\id JHN - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h योहान \toc1 योहानकृत शुभवर्तमान \toc2 योहान \toc3 योहा \mt1 योहानकृत शुभवर्तमान \c 1 \s1 शब्द देही झाला \p \v 1 प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता. \v 2 तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता. \v 3 शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही. \v 4 त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते. \v 5 तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले\f + \fr 1:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa समजले\fqa*\f* नाही. \p \v 6 परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले. \v 7 तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. \v 8 तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता. \p \v 9 जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. \v 10 तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही. \v 11 ते स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. \v 12 परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— \v 13 ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला. \p \v 14 शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते. \p \v 15 योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, “ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जो माझ्यानंतर येणार आहे तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता.’ ” \v 16 त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे. \v 17 कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे. \v 18 परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे. \s1 बाप्तिस्मा करणारा योहान स्वतः ख्रिस्त असल्याचे नाकारतो \p \v 19 जेव्हा यहूदी पुढार्‍यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय. \v 20 तो कबूल करण्यास कचरला नाही, त्याने मोकळेपणाने सांगितले, तो म्हणाला, “मी ख्रिस्त नाही.” \p \v 21 त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीयाह आहात काय?” \p त्याने उत्तर दिले, “नाही.” \p “मग आपण संदेष्टा आहात काय?” \p त्याने उत्तर दिले, “नाही.” \p \v 22 शेवटी ते म्हणाले, “तर मग आपण आहात तरी कोण? आम्हाला सांगा, म्हणजे ज्यांनी आम्हाला हे विचारण्यास पाठविले आहे त्यांना उत्तर देता येईल.” \p \v 23 यशायाह संदेष्ट्याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी आहे, जी म्हणते, “ ‘प्रभूचा मार्ग सरळ करा.’ ”\f + \fr 1:23 \fr*\ft \+xt यश 40:3\+xt*\ft*\f* \p \v 24 आता ज्या परूश्यांनी त्यांना पाठविले होते, \v 25 त्यांनी प्रश्न विचारला, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीयाह नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?” \p \v 26 तेव्हा योहान उत्तरला, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु तुम्हामध्ये एकजण असा आहे की, ज्याला तुम्ही ओळखत नाही. \v 27 तो हाच आहे जो माझ्यानंतर येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासाठी एक दास होण्याची देखील माझी पात्रता नाही.” \p \v 28 हे सर्व यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे घडले, जिथे योहान बाप्तिस्मा देत होता. \s1 योहानाची येशूंबद्दल साक्ष \p \v 29 दुसर्‍या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा! \v 30 ते हेच आहेत, ज्यांच्या संदर्भात मी म्हणत होतो, ‘हा मनुष्य जो माझ्यानंतर येणार आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे कारण तो माझ्यापूर्वी होता.’ \v 31 मला स्वतः त्यांची ओळख नव्हती, पण मी याच कारणासाठी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो की त्यांनी इस्राएली लोकांस प्रकट व्हावे.” \p \v 32 मग योहानाने अशी साक्ष दिली: “स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा खाली आला व त्यांच्यावर स्थिरावला. \v 33 मी स्वतः त्यांना ओळखत नव्हतो, परंतु ज्यांनी मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी पाठविले त्यांनी मला सांगितले होते की, ‘ज्या मनुष्यावर आत्मा उतरतांना आणि स्थिरावताना तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’ \v 34 हे घडताना मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष देतो की हे परमेश्वराचे पुत्र आहेत.”\f + \fr 1:34 \fr*\ft पाहा \+xt यश 42:1\+xt* अनेक मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa परमेश्वराचा पुत्र.\fqa*\f* \s1 योहानाचे शिष्य येशूंना अनुसरण करतात \p \v 35 दुसर्‍या दिवशी योहान आपल्या दोन शिष्यांसह उभा असताना, \v 36 येशूंना जाताना पाहून योहानाने म्हटले, “हा पाहा, परमेश्वराचा कोकरा!” \p \v 37 त्या दोन शिष्यांनी त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा ते येशूंना अनुसरले. \v 38 येशूंनी मागे वळून ते आपल्याला अनुसरत आहेत हे पाहून विचारले, “तुम्हाला काय पाहिजे?” \p त्यांनी उत्तर दिले, “रब्बी” म्हणजे “गुरुजी, आपण कुठे राहता?” \p \v 39 येशूंनी म्हटले, “या आणि पाहा.” \p त्यांनी जाऊन त्यांचे निवासस्थान पाहिले आणि तो संपूर्ण दिवस त्यांनी त्यांच्याबरोबर घालविला. त्यावेळी दुपारचे चार वाजले होते. \p \v 40 योहानाचे बोलणे ऐकून ज्यांनी येशूंना अनुसरले होते, त्या दोन शिष्यांमधील एक आंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ होता. \v 41 आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की त्याने त्याचा भाऊ शिमोन याला शोधले आणि त्याला सांगितले, “आम्हाला मसिहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे.” \v 42 मग तो त्याला येशूंकडे घेऊन आला. \p येशूंनी त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा, म्हणजे खडक असे म्हणतील.” भाषांतर केल्यानंतर पेत्र\f + \fr 1:42 \fr*\fq केफा \fq*\ft अरामी आणि \ft*\fq पेत्र \fq*\ft ग्रीक दोन्हीचा अर्थ \ft*\fqa खडक असा होतो.\fqa*\f*. \s1 येशू, फिलिप्प व नथानेल यांना पाचारण करतो \p \v 43 दुसर्‍या दिवशी येशूंनी गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. त्यांना फिलिप्प सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” \p \v 44 आंद्रिया आणि पेत्र यांच्याप्रमाणेच फिलिप्प बेथसैदा नगरचा रहिवासी होता. \v 45 मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.” \p \v 46 त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?” \p यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.” \p \v 47 आपल्याकडे नाथानाएल येताना पाहून, येशू म्हणाले, “हा खरा इस्राएली असून याच्यामध्ये फसवणूक आढळत नाही.” \p \v 48 तेव्हा नाथानाएलाने विचारले, “तुम्ही मला कसे ओळखता?” \p येशूंनी त्याला उत्तर दिले, “फिलिप्पाने तुला बोलविण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली उभे असताना पाहिले होते.” \p \v 49 नाथानाएलाने जाहीर केले, “गुरुजी, आपण परमेश्वराचे पुत्र; आपण इस्राएलचे राजे आहात.” \p \v 50 त्यावर येशू म्हणाले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस. परंतु यापेक्षा अधिक मोठ्या गोष्टी तू पाहशील.” \v 51 ते पुढे असेही म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की तुम्ही स्वर्ग उघडलेला आणि परमेश्वराचे स्वर्गदूत वर चढताना व मानवपुत्रावर उतरतांना पाहाल.” \c 2 \s1 येशू पाण्याचा द्राक्षारस करतात \p \v 1 तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तिथे होती, \v 2 येशू व त्यांच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. \v 3 ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.” \p \v 4 येशू म्हणाले, “बाई,\f + \fr 2:4 \fr*\fq बाई \fq*\ft मूळ भाषेत स्त्रीसाठी वापरलेला शब्द अनादर करावा म्हणून वापरला नाही.\ft*\f* तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजूनही आलेली नाही.” \p \v 5 त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.” \p \v 6 त्या ठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लीटर पाणी मावत असे.\f + \fr 2:6 \fr*\ft अंदाजे 75 ते 115 लीटर क्षमतेचे\ft*\f* \p \v 7 येशू त्या नोकरांना म्हणाले, “रांजण पाण्याने भरा” त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपूर भरले. \p \v 8 नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातील काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.” \p त्यांनी तसे केले, \v 9 त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले, \v 10 “प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.” \p \v 11 येशूंनी गालीलातील काना येथे केलेले हे पहिले चिन्ह होते व त्याद्वारे आपले गौरव प्रकट केले आणि शिष्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. \p \v 12 यानंतर येशू आपली आई, भाऊ आणि शिष्य यांच्याबरोबर काही दिवस खाली कफर्णहूम येथे राहण्यास गेले. \s1 येशू मंदिर शुद्ध करतात \p \v 13 त्यानंतर यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला असताना येशू वर यरुशलेमास गेले. \v 14 तिथे त्यांनी मंदिराच्या अंगणात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैसे बदलून देणारे लोक यांना पाहिले, \v 15 तेव्हा त्यांनी दोर्‍यांचा एक चाबूक तयार केला आणि त्या सर्वांना मेंढरे आणि गुरे यांच्यासहित मंदिराच्या परिसरातून बाहेर घालविले आणि नाणी बदलून देणार्‍यांचे मेज पालथे करून त्यांची नाणी उधळून टाकली. \v 16 मग जे कबुतरे विक्रेते होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका” \v 17 तेव्हा शिष्यांना हा शास्त्रलेख आठवला: “तुझ्या मंदिराविषयीच्या ईर्षेने मला ग्रासून टाकले आहे.”\f + \fr 2:17 \fr*\ft \+xt स्तोत्र 69:9\+xt*\ft*\f* \p \v 18 यहूदी पुढार्‍यांनी त्यांना म्हटले, “हे सर्व करण्याचा अधिकार आपणाला दिला आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण कोणते चिन्ह आम्हास दाखवाल?” \p \v 19 येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.” \p \v 20 त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?” \v 21 परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते. \v 22 पुढे ते मरणातून उठल्यानंतर, त्यांच्या शिष्यांना या शब्दाचे स्मरण झाले. नंतर त्यांनी शास्त्रलेख व येशूंनी उच्चारलेली वचने यावर विश्वास ठेवला. \p \v 23 वल्हांडणाच्या उत्सवात येशू यरुशलेमात असताना, अनेक लोकांनी त्यांच्याद्वारे घडत असलेली चिन्हे पाहिली व त्यांच्या नावावर विश्वास ठेवला. \v 24 परंतु येशूंनी स्वतःस त्यांच्या अधीन केले नाही, कारण ते सर्व लोकांस ओळखून होते. \v 25 त्यांना मनुष्याविषयी कोणाच्याही साक्षीची गरज नव्हती, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे हे त्यांना माहीत होते. \c 3 \s1 येशू निकदेमास शिक्षण देतात \p \v 1 आता निकदेम नावाचा एक परूशी, जो यहूदी प्रतिनिधीमंडळाचा सभासद होता, \v 2 तो रात्री येशूंकडे आला व म्हणाला, “गुरुजी, आपण शिक्षक आहात व परमेश्वराकडून आलेले आहात, हे आम्हास माहीत आहे. कारण ही जी चिन्हे आपण करत आहात, ती परमेश्वर बरोबर असल्याशिवाय करता येणार नाही.” \p \v 3 त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म\f + \fr 3:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa वरून जन्मल्याशिवाय\fqa*\f* झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.” \p \v 4 तेव्हा निकदेमाने विचारले, “जे वृद्ध आहेत त्यांचा नव्याने जन्म कसा होऊ शकेल? त्यांना दुसर्‍या वेळी आपल्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेता येणे शक्य नाही!” \p \v 5 येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. \v 6 शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो. \v 7 ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही. \v 8 वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.” \p \v 9 तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?” \p \v 10 “येशूंनी म्हटले, तुम्ही इस्राएलचे शिक्षक असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? \v 11 मी तुम्हाला निश्चित सांगतो की जे आम्हास समजले आहे ते आम्ही बोलतो आणि आम्ही जे काही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो आणि तरीही तुम्ही लोक आमची साक्ष मान्य करीत नाही. \v 12 मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही; तर मग स्वर्गीय गोष्टी तुम्हाला सांगितल्यास कसा विश्वास ठेवाल? \v 13 स्वर्गातून आलेल्या मानवपुत्राशिवाय इतर कोणीही स्वर्गात गेला नाही.\f + \fr 3:13 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa मनुष्य जो स्वर्गात आहे.\fqa*\f* \v 14 जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल,\f + \fr 3:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa गौरविले जाणे\fqa*\f* \v 15 जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.” \p \v 16 कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. \v 17 परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे. \v 18 जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो दोषरहित ठरेल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही तो दोषी ठरविण्यात आला आहे, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याचे नाकारले. \v 19 निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. \v 20 दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते. \v 21 परंतु जो सत्याने जीवन जगतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जे काही त्यांनी केले ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे. \s1 योहानाची येशूंविषयी साक्ष \p \v 22 त्यानंतर, येशू आणि त्यांचे शिष्य यहूदीया प्रांतात आले आणि तिथे थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालविला आणि बाप्तिस्मे केले. \v 23 आता योहान शालिमाजवळ असलेले एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तिथे विपुल प्रमाणात पाणी असून, लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असत. \v 24 त्या वेळेपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता. \v 25 कोणाएका यहूदी मनुष्याने योहानाच्या शिष्यांबरोबर शुद्धीकरणाच्या विधीबद्दल वादविवाद केला. \v 26 तेव्हा शिष्य योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरुजी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य आपल्याबरोबर होता व ज्यांच्याबद्दल आपण साक्ष दिली, ते बाप्तिस्मा करीत आहेत आणि पाहा, प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे.” \p \v 27 त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल. \v 28 ‘मी ख्रिस्त नव्हे, परंतु त्यांच्यापुढे मला पाठविण्यात आले आहे,’ असे मी म्हटले होते याचे साक्षी तुम्हीच आहात. \v 29 वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे. \v 30 ते अधिक थोर होवो आणि मी लहान व्हावे.” \p \v 31 जो स्वर्गातून आलेला आहे तो इतर सर्वांपेक्षा थोर आहे. जो जगापासून आहे तो जगाचा आहे; व जगातील विषयांच्या बाबतीत बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांहून थोर आहे. \v 32 त्यांनी जे पाहिले व ऐकले त्याविषयी ते साक्ष देतात, परंतु त्यांची साक्ष कोणीच मान्य करत नाही. \v 33 जे कोणी त्यांची साक्ष स्वीकारतात, त्यांनी असे प्रमाणित केले की परमेश्वर सत्य आहे. \v 34 ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात. \v 35 पिता पुत्रावर प्रीती करतात आणि त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती सोपविली आहे. \v 36 जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो कोणी पुत्राला नाकारतो, तो जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहील. \c 4 \s1 येशूचे शोमरोनी स्त्रीबरोबर संभाषण \p \v 1 येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहेत असे परूश्यांच्या कानावर गेले आहे असे येशूंना समजले— \v 2 वास्तविक पाहता येशू बाप्तिस्मा देत नव्हते, परंतु त्यांचे शिष्यच बाप्तिस्मा देत असत. \v 3 तेव्हा यहूदीया प्रांत सोडून ते पुन्हा गालील प्रांतामध्ये गेले. \p \v 4 त्यासाठी त्यांना शोमरोन प्रांतामधून जावे लागले. \v 5 मग ते शोमरोनातील सूखार नावाच्या नगरास आले; ते याकोबाने आपला पुत्र योसेफास दिलेल्या शेताजवळ होते. \v 6 तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती. \p \v 7 तेव्हा एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी आली, येशूंनी तिला म्हटले, “तू मला पाणी प्यावयास देशील का?” \v 8 त्यांचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेलेले होते. \p \v 9 तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध\f + \fr 4:9 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa शोमरोनी लोकांनी वापरलेले भांडे वापरत नाही\fqa*\f* ठेवीत नसत.) \p \v 10 येशू तिला म्हणाले, “परमेश्वराचे वरदान आणि मला प्यावयाला पाणी दे असे म्हणणारा कोण, हे जर तुला कळले असते तर तू त्यांच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिले असते.” \p \v 11 “महाराज,” ती स्त्री म्हणाली, “परंतु आपल्याजवळ पाणी काढण्यासाठी पोहरा नाही आणि विहीर तर खूप खोल आहे. हे जिवंत पाणी आपणाकडे कुठून येणार? \v 12 आमचा पिता याकोबाने आम्हाला ही विहीर दिली होती व ते स्वतः, त्यांची गुरे आणि त्याचे पुत्रही हे पाणी पीत असत, त्यांच्यापेक्षा आपण थोर आहात काय?” \p \v 13 येशूंनी तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, \v 14 परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.” \p \v 15 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला हे पाणी द्या, म्हणजे मला तहान लागणार नाही आणि सतत पाणी काढण्यासाठी येथे येण्याची गरजही पडणार नाही.” \p \v 16 येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.” \p \v 17 परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” \p त्यावर येशू म्हणाले, “मला पती नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी खरे आहे. \v 18 कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.” \p \v 19 “महाराज,” ती स्त्री उद्गारली, “आपण खरोखर संदेष्टे आहात असे मला दिसते. \v 20 आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर परमेश्वराची उपासना केली, परंतु तुम्ही यहूदी, उपासनेचे स्थान यरुशलेममध्येच आहे असा आग्रह धरता.” \p \v 21 येशू तिला म्हणाले, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही. \v 22 तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे. \v 23 अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे. \v 24 परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.” \p \v 25 ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसिहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.” \p \v 26 यावर येशूंनी जाहीरपणे सांगितले, “मी, तुजबरोबर बोलत आहे तोच मी आहे.” \s1 शिष्य येशूंकडे परत येतात \p \v 27 त्यांचे शिष्य परतले आणि ते एका बाईशी बोलत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु, “तुम्हाला काय हवे आहे?” किंवा “तिच्याबरोबर कसला संवाद करीत होते?” असे त्यांना त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही. \p \v 28 मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली, \v 29 “चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?” \v 30 तेव्हा ते नगरातून बाहेर आले व त्यांच्याकडे वाटचाल करू लागले. \p \v 31 “गुरुजी, आपण काही खावे,” म्हणून शिष्य त्यांना आग्रह करू लागले. \p \v 32 पण ते त्यांना म्हणाले, “माझ्याजवळ असे अन्न आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊक नाही.” \p \v 33 त्यावर शिष्य एकमेकांना विचारू लागले, “यांना कोणी अन्न आणून दिले का?” \p \v 34 येशूंनी म्हटले, “ज्याने मला पाठविले त्यांच्या इच्छेप्रमाणे करणे व त्यांचे कार्य पूर्ण करणे हेच माझे अन्न. \v 35 ‘चार महिन्यांचा अवधी कापणी करण्यासाठी आहे असे तुमचे म्हणणे आहे ना?’ तर मी तुम्हाला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा! ती कापणीसाठी तयार आहेत. \v 36 आता कापणार्‍याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्‍याने व कापणार्‍यानेही एकत्रित मिळून आनंद करावा. \v 37 ‘एक पेरतो व दुसरा कापणी करतो,’ अशी जी म्हण आहे ती खरी आहे. \v 38 जिथे तुम्ही पेरणी केली नाही, तिथे कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले; इतरांनी पेरणी करण्याचे कष्ट केले होते आणि त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ तुम्हाला मिळाले आहे.” \s1 अनेक शोमरोनी विश्वास ठेवतात \p \v 39 “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली,” या तिच्या साक्षीवरून शोमरोन नगरातील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. \v 40 म्हणून शोमरोनी लोक येशूंकडे आल्यावर त्यांनी येशूंना नगरात राहण्याची विनंती केली. तेव्हा ते तिथे दोन दिवस राहिले. \v 41 याकाळात त्यांच्या वचनामुळे आणखी पुष्कळ लोक विश्वासू झाले. \p \v 42 मग ते त्या बाईला म्हणाले, “तू सांगितले म्हणून नव्हे, तर आम्ही प्रत्यक्ष त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि आम्हाला माहीत आहे की हा मनुष्य खरोखर जगाचा तारणारा आहे.” \s1 येशू अंमलदाराच्या मुलाला बरे करतात \p \v 43 दोन दिवसानंतर ते गालील प्रांतात गेले. \v 44 कारण येशूंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही. \v 45 ते गालीलात आले, तेव्हा गालिलकरांनी त्यांचे स्वागत केले. कारण वल्हांडण सणाच्या वेळी, ते तिथे उपस्थित होते व यरुशलेममध्ये जे काही येशूंनी केले ते त्यांनी पाहिले होते. \p \v 46 गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तिथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्‍याचा मुलगा आजारी होता. \v 47 येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता. \p \v 48 तेव्हा येशू म्हणाले, “मी अद्भुते व चिन्हे केल्याशिवाय तुम्ही लोक मजवर विश्वास ठेवणार नाही.” \p \v 49 तो शासकीय अधिकारी म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी येण्याची कृपा करा.” \p \v 50 येशू त्याला म्हणाले, “जा, तुझा मुलगा जगेल, तो मरणार नाही.” \p त्या मनुष्याने येशूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि निघाला. \v 51 तो मार्गावर असतानाच, त्याचे काही दास त्याला भेटले आणि आपला मुलगा जिवंत आहे अशी बातमी त्यांनी त्याला दिली. \v 52 मुलाला कोणत्या वेळेपासून बरे वाटू लागले, अशी त्याने त्यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप नाहीसा झाला.” \p \v 53 तेव्हा त्या पित्याला उमगले की त्याच घटकेस येशूंनी, “तुझा मुलगा जगेल तो मरणार नाही.” हे शब्द उच्चारले होते. मग तो व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशूंवर विश्वास ठेवला. \p \v 54 येशूंनी यहूदीयातून गालीलात आल्यानंतर हे दुसरे चिन्ह केले होते. \c 5 \s1 तळ्याजवळ बरे करणे \p \v 1 काही काळानंतर, येशू यहूद्यांच्या सणांपैकी एकास यरुशलेम येथे गेले. \v 2 आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरामी\f + \fr 5:2 \fr*\fq अरामी \fq*\ft किंवा \ft*\fqa हिब्रू\fqa*\f* भाषेत बेथेस्दा\f + \fr 5:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa बेथसैदा\fqa*\f* म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या. \v 3 येथे लंगडे, आंधळे, लुळे असे अनेक अपंग लोक पडून असत. \v 4 कारण प्रभूचा दूत वेळोवेळी येऊन, ते पाणी हालवीत असे. पाणी हालविताच कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती तळ्यात प्रथम उतरल्यास बरी होत असे.\f + \fr 5:4 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa पाणी हालविले जावे म्हणून अपंग वाट पाहत होते \fqa*\fqa आणि पाणी हालविल्यानंतर त्या तळ्यात प्रथम उतरणारी व कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती बरी होत असे\fqa*\f* \v 5 तिथे अडतीस वर्षे अपंग असलेला एक मनुष्य होता. \v 6 येशूंनी त्याला तिथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” \p \v 7 “प्रभूजी,” तो अपंग म्हणाला, “पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो.” \p \v 8 तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरूण उचल आणि चालू लाग.” \v 9 त्याच क्षणी तो मनुष्य बरा झाला आणि आपले अंथरूण उचलून चालू लागला. \p ज्या दिवशी हे घडले तो शब्बाथ दिवस होता. \v 10 आणि यहूदी पुढारी त्या बर्‍या झालेल्या मनुष्याला म्हणाले, “शब्बाथ दिवशी अंथरूण उचलणे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.” \p \v 11 परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले, तो म्हणाला, ‘तुझे अंथरूण उचलून चालू लाग.’ ” \p \v 12 त्यांनी त्याला विचारले, “तुझे अंथरूण उचलून चालू लाग, असे सांगणारा व्यक्ती कोण आहे?” \p \v 13 जो मनुष्य बरा झाला होता त्याला आपल्याला कोणी बरे केले, याची कल्पना नव्हती, कारण येशू गर्दीत दिसेनासे झाले होते. \p \v 14 नंतर येशूंना तो मनुष्य मंदिरात आढळला आणि येशूंनी त्याला सांगितले, “पाहा, तू आता बरा झाला आहेस. येथून पुढे पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” \v 15 मग त्या मनुष्याने यहूदी पुढार्‍यांकडे जाऊन ज्याने मला बरे केले तो येशू आहे असे सांगितले. \s1 पुत्राचा अधिकार \p \v 16 येशू शब्बाथ दिवशी अशा गोष्टी करीत असल्यामुळे यहूदी पुढार्‍यांनी त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. \v 17 येशूंनी त्यांच्या आरोपाला उत्तर दिले व म्हणाले, “माझा पिता या दिवसापर्यंत सतत कार्य करीत आहे आणि मी देखील कार्य करीत आहे.” \v 18 या कारणासाठी तर यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यास अधिकच आतुर झाले; कारण त्यांनी शब्बाथ मोडला होता, एवढेच नव्हे, तर त्यांनी परमेश्वराला आपला पिता म्हणून स्वतःला परमेश्वरासमान केले होते. \p \v 19 येशूंनी त्यांना असे उत्तर दिले: “मी तुम्हाला निश्चित सांगतो, पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो, कारण जे काही पिता करतो, तेच पुत्रही करतो. \v 20 पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो जे करतो ते सर्व पुत्राला विदित करतो. होय आणि तो याहूनही मोठी कृत्ये त्याला दाखवेल व त्यामुळे तुम्ही चकित व्हाल. \v 21 कारण जसा पिता मेलेल्यास उठवून जीवन देतो, तसा पुत्रही त्याच्या मर्जीप्रमाणे ज्यांना पाहिजे त्यांना जीवन देतो. \v 22 याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपविले आहे, \v 23 यासाठी की जसा पित्याचा तसा सर्वांनी पुत्राचाही सन्मान करावा, जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने पुत्राला पाठविले त्या पित्याचाही सन्मान करीत नाही. \p \v 24 “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे. \v 25 मी निश्चित सांगतो, अशी वेळ येत आहे आणि आलेलीच आहे की त्यावेळी मेलेले लोक परमेश्वराच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील, ते जिवंत राहतील. \v 26 कारण ज्याप्रमाणे पित्यामध्ये जीवन आहे, त्याचप्रमाणे पुत्रामध्येही जीवन असावे अशी त्यांनी योजना केली आहे. \v 27 आणि तो मानवपुत्र आहे म्हणून न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यांना दिला आहे. \p \v 28 “याविषयी आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे हे की, जे सर्व कबरेमध्ये आहेत ते त्यांची वाणी ऐकतील, \v 29 आणि बाहेर येतील. ज्यांनी चांगली कर्मे केली आहेत ते सार्वकालिक जीवनासाठी उठतील, व ज्यांनी दुष्कर्मे केली आहेत ते दंड भोगण्यासाठी उठतील. \v 30 मी स्वतःहून काही करू शकत नाही; मी ऐकतो त्याप्रमाणे न्याय करतो आणि माझा निर्णय योग्य आहे, कारण मी स्वतःस खुश करू इच्छित नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांना खुश करू पाहतो. \s1 येशूंविषयी साक्ष \p \v 31 “जर मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी ठरणार नाही. \v 32 परंतु दुसरा एक आहे जो माझ्या बाजूने साक्ष देतो आणि त्याने जी साक्ष माझ्याबद्दल दिली, ती खरी आहे. \p \v 33 “तुम्ही लोकांना योहानाकडे पाठविले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली \v 34 मी मनुष्याची साक्ष स्वीकारतो असे नाही; मी हे यासाठी सांगत आहे की त्याद्वारे तुमचे तारण व्हावे. \v 35 योहान एक ज्वलंत दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशाचा आनंद घेण्याचे मान्य केले. \p \v 36 “माझी जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा वजनदार आहे. कारण जी कामे पूर्ण करण्याचे मला पित्याने सोपविले आहे, तीच कार्ये मी करीत आहे व ती साक्ष देतात की पित्यांनीच मला पाठविले आहे. \v 37 ज्या पित्याने मला पाठविले त्यांनी स्वतःच माझ्याबद्दल साक्ष दिली आहे. तुम्ही त्यांची वाणी कधीही ऐकली नाही आणि त्यांची आकृती पाहिली नाही, \v 38 त्यांचे वचन तुम्हामध्ये राहत नाही, कारण ज्याला त्यांनी पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही. \v 39 तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता\f + \fr 5:39 \fr*\ft किंवा \ft*\fqa अभ्यास करता\fqa*\f*, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात; \v 40 तरी जीवनप्राप्ती साठी तुम्ही माझ्याकडे येत नाही. \p \v 41 “मी मनुष्याचे गौरव स्वीकारीत नाही, \v 42 परंतु मी तुम्हाला ओळखतो व मला चांगले माहीत आहे की तुमच्या हृदयात परमेश्वराची प्रीती नाही. \v 43 कारण मी पित्याच्या नावाने आलो, पण तुम्ही माझा स्वीकार केला नाही; परंतु जर स्वतःच्याच नावाने दुसरा कोणी आला, तर तुम्ही त्याला स्वीकाराल. \v 44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा स्वीकारता परंतु जो एकच परमेश्वर, त्यांच्याकडून प्रशंसा मिळविण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हाला विश्वास तरी कसा ठेवता येईल? \p \v 45 “परंतु मी पित्यासमोर तुम्हाला दोषी ठरवेन असा विचार करू नका. कारण ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशेच तुम्हाला दोषी ठरवेल. \v 46 तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला, तर माझ्यावरही ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. \v 47 परंतु ज्याअर्थी तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवीत नाही, त्याअर्थी मी जे सांगतो त्यावर