच्यादेखत थट्टा करीत तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करीत आहेत? ते तटाची पुनर्बांधणी करू शकतील काय? ते अर्पणे वाहू शकतील काय? एका दिवसात ते कामे संपवू शकतील काय? मातीच्या ढिगार्‍यातून उपसून काढलेल्या दगडात ते प्राण घालू शकतील काय—ते तर पार जळून गेलेले दगड!” \p \v 3 तोबीयाह अम्मोनी त्याच्या जवळच उभा होता. तो बोलला, “काय तरी यांचे बांधकाम—एखादा कोल्हा जरी यांच्या त्या तटावरून चालत गेला तरी तो दगडी तट कोसळेल!” \b \p \v 4 आमच्या परमेश्वरा, आमचे ऐका, कारण आमचा उपहास होत आहे. त्यांची थट्टा त्यांच्याच शिरी उलटो आणि एखाद्या परकीय देशात बंदिवान म्हणून त्यांची लूट होऊ द्या. \v 5 त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्‍यांना त्यांनी अपमानित केले आहे. \b \p \v 6 शेवटी मूळ उंचीच्या अर्ध्या उंचीपर्यंतचा तट पूर्ण झाला, कारण लोकांनी अगदी मन लावून काम केले होते. \p \v 7 पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले. \v 8 त्यांनी यरुशलेममध्ये दंगे व गोंधळ निर्माण करण्याचा कट केला. \v 9 पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला. \p \v 10 नंतर यहूदीयाचे लोक म्हणाले, “कामकऱ्यांची शक्ती घटत चालली आहे आणि दगडविटांचे इतके खच पडले आहेत की पुढील भिंत बांधणे अशक्यच वाटते.” \p \v 11 आमच्या शत्रूंनी हे देखील म्हटले, “त्यांना काही कळण्याआधी व ते आपल्याला पाहण्याआधी, आपण त्यांच्यामध्ये जाऊ, अचानक हल्ला करून आपण त्यांना ठार करू व त्यांचे काम बंद करू.” \p \v 12 तेव्हा जवळपास राहणारे यहूदी लोक आले व आम्हाला दहा वेळेस येऊन सांगून गेले, “तुम्ही ज्या दिशेने जाल, हे लोक त्या दिशेने तुमच्यावर हल्ला करतील.” \p \v 13 याकारणास्तव मी प्रत्येक कुटुंबानुसार काही लोक निवडले व त्यांना तलवारी, भाले व धनुष्‍यबाण देऊन तटाच्या खालच्या मागील खुल्या जागी त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांना पहारेकरी म्हणून बसविले. \v 14 संपूर्ण परिस्थितीकडे नजर टाकल्यावर, मी उभा राहिलो व सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व बाकी लोकांना एकत्र बोलाविले आणि त्यांना म्हणालो, “त्यांना भिऊ नका! महान व भयावह परमेश्वराची आठवण ठेवा. आपल्या कुटुंबांसाठी, तुमच्या पुत्रांसाठी, तुमच्या कन्यांसाठी, तुमच्या पत्नीसाठी आणि घरांसाठी लढा!” \p \v 15 आमच्या शत्रूंनी ऐकले की आम्हाला त्यांचा कट समजला आहे आणि परमेश्वराने त्यांच्या सर्व योजना व्यर्थ केल्या आहेत. मग आम्ही तट बांधण्याच्या कामाला पुन्हा लागलो. \p \v 16 पण त्या दिवसापासून पुढे माझे फक्त अर्धेच पुरुष काम करीत असत व बाकी अर्धे पाठीमागे भाले, ढाली, धनुष्य व शस्त्रे घेऊन होते. हे अधिकारी जे यहूदीयाचे लोक \v 17 बांधकाम करीत होते त्यांच्यामागे उभे राहिले. जे कामकरी सामान नेआण करीत, ते आपली लढाईची शस्त्रे एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने कामे करीत असत. \v 18 आपल्या कमरेला तलवारी लटकवून प्रत्येकजण काम करीत असत. मात्र रणशिंग वाजविणारा माझ्याजवळच असे. \p \v 19 मग मी प्रतिष्ठित लोक, अधिकारी आणि इतर लोकांना समजावून सांगितले, “काम इतके मोठे व विस्तृत आहे की त्यामुळे आपण भिंतीशी बांधकाम करीत असताना एकमेकांपासून लांब लांब असतो. \v 20 म्हणून तुम्ही रणशिंगाचा आवाज ऐकाल, तेव्हा तुम्ही आम्ही असलेल्या जागी धावत आले पाहिजे आणि आपले परमेश्वर आपल्यासाठी लढतील!” \p \v 21 आम्ही सूर्योदयापासून कामाला सुरुवात करून तारे दिसेपर्यंत करीत असू आणि अर्धे लोक भाले घेऊन नेहमीच असत. \v 22 त्यावेळी मी सर्व लोकांना सांगितले, “प्रत्येकाने रात्रीच्या मुक्कामाला यरुशलेमच्या आतच राहावे, म्हणजे ते रात्री पहार्‍याचे व दिवसा तटाच्या बांधकामाचे कार्य करू शकतील.” \v 23 याकाळात आमच्यापैकी कोणीही, मी किंवा माझे बांधव, माझी माणसे किंवा माझ्याबरोबर असणारे पहारेकरी, कोणीही आपले कपडे बदलले नाहीत आणि जलाशयाला जाते वेळी देखील आम्ही आमची शस्त्रे नेहमीच आमच्याबरोबर बाळगत असू. \c 5 \s1 नहेम्याहची गरिबास मदत \p \v 1 काही काळानंतर स्त्रीपुरुषांनी आपल्या यहूदी बांधवांविरूद्ध तक्रार करण्यास सुरुवात केली. \v 2 काहीजण म्हणाले, “आम्ही व आमचे पुत्र व कन्या असे बरेच लोक आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला धान्याची गरज आहे.” \p \v 3 दुसरे म्हणाले, “दुष्काळापासून जीव वाचवावा म्हणून धान्य मिळविण्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागली आहेत.” \p \v 4 आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत. \v 5 आम्ही त्यांचेच बांधव आहोत आणि आमची मुले त्यांच्या मुलांबाळांसारखीच आहेत, तरीसुद्धा जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळावेत म्हणून आम्हाला आमची मुले व मुली गुलाम म्हणून कामाला लावावी लागतात. आमच्या काही कन्या आम्ही आधीच गुलाम म्हणून विकलेल्या आहेत, पण आम्ही असमर्थ आहोत, कारण आमची शेते व द्राक्षमळेसुद्धा इतरांचे झाले आहेत.” \p \v 6 जेव्हा मी त्यांचा हा आक्रोश व या तक्रारी ऐकल्या, तेव्हा मी अतिशय संतापलो. \v 7 या परिस्थितीवर विचार केल्यानंतर मी या प्रतिष्ठितांना व अधिकार्‍यांना म्हणालो, “तुम्ही स्वतःच्याच देशबांधवांकडून व्याज गोळा करीत आहात!” मग त्यांचा समाचार घेण्यासाठी मी एक मोठी सभा बोलाविली. \v 8 या सभेत मी त्यांना म्हणालो, “आम्ही गैरयहूद्यांना गुलामगिरीत विकलेल्या आपल्या यहूदी बांधवांना शक्य होईल तितक्यांना परत आणले आहे. आता तुम्ही मात्र तुमच्याच लोकांना विकून, त्यांना पुन्हा आम्हाला विकत आहात! त्यांची सुटका आम्ही किती वेळा करावी?