\id MIC - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h मीखा \toc1 मीखाहची भविष्यवाणी \toc2 मीखाह \toc3 मीखा \mt1 मीखाहची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला. \b \b \q1 \v 2 सर्व लोकहो, तुम्ही सर्वजण, ऐका, \q2 पृथ्वी आणि जे सर्व त्यामध्ये राहतात, लक्ष द्या, \q1 सार्वभौम याहवेह परमेश्वर, त्यांच्या पवित्र मंदिरातून, \q2 तुमच्याविरुद्ध साक्ष देतील. \s1 शोमरोन आणि यरुशलेमविरुद्ध न्याय \q1 \v 3 पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत. \q2 ते खाली उतरतात आणि पृथ्वीच्या उंच जागा तुडवितात. \q1 \v 4 त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात \q2 जसे अग्नीपुढे मेण, \q1 जसे पाणी उतारावरून खाली येते, \q2 तशा दऱ्या दुभंगतात. \q1 \v 5 हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे \q2 आणि इस्राएली लोकांच्या पापाचे परिणाम आहे. \q1 याकोबाचा अपराध काय आहे? \q2 ते शोमरोन आहे की नाही? \q1 यहूदीयाचे उच्च स्थान कोणते आहे? \q2 ते यरुशलेम नाही की नाही? \b \q1 \v 6 “म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा, \q2 द्राक्षमळे लावण्याची जागा करेन. \q1 मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन \q2 आणि तिचा पाया उघडा करेन. \q1 \v 7 तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील; \q2 तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील; \q2 मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन. \q1 कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत, \q2 आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.” \s1 शोक व आक्रंदन \q1 \v 8 म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; \q2 मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. \q1 कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; \q2 आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन. \q1 \v 9 कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे; \q2 ती यहूदीयामध्ये पसरली आहे. \q1 ती माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे, \q2 ती यरुशलेमपर्यंतही पोहोचली आहे. \q1 \v 10 गथ\f + \fr 1:10 \fr*\fq गथ \fq*\ft म्हणजे \ft*\fqa सांगणे\fqa*\f* मध्ये ही बातमी देऊ नका; \q2 अजिबात रडू नका. \q1 बेथ‑ले‑अफ्राह\f + \fr 1:10 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa धुळीचे घर\fqa*\f* मध्ये जाऊन \q2 धुळीत लोळ. \q1 \v 11 शाफीर\f + \fr 1:11 \fr*\fq शाफीर \fq*\ft अर्थात् \ft*\fqa आनंददायी\fqa*\f* मध्ये राहणारे तुम्ही \q2 वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा. \q1 जे झानन\f + \fr 1:11 \fr*\fq झानन \fq*\ft अर्थात् \ft*\fqa बाहेर या\fqa*\f* मध्ये राहतात \q2 ते बाहेर जाणार नाहीत. \q1 बेथ‑एसल विलाप करीत आहे; \q2 ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही. \q1 \v 12 मारोथ\f + \fr 1:12 \fr*\fq मारोथ \fq*\ft अर्थात् \ft*\fqa कडू\fqa*\f* मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, \q2 आणि मदतीची वाट पाहत आहेत, \q1 कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा \q2 याहवेहने पाठविलेली आहे. \q1 \v 13 लाखीशमध्ये राहणार्‍यांनो, \q2 वेगवान घोडे रथाला जुंपा. \q1 तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, \q2 कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले. \q1 \v 14 त्यामुळे तू मोरेशेथ-गथला \q2 निरोपाची भेट देशील. \q1 अकजीब\f + \fr 1:14 \fr*\fq अकजीब \fq*\ft म्हणजे \ft*\fqa फसवणूक\fqa*\f* चे रहिवासी \q2 इस्राएलच्या राजांना फसविणारी ठरतील. \q1 \v 15 मारेशाहच्या रहिवाशांनो, \q2 मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. \q1 इस्राएलचे प्रतिष्ठित लोक \q2 अदुल्लामला पळून जातील. \q1 \v 16 ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात \q2 त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा; \q1 गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा, \q2 कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील. \c 2 \s1 मानवी योजना आणि परमेश्वराच्या योजना \q1 \v 1 जे वाईट कृत्याची योजना करतात, \q2 जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो! \q1 पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात \q2 कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते. \q1 \v 2 ते लोभीपणाने इतरांची शेते बळकावतात, \q2 दुसऱ्यांची घरेही हिसकावून घेतात. \q1 ते कपटाने लोकांची घरे बळकावतात \q2 आणि त्यांच्या पूर्वजांची संपत्ती लुटतात. \p \v 3 म्हणून याहवेह म्हणतात: \q1 “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, \q2 ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. \q1 तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, \q2 कारण तो आपत्तीचा काळ असेल. \q1 \v 4 त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; \q2 ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: \q1 ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; \q2 माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. \q1 ते ती माझ्यापासून काढून घेतात! \q2 ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ” \b \q1 \v 5 म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून \q2 सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही. \s1 खोटे संदेष्टे \q1 \v 6 त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका, \q2 या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका; \q2 आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.” \q1 \v 7 हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, \q2 याहवेह\f + \fr 2:7 \fr*\fq याहवेह \fq*\ft किंवा \ft*\fqa याहवेहचा आत्मा\fqa*\f* अधीर होतात काय? \q2 ते अशी कामे करतात काय? \b \q1 “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे \q2 माझे शब्द भले करत नाहीत काय? \q1 \v 8 अलीकडे माझे लोक \q2 शत्रूसारखे उठले आहेत. \q1 जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात \q2 त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता, \q2 जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात. \q1 \v 9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना \q2 त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. \q1 तुम्ही त्यांच्या मुलांकडून \q2 माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता. \q1 \v 10 उठा, चालते व्हा! \q2 कारण हे तुमचे विश्रांतिस्थान नाही, \q1 कारण हे अशुद्ध झाले आहे, \q2 सर्व उपायांच्या पलीकडे, ते उद्ध्वस्त झाले आहे. \q1 \v 11 जर एखादा लबाड आणि फसवणूक करणारा येऊन म्हणाला, \q2 ‘मी तुम्हाला भरपूर द्राक्षारस व मद्याची भविष्यवाणी करेन,’ \q2 तर अशीच व्यक्ती या लोकांसाठी योग्य संदेष्टा होईल! \s1 सुटकेचे अभिवचन \q1 \v 12 “हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्चित गोळा करेन; \q2 इस्राएलच्या उरलेल्यांना मी खचित गोळा करेन. \q1 जसे मेंढवाड्यात मेंढरे, \q2 जसे कुरणात कळप, तसे मी त्यांना एकत्र गोळा करेन; \q2 आणि ती जागा लोकांनी फुलून जाईल. \q1 \v 13 जे कुंपण तोडून मार्ग उघडणारे त्यांच्या पुढे जातील; \q2 ते द्वार तोडून त्यातून बाहेर जातील. \q1 त्यांचा राजा त्यांच्या पुढे जाईल, \q2 याहवेह त्यांचे पुढारी असतील.” \c 3 \s1 पुढारी आणि संदेष्टे यांना फटकारणे \p \v 1 तेव्हा मी म्हणालो, \q1 याकोबाच्या पुढार्‍यांनो, \q2 इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका. \q1 तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय, \q2 \v 2 तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता; \q1 तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता, \q2 आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता; \q1 \v 3 तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता, \q2 त्यांची कातडी सोलता \q2 आणि त्यांची हाडे मोडता, \q1 आणि पातेल्यात शिजविण्यासाठी \q2 मांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता. \b \q1 \v 4 मग ते याहवेहचा धावा करतील, \q2 पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही. \q1 त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे \q2 याहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील. \p \v 5 याहवेह असे म्हणतात: \q1 “माझ्या लोकांना \q2 चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, \q1 त्यांना काही खायला मिळाल्यास \q2 ते ‘शांती’ ची घोषणा करतात. \q1 परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो \q2 त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात. \q1 \v 6 म्हणूनच तुझ्यावर रात्र येईल, दृष्टान्त दिसणार नाही, \q2 आणि अंधार येईल, तुम्ही दैवप्रश्न पाहिल्याशिवाय! \q1 या संदेष्ट्यांसाठी सूर्यास्त होईल \q2 आणि दिवस असता त्यांच्यावर अंधार पडेल. \q1 \v 7 द्रष्ट्यांना लाज वाटेल \q2 आणि दैवप्रश्न करणारे फजीत होतील. \q1 ते सर्व आपली मुखे झाकतील \q2 कारण त्यांना परमेश्वराकडून उत्तर आलेले नाही.” \q1 \v 8 परंतु माझ्याबाबतीत म्हणाल, \q2 तर याकोबाला त्याचे अपराध \q2 आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी \q1 मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने \q2 परिपूर्ण आहे. \b \q1 \v 9 अहो याकोबाच्या पुढार्‍यांनो, \q2 इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, माझे ऐका, \q1 तुम्ही न्यायाला तुच्छ लेखता \q2 आणि चांगल्या गोष्टी विकृत करता; \q1 \v 10 सीयोनला रक्तपाताने \q2 आणि यरुशलेमला दुष्टपणाने बांधले आहे. \q1 \v 11 तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, \q2 तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, \q2 व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. \q1 तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, \q2 “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? \q2 आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.” \q1 \v 12 म्हणून तुमच्यामुळे, \q2 सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, \q1 यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, \q2 मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील. \c 4 \s1 याहवेहचे पर्वत \p \v 1 पण शेवटच्या दिवसात \q1 याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच \q2 असे स्थापित केले जातील; \q1 सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जातील, \q2 आणि लोकांचा लोंढा त्याकडे एकत्र येईल. \p \v 2 अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील, \q1 “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, \q2 याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. \q1 ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, \q2 म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” \q1 कारण सीयोनमधून नियमशास्त्र, \q2 यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल. \q1 \v 3 ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील, \q2 दूरदूरच्या बलाढ्य राष्ट्रांमधील वाद मिटवतील. \q1 ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, \q2 व भाल्यांचे आकडे बनवतील. \q1 एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, \q2 तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत. \q1 \v 4 प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली \q2 आणि आपआपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, \q1 आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही, \q2 कारण सर्वसमर्थ याहवेहने म्हटले आहे. \q1 \v 5 सर्व राष्ट्रे \q2 आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील, \q1 पण आम्ही नेहमी \q2 याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू. \s1 याहवेहची योजना \q1 \v 6 याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, \q2 मी लंगड्यांना एकत्र करेन; \q1 बहिष्कृत लोकांना \q2 आणि ज्यांना मी दुखविले आहे त्यांनाही एकत्र करेन. \q1 \v 7 मी लंगड्यांना माझे अवशेष करेन, \q2 आणि बहिष्कृत लोकांना एक बलाढ्य राष्ट्र करेन. \q1 त्या दिवसापासून याहवेह सीयोन पर्वतावरून \q2 सदासर्वदा राज्य करतील. \q1 \v 8 आणि तू, कळपाच्या टेहळणीच्या बुरुजा, \q2 सीयोन कन्येच्या मजबूत किल्ल्या,\f + \fr 4:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa पर्वत\fqa*\f* \q1 तुझे पूर्वीचे राज्य तुला परत देण्यात येईल; \q2 यरुशलेमच्या कन्येला सिंहासन दिले जाईल.” \b \q1 \v 9 तू आता मोठ्याने का रडत आहेस— \q2 तुला राजा नाही काय? \q1 तुमचा अधिकारी नष्ट झाला आहे काय, \q2 म्हणून तुम्ही स्त्रीच्या प्रसूती वेदनांप्रमाणे व्याकूळ झाला आहात काय? \q1 \v 10 हे सीयोनच्या कन्ये, \q2 बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांनी कण्हत राहा, \q1 कारण तू आता शहर सोडून \q2 मोकळ्या मैदानात तळ ठोकला पाहिजे. \q1 तू बाबेलला जाशील; \q2 आणि तिथे तुझी सुटका होईल \q1 आणि याहवेह तिथून तुम्हाला \q2 तुमच्या शत्रूंच्या हातातून मुक्त करतील. \b \q1 \v 11 पण आता पुष्कळ राष्ट्रे \q2 तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. \q1 ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, \q2 आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!” \q1 \v 12 पण त्यांना \q2 याहवेहचे विचार माहीत नाहीत; \q1 त्यांना याहवेहच्या योजना समजत नाही, \q2 खळ्यातील पेंढ्यांप्रमाणे याहवेहने त्यांना गोळा केले आहे. \q1 \v 13 “अगे सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; \q2 कारण मी तुला लोखंडाची शिंगे \q1 व कास्याचे खूर देईन, \q2 आणि तू अनेक राष्ट्रांचे तुकडे करशील.” \q1 त्यांची लूट तू याहवेहला, \q2 त्यांची संपत्ती सर्व पृथ्वीच्या प्रभूला अर्पण करशील. \c 5 \s1 बेथलेहेमातून अधिपती देण्याचे अभिवचन \q1 \v 1 हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, \q2 कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. \q1 ते काठीने इस्राएलाच्या \q2 शासकाच्या गालावर मारतील. \b \q1 \v 2 “परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, \q2 तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, \q1 तरी तुझ्यातून माझ्यासाठी \q2 इस्राएलचा शासक उदय पावेल,\f + \fr 5:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa अधिपती\fqa*\f* \q1 ज्याची उत्पत्ती \q2 प्राचीन काळातील आहे.” \b \q1 \v 3 म्हणून प्रसूती वेदनेत असलेली \q2 एका मुलाला जन्म देईपर्यंत \q1 आणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंत \q2 इस्राएलचा त्याग केला जाईल. \b \q1 \v 4 तो याहवेहच्या सामर्थ्याने, \q2 याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाच्या वैभवात उठेल \q2 आणि आपल्या कळपाचा मेंढपाळ होईल आणि ते सुरक्षित राहतील, \q1 कारण तेव्हा पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या लोकांना \q2 याहवेहची महानता कळेल. \b \q1 \v 5 ते पुरुष\f + \fr 5:5 \fr*\fq ते पुरुष \fq*\ft अर्थात् याहवेह\ft*\f* आपली शांती असतील \q2 जेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करतील \q2 आणि आपल्या किल्ल्यांमध्ये प्रवेश करतील, \q1 तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध सात मेंढपाळ, \q2 आठ देखील सेनापती उभे करू, \q1 \v 6 अश्शूर देशावर तलवारीने, \q2 निम्रोदाच्या देशावर उपसलेल्या तलवारीने कोण शासन\f + \fr 5:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa चुराडा\fqa*\f* करेल. \q1 अश्शूरचे लोक जेव्हा आपल्या देशावर आक्रमण करतील \q2 आणि आपली सीमा ओलांडतील \q2 तेव्हा याहवेह आपल्याला त्यांच्यापासून सोडवतील. \b \q1 \v 7 याकोबाचे उरलेले लोक \q2 अनेक लोकांमध्ये असतील, \q1 ते याहवेहने पाठविलेल्या दहिवराप्रमाणे, \q2 गवतावर पडणाऱ्या पावसाप्रमाणे असतील, \q1 जे कोणाचीही वाट पाहत नाही \q2 आणि कोणा मनष्यावर अवलंबून राहत नाही. \q1 \v 8 याकोबाचे अवशेष राष्ट्रांमध्ये \q2 आणि अनेक लोकांमध्ये असणार, \q1 जंगली श्वापदांमध्ये सिंहासारखे \q2 आणि मेंढरांच्या कळपामध्ये तरुण सिंहासारखे असतील, \q1 ते त्यांच्यावर झेप घेतील आणि त्यांना ठार करीत पुढे जातील \q2 आणि कोणीही त्यांना वाचवू शकत नाही. \q1 \v 9 तुझ्या शत्रूंवर विजय मिळवून तुझा हात उंच होईल \q2 आणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल. \p \v 10 “त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात, \q1 “मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन \q2 आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन. \q1 \v 11 मी तुझ्या देशातील शहरांचा नाश करेन \q2 आणि तुझे किल्ले उद्ध्वस्त करेन. \q1 \v 12 मी तुमच्यातील चेटके नष्ट करेन \q2 आणि यापुढे तुझ्यामध्ये कोणीही शकुन पाहणार नाही. \q1 \v 13 मी तुमच्या मूर्ती \q2 आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन; \q1 तुमच्या हस्तकृतींना \q2 तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही. \q1 \v 14 जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन, \q2 तेव्हा तुझे अशेरा स्तंभ\f + \fr 5:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa अश्शेरा देवीचे लाकडी चिन्ह\fqa*\f* उपटून टाकीन. \q1 \v 