\id NAM - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h नहूम \toc1 नहूमाची भविष्यवाणी \toc2 नहूम \toc3 नहूम \mt1 नहूमाची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 निनवेहविषयी भविष्यवाणी. एल्कोशवासी नहूमच्या दृष्टान्ताचे पुस्तक. \b \s1 निनवेहविषयी याहवेहचा क्रोध \q1 \v 2 याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत; \q2 याहवेह सूड घेणारे आणि क्रोधाने भरलेले आहेत. \q1 त्यांच्या शत्रूंचा ते सूड घेतात \q2 आणि आपला कोप त्यांच्याविरुद्ध मोकळा करतात. \q1 \v 3 याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत; \q2 याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. \q1 त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात. \q2 ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत. \q1 \v 4 ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; \q2 ते सर्व नद्यांना कोरडे करतात. \q1 बाशान व कर्मेल मलूल होतात; \q2 लबानोनचा मोहोर कोमेजतो. \q1 \v 5 त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात \q2 व टेकड्या विरघळतात. \q1 पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण \q2 त्यांच्या समक्षतेत थरकापतात. \q1 \v 6 संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल? \q2 त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल? \q1 त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो; \q2 त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात. \b \q1 \v 7 याहवेह चांगले आहेत, \q2 संकटसमयी आश्रयस्थान आहेत. \q1 त्यांच्यावर भरवसा ठेवणार्‍या प्रत्येकाची ते काळजी घेतात. \q2 \v 8 परंतु भयंकर महापुराने \q1 ते निनवेहचा अंत करतील; \q2 त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात. \b \q1 \v 9 याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात\f + \fr 1:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुम्ही जे शत्रू ते याहवेहविरुद्ध काय कट रचता?\fqa*\f* \q2 त्याचा ते अंत करतील; \q2 ते संकट दुसऱ्यांदा येणार नाही. \q1 \v 10 याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील \q2 आणि स्वतःचेच मद्य पिऊन ते धुंद होतील; \q2 वाळलेल्या गवताप्रमाणे ते अग्नीमध्ये भस्म होतील. \q1 \v 11 हे निनवेह, तुमच्यापैकी कोण आहे \q2 जो याहवेहविरुद्ध कट रचेल \q2 आणि दुष्ट योजना करू शकेल? \p \v 12 याहवेह असे म्हणतात: \q1 “यद्यपि त्यांना अनेक दोस्त राष्ट्र आहेत व ते असंख्य आहेत, \q2 तरी ते नष्ट होतील व त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल. \q1 हे यहूदाह, मी जरी तुला पीडित केले, \q2 तरी आता मी तुला पीडा देणार नाही. \q1 \v 13 आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन \q2 आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.” \b \q1 \v 14 हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे: \q2 “तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही. \q1 आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत \q2 ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन. \q1 मी तुझी कबर तयार करेन, \q2 कारण तू तिरस्करणीय आहेस.” \b \q1 \v 15 पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत, \q2 ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत, \q2 जे शांतीची घोषणा करतात! \q1 हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर, \q2 आणि तुझे नवस फेड. \q1 कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत; \q2 त्यांचा कायमचा उच्छेद होईल. \c 2 \s1 निनवेहचा पाडाव \q1 \v 1 हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे. \q2 आपल्या गडांवर पहारा दे, \q2 मार्गांची रखवाली कर, \q2 मोर्चा बांध, \q2 आपल्या सर्व शक्तिनिशी सैन्यांची संरक्षक फळी मजबूत कर! \b \q1 \v 2 जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे \q2 आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, \q1 इस्राएलच्या वैभवासारखे \q2 याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत. \b \q1 \v 3 ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; \q2 त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, \q1 सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; \q2 योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत \q2 सनोवरचे भाले परजलेले आहेत. \q1 \v 4 रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत, \q2 चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत. \q1 ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत; \q2 ते वीजगतीने दौडत आहेत. \b \q1 \v 5 निनवेहने आपल्या निवडक सैनिकांना पाचारण केले आहे, \q2 तरी ते आपल्या मार्गांवर अडखळत आहेत. \q1 ते तटाच्या भिंतीकडे धाव घेतात; \q2 संरक्षक ढाल नियोजित ठिकाणी ठेवलेली आहे. \q1 \v 6 नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत \q2 आणि राजवाडे ढासळत आहेत. \q1 \v 7 अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे, \q2 की निनवेहला बंदिवासात टाकून नेण्यात यावे. \q1 तिच्या दासी पारव्यांच्या घुमण्याप्रमाणे विलाप करीत आहेत \q2 आणि त्यांचे ऊर बडवित आहेत. \q1 \v 8 निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे \q2 जिचे पाणी गळून चालले आहे. \q1 “थांबा, थांबा,” ते ओरडतात, \q2 पण कोणीही वळून तिच्याकडे परत येत नाही. \q1 \v 9 चांदी लुटा! \q2 सोने लुटा! \q1 निनवेहची संपत्ती \q2 येथील मौल्यवान वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे! \q1 \v 10 ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे! \q2 तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत, \q2 त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत. \b \q1 \v 11 ती सिंहाची गुहा कुठे आहे \q2 जिथे ते त्यांच्या बछड्यांचे पालनपोषण करीत असत, \q1 जिथे सिंह आणि सिंहिणी जातात, कोवळी मुलेदेखील निर्भयतेने राहात असत, \q2 आणि त्यांच्या बछड्यांना कशाचेही भय नसे? \q1 \v 12 सिंह आपल्या बछड्यांना पुरेलशी शिकार करत असे \q2 व आपल्या सिंहिणींना भक्ष्य पुरविण्यासाठी सावजाची नरडी दाबून ठार मारत असे, \q1 आपल्या गुहेत ते जमा करीत असत \q2 आणि आपली गुहा भक्षांनी भरून टाकीत असत. \b \q1 \v 13 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात: \q2 “मी तुझ्याविरुद्ध उठलो आहे, \q1 मी तुझे रथ भस्म करून त्यांचा धूर करेन, \q2 आणि तलवार तुझ्या सिंहाच्या बछड्यांना गिळंकृत करेल. \q2 मी पृथ्वीवर तुझ्यासाठी एकही भक्ष ठेवणार नाही. \q1 तुझ्या संदेशवाहकांचे आवाज \q2 यापुढे कधीही ऐकू येणार नाहीत.” \c 3 \s1 निनवेहला धिक्कार असो \q1 \v 1 हे रक्तपात करणाऱ्या नगरी, तुला धिक्कार असो, \q2 लबाड्यांनी गच्च भरलेली, \q1 लूटमाऱ्यांनी भरलेली, \q2 कधीही पीडितांशिवाय नसणारी! \q1 \v 2 चाबकांच्या फटकार्‍यांचा आवाज, \q2 चाकांचा खडखडाट, \q1 चौखूर धावणारे घोडे \q2 आणि हिसके देणारे रथ! \q1 \v 3 आक्रमक घोडेस्वारांची पलटण \q2 लखलखणार्‍या तलवारी \q2 चमचमणारे भाले! \q1 पडलेली अनेक प्रेते, \q2 सर्वत्र मृतांचे ढीग, \q1 अगणित मृत शरीरे, \q2 प्रेतांना अडखळून पडणारे लोक— \q1 \v 4 या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना, \q2 ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे, \q1 तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना \q2 आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले. \b \q1 \v 5 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “मी तुझ्याविरुद्ध आहे, \q2 मी तुझे वस्त्र तुझ्या चेहऱ्यावर उचलेन. \q1 तुझी नग्नता सर्व राष्ट्रांना \q2 आणि तुझी लज्जा सर्व देशांना दाखवेन. \q1 \v 6 मी तुझ्यावर घृणास्पद गोष्टी फेकेन, \q2 मी तुला अपमानित करेन \q2 आणि तुला तमाशा बनवेन. \q1 \v 7 तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील, \q2 ‘निनवेह उद्ध्वस्त झाली आहे—तिच्यासाठी कोण शोक करेल?’ \q2 तुझे सांत्वन करणारा मला कुठे मिळेल?” \b \q1 \v 8 नाईल नदीकाठी वसलेल्या, \q2 सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेल्या \q2 थेबेस नगरीपेक्षा तू अधिक चांगली आहेस काय? \q1 नदीच तिला संरक्षण देते, \q2 नदीच तिची तटबंदी आहे. \q1 \v 9 कूश\f + \fr 3:9 \fr*\ft नाईल नदीचा वरचा भाग\ft*\f* आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते; \q2 पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते. \q1 \v 10 असे असूनही थीब्जचा पाडाव झाला \q2 आणि तिला बंदिवासात नेण्यात आले. \q1 तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर \q2 दगडांवर आपटून ठार मारण्यात आली. \q1 तिच्या अधिकार्‍यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, \q2 तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले. \q1 \v 11 तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; \q2 तू लपून बसशील \q2 आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील. \b \q1 \v 12 तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील \q2 त्यांच्या प्रथम पिकलेल्या फळांगत; \q1 जेव्हा ते हलविले जातात, \q2 तेव्हा ते नेमके खाणाऱ्याच्या तोंडात पडतात. \q1 \v 13 तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा— \q2 ते सर्व दुर्बल आहेत. \q1 तुझ्या देशाच्या वेशी \q2 तुझ्या शत्रूंसाठी सताड उघडलेल्या आहेत; \q2 तुझ्या वेशीच्या सळया अग्नीने भस्म केल्या आहेत. \b \q1 \v 14 तुला पडणार्‍या वेढ्यासाठी पाण्याचा साठा करून ठेव, \q2 तुझे किल्ले मजबूत कर! \q1 चिखल तुडवून ठेव, \q2 चिखलाचा गारा साच्यांत भर, \q2 वीटकाम दुरुस्त कर! \q1 \v 15 तिथे तुला अग्नी भस्म करेल; \q2 तलवार तुला कापून टाकेल— \q2 एखाद्या टोळधाडीप्रमाणे ते तुला गिळंकृत करतील. \q1 नाकतोड्यासारखे बहुगुणित व्हा, \q2 टोळांसारखे बहुगुणित व्हा! \q1 \v 16 तू तुझ्या व्यापार्‍यांची संख्या वाढविली आहे \q2 त्यांची संख्या आकाशातील तार्‍यांपेक्षाही जास्त वाढली आहे, \q1 परंतु ते एखाद्या टोळधाडीप्रमाणे संपूर्ण भूमी ओरबाडून टाकतात \q2 व मग ते उडून जातात. \q1 \v 17 तुझे रक्षक टोळांसारखे आहेत, \q2 तुझे अधिकारी टोळांच्या झुंडीप्रमाणे आहेत \q2 थंडीच्या दिवसात ते भिंतीमध्ये वसतात— \q1 पण सूर्योदय होताच उडून जातात, \q2 आणि कुठे जातात ते कोणालाच कळत नाही. \b \q1 \v 18 हे अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ\f + \fr 3:18 \fr*\ft अधिपती\ft*\f* डुलकी घेतात; \q2 तुझे प्रतिष्ठित लोक विश्रांती घेण्यासाठी पहुडले आहेत. \q1 तुझे लोक डोंगरांवर विखुरले आहेत \q2 त्यांना एकत्र करण्यास कोणीही नाही. \q1 \v 19 तुला कशानेही आरोग्य मिळणार नाही; \q2 तुझी जखम घातक आहे. \q1 तुझ्या दुर्दशेची बातमी जे कोणी ऐकतील \q2 ते सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवितील, \q1 तुझ्या क्रूरतेचा उपद्रव ज्याला झाला नाही, \q2 असा कोण आहे?