\id ISA - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h यशायाह \toc1 यशायाहची भविष्यवाणी \toc2 यशायाह \toc3 यश \mt1 यशायाहची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला. \b \s1 बंडखोर राष्ट्र \q1 \v 2 हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! \q2 कारण याहवेह असे म्हणाले: \q1 “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, \q2 परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे. \q1 \v 3 बैल त्याच्या मालकाला ओळखतो, \q2 गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, \q1 परंतु इस्राएल ओळखत नाही, \q2 माझ्या लोकांना समजत नाही.” \b \q1 \v 4 हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, \q2 तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, \q1 वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, \q2 भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! \q1 त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; \q2 इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, \q2 आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. \b \q1 \v 5 तुम्हाला आणखी मार का दिला जावा? \q2 तुम्ही विद्रोह का करीत राहावे? \q1 तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, \q2 तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे. \q1 \v 6 पायाच्या तळव्यापासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत \q2 काहीही चांगले तिथे राहिले नाही— \q1 फक्त जखमा आणि खरचटलेले, \q2 आणि उघडे व्रण आहेत, \q1 त्या स्वच्छ केलेल्या किंवा पट्ट्यांनी बांधलेल्या नाहीत \q2 किंवा जैतुनाच्या तेलाने त्या पुसलेल्या नाहीत. \b \q1 \v 7 तुमचा देश उद्ध्वस्त झाला आहे, \q2 तुमची शहरे अग्नीमध्ये जळाली आहेत; \q1 पाडाव केल्यानंतर करावे तसे, \q2 तुमच्यादेखत तुमची शेते \q2 परदेशीयांनी ओरबाडून घेतली आहेत. \q1 \v 8 सीयोनकन्येला \q2 द्राक्षमळ्यात असलेल्या आश्रयस्थानासारखे, \q1 काकडीच्या शेतातील झोपडीसारखे, \q2 वेढा दिलेल्या शहराप्रमाणे आहे. \q1 \v 9 सर्वसमर्थ\f + \fr 1:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa सेनाधीश\fqa*\f* याहवेह यांनी जर \q2 आमच्यातील काहींना वाचविले नसते तर, \q1 आम्ही सदोमासारखे झालो असतो, \q2 गमोरासारखी आमची गत झाली असती. \b \q1 \v 10 अहो, सदोमाचे राज्यकर्ते, \q2 याहवेहचे शब्द ऐका; \q1 तुम्ही गमोराचे लोकहो, \q2 आमच्या परमेश्वराची सूचना ऐका! \q1 \v 11 “तुमची असंख्य होमर्पणे— \q2 ती माझ्यासाठी काय आहेत?” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त \q2 मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; \q1 बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये \q2 मला काही आनंद नाही. \q1 \v 12 जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, \q2 तुम्हाला कोणी सांगितले, \q2 की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा? \q1 \v 13 अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! \q2 तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. \q1 नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— \q2 अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही. \q1 \v 14 तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण \q2 यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. \q1 ते मला भार असे झाले आहेत; \q2 त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे. \q1 \v 15 प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, \q2 तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; \q1 जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, \q2 मी त्या ऐकत नाही. \b \q1 तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत! \b \q1 \v 16 “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. \q2 तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; \q2 वाईट कृत्ये करणे थांबवा. \q1 \v 17 योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. \q2 पीडितांचे संरक्षण करा. \q1 पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; \q2 विधवांची बाजू मांडा. \b \q1 \v 18 “या आता, आपण वाद मिटवू या,” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, \q2 तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; \q1 जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, \q2 तरी ती लोकरीसारखी होतील. \q1 \v 19 जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, \q2 तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल; \q1 \v 20 परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, \q2 तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” \q1 कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत. \b \q1 \v 21 पाहा, ही विश्वासू नगरी \q2 आता कशी वेश्या झाली आहे! \q1 ती न्यायाने भरलेली होती; \q2 नीतिमत्व तिच्यामध्ये वास करीत होते— \q2 परंतु आता वध करणारे राहतात! \q1 \v 22 तुमची चांदी क्षुद्र झाली आहे, \q2 तुमचा उत्तम द्राक्षारस पाणी मिसळून पांचट झाला आहे. \q1 \v 23 तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, \q2 चोरांचे भागीदार आहेत; \q1 त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, \q2 आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. \q1 ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; \q2 विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत. \b \q1 \v 24 म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, \q2 इस्राएलचे महाशक्तिमान असे जाहीर करतात: \q1 “अहा! मी माझ्या शत्रूंवर माझा क्रोध मोकळा करेन \q2 आणि माझ्या शत्रूंचा मी स्वतः सूड घेईन. \q1 \v 25 मी माझा हात तुमच्याविरुद्ध\f + \fr 1:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa यरुशलेमविरुद्ध\fqa*\f* उचलेन; \q2 मी तुमची सर्व मलिनता पूर्णपणे काढून टाकेन \q2 आणि तुमची सर्व अशुद्धता काढून दोषरहित करेन. \q1 \v 26 मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन, \q2 तुमचे राज्यकर्त्ये सुरुवातीला होते तसेच त्यांना परत करेन. \q1 त्यानंतर तुम्हाला, \q2 धार्मिकतेचे शहर, \q2 विश्वासू शहर असे म्हटले जाईल.” \b \q1 \v 27 सीयोन न्यायाने, \q2 आणि तिचे पश्चात्तापकर्त्ये नीतिमत्त्वाने सोडविले जातील. \q1 \v 28 परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल, \q2 आणि ज्यांनी याहवेहचा त्याग केला, त्यांचा नाश होईल. \b \q1 \v 29 “ज्यांच्यामध्ये तुम्ही हर्षोत्सव केले, \q2 त्या एलाच्या पवित्र वृक्षाबद्दल तुम्ही लज्जित व्हाल; \q1 ज्यांची तुम्ही निवड केली आहे \q2 त्या बागांमुळे तुमचा अपमान केला जाईल. \q1 \v 30 तुम्ही पाने कोमेजून गेलेल्या एलावृक्षासारखी, \q2 पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. \q1 \v 31 पराक्रमी मनुष्य चकमकीसारखा होईल, \q2 आणि त्याचे काम ठिणगी असे होईल; \q1 दोघेही एकत्र जळतील, \q2 ती आग विझविणारे कोणीही नसेल.” \c 2 \s1 याहवेहचा पर्वत \p \v 1 यहूदीया व यरुशलेमविषयी आमोजाचा पुत्र यशायाहने पाहिलेला दृष्टान्त: \b \p \v 2 पण शेवटच्या दिवसात \q1 याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच \q2 असे स्थापित केले जाईल; \q1 सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, \q2 आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील. \p \v 3 अनेक लोक येतील आणि म्हणतील, \q1 “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, \q2 याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. \q1 ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, \q2 म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” \q1 कारण सीयोनमधून नियमशास्त्र, \q2 यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल. \q1 \v 4 ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, \q2 आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. \q1 ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, \q2 व भाल्यांचे आकडे बनवतील. \q1 एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, \q2 तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत. \b \q1 \v 5 याकोबाच्या वंशजा ये, \q2 आपण याहवेहच्या प्रकाशात चालू. \s1 याहवेहचा दिवस \q1 \v 6 याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा \q2 तुमच्या लोकांचा त्याग केला आहे, \q1 ते पूर्वेकडील अंधश्रद्धेने भरून गेलेले आहेत; \q2 पलिष्टी लोकांप्रमाणे ते दुरात्म्यांशी संपर्क साधतात \q2 आणि मूर्तिपूजकांच्या रूढी त्यांनी स्वीकारल्या आहेत. \q1 \v 7 त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे; \q2 त्यांची संपत्ती अमाप आहे. चांदी व सोने यांचे अमाप खजिने आहेत. \q1 त्यांच्या भूमीत असंख्य घोडे आहेत; \q2 त्यांच्याकडे असंख्य रथही आहेत. \q1 \v 8 सर्व भूमी मूर्तीनी भरली आहे; \q2 त्यांच्याच हस्तकृतींनी, \q2 जे त्यांच्या बोटांनी बनविले आहे, त्याला ते नमन करतात. \q1 \v 9 म्हणून या लोकांचे पतन केले जाईल \q2 आणि सर्वजण नमविले जातील— \q2 त्यांना क्षमा करू नका. \b \q1 \v 10 याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून \q2 आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास \q2 कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा! \q1 \v 11 उन्मताची नजर नमविली जाईल, \q2 आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; \q1 त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील. \b \q1 \v 12 गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, \q2 जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे \q1 त्यांना नम्र करण्यासाठी, \q2 सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे— \q1 \v 13 लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू \q2 आणि बाशान येथील एलावृक्ष, \q1 \v 14 उंच उंच पर्वत \q2 आणि सर्व उंच डोंगर, \q1 \v 15 प्रत्येक भव्य बुरूज, \q2 प्रत्येक तटबंदीची भिंत, \q1 \v 16 तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत\f + \fr 2:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa तार्शीशचे गलबत\fqa*\f* \q2 आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील. \q1 \v 17 मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल \q2 आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; \q1 त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील. \q2 \v 18 सर्व मूर्तीचा समूळ उच्छेद होईल. \b \q1 \v 19 जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील \q2 तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून \q1 आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास \q2 लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील \q2 आणि जमिनीतील खाचात लपतील. \q1 \v 20 त्या दिवशी लोक \q2 उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या \q1 त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती \q2 चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील. \q1 \v 21 जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील \q2 तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून \q1 आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास \q2 लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील \q2 डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील. \b \q1 \v 22 मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर \q2 ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. \q2 त्यांना इतका बहुमान का द्यावा? \c 3 \s1 यहूदीया व यरुशलेम यांचा न्याय \q1 \v 1 आता बघा, प्रभू \q2 सर्वसमर्थ याहवेह \q1 यरुशलेम व यहूदीयाचा \q2 अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत— \q1 सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा, \q2 \v 2 वीर योद्धे तथा सैनिक, \q1 न्यायाधीश आणि संदेष्टे, \q2 दैवप्रश्न करणारे आणि वडीलजन, \q1 \v 3 पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी, \q2 सल्लागार, कुशल कारागीर आणि धूर्त मांत्रिक \q2 या सर्वांसहित अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा ते काढून घेणार आहेत. \b \q1 \v 4 “मी किशोर मुलांना त्यांचा अधिकारी बनवेन; \q2 बालके त्यांच्यावर राज्य करतील.” \b \q1 \v 5 लोक एकमेकांवर अत्याचार करतील— \q2 पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी. \q1 तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील, \q2 मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील. \b \q1 \v 6 एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात, \q2 आपल्या भावास धरून म्हणेल, \q1 “भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो; \q2 या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!” \q1 \v 7 पण त्या दिवशी तो ओरडेल, \q2 “माझ्याकडे त्याचा इलाज नाही. \q1 माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत; \q2 मला लोकांचा पुढारी बनवू नका.” \b \q1 \v 8 यरुशलेम डगमगत आहे, \q2 यहूदीया कोसळत आहे; \q1 त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, \q2 त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला. \q1 \v 9 त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; \q2 त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; \q2 ते लपवित नाहीत. \q1 त्यांचा धिक्कार असो! \q2 त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे. \b \q1 \v 10 परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल. \q2 त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल. \q1 \v 11 दुष्टांचा धिक्कार असो! \q2 अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! \q1 त्यांनी केलेल्या कृत्याचा, \q2 त्यांना मोबदला मिळणार. \b \q1 \v 12 तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात, \q2 स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. \q1 माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात; \q2 ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात. \b \q1 \v 13 याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात; \q2 ते लोकांचा न्याय करण्यासाठी उभे राहतात. \q1 \v 14 त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी \q2 याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात: \q1 “तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे; \q2 गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे. \q1 \v 15 माझ्या लोकांना चिरडण्याचे \q2 व गरिबांचे चेहरे ठेचण्याचे काय कारण होते?” \q2 प्रभू सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. \b \q1 \v 16 याहवेह म्हणतात, \q2 “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, \q1 त्या मान उडवीत चालतात, \q2 चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, \q1 पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, \q2 कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात. \q1 \v 17 म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार; \q2 याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.” \p \v 18 त्या दिवशी त्यांची सर्व आभूषणे प्रभू ओरबाडून काढतील: त्यांच्या बांगड्या, ललाटपट्टी, व चंद्रकोर हार, \v 19 त्यांचे कानातील झुमके, कांकण आणि मुखावरण, \v 20 त्यांची शिरोवेष्टणे, त्यांचे पैंजण आणि कमरपट्टे, अत्तरदाण्या आणि ताईत, \v 21 अंगठ्या आणि नथण्या, \v 22 उत्तम पोशाख, अधोवस्त्रे, अंगरखे, आणि बटवे, \v 23 त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली. \q1 \v 24 सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल; \q2 कमरपट्ट्याऐवजी एक दोरी असेल; \q1 नीट केशरचनेऐवजी टक्कल; \q2 उत्तम पोशाखाऐवजी गोणपाट; \q2 आणि सौंदर्याऐवजी व्रण त्यांच्या वाट्याला येतील. \q1 \v 25 तुमचे पुरुष तलवारीने पडतील, \q2 तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील, \q1 \v 26 सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; \q2 ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल. \c 4 \q1 \v 1 त्या दिवसात सात स्त्रिया \q2 एका पुरुषास धरून असे म्हणतील \q1 “आम्ही स्वतःचे अन्न मिळवू \q2 आणि स्वतःचे वस्त्र मिळवू; \q1 आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे, \q2 आणि आमची अप्रतिष्ठा घालवून दे!” \s1 याहवेहची शाखा \p \v 2 त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल. \v 3 सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील. \v 4 प्रभू परमेश्वर सीयोनच्या स्त्रियांची घाण धुवून टाकतील; ते न्यायाच्या आत्म्याने आणि अग्नीच्या आत्म्याने यरुशलेममधील रक्ताचे डाग स्वच्छ करतील. \v 5 त्यानंतर याहवेह संपूर्ण सीयोन पर्वतावर आणि तिथे जमलेल्या सर्वांवर दिवसा धुराचा ढग आणि रात्रीच्या वेळेस प्रखर अग्नी प्रज्वलित करतील; या सर्व गोष्टींवर गौरवाचे एक छत असेल. \v 6 दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल. \c 5 \s1 द्राक्षमळ्याचे गीत \q1 \v 1 माझी ज्यांच्यावर प्रीती आहे \q2 त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन: \q1 सुपीक डोंगराळ भागावर \q2 माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता. \q1 \v 2 त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले \q2 आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. \q1 त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला \q2 आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. \q1 नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, \q2 परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली. \b \q1 \v 3 “आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, \q2 मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा. \q1 \v 4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे \q2 त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? \q1 मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, \q2 तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली? \q1 \v 5 आता मी तुम्हाला सांगेन, \q2 मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: \q1 मी त्याचे कुंपण काढून टाकेन, \q2 आणि त्याचा नाश होईल; \q1 मी त्याची भिंत पाडेन, \q2 आणि ते तुडविले जाईल. \q1 \v 6 मी ती जमीन उजाड करेन, \q2 तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, \q2 आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. \q1 मी ढगांना आज्ञा देईन की, \q2 त्यांच्यावर पाऊस पाडू नका.” \b \q1 \v 7 इस्राएल राष्ट्र \q2 सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, \q1 आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, \q2 ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. \q1 आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; \q2 नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले. \s1 धिक्कार व न्याय \q1 \v 8 तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, \q2 आणि जोपर्यंत जागा संपत नाही \q1 शेताला शेत जोडून घेतात, \q2 आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो. \p \v 9 माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे: \q1 “मोठमोठी घरे निश्चितच निर्जन होतील, \q2 उत्तम महालांमध्ये कोणी रहिवासी नसेल. \q1 \v 10 दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ\f + \fr 5:10 \fr*\ft अंदाजे 22 लीटर\ft*\f* द्राक्षारस निघेल; \q2 एक होमेर\f + \fr 5:10 \fr*\ft अंदाजे 160 कि.ग्रॅ.\ft*\f* बियाणे फक्त एक एफा\f + \fr 5:10 \fr*\ft अंदाजे 16 कि.ग्रॅ.\ft*\f* धान्याचे पीक देईल.” \b \q1 \v 11 जे सकाळी लवकर उठतात \q2 व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, \q1 रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत \q2 जागे राहतात त्यांचा धिक्कार असो! \q1 \v 12 त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, \q2 वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, \q1 परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. \q2 याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत. \q1 \v 13 म्हणून असमजंसपणामुळे \q2 माझे लोक बंदिवासात नेले जातील; \q1 उच्च पदावरील लोक भुकेने मरतील \q2 आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील. \q1 \v 14 म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो, \q2 त्याचे तोंड मोठे करून उघडतो. \q1 त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह, \q2 त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील. \q1 \v 15 म्हणून लोकांची अधोगती होईल \q2 आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, \q2 गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल. \q1 \v 16 परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील, \q2 आणि पवित्र परमेश्वर त्यांच्या नीतिमान कृत्यांद्वारे पवित्र ठरतील. \q1 \v 17 तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील; \q2 श्रीमंतांच्या अवशेषांमध्ये कोकरे चरतील. \b \q1 \v 18 धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, \q2 आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात. \q1 \v 19 धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या; \q2 त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या \q2 म्हणजे आपल्याला ते पाहता येईल. \q1 इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना— \q2 ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या, \q2 म्हणजे आम्हाला ती कळेल.” \b \q1 \v 20 धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात \q2 आणि चांगल्याला वाईट म्हणतात, \q1 जे अंधाराला प्रकाश \q2 आणि प्रकाशाला अंधार, \q1 जे गोड त्याला कडू \q2 आणि कडू त्याला गोड असे म्हणतात. \b \q1 \v 21 धिक्कार असो, जे स्वतःच्या दृष्टीत शहाणे आहेत \q2 आणि स्वतःच्या नजरेत हुशार आहेत. \b \q1 \v 22 धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत \q2 आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत, \q1 \v 23 लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, \q2 परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात. \q1 \v 24 म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात \q2 आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, \q1 तशीच त्यांची मुळे कुजून जातील, \q2 आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; \q1 कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे \q2 आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे. \q1 \v 25 म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे; \q2 त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात. \q1 पर्वत डगमगतात, \q2 आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत. \b \q1 हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही, \q2 त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे. \b \q1 \v 26 दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, \q2 पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. \q1 हे बघा ते आले, \q2 तत्काळ आणि वेगाने! \q1 \v 27 त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, \q2 एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; \q1 एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, \q2 एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही. \q1 \v 28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, \q2 त्यांच्या सर्व धनुष्यांच्या तारा ताणून तयार आहेत; \q1 त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे वाटतात, \q2 त्यांच्या रथाची चाके वावटळीसारखी दिसतात. \q1 \v 29 त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, \q2 तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; \q1 ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, \q2 आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही. \q1 \v 30 त्या दिवशी ते त्याच्यावर \q2 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील. \q1 आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर, \q2 तिथे फक्त अंधार आणि संकट आहे; \q2 ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल. \c 6 \s1 यशायाहचे पाचारण \p \v 1 उज्जीयाह राजा मरण पावला त्या वर्षी, मी प्रभूला सिंहासनावर बसलेले उच्चतम आणि गौरवी असे पाहिले; आणि त्यांच्या अंगरख्याच्या घोळाने मंदिर भरून गेले होते. \v 2 त्यांच्या वरच्या बाजूला सराफीम होते, प्रत्येकाला सहा पंख होते: दोन पंखांनी त्यांनी स्वतःचे मुख झाकले होते, दोन पंखांनी पाय झाकले होते आणि दोन पंखांनी ते उडत होते. \v 3 आणि ते एकमेकांना म्हणत होते: \q1 “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; \q2 त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!” \m \v 4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले. \p \v 5 “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!” \p \v 6 नंतर, सराफीम दूतांपैकी एकाने, वेदीवरील एक निखारा चिमट्याने उचलला व तो उडत माझ्याकडे आला. \v 7 माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, “हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे.” \p \v 8 नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?” \p मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!” \p \v 9 ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: \q1 “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, \q2 ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’ \q1 \v 10 या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; \q2 त्यांचे कान मंद \q2 आणि त्यांचे डोळे बंद करा. \q1 नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, \q2 त्यांच्या कानांनी ऐकतील, \q2 अंतःकरणापासून समजतील, \q1 आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.” \p \v 11 नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” \p आणि त्यांनी उत्तर दिले: \q1 “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत \q2 आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, \q1 घरे ओसाड पडत नाहीत \q2 आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत. \q1 \v 12 याहवेह सर्व लोकांना दूर पाठवून देईपर्यंत \q2 आणि देशाचा पूर्णपणे त्याग केला जाईपर्यंत. \q1 \v 13 आणि भूमीवर एक दशांश जरी राहिला तरी, \q2 तो पुन्हा उद्ध्वस्त होईल. \q1 परंतु जसे एला आणि अल्लोन \q2 जेव्हा कापून टाकल्यावर बुंधा उरतो, \q2 त्याचप्रमाणे पवित्र बियाणे हे भूमीमध्ये बुंध्याप्रमाणे होईल.” \c 7 \s1 इम्मानुएलचे चिन्ह \p \v 1 जेव्हा यहूदीयाचा राजा आहाज, जो योथामचा पुत्र, जो उज्जीयाहचा पुत्र होता, अरामचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहने यरुशलेमवर हल्ला केला, परंतु त्यांच्यावर ते विजय मिळवू शकले नाहीत. \p \v 2 आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली. \p \v 3 तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब\f + \fr 7:3 \fr*\fq शेर-याशूब \fq*\ft किंवा \ft*\fqa अवशिष्ट परत येतील\fqa*\f* यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे. \v 4 आहाजाला सांग, ‘सावध राहा, शांत राहा आणि घाबरू नकोस. जळाऊ लाकडाच्या या दोन धुरकट थोटकामुळे अंतःकरण खचून देऊ नको—रसीन आणि अराम आणि रमाल्याहच्या पुत्राच्या भयंकर रागामुळे अंतःकरण खचू देऊ नको. \v 5 अराम, एफ्राईम आणि रमाल्याहच्या पुत्राने असे म्हणून तुमच्या नाशाचा कट रचला आहे, \v 6 “चला, आपण यहूदीयावर हल्ला करू; चला आपण ते तोडून त्याचे तुकडे करू आणि आपसात वाटून ते घेऊ आणि ताबीलच्या पुत्राला त्यावर राजा बनवू.” \v 7 तरीही सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘तसे होणार नाही, \q2 तसे घडणार नाही, \q1 \v 8 कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, \q2 आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. \q1 पासष्ट वर्षांच्या आतच \q2 एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत. \q1 \v 9 एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, \q2 आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. \q1 जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर \q2 तुम्ही उभे राहणारच नाही.’ ” \p \v 10 पुन्हा याहवेह आहाजबरोबर बोलले, \v 11 “याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.” \p \v 12 परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.” \p \v 13 तेव्हा यशायाह म्हणाला, “अहो तुम्ही दावीदाच्या घराण्यांनो, आता ऐका! माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे पुरेसे झाले नाही का? तुम्ही माझ्या परमेश्वराच्यासुद्धा सहनशक्तीची परीक्षा घेणार आहात का? \v 14 म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल\f + \fr 7:14 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa आम्हासह परमेश्वर\fqa*\f* हे नाव देतील. \v 15 जेव्हापर्यंत त्याला योग्य व अयोग्याची पारख करता येत नाही, तेव्हापर्यंत तो दही आणि मध खाईल, \v 16 कारण त्या मुलाला अयोग्य नाकारणे आणि योग्य निवडणे हे पुरेसे माहीत होण्याआधीच, ज्या दोन देशाच्या राजांची तुम्हाला भीती वाटत आहे ते नष्ट केले जातील. \v 17 एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.” \s1 अश्शूर, याहवेहचे साधन \p \v 18 त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील. \v 19 ते सर्व येतील आणि उतरत्या खोल दऱ्यांमध्ये, खडकांच्या कपाऱ्यांमध्ये, सर्व काटेरी झुडूपांवर आणि पाण्याच्या सर्व झऱ्यांवर वस्ती करतील. \v 20 त्या दिवशी प्रभू फरात\f + \fr 7:20 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीच्या पलीकडून भाड्याने आणलेला वस्तरा—अश्शूरचा राजा—याचा उपयोग तुमची डोकी आणि गुप्तांगाचे मुंडण करण्यासाठी आणि तुमच्या दाढ्या कापण्यासाठीही करतील. \v 21 त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील. \v 22 आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील. \v 23 त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल\f + \fr 7:23 \fr*\ft अंदाजे 12 कि.ग्रॅ.\ft*\f* होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील. \v 24 शिकारी धनुष्य आणि बाण घेऊन तिथे जातील, कारण तेथील जमीन काटेरी झुडूपांनी आणि कुसळांनी झाकलेली असेल. \v 25 एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील. \c 8 \s1 चिन्हे म्हणून यशायाह आणि त्याची मुले \p \v 1 याहवेह मला म्हणाले, “एक मोठी चर्मपत्राची पाटी घे आणि त्याच्यावर एका साध्या लेखणीने लिही: महेर-शालाल-हश-बाज\f + \fr 8:1 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa लूट त्वरा करते, पारध घाई करते\fqa*\f*.” \v 2 म्हणून मी उरीयाह याजकाला आणि यबेरेक्याहचा पुत्र जखर्‍याहला माझ्यासाठी विश्वसनीय साक्षीदार म्हणून बोलाविले. \v 3 तेव्हा मी माझी पत्नी, जी संदेष्टी आहे, तिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि ती गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. आणि याहवेह मला म्हणाले, “त्याचे नाव महेर-शालाल-हश-बाज असे ठेव. \v 4 कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.” \p \v 5 याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले: \q1 \v 6 “कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे \q2 शिलोहचे पाणी नाकारले आहे \q1 आणि रसीन आणि रमाल्याहच्या पुत्राबद्दल \q2 आनंद व्यक्त केला आहे. \q1 \v 7 म्हणून प्रभू आता त्यांच्यावर \q2 फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— \q2 अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. \q1 ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, \q2 त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील, \q1 \v 8 हे इम्मानुएला\f + \fr 8:8 \fr*\ft परमेश्वर आम्हासह\ft*\f*! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल, \q2 तिच्यामधून जाईल आणि तिच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. \q1 त्याचे पसरलेले पंख \q2 तुमच्या देशाचा विस्तार झाकून टाकतील.” \b \q1 \v 9 युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! \q2 दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, \q1 युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! \q2 युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! \q1 \v 10 तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; \q2 तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, \q2 कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत. \p \v 11 याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस: \q1 \v 12 “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात \q2 त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका; \q1 त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका, \q2 आणि त्याची धास्ती घेऊ नका. \q1 \v 13 याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे, \q2 तेच आहेत ज्यांचे तुम्ही भय धरावे, \q2 तेच आहेत ज्यांना तुम्ही घाबरावे. \q1 \v 14 इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी; \q2 ते एक पवित्रस्थान असतील, \q1 लोकांना ठेच लागण्याचा एक दगड \q2 व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील. \q1 आणि यरुशलेमच्या लोकांसाठी \q2 तो एक सापळा आणि पाश होईल. \q1 \v 15 त्यांच्यापैकी पुष्कळजण अडखळतील; \q2 ते पडतील आणि तुटून जातील, \q2 ते जाळ्यात अडकतील आणि बंदिवान केले जातील.” \b \q1 \v 16 चेतावणीच्या या साक्षीला बांधून घ्या \q2 आणि परमेश्वराची ही शिकवण माझ्या शिष्यांमध्ये मोहोरबंद करा. \q1 \v 17 मी याहवेहची वाट पाहीन \q2 जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. \q1 मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन. \p \v 18 मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत. \s1 अंधकार प्रकाशात बदलतो \p \v 19 जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा? \v 20 परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही. \v 21 दुःखी आणि भुकेले असे ते देशभर फिरत राहतील; जेव्हा ते भुकेने व्याकूळ होतील, तेव्हा ते रागावतील आणि वर पाहतील आणि त्यांच्या राजाला आणि त्यांच्या परमेश्वराला शाप देतील. \v 22 तेव्हा ते खाली पृथ्वीकडे पाहतील आणि त्यांना फक्त संकट, अंधकार आणि भयभीत करणारी निस्तेज काळोखी दिसेल आणि त्यांना गडद अंधारात ढकलण्यात येईल. \c 9 \p \v 1 तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील— \q1 \v 2 अंधारात चालणाऱ्या लोकांनी \q2 मोठा प्रकाश पाहिला आहे; \q1 गडद अंधकार असलेल्या देशात राहणाऱ्यांवर \q2 प्रकाश उदय पावला आहे. \q1 \v 3 तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे \q2 आणि त्यांचा आनंद वाढविला आहे. \q1 जसे लोक कापणीच्या वेळेस आनंद करतात, \q2 तसे ते तुमच्यासमोर आनंद करतात, \q1 लुटलेला माल वाटून घेतांना \q2 युद्ध करणारे आनंद करतात तसे. \q1 \v 4 कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, \q2 तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, \q1 त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, \q2 त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी \q2 मोडून टाकली आहे. \q1 \v 5 लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे \q2 आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र \q1 जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, \q2 जाळण्यासाठी इंधन असे होईल. \q1 \v 6 कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे, \q2 आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे, \q2 आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल. \q1 आणि त्यांना \q2 अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर, \q2 सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील. \q1 \v 7 त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा \q2 अंत होणार नाही. \q1 ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील \q2 आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, \q1 ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत \q2 न्याय आणि धार्मिकता \q2 स्थापन करतील आणि टिकवतील. \q1 सर्वसमर्थ याहवेहचा आवेश \q2 हे पूर्ण करेल. \s1 इस्राएलविरुद्ध याहवेहचा क्रोध \q1 \v 8 प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे; \q2 तो इस्राएलवर पडेल. \q1 \v 9 सर्व लोकांना ते माहीत होईल— \q2 एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— \q1 जे अभिमानाने \q2 आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात, \q1 \v 10 “विटा खाली पडल्या आहेत, \q2 परंतु आम्ही ते घडविलेल्या दगडाने पुन्हा बांधू; \q1 उंबराची झाडे कापली गेली आहेत, \q2 परंतु आम्ही त्यांच्या जागी देवदारू लावू.” \q1 \v 11 परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे \q2 आणि त्यांच्या शत्रूंना प्रेरित केले आहे. \q1 \v 12 पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी \q2 इस्राएलला मोठा आ वासून गिळंकृत केले आहे. \b \q1 हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, \q2 त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे. \b \q1 \v 13 परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत, \q2 आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही. \q1 \v 14 म्हणून याहवेह एकाच दिवसात इस्राएलचे मस्तक आणि शेपूट, \q2 खजूराच्या फांद्या आणि लव्हाळा हे दोन्ही कापून टाकतील; \q1 \v 15 वडीलजन आणि मान्यवर लोक हे मस्तक आहेत, \q2 खोटे शिक्षण देणारे संदेष्टे हे शेपूट आहेत. \q1 \v 16 या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात, \q2 आणि ज्यांना मार्गदर्शन मिळाले, ते पथभ्रष्ट झाले आहेत. \q1 \v 17 म्हणूनच प्रभू त्यांच्या तरुण पुरुषांना पाहून प्रसन्न होणार नाहीत; \q2 त्यांना विधवांचा आणि अनाथांचा कळवळा येणार नाही; \q1 कारण हे सर्वच अधर्मी व दुष्ट असून, \q2 प्रत्येक मुख असत्य बोलणारे आहे. \b \q1 हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, \q2 त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे. \b \q1 \v 18 दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते. \q2 ती काटेरी झुडपे आणि काटेरी झाडे यांना भस्म करते, \q1 ती झाडेझुडपांचे रान पेटवून टाकते, \q2 त्यामुळे तो धुराचा एक स्तंभ होऊन गरगर फिरत वर जातो. \q1 \v 19 सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने \q2 भूमी होरपळून जाईल \q1 आणि लोक त्या आगीचे इंधन होतील; \q2 ते एकमेकांना वाचविणार नाहीत. \q1 \v 20 उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील \q2 परंतु ते भुकेले राहतील; \q1 डाव्या बाजूला असलेलेही खातील \q2 परंतु समाधानी होणार नाहीत. \q1 प्रत्येकजण स्वतःच्याच संततीचे मांस\f + \fr 9:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa बाहू\fqa*\f* खातील: \q2 \v 21 मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल; \q2 ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील. \b \q1 हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, \q2 त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे. \b \b \c 10 \q1 \v 1 त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात— \q2 जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात, \q1 \v 2 गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी \q2 आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, \q1 विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी \q2 आणि अनाथांना लुटण्यासाठी. \q1 \v 3 दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, \q2 जेव्हा फार दुरून संकट येईल? \q1 तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? \q2 तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार? \q1 \v 4 बंदिवानांमध्‍ये लपून बसणे, \q2 किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही. \b \q1 हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, \q2 त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे. \s1 परमेश्वर अश्शूरचा न्यायनिवाडा करतात \q1 \v 5 “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, \q2 ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे! \q1 \v 6 मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, \q2 मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, \q1 त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, \q2 आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी. \q1 \v 7 परंतु हा त्याचा उद्देश नाही, \q2 त्याच्या मनात हे नाही; \q1 त्याचा उद्देश आहे की नाश करावा, \q2 अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा. \q1 \v 8 ‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात. \q2 \v 9 ‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? \q1 हमाथ अर्पादसारखा \q2 आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय? \q1 \v 10 जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली, \q2 अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या— \q1 \v 11 शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला \q2 तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ” \p \v 12 जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन. \v 13 कारण ते म्हणतात: \q1 “ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे, \q2 आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे. \q1 मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या, \q2 मी त्यांचे खजिने लुटले; \q2 एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले. \q1 \v 14 जसा कोणी घरट्यात पोहोचतो, \q2 तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. \q1 जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, \q2 तसे मी सर्व देशांना एकत्र केले; \q1 कोणीही पंख फडफडविला नाही, \q2 किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ” \b \q1 \v 15 जो कुर्‍हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय, \q2 किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय? \q1 जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय, \q2 किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय! \q1 \v 16 म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, \q2 त्याच्या दणकट योद्ध्यांवर विनाशकारी रोग पाठवतील; \q1 त्यांच्या ऐश्वर्यात धगधगत्या ज्योतीसारखा अग्नी प्रज्वलित केला जाईल \q2 अग्नी प्रज्वलित केला जाईल. \q1 \v 17 इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल, \q2 त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील; \q1 त्याचे काटे आणि काटेरी झुडपे \q2 ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील. \q1 \v 18 ज्याप्रकारे एखादा रोगी क्षय पावतो \q2 त्याप्रकारे त्याच्या जंगलांचे आणि सुपीक शेत जमिनींचे वैभव, \q2 ते पूर्णपणे नष्ट करतील. \q1 \v 19 आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की, \q2 एखादे लहान बालकही त्याची नोंद करेल. \s1 इस्राएलचे अवशिष्ट लोक \q1 \v 20 त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट, \q2 जिवंत राहिलेले याकोबाचे लोक, \q1 ज्याने त्यांना मारून टाकले \q2 त्याच्यावर यापुढे अवलंबून राहणार नाहीत, \q1 परंतु याहवेह, इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर \q2 ते खरोखरच भरवसा ठेवतील. \q1 \v 21 याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल, \q2 सर्वसमर्थ परमेश्वराकडे परत येईल. \q1 \v 22 हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी, \q2 उरलेलेच मात्र परत येतील. \q1 नाश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, \q2 परिपूर्ण आणि न्याययुक्त. \q1 \v 23 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, \q2 नाश करण्याचा हुकूमनामा संपूर्ण देशामध्ये अंमलात आणतील. \p \v 24 म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “माझे लोकहो, जे तुम्ही सीयोनमध्ये राहता, \q2 अश्शूरी लोकांना घाबरू नका, \q1 जे तुम्हाला दांडक्याने मारतात. \q2 आणि इजिप्तने केले त्याप्रमाणे तुमच्याविरुद्ध सोटा उगारतात. \q1 \v 25 तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल \q2 आणि माझा क्रोध त्यांच्या नाशाच्या मार्गाकडे वळेल.” \b \q1 \v 26 सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील, \q2 जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते; \q1 आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील, \q2 जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते. \q1 \v 27 त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून, \q2 त्यांचे जू तुमच्या मानेवरून काढून घेतले जाईल. \q1 तुमच्या खांद्यावरून \q2 जू तुटले जाईल.\f + \fr 10:27 \fr*\ft किंवा \ft*\fqa कारण तुमची चरबी वाढली आहे\fqa*\f* \b \q1 \v 28 ते अयाथमध्ये प्रवेश करतात; \q2 ते मिग्रोनमधून पुढे जातात; \q2 ते मिकमाश येथे पुरवठा साठवितात. \q1 \v 29 ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात, \q2 “आम्ही गेबा येथे रात्रभर छावणी टाकू.” \q1 रामाह थरथर कापतो; \q2 शौलाचा गिबियाह पळून जातो. \q1 \v 30 गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा! \q2 ऐक, लईशाह! \q2 गरीब बिचारा अनाथोथ! \q1 \v 31 मदमेनाह पळून गेला आहे; \q2 गेबीमचे लोक आश्रय घेत आहेत. \q1 \v 32 आज ते नोब येथे थांबतील; \q2 सीयोन कन्येच्या डोंगराकडे, \q1 यरुशलेमच्या टेकडीकडे \q2 ते त्यांच्या मुठी वळवतील. \b \q1 \v 33 हे पाहा, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, \q2 मोठ्या सामर्थ्याने झाडांच्या मोठ्या फांद्या छाटून टाकतील. \q1 भव्य झाडे पाडली जातील, \q2 उंच झाडे खाली आणली जातील. \q1 \v 34 ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील; \q2 लबानोन प्रतापी परमेश्वरासमोर पडेल. \c 11 \s1 इशायापासून फांदी \q1 \v 1 इशायाच्या बुंध्यापासून एक अंकुर निघून वर येईल; \q2 त्याच्या मुळांपासून एक फांदी येऊन ती फळ देईल. \q1 \v 2 याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— \q2 शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, \q2 सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, \q2 ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा— \q1 \v 3 आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील. \b \q1 ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत, \q2 किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत. \q1 \v 4 परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, \q2 न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. \q1 ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; \q2 ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील. \q1 \v 5 धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल \q2 आणि विश्वासूपणा त्यांचा कंबरपट्टा असेल. \b \q1 \v 6 लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, \q2 चित्ता बकरीबरोबर झोपेल, \q1 वासरे आणि सिंह एकत्र राहतील;\f + \fr 11:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa सिंह वासराला चारेल\fqa*\f* \q2 आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल. \q1 \v 7 गाई अस्वलाबरोबर चरतील, \q2 त्यांची पिल्ले एकत्र झोपतील, \q2 आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. \q1 \v 8 लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, \q2 आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल. \q1 \v 9 माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी \q2 ते कोणाचेही नुकसान किंवा नाश करणार नाहीत, \q1 कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे \q2 तशीच पृथ्वी याहवेहच्या ज्ञानाने भरून जाईल. \p \v 10 त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल. \v 11 त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून\f + \fr 11:11 \fr*\ft बाबिलोन\ft*\f*, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील. \q1 \v 12 राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उभा करतील \q2 आणि इस्राएलच्या बंदिवासात गेलेल्यांना एकत्र करतील; \q1 पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून \q2 यहूदीयाच्या विखुरलेल्या लोकांना ते एकत्र जमवतील. \q1 \v 13 एफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल, \q2 आणि यहूदीयाच्या शत्रूंचा नाश होईल; \q1 एफ्राईमला यहूदाहचा मत्सर वाटणार नाही, \q2 किंवा यहूदाह एफ्राईमबरोबर शतृत्व करणार नाही. \q1 \v 14 ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील; \q2 एकत्र मिळून ते पूर्व दिशेकडील लोकांना लुटतील. \q1 एदोम आणि मोआब या देशांना ते जिंकून घेतील, \q2 आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील. \q1 \v 15 याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे \q2 आखात कोरडे करतील; \q1 होरपळणाऱ्या वाऱ्याने \q2 ते फरात नदीवर हात झटकून टाकतील. \q1 ते त्याचे सात ओढे पाडतील \q2 जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल. \q1 \v 16 अश्शूरपासून त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी \q2 जेव्हा ते इजिप्तमधून आले \q1 तेव्हा जसा इस्राएलसाठी केला होता, \q2 तसा एक राजमार्ग असेल. \c 12 \s1 स्तुतिगीत \p \v 1 त्या दिवशी तुम्ही म्हणाल: \q1 “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, \q2 जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, \q1 तरी तुमचा राग दूर झाला आहे \q2 आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे. \q1 \v 2 निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; \q2 मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. \q1 याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण\f + \fr 12:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa गीत\fqa*\f* आहेत; \q2 ते माझे तारण झाले आहेत.” \q1 \v 3 तारणाच्या विहिरींतून \q2 तुम्ही आनंदाने पाणी काढाल. \p \v 4 त्या दिवशी तुम्ही म्हणाल: \q1 “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; \q2 त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, \q2 आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे. \q1 \v 5 याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत; \q2 हे सर्व जगाला माहीत करून द्या. \q1 \v 6 सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, \q2 कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.” \c 13 \s1 बाबेलविरुद्ध केलेली भविष्यवाणी \p \v 1 आमोजाचा पुत्र यशायाहने बाबेलच्या विरोधात पाहिलेला दृष्टान्त: \q1 \v 2 उघड्या टेकडीच्या शिखरावर ध्वज उंच करा, \q2 मान्यवर लोकांच्या फाटकांमधून प्रवेश करण्यासाठी \q1 त्यांना ओरडून सांगा; \q2 खुणा करून त्यांना बोलवा. \q1 \v 3 ज्यांना मी युद्धासाठी सुसज्ज केले आहे, त्यांना मी आज्ञा दिली आहे. \q2 जे माझ्या विजयाचा आनंद करीत आहेत— \q2 मी माझा क्रोध अंमलात आणण्यासाठी त्या माझ्या योद्ध्यांना पाचारण केले आहे. \b \q1 \v 4 ऐका, डोंगरावरील एक आवाज, \q2 मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज! \q1 ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ, \q2 राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज! \q1 सर्वसमर्थ याहवेह, \q2 युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत. \q1 \v 5 ते फार दूर देशातून येतात, \q2 आकाशाच्या शेवटच्या टोकापासून— \q1 याहवेह आणि त्यांच्या क्रोधाची शस्त्रे \q2 संपूर्ण देशाचा नाश करण्यासाठी येतात. \b \q1 \v 6 आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे; \q2 तो दिवस सर्वसमर्थ यांच्याकडून नाशाप्रमाणे येईल. \q1 \v 7 या कारणामुळे सर्वांचे हात शक्तिहीन होतील, \q2 प्रत्येकाचे हृदय भीतीने वितळून जाईल. \q1 \v 8 दहशत त्यांच्यावर झडप घालेल, \q2 वेदना आणि मनस्ताप त्यांना घट्ट पकडतील; \q2 प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेदनेने गडाबडा लोळतील. \q1 भयग्रस्त होऊन ते एकमेकांकडे पाहतील, \q2 त्यांचे चेहरे होरपळतील. \b \q1 \v 9 पाहा, याहवेहचा दिवस येत आहे \q2 —एक कठोर दिवस, क्रोधाचा आणि घोर संतापाचा— \q1 भूमी उजाड करण्यासाठी \q2 आणि तेथील पापी लोकांचा नाश करण्यासाठी. \q1 \v 10 आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे \q2 त्यांचा प्रकाश देणार नाहीत. \q1 उगवता सूर्य अंधकारमय होईल \q2 आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही. \q1 \v 11 मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल \q2 दुष्टांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करेन. \q1 मी गर्विष्ठांचा अहंकार नाहीसा करेन \q2 आणि निर्दयी अभिमानींना मी लीन करेन. \q1 \v 12 मी लोकांना शुद्ध सोन्यापेक्षा दुर्मिळ करेन, \q2 ओफीरच्या सोन्यापेक्षाही अप्राप्य करेन. \q1 \v 13 म्हणून सर्वसमर्थ याहवेह यांच्या क्रोधाने \q2 आणि त्यांच्या क्रोधाग्नीच्या दिवशी \q1 मी आकाशे थरथर कापतील असे करेन; \q2 पृथ्वी तिच्या जागेवर हादरेल. \b \q1 \v 14 शिकार केलेल्या छोट्या हरिणीप्रमाणे, \q2 जसे मेंढपाळ नसलेले मेंढरू, \q1 सर्व त्यांच्या त्यांच्या लोकांकडे परत जातील, \q2 ते त्यांच्या मातृभूमीत पळून जातील. \q1 \v 15 जो कोणी पकडला जाईल, त्याला आरपार खुपसले जाईल. \q2 जे सर्व पकडले गेले, ते तलवारीने मारले जातील. \q1 \v 16 त्यांची बालके त्यांच्या डोळ्यासमोर आपटून, त्यांचे तुकडे केले जातील; \q2 त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांचा विनयभंग केला जाईल. \b \q1 \v 17 पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही, \q2 आणि जे सोन्यामध्ये आनंद मानत नाहीत \q2 त्या मेदिया लोकांना मी त्यांच्याविरुद्ध चिथावणी देईन. \q1 \v 18 त्यांची धनुष्ये तरुणांना मारून टाकतील; \q2 ते तान्ह्या बालकांवर दया करणार नाहीत, \q2 किंवा ते लहान मुलांकडे दयेने पाहणार नाहीत. \q1 \v 19 खास्द्यांच्या राज्यांचे बहुमूल्य रत्न, \q2 बाबेलच्या लोकांचा अभिमान आणि गौरव, \q1 सदोम आणि गमोराप्रमाणे \q2 परमेश्वराकडून उद्ध्वस्त केल्या जाईल. \q1 \v 20 तिच्यात कोणी कधीही वसती करणार नाही \q2 किंवा पिढ्यान् पिढ्या रहिवास करणार नाही; \q1 कोणीही अरब\f + \fr 13:20 \fr*\ft भटके\ft*\f* त्यांचे तंबू तिथे ठोकणार नाहीत, \q2 तिथे कोणीही मेंढपाळ त्यांच्या कळपांना विश्रांती देणार नाहीत. \q1 \v 21 परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील, \q2 तरसानी तिची घरे भरून जातील; \q1 तिथे घुबडे राहतील, \q2 आणि तिथे बोकडे उड्या मारतील. \q1 \v 22 तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील, \q2 कोल्हे तिच्या आलिशान राजवाड्यांमध्ये वस्ती करतील. \q1 तिची वेळ फार जवळ आली आहे, \q2 आणि तिचे दिवस लांबणार नाहीत. \b \b \c 14 \q1 \v 1 याहवेह याकोबवर दया करतील; \q2 पुन्हा एकदा ते