\id MRK - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h मार्क \toc1 मार्ककृत शुभवर्तमान \toc2 मार्क \toc3 मार्क \mt1 मार्ककृत शुभवर्तमान \c 1 \s1 बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग तयार करतो \p \v 1 परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त\f + \fr 1:1 \fr*\ft इब्री आणि ग्रीक भाषेत दोन्ही शब्दांचा अर्थ \ft*\fqa अभिषिक्त\fqa*\f*, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ. \v 2 यशायाह संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे: \q1 “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन, \q2 तो तुझा मार्ग तयार करेल,”\f + \fr 1:2 \fr*\fq \+xt मला 3:1\+xt*\fq*\f* \q1 \v 3 “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, \q1 ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, \q2 आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”\f + \fr 1:3 \fr*\ft \+xt यश 40:3\+xt*\ft*\f* \m \v 4 आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला. \v 5 यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमातील लोक त्याच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे. \v 6 योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कापडाचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधत असे.\f + \fr 1:6 \fr*\ft पारंपारिकपणे संदेष्टे असले कपडे घालत असे (पाहा \+xt 2 राजे 1:8; जख 13:4\+xt*)\ft*\f* तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे. \v 7 त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर एकजण येत आहे, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. \v 8 मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.” \s1 येशूंचा बाप्तिस्मा आणि परीक्षा \p \v 9 त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला. \v 10 येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले \v 11 त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.” \p \v 12 नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले, \v 13 रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली. \s1 येशू शुभवार्ता जाहीर करतात \p \v 14 योहानाला बंदिवासात टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले. \v 15 ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!” \s1 येशूंचे त्यांच्या प्रथम शिष्यांना पाचारण \p \v 16 एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. \v 17 येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.” \v 18 लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. \p \v 19 थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले. \v 20 त्यांनी उशीर न करता त्यांना बोलाविले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले. \s1 येशू एका अशुद्ध आत्म्याला घालवून देतात \p \v 21 ते कफर्णहूम येथे गेले, आणि शब्बाथ आला तेव्हा\f + \fr 1:21 \fr*\fq शब्बाथ \fq*\fqa आठवड्याचा सातवा दिवस जो विश्रांतीचा व पवित्र म्हणून पाळत असत.\fqa*\f* सभागृहामध्ये जाऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली. \v 22 त्यांच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते. \v 23 इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला, \v 24 “हे नासरेथकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमचा नाश करावयास आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!” \p \v 25 “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” \v 26 त्या अशुद्ध आत्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला. \p \v 27 हे पाहून सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते अशुद्ध आत्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” \v 28 त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली. \s1 येशू अनेकांना बरे करतात \p \v 29 सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले. \v 30 तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले. \v 31 येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. \p \v 32 त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले. \v 33 संपूर्ण शहर दारात गोळा झाले होते, \v 34 तेव्हा येशूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी ग्रासलेल्या पुष्कळांना बरे केले व अनेक दुरात्म्यांना हाकलून दिले, परंतु दुरात्म्यांना बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते कोण आहेत, हे त्यांना माहीत होते. \s1 येशू एकांतस्थळी प्रार्थना करतात \p \v 35 अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली. \v 36 शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले. \v 37 ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहे!” \p \v 38 येशूंनी म्हटले, “आपण दुसरीकडे कुठेतरी आसपासच्या गावात जाऊ म्हणजे मला तिथे प्रवचन देता येईल कारण त्यासाठीच मी आलो आहे.” \v 39 मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले. \s1 येशू कुष्ठरोग्याला बरे करतात \p \v 40 एक कुष्ठरोगी\f + \fr 1:40 \fr*\ft कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी हा शब्द वापरला जात असे.\ft*\f* येशूंकडे आला आणि गुडघे टेकून विनंती करून म्हणाला, “तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.” \p \v 41 येशूंना कळवळा आला. त्यांनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो!” \v 42 त्याचा कुष्ठरोग निघून गेला आणि तो शुद्ध झाला. \p \v 43 येशूंनी त्याला निक्षून सांगितले: \v 44 “पाहा हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते, ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस याचे हे प्रमाण प्रत्येकाला पटेल.” \v 45 याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना, म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तिथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले. \c 2 \s1 येशू पक्षघाती मनुष्याला बरे करून क्षमा करतात \p \v 1 काही दिवसानंतर, जेव्हा येशू कफर्णहूम या ठिकाणी पुन्हा आले, तेव्हा लोकांनी ऐकले की ते घरी आले आहेत. \v 2 ते इतक्या मोठ्या संख्येने जमले की जागा उरली नाही, दाराबाहेरही जागा उरली नाही आणि येशूंनी वचनातून लोकांना उपदेश केला. \v 3 तेवढ्यात काही लोक एका पक्षघाती मनुष्याला त्यांच्याकडे घेऊन आले, त्याला चार जणांनी उचलून आणले. \v 4 आणि तिथे मोठी गर्दी असल्यामुळे ते त्या मनुष्याला येशूंजवळ घेऊन जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी येशू जिथे बसले होते त्या ठिकाणचे छप्पर उघडले आणि तिथून त्या मनुष्याला त्याच्या अंथरुणासहित खाली सोडले \v 5 जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” \p \v 6 हे ऐकून तिथे बसलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, \v 7 “हा मनुष्य अशाप्रकारे का बोलतो? तो दुर्भाषण करतो! परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?” \p \v 8 ते काय विचार करीत आहेत, हे येशूंनी लगेच त्यांच्या आत्म्यामध्ये ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “तुम्ही या गोष्टींचा असा विचार का करता? \v 9 या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे. \v 10 तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” \v 11 ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” \v 12 तो मनुष्य उठला आणि लगेच अंथरूण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, “आम्ही असे काही कधीही पाहिले नाही!” \s1 लेवीला पाचारण व पापी लोकांबरोबर भोजन \p \v 13 नंतर येशू पुन्हा सरोवरावर चालत गेले आणि तिथे त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय जमा झाला व ते त्यांना शिकवू लागले. \v 14 येशू चालत असताना जकात नाक्यावर बसलेला अल्फीचा पुत्र लेवी त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि त्यांना अनुसरला. \p \v 15 येशू आणि त्यांचे शिष्य लेवीच्या घरी भोजन करत असताना, त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार व पापी लोक भोजन करत होते. कारण येशूंच्या मागे आलेले पुष्कळजण तिथे होते. \v 16 जेव्हा नियमशास्त्र शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूंना जकातदार व पापी लोकांबरोबर जेवत असताना पाहिले, तेव्हा त्यांनी शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतात?” \p \v 17 हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.” \s1 उपवासासंबंधी येशूंना प्रश्न विचारतात \p \v 18 आता योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करीत होते. काही लोक येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करतात, परंतु तुमचे शिष्य का करत नाही?” \p \v 19 येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना उपवास कसे करू शकतात? जोपर्यंत वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत ते उपवास करू शकत नाहीत. \v 20 परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपवास करतील. \p \v 21 “नवीन कापडाचा तुकडा जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. नाहीतर ते नवीन ठिगळ वस्त्राला फाडेल आणि छिद्र अधिक मोठे होईल. \v 22 आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जाईल, द्राक्षारस वाहून जाईल आणि द्राक्षारस व बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.” \s1 येशू शब्बाथाचे धनी \p \v 23 एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर चालत असताना, ते गव्हाची काही कणसे तोडू लागले. \v 24 ते पाहून परूशी त्यांना म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे असे ते का करतात?” \p \v 25 येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का? \v 26 महायाजक अबीयाथार यांच्या दिवसात तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या, ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.” \p \v 27 मग येशूंनी त्यांना म्हटले, “शब्बाथ मनुष्यासाठी निर्माण केला आहे, मनुष्य शब्बाथासाठी नाही. \v 28 म्हणून मानवपुत्र\f + \fr 2:28 \fr*\fq मानवपुत्र \fq*\fqa सर्वसाधारणतः येशू स्वतःला या नावाने संबोधित असे\fqa*\f* हा शब्बाथाचा देखील प्रभू आहे.” \c 3 \s1 शब्बाथ दिवशी येशू बरे करतात \p \v 1 आणखी एका वेळेला येशू सभागृहामध्ये गेले आणि तिथे हात वाळलेला एक मनुष्य होता. \v 2 काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण पाहत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते. \v 3 येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “असा सर्वांसमोर उभा राहा.” \p \v 4 नंतर येशू त्यांना म्हणाले, “शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे?” परंतु ते शांत बसले. \p \v 5 त्यांनी सभोवार जमलेल्यांकडे रागाने आपली नजर फिरविली आणि त्यांची कठीण हृदये पाहून ते अत्यंत अस्वस्थ झाले व त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला. \v 6 यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना कसे जिवे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली. \s1 समुदाय येशूंच्या मागे जातो \p \v 7 इकडे येशू आणि त्यांचे शिष्य सरोवराकडे निघून गेले. त्यांच्यामागे गालील प्रांतातून मोठा समुदाय आला होता. \v 8 येशूंनी जे सर्वकाही केले होते ते ऐकून, पुष्कळ लोक त्यांच्याकडे यहूदीया, यरुशलेम, इदूमिया, यार्देन नदीपलीकडील प्रदेश, सोर व सीदोन येथून आले होते. \v 9 तिथे गर्दी असल्यामुळे व येशूंच्या भोवती लोकांची गर्दी थांबविण्यासाठी त्यांनी शिष्यांना एक लहान होडी तयार ठेवावी असे सांगितले. \v 10 कारण त्यांनी पुष्कळांना बरे केले होते, त्यामुळे जे लोक आजारी होते ते येशूंना स्पर्श करावा म्हणून पुढे रेटत होते. \v 11 जेव्हा अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले त्यांना पाहत असत, तेव्हा ते त्यांच्यापुढे खाली पडत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात!” \v 12 परंतु त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली की त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका. \s1 येशू बारा प्रेषितांची निवड करतात \p \v 13 येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले. \v 14 तेव्हा त्यांनी बारा जणांची\f + \fr 3:14 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa 12 प्रेषित असे संबोधिले आहे.