विश्वास कसा ठेवाल?” \c 6 \s1 येशू पाच हजारांना जेवू घालतात \p \v 1 काही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला (तिबिर्‍यास सरोवर) असेही म्हणत \v 2 लोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्‍यांना अद्भुत चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते. \v 3 यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले. \v 4 यहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता. \p \v 5 जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?” \v 6 ते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात आधी ठरविले होते. \p \v 7 फिलिप्पाने उत्तर दिले, “प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक\f + \fr 6:7 \fr*\ft ग्रीकमध्ये \ft*\fqa चांदीचे दोनशे दिनार\fqa*\f* तरी लागेल!” \p \v 8 मग शिमोन पेत्र जो येशूंचा शिष्य होता, त्याचा भाऊ आंद्रिया म्हणाला, \v 9 “येथे एक मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच लहान भाकरी आणि दोन लहान मासे आहेत, परंतु त्या इतक्या लोकांना कशा काय पुरतील?” \p \v 10 येशूंनी म्हटले, “लोकांना खाली गटागटाने बसावयास सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत होते व ते खाली बसले. तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती. \v 11 मग येशूंनी त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व जे बसले होते ते खाऊन तृप्त होईपर्यंत वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले. \p \v 12 सर्वांनी भरपूर जेवण केल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “आता उरलेले तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.” \v 13 मग त्यांनी उरलेले तुकडे गोळा केले आणि जवाच्या पाच भाकरींपैकी जेवून उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या. \p \v 14 येशूंनी हे चिन्ह केल्याचे पाहून लोक म्हणू लागले, “खरोखर, या जगात जो येणार होता तो संदेष्टा हाच आहे.” \v 15 लोक आपल्याला जबरदस्तीने राजा करण्याच्या उद्देशाने आले आहेत हे येशूंना माहीत होते, तेव्हा ते पुन्हा एकटेच डोंगरावर निघून गेले. \s1 येशू पाण्यावर चालतात \p \v 16 संध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले, \v 17 ते होडीत बसून सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यपि त्यांच्याकडे परतले नव्हते. \v 18 परंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या. \v 19 ते तीन किंवा चार मैल\f + \fr 6:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa पाच ते सहा किलोमीटर\fqa*\f* अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले. \v 20 परंतु ते त्यांना म्हणाले, “मीच आहे; भिऊ नका.” \v 21 ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्‍यास पोहोचली. \p \v 22 मग दुसर्‍या दिवशी सकाळी सरोवराच्या पलीकडच्या किनार्‍यावर लोकांचा समुदाय थांबला होता, तिथे केवळ एक होडी होती आणि येशू शिष्यांसहित त्यामध्ये गेले नव्हते, तरी शिष्य होडीत बसून निघून गेले होते. \v 23 काही होड्या तिबिर्याहून ज्या ठिकाणी आभार मानून प्रभूने त्यांना भाकर खाऊ घातली होती त्या ठिकाणी आल्या. \v 24 समुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तिथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले. \s1 जीवनाची भाकर \p \v 25 ते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?” \p \v 26 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात. \v 27 नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.” \p \v 28 त्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?” \p \v 29 येशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्यांना त्यांनी पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” \p \v 30 त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल? \v 31 आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’\f + \fr 6:31 \fr*\ft \+xt निर्ग 16:4; नहे 9:15; स्तोत्र 78:24, 25\+xt*\ft*\f*” \p \v 32 येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे. \v 33 ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.” \p \v 34 ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.” \p \v 35 त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. \v 36 परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. \v 37 जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही. \v 38 कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे. \v 39 आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे. \v 40 कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.” \p \v 41 मी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले. \v 42 ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?” \p \v 43 हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका, \v 44 ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन. \v 45 संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’\f + \fr 6:45 \fr*\ft \+xt यश 54:13\+xt*\ft*\f* जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो. \v 46 जो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही. \v 47 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे. \v 48 मीच जीवनाची भाकर आहे. \v 49 तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले. \v 50 परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही. \v 51 मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.” \p \v 52 यास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?” \p \v 53 येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही. \v 54 जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन. \v 55 कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे. \v 56 जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो. \v 57 मला पाठविणार्‍या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल. \v 58 मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.” \v 59 येशूंनी हे शिक्षण कफर्णहूमातील सभागृहामध्ये दिले. \s1 अनेक शिष्य येशूंना सोडून जातात \p \v 60 हे ऐकून, त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळजण म्हणाले, “ही शिकवण अवघड आहे. हे कोण स्वीकारू शकेल?” \p \v 61 त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का? \v 62 तर मग मानवपुत्राला, जिथे ते पूर्वी होते तिथे वर चढून जाताना पाहाल! \v 63 फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत. \v 64 तरी, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” आपणावर कोण विश्वास ठेवतो व कोण आपला विश्वासघात करणार हे येशूंना सुरुवातीपासून माहीत होते. \v 65 पुढे येशू म्हणाले, “यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की, पित्याने शक्य केल्याशिवाय कोणालाही माझ्याकडे येता येत नाही.” \p \v 66 हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत. \p \v 67 येशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?” \p \v 68 त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. \v 69 आम्ही विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही परमेश्वराचे पवित्र पुरुष आहात हे ओळखले आहे.” \p \v 70 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांस निवडून घेतले नव्हते काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे!” \v 71 हे शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदाह याच्यासंबंधात ते बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून त्यांचा विश्वासघात करणार होता. \c 7 \s1 येशू मंडपाच्या सणास जातात \p \v 1 यानंतर, येशू गालीलाच्या अवतीभोवती फिरले. त्यांना यहूदीया प्रांतातून जाण्याची इच्छा नव्हती,\f + \fr 7:1 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa त्याला अधिकार नव्हता\fqa*\f* कारण तेथील यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यासाठी मार्ग शोधत होते. \v 2 परंतु जेव्हा यहूदीयांच्या मंडपाचा सण जवळ आला, \v 3 येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल. \v 4 ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा.” \v 5 कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता. \p \v 6 यावर येशूंनी त्यांना म्हटले, “माझी वेळ अद्यापि आलेली नाही; तुम्हाला कोणतीही वेळ योग्यच आहे. \v 7 जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो. \v 8 तुम्ही सणास जा. मी या सणास वर जात नाही कारण माझी वेळ अजून आली नाही.” \v 9 त्यांना असे सांगितल्यावर, ते गालीलातच राहिले. \p \v 10 तथापि, असे असूनही, येशूंचे भाऊ सणासाठी गेल्यानंतर, येशूही, उघडपणे नव्हे, तर गुप्तपणे तिथे गेले. \v 11 आता सणात यहूदी पुढारी येशूंवर नजर ठेवून विचारपूस करीत होते, “की ते कुठे आहेत?” \p \v 12 समुदायामध्ये त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती. काही म्हणत होते, “तो खरोखर चांगला मनुष्य आहे.” \p तर इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांची फसवणूक करतो.” \v 13 परंतु यहूदी पुढार्‍यांच्या भीतीमुळे लोकांसमोर त्यांच्याविषयी बोलण्यास कोणीच धजत नव्हते. \s1 येशू सणामध्ये शिकवितात \p \v 14 मग अर्धा सण पार पडल्यानंतर येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि शिकवू लागले. \v 15 जे यहूदी तिथे होते ते चकित झाले आणि विचारू लागले, “हा मनुष्य शिकला नसून हे ज्ञान त्याला कसे प्राप्त झाले?” \p \v 16 येशू त्यांना म्हणाले, “माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले त्यांची आहे. \v 17 जर कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करण्याचा निर्धार करेल तर त्याला खात्रीने समजेल की माझी शिकवण परमेश्वरापासून आहे की मी स्वतःच्या मनाचे बोलत आहे. \v 18 जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही. \v 19 मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले आहे ना? तरी तुम्हापैकी एकही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारण्याचा प्रयत्न का करता?” \p \v 20 त्यावर लोकसमुदायाने उत्तर दिले, “तू भूतग्रस्त आहेस. तुला जिवे मारण्याचा प्रयत्न कोण करीत आहे?” \p \v 21 येशू त्यांना म्हणाले, “मी एक चमत्कार केला आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. \v 22 मोशेने तुम्हाला सुंतेचा नियम दिला तरी, ही प्रथा मोशेद्वारे आली नसून, पूर्वजांपासून आलेली आहे, त्यानुसार तुम्ही मुलाची सुंता शब्बाथ दिवशी करता. \v 23 मोशेच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून मुलाची सुंता जर शब्बाथ दिवशी करता, मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला पूर्ण स्वास्थ्य दिले तर माझ्यावर का रागावता? \v 24 तोंड बघून न्याय करू नका, तर यथायोग्य न्याय करा.” \s1 येशू कोण आहे यावरून फूट पडते \p \v 25 यरुशलेममध्ये राहणारे काही लोक एकमेकास विचारू लागले, “ज्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत तो हाच मनुष्य नाही काय? \v 26 हा तर येथे जाहीरपणे बोलत आहे आणि ते एक शब्दही बोलत नाहीत. तर मग हाच ख्रिस्त आहे अशी आपल्या पुढार्‍यांना खात्री पटली आहे का? \v 27 परंतु हा मनुष्य कुठून आला आहे हे आपणास माहीत आहे; जेव्हा ख्रिस्त येईल, तेव्हा तो कुठून येईल हे कोणालाही कळणार नाही.” \p \v 28 हे ऐकून मंदिराच्या आवारात, शिकवीत असताना, येशू मोठ्याने म्हणाले, “होय, मी कोण, कुठला हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. तरी मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने येथे आलो नाही, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे; त्यांना तुम्ही ओळखीत नाही, \v 29 पण मी त्यांना ओळखतो, कारण मी त्यांच्यापासून आहे आणि त्यांनीच मला पाठविले आहे.” \p \v 30 त्यांनी येशूंना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी त्यांच्यावर हात टाकू शकले नाही, कारण त्यांची वेळ अद्यापि आली नव्हती. \v 31 तरी, लोकसमुदायामधील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले, “जेव्हा ख्रिस्त मसिहा येईल, तेव्हा तो या मनुष्यापेक्षा अधिक चिन्हे करेल काय?” \p \v 32 जेव्हा परूश्यांनी लोकांची त्यांच्याबद्दल चाललेली कुजबुज ऐकली. तेव्हा त्यांनी आणि महायाजकांनी येशूंना अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. \p \v 33 येशू त्यांना म्हणाले, “मी तुमच्याजवळ आणखी थोडा वेळ राहणार आहे, मग ज्याने मला पाठविले, त्यांच्याकडे परत जाईन. \v 34 तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे असेन, तिथे तुम्हाला येता येणार नाही.” \p \v 35 यहूदी पुढारी एकमेकास विचारू लागले, “या मनुष्याचा कुठे जाण्याचा विचार आहे की तो आपणास सापडणार नाही? कदाचित हा आपले लोक जे ग्रीक लोकांमध्ये पांगलेले आहेत, त्या लोकांना शिक्षण देण्यासाठी जात असेल काय? \v 36 ‘तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे असेन, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ असे तो बोलला याचा अर्थ तरी काय असावा?” \p \v 37 मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्त्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तहानलेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे. \v 38 शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” \v 39 त्यांच्या म्हणण्याचा अर्थ, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दिला जाणार होता. परंतु त्यावेळेपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते. \p \v 40 त्यांचे हे शब्द ऐकल्यावर, त्यांच्यातील काहीजण म्हणाले, “खरोखर हा मनुष्य संदेष्टा आहे.” \p \v 41 इतर काही म्हणाले, “हेच ख्रिस्त आहेत.” \p पण इतर काहीजण म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येऊ शकेल काय? \v 42 शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये\f + \fr 7:42 \fr*\fq बेथलेहेम \fq*\ft हिब्रू भाषेनुसार \ft*\fqa बेथलेहेम\fqa*\f*, जिथे दावीद राहिला तिथून ख्रिस्त येईल?” \v 43 अशा रीतीने लोकसमुदायात येशूंमुळे फूट पडली. \v 44 काहींना त्यांना पकडावेसे वाटले, परंतु कोणीही त्यांच्यावर हात टाकला नाही. \s1 यहूदी पुढार्‍यांचा अविश्वास \p \v 45 शेवटी मंदिराचे शिपाई महायाजक व परूशी यांच्याकडे परत आले. त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?” \p \v 46 शिपाई उत्तर देत म्हणाले, “या मनुष्यासारखे आतापर्यंत कोणीही बोलले नाही.” \p \v 47 त्यावर उलट उत्तर देत परूशी म्हणाले, “तुम्हालाही त्याने फसविले आहे काय?” \v 48 अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? \v 49 नाही! परंतु हा समुदाय ज्यांना नियमशास्त्राविषयी माहिती नाही—तो शापित आहे. \p \v 50 निकदेम, हा त्यांच्यापैकी एक असून, जो पूर्वी येशूंकडे गेला होता, म्हणाला, \v 51 “एखाद्याचे प्रथम न ऐकता व जे कार्य तो करत आहे ते समजून न घेता नियमशास्त्र त्याला दोषी ठरविते काय?” \p \v 52 त्यावर त्यांनी उत्तर दिले, “तुम्हीदेखील