\id JOS - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h यहोशुआ \toc1 यहोशुआ \toc2 यहोशुआ \toc3 यहो \mt1 यहोशुआ \c 1 \s1 पुढारी म्हणून यहोशुआची नेमणूक \p \v 1 याहवेहचा सेवक मोशेच्या मृत्यूनंतर, मोशेचा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआला याहवेह म्हणाले: \v 2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता तू आणि हे सर्व लोक यार्देन नदी ओलांडून त्या देशात जाण्यास तयार व्हा, जो मी त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना देत आहे. \v 3 मी मोशेला दिलेल्या वचनानुसार जिथे तुम्ही तुमचे पाऊल ठेवाल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन. \v 4 तुमची सीमा वाळवंटापासून लबानोन पर्यंत आणि महान नदी फरातपासून\f + \fr 1:4 \fr*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f*, सर्व हिथी देश, ते पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत असेल. \v 5 तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही. \v 6 खंबीर हो आणि हिंमत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना वारसा म्हणून देण्याची मी शपथ वाहिली त्या देशात नेण्यासाठी तू त्यांचे नेतृत्व करशील. \p \v 7 “मात्र तू खंबीर हो आणि फार धैर्यवान हो. माझा सेवक मोशेने तुम्हाला दिलेले सर्व नियम पाळण्याची काळजी घे; त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जिथे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील. \v 8 शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. \v 9 मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.” \p \v 10 तेव्हा यहोशुआने तेथील लोकांच्या अधिकार्‍यांना हुकूम दिला: \v 11 “छावणीमधून जा आणि लोकांना सांगा, ‘तुमची अन्नसामुग्री तयार ठेवा. आतापासून तीन दिवसात तुम्ही येथून यार्देन नदी पार करून जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहेत, त्याचा ताबा घ्याल.’ ” \p \v 12 परंतु रऊबेन आणि गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला यहोशुआ म्हणाला, \v 13 “याहवेहचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेची आठवण ठेवा, नंतर तो म्हणाला, ‘तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर हा प्रदेश तुम्हाला देतील.’ \v 14 तुमच्या स्त्रिया, तुमची लेकरे आणि गुरे मोशेने तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेकडे दिलेल्या प्रदेशात राहू शकतील, परंतु युद्धासाठी तयार असलेले तुमचे सर्व योद्धे इस्राएली लोकांच्या पुढे नदी पार करून जातील. तुम्ही त्यांना मदत करावी. \v 15 याहवेहने जशी तुम्हाला विश्रांती दिली आहे तशीच त्यांनाही देईपर्यंत आणि याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना जो प्रदेश देत आहेत, त्याचा ताबा घेईपर्यंत तुम्ही त्यांची मदत करावी. त्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता आणि जो यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश याहवेहचा सेवक मोशेने तुम्हास दिला आहे, त्या स्वतःच्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य करू शकता.” \p \v 16 तेव्हा ते यहोशुआला म्हणाले, “जी आज्ञा तू आम्हाला दिली आहेस त्याप्रमाणे आम्ही करू आणि जिथे कुठे तू आम्हाला पाठवशील तिथे आम्ही जाऊ. \v 17 जसे आम्ही मोशेच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केले, तसेच आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करू. फक्त एवढेच की तुझे परमेश्वर याहवेह तुझ्याबरोबर असावे जसे ते मोशेबरोबर होते. \v 18 जो कोणी तुझ्या शब्दाविरुद्ध बंड करेल आणि त्याचे पालन करणार नाही, त्याला मरणदंड दिला जाईल. फक्त खंबीर हो आणि धैर्यवान हो!” \c 2 \s1 राहाब आणि हेर \p \v 1 त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले. \p \v 2 तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” \v 3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.” \p \v 4 परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते. \v 5 संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.” \v 6 परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्‍याखाली लपविले होते. \v 7 तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या. \p \v 8 रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली \v 9 आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत. \v 10 कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे. \v 11 जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत. \p \v 12 “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या, \v 13 की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.” \p \v 14 “आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!”\f + \fr 2:14 \fr*\ft म्हणजे तुझ्या संरक्षणासाठी आम्ही मरण पत्करण्यास तयार आहोत\ft*\f* त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.” \p \v 15 तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते. \v 16 ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्‍यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.” \p \v 17-18 आता ते पुरुष तिला म्हणाले, “जेव्हा आम्ही या प्रदेशात प्रवेश करू त्यावेळेस किरमिजी रंगाचा हा दोर, ज्याने तू आम्हाला खाली सोडलेस तो तुझ्या खिडकीतून लोंबताना आम्हाला दिसला नाही आणि तुझे वडील आणि आई, तुझे भाऊ आणि तुझ्या सर्व कुटुंबाला तुझ्या घरात आणले नाहीस तर, तू जे वचन आमच्याकडून शपथ घालून घेतले आहेस, ते आमच्यावर बंधनकारक राहणार नाही. \v 19 जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल. \v 20 परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.” \p \v 21 “मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.” \p तेव्हा तिने त्यांना पाठवून दिले आणि ते निघून गेले आणि तिने किरमिजी रंगाचा दोर तिच्या खिडकीला बांधला. \p \v 22 जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्‍यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले. \v 23 नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. \v 24 ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.” \c 3 \s1 यार्देन नदी पार करणे \p \v 1 दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी शिट्टीम सोडले आणि ते यार्देन नदी पार करण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तिथेच तळ दिला. \v 2 मग तीन दिवसानंतर अधिकार्‍यांनी छावणीत फिरून लोकांना या सूचना दिल्या: \v 3 “तुम्ही जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वराच्या कराराचा कोश व तो वाहत असणार्‍या लेवी याजकांना पाहाल, तेव्हा तुमच्या ठिकाणातून निघून त्यांच्या पाठोपाठ जा. \v 4 तेव्हा कोणत्या मार्गाने जावे हे तुम्हाला समजेल, कारण तुम्ही या मार्गाने पूर्वी कधी गेला नाही. परंतु तुमच्यात व कोशात अंदाजे वीस हजार हाताचे\f + \fr 3:4 \fr*\ft अंदाजे 900 मीटर\ft*\f* अंतर असावे; तुम्ही त्याजवळ जाऊ नये.” \p \v 5 मग यहोशुआने लोकांना सांगितले, “तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या तुम्हामध्ये याहवेह एक महान चमत्कार करणार आहेत.” \p \v 6 यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले. \p \v 7 मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे. \v 8 कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ” \p \v 9 मग यहोशुआने इस्राएली लोकांस म्हटले, “इकडे या व याहवेह तुमच्या परमेश्वराचे शब्द ऐका. \v 10 यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील. \v 11 पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल. \v 12 तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा. \v 13 याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.” \p \v 14 जेव्हा यार्देन नदी पार करण्यासाठी लोकांनी आपली छावणी उठविली, तेव्हा कराराचा कोश वाहून नेणारे याजक त्यांच्या पुढे निघाले. \v 15 तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच, \v 16 वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले. \v 17 सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले. \c 4 \p \v 1 जेव्हा सर्व लोकांनी यार्देन नदी ओलांडली, तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, \v 2 “लोकातील प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषांची निवड कर, \v 3 आणि त्यांना सांग की त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून, म्हणजे जिथे याजक उभे आहेत, तिथून बारा धोंडे उचलून घ्यावे आणि ते तुमच्याबरोबर घेऊन आज रात्री ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात त्या ठिकाणी ठेवावे.” \p \v 4 तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले, \v 5 आणि यहोशुआ त्यांना म्हणाला, “यार्देनेच्या मध्यभागी जिथे याहवेह तुमच्या परमेश्वराचा कोश आहे त्याच्यापुढे जा. तिथून तुमच्यातील प्रत्येकाने एक धोंडा खांद्यावर वाहून आणावा. इस्राएलच्या बारा गोत्रातील प्रत्येक गोत्रामागे एक, असे एकूण बारा धोंडे तुम्ही बारा जणांनी आणावे. \v 6 ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ \v 7 तेव्हा तुम्हाला त्यांना सांगता येईल, याहवेहच्या कराराच्या कोशासमोर यार्देन नदीचा वाहता प्रवाह थांबला होता. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली, तेव्हा यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह दुभागला होता. हे धोंडे इस्राएली लोकांसाठी कायमचे स्मारक चिन्ह असावे.” \p \v 8 तेव्हा इस्राएली लोकांनी यहोशुआने सांगितल्याप्रमाणे केले. याहवेहने यहोशुआला आज्ञापिल्यानुसार प्रत्येक गोत्रामागे एक याप्रमाणे बारा धोंडे त्यांनी यार्देन नदीच्या मध्यभागातून उचलले व ज्या ठिकाणी त्यांनी छावणी दिली, त्या ठिकाणी ते धोंडे ठेवले. \v 9 यहोशुआने यार्देन नदीच्या मध्यभागी असलेले बारा धोंडे जिथे कराराचा कोश वाहून नेणारे याजक उभे होते तिथे उभे केले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत. \p \v 10 मोशेने यहोशुआला सुचविल्याप्रमाणे, याहवेहने यहोशुआला ज्या आज्ञा होत्या, त्या पूर्ण होईपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देन नदीच्या मध्यभागी उभे राहिले, तेव्हा लोकांनी घाईने नदी ओलांडली. \v 11 त्या सर्वांनी नदी पार करणे संपविताच याहवेहचा कोश व याजक सर्व लोकांच्या देखत पलीकडे गेले. \v 12 मग मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र इस्राएली लोकांपुढे युद्धासाठी सुसज्ज होऊन पुढे निघाले. \v 13 युद्धासाठी सुसज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष याहवेहसमोर यरीहोच्या मैदानात पलीकडे गेले. \p \v 14 त्या दिवशी याहवेहने यहोशुआला सर्व इस्राएली लोकांच्या दृष्टीत सन्मानित केले आणि जसे त्यांनी मोशेच्या संपूर्ण आयुष्यभर त्याचा आदर केला, तसाच त्यांनी यहोशुआचाही केला. \p \v 15 नंतर याहवेह यहोशुआला म्हणाले, \v 16 “याजकांना आज्ञा दे, कराराच्या नियमांचा कोश घेऊन यार्देन नदीतून वर या.” \p \v 17 तेव्हा यहोशुआने याजकांना आज्ञा दिली, “यार्देन नदीतून वर या.” \p \v 18 आणि याजक याहवेहच्या कराराचा कोश घेऊन यार्देन नदीच्या पात्रातून वर आले. त्यांनी त्यांचे पाय कोरड्या जमिनीवर ठेवताच, नदीचे पाणी परत मूळ ठिकाणी आले आणि पूर्वीप्रमाणे ते भरून वाहू लागले. \p \v 19 पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी ते यार्देनेतून वर आले आणि यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे त्यांनी छावणी घातली. \v 20 आणि यहोशुआने गिलगाल येथे यार्देनेतून बाहेर काढलेल्या बारा धोंड्यांची रचना केली. \v 21 तो इस्राएली लोकांना म्हणाला, “भविष्यकाळात तुमचे वंशज त्यांच्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ \v 22 त्यांना सांग, ‘इस्राएली लोक यार्देन नदीतून कोरड्या जमिनीवरून पलीकडे आले.’ \v 23 कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्ही यार्देन नदी पार करेपर्यंत तुमच्यासमोर नदीचे पात्र कोरडे ठेवले. याहवेह तुमच्या परमेश्वरांनी यार्देन नदीचे जसे केले तसेच त्यांनी आम्ही लाल समुद्र पार करेपर्यंत तो कोरडा केला होता. \v 24 हे त्यांनी यासाठी केले की, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळावे की याहवेह सामर्थ्यशाली आहेत आणि म्हणून तुम्ही सदैव याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे.” \c 5 \p \v 1 आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही. \s1 गिलगाल येथे वल्हांडण आणि सुंता \p \v 2 त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्‍या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.” \v 3 तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्‍या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ\f + \fr 5:3 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa अग्रत्वचेची टेकडी\fqa*\f* या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली. \p \v 4 यहोशुआने सुंता यासाठी केली की: इजिप्त देश सोडून जे सर्व बाहेर आले—युद्धाचे वय असलेले सर्व पुरुष—इजिप्त सोडून येत असताना रानामध्ये मरण पावले. \v 5 बाहेर पडलेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, परंतु इजिप्त सोडल्यानंतरच्या प्रवासाच्या काळात जे सर्व पुरुष जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती. \v 6 इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही. \v 7 म्हणून जी मुले आपल्या वडिलांची जागा घेण्यायोग्य झाली होती, यहोशुआने त्यांची सुंता केली. ते अजूनही बेसुंती होते कारण वाटेत त्यांची सुंता झाली नव्हती \v 8 सुंतेच्या विधीनंतर जखमा बर्‍या होईपर्यंत संपूर्ण इस्राएली राष्ट्राने छावणीत विश्रांती घेतली. \p \v 9 मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुमच्यापासून इजिप्तचा कलंक दूर लोटून दिला आहे,” यास्तव त्या ठिकाणाला गिलगाल\f + \fr 5:9 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa लोटून देणे\fqa*\f* असे नाव देण्यात आले आणि आज देखील ते ठिकाण त्याच नावाने ओळखले जाते. \p \v 10 यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला. \v 11 वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य. \v 12 त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला. \s1 यरीहोचा पराभव \p \v 13 आता यहोशुआ जेव्हा यरीहोजवळ होता, त्याने वर पाहिले आणि त्याला दिसले की त्याच्यासमोर एक पुरुष तलवार हातात घेऊन त्याच्यासमोर उभा आहे. यहोशुआ त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारले, “तू आमच्या बाजूने आहेस की आमच्या शत्रूच्या बाजूने आहेस?” \p \v 14 “कोणाच्याही बाजूचा नाही,” त्याने उत्तर दिले, “परंतु याहवेहचा सेनानायक म्हणून मी आलो आहे.” तेव्हा यहोशुआने आदराने त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि त्याला विचारले, “माझ्या प्रभूकडून त्याच्या सेवकासाठी काय आदेश आहे?” \p \v 15 याहवेहच्या सेनानायकाने उत्तर दिले, “तुझ्या पायातील पायतण काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशुआने त्याप्रमाणे केले. \c 6 \p \v 1 इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही. \p \v 2 तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे. \v 3 सर्व सशस्त्र माणसांना घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घाला. सहा दिवस असेच करा. \v 4 मेंढ्याच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन सात याजक कोशाच्या पुढे ठेवा. सातव्या दिवशी याजक रणशिंगे वाजवित शहराभोवती सात वेळेस प्रदक्षिणा घालतील. \v 5 जेव्हा त्यांच्या रणशिंगाचा मोठा व दीर्घ आवाज तुम्ही ऐकाल, त्यावेळी संपूर्ण सैन्याने मोठा जयघोष करावा. तेव्हा शहराचा तट कोसळेल आणि सैन्य पुढे जाईल, नंतर प्रत्येकजण सरळ आत प्रवेश करेल.” \p \v 6 तेव्हा नूनाचा पुत्र यहोशुआने याजकांना बोलाविले आणि त्यांना सांगितले, “याहवेहच्या कराराचा कोश घ्या आणि त्यासमोर सात याजक रणशिंगे घेऊन जातील.” \v 7 त्याने सैनिकांना हुकूम दिला, “पुढे चला! सशस्त्र सुरक्षा सैनिकांना याहवेहच्या कोशापुढे ठेऊन शहराच्या सर्व बाजूने प्रदक्षिणा घाला.” \p \v 8 जेव्हा यहोशुआने लोकांबरोबर बोलणे केले, तेव्हा सात याजक याहवेहच्या पुढे त्यांची सात रणशिंगे वाजवित पुढे निघाले आणि याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्यामागे गेला. \v 9 सशस्त्र शिपाई रणशिंगे वाजविणार्‍या याजकांच्या पुढे चालू लागले आणि मागून येणारे शिपाई कोशाच्या मागे चालत राहिले. या सर्व वेळेपर्यंत रणशिंगे वाजविली जात होती. \v 10 परंतु यहोशुआने सैन्याला आज्ञा दिली होती, “युद्धाची घोषणा करू नका, तुम्ही मोठ्याने जयघोष करू नका, तुमचा आवाज उंचावू नका, जयघोष करा असे मी तुम्हाला सांगेन त्या दिवसापर्यंत एकही शब्द बोलू नका.” \v 11 तेव्हा त्यांनी याहवेहचा कोश घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सैन्य परत छावणीत आले आणि तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. \p \v 12 दुसर्‍या दिवशी सकाळीच यहोशुआ उठला आणि याजकांनी याहवेहचा कोश उचलून घेतला. \v 13 सात याजक सात रणशिंगे फुंकत याहवेहच्या कोशाच्या पुढे निघाले. सशस्त्र सैनिक त्यांच्या पुढे गेले आणि रणशिंगे फुंकली जात असताना मागे जाणारे सुरक्षा सैनिक याहवेहच्या कोशाच्या मागे गेले. \v 14 तेव्हा दुसर्‍या दिवशी त्यांनी शहराभोवती एक वेळेस प्रदक्षिणा घातली आणि ते छावणीकडे परत आले. सहा दिवस त्यांनी असेच केले. \p \v 15 सातव्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे त्या शहराला प्रदक्षिणा घातल्या, फक्त त्या दिवशी त्यांनी सात प्रदक्षिणा घातल्या. \v 16 सातव्या प्रदक्षिणेच्या वेळी जेव्हा याजकांनी रणशिंगांचा दीर्घ निनाद केला, तेव्हा यहोशुआने सैन्याला आज्ञा केली, “जयघोष करा! कारण याहवेहनी हे शहर तुम्हाला दिले आहे! \v 17 हे शहर आणि त्यातील सर्वकाही याहवेहला समर्पित करावे. राहाब वेश्या आणि जी कोणी माणसे तिच्या घरात असतील त्यांना वाचविले जावे, कारण आपण पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते. \v 18 परंतु अर्पण केलेल्या सर्व वस्तूंपासून दूर राहा, म्हणजे त्यातील काहीही घेतल्याने तुम्ही स्वतःवर नाश ओढवून घेणार नाही. नाहीतर तुम्ही इस्राएलच्या छावणीच्या नाशासाठी जबाबदार ठराल आणि तिच्यावर संकट आणाल. प्रत्येक वस्तूचा तुम्ही नाश केला नाही, तर संपूर्ण इस्राएली राष्ट्रावर अनर्थ कोसळेल. \v 19 सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.” \p \v 20 जेव्हा रणशिंगांनी निनाद केला, तेव्हा सैन्याने मोठा जयघोष केला आणि रणशिंगाच्या आवाजामुळे जेव्हा पुरुषांनी मोठ्याने आवाज केला, तेव्हा तेथील भिंत कोसळून पडली; तेव्हा प्रत्येकजण सहजपणे आत गेला आणि त्यांनी ते शहर हस्तगत केले. \v 21 त्यांनी ते शहर याहवेहला समर्पित केले आणि त्या शहरात जिवंत असलेल्या प्रत्येकाचा संहार केला: पुरुष, स्त्रिया, तरुण आणि वृद्ध, बैल, मेंढरे आणि गाढवे या सर्वांचा नाश केला. \p \v 22 ज्यांनी तो देश हेरला होता त्या दोन हेरांना यहोशुआ म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्याबरोबर असलेल्या तिच्या नातेवाईकांना तुम्ही वचन दिल्याप्रमाणे बाहेर काढा.” \v 23 तेव्हा ज्या तरुण पुरुषांनी तो देश हेरला होता, ते आत गेले आणि त्यांनी राहाब, तिचे वडील आणि आई, तिचे भाऊ आणि बहिणी आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. त्यांनी तिच्या संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढले आणि इस्राएलच्या छावणीबाहेरील जागेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. \p \v 24 इस्राएली लोकांनी ते शहर व त्यातील प्रत्येक गोष्ट जाळून टाकली. फक्त चांदी व सोने, कास्य व लोखंडाची पात्रे याहवेहच्या भांडारासाठी राखून ठेवण्यात आली. \v 25 परंतु यहोशुआने राहाब वेश्येस आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना वाचविले, कारण यहोशुआने यरीहोत पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते आणि इस्राएली लोकांमध्ये ते आजपर्यंत राहत आहेत. \p \v 26 तेव्हा यहोशुआने गंभीरपणाने शपथ घेतली: “जो कोणी यरीहो शहर पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करेल, तो याहवेहसमोर शापित ठरेल: \q1 “जो कोणी या शहराचा पाया घालेल; \q2 त्याचा प्रथमपुत्र मरण पावेल, \q1 आणि जो कोणी या शहराच्या वेशी उभारेल, \q2 त्याचा धाकटा पुत्र मरण पावेल.” \p \v 27 याप्रमाणे याहवेह यहोशुआबरोबर होते आणि त्याच्या नावाची सर्वत्र किर्ती पसरली. \c 7 \s1 आखानाचे पाप \p \v 1 परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी\f + \fr 7:1 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa जिम्री\fqa*\f* याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला. \p \v 2 यहोशुआने काही माणसे यरीहोकडून आयकडे पाठविली, जे बेथेलच्या पूर्वेकडे बेथ-आवेनजवळ आहे आणि त्यांना म्हणाला, “जा आणि त्या प्रदेशाला हेरा.” तेव्हा ती माणसे निघाली आणि त्यांनी आय शहर हेरले. \p \v 3 जेव्हा ते यहोशुआकडे परत आले, त्यांनी सांगितले, “संपूर्ण सैन्याला आय विरुद्ध लढाई करण्यासाठी जावे लागणार नाही. ते जिंकण्यासाठी दोन ते तीन हजार माणसे पाठवा आणि संपूर्ण सैन्याला थकवू नका, कारण फक्त थोडेच लोक तिथे राहतात.” \v 4 तेव्हा सुमारे तीन हजार हल्ला करून गेले; परंतु आयच्या लोकांनी त्यांचा पराभव केला. \v 5 आयच्या लोकांनी त्यांच्यातील छत्तीसजणांना मारून टाकले. त्यांनी इस्राएली सैनिकांचा वेशीपुढे शबारीमपर्यंत\f + \fr 7:5 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa दगडाच्या खाणी\fqa*\f* पाठलाग केला; यामुळे लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून पाण्यासारखी झाली. \p \v 6 तेव्हा यहोशुआने त्याची वस्त्रे फाडली आणि तो संध्याकाळपर्यंत याहवेहच्या कोशासमोर जमिनीवर तसाच पालथा पडून राहिला. इस्राएलच्या वडीलजनांनी तसेच केले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर राख शिंपडली. \v 7 आणि यहोशुआ म्हणाला, “हाय, सार्वभौम याहवेह, तुम्ही आम्हाला अमोर्‍यांच्या हातून ठार करणार होता, तर आम्हाला यार्देन नदी पार करून का आणले? आम्ही यार्देन पलीकडे आमच्याजवळ होते त्यातच आम्ही समाधानी होतो! \v 8 हे प्रभू तुमच्या सेवकाला क्षमा करा. आता इस्राएलचा त्यांच्या शत्रूकडून पराभव झालेला आहे तर मी काय बोलू? \v 9 कारण कनानी लोक आणि आसपासची राष्ट्रे याबद्दल ऐकतील, तेव्हा ते आम्हाला सभोवार घेरतील, आमच्यावर हल्ला करतील आणि आम्हाला नामशेष करून टाकतील. मग तुमच्या महान नावाच्या थोरवीचे काय होईल?” \p \v 10 याहवेह यहोशुआस म्हणाले, “ऊठ! तू असा पालथा का पडला आहेस? \v 11 इस्राएलने पाप केले आहे; त्यांनी माझा करार भंग केला आहे, ज्याचे पालन करण्यास मी त्यांना सांगितले होते. समर्पित केलेल्या वस्तू ते घेऊन आले आहेत; त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी त्या वस्तू स्वतःच्या मालकीच्या केल्या आहेत. \v 12 यामुळे इस्राएल त्यांच्या शत्रूपुढे उभे राहू शकत नाहीत; ते पाठ फिरवून पळून जात आहेत, कारण त्यांच्या नाशासाठी तेच जबाबदार आहेत. तुमच्यामधून नाशासाठी समर्पित असलेल्या वस्तूंचा तुम्ही नाश करेपर्यंत मी तुम्हाबरोबर असणार नाही. \p \v 13 “तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, तुमच्यापैकी प्रत्येकाने उद्यासाठी स्वतःला शुद्ध करून घ्या, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: अहो इस्राएली लोकहो, तुमच्यामध्ये समर्पित केलेल्या वस्तू आहेत. त्या वस्तू काढून टाकेपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूपुढे उभे राहू शकणार नाही. \p \v 14 “सकाळी तुम्ही तुमच्या गोत्राप्रमाणे याहवेहसमोर उपस्थित व्हावे. जे गोत्र याहवेह निवडतील त्यांनी त्यांच्या कुळाप्रमाणे पुढे यावे; ज्या कुळाची याहवेह निवड करतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे पुढे यावे; आणि ज्या कुटुंबाची याहवेह निवड करतील त्यातील प्रत्येक पुरुषाने पुढे यावे. \v 15 जो कोणी समर्पित केलेल्या वस्तूसह सापडेल त्याला, त्याच्याकडे असलेल्या सर्व वस्तूसह जाळून टाकावे. त्याने याहवेहचा करार मोडला आहे आणि इस्राएलमध्ये घृणास्पद कृत्य केले आहे.” \p \v 16 दुसर्‍या दिवशी सकाळ होताच यहोशुआने इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार पुढे बोलाविले आणि यहूदाहचे गोत्र निवडण्यात आले. \v 17 यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले. \v 18 मग जब्दीच्या घराण्यातील एकाएका पुरुषाला समोर आणण्यात आले आणि यहूदाहच्या वंशातील जेरहाचा पुत्र जब्दीचा पुत्र कर्मीचा पुत्र आखान निवडला गेला. \p \v 19 तेव्हा यहोशुआ आखानास म्हणाला, “माझ्या मुला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे गौरव कर आणि आपले पाप कबूल कर. तू काय केलेस ते मला सांग; माझ्यापासून काहीही लपवू नकोस.” \p \v 20 तेव्हा आखानाने यहोशुआला उत्तर दिले, “खचितच मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. मी जे केले ते हे: \v 21 लुटीमध्ये मी एक सुंदर शिनारी झगा आणि दोनशे शेकेल चांदी,\f + \fr 7:21 \fr*\ft अंदाजे 2.3 कि.ग्रॅ.\ft*\f* पन्नास शेकेल सोन्याची लगड\f + \fr 7:21 \fr*\ft अंदाजे 575 ग्रॅ.