\id JER - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h यिर्मयाह \toc1 यिर्मयाहची भविष्यवाणी \toc2 यिर्मयाह \toc3 यिर्म \mt1 यिर्मयाहची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील याजकांपैकी हिल्कियाहचा पुत्र यिर्मयाहचे वचन. \v 2 यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले, \v 3 आणि यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम, याच्या राजवटीपासून आणि यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याच्या राजवटीच्या अकराव्या वर्षाच्या पाचवा महिना संपला, जेव्हा यरुशलेममधील लोक बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा. \b \s1 यिर्मयाहचे पाचारण \p \v 4 याहवेहचे वचन मला मिळाले ते असे, \q1 \v 5 “मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो\f + \fr 1:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa निवडले\fqa*\f*, \q2 तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; \q2 आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.” \p \v 6 मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.” \p \v 7 परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल. \v 8 त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे,” याहवेह असे जाहीर करीत आहेत. \p \v 9 तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे. \v 10 पाहा, आज मी तुझी काही राष्ट्रे आणि राज्ये उपटून टाकण्यासाठी, काहींचा नाश करण्यासाठी, तर काहींची स्थापना, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांच्यावर तुझी नेमणूक करीत आहे.” \p \v 11 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “यिर्मयाह, तुला काय दिसते?” \p तेव्हा मी उत्तर दिले, “मला बदाम वृक्षाची फांदी दिसते.” \p \v 12 याहवेहनी मला म्हटले, “तुला योग्य दिसले, अगदी बरोबर सांगितलेस, मी आपले वचन पूर्ण झालेले पाहत आहे.” \p \v 13 याहवेहचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले: “तुला काय दिसते?” \p मी उत्तर दिले, “मला उकळत्या पाण्याचे एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडून आमच्या दिशेने तिरपे झालेले आहे.” \p \v 14 याहवेह मला म्हणाले, “या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांवर उत्तरेकडून संकट येऊन पडेल. \v 15 मी उत्तरेकडील राष्ट्रांच्या सर्व लोकांना आवाहन केले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. \q1 “त्यांचे राजे येतील व त्यांची सिंहासने \q2 यरुशलेमच्या प्रवेश व्दारावर स्थापतील. \q1 ते तटाच्या सर्व बाजूला \q2 व यहूदीयाच्या सर्व नगरांविरुद्ध येतील. \q1 \v 16 मी माझ्या लोकांविरुद्ध माझ्या न्यायाची घोषणा करेन, \q2 कारण त्यांनी माझा त्याग करण्याचे वाईट कृत्य केले आहे. \q1 इतर दैवतांच्या मूर्तीला धूप जाळला \q2 व स्वतःच्या हस्तकृतींची पूजा केली आहे. \p \v 17 “तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन. \v 18 आज मी तुला तटबंदीचे नगर केले आहे, या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध उभे राहण्यासाठी लोहस्तंभासारखे व भक्कम कास्य दरवाजांसारखे केले आहे—यहूदीयाचे राजे, त्यांचे अधिकारी, याजक आणि लोक या सर्वांविरुद्धच. \v 19 ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात. \c 2 \s1 इस्राएल परमेश्वराचा त्याग करतात \p \v 1 तेव्हा याहवेहचे वचन मला प्राप्त झाले: \v 2 “जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: \b \p “याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी \q2 तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. \q1 आणि रानात \q2 व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला. \q1 \v 3 इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते; \q2 त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते. \q1 ज्यांनी त्यांचा नाश केला, \q2 त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 4 याकोबाचे वंशजा, याहवेहचे वचन ऐका, \q2 सर्व इस्राएली कुळांनो तुम्ही सुद्धा. \p \v 5 याहवेह असे म्हणतात: \q1 “तुमच्या पूर्वजांना माझ्याठायी असा कोणता अन्याय दिसला की \q2 ते माझ्यापासून इतके दूर गेले? \q1 आणि ते व्यर्थ मूर्तींना अनुसरू लागले, \q2 आणि स्वतःही तसेच निरुपयोगी बनले? \q1 \v 6 त्यांनी असे विचारले नाही, \q2 ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले \q1 आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, \q2 वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, \q1 निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, \q2 ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही \q1 व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, \q2 ते याहवेह कुठे आहेत?’ \q1 \v 7 मी तुम्हाला एका सुपीक भूमीवर घेऊन आलो, \q2 तिची उपज आणि तिचे उत्तमोत्तम पदार्थ खाण्यासाठी आणले. \q1 परंतु तुम्ही ती भूमी अशुद्ध केली \q2 आणि माझे वतन अमंगळ केले. \q1 \v 8 याजकांनी विचारले नाही, \q2 ‘याहवेह कुठे आहेत?’ \q1 नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती; \q2 त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे. \q1 संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले, \q2 आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले. \b \q1 \v 9 “यास्तव मी तुमच्याविरुद्ध आरोप करणार आहे,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q2 “आणि मी तुमच्या मुलांच्या मुलांवरही आरोप लावणार. \q1 \v 10 समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम\f + \fr 2:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्याला सध्याच्या काळात सायप्रस म्हणून ओळखले जाते\fqa*\f* बेटाच्या तटावर जा आणि पाहा, \q2 केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; \q2 अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा: \q1 \v 11 कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय? \q2 (जरी ते सर्व देव नाहीतच.) \q1 परंतु माझ्या लोकांनी आपल्या गौरवी परमेश्वराची \q2 व्यर्थ मूर्तींशी अदलाबदल केली. \q1 \v 12 हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा \q2 आणि भीतीने गर्भगळीत व्हा,” \q2 अशी याहवेह घोषणा करतात. \q1 \v 13 “माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: \q1 त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्‍याला, \q2 म्हणजे मला, सोडले आहे, \q1 आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, \q2 गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत. \q1 \v 14 जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का? \q2 मग ते सगळ्यांची लूट का झाले आहेत? \q1 \v 15 सिंहगर्जना करतात; \q2 त्यांनी त्यांच्यावर मोठ्याने गर्जना केली. \q1 त्यांनी त्यांची भूमी उद्ध्वस्त केली; \q2 त्यांची गावे जाळली व वैराण केली आहेत. \q1 \v 16 मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी \q2 तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे. \q1 \v 17 ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले \q2 त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, \q2 ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का? \q1 \v 18 आता इजिप्तकडे कशाला जाता \q2 नील नदीचे पाणी पिण्यासाठी काय? \q1 आणि अश्शूराकडे का जावे \q2 फरात नदीचे पाणी पिण्यासाठी काय? \q1 \v 19 तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; \q2 तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. \q1 म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल \q2 याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे \q1 तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, \q2 आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” \q2 सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात. \b \q1 \v 20 “फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले \q2 व मी बांधलेले दावे तोडून टाकले; \q2 तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’ \q1 अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर, \q2 आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली \q2 तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात. \q1 \v 21 मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते \q2 उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते. \q1 मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात \q2 भ्रष्ट व रानटी लता का झालात? \q1 \v 22 तुम्ही स्वतःला साबणाने धुतले \q2 आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, \q2 तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” \q2 असे सार्वभौम याहवेह म्हणतात. \q1 \v 23 “तुम्हाला कसे म्हणता येईल ‘मी अशुद्ध नाही; \q2 मी बआल दैवताच्या मागे गेलो नाही’? \q1 दरीत जाऊन तुम्ही कसे वागले ते पाहा, \q2 तुमच्या आचरणाबद्धल विचार करा. \q1 इकडे तिकडे पळणार्‍या \q2 चपळ उंटिणीसारखे तुम्ही आहात. \q1 \v 24 वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, \q2 तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; \q2 तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? \q1 कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; \q2 संभोगासमयी त्यांना ती सापडेल. \q1 \v 25 तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, \q2 आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. \q1 परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! \q2 मी परकीय दैवतावर प्रेम करतो, \q2 आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’ \b \q1 \v 26 “चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, \q2 तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— \q1 ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, \q2 त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण. \q1 \v 27 लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’ \q2 आणि पाषाणाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ \q1 त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे, \q2 पण त्यांचे मुख नव्हे; \q1 परंतु संकट समय येताच ते माझा धावा करून म्हणतात, \q2 ‘या आणि आमचे रक्षण करा!’ \q1 \v 28 तुम्ही स्वतःसाठी निर्माण केलेली दैवते कुठे आहेत? \q2 जर ते तुमचे रक्षण करू शकतील, तर त्यांनी यावे \q2 तुमच्या संकटसमयी यावे! \q1 तुम्ही यहूदीया, तुमच्या दैवतांची संख्या इतकी आहे \q2 जेवढी नगरे तुमच्या प्रांतात आहेत. \b \q1 \v 29 “तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता? \q2 तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 30 “मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; \q2 त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. \q1 तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला \q2 जणू एखादा खवखवलेला सिंहच. \p \v 31 “या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा: \q1 “मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे \q2 किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय? \q1 माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत; \q2 आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’? \q1 \v 32 एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा \q2 एखादी वधू आपली विवाहाभूषणे विसरेल का? \q1 तरी माझे लोक मला, \q2 असंख्य दिवसापासून विसरले आहेत. \q1 \v 33 तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात! \q2 अत्यंत चरित्रहीन स्त्रियांनाही तुमच्यापासून धडे शिकता येतील. \q1 \v 34 निष्पाप लोकांच्या रक्ताने \q2 तुमची वस्त्रे माखली आहेत, \q2 तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही. \q1 असे सर्व असूनही \q2 \v 35 तुम्ही म्हणता, ‘मी निर्दोष आहे; \q2 परमेश्वर माझ्यावर रागावले नाहीत.’ \q1 परंतु मी तुमचा न्याय करेन \q2 कारण तुम्ही म्हटले, ‘मी पाप केलेले नाही.’ \q1 \v 36 तुम्ही आपले मार्ग सोडून \q2 पथभ्रष्ट का होता? \q1 अश्शूरने तुमचा आशाभंग केला \q2 तसाच इजिप्तही करेल. \q1 \v 37 तुम्हीही आपले स्थान सोडणार \q2 आपले हात डोक्यावर ठेऊन जाल, \q1 कारण ज्यांच्यावर तुमचा भरवसा आहे, त्यांनाच याहवेहने नाकारले आहे. \q2 ते तुम्हाला मदत करणारच नाहीत. \b \b \c 3 \q1 \v 1 “जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला \q2 आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, \q1 तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? \q2 असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? \q1 परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— \q2 तू माझ्याकडे आता परत येणार का?” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 2 “उजाड टेकडीकडे आपली दृष्टी कर व पाहा. \q2 असे कोणते स्थान आहे जिथे तुझ्यासह कुकर्म केले गेले नाही? \q1 रस्त्याच्या कडेला तू आपल्या प्रियकरांची वाट बघतेस, \q2 एखाद्या अरबीचे\f + \fr 3:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa भटक्या\fqa*\f* जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखी बसून राहतेस. \q1 आपल्या कुकर्माने व जारकर्माने \q2 तू सर्व भूमी दूषित केली आहेस. \q1 \v 3 यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. \q2 वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, \q1 तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, \q2 पण तू शरमिंदी होण्यास नकार देते. \q1 \v 4 तू मला आताच म्हणालीस ना, \q2 ‘माझ्या पित्या, माझ्या तारुण्यातील मित्रा, \q1 \v 5 तू नेहमीसाठी रागावला आहेस का? \q2 हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ \q1 याप्रकारे तू बोलतेस, \q2 परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.” \s1 अविश्वासू इस्राएल \p \v 6 योशीयाह राजाच्या शासनकाळात, याहवेहने मला म्हटले, “तुम्ही पहिले का अविश्वासू इस्राएलने काय केले आहे? एखाद्या दुराचारी स्त्रीप्रमाणे प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली व्यभिचार करते. \v 7 मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला. \v 8 मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला. \v 9 कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे. \v 10 हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात. \p \v 11 याहवेहने मला म्हटले, “विश्वासघातकी यहूदीयापेक्षा विश्वासहीन इस्राएल अधिक नीतिमान आहे. \v 12 उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा: \q1 “ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये, \q2 मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही, \q1 कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात \q2 ‘मी नेहमीच क्रोध करणार नाही, \q1 \v 13 केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा— \q2 तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे, \q1 इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली \q2 प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली, \q2 माझे आज्ञापालन केले नाही,’ ” \q2 असे याहवेह म्हणतात. \p \v 14 “विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन. \v 15 नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल. \v 16 हे त्या दिवसामध्ये होईल, जेव्हा तुम्ही देशात बहुगुणित व्हाल,” याहवेह अशी घोषणा करतात, “तेव्हा लोक असे म्हणणार नाहीत, ‘याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या मनात येणार नाही.’ ते कधीही त्यांच्या लक्षात येणार नाही, त्यांना आठवणसुद्धा राहणार नाही; ते त्याच्याविषयी पुन्हा विचार करणार नाहीत, दुसरा कोश पुन्हा निर्माण होणार नाही. \v 17 त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत. \v 18 त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील. \p \v 19 “मी स्वतःला म्हटले, \q1 “ ‘तुम्हाला माझ्या मुलाबाळांप्रमाणे वागवितांना मला किती आनंद होईल \q2 आणि मी तुम्हाला सुखद भूमी देईन, \q2 कोणत्याही देशापेक्षा अधिक सुंदर वतन.’ \q1 मला वाटले तू मला ‘पिता’ म्हणून हाक मारशील \q2 आणि माझे अनुसरण करण्यापासून मागे फिरणार नाही. \q1 \v 20 परंतु आपल्या पतीला सोडून जाणार्‍या विश्वासघातकी स्त्रीसारखे \q2 तू इस्राएलाच्या घराण्या माझा विश्वासघात केला,” \q2 असे याहवेह म्हणतात. \b \q1 \v 21 उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे, \q2 तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज, \q1 कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत \q2 आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत. \b \q1 \v 22 “विश्वासहीन लोकांनो परत या; \q2 मी तुमच्यामागे घसरणीस बरे करेन.” \b \q1 “होय, आम्ही तुमच्याकडे येऊ, \q2 कारण तुम्हीच आमचे परमेश्वर याहवेह आहात. \q1 \v 23 निश्चितच डोंगरावरील गोंधळ \q2 व पर्वतावरील फसवणूक; \q1 निश्चितच आमचे परमेश्वर याहवेह \q2 हेच इस्राएलचे तारण आहेत. \q1 \v 24 आमच्या तारुण्यापासून लाजिरवाण्या दैवतांनी \q2 आमच्या पूर्वजांच्या कष्टाची फळे— \q1 त्यांच्या जनावरांचे थवे व कळप, \q2 त्यांचे पुत्र आणि कन्या गिळंकृत केले आहेत. \q1 \v 25 आम्ही लज्जास्पद अवस्थेत लोळू \q2 आमची विटंबना आम्हाला झाकून टाको. \q1 आम्ही आमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, \q2 आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी; \q1 तारुण्यापासून आजपर्यंत \q2 आमच्या याहवेह परमेश्वराची आज्ञा आम्ही पाळली नाही.” \b \c 4 \q1 \v 1 याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,” \q2 “मग माझ्याकडे परत ये.” \q1 “जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील \q2 आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही, \q1 \v 2 आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील, \q2 ‘जिवंत याहवेहची शपथ वाहशील,’ \q1 तर मग राष्ट्रे याहवेहच्या द्वारे आशीर्वादित होतील. \q2 आणि याहवेहच्या नामामध्ये त्यांचा गौरव करतील.” \p \v 3 यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात: \q1 “तुमची कठीण भूमीवर नांगरून घ्या, \q2 काट्यांमध्ये बीजारोपण करू नका. \q1 \v 4 अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो \q2 याहवेहसाठी तुमची सुंता करा, \q2 तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, \q1 नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल \q2 कारण तुम्ही पापे केली आहेत— \q2 तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.” \s1 उत्तरेकडून येणारी आपत्ती \q1 \v 5 “यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा: \q2 ‘संपूर्ण राष्ट्रांत रणशिंगे फुंका!’ \q1 मोठ्याने ओरडून सांगा: \q2 ‘सर्वजण एकत्र या! \q2 तटबंदीच्या नगरात शरण घ्या!’ \q1 \v 6 सीयोनच्या दिशेने ध्वजेचा संकेत करा! \q2 विलंब न करता सुरक्षित ठिकाणी पळ काढा! \q1 कारण मी उत्तरेकडून महान संकट आणत आहे, \q2 होय, एक भयानक विनाश.” \b \q1 \v 7 सिंह आपल्या गुहेतून बाहेर पडला आहे; \q2 राष्ट्रांचा विनाशक आलेला आहे. \q1 त्याने आपले निवास सोडले आहे. \q2 तुमच्या भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी. \q1 तुमची नगरे उजाड होतील \q2 आणि निर्जन होतील. \q1 \v 8 म्हणून आपल्या अंगावर गोणपाट वेष चढवा, \q2 शोक व आक्रोश करा. \q1 कारण याहवेहचा महाभयंकर क्रोध \q2 अजून आमच्यावरून शमलेला नाही. \b \q1 \v 9 याहवेह असे म्हणतात, “त्या दिवशी असे घडेल,” \q2 “राजा आणि अधिकारी भीतीने गर्भगळीत होतील, \q1 याजकांना भयाने धडकी भरेल \q2 आणि संदेष्टे भीतीने गांगरून जातील,” \p \v 10 त्यावर मी म्हटले, “परंतु हे सार्वभौम याहवेह! तुम्ही यरुशलेमातील लोकांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे, असे म्हणून ‘तुम्हाला शांती लाभेल,’ पण आम्हाला जिवे मारण्यासाठी तलवार गळ्यावर उगारली आहे!” \p \v 11 त्यावेळी या लोकांना व यरुशलेमला सांगितल्या जाईल, “वाळवंटातील उजाड टेकड्यांवरून दाहक वारा माझ्या लोकांकडे येईल, परंतु पाखडणे किंवा स्वच्छ करण्यासाठी नाही. \v 12 तो झंझावाती वारा माझ्याकडून येईल. आता मी त्यांच्याविरुद्ध माझा न्याय जाहीर करेन.” \q1 \v 13 पाहा! तो ढगांसारखा पुढे येत आहे, \q2 चक्रीवादळाप्रमाणे त्याचे रथ आहेत, \q1 त्यांच्या घोड्यांचा वेग गरुडांहून जास्त आहे. \q2 हाय! हाय! आमचा नायनाट झाला आहे! \q1 \v 14 यरुशलेम, तुमच्या अंतःकरणाची अशुद्धता स्वच्छ करा आणि तुमचे रक्षण होईल. \q2 किती काळ तुम्ही तुमचे दुष्ट विचार अंतःकरणात ठेवणार? \q1 \v 15 दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, \q2 एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे. \q1 \v 16 “राष्ट्रांना सांगा, \q2 यरुशलेमविषयी घोषणा करा: \q1 ‘शहराला वेढा घालण्यासाठी दूर देशाचे सैन्य येत आहे, \q2 यहूदीयाच्या शहराविरुद्ध रणगर्जना करीत आहेत. \q1 \v 17 त्यांनी तिला एखाद्या शेताच्या राखणदारांसारखे घेरले आहे, \q2 कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केले आहे,’ ” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 18 “तुमच्या वागणुकीमुळे व वाईट कृत्यामुळे \q2 हा प्रसंग तुम्ही स्वतःवर ओढवून घेतला आहे. \q1 तुमची ही शिक्षा आहे! \q2 किती कडू आहे हे! \q2 कसे अंतःकरण छेदून टाकले आहे!” \b \q1 \v 19 अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! \q2 मला अत्यंत वेदना होत आहेत. \q1 अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! \q2 माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, \q2 मी शांत राहू शकत नाही. \q1 कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; \q2 मी युद्धाची ललकारी ऐकली आहे. \q1 \v 20 एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते; \q2 सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे. \q1 माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे, \q2 क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे. \q1 \v 21 किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे \q2 आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार? \b \q1 \v 22 “माझे लोक मूर्ख आहेत; \q2 ते मला ओळखत नाही. \q1 ते असमंजस मुलांसारखे आहेत. \q2 त्यांना समज अजिबात नाही. \q1 दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; \q2 त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.” \b \q1 \v 23 मी पृथ्वीकडे पाहिले, \q2 आणि ती निराकार आणि रिकामी होती; \q1 आणि आकाशाकडे दृष्टी केली \q2 आणि तेथील प्रकाश नाहीसा झाला होता. \q1 \v 24 मी पर्वतांकडे पाहिले, \q2 ते कंपायमान झालेले होते; \q2 सर्व डोंगर डळमळत होते. \q1 \v 25 मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता; \q2 आकाशातील सर्व पक्षी उडून गेलेले होते. \q1 \v 26 सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती; \q2 आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती \q2 याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे. \p \v 27 याहवेह असे म्हणतात: \q1 “संपूर्ण भूमी उजाड होईल, \q2 तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही. \q1 \v 28 यास्तव पृथ्वी शोक करेल \q2 आणि आकाशात काळोख होईल, \q1 कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, \q2 मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.” \b \q1 \v 29 घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच \q2 आवाजाने सर्व नगरे घाबरून पळतात. \q1 काही लोक झुडूपात लपून बसतात; \q2 आणि डोंगरा-पर्वतांवर चढतात. \q1 सर्व नगरे उजाड पडली आहेत; \q2 कोणीही त्यात राहत नाही. \b \q1 \v 30 हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? \q2 कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस \q2 आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? \q1 आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? \q2 या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. \q1 तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; \q2 तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे. \b \q1 \v 31 एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, \q2 जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— \q1 सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, \q2 ती आपले हात पसरून म्हणत आहे, \q1 “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; \q2 माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.” \c 5 \s1 एकही प्रामाणिक नाही \q1 \v 1 “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, \q2 शोध घे व विचार कर, \q2 तिच्या चौकात तपास कर. \q1 असा एक जरी मनुष्य आढळला \q2 जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, \q2 तरी मी या नगराला क्षमा करेन. \q1 \v 2 ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात \q2 पण ते ही खोटीच शपथ घेतात.” \b \q1 \v 3 हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? \q2 तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. \q2 तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. \q1 आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली \q2 व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले. \q1 \v 4 मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; \q2 ते निर्बुद्ध आहेत, \q1 त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही \q2 त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही. \q1 \v 5 मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन \q2 व त्यांच्याशी बोलेन; \q1 कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. \q2 त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” \q1 पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. \q2 आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत. \q1 \v 6 म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, \q2 वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, \q1 त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, \q2 आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; \q1 कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे \q2 त्यांची घसरण फार मोठी आहे. \b \q1 \v 7 “मी तुम्हाला का क्षमा करू? \q2 तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे \q2 आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. \q1 मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, \q2 तरी त्यांनी व्यभिचार केला \q2 वेश्यागृहात गर्दी केली. \q1 \v 8 हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत, \q2 प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीची लालसा धरतो. \q1 \v 9 हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? \q2 ही याहवेहची जाहीर वाणी आहे. \q1 अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः \q2 प्रतिकार करू नये काय? \b \q1 \v 10 “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. \q2 पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. \q1 वेलीच्या फांद्या तोडून टाका, \q2 कारण हे लोक याहवेहचे नाहीत. \q1 \v 11 इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी \q2 माझा घोर विश्वासघात केला आहे,” \q2 असे याहवेह म्हणतात. \b \q1 \v 12 ते याहवेहबद्दल खोटे बोलतात; \q2 ते म्हणतात, “ते काहीही करणार नाहीत! \q1 आमच्यावर अरिष्ट कोसळणारच नाही; \q2 आम्ही दुष्काळ आणि लढाई बघणारही नाही. \q1 \v 13 संदेष्टे निव्वळ वारा आहेत \q2 त्यांच्यामध्ये परमेश्वराचे वचन नाही. \q2 म्हणून ते जे काही बोलतात ते सर्व त्यांच्यावरच कोसळू दे.” \p \v 14 म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: \q1 “कारण या लोकांनी हे शब्द उच्चारले आहेत, \q2 मी तुमच्या मुखात माझे शब्द भडकत्या अग्नीसारखे करेन \q2 आणि जो या लोकांना सरपणाच्या लाकडांप्रमाणे जाळून भस्म करेल.” \q1 \v 15 याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, \q2 मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या \q1 बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— \q2 त्यांची भाषा तू जाणत नाही, \q2 त्यांची वाणी तुला समजत नाही. \q1 \v 16 त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे; \q2 त्यांचे सर्व योद्धे प्रतापी आहेत. \q1 \v 17 ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, \q2 तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, \q1 गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, \q2 आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. \q1 त्यांच्या तलवारीने ते तुमची \q2 जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील. \p \v 18 “परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात. \v 19 जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल. \q1 \v 20 “याकोबाच्या वंशजांना \q2 आणि यहूदीयाला हे जाहीर कर: \q1 \v 21 ऐका, अहो मूर्खानो व बुद्धिहीन लोकांनो, \q2 तुम्हाला डोळे आहेत तरी तुम्हाला दिसत नाही, \q2 कान आहेत तरी तुम्हाला ऐकू येत नाही: \q1 \v 22 तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” \q2 असे याहवेह विचारतात. \q2 “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? \q1 सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, \q2 एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, \q1 म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; \q2 त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही. \q1 \v 23 परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत; \q2 माझ्याकडे पाठ फिरवून ते पथभ्रष्ट झाले आहेत. \q1 \v 24 ते स्वतःस असे म्हणत नाहीत, \q2 ‘आपण आपल्या याहवेह परमेश्वराचे भय धरू, \q1 जे आपल्याला प्रत्येक वर्षी वसंतॠतूत, हिवाळ्यात पाऊस देतात, \q2 जे आपल्याला निश्चित वेळेवर पीक देतात.’ \q1 \v 25 तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात; \q2 तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात. \b \q1 \v 26 “माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत \q2 शिकारी जसा आडोशाला दबा धरून पक्षांची वाट बघतो, \q2 तसे ते माणसांना पकडण्यासाठी सापळे लावतात. \q1 \v 27 पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे, \q2 तशी त्यांची घरे कपटाने भरलेली आहेत, \q1 म्हणून आता ते बलवान व श्रीमंत बनले आहेत. \q2 \v 28 ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत. \q1 त्यांच्या दुष्कर्मांना मर्यादाच नाही; \q2 ते न्याय करीत नाहीत. \q1 अनाथांच्या न्यायाचा पाठपुरावा करीत नाहीत; \q2 आणि गरिबांच्या रास्त हक्काचे समर्थन करत नाहीत. \q1 \v 29 मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” \q2 असे याहवेह विचारतात. \q1 “अशा राष्ट्राचा मी स्वतः \q2 सूड घेऊ नये का? \b \q1 \v 30 “या देशात एक महाभयंकर \q2 व धक्कादायक गोष्ट घडली आहे: \q1 \v 31 संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, \q2 याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, \q1 आणि माझ्या लोकांना ते आवडते. \q2 पण शेवटी तुम्ही काय करणार आहात? \c 6 \s1 यरुशलेमला वेढा पडतो \q1 \v 1 “बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा! \q2 यरुशलेममधून पळून जा! \q1 तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच \q2 बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या! \q1 कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे, \q2 भयंकर विनाश. \q1 \v 2 सीयोनाच्या सुंदर आणि सुकुमार कन्येला \q2 मी उद्ध्वस्त करेन. \q1 \v 3 मेंढपाळ त्यांचे कळप सोबत घेऊन तिच्याविरुद्ध येतील; \q2 ते तिच्या नगराभोवती त्यांचे तंबू ठोकतील, \q2 प्रत्येक कळपासाठी कुरणे विभागतील.” \b \q1 \v 4 “तिच्याविरुद्ध युद्धाची तयारी करा! \q2 उठा, चला दुपारच्या वेळी हल्ला करू! \q1 हाय हाय! परंतु आता दिवसाचा प्रकाश मंदावला आहे. \q2 आणि संध्याकाळची छाया लांब वाढत आहे. \q1 \v 5 चला, आता आपण रात्री हल्ला चढवू \q2 आणि तिच्या गडांचा नाश करू!” \p \v 6 कारण सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: \q1 “झाडे तोडून टाका \q2 आणि यरुशलेममध्ये तटबंदीची बांधणी करा. \q1 या नगराला शिक्षा झालीच पाहिजे; \q2 तिच्यात जुलूम भरलेला आहे. \q1 \v 7 ज्याप्रमाणे विहिरीच्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहते, \q2 तशी तिची दुष्टाई झर्‍याप्रमाणे उफाळून येते. \q1 तिच्या रस्त्यारस्त्यातून हिंसाचार व विनाशाचे आवाज घुमतात; \q2 तिचे रोग व तिच्या जखमा सदोदित माझ्या नजरेसमोर आहेत. \q1 \v 8 हे यरुशलेम, तुला हा इशारा आहे. \q2 नाही तर मी तुझ्यापासून दूर होईन \q1 आणि मी तुझ्या देशाला उजाड करेन \q2 जिथे कोणीही मनुष्य राहणार नाही.” \p \v 9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “ज्या प्रकारे उरलेले थोडेथोडे द्राक्ष गोळा करण्यात येतात \q2 त्याचप्रमाणे इस्राएलमधून थोड्याफार उरलेल्या निवडक लोकांना एकत्र करण्यात येईल; \q1 ज्या प्रकारे द्राक्ष गोळा करण्यात येतात, \q2 त्याप्रकारे तुमचे हात पुन्हा फांद्यांवरून फिरवा.” \b \q1 \v 10 मी कोणाशी बोलू व सावधगिरीचा इशारा देऊ? \q2 माझे कोण ऐकेल? \q1 त्यांचे कान बंद झाले आहेत\f + \fr 6:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa बेसुंती\fqa*\f* \q2 त्यांना ऐकूच येत नाही. \q1 याहवेहचे वचन त्यांना संतप्त करते; \q2 त्यांना ते सुखद वाटत नाही. \q1 \v 11 परंतु मी याहवेहच्या क्रोधाने भडकलो आहे, \q2 हा क्रोध मला आवरून धरवत नाही. \b \q1 “मी हा क्रोध रस्तोरस्ती असलेल्या मुलांवर \q2 आणि तरुणांच्या गटांवर ओततो; \q1 दोघे पतिपत्नी त्यात अडकले जातील, \q2 आणि वयस्कर, जे वयातीत आहेत ते देखील. \q1 \v 12 त्यांची घरे दुसऱ्यांना देण्यात येतील, \q2 ते त्यांची शेते व त्यांच्या स्त्रियाही इतरांना दिल्या जातील, \q1 जेव्हा माझा हात मी या देशात राहणाऱ्या \q2 लोकांविरुद्ध उगारेन, तेव्हा हे घडेल,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 13 “त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत \q2 सर्वजण लोभी आहेत; \q1 संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, \q2 कपटी व्यवहार करतात. \q1 \v 14 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात \q2 की जणू ते फारसे गंभीर नाही. \q1 ‘शांती, शांती आहे’ असे ते म्हणतात, \q2 परंतु शांती कुठेही नाही. \q1 \v 15 त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? \q2 नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; \q2 लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. \q1 म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; \q2 मी जेव्हा त्यांना शिक्षा देईल तेव्हा त्यांचे पतन होईल,” \q2 असे याहवेह म्हणतात. \p \v 16 याहवेह असे म्हणतात: \q1 “चौरस्त्यावर उभे राहा व पाहा; \q2 पुरातन मार्गाची विचारणा करा, \q1 तो चांगला मार्ग कुठे आहे ते विचारा आणि त्या मार्गाने जा, \q2 तसे केल्यास तुमच्या आत्म्याला शांती लाभेल. \q2 परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही त्या मार्गाने चालणार नाही.’ \q1 \v 17 मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले, \q2 ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’ \q2 परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही ऐकणार नाही.’ \q1 \v 18 म्हणून माझ्या राष्ट्रांनो माझे ऐका; \q2 तुम्ही माझे साक्षीदार आहात, \q2 त्यांचे काय होईल ते समजून घ्या. \q1 \v 19 हे पृथ्वी तू ऐक: \q2 मी या लोकांवर महासंकट आणत आहे, \q2 त्यांच्याच कारस्थानाचे फळ, \q1 कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही \q2 आणि माझे नियम नाकारले. \q1 \v 20 शबाहून आणलेल्या सुगंधी धूपाचा मला काय उपयोग \q2 किंवा दूरदेशातील मोलाच्या द्रव्याचा काय उपयोग? \q1 तुमची होमार्पणे मला संतुष्ट करीत नाही; \q2 तुमचे यज्ञबली मला प्रसन्न करीत नाहीत.” \p \v 21 म्हणून याहवेह असे म्हणतात: \q1 “मी या लोकांच्या मार्गात अडथळे पाठवेन. \q2 त्यावर मातापिता आणि लेकरे सारखेच अडखळतील. \q2 शेजारी आणि मित्र नाश पावतील.” \p \v 22 याहवेह असे म्हणतात: \q1 “पाहा, उत्तरेकडील देशातून \q2 सैन्य येत आहे; \q1 पृथ्वीच्या शेवटापासून \q2 एक मोठे राष्ट्र भडकविले जात आहे. \q1 \v 23 त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत. \q2 ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही. \q1 ते घोड्यांवर स्वार झाले असता \q2 त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. \q1 हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी \q2 युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.” \b \q1 \v 24 आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे, \q2 आणि आमचे बाहू निखळले आहेत. \q1 बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे \q2 वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे. \q1 \v 25 शेतातून बाहेर जाऊ नका, \q2 किंवा रस्त्यांवरून प्रवास करू नका, \q1 कारण शत्रूकडे तलवार आहे, \q2 आणि प्रत्येक बाजूला आतंक पसरलेला आहे. \q1 \v 26 माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा, \q2 आणि राखेत लोळा; \q1 एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो \q2 तसा आक्रोश कर. \q1 कारण संहारक सेना एकाएकी \q2 तुझ्यावर हल्ला करेल. \b \q1 \v 27 “मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे. \q2 आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू, \q1 जेणेकरून तू त्यांना पारखावे, \q2 व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी. \q1 \v 28 ते सर्व कठोर बंडखोर आहेत, \q2 निंदा करीत फिरत आहेत. \q1 ते कास्य आणि लोखंडासारखे; \q2 त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे. \q1 \v 29 भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे. \q2 शुद्ध करणारा अग्नी शिसे भस्म करीत आहे, \q1 परंतु हे शुद्धीकरण व्यर्थ होत आहे, \q2 दुष्ट मार्गानी चालणारे पूर्णपणे शुद्ध होत नाहीत. \q1 \v 30 ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत, \q2 कारण याहवेहने त्यांचा त्याग केला आहे.” \c 7 \s1 खोटी धार्मिकतेची व्यर्थता \p \v 1 याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: \v 2 “याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर: \p “ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका. \v 3 इस्राएलचे सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुमच्या मार्गाची व वर्तणुकीची सुधारणा करा, मग मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन. \v 4 तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!” \v 5 तुम्ही तुमचे मार्ग व वर्तणूक खरोखर बदलली तर व इतरांशी न्यायाने वागाल, \v 6 जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही, \v 7 तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन. \v 8 परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत. \p \v 9 “ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा\f + \fr 7:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa खोट्या दैवताच्या नावांची शपथ\fqa*\f* घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून, \v 10 आणि मग येथे येऊन, ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे, त्या मंदिरात माझ्यासमोर उभे राहता व म्हणता “आम्ही सुरक्षित आहोत;” हे सर्व दुष्कृत्य करण्यासाठी सुरक्षित आहात काय? \v 11 हे मंदिर ज्याने माझे नाव धारण केले आहे, तुमच्यासाठी लुटारूंची गुहा झाली आहे काय? परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिले आहे! अशी याहवेह घोषणा करीत आहेत. \p \v 12 “ ‘शिलोह नगरात जा, जिथे मी सर्वप्रथम माझ्या नावाचे निवासस्थान केले, आणि माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्टाईमुळे मी काय केले ते पाहा. \v 13 याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही. \v 14 म्हणून माझे नाव धारण केलेले मंदिर, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता, जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले होते, आता त्या मंदिराचे, मी शिलोहचे केले तसेच करेन. \v 15 मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’ \p \v 16 “म्हणून या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, किंवा यांच्यासाठी माझ्याकडे विनंती किंवा विनवण्या करू नकोस. कारण मी तुझे ऐकणार नाही. \v 17 यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का? \v 18 मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात. \v 19 याहवेह विचारतात, या त्यांच्या करणीने ते मला चिथावणी देतात का? नाही! यामुळे त्यांचेच मोठे नुकसान होत नाही का, त्यांचीच बेअब्रू होत नाही का? \p \v 20 “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी माझा कोप आणि माझा क्रोध मी या जागेवर ओतेन—लोक, पशू, वृक्ष, आणि रोपे भस्मसात होतील—आणि तो अग्नी भडकेल व तो न शमणार नाही. \p \v 21 “ ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: जा पुढाकार घ्या, तुमची होमार्पणे इतर अर्पणात टाका व ते मांस तुम्हीच खा! \v 22 तुमच्या पूर्वजांना मी इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना केवळ होमार्पणे व यज्ञार्पणे याविषयीच आज्ञा दिली नव्हती, \v 23 पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. \v 24 पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली. \v 25 तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो. \v 26 परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’ \p \v 27 “जेव्हा हे सर्व तू त्यांना सांगशील, ते तुझे ऐकणार नाहीत; तू त्यांना हाक मारशील, पण ते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत. \v 28 म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे. \p \v 29 “ ‘आपले केस कापून टाक, ते फेकून दे; आणि वनस्पतिहीन पर्वतावर विलाप कर, कारण याहवेहने आपल्या क्रोधामुळे या पिढीला धिक्कारले आहे व त्यांचा त्याग केला आहे. \s1 कत्तलीचे खोरे \p \v 30 “ ‘याहवेह म्हणतात, यहूदीयाच्या लोकांनी माझ्या दृष्टीत पाप केले आहे. ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्ती ठेवून, ते मंदिर भ्रष्ट केले आहे. \v 31 बेन-हिन्नोमच्या खोर्‍यात त्यांनी तोफेत नावाची एक उच्च वेदी बांधली आहे—तिथे त्यांच्या दैवतांना ते आपल्या मुलामुलींचे होमबली देतात—अशी आज्ञा मी त्यांना मुळीच दिली नव्हती, असे भयानक कृत्य माझ्या कधी मनातही आले नाही. \v 32 म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्‍याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही. \v 33 नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही. \v 34 तेव्हा मी हर्षगीते व आनंदाचे गायन आणि वर-वधू यांचे आनंदी बोल यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावरून संपविणार आहे, कारण संपूर्ण भूमी उजाड अशी होईल. \c 8 \p \v 1 “ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील. \v 2 आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील. \v 3 जिथे कुठेही मी या राष्ट्राला हद्दपार केले, या दुष्ट राष्ट्रातील सर्व वाचलेल्या लोकांना जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटेल, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.’ \s1 पाप व शिक्षा \p \v 4 “त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘जेव्हा लोक पडतात, तेव्हा ते पुन्हा उठत नाहीत काय? \q2 जेव्हा कोणी रस्ता चुकला असेल, तर तो मागे फिरत नाही काय? \q1 \v 5 मग हे लोक परत का वळले नाही? \q2 यरुशलेम नेहमी बंडखोरी का करते? \q1 ते कपटाला चिकटून राहिले आहेत; \q2 ते वळण्यास कबूल होत नाहीत. \q1 \v 6 मी त्यांचे लक्षपूर्वक ऐकले आहे, \q2 परंतु ते योग्य ते बोलत नाहीत. \q1 त्यांच्यातील कोणीही आपल्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करीत नाही, \q2 असे म्हणत नाही की “हे मी काय केले?” \q1 प्रत्येकजण आपल्या निवडलेल्या मार्गाचा पाठपुरावा करतो \q2 जणू एखादा घोडा युद्धात धाव घेतो. \q1 \v 7 आकाशातील करकोचाला \q2 तिचे निवडलेले ऋतू माहीत आहे, \q1 आणि तसेच कबुतर, बगळा व निळवी देखील \q2 त्यांच्या स्थलांतराच्या वेळेकडे लक्ष ठेऊन असतात. \q1 परंतु माझ्या लोकांना माहीतच नाही \q2 याहवेहच्या काय अपेक्षा आहेत. \b \q1 \v 8 “ ‘तुम्ही कसे म्हणू शकता, “आम्ही बुद्धिमान आहोत, \q2 कारण आमच्याकडे याहवेहचे नियम आहेत,” \q1 खरेतर लेखनिकाच्या खोट्या लेखणीने \q2 याचा विपर्यास केला आहे? \q1 \v 9 बुद्धिमान लज्जित केले जातील; \q2 त्यांची त्रेधा उडेल आणि ते सापळ्यात अडकतील. \q1 कारण त्यांनी याहवेहचे वचन झिडकारले आहे, \q2 त्यांना कशाप्रकारचा शहाणपणा असेल? \q1 \v 10 यास्तव मी त्यांच्या स्त्रिया इतर पुरुषांना देईन \q2 आणि त्यांची शेतीवाडी नवीन मालकांना देईन. \q1 त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत \q2 सर्वजण लोभी आहेत; \q1 संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, \q2 कपटी व्यवहार करतात. \q1 \v 11 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात \q2 की जणू ते फारसे गंभीर नाही. \q1 “शांती, शांती आहे,” असे ते म्हणतात, \q2 परंतु शांती कुठेही नाही. \q1 \v 12 त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? \q2 नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; \q2 लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. \q1 म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; \q2 त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल, \q2 असे याहवेह म्हणतात. \b \q1 \v 13 “ ‘मी त्यांचे पीक काढून घेईन, \q2 याहवेह घोषित करतात \q2 द्राक्षलतेला द्राक्ष नसतील, \q1 झाडांवर अंजीर फळ दिसणार नाही, \q2 त्यांची पाने सुद्धा वाळून जातील. \q1 मी त्यांना जे काही दिले आहे \q2 त्यांच्यापासून परत घेतले जाईल.’ ” \b \q1 \v 14 आम्ही इथे का बसलो आहोत? \q2 एकत्र होऊ या! \q1 आपण तटबंदीच्या शहरात पलायन करू \q2 आणि तिथेच मरू! \q1 कारण आमच्या याहवेह परमेश्वराने आमचा नाश होण्यासाठी आम्हाला टाकून दिले आहे \q2 आणि त्यांनी आम्हाला विषारी पाणी पिण्यासाठी दिले आहे, \q2 कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध पाप केले आहे. \q1 \v 15 आम्ही शांतीची आशा करीत होतो, \q2 परंतु चांगले काही लाभलेच नाही, \q1 आरोग्य मिळण्याच्या वेळेची आशा करीत होतो, \q2 केवळ भयंकर दहशत मिळाली. \q1 \v 16 दान इथून शत्रूच्या \q2 घोड्यांचा फुरफुरण्याचा आवाज येतो; \q1 घोड्यांच्या मोठ्या किंकाळण्यांनी \q2 सर्व भूमीवर थरकाप उडाला आहे. \q1 ते भूमी आणि त्यात जे काही आहे, \q2 हे नगर आणि जे सर्व इथे राहतात, \q2 ते सर्वनाश करण्यासाठी आले आहेत. \b \q1 \v 17 “पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन, \q2 असे सर्प ज्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकणार नाही. \q2 आणि ते तुम्हाला दंश करतील,” \q2 याहवेह असे घोषित करतात. \b \q1 \v 18 तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात, \q2 माझे अंतःकरण क्षीण झाले आहे. \q1 \v 19 माझ्या लोकांचे आक्रोश ऐका \q2 दूर देशातून ते ऐकू येत आहे: \q1 “सीयोनेत याहवेह नाहीत काय? \q2 तिचा राजा तिथे नाही काय?” \b \q1 “त्यांनी कोरीव मूर्ती करून मला का संताप आणला, \q2 त्यांनी व्यर्थ परकीय दैवत का पुजले?” \b \q1 \v 20 “हंगाम संपला, \q2 उन्हाळा सरला \q2 आणि तरीही आमचे तारण झाले नाही.” \b \q1 \v 21 माझे लोक चिरडले गेले, मी चिरडलो; \q2 मी शोकाकुल झालो, भीतीने मला दहशत भरली आहे. \q1 \v 22 गिलआदात काही औषध नाही का? \q2 तिथे कोणी वैद्य नाही का? \q1 मग माझ्या लोकांच्या जखमा \q2 तिथे बऱ्या का होत नाहीत? \c 9 \q1 \v 1 हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत \q2 आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! \q1 तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत \q2 माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता. \q1 \v 2 बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे \q2 या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते. \q1 जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून \q2 त्यांच्यापासून दूर गेलो असतो; \q1 कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत, \q2 विश्वासघातकी लोकांचा एक जमाव. \b \q1 \v 3 “ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार \q2 करण्यासाठी धनुष्यांप्रमाणे तयार करतात; \q1 ते सत्याने या भूमीत \q2 विजय\f + \fr 9:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa ते सत्याचे योद्धे नाहीत\fqa*\f* मिळवित नाहीत. \q1 ते एका पापापासून दुसऱ्या पापाकडे धाव घेतात \q2 ते माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाहीत,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 4 “तुमच्या मित्रांपासून सावध राहा; \q2 तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका. \q1 कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा\f + \fr 9:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa फसविणारा याकोब\fqa*\f* आहे, \q2 व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे. \q1 \v 5 मित्र मित्रास फसवितो, \q2 आणि कोणीही सत्य बोलत नाही. \q1 त्यांनी त्यांच्या जिभेला खोटे बोलणे शिकविले आहे; \q2 अगदी दमून जाईपर्यंत ते पाप करीत राहतात. \q1 \v 6 तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे; \q2 त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,” \q2 असे याहवेह म्हणतात. \p \v 7 म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, \q2 याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार \q2 याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय? \q1 \v 8 त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; \q2 ते असत्य वचने बोलतात. \q1 त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, \q2 परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात. \q1 \v 9 अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” \q2 अशी याहवेह घोषणा करतात. \q1 “या अशा राष्ट्रावर \q2 मी स्वतः सूड उगवू नये काय?” \b \q1 \v 10 मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन \q2 आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन. \q1 कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत, \q2 गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. \q1 पक्षीसुद्धा उडून गेले आहेत. \q2 आणि जनावरेही गेली आहेत. \b \q1 \v 11 “मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, \q2 आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. \q1 यहूदीयातील नगरे उजाड करेन \q2 तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.” \p \v 12 हे सर्व समजण्याइतपत शहाणा कोण आहे? याहवेहने हे त्याला समजावून सांगितले व तो त्याचे स्पष्टीकरण करेल तो कुठे आहे? हा देश एवढा ओसाड व वाळवंटासारखा का झाला की यातून प्रवास करण्यासही कोणी धजत नाही? \p \v 13 याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही. \v 14 याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.” \v 15 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन. \v 16 जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.” \b \p \v 17 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “विचार करा! आक्रंदन करणार्‍या स्त्रियांना बोलवा; \q2 त्यामधून कुशल अशा स्त्रियांना पाठवा. \q1 \v 18 त्यांना त्वरित येऊ द्या \q2 आणि आमच्यासाठी आक्रोश करतील \q1 व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील \q2 आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील. \q1 \v 19 सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: \q2 ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! \q2 आमच्यावर घोर लज्जा आली आहे! \q1 आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे \q2 कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ” \b \q1 \v 20 आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! \q2 त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. \q1 तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; \q2 एकमेकींना आकांत करण्यास शिकवा. \q1 \v 21 कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला \q2 आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; \q1 त्याने रस्त्यांवरून बालकांना \q2 आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे. \p \v 22 त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘मृतदेह उघड्या जागांवर \q2 विष्ठेप्रमाणे पसरली जातील; \q1 कापणार्‍यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील, \q2 आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ” \p \v 23 याहवेहने असे म्हणतात: \q1 “शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये. \q2 बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये \q2 आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये. \q1 \v 24 जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी \q2 मी याहवेह, जो कृपा करणारा \q1 पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, \q2 असे त्यांनी मला खरोखर समजावे, \q2 ह्यात मला संतोष आहे, \q2 असे याहवेहने म्हणतात.” \p \v 25 याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे— \v 26 म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात\f + \fr 9:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa जे कपाळावरील केस कापतात\fqa*\f*. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.” \c 10 \s1 परमेश्वर आणि मूर्ती \p \v 1 हे इस्राएलच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका. \v 2 याहवेह असे म्हणतात: \q1 “इतर राष्ट्रांचे मार्ग शिकू नका \q2 जरी त्यांच्यामुळे इतर राष्ट्रे भयभीत होतात, \q2 तरी आकाशाच्या चिन्हांनी तुम्ही भयभीत होऊ नका. \q1 \v 3 कारण लोकांच्या प्रथा व्यर्थ आहेत; \q2 ते जंगलातील एक लाकूड कापून आणतात, \q2 आणि एक कारागीर हातातील छेनीने त्यास आकार देतो. \q1 \v 4 ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात; \q2 ती एका जागी स्थिर रहावी, \q2 पडू नये म्हणून खिळे व हातोडा यांनी ती ठोकून घट्ट बसवितात. \q1 \v 5 ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, \q2 या मूर्तीला बोलता येत नाही; \q1 तिला तर उचलून न्यावे लागते \q2 कारण तिला चालता येत नाही. \q1 त्यांना घाबरू नकोस; \q2 त्या काहीही इजा करू शकत नाही \q2 तुमचे काही भले सुद्धा करत नाही.” \b \q1 \v 6 हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही. \q2 कारण तुम्ही महान आहात, \q2 आणि तुमचे नाव अति सामर्थ्यशाली आहे. \q1 \v 7 हे राष्ट्रांच्या राजा, \q2 तुमचे भय नाही असा कोण आहे? \q2 अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात, \q1 सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये \q2 आणि जगातील सर्व राज्यांमध्ये \q2 तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही. \b \q1 \v 8 लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते, \q2 ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत; \q1 \v 9 ते तार्शीशहून चांदीचे पत्रे \q2 आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून \q1 कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात. \q2 मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात— \q2 हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते. \q1 \v 10 परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; \q2 ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. \q1 जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; \q2 त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. \p \v 11 “त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ” \q1 \v 12 परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; \q2 संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली \q2 आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले. \q1 \v 13 जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात; \q2 ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. \q1 ते विजा आणि पाऊस पाठवितात \q2 आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात. \b \q1 \v 14 प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे; \q2 प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे. \q1 त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत. \q2 त्यांच्यामध्ये श्वास नाही. \q1 \v 15 त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत; \q2 जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा त्यांचा नाश होईल. \q1 \v 16 परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. \q2 कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, \q1 इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत; \q2 सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे. \s1 आगामी विनाश \q1 \v 17 तुम्ही, जे वेढ्यात राहत आहात, \q2 उठा, ही भूमी सोडण्यासाठी तुमच्या सामानाची बांधाबांध करा. \q1 \v 18 कारण याहवेह असे म्हणतात: \q2 “जे या देशाचे रहिवासी आहेत त्यांना \q2 यावेळी मी तुम्हाला या देशातून बाहेर भिरकावून देईन; \q1 त्यांच्यावर महासंकटे आणेन \q2 म्हणजे ते सहजगत्या पकडल्या जातील.” \b \q1 \v 19 मला धिक्कार असो! कारण मला जखम झाली आहे! \q2 ती असाध्य आहे! \q1 तरी देखील मी स्वतःला म्हटले, \q2 “हा माझा आजार आहे आणि तो मला सहन केलाच पाहिजे.” \q1 \v 20 माझा तंबू धुळीला मिळाला आहे; \q2 त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत. \q1 माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत; \q2 माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही, \q2 माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही. \q1 \v 21 माझे मेंढपाळ असमंजस आहेत \q2 कारण ते याहवेहचे मार्गदर्शन घेत नाहीत; \q1 म्हणून ते समृद्ध होत नाहीत \q2 आणि त्यांच्या सर्व कळपांची पांगापांग होते. \q1 \v 22 ऐका! तो अहवाल येत आहे— \q2 उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे! \q1 तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल, \q2 तिथे कोल्हे भटकतील. \s1 यिर्मयाहची प्रार्थना \q1 \v 23 याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही; \q2 ते स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाहीत. \q1 \v 24 हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— \q2 रागाने करू नका, \q2 नाहीतर मी नाहीसा होईन. \q1 \v 25 या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा \q2 जे तुमचा अधिकार मान्य करीत नाहीत, \q2 जे लोक तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत. \q1 त्यांनी याकोबाला गिळले आहे; \q2 त्याला संपूर्णपणे गिळंकृत केले आहे \q2 आणि त्यांच्या मातृभूमीचा नायनाट केला आहे. \c 11 \s1 करार भंग होतो \p \v 1 याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: \v 2 “या कराराच्या ठराविक अटी ऐकून घे व यहूदीयाचे लोक व यरुशलेममध्ये राहणारे लोक, यांना त्या सांग. \v 3 त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे— \v 4 ‘इजिप्तच्या गुलामगिरीतून, लोखंडी भट्टीतून मी त्यांना सोडवून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना हे नियम सांगितले होते.’ मी म्हटले ‘माझ्या आज्ञा व मी जे सुचविले ते पालन करा, आणि मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन. \v 5 तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.” \p मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.” \p \v 6 नंतर याहवेहने मला म्हटले, “यहूदीयाच्या प्रत्येक नगरात व यरुशलेमच्या रस्त्यातून जा व हा संदेश घोषित कर: ‘कराराच्या अटी ऐकून घ्या व त्यांचे पालन करा. \v 7 कारण तुमच्या पूर्वजांना मी इजिप्तमधून बाहेर आणले तेव्हापासून मी त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितले होत, “तुम्ही माझी आज्ञा पाळा.” \v 8 परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ” \p \v 9 नंतर याहवेह मला म्हणाले, “यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे. \v 10 ते त्यांच्या पूर्वजांच्या पापाकडे परतले आहेत, ज्यांनी माझे वचन पाळणे नाकारले होते. त्यांनी इतर दैवतांचे अनुसरण करून सेवा केली. त्यामुळे यहूदीया व इस्राएलाच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे. \v 11 म्हणून याहवेह असे म्हणाले: ‘मी त्यांच्यावर घोर आपत्ती घेऊन येणार त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ते रडून दयेसाठी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही. \v 12 यहूदीयातील नगर आणि यरुशलेममधील लोकांनी ज्या अन्य देवतांसमोर धूप जाळला, ते त्यांचा धावा करतील, परंतु त्यांना ते आपत्तीतून सोडवू शकणार नाही. निराशेच्या आपत्तीतून त्यांना सोडवू शकणार नाही. \v 13 हे यहूदीया, जेवढी तुमची शहरे आहेत तेवढीच त्या दैवतांची संख्या; आणि तुमच्या या लाजिरवाण्या दैवतांच्या वेद्या, बआलापुढे धूप जाळण्याच्या वेद्या यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावर आहेत.’ \p \v 14 “म्हणून हे यिर्मयाह, इतःपर या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी रडू नकोस अथवा विनवण्याही करू नकोस; कारण अखेरीस निराशेने व्याकूळ होऊन ते माझ्यापुढे पदर पसरतील. परंतु मी त्यांचे ऐकणार नाही. \q1 \v 15 “माझी प्रिया माझ्या मंदिरात काय करीत आहे? \q2 इतरांसह मिळून ती तिच्या दुष्ट कारस्थानाची योजना करीत आहे का? \q2 तुमच्या अर्पणाचे शुद्धीकरण करून तुमची शिक्षा परतवू शकाल का? \q1 जेव्हा तुम्ही तुमच्या दुष्ट योजना पार पाडण्यात व्यस्त राहता, \q2 तेव्हा तुम्ही आनंदित होता.” \b \q1 \v 16 याहवेह तुम्हाला बहरलेला जैतून वृक्ष म्हणत असत \q2 सुंदर आकाराच्या फळांनी भरलेला. \q1 परंतु एखाद्या वादळाच्या भयंकर गर्जनेने \q2 ते आता त्याला अग्नीने भस्म करतील, \q2 आणि त्याच्या फांद्या मोडून जातील. \m \v 17 सर्वसमर्थ याहवेह, ज्यांनी तुमचे रोपण केले, त्यांनी तुमचा सर्वनाश करण्याची आज्ञा दिली आहे, कारण इस्राएल व यहूदीया या दोन्ही लोकांनी दुष्टपणा केला आहे आणि बआलापुढे धूप जाळून माझा क्रोधाग्नी भडकविला आहे. \s1 यिर्मयाहाविरुद्ध कट \p \v 18 याहवेहने त्यांचे सर्व कारस्थान मला सांगितले, म्हणून ज्यावेळी त्यांनी ते काय करीत आहेत हे मला दाखविले, मला ते आधीच कळले होते. \v 19 कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, \q1 “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; \q2 याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, \q2 म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.” \q1 \v 20 सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता \q2 मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, \q1 त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, \q2 कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत. \p \v 21 म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;” \v 22 म्हणून सर्वसमर्थ याहवेहने मला असे उत्तर दिले: “मी त्यांना शिक्षा देईन. त्यांचे पुरुष तलवारीस बळी जातील, त्यांचे पुत्र व कन्या उपासमारीने मरतील. \v 23 त्यांच्यातील एकही जिवंत राहणार नाही. कारण त्यांच्या शिक्षेचे वर्ष येताच मी अनाथोथच्या लोकांवर अरिष्ट आणेन.” \c 12 \s1 यिर्मयाहची तक्रार \q1 \v 1 हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, \q2 तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. \q1 तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: \q2 वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? \q2 सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात? \q1 \v 2 तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले; \q2 ते वाढतात व फलवंत होतात. \q1 तुमचे नाव सतत त्यांच्या मुखात असते \q2 परंतु त्यांच्या अंतःकरणापासून तुम्ही फार दूर असता. \q1 \v 3 पण याहवेह, तुम्ही मला ओळखता; \q2 मला बघता व तुमच्याबद्दल माझ्या विचारांची परीक्षा घेता. \q1 मेंढरांना कत्तलखान्याकडे फरफटत न्यावे तसे त्यांना न्या! \q2 कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना वेगळे करा! \q1 \v 4 किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील \q2 आणि प्रत्येक कुरणातील गवत सुकलेले असेल? \q1 कारण जे या ठिकाणी राहतात ते दुष्ट आहेत, \q2 पशू व पक्षी नाहीसे झाले आहेत. \q1 त्यावर लोक म्हणतात, \q2 “परमेश्वर आमचा परिणाम बघणारही नाही.” \s1 परमेश्वराचे उत्तर \q1 \v 5 “जर माणसांबरोबर तू पायी धावतो \q2 आणि तू थकून इतका झिजून गेलास, \q2 तर घोड्यांबरोबर तू स्पर्धा कशी करशील? \q1 जर सुरक्षित देशात\f + \fr 12:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa केवळ तिथेच तुला सुरक्षित वाटते\fqa*\f* तू अडखळतोस, \q2 तर यार्देनेच्या जंगलात\f + \fr 12:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa यार्देनेच्या पुरात\fqa*\f* तू कसे करशील? \q1 \v 6 तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य— \q2 यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे; \q2 ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात. \q1 तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी \q2 त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस. \b \q1 \v 7 “मी माझ्या लोकांचा त्याग करेन, \q2 माझ्या वारसांचा परित्याग करेन; \q1 माझ्या अतिप्रियजनांना \q2 मी त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन. \q1 \v 8 माझे वारस माझ्याकरिता \q2 जणू वनातील सिंहिणीप्रमाणे झाले आहेत. \q1 ती माझ्यावर गर्जना करते; \q2 म्हणून मी तिचा तिरस्कार करतो. \q1 \v 9 माझे वारसदार \q2 एखाद्या ठिपकेदार पक्ष्यासारखे झाले नाहीत का, \q2 त्यांच्यावर इतर हिंस्र पक्ष्यांनी चहूबाजूंनी हल्ले चढविले नाहीत का? \q1 जा आणि त्यांना गिळंकृत करण्यासाठी \q2 सर्व वनपशूंना एकत्र कर. \q1 \v 10 अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील \q2 मळा पायाखाली तुडवतील; \q1 ते माझा रमणीय मळा \q2 ओसाड करतील. \q1 \v 11 माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून \q2 तो ओसाड केला जाईल, \q1 संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, \q2 कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल. \q1 \v 12 उजाड वाळवंटाच्या टोकांवर \q2 संहार करणारे झुंडीने येतील, \q1 कारण याहवेहची तलवार भूमीला गिळून टाकेल, \q2 एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत \q2 कोणीही सुरक्षित राहणार नाही. \q1 \v 13 माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; \q2 ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. \q1 कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे \q2 ते लज्जेचे पीक गोळा करतील.” \p \v 14 म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन. \v 15 परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन. \v 16 आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील. \v 17 परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्‍या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात. \c 13 \s1 तागाचा कमरबंद \p \v 1 याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” \v 2 तेव्हा याहवेहच्या सांगण्याप्रमाणे मी एक कमरबंद विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला. \p \v 3 नंतर मला दुसऱ्यांदा याहवेहचा संदेश मिळाला: \v 4 “जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात\f + \fr 13:4 \fr*\fq फरात \fq*\ft आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.” \v 5 मी याहवेहने सांगितल्याप्रमाणे फरात येथे गेलो व तो लपवून ठेवला. \p \v 6 बर्‍याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.” \v 7 मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता. \p \v 8 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 9 “याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे. \v 10 हे दुष्ट लोक, माझी वचने ऐकण्याचे नाकारतात, आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टीपणाच्या मागे जातात आणि इतर दैवतांची सेवा व आराधना करतात, ते या कमरबंदाप्रमाणे होतील—पूर्णपणे निरुपयोगी! \v 11 याहवेह म्हणतात, ‘मनुष्याचा कमरबंद त्याच्या कमरेला वेढा घातलेला असतो, त्याचप्रमाणे यहूदीयाच्या सर्व लोकांना व इस्राएलच्या सर्व लोकांना मी वेढा घातला आहे, जेणेकरून त्यांनी माझ्या गौरवाचे व प्रशंसेचे व मानाचे लोक व्हावे. पण त्यांनी ऐकले नाही.’ \s1 द्राक्षरसाच्या बुधल्या \p \v 12 “त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’ \v 13 मग त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: या देशातील सर्व रहिवाशांना, अगदी दावीदाच्या राजासनावर बसणारा राजा, याजक व संदेष्टे यांच्यापासून ते सर्व यरुशलेमनिवासी यांना मी मदिरेने झिंगून टाकणार आहे. \v 14 ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ” \s1 बंदिवासाची धमकी \q1 \v 15 ऐका व लक्ष द्या, \q2 उर्मट होऊ नका, \q2 कारण असे याहवेहने म्हटले आहे. \q1 \v 16 तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या \q2 तुमच्यावर त्यांनी निबिड अंधार पाडण्याच्या आधी, \q1 अंधारलेल्या डोंगरावर \q2 तुमची पावले अडखळण्याआधी, \q1 तुम्ही प्रकाशाची आशा कराल, \q2 पण ते त्यास गहन अंधकारात \q2 आणि निबिड काळोखात बदलतील. \q1 \v 17 जर तुम्ही माझे ऐकले नाही, \q2 तर मी एकांतात अश्रू ढाळेन \q2 तुमच्या गर्विष्ठपणामुळे; \q1 माझे डोळे घोर रुदन करतील, \q2 माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, \q2 कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल. \b \q1 \v 18 राजाला व राजमातेला सांगा, \q2 “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, \q1 कारण तुमचे वैभवी मुकुट \q2 तुमच्या मस्तकांवरून पडतील.” \q1 \v 19 यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील, \q2 आणि त्या उघडण्यास तिथे कोणीही नसेल. \q1 संपूर्ण यहूदीयाला बंदिवासात नेण्यात येईल \q2 पूर्णपणे नेण्यात येईल. \b \q1 \v 20 नेत्र उंच करा व पाहा \q2 उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्‍यांना पाहा. \q1 ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता, \q2 विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे? \q1 \v 21 ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले \q2 त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? \q1 तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या \q2 स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का? \q1 \v 22 “हे सर्व माझ्यावर का ओढवले?” \q2 असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास— \q1 तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे \q2 तुझी वस्त्रे फाडण्यात आली \q2 तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे. \q1 \v 23 कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का \q2 चित्त्याला आपल्या शरीरावरील ठिपके बदलता येतील का? \q1 त्याचप्रमाणे तुला सत्कर्मे करता येत नाहीत \q2 दुष्कर्मे करण्याची तुला चटक लागली आहे. \b \q1 \v 24 “वार्‍यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन \q2 जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी. \q1 \v 25 हाच तुझा वाटा आहे, \q2 तुला माझ्याकडून मिळावयाचा वतनभाग हाच होय,” \q2 असे याहवेह जाहीर करतात, \q1 “कारण तू मला विसरला आहेस \q2 आणि खोट्या दैवतांवर विश्वास ठेवलास. \q1 \v 26 म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन \q2 जेणेकरून तुझी लाज उघडी पडेल— \q1 \v 27 तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, \q2 व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! \q1 डोंगरावर आणि शेतात चाललेली \q2 तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. \q1 हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! \q2 तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?” \c 14 \s1 अनावृष्टि, दुष्काळ आणि तलवार \p \v 1 अनावृष्टि संबंधित खुलासा करणारा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला प्राप्त झाला. \q1 \v 2 “यहूदीया विलाप करीत आहे, \q2 तिची नगरे झुरणीला लागली आहेत; \q1 ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, \q2 आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत. \q1 \v 3 त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; \q2 ते विहिरीवर जातात \q2 परंतु त्यांना पाणी मिळत नाही. \q1 ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; \q2 गोंधळून व निराश होऊन \q2 आपली डोकी झाकून घेतात. \q1 \v 4 जमिनीला भेगा पडल्या आहेत \q2 कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही; \q1 शेतकरी घाबरले आहेत \q2 म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात. \q1 \v 5 हरिणी देखील \q2 आपली पाडसे शेतात सोडून जात आहे \q2 कारण गवताचा मागमूसही उरला नाही. \q1 \v 6 रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून \q2 कोल्ह्यागत धापा टाकत आहेत; \q1 अन्नाशिवाय \q2 त्यांची नजर निस्तेज झाली आहे.” \b \q1 \v 7 जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, \q2 तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. \q1 आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; \q2 आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे! \q1 \v 8 तुम्हीच इस्राएलची आशा आहात, \q2 संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, \q1 तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, \q2 केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात? \q1 \v 9 एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? \q2 एखाद्या तारण ने करणाऱ्या वीरासारखे का झालात? \q1 हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, \q2 आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; \q2 आमचा त्याग करू नका! \p \v 10 यावर याहवेहने या लोकांबद्दल असे म्हटले: \q1 “माझ्यापासून दूर भटकणे त्यांना फार आवडते; \q2 ते त्यांची पावले ताब्यात ठेवत नाहीत. \q1 म्हणून याहवेह तुमचा स्वीकार करीत नाहीत; \q2 आता मी तुमची दुष्कर्मे आठवेन \q2 आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला शासन करेन.” \p \v 11 मग याहवेहने मला म्हटले, “त्यांच्या भल्यासाठी इतःपर प्रार्थना करू नकोस. \v 12 जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.” \p \v 13 परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ” \p \v 14 त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.” \v 15 म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील. \v 16 आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत. \b \p \v 17 “हे वचन तू त्यांना सांग: \q1 “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे \q2 मी माझे रडणे थांबविणार नाही; \q1 माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, \q2 कारण ती जखमांनी घायाळ होऊन \q2 तुडविली गेली आहे. \q1 \v 18 नगराबाहेर जाऊन पाहावे तर, \q2 मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; \q1 नगरातून गेलो तर \q2 उपासमारीला बळी पडलेले दिसतात. \q1 संदेष्टे व याजक \q2 त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ” \b \q1 \v 19 तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय? \q2 सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय? \q1 तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली \q2 म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही? \q1 आम्ही शांतीची आशा केली होती \q2 पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही, \q1 आरोग्य मिळण्याच्या ऐवजी \q2 सर्वत्र दहशतच पसरली आहे. \q1 \v 20 हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो \q2 आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; \q2 आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. \q1 \v 21 तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; \q2 तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. \q1 आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा \q2 आणि तो मोडू नका. \q1 \v 22 या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? \q2 आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? \q1 हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. \q2 म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, \q2 तुम्हीच हे सर्व करू शकता. \c 15 \p \v 1 तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे! \v 2 आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; \q1 तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; \q1 उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; \q1 जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’ \p \v 3 “मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे. \v 4 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल. \q1 \v 5 “हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करेल? \q2 तुझ्यासाठी कोण शोक करेल? \q2 तू कसा आहे अशी विचारपूस कोण करेल? \q1 \v 6 तुम्ही मला नाकारले आहे,” \q2 याहवेह असे म्हणतात. \q2 “तुमची घसरण सुरूच आहे. \q1 म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; \q2 विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे. \q1 \v 7 मी शहरांच्या वेशींमध्येच \q2 त्यांना पाखडेन. \q1 मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, \q2 कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही. \q1 \v 8 मी त्यांच्या विधवांची संख्या \q2 समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. \q1 मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध \q2 भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; \q1 अचानक त्यांच्यावर \q2 वेदना आणि क्लेश ओढवतील, \q1 \v 9 सात मुलांची माता बेशुद्ध होऊन \q2 मृत्युमुखी पडेल. \q1 भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; \q2 आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. \q1 त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्‍यांसमक्ष \q2 मी तलवारीस बळी देईन,” \q2 याहवेहने असे जाहीर करतात. \b \q1 \v 10 हे माझ्या आई, हाय हाय, तू मला जन्म दिला, \q2 मी या सर्व राष्ट्राच्या दृष्टीने झगडा आणि विद्रोह करणारा झालो आहे! \q1 मी कोणाही कडून कर्ज घेतलेले नाही, ना कोणी माझ्याकडून घेतलेले आहे, \q2 तरीपण प्रत्येकजण मला श्राप देतात. \p \v 11 याहवेह म्हणाले, \q1 “चांगल्या कार्यासाठी मी निश्चितच तुझी सुटका करेन; \q2 तुझे शत्रू संकटात आणि क्लेशदायक समयी \q2 तुला विनवण्या करतील असे मी करेन. \b \q1 \v 12 “एखाद्या मनुष्याला लोखंड— \q2 उत्तरेकडील लोखंडाचे—किंवा कास्याचे गज मोडता येतील का? \b \q1 \v 13 “मी तुमची संपत्ती व तुमचा ठेवा \q2 बेमोबदला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करेन, \q1 कारण तुम्ही केलेल्या सर्व पातकांमुळे \q2 संपूर्ण देशात असे घडेल. \q1 \v 14 जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता, \q2 त्या देशात मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचे गुलाम करेन, \q1 कारण माझा क्रोध अग्नीप्रमाणे भडकला आहे, \q2 आणि तो तुम्हाला भस्म करून टाकील.” \b \q1 \v 15 हे याहवेह, तुम्हाला सर्व कळते; \q2 माझी आठवण ठेवा व माझी काळजी घ्या. \q2 माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सूड घ्या, \q1 तुम्ही सहनशील आहात—मला दूर करू नका; \q2 विचार करा तुमच्यामुळे मला किती निंदा सहन करावी लागते. \q1 \v 16 जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले; \q2 ते माझा आनंद आणि माझ्या हृदयाचा उल्लास होते, \q1 याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वरा, \q2 कारण मी तुमचे नाव धारण केले आहे. \q1 \v 17 मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, \q2 त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; \q1 मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता \q2 आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे. \q1 \v 18 माझ्या दुःखाचा निश्चित अंत का होत नाही \q2 आणि माझ्या जखमा त्रासदायक आणि असाध्य का आहेत? \q1 तुम्ही मला एका फसविणाऱ्या झऱ्यासारखे आहात, \q2 जणू एखादा बिनपाण्याचा ओढा. \p \v 19 म्हणून याहवेहने असे म्हणतात: \q1 “जर तू पश्चात्ताप करशील, तर मी तुला पुनर्स्थापित करेन \q2 म्हणजे तू माझी सेवा करशील; \q1 जर तू अयोग्य नव्हे, तर योग्य शब्द उच्चारशील, \q2 मग तू माझ्यावतीने बोलणारा होशील. \q1 या लोकांना तुझ्याकडे परत येऊ दे, \q2 परंतु तू त्यांच्याकडे वळू नको. \q1 \v 20 मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन, \q2 कास्याच्या तटबंदीची भिंत; \q1 ते तुझ्याशी युद्ध करतील \q2 परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत, \q1 तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास \q2 मी तुझ्यासोबत आहे,” \q2 याहवेह असे म्हणतात. \q1 \v 21 “या दुष्ट लोकांच्या हातातून मी तुझी सुटका करेन \q2 आणि निर्दयी लोकांच्या तावडीतून मी तुला सोडवेन.” \c 16 \s1 विनाशाचा दिवस \p \v 1 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “तू येथे विवाह करू नये व तुला येथे मुलेही होऊ नयेत.” \v 3 कारण ज्यांना या भूमीवर पुत्र आणि कन्या झाले आहेत आणि ज्या स्त्रिया त्यांच्या आई आणि जे पुरुष त्यांचे वडील झाले त्यांच्याबद्दल याहवेह असे म्हणतात: \v 4 “ते भयानक रोगांना बळी पळून मरतील. त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही, की त्यांना मूठमाती देणार नाही, तर त्यांची प्रेते जमिनीवर शेणासारखे पडून राहतील. तलवार व दुष्काळ यांनी त्यांचा अंत होईल आणि त्यांची प्रेते पक्षी आणि हिंस्र श्वापदे यांचे खाद्य होतील.” \p \v 5 कारण याहवेह असे म्हणतात: “ज्या घरात मयतीचे भोजन होत आहे तिथे प्रवेश करू नको; शोक करू नको किंवा सांत्वना देऊ नको, कारण मी माझे आशीर्वाद, माझे प्रेम आणि माझी दया या लोकांपासून काढून घेतली आहेत.” याहवेहची ही घोषणा आहे, \v 6 “या राष्ट्रातील थोर आणि लहान सर्व मरतील. त्यांना मूठमाती मिळणार नाही, कोणी त्यांच्यासाठी शोक करणार नाही. प्रथेप्रमाणे दुःखाचे चिन्ह म्हणून ते स्वतःच्या शरीरास दुखापत करणार नाहीत किंवा डोक्याचे मुंडण करणार नाहीत. \v 7 शोक करणार्‍यांना अन्न देऊन कोणी त्यांचे—त्यांच्या आई वा वडिलांच्या मृत्यूबद्दल—समाधान करणार नाही. सांत्वन करण्यासाठी कोणी त्यांना प्यालाभर द्राक्षारसही देणार नाही. \p \v 8 “ज्या घरात मेजवानी होत आहे, त्या घरात तू प्रवेश करू नकोस व त्यांच्याबरोबर खाण्यापिण्या करिता बसू नकोस. \v 9 कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘त्या दिवसामध्ये तुमच्या डोळ्यादेखत या ठिकाणी मी त्यांच्या हर्ष व आनंद गीतांचा, वर आणि वधूंच्या आवाजाचा शेवट करेन.’ \p \v 10 “हे सर्व तू लोकांना सांगशील, तेव्हा ते विचारतील, ‘याहवेहने ही भयानक संकटे आमच्यावर पाठविण्याचा हुकूम का दिला आहे? आम्ही कोणती चूक केली आहे? आमच्या याहवेह परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही असे कोणते पाप केले आहे?’ \v 11 तेव्हा त्यांना सांग, याहवेह असे म्हणाले, ‘कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडले. त्यांनी इतर दैवतांची उपासना केली, त्यांची सेवा केली आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, \v 12 परंतु तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा अधिक दुष्टपणा केला आहे. पाहा, माझी आज्ञा पाळण्याऐवजी, तुम्ही तुमच्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने वागता. \v 13 म्हणून मी तुम्हाला या राष्ट्रातून बाहेर फेकून देईन आणि तुमच्या पूर्वजांना अनोळखी अशा देशात तुम्हाला पळवून लावेन. तिथे गेल्यावर तुम्ही इतर दैवतांची रात्रंदिवस सेवा कराल, मी तुमच्यावर मुळीच कृपा करणार नाही.’ \p \v 14 “तथापि, असे दिवस येत आहेत,” याहवेह असे म्हणतात, “ ‘ज्या याहवेहने इस्राएलांना इजिप्तमधून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही, \v 15 परंतु असे म्हटले जाईल, ‘जिवंत याहवेहची शपथ, ज्यांनी इस्राएलला उत्तर दिशेच्या भूमीतून व गुलामगिरीत पाठविलेल्या सर्व देशातून त्यांना बाहेर आणले.’ त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या या देशात मी त्यांना पुनर्वसित करेन. \p \v 16 “परंतु आता मी अनेक मासे पकडणारे पाठवेन,” याहवेह अशी घोषणा करतात, “व ते त्यांना पकडतील. त्यानंतर मी शिकार्‍यांना पाठवेन, आणि ते प्रत्येक पर्वतातून, डोंगरातून आणि खडकाच्या कपारीतून त्यांचा शोध घेऊन त्यांची शिकार करतील. \v 17 कारण माझी नजर तुझ्या सर्व मार्गावर लक्ष ठेऊन आहे; ते माझ्यापासून लपू शकत नाही, आणि त्यांचे कोणतेही पाप माझ्या नजरेतून सुटत नाही. \v 18 त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.” \q1 \v 19 याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग, \q2 संकटकाळच्या वेळी माझा आश्रय, \q1 जगातील सर्व राष्ट्रे \q2 अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील, \q1 “आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते, \q2 व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही. \q1 \v 20 लोक स्वतःसाठी दैवते निर्माण करतात काय? \q2 होय, परंतु ते देव नाहीत!” \b \q1 \v 21 “म्हणून मी त्यांना शिक्षण देईन— \q2 यावेळी मी त्यांना शिकवेन \q2 माझे सामर्थ्य व माझा प्रताप. \q1 मग त्यांना कळेल की \q2 माझे नाव याहवेह आहे. \b \c 17 \q1 \v 1 “त्यांच्या हृदय पटलावर \q2 आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर \q1 यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने \q2 एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत, \q1 \v 2 घनदाट वृक्षाजवळ \q2 आणि उंच डोंगरावरील, \q1 प्रत्येक वेदी व अशेरास्तंभाची \q2 त्यांची लेकरे सुद्धा आठवण करतात. \q1 \v 3 या भूमीवर माझे उंच पर्वत \q2 आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे \q1 तुमच्या उच्च स्थळासहित, \q2 लूट म्हणून मी देईन, \q2 कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे. \q1 \v 4 तुमच्याच चुकीमुळे \q2 मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. \q1 तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत \q2 मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. \q1 कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे \q2 आणि तो सतत जळत राहील.” \p \v 5 याहवेह असे म्हणतात: \q1 “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, \q2 जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो \q2 आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो. \q1 \v 6 तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे; \q2 उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत. \q1 ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये, \q2 ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील. \b \q1 \v 7 “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, \q2 जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो, \q1 \v 8 ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. \q2 त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. \q1 या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; \q2 त्याची पाने सदा हिरवी राहतात. \q1 अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. \q2 आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.” \b \q1 \v 9 सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण \q2 आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. \q2 हे कळण्यास कोण समर्थ आहे? \b \q1 \v 10 “मी याहवेह, अंतःकरणे पारखतो, \q2 आणि मनाची परीक्षा घेतो, \q1 म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे, \q2 प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.” \b \q1 \v 11 तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो \q2 अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. \q1 अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, \q2 आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात. \b \q1 \v 12 तुमचे गौरवी सिंहासन प्रारंभापासून उच्च आहे, \q2 हेच आमचे आश्रयस्थान आहे. \q1 \v 13 हे याहवेह, तुम्हीच इस्राएलची आशा आहात; \q2 ज्यांनी याहवेहला सोडले आहे, ते लाजिरवाणे होतील. \q1 जे तुमच्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्यांचे नाव धुळीत लिहिले जाईल \q2 कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला, \q2 जिवंत पाण्याच्या झर्‍याला सोडले आहे. \b \q1 \v 14 हे याहवेह, मला आरोग्य द्या, म्हणजे मी बरा होईन; \q2 माझे रक्षण करा, म्हणजे मी सुरक्षित राहीन, \q2 कारण मी केवळ तुमचेच स्तवन करतो. \q1 \v 15 ते मला सतत म्हणत असतात, \q2 “याहवेहचे वचन कुठे आहे? \q2 ते आता पूर्ण होऊ द्या!” \q1 \v 16 मी तुमचा मेंढपाळ होण्यापासून पळून गेलेलो नाही; \q2 तुम्हाला ठाऊक आहे मी अशा भयंकर दिवसाची इच्छा केली नव्हती. \q2 माझ्या मुखातून काय निघाले हे तुम्हाला ठाऊक आहे. \q1 \v 17 माझ्यासाठी तुम्ही भीतिदायक होऊ नका; \q2 संकटसमयी तुम्हीच माझे आश्रय आहात. \q1 \v 18 माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, \q2 परंतु मला फजिती पासून सोडवा; \q1 त्यांना भयभीत करा \q2 परंतु मला भय मुक्त करा. \q1 त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; \q2 त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे. \s1 शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळणे \p \v 19 याहवेह मला असे म्हणाले: “जा आणि लोकांच्या\f + \fr 17:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa सैन्यांच्या\fqa*\f* प्रवेश दारावर उभा राहा. ज्या प्रवेश दारांनी यहूदीयाचा राजा प्रवेश करतो; आणि यरुशलेमच्या इतर सर्व प्रवेश दाराशी जाऊन उभा राहा. \v 20 लोकांना सांग, ‘याहवेहचे हे वचन ऐका, यहूदीयाच्या राजांनो, यहूदीयातील सर्व लोकांनो, आणि यरुशलेमच्या नागरिकांनो, तुम्ही जे या प्रवेशदारातून प्रवेश करता, \v 21 याहवेह असे म्हणत आहेत: सावध असा, शब्बाथ दिवशी कोणतेही भार वाहू नका, यरुशलेमच्या प्रवेश व्दारातून ते नेआण करू नका. \v 22 शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती. \v 23 परंतु त्यांनी ती ऐकली नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. ते हट्टी होते आणि ते ऐकत नव्हते वा शिस्तीस प्रतिसाद देत नव्हते. \v 24 याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात, \v 25 तर असे होईल, दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि अधिपती थाटाने, वैभवाने रथारूढ व अश्वारूढ होऊन येणारे या शहराच्या प्रवेश व्दारातून प्रवेश करतील, आणि त्यांचे सरदार, यहूदीयाचे लोक व यरुशलेमनिवासी या लोकांवर राज्य करतील आणि हे शहर कायम वसलेले राहील. \v 26 तेव्हा लोकसमुदाय यहूदीयाच्या शहरातून आणि यरुशलेमच्या परिसरातून, त्याचप्रमाणे बिन्यामीन या प्रांतांच्या डोंगरदऱ्यांच्या नेगेव येथून, पश्चिमेकडील तळवटीतून, सर्व लोक आपआपली होमार्पणे, धान्यार्पणे व ऊद आणतील व याहवेहच्या मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुतीची अर्पणे आणतील. \v 27 परंतु जर तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळण्याचे ऐकले नाही, शब्बाथ दिवशी यरुशलेमच्या या प्रवेश व्दारातून इतर दिवशी करता तसे मालाचे भार आणले, तर मी या यरुशलेमचे प्रवेश व्दार पेटवून त्याचा पूर्णपणे विध्वंस करेन, जो अग्नी कधीही विझणार नाही, जो तेथील गड भस्म करेल.’ ” \c 18 \s1 कुंभाराच्या घरी \p \v 1 याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: \v 2 “कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन.” \v 3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला. \v 4 परंतु तो जे मडके करीत होता, त्याच्या हातातील मातीचा आकार बिघडला; म्हणून त्याने त्याचे, त्याला योग्य वाटेल तसे दुसरे मडके बनविले. \p \v 5 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले. \v 6 ते म्हणाले, “हे इस्राएला, या कुंभाराने आपल्या मातीचे केले तसे मला तुझे करता येणार नाही काय? कुंभाराच्या हातात माती असते तसे इस्राएला, तुम्ही माझ्या हातात आहात,” असे याहवेह जाहीर करतात. \v 7 एखाद्या राष्ट्राचा भेद पाडावा, त्याचे निर्मूलन करावे, व समूळ नाश करावा, असे जेव्हा मी जाहीर करतो, \v 8 तेव्हा ज्यास मी सावध केले त्या राष्ट्राने आपल्या कुमार्गाबद्दल पश्चात्ताप केला, तर मी त्यांच्यावर दया करेन व माझ्या योजनेप्रमाणे त्यांचा नाश करणार नाही. \v 9 आणि जर मी एखाद्या राष्ट्राची बांधणी करण्याची आणि वसविण्याची घोषणा केली, \v 10 आणि जर त्यांनी माझ्या दृष्टीने पाप केले आणि माझी आज्ञा पाळली नाही, तर मी त्याला आशीर्वाद देण्यासाठी पुनर्विचार करेन. \p \v 11 “म्हणून आता यहूदीयातील लोकांना आणि जे यरुशलेममध्ये राहतात, त्यांना सांग, ‘याहवेहचा संदेश ऐका: पाहा! मी तुमच्यासाठी विपत्ती तयार करीत आहे आणि तुमच्याविरुद्ध योजना आखीत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकजण दुष्ट मार्गापासून वळा, व तुमचे मार्ग व तुमचे आचरण सुधारा.’ \v 12 परंतु त्यांनी उत्तर दिले, ‘हे उपयोगाचे नाही. आम्ही आमच्या आखलेल्या योजनेप्रमाणे करीत राहू; आम्ही आमच्या हृदयाच्या हट्टीपणा व दुष्टपणानेच चालणार.’ ” \b \p \v 13 म्हणून याहवेह असे म्हणतात: \q1 “आता राष्ट्रांमध्ये जाऊन चौकशी करा: \q2 असा प्रकार कोणी कधी ऐकला आहे काय? \q1 इस्राएलाच्या कुमारिकेने \q2 एवढे भयंकर कर्म केले आहे. \q1 \v 14 लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ \q2 कधी वितळतो का? \q1 दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी \q2 कधी वाहण्याचे थांबते काय? \q1 \v 15 तरीसुद्धा माझे लोक मला विसरले; \q2 ते व्यर्थ मूर्तीला व्यर्थ धूप जाळतात, \q1 ते त्यांना अडखळत चालावयास लावतात \q2 ते पूर्वजांचे मार्ग आहेत. \q1 जे मार्ग नीट बांधलेले नाही, \q2 म्हणून त्या आडमार्गावरून त्यांना चलविले गेले. \q1 \v 16 त्यांचा देश भयानकतेचे, \q2 आणि नेहमीसाठी तिरस्काराचे उदाहरण होईल; \q1 येजा करणाऱ्या सर्वांना हे बघून दहशत भरेल \q2 आणि ते आश्चर्याने आपली डोकी हालवितील. \q1 \v 17 जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो, \q2 त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन; \q1 त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी \q2 मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.” \p \v 18 त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.” \q1 \v 19 “हे याहवेह, माझे ऐका, \q2 माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे काय म्हणतात ते ऐका! \q1 \v 20 चांगल्याची वाईटाने भरपाई करावी का? \q2 माझा जीव घेण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे. \q1 आठवण ठेवा की मी आपल्यासमोर उभा राहिलो \q2 आणि त्यांच्यावतीने बोललो \q2 जेणेकरून तुमचा क्रोध त्यांच्यापासून दूर व्हावा. \q1 \v 21 म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; \q2 त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. \q1 त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; \q2 त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, \q2 व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत. \q1 \v 22 जेव्हा स्वारी करणारे त्यांच्यावर अचानक हल्ला करतील \q2 तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश व किंचाळ्या ऐकू येवोत, \q1 कारण मला पकडावे म्हणून त्यांनी खड्डा खणला आहे \q2 आणि माझ्या वाटेवर त्यांनी गुप्त सापळे लावले आहेत. \q1 \v 23 परंतु याहवेह, मला मारण्याच्या \q2 त्यांच्या सर्व युक्त्या तुम्ही जाणता. \q1 त्यांच्या अपराधांची क्षमा करू नका, \q2 किंवा त्यांचे पाप दृष्टीपुढून पुसून जाऊ नये. \q1 ते तुमच्यापुढे उलटून पडोत; \q2 तुम्ही आपल्या क्रोधाच्या वेळी त्यांचा समाचार घ्या.” \c 19 \p \v 1 याहवेह मला असे म्हणतात: “जा व एक मातीचे मडके विकत घे आणि जाताना लोकांमधील काही वडीलजन आणि काही याजक यांना आपल्याबरोबर घे. \v 2 आणि बेन-हिन्नोमच्या खोर्‍यातून जा, तुटलेल्या मडक्याच्या व्दारा जवळ जा. तिथे जाऊन मी सांगेन त्या वचनाची घोषणा कर, \v 3 आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील. \v 4 कारण त्यांनी मला सोडले आहे आणि हे स्थान त्यांनी परक्या दैवताचे केले आहे; हे लोक अन्य दैवतांपुढे धूप जाळतात, जे त्यांच्या पूर्वजांना किंवा यहूदीयाच्या राजांना कधीही माहीत नव्हते, आणि त्यांनी ही जागा निर्दोष रक्ताने भरून टाकली आहे. \v 5 त्यांनी बआल दैवतासाठी होमार्पण म्हणून वेद्या बांधल्या आहेत आणि त्यावर ते आपल्या मुलांचा होम करतात—असे करण्याची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती किंवा कधी उल्लेखही केला नव्हता, अथवा विचारही केला नव्हता. \v 6 याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्‍याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील. \p \v 7 “ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन. \v 8 मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील. \v 9 मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’ \p \v 10 “यिर्मयाह, आता हे लोक पाहत असताना तू आणलेले ते मडके फोडून टाक, \v 11 आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही. \v 12 या ठिकाणी मी हेच करणार व इथे राहणाऱ्या लोकांनाही करेन, ही याहवेहची घोषणा आहे. मी या नगराला तोफेतासारखे करेन. \v 13 यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ” \p \v 14 नंतर यिर्मयाह तोफेत येथे हा संदेश देऊन परतला, जिथे याहवेहने यिर्मयाहला भविष्यवाणी करण्यासाठी पाठविले होते, तिथे तो मंदिरापुढे थांबला व सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, \v 15 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, काय म्हणतात: ‘ऐका! मी या नगरावर आणि सभोवतालच्या गावावर मी शपथपूर्वक म्हटल्याप्रमाणे सर्व अरिष्टे आणणार आहे, कारण ते हट्टी होते व माझी वचने ऐकत नव्हते.’ ” \c 20 \s1 यिर्मयाह आणि पशहूर \p \v 1 जेव्हा याहवेहच्या मंदिराचा मुख्य अधिकारी इम्मेरचा पुत्र पशहूर याजक, याने यिर्मयाहास अशी भविष्यवाणी करताना ऐकले, तेव्हा \v 2 पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले. \v 3 पशहूरने जेव्हा दुसर्‍या दिवशी यिर्मयाहाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह त्याला म्हणाला, “याहवेहने तुझे पशहूर नाव बदलून, येथून पुढे सर्व बाजूने दहशत असे ठेवले आहे. \v 4 याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल. \v 5 मी या नगरातील सर्व संपत्ती त्यांच्या शत्रूंच्या हातात देईन—सर्व उत्पादन, सर्व जडजवाहीर आणि यहूदीयाच्या राजांचा सर्व खजिना. ते त्यांना लुटतील आणि बाबेलला ते घेऊन जातील. \v 6 आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.” \s1 यिर्मयाहची तक्रार \q1 \v 7 याहवेह, तुम्ही मला फसविले\f + \fr 20:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa पाठलाग केला\fqa*\f* आणि मी फसलो; \q2 तुम्ही माझ्यापेक्षा प्रबळ आहात म्हणून विजयी झालात. \q1 मी दिवसभर उपहासाचा विषय झालो आहे; \q2 सर्वजण माझी थट्टा करतात. \q1 \v 8 जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो \q2 हिंसाचार व विनाश हेच जाहीर करतो. \q1 कारण याहवेहच्या वचनामुळे माझ्या वाट्याला \q2 दिवसभर निंदा व अप्रतिष्ठाच आली आहे. \q1 \v 9 परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही \q2 किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,” \q1 तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते, \q2 व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो. \q1 तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते. \q2 निश्चितच, मी ते करू शकत नाही. \q1 \v 10 मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे, \q2 “सर्व बाजूंनी दहशत! \q2 त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!” \q1 माझे सर्व मित्रगण \q2 माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, \q1 “कदाचित त्याची फसवणूक होईल; \q2 मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू \q2 आणि आपला सूड उगवू.” \b \q1 \v 11 परंतु याहवेह सामर्थ्यवान योद्ध्यासारखे माझ्यासोबत आहेत; \q2 म्हणून माझा छळ करणारे अडखळतील व वरचढ होणार नाहीत. \q1 ते पराजित होतील आणि पुरेपूर फजीत होतील; \q2 आणि त्यांची अप्रतिष्ठा कधीही विसरली जाणार नाही. \q1 \v 12 हे सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमानाची पारख करता \q2 अंतःकरणाची व मनाची तपासणी करता, \q1 तुम्ही त्यांचा सूड घेतांना मला पाहू द्या, \q2 कारण मी माझी फिर्याद तुमच्यापुढे सादर केली आहे. \b \q1 \v 13 याहवेहचे स्तवन करा! \q2 याहवेहची स्तुती गा! \q1 दुष्टजनांच्या हातातून \q2 ते गरजवंताचे प्राण वाचवितात. \b \q1 \v 14 मी जन्मलो तो दिवस शापित होवो! \q2 ज्या दिवशी आईने मला जन्म दिला तो आशीर्वादित नसो! \q1 \v 15 “तुला बाळ झाले आहे—पुत्र झाला आहे!” \q2 हा संदेश ज्या मनुष्याने माझ्या पित्यास कळविला, तो मनुष्य शापित असो, \q2 याव्दारे त्यांना मोठा आनंद झाला होता. \q1 \v 16 याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, \q2 तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. \q1 सकाळी तो शोकगीते ऐको, \q2 व दुपारी रणगर्जना. \q1 \v 17 कारण त्यांनी मला गर्भाशयामध्ये मारून टाकले नाही, \q2 मी माझ्या आईच्या उदरातच मेलो असतो, \q2 तिचे गर्भाशयच माझी कबर होऊन ते विस्तृत झाले असते, \q1 \v 18 मी गर्भाशयातून बाहेरच का आलो, \q2 ही संकटे व दुःख बघण्यासाठी \q2 आणि अप्रतिष्ठा सोसत जीवनाचा शेवट करण्यासाठी? \c 21 \s1 याहवेह सिद्कीयाहची विनंती अमान्य करतात \p \v 1 याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले जेव्हा सिद्कीयाह राजाने मल्कीयाहचा पुत्र पशहूर व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाहकडे पाठविले. ते त्याला म्हणाले, \v 2 “आम्हाला साहाय्य करावे, अशी विनंती याहवेहला कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आमच्यावर आक्रमण करणार आहे. याहवेह आमच्यावर कृपा करतील आणि प्राचीन काळी ते करीत असत तसा एखादा महान चमत्कार करून नबुखद्नेस्सरला सैन्य घेऊन परत जायला भाग पाडतील.” \p \v 3 यावर यिर्मयाहने उत्तर दिले, “सिद्कीयाहला सांगा, \v 4 ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात की तुम्हाला ज्या बाबेलच्या राजाने व खाल्डियन लोकांनी वेढा घातला आहे, त्यांच्याशी लढताना मी तुमची शस्त्रे तुमच्याच विरुद्ध करेन. मी तुमच्या शत्रूंना या नगराच्या आत एकत्रित करणार आहे. \v 5 माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे. \v 6 या नगरात राहणाऱ्या सर्वांवर—मनुष्य व प्राणी या दोघांवर—मी भयानक मरी पाठवेन आणि ते मरतील. \v 7 त्यानंतर याहवेहने ही घोषणा केली, मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी, व मरीमधून वाचलेल्या या नगरातील सर्व लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्यांचे शत्रू, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात त्यांच्या हाती देईन. तो त्यांना तलवारीने ठार करेल; तो त्यांच्यावर कोणतीही दया, करुणा वा कृपा करणार नाही.’ \p \v 8 “पुढे या लोकांना सांग, ‘याहवेह म्हणतात: पाहा मी तुमच्यासमोर जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग ठेवला आहे. \v 9 या नगरात जे कोणी राहतील ते तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरतील. परंतु जे कोणी ज्यांनी तुम्हाला वेढा घातला आहे त्या खास्द्यांच्या सैन्यास समर्पण करतील ते जगतील; त्यांचा जीव वाचेल. \v 10 कारण मी या नगराचे भले नाही, तर विध्वंस करण्याचा निर्धार केला आहे, ही याहवेहची घोषणा आहे. हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल आणि तो ते अग्नीने जाळून भस्म करेल.’ \p \v 11 “यहूदीयाच्या राजघराण्याला असे म्हण, ‘याहवेहचे वचन ऐका. \v 12 दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: \q1 “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; \q2 दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे \q2 अशांना त्यांच्या हातातून सोडवा, \q1 नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल \q2 कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— \q2 हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही. \q1 \v 13 हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, \q2 तुम्ही जे या खोर्‍यावर राहता \q2 खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; \q1 तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? \q2 आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?” \q1 \v 14 याहवेह म्हणतात, \q2 तुमच्या कृत्याच्या योग्य शिक्षा मी तुम्हाला करेन. \q1 मी तुमच्या अरण्यामध्ये अग्नी पेटवेन \q2 तो तुमच्या सभोवती असलेले सर्वकाही जाळून टाकेल.’ ” \c 22 \s1 दुष्ट राजां विरुद्ध न्याय \p \v 1 याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर: \v 2 ‘दावीदाच्या राजासनावर बसलेल्या हे यहूदीयाच्या राजा, याहवेहचा हा संदेश तुझ्यासाठी आहे—तू, तुझे अधिकारी आणि लोक जे या व्दारातून आत येतात या सर्वांसाठी. \v 3 याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका. \v 4 जर तुम्ही या आज्ञेचे काळजीपूर्वक पालन केले, नंतर दावीदाच्या राजासनावर बसलेले राजे या महालाच्या व्दारातून रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन, त्यांचे अधिकारी आणि लोक यांच्यासह प्रवेश करतील. \v 5 परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ” \p \v 6 कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: \q1 “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, \q2 व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, \q1 मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड \q2 आणि निर्जन नगरीसारखे करेन. \q1 \v 7 मी तुझ्याविरुद्ध विध्वंसकांची टोळी पाठवेन, \q2 प्रत्येक मनुष्य आपल्या शस्त्रांनी सुसज्ज असेल, \q1 ते तुझ्या सर्व उत्तम गंधसरूच्या तुळया कापतील \q2 आणि त्या तोडून अग्नीत टाकतील. \p \v 8 “अनेक राष्ट्रातील लोक या शहराजवळून जातील आणि येथील विध्वंस पाहून ते एकमेकांना म्हणतील, ‘याहवेहने हे एवढे भव्य शहर का बरे नष्ट केले?’ \v 9 आणि याचे उत्तर मिळेल: ‘कारण त्यांना याहवेह परमेश्वराच्या कराराचा त्याग केला होता आणि त्यांनी दुसऱ्या दैवतांची आराधना व सेवा केली.’ ” \q1 \v 10 मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका; \q2 त्याऐवजी, जो बंदिवासात गेला आहे त्याच्यासाठी विलाप करा, \q1 कारण तो मायदेशी परत येणार नाही \q2 किंवा मातृभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही. \m \v 11 यहूदीयाचा राजा योशीयाह याचा पुत्र शल्लूम\f + \fr 22:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa यहोआहाज\fqa*\f* याच्यानंतर गादीवर बसला, पण त्याला या ठिकाणाहून नेण्यात आले, त्याबद्दल याहवेह म्हणाले: “पुन्हा तो कधीच परत येणार नाही. \v 12 त्याला ज्या ठिकाणी त्यांनी बंदी करून नेले, तिथेच मरण पावेल; तो ही भूमी पुन्हा कधी पाहणार नाही.” \q1 \v 13 “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो, \q2 अन्यायाने माळे बांधतो, \q1 त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो, \q2 आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही. \q1 \v 14 तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन, \q2 ज्यामध्ये वरच्या मजल्यावर मोठमोठ्या खोल्या असतील.’ \q1 तो त्याला अनेक मोठ्या खिडक्या बांधतो, \q2 गंधसरूची तक्तपोशी करतो \q2 आणि सुंदर लाल रंगाने सजवितो. \b \q1 \v 15 “तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर \q2 ते तुला राजा बनविल काय? \q1 तुझा पिता खातपीत नव्हता काय? \q2 त्याने जे योग्य आणि न्याय्य केले, \q2 म्हणून त्याचे सर्व चांगलेच झाले. \q1 \v 16 त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, \q2 म्हणून त्याचे सर्व भले झाले. \q1 मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 17 “परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण \q2 केवळ अनीतीने धन कसे मिळवावे, \q1 निर्दोष्यांचे रक्त कसे वाहवे, \q2 आणि जुलूम व अन्यायाने कसे बळकावे याचाच शोध घेत असतात.” \m \v 18 म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: \q1 “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: \q2 ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ \q1 त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: \q2 ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’ \q1 \v 19 त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल— \q2 त्याला सिंहासनावरून फरफटत आणून \q2 यरुशलेमच्या द्वाराबाहेर फेकतील!” \b \q1 \v 20 “लबानोनात जा व विलाप करा, \q2 बाशानात तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे, \q1 अबारीमाहून आरोळी मारा, \q2 कारण तुमचे सर्व मित्र चिरडले गेले आहेत. \q1 \v 21 तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता, \q2 परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’ \q1 लहानपणापासून तुम्ही असेच आहात; \q2 तुम्ही आज्ञापालन केलेच नाही! \q1 \v 22 आता वार्‍याच्या झोतासरशी तुझे मेंढपाळ उडून जातील, \q2 तुमच्या सर्व मित्रांना बंदिवासात नेण्यात येईल. \q1 मग तुम्ही शरमिंदे व्हाल व तुमच्या सर्व दुष्टपणामुळे \q2 तुम्ही तुमची प्रतिष्ठा घालवाल. \q1 \v 23 तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात\f + \fr 22:23 \fr*\ft म्हणजेच यरुशलेमातील राजवाडा\ft*\f* \q2 रहिवास करीत होते, \q1 जेव्हा तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा तुम्ही तळमळाल; \q2 एखादी स्त्री प्रसूती वेदनांनी व्याकूळ होऊन तळमळते तसे तुमचे होईल! \p \v 24 “मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह\f + \fr 22:24 \fr*\ft किंवा \ft*\fqa यहोयाकीन\fqa*\f*, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन, \v 25 आणि तुझा वध करू पाहणार्‍यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा. \v 26 तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल. \v 27 ज्या देशात परत येण्याची तू उत्कट इच्छा करशील, त्या देशात तू कधीच परतणार नाहीस. \q1 \v 28 हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा \q2 कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? \q1 तो व त्याच्या मुलांना \q2 त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले. \q1 \v 29 अगे, हे भूमी, हे भूमी, हे भूमी \q2 तू याहवेहचे वचन ऐक! \q1 \v 30 याहवेह असे म्हणतात: \q1 “कान्याह हा मनुष्य जणू अपत्यहीन आहे अशी नोंद करा, \q2 कारण त्याच्या जीवनात तो कधीही समृद्ध होणार नाही, \q1 त्याच्या मुलांपैकी कोणीही समृद्ध होणार नाही, \q2 त्याचा कोणताही वारस दावीदाच्या राजासनावर बसणार नाही, \q2 किंवा यहूदीया प्रांतावर राज्य करणार नाही.” \c 23 \s1 नीतिमान फांदी \p \v 1 “धिक्कार असो त्या मेंढपाळांवर जे माझ्या कुरणातील मेंढरांचा नाश करतात व त्यांची पांगापांग करतात!” असे याहवेह जाहीर करतात. \v 2 म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात. \v 3 “जिथे माझ्या कळपाला मी पाठविले आहे, तिथून मी माझ्या कळपाच्या अवशेषाला त्या सर्व देशातून एकत्र करून पुन्हा त्यांच्या मेंढवाड्यात आणेन आणि मग ती मेंढरे फलद्रूप होतील व त्यांची संख्यावाढ होईल. \v 4 त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 5 याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की, \q2 त्या समयी मी दावीदातून\f + \fr 23:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa दावीदाच्या वंशातून\fqa*\f* एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन, \q1 तो राजा सर्व देशात सुज्ञतेने, \q2 खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल. \q1 \v 6 तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल \q2 आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल. \q1 याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता\f + \fr 23:6 \fr*\fq याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa याहवेह सिदकेनू\fqa*\f* \q2 या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल. \b \m \v 7 “असे दिवस येत आहेत की,” याहवेह म्हणतात, “शपथ घेताना इस्राएलचे लोक, ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, त्यांच्या जीविताची शपथ’ असे न म्हणता, \v 8 ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांच्या वंशजांना उत्तरेकडील भूमीतून आणि ज्या वेगवेगळ्या देशात पांगविले होते, त्या देशातून परत आणले आहे. त्या जिवंत परमेश्वराची शपथ’ असे म्हणतील. मग ते स्वतःच्या भूमीवर वस्ती करतील.” \s1 खोटे संदेष्टे \p \v 9 संदेष्ट्याविषयी: \q1 माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे; \q2 माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत. \q1 मद्यप्यासारखा माझा झोक जात आहे, \q2 एखाद्या बलवान पुरुषावर मद्याने मात केली आहे, \q1 कारण याहवेह \q2 व त्यांचे पवित्र शब्द. \q1 \v 10 सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे; \q2 कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे. \q2 अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत, \q1 कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात \q2 आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात. \b \q1 \v 11 “याजक व संदेष्टे हे दोघेही देवहीन आहेत; \q2 माझ्या मंदिरातही मी त्यांची तिरस्करणीय कृत्ये पाहिली आहेत,” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 12 “म्हणूनच त्यांचे मार्ग निसरडे होतील; \q2 त्यांना अंधारात हद्दपार करण्यात येईल \q2 आणि तिथे ते पडतील. \q1 ज्या वर्षी त्यांना शिक्षा देईन \q2 मी त्यांच्यावर अरिष्टे आणेन.” \q2 असे याहवेह म्हणतात. \b \q1 \v 13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांमध्ये \q2 मी ही तिरस्करणीय गोष्ट बघितली: \q1 त्यांनी बआल दैवताच्या नावाने संदेश देऊन \q2 माझ्या इस्राएली लोकांना मार्गभ्रष्ट केले. \q1 \v 14 आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात \q2 मी काही भयानक गोष्टी बघितल्या: \q2 ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात. \q1 ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात, \q2 जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही. \q1 ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात; \q2 यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.” \p \v 15 म्हणून सर्वसमर्थ याहवेह संदेष्ट्यांबद्धल असे म्हणतात: \q1 “मी त्यांना खावयास कडू दवणा देईन \q2 व प्यावयास विषारी पाणी देईन, \q1 कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळेच \q2 देवहीनता देश व्यापून टाकीत आहे.” \p \v 16 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; \q2 ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. \q1 ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, \q2 त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत! \q1 \v 17 माझा तिरस्कार करणार्‍या बंडखोरांना ते म्हणतात, \q2 ‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’ \q1 आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात \q2 त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’ \q1 \v 18 परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी, \q2 त्यांच्यापैकी कोण याहवेहच्या न्यायसभेत राहिला आहे, \q2 कोणी त्यांच्या वचनाकडे कान दिला आहे आणि ते ऐकले आहे? \q1 \v 19 पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. \q2 त्याचा प्रकोपात स्फोट होईल, \q1 दुष्टांच्या मस्तकावर \q2 ते एका वावटळीप्रमाणे येईल. \q1 \v 20 याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश \q2 पूर्ण झाल्याशिवाय \q2 त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. \q1 पुढे येणाऱ्या दिवसात \q2 तुला ते अगदी स्पष्टपणे कळेल. \q1 \v 21 या संदेष्ट्यांना मी पाठविलेले नाही, \q2 तरीसुद्धा ते त्यांचा संदेश घेऊन धाव घेतात; \q1 मी त्यांच्याशी बोललो नाही, \q2 तरी ते संदेश देतात. \q1 \v 22 जर ते माझ्या समक्षतेत उभे राहिले असते, \q2 तर त्यांनी माझ्या लोकांना माझे वचन जाहीर केले असते \q1 आणि ते दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले असते \q2 व त्यांच्या दुष्टकर्मापासून दूर झाले असते. \b \q1 \v 23 “मी केवळ जवळ असणाराच परमेश्वर आहे काय, \q2 दुरून बघणारा परमेश्वर नाही काय?” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 24 “माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय? \q2 जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय? \q2 असे याहवेह जाहीर करतात. \p \v 25 “माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’ \v 26 हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात? \v 27 त्यांचे पूर्वज बआल दैवताच्या उपासनेमुळे मला विसरले, तसे आपली खोटी स्वप्ने सांगितल्यास माझे लोक मला विसरून जातील असा ते विचार करतात. \v 28 ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात. \v 29 याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्‍या हातोडीसारखे ते नाही काय? \p \v 30 “जे आपले संदेश एकमेकांपासून माझ्यापासून चोरतात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे,” याहवेह जाहीर करतात. \v 31 होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे. \v 32 जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात. \s1 खोटे संदेश \p \v 33 “या लोकांपैकी, या संदेष्ट्यांपैकी, किंवा याजकांपैकी कोणी तुला विचारेल, ‘अरे यिर्मयाह, आज याहवेहकडून काय संदेश आहे?’ तेव्हा तू त्यांना असे उत्तर द्यावेस, ‘कसला संदेश? मी तुम्हाला दूर लोटून टाकणार आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ \v 34 आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन. \v 35 तुम्ही व इतर इस्राएली एकमेकांना विचारीत असता, ‘याहवेहने काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ \v 36 परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता. \v 37 तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ \v 38 ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने तुम्ही सांगता, याहवेह असे म्हणतात: ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ मी तुम्हाला हे वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतरही हे शब्द तुम्ही वापरता. \v 39 म्हणून मी निश्चितच तुम्हाला विसरेन आणि तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या या शहराला माझ्या समक्षतेतून घालवून देईन. \v 40 मी तुमची कायमची अप्रतिष्ठा—तुम्हाला कायमचे लज्जास्पद करेन, जे कधीही विसरल्या जाणार नाही.” \c 24 \s1 अंजिराच्या दोन टोपल्या \p \v 1 बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह\f + \fr 24:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa यहोयाखीन\fqa*\f*, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या. \v 2 एका टोपलीमध्ये उत्तम, आधी पिकलेले अंजीर होते, परंतु दुसर्‍या टोपलीतले अंजीर मात्र खराब झालेले होते, इतके खराब की ते खाण्यास योग्य नव्हते. \p \v 3 तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?” \p मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.” \p \v 4 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 5 “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘हे उत्तम अंजीर यहूदीयातून बंदिवासात पाठवलेल्यांचे प्रतीक आहे, ज्यांना मी या ठिकाणातून खास्द्यांच्या देशामध्ये रवाना केले आहे. \v 6 त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही. \v 7 मी त्यांना असे अंतःकरण देईन जेणेकरून ते मला ओळखतील, की मीच याहवेह आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा परमेश्वर होईन, कारण ते पूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे परत येतील. \p \v 8 “ ‘परंतु नासके अंजीर जे इतके नासके आहेत की ते खाण्यायोग्य नाहीत, हे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी व या देशात उरलेले यरुशलेमचे सर्व लोक यांचे प्रतीक आहेत; मग ते यरुशलेमचे अवशिष्ट लोक असोत वा इजिप्तमध्ये वस्ती करून राहिलेले असोत, याहवेह म्हणतात. \v 9 मी त्यांना असे करेन की पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला त्यांची घृणा येईल, आणि मी जिथे मी घालवून देईन, तिथे निंदा, कुचेष्टा, शाप\f + \fr 24:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa शाप देण्यासाठी त्यांचे नाव उच्चारले जाईल\fqa*\f* आणि ते उपहासाचा विषय होतील. \v 10 त्यांना व त्यांच्या पूर्वजांना मी दिलेल्या या भूमीतून त्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन.’ ” \c 25 \s1 बंदिवासाची सत्तर वर्षे \p \v 1 यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदीयाच्या सर्व लोकांबद्दल यिर्मयाहला संदेश मिळाला. \v 2 मग यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाच्या सर्व लोकांना व यरुशलेमच्या रहिवाशांना म्हणाला: \v 3 गेली तेवीस वर्षे—यहूदीयाचा राजा आमोनचा पुत्र योशीयाह याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षापासून आजपर्यंत—याहवेह मला त्यांचे संदेश देत आले आहेत आणि मी तेच संदेश परत परत तुम्हाला सांगत आलो आहे, पण तुम्ही ते ऐकले नाहीत. \p \v 4 पुनः पुनः याहवेहने आपले सर्व सेवक संदेष्टे तुमच्याकडे पाठविले, पण तुम्ही ऐकावयाचे नाकारले व त्याकडे दुर्लक्ष केले. \v 5 त्यांनी तुम्हाला संदेश दिला: “तुम्ही प्रत्येकजण तुमच्या दुष्ट मार्गापासून व जी दुष्कर्मे करीत आहात त्यापासून मागे फिरा, तरच याहवेहने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना सर्वकाळासाठी दिलेल्या या देशात तुम्ही राहाल. \v 6 इतर दैवतांची सेवा करण्यासाठी त्यांचे अनुसरण करू नका व त्यांची उपासना करू नका; तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकवू नका. तर मी तुम्हाला अपाय करणार नाही.” \p \v 7 याहवेह म्हणतात, “पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकविला व सर्व संकटे तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली.” \p \v 8 म्हणून आता सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तुम्ही माझी वचने ऐकली नाही, \v 9 मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात, \v 10 “त्यांचे हर्ष व त्यांच्या आनंदोत्सवाचे स्वर, वर आणि वधूंचे स्वर, त्यांच्या जात्यांचे आवाज व त्यांच्या दिव्यांचा प्रकाश मी नाहीसा करेन. \v 11 हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील. \p \v 12 “गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन, \v 13 या पुस्तकात मी जाहीर केलेले सर्व भयानक अनर्थ आणि यिर्मयाहने सर्व राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाणीत केलेल्या शिक्षा, मी या खाल्डियनांच्या देशावर आणेन. \v 14 अनेक राष्ट्रे व महान राजे त्यांना गुलाम करतील. त्यांनी माझ्या लोकांचा कृत्याद्वारे व हस्तकृतीद्वारे ज्या प्रमाणात छळ केला, त्याच प्रमाणात मी त्यांना शासन करेन,” याहवेह असे म्हणतात. \s1 परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला \p \v 15 याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव. \v 16 जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.” \v 17 तेव्हा मी याहवेहच्या हातातून तो प्याला घेतला आणि त्यांनी मला ज्या राष्ट्रांकडे पाठविले, त्या प्रत्येक राष्ट्राला त्यातून प्यावयला लावले: \b \li1 \v 18 यरुशलेम व यहूदीयाची नगरे, आणि त्यांचे राजे आणि अधिपती या सर्वांनी पडीक व भयानकतेचे एक उदाहरण, तिरस्कृत व शापित व्हावे—जसे ते आजही आहेत; \li1 \v 19 इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक; \li1 \v 20 त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे; \li1 व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक); \li1 \v 21 एदोम, मोआब व अम्मोन; \li1 \v 22 तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे; \li1 समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे; \li1 \v 23 ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात\f + \fr 25:23 \fr*\ft किंवा \ft*\fqa जे त्यांच्या कपाळावरील केस कापतात\fqa*\f* असलेले; \li1 \v 24 आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे; \li1 \v 25 जिम्री, एलाम व मेदिया येथील सर्व राजे; \li1 \v 26 तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; \li1 सरतेशेवटी शेशाकचा\f + \fr 25:26 \fr*\ft बाबिलोन\ft*\f* राजा या प्याल्यातून पिईल. \b \p \v 27 “त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’ \v 28 हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल! \v 29 माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’ \p \v 30 “म्हणून आता त्यांच्याविरुद्ध हा सर्व संदेश दे व त्यांना सांग: \q1 “ ‘याहवेह त्यांच्या उच्च स्थानातून गर्जना करतील; \q2 त्यांच्या पवित्रस्थानातून ते मेघनाद करतील \q2 आणि स्वतःच्या भूमीविरुद्ध गर्जना करतील \q1 पृथ्वीवरील सर्व रहिवाशांविरुद्ध. \q2 द्राक्षे तुडविणाऱ्यासारखे ते आरोळी मारतील, \q1 \v 31 हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल, \q2 कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील; \q1 ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील \q2 सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ” \q2 याहवेहची ही घोषणा आहे. \p \v 32 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, \q1 “पाहा! विपत्ती पसरत आहे \q2 एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात; \q1 पृथ्वीच्या टोकापासून \q2 एक भयंकर वादळ उठत आहे.” \m \v 33 त्या दिवशी याहवेहने वधलेल्या लोकांनी पृथ्वी व्यापून जाईल—त्यांच्यासाठी कोणीही विलाप करणार नाही, अथवा मूठमाती देण्यासाठी त्यांची प्रेते कोणी गोळा करणार नाही. ते भूमीवर शेणाप्रमाणे पडून राहतील. \q1 \v 34 अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा; \q2 मानवजातीच्या कळपांच्या पुढार्‍यांनो, धुळीत लोळा. \q1 कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे; \q2 मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल. \q1 \v 35 मेंढपाळांना पळून जाण्यास कुठेही जागा मिळणार नाही, \q2 पुढाऱ्यांना सुटकेसाठी मार्ग आढळणार नाही. \q1 \v 36 मेंढपाळ मारीत असलेल्या आरोळ्या ऐका, \q2 कळपांच्या पुढाऱ्यांचा विलाप ऐका! \q2 याहवेह त्यांची कुरणे उद्ध्वस्त करीत आहेत. \q1 \v 37 आता शांत कुरणे उजाड होतील \q2 याहवेहच्या भयानक क्रोधाला बळी पडतील. \q1 \v 38 सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील, \q2 आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे\f + \fr 25:38 \fr*\ft किंवा \ft*\fqa रागामुळे\fqa*\f* \q1 आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे \q2 त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल. \c 26 \s1 यिर्मयाहला मृत्यूची धमकी \p \v 1 यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी यिर्मयाहला याहवेहकडून हा संदेश मिळाला: \v 2 याहवेह असे म्हणतात, “यहूदीया प्रांताच्या विविध नगरातून लोक उपासना करावयास आले आहेत, तेव्हा तू याहवेहच्या मंदिरासमोर उभा राहा आणि यहूदीया नगरातील सर्व लोकांना जे याहवेहच्या मंदिरात उपासना करण्यास आले त्यांच्याशी बोल. मी तुला सांगितलेले सर्व त्यांना सांग; त्यातील एकही शब्द कमी करू नकोस. \v 3 कारण कदाचित ते ऐकतील आणि आपल्या कुमार्गापासून मागे वळतील; मग त्यांच्या कुकर्माबद्दल मी त्यांना करणार होतो तो विनाश आवरून धरेन. \v 4 त्यांना सांग, ‘याहवेह म्हणतात: जर तुम्ही माझे ऐकणार नाही व मी तुमच्यापुढे ठेवलेले नियम तुम्ही पाळणार नाही, \v 5 आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही), \v 6 तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ” \p \v 7 याजक, संदेष्टे व सर्व लोकांनी यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगितलेले ऐकले. \v 8 यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगणे संपविताच याजक, संदेष्टे व मंदिरातील सर्व लोकांनी त्याला घेरून त्याला म्हटले “तू मेलाच पाहिजे! \v 9 तू याहवेहच्या नावाने का भविष्यवाणी करतोस, की हे भवन शिलोहसारखे होईल व हे नगर निर्जन व उजाड होईल?” मग सर्व लोकांनी याहवेहच्या मंदिरात यिर्मयाहभोवती गर्दी केली. \p \v 10 जेव्हा यहूदीयाच्या अधिकार्‍यांनी हे ऐकले, तेव्हा ते राजवाड्यातून निघून मंदिराच्या दरवाजापाशी आले व याहवेहच्या मंदिराच्या देवडीत बसले. \v 11 मग याजक व संदेष्टे, अधिकारी व लोकांस म्हणाले, “या मनुष्यास मरणदंड दिलाच पाहिजे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला आहे, तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे!” \p \v 12 मग यिर्मयाह सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व लोकांना म्हणाला: “या मंदिराविरुद्ध आणि या शहराविरुद्ध तुम्ही ऐकलेल्या सर्व गोष्टीसाठी भविष्यवाणी करण्यासाठी याहवेहने मला पाठविले आहे. \v 13 आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील. \v 14 माझ्याबाबतीत म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुमच्यामते जे योग्य व वाजवी आहे ते येईल माझे करा. \v 15 परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही मला ठार केले, तर एका निरपराध मनुष्याला ठार केल्याचा ठपका तुमच्यावर, या नगरावर व येथील प्रत्येक रहिवाशावर येईल; कारण तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द तुम्हाला सांगण्यासाठी याहवेहने मला पाठविले, हे अगदी सत्य आहे.” \p \v 16 यावर अधिकारी व लोक, याजकांना आणि संदेष्ट्यांना उद्देशून म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडाला पात्र नाही, कारण तो आमचे परमेश्वर याहवेहच्या नावाने आमच्याशी बोलला आहे.” \p \v 17 नंतर काही वडीलजन पुढे आले व संपूर्ण सभेतील लोकांना उद्देशून बोलू लागले, \v 18 “यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: \q1 “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, \q2 यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, \q2 मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’ \m \v 19 “परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!” \p \v 20 (आता किर्याथ-यआरीम येथील शमायाहचा पुत्र उरीयाह हा याहवेहच्या नावाने संदेश देणारा दुसरा संदेष्टा होता. त्यानेही यिर्मयाहप्रमाणे नगरांविरुद्ध व देशाविरुद्ध या सारखाच संदेश दिला. \v 21 परंतु यहोयाकीम राजा, सेनाधिकारी व इतर अधिकारी वर्ग यांनी त्याचे शब्द ऐकले. तेव्हा राजाने त्याला मारण्याचे ठरविले. ही बातमी उरीयाहाला कळताच तो घाबरून इजिप्त देशात पळून गेला. \v 22 तेव्हा यहोयाकीम राजाने अकबोरचा पुत्र एलनाथान व बरोबर काही माणसे देऊन त्यांना इजिप्त देशी पाठविले. \v 23 इजिप्त देशातून त्यांनी उरीयाहला परत आणले, त्याला राजा यहोयाकीम राजाकडे परत आणले, त्याने त्याला तलवारीने ठार मारले आणि ज्या ठिकाणी सामान्य लोक पुरले होते तिथे त्याचा मृतदेह फेकून दिला.) \p \v 24 परंतु शाफानचा पुत्र हा अहीकाम यिर्मयाहच्या बाजूने उभा राहिला व त्याला मारण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आले नाही. \c 27 \s1 यहूदाचे लोक नबुखद्नेस्सरची सेवा करणार \p \v 1 यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी हा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला मिळाला: \v 2 याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव. \v 3 मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव, \v 4 त्यांच्या अधिकार्‍यांसाठी एक संदेश दे आणि सांग, ‘इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, असे म्हणतात: “तुमच्या धन्यांना सांगा की: \v 5 माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो. \v 6 यास्तव आता तुमचे सर्व देश, मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वनपशूदेखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे. \v 7 सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील, आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील. \p \v 8 “ ‘ “जर, कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, असे याहवेह घोषित करतात, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही. \v 9 तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका. \v 10 कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल; मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल. \v 11 परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्‍या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ” \p \v 12 हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल. \v 13 जे राष्ट्र बाबेलच्या राजाला अधीन होणार नाही, त्यांना याहवेहने देऊ केलेल्या युद्ध, दुष्काळ व मरी यांनी तू आणि तुझे लोक का मरावे? \v 14 ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ असे सांगणार्‍या संदेष्ट्यांचे ऐकू नका, कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. \v 15 याहवेह म्हणतात, ‘मी त्यांना पाठविलेले नाही, ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन.’ ” \p \v 16 मी याजकांशी व सर्व लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितले, “याहवेह म्हणतात: ‘मंदिरातून नेलेली सुवर्णपात्रे लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,’ असे सांगणार्‍या तुमच्या संदेष्ट्यांचे मुळीच ऐकू नका. ते तुम्हाला खोटे भविष्य सांगत आहेत. \v 17 त्यांचे ऐकू नका. बाबेलच्या राजाच्या अधीन व्हा, तर तुम्ही जिवंत राहाल. हे नगर उद्ध्वस्त का व्हावे? \v 18 जर ते संदेष्टे असतील व त्यांच्याकडे याहवेहचे वचन असेल तर, याहवेहच्या मंदिरातील सुवर्णपात्रे मंदिरात व यहूदीयाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममधील महालांमध्येच राहवी, ती बाबेलला नेली जाऊ नयेत, अशी त्यांनी सर्वसमर्थ याहवेहस विनंती करावी. \v 19 कारण स्तंभ, कास्याचे गंगाळ, धातूच्या बैठकी व या नगरात उरलेल्या इतर वस्तूंच्या बाबतीत सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, \v 20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले, \v 21 मंदिरातील उरलेली पात्रे व यहूदीया आणि यरुशलेमच्या राजांच्या महालातील उरलेल्या मौल्यवान वस्तू याविषयी सर्वसमर्थ याहवेह इस्राएलाचे परमेश्वर असे म्हणतात: \v 22 ‘होय, त्या आता बाबेलला नेण्यात येतील आणि मी त्यांची भेट घेईपर्यंत त्या तिथेच राहतील,’ याहवेह घोषित करतात. ‘नंतर पुढे मी हे सर्व यरुशलेमला परत आणेन व पुनर्स्थापित करेन.’ ” \c 28 \s1 खोटा संदेष्टा हनन्याह \p \v 1 त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला: \v 2 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर जाहीर करतात: ‘तुमच्या मानेवरील बाबेलच्या राजाचे जू मी काढून टाकेन. \v 3 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने लुटून नेलेली याहवेहच्या मंदिरातील सर्व पात्रे मी दोन वर्षात परत आणेन. \v 4 आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.” \p \v 5 यावर याहवेहच्या मंदिरात उभे असलेले सर्व लोक आणि याजकांच्या समक्ष यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, \v 6 यिर्मयाह संदेष्टा म्हणाला, “आमेन! तुझे संदेश याहवेह खरे करोत! तू दिलेल्या संदेशाच्या वचनानुसार याहवेहच्या मंदिरातील पात्र व सर्व बंदिवान बाबेलमधून परत येवोत. \v 7 परंतु तरी देखील, आता या सर्व लोकांसमक्ष व तुझ्यासमक्ष मी जे सांगतो ते तू ऐक: \v 8 तुझ्या आणि माझ्या आधी जे संदेष्टे होऊन गेले, ज्यांनी युद्ध, विनाश व मरी याविषयी अनेक राष्ट्रांना व शक्तिशाली राज्यांना संदेश दिला. \v 9 परंतु जो संदेष्टा शांतीचा संदेश देत असे व त्याचे भविष्य खरे ठरताच, तो खरोखर याहवेहने पाठविला आहे, असे समजले जात असे.” \p \v 10 यावर संदेष्टा हनन्याह याने यिर्मयाहच्या मानेवरील जू घेतले व ते मोडले; \v 11 आणि तिथे जमलेल्या समुदायाला उद्देशून हनन्याह म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: याचप्रकारे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवलेले जोखड मी दोन वर्षात तोडून टाकेन.” हे ऐकताच यिर्मयाह संदेष्टा तिथून चालता झाला. \p \v 12 संदेष्टा हनन्याहने यिर्मयाहच्या मानेवरील जू मोडल्यानंतर याहवेहचे वचन यिर्मयाहला आले: \v 13 “जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल. \v 14 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ” \p \v 15 मग यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, “हनन्याह, ऐक! याहवेहने तुला पाठविलेले नाही, परंतु तू तुझ्या खोट्या संदेशावर विश्वास ठेवण्यास या राष्ट्रास विवश केले. \v 16 म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ” \p \v 17 यानंतर त्याच वर्षी, सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्याह मरण पावला. \c 29 \s1 बंदिवानांना पत्र \p \v 1 नबुखद्नेस्सरने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी अवशेष वडीलजनांना, याजकांना, संदेष्ट्यांना व इतर सर्व लोकांना यिर्मयाहने लिहिलेल्या पत्राचा हा मजकूर आहे. \v 2 (राजा यकोन्याह, राजमाता, न्यायालयातील अधिकारी, यहूदाहचे व यरुशलेमचे अधिकारी व कारागीर अशा सर्वांना यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेण्यात आले होते.) \v 3 यिर्मयाहने शाफानचा पुत्र एलासाह व हिल्कियाहचा पुत्र गमर्‍याह यांच्याकडे सुपूर्द ते केले, जे यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरकडे पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा: \pm \v 4 यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवान करून आणलेल्या सर्वांना सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर यांचा हा संदेश आहे: \v 5 “बाबेलमध्ये घरे बांधा व तिथे वस्ती करा; मळे लावा व तेथील उत्पादन खा. \v 6 लग्न करा, पुत्र व कन्याचा जन्म होऊ द्या; आणि तुमच्या पुत्रांसाठीही वधू शोधा व तुमच्या कन्यांचा विवाह करून द्या, म्हणजे त्यांनाही पुत्र व कन्या होतील. तिथे बहुगुणित व्हा; पण ऱ्हास नव्हे. \v 7 ज्या खास्द्यांच्या नगरात तुम्हाला बंदिवान म्हणून नेण्यात आले आहे तिथे शांतता आणि समृद्धी नांदावी म्हणून प्रयत्न करा. खास्द्यांसाठी याहवेहकडे प्रार्थना करा, कारण तिथे समृद्धी आल्यास तुम्हासही समृद्धी लाभेल.” \v 8 होय, सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “तुम्हामध्ये असलेल्या संदेष्टे व दैवप्रश्न करणारे त्यांच्या फसवेगिरीला बळी पडू नका. त्यांनी स्वप्ने बघावी म्हणून तुम्ही त्यांना प्रोत्साहित केले असेल तर ती स्वप्ने ऐकू नका. \v 9 कारण माझ्या नावाने ते खोटे संदेश देतात. मी काही त्यांना पाठविले नाही,” असे याहवेह जाहीर करतात. \pm \v 10 याहवेह असे म्हणतात: “बाबेलमध्ये सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला दिलेल्या उत्तम अभिवचनानुसार पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आणेन.” \v 11 याहवेह असे जाहीर करतात, “कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत. \v 12 मग तुम्ही माझ्याकडे याल व माझी प्रार्थना कराल, तेव्हा त्या मी ऐकेन. \v 13 तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.” \v 14 याहवेह जाहीर करतात, “मी तुम्हाला आढळेन व तुमच्या दास्यातून तुम्हाला परत आणेन\f + \fr 29:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमचे भविष्य बदलेन\fqa*\f*, तुम्हाला ज्या सर्व राष्ट्रातून व ठिकाणाहून इतर देशात बंदिवासात पाठविले, तर तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणेन,” असे याहवेह जाहीर करतात. \pm \v 15 तुम्ही म्हणाल, “याहवेहने बाबेलमध्ये आपल्यासाठी संदेष्टे उभे केले आहेत,” \v 16 परंतु याहवेह असे म्हणतात, जो दावीदाच्या सिंहासनावर बसलेला राजा आणि या नगरात उरलेल्या लोकांबद्दल आहे, जे तुमचे बांधव म्हणून बंदिवासात गेले नाहीत— \v 17 होय, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन, व त्यांना नासक्या आणि खाण्यास अयोग्य अशा अंजिरासारखे करेन. \v 18 मी त्यांचा तलवार, दुष्काळ व मरीने पाठलाग करेन, जगभरातील सर्व राष्ट्राचे लोक त्यांची घृणा करतील, व त्यांना मी जिथेही हाकलून लावले तेथील लोक शाप देतील, त्यांची नाचक्की करतील, त्यांची चेष्टा करतील. \v 19 कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही, माझी वचने घेऊन माझे सेवक संदेष्टे मी त्यांच्याकडे पुनः पुन्हा पाठविले, परंतु तुम्ही बंदिवानांनीही माझे ऐकण्यास नकार दिला,” असे याहवेह जाहीर करतात. \pm \v 20 म्हणून यरुशलेम येथून बाबिलोन येथे मी पाठविलेल्या सर्व यहूदी बंदिवानांनो, आता याहवेहचे वचन ऐका. \v 21 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर कोलायाहचा पुत्र अहाब व मासेयाहचा पुत्र सिद्कीयाह या तुमच्या खोट्या संदेष्ट्याविषयी असे म्हणतात: “त्यांचा तुमच्यासमोर जाहीरपणे वध व्हावा म्हणून मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हवाली करणार आहे. \v 22 ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’ \v 23 कारण त्यांनी इस्राएलमध्ये एक अति घृणास्पद कृत्य केले आहे; त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या स्त्रियांशी व्यभिचार केला, आणि माझ्या नावाने खोटे संदेश दिले—जो अधिकार मी त्यांना दिला नव्हता. हे मला माहीत आहे, कारण त्यांचे प्रत्येक कृत्य मी पाहिले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. \s1 शमायाहसाठी संदेश \p \v 24 नेहेलामी शमायाह याला सांग, \v 25 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तू स्वतःच्या नावाने मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक याला, इतर सर्व याजकांना व यरुशलेममधील प्रत्येकाला पत्रे लिहिली आहेस. तू सफन्याहला असे म्हटले, \v 26 ‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. \v 27 मग तू या अनाथोथच्या यिर्मयाहला का फटकारले नाहीस, जो स्वतःला संदेष्टा म्हणवितो? \v 28 कारण त्याने आम्हाला येथे बाबेलमध्ये हा संदेश पाठविला आहे: आमचा बंदिवास दीर्घकाळचा आहे. आम्ही येथे पक्की खरे बांधून वसती करावी; मळा लावावा व त्यातील उत्पादन खावे.’ ” \p \v 29 याजक सफन्याह हे पत्र घेऊन यिर्मयाह संदेष्ट्याकडे गेला व त्याने त्याला वाचून दाखविले. \v 30 तेव्हा याहवेहचे यिर्मयाहला हे वचन मिळाले: \v 31 “खास्द्यांमध्ये बंदिवासात असलेल्या सर्वांना हा संदेश पाठव: ‘नेहेलामी शमायाहविषयी याहवेह असे म्हणतात: कारण त्याला मी पाठविले नसतानाही त्याने तुम्हाला संदेश दिला, आणि त्याच्या खोट्या वचनावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला विवश केले, \v 32 याहवेह असे म्हणतात: मी नेहेलामी शमायाहला व त्याच्या वंशजांना निश्चितच शिक्षा करेन. त्याच्या लोकांपैकी कोणीही हयात राहणार नाही, माझ्या लोकांचे जे अभीष्ट मी करणार आहे, ते तो बघू शकणार नाही, असे याहवेह जाहीर करतात, कारण माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्याचा त्याने संदेश दिला आहे.’ ” \c 30 \s1 इस्राएलचे पुनर्वसन \p \v 1 याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: \v 2 “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला सांगितलेली सर्व वचने एका नोंदवहीत लिहून ठेव. \v 3 याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन\f + \fr 30:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझ्या इस्राएल आणि यहूदीयाच्या लोकांची समृद्धी मी परत आणेन\fqa*\f* व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.” \p \v 4 इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात: \v 5 “याहवेह म्हणतात: \q1 “ ‘त्यांचा भयभीत आक्रोश ऐकू येत आहे— \q2 शांती नव्हे, तर दहशत. \q1 \v 6 विचारून पाहा: \q2 पुरुष मुले प्रसवू शकतात काय? \q1 मग प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांप्रमाणे \q2 आपल्या पोटावर हात ठेऊन \q2 मेल्यागत फिक्के पडलेल्या चेहऱ्याचे बलवान पुरुष मला का दिसत आहेत? \q1 \v 7 हाय हाय! तो दिवस किती भयंकर असेल! \q2 इतर कोणताही दिवस असा नसेल. \q1 याकोबासाठी तो संकटकाळ असेल. \q2 पण तो यातून वाचून बाहेर पडेल. \b \q1 \v 8 “कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, \q2 ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, \q1 त्यांच्या बेड्या तोडेन, \q2 आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत; \q1 \v 9 याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा, \q2 ज्याला मी त्यांच्यातून उभारेन, \q2 ते त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करतील! \b \q1 \v 10 “ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; \q2 हे इस्राएला, निराश होऊ नको,’ \q2 याहवेह असे जाहीर करतात. \q1 ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, \q2 व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. \q1 याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल \q2 आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’ \q1 \v 11 कारण याहवेह जाहीर करतात, \q2 ‘मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझी मुक्तता करेन. \q1 जरी ज्या राष्ट्रात मी तुझी पांगापांग केली, \q2 त्या राष्ट्रांचा मी समूळ नायनाट केला, \q2 तरी मी तुझा पूर्णपणे नायनाट करणार नाही. \q1 मी तुला योग्य शासन करेन, पण ते मर्यादित; \q2 तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.’ \p \v 12 “याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘तुझी जखम असाध्य आहे, \q2 तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे. \q1 \v 13 तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही, \q2 तुझ्या दुखापतीवर काहीही इलाज नाही, \q2 तुला आरोग्य प्राप्त होणार नाही. \q1 \v 14 तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; \q2 त्यांना तुझी चिंता नाही; \q1 एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे \q2 निर्दयागत मी तुला शासन केले, \q1 कारण तुझा अपराध फार मोठा आहे \q2 तुझी पातके पुष्कळ झाली आहेत. \q1 \v 15 तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, \q2 तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? \q1 कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत \q2 म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला. \b \q1 \v 16 “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; \q2 तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. \q1 ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; \q2 ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील. \q1 \v 17 मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन \q2 आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, \q1 ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, \q2 सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’ \p \v 18 “परंतु याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘मी तुझी धनसंपत्ती तुला परत देईन, \q2 आणि याकोबाच्या निवासावर करुणा करेन; \q1 त्याच्या भग्नावशेषांवरही नगरी पुन्हा बांधली जाईल \q2 आणि राजवाडा पुन्हा त्याच्या ठराविक जागी उभारला जाईल. \q1 \v 19 तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील \q2 आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. \q1 मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, \q2 पण त्यात घट होऊ देणार नाही; \q1 मी त्यांना प्रतिष्ठित करेन, \q2 पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत. \q1 \v 20 त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील, \q2 त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील; \q2 त्यांचा छळ करणार्‍या सर्वांना मी शिक्षा करेन. \q1 \v 21 त्यांना त्यांच्या स्वजनापैकीच राजा पुन्हा लाभेल; \q2 त्यांचा शासनकर्ता त्यांच्यामधून उभारल्या जाईल. \q1 मी त्याला माझ्या निकट आणेन आणि तो माझ्या निकट येईल, \q2 कारण माझ्या निकट येण्यासाठी \q2 त्याने स्वतःस मला समर्पित केले पाहिजे ना?’ \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 22 ‘तुम्ही माझे लोक व्हाल \q2 व मी तुमचा परमेश्वर होईन.’ ” \b \q1 \v 23 पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. \q2 त्याचा प्रकोपात स्फोट होईल, \q1 दुष्टांच्या मस्तकावर \q2 ते एका वावटळीप्रमाणे येईल. \q1 \v 24 याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश \q2 पूर्ण झाल्याशिवाय \q2 त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. \q1 पुढे येणाऱ्या दिवसात \q2 तुला हे कळेल. \c 31 \p \v 1 याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.” \p \v 2 याहवेह जे म्हणतात ते असे: \q1 “जे तलवारीच्या प्रहारातून वाचले \q2 त्यांना रानात अनुकूलता सापडेल \q2 इस्राएलला विश्रांती देण्यासाठी मी स्वतः येईन.” \p \v 3 कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले: \q1 “मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे; \q2 मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे. \q1 \v 4 मी तुला पुन्हा उभारेन, \q2 आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील. \q1 तू पुन्हा तुझे खंजीर घेशील \q2 आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील. \q1 \v 5 शोमरोनच्या डोंगरावर \q2 तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; \q1 शेतकरी ते मळे लावतील \q2 व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील. \q1 \v 6 ‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, \q2 आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” \q1 पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून \q2 अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे, \p \v 7 याहवेह असे म्हणतात: \q1 “याकोबासाठी हर्षाने गाणी गा; \q2 सर्वश्रेष्ठ इस्राएली राष्ट्रासाठी गर्जना करा. \q1 तुमचे स्तुतिगान जाहीरपणे ऐकू यावे आणि म्हणा, \q2 ‘याहवेह, आपल्या लोकांचे, \q2 इस्राएलाच्या अवशेषाचे तारण करा’ \q1 \v 8 पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन \q2 आणि पृथ्वीच्या दिगंतापासून गोळा करेन. \q1 त्यांच्यात आंधळे व पांगळे, \q2 गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या माता असतील; \q2 फार मोठा समुदाय परत येईल. \q1 \v 9 ते आनंदाश्रू ढाळतील. \q2 मी त्यांना परत आणतांना ते प्रार्थना करतील. \q1 मी त्यांना जलप्रवाहाच्या बाजूने चालवेन \q2 समतल भूमीवरून ते न अडखळता चालतील, \q1 कारण मी इस्राएलचा पिता आहे, \q2 आणि एफ्राईम माझा ज्येष्ठपुत्र आहे. \b \q1 \v 10 “अहो राष्ट्रांनो, याहवेहचे वचन ऐका, \q2 आणि दूरवरील सर्व सागरतीरांवर ते जाहीर करा: \q1 ‘ज्यांनी इस्राएली लोकांना विखरले, तेच त्यांना एकत्र करतील. \q2 मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपांची निगा राखतील.’ \q1 \v 11 याहवेह याकोबाची सुटका करतील \q2 आणि त्यांच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांपासून त्यांना सोडवितील. \q1 \v 12 ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; \q2 याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— \q1 धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, \q2 गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. \q1 भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील \q2 आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील. \q1 \v 13 त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, \q2 तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. \q1 कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; \q2 मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन. \q1 \v 14 मी मंदिरातील याजकांना विपुल पुरवठ्याने समाधानी करेन, \q2 आणि माझे लोक भरघोस साठ्याने तृप्त होतील.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \p \v 15 याहवेह असे म्हणतात: \q1 “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, \q2 शोक आणि घोर आकांत, \q1 राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. \q2 ती सांत्वन पावण्यास नकार देते, \q2 कारण ते आता राहिले नाहीत.” \p \v 16 परंतु याहवेह असे म्हणतात: \q1 “तुझा रुदनस्वर आणि \q2 तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आवर, \q1 कारण तुझ्या कार्यास फलप्राप्ती होणार आहे,” \q2 याहवेह असे जाहीर करतात \q2 “ते शत्रूच्या देशातून परत येतील. \q1 \v 17 तुझ्या वंशजासाठी आशा आहे,” \q2 याहवेह असे जाहीर करतात. \q2 तुझी मुले आपल्या देशात परत येतील. \b \q1 \v 18 “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: \q2 ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, \q2 आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. \q1 मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, \q2 कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात. \q1 \v 19 मी भरकटल्यानंतर, \q2 मला पश्चात्ताप झाला; \q1 मला समज आल्यानंतर, \q2 मी दुःखातिशयाने ऊर बडवून घेतला. \q1 माझ्या तरुणपणाच्या दिवसात मी जे आचरण केले, \q2 त्यामुळे मी लज्जित व अपमानित झालो आहे.’ \q1 \v 20 हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, \q2 जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? \q1 जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, \q2 तरी मला आताही त्याची आठवण येते. \q1 म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; \q2 मला त्याची अत्यंत दया येते.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 21 “जाताना वाटेवर खुणा कर; \q2 दिशादर्शक लाव. \q1 तू गेलीस तो महामार्ग ध्यानात ठेव, \q2 त्या मार्गावर लक्ष ठेव. \q1 हे इस्राएली कुमारी, परत ये, \q2 तू आपल्या नगरांमध्ये परत ये. \q1 \v 22 अगे विश्वासघातकी कन्ये, \q2 तू कुठवर भटकत राहणार? \q1 याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत— \q2 स्त्री पुरुषाकडे परत\f + \fr 31:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa सुरक्षा देईल\fqa*\f* येईल.” \p \v 23 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’ \v 24 मग यहूदीया नगरवासी—शेतकरी व कळप घेऊन फिरणारे मेंढपाळ सर्वच एकत्र नांदतील. \v 25 मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.” \p \v 26 एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती. \p \v 27 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन. \v 28 जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात. \v 29 “लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत, \q1 ‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली, \q2 आणि मुलांचे दात आंबले.’ \m \v 30 कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील. \q1 \v 31 “असे दिवस येतील जेव्हा, \q2 इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी \q1 मी एक नवीन करार करेन,” \q2 याहवेह म्हणतात. \q1 \v 32 “मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून \q2 त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, \q1 तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या \q2 कराराप्रमाणे हा करार नसेल. \q1 मी जरी त्यांचा पती होतो\f + \fr 31:32 \fr*\ft किंवा \ft*\fqa मी त्यांच्यापासून दूर गेलो\fqa*\f*, \q2 तरी त्यांनी माझा करार मोडला.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 33 “परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” \q2 याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर \q1 मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, \q2 आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, \q1 मी त्यांचा परमेश्वर होईन, \q2 आणि ते माझे लोक होतील. \q1 \v 34 कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, \q2 किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, \q1 कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण \q2 मला ओळखतील,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 “मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन \q2 व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.” \p \v 35 याहवेह असे म्हणतात, \q1 दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून \q2 ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, \q1 व रात्री प्रकाश देण्यासाठी \q2 चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, \q1 गर्जना करणार्‍या लाटा उसळाव्यात म्हणून \q2 जे समुद्र ढवळतात; \q2 त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे: \q1 \v 36 “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच \q2 माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून \q1 इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” \q2 याहवेह असे जाहीर करतात. \p \v 37 याहवेह असे म्हणतात: \q1 “जर आकाशाचे मोजमाप करता आले असते \q2 व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता, \q1 तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना \q2 त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,” \q2 याहवेह जाहीर करतात. \p \v 38 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्‍यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल. \v 39 आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल. \v 40 संपूर्ण खोरे जिथे प्रेते व राख फेकण्यात येत असे, व त्याचप्रमाणे किद्रोनच्या खोऱ्यापर्यंतची आणि तिथून पूर्वेकडील घोडवेशी पर्यंतची सर्व शेते याहवेहला पवित्र अशी होतील. या नगराचा पुन्हा कधीही पाडाव किंवा विध्वंस होणार नाही.” \c 32 \s1 यिर्मयाह एक शेत विकत घेतो \p \v 1 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या राजवटीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, याहवेहकडून यिर्मयाहला पुढील वचन प्राप्त झाले: \v 2 यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता. \p \v 3 यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला कैदेत टाकले, असे म्हणून, “तू असा संदेश का देतोस? तू म्हणतोस याहवेह असे म्हणतात: ‘मी आता बाबेलच्या राजाच्या हातात हे नगर देणार आहे, आणि तो ते हस्तगत करणार आहे. \v 4 यहूदीयाचा राजा सिद्कीयाहची खास्द्यांच्या\f + \fr 32:4 \fr*\ft खाल्डियन\ft*\f* हातून सुटका होणार नाही, पण तो निश्चितच बाबेलच्या राजाच्या हातात पडेल व त्याच्याशी तो समोरासमोर बोलेल आणि सर्व स्वतःच्या डोळ्याने बघेल. \v 5 तो राजा सिद्कीयाहला खास्द्यांच्या येथे नेईल व मी येऊन तुझी भेट घेईपर्यंत तो तिथेच राहील, असे याहवेह जाहीर करतात. जर तू बाबेलांशी युद्ध केलेस तरी तुला विजय मिळणार नाही.’ ” \p \v 6 यिर्मयाह म्हणाला, याहवेहकडून मला हे वचन आले आहे: \v 7 शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’ \p \v 8 “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ \p “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता; \v 9 मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल\f + \fr 32:9 \fr*\ft अंदाजे 200 ग्रॅ.\ft*\f* चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले. \v 10 साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली. \v 11 नंतर मी शर्ती व अटी नमूद केलेले—मोहोरबंद केलेले खरेदीखत घेतले, तसेच त्या खतपत्राची मोहोर न केलेली प्रत घेतली— \v 12 आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली. \p \v 13 “सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या: \v 14 ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव. \v 15 कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’ \p \v 16 “मग खरेदीखत नेरीयाहचा पुत्र, नेरीयाहचा पुत्र बारूखच्या हवाली केल्यावर मी याहवेहकडे प्रार्थना केली. \pm \v 17 “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही. \v 18 तुम्ही हजारांवर प्रीती करता, परंतु वडिलांच्या पापांसाठी मुलांना शिक्षा होतेच. परमथोर आणि सामर्थ्यवान, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे. \v 19 तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता. \v 20 तुम्ही इजिप्त देशात, इस्राएलमध्ये व सर्व मानवजातीत चिन्हे व चमत्कार केले व आजही करीत आहात, त्यामुळे तुमच्या नावाला आजतागायत महान थोरवी लाभली आहे. \v 21 चिन्ह व चमत्कारांनी आणि सशक्त बाहूंनी व विस्तारलेल्या भुजांनी, तसेच मोठी दहशत बसवून तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले. \v 22 आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला. \v 23 ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे. \pm \v 24 “पाहा, वेढा घालणार्‍यांनी शहराचा ताबा घेण्यासाठी भिंत बांधली आहे. तलवार, दुष्काळ व मरी यांच्यामुळे हे शहर हल्ला करणाऱ्या खास्द्यांच्या हाती पडेल. तुम्ही जे होईल असे म्हटले होते, तेच आता घडतांना तुम्ही बघू शकता. \v 25 सार्वभौम याहवेह, खास्द्यांच्या हाती हे नगर दिले जाणार असूनही तुम्ही मला म्हणता, ‘चांदीची नाणी देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांच्या सहीने खरेदीखत तयार कर.’ ” \p \v 26 नंतर यिर्मयाहला याहवेहचे पुढील वचन आले: \v 27 “मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का? \v 28 म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल. \v 29 हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील. \p \v 30 “त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात. \v 31 हे शहर बांधले त्या दिवसापासून आतापर्यंत या शहराने माझा क्रोध व संताप इतका भडकविला आहे की या शहराला मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकणार आहे. \v 32 इस्राएली व यहूदीयाच्या लोकांनी—ते, त्यांचे राजे व अधिकारी, त्यांचे याजक व संदेष्टे, यरुशलेम नगरात व यहूदीयात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुष्कर्माने मला अत्यंत संताप आणला आहे. \v 33 त्यांनी माझ्याकडे त्यांचे मुख नव्हे तर पाठ फिरविली आहे; परत परत मी त्यांना शिक्षण दिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही किंवा माझ्या शिस्तीस प्रतिसाद दिला नाही. \v 34 माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे. \v 35 बेन हिन्नोम खोर्‍यांमध्ये त्यांनी बआल दैवतासाठी उंच उंच वेद्या बांधल्या आहेत. तिथे त्यांनी त्यांचे पुत्र व कन्या मोलख मूर्तीस अर्पण केले, हे करण्याचे मी त्यांना कधीही आज्ञापिले नव्हते—असे माझ्या मनातही कधी आले नव्हते—की ते अशी घृणास्पद कृत्ये करतील व यहूदीयास पाप करण्यास लावतील. \p \v 36 “या नगराबद्धल तुम्ही असे म्हणता, ‘तलवार, दुष्काळ व मरी यामुळे हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती पडेल, परंतु याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: \v 37 परंतु माझ्या महाक्रोधाने व उग्र कोपाने मी त्यांना ज्या देशात हाकलून दिले, त्या सर्व देशातून मी माझ्या लोकांना एकत्र करेन; मी त्यांना याच ठिकाणी परत आणेन आणि ते सुरक्षितपणे वस्ती करतील. \v 38 मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. \v 39 मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल. \v 40 मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत. \v 41 त्यांचे कल्याण करण्यात मला आनंद वाटेल व माझ्या पूर्ण मनाने व आत्म्याने मी त्यांना या देशामध्ये पुन्हा स्थापन करेन. \p \v 42 “याहवेह म्हणतात ते असे: ही सर्व भयंकर संकटे मी या लोकांवर आणली, म्हणून आता मी त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे समृद्धी देईन. \v 43 या देशाबद्दल तुम्ही म्हणत, ‘हा देश उजाड झाला आहे, इथे माणसे आणि पशू यांचा मागमूस राहिलेला नाही, कारण हा बाबिलोनचे लोकांच्या हाती देण्यात आला होता,’ तिथे शेतांची खरेदी पुन्हा सुरू होईल. \v 44 बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी\f + \fr 32:44 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांना बंदिवासातून परत आणेन\fqa*\f* निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.” \c 33 \s1 पुनर्वसनाचे अभिवचन \p \v 1 यिर्मयाह अद्यापही तुरुंगात असताना याहवेहचे त्याला दुसऱ्यांदा वचन आले: \v 2 “याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात: \v 3 ‘मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहीत नसलेल्या महान आणि शोधता न येणाऱ्या गोष्टी तुला सांगेन.’ \v 4 याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, या नगरातील जी घरे आणि यहूदीयातील राजवाडे वेढा देऊन व तलवारीच्या प्रहाराचा उपयोग करून पाडून टाकण्यात आले आहेत, त्याविषयी असे म्हणतात, \v 5 बाबेलांशी युद्ध करताना: ‘ज्या लोकांवर मी माझ्या कोपाने प्रहार करणार आहे, ते त्या लोकांच्या शवांनी भरून जातील. त्यांनी केलेल्या सर्व दुष्टतेमुळे मी या नगराला विमुख होईन. \p \v 6 “ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन. \v 7 मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन. \v 8 त्यांनी माझ्याविरुद्ध केलेली सर्व पापे मी शुद्ध करेन, आणि माझ्याविरुद्ध बंडखोरी करून केलेल्या सर्व पापांची क्षमा करेन. \v 9 मग पृथ्वीवरील जी सर्व राष्ट्रे मी त्यांच्यासाठी केलल्या सर्व चांगल्या गोष्टी ऐकतील, त्यांच्यापुढे हे नगर मला बहुमानास्पद, आनंददायक, प्रशंसा व आदर देणारे होईल; माझ्या लोकांना मी प्रदान केलेली विपुल समृद्धी व शांती पाहून, त्या राष्ट्रांना दरारा व आदरयुक्त भीती वाटेल.’ \p \v 10 “याहवेह असे म्हणतात: ‘या नगराविषयी तुम्ही म्हणता, “हे उद्ध्वस्त झालेले ठिकाण आहे, इथे ना लोक राहतात ना पशू.” तरी देखील वैराण झालेल्या यहूदीयाच्या नगरात व यरुशलेमच्या रस्त्यांवर पुन्हा ते स्वर ऐकू येतील. \v 11 आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्‍यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, \q1 “याहवेहला धन्यवाद द्या, \q2 कारण ते चांगले आहेत; \q2 त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” \m मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात. \p \v 12 “याहवेह असे म्हणतात: ‘कोणीही मनुष्य व पशू नसलेल्या या उजाड ठिकाणी—यातील सर्व नगरात कळपांना विश्रांती मिळण्यासाठी मेंढपाळांना कुरणे मिळतील. \v 13 पश्चिमेकडील डोंगरातील गावात व तळवटीत, व नेगेवच्या गावात, बिन्यामीन प्रांतात, यरुशलेमच्या सभोवतालच्या प्रदेशात आणि यहूदीयाच्या सर्व नगरात, मोजणाऱ्यांच्या हाताखालून पुन्हा त्यांचे कळप जातील,’ असे याहवेह म्हणतात. \p \v 14 “ ‘असे दिवस येतील, जेव्हा इस्राएल व यहूदीयाला दिलेले अभिवचन मी पूर्ण करेन, याहवेह जाहीर करतात. \q1 \v 15 “ ‘त्या दिवसात व त्या समयी \q2 मी दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन; \q2 आणि तो या राष्ट्रात न्यायाने व नीतीने कार्य करेल. \q1 \v 16 त्या दिवसात यहूदीयाचा बचाव होईल \q2 व यरुशलेम येथील लोक सुरक्षितपणे राहतील. \q1 याहवेह जे आमचे नीतिमान तारणकर्ता \q2 या नावाने संबोधित करण्यात येईल.’ \m \v 17 कारण याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएलाच्या सिंहासनावर बसण्यासाठी दावीदाला वारसाचा अभाव कधीही होणार नाही. \v 18 तसेच माझ्या समक्षतेत निरंतर होमार्पणे, अन्नार्पणे व यज्ञार्पणे करण्यासाठी लेवीय याजकाचा अभाव कधीही होणार नाही.’ ” \p \v 19 नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: \v 20 “याहवेह असे म्हणतात, ‘मी दिवसाशी केलेला करार व रात्रीशी केलेला करार तुम्ही मोडू शकला, तर दिवस व रात्र योग्य समयी येणार नाहीत, \v 21 मग माझा सेवक दावीद याच्या बरोबरचा माझा करार—त्याचप्रमाणे माझ्या समक्षतेत उभे राहून सेवा करणारे लेवीय याजक यांच्या बरोबरचा माझा करार—भंग पावू शकेल आणि दावीदाच्या सिंहासनावर बसून राज्य करण्यास त्याचा कोणीही वंशज असणार नाही. \v 22 ज्याप्रमाणे आकाशातील तारे मोजता येत नाहीत व समुद्र किनार्‍यावरील वाळूचे मापन करता येत नाही, त्याचप्रमाणे माझा सेवक दावीद याचे वंशज आणि माझी सेवा करणाऱ्या लेवी वंशज यांना मी असंख्य करेन.’ ” \p \v 23 याहवेहचे वचन यिर्मयाहला आले: \v 24 “लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा\f + \fr 33:24 \fr*\ft किंवा \ft*\fqa कुटुंबाचा\fqa*\f* त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत. \v 25 यावर याहवेह असे म्हणतात: ‘जर मी रात्र व दिवस यांच्याशी करार केला नसता व आकाश व पृथ्वी स्थापित केले नसते, \v 26 तर मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या या वंशजांवर राज्य करण्यास याकोबाचे व माझा सेवक दावीदाचे वंशज नाकारले असते व दावीदाच्या पुत्राला निवडले नसते. पण मी त्यांची पूर्वीची समृद्धी त्यांना परत देईन\f + \fr 33:26 \fr*\ft त्यांना बंदिवासातून सोडवून\ft*\f* व त्यांच्यावर दया करेन.’ ” \c 34 \s1 सिद्कीयाहला यिर्मयाहचा इशारा \p \v 1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, त्याची संपूर्ण सेना व त्याच्या अंकित असलेल्या सर्व राज्यांच्या व लोकांच्या सेना, यरुशलेम व सभोवतालची सर्व नगरे यांच्याबरोबर युद्ध करीत असताना, यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: \v 2 “इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याला जाऊन सांग की याहवेह म्हणतात, ‘मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हातात देईन व तो ते जाळून टाकील. \v 3 तू त्याच्या तावडीतून सुटणार नाहीस पण तू पकडल्या जाशील व त्याच्या हातात पडशील. तू स्वतःच्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला बघशील, आणि तो तुझ्याशी समोरासमोर बोलेल व तू बाबेलला जाशील. \p \v 4 “ ‘परंतु हे सिद्कीयाह, यहूदीयाच्या राजा, याहवेहचे हे वचन ऐक! याहवेह तुझ्याविषयी असे म्हणतात: तलवारीने तुझा वध होणार नाही; \v 5 पण तू शांतीने मरण पावशील. जसा तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी लोकांनी सन्मानदर्शक मृतकाग्नी जाळला, तसा तुझ्या सन्मानार्थही जाळतील आणि ते तुझ्यासाठी विलाप करून म्हणतील, “हाय हाय! आमच्या स्वामी!” मी स्वतः हे वचन देत आहे, असे याहवेह घोषित करतात.’ ” \p \v 6 त्याप्रमाणे यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा सिद्कीयाह राजाला यरुशलेममध्ये हे सर्वकाही सांगितले. \v 7 यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमशी युद्ध करीत होते, यहूदीया प्रांतातील इतर नगरे—लाखीश व अजेकाह—अद्यापही टिकाव धरून होती. यहूदीयात एवढीच तटबंदी असलेली शहरे बाकी होती. \s1 गुलामांची मुक्तता \p \v 8 यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले. \v 9 प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्‍या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये. \v 10 सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले. \v 11 पण नंतर त्यांनी आपले मन बदलले व मुक्त केलेल्या आपल्या सेवकांना पुन्हा गुलाम केले. \p \v 12 मग यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: \v 13 “इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले, \v 14 ‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही. \v 15 अलीकडेच तुम्ही पश्चात्ताप केला व माझ्या दृष्टीने योग्य ते केले: आपल्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा केली. आम्ही तसे करू, असे तुम्ही मला माझे नाव धारण केलेल्या मंदिरात शपथपूर्वक वचन दिले होते. \v 16 परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली. \p \v 17 “म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन. \v 18 ज्यांनी माझा करार मोडला व माझ्या करारातील अटी पूर्ण करण्याचे नाकारले आहे, त्यांना ज्याप्रमाणे वासरू कापून त्याचे दोन भाग करून त्यामधून चालत जावे, त्याचप्रमाणे मी त्यांना वागवेन. \v 19 यहूदीया व यरुशलेममधील अधिपती, न्यायालयीन अधिकारी, याजक व सामान्य लोक जे दोन भाग केलेल्या वासराच्या मधून चालत गेले, \v 20 मी जे तुम्हाला ठार करू पाहतात त्या तुमच्या शत्रूंच्या हवाली करेन. त्यांची प्रेते पक्षी व हिंस्र श्वापदांचे अन्न होतील. \p \v 21 “बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन. \v 22 मी हा आदेश देणार आहे, असे याहवेह जाहीर करतात, मी त्यांना या शहरात परत आणेन. ते पुन्हा या नगरांविरुद्ध लढतील, ते जिंकतील व त्यास जाळून टाकतील. यहूदीयाची सर्व शहरे मी अशी ओसाड करेन जिथे कोणीही वसती करू शकणार नाही.” \c 35 \s1 रेखाबी लोक \p \v 1 योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे: \v 2 “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.” \p \v 3 त्याप्रमाणे याजन्याह, यिर्मयाहचा पुत्र, याजन्याहचा नातू, हबसिन्याहचा पुत्र, तो, त्याचे भाऊ व सर्व पुत्र—म्हणजे पूर्ण रेखाबी कुटुंब यांना मी भेटण्यास गेलो. \v 4 सर्वांना मी याहवेहच्या मंदिरात आणले व इग्दल्याह, परमेश्वराच्या मनुष्याचा पुत्र, हानानाचे पुत्र जी खोली वापरीत असत, त्या खोलीत त्यांना नेले. ही खोली राजवाड्याचे अधिकारी वापरीत असलेल्या खोलीच्या बाजूस आणि मंदिराचा द्वारपाल शल्लूमचा पुत्र मासेयाह, याच्या खोलीच्या बरोबर वर होती. \v 5 मग त्या रेखाबीसमोर मी द्राक्षारसाचे कटोरे व काही पेले ठेवले आणि, “द्राक्षारस प्या,” असे त्यांना म्हणालो. \p \v 6 परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब\f + \fr 35:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa यहोनादाब\fqa*\f* याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये. \v 7 त्या शिवाय आम्ही कधीही घरे बांधू नयेत, बीज पेरणी करू नये, द्राक्षमळे लावू नयेत; यापैकी कशाचीही मालकी पत्करू नये, तर आम्ही आजीवन तंबूंमध्येच राहावे. तर ज्या भूमीवर आम्ही विमुक्त म्हणून वसती करू, तिथे दीर्घकाळ राहू. \v 8 आम्ही आमचा पिता रेखाबचा पुत्र यहोनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा पाळल्या आहेत. आम्ही, आमच्या पत्नींनी, पुत्रांनी वा कन्यांनी कधीही द्राक्षारस प्याला नाही. \v 9 किंवा राहण्यासाठी घरे बांधली, वा द्राक्षमळे, शेते अथवा पिके घेतली नाहीत. \v 10 आम्ही तंबूत राहिलो व आमचा पिता योनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळल्या आहेत. \v 11 परंतु जेव्हा बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरने या देशावर हल्ला केला, आम्ही म्हटले, ‘चला, बाबिलोनचे व अराम्यांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण यरुशलेमला पलायन करू या.’ म्हणून आम्ही यरुशलेम येथेच राहत आलो आहोत.” \p \v 12 नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: \v 13 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: जा आणि यहूदीयाच्या लोकांना व जे यरुशलेममध्ये राहतात त्यांना सांग, ‘रेखाबवंशातील घराण्याकडून तुम्ही काही धडा शिकून माझी वचने का पाळली नाहीत?’ याहवेह असे जाहीर करतात. \v 14 ‘रेखाबचा पुत्र यहोनादाब याने त्याच्या वंशजांना आज्ञा दिली होती की द्राक्षारस पिऊ नये, आणि ही आज्ञा त्यांनी पाळली. त्यांच्या पूर्वजांची आज्ञा पाळण्याकरिता, आजतागायत ते द्राक्षारस पीत नाहीत. मी तुमच्याशी पुन्हापुन्हा बोललो, पण माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत. \v 15 पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही. \v 16 रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’ \p \v 17 “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘ऐका! मी यहूदीयावर व यरुशलेमवर जी अरिष्टे आणण्याची घोषणा केली होती ती अरिष्टे आणेन. मी त्यांच्याशी बोललो, पण ते ऐकत नाहीत; मी हाक मारतो, तेव्हा ते उत्तर देत नाहीत.’ ” \p \v 18 मग यिर्मयाह रेखाबी लोकांच्या कुटुंबाकडे वळून त्यांना म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘तुम्ही तुमचे पूर्वज यहोनादाबचे प्रत्येक बाबतीत आज्ञापालन केले व त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या.’ \v 19 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘रेखाबचा पुत्र योनादाबच्या वंशामध्ये माझी सेवा करणाऱ्यांचा कधीही अभाव होणार नाही.’ ” \c 36 \s1 यहोयाकीम यिर्मयाहचे चर्मपत्र जाळतो \p \v 1 योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले: \v 2 “तू एक गुंडाळी घेऊन त्याच्यावर इस्राएल, यहूदीया व इतर राष्ट्रे यांच्याविषयी योशीयाहच्या काळापासून आतापर्यंत मी जे सर्व संदेश देत आलो आहे, ते लिही. \v 3 जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.” \p \v 4 तेव्हा यिर्मयाहने नेरीयाहचा पुत्र बारूख, याला बोलावून त्याला याहवेहने सांगितलेली सर्व वचने बोलून दाखविली आणि बारूखने ते चर्मपत्रावर लिहिले. \v 5 मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. \v 6 म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव. \v 7 कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.” \p \v 8 यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली. \v 9 योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती. \v 10 शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला. \p \v 11 शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली, \v 12 तेव्हा तो राजवाड्यातील चिटणीसाच्या दालनात खाली गेला, तिथे सर्व अधिकारी—एलीशामा चिटणीस, शमायाहचा पुत्र दलायाह, अकबोरचा पुत्र एलनाथान, शाफानचा पुत्र गमर्‍याह, हनन्याहचा पुत्र सिद्कीयाह व तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी मसलतीसाठी जमले होते. \v 13 नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले. \v 14 तेव्हा अधिकार्‍यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला. \v 15 ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.” \p म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले. \v 16 जेव्हा त्यांनी ती सर्व वचने ऐकली, तेव्हा सर्व अधिकारी अतिशय भयभीत नजरेने एकमेकांकडे बघू लागले व नेरीयाहचा पुत्र बारूखाला म्हणाले, “या सर्व वचनांचा राजाला अहवाल दिलाच पाहिजे.” \v 17 त्यांनी नेरीयाहचा पुत्र बारूखाला विचारले, “आम्हाला सांग, हे सर्व तू कसे काय लिहिले? यिर्मयाहने सांगून तू हे लिहिले का?” \p \v 18 त्यावर नेरीयाहचा पुत्र बारूखने म्हटले, “यिर्मयाहने ही वचने सांगितली व मी ती चर्मपत्रावर शाईने लिहिली.” \p \v 19 अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.” \p \v 20 नंतर अधिकार्‍यांनी एलीशामा चिटणीसाच्या खोलीमध्ये ते चर्मपत्र ठेवले आणि राजाला भेटण्यासाठी ते राज्यसभेत गेले व ही सर्व गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. \v 21 मग राजाने यहूदीस ते चर्मपत्र आणण्यासाठी पाठविले, व यहूदीने चिटणीस एलीशामाच्या खोलीमधून ते आणले आणि सर्व अधिकारी राजाजवळ उभे असताना, त्याने तो राजाला वाचून दाखविले. \v 22 हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता. \v 23 यहूदीने तीन-चार रकाने वाचून संपवली की राजा वाचलेला भाग लेखनिकाच्या चाकूने तेवढा कापून विस्तवात टाकी. असे संपूर्ण चर्मपत्र जळून नष्ट झाले. \v 24 राजा व त्याच्या इतर सर्व सेवेकऱ्यांनी हे ऐकल्यानंतर भय वाटल्याचे दर्शविले नाही वा संतापाने आपले वस्त्र फाडले नाही. \v 25 त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्‍याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही. \v 26 याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले. \p \v 27 राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली: \v 28 “दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ. \v 29 याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?” \v 30 म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील. \v 31 मी त्याला, त्याच्या लेकरांना व त्याच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या सर्व दुष्टतेकरिता शिक्षा देईन; मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर, तसेच यहूदीयात राहणाऱ्या लोकांवर व यरुशलेम येथील सर्व लोकांवर घोषित केलेली अरिष्टे आणेन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’ ” \p \v 32 मग यिर्मयाहने पुन्हा दुसरे चर्मपत्र घेतले, यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळलेल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूखाला पुन्हा सांगून त्याच्याकडून लिहून घेतली. आणि त्यासारख्या आणखी पुष्कळ वचनाची त्यामध्ये भर घातली गेली. \c 37 \s1 यिर्मयाहला तुरुंगात टाकण्यात येते \p \v 1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली. \v 2 याहवेह यिर्मयाह संदेष्ट्याद्वारे जी वचने सांगत होते, त्याकडे सिद्कीयाह राजा, त्याचे सेवेकरी व देशातील लोक यापैकी कोणीही लक्ष दिले नाही. \p \v 3 तरीपण सिद्कीयाह राजाने शेलेम्याहचा पुत्र यहूकल व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाह संदेष्ट्याकडे अशी विनंती करण्यास पाठविले: “तू आमच्यासाठी आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे प्रार्थना कर.” \p \v 4 यावेळी यिर्मयाह अद्यापही बंदिवासात टाकला गेला नव्हता, त्यामुळे तो आपल्या इच्छेप्रमाणे लोकांमध्ये जाणे-येणे करू शकत असे. \v 5 इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली. \p \v 6 त्यावेळी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले: \v 7 “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील. \v 8 बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’ \p \v 9 “याहवेह असे म्हणतात: ‘बाबिलोनचे सैन्याने आपल्याला निश्चितच सोडणार आहेत.’ असा गैरसमज करून घेऊ नका. ते सोडून जाणार नाहीत! \v 10 तू बाबेलच्या सैन्याचा पराभव केलास, व त्यांच्यातील घायाळ झालेले सैनिकच त्यांच्या तंबूत उरले, तरी ते बाहेर येतील व हे शहर पेटवून देतील!” \p \v 11 जेव्हा फारोहच्या सैन्यामुळे बाबेलच्या सैन्याने यरुशलेमहून माघार घेतली, \v 12 तेव्हा यिर्मयाह शहरातून बाहेर पडू लागला व बिन्यामीन प्रांतातील त्याने विकत घेतलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी यरुशलेमहून निघाला. \v 13 परंतु तो बिन्यामीन वेशीतून बाहेर जात असता, हनन्याहचा नातू, शेलेम्याहचा पुत्र इरीयाह या पहारेकर्‍याच्या प्रमुखाने त्याला पकडले व यिर्मयाह संदेष्ट्याला म्हणाला, “तू बाबेलच्या सैन्यास फितूर झाला आहेस!” \p \v 14 तेव्हा यिर्मयाह म्हणाला, “हे खोटे आहे! मी बाबेलच्या सैन्यास फितूर झालो नाही.” परंतु इरीयाहने त्याचे ऐकले नाही; याउलट त्याने यिर्मयाहला अटक करून अधिकार्‍यांपुढे उभे केले. \v 15 ते यिर्मयाहवर संतापले आणि त्यांनी त्याला फटके मारवले आणि योनाथान चिटणीसाच्या घरात, जे त्यांनी कारागृह केले होते, त्यात त्याला कैद केले. \p \v 16 यिर्मयाहास भुयारागत खोलीत ठेवण्यात आले. तिथेच तो अनेक दिवस राहिला. \v 17 मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” \p यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.” \p \v 18 नंतर यिर्मयाहने सिद्कीयाह राजाला विचारले, “मी तुमच्याविरुद्ध किंवा तुमच्या अधिकार्‍यांविरुद्ध किंवा लोकांविरुद्ध कोणते पाप केले आहे, की मला तुरुंगवासाची शिक्षा व्हावी? \v 19 बाबेलचा राजा तुमच्यावर किंवा या देशावर हल्ला करणार नाही, असे तुम्हाला सांगणारे ते संदेष्टे आता कुठे आहेत? \v 20 महाराज, माझे स्वामी, कृपया माझे ऐका. माझी विनंती तुमच्यापुढे ठेऊ द्या: मला परत त्या योनाथान चिटणीसाच्या घरात पाठवू नका, नाहीतर मी तिथे मरेन.” \p \v 21 त्यावर यिर्मयाहला अंधारकोठडीत पाठवू नये, तर त्याऐवजी राजवाड्यातील तुरुंगात ठेवावे, आणि शहरात भाकरीचा पुरवठा संपेपर्यंत, त्याला रोज एक ताजी भाकर देण्यात यावी, असा सिद्कीयाह राजाने हुकूम दिला. त्याप्रमाणे यिर्मयाहला राजवाड्यातील पहारेकरांच्या अंगणात ठेवण्यात आले. \c 38 \s1 यिर्मयाहला शुष्क विहिरीत फेकण्यात येते \p \v 1 परंतु यिर्मयाह लोकांना काय सांगत आहे हे मत्तानचा पुत्र शफाट्याह, पशहूरचा पुत्र गदल्याह, शेलेम्याहचा पुत्र युकाल\f + \fr 38:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa येहूकाल\fqa*\f* व मल्कीयाहचा पुत्र पशहूर यांनी ऐकले. \v 2 यिर्मयाह सांगत होता, “याहवेह असे म्हणतात: ‘यरुशलेम नगरीमध्ये जे कोणी राहतील ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडतील. पण जे बाबिलोनचे सेनेला शरण जातील ते जगतील. त्यांचा जीव वाचेल; ते जगतील.’ \v 3 आणि याहवेह असे म्हणतात: ‘हे शहर निश्चितच बाबिलोनचे राजाच्या सेनेच्या हाती देण्यात येईल, तो ते हस्तगत करेल.’ ” \p \v 4 मग हे ऐकताच अधिकारी राजाकडे गेले व म्हणाले, “महाराज, या मनुष्याला जिवे मारलेच पाहिजे. कारण याच्या बोलण्याने नगरात आपल्या उरलेल्या सैनिकांचे आणि जनतेचेही मनोधैर्य खचत आहे, हा या लोकांच्या कल्याणाचे बोलत नाही, तर त्यांच्या नाशाबद्दल बोलतो.” \p \v 5 यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.” \p \v 6 मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला. \p \v 7 यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्‍याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता. \v 8 एबेद-मेलेख लागलीच राजवाड्याच्या बाहेर गेला व राजाला म्हणाला, \v 9 “महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.” \p \v 10 मग राजाने कूशी एबेद-मेलेखला सांगितले, “तू तीस माणसे घेऊन जा आणि यिर्मयाह संदेष्टा मरण्याआधीच त्याला त्या अंधार विहिरीतून बाहेर काढ.” \p \v 11 तेव्हा इथिओपी एबेद-मेलेखने माणसे घेतली आणि तो राजवाड्यातील एका कोठारात गेला. तिथे टाकून दिलेल्या वस्तू व जुने कपडे ठेवलेले होते. तिथून काही चिंध्या व जुने कपडे घेऊन तो अंधार विहिरीकडे गेला व दोरीला बांधून ते बोचके त्याने खाली यिर्मयाहकडे विहिरीत सोडले. \v 12 कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्‍या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर \v 13 यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला. \s1 सिद्कीयाह यिर्मयाहचा सल्ला घेतो \p \v 14 एके दिवशी सिद्कीयाह राजाने निरोप पाठविला की यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहच्या मंदिराच्या बाजूच्या देवडीत घेऊन यावे. राजा यिर्मयाहला म्हणाला, “मी तुला काही विचारणार आहे. तर खरे तेच सांग. मजपासून काहीही लपविण्याचा प्रयत्न करू नकोस.” \p \v 15 त्यावर यिर्मयाह सिद्कीयाह राजा म्हणाला, “मी तुम्हाला उत्तर दिले, तर तुम्ही मला ठार करणार नाही का? आणि मी तुम्हाला काही सल्ला जरी दिला तरी तुम्ही माझे ऐकणार नाहीच.” \p \v 16 तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हाती तुला देणार नाही.” \p \v 17 मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल. \v 18 परंतु तुम्ही बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्यांना शरण जाण्याचे नाकारलेस, तर हे शहर बाबेल्यांच्या हाती देण्यात येईल आणि ते या शहराला आग लावील आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाहीस.” \p \v 19 यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.” \p \v 20 यिर्मयाहने उत्तर दिले, “ते तुम्हाला त्यांच्या हवाली करणार नाही. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळा व मी काय सांगतो ते करा. तर ते तुम्हाला हितकारक ठरेल आणि तुमचा जीव वाचेल. \v 21 मात्र आत्मसमर्पण करण्याचे नाकारले, तर याहवेहने मला हे प्रगट केले आहे: \v 22 तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: \q1 “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— \q2 ते तुझे विश्वसनीय मित्र. \q1 तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; \q2 त्यांनी टाकून दिले आहे.’ \p \v 23 “तुमच्या सर्व स्त्रिया व मुले यांना बाबिलोनच्या लोकांच्या हवाली केले जाईल, आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाही. बाबिलोनचा राजा तुम्हाला पकडेल आणि हे शहर\f + \fr 38:23 \fr*\ft तुझ्यामुळे\ft*\f* जळून खाक होईल.” \p \v 24 मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल. \v 25 मी तुझ्याशी बोललो, हे माझ्या अधिकार्‍यांना कळले, व ‘आम्हाला सांग, राजाला तू काय सांगितले व राजाने तुला काय सांगितले; काहीही लपवू नकोस नाहीतर, आम्ही तुला ठार करतो,’ अशी त्यांनी तुला धमकी दिली, \v 26 तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ” \p \v 27 सर्व नगराधिकारी यिर्मयाहकडे आले व त्याला प्रश्न विचारू लागले. तेव्हा राजाने आज्ञापिल्याप्रमाणे यिर्मयाहने त्यांना सांगितले. मग त्यांनी त्याला काहीही विचारले नाही व राजाशी त्याचा झालेला संवाद कोणीही ऐकला नव्हता. \p \v 28 आणि बाबिलोनच्या लोकांनी यरुशलेम पुन्हा जिंकून घेईपर्यंत, यिर्मयाह राजवाड्यातील अंगणात राहिला. \s1 यरुशलेमचे पतन \p यरुशलेमचा अशाप्रकारे पाडाव झाला. \c 39 \nb \v 1 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्याभोवती वेढा घातला. \v 2 आणि सिद्कीयाह राजाच्या राजवटीच्या अकराव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी नगराच्या तटाला खिंड पाडली. \v 3 बाबिलोनच्या सैन्यातील सर्व अधिकारी—सामगरचा नेरगल-शरेसर उच्चाधिकारी, प्रमुख अधिकारी नेबो-सर्सखीम, उच्चाधिकारी नेर्गल-शरेसर व बाबिलोनच्या राजाचे इतर सर्व अधिकाऱ्यांनी आत प्रवेश केला व ते मधल्या वेशीत येऊन बसले. \v 4 हे पाहताच यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे सैनिक रात्रीच्या वेळी शहर सोडले, त्यांनी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या\f + \fr 39:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa यार्देनचे खोरे\fqa*\f* दिशेने पळून गेले. \p \v 5 परंतु बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला व सिद्कीयाहला यरीहोच्या मैदानात पकडले व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याकडे हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. \v 6 बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला. \v 7 मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. \p \v 8 बाबेलच्या सैन्याने राजवाडा आणि लोकांची घरे जाळली आणि यरुशलेमचे तट पाडून टाकले. \v 9 मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला. \v 10 परंतु सर्व यहूदाह प्रांतात त्याने अगदी गरीब असलेल्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीही नव्हते त्यांना नबुजरदानने तिथेच राहू दिले व त्यांना शेते आणि द्राक्षमळे दिले. \p \v 11 आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली: \v 12 “त्याला ताब्यात घेऊन त्याची नीट काळजी घ्या; त्याला काही इजा होऊ देऊ नका व तो मागेल ते त्याला द्या,” \v 13 त्याप्रमाणे गारद्यांचा सरदार नबुजरदान, खोजांचा प्रमुख नबूशजबान व राजाचा सल्लागार नेरगल-शरेसर व बाबिलोनचे इतर उच्चाधिकारी यांनी \v 14 सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला. \p \v 15 यिर्मयाह पहारेकऱ्यांच्या आंगणातच असताना त्याला याहवेहचे वचन आले: \v 16 “जा आणि कूशी एबेद-मेलेखला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी या शहराविरुद्ध दिलेली माझी वचने पूर्ण करण्याची वेळ आली आहे—समृद्धी नव्हे तर विध्वंस. तुझ्या डोळ्यादेखत मी ते पूर्ण करेन. \v 17 परंतु त्या दिवशी तुझी मात्र मी सुटका करेन, असे याहवेह जाहीर करतात; ज्यांची तुला भीती वाटते, त्यांच्या हातात तुला देणार नाही. \v 18 मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ” \c 40 \s1 यिर्मयाहची सुटका \p \v 1 पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याला, बाबिलोन येथे बंदिवासात यरुशलेम व यहूदीया येथील जे लोक पाठविले जाणार होते, त्यांच्याबरोबर यिर्मयाह साखळदंडात बांधलेला आढळला. तेव्हा त्याने त्याला रामाह येथे नेले, त्याची सुटका केली. यानंतर यिर्मयाहला याहवेहचे वचन आले. \v 2 पहारेकऱ्यांच्या नायकाला जेव्हा यिर्मयाह सापडला, तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझे परमेश्वर याहवेहने या देशावर हे सर्व अरिष्ट आणण्याचा निवाडा केला होता. \v 3 आणि जसे त्यांनी पूर्वी सांगितलेच होते, आता तसा हा अनर्थ ओढवला आहे; हे सर्व यामुळे घडले, कारण या लोकांनी याहवेहची आज्ञा न पाळता त्यांच्याविरुद्ध पाप केले. \v 4 आज मी तुझ्या हातातील बेड्या काढून तुला मोकळे करतो. माझ्याबरोबर बाबेलला यावे अशी तुझी इच्छा असेल तर चल. मी तुझा सांभाळ करेन; पण तिकडे यावे असे तुला वाटत नसेल, तर येऊ नकोस. संपूर्ण देश तुझ्यासमोर आहे, तुझ्या मनात येईल तिकडे जा.” \v 5 यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.” \p नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले. \v 6 तेव्हा यिर्मयाह मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहकडे गेला व देशातील उरलेल्या लोकांमध्ये राहिला. \s1 गदल्याहचा वध \p \v 7 अजूनही मोकळ्या मैदानात असणारे सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने अहीकामचा पुत्र गदल्याहची देशाचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, आणि अत्यंत गरीब असे पुरुष, स्त्रिया व लेकरे व ज्यांना बाबेलास बंदिवासात नेले नाही अशांवर अधिकारी केले आहे. राज्यपाल म्हणून गदल्याहचा पुत्र अहीकामची नेमणूक केली आहे, \v 8 तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले. \v 9 शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल. \v 10 मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.” \p \v 11 यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा \v 12 तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले. \p \v 13 कारेहपुत्र योहानान व मोकळ्या रानातील सैनिकांचे प्रमुख मिस्पाह येथे गदल्याहकडे आले, \v 14 व तो गदल्याहला सतर्क करून म्हणाला, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस, याने नथन्याहचा पुत्र इश्माएल, याला तुझा वध करण्यास पाठविले आहे, हे तुला माहीत नाही काय?” परंतु अहीकामचा पुत्र गदल्याहने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. \p \v 15 नंतर कारेहाचा पुत्र योहानानने मिस्पाह येथे गदल्याहशी गुप्तपणे चर्चा केली व त्याला म्हटले, “मी नथन्याहचा पुत्र इश्माएलचा वध करतो, कोणालाही कळणार नाही. त्याला तुमचा वध का करू द्यावा, जे यहूदी गोळा होऊन तुझ्याकडे परतले आहेत, त्यांची पांगापांग होऊन उरलेल्या यहूदीयाचा नाश का होऊ द्यावा?” \p \v 16 परंतु अहीकामचा पुत्र गदल्याह कारेहाचा पुत्र योहानानला म्हणाला, “अशी कोणतीही गोष्ट तू करू नये! कारण तू इश्माएलबद्दल खोटे सांगत आहेस.” \c 41 \p \v 1 परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याह याचा पुत्र, इश्माएल, जो राजघराण्यातील व राजाच्या उच्चाधिकार्‍यांपैकी एक होता. हा आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहस भेटण्यासाठी आला. ते सर्व भोजन करीत असताना, \v 2 नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले. \v 3 नंतर त्याने गदल्याह बरोबर मिस्पाह येथे असलेले यहूदीयातील अधिकारी व बाबिलोनचे सैनिक यांचीही इश्माएलाने कत्तल केली. \p \v 4 गदल्याहाच्या खुनाच्या दुसर्‍या दिवशी, कोणालाही हे समजण्यापूर्वी, \v 5 याहवेहच्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी शेखेम, शिलोह व शोमरोनात येथून ऐंशी माणसे मिस्पाहच्या रोखाने आली. त्यांच्या दाढ्या काढल्या होत्या. त्यांनी आपले कपडे फाडले होते, तसेच त्यांनी स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या; त्यांनी बरोबर अर्पणे व ऊद आणली होती. \v 6 नथन्याहचा पुत्र इश्माएल रडत त्यांना भेटण्यासाठी मिस्पाह शहरातून निघाला व म्हणाला “चला! आपण अहीकामचा पुत्र गदल्याहची भेट घेऊ.” \v 7 मग ते सर्वजण शहराच्या आत आल्यावर, नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याची माणसे यांनी त्यांच्यापैकी दहा जणांना सोडून बाकी सर्वांना जिवे मारले व त्यांची प्रेते एका विहिरीत टाकली. \v 8 त्यापैकी दहाजणांनी इश्माएलशी बोलणे केले, “तू आम्हाला ठार मारू नको! आम्ही गहू, जव, तेल व मध यांचे मोठे साठे एका शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने इतरांसह त्यांचा वध न करता त्यांना सोडून दिले. \v 9 वध केलेल्या लोकांचे व गदल्याहचे प्रेत नथन्याहचा पुत्र इश्माएलने ज्या विहिरीत टाकले होते, ती भली मोठी विहीर, इस्राएलचा राजा बाशा, याच्यापासून आपले संरक्षण करण्याकरिता आसा राजाने बांधली होती. नथन्याहचा पुत्र इश्माएलने ती विहीर प्रेतांनी भरून टाकली. \p \v 10 नथन्याहचा पुत्र इश्माएलने पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने मिस्पाहमध्ये अहीकामचा पुत्र गदल्याहच्या स्वाधीन केलेल्या लोकांना व राजकन्यांना आणि उरलेल्या सर्वांनाही ताब्यात घेतले. सर्व कैद्यांना त्याने बरोबर घेऊन तो पलीकडील अम्मोनी लोकांकडे चालू लागला. \p \v 11 परंतु कारेहपुत्र योहानान व इतर सर्व सेना प्रमुखांनी नथन्याहचा पुत्र इश्माएलने केलेल्या गुन्ह्याबद्दल ऐकले, \v 12 तेव्हा त्यांनी आपले सर्व लोक गोळा केले आणि नथन्याहचा पुत्र इश्माएलशी युद्ध करण्यास ते निघाले. गिबोनजवळच्या महाकुंडापाशी त्यांनी त्याला गाठले. \v 13 इश्माएल बरोबरच्या लोकांनी कारेहचा पुत्र योहानान व त्याच्यासोबत असलेल्या सरदारांना पाहताच आनंदाने जयघोष केला. \v 14 इश्माएलने मिस्पाह येथे बंदिवान म्हणून नेलेले सर्व लोक वळले व कारेहपुत्र योहानानला जाऊन मिळाले. \v 15 परंतु नथन्याहचा पुत्र इश्माएल, योहानानपासून सुटून त्याच्या आठ माणसांसह अम्मोन्यांकडे पळून गेला. \s1 इजिप्तला पलायन \p \v 16 मग कारेहापुत्र योहानान व त्याच्यासोबत असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी अहीकामचा पुत्र गदल्याहचा नथन्याहचा पुत्र इश्माएलने वध केल्यानंतर मिस्पाह इथे उरलेल्या लोकांना—सैनिक, स्त्रिया, मुले व गिबोन येथून सोडविलेले राजदरबारातील अधिकारी यांना घेऊन ते निघाले. \v 17 इजिप्त येथे जाण्याच्या उद्देशाने ते बेथलेहेम नजीकच्या गेरूथ किमहाम या गावी गेले. \v 18 त्यांना बाबिलोनच्या लोकांचे भय वाटू लागले व ते त्यांना चुकविण्याचा प्रयत्न करू लागले, कारण नथन्याहचा पुत्र इश्माएलने बाबिलोनच्या राजाने देशाचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या अहीकामचा पुत्र गदल्याहचा वध केला होता. \c 42 \p \v 1 मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह\f + \fr 42:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa असारिया\fqa*\f*, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक \v 2 यिर्मयाह संदेष्ट्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही सर्व उरलेल्या लोकांसाठी याहवेह, तुझे परमेश्वर यांची प्रार्थना कर. कारण आम्ही पूर्वी पुष्कळ होतो, आता फारच थोडे उरलो आहोत, हे तू पाहतोस. \v 3 आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.” \p \v 4 यिर्मयाह संदेष्ट्याने उत्तर दिले, “मी तुमचे ऐकले आहे, मी निश्चितच याहवेह, तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या विनवणीप्रमाणे प्रार्थना करतो; आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, मी तुमच्यापासून काही लपविणार नाही.” \p \v 5 त्यावर ते यिर्मयाहला म्हणाले, “आम्हाला याहवेह जे करावयास सांगतील, ते आम्ही करण्याचे नाकारले, तर याहवेह आमचे परमेश्वर आमच्याविरुद्ध सत्य व विश्वसनीय साक्षीदार असतील. \v 6 त्यांचा संदेश आम्हाला अनुकूल असो वा प्रतिकूल, आम्ही आमच्या याहवेहच्या आज्ञा पाळू, आम्ही तुला ज्यांच्याकडे विनंती करण्यास पाठवित आहोत, त्या आमच्या परमेश्वर याहवेहचे आम्ही ऐकू.” \p \v 7 दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले. \v 8 तेव्हा त्याने कारेहाचा पुत्र योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाप्रमुख व सर्व लहान थोर लोक यांना एकत्र बोलाविले. \v 9 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपली विनंती सादर करण्यासाठी मला याहवेह, इस्राएलाच्या परमेश्वराकडे पाठविले, ते असे म्हणतात: \v 10 ‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे. \v 11 आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन. \v 12 त्याने तुमच्यावर दया करावी व तुम्हाला तुमच्या भूमीवर परत पुनर्वसित करावे म्हणून मी तुमच्यावर दया करेन.’ \p \v 13 “परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही, \v 14 आणि आम्ही इजिप्तमध्ये जाऊन राहू, जिथे आम्हाला लढाई, रणशिंगे ऐकू येणार नाहीत किंवा अन्नाची भूक यापासून सुटका मिळेल,’ \v 15 तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल, \v 16 तर ज्या लढाईच्या व दुष्काळाच्या आपत्तींना तुम्ही घाबरता, त्या तुमच्या मागोमाग इजिप्तमध्ये येतील व तुम्ही तिथे नाश पावाल. \v 17 तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्‍या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’ \v 18 कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’ \p \v 19 “कारण याहवेहने तुम्हाला म्हटले आहे. ‘अहो यहूदीयातील अवशिष्ट लोकांनो, इजिप्तमध्ये जाऊ नका! आज मी तुम्हाला इशारा दिला आहे, तो कधी विसरू नका. \v 20 तुम्ही ही भयानक चूक केली आहे, तुम्हीच मला याहवेह, तुमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी पाठविले होते व सांगितले की आमच्या याहवेह परमेश्वराकडे प्रार्थना करून ते काय म्हणतात ते सर्व आम्हाला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू.’ \v 21 याहवेह तुमचे परमेश्वर यांनी जे सांगण्यास मला तुमच्याकडे पाठविले, ते मी तुम्हाला आज सांगितले, परंतु तुम्ही ते अद्यापि पाळले नाही. \v 22 म्हणून आता तुम्ही हे निश्चित समजा: जिथे जाऊन वसती करण्याची तुमची इच्छा आहे, तिथे तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल.” \c 43 \p \v 1 जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा \v 2 होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही. \v 3 नेरीयाहचा पुत्र नेरीयाहचा पुत्र बारूख याने तुला हे आम्हास सांगण्यास चिथविले आहे, म्हणजे आम्ही येथेच राहू आणि बाबिलोनच्या सैन्याकडून मारले जाऊ किंवा गुलाम करून बाबेलला नेले जाऊ.” \p \v 4 अशाप्रकारे कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख व सर्व लोकांनी यहूदीयात राहण्याची याहवेहची अवज्ञा केली. \v 5 यहूदीया जे इतर देशात विखुरलेले पण आता परत आलेल्या सर्व उरलेल्या लोकांना कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख आपल्या देखरेखीत घेऊन निघाले. \v 6 त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले. \v 7 त्यांनी याहवेहची आज्ञा न पाळता इजिप्तमध्ये प्रवेश केला आणि ते तहपनहेस पर्यंत येऊन पोहोचले. \p \v 8 तहपनहेस येथे यिर्मयाहला याहवेहचे वचन आले: \v 9 “यहूदी लोक तुझ्याकडे पाहत असताना त्यांच्या समक्ष तहपनहेस येथील फारोहच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी फरसबंदीचे जे दगड आहेत, त्यांच्यामध्ये काही मोठे धोंडे मातीत पुरून टाक, \v 10 आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल. \v 11 तो येईल व इजिप्त देशावर हल्ला करेल, जे मृत्यूसाठी नियुक्त आहेत, त्यांना तो मृत्यू देईल, जे बंदिवासासाठी नियुक्त आहेत, त्यांना बंदिवासात टाकेल, आणि जे तलवारीसाठी नियुक्त आहेत, त्यांचा तो तलवारीने वध करेल. \v 12 तो इजिप्तच्या दैवतांच्या मंदिरांना आग लावील; तो त्यांची मंदिरे जाळून त्यांच्या मूर्ती ताब्यात घेईल. एखादा धनगर आपल्या अंगरख्यातील पिसवा वेचून स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो इजिप्त देशातील सर्व वेचूनवेचून लुटून नेईल. \v 13 तसेच इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या\f + \fr 43:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa हेलिओपोलिस\fqa*\f* मंदिरातील बेथ-शेमेशचे स्तंभ नष्ट करून तो मोडून टाकील व इजिप्तच्या दैवतांची मंदिरे जाळून भस्म करेल.’ ” \c 44 \s1 मूर्तिपूजेमुळे ओढवलेला विनाश \p \v 1 इजिप्तच्या उत्तरेस मिग्दोल, तहपनहेस, व मेम्फीस या शहरात व संबंध दक्षिण इजिप्तमधील पथरोस प्रदेशात राहत असलेल्या यहूद्यांसंबंधी याहवेहचे यिर्मयाहला हे वचन आले: \v 2 “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: यरुशलेम व यहूदीयाची सर्व नगरे यांच्यावर मी कसा विनाश आणला, ते तुम्ही पाहिले आहे. ते आता टाकलेल्या लोकागत भग्नावशेषात निवास करतात, \v 3 त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळेच असे झाले. त्यांनी इतर दैवतांना धूप जाळला व त्यांची आराधना केली म्हणून माझा क्रोध त्यांच्यावर भडकला. अशी दैवते जी त्यांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती. \v 4 मी माझे सेवक संदेष्टे त्यांच्याकडे वारंवार पाठविले, हे सांगण्यास, ‘ज्यांचा मला तिरस्कार वाटतो, त्या घृणास्पद गोष्टी करू नका!’ \v 5 पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; आणि आपल्या कुमार्गापासून ते माघारी फिरले नाहीत व इतर दैवतांना धूप जाळण्याचे बंदही केले नाही. \v 6 यामुळे माझा क्रोधाग्नी उफाळून आला; त्याचा यहूदीयातील नगरांवर, यरुशलेमच्या रस्त्यावर वर्षाव झाला. त्याने ती नगरे ओसाड केली, जसे ते आजही आहेत. \p \v 7 “आता सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही स्वतःवर विनाश आणला. यहूदीयातील तुमचे पुरुष, स्त्री, अथवा लेकरे व तान्हीमुले देखील वाचणार नाहीत व तुमचे कोणीही अवशेष राहणार नाहीत असे तुम्ही का करीत आहात? \v 8 इथे तुम्ही बनविलेल्या मूर्ती केल्या. इजिप्तमध्ये, जिथे तुम्ही निवास करण्यास आला आहात, तेथील इतर दैवतांना धूप जाळून, तुम्ही माझा क्रोध का भडकावित आहात व तुमचा पूर्ण नाश करावयाला मला का लावत आहात? तुम्ही स्वतःस पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शाप व त्यांच्या उपहासाचा विषय बनवित आहात. \v 9 तुम्ही तुमच्या पूर्वजांनी केलेली पापे, यहूदीयाचे राजे व राण्यांनी केलेली पापे, यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावर तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी केलेली पापे, ही सर्व विसरला काय? \v 10 आणि अद्यापही कोणी लीन होऊन माझ्याविषयी श्रद्धा व्यक्त केली नाही, किंवा मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेले नियम व आज्ञा पाळल्या नाही. \p \v 11 “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी तुम्हावर अरिष्ट आणून संपूर्ण यहूदीयाचा नाश करण्याचा निर्धार केला आहे. \v 12 इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील. \v 13 यरुशलेममध्ये राहणाऱ्यांना मी जशी शिक्षा केली, तशीच या इजिप्तमध्ये राहणाऱ्यांनाही मी तलवार, दुष्काळ व मरी यांनी शिक्षा करेन. \v 14 इजिप्तमध्ये निवास करण्यास गेलेल्या यहूदीयाच्या अवशेषांपैकी एकही जण, जिथे परत येऊन राहण्याची त्यांची उत्कट इच्छा आहे, तिथे सुटून परत यहूदीयात येण्यासाठी जिवंत राहणार नाहीत; मोजक्या फराऱ्यांशिवाय कोणीही परतणार नाही.” \p \v 15 त्यांच्या स्त्रिया इतर सर्व उपस्थित स्त्रियांसोबत—एका विशाल सभेत—परकीय दैवतांना धूप जाळीत असतात हे माहीत असलेल्या पुरुषांनी व वरच्या व खालच्या इजिप्तच्या पथरोसमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी यिर्मयाहला उत्तर दिले: \v 16 “याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही! \v 17 आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही. \v 18 जेव्हापासून आम्ही आकाशराणीला धूप जाळणे थांबविले व तिला पेयार्पणे करण्याचे थांबविले, तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींचा अभाव झाला असून तलवारीने आणि दुष्काळाने आमचा नाश होत आहे.” \p \v 19 स्त्रिया त्याची पुष्टी करीत म्हणाल्या, “आम्ही आकाशराणीची पूजा करीत होतो, तिला पेयार्पणे ओतीत होतो, तिच्यासाठी तिची प्रतिमा असलेल्या पोळ्या करीत होतो, हे सर्व आमच्या पतींना माहीत नव्हते काय?” \p \v 20 तेव्हा हे उत्तर देणार्‍या सर्व स्त्रीपुरुषांना यिर्मयाह म्हणाला, \v 21 “तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे व अधिपती, आणि सर्व लोक यहूदीयाच्या नगरामध्ये, आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर मूर्तींपुढे धूप जाळीत होता, हे याहवेहच्या स्मरणात नाही का व ते त्यांनी दर्शवून दिले नाही का? \v 22 तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे. \v 23 जी तुम्ही बघता ती भयानक संकटे तुमच्यावर कोसळली याचे खरे कारण एकच आहे, ते म्हणजे तुम्ही मूर्तींपुढे धूप जाळला, याहवेहविरुद्ध पाप केले आणि त्यांच्या आज्ञा, नियम व करार पाळण्याचे नाकारले.” \p \v 24 मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका! \v 25 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ \p “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा! \v 26 तरीपण इजिप्त देशात राहणार्‍या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही. \v 27 इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे. \v 28 तलवारीपासून वाचलेले जे इजिप्त देशातून यहूदीयाला परत जातील, ते अगदी थोडके असतील. मग इजिप्त देशात येऊन राहणाऱ्या यहूदीयाच्या सर्व अवशेष नागरिकांना कळेल की कोणाचा शब्द खरा ठरतो—माझा की त्यांचा. \p \v 29 “ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’ \v 30 याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हातात देईन.’ ” \c 45 \s1 बारूखाला संदेश \p \v 1 यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला: \v 2 “हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत: \v 3 तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’ \v 4 परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन. \v 5 मग तू स्वतःसाठी मोठमोठ्या गोष्टी मिळवू पाहतोस काय? तसे करू नकोस, कारण या सर्व लोकांवर मी महान विपत्ती आणणार असलो, तरी मात्र तू जिथे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवेन,’ असे याहवेह जाहीर करतात.” \c 46 \s1 इजिप्तविषयी भविष्य \p \v 1 राष्ट्रांसंबंधी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले: \b \p \v 2 इजिप्तसंबंधी: \b \p योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला. \q1 \v 3 “तुमच्या ढाली सिद्ध करा, लहान व मोठ्या अशा दोन्ही, \q2 आणि लढाईसाठी कूच करा! \q1 \v 4 घोड्यांवर खोगीर चढवा, \q2 आणि अश्वारूढ व्हा! \q1 शिरस्त्राण घालून \q2 मोर्चा बांधा! \q1 भाल्यांना धार लावा, \q2 व चिलखते चढवा! \q1 \v 5 मी हे काय पाहात आहे? \q2 ते भयभीत झालेले आहेत, \q1 ते माघार घेत आहेत, \q2 त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. \q1 मागे वळूनदेखील न पाहता \q2 ते घाईघाईत पळत आहेत, \q2 आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात. \q1 \v 6 “चपळ सैनिक पळू शकत नाहीत. \q2 वा बलाढ्य निसटून शकत नाहीत. \q1 उत्तरेकडे फरात नदीकाठी \q2 ते अडखळून पडत आहेत. \b \q1 \v 7 “नाईल नदीसारखा हा कोण उभारून येत आहे, \q2 पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखा हा कोण आहे? \q1 \v 8 इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे, \q2 पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखी. \q1 ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन; \q2 मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’ \q1 \v 9 अश्वांनो, तुम्ही हल्ला करा! \q2 सारथ्यांनो, तुम्ही आवेशाने धाव घ्या! \q1 योद्ध्यांनो—पूट व कूश या प्रांतातील ढालधारक, \q2 लूदीमवासी बाण जे सोडतात, ते तुम्ही सर्वजण पुढे कूच करा! \q1 \v 10 कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— \q2 हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. \q1 रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत \q2 तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. \q1 कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, \q2 उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार. \b \q1 \v 11 “हे इजिप्तच्या कुमारिके, \q2 वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण. \q1 तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस, \q2 पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही. \q1 \v 12 राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील; \q2 तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल. \q1 तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील; \q2 दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.” \p \v 13 यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता: \q1 \v 14 “इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; \q2 मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! \q1 ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, \q2 कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’ \q1 \v 15 तुमचे योद्धे कोलमडून का पडले? \q2 ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे. \q1 \v 16 ते पुन्हापुन्हा अडखळतील; \q2 ते एकमेकांवर कोसळून पडतील. \q1 ते म्हणतील, ‘चला, उठा, आपल्या लोकांकडे व आपल्या जन्मभूमीत \q2 आपण परत जाऊ, \q2 या छळवाद्यांच्या तलवारीपासून दूर जाऊ.’ \q1 \v 17 तिथे ते उद्गारतील, \q2 ‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे; \q2 त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’ \b \q1 \v 18 “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, \q2 ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ \q1 जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, \q2 समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे. \q1 \v 19 इजिप्तमधील रहिवाशांनो, \q2 सामानाची बांधाबांध करा, \q1 कारण मेम्फीस शहराचा नाश होणार आहे \q2 व ते ओसाड होऊन एक निर्जन स्थान होईल. \b \q1 \v 20 “इजिप्त ही सुंदर कालवड आहे; \q2 परंतु उत्तरेकडून तिच्याविरुद्ध \q2 गांधीलमाशी येत आहे. \q1 \v 21 तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक \q2 एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. \q1 तेही वळून एकत्र पलायन करतील, \q2 ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, \q1 कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, \q2 त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे. \q1 \v 22 जसे त्यांचे बलाढ्य शत्रूपुढे चाल करतील, \q2 जंगलतोड्यांगत येऊन त्यांच्यावर \q1 ते कुऱ्हाड घेऊन आक्रमण करतील. \q2 तेव्हा इजिप्त फुत्कारणाऱ्या सर्पाप्रमाणे पळ काढेल; \q1 \v 23 याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल \q2 ते कापून नष्ट करतील. \q1 ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, \q2 ज्यांची संख्या मोजता येणार नाही. \q1 \v 24 उत्तरेकडील लोकांच्या तावडीत सापडलेल्या \q2 इजिप्तच्या कुमारिकेची लज्जा घालविण्यात येईल.” \p \v 25 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे. \v 26 त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 27 “याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नको; \q2 इस्राएला, निराश होऊ नका. \q1 मी बंदिवासाच्या देशातून तुमच्या वंशजांचा \q2 दूर देशातून तुमचा बचाव करेन, \q1 याकोबाला पुन्हा शांती व संरक्षण मिळेल, \q2 त्याला कोणीही भयभीत करणार नाही. \q1 \v 28 याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, \q2 कारण मी तुझ्याबरोबर आहे.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 “मी तुला ज्या राष्ट्रांमध्ये विखरून दिले होते, \q2 त्या राष्ट्रांचा जरी नाश केला, \q2 परंतु तुझा संपूर्ण नाश करणार नाही. \q1 मी तुला शिस्त लावण्यासाठी एका मर्यादेत शिक्षा करेन. \q2 तुला पूर्णपणे विना शिक्षेचे मी सोडणार नाही.” \c 47 \s1 पलिष्टी लोकांविषयी संदेश \p \v 1 गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे: \b \p \v 2-3 याहवेह हे असे म्हणतात: \q1 “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; \q2 तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. \q1 जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल \q2 म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. \q1 लोक किंकाळ्या मारतील; \q2 त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. \q1 कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, \q2 शत्रूंच्या रथाचा आवाज \q2 आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. \q1 त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; \q2 त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत. \q1 \v 4 कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास \q2 आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा, \q1 सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा \q2 समय आला आहे. \q1 याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत, \q2 कफतोरहून\f + \fr 47:4 \fr*\ft म्हणजेच क्रीट बेट\ft*\f* आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत. \q1 \v 5 गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल; \q2 अष्कलोन पूर्णपणे निःशब्द होईल. \q1 अहो तुम्ही घाटातील अवशिष्ट लोकहो, \q2 तुम्ही केव्हापर्यंत स्वतःच्या देहास जखमी कराल? \b \q1 \v 6 “ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी, \q2 तू पुन्हा केव्हा विसावा घेणार? \q1 जा! आपल्या म्यानात परत जा; \q2 शांत राहा व स्तब्ध हो.’ \q1 \v 7 परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, \q2 तर ती स्वस्थ कशी बसेल, \q1 त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना \q2 अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?” \c 48 \s1 मोआबी लोकांविषयी संदेश \p \v 1 मोआबी लोकांविषयी: \b \p इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, यांनी दिलेला संदेश हा आहे: \q1 “नबो शहराचा धिक्कार असो, कारण त्याचा विध्वंस होईल. \q2 किर्याथाईम लज्जित होईल व हस्तगत करण्यात येईल; \q2 तेथील किल्ले लज्जित होतील व चक्काचूर करण्यात येतील. \q1 \v 2 आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही; \q2 हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील: \q2 ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’ \q1 तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील; \q2 तलवार तुमचा पाठलाग करेल. \q1 \v 3 नंतर होरोनाईममधून विलापध्वनी ऐकू येत आहे, \q2 प्रचंड संहाराचा व विध्वंसाचा आक्रांत ऐकू येत आहे. \q1 \v 4 कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे, \q2 तिचे बालक विलाप करतील. \q1 \v 5 ते लुहिथच्या डोंगरावर चढतील \q2 व चढताना आक्रोश करीत जातील; \q1 व होरोनाईम नगराच्या उतरणीवरून \q2 विनाश बघतांनाच्या किंकाळ्या ऐकू येतील. \q1 \v 6 पळा, जीव घेऊन पळा! \q2 रानावनात झुडूपागत व्हा. \q1 \v 7 कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, \q2 तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. \q1 तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, \q2 त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील. \q1 \v 8 विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल, \q2 एकाही नगराची त्याच्या हातून सुटका होणार नाही. \q1 दर्‍याखोर्‍यांचा नाश होईल, \q2 आणि पठारे उद्ध्वस्त होतील, \q2 कारण याहवेहने तसे म्हटले आहे. \q1 \v 9 मोआबावर मीठ टाका \q2 कारण तिचा उकिरडा बनेल\f + \fr 48:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa ती उडून जाईल\fqa*\f*; \q1 तिची नगरे उजाड़ होतील, \q2 तिथे कोणीही वसती करणार नाही. \b \q1 \v 10 “याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो! \q2 रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो! \b \q1 \v 11 “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. \q2 गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, \q1 तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— \q2 ती बंदिवासात गेलेली नाही. \q1 म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, \q2 आणि तिचा सुवासही बदललेला नाही. \q1 \v 12 परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत, \q1 मी तिला बुधल्यातून ओतणारी माणसे पाठवेन, \q2 ते तिला या पात्रातून ओतून बाहेर टाकतील; \q1 ते तिचे बुधले रिकामी करतील \q2 व नंतर तिची पात्रे फोडून टाकतील. \q1 \v 13 इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, \q2 व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. \q2 तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल, \b \q1 \v 14 “ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ \q2 असे तुम्ही कसे बोलू शकता? \q1 \v 15 परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत; \q2 तिच्या अत्यंत उमद्या तरुणांची कत्तल होईल,” \q2 असे राजाधिराज, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे ते म्हणतात. \q1 \v 16 “मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे; \q2 तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे. \q1 \v 17 तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा, \q2 तिची किर्ती माहीत असणारे सर्व सामील व्हा; \q1 म्हणा, ‘तिचा बलशाली राजदंड कसा मोडला, \q2 इतकी वैभवशाली काठी कशी मोडली!’ \b \q1 \v 18 “अहो दिबोन कन्येचे निवासी, \q2 आपल्या वैभवावरून खाली उतरा \q2 आणि शुष्क भूमीवर येऊन बसा, \q1 कारण जे मोआब भूमीचा विनाशक \q2 तुमच्याविरुद्ध येत आहेत \q2 आणि ते तिच्या सर्व तटबंदीची नगरे नष्ट करतील. \q1 \v 19 अरोएरवासी जनहो, \q2 तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, \q1 आणि पळ काढणार्‍या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, \q2 ‘तिथे काय घडले?’ \q1 \v 20 मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. \q2 रडा व आकांत करा! \q1 आर्णोनच्या काठी घोषणा करा \q2 मोआब नष्ट झाले आहे. \q1 \v 21 पठारे—होलोन, याहसाह, मेफाथ \q2 यांनाही शिक्षा मिळाली आहे. \q2 \v 22 दिबोन, नबो, बेथ‑दिबलाथाईम, \q2 \v 23 किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन \q2 \v 24 करीयोथ, बस्रा— \q2 मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे. \q1 \v 25 मोआबभूमीचे शिंग\f + \fr 48:25 \fr*\ft शक्तीचे प्रतीक\ft*\f* तोडून टाकण्यात आले आहे. \q2 तिचे बाहू मोडले आहेत.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 26 “तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे, \q2 कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे. \q1 मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे; \q2 तिला उपहासाचा विषय होऊ दे. \q1 \v 27 इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का? \q2 ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का, \q1 कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो, \q2 घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का? \q1 \v 28 मोआबभूमीच्या रहिवाशांनो \q2 आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा. \q1 गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या \q2 पारव्याप्रमाणे व्हा. \b \q1 \v 29 “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— \q2 तिचा गर्व किती मोठा आहे— \q1 तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव \q2 आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे. \q1 \v 30 याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, \q2 तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही. \q1 \v 31 म्हणून मी मोआबभूमीसाठी विलाप करतो, \q2 मी मोआबसाठी अश्रू गाळतो, \q2 कीर-हरेसेथच्या लोकांसाठी मी शोक करतो. \q1 \v 32 जसे याजेर शोक करतो, \q2 तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो. \q1 तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत\f + \fr 48:32 \fr*\ft बहुतेक मृत समुद्र\ft*\f* पसरलेल्या आहेत, \q2 त्या याजेरपर्यंत\f + \fr 48:32 \fr*\ft समुद्रापर्यंत\ft*\f* पोहोचतात; \q1 संहार करणाऱ्याने \q2 तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे. \q1 \v 33 मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून \q2 आनंद व हर्ष लयास गेले आहेत. \q1 द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; \q2 हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. \q1 ओरडणे आहे, \q2 होय पण ते आनंदाचे नाही. \b \q1 \v 34 “त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे \q2 हेशबोनपासून एलिआलेह आणि याहसापर्यंत, \q1 सोअरापासून होरोनाईम आणि एग्लाथ-शलीशियापर्यंत तो ऐकू येत आहे, \q2 निम्रीमाची कुरणेही आता शुष्क झाली आहेत. \q1 \v 35 जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात, \q2 आणि त्यांच्या खोट्या दैवतांना धूप जाळतात \q2 त्या मोआबभूमीत या गोष्टी मी आता बंद पाडेन,” याहवेह असे जाहीर करतात. \q1 \v 36 “माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे; \q2 कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे. \q2 त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे. \q1 \v 37 तेथील प्रत्येक डोक्याचे मुंडण झाले आहे \q2 व प्रत्येक दाढीचे बोडण झाले आहे; \q1 प्रत्येक हातावर घाव करण्यात आला आहे \q2 व प्रत्येक कमरेवर गोणपाट नेसलेला आहे. \q1 \v 38 मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर \q2 आणि प्रत्येक चौरस्त्यावर \q1 केवळ आकांतच आढळत आहे, \q2 कारण जुन्या निकामी पात्रांचा चक्काचूर करावा त्याप्रमाणे \q2 मोआब भूमीचा मी चुराडा केला आहे,” याहवेह असे जाहीर करतात. \q1 \v 39 “पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे! \q2 मोआबने लज्जेने कशी पाठ फिरविली आहे ते पाहा! \q1 मोआब तिच्या सभोवती असलेल्या लोकांच्या उपहासाचा \q2 व दहशतीचा विषय झाली आहे.” \p \v 40 याहवेह असे म्हणतात: \q1 पाहा! एक गरुड आकाशातून खाली झेप घेत आहे, \q2 मोआबभूमीवर आपले पंख पसरवित आहे. \q1 \v 41 करीयोथ\f + \fr 48:41 \fr*\ft किंवा \ft*\fqa शहरे\fqa*\f* पडले आहेत, \q2 व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत. \q1 प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे \q2 मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल. \q1 \v 42 मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल. \q2 कारण तिने याहवेहविरुद्ध उर्मटपणा केला आहे. \q1 \v 43 हे मोआबातील लोकांनो, \q2 दहशत, खड्डे व पाश तुझ्या वाट्याला येतील, \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 44 “जो कोणी दहशतीपासून दूर पळेल \q2 तो खड्ड्यात पडेल, \q1 जो कोणी खड्ड्यातून बाहेर पडेल, \q2 तो पाशात सापडेल. \q1 कारण मी मोआबावर \q2 तिच्या शिक्षेचे वर्ष आणणार आहे. \q2 याहवेह असे जाहीर करतात. \b \q1 \v 45 “हेशबोनच्या सावलीत \q2 फरारी हतबलपणे उभे आहेत, \q1 हेशबोनमधून अग्नी येत आहे, \q2 सीहोनच्या मध्यातून ज्वाला पसरत आहेत; \q1 त्या मोआबाचे कपाळ जाळून टाकीत आहे, \q2 त्या कर्कश बढाईखोरांचे मस्तक जाळीत आहे. \q1 \v 46 हे मोआबा, तुला धिक्कार असो! \q2 कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत; \q1 आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे \q2 व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे. \b \q1 \v 47 “परंतु मी मोआबच्या समृद्धीची \q2 येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” \q2 असे याहवेह म्हणतात. \p मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते. \b \c 49 \s1 अम्मोनी लोकांविषयी संदेश \p \v 1 अम्मोनी लोकांविषयी: \b \p याहवेह असे म्हणतात: \q1 “इस्राएलला पुत्र नाहीत काय? \q2 इस्राएलला वारस नाहीत काय? \q1 अम्मोनी राजाने\f + \fr 49:1 \fr*\ft दैवत मोलेकाने\ft*\f* गादचा ताबा का घेतला आहे? \q2 त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत? \q1 \v 2 याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, \q1 जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, \q2 ते नासाडीचा ढिगारा होईल, \q1 आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. \q2 मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. \q1 मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, \q2 त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 3 “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! \q2 राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! \q1 गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; \q2 भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, \q1 कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह \q2 दैवत मोलेख बंदिवासात जाईल. \q1 \v 4 तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, \q2 सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? \q1 हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, \q2 तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, \q2 माझ्यावर कोण हल्ला करू शकतो? \q1 \v 5 तुझ्या सर्व बाजूने \q2 मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, \q2 असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \q1 तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, \q2 त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल. \b \q1 \v 6 “परंतु नंतर मी अम्मोन्यांच्या समृद्धीची भरपाई करेन,” \q2 याहवेह जाहीर करतात. \s1 एदोमी लोकांविषयी संदेश \p \v 7 एदोम्यांविषयी: \b \p सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का? \q2 शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय? \q2 त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय? \q1 \v 8 ददान प्रदेशातील रहिवाशांनो, \q2 मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा, \q1 कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन, \q2 तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन. \q1 \v 9 जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, \q2 तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय? \q1 जर रात्रीच्या वेळी चोर आले, \q2 तर ते त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय? \q1 \v 10 परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; \q2 मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, \q2 म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. \q1 त्याचे शस्त्रधारी पुरुष, \q2 तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, \q2 म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही, \q1 \v 11 ‘तुझ्या पितृहीन मुलांना माझ्याकडे ठेव; मी त्यांना जिवंत ठेवेन. \q2 आणि तुझ्या विधवाही माझ्यावर विसंबून राहू शकतात.’ ” \p \v 12 याहवेह असे म्हणतात: “जे हे पेय पिण्यास पात्र नाहीत त्यांनी ते प्यालेच पाहिजे, तुम्हाला शिक्षा का होऊ नये? तुम्ही शिक्षा भोगलीच पाहिजे, तुम्ही ते प्यालेच पाहिजे. \v 13 याहवेह जाहीर करतात, मी माझ्या नावाची शपथ वाहून म्हणत आहे, बस्रा उद्ध्वस्त व शापित होईल, ते दहशत व उपहासाचा विषय बनतील; आणि त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.” \q1 \v 14 मी याहवेहकडून हा संदेश ऐकला आहे; \q2 “एदोमावर हल्ला करण्यास एकत्र या! \q1 युद्ध करण्यास सज्ज व्हा!” \q2 असे सर्व राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला होता. \b \q1 \v 15 “आता राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन \q2 व सर्व मानवजात तुमचा तिरस्कार करतील. \q1 \v 16 तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन \q2 आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, \q1 तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, \q2 तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. \q1 जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, \q2 तरी तिथून मी तुला खाली आणेन. \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 17 एदोम दहशतीचे ठिकाण होईल; \q2 त्याच्या जवळून जाणारा कोणीही \q2 त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील. \q1 \v 18 याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा \q2 त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश झाला, \q1 म्हणजे तिथे कोणी राहणार नाही; \q2 त्यात लोक वस्ती करणार नाहीत. \b \q1 \v 19 “यार्देन नदीच्या झुडूपातून \q2 सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, \q1 एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. \q2 मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? \q1 माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? \q2 कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?” \b \q1 \v 20 एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. \q2 तेमानमध्ये राहणार्‍या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. \q1 त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. \q2 त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल. \q1 \v 21 एदोमच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; \q2 त्यांचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत प्रतिध्वनित होईल. \q1 \v 22 पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, \q2 व बस्रावर आपले पंख पसरेल. \q1 त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे \q2 वेणा देणार्‍या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील. \s1 दमास्कसविषयी संदेश \p \v 23 दिमिष्क विषयी: \q1 “हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत, \q2 कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे. \q1 ते निराश झाले आहेत, \q2 एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत. \q1 \v 24 दिमिष्क दुर्बल झाले आहे, \q2 पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे \q2 आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; \q1 जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, \q2 त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे. \q1 \v 25 जी नगरी मला प्रसन्न करते, \q2 त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही? \q1 \v 26 निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; \q2 तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” \q2 असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \q1 \v 27 “आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन \q2 व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.” \s1 केदार व हासोर यांच्याविषयी संदेश \p \v 28 केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: \b \p याहवेह असे म्हणतात: \q1 “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा \q2 आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा. \q1 \v 29 त्यांचे कळप व त्यांचे तंबू उचलून नेण्यात येतील; \q2 त्यांची आश्रयस्थाने, सर्व घरगुती सामान व उंटही \q2 हस्तगत केले जातील. \q1 लोक त्यांच्यावर ओरडून म्हणतील, \q2 ‘प्रत्येक बाजूला आतंक पसरला आहे!’ \b \q1 \v 30 “लवकर दूर पळा! \q2 हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” \q2 कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; \q1 नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, \q2 याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 31 “सज्ज हो आणि सुखात राहणार्‍या राष्ट्रांवर हल्ला कर, \q2 जे आत्मविश्वासाने जगतात,” \q2 याहवेह जाहीर करतात. \q1 “ज्या राष्ट्रांना प्रवेशद्वार नाही वा सळया नाहीत; \q2 त्यातील लोक धोक्यांपासून दूर राहतात. \q1 \v 32 त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, \q2 व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. \q1 या मूर्तिपूजक\f + \fr 49:32 \fr*\ft किंवा \ft*\fqa जे त्यांच्या कपाळावरील केस कापतात\fqa*\f* लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन \q2 मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. \q2 याहवेह असे जाहीर करतात. \q1 \v 33 हासोरात कोल्हे संचार करतील, \q2 ते कायमचे ओसाड होईल. \q1 तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; \q2 मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.” \s1 एलामविषयी संदेश \p \v 34 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला. \b \p \v 35 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “मी एलामचा धनुष्य तोडणार आहे, \q2 जो त्यांच्या सामर्थ्याचा मुख्य आधार आहे. \q1 \v 36 मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्‍याला आणेन; \q2 ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील; \q1 मी त्यांना चारही दिशातील वार्‍यावर पसरवून टाकेन, \q2 असे एकही राष्ट्र नसेल \q2 जिथे एलामचे निर्वासित नसतील. \q1 \v 37 जे एलामचा वध करू इच्छितात, \q2 त्या त्यांच्या शत्रूदेखत मी पांगापांग करेन; \q1 मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन, \q2 माझा भयंकर क्रोधही आणेन,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 “मी त्यांचा समूळ नाश करेपर्यंत \q2 त्यांचा तलवारीने पाठलाग करेन. \q1 \v 38 मी माझे राजासन एलाम येथे स्थापन करेन \q2 मी तिचा राजा व तिचे सरदार यांचा नाश करेन. \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 39 “तरी येत्या दिवसात \q2 मी एलामची समृद्धी परत आणेन,” \q2 याहवेह जाहीर करतात. \c 50 \s1 बाबिलोनसंबंधी संदेश \p \v 1 बाबिलोन\f + \fr 50:1 \fr*\ft खाल्डियन\ft*\f* व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे: \q1 \v 2 “राष्ट्रांमध्ये जाहीर कर व घोषणा कर, \q2 ध्वज उंचावून घोषणा कर; \q2 काहीही मागे सोडू नको, पण म्हण, \q1 ‘बाबेलचा पाडाव होणार आहे; \q2 तिचे दैवत बेल लज्जित करण्यात येणार आहे, \q2 मरोदख भयाने व्याप्त होणार. \q1 तिच्या मूर्ती लज्जित करण्यात येणार आहेत \q2 तिची दैवते भयाने व्याप्त होणार आहेत.’ \q1 \v 3 तिच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र हल्ला करेल \q2 आणि तिच्या भूमीचा विध्वंस करेल. \q1 तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; \q2 लोक आणि पशू पलायन करतील. \b \q1 \v 4 “त्या समयी, त्या दिवसात \q1 इस्राएलचे लोक आणि यहूदीयाचे लोक एकत्र येतील, \q2 आणि अश्रू गाळीत त्यांचे परमेश्वर याहवेहचा शोध घेतील, याहवेह जाहीर करतात. \q1 \v 5 ते सीयोनकडे जाणार्‍या मार्गाची विचारणा करतील \q2 आणि त्या दिशेने ते अभिमुख होतील. \q1 ते येतील व याहवेहशी, \q2 कधीही विस्मृतित न जाणाऱ्या, \q2 एका सार्वकालिक कराराशी जडून जातील. \b \q1 \v 6 “माझे लोक हरवलेली मेंढरे होती; \q2 त्यांच्या मेंढपाळांनीच त्यांची वाट चुकविली \q2 त्यांना डोंगरांवर भटकण्यासाठी सोडून दिले होते. \q1 ते डोंगर व पर्वतावर भटकत राहिले \q2 व त्यांच्या मेंढवाड्यास ते विसरले. \q1 \v 7 ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले; \q2 त्यांचे शत्रू म्हणाले, ‘आपण दोषी नाही, \q1 कारण याहवेह, त्यांचे हिरवेगार कुरण, \q2 आणि त्यांच्या पूर्वजांचे आशास्थान, यांच्याविरुद्धच ज्यांनी पाप केले आहे.’ \b \q1 \v 8 “बाबेलच्या बाहेर पळा; \q2 बाबिलोनच्या लोकांच्या भूमीचा त्याग करा, \q2 आणि त्या बोकडांसारखे व्हा, जे कळपाचे नेतृत्व करतात. \q1 \v 9 कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून \q2 बाबेलवर हल्ला करण्यास प्रेरित करणार. \q1 ते बाबेलवर हल्ला करण्यास सज्ज होतील, \q2 आणि उत्तरेकडून तिचा पाडाव होईल. \q1 त्यांचे बाण लक्ष्यवेधी योद्ध्यांसारखे असतील \q2 ते रिकाम्या हाताने परत जात नसतात. \q1 \v 10 तर मग बाबेलची लूट करण्यात येईल; \q2 ते सर्व तिची मनसोक्त लूट करतील,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 11 “तुम्ही जे माझे वतन लुटता, \q2 तुम्ही आनंद व उल्हास करतात, \q1 तुम्ही धान्य मळणार्‍या कालवडीप्रमाणे बागडता \q2 आणि घोड्यांसारखे खिंकाळत असाल, \q1 \v 12 पण तुमची माता अत्यंत लज्जित होईल; \q2 जिने तुम्हाला जन्म दिला, तिची अप्रतिष्ठा होईल, \q1 ती सर्व राष्ट्रात सर्वात क्षुद्र होईल— \q2 मग ती अरण्यात असो, शुष्क भूमीत, वा वाळवंटात असो. \q1 \v 13 याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, \q2 पण पूर्णपणे ओसाड होईल. \q1 आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्‍यांना दहशत वाटेल; \q2 तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील. \b \q1 \v 14 “बाबेलच्या सभोवती तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा, \q2 धनुर्धाऱ्यांनो तिच्यावर बाणांचा नेम धरा. \q1 तिच्यावर बाण मारा, कोणताही बाण राखून ठेवू नका. \q2 कारण तिने याहवेहविरुद्ध पाप केले आहे. \q1 \v 15 तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! \q2 ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, \q2 तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. \q1 हा याहवेहने घेतलेला सूड आहे, \q2 तुम्हीही तिचा सूड घ्या; \q2 जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा. \q1 \v 16 बाबेलच्या शेतकऱ्यांना तिथून काढून टाका, \q2 कापणी करणारे आपले विळे घेऊन निघून जावोत. \q1 अत्याचाऱ्याच्या तलवारीमुळे \q2 प्रत्येकाने आपल्या लोकांकडे परत जावे. \q2 प्रत्येकाने आपल्या देशाकडे पलायन करावे. \b \q1 \v 17 “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, \q2 सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. \q1 प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले \q2 तो अश्शूरचा राजा होता; \q1 नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला \q2 तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.” \p \v 18 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: \q1 “मी बाबेलच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन, \q2 अश्शूरच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन. \q1 \v 19 पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, \q2 ते कर्मेल व बाशान येथे चरतील; \q1 एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर \q2 ते खाऊन तृप्त होतील. \q1 \v 20 त्या दिवसात, त्या समयी, याहवेह घोषित करतात, \q1 इस्राएलमध्ये दोषाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला \q2 तरी ते आढळणार नाहीत, \q1 आणि यहूदीयामध्ये पाप शोध घेण्याचा प्रयत्न केला \q2 तरी आढळणार नाही, लोकांना मी क्षमा करेन. \q2 कारण मी वाचवून ठेवलेल्या अवशेषाला क्षमा करेन. \b \q1 \v 21 “मराथाईम प्रदेशावर आक्रमण करा \q2 आणि पकोड येथील रहिवाशांवर स्वारी करा. \q1 त्यांचा पाठलाग करा, त्यांचा वध करा व त्यांना समूळ नष्ट करा.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q2 “मी तुम्हाला आज्ञापिलेले सर्वकाही करा. \q1 \v 22 देशामध्ये रणगर्जनेचा ध्वनी ऐकू येत आहे. \q2 प्रचंड विध्वंसतेचा ध्वनी! \q1 \v 23 कसा मोडणारा व चुराडा करणारा \q2 संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! \q1 सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन \q2 किती ओसाड बनले आहे! \q1 \v 24 अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला \q2 आणि तुला कळण्या आधीच तू त्यात अडकलीस; \q1 तू सापडलीस व पकडण्यात आलीस \q2 कारण तू याहवेहस विरोध केला. \q1 \v 25 याहवेहने आपले शस्त्रागार उघडले \q2 व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, \q1 कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस \q2 बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे. \q1 \v 26 या! दूरदूरच्या राष्ट्रांमधून बाबेलवर स्वारी करण्यासाठी या! \q2 तिची धान्यांची कोठारे फोडा; तिच्या भिंती पाडा, \q2 धान्याच्या राशी सारखा तिचा ढिगारा करा. \q1 आणि तिचा समूळ नायनाट करा \q2 तिच्यातील कोणीही शिल्लक ठेवू नका. \q1 \v 27 तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; \q2 त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! \q1 त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, \q2 त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे. \q1 \v 28 बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका \q2 याहवेह, आमच्या परमेश्वराने कसा सूड घेतला, \q1 त्यांच्या मंदिराबद्दल सूड घेतला. \q2 हे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 29 “धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, \q2 धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. \q1 नगरीला वेढा घाला; \q2 कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. \q1 तिच्या कृत्याची परतफेड करा; \q2 तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. \q1 तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला \q2 उद्दामपणे तुच्छ लेखले, \q1 \v 30 म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; \q2 त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” \q2 हे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 31 “पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे \q2 आता तुमचा दिवस आला आहे, \q1 तुम्हाला शिक्षा देण्याचा समय आला आहे! \q2 प्रभू सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \q1 \v 32 गर्विष्ठ अडखळतील व पडतील, \q2 तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; \q1 मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन \q2 तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.” \p \v 33 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “इस्राएलाच्या लोकांवर जुलूम झाला आहे. \q2 व यहूदीयाच्या लोकांवरही झाला आहे. \q1 त्यांना कैद करणार्‍यांनी त्यांना घट्ट पकडून ठेवले आहे \q2 व त्यांना जाऊ देण्याचे ते नाकारतात. \q1 \v 34 परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; \q2 सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. \q1 ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, \q2 म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, \q2 परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल. \b \q1 \v 35 “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! \q2 ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर \q1 आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! \q2 याहवेह असे जाहीर करतात. \q1 \v 36 तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल \q2 ते सल्लागार मूर्ख बनतील! \q1 तिच्या योद्ध्यांवर तलवारीचा प्रहार होईल! \q2 ते अत्यंत भयभीत होतील. \q1 \v 37 तिचे घोडे, रथांवर तलवारीचा प्रहार होईल! \q2 आणि तिच्यात राहणाऱ्या विदेशीयांवरही होईल! \q2 ते दुर्बल होतील. \q1 तिच्या संपत्तीवर तलवारीचा प्रहार होईल! \q2 त्यांची लूट केली जाईल. \q1 \v 38 तिच्या पाण्यावर तलवारीचा\f + \fr 50:38 \fr*\ft किंवा \ft*\fqa च्या विरुद्ध तलवार\fqa*\f* प्रहार होईल! \q2 ते शुष्क होतील. \q1 कारण ही मूर्तींची भूमी आहे, \q2 आणि या मूर्ती भयाने वेड्या होतील. \b \q1 \v 39 “म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील, \q2 व घुबडे येऊन राहतील. \q1 येथे आता पुन्हा कधी मानवाची वस्ती होणार नाही; \q2 किंवा ही नगरीत पिढ्यान् पिढ्या ओसाड पडेल. \q1 \v 40 याहवेह जाहीर करतात, \q2 जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा \q2 त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, \q1 म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. \q2 त्यात लोक वस्ती करणार नाहीत. \b \q1 \v 41 “पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; \q2 पृथ्वीच्या शेवटापासून \q2 एक मोठे राष्ट्र व अनेक राजे भडकविले जात आहेत. \q1 \v 42 त्यांचे सैनिक धनुष्ये व भाल्यांसहित सज्ज आहेत. \q2 ते अत्यंत क्रूर व दयाहीन आहेत. \q1 ते घोड्यांवर स्वार झाले असता \q2 त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. \q1 हे बाबिलोन कन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी \q2 युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत. \q1 \v 43 बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. \q2 त्याचे बाहू निखळले आहेत. \q1 बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे \q2 वेदनांनी त्याला ग्रासले आहे. \q1 \v 44 यार्देन नदीच्या झुडूपातून \q2 सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, \q1 बाबेलच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. \q2 मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? \q1 माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? \q2 कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?” \b \q1 \v 45 बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. \q2 बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. \q1 त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. \q2 त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल. \q1 \v 46 बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; \q2 त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल. \c 51 \p \v 1 याहवेहचे म्हणणे हे असे आहे, \q1 “बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांवर\f + \fr 51:1 \fr*\ft मूळ प्रतीत लेव खमायी\ft*\f* चाल करून जाण्यास \q2 मी एका संहारक आत्म्याला प्रेरित करेन. \q1 \v 2 त्यांना पाखडण्यात यावे व त्यांच्या भूमीचा विध्वंस व्हावा \q2 म्हणून मी बाबेलविरुद्ध विदेशी लोकांना पाठवेन; \q1 तिच्या विनाशाच्या दिवशी \q2 ते प्रत्येक दिशेने तिच्या विरोधात येतील. \q1 \v 3 तिच्या सैनिकांना त्यांचे धनुष्य ताणू देऊ नका. \q2 तिच्या योद्ध्यांची चिलखते अंगात घालू देऊ नका. \q1 त्यांच्या तरुणांनाही सोडू नका; \q2 त्यांच्या सैन्याचा संपूर्ण नाश करा. \q1 \v 4 बाबेलमध्ये ते मरून पडतील. \q2 तिच्या रस्त्यांवर ते मरणोप्राय जखमी होतील. \q1 \v 5 त्यांची भूमी इस्राएलच्या पवित्र परमेश्वरासमोर \q2 जरी तिच्या अपराधाने भरलेली आहे तरीही \q1 त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेह यांनी \q2 इस्राएल व यहूदीयाचा त्याग केला नाही. \b \q1 \v 6 “बाबेलमधून पलायन करा! \q2 आपला जीव वाचविण्यास पळा! \q2 तिच्या पापांमुळे तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका. \q1 हा याहवेहचा सूड घेण्याचा समय आहे; \q2 ज्यास ती पात्र आहे, त्याचा मोबदला ते तिला देतील. \q1 \v 7 बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; \q2 तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. \q1 सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; \q2 म्हणून आता ते वेडे झाले आहेत. \q1 \v 8 बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. \q2 तिच्यासाठी विलाप करा! \q1 तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; \q2 कदाचित ती बरी होऊ शकेल. \b \q1 \v 9 “ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. \q2 पण ती बरी होऊ शकत नाही. \q1 आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. \q2 कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, \q2 तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’ \b \q1 \v 10 “ ‘याहवेहने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे; \q2 चला, आपण सीयोनात जाऊन सांगू \q2 आमचे परमेश्वर याहवेहने काय केले आहे.’ \b \q1 \v 11 “बाणांना धार लावा, \q2 ढाली उचलून घ्या! \q1 याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, \q2 कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. \q1 याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, \q2 हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे. \q1 \v 12 बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! \q2 पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, \q1 पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, \q2 दबा धरून बसण्याची तयारी करा! \q1 याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या \q2 फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील. \q1 \v 13 तुम्ही, जे बऱ्याच जलाशयाकाठी वास करता, \q2 आणि अतिसंपन्न आहात, \q1 तुमचा अंत जवळ आला आहे, \q2 तुमचा नाश होण्याचा समय आला आहे. \q1 \v 14 सर्वसमर्थ याहवेह, स्वतःच्याच नावाची शपथ घेतातः \q2 मी निश्चितच तुम्हाला टोळधाडीसारख्या असंख्य सैनिकांनी भरून टाकेन \q2 आणि लोक तुमच्यावरील विजयोन्मादाने गर्जना करतील. \b \q1 \v 15 “त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; \q2 संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली \q2 आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले. \q1 \v 16 जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघ गर्जना करतात; \q2 ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. \q1 ते विजा आणि पाऊस पाठवितात \q2 आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात. \b \q1 \v 17 “प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे; \q2 प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे. \q1 त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत. \q2 त्यांच्यामध्ये श्वास नाही. \q1 \v 18 त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत; \q2 जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा त्यांचा नाश होईल. \q1 \v 19 परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. \q2 कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, \q1 ते लोक त्यांचे वारस आहेत; \q2 सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे. \b \q1 \v 20 “तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस. \q2 माझे युध्दशस्त्र— \q1 तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना डळमळीत करेन, \q2 तुझ्याद्वारे मी राज्ये नष्ट करेन, \q1 \v 21 तुझ्याद्वारे मी घोडा आणि घोडेस्वाराचा संपूर्ण नाश करेन, \q2 तुझ्याद्वारे मी रथ आणि सारथी यांचा संपूर्ण नाश करेन, \q1 \v 22 तुझ्याद्वारे मी पुरुष व स्त्रीचा संपूर्ण नाश करेन, \q2 तुझ्याद्वारे मी वृद्धाचा व तरुणाचा संपूर्ण नाश करेन, \q2 तुझ्याद्वारे मी तरुण व तरुणींचा संपूर्ण नाश करेन, \q1 \v 23 तुझ्याद्वारे मी मेंढपाळांचा आणि कळपांचा संपूर्ण नाश करेन, \q2 तुझ्याद्वारे मी शेतकर्‍यांचा आणि बैलांचा संपूर्ण नाश करेन, \q2 तुझ्याद्वारे मी राज्यपालांचा आणि अधिपतींचा संपूर्ण नाश करेन. \p \v 24 “बाबिलोन व बाबिलोनचे लोक यांनी सीयोनाशी जे दुष्कृत्य केले, त्याबद्दल मी तुझ्या डोळ्यादेखत त्यांची परतफेड करेन.” असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 25 “हे संहारक पर्वता, तू जो संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करतो, \q2 मी तुझ्याविरुद्ध आहे,” \q2 याहवेह जाहीर करतात, \q1 “मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन, \q2 तुला कडेलोट करेन, \q2 आणि तुला भस्म झालेला डोंगर करेन. \q1 \v 26 तुझ्यातील पाषाण कोनशिलेसाठी वापरण्यात येणार नाहीत. \q2 पायाभरणीसाठीही तुझे डबर घेणार नाहीत, \q2 तू कायमची उजाड होशील,” याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 27 “या भूमीवर आपले ध्वज फडकवा! \q2 राष्ट्रांमध्ये रणशिंगे वाजवा! \q1 तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा; \q2 या राष्ट्रांना तिच्याविरुद्ध पाचारण करा: \q2 अरारात, मिन्नी व आष्कनाज. \q1 तिच्याविरुद्ध सेनापतीची नेमणूक करा; \q2 टोळधाडी सारखा घोड्यांचा प्रचंड समुदाय पाठवा. \q1 \v 28 तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा— \q2 मेदिया राजे, \q1 त्यांचे राज्यपाल आणि अधिपती, \q2 आणि ज्यावर ते शासन करतात अशी सर्व राष्ट्रे. \q1 \v 29 भूमी थरथरत व वेदनांनी तळमळत आहे, \q2 कारण याहवेहने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प कायमचा आहे— \q1 बाबेलची भूमी ओसाड होईल \q2 जेणेकरून तिथे कोणीही राहणार नाही. \q1 \v 30 बाबिलोनचे योद्धे युद्ध करण्याचे थांबले आहेत; \q2 ते त्यांच्या गडात बसून आहेत. \q1 त्यांचे सामर्थ्य संपुष्टात आले आहे; \q2 ते दुर्बल झाले आहेत. \q1 तिचे आवास जळत आहेत; \q2 तिच्या प्रवेशद्वाराच्या सळया मोडल्या आहेत. \q1 \v 31 बाबेलच्या राजाला वर्तमान सांगण्यासाठी, \q2 की त्याचे संपूर्ण नगर हस्तगत करण्यात आले आहे, \q1 संदेशवाहक एका पाठोपाठ धावत आहेत \q2 निरोपे एका पाठोपाठ येत आहेत, \q1 \v 32 नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत, \q2 दलदली जळत आहेत, \q2 सैन्य भयभीत झाले आहेत.” \p \v 33 कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: \q1 “बाबेलची कन्या अशा खळ्याप्रमाणे आहे \q2 जिची तुडवणी सुरू होण्याची वेळ आली आहे; \q2 तिचे पीक घेण्याचा समय लवकरच येणार आहे.” \b \q1 \v 34 “बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने आम्हाला गिळंकृत केले आहे, \q2 त्याने आम्हाला निराशेत ढकलले आहे, \q2 त्याने आम्हाला रिक्त भांड्यासारखे केले आहे. \q1 सर्पासारखे त्याने आम्हाला गिळले आहे. \q2 आणि आमच्या मिष्टान्नाने स्वतःचे पोट भरले आहे, \q2 आणि मग आम्हाला बाहेर थुंकून दिले आहे. \q1 \v 35 सीयोनचे रहिवासी म्हणतात, \q2 आमच्या संतानांवर जसा अत्याचार केला, तसा बाबेलवर येवो,” \q1 यरुशलेम म्हणते, \q2 “आमचे रक्त सांडल्याचा सर्व दोष बाबेल्यांवर पडो.” \p \v 36 म्हणून याहवेह असे म्हणतात: \q1 “मी तुमची बाजू मांडेन \q2 मी तुमचा सूड उगवेन; \q1 मी तिचे समुद्र आटवून टाकेन \q2 आणि तिचे झरे शुष्क करेन. \q1 \v 37 बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, \q2 तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, \q1 ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, \q2 जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण. \q1 \v 38 तिचे सर्व लोक तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील, \q2 सिंहाच्या छाव्यासारखे डरकाळ्या मारतील. \q1 \v 39 पण ते जेव्हा जागृत होतील, \q2 मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करेन \q2 त्यांना मद्यधुंद करेन, \q1 म्हणजे ते किंकाळ्या मारून हसतील—मग ते कायमचे झोपतील \q2 मग ते चिरनिद्रा घेतील व उठणार नाहीत.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 40 मी त्यांना कोकरागत, \q2 मेंढ्या व बोकडागत \q2 कत्तल करण्यास खाली आणेन. \b \q1 \v 41 “शेशाक\f + \fr 51:41 \fr*\ft बाबिलोन\ft*\f* कसे हस्तगत केल्या जाईल, \q2 संपूर्ण पृथ्वीचे अभिमान पात्र जप्त केल्या जाईल! \q1 सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन \q2 किती ओसाड होईल! \q1 \v 42 बाबेलवर सागर उसळून येईल; \q2 सागरलाटांनी ती भूमी झाकून जाईल. \q1 \v 43 तिची शहरे ओसाड होतील, \q2 ती एक शुष्क व निर्जन भूमी होईल, \q1 एक अशी भूमी जिथे कोणी मनुष्य राहत नाही, \q2 जिच्यामधून कोणीही प्रवास करीत नाही. \q1 \v 44 मी बेलला बाबिलोन मध्येच शिक्षा देईन \q2 आणि त्याने जे गिळले ते मी त्याला थुंकावयास लावेन. \q1 यापुढे राष्ट्रे त्याच्याकडे\f + \fr 51:44 \fr*\ft उपासना करण्यास\ft*\f* जमावाने येणार नाहीत. \q2 बाबेलची तटबंदी कोसळून पडेल. \b \q1 \v 45 “अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर पडा! \q2 पलायन करून आपला जीव वाचवा! \q2 याहवेहच्या भयंकर क्रोधापासून दूर पळा. \q1 \v 46 जेव्हा तुम्हाला देशात अफवा ऐकिवात येतील \q2 तेव्हा तुमचे अंतःकरण खचू देऊ नका किंवा भयभीत होऊ नका; \q1 देशात आणि एका राजाने दुसऱ्या राजाविरुद्ध केलेल्या \q2 हिंसाचारांच्या अफवा ऐकू येतील, \q2 एक अफवा या वर्षी येते तर दुसरी पुढील वर्षी येते. \q1 \v 47 असा समय निश्चित येईल \q2 जेव्हा मी बाबेलच्या मूर्तींना शिक्षा करेन; \q1 तिच्या संपूर्ण देशाची अप्रतिष्ठा होईल \q2 वध केलेल्यांचे शव तिच्या भूमीवर पडलेले दिसतील. \q1 \v 48 मग स्वर्गात व पृथ्वीवर व त्यामध्ये असलेले सर्व \q2 बाबेलवरील विजयोत्सवाच्या आनंदाने गर्जना करतील, \q1 कारण उत्तरेकडून \q2 विनाशक तिच्यावर हल्ला करतील.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 49 “जसे संपूर्ण पृथ्वीवर वध झालेले मृतदेह पडतात, \q2 तसेच इस्राएल लोकांच्या केलेल्या हत्येमुळे \q2 बाबेलचा पाडाव होईल. \q1 \v 50 जे तुम्ही तलवारीपासून वाचला आहात, \q2 ते तुम्ही निघून जा, उगाच रेंगाळू नका! \q1 दूरवरील भूमीवर याहवेहचे स्मरण करा, \q2 आणि यरुशलेम तुमच्या स्मरणात येवो.” \b \q1 \v 51 “आमची अप्रतिष्ठा झाली आहे, \q2 आमचा अपमान झाला आहे \q2 लज्जेने आमची मुखमंडले झाकली गेली आहेत, \q1 कारण परकीय लोकांनी \q2 याहवेहच्या भवनातील पवित्रस्थानी प्रवेश केला आहे.” \b \q1 \v 52 याहवेह जाहीर करतात, “पण असे दिवस येत आहेत, \q2 जेव्हा मी तिच्या मूर्तींना शिक्षा देईन, \q1 संपूर्ण देशभरातील \q2 जखमी लोक कण्हतील. \q1 \v 53 बाबिलोन जरी गगनापर्यंत पोचली \q2 आणि तिने आपल्या गढांची तटबंदी केली, \q2 तरी मी तिच्याविरुद्ध विनाशक पाठवेन,” \q2 याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 54 “बाबेलमधून विलापाचा ध्वनी ऐकू येत आहे, \q2 तिच्या घोर विनाशाचा ध्वनी \q2 बाबेलांच्या प्रदेशातूनच ऐकू येत आहे. \q1 \v 55 याहवेह बाबेलचा विनाश करणार आहेत; \q2 तेच तिच्यामधील कोलाहल शांत करतील. \q1 शत्रूंच्या लाटा तिच्यावर प्रचंड पाण्यासारख्या कोसळतील; \q2 त्या आवाजाच्या गर्जनेचा प्रतिध्वनी ऐकू येईल. \q1 \v 56 बाबेलांच्या विरुद्ध विनाशक येईल; \q2 तिचे योद्धे बंदी बनविले जातील, \q2 आणि त्यांचे धनुष्य मोडून टाकण्यात येतील. \q1 कारण याहवेह परतफेड करणारे परमेश्वर आहेत; \q2 ते पुरेपूर परतफेड करतील. \q1 \v 57 मी तिचे राज्यपाल, सुज्ञ लोक, अधिपती, सेनापती \q2 व योद्धे या सर्वांना मद्यधुंद करेन; \q1 ते झोपतील आणि पुन्हा कधीच उठणार नाहीत,” \q2 महाराज, सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात. \p \v 58 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “बाबेलची दुर्गम तटबंदी भुईसपाट होईल \q2 आणि तिच्या उंच वेशी अग्नीने भस्म करण्यात येतील; \q1 लोकांचे कष्ट व्यर्थ ठरतील, \q2 देशाने केलेले श्रम अग्नीचे जळण होईल.” \p \v 59 सिद्कीयाहच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी जेव्हा यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा राजा सिद्कीयाहसह बाबेलला गेला, तेव्हा त्याने सेरायाहस, जो नेरीयाहचा पुत्र, जो महसेयाहचा नातू, तो सैन्यात दुय्यम दर्जाचा एक अधिकारी होता त्याला हा संदेश दिला. \v 60 बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती. \v 61 यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच. \v 62 मग म्हण, ‘हे याहवेह, तुम्ही म्हटले की तुम्ही बाबेलचा नाश कराल व तिथे कोणीही मनुष्य वा पशूप्राणी वसती करणार नाही; ती कायमची ओसाड होईल.’ \v 63 मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात\f + \fr 51:63 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीत फेकून दे. \v 64 आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” \b \b \p इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो. \b \c 52 \s1 यरुशलेमचा पाडाव \p \v 1 सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती. \v 2 यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \v 3 यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. \p आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले. \p \v 4 म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्यांनी त्यांच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले. \v 5 सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता. \p \v 6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही. \v 7 तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सर्व सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही ते रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून ते अराबाह\f + \fr 52:7 \fr*\ft यार्देनच्या खोऱ्याकडे\ft*\f* च्या दिशेने पळून गेले. \v 8 परंतु बाबिलोनच्या सैनिकांनी सिद्कीयाह राजाचा पाठलाग केला आणि त्याला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते, \v 9 आणि तो पकडला गेला. \p त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. \v 10 बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला. \v 11 मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले. \p \v 12 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला. \v 13 त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत त्याने जाळून भस्म केली. \v 14 रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटे पाडून टाकली. \v 15 नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने काही अगदी गरीब लोक, शहराच्या विध्वंसातून वाचलेले लोक, आणि जे बाबेलच्या राजाला शरण गेले होते त्यांना व बाकीचे कारागीर यांना बंदिवासात नेले. \v 16 परंतु नबुजरदानने देशातील जे लोक अत्यंत गरीब होते त्यांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले. \p \v 17 बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि सर्व कास्य ते बाबेलास घेऊन गेले. \v 18 त्यांनी भांडी, फावडे, चिमटे, शिंपडण्याची भांडी आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली. \v 19 रक्षक दलाच्या अधिकार्‍याने गंगाळे, अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी, वाट्या, दीपस्तंभे, आणि पेयार्पणासाठी वापरण्यात येणारी ताटे व पात्रे काढून घेतले—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते. \p \v 20 याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते. \v 21 प्रत्येक खांब अठरा हात उंच आणि बारा त्याचा हाताचा घेर होता;\f + \fr 52:21 \fr*\ft अंदाजे 8.1 मीटर उंच आणि 5.4 मीटर घेर\ft*\f* प्रत्येक चार बोटांइतके जाड आणि पोकळ होते. \v 22 एका खांबावर कास्याचा कळस होता जो पाच हात\f + \fr 52:22 \fr*\ft अंदाजे 2.3 मीटर\ft*\f* उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. डाळिंबांसह दुसरा खांबही तसाच होता. \v 23 खांबाच्या चारही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती; राहिलेल्या भागावरच्या जाळीच्या नक्षीकामात एकूण शंभर डाळिंबे कोरली होती. \p \v 24 रक्षक दलाच्या अधिकार्‍याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपाल यांना बंदिवान म्हणून नेले. \v 25 जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि सात राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने काढून नेले. \v 26 रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले. \v 27 हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. \p याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले. \b \lh \v 28 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने बंदिवासात नेलेल्या लोकांची संख्या अशी: \b \li1 सातव्या वर्षी, \li2 3,023 यहूदी; \li1 \v 29 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या अठराव्या वर्षी, \li2 832 लोक यरुशलेममधून; \li1 \v 30 नबुखद्नेस्सरच्या तेविसाव्या वर्षी, \li2 पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने 745 यहूदी लोक बाबेलला नेले. \b \lf असे एकूण 4,600 लोक नेण्यात आले. \s1 यहोयाखीनची मुक्तता \p \v 31 यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले. \v 32 तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबिलोन येथे होते त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले. \v 33 यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले. \v 34 यहोयाखीन जिवंत असेपर्यंत बाबेलचा राजा त्याला प्रती दिवस तो मरेपर्यंत नियमित पुरवठा देत असे.