\id LEV - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h लेवीय \toc1 लेवीयचे पुस्तक \toc2 लेवीय \toc3 लेवी \mt1 लेवीयचे पुस्तक \c 1 \s1 होमार्पण \p \v 1 याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा तुमच्यामधील कोणी याहवेहसाठी अर्पण आणतील, तेव्हा तुमच्या गुरांमधील किंवा कळपातील प्राण्यांचे अर्पण आणावे. \p \v 3 “ ‘जर हे होमार्पण गुरांमधून करावयाचे असेल, तर निर्दोष असलेला नरगोर्‍हा तुम्ही अर्पण करावा. तुम्ही ते सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणावे, म्हणजे ते याहवेहद्वारे मान्य केले जाईल. \v 4 तुम्ही तुमचे हात त्या होमार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि प्रायश्चित्त म्हणून तुमच्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वीकारले जाईल. \v 5 तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील. \v 6 तुम्ही यज्ञपशूची कातडी काढावी आणि पशूचे कापून तुकडे करावे. \v 7 अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, त्यांनी वेदीवर अग्नी ठेवावा आणि अग्नीवर लाकडांची रचना करावी. \v 8 नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी. \v 9 पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. \p \v 10 “ ‘जर हे होमार्पण कळपातून आणलेले, मेंढी किंवा शेळी असेल तर तुम्ही दोष नसलेल्या नराचे अर्पण करावे. \v 11 तुम्ही याहवेहसमोर वेदीच्या उत्तर दिशेला त्या प्राण्याचा वध करावा आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. \v 12 मग त्या पशूचे कापून तुकडे करावेत आणि याजकाने शिर व चरबी यासह ते तुकडे वेदीवरील लाकडांवर ठेवावे. \v 13 त्याची आतडी आणि पाय तुम्ही पाण्याने धुऊन घ्यावीत आणि याजकाने हे सर्व घेऊन यावे आणि त्यांचा वेदीवर होम करावा. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. \p \v 14 “ ‘जर याहवेहसाठी पक्ष्यांचे होमार्पण म्हणून अर्पण असेल तर त्याने पारवा किंवा कबुतराची पिल्ले अर्पण करावी. \v 15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून काढावे आणि त्याचे वेदीवर होम करावे; त्याचे रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावे. \v 16 त्याने त्या पक्ष्याची चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकावयाच्या जागी फेकून द्यावी. \v 17 तो त्याला पंखांच्या मधोमध फाडेल, त्याचे पूर्णपणे तुकडे करणार नाही आणि नंतर याजक त्याचे वेदीवरील जळत्या लाकडांवर होमार्पण करेल. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. \c 2 \s1 धान्यार्पण \p \v 1 “ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा. \v 2 आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांच्याकडे ते आणावे. याजक मूठभर पीठ आणि तेल घेतील, त्याचबरोबर सर्व धूप स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर एकत्र जाळतील, हे अन्नार्पण, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. \v 3 अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे. \p \v 4 “ ‘जर तुम्ही भट्टीत भाजलेले अन्नार्पण आणता, तर ते उत्तम पिठाचे असावे: बेखमीर जाड भाकरी आणि जैतुनाच्या तेलात मळलेल्या किंवा पातळ बेखमीर भाकरी आणि वर जैतुनाचे तेल लावलेले असे असावे. \v 5 जर तुमचे अन्नार्पण तव्यावर भाजलेले असेल तर ते उत्तम पिठापासून तयार केलेले तेलात मिसळलेले आणि बेखमीर असे असावे. \v 6 तिचा भुगा करावा आणि त्यावर तेल ओतावे; हे धान्यार्पण आहे. \v 7 जर तुमचे धान्यार्पण भांड्यात शिजविलेले असेल, तर ते उत्तम पिठाचे आणि थोडेसे जैतुनाचे तेल वापरून तयार केलेले असावे. \v 8 याहवेहला अर्पण करण्याचे अशा प्रकारच्या वस्तूंनी बनविलेले धान्यार्पण तुम्ही याजकास आणून द्यावे व त्याने ते वेदीवर ठेवावे. \v 9 स्मरणभाग म्हणून याजक ते अन्नार्पणातून काढून ठेवेल आणि याहवेहला प्रसन्न करणारे सुवासिक अन्नार्पण म्हणून वेदीवर त्याचे हवन करेल. \v 10 अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे. \p \v 11 “ ‘याहवेहसाठी आणले जाणारे प्रत्येक अन्नार्पण हे खमीर न घालता तयार करावे, तुम्ही याहवेहसाठी आणलेल्या अन्नार्पणात खमीर किंवा मध जाळू नये. \v 12 तुम्ही त्यांना प्रथमफळाचे अर्पण म्हणून याहवेहकडे आणू शकता, परंतु ते वेदीवर प्रसन्न करणारे सुवासिक अर्पण म्हणून करू नये. \v 13 प्रत्येक अर्पण मीठ घालून रुचकर करावे, कारण तुमच्या परमेश्वराबरोबर झालेल्या कराराचे मीठ तुमच्या अन्नार्पणात असलेच पाहिजे. \p \v 14 “ ‘जर तुम्ही याहवेहसाठी प्रथम पिकाचे धान्यार्पण आणले, तर नवीन कणसाला चिरडून भाजलेल्या दाण्याचे अर्पण करावे. \v 15 त्यावर जैतुनाचे तेल व धूप ठेवावे; ते धान्यार्पण आहे. \v 16 याजकाने त्या चिरडलेल्या धान्याचा आणि तेलाचा स्मरणभाग, सर्व धूपांबरोबर एकत्र जाळावा, याहवेहसाठी अर्पण असे हे एक अन्नार्पण असावे. \c 3 \s1 शांत्यर्पण \p \v 1 “ ‘जर तुमचे अर्पण हे शांत्यर्पण असेल आणि तुम्ही कळपातील नर किंवा मादी प्राण्याचे अर्पण करीत असाल, तुम्ही निर्दोष असा प्राणी याहवेहसमोर आणावा. \v 2 तुम्ही तुमचा हात त्या अर्पणाच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारात त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत, त्यांनी वेदीच्या भोवती त्याचे रक्त शिंपडावे. \v 3 शांत्यर्पणातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण आणावे: अंतर्गत अवयव आणि त्यांना जोडून असलेली सर्व चरबी, \v 4 कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल. \v 5 नंतर अहरोनाच्या पुत्रांनी जळत्या लाकडावर असलेल्या होमार्पणावरील वेदीवर त्याचे हवन करावे. हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. \p \v 6 “ ‘परंतु शांत्यर्पणाचे अर्पण म्हणून शेरडामेंढरांतील नर किंवा मादी यांचे याहवेहला अर्पण करावयाचे असेल तर तो पशू निर्दोष असावा. \v 7 जर तुम्ही कोकर्‍याचे अर्पण करीत असाल तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे, \v 8 तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त अर्पण म्हणून वेदीच्या भोवती शिंपडतील. \v 9 शांत्यर्पणातून जे अन्नार्पण तुम्ही याहवेहसाठी आणावयाचे ते हे: त्याची चरबी, पाठीच्या हाडाजवळून कापलेली संपूर्ण चरबीदार शेपटी, आतील अवयव आणि त्याला जोडून असलेली सर्व चरबी, \v 10 कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग. \v 11 याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून याजक या सर्वाचे वेदीवर हवन करेल. \p \v 12 “ ‘जर तुमचे अर्पण बोकड असेल, तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे, \v 13 तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त वेदीच्या भोवती शिंपडतील. \v 14 जे काही अर्पण तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून आणता ते अशाप्रकारे असावे: आतील अवयव आणि आतड्यांवरील सर्व चरबी, \v 15 कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग. \v 16 याजक त्यांचे अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करतील, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. सर्व चरबी याहवेहसाठी आहे. \p \v 17 “ ‘भावी पिढीसाठी हे विधी सर्वकाळासाठी आहेत, जिथे कुठे तुम्ही राहाल: तुम्ही कोणतीही चरबी किंवा कोणतेही रक्त सेवन करू नये.’ ” \c 4 \s1 पापार्पण \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले: \v 2 “इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.” \p \v 3 एखाद्या अभिषिक्त याजकाकडून अजाणतेने घडलेल्या पापामुळे लोकांवर दोष आला, तर पापार्पण\f + \fr 4:3 \fr*\ft किंवा शुद्धीकरणाचे अर्पण\ft*\f* म्हणून याहवेहला त्याने एक निर्दोष गोर्‍हा अर्पण करावा. \v 4 त्याने तो गोर्‍हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा. \v 5 मग अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे थोडे रक्त सभामंडपामध्ये नेऊन त्यात आपली बोटे बुडवून \v 6 याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्‍या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे. \v 7 नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्‍ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे. \v 8 नंतर पापार्पणाच्या गोर्‍ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, \v 9 दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे. \v 10 शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्‍ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे. \v 11 परंतु त्या गोर्‍ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस तसेच डोके आणि पाय, आतील अवयव आणि आतडी, \v 12 त्या गोर्‍ह्याचे राहिलेले सर्व भाग, छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी, राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडांच्या विस्तवावर जाळून टाकावेत. \p \v 13 जर संपूर्ण इस्राएली लोकांकडून अजाणतेने पाप घडले, आणि याहवेहनी निषिद्ध केलेल्यापैकी एखादी गोष्ट केली, ते केलेले जरी समुदायाला माहीत नसेल, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक समजून येईल, \v 14 आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्‍हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा. \v 15 तिथे इस्राएली समुदायातील पुढार्‍यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्‍ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा. \v 16 नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे. \v 17 याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे. \v 18 त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे. \v 19 त्याने त्यावरील सर्व चरबी काढावी आणि तिचे वेदीवर होम करावे. \v 20 पापार्पणाच्या गोर्‍ह्यासंबंधीच्या विधीप्रमाणेच त्याने या गोर्‍ह्याचेही करावे. अशा प्रकारे याजकाने संपूर्ण समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल. \v 21 नंतर तो गोर्‍हा वस्तीबाहेर काढून, जसा पहिला गोर्‍हा त्याने जाळून टाकला तसाच हा गोर्‍हा जाळून टाकावा. समुदायासाठी हे पापार्पण आहे. \p \v 22 जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो, \v 23 ज्यावेळी त्याला हे पाप कळून येईल तेव्हा त्याने एका निर्दोष बोकडाचे अर्पण आणावे. \v 24 त्याने त्या बोकडाच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व होमार्पणाच्या स्थळी त्याचा वध करून तो याहवेहला अर्पावा. हे त्याचे पापार्पण होय. \v 25 मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे. \v 26 शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्‍याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल. \p \v 27 समुदायातील सामान्य मनुष्याने चुकून पाप केले व याहवेहने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे ते दोषी ठरले, \v 28 पण जेव्हा ते त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा त्यांनी आपल्या पापाबद्दल प्रायश्चिताचे अर्पण म्हणून एक निर्दोष शेळी आणावी. \v 29 त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा. \v 30 याजकाने आपल्या बोटांनी काही रक्त घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतावे. \v 31 मग सर्व चरबी काढून शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने तिचा याहवेहसाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशाप्रकारे याजकाने त्या व्यक्तीसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. \p \v 32 जर कोणी पापार्पणासाठी अर्पण म्हणून एखादे कोकरू घेऊन येतो, तर ती एक निर्दोष मादी असावी. \v 33 होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा. \v 34 “नंतर याजकाने पापार्पणाच्या रक्तातील काही रक्त बोटांनी घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे, व राहिलेले सर्व रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.” \v 35 शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीचा उपयोग करतात, तसा या चरबीचा उपयोग करावा. याजकाने सर्व चरबी काढून तिचे वेदीवर याहवेहसमोर होम करावे. अशाप्रकारे याजक त्या व्यक्तींसाठी प्रायश्चित करेल, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल. \c 5 \p \v 1 जर पाहिलेल्या किंवा माहीत झालेल्या गोष्टींबद्दल साक्ष देण्यासाठी सार्वजनिकरित्या केलेला आरोप जे ऐकतात पण काही बोलत नाहीत, तर ते पाप करतात, त्यांना जबाबदार धरले जाईल. \p \v 2 एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे. \v 3 कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास; \v 4 किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल. \v 5 जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे, \v 6 आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे. \p \v 7 परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी. \v 8 त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये. \v 9 नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय. \v 10 दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल. \p \v 11 “जर होले किंवा पारव्याची पिल्ले आणण्याइतकीही त्याची ऐपत नसेल, तर त्याने एफाचा दहावा भाग\f + \fr 5:11 \fr*\ft अंदाजे 1.6 कि.ग्रॅ.\ft*\f* उत्तम पीठ आणावे. ते पापार्पण असल्यामुळे त्याने ते जैतुनाच्या तेलात मिश्रित करू नये किंवा त्यावर धूपही ठेवू नये. \v 12 त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातील मूठभर पीठ घेऊन संपूर्ण पापार्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून याहवेहला इतर अर्पणांचा होम करतात तसे त्याचे वेदीवर होम करावे. हे त्याच्यावतीने पापार्पण होय. \v 13 अशारितीने याजकाने त्यांच्या अशा प्रकारच्या कोणत्याही पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. अन्नार्पणासंबंधी सांगितल्याप्रमाणे, पापार्पणाचे उरलेले पीठ याजकाचे होईल.” \s1 दोषार्पणे \p \v 14 याहवेह मोशेला म्हणाले: \v 15 “याहवेहशी अविश्वासूपणा करून त्यांची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला, तर त्याने दोषार्पण म्हणून, तू ठरवशील तितक्या निवासमंडपातील चांदीच्या शेकेलांच्या\f + \fr 5:15 \fr*\ft अंदाजे 12 ग्रॅ.