\id LAM - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h विलापगीत \toc1 विलापगीत \toc2 विलापगीत \toc3 विला \mt1 विलापगीत \c 1 \q1 \v 1 एकेकाळी माणसांनी गजबजलेली ही नगरी, \q2 आता कशी निर्जन झाली आहे! \q1 एकेकाळी राष्ट्रांमध्ये जी सर्वोत्कृष्ट नगरी होती, \q2 तिला आता कसे वैधव्यच प्राप्त झाले आहे! \q1 एकेकाळची ही सर्व प्रांताची राणी \q2 आता कशी दासी झाली आहे. \b \q1 \v 2 रात्रभर ती अत्यंत रडत असते; \q2 तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. \q1 तिच्या सर्व प्रियकरात तिचे \q2 सांत्वन करणारा कोणी नाही; \q1 तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; \q2 ते तिचे शत्रू बनले आहेत. \b \q1 \v 3 पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर \q2 यहूदाह बंदिवासात गेली आहे. \q1 ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते; \q2 आता तिला कुठेही आराम मिळत नाही. \q1 जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी \q2 तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे. \b \q1 \v 4 सीयोनकडे जाणारे रस्ते विलाप करीत आहेत, \q2 निर्धारित सणाला तिच्याकडे कोणीही येत नाही. \q1 तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, \q2 तिचे याजक कण्हत आहेत, \q1 तिच्या तरुणी शोकग्रस्त आहेत, \q2 आणि तिला अत्यंत पीडा होत आहे. \b \q1 \v 5 तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; \q2 तिचे शत्रू सुखात आहेत. \q1 याहवेहने तिला दुःख दिले आहे, \q2 कारण तिने अनेक पापे केली आहेत. \q1 तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. \q2 ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत. \b \q1 \v 6 सीयोनकन्येचे \q2 सर्व वैभव लुप्त झाले आहे. \q1 तिचे राजपुत्र ज्यांना चरण्याकरिता \q2 कुरण उपलब्ध नाही अशा हरिणासारखे झाले आहेत; \q1 सामर्थ्यहीन होऊन ते \q2 त्यांच्या पाठलाग करणाऱ्यांपासून त्यांनी पलायन केले आहे. \b \q1 \v 7 यरुशलेमच्या या पीडित व भटकंतीमध्ये \q2 ती तिच्या समृद्धीचे स्मरण करते \q2 जे तिचे गतवैभवाचे दिवस होते. \q1 जेव्हा तिचे लोक शत्रूच्या हातात पडले, \q2 तिला साहाय्य करणारे कोणीही नव्हते. \q1 तिचे शत्रू तिच्याकडे बघतात, \q2 आणि तिच्या विध्वंसामुळे तिचा उपहास करतात. \b \q1 \v 8 कारण यरुशलेमेने भयंकर पापे केली \q2 म्हणूनच ती किळसवाणी झाली आहे. \q1 तिचा मान सन्मान करणारे आता तिला तुच्छ मानतात, \q2 कारण तिला विवस्त्र असे त्यांनी पाहिले आहे; \q1 ती कण्हते \q2 व वळून निघून जाते. \b \q1 \v 9 तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; \q2 तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. \q1 तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; \q2 तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. \q1 “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, \q2 शत्रू विजयी झाला आहे.” \b \q1 \v 10 तिच्या सर्व संपत्तीवर \q2 तिच्या शत्रूंनी हात टाकला आहे. \q1 परकीय राष्ट्रांनी तिच्या पवित्र मंदिरात प्रवेश \q2 करताना तिने बघितले होते— \q1 तुम्ही निषिद्ध केलेल्यांनी \q2 तुमच्या सभास्थानात प्रवेश केला. \b \q1 \v 11 अन्नाचा शोध घेत असताना \q2 तिचे लोक कण्हत आहेत; \q1 मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात ते अन्न विकत घेत आहेत \q2 जेणेकरून ते जिवंत राहतील. \q1 “हे याहवेह, पाहा आणि याकडे लक्ष द्या, \q2 मी कशी घृणास्पद झाले आहे.” \b \q1 \v 12 या वाटेच्या वाटसरूंनो माझी \q2 दुर्दशा पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय? \q1 मला जे दुःख देण्यात आले आहे, \q2 त्या माझ्या दुःखासारखे दुसरे दुःख आहे काय? \q1 याहवेहने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी \q2 ही वेदना माझ्यावर लादली आहे. \b \q1 \v 13 त्यांनी उच्च स्थानातून अग्नी पाठविला आहे \q2 व तो माझ्या हाडांमध्ये जळत आहे. \q1 त्यांनी माझ्या पावलात सापळा पसरविला आहे \q2 व मला मागे वळविले आहे. \q1 त्यांनी मला उद्ध्वस्त केले आहे, \q2 मी दिवसभर मूर्छित होत आहे. \b \q1 \v 14 माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत\f + \fr 1:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याने माझ्या पापावर नजर ठेवली\fqa*\f*; \q2 त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. \q1 ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, \q2 आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. \q1 मी ज्यांचा सामना करू शकत नाही, \q2 त्यांच्या हाती मला दिले आहे. \b \q1 \v 15 “माझ्यामध्ये असलेल्या सर्व योद्ध्यांना \q2 प्रभूने नाकारले आहे; \q1 माझ्या तरुणांना चिरडून टाकण्यासाठी \q2 प्रभूंनी एका मोठ्या सैन्यास हजर राहण्यास\f + \fr 1:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa समय ठरवून ठेवला आहे\fqa*\f* फर्माविले आहे. \q1 त्यांच्या द्राक्षकुंडात प्रभूंनी \q2 कुमारी कन्या यहूदीयास तुडविले आहे. \b \q1 \v 16 “याकारणास्तव मी रडत आहे \q2 आणि माझ्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे. \q1 माझे सांत्वन करण्यास माझ्याजवळ कोणीही नाही, \q2 माझा आत्मा पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणीही नाही. \q1 माझी मुलेबाळे निराश्रित झाली आहेत. \q2 कारण शत्रूचे वर्चस्व झाले आहे.” \b \q1 \v 17 सीयोन हात पसरीत आहे, \q2 पण तिचे सांत्वन करण्यास कोणीही नाही. \q1 कारण याहवेहने याकोबाविषयी फर्मान काढले आहे \q2 तिचे शेजारीच तिचे शत्रू होवोत; \q1 तिच्या शेजाऱ्यामध्ये यरुशलेम \q2 अमंगळ वस्तूसारखी झाली आहे. \b \q1 \v 18 “याहवेह नीतिमान आहेत, \q2 तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. \q1 सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; \q2 माझ्या वेदना पाहा. \q1 कारण माझे तरुण व तरुणी \q2 बंदिवासात गेले आहेत. \b \q1 \v 19 “मी माझ्या मित्रगणांना बोलाविले \q2 पण त्यांनी माझा विश्वासघात केला. \q1 माझे याजक आणि वडीलजन \q2 स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी \q1 जेव्हा ते अन्नाचा शोध घेत होते \q2 तेव्हा ते नगरात नष्ट झाले. \b \q1 \v 20 “हे याहवेह, माझ्या वेदना पाहा! \q2 माझे अंतःकरण यातनाग्रस्त झाले आहे, \q1 आणि माझे हृदय अस्वस्थ झाले आहे. \q2 कारण मी अत्यंत बंडखोर झाले होते. \q1 बाहेर तलवार मला मृत्यू आणते; \q2 आत तर केवळ मरणच आहे. \b \q1 \v 21 “लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, \q2 पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. \q1 माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे \q2 तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; \q1 तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो \q2 म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील. \b \q1 \v 22 “त्यांची सर्व दुष्कृत्ये तुमच्यापुढे येवोत; \q2 माझ्या सर्व पापांमुळे \q1 तुम्ही माझ्याशी जसा व्यवहार केला \q2 तसाच त्यांच्याशीही करा. \q1 माझे उसासे खूप आहेत \q2 व माझे हृदय मूर्छित झाले आहे.” \b \b \c 2 \q1 \v 1 प्रभूने सीयोनकन्येला आपल्या क्रोधरूपी \q2 मेघाने कसे आच्छादून टाकले आहे! \q1 त्यांनी इस्राएलचे वैभव स्वर्गातून पृथ्वीवर \q2 खाली धुळीत फेकले आहे; \q1 क्रोधाच्या दिवशी त्यांनी \q2 आपल्या पादासनाचेही स्मरण केले नाही. \b \q1 \v 2 प्रभूने कसलीच दयामाया न दाखविता \q2 याकोबाच्या सर्व आवासांना गिळंकृत केले आहे; \q1 त्यांच्या क्रोधाग्नीने यहूदाह कन्येच्या \q2 तटबंदीची प्रत्येक भिंत पाडून टाकली आहे. \q1 तिचे राज्य व तिचे अधिपती या सर्वांना अपमानित करून \q2 त्यांनी जमीनदोस्त केले आहे. \b \q1 \v 3 त्यांच्या क्रोधात त्यांनी इस्राएलचे \q2 प्रत्येक शिंग\f + \fr 2:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa सामर्थ्य\fqa*\f* नष्ट केले आहे. \q1 शत्रूने हल्ला केला तेव्हा त्यांनी \q2 त्यांचा संरक्षण करणारा उजवा हात काढून घेतला आहे. \q1 पेटलेल्या अग्नीप्रमाणे त्यांनी याकोबाभोवती \q2 असलेले सर्वकाही भस्म करून टाकले आहे. \b \q1 \v 4 शत्रूसारखे त्यांनी धनुष्य वाकविले आहे; \q2 त्यांचा उजवा हात सज्ज झाला आहे. \q1 शत्रूसारखे त्यांनी नयनरम्य तरुणांचा \q2 संहार केला आहे. \q1 त्यांनी त्यांच्या क्रोधाग्नीचा \q2 सीयोन कन्येच्या तंबूवर वर्षाव केला आहे. \b \q1 \v 5 प्रभू शत्रूसारखे झाले आहेत; \q2 त्यांनी इस्राएलला गिळंकृत केले आहे. \q1 त्यांनी तिचे सर्व राजवाडे गिळंकृत केले आहेत \q2 आणि दुर्ग उद्ध्वस्त केले आहेत. \q1 यहूदीया कन्येचा शोक व विलाप \q2 त्यांनी बहुगुणित केला आहे. \b \q1 \v 6 बागेसारख्या आवासांना त्यांनी उकिरड्यागत केले आहे; \q2 