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले कारण त्यांना त्यावर उत्तरच सापडले नाही. \p \v 9 मग मी पुढे म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात, ते अयोग्य आहे. आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये आपली निंदा होऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराचे भय बाळगू नये काय? \v 10 मी व माझे बंधू, आणि माझे लोक कोणतेही व्याज न घेता पैसे आणि धान्य उसने देत आहोत. आपण हे व्याज घेणे बंद केले पाहिजे! \v 11 त्यांची शेते, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे त्यांना लगेच परत करा व पैसे, धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यावरील एक टक्का जे व्याज म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेता ते सोडून द्या.” \p \v 12 त्यांनी म्हटले, “आम्ही त्यांना सर्वकाही परत देऊ. आणि त्यांच्याकडून काहीही मागणी करणार नाही. तुम्ही म्हणता तसेच आम्ही करू.” \p मग मी याजकांना बोलाविणे पाठविले, प्रतिष्ठित व इतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी जे वचन दिले होते, त्या शपथा घेण्यास लावल्या. \v 13 व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!” \p यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले. \p \v 14 याशिवाय, अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंतच्या—बारा वर्षांच्या संपूर्ण कालावधीत मी यहूदीयाचा राज्यपाल असताना, माझ्या बंधूंनी आणि मी राज्यपालास नेमून दिलेल्या अन्नाचा वाटा घेतला नाही. \v 15 पण माझ्यापूर्वी असलेल्या राज्यपालांनी लोकांवर फारच जड ओझी लादली आणि त्यांच्याकडून अन्न व द्राक्षारसाशिवाय चांदीची चाळीस शेकेल\f + \fr 5:15 \fr*\ft अंदाजे 460 ग्रॅ.\ft*\f* यांची मागणी ते करीत असत. त्यांचे उपाधिकाराही प्रजेचे शोषण करीत. परंतु मी परमेश्वराच्या भयात राहून त्यांच्याप्रमाणे वागलो नाही. \v 16 याउलट मी सर्व शक्तिनिशी तटाच्या कामास समर्पित राहिलो. माझे सेवकही एकत्र येऊन कामास लागले. आम्ही कोणत्याही जमिनीची खरेदी केली नाही. \p \v 17 माझ्या मेजावर नियमितपणे दीडशे यहूदी व त्यांचे अधिकारी जेवण करीत असत. त्याचप्रमाणे शेजारच्या राष्ट्रांतून आलेल्या लोकांनाही मी जेवू घालीत असे. \v 18 दररोज एक बैल, सहा पुष्ट मेंढरे, काही पक्षी यापासून बनविलेले अन्न माझ्यासाठी शिजविण्यात येत असे. तसेच दर दहा दिवसांनी मी त्यांना सर्वप्रकारचे द्राक्षारस विपुल प्रमाणात पुरवित असे. इतके असूनही राज्यपालांना जो भोजनभत्ता मिळण्याचा हक्क होता, तो मी कधीही मागितला नाही, कारण या सेवा लोकांना भारी पडत होत्या. \p \v 19 हे माझ्या परमेश्वरा, मी जे काही या लोकांसाठी केले आहे, त्याबद्दल प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा. \c 6 \s1 पुनर्बांधणीला आणखी विरोध \p \v 1 सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते, \v 2 तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, “ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात\f + \fr 6:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa केफिरीम\fqa*\f* भेटू या.” \p पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले, \v 3 म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: “मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?” \v 4 त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले. \p \v 5 पाचव्या वेळेला सनबल्लटाचा सेवक हातात तोच निरोप असलेले एक खुले पत्रे घेऊन आला. \v 6 त्या पत्रात असा मजकूर होता: \pm “देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस, \v 7 आणि अशी घोषणा करण्यासाठी तू यरुशलेममध्ये संदेष्ट्याची नेमणूक केली आहेस की: ‘यहूदीयामध्ये आता एक राजा आहे!’ ही बातमी राजाकडे जाणार आहे; म्हणून इकडे येऊन या गोष्टी आमच्याशी बोल.” \p \v 8 तेव्हा मी त्याला असे उत्तर पाठविले, “तू जे काही बोलत आहेस त्यातील काहीही घडणार नाही; या सर्व तुझ्या कल्पनेतील गोष्टी आहेत.” \p \v 9 “यामुळे त्यांच्या हातातील शक्ती गळून पडेल व ते त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत” असा विचार करून ते आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. \p पण मी प्रार्थना केली, “आता माझे बाहू बळकट करा.” \p \v 10 एक दिवस मी महेटाबेलाचा पुत्र दलायाहचा पुत्र शमायाह याच्या घरी गेलो, जो त्याच्या घराबाहेर पडत नसे. तो म्हणाला, “आपण परमेश्वराच्या भवनात भेटू या, मंदिराची दारे व कड्या लावून घेऊ, कारण तुला ठार मारण्यास माणसे येत आहेत—आज रात्री ते तुला ठार करण्यासाठी येतील.” \p \v 11 पण मी म्हणालो, “माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? अथवा माझ्यासारख्याने स्वतःचा प्राण वाचविण्याकरिता मंदिरात लपून बसावे? मी मुळीच जाणार नाही!” \v 12 नंतर मला समजले की परमेश्वराने त्याला पाठविले नव्हते, परंतु तोबीयाह व सनबल्लट यांनी माझ्याविरुद्ध भविष्यवाणी करण्यासाठी त्याला लाच दिली होती. \v 13 मी घाबरून माझ्याकडून असे पाप घडावे व त्यांना मजवर दोषारोप करावा, मग मी निंदेस पात्र व्हावे, अशा उद्देशानेच त्यांनी शमायाहला या कामासाठी घेतले होते. \b \p \v 14 हे माझ्या परमेश्वरा, तोबीयाह, सनबल्लट हे माझ्याशी कसे वागले हे विसरू नका. नोअद्याह संदेष्टी व इतर संदेष्टे ज्यांनी मला भीती घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही तुम्ही विसरू नका. \v 15 शेवटी बावन्न दिवसांच्या अवधीत, एलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी तट बांधून तयार झाला. \s1 पूर्ण झालेल्या तटबंदीच्या बांधकामास विरोध \p \v 16 आमच्या शत्रूंनी व आजूबाजूच्या देशांनी याबद्दल ऐकले, तेव्हा ते घाबरले आणि त्यांचा आत्मविश्वास ढासाळला, कारण हे कार्य आमच्या परमेश्वराच्या मदतीनेच झाले आहे, याची त्यांना जाणीव झाली. \p \v 17 तसेच, या दिवसात यहूदीयातील प्रतिष्ठित लोक तोबीयाहास बरीच पत्रे पाठवू लागले व तोबीयाकडून त्यांना उत्तर मिळत गेले. \v 18 यहूदीयातील पुष्कळ लोकांनी तोबीयाहाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली होती, कारण तोबीयाहचा सासरा, आरहाचा पुत्र शखन्याह होता आणि तोबीयाहचा पुत्र यहोहानान याने बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी विवाह केला होता. \v 19 याशिवाय, तोबीयाहने किती चांगली कामे केली आहेत, हे त्या सर्वांनी मला सांगितले व नंतर मी जे काही बोललो ते सर्व त्यांनी त्याला सांगितले आणि तोबीयाहने मला घाबरून सोडण्यासाठी पत्रे पाठवली. \c 7 \p \v 1 तट बांधल्यावर मी वेशींना दारे लावली. द्वारपाल, संगीतकार व लेवी यांची नेमणूकही केली; \v 2 मी यरुशलेमच्या शासनाची जबाबदारी माझा भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्याह यांना दिली. हनन्याह अत्यंत विश्वासू असून सर्व लोकांपेक्षा तो