\id JOB - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h इय्योब \toc1 इय्योब \toc2 इय्योब \toc3 इय्योब \mt1 इय्योब \c 1 \s1 प्रस्तावना \p \v 1 ऊस नावाच्या देशात इय्योब नावाचा एक मनुष्य राहत होता. तो निर्दोष आणि सरळ; परमेश्वराचे भय धरणारा व पापापासून दूर राहणारा असा होता. \v 2 त्याला सात पुत्र व तीन कन्या होत्या, \v 3 त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता. \p \v 4 त्याचे पुत्र त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी मेजवानी देत असत, त्यावेळी ते आपल्या तीनही बहिणींना मेजवानीचे आमंत्रण देत असत. \v 5 या भोजनसमारंभाचा कालावधी आटोपल्यावर इय्योब त्यांच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करी. तो पहाटेस उठून त्या सर्वांकरिता होमार्पणाचा यज्ञ करी; कारण तो विचार करीत असे, “न जाणो माझ्या लेकरांनी पाप केले असेल आणि आपल्या अंतःकरणात परमेश्वराला शाप दिला असेल.” असा इय्योबाचा नित्यक्रम असे. \p \v 6 एके दिवशी देवदूत\f + \fr 1:6 \fr*\fq देवदूत \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa परमेश्वराचे पुत्र\fqa*\f* याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यासाठी आलेले असताना, सैतानही\f + \fr 1:6 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa शत्रू\fqa*\f* त्यांच्याबरोबर आला. \v 7 याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आला आहेस?” \p सैतानाने उत्तर दिले, “पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे.” \p \v 8 तेव्हा याहवेहने सैतानाला विचारले, “माझा सेवक इय्योब याच्याकडे तू लक्ष दिलेस का? तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा व वाईटापासून दूर राहणारा आहे; अखिल पृथ्वीवर त्याच्यासारखा तुला कोणीही आढळणार नाही.” \p \v 9 सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “इय्योब परमेश्वराचे भय विनाकारण बाळगतो काय? \v 10 आपण त्याचे घरदार व जे सर्वकाही त्याचे आहे त्याभोवती कुंपण घातलेले नाही का? तुम्ही त्याच्या हाताचे श्रम आशीर्वादित केले आहेत व देशात त्याचे कळप आणि गुरे वृद्धी पावत आहेत. \v 11 परंतु आता आपला हात पुढे करून जे सर्वकाही त्याचे आहे ते हिरावून घ्या आणि मग पाहा, आपल्या तोंडावर तो आपल्याला खचितच शाप देईल.” \p \v 12 याहवेहने सैतानाला म्हटले, “ठीक आहे, मग सर्वकाही जे त्याचे आहे त्यावर तुला अधिकार दिला आहे, मात्र त्या मनुष्याला तू हात लावू नये.” \p तेव्हा सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला. \p \v 13 एके दिवशी इय्योबाचे पुत्र व कन्या आपल्या वडील भावाच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता, \v 14 एक निरोप्या इय्योबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते व गाढवे जवळपास चरत होती, \v 15 एवढ्यात शबाई लोकांनी आक्रमण करून त्यांना लुटून नेले आणि सर्व चाकरांना तलवारीने वधले. तुम्हाला सांगण्यासाठी मीच एकटा सुटून आलो आहे!” \p \v 16 तो बोलतच असताना, दुसरा एक निरोप्या आला व म्हणाला, “परमेश्वराचा अग्नी आकाशातून आला, त्याने मेंढरे आणि चाकरे भस्म केले, तुम्हाला सांगण्यासाठी मीच एकटा सुटून आलो आहे!” \p \v 17 तो बोलतच आहे इतक्यात, आणखी एक निरोप्या आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या केल्या व उंटांवर आक्रमण करून त्यांना घेऊन गेले; त्यांनी चाकरांना तलवारीने वधले, हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!” \p \v 18 तो बोलतच असताना, आणखी एक निरोप्या आला व म्हणाला, “तुमचे पुत्र आणि कन्या त्यांच्या वडील भावाच्या घरी मेजवानी करीत आणि द्राक्षारस पीत असता, \v 19 वाळवंटातून अचानक प्रचंड वारा आला आणि त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्यांच्यावर कोसळले आणि ते मरण पावले; हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!” \p \v 20 हे ऐकताच इय्योब उठला आणि त्याने आपला झगा फाडला आणि डोक्यावरून वस्तरा फिरविला. नंतर जमिनीवर पडून त्याने उपासना केली \v 21 आणि म्हणाला: \q1 “आईच्या उदरातून मी नग्न आलो, \q2 आणि नग्नच मी परत जाईन, \q1 याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; \q2 त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.” \p \v 22 या सर्व बाबतीत, इय्योबाने पाप केले नाही किंवा परमेश्वराने अयोग्य केले असा दोष त्यांच्यावर लावला नाही. \b \c 2 \p \v 1 पुन्हा एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यास येऊन उभे राहिले; आणि त्यांच्याबरोबर सैतानही स्वतःला सादर करण्यास याहवेहसमोर येऊन उभा राहिला. \v 2 आणि याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आलास?” \p सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे.” \p \v 3 तेव्हा याहवेहने त्याला विचारले, “मग माझा सेवक इय्योब याच्याकडे तुझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही; तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा आणि वाईटापासून दूर राहणारा मनुष्य आहे. विनाकारण त्याचा नाश करण्यास जरी तू मला उत्तेजित केलेस, तरी त्याने त्याच्या प्रामाणिकतेला दृढ धरून ठेवले आहे.” \p \v 4 सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्याचे जे सर्वकाही आहे ते तो आपल्या स्वतःच्या जिवासाठी देईल. \v 5 परंतु आता, आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसाला लावून तर पाहा, म्हणजे तो खचितच तुमच्या तोंडावर तुम्हाला शाप देईल.” \p \v 6 त्यावर याहवेहने सैतानाला म्हटले, “ठीक आहे, तो तुझ्या हातात आहे; मात्र तू त्याचा जीव वाचू दे.” \p \v 7 मग सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि त्याने इय्योबाला तळपायापासून त्याच्या डोक्यापर्यंत वेदनादायक गळवांनी पीडले, \v 8 तेव्हा इय्योबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी एक फुटलेली खापर घेतली आणि तो राखेमध्ये जाऊन बसला. \p \v 9 तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, “तुम्ही अजूनही सत्याला धरून आहात काय? परमेश्वराला शाप द्या आणि मरून जा!” \p \v 10 यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख\f + \fr 2:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa अनैतिक\fqa*\f* स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” \p या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही. \b \p \v 11 जेव्हा इय्योबाचे तीन मित्र एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी इय्योबावर आलेल्या संकटांविषयी ऐकले, ते आपआपल्या घरून निघाले; इय्योबाकडे आपण मिळून जावे व त्याला सहानुभूती दाखवून त्याचे सांत्वन करावे असे त्यांनी एकमताने ठरविले. \v 12 त्यांनी इय्योबाला दुरून पाहिले, तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत; मग ते मोठ्याने रडू लागले, त्यांनी आपले झगे फाडले आणि आपल्या डोक्यावर धूळ घातली. \v 13 मग ते त्याच्याबरोबर सात दिवस व सात रात्री जमिनीवर बसून राहिले. कोणी एक शब्दही त्याच्याबरोबर बोलले नाही, कारण इय्योबाचे दुःख फार मोठे आहे, हे त्यांना कळले होते. \c 3 \s1 इय्योबाचा संवाद \p \v 1 यानंतर, इय्योबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. \v 2 तो म्हणाला: \q1 \v 3 “माझा जन्मदिवस नष्ट होवो, \q2 आणि ‘पुत्र गर्भधारण झाले!’ असे ज्या रात्रीने म्हटले, \q1 \v 4 तो दिवस अंधकार असा होवो; \q2 वर राहणाऱ्या परमेश्वरासही त्याचे ध्यान न राहो; \q2 त्या दिवसावर प्रकाश न पडो. \q1 \v 5 होय, खिन्नता व संपूर्ण काळोख त्यावर पुन्हा आपला हक्क गाजवो; \q2 त्यावर ढग वास्तव्य करून राहो; \q2 काळोख त्यावर मात करो. \q1 \v 6 त्या रात्रीला अंधकार जप्त करो; \q2 वर्षाच्या दिवसात त्याची गणती न होवो \q2 कोणत्याही महिन्यांमध्ये त्याची गणती न होवो. \q1 \v 7 ती रात्र उजाड होवो; \q2 आणि आनंदाचा गजर त्यातून ऐकू न येवो. \q1 \v 8 जे दिवसाला शाप देतात, \q2 जे लिव्याथानाला चेतविण्यास तयार असतात, ते त्याला शापित करोत. \q1 \v 9 त्या रात्रीचे तारे अंधकारमय होवोत; \q2 दिवसाच्या प्रकाशाची ती व्यर्थ वाट पाहो \q2 आणि पहाटेचा पहिला किरण तिच्या दृष्टीस न पडो, \q1 \v 10 कारण तिने माझ्यावर गर्भाशयद्वार बंद केले नाहीत \q2 आणि दुःखाला माझ्या डोळ्याआड केले नाही. \b \q1 \v 11 “मी जन्माला आलो तेव्हाच का नाश पावलो नाही? \q2 गर्भाशयातून निघताच माझे प्राण का गेले नाहीत? \q1 \v 12 माझे स्वागत करण्यास मांड्या का तयार होत्या \q2 आणि मला दुग्धपान करावे म्हणून स्तन का तयार होते? \q1 \v 13 कारण मी तर आता शांतपणे पडून निजलेला असतो; \q2 मी झोपेत विश्रांती पावलेला असतो. \q1 \v 14 पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी, \q2 ज्यांनी स्वतःसाठी वाडे बांधले ते आता ओसाड पडले आहेत, \q1 \v 15 ज्या राजपुत्रांच्या जवळ सोने होते, \q2 ज्यांनी आपली घरे रुप्यांनी भरली. \q1 \v 16 अकाली पतन पावलेल्या गर्भासारखे, \q2 दिवसाचा प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखे मला जमिनीत गाडून का ठेवले नाही? \q1 \v 17 कारण तिथे दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात, \q2 आणि थकलेले लोक विसावा पावतात. \q1 \v 18 तिथे बंदिवान देखील स्वस्थ असतात, \q2 कारण तिथे गुलामाच्या अधिकार्‍याचे ओरडणे ऐकू येत नाही. \q1 \v 19 लहान आणि मोठे तिथे असतात, \q2 आणि गुलाम आपल्या धन्यापासून मुक्त झालेले असतात. \b \q1 \v 20 “जे कष्टात आहेत त्यांना प्रकाश, \q2 आणि जे आत्म्यात कडू आहेत त्यांना जीवन का द्यावे, \q1 \v 21 ते मृत्यूची उत्कट इच्छा करतात पण ते येत नाही, \q2 गुप्त धनापेक्षा अधिक ते मृत्यूला शोधतात, \q1 \v 22 जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात, \q2 आणि उल्हास पावतात. \q1 \v 23 ज्याचा मार्ग गुपित आहे, \q2 ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे \q2 अशा मनुष्याला जीवन का दिले आहे? \q1 \v 24 उसासे हे माझे रोजचे अन्न झाले आहे; \q2 माझे कण्हणे पाण्याप्रमाणे ओतले जात आहे. \q1 \v 25 ज्याचे मला भय वाटत होते, तेच माझ्यावर चालून आले आहे; \q2 जे भयानक तेच माझ्याकडे आले आहे. \q1 \v 26 मला शांती नाही, स्वस्थता नाही; \q2 मला विश्रांती नाही, पण केवळ अस्वस्थता आहे.” \c 4 \s1 एलीफाज \p \v 1 एलीफाज तेमानीने उत्तर दिले: \q1 \v 2 “जर कोणी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू धीराने ऐकशील का? \q2 परंतु बोलल्याशिवाय कोणाच्याने राहवेल? \q1 \v 3 तू अनेक जणांना कसे शिकवलेस, \q2 तू दुर्बल हात कशाप्रकारे सबळ केलेत याचा विचार कर. \q1 \v 4 तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे; \q2 आणि लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस. \q1 \v 5 परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास; \q2 तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास. \q1 \v 6 तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय \q2 आणि तुझे निर्दोष मार्ग तुझी आशा असू नयेत काय? \b \q1 \v 7 “विचार कर: निरपराधी असून, कधी कोणी नष्ट झाले आहेत का? \q2 सज्जनांचा नाश झाला आहे का? \q1 \v 8 मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात \q2 आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात. \q1 \v 9 परमेश्वराच्या श्वासाने ते नष्ट होतात; \q2 त्यांच्या क्रोधाची केवळ एक फुंकर त्यांना नाहीसे करते. \q1 \v 10 सिंह डरकाळी फोडतील आणि गर्जना करतील, \q2 तरी त्या बलिष्ठ सिंहाचे दात मोडलेले आहेत. \q1 \v 11 भक्ष्याच्या अभावी सिंह नाश पावतो, \q2 आणि सिंहिणीची पिल्ले पांगून जातात. \b \q1 \v 12 “गुप्तपणे मला वचन सांगण्यात आले, \q2 माझ्या कानांनी त्याची कुजबुज ऐकली. \q1 \v 13 रात्रीच्या अस्वस्थ स्वप्नात, \q2 जेव्हा लोकांना गाढ झोप लागते, \q1 \v 14 तेव्हा मी भयभीत झालो आणि घाबरून त्रस्त झालो \q2 त्यामुळे माझी सर्व हाडे थरथरली. \q1 \v 15 माझ्या मुखासमोरून एक आत्मा गेला, \q2 आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. \q1 \v 16 तो थांबला, \q2 परंतु काय आहे ते मात्र मला समजेना. \q1 त्याचा आकार माझ्या डोळ्यासमोर होता, \q2 आणि त्याचे कुजबुजणे मी ऐकले: \q1 \v 17 ‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय? \q2 बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय? \q1 \v 18 जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, \q2 जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो, \q1 \v 19 तर मग जे मातीच्या घरात राहतात, \q2 ज्यांचा पाया धुळीत आहे, \q2 जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय? \q1 \v 20 पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे तुकडे होतात; \q2 कोणाच्या लक्षात न येताच ते सर्वकाळासाठी नष्ट होतात. \q1 \v 21 त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून, \q2 त्यांच्या डेर्‍याचे दोर आतूनच कापले जात नाही काय?’ \b \c 5 \q1 \v 1 “आता हाक मारून पाहा, परंतु तुला कोण उत्तर देणार? \q2 पवित्र लोकांपैकी कोणाकडे तू वळशील? \q1 \v 2 क्रोध मूर्खाचा घात करतो, \q2 आणि सामान्य मनुष्याचा मत्सराने घात होतो. \q1 \v 3 मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले, \q2 परंतु अचानक त्याचे घर शापित झाले. \q1 \v 4 त्यांची मुलेबाळे सुरक्षित नाहीत, \q2 वेशीत ते चिरडली जातात व त्यांना सोडविणारा कोणी नाही. \q1 \v 5 त्यांच्या कापणीचा हंगाम भुकेले खाऊन टाकतात \q2 काट्याकुट्यातून सुद्धा ते काढून नेतात; \q2 आणि कारस्थानी त्याच्या धनाचा लोभ धरतात. \q1 \v 6 कारण कष्ट मातीतून वाढत नाही, \q2 आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत. \q1 \v 7 खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात \q2 तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे. \b \q1 \v 8 “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; \q2 त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता. \q1 \v 9 आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, \q2 व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात. \q1 \v 10 ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; \q2 आणि शेतांवर पाणी पाडतात. \q1 \v 11 नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, \q2 जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात. \q1 \v 12 धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये, \q2 म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात, \q1 \v 13 ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात, \q2 आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात. \q1 \v 14 दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो; \q2 आणि रात्र असल्याप्रमाणे भर दुपारच्या प्रहरी ते चाचपडतात. \q1 \v 15 परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून; \q2 व बलवानांच्या तावडीतून वाचवितात. \q1 \v 16 म्हणून दीन लोकांस आशा आहे, \q2 आणि अन्याय आपले तोंड बंद करेल. \b \q1 \v 17 “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; \q2 म्हणून सर्वसमर्थाचे\f + \fr 5:17 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa शद्दाय\fqa*\f* शासन तू तुच्छ मानू नको. \q1 \v 18 कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्‍दा तेच बांधतात; \q2 ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो. \q1 \v 19 सहा संकटातून ते तुला वाचवतील; \q2 आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही. \q1 \v 20 दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील; \q2 युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील. \q1 \v 21 जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील, \q2 विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही. \q1 \v 22 विनाश व दुष्काळ यांना तू हसशील, \q2 आणि हिंस्त्र पशूंचे भय तुला वाटणार नाही. \q1 \v 23 कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल, \q2 आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील. \q1 \v 24 तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील; \q2 तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही. \q1 \v 25 तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल, \q2 आणि तुझे वंशज पृथ्वीवरील गवतासारखे होतील. \q1 \v 26 जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात, \q2 तसेच तू कबरेत जाईपर्यंत तुझ्या शौर्याचा ऱ्हास होणार नाही. \b \q1 \v 27 “हे सर्व अगदी सत्य आहे आणि याची आम्ही परीक्षा केली आहे. \q2 म्हणून माझा हा सल्ला ऐकून त्याचा अंगीकार करून घे.” \c 6 \s1 इय्योब \p \v 1 इय्योबाने उत्तर दिले: \q1 \v 2 “माझे क्लेश जर केवळ तोलून पाहिले \q2 आणि माझी सर्व विपत्ती तागडीत घातली तर! \q1 \v 3 ते खचितच वजनाने समुद्राच्या वाळूपेक्षा जास्त भरतील. \q2 म्हणूनच माझे शब्द उतावळेपणाचे आहेत ह्यात काही आश्चर्य नाही. \q1 \v 4 सर्वसमर्थाचे तीर माझ्यात शिरले आहेत, \q2 त्या तीरांचे विष माझा आत्मा पिऊन टाकतो; \q2 परमेश्वराचा आतंक माझ्याविरुद्ध उभा आहे. \q1 \v 5 गवत मिळते तेव्हा रानगाढव ओरडते काय, \q2 किंवा बैलापुढे चारा असतो तेव्हा तो हंबरतो काय? \q1 \v 6 बेचव पदार्थ मिठावाचून खाता येतो काय, \q2 किंवा अंड्याच्या पांढर्‍या बलकाला रुची असते काय? \q1 \v 7 त्याला मी स्पर्श करण्याचे नाकारतो; \q2 असे अन्न मला आजारी बनवते. \b \q1 \v 8 “अहा! जर मी मागितलेले मला मिळाले, \q2 ज्याची मी आशा करतो ते परमेश्वराने दिले, \q1 \v 9 की परमेश्वराने त्यांच्या इच्छेनुसार मला चिरडून टाकावे, \q2 आपला हात ढिला सोडून माझ्या जिवाचा नाश करावा! \q1 \v 10 तरीही हे मला सांत्‍वनच असणार— \q2 आणि तीव्र क्लेशातही माझा आनंद असणार— \q2 कारण त्या परमपवित्रांची वचने मी धिक्कारली नाहीत. \b \q1 \v 11 “मी आशा धरावी अशी माझ्यात काय शक्ती आहे? \q2 माझ्यात असे काय आहे की मी धीर धरावा? \q1 \v 12 माझ्याठायी खडकाचे सामर्थ्य आहे काय? \q2 किंवा माझे शरीर कास्याचे आहे काय? \q1 \v 13 आता यश माझ्यापासून दूर केले गेले आहे, \q2 मग माझ्यात स्वतःला मदत करण्यासाठी शक्ती आहे का? \b \q1 \v 14 “जो कोणी मित्रावर दया करण्यापासून स्वतःस आवरतो \q2 त्याने सर्वसमर्थाचे भय सोडून दिले आहे. \q1 \v 15 माझे बंधुजन खंडित झालेल्या ओढ्याप्रमाणे, \q2 वाहून जाणार्‍या ओहोळाप्रमाणे दगा देणारे आहेत \q1 \v 16 जो ओढा वितळणार्‍या बर्फाने अदृश्य होतो; \q2 आणि द्रवीकरण होत असलेल्या हिमामुळे तो फुगून जातो, \q1 \v 17 तो तापला म्हणजे आटून जातो; \q2 उन्हाळ्यात तो आपल्या जागीच नाहीसा होतो. \q1 \v 18 प्रवासी काफिले टवटवीत होण्यासाठी बाजूला वळतात, \q2 परंतु ते ओसाड ठिकाणी जातात आणि नष्ट होतात. \q1 \v 19 तेमाच्या काफिल्यांनी पाण्याचा शोध केला, \q2 शबाच्या व्यापारी प्रवाशांनी पाण्याची आशा धरली. \q1 \v 20 ते त्रस्त झाले, कारण त्यांना खात्री झाली होती; \q2 केवळ निराश होण्यासाठी ते तिथे आले. \q1 \v 21 तुम्ही सुद्धा माझी मदत करू शकत नाही असे सिद्ध झाले आहे; \q2 कारण अनर्थ पाहिला की तुम्ही घाबरून जाता. \q1 \v 22 ‘माझ्यावतीने काहीतरी द्या, \q2 तुमच्या संपत्तीतून माझी किंमत मोजून मला मुक्त करा, \q1 \v 23 माझ्या शत्रूच्या हातातून मला सोडवा, \q2 किंवा निर्दयाच्‍या तावडीतून माझी सुटका करा,’ मी कधी असे म्हटले का? \b \q1 \v 24 “मला शिकवा आणि मी शांत बसेन; \q2 मी कुठे चुकलो ते मला सांगा. \q1 \v 25 सत्य बोलणे हे किती क्लेशदायक असते! \q2 परंतु तुमचे वाद काय सिद्ध करतात? \q1 \v 26 तुम्ही मला शब्दात धरावयास पाहता का, \q2 माझे निराशेचे शब्द वार्‍यासारखे वाटतात का? \q1 \v 27 तुम्ही तर अनाथांवर चिठ्ठ्या टाकण्यास \q2 व आपल्या मित्रांची विक्री करण्यास चुकत नाही. \b \q1 \v 28 “पण आता कृपा करून माझ्याकडे नीट पाहा. \q2 मी तुमच्या तोंडावर तुमच्याशी लबाडी करेन, असे तुम्हाला वाटते का? \q1 \v 29 कळवळा येऊ द्या, अन्याय करू नका; \q2 पुन्हा विचार करा, कारण माझी सत्यता पणास लागली आहे.