\fqa*\f* निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे \v 15 आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा. \b \lh \v 16 त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: \b \li1 शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले), \li1 \v 17 जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता), \li1 \v 18 आंद्रिया, \li1 फिलिप्प, \li1 बर्थलमय, \li1 मत्तय, \li1 थोमा, \li1 अल्फीचा पुत्र याकोब, \li1 तद्दय, \li1 शिमोन कनानी\f + \fr 3:18 \fr*\fq कनानी \fq*\fqa हा एक राष्ट्रवादी पक्ष असून त्यांनी रोमी सत्तेला विरोध केला शिमोन त्यांच्यापैकी एक होता.\fqa*\f* \li1 \v 19 आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने त्यांचा विश्वासघात केला. \s1 येशूंवर नियमशास्त्राच्या शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप \p \v 20 येशू एका घरात गेले आणि समुदायाने पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना भोजन करण्यासही वेळ मिळेना. \v 21 येशूंच्या कुटुंबीयांनी\f + \fr 3:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa साथीदारांनी\fqa*\f* जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, कारण ते म्हणाले, “याला वेड लागले आहे.” \p \v 22 आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.” \p \v 23 येशूंनी त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलण्यास सुरुवात केली: “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल? \v 24 जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही. \v 25 जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही. \v 26 सैतानच स्वतःविरुद्ध झाला आणि सैतानातच फूट पडली तर त्याचा टिकाव लागणार नाही; त्याचा शेवट झालाच आहे. \v 27 खरोखर, एखाद्या बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बळकट मनुष्याला बांधले पाहिजे मगच त्याचे घर लुटता येईल. \v 28 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल, \v 29 परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.” \p \v 30 असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते. \p \v 31 इतक्यात येशूंची आई आणि भाऊ येऊन बाहेर उभे राहिले आणि एकाला त्यांना बोलविण्यास पाठविले. \v 32 त्यांच्या सभोवती समुदाय बसला होता आणि त्याने त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत आणि ते तुमचा शोध घेत आहेत.” \p \v 33 यावर त्यांनी म्हटले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” \p \v 34 नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, “ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत! \v 35 जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.” \c 4 \s1 पेरणी करणार्‍याचा दाखला \p \v 1 येशूंनी सरोवराच्या किनार्‍यावर शिकविण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा त्यांच्याभोवती जमा झालेला समुदाय इतका मोठा होता की, ते एका होडीत बसून किनार्‍यावरील लोकांना शिकवू लागले. \v 2 त्यांनी अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकविल्या, त्यांच्या शिक्षणात त्यांनी सांगितले: \v 3 “ऐका! एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. \v 4 तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. \v 5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. \v 6 परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. \v 7 काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली व त्याला पीक आले नाही. \v 8 पण काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले, त्याची वाढ झाली आणि त्या काही ठिकाणी तीसपट, साठपट किंवा शंभरपट पीक आले.” \p \v 9 मग येशू म्हणाले, “ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.” \p \v 10 मग ते एकटे असताना बारा जणांनी आणि इतरांनी त्यांना दाखल्याबद्दल विचारले. \v 11 ते म्हणाले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्वगोष्टी दाखल्याद्वारेच सांगण्यात येतील. \v 12 यासाठी की, \q1 “ते पाहत असले तरी त्यांना काही दिसत नाही, \q2 आणि ते ऐकतात तर, परंतु काही समजत नाही; \q1 कदाचित ते वळतील आणि त्यांची क्षमा होईल!”\f + \fr 4:12 \fr*\ft \+xt यश 6:9, 10\+xt*\ft*\f* \p \v 13 नंतर येशू त्यांना म्हणाले, “तुम्हाला हा दाखला समजत नाही का? तर इतर दाखले तुम्हाला कसे समजतील? \v 14 शेतकरी वचनाची पेरणी करतो. \v 15 काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जिथे वचन पेरले जाते. ते वचन लगेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. \v 16 काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. \v 17 पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात. \v 18 काही असे आहेत, की ते काटेरी झुडपांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात; \v 19 परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही. \v 20 याउलट काहीजण उत्तम जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात, स्वीकार करतात, पीक देतात—जे पेरले होते त्यापेक्षा तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देतात.” \s1 दिवठणीवरील दिवा \p \v 21 नंतर येशूंनी त्यांना म्हटले, “कोणी दिवा लावून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवतो काय? त्याऐवजी, तुम्ही दिवठणीवर ठेवत नाही का? \v 22 असे काही झाकलेले नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही गुप्त नाही जे जाहीर केले जाणार नाही. \v 23 ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.” \p \v 24 ते त्यांना पुन्हा म्हणाले, “तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल आणि त्यापेक्षा अधिक जास्त तुम्हाला देण्यात येईल. \v 25 कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल नसेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.” \s1 वाढणार्‍या बियांचा दाखला \p \v 26 येशू आणखी म्हणाले, “परमेश्वराचे राज्य असे आहे. एक मनुष्य जमिनीवर बी विखरतो. \v 27 रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही. \v 28 कारण जमीन स्वतः पीक उत्पन्न करते—पहिल्यांदा अंकुर, कणसे आणि मग कणसात दाणे भरतात. \v 29 अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर तो विळा चालवून पीक कापून नेतो, कारण हंगाम आलेला आहे.” \s1 मोहरीच्या दाण्याचा दाखला \p \v 30 आणखी ते म्हणाले, “परमेश्वराचे राज्य कसे आहे किंवा कोणता दाखला देऊन त्याचे वर्णन करता येईल? \v 31 ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो पृथ्वीवरील सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी, \v 32 तो दाणा वाढून त्याचे झाड होऊन बागेतील सर्वात मोठे झाड होते आणि त्याच्या मोठ्या फांद्यांवर आकाशातील पक्षी विसावा घेऊ शकतात.” \p \v 33 अशाच प्रकारच्या अनेक दाखल्यांद्वारे जसे ते समजू शकतील तसे येशू त्यांच्यासोबत वचनाद्वारे बोलले. \v 34 ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. परंतु एकांतात मात्र ते आपल्या शिष्यांना सर्व स्पष्ट करून सांगत असत. \s1 येशू वादळ शांत करतात \p \v 35 त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” \v 36 तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. \v 37 थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली. \v 38 येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?” \p \v 39 मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला धमकाविले व लाटांना, “शांत हो” असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले. \p \v 40 त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?” \p \v 41 शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?” \c 5 \s1 येशू भूतग्रस्त मनुष्यास बरे करतात \p \v 1 ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या\f + \fr 5:1 \fr*\ft काही प्रतींमध्ये \ft*\fqa गदारेनेस \fqa*\ft दुसर्‍या प्रतींमध्ये \ft*\fqa गरगेसेनेस\fqa*\f* प्रांतात आले. \v 2 येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला. \v 3 हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते. \v 4 बरेचदा त्याचे हात व पाय साखळदंडाने बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले व पायातील लोखंडाच्या बेड्यांचे तुकडे केले. त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद कोणातही नव्हती. \v 5 दिवस आणि रात्र तो स्वतःला दगडांनी ठेचून घेई व थडग्यामध्ये आणि डोंगरामधून मोठमोठ्याने ओरडत असे. \p \v 6 येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला, \v 7 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस.” \v 8 कारण येशूंनी त्याला म्हटले होते, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये.” \p \v 9 “तुझे नाव काय?” येशूंनी विचारले, \p त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन\f + \fr 5:9 \fr*\fq लेगियोन \fq*\ft अर्थात् \ft*\fqa सैन्य\fqa*\f* आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत. \v 10 आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस,” अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली. \p \v 11 त्याचवेळी डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. \v 12 “आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे.” अशी भुतांनी येशूंना विनंती केली. \v 13 येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाली आणि डुकरांमध्ये शिरली व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला. \p \v 14 डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले. \v 15 जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले जो भुताच्या सैन्याने पछाडलेला होता तो बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. \v 16 प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले आणि डुकरांच्या बाबतीत काय झाले, ते सर्वांना सांगितले. \v 17 तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली. \p \v 18 येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली. \v 19 पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, “आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग.” \v 