\id JDG - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h शास्ते \toc1 शास्ते \toc2 शास्ते \toc3 शास्ते \mt1 शास्ते \c 1 \s1 इस्राएलचे उर्वरित कनानी सोबत युद्ध \p \v 1 यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?” \p \v 2 याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने पुढे जावे; ही भूमी मी त्यांच्या हातात दिली आहे.” \p \v 3 मग यहूदीयाच्या पुरुषांनी इस्राएली बांधव शिमओनीना म्हणाले, “कनानविरुद्ध लढण्यासाठी आमच्यासोबत मिळालेल्या वतनात वर चला. तुमच्या वतनात आम्ही तुमच्यासोबत येऊ.” तेव्हा शिमओनी त्यांच्याबरोबर गेले. \p \v 4 जेव्हा यहूदाहने आक्रमण केले, याहवेहने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी बेजेक इथे दहा हजार लोकांचा वध केला. \v 5 बेजेक इथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध युद्ध करून कनानी आणि परिज्जी लोकांचा नायनाट केला. \v 6 अदोनी-बेजेक पळून गेला, परंतु त्यांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडले आणि त्याच्या हातांचे आणि पायांचे आंगठे कापले. \p \v 7 त्यानंतर अदोनी-बेजेक म्हणाला, “ज्या सत्तर राजांच्या हातापायांचे आंगठे कापून टाकले आणि ते माझ्या मेजाखालचे तुकडे उचलतात. आता परमेश्वराने मला त्याची परतफेड दिली आहे.” त्यांनी त्याला यरुशलेमला आणले आणि तिथे तो मरण पावला. \p \v 8 यहूदाह गोत्राच्या लोकांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि ते देखील जिंकून घेतले. तेथील लोकांची तलवारीने कत्तल केली आणि त्या शहराला आग लावून दिली. \p \v 9 त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले. \v 10 मग त्या हेब्रोनात (ज्याला पूर्वी किर्याथ-अर्बा म्हणत) राहणार्‍या कनान्यांवर यहूदाहने हल्ला केला आणि त्यांनी शेशय, अहीमान, व तलमय यांचा पराभव केला. \v 11 तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला. \p \v 12 कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.” \v 13 कालेबाचा लहान भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले; म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह पत्नी म्हणून त्याला दिली. \p \v 14 एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?” \p \v 15 तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले. \p \v 16 मोशेच्या सासर्‍याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून\f + \fr 1:16 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa यरीहो\fqa*\f* अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले. \p \v 17 नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्‍या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह\f + \fr 1:17 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa विनाश\fqa*\f* असे म्हणतात. \v 18 यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला. \p \v 19 याहवेह यहूदाहच्या लोकांसह होते. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील देशांचा पूर्णपणे ताबा घेतला, परंतु खोर्‍यात राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना ते हाकलू शकले नाहीत. \v 20 मोशेने अभिवचन दिल्याप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आले, ज्याने अनाकाच्या तीन पुत्रांना हाकलून लावले. \v 21 तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्‍या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत. \p \v 22 योसेफाच्या गोत्रांच्या लोकांनी बेथेलवर स्वारी केली आणि याहवेह त्यांच्याबरोबर होते. \v 23 जेव्हा योसेफाच्या घराण्याने बेथेल नगरीची (ज्याला पूर्वी लूज असे म्हणत) हेरगिरी करण्यासाठी पुरुष पाठविले, \v 24 एका मनुष्याला शहरातून बाहेर येताना हेरांनी पाहिले आणि ते त्याला म्हणाले, “नगरात कसे जायचे ते आम्हाला दाखव आणि आम्ही पाहू की तुझ्याशी चांगले वागले जाईल.” \v 25 म्हणून त्याने त्यांना दाखविले आणि त्यांनी तलवारीच्या बळावर पूर्ण शहर नष्ट केले, परंतु त्या मनुष्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाचविले. \v 26 त्यानंतर तो हिथी लोकांच्या देशात गेला, तिथे त्याने एक शहर निर्माण केले आणि त्याचे नाव लूज ठेवले, जे नाव आजपर्यंत आहे. \p \v 27 परंतु मनश्शेहने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम किंवा मगिद्दो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना घालविले नाही, कारण कनानी लोकांनी त्या देशात राहण्याचा निश्चय केला होता. \v 28 जेव्हा इस्राएली प्रबळ झाले, त्यांनी कनानी लोकांना गुलाम म्हणून काम करण्यास लावले, परंतु त्यांना कधीही पूर्णपणे हाकलून दिले नाही. \v 29 तसेच एफ्राईमने गेजेर येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून दिले नाही, परंतु कनानी लोक त्यांच्यामध्येच राहिले. \v 30 जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले. \v 31 आशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोबातील रहिवाशांस हाकलून दिले नाही. \v 32 आशेरी लोक त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते, कारण त्यांनी त्यांना हाकलून दिले नाही. \v 33 नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्‍यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले. \v 34 अमोरी लोकांनी दान गोत्राच्या लोकांना डोंगराळ प्रदेशात पळवून लावले, त्यांना खाली खोर्‍यात येऊ दिले नाही. \v 35 आणि अमोरी लोकांनी हेरेस, अय्यालोन आणि शालब्बीम पर्वतावर देखील थांबण्याचा निर्धार केला होता, परंतु जेव्हा योसेफाच्या गोत्रांचे लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांच्यावर देखील जबरदस्तीने मजुरकामासाठी दबाव टाकण्यात आला. \v 36 अमोरी लोकांची सीमा अक्राब्बीमच्या चढावापासून सेला आणि त्यापलीकडे होती. \c 2 \s1 बोखीम येथे याहवेहचा दूत \p \v 1 याहवेहचा दूत गिलगालहून वर बोखीम येथे गेला आणि म्हणाला, “मी तुम्हाला इजिप्त देशातून काढून तुमच्या पूर्वजास शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात आणले. मी म्हणालो, ‘तुमच्याशी केलेला करार मी कधी मोडणार नाही, \v 2 आणि तुम्ही या देशातील लोकांशी कोणतेही करार करू नका, परंतु तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका.’ तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही हे का केले? \v 3 आणि मी हे देखील म्हणालो, ‘मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देणार नाही; ते तुम्हाला काट्यांसारखे होतील आणि त्यांची दैवते तुम्हाला सापळे होतील.’ ” \p \v 4 जेव्हा याहवेहचा दूत या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, ते लोक मोठ्याने रडू लागले, \v 5 आणि म्हणून त्या ठिकाणाचे नाव “बोखीम\f + \fr 2:5 \fr*\fq बोखीम \fq*\ft म्हणजे \ft*\fqa विलाप करणारे\fqa*\f*” असे ठेवले. तिथे त्यांनी याहवेहला यज्ञ अर्पण केले. \s1 आज्ञाभंग आणि पराभव \p \v 6 नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले. \v 7 लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेली महान कृत्ये ज्यांनी पाहिली त्यांनी याहवेहची सेवा केली. \p \v 8 नूनाचा पुत्र यहोशुआ, याहवेहचा सेवक, वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. \v 9 आणि गाश पर्वताच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-हेरेस\f + \fr 2:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa तिम्नाथ-सेराह म्हणून सुद्धा ओळखले जाते\fqa*\f* येथे त्याच्या वतनाच्या प्रदेशात त्यांनी त्याचे दफन केले. \p \v 10 नंतर ती संपूर्ण पिढी त्यांच्या पूर्वजांना मिळाल्यानंतर, दुसरी पिढी उदयास आली, ज्यांना याहवेहबद्धल किंवा त्यांनी इस्राएलसाठी काय केले हे माहीत नव्हते. \v 11 तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली. \v 12 त्यांच्या पूर्वजांच्या ज्या याहवेह परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले होते, त्यांनी त्यांचा त्याग केला. त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या अन्य दैवतांचे अनुसरण केले आणि त्यांची उपासना केली. त्यांनी याहवेहचा क्रोध भडकाविला \v 13 कारण त्यांनी याहवेहला सोडून बआल आणि अष्टारोथची उपासना केली. \v 14 याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले. \v 15 जेव्हा इस्राएली राष्ट्र त्यांच्या शत्रूविरुद्ध लढण्यास जात असे, तेव्हा याहवेहचा हात त्यांच्याविरुद्ध असून त्यांचा पराभव होत असे, जसे याहवेहने त्यांना वचन दिले होते. ते भयंकर संकटात होते. \p \v 16 तेव्हा याहवेहने त्यांना लुटारूंच्या हातून वाचविण्यासाठी शास्ते\f + \fr 2:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa पुढारी\fqa*\f* उभे केले. \v 17 तरी देखील त्यांनी आपल्या शास्त्यांचे ऐकले नाही, परंतु व्यभिचारी मनाने इतर दैवतांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना करू लागले. त्वरेने ते आपल्या पूर्वजांच्या मार्गापासून बहकले, ज्यांनी याहवेहच्या आज्ञांचे पालन केले होते. \v 18 जेव्हा याहवेहने त्यांच्यासाठी शास्ते उभे केले होते, ते शास्त्यांबरोबर होते आणि शास्तेच्या जीवनभर ते त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून त्यांना सोडवित होते; कारण जुलूम व त्रास देणाऱ्यांमुळे इस्राएली लोक विव्हळत असल्यामुळे याहवेहला त्यांची दया येऊ लागली होती. \v 19 परंतु शास्ते मरण पावले की लोक योग्य ते करण्याचे सोडून त्यांचे पूर्वज करीत त्यापेक्षा अधिक वाईट आचरण करू लागले. ते इतर दैवतांची उपासना करीत व त्यांच्या पापी चालीरीतींकडे हट्टाने पुन्हा वळत. \p \v 20 यासाठी याहवेहचा क्रोध इस्राएलविरुद्ध भडकला आणि त्यांनी जाहीर केले, “कारण या इस्राएली राष्ट्राने त्यांच्या पूर्वजांशी मी केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे आणि माझे ऐकले नाही, \v 21 यहोशुआ मरण पावल्यावर, यापुढे मी घालविलेल्या राष्ट्रांपैकी कोणतेही राष्ट्र त्यांच्यापुढून घालविणार नाही. \v 22 इस्राएली लोकांची मी परीक्षा घेईन आणि त्यांच्या पूर्वजांप्रमाणे याहवेहच्या आज्ञेचे पालन ते करतात की नाही हे पाहण्यासाठी या राष्ट्रांचा मी उपयोग करेन.” \v 23 याहवेहने त्या राष्ट्रांना तिथेच राहू दिले; यहोशुआच्या हातात देऊनही त्यांना एकदम घालवून दिले नाही. \c 3 \p \v 1 कनानमधील युद्धांमध्ये भाग न घेतलेल्या इस्राएली लोकांची परीक्षा घेण्यासाठी याहवेहने या राष्ट्रांना त्या देशात राहण्याची परवानगी दिली \v 2 (हे केवळ यासाठी की ज्यांना युद्धाचा पूर्वी कोणताही अनुभव नव्हता, त्या इस्राएली लोकांच्या वंशजांना हा अनुभव यावा): \v 3 ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी. \v 4 याहवेहने मोशेद्वारे त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञांचे पालन ते करतील की नाही याबाबत परीक्षा पाहण्यासाठी इस्राएली लोकांना मागे राहू दिले होते. \p \v 5 इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले. \v 6 इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले. \s1 ओथनिएल \p \v 7 इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले. \v 8 याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला म्हणून त्यांनी, जिथे इस्राएली लोक आठ वर्षे गुलामगिरीत होते त्या अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईमच्या हाती त्यांना विकले. \v 9 परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. \v 10 याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता\f + \fr 3:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa पुढारी\fqa*\f* झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला. \v 11 त्यामुळे केनाजचा पुत्र ओथनिएल मरेपर्यंत देशात चाळीस वर्षे शांतता होती. \s1 एहूद \p \v 12 एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले. \v 13 एग्लोन अम्मोनी व अमालेकींना सोबत घेऊन आला आणि त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला आणि त्यांनी खजुरीच्या झाडांचे शहर\f + \fr 3:13 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa यरीहो\fqa*\f* ताब्यात घेतले. \v 14 इस्राएली लोक अठरा वर्षे मोआबचा राजा एग्लोनचे गुलाम होते. \p \v 15 इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले. \v 16 आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर\f + \fr 3:16 \fr*\ft अंदाजे 45 सें.मी\ft*\f* लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली. \v 17 त्याने मोआबच्या राजा एग्लोनाच्या समोर रसद सादर केली, जो खूप गलेलठ्ठ मनुष्य होता. \v 18 एहूदाने रसद सादर केल्यानंतर, ज्यांनी ते वाहून नेले होते त्यांना त्यांच्या मार्गावर परत पाठविले. \v 19 परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.” \p राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आम्हाला एकटे सोडा!” आणि ते सर्व निघून गेले. \p \v 20 मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच, \v 21 एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली. \v 22 पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती. \v 23 मग एहूद बाहेर ओसरीत गेला; त्याने त्याच्यामागे वरच्या खोलीचे दरवाजे बंद केले आणि त्यांना कुलूप लावले. \p \v 24 तो गेल्यानंतर सेवक आले आणि त्यांना वरच्या खोलीचे दरवाजे कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. ते म्हणाले, “महाराज राजवाड्याच्या आतील खोलीत आराम करण्यास गेले असावे.” \v 25 ते लाजिरवाणे वाटेपर्यंत थांबले, परंतु जेव्हा त्यांनी खोलीचे दार उघडले नाही, तेव्हा त्यांनी किल्ली घेतली आणि दार उघडले. तिथे त्यांना आपला स्वामी जमिनीवर मरून पडलेला दिसला. \p \v 26 ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला. \v 27 तो तिथे गेल्यावर त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले आणि इस्राएली लोक त्याच्यासोबत डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि त्याने त्यांचे नेतृत्व केले. \p \v 28 त्याने आदेश दिला, “माझ्यामागे या, कारण याहवेहने तुमचे शत्रू मोआबी लोक तुमच्या हाती दिले आहेत.” मग ते त्याच्या पाठोपाठ खाली गेले आणि त्यांनी मोआब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणासही पलीकडे जाऊ दिले नाही. \v 29 त्यावेळी त्यांनी सुमारे दहा हजार मोआबी लोक मारले. हे सर्व धिप्पाड आणि बलवान पुरुष होते; त्यापैकी एकही सुटू शकला नाही. \v 30 त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली. \s1 शमगार \p \v 31 एहूदनंतर अनथाचा पुत्र शमगार आला, त्याने बैलाच्या अंकुशाने सहाशे पलिष्ट्यांना मारले. त्यानेही इस्राएलला वाचविले. \c 4 \s1 दबोरा \p \v 1 एहूदच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. \v 2 म्हणून याहवेहने त्यांना कनानातील हासोर येथील राजा याबीनच्या हाती दिले. त्याच्या सैन्याचा सेनापती सिसेरा हा हरोशेथ-हग्गोईम येथे राहणारा होता. \v 3 त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला. \p \v 4 त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व\f + \fr 4:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्याय\fqa*\f* करत होती. \v 5 तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत. \v 6 तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा. \v 7 मी याबीनाच्या सैन्याचा सेनापती सिसेराला त्याच्या रथांसह आणि त्याच्या सैन्यासह किशोन नदीकडे नेईन आणि त्याला तुझ्या हाती देईन.’ ” \p \v 8 बाराक तिला म्हणाला, “जर तू माझ्यासोबत येशील तर मी जाईन; परंतु तू माझ्याबरोबर येत नसशील, तर मी जाणार नाही.” \p \v 9 दबोराने उत्तर दिले, “मी तुजबरोबर अवश्य येईन, परंतु जो मार्ग तू घेत आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण याहवेह सिसेराला एका स्त्रीच्या हातात देतील.” मग ती बाराकासोबत केदेश येथे गेली. \v 10 बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली. \p \v 11 आता हेबेर केनीने मोशेचा मेहुणा\f + \fr 4:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa सासरा\fqa*\f* होबाबचे गोत्र व इतर केनी लोकांना सोडले आणि केदेशजवळ साननीम येथील मोठ्या एलावृक्षाजवळ आपला तंबू ठोकला. \p \v 12 जेव्हा त्यांनी सिसेराला सांगितले की अबीनोअमाचा मुलगा बाराक ताबोर पर्वतावर गेला आहे, \v 13 तेव्हा सिसेराने आपले सर्व लोक आणि आपले नऊशे लोखंडी रथ सज्ज करून, हरोशेथ-हग्गोईम येथून किशोन नदीकडे कूच केले. \p \v 14 तेव्हा दबोरा बाराकास म्हणाली, “जा! आज तो दिवस आहे, याहवेहने सिसेराला तुझ्या हाती दिलेले आहे. याहवेह तुझ्यापुढे निघाले आहेत ना?” तेव्हा बाराक दहा हजार लोकांसह ताबोर पर्वतावरून उतरला. \v 15 जसा बाराक पुढे गेला, याहवेहने सिसेरा आणि त्याचे सर्व रथ आणि त्याच्या सैनिकांचा तलवारीने धुव्वा उडविला, सिसेरा तर आपल्या रथातून उतरला आणि पायी पळून गेला. \p \v 16 बाराकाने रथांचा आणि सैन्याचा हरोशेथ-हग्गोईमपर्यंत पाठलाग केला आणि सिसेराचे संपूर्ण सैन्य तलवारीने पडले; एकही पुरुष जिवंत राहिला नाही. \v 17 सिसेरा तर केनी हेबेराची पत्नी याएलच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला, कारण हासोरचा राजा याबीन आणि केनी हेबेरच्या घराण्यात सलोखा होता. \p \v 18 याएल सिसेराला भेटण्यास बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “या, महाराज, आत या. भिऊ नका.” म्हणून तो तिच्या डेर्‍यात गेला आणि तिने त्याला कांबळीखाली झाकले. \p \v 19 “मला तहान लागली आहे,” तो तिला म्हणाला. “कृपा करून मला थोडेसे पाणी दे.” तेव्हा तिने त्याला दुधाची बुधली उघडून त्यातून त्याला थोडे दूध दिले आणि त्याला झाकून टाकले. \p \v 20 तो तिला म्हणाला, “डेर्‍याच्या दाराशी उभी राहा. जर कोणी येईल आणि तुला विचारेल, ‘आत कोणी आहे का?’ तर ‘नाही’ असे सांग.” \p \v 21 सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्‍याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला. \p \v 22 बाराक सिसेराचा शोध करीत आला, तेव्हा याएल त्याला सामोरी गेली व म्हणाली, “या, ज्या पुरुषाचा तुम्ही शोध करीत आहात, तो मी तुम्हाला दाखविते.” तो तिच्याबरोबर आत गेला, तेव्हा तिथे डेर्‍याची मेख कपाळातून आरपार जाऊन सिसेरा मरून पडलेला त्याला दिसला. \p \v 23 त्या दिवशी परमेश्वराने कनानाचा राजा याबीनास इस्राएलसमोर पराजित केले. \v 24 इस्राएली लोकांचे वर्चस्व अधिकाधिक प्रबळ होत गेले आणि शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीनचा नाश केला. \c 5 \s1 दबोराचे गीत \p \v 1 त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले: \q1 \v 2 “जेव्हा इस्राएलचे राजकुमार पुढे चालतात, \q2 जेव्हा लोक स्वेच्छेने स्वतःला सादर करतात— \q2 याहवेहची स्तुती करा! \b \q1 \v 3 “अहो राजांनो हे ऐका! अधिपतींनो कान द्या! \q2 मी स्वतः याहवेहची\f + \fr 5:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa याहवेहला\fqa*\f* स्तुती करेन; \q2 मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती गाईन. \b \b \q1 \v 4 “जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले, \q2 जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले, \q1 पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले, \q2 ढगांनी जलबिंदू खाली ओतले. \q1 \v 5 याहवेहसमोर पर्वत थरथरला, \q2 याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासमोर सीनाय थरकापला. \b \q1 \v 6 “अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये, \q2 याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले; \q2 प्रवाशांनी वळणाचा मार्ग वापरला. \q1 \v 7 इस्राएलमधील ग्रामीण लढणार नाहीत; \q2 मी, दबोरा उठेपर्यंत ते थांबले, \q2 मी, इस्राएलमधील एक माता उठेपर्यंत ते थांबले. \q1 \v 8 परमेश्वराने नवीन पुढारी निवडले \q2 जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, \q1 परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये \q2 एकही ढाल किंवा भाला दिसला नाही. \q1 \v 9 माझे हृदय इस्राएलच्या राजपुत्रांसह आहे, \q2 लोकांमध्ये स्वेच्छेने काम करणाऱ्यांबरोबर आहे. \q2 याहवेहची स्तुती हो! \b \q1 \v 10 “तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता, \q2 गालिचांच्या खोगिरावर बसता, \q2 आणि तुम्ही त्या मार्गाने पायी चालणारे, \q1 विचार करा, \v 11 गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी. \q2 ते याहवेहचे विजयगीत गातात, \q2 इस्राएलच्या गावकर्‍यांच्या विजयाचे स्मरण करतात. \b \q1 “नंतर याहवेहचे लोक \q2 शहराच्या द्वाराजवळ गेले. \q1 \v 12 ‘दबोरा जागी हो, जागी हो! \q2 जागी हो, जागी हो, तुझ्या मुखातून गीत भरभरून वाहो! \q1 ऊठ, हे बाराका! \q2 हे अबीनोअमाच्या पुत्रा, तू बंधनात टाकलेल्या बंदिवानांना घेऊन जा.’ \b \q1 \v 13 “राहिलेले सरदार खाली आले; \q2 याहवेहचे लोक बलवान लोकांविरुद्ध माझ्याकडे आले. \q1 \v 14 ज्यांचे मूळ अमालेकामध्ये होते, ते काही लोक एफ्राईमामधून आले; \q2 बिन्यामीन तुम्हाला अनुसरण करणार्‍या लोकांसह होते. \q1 माखीराचे सरदारही आले, \q2 जबुलूनाचे दंडधारी\f + \fr 5:14 \fr*\ft या शब्दाचा अर्थ निश्चित नाही\ft*\f* सेनापतिसुद्धा आले. \q1 \v 15 इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; \q2 होय, इस्साखार बाराक सोबत, \q2 रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये \q1 त्याच्या नेतृत्वाखाली खोर्‍यामध्ये पाठविले \q2 अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला. \q1 \v 16 मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी \q2 ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात\f + \fr 5:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa शेकोटी\fqa*\f* का राहिलास? \q1 रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये \q2 अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला. \q1 \v 17 गिलआद यार्देनेपलीकडे राहिला, \q2 पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला? \q1 आशेर सागरकिनारीच राहिला \q2 आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला. \q1 \v 18 जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला; \q2 तसेच नफतालीच्या लोकांनी रणभूमीवर मरणाचा धोका पत्करला. \b \q1 \v 19 “राजे आले, ते लढले, \q2 कनानाचे राजे लढले, \q1 मगिद्दोच्या झर्‍याजवळ तानख येथे लढले, \q2 त्यांनी चांदीची लूट घेतली नाही. \q1 \v 20 आकाशातून तारे लढले, \q2 त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले. \q1 \v 21 किशोन नदीने त्यांना वाहून नेले, \q2 पुरातन नदी, किशोन नदी. \q2 कूच कर, माझ्या आत्म्या; समर्थ होऊन पुढे जा! \q1 \v 22 घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला— \q2 घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले! \q1 \v 23 याहवेहच्या दूताने आदेश दिला, ‘मेरोजला शाप द्या. \q2 त्याच्या लोकांना कडवटपणे शाप द्या, \q1 कारण ते याहवेहला मदत करावयाला आले नाहीत, \q2 पराक्रमी लोकांविरुद्ध याहवेहला मदत करावयाला आले नाहीत.’ \b \b \q1 \v 24 “स्त्रियांमध्ये सर्वाधिक आशीर्वादित याएल, \q2 केनी हेबेरची पत्नी, \q2 तंबूत राहणार्‍या स्त्रियांमध्ये सर्वात धन्य. \q1 \v 25 त्याने पाणी मागितले आणि तिने त्याला दूध दिले; \q2 आणि सरदाराला साजेल अशा वाटीत त्याला दही दिले. \q1 \v 26 तिचा हात तंबूच्या खुंटीकडे गेला, \q2 उजवा हात कामगाराच्या हातोडीसाठी. \q1 तिने सिसेराला मारले, तिने त्याचे डोके चिरडले. \q2 तिने त्याच्या कपाळाचे भोसकून तुकडे केले. \q1 \v 27 तिच्या पायाशी तो खचला, तो पडला, \q2 जिथे तो पडला; तिथेच तो पडून राहिला. \q1 तिच्या पायाशी तो खचला, तो पडला; \q2 जिथे तो खचला, तिथे तो पडला व मेला. \b \q1 \v 28 “खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले; \q2 जाळीच्या मागे ती ओरडली, \q1 ‘त्याचा रथ येण्यास इतका वेळ का लागला आहे? \q2 त्याच्या रथांचा कल्लोळ ऐकू येण्यास का उशीर होत आहे?’ \q1 \v 29 तिच्यातील हुशार स्त्रिया तिला उत्तर देतात; \q2 खरंच, ती स्वतःशीच म्हणते, \q1 \v 30 ‘ते लूट शोधून वाटून तर घेत नाहीत ना: \q2 प्रत्येक पुरुषासाठी एक किंवा दोन स्त्रिया, \q1 सिसेरासाठी लूट म्हणून रंगीबेरंगी वस्त्रे, \q2 रंगीबेरंगी नक्षीदार वस्त्रे, \q1 माझ्या गळ्यात भरतकाम केलेली वस्त्रे— \q2 ही सर्व लूट म्हणून आहेत काय?’ \b \b \q1 \v 31 “याहवेह याप्रकारे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होवो! \q2 जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने उगवतो तसे, \q2 जे लोक तुमच्यावर प्रीती करतात ते सर्व त्या सूर्याप्रमाणे होवोत.” \p त्यानंतर देशात चाळीस वर्षे देशात शांतता होती. \c 6 \s1 गिदोन \p \v 1 इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले. \v 2 कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले. \v 3 जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत. \v 4 त्यांनी तेथील जमिनीवर तळ ठोकला आणि गाझापर्यंत पिकांची नासाडी केली आणि इस्राएलसाठी मेंढ्या, गुरे, गाढवेही त्यांनी जिवंत ठेवली नाहीत. \v 5 ते टोळांच्या समुहासारखे त्याचे तंबू आणि त्यांचे पशुधन घेऊन आले. त्यांना किंवा त्यांचे उंट मोजणे शक्य नव्हते; त्यांनी ती भूमी उद्ध्वस्त करण्यासाठी आक्रमण केले. \v 6 अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले. \p \v 7 मिद्यान्यांमुळे जेव्हा इस्राएली लोक मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले, \v 8 त्यांनी एक संदेष्टा पाठवला, तो म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले. \v 9 मी तुम्हाला इजिप्तमधील लोकांच्या हातातून सोडविले आणि जे तुमच्याशी क्रूरपणे वागत, त्या सर्व लोकांच्या हातून सोडविले आणि तुमच्या शत्रूंना तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हाला दिला. \v 10 मी तुम्हाला म्हटले, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता, त्यांच्या दैवतांची उपासना करू नका. परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.” \p \v 11 याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता. \v 12 जेव्हा याहवेहचा दूत गिदोनाच्या पुढे प्रगट झाला आणि त्यास म्हणाला, “हे बलवान सैनिका, याहवेह तुझ्याबरोबर आहेत.” \p \v 13 गिदोन त्यास म्हणाला, “महाराज, मला माफ करा, परंतु जर याहवेह आमच्यासह असते तर हे सर्व आमच्यासोबत का घडले? आमच्या पूर्वजांनी सांगितलेले त्यांचे सर्व चमत्कार कुठे आहेत, जेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले नाही का?’ पण आता याहवेहने आम्हाला सोडून दिले आहे आणि आम्हाला मिद्यानच्या हाती दिले आहे.” \p \v 14 याहवेह त्याच्याकडे वळून म्हणाले, “आपल्या बळाचा उपयोग कर आणि जा इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवित नाही का?” \p \v 15 गिदोनाने उत्तर दिले, “महाराज, मला माफ करा, मी इस्राएली लोकांना कसा काय सोडविणार? माझे कुटुंब संपूर्ण मनश्शेह गोत्रातील अत्यंत दुर्बल असे कुटुंब आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजले जाते.” \p \v 16 याहवेहने उत्तर दिले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि तू सर्व मिद्यान्यांचा असा नायनाट करशील की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” \p \v 17 गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा. \v 18 मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.” \p आणि याहवेह म्हणाले, “तू परत येईपर्यंत मी वाट पाहीन.” \p \v 19 गिदोन आत गेला, त्याने एक करडू कापून कालवण तयार केले आणि पिठाच्या एक एफापासून\f + \fr 6:19 \fr*\ft अंदाजे 16 कि.ग्रॅ.