परमेश्वराचे भय अधिक बाळगत असे. \v 3 मी त्यांना म्हणालो, “यरुशलेमच्या वेशी सूर्य बराच उष्ण होईपर्यंत उघडण्यात येऊ नयेत. पहारेकरी कामावर असतानाच, सर्व वेशींना अडसर लावून त्या बंद करण्यात याव्या. तसेच यरुशलेममधील रहिवाशांनाच पहारेकरी म्हणून नेमावे. काहीजण त्यांच्या चौकीवर तर काहींनी त्यांच्या घराजवळच्या भागाचे रक्षण करावे.” \s1 बंदिवासातून परतणार्‍यांची यादी \p \v 4 शहर मोठे व विस्तृत होते, पण लोकसंख्या थोडी होती आणि जी घरे होती, त्यांची पुनर्बांधणी झाली नव्हती. \v 5 नंतर माझ्या परमेश्वराने शहराच्या सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना एकत्र करून वंशावळ्यांप्रमाणे त्यांची नोंदणी करावी असे विचार माझ्या मनात घातले. जे सर्वप्रथम परतले त्यांच्या वंशावळ्याची नावनिशी मला सापडली. तिच्यात असे लिहिले होते: \b \lh \v 6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने जे लोक धरून नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले त्यांच्या नावांची यादी ही आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले. \v 7 जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, अजर्‍याह, रामयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम व बाअनाह): \b \lh यांच्यासोबत परतलेल्या इस्राएली लोकांची नावे ही: \li1 \v 8 पारोशचे वंशज 2,172, \li1 \v 9 शफाट्याहचे 372, \li1 \v 10 आरहचे 652, \li1 \v 11 पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,818, \li1 \v 12 एलामचे 1,254, \li1 \v 13 जत्तूचे 845, \li1 \v 14 जक्काईचे 760, \li1 \v 15 बिन्नुईचे 648, \li1 \v 16 बेबाईचे 628, \li1 \v 17 अजगादचे 2,322, \li1 \v 18 अदोनिकामचे 667, \li1 \v 19 बिग्वईचे 2,067, \li1 \v 20 आदीनचे 655, \li1 \v 21 हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98, \li1 \v 22 हाशूमचे 328, \li1 \v 23 बेसाईचे 324, \li1 \v 24 हारीफचे 112, \li1 \v 25 गिबोनचे 95, \li1 \v 26 या ठिकाणातून पुरुष: \li1 बेथलेहेम व नटोफाहचे 188, \li1 \v 27 अनाथोथचे 128, \li1 \v 28 बेथ-अजमावेथचे 42, \li1 \v 29 किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743, \li1 \v 30 रामाह व गेबाचे 621, \li1 \v 31 मिकमाशचे 122, \li1 \v 32 बेथेल व आयचे 123, \li1 \v 33 दुसऱ्या नबोचे 52, \li1 \v 34 दुसऱ्या एलामचे 1,254, \li1 \v 35 हारीमचे 320, \li1 \v 36 यरीहोचे 345, \li1 \v 37 लोद, हादीद व ओनोचे 721, \li1 \v 38 सनाहाचे 3,930. \b \lh \v 39 याजक: \li1 यांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973, \li1 \v 40 इम्मेरचे 1,052, \li1 \v 41 पशहूरचे 1,247, \li1 \v 42 हारीमचे 1,017. \b \lh \v 43 लेवी: यांचे वंशज: \li1 येशूआचे (कदमीएलचे कुटुंबातील होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74. \b \lh \v 44 संगीतकार: \li1 आसाफचे वंशज 148. \b \lh \v 45 मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज: \li1 शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, \li1 अक्कूबचे, हतीताचे, \li1 शोबाईचे, एकूण 138. \b \lh \v 46 मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज: \li1 झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे, \li1 \v 47 केरोसचे, सीयाचे, पादोनचे, \li1 \v 48 लबानाहचे, हगाबाहचे, शलमाईचे, \li1 \v 49 हानानचे, गिद्देलचे, गहरचे, \li1 \v 50 रेआयाहचे, रसीनचे, नकोदाचे, \li1 \v 51 गज्जामचे, उज्जाचे, पासेआहचे, \li1 \v 52 बेसाईचे, मऊनीमचे, नफूसीमचे, \li1 \v 53 बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे, \li1 \v 54 बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे, \li1 \v 55 बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे, \li1 \v 56 नसीयाहचे व हतीफाचे. \lh \v 57 शलोमोनच्या सेवकांचे वंशज: पोकेरेथ-हस्सबाईम व आमोन. \li1 यांचे वंशज: \li1 सोताईचे, सोफेरेथचे, पेरीदाचे, \li1 \v 58 यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे, \li1 \v 59 शफाट्याहचे, हत्तीलचे, पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे, आमोनचे, \lf \v 60 मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392. \b \lh \v 61 याच वेळी पर्शियाचा तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत: \li1 \v 62 ते यांचे वंशज होते: \li2 दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 642. \b \lh \v 63 आणि याजक पितृकुळातील: \li1 यांचे वंशज: \li2 हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते). \lf \v 64 यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले. \v 65 यास्तव राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणातील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही. \b \lf \v 66 सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते. \v 67 याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी आणि 245 गायक व गायिका होत्या. \v 68 त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 गाढव, \v 69 435 उंट आणि 6,720 गाढवे आणली होती. \b \pm \v 70 त्यांच्यातील काही पुढार्‍यांनी कामासाठी देणग्या दिल्या. राज्यपालाने 1,000 दारिक\f + \fr 7:70 \fr*\ft अंदाजे 8.4 कि.ग्रॅ.\ft*\f* सोने, धार्मिक विधींसाठी लागणारे 50 कटोरे, आणि याजकांसाठी पोशाखांचे 530 संच दिले. \v 71 काही कुलप्रमुखांनी कामासाठी भांडारात 20,000 दारिक\f + \fr 7:71 \fr*\ft अंदाजे 170 कि.ग्रॅ.