\id JON - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h योना \toc1 योनाहाची भविष्यवाणी \toc2 योना \toc3 योना \mt1 योनाहाची भविष्यवाणी \c 1 \s1 योनाह याहवेहपासून पळून जातो \p \v 1 याहवेहचे वचन अमित्तयाचा पुत्र योनाहकडे आले: \v 2 “महान शहर निनवेहस जा आणि त्याविरुद्ध संदेश दे, कारण त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे.” \p \v 3 परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला. \p \v 4 मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले. \v 5 सर्व खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपआपल्या दैवतांचा धावा करू लागला. आणि जहाजाचा भार कमी व्हावा म्हणून त्यांनी जहाजात भरलेले साहित्य समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. \p पण योनाह मात्र जहाजाच्या तळघरात अगदी गाढ झोपला होता. \v 6 तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.” \p \v 7 तेव्हा खलाशी एकमेकांना म्हणाले, “आपण चिठ्ठ्या टाकून कोणामुळे हे संकट आले आहे ते शोधू या.” मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाहच्या नावाने चिठ्ठी निघाली. \v 8 यावर त्यांनी योनाहला विचारले, “आम्हाला सांग, आमच्यावर हे संकट कोणामुळे आले आहे? तू काय काम करतो? तू कुठे राहतो? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?” \p \v 9 योनाहने त्यांना उत्तर दिले, “मी एक इब्री आहे आणि मी स्वर्गातील याहवेह परमेश्वराची उपासना करतो, ज्यांनी समुद्र आणि कोरडी जमीन निर्माण केली.” \p \v 10 हे ऐकून ते घाबरले आणि योनाहला म्हणाले, “तू हे काय केलेस?” (कारण योनाहने त्यांना सांगितले होते की तो याहवेहच्या उपस्थितीतून पळून जात आहे.) \p \v 11 मग त्यांनी योनाहला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत काय करावे जेणेकरून समुद्र आमच्यासाठी शांत होईल?” कारण समुद्र तर अधिकाधिक उग्र होत होता. \p \v 12 तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मला समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र पुन्हा शांत होईल. कारण माझ्या चुकीमुळेच हे भयंकर वादळ तुमच्यावर आले आहे, हे मला ठाऊक आहे.” \p \v 13 तरीही खलाश्यांनी जहाज किनाऱ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत, कारण समुद्र पूर्वीपेक्षा जास्त उग्र होत होता. \v 14 मग ते मोठ्या आवाजात याहवेहचा धावा करत म्हणाले, “याहवेह, कृपया या मनुष्याचा जीव घेतल्याने आमचा नाश होऊ देऊ नका. एका निरपराध व्यक्तीला मारल्याबद्दल आम्हाला दोष देऊ नका, कारण तुम्हाला जे आवडले ते तुम्ही केले आहे.” \v 15 मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला! \v 16 यामुळे त्या लोकांना याहवेहची भीती वाटली आणि त्यांनी याहवेहला यज्ञ केला आणि नवस केला. \s1 योनाहची प्रार्थना \p \v 17 याहवेहने एक मोठा मासा नेमला ज्याने योनाहला गिळंकृत केले आणि योनाह त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला. \c 2 \nb \v 1 मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली. \v 2 तो म्हणाला: \q1 “माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला \q2 आणि त्यांनी मला उत्तर दिले. \q1 मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली \q2 आणि तुम्ही माझी हाक ऐकली. \q1 \v 3 तुम्ही मला खोलवर, \q2 समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले \q2 आणि प्रवाहाने मला घेरले; \q1 आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ \q2 यांनी मला झाकून टाकले. \q1 \v 4 मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून \q2 दूर करण्यात आले आहे; \q1 तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे \q2 दृष्टी लावेन.’ \q1 \v 5 बुडविणार्‍या पाण्याने मला घाबरविले,\f + \fr 2:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझ्या गळ्यापर्यंत होते\fqa*\f* \q2 माझ्या सभोवताली खोल डोह होता; \q2 माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते. \q1 \v 6 मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो; \q2 मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो. \q1 तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा, \q2 तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला. \b \q1 \v 7 “जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, \q2 तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, \q1 आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, \q2 तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली. \b \q1 \v 8 “जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात \q2 ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात. \q1 \v 9 परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, \q2 तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. \q1 मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. \q2 मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ” \p \v 10 मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले. \c 3 \s1 योनाह निनवेस जातो \p \v 1 मग याहवेहचे वचन दुसऱ्या वेळेस योनाहकडे आले: \v 2 “ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.” \p \v 3 तेव्हा योनाहने याहवेहच्या वचनाप्रमाणे केले आणि निनवेह शहरास गेला. आता निनवेह हे फारच मोठे शहर\f + \fr 3:3 \fr*\fq फारच मोठे शहर \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa परमेश्वरासाठी एक महान शहर\fqa*\f* होते. ते पार करण्यास तीन दिवस लागत होते. \v 4 जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.” \v 5 तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले. \p \v 6 जेव्हा योनाहची चेतावणी निनवेहच्या राजापर्यंत पोहोचली, तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला, आपली राजवस्त्रे काढून बाजूला ठेवली व गोणपाट परिधान करून तो राखेत जाऊन बसला. \v 7 त्याने निनवेहमध्ये ही घोषणा केली: \pmo “राजा आणि त्याच्या सरदारांच्या आदेशानुसार: \pm “कोणत्याही मनुष्याने किंवा पशूने, गुरे किंवा मेंढरांनी, काहीही चाखू नये; त्यांनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये. \v 8 पण मनुष्याने आणि प्राण्याने गोणपाट घालावे. प्रत्येकाने त्वरित परमेश्वराचा धावा केला करावा आणि आपली वाईट कृत्ये आणि हिंसाचार सोडावा. \v 9 कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.” \p \v 10 जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही. \c 4 \s1 याहवेहच्या दयेवर योनाहचा संताप \p \v 1 परंतु योनाहला हे फार चुकीचे आहे असे वाटले आणि त्याला राग आला. \v 2 त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात. \v 3 तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.” \p \v 4 परंतु याहवेहनी उत्तर दिले, “तुला राग येणे योग्य आहे का?” \p \v 5 मग योनाह बाहेर गेला आणि शहराच्या पूर्वेकडे बसला. तिथे त्याने एक मंडप बांधून सावलीत बसला आणि तिथून शहराचे काय होते, याची वाट बघत बसला. \v 6 मग याहवेह परमेश्वराने योनाहच्या डोक्यावर छाया पडावी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून एक वेलाचे रोपटे\f + \fr 4:6 \fr*\ft हे नेमके कोणते रोपटे होते ते निश्चित नाही\ft*\f* वाढविले. त्या रोपामुळे योनाहला खूप आनंद झाला. \v 7 पण दुसर्‍या दिवशी पहाटे परमेश्वराने एक कीटक पाठविला, ज्याने रोपटे कुरतडले आणि त्यामुळे रोपटे सुकले. \v 8 जेव्हा सूर्य उगवला तेव्हा परमेश्वराने पूर्वेचा एक प्रखर वारा पाठवला आणि योनाहच्या डोक्यावर सूर्याची उष्णता आदळली, ज्यामुळे तो मूर्छित झाला. त्याला मरावेसे वाटू लागले, आणि तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरण बरे.” \p \v 9 तेव्हा परमेश्वर योनाहला म्हणाले, “रोपट्यामुळे तू रागवावेस, हे योग्य आहे का?” \p तो म्हणाला, “होय, तेच योग्य आहे. मला इतका राग आला आहे की मला मरावेसे वाटते.” \p \v 10 परंतु याहवेह म्हणाले, “तू या रोपट्यासाठी चिंतित आहेस, ज्याची काळजी तू घेतली नाहीस किंवा वाढविले नाहीस. ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली. \v 11 मग मी निनवेह या महान शहराची काळजी का करू नये? ज्यामध्ये एक लाख वीस हजारांहून अधिक लोक राहतात, ज्यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातातील फरक देखील माहीत नाही—आणि या शहरात अनेक प्राणीही आहेत.”