\ft*\f* खमीर नसलेली भाकर केली. टोपलीत मांस आणि त्याचा रस्सा एका भांड्यात ठेवून त्याने ते बाहेर आणले आणि एलाच्या वृक्षाखाली त्याला अर्पण केले. \p \v 20 परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले, \v 21 तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला. \v 22 जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!” \p \v 23 परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.” \p \v 24 म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे. \p \v 25 त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा\f + \fr 6:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa संपूर्ण वाढ झालेला\fqa*\f* दुसरा गोर्‍हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्‍या अशेरा देवीचा खांब\f + \fr 6:25 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa अशेरा देवीचे लाकडी चिन्ह\fqa*\f* तोडून टाक. \v 26 नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी\f + \fr 6:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa दगडाच्या पायर्‍या बांधणे\fqa*\f* बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्‍हा\f + \cat dup\cat*\fr 6:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa संपूर्ण वाढ झालेला\fqa*\f* अर्पण कर.” \p \v 27 यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले. \p \v 28 दुसर्‍या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्‍या गोर्‍ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले! \p \v 29 ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?” \p शोध घेतल्यावर त्यांना सांगण्यात आले, “योआशाचा पुत्र गिदोनाने ते केले होते.” \p \v 30 योआशाला नगरवासी मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “तुझ्या पुत्राला बाहेर आण; बआल दैवताच्या वेदीचा अपमान केल्याबद्दल व तिच्याजवळील अशेरामूर्ती फोडल्याबद्दल त्याने मेलेच पाहिजे.” \p \v 31 परंतु योआशाने त्याच्या आजूबाजूच्या विरोधी जमावाला उत्तर दिले, “तुम्ही बआलची बाजू मांडणार आहात का? तुम्ही त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहात का? जो कोणी त्याच्यासाठी लढेल त्याला सकाळपर्यंत जिवे मारावे! जर बआल खरोखरच देव असता तर, जेव्हा कोणी त्याची वेदी तोडतो तेव्हा तो स्वतःचा बचाव करू शकला असता.” \v 32 म्हणून गिदोनाने बआल दैवताची वेदी विध्वंस केली, त्या दिवशी त्यांनी त्याला “यरूब्बआल” असे नाव दिले, त्याचा अर्थ, “बआल दैवतानेच त्याचा विरोध करावा,” असा होता. \p \v 33 त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्‍यात तळ दिला. \v 34 तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले. \v 35 त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली. \p \v 36 गिदोन परमेश्वराला म्हणाला, “जर तुम्ही इस्राएलला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या हातांनी वाचवाल— \v 37 पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.” \v 38 आणि अगदी तसेच घडून आले. दुसर्‍या दिवशी सकाळी गिदोन उठला; त्याने ती लोकर दाबली आणि तिच्यातील दहिवर पिळले—एक वाटीभर पाणी काढले. \p \v 39 नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.” \v 40 त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली. \c 7 \s1 गिदोन मिद्यान्यांचा पराभव करतो \p \v 1 अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्‍यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्‍यात होता. \v 2 याहवेह गिदोनाला म्हणाले, “तुझ्याकडे खूप जास्त लोक आहेत. मी मिद्यानी लोकांना तुमच्या हातात देणार नाही; नाहीतर इस्राएलचे लोक माझ्यासमोर गर्व करून म्हणतील की, ‘आमच्याच बळाने आम्ही स्वतःला वाचविले आहे.’ \v 3 आता सैन्यांना सूचना दे, ‘जर कोणी घाबरत असतील, तर त्यांनी गिलआद डोंगरावरून माघारी जावे.’ ” त्यामधून बावीस हजार लोक परत गेले व दहा हजार राहिले. \p \v 4 परंतु याहवेह गिदोनास म्हणाले, “अजूनही पुष्कळ लोक आहेत. त्यांना पाण्याजवळ घेऊन चल आणि तिथे मी त्यांना पारखून त्यांची संख्या तुझ्यासाठी कमी करेन. जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाईल,’ तो तुझ्याबरोबर जाईल; पण जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाऊ नये,’ तर त्याने तुझ्याबरोबर जाऊ नये.” \p \v 5 म्हणून गिदोनाने त्या माणसांना पाण्याजवळ नेले. तिथे याहवेहने त्याला सांगितले, “जे कुत्र्याप्रमाणे पाणी जिभेने पितात त्यांना जे गुडघे टेकून पाणी पितात त्यांच्यापासून वेगळे करा.” \v 6 त्यांच्यापैकी तीनशे जण होते जे पाणी आपल्या तोंडाजवळ घेऊन, कुत्र्यांसारखे चाटून पाणी प्याले. बाकी सर्व गुडघे टेकून पाणी प्याले. \p \v 7 याहवेहने गिदोनाला सांगितले, “जे चाटून पाणी प्याले, त्या तीनशे लोकांच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सोडवेन आणि मिद्यानी लोकांना तुमच्या हाती देईन. बाकी सर्वांना तू घरी पाठवून दे.” \v 8 गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली. \p त्याच्या खाली खोर्‍यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते. \v 9 त्या रात्री, याहवेह गिदोनास म्हणाले, “ऊठ, खाली छावणीवर चाल कर, कारण मी त्यांना तुझ्या हातात देणार आहे. \v 10 परंतु तुला हल्ला करण्यास भीती वाटत असेल, तर तुझा सेवक पुराहला आपल्याबरोबर घे \v 11 आणि ते काय बोलत आहे ते ऐक. त्यानंतर तू हल्ला करण्यास उत्साहित होशील.” तेव्हा तो आणि त्याचा सेवक पुराह छावणीच्या सीमेपर्यंत खाली उतरले. \v 12 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्‍यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते. \p \v 13 गिदोन तिथे पोहोचला तेव्हा एक मनुष्य आपल्या सोबत्याला स्वप्न सांगत होता. तो म्हणत होता, “मला एक स्वप्न पडले, एक जवाची गोल भाकर घरंगळत मिद्यानी छावणीत आली. तिने आपल्या तंबूला असा जोराचा धक्का दिला की तो तंबू उलटला आणि जमिनीवर भुईसपाट झाला.” \p \v 14 त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “हे इस्राएलातील योआशाचा पुत्र गिदोनाच्या तलवारीशिवाय दुसरे काही नाही. परमेश्वराने मिद्यानी व त्यांची संपूर्ण छावणी त्याच्या हाती दिली आहे.” \p \v 15 जेव्हा गिदोनाने स्वप्न व त्याचा अर्थ ऐकला, तेव्हा तिथे त्याने दंडवत घातले आणि उपासना केली. तो इस्राएली लोकांच्या छावणीत लोकांकडे परतला आणि म्हणाला, “उठा! कारण मिद्यानी लोकांची छावणी याहवेहने तुमच्या हातात दिली आहे.” \v 16 मग गिदोनाने आपल्या तीनशे सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या आणि प्रत्येकाला एक रणशिंग व मातीचे एक रिकामे मडके दिले, त्या मडक्यात एकेक मशाल होती. \p \v 17 तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहत राहा आणि जसे मी करतो तसे करा. मी छावणीच्या सीमेवरील टोकावर पोहोचल्यावर जसे मी करतो तसेच करा. \v 18 मी व माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी आमची रणशिंगे फुंकल्यानंतर तुम्हीही छावणीच्या सर्व बाजूंना तुमची रणशिंगे फुंका आणि मोठ्याने ओरडून म्हणा, ‘याहवेहसाठी व गिदोनासाठी.’ ” \p \v 19 गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले. \v 20 तीनही दलांनी रणशिंग फुंकले आणि मडके फोडले. आपल्या डाव्या हातात मशाली धरून आणि उजव्या हातात रणशिंगे धरून जे फुंकणार होते, ते ओरडले, “याहवेहसाठी आणि गिदोनासाठी तलवार!” \v 21 प्रत्येक व्यक्ती छावणीच्या सभोवताली आपल्या स्थानी उभे राहिले, सर्व मिद्यानी लोक पळू लागले, ते पळत असता मोठ्याने ओरडत पळाले. \p \v 22 जेव्हा तीनशे रणशिंगे फुंकली, याहवेहने छावणीतील संपूर्ण पुरुषांची तलवार त्यांच्याच साथीदारावर चालविली. सैन्य सरेराहनजीकच्या बेथ-शिट्टाहपर्यंत व टब्बाथा नजीकच्या आबेल-महोलाहच्या सीमेपर्यंत पळून गेले. \v 23 तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला. \v 24 गिदोनाने एफ्राईमच्या सर्व डोंगराळ प्रदेशात आपले दूत पाठवून हा संदेश दिला, “खाली येऊन मिद्यानाशी लढून बेथ-बाराहपर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” \p म्हणून एफ्राईमच्या सर्व लोकांना बोलाविण्यात आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंत यार्देन नदीचा उतार रोखून धरला. \v 25 त्यांनी ओरेब व जेब नावांच्या दोन मिद्यानी पुढार्‍यांनाही पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ मारले. मग इस्राएली लोकांनी मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची शिरे यार्देनेपलीकडे गिदोनाकडे आणली. \c 8 \s1 जेबह व सलमुन्ना \p \v 1 आता एफ्राईमचे लोक गिदोनाला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागला? जेव्हा तू मिद्यानी लोकांशी युद्ध करावयास गेला तर आम्हाला का बोलाविले नाही?” आणि त्यांनी रागात गिदोनासह वाद घातला. \p \v 2 परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या तुलनेत मी काय साध्य केले आहे? एफ्राईमच्या द्राक्षांचा सरवा हा अबिएजेराच्या द्राक्षाच्या पूर्ण कापणीपेक्षा चांगला नाही काय? \v 3 परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला. \p \v 4 मग गिदोन आणि त्याचे तीनशे लोक थकून गेलेले होते तरीही ते त्यांचा पाठलाग करीत यार्देन किनारी आले आणि पलीकडे गेले. \v 5 तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.” \p \v 6 परंतु सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, “आता तुझ्या हातात जेबह व सलमुन्नाचे हात आहेत का? मग आम्ही तुझ्या सैन्याला भाकरी का द्यावी?” \p \v 7 त्यावर गिदोन म्हणाला, “याहवेह जेव्हा जेबह व सलमुन्नाला माझ्या हाती देतील, तेव्हा मी रानातील काटे व काटेरी झुडपांनी तुमच्या शरीराचे मांस फाडेन.” \p \v 8 मग तो तिथून पेनुएल\f + \fr 8:8 \fr*\fq पेनुएल \fq*\ft काही हस्तलेखात \ft*\fqa पेनुएल\fqa*\f* येथे गेला आणि तिथेही त्याने तीच विनंती केली, पण त्यांनी देखील सुक्कोथ येथील लोकांप्रमाणे उत्तर दिले. \v 9 म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.” \p \v 10 आता जेबह राजा व सलमुन्ना राजा आपल्या उरलेल्या पंधरा हजार सैनिकांसह कर्कोर येथे पोहोचले होते, पूर्वेकडील देशांच्या मित्र सेनांपैकी तेवढेच सैनिक उरले होते; कारण त्यांचे एक लाख वीस हजार सैनिक आधीच ठार झालेले होते. \v 11 मग गिदोनाने नोबाह व योगबेहाहच्या पूर्वेस राहुट्यात राहणार्‍या लोकांच्या वाटेने वर जाऊन बेसावध सेनेवर अचानक हल्ला चढविला. \v 12 जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली. \p \v 13 योआशाचा पुत्र गिदोन युद्धावरून हेरेसच्या खिंडीतून परत आला. \v 14 तिथे त्याने सुक्कोथातील एका तरुणास पकडले व त्याला विचारले आणि त्या तरुणाने सुक्कोथ येथील सर्व सत्याहत्तर अधिकारी आणि वडीलजनांची नावे लिहून दिली. \v 15 मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ” \v 16 मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला. \v 17 त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला. \p \v 18 मग गिदोनाने जेबह राजा व सलमुन्ना राजाला विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांना ठार केले ते कसे होते?” \p त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच, प्रत्येकजण राजपुत्राप्रमाणे दिसत होते.” \p \v 19 गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.” \v 20 मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला. \p \v 21 जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले. \s1 गिदोनाचा एफोद \p \v 22 आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.” \p \v 23 परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.” \v 24 आणि गिदोन म्हणाला, “माझी एक विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या लुटीतील एक कुंडले मला द्यावे.” (सोन्याची कुंडले घालण्याची इश्माएली लोकांची प्रथा होती.) \p \v 25 त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला ते देण्यास आनंद होईल.” म्हणून त्यांनी एक वस्त्रे पसरले आणि त्यांच्यातील प्रत्येकाने आपल्या लुटीतील एकेक कुंडले तिथे टाकली. \v 26 त्याने मागितलेल्या कुंडलांचे वजन एक हजार सातशे शेकेल,\f + \fr 8:26 \fr*\ft अंदाजे 20 कि.ग्रॅ.\ft*\f* याखेरीज त्याला चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळ्याही मिळाल्या. \v 27 गिदोनाने त्या सोन्याचे एक एफोद करून आपले नगर ओफराह येथे ठेवले. सर्व इस्राएली लोकांनी त्याची उपासना करून व्यभिचार केला आणि ते गिदोन आणि त्याच्या कुटुंबासाठी पाश असे झाले. \s1 गिदोनचा मृत्यू \p \v 28 अशा प्रकारे इस्राएली लोकांपुढे मिद्यानी वश झाले आणि त्यांनी आपले डोके पुन्हा कधीही वर काढले नाही. आणि गिदोनाच्या सर्व हयातीत चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली. \p \v 29 योआशचा पुत्र यरूब्बआल राहण्यासाठी घरी परतला. \v 30 गिदोनाला एकूण सत्तर पुत्र झाले, कारण त्याला अनेक पत्नी होत्या. \v 31 शेखेमातही त्याला एक उपपत्नी होती. तिने त्याला एक पुत्र दिला. त्याचे नाव अबीमेलेख असे होते. \v 32 योआशचा पुत्र गिदोन पूर्ण वयातीत होऊन मरण पावला व त्याला अबियेजर्‍यांच्या ओफराह येथे त्याचा पिता योआशच्या कबरेत पुरण्यात आले. \p \v 33 गिदोन मरण पावल्याबरोबर, इस्राएली लोकांनी बआल दैवताच्या मागे लागून पुन्हा व्यभिचार केला. त्यांनी बआल-बरीथची दैवत म्हणून स्थापना केली \v 34 आणि ज्या याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने, त्यांच्या चहूकडील शत्रूंच्या हातातून सोडविले होते, त्यांचे स्मरण ठेवले नाही. \v 35 तसेच इस्राएलसाठी सगळ्या चांगल्या गोष्टी करूनही त्यांनी यरूब्बआल (म्हणजे गिदोन) च्या घराण्यावर काहीही निष्ठा दाखविली नाही. \c 9 \s1 अबीमेलेखाची कारकीर्द \p \v 1 यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला, \v 2 “तुम्ही शेखेमातील सर्व नागरिकांना विचारा, ‘तुमच्यासाठी काय उत्तम आहे: यरूब्बआलच्या सर्व सत्तर पुत्रांनी किंवा एक व्यक्तीने तुमच्यावर राज्य करावे?’ स्मरण ठेवा मी तुमच्या रक्तामांसाचा आहे.” \p \v 3 जेव्हा बंधूंनी हे सर्व शेखेमातील नागरिकांना सांगितले, त्यांनी अबीमेलेखाचे अनुसरण करण्याचे ठरविले, कारण ते म्हणाले, “तो आमचा नातेवाईक आहे.” \v 4 त्यांनी त्याला बआल-बरीथ मंदिरातील सत्तर शेकेल\f + \fr 9:4 \fr*\ft अंदाजे 800 ग्रॅ.