20 त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस\f + \fr 5:20 \fr*\fq दकापलीस \fq*\ft अर्थात् \ft*\fqa दहा गावे\fqa*\f* येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला. \s1 येशू मृत बालिकेला जिवंत करतात व आजारी स्त्रीस बरे करतात \p \v 21 जेव्हा येशू होडीत बसून पलीकडच्या तीरावर गेले, तेव्हा त्यांच्याभोवती खूप मोठा समुदाय गोळा झाला, त्यावेळी ते सरोवराच्या किनार्‍याजवळ होते. \v 22 त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला. \v 23 त्यांना आग्रहाने विनंती करू लागला, “माझी लहान मुलगी मरणाच्या पंथाला लागली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती बरी होईल व वाचेल.” \v 24 म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. \p सभोवतालचा जमावही त्यांच्याबरोबर निघाला व गर्दी करू लागला. \v 25 आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती. \v 26 याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता. \v 27 जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला. \v 28 “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन,” असे तिला वाटत होते. \v 29 तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली. \p \v 30 तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, “माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?” \p \v 31 “यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ ” \p \v 32 तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले. \v 33 तेव्हा भयभीत झालेली ती स्त्री आपल्या बाबतीत काय घडले हे लक्षात घेऊन थरथर कापत आली आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना सर्व खरे सांगितले. \v 34 येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा.” \p \v 35 येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.” \p \v 36 त्यांचे बोलणे ऐकून\f + \fr 5:36 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून\fqa*\f* येशू सभागृहाच्या अधिकार्‍याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.” \p \v 37 येशूंनी पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणासही बरोबर येऊ दिले नाही. \v 38 ते सभागृहाच्या अधिकार्‍याच्या घरी आले, तेव्हा गडबड व उच्च स्वरात लोकांची रडारड, आक्रोश त्यांना दिसून आला. \v 39 ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, “हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.” \v 40 परंतु ते त्याला हसू लागले. \p त्या सर्वांना बाहेर घालविल्यावर, तिचे आईवडील आणि आपले शिष्य यांना घेऊन त्या बालिकेला ज्या खोलीत ठेवले होते तिथे गेले. \v 41 तिच्या हाताला धरून येशू तिला म्हणाले, “तलीथा कूम!” (म्हणजे “छोट्या मुली, मी तुला सांगतो, ऊठ!”) \v 42 ते ऐकताच ती उठून उभी राहिली आणि चालू फिरू लागली. तिचे वय बारा वर्षाचे होते. यावरून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. \v 43 येशूंनी त्यांना कडक आदेश दिला की, याविषयी कोणाला सांगू नका व मुलीला काहीतरी खावयास द्यावे असे सांगितले. \c 6 \s1 संदेष्ट्याचा अवमान \p \v 1 येशू तिथून निघाले व त्यांच्या शिष्यांसह स्वतःच्या गावी परतले. \v 2 शब्बाथ आला त्यावेळी त्यांनी तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि ज्या सर्वांनी त्यांचे शिक्षण ऐकले ते आश्चर्यचकित झाले. \p त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे कुठून प्राप्त झाले? कशाप्रकारचे हे सुज्ञान त्यांना देण्यात आले आहे? हा अद्भुत चमत्कारसुद्धा कसे करतो? \v 3 हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ,\f + \fr 6:3 \fr*\ft मूळ (ग्रीक) भाषेत \ft*\fqa योसेस\fqa*\f* शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले. \p \v 4 मग येशू त्यांना म्हणाले, “संदेष्टा सन्मानित होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर व नातेवाईक यांच्यात तो मान्यता पावत नाही.” \v 5 काही आजार्‍यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत. \v 6 त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. \s1 येशू बारा शिष्यांना पाठवितात \p मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले. \v 7 त्यांनी बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलाविले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला. \p \v 8 त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका. \v 9 जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका. \v 10 ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी त्या गावातून निघेपर्यंत तिथेच राहा. \v 11 एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.” \p \v 12 त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला. \v 13 त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्‍यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले. \s1 बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा शिरच्छेद \p \v 14 हेरोद राजाने याबद्दल ऐकले, कारण येशूंचे नाव सर्वठिकाणी प्रसिद्ध झाले होते. काहीजण म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरणातून उठला आहे आणि म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.” \p \v 15 आणखी दुसरे म्हणाले, “हा एलीयाह आहे.” \p तर आणखी काही लोकांनी असा दावा मांडला, “तो प्राचीन संदेष्ट्यांसारखा एक संदेष्टा आहे.” \p \v 16 परंतु हेरोदाने हे ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच पुनः जिवंत झाला आहे!” \p \v 17 कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले, की त्याचा भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने विवाह केला होता. \v 18 कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.” \v 19 यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती, \v 20 कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे. \p \v 21 अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती\f + \fr 6:21 \fr*\fq सेनापती \fq*\ft अर्थात् \ft*\fqa एक हजार सैनिकांवर अधिकारी\fqa*\f* तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली. \v 22 त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले. \p हेरोद राजाने मुलीला म्हटले, “तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन.” \v 23 शपथ घेऊन व वचन देऊन तो तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्याइतके जे काही तू मला मागशील, ते मी तुला देईन.” \p \v 24 ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?” \p आईने सल्ला दिला, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर माग.” \p \v 25 घाईघाईने ती मुलगी राजाकडे परत आली आणि त्याला म्हणाली, “मला बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर तबकात घालून आता हवे आहे.” \p \v 26 तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही. \v 27 शेवटी राजाने आपल्या एका शिरच्छेद करणार्‍याला तुरुंगात पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्या मनुष्याने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला, \v 28 आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले. \v 29 ही घटना ऐकल्यानंतर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि कबरेत ठेवले. \s1 येशू पाच हजारांना अन्न देतात \p \v 30 नंतर प्रेषित येशूंभोवती गोळा झाले आणि आपण काय केले व काय शिकविले यासंबंधीचा सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. \v 31 नंतर येशूंनी सुचविले, “तुम्ही माझ्याबरोबर या, आपण शांत ठिकाणी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ.” कारण इतके लोक येजा करीत होते की, त्यांना जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. \p \v 32 त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले. \v 33 अनेकांनी त्यांना जाताना पाहिले व त्यांना ओळखले. तेव्हा नगरातील लोक त्यांच्याकडे पायी आले आणि त्यांच्या आधी तिथे पोहोचले. \v 34 जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. येशूंनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली. \p \v 35 दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे, शिवाय उशीरही होत चालला आहे. \v 36 या लोकांना आसपासच्या गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.” \p \v 37 यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” \p त्यांनी विचारले, “इतक्या लोकांना जेवू घालावयाचे म्हणजे अर्ध्या वर्षाच्या मजुरी\f + \fr 6:37 \fr*\ft किंवा \ft*\fqa दोनशे दिनार\fqa*\f* पेक्षा अधिक रक्कम खर्च करावी काय?” \p \v 38 ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” \p जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांना कळले व ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” \p \v 39 मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले. \v 40 त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले. \v 41 मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. \v 42 ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले, \v 43 आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या. \v 44 तिथे जेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. \s1 येशू पाण्यावर चालतात \p \v 45 लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे बेथसैदास जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. \v 46 त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. \p \v 47 रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते. \v 48 तिथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले, \v 49 परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले, \v 50 कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. \p पण ते त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.” \v 51 मग ते त्यांच्याबरोबर होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले. \v 52 कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती. \p \v 53 ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली, \v 54 ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले; \v 55 लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि ते जिथे कुठे आहे असे त्यांनी ऐकले तिथे आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून त्यांच्याकडे घेऊन गेले. \v 56 आणि जिथे कुठेही येशू गेले—गावात, शहरात—बाजारपेठेत लोक आजार्‍यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले. \c 7 \s1 जे विटाळविते \p \v 1 परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. \v 2 येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते. \v 3 परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. \v 4 ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे\f + \fr 7:4 \fr*\ft काही हस्तलिखितांमध्ये \ft*\fqa आणि जेवणाचे पलंग\fqa*\f* धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत. \p \v 5 या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरे प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?” \p \v 6 त्यांनी उत्तर दिले, “यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे: \q1 “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, \q2 पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत. \q1 \v 7 माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; \q2 त्यांची शिकवण केवळ मानवी नियम\f + \fr 7:7 \fr*\ft \+xt यश 29:13\+xt*\ft*\f* आहेत.’ \m \v 8 तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.” \p \v 9 आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे! \v 10 मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’\f + \fr 7:10 \fr*\ft \+xt निर्ग 20:12; अनु 5:16\+xt*\ft*\f* आणि ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’\f + \fr 7:10 \fr*\ft \+xt निर्ग 21:17; लेवी 20:9\+xt*\ft*\f* \v 11 परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे— \v 12 त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता. \v 13 या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता.” \p \v 14 येशूने परत गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “तुम्ही माझे ऐका आणि हे समजून घ्या. \v 15 अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल. \v 16 वास्तविक मनुष्यामधून जे बाहेर पडते, तेच त्याला अशुद्ध करते. ज्याला ऐकावयास कान आहेत, तो ऐको.”\f + \fr 7:16 \fr*\ft हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही\ft*\f* \p \v 17 गर्दीतून निघून घरी गेल्यावर, शिष्यांनी त्यांना दाखल्याचा अर्थ विचारला. \v 18 “तुम्ही इतके मतिमंद आहात काय?” त्यांनी विचारले, “जे काही मनुष्यामध्ये बाहेरून शिरते ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही काय? \v 19 ते त्यांच्या हृदयात जात नाही पण पोटात उतरते आणि नंतर शरीरातून बाहेर पडते.” या म्हणण्यावरून सर्व अन्न शुद्ध आहे, असे येशूंनी जाहीर केले. \p \v 20 ते पुढे म्हणाले, “मनुष्यामधून जे बाहेर पडते तेच मनुष्याला अशुद्ध करते. \v 21 कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे, \v 22 बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा \v 23 या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.” \s1 येशू एका सुरफुनीकी स्त्रीच्या विश्वासाचा मान राखतात \p \v 24 नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन\f + \fr 7:24 \fr*\ft पुष्कळ जुन्या प्रतींमध्ये \ft*\fqa सोर आणि सीदोन\fqa*\f* या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही. \v 25 त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली. \v 26 आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती. \p \v 27 “प्रथम लेकरांना जेवढे पाहिजे तेवढे खाऊ द्या,” ते म्हणाले, “मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.” \p \v 28 “प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.” \p \v 29 येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.” \p \v 30 ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता. \s1 येशू एका बहिर्‍या व मुक्या मनुष्याला बरे करतात \p \v 31 सोर सोडून येशू सीदोन प्रांतामधून गेले आणि तिथून दकापलीस\f + \fr 7:31 \fr*\ft दहा गावे\ft*\f* रस्त्याने ते पुन्हा गालील समुद्राकडे आले. \v 32 तिथे काही लोकांनी एका बहिर्‍या आणि बोबड्या अशा मनुष्याला त्यांच्याकडे आणले. येशूंनी त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे करावे अशी लोकांनी येशूंना विनंती केली. \p \v 33 येशूंनी त्याला गर्दीतून बाजूला नेले. त्याच्या कानात त्यांनी बोटे घातली. नंतर ते थुंकले आणि त्या मनुष्याच्या जिभेला केला. \v 34 मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो” \v 35 ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले. \p \v 36 याविषयी कोणाला सांगू नका, असे येशूंनी निक्षून सांगितले. परंतु ते जसे सांगत गेले तशी ही बातमी अधिकच प्रसिद्ध होत गेली. \v 37 लोक कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, “त्यांनी सर्वकाही उत्कृष्ट केले आहे. ते बहिर्‍यांना ऐकण्यास व मुक्यांना बोलावयास लावतात.” \c 8 \s1 चार हजारांना भोजन खाऊ घालणे \p \v 1 त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले, \v 2 “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. \v 3 मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.” \p \v 4 शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?” \p \v 5 येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” \p शिष्यांनी उत्तर दिले, “सात.” \p \v 6 त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले. \v 7 त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले. \v 8 लोक जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. \v 9 तिथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर, \v 10 येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले. \p \v 11 तिथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले. \v 12 हे ऐकून त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि म्हणाले, “ही पिढी चिन्ह का मागते? खरोखर या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” \v 13 नंतर ते त्यांना सोडून निघून गेले व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले. \s1 परूशी आणि हेरोद यांचे खमीर \p \v 14 शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती. \v 15 “सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.” \p \v 16 ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील. \p \v 17 परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का? \v 18 तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का? \v 19 पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” \p “बारा” त्यांनी उत्तर दिले. \p \v 20 “आणि सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” \p “सात,” त्यांनी उत्तर दिले. \p \v 21 येशूंनी त्यांना विचारले, “अजूनही तुम्हाला समजत नाही का?” \s1 बेथसैदा येथील एका आंधळ्या मनुष्याला दृष्टी देणे \p \v 22 ते बेथसैदा येथे आले, तेव्हा काही लोकांनी एका आंधळ्या मनुष्याला त्यांच्याकडे आणले आणि येशूंनी त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली. \v 23 येशूंनी त्या आंधळ्या मनुष्याला हाताशी धरून गावाबाहेर नेले. त्याच्या डोळ्यांमध्ये थुंकल्यावर व त्याच्यावर हात ठेवल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “आता तुला काही दिसते का?” \p \v 24 तो वर दृष्टी करून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत; ती झाडांसारखी, इकडे तिकडे चालताना दिसतात.” \p \v 25 तेव्हा येशूंनी पुनः आपले हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले. तेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी प्राप्त झाली व त्याला सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. \v 26 “या गावात जाऊ नकोस,” येशूंनी अशी ताकीद देऊन त्याला त्याच्या घरी पाठविले. \s1 येशू हे ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली \p \v 27 येशू आणि त्यांचे शिष्य कैसरीया फिलिप्पाच्या गावात गेले. वाटेत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?” \p \v 28 त्यांनी उत्तर दिले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; तर आणखी काही संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” \p \v 29 “परंतु तुमचे मत काय?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” \p पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.” \p \v 30 “ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले. \s1 येशू आपल्या मृत्यूचे भविष्य करतात \p \v 31 यानंतर येशू त्यांना शिकवू लागले की, मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावी, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जिवे मारले जावे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे. \v 32 ते या गोष्टीविषयी त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलले आणि पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला. \p \v 33 येशूंनी वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि मग पेत्राला ते धमकावून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टिआड हो. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.” \s1 क्रूसाचा मार्ग \p \v 34 नंतर शिष्यांना आणि जमावाला त्यांनी जवळ बोलाविले आणि म्हणाले: “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. \v 35 कारण जो कोणी आपला जीव स्वतःसाठीच राखून ठेवतो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आणि शुभवार्तेसाठी आपल्या जीवाला मुकेल, तो त्याचा जीव वाचवेल. \v 36 कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून चांगले काय निष्पन्न होणार? \v 37 आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का? \v 38 ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या गौरवात व पवित्र देवदूतांच्या समवेत परत येईन तेव्हा लाज वाटेल.” \c 9 \p \v 1 ते त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की येथे उभे असणारे काहीजण असे आहेत की, परमेश्वराचे राज्य सामर्थ्याने आलेले पाहतील तोपर्यंत मरणाचा अनुभव घेणार नाहीत.” \s1 रूपांतर \p \v 2 सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले, तिथे ते एकटे असताना त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले. \v 3 त्यांची वस्त्रे इतकी शुभ्र, चमकणारी झाली की जगामध्ये इतर कोणालाही त्यापेक्षा शुभ्र करता येणार नाही. \v 4 तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले. \p \v 5 तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण या ठिकाणी तीन मंडप उभारू या—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.” \v 6 त्याला काय बोलावे हे समजत नव्हते, कारण ते भयभीत झाले होते. \p \v 7 इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!” \p \v 8 मग एकाएकी, जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांच्या नजरेस कोणीही पडले नाही. \p \v 9 ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका. \v 10 म्हणून त्यांनी ही गोष्ट आपसातच ठेवली आणि, “मरणातून पुन्हा उठणे” म्हणजे काय या गोष्टीविषयी ते चर्चा करू लागले. \p \v 11 नंतर शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?” \p \v 12 येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. पण मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावीत आणि तुच्छ मानले जावे असे कशाला लिहिले आहे? \v 13 पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आलेला आहे आणि त्याच्याविषयी जसे लिहून ठेवले आहे, त्यानुसार त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.” \s1 येशू अशुद्ध आत्मा लागलेल्या मुलास बरे करतात \p \v 14 जेव्हा ते बाकीच्या शिष्यांकडे आले, तेव्हा त्यांच्याभोवती मोठा समुदाय होता आणि काही नियमशास्त्र शिक्षक त्यांच्याशी वाद घालत आहेत, असे त्यांना दिसले. \v 15 येशूंना पाहून सर्व समुदायाला आश्चर्य वाटले आणि त्यांचे अभिवादन करण्यास ते धावत गेले. \p \v 16 येशूंनी विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कशाविषयी