\ft*\f* या वस्तू पाहिल्या, तेव्हा त्या मला इतक्या हव्याशा वाटल्या की, मी त्या घेतल्या आणि त्या वस्तू माझ्या डेर्‍यात खाली जमिनीत पुरून ठेवलेल्या आहेत. झगा आणि सोने यांच्याहून चांदी सर्वात खाली पुरलेली आहे.” \p \v 22 तेव्हा यहोशुआने संदेशवाहकांना पाठविले, त्यांनी तंबूकडे धाव घेतली आणि तिथे तंबूत खाली चांदीबरोबर ते सर्वकाही लपविले होते. \v 23 त्यांनी तंबूतून त्या सर्व वस्तू घेतल्या व यहोशुआ व सर्व इस्राएली लोकांकडे आणल्या आणि याहवेहसमोर पसरवून ठेवल्या. \p \v 24 मग यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी जेरहाचा पुत्र आखान व त्याच्याबरोबर, ती चांदी, तो झगा, ती सोन्याची लगड, त्याचे पुत्र, त्याच्या कन्या, त्याचे बैल, गाढवे, मेंढरे, त्याचा तंबू आणि त्याचे जे काही होते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले. \p \v 25 मग यहोशुआ आखानाला म्हणाला, “तू आमच्यावर अरिष्ट का आणलेस? आता याहवेह तुझ्यावर अरिष्ट आणतील.” \p मग इस्राएल लोकांनी त्याला धोंडमार केली व त्याच्या बरोबरच्या इतरांनाही धोंडमार केल्यावर त्यांनी त्यांना जाळून टाकले. \v 26 आणि आखानावर दगडांची एक मोठी रास केली, जी आज देखील तिथे आहे. तेव्हा याहवेहचा कोप शांत झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणाला अखोरचे खोरे\f + \fr 7:26 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa संकटाची दरी\fqa*\f* असे म्हटले जाते. \c 8 \s1 आय शहराचा विध्वंस \p \v 1 तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “भिऊ नकोस किंवा निराश होऊ नकोस; सर्व सैन्य बरोबर घे आणि आय शहरावर हल्ला कर, कारण जिंकून घेण्यासाठी मी आय शहराचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर व त्याची भूमी तुझ्या हाती दिली आहे. \v 2 यरीहो शहर आणि त्याच्या राजाचे तू केलेस तसेच आय शहर आणि त्याच्या राजाचे कर; परंतु यावेळी हाती लागेल ती लूट व गुरे तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकाल. शहराच्या मागील बाजूस तुझ्या लोकांना दबा धरून बसव.” \p \v 3 तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले, \v 4 त्यांना आज्ञा दिली: “लक्षपूर्वक ऐका. शहराच्या मागील बाजूस तुम्ही दबा धरून बसावे. त्या ठिकाणापासून फार दूर जाऊ नका. तुम्ही सर्वजण सावध असा. \v 5 मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्वजण या नगरावर हल्ला करतील आणि जेव्हा त्यांनी आधी केल्याप्रमाणे ती माणसे बाहेर आमच्यावर चालून येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ. \v 6 जोपर्यंत आम्ही त्यांना फसवून शहरापासून दूर घेऊन जाऊ, ते आमचा पाठलाग करतील. कारण ते म्हणतील, ‘आधी केले तसेच ते आमच्यापासून पळून जात आहेत.’ जेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ, \v 7 तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील. \v 8 जेव्हा ते शहर तुम्ही हाती घ्याल, तेव्हा याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे तुम्ही त्या शहरास आग लावून द्यावी. लक्षात घ्या; तुम्हाला मी आज्ञा दिलेल्या आहेत.” \p \v 9 नंतर यहोशुआने त्यांना पाठवून दिले आणि ते आयच्या पश्चिमेकडे बेथेल आणि आयच्यामध्ये दबा धरून बसण्याच्या ठिकाणाकडे गेले आणि वाट पहात राहिले; परंतु यहोशुआने ती रात्र लोकांबरोबर घालविली. \p \v 10 दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआने त्याच्या सैन्याला जमविले आणि तो आणि इस्राएलचे पुढारी त्यांच्यापुढे आयच्या दिशेने चालत निघाले. \v 11 संपूर्ण सैन्यदल जे त्याच्याबरोबर होते ते निघाले आणि शहरापर्यंत पोहोचले आणि त्या शहरासमोर आले. त्यांनी आयच्या उत्तरेकडे छावणी उभी केली त्यांच्यामध्ये आणि आय शहराच्यामध्ये खोरे होते. \v 12 यहोशुआने त्याच्याबरोबर सुमारे पाच हजार पुरुष घेतले आणि त्यांना बेथेल आणि आय शहराच्यामध्ये पश्चिमेकडे दबा धरून बसविले होते. \v 13 मुख्य छावणी शहराच्या उत्तरेकडे व दबा धरून बसलेले पश्चिमेकडे, याप्रमाणे सैन्याने आपआपले स्थान घेतले. त्या रात्री यहोशुआ खोर्‍यात गेला. \p \v 14 जेव्हा आय शहराच्या राजाने हे पाहिले, तेव्हा तो आणि त्या शहराचे सर्व पुरुष पहाटेस घाई करून अराबासमोर एका विशिष्ट ठिकाणी इस्राएलशी युद्ध करण्यास निघाले. परंतु त्याला माहीत नव्हते की शहराच्या मागील बाजूस शत्रुसैन्य दबा धरून बसले आहे. \v 15 नंतर यहोशुआ आणि सर्व इस्राएली सैन्याने त्यांना मागे येऊ दिले आणि त्यांच्यापुढे ते रानाच्या दिशेने पळाले. \v 16 आय शहरातील सर्व पुरुषांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी बोलाविण्यात आले. ते यहोशुआचा पाठलाग करीत शहरापासून लांब गेले. \v 17 इस्राएली लोकांच्या मागे गेला नाही असा एकही पुरुष आय शहरात किंवा बेथेल येथे मागे राहिला नाही. त्यांनी आय शहराच्या वेशी उघड्याच टाकल्या आणि इस्राएलचा पाठलाग करण्यास गेले. \p \v 18 तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “तुझा भाला आय शहराकडे उंच कर कारण ते शहर मी तुझ्या हाती देणार आहे.” तेव्हा यहोशुआने त्याच्या हातात असलेला भाला त्या शहराच्या दिशेने उंच केला. \v 19 त्याने तसे केले त्याच क्षणाला दबा धरून बसलेले पुरुष त्यांच्या जागेतून बाहेर आले आणि पुढे पळत निघाले. त्यांनी त्या शहरात प्रवेश केला आणि ते ताब्यात घेतले आणि लगेच ते शहर पेटवून दिले. \p \v 20 आयच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या शहरातून धूर निघून वर आकाशात जात आहे, परंतु आता कोणत्याही दिशेकडे पळून जाणे त्यांना शक्य नव्हते; जे इस्राएली लोक रानाकडे पळत चालले होते ते आता मागे वळून त्यांचा पाठलाग करणार्‍यांवर चालून आले. \v 21 कारण जेव्हा यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की दबा धरून बसलेल्या सैन्याने शहराचा ताबा घेतला आहे आणि तिथून धूर निघून वर जात आहे तेव्हा ते मागे फिरले आणि त्यांनी आयच्या पुरुषांवर हल्ला केला. \v 22 दबा धरून बसलेले सैन्यसुद्धा शहरातून बाहेर पडून त्यांच्या विरोधात आले तेव्हा ते दोन्ही बाजूंनी इस्राएली लोकांमध्ये सापडले. इस्राएली लोकांनी त्या सर्वांना मारून टाकले, त्यातील कोणीही जिवंत ठेवला नाही किंवा निसटूनही गेला नाही. \v 23 परंतु त्यांनी आय शहराच्या राजाला जिवंत ताब्यात घेतले आणि त्याला यहोशुआकडे आणले. \p \v 24 आय नगरात राहणारे जे मैदानात आणि रानात त्यांचा पाठलाग करीत आले होते त्यांच्यातील प्रत्येकाला इस्राएलने तलवारीने मारून संपविल्यानंतर सर्व इस्राएली लोक आय शहराकडे परत आले आणि तिथे असलेल्या सर्व लोकांना त्यांनी मारून टाकले. \v 25 आय शहराचे सर्व रहिवासी; जे पुरुष आणि स्त्रिया त्या दिवशी मारले गेले, त्यांची संख्या बारा हजार होती. \v 26 कारण यहोशुआने आपल्या भाल्याचे टोक आय शहरातील सर्व लोकांचा नाश होईपर्यंत, मागे घेतले नाही. \v 27 परंतु याहवेहने यहोशुआला सूचना दिली त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शहराची गुरे आणि लूट जिंकून आणली. \p \v 28 अशा रीतीने यहोशुआने आय\f + \fr 8:28 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa विध्वंस\fqa*\f* शहर जाळून टाकले आणि ते नाश झालेल्या अवशेषांचा ढिगारा असे केले, आजपर्यंत ते ठिकाण असेच ओसाड पडलेले आहे. \v 29 यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे. \s1 एबाल पर्वतावर कराराचे नूतनीकरण \p \v 30 मग यहोशुआने याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासाठी एबाल पर्वतावर वेदी बांधली, \v 31 जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली. \v 32 तिथेच इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआने मोशेच्या नियमशास्त्राची एक प्रत दगडांवर लिहिली. \v 33 सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या. \p \v 34 मग यहोशुआने त्या सर्व लोकांस नियमशास्त्राच्या पुस्तकात जशी लिहिलेली होती तशीच आशीर्वादांची आणि शापांची वचने वाचून दाखविली. \v 35 यहोशुआने संपूर्ण इस्राएली मंडळी, स्त्रिया आणि मुलेबाळे आणि जे परदेशीय त्यांच्यामध्ये राहत होते यांना, मोशेने दिलेल्या सर्व आज्ञातील वाचून दाखविण्यात आल्या, एकही शब्द न वाचता सोडला नाही. \c 9 \s1 गिबोनी लोकांनी केलेली फसवणूक \p \v 1 यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व राजांनी—डोंगराळ प्रदेशाच्या राजांनी, पश्चिमी पर्वत पायथ्यावरील राजांनी आणि लबानोन पर्यंत असलेल्या भूमध्य समुद्रकिनार्‍यांवरील सर्व राजांनी (हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी राजांनी) या गोष्टींबद्दल ऐकले \v 2 तेव्हा ते एकमताने यहोशुआ आणि इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र आले. \p \v 3 तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले, \v 4 तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले. \v 5 त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्‍यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या. \v 6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.” \p \v 7 तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?” \p \v 8 ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.” \p परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?” \p \v 9 त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे. \v 10 त्याचप्रमाणे तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील अमोर्‍यांच्या दोन राजांचे—हेशबोनचा राजा सीहोन व अष्टारोथातील बाशानचा राजा ओगचे काय केले त्यासंबंधी देखील ऐकले आहे. \v 11 म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’ \v 12 आम्ही तुमच्याकडे येण्यास आमचे ठिकाण सोडले, तेव्हा या भाकरी गरम होत्या, परंतु आता तुम्ही पाहता की त्या वाळून त्यांना बुरशी लागली आहे. \v 13 हे द्राक्षारसाचे बुधले अगदी नवीन होते, परंतु आता ते जुने झालेले आहेत व त्यांना भेगा पडलेल्या आहेत. आमचे कपडे व आमचे जोडे लांबच्या खडतर प्रवासाने जीर्ण झालेले आहेत.” \p \v 14 इस्राएली लोकांनी त्यांच्या अन्नसामुग्रींचा नमुना पाहिला, परंतु त्यांनी याबाबतीत याहवेहला विचारले नाही. \v 15 नंतर यहोशुआने त्यांनी जगावे यासाठी त्यांच्याबरोबर शांतीचा करार केला आणि मंडळीच्या पुढार्‍यांनी शपथेच्याद्वारे या गोष्टीला संमती दिली. \p \v 16 त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते. \v 17 तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे. \v 18 परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्‍यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती. \p संपूर्ण सभेने पुढार्‍यांविरुद्ध कुरकुर केली, \v 19 परंतु सर्व पुढार्‍यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही. \v 20 आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.” \v 21 ते पुढे म्हणाले, “त्यांना जगू द्या, परंतु त्यांनी संपूर्ण मंडळीच्या सेवेसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी वाहणारे म्हणून राहावे.” अशाप्रकारे पुढार्‍यांनी त्यांना दिलेल्या वचनाचे पालन केले. \p \v 22 नंतर यहोशुआने गिबोनी लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, “आम्ही दूरच्या देशात राहतो असे सांगून तुम्ही आमची फसवणूक का केली? खरे पाहिले तर तुम्ही आमच्या जवळच राहता. \v 23 तुमच्यावर आता शाप आला आहे: तुम्हाला आता माझ्या परमेश्वराच्या घरासाठी लाकडे तोडणारे आणि पाणी वाहणारे या सेवेतून कधीही सोडविले जाणार नाही.” \p \v 24 तेव्हा त्यांनी यहोशुआला उत्तर दिले, “कारण आम्हाला असे सांगण्यात आले होते की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी आपला सेवक मोशेला हा संपूर्ण प्रदेश जिंकून घेण्याची आणि त्यात राहणार्‍या सर्व लोकांना नष्ट करण्याची आज्ञा दिली होती. म्हणून तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जिवाबद्दल भीती वाटू लागली; म्हणूनच आम्ही हे केले. \v 25 आता आम्ही सर्वस्वी तुमच्या हाती आहोत. तुम्हाला चांगले व योग्य वाटेल त्याप्रमाणे आमचे करा.” \p \v 26 तेव्हा यहोशुआने त्यांना इस्राएली लोकांपासून वाचविले व त्यांना जिवे मारू दिले नाही. \v 27 यहोशुआने त्या दिवशी इस्राएली लोकांच्या सभेकरिता आणि याहवेह निवडतील त्या ठिकाणच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले. हीच व्यवस्था आजपर्यंत आहे. \c 10 \s1 सूर्य स्थिर राहतो \p \v 1 यरीहो येथे यहोशुआने जे केले, तसेच आय शहरात करून त्याने ते कसे हस्तगत केले, त्याचा कसा नाश केला, त्याच्या राजांचा कसा वध केला, गिबोनाच्या लोकांनी इस्राएली लोकांशी शांतीचा करार कसा केला आणि आता ते इस्राएलचे मित्र राष्ट्र म्हणून कसे बनून राहिले, या सर्व गोष्टी यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेक याने ऐकल्या, \v 2 तेव्हा तो व त्याचे लोक अतिशय घाबरून गेले. कारण गिबोन हे एका राजेशाही शहराप्रमाणे प्रतिष्ठित शहर होते; ते आय नगरापेक्षा मोठे होते व त्यातील पुरुष उत्तम योद्धे होते. \v 3 म्हणून यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेकाने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीरकडे आपले निवेदन पाठवले. \v 4 तो म्हणाला, “या आणि गिबोनावर हल्ला करण्यास मला मदत करा, कारण त्यांनी यहोशुआशी व इस्राएल लोकांशी शांतीचा करार केला आहे.” \p \v 5 तेव्हा अमोर्‍यांचे पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोन या नगरांचे राजे एकत्र आले व आपले सैन्य एकजूट करून गिबोन विरुद्ध त्यांनी