\ft*\f* चांदी दिली आणि अबीमेलेखाने ती अविचारी व लुच्ची माणसे त्याच्यामागे चालण्यासाठी उपयोगी आणली. \v 5 तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला. \v 6 तेव्हा शेखेमातील आणि बेथमिल्लोतील सर्व नागरिकांनी एक सभा बोलावली आणि शेखेमातील स्तंभाजवळील मोठ्या एलावृक्षाजवळ त्यांनी अबीमेलेखाचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. \p \v 7 जेव्हा योथामाला हे सांगण्यात आले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर उभा राहिला व त्यांना उंच वाणीने ओरडून म्हणाला, “शेखेमातील नागरिकांनो माझे ऐका, म्हणजे परमेश्वर तुमचे ऐकतील. \v 8 एकदा वृक्षांनी त्यांच्यासाठी राजाला अभिषिक्त करण्यास गेले. ते जैतून वृक्षाला म्हणाले, ‘तू आमचा राजा हो!’ \p \v 9 “परंतु जैतून वृक्षाने उत्तर दिले, ‘ज्याद्वारे दैवत आणि मनुष्य या दोघांचा सन्मान होतो ते माझे तेल देणे मी सोडून इतर वृक्षांवर हलतडुलत राहावे काय?’ \p \v 10 “नंतर ते वृक्ष अंजिराच्या वृक्षास म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो!’ \p \v 11 “परंतु अंजिराच्या वृक्षाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी मी माझे माधुर्य आणि चांगली फळे देण्याचे सोडून द्यावे का?’ \p \v 12 “मग ते वृक्ष द्राक्षवेलास म्हणाले, ‘ये आणि आमचा राजा हो.’ \p \v 13 “परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’ \p \v 14 “अखेरीस सर्व वृक्ष काटेरी झुडूपाला म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो.’ \p \v 15 “ते काटेरी झुडूप त्या वृक्षांना म्हणाला, ‘तुमचा राजा म्हणून माझा अभिषेक व्हावा अशी तुमची इच्छा आहे, हे जर सत्य असेल तर या आणि माझ्या सावलीचा आश्रय घ्या; पण जर तसे नसेल तर काटेरी झुडूपातून अग्नी निघो व तो लबानोनाचे गंधसरू भस्म करून टाको!’ \p \v 16 “तुम्ही अबीमेलेखाचा तुमचा राजा करून सन्मानाने आणि चांगल्या विश्वासाने वागलात काय? यरूब्बआल आणि त्याचा कुटुंबासाठी योग्य ते केले आहे का? ज्या योग्यतेचा तो आहे, त्याप्रमाणे त्याच्याशी वागलात का? \v 17 आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. \v 18 परंतु आज तुम्ही माझ्या पित्याच्या कुटुंबाविरुद्ध बंड केले व तुम्ही त्याच्या सत्तर पुत्रांचा एका दगडावर वध केला आणि आता अबीमेलेख जो एक दासीचा पुत्र आहे, त्याला शेखेमातील नागरिकांवर राजा केले आहे, कारण तो तुमचा नातेवाईक आहे. \v 19 आज तुम्ही यरूब्बआल आणि त्याच्या कुटुंबासोबत सन्मानाने आणि सदिच्छेने वागलात काय? तर मग अबीमेलेख तुमचा आनंद होवो आणि तुम्ही त्याचा आनंद होवो! \v 20 परंतु जर तसे नाही, तर अबीमेलेखातून अग्नी निघून तुम्हाला, शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकांना भस्म करो आणि शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकातून अग्नी निघून अबीमेलेखाला भस्म करो!” \p \v 21 मग योथाम निसटून गेला व आपला भाऊ अबीमेलेखाच्या भीतीमुळे बैर येथे जाऊन राहिला. \p \v 22 अबीमेलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केल्यानंतर, \v 23 परमेश्वराने अबीमेलेख व शेखेमाच्या नागरिकांमध्ये वैर निर्माण केले, ज्यामुळे त्यांनी अबीमेलेखाचा विश्वासघात केला. \v 24 यरूब्बआलाच्या सत्तर पुत्रांचा विरोधात केलेल्या अपराधाचा, त्यांचा रक्तपात करण्याचा, त्यांचा भाऊ अबीमेलेख आणि शेखेमाच्या नागरिकांवर ज्यांनी अबीमेलेखाचा त्याच्या बंधूंची हत्या करण्यास साहाय्य केले होते, त्यांचा सूड घेण्यास परमेश्वराने असे केले. \v 25 शेखेमाच्या नागरिकांनी त्याच्याविरुद्ध डोंगराच्या माथ्यावर वाटेवर दबा धरण्यास लोक ठेवले आणि त्या वाटेने जाणार्‍या येणार्‍या प्रत्येकाला ते लुबाडू लागले आणि हे कोणीतरी अबीमेलेखाचा सांगितले. \p \v 26 मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला. \v 27 नंतर ते शेतात गेले आणि द्राक्षे गोळा केली आणि ती तुडविली व त्यांच्या दैवताच्या मंदिरात उत्सव केला. ते खातपीत असताना त्यांनी अबीमेलेखाला शाप दिला. \v 28 नंतर एबेदचा पुत्र गाल म्हणाला, “अबीमेलेख कोण आहे आणि आम्ही शेखेमी लोकांनी त्याची चाकरी का करावी? तो यरूब्बआलाचा पुत्र नाही का आणि त्याचा कारभारी जबुल नाही का? शेखेमचा पिता हमोरच्या कुटुंबाची तुम्ही सेवा करा! अबीमेलेखाच्या कुटुंबाची आम्ही सेवा का करावी? \v 29 जर हे लोक माझ्या अधिकारात असते तर किती बरे झाले असते! तेव्हाच मी अबीमेलेखाला काढून टाकले असते. मी अबीमेलेखाला म्हणेन, ‘तुझे संपूर्ण सैन्य घेऊन बाहेर पड आणि लढाई कर!’ ” \p \v 30 परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला. \v 31 त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत. \v 32 म्हणून आता तू आणि तुझे लोक रात्री या आणि शेतांमध्ये दबा धरून बसा. \v 33 सकाळी अगदी सूर्योदय झाल्याबरोबर शहरावर स्वारी कर. जेव्हा गाल आणि त्याचे लोक तुझ्याविरुद्ध लढण्यास बाहेर येतील, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी पाहा.” \p \v 34 तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले. \v 35 आता एबेदचा पुत्र गाल बाहेर आला आणि शहराच्या वेशीजवळ उभा राहिला, अबीमेलेख आणि त्याचे सैन्य जे दबा धरून बसले होते तेही बाहेर आले. \p \v 36 जेव्हा गालने त्यांना पाहिले, तेव्हा तो जबुलास म्हणाला, “पाहा, डोंगराच्या शिखरांवरून लोक उतरत आहेत!” \p जबुल त्याला म्हणाला, “नाही, ती केवळ डोंगराची सावली आहे जी तुला माणसांसारखी दिसत आहे.” \p \v 37 परंतु गाल परत म्हणाला: “पाहा, मध्य उंचवट्यापासून\f + \fr 9:37 \fr*\ft या इब्री शब्दाचा अर्थ \ft*\fqa पृथ्वीची नाभी\fqa*\f* लोक खाली येत आहेत आणि दैवप्रश्न करणाऱ्यांच्या एला वृक्षाच्या मागील वाटेने टोळी येत आहे.” \p \v 38 तेव्हा जबुल त्याला म्हणाला, “आता तुझे ते मोठेपणाचे बोलणे कुठे आहे, तू जे बोलला होता, ‘अबीमेलेख कोण आहे की त्याची चाकरी करावी?’ हीच माणसे आहेत ना ज्यांची तू थट्टा केली होती? तर बाहेर जा आणि त्यांच्याशी लढ!” \p \v 39 तेव्हा गालने\f + \fr 9:39 \fr*\ft किंवा \ft*\fqa च्या दृष्टिआड गेला\fqa*\f* शेखेमाच्या नागरिकांना लढण्यासाठी नेले व अबीमेलेखाशी तो लढला. \v 40 नंतर अबीमेलेखाने त्याचा वेशीच्या प्रवेश दारापर्यंत पाठलाग केला आणि पळून जात असता अनेक मृत्युमुखी पडले. \v 41 मग अबीमेलेख अरुमा येथे राहिला आणि जबुलाने गाल आणि त्याच्या भाऊबंदांना शेखेमातून घालवून दिले. \p \v 42 दुसर्‍या दिवशी शेखेमातील लोक बाहेर शेतात गेले आणि अबीमेलेखाला ही बातमी देण्यात आली. \v 43 म्हणून त्याने लोक घेतले, त्यांना तीन तुकड्या मध्ये विभाजित केले व ते शेतांमध्ये दबा धरून बसले. जेव्हा त्याने पहिले की लोक शहरातून बाहेर येत आहेत, तेव्हा त्याने उठून त्यांच्यावर हल्ला केला. \v 44 अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला. \v 45 संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले. \p \v 46 हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला \v 47 जेव्हा अबीमेलेखाने हे ऐकले की नागरिक शेखेमाच्या बुरुजात एकत्र झाले आहेत, \v 48 अबीमेलेख आणि त्याची सर्व माणसे सलमोन डोंगराकडे गेले. त्याने कुर्‍हाड घेतली आणि झाडांच्या फांद्या तोडून, त्या आपल्या खांद्यावर उचलून ठेवल्या. त्याने आपल्या लोकांना आदेश दिला, “त्वरा करा! तुम्ही मला जे करताना पाहिले तसेच करा!” \v 49 म्हणून सर्व माणसांनी फांद्या तोडल्या आणि अबीमेलेखाच्या मागे चालले. त्यांनी फांद्यांची रास बुरुजाच्या चहूबाजूंनी लावली आणि लोक आत असता त्याला आग लावली. अशा रीतीने शेखेमाच्या बुरुजामध्ये असलेले सुमारे एक हजार स्त्रीपुरुष मरण पावले. \p \v 50 त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले. \v 51 त्या शहरात एक मजबूत बुरूज होता, ज्यामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया—शहरातील सर्व लोक—बुरुजाकडे पळाले. त्यांनी स्वतःला आतमध्ये बंद करून घेतले आणि बुरुजाच्या छतावर चढले. \v 52 अबीमेलेख बुरुजाकडे गेला आणि त्याने त्यावर हल्ला केला. पण बुरुजाला आग लावण्यासाठी तो प्रवेशद्वाराजवळ गेला असताना, \v 53 एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला. \p \v 54 त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला. \v 55 जेव्हा इस्राएली लोकांनी अबीमेलेख मृत झाल्याचे पाहिले, तेव्हा ते आपापल्या घरी परतले. \p \v 56 अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांचे वध करून आपल्या वडिलांविरुद्ध जी दुष्टाई केली होती, तिची परतफेड परमेश्वराने अशा रीतीने केली. \v 57 शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला. \c 10 \s1 तोला \p \v 1 अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे. \v 2 तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व\f + \fr 10:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्याय केला\fqa*\f* केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली. \s1 याईर \p \v 3 त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. \v 4 त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर\f + \fr 10:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa याईराची वस्ती\fqa*\f* म्हणून संबोधली जातात. \v 5 याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. \s1 इफ्ताह \p \v 6 इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले. \v 7 यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले. \v 8 ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला. \v 9 तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते. \v 10 तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.” \p \v 11 याहवेहने इस्राएली लोकांना उत्तर दिले, “जेव्हा इजिप्ती, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी, \v 12 सीदोनी, अमालेकी व माओनी\f + \fr 10:12 \fr*\ft काही इब्री मूळ प्रतींनुसार \ft*\fqa मिद्यानी\fqa*\f* या सर्वांनी तुमच्यावर अत्याचार केला आणि तुम्ही माझ्या मदतीसाठी धावा केला आणि मी तुम्हाला सोडविले नाही काय? \v 13 परंतु तुम्ही माझा त्याग केला आणि इतर दैवतांची सेवा करू लागले, म्हणून यापुढे मी तुम्हाला सोडविणार नाही. \v 14 जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!” \p \v 15 परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.” \v 16 नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही. \p \v 17 जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला. \v 18 गिलआदाच्या लोकांचे पुढारी एकमेकांना म्हणाले, “जो कोणी अम्मोनी लोकांवर हल्ला करण्यास पुढाकार घेईल तो गिलआदामध्ये राहणार्‍या सर्वांचा प्रमुख होईल.” \c 11 \p \v 1 गिलआदी इफ्ताह हा एक महान योद्धा होता. त्याच्या पित्याचे नाव गिलआद; त्याची आई एक वेश्या होती. \v 2 गिलआदाच्या पत्नीने सुद्धा त्याच्या पुत्रांना जन्म दिला आणि जेव्हा ते मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला हाकलून दिले. ते त्याला म्हणाले, “आमच्या पित्याच्या वतनातून तुला काहीही मिळावयाचे नाही, कारण तू दुसर्‍या स्त्रीचा पुत्र आहेस.” \v 3 म्हणून इफ्ताह आपल्या भावांपासून पळून गेला आणि तोब या देशात जाऊन राहिला. लवकरच त्याने गुंड लोकांची टोळी जमविली. त्या टोळीतले लोक त्याचे अनुयायी बनले व त्याच्याबरोबर राहू लागले. \p \v 4 काही वेळानंतर, अम्मोनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करू लागले. \v 5 जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले. \v 6 त्यांनी इफ्ताहाला म्हटले, “ये आणि आमचा सेनापती हो, म्हणजे आपण अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करू.” \p \v 7 गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष केला नाही का आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले होते ना? जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा आता तुम्ही मजकडे का आलात?” \p \v 8 गिलआदाच्या वडीलजनांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही तुझ्याकडे यासाठी आलो आहेत की; तू आमच्यासोबत अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास ये आणि गिलआद मधील रहिवाशांचा प्रमुख हो.” \p \v 9 गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताहाने उत्तर दिले, “समजा तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी परत नेले आणि याहवेहने ते मला दिले तर मी खरोखर तुमचा प्रमुख होईन काय?” \p \v 10 गिलआदाच्या वडिलांनी इफ्ताहाला उत्तर दिले, “याहवेह आमचे साक्षी आहेत; तुम्ही सांगाल तसे आम्ही नक्कीच करू.” \v 11 तेव्हा इफ्ताह गिलआदाच्या वडिलांसोबत गेला आणि लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख व सेनापती केले. आणि त्याने मिस्पाह येथे याहवेहसमोर आपले सर्व शब्द पुन्हा सांगितले. \p \v 12 नंतर इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूत पाठवून प्रश्न केला: “तुला माझ्याविरुद्ध काय तक्रार आहे की तू माझ्या देशावर हल्ला केला?” \p \v 13 अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.” \p \v 14 इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूतांना परत पाठवले \v 15 म्हणाला: \pm “इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही. \v 16 परंतु जेव्हा इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले, त्यांनी तांबडा समुद्र\f + \fr 11:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa अलगूजचा समुद्र\fqa*\f* ओलांडला आणि कादेश या ठिकाणी आले. \v 17 तेव्हा इस्राएली लोकांनी एदोमाच्या राजाकडे दूतांना पाठवून म्हटले, ‘आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या,’ परंतु एदोमाच्या राजाने ऐकले नाही. तसाच त्यांनी मोआबाच्या राजाकडे निरोप पाठविला आणि त्यानेही नकार दिला. म्हणून इस्राएली लोक कादेश येथेच राहिले. \pm \v 18 “नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती. \pm \v 19 “नंतर इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूतांना पाठविले. जो त्यावेळी हेशबोन येथे राज्य करीत होता आणि त्याला म्हटले, ‘आम्हाला आमच्या स्वस्थानी जाण्यासाठी तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या.’ \v 20 त्यांना त्याच्या सीमेतून जाऊ द्यावे असा विश्वास सीहोन राजाने इस्राएलवर ठेवला नाही\f + \fr 11:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa इस्राएलशी करार केला नाही\fqa*\f*. त्याने आपले सर्व सैन्य गोळा केले आणि याहसाह येथे तळ दिला आणि इस्राएलाशी युद्ध केले. \pm \v 21 “नंतर याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने सीहोन व त्याचे सर्व सैन्य इस्राएलाच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांचा पराभव केला. त्या देशात राहणार्‍या अमोरी लोकांचा सर्व देश इस्राएलने घेतला, \v 22 आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्‍यांचा सर्व प्रदेश काबीज केला. \pm \v 23 “याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराने आपल्या इस्राएली लोकांपुढून अमोर्‍यांना घालवून टाकले, तर ते परत मागण्याचा तुला कोणता अधिकार आहे? \v 24 तुझे दैवत कमोशने तुला काही वतन दिले, तर ते तू आपल्या ताब्यात ठेवणार नाहीस का? तसेच याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला जे वतन म्हणून देत आहे, ते आम्ही आमच्याच ताब्यात ठेवू. \v 25 सिप्पोरचा पुत्र मोआबाचा राजा बालाकहून आपण श्रेष्ठ आहोत, असे तुला वाटते काय? त्याने इस्राएलशी कधी भांडण केले का किंवा त्यांच्याशी त्याने युद्ध केले काय? \v 26 तीनशे वर्षे इस्राएलने हेशबोन, अरोएर, आजूबाजूच्या वसाहती आणि आर्णोनच्या बाजूची सर्व नगरे ताब्यात घेतली. त्या काळात तुम्ही त्यांना पुन्हा का घेतले नाही? \v 27 मी तुझ्याविरुद्ध काही अपराध केलेला नाही, उलट तूच माझ्याशी लढण्यासाठी येऊन माझ्यावर अन्याय करीत आहेस. याहवेह जे न्यायी आहेत, ते इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांच्यामध्ये आज न्याय करोत.” \m \v 28 अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाने पाठविलेल्या संदेशाकडे अजिबात लक्ष दिले नाही. \p \v 29 मग याहवेहचा आत्मा इफ्ताहावर आला. तो गिलआद व मनश्शेह पार करून गिलआदाच्या मिस्पेह येथे गेला आणि तिथून त्याने अम्मोनी लोकांवर आक्रमण केले. \v 30 इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल, \v 31 आणि जेव्हा मी अम्मोन्यांकडून सुरक्षित परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जे काही मला भेटायला येईल ते याहवेहचे असेल आणि मी त्याचा होमार्पण म्हणून यज्ञ करेन.” \p \v 32 नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले. \v 33 अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले. \p \v 34 जेव्हा इफ्ताह मिस्पाह येथे आपल्या घरी परतला, त्याची कन्या डफ वाजवित व आनंदाने नृत्य करीत त्याला भेटण्यास बाहेर आली! ती त्याची एकुलती एक कन्या होती, तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती. \v 35 जेव्हा त्यांना तिला पाहिले, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो आकांत केला, “हाय, हाय, माझ्या कन्ये! तू मला मातीत मिळविले आहेस आणि तू माझ्या शोकाचे कारण झाली आहेस! कारण मी याहवेहला नवस केला आहे, जो आता मला मागे घेता येत नाही.” \p \v 36 “माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे. \v 37 परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.” \p \v 38 त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, तू जाऊ शकते.” त्याने तिला दोन महिन्यांसाठी जाऊ दिले. ती आणि तिच्या सख्या डोंगरावर गेल्या आणि तिचा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक केला. \v 39 दोन महिन्यानंतर ती आपल्या पित्याकडे परत आली आणि त्याने नवस केल्याप्रमाणे तिच्यासोबत केले आणि ती कुमारिका होती. \p त्यानंतर इस्राएली लोकांमध्ये प्रथा पडली, \v 40 की प्रत्येक वर्षी इस्राएली कुमारिकांनी चार दिवस डोंगरांवर जावे आणि गिलआदी इफ्ताहाच्या कन्येच्या स्मरणात शोक करावा. \c 12 \s1 इफ्ताह आणि एफ्राईम \p \v 1 मग एफ्राईमच्या लोकांनी आपले सैन्य एकवटली आणि ते पार होऊन साफोन येथे आले. ते इफ्ताहाला म्हणाले, “आम्हाला सोबत न घेता तू अम्मोन्यांशी लढावयास का गेलास? आता आम्ही तुझ्यासह तुझे घर जाळून टाकणार आहोत.” \p \v 2 इफ्ताहाने प्रत्युत्तर दिले, “मी आणि माझ्या लोकांचे अम्मोन्यांशी फार मोठे भांडण झाले आणि मी तुम्हाला बोलाविले देखील होते, पण तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडविले नाही. \v 3 जेव्हा मी हे पहिले तुम्ही मदतीला येत नाही, तेव्हा मी माझा जीव मुठीत घेतला आणि अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि याहवेहने मला त्यांच्यावर विजय दिला. मग आज तुम्ही आमच्याविरुद्ध लढावयास का आले?” \p \v 4 मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.” \v 5 गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,” \v 6 ते म्हणत, “ठीक आहे मग ‘शिब्बोलेथ म्हण.’ ” जर तो “सीब्बोलेथ,” म्हणाला, कारण तो ते शब्द नीट उच्चारू शकला नाही, तर ते त्याला धरत आणि त्याला यार्देनेच्या उतारावर ठार करीत. त्यावेळी एफ्राईमचे बेचाळीस हजार लोक ठार झाले. \p \v 7 इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व\f + \fr 12:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्याय केला\fqa*\f* केले. मग गिलआदी इफ्ताह मरण पावला आणि त्याला गिलआदाच्या एका गावात पुरण्यात आले. \s1 इब्झान, एलोन आणि अब्दोन \p \v 8 त्याच्यानंतर बेथलेहेमच्या इब्झानने इस्राएलचे नेतृत्व केले. \v 9 त्याला तीस पुत्र आणि तीस कन्या होत्या. त्याने आपल्या कन्यांचा विवाह परकीय कुळात केला आणि आपल्या पुत्रांसाठी त्याने तीस तरुण स्त्रियांना परकीय कुळांतून आणल्या. इब्झानने इस्राएलचे नेतृत्व सात वर्षे केले. \v 10 नंतर इब्झान मरण पावला आणि त्याला बेथलेहेमात मूठमाती देण्यात आली. \p \v 11 त्याच्यानंतर एलोन जबुलून याने दहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. \v 12 मग एलोन मरण पावला आणि त्याला जबुलून देशातील अय्यालोनमध्ये पुरण्यात आले. \p \v 13 त्याच्यानंतर पिराथोन येथील हिल्लेलचा मुलगा अब्दोन याने इस्राएलचे नेतृत्व केले. \v 14 त्याला चाळीस पुत्र आणि तीस नातू होते, ते सत्तर गाढवांवर स्वार होते. त्याने आठ वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. \v 15 मग हिल्लेलचा पुत्र अब्दोन मरण पावला आणि त्याला अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात एफ्राईममधील पिराथोन येथे पुरण्यात आले. \c 13 \s1 शमशोनाचा जन्म \p \v 1 पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, म्हणून याहवेहने त्यांना चाळीस वर्षे पलिष्टी लोकांच्या अंमलाखाली ठेवले. \p \v 2 दान कुळातील सोराह येथील एक मनुष्य होता, ज्याचे नाव मानोहा होते, त्याची पत्नी होती, जी वांझ असून ती लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती. \v 3 याहवेहच्या दूताने तिला दर्शन दिले आणि म्हणाला, “तू वांझ आहे आणि तुला मूल नाही, तरीपण तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील. \v 4 तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस. \v 5 कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर असा होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.” \p \v 6 तेव्हा ती स्त्री आपल्या पतीकडे गेली आणि त्याला सांगितले, “परमेश्वराचा एक पुरुष माझ्याकडे आला. तो परमेश्वराच्या दूतासारखा दिसत होता, अतिशय अद्भुत. तो कुठून आला होता हे मी त्याला विचारले नाही आणि त्याने आपले नावही मला सांगितले नाही. \v 7 परंतु त्याने मला सांगितले, ‘तू गर्भवती होशील आणि एक पुत्रास जन्म देशील. आतापासून द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नको, अशुद्ध असे काहीही खाऊ नको, कारण ते बाळ, तो पुत्र गर्भावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत परमेश्वराचा नाजीर असा होईल.’ ” \p \v 8 तेव्हा मानोहाने याहवेहला प्रार्थना केली: “हे प्रभू, तुमच्या सेवकाला क्षमा करा. परमेश्वराचा दूत पुन्हा आमच्याकडे येईल असे करा म्हणजे जे बाळ जन्मास येणार आहे त्याचे संगोपन कसे करावे ते आम्हास शिकवेल.” \p \v 9 परमेश्वराने मानोहानाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि परमेश्वराचा दूत परत त्या स्त्रीकडे आला, जेव्हा ती शेतात बसलेली होती; परंतु तिचा पती मानोहा तिच्याबरोबर नव्हता \v 10 म्हणून ती स्त्री लगबगीने आपल्या पतीस सांगण्यास गेली, “जो पुरुष त्या दिवशी माझ्या दृष्टीस पडला होता तो इथे आहे!” \p \v 11 मानोहा उठला आणि आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी गेला, तो त्या पुरुषाजवळ गेला व त्याला विचारले, “त्या दिवशी माझ्या पत्नीशी बोलणारे आपणच आहात का?” \p त्याने उत्तर केले, “मीच आहे.” \p \v 12 “तेव्हा मानोहाने त्याला विचारले, जेव्हा तुमचे शब्द पूर्ण होतील तेव्हा त्या बाळाच्या कार्यासाठी व जीवनासाठी कोणते नियम असावे?” \p \v 13 याहवेहच्या दूताने मानोहाला उत्तर दिले, “तुझ्या पत्नीने जे मी तिला सांगितले आहे ते सर्व तिने करावे. \v 14 तिने द्राक्षाच्या वेलीतून आलेले कोणतेही उपज खाऊ नये, द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये किंवा जे अशुद्ध आहे असे काहीही खाऊ नये. ज्या सर्व आज्ञा तिला दिल्या आहेत त्या तिने पाळाव्या.” \p \v 15 मानोहा याहवेहच्या दूतास म्हणाला, “आम्ही आपणासाठी करडू तयार करेपर्यंत आपण येथेच थांबावे.” \p \v 16 याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तुम्ही मला रोखून धरले तरी मी तुमचे भोजन खाणार नाही. पण जर तुम्ही होमार्पण तयार केले तर ते याहवेहला अर्पण करा.” (हा याहवेहचा दूत आहे, हे अद्यापही मानोहाला समजले नव्हते.) \p \v 17 नंतर मानोहाने याहवेहच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? म्हणजे तुमचे शब्द खरे ठरल्यानंतर आम्ही तुमचा आदर करू.” \p \v 18 याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तू माझे नाव का विचारतो? हे समजण्यापलीकडे आहे.\f + \fr 13:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa सुंदर आहे\fqa*\f*” \v 19 मग मानोहाने एक तरुण करडू घेतले आणि ते अन्नबलीसह याहवेहला एका खडकावर अर्पिले. आणि जेव्हा मानोहा आणि त्याची पत्नी हे पाहत असताना याहवेहने आश्चर्यकारक कृत्ये केली: \v 20 मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना वेदीवरून आकाशाकडे उफाळून वर जाणार्‍या अग्नीच्या ज्वालेवर याहवेहच्या दूताने आरोहण केले. ते पाहून मानोहा आणि त्याची पत्नी यांनी दंडवत घातले. \v 21 जेव्हा याहवेहचा दूत मानोहा आणि त्याच्या पत्नीला परत प्रकट झाला नाही, तेव्हा मानोहाला हे कळले की तो याहवेहचा दूत होता. \p \v 22 “आता आपला मृत्यू निश्चित आहे!” मानोहा त्याच्या पत्नीला म्हणाला. “आम्ही परमेश्वराला पाहिले आहे!” \p \v 23 परंतु त्याची पत्नीने उत्तर दिले, “जर याहवेहला आपल्याला मारून टाकावयाचे असते, तर त्यांनी आपल्या हातांनी होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपल्याला या सर्व अद्भुत गोष्ट प्रकट केली नसती वा आपल्याला सांगितलीही नसती.” \p \v 24 मग त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव शमशोन ठेवले. तो वाढत गेला आणि याहवेहने त्याला आशीर्वाद दिला, \v 25 सोराह आणि एष्टाओल यांच्यामध्ये महनेह दान येथे असताना याहवेहचा आत्मा त्याला प्रवृत्त करू लागला. \c 14 \s1 शमशोनाचा विवाह \p \v 1 शमशोन खाली तिम्नाह येथे गेला आणि तिथे त्याने एक सुंदर पलिष्टी स्त्री पाहिली. \v 2 तिथून परत आल्यावर, तो आपल्या आईवडिलांना म्हणाला, “मी तिम्नाह इथे एक पलिष्टी स्त्री पाहिली आहे; मला ती माझी पत्नी करून द्या.” \p \v 3 त्याच्या आईवडिलांनी प्रत्युत्तर दिले, “तुझ्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या सर्व लोकांमध्ये स्वीकार करण्यायोग्य स्त्री नाही काय? सुंता न झालेल्या पलिष्टी लोकांकडे पत्नी मिळविण्यासाठी जावे काय?” \p परंतु शमशोनाने आपल्या वडिलांना म्हटले, “मला तीच हवी आहे. ती माझ्यासाठी योग्य आहे.” \v 4 (त्याच्या आईवडिलांना हे कळले नाही की हे याहवेहकडून आहे, जे पलिष्ट्यांना विरोध करण्याच्या संधीची वाट पाहत होते; कारण त्यावेळी ते इस्राएलावर राज्य करीत होते.) \p \v 5 शमशोन त्यांच्या आईवडिलांसोबत खाली तिम्नाह येथे गेला. ते तिम्नाह येथील द्राक्षांच्या मळ्यांजवळ पोहोचले असता, अचानक एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला. \v 6 याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर आला जेणेकरून त्याने आपल्या हाताने एखादी शेळी फाडावे त्याप्रमाणे त्याने त्या सिंहाचे जबडे फाडून ते अलग केले. परंतु त्याने त्याबद्दल आपल्या वडिलांना किंवा आईला काहीही सांगितले नाही. \v 7 नंतर शमशोन खाली गेला आणि त्या स्त्रीसह बोलला आणि ती त्याला प्रिय वाटली. \p \v 8 काही वेळानंतर, जेव्हा तो तिच्यासोबत विवाह करण्यासाठी परत आला, आडवाट करून तो सिंहाचे कलेवर पाहण्यास गेला आणि त्यामध्ये त्याने मधमाश्यांचा थवा आणि काही मध पाहिला. \v 9 त्याने आपल्या हाताने तो मध घेतला आणि वाटेने मध खात खात तो पुढे गेला. जेव्हा तो आपल्या आईवडिलांजवळ पोहोचला तेव्हा त्यांनाही काही मध दिला आणि त्यांनीही तो खाल्ला. परंतु तो त्याने सिंहाच्या कलेवरातून आणला आहे, हे त्याने त्यांना सांगितले नाही. \p \v 10 आता त्याचे वडील त्या स्त्रीला बघायला खाली गेले. आणि तिथे शमशोनाने तरुणांच्या प्रथेप्रमाणे मेजवानी दिली. \v 11 जेव्हा लोकांनी त्याला पाहिले, तेव्हा त्यांनी तीस लोकांना त्याचे साथीदार म्हणून निवडले. \p \v 12 शमशोन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला एक कोडे सांगतो, तुम्ही मला सणाच्या सात दिवसांत उत्तर देऊ शकलात तर मी तुम्हाला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे देईन. \v 13 जर तुम्ही मला उत्तर सांगू शकत नसाल, तर तुम्ही मला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे द्याल.” \p “तुझे कोडे आम्हाला सांग,” ते म्हणाले. “चला ऐकू या.” \p \v 14 त्याचे कोडे असे होते \q1 “खाणार्‍यातून