इस्राएलची निवड करतील \q2 आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत स्थायी करतील. \q1 परदेशी लोक त्यांच्यात सामील होतील \q2 आणि याकोबाच्या वंशजांसोबत एकत्र येतील. \q1 \v 2 अनेक राष्ट्रे त्यांना सहकार्य करतील \q2 व त्यांना त्यांच्या जागी आणतील. \q1 आणि इस्राएल राष्ट्रांवर ताबा मिळवतील, \q2 व याहवेहच्या भूमीत त्यांच्या स्त्रिया व पुरुषांना आपले सेवक बनवतील, \q1 त्यांना बंदिवासात नेलेल्यांना ते बंदी करतील \q2 त्यांना पीडलेल्यांवर ते राज्य करतील. \p \v 3 त्या दिवशी याहवेह तुम्हाला तुमच्या सर्व पीडा व अस्वस्थता व कठोर परिश्रमातून मुक्तता देतील. \v 4 तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल: \q1 पाहा, तो जुलूमशहा कसा नाश पावला आहे! \q2 त्यांचा उन्मत्तपणा कसा नष्ट झाला आहे! \q1 \v 5 कारण याहवेहने दुष्टांची काठी, \q2 व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे, \q1 \v 6 ज्या लोकांना तू क्रोधाने मारले, \q2 सतत ठोसा मारत राहिलास, \q1 बेफाम त्वेषाने व \q2 पाषाणहृदयी आवेशाने देशांना अधीन केले. \q1 \v 7 सर्व देश आता समाधानी आणि शांत आहेत; \q2 ते गाणी गात आहेत. \q1 \v 8 लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा \q2 आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात, \q1 “आता तुम्हाला खाली पाडले आहे, \q2 तेव्हापासून आम्हाला तोडण्यासाठी कोणी आलेले नाही.” \b \q1 \v 9 अधोलोक तुम्हाला भेटण्यासाठी \q2 मृतांच्या रसातळात हालचाल होत आहे; \q1 मेलेल्यांचे आत्मे जागृत होऊन तुम्हाला अभिवादन करण्यासाठी— \q2 जगामध्ये जे सर्व पुढारी होते; \q1 जे सर्व राष्ट्रांवरील राजे होते, \q2 ते त्यांच्या सिंहासनावरून उठत आहेत. \q1 \v 10 ते सर्व प्रतिसाद देतील, \q2 ते तुम्हाला असे म्हणतील, \q1 “जसे आम्ही आहोत, तसे तुम्ही सुद्धा दुर्बल झाला आहात; \q2 तुम्ही आमच्यासारखे झाला आहात.” \q1 \v 11 तुमच्या वीणांच्या आवाजासहीत, \q2 तुमचा सर्व डामडौल खाली थडग्यात आणण्यात आला आहे, \q1 कृमी तुमच्या खाली पसरलेल्या आहेत \q2 आणि कीटक तुम्हाला झाकून टाकत आहेत. \b \q1 \v 12 पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! \q2 तू स्वर्गातून कसा पडला आहेस, \q1 तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, \q2 तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस! \q1 \v 13 तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला, \q2 “मी स्वर्गात चढून जाईन; \q1 मी माझे सिंहासन \q2 परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन; \q1 मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, \q2 झाफोनच्या\f + \fr 14:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa कनानी लोकांचा पवित्र पर्वत\fqa*\f* सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन. \q1 \v 14 मी ढगांच्या शिखरांवर जाईन; \q2 मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन.” \q1 \v 15 परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात, \q2 खोल खाईत लोटला गेला आहेस. \b \q1 \v 16 जे तुझ्याकडे पाहतात ते टक लावून बघत आहेत, \q2 ते तुझ्या नशिबाविषयी विचार करतात: \q1 “हा तोच मनुष्य आहे काय, ज्याने पृथ्वीला हादरविले होते \q2 आणि राज्यांना कंप सुटेल असे केले होते. \q1 \v 17 ज्या मनुष्याने जगाला अरण्य केले \q2 ज्याने शहरे उद्ध्वस्त केली \q2 आणि तो त्याच्या बंदिवानांना घरी जाऊ देत नसे?” \b \q1 \v 18 राष्ट्रांचे सर्व राजे चिरनिद्रीत अवस्थेत आहेत, \q2 प्रत्येकजण स्वतःच्या कबरेत आहे. \q1 \v 19 परंतु तुला तुझ्या कबरेतून \q2 नको असलेल्या फांदीसारखे बाहेर टाकले आहे; \q1 ज्यांना तलवारीने भोसकून टाकले, \q2 जे दगडांच्या खड्ड्यात टाकण्यात येतात, \q2 ज्याप्रकारे माणसांची प्रेते पायाखाली तुडविली जातात \q1 तसे त्यांना तुमच्यावर झाकून टाकले आहे. \q2 \v 20 तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही, \q1 कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे \q2 आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे. \b \b \q1 दुष्ट लोकांच्या संततीचा \q2 पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये. \q1 \v 21 भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये \q2 आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये, \q1 म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी \q2 त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा. \b \q1 \v 22 सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, \q2 “मी त्यांच्याविरुद्ध उठेन, \q1 बाबेलचे नाव आणि तेथील जिवंत राहिलेले, \q2 तिची संतती आणि तिच्या वंशजांना मी नामशेष करून टाकेन,” \q2 असे याहवेह घोषित करतात. \q1 \v 23 “मी तिला घुबडांचे निवासस्थान \q2 आणि दलदलीचा प्रदेश करेन; \q1 मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकेन,” \q2 असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात. \p \v 24 सर्वसमर्थ याहवेहनी शपथ घेतली आहे, \q1 “निश्चितच, मी जी योजना केली आहे, तसेच होईल, \q2 आणि जो माझा संकल्प आहे, त्याप्रमाणे हे घडून येईल. \q1 \v 25 माझ्या भूमीवर मी अश्शूरांना चिरडून टाकेन; \q2 त्यांना माझ्या डोंगरावर तुडवेन. \q1 त्याचे जू माझ्या लोकांवरून काढून टाकेन, \q2 आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून उतरवेन.” \b \q1 \v 26 अखिल पृथ्वीसाठी ही योजना केली आहे; \q2 सर्व देशांवर हा हात फिरविला जाईल. \q1 \v 27 सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो? \q2 त्यांचा हात उठला आहे, त्याला कोण आवर घालू शकतो? \s1 पलिष्टी लोकांविरुद्ध भविष्यवाणी \p \v 28 आहाज राजा मरण पावला त्या वर्षी हा संदेश मला प्राप्त झाला: \q1 \v 29 अहो पलिष्टी लोकांनो, ज्या दांडक्याने तुम्हाला मारले \q2 तो मोडला आहे म्हणून आनंद करू नका. \q1 तरी त्या सापापासून फुरसे निपजेल \q2 त्याचे फळ तुमचा वेध घेणारे विषारी नाग असतील. \q1 \v 30 गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल, \q2 आणि गरजवंत सुरक्षितेत झोप घेतील. \q1 पण तुझे मूळ दुष्काळाने नष्ट होईल; \q2 ते तुझ्या अवशिष्टांचा तलवारीने नाश करतील. \b \q1 \v 31 वेशींनो, आक्रोश करा! नगरांनो विलाप करा! \q2 पलिष्टी लोकांनो, भयाने वितळून जा! \q1 कारण उत्तरेकडून धुराचा लोट येत आहे, \q2 त्यांच्या पलटणींत कोणीही रेंगाळणारे नाहीत. \q1 \v 32 आता राष्ट्रांच्या राजदूतांना \q2 काय उत्तर देण्यात यावे? \q1 “याहवेहने सीयोन स्थापिले आहे, \q2 आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.” \c 15 \s1 मोआबा विरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी: \q1 मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे, \q2 एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! \q1 मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे, \q2 एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! \q1 \v 2 दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, \q2 मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; \q2 नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. \q1 प्रत्येकाच्या डोक्यावरील केस \q2 आणि दाढी काढलेली आहे. \q1 \v 3 रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; \q2 छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये \q1 ते सर्व आक्रोश करतात, \q2 विलाप करीत पालथे पडतात. \q1 \v 4 हेशबोन आणि एलिआलेह रडतात, \q2 त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. \q1 म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, \q2 आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत. \b \q1 \v 5 माझे मन मोआबसाठी रडते; \q2 तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, \q2 एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. \q1 ते लुहिथकडे टेकडीवर जातात, \q2 जाताना ते विलाप करतात; \q1 होरोनाईमच्या वाटेवर \q2 ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात. \q1 \v 6 निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे \q2 आणि गवत करपून गेले आहे; \q1 वनस्पती सुकून गेली आहे; \q2 आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही. \q1 \v 7 म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती \q2 ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात. \q1 \v 8 त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. \q2 त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, \q2 त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो. \q1 \v 9 दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे, \q2 परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन— \q1 मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर \q2 आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन. \b \b \c 16 \q1 \v 1 देशाच्या अधिपतीकडे \q2 सेलापासून वाळवंटाच्या पलीकडे \q1 सीयोन कन्येच्या पर्वतापर्यंत \q2 खंडणी म्हणून कोकरे पाठवा. \q1 \v 2 घरट्यातून ढकलून दिलेल्या \q2 फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, \q1 मोआबच्या स्त्रिया \q2 आर्णोनच्या घाटावर आहेत. \b \q1 \v 3 मोआब म्हणतो, “तुमच्या मनाची तयारी करा, \q2 निर्णय द्या. \q1 तुमची सावली रात्रीसारखी करा— \q2 भर दुपारच्या वेळेसारखी. \q1 पलायन केलेल्यांना लपवा, \q2 शरणार्थी लोकांचा विश्वासघात करू नका. \q1 \v 4 पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या; \q2 संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.” \b \q1 जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल, \q2 आणि नाश थांबेल; \q2 आक्रमण करणारे नाहीसे होतील. \q1 \v 5 प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल; \q2 दावीदाच्या घराण्यातील\f + \fr 16:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa डेर्‍यातून\fqa*\f* एकजण, \q2 विश्वासूपणाने त्यावर बसेल— \q1 जो न्यायनिवाडा करताना न्यायाची बाजू घेतो \q2 आणि धार्मिकतेची कामे जलदगतीने करतो. \b \q1 \v 6 मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे— \q2 तिचा अहंकार किती मोठा आहे! \q1 तिची घमेंड, तिचा अभिमान आणि तिचा उर्मटपणा; \q2 परंतु तिच्या सर्व फुशारक्या पोकळ आहेत. \q1 \v 7 म्हणून मोआबी मोठ्याने रडतात, \q2 मोआबसाठी ते एकत्र मोठ्याने रडतात. \q1 कीर-हरेसेथचा बेदाणा किंवा मनुका मिश्रित पिठाच्या गोड ढेपांसाठी \q2 विलाप आणि शोक करतात. \q1 \v 8 हेशबोनची शेते सुकून गेली आहेत, \q2 सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा. \q1 ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या \q2 आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या, \q1 त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली \q2 इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत. \q1 त्यांची कोंबे बाहेर पसरली \q2 आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत. \q1 \v 9 म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी \q2 याजेरसह मीही रडतो. \q1 हेशबोन आणि एलिआलेह, \q2 मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! \q1 तुमच्या पिकलेल्या फळांसाठी \q2 आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे. \q1 \v 10 फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे; \q2 द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही; \q1 कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही, \q2 कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे. \q1 \v 11 माझे हृदय वीणेप्रमाणे मोआबसाठी विलाप करीत आहे, \q2 कीर-हरेसेथसाठी माझे अंतःकरण विलाप करीत आहे. \q1 \v 12 जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते, \q2 तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते; \q1 जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते, \q2 तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही. \p \v 13 याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे. \v 14 परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.” \c 17 \s1 दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी: \q1 “पहा, दिमिष्क आता शहर असे राहणार नाही \q2 परंतु ते नाशवंत वस्तूंचा ढिगारा असे होईल. \q1 \v 2 अरोएरची शहरे ओसाड होतील \q2 आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, \q2 तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल. \q1 \v 3 तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, \q2 आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; \q1 अराम नगरातील अवशिष्ट \q2 इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” \q2 असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात. \b \q1 \v 4 “त्या दिवशी याकोबाचे वैभव कमी होईल; \q2 त्याच्या शरीरातील चरबी व्यर्थ जाईल. \q1 \v 5 जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, \q2 आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— \q1 जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात \q2 धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल. \q1 \v 6 जसे जैतुनाच्या झाडाला झोडपतात \q2 तेव्हा उंचटोकाच्या फांद्यांवर दोन किंवा तीन जैतून, \q1 आणि फळ देणाऱ्या मोठ्या फांद्यांवर चार किंवा पाच जैतून राहून जातात, \q2 तसे जमा करण्याचे काही शिल्लक राहील,” \q2 असे इस्राएलचे परमेश्वर याहवेह घोषित करतात. \b \q1 \v 7 त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील \q2 त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील. \q1 \v 8 ते वेद्यांकडे, \q2 त्यांच्या हस्तकृतींकडे पाहणार नाहीत, \q1 आणि अशेरा स्तंभांसाठी\f + \fr 17:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa अश्शेरा देवीचे लाकडी चिन्ह\fqa*\f* \q2 आणि त्यांच्या बोटांनी तयार केलेल्या धूप वेद्यांकडे आदराने पाहणार नाहीत. \p \v 9 त्या दिवशी त्यांची आश्रयस्थान असलेली शहरे, जी त्यांनी इस्राएली लोकांमुळे सोडली होती, ती आता काटेरी झाडे आणि झुडपे वाढत असलेल्या ठिकाणांसारखी होतील. ती सर्व उजाड होतील. \q1 \v 10 तुम्ही तुमचे तारणकर्ते परमेश्वरांना विसरले आहात; \q2 तुम्ही तुमचा दुर्ग, तुमच्या खडकाची आठवण केली नाही. \q1 जरी तुम्ही अत्युत्तम झाडांची लागवड केली आहे, \q2 आणि विदेशी द्राक्षवेलींची लागवड केली आहे, \q1 \v 11 ज्या दिवशी तुम्ही त्यांना लावता, तुम्ही त्यांना वाढविता, \q2 आणि सकाळी तुम्ही त्यांची पेरणी करता, तेव्हा तुम्ही त्यांना अंकुर फुटू देता, \q1 तरीसुद्धा रोग आणि असाध्य वेदना होणाऱ्या दिवसामध्ये \q2 त्यांचे काहीच उत्पादन होणार नाही. \b \q1 \v 12 पुष्कळ राष्ट्रे जी संतापतात त्यांना धिक्कार असो— \q2 ते उफाळणाऱ्या समुद्राप्रमाणे रागावतात! \q1 गर्जना करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो— \q2 पाण्याच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे ते गर्जना करतात! \q1 \v 13 जरी लोक उचंबळणाऱ्या पाण्याप्रमाणे गर्जना करतात, \q2 जेव्हा याहवेह त्यांना दटावतात, तेव्हा ते दूर पळून जातात, \q1 टेकड्यांवरील भुश्याप्रमाणे वार्‍याने पुढे ढकलून दिले जातात, \q2 जणू काही वावटळीची धूळ वादळी वाऱ्यासमोर जाते. \q1 \v 14 संध्याकाळी अचानक दहशत! \q2 सकाळ होण्याआधीच ते गेले असतात! \q1 जे आम्हाला लुटतात त्यांच्या वाट्याला हे येते, \q2 जे आमची लूटमार करतात त्यांचा हा वाटा आहे. \c 18 \s1 कूश\f + \fr 18:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa इथिओपिया\fqa*\f* विरुद्ध भविष्यवाणी \q1 \v 1 कूशच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांचा, \q2 जिथून पंखांचा फडफड\f + \fr 18:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa टोळ\fqa*\f* आवाज येतो त्यास धिक्कार असो. \q1 \v 2 जो समुद्रमार्गाने पाण्यावरून \q2 पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो. \b \q1 जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो, \q1 धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा, \q2 त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे, \q1 विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र, \q2 ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे. \b \q1 \v 3 अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, \q2 तुम्ही जे पृथ्वीवर राहता, \q1 जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, \q2 तेव्हा तुम्हाला तो दिसेल, \q1 आणि जेव्हा तुतारी वाजेल \q2 तेव्हा तुम्ही ती ऐकाल. \q1 \v 4 याहवेह मला असे म्हणतात: \q2 “मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन, \q1 सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे, \q2 दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.” \q1 \v 5 कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल \q2 आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, \q1 ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, \q2 आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील. \q1 \v 6 डोंगरावरील हिंस्र पक्ष्यांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठी, \q2 भक्ष्य म्हणून त्या सर्वांना तिथेच सोडले जाईल; \q1 संपूर्ण उन्हाळ्यात पक्षी त्यांचे भक्षण करतील, \q2 आणि संपूर्ण हिवाळ्यात वन्यप्राणी त्यांचे भक्षण करतील. \p \v 7 त्याकाळी सर्वसमर्थ याहवेहसाठी सीयोनातून भेटी आणल्या जातील \q1 धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडून, \q2 ज्यांचे भय आहे अशा दूरवरच्या लोकांकडून, \q1 विक्षिप्त भाषण करणाऱ्या आक्रमक राष्ट्राकडून, \q2 ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे. \m अशा लोकांकडून सर्वसमर्थ याहवेह यांच्यासाठी भेटी आणल्या जातील. \c 19 \s1 इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी: \q1 पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन \q2 इजिप्तला येत आहेत. \q1 इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात, \q2 आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात. \b \q1 \v 2 “मी इजिप्तच्या लोकांना इजिप्तच्या लोकांविरुद्ध चिथावेन— \q2 भाऊ भावाविरुद्ध लढेल, \q2 शेजारी शेजार्‍याविरुद्ध, \q2 शहर शहराविरुद्ध, \q2 राज्य राज्याविरुद्ध. \q1 \v 3 इजिप्तच्या लोकांचे हृदय खचून जाईल, \q2 आणि मी त्यांच्या योजना विफल करेन; \q1 मूर्तींबरोबर आणि मृतात्म्यांबरोबर, \q2 माध्यमांशी आणि भूतविद्या करणाऱ्यांशी ते सल्लामसलत करतील. \q1 \v 4 मी इजिप्तच्या लोकांना \q2 क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन, \q1 आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,” \q2 असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात. \b \q1 \v 5 नदीचे पाणी वाळून जाईल, \q2 आणि नदीचे पात्र कोरडे आणि शुष्क होईल. \q1 \v 6 कालव्यांना दुर्गंधी येईल; \q2 मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. \q1 लव्हाळे आणि वेळू सुकून जातील, \q2 \v 7 तसेच नाईल नदीच्या काठावरील, \q2 नदिमुखावरील झाडेसुद्धा, \q1 नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले \q2 प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल. \q1 \v 8 जे नाईल नदीत आकड्या टाकतात, \q2 ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; \q1 जे पाण्यावर जाळे टाकतात \q2 ते झुरणीस लागतील. \q1 \v 9 जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, \q2 विणकर आशा हरवतील. \q1 \v 10 कापडकामाचे कारागीर उदास होतील, \q2 आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील. \b \q1 \v 11 सोअन येथील अधिकारी निरुपयोगीच नाहीत तर मूर्ख आहेत; \q2 फारोह राजाचे शहाणे सल्लागार निरर्थक सल्ला देतात. \q1 तुम्ही फारोहला कसे म्हणू शकता, \q2 “ज्ञानी लोकांपैकी एक मी आहे, \q2 प्राचीन राजांचा मी एक शिष्य आहे?” \b \q1 \v 12 आता तुमची ज्ञानी माणसे कुठे आहेत? \q2 त्यांनी तुम्हाला दाखवावे किंवा तुमच्यापुढे यावे आणि माहीत करून द्यावे, \q1 कि सर्वसमर्थ याहवेह यांनी \q2 इजिप्तविरुद्ध काय योजना केली आहे. \q1 \v 13 सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, \q2 मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; \q1 तिच्या लोकांच्या कोनशिलांनी \q2 इजिप्तला भरकटून टाकले आहे. \q1 \v 14 याहवेहनी त्यांच्यामध्ये \q2 भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे; \q1 त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते, \q2 जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो. \q1 \v 15 इजिप्त काहीही करू शकत नाही— \q2 मस्तक किंवा शेपूट, वर झावळ्याची शाखा किंवा खालील लव्हाळे. \p \v 16 त्या दिवशी इजिप्तचे लोक दुर्बल होतील. सर्वसमर्थ याहवेहनी त्यांच्याविरुद्ध उगारलेल्या हाताच्या धाकामुळे ते घाबरून थरकापतील. \v 17 यहूदीयाची भूमी इजिप्तच्या लोकांवर दहशत आणेल; आणि सर्वसमर्थ याहवेह जी योजना त्यांच्याविरुद्ध करीत आहेत, त्यामुळे कोणी यहूदीयाचा उल्लेख केलेला ऐकताच ते घाबरून जातील. \p \v 18 त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर\f + \fr 19:18 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa नाशाचे शहर\fqa*\f* म्हटले जाईल. \p \v 19 त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल. \v 20 इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील. \v 21 तेव्हा याहवेह स्वतःला इजिप्तच्या लोकांस प्रगट करतील आणि त्या दिवशी ते याहवेह यांना स्वीकारतील. यज्ञार्पणे आणि धान्यार्पणे यांच्यासहित ते आराधना करतील; ते याहवेहकडे शपथ वाहतील आणि त्याचे पालन करतील. \v 22 याहवेह इजिप्तवर महामारीच्या साथीने हल्ला करतील; ते त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना बरे करतील. ते याहवेहकडे वळतील आणि ते त्यांच्या विनवणीला प्रतिसाद देतील आणि त्यांना बरे करतील. \p \v 23 त्या दिवशी इजिप्तपासून अश्शूराकडे जाणारा एक महामार्ग असेल. अश्शूरचे लोक इजिप्तकडे आणि इजिप्तचे लोक अश्शूरला जातील. इजिप्तचे आणि अश्शूरचे लोक एकत्र भक्ती करतील. \v 24 त्या दिवशी इजिप्त आणि अश्शूरबरोबर इस्राएल हे पृथ्वीवरील तिसरे आशीर्वादित राष्ट्र\f + \fr 19:24 \fr*\ft ज्याला लोक आशीर्वाद म्हणून पाहतील\ft*\f* असेल. \v 25 सर्वसमर्थ याहवेह त्यांना आशीर्वाद देतील आणि म्हणतील, “इजिप्तमधील माझे लोक आशीर्वादित असावेत, अश्शूर माझी हस्तकला आणि इस्राएल माझे वतन असो!” \c 20 \s1 इजिप्त आणि इथिओपिया यांच्याविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 ज्या वर्षी अश्शूरचा राजा सार्गोनने पाठविलेला सर्वोच्च सेनापती अश्दोदला आला आणि त्याने हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले— \v 2 त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला. \p \v 3 तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल, \v 4 म्हणून अश्शूरचा राजा इजिप्तच्या बंदिवानांना आणि कूशच्या बंदिवानांना, तरुणांना आणि वृद्धांना उघडे ठेवलेले नितंब आणि अनवाणी असे—इजिप्तला लज्जित म्हणून चालवेल. \v 5 ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील. \v 6 त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ” \c 21 \s1 बाबेलविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: \q1 ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, \q2 त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, \q2 दहशती भूमीमधून येतो. \b \q1 \v 2 एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे: \q2 देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो. \q1 हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला! \q2 तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन. \b \q1 \v 3 यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, \q2 प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. \q1 जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, \q2 मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो. \q1 \v 4 माझे अंतःकरण अडखळते, \q2 भीती मला थरथर कापविते; \q1 ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे \q2 ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे. \b \q1 \v 5 ते मेजावर भोजनाची तयारी करतात, \q2 ते गालिचे पसरवितात, \q2 ते खातात, ते पितात! \q1 अहो, अधिकारी, तुम्ही आता उठा, \q2 ढालींना तेल लावा! \p \v 6 प्रभू मला असे म्हणत आहेत: \q1 “जा, टेहळणी करणारा उभा कर, \q2 आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे. \q1 \v 7 जेव्हा तो रथांना \q2 घोड्यांच्या ताफ्यासहीत, \q1 आणि गाढवावर स्वार असलेले \q2 किंवा उंटावर स्वार असलेले पाहतो, \q1 तेव्हा त्याने सावध राहावे, \q2 पूर्णपणे सावध राहावे.” \p \v 8 त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला, \q1 “महाराज, मी दिवसेंदिवस, \q2 रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो. \q1 \v 9 पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन \q2 घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. \q1 आणि तो प्रत्युत्तर देत आहे: \q2 ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! \q1 तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या \q2 सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ” \b \q1 \v 10 माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, \q2 इस्राएलचे परमेश्वर, \q1 सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, \q2 मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो. \s1 एदोमविरुद्ध भविष्यवाणी \p \v 11 दूमाह\f + \fr 21:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa एदोम \fqa*\ft म्हणजे \ft*\fqa शांतता किंवा स्तब्धता\fqa*\f* विरुद्ध एक भविष्यवाणी: \q1 सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, \q2 “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? \q2 रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?” \q1 \v 12 पहारेकरी उत्तर देतो, \q2 “सकाळ होत आहे, पण रात्रही आली आहे. \q1 जर तुम्हाला विचारणा करावयाची आहे, तर मला विचारा; \q2 आणि मग पुन्हा या.” \s1 अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी \p \v 13 अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: \q1 ददानी काफिल्यांनो, \q2 तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता, \q2 \v 14 तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो, \q1 तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या; \q2 पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या. \q1 \v 15 ते तलवारीपासून पळतात \q2 म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, \q1 वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून \q2 आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात. \p \v 16 प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल. \v 17 केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत. \c 22 \s1 यरुशलेमविषयी भविष्यवाणी \p \v 1 दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी: \q1 आता तुम्हाला काय त्रास होत आहे, \q2 ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात? \q1 \v 2 हे गोंधळाने भरलेल्या नगरा, \q2 हे दंगा व चंगळबाजीने भरलेल्या शहरा, \q1 तुमचे वधलेले लोक तलवारीने मारले गेले नव्हते, \q2 ते युद्धातही मरण पावले नव्हते. \q1 \v 3 तुमचे सर्व पुढारी एकत्र मिळून पळून गेले आहेत; \q2 धनुष्याचा वापर न करताच ते पकडले गेले आहेत. \q1 जेव्हा शत्रू अजून दूर आहे, तोपर्यंत तुम्ही पळून गेला होता, \q2 ते तुम्ही सर्व पकडले गेले व त्यांना कैदी करून नेले. \q1 \v 4 