\ft*\f* सोने, 2,200 मीना\f + \fr 7:71 \fr*\ft अंदाजे 1.2 मेट्रिक टन\ft*\f* चांदी दिली. \v 72 बाकीच्या लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 मीना\f + \fr 7:72 \fr*\ft अंदाजे 1.1 मेट्रिक टन\ft*\f* चांदी आणि याजकांसाठी 67 झगे दिले. \pm \v 73 इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएली लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले. \s1 एज्रा नियम वाचतो \p सातव्या महिन्यापर्यंत ते यरुशलेमला आपआपल्या नगरात स्थायिक झाले. \c 8 \nb \v 1 आता सर्व लोक जल वेशीसमोरील चौकात एकत्र जमले. आणि त्यांनी नियम शिकविणारा शिक्षक एज्राला विनंती केली की याहवेहने इस्राएली लोकांना दिलेले मोशेचे नियमशास्त्र त्याने बाहेर आणून सर्वांना वाचून दाखवावे. \p \v 2 तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एज्रा याजक मोशेचे नियमशास्त्र घेऊन बाहेर आला. ते कळण्यास समर्थ असलेले सर्व स्त्री-पुरुष सभेत एकत्र जमा झाले. \v 3 सकाळपासून दुपारपर्यंत त्याने जल वेशीसमोरील चौकाच्या दिशेने आपले मुख करून समजण्यास समर्थ असे जितके लोक होते त्यासर्वांच्या समक्षतेत वाचन केले. सर्व लोकांनी नियमशास्त्र लक्षपूर्वक ऐकले. \p \v 4 त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्‍याह व मशुल्लाम हे उभे होते. \p \v 5 एज्राने पुस्तक उघडले. प्रत्येकजण त्याला पाहू शकत होता, कारण तो इतरांपेक्षा जास्त उंचीवर उभा होता; तो उघडीत असताना सर्वजण उभे राहिले \v 6 नंतर एज्राने महान परमेश्वर याहवेहची स्तुती केली आणि सर्व लोक आपले हात उंचाऊन उत्तरले “आमेन! आमेन!” आपली मस्तके लववून, भूमीकडे मुखे करून त्यांनी याहवेहची आराधना केली. \p \v 7 लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली. \v 8 ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्‍या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्‍याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते. \p \v 9 मग राज्यपाल नहेम्याह, एज्रा याजक व शास्त्राचा शिक्षक व लोकांना शिकविणारे लेवी सर्व लोकांना म्हणाले, “याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने आजचा दिवस पवित्र आहे. तुम्ही विलाप करू नये वा रडू नये.” कारण लोक नियमशास्त्रातील वचने ऐकत असताना सर्वजण रडत होते. \p \v 10 नहेम्याह म्हणाला, “जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे.” \p \v 11 लेव्यांनी लोकांना शांत केले. ते म्हणाले, “तुम्ही शांत राहा, कारण हा पवित्र दिवस आहे. दुःख करू नका.” \p \v 12 म्हणून लोक मिष्टान्ने करून खाण्या-पिण्यासाठी आणि ताटे वाढून पाठविण्यासाठी गेले. तो दिवस मोठ्या आनंदाने उत्सव करण्याचा होता, कारण त्यांना देण्यात आलेले वचन आता त्यांना समजले होते. \p \v 13 महिन्याच्या दुसर्‍या दिवशी सर्व कुलप्रमुख, याजक आणि लेवी नियमशास्त्राचे अधिक काळजीपूर्वकरित्या वाचन ऐकण्यासाठी एज्रा शिक्षकाकडे एकत्र आले. \v 14 नियम ऐकत असताना, त्यांच्या निदर्शनास आले ते हे, याहवेहने मोशेला सांगितले होते की सातव्या महिन्यात येणार्‍या मंडपांच्या सणाच्या काळात इस्राएली लोकांनी तात्पुरत्या मांडवात राहावे. \v 15 देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.” \p \v 16 तेव्हा लोक बाहेर पडले आणि डाहळ्या तोडून आपल्या घरांच्या धाब्यांवर, आपल्या अंगणात, परमेश्वराच्या भवनाच्या अंगणात, जल वेशीच्या जवळील चौकात आणि एफ्राईम वेशींच्या चौकात त्यांनी तात्पुरते मांडव घातले. \v 17 या मांडवामध्ये बंदिवासातून परत आलेले सर्वजण सणाचे सात दिवस राहिले. नूनाचा पुत्र येशूआ\f + \fr 8:17 \fr*\ft म्हणजे \ft*\fq येशूआ\fq*\f* याच्या काळापासून हा सण इस्राएली लोकांनी अशा प्रकारे साजरा केलेला नव्हता. प्रत्येकाचा आनंद खूप मोठा होता. \p \v 18 सणाच्या या दिवसांच्या काळात, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा परमेश्वराच्या नियमशास्त्राचे वाचन करीत असे. सात दिवस सण साजरा केल्यानंतर आठव्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरून महासभा घेण्यात आली. \c 9 \s1 इस्राएली लोक पापांगिकार करतात \p \v 1 याच महिन्याच्या चोवीस तारखेला, इस्राएली एकत्र आले. यावेळी त्यांनी उपास केला व गोणपाट पांघरूण त्यांनी आपल्या डोक्यावर धूळ घातली \v 2 ज्या इस्राएली वंशजांनी स्वतःला सर्व गैरयहूद्यांपासून वेगळे ठेवले, ते आपआपल्या जागेवर उभे राहिले व त्यांनी स्वतःची आणि आपल्या पूर्वजांची पापे कबूल केली. \v 3 ते उभे असताना याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ त्यांना तीन तास मोठ्याने वाचून दाखविण्यात आला. त्यानंतरचे तीन तास पापांगिकार केला व याहवेह आपल्या परमेश्वराची भक्ती केली. \v 4 लेव्यांसाठी नेमलेल्या पायऱ्यावर उभे राहून येशूआ, बानी, कदमीएल, शबन्याह, बुन्नी, शेरेब्याह, बानी व कनानी या लेव्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वरासमोर आपला आवाज उंचाविला. \v 5 मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” \pm “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो. \v 6 केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात. \pm \v 7 “याहवेह तुम्हीच परमेश्वर आहात, ज्यांनी अब्रामाला निवडले आणि त्याला खाल्डियनांच्या ऊर शहरातून बाहेर काढून अब्राहाम असे नाव दिले. \v 8 त्याचे अंतःकरण तुमच्याशी विश्वासू आहे हे तुम्ही बघितले, म्हणून त्याच्या वंशजांना कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशीचा देश देण्याचा तुम्ही त्याच्याशी करार केला. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे केले, कारण तुम्ही विश्वासयोग्य आहात. \pm \v 9 “इजिप्तमध्ये आमच्या पूर्वजांच्या हालअपेष्टा तुम्ही पाहिल्या; तांबड्या समुद्राच्या जवळ त्यांनी केलेला तुमचा धावा तुम्ही ऐकला. \v 10 फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे. \v 11 तुम्ही त्यांच्यासमोर समुद्र दुभागला, म्हणजे त्यांनी कोरड्या जमिनीवरून चालत जावे. परंतु त्यांचा पाठलाग करणार्‍यांना असे खोलात फेकले, जणू प्रचंड जलाशयात एखादा दगड फेकला जावा. \v 12 आमच्या पूर्वजांचे दिवसा मेघस्तंभाद्वारे व रात्री त्यांना आपल्या मार्गाने जाता यावे म्हणून अग्निस्तंभाद्वारे मार्गदर्शन केले. \pm \v 13 “तुम्ही सीनाय पर्वतावर खाली उतरले; त्यांच्याशी स्वर्गातून बोलले; त्यांना न्याय्य व योग्य विधी व कायदे दिले आणि उत्तम नियम व आज्ञा दिल्या. \v 14 तुम्ही त्यांना तुमच्या पवित्र शब्बाथाची ओळख करून दिली व तुमचा सेवक मोशेद्वारे त्यांना आज्ञा, नियम व कायदे प्रदान केले. \v 15 ते भुकेले असताना त्यांना स्वर्गातून भाकर दिली आणि तहानलेले असताना खडकातून पाणी दिले; तुम्ही त्यांना आज्ञा दिली की, त्यांनी जावे व जी तुम्ही बाहू उभारून वचनदत्त केली होती, त्या भूमीचा ताबा घ्यावा. \pm \v 16 “पण ते, आमचे पूर्वज गर्विष्ठ व दुराग्रही बनले व त्यांनी तुमच्या आज्ञा पाळल्या