त्यांच्या भेटण्याचे स्थान नष्ट केले आहे. \q1 याहवेहने सीयोनला तिच्या सर्व \q2 निर्धारित उत्सव व शब्बाथाचे विस्मरण केले आहे; \q1 राजे व याजक या दोघांना \q2 त्यांनी क्रोधित तिरस्काराने नाकारले आहे. \b \q1 \v 7 प्रभूने आपल्या वेदीस नाकारले आहे \q2 आणि त्यांच्या पवित्रस्थानाचा त्याग केला आहे. \q1 त्यांनी तिच्या राजवाड्यांच्या भिंती \q2 तिच्या शत्रूंच्या हातात दिल्या आहेत; \q1 एका निर्धारित उत्सवाच्या दिवसात करण्याचा जयघोष \q2 याहवेहच्या भवनात त्यांच्या शत्रूंनी केला आहे. \b \q1 \v 8 सीयोन कन्येच्या भिंतींना धराशायी करण्याचा \q2 याहवेहने निर्धार केला आहे. \q1 त्यांनी मापक दोरी ताणली आहे \q2 विनाश करण्यास आपला हात रोखला नाही. \q1 त्यांनी संरक्षक भिंत व तटबंदीस विलाप करण्यास लावले \q2 ते एकत्रच ढासळून पडले. \b \q1 \v 9 तिच्या वेशी जमिनीत धसल्या आहेत; \q2 त्यांच्या सळया मोडून नष्ट झाल्या आहेत. \q1 तिचे राजे आणि अधिपती इतर देशात बंदिवासात गेले आहेत, \q2 तिथे नियमशास्त्र राहिले नाही, \q1 आणि तेथील संदेष्ट्यांना आता याहवेहकडून \q2 दृष्टान्तही मिळत नाहीत. \b \q1 \v 10 सीयोनकन्येचे वडीलजन \q2 मूकपणे जमिनीवर बसले आहेत; \q1 त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे \q2 आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. \q1 यरुशलेमच्या तरुणींनी \q2 माना खाली घातल्या आहेत. \b \q1 \v 11 माझे डोळे आता रडून थकले आहेत, \q2 मला आतून उत्कट यातना होत आहेत; \q1 माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे \q2 कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, \q1 कारण लहान मुले व तान्ही बाळे \q2 नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत. \b \q1 \v 12 ते त्यांच्या मातांना विचारत आहेत, \q2 “द्राक्षारस व धान्य कुठे आहे?” \q1 ते नगराच्या रस्त्यांवर घायाळ झालेल्याप्रमाणे \q2 बेशुद्ध होऊन पडत आहेत, \q1 त्यांच्या मातांच्या बाहूत \q2 या मुलांचे प्राण हळूहळू निघून जात आहेत. \b \q1 \v 13 हे यरुशलेमकन्ये, सर्व जगात असले दुःख \q2 मी तुला काय म्हणू? \q2 मी तुझी तुलना कशाशी करू? \q1 मी तुला कोणा समान लेखू? \q2 जेणेकरून मी तुझे सांत्वन करू शकेन? \q2 हे सीयोनच्या कुमारी कन्ये? \q1 तुझा घाव सागराएवढा खोल आहे. \q2 तुला कोण बरे करू शकेल? \b \q1 \v 14 तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त \q2 खोटे व व्यर्थ होते; \q1 तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता \q2 तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. \q1 त्यांनी तुला दिलेले संदेश \q2 खोटे व दिशाभूल करणारे होते. \b \q1 \v 15 वाटेने जाणारे सर्व वाटसरू \q2 तुझी स्थिती बघून टाळ्या वाजवित होते; \q1 यरुशलेमकन्ये. \q2 तुझा उपहास करून डोकी हालवून ते म्हणतात, \q1 “सौंदर्याची परिपूर्णता, \q2 संपूर्ण पृथ्वीचा आनंद \q2 असे संबोधली जाणारी नगरी ती हीच आहे का?” \b \q1 \v 16 तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध \q2 त्यांचे मुख मोठे रुंद उघडले आहे; \q1 दात खाऊन रागाने फुत्कार टाकीत ते म्हणतात, \q2 “आपण अखेरीस तिला गिळंकृत केले. \q1 या दिवसाची आम्ही किती वाट पाहत होतो; \q2 ते बघण्यास आपण जिवंत आहोत.” \b \q1 \v 17 याहवेहने योजल्यानुसार केले आहे; \q2 त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, \q2 जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. \q1 त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, \q2 तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, \q2 त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे. \b \q1 \v 18 लोकांची अंतःकरणे. \q2 प्रभूकडे विलाप करतात. \q1 सीयोन कन्येच्या तटांनो, \q2 स्वतःला विसावा न देता, \q2 तुमचे डोळे आराम न करता \q1 एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू \q2 रात्रंदिवस वाहोत. \b \q1 \v 19 उठा, रात्री धावा करा, \q2 जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; \q1 त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, \q2 प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर \q1 भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्‍या \q2 तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. \q1 प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे \q2 पाण्यासारखी ओता. \b \q1 \v 20 याहवेह, बघा व विचार करा: \q2 तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? \q1 ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, \q2 त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? \q1 प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि \q2 संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय? \b \q1 \v 21 पाहा वृद्ध व तरुण एकत्र \q2 रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; \q1 माझे तरुण व तरुणी \q2 शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. \q1 तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; \q2 कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला. \b \q1 \v 22 “सणासाठी आमंत्रित केल्याप्रमाणे, \q2 तुम्ही माझ्याविरुद्ध संकटांना सर्व बाजूंनी बोलाविले. \q1 याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी एकही \q2 मनुष्य निसटला नाही किंवा जिवंत राहिला नाही. \q1 ज्यांचे मी संगोपन केले आणि वाढविले, \q2 त्या सर्वांचा माझ्या शत्रूकडून नाश झाला आहे.” \b \b \c 3 \q1 \v 1 याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, \q2 याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे. \q1 \v 2 त्यांनी मला हाकलून लावले व \q2 प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे; \q1 \v 3 निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर \q2 माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे. \b \q1 \v 4 त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत \q2 आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत. \q1 \v 5 विषारी\f + \fr 3:5 \fr*\ft कटुता\ft*\f* व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या \q2 कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे. \q1 \v 6 जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत \q2 त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे. \b \q1 \v 7 त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; \q2 त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे. \q1 \v 8 जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, \q2 तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत. \q1 \v 9 मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. \q2 त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे. \b \q1 \v 10 दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, \q2 लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे \q1 \v 11 त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले \q2 आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले. \q1 \v 12 त्यांनी आपले धनुष्य ताणून \q2 मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे. \b \q1 \v 13 आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी \q2 माझे अंतर्याम छेदले आहे. \q1 \v 14 मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे; \q2 ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात. \q1 \v 15 प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, \q2 आणि मला आंब प्यावयास दिली आहे. \b \q1 \v 16 त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. \q2 त्यांनी मला धुळीत तुडविले आहे. \q1 \v 17 माझी शांती हिरावून गेली आहे; \q2 समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे. \q1 \v 18 म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे \q2 व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.” \b \q1 \v 19 माझी पीडा व भटकंतीची, \q2 विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते. \q1 \v 20 ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, \q2 आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो. \q1 \v 21 तरीपण आशेचा हा एक \q2 किरण उरला आहे: \b \q1 \v 22 याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही \q2 कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही. \q1 \v 23 त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; \q2 तुमची विश्वसनीयता महान आहे. \q1 \v 24 मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; \q2 म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.” \b \q1 \v 25 जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, \q2 आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत. \q1 \v 26 याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे \q2 हितकारक आहे. \q1 \v 27 मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे \q2 त्याच्या हितासाठी आहे. \b \q1 \v 28 कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे \q2 म्हणून त्याने एकांतात शांत बसावे. \q1 \v 29 त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— \q2 तरी आशा कायम असेल. \q1 \v 30 जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, \q2 आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे. \b \q1 \v 31 कारण प्रभू कोणाचाही \q2 कायमचा त्याग करत नाहीत. \q1 \v 32 जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, \q2 त्यांची महान प्रेमदया अथांग आहे. \q1 \v 33 ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत \q2 व त्यांना दुखवित नाहीत. \b \q1 \v 34 जगातील सर्व बंदिवानांना \q2 पायाखाली तुडवून चिरडणे, \q1 \v 35 परमोच्चांनी दिलेले हक्क \q2 त्यांच्यापासून हिरावून घेणे, \q1 \v 36 कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— \q2 या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय? \b \q1 \v 37 प्रभूने परवानगी दिल्याशिवाय \q2 बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे? \q1 \v 38 अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही \q2 परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय? \q1 \v 39 आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, \q2 तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी? \b \q1 \v 40 आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, \q2 आणि परत याहवेहकडे वळू. \q1 \v 41 आपण स्वर्गातील परमेश्वराकडे \q2 आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू: \q1 \v 42 आम्ही पाप केले आणि बंड केले \q2 आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही. \b \q1 \v 43 “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; \q2 तुम्ही निर्दयपणे संहार केला. \q1 \v 44 तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे \q2 जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये. \q1 \v 45 तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा \q2 गाळ व उकिरडा केले आहे. \b \q1 \v 46 “सर्व शत्रूंनी आपले मुख \q2 आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे. \q1 \v 47 आम्ही दहशत व जोखिम, \q2 विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.” \q1 \v 48 माझ्या लोकांच्या विनाशामुळे \q2 माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत. \b \q1 \v 49 माझे डोळे अखंडपणे, \q2 न थांबता, अश्रुपात करीत राहतील, \q1 \v 50 याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून \q2 पाहीपर्यंत ते वाहत राहतील. \q1 \v 51 माझ्या नगरातील स्त्रियांना बघून \q2 माझे अंतःकरण पीडित होत आहे. \b \q1 \v 52 जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, \q2 त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे. \q1 \v 53 त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला \q2 आणि माझ्यावर दगडमार केला; \q1 \v 54 पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले, \q2 आणि मला वाटले की आता माझा नाश होणार. \b \q1 \v 55 याहवेह, त्या खोल डोहातून \q2 मी तुमच्या नावाचा धावा केला, \q1 \v 56 तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे \q2 तुम्ही दुर्लक्ष करू नका.” \q1 \v 57 मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले \q2 आणि म्हणाले, “भिऊ नकोस.” \b \q1 \v 58 हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला; \q2 तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली. \q1 \v 59 याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. \q2 तुम्हीच माझी बाजू उचलून धरा! \q1 \v 60 तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, \q2 त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे. \b \q1 \v 61 याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत, \q2 त्यांनी रचलेले सर्व कारस्थान— \q1 \v 62 माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर \q2 काय बोलतात व काय कुजबुजतात, हे सर्व तुम्ही ऐकले आहे. \q1 \v 63 त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून, \q2 ते माझ्या उपहासाची गाणी गातात. \b \q1 \v 64 हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल \q2 ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या. \q1 \v 65 त्यांच्या हृदयावर आवरण टाका, \q2 तुमचा शाप त्यांच्यावर पडो! \q1 \v 66 क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि \q2 याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा. \b \b \c 4 \q1 \v 1 सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, \q2 उत्तम सोने निस्तेज झाले आहे! \q1 पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या \q2 कोपऱ्यात विखुरली आहेत. \b \q1 \v 2 सुवर्णतुल्य असलेल्या, \q2 सीयोनाच्या लेकरांना, \q1 आता कुंभाराच्या हातांनी \q2 घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे! \b \q1 \v 3 कोल्हीदेखील आपल्या पिलांना \q2 स्तनपान करते, \q1 पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे \q2 निर्दयी झाले आहेत. \b \q1 \v 4 तहानेमुळे शिशूंच्या जिभा \q2 टाळूला चिकटल्या आहेत; \q1 भाकरीसाठी लेकरे याचना करीत आहेत, \q2 पण त्यांना कोणीही देत नाही. \b \q1 \v 5 उत्तम पक्वान्ने खाणारे \q2 आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. \q1 जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले \q2 आता राखेत लोळत आहेत. \b \q1 \v 6 माझ्या लोकांची शिक्षा \q2 सदोमापेक्षाही घोर झाली आहे, \q1 ज्यांना इतर कोणी मदत करण्याआधी \q2 त्यांचा एका क्षणात नायनाट झाला. \b \q1 \v 7 त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी \q2 आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, \q1 त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, \q2 सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती. \b \q1 \v 8 पण आता ते चेहरे काजळीपेक्षा काळेकुट्ट झाले आहेत; \q2 त्यांना वाटेत कोणी ओळखू शकत नाही. \q1 त्यांची कातडी हाडांना चिकटली आहे; \q2 ती काठीसारखी शुष्क झाली आहे. \b \q1 \v 9 उपासमारीने हळूहळू मरण्यापेक्षा \q2 तलवारीने मरणारे फार बरे; \q1 कारण शेतातील उपज नसल्यामुळे \q2 भुकेपायी व्याकूळ होऊन ते क्षय पावतात. \b \q1 \v 10 करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने \q2 आपलीच मुले-बाळे शिजविली, \q1 जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला, \q2 ती त्यांचे अन्न बनली. \b \q1 \v 11 याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे; \q2 त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे. \q1 त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला \q2 त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे. \b \q1 \v 12 यरुशलेमच्या वेशीतून आत \q2 एखादा शत्रू वा विरोधी शिरू शकेल, \q1 यावर संपूर्ण पृथ्वीवरील राजांनी \q2 तसेच जगातील कोणत्याही लोकांनी विश्वास ठेवला नाही. \b \q1 \v 13 तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे \q2 आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त \q1 या नगरीत सांडून \q2 याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले. \b \q1 \v 14 आता तेच लोक आंधळ्यासारखे झोकांड्या \q2 खात चालले आहेत. \q1 ते रक्ताने माखून असे भ्रष्ट झाले आहेत \q2 की त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करण्याचे कोणीही धाडस करीत नाही. \b \q1 \v 15 लोक त्यांच्यावर खेकसतात: “चालते व्हा! तुम्ही अशुद्ध आहात! \q2 दूर! दूर! आम्हाला स्पर्श करू नका!” \q1 जेव्हा ते पलायन करतात आणि तिथे भटकतात, \q2 त्या देशातील लोक म्हणतात, \q2 “ते आता इथे राहू शकत नाहीत.” \b \q1 \v 16 स्वतः याहवेहने त्यांची पांगापांग केली आहे; \q2 ते आता त्यांचा सांभाळ करणार नाहीत. \q1 याजक सन्मानयोग्य राहिले नाहीत, \q2 वडीलजन कृपेयोग्य राहिले नाहीत. \b \q1 \v 17 शिवाय, मदतगार शोधून \q2 आमची दृष्टी मंद झाली आहे; \q1 जे आमच्या मदतीसाठी येणार नाहीत \q2 अशा राष्ट्रांवर आमच्या बुरुजांवरून