म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा; \q2 मला आवेगाने रडू द्या. \q1 माझ्या लोकांच्या नाशामुळे \q2 माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका.” \b \q1 \v 5 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांचा एक दिवस आहे \q2 दृष्टान्ताच्या खोऱ्यामध्ये \q2 गोंधळाचा, तुडविण्याचा आणि दहशतीचा, \q1 भिंती तोडून पाडण्याचा दिवस \q2 आणि पर्वतातून ओरडण्याचा दिवस आहे. \q1 \v 6 एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित \q2 बाण ठेवण्याचा भाता हाती घेते; \q2 कीर ढाल उघडी करते. \q1 \v 7 तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत, \q2 आणि घोडेस्वार नगराच्या फाटकांवर तैनात आहेत. \b \q1 \v 8 प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले, \q2 आणि तुम्ही त्या दिवशी \q2 जंगलाच्या राजवाड्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांकडे पाहिले. \q1 \v 9 तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी \q2 पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती; \q1 खालच्या जलाशयात \q2 तुम्ही पाणी साठविले होते. \q1 \v 10 यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या \q2 आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली. \q1 \v 11 जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी \q2 तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला, \q1 परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही, \q2 किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही. \b \q1 \v 12 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, \q2 रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, \q1 तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, \q2 त्या दिवशी तुम्हाला बोलावतील. \q1 \v 13 परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, \q2 गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, \q2 मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! \q1 तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, \q2 कारण उद्या आपण मरणार आहोत!” \p \v 14 सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \b \p \v 15 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: \q1 “जा, या कारभाऱ्याला सांग, \q2 राजवाड्याचा प्रशासक शेबनाला सांग: \q1 \v 16 तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची \q2 उंचीवर तुमची कबर कोरण्याची, \q1 आणि या खडकात तुमची विश्रांतीची जागा तयार करण्याची \q2 परवानगी तुम्हाला कोणी दिली आहे? \b \q1 \v 17 “हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत \q2 आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत. \q1 \v 18 ते तुला हातामध्ये चुरगाळून, चेंडूसारखे, \q2 दूर ओसाड प्रदेशात भिरकावून देणार आहे \q1 आणि तिथेच तुझा अंत होईल. \q2 ज्या रथांचा तुला इतका अभिमान होता \q2 ते तुझ्या मालकाच्या घरास लज्जित करतील. \q1 \v 19 मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन \q2 आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन. \p \v 20 “मग मी माझा सेवक, हिल्कियाहचा पुत्र एल्याकीमला पाचारण करेन. \v 21 तुझा पोशाख, तुझी पदवी, तुझा अधिकार मी त्याला देईन. तो यहूदीयाच्या लोकांचा व यरुशलेममधील रहिवाशांचा पिता होईल. \v 22 मी त्याच्या खांद्यावर दावीदाच्या घराण्याची चावी ठेवेन. तो जे उघडेल, ते कोणीही बंद करू शकणार नाही आणि तो जे काही बंद करेल, ते कधीही उघडू शकणार नाही. \v 23 मी त्याला एखाद्या खुंटीसारखे मजबूत ठिकाणी रोवेन; त्याच्या पित्याच्या घराण्यासाठी सन्मानाचे आसन\f + \fr 22:23 \fr*\ft किंवा \ft*\fqa राजासन\fqa*\f* होईल. \v 24 त्याच्या घराण्याचा लौकिक त्याच्यावर स्थिर करेन: त्याचे वंशज व त्याच्या शाखा—त्याचे सर्व लहान पात्र, कटोऱ्यापासून ते मोठ्या पात्रापर्यंत.” \p \v 25 सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे. \c 23 \s1 सोरविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 सोरविरुद्ध भविष्यवाणी: \q1 तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! \q2 कारण सोरचा नाश झाला आहे \q2 आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. \q1 कित्तीम\f + \fr 23:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa सध्याच्या काळात ज्याला सायप्रस म्हणून ओळखले जाते\fqa*\f* देशाकडून \q2 हे वचन त्यांच्याकडे आले आहे. \b \q1 \v 2 तुम्ही बेटावरील रहिवाशांनो, \q2 आणि तुम्ही सीदोनचे व्यापारी, \q2 ज्यांना खलाश्यांनी श्रीमंत केले आहे, शांत राहा. \q1 \v 3 प्रचंड जलाशयावरून \q2 शिहोरचे धान्य आले; \q1 नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, \q2 आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली. \b \q1 \v 4 सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा, \q2 कारण समुद्र म्हणाला: \q1 “मला कधीही बाळंतपणाच्या वेदना झाल्या नाहीत आणि मी कधीही प्रसवलो नाही; \q2 मी कधीही मुलांचे संगोपन केले नाही किंवा मुलींचा सांभाळ केला नाही.” \q1 \v 5 जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, \q2 तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील. \b \q1 \v 6 तार्शीश ओलांडून पलीकडे जा; \q2 बेटावरील लोकहो, आक्रोश करा. \q1 \v 7 ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, \q2 फार जुने, पुरातन नगर, \q1 जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात \q2 स्थायिक होण्यासाठी नेले आहे? \q1 \v 8 सोरच्या विरोधात अशी योजना कोणी केली आहे, \q2 मुकुटाचा बहुमान प्रदान करणारे, \q1 ज्यांचे व्यापारी राजकुमार आहेत, \q2 ज्यांचे व्यापारी पृथ्वीवरील प्रसिद्ध लोक आहेत? \q1 \v 9 सर्वसमर्थ याहवेहनी ती योजना केली आहे, \q2 तिच्या सर्व वैभवाचा गर्व कमी करण्यासाठी \q2 आणि पृथ्वीवर नामांकित असलेल्या सर्वांना नम्र करण्यासाठी. \b \q1 \v 10 तार्शीश मुली, \q2 नाईल नदीच्या काठाने तुमच्या जमिनीची मशागत करा, \q2 कारण आता तुमच्याकडे बंदर राहणार नाही. \q1 \v 11 याहवेहनी त्यांचा हात समुद्रापलीकडे लांबविला आहे, \q2 आणि तिच्या राज्यांना थरकाप आणला आहे. \q1 त्यांनी कनानच्या\f + \fr 23:11 \fr*\ft फोनेशीया\ft*\f* संदर्भात आदेश दिले आहेत की, \q2 तिचे किल्ले नष्ट केले जावे. \q1 \v 12 ते म्हणाले, “कुमारिके सीदोन, \q2 यापुढे तुझी चैनबाजी चालणार नाही. आता तू चिरडली जावी! \b \q1 “वर कित्तीम पलीकडे गेलात; \q2 तर तिथेही तुम्हाला विश्रांती मिळणार नाही.” \q1 \v 13 खास्द्यांच्या भूमीकडे बघा \q2 या लोकांचे आता काहीही महत्त्व राहिले नाही! \q1 अश्शूर लोकांनी \q2 ते वाळवंटातील श्वापदांसाठी एक ठिकाण केले आहे; \q1 त्यांनी त्यांचे वेढा बुरूज उभारले, \q2 त्यांनी त्याचे मोठे किल्ले पाडले \q2 आणि त्याचे भग्नावशेष केले. \b \q1 \v 14 तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा; \q2 तुमचा किल्ला नष्ट झाला आहे! \p \v 15 त्यावेळी एका राजाच्या आयुष्याचा कालावधी, म्हणजे सत्तर वर्षे, सोर विसरला जाईल. परंतु या सत्तर वर्षांच्या शेवटी, वेश्येच्या गाण्याप्रमाणे सोरचे होईल: \q1 \v 16 “वीणा हाती घे, शहरामधून फीर, \q2 तू विसरून गेलेली वेश्या; \q1 वीणा चांगली वाजव, पुष्कळ गाणी गा, \q2 म्हणजे तुझी आठवण होत राहील.” \p \v 17 सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल. \v 18 तरीसुद्धा तिचा नफा आणि तिचे उत्पन्न याहवेहसाठी वेगळे ठेवले जाईल; ते साठविले जाणार नाही किंवा त्याचा गुप्तसंचय केला जाणार नाही. तिचा फायदा याहवेहसमोर जे राहतात त्यांना भरपूर अन्न आणि उत्तम कपडे मिळावे यासाठी त्यांच्याकडे जाईल. \c 24 \s1 याहवेहकडून केला जाणारा पृथ्वीचा विध्वंस \q1 \v 1 पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत \q2 आणि ती उद्ध्वस्त करणार आहेत; \q1 ते तिचा चेहरा बिघडवून टाकतील \q2 आणि तेथील रहिवाशांची पांगापांग करतील— \q1 \v 2 ते प्रत्येकासाठी समान असेल, \q2 जसे लोकांसाठी तसेच याजकासाठी \q2 जसे सेवकासाठी तसेच त्याच्या मालकासाठी \q2 जसे सेविकेसाठी तसेच तिच्या मालकिणीसाठी, \q2 जसे खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच विकत घेणाऱ्यांसाठी, \q2 जसे उसने देणाऱ्यासाठी तसेच उसने घेणाऱ्यासाठी, \q2 जसे कर्जदारांसाठी तसेच कर्जदात्यांसाठी. \q1 \v 3 पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल \q2 आणि संपूर्णपणे लुटली जाईल. \q1 हे शब्द याहवेह बोलले आहेत. \b \q1 \v 4 पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते, \q2 जग खंगून जाते आणि सुकून जाते, \q2 आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते. \q1 \v 5 पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे. \q2 त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, \q1 कायदे भंग केले आहेत \q2 आणि अनंतकाळाचा करार मोडला आहे! \q1 \v 6 म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो. \q2 तिच्या लोकांना त्यांच्या दोषाचे परिणाम भोगावे लागतील. \q1 त्यामुळे पृथ्वीचे रहिवासी जळून गेले आहेत, \q2 आणि फारच थोडे उरले आहेत. \q1 \v 7 नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते. \q2 आनंद करणारे सर्वजण विव्हळतात. \q1 \v 8 आनंददायक ढोलकी शांत झाली आहे, \q2 हर्षोल्हास करणार्‍यांचा आवाज थांबला आहे, \q2 आनंद करणारी वीणा शांत आहे. \q1 \v 9 गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! \q2 मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो! \q1 \v 10 उद्ध्वस्त नगरी निर्जन झाली आहे; \q2 प्रत्येक घराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. \q1 \v 11 रस्त्यावर ते मद्यासाठी आरडाओरडा करीत आहेत; \q2 सगळा आनंद दुःखात बदलला आहे, \q2 हर्षोल्हासाचे स्वर पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत! \q1 \v 12 नगर उद्ध्वस्त झाले आहे, \q2 त्याच्या वेशी तोडून त्यांचे तुकडे करण्यात आले आहेत. \q1 \v 13 जसे जैतून वृक्ष झाडल्यानंतर \q2 किंवा द्राक्ष गोळा करून द्राक्षाचा हंगाम संपल्यानंतर उरलले राहतात, \q1 तशी देशांची अवस्था होईल, \q2 तशी या पृथ्वीची अवस्था होईल. \b \q1 \v 14 ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील, \q2 पश्चिमेकडून ते याहवेहच्या ऐश्वर्याची स्तुती करतील. \q1 \v 15 म्हणून पूर्वेकडे याहवेहचा गौरव करा; \q2 समुद्राच्या बेटांवर, \q2 इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या नावाचा गौरव करा. \q1 \v 16 पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो: \q2 “नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.” \b \q1 पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे! \q2 माझा धिक्कार असो! \q1 फसवणूक करणारा विश्वासघात करतो! \q2 फसवणूक करून तो विश्वासघात करतो!” \q1 \v 17 पृथ्वीवरील सर्व लोकांनो, \q2 तुमच्या वाट्याला दहशत, खड्डा व सापळा येणार आहे! \q1 \v 18 भीतीने तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न कराल, \q2 तर खड्ड्यात पडाल; \q1 खड्ड्यातून कसेबसे बाहेर पडाल, \q2 तर तुम्ही सापळ्यात अडकाल, \b \q1 कारण आकाशाचे धरणद्वार उघडण्यात आले आहे, \q2 पृथ्वीचा पाया हादरला आहे. \q1 \v 19 पृथ्वीचे तुकडे झाले आहेत, \q2 पृथ्वी पूर्ण फाटून गेली आहे, \q2 पृथ्वीला जबरदस्त हादरा मिळाला आहे. \q1 \v 20 पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे. \q2 वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे; \q1 कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे, \q2 ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही. \b \q1 \v 21 त्या दिवशी याहवेह, \q2 वर आकाशातील अधिपतींना \q2 आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील. \q1 \v 22 त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल \q2 आणि कैद्यांसारखे त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात येईल; \q1 त्यांना कारागृहात कोंडून ठेवण्यात येईल. \q2 आणि त्यांना अनेक दिवसांकरिता शिक्षा देण्यात येईल. \q1 \v 23 चंद्राची त्रेधा उडेल, \q2 सूर्य लज्जित होईल; \q1 कारण सर्वसमर्थ याहवेह वैभवाने \q2 सीयोन पर्वतावर आणि यरुशलेममध्ये, \q2 आणि आपल्या वडीलजनांसमोर—गौरवाने राज्य करतील. \c 25 \s1 याहवेहचे स्तवनगीत \q1 \v 1 याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात; \q2 मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन, \q1 कारण परिपूर्ण विश्वासूपणाने \q2 तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत, \q2 ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या. \q1 \v 2 तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले, \q2 तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले, \q1 परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत. \q2 ते परत कधीही बांधले जाणार नाही. \q1 \v 3 म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील; \q2 निर्दयी राष्ट्रांची नगरे तुमचा आदर करतील. \q1 \v 4 तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, \q2 गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, \q1 वादळामध्ये निवारा आहात \q2 आणि उष्णतेमध्ये सावली आहात. \q1 कारण निर्दयी लोकांचा श्वास \q2 हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे, \q2 \v 5 आणि वाळवंटातील उष्णतेसारखा. \q1 परदेश्यांची गर्जना तुम्ही शांत करता; \q2 जशी ढगाच्या सावलीने उष्णता कमी होते, \q2 तसे निर्दयी लोकांचे हर्षगीत शांत होते. \b \q1 \v 6 या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह \q2 सर्व लोकांसाठी उत्तम अन्नाच्या मेजवानीची तयारी करतील, \q1 जुन्या द्राक्षारसाची मेजवानी— \q2 सर्वोत्तम मांस आणि सर्वोत्कृष्ट द्राक्षारस. \q1 \v 7 जे आच्छादन सर्व लोकांना आच्छादून टाकते, \q2 चादर जी सर्व राष्ट्रांना झाकते, \q1 या पर्वतावर याहवेह तिचा नाश करतील; \q2 \v 8 सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. \q1 सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील \q2 अश्रू पुसून टाकतील; \q1 ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा \q2 सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. \q1 याहवेह असे बोलले आहेत. \p \v 9 त्या दिवशी लोक असे म्हणतील, \q1 “निश्चितच, हे आमचे परमेश्वर आहेत; \q2 आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला वाचविले. \q1 हे याहवेह आहेत, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला; \q2 चला आपण त्यांच्या तारणात आनंद आणि हर्षोल्हास करू या.” \b \q1 \v 10 याहवेहचा हात या पर्वतावर राहील; \q2 परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, \q2 तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील. \q1 \v 11 जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात \q2 तसे ते त्यांचे हात त्यांच्यावर लांब करतील. \q1 त्यांच्या हातात चतुराई असतानाही \q2 परमेश्वर त्यांचा अभिमान उतरवून टाकतील. \q1 \v 12 ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील \q2 आणि त्या खाली येतील; \q1 ते त्यांना खाली जमिनीवर आणून, \q2 पूर्ण धुळीत मिळवतील. \c 26 \s1 स्तुतिगान \p \v 1 त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल: \q1 आमच्याकडे एक भक्कम शहर आहे; \q2 परमेश्वर त्याचे तारण \q2 त्याच्या भिंती आणि तटबंदी करतात. \q1 \v 2 वेशी उघडा \q2 जेणेकरून नीतिमान राष्ट्र, \q2 जे राष्ट्र कायम विश्वास ठेवते, ते प्रवेश करेल. \q1 \v 3 ज्यांचे मन स्थिर आहे, \q2 त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल, \q2 कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात. \q1 \v 4 याहवेहवर कायम भरवसा ठेवा, \q2 कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत. \q1 \v 5 जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात \q2 वैभवशाली असलेले शहर ते खाली पाडतात; \q1 ते त्याला भुईसपाट करतात \q2 आणि त्याला धुळीत टाकून देतात. \q1 \v 6 पावलांनो ते तुडवा— \q2 पीडितांच्या पावलांनो, \q2 गरिबांच्या पावलांनो. \b \q1 \v 7 नीतिमानाचा मार्ग समतल असतो; \q2 तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा. \q1 \v 8 होय, याहवेह, तुमच्या नियमांना\f + \fr 26:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्याय\fqa*\f* अनुसरून चालत असताना, \q2 आम्ही तुमची वाट पाहतो; \q1 तुमचे नाव आणि किर्ती \q2 हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे. \q1 \v 9 रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; \q2 सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. \q1 जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, \q2 तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात. \q1 \v 10 परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते, \q2 तेव्हा ते धार्मिकता शिकत नाहीत. \q1 प्रामाणिकपणा असलेल्या देशामध्येही ते दुष्कृत्ये करीत राहतात \q2 आणि याहवेहच्या प्रतिष्ठेची ते पर्वा करीत नाहीत. \q1 \v 11 याहवेह, तुमचा हात उगारलेला आहे, \q2 परंतु ते पाहात नाहीत. \q1 तुमच्या लोकांबद्दलचा तुमचा आवेश त्यांना पाहू द्या व लज्जित होऊ द्या; \q2 तुमच्या शत्रूंना भस्म करण्यासाठी अग्नी राखून ठेवा. \b \q1 \v 12 याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता; \q2 जे सर्वकाही आम्ही साध्य केले, ते तुम्ही आमच्यासाठी केले आहे. \q1 \v 13 याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो. \q2 तुमच्याशिवाय इतर प्रभूंनी आमच्यावर राज्य केले आहे, \q1 \v 14 ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत. \q2 त्यांचे मृतात्मे उठत नाहीत. \q1 तुम्ही त्यांना शिक्षा केली आणि त्यांचा नाश केला; \q2 तुम्ही त्यांच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या. \q1 \v 15 याहवेह, तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे; \q2 तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे. \q1 तुम्ही स्वतःसाठी गौरव प्राप्त केले आहे; \q2 तुम्ही देशाच्या सर्व सीमा वाढविल्या आहेत. \b \q1 \v 16 हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले; \q2 जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली, \q2 तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते. \q1 \v 17 जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस \q2 तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, \q2 याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो. \q1 \v 18 आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो, \q2 परंतु आम्ही वार्‍याला जन्म दिला. \q1 आम्ही देशात तारण आणलेले नाही, \q2 आणि जगातील लोक जीवनाकडे आले नाहीत. \b \q1 \v 19 याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील; \q2 त्यांची शरीरे उठतील— \q1 जे धुळीमध्ये पडून राहतात \q2 त्यांना जागे होऊ द्या आणि हर्षनाद करू द्या— \q1 तुमचे दव प्रातःकाळच्या दवासारखे आहे; \q2 पृथ्वी तिच्या मृत लोकांना जन्म देईल. \b \q1 \v 20 माझ्या लोकांनो, जा, तुमच्या खोल्यांध्ये जा \q2 आणि तुमच्यामागे दारे बंद करा; \q1 थोडा वेळ पर्यंत तुम्ही स्वतःला लपवून ठेवा \q2 जोपर्यंत त्यांचा राग निघून जात नाही. \q1 \v 21 पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता, \q2 याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत \q1 तिच्यावर झालेला रक्तपात पृथ्वी प्रगट करेल; \q2 तिच्यावर वधलेले यापुढे पृथ्वी लपवून ठेवणार नाही. \c 27 \s1 इस्राएलची मुक्तता \p \v 1 त्या दिवशी, \q1 याहवेह त्यांच्या तलवारीने शिक्षा करतील— \q2 त्यांची हिंसक, मोठी आणि शक्तिशाली तलवार— \q1 लिव्याथान सरपटणारा सर्प, \q2 गुंडाळून घेणारा सर्प लिव्हियाथान; \q1 ते समुद्रातील या राक्षसाचा वध करतील. \p \v 2 त्या दिवशी— \q1 “फलवंत द्राक्षमळ्याबद्दल गीत गा: \q2 \v 3 मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; \q2 मी त्याला सतत पाणी देतो. \q1 मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो \q2 जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही. \q2 \v 4 मी रागावलेलो नाही. \q1 परंतु जर माझ्यासमोर काटेरी झुडपे आणि काटे आले तर! \q2 मी त्यांच्यावर हल्ला करून युद्ध केले असते; \q2 मी त्या सर्वांना आग लावली असती. \q1 \v 5 नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; \q2 त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, \q2 होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.” \b \q1 \v 6 येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल, \q2 इस्राएलला अंकुर फुटेल आणि ती बहरेल \q2 आणि सर्व जगास फळांनी भरेल. \b \q1 \v 7 याहवेहनी तिच्यावर\f + \fr 27:7 \fr*\ft इस्राएलवर\ft*\f* हल्ला केला आहे का, \q2 ज्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्यावर याहवेहने हल्ला केला होता का? \q1 तिला मारण्यात आले आहे का, \q2 ज्यांनी तिला मारले, त्यांना मारण्यात आले आहे का? \q1 \v 8 रणनीती आणि बंदिवास करून तुम्ही तिच्याबरोबर वाद घालता— \q2 जसे एखाद्या दिवशी पूर्वेचा वारा वाहतो, \q2 तसे त्यांच्या हिंसक स्फोटाने ते तिला घालवून देतात. \q1 \v 9 तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल, \q2 आणि त्याचे पाप काढून टाकल्याचे हे पूर्ण फळ असेल: \q1 जेव्हा ते वेदीच्या सर्व दगडाचे \q2 चुनखडीसारखे चूर्ण करतील. \q1 अशेरा दैवतेचे स्तंभ किंवा धूपवेद्या \q2 तशाच उभ्या सोडतील. \q1 \v 10 तटबंदीचे शहर उजाड झाले आहे, \q2 टाकून दिलेले आवास, टाकून दिलेल्या अरण्यासारखी आहे; \q1 तिथे वासरे चरतात, \q2 तिथे ती झोपतात, \q2 ते त्याच्या फांद्या खाऊन निष्पर्ण करतात. \q1 \v 11 जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात \q2 आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. \q1 तसे हे लोक असमंजस आहेत; \q2 म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही \q2 आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही. \p \v 12 त्या दिवशी याहवेह वाहत्या फरात नदीपासून इजिप्तच्या खोऱ्यापर्यंत मळणी करतील आणि तुम्ही, इस्राएल एकएक करून गोळा केले जाल. \v 13 आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील. \c 28 \s1 एफ्राईम व यहूदीयाच्या पुढाऱ्यांचा धिक्कार \q1 \v 1 त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, \q2 त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, \q1 सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— \q2 त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे! \q1 \v 2 पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. \q2 तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, \q1 वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, \q2 तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल. \q1 \v 3 तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान, \q2 पायाखाली तुडविले जाईल. \q1 \v 4 ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले, \q2 त्याचे तेजस्वी सौंदर्य, \q1 कापणीच्या आधी पिकलेल्या अंजिरांसारखे होईल— \q2 लोक त्यांना पाहताक्षणीच त्यांना हातात घेतात, \q2 व त्यांना गिळंकृत करतात. \b \q1 \v 5 त्या दिवशी सर्वसमर्थ याहवेह \q2 त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी \q1 एक गौरवशाली मुकुट, \q2 सुंदर पुष्पचक्र असे होतील. \q1 \v 6 जे न्याय करण्यासाठी बसतात \q2 त्यांच्यासाठी ते न्यायाचा आत्मा होतील, \q1 जे वेशीतूनच युद्धामधून मागे फिरतात \q2 त्यांच्यासाठी ते सामर्थ्याचा उगम असतील. \b \q1 \v 7 आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात \q2 आणि मद्यापासून झोकांड्या देतात: \q1 याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात \q2 आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात. \q1 आणि मद्यापासून झोकांड्या देतात \q2 ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात, \q2 निर्णय देताना ते अडखळतात. \q1 \v 8 त्यांच्या भोजनांची सर्व मेजे वांतीने भरली आहेत! \q2 आणि तिथे घाण नाही अशी एकही जागा नाही. \b \q1 \v 9 “तो कोणाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे? \q2 त्याचा संदेश तो कोणाला समजावून सांगत आहे? \q1 त्यांच्या दूध तुटलेल्या बालकांना, \q2 नुकतेच स्तनपान झालेल्या तान्ह्या बाळांना? \q1 \v 10 कारण हे आहे: \q2 हे करा, ते करा, \q2 यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम\f + \fr 28:10 \fr*\ft कदाचित \ft*\fqa संदेष्ट्याच्या शब्दांची चेष्टा करताना काढलेले व्यर्थ आवाज\fqa*\f*; \q2 थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे.” \b \q1 \v 11 ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने \q2 परमेश्वर या लोकांशी बोलतील, \q1 \v 12 ज्यांना ते असे म्हणाले, \q2 “हे विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे, थकलेल्यांना विश्रांती घेऊ द्या;” \q1 आणि, “ही विश्राम करण्याची जागा आहे;” \q2 परंतु ते ऐकणार नाहीत. \q1 \v 13 म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: \q2 हे करा, ते करा, \q2 यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; \q2 थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— \q1 जेणेकरून ते मागे पडतील; \q2 ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील. \b \q1 \v 14 म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात, \q2 त्या उपहास करणार्‍या अधिकार्‍यांनो, याहवेहचे वचन ऐका: \q1 \v 15 तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, \q2 अधोलोकाशी आम्ही करार केला आहे. \q1 जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो, \q2 तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, \q1 कारण आम्ही खोट्या गोष्टींना\f + \fr 28:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa खोटी दैवते\fqa*\f* आमचे आश्रयस्थान केले आहे \q2 आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.” \p \v 16 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड, \q2 खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला; \q1 त्यावर भिस्त ठेवणारा, \q2 कधीही भीतीने त्रस्त होत नाही. \q1 \v 17 मी न्यायाला मापनदोरी \q2 आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. \q1 गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, \q2 आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील. \q1 \v 18 मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; \q2 अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. \q1 जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, \q2 तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल. \q1 \v 19 जितक्या वेळेस ते येईल तितक्या वेळेस ते तुम्हाला वाहवत घेऊन जाईल; \q2 रोज सकाळी, दिवसभर आणि रात्रभर, \q2 ते आरपार झाडत राहील.” \b \q1 हा संदेश समजून घेतल्याने \q2 अत्यंत भीती निर्माण होईल. \q1 \v 20 तुमचे अंथरूण फारच आखूड आहे, \q2 तुमचे पांघरूण अगदी अरुंद आहे. \q1 \v 21 त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम, \q2 आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी, \q1 जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील, \q2 जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील. \q1 \v 22 आता तुमचे थट्टा करणे थांबवा, \q2 नाहीतर तुमच्या साखळ्या आणखीच जड होतील. \q1 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांनी मला सांगितले आहे, \q2 संपूर्ण भूमीचा नाश करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. \b \q1 \v 23 ऐका व माझ्या म्हणण्याकडे कान द्या; \q2 मी तुम्हाला जे सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या. \q1 \v 24 जेव्हा शेतकरी लागवडीसाठी नांगरतो तेव्हा तो सतत नांगरतो का? \q2 तो सतत ढेकळे मोडून मातीत काम करीत राहतो का? \q1 \v 25 मग त्याने शेत नांगरून तयार केले, \q2 तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? \q1 तो गव्हाच्या ठिकाणी गहू \q2 आणि जव सरीने लावत नाही का? \q2 आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का? \q1 \v 26 त्याचे परमेश्वर त्याला सूचना देतात \q2 आणि त्याला योग्य रीत शिकवितात. \b \q1 \v 27 शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही, \q2 किंवा मळणीसाठी गाडीचे चाक जिऱ्यावर फिरविले जात नाही; \q1 शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी हलक्या वजनाची काठी वापरतो, \q2 आणि जिऱ्याची मळणी बारीक काठीने करतो. \q1 \v 28 भाकरी करण्यासाठी धान्याचे पीठ करावे लागते; \q2 म्हणून त्याची सतत मळणी करत नाहीत. \q1 ते खळ्यात घालून त्यावर मळणीच्या गाडीची चाके फिरविली जातात, \q2 पण त्याची मळणी करण्यासाठी घोड्याचा वापर करत नाहीत. \q1 \v 29 ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते. \q2 त्यांच्या योजना चमत्कारिक असतात, \q2 त्यांचे ज्ञान अद्भुत आहे. \c 29 \s1 दावीदाच्या नगराचा धिक्कार असो \q1 \v 1 अरीएल, अरीएल, तुम्हाला धिक्कार असो \q2 ते नगर जिथे दावीदाने वास्तव्य केले! \q1 वर्षा पुढे वर्ष जोडा \q2 आणि तुमच्या सणांचे चक्र पुढे चालू द्या. \q1 \v 2 तरीसुद्धा मी अरीएलला वेढा घालेन; \q2 ती शोक करेल आणि विलाप करेल, \q2 ती माझ्यासाठी वेदीच्या अरीएलसारखे होईल. \q1 \v 3 मी तुमच्याविरुद्ध सर्व बाजूंनी छावणी टाकेन; \q2 मी तुमच्या भोवताली उंच बुरुजांचे रिंगण उभे करेन. \q2 आणि मी तुमच्याविरुद्ध वेढा घालण्याची कामे करेन. \q1 \v 4 तुम्हाला खाली टाकले आहे, तुम्ही भूमीवरून बोला. \q2 तुमचे बोलणे धुळीतून पुटपुटत येईल. \q1 पृथ्वीवरून तुमचा आवाज भुतासारखा येईल; \q2 धुळीमधून तुमचे बोलणे कुजबुज करेल. \b \q1 \v 5 परंतु तुमचे पुष्कळ शत्रू बारीक धुळीसारखे होतील, \q2 उडालेल्या भुशासारखे निर्दयी लोकांच्या झुंडी. \q1 अचानक, एका क्षणातच, \q2 \v 6 सर्वसमर्थ याहवेह येतील \q1 मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, \q2 सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील. \q1 \v 7 तेव्हा अरीएलविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडी, \q2 जे तिच्यावर आणि तिच्या गडांवर हल्ला करतील आणि तिला वेढा घालतील, \q1 ते स्वप्नासारखेच होईल, \q2 ते रात्रीच्या दृष्टान्तासारखे— \q1 \v 8 जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो, \q2 परंतु तो जागा होतो तेव्हा भुकेलाच असतो; \q1 जसे तहान लागलेला मनुष्य जेव्हा पाणी पिण्याची स्वप्ने पाहतो, \q2 परंतु तो जागृत होतो तेव्हा दुर्बल आणि तहानलेलाच असतो. \q1 तशाच प्रकारे सीयोन पर्वताविरुद्ध लढणाऱ्या \q2 सर्व राष्ट्रांच्या झुंडींचे होईल. \b \q1 \v 9 सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा, \q2 तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा. \q1 झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे, \q2 लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे. \q1 \v 10 याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे: \q2 त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत; \q2 त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे. \p \v 11 तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्‍या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.” \v 12 किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.” \b \p \v 13 प्रभू असे म्हणतात: \q1 “हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, \q2 पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. \q1 माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; \q2 त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.