\ft*\f* ठरलेल्या किमतीचा एक निर्दोष मेंढा आणावा. \v 16 पवित्र वस्तू दूषित करून त्यांनी जे पाप केले त्याची ते भरपाई करतील. त्यांनी भरपाईची रक्कम देऊन वर वीस टक्के अधिक दंड द्यावा. त्यांनी दोषार्पणाचा एक मेंढा याजकाकडे आणावा आणि याजक त्यांच्यासाठी तो मेंढा अर्पून प्रायश्चित्त करेल व त्यांची क्षमा होईल. \p \v 17 “अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील. \v 18 त्यांनी निर्दोष मेंढा याजकाकडे न्यावा, तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा, म्हणजे याजक तो मेंढा अर्पून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त करेल, आणि अजाणतेने घडलेल्या पापाबद्दल त्यांची क्षमा होईल. \v 19 हे दोषार्पण आहे, याहवेहविरुद्ध चुकीची गोष्ट केल्याने ते दोषी ठरले आहेत.” \c 6 \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले: \v 2 “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्‍याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो \v 3 किंवा जर कोणाला हरवलेली वस्तू सापडली आणि त्याबद्दल ते खोटे बोलतील आणि तिच्याविषयी खोटी शपथ वाहतील किंवा जर लोकांनी केलेल्या अशा पापाबद्दल ते खोटे बोलतील, \v 4 अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी— \v 5 किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा. \v 6 आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा. \v 7 याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.” \s1 होमार्पणे \p \v 8 याहवेह मोशेला म्हणाले, \v 9 “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना अशी आज्ञा कर, होमार्पणासाठी पाळावयाचे नियम हे आहेत: होमार्पण रात्रभर वेदीवर ठेवून ते सकाळपर्यंत राहू द्यावे आणि त्या वेदीवरील अग्नी जळत ठेवावा. \v 10 नंतर याजकाने त्याची तागमिश्रित वस्त्रे, त्याचबरोबर त्याची अंतर्वस्त्रे अंगावर घालावी आणि वेदीवरील अग्नीत भस्म झालेली होमार्पणाची राख काढावी आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी. \v 11 मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी. \v 12 वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा, तो विझू देऊ नये. तो पेटलेला ठेवण्यासाठी याजकाने रोज सकाळी वेदीवर लाकडे ठेवावी व त्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या चरबीचे हवन करावे. \v 13 वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा; तो कधीही विझू देऊ नये. \s1 अन्नार्पणे \p \v 14 “अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे. \v 15 मग याजकांनी सुगंधी मसाले व जैतुनाचे तेल व धूप घ्यावा आणि मळलेला अन्नार्पणातील मूठभर सपीठ घ्यावे व संपूर्ण अर्पणाचा स्मरणभाग म्हणून वेदीवर त्याचे हवन करावे. हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असेल. \v 16 उर्वरित भाग अहरोन आणि त्याचे पुत्र खातील, परंतु त्यांनी ते खमीर न घालता पवित्रस्थानात खावे; त्यांनी ते सभामंडपाच्या अंगणात खावे. \v 17 तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे. \v 18 अहरोनाच्या संतानांतील फक्त पुरुषांनी ते खावे आणि याहवेहला अर्पिलेला अन्नार्पणाचा हा भाग त्यांच्यासाठी पिढ्यान् पिढ्या कायमचा वाटा राहावा. जे कोणी यास स्पर्श करतील, ते पवित्र\f + \fr 6:18 \fr*\ft त्याने पवित्र असणे गरजेचे आहे\ft*\f* गणले जातील.” \p \v 19 याहवेह मोशेला हे देखील म्हणाले, \v 20 “ज्या दिवशी अहरोन व त्याच्या पुत्रांचा याजकीय सेवेसाठी अभिषेक होईल, त्या दिवशी त्यांनी एफाचा दहावा हिस्सा\f + \fr 6:20 \fr*\ft अर्थात् 1.6 कि.ग्रॅ.\ft*\f* उत्तम सपीठ, अर्धे सकाळी व अर्धे सायंकाळी, अन्नार्पण म्हणून नेमाने याहवेहला अर्पावे. \v 21 ते अन्नार्पण तव्यावर तेलात चांगले परतावे आणि मग याहवेहला अर्पण म्हणून आणावे, कारण हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असे अर्पण आहे. \v 22 त्याच्या पुत्रांपैकी जो पुत्र त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून नियुक्त होईल तो ते तयार करेल. याहवेहचा हा वाटा सर्वकाळचा आहे आणि तो पूर्णपणे जाळून टाकावा. \v 23 याजकाचे प्रत्येक धान्यार्पण पूर्णपणे जाळून टाकले जाईल; ते खाऊ नये.” \s1 पापार्पणे \p \v 24 याहवेह मोशेला म्हणाले, \v 25 “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे. \v 26 ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे. \v 27 जे काही या मांसाला स्पर्श करेल ते पवित्र होईल आणि जर काही रक्त वस्त्रावर उडाले असेल, तर ते तुम्ही पवित्रस्थानी धुवावे. \v 28 ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. \v 29 याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे. \v 30 परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.” \c 7 \s1 दोषार्पणे \p \v 1 “दोषार्पण जे परमपवित्र आहे त्यासंबंधी जे नियम आहेत ते हे: \v 2 ज्या स्थळी होमार्पणाचे यज्ञपशू मारले जातात, त्याच निर्धारित स्थळी दोषार्पणाच्या यज्ञपशूचा वध करावा आणि त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. \v 3 मग याजकाने त्याची सर्व चरबी: चरबीदार शेपूट, आतड्यावरील चरबी, \v 4 कंबरेजवळील चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग तुम्ही गुरद्यासह काढून टाकावे. \v 5 आणि याजकाने या सर्वांचे याहवेहला अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करावे. हे दोषार्पण होय. \v 6 याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला हा बली खाण्याचा अधिकार असून त्यांनी तो बली पवित्रस्थानातच बसून खावा; कारण हे परमपवित्र आहे. \p \v 7 “पापार्पणासारखेच दोषार्पण आहे; त्या दोघांचे नियम सारखेच आहेत. अर्पिलेला हा बली प्रायश्चित्तविधी करणार्‍या याजकाच्याच अधिकाराचा होईल. \v 8 जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल. \v 9 भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्‍या याजकाचे होईल, \v 10 अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.” \s1 शांत्यर्पण \p \v 11 “याहवेहसाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा: \p \v 12 “उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात. \v 13 उपकारस्तुतीच्या या शांत्यर्पणासह खमीर घालून केलेल्या जाड भाकरींचेही अर्पण करावे. \v 14 या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल. \v 15 उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये. \p \v 16 “परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्‍या दिवशी खाण्यास हरकत नाही. \v 17 अर्पणातील काही मांस तिसर्‍या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे. \v 18 शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्‍या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल. \p \v 19 “ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो. \v 20 परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे. \v 21 जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्‍या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ” \s1 चरबी व रक्ताचे सेवन निषिद्ध \p \v 22 याहवेह मोशेला म्हणाले, \v 23 “इस्राएली लोकांस सांग: तुम्ही बैलांची, मेंढरांची किंवा शेळ्यांची चरबी खाऊ नये. \v 24 मेलेल्या प्राण्याची चरबी किंवा हिंस्त्र श्वापदाने फाडलेल्या प्राण्याची चरबी सापडली तर ती इतर कामासाठी वापरता येईल, परंतु तुम्ही ती खाऊ नये. \v 25 याहवेहला केलेल्या होमार्पणातील चरबी जो कोणी खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा. \v 26 जिथे कुठे तुम्ही राहाल, पशूचे किंवा पक्ष्याच्या रक्ताचे केव्हाही सेवन करू नये. \v 27 जो कोणी ते खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.” \s1 याजकाचा वाटा \p \v 28 याहवेह मोशेला म्हणाले, \v 29 इस्राएली लोकांस सांग: जो कोणी याहवेहसाठी शांत्यर्पण आणेल, त्याने त्याचा काही भाग याहवेहला अर्पणासाठी वेगळा आणावा. \v 30 त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे. \v 31 मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल. \v 32 तू त्याची उजवी मांडी शांत्यर्पणाचा भाग म्हणून याजकास द्यावी. \v 33 अहरोनाच्या पुत्रांपैकी जो शांत्यर्पणातील रक्त व चरबी अर्पण करेल, त्याला त्याचा वाटा म्हणून उजवी मांडी देण्यात यावी. \v 34 कारण ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही इस्राएली लोकांतर्फे याजक अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिली आहेत. शांत्यर्पणाचा हा भाग त्यांचा सर्वकाळचा वाटा म्हणून देण्यात यावा. \p \v 35 होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे. \v 36 कारण याहवेहनी त्यांचा अभिषेक केला, त्याच दिवशी त्यांनी इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, त्यांनी हा सर्वकाळचा वाटा त्या वंशाला पिढ्यान् पिढ्या द्यावा. \p \v 37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत. \v 38 याहवेहनी हे नियम सीनाय पर्वतावर मोशेला दिले. सीनायच्या रानात इस्राएली लोकांना याहवेहप्रीत्यर्थ कोणती अर्पणे आणावी म्हणून मोशेला हे नियम देण्यात आले. \c 8 \s1 अहरोन आणि त्याच्या पुत्रांचा अभिषेक \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना, त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणासाठी एक गोर्‍हा, दोन मेंढे आणि टोपलीभर बेखमीर भाकरी घेऊन ये, \v 3 आणि सर्व लोकांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र कर.” \v 4 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि सर्व लोक सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले. \p \v 5 तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.” \v 6 नंतर मोशेने अहरोन आणि त्याच्या पुत्रांना पुढे आणले आणि त्यांना पाण्याने आंघोळ घातली. \v 7 त्याने अहरोनास अंगरखा घातला, कंबरपट्टा कसला, झगा घातला, झग्यावर एफोद घातले, एफोदावर सुशोभित केलेला कमरबंद त्याच्या सभोवती बांधला. \v 8 नंतर त्याने अहरोनाला ऊरस्त्राण घातले व त्यात उरीम व थुम्मीम ठेवले. \v 9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा बांधला. त्या फेट्याच्या पुढील भागी सोन्याची एक पट्टी म्हणजे पवित्र मुद्रा जोडली, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले. \p \v 10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली. \v 11 काही तेल त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले; वेदी आणि त्यावरील सर्व उपकरणे, हात धुण्याचे भांडे व त्याची बैठक पवित्र करण्यासाठी त्याने ते तेल त्यांच्यावरही शिंपडले. \v 12 मग त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र केले. \v 13 मग मोशेने अहरोनाच्या पुत्रांना पुढे आणले, त्यांना झगे घातले, कमरपट्टे कसले व फेटे बांधले, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले. \p \v 14 मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्‍हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. \v 15 मग मोशेने त्या गोर्‍ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्‍ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली. \v 16 मोशेने आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ, दोन्ही गुरदे काढून घेऊन तिचे वेदीवर हवन केले. \v 17 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्‍हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले. \p \v 18 नंतर त्याने होमार्पणासाठी एक मेंढा घेतला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. \v 19 नंतर मोशेने त्याचा वध केला आणि त्या मेंढ्याचे रक्त वेदीभोवती शिंपडले. \v 20 मग मोशेने तो मेंढा कापून त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांसह डोके व चरबी यांचा होम केला. \v 21 त्याची आतडी व खूर पाण्याने धुऊन त्याने संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम केले. हे होमार्पण आहे. ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे, जसे याहवेहने मोशेला आज्ञा केली होती. \p \v 22 मग मोशेने दुसरा मेंढा, अर्थात् समर्पणाचा मेंढा घेतला व अहरोन व त्याच्या पुत्रांनी मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. \v 23 मग मोशेने त्याचा वध केला व त्याचे काही रक्त घेऊन ते अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला व उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले. \v 24 नंतर मोशेने काही रक्त अहरोनाच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळ्यांना व उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले. उर्वरित सर्व रक्त त्याने वेदीभोवती शिंपडले. \v 25 मग त्याने सर्व चरबी आणि चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाची लांब पाळ व उजवी मांडी ही घेतली. \v 26 आणि बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर होती त्यातून त्याने एक जाड भाकर, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घेतली, आणि त्याने ते सर्व चरबीच्या भागावर आणि उजव्या मांडीवर ठेवले. \v 27 त्याने हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवले आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी केली. \v 28 नंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातातून घेतले आणि ते वेदीवर होमार्पणासहित समर्पणाचे अर्पण म्हणून सादर केले, हा याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण होते. \v 29 मग मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेतला, हा समर्पणाच्या गोर्‍ह्याचा त्याचा स्वतःचा वाटा होता, तो त्याने ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळले. याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले. \p \v 30 नंतर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या पुत्रांवर व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडले. अशारितीने मोशेने अहरोन व त्याचे पुत्र यांना याहवेहच्या सेवेसाठी पवित्र केले. \p \v 31 मग मोशे, अहरोन व त्याच्या पुत्रांना म्हणाला, “मी तुम्हाला आज्ञा दिली होती त्याप्रमाणे, सभामंडपाच्या प्रवेशद्वारात मांस शिजवा व ते मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावे. \v 32 उरलेले मांस व भाकरी मात्र अग्नीत जाळून टाका. \v 33 मग सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही सभामंडपाच्या द्वाराबाहेर जाऊ नका, कारण तुमचा समर्पणविधी सात दिवसाचा आहे. \v 34 आज जो विधी करण्यात आला तो तुमच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे करण्यात आला. \v 35 शिवाय, सात दिवस सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रंदिवस राहून, याहवेहने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने तुम्ही मरणार नाही, कारण मला अशी आज्ञा देण्यात आली आहे.” \p \v 36 तेव्हा अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी ते सर्वकाही केले जे करण्याची आज्ञा याहवेहनी मोशेद्वारे त्यांना दिली होती. \c 9 \s1 याजकांच्या सेवेचा प्रारंभ \p \v 1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन आणि त्याचे पुत्र व इस्राएलच्या पुढाऱ्यांना बोलाविले. \v 2 तो अहरोनाला म्हणाला, “तुझ्या पापार्पणासाठी व्यंग नसलेला एक गोर्‍हा व होमार्पणासाठी व्यंग नसलेला एक मेंढा घेऊन याहवेहसमोर अर्पण कर. \v 3 मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत, \v 4 आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्‍हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.” \p \v 5 म्हणून मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सभामंडपापुढे सर्वकाही आणले आणि संपूर्ण मंडळी याहवेहसमोर येऊन उभी