नाही. \v 17 त्यांनी तुमचे ऐकण्याचे नाकारले आणि तुम्ही त्यांच्यामध्ये केलेल्या चमत्कारांची आठवण ठेवली नाही. उलट त्यांनी बंडखोरी केली आणि परत गुलामगिरीत आपल्याला न्यावे म्हणून एक पुढारी नेमला. पण तुम्ही क्षमाशील परमेश्वर आहात, दयाळू आणि कृपाळू, मंदक्रोध व प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहात. तुम्ही त्यांचा त्याग केला नाही, \v 18 जरी त्यांनी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आणि जाहीर केले, ‘हे आमचे परमेश्वर आहेत; यांनीच आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले,’ अथवा जेव्हा त्यांनी भयानक रीतीने ईशनिंदा केली तरीही. \pm \v 19 “तुमच्या महान करुणेमुळे रानातच त्यांचा त्याग केला नाही. मेघस्तंभाने दिवसा त्यांना मार्गदर्शन केले आणि अग्निस्तंभाने रात्री प्रकाश देऊन त्यांना वाट दाखविणे थांबविले नाही. \v 20 आपला चांगला आत्मा पाठवून त्यांना बोध केला. त्यांच्या मुखासाठी स्वर्गातून तुमचा मान्ना पुरविण्याचे आणि तहान भागविण्यासाठी पाणी देण्याचे तुम्ही थांबविले नाही. \v 21 चाळीस वर्षापर्यंत रानात तुम्ही त्यांचे पालनपोषण केले; त्यांना कशाचीही उणीव पडू दिली नाही, त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत की त्यांचे पाय सुजले नाहीत. \pm \v 22 “नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले. \v 23 तुम्ही त्यांचे वंशज ताऱ्यागत बहुगुणित केले आणि त्यांच्या पूर्वजांना जा व काबीज करा असे वचन दिलेल्या देशात तुम्ही त्यांना आणले. \v 24 त्यांची लेकरे आत गेली व त्यांनी तो प्रदेश ताब्यात घेतला. तुम्ही त्यांच्यापुढे, तिथे राहणारे कनानी लोक नमविले. हे कनानी लोक व त्यांचे राजेसुद्धा त्यांच्या हातात, त्यांना वाटेल तसे वागविण्यासाठी सुपूर्द केले. \v 25 त्यांनी तटबंदीची शहरे आणि सुपीक जमिनी काबीज केल्या; सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेल्या विहिरी, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे हस्तगत केली. मग ते खाऊन तृप्त व उत्तमरित्या पोषित झाले; आणि तुमच्या महान चांगुलपणाचा त्यांनी आनंद साजरा केला. \pm \v 26 “पण त्यांनी आज्ञाभंग केला आणि तुमच्याविरुद्ध बंड केले; त्यांनी तुमच्या नियमांकडे पाठ फिरविली. लोकांनी तुमच्याकडे परत यावे असे त्यांना सांगणार्‍या संदेष्ट्यांना ठार मारले आणि इतर अनेक तऱ्हेने महाभयंकर ईशनिंदा केली. \v 27 म्हणून तुम्ही त्यांना शत्रूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांचा छळ केला. पण जेव्हा त्यांचा छळ होऊ लागला, त्यावेळी त्यांनी तुमचा धावा केला. तो तुम्ही स्वर्गातून ऐकला. त्यांच्यावर महान कृपा करून, शत्रूपासून मुक्त करणारे रक्षक त्यांच्याकडे पाठविले. \pm \v 28 “पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत! \pm \v 29 “त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले. \v 30 अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले. \v 31 पण तुमच्या महान दयेमुळे तुम्ही त्यांचा सर्वनाश केला नाही व त्यांचा त्याग केला नाही, कारण तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात. \pm \v 32 “म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्‍यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली. \v 33 जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो. \v 34 आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही. \v 35 ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही. \pm \v 36 “पण पाहा, आज आम्ही गुलामगिरीत आहोत, आम्ही ज्या भूमीतील उत्तम फळे व इतर गोष्टींचा उपभोग घ्यावा त्या आमच्या पूर्वजांना तुम्ही दिलेल्या या समृद्ध देशात गुलाम आहोत. \v 37 आमच्या पापांमुळे, या देशाचे विपुल उत्पन्न, आमच्यावर राज्य करणाऱ्या राजांकडे जात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते आमच्या शरीरावर व आमच्या पशूंवर सत्ता करतात. खरोखर आम्ही घोर दैन्यावस्थेत आहोत. \s1 लोकांची संमती \p \v 38 “हे सर्व बघता, आम्ही असे बंधनकारक, लिखित वचन देतो आणि आमचे अधिपती, आमचे लेवी व आमचे याजक या करारांवर त्यांची मोहर लावतो.” \b \c 10 \p \v 1 या करारावर सही करणाऱ्यांची नावे: \b \li1 राज्यपाल: \li2 हखल्याहचा पुत्र नहेम्याह. \b \li2 सिद्कीयाह, \v 2 सेरायाह, अजर्‍याह, यिर्मयाह, \li2 \v 3 पशहूर, अमर्‍याह, मल्कीयाह, \li2 \v 4 हट्टूश, शबन्याह, मल्लूख, \li2 \v 5 हारीम, मरेमोथ, ओबद्याह, \li2 \v 6 दानीएल, गिन्नथोन, नेरीयाहचा पुत्र बारूख, \li2 \v 7 मशुल्लाम, अबीया, मियामीन, \li2 \v 8 माझियाह, बिल्गई व शमायाह. \li1 वर नोंदवलेले सर्वजण याजक होते. \b \li1 \v 9 लेवी: \li2 अजन्याचा पुत्र येशूआ, हेनादादाचा पुत्र बिन्नुई, कदमीएल, \li2 \v 10 आणि त्याचे सहकारीः शबन्याह, \li2 होदीयाह, कलीता, पेलतियाह, हानान, \li2 \v 11 मीखा, रहोब, हशब्याह, \li2 \v 12 जक्कूर, शेरेब्याह, शबन्याह, \li2 \v 13 होदीयाह, बानी व बनीनू. \b \li1 \v 14 लोकांचे पुढारी: \li2 पारोश, पहथ-मोआब, एलाम, जत्तू, बानी, \li2 \v 15 बुन्नी, अजगाद, बेबाई, \li2 \v 16 अदोनियाह, बिग्वई, आदीन, \li2 \v 17 आतेर, हिज्कीयाह, अज्जूर, \li2 \v 18 होदीयाह, हाशूम, बेसाई, \li2 \v 19 हारीफ, अनाथोथ, नोबाई, \li2 \v 20 मग्पीयाश, मशुल्लाम, हेजीर, \li2 \v 21 मशेजबेल, सादोक, यद्दूआ, \li2 \v 22 पेलतियाह, हानान, अनायाह, \li2 \v 23 होशेय, हनन्याह, हश्शूब, \li2 \v 24 हल्लोहेश, पिल्हा, शोबेक, \li2 \v 25 रहूम, हशबनाह, मासेयाह, \li2 \v 26 अहीयाह, हानान, अनान, \li2 \v 27 मल्लूख, हारीम व बाअनाह. \b \pm \v 28 “बाकी सर्व—याजक, लेवी, द्वारपाल, संगीतकार, मंदिराचे सेवक आणि बाकीचे इतर सर्व, ज्यांनी आपल्या पत्नी व सज्ञान पुत्र व कन्या यांच्यासह, परमेश्वराच्या नियमासाठी स्वतःला सभोवतीच्या लोकांपासून वेगळे केले होते— \v 29 त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला. \pm \v 30 “आम्ही असेही वचन देतो की आम्ही आमच्या कन्यांना यहूदीतर पुरुषांशी व पुत्रांना यहूदीतर कन्यांशी विवाह करू देणार नाही. \pm \v 31 “शेजारील देशात असणार्‍या लोकांनी विक्रीसाठी धान्य किंवा इतर उत्पन्न आणले, तर शब्बाथ दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आम्ही ते विकत घेणार नाही. दर सातव्या वर्षी शेतात कोणतेही पीक न घेण्याचे आम्ही मान्य केले आणि सर्व कर्ज प्रत्येक सातव्या वर्षी माफ करू. \pm \v 32 “प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग\f + \fr 10:32 \fr*\ft अंदाजे 4 ग्रॅ.