अन्न; \q2 प्रबळातून माधुर्य ते काय?” \m तीन दिवसापर्यंत ते उत्तर देऊ शकले नाही. \p \v 15 चौथ्या दिवशी\f + \fr 14:15 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa सातव्या\fqa*\f* ते शमशोनाच्या पत्नीस म्हणाले, “तुझ्या पतीला फूस लावून या कोड्याचा अर्थ काढून घे नाहीतर किंवा तुझ्यासह आम्ही तुझ्या वडिलांचे घर तुम्ही मरेपर्यंत जाळून टाकू. आमची मालमत्ता चोरण्यासाठी आम्हाला या मेजवानीला बोलाविले होते का?” \p \v 16 तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यापुढे अश्रू गाळीत म्हणाली, “तुम्ही माझा द्वेष करता! तुम्ही माझ्यावर प्रीती करीत नाही. कारण तुम्ही माझ्या लोकांना कोडे घातले आहे, परंतु तुम्ही मला उत्तर दिले नाही.” \p तो तिला म्हणाला, “मी माझ्या वडिलांना किंवा आईला देखील कोड्याचे उत्तर सांगितलेले नाही, तर मग मी तुला ते का सांगावे?” \v 17 मेजवानीचे संपूर्ण सात दिवस ती रडली. त्यामुळे सातव्या दिवशी शेवटी त्याने तिला सांगितले, कारण ती त्याच्यावर फार दबाव टाकत होती. तिने जाऊन आपल्या लोकांना कोडे समजावून सांगितले. \p \v 18 सातव्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी नगरातील लोक त्याला म्हणाले, \q1 “मधापेक्षा गोड काय आहे? \q2 सिंहापेक्षा बलवान काय आहे?” \p शमशोन त्यांना म्हणाला, \q1 “तुम्ही माझ्या कालवडीने नांगरणी केली नसती, \q2 तर तुम्ही माझे कोडे सोडविले नसते.” \p \v 19 नंतर याहवेहचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. तो खाली अष्कलोनला गेला, त्यांच्यापैकी तीस लोकांना मारले, त्यांच्याकडून सर्वकाही काढून टाकले आणि ज्यांनी कोडे समजावून सांगितले त्यांना त्यांचे कपडे दिले. रागाने पेटून तो आपल्या वडिलांच्या घरी परतला. \v 20 आणि शमशोनची पत्नी त्याच्या मेजवानीला उपस्थित असलेल्या त्याच्या एका सोबत्याला देण्यात आली. \c 15 \s1 पलिष्ट्यांवर शमशोनाचा सूड \p \v 1 काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देत नव्हते. \p \v 2 “मला खात्री होती की तू तिचा तिरस्कार करतोस,” तो म्हणाला, “मी तिला तुझ्या सोबत्याला दिले. तिची धाकटी बहीण अधिक आकर्षक नाही का? तिच्याऐवजी हिला घेऊन जा.” \p \v 3 शमशोन त्यांना म्हणाला, “यावेळी मला पलिष्ट्यांवर जाण्याचा अधिकार आहे; मी त्यांना शिक्षा करेन.” \v 4 म्हणून शमशोन बाहेर पडला आणि त्याने तीनशे कोल्हे पकडले आणि जोडीजोडीने त्यांच्या शेपट्या एकत्र बांधल्या. प्रत्येक दोन शेपट्यांच्या जोडीमध्ये त्याने एकएक मशाल बांधली, \v 5 मशाली पेटविल्या आणि कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात मोकळे सोडले. त्यांनी द्राक्षमळे आणि जैतुनाचे मळे आणि उभे धान्य जाळून टाकले. \p \v 6 तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” त्यांना सांगण्यात आले, लोकांनी उत्तर दिले, “हे तिम्नाहचा जावई शमशोनाने केले आहे, कारण त्याची पत्नी त्याच्या सोबत्याला देण्यात आली आहे.” \p तेव्हा पलिष्टी लोक आले व त्यांनी तिला व तिच्या पित्याला जाळून टाकले. \v 7 शमशोन त्यांना म्हणाला, “आता तुम्ही याप्रकारे वागला आहात म्हणून, मी अशी शपथ घेतो की तुमच्यावर सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.” \v 8 तेव्हा अतिशय क्रूरतेने त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी अनेकांना ठार केले. त्यानंतर तो खाली गेला आणि एटाम खडकातील गुहेत राहू लागला. \p \v 9 इकडे पलिष्टी लोक वर गेले आणि त्यांनी यहूदीयात तळ ठोकला व लेहीवर हल्ला केला. \v 10 तेव्हा यहूदीयाच्या लोकांनी विचारले, “तुम्ही आमच्यासोबत युद्ध करण्यास का आलात?” \p त्यांनी उत्तर दिले, “आम्ही शमशोनाला कैदी करून घेऊन जाण्यास आलो आहोत, कारण जसे त्याने आमचे केले तसे आम्ही त्याचे करणार आहोत.” \p \v 11 तेव्हा यहूदाहचे तीन हजार लोक खाली एटाम खडकातील गुहेकडे गेले आणि ते शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी लोक आपल्यावर राज्य करतात हे तुला माहिती नाही काय? तू आमच्यासोबत हे काय केले आहे?” \p त्याने उत्तर दिले, “ज्याप्रकारे त्यांनी माझ्याशी वर्तन केले तसेच मीही त्यांच्याशी केले.” \p \v 12 ते त्याला म्हणाले, “आम्ही तुला बांधण्यासाठी आणि तुला पलिष्टी लोकांच्या हवाली करण्यासाठी आलो आहोत.” \p शमशोन म्हणाला, “तुम्ही मला ठार मारणार नाही, अशी शपथ माझ्याजवळ खा.” \p \v 13 “आम्ही सहमत आहोत,” त्यांनी उत्तर दिले. “आम्ही फक्त तुला बांधणार आणि तुला त्यांच्या हवाली करणार. आम्ही तुला मारणार नाही.” तेव्हा त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधले आणि खडकाच्या कपारीतून बाहेर आणून वर घेऊन गेले. \v 14 जेव्हा तो लेहीला पोहोचला, तेव्हा पलिष्टी लोक ओरडत पुढे आले. याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर उतरला. ज्या दोरांनी त्याच्या दंडांना बांधले होते ते दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि त्याच्या हातांवरून गळून पडले. \v 15 मग तिथे त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले, त्याने ते उचलले आणि त्याने एक हजार पलिष्ट्यांस ठार केले. \p \v 16 मग शमशोन म्हणाला, \q1 “गाढवाच्या जाभाडाने \q2 मी राशींवर राशी पाडल्या. \q1 केवळ गाढवाच्या जाभाडाने \q2 मी हजार माणसे वधली.” \m \v 17 आपले बोलणे संपविल्यावर त्याने आपल्या हातातील ते जाभाड फेकून दिले; आणि त्या ठिकाणाचे नाव त्याने रामाथ-लेही\f + \fr 15:17 \fr*\fq रामाथ-लेही \fq*\ft म्हणजे \ft*\fqa जाभाडाची टेकडी\fqa*\f* असे ठेवले. \p \v 18 त्याला अतिशय तहान लागली होती, तेव्हा त्याने याहवेहचा धावा केला, “तुम्ही आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे. आता मी तहानेने मरावे काय आणि बेसुंती लोकांच्या हाती पडावे काय?” \v 19 तेव्हा परमेश्वराने लेहीतील खोलगट जागा दुभंगली आणि त्यातून पाणी बाहेर आले. जेव्हा शमशोन ते पाणी प्याला, तेव्हा त्याची शक्ती परत आली आणि तो ताजातवाना झाला. मग त्याने त्या ठिकाणाचे नाव एन-हक्कोरे\f + \fr 15:19 \fr*\fq एन-हक्कोरे \fq*\ft म्हणजे \ft*\fqa हाक मारणार्‍या मनुष्याचा झरा\fqa*\f* असे ठेवले. आज देखील तो झरा लेही येथे आढळतो. \p \v 20 पलिष्टी लोकांच्या काळात शमशोनाने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व\f + \fr 15:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्याय केला\fqa*\f* केले. \c 16 \s1 शमशोन आणि दलीला \p \v 1 एके दिवशी शमशोन गाझा येथे गेला, जिथे त्याने एका वेश्येला पाहिले. तिच्यासोबत रात्र घालविण्यास तो आत गेला. \v 2 गाझा येथील लोकांना सांगण्यात आले, “शमशोन येथे आला आहे!” म्हणून त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि त्याची वाट पाहत शहराच्या वेशीत रात्रभर दबा धरून बसले. त्यांनी रात्रभर कोणतीही हालचाल केली नाही, ते म्हणाले, “पहाटेस आपण त्याला ठार मारू.” \p \v 3 परंतु मध्यरात्री पर्यंत शमशोन तिथे झोपला. मग तो उठला आणि त्याने शहराच्या वेशीची दारे, दोन्ही खांब व अडसरासह जमिनीतून उखडून काढली व आपल्या खांद्यांवर ठेवून हेब्रोनासमोरील डोंगरमाथ्यावर नेली. \p \v 4 काही काळानंतर सोरेक खोर्‍यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. \v 5 पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे गेले व म्हणाले, “काहीतरी युक्ती कर आणि त्याच्या बळाचे रहस्य काय आहे आणि त्याच्यावर प्रबल होऊन, त्याला बांधून आपल्याला वश कसे करावे हे विचार. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची अकराशे शेकेल\f + \fr 16:5 \fr*\ft अंदाजे 13 कि.ग्रॅ.\ft*\f* देऊ.” \p \v 6 दलीला शमशोनास म्हणाली, “मला सांगा, तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य काय आहे आणि तुम्हाला कशाने बांधावे आणि तुम्ही शक्तिहीन व्हाल.” \p \v 7 शमशोनाने तिला उत्तर दिले, “जर मला कोणी धनुष्याच्या न सुकलेल्या ताज्या सात दोर्‍यांनी बांधले, तर मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन होईन.” \p \v 8 तेव्हा पलिष्टी अधिकार्‍यांनी तिला धनुष्याच्या न सुकलेल्या सात ताज्या दोर्‍या आणून दिल्या आणि तिने त्याला बांधून टाकले. \v 9 काही लोक खोलीत लपून होते, तिने त्याला म्हटले, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत!” परंतु अग्नीजवळ जाताच सुताचा धागा जसा सहज तुटून जातो त्याप्रमाणे शमशोनाने त्या धनुष्याच्या दोर्‍या तोडून टाकल्या जणू आणि त्याच्या बळाचे रहस्य उघडकीस आले नाही. \p \v 10 त्यानंतर दलीला शमशोनास म्हणाली, “तुम्ही मला मूर्ख बनविले आहे; तुम्ही मला खोटे सांगितले. तर आता, मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.” \p \v 11 तो म्हणाला, “ज्यांचा कधीही वापर केला नाही अशा अगदी नव्या कोर्‍या दोरांनी जर मला कोणी बांधून टाकले, तर मी इतर मनुष्यासारखा बलहीन होईन.” \p \v 12 तेव्हा दलीलाने नवीन दोर घेतले आणि त्यांनी त्याला बांधून टाकले. नंतर लोक खोलीत लपून बसलेले होते, ती त्याला म्हणाली, “शमशोन पलिष्टी लोक तुमच्यावर चालून आले आहेत!” परंतु शमशोनाने दंडाला बांधलेले दोर, सुताचा धागा तोडावा त्याप्रमाणे तोडून टाकले! \p \v 13 तेव्हा दलीलाने शमशोनास म्हटले, “आतापर्यंत तुम्ही मला मूर्ख बनविले आणि आणि मला खोटे सांगितले. मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.” \p तो तिला म्हणाला, “पाहा, माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या आणि त्या फणीने घट्ट केल्या तर मी इतर माणसांसारखा बलहीन होईन.” मग तो झोपला असताना, दलीलाने त्याच्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या \v 14 आणि ते फणीने घट्ट केल्या. \p परत ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला व त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला. \p \v 15 नंतर ती त्याला म्हणाली, “जेव्हा तुमचे हृदय माझ्यावर नाही, तेव्हा तुम्हाला कसे म्हणता येईल, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो?’ ही तिसरी वेळ आहे जेव्हा तुम्ही मला मूर्ख बनविले आहे आणि तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य सांगितले नाही.” \v 16 दररोज बोलून बोलून तिने त्याला भांडावून सोडले; त्याला जीव नकोसा झाला. \p \v 17 म्हणून त्याने तिला सर्वकाही सांगितले, “माझ्या डोक्यावर कधीही वस्तरा वापरला नाही,” तो म्हणाला, “कारण मी माझ्या आईच्या उदरात होतो तेव्हापासून मी परमेश्वराला समर्पित एक नाजीर आहे. जर माझे केस कापले गेले, तर माझी शक्ती मला सोडून जाईल आणि मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन बनेन.” \p \v 18 जेव्हा दलीलाने पाहिले की त्याने तिला सर्वकाही सांगितले आहे, तेव्हा तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांना निरोप पाठविला, “एकदा अजून या; त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांच्या हातात चांदी घेऊन परत आले. \v 19 त्याला आपल्या मांडीवर झोपविल्यानंतर, तिने कोणाला तरी बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करून घेतले आणि तिने त्याला वश\f + \fr 16:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याला अशक्त वाटू लागले\fqa*\f* करण्यास प्रारंभ केला आणि त्याचे सामर्थ्य त्याला सोडून गेले. \p \v 20 मग ती म्हणाली, “शमशोन, तुमच्यावर पलिष्टी चालून आले आहेत!” \p तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याला वाटले, “मी पूर्वीप्रमाणेच बाहेर जाईन आणि झटका मारून स्वतःस मोकळे करेन.” परंतु याहवेहने त्याला सोडले आहे, हे त्याला कळले नाही. \p \v 21 तेव्हा पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडून टाकले. नंतर ते त्याला खाली गाझा येथे घेऊन गेले. त्याला कास्याच्या साखळ्यांनी जखडून कारागृहात त्याला धान्य दळावयाला लावले. \v 22 परंतु त्याच्या डोक्यावरील केस मुंडण झाल्यानंतर पुन्हा वाढू लागले. \s1 शमशोनचा मृत्यू \p \v 23 आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोन याला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.” \p \v 24 जेव्हा त्यांनी शमशोनला पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैवताची स्तुती करीत ते म्हणाले, \q1 “आमच्या दैवताने आमच्या शत्रूला \q2 आमच्या हाती दिले आहे, \q1 जो आमच्या देशाची गांजणूक करणारा \q2 व आमच्या लोकांतील अनेकांचा संहार करणारा होता.” \p \v 25 जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. \p जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले, \v 26 तेव्हा ज्या सेवकाने त्याचा हात धरला होता त्यास शमशोन म्हणाला, “मला अशा ठिकाणी ठेव जेणेकरून ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मी चाचपडू शकेन, म्हणजे मी त्याचावर टेकेन.” \v 27 आता ते मंदिर पूर्णपणे पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते; पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तिथे होते आणि गच्चीवर सुमारे तीन हजार पुरुष आणि स्त्रिया शमशोन करीत असलेली करमणूक पाहत होते. \v 28 मग शमशोनाने याहवेहला प्रार्थना केली, अहो, सार्वभौम याहवेह माझी आठवण करा. परमेश्वरा कृपा करून आणखी एकदाच मला बळ द्या आणि म्हणजे या पलिष्ट्यांचा मी माझ्या डोळ्यांबद्दल त्याचा सूड घेऊ शकेन. \v 29 मग ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेले होते, त्यास शमशोनाने एका बाजूला त्याच्या उजव्या हाताने, आणि दुसर्‍या बाजूला डाव्या हाताने धरले, \v 30 शमशोन म्हणाला, “या पलिष्ट्यांबरोबर मलाही मृत्यू येवो!” नंतर त्याने आपल्या पूर्ण सामर्थ्याने ढकलले, आणि ते मंदिर अधिकारी आणि सर्व लोक यांच्यावर कोसळले. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याने जेवढे लोक ठार केले त्यांची संख्या, त्याने आपल्या सर्व हयातीत मारलेल्या संख्येहून अधिक होती. \p \v 31 नंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी त्याचे भाऊबंद आणि पित्याच्या घरचे सर्व कुटुंब खाली आले. त्यांनी त्याला परत आणले व सोराह आणि एष्टाओल यांच्या दरम्यान त्याचा पिता मानोहाला मूठमाती दिली होती, तिथेच त्यालाही मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. \c 17 \s1 मीखाहने केलेली मूर्तिपूजा \p \v 1 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाह नावाचा एक मनुष्य होता, \v 2 तो आपल्या आईला म्हणाला, “तुझी अकराशे शेकेल चांदीची नाणी\f + \fr 17:2 \fr*\ft अंदाजे 13 कि.