राहिली. \v 6 तेव्हा मोशे म्हणाला, “हे करण्याची आज्ञा तुम्हाला याहवेहनी दिली आहे, जेणेकरून याहवेहचे गौरव तुम्हाला प्रकट व्हावे.” \p \v 7 मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ ये आणि तुझे पापार्पण आणि तुझे होमार्पण यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर; लोकांसाठी बलीचे अर्पण कर आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, याहवेहने आज्ञा दिली त्याप्रमाणे ते कर.” \p \v 8 तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला आणि त्याने स्वतःच्या पापासाठी गोर्‍ह्याचा वध केला. \v 9 मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्‍ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले. \v 10 याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला. \v 11 कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले. \p \v 12 मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले. \v 13 मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला. \v 14 त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला. \p \v 15 मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला. \p \v 16 नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले. \v 17 मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले. \p \v 18 यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले. \v 19 परंतु त्याने गोर्‍ह्याची व मेंढ्याची चरबी, म्हणजे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा \v 20 त्या बलींच्या उरांवर ठेवली, मग अहरोनाने त्या सर्वांचा वेदीवर होम केला. \v 21 मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले. \p \v 22 मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला. \p \v 23 नंतर मोशे व अहरोन सभामंडपात गेले. ते परत बाहेर आले, तेव्हा त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला आणि याहवेहचे वैभव सर्वांना प्रकट झाले. \v 24 याहवेहपासून अग्नी येऊन त्याने वेदीवरील होमार्पण व चरबीही भस्म केली. जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने जयजयकार केला आणि जमिनीवर लोटांगण घातले. \c 10 \s1 नादाब व अबीहू यांचा मृत्यू \p \v 1 अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते. \v 2 म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले. \v 3 तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: \q1 “ ‘जे माझ्याजवळ येतात \q2 त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; \q1 सर्व लोकांसमक्ष \q2 माझे गौरव होईल.’ ” \m यावर अहरोन शांत राहिला. \p \v 4 मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.” \v 5 तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी जाऊन ती उचलली आणि त्यांच्या अंगरख्यांसह ती बाहेर नेली. \p \v 6 मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका\f + \fr 10:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमचे डोके झाकलेले ठेवा\fqa*\f* व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील. \v 7 सभामंडपाचे प्रवेशद्वार सोडू नका, नाही तर तुम्ही मराल, कारण याहवेहच्या अभिषेकाचे तेल तुम्हावर आहे.” तेव्हा त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे केले. \p \v 8 मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली, \v 9 “तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे, \v 10 यासाठी की पवित्र व अपवित्र, शुद्ध व अशुद्ध यातील भेद तुला कळेल. \v 11 आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.” \p \v 12 अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे. \v 13 ते तुम्ही पवित्रस्थानी बसून खावे, कारण याहवेहला अर्पण केलेल्या यज्ञपशूचा तो भाग तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी ठरलेला वाटा आहे; कारण मला तशी आज्ञा देण्यात आली आहे. \v 14 परंतु अर्पण केलेला ऊर व समर्पित केलेली मांडी मात्र तुम्ही कोणत्याही विधिनियमानुसार शुद्ध केलेल्या जागी बसून खावी. इस्राएली लोकांनी अर्पिलेल्या शांत्यर्पणाचा हा भाग तुमचे पुत्र व कन्या यांच्यासाठी आहे. \v 15 मग मोशे पुढे म्हणाला, मांडी व ऊर दोन्ही चरबीसह याहवेहसमोर आणावी व ती झोके देऊन परमेश्वराला अर्पण करावी. याहवेहनी आज्ञा दिल्याप्रमाणे हे सर्व भाग सर्वकाळ तुमच्या व तुमच्या मुलांचा वाटा समजावे.” \p \v 16 जेव्हा मोशेने पापार्पणाच्या बोकडाचा शोध घेतला, तेव्हा त्याला समजले की तो जाळून टाकण्यात आला आहे. तेव्हा अहरोनाचे बाकी असलेले पुत्र एलअज़ार व इथामार यांच्यावर तो संतापला. \v 17 “तुम्ही पापबली पवित्रस्थानात का खाल्ला नाही? ते परमपवित्र आहे; आणि समुदायाची पापे दूर करण्यासाठी आणि याहवेहसमोर त्यांच्याकरिता प्रायश्चित्त करण्यासाठी याहवेहने ते तुम्हाला दिले आहे. \v 18 पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानात आणले नव्हते, म्हणून माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही तो पवित्रस्थानात खावयाचा होता.” \p \v 19 तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?” \v 20 हे ऐकल्यावर मोशेचे समाधान झाले. \c 11 \s1 शुद्ध व अशुद्ध अन्न \p \v 1 याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता. \v 3 ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता. \p \v 4 “जे प्राणी फक्त रवंथ करतात किंवा त्यांचे फक्त खूर दुभागलेले आहेत, ते तुम्ही खाऊ नयेत. उंट जरी रवंथ करतात तरी त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत. \v 5 रानससा जरी रवंथ करतो तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. \v 6 ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. \v 7 डुकरे देखील अशुद्ध आहेत; जरी त्यांचे दुभागलेले खूर आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत. \v 8 त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत. \p \v 9 “समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता. \v 10 पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत. \v 11 तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये. \v 12 ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे. \p \v 13 “जे पक्षी तुम्ही अशुद्ध समजावेत आणि ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते अशुद्ध आहेत ते हे: गरुड, गिधाड, काळे गिधाड, \v 14 लाल पतंग, कोणत्याही जातीचे काळे पतंग, \v 15 कोणत्याही जातीचे कावळे, \v 16 शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे, \v 17 लहान घुबड, करढोक, मोठे घुबड, \v 18 पांढरे घुबड, वाळवंटी घुबड, कुरर, \v 19 करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.” \p \v 20 चार पाय असलेले उडणारे कीटक तुम्ही खाऊ नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध समजले जातात. \v 21 तरीसुद्धा उडणारे कीटक, जे त्यांच्या चारही पायांवर चालतातः जमिनीवर उड्या मारण्याकरिता ज्यांच्या पायांवर एकजोड असतो, ते तुम्ही खाऊ शकता. \v 22 उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत. \v 23 मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत. \p \v 24 वर उल्लेखलेल्या प्राण्यांमुळे तुम्ही अशुद्ध व्हाल, जो कोणी त्यांच्या मृतशरीराना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \v 25 जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील. \p \v 26 ज्या प्राण्यांचे खूर अर्धवट दुभागलेले आहेत किंवा जे प्राणी रवंथ करीत नाहीत, अशा प्राण्यांच्या मृतशरीरांना तुम्ही स्पर्श केलात, तर तुम्ही अशुद्ध व्हाल. \v 27 पंजांवर चालणारा प्रत्येक प्राणी खाण्यास तुम्हाला मनाई आहे. अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. \v 28 जो कोणी त्याचे मृतदेह उचलून नेईल त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. तो प्राणी तुम्ही अशुद्ध समजावा. \p \v 29 जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे, \v 30 घोरपड, घुशी, पाल, मगर, गोगलगाय व गुहिर्‍या सरडा. \v 31 जमिनीवर सरपटणार्‍यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. \v 32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; काष्ठपात्रे, वस्त्रे, कातडे, गोणपाट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; नंतर ते शुद्ध होईल. \v 33 त्यापैकी एखादा प्राणी मातीच्या पात्रात पडला, तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे. \v 34 अशाप्रकारे अशुद्ध झालेली वस्तू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा जर एखाद्या पदार्थाला स्पर्श झाला, तर ते सर्व अशुद्ध समजावे. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध आहे. \v 35 अशा प्राण्यांच्या मृत शरीराचा स्पर्श चुलीला किंवा एखाद्या भांड्याला झाला तर ते अशुद्ध होय. अशा अशुद्ध चुलीचा व भांड्याचा नाश करावा. \v 36 जर एखाद्या प्राण्याचे मृतदेह पाणी असलेल्या एखाद्या झर्‍यात किंवा हौदात पडले, तरी ते पाणी शुद्धच राहते. तरीपण जो त्या मृत शरीराला स्पर्श करेल त्याला अशुद्ध समजावे. \v 37 जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते; \v 38 पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत. \p \v 39 तुम्हाला खाण्यास मोकळीक असलेला प्राणी आजारी पडून मेला, तर अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो कोणी स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \v 40 त्याचप्रमाणे जो कोणी त्या प्राण्याचे मांस खाईल किंवा त्याचे मृतदेह वाहून नेईल, त्याने आपली वस्त्रे धुवावीत; तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 41 जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत. ते खाऊ नयेत. \v 42 जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत. \v 43 झुंडीने राहणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करून तुम्ही अशुद्ध होऊ नये. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका. \v 44 मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये. \v 45 मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. \p \v 46 “पशू, पक्षी, प्रत्येक जलचर आणि प्रत्येक प्राणी जे जमिनीवर सरपटणारे आहेत त्यांच्यासंबंधी हे नियम आहेत. \v 47 शुद्ध व अशुद्ध प्राणी तुम्ही खावे वा खाऊ नये यामधील फरक दाखविण्यासाठी हे नियम आहेत.” \c 12 \s1 प्रसूतीनंतर शुध्दीकरणाविषयी नियम \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांना सांग: एखादी स्त्री गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाल्यास, ती आई विधीनियमाप्रमाणे सात दिवस अशुद्ध राहील. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते, तशीच ती अशुद्ध समजावी. \v 3 आठव्या दिवशी तिच्या पुत्राची सुंता करावी. \v 4 नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्‍या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये. \v 5 जर ती कन्येला जन्म देईल, तर ती स्त्री जशी तिच्या मासिक पाळीच्या वेळेस अशुद्ध राहते तशी ती चौदा दिवस अशुद्ध राहील. नंतर रक्तस्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तिने सहासष्ट दिवस वाट पाहावी.” \p \v 6 हे शुद्ध होण्याचे दिवस संपल्यानंतर तिला पुत्र झालेला असो की कन्या, तिला पुढील नियम लागू आहेत: तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरू आणावे व पापार्पणासाठी होला किंवा पारव्याचे पिलू सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे घेऊन जावे. \v 7 याजक याहवेहला ते अर्पण करून तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे बाळंतपणात होणार्‍या रक्तस्त्रावापासून ती विधिपूर्वक शुद्ध होईल. \p पुत्र किंवा कन्या झालेल्या स्त्री विषयी हा विधिनियम आहे. \v 8 जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल. \c 13 \s1 त्वचेच्या रोगासंबंधी नियम \p \v 1 याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, \v 2 “जेव्हा एखाद्या मनुष्याच्या त्वचेवर सूज, पुरळ किंवा पुटकुळी आली आणि त्यामुळे त्याची त्वचा पांढरी झाली असली, तो कुष्ठरोगाचा चट्टा असेल, त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेले त्याचे पुत्र\f + \fr 13:2 \fr*\ft किंवा वंशज\ft*\f* यापैकी एकाकडे आणावे. \v 3 याजकाने त्या व्यक्तीच्या त्वचेवरील चट्टा तपासावा आणि चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील व तो त्वचेपेक्षा खोल गेलेला असेल, तर हा कुष्ठरोग समजावा; आणि याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी केल्यावर, त्याला विधिनियमानुसार अशुद्ध म्हणून जाहीर करावे. \v 4 जर त्वचेवरील चट्टा पांढरा असेल, परंतु तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झाले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे. \v 5 सातव्या दिवशी, याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवरील चट्टा अधिक पसरलेला नसेल, तर याजकाने त्याला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. \v 6 सातव्या दिवशी, याजकाने त्याची पुन्हा तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला आहे व तो त्वचेवर पसरला नसेल, तर तो शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे; कारण तो साधारण खवंद होय. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत आणि पूर्ववत शुद्ध व्हावे. \v 7 परंतु याजकापुढे शुद्ध सिद्ध झाल्यावर, तो चट्टा त्वचेवर पसरू लागला, तर त्या व्यक्तीने स्वतःला पुन्हा याजकासमोर हजर करावे. \v 8 याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी करावी आणि खवंद त्वचेवर पसरलेला दिसून आल्यास, त्याला अशुद्ध असे जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे. \p \v 9 “एखाद्या मनुष्याला कुष्ठरोग झाला असेल, तर त्याला याजकाकडे न्यावे. \v 10 याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवर पांढरी सूज येऊन आणि तेथील केस पांढरे झाले असतील आणि सूजेवर उघडी जखम आढळल्यास, \v 11 तर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.” \p \v 12 जर कुष्ठरोग सर्व त्वचेवर पसरलेला असेल आणि याजक जितके पाहू शकतो तितके म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पसरलेला असेल तर, \v 13 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते कोड संपूर्ण शरीरावर पसरलेले असेल तर त्याने त्याला शुद्ध म्हणून जाहीर करावे. कुष्ठरोगापासून बरा झाला आहे, असे जाहीर करावे; कारण तो संपूर्ण शुभ्र झाला आहे, म्हणजेच तो शुद्ध होय. \v 14 परंतु त्यांच्यावर उघडी जखम आढळल्यास, ते अशुद्ध समजावे. \v 15 याजकाने त्वचेवरील जखम पाहून त्या व्यक्तीला अशुद्ध जाहीर करावे; त्वचा नसलेले मांस अशुद्ध असून ते कुष्ठरोग आहे; हा गंभीर आजार आहे. \v 16 परंतु उघडी जखम फिरून पांढरी पडली तर त्या कुष्ठरोग्याने याजकाकडे यावे. \v 17 याजकाने त्यांना तपासावे, जर तो भाग खरोखर पूर्णपणे पांढरा झालेला असेल, तर तो मनुष्य शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे. \p \v 18 ज्या माणसाच्या त्वचेवर फोड येऊन पुढे तो फोड बरा झाला \v 19 व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे. \v 20 याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर तो चट्टा त्वचेखाली खोलवर गेला असेल आणि त्याच्यावरील केस पांढरे झाले असतील, तर याजकाने त्याला अशुद्ध म्हणून जाहीर करावे; कारण फोडामधून कुष्ठरोग निर्माण झाला आहे. \v 21 पण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे. \v 22 त्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे. \v 23 पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे. \p \v 24 एखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले, \v 25 तर याजकाने तो चट्टा अवश्य तपासावा. जर चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील, आणि तो त्वचेपेक्षा खोल गेला आहे असे दिसून आले, तर त्या जळालेल्या भागी कुष्ठरोग फुटला असे समजावे; याजकाने त्यास अशुद्ध जाहीर करावे; तो मनुष्य कुष्ठरोगी आहे. \v 26 पण तपासणीनंतर त्या पांढर्‍या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे; \v 27 सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे. \v 28 पण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही. \p \v 29 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल \v 30 तर याजकाने त्याची तपासणी करावी. चट्टा त्वचेखाली खोलवर आहे असे वाटत असेल आणि चट्ट्यावर पिवळे केस सापडले असतील, तर याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे; हा डोक्याचा अथवा हनुवटीचा कुष्ठरोग आहे. \v 31 पण तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नाही आणि त्यामध्ये काळे केस नाहीत, असे याजकाच्या तपासणीत दिसून आले तर याजकाने त्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे. \v 32 सातव्या दिवशी याजकाने तपासणी करावी आणि चट्टा जर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेमध्ये खोलवर गेला नसेल किंवा पिवळसर केस दिसून येत नसतील, \v 33 तर व्रणाभोवतीचे केस काढून टाकावे; व्रणावरचे केस मात्र काढू नयेत. मग याजकाने त्या व्यक्तीला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. \v 34 मग याजकाने सातव्या दिवशी तपासणी करावी, आणि व्रण त्वचेवर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेखाली खोलवर गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध म्हणून जाहीर करावे आणि ती व्यक्ती कपडे धुतल्यानंतर शुद्ध व्हावी. \v 35 पण तो शुद्ध जाहीर केल्यानंतर तो चट्टा पसरू लागला, \v 36 तर याजकाने तपासणी करावी आणि चट्ट्याभोवतालचे केस पिवळे होतात की नाही याची वाट न पाहता, ती व्यक्ती अशुद्ध असे जाहीर करावे. \v 37 पण चट्टा पसरण्याची क्रिया थांबली असून तिच्यावर काळे केस सापडले, तर ती व्यक्ती बरी झाली असून शुद्ध आहे आणि याजकाने त्याला शुद्ध असे जाहीर करावे. \p \v 38 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर पांढरे चट्टे असतील, \v 39 तर याजक तपासणी करेल आणि त्वचेवरील चट्ट्याचा रंग पांढरट असेल, तर इसब हा चर्मरोग झाला आहे, असे जाहीर करेल; ती व्यक्ती शुद्ध आहे. \p \v 40 कोणा माणसाच्या डोक्यावरील केस गळून टक्कल झाले असेल तर तो शुद्ध आहे. \v 41 जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय. \v 42 तरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे. \v 43 याबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल, \v 44 तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडलेला चट्टा कुष्ठरोगाचा आहे; ती व्यक्ती अशुद्ध आहे; याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे. \p \v 45 असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे. \v 46 जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे. \s1 वस्त्रावरील कुष्ठरोग \p \v 47 एखाद्या लोकरीच्या वा तागमिश्रित सुताच्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला रोगाचा संसर्ग झाला आहे, \v 48 सुताच्या, लोकरीच्या ताण्याने विणलेले वस्त्र वा तागमिश्रित चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोग झाला आहे, असा संशय आला \v 49 आणि जर ते चामड्याच्या, विणलेल्या वस्त्रावर, अथवा चामड्याच्या वस्तूवर हिरवट किंवा तांबूस चट्टा असला, तर तो कुष्ठरोगच आहे, म्हणून तपासणीसाठी ती वस्तू याजकाकडे अवश्य घेऊन जावी. \v 50-51 याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय. \v 52 तेव्हा याजकाने ती वस्त्रे, ते कापड किंवा ती विणलेली लोकरीची वा चामड्याची वस्तू संसर्गजन्य आहे असे म्हणून अग्नीत जाळून टाकावी. \p \v 53-54 पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी. \v 55 मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो पसरला नाही. तरी तो अशुद्ध आहे असे समजावे; ती वस्तू जाळून टाकावी कारण तिला आतून, बाहेरून, सगळीकडून कुष्ठरोगाचा संसर्ग पोहोचला आहे असे समजावे. \p \v 56 पण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा. \v 57 इतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे. \v 58 पण ती विणलेल्या कापडाची किंवा चामड्याची वस्तू धुतल्यानंतर तिच्यावरील चट्टा नाहीसा झाला, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल. \p \v 59 लोकरीच्या व तागमिश्रित सुताच्या विणलेल्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला, चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहे. \c 14 \s1 कुष्ठरोगापासून शुद्धता \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 कोणत्याही रोगग्रस्त व्यक्तीला त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीसमयी, जेव्हा त्यांना याजकाकडे आणले जाते तेव्हा हे नियम आहेत: \v 3 याजकाने छावणीबाहेर जाऊन बरे झालेल्या कुष्ठरोग्यांस तपासून पाहावे. जर ते कुष्ठरोगी\f + \fr 14:3 \fr*\ft कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी या शब्दाचा उपयोग केला जात असे.\ft*\f* बरे झाले आहेत असे दिसून आले, \v 4 याजक आज्ञा करतील की दोन जिवंत शुद्ध पक्षी आणि काही गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी आणि एजोब त्या व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी आणाव्यात. \v 5 मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा; \v 6 गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन दुसर्‍या जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात या सर्व वस्तू बुडवाव्यात. \v 7 मग याजकाने ते रक्त कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीवर सात वेळा शिंपडावे व तो शुद्ध झाला आहे, असे जाहीर करून त्या जिवंत पक्ष्याला उघड्या शेतात सोडून द्यावे. \p \v 8 मग शुद्ध करण्यात येणार्‍या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करावे व स्नान करावे; म्हणजे तो विधिनियमानुसार शुद्ध होईल. त्यानंतर त्याने छावणीत राहण्यासाठी परत यावे. तरी सात दिवसापर्यंत त्याने आपल्या तंबूबाहेरच राहावे. \v 9 सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे. मग तो शुद्ध होईल. \p \v 10 आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा\f + \fr 14:10 \fr*\ft अंदाजे 5 कि.ग्रॅ.\ft*\f* एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर\f + \fr 14:10 \fr*\ft अंदाजे 0.3 लीटर\ft*\f* तेल घेऊन यावे. \v 11 मग शुद्ध जाहीर करणार्‍या याजकाने शुद्ध होणार्‍या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे. \p \v 12 नंतर याजकाने एक कोकरू व एकतृतीयांश लीटर जैतुनाचे तेल दोषार्पण म्हणून वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळावे. \v 13 पवित्रस्थानात ज्या ठिकाणी पापार्पणाच्या व होमार्पणाच्या बलींचा वध करतात, त्या ठिकाणी याजकाने कोकराला ठार मारावे. पापार्पणातील बलीप्रमाणेच या दोषार्पणातील बली याजकाच्या हक्काचा आहे. हे परमपवित्र होय. \v 14 मग याजकाने या दोषबलीचे काही रक्त घ्यावे आणि शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. \v 15 मग याजकाने तेलाचा काही भाग घ्यावा आणि ते आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर ओतावे, \v 16 व याजकाने त्यात आपल्या उजव्या हाताची बोटे बुडवून ते याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे. \v 17 यानंतर तळहातावर शिल्लक राहिलेले तेल याजकाने शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या पायाच्या व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे. \v 18 याजकाच्या तळहातावर शिल्लक राहिलेले सर्व तेल शुद्ध ठरविण्याच्या माणसाच्या मस्तकास लावावे. अशाप्रकारे याजकाने त्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे. \p \v 19 नंतर अशुद्धतेपासून शुद्ध झालेल्या माणसासाठी याजकाने पापबली अर्पावा व त्याच्यासाठी प्रायश्चित्ताचा विधी करावा; आणि यानंतर याजकाने होमबलीचा वध करावा, \v 20 मग याजकाने अन्नार्पणासह, होमबली वेदीवर अर्पावा व त्या माणसासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे तो मनुष्य शुद्ध ठरेल. \p \v 21 जर तो गरीब असेल आणि इतके आणण्याची त्याची ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे. अन्नार्पणासाठी जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग\f + \fr 14:21 \fr*\ft अंदाजे 1.6 कि.ग्रॅ\ft*\f* आणावा, \v 22 आणि ऐपतीप्रमाणे त्याने पारव्याची दोन पिल्ले किंवा दोन होले आणावे; त्यातील एक पापबली व दुसरा होमबली म्हणून अर्पण करावा. \p \v 23 “प्रायश्चित्तविधीसाठी त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी आठव्या दिवशी ते पक्षी याहवेहसमोर सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावेत. \v 24 मग याजकाने दोषार्पणाचे कोकरू व अर्धा लीटर तेल घेऊन वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी ओवाळावे. \v 25 त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. \v 26 मग याजकाने आपल्या डाव्या तळहातावर तेलातील काही तेल ओतावे, \v 27 आणि याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी सात वेळा ते याहवेहपुढे शिंपडावे. \v 28 मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन ते शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला दोषबलीचे रक्त लावले त्या जागी लावावे. \v 29 याजकाने त्याच्या तळहातावर उरलेले तेल त्या शुद्ध होणार्‍या माणसाच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहपुढे त्याच्या डोक्यास लावावे. \v 30 मग त्या व्यक्तीला परवडेल त्याप्रमाणे त्याने पारव्याच्या किंवा होल्याच्या पिल्लाचे अर्पण करावे. \v 31 एक पक्ष्याचे पापार्पण म्हणून व दुसर्‍या पक्ष्याचे अन्नार्पणासह होमार्पण म्हणून अर्पणे करावी. अशाप्रकारे याजकाने शुद्ध होणार्‍या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.” \p \v 32 हे नियम सर्वसाधारणपणे शुद्धीकरणासाठी लागणारे अर्पण आणण्याची ऐपत नसलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आहेत. \s1 चट्ट्यापासून शुद्धीकरण \p \v 33 याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, \v 34 “जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन, \v 35 तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’ \v 36 याजकाने घरामध्ये जाऊन चिन्हाचे परीक्षण करण्यापूर्वी, त्याने घर रिकामे करण्याचा आदेश दिला पाहिजे, अन्यथा त्या घरातील सर्व वस्तू अशुद्ध होऊ शकतील. त्यानंतर याजकाने त्या घरात प्रवेश करून त्याची तपासणी करावी. \v 37 त्याने घराच्या भिंतींची तपासणी करून त्यावरील चट्टा भिंतींपेक्षा खोलवर हिरवट किंवा लालसर आहे, असे याजकाला आढळले, \v 38 तर याजकाने घराबाहेर दाराजवळ यावे आणि ते घर सात दिवस बंद ठेवावे. \v 39 मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा भिंतीवर पसरला असेल, \v 40 तर याजकाने चट्टा असलेला भाग काढून तो नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. \v 41 नंतर भिंतीचा आतील भाग पूर्णपणे खरवडून त्याची दगड व माती नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. \v 42 मग त्या जागी बसविण्यासाठी दुसरे दगड आणावेत व नव्या चुन्याचा गिलावा करावा.” \p \v 43 दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला, \v 44 तर याजकाने आत येऊन तो तपासावा, आणि जर चट्टा पसरला आहे असे त्याला दिसून आले, तर तो न निघणारा कुष्ठरोग असून ते घर अशुद्ध झाले आहे. \v 45 मग ते घर पाडून टाकण्यात यावे व त्या घराचे दगड, चुना, लाकूड नगराबाहेर नेऊन अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावे. \p \v 46 असे घर बंद असता जो कोणी त्या घरात शिरेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील, \v 47 जर कोणी अशा घरात झोपेल किंवा जेवेल, तर त्याने आपली वस्त्रे धुवावी. \p \v 48 याजकाने आत जाऊन घर पुन्हा तपासावे आणि गिलाव्यावर चट्टे पुनः दिसले नाहीत, तर ते घर शुद्ध झाले असून तेथील कुष्ठरोग नाहीसा झाला आहे असे त्याने जाहीर करावे. \v 49 मग त्याने दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन शुद्धीकरणाचा विधी करावा. \v 50 त्याने वाहत्या पाण्याच्या वर मातीचे पात्र धरून त्याच्यात एक पक्षी मारावे, \v 51-52 व वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात, तसेच वाहत्या पाण्यात, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी, एजोब त्याचप्रमाणे दुसरा जिवंत पक्षी बुडवावा, आणि ते रक्त सात वेळा त्या घरावर शिंपडावे. अशाप्रकारे याजक ते घर शुद्ध करेल. \v 53 मग त्याने तो जिवंत पक्षी शहराबाहेर मोकळ्या जागी सोडून द्यावा. अशाप्रकारे त्याने घराकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे ते शुद्ध होईल. \p \v 54 सर्व प्रकाराचा कुष्ठरोग, चाई, \v 55 वस्त्रावरील आणि घरावरील कुष्ठरोग, \v 56 सूज, खवंद, पांढरा चट्टा या सर्वांसंबंधीचा हा नियम आहे. \v 57 अशाप्रकारे हा खरोखरच शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे तुम्हाला समजेल. \p कुष्ठरोग आणि बुरशी यासाठी हे नियम दिलेले आहेत. \c 15 \s1 शरीरातील स्त्रावापासून शुद्धता \p \v 1 याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, \v 2 इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: जेव्हा कोणाही माणसाच्या शरीरातून स्राव होत असेल, तर अशा प्रकारचा स्त्राव हा अशुद्ध आहे. \v 3 त्याचे शरीर सतत स्राव बाहेर टाकीत असले किंवा अडवून ठेवीत असले, तरी तो मनुष्य अशुद्ध आहे. या स्रावामुळे तो मनुष्य अशुद्ध होतो: \p \v 4 ज्या बिछान्यावर तो झोपेल आणि ज्या बैठकीवर तो बसेल ती अशुद्ध होईल. \v 5 जे कोणी अशा माणसाच्या अंथरुणाला स्पर्श करतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत ते अशुद्ध राहतील. \v 6 स्रावामुळे अशुद्ध झालेला मनुष्य ज्या बैठकीवर बसला असेल त्या बैठकीवर जो कोणी बसेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. त्याने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे. \p \v 7 जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 8 ज्या कोणा शुद्ध व्यक्तीवर असा मनुष्य थुंकेल, त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 9 ज्या वाहनांचा तो स्त्राव होणारा मनुष्य उपयोग करेल ते वाहन अशुद्ध होय, \v 10 आणि जो कोणी अशा माणसाच्या अंगाखालील वस्तूला स्पर्श करेल किंवा ती उचलेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 11 हात धुतल्याशिवाय स्त्राव होणारा मनुष्य जर कोणाला स्पर्श करेल, तर स्पर्श झालेल्या त्या मनुष्याने अवश्य आपली वस्त्रे धुवावीत आणि पाण्याने स्नान करावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 12 “असा मनुष्य ज्या मातीच्या पात्राला स्पर्श करेल ते अवश्य फोडून टाकावे आणि कोणत्याही लाकडाच्या भांड्याला त्याचा स्पर्श झाल्यास ते पाण्याने धुऊन घ्यावे. \p \v 13 “स्राव थांबल्यावर त्याने आपली वस्त्रे धुऊन, सात दिवसांच्या शुद्ध होण्याच्या विधीची सुरुवात करावी. त्याने आपली वस्त्रे धुवावी आणि वाहत्या पाण्यात स्नान करून शुद्ध व्हावे. \v 14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत. \v 15 याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे. \p \v 16 “जर एखाद्या मनुष्याला वीर्यपात झाला, तर त्याने संपूर्ण शरीर पाण्याने धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \v 17 ज्या वस्त्रांवर वा चामड्यावर वीर्य लागले असेल, ते अवश्य धुऊन टाकावे व सायंकाळपर्यंत ते अशुद्ध समजावे. \v 18 जर एखाद्या पुरुषाने स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवले आणि या प्रक्रियेत त्याचे वीर्यस्खलन झाले, तर दोघांनीही पाण्याने स्नान केले पाहिजे. ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील. \p \v 19 “स्त्री ॠतुमती होते, तेव्हा तिने विधिनियमानुसार सात दिवस अशुद्ध राहावे. त्या काळात जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 20 “याकाळात ती ज्या अंथरुणावर झोपेल किंवा बैठकीवर बसेल, ती सर्व अशुद्ध होतील \v 21 जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. \v 22 जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. \v 23 जो कोणी तिच्या अंथरुणाला किंवा बैठकीला स्पर्श करेल तो व्यक्ती सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 24 “याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा. \p \v 25 “महिन्यात अनियमित वेळा किंवा मासिक पाळीच्या दिवसानंतरही जर ॠतुस्राव चालू राहिला, तर त्यामुळे मासिक पाळीच्या अशुद्धतेप्रमाणे ती या अशुद्ध स्त्रावात अशुद्धच राहील. \v 26 म्हणजे, नियमित मासिक पाळी चालू असलेल्या ॠतुस्रावाच्या काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अशुद्ध होईल; आणि ज्या बैठकीवर बसेल ती ही अशुद्ध होईल. \v 27 जी व्यक्ती तिच्या अंथरुणाला वा बैठकीला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल. त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे आणि तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. \p \v 28 “जेव्हा ती स्त्री तिच्या स्त्रावातून शुद्ध होईल, तेव्हा तिने शुद्ध होण्यासाठी सात दिवस मोजावे, त्यानंतर ती शुद्ध होईल. \v 29 आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी; \v 30 याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण म्हणून याहवेहपुढे अर्पून तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेकरिता प्रायश्चित्त करावे. \p \v 31 “अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.” \p \v 32 स्राव किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो, त्याच्यासाठी हे नियम आहेत. \v 33 जी स्त्री ॠतुमती होते आणि जो कोणी अशा ॠतुमती असलेल्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवून विधिनियमानुसार अशुद्ध होतो, यासंबंधीचे हे नियम आहेत. \c 16 \s1 प्रायश्चित्ताचा दिवस \p \v 1 अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले. \v 2 याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण\f + \fr 16:2 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa दयासन\fqa*\f* असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन. \p \v 3 “अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा. \v 4 त्याने तागाचा पवित्र झगा घातला पाहिजे आणि त्याच्या शरीराभोवती तागाचे अंतर्वस्त्र घालावे; तागाच्या वस्त्राने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा. ही पवित्र वस्त्रे आहेत; म्हणून ती अंगावर घालण्यापूर्वी त्याने पाण्याने स्नान करावे. \v 5 मग इस्राएली समुदायाकडून पापार्पणासाठी दोन बोकडे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा. \p \v 6 “अहरोनाने स्वतःच्या पापार्पणाचा गोर्‍हा परमेश्वराला पहिल्याने अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी प्रायश्चित्त करावे. \v 7 मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी. \v 8 दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड. \v 9 नंतर याहवेहसाठी चिठ्ठी पडलेल्या बोकडाला अहरोनाने घेऊन यावे आणि पापार्पणाचा बळी म्हणून त्याचा यज्ञ करावा. \v 10 परंतु चिठ्ठी टाकून जो दुसरा बोकड आला तो पाप वाहून नेण्यासाठीचा बोकड जिवंत ठेवून याहवेहसमोर आणावा आणि त्याच्यावर प्रायश्चित्ताचा विधी करून, पाप वाहून नेण्यासाठी तो रानात सोडून द्यावा. \p \v 11 “अहरोनाने स्वतःसाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी पापार्पणाच्या गोर्‍ह्याचा वध करून प्रायश्चित्त करावे. \v 12 याहवेहच्या वेदीसमोरील धुपाटण्यात जळते निखारे भरून घ्यावेत व कुटून बारीक केलेला व दोन मुठीत भरेल एवढा सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा. \v 13 तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्‍यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही. \v 14 मग त्याने गोर्‍ह्याचे काही रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी दयासनाच्या पूर्वेस शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर सात वेळा शिंपडावे. \p \v 15 “नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्‍ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे. \v 16 कारण इस्राएली लोकांची अशुद्धता आणि बंडखोरी, त्यांची पापे कोणतीही असोत, अशाप्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे. त्याचप्रमाणे त्याने सभामंडपासाठीही असेच करावे, कारण तो त्यांच्यामध्ये उभारला असून त्यांच्या अशुद्धतेने वेढला गेला आहे. \v 17 अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी परमपवित्रस्थानात जाईल, तेव्हापासून तो परत येईपर्यंत, तो स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी व सर्व इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित्त करेपर्यंत कोणीही सभामंडपात जाऊ नये. \p \v 18 “मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे. \v 19 काही रक्त घेऊन वेदीवर आपल्या बोटांनी सात वेळा शिंपडावे. अशाप्रकारे इस्राएलांच्या अशुद्धतेपासून वेदी शुद्ध व पवित्र करावी. \p \v 20 “परमपवित्रस्थान, सभामंडप व वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्तविधी पूर्ण केल्यानंतर अहरोनाने जिवंत बोकड आणावा. \v 21 मग अहरोन आपले दोन्ही हात बोकडाच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांचे सर्व अन्याय, बंडखोरी—त्यांची सर्व पापे—त्या बोकडाच्या मस्तकावर ठेवावी व नेमलेल्या माणसाद्वारे त्या बोकडाला रानात पाठवून द्यावे. \v 22 जिथे कोणी राहत नाही अशा प्रदेशात तो बोकड लोकांच्या पापाचा भार वाहून नेईल, नंतर त्या मनुष्याने त्या बोकडाला रानात सोडून द्यावे. \p \v 23 “मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत. \v 24 नंतर त्याने पवित्रस्थानी पाण्याने स्नान करावे, आपली नियमित वस्त्रे घालावी. मग त्याने बाहेर यावे व स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्ताचे होमार्पण करावे म्हणून स्वतःसाठी होमार्पण व लोकांसाठीही होमार्पण करावे. \v 25 त्याने पापार्पणासाठी ठेवलेल्या चरबीचा वेदीवर होम करावा. \p \v 26 “ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे. \v 27 पापार्पणाच्या ज्या गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त अहरोनाने प्रायश्चित्तासाठी पवित्रस्थानात नेले होते, त्यांचे मृतदेह, कातडी व आतडी छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळण्यात यावीत.” \v 28 ज्या मनुष्याने ते जाळून टाकले, त्याने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे; त्यानंतर छावणीत परत यावे. \p \v 29 तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये \v 30 कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल. \v 31 तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय. \v 32 अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत \v 33 त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे. \p \v 34 “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” \p याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले. \c 17 \s1 रक्त खाण्यास मनाई आहे \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत: \v 3 इस्राएलाच्या घराण्यातील कोणत्याही मनुष्याने बैल, कोकरू किंवा शेळी यांचा छावणीत किंवा छावणीबाहेर वध केला, \v 4 परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे. \v 5 या आज्ञेचा उद्देश असा आहे की, इस्राएली लोक जे उघड्या मैदानात यज्ञपशू मारीत होते, ते त्यांनी सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे याहवेहपुढे आणावे आणि शांत्यर्पणाचे यज्ञ म्हणून याहवेहला अर्पण करावे. \v 6 याजकाने सभामंडपाच्या दाराशी असलेल्या याहवेहच्या वेदीवर रक्त शिंपडून याहवेहला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. \v 7 यापुढे ज्यांच्याबरोबर ते स्वतःच व्यभिचार करतात, त्या बोकडाच्या मूर्तींना\f + \fr 17:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa अशुद्ध आत्म्यांना\fqa*\f*, त्यांचे कोणतेही अर्पण करू नये. हा नियम त्यांच्यासाठी आणि येणार्‍या पिढ्यांसाठी लागू आहे.” \p \v 8 तू त्यांना सांग: इस्राएली किंवा तुमच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी यांनी होमार्पण किंवा यज्ञार्पण केले, \v 9 आणि याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी तो प्राणी अर्पण करण्यास आणला नाही, तर त्याला आपल्या लोकांमधून बहिष्कृत करावे. \p \v 10 इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन. \v 11 कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते. \v 12 म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.” \p \v 13 “ ‘इस्राएली किंवा तुमच्यामध्ये असलेला कोणीही विदेशी शिकारीला गेला असता, त्याने खाण्यास योग्य असलेला पशू किंवा पक्षी यांची शिकार केली, तर त्याचे रक्त जमिनीवरच ओतून मातीने झाकून टाकावे, \v 14 कारण रक्त हे प्रत्येक प्राण्याचे जीवन आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुम्ही कोणत्याही प्राण्याचे रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचे जीवन हे त्याचे रक्त आहे; जो कोणी रक्ताचे सेवन करेल त्याला बहिष्कृत केलेच पाहिजे.” \p \v 15 “ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल. \v 16 पण जर त्याने आपली वस्त्रे धुतली नाहीत व स्नान केले नाही, तर तो दोषीच राहील.’ ” \c 18 \s1 बेकायदेशीर लैंगिक संबंध \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \v 3 तुम्ही ज्या इजिप्त देशात राहिलात त्यांच्यासारखे वागू नका आणि मी तुम्हाला जिथे नेत आहे, त्या कनान देशाचे लोक जे करतात ते करू नका. त्यांच्या रीतिरिवाजाचे पालन करू नका. \v 4 तुम्ही माझ्या नियमांचे पालन केलेच पाहिजे आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \v 5 तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे. \p \v 6 “ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे. \p \v 7 “ ‘तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून वडिलांचा अनादर करू नकोस. ती तुझी आई आहे; तिच्याशी संबंध ठेवू नकोस. \p \v 8 “ ‘तुझ्या वडिलांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; जे तुझ्या वडिलांचा अपमान करेल. \p \v 9 “ ‘तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध तू ठेवू नकोस, तुझ्या वडिलांची कन्या असो किंवा तुझ्या आईची कन्या, मग ती एकाच घरात जन्मली असेल किंवा इतरत्र. \p \v 10 “ ‘तू तुझ्या पुत्राच्या कन्येशी किंवा तुझ्या कन्येच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; त्यामुळे तुझा अपमान होईल. \p \v 11 “ ‘तुझ्या पित्याच्या पत्नीच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझी बहीण आहे. \p \v 12 “ ‘तू तुझ्या पित्याच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझ्या पित्याची जवळची नातेवाईक आहे. \p \v 13 “ ‘तुझ्या मातेच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची नातेवाईक आहे. \p \v 14 “ ‘आपल्या पित्याच्या भावाचा त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचा अपमान करू नका; ती तुझी चुलती आहे. \p \v 15 “ ‘तू तुझ्या सूनेशी शारीरिक संबंध ठेवू नकोस. ती तुझ्या पुत्राची पत्नी होय; तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू नकोस. \p \v 16 “ ‘तुझ्या भावाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस; हा तुझ्या भावाचा अपमान आहे. \p \v 17 “ ‘तू एखाद्या स्त्रीसोबत आणि तिच्या कन्येसोबत शारीरिक संबंध ठेऊ नकोस. तिच्या पुत्राच्या किंवा कन्येच्या कन्येशी तू शारीरिक संबंध ठेऊ नकोस, कारण ते तिचे जवळचे नातेवाईक आहेत; आणि असे करणे भयंकर पाप आहे. \p \v 18 “ ‘तुझी पत्नी जिवंत असताना तिची वैरीण म्हणून तिच्या बहिणीशी विवाह करू नकोस आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका. \p \v 19 “ ‘स्त्री ॠतुमती असताना तिच्या अशुद्धतेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला जाऊ नको. \p \v 20 “ ‘तू आपल्या शेजार्‍याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस आणि स्वतःला भ्रष्ट करू नकोस. \p \v 21 “ ‘तू आपल्या संतानांपैकी कोणालाही मोलख दैवतासाठी यज्ञबली म्हणून अर्पण करू नये, कारण असा यज्ञ केल्याने तुझ्या परमेश्वराच्या नावाचा अनादर होतो. मी याहवेह आहे. \p \v 22 “ ‘स्त्रीप्रमाणे पुरुषाने पुरुषाशी शारीरिक संबंध ठेऊ नये. ते ओंगळ कृत्य आहे. \p \v 23 “ ‘प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवू नकोस आणि त्याद्वारे स्वतःला अशुद्ध करू नको. स्त्रीने प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी स्वतःला सादर करू नये; ती एक विकृती आहे. \p \v 24 “ ‘अशा प्रकारच्या कोणत्याही अमंगळ गोष्टी करून तुम्ही स्वतःला अपवित्र करून घेऊ नये, कारण ज्या राष्ट्रात मी तुम्हाला पाठवित आहे, ती राष्ट्रे या गोष्टींनी भ्रष्ट झाली आहेत. \v 25 भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे. \v 26 म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत, \v 27 ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, त्या देशातील रहिवाशांनी अशा ओंगळ गोष्टी सतत केल्या म्हणून तो देश भ्रष्ट झाला. \v 28 जर तुम्ही ही भूमी भ्रष्ट कराल, तर ती तुम्हाला ओकून टाकेल, जसे तुमच्या पूर्वी असलेल्या राष्ट्रांना तिने ओकून टाकले होते. \p \v 29 “ ‘या ओंगळ कृत्यांपैकी एकदेखील कृत्य जो करेल, त्याला या राष्ट्रातून बहिष्कृत केले जाईल. \v 30 म्हणून तुम्ही जात आहात, तेथील लोकांच्या ओंगळ कृत्यांचे अनुकरण करून तुम्ही स्वतःस भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” \c 19 \s1 वैयक्तिक आचरणासंबंधीचे नियम \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “सर्व इस्राएली लोकांस सांग: ‘तुम्ही पवित्र असावे, कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, पवित्र आहे. \p \v 3 “ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 4 “ ‘मूर्तीकडे वळू नका आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 5 “ ‘जेव्हा तुम्ही याहवेहला शांत्यर्पणे करता, तेव्हा ती अशा प्रकारे अर्पण करा की तुमच्यावतीने मान्य करण्यात येतील. \v 6 तुम्ही अर्पिलेला यज्ञपशू त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी खावा; पण तिसर्‍या दिवशी उरलेले जाळूनच टाकले पाहिजे. \v 7 जर कोणी तिसर्‍या दिवशी त्यातील काही खाल्ले तर ते अशुद्ध आहे आणि ते स्वीकारले जाणार नाही. \v 8 जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे. \p \v 9 “ ‘तुम्ही पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये आणि शेतात हंगामानंतर राहिलेला सरवा गोळा करू नये. \v 10 तुमच्या द्राक्षमळ्यावर दुसर्‍यांदा जाऊ नका अथवा पडलेली द्राक्षे गोळा करू नका. गोरगरिबांसाठी आणि परदेशीयांसाठी ती तिथेच राहू द्यावी. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 11 “ ‘तुम्ही चोरी करू नये. \p “ ‘खोटे बोलू नये. \p “ ‘एकमेकांना फसवू नये. \p \v 12 “ ‘तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहू नये आणि तुमच्या परमेश्वराचे नाव अपवित्र करू नये. मी याहवेह आहे. \p \v 13 “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. \p “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये. \p \v 14 “ ‘तुम्ही बहिर्‍यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे. \p \v 15 “ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्‍याचा योग्य न्याय करावा. \p \v 16 “ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. \p “ ‘तुमच्या शेजार्‍याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे. \p \v 17 “ ‘तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली मनुष्याचा तुमच्या अंतःकरणात द्वेष करू नये. तुमच्या शेजार्‍याला उघडपणे ताकीद द्यावी म्हणजे तुम्ही त्यांच्या पापाचे सहभागी होणार नाही. \p \v 18 “ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे. \p \v 19 “ ‘माझ्या आज्ञा पाळा. \p “ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये. \p “ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका. \p “ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत. \p \v 20 “ ‘एखादा मनुष्य एखाद्या गुलाम स्त्रीसोबत झोपेल जी एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, परंतु ज्याला खंडणी दिली गेली नाही किंवा तिला स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर त्याला योग्य शिक्षा\f + \fr 19:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa चौकशी\fqa*\f* झाली पाहिजे. तरीही त्यांना मृत्युदंड दिला जाऊ नये, कारण तिला मुक्त केले गेले नाही. \v 21 त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे. \v 22 त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल. \p \v 23 “ ‘तुम्ही आपल्या देशात प्रवेश कराल व तिथे सर्व प्रकारची फळझाडे लावाल. तेव्हा पहिली तीन वर्षे त्या झाडांची फळे खाऊ नका, कारण ती बेसुंती समजावी व तुम्हाला निषिद्ध आहेत, \v 24 चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे. \v 25 परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 26 “ ‘तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नये. \p “ ‘तुम्ही जादूटोणा करू नये किंवा शकुन पाहू नये. \p \v 27 “ ‘तुम्ही आपले केस कापतांना बाजूचे केस कापून गोलाकार देऊ नये किंवा आपल्या दाढीचे टोक कापू नये. \p \v 28 “ ‘मृत्यू पावलेल्यासाठी तुम्ही आपल्या शरीरावर जखमा करून घेऊ नये किंवा शरीर गोंदून घेऊ नये. मी याहवेह आहे. \p \v 29 “ ‘तुम्ही आपल्या कन्यांना वेश्याकर्माला लावून त्यांना भ्रष्ट करू नये, नाहीतर देश व्यभिचारी होऊन दुष्टाईने भरून जाईल. \p \v 30 “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे. \p \v 31 “ ‘तुम्ही शकुनविद्या, ज्योतिष किंवा चेटक्यांची सल्लामसलत घेऊन स्वतःला भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 32 “ ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे. \p \v 33 “ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये. \v 34 जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 35 “ ‘लांबी, वजन किंवा प्रमाण मापण्यात अप्रामाणिक मापे वापरू नका. \v 36 तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा\f + \fr 19:36 \fr*\ft एफा हे घन पदार्थाचे माप होते ज्याची क्षमता अंदाजे 22लीटर होती.\ft*\f* आणि हीन\f + \fr 19:36 \fr*\ft हीन हे द्रव पदार्थाचे माप होते ज्याची क्षमता अंदाजे 3.8 लीटर होती.\ft*\f* उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे. \p \v 37 “ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ” \c 20 \s1 आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांना सांग: इस्राएली लोकांपैकी कोणीही किंवा तुमच्यात राहणाऱ्या कोणत्याही परदेश्याने त्याच्या मुलाचे अर्पण मोलख दैवतासाठी केले, तर समुदायातील सभासदांनी त्याला दगडमार करावा. \v 3 मी स्वतः त्या मनुष्याच्या विरुद्ध माझे मुख फिरवेन व लोकातून त्याच्या उच्छेद करेन; कारण त्याने आपले मूल मोलख दैवताला बळी देऊन व माझे पवित्रस्थान भ्रष्ट करून माझ्या पवित्र नावाचा अपमान केला आहे. \v 4 पण जर त्या मनुष्याने आपले मूल मोलखला बळी दिले हे माहीत असूनही त्या समुदायाच्या लोकांनी त्याकडे डोळेझाक केली व बळी देणार्‍याला मारून टाकण्याचे नाकारले, \v 5 मी स्वतः त्याच्याविरुद्ध व त्याच्या घराण्याविरुद्ध मुख फिरवेन आणि मोलखबरोबर व्यभिचार करून त्याचे अनुकरण करणार्‍या सर्वांचा त्यांच्या लोकांतून नाश करेन. \p \v 6 “ ‘शकुनविद्या आणि चेटक्यांची अनुसरण करून स्वतःला वेश्या करण्याचा प्रयत्न करणार्‍यांकडून मी माझे मुख फिरवेन आणि मी त्याचा त्याच्या लोकांमधून उच्छेद करेन. \p \v 7 “ ‘तुम्ही स्वतःस शुद्ध राखून पवित्र राहावे, कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \v 8 तुम्ही माझे नियम पाळा आणि त्याचे पालन करा. मी याहवेह आहे, जो तुम्हाला पवित्र करतो. \p \v 9 “ ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो, त्याला अवश्य जिवे मारावे, कारण त्याने स्वतःच्या आईवडिलांना शाप दिला आहे, त्याच्या रक्ताचा दोष त्याच्याच माथी राहील. \p \v 10 “ ‘जर कोणी व्यक्ती दुसर्‍याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—आपल्या शेजार्‍याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—त्या व्यभिचारी आणि व्यभिचारिणी दोघांनाही जिवे मारावे. \p \v 11 “ ‘जो व्यक्ती आपल्या पित्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतो, तो आपल्या पित्याचा अपमान करतो. त्या व्यक्तीला व त्या स्त्रीला अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच माथी राहील. \p \v 12 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या सुनेबरोबर शारीरिक संबंध ठेवले, तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी जे केले ते विकृत आहे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील. \p \v 13 “ ‘जर एखादा पुरुष जसे एखाद्या स्त्रीसोबत तसे दुसर्‍या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवतो, तर त्या दोघांनीही घृणास्पद कृत्य केले आहे. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील. \p \v 14 “ ‘एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करून तिच्या आईबरोबरही विवाह केला, तर ती भयंकर दुष्टता आहे. तुमच्यातील ही दुष्टता निपटून काढण्यासाठी त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे. \p \v 15 “ ‘एखाद्या व्यक्तीने प्राण्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीला जिवे मारावे; त्या पशूलाही ठार करावे. \p \v 16 “ ‘जर एखादी स्त्री एखाद्या प्राण्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गेली तर ती स्त्री आणि तो प्राणी दोघांनाही मारून टाका. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील. \p \v 17 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर मग ती त्याच्या पित्याची किंवा आईची कन्या असो, विवाह केला आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, तर ते अपमानास्पद आहे. त्यांना जाहीरपणे लोकांमधून काढून टाकावे. कारण त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला आहे आणि त्यासाठी तोच जबाबदार राहील. \p \v 18 “ ‘एखादी स्त्री ॠतुमती असताना तिच्याबरोबर एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने तिच्या प्रवाहाचा स्त्रोत उघड केला आहे आणि तिने देखील ते उघड केले आहे. तर दोघांनाही समुदायामधून बहिष्कृत करावे. \p \v 19 “ ‘आईच्या किंवा वडिलांच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नका, कारण त्यामुळे जवळच्या नातेवाईकाचा अपमान होईल; त्यांना आपल्या पापाचा भार वाहावा लागेल. \p \v 20 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या भावाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने त्याच्या वडिलांच्या भावाचा अपमान केला आहे. त्यांना जबाबदार धरले जाईल; ते निःसंतान मरतील. \p \v 21 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीसोबत विवाह केला, तर ते अशुद्धपणाचे कृत्य होय; त्याने आपल्या भावाचा अपमान केला आहे. ते निःसंतान राहतील. \p \v 22 “ ‘तुम्ही माझे विधी व नियम पाळले तर मी वस्ती करून राहण्यासाठी ज्या देशात तुम्हाला नेत आहे, ती भूमी तुम्हाला बाहेर ओकून देणार नाही. \v 23 ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालवून देत आहे, त्या राष्ट्रांचे रीतिरिवाज तुम्ही पाळू नयेत, कारण त्यांनी ही दुष्कर्मे केली म्हणून मला त्यांचा तिरस्कार आहे. \v 24 परंतु मी तुम्हाला म्हणालो, “तुम्ही त्यांच्या देशाचे मालक व्हाल; मी तुम्हाला तो वारसाप्राप्त संपत्ती असे देईन, दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा तो देश आहे.” तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे राखणारा, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 25 “ ‘तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, शुद्ध आणि अशुद्ध पक्षी यांच्यात स्पष्ट फरक करावा लागेल; कोणत्याही पशू, पक्षी किंवा जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका, ज्यांना मी तुमच्यासाठी अशुद्ध म्हणून वेगळे केले आहे. \v 26 तुम्ही माझ्यासाठी पवित्र असावे, कारण मी याहवेह पवित्र आहे आणि तुम्ही माझे व्हावे म्हणून मी तुम्हाला इतर सर्व राष्ट्रांपासून वेगळे केले आहे. \p \v 27 “ ‘शकुनविद्या वा चेटूक करणारा पुरुष किंवा स्त्री यांना अवश्य जिवे मारावे. त्यांना दगडमार करावा. त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.’ ” \c 21 \s1 याजकांसाठी विशेष नियम \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये, \v 2 आपले जवळचे नातलग म्हणजे त्याची आई किंवा वडील, पुत्र किंवा कन्या, त्याचा भाऊ \v 3 किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो. \v 4 याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये. \p \v 5 “ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत. \v 6 त्यांनी त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र राहावे आणि त्यांच्या परमेश्वराच्या नावाला काळिमा लावू नये. ते याहवेहला अन्नार्पण म्हणजे त्यांच्या परमेश्वराचे अन्न अर्पितात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे. \p \v 7 “ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत. \v 8 त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो. \p \v 9 “ ‘एखाद्या याजकाची कन्या वेश्याकर्म करून स्वतःला भ्रष्ट करते तर ती आपल्या पित्याला अशुद्ध करते, म्हणून तिला अग्नीत जाळून टाकावे. \p \v 10 “ ‘प्रमुख याजक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो याजकीय वस्त्रे घालण्यास पवित्र करण्यात आला आहे, त्याने शोक व्यक्त करण्याकरिता आपले केस मोकळे सोडू नयेत किंवा आपली वस्त्रे फाडू नये. \v 11 ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये. \v 12 त्याच्या परमेश्वराचे पवित्रस्थान सोडू नये किंवा ते अपवित्र करू नये, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाद्वारे समर्पित करण्यात आलेला आहे. मी याहवेह आहे. \p \v 13 “ ‘त्याने कुमारिकेबरोबरच विवाह करावा. \v 14 त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा, \v 15 त्यामुळे तो त्याच्या लोकांमध्ये त्याचे वंशज अशुद्ध करणार नाही. मी याहवेह आहे, जो त्याला पवित्र करतो.’ ” \p \v 16 याहवेह मोशेला म्हणाले, \v 17 “अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये. \v 18 एखादा मनुष्य आंधळा, लंगडा, चपट्या नाकाचा, हातापायांना अधिक बोटे असलेला; \v 19 ज्याचा पाय किंवा हात तुटलेला आहे, \v 20 कुबडा, ठेंगणा, डोळ्यात कमतरता असलेला, त्वचेचे रोग असलेला व भग्नांड असून \v 21 तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये. \v 22 तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो; \v 23 पण त्याला शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने पडद्यामागील परमपवित्रस्थानात किंवा वेदीजवळही जाऊ नये, त्याने तसे केल्यास, माझे पवित्रस्थान भ्रष्ट होईल, कारण त्यांना पवित्र करणारा मीच याहवेह आहे.’ ” \p \v 24 अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांना मोशेने हे सांगितले. \c 22 \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग की, इस्राएलच्या लोकांनी आणलेल्या पवित्र अर्पणांचा आदर करावा, म्हणजे ते माझ्या पवित्र नावाला अपवित्र करणार नाही. मी याहवेह आहे. \p \v 3 “त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे. \p \v 4 “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल, \v 5 किंवा जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल. \v 6 अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये. \v 7 सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे. \v 8 मृत पावलेले किंवा जंगली प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस त्याने खाऊन अशुद्ध होऊ नये. मी याहवेह आहे. \p \v 9 “ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे. \p \v 10 “ ‘याजकाच्या कुटुंबा बाहेरील इतर कोणीही, त्याच्याकडे आलेले पाहुणे किंवा त्याच्याकडे काम करणारे मजूर यांनी पवित्र अर्पणांतील कोणताही पदार्थ खाऊ नये. \v 11 पण याजकाने स्वतःच्या पैशाने गुलाम विकत घेतला असेल किंवा जर त्या गुलामांनी याजकाच्या घरात जन्म घेतला असेल, ते त्याचे अन्न खाऊ शकतील. \v 12 जर याजकाच्या कन्येचा विवाह याजकासोबत झाला नसून, दुसर्‍यासोबत झाला असेल तर तिने पवित्र अर्पणांतील पदार्थ खाऊ नयेत. \v 13 पण जर याजकाची मुलगी विधवा किंवा पतीने सोडलेली असून तिला पुत्र नसेल आणि ती तरुणपणी पुन्हा आपल्या पित्याच्या घरात येऊन राहत असेल, तर मात्र तिने आपल्या पित्याच्या घरातील अन्न खावे. तथापि, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने\f + \fr 22:13 \fr*\fq अनधिकृत व्यक्ती \fq*\ft अर्थात् \ft*\fqa जो याजकीय कुटुंबातील नाही\fqa*\f* हे अन्न खाऊ नये. \p \v 14 “ ‘एखाद्याने चुकून पवित्र अर्पणांतील काही पदार्थ खाल्ले, तर त्याने जितके पदार्थ खाल्ले असतील तितके सर्व आणि पाचव्या हिश्शाइतका पदार्थाचा भाग याजकाला द्यावा. \v 15 इस्राएली लोकांनी याहवेहला अर्पिलेली पवित्र अर्पणे, याजकाने भ्रष्ट करू नयेत, \v 16 ती पवित्र अर्पणे खाण्यास मनाई न केल्यास पापदंड भरण्याची शिक्षा त्यांच्यावर ते ओढवून घेतील; मी याहवेह आहे, जो त्यांना पवित्र करतो.’ ” \s1 स्वीकृत नसलेले बलिदान \p \v 17 याहवेह मोशेला म्हणाले, \v 18 “अहरोन, त्याचे पुत्र व इस्राएली लोकांना सांग, ‘जर तुमच्यापैकी—इस्राएली लोकांपैकी किंवा इस्राएलात राहणारे विदेशी यापैकी कोणीही—याहवेहला वचनपूर्तीचे किंवा स्वैच्छिक होमार्पण आणले, \v 19 तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्‍हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे. \v 20 दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत. \v 21 याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे. \v 22 याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका. \v 23 तुम्ही एखाद्या गोर्‍ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही. \v 24 ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका. \v 25 आणि तुम्ही अशा प्रकारचे प्राणी परराष्ट्रीयांकडून घेऊ नयेत आणि तुमच्या परमेश्वरासाठी अन्नार्पण करू नये. ते तुमच्यावतीने स्वीकारले जाणार नाहीत, कारण ते विकृत आहेत आणि त्यांच्यात दोष आहेत.’ ” \p \v 26 याहवेह मोशेला म्हणाले, \v 27 “वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल. \v 28 गाई व तिचे वासरू किंवा मेंढी व तिचे करडू यांचा एकाच दिवशी वध करू नये. \p \v 29 “ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा. \v 30 त्याच दिवशी ते खाऊन टाकावे; त्यातील काहीही सकाळपर्यंत ठेवू नये. मी याहवेह आहे. \p \v 31 “तुम्ही माझ्या सर्व आज्ञा पाळाव्यात; मी याहवेह आहे. \v 32 माझ्या पवित्र नावाला अपवित्र करू नका, कारण मला इस्राएली लोकांनी पवित्र म्हणून ओळखावे. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला पवित्र केले \v 33 आणि ज्याने तुमचा परमेश्वर होण्यासाठी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. मी याहवेह आहे.” \c 23 \s1 नेमून दिलेले सण \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘हे मी नेमून दिलेले सण आहेत, याहवेहचे नेमून दिलेले सण, जे तुम्ही पवित्र मेळावे असे जाहीर करावे. \s2 शब्बाथ \p \v 3 “ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे. \s2 वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण \p \v 4 “ ‘याहवेहने नेमून दिलेले हे पवित्र सण आहेत, पवित्र मेळाव्यांची घोषणा तुम्ही त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळांमध्ये करावी: \v 5 याहवेहच्या वल्हांडण सणाची सुरुवात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून होते. \v 6 त्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी याहवेहचा बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; सात दिवस खमीर नसलेली भाकर खावी. \v 7 पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतीही नियमित कामे करू नये. \v 8 सात दिवस याहवेहसाठी अन्नार्पण द्यावे. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.’ ” \s2 प्रथम फळांचा सण \p \v 9 याहवेह मोशेला म्हणाले, \v 10 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी जो देश तुम्हाला देणार आहे, जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश कराल आणि पिकांची कापणी कराल, तेव्हा तुम्ही कापणी केलेल्या पहिल्या धान्याची एक पेंढी याजकाकडे आणावी. \v 11 त्याने याहवेहसमोर पेंढी ओवाळावी, जेणेकरून ते तुमच्यावतीने मान्य केले जाईल; शब्बाथाच्या दुसर्‍या दिवशी याजकाने ते ओवाळावे. \v 12 आता ज्या दिवशी तुम्ही पेंढी ओवाळाल, त्याच दिवशी तुम्ही याहवेहला एक वर्षाच्या निर्दोष कोकर्‍याचे होमार्पण करावे. \v 13 त्याच्या धान्यासोबत, जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग जैतुनाच्या तेलात मळून अर्पावा; हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. त्यासोबत पावशेर हीन\f + \fr 23:13 \fr*\ft अंदाजे 1लीटर\ft*\f* द्राक्षारसही याहवेहला अर्पण करावा. \v 14 तुम्ही आपल्या परमेश्वराला हे सर्व अर्पण आणल्याशिवाय पिकातील कोणताही भाग म्हणजे कोवळी कणसे, त्या धान्याच्या भाकरी किंवा भाजलेले दाणे यापैकी काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहिले तरी येणार्‍या पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. \s2 आठवड्यांचा सण \p \v 15 “ ‘शब्बाथाच्या दुसर्‍या दिवशी, तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुढे पूर्ण सात आठवडे मोजावे. \v 16 पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे. \v 17 तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग\f + \fr 23:17 \fr*\ft अंदाजे दोन कि.ग्रॅ.\ft*\f* सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे. \v 18 या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्‍हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण. \v 19 मग याजकाने पापार्पणासाठी एक बोकड व शांत्यर्पणासाठी एक वर्षांचे दोन मेंढे अर्पण करावे. \v 20 याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल. \v 21 त्याच दिवशी तुम्ही एक पवित्र सभा भरवा आणि नियमित कामे करू नका. तुम्ही कुठेही राहिले तरी तुमच्या सर्व भावी पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. \p \v 22 “ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्‍या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” \s2 कर्णे वाजविण्याचा सण \p \v 23 याहवेह मोशेला म्हणाले, \v 24 “इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत. \v 25 या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ” \s2 प्रायश्चित्ताचा दिवस \p \v 26 नंतर याहवेह मोशेला म्हणाले, \v 27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार\f + \fr 23:27 \fr*\ft किंवा \ft*\fqa उपवास करणे\fqa*\f* करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे. \v 28 या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल. \v 29 जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल. \v 30 जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन. \v 31 कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. \v 32 तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.” \s2 मंडपांचा सण \p \v 33 याहवेह मोशेला म्हणाले, \v 34 “इस्राएली लोकांना सांग: ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून याहवेहकरिता मंडपाचा सण सात दिवस पाळावा. \v 35 पहिला दिवस हा पवित्र मेळावा आहे. कोणतेही नियमित काम या दिवशी करू नये. \v 36 सात दिवस याहवेहला अन्नार्पण करा आणि आठव्या दिवशी पवित्र मेळावा भरवून याहवेहला अन्नार्पण करा. हा मेळाव्याचा समारोप आहे; कोणतेही नियमित काम करू नका. \p \v 37 (“ ‘हे याहवेहने स्थापित केलेले सण आहेत, जे तुम्ही याहवेहला अन्नार्पण करण्यासाठी पवित्र मेळावे घोषित करावे; होमार्पण, धान्यार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण आवश्यक त्या दिवशी अर्पणे करावी. \v 38 ही अर्पणे याहवेहच्या शब्बाथांच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे यज्ञ तुम्ही परमेश्वराला अर्पण करता त्या तुमच्या देणग्या आणि नवस फेडावयाची अर्पणे आणि स्वैच्छिक अर्पणे त्या व्यतिरिक्त आहेत.) \p \v 39 “ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जेव्हा तुम्ही जमिनीचे पीक गोळा कराल, तेव्हा सात दिवस याहवेहपुढे सण पाळावा. पहिला दिवस हा शब्बाथ, विश्रामदिन आणि आठवा दिवसही शब्बाथाचा विश्रामदिन असेल. \v 40 पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा. \v 41 हा सात दिवसांचा वार्षिक सण तुम्ही याहवेहसाठी प्रत्येक वर्षी पाळावा. हा सर्वकाळचा नियम येणार्‍या पिढ्यांसाठी आहे; सातव्या महिन्यात हा सण साजरा करावा. \v 42 या सात दिवसात इस्राएली वंशातील सर्वांनी डहाळ्याच्या मंडपात राहावे \v 43 यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” \p \v 44 अशाप्रकारे याहवेहनी नेमून दिलेले हे वार्षिक सण मोशेने इस्राएली लोकांना जाहीर केले. \c 24 \s1 जैतून तेल आणि भाकर याहवेहपुढे ठेवणे \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे. \v 3 सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात, त्याच्याबाहेर अहरोनाने संध्याकाळपासून सकाळपर्यंत याहवेहसमोर दिवे सतत पेटत ठेवावेत, हा नियम पिढ्यान् पिढ्या असावा. \v 4 याहवेहसमोर असलेल्या शुद्ध सोन्याच्या दीपस्तंभावरील दिव्यांची नियमितपणे व्यवस्था करावी. \p \v 5 “सपीठ घ्यावे आणि त्याच्या बारा भाकरी तयार कराव्या, प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा\f + \fr 24:5 \fr*\ft अंदाजे 3.2 कि.ग्रॅ.\ft*\f* वापरावा. \v 6 त्यांच्या दोन रांगा आणि प्रत्येक रांगेत सहा भाकरी शुद्ध सोन्याच्या मेजावर मांडून याहवेहसमोर ठेवाव्यात. \v 7 प्रत्येक रांगेभोवती स्मरणभाग म्हणून शुद्ध धूप टाकावा, याचे प्रतीक म्हणून भाकर आणि अन्नार्पण हे याहवेहसाठी अर्पण करावी. \v 8 ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे. \v 9 या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्‍या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे.” \s1 ईशनिंदा करणार्‍याला मृत्युदंड \p \v 10 एकदा एका इस्राएली स्त्रीचा मुलगा, ज्याचे वडील इजिप्तचे होते, इस्राएली छावणीत गेला. तिथे छावणीत त्याचे आणि एका इस्राएली मनुष्याचे भांडण झाले. \v 11 इस्राएली स्त्रीच्या मुलाने परमेश्वराच्या नावाची निंदा केली आणि तो शिव्याशाप देऊ लागला; तेव्हा त्याला मोशेकडे आणले. (त्याच्या आईचे नाव शेलोमीथ होते, ती दान वंशातील दिब्रीची कन्या होती.) \v 12 तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले. \p \v 13 मग याहवेहनी मोशेला सांगितले: \v 14 “परमेश्वराच्या नावाची निंदा करणार्‍याला छावणीच्या बाहेर घेऊन जा. ज्यांनी हे बोलताना ऐकले आहे, त्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. \v 15 इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी; \v 16 याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे. \p \v 17 “ ‘जो कोणी एखाद्या मनुष्याचा जीव घेईल त्याला निश्चित जिवे मारावे. \v 18 जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन. \v 19 जो कोणी आपल्या शेजार्‍याला दुखापत करतो, त्याला त्याच प्रकारे दुखापत केली पाहिजे: \v 20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे. \v 21 जो कोणी प्राण्याची हत्या करतो, त्याने निश्चित त्याची परतफेड करावी, परंतु जो कोणी मनुष्याची हत्या करतो त्याला जिवे मारावे. \v 22 परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” \p \v 23 मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्‍याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले. \c 25 \s1 शब्बाथ वर्ष \p \v 1 सीनाय पर्वतावर याहवेहनी मोशेला सांगितले, \v 2 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा. \v 3 सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे. \v 4 पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका. \v 5 आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील. \v 6 त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे. \v 7 तसेच जनावरे, वनपशू या दोघांनाही तिथे चरावयाची मोकळीक आहे. \s1 योबेल वर्ष \p \v 8 “ ‘तुम्ही सात शब्बाथ वर्षे मोजावे; म्हणजेच सात वेळा सात वर्षे; म्हणजे सात शब्बाथ वर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होईल. \v 9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे. \v 10 पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे. \v 11 पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. \v 12 कारण हे योबेल वर्ष असेल आणि हे तुमच्याकरिता पवित्र असेल; शेतात आपोआप उगविलेले पीक तुम्ही खावे. \p \v 13 “ ‘या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपल्या स्वतःच्या वतनात परत जावे. \p \v 14 “ ‘यासाठी की तुम्ही जेव्हा आपल्या लोकांना जमीन विकाल किंवा त्याच्याकडून विकत घ्याल, तेव्हा तुमच्याकडून अन्यायाचा व्यवहार होऊ नये. \v 15 योबेल वर्षानंतरच्या वर्षांच्या संख्येच्या आधारावर तुम्ही तुमच्या लोकांकडून विकत घ्यावयाची आणि पीक कापणीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत या आधारावर त्याची तुम्हाला विक्री करावयाची आहे. \v 16 जर वर्षे अनेक असतील तर जमिनीची किंमत त्या मानाने जास्त असेल, परंतु ही वर्षे थोडी असल्यास तिची किंमत त्या मानाने कमी असेल; कारण खरोखर विक्री जमिनीची होत नाही, तर ती जमीन किती वेळा पिके देऊ शकेल यावर तिची किंमत अवलंबून राहील. \v 17 एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 18 “ ‘माझ्या आज्ञांचे पालन करा आणि माझे विधीचे पालन करण्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही देशात सुरक्षितपणे राहाल. \v 19 भूमी भरपूर पीक देईल आणि तुम्ही भरपूर खाल आणि सुरक्षित राहाल. \v 20 तुम्ही असे विचाराल, “जर आम्ही झाडे लावली नाही किंवा आमच्या पिकांची कापणी केली नाही, तर आम्ही सातव्या वर्षी काय खावे?” \v 21 मी तुम्हाला असे आशीर्वादित करेन की जमीन सहाव्या वर्षी तीन वर्षापर्यंत पर्याप्‍त असे पीक