\ft*\f* चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची; \v 33 समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे;\f + \fr 10:33 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्धीकरणाचे अर्पण\fqa*\f* आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली. \pm \v 34 “आम्ही—याजक, लेवी आणि लोकांनी—लाकडांचा पुरवठा निर्धारित करण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या की आमच्या प्रत्येक कुटुंबांनी आमच्या परमेश्वराच्या भवनात आणावे जेणेकरून याहवेह आमच्या परमेश्वराच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे लाकूड आणायचे आहे. \pm \v 35 “प्रत्येक पिकाचा व प्रत्येक फळझाडाचा पहिला उपज दरवर्षी याहवेहच्या भवनामध्ये द्यावा अशी जबाबदारीही आम्ही स्वीकारली. \pm \v 36 “नियमांत लिहिल्यानुसार, प्रथम जन्मलेला पुत्र व आमच्या गोठ्यातील व कळपातील जनावरांचे प्रथमवत्स, परमेश्वराच्या भवनामध्ये सेवा करणाऱ्या याजकांकडे आम्ही ते सादर करू. \pm \v 37 “याशिवाय आमच्या परमेश्वराच्या भवनातील कोठारासाठी याजकाकडे प्रथम दळलेले पीठ, आमचे धान्यार्पण व फलार्पण, नवा द्राक्षारस आणि जैतुनाच्या तेलाचा पहिला हिस्सा आणू. आम्ही आमच्या प्रत्येक उत्पन्नाचा एक दशांश लेव्यांना देण्याचे वचन दिले, कारण आम्ही जिथे काम करतो त्या सर्व नगरातून दशांश जमा करण्याची जबाबदारी लेव्यांची होती. \v 38 लेवी दशांश गोळा करीत असताना, त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातील एक याजक असावा व लेव्यांनी दशांशाचा दशांश परमेश्वराच्या भवनामध्ये समर्पित करून मंदिराच्या कोठारात जमा करावा. \v 39 इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत. \pm “अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.” \c 11 \s1 यरुशलेमचे नवे रहिवासी \p \v 1 आता लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये स्थायिक झाले. बाकीच्या लोकातील दहापैकी एकाने यरुशलेम, पवित्र नगरीत येऊन राहावे म्हणून चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली, व उरलेल्या नऊ लोकांनी स्वतःच्या नगरात राहावे. \v 2 यावेळी यरुशलेमला जे स्वखुशीने गेले त्यांचा लोकांनी बहुमान केला. \b \lh \v 3 यरुशलेमला येणार्‍या प्रांताधिकार्‍यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे (आता काही इस्राएली, याजक, लेवी, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज यहूदीयाच्या नगरात स्वतःच्या वतनांतच राहिले, प्रत्येकजण निरनिराळ्या नगरातील स्वतःच्या मालकीच्या भूमीवर स्थायी झाला. \v 4 पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): \b \li1 यहूदीयाच्या गोत्रातील: \li2 अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो अमर्‍याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता; \li2 \v 5 मासेयाह, हा बारूखाचा पुत्र, तो कोल-होजेचा पुत्र, तो हजायाहचा पुत्र, तो अदायाहचा पुत्र, तो योयारीबचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र व तो शिलोनी वंशज होता. \li2 \v 6 पेरेसाचे जे वंशज यरुशलेममध्ये राहत होते ते सर्व 468 वीरपुरुष होते. \li1 \v 7 बिन्यामीनच्या गोत्रातील: \li2 सल्लू, हा मशुल्लामाचा पुत्र, तो योएदाचा पुत्र, तो पदायाहचा पुत्र, तो कोलायाहचा पुत्र, तो मासेयाहचा पुत्र, तो इथिएलाचा पुत्र, तो यशायाहचा पुत्र होता. \v 8 आणि त्याला अनुसरणारे, गब्बई व सल्लाइ 928 पुरुष. \li2 \v 9 जिक्रीचा पुत्र योएल व हस्सनूआहाचा पुत्र यहूदाह हे शहराच्या नव्या भागावर त्यांचे प्रमुख होते. \li1 \v 10 याजकांपैकी: \li2 यदायाह, हा योयारीबाचा पुत्र होता; याखीन; \li2 \v 11 सेरायाह, हा हिल्कियाहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो सादोकाचा पुत्र, तो मरायोथाचा पुत्र, जो अहीतूबाचा पुत्र होता. अहीतूब हा परमेश्वराच्या भवनाचा अधिकृत अधिकारी होता. \v 12 आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत. \li2 अदायाह, हा यरोहामाचा पुत्र, तो पलल्याहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो अमसीचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र, \v 13 आणि त्याचे सहकारी, जे कुटुंबप्रमुख होते ते 242 पुरुष; \li2 अमश्सइ, अजरएलाचा पुत्र, तो अहजईचा पुत्र, तो मेशिल्लेमोथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र होता. \v 14 आणि त्याचे सहकारी, जे वीरपुरुष होते 128. \li2 जब्दीएल, हगदोलीमाचा पुत्र हा मुख्य प्रधान होता. \li1 \v 15 लेवी गोत्रातील: \li2 शमायाह, हा हश्शूबचा पुत्र, तो अज्रीकामचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, जो बुन्नीचा पुत्र होता; \li2 \v 16 शब्बथई व योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख परमेश्वराच्या भवनाचा बाहेरील कामाचे अधिकारी होते; \li2 \v 17 मत्तन्याह, हा मीखाहचा पुत्र, तो जब्दीचा पुत्र, जो आसाफाचा पुत्र, तो उपकारस्तुतीत व प्रार्थनेत नेतृत्व करणारा प्रमुख होता; \li2 बकबुकियाह, त्याच्या सहकाऱ्यातील दुसरा; \li2 आणि अब्दा, हा शम्मुवाचा पुत्र, तो गालालचा पुत्र, जो यदूथूनाचा पुत्र होता. \li2 \v 18 पवित्र शहरामधील सर्व लेवी एकूण 284. \li1 \v 19 द्वारपाल: \li2 अक्कूब, तल्मोन व त्यांचे सहकारी, जे वेशींवर निगराणी ठेवीत ते 172 पुरुष. \b \p \v 20 राहिलेले इस्राएली, याजक व लेवीसह यहूदीयाच्या सर्व नगरात, आपआपल्या घराण्यांची वतने जिथे होती, तिथे राहत असत. \p \v 21 तरी मंदिराची सेवा करणारे, ज्यांचे पुढारी झीहा व गिश्पा होते, ते सर्वजण ओफेल येथे राहत. \p \v 22 यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्‍यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते. \v 23 राजाने संगीतकार म्हणून त्यांची नेमणूक केली होती व त्यांचे दररोजचे कार्य निर्धारित केले होते. \p \v 24 पथह्याह, तो मशेजबेलचा पुत्र, तो जेरहाचा वंशज, जो यहूदाहचा पुत्र होता, हा लोकसेवेच्या कामी