\f + \fr 29:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांचे शिक्षण केवळ मानवी नियम आहेत.\fqa*\f* \q1 \v 14 म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन. \q2 चमत्कारानंतर चमत्कार करून; \q1 ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल, \q2 बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.” \q1 \v 15 धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून \q2 लपविण्यासाठी खूप खोलवर जातात, \q1 जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात, \q2 “आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?” \q1 \v 16 तुम्ही गोष्टी उलटवून टाकता, \q2 जणू कुंभार हा मातीसारखा असेल! \q1 ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का, \q2 “तू माझी रचना केली नाहीस?” \q1 मडके कुंभाराला म्हणू शकते का, \q2 “तुला काहीच माहीत नाही?” \b \q1 \v 17 लबानोनचा थोड्याच वेळात सुपीक भूमीत बदल होणार नाही का, \q2 आणि सुपीक भूमी जंगलासारखी होणार नाही का? \q1 \v 18 त्या दिवशी गुंडाळीतील शब्द बहिर्‍यांना ऐकू येतील \q2 आणि अंधकार व औदासिन्यतेतून \q2 अंधाचे नेत्र पाहू लागतील. \q1 \v 19 नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील; \q2 गरजवंत इस्राएलचे पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात आनंद साजरा करतील. \q1 \v 20 निर्दयी नाहीसे होतील, \q2 आणि उपहास करणारे दिसेनासे होतील, \q2 वाईट नजर ठेवणाऱ्याचा सर्वांचा नाश होईल— \q1 \v 21 जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात, \q2 जे रक्षकाला सापळ्यात अडकवितात, \q2 जे खोटी साक्ष देऊन निष्पाप लोकांना न्यायापासून वंचित करतात. \p \v 22 म्हणूनच अब्राहामाचा उद्धार करणारे याहवेह, याकोबाच्या वंशजांना म्हणतात: \q1 “येथून पुढे याकोब लज्जित होणार नाही. \q2 येथून पुढे त्यांचे चेहरे पांढरेफटक पडणार नाहीत. \q1 \v 23 जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती, \q2 माझी हस्तकृती बघतील, \q1 तेव्हा ते माझे नाव पवित्र ठेवतील; \q2 ते याकोबच्या पवित्र परमेश्वराची पवित्रता स्वीकारतील \q2 आणि इस्राएलच्या परमेश्वराचा आदर करतील. \q1 \v 24 मूर्ख आत्म्याचे लोक समंजसपणा शिकतील; \q2 आणि कुरकुरणारे शिक्षण ग्रहण करतील.” \c 30 \s1 दुराग्रही राष्ट्राचा धिक्कार असो \q1 \v 1 याहवेह असे घोषित करतात, \q2 “दुराग्रही संततीचा धिक्कार असो, \q1 ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात, \q2 नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही, \q2 पापावर पापाचा ढीग रचतात; \q1 \v 2 जे माझा सल्ला न घेता \q2 इजिप्तकडे जातात; \q1 जे आश्रयासाठी इजिप्तच्या सावलीची \q2 फारोहच्या रक्षणासाठी मदतीची अपेक्षा करतात. \q1 \v 3 परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल, \q2 इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल. \q1 \v 4 जरी सोअनमध्ये त्यांचे अधिकारी आहेत \q2 आणि त्यांचे दूत हानेस येथे पोहोचले आहेत, \q1 \v 5 तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल \q2 कारण त्यांच्यासाठी ते निरुपयोगी लोक आहेत, \q1 जे काहीही मदत किंवा लाभ आणत नाहीत. \q2 परंतु केवळ लज्जा आणि अपमान.” \p \v 6 नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी: \q1 कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून, \q2 सिंह आणि सिंहीण, \q2 फुरसे आणि उडणारे साप, \q1 दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर, \q2 त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून, \q1 त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात, \q2 \v 7 इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत. \q1 म्हणून मी इजिप्तला \q2 निरुपयोगी राहाब\f + \fr 30:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa समुद्रात गोंधळ करणारा पुरातन साहित्यातील काल्पनिक समुद्रीराक्षस\fqa*\f* म्हणतो. \b \q1 \v 8 आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा, \q2 चर्मपत्राच्या गुंडाळीवर ते कोरून टाका, \q1 म्हणजे येणाऱ्या दिवसात \q2 ते सर्वकाळासाठी साक्षीदार असेल. \q1 \v 9 कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, \q2 याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले. \q1 \v 10 दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात, \q2 “यापुढे दृष्टान्त पाहू नका!” \q1 आणि संदेष्ट्यांना म्हणतात, \q2 “यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका! \q1 आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, \q2 भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा. \q1 \v 11 हा मार्ग सोडा, \q2 या वाटेवरून दुसरीकडे जा, \q1 आणि इस्राएलचे जे पवित्र परमेश्वर आहेत \q2 त्यांच्याबरोबर आमची समोरासमोर भेट करणे थांबवा!” \p \v 12 त्यामुळे इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: \q1 “कारण तुम्ही हा संदेश नाकारला, \q2 जुलूम करण्यावर भरवसा ठेवला \q2 आणि कपट करण्यावर अवलंबून राहिला, \q1 \v 13 हे पाप तुमच्यासाठी \q2 उंच, भेगा पडलेल्या आणि फुगलेल्या भिंतीसारखे, \q2 जी अचानक, क्षणार्धात कोसळते अशी होईल. \q1 \v 14 मातीच्या भांड्यांसारखे त्याचे \q2 इतक्या निर्दयीपणाने तुकडे केले जातील \q1 की त्याच्या अनेक बारीक तुकड्यांमध्ये \q2 चुलीमधून निखारे घेण्यासाठी \q2 किंवा रांजणातून पाणी काढण्यासाठी एकही तुकडा सापडणार नाही.” \p \v 15 सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: \q1 “पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे, \q2 शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे, \q2 परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल. \q1 \v 16 तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’ \q2 म्हणून तुम्ही पळून जाल! \q1 तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’ \q2 म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील! \q1 \v 17 जोपर्यंत तुम्हाला \q2 डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे, \q1 टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे \q2 सोडून दिले जात नाही तोपर्यंत \q1 एका व्यक्तीच्या धमकीने \q2 एक हजार लोक पळून जातील; \q2 पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.” \b \q1 \v 18 तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात; \q2 त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील. \q1 कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत. \q2 धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात! \p \v 19 यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील. \v 20 जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. \v 21 तुम्ही जरी उजवीकडे किंवा डावीकडे वळलात तरी तुमच्यामागे तुमच्या कानांवर एक आवाज पडेल, “हाच मार्ग आहे; त्यावर चाल.” \v 22 मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!” \b \p \v 23 तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील. \v 24 शेतात मशागतीचे काम करणारे बैल आणि गाढवे हे काटे आणि फावड्याने उफणलेला चारा आणि उकडलेले बटाटे खातील. \v 25 त्या मोठ्या कत्तलीच्या दिवशी, जेव्हा बुरूज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच पर्वतावर पाण्याचे प्रवाह वाहतील. \v 26 जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल. \q1 \v 27 पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर, \q2 याहवेहचे नाव फार लांबून येत आहे; \q1 त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत, \q2 आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे. \q1 \v 28 त्यांचा श्वास जलदगतीने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यासारखा आहे, \q2 तो गळ्यापर्यंत वर येतो. \q1 ते नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना हादरवितात; \q2 ते लोकांच्या जबड्यात लगामाचा भाग ठेवतात \q2 जो त्यांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातो. \q1 \v 29 आणि तुम्ही जसे रात्रीच्या वेळेस पवित्र सण साजरा करता \q2 त्याप्रमाणे तुम्ही गाणी गाल; \q1 जेव्हा लोक बासरी वाजवित \q2 याहवेहच्या पर्वताकडे वर \q1 इस्राएलच्या खडकाकडे जातात, \q2 तेव्हा तुमची अंतःकरणे आनंदित होतील. \q1 \v 30 याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील \q2 आणि घोर संतापाने आणि भस्मसात करणाऱ्या अग्नीने, \q1 ढगफुटी, वादळ आणि गारा यांच्याबरोबर \q2 त्यांची भुजा खाली येत असताना लोक पहातील. \q1 \v 31 याहवेहचा आवाज अश्शूरला हादरून टाकेल; \q2 ते त्यांच्या काठीने त्यांना तडाखा देतील. \q1 \v 32 याहवेह त्यांच्याकडील शिक्षेच्या दांड्याने \q2 त्यांच्यावर दिलेला प्रत्येक प्रहार \q1 डफ आणि वीणा यांच्या संगीतावर असेल, \q2 जसे ते त्यांच्या हाताच्या तडाख्याने युद्धामध्ये त्यांच्याशी लढतात. \q1 \v 33 तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; \q2 ते राजासाठी तयार केलेले आहे. \q1 त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, \q2 त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; \q1 जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, \q2 याहवेहचा श्वास \q2 ते पेटवितो. \c 31 \s1 इजिप्तवर अवलंबून राहणाऱ्यांचा धिक्कार असो \q1 \v 1 जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, \q2 जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, \q1 जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर \q2 आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, \q1 परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, \q2 किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत. \q1 \v 2 तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात. \q2 ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. \q1 जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध \q2 ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील, \q1 \v 3 परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत; \q2 त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत. \q1 जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा \q2 जे मदत करणारे ते अडखळतील, \q2 ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील. \q2 सर्वजण एकत्र नाश पावतील. \p \v 4 याहवेह मला असे म्हणतात: \q1 “जसा सिंह गुरगुरतो, \q2 एक मोठा सिंह त्याच्या भक्ष्यावर— \q1 आणि त्याला विरोध करण्यासाठी \q2 जरी मेंढपाळांची संपूर्ण टोळी एकत्र बोलावली जाते, \q1 तरी तो त्यांच्या ओरडण्याने घाबरत नाही \q2 किंवा त्यांच्या मोठ्या गोंधळ्याच्या आवाजाने अस्वस्थ होत नाही, \q1 म्हणून सर्वसमर्थ याहवेह सीयोन पर्वतावर आणि त्याच्या उंचीवर \q2 युद्ध करण्यासाठी खाली येतील. \q1 \v 5 ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, \q2 त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; \q1 ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, \q2 ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.” \p \v 6 अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या. \v 7 कारण त्या दिवशी तुमच्यामधील प्रत्येकजण तुमच्या पापी हातांनी सोन्या-चांदीच्या ज्या मूर्ती तयार केल्या आहेत, त्यांना नाकारतील. \q1 \v 8 “अश्शूर मानवी तलवारीने पडणार नाही; \q2 एक तलवार, जी मर्त्य मानवांची नाही, ती त्यांना गिळून टाकेल. \q1 तलवार पाहून ते पळून जातील \q2 आणि त्यांच्या तरुणांना जबरदस्तीने मजुरीच्या कामाला ठेवले जाईल. \q1 \v 9 दहशतीमुळे त्यांचा किल्ला पडून जाईल; \q2 युद्धाच्या ध्वजाचे दृश्य पाहून त्यांचे सेनापती भयभीत होतील,” \q1 ज्या याहवेहचा अग्नी सीयोनमध्ये आहे, \q2 ज्यांची भट्टी यरुशलेममध्ये आहे, \q2 ते अशी घोषणा करतात. \c 32 \s1 नीतिमत्वाचे राज्य \q1 \v 1 पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल \q2 आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील. \q1 \v 2 प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान \q2 आणि वादळापासून आश्रयस्थान, \q1 वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा \q2 आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल. \b \q1 \v 3 तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत, \q2 आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील. \q1 \v 4 भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील \q2 आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल. \q1 \v 5 यापुढे मूर्खांना चांगले \q2 व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही. \q1 \v 6 मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात, \q2 त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते: \q1 ते देवहीनतेची कृत्ये करतात \q2 आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात; \q1 भुकेल्यांना ते उपाशी सोडतात \q2 आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात. \q1 \v 7 बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात, \q2 गरजवंताची याचना वाजवी असली तरी, \q1 ते दुष्टाईच्या योजना बनवितात, \q2 ते लबाडीने गरिबांचा नाश करतात. \q1 \v 8 परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो \q2 आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो. \s1 यरुशलेमच्या स्त्रिया \q1 \v 9 आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो, \q2 उठा व माझे ऐका; \q1 हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो, \q2 मी काय सांगतो याकडे लक्ष द्या! \q1 \v 10 एका वर्षाहून अधिक कालावधीत \q2 तुम्हाला जे सुरक्षित वाटते ते थरथर कापतील; \q1 कारण द्राक्षाचा उपज बुडेल, \q2 आणि फळांचा हंगाम येणार नाही. \q1 \v 11 आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; \q2 निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! \q1 आपली सुंदर वस्त्रे काढून \q2 शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा. \q1 \v 12 तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्‍या तुमच्या शेतांसाठी, \q2 फलवंत द्राक्षवेलीसाठी \q1 \v 13 आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही \q2 कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील— \q1 होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी, \q2 व चैनबाजी करणार्‍या या शहरांसाठी विलाप करा. \q1 \v 14 गडाचा त्याग करण्यात येईल, \q2 गजबजलेली शहरे रिकामी होतील; \q1 किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, \q2 जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील, \q1 \v 15 परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल, \q2 ओसाड भूमी सुपीक होईल, \q2 आणि सुपीक भूमी अरण्यासारखी वाटू लागेल. \q1 \v 16 याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल, \q2 व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल. \q1 \v 17 शांती नीतिमत्तेचे फळ असेल; \q2 नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे. \q1 \v 18 माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली \q2 आणि सुरक्षित असतील, \q2 त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील. \q1 \v 19 जरी गारांनी अरण्याचा नाश होईल \q2 आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील. \q1 \v 20 तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, \q2 प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, \q2 आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील. \c 33 \s1 अरिष्ट आणि मदत \q1 \v 1 हे विनाशका, तुझा धिक्कार असो, \q2 तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! \q1 हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, \q2 तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! \q1 जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, \q2 तेव्हा तुमचा नाश होईल; \q1 जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, \q2 तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल. \b \q1 \v 2 हे याहवेह, आम्हावर कृपा करा; \q2 आम्ही तुमची आस धरलेली आहे. \q1 रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा, \q2 संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा. \q1 \v 3 तुमच्या सैन्याच्या रणगर्जनेने लोक पलायन करतात. \q2 जेव्हा तुम्ही युद्धासाठी सज्ज होता, तेव्हा राष्ट्रांची पांगापांग होते. \q1 \v 4 अहो राष्ट्रांनो, तरुण टोळांनी तुम्ही केलेल्या लुटीची कापणी केली आहे. \q2 टोळांच्या थव्याप्रमाणे लोक त्यावर झडप घालतात. \b \q1 \v 5 याहवेहना उच्च केले आहे, कारण ते उच्चस्थानी राहतात; \q2 सीयोनला ते त्यांच्या न्यायाने आणि धार्मिकतेने भरून टाकतील. \q1 \v 6 तुमच्या वेळेसाठी ते निश्चित पाया असे असतील, \q2 तारण, शहाणपण आणि सुज्ञान यांचे ते विपुल भांडार असतील; \q2 याहवेहचे भय हेच या खजिन्याची चावी आहे. \b \q1 \v 7 पाहा, त्यांचे शूर लोक रस्त्यावर मोठ्याने आक्रोश करत आहेत. \q2 शांतीचे दूत मोठ्या दुःखाने रडत आहेत. \q1 \v 8 नगरातील महामार्ग निर्जन झाले आहेत, \q2 रस्त्यावर कोणी प्रवासी नाहीत. \q1 करार मोडला आहे, \q2 त्याचे साक्षीदार तुच्छ झाले आहेत, \q2 कोणाचाही आदर केल्या जात नाही. \q1 \v 9 भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, \q2 लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; \q1 शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, \q2 आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत. \b \q1 \v 10 याहवेह म्हणतात, “मी आता उठेन, \q2 मी आता उच्च केल्या जाईन; \q2 आता मला उंच केले जाईल. \q1 \v 11 तुम्ही भुशाची गर्भधारणा करता, \q2 तुम्ही पेंढीला जन्म देता; \q2 तुमचा श्वास हा अग्नी आहे, जो तुम्हाला भस्म करतो. \q1 \v 12 लोक जळून राख होतील; \q2 कापलेल्या काटेरी झुडूपांप्रमाणे ते जाळले जातील.” \b \q1 \v 13 तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका. \q2 तुम्ही जे जवळ आहात ते, माझे सामर्थ्य मान्य करा! \q1 \v 14 सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत; \q2 देवहीन लोक थरथर कापत आहेत: \q1 “भस्म करणाऱ्या अग्नीमध्ये आमच्यामधील कोण राहू शकेल? \q2 सार्वकालिक अग्नीत आमच्यामधील कोण जळत राहू शकेल काय?” \q1 \v 15 जे नीतीने चालतात \q2 आणि जे योग्य तेच बोलतात, \q1 जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात \q2 आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, \q1 खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात \q2 दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात— \q1 \v 16 ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, \q2 तेच उच्चस्थानी वास करतील. \q1 त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, \q2 आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही. \b \q1 \v 17 तुमची दृष्टी राजाला त्यांच्या सौंदर्यात पाहतील \q2 आणि फार दूरवर पसरत असलेला देश पाहतील. \q1 \v 18 तुम्ही यापूर्वीच्या दहशत बसविणाऱ्या गोष्टीचा नीट विचार कराल: \q2 “तो मुख्याधिकारी कुठे आहे? \q1 ज्याने महसूल कर घेतला, तो कुठे आहे? \q2 उंच बुरुजावरील प्रमुख अधिकारी कुठे आहे?” \q1 \v 19 ज्यांचे बोलणे अस्पष्ट आहे, \q2 ज्यांची भाषा अनोळखी आणि न समजण्यासारखी आहे, \q2 असे उर्मट लोक तुम्हाला इथूनपुढे दिसणार नाहीत. \b \q1 \v 20 आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा; \q2 तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील, \q2 शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू; \q1 त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत, \q2 किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत. \q1 \v 21 आमचे प्रतापी याहवेह तिथे असतील. \q2 विस्तीर्ण नद्या आणि प्रवाह असलेले ते ठिकाण असेल. \q1 कोणत्याही लहान जहाजाचे वल्हे त्यांच्यावर स्वार होणार नाही, \q2 कोणतेही प्रचंड जहाज त्यांच्यावरून जाणार नाही. \q1 \v 22 कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत, \q2 याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत, \q1 याहवेह आमचे राजा आहेत; \q2 तेच आम्हाला वाचविणार आहेत. \b \q1 \v 23 तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत: \q2 जहाजाची शीडकाठी सुरक्षित धरलेली नाही, \q2 जहाजाचे शीड पसरलेले नाही. \q1 तेव्हा लूट केलेल्या विपुल मालाची वाटणी केली जाईल \q2 आणि लंगडेसुद्धा लूट घेऊन जातील. \q1 \v 24 सीयोनमध्ये राहणारा कोणीही असे म्हणणार नाही, “मी आजारी आहे;” \q2 आणि तिथे जे राहणारे आहेत, त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल. \c 34 \s1 राष्ट्रांविरुद्ध न्यायनिवाडा \q1 \v 1 अहो तुम्ही सर्व राष्ट्रांनो, जवळ या आणि ऐका; \q2 लोकांनो! तुम्ही इकडे लक्ष द्या! \q1 पृथ्वी आणि तिच्यामध्ये असणाऱ्या सर्वांना हे ऐकू द्या, \q2 जग आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या सर्वांना ऐकू द्या! \q1 \v 2 याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; \q2 त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. \q1 ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, \q2 ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील. \q1 \v 3 त्यांच्या वधलेल्यांना बाहेर फेकून देण्यात येईल, \q2 त्यांच्या मृतदेहांना दुर्गंधी येईल; \q2 पर्वत त्यांच्या रक्ताने भिजून जातील. \q1 \v 4 आकाशातील सर्व तारे विरघळून जातील \q2 आणि आकाशे चर्मपत्राच्या गुंडाळीसारखे गुंडाळले जातील; \q1 द्राक्षवेलावरील कोमेजलेल्या पानांप्रमाणे, \q2 अंजिराच्या झाडावरील सुकून गेलेल्या अंजिरांप्रमाणे \q2 सर्व तारांगण गळून पडतील. \b \q1 \v 5 माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे. \q2 पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे, \q2 त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे. \q1 \v 6 याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे, \q2 ती चरबीने झाकलेली आहे— \q1 कोकरे आणि शेळ्यांचे रक्त, \q2 मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे. \q1 कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे \q2 आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत. \q1 \v 7 आणि त्यांच्याबरोबर रानबैल आणि \q2 गोर्‍हे व मोठे बैल यज्ञात पडतील. \q1 त्यांची भूमी रक्ताने चिंब भिजून जाईल, \q2 आणि धूळ चरबीमध्ये पूर्ण भिजली जाईल. \b \q1 \v 8 कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे, \q2 सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष. \q1 \v 9 एदोम येथील प्रवाह मैदानासारखे होतील, \q2 तिची धूळ जळत्या गंधकात बदलली जाईल. \q2 तिची भूमी धगधगते मैदान होईल! \q1 \v 10 रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही. \q2 त्याचा धूर कायमचा उठत राहील. \q1 पिढ्यान् पिढ्या ते ओसाड पडून राहील. \q2 यामधून पुन्हा कोणीही प्रवास करणार नाही. \q1 \v 11 ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील; \q2 मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील. \q1 कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर \q2 मापनदोरी ताणली आहे \q2 आणि नाशाचा ओळंबा लावला आहे. \q1 \v 12 तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही, \q2 तिचे सर्व राजपुत्र नाहीसे होतील. \q1 \v 13 काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, \q2 जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. \q1 कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, \q2 घुबडांचे घर होईल. \q1 \v 14 वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील, \q2 आणि रानबोकडे एकमेकांना साद घालतील; \q1 तिथे निशाचरही झोपतील \q2 आणि त्यांना विश्रांतीच्या जागा मिळतील. \q1 \v 15 तिथे घुबड घरटे बांधून अंडी घालेल, \q2 ती