देईल. \v 22 आठव्या वर्षी जेव्हा तुम्ही बी पेराल, तेव्हा तुम्ही मागच्या वर्षात गोळा केलेले पीक खात राहाल आणि नवव्या वर्षाचे पीक येईपर्यंत तुम्ही ते खाऊ शकाल. \p \v 23 “ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात. \v 24 तुमच्या ताब्यात असलेली संपूर्ण जमीन, तुम्ही त्या जमिनीला सोडविण्याची तरतूद केली पाहिजे. \p \v 25 “ ‘तुमचा इस्राएली सहकारी गरीब झाला आणि त्याने त्यांची काही मालमत्ता विकली, तर त्यांच्या जवळच्या नातलगाने ती खंडणी भरून सोडवून घ्यावी. \v 26 जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली, \v 27 तर योबेल वर्षापर्यंत जमीन आणखी किती वर्षे पीक देऊ शकेल हे पाहून त्या प्रमाणात तिची किंमत भरावी. जमिनीच्या सध्याच्या मालकाने तितके पैसे घेऊन तिच्या मूळ मालकाला ती परत करावी. \v 28 पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे. \p \v 29 “ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील. \v 30 नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही. \v 31 पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे. \p \v 32 “ ‘लेवी वंशातील मनुष्याचे घर तटबंदी असलेल्या शहरात असले तरी ते त्याला केव्हाही खंडणी भरून सोडवून घेता येईल. \v 33 म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे. \v 34 लेव्यांना त्यांच्या शहराभोवती असलेली कुरणे विकण्यास परवानगी नाही, कारण ती त्यांची कायमचीच मालमत्ता आहे. \p \v 35 “ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील. \v 36 परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये. \v 37 तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये. \v 38 ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 39 “ ‘जर तुमच्यापैकी कोणी इस्राएली गरीब झाला असेल आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर तुम्ही त्यांना गुलामासारखे कामे करावयास लावू नये. \v 40 तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल. \v 41 त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील. \v 42 कारण इस्राएली तर माझे सेवक आहेत, मी त्याला इजिप्त देशातून बाहेर आणले आहे. म्हणून त्याची सर्वसाधारण गुलामाप्रमाणे विक्री केली जाऊ नये. \v 43 त्यांना जुलमाने वागविले जाऊ नये, परंतु तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे. \p \v 44 “ ‘तुमचे पुरुष आणि स्त्री गुलाम तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांमधून यावेत; तुम्ही त्यांच्याकडून गुलाम विकत घेऊ शकता. \v 45 तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे काही तात्पुरते रहिवासी आणि तुमच्या देशात जन्मलेल्या त्यांच्या कुळातील सदस्यांना देखील विकत घेऊ शकता आणि ते तुमची मालमत्ता बनतील. \v 46 तुम्ही ते तुमच्या मुलांना वारसाहक्कात देऊ शकता आणि त्यांना आयुष्यभर गुलाम बनवू शकता, पण तुमच्या इस्राएली बांधवांना अशा प्रकारची कठोर वागणूक तुम्ही देऊ नये. \p \v 47 “ ‘तुमच्यात राहणारा एखादा परदेशी श्रीमंत झाला व इस्राएली वंशातील कोणी आपल्या दारिद्र्यामुळे स्वतःला त्या परदेश्याला वा परदेशी कुटुंबाला विकून टाकले, \v 48 तर त्याची विक्री झाल्यावरही त्याच्या घराण्यापैकी कोणालाहीः \v 49 त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल. \v 50 त्याने स्वतःला विकले त्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे राहिली असतील तितकी मोजून याकाळात एका मजुराला जितकी मजुरी द्यावी लागेल तितका पैसा भरून त्याची सुटका करावी. \v 51 जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा. \v 52 जर योबेल वर्षाला थोडीच वर्षे राहिली असतील तर त्यांनी हिशोब करावा आणि त्यांच्या सुटकेसाठी नियमाप्रमाणे किंमत द्यावी. \v 53 तो दरवर्षी मजुराच्या हिशोबाप्रमाणे त्याच्याबरोबर वागणूक करेल आणि ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्यांना कठोर वागणूक देऊ नये. \p \v 54 “ ‘योबेल वर्षापर्यंतही तो मुक्त झाला नसेल, तर तो व त्याची मुलेबाळे योबेल वर्षी मुक्त होतील, \v 55 कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \c 26 \s1 आज्ञापालनाने मिळणारे आशीर्वाद \p \v 1 “ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. \p \v 2 “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे. \p \v 3 “ ‘माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल, \v 4 तर मी हंगामात तुमच्यासाठी पाऊस पाठवेन आणि जमीन पीक देईल आणि झाडे फळ देतील. \v 5 द्राक्षमळ्याची कापणी होईपर्यंत तुझी मळणी सुरूच राहील आणि द्राक्षांची कापणी पेरणी होईपर्यंत चालू राहील आणि पोटभर अन्न खाऊन तुम्ही तृप्त व्हाल आणि देशात सुरक्षित राहाल. \p \v 6 “ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही. \v 7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील. \v 8 तुम्हातील पाचजण शंभरांचा व शंभर दहा हजारांचा पाठलाग करून सर्व शत्रूंचा पराजय करतील आणि तुमचे शत्रू तलवारीने तुमच्यासमोर पडतील. \p \v 9 “ ‘मी तुमच्यावर कृपादृष्टी करेन, तुम्हाला बहुगुणित करेन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करेन. \v 10 तुम्ही अजूनही मागील कापणी खात राहाल, तुमच्या शेतात इतके भरपूर पीक येईल की, ते साठविण्यासाठी तुम्हाला जुने धान्य बाहेर काढावे लागेल. \v 11 मी तुमच्यामध्ये वस्ती करेन\f + \fr 26:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa निवासमंडप\fqa*\f* व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही. \v 12 मी तुमच्यामध्ये चालेन; मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. \v 13 इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे. \s1 आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा \p \v 14 “ ‘पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि या सर्व आज्ञा पाळल्या नाही, \v 15 आणि माझे विधी तुम्ही स्वीकारले नाही आणि माझे नियम तुच्छ लेखून माझ्या आज्ञा पाळण्यात कसूर केली आणि माझ्या कराराचा भंग केला, \v 16 तर मी तुमच्यासोबत हे करेन: तुम्हाला एकाएकी भयंकर भीतीने ग्रासून टाकेन, तुम्हाला क्षयरोग होईल व असे भयंकर ज्वर तुम्हाला पछाडतील की त्यामुळे तुमचे नेत्र अंधुक होतील आणि तुमची शक्ती कोमेजून जाईल. तुम्ही केलेली धान्याची पेरणी व्यर्थ जाईल, कारण तुमचे पीक तुमचे शत्रू खाऊन टाकतील. \v 17 मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल. \p \v 18 “ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करेन. \v 19 मी तुमच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा करेन आणि तुमचे आकाश लोखंडासारखे व पृथ्वी कास्यासारखी करून टाकेन. \v 20 तुमची मेहनत व्यर्थ गोष्टींमुळे नाश पावेल, कारण तुमची जमीन पिके देणार नाही व तुझ्या देशातील झाडांना फळे येणार नाहीत. \p \v 21 “ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझे ऐकले नाही, तर मी तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट पीडा आणेन. \v 22 मी तुमच्यावर जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुमच्या लेकरांना उचलून नेतील, गुरांचा नायनाट करतील आणि तुमची संख्या कमी करतील; आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओसाड होतील. \p \v 23 “ ‘एवढे करून सुद्धा तुमच्यात सुधारणा झाली नाही आणि माझ्याविरुद्ध तुम्ही वागत राहिलात, \v 24 तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन. \v 25 माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल. \v 26 मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत. \p \v 27 “ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल, \v 28 तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन. \v 29 तुम्ही तुमच्या पुत्रांचे व तुमच्या कन्यांचे मांस खाल. \v 30 तुमच्या उच्च स्थानांचा मी नाश करेन; तुमच्या धूपवेद्या मी मोडून टाकीन; तुमची प्रेते\f + \fr 26:30 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमची अंत्यसंस्काराची अर्पणे\fqa*\f* कुजण्यासाठी मी ती मूर्तीच्या समवेतच राहू देईन आणि मी तुमचा तिरस्कार करेन. \v 31 तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही. \v 32 मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील. \v 33 मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल. \v 34 जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल. \v 35 अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल. \p \v 36 “ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील. \v 37 कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही. \v 38 तुम्ही राष्ट्रांत पांगून नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकील. \v 39 तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील. \p \v 40 “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील, \v 41 ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील, \v 42 तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन. \v 43 कारण ती भूमी ओसाड पडल्यामुळेच शब्बाथांचा आनंद उपभोगू शकत आहे. ते त्यांच्या पापांची परतफेड करतील कारण त्यांनी माझे नियम नाकारले आणि माझ्या विधींचा तिरस्कार केला. \v 44 त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे. \v 45 परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ” \p \v 46 हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या. \c 27 \s1 याहवेहचे जे आहे ते सोडविणे \p \v 1 याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा एखादा मनुष्य याहवेहला समर्पणाचे विशेष नवस करेल, तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्य पुढीलप्रमाणे ठरवावे. \v 3 वीस ते साठ वर्षे वयाच्या पुरुषाचे मूल्य पवित्रस्थानाच्या वजनानुसार चांदीचे पन्नास शेकेल\f + \fr 27:3 \fr*\ft अंदाजे 575 ग्रॅ.\ft*\f* असावे, \v 4 स्त्रीसाठी तिचे मूल्य चांदीचे तीस शेकेल\f + \fr 27:4 \fr*\ft अंदाजे 345 ग्रॅ.\ft*\f* असावे; \v 5 पाच ते वीस वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी, पुरुषाचे मूल्य वीस शेकेल\f + \fr 27:5 \fr*\ft अंदाजे 230 ग्रॅ.\ft*\f* असावे आणि स्त्रीसाठी दहा शेकेल\f + \fr 27:5 \fr*\ft अंदाजे 115 ग्रॅ.\ft*\f* असावे; \v 6 एक महिना ते पाच वर्षे वयाच्या पुरुषाला चांदीचे पाच शेकेल\f + \fr 27:6 \fr*\ft अंदाजे 58 ग्रॅ.\ft*\f* आणि स्त्रीसाठी चांदीचे तीन शेकेल\f + \fr 27:6 \fr*\ft अंदाजे 35 ग्रॅ.\ft*\f* असावे; \v 7 साठ वर्ष आणि अधिक वर्षाच्या पुरुषाचे मूल्य चांदीचे पंधरा शेकेल\f + \fr 27:7 \fr*\ft अंदाजे 175 ग्रॅ.\ft*\f* असावे आणि स्त्रीसाठी दहा चांदीचे शेकेल असावे. \v 8 फारच गरिबीमुळे नवस फेडण्यासाठी मनुष्याला इतके शेकेल भरणे शक्य नसेल, तर ज्याचे समर्पण होत आहे त्याला याजकापुढे उभे करावे. मग नवस फेडण्यासाठी याजक ठरवेल तितके शेकेल त्याने द्यावे. \p \v 9 “ ‘जर त्याने एखादा पशू याहवेहला अर्पण करण्याचा नवस केला असेल, तर हे अर्पण याहवेहला पवित्र असे होईल. \v 10 त्यांनी त्याची अदलाबदल करू नये किंवा वाईटाच्या बदल्यात चांगला किंवा चांगल्याच्या बदल्यात वाईट असे करू नये; जर ते एका पशूबद्दल दुसरा पशू अशी अदलाबदल करतील, तर दोन्ही पशू आणि बदललेला पशू पवित्र होतील. \v 11 जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे. \v 12 तो त्याचा दर्जा चांगला किंवा वाईट हे ठरवेल. मग याजक त्याचे जे काही मूल्य ठरवेल, तेवढेच त्याचे मूल्य असेल. \v 13 परंतु जर त्या मालकाला तो पशू सोडवून घ्यावयाचा असेल, तर त्याच्या किमतीचा पाचवा भाग अधिक द्यावा. \p \v 14-15 “ ‘जर एखाद्याने याहवेहला आपले घर पवित्र म्हणून समर्पित केले आणि नंतर त्याची इच्छा असेल की, ते सोडवून घ्यावे, तर याजक त्या घराची चांगलीवाईट स्थिती पाहून त्याचे मूल्य ठरवेल, आणि घरमालक याजकाने ठरविलेली किंमत अधिक वीस टक्के भरून ते घर आपल्या ताब्यात घेईल. \p \v 16 “ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर\f + \fr 27:16 \fr*\ft अंदाजे 135 कि.ग्रॅ.\ft*\f* जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील. \v 17 जर योबेल वर्षापासून त्याने आपले शेत समर्पित केले तर त्याची ठरविलेली किंमत तितकीच राहील. \v 18 तरी, त्याने योबेल वर्षानंतर जर आपले शेत अर्पण केले असेल, तर दुसर्‍या योबेल वर्षाला जितकी वर्षे असतील त्या मानाने याजकाने त्या शेताचे मोल कमी करून मूल्य ठरवावे. \v 19 जर शेत समर्पित करणार्‍याला ते सोडवून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्याच्या मूल्यात पाचवा भाग जोडला पाहिजे आणि ते शेत पुन्हा त्यांचे होईल. \v 20 तथापि, जर त्यांनी ते शेत परत सोडवून न घेता, किंवा त्यांनी ते इतर कोणाला विकले असेल, तर ते कधीही सोडविले जाऊ शकत नाही. \v 21 जर ते शेत योबेल वर्षी सोडविले जाते तर ते याहवेहसाठी समर्पित पवित्र शेत मानले जाईल; ते याजकाचे वतन होईल. \p \v 22 “ ‘एखाद्याने स्वतःचे वतन नसलेले, पण दुसर्‍याकडून विकत घेतलेले शेत याहवेहला समर्पित केले, जी त्याच्या कुटुंबाची संपत्ती नसेल, \v 23 तर याजक योबेल वर्षापर्यंतची त्या शेताची किंमत ठरवेल, आणि त्याने त्याच दिवशी याजकाने ठरविलेले मूल्य याहवेहसाठी पवित्र समजून द्यावे. \v 24 योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे. \v 25 तुम्ही विकता त्या प्रत्येकाचे मूल्य पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार असावे आणि एक शेकेल म्हणजे वीस गेरा. \p \v 26 “ ‘तथापि, कोणीही प्राण्याचे प्रथम जन्मलेले समर्पित करू शकत नाही, कारण प्रथम जन्मलेले मुळातच याहवेहचे आहेत; बैल\f + \fr 27:26 \fr*\ft नर वा मादी\ft*\f* असो वा मेंढरे, ते याहवेहचेच आहे. \v 27 जर ते अशुद्ध पशूंपैकी असेल, तर त्याची ठरवून दिलेले मूल्य द्यावे व त्या शिवाय ठरविलेल्या किमतीचा पाचवा भाग अधिक किंमत भरावी. जर तो पशू सोडवून घेतला जात नसेल, तर तो त्याच्या ठरविलेल्या किमतीत विकता येईल. \p \v 28 “ ‘एखादा मनुष्य आपल्याजवळ असलेले काहीही याहवेहला समर्पित करेल—मग ते एखादी व्यक्ती असो, पशू असो वा वतनाची जमीन असो—ते विकू नये किंवा खंडणी भरून सोडवूनही घेऊ नये; कारण समर्पित ते सर्व याहवेहसाठी परमपवित्र आहे. \p \v 29 “ ‘मरणदंडाची शिक्षा झालेल्या मनुष्याला खंडणी भरून सोडविता येणार नाही. त्याचा अवश्य वध करावा. \p \v 30 “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत. \v 31 ज्या कोणाला त्यांचा कोणताही दशांश भाग सोडावयाचा असेल त्यांनी त्या वस्तूंच्या किमतीचा पाचवा भाग अधिक रक्कम भरावी. \v 32 गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल. \v 33 कोणीही वाईटामधून चांगल्याची निवड करू नये किंवा अदलाबदल करू नये; तशी अदलाबदल केल्यास दोन्हीही प्राणी आणि बदली केलेला पवित्र होतील आणि त्यांना खंडणी भरून सोडवू शकणार नाहीत.’ ” \p \v 34 या आज्ञा सीनाय पर्वतावर याहवेहने इस्राएली लोकांसाठी मोशेला दिल्या.