15 ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही, \q2 त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.” \c 6 \s1 याहवेहचा इस्राएलशी वाद \p \v 1 याहवेह काय म्हणतात ते ऐका: \q1 “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; \q2 आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको. \b \q1 \v 2 “हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; \q2 हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. \q1 कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. \q2 ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत. \b \q1 \v 3 “हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? \q2 मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या. \q1 \v 4 मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले \q2 आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. \q1 मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, \q2 अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले. \q1 \v 5 माझ्या लोकांनो, \q2 मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला \q2 आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. \q1 शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, \q2 म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.” \b \q1 \v 6 मी याहवेहसमोर काय आणावे \q2 आणि स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरासमोर मी नमन करावे? \q1 होमार्पणासाठी मी एक वर्षाचे वासरू घेऊन \q2 त्यांच्यासमोर येऊ का? \q1 \v 7 एक हजार मेंढे \q2 किंवा जैतून तेलाच्या दहा हजार नद्यांनी याहवेह संतुष्ट होतील काय? \q1 माझ्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून मी माझा ज्येष्ठपुत्र अर्पावा काय, \q2 माझ्या आत्म्याच्या पापासाठी माझ्या शरीराचे फळ द्यावे काय? \q1 \v 8 हे मनुष्या, त्यांनी तुला चांगले काय ते दाखविले आहे. \q2 आणि याहवेह तुझ्याकडून काय अपेक्षा करतात? \q1 नीतीने वागणे आणि दयेने प्रीती करणे \q2 आणि तुझ्या परमेश्वराबरोबर नम्रपणे चालणे.\f + \fr 6:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa शहाणपणाने\fqa*\f* \s1 इस्राएलचा दोष व शासन \q1 \v 9 ऐका! याहवेह नगराला हाक मारीत आहेत— \q2 आणि तुमच्या नावाचे भय बाळगणे हे ज्ञान आहे— \q2 “काठी आणि त्यास नियुक्त करणाऱ्याचे ऐका. \q1 \v 10 हे दुष्ट घरा, अजूनही तुझी अन्यायाने मिळवलेली संपत्ती, \q2 आणि उणे एफा माप\f + \fr 6:10 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa जे कोरडे माप करण्यासाठी उपयोगात आणले जात असे\fqa*\f* जे शापित आहे त्यास विसरेन काय? \q1 \v 11 चुकीच्या वजनाच्या पिशवीने, \q2 कपटाच्या वजनांनी मी कोणाची सुटका करू काय? \q1 \v 12 तुमचे श्रीमंत लोक हिंसा करतात; \q2 तुमचे रहिवासी लबाड आहेत \q2 आणि त्यांची जीभ कपटी गोष्ट बोलते. \q1 \v 13 म्हणून तुमच्या पातकांमुळे तुमचा नायनाट \q2 व नाश करण्यास मी सुरुवात केली आहे. \q1 \v 14 तू खाशील तृप्त होणार नाही; \q2 खाल्ल्यानंतरही तुझे पोट रिकामे राहील. \q1 तू साठवून ठेवशील, पण काहीही उरणार नाही, \q2 कारण मी तुझी बचत तलवारीला देईन. \q1 \v 15 तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; \q2 तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, \q2 तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही. \q1 \v 16 तू ओमरीचे नियम \q2 आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; \q2 तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. \q1 म्हणून मी तुझा नाश करेन \q2 व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; \q2 तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”\f + \fr 6:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हाला सोसावी लागेल\fqa*\f* \c 7 \s1 इस्राएलची दुर्दशा \q1 \v 1 काय ही माझी दुःखद स्थिती! \q1 मी द्राक्षमळ्यातील \q2 उन्हाळी फळे गोळा करणार्‍यासारखा आहे; \q1 खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, \q2 अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही. \q1 \v 2 पृथ्वीवरून विश्वासू लोकांचा नाश झाला आहे; \q2 एकही प्रामाणिक मनुष्य उरला नाही. \q1 प्रत्येकजण रक्तपात करण्यात गुंतला आहे; \q2 ते सापळा रचून एकमेकांची