तिच्या पंखाच्या सावलीत \q2 त्यांना उबवेल आणि पिलांची काळजी घेईल; \q1 तिथे प्रत्येक बाज पक्षीही \q2 आपल्या जोडीदारासह जमतील. \p \v 16 याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा: \q1 यामधील कोणाचाही अभाव होणार नाही, \q2 एकालाही जोडीदाराची कमतरता पडणार नाही. \q1 कारण ही त्यांच्याच मुखाने दिलेली आज्ञा आहे, \q2 आणि त्यांचा आत्मा त्यांना एकत्र करेल. \q1 \v 17 ते त्यांच्या भागांचे वाटप करतात; \q2 त्यांच्या हाताने त्यांना मोजून वाटतात. \q1 तो भाग सर्वकाळासाठी त्यांच्याकडे राहील \q2 आणि ते पिढ्यान् पिढ्या तिथे निवास करतील. \c 35 \s1 तारण पावलेल्यांचा आनंद \q1 \v 1 वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; \q2 अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. \q1 केशराच्या फुलाप्रमाणे, \v 2 त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; \q2 तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. \q1 लबानोनचे गौरव, \q2 कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; \q1 ते याहवेहचे गौरव, \q2 आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील. \b \q1 \v 3 अशक्त हात बळकट करा, \q2 निर्बल झालेले गुडघे स्थिर करा; \q1 \v 4 भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, \q2 “बलवान व्हा, घाबरू नका; \q1 तुमचे परमेश्वर येतील, \q2 ते सूड घेण्यास येतील. \q1 दैवी प्रतिफळ देऊन \q2 तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.” \b \q1 \v 5 तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील \q2 आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील. \q1 \v 6 तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील, \q2 आणि मुकी जीभ आनंदाने ओरडेल. \q1 अरण्यामध्ये पाणी \q2 आणि वाळवंटात झरे उफाळून वर येतील. \q1 \v 7 तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, \q2 आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. \q1 जिथे कधी कोल्हे निजले, \q2 त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल. \b \q1 \v 8 आणि तिथे एक महामार्ग असेल; \q2 त्याला पवित्रतेचा मार्ग म्हटले जाईल; \q2 तो त्यांच्यासाठी असेल जे त्या पवित्र मार्गावरून चालतात. \q1 अशुद्ध असलेले त्यावरून प्रवास करणार नाहीत. \q2 दुष्ट मूर्ख लोक त्यावरून चालणार नाहीत. \q1 \v 9 तिथे कोणताही सिंह नसेल, \q2 किंवा कोणताही वखवखलेला हिंस्र पशू नसेल. \q2 ते तिथे सापडणार नाहीत. \q1 फक्त तारण झालेलेच तिथे चालतील, \q2 \v 10 आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. \q2 ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; \q2 अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. \q1 हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, \q2 दुःख व शोक दूर पळून जातील. \c 36 \s1 सन्हेरीब यरुशलेमला धमकावितो \p \v 1 हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या शहरांवर आक्रमण केले आणि ती ताब्यात घेतली \v 2 अश्शूरच्या राजाने आपल्या मोठ्या सैन्यासह सरसेनापतीला लाखीशहून हिज्कीयाह राजाकडे यरुशलेमला पाठविले. जेव्हा सेनापती वरच्या हौदाच्या पाटाजवळ रस्त्याच्या कडेला थांबला \v 3 तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम त्याच्या राजवाड्याचा कारभारी, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र, त्याच्याकडे गेले. \p \v 4 तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: \pm “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस? \v 5 तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस? \v 6 पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते. \v 7 पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय?” \pm \v 8 “ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तुमच्याकडे त्यांच्यासाठी तेवढे घोडेस्वार असतील तर! \v 9 रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार? \v 10 शिवाय, मी याहवेहशिवाय या भूमीवर हल्ला करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलो आहे काय? याहवेहने स्वतःच मला या देशाविरुद्ध चाल करून येण्यास आणि त्याचा नाश करण्यास सांगितले आहे.’ ” \p \v 11 तेव्हा एल्याकीम, शेबना आणि योवाह सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.” \p \v 12 परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगायला पाठवले होते, ते काय फक्त तुझ्या धन्याला आणि तुला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुझ्यासारखेच त्यांची स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?” \p \v 13 मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरचे महाराज यांचे ऐका! \v 14 महाराज असे म्हणतात: हिज्कीयाहास तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही. \v 15 हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका, जेव्हा तो म्हणेल, ‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवितील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ \p \v 16 “हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे महराज असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल, \v 17 जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या देशात घेऊन जाईपर्यंत. \p \v 18 “हिज्कीयाहला तुमची दिशाभूल करू देऊ नका जेव्हा म्हणतो की, ‘याहवेह आम्हाला सोडवतील.’ कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय? \v 19 हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईमची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय? \v 20 या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्यांच्या देशांना माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?” \p \v 21 परंतु लोक गप्प राहिले आणि उत्तर देण्यासाठी काहीच बोलले नाहीत, कारण राजाने आज्ञा केली होती, “त्याला उत्तर देऊ नका.” \p \v 22 यानंतर हिल्कियाहचा पुत्र, राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले. \c 37 \s1 यरुशलेमच्या सुटकेचे भविष्य \p \v 1 जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला. \v 2 त्याने राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडील याजक यांना गोणपाट नेसून आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याकडे पाठविले. \v 3 ते त्याला म्हणाले, “हिज्कीयाह असे म्हणतो: आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमानाचा दिवस आहे, कारण लेकरे होण्याची वेळ आली परंतु ते प्रसवण्याची शक्ती नाही. \v 4 कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” \p \v 5 जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले, \v 6 यशायाह त्यांना म्हणाला, “तुमच्या धन्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: तुम्ही जे ऐकले आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका—त्या शब्दांनी अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी माझी निंदा केली आहे. \v 7 ऐका! जेव्हा तो एक ठराविक अहवाल ऐकेल, तेव्हा मी त्याला त्याच्या स्वतःच्या देशात परत जाण्याची इच्छा व्हावी असे करेन आणि तिथे तो तलवारीने वधला जाईल असे मी करेन.’ ” \p \v 8 जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला. \p \v 9 आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्यास निघाला आहे. जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले: \v 10 “यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणत असताना तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका. \v 11 अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्रांचा नाश कसा केला, हे तुम्ही ऐकलेच आहे. मग तुमची सुटका होईल काय? \v 12 माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय? \v 13 हमाथ नगरीचा राजा किंवा अर्पादचा राजा हे कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाह यांचे राजे कुठे आहेत?” \s1 हिज्कीयाहची प्रार्थना \p \v 14 हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले. \v 15 आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: \v 16 “अहो सर्वसमर्थ याहवेह इस्राएलांचे परमेश्वरा, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे. \v 17 हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे सर्व शब्द ऐका. \p \v 18 “हे याहवेह, हे खरे आहे की अश्शूरच्या राजांनी या सर्व लोकांचा आणि त्यांच्या भूमीचा नाश केला आहे. \v 19 आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते. \v 20 आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडव, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.” \s1 सन्हेरीबचे पतन \p \v 21 मग आमोजाचा पुत्र यशायाह याने हिज्कीयाह राजाला हा संदेश पाठविला: “इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात: कारण तू अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्याविषयी माझ्याकडे प्रार्थना केली, \v 22 त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: \q1 “सीयोनाची कुमारी कन्या \q2 तुझा उपहास आणि तिरस्कार करते. \q1 यरुशलेम कन्या \q2 तुझे पलायन बघून आपले डोके हालविते. \q1 \v 23 तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? \q2 तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास, \q1 गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? \q2 इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस! \q1 \v 24 तुझे दूत पाठवून \q2 तू प्रभूची चेष्टा केली. \q1 आणि तू म्हणतोस, \q2 ‘मी माझ्या अनेक रथांनी \q1 उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, \q2 लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. \q1 मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, \q2 निवडक गंधसरू तोडले. \q1 मी तिच्या दुर्गम उंचीवर पोहोचलो \q2 तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो. \q1 \v 25 अनेक परकीय देशात मी विहिरी खणल्या \q2 आणि तेथील पाणी प्यालो. \q1 माझ्या पावलाच्या तळव्याने \q2 मी मिसरचे सर्व झरे आटवून टाकले.’ \b \q1 \v 26 “हे तू ऐकले नव्हते काय? \q2 याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. \q1 या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; \q2 आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, \q1 जी तटबंदीची शहरे तू \q2 उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास. \q1 \v 27 त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली, \q2 ते निराश व लज्जित झालेले आहेत. \q1 ते शेतातील पिकासारखे, \q2 कोवळी पाने आलेल्या रोपासारखे, \q1 छतावर उगविलेल्या गवतासारखे, \q2 पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते. \b \q1 \v 28 “परंतु मी जाणतो तू कुठे आहेस \q2 तू कधी जातो व येतो \q2 आणि तू माझ्यावर कसा संतापतोस. \q1 \v 29 कारण तू माझ्यावर संतापतो \q2 व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, \q1 मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन \q2 व तुझ्या तोंडात लगाम घालेन \q1 आणि मग तू आलास त्याच वाटेने \q2 तुझ्याच देशात तुला परत नेईन. \p \v 30 “हिज्कीयाह, तुझ्यासाठी चिन्ह असेल: \q1 “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, \q2 तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. \q1 परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, \q2 द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल. \q1 \v 31 पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक \q2 जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल. \q1 \v 32 यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, \q2 सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. \q1 सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने \q2 हे सर्व घडून येईल. \p \v 33 “म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: \q1 “तो या शहरात प्रवेश करणार नाही \q2 किंवा एखादा बाणही सोडणार नाही. \q1 तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही \q2 किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही. \q1 \v 34 ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; \q2 तो या शहरात प्रवेश करणार नाही,” \q2 असे याहवेह घोषित करतात. \q1 \v 35 “माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीद याच्या स्मरणार्थ, \q2 मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!” \p \v 36 त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तो त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती. \v 37 म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला. \p \v 38 एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस, त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला. \c 38 \s1 हिज्कीयाह राजाचा आजार \p \v 1 त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझे घर व्यवस्थित ठेव, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.” \p \v 2 हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली, \v 3 “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला. \p \v 4 तेव्हा याहवेहचे वचन यशायाहकडे आले: \v 5 “जा आणि हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन. \v 6 आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. मी या शहराचे रक्षण करेन. \p \v 7 “ ‘याहवेहनी जे वचन दिले आहे, त्याप्रमाणे ते करतील यासाठी याहवेहनी तुम्हाला हे चिन्ह दिले आहे: \v 8 मी सूर्याच्या सावलीला आहाजच्या पायऱ्यांवरून दहा पावले मागे जाईल असे करेन.’ ” तेव्हा सूर्यप्रकाश जिथून तो गेला होता, त्याच्या दहा पावले मागे गेला. \b \p \v 9 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने त्याच्या आजारपणा नंतर आणि बरा झाल्यावर केलेले लिखाण: \q1 \v 10 मी म्हणाला, “माझ्या जीवनाच्या बहराच्या काळात \q2 मला मृत्यूच्या दारातून जावे लागेल काय \q2 आणि माझी उरलेली वर्षे लुटली जावी काय?” \q1 \v 11 मी म्हणालो, “मी जिवंतांच्या देशात पुन्हा \q2 याहवेह यांना स्वतः पाहणार नाही; \q1 येथून पुढे मला माझे सहकारी दिसणार नाहीत, \q2 किंवा जे आता या जगात आहेत त्यांच्याबरोबर मी राहणार नाही. \q1 \v 12 मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर \q2 पाडले गेले आणि माझ्याकडून काढून घेतले गेले. \q1 विणकराप्रमाणे मी माझे जीवन गुंडाळून टाकले आहे, \q2 आणि त्यांनी मला विणकऱ्याच्या मागापासून तोडून टाकले आहे; \q2 रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले. \q1 \v 13 मी धीर धरून पहाटेपर्यंत वाट पाहिली, \q2 परंतु सिंहासारखे त्यांनी माझी सर्व हाडे मोडली; \q2 रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले. \q1 \v 14 मी निळवी किंवा सारसाप्रमाणे चित्कारलो \q2 मी शोक करणाऱ्या कबुतरासारखा कण्हत राहिलो. \q1 आकाशाकडे पाहून माझे डोळे दुर्बल झाले. \q2 मला धमकाविण्यात आले आहे; हे प्रभू, मला मदत करण्यासाठी या!” \b \q1 \v 15 परंतु मी काय बोलू शकतो? \q2 ते माझ्याशी बोलले आहेत आणि त्यांनी स्वःताच हे केले आहे. \q1 कारण माझ्या या तीव्र मनोवेदनेमुळे \q2 माझी सर्व वर्षे मी नम्रपणाने चालेन. \q1 \v 16 हे प्रभू, अशा गोष्टी करून लोक जगतात; \q2 आणि माझ्या आत्म्याला त्यांच्यामध्येही जीवन सापडते. \q1 तुम्ही माझे आरोग्य पुनः प्रदान केले आहे \q2 आणि मला जीवन दिले आहे. \q1 \v 17 अशा मनोवेदना मी सहन करणे \q2 निश्चितच माझ्या भल्याचे होते. \q1 तुमच्या प्रेमाखातर तुम्ही मला \q2 नाशाच्या गर्तेपासून वाचविले; \q1 तुम्ही माझी सर्व पापे \q2 तुमच्या पाठीमागे टाकली आहेत. \q1 \v 18 कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, \q2 मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. \q1 जे खाली गर्तेत जातात \q2 ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत. \q1 \v 19 जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, \q2 जसे मी आज करीत आहे; \q1 पालक त्यांच्या मुलांना \q2 तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात. \b \q1 \v 20 याहवेह मला वाचवतील, \q2 आणि आपण याहवेहच्या मंदिरात \q1 आपल्या आयुष्याचे सर्व दिवस \q2 तंतुवाद्याच्या साहाय्याने गाणी गात राहू. \p \v 21 यशायाहने म्हटले होते, “अंजिराचा लेप तयार करा आणि तो गळवावर लावा आणि तो बरा होईल.” \p \v 22 हिज्कीयाहने विचारले होते, “मी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?” \c 39 \s1 बाबेलचे प्रतिनिधीमंडळ \p \v 1 त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादानने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजारपणाबद्दल आणि बरे झाल्याबद्दल ऐकले होते. \v 2 हिज्कीयाहने राजदूतांचे आनंदाने स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते दाखविले—चांदी, सोने, मसाले, उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते. \p \v 3 तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” \p हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून माझ्याकडे आले आहेत.” \p \v 4 संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” \p हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.” \p \v 5 तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेहचे वचन ऐका: \v 6 अशी वेळ निश्चितच येईल जेव्हा तुमच्या राजवाड्यामधील सर्वकाही आणि तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व, बाबेलला नेले जाईल. काहीही सोडले जाणार नाही, असे याहवेह म्हणतात. \v 7 आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.” \p \v 8 हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभर शांती आणि सुरक्षितता असेल.” \c 40 \s1 परमेश्वराच्या लोकांचे सांत्वन \q1 \v 1 सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, \q2 तुमचे परमेश्वर असे म्हणतात. \q1 \v 2 यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, \q2 आणि तिला असे घोषित करा की, \q1 तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, \q2 तिच्या पापाची परतफेड झाली आहे, \q1 याहवेहच्या हातातून तिला \q2 तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे. \b \q1 \v 3 बोलविणार्‍याचा आवाज म्हणतो: \q1 “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली \q2 याहवेहसाठी मार्ग तयार करा; \q1 आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये \q2 महामार्ग सरळ करा, \q1 \v 4 प्रत्येक दरी उंच केली जाईल, \q2 प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; \q1 खडबडीत जमीन सपाट होईल, \q2 खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल. \q1 \v 5 आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल, \q2 आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील. \q1 कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.” \b \q1 \v 6 एक वाणी म्हणाली, “आरोळी द्या.” \q2 आणि मी म्हणालो, “मी काय आरोळी देऊ?” \b \q1 “सर्व लोक गवतासारखे आहेत, \q2 आणि त्यांचे विश्वासूपण वनातील फुलांसारखे आहे. \q1 \v 7 गवत सुकते आणि फुले गळून पडतात, \q2 कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो. \q2 निश्चितच लोक गवत आहेत. \q1 \v 8 गवत सुकते आणि फुले गळून पडतात, \q2 परंतु आपल्या परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” \b \q1 \v 9 तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, \q2 उंच डोंगरावर जा. \q1 यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, \q2 तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, \q1 आवाज उंच करा, घाबरू नका; \q2 यहूदीयाच्या नगरांना सांगा, \q2 “तुमचे परमेश्वर येत आहेत!” \q1 \v 10 पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत, \q2 आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात. \q1 पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे, \q2 आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे. \q1 \v 11 ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: \q2 ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात \q1 आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; \q2 जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात. \b \q1 \v 12 त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, \q2 किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? \q1 पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, \q2 किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे \q2 आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत? \q1 \v 13 याहवेहचा आत्मा\f + \fr 40:13 \fr*\ft मन\ft*\f* कोण जाणू शकेल, \q2 किंवा याहवेहना सल्ला देऊ शकेल असा कोण सल्लागार आहे? \q1 \v 14 ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला, \q2 आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला? \q1 असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले, \q2 किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला? \b \q1 \v 15 राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; \q2 त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; \q2 बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत. \q1 \v 16 लबानोनांच्या विशाल वनाची लाकडे वेदीच्या अग्नीसाठी पुरेशी नाहीत, \q2 तसेच होमार्पणासाठी तेथील असंख्य जनावरे सुद्धा पुरेशी नाहीत. \q1 \v 17 त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत; \q2 ते त्यांना निरुपयोगी असे समजतात. \q2 त्यांच्या दृष्टीने शून्यवत आहेत. \b \q1 \v 18 तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल? \q2 तुम्ही कोणत्या प्रतिमेला त्यांची उपमा द्याल? \q1 \v 19 एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो, \q2 आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो \q2 आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो. \q1 \v 20 गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही \q2 सडले जाणार नाही, असे लाकूड ते निवडतात; \q1 ती मूर्ती पडणार नाही अशी तिची रचना करण्यासाठी \q2 ते एका कुशल कारागिराला शोधतात. \b \q1 \v 21 तुम्हाला माहीत नाही काय? \q2 तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? \q1 तुम्हाला ते सुरुवातीपासूनच सांगितले नव्हते काय? \q2 पृथ्वीची स्थापना होताच तुम्ही ते कधी जाणले नाही काय? \q1 \v 22 जे पृथ्वीवरील मंडलावर विराजमान होतात, \q2 त्यावरील लोक त्यांना टोळांप्रमाणे दिसतात. \q1 ते आकाशे एखाद्या आच्छादनाप्रमाणे पसरवितात, \q2 आणि तंबूप्रमाणे त्याला फैलावून आपला डेरा तयार करतात. \q1 \v 23 ते राजपुत्रांना तुच्छतेस आणतात \q2 आणि या जगातील राज्यकर्त्यांना शून्यवत करून टाकतात. \q1 \v 24 लागण करताच, \q2 पेरणी करताच, \q2 ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, \q1 ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, \q2 आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो. \b \q1 \v 25 “माझी तुलना तुम्ही कोणाशी कराल? \q2 माझी बरोबरी करेल असा कोण आहे?” असे पवित्र परमेश्वर विचारतात. \q1 \v 26 तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा: \q2 हे सर्व कोणी निर्माण केले आहे? \q1 एकामागून एक असे हे तारांगण कोणी अस्तित्वात आणले आहे, \q2 आणि त्यातील प्रत्येकाला ते नावाने हाक मारतात. \q1 त्यांच्या थोर सामर्थ्यामुळे व त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे \q2 त्यातील एकही कधी हरवत नाही. \b \q1 \v 27 हे याकोबा, तू अशी तक्रार का करतो? \q2 हे इस्राएला, असे तू कसे म्हणतोस, \q1 “याहवेहपासून माझे मार्ग लपलेले आहेत; \q2 माझे परमेश्वर माझ्या संकटाकडे दुर्लक्ष का करतात”? \q1 \v 28 तुम्हाला माहीत नाही काय? \q2 तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? \q1 याहवेहच सनातन परमेश्वर आहेत, \q2 पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत. \q1 ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत, \q2 त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे. \q1 \v 29 थकलेल्यास ते शक्ती देतात \q2 आणि बलहीनाचे सामर्थ्य वाढवितात. \q1 \v 30 तरुण थकतात व कंटाळतात, \q2 तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात; \q1 \v 31 पण जे याहवेहवर आशा ठेवतात \q2 ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, \q1 ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; \q2 ते धावतील पण दमणार नाहीत, \q2 ते चालतील पण क्षीण होणार नाहीत. \c 41 \s1 इस्राएलचे सहायक \q1 \v 1 “हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा! \q2 राष्ट्रांना त्यांच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करू द्या! \q1 त्यांना पुढे येऊन बोलू द्या; \q2 न्यायनिवाड्यासाठी आपण एकत्र भेटू या. \b \q1 \v 2 “पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले, \q2 नीतिमत्वात त्यांची सेवा करण्यासाठी त्याला बोलाविले\f + \fr 41:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्याला प्रत्येक पावलावर विजय मिळतो\fqa*\f*? \q1 राष्ट्रांना ते त्याच्या स्वाधीन करतात \q2 आणि राजांना त्याच्या अधीन करतात. \q1 ते त्याच्या तलवारीने त्यांची धूळधाण करतात, \q2 त्याच्या धनुष्याने वार्‍याने उडणारा भुसा करतात. \q1 \v 3 तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता, \q2 आणि आधी प्रवास न केलेल्या वाटेने सुरक्षित पुढे निघून जातो. \q1 \v 4 पुरातन काळापासून पिढ्यांना \q2 कोणी पाचारण केले व हे घडवून आणले? \q1 मी, याहवेह—मी आदि आहे, \q2 मी अंत आहे—तो मीच आहे.” \b \q1 \v 5 बेटांनी हे बघितले व ते भयभीत झाले; \q2 पृथ्वीचा दिगंतापासून थरकाप झाला. \q1 त्यांनी प्रवेश केला व ते पुढे आले; \q2 \v 6 ते एकमेकास साहाय्य करू लागले \q2 व त्यांच्या सहकार्यास म्हणाले “धैर्यवान हो!” \q1 \v 7 धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो, \q2 आणि हातोडीने धातू गुळगुळीत करणारा, \q2 ऐरणीवर घण मारणार्‍यास उत्तेजन देतो. \q1 धातू जोडणीबद्दल तो म्हणतो, “हे चांगले आहे.” \q2 मग दुसरा, ती मूर्ती कलंडू नये म्हणून त्यास खिळे ठोकतो. \b \q1 \v 8 “परंतु हे इस्राएल, माझे सेवक, \q2 याकोब, माझे निवडलेले, \q2 कारण तुम्ही माझा मित्र अब्राहामाचे वंशज आहात, \q1 \v 9 पृथ्वीच्या दिगंतांपासून मी तुम्हाला निवडले आहे, \q2 तिच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातून मी तुम्हाला बोलाविले आहे. \q1 मी म्हटले, ‘तुम्ही माझे सेवक आहात’; \q2 मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नाकारले नाही. \q1 \v 10 भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; \q2 हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. \q1 मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; \q2 मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन. \b \q1 \v 11 “पाहा, जे तुमच्यावर चवताळले, \q2 ते निश्चितच लज्जित व अपमानित होतील; \q1 ज्यांनी तुम्हाला विरोध केला \q2 ते नाहीसे होऊन नाश पावतील. \q1 \v 12 तुम्ही तुमच्या शत्रूचा शोध कराल, \q2 पण ते तुम्हाला सापडणार नाहीत. \q1 जे तुमच्याविरुद्ध युद्ध करतात \q2 त्यांचे अस्तित्वच राहणार नाही. \q1 \v 13 कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, \q2 जो तुमचा उजवा हात धरतो \q1 आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको; \q2 मी तुला साहाय्य करेन. \q1 \v 14 हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, \q2 हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, \q1 कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, \q2 तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात, \q1 \v 15 “पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन \q2 ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील \q1 आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल \q2 आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल. \q1 \v 16 तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, \q2 आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; \q1 मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल \q2 इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल. \b \q1 \v 17 “गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात, \q2 पण पाणी कुठेही नाही; \q2 तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे. \q1 पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन; \q2 मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही. \q1 \v 18 ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन \q2 त्यांच्यासाठी दर्‍यात मी पाण्याचे झरे उफळवेन. \q1 मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, \q2 आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील. \q1 \v 19 मी वाळवंटात \q2 देवदारू, बाभळी, मेंदी, जैतून लावेन. \q1 गंधसरूची झाडे माळरानात लावेन, \q2 चिनार व भद्रदारूची झाडे ही लावेन. \q1 \v 20 जेणेकरून लोक हा चमत्कार पाहतील व जाणतील, \q2 ते विचार करतील व त्यांना समजेल, \q1 याहवेहच्या बाहूंनी हे सर्व केले आहे, \q2 इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरानेच हे निर्माण केले आहे. \b \q1 \v 21 “तुमचा वाद पुढे आणा,” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 “तुमचा विवाद पुढे चालवा” \q2 असे याकोबाचा राजा म्हणतो. \q1 \v 22 “हे मूर्तींनो, आम्हाला सांगा, \q2 भावी काळात काय घडणार आहे. \q1 आम्हाला सांगा, गतकाळात कोणत्या घटना घडल्या, \q2 म्हणजे आम्ही त्याबद्दल विचार करू \q2 आणि त्यांचा परिणाम आम्हाला कळेल. \q1 किंवा पुढे होणाऱ्या घटना तरी सांगा, \q2 \v 23 भविष्यात काय घडणार ते सांगा, \q2 जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही देव आहात. \q1 काही तरी करा, चांगले वा वाईट, \q2 म्हणजे आम्ही भयभीत होऊ व घाबरून जाऊ. \q1 \v 24 परंतु तुम्ही शून्यते पेक्षाही कमी आहात \q2 आणि तुमची कामे पूर्णपणे व्यर्थ आहेत; \q2 जो कोणी तुमची निवड करतो, तो धिक्कार-योग्य आहे. \b \q1 \v 25 “मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे— \q2 एक जो सूर्योदयाकडून येतो आणि माझ्या नावाचा धावा करतो. \q1 तो राज्यकर्त्यांना तुडवेल, जणू ते बांधकामाचा चुना आहेत, \q2 जणू तो माती तुडविणारा कुंभार आहे. \q1 \v 26 हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल, \q2 किंवा आधीच सांगा, मग आम्ही म्हणू, ‘त्याचे म्हणणे न्यायी होते?’ \q1 कोणीही हे सांगितले नाही, \q2 कोणीही हे भविष्य केले नाही, \q2 कोणी तुमच्याकडून आलेला एकही शब्द ऐकला नाही. \q1 \v 27 मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’ \q2 मीच यरुशलेमकडे शुभ संदेश सांगणारा एक निरोप्या पाठविला. \q1 \v 28 मी बघितले, पण तिथे कोणीही नव्हते— \q2 तुमच्या दैवतांपैकी कोणीही सल्ला दिला नाही, \q2 मी विचारले तेव्हा त्यांच्यातील कोणीही उत्तर दिले नाही. \q1 \v 29 पाहा, ती सर्व खोटी आहेत! \q2 त्यांची कामे व्यर्थ आहेत; \q2 त्यांच्या मूर्ती केवळ वायू असून, त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत. \c 42 \s1 याहवेहचा सेवक \q1 \v 1 “पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे! \q2 माझा निवडलेला, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; \q1 माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. \q2 राष्ट्रांना तो न्याय आणेल. \q1 \v 2 तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. \q2 किंवा रस्त्यांमध्ये त्याचा आवाज उंचावणार नाही. \q1 \v 3 चेपलेला बोरू तो मोडणार नाही. \q2 मिणमिणती वात तो विझविणार नाही. \q1 तो विश्वासूपणाने न्यायदान करेल; \q2 \v 4 पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत, \q1 तो अडखळणार नाही किंवा निराश होणार नाही \q2 त्याच्या शिक्षणावर द्वीपही आशा ठेवतील.” \b \q1 \v 5 परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— \q1 आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, \q2 पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, \q2 ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, \q2 आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात: \q1 \v 6 “मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; \q2 मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, \q1 मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला \q2 कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन \q2 आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे, \q1 \v 7 जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे \q2 आणि बंदीशाळेत आहेत, त्यांना सोडविणारे \q2 अंधारात बसलेल्यांची सुटका करणारे असे करेन. \b \q1 \v 8 “मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! \q2 मी माझे गौरव दुसर्‍या कोणालाही \q2 किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही. \q1 \v 9 पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, \q2 आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; \q1 भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच \q2 मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.” \s1 याहवेहसाठी स्तुतिगान \q1 \v 10 याहवेहसाठी एक नवे गीत गा, \q2 पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुतिस्तोत्रे गा, \q1 तुम्ही जे सागराच्या खोलात जाऊन राहता आणि त्यात असलेले सर्वकाही, \q2 तुम्ही बेटांनो व त्यावर राहणारे सर्वजण गीत गा. \q1 \v 11 अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; \q2 जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. \q1 सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; \q2 त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे. \q1 \v 12 त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे \q2 आणि त्यांचा महिमा बेटांना घोषित करावा. \q1 \v 13 याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील, \q2 एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते आपला आवेश चेतवतील; \q1 ते गर्जना करून युद्धाची नांदी देतील \q2 आणि त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील. \b \q1 \v 14 “दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे, \q2 मी शांत राहून स्वतःला आवर घातला आहे. \q1 परंतु आता, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे, \q2 मी आक्रोश करेन, धापा टाकेन व माझी दमछाक होईल. \q1 \v 15 मी पर्वत व टेकड्या उजाड करेन. \q2 त्यांची सर्व हिरवळ वाळवून टाकेन; \q1 मी नद्यांना बेटांमध्ये रूपांतरित करेन, \q2 आणि जलाशय वाळवून टाकेन. \q1 \v 16 मी आंधळ्यांना त्यांना माहीत नसलेल्या मार्गावरून चालवेन, \q2 अपरिचित रस्त्यावरून मी त्यांचे मार्गदर्शन करेन; \q1 मी त्यांच्यापुढील अंधकार प्रकाशात बदलेन \q2 आणि खडबडीत जागा सपाट करेन. \q1 या गोष्टी मी करेन; \q2 मी त्यांना टाकणार नाही. \q1 \v 17 परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात, \q2 जे मूर्तींना म्हणतात कि, ‘तुम्ही आमची दैवते आहात,’ \q2 ते पूर्णपणे लज्जित होऊन मागे फिरतील. \s1 आंधळी व बहिरी इस्राएल \q1 \v 18 “अहो, तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; \q2 पाहा, तुम्ही आंधळ्यांनो आणि बघा! \q1 \v 19 आंधळे कोण आहेत, केवळ माझे सेवक, \q2 आणि बहिरे कोण आहेत, मी पाठविलेले संदेशवाहक? \q1 आंधळे कोण आहेत, ज्यांनी माझ्याशी करार केला आहे, \q2 याहवेहच्या सेवकासारखे आंधळे? \q1 \v 20 तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही; \q2 तुमचे कान उघडे आहेत, परंतु तुम्हाला ऐकावयास येत नाही.” \q1 \v 21 त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ \q2 त्यांचे नियमशास्त्र महान व गौरवित केल्याने \q2 याहवेह प्रसन्न होतात. \q1 \v 22 पण हेच लोक लुटले व लुबाडले गेले आहेत, \q2 ते सर्वजण खड्ड्यात अडकले आहेत \q2 किंवा तुरुंगात लपवून ठेवण्यात आले आहेत. \q1 तेच लूट बनले आहेत, \q2 त्यांना सोडविणारा कोणी नाही; \q1 त्यांना लूट बनविण्यात आले आहे, \q2 “त्यांना परत पाठवा,” असे म्हणणारे कोणीही नाही. \b \q1 \v 23 भावी काळात तुमच्यापैकी कोण हे ऐकेल \q2 किंवा काळजीपूर्वक लक्ष देईल? \q1 \v 24 याकोबाची लूट होण्यासाठी त्यांना कोणी हवाली केले, \q2 आणि इस्राएलला लुबाडू दिले? \q1 ज्यांच्याविरुद्ध आम्ही पातक केले \q2 ते याहवेहच नाहीत काय? \q1 त्यांनी याहवेहचे मार्ग अनुसरले नाहीत; \q2 त्यांच्या नियमांचे पालन केले नाही, \q1 \v 25 म्हणूनच याहवेहने आपला क्रोधाग्नी \q2 आणि लढाईचा विध्वंस त्यांच्यावर ओतला. \q1 चारही बाजूने ते ज्वालांनी वेढले गेले होते, तरीसुद्धा त्यांना उमगले नाही; \q2 ज्वालांनी ते भस्म झाले, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही. \c 43 \s1 इस्राएलचे एकमेव तारणकर्ता \q1 \v 1 परंतु आता, याहवेह असे म्हणतात— \q2 याकोबा, ज्यांनी तुला निर्माण केले, \q2 इस्राएला, ज्यांनी तुझी रचना केली: \q1 “भिऊ नको, कारण खंडणी भरून मी तुझी सुटका केली आहे. \q2 मी तुला नावाने हाक मारली आहे; तू माझीच आहेस. \q1 \v 2 जेव्हा तू खोल जलातून जाशील, \q2 मी तुझ्याबरोबर असेन, \q1 जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, \q2 त्या तुला बुडविणार नाही! \q1 जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, \q2 तू भाजली जाणार नाही. \q2 त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत. \q1 \v 3 कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, \q2 इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता; \q1 तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले, \q2 तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले, \q1 \v 4 कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस, \q2 आणि मी तुझ्यावर प्रीती करतो, \q1 मी तुझ्या मोबदल्यात लोकांना देईन, \q2 तुझ्या जिवाच्या मोबदल्यात मी राष्ट्रांना देईन. \q1 \v 5 भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; \q2 मीच तुझ्या संततीला पूर्वेकडून \q2 आणि पश्चिमेकडून एकत्र करेन, \q1 \v 6 मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’ \q2 आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’ \q1 माझ्या पुत्रांना दूरवरून \q2 आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या— \q1 \v 7 जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो, \q2 ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, \q2 ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.” \b \q1 \v 8 जे डोळे असून अंध आहेत, \q2 जे कान असून बहिरे आहेत, अशांना बाहेर काढ. \q1 \v 9 सर्व राष्ट्रे एकत्र येतात \q2 आणि सर्व लोक एकजूट होतात. \q1 त्यांच्या कोणत्या मूर्तींनी हे भाकीत केले होते \q2 आणि भावी गोष्टी आम्हाला घोषित केल्या? \q1 त्या सत्य बोलल्या तर त्याचे साक्षीदार त्यांनी आणावे, \q2 जेणेकरून ऐकणारे म्हणतील, “हे न्याय्य आहे.” \q1 \v 10 परंतु याहवेह घोषित करतात, “हे इस्राएला, तुम्ही माझे साक्षीदार आहात, \q2 आणि तुम्ही माझे निवडलेले सेवक आहात. \q1 जेणेकरून तुम्ही ओळखावे आणि माझ्यावर विश्वास ठेवावा, \q2 मीच परमेश्वर आहे हे समजून घ्यावे. \q1 माझ्यापूर्वी दुसरा कोणी देव अस्तित्वात नव्हता, \q2 आणि माझ्या नंतरही नसेल. \q1 \v 11 मी, केवळ मीच याहवेह आहे, \q2 माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. \q1 \v 12 मी प्रगट केले, वाचविले व घोषित केले— \q2 मीच केले, तुमच्यातील इतर कोणत्याही विदेशी दैवताने केले नाही.” \q1 याहवेह घोषित करतात, तुम्ही माझे साक्षीदार आहात की, “मीच परमेश्वर आहे. \q2 \v 13 सनातनकालापासून मीच परमेश्वर म्हणून अस्तित्वात आहे. \q1 माझ्या हातातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. \q2 मी जेव्हा कार्य करतो, त्याला कोणीही उलट करू शकत नाही.” \s1 परमेश्वराची कृपा आणि इस्राएलचा अविश्वासूपणा \q1 \v 14 तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर \q2 याहवेह असे म्हणतात— \q1 “तुमच्याकरिता मी खास्द्यांवर सैन्य पाठवेन \q2 आणि सर्व बाबेलच्या लोकांना \q1 ज्यांचा त्यांना अत्यंत अभिमान होता, \q2 त्या त्यांच्याच जहाजात पलायन करणारे म्हणून मी त्यांना आणेन. \q1 \v 15 मी याहवेह, तुमचा पवित्र परमेश्वर आहे, \q2 इस्राएलचा निर्माणकर्ता व तुमचा राजा आहे.” \b \q1 \v 16 याहवेह असे म्हणतात— \q2 ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला, \q2 महासागरामधून रस्ता तयार केला, \q1 \v 17 ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह \q2 व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले, \q1 तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या, \q2 कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले: \q1 \v 18 “पण पूर्वीच्या गोष्टी विसरा; \q2 गतकाळाचा जास्त विचार करू नका. \q1 \v 19 पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे! \q2 ती आता उभारत आहे; तुम्हाला ते आकलन होत नाही का? \q1 मी अरण्यातून रस्ता तयार करत आहे \q2 ओसाड भूमीत झरे बनवित आहे. \q1 \v 20 रानातील हिंस्र श्वापदे \q2 कोल्हे आणि घुबडे माझा आदर करतात, \q1 कारण मी अरण्यात त्यांना जलपुरवठा करतो \q2 माझ्या त्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी, \q1 ओसाड भूमीत झरे बनवितो, \q2 \v 21 ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले \q2 ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील. \b \q1 \v 22 “परंतु याकोबा, तू माझा धावा केला नाही, \q2 इस्राएला, तुम्ही माझ्यासाठी स्वतःला थकविले\f + \fr 43:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa निश्चितच तुम्ही माझ्यामुळे थकला आहात\fqa*\f* नाही. \q1 \v 23 होमार्पणासाठी तुम्ही कोकरे आणली नाहीत. \q2 अर्पणे करून तुम्ही माझा सन्मान केला नाही. \q1 मी तुम्हाला अन्नार्पणाचे ओझे दिले नाही \q2 धूप जाळण्याचा आग्रह करून थकविले नाही. \q1 \v 24 तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, \q2 किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. \q1 उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले \q2 व तुमच्या अपराधांनी मला शिणविले. \b \q1 \v 25 “मी, खरोखर केवळ माझ्याकरिताच \q2 मी तुमचे अपराध पुसेन \q2 आणि पुन्हा त्यांची आठवणही करणार नाही. \q1 \v 26 भूतकाळाचे परीक्षण करा, \q2 चला, याबद्दल चर्चा करू या; \q2 तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा. \q1 \v 27 तुमच्या पूर्वपित्याने पातके केली; \q2 ज्याला मी पाठविले, कि तुम्हाला माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्यास शिकवावे. \q1 \v 28 म्हणूनच मी तुमच्या मंदिराच्या अधिपतींची मानहानी केली; \q2 मी याकोबाला विध्वंसाच्या हवाली केले \q2 व इस्राएलला तिरस्कारास्पद केले. \c 44 \s1 याहवेहने निवडलेले इस्राएल \q1 \v 1 “परंतु आता माझ्या सेवका याकोबा, \q2 माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक, \q1 \v 2 याहवेह असे म्हणतात— \q2 ज्यांनी तुला निर्माण केले व तुला गर्भाशयात घडविले, \q2 आणि जे तुला साहाय्य करतील: \q1 याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, \q2 हे यशुरून\f + \fr 44:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa इस्राएल जो नीतिमान आहे\fqa*\f*, ज्याला मी निवडले आहे, घाबरू नको. \q1 \v 3 कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन, \q2 आणि शुष्क जमिनीला झरे देईन; \q1 तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन \q2 व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन. \q1 \v 4 कुरणातील गवतासारखे ते उगवतील \q2 वाहत्या झऱ्याच्या काठावरील वाळुंजाच्या वृक्षासारखे ते वाढतील. \q1 \v 5 काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’; \q2 तर इतरजण स्वतःला याकोबाच्या नावाने संबोधतील; \q1 आणखी दुसरे आपल्या हातावर ‘याहवेहचा’ असे लिहून \q2 स्वतःचे नाव इस्राएल ठेवतील. \s1 मूर्ती नव्हे तर, याहवेह \q1 \v 6 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, \q2 याहवेह असे म्हणतात— \q1 मी आदि व अंत आहे. \q2 माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही. \q1 \v 7 माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. \q2 त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, \q1 मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, \q2 आणि पुढे काय होणार आहे \q2 होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे. \q1 \v 8 भिऊ नका, थरथर कापू नका. \q2 मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? \q1 तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? \q2 नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.” \b \q1 \v 9 कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत, \q2 आणि त्यांना जे मौल्यवान वाटते ते मातीमोल आहे. \q1 जे त्यांच्यावतीने बोलतात, ते अंध आहेत; \q2 ते अज्ञानी असून ते लज्जित झाले आहेत. \q1 \v 10 जिच्यापासून काहीही लाभ होत नाही \q2 अशा दैवतांना आकार कोण देतो व त्या मूर्ती कोण घडवितो? \q1 \v 11 हे करणारे लोक लज्जित होतील; \q2 हे सर्व कारागीर तर केवळ मानव आहेत. \q1 या सर्वांनी एकत्र यावे व सिद्ध करावे; \q2 त्यांना भयभीत करून लज्जित करण्यात येईल. \b \q1 \v 12 लोहार अवजारे घेतो \q2 आणि आपल्या भट्टीपाशी उभा राहून तो काम करतो; \q1 मूर्तीला आकार देण्यासाठी तो हातोडी वापरतो, \q2 त्याच्या बाहूच्या शक्तीने तो त्याला ठोकून घडवितो. \q1 मग त्याला भूक लागते व तो शक्तिहीन होतो; \q2 तो पाणी पीत नाही आणि दुर्बल होतो. \q1 \v 13 सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो \q2 आणि त्यावर लेखणीने खुणा करतो; \q1 पटाशीने ते तासून गुळगुळीत करतो. \q2 कंपासने त्यावर निशाणी करतो. \q1 त्याला मानवाच्या शरीराचा आकार देतो, \q2 सर्व मानवी गौरवाने अलंकृत करतो, \q2 जेणेकरून त्याची मंदिरात स्थापना होऊ शकेल. \q1 \v 14 तो गंधसरू तोडतो \q2 किंवा बहुतेक सुरू वा एला ही झाडे निवडतो, \q1 तो त्या झाडाला रानातील इतर झाडांसह वाढवितो, \q2 किंवा देवदारू लावतो व पावसाच्या पाण्यावर त्याला वाढू देतो. \q1 \v 15 मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो; \q2 काही लाकूड जाळून स्वतःला ऊब मिळण्यासाठी, \q2 आणि आग पेटवून भाकर भाजण्यासाठी. \q1 परंतु तो त्या लाकडातून स्वतःसाठी एक देवही निर्माण करतो व त्याची आराधना करतो; \q2 तो एक मूर्ती तयार करतो व त्यास नमन करतो. \q1 \v 16 अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो; \q2 त्यावर आपले अन्न शिजवितो, \q2 तो त्यावर मांस भाजतो व खाऊन तृप्त होतो. \q1 आपल्याला ऊबही आणतो व म्हणतो, \q2 “अहा! मी किती उबदार झालो आहे; मला अग्नी दिसत आहे.” \q1 \v 17 आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो; \q2 त्या मूर्तीस नमन करून तिची पूजा करतो, \q1 तो त्याची प्रार्थना करतो आणि म्हणतो \q2 “माझी सुटका कर! तू माझ्या देव आहेस!” \q1 \v 18 ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही; \q2 त्यांनी बघू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. \q2 त्यांना समज येऊ नये म्हणून त्यांची अंतःकरणे बधिर केली आहेत. \q1 \v 19 कोणीही थांबून विचार करीत नाही, \q2 कोणालाही समज नाही व ते जाणून असे म्हणत नाहीत, “अरे! हा तर लाकडाचा ठोकळा आहे; \q1 यातील काही भाग मी सरपण म्हणून वापरला, \q2 याच्या कोळशावर मी भाकरही भाजली \q2 व मांस शिजवून ते खाल्ले. \q1 मग यातील अवशिष्ट भागाची मी तिरस्करणीय वस्तू बनवावी काय? \q2 मी लाकडाच्या ठोकळ्याला नमन करावे काय?” \q1 \v 20 असा मनुष्य राख भक्षण करतो; \q2 संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते; \q1 तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही \q2 “ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?” \b \q1 \v 21 “हे याकोबा, या गोष्टी आठवणीत ठेव, \q2 इस्राएला, तू माझा सेवक आहेस. \q1 मीच तुला निर्माण केले, तू माझा सेवक आहेस; \q2 इस्राएला, तुला मी विसरणार नाही. \q1 \v 22 मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे, \q2 सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत. \q1 माझ्याकडे परत ये, \q2 मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे.” \b \q1 \v 23 अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे; \q2 हे खालील पृथ्वी, गर्जना कर, \q1 हे पर्वतांनो, अरण्यांनो आणि सर्व वृक्षांनो, \q2 गायनाचा कल्लोळ उसळू द्या. \q1 कारण याहवेहने याकोबाचा उद्धार केला आहे. \q2 इस्राएलमध्ये त्यांनी त्यांचे गौरव प्रकट केले आहे! \s1 यरुशलेम पुनः रहिवासित होईल \q1 \v 24 “याहवेह असे म्हणतात; \q2 तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली: \b \q1 मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले, \q2 मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, \q2 ज्याने आकाश ताणले, \q2 ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली, \q1 \v 25 खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात \q2 आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात, \q1 जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो \q2 आणि ते निरर्थक बनवितो. \q1 \v 26 जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो \q2 आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, \b \q1 जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ \q2 यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ \q2 आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’ \q1 \v 27 जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा, \q2 आणि मी तुमचे झरे कोरडे करेन,’ \q1 \v 28 कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे \q2 तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल; \q1 तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,” \q2 आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’ \b \b \c 45 \q1 \v 1 “त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश, \q2 कोरेशने अनेक देश जिंकावे \q1 आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी \q2 मी त्याचा उजवा हात धरला आहे. \q1 मी त्याच्यासाठी दारे उघडेन; \q2 यापुढे या वेशी बंद होणार नाहीत: \q1 \v 2 हे सायरसा, मी तुझ्यापुढे चालेन, \q2 मी पर्वत जमीनदोस्त करेन \q1 आणि कास्याच्या वेशी तोडेन \q2 व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन. \q1 \v 3 दडवून ठेवलेली भांडारे, \q2 गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन, \q1 जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, \q2 इस्राएलचा परमेश्वर याहवेह मीच आहे हे तुला समजेल. \q1 \v 4 माझा सेवक याकोबासाठी, \q2 माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, \q1 तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, \q2 तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले \q2 आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले. \q1 \v 5 मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; \q2 माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही. \q1 तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, \q2 तरी मी तुला सामर्थ्य देईन. \q1 \v 6 मग सूर्योदयापासून \q2 ते सूर्यास्तापर्यंत \q1 सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. \q2 मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; \q1 \v 7 मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. \q2 मीच कल्याण व अरिष्ट आणतो, \q2 या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे. \b \q1 \v 8 “अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या; \q2 मेघ त्याचा वर्षाव करोत, \q1 पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो, \q2 तारण उसळून वर येवो \q1 त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो; \q2 मी, याहवेहने हे निर्माण केले आहे. \b \q1 \v 9 “जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो. \q2 जो जमिनीवर पडलेल्या अनेक मडक्याच्या तुकड्यांमधील \q2 केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे. \q1 माती कुंभाराला म्हणते काय, \q2 ‘हे तू काय घडवित आहेस?’ \q1 तुझी हस्तकृती तुला म्हणते काय, \q2 ‘कुंभाराला तर हातच नाहीत’? \q1 \v 10 धिक्कार असो त्या मुलाला, जो त्याच्या पित्याला म्हणतो \q2 ‘तुम्ही कोणाला जन्म दिलात?’ \q1 किंवा त्याच्या आईला विचारतो, \q2 ‘तू कोणाला जन्मास घातले?’ \b \q1 \v 11 “इस्राएलचे पवित्र परमेश्वर आणि तिचे निर्माणकर्ता, \q2 याहवेह हे असे म्हणतात: \q1 जे पुढे घडणार आहे त्याविषयी, \q2 माझ्या लेकरांबद्धल तुम्ही मला प्रश्न विचारता काय, \q2 किंवा माझ्या हस्तकृतीसाठी मला आज्ञा देता काय? \q1 \v 12 ज्याने पृथ्वी अस्तित्वात आणली \q2 व तिच्यावर मानवजात निर्माण केली, तो मीच आहे. \q1 माझ्या हातांनी मी अंतराळ पसरले \q2 त्यांच्या तारकागण माझ्याच आज्ञेत आहेत. \q1 \v 13 माझा न्याय्य हेतू सिद्धीस नेण्यास मीच सायरसला उभारेन: \q2 त्याचे सर्व मार्ग मी सरळ करेन. \q1 तो माझे शहर पुनर्निर्मित करेल, \q2 माझे बंदिवान लोक मोकळे करेल, \q1 पण ते तो बक्षीस किंवा मोबदल्यासाठी करणार नाही, \q2 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.” \p \v 14 याहवेह असे म्हणतात: \q1 “इजिप्तचे उत्पादन आणि कूशचा सर्व व्यापारी माल \q2 व शबाईचे ते उंच लोक— \q1 ते तुमच्याकडे येतील \q2 ते सर्वकाही तुमचेच होईल. \q1 बेड्या घातलेल्या बंदिवानाप्रमाणे ते पाय ओढत तुमच्यामागे चालतील \q2 ते साखळदंडाने बांधलेले तुमच्याकडे येतील. \q1 तुम्हाला नमन करतील \q2 व विनंती करून म्हणतील, \q1 ‘निश्चितच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, दुसरे कोणी नाही; \q2 त्यांच्याशिवाय दुसरा देव नाही.’ ” \b \q1 \v 15 हे परमेश्वरा आणि इस्राएलाच्या तारणकर्त्या, \q2 खरोखर तुम्ही परमेश्वर आहात, जे स्वतःला अदृश्य ठेवतात. \q1 \v 16 जे मूर्ती घडवितात, ते लज्जित व अपमानित होतील; \q2 ते सर्वजण एकत्र अपमानित केले जातील. \q1 \v 17 परंतु अनंतकाळच्या तारणाने \q2 याहवेह इस्राएलला सोडवतील; \q1 युगानुयुगापर्यंत ते कधीही \q2 लज्जित व अपमानित होणार नाहीत. \b \q1 \v 18 याहवेह असे म्हणतात— \q1 ज्यांनी आकाशे निर्माण केली \q2 तेच परमेश्वर आहेत; \q1 ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली, \q2 ती प्रस्थापित केली; \q1 ती ओसाड व निर्जन घडविली नाही, \q2 परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली— \q1 ते म्हणतात: \q1 “मीच याहवेह आहे. \q2 माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही. \q1 \v 19 मी गुप्तपणे, \q2 एखाद्या अंधार्‍या ठिकाणाहून बोललो नाही; \q1 मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, \q2 ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ \q1 मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; \q2 जे योग्य आहे तेच घोषित करतो. \b \q1 \v 20 “हे देशातून पलायन करणाऱ्यांनो, एकत्र या, \q2 जमा होऊन एकत्र या; \q1 लाकडी मूर्ती घेऊन फिरणारे अज्ञानी लोक, \q2 ते अशा दैवतांची प्रार्थना करतात, जे त्यांची सोडवणूक करू शकत नाहीत. \q1 \v 21 पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— \q2 आपसात विचारविनिमय करा. \q1 पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, \q2 अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? \q1 तो मीच, याहवेह नव्हतो काय? \q2 कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, \q1 न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता \q2 माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही. \b \q1 \v 22 “पृथ्वीच्या सर्व टोकांनो, \q2 माझ्याकडे वळा व उद्धार पावा; \q2 कारण मीच परमेश्वर आहे, अन्य कोणीही नाही. \q1 \v 23 मी स्वतः शपथ वाहिली आहे, \q2 माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत \q2 ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः \q1 प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; \q2 आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल. \q1 \v 24 ते माझ्याबद्दल म्हणतील, \q2 ‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ” \q1 जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण \q2 त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील. \q1 \v 25 इस्राएलचे सर्व वंशज \q2 याहवेहमध्ये सुटका पावतील \q2 आणि त्यांच्याबद्दल अभिमान बाळगतील. \c 46 \s1 बाबेलची दैवते \q1 \v 1 बेल नतमस्तक होतो, नबो\f + \fr 46:1 \fr*\ft बाबेलच्या दैवतांची नावे\ft*\f* वाकून जातो; \q2 ओझे वाहणारे पशू त्यांच्या मूर्ती वाहून नेतात. \q1 या प्रतिमांची नेआण तापदायक, \q2 व थकेलेल्यांना अधिकच ओझे देणारे आहे. \q1 \v 2 ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात; \q2 हे ओझे सोडविणे अशक्य झाल्यामुळे, \q2 ते स्वतःच बंदिवासात जातात. \b \q1 \v 3 “याकोबाच्या वंशजांनो, \q2 इस्राएलच्या सर्व अवशिष्ट लोकांनो, माझे ऐका, \q1 तुम्ही जन्माला आल्यापासून मीच तुमचे संगोपन केले आहे, \q2 आणि तुमच्या जन्मापासून मीच तुमची काळजी घेतली आहे. \q1 \v 4 वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत \q2 तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल. \q1 मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन; \q2 मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन. \b \q1 \v 5 “तुम्ही कोणाशी माझी तुलना कराल किंवा माझी बरोबरी कराल? \q2 तुम्हाला माझ्यासारखा असा कोण आढळेल, ज्याच्याशी तुम्ही माझी तुलना कराल? \q1 \v 6 काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात \q2 व चांदी तराजूत तोलतात; \q1 ते एखाद्या सोनाराला दैवत घडविण्यासाठी मजुरीने कामाला लावतात, \q2 आणि मग ते त्याच्यापुढे नमन करून त्याची पूजा करतात. \q1 \v 7 ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात; \q2 नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते. \q2 त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही. \q1 कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही; \q2 ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही. \b \q1 \v 8 “बंडखोरांनो, हे लक्षात ठेवा, विसरू नका, \q2 हे जरा मनावर घ्या. \q1 \v 9 भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण करा, फार पुरातन काळातील गोष्टी; \q2 मी परमेश्वर आहे, माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही नाही; \q2 मी परमेश्वर आहे आणि माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. \q1 \v 10 मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो \q2 व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. \q1 मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील, \q2 आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’ \q1 \v 11 मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला, \q2 त्या अति दूर असलेल्या मनुष्याला माझा हेतू साध्य करण्यासाठी बोलवेन. \q1 जे मी बोललो, ते मी घडवून आणणार; \q2 जे मी योजले आहे, ते मी करेनच! \q1 \v 12 अहो हट्टी अंतःकरणाच्या लोकांनो, \q2 तुम्ही, जे आता माझ्या नीतिमत्वापासून फार दूर गेलेले आहात, माझे ऐका. \q1 \v 13 मी माझे नीतिमत्व तुमच्याजवळ आणत आहे, \q2 ते फार दूर नाही; \q2 आणि माझ्या तारणास विलंब लागणार नाही. \q1 मी माझे तारण सीयोनाला \q2 माझे वैभव इस्राएलला बहाल करेन. \c 47 \s1 बाबेलचा पाडाव \q1 \v 1 “हे कुमारी खाल्डियन कन्ये, \q2 सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस; \q1 हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी, \q2 सिंहासन सोडून जमिनीवर बस. \q1 तू यापुढे कोमल व नाजूक \q2 म्हणविली जाणार नाहीस. \q1 \v 2 जाते घेऊन धान्य दळीत बस; \q2 तुझा बुरखा काढून टाक. \q1 तुझ्या घागर्‍याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून \q2 ओढ्यातून पायपीट करत जा. \q1 \v 3 तुझ्या नग्नतेचे प्रदर्शन होईल, \q2 आणि तुझी लज्जा अनावृत होईल. \q1 मी सूड उगवेन; \q2 मी कोणा मनुष्याला सोडणार नाही.” \b \q1 \v 4 आमचे उद्धारकर्ता—सर्वसमर्थ याहवेह हे ज्यांचे नाव आहे— \q2 तेच इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत. \b \q1 \v 5 “स्तब्ध बस, अंधारात जा, \q2 खास्द्यांच्या नगराची राणी. \q1 तू यापुढे राज्याची महाराणी \q2 म्हणविली जाणार नाहीस. \q1 \v 6 मी माझ्या लोकांवर संतापलो होतो \q2 आणि माझ्या वारसांना भ्रष्ट केले; \q1 त्यांना तुझ्या हाती दिले, \q2 पण तू त्यांना थोडीसुध्दा दया दाखविली नाहीस. \q1 वयस्कर लोकांवरही \q2 तू अवघड ओझे लादलेस. \q1 \v 7 तू म्हटले, ‘मी सदैव अस्तित्वात आहे— \q2 सर्वकाळाची राणी आहे!’ \q1 परंतु तू या गोष्टींचा विचार केला नाहीस \q2 किंवा परिणामी काय होऊ शकेल याकडे लक्ष दिले नाही. \b \q1 \v 8 “अगे चैनबाजीचे वेड असणारी, \q2 सुरक्षितपणे विलासणारी, \q1 आणि स्वतःला म्हणणारी, \q2 ‘मीच आहे, माझ्यासारखे कोणीही नाही. \q1 मी कधीही विधवा होणार नाही \q2 माझी लेकरे मी कधी गमावणार नाही.’ \q1 \v 9 पण आता या दोन्ही आपत्ती तुझ्यावर त्याच क्षणी, \q2 एकाच दिवशी, पूर्णपणे गुदरतील: \q2 तू विधवा होशील आणि तुझी मुलेही गमावशील. \q1 येथे तुझे अनेक चेटके \q2 आणि तुझा सर्व जादूटोणा असूनही \q2 हे सर्व पूर्ण मापाने भरून तुझ्यावर पडेल. \q1 \v 10 तू तुझ्या दुष्टाईवर भरवसा ठेवला \q2 ‘मला कोणी पाहत नाही,’ असे तू म्हणालीस. \q1 तुझ्या ज्ञानाने व शहाणपणाने तुला पथभ्रष्ट केले \q2 जेव्हा तू स्वतःला म्हणालीस, \q2 ‘मीच आहे आणि माझ्यासारखी दुसरी कोणी नाही.’ \q1 \v 11 तुझ्यावर आपत्ती कोसळेल \q2 आणि ती हातचलाखी करून कशी उलटावी हे तुला कळणार नाही. \q1 तुझ्यावर संकट कोसळेल \q2 खंडणी भरूनही त्याचे निवारण करता येणार नाही; \q1 जी येईल असे वाटले नाही अशी एक घोर विपत्ती \q2 अकस्मात तुझ्यावर येईल. \b \q1 \v 12 “मग तुझा जादूटोणा व मंत्रतंत्र, \q2 ज्याचा अनेक वर्षापासून परिश्रम करून तू अभ्यास केला, ते चालू दे. \q1 कदाचित तुला यश मिळेल, \q2 कदाचित दहशत निर्माण करशील. \q1 \v 13 तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस! \q2 तुझे ज्योतिषी पुढे येवोत, \q1 नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे, \q2 तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो. \q1 \v 14 ते निश्चितच भुसकटासारखे आहेत; \q2 अग्नी त्यांना भस्म करेल. \q1 ते अग्नीच्या सामर्थ्यापासून \q2 स्वतःचेही संरक्षण करू शकत नाहीत. \q1 हे ऊब देणारे निखारे नाहीत; \q2 ही जवळ बसविणारी शेकोटी नव्हे. \q1 \v 15 ते तुझ्यासाठी एवढेच करतील की— \q2 ज्यांच्याशी तू आयुष्यभर व्यवहार केलास, \q2 आणि बालपणापासून ज्यांच्यासह कष्ट केलेस, \q1 ते सर्व त्यांच्या चुका कायम करीतच राहतील; \q2 आणि तुझा बचाव करण्यासाठी कोणीही राहणार नाही. \c 48 \s1 हट्टी इस्राएल \q1 \v 1 “याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका \q2 तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, \q2 आणि यहूदाह वंशावळीतून येता, \q1 तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता \q2 आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— \q2 परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे— \q1 \v 2 पवित्र नगरीचे रहिवासी असल्याचा दावा करता \q2 आणि इस्राएलाच्या परमेश्वरावर अवलंबून असल्याची फुशारकी मारता— \q2 ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे: \q1 \v 3 भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे \q2 मी माझ्या मुखाने ते घोषित करून जाहीर केले; \q2 मग अकस्मात मी ते प्रत्यक्ष केले व तसे घडले. \q1 \v 4 तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते; \q2 तुमच्या मानेचे स्नायू लोखंडाचे \q2 आणि तुमचे कपाळ कास्याचे आहेत. \q1 \v 5 याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; \q2 प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, \q1 जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, \q2 ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; \q2 आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’ \q1 \v 6 ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा. \q2 ती तुम्ही स्वीकारीत नाही का? \b \q1 “यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या \q2 नव्या गोष्टी सांगतो. \q1 \v 7 त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे; \q2 आजच्या आधी त्या तुम्ही ऐकलेल्या नाहीत. \q1 तुम्ही असे म्हणू शकणार नाही, \q2 ‘होय, त्या आम्हाला माहीत होत्या.’ \q1 \v 8 तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत; \q2 पूर्वीपासूनच तुमचे कान उघडलेले नाहीत. \q1 कारण मला चांगले माहीत आहे कि तुम्ही किती विश्वासघातकी आहात; \q2 जन्मापासूनच तुम्ही बंडखोर म्हटले गेले. \q1 \v 9 तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन, \q2 आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन \q2 आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही. \q1 \v 10 पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे; \q2 पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली. \q1 \v 11 तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन. \q2 मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन? \q2 माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही. \s1 इस्राएलची मुक्तता \q1 \v 12 “याकोबा, मी ज्यांना बोलाविले, \q2 त्या इस्राएला, माझे ऐक, \q1 मीच परमेश्वर आहे; \q2 मीच आदि आणि मीच अंत आहे. \q1 \v 13 मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला, \q2 आणि माझ्या उजव्या हाताने आकाश आच्छादले; \q1 मी जेव्हा त्यांना हजर होण्याची आज्ञा देतो, \q2 ते सर्व एकत्र उभे राहतात. \b \q1 \v 14 “एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका: \q2 तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते? \q1 याहवेहचा निवडलेला मित्र \q2 बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल; \q2 बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील. \q1 \v 15 मी, जरी मी हे बोललो; \q2 होय, मीच त्याला बोलाविले आहे. \q1 मी त्याला आणेन. \q2 आणि या कामगिरीत तो यशस्वी होईल. \p \v 16 “माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका: \q1 “माझ्या पहिल्या घोषणेपासूनच मी गुप्तपणे बोललो नाही; \q2 ज्यावेळी ते घडेल, मी तिथे हजर आहे.” \b \q1 आणि आता सार्वभौम याहवेहने, \q2 त्यांच्या पवित्र आत्म्याची देणगी देऊन मला पाठविले आहे. \b \q1 \v 17 याहवेह हे असे म्हणतात— \q2 जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत: \q1 “मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे, \q2 जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो, \q2 जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो. \q1 \v 18 केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते, \q2 तर शांती एखाद्या नदीप्रमाणे, \q2 तुमचे सुयश समुद्रातील लाटांप्रमाणे वाहिले असते, \q1 \v 19 तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते. \q2 तुमची संतती धान्यकणासारखी अगणित असती; \q1 त्यांचे नाव कधीही मिटले नसते \q2 ना ते माझ्यासमोर कधी नष्ट झाले असते.” \b \q1 \v 20 बाबेलमधून निघा, \q2 खास्द्यांपासून पलायन करा! \q1 हे हर्षगर्जना करून जाहीर करा \q2 व घोषित करा, \q1 “याहवेहने आपला सेवक याकोबाचा उद्धार केला आहे.” \q2 अशी घोषणा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहचू द्या. \q1 \v 21 त्यांनी त्यांना वाळवंटातून नेले, तेव्हा ते तहानले नाहीत; \q2 त्यांनी त्यांच्याकरिता खडकातून पाणी वाहत बाहेर आणले. \q1 त्यांनी खडक दुभांगला \q2 आणि पाणी उफाळून बाहेर आले. \b \q1 \v 22 “दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात. \c 49 \s1 याहवेहचा सेवक \q1 \v 1 हे द्वीपांनो, माझे ऐका; \q2 हे दूरवरील देशांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या: \q1 माझा जन्म होण्यापूर्वीच याहवेहने मला बोलाविले; \q2 गर्भाशयात असतानाच त्यांनी माझे नाव उच्चारले. \q1 \v 2 त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत, \q2 त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे; \q1 त्यांनी मला बाणाप्रमाणे तीक्ष्ण केले आहे \q2 त्यांनी मला त्यांच्या भात्यात झाकून ठेवले आहे. \q1 \v 3 ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस; \q2 इस्राएला, तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन.” \q1 \v 4 मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले. \q2 मी माझे सामर्थ्य निरुपयोगीच खर्ची घातले, \q1 तरीपण माझे प्रतिफळ म्हणजे याहवेहचा वरदहस्त \q2 आणि माझे बक्षीस माझ्या परमेश्वराकडे आहे.” \b \q1 \v 5 आणि आता याहवेह म्हणतात— \q2 याकोबाला त्यांच्याकडे परत आणावे \q1 व इस्राएलला स्वतःसाठी एकत्र करावे, \q2 यासाठी त्यांचा सेवक व्हावा म्हणून ज्याची गर्भाशयातच घडण केली, \q1 आणि हे काम देऊन माझा बहुमान केला \q2 व माझे परमेश्वर माझे सामर्थ्य आहेत— \q1 \v 6 ते म्हणतात, \q1 “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे \q2 आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, \q2 हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, \q1 तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी \q2 मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.” \b \q1 \v 7 ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे, \q2 जो शासनकर्त्यांचा सेवक आहे, त्याला: \q1 उद्धारकर्ता आणि इस्राएलचे पवित्र परमेश्वर, \q2 याहवेह असे म्हणतात— \q1 “जेव्हा राजे तुला बघतील तेव्हा ते उठून उभे राहतील, \q2 अधिपती तुला लवून मुजरा करतील, \q1 कारण याहवेहने, जे विश्वसनीय आहेत, \q2 जे इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुला निवडले आहे.” \s1 इस्राएलची पुन्हा स्थापना \p \v 8 याहवेह असे म्हणतात: \q1 “माझ्या कृपेच्या समयी मी तुम्हाला उत्तर देईन, \q2 आणि तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य करेन; \q1 मी तुमचे संगोपन करेन \q2 आणि तुम्हाला सर्व लोकांसाठी एक करार असे करेन, जेणेकरून, \q1 तुमची भूमी पुनर्स्थापित होईल, \q2 आणि ओसाड वतने पुन्हा तुमच्या स्वाधीन होतील, \q1 \v 9 बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे \q2 आणि जे अंधारात आहेत, त्यांना म्हणावे, ‘स्वतंत्र व्हा!’ \b \q1 “ते रस्त्याच्या काठावर चरतील \q2 आणि प्रत्येक नापीक टेकड्यांवर त्यांना गवत सापडेल. \q1 \v 10 ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत. \q2 वाळवंटातील किंवा सूर्याची उष्णता त्यांना इजा करणार नाही. \q1 ज्यांनी त्यांच्यावर करुणा केली आहे, ते त्याचे मार्गदर्शन करतील \q2 आणि त्यांना पाण्याच्या झर्‍यांजवळून चालवितील. \q1 \v 11 मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन, \q2 आणि माझे महामार्ग उंचावले जातील. \q1 \v 12 पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील— \q2 काही उत्तरेकडून, काही पश्चिमेकडून, \q2 तर काही सीनीम\f + \fr 49:12 \fr*\ft काही मूळ प्रतीत \ft*\fqa आस्वान\fqa*\f* प्रांतातून येतील.” \b \q1 \v 13 हे आकाशांनो, हर्षगर्जना करा; \q2 अगे पृथ्वी, आनंदित हो; \q2 अहो पर्वतांनो, गीते वर उचंबळून येऊ द्या! \q1 कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे \q2 व त्यांच्या पीडितांवर करुणा ते करतील. \b \q1 \v 14 परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे; \q2 प्रभू आम्हाला विसरले आहेत.” \b \q1 \v 15 “आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का \q2 आपल्या जन्मदात्या मुलावरील तिची माया कधी आटेल का? \q1 ती कदाचित विसरेल, \q2 पण मी तुम्हाला विसरणार नाही. \q1 \v 16 पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे \q2 व तुझे तट सदोदित माझ्यासमोर आहेत. \q1 \v 17 तुमची संतती घाईघाईने परत येईल, \q2 आणि तुम्हाला उजाड करणारे तुम्हाला सोडून निघून जातील. \q1 \v 18 तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा; \q2 तुमची सर्व संतती एकत्र येऊन तुमच्याकडे परत येतील. \q1 मी जिवंत आहे,” याहवेह घोषणा करतात, \q2 “तुम्ही त्यांना आभूषणाप्रमाणे अंगावर धारण कराल, \q2 वधूप्रमाणे तुम्ही त्यांना परिधान कराल. \b \b \q1 \v 19 “जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते \q2 आणि जी तुमची भूमी उजाड झाली, \q1 ती तुमच्या लोकांना फारच कमी पडेल, \q2 आणि तुम्हाला गिळंकृत करणारे खूप दूर गेलेले असतील. \q1 \v 20 विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला \q2 असे म्हणताना तुम्ही ऐकाल, \q1 ‘आम्हाला ही जागा फारच कमी पडते; \q2 आम्हाला राहण्यास आणखी जास्त जागा पाहिजे.’ \q1 \v 21 तेव्हा तू मनात म्हणशील, \q2 ‘यांना माझ्यासाठी कोणी जन्माला घातले? \q1 मी दुःखी व निर्वंश होते; \q2 मी बंदिवासात व नाकारलेली होते. \q2 माझ्यासाठी यांना कोणी वाढविले? \q1 मला एकटेच टाकण्यात आले होते, \q2 मग हे सर्व—कुठून आले?’ ” \p \v 22 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “पाहा, मी राष्ट्रांना इशारा करेन, \q2 मी माझा झेंडा लोकांपुढे उंचावेन; \q1 ते तुझ्या पुत्रांना खांद्यांवर उचलून आणतील \q2 व तुझ्या कन्यांना कडेवर घेऊन आणतील. \q1 \v 23 राजे तुला उपपित्यासमान होतील, \q2 व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. \q1 ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; \q2 आणि तुझी पायधूळ चाटतील. \q1 तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. \q2 माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.” \b \q1 \v 24 योद्ध्याच्या हातून लूट घेता येईल काय? \q2 किंवा अत्याचारीकडून नीतिमान बंदिवानांना सोडविता येईल काय? \p \v 25 परंतु याहवेह हे असे म्हणतात: \q1 “होय, योद्ध्याच्या हातून बंदिवान सोडविले जातील, \q2 व अत्याचारीकडून लूट हिसकावून घेतली जाईल; \q1 तुमच्याशी झगडणाऱ्यांशी मी झगडेन, \q2 आणि मी तुमच्या मुलांना वाचवेन. \q1 \v 26 तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; \q2 आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. \q1 मग हे सर्व मानवजातीला समजेल \q2 कि मी, याहवेह, तुझा त्राता, \q2 तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.” \c 50 \s1 इस्राएलचे पाप व सेवकाचे आज्ञापालन \p \v 1 याहवेह असे म्हणतात: \q1 “मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले, \q2 तो कुठे आहे? \q1 मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना \q2 विकून टाकले? \q1 तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात; \q2 आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले. \q1 \v 2 मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? \q2 मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? \q1 तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? \q2 तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? \q1 मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! \q2 नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; \q1 त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात \q2 आणि तहानेने मरतात. \q1 \v 3 मी आकाशास अंधकार परिधान करवितो \q2 आणि गोणपाट त्याचे आच्छादन करतो.” \b \q1 \v 4 सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे, \q2 त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत, \q1 ते मला रोज सकाळी जागे करतात, \q2 शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात. \q1 \v 5 सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत; \q2 मी बंडखोर नव्हतो, \q2 मी मागे फिरलो नाही. \q1 \v 6 जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, \q2 जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; \q1 उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून \q2 मी तोंड लपवित नाही. \q1 \v 7 मी लज्जित होणार नाही, \q2 कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. \q1 म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे \q2 आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे. \q1 \v 8 मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. \q2 मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? \q2 चला आपण एकमेकांचा सामना करू या! \q1 माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? \q2 त्याने माझा सामना करावा! \q1 \v 9 सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. \q2 मला कोण दोषी ठरविणार? \q1 माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; \q2 कसर त्यांना खाऊन टाकेल. \b \q1 \v 10 तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो \q2 आणि त्यांच्या सेवकाच्या आज्ञा पाळतो? \q1 जो अंधारात चालतो, \q2 ज्याच्याकडे प्रकाश नाही, \q1 त्याने याहवेहच्या नावावर विश्वास ठेवावा \q2 आणि त्याने आपल्या परमेश्वरावर विसंबून राहावे. \q1 \v 11 परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता \q2 आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, \q1 जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, \q2 आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, \q1 माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: \q2 तुम्ही यातनामध्ये पडून राहाल. \c 51 \s1 सीयोनसाठी अनंतकाळचे तारण \q1 \v 1 “तुम्ही, ज्यांनी नीतिमत्तेचा ध्यास घेतला आहे \q2 व जे याहवेहचा शोध घेता, ते सर्वजण, माझे ऐका: \q1 ज्या खडकातून तुम्हाला कापून काढले, \q2 आणि ज्या खाणीतून तुम्हाला खोदून काढले, त्याकडे बघा; \q1 \v 2 होय, तुमचा पिता अब्राहामाकडे, \q2 आणि साराहकडे, जिने तुम्हाला जन्म दिला, त्यांच्याकडे बघा. \q1 मी अब्राहामाला बोलाविले, तेव्हा तो एकटा होता, \q2 मी त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा तो बहुगुणित झाला. \q1 \v 3 तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील \q2 आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; \q1 ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, \q2 तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. \q1 तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. \q2 उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील. \b \q1 \v 4 “माझ्या लोकांनो, माझे ऐका; \q2 माझ्या देशा, माझ्याकडे लक्ष दे: \q1 माझाकडूनच तुम्हाला उपदेश प्राप्त होईल. \q2 माझा न्याय राष्ट्रांसाठी प्रकाश बनेल. \q1 \v 5 माझी नीतिमत्ता वेगाने जवळ येत आहे, \q2 माझे तारण येण्याच्या मार्गावर आहे. \q2 माझी भुजा राष्ट्रांना न्याय प्रदान करेल. \q1 द्वीप माझा शोध घेतील \q2 आणि माझ्या भुजेची आशेने वाट पाहतील. \q1 \v 6 तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा, \q2 आणि खाली पृथ्वीकडे पाहा; \q1 आकाश धुरासारखे विरून नाहीसे होईल, \q2 पृथ्वी वस्‍त्रांप्रमाणे जीर्ण होईल \q2 आणि पृथ्वीवरील लोक चिलटांप्रमाणे मरतील. \q1 परंतु माझे तारण सदासर्वकाळ टिकेल. \q2 माझ्या नीतिमत्तेचा कधीही अंत होणार नाही. \b \q1 \v 7 “हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो, \q2 माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्‍यांनो माझे ऐका: \q1 मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका \q2 किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका. \q1 \v 8 कारण वस्त्रांसारखे कसर त्यांचाही नाश करेल; \q2 लोकरीसारखे कीड त्यांनाही खाऊन टाकेल. \q1 परंतु माझी नीतिमत्ता सदासर्वकाळ टिकेल. \q2 व माझे तारण पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.” \b \q1 \v 9 उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, \q2 सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. \q1 उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, \q2 पुरातन पिढीत जसे उठले होते. \q1 नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, \q2 त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का? \q1 \v 10 ते तुम्हीच नाही का, ज्यांनी समुद्र आटवून कोरडा केला, \q2 त्या अति खोल पाण्याला आटविले, \q1 ज्यांनी समुद्राच्या खोलीत मार्ग तयार केला \q2 जेणेकरून तुमचे सोडविलेले लोक ते पार करतील? \q1 \v 11 ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. \q2 ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; \q2 अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. \q1 हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, \q2 दुःख व शोक दूर पळून जातील. \b \q1 \v 12 “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. \q2 तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, \q2 मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात, \q1 \v 13 तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता, \q2 ज्यांनी आकाश ताणून पसरले \q2 आणि ज्यांनी पृथ्वीचा पाया घातला, \q1 तुम्ही सतत दहशतीखाली का जगता \q2 दिवसभर विरोधकांच्या क्रोधाच्या भीतीत का राहता? \q2 कारण त्यांनी तुमचा नाश करण्याचा निर्धार केला आहे? \q1 विरोधकांचा क्रोध कुठे आहे? \q2 \v 14 भीतीने थिजलेल्या बंदिवानांची लवकरच सुटका होईल; \q1 ते त्यांच्या अंधारकोठडीत मरणार नाहीत, \q2 त्यांना भाकरीची उणीव भासणार नाही. \q1 \v 15 कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, \q2 जो लाटांनी गर्जना करावी म्हणून समुद्र ढवळतो— \q2 सर्वसमर्थ याहवेह हे त्याचे नाव आहे. \q1 \v 16 मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत \q2 आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— \q1 मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, \q2 आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, \q2 आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ” \s1 याहवेहच्या क्रोधाचा प्याला \q1 \v 17 ऊठ, ऊठ! \q2 अगे यरुशलेमे, जागी हो, \q1 तू, जिने क्रोधाचा प्याला याहवेहच्या हातून \q2 भरपूर प्याला आहे, \q1 दहशतीचा प्याला तू गाळासकट पिऊन टाकला आहेस, \q2 तो प्याला, जो लोकांना मद्यधुंद करून अडखळवितो. \q1 \v 18 तिने जन्माला घातलेल्या लेकरांपैकी \q2 तिचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते; \q1 तिने संगोपन केलेल्या लेकरांपैकी \q2 तिचा हात धरून चालविण्यासाठी कोणीही नव्हते. \q1 \v 19 ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार \q2 ही दुप्पट अरिष्टे तुझ्यावर आली आहेत— \q1 कोण तुझे सांत्वन करू शकेल? \q2 कोण तुझे दुःखपरिहार करू शकेल? \q1 \v 20 कारण तुझी लेकरे ग्लानी येऊन, \q2 प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात पडली आहेत, \q2 हरिणाप्रमाणे ते जाळ्यात अडकलेले आहेत. \q1 याहवेहच्या क्रोधाने \q2 आणि तुमच्या परमेश्वराच्या धमकीने भरले आहेत. \b \q1 \v 21 म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका! \q2 तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे. \q1 \v 22 तुमचे सार्वभौम याहवेह, \q2 तुमचे परमेश्वर, जे त्यांच्या लोकांना सुरक्षित ठेवतात