आम्ही लक्ष ठेवले. \b \q1 \v 18 आम्हाला बाहेर रस्त्यांवर चालता येत नाही, \q2 कारण लोक प्रत्येक पावलावर आमचा पाठलाग करतात. \q1 आमचा अंत जवळ आला आहे, आणि आमचे मोजकेच दिवस राहिले आहेत. \q2 आमचा अंत आलेलाच आहे. \b \q1 \v 19 आमचा पाठलाग करणारे \q2 आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत; \q1 ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात \q2 आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात. \b \q1 \v 20 याहवेह द्वारा अभिषिक्त, आमच्या जीवनाचा श्वास, \q2 त्यांच्या जाळ्यात अडकला. \q1 आम्ही विचार केला होता की त्यांच्या छत्राखाली \q2 कोणत्याही परकीय राष्ट्रात आम्ही रहिवास करू. \b \q1 \v 21 ऊस प्रांतात राहणार्‍या एदोम कन्ये, \q2 हर्ष कर व उल्हासित हो. \q1 परंतु तुझ्याकडे देखील तो प्याला आणल्या जाईल; \q2 तू तो पिऊन मदोन्मत्त होऊन पूर्णतः निर्वस्त्र होशील. \b \q1 \v 22 सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, \q2 ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. \q1 पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, \q2 आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील. \b \b \c 5 \q1 \v 1 हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; \q2 आमच्या अपमानाकडे लक्ष द्या. \q1 \v 2 आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे, \q2 आमची घरे परकियांनी दिली आहेत. \q1 \v 3 आम्ही पितृहीन झालो आहोत, \q2 आमच्या माता विधवा झाल्या आहेत. \q1 \v 4 पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते; \q2 किंमत चुकविल्याशिवाय आम्हाला जळण मिळत नाही. \q1 \v 5 पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. \q2 आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच. \q1 \v 6 पुरेशी भाकरी मिळण्याकरिता \q2 आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे. \q1 \v 7 आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. \q2 आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत. \q1 \v 8 गुलाम आता आमचे धनी झाले आहेत, \q2 त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही. \q1 \v 9 भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो, \q2 कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो. \q1 \v 10 आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, \q2 कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत. \q1 \v 11 स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, \q2 व कुमारिकांना यहूदीयातील नगरात. \q1 \v 12 आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; \q2 आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही. \q1 \v 13 तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; \q2 तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात. \q1 \v 14 वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत; \q2 तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे. \q1 \v 15 आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे; \q2 आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे. \q1 \v 16 आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. \q2 धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे! \q1 \v 17 याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, \q2 या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत. \q1 \v 18 सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे, \q2 तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात. \b \q1 \v 19 हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; \q2 तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे. \q1 \v 20 मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता? \q2 तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला? \q1 \v 21 याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, \q2 म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; \q2 पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा, \q1 \v 22 जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल \q2 आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.