\f + \fr 6:29 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझे नीतिमत्व स्थिर आहे\fqa*\f* \q1 \v 30 माझ्या जिभेवर काही दुष्टपणा आहे काय? \q2 माझ्या मुखाला अधर्माची पारख नाही काय? \b \c 7 \q1 \v 1 “या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का? \q2 त्यांचे दिवस हे मोलकर्‍यासारखे नाहीत काय? \q1 \v 2 जसा गुलाम उत्कंठेने संध्याकाळच्या छायेची उत्कंठेने वाट पाहतो, \q2 किंवा जसा मजूर वेतनासाठी आशा लाऊन असतो, \q1 \v 3 त्याचप्रमाणे मला निष्‍फळतेचे महिने दिले गेलेले आहेत, \q2 कष्टाच्या रात्री माझ्यासाठी नेमलेल्या आहेत. \q1 \v 4 मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो, ‘उठण्यासाठी अजून किती वेळ आहे?’ \q2 रात्र काही संपतच नाही, पहाटेपर्यंत मी तळमळत असतो. \q1 \v 5 माझे मांस किड्यांनी व खपल्‍यांनी आच्छादून गेले आहे; \q2 माझी त्वचा फाटून चिघळत आहे. \b \q1 \v 6 “माझे दिवस विणकर्‍याच्या मागापेक्षा वेगवान आहेत, \q2 आणि ते आशेविनाच संपतात. \q1 \v 7 हे परमेश्वरा माझे जीवन मात्र श्वास आहे याची आठवण करा; \q2 माझे नेत्र पुन्हा कधीही सुख पाहणार नाहीत. \q1 \v 8 जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत; \q2 तुम्ही मला शोधाल पण मी अस्तित्वहीन असेन. \q1 \v 9 ढग जसे विरळ होऊन नाहीसे होतात, \q2 त्याचप्रमाणे जो कबरेत जातो तो कधीही परत येत नाही. \q1 \v 10 तो आपल्या घरी परत कधीही येणार नाही; \q2 त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही. \b \q1 \v 11 “म्हणून मी शांत राहणार नाही; \q2 मी आपल्या आत्म्याचा खेद उघड करून सांगेन, \q2 माझ्या जिवाच्या कडूपणात मी गार्‍हाणे करेन. \q1 \v 12 मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का, \q2 की तुम्ही माझ्यावर पहारा करावा? \q1 \v 13 जेव्हा मला वाटते की माझे अंथरूण मला समाधान देईल, \q2 आणि माझा पलंग माझे गार्‍हाणे हलके करेल, \q1 \v 14 तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात \q2 आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात, \q1 \v 15 असे की या माझ्या शारीरिक स्थितीपेक्षा, \q2 गळा दाबून मरणे मला बरे वाटते. \q1 \v 16 मी आपल्या जिवाचा तिरस्कार करतो; मी सर्वकाळ जगणार नाही. \q2 मला एकटे असू द्या; माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. \b \q1 \v 17 “मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे, \q2 व आपले चित्त त्याच्यावर ठेवावे, \q1 \v 18 दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी \q2 आणि प्रत्येक क्षणाला त्याची पारख करावी? \q1 \v 19 माझ्यावरची तुमची नजर कधीही वळवणार नाही का, \q2 एकही क्षण मला एकटे सोडणार नाही का? \q1 \v 20 जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते, \q2 त्या तुमचे मी काय केले? \q1 माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे? \q2 मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का? \q1 \v 21 माझ्या अपराधांची क्षमा करून \q2 माझ्या पापांची गय का करीत नाही? \q1 कारण लवकरच मी धुळीत पडणार आहे, \q2 तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी अस्तित्वात नसेन.” \c 8 \s1 बिल्दद \p \v 1 तेव्हा बिल्दद शूहीने उत्तर दिले, \q1 \v 2 “कुठवर अशा गोष्टी तू बोलत राहशील? \q2 सोसाट्याच्या वार्‍यासारखे तुझे शब्द आहेत. \q1 \v 3 परमेश्वर न्याय विपरीत करतात काय? \q2 सर्वसमर्थ जे योग्य आहे त्याचा विपर्यास करतात काय? \q1 \v 4 जेव्हा तुझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध पाप केले, \q2 म्हणून परमेश्वराने त्यांच्या पापाची त्यांना शिक्षा केली. \q1 \v 5 परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील \q2 आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील, \q1 \v 6 जर तू शुद्ध व सरळ आहेस, \q2 आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील \q2 आणि तुला तुझ्या समृध्‍दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील. \q1 \v 7 तुझा प्रारंभ लीन असला, \q2 तरी तुझे भावी आयुष्य समृद्धीचे होईल. \b \q1 \v 8 “पूर्वीच्या पिढ्यांना विचार \q2 आणि त्यांचे पूर्वज काय शिकले ते शोधून काढ, \q1 \v 9 कारण आपण तर केवळ काल जन्माला आलो आहोत आणि आपण काही जाणत नाही, \q2 आणि पृथ्वीवरील आपले दिवस केवळ सावलीच आहे. \q1 \v 10 आपले पूर्वज तुला बोध करून सांगणार नाहीत काय? \q2 त्यांच्या सुज्ञतेचे शब्द ते पुढे आणणार नाहीत काय? \q1 \v 11 लव्हाळ्याची चिखला वाचून वाढ होईल काय? \q2 वेत पाण्याविना भरभरून वाढेल काय? \q1 \v 12 तो वाढतो पण कापला जात नाही, \q2 गवतापेक्षा तो लवकर सुकून जातो. \q1 \v 13 जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो; \q2 देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते. \q1 \v 14 ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते, \q2 ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्‍या जाळासारखे आहे. \q1 \v 15 ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही; \q2 ते त्याला बिलगतील, परंतु ते मजबूत राहत नाहीत. \q1 \v 16 सूर्यप्रकाशात भरपूर पाणी दिलेल्या रोपट्यासारखे ते होतात. \q2 त्यांच्या फांद्या बागेत सर्वत्र पसरतात. \q1 \v 17 त्याची मुळे दगडांच्या चोहो बाजूंना वेढतात. \q2 आणि त्यांच्यामध्ये आपली जागा शोधतात. \q1 \v 18 परंतु जेव्हा त्याला त्याच्या जागेवरून उपटून टाकले जाते, \q2 तर ती जागा त्याला नाकारून म्हणते, ‘मी तुला कधीही पाहिले नाही.’ \q1 \v 19 त्याचे जीवन खचित कोमेजून जाते, \q2 आणि मातीतून दुसरी रोपटे आनंदाने उगवतात. \b \q1 \v 20 “परंतु पाहा! जो निर्दोष आहे, अशाचा परमेश्वर धिक्कार करत नाही, \q2 किंवा दुष्कर्म्‍याचा हातही सबळ करत नाही. \q1 \v 21 परमेश्वर अजूनही तुझे मुख हास्याने, \q2 व तुझे ओठ आनंद घोषाने भरतील. \q1 \v 22 तुझे शत्रू लज्जा पांघरतील, \q2 आणि दुष्टांचे निवासस्थान अस्तित्वात राहणार नाही.” \c 9 \s1 इय्योब \p \v 1 मग इय्योबाने उत्तर दिले, \q1 \v 2 “खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो. \q2 परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल? \q1 \v 3 त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले, \q2 तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही. \q1 \v 4 त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. \q2 त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? \q1 \v 5 ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात, \q2 आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात. \q1 \v 6 ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, \q2 आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात. \q1 \v 7 ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; \q2 ते तार्‍यांचा प्रकाश मुद्रित करतात. \q1 \v 8 तेच एकटे आकाश ताणून पसरवितात \q2 आणि समुद्राच्या लाटांवरून चालतात. \q1 \v 9 सप्तर्षी, मृगशीर्ष, \q2 कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत. \q1 \v 10 आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये; \q2 आणि मोजता येत नाहीत असे चमत्कार ते करतात. \q1 \v 11 ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही; \q2 ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही. \q1 \v 12 जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? \q2 ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार? \q1 \v 13 परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत; \q2 राहाबाच्‍या सैन्याची टोळी\f + \fr 9:13 \fr*\ft राहाब \ft*\fqa एक काल्पनिक समुद्री राक्षसी प्राणी\fqa*\f* सुद्धा त्यांच्यापुढे गुडघे टेकते. \b \q1 \v 14 “तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार? \q2 त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू? \q1 \v 15 मी जरी निर्दोष असलो, तरी मी त्यांना उत्तर देणार नाही; \q2 मी केवळ माझ्या न्यायाधीशाजवळ दयेची भीक मागेन. \q1 \v 16 मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; \q2 तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही. \q1 \v 17 वादळाने ते मला चेंगरून टाकतात \q2 आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात. \q1 \v 18 ते मला श्वास घेऊ देत नाहीत, \q2 परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात. \q1 \v 19 जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! \q2 आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल? \q1 \v 20 मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; \q2 मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल. \b \q1 \v 21 “मी जरी निर्दोष असलो, \q2 मला स्वतःबद्दल चिंता नाही; \q2 मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो. \q1 \v 22 हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो, \q2 ‘निर्दोषी आणि दोषी या दोघांचाही ते नाश करतात.’ \q1 \v 23 जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, \q2 निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात. \q1 \v 24 जेव्हा पृथ्वी दुष्टाच्या हाती जाते, \q2 ते न्यायाधीशांचे डोळे झाकतात. \q2 जर ते नाहीत, तर मग कोण? \b \q1 \v 25 “माझे दिवस एखाद्या धावपट्टू पेक्षाही वेगवान आहेत; \q2 आनंदाची झलक नसतानाच ते उडून जातात. \q1 \v 26 ते लव्हाळ्याच्या वेगवान तारवांसारखे, \q2 भक्ष्यावर झडप घालणार्‍या गरुडासारखे निघून जात आहेत. \q1 \v 27 मी जर म्हणालो की, ‘मी माझे गार्‍हाणे विसरेन, \q2 माझे भाव बदलून उल्हास करेन,’ \q1 \v 28 तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील; \q2 कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही. \q1 \v 29 मी आधी दोषी ठरविला गेलो आहे, \q2 तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे? \q1 \v 30 जरी मी स्वतःला साबणाने, \q2 आणि माझे हात क्षाराने धुतले, \q1 \v 31 तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल, \q2 आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील. \b \q1 \v 32 “कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे, \q2 किंवा न्यायालयात आम्ही समोरासमोर येऊन वाद घालू. \q1 \v 33 परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता, \q2 कोणी आम्हाला एकत्र आणणारा असता, \q1 \v 34 कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा, \q2 म्हणजे त्यांचा धाक मला अजून भयभीत करणार नाही. \q1 \v 35 मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन, \q2 पण या घटकेला, मी ते करू शकत नाही. \b \c 10 \q1 \v 1 “मला माझ्या जिवाचा तिरस्कार आला आहे; \q2 म्हणून मनमोकळे करून मी \q2 माझ्या जिवाच्या कडूपणाने बोलेन. \q1 \v 2 मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, \q2 पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा. \q1 \v 3 माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का, \q2 दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता, \q2 आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता? \q1 \v 4 तुम्हाला मानवी डोळे आहेत का? \q2 मनुष्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का? \q1 \v 5 तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का, \q2 किंवा त्या बलवान मनुष्यासारखे तुमचे आयुष्य आहे, \q1 \v 6 म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत \q2 आणि माझी पापे बारकाईने तपासून पाहावी; \q1 \v 7 मी दोषी नाही हे जरी तुम्हाला माहीत आहे \q2 आणि मला तुमच्या हातून सोडविणारा कोणी नाही? \b \q1 \v 8 “तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. \q2 आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय? \q1 \v 9 तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा, \q2 पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय? \q1 \v 10 दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का \q2 तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे, \q1 \v 11 तुम्ही मला त्वचा व मांस दिले, \q2 आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का? \q1 \v 12 तुम्ही मला जीवन देऊन दया दाखविली, \q2 आणि तुमच्या निगेत माझा आत्मा सुरक्षित राहिला. \b \q1 \v 13 “परंतु हे तुम्ही तुमच्या हृदयात गुप्त ठेवले, \q2 आणि मला माहीत आहे की हे तुमच्या मनामध्ये होते: \q1 \v 14 मी जर पातक केले, तर तुमची नजर माझ्यावर आहे \q2 आणि माझ्या पापांबद्दल शिक्षा दिल्यावाचून राहणार नाही. \q1 \v 15 जर मी दोषी असेन; तर माझा धिक्कार असो! \q2 मी निष्पाप असलो, तरीसुद्धा मी माझे डोके उंच करू शकत नाही, \q1 कारण मी लज्जेने व्याप्त झालो आहे \q2 आणि माझ्या दुःखात बुडून गेलो आहे. \q1 \v 16 मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार \q2 आणि पुन्हा तुमच्या अद्भुत शक्तीचे माझ्याविरुद्ध प्रदर्शन करणार. \q1 \v 17 तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता, \q2 आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता; \q2 तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात. \b \q1 \v 18 “मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले? \q2 कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते. \q1 \v 19 मी जर कधी अस्‍तित्‍वातच आलो नसतो, \q2 किंवा गर्भाशयातून सरळ कबरेत गेलो असतो तर किती बरे असते! \q1 \v 20 माझ्या थोड्या दिवसांची समाप्ती अजून झाली नाही का? \q2 मला आनंदाचे क्षण उपभोगायला मिळावे म्हणून माझ्यापासून दूर जा; \q1 \v 21 म्हणजे जिथून परत येणे होत नाही, \q2 जे अंधार आणि मृत्यूचे स्थान, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी, \q1 \v 22 जे मध्यरात्रीच्या काळोखासारखे आहे, \q2 तिथे गाढ अंधकार व अव्यवस्था आहे, \q2 आणि तेथील प्रकाश सुद्धा अंधकारासारखा असतो.” \c 11 \s1 सोफर \p \v 1 तेव्हा सोफर नामाथीने उत्तर दिले: \q1 \v 2 “हे सर्व शब्द निरुत्तरीत राहतील काय? \q2 हा बडबडा मनुष्य न्यायी ठरेल काय? \q1 \v 3 तुझ्या व्यर्थ गोष्टींनी लोक शांत होतील काय? \q2 तू उपहास करीत असताना, कोणी तुझा निषेध करणार नाही का? \q1 \v 4 तू परमेश्वराला म्हणतोस, ‘माझा विश्वास अचूक आहे \q2 आणि मी तुमच्या दृष्टीने शुद्ध आहे.’ \q1 \v 5 अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे, \q2 आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडावे \q1 \v 6 आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे, \q2 कारण खर्‍या ज्ञानाला दोन बाजू आहेत. \q2 हे माहीत असू दे: की परमेश्वराने तुझी काही पापे सोडली आहेत. \b \q1 \v 7 “परमेश्वराच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? \q2 सर्वसमर्थाच्या मर्यादेचे तुला आकलन होईल का? \q1 \v 8 ती आकाशाहून उंच आहे; मग तू काय करशील? \q2 ती अधोलोकाहून खोल आहे; तुला ते काय कळणार? \q1 \v 9 त्यांचा विस्तार पृथ्वीपेक्षा रुंद, \q2 आणि सागराहून ती अधिक विस्तृत आहे. \b \q1 \v 10 “जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले \q2 व न्यायसभा बोलावली, तर त्यांना कोण प्रतिबंध करू शकेल? \q1 \v 11 खरोखर ते फसविणार्‍यास ओळखतात; \q2 आणि जेव्हा ते दुष्टता पाहतात, तेव्हा ते दखल घेणार नाही का? \q1 \v 12 जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही \q2 तसेच अक्कलशून्य मनुष्य शहाणा होणार नाही. \b \q1 \v 13 “जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील \q2 आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील, \q1 \v 14 तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील \q2 आणि आपल्या डेर्‍यात अन्याय राहू देणार नाहीस, \q1 \v 15 तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; \q2 तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील. \q1 \v 16 तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, \q2 केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील. \q1 \v 17 तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, \q2 आणि अंधकार पहाटेसारखा होईल. \q1 \v 18 आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; \q2 तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील. \q1 \v 19 तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही, \q2 आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील. \q1 \v 20 परंतु दुष्टांची नजर अंधुक होईल, \q2 आणि निसटून जाण्याचा मार्ग त्यांना आढळणार नाही; \q2 मृत्यूची धाप हीच त्यांची आशा असेल.” \c 12 \s1 इय्योबाचा प्रतिसाद \p \v 1 मग इय्योबाने उत्तर दिले, \q1 \v 2 “खचितच तुम्हीच ते विशिष्ट लोक आहात, \q2 आणि ज्ञान तुमच्याबरोबरच नाहीसे होईल! \q1 \v 3 परंतु मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे; \q2 मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही. \q2 या सर्वगोष्टी कोणाला ठाऊक नाहीत? \b \q1 \v 4 “मी माझ्या मित्रांच्या चेष्टेचा विषय बनलो आहे, \q2 मी परमेश्वराचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले— \q2 नीतिमान आणि निर्दोष असूनही मी केवळ चेष्टेचा विषय झालो आहे! \q1 \v 5 सुखी मनुष्याला विपत्तीचा तिरस्कार वाटतो; \q2 मात्र ज्यांचे पाय घसरतात त्यांच्यावर ती वार करते. \q1 \v 6 हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, \q2 आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— \q2 ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.