गालीलकर आहात काय? शोधून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही.” \p \v 53 नंतर ते सर्वजण घरी गेले. \c 8 \nb \v 1 नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे परतले. \p \v 2 अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले. \v 3 नियमशास्त्र शिक्षक व परूशी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्यांच्याकडे आणले. त्यांनी तिला समुदायाच्या पुढे उभे केले \v 4 आणि ते येशूंना म्हणाले, “गुरुजी, या स्त्रीला व्यभिचाराचे कृत्य करीत असतानाच धरले आहे. \v 5 मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हास आज्ञा दिली आहे की अशा स्त्रियांना दगडमार करावा. परंतु आपण काय म्हणता?” \v 6 ते या प्रश्नाचा उपयोग त्यांना सापळ्यात पकडावे व दोष ठेवण्यास आधार मिळावा म्हणून करत होते. \p परंतु येशू खाली वाकून बोटाने जमिनीवर लिहू लागले. \v 7 ते त्यांना प्रश्न विचारत राहिले, तेव्हा येशू सरळ उभे राहून त्यांना म्हणाले, “तुम्हामध्ये जो पापविरहित आहे त्यानेच तिच्यावर प्रथम दगड टाकावा.” \v 8 मग ते पुन्हा खाली वाकून जमिनीवर लिहू लागले. \p \v 9 ज्यांनी हे ऐकले, ते सर्वजण प्रथम वयस्कर व नंतर एका पाठोपाठ एक असे सर्वजण निघून गेले आणि शेवटी येशू एकटेच त्या स्त्रीसोबत राहिले, ती स्त्री अद्याप तिथेच उभी होती. \v 10 मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कुठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?” \p \v 11 ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!” \p येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.” \s1 येशूंच्या साक्षीवरून वाद \p \v 12 येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” \p \v 13 यावर परूशी त्यांना आव्हान देत म्हणाले, “येथे आपण, आपल्या स्वतःविषयी साक्ष देता; म्हणून तुमची साक्ष सबळ वाटत नाही.” \p \v 14 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो, तरी माझी साक्ष सबळ आहे, कारण मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे, हे मला माहीत आहे. परंतु मी कुठून येतो व मी कुठे जातो याची तुम्हाला काही कल्पना नाही. \v 15 तुम्ही मानवी मापदंडाने न्याय करता; परंतु मी कोणाचाही न्याय करीत नाही. \v 16 मी न्याय केलाच, तर माझे निर्णय खरे आहेत, कारण मी एकटाच नाही, तर ज्या पित्याने मला पाठविले तेही माझ्याबरोबर असतात. \v 17 तुमच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की दोन साक्षीदारांची साक्ष खरी मानावी. \v 18 मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठविले ते माझे दुसरे साक्षीदार आहेत.” \p \v 19 तेव्हा त्यांनी विचारले, “तुझा पिता कुठे आहे?” \p त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी व माझा पिता कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” \v 20 मंदिराच्या अंगणाच्या जवळ जिथे दानार्पण टाकीत असत तिथे शिकवीत असताना ते ही वचने बोलले, तरीसुद्धा त्यांना कोणीही धरले नाही, कारण त्यांची वेळ तेव्हापर्यंत आली नव्हती. \s1 ख्रिस्त कोण आहे यावर वाद \p \v 21 मग पुन्हा येशू त्यांना म्हणाले, “मी जाणार आहे आणि तुम्ही माझा शोध कराल व तुमच्या पापात मराल. मी जिथे जाणार तिथे तुम्हाला येता येणार नाही.” \p \v 22 यामुळे यहूदी म्हणू लागले, “ ‘मी जिथे जातो, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ म्हणजे तो आत्महत्या करेल की काय?” \p \v 23 परंतु ते पुढे म्हणाले, “तुम्ही खालचे आहात; मी तर वरून आहे. तुम्ही या जगाचे आहात; तसा मी या जगाचा नाही. \v 24 मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.” \p \v 25 त्यांनी विचारले, “तर मग आपण कोण आहात?” \p येशूंनी उत्तर दिले, “मी प्रारंभापासून तुम्हाला सांगत आलो आहे, \v 26 मला तुमचा न्याय करण्याबाबत बरेच काही बोलायचे आहे. परंतु ज्यांनी मला पाठविले, ते विश्वसनीय आहेत आणि जे मी त्यांच्यापासून ऐकले आहे, तेच जगाला सांगतो.” \p \v 27 परंतु ते त्यांच्याशी पित्यासंबंधी बोलत होते, हे त्यांना अद्यापि उमगले नव्हते. \v 28 म्हणून येशू म्हणाले, “जेव्हा तुम्ही मानवपुत्राला उंच कराल,\f + \fr 8:28 \fr*\ft किंवा \ft*\fqa उच्च करणे\fqa*\f* तेव्हाच मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर पित्याने मला ज्यागोष्टी शिकविल्या, त्याच बोलतो हे तुम्हाला समजेल. \v 29 ज्याने मला पाठविले; ते माझ्याबरोबर आहेत, त्यांनी मला एकटे सोडले नाही, कारण त्यांना जे आवडते ते मी नेहमी करत असतो.” \v 30 हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. \s1 येशूंच्या विरोधकांची मुले यावर वाद \p \v 31 ज्या यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. \v 32 मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल.” \p \v 33 त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?” \p \v 34 त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे. \v 35 आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तिथे सदासर्वदा राहतो. \v 36 म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल. \v 37 मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही. \v 38 मी पित्याच्या समक्षतेत असताना जे पाहिले, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही मात्र तुमच्या पित्यापासून जे काही ऐकले त्याप्रमाणे करता.” \p \v 39 त्यांनी उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” \p येशू म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची लेकरे असता तर तुम्ही अब्राहामाची\f + \fr 8:39 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa येशू म्हणाला, जर तुम्ही अब्राहामाचे लेकरे आहात तर,\fqa*\f* कृत्ये केली असती. \v 40 परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले, म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते. \v 41 तुम्ही तुमच्या स्वतःच्या पित्याची कामे करीत आहात.” \p तेव्हा ते विरोध करीत म्हणाले, “आम्ही बेवारस संतती नाही, आमचा खरा पिता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.” \p \v 42 येशूंनी त्यांना म्हटले, “परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे. \v 43 मी म्हणतो ते तुम्हाला समजत नाही कारण ते तुम्ही ऐकू इच्छित नाहीत. \v 44 तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे. \v 45 पण मी सत्य सांगतो तर तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही! \v 46 मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही? \v 47 जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्यांचे ऐकत नाही, याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.” \s1 येशूंची स्वतःविषयीची साक्ष \p \v 48 यहूदी पुढार्‍यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?” \p \v 49 येशू म्हणाला, “मला भूत लागलेले नाही, कारण मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता. \v 50 मी स्वतःचे गौरव करू इच्छित नाही; पण एकजण ते इच्छितो आणि तो न्यायाधीश आहे. \v 51 मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे कोणी माझे वचन पाळतात त्यांना मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.” \p \v 52 यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्‍यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही. \v 53 आमचा पिता अब्राहाम त्यापेक्षा तू थोर आहेस काय? तो मरण पावला आणि संदेष्टेही. तू कोण आहेस असे तुला वाटते?” \p \v 54 तेव्हा येशूंनी त्यांना सांगितले, “मी स्वतः आपले गौरव केले, तर ते व्यर्थ आहे. परंतु माझा गौरव करणारे माझे पिता आहेत आणि त्यानांच तुम्ही आपला परमेश्वर मानता. \v 55 तुम्ही त्यांना ओळखत नाही, मी त्यांना ओळखतो आणि मी त्यांना ओळखत नाही असे म्हटले असते, तर मी तुमच्यासारखाच लबाड ठरलो असतो; परंतु मी त्यांना ओळखतो व त्यांचे वचन पाळतो. \v 56 तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या विचाराने उत्सुक झाला होता; व तो पाहून त्याला आनंद झाला.” \p \v 57 तेव्हा यहूदी पुढारी त्याला म्हणाले, “तुझे वय पन्नास वर्षाचे देखील नाही आणि तू अब्राहामाला पाहिले!” \p \v 58 येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की अब्राहाम जन्मला नव्हता, त्यापूर्वी मी आहे!” \v 59 हे ऐकल्याबरोबर त्यांनी येशूंना मारण्यासाठी दगड उचलले, परंतु येशू त्यांच्यापासून लपून मंदिराच्या आवारातून निघून गेले. \c 9 \s1 जन्मांधाला दृष्टीलाभ \p \v 1 येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले, \v 2 तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?” \p \v 3 येशूंनी उत्तर दिले, “त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केले नाही, परंतु हे यासाठी झाले की परमेश्वराची कृत्ये त्याच्यामध्ये प्रकट व्हावी. \v 4 जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही. \v 5 मी या जगात आहे, तेव्हापर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे.” \p \v 6 असे बोलून, ते जमिनीवर थुंकले व थुंकीने चिखल करून त्याचा लेप त्यांनी त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला. \v 7 “जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू.” (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला. \p \v 8 त्याचे शेजारी आणि इतर लोक त्याला एक भिकारी म्हणून ओळखत होते, ते एकमेकांना विचारू लागले “बसून भीक मागणारा तो हाच मनुष्य नाही काय?” \v 9 काहीजण म्हणाले, “होय, हाच तो.” \p पण इतर म्हणाले, “नाही, तो फक्त त्याच्यासारखा दिसतो.” \p तो भिकारी आग्रहपूर्वक म्हणाला, “मी तोच मनुष्य आहे!” \p \v 10 “मग तुझे डोळे कसे उघडले?” त्यांनी त्याला विचारले. \p \v 11 तेव्हा त्याने सांगितले, “येशू नावाच्या एका मनुष्याने चिखल केला आणि माझ्या डोळ्यांवर लावला. मग मला शिलोआमाच्या तळ्यावर जाऊन चिखल धुण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी जाऊन धुतले व मला दृष्टी प्राप्त झाली.” \p \v 12 त्यांनी विचारले, “तो मनुष्य कुठे आहे?” \p तो म्हणाला, “मला माहीत नाही.” \s1 आंधळा बरा झाल्याची परूशी चौकशी करतात \p \v 13 तेव्हा त्यांनी जो मनुष्य आंधळा होता त्याला परूश्यांकडे आणले, \v 14 आता येशूंनी चिखल तयार करून त्या माणसाचे डोळे उघडले तो शब्बाथवार होता. \v 15 यास्तव परूश्यांनीही त्याला दृष्टी कशी आली हे विचारले. तेव्हा तो मनुष्य उत्तरला, “त्यांनी माझ्या डोळ्यांवर चिखल लावला आणि मी तो धुऊन टाकला आणि आता मी पाहू शकतो.” \p \v 16 त्यांच्यापैकी काही परूशी म्हणाले, “हा मनुष्य परमेश्वरापासून आलेला नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” \p परंतु इतरांनी विचारले, “पण पातकी मनुष्याला अशी चिन्हे करता येतील का?” यावरून त्यांच्यामध्ये फूट पडली. \p \v 17 शेवटी परूशी पुन्हा आंधळ्या मनुष्याकडे वळले व त्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्यांच्याविषयी तुला काय म्हणावयाचे आहे?” \p यावर तो मनुष्य उत्तरला, “तो परमेश्वराचा संदेष्टा आहे.” \p \v 18 यहूदी पुढार्‍यांनी दृष्टी प्राप्त झालेल्या त्या माणसाच्या आईवडिलांस बोलावून आणेपर्यंत, तो आंधळा होता आणि आता त्याला दिसते, यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. \v 19 त्यांना विचारले, “हा तुमचा मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता तो हाच आहे का जो आंधळा जन्मला होता? तर मग त्याला आता दृष्टी कशी आली?” \p \v 20 तेव्हा त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला होता हे आम्हास ठाऊक आहे. \v 21 तरी त्याला आता कसे दिसते किंवा त्याला कोणी दृष्टी दिली, हे आम्हास माहीत नाही. तो प्रौढ आहे. त्यालाच विचारा.” \v 22 त्याचे आईवडील यहूदी पुढार्‍यांच्या भीतीमुळे असे म्हणाले, कारण त्यांनी आधी ठरविले होते की जे कोणी, येशू हा ख्रिस्त आहे, असे कबूल करतील, त्यांना सभागृहामधून बाहेर टाकण्यात यावे. \v 23 यामुळे त्याच्या आईवडिलांनी म्हटले, “तो प्रौढ आहे; त्याला विचारा.” \p \v 24 तेव्हा जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी पुन्हा दुसर्‍यांदा बोलावून सांगितले, “सत्य सांगून परमेश्वराचे गौरव कर, हा मनुष्य पापी आहे, हे आम्हाला माहीत आहे.” \p \v 25 त्यावर तो म्हणाला, “तो पापी आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु मला एक गोष्ट माहीत आहे. मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते!” \p \v 26 त्यांनी त्याला विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?” \p \v 27 तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी या आधीच तुम्हाला सांगितले; पण तुम्ही ऐकले नाही. ते पुन्हा का ऐकता? त्यांचे शिष्य व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय?” \p \v 28 त्यावर त्यांनी त्याची निंदा केली व ते म्हणाले, “तूच त्याचा शिष्य आहेस! आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत! \v 29 आम्हाला माहीत आहे की परमेश्वर मोशेशी बोलले, परंतु याच्याबद्दल म्हणशील, तर तो कुठला आहे हे आम्हास ठाऊक देखील नाही.” \p \v 30 तेव्हा त्याने उत्तर दिले, “हे केवढे आश्चर्य आहे! त्याने माझे डोळे उघडले आणि तो मात्र कुठून आला याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही! \v 31 आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही. तर जे कोणी परमेश्वर भक्त असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचेच ते ऐकतात. \v 32 कोणी जन्माधांचे डोळे उघडले, असे कधीच ऐकण्यात आले नाही. \v 33 ही व्यक्ती परमेश्वरापासून नसती, तर हे करू शकली नसती.” \p \v 34 तेव्हा यहूदी पुढारी म्हणाले, “तू जन्मापासून पापात बुडलेला आहेस आणि आम्हाला शिकवितोस?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले. \s1 आध्यात्मिक अंधत्व \p \v 35 त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूंनी ऐकले आणि तो त्यांना भेटल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “तुझा मानवपुत्रावर विश्वास आहे का?” \p \v 36 तो म्हणाला, “प्रभू, ते कोण हे मला सांगा म्हणजे मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन.” \p \v 37 येशू म्हणाले, “आता तू त्याला पाहिले आहेस आणि खरेतर तो तुझ्याशी बोलत आहे.” \p \v 38 “होय प्रभूजी,” तो म्हणाला, “मी विश्वास धरतो!” आणि त्याने त्यांची उपासना केली. \p \v 39 मग येशू म्हणाले, “मी न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की आंधळ्यांना दिसावे आणि जे पाहतात त्यांनी आंधळे व्हावे.” \p \v 40 जे परूशी तिथे होते त्यांनी जे बोलले ते ऐकले आणि विचारले, “आम्ही आंधळे आहोत काय?” \p \v 41 येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.” \c 10 \s1 उत्तम मेंढपाळ व त्याची मेंढरे \p \v 1 “परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असला पाहिजे. \v 2 जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. \v 3 दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. \v 4 आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. \v 5 ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.” \v 6 येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही. \p \v 7 यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. \v 8 जे सर्व माझ्यापूर्वी आले होते ते सर्व चोर व लुटारू होते, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही. \v 9 मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल.\f + \fr 10:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa सुरक्षित ठेवले जातील\fqa*\f* ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील. \v 10 चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे. \p \v 11 “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो. \v 12 परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते. \v 13 तो मनुष्य पळून जातो कारण तो भाडेकरू असतो आणि त्याला मेंढरांची काहीच काळजी नसते. \p \v 14 “मी उत्तम मेंढपाळ आहे; मला माझी मेंढरे माहीत आहेत व माझ्या मेंढरांना मी माहीत आहे \v 15 तसेच माझे पिता मला ओळखतात आणि मी पित्याला ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो. \v 16 माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. \v 17 पिता मजवर प्रीती करतात, याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरिता देतो; \v 18 तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.” \p \v 19 यहूद्यांनी या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांच्यात पुन्हा मतभेद उत्पन्न झाले. \v 20 त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “तो एकतर भूतग्रस्त अथवा वेडा तरी असावा. अशा माणसाचे तुम्ही का ऐकता?” \p \v 21 तर इतर म्हणाले, “ही वचने ज्याला भूत लागलेले आहे त्या माणसाची नाहीत. भुताला आंधळ्यांचे डोळे उघडता येतील काय?” \s1 येशूंच्या दाव्यावरून अधिक वाद \p \v 22 ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा\f + \fr 10:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa हनूकाह\fqa*\f* सण होता. \v 23 आणि येशू मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या शलोमोनच्या अंगणामध्ये फिरत होते. \v 24 यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्याभोवती गराडा घालून विचारले, “तू आम्हाला अजून किती वेळ संशयात ठेवणार आहेस? तू जर ख्रिस्त असशील, तर तसे आम्हाला स्पष्टपणे सांगून टाक.” \p \v 25 येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. माझ्या पित्याच्या नावाने मी जे कार्य करतो ते माझ्याविषयी साक्ष देतात, \v 26 परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत. \v 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. \v 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही. \v 29 ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे;\f + \fr 10:29 \fr*\ft पूर्वीच्या प्रतींमध्ये \ft*\fqa जे काही माझ्या पित्याने मला दिले आहे ते सर्वात महान आहे.\fqa*\f* कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही. \v 30 मी आणि माझे पिता एक आहोत.” \p \v 31 तेव्हा यहूदी विरोधकांनी त्यांना दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले, \v 32 परंतु येशू त्यांना म्हणाले, “मी पित्याद्वारे अनेक चांगली कामे केली आहेत. माझ्या कोणत्या कामामुळे तुम्ही मला दगडमार करीत आहात?” \p \v 33 ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.” \p \v 34 त्यावर येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही ‘दैवते’\f + \fr 10:34 \fr*\ft \+xt स्तोत्र 82:6\+xt*\ft*\f* आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या नियमात लिहिले नाही काय? \v 35 ज्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले त्यास त्याने ‘दैवते’ म्हटले तर शास्त्रलेखाचा भंग होत नाही \v 36 तर ज्याला पित्याने स्वतः वेगळे करून जगात पाठविले, तो जर म्हणतो की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे,’ तर त्या विधानाला तुम्ही दुर्भाषण, असे कसे म्हणता? \v 37 मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास, माझ्यावर विश्वास ठेऊ नका; \v 38 तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, तर मी करत असलेल्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. म्हणजे तुमची खात्री होईल की पिता मजमध्ये आहे व मी पित्यामध्ये आहे.” \v 39 त्यांना अटक करण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या हातातून निसटून गेले. \p \v 40 मग येशू यार्देन नदीच्या पलीकडे जिथे योहान आरंभीच्या दिवसात बाप्तिस्मा करीत असे, त्या ठिकाणी जाऊन राहिले. \v 41 आणि त्यांच्याकडे अनेक लोक आले. ते आपसात म्हणू लागले, “योहानाने काही चिन्ह केले नाही, तरी येशूंबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे ठरले आहे.” \v 42 तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोकांनी येशूंवर विश्वास ठेवला. \c 11 \s1 लाजराचा मृत्यू \p \v 1 आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता. \v 2 ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते. \v 3 तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.” \p \v 4 येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.” \v 5 मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती, \v 6 तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तिथेच अधिक दोन दिवस राहिले. \v 7 यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.” \p \v 8 परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तिथे जाता काय?” \p \v 9 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते. \v 10 जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.” \p \v 11 असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.” \p \v 12 त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभूजी तो झोपला असेल, तर बरा होईल.” \v 13 येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत. \p \v 14 मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे, \v 15 तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.” \p \v 16 परंतु दिदुम\f + \fr 11:16 \fr*\fq थोमा \fq*\ft (अरामी) आणि \ft*\fqa दिदुमस \fqa*\ft (ग्रीक) या दोघांचा अर्थ \ft*\fqa जुळा \fqa*\ft असा आहे\ft*\f* म्हटलेला थोमा इतर शिष्यांना म्हणाला, “चला, आपणही त्यांच्याबरोबर मरू.” \s1 येशू मार्था आणि मरीयेचे सांत्वन करतात \p \v 17 ते तिथे पोहोचल्यावर, येशूंना समजले की, लाजराला कबरेत ठेऊन चार दिवस झाले होते. \v 18 बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा\f + \fr 11:18 \fr*\ft अंदाजे 3 किलोमीटर\ft*\f* कमी अंतरावर होते. \v 19 आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. \v 20 येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली. \p \v 21 “प्रभूजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. \v 22 परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे.” \p \v 23 त्यावर येशूंनी तिला सांगितले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” \p \v 24 मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.” \p \v 25 येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; \v 26 जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?” \p \v 27 “होय, प्रभूजी,” ती म्हणाली, “या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसिहा), परमेश्वराचे पुत्र आपण आहात यावर माझा विश्वास आहे.” \p \v 28 ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीयेला बाजूला बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत.” \v 29 मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. \v 30 येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जिथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते. \v 31 जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले. \p \v 32 येशू जिथे होते तिथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.” \p \v 33 येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकूळ व अस्वस्थ झाले. \v 34 येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?” \p ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, या आणि पाहा.” \p \v 35 येशू रडले. \p \v 36 नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!” \p \v 37 परंतु काहीजण म्हणाले, “ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाहीत का?” \s1 येशू लाजराला मृतातून उठवितात \p \v 38 येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. \v 39 येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.” \p मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.” \p \v 40 तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?” \p \v 41 यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो. \v 42 मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” \p \v 43 हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!” \v 44 लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते. \p येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.” \s1 येशूंना ठार मारण्याचा कट \p \v 45 यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला. \v 46 परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले. \v 47 मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. \p ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे. \v 48 जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.” \p \v 49 त्यांच्यापैकी कयफा नावाचा मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही! \v 50 तुम्ही हे देखील लक्षात आणत नाही की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होणे यापेक्षा लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे तुमच्या हिताचे आहे.” \p \v 51 हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत, \v 52 हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव. \v 53 मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला. \p \v 54 यामुळे येशू यहूदीया प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले. \p \v 55 जेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, तेव्हा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धीकरणाचा विधी पार पाडावा म्हणून देशातील अनेक लोक वर यरुशलेममध्ये आले होते \v 56 येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?” \v 57 इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील. \c 12 \s1 बेथानी येथे येशूंना तैलाभ्यंग \p \v 1 वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते तो लाजर जिथे राहत होता त्या बेथानी गावी येशू आले. \v 2 तिथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता. \v 3 मरीयेने अर्धा शेर\f + \fr 12:3 \fr*\ft अंदाजे 0.5 लीटर\ft*\f*, शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि तिने त्यांचे पाय आपल्या केसांनी पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. \p \v 4 परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदाह इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला, \v 5 “वास्तविक ते तेल विकून येणारे पैसे गोरगरिबांना देता आले नसते का? त्या तेलाचे मोल एका वर्षाच्या मजुरीएवढे\f + \fr 12:5 \fr*\ft मूळ भाषा ग्रीकमध्ये \ft*\fqa 300 दिनारी\fqa*\f* होते.” \v 6 त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला नाही, तर तो चोर होता; व पैशाच्या पिशवीचा मालक असून, जे काही त्यात टाकले जाई त्यातून स्वतःसाठी काढून घेत असे. \p \v 7 त्यावर येशू म्हणाले, “तिला असू दे, माझ्या उत्तरक्रियेसाठी सुगंधी तेल तिने बचत करून ठेवले होते. \v 8 गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर राहतील,\f + \fr 12:8 \fr*\ft \+xt अनु 15:11\+xt*\ft*\f* परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.” \p \v 9 तितक्यात येशू तिथे आले आहेत हे कळल्यावर यहूदी लोकांचा समुदाय तिथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्या लाजराला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली. \v 10 हे पाहून मुख्य याजकांनी लाजराला देखील जिवे मारण्याची योजना केली. \v 11 यासाठी की अनेक यहूदी लोक लाजरामुळे येशूंवर विश्वास ठेवू लागले होते. \s1 यरुशलेममध्ये येशूंचा राजा म्हणून प्रवेश \p \v 12 दुसर्‍या दिवशी येशू यरुशलेमला येत आहेत ही बातमी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या समुदायाने ऐकली. \v 13 त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले, \q1 “होसान्ना!\f + \fr 12:13 \fr*\ft हा इब्री शब्द ज्याचा अर्थ “तारण कर!” असा आहे नंतर तो शब्द स्तुतीचा उद्गार झाला\ft*\f*” \b \q1 “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”\f + \fr 12:13 \fr*\ft \+xt स्तोत्र 118:25\+xt*\ft*\f* \b \q1 “इस्राएलचा राजा धन्यवादित असो!” \m \v 14 येशूंना एक गाढवीचे शिंगरू सापडले व ते त्यावर बसले, शास्त्रलेखात असे लिहिले आहे: \q1 \v 15 “सीयोनकन्ये भिऊ नको; \q2 पाहा, तुझा राजा येत आहे \q2 गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.”\f + \fr 12:15 \fr*\ft \+xt जख 9:9\+xt*\ft*\f* \p \v 16 हे प्रथम त्यांच्या शिष्यांना समजले नाही; परंतु येशूंचे गौरव झाल्यानंतर त्यांना समजून आले की, ज्यागोष्टी येशूंबद्दल लिहिल्या गेल्या होत्या त्याच गोष्टी त्यांच्यासाठी करण्यात आल्या होत्या. \p \v 17 येशूंनी लाजराला कबरेमधून बाहेर बोलाविले व मरणातून उठविले, त्यावेळेस जो लोकसमुदाय तिथे होता त्यांनी वचनाचा प्रचार करणे सुरू ठेवले. \v 18 ज्यांनी त्या चिन्हाबद्दल ऐकले होते, असे अनेक लोक येशूंना भेटण्यासाठी गेले. \v 19 यास्तव परूशी एकमेकांना म्हणू लागले, “आपण काहीच साध्य केले नाही. पाहा, सारे जग कसे त्याच्यामागे जात आहे!” \s1 येशूंचे आपल्या मृत्यूविषयीचे भविष्य \p \v 20 सणाच्या उपासनेला हजर राहण्यासाठी जे ग्रीक लोक आले होते, \v 21 ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, “महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे.” \v 22 तेव्हा फिलिप्पाने त्याबद्दल आंद्रियाला सांगितले; मग त्या दोघांनी येशूंना सांगितले. \p \v 23 येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. \v 24 मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला तर बहुत पीक देतो. \v 25 जो कोणी आपल्या जिवावर प्रीती करतो, तो आपल्या जीवास मुकेल आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करेल, तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखेल. \v 26 जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील. \p \v 27 “आता माझा जीव अस्वस्थ झाला आहे, मी काय म्हणू? ‘हे पित्या, या घटकेपासून मला वाचव?’ नाही, केवळ याच कारणासाठी मी या घटकेस आलो आहे. \v 28 हे पित्या, आपल्या नावाचे गौरव करा!” \p नंतर स्वर्गातून वाणी आली, “मी ते गौरविले आहे आणि पुनः गौरवेन.” \v 29 जो लोकसमुदाय तिथे उभा असून ऐकत होता तो म्हणाला, ही गर्जना झाली; इतर म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. \p \v 30 तेव्हा येशू म्हणाले, “ती वाणी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी होती. \v 31 आता या जगाचा न्यायनिवाडा होण्याची वेळ आहे आणि जगाच्या अधिपतीला बाहेर टाकण्यात येईल. \v 32 आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन.” \v 33 आपण कोणत्या प्रकारे मरणार आहोत हे सुचविण्यासाठी येशू असे बोलले. \p \v 34 जमावाने म्हटले, “नियमशास्त्रामधून आम्ही ऐकले आहे की ‘ख्रिस्त सर्वदा राहील, तर मानवपुत्राला उंच केले पाहिजेत’ असे तुम्ही कसे म्हणता? हा ‘मानवपुत्र’ कोण आहे?” \p \v 35 तेव्हा येशूंनी त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्याबरोबर राहील. तुम्हावर अंधकाराने मात करण्यापूर्वी प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा, कारण जो कोणी अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही. \v 36 तुम्ही प्रकाशाची मुले व्हावी म्हणून जोपर्यंत तुम्हाबरोबर प्रकाश आहे, तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलले व तिथून निघून त्यांच्यापासून गुप्त राहिले. \s1 यहूदीयांचा विश्वास आणि अविश्वास \p \v 37 येशूंनी अनेक चिन्हे त्यांच्यासमोर केली असतानाही, ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. \v 38 नेमके हेच भविष्य यशायाह संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले: \q1 “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला \q2 आणि प्रभूचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?”\f + \fr 12:38 \fr*\ft \+xt यश 53:1\+xt*\ft*\f* \p \v 39 परंतु या कारणाने ते विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण, यशायाहने इतरत्र असेही म्हटले आहे: \q1 \v 40 “म्हणून परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत \q2 आणि त्यांची हृदये कठोर केली होती, \q1 म्हणजे त्यांना डोळ्यांनी दिसू नये, \q2 किंवा अंतःकरणाने समजू नये, \q2 किंवा ते वळू नये—जेणे करून मी त्यांना बरे करेन.”\f + \fr 12:40 \fr*\ft \+xt यश 6:10\+xt*\ft*\f* \m \v 41 यशायाहने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला. \p \v 42 त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्‍यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते; \v 43 कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या स्तुतीपेक्षा त्यांना मानवाकडून मिळणारी स्तुती अधिक प्रिय होती. \p \v 44 नंतर येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी मजवर विश्वास ठेवतात ते फक्त मजवरच विश्वास ठेवतात असे नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर ठेवतात; \v 45 जे मला पाहतात ते वास्तविक ज्यांनी मला पाठविले त्यांनाच पाहतात. \v 46 मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये. \p \v 47 “जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. \v 48 जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील. \v 49 कारण मी माझे स्वतःचे बोलत नाही, ज्या पित्याने मला पाठविले, त्यांनी मी काय सांगावे व काय बोलावे याची मला आज्ञा दिली आहे. \v 50 त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्‍या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.” \c 13 \s1 येशू आपल्या शिष्यांचे पाय धुतात \p \v 1 वल्हांडण सण सुरू होण्यास थोडा अवधी होता. येशूंना माहीत होते की हे जग सोडून पित्याकडे जाण्याची त्यांची वेळ जवळ आली आहे. जगात जे त्यांचे लोक होते, त्यांच्यावर त्यांनी प्रीती केली व शेवटपर्यंत प्रीती केली. \p \v 2 संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता. \v 3 येशूंना माहीत होते की, पित्याने सर्वगोष्टी त्यांच्या सत्तेखाली ठेवल्या आहेत आणि ते परमेश्वरापासून आले आहेत व त्यांच्याकडे परत जाणार आहेत; \v 4 म्हणून येशू भोजनावरून उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला. \v 5 त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले. \p \v 6 ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?” \p \v 7 येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, पण नंतर कळेल.” \p \v 8 पेत्र म्हणाला, “नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” \p येशू म्हणाले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” \p \v 9 शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!” \p \v 10 यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत.” \v 11 आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही. \p \v 12 त्यांचे पाय धुतल्यावर त्यांनी कपडे पुन्हा अंगावर घातले आणि आपल्या जागी परत आले व आपल्या शिष्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला समजले का? \v 13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे. \v 14 आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. \v 15 जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे. \v 16 मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही. \v 17 आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही त्याप्रमाणे कराल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. \s1 आपल्या विश्वासघाताविषयी येशूंचे भविष्य \p \v 18 “मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला\f + \fr 13:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa आपली टाच उचलली आहे\fqa*\f* आहे.’\f + \fr 13:18 \fr*\ft \+xt स्तोत्र 41:9\+xt*\ft*\f* हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे. \p \v 19 “मी तुम्हाला हे आताच, घडून येण्यापूर्वी सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा तसे घडून येईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे. \v 20 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जे कोणी ज्याला मी पाठविले त्याला स्वीकारतात, ते मला स्वीकारतात आणि जे कोणी मला स्वीकारतात ते ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतात.” \p \v 21 असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकूळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.” \p \v 22 त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना. \v 23 त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता. \v 24 “कोणाविषयी सांगत आहे हे विचारून आम्हास सांग,” असे शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावून विचारले. \p \v 25 तो येशूंच्या उराशी टेकलेला असता, म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?” \p \v 26 येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतला दिला. \v 27 यहूदाहने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला. \p येशूंनी त्याला म्हटले, “जे तू करणार आहेस, ते आता त्वरेने कर.” \v 28 येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही. \v 29 काहींना वाटले की यहूदाहच्या हाती पैशाचा कारभार असल्यामुळे सणासाठी काही विकत घ्यावे किंवा गरिबांना काही द्यावे म्हणून येशूने सांगितले असेल. \v 30 मग तो भाकरीचा तुकडा घेतल्याबरोबर, यहूदाह बाहेर निघून गेला. तेव्हा रात्र होती. \s1 पेत्राच्या नकाराविषयीचे भविष्य \p \v 31 तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे; \v 32 जर परमेश्वराचे गौरव त्यांच्यामध्ये झाले तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करतील आणि लवकरच गौरव करतील. \p \v 33 “माझ्या मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. मग तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूदी पुढार्‍यांना सांगितले, तसेच आता तुम्हालाही सांगतो: मी जिथे जाणार, तिथे तुम्हाला येता येणार नाही. \p \v 34 “मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. \v 35 तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” \p \v 36 शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?” \p येशूंनी उत्तर दिले, “मी जिथे जातो, तिथे आता तुला माझ्यामागे येता येणार नाही, परंतु नंतर तू माझ्यामागे येशील.” \p \v 37 त्यावर पेत्र म्हणाला, “प्रभू, मला आताच तुम्हाला का अनुसरता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा प्राण देईन.” \p \v 38 येशूंनी उत्तर दिले, “माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय? मी तुला निश्चित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील! \c 14 \s1 येशू आपल्या शिष्यांचे सांत्वन करतात \p \v 1 “तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा. \v 2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का? \v 3 आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे. \v 4 मी ज्या ठिकाणी जाणार आहे, तिथे जाण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.” \s1 पित्याकडे जाण्याचा मार्ग येशू \p \v 5 थोमा त्यांना म्हणाला, “प्रभूजी, आपण कुठे जात आहात हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” \p \v 6 येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही. \v 7 जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.” \p \v 8 फिलिप्प म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.” \p \v 9 येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’? \v 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे. \v 11 फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा. \v 12 मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करेल, कारण मी पित्याकडे जात आहे. \v 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. \v 14 तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करेन. \s1 येशूंचे पवित्र आत्मा देण्याबद्दल अभिवचन \p \v 15 “जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा. \v 16 आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील— \v 17 सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील. \v 18 मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन. \v 19 आता थोड्याच वेळात, जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. \v 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे व तुम्ही मजमध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे. \v 21 ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन.” \p \v 22 नंतर यहूदाह (यहूदाह इस्कर्योत नव्हे) म्हणाला, “पण प्रभूजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?” \p \v 23 येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू. \v 24 जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत. \p \v 25 “मी तुमच्याबरोबर असताना, हे सर्व तुम्हाला सांगितले आहे. \v 26 परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. \v 27 शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका. \p \v 28 “मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे की, ‘मी जात आहे, परंतु मी तुम्हाकडे परत येईन.’ जर तुमची मजवर प्रीती असती, तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझे पिता मजपेक्षा थोर आहेत. \v 29 आता हे घडून येण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे, यासाठी की ते घडून आले म्हणजे, तुम्ही विश्वास ठेवावा. \v 30 आता मी तुम्हाला यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे. त्याचा मजवर काहीही अधिकार नाही, \v 31 परंतु तो यासाठी आला की जगाने ओळखावे की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसेच मी तंतोतंत करतो. \p “आता उठा; आपण येथून जाऊ.” \c 15 \s1 द्राक्षवेल आणि डाहळ्या \p \v 1 “मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत. \v 2 माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी\f + \fr 15:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa स्वच्छ करतो\fqa*\f* करतात. \v 3 जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात. \v 4 म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही. \p \v 5 “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही. \v 6 जर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, तर त्या फांदीसारखे आहात जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून अग्नीत टाकून जाळतात. \v 7 परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल. \v 8 तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे. \p \v 9 “जशी पित्याने मजवर प्रीती केली, तशीच मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. आता तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. \v 10 जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल. \v 11 मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे कारण माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा. \v 12 माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. \v 13 आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. \v 14 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही माझे मित्र आहात. \v 15 मी यापुढे तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धन्याचे व्यवहार दासाला माहीत नसतात; त्याऐवजी, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून शिकून घेतले आहे, ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. \v 16 तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले व तुमची नेमणूक केली. ती यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे—म्हणजे तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे. \v 17 ही माझी आज्ञा आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. \s1 जग शिष्यांचा द्वेष करते \p \v 18 “जर जगाने तुमचा द्वेष केला, तर हे लक्षात ठेवा की त्यांनी प्रथम माझाही द्वेष केला आहे. \v 19 जर तुम्ही जगाचे असता, तर स्वतःवर करावी अशी त्यांनी तुमच्यावर प्रीती केली असती. परंतु तुम्ही जगाचे नाही, या जगातून मी तुमची निवड केली आहे. त्या कारणाने जग तुमचा द्वेष करते. \v 20 मी तुम्हाला जे सांगितले याची आठवण ठेवा: ‘दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही.’