आपले स्थान घेतले व त्यांच्यावर हल्ला केला. \p \v 6 तेव्हा यहोशुआ जो गिलगालच्या छावणीत होता, त्याच्याकडे गिबोनाच्या लोकांनी निरोप पाठवून म्हटले: “आमचा त्याग करू नका. आमच्याकडे लवकर येऊन आम्हाला वाचवा! आमची मदत करा, कारण डोंगरवटीच्या सर्व अमोरी राजांनी आमच्याविरुद्ध आपले सैन्य उभारले आहे.” \p \v 7 लगेच यहोशुआ आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांसह सर्व सैन्य घेऊन गिलगालहून निघाला. \v 8 तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही.” \p \v 9 गिलगालहून रात्रभर प्रवास केल्यानंतर, यहोशुआने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. \v 10 मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्‍या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले. \v 11 ते इस्राएल पुढून बेथ-होरोन पासून अजेकाहच्या वाटेवरून पळून जात असताना, याहवेहने त्यांच्यावर गारांच्या प्रचंड वर्षाव केला आणि इस्राएली लोकांच्या तलवारीपेक्षा गारांनीच अधिक लोक मारले गेले. \p \v 12 ज्या दिवशी याहवेहने अमोरी लोकांना इस्राएली लोकांच्या हाती दिले, तेव्हा इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआ याहवेहना म्हणाला: \q1 “सूर्या, गिबोनावर स्थिर उभा हो, \q2 आणि हे चंद्रा, तू अय्यालोनच्या खोर्‍यावर स्तब्ध राहा” \q1 \v 13 तेव्हा इस्राएली राष्ट्राने आपल्या शत्रूंचा सूड\f + \fr 10:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa विजय मिळवेपर्यंत\fqa*\f* घेईपर्यंत \q2 सूर्य स्थिर उभा राहिला, \q2 आणि चंद्र स्तब्ध झाला. \m जसे याशारच्या ग्रंथात लिहिलेले आहे. \p सूर्य संपूर्ण दिवसभर आकाशात मध्यभागी स्थिर राहिला आणि त्याने अस्त होण्यास विलंब केला. \v 14 असा दिवस यापूर्वी कधीही आला नव्हता आणि त्यानंतरही कधी आला नाही. त्या दिवशी, याहवेहने एका मनुष्याचा शब्द ऐकला. कारण याहवेह निश्चितच इस्राएलसाठी लढत होते! \p \v 15 त्यानंतर यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसोबत गिलगाल येथील छावणीकडे परतला. \s1 पाच अमोरी राजांचा वध \p \v 16 तेव्हा ते पाच राजे पळून गेले व मक्केदा येथे गुहेत लपून बसले. \v 17 ते पाच राजे मक्केदा येथील एका गुहेत लपलेले आहेत हे जेव्हा यहोशुआला कळविण्यात आले, \v 18 तेव्हा यहोशुआ म्हणाला, “मोठे धोंडे गुहेच्या तोंडावर लोटा आणि त्याचे राखण करावयाला काही माणसांना तिथे बसवा. \v 19 पण थांबू नका; शत्रूचा पाठलाग चालू ठेवा! त्यांच्यावर मागून हल्ला करा आणि त्यांना त्यांच्या शहरांकडे जाऊ देऊ नका, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या हातात दिले आहे.” \p \v 20 तेव्हा यहोशुआ आणि इस्राएली सैन्याने त्यांचा पूर्ण पराभव केला, परंतु त्यातून काही लोक वाचले व त्यांच्या तटबंदीच्या शहरात गेले. \v 21 मग संपूर्ण इस्राएली सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशुआकडे सुरक्षित परतले. त्यानंतर इस्राएलविरुद्ध कोणीही एकही शब्द उच्चारला नाही. \p \v 22 यहोशुआने म्हटले, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना माझ्याकडे बाहेर आणा.” \v 23 मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले. \v 24 जेव्हा त्या पाच राजांना बाहेर काढून यहोशुआ पुढे हजर करण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली पुरुषांना बोलाविले. मग त्याच्यासोबत आलेल्या सेनेच्या अधिकार्‍यांना तो म्हणाला, “इकडे या व आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवा.” तेव्हा ते पुढे आले आणि त्यांनी आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवले. \p \v 25 तेव्हा यहोशुआ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; निराश होऊ नका. खंबीर आणि धैर्यवान व्हा, कारण याहवेह तुमच्या सर्व शत्रूंच्या बाबतीत हेच करणार आहेत.” \v 26 नंतर यहोशुआने त्या राजांचा वध केला आणि त्यांची मृत शरीरे पाच झाडांवर संध्याकाळपर्यंत तशीच टांगून ठेवली. \p \v 27 सूर्य मावळू लागला, तेव्हा यहोशुआने आज्ञा दिली की त्या राजांचे मृतदेह झाडांवरून खाली काढा आणि ते ज्या गुहेमध्ये लपून राहिले होते त्या गुहेत ती फेकून द्या. हे केल्यावर गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठ्या खडकांची रास रचून ठेवली. आजपर्यंत ती रास तिथेच आहे. \s1 दक्षिणेकडील शहरांवर ताबा \p \v 28 त्याच दिवशी यहोशुआने मक्केदा या शहराचा नाश केला आणि त्या शहराचा राजा व त्यातील प्रत्येकाचा तलवारीने संहार केला. एकही व्यक्ती जिवंत ठेवण्यात आली नाही. त्याने यरीहोच्या राजाचे केले तसेच मक्केदाच्या राजाचेही केले. \p \v 29 नंतर यहोशुआ व त्याच्याबरोबर सर्व इस्राएली लोक मक्केदाहून लिब्नाह शहरावर चालून गेले आणि त्याच्यावर हल्ला केला. \v 30 याहवेहने ते शहर आणि त्याच्या राजालाही इस्राएलच्या हाती दिले. ते शहर आणि त्यातील प्रत्येकाचा यहोशुआने तलवारीने नाश केला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही आणि यरीहोच्या राजाचे जसे केले तसे त्याने तेथील राजांचे केले. \p \v 31 मग यहोशुआसह संपूर्ण इस्राएल लिब्नाहहून लाखीशला गेले; ते त्या शहराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाले व त्यांच्यावर हल्ला केला. \v 32 याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्‍या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला. \v 33 लाखीशवर हल्ला होत असताना, गेजेरचा राजा होराम लाखीश शहरास मदत करण्यास आला. परंतु यहोशुआने त्याचा व त्याच्या सैनिकांचा पराजय केला; त्यांच्यातील एकही जण वाचला नाही. \p \v 34 मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने लाखीश सोडल्यावर ते एग्लोनला आले; त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याची तयारी केली व त्यांच्याशी लढले. \v 35 त्यांनी ते शहर त्याच दिवशी हस्तगत केले आणि तेथील प्रत्येकाचा लाखीश येथे केल्याप्रमाणे तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही. \p \v 36 मग यहोशुआ आणि त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने एग्लोन सोडल्यावर ते हेब्रोनला आले आणि त्यावर हल्ला केला. \v 37 त्यांनी ते शहर हस्तगत केले आणि एग्लोन येथे केल्याप्रमाणे हेब्रोनच्या राजासह प्रत्येकाचा तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहू दिली नाही. \p \v 38 मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएली मागे वळून दबीरवर चालून गेले व त्यांच्याशी लढले. \v 39 त्यांनी ते शहर, त्याचा राजा व त्यातील गावे हस्तगत केली व त्यांना तलवारीने मारून टाकले. त्यातील प्रत्येकाचा समूळ नाश केला. त्यांनी एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. आणि लिब्नाह व त्याच्या राजाला व हेब्रोनला केले तसे त्यांनी दबीर व त्याच्या राजालाही केले. \p \v 40 अशा रीतीने यहोशुआने सर्व देश, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, पश्चिमी तळवट, डोंगराची उतरण, तेथील राजांसह हस्तगत केला. एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. याहवेह इस्राएलच्या परमेश्वरांनी आज्ञापिल्याप्रमाणे प्रत्येक जीवधारी प्राण्यांचा नाश केला. \v 41 कादेश-बरनेआपासून गाझापर्यंत आणि गोशेनपासून गिबोनापर्यंतचे प्रदेश यहोशुआने हस्तगत केले. \v 42 यहोशुआने हे सर्व राजे व त्यांची भूमी एकाच मोहिमेत जिंकले, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर इस्राएलसाठी लढले. \p \v 43 मग यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसह गिलगालच्या छावणीकडे परतला. \c 11 \s1 उत्तरेकडील राजांचा पराभव \p \v 1 हासोराचा राजा याबीनने या घडलेल्या घटनांबद्दल ऐकले, तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचे व अक्षाफाचे राजे, \v 2 व उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांचे सर्व राजे; किन्नेरेथाच्या दक्षिणेकडील अराबात असलेले राजे; तळवटीत असलेले राजे, पश्चिमेकडील नाफथ दोराच्या प्रदेशातील राजे; \v 3 पूर्वेकडील व पश्चिमेकडील कनानी; अमोरी, हिथी, परिज्जी आणि डोंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना; आणि मिस्पाहच्या हर्मोन डोंगराच्या तळाशी राहणारे हिव्वी या सर्व लोकांना निरोप पाठवला. \v 4 ते त्यांचे सैनिक, मोठ्या संख्येने घोडे आणि रथ घेऊन समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे एक मोठे सैन्य घेऊन बाहेर आले. \v 5 हे सर्व राजे इस्राएलाशी लढण्यासाठी एकत्र आले व मेरोम सरोवरापाशी त्यांनी आपला तळ दिला. \p \v 6 परंतु याहवेह यहोशुआला म्हणाले, “तू त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या यावेळेस मी त्यांना मृत झालेले इस्राएलच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ जाळून टाक.” \p \v 7 तेव्हा यहोशुआ आणि त्याचे सैन्य अकस्मात मेरोम सरोवराजवळ दाखल झाले आणि त्यांनी हल्ला केला. \v 8 याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्‍यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही. \v 9 मग याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे यहोशुआने त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाकल्या आणि त्यांचे सर्व रथ जाळून टाकले. \p \v 10 परत येताना यहोशुआने हासोर शहर हस्तगत केले आणि तेथील राजाला तलवारीने ठार मारले. (हासोर शहर त्या सर्व संयुक्त राज्यांची राजधानी होती.) \v 11 त्या शहरातील प्रत्येकाचा तलवारीने संहार करण्यात आला. त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा नाश केला आणि हासोर शहर जाळून टाकले. \p \v 12 मग यहोशुआने ही सर्व राजकीय शहरे व त्यांच्या राजांवर हल्ले करून त्यांचा नाश केला. याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे सर्व लोकांची तलवारीने कत्तल करण्यात आली. \v 13 इस्राएलने टेकड्यांवर वसलेल्या शहरांपैकी कोणतेही शहर जाळून टाकले नाही—फक्त हासोर, जे यहोशुआने जाळले. \v 14 उद्ध्वस्त केलेल्या सर्व शहरातील लूट व गुरे इस्राएली लोकांनी स्वतःसाठी घेतली; परंतु सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांना तलवारीने मारले. त्यांनी कोणालाही जिवंत ठेवले नाही. \v 15 कारण याहवेहने आपला सेवक मोशेला अशीच आज्ञा दिली होती; आणि मोशेने ही आज्ञा यहोशुआला दिली व यहोशुआने जसे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे केले; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे त्याने काळजीपूर्वक पालन केले. \p \v 16 अशा रीतीने यहोशुआने हे सर्व देश जिंकून घेतले, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमी तळवट, अराबा आणि इस्राएलचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट, \v 17 सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्‍यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले. \v 18 या सर्व राजांशी यहोशुआने दीर्घकाळ युद्ध केले. \v 19 गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले. \v 20 कारण याहवेहनेच इस्राएली लोकांशी युद्ध करण्यासाठी या राजांचे हृदय कठोर केले होते, अशासाठी की याहवेहने त्यांना काहीही दयामाया न दाखविता त्यांचा समूळ नाश करावा असे मोशेला आज्ञापिले होते. याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे काही दयामाया न दाखविता त्यांचा वध करण्यात आला. \p \v 21 या काळामध्ये हेब्रोन, दबीर व अनाब येथील आणि यहूदीया व इस्राएलच्या सर्व डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अनाकाच्या सर्व वंशजांचा यहोशुआने सर्वस्वी नायनाट केला आणि त्यांची शहरे संपूर्णपणे ओसाड केली. \v 22 इस्राएली लोकांच्या देशात एकही अनाकी जिवंत उरला नाही, मात्र गाझा, गथ व अश्दोद येथे काही उरले. \p \v 23 याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे यहोशुआने संपूर्ण प्रदेश घेतला; आणि इस्राएलाच्या गोत्रांच्या अनुसार विभागणी करून, त्यांचे वतन म्हणून तो इस्राएली लोकांस दिला. अशा रीतीने शेवटी देशास युद्धापासून विसावा मिळाला. \c 12 \s1 पराभूत झालेल्या राजांची यादी \lh \v 1 यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे: \b \li1 \v 2 हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन. \li2 त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्‍याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्‍याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता. \li2 \v 3 अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ\f + \fr 12:3 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa गालील\fqa*\f* समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले. \li1 \v 4 बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले. \li2 \v 5 त्याचे राज्य हर्मोन पर्वत, सलेकाह, संपूर्ण बाशानपासून गशूरी आणि माकाथी लोकांच्या सीमेपर्यंत, अर्ध्या गिलआद पासून हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत विस्तृत होते. \b \lf \v 6 याहवेहचा सेवक मोशे