वाद करीत होता?” \p \v 17 गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, “गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे; \v 18 ज्यावेळी दुरात्मा त्याला ताब्यात घेतो, तेव्हा तो त्याला जमिनीवर आपटतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, क्रोधाने दात खातो आणि त्याचे शरीर ताठ होते. त्या दुरात्म्याला हाकलून लावण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली, पण ते करू शकले नाहीत.” \p \v 19 येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे आणा.” \p \v 20 त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. पण दुरात्म्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्याने त्या मुलाला झटके आणले आणि तो मुलगा जमिनीवर पडून लोळू लागला व त्याच्या तोंडामधून फेस येऊ लागला. \p \v 21 “हा केव्हापासून असा आहे?” येशूंनी त्याच्या वडिलांना विचारले. \p वडिलांनी उत्तर दिले, “अगदी बालपणापासून, \v 22 त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.” \p \v 23 “जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.” \p \v 24 मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!” \p \v 25 हे पाहण्याकरिता लोक धावत तिथे येत आहेत, हे पाहून येशूंनी अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटले, “अरे बहिरेपणाच्या व मुकेपणाच्या आत्म्या, या मुलामधून बाहेर येण्याची मी तुला आज्ञा करीत आहे आणि पुन्हा कधीही त्याच्यामध्ये प्रवेश करू नकोस.” \p \v 26 हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले. \v 27 परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला. \p \v 28 नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?” \p \v 29 त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”\f + \fr 9:29 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa प्रार्थना आणि उपास\fqa*\f* \s1 येशू आपल्या मृत्यूचे दुसर्‍यांदा भविष्य करतात \p \v 30 ते ठिकाण सोडल्यानंतर ते गालील प्रांतामधून गेले. येशूंनी आपण कुठे आहोत हे कोणालाही कळू न देण्याचा प्रयत्न केला, \v 31 कारण ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते. ते त्यांना म्हणाले, “मानवपुत्राला मनुष्यांच्या हाती धरून दिले जाईल. ते त्याला जिवे मारतील, पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” \v 32 परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली. \p \v 33 मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?” \v 34 परंतु शिष्य शांत राहिले कारण मार्गावर असताना आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यासंबंधी शिष्यांचा वादविवाद सुरू झाला होता. \p \v 35 ते खाली बसले, त्यांनी आपल्या बारा शिष्यांना बोलाविले आणि म्हणाले, “तुमच्यामध्ये जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने सर्वात शेवटचा, आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” \p \v 36 मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले, \v 37 “जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.” \s1 आमच्याविरुद्ध नसलेला आमच्या बाजूचा असतो \p \v 38 योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले. आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यातील नव्हता.” \p \v 39 येशू म्हणाले, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने चमत्कार करतो तो कोणीही असला, तरी तो लगेचच माझ्याविरुद्ध वाईट बोलणार नाही. \v 40 कारण जो आपल्याविरुद्ध नाही, तो आपल्या बाजूचा आहे. \v 41 मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून माझ्या नावाने कोणी तुम्हाला पेलाभर पाणी दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही. \s1 अडखळण करणे \p \v 42 “जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या या लहानातील एकालाही अडखळण करण्यास प्रवृत्त करतो, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला सरोवरात फेकून द्यावे हे त्याच्या चांगल्यासाठी होईल. \v 43 जर तुझा हात अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन हात असून नरकात जावे व न विझणार्‍या अग्नीत जाण्याऐवजी एका हाताने अधू होऊन जीवनात प्रवेश करणे अधिक हिताचे होईल.” \v 44 ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.\f + \fr 9:44 \fr*\ft हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही\ft*\f* \v 45 जर तुझा पाय अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे. \v 46 ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.\f + \cat dup\cat*\fr 9:46 \fr*\ft हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही\ft*\f* \v 47 जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे हे उत्तम आहे. \v 48 ज्या ठिकाणी, \q1 “ ‘त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत, \q2 किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.’ \m \v 49 प्रत्येकजण अग्नीद्वारे खारट केले जातील. \p \v 50 “मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? तुमच्यातील मीठ गमावू नका, एकमेकांशी शांतीने राहा.” \c 10 \s1 घटस्फोट \p \v 1 येशू कफर्णहूम प्रांत सोडून यार्देनेच्या यहूदीया प्रांतात आले. त्यांच्यामागे लोकांची गर्दी होती आणि रीतीप्रमाणे त्यांना त्यांनी शिक्षण दिले. \p \v 2 काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?” \p \v 3 त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?” \p \v 4 ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.” \p \v 5 येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले. \v 6 परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’\f + \fr 10:6 \fr*\ft \+xt उत्प 1:27\+xt*\ft*\f* असे निर्माण केले. \v 7 ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील,\f + \fr 10:7 \fr*\ft काही जुन्या प्रतींमध्ये आढळत नाही \ft*\fqa आई आणि वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील\fqa*\f* \v 8 आणि ते दोघे एकदेह होतील.’\f + \fr 10:8 \fr*\ft \+xt उत्प 2:24\+xt*\ft*\f* म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. \v 9 म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.” \p \v 10 नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले. \v 11 त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो. \v 12 आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.” \s1 लहान बालके व येशू \p \v 13 लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. \v 14 जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. \v 15 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.” \v 16 नंतर त्यांनी बालकांना कवेत घेतले, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. \s1 श्रीमंत आणि परमेश्वराचे राज्य \p \v 17 येशू वाटेला लागणार तोच, एक मनुष्य त्यांच्याकडे धावत आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून त्यांना म्हणाला, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?” \p \v 18 येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. \v 19 तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.\f + \fr 10:19 \fr*\ft \+xt निर्ग 20:12‑16; अनु 5:16‑20\+xt*\ft*\f*’ ” \p \v 20 “गुरुजी” तो तरुण जाहीरपणे म्हणाला, “मी बालक होतो तेव्हापासूनच या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.” \p \v 21 येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. “तू एका गोष्टीत उणा आहेस,” तो म्हणाला. जा, “तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.” \p \v 22 यावर त्या तरुणाचा चेहरा पडला. तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. \p \v 23 येशूंनी सभोवती पाहिले व आपल्या शिष्यांना म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती अवघड आहे!” \p \v 24 हे ऐकून त्यांच्या बोलण्याचे शिष्यांना आश्चर्य वाटले. मग येशू पुन्हा म्हणाले, “मुलांनो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी अवघड आहे.\f + \fr 10:24 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa जे धनावर भरवसा करतात त्यांच्यासाठी\fqa*\f* \v 25 श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” \p \v 26 शिष्य आणखी चकित झाले व ते एकमेकास म्हणू लागले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” \p \v 27 येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही; परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.” \p \v 28 पेत्र बोलला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” \p \v 29 येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, ज्यांनी मला अनुसरण्यासाठी व शुभवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहीण, आई, पिता, मुले आणि जमिनीचा त्याग केला आहे. \v 30 या वर्तमान युगात त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, घरे, भाऊ बहीण, आई, मुले आणि जमीन आणि याबरोबरच छळ आणि येणार्‍या युगात त्याला सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही. \v 31 पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.” \s1 येशू आपल्या मरणाचे तिसर्‍यावेळी भविष्य करतात \p \v 32 ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले. \v 33 “आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील. \v 34 ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील; परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” \s1 याकोब व योहान यांची विनंती \p \v 35 नंतर जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान येशूंकडे आले. “गुरुजी,” ते म्हणाले, “आम्ही आपल्याजवळ जे काही मागतो, ते आपण आमच्यासाठी करावे.” \p \v 36 “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” येशूंनी विचारले. \p \v 37 ते म्हणाले, “आपण आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला डावीकडे बसू द्यावे.” \p \v 38 “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही,” येशू म्हणाले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही पिऊ शकाल काय किंवा ज्या बाप्तिस्माने मी बाप्तिस्मा पावलो आहे तो बाप्तिस्मा तुम्ही घेऊ शकाल का?” \p \v 39 ते उत्तरले, “आम्ही तो पिऊ शकू.” \p येशूंनी त्यांना म्हटले, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल खरा आणि जो बाप्तिस्मा मला दिला आहे तो बाप्तिस्मा तुम्हीही घ्याल. \v 40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा ज्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्यांनाच त्या मिळतील.” \p \v 41 हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा ते याकोब आणि योहानवर रागावले. \v 42 येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदीयांवर शासन करणारे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे. \v 43 पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. \v 44 आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, तो सर्वांचा गुलाम झाला पाहिजे. \v 45 मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.” \s1 आंधळ्या बार्तीमयाला दृष्टीलाभ \p \v 46 मग येशू यरीहो शहरात आले. तिथे येशू आणि त्यांचे शिष्य, मोठ्या समुदायासह शहर सोडून जात असताना, तीमयाचा पुत्र बार्तीमय हा आंधळा, येशू ज्या रस्त्याने चालले होते, त्या रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. \v 47 जेव्हा हे नासरेथकर येशू जात आहेत असे त्याने ऐकले, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!” \p \v 48 अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!” \p \v 49 येशू थांबले आणि म्हणाले, “त्याला इकडे बोलवा.” \p त्याप्रमाणे लोक त्या आंधळ्या मनुष्याला म्हणाले, “धीर धर, आपल्या पायांवर उभा राहा, ते तुला बोलावत आहेत.” \v 50 हे ऐकताच बार्तीमयने आपला अंगरखा भिरकावून दिला, उडी मारून तो उठला आणि येशूंकडे आला. \p \v 51 “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” येशूंनी त्याला विचारले. \p आंधळा मनुष्य म्हणाला, “गुरुजी मला दृष्टी यावी.” \p \v 52 येशू म्हणाले, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि तो रस्त्याने येशूंच्या मागे चालू लागला. \c 11 \s1 येशूंचा राजा म्हणून यरुशलेममध्ये प्रवेश \p \v 1 ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, \v 2 “समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा. \v 3 ‘तुम्ही हे का करीत आहात?’ असे जर कोणी तुम्हाला विचारले, तर एवढेच म्हणा की, ‘प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लगेच त्याला पाठवून देतील.’ ” \p \v 4 ते निघाले व त्यांना एका रस्त्यावर फाटकाच्या बाहेर शिंगरू बांधलेले आढळले. ते सोडू लागले, \v 5 त्यावेळी उभ्या असलेल्या काहींनी विचारले, “तुम्ही बांधलेल्या शिंगरूचे काय करत आहात?” \v 6 येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी उत्तर दिले. तेव्हा त्या माणसांनी त्यांना जाऊ दिले. \v 7 जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले. \v 8 अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्‍यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या. \v 9 मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: \q1 “होसान्ना!” \b \q1 “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”\f + \fr 11:9 \fr*\ft \+xt स्तोत्र 118:25‑26\+xt*\ft*\f* \b \q1 \v 10 “आमचा पिता दावीदाचे येणारे राज्य आशीर्वादित होवो!” \b \q1 “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!” \p \v 11 येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि ते मंदिराच्या अंगणात गेले. त्यांनी सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले, कारण आता उशीर झाला होता, म्हणून आपल्या बारा शिष्यांबरोबर ते बेथानीस गेले. \s1 अंजिराच्या झाडाला शाप आणि मंदिराचे अंगण स्वच्छ करणे \p \v 12 दुसर्‍या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली. \v 13 काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता. \v 14 तेव्हा येशू झाडाला म्हणाले, “तुझे फळ कोणीही कधीही न खावो.” त्यांचे हे बोलणे शिष्य ऐकत होते. \p \v 15 यरुशलेमला पोहोचल्यावर, येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्‍या सर्वांना ते बाहेर घालवून देऊ लागले. पैशाची अदलाबदल करणार्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणार्‍यांची आसने त्यांनी उधळून लावली. \v 16 त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातून विक्रीच्या मालाची नेआण करण्यासही त्यांनी मनाई केली. \v 17 येशू त्यांना शिकवीत होते, ते म्हणाले, “असे लिहिले नाही का: माझ्या घराला ‘सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना घर म्हणतील,’\f + \fr 11:17 \fr*\ft \+xt यश 56:7\+xt*\ft*\f* परंतु तुम्ही ती ‘लुटारूंची गुहा केली आहे.’ ”\f + \fr 11:17 \fr*\ft \+xt यिर्म 7:11\+xt*\ft*\f* \p \v 18 येशूंनी काय केले, हे प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षकांनी ऐकले, तेव्हा त्यांना कसे ठार मारता येईल याचा मार्ग ते शोधू लागले. त्यांना येशूंची भीती वाटत होती. कारण त्यांच्या शिक्षणामुळे सर्व समुदाय आश्चर्यचकित झाला होता. \p \v 19 संध्याकाळ झाली, तेव्हा येशू व त्यांचे शिष्य शहराच्या बाहेर गेले. \p \v 20 सकाळी जात असताना अंजिराचे झाड मुळापासून सुकून गेले आहे असे त्यांना दिसले! \v 21 पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!” \p \v 22 येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वरावर विश्वास ठेवा, \v 23 मी तुम्हाला निश्चित\f + \fr 11:23 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर येशू म्हणाले \fqa*\fqa खरोखर\fqa*\f* सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल. \v 24 यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. \v 25 आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या पातकांची क्षमा करतील. \v 26 पण तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”\f + \fr 11:26 \fr*\ft हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही\ft*\f* \s1 येशूंच्या अधिकारास आव्हान \p \v 27 ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. \v 28 “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” असे त्यांना विचारू लागले. \p \v 29 येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या आणि मी हे कोणत्या अधिकाराने करीत आहे, हे मी तुम्हाला सांगेन. \v 30 मला सांगा, योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?” \p \v 31 या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा ‘स्वर्गापासून होता’ असे जर आपण म्हणालो तर ते विचारतील ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ \v 32 पण जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता,’ ” त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण योहान संदेष्टा होता असे प्रत्येकजण मानत होता. \p \v 33 शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.” \p यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.” \c 12 \s1 कुळांचा दाखला \p \v 1 मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला. \v 2 हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्‍यांकडे पाठविला. \v 3 परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले. \v 4 त्याने दुसरा सेवक त्याच्याकडे पाठविला; पण त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली. \v 5 त्यानंतर त्याने आणखी एकाला पाठविले, त्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले. \p \v 6 “आता त्याच्याजवळ पाठविण्यासाठी केवळ ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो त्याचा पुत्र राहिला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले, व तो म्हणाला की, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’ \p \v 7 “पण शेतकर्‍यांनी मालकाच्या पुत्राला येतांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ \v 8 त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले. \p \v 9 “द्राक्षमळ्याचा धनी काय करेल असे तुम्हाला वाटते? तो येईल आणि त्या भाडेकर्‍यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल. \v 10 धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: \q1 “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, \q2 तोच कोनशिला झाला आहे; \q1 \v 11 प्रभूने हे केले आहे, \q2 आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’\f + \fr 12:11 \fr*\ft \+xt स्तोत्र 118:22, 23\+xt*\ft*\f*” \p \v 12 प्रमुख याजक, नियमशास्त्र शिक्षक आणि वडील येशूंना अटक करण्याचा मार्ग शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती; मग ते त्यांना सोडून निघून गेले. \s1 कैसराला कर देणे \p \v 13 काही काळानंतर येशूंना शब्दात पकडावे, या उद्देशाने काही परूशी व हेरोदियांना पाठविण्यात आले. \v 14 ते त्याच्याकडे आले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता, भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाही व खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता; तर आम्हाला सांगा, कैसराला कर\f + \fr 12:14 \fr*\ft विशेष कर जो प्रजेवर लादला जातो, पण रोमी नागरिकांवर नाही.\ft*\f* देणे योग्य आहे की नाही? \v 15 आम्ही कर भरावा की नाही?” \p परंतु येशूंनी त्यांचे ढोंग ओळखले व ते म्हणाले, “तुम्ही मला सापळ्यात का पाडू पाहता? एक दिनार आणा आणि मला दाखवा.” \v 16 त्याप्रमाणे त्यांना एक नाणे दिले आणि त्यांनी विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?” \p “कैसराचा” त्यांनी उत्तर दिले. \p \v 17 तेव्हा प्रभू येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” \p तेव्हा ते त्यांच्याविषयी आश्चर्यचकित झाले. \s1 पुनरुत्थानासमयी विवाह \p \v 18 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले. \v 19 त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. \v 20 आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला. \v 21 मग दुसर्‍या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्‍याचेही तसेच झाले. \v 22 ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली. \v 23 आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?” \p \v 24 येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता? \v 25 जेव्हा मृत लोक उठतील, ते विवाह करत नाही किंवा विवाह करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. \v 26 पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा\f + \fr 12:26 \fr*\ft \+xt निर्ग 3:6\+xt*\ft*\f* परमेश्वर आहे?’ \v 27 ते मृतांचे नसून जिवंतांचे परमेश्वर आहेत, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.” \s1 सर्वश्रेष्ठ आज्ञा \p \v 28 कोणी एक नियमशास्त्र शिक्षक तिथे आला व त्याने त्यांचा वाद ऐकला. येशूंनी योग्य उत्तर दिले आहे, हे पाहून त्याने येशूंना विचारले, “सर्व आज्ञांपैकी महत्त्वाची कोणती आहे?” \p \v 29 येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्त्वाची आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएला ऐक: प्रभू आपले परमेश्वर एकच प्रभू आहेत. \v 30 प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’\f + \fr 12:30 \fr*\ft \+xt अनु 6:4, 5\+xt*\ft*\f* \v 31 दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर\f + \fr 12:31 \fr*\ft \+xt लेवी 19:18\+xt*\ft*\f* तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.” \p \v 32 “योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे. \v 33 त्यांच्यावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करणे, हे सर्व प्रकारची होमार्पणे व बली वाहण्यापेक्षा फारच महत्त्वाचे आहे.” \p \v 34 त्याने सुज्ञतेने उत्तर दिले आहे हे पाहून येशू त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या राज्यापासून दूर नाहीस.” आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत. \s1 ख्रिस्त कोणाचा पुत्र? \p \v 35 नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?” \v 36 कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, \q1 “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, \q2 “मी तुझ्या शत्रूंना, \q1 तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, \q2 तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’\f + \fr 12:36 \fr*\ft \+xt स्तोत्र 110:1\+xt*\ft*\f* \m \v 37 स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” \p जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता. \s1 नियमशास्त्र शिक्षकासंबंधी इशारा \p \v 38 येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, \v 39 सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते. \v 40 ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.” \s1 विधवेचे दान \p \v 41 येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले. \v 42 मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती. \p \v 43 ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने दान पात्रात इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. \v 44 कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरिबीतून सर्व देऊन टाकले—जी तिची उपजीविका होती.” \c 13 \s1 मंदिराचा नाश व अखेरच्या काळाची चिन्हे \p \v 1 येशू मंदिरातून बाहेर निघत असताना, त्यांच्या शिष्यांपैकी एकजण त्यांना म्हणाले, “पाहा ना, गुरुजी! किती भव्य हे दगड आणि सुंदर इमारती!” \p \v 2 येशू उत्तरले, “तुम्ही आता या भव्य इमारती पाहता ना? याच्या एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड पाडला जाईल.” \p \v 3 येशू मंदिरासमोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, पेत्र, याकोब, योहान आणि आंद्रिया यांनी त्यांना खाजगी रीतीने विचारले, \v 4 “या घटना केव्हा घडतील या गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास काय चिन्ह असतील हे आम्हाला सांगा.” \p \v 5 येशू त्यांना म्हणाले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. \v 6 कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘तो मीच आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील. \v 7 जेव्हा तुम्ही लढायांसंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण शेवट अजूनही यावयाचा आहे. \v 8 कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळ पडतील. या गोष्टी तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत. \p \v 9 “तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल आणि माझ्यामुळे तुम्हाला राज्यपाल आणि राजे त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल. \v 10 प्रथम शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झालाच पाहिजे. \v 11 परंतु जेव्हा ते तुम्हाला धरून नेतील व तुमच्याविरुद्ध खटला सुरू होईल, तेव्हा तुम्ही काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला जे सुचविले जाईल ते बोला. कारण तुम्ही ते बोलणार नाही, तर पवित्र आत्मा बोलेल. \p \v 12 “भाऊ भावाला, पिता आपल्या पोटच्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. \v 13 माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील, त्याचे मात्र तारण होईल. \p \v 14 “जेव्हा तुम्ही ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’\f + \fr 13:14 \fr*\ft \+xt दानी 9:27; 11:31; 12:11\+xt*\ft*\f* ज्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, त्या ठिकाणी उभा असलेला पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. \v 15 जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता प्रवेश करू नये; \v 16 जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. \v 17 गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! \v 18 तरी हे हिवाळ्यामध्ये होऊ नये, म्हणून प्रार्थना करा, \v 19 कारण ते दिवस इतके कष्टाचे असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत. \p \v 20 “जर प्रभूने ते दिवस कमी केले नसते, तर कोणी वाचला नसता. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी, ज्यांना त्यांनी निवडले आहे, त्यांच्यासाठी ते कमी केले जातील. \v 21 त्या काळात, ‘येथे ख्रिस्त आहे!’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. \v 22 कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील. \v 23 म्हणून तुम्ही सावध राहा. मी तुम्हाला आधी सर्वकाही सांगून ठेवलेले आहे. \p \v 24 “हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात, \q1 “ ‘सूर्य अंधकारमय होईल, \q2 आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; \q1 \v 25 आकाशातून तारे गळून पडतील, \q2 आणि आकाशमंडळ डळमळेल.’\f + \fr 13:25 \fr*\ft \+xt यश 13:10; 34:4\+xt*\ft*\f* \p \v 26 “त्यावेळी लोक मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि सामर्थ्याने व पराक्रमाने आकाशात मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहतील. \v 27 आणि चारही दिशांकडून, पृथ्वीच्या व आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी ते आपल्या दूतांस पाठवतील. \p \v 28 “आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका: त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. \v 29 या घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते जवळ अगदी दारातच आहे, हे समजून घ्या. \v 30 मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी नाहीशी होणार नाही. \v 31 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. \s1 दिवस व घटका अज्ञात \p \v 32 “तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. \v 33 सावध असा! जागृत राहा!\f + \fr 13:33 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa सावध राहा आणि प्रार्थना करा\fqa*\f* ती वेळ केव्हा येईल, हे तुम्हाला माहीत नाही! \v 34 हे एका दूरच्या प्रवासावर निघालेल्या मनुष्यासारखे आहे: तो आपले घर सोडतो, त्याच्या दासांना अधिकार देतो, प्रत्येकाला ज्याचे त्याचे काम वाटून देतो आणि तो परत येईपर्यंत बारकाईने लक्ष ठेवावे, असे द्वारपालाला सांगतो. \p \v 35 “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. \v 36 तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये. \v 37 मी जे तुम्हाला सांगतो ते प्रत्येकाला सांगत आहेः ‘सावध राहा!’ ” \c 14 \s1 येशूंना बेथानीत तैलाभ्यंग \p \v 1 वल्हांडण\f + \fr 14:1 \fr*\fq वल्हांडण \fq*\ft इजिप्त देशातील 430 वर्षांच्या गुलामगिरीच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतर साजरा केलेला सण, सात दिवसानंतर खमीर न घालता भाकरी खाण्याचा सण. हे दोन्ही सण एकत्रित पाळीत असत व त्यांची नावेही समानार्थाने वापरलेली आहेत.\ft*\f* आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते. \v 2 ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” \p \v 3 येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली. \p \v 4 तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला? \v 5 एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही\f + \fr 14:5 \fr*\ft ग्रीक \ft*\fq अधिक \fq*\fqa याहून 300 दिनारी\fqa*\f* अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला. \p \v 6 “तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. \v 7 गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील.\f + \fr 14:7 \fr*\ft \+xt अनु 15:11\+xt*\ft*\f* तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. \v 8 तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे. \v 9 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.” \p \v 10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला. \v 11 तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला. \s1 शेवटचे भोजन \p \v 12 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रीतीप्रमाणे ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्‍याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे?” \p \v 13 तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल, त्याच्यामागे जा. \v 14 तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ \v 15 तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” \p \v 16 ते शिष्य नगरात गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. \p \v 17 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले, \v 18 ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.” \p \v 19 ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?” \p \v 20 “तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. \v 21 कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.” \p \v 22 भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.” \p \v 23 त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले. \p \v 24 मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे \v 25 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.” \p \v 26 मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. \s1 पेत्राच्या नाकारण्यासंबंधी येशूंचे भविष्यकथन \p \v 27 “तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे: \q1 “मी मेंढपाळावर प्रहार करेन आणि \q2 मेंढरांची पांगापांग होईल.\f + \fr 14:27 \fr*\ft \+xt जख 13:7\+xt*\ft*\f* \m \v 28 परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” \p \v 29 पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.” \p \v 30 “पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” \p \v 31 परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले. \s1 गेथशेमाने \p \v 32 आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” \v 33 त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकूळ होऊ लागले. \v 34 ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकूळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.” \p \v 35 थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. \v 36 “अब्बा!\f + \fr 14:36 \fr*\fq अब्बा \fq*\ft अरामी भाषेमध्ये \ft*\fqa पिता\fqa*\f* पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.” \p \v 37 नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तू जागे राहू शकला नाही का? \v 38 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” \p \v 39 येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली. \v 40 नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे समजले नाही. \p \v 41 मग ते तिसर्‍या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. \v 42 उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.” \s1 येशूंना अटक \p \v 43 ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्‍या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला. \p \v 44 आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” \v 45 तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. \v 46 त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले. \v 47 पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. \p \v 48 येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? \v 49 मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.” \v 50 मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले. \p \v 51 मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला, \v 52 परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला. \s1 न्यायसभेपुढे येशू \p \v 53 येशूंना महायाजक कयफाकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले. \v 54 पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्‍यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला. \p \v 55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही. \v 56 नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता. \p \v 57 नंतर काहींनी उठून त्यांच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली: \v 58 “आम्ही त्याला बोलताना ऐकले, ‘मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उद्ध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करेन.’ ” \v 59 तरीपण त्यांच्या साक्षीमध्येही काही ताळमेळ नव्हता. \p \v 60 हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे? \v 61 पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. \p नंतर महायाजकाने त्यांना पुन्हा विचारले, “धन्यवादित परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?” \p \v 62 “मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.” \p \v 63 महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे? \v 64 तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे, आता तुम्हाला काय वाटते?” \p तो मृत्युदंडास पात्र आहे असा सर्वांनी त्यांच्यावर आरोप केला. \v 65 त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्‍यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले. \s1 पेत्र येशूंना नाकारतो \p \v 66 हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तिथे महायाजकाची एक दासी आली. \v 67 तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. \p “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.” \p \v 68 पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला. \p \v 69 त्याला तिथे उभे असलेल्या दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा मनुष्य त्यांच्यापैकी एक आहे!” \v 70 पेत्राने ते पुन्हा नाकारले. \p थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती. त्यातील काहीजण पेत्राला म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालील प्रांताचा आहेस!” \p \v 71 हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.” \p \v 72 तेवढ्यात कोंबडा दुसर्‍या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला. \c 15 \s1 पिलातासमोर येशू \p \v 1 प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले. \p \v 2 पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” \p येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता तसेच.” \p \v 3 प्रमुख याजक आणि यहूदी पुढार्‍यांनी येशूंवर अनेक आरोप केले. \v 4 म्हणून पिलाताने येशूंना विचारले, “तू त्यांना उत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर कितीतरी गोष्टींचा दोषारोप करीत आहे.” \p \v 5 परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले. \p \v 6 आता सणामध्ये एका कैद्याला लोकांच्या विनंतीप्रमाणे सोडून देण्याची प्रथा होती. \v 7 बरब्बा म्हटलेला एक मनुष्य त्यावेळी बंडखोरांबरोबर तुरुंगात शिक्षा भोगत होता, त्याने उठाव करून खून केला होता. \v 8 आता जसे पिलात रीतीप्रमाणे करीत असे, तसे त्याने करावे अशी मागणी समुदाय त्याला करू लागला. \p \v 9 “तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” पिलाताने विचारले, \v 10 प्रमुख याजकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले हे पिलाताच्या लक्षात आले होते. \v 11 पण तेवढ्यात येशूंच्या ऐवजी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्यासाठी प्रमुख याजकांनी समुदायास चिथाविले. \p \v 12 पिलाताने विचारले, “ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?” \p \v 13 लोक ओरडून म्हणाले, “त्याला क्रूसावर खिळा!” \p \v 14 “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” \p पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!” \p \v 15 लोकांना खुश करण्याच्या विचाराने, पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. \s1 सैनिक येशूंची थट्टा करतात \p \v 16 मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलाविले. \v 17 त्यांनी त्यांना जांभळा झगा घातला आणि काट्यांचा एक मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकावर ठेवला. \v 18 नंतर ते त्याला प्रणाम करून म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” \v 19 त्यांनी त्यांच्या मस्तकांवर काठीने वारंवार मारले व ते त्यांच्या तोंडावर थुंकले. त्यांच्यासमोर त्यांनी गुडघे टेकून त्यांची उपासना केली. \v 20 येशूंची अशी थट्टा केल्यावर, त्यांनी त्याला घातलेला जांभळा झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता बाहेर घेऊन गेले. \s1 येशूंना क्रूसावर खिळणे \p \v 21 कुरेने गावचा एक रहिवासी, आलेक्सांद्र व रूफस यांचा पिता शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले. \v 22 मग त्यांनी येशूंना गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या जागी आणले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. \v 23 त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. \v 24 मग त्यांनी त्याला क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांची वस्त्रे वाटून, प्रत्येकाला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. \p \v 25 त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते. \v 26 एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता: \pc यहूद्यांचा राजा. \p \v 27 त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. \v 28 अशा रीतीने, “अपराधी लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला.\f + \fr 15:28 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये सारखेच शब्द आढळतात \+xt लूक 22:37\+xt*.\ft*\f* \v 29 जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना, \v 30 तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव!” \v 31 त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षकांनीही त्यांची थट्टा केली. ते म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. \v 32 तो इस्राएलाचा राजा व ख्रिस्त आहे, त्याला आता क्रूसावरून खाली उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही पाहू आणि विश्वास ठेवू.” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्यांनीही त्यांच्यावर अपमानाची रास केली. \s1 येशूंचा मृत्यू \p \v 33 संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. \v 34 आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”\f + \fr 15:34 \fr*\ft \+xt स्तोत्र 22:1\+xt*\ft*\f* \p \v 35 तिथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाहला बोलावित आहे.” \p \v 36 कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला व तो म्हणाला, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!” \p \v 37 मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला. \p \v 38 तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. \v 39 जेव्हा येशूंच्या समोर उभे असलेल्या शताधिपतीने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!” \p \v 40 अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब व योसेफ\f + \fr 15:40 \fr*\fq योसेफ \fq*\ft मूळ (ग्रीक) भाषेत \ft*\fqa योसेस\fqa*\f* यांची आई मरीया, सलोमी होत्या. \v 41 गालीलामध्ये असताना या स्त्रिया येशूंना अनुसरून त्यांची सेवा करीत असत. यरुशलेममधून त्यांच्याबरोबर आलेल्या इतर अनेक स्त्रियाही तिथे होत्या. \s1 येशूंना कबरेत ठेवतात \p \v 42 हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना, \v 43 सभेचा एक सन्मान्य सभासद अरिमथियाकर योसेफ, स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले. \v 44 येशू इतक्या लवकर मरण पावले हे ऐकून पिलाताला नवल वाटले. त्याने शताधिपतीला बोलाविले आणि विचारले, येशूंचा मृत्यू आधी झाला आहे की काय? \v 45 ते खरे असल्याचे शताधिपतीकडून समजल्यावर, त्याने येशूंचे शरीर योसेफाच्या ताब्यात दिले. \v 46 योसेफाने एक तागाचे कापड विकत आणले, येशूंचे शरीर खाली काढले, तागाच्या वस्त्राने गुंडाळले आणि खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने शिळा लोटून ठेवली. \v 47 त्यांना कबरेत कुठे ठेवले हे, मरीया मग्दालिया आणि योसेफाची आई मरीया यांनी पाहिले. \c 16 \s1 येशूंचे पुनरुत्थान \p \v 1 शब्बाथ संपल्यानंतर मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले. \v 2 आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस, सूर्योदय झाल्यावर त्या कबरेकडे जाण्यास निघाल्या. \v 3 “आपल्यासाठी कबरेच्या द्वाराशी असलेली धोंड कोण बाजूला करेल?” याविषयी त्या आपसात चर्चा करीत होत्या. \p \v 4 त्यांनी वर पाहिले तेव्हा जी धोंड अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे असे त्यांना दिसले. \v 5 त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तिथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या. \p \v 6 “भिऊ नका,” तो म्हणाला, “क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेवले होते ती जागा पाहा! \v 7 पण जा, ही बातमी त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, ‘ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. जसे त्यांनी तुम्हाला सांगितले होते तसे ते तिथे तुम्हाला भेटतील.’ ” \p \v 8 भयभीत होऊन व थरथर कापत त्या स्त्रिया कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या घाबरल्या होत्या.\f + \fr 16:8 \fr*\ft काही प्रतींमध्ये वचन 8 आणि 9 खालीलप्रमाणे समाप्ती दिसते: \ft*\fqa त्यांनी लगेचच पेत्राच्या अवतीभोवती असणार्‍यांना बोध कळविले. यानंतर, येशूंने स्वतः त्यांच्यातून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जे अविनाशी व पवित्र असे तारण दिले आमेन.\fqa*\f* \p \v 9 येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले. \v 10 जे लोक येशूंबरोबर होते आणि जे शोक व विलाप करीत होते, त्यांच्याकडे जाऊन तिने हे वर्तमान त्यांना सांगितले. \v 11 येशू जिवंत आहे आणि तिने त्यांना प्रत्यक्ष बघितले होते, हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. \p \v 12 नंतर त्याच दिवशी शहरातून चाललेल्या दोघांना येशूंनी वेगळ्या रूपात दर्शन दिले. \v 13 ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही. \p \v 14 नंतर अकरा शिष्य भोजन करण्यास बसले असताना, येशू त्यांना प्रकट झाले. ज्यांनी त्यांना मरणातून उठलेले पाहिले होते, त्यांच्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी अविश्वास व हृदयाच्या कठीणपणा बद्दल त्यांचा निषेध केला. \p \v 15 ते त्यांना म्हणाले, “सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा. \v 16 जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील. \v 17 आणि विश्वास ठेवणार्‍याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. \v 18 ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्‍यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.” \p \v 19 प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले. \v 20 मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.