\f + \fr 15:20 \fr*\ft \+xt योहा 13:16\+xt*\ft*\f* जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील. त्यांनी माझी वचने पाळली, तर ते तुमची ही पाळतील! \v 21 माझ्या नावामुळे ते तुमच्याशी असे वागतील, कारण ज्यांनी मला पाठविले त्यांना ते ओळखीत नाहीत. \v 22 मी आलो नसतो व त्यांच्याशी बोललो नसतो, तर त्यांच्यावर पापाचा दोष नसता; परंतु आता त्यांना त्यांच्या पापासाठी काहीही सबब सांगता येणार नाही. \v 23 जो कोणी माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. \v 24 जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे. \v 25 ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’\f + \fr 15:25 \fr*\ft \+xt स्तोत्र 35:19; 69:4\+xt*\ft*\f* असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे. \s1 पवित्र आत्म्याचे कार्य \p \v 26 “जेव्हा कैवारी येईल, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवेन, तो सत्याचा आत्मा जो पित्याकडून येतो—तो माझ्याविषयी साक्ष देईल. \v 27 परंतु तुम्हीदेखील साक्ष दिलीच पाहिजे, कारण आरंभापासून तुम्ही मजबरोबर राहिला आहात. \c 16 \p \v 1 “तुम्ही बहकविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे. \v 2 कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल. \v 3 ते अशा गोष्टी करतील कारण त्यांनी कधीही पित्याला किंवा मला ओळखले नाही. \v 4 मी तुम्हाला हे सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की मी आधी तुम्हाला त्यासंबंधी इशारा दिला होता. मी या गोष्टी यापूर्वी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी प्रत्यक्ष तुम्हाबरोबर होतो, \v 5 परंतु आता ज्यांनी मला पाठविले त्यांच्याकडे मी परत जात आहे. तरी तुम्हापैकी कोणीही, ‘आपण कुठे जाता?’ असे विचारीत नाही \v 6 खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत. \v 7 परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन. \v 8 जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल. \v 9 पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत; \v 10 नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही; \v 11 न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे. \p \v 12 “मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही. \v 13 परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल. \v 14 कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल. \v 15 पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.” \s1 शिष्यांच्या दुःखाचे आनंदात रूपांतर होईल \p \v 16 येशू वारंवार म्हणत होते, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल.” \p \v 17 यावरून, त्यांचे काही शिष्य एकमेकास विचारू लागले, “मी पित्याकडे जातो म्हणून थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल याचा अर्थ काय?” \v 18 तेव्हा ते विचारू लागले, “थोड्या वेळाने, असे जे येशू म्हणत आहेत, हे आम्हास समजत नाही.” \p \v 19 त्यांना याविषयी काही विचारायचे आहे हे ओळखून येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला जे सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय की ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.’ \v 20 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जग आनंद करेल पण तुम्ही रडाल व शोक कराल. तुम्ही दुःख कराल परंतु तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात होईल. \v 21 जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते. \v 22 त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. \v 23 त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल. \v 24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल. \p \v 25 “जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन. \v 26 त्या दिवसात तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन. \v 27 नाही, पिता स्वतःही तुमच्यावर प्रीती करतात, कारण तुम्ही मजवर प्रीती केली व मी परमेश्वरापासून आलो आहे असा विश्वास ठेवला. \v 28 मी पित्यापासून आलो आणि या जगात प्रवेश केला आणि मी हे जग सोडून पित्याकडे परत जात आहे.” \p \v 29 तेव्हा येशूंचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता तुम्ही स्पष्ट बोलत आहात, अलंकारिक भाषेत काही सांगत नाही. \v 30 आता आम्हास कळले की, तुम्हाला सर्वगोष्टी ठाऊक आहेत, म्हणून कोणासही आपणास प्रश्न विचारण्याची गरज नाही. यावरून आपण परमेश्वरापासून आला आहात असा आम्ही विश्वास ठेवतो.” \p \v 31 येशूंनी उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास ठेवता काय? \v 32 अशी वेळ येत आहे आणि आलीच आहे की तुमची पांगापांग होईल व तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी परत जाल. तुम्ही मला एकटे सोडाल, तरीसुद्धा मी एकटा नसेन, कारण माझे पिता मजबरोबर आहेत. \p \v 33 “मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे.” \c 17 \s1 येशू गौरविले जाण्यासाठी प्रार्थना करतात \p \v 1 हे म्हटल्यावर, येशूंनी वर आकाशाकडे दृष्टी लावून प्रार्थना केली: \pm “हे पित्या, वेळ आली आहे, आपल्या पुत्राचे गौरव करा, यासाठी की पुत्राने आपले गौरव करावे; \v 2 आपण त्याला सर्व लोकांवर अधिकार दिला आहे, ते यास्तव की ज्यांना तुम्ही त्याच्याकडे सोपविले आहे, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. \v 3 आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. \v 4 तुम्ही दिलेले कार्य समाप्त करून मी तुम्हाला पृथ्वीवर गौरव प्राप्त करून दिले आहे. \v 5 तर आता, हे पित्या, जग स्थापन होण्यापूर्वी जे माझे गौरव तुमच्या समक्षतेत होते त्याच्यायोगे माझे गौरव करा. \s1 येशू शिष्यांसाठी प्रार्थना करतात \pm \v 6 “तुम्ही मला या जगातील जे लोक दिले, त्यांच्यासमोर मी तुम्हाला\f + \fr 17:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमचे नाव\fqa*\f* प्रगट केले आहे. ते तुमचे होते; तुम्ही ते सर्वजण मला दिले आणि त्यांनी तुमचे वचन पाळले आहे. \v 7 आता त्यांना कळले आहे की, जे काही तुम्ही मला दिले आहे ते तुमच्यापासून आहे. \v 8 कारण तुम्ही मला दिलेली वचने मी त्यांना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली आहेत. त्यांना खात्रीपूर्वक समजले की मी तुमच्यापासून आलो आणि तुम्ही मला पाठविले आहे. \v 9 मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, परंतु जे तुम्ही मला दिले आहेत आणि ते आपले आहेत त्यांच्यासाठी करतो. \v 10 जे सर्व माझे आहेत ते तुमचेच आहेत आणि जे सर्व तुमचे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे मला गौरव मिळाले आहे. \v 11 आता मी या जगात राहणार नाही, मी तुमच्याकडे येत आहे, परंतु ते या जगात अजूनही आहेत. पवित्र पित्या, जे नाव तुम्ही मला दिले आहे, त्या नावाच्या सामर्थ्याने त्यांना सुरक्षित ठेवा,\f + \fr 17:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांना विश्वासू ठेवा\fqa*\f* यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. \v 12 जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत जे नाव तुम्ही मला दिले, त्याद्वारे मी त्यांना राखले व सुरक्षित ठेवले\f + \fr 17:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa विश्वासू ठेवले\fqa*\f* आणि जो नाशाचा पुत्र आहे त्याच्याशिवाय एकाचाही नाश झाला नाही, यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा. \pm \v 13 “आता मी तुमच्याकडे येत आहे, परंतु मी या जगात असतानाच हे सांगत आहे, यासाठी की माझा आनंद त्यांच्यामध्ये परिपूर्ण व्हावा. \v 14 मी त्यांना तुमचे वचन सांगितले आहे आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत. \v 15 तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे. \v 16 जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.” \v 17 सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे. \v 18 जसे तुम्ही मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे. \v 19 त्यांनी देखील खरोखर पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतो. \s1 येशू सर्व विश्वासणार्‍यांसाठी प्रार्थना करतात \pm \v 20 “माझी प्रार्थना केवळ त्यांच्यासाठीच नाही. जे त्यांच्या संदेशाद्वारे मजवर विश्वास ठेवतील मी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. \v 21 हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल. \v 22 तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, \v 23 मी त्यांच्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तुम्ही मला पाठविले आहे आणि जशी तुम्ही मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे. \pm \v 24 “हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे. \pm \v 25 “हे नीतिमान पित्या, जग तुम्हाला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही मला पाठविले हे त्यांना समजले आहे. \v 26 मी तुमच्या नाव त्यांच्यासमोर प्रकट केले आहे, मी तुम्हाला प्रकट करीतच राहीन, जेणे करून जी तुमची प्रीती मजवर आहे ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.” \c 18 \s1 येशूंना अटक \p \v 1 त्यांची प्रार्थना आटोपल्यावर, येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेले. दुसर्‍या बाजूला एक बाग होती, ते व त्यांचे शिष्य तिथे गेले. \p \v 2 आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्‍याच वेळा तिथे भेटत होते. \v 3 तेव्हा सैनिकांची एक तुकडी, महायाजक आणि परूश्यांकडील अधिकाऱ्यांना वाट दाखवित यहूदाह त्यांना बागेत घेऊन आला. त्यांच्याजवळ मशाली, कंदिले व हत्यारे होती. \p \v 4 येशू, जे सर्व आपल्यासोबत घडणार होते ते पूर्णपणे जाणून होते, त्यांनी बाहेर जाऊन त्यांना विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?” \p \v 5 त्यावर त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशू.” \p तेव्हा येशू म्हणाले, “तो मी आहे,” आणि विश्वासघात करणारा यहूदाही त्यांच्याबरोबर तिथे उभा होता. \v 6 जेव्हा येशूने म्हटले, “मी तो आहे,” तेव्हा ते मागे सरकून भूमीवर पडले. \p \v 7 त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?” \p त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.” \p \v 8 येशू म्हणाले, “तो मी आहे असे मी तुम्हाला सांगितले आहेच, आणि जर तुम्ही मला शोधत आहात, तर या माणसांना जाऊ द्यावे. \v 9 जे तुम्ही मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,”\f + \fr 18:9 \fr*\ft \+xt योहा 6:39\+xt*\ft*\f* हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. \p \v 10 तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने महायाजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. \p \v 11 येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?” \p \v 12 मग यहूदी अधिकार्‍यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बंदी बनविले. \v 13 प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले. \v 14 याच कयफाने यहूदी पुढार्‍यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे. \s1 पेत्राचा प्रथम नकार \p \v 15 शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला. \v 16 परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्‍या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले. \p \v 17 मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” \p त्याने उत्तर दिले, “मी नाही.” \p \v 18 थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला. \s1 महायाजकाकडून येशूंची चौकशी \p \v 19 दरम्यान, महायाजकाने येशूंना त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्यांचे शिक्षण त्याविषयी प्रश्न विचारले. \p \v 20 येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगापुढे उघडपणे बोलतो, कारण मी सभागृहांमध्ये व मंदिरात जिथे सर्व यहूदी एकत्रित येतात तिथे नियमितपणे शिक्षण दिले आहे. मी गुप्तपणे काहीही बोललो नाही. \v 21 मला का विचारता? ज्यांनी माझे ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो ते त्यांना माहीतच असेल.” \p \v 22 येशूने असे म्हटल्यावर, जवळ असणार्‍या अधिकार्‍यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व “अशा रीतीने तू महायाजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली. \p \v 23 येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?” \v 24 मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले. \s1 पेत्राचा दुसरा व तिसरा नकार \p \v 25 दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” \p पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.” \p \v 26 परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?” \v 27 पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला. \s1 पिलातापुढे येशू \p \v 28 मग यहूदी पुढार्‍यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत. \v 29 तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर आला आणि त्याने त्यांना विचारले, “या मनुष्याविरुद्ध तुमचे काय आरोप आहेत?” \p \v 30 पिलाताला उलट निरोप देत ते म्हणाले, “तो गुन्हेगार नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलेच नसते!” \p \v 31 पिलात त्यांना म्हणाला, “त्याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” \p ते विरोध करून म्हणाले, “मृत्युदंड देण्याचा अधिकार आम्हाला नाही.” \v 32 आपण कोणत्या प्रकारे मरणार असे जे येशूंनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. \p \v 33 मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” \p \v 34 “ही तुमची स्वतःची कल्पना आहे की, इतरजण माझ्याबद्दल तुमच्याजवळ असे बोलले?” येशूंनी विचारले. \p \v 35 तेव्हा प्रत्युत्तर करीत पिलात म्हणाला, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केले नाही का? तू काय केले?” \p \v 36 मग येशूंनी उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. जर असते तर, यहूदी पुढार्‍यांनी मला अटक करू नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य दुसर्‍या ठिकाणचे आहे.” \p \v 37 यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!” \p येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.” \p \v 38 पिलाताने उलट विचारले, “सत्य काय आहे?” मग तो पुन्हा यहूदी जिथे जमले होते तिथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, “त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही. \v 39 परंतु वल्हांडण सणाच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी एका कैद्याला सोडावे अशी तुमची रीत आहे. तर मी या ‘यहूद्यांच्या राजाला’ सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” \p \v 40 ते ओरडले, “नाही, त्याला नको! आम्हाला बरब्बा हवा आहे!” बरब्बाने तर बंडात भाग घेतला होता. \c 19 \s1 येशूंना क्रूसावर खिळण्याची शिक्षा दिली जाते \p \v 1 मग पिलाताने येशूंना फटके मारविले. \v 2 सैनिकांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकांवर घातला. त्यांच्या अंगावर जांभळा झगा घातला. \v 3 ते त्यांच्याकडे वारंवार जाऊन म्हणाले, “यहूद्यांचा राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर चापटा मारल्या. \p \v 4 मग पिलात पुन्हा एकदा बाहेर आला आणि तिथे जमलेल्या यहूद्यांना म्हणाला, “पाहा, मी आता त्याला तुमच्यापुढे बाहेर आणत आहे, परंतु लक्षात ठेवा की मला त्याच्या ठायी कोणताही अपराध सापडला नाही.” \v 5 येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!” \p \v 6 येशूंना पाहताच मुख्य याजक व त्यांचे अधिकारी ओरडू लागले, “क्रूसावर खिळा! क्रूसावर खिळा!” \p परंतु पिलाताने उत्तर दिले, “तुम्हीच त्याला घेऊन जा आणि त्याला क्रूसावर खिळा. कारण माझ्या दृष्टीने पाहिले तर, त्याच्यावर दोष ठेवण्यासाठी मला कोणताही आधार सापडत नाही.” \p \v 7 तेव्हा यहूदी अधिकार्‍यांनी आग्रहपूर्वक म्हटले, “आमचे