ग्रॅ.\ft*\f* कोणीतरी चोरली असे तुला वाटत होते त्याबद्दल तू चोराला शाप देत होतीस ती चांदीची नाणी मीच चोरली होती.” \p तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, याहवेह तुला आशीर्वाद देवो!” \p \v 3 जेव्हा त्याने ती अकराशे चांदीची नाणी त्याच्या आईला परत दिली, ती म्हणाली, “माझ्या मुलाने चांदीने मढविलेली प्रतिमा बनवण्यासाठी मी माझी चांदी याहवेहला समर्पित करते. मी ते तुला परत देईन.” \p \v 4 जेव्हा त्याने चांदी त्याच्या आईला परत केली, तिने दोनशे शेकेल\f + \fr 17:4 \fr*\ft अंदाजे 2.3 कि.ग्रॅ.\ft*\f* चांदी घेतली आणि रौप्यकाराला दिली, जो त्याद्वारे मूर्ती बनवित असे. आणि ती मीखाहच्या घरात ठेवण्यात आली. \p \v 5 आता ही व्यक्ती मीखाहचे एक देवघर होते आणि त्याच्याजवळ एक एफोद आणि काही कुलदेवता होत्या आणि आपल्या पुत्रांपैकी एकाची त्याने पुरोहित म्हणून प्रतिष्ठापना केली. \v 6 त्या दिवसांमध्ये इस्राएलला कोणी राजा नव्हता; प्रत्येकजण त्याला योग्य वाटेल ते करत असे. \p \v 7 एक तरुण लेवी जो यहूदाह कुळातील यहूदीयातील बेथलेहेम नगरात राहत होता, \v 8 यहूदीयातील बेथलेहेम नगर सोडून राहण्यासाठी तो चांगलेसे ठिकाण शोधीत होता. प्रवास करत तो डोंगराळ भागात एफ्राईम देशातील मीखाहच्या घराजवळ आला. \p \v 9 मीखाहने त्याला विचारले, “तू कुठून आलास?” \p तो म्हणाला, “मी यहूदीयातील बेथलेहेम येथील एक लेवी आहे आणि मी राहण्यासाठी एक ठिकाण शोधत आहे.” \p \v 10 त्यावर मीखाह लेवीला म्हणाला, “तू माझ्यासोबत राहा आणि माझ्या पित्याचे आणि पुरोहिताचे कर्तव्य पार पाड. आणि मी तुला वर्षाचे दहा शेकेल\f + \fr 17:10 \fr*\ft अंदाजे 115 ग्रॅ.\ft*\f* चांदीचे नाणे, एकजोड कपडे आणि अन्न देईल.” \v 11 तो लेवी त्याच्यासोबत राहण्यास तयार झाला आणि त्याच्या पुत्रांपैकी एक असा तो राहू लागला. \v 12 तेव्हा मीखाहने लेवीला शुद्ध केले आणि तो तरुण त्याचा पुरोहित झाला आणि त्याच्या घरात राहू लागला. \v 13 आणि मीखाहने म्हटले, “मला माहीत आहे की याहवेह माझे कल्याण करतील, कारण हा लेवी माझा पुरोहित झाला आहे.” \c 18 \s1 मीखा आणि दान गोत्र \p \v 1 त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता. \p आणि त्या दिवसामध्ये दान गोत्राचे लोक स्वतः स्थायिक होण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करीत होते, कारण आतापर्यंत त्यांना इस्राएलच्या गोत्रांमध्ये त्यांचे वतन मिळाले नव्हते. \v 2 म्हणून दानच्या लोकांनी आपल्या गोत्रातून सोराह व एष्टाओल येथील पाच प्रमुख व्यक्तींना देश हेरायला व भेद घेण्यास पाठविले. हे लोक सर्व दानी लोकांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी त्यांना म्हटले, “जा आणि देशाचा भेद घेऊन या!” \p मग त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात प्रवेश केला आणि ते मीखाहच्या घरी आले, जिथे त्यांनी रात्र घालविली. \v 3 जेव्हा ते मीखाहच्या घराजवळ पोहोचले, त्यांनी त्या तरुण लेवीचा आवाज ओळखला. त्यांनी त्याला बाजूला घेतले आणि विचारले, “तुला इथे कोणी आणले? या ठिकाणी तू काय करीत आहेस? तू येथे का आलास?” \p \v 4 त्याने त्यांना सांगितले की मीखाहने त्याच्यासाठी काय केले आणि त्याने म्हटले, “त्यांनी मला कामावर ठेवले आहे आणि मी त्यांचा पुरोहित आहे.” \p \v 5 तेव्हा ते त्याला म्हणाले, “आमचा प्रवास यशस्वी होईल की नाही, हे कृपया परमेश्वराला विचार.” \p \v 6 पुरोहिताने त्यांना उत्तर दिले, “शांतीने जा. तुमच्या प्रवासाला याहवेहची मंजुरी आहे.” \p \v 7 म्हणून ते पाच माणसे निघून लईश येथे आले, तिथे त्यांनी पाहिले की सर्व लोक सुरक्षितपणे राहत होते, ते सीदोनी लोकांप्रमाणे शांततेत व सुरक्षित राहत आहेत. आणि त्यांच्या जमिनीत कशाचीही कमतरता नसल्यामुळे ते समृद्ध होते. तसेच, ते सीदोनी लोकांपासून लांब राहत होते आणि इतर कोणाशीही त्यांचा संबंध नव्हता.\f + \fr 18:7 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अरामी लोकांशी\fqa*\f* \p \v 8 जेव्हा ते हेर सोराह व एष्टाओल येथे परतले, त्यांच्या दान भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्ही काय माहिती आणली आहे?” \p \v 9 त्यांनी उत्तर दिले, “चला, आपण त्यांच्यावर हल्ला करू! आम्ही तो देश पाहिला आहे आणि तो खूप चांगला आहे. तुम्ही काही करणार नाही का? तिथे जाऊन ते ताब्यात घेण्यास अजिबात संकोच करू नका. \v 10 जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल, तेव्हा तुम्हाला एक संशयहीन लोक आणि परमेश्वराने तुमच्या हातात दिलेली सुरक्षित प्रशस्त भूमी सापडेल, अशी भूमी जिथे कशाचीही कमतरता नाही.” \p \v 11 तेव्हा दान गोत्राचे सहाशे सैनिक सोराह व एष्टाओल येथून निघाले. \v 12 त्यांनी जाताना यहूदीयातील किर्याथ-यआरीम जवळ तळ दिला, यामुळे या ठिकाणाला आज देखील “महाने-दान\f + \fr 18:12 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa दानची छावणी\fqa*\f*” असेच म्हणतात. \v 13 तिथून ते एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाहच्या घरी आले. \p \v 14 नंतर पाच व्यक्ती जे लईश हेरायला आले होते ते आपल्या दान भाऊबंदांना म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का या घरातील एका घरात एक एफोद, काही कुलदेवता आणि अनेक रुप्याचा मुलामा दिलेल्या मूर्ती आहेत? आता काय करावयाचे हे तुम्हाला माहीत आहे.” \v 15 म्हणून ते तिथे वळले आणि मीखाहकडील त्या तरुण लेवीच्या घरी जाऊन त्याला अभिवादन केले. \v 16 युद्धासाठी सज्ज असलेले दानी गोत्राचे सहाशे सैनिक प्रवेशद्वाराजवळ उभे होते. \v 17 मग ते पाच पुरुष, जे तो देश हेरायला गेले होते, ते आत गेले आणि त्यांनी तेथील मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता घेतली, जेव्हा पुरोहित आणि सहाशे सैनिक बाहेर प्रवेशद्वाराजवळ उभे होते. \p \v 18 जेव्हा ते पाच पुरुष मीखाहच्या घरी गेले आणि त्यांनी मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता उचलत असता, पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहे?” \p \v 19 त्यांनी त्याला उत्तर दिले, “शांत राहा! एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आमच्याबरोबर ये आणि आमचा पिता आणि पुरोहित हो. केवळ एका मनुष्याचा पुरोहित होऊन राहण्यापेक्षा, इस्राएलातील एक संपूर्ण गोत्र आणि वंशाचा पुरोहित होऊन राहणे अधिक चांगले नाही का?” \v 20 तेव्हा त्या पुरोहिताला अतिशय आनंद झाला. त्याने एफोद, कुलदेवता आणि मूर्ती घेतली आणि तो त्या लोकांबरोबर गेला. \v 21 मग ते फिरले आणि कूच करीत असताना ते आपली लहान मुले, गुरे आणि सामान अग्रभागी घेऊन चालले. \p \v 22 जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले. \v 23 जेव्हा त्यांनी दानच्या लोकांना हाक मारली तेव्हा ते वळले आणि मीखाहला विचारले, “तुला काय झाले आहे की तू आपल्या लोकांना युद्ध करण्यास घेऊन आला आहेस?” \p \v 24 मीखाहने प्रत्युत्तर दिले, “जे दैवत मी तयार केले त्यांना आणि माझा पुरोहित याला तुम्ही घेऊन जात आहात. आणि उलट तुम्हीच मला विचारता? मला काय हवे आहे. ‘आता माझ्याजवळ काहीही राहिलेले नाही?’ ” \p \v 25 त्यावर दानच्या लोकांनी उत्तर दिले, “आमच्यासोबत वाद घालू नकोस, नाहीतर काही माणसांना राग येईल आणि ते तुझ्यावर हल्ला करतील आणि तुला आणि तुझ्या कुटुंबीयांनी आपला जीव गमवावा लागेल.” \v 26 मग दानचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मीखाहने पाहिले ते लोक फार शक्तिशाली आहेत, तेव्हा तो माघारी फिरला आणि आपल्या घरी गेला. \p \v 27 मग मीखाहने जे बनविले होते आणि त्याच्या पुरोहितासह दानचे लोक लईश या शहरात येऊन दाखल झाले. तेथील लोक शांत आणि सुरक्षित होते. त्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यांचे शहर जाळून टाकले. \v 28 त्यांना वाचविणारा कोणी नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर राहत होते आणि त्यांचा इतर लोकांशी कसलाही व्यवहार नव्हता. हे शहर बेथ-रहोब शेजारी असलेल्या खोर्‍यात होते. \p मग दानच्या लोकांनी ते शहर पुन्हा बांधले आणि ते तिथे राहू लागले. \v 29 त्यांनी त्या शहरास आपला पूर्वज, इस्राएलचा एक पुत्र दान त्याचे नाव दिले—त्या शहराचे मूळ नाव लईश होते. \v 30 मग दानच्या लोकांनी आपणासाठी मूर्तीची स्थापना केली व गेर्षोमाचा पुत्र, मोशेचा नातू\f + \fr 18:30 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa मनश्शेहचा पुत्र\fqa*\f* योनाथान आणि त्याच्या पुत्रास, त्या देशाचा त्याच्या शत्रूकडून पाडाव होईपर्यंत दानच्या गोत्राचे पुरोहित म्हणून नेमले. \v 31 अशा रीतीने जोपर्यंत परमेश्वराचे निवासस्थान शिलोह येथे होते, तोपर्यंत मीखाहने तयार केलेली मूर्तीची उपासना दानच्या लोकांकडून केली जात होती. \c 19 \s1 एक लेवी आणि त्याची उपपत्नी \p \v 1 त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता. \p लेवी वंशातील कोण एक मनुष्य एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशाच्या दूरच्या भागात राहत होता. त्याने यहूदीयातील बेथलेहेम मधील एक स्त्री आपली उपपत्नी करून घेतली. \v 2 परंतु ती उपपत्नी त्याच्यासोबत विश्वासू राहिली नाही. तिने त्याला सोडले आणि यहूदीयातील बेथलेहेमातील आपल्या पित्याच्या घरी परतली. तिथे चार महिने राहिल्यानंतर, \v 3 तिचा पती तिला परत आणावे म्हणून तिच्याकडे गेला. त्याच्याबरोबर त्याने एक सेवक आणि दोन गाढवे घेतली. तिने त्याला पित्याच्या घरी नेले आणि जेव्हा तिच्या पित्याने त्याला पाहिले, तेव्हा त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले. \v 4 त्याच्या सासर्‍याने म्हणजे स्त्रीच्या पित्याने त्याला थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला; आणि म्हणून तो त्याच्यासोबत खातपीत आणि विश्राम करीत तिथे तीन दिवस राहिला. \p \v 5 चौथ्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्या मनुष्याने निघण्याची तयारी केली, परंतु स्त्रीच्या पित्याने आपल्या जावयाला म्हटले, “काहीतरी खाऊन तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा; नंतर तुम्ही जाऊ शकता.” \v 6 मग ते दोघे सोबत खाली बसून एकत्र खाणेपिणे केले. त्यानंतर स्त्रीचा पिता म्हणाला, “कृपया आजची रात्र थांबा आणि आनंद करा.” \v 7 आणि जेव्हा तो पुरुष जाण्यास उठला तेव्हा त्याच्या सासर्‍याने त्याला आग्रह केला, म्हणून त्या रात्री तो तिथे राहिला. \v 8 पाचव्या दिवसाच्या सकाळी, जेव्हा तो जाण्यास उठला, स्त्रीच्या पित्याने म्हटले, “तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा. मग दुपारपर्यंत थांबा!” मग ते दोघे एकत्र जेवले. \p \v 9 मग जेव्हा तो पुरुष, त्याची उपपत्नी आणि त्याचा सेवक जाण्यास उठले, तेव्हा त्याचा सासरा, त्या स्त्रीचा पिता म्हणाला, “पाहा, आता तर संध्याकाळ झालीच आहे. रात्र इथेच घालवा. दिवस संपत आला आहे. थांबा आणि आनंद करा. उद्या सकाळी लवकर उठा आणि आपल्या घरासाठी मार्गस्थ व्हा.” \v 10 परंतु आणखी एक रात्र थांबण्यास तयार झाला नाही, तो पुरुष निघाला आणि आपली उपपत्नी व त्याचे खोगीर घातलेले दोन गाढव घेऊन यबूस (म्हणजे यरुशलेम आहे) येथे निघाले. \p \v 11 जेव्हा ते यबूस जवळ होते आणि दिवस उतरला होता, तेव्हा तो सेवक आपल्या धन्यास म्हणाला, “चला आपण या यबूसी लोकांच्या शहरात थांबू आणि रात्र घालवू.” \p \v 12 त्याच्या धनी म्हणाला, “नाही, आपण अशा कोणत्याही शहरात जाणार नाही जे इस्राएली लोक नाहीत. आपण गिबियाहपर्यंत जाऊ.” \v 13 तो आणखी म्हणाला, “चला आपण गिबियाह किंवा रामाहपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि यापैकी एका ठिकाणी मुक्काम करू.” \v 14 तेव्हा ते प्रवास करीत पुढे निघाले आणि सूर्य मावळत असता ते बिन्यामीनच्या गिबियाहजवळ पोहोचले. \v 15 तिथे रात्र घालविण्यासाठी ते गिबियाहात थांबले. ते शहराच्या चौकात बसले, परंतु कोणीही त्यांना आपल्या घरी घेतले नाही. \p \v 16 त्या संध्याकाळी एक म्हातारा आपले शेतातले काम आटोपून येत होता. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह (बिन्यामीन लोक तिथे राहत होते) येथे राहत होता. \v 17 त्याने शहराच्या चौकात तळ दिलेल्या प्रवाशांना पाहिले, आणि विचारले, “तुम्ही कुठे जात आहात? तुम्ही कुठून आला?” \p \v 18 त्याने उत्तर दिले. “यहूदीयातील बेथलेहेमातून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशाच्या दूरच्या ठिकाणी जिथे मी राहतो तिथे जात आहोत. मी यहूदीयातील बेथलेहेम नगरात गेलो होतो आणि आता मी याहवेहच्या भवनात\f + \fr 19:18 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa घरी\fqa*\f* जात आहे. परंतु कोणीही मला रात्रीसाठी आपल्या घरात घेतलेले नाही. \v 19 आमच्याजवळ आमच्या गाढवांसाठी दाणा आणि वैरण आहे आणि आमच्या सेवकांसाठी भाकरी आणि द्राक्षारस भरपूर आहे—मी, तुमची सेविका आणि आमच्यासोबतचा तरुण. आम्हाला कशाचीही उणीव नाही.” \p \v 20 “तुमचे कल्याण असो,” तो म्हातारा गृहस्थ म्हणाला. “तुम्हाला जे काही लागेल ते मला पुरवू द्या. फक्त रात्र चौकात घालवू नका.” \v 21 तेव्हा त्याने त्यांना आपल्याबरोबर घरी नेले. ते विश्रांती घेत असताना आणि त्यांच्या गाढवांना वैरण दिली. त्यांनी आपले पाय धुतले, त्यांनी काही खाणेपिणे केले. \p \v 22 ते आनंदात असताना, गावातील काही अधम लोकांचे टोळके घराभोवती जमा झाले आणि दार जोरजोराने ठोकून त्या म्हातार्‍या मनुष्यास जो घराचा स्वामी आहे त्यास ओरडून म्हणू लागले, “जो पुरुष तुझ्या घरी आला आहे त्यास बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर शारीरिक संबंध करू.” \p \v 23 तेव्हा घराचा स्वामी बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “नाही, माझ्या बंधुजनांनो, असले नीच कृत्य करू नका, कारण तो पुरुष माझा पाहुणा आहे, तुम्ही हे घृणास्पद कृत्य करू नका. \v 24 पाहा, इथे माझी कुमारी कन्या आणि त्याची उपपत्नी आहे. मी त्या दोघींना तुमच्याकडे बाहेर आणतो आणि त्यांच्याशी तुम्हाला वाटेल ते करा, परंतु त्या पुरुषाशी असले घृणास्पद कृत्य करू नका.” \p \v 25 परंतु ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या पुरुषाने आपल्या उपपत्नीला घेतले आणि तिला त्यांच्याकडे बाहेर पाठविले, आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि रात्रभर तिच्याशी कुकर्म केले व पहाटेस त्यांनी तिला जाऊ दिले. \v 26 पहाटेस ती स्त्री आपला स्वामी राहत असलेल्या घरी परतली आणि घराच्या दाराशी खाली पडली आणि उजाडेपर्यंत ती तशीच पडून राहिली. \p \v 27 सकाळी जेव्हा तिचा स्वामी उठला व घराचे दार उघडले आणि आपल्या प्रवासाला निघण्यासाठी बाहेर आला, तेव्हा त्याने त्याच्या उपपत्नीला घराच्या दारासमोर खाली पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले. \v 28 तो तिला म्हणाला, “चल ऊठ, आपण निघू या.” परंतु काहीही उत्तर आले नाही. नंतर त्या मनुष्याने तिला गाढवाच्या पाठीवर घातले व तो आपल्या घरी गेला. \p \v 29 जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याने एक सुरी घेतली आणि त्याच्या उपपत्नीचे एकएक भाग कापून बारा भाग केले आणि इस्राएलांच्या सर्व प्रदेशात पाठवून दिले. \v 30 ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी एक दुसर्‍यांना म्हटले, “इस्राएली लोक इजिप्तमधून आले, तेव्हापासून आजवर अशी घटना पाहिली नाही किंवा केली नाही. आपण काहीतरी केलेच पाहिजे! चला बोलू या!” \c 20 \s1 इस्राएली बिन्यामीन गोत्रांना शिक्षा देतात \p \v 1 तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले. \v 2 इस्राएलाच्या सर्व गोत्रप्रमुखांनी परमेश्वराच्या लोकांच्या सभेत आपले स्थान घेतले, जे तलवारीने सज्ज असलेले चार लाख लोक होते. \v 3 (बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएल लोक वर मिस्पाह येथे गेले आहे.