व इस्राएलच्या लोकांनी या लोकांवर विजय मिळविला आणि याहवेहचा सेवक मोशेने त्यांचा देश रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून दिला होता. \b \p \v 7 यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्‍यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्‍या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला. \v 8 यात डोंगराळ प्रदेश, पश्चिमेकडील तळवट, अराबा, डोंगराचा उतार, अरण्याचा भाग आणि नेगेव प्रांतांचा समावेश होता. हे सर्व प्रदेश हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसीचे होते. \b \lh त्या प्रदेशांचे राजे हे होते: \b \li1 \v 9 यरीहोचा राजा-एक, \li1 बेथेल जवळील आय शहराचा राजा-एक, \li1 \v 10 यरुशलेमचा राजा-एक, \li1 हेब्रोनचा राजा-एक, \li1 \v 11 यर्मूथचा राजा-एक, \li1 लाखीशचा राजा-एक, \li1 \v 12 एग्लोनाचा राजा-एक, \li1 गेजेरचा राजा-एक, \li1 \v 13 दबीरचा राजा-एक, \li1 बेथ-गादेरचा राजा-एक, \li1 \v 14 होरमाहचा राजा-एक, \li1 अरादचा राजा-एक, \li1 \v 15 लिब्नाहचा राजा-एक, \li1 अदुल्लामचा राजा-एक, \li1 \v 16 मक्केदाचा राजा-एक, \li1 बेथेलचा राजा-एक, \li1 \v 17 तप्पूआहचा राजा-एक, \li1 हेफेराचा राजा-एक, \li1 \v 18 अफेकाचा राजा-एक, \li1 शारोनचा\f + \fr 12:18 \fr*\fq शारोन \fq*\ft किंवा \ft*\fqa लाशारोन\fqa*\f* राजा-एक, \li1 \v 19 मादोनाचा राजा-एक, \li1 हासोरचा राजा-एक, \li1 \v 20 शिम्रोन-मरोनाचा राजा-एक, \li1 अक्षाफाचा राजा-एक, \li1 \v 21 तानखाचा राजा-एक, \li1 मगिद्दोचा राजा-एक, \li1 \v 22 केदेशचा राजा-एक, \li1 कर्मेलातील योकनामाचा राजा-एक, \li1 \v 23 नाफथ दोरचा राजा-एक, \li1 गिलगालातील गोईमाचा राजा-एक, \li1 \v 24 तिरजाहचा राजा-एक, \b \lf ते सर्व एकूण एकतीस राजे होते. \c 13 \s1 जिंकावयाचे राहिलेले आणखी प्रदेश \p \v 1 जेव्हा यहोशुआ उतार वयाचा झाला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “तू आता खूप वयस्कर झाला आहेस आणि देशाचा बराच भाग ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे.” \b \lh \v 2 जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे: \b \li1 पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश; \v 3 पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; \li1 अव्वी लोकांचा प्रदेश: \v 4 दक्षिणेकडे कनानी लोकांचा सर्व प्रदेश; \li1 सीदोनी लोकांचा माराह, अफेक आणि अमोर्‍यांची सीमा इथपर्यंत आहे; \li1 \v 5 गिबली लोकांचा प्रदेश; \li1 बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन. \b \p \v 6 “लबानोनपासून मिसरेफोत-मयिम डोंगराळ प्रदेशात राहणारे सर्व रहिवासी, म्हणजे सर्व सीदोन्यांना मी स्वतः इस्राएली लोकांपुढून घालवून देईन. मी तुला सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना हा देश त्यांचे वतन म्हणून विभागून देण्यात येईल याची खात्री कर. \v 7 इस्राएलचे नऊ गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला तो वतन म्हणून तू विभागणी करून दे.” \s1 यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेशाची विभागणी \lh \v 8 मनश्शेहचे बाकीचे अर्धे गोत्र, रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना यार्देनेच्या पूर्वेकडे आपले वतन मिळाले होते, याहवेहचा सेवक मोशेने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे तो प्रदेश त्यांना वाटून दिला होता. \li1 \v 9 आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या सीमेवर असलेले अरोएर व खोर्‍यांमधील शहरापासून दिबोनपर्यंतचा मेदबाचा सर्व पठाराचा प्रदेश, \v 10 अम्मोन्यांच्या सीमेपर्यंतची हेशबोनात राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन याची सर्व नगरे. \li1 \v 11 आणि गिलआद देश, गशूरी व माकाथी या लोकांचा सर्व प्रदेश; सर्व हर्मोन पर्वत; सलेकाहपर्यंत सर्व बाशान; \v 12 म्हणजे अष्टारोथ व एद्रेईवर ज्याने राज्य केले त्या ओग राजाचे बाशानातील संपूर्ण राज्य. (रेफाईम लोकांपैकी तो शेवटचा होता.) मोशेने त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना वतनातून बाहेर घालवून दिले. \v 13 परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत. \b \li1 \v 14 परंतु लेवीच्या गोत्रास त्याने कोणतेही वतन दिले नाही, कारण याहवेहने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, इस्राएलचे परमेश्वर याहवेहना वाहिलेली अन्नार्पणे हे त्यांचे वतनभाग आहेत. \b \lh \v 15 रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही: \li1 \v 16 आर्णोन खोर्‍यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्‍यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार, \v 17 हेशबोन व दिबोन, बामोथ-बआल, बेथ-बआल-मेओनसह पठारावरील त्याची सर्व इतर नगरे, \v 18 याहसाह, केदेमोथ, मेफाथ, \v 19 किर्याथाईम, सिबमाह, खोर्‍यातील टेकडीवरील जेरेथ-नगर. \v 20 बेथ-पौर, पिसगाची उतरण व बेथ-यशिमोथ. \v 21 पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्‍यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला. \v 22 या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते. \lf \v 23 यार्देनच्या किनार्‍यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते. \b \lh \v 24 मोशेने गाद गोत्रास त्यांच्या कुळानुसार हे वतन दिले: \li1 \v 25 गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती. \v 26 आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत; \v 27 व खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निमराह, सुक्कोथ, साफोन म्हणजे हेशबोनचा राजा सीहोनच्या राज्याचे हे उरलेले राज्य होते (यार्देन नदीच्या पूर्वबाजूपासून किन्नेरेथ समुद्रापर्यंत त्यांची सीमा होती). \lf \v 28 ही नगरे व गावे गादच्या गोत्राला त्यांच्या कुळानुसार वतन म्हणून दिली होती. \b \lh \v 29 मोशेने मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला, म्हणजेच मनश्शेहच्या कुटुंबाच्या अर्ध्या वंशजांना त्यांच्या कुळानुसार हे प्रदेश दिले: \li1 \v 30 त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे, \v 31 अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे). \lf मनश्शेहचा पुत्र माखीरच्या वंशजांना; माखीरच्या पुत्रांपैकी अर्ध्यांना त्यांच्या कुळाप्रमाणे हे देण्यात आले. \b \lf \v 32 यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली. \v 33 परंतु लेवी गोत्राला मोशेने कोणतेही वतन दिले नाही, कारण त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, याहवेह इस्राएलचे परमेश्वरच त्यांचे वतन आहेत. \c 14 \s1 यार्देनेच्या पश्चिमेकडील प्रदेशाची वाटणी \p \v 1 एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले. \v 2 याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते. \v 3 अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते. \v 4 योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती. \v 5 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी देशाची वाटणी केली. \s1 कालेबाचे वतन \p \v 6 यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे. \v 7 जेव्हा याहवेहचा सेवक मोशेने मला कादेश-बरनेआवरून हा देश हेरण्यासाठी पाठविले होते तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो. आणि मला मनापासून जे वाटले त्याप्रमाणे मी त्याला वर्तमान दिले, \v 8 परंतु माझ्याबरोबर गेलेल्या माझ्या इस्राएली बांधवांनी लोकांचे अंतःकरण भयभीत केले. तरीही मी, याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले, \v 9 म्हणून त्या दिवशी मोशेने मला शपथ घेऊन सांगितले, ‘देशाच्या ज्या भागात तुझे पाऊल पडेल तो भाग तुझा आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईल, कारण तू याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले आहे.’\f + \fr 14:9 \fr*\ft \+xt अनु 1:36\+xt*\ft*\f* \p \v 10 “इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे! \v 11 मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे. \v 12 म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.” \p \v 13 तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले. \v 14 म्हणून तेव्हापासून हेब्रोन हे कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेबच्या मालकीचे वतन झाले, कारण त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले. \v 15 (त्यापूर्वी हेब्रोनचे नाव किर्याथ-अर्बा असे होते, कारण अर्बा अनाकी लोकातील सर्वात महान व्यक्ती होता.) \p मग सर्व देशास युद्धापासून विसावा मिळाला. \c 15 \s1 यहूदाहला देण्यात आलेला प्रदेश \lh \v 1 यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता. \b \li1 \v 2 त्यांची दक्षिण सीमा मृत समुद्राच्या दक्षिणेस असलेल्या शेवटच्या खाडीपासून सुरू झाली, \v 3 अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस असलेल्या मार्गाने सीन रानाच्या कडेने जाऊन दक्षिणेस कादेश-बरनेआपर्यंत. नंतर ती हेस्रोनच्या पुढे अद्दारपर्यंत आणि कारकाला वळण घेते. \v 4 नंतर पुढे जाऊन ती आजमोनच्या बाजूने इजिप्तच्या ओढ्यापर्यंत जाऊन, त्या ओढ्याच्या कडेने ती भूमध्य समुद्रापर्यंत गेली होती. ही त्यांची दक्षिणी सीमा आहे. \li1 \v 5 त्यांची पूर्वेकडील सीमा यार्देन नदीच्या मुखाकडे असलेल्या मृत समुद्रापर्यंत होती. \li1 त्यांच्या उत्तरेकडील सीमेची सुरुवात यार्देनेच्या मुखाशी असलेल्या खाडीपासून झाली, \v 6 व पुढे बेथ-होगलाहपर्यंत चढून बेथ-अराबाहच्या उत्तरेकडे रऊबेनाचा पुत्र बोहनच्या खडकापर्यंत गेली. \v 7 तिथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरपर्यंत जाऊन गिलगालच्या उत्तरेकडे वळली. हे गिलगाल खोर्‍याच्या दक्षिण बाजूस असलेल्या अदुमिम्माच्या चढावांच्या समोरील बाजूस आहे. तिथून त्या सीमेचा विस्तार एन-शेमेशच्या झर्‍यांपासून एन-रोगेलपर्यंत होता. \v 8 त्यानंतर ती सीमा हिन्नोमाच्या खोर्‍यातून जाऊन यबूसी नगराच्या (म्हणजे यरुशलेम) दक्षिणेकडील बाजूने गेली. पुढे ती सीमा पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेकडील टोकास असलेल्या पर्वताच्या माथ्यावर जाऊन पोहोचली. \v 9 तिथून ती सीमा त्या डोंगराच्या माथ्यापासून नेफतोआहच्या झर्‍यापर्यंत आणि तिथून एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून बालाह म्हणजेच किर्याथ-यआरीमपर्यंत पोहोचते. \v 10 तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते. \v 11 तिथून ती एक्रोनच्या उत्तरेकडून शिक्रोनपर्यंत गेली व बालाह पर्वतावरून यबनेलास जाऊन पोहोचली. सीमेचा शेवट भूमध्य समुद्राजवळ झाला. \li1 \v 12 भूमध्य समुद्राचा किनारा ही पश्चिमेची सीमा होती. \b \lf यहूदाह कुळातील लोकांच्या त्यांच्या वंशानुसार हा प्रदेश मिळाला. \b \p \v 13 आणि यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला यहूदाहच्या कुळाबरोबर जो वाटा दिला तो हा: किर्याथ-अर्बा म्हणजेच हेब्रोन. (अर्बा हा अनाकांचा पूर्वज होता.) \v 14 अनाकाचे पुत्र शेशय, अहीमान व तलमय या अनाकांच्या वंशजांना कालेबाने बाहेर घालवून दिले. \v 15 तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला. \v 16 आणि कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.” \v 17 कालेबाचा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले, म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह त्याला पत्नी म्हणून दिली. \p \v 18 एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना एक शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?” \p \v 19 तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले. \b \lh \v 20 यहूदाह गोत्रास त्यांच्या कुळानुसार आलेले वतन हे होते: \b \li1 \v 21 दक्षिण भागाची नगरे यहूदाह गोत्राची जी नेगेव प्रांताकडे एदोमाच्या सीमेजवळ होती: \li2 कबसेल, एदर, यागूर, \v 22 कीनाह, दीमोनाह, अदआदाह, \v 23 केदेश, हासोर, इथनान, \v 24 जीफ, तेलेम, बालोथ, \v 25 हासोर-हदत्ताह, करीयोथ हेस्रोन (हेच हासोर), \v 26 अमाम, शमा, मोलादाह, \v 27 हसर-गदाह, हेशमोन, बेथ-पेलेट, \v 28 हसर-शुआल, बेअर-शेबा, बिजोथा, \v 29 बालाह, ईयीम, असेम, \v 30 एलतोलाद, कसील, होरमाह, \v 31 सिकलाग, मदमन्नाह, सनसन्नाह, \v 32 लबाओथ, शिलहीम, एईन व रिम्मोन. ही सर्व मिळून एकोणतीस नगरे आणि त्यांची गावे होती. \li1 \v 33 पश्चिम तळवटीत वसलेली नगरे ही: \li2 एष्टाओल, सोराह, अशनाह, \v 34 जानोहा, एन-गन्नीम, तप्पूआह, एनाम, \v 35 यर्मूथ, अदुल्लाम, सोकोह, अजेकाह, \v 36 शाराईम, अदीथयिम, व गेदेराह\f + \fr 15:36 \fr*\ft किंवा \ft*\fqa गदेरोथाईम\fqa*\f* ही एकूण चौदा नगरे व त्यांची गावे होती. \li2 \v 37 सेनान, हदाशाह, मिगदल-गाद, \v 38 दिलआन, मिस्पेह, योकथएल, \v 39 लाखीश, बसकाथ, एग्लोन, \v 40 कब्बोन, लहमास, किथलीश, \v 41 गदेरोथ, बेथ-दागोन, नामाह व मक्केदा अशी सोळा