नियमशास्त्र आहे, त्यानुसार त्याने मरण पावलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हटले आहे.” \p \v 8 हे ऐकल्यावर पिलात, अधिकच घाबरला. \v 9 आणि तो राजवाड्यामध्ये परत गेला. “तू कुठून आला आहेस?” त्याने येशूंना विचारले, परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले नाही. \v 10 पिलाताने म्हटले, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला सोडण्याचा अथवा तुला क्रूसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला कळत नाही का?” \p \v 11 तेव्हा येशू उत्तरले, “जर तुम्हाला वरून अधिकार दिला गेला नसता तर तो माझ्यावर चालला नसता. यास्तव ज्यांनी मला तुमच्या स्वाधीन केले त्यांचा पापदोष अधिक मोठा आहे.” \p \v 12 तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.” \p \v 13 हे ऐकल्यावर, पिलाताने येशूंना बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला अरामी\f + \fr 19:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa हिब्रू\fqa*\f* भाषेत गब्बाथा म्हणतात, तिथे तो न्यायासनावर बसला \v 14 तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. \p “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला. \p \v 15 पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!” \p तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?” \p त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.” \p \v 16 शेवटी पिलाताने येशूंना क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. \s1 येशूंना क्रूसावर खिळतात \p सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले. \v 17 मग आपला स्वतःचा क्रूस वाहवून, ते कवटी म्हटलेल्या जागी आले, ज्याला अरामी भाषेमध्ये गोलगोथा म्हणतात. \v 18 तिथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एकएक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले. \p \v 19 पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: \pc यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू. \m \v 20 अनेक यहूद्यांनी हे पत्रक वाचले, कारण येशूंना ज्या ठिकाणी क्रूसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते आणि क्रूसावरील लेख हा हिब्रू, लॅटिन व ग्रीक भाषांमध्ये लिहिलेला होता. \v 21 मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.” \p \v 22 तेव्हा पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.” \p \v 23 सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता. \p \v 24 ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.” \p यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला: \q1 “त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली, \q2 आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.”\f + \fr 19:24 \fr*\ft \+xt स्तोत्र 22:18\+xt*\ft*\f* \m म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले. \p \v 25 क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. \v 26 मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई,\f + \fr 19:26 \fr*\ft ग्रीकमध्ये \ft*\fq बाई \fq*\ft हा शब्द अनादर करावा या उद्देशाने वापरलेला नाही.\ft*\f* पाहा, हा तुझा पुत्र!” \v 27 आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. \s1 येशूंचा मृत्यू \p \v 28 यानंतर सर्वगोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूंनी म्हटले, “मला तहान लागली आहे.” \v 29 तिथे शिरक्यात भिजविलेला एक स्पंज एजोबाच्या काठीवर ठेवून व काठी उंच करून त्यांनी येशूंच्या ओठांना लावला. \v 30 तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला. \p \v 31 आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्‍या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्‍यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील. \v 32 त्याप्रमाणे सैनिकांनी येशूंबरोबर क्रूसावर टांगलेल्या पहिल्याचे पाय मोडले मग दुसर्‍याचे ही मोडले. \v 33 परंतु जेव्हा ते येशूंजवळ आले, तेव्हा ते आधीच मरण पावल्याचे त्यांना दिसून आले, म्हणून त्यांनी येशूंचे पाय मोडले नाहीत. \v 34 तरीपण, सैनिकांपैकी एकाने त्यांच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा रक्त व पाण्याचा ओघ बाहेर पडला. \v 35 ज्या मनुष्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की तो सत्य बोलत आहे आणि तो साक्ष देतो यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. \v 36 सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,”\f + \fr 19:36 \fr*\ft \+xt निर्ग 12:46; गण 9:12; स्तोत्र 34:20\+xt*\ft*\f* \v 37 आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”\f + \fr 19:37 \fr*\ft \+xt जख 12:10\+xt*\ft*\f* \s1 येशूंचा अंत्यसंस्कार \p \v 38 त्यानंतर अरिमथियाकर योसेफाने येशूंचे शरीर पिलाताकडे मागितले. आता योसेफ येशूंचा एक गुप्त अनुयायी असून यहूदी पुढार्‍यांना भीत होता. पिलाताच्या परवानगीने, तो आला आणि येशूंचे शरीर घेऊन गेला. \v 39 जो येशूंकडे रात्री आलेला होता, तो निकदेमही त्याच्याबरोबर होता व त्याने आपल्याबरोबर गंधरस व अगरू यांचे सुमारे चौतीस कि.ग्रॅ.\f + \fr 19:39 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa शंभर लित्रा\fqa*\f* मिश्रण आणले होते. \v 40 येशूंचे शरीर घेऊन त्या दोघांनी ते सुगंधी द्रव्यासह तागाच्या वस्त्राने गुंडाळले. हे यहूद्यांच्या उत्तरक्रियेच्या रीतीप्रमाणे होते. \v 41 ज्या ठिकाणी येशूंना क्रूसावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर होती, त्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. \v 42 शब्बाथ सुरू होण्यापूर्वी सर्वकाही उरकण्याची घाई होती व ही कबर जवळच होती, म्हणून त्यांनी येशूंचे शरीर त्याच कबरेत ठेवले. \c 20 \s1 रिकामी कबर \p \v 1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटेस, अंधार असताना, मरीया मग्दालिया कबरेकडे गेली आणि प्रवेशद्वारावरून मोठी धोंड बाजूला लोटलेली आहे, असे तिने पाहिले. \v 2 तेव्हा धावतच ती शिमोन पेत्र व दुसरा शिष्य, ज्यावर येशूंची प्रीती होती, त्यांना येऊन म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आहे आणि त्यांना कुठे ठेवले आहे ते आम्हाला माहीत नाही!” \p \v 3 मग पेत्र आणि दुसरा शिष्य कबरेकडे निघाले. \v 4 दोघेही धावत होते, परंतु तो दुसरा शिष्य पेत्रापुढे धावत गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला. \v 5 त्याने डोकावून आत पाहिले, तेव्हा तिथे त्याने तागाच्या पट्ट्या पडलेल्या पाहिल्या, परंतु तो आत गेला नाही. \v 6 एवढ्यात शिमोन पेत्र त्याच्यामागून आला आणि सरळ कबरेच्या आत गेला. त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, \v 7 त्याप्रमाणे जे कापड येशूंच्या डोक्याला गुंडाळून बांधले होते, ते कापड अजूनही त्याच ठिकाणी तागाच्या वस्त्रापासून वेगळे पडलेले होते असे त्याने पाहिले. \v 8 शेवटी दुसरा शिष्य, जो प्रथम कबरेजवळ पोहोचला होता, तोही आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. \v 9 कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता. \v 10 नंतर शिष्य एकत्र जिथे राहत होते तिथे ते परत गेले. \s1 येशू मरीया मग्दालिनीला दर्शन देतात \p \v 11 परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले. \v 12 आणि तिला, जिथे येशूंचे शरीर ठेवले होते तिथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले. \p \v 13 त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” \p तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कुठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.” \v 14 असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही. \p \v 15 येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” \p तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर तुम्ही कुठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.” \p \v 16 येशू तिला म्हणाले, “मरीये.” \p त्यांच्याकडे वळून ती अरामी भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.” \p \v 17 येशू म्हणाले, “मला स्पर्श करू नको, कारण मी अद्याप पित्याकडे वर गेलो नाही. पण तू जा आणि माझ्या भावांना सांग, की ‘मी वर माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे.’ ” \p \v 18 मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: “मी प्रभूला पाहिले आहे!” ज्यागोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या. \s1 येशू शिष्यांना दर्शन देतात \p \v 19 आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असता, यहूदी पुढार्‍यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!” \v 20 असे बोलल्यावर, त्यांनी आपले हात व आपली कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना अतिशय आनंद झाला. \p \v 21 पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.” \v 22 आणि येशूंनी त्यांच्यावर श्वास फुंकला व म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. \v 23 तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्यांची क्षमा होईल; पण जर तुम्ही क्षमा केली नाही, तर त्यांची क्षमा होणार नाही.” \s1 येशू थोमाला दर्शन देतात \p \v 24 येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा या नावाने ओळखला जाणारा थोमा तिथे शिष्यांबरोबर नव्हता. \v 25 इतर शिष्य त्याला सांगू लागले, “आम्ही प्रभूला पाहिले!” \p परंतु तो त्यांना म्हणाला, “त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जिथे खिळे ठोकले होते तिथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.” \p \v 26 एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!” \v 27 नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.” \p \v 28 थोमाने म्हटले, “माझे प्रभू व माझे परमेश्वर!” \p \v 29 मग येशूंनी त्याला म्हटले, “कारण तू मला पाहिले आहेस, म्हणून तू विश्वास ठेवतोस; परंतु न पाहता विश्वास ठेवणारे धन्य होत.” \s1 योहान शुभवार्तेचा उद्देश \p \v 30 येशूंनी अनेक चिन्हे आपल्या शिष्यांदेखत केली, ती या पुस्तकात कथन केलेली नाहीत. \v 31 परंतु हे यासाठी नोंदले आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत व त्यांच्या नावावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभावे. \c 21 \s1 येशू आणि मासे धरण्याचा चमत्कार \p \v 1 त्यानंतर येशू पुन्हा तिबिर्‍यास सरोवराजवळ शिष्यांस प्रगट झाले, ते असे घडले: \v 2 शिमोन पेत्र, दिदुम म्हणून ओळखला जाणारा थोमा, गालीलातील काना येथील नाथानाएल, जब्दीचे पुत्र आणि दुसरे दोन शिष्य एकत्रित होते. \v 3 शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास बाहेर जात आहे,” तेव्हा ते पेत्राला म्हणाले, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते बाहेर निघून होडीत बसले, परंतु त्या रात्री ते काहीही धरू शकले नाही. \p \v 4 पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही. \p \v 5 येशूंनी हाक मारून विचारले, “मित्रांनो, तुमच्याजवळ काही मासे आहेत काय?” \p “नाही,” त्यांनी उत्तर दिले. \p \v 6 मग त्यांनी म्हटले, “होडीच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला काही सापडतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मासे मिळाले की त्यांना जाळे ओढणे अशक्य झाले. \p \v 7 मग ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “ते प्रभू आहेत!” शिमोन पेत्राने, “ते प्रभू आहेत,” हे ऐकताच आपला अंगरखा कंबरेभोवती गुंडाळला, कारण त्याने तो काढून ठेवला होता आणि पाण्यात उडी मारली. \v 8 दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे नव्वद मीटर अंतरावर होते. \v 9 मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी व काही भाकरी ठेवल्या होत्या. \p \v 10 येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.” \v 11 शिमोन पेत्राने परत मचव्यावर चढून जाळे काठावर ओढून आणले. त्याने मोजल्याप्रमाणे त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते आणि इतके असूनही ते जाळे फाटले नव्हते. \v 12 येशू त्यांना म्हणाले, “या आणि न्याहरी करा.” आपण कोण आहात? असे विचारण्याचे त्यांच्या शिष्यांपैकी एकालाही धैर्य झाले नाही, परंतु ते प्रभू आहे हे त्यांना माहीत होते. \v 13 मग येशू आले, त्यांनी भाकर घेऊन त्यांना दिली व मासळीचेही त्यांनी तसेच केले. \v 14 मेलेल्यातून उठल्यावर शिष्यांना प्रगट होण्याची येशूंची ही तिसरी वेळ होती. \s1 येशू पेत्राची पुनर्स्थापना करतात \p \v 15 जेवल्यानंतर येशू शिमोन पेत्राला म्हणाले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?” \p तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “होय, प्रभू, आपणाला माहीत आहे, की माझे तुमच्यावर प्रेम आहे.” \p येशूंनी त्याला म्हटले, “तर माझ्या कोकरांना चार.” \p \v 16 येशूंनी पुन्हा विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?” \p पेत्र म्हणाला, “होय, प्रभू मी आपणावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” \p येशू त्याला म्हणाले, “माझ्या मेंढरांना पाळ.” \p \v 17 तिसर्‍या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” \p “तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला “प्रभूजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो.” \p येशू म्हणाले, “माझ्या मेंढरांस चार. \v 18 मी तुला निश्चित सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा पोशाख चढवून तुला हवे तिथे जात होतास; परंतु तू जेव्हा वृद्ध होशील, तेव्हा तू आपले हात पसरशील आणि मग दुसरे तुला पोशाख घालतील आणि तुला जिथे जावयास नको तिथे नेतील.” \v 19 परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पेत्र कोणत्या प्रकारच्या मरणाने मरेल, हे त्याला कळावे, म्हणून येशू असे बोलले. मग येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये!” \p \v 20 मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो त्यांच्यामागे येत होता असे त्याने पाहिले. भोजनाच्या वेळी येशूंच्या उराशी असता मागे वळून, “प्रभूजी, आपला घात कोण करणार आहे?” असे ज्याने विचारले होते तो हा शिष्य होता. \v 21 पेत्राने त्याला पाहिल्यावर येशूंना विचारले, “प्रभूजी, याचे काय?” \p \v 22 त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी पुन्हा येईपर्यंत त्याने जगावे, अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तुला माझ्यामागे आलेच पाहिजे.” \v 23 या कारणाने, तो शिष्य मरणार नाही अशी अफवा विश्वासणार्‍यांमध्ये पसरली. परंतु तो मरणार नाही, असे ते म्हणाले नव्हते; येशू ख्रिस्त एवढेच म्हणाले होते, “मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली, तर त्याचे तुला काय?” \p \v 24 तो हा शिष्य ज्याने या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली आणि त्या लिहून ठेवल्या. त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. \p \v 25 येशूंनी दुसरीही बहुत कृत्ये केलीत. मला वाटते, जर सर्व घटना लिहून काढल्या, तर इतकी पुस्तके होतील की ती या संपूर्ण जगात मावणार नाहीत.