\f + \fr 12:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्यांची दैवते त्यांच्याच हाती आहेत\fqa*\f* \b \q1 \v 7 “परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील, \q2 किंवा आकाशातील पाखरे तुला सांगतील; \q1 \v 8 अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल; \q2 किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे. \q1 \v 9 या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की \q2 याहवेहच्या हाताने हे केले आहे? \q1 \v 10 कारण प्रत्येक प्राण्याचा जीव, \q2 आणि सर्व मानवजातीचा श्वास त्यांच्याच हातात आहे. \q1 \v 11 जशी अन्नाची चव जिभेला समजते, \q2 तशीच शब्दांची पारख कान करीत नाहीत का? \q1 \v 12 वयस्कांमध्ये ज्ञान आढळून येते की नाही? \q2 दीर्घ आयुष्याने समज येते की नाही? \b \q1 \v 13 “ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत; \q2 सल्ला आणि समज त्यांचेच आहे. \q1 \v 14 ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही; \q2 ते ज्याला बंदिवासात पकडतात, त्याला सुटका नाही. \q1 \v 15 परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो; \q2 आणि त्याला मोकळे सोडले, तर पृथ्वी उद्ध्वस्त होते. \q1 \v 16 पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत; \q2 फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत. \q1 \v 17 ते मंत्र्यांना विवस्त्र करतात \q2 आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात. \q1 \v 18 राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात \q2 आणि त्यांच्या कंबरेस लंगोट बांधतात. \q1 \v 19 ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात \q2 स्थिर झालेल्या अधिकार्‍यांना ते उलथून टाकतात. \q1 \v 20 विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात \q2 आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात. \q1 \v 21 ते सरदारांवर तिरस्कार ओततात, \q2 आणि सबळांना दुर्बल करतात. \q1 \v 22 ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात \q2 आणि घोर अंधकाराला प्रकाशाने उजळून टाकतात. \q1 \v 23 ते राष्ट्रांना महान करतात आणि त्याचा नाशही करतात; \q2 ते राष्ट्रे विस्तृत करतात आणि त्यांचा नायनाट करतात. \q1 \v 24 ते पृथ्वीवरील अधिकार्‍यांची बुद्धी काढून घेतात; \q2 आणि त्यांना दिशाहीन असे भटकण्यास लावतात. \q1 \v 25 ते अंधारात प्रकाशाविना चाचपडतात; \q2 त्यांना मद्यपीसारखे लटपटण्यास लावतात. \b \c 13 \q1 \v 1 “माझ्या नेत्रांनी हे सर्व पाहिले आहे, \q2 माझ्या कानांनी ते ऐकले आणि समजले. \q1 \v 2 जे तुम्हाला माहीत आहे, ते मलाही माहीत आहे; \q2 मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही. \q1 \v 3 पण मी सर्वसमर्थाशी बोलावे \q2 आणि माझा वाद परमेश्वरासमोर मांडावा असे मी इच्छितो. \q1 \v 4 तुम्ही तर मला लबाड्यांनी कलंकित करता; \q2 तुम्ही सर्व अयोग्य वैद्य आहात! \q1 \v 5 तुम्ही गप्प राहाल तर किती बरे होईल! \q2 कारण त्यातच तुमचे शहाणपण आहे. \q1 \v 6 आता माझा वाद ऐकून घ्या; \q2 माझ्या ओठांच्या विनंतीकडे कान द्या. \q1 \v 7 परमेश्वराच्या वतीने तुम्ही दुष्टतेने बोलणार का? \q2 त्यांच्याकरिता तुम्ही कपटाचे भाषण कराल का? \q1 \v 8 तुम्ही त्यांना पक्षपात दाखविणार का? \q2 परमेश्वराच्या वतीने त्यांचा वाद तुम्ही कराल काय? \q1 \v 9 त्यांनी जर तुमची परीक्षा केली तर चांगले होईल काय? \q2 जसे मनुष्याला तसे तुम्ही परमेश्वरालाही फसवू शकाल काय? \q1 \v 10 जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात कराल \q2 तर परमेश्वर तुमच्याकडून निश्चितच हिशोब मागेल. \q1 \v 11 त्यांचे वैभव तुम्हाला भयभीत करीत नाही का? \q2 त्यांचे भय तुम्हावर पडणार नाही का? \q1 \v 12 तुमच्या नीतिवचनांना राखेएवढेच मोल आहे; \q2 तुमचे रक्षण हा मातीचा बचाव आहे. \b \q1 \v 13 “आता गप्प राहा व मला बोलू द्या; \q2 मग माझ्यावर जे यावयाचे ते येवो. \q1 \v 14 मी स्वतःला धोक्यात का टाकू \q2 आणि माझे जीवन माझ्याच हातात का घेऊ? \q1 \v 15 जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन; \q2 व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन. \q1 \v 16 खचितच ह्यातच माझी खरी मुक्ती आहे, \q2 कारण कोणी देवहीन व्यक्ती त्यांच्यासमोर येण्याचे धाडस करणार नाही! \q1 \v 17 मी जे सांगतो, ते लक्ष देऊन ऐका; \q2 माझे शब्द तुमच्या कानावर पडू द्या. \q1 \v 18 मी माझा वाद तयार केला आहे, \q2 मला माहीत आहे की मी दोषमुक्त ठरेन. \q1 \v 19 माझ्याविरुद्ध कोणी आरोप करेल काय? \q2 केलाच तर, मी शांत राहीन आणि मरून जाईन. \b \q1 \v 20 “हे परमेश्वरा, मला या दोन गोष्टी द्या, \q2 आणि मग मी तुमच्यापासून लपणार नाही: \q1 \v 21 माझ्यावरील आपला हात दूर करा, \q2 आणि तुमच्या धाकाने मला आणखी घाबरवू नका. \q1 \v 22 मला आवाज द्या आणि मी उत्तर देईन, \q2 किंवा मी बोलेन आणि तुम्ही मला उत्तर द्या. \q1 \v 23 मी किती चुका आणि पाप केलेत? \q2 माझे पाप आणि माझे अपराध मला दाखवा. \q1 \v 24 तुम्ही आपले मुख का लपविता \q2 आणि मला आपला शत्रू का मानता? \q1 \v 25 वार्‍याने उडून जाणार्‍या पानाला तुम्ही छळणार का? \q2 कोरड्या भुशाचा तुम्ही पाठलाग करणार का? \q1 \v 26 कारण माझ्याविरुद्ध तुम्ही कटुत्वाच्या गोष्टी लिहिता, \q2 आणि माझ्या तारुण्यातील पातकांची शिक्षा मला देता. \q1 \v 27 तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता; \q2 माझ्या पायांच्या तळव्यांना चिन्ह करून \q2 माझ्या सर्व मार्गावर तुम्ही लक्ष ठेवले आहे. \b \q1 \v 28 “सडलेल्या वस्तूप्रमाणे, \q2 कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे मनुष्य नष्ट होतो. \b \c 14 \q1 \v 1 “स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन, \q2 अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे. \q1 \v 2 अशा फुलासारखे, जे फुलते आणि सुकून जाते; \q2 क्षणभंगुर सावलीप्रमाणे ते जास्त काळ टिकत नाही. \q1 \v 3 अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का? \q2 त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना आपल्या उपस्थितीत आणणार का? \q1 \v 4 अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल? \q2 कोणीही नाही! \q1 \v 5 मानवाचे दिवस ठरलेले आहेत; \q2 त्याच्या महिन्यांची संख्या तुमच्या स्वाधीन आहे \q2 आणि त्याची नेमलेली मर्यादा त्याला ओलांडता येत नाही. \q1 \v 6 रोजगाराच्‍या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत, \q2 आपली दृष्टी त्याच्यावरून काढून त्याला एकटे असू द्या. \b \q1 \v 7 “झाडाला देखील आशा असते: \q2 की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार, \q2 आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत. \q1 \v 8 मातीत त्याची मुळे जुनी झाली असली, \q2 आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला, \q1 \v 9 तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते \q2 आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात. \q1 \v 10 परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते; \q2 तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो. \q1 \v 11 जसे सरोवराचे पाणी आटते \q2 किंवा नदीचे पात्र आटून कोरडे होते, \q1 \v 12 तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही; \q2 आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत, \q2 ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत. \b \q1 \v 13 “तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते \q2 तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते! \q1 आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा \q2 आणि मग माझी आठवण करावी! \q1 \v 14 जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का? \q2 माझ्या सर्व कठीण श्रमाच्‍या दिवसात \q2 माझ्या सुटकेची मी वाट पाहीन. \q1 \v 15 मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन; \q2 आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल. \q1 \v 16 तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही, \q2 तर माझ्या पावलांची मोजणी कराल. \q1 \v 17 तुम्ही माझे अपराध एका थैलीत बंद करून; \q2 माझ्या पापांवर पांघरूण घालाल. \b \q1 \v 18 “परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो, \q2 आणि जसे खडक आपल्या ठिकाणातून ढळविले जातात, \q1 \v 19 जल पाषाण झिजवून टाकते \q2 व पूर माती वाहून नेतो, \q2 त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता. \q1 \v 20 तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो; \q2 तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता. \q1 \v 21 जरी त्याच्या संतानाचा सन्मान झाला, तरी त्याला ते माहीत नसते; \q2 किंवा त्यांना नीच करण्यात आले, तरी ते त्याला दिसत नाही. \q1 \v 22 त्यांना फक्त त्यांच्या शरीरातील दुःख जाणवते \q2 आणि स्वतःसाठीच ते शोक करतात.” \c 15 \s1 एलीफाज \p \v 1 मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले: \q1 \v 2 “सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का \q2 किंवा पूर्वेकडील गरम वार्‍याने आपले पोट भरणार काय? \q1 \v 3 कुचकामी शब्दांनी, \q2 आणि व्यर्थ भाषणाने ते वाद घालतील काय? \q1 \v 4 परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस \q2 आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो. \q1 \v 5 तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात; \q2 धूर्तांची जीभ तू अंगीकारतो. \q1 \v 6 माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते; \q2 तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देते. \b \q1 \v 7 “सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का? \q2 पर्वत निर्माण होण्यापूर्वी तू अस्तित्वात आला का? \q1 \v 8 परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय? \q2 शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का? \q1 \v 9 आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे? \q2 आम्हाला आहे, त्याहून अधिक कोणते ज्ञान तुला आहे? \q1 \v 10 केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत; \q2 जे तुझ्या वडिलांपेक्षाही अधिक वयाचे आहेत. \q1 \v 11 परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द \q2 तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का? \q1 \v 12 तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, \q2 तुझे डोळे असे का चमकतात, \q1 \v 13 यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा \q2 आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे? \b \q1 \v 14 “मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत, \q2 किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत? \q1 \v 15 जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही, \q2 त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही, \q1 \v 16 तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, \q2 तो किती कमी दर्जाचा असावा! \b \q1 \v 17 “माझे लक्षपूर्वक ऐक, मी तुला स्पष्ट करून सांगतो; \q2 मी जे पाहिले आहे ते तुला सांगू दे, \q1 \v 18 ज्ञानी लोकांनी जे त्यांच्या पूर्वजांपासून मिळविले, \q2 त्यातील काहीच गुपित न ठेवता ते जाहीर केले, \q1 \v 19 (ज्यांना केवळ ही भूमी देण्यात आली होती \q2 आणि त्यांच्यामध्ये कोणीही विदेशी नव्हता): \q1 \v 20 दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, \q2 तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो. \q1 \v 21 त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात; \q2 सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो. \q1 \v 22 अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही; \q2 तलवारीसाठी त्याला नेमले आहे. \q1 \v 23 गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो; \q2 अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे. \q1 \v 24 संकट व चिंता त्याला घाबरे करतात; \q2 हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात, \q1 \v 25 कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो \q2 आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो, \q1 \v 26 त्यांच्या विरोधात अपमानाने \q2 जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो. \b \q1 \v 27 “कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे; \q2 त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे, \q1 \v 28 पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल, \q2 कोणी राहत नाही अशा ठिकाणी, \q2 तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल. \q1 \v 29 त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही, \q2 ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार. \q1 \v 30 त्याला अंधकारातून सुटका नाही; \q2 अग्नीने त्याचा अंकुर जळून जाईल, \q2 परमेश्वराचा मुखश्वास त्याला दूर वाहून नेईल. \q1 \v 31 निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, \q2 कारण त्याला त्याचा काही लाभ मिळणार नाही. \q1 \v 32 त्याच्या ठरलेल्या वेळे आधी तो गळून जाईल, \q2 आणि त्याच्या फांद्या भरभराट पावणार नाहीत. \q1 \v 33 न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, \q2 बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल. \q1 \v 34 कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील, \q2 आणि लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी जाळून टाकील. \q1 \v 35 ते क्लेशाची गर्भधारणा करतात आणि दुष्टतेला जन्म देतात; \q2 आणि त्यांचे गर्भाशय कपट प्रसवते.” \c 16 \s1 इय्योबाचे प्रत्युत्तर \p \v 1 यावर इय्योब म्हणाला: \q1 \v 2 “अशा पुष्कळ गोष्टी मी ऐकल्या आहेत; \q2 तुम्ही सर्व पोकळ सांत्वनकर्ते आहात! \q1 \v 3 तुमच्या या लांबलचक भाषणांचा कधी शेवट होणार नाही का? \q2 तुम्हाला काय त्रास होत आहे की तुम्ही सतत वाद घालावे? \q1 \v 4 तुम्ही माझ्या जागी असता, \q2 तर मी सुध्‍दा तुमच्यासारखेच बोललो असतो; \q1 मीही तुमच्याविरुद्ध उत्तम भाषण दिले असते \q2 आणि तुम्हाकडे पाहून माझे डोके हालविले असते. \q1 \v 5 परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल; \q2 तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझ्या ओठांनी मी तुमचे सांत्वन करेन. \b \q1 \v 6 “परंतु मी जरी बोललो तरी, माझे दुःख कमी होत नाही; \q2 आणि जरी मी गप्प राहिलो तरी ते जात नाही. \q1 \v 7 खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे; \q2 तुम्ही माझे घरदार उजाड केले आहे. \q1 \v 8 तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत. \q2 माझी ओसाडी उठून माझ्याविरुद्ध साक्ष देते. \q1 \v 9 परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात, \q2 आणि माझ्यावर दात खातात; \q2 माझे विरोधी माझ्यावर कडक नजर लावून आहेत. \q1 \v 10 ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात; \q2 तिरस्काराने ते माझ्या गालावर मारतात. \q2 आणि माझ्याविरुद्ध एकजूट करतात. \q1 \v 11 परमेश्वराने मला देवहीनांच्‍या स्वाधीन केले आहे \q2 आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे. \q1 \v 12 मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे. \q2 माझ्या मानेला पकडून त्यांनी माझा चुराडा केला आहे. \q1 त्यांनी मला त्यांचा निशाणा म्हणून केले आहे; \q2 \v 13 त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत. \q1 दया विरहित ते माझी आतडी\f + \fr 16:13 \fr*\fq आतडी \fq*\ft इब्री भाषेत \ft*\fqa मूत्रपिंड\fqa*\f* छेदतात \q2 आणि माझे पित्त भूमीवर ओततात. \q1 \v 14 पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; \q2 एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात. \b \q1 \v 15 “मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे \q2 आणि माझे डोके धुळीला मिळविले आहे. \q1 \v 16 रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे, \q2 आणि माझ्या डोळ्यांभोवती काळे डाग पडले आहेत. \q1 \v 17 तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही \q2 आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे. \b \q1 \v 18 “अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस; \q2 माझे रुदन कधीही विश्रांती न पावो! \q1 \v 19 तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे; \q2 माझा कैवारी उच्चस्थानी आहे. \q1 \v 20 माझा मध्यस्थ माझा मित्र आहे\f + \fr 16:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझे मित्र माझा तिरस्कार करतात\fqa*\f* \q2 आणि परमेश्वरासमोर माझे नेत्र अश्रू गाळतात; \q1 \v 21 एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी \q2 तसाच तो एका मनुष्याच्या वतीने परमेश्वराजवळ विनवणी करतो. \b \q1 \v 22 “केवळ काही वर्षे निघून जातील \q2 आणि फिरून परत येत नाही त्या वाटेने मी रवाना होईल. \c 17 \q1 \v 1 माझा आत्मा तुटून गेला आहे, \q2 