राजाचा प्रतिनिधी होता. \p \v 25 यहूदीयाचे लोक राहत असलेली काही गावे व शेती होती, काही लोक किर्याथ-अर्बा व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, दिबोन व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, यकब्सेल आणि त्यांच्या आसपासची गावे: \v 26 येशूआ, मोलादाह, बेथ-पेलेट, \v 27 हसर-शुआल, बेअर-शेबा, आणि त्यांची आसपासची गावे, \v 28 सिकलाग, मकोनाह व त्यांची आसपासची गावे. \v 29 एन-रिम्मोन, सोराह, यर्मूथ, \v 30 जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्‍यापर्यंत वस्ती केली. \p \v 31 बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे, \v 32 अनाथोथ, नोब, अनन्याह, \v 33 हासोर, रामाह, गित्ताइम, \v 34 हादीद, सबोईम, नेबल्लाट, \v 35 लोद व ओनो व गे-हाराशीम. \p \v 36 यहूदीयामध्ये राहणारे काही लेवी बिन्यामीन गोत्राच्या लोकांबरोबर राहण्यासाठी गेले. \c 12 \s1 याजक व लेवी यांची यादी \lh \v 1 शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व येशूआसह आलेल्या याजकांची व लेव्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे: \b \li1 सेरायाह, यिर्मयाह, एज्रा, \li1 \v 2 अमर्‍याह, मल्लूख, हट्टूश, \li1 \v 3 शखन्याह, रहूम, मरेमोथ, \li1 \v 4 इद्दो, गिन्नथोई, अबीया, \li1 \v 5 मियामीन, मादियाह, बिल्गाह, \li1 \v 6 शमायाह, योयारीब, यदायाह, \li1 \v 7 सल्लू, आमोक, हिल्कियाह व यदायाह. \b \lf हे येशूआच्या काळी असलेले याजक व त्यांचे सहकारी. \b \p \v 8 लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते. \v 9 बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत. \b \li1 \v 10 येशूआ योयाकिमाचा पिता होता; \li1 योयाकीम एल्याशीबाचा पिता होता; \li1 एल्याशीब यहोयादाचा पिता होता; \li1 \v 11 यहोयादा योनाथानाचा पिता होता; \li1 योनाथान यद्दूआचा पिता होता. \b \b \lh \v 12 मुख्य याजक योयाकीमच्या कार्यकालात, हे याजकांचे कुलप्रमुख होते. \b \li1 मरायाह, सेरायाह कुळाचा प्रमुख; \li1 हनन्याह, यिर्मयाह कुळाचा प्रमुख; \li1 \v 13 मशुल्लाम, एज्रा कुळाचा प्रमुख; \li1 यहोहानान, अमर्‍याह कुळाचा प्रमुख; \li1 \v 14 योनाथान, मल्लूखी कुळाचा प्रमुख; \li1 योसेफ, शबन्याह कुळाचा प्रमुख; \li1 \v 15 अदना, हारीम कुळाचा प्रमुख; \li1 हेलकइ, मरायोथ कुळाचा प्रमुख; \li1 \v 16 जखर्‍याह, इद्दो कुळाचा प्रमुख; \li1 मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख; \li1 \v 17 जिक्री, अबीया कुळाचा प्रमुख; \li1 पिल्तय, मोवद्याह व मिन्यामीन कुळाचा प्रमुख; \li1 \v 18 शम्मुवा, बिल्गाह कुळाचा प्रमुख; \li1 योनाथान, शमायाह कुळाचा प्रमुख; \li1 \v 19 मत्तनई, योयारीब कुळाचा प्रमुख; \li1 उज्जी, यदायाह कुळाचा प्रमुख; \li1 \v 20 कल्लय, सल्लू कुळाचा प्रमुख; \li1 एबर, आमोक कुळाचा प्रमुख; \li1 \v 21 हशब्याह, हिल्कियाह कुळाचा प्रमुख; \li1 नथानेल, यदायाह कुळाचा प्रमुख. \b \p \v 22 एल्याशीबाच्या कार्यकालात सर्व लेवीचे कुलप्रमुख यहोयादा, योहानान व यद्दूआ होते, पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीत याजक व लेवीच्या वंशावळी तयार करण्यात आल्या होत्या. \v 23 इतिहासाच्या पुस्तकामध्ये एल्याशीबाचा पुत्र योहानानच्या काळापर्यंत लेवींच्या वंशजांची नावे नमूद केली होती. \v 24 त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत. \p \v 25 मत्तन्याह, बकबुकियाह, ओबद्याह, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाल दरवाजांजवळ असलेल्या कोठारांचे संरक्षण करीत होते. \v 26 योसादाकाचा पुत्र येशूआचा पुत्र योयाकीमच्या कार्यकालात म्हणजे जेव्हा नहेम्याह राज्यपाल होता व एज्रा याजक व नियमाचा शिक्षक होता, तेव्हा हे कामावर होते. \s1 यरुशलेमच्या तटाचे समर्पण \p \v 27 यरुशलेमच्या नवीन तटाच्या समर्पणविधीमध्ये भाग घेण्यासाठी देशातील सर्वच लेवी जिथे कुठे असतील तिथून शोधून यरुशलेम येथे पाचारण करण्यात आले, जेणेकरून या विधीमध्ये त्यांनी भाग घेऊन साह्य करावे, झांजा, सारंग्या, वीणा यांच्या संगीतासह गीते गाऊन उपकारस्तुती करावी आणि हा आनंदोत्सवाचा सोहळा साजरा करावा. \v 28 संगीतकारांनाही यरुशलेम सभोवतालच्या प्रदेशातून व नटोफाथी प्रांतातून आणले. \v 29 बेथ-गिलगाल, गेबाच्या प्रांतातून व अजमावेथ येथूनही हे संगीतकार आले, कारण त्यांनी यरुशलेमच्या सभोवती आपली उपनगरे बांधली होती. \v 30 प्रथम याजक व लेवींनी स्वतःला शुद्ध करून घेतले. नंतर त्यांनी लोकांना, तटाला आणि वेशींना शुद्ध केले. \p \v 31 मी यहूदाह पुढार्‍यांना तटावर नेले. धन्यवाद देण्याकरिता त्यांचे दोन मोठे गायकवृंद तयार केले. स्तुतिस्तोत्रे गात त्या रांगा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चालल्या. एक गायकवृंद तटाच्या वर उजवीकडे म्हणजे उकिरडा वेशीकडे चालली. \v 32 होशयाह व यहूदाहच्या पुढार्‍यांपैकी अर्धे त्यांच्या मागोमाग चालले. \v 33 अजर्‍याह सोबत, एज्रा, मशुल्लाम, \v 34 यहूदाह, बिन्यामीन, शमायाह व यिर्मयाह यांचा त्यात समावेश होता. \v 35 तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्‍याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता, \v 36 त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता. \v 37 ते झरावेशीजवळ आले, तेव्हा ते सरळ पुढे गेले व दावीदाच्या नगराच्या पायर्‍यांवरून तटाच्या चढणीवर असलेल्या दावीदाच्या महालाच्या वरच्या भागाकडून पूर्वेकडे पाणीवेशीपर्यंत गेले. \p \v 38 स्तुतिगान करणारे दुसरे गायकवृंद विरुद्ध दिशेने पुढे निघाले. मी वरच्या बाजूने त्यांच्यात सामील होण्यास दुसऱ्या अर्ध्या लोकांबरोबर निघालो—आम्ही भट्टीबुरुजापासून रुंद तटापर्यंत चालत गेलो. \v 39 नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो. \p \v 40 नंतर धन्यवाद देणारे दोन्ही गायकवृंद परमेश्वराच्या भवनात जाऊन त्यांनी आणि अर्ध्या अधिकाऱ्यांसह मी देखील आपले नेमलेले स्थान ग्रहण केले. \v 41 तसेच कर्णे वाजविणारे याजक—एल्याकीम, मासेयाह, मिन्यामीन, मिखायाह, एलिओएनाइ, जखर्‍याह, आणि हनन्याह. \v 42 व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले. \v 43 या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले. \p \v 44 त्यावेळी प्रथम