नगरे आणि त्यांची गावे. \li2 \v 42 लिब्नाह, एथेर, आशान, \v 43 इफ्ताह, अशनाह, नेजीब, \v 44 कईलाह, अकजीब, आणि मारेशाह अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे. \li2 \v 45 एक्रोन व सभोवतालच्या वस्त्या व गावे. \v 46 एक्रोनच्या पश्चिमेपासून अश्दोदच्या परिसरात असलेल्या गावांसहीत सर्वकाही; \v 47 अश्दोद व त्याच्या सभोवतालच्या वस्त्या व गावे, गाझा, त्याच्या वस्त्या व गावे, इजिप्तच्या नाल्यापर्यंतची गावे व भूमध्य समुद्राच्या काठापर्यंत. \li1 \v 48 डोंगराळ प्रदेशातील: \li2 शामीर, यत्तीर सोकोह, \v 49 दन्नाह किर्याथ-सन्नाह; म्हणजेच दबीर, \v 50 अनाब, एष्तमोह, अनीम, \v 51 गोशेन, होलोन, आणि गिलोह अशी अकरा नगरे आणि त्यांची गावे. \li2 \v 52 अरब, दूमाह\f + \fr 15:52 \fr*\ft किंवा \ft*\fqa रुमाह\fqa*\f*, एशआन, \v 53 यानीम, बेथ-तप्पूआह, अफेकाह, \v 54 हुमताह, किर्याथ-अर्बा; म्हणजेच हेब्रोन आणि सियोर अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे. \li2 \v 55 माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह, \v 56 येज्रील, योकदेआम, जानोहा, \v 57 काईन, गिबियाह, तिम्नाह अशी दहा नगरे आणि त्यांची गावे. \li2 \v 58 हल्हूल, बेथ-सूर, गदोर, \v 59 माराथ, बेथ-अनोथ व एलतेकोन अशी सहा नगरे आणि त्यांची गावे. \li2 \v 60 किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे. \li1 \v 61 अरण्यातील नगरे ही: \li2 बेथ-अराबाह, मिद्दीन, सकाकाह, \v 62 मिठाचे नगर निबशान आणि एन-गेदी अशी सहा नगरे आणि त्यांची गावे. \b \p \v 63 परंतु यरुशलेम शहरात राहणार्‍या यबूसी लोकांना यहूदाह वंशातील लोक घालवून देऊ शकले नाहीत; आजही यबूसी लोक यरुशलेममध्ये यहूदीयाच्या लोकांमध्ये राहात आहेत. \c 16 \s1 एफ्राईम व मनश्शेह यांना मिळालेले वतन \li1 \v 1 योसेफाच्या गोत्राला मिळालेल्या भागाची सुरुवात यार्देनेकडून होते, यरीहोच्या पूर्वेकडील झर्‍यापासून रानातून बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत जाते. \v 2 पुढे ती बेथेल (म्हणजे लूज) पासून अर्की लोकांची सीमा पार करून अटारोथपर्यंत गेली, \v 3 पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते. \b \lf \v 4 याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शेह आणि एफ्राईम यांना वतन मिळाले. \b \b \lh \v 5 एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती: \b \li1 त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग \v 6 आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती. \v 7 नंतर पुढे ती सीमा यानोहापासून खाली वळून अटारोथ व नाराह येथवर जाऊन यरीहोस पोहोचून यार्देनातून आली होती. \v 8 तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते. \li1 \v 9 मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती. \b \p \v 10 त्यांनी गेजेरात राहणार्‍या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात. \c 17 \p \v 1 योसेफाचा प्रथमपुत्र म्हणून मनश्शेहच्या गोत्राला देण्यात आलेला वाटा हा होता. गिलआदाचा पूर्वज माखीर, मनश्शेहच्या प्रथमपुत्राला गिलआद व बाशान हे मिळाले कारण माखीरी लोक महान योद्धे होते. \v 2 हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत. \p \v 3 मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती. \v 4 त्या एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि पुढाऱ्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, “याहवेहने मोशेला आज्ञा दिली होती की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला वतन दिले जावे.” तेव्हा यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या भावांबरोबर त्यांना वतन दिले. \v 5 यार्देनेच्या पूर्वेकडे गिलआद व बाशान याशिवाय मनश्शेहच्या वाट्याला भूमीचे दहा भाग आले, \v 6 कारण मनश्शेहच्या गोत्रातील कन्यांना पुत्रांमध्ये वतन मिळाले. गिलआदाचा प्रदेश मनश्शेहच्या बाकीच्या वंशजाचा झाला होता. \b \li1 \v 7 मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते. \v 8 (मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.) \v 9 ती सीमा पुढे दक्षिणेकडील कानाहा ओढ्याकडे जाते. एफ्राईमच्या मालकीची नगरे मनश्शेहच्या नगरांमध्ये होती, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे होती आणि भूमध्य समुद्राकडे संपते. \v 10 दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत. \li1 \v 11 इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ\f + \fr 17:11 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa नाफोथ दोर\fqa*\f* होते). \b \p \v 12 तरीही मनश्शेहचे वंशज त्या नगरांमध्ये राहू शकत नव्हते, कारण कनानी लोकांनी त्यात राहण्याचा अट्टाहास केला होता. \v 13 परंतु जेव्हा इस्राएली लोक समर्थ झाले, तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपले गुलाम बनविले पण त्यांना देशातून पूर्णपणे बाहेर घालवून दिले नाही. \p \v 14 योसेफाचे लोक यहोशुआला म्हणाले, “वतन म्हणून तू आम्हाला एकच वाटा आणि एकच भाग का दिला आहेस? आम्ही संख्येने पुष्कळ लोक आहोत आणि याहवेहने आम्हाला पुष्कळ आशीर्वादित केले आहे.” \p \v 15 तेव्हा यहोशुआने उत्तर दिले, “जर तुम्ही संख्येने पुष्कळ आहात आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश तुमच्यासाठी खूप लहान आहे, तर परिज्जी व रेफाईम लोक राहतात तो रानाचा प्रदेश तुमच्यासाठी मोकळा करून घ्या.” \p \v 16 योसेफाच्या लोकांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरेसा नाही आणि बेथ-शान व सभोवतालच्या वस्तीत राहणारे व येज्रील खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.” \p \v 17 परंतु यहोशुआ योसेफाच्या गोत्राचे एफ्राईम आणि मनश्शेहला म्हणाला; “तुम्ही संख्येने पुष्कळ आणि बलवान आहात. तुम्हाला केवळ एकच भाग नसावा \v 18 परंतु अरण्यातील डोंगराळ भाग व त्याच्या टोकापर्यंतच्या हद्दी तुमच्या होतील; जरी कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत आणि ते फार शक्तिशाली आहेत, तरीही तुम्ही त्यांना घालवून देऊ शकाल.” \c 18 \s1 उरलेल्या भूमीची विभागणी \p \v 1 संपूर्ण इस्राएली लोकांचा समुदाय शिलोह येथे एकत्र जमला आणि तिथे त्यांनी सभामंडप उभारला. देश त्यांच्या ताब्यात आला होता. \v 2 परंतु अजूनही सात इस्राएली गोत्र होते ज्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते. \p \v 3 तेव्हा यहोशुआ इस्राएली लोकांना म्हणाला, “याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेला प्रदेश ताब्यात घेण्यास तुम्ही किती वेळ वाट पाहणार आहात? \v 4 प्रत्येक गोत्रातून तीन पुरुषांची नेमणूक करा. आपआपल्या वतनानुसार देशाचे सर्वेक्षण करावे व त्याचे वर्णन लिहावे म्हणून मी त्यांना पाठवेन. मग त्यांनी माझ्याकडे परत यावे. \v 5 तुम्ही ती भूमी त्यांना सात विभागांमध्ये विभागून द्यावी, यहूदाहच्या गोत्राने त्यांच्या दक्षिणेकडील सीमेत आणि योसेफाच्या गोत्राने त्यांच्या उत्तरेकडील सीमेतच राहावे. \v 6 त्या सात प्रदेशांचे वर्णन लिहिल्यावर ते तुम्ही माझ्याकडे आणावे, मग याहवेह आपल्या परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. \v 7 तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.” \p \v 8 जेव्हा ते पुरुष प्रदेशाची मोजणी करण्यासाठी निघाले, तेव्हा यहोशुआने त्यांना सूचना दिली, “जा आणि त्या प्रदेशाचे सर्वेक्षण करा आणि त्याचे वर्णन लिहा आणि परत माझ्याकडे या, मग मी येथे शिलोहमध्ये याहवेहसमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकेन.” \v 9 तेव्हा ते पुरुष निघाले आणि त्या प्रदेशातून फिरले व प्रत्येक नगरांप्रमाणे सात भागात त्याचे वर्णन एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहिले आणि शिलोह येथील छावणीत यहोशुआकडे परत आले. \b \lh \v 10 तेव्हा शिलोह येथे याहवेहसमोर यहोशुआने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या व तिथे त्याने इस्राएली लोकांच्या गोत्राच्या भागानुसार प्रदेशाची वाटणी करून दिली. \s1 बिन्यामीनचे वतन \lh \v 11 बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार पहिली चिठ्ठी निघाली. त्यांच्या वाट्याला आलेला भाग यहूदाह आणि योसेफाच्या गोत्रातील प्रांतांच्या दरम्यान होता. \li1 \v 12 उत्तरेकडील सीमा यार्देन नदीजवळ सुरू होऊन ती यरीहोच्या उत्तरेच्या उतरणीस जाऊन नंतर पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून व बेथ-आवेनच्या रानातून गेलेली होती. \v 13 तिथून ती सीमा ज्याला बेथेल देखील म्हणत, त्या लूज शहराच्या दक्षिणेकडे जाऊन पुढे खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशातील अटारोथ-अद्दार पर्यंत गेली. \li1 \v 14 तिथून ती सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनजवळील डोंगरावरून किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) मध्ये येते. यहूदीयाच्या लोकांच्या नगरांपैकी ते एक होते. ही पश्चिमी सीमा होती. \li1 \v 15 दक्षिणेकडील सीमा किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) नगराच्या बाहेरील बाजूपासून सुरू झाली व ती नेफतोआहच्या झर्‍याकडे पोहोचली. \v 16 तिथून ती खाली रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या हिन्नोम खोर्‍याच्या जवळील डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पुढे हिन्नोम खोरे ओलांडून यबूसी लोक राहत त्या यरुशलेम शहराच्या दक्षिण बाजूने एन-रोगेल येथे गेली. \v 17 मग ती सीमा उत्तरेस वळून एन-शेमेशकडे जाऊन पुढे गलीलोथ जे अदुमिम्माच्या उतरणीच्या समोर होते तिथे गेली. नंतर तिथून ती खाली रऊबेनाचा पुत्र बोहन याच्या खडकाकडे जाते. \v 18 ती सीमा पुढे बेथ-अराबाहच्या उत्तरेकडील उताराकडून खाली अराबाकडे गेली होती. \v 19 पुढे ती सीमा बेथ-होगलाहच्या उत्तरेकडील उताराला जाऊन मृत समुद्राच्या उत्तरेच्या खाडीजवळ येते. ही यार्देन नदीच्या मुखाजवळील दक्षिण सीमा आहे. \li1 \v 20 पूर्वेकडील सीमा यार्देन नदी होती. \lf बिन्यामीनच्या कुळांना मिळालेल्या वतनाच्या चारही बाजूने या सीमा होत्या. \b \lh \v 21 बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार मिळालेली नगरे ही होती: \li1 यरीहो, बेथ-होगलाह, एमेक-केझीज, \v 22 बेथ-अराबाह, सेमाराईम, बेथेल, \v 23 अव्वीम, पाराह, ओफराह, \v 24 कफर-अम्मोनी, ओफनी आणि गेबा; ही बारा नगरे आणि त्यांची गावे. \li1 \v 25 गिबोन, रामाह, बैरोथ, \v 26 मिस्पेह, कफीराह, मोजाह, \v 27 रेकेम, यिरपएल, तरलाह, \v 28 सेला हाएलेफ, यबूसी शहर (म्हणजेच यरुशलेम), गिबियाह आणि किर्याथ; ही चौदा नगरे आणि त्यांची गावे. \lf बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार हे वतन होते. \c 19 \s1 शिमओनाचे वतन \lh \v 1 दुसरी चिठ्ठी शिमओन गोत्राच्या कुळानुसार निघाली. त्यांचे वतन यहूदीयाच्या सीमेमध्ये होते. \v 2 त्यांना मिळालेल्या वतनातील नगरे याप्रमाणे: \li1 बेअर-शेबा (किंवा शेबा), मोलादाह, \v 3 हसर-शुआल, बालाह, असेम, \v 4 एलतोलाद, बेथूल, होरमाह, \v 5 सिकलाग, बेथ-मर्काबोथ, हाझर-सूसाह, \v 6 बेथ-लेबाओथ, आणि शारूहेन; ही तेरा नगरे आणि त्यांची गावे; \li1 \v 7 एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे; \v 8 आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे. \lf शिमओन गोत्राच्या कुळांनुसार दिलेले वतन हे होते. \v 9 शिमओन गोत्राच्या वतनाचा हिस्सा यहूदीयाच्या वतनातून घेतला होता, कारण यहूदाहचा भाग त्यांच्या गरजेपेक्षा मोठा होता. त्यामुळे शिमओन वंशाला त्यांचे वतन यहूदाह वंशाच्या सीमेमध्ये मिळाले. \s1 जबुलूनाचे वतन \lh \v 10 तिसरी चिठ्ठी जबुलून गोत्राच्या कुळांनुसार निघाली: \li1 त्यांच्या वतनभागाची सीमा सारीदपर्यंत गेली होती. \v 11 तिथून पुढे ती पश्चिमेकडे मरलापर्यंत व दब्बेशेथला जोडून पुढे योकनामच्या ओहोळास जाऊन पोहोचली. \v 12 ती सारीदपासून वळून पूर्वेकडे उगवतीला किसलोथ-ताबोर याच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे दाबरथ आणि याफीयापर्यंत गेली. \v 13 तिथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर आणि एथ-काझीनपर्यंत येते; व तिथून रिम्मोनकडे येऊन नेआहकडे वळते. \v 14 तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्‍यापर्यंत जाऊन संपते. \li1 \v 15 त्यात कट्टाथ, नहलाल, शिम्रोन, इदलाह आणि बेथलेहेम यांचा समावेश होता. ती बारा नगरे आणि त्यांची गावे होती. \lf \v 16 ही नगरे व त्यातील गावे जबुलून गोत्राच्या कुळानुसार वतन होती. \s1 इस्साखारचे वतन \lh \v 17 चौथी चिठ्ठी इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार निघाली. \v 18 त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: \li1 येज्रील, कसुल्लोथ, शूनेम, \v 19 हफाराईम, शियोन, अनाहराथ, \v 20 रब्बीथ, किशोन, एबेज, \v 21 रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दाह आणि बेथ-पसेस. \li1 \v 22 ही सीमा ताबोर, शहसुमा आणि बेथ-शेमेश यांना लागून