माझ्या आयुष्याचे दिवस छाटले गेले आहे, \q2 कबर माझी वाट पाहत आहे. \q1 \v 2 खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात; \q2 त्यांच्या वैरभावावर माझी नजर लागली आहे. \b \q1 \v 3 “हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा. \q2 कारण मला जामीन आणखी कोण आहे? \q1 \v 4 तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे; \q2 म्हणून तुम्ही त्यांना विजयी होऊ देणार नाही. \q1 \v 5 जे मोबदल्यासाठी आपल्या मित्रांचा घात करतात, \q2 त्यांच्या लेकरांचे डोळे अंध होतील. \b \q1 \v 6 “परमेश्वराने मला सर्वांसाठी थट्टेचा विषय केले आहे, \q2 असा मनुष्य, ज्याच्या तोंडावर लोक थुंकतात. \q1 \v 7 दुःखाने माझे डोळे अंधुक झाले आहेत; \q2 आणि माझे शरीर सावलीसारखे झाले आहे. \q1 \v 8 यामुळे प्रामाणिक लोक भयप्रद झाले आहेत; \q2 निर्दोष लोक देवहीनांवर उठले आहेत. \q1 \v 9 तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, \q2 आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील. \b \q1 \v 10 “परंतु चला, तुम्ही सर्वजण पुन्हा प्रयत्न करा! \q2 तुमच्यात एकही बुद्धिमान मला सापडणार नाही. \q1 \v 11 माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत. \q2 परंतु माझ्या हृदयाची आशा भंगली नाही. \q1 \v 12 ते रात्रीला दिवसात बदलतात; \q2 आणि अंधारात असूनही दिवस जवळ आहे असे म्हणतात. \q1 \v 13 ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे, \q2 अंधकाराच्या राज्यात जर मी माझे अंथरूण पसरेल, \q1 \v 14 जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले \q2 आणि किडण्याला, ‘माझी आई’ किंवा ‘माझी बहीण’ म्हणेन, \q1 \v 15 तर मग माझी आशा कुठे आहे— \q2 आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार? \q1 \v 16 ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का? \q2 आम्ही दोघेही धुळीमध्ये एकत्रच जाणार का?” \c 18 \s1 बिल्दद \p \v 1 यावर बिल्दद शूहीने उत्तर दिले: \q1 \v 2 “ही अशी भाषणे तू कधी थांबविणार आहेस? \q2 जरा समजूतदारपणे घे आणि मग आपण बोलू. \q1 \v 3 आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस \q2 तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का? \q1 \v 4 रागाने जो तू स्वतःला फाडतोस, \q2 त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय? \q2 किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय? \b \q1 \v 5 “दुष्टांचा दिवा विझून जातो; \q2 त्याच्या अग्नीच्या ज्वाला पेटावयाच्या थांबतात. \q1 \v 6 त्याच्या तंबूतील प्रकाश अंधकार होऊन होतो; \q2 त्याच्या जवळचा दिवा विझून जातो. \q1 \v 7 त्याच्या पावलांचा प्रभाव दुर्बल होतो; \q2 त्याच्या स्वतःच्याच योजना त्याला खाली खेचतात. \q1 \v 8 त्याचेच पाऊल त्याला पाशात अडकवितात; \q2 आणि त्याच्या जाळ्यात तो सापडतो. \q1 \v 9 फास त्याची टाच पकडते; \q2 आणि तो सापळ्यात धरला जातो. \q1 \v 10 त्याच्यासाठी गळफास जमिनीत लपविलेला आहे; \q2 त्याच्या मार्गात सापळा ठेवलेला आहे. \q1 \v 11 आतंक त्याला चहूकडून घेरून आहे \q2 आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे. \q1 \v 12 विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे; \q2 तो पडला तर, विनाश त्याच्यासाठी तयारच आहे. \q1 \v 13 रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे; \q2 मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात. \q1 \v 14 त्याच्या सुरक्षित डेर्‍यांतून त्याला फाडून \q2 भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे. \q1 \v 15 अग्नी त्याच्या डेर्‍यात वस्ती\f + \fr 18:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याचे जे होते त्यातील काही उरले नाही\fqa*\f* करते; \q2 त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे. \q1 \v 16 त्याची मुळे खाली सुकतात \q2 आणि त्याच्यावर सर्व फांद्या वाळून जातात. \q1 \v 17 पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते; \q2 आणि आता भूमीवर त्याचे नाव राहणार नाही. \q1 \v 18 प्रकाशातून त्याला अंधाराच्या राज्यात घालविले आहे; \q2 आणि जगातून तो हद्दपार केला गेला आहे. \q1 \v 19 त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत, \q2 तो जिथे राहत होता, तिथेही कोणी उरले नाहीत. \q1 \v 20 पश्चिमेचे लोक त्याची अवस्था बघून भयप्रद होतात; \q2 हा भयंकर अंत पाहून पूर्वेकडील लोक घाबरून जातात. \q1 \v 21 पातक्यांचे जीवन खचितच असे असते; \q2 परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.” \c 19 \s1 इय्योब \p \v 1 मग इय्योबाने उत्तर देत म्हटले: \q1 \v 2 “किती काळ तुम्ही मला त्रास देणार \q2 आणि आपल्या शब्दांनी मला चिरडणार? \q1 \v 3 एवढ्यात दहा वेळा माझी निंदा करून; \q2 निर्लज्या सारखा तुम्ही माझ्यावर हल्ला केला. \q1 \v 4 मी जर खरोखरच चुकलो असेन, \q2 तरी त्यासाठी मी स्वतः जबाबदार असणार. \q1 \v 5 जर स्वतःला तुम्ही खरच माझ्यापेक्षा थोर समजता \q2 आणि माझ्या या दैनावस्थेचा माझ्याविरुद्ध गैरउपयोग करता, \q1 \v 6 तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे \q2 आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे. \b \q1 \v 7 “मी जरी ‘जुलूम!’ असे म्हणून ओरडतो, परंतु मला प्रतिसाद मिळत नाही; \q2 साहाय्यासाठी मी बोलावितो, परंतु मला न्याय मिळत नाही. \q1 \v 8 मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे; \q2 त्यांनी माझे मार्ग अंधाराने झाकून टाकले आहेत. \q1 \v 9 माझा सन्मान त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतला आहे \q2 आणि माझ्या मस्तकावरील मुकुट काढून घेतला आहे. \q1 \v 10 माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे; \q2 झाडाप्रमाणे त्यांनी माझी आशा उपटून टाकली आहे. \q1 \v 11 त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे; \q2 आपल्या शत्रूंमध्ये त्यांनी मला गणले आहे. \q1 \v 12 त्यांची फौज जोमाने पुढे जात आहे; \q2 त्यांनी माझ्याविरुद्ध युद्ध रचले आहे \q2 आणि माझ्या डेर्‍या सभोवती वेढा घातला आहे. \b \q1 \v 13 “माझे बंधुजन त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत; \q2 माझे परिचित मला अगदी परके झाले आहेत. \q1 \v 14 माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत; \q2 माझ्या जिवलग मित्रांना माझा विसर पडला आहे. \q1 \v 15 माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात; \q2 अनोळखी माणसाप्रमाणे ते माझ्याकडे बघतात. \q1 \v 16 मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो, \q2 आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही. \q1 \v 17 माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे; \q2 माझ्या परिवारासाठी मी घृणास्पद असा आहे. \q1 \v 18 लहान मुलेदेखील माझी निंदा करतात; \q2 मी दिसलो तरी ते माझा अपमान करतात. \q1 \v 19 माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो; \q2 ज्यांच्यावर मी प्रीती केली, तेही माझ्यावर उलटले. \q1 \v 20 मी आता फक्त हाडे व कातडी असा उरलो आहे; \q2 आणि मृत्यूच्या संकटातून थोडक्यात निभावून गेलो आहे.\f + \fr 19:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa केवळ हिरड्या बाकी आहेत\fqa*\f* \b \q1 \v 21 “माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा, \q2 कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे. \q1 \v 22 परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता? \q2 माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय? \b \q1 \v 23 “अहा, माझ्या शब्दांची नोंद करण्यात आली असती, \q2 ते एका चर्मपत्राच्या गुंडाळीत लिहून ठेवले असते, \q1 \v 24 लोखंडी कलमाने ते शिसावर, \q2 किंवा कायम स्‍वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते! \q1 \v 25 मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, \q2 आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील; \q1 \v 26 आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, \q2 आपल्या देहाशिवाय\f + \fr 19:26 \fr*\fq देहाशिवाय \fq*\ft इतर मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa देहामध्ये\fqa*\f* मी परमेश्वराला पाहीन; \q1 \v 27 होय, मी स्वतः त्यांना पाहीन \q2 दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन. \q2 त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे! \b \q1 \v 28 “आणि आता जर तुम्ही असा विचार केला की, ‘आम्ही कसे त्याला नीच करू, \q2 कारण समस्येचे मूळ तर त्याच्यामध्येच आहे,’ \q1 \v 29 तुम्ही स्वतः तलवारी विषयी भय धरावे; \q2 कारण क्रोधाची शिक्षा तलवारीने येणार, \q2 आणि मग न्याय अस्तित्वात आहे हे तुम्हाला समजेल.\f + \fr 19:29 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुला सर्वसमर्थाची ओळख होईल\fqa*\f*” \c 20 \s1 सोफर \p \v 1 मग सोफर नामाथीने उत्तर देऊन म्हटले: \q1 \v 2 “माझे त्रस्त विचार मला उत्तर देण्यास प्रेरित करीत आहेत \q2 कारण मी फारच अस्वस्थ झालो आहे. \q1 \v 3 मला अपमानित करणार्‍या धमक्या मला ऐकायला येतात, \q2 आणि माझी सुबुद्धी उत्तर देण्यास मला प्रवृत्त करीत आहे. \b \q1 \v 4 “पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली, \q2 तेव्हापासूनच्या गोष्टी तुला खचित माहीत आहेत, \q1 \v 5 की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, \q2 देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे. \q1 \v 6 जरी देवहीन मनुष्याचा गर्व आकाशापर्यंत पोहोचला \q2 आणि त्याचे डोके आभाळाला जाऊन भिडले, \q1 \v 7 तरी तो आपल्या स्वतःच्या विष्ठेप्रमाणे नष्ट होणार; \q2 जे त्याला ओळखीत होते, ते विचारीत राहतील, ‘तो कुठे आहे?’ \q1 \v 8 तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही. \q2 रात्रीच्या दृष्‍टांताप्रमाणे तो नाहीसा होईल. \q1 \v 9 ज्यांनी त्याला पाहिले होते, ते त्याला पुन्हा पाहणार नाहीत; \q2 त्याचे स्थान त्याच्याकडे पुन्हा पाहणार नाही. \q1 \v 10 त्याची मुलेबाळे गरिबांची नुकसान भरपाई करतील; \q2 आणि स्वतःच्या हातांनी आपली संपत्ती परत करतील. \q1 \v 11 तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे \q2 तो त्याच्याबरोबरच धुळीत मिळेल. \b \q1 \v 12 “जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते \q2 आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो, \q1 \v 13 ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते \q2 म्हणून हळूहळू चघळत राहतो, \q1 \v 14 तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही; \q2 त्याच्या पोटात ते सापाच्‍या विषासारखे होईल. \q1 \v 15 गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; \q2 परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल. \q1 \v 16 तो सापाचे विष चोखून घेईल; \q2 विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल. \q1 \v 17 मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्‍या प्रवाहाने वाहतात, \q2 त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नाही. \q1 \v 18 ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही; \q2 त्याच्या व्यापाराचा नफा त्याला मिळणार नाही. \q1 \v 19 कारण त्याने गोरगरिबांवर जुलूम करून त्यांना निराधार सोडले; \q2 जी घरे त्याने बांधली नाहीत, ती त्याने जप्त केली. \b \q1 \v 20 “त्याच्या हावेपासून त्याला कधीही सुटका मिळणार नाही; \q2 त्याची संपत्ती त्याला वाचवू शकणार नाही. \q1 \v 21 गिळून टाकावे असे आता काही उरले नाही; \q2 त्याची समृद्धी दीर्घकाल टिकणार नाही. \q1 \v 22 त्याच्या भरभराटीत विपत्ती त्याला गाठेल; \q2 आणि त्याच्यावर मोठ्या यातना येऊन पडतील. \q1 \v 23 जेव्हा त्याने पोटभरून खाल्ले असणार, \q2 तेव्हा परमेश्वराचा प्रचंड कोप त्याच्याविरुद्ध पेटेल \q2 आणि त्याच्यावर त्यांच्या क्रोधाची वृष्टी होईल. \q1 \v 24 लोखंडी शस्‍त्रांपासून त्याने जरी पळ काढला, \q2 तरी कास्य धनुष्‍यबाण त्याच्या पार जाईल. \q1 \v 25 बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल, \q2 आणि त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. \q1 तो भीतीने ग्रस्त होईल. \q2 \v 26 निबिड अंधकार त्याच्या संपत्तीची वाट पाहत आहे, \q1 अग्नी त्याला भस्म करेल \q2 आणि त्याच्या तंबूमध्ये जे काही उरलेले आहे ते गिळून टाकेल. \q1 \v 27 आकाश त्याचे दोष प्रकट करेल; \q2 आणि पृथ्वी त्याच्याविरुद्ध उभी राहील. \q1 \v 28 त्याचे घर पुराने वाहून जाईल, \q2 परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्याची सर्व संपत्ती पाण्याच्या ओघात नष्ट होईल. \q1 \v 29 दुष्ट मनुष्याचा परमेश्वराने हाच वाटा नेमलेला आहे, \q2 परमेश्वराने त्यांच्याकरिता नेमलेला वारसा तो हाच आहे.” \c 21 \s1 इय्योब \p \v 1 मग इय्योबाने उत्तर देऊन म्हटले: \q1 \v 2 “माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका; \q2 आणि हेच तुमच्याकडून माझ्यासाठी सांत्वन असे असू द्या. \q1 \v 3 मी बोलत असताना धीर धरा, \q2 त्यानंतर खुशाल माझी थट्टा करा. \b \q1 \v 4 “माझी तक्रार मनुष्याविरुद्ध आहे काय? \q2 मी अधीर का असू नये? \q1 \v 5 माझ्याकडे पाहा आणि भयचकित व्हा; \q2 आपल्या मुखावर आपला हात ठेवा. \q1 \v 6 याविषयी मी विचार करतो, त्यावेळी मी भयभीत होतो; \q2 भीतीने माझे शरीर थरथर कापते. \q1 \v 7 दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते, \q2 वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात? \q1 \v 8 त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात, \q2 आणि त्यांचे वंशज त्यांच्या दृष्टीपुढे असतात. \q1 \v 9 त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात; \q2 परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो. \q1 \v 10 त्यांचा बैल निष्फळ असत नाही; \q2 त्यांच्या गाई वासरांना जन्म देतात आणि त्यांचा गर्भपात होत नाही. \q1 \v 11 ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात; \q2 आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात. \q1 \v 12 डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; \q2 आणि बासरीच्‍या स्‍वरावर हर्षनाद करतात. \q1 \v 13 ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात \q2 आणि शांतीने\f + \fr 21:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa अचानक\fqa*\f* खाली कबरेत जातात. \q1 \v 14 तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! \q2 तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही. \q1 \v 15 हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? \q2 त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’ \q1 \v 16 परंतु त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या हातात नाही, \q2 म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर थांबतो. \b \q1 \v 17 “तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? \q2 आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, \q2 परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात? \q1 \v 18 ते कितीदा वार्‍यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात, \q2 व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात? \q1 \v 19 असे म्हटले जाते, ‘परमेश्वर दुर्जनांची शिक्षा त्याच्या संततीसाठी राखून ठेवतात.’ \q2 दुर्जनालाच स्वतःच्या पापाची परतफेड करू द्यावी, \q2 म्हणजे त्याला त्याचा अनुभव येईल! \q1 \v 20 आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे; \q2 सर्वसमर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने प्यावा. \q1 \v 21 जेव्हा त्याला नेमून दिलेला काळ समाप्त होतो \q2 तेव्हा आपण आपल्यामागे सोडून दिलेल्या कुटुंबाविषयी त्याला काय चिंता? \b \q1 \v 22 “परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल, \q2 कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात? \q1 \v 23 एखादा मनुष्य पूर्ण जोमात असताना मरण पावतो, \q2 जो सुरक्षित आणि सुखी असतो, \q1 \v 24 जो शरीराने सुदृढ, \q2 आणि हाडांनी धष्टपुष्ट आहे. \q1 \v 25 आणि दुसरा एखादा जिवाच्या कडूपणात मरतो, \q2 ज्याने जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नसतो. \q1 \v 26 तरी ते दोघेही मेल्यानंतर मातीत एकमेका शेजारी पुरले जातात, \q2 आणि दोघेही किड्यांनी झाकले जातात. \b \q1 \v 27 “आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे, \q2 माझे वाईट होईल अशा योजना तुम्ही करता. \q1 \v 28 तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे, \q2 ज्यात दुष्टाचा डेरा होता?’ \q1 \v 29 जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय? \q2 आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष दिले नाही काय— \q1 \v 30 अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो, \q2 आणि क्रोधाच्या दिवशी ते सोडविले जातात? \q1 \v 31 उघडपणे त्यांना कोण दोष लावणार? \q2 त्यांनी जे केले आहे, त्याचे प्रतिफळ त्यांना कोण देणार? \q1 \v 32 त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते, \q2 आणि त्यांच्या धोंड्यावर पहारा ठेवतात. \q1 \v 33 दरीतील माती त्याला गोड लागते; \q2 असंख्य त्यांच्यापुढे गेले आहेत, \q2 आणि सर्व लोक त्यांचे अनुसरण करतात. \b \q1 \v 34 “तर तुमच्या निरर्थक शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन कसे कराल? \q2 कारण तुमची प्रत्युत्तरे केवळ असत्य आहेत!” \c 22 \s1 एलीफाज \p \v 1 मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले: \q1 \v 2 “मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का? \q2 अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ? \q1 \v 3 जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद? \q2 तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार? \b \q1 \v 4 “तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध \q2 आणि तुझ्याविरुद्ध आरोप करीत आहेत का? \q1 \v 5 तुझी दुष्टता पुष्कळ नाही का? \q2 तुझे अपराध अनंत नाही का? \q1 \v 6 तू निष्कारण आपल्या नातेवाईकांकडून गहाण घेतलेस; \q2 आणि लोकांना वस्त्राशिवाय सोडले. \q1 \v 7 थकलेल्यांना तू पाणी दिले नाही \q2 आणि तू भुकेल्‍यांपासून अन्न राखून ठेवलेस, \q1 \v 8 जरी तू प्रभावी व्यक्ती, एक जमीनदार होतास; \q2 सन्माननीय मनुष्य असा त्या भूमीवर राहत होतास \q1 \v 9 आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले \q2 तसेच अनाथांना बलहीन केलेस. \q1 \v 10 म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे, \q2 अकस्मात आलेली संकटे तुला का भयभीत करतात, \q1 \v 11 इतका अंधकार का आहे की तुला दिसत नाही, \q2 आणि जलांच्या पुराने तुला का झाकून टाकले आहे. \b \q1 \v 12 “परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय? \q2 आणि अतिउंच असलेल्या त्या तार्‍यांकडे बघ! \q1 \v 13 पण तरीही तू म्हणतोस, ‘परमेश्वराला काय माहीत? \q2 निबिड अंधकारातून ते न्याय करतील काय? \q1 \v 14 ते जेव्हा घुमटकार नभोमंडळात चालतात \q2 तेव्हा त्यांनी आम्हाला बघू नये म्हणून दाट ढगांनी त्यांच्यावर पडदा टाकला आहे.’ \q1 \v 15 पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते \q2 त्यावर अजून किती काळ तू चालशील? \q1 \v 16 ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्‍या आधी उठविले गेले, \q2 त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला. \q1 \v 17 ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा! \q2 सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’ \q1 \v 18 तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली, \q2 म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर राहतो. \q1 \v 19 नीतिमान दुष्टांचा नाश झालेला पाहून हर्ष करतील; \q2 निर्दोष लोक त्यांचा उपहास करतील, \q1 \v 20 ते म्हणतील, ‘खचितच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे, \q2 अग्नीने त्यांची संपत्ती भस्म केली आहे.’ \b \q1 \v 21 “परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; \q2 म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल. \q1 \v 22 त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे \q2 त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव. \q1 \v 23 जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्‍यातून दुष्टता काढून टाकशील: \q2 तर तू पुनर्स्थापित होशील. \q1 \v 24 जर तू आपले सोने धुळीत मिळवशील, \q2 आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील, \q1 \v 25 तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने, \q2 आणि तुझे मौल्यवान रुपे होतील. \q1 \v 26 मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्‍ये आनंद पावशील \q2 व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील. \q1 \v 27 तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, \q2 आणि तुझे नवस तू फेडशील. \q1 \v 28 ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल, \q2 आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. \q1 \v 29 जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’ \q2 जे पडलेले ते वाचविले जातील. \q1 \v 30 आणि जे निर्दोष नाहीत त्यांना देखील ते वाचवतील, \q2 आणि तुझ्या शुद्ध हातांकरवी ते पातक्यांना साहाय्य करतील.” \c 23 \s1 इय्योब \p \v 1 मग इय्योबाने उत्तर दिले: \q1 \v 2 “आज देखील माझे गार्‍हाणे कडू आहे; \q2 मी कण्हत असतानाही परमेश्वराचा हात माझ्यावर भारी आहे. \q1 \v 3 परमेश्वर कुठे आढळेल हे जर मला माहीत असते; \q2 मी जर त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊ शकलो असतो! \q1 \v 4 तर माझा वाद मी त्यांच्यापुढे ठेवली असता \q2 माझी बाजू त्यांच्यापुढे सविस्तर मांडली असती. \q1 \v 5 ते मला काय उत्तर देतील हे मी बघेन, \q2 आणि त्यांचे म्हणणे मी स्वीकारेन. \q1 \v 6 मोठ्या जोमाने ते माझा विरोध करतील काय? \q2 नाही, ते नक्कीच मला दोष लावणार नाहीत. \q1 \v 7 सज्जन त्यांच्यासमोर आपली निर्दोषता सिद्ध करू शकतो, \q2 आणि माझ्या न्यायाधीशापासून सर्वकाळासाठी माझी सुटका होईल. \b \q1 \v 8 “परंतु मी जर पूर्वेकडे गेलो तर परमेश्वर तिथे नाही; \q2 आणि पश्चिमेकडे गेलो, तिथेही ते मला सापडत नाहीत. \q1 \v 9 जेव्हा ते उत्तरेकडे कार्यरत असतात, तरी मला ते दिसत नाहीत; \q2 जेव्हा ते दक्षिणेकडे वळतात, तेव्हा मला ते ओझरतेही दिसत नाहीत. \q1 \v 10 परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत; \q2 जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्‍यासारखा मी प्रमाणित होईन. \q1 \v 11 माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे; \q2 दुसरीकडे न वळता मी त्यांच्या मार्गावरच राहिलो आहे. \q1 \v 12 मी त्यांच्या मुखातील आज्ञांपासून अलिप्त झालो नाही; \q2 माझ्या दररोजच्या अन्नापेक्षा त्यांच्या तोंडचे शब्द मला मौल्यवान आहेत. \b \q1 \v 13 “परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे? \q2 त्यांच्या मनास येईल तसेच ते करतात. \q1 \v 14 माझ्याविरुद्ध असलेला त्यांचा निवाडा ते पूर्णतेस नेतील, \q2 आणि अशा पुष्कळ योजना त्यांनी माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत. \q1 \v 15 म्हणून त्यांच्या समक्षतेत मला भय वाटते; \q2 जेव्हा या सर्वांचा मी विचार करतो, तेव्हा मला त्यांचा दरारा वाटतो. \q1 \v 16 परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे; \q2 सर्वसमर्थाने मला भीतीने जखडले आहे. \q1 \v 17 निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो, \q2 परंतु तो मला गप्प करू शकला नाही. \b \c 24 \q1 \v 1 “सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही? \q2 जे त्यांना ओळखतात त्यांनी त्या दिवसांची व्यर्थ वाट का पाहावी? \q1 \v 2 असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात; \q2 चोरी करून आणलेले कळप ते चारतात. \q1 \v 3 अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात \q2 आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात. \q1 \v 4 गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात \q2 देशातील सगळ्या गरिबांना लपून राहण्यास भाग पाडतात. \q1 \v 5 रानातील रानगाढवां प्रमाणे, \q2 गरीब मनुष्य अन्नासाठी कष्ट करीत भटकतात; \q2 पडीक जमिनीतून त्यांच्या लेकरांस भोजन पुरवठा होतो. \q1 \v 6 ते रानातून चारा गोळा करतात \q2 आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात. \q1 \v 7 पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते. \q2 थंडीत पांघरण्यास देखील त्यांच्याकडे काही नसते. \q1 \v 8 पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात \q2 आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात. \q1 \v 9 पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते; \q2 ऋण फेडून घेण्यासाठी गरिबांची तान्ही बाळे जप्त करतात. \q1 \v 10 पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात; \q2 ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशीच राहतात. \q1 \v 11 आपल्याच आवारात ते जैतुनाचे तेल काढतात; \q2 द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवितात, परंतु तहानेने व्याकूळ झालेले असतात. \q1 \v 12 मरणासन्न असलेल्‍यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते, \q2 आणि घायाळ झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश चालू आहे. \q2 तरी देखील परमेश्वर कोणालाही दोष देत नाही. \b \q1 \v 13 “काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात, \q2 ज्यांना तो मार्ग अवगत नाही \q2 ते त्या मार्गात टिकूनही राहत नाहीत. \q1 \v 14 दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो, \q2 गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो, \q2 आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो. \q1 \v 15 व्यभिचार्‍याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; \q2 तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’ \q2 तो आपला चेहरा झाकून घेतो. \q1 \v 16 चोर अंधारात घरे फोडतात, \q2 परंतु दिवसा ते लपून राहतात; \q2 त्यांना प्रकाशाशी काहीही देणे घेणे नको असते. \q1 \v 17 मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते, \q2 अंधारातील आतंकाशी त्यांचे सख्य असते. \b \q1 \v 18 “तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत; \q2 त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते, \q2 की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही. \q1 \v 19 जसे उष्णता आणि दुष्काळ वितळलेल्‍या हिमाला शोषून घेते, \q2 त्याचप्रमाणे पाप्‍यांची कबर त्यांना ओढून घेते. \q1 \v 20 त्यांनी जन्म घेतलेले उदर त्यांना विसरते, \q2 किडे त्यांचा फडशा पाडतात; \q1 दुष्टांची आठवण देखील पुन्हा केली जात नाही \q2 आणि वृक्षाप्रमाणे ते मोडले जातात. \q1 \v 21 पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात, \q2 आणि विधवांशी ते दयेने वागत नाहीत. \q1 \v 22 परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात; \q2 त्याला जीवनाची खात्री नसली तरी ते स्थिरावतात. \q1 \v 23 आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले, \q2 तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते. \q1 \v 24 त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात; \q2 इतरांप्रमाणे ते देखील गळून पडतात; \q2 धान्याच्या कणसाप्रमाणे ते कापले जातील. \b \q1 \v 25 “जर असे नाही तर, कोण मला खोटे ठरवेल \q2 आणि माझे शब्द कोणाला शून्यात जमा करता येतील?” \c 25 \s1 बिल्दद \p \v 1 मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले: \q1 \v 2 “प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे; \q2 तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात. \q1 \v 3 त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय? \q2 आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही? \q1 \v 4 मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? \q2 स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय? \q1 \v 5 जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही \q2 आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत, \q1 \v 6 मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— \q2 मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!” \c 26 \s1 इय्योब \p \v 1 नंतर इय्योबाने उत्तर देऊन म्हटले: \q1 \v 2 “तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले! \q2 एखाद्या शक्ती नसलेल्या हाताला कसे संरक्षण दिले! \q1 \v 3 बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला! \q2 आणि कोणते प्रचंड अंतर्विचार तुम्ही सादर केले आहे! \q1 \v 4 असे शब्द बोलण्यास तुम्हाला कोणी साहाय्य केले? \q2 आणि कोणाचा आत्मा तुमच्या मुखाद्वारे बोलला आहे? \b \q1 \v 5 “जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्‍ये आहेत, \q2 जे जलांमध्ये आणि जलांच्या खाली राहतात ते सुद्धा तसेच आहे. \q1 \v 6 मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे; \q2 त्यांच्या दृष्टीपासून नाश\f + \fr 26:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa अबद्दोन\fqa*\f* लपलेला नाही. \q1 \v 7 परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात; \q2 आणि पृथ्वी निराधार टांगली आहे. \q1 \v 8 आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात, \q2 तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत. \q1 \v 9 त्यांनी आपले मेघ पसरवून, \q2 पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे. \q1 \v 10 त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे \q2 प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत. \q1 \v 11 परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, \q2 त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात. \q1 \v 12 आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात; \q2 आणि आपल्या बुद्धीच्या बलाने राहाबाचे तुकडे तुकडे करतात. \q1 \v 13 केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; \q2 त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्‍या सर्पाला विंधले आहे. \q1 \v 14 परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; \q2 आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! \q2 त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?” \c 27 \s1 इय्योबाचे त्याच्या मित्रांशी शेवटचे भाषण \p \v 1 इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला: \q1 \v 2 “ज्या परमेश्वराने मला न्याय देण्याचे नाकारले आहे, \q2 आणि ज्या सर्वसमर्थाने माझे जीवन कटुत्वाने भरले आहे, त्यांना स्मरून मी सांगतो, \q1 \v 3 की जोपर्यंत मी जिवंत आहे, \q2 आणि परमेश्वराचा श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे, \q1 \v 4 तोपर्यंत माझे ओठ काहीच वाईट बोलणार नाहीत, \q2 आणि माझी जीभ असत्य उच्चारणार नाही. \q1 \v 5 मी कधीही मान्य करणार नाही की तुमचे म्हणणे बरोबर आहे; \q2 मी मरेपर्यंत, माझी प्रामाणिकता मी नाकारणार नाही. \q1 \v 6 माझी निर्दोषता मी कधीही सोडून देणार नाही; \q2 मी जिवंत आहे तोपर्यंत माझा विवेक मला दोष देणार नाही. \b \q1 \v 7 “माझे शत्रू दुष्‍टांप्रमाणे, \q2 आणि माझे विरोधी अन्यायीप्रमाणे होवोत! \q1 \v 8 कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले, \q2 आणि त्याचा प्राण घेतला तर त्यांना काय आशा आहे? \q1 \v 9 जेव्हा त्यांच्यावर संकट येईल, \q2 तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय? \q1 \v 10 सर्वसमर्थामध्‍ये त्यांना संतोष मिळणार काय? \q2 सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय? \b \q1 \v 11 “परमेश्वराच्या सामर्थ्‍याविषयी मी तुम्हाला शिकवेन; \q2 सर्वसमर्थाचे मार्ग मी लपवणार नाही. \q1 \v 12 तुम्ही सर्वांनी स्वतः हे बघितले आहे, \q2 मग या निरर्थक गोष्टी का बोलता? \b \q1 \v 13 “दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे, \q2 कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो: \q1 \v 14 त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार; \q2 त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही. \q1 \v 15 आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील, \q2 आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत. \q1 \v 16 दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो \q2 व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो, \q1 \v 17 जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील, \q2 आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील. \q1 \v 18 त्याने बांधलेले घर पतंगाच्‍या कोशाप्रमाणे आहे, \q2 पहारेकर्‍याच्या झोपडीप्रमाणे ते आहे. \q1 \v 19 धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो; \q2 पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते. \q1 \v 20 संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; \q2 रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते. \q1 \v 21 पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो; \q2 त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो. \q1 \v 22 तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो \q2 तरी त्याच्यावर दया न होता तो दूर फेकला जाईल. \q1 \v 23 टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल \q2 आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल.” \c 28 \s1 मानवाचा ज्ञानासाठी शोध \q1 \v 1 चांदीसाठी खाण असते \q2 आणि सोने शुद्ध करण्याचे एक ठिकाण असते. \q1 \v 2 लोखंड मातीतून घेतले जाते, \q2 आणि दगड वितळून तांबे काढले जाते. \q1 \v 3 मनुष्य अंधाराची कदर न करता; \q2 खूप दूर त्या दाट अंधकारात \q2 त्या धातूच्या दगडाचा शोध करीत असतो. \q1 \v 4 मनुष्यांच्या वसतीपासून दूर, \q2 जिथे मानवाच्या पावलांचा कधी स्पर्श झाला नाही, तिथे ते खोल खाण खणतात; \q2 व सर्वांपासून दूर घुटमळत व झोके घेत असतात. \q1 \v 5 पृथ्वी, जी आम्हाला अन्न देते, \q2 ती खाली अग्नीने पालटून गेली आहे; \q1 \v 6 तिच्या खडकातून नीलमणी येतात, \q2 आणि त्याच धुळीत सोन्याचे गोळे असतात. \q1 \v 7 कोणत्याही शिकारी पक्ष्यास तो गुप्त मार्ग माहीत नाही, \q2 कोणत्याही बहिरी ससाण्‍याची नजर त्यावर पडली नाही. \q1 \v 8 गर्विष्ठ श्वापदाने ना कधी ती आपल्या पायाखाली तुडविली, \q2 ना कोणत्याही सिंहाने त्यावर आपला पंजा ठेवला. \q1 \v 9 गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात \q2 आणि पर्वतांना समूळ उघडे करतात. \q1 \v 10 ते खडकामधून भुयारे तयार करतात; \q2 आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात. \q1 \v 11 पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात \q2 आणि गुप्त गोष्टी उजेडात आणतात. \b \q1 \v 12 परंतु ज्ञान कुठे सापडेल? \q2 आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? \q1 \v 13 मानवाला त्याचे मोल अवगत नाही; \q2 जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही. \q1 \v 14 महासागर म्हणतात, “ते माझ्यात नाही”; \q2 आणि समुद्र म्हणतो, “ते माझ्याकडे नाही.” \q1 \v 15 अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही, \q2 किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही. \q1 \v 16 ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी, \q2 यांनीही त्याचे मोल करता येणार नाही. \q1 \v 17 सोने आणि रत्ने किंवा, \q2 शुद्ध सोन्याचे अलंकार त्या ज्ञानाच्या तुलनेत बसत नाही. \q1 \v 18 प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको; \q2 ज्ञानाचे मोल माणकांपेक्षाही खूपच अधिक आहे. \q1 \v 19 कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही, \q2 आणि शुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही. \b \q1 \v 20 तर मग ज्ञान कुठून येते? \q2 आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? \q1 \v 21 ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे, \q2 आकाशातील पक्ष्यांपासून देखील ते लपविलेले आहे. \q1 \v 22 विनाश आणि मृत्यू म्हणतात, \q2 “की आमच्या कानी तर त्याची केवळ वार्ता