\id MAL - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h मलाखी \toc1 मलाखीची भविष्यवाणी \toc2 मलाखी \toc3 मला \mt1 मलाखीची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 एक भविष्यवाणी: संदेष्टा मलाखी\f + \fr 1:1 \fr*\fq मलाखी \fq*\ft अर्थात् \ft*\fqa माझा संदेष्टा\fqa*\f* द्वारे याहवेहने इस्राएलला दिलेले वचन. \s1 परमेश्वराच्या प्रीतीबद्दल इस्राएलला संदेह \p \v 2 याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.” \p पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?” \p याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली. \v 3 परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.” \p \v 4 एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.” \p परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील. \v 5 तू स्वतःच्या डोळ्याने बघशील व म्हणशील, ‘इस्राएलच्या सीमेपलीकडे देखील याहवेह महान आहेत!’ \s1 दोषपूर्ण अर्पणामुळे करार मोडला जातो \p \v 6 “पुत्र आपल्या पित्याचा आदर करतो, नोकर आपल्या धन्याचा आदर करतो. जर मी तुमचा पिता आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे? मी जर धनी आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \p “ते तुम्ही याजक आहात, जे माझ्या नामाचा अनादर करतात. \p “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्या नामाचा अनादर कसा केला?’ \p \v 7 “तुम्ही माझ्या वेदीवर भ्रष्ट अर्पणे आणता तेव्हा. \p “परंतु तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे अमंगळ केले?’ \p “याहवेहचा मेज तुच्छ आहे असे तुमच्या म्हणण्याने. \v 8 जेव्हा तुम्ही वेदीवर आंधळे पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? जेव्हा तुम्ही वेदीवर लंगडे वा रोगट पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? हे अर्पण तुम्ही आपल्या राज्यपालांना करून पाहा! ते तुमच्यावर प्रसन्न होतील का? ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \p \v 9 “मग तुम्ही विनंती करता, परमेश्वरा आम्हावर दया करा. पण अशा प्रकारची अर्पणे हातात घेऊन येता, तर ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \p \v 10 “अहा, तुमच्यापैकी कोणीतरी मंदिराची दारे बंद करावी, म्हणजे तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक धूप जाळणार नाही! मी तुमच्यावर मुळीच प्रसन्न नाही, आणि तुमच्या हातातील अर्पणांचा स्वीकार करणार नाही.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \v 11 “जिथून सूर्य उगवतो व जिथे तो मावळतो तिथपर्यंतच्या सर्व राष्ट्रांमध्ये माझे नाम महान केले जाईल. प्रत्येक ठिकाणी माझ्या सन्मानार्थ सुवासिक धूप जाळण्यात येईल व शुद्ध अर्पणे वाहण्यात येतील, कारण माझे नाम सर्व राष्ट्रांमध्ये थोर होईल,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \p \v 12 “ ‘प्रभूचा मेज अशुद्ध आहे’ व ‘त्यावरील अन्न तुच्छ आहे,’ असे सांगून तुम्ही माझे नाम अपवित्र करता. \v 13 ‘किती हे ओझे आहे!’ असे म्हणून तुम्ही त्याकडे घृणेने नाक मुरडता,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \p “जेव्हा तुम्ही जखमी, लंगडे आणि आजारी पशू आणता व ते अर्पणे म्हणून वाहता, मी ते तुमच्या हातून स्वीकारावे काय?” याहवेह असे म्हणतात. \v 14 “प्रभूला आपल्या कळपातील एखादा धष्टपुष्ट मेंढा असूनही व त्याचे अर्पण करण्याचे वचन देऊन, जो आजारी असलेला मेंढा अर्पण करतो, तो लबाड शापित असो. कारण मी परमथोर राजा आहे आणि माझे नाव सर्व देशांमध्ये अत्यंत भयनीय आहे.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \c 2 \s1 याजकांना अतिरिक्त इशारा \p \v 1 “आणि आता, अहो याजकांनो ऐका, हा सावधानतेचा इशारा तुमच्याकरिता आहे. \v 2 जर तुम्ही ऐकले नाही आणि माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवेन आणि तुमच्या आशीर्वादास शाप देईन. होय, मी ते आधीच शापित केले आहेत, कारण तुम्ही माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \p \v 3 “हे लक्षात ठेवा की मी तुमच्या मुलांना धमकावेन\f + \fr 2:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa धान्यावर रोग आणेन\fqa*\f* आणि तुम्ही मला सणासाठी अर्पण म्हणून आणलेल्या पशूंची विष्ठा मी तुमच्या मुखांना फाशीन आणि तुम्हाला तसेच जाऊ देईन. \v 4 आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \v 5 “माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले. \v 6 सत्याचे शिक्षण त्याच्या मुखात होते व त्याच्या जिभेवर काहीही असत्य असे नव्हते. तो माझ्यासह शांती व नीतिमत्तेत चालला आणि त्याने अनेकांना त्यांच्या पापी जीवनापासून वळविले. \p \v 7 “याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात. \v 8 पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \v 9 “म्हणून सर्व लोकांच्या दृष्टीने मी तुम्हाला तिरस्करणीय व तुच्छ केले आहे; कारण तुम्ही स्वतः माझे मार्ग अनुसरले नाहीतच, पण कायद्याबाबत तुम्ही पक्षपात केला.” \s1 घटस्फोटाद्वारे करार मोडणे \p \v 10 आपण सर्व एकाच पित्याची मुले नाही का? आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? मग आपण एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो? \p \v 11 यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे. \v 12 ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको. \p \v 13 दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत. \v 14 तुम्ही विचारता, “का?” कारण याहवेह तुम्ही व तुमच्या तारुण्यातील पत्नी मधील साक्षीदार आहेत. ती तुमची सहचारिणी आहे व तुमच्या वैवाहिक कराराद्वारे तुमची पत्नी आहे, तरीही तुम्ही तिचा विश्वासघात केला. \p \v 15 तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका. \p \v 16 याहवेह इस्राएलाचे परमेश्वर म्हणतात, “जिला संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य आहे, तिच्याविरुद्ध तो हिंसाचार करतो,\f + \fr 2:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa याहवेह म्हणतात, “मला घटस्फोटाचा वीट आहे, कारण जो मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तो आपली वस्त्रे हिंसेने झाकतो”\fqa*\f* तिचा तो तिरस्कार करतो व तिला घटस्फोट देतो.” \p म्हणून सावध राहा व विश्वासघात करू नका. \s1 अन्याय करून करार मोडणे \p \v 17 तुम्ही आपल्या शब्दांनी याहवेहला त्रागा आणला आहे. \p पण तुम्ही विचारता, “आम्ही याहवेहला त्रागा कसा आणला?” \p असे म्हणूनच, “जे सर्व लोक दुष्टता करतात, ते याहवेहच्या दृष्टीने चांगले आहेत व ते त्यांच्यावर प्रसन्न आहेत, मग न्यायी परमेश्वर कुठे आहेत?” \c 3 \p \v 1 “मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \p \v 2 पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल. \v 3 रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील, \v 4 मग पूर्वीच्या दिवसाप्रमाणे आणि गतवर्षासारखे पुन्हा एकदा यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी आणलेली अर्पणे याहवेहस मान्य होतील. \p \v 5 “त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \s1 दशांश देणे \p \v 6 “मी याहवेह बदलत नाहीत. म्हणून तुम्ही, याकोबाचे वंशज नष्ट झाला नाहीत. \v 7 तुमच्या पूर्वजांच्या काळापासून तुम्ही माझ्या विधिनियमापासून दूर जात आहात व त्यांचे पालन करीत नाही. माझ्याकडे पुन्हा या व मी तुमच्याकडे परत येईन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \p “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्याकडे परत कसे यावे?’ \p \v 8 “एखादा मर्त्यमनुष्य परमेश्वराला लुबाडू शकेल काय? तरीही तुम्ही मला लुबाडले आहे. \p “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे लुबाडत आहोत?’ \p “दशांश आणि अर्पणात. \v 9 तुमच्यावर शाप आहे—तुमचे संपूर्ण राष्ट्र—तुम्ही मला लुबाडीत आहात. \v 10 तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या,” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही. \v 11 कीटकांना तुमची पिके नाश करण्यापासून मी रोखेन आणि तुमच्या मळ्यातील द्राक्षे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \v 12 “सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी आनंददायी असेल.” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \s1 इस्राएल याहवेहविरुद्ध उर्मटपणे बोलते \p \v 13 याहवेह म्हणतात, “तुम्ही माझ्याविरुद्ध उर्मटपणे बोलता.” \p “तरी तुम्ही विचारता, ‘तुमच्याविरुद्ध आम्ही काय बोललो?’ \p \v 14 “तुम्ही असे म्हणाला, ‘परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. त्यांचे सर्व विधिनियम पाळण्याने किंवा सर्वसमर्थ याहवेहपुढे शोक करण्याऱ्यासारखे जाण्याने आम्हाला काय मिळते? \v 15 पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ” \s1 विश्वासू अवशिष्ट लोक \p \v 16 मग याहवेहचे भय बाळगणार्‍यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि याहवेहने ती लक्षपूर्वक ऐकली. नंतर याहवेहच्या समक्ष, एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर याहवेहचे भय बाळगणारे व त्यांच्या नावाचा सन्मान करणारे यांच्यासंबंधीची स्मरण पुस्तिका लिहिण्यात आली. \p \v 17 सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “त्या दिवशी मी कृती करेन, ते लोक माझी मौल्यवान संपत्ती होतील; आणि ज्याप्रमाणे एखादा पिता आपली सेवा करणाऱ्या पुत्राची गय करतो, त्याप्रमाणे मी त्यांची गय करेन. \v 18 मग नीतिमान व दुष्ट माणसे, त्याचप्रमाणे परमेश्वराची सेवा करणारे व सेवा न करणारे यातील फरक तुम्हाला दिसून येईल.” \c 4 \s1 न्याय आणि कराराचे नूतनीकरण \p \v 1 सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही. \v 2 परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल. \v 3 जेव्हा मी कार्य करेन, त्या दिवशी तुम्ही दुष्ट लोकांना तुडवाल, ते तुमच्या पायाखालच्या राखेप्रमाणे होतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \p \v 4 “होरेब पर्वतावर माझा सेवक मोशेमार्फत सर्व इस्राएली लोकांसाठी मी जे नियमशास्त्र दिले त्याची आठवण ठेवा. \p \v 5 “पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन. \v 6 तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.”