पुढे जाऊन यार्देनकडे समाप्त होते. \li1 ही सोळा नगरे आणि त्यांची गावे होती. \lf \v 23 ही नगरे आणि त्यातील गावे इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती. \s1 आशेराचे वतन \lh \v 24 पाचवी चिठ्ठी आशेर गोत्राच्या कुळांनुसार निघाली. \v 25 त्यांच्या सीमेमध्ये समाविष्ट असलेली ही नगरे: \li1 हेलकथ, हली, बेटेन, अक्षाफ, \v 26 अल्लामेलेख, अमआद आणि मिशाल. पश्चिमेकडे ती सीमा कर्मेल आणि शिहोर-लिबनाथजवळून जाते. \v 27 तिथून ती पूर्वेकडे बेथ-दागोनकडे वळून जबुलून आणि इफ्ताह-एल खोर्‍याजवळ जाते आणि उत्तरेकडे बेथ-एमेक आणि नेईएल तसेच डाव्या बाजूने काबूलकडे जाते. \v 28 ती पुढे अब्दोन, रहोब, हम्मोन आणि कानाहाकडून मोठ्या सीदोनपर्यंत जाते. \v 29 नंतर ती सीमा रामाहकडे वळसा घेते आणि तटबंदीचे शहर सोरकडे जाते, तिथून होसाहकडे वळून अकजीबकडून भूमध्य समुद्राजवळ निघते, \v 30 उम्माह, अफेक आणि रहोब यासहित. \li1 यामध्ये बावीस नगरे आणि त्यांच्या गावांचा समावेश होता: \lf \v 31 ही नगरे आणि त्यातील गावे आशेरच्या गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती. \s1 नफतालीचे वतन \lh \v 32 सहावी चिठ्ठी त्यांच्या कुळांनुसार नफताली गोत्राची निघाली. \li1 \v 33 ही सीमा हेलेफ आणि साननीमातील मोठ्या एलावृक्षापासून पुढे अदामी-नेकेब आणि यबनेल ते लक्कूम आणि यार्देनपर्यंत समाप्त होते. \v 34 पुढे पश्चिमेकडे अझनोथ ताबोरमधून जाते आणि हुक्कोक येथे निघते. दक्षिणेकडून ती जबुलूनजवळ, पश्चिमेकडून आशेरजवळ आणि पूर्वेकडून यार्देनच्या यहूदीया वतनभागाला जाऊन मिळते. \li1 \v 35 तटबंदीची नगरे सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ, \v 36 अदमाह, रामाह, हासोर, \v 37 केदेश, एद्रेई, एन-हासोर, \v 38 इरोन, मिगदल-एल, होरेम, बेथ-अनाथ, व बेथ-शेमेश ही होती. \li1 ही सर्व एकोणवीस नगरे आणि त्यांची गावे होती. \lf \v 39 ही नगरे आणि त्यातील गावे नफताली गोत्राच्या कुळाप्रमाणे वतनभाग होती. \s1 दानाचे वतन \lh \v 40 सातवी चिठ्ठी दान गोत्राच्या कुळांनुसार निघाली. \v 41 त्यांच्या वतनभागाची सीमा ही होती: \li1 सोराह, एष्टाओल, ईर-शमेश, \v 42 शालब्बीन, अय्यालोन, इथलाह, \v 43 एलोन, तिम्नाह, एक्रोन, \v 44 एल्तेकेह, गिब्बथोन, बालाथ, \v 45 येहूद, बने-बराक, गथ-रिम्मोन, \v 46 मे-यरकोन आणि रक्कोन, याबरोबरच याफोसमोर असलेला प्रदेश. \lf \v 47 (जेव्हा दानच्या गोत्राची सीमा त्यांनी गमावली, तेव्हा त्यांनी जाऊन लेशेम शहरावर हल्ला करून ते हस्तगत केले, तलवारीने त्यांचा नाश केला व तिथे वस्ती केली. लेशेममध्ये ते स्थायिक झाले व त्या शहराला त्यांचा पूर्वज दानचे नाव दिले.) \lf \v 48 ही नगरे आणि त्यातील गावे दानच्या गोत्राच्या कुळांनुसार त्यांचे वतन म्हणून मिळाले. \s1 यहोशुआचे वतन \li1 \v 49 जेव्हा त्यांनी त्यांना दिलेल्या भागाची वाटणी करण्याचे संपविले, तेव्हा इस्राएली लोकांनी नूनाचा पुत्र यहोशुआला आपल्या वतनामध्ये वाटा दिला, \v 50 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह नगर जे यहोशुआने मागितले होते ते त्याला दिले आणि त्याने ते नगर बांधून त्यात वस्ती केली. \b \lf \v 51 या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्‍यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले. \c 20 \s1 आश्रयाची शहरे \p \v 1 तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले: \v 2 “इस्राएली लोकांना सांग, मोशेद्वारे तुम्हाला सुचविल्यानुसार आश्रयाची शहरे नेमून द्यावीत. \v 3 यासाठी की जर एखाद्याने अकस्मात् आणि अजाणतेने एखाद्या व्यक्तीची हत्या केली, तर त्याने तिथे पळून जावे आणि रक्ताचा सूड घेणार्‍यापासून आश्रय घेऊन सुरक्षित राहावे. \v 4 जेव्हा ते या शहरांपैकी एका शहराकडे पळून जातील, तेव्हा त्यांनी त्या शहराच्या वेशीवर उभे राहावे आणि आपली हकिकत त्या शहराच्या वडीलजनांना सांगावी. आणि त्या वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्यांच्या शहरात घ्यावे आणि त्यांच्यामध्ये राहण्यासाठी त्याला जागा द्यावी. \v 5 जर रक्ताचा सूड घेणारा शोध करीत आला तर, वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्याच्याकडे स्वाधीन करू नये, कारण त्याने आपल्या शेजार्‍याचा काही दुष्ट उद्देश नसताना वध केला आहे आणि त्याच्या मनात कोणतीही द्वेषभावना नव्हती. \v 6 जोपर्यंत तो सभेसमोर खटल्यासाठी उभा राहत नाही आणि त्यावेळेस तिथे सेवा करीत असलेला महायाजकास मृत्यू येईपर्यंत त्याने त्या शहरात राहावे. त्यानंतर तो व्यक्ती जिथून पळून आला, त्या नगरात स्वतःच्या घरी परत जावे.” \p \v 7 तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली. \v 8 यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली. \v 9 त्यांच्यामध्ये राहणारा कोणा इस्राएली किंवा परदेशीयाने नकळतपणे कोणाची हत्या केली असेल, तर त्याने या नेमून दिलेल्या शहरांकडे पळून जावे, यासाठी की मंडळीसमोर खटल्यासाठी उभे राहण्याआधी रक्ताचा सूड घेणार्‍याकडून तो मारला जाऊ नये. \c 21 \s1 लेव्यांची नगरे \p \v 1 आता लेवीचे कुटुंबप्रमुख कनानातील शिलोहमध्ये असताना एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या इतर गोत्राच्या कुटुंब प्रमुखांकडे आले \v 2 आणि कनानातील शिलोह येथे त्यांना म्हणाले, “याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिली होती की तुम्ही आम्हाला राहण्यासाठी नगरे व आमच्या गुरांसाठी कुरणे द्यावीत.” \b \lh \v 3 तेव्हा याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे, इस्राएली लोकांनी स्वतःच्या वतनभागातून लेवी लोकांना नगरे आणि कुरणे दिली, ती ही: \b \li1 \v 4 पहिली चिठ्ठी कोहाथी लोकांच्या कुळांप्रमाणे निघाली. लेवी जे अहरोन याजकाचे वंशज होते त्यांना यहूदाह, शिमओन आणि बिन्यामीन गोत्रांच्या वतनातून तेरा नगरे दिली गेली. \li1 \v 5 बाकीच्या कोहाथी वंशजांना एफ्राईम, दान व मनश्शेहचा अर्धा वंश या गोत्रांच्या प्रदेशातील दहा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली. \li1 \v 6 गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार, आशेर, नफताली व बाशानातील मनश्शेहच्या अर्धा वंशाच्या गोत्रातील कुळांच्या वतनातून तेरा नगरे देण्यात आली. \li1 \v 7 मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांनुसार रऊबेन, गाद आणि जबुलून गोत्रातून बारा नगरे मिळाली. \b \lf \v 8 याहवेहने मोशेद्वारे जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी चिठ्ठ्या टाकून लेवी लोकांना नगरे व त्यांची कुरणे नेमून दिली. \b \li1 \v 9 त्यांनी यहूदाह आणि शिमओनच्या गोत्रांना त्यांच्या नावानुसार नगरे दिली. \v 10 अहरोनाचे वंशज जे लेवीच्या गोत्रातील कोहाथी कुळाचे होते, त्यांची चिठ्ठी पहिली निघाली होती. त्यांना जी नगरे मिळाली ती ही: \li2 \v 11 त्यांना यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) व त्याची सभोवतालची कुरणे दिली. (अर्बा हा अनाकाचा पूर्वज होता.) \v 12 परंतु त्या शहराच्या सभोवतालची शेती आणि गावे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला त्याचे वतन म्हणून देण्यात आले होते. \v 13 म्हणून अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांनी हेब्रोन (हत्या केलेल्या व्यक्तीसाठी एक आश्रयाचे शहर), लिब्नाह, \v 14 यत्तीर, एशतमोआ, \v 15 होलोन, दबीर, \v 16 एईन, युत्ताह आणि बेथ-शेमेश व त्यांची कुरणे, ही एकूण नऊ नगरे या दोन गोत्रांकडून दिली. \li1 \v 17 बिन्यामीनच्या गोत्राकडून त्यांना: \li2 गिबोन, गेबा, \v 18 अनाथोथ आणि अलमोन अशी त्यांच्या कुरणांसह चार नगरे दिली. \lf \v 19 अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांच्या कुरणासहित मिळालेल्या नगरांची एकूण संख्या तेरा झाली. \b \lh \v 20 कोहाथाच्या कुळांतील राहिलेल्या लेव्यांना एफ्राईम गोत्राच्या वतनातून नगरे देण्यात आली: \li1 \v 21 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्यांना दिलेली नगरे ही: \li2 शेखेम (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) आणि गेजेर, \v 22 किबसाईम आणि बेथ-होरोन ही त्यांच्या कुरणांसह एकूण चार नगरे. \li1 \v 23 दानच्या गोत्राकडून त्यांना मिळालेली नगरे ही: \li2 एल्तेकेह, गिब्बथोन, \v 24 अय्यालोन व गथ-रिम्मोन; त्यांच्या कुरणासह ही चार नगरे होती. \li1 \v 25 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: \li2 तानख व गथ-रिम्मोन त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे. \lf \v 26 ही सर्व एकूण दहा नगरे व त्यांची कुरणे राहिलेल्या कोहाथी कुळाला मिळाली. \b \lh \v 27 लेवी कुळातील गेर्षोनाच्या गोत्राला: \li1 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: \li2 बाशानातील गोलान (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) व बीशतेराह त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे देण्यात आली. \li1 \v 28 इस्साखारच्या गोत्राकडून: \li2 किशोन, दाबरथ, \v 29 यर्मूथ व एन-गन्नीम व त्यांच्या कुरणासह चार नगरे देण्यात आली. \li1 \v 30 आशेरच्या गोत्राकडून: \li2 मिशाल, अब्दोन, \v 31 हेलकथ व रहोब ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली; \li1 \v 32 नफतालीच्या गोत्राकडून: \li2 गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली. \lf \v 33 गेर्षोन कुळाच्या वाट्याला तेरा नगरे व त्यांची कुरणे आली. \b \lh \v 34 मरारी कुळास (बाकीच्या लेवी गोत्राला): \li1 जबुलूनच्या गोत्राकडून: \li2 योकनाम, करताह, \v 35 दिमनाह व नहलाल ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली. \li1 \v 36 रऊबेनच्या गोत्राकडून: \li2 बेसेर, याहसाह, \v 37 केदेमोथ व मेफाथ ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली. \li1 \v 38 गादच्या गोत्राकडून: \li2 गिलआद मधील रामोथ (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), महनाईम, \v 39 हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली. \lf \v 40 लेवीच्या उर्वरित कुळांना, म्हणजे मरारी कुळास एकूण बारा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली. \b \lf \v 41 इस्राएली लोकांच्या हद्दीत लेवी लोकांची सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची कुरणे होती. \v 42 यातील प्रत्येक नगराच्या सभोवती कुरणे होती. असेच सर्व नगरांचे होते. \b \p \v 43 याप्रमाणे याहवेहने इस्राएलाच्या पूर्वजांना जो देश देण्याची शपथ घेतली होती, तो सर्व त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती केली. \v 44 याहवेहने त्यांच्या पूर्वजांना शपथ दिल्याप्रमाणे त्यांना सर्वस्वी विसावा दिला. त्यांचा एकही शत्रू त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही; याहवेहने इस्राएली लोकांच्या प्रत्येक शत्रूला त्यांच्या हाती दिले. \v 45 याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले. \c 22 \s1 पूर्वेकडील गोत्रे घरी परततात \p \v 1 नंतर यहोशुआने रऊबेन, गाद व मनश्शेहचे अर्धे गोत्र यांना बोलाविले \v 2 आणि त्यांना म्हटले, “याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले आहे आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली आहे. \v 3 कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे. \v 4 आता याहवेह तुमच्या परमेश्वरांनी अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा दिला आहे. तर आता यार्देनेच्या पलीकडे याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या प्रदेशातील तुमच्या घरी तुम्ही परत जा. \v 5 परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.” \p \v 6 तेव्हा यहोशुआने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या घरी रवाना झाले. \v 7 (मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला मोशेने बाशान प्रदेशात वतन दिले होते, तर यहोशुआने त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या गोत्राला त्यांच्या सहइस्राएली लोकांबरोबर यार्देनेच्या पश्चिमेस वतन दिले होते.) जेव्हा यहोशुआने त्यांना घरी पाठवले, तेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला, \v 8 “तुमची मोठी संपत्ती घेऊन घरी जा—गुरांचा मोठा कळप, चांदी, सोने, कास्य आणि लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे आणि तुमच्या शत्रूपासून मिळालेली लूट आपल्या इस्राएली बांधवांसह वाटून घ्या.” \p \v 9 तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला. \p \v 10 जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली. \v 11 आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, \v 12 तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले. \p \v 13 म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले. \v 14 त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले. \p \v 15 जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले: \v 16 “याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता? \v 17 पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही. \v 18 आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? \p “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल. \v 19 जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका. \v 20 जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ” \p \v 21 तेव्हा रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी इस्राएलच्या कुटुंबप्रमुखांना उत्तर दिले: \v 22 “याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! त्यांना माहीत आहे! आणि हे सर्व इस्राएलच्या लोकांना माहीत व्हावे! जर हे, याहवेहविरुद्ध बंड करण्यासाठी किंवा आज्ञाभंग असे असेल तर आज आम्हाला जिवंत सोडू नका. \v 23 जर याहवेहपासून दूर जाण्यासाठी, आणि होमार्पण आणि अन्नार्पण किंवा शांत्यर्पण त्यावर करावे म्हणून आम्ही आमची स्वतःची वेदी बांधली असेल तर याहवेह स्वतः त्याचा हिशोब आमच्याकडून घेवो. \p \v 24 “नाही! आम्ही या भयाने हे केले की जर कधी तुमच्या वंशजांनी आमच्या वंशजांना विचारले, ‘याहवेह इस्राएलच्या परमेश्वराशी तुमचा काय संबंध आहे? \v 25 आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील. \p \v 26 “म्हणूनच आम्ही म्हणालो, ‘चला आपण तयार होऊन वेदी बांधू या, परंतु होमार्पणासाठी किंवा यज्ञासाठी नाही.’ \v 27 तर ती आमच्या आणि तुमच्या आणि पुढच्या पिढ्यांमध्ये साक्ष असावी, यासाठी की आम्ही होमार्पण, यज्ञे व शांत्यर्पणे करून याहवेहच्या पवित्रस्थानी सेवा करावी, म्हणजे ‘याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही’ असे भविष्यात तुमचे वंशज आमच्या वंशजांना म्हणू शकणार नाहीत. \p \v 28 “आणि आम्ही म्हणालो, ‘जर ते आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तर आम्ही उत्तर देऊ: आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या याहवेहच्या वेदीचा हा नमुना पाहा, होमार्पणे किंवा यज्ञांसाठी नाही, परंतु आमच्या आणि तुमच्यामध्ये ही साक्ष म्हणून असावी.’ \p \v 29 “याहवेहच्या विरुद्ध बंड करणे आणि त्यांच्या निवासमंडपासमोर उभ्या असलेल्या याहवेह आपल्या परमेश्वराची होमवेदी सोडून धान्यार्पण आणि यज्ञांसाठी दुसरी वेदी बांधून त्यांच्यापासून दूर जाणे हे आमच्याकडून कधी ना होवो.” \p \v 30 जेव्हा फिनहास याजक आणि समाजाचे पुढारी; इस्राएलच्या कुळांच्या कुटुंबप्रमुखांनी रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना जे म्हणायचे होते ते ऐकले, तेव्हा त्यांचे समाधान झाले. \v 31 मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.” \p \v 32 मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला. \v 33 तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही. \p \v 34 रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले. \c 23 \s1 पुढार्‍यांना यहोशुआचा निरोप \p \v 1 पुष्कळ काळ होऊन गेला होता आणि याहवेहने इस्राएली लोकास सभोवतालच्या सर्व शत्रूपासून विश्रांती दिली, तोपर्यंत यहोशुआ अतिशय वयस्कर झाला होता, \v 2 यहोशुआने सर्व इस्राएली लोकास, त्यांच्या वडीलजनास, पुढार्‍यांना, न्यायाधीशांना आणि अधिकार्‍यांना बोलाविले; आणि त्यांना म्हटले, “मी फार वृद्ध झालो आहे. \v 3 याहवेह, तुमचे परमेश्वरांनी तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचे जे काही केले, ते सर्वकाही तुम्ही स्वतःच पाहिले आहे. ते याहवेहच तुमचे परमेश्वर होते जे तुमच्यासाठी लढले. \v 4 आठवण करा, कशाप्रकारे यार्देनपासून पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत या उर्वरित राष्ट्रांना मी जिंकले व ती तुमच्या गोत्रांना तुमचे वतन म्हणून वाटून दिले. \v 5 याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यासाठी बाहेर हाकलून देतील. तुमच्यासमोर ते त्यांना बाहेर काढतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्यानुसार तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल. \p \v 6 “अत्यंत बलवान व्हा; मोशेच्या नियमशास्त्रात जे सर्व लिहिले आहे, त्याचे काळजीपूर्वक पालन करा, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. \v 7 तुमच्यामध्ये जी उर्वरित राष्ट्रे आहेत त्यांच्याशी संगती करू नका; त्यांच्या दैवतांची नावे घेऊ नका किंवा त्यांची शपथही घेऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करू नये किंवा त्यांना नमन करू नये \v 8 परंतु आतापर्यंत जसे तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांना धरून राहिलात तसेच राहा. \p \v 9 “याहवेहने तुमच्यापुढून महान आणि शक्तिशाली राष्ट्रे घालवून दिली आहेत, कोणतेही राष्ट्र आजपर्यंत तुमच्यापुढे टिकू शकले नाही. \v 10 तुमच्यातील एकजण हजारांना पळवून लावतो, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, याहवेह तुमच्यासाठी लढतात, \v 11 म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करण्याबाबत फार सावध असा. \p \v 12 “परंतु जर तुम्ही मागे फिराल आणि या राष्ट्रांतील उर्वरित जे लोक तुमच्यामध्ये राहतात त्यांच्याबरोबर स्वतःला जोडाल, त्यांच्याबरोबर सोयरीक कराल आणि त्यांची संगत धराल \v 13 तर खचित हे जाणून घ्या की, याहवेह तुमचे परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या समोरून आणखी घालवून देणार नाही. परंतु हा चांगला देश, जो याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिला आहे, त्यातून तुमचा नाश होईपर्यंत, ती राष्ट्रे तुमच्यासाठी पाश व सापळा अशी होतील, तुमच्या पाठीवर चाबूक आणि तुमच्या डोळ्यात काटे असतील. \p \v 14 “आता मी लवकरच सर्व जग जाते त्या वाटेने जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व हृदयाने व जिवाने माहीत आहे की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या अभिवचनातील एकही निष्फळ झाले नाही. प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले आहे; एकही निष्फळ झाले नाही. \v 15 तर याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्याप्रमाणे सर्व चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याच प्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला चेतावणी दिल्याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या या चांगल्या देशातून तुमचा समूळ नाश होईपर्यंत प्रत्येक वाईट गोष्ट याहवेह तुमच्यावर आणतील. \v 16 याहवेह तुमच्या परमेश्वरांनी जो करार तुम्हास आज्ञापिला आहे त्याचे जर तुम्ही उल्लंघन केले, आणि जाऊन इतर दैवतांची सेवा केली आणि त्यांना नमन केले, तर याहवेहचा क्रोध तुमच्याविरुद्ध भडकेल आणि या चांगल्या प्रदेशातून जो त्यांनी तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा लवकरच नाश होईल.” \c 24 \s1 शेखेम येथे कराराचे नूतनीकरण \p \v 1 नंतर यहोशुआने इस्राएलांच्या सर्व गोत्रांना शेखेम येथे एकत्र केले. त्याने इस्राएलचे वडीलजन, पुढारी, न्यायाधीश व सर्व अधिकाऱ्यांना बोलाविले आणि त्या सर्वांनी स्वतःस परमेश्वरासमोर सादर केले. \p \v 2 यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज, अब्राहाम व नाहोराचा पिता तेरह, फरात\f + \fr 24:2 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीच्या पलीकडे राहत होते आणि ते इतर दैवतांची भक्ती करीत होते. \v 3 परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला, \v 4 आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले. \p \v 5 “ ‘नंतर मी मोशे आणि अहरोनला पाठविले आणि मी तिथे जे केले त्यामुळे इजिप्तच्या लोकांवर पीडा आल्या आणि मी तुम्हाला बाहेर आणले. \v 6 जेव्हा मी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा तुम्ही समुद्राजवळ आला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि घोडेस्वार घेऊन तांबड्या समुद्रापर्यंत तुमचा पाठलाग केला. \v 7 त्यांनी साहाय्यासाठी याहवेहचा (म्हणजे माझा) धावा केला आणि मी तुमच्या व इजिप्तच्या लोकांमध्ये अंधार केला, समुद्र इजिप्तच्या लोकांवर आणला आणि त्यात त्यांना बुडवून टाकले. मी इजिप्तच्या लोकांचे काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यानंतर तुम्ही पुष्कळ काळ अरण्यात राहिला. \p \v 8 “ ‘यार्देनेच्या पूर्वेकडे राहणार्‍या अमोर्‍यांच्या देशात मी तुम्हाला आणले. ते तुमच्याविरुद्ध लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. तुमच्यापुढे त्यांचा नाश केला आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. \v 9 जेव्हा सिप्पोरचा पुत्र, मोआबाचा राजा बालाकाने इस्राएलविरुद्ध युद्धाची तयारी केली आणि तुम्हाला शाप देण्यासाठी बौराचा पुत्र बलामाला पाठविले. \v 10 परंतु मी बलामाचे ऐकले नाही आणि त्याने तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले. \p \v 11 “ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. \v 12 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठविल्या व त्यांनी त्यांना व दोन अमोरी राजांना तुमच्यापुढून घालवून दिले. हे तुमच्या तलवारीने आणि धनुष्य बाणांनी केले नाही. \v 13 म्हणून ज्या भूमीवर तुम्ही कष्ट केले नाहीत अशी भूमी आणि जी शहरे तुम्ही बांधली नाहीत ती मी तुम्हाला दिली; आणि तुम्ही त्यात राहता आणि जे तुम्ही लावले नाही त्या द्राक्षमळ्यातून व जैतुनाच्या बागेतून फळे खाता.’ \p \v 14 “तर आता याहवेहचे भय धरा आणि संपूर्ण विश्वासूपणाने त्यांची सेवा करा. तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे आणि इजिप्तमध्ये राहत असताना ज्या देवतांची उपासना करीत होते, त्या टाकून द्या आणि याहवेहची सेवा करा. \v 15 परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.” \p \v 16 तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो! \v 17 याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले. \v 18 आणि याहवेहने जे अमोरी लोक त्या देशात राहत होते त्यांच्यासहित सर्व राष्ट्रांना आमच्या समोरून बाहेर घालवून दिले. आम्हीही याहवेहचीच सेवा करणार, कारण ते आमचे परमेश्वर आहेत.” \p \v 19 यहोशुआ लोकांना म्हणाला, “तुमच्याने याहवेहची सेवा करविणार नाही. ते पवित्र परमेश्वर आहे; ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत. ते तुमच्या बंडाची आणि तुमच्या पातकांची क्षमा करणार नाही. \v 20 जर तुम्ही याहवेहचा त्याग कराल आणि परदेशी दैवताची सेवा कराल, जरी इतका काळ ते तुमच्याबरोबर चांगले राहिले आहेत, तरी ते उलटून तुमच्यावर संकट आणून तुमचा अंत करतील.” \p \v 21 परंतु लोक यहोशुआला म्हणाले, “नाही! आम्ही याहवेहचीच सेवा करणार.” \p \v 22 तेव्हा यहोशुआ लोकांस म्हणाला, “तुम्ही याहवेहची सेवा करण्याचे निवडले आहे, याला तुम्ही स्वतःच साक्षीदार आहात.” \p त्यांनी उत्तर दिले. “होय, आम्ही साक्षीदार आहोत.” \p \v 23 तेव्हा यहोशुआ म्हणाला, “तर आता तुमच्यामध्ये जे परदेशी दैवते आहेत ती टाकून द्या आणि तुमची अंतःकरणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराकडे लावा.” \p \v 24 लोकांनी यहोशुआला उत्तर दिले, “आम्ही याहवेह आमचे परमेश्वर यांचीच सेवा करू आणि त्यांच्याच आज्ञा पाळू.” \p \v 25 त्या दिवशी यहोशुआने इस्राएली लोकांशी एक करार केला, आणि शेखेम येथे त्याने त्यांच्यासाठी नियम आणि आज्ञा पुन्हा निश्चित करून घेतल्या. \v 26 तेव्हा यहोशुआने या सर्व गोष्टींची नोंद परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात केली. नंतर त्याने एक मोठी धोंड घेतली आणि याहवेहच्या पवित्रस्थानाजवळ एला वृक्षाखाली ठेवली. \p \v 27 नंतर यहोशुआ सर्व लोकांस म्हणाला, “पाहा, ही धोंड आपल्याविरुद्ध साक्ष असेल. याहवेह जे आपल्याशी बोलले तो प्रत्येक शब्द तिने ऐकला आहे. जर तुम्ही तुमच्या परमेश्वराबरोबर खरेपणाने राहिला नाहीत तर ती तुमच्याविरुद्ध साक्ष देईल.” \p \v 28 नंतर यहोशुआने त्या लोकांना आपआपल्या वतनास पाठवून दिले. \s1 यहोशुआला वचनदत्त देशात पुरतात \p \v 29 या गोष्टीनंतर, याहवेहचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. \v 30 आणि त्यांनी त्याला गाश पर्वतांच्या उत्तरेला असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह\f + \fr 24:30 \fr*\ft किंवा \ft*\fqa तिम्नाथ-हेरेस\fqa*\f* येथे त्याच्याच वतनभागात पुरले. \p \v 31 इस्राएली लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला, त्यांनी याहवेहची सेवा केली. \p \v 32 योसेफाच्या ज्या अस्थी इस्राएली लोकांनी इजिप्त येथून आणल्या होत्या, त्या शेखेम येथे जी जागा याकोबाने हमोराच्या पुत्रांकडून चांदीच्या शंभर नाण्यांस\f + \fr 24:32 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa केशिता, या नाण्याचे मूल्य व वजन अज्ञात आहे\fqa*\f* विकत घेतलेली होती तिथे पुरल्या. हे योसेफाच्या वंशजांचे वतन झाले. \p \v 33 अहरोनाचा पुत्र एलअज़ार मरण पावला आणि त्याला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह येथे पुरण्यात आले. जे त्याचा पुत्र फिनहासला वतन म्हणून देण्यात आले होते.