शिकार करतात. \q1 \v 3 वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत; \q2 शासक भेटवस्तूंची मागणी करतो, \q1 न्यायाधीश लाच घेतात, \q2 सामर्थ्यवान लोक बळजबरीने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात; \q2 ते सर्व मिळून कट रचतात. \q1 \v 4 त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप \q2 आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. \q1 परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, \q2 म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. \q2 आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे. \q1 \v 5 शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; \q2 आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. \q1 तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, \q2 तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर. \q1 \v 6 कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो, \q2 मुलगी तिच्या आईविरुद्ध, \q1 आणि सून तिच्या सासूविरुद्ध उठते— \q2 मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात. \b \q1 \v 7 मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, \q2 मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; \q2 माझे परमेश्वर माझे ऐकतील. \s1 इस्राएल उठेल \q1 \v 8 अरे माझ्या वैर्‍या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस! \q2 कारण मी पडलो, तरी पुन्हा उठेन. \q1 जरी मी अंधारात बसलो, \q2 तरी याहवेह माझा प्रकाश होतील. \q1 \v 9 मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे, \q2 ते माझी बाजू ऐकून \q1 मला न्याय देईपर्यंत \q2 मी याहवेहचा कोप सहन करेन. \q1 ते मला प्रकाशात आणतील; \q2 आणि मी त्यांचे न्यायीपण पाहीन. \q1 \v 10 मग माझे शत्रू हे पाहून \q2 ते लज्जेने झाकले जातील, \q1 ती जी मला म्हणत होती, \q2 “याहवेह तुझा परमेश्वर कुठे आहे?” \q1 माझे डोळे तिचे पतन पाहतील; \q2 रस्त्याच्या चिखलाप्रमाणे \q2 तीही पायाखाली तुडविली जाईल. \b \q1 \v 11 तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल, \q2 आणि तुमच्या सीमा विस्तारित करण्याचा दिवस येईल. \q1 \v 12 अश्शूरपासून इजिप्तच्या नगरांपर्यंत \q2 आणि मिसरपासून फरात\f + \fr 7:12 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीपर्यंत, \q1 समुद्रापासून समुद्रापर्यंत \q2 आणि डोंगरांपासून डोंगरांपर्यंत, \q2 त्या दिवशी लोक तुझ्याकडे येतील. \q1 \v 13 पृथ्वीवरील रहिवाशांमुळे, \q2 त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून, पृथ्वी उजाड होईल. \s1 प्रार्थना आणि स्तुती \q1 \v 14 आपल्या लोकांचा काठीसह मेंढपाळ हो, \q2 जो तुझ्या वतनाचा कळप आहे, \q1 जो एकटाच जंगलात, \q2 सुपीक कुरणात राहतो.\f + \fr 7:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa कर्मेलच्या मधोमध\fqa*\f* \q1 त्यांना पूर्वीप्रमाणे बाशानात व गिलआदात \q2 यथेच्छ चरू द्या. \b \q1 \v 15 “तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे, \q2 मी त्यांना माझे चमत्कार दाखवेन.” \b \q1 \v 16 राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, \q2 त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. \q1 ते आपली मुखे हाताने झाकतील \q2 आणि त्यांचे कान बहिरे होतील. \q1 \v 17 ते सर्पाप्रमाणे, \q2 भूमीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. \q1 ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; \q2 भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील \q2 आणि तुमचे भय बाळगतील. \q1 \v 18 तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, \q2 आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात \q2 त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? \q1 तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, \q2 परंतु दया दाखविण्यात आनंद मानता. \q1 \v 19 पुन्हा एकदा तुम्ही आम्हावर दया कराल; \q2 तुम्ही आमची पापे आपल्या पायाखाली तुडविणार; \q2 आणि आमची दुष्कृत्ये समुद्राच्या खोलीत फेकून द्याल. \q1 \v 20 फार पूर्वी, \q2 आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, \q1 तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, \q2 आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.