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.” \p \v 4 तेव्हा तो लेवी, ज्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती तिचा पती म्हणाला, “मी आणि माझी उपपत्नी बिन्यामीनच्या गिबियाह येथे रात्र घालविण्यास आलो. \v 5 रात्रीच्या वेळेस गिबियाहतील लोक माझ्यामागे आले आणि घरास वेढा घातला व माझा घात करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली. \v 6 तेव्हा मी उपपत्नीला घेतले आणि तिच्या शरीराचे कापून बारा तुकडे केले व ते इस्राएलांच्या वारसांच्या सर्व प्रांतात पाठवून दिले, कारण इस्राएलात त्यांनी हे अपवित्र आणि घृणास्पद कृत्य केले. \v 7 तर आता इस्राएलांच्या सर्व लोकांनो, बोला आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला ते मला सांगा.” \p \v 8 सर्व पुरुष एकत्र उठून एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही घरी परतणार नाही. नाही, आपल्यापैकी कोणीही त्याच्या घरी परतणार नाही. \v 9 पण आता आम्ही हे गिबियाहविषयी करणार: आपण चिठ्ठ्या टाकून त्याच्या क्रमानुसार त्यांच्या विरोधात जाऊ. \v 10 आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा\f + \fr 20:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa गेबा\fqa*\f* येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.” \v 11 अशा रीतीने सर्व इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी शहराविरुद्ध एकजूट केली. \p \v 12 मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे? \v 13 गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.” \p परंतु बिन्यामीन लोक आपले भाऊबंद इस्राएलींचे ऐकेनात. \v 14 बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले. \v 15 बिन्यामीन लोकांनी ताबडतोब आपआपल्या नगरांतून सव्वीस हजार तलवार चालविण्यास निपुण अशी माणसे आणि गिबियाह येथील स्थानिक सातशे कुशल तरुण जमविले. \v 16 या सर्व सैनिकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावखुरे होते. ते एवढे नेमबाज होते की त्यांच्या गोफणीचा नेम केसभरदेखील चुकत नसे. \p \v 17 बिन्यामीन गोत्राला सोडून इस्राएलांच्या सेनेतील तलवार चालविण्यास निपुण पुरुषांची संख्या चार लाख होती, ते सर्व योद्धे होते. \p \v 18 इस्राएली लोक वर बेथेल\f + \fr 20:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa परमेश्वराचे घर\fqa*\f* येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?” \p याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.” \p \v 19 इस्राएली लोक दुसर्‍या दिवशी उठले आणि त्यांनी गिबियाहजवळ तळ दिला. \v 20 मग इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी गेले आणि त्यांनी गिबियाह येथे त्यांच्याविरुद्ध युद्धाची व्यूहरचना केली. \v 21 बिन्यामीन लोक गिबियाहतून बाहेर आले आणि त्यांनी त्या दिवशी युद्धभूमीवर इस्राएली लोकांचे बावीस हजार पुरुष ठार केले. \v 22 परंतु इस्राएली लोकांनी एक दुसर्‍यांना प्रोत्साहन दिले आणि पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी मोर्चा दिला होता, दुसर्‍या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा मोर्चा दिला. \v 23 इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?” \p याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.” \p \v 24 दुसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीन लोकांवर हल्ला केला. \v 25 या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते. \p \v 26 मग संपूर्ण इस्राएली लोक, संपूर्ण सेना वर बेथेल येथे गेली आणि तिथे ते याहवेहसमोर रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि याहवेहला होमबली व शांत्यर्पणे अर्पिली. \v 27 आणि इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले. (त्या समयी परमेश्वराचा कराराचा कोश तिथे होता, \v 28 एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?” \p याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.” \p \v 29 तेव्हा इस्राएलने गिबियाहच्या सभोवती दबा धरणारे बसविले. \v 30 तिसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनच्या लोकांविरुद्ध युद्ध केले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिबियाहजवळ व्यूहरचना केली. \v 31 बिन्यामीन लोक त्यांच्यावर हल्ला करण्यास बाहेर आले आणि माघार घेत असलेल्या इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून दूर नेले. पूर्वी केले त्याप्रमाणे बिन्यामीन पुरुषांनी इस्राएली पुरुषांना बेथेल आणि गिबियाह यांच्यामधील मार्गावर ठार करण्यास सुरुवात केली. तेव्हा इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे ठार झाली. \v 32 मग बिन्यामीन लोक बोलू लागले, “आपण पहिल्याप्रमाणेच त्यांचा पराभव करीत आहोत!” परंतु इस्राएली लोक म्हणाले, “चला आपण पळण्यास सुरू करू आणि त्यांना शहरापासून दूर मार्गावर घेऊन येऊ.” \p \v 33 सर्व इस्राएली लोक आपल्या ठिकाणाहून उठले आणि बआल-तामार येथे युद्धाची व्यूहरचना केली आणि इस्राएली लोक गेबाच्या पश्चिमेला दबा धरून बसले होते. \v 34 मग इस्राएलातील निवडलेले दहा हजार तरुण पुरुष गिबियाहवर चालून आले. युद्ध एवढे भयंकर झाले की आपल्यावर मोठा अनर्थ येऊन ठेपला आहे, याची बिन्यामीन लोकांना काही कल्पना नव्हती. \v 35 तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते. \v 36 तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे. \p इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून असलेल्या लोकांवर भरवसा होता. \v 37 जे दबा धरून बसलेले होते त्यांनी अचानक गिबियाहवर हल्ला केला आणि ते शहरात पसरले आणि पूर्ण शहराचा तलवारीने नाश केला. \v 38 इस्राएली लोक आणि दबा धरून बसलेले यांच्यात अशी सांकेतिक खूण ठरली होती की शहरातून धुराचा मोठा लोट वर चढेल असे करावे, \v 39 आणि मग इस्राएली लोक पलटवार करतील. \p बिन्यामीन लोकांनी इस्राएली पुरुष (सुमारे तीस) ठार केले आणि ते म्हणाले, “आपण त्यांचा पहिल्या युद्धाप्रमाणेच पराभव करीत आहोत.” \v 40 परंतु जेव्हा शहरातून धुराचा लोट वर चढू लागला, तेव्हा बिन्यामीन लोकांनी मागे वळून पाहिले आणि संपूर्ण शहरातून धुराचा लोट वर आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले. \v 41 नंतर इस्राएली लोकांनी पलटवार केला आणि बिन्यामीन लोक घाबरून गेले आणि त्यांना कळून आले की त्यांच्यावर भयंकर संकट आले आहे. \v 42 म्हणून ते इस्राएली लोकांपुढून रानाकडे पळू लागले, परंतु युद्धापासून वाचू शकले नाही. आणि इस्राएली लोकांनी ते ज्या नगरातून निघाले होते त्यांना तिथेच ठार मारले. \v 43 त्यांनी बिन्यामीन लोकांचा पाठलाग करीत गिबियाहच्या पूर्वेस त्यांना वेढले आणि त्यांना सहज तुडविले. \v 44 बिन्यामीन लोकांचे अठरा हजार लोक ठार झाले, ते सर्व वीर योद्धे होते. \v 45 जसे ते मागे वळले आणि रानात रिम्मोनाच्या खडकाकडे पळाले, परंतु इस्राएली लोकांनी वाटेतच त्यांच्यापैकी पाच हजार पुरुषांना ठार केले आणि पुढे बिन्यामीन लोकांचा गिदोमापर्यंत पाठलाग करून त्यांचे आणखी पुरुष दोन हजार पुरुष मारून टाकले. \p \v 46 त्या दिवशी बिन्यामीनचे पंचवीस हजार तलवार चालविणारे मारले गेले, जे सर्व वीर योद्धे होते. \v 47 पण त्यापैकी सहाशे पुरुष वळले आणि रानात रिम्मोन खडकावर पळून गेले आणि तिथे ते चार महिने राहिले. \v 48 मग इस्राएली पुरुष परत बिन्यामीन लोकांकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण नगर व पशू आणि त्यांना जे मिळाले त्या सर्वांना तलवारीने मारले. जी नगरे त्यांना आढळली त्या सर्वांना त्यांनी जाळून भस्मसात केले. \c 21 \s1 बिन्यामीन वंशजांसाठी स्त्रिया \p \v 1 इस्राएलांच्या पुरुषांनी मिस्पाह येथे प्रतिज्ञा केलेली होती: “आपल्यापैकी कोणीही आपल्या कन्यांना बिन्यामीन गोत्रांना विवाहात देणार नाही.” \p \v 2 ते बेथेल येथे गेले, जिथे संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर बसून त्यांनी उच्चस्वरात शोक केला. \v 3 “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर,” ते आक्रंदून म्हणाले, “इस्राएल सोबत असे का घडले? आज इस्राएलातील एक गोत्र का कमी झाले?” \p \v 4 मग दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून, त्यांनी तिथे वेदी बांधली आणि तिच्यावर होमार्पण व शांत्यर्पणे अर्पिली. \p \v 5 नंतर इस्राएली लोकांनी हे विचारले, ते एकमेकास विचारू लागले, “इस्राएलाच्या सर्व गोत्रांमधून असा कोणी आहे, जो या सभेत याहवेहसमोर आला नाही?” कारण त्यांनी गंभीरतेने शपथ घेतली होती की, जो कोणी मिस्पाह येथे याहवेहसमोर उपस्थित राहणार नाही, त्याला अवश्य जिवे मारावे. \p \v 6 सर्व इस्राएली लोक त्यांचा बंधू बिन्यामीन गोत्राबद्दल दुःखी झाले. ते म्हणाले, “आज इस्राएलांच्या एका गोत्राचा उच्छेद झाला आहे. \v 7 आता जे उरले आहेत त्यांच्यासाठी पत्नी मिळवून देण्यास काय करावे? कारण आपण तर याहवेहची शपथ घेऊन म्हटले आहे की विवाहात त्यांना आपण आपल्या कन्या देणार नाही.” \v 8 नंतर त्यांनी विचारले “मिस्पाह येथे याहवेहसमोर इस्राएलचा कोणता गोत्र आला नव्हता?” तेव्हा त्यांना कळून आले की, याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही हजर नव्हते. \v 9 कारण जेव्हा त्यांनी लोकांची मोजणी केली, त्यांना आढळून आले की याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही तिथे नव्हते. \p \v 10 म्हणून सभेने बारा हजार योद्ध्यांना सूचना देऊन याबेश-गिलआद येथे पाठविले आणि त्यांनी जाऊन तिथे राहणार्‍यांचा, स्त्रियांचा आणि लेकरांचा तलवारीने संहार करावा. \v 11 तुम्हाला हे करावयाचे आहे ते म्हणाले, “सर्व पुरुष आणि स्त्रिया ज्या कुमारिका नाहीत त्या सर्वांना तुम्ही मारावे.” \v 12 त्यांना याबेश-गिलआद येथे राहणार्‍या लोकांमध्ये चारशे तरुण स्त्रिया आढळल्या ज्या कधीही पुरुषांसोबत निजल्या नव्हत्या आणि त्यांनी त्यांना कनान देशातील शिलोह येथील छावणीत आणले. \p \v 13 मग संपूर्ण सभेने बिन्यामीन गोत्राकडे जे रिम्मोन खडकावर राहत होते, निरोप पाठवून त्यांच्याकडे शांतीची बोलणी केली. \v 14 बिन्यामीन लोक त्यावेळेस परत आले आणि याबेश-गिलआद येथील उर्वरित स्त्रिया त्यांना पत्नी म्हणून देण्यात आल्या आणि मग ते आपापल्या घरी परतले. परंतु त्या त्यांना पुरेसा नव्हत्या. \p \v 15 बिन्यामीन गोत्रासाठी लोकांनी दुःख केले, कारण याहवेहने इस्राएलांच्या गोत्रांमध्ये दरी निर्माण केली. \v 16 आणि सभेतील वडिलांनी म्हटले, “बिन्यामीन स्त्रियांचा संहार केल्यामुळे जे पुरुष उरले आहेत त्यांना पत्नी कशी मिळवून द्यावी? \v 17 उरलेल्या बिन्यामीन लोकांना वारस मिळालेच पाहिजे, म्हणजे इस्राएलच्या एका गोत्राचा नाश होणार नाही. \v 18 आपण आपल्या कन्या त्यांना देऊ शकत नाही. कारण आपण इस्राएली लोकांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे: ‘जो कोणी बिन्यामीनास पत्नी करून देईल, तो शापित होईल.’ \v 19 आणि मग ते म्हणाले, पाहा, शिलोह येथे याहवेहचा उत्सव दरवर्षी असतो, तो बेथेलाच्या उत्तरेस आहे, जो रस्ता बेथेलापासून वर शेखेमास जातो त्याच्या पूर्वेकडे आणि लबोनाहच्या दक्षिणेस आहे.” \p \v 20 म्हणून त्यांनी बिन्यामीन लोकांना असे बोलत सूचना दिली, “जा आणि द्राक्षमळ्यात लपून बसा \v 21 आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकी एकीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे. \v 22 आणि जेव्हा त्यांचे वडील आणि भाऊ गार्‍हाणे घेऊन आमच्याकडे येतील, तेव्हा आम्ही त्यांना म्हणू, ‘आमच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी, कारण युद्धात आम्हाला त्यांच्यासाठी पत्नी मिळाली नाही. तुम्ही तुमची शपथ मोडल्याबद्दल दोषी ठरणार नाही, कारण तुम्ही तुमच्या कन्या त्यांना दिल्या नाहीत.’ ” \p \v 23 यासाठी बिन्यामीन लोकांनी हे केले. जेव्हा तरुण स्त्रिया नाचत होत्या, तेव्हा प्रत्येक पुरुषाने एकी एकीला धरले आणि तिला आपली पत्नी म्हणून घेऊन गेले. ते परत आपल्या वतनात आले आणि त्यांनी नगरे परत बांधली आणि ते त्यात राहू लागले. \p \v 24 मग त्यावेळी इस्राएली लोकांनी ते स्थान सोडले आणि आपआपले गोत्र आणि कुळाप्रमाणे असलेल्या वतनात आपल्या घरी परतले. \p \v 25 त्या दिवसांमध्ये इस्राएलला कोणी राजा नव्हता; प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल ते करी.