हंगामाची अर्पणे व दशांश या अर्पणांच्या भांडारावर पुरुष अधिकारी नेमण्यात आले. ही सर्व अर्पणे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सभोवतीच्या नगरींच्या शेतांप्रमाणे अर्पणे याजक व लेवींना नेमून देण्यात आली, त्यांनी ती गोळा करून भांडारात जमा करावयाची होती. कारण यहूदीयाच्या लोकांना लेवी व याजक आणि त्यांचे सेवाकार्य यांचे कौतुक वाटत होते. \v 45 दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे परमेश्वराच्या उपासनेत आणि शुद्धीकरणविधीमध्ये गायक व द्वारपाल हे सहकार्य करीत होते. \v 46 दावीदाच्या व आसाफाच्या काळापासून संगीतकारांसाठी संचालक नेमण्याची व परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे व उपकारस्तुती गाण्यास सुरुवात झाली होती. \v 47 म्हणून सर्व इस्राएली जरूब्बाबेल आणि नहेम्याहच्या काळात द्वारपाल, लेवी व संगीतकारांसाठी दररोज अन्नाचा वाटा आणत असत. ते आपल्याला मिळालेल्या हिश्शातील काही भाग इतर लेव्यांसाठी ठेवीत आणि लेवी आपल्यातील वाटा अहरोनाच्या वंशजांसाठी समर्पित करीत असत. \c 13 \s1 नहेम्याहच्या अंतिम सुधारणा \p \v 1 त्याच दिवशी, मोशेचे नियमशास्त्र मोठ्याने वाचण्यात येत असताना, लोकांना एक विधान ऐकावयास मिळाले. त्यात असे लिहिले होते की अम्मोनी व मोआबींना परमेश्वराच्या सभामध्ये प्रवेश करण्याची कधीही परवानगी देण्यात येऊ नये, \v 2 कारण त्यांनी इस्राएली लोकांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला नाही. उलट त्यांनी त्यांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देऊन बोलाविले. (पण परमेश्वराने त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले ही गोष्ट वेगळी.) \v 3 जेव्हा लोकांनी नियमशास्त्रातील हे वचन ऐकले, तेव्हा त्यांनी सर्व विदेशी वंशजांच्या लोकांना इस्राएलमधून वगळले. \p \v 4 ही घटना घडण्यापूर्वी, एल्याशीब याजकाला परमेश्वराच्या भवनातील कोठड्यांचा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तो तोबीयाहाचा एक स्नेही होता. \v 5 त्याने तोबीयाहाला एका कोठडी दिली. ही कोठडी पूर्वी धान्यार्पण, ऊद, मंदिराचे सामान, तसेच धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांच्या दशांशांचे साठे ठेवण्यासाठी वापरली जात असे. ही सर्व अर्पणे लेव्यांसाठी, संगीतकारांच्या सभासदांसाठी आणि द्वारपालांसाठी, त्याचबरोबर याजकांसाठी वर्गणी म्हणून असत. \p \v 6 हे सर्वकाही होत असताना, मी यरुशलेमात नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे परतलो होतो. काही काळानंतर मी त्याला परवानगी मागितली, \v 7 आणि मी यरुशलेमला परत आलो. तेव्हा मला एल्याशीबाने तोबीयाहास परमेश्वराच्या मंदिरातील अंगणात एका कोठार देण्याचे गैरकृत्य केल्याचे कळले. \v 8 मी फारच नाराज झालो आणि तोबीयाहाच्या सर्व वस्तू मी कोठडीबाहेर फेकून दिल्या. \v 9 नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली. \p \v 10 मला असेही समजले की, लेव्यांना जो हिस्सा नेमून दिला होता, तो त्यांना देण्यात आला नव्हता आणि यामुळे ते सर्व लेवी व ज्यांची उपासना घेण्याची जबाबदारी होती, ते संगीतकार आपआपल्या शेतांवर परत निघून गेले होते. \v 11 मी पुढार्‍यांना भेटून त्यांचा समाचार घेऊन विचारले, “परमेश्वराच्या भवनाकडे असे दुर्लक्ष का करण्यात आले आहे?” नंतर मी सर्व लेव्यांना परत एकत्र बोलाविले व त्यांच्या पूर्वीच्याच जागी त्यांची नेमणूक केली. \p \v 12 आणि पुन्हा एकदा यहूदीयाचे सर्व लोक धान्य, नवा द्राक्षारस व तेलाचे दशांश मंदिराच्या कोठारांत आणू लागले. \v 13 मी शेलेम्याह याजक, सादोक शास्त्री आणि पदायाह नामक लेवींना कोठारांत अधिकारी म्हणून नेमले व त्यांचा मदतनीस म्हणून हानान, जो जक्कूराचा पुत्र व मत्तन्याहचा नातू होता, याची नेमणूक केली. कारण हे सर्वजण विश्वासयोग्य मानले जात होते. आपल्या लेवी बांधवांना अर्पणाचे वाटप प्रामाणिकपणे करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली. \b \p \v 14 हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि परमेश्वराच्या भवनासाठी मी जे सर्व अत्यंत विश्वासूपणाने केले आहे ते पुसून टाकू नका. \b \p \v 15 त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला. \v 16 सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत. \v 17 मी यहूदीयाच्या प्रतिष्ठितांना फटकारून विचारले, “तुम्ही हे काय दुराचरण करीत आहात—शब्बाथ भ्रष्ट करीत आहात? \v 18 तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.” \p \v 19 यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये. \v 20 सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली. \v 21 पण मी त्यांना ताकीद दिली आणि म्हणालो, “तुम्ही येथे तटाजवळ रात्र का घालविली? परत असे काही केले, तर मी तुम्हाला अटक करेन.” मग त्या दिवसानंतर परत ते शब्बाथ दिवशी आले नाही. \v 22 नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा. \b \p हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा. \b \p \v 23 याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता. \v 24 त्यांची अर्धी मुलेबाळे अश्दोदी अथवा इतर लोकांची भाषा बोलत होती, पण त्यांना यहूदीयाची भाषा बोलता येत नसे. \v 25 तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही. \v 26 शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले. \v 27 आता तुम्हीही तोच सर्व भयंकर दुष्टपणा करता व यहूदीतर स्त्रियांशी विवाह करून परमेश्वराशी विश्वासघात करीत आहात हे आम्ही ऐकावे काय?” \p \v 28 मुख्य याजक एल्याशीबचा पुत्र यहोयादाच्या पुत्रांपैकी एकजण सनबल्लट होरोनी याचा जावई होता, म्हणून मी त्याला माझ्यापासून दूर हाकलून दिले. \b \p \v 29 हे माझ्या परमेश्वरा, त्यांनी याजकपद व याजकांचे आणि लेव्यांचे करार भ्रष्ट केले आहेत, त्यांची तुम्ही आठवण ठेवा. \b \p \v 30 तेव्हा मी त्या याजक व लेव्यांना सर्व यहूदीतर गोष्टींपासून शुद्ध करून घेतले. याजकांची व लेव्यांची कामे आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या. \v 31 वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली. \b \p हे माझ्या परमेश्वरा, मजवर प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.