आली आहे.” \q1 \v 23 परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो \q2 ते कुठे आढळेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे. \q1 \v 24 कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात. \q2 आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते. \q1 \v 25 जेव्हा त्यांनी वार्‍याची गती स्थापित केली \q2 आणि जलांचे माप घेतले, \q1 \v 26 जेव्हा त्यांनी पावसाला नियम, \q2 आणि गर्जणार्‍या विजेला मार्ग आखून दिला, \q1 \v 27 तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्‍यमापन केले; \q2 त्याची पुष्टी करून त्याची पारख केली. \q1 \v 28 याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले, \q2 “प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे, \q2 वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.” \c 29 \s1 इय्योबाचे शेवटचे समर्थन \p \v 1 इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला: \q1 \v 2 “माझे गेलेले महिने, ज्यामध्ये परमेश्वराची नजर माझ्यावर होती, \q2 त्या दिवसांची मला खूप आस आहे, \q1 \v 3 जेव्हा त्यांचा प्रकाशदीप माझ्या मस्तकावर पडत असे \q2 मग अंधारातही त्यांच्याच प्रकाशात मी चालत असे! \q1 \v 4 माझ्या उत्कृष्ट दिवसात, \q2 जेव्हा माझे घराणे परमेश्वराच्या जिव्हाळ्याच्या संगतीने आशीर्वादित होते, \q1 \v 5 जेव्हा सर्वसमर्थाची साथ अजूनही माझ्याबरोबर होती \q2 आणि माझी मुलेबाळे माझ्याभोवती होती, \q1 \v 6 जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे \q2 आणि खडक माझ्यासाठी जैतुनाच्या तेलाचे झरे ओतून देत असे. \b \q1 \v 7 “जेव्हा मी नगराच्या वेशीमध्ये जाई \q2 आणि माझ्या मानाचे आसन ग्रहण करीत असे, \q1 \v 8 तरुण मला पाहून बाजूला होत असत, \q2 आणि वृद्ध आदराने उभे राहत; \q1 \v 9 अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत \q2 आणि आपल्या मुखांवर हात ठेवीत; \q1 \v 10 सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून \q2 शांतपणे उभे राहत असत. \q1 \v 11 ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत, \q2 आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली. \q1 \v 12 कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, \q2 त्यांची मी सुटका केली. \q1 \v 13 मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; \q2 आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले. \q1 \v 14 नीतिमत्वाला मी पांघरले होते; \q2 न्याय हाच माझा झगा व मुकुट असे. \q1 \v 15 मी अंधाचे नेत्र \q2 आणि पांगळ्यांचे पाय असा होतो. \q1 \v 16 मी गरजवंतांचा पिता होतो; \q2 आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे. \q1 \v 17 मी दुष्टांचे जबडे फाडून \q2 त्यांच्या मुखातून पीडितांना बाहेर ओढून काढले. \b \q1 \v 18 “मी विचार केला की, ‘मी माझ्या घरातच मरण पावेन, \q2 मातीच्या कणांइतके माझ्या आयुष्याचे दिवस असतील. \q1 \v 19 माझी मुळे खोल पाण्यापर्यंत पोहचतील, \q2 आणि रात्रभर दहिवर माझ्या फांद्यांना भिजवतील. \q1 \v 20 माझे वैभव कधीही नष्ट होणार नाही; \q2 आणि माझे धनुष्य सदैव माझ्या हातात नवेच राहील.’ \b \q1 \v 21 “लोक माझे बोलणे उत्सुकतेने ऐकत, \q2 माझ्या सल्ल्याची शांतीने वाट बघत. \q1 \v 22 माझे बोलणे संपल्यावर; \q2 माझे शब्द त्यांच्या कानावर पडल्यावर ते पुन्हा बोलत नसत. \q1 \v 23 पावसाच्या वर्षावाची पाहावी, तशी ते माझी वाट पाहत \q2 माझे शब्द ते वसंत ऋतुतील पावसासारखे प्राशन करीत. \q1 \v 24 मी त्यांच्याकडे हसतमुखाने बघितल्यास ते विश्वास करीत नसत; \q2 माझे मुखतेज त्यांना मोलाचे वाटे. \q1 \v 25 त्यांचा पुढारी म्हणून मी त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन केले; \q2 त्यांच्या सैन्याचा राजा म्हणून मी त्यांच्यात वास केला; \q2 शोक करणार्‍यांचे सांत्वन करणारा असा मी होतो. \b \c 30 \q1 \v 1 “परंतु आता जे माझ्याहून वयाने लहान आहेत, \q2 ते माझी चेष्टा करतात, \q1 ज्यांच्या वडिलांना मी तिरस्काराने \q2 मेंढ्यांचे राखण करणार्‍या कुत्र्यांबरोबर बसविले. \q1 \v 2 त्यांच्या हातच्या सामर्थ्याचा मला काय लाभ, \q2 जेव्हा त्यांचा जोम त्यांच्यात राहिलाच नाही? \q1 \v 3 भुकेने ते निस्तेज पडले आहेत, \q2 रात्रीच्या वेळी शुष्क आणि निर्जन भूमीवर \q2 ते वणवण भटकले. \q1 \v 4 ते औषधी वनस्पतीचा पाला गोळा करत होते, \q2 केरसुणीच्या झाडाची मुळे त्यांचे अन्न होते. \q1 \v 5 त्यांना समाजातून घालवून दिले होते, \q2 जसे चोरांवर ओरडावे तसे त्यांच्यामागून लोक ओरडत होते. \q1 \v 6 त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये, \q2 खडकात आणि भूमीतील बिळांमध्ये राहावे लागले. \q1 \v 7 झुडपांमधून ते कर्कश आवाजात ओरडत \q2 आणि झुडपाखाली दाटून बसत. \q1 \v 8 आधार नसलेल्या आणि अपरिचित पिलावळी सारखे \q2 त्यांना त्यांच्या देशातून हाकलून दिले होते. \b \q1 \v 9 “आणि आता हेच तरुण लोक माझ्या निंदेची गाणी गातात; \q2 मी त्यांच्या चर्चेचा विषय झालो आहे. \q1 \v 10 ते माझा तिरस्कार करतात आणि माझ्यापासून दूर राहतात; \q2 माझ्या तोंडावर थुंकण्यास ते संकोच करीत नाहीत. \q1 \v 11 आता तर परमेश्वरानेच माझ्या कमानीची तार सैल सोडून मला पीडले आहे, \q2 माझ्यासमोर ते अनियंत्रितपणे वागतात. \q1 \v 12 माझ्या उजव्या बाजूने घोळक्‍याने येऊन ते माझ्यावर हल्ला करतात; \q2 आणि माझ्या वाटेवर जाळे पसरवितात, \q2 माझ्याविरुद्ध ते उतरणी बांधतात. \q1 \v 13 ते माझा मार्ग अडवितात; \q2 माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. \q2 ते म्हणतात, ‘याला साहाय्य करणारा कोणीही नाही.’ \q1 \v 14 खिंडारातून हल्ला केल्यासारखे ते माझ्यावर धावून येतात; \q2 माझा नाश करण्यासाठी भग्नावशेषातून ते माझ्यावर लोंढ्यासारखे धावून येतात. \q1 \v 15 भयाने मला ग्रासून टाकले आहे; \q2 माझा मान सन्मान वार्‍याप्रमाणे नष्ट झाला आहे, \q2 आणि माझी सुरक्षा ढगाप्रमाणे सरून गेली आहे. \b \q1 \v 16 “आणि आता माझे जीवन संपुष्टात आले आहे; \q2 पीडेच्या काळाने माझ्यावर पकड घट्ट केली आहे. \q1 \v 17 रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात; \q2 मला छळणार्‍या वेदना थांबत नाहीत. \q1 \v 18 परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत; \q2 वस्‍त्रांच्या गळबंदासारखे ते मला बांधत आहेत. \q1 \v 19 परमेश्वराने मला चिखलात फेकले आहे, \q2 मी धूळ व राख यांच्यासारखा क्षीण झालो आहे. \b \q1 \v 20 “हे परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारतो, पण तुम्ही मला उत्तर देत नाहीत; \q2 मी उभा राहतो, पण तुम्ही केवळ माझ्याकडे नजर टाकता. \q1 \v 21 तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात; \q2 आणि आपल्या हाताच्या बळाने माझ्यावर वार करता. \q1 \v 22 तुम्ही मला ओढून वार्‍यावर उडवून टाकता, \q2 आणि वादळामध्ये भिरकावून फेकले आहे. \q1 \v 23 मला माहीत आहे की तुम्ही मी मरेपर्यंत खाली खेचणार आहात, \q2 अशा ठिकाणी जे सर्व जीवितांसाठी नेमण्यात आले आहे. \b \q1 \v 24 “पीडित मनुष्य जेव्हा त्याच्या मदतीसाठी याचना करतो \q2 तेव्हा खचितच कोणीही त्याला हात देत नाही. \q1 \v 25 संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय? \q2 गरिबांसाठी माझा जीव खिन्न झाला नाही काय? \q1 \v 26 तरीही मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा केली, पण वाईटच मिळाले; \q2 आणि मी प्रकाशाची वाट पाहिली, पण अंधकार आला. \q1 \v 27 माझ्या आतील व्याकुळतेचे मंथन थांबत नाही; \q2 क्लेशाचे दिवस माझ्याशी सामना करतात. \q1 \v 28 मी काळवंडून जात आहे, पण तो उन्हाने नव्हे; \q2 मी सभेत उभा राहून मदतीची याचना करतो. \q1 \v 29 मी कोल्ह्यांचा भाऊ, \q2 आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे. \q1 \v 30 माझी त्वचा काळी पडून ती सोलून निघत आहे; \q2 माझे शरीर तापाने फणफणत आहे. \q1 \v 31 माझी वीणा रडण्याचे, \q2 आणि माझा पावा शोकाचे स्वर काढते. \b \c 31 \q1 \v 1 “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे \q2 की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही. \q1 \v 2 कारण वरून परमेश्वराचा आमच्यासाठी वाटा, \q2 किंवा सर्वसमर्थ्‍याकडून आमचा वारसा काय आहे? \q1 \v 3 दुष्ट लोकांचा विनाश, \q2 आणि पापी लोकांचे अरिष्ट हा नाही काय? \q1 \v 4 माझे मार्ग परमेश्वर पाहात नाही का \q2 आणि माझे प्रत्येक पाऊल ते मोजत नाहीत काय? \b \q1 \v 5 “जर मी खोटेपणात चाललो आहे \q2 किंवा कपटाकडे माझा पाय घाईने उचलले; \q1 \v 6 तर परमेश्वर सत्याच्या तराजूत मला तोलून पाहो \q2 आणि मी निरपराधी आहे हे त्यांना समजेल— \q1 \v 7 जर माझे पाऊल मार्गातून भटकले असतील, \q2 जर माझ्या हृदयाने माझ्या डोळ्यांचे अनुसरण केले असेल, \q2 अथवा माझे हात भ्रष्ट झाले असतील, \q1 \v 8 तर ज्याची पेरणी मी केली, त्याची कापणी दुसरा कोणी करो, \q2 आणि माझे पीक उपटून टाकले जावो. \b \q1 \v 9 “जर माझे हृदय परस्‍त्रीद्वारे भुरळीत झाले असेल, \q2 अथवा मी शेजार्‍याच्या दाराशी दडून बसलो आहे, \q1 \v 10 तर माझी पत्नी परपुरुषाच्‍या घरातील धान्य दळो, \q2 आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो. \q1 \v 11 कारण ते तर खूपच दुष्ट, \q2 आणि दंडास पात्र असे पाप आहे. \q1 \v 12 हा भस्म करणारा अग्नी आहे; \q2 जो माझा हंगाम उपटून टाकेल. \b \q1 \v 13 “जेव्हा माझे सेवक माझ्याविरुद्ध गार्‍हाणे घेऊन आले, \q2 मग ते स्त्री असो वा पुरुष, \q2 तेव्हा मी त्यांना न्याय देण्याचे नाकारले असेल, \q1 \v 14 तर मी परमेश्वराला सामोरे कसे जाणार? \q2 मला जाब विचारावयास बोलाविले असता, मी काय उत्तर देणार? \q1 \v 15 कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय? \q2 एकाच परमेश्वराने आम्हा दोघांना आमच्या मातांच्या उदरात निर्माण केले नाही काय? \b \q1 \v 16 “जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्‍या असतील \q2 अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल, \q1 \v 17 जर मी माझे अन्न स्‍वतःपाशीच ठेवले, \q2 आणि ते मी अनाथांना वाटून दिले नाही— \q1 \v 18 परंतु माझ्या तारुण्याच्या दिवसांपासून पित्याने करावे तसे मी त्यांचे पोषण केले, \q2 आणि माझ्या जन्मापासून मी विधवांचे मार्गदर्शन केले. \q1 \v 19 मी जर कोणाला वस्‍त्राविना, \q2 आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले, \q1 \v 20 त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले \q2 तरीही त्यांच्या हृदयाने मला आशीर्वाद दिला नाही, \q1 \v 21 न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून, \q2 मी जर एखाद्या अनाथावर हात उगारला असेन, \q1 \v 22 तर खांद्यापासून माझा हात गळून पडो, \q2 सांध्‍यापासून ते तुटून जावोत. \q1 \v 23 कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे, \q2 आणि त्यांच्या वैभवाच्या भयनिमित्ताने या सर्वगोष्टी मी केल्या नाहीत. \b \q1 \v 24 “जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन \q2 किंवा शुद्ध सोन्याला म्हटले असते की, ‘तू माझा रक्षक आहेस,’ \q1 \v 25 जर मी माझे मोठे धन, \q2 आणि आपल्या हाताने मिळवलेल्‍या संपत्तीमध्‍ये आनंद बाळगला असेल, \q1 \v 26 जर आकाशात तळपणार्‍या सूर्याकडे पाहून, \q2 अथवा वैभवशाली वाटेने जाणार्‍या चंद्राकडे पाहून, \q1 \v 27 माझे अंतःकरण गुप्तपणे मोहित झाले असेल, \q2 आणि आपल्या हाताच्या चुंबनांने मी त्यांची उपासना केली असेन, \q1 \v 28 तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, \q2 कारण याप्रकारे सर्वोच्च परमेश्वराशी माझे अविश्वासूपण असते. \b \q1 \v 29 “माझ्या शत्रूंची आपत्ती पाहून मी जर कधी आनंद मानला असेन, \q2 किंवा त्याच्यावर अरिष्ट आले म्हणून मी समाधानी झालो असेन; \q1 \v 30 त्यांच्या जीवनाच्या विरोधात शाप उच्चारून \q2 मी आपल्या मुखाला पाप करू दिले नाही; \q1 \v 31 जर माझ्या सेवकांपैकी कधी कोणी म्हटले नाही की, \q2 ‘असे कोण आहे ज्याने इय्योबाच्या घरी मांस खाल्ले नाही?’ \q1 \v 32 परंतु कोणी अनोळखी व्यक्तीने देखील रस्त्यावर रात्र काढली नाही, \q2 कारण प्रवाशांसाठी माझ्या घराचे दार नेहमीच उघडे असे; \q1 \v 33 अथवा इतर लोकांप्रमाणे\f + \fr 31:33 \fr*\ft किंवा \ft*\fqa आदामाप्रमाणे\fqa*\f* मी माझे अपराध झाकून ठेवले असते, \q2 व आपला दोष हृदयात लपवला असता \q1 \v 34 मी कधी मोठ्या जनसमूहाचे भय धरले काय, \q2 कुळाच्या तिरस्काराने मी भयभीत झालो काय, \q2 शांतपणे मी घराबाहेर पडलो नाही काय— \b \q1 \v 35 (“अहा, माझे ऐकणारे कोणी असते! \q2 आता माझ्या समर्थनावर मी सही करतो—सर्वसमर्थ मला उत्तर देवो; \q2 मला दोष देणार्‍याने लेखी दोषारोप द्यावा. \q1 \v 36 तो मी खचित खांद्यावर घेऊन वाहिला असता, \q2 आणि मी तो मुकुटाप्रमाणे डोक्याला बांधला असता. \q1 \v 37 मी सर्वसमर्थाला माझ्या प्रत्येक पावलांचा हिशोब दिला असता; \q2 एखाद्या राज्यकर्त्या समोर, तसे मी ते त्यांच्यासमोर सादर करेन.) \b \q1 \v 38 “किंवा माझी जमीन जर माझ्याविरुद्ध रडत आहे, \q2 आणि तिच्या खाचा जर अश्रूंनी ओल्या झाल्या आहेत, \q1 \v 39 मोल चुकते न करताच जर मी त्याचा उपज खाल्ला असेल \q2 किंवा भाडेकरूंचे मन मोडले असेल, \q1 \v 40 तर मग गव्हाऐवजी वनझुडूप उगवोत \q2 आणि सातूऐवजी तिथे दुर्गंधी गवत येवो.” \p येथे इय्योबाचे भाषण संपले. \c 32 \s1 एलीहूचे प्रत्युत्तर \p \v 1 मग त्या तिघांनी इय्योबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण आपल्या दृष्टीने तो स्वतः नीतिमान होता. \v 2 परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता. \v 3 तीन मित्रांवर देखील तो संतापला कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे इय्योबाचे खंडन केले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी परमेश्वराला दोषी ठरविले होते. \v 4 एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते. \v 5 परंतु जेव्हा एलीहूने पाहिले की आणखी बोलण्यास त्यांच्याजवळ काहीही उरले नाही, त्याचा राग भडकला. \p \v 6 आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला: \q1 “मी वयाने लहान आहे, \q2 व आपण वयोवृद्ध आहात; \q1 म्हणूनच मी घाबरलो, \q2 आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही; \q1 \v 7 मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे; \q2 प्रौढ असलेल्यांनी ज्ञान शिकवावे.’ \q1 \v 8 परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा, \q2 आणि सर्वसमर्थाचा श्वासच आहे की जो शहाणपण देतो. \q1 \v 9 जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते, \q2 जे योग्य ते केवळ वृद्धांनाच समजते असेही नाही. \b \q1 \v 10 “म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका; \q2 मी सुद्धा मला जे माहीत आहे ते सांगतो. \q1 \v 11 तुम्ही बोलत असता, मी प्रतीक्षा करीत बसलो, \q2 जेव्हा तुम्हाला शब्द अपुरे पडत होते; \q1 तेव्हा तुमचे ते तर्कवाद मी ऐकले, \q2 \v 12 लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले. \q1 परंतु तुमच्यातील एकानेही इय्योबाला चुकीचे असे सिध्‍द केले नाही; \q2 तुमच्यापैकी कोणीही त्याच्या वादास प्रत्युत्तर केले नाही. \q1 \v 13 ‘आम्हाला ज्ञान सापडले आहे’ असे म्हणू नका; \q2 ‘परमेश्वराने त्याचे खंडन करावे, मनुष्याने नव्हे.’ \q1 \v 14 परंतु इय्योबाने माझ्याविरुद्ध शब्द लढवले नाहीत, \q2 आणि तुमच्या वादांच्‍या साहाय्याने मी त्याला उत्तर देणार नाही. \b \q1 \v 15 “ते निराश झाले आहेत आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी आणखी काही उरले नाही; \q2 ते शब्‍दरहित झाले आहेत. \q1 \v 16 आता ते तिथे गप्प उभे आहेत, \q2 ते शांत आहेत म्हणून ते बोलतील याची मी वाट का पाहावी? \q1 \v 17 मी देखील माझे म्हणणे सादर करेन; \q2 मला जे माहीत आहे ते मी सुध्‍दा सांगेन. \q1 \v 18 कारण माझ्याकडे भरपूर शब्द आहेत, \q2 आणि माझ्या आत माझा आत्मा मला बोलावयास भाग पाडत आहे; \q1 \v 19 बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या द्राक्षारसा समान, \q2 नवीन बुधला जो फुटायला आला आहे, त्यासारखा मी झालो आहे. \q1 \v 20 मला आराम मिळावा म्हणून मी बोलणारच; \q2 उत्तर देण्यासाठी मी माझे मुख उघडलेच पाहिजे. \q1 \v 21 मी पक्षपात करणार नाही, \q2 ना मी कोणा मनुष्याची उगीच प्रशंसा करणार; \q1 \v 22 कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो, \q2 तर माझा निर्माणकर्ता मला लवकरच घेऊन जाईल. \b \c 33 \q1 \v 1 “परंतु आता हे इय्योबा, माझे शब्द ऐक; \q2 मी जे बोलणार आहे त्या सर्वाकडे लक्ष दे. \q1 \v 2 मी बोलायला माझे मुख उघडत आहे; \q2 माझे शब्द माझ्या जिभेच्या टोकावर आहेत. \q1 \v 3 माझे शब्द सरळ हृदयातून येतात; \q2 माझे ओठ जे मला माहीत आहे तेच खरेपणाने बोलतील. \q1 \v 4 परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे; \q2 आणि सर्वसमर्थाचा श्वास मला जीवन देतो. \q1 \v 5 तुला उत्तर देता येत असेल, तर मला उत्तर दे; \q2 ऊठ आणि तुझा खटला माझ्यासमोर चालव. \q1 \v 6 परमेश्वरासमोर जसा तू, तसा मीही आहे; \q2 मी सुद्धा मातीचा घडविलेला आहे. \q1 \v 7 माझे भय बाळगण्याची तुला गरज नाही, \q2 किंवा माझा हात तुझ्यावर भारी नसो. \b \q1 \v 8 “तुला असे बोलताना मी ऐकले आहे— \q2 हेच शब्द मी ऐकले आहेत— \q1 \v 9 ‘मी शुद्ध आहे, मी काही पाप केले नाही; \q2 मी स्वच्छ आणि दोषविरहीत आहे. \q1 \v 10 तरी देखील परमेश्वराला माझ्यात दोष सापडला आहे; \q2 आणि ते मला त्यांचा शत्रू मानतात. \q1 \v 11 ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात; \q2 आणि माझ्या सर्व मार्गावर कडक नजर ठेवतात.’ \b \q1 \v 12 “परंतु मी तुला सांगतो, याबाबतीत तू चुकतोस, \q2 कारण परमेश्वर कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे. \q1 \v 13 तू त्यांच्याविरुद्ध तक्रार का करतोस \q2 की ते कोणाच्याही शब्दास प्रतिसाद देत नाही? \q1 \v 14 कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्‍या मार्गाने मानवांशी बोलत असतात— \q2 जरी कोणाला त्याचे अवलोकन होत नाही. \q1 \v 15 रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये, \q2 जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते \q2 त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना, \q1 \v 16 परमेश्वर त्यांच्या कानात बोलून \q2 आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात, \q1 \v 17 म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील \q2 आणि अहंकारापासून दूर राहतील, \q1 \v 18 खड्ड्यात पडण्यापासून \q2 आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील. \b \q1 \v 19 “किंवा काहींना वेदनादायक बिछान्यावर \q2 त्यांच्या हाडांमध्ये सततच्‍या क्लेशाने शासन होते, \q1 \v 20 अशासाठी की त्यांच्या शरीराला अन्नाची किळस वाटेल \q2 आणि त्यांचा जीव मिष्टान्नाचा तिरस्कार करतो. \q1 \v 21 त्यांचे मांस दिसेनासे होते, \q2 आणि त्यांची लपलेली हाडे आता बाहेर लटकलेली दिसतात. \q1 \v 22 ते त्यांच्या कबरेजवळ पोहोचतात, \q2 आणि त्यांचे जीवन मृतांच्या ठिकाणाकडे\f + \fr 33:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa मृतांच्या संदेष्ट्यांच्या ठिकाणाकडे\fqa*\f* जाऊन ठेपते. \q1 \v 23 तरीही त्यांच्या बाजूला जर एखादा दूत, \q2 हजारांमधला कोणी एक मनुष्य निरोप्या असला, \q2 जो न्यायी जीवन कसे जगावे याविषयी सांगण्यासाठी पाठविलेला असला, \q1 \v 24 आणि त्या व्यक्तीबद्दल दया दाखवून तो परमेश्वराला म्हणतो, \q2 ‘त्यांना मरणाकडे जाण्यापासून वाचवा; \q2 त्यांच्यासाठी खंडणी मला मिळाली आहे— \q1 \v 25 लहान लेकराप्रमाणे त्यांचे मांस पुन्हा भरून येवो; \q2 तरुणपणाच्या दिवसांप्रमाणे त्यांची पुनर्रचना होवो’; \q1 \v 26 मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल, \q2 ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील; \q2 आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील. \q1 \v 27 मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील, \q2 ‘मी पाप केले होते, जे सरळ ते मी विकृत केले, \q2 परंतु ज्यास मी पात्र होतो ते मला मिळाले नाही. \q1 \v 28 परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या गर्तेत जाण्यापासून वाचविले, \q2 आणि जीवनाच्या प्रकाशाचा आनंद उपभोगत मी जीवन जगेन.’ \b \q1 \v 29 “परमेश्वर मानवासाठी या सर्वगोष्टी करतात; \q2 दोनदा किंवा तीनदाही ते करीत असतात— \q1 \v 30 त्याचा जीव त्या गर्तेपासून फिरवितात, \q2 यासाठी की जीवनाचा प्रकाश त्याच्यावर उज्वल व्हावा. \b \q1 \v 31 “हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक; \q2 तू शांत राहा आणि मी बोलेन. \q1 \v 32 जर तुला काही बोलायचे असेल तर मला उत्तर दे; \q2 बोल, कारण तुझे समर्थन मी करावे असे मला वाटते. \q1 \v 33 परंतु जर नाही तर माझे ऐक; \q2 तू शांत राहा आणि मी तुला ज्ञान शिकवेन.” \c 34 \p \v 1 मग एलीहू पुढे म्हणाला: \q1 \v 2 “सुज्ञ लोकहो, माझे शब्द ऐका; \q2 विद्वानांनो, तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका. \q1 \v 3 कारण कानाला शब्दाची पारख आहे \q2 जशी जिभेला अन्नाची चव आहे. \q1 \v 4 आमच्यासाठी जे योग्य ते जाणून घेऊ या; \q2 आणि जे उत्तम ते एकत्र शिकू या. \b \q1 \v 5 “इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे, \q2 परंतु परमेश्वर मला न्याय देत नाहीत. \q1 \v 6 मी जरी अचूक आहे, \q2 तरी मला लबाड ठरविले जाते; \q1 मी जरी दोष विरहित आहे, \q2 भरणार नाही अशा जखमांनी त्यांचे बाण मला घायाळ करतात.’ \q1 \v 7 इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय, \q2 जो पाण्याप्रमाणे उपहास पितो? \q1 \v 8 तो दुष्टांची सोबत धरतो; \q2 तो दुष्कर्म करणार्‍यांशी संबंध ठेवतो. \q1 \v 9 कारण तो म्हणतो, ‘परमेश्वराला प्रसन्न करण्यात \q2 काही लाभ नाही.’ \b \q1 \v 10 “तर अहो समंजस मनुष्यांनो, माझे ऐका. \q2 वाईट करणे हे परमेश्वरापासून \q2 आणि अयोग्य करावे असे सर्वसमर्थापासून दूरच असो. \q1 \v 11 ते मनुष्याला त्याच्या कृत्यांचे प्रतिफळ देतात; \q2 आणि त्यांच्या वर्तनास अनुरूप असे फळ त्यांना देतात. \q1 \v 12 परमेश्वर चूक करतील, \q2 किंवा सर्वसमर्थ न्याय विपरीत करतील हे अकल्पनीय आहे. \q1 \v 13 त्यांची या पृथ्वीवर कोणाला नियुक्त केले? \q2 किंवा संपूर्ण जगाचा अधिकार त्यांना कोणी दिला? \q1 \v 14 जर त्यांच्या मनास आले \q2 आणि आपला आत्मा व श्वास काढून घेतला, \q1 \v 15 तर सर्व मानवजात एकदम नष्ट होईल \q2 आणि मनुष्यप्राणी परत धुळीला जाऊन मिळेल. \b \q1 \v 16 “तुम्हाला जर समज आहे, तर हे ऐका; \q2 मला काय बोलायचे आहे ते लक्षपूर्वक ऐका. \q1 \v 17 जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय? \q2 जो नीतिमान आणि बलवान त्याचे तू खंडन करशील काय? \q1 \v 18 ‘तुम्ही मूल्यहीन आहात,’ असे राजांना सांगणारे, \q2 आणि ‘तुम्ही दुष्ट आहात’ असे सज्जनांना म्हणणारे परमेश्वरच नाही काय? \q1 \v 19 जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही \q2 आणि गरिबांपेक्षा श्रीमंतावर उपकार करत नाही, \q2 कारण ते सर्व त्यांचीच हस्तकृती नाहीत काय? \q1 \v 20 मध्यरात्री, एका क्षणात त्यांचा अंत होतो; \q2 लोक डळमळतात आणि नाहीसे होतात; \q2 मानवी मदतीशिवाय बलवान काढून टाकले जातात. \b \q1 \v 21 “मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत; \q2 परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे. \q1 \v 22 कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे, \q2 जिथे दुष्कर्मी लपू शकतील. \q1 \v 23 लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही, \q2 जेणेकरून त्यांनी न्यायासाठी त्यांच्यासमोर यावे. \q1 \v 24 चौकशी न करताच ते बलवानांना छिन्नभिन्न करतात \q2 आणि त्यांच्या स्थानी दुसर्‍यास स्थापितात. \q1 \v 25 कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात, \q2 रात्रीच्या वेळी ते दुष्टाला उलथून टाकतात आणि ते तुडविले जातात. \q1 \v 26 आणि सर्व लोक पाहू शकतील \q2 अशी शिक्षा त्यांच्या दुष्टपणामुळे परमेश्वर त्यांना करतात, \q1 \v 27 कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत \q2 आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही. \q1 \v 28 त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत \q2 अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील. \q1 \v 29 परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल? \q2 जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल? \q1 तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत, \q2 \v 30 अशासाठी की देवहीन मनुष्याला अधिकार देण्यापासून \q2 आणि लोकांसाठी जाळे टाकण्यापासून प्रतिबंध करता यावा. \b \q1 \v 31 “समजा कोणी परमेश्वराला म्हटले, \q2 ‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही. \q1 \v 32 मी पाहू शकत नाही ते मला शिकवा; \q2 मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’ \q1 \v 33 जेव्हा तुम्ही पश्चात्ताप करण्याचे नाकारता \q2 तरी परमेश्वराने तुमच्या अटींनुसार न्याय द्यावा काय? \q1 मी नाही तर तुम्हीच ते ठरविले पाहिजे; \q2 म्हणून तुम्हाला काय माहीत आहे ते मला सांगा. \b \q1 \v 34 “बुद्धिमान मनुष्य जाहीर करतात, \q2 ज्ञानी लोक जे माझे बोलणे ऐकतात ते म्हणतात, \q1 \v 35 ‘इय्योब अज्ञानाने बोलत आहे; \q2 त्याच्या बोलण्यात सुज्ञता नाही.’ \q1 \v 36 त्या इय्योबाची पूर्णपणे पारख केली जावी \q2 कारण तो दुष्‍टांप्रमाणे बोलत आहे! \q1 \v 37 कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो; \q2 आमच्यामध्ये तिरस्काराने हातांनी टाळ्या वाजवितो \q2 आणि परमेश्वराविरुद्ध आपले शब्द वाढवितो.” \c 35 \p \v 1 एलीहू पुढे म्हणाला: \q1 \v 2 “हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? \q2 तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’ \q1 \v 3 तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने \q2 मला काय फायदा आणि मी काय मिळविणार?’ \b \q1 \v 4 “तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना \q2 मला उत्तर द्यायला आवडेल. \q1 \v 5 वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा; \q2 तुझ्याहून फार उंच असलेल्या ढगांकडे निरखून पाहा. \q1 \v 6 जर तू पाप केलेस, तर परमेश्वरावर काय परिणाम होणार? \q2 तुझी पापे जरी पुष्कळ आहेत, तरी त्याचे त्यांना काय? \q1 \v 7 जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार, \q2 किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते? \q1 \v 8 तुझा दुष्टपणा केवळ तुझ्यासारख्याच मानवांवर, \q2 आणि तुझे न्यायीपण इतर लोकांवर परिणाम करू शकतात. \b \q1 \v 9 “अत्याचाराच्या भाराने लोक आक्रोश करतात; \q2 बलवान मनुष्याच्या हातून सुटकेसाठी आरोळी करतात. \q1 \v 10 तरी देखील कोणीही म्हणत नाही, ‘परमेश्वर माझा निर्माणकर्ता कुठे आहे, \q2 जे रात्रीच्या वेळी गीत देतात, ते कुठे आहेत, \q1 \v 11 जे पृथ्वीवरील पशूंपेक्षा आम्हाला जास्त शिकवण देतात, \q2 आणि आकाशातील पक्ष्यांपेक्षा आम्हाला अधिक ज्ञानी बनवितात?’ \q1 \v 12 परंतु दुष्टाच्या अहंकारामुळे \q2 जेव्हा ते लोक आरोळी मारतात तेव्हा परमेश्वर उत्तर देत नाहीत. \q1 \v 13 खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत; \q2 सर्वसमर्थ त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. \q1 \v 14 मग ते तुझे कसे ऐकतील, \q2 जेव्हा तू म्हणतो की तुला ते दिसत नाहीत, \q1 की तुझा वाद त्यांच्यासमोर आहे \q2 आणि तू त्यांची वाट पाहावी, \q1 \v 15 आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही \q2 आणि दुष्टतेची थोडी सुद्धा नोंद घेत नाही. \q1 \v 16 म्हणून इय्योब रिकाम्या शब्दांनी आपले मुख उघडतो; \q2 आणि ज्ञानाशिवाय शब्द वाढवित राहतो.” \c 36 \p \v 1 एलीहू पुढे म्हणाला: \q1 \v 2 “अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन \q2 की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे. \q1 \v 3 माझे ज्ञान मला फार दुरून मिळते; \q2 माझ्या निर्माणकर्त्याचे न्यायीपण मी वर्णन करून सांगेन. \q1 \v 4 ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत; \q2 ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे. \b \q1 \v 5 “परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही; \q2 ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत. \q1 \v 6 दुष्टांना ते जिवंत ठेवत नाही \q2 परंतु पीडितांना त्यांचे हक्क देतात. \q1 \v 7 न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही; \q2 राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात \q2 आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात. \q1 \v 8 परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत, \q2 आणि दुःखाच्या दोरखंडात जखडलेले आहेत, \q1 \v 9 त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात— \q2 त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे. \q1 \v 10 ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात \q2 आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात. \q1 \v 11 जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली, \q2 तर त्यांच्या आयुष्याचे बाकीचे दिवस ते समृद्धीत घालवतील \q2 आणि संतृप्तीची वर्षे बघतील. \q1 \v 12 परंतु जर ते ऐकणार नाहीत, \q2 तर तलवारीने ते नाश होतील \q2 आणि ज्ञाना अभावी मरण पावतील. \b \q1 \v 13 “देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात; \q2 त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही. \q1 \v 14 त्यांच्या भर तारुण्यातच \q2 मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह\f + \fr 36:14 \fr*\ft मूळ अर्थ \ft*\fqa मंदिरात लैंगिक व्यवसायात लावलेले\fqa*\f* ते मरण पावतात. \q1 \v 15 परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात; \q2 त्यांच्या दुःखात ते त्यांच्याशी बोलतात. \b \q1 \v 16 “दुःखाच्या जाभाड्यातून ते तुला निमंत्रण देतात \q2 आणि विशाल व मर्यादा नसलेल्या ठिकाणी, \q2 तुझ्या आरामदायी मेजावर मिष्टान्नांनी परमेश्वर तुला तृप्त करतात. \q1 \v 17 परंतु आता दुष्टांमुळे तुझ्यावर दंड लादला आहे; \q2 शिक्षा आणि न्याय यांनी तुझी पकड घेतली आहे. \q1 \v 18 सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये; \q2 आणि मोठी लाच देऊन तुला कोणी भटकू देऊ नये. \q1 \v 19 तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न \q2 संकटात पडण्यापासून तुला उचलून धरतील काय? \q1 \v 20 लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी, \q2 रात्रीच्या समयाची इच्छा करू नकोस. \q1 \v 21 दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे, \q2 कारण असेच दिसते की तू कष्टापेक्षा दुष्टतेची निवड करतोस. \b \q1 \v 22 “परमेश्वर त्यांच्या सामर्थ्यात उंचावलेले आहेत. \q2 त्यांच्यासारखा दुसरा शिक्षक कोण आहे? \q1 \v 23 त्यांचे मार्ग त्यांच्यासाठी कोणी विदित केले आहेत, \q2 किंवा, ‘तुम्ही दुष्कृत्य केले आहे’ असे त्यांना कोण म्हणणार? \q1 \v 24 ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, \q2 ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर. \q1 \v 25 सर्व मानवजातीने हे पाहिले आहे; \q2 मनुष्य दुरूनच त्याच्याकडे टक लावून पाहतात. \q1 \v 26 परमेश्वर किती महान आहे—ते समजणे आमच्या बुद्धीपलीकडे आहे! \q2 त्यांच्या आयुष्याच्या संख्येचे आकलन करता येत नाही. \b \q1 \v 27 “ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात, \q2 आणि झर्‍यासाठी त्याचे रूपांतर पावसात करतात; \q1 \v 28 मेघ आपले दहिवर खाली ओततात \q2 आणि मनुष्यांवर भरपूर वृष्टी होते. \q1 \v 29 ढगांना त्यांनी कसे पसरविले आहे, \q2 आपल्या मंडपातून ते कसे गडगडाट करतात हे कोणाला समजते? \q1 \v 30 पाहा ते कशाप्रकारे आपल्या सभोवती वीज विखरून ठेवतात, \q2 आणि समुद्राच्या खोलीला झाकून घेतात. \q1 \v 31 अशाप्रकारे परमेश्वर राष्ट्रांवर अधिकार\f + \fr 36:31 \fr*\ft किंवा \ft*\fqa पोषण\fqa*\f* करतात \q2 आणि विपुलतेने अन्न पुरवितात. \q1 \v 32 चमकणार्‍या विजेला ते आपल्या हातात भरतात \q2 आणि त्याच्या नेमाने तडाखा करण्यास आज्ञा करतात. \q1 \v 33 त्यांचा गडगडाट येणार्‍या वादळाची घोषणा करते; \q2 पशूप्राण्यांना सुद्धा त्यांच्या येण्याचे पूर्वज्ञान होते. \b \c 37 \q1 \v 1 “हे ऐकून माझे हृदय धडधडते \q2 ते आपल्याच ठिकाणी झेप घेते. \q1 \v 2 ऐका! परमेश्वराच्या डरकाळीचा आवाज ऐका, \q2 ती गर्जना जी त्यांच्या मुखातून येते. \q1 \v 3 संपूर्ण आकाशाच्या खालून ते लखलखीत वीज मोकळी सोडतात \q2 आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवितात. \q1 \v 4 त्यानंतर त्यांच्या डरकाळीचा आवाज येतो; \q2 त्यांच्या राजेशाही आवाजात ते गडगडतात. \q1 जेव्हा त्यांचा आवाज सगळीकडे घुमतो, \q2 तेव्हा ते काहीही मागे धरून ठेवीत नाहीत. \q1 \v 5 परमेश्वराची वाणी आश्चर्यकारकरित्या गर्जना करते; \q2 आमच्या बुद्धीपलीकडील महान कार्य ते करतात. \q1 \v 6 हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’ \q2 आणि पावसाच्या सरींना, ‘मुसळधार वृष्टी होवो’ असे सांगतात. \q1 \v 7 त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येकाने परमेश्वराचे कार्य ओळखावे, \q2 म्हणून ते सर्व लोकांचे कामकाज बंद करतात. \q1 \v 8 वनपशू लपून राहतात; \q2 अथवा त्यांच्या गुहांमध्येच राहतात. \q1 \v 9 त्यांच्या भवनामधून तुफान येते, \q2 आणि वादळी वार्‍यातून थंडी येते. \q1 \v 10 परमेश्वराचा श्वास बर्फ तयार करते, \q2 आणि मोठ्या पाण्याचा प्रवाह गोठून जातो. \q1 \v 11 ते मेघांना दहिवराने भरून टाकतात; \q2 आणि त्यातूनच त्यांची लखलखीत वीज पसरवितात. \q1 \v 12 परमेश्वर जे काही त्यांना मार्गदर्शन करून सांगतात \q2 ते संपूर्ण पृथ्वीवर करण्यासाठी \q2 त्यांच्या दिशेने ते चोहीकडे फिरतात. \q1 \v 13 लोकांना शासन करावे म्हणून, \q2 किंवा पृथ्वीला पाणी देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करावे म्हणून ते मेघ आणतात. \b \q1 \v 14 “हे इय्योबा, लक्षपूर्वक ऐक; \q2 थांब आणि परमेश्वराची आश्चर्यकर्मे समजून घे. \q1 \v 15 परमेश्वर मेघांवर कसे नियंत्रण करतात \q2 आणि त्यांची वीज कशी चमकवितात हे तुला माहीत आहे का? \q1 \v 16 मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का \q2 त्यांच्या त्या अद्भुत कृत्यांचे परिपूर्ण ज्ञान कोणाला आहे? \q1 \v 17 जेव्हा तुझ्या वस्त्रांमध्ये तुला घाम फुटतो \q2 आणि दक्षिणेच्या वार्‍यामुळे भूमी स्तब्ध होते, \q1 \v 18 आकाश जे साच्यात असलेल्या कास्य आरशाप्रमाणे आहे, \q2 ते परमेश्वराबरोबर तू पसरवशील काय? \b \q1 \v 19 “आपण त्यांच्याशी काय बोलावे ते आम्हाला सांग; \q2 आपल्या अंधकारामुळे आपला वाद आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. \q1 \v 20 मला बोलायचे आहे असे त्यांना सांगावे काय? \q2 आपणास गिळून टाकावे म्हणून कोणी विचारतील काय? \q1 \v 21 आता सूर्याकडे कोणीही बघू शकत नाही, \q2 तो आकाशांमध्ये किती प्रखर आहे \q2 वार्‍याने त्या मेघांना साफ पुसून टाकले आहे. \q1 \v 22 उत्तरेकडून ते सोनेरी वैभवाने येत आहे; \q2 होय, परमेश्वर अप्रतिम ऐश्वर्याने येत आहेत. \q1 \v 23 सर्वसमर्थ आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत आणि ते सामर्थ्याने उन्नत आहेत; \q2 त्यांच्या न्यायात आणि महान नीतिमत्वात ते जुलूम करीत नाही. \q1 \v 24 म्हणून लोक त्यांची श्रद्धा बाळगतात, \q2 कारण जे सर्व हृदयाने ज्ञानी आहेत त्यांच्याप्रती परमेश्वराला आदर नाही काय?” \c 38 \s1 याहवेह इय्योबाशी बोलतात \p \v 1 मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले: \q1 \v 2 “हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी \q2 माझ्या योजना अस्पष्ट करतो? \q1 \v 3 पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे; \q2 मी तुला प्रश्न विचारेन, \q2 आणि तू मला उत्तर देशील. \b \q1 \v 4 “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? \q2 तुला समजत असेल तर सांग. \q1 \v 5 तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार! \q2 तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले? \q1 \v 6 तिचे पाये कशावर रोवले आहे, \q2 किंवा तिची कोनशिला कोणी बसवली— \q1 \v 7 जेव्हा प्रभात तार्‍यांनी एकत्र गाणी गाईली \q2 आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता? \b \q1 \v 8 “सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला \q2 तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले, \q1 \v 9 जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली \q2 आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले, \q1 \v 10 जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या \q2 आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली, \q1 \v 11 जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही; \q2 तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’? \b \q1 \v 12 “तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, \q2 किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे, \q1 \v 13 यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील \q2 आणि दुष्टांना त्यातून झटकून टाकतील? \q1 \v 14 जशी शिक्क्याच्या खाली ओली माती, तशी पृथ्वी आकार घेते; \q2 आणि वस्त्रासारखी त्याची मुद्रा उठून दिसते. \q1 \v 15 दुष्टांपासून त्यांचा प्रकाश मागे रोखला जातो, \q2 आणि त्यांचा उगारलेला हात मोडला जातो. \b \q1 \v 16 “समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय \q2 किंवा त्याच्या खोल गर्तेमध्ये कधी चालत गेलास काय? \q1 \v 17 मृत्यूची द्वारे तुला दाखविली गेली आहेत काय? \q2 अति खोल अंधकाराचे दरवाजे तू पाहिलेस काय? \q1 \v 18 पृथ्वीचा विस्तार केवढा आहे याचे आकलन तुला झाले आहे का, \q2 हे सर्व जर तू जाणतोस तर मला सांग. \b \q1 \v 19 “प्रकाशाच्या निवासस्थानाकडे नेणारी वाट कोणती आहे? \q2 आणि अंधार कुठे वस्ती करतो? \q1 \v 20 त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय? \q2 त्यांच्या घराच्या वाटा तुला माहीत आहेत काय? \q1 \v 21 तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता! \q2 तू तर पुष्कळ वर्षे जगला आहेस! \b \q1 \v 22 “हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय \q2 किंवा गारांची भांडारे तू पाहिलीस काय? \q1 \v 23 जी मी संकट काळासाठी, \q2 लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो? \q1 \v 24 आकाशात चमकणारी वीज कुठून पांगवली जाते, \q2 किंवा जिथून पूर्वेचा वारा पृथ्वीवर विखुरला जातो, त्याचा मार्ग कुठे आहे? \q1 \v 25 मुसळधार पावसासाठी प्रवाह, \q2 आणि वादळी पावसाची वाट कोण खणतात, \q1 \v 26 म्हणजे ज्या भूमीवर कोणीही लोक राहत नाहीत, \q2 निर्जन वाळवंटामध्ये पाणी पुरवठा करू शकेल, \q1 \v 27 यासाठी की ते ओसाड उजाड भूमीला तृप्त करेल \q2 व तिथे गवत उगवू शकेल? \q1 \v 28 पावसाला पिता आहे का? \q2 दहिवराच्या थेंबांचा पिता कोण आहे? \q1 \v 29 बर्फ कोणाच्या उदरातून येते? \q2 आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते \q1 \v 30 जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते, \q2 जेव्हा खोल सागराचा पृष्ठभाग गोठून जातो? \b \q1 \v 31 “कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? \q2 मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय? \q1 \v 32 तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय \q2 सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय? \q1 \v 33 स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? \q2 परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय? \b \q1 \v 34 “ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय \q2 पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय? \q1 \v 35 आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? \q2 ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय? \q1 \v 36 पाणपक्ष्याला\f + \fr 38:36 \fr*\ft किंवा \ft*\fqa काळा कंकर\fqa*\f* ज्ञान कोण देते, \q2 किंवा कोंबड्याला समज कोणी दिला? \q1 \v 37-38 मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? \q2 जेव्हा माती कडक होते, \q1 आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? \q2 तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील? \b \q1 \v 39 “सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? \q2 तरुण सिंहांची भूक तू शमवतोस\f + \fr 38:39 \fr*\fq भूक तू शमवतोस \fq*\ft किंवा \ft*\fqa जीव तू भरतोस\fqa*\f* का? \q1 \v 40 ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात \q2 किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात? \q1 \v 41 कावळ्यांना अन्न कोण पुरवितो \q2 जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात \q2 आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात? \b \c 39 \q1 \v 1 “रानशेळ्या कधी प्रसवितात हे तू जाणतो काय? \q2 हरिणी आपल्या पाडसाला जन्म देताना तू पाहतो का? \q1 \v 2 प्रसवे पर्यंत त्यांचे महिने तू मोजतो काय? \q2 त्यांचा प्रसविण्याचा समय तुला कळतो काय? \q1 \v 3 त्या ओणवतात आणि आपल्या पिलांना प्रसवितात; \q2 व त्यांच्या प्रसूती वेदना संपतात. \q1 \v 4 त्यांच्या पिल्लांची भरभराट होते व मोकळ्या रानात ते जोमाने वाढतात; \q2 ते सोडून जातात व परत येत नाहीत. \b \q1 \v 5 “रानगाढवांना कोणी मोकळे सोडून दिले? \q2 त्यांचे दोर कोणी सोडले? \q1 \v 6 मीच त्यांना रान त्यांचे घर म्हणून दिले आहे, \q2 आणि क्षारभूमी त्यांचे वसतिस्थान म्हणून दिले आहे. \q1 \v 7 नगरातील गोंधळाला ते हसतात; \q2 चालकाची ओरड त्याला ऐकू येत नाही. \q1 \v 8 टेकड्यांवर कुरणासाठी ते रांगा धरतात \q2 आणि जे काही हिरवेगार ते शोधत असतात. \b \q1 \v 9 “रानबैल तुझी सेवा करण्यासाठी संमती देईल काय? \q2 रात्रीच्या वेळी तो तुझ्या गोठ्यात राहील काय? \q1 \v 10 त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय? \q2 तुझ्यामागे जमिनीची मशागत तो करेल काय? \q1 \v 11 त्याच्या मोठ्या बलावर तू अवलंबून राहशील काय? \q2 तुझी जड कामे तू त्याच्यावर सोडशील काय? \q1 \v 12 खळ्यातून तुझे धान्य खेचून घेऊन \q2 ते तुझ्या मळणीपर्यंत तो ते आणेल असा तू त्याच्यावर विश्वास ठेवशील काय? \b \q1 \v 13 “जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्‍याशी \q2 त्यांची तुलना करता येत नाही \q2 तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात. \q1 \v 14 ती धुळीत आपली अंडी देते \q2 आणि वाळूमध्ये ती उबविते, \q1 \v 15 एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील, \q2 किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही. \q1 \v 16 ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत; \q2 तिच्या प्रसूती वेदना व्यर्थ गेल्या याचे तिला काहीच वाटत नाही, \q1 \v 17 कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही \q2 किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही. \q1 \v 18 परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते, \q2 तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते. \b \q1 \v 19 “घोड्याला त्याचे बळ तू देतोस काय \q2 अथवा त्याच्या मानेवर आयाळ तू पांघरलेस काय? \q1 \v 20 टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय? \q2 जे त्यांच्या गर्विष्ठपणात आतंक व्यक्त करतात? \q1 \v 21 ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो, \q2 आणि शत्रूशी सामना करण्यासाठी धावून येतो. \q1 \v 22 तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही; \q2 तलवारीपासून तो मागे हटत नाही. \q1 \v 23 त्याच्या पाठीवर असलेला भाता; \q2 व त्याच्याबरोबर ठेवलेला चमकणारा भाला व बरची खणखणत असते. \q1 \v 24 तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो; \q2 रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही. \q1 \v 25 तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो, \q2 दुरूनच तो लढाईचा वास घेतो, \q2 मग ती सेनापतीची ओरड असो किंवा रणगर्जना. \b \q1 \v 26 “बहिरी ससाणा उंच उडतो, \q2 आणि आपले पंख दक्षिणेकडे पसरतो, ते तो तुझ्या ज्ञानाने करतो काय? \q1 \v 27 तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्‍या मारत \q2 आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय? \q1 \v 28 तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो; \q2 खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे. \q1 \v 29 तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो; \q2 त्याच्या नेत्रास ते दुरूनच दिसते. \q1 \v 30 तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात. \q2 आणि जिथे मेलेले असतात, तिथे ती असतात.” \c 40 \p \v 1 याहवेहने इय्योबास पुढे म्हटले, \q1 \v 2 “जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का? \q2 जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!” \p \v 3 तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला: \q1 \v 4 “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? \q2 मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो. \q1 \v 5 मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; \q2 दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.” \p \v 6 मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले: \q1 \v 7 “पुरुषासारखी आपली कंबर कस; \q2 मी तुला प्रश्न विचारतो, \q2 आणि तू मला त्याचे उत्तर देशील. \b \q1 \v 8 “माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय? \q2 स्वतःचे समर्थन करावे म्हणून तू मला दोष लावशील काय? \q1 \v 9 तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय, \q2 तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय? \q1 \v 10 मग गौरव आणि वैभव यांनी स्वतःला सुशोभित कर, \q2 आणि सन्मान व ऐश्वर्य ही परिधान कर. \q1 \v 11 तू आपल्या क्रोधाचा त्वेष मोकळा सोडून दे, \q2 आणि प्रत्येक गर्विष्ठाकडे पाहा व त्यांना खाली वाकव, \q1 \v 12 जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर. \q2 दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव. \q1 \v 13 त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक; \q2 कबरेमध्ये त्यांची तोंडे कफनवस्त्रांनी झाकून टाक. \q1 \v 14 मग मी स्वतः हे मान्य करेन \q2 की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो. \b \q1 \v 15 “बेहेमोथ\f + \fr 40:15 \fr*\fq बेहेमोथ \fq*\ft किंवा \ft*\fqa पाणगेंड्यासारखा प्रचंड प्राणी\fqa*\f* कडे पाहा, \q2 तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले. \q2 तो बैलाप्रमाणे गवत खातो. \q1 \v 16 त्याच्या कमरेत किती शक्ती आहे, \q2 आणि त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत! \q1 \v 17 गंधसरूप्रमाणे त्याचे शेपूट झोकांडत असते. \q2 त्याच्या मांड्यांच्या हाडांचे स्नायू एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. \q1 \v 18 त्याची हाडे कास्याच्या नळ्यासमान आहेत; \q2 त्याचे अवयव पोलादी गजासारखे आहेत. \q1 \v 19 परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे, \q2 तरीही त्याचा उत्पन्नकर्ता त्याच्याजवळ तलवार घेऊनच जातो. \q1 \v 20 डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात; \q2 आणि सर्व वनपशू त्याच्याभोवती खेळतात. \q1 \v 21 कमलिनीखाली तो पडून राहतो, \q2 लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो. \q1 \v 22 कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात; \q2 ओढ्याच्या सभोवतीची उंच वाळुंजे त्याला वेढून घेतात. \q1 \v 23 उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही; \q2 यार्देनेचा ओघ त्याच्या तोंडावर वेगाने आला तरी तो सुरक्षित असतो. \q1 \v 24 उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय, \q2 किंवा त्याला जाळ्यात अडकवून त्याचे नाक टोचतील काय? \b \c 41 \q1 \v 1 “लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय \q2 किंवा त्याच्या जिभेला दोर बांधू शकशील काय? \q1 \v 2 त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय \q2 किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय? \q1 \v 3 दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय? \q2 तो तुझ्याशी सौम्य शब्दांनी बोलेल काय? \q1 \v 4 जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे \q2 म्हणून तो तुझ्याशी करार करेल का? \q1 \v 5 एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय \q2 किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील? \q1 \v 6 विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय? \q2 व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय? \q1 \v 7 त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय \q2 किंवा मत्स्यबाण त्याच्या डोक्यात खुपसता येईल काय? \q1 \v 8 जर तू आपला हात त्याच्यावर ठेवला, \q2 तर त्या संघर्षाचे तुला स्मरण होऊन तसे तू पुन्हा कधीही करणार नाही! \q1 \v 9 त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे; \q2 तो केवळ नजरेसमोर असणेच अत्यंत तीव्रतेचे आहे. \q1 \v 10 त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही. \q2 तर मग माझ्याविरुद्ध कोण उभा राहील? \q1 \v 11 मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे? \q2 आकाशाखाली आहे ते सर्वकाही माझेच आहे. \b \q1 \v 12 “लिव्याथानाचे अवयव, \q2 त्याची शक्ती आणि त्याच्या शरीराच्या आकर्षक आकाराविषयी बोलण्यास मी चुकणार नाही. \q1 \v 13 त्याची बाह्य कातडी कोण उतरवू शकणार? \q2 त्याच्या दुहेरी चिलखतामधून कोण भेद करू शकेल? \q1 \v 14 जी भयानक दातांनी घेरलेली आहे, \q2 अशी त्याची मुखद्वारे उघडण्याचे धाडस कोणाला आहे? \q1 \v 15 त्याच्या पाठीवर ढालीच्या रांगा आहेत \q2 ज्या घट्ट एकत्र मुद्रित केलेल्या आहेत; \q1 \v 16 ती एकमेकांना इतकी जखडून आहेत \q2 की त्यामधून हवा देखील पार होऊ शकत नाही. \q1 \v 17 ती एकमेकांना घट्ट जोडलेली आहेत; \q2 ती एकमेकांना लगटून असतात आणि ती वेगळी करता येत नाहीत. \q1 \v 18 त्याच्या फुरफुरण्यातून प्रकाशाचे झोत येतात; \q2 त्याचे डोळे प्रभात किरणांसारखे आहेत. \q1 \v 19 त्याच्या मुखातून ज्वाला उफाळून येतात; \q2 अग्नीच्या ठिणग्या बाहेर उसळतात. \q1 \v 20 जळत्या लव्हाळ्यावर उकळत असलेल्या पात्रातून यावा \q2 तसा त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत असतो. \q1 \v 21 त्याच्या श्वासाने कोळसा पेट घेतो, \q2 आणि त्याच्या मुखातून तापलेल्या ज्वाला पडतात. \q1 \v 22 त्याच्या मानेत सामर्थ्य राहते; \q2 त्याच्यापुढे भीती चालत असते. \q1 \v 23 त्याच्या मांसाचे थर घट्टपणे जोडलेले आहेत; \q2 ते दृढ आणि अढळ असतात. \q1 \v 24 त्याची छाती खडकासारखी कडक आहे, \q2 जात्याच्या तळीसारखी कणखर आहे. \q1 \v 25 तो जेव्हा उभा राहतो, पराक्रमी भयभीत होतात; \q2 त्याचा वार होण्याआधीच ते माघार घेतात. \q1 \v 26 त्याच्यावर वार केलेल्या तलवारीचा, \q2 अथवा भाला, बरची किंवा बाणाचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही. \q1 \v 27 लोखंडाला तो वाळलेल्या गवतासारखे \q2 आणि कास्याला कुजलेले लाकूड असे लेखतो. \q1 \v 28 बाण त्याला पळवून लावू शकत नाही; \q2 आणि गोफणधोंडे त्याला भुसकटासारखे आहेत. \q1 \v 29 लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते; \q2 भाल्याच्या खुळखुळण्याला तो हसत असतो. \q1 \v 30 त्याच्या पोटावरील भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्‍यांसारखा आहे, \q2 मळणीच्या घणाप्रमाणे आपल्या खुणा चिखलावर मागे सोडतो. \q1 \v 31 तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो \q2 आणि तेलाच्या पात्रासारखे सागरास ढवळतो. \q1 \v 32 तो आपल्यामागे चमकणारा मार्ग सोडतो; \q2 की एखाद्याला वाटेल की सागराला पांढरे केस आहेत. \q1 \v 33 त्याच्यासारखे पृथ्वीवर काहीही नाही; \q2 तो एक निर्भय प्राणी आहे. \q1 \v 34 तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो; \q2 जे सर्व गर्विष्ठ आहेत, त्यांचा तो राजा आहे.” \c 42 \s1 इय्योब \p \v 1 मग इय्योबाने याहवेहला म्हटले, \q1 \v 2 “तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे; \q2 तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही. \q1 \v 3 तुम्ही विचारले, ‘हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?’ \q2 खरोखर अद्भुत आणि माझ्या समजबुद्धीत नसणार्‍या गोष्टी, \q2 त्याविषयी मी बोललो. \b \q1 \v 4 “तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार; \q2 मी तुला प्रश्न करणार, \q2 आणि तू मला उत्तर देशील.’ \q1 \v 5 माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते \q2 परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे. \q1 \v 6 म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, \q2 आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.” \s1 समारोप \p \v 7 याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, “मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत. \v 8 म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.” \v 9 मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली. \p \v 10 इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले \v 11 त्याचे सर्व भाऊ, बहिणी व ते सर्वजण जे त्याला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याच्या घरी येऊन त्याच्याबरोबर भोजन केले. त्यांनी त्याचे सांत्वन केले आणि याहवेहने त्याच्यावर आणलेल्या प्रत्येक संकटाविषयी सहानुभूती दाखविली, आणि प्रत्येकाने त्याला चांदीचे नाणे\f + \fr 42:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa केसिताह, जे त्या काळातील पैसे होते ज्याचे वजन किंवा मोल अज्ञात आहे\fqa*\f* व सोन्याची अंगठी दिली. \p \v 12 याहवेहने इय्योबाच्या जीवनाच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या उतार वयात त्याला अधिक आशीर्वादित केले. त्याच्याजवळ चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या व हजार गाढवे होती. \v 13 आणि त्याला सात मुले व तीन मुली होत्या. \v 14 त्याने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसरीचे कसीया व तिसरीचे केरेन-हप्पूक असे ठेवले. \v 15 संपूर्ण देशामध्ये इय्योबाच्या मुलींएवढ्या सुंदर मुली कुठेही नव्हत्या; त्यांच्या पित्याने त्यांच्या भावांबरोबर त्यांनाही वतन दिले. \p \v 16 त्यानंतर इय्योब एकशेचाळीस वर्षे जगला; त्याने आपली लेकरे व त्यांची लेकरे अशा चार पिढ्या पाहिल्या. \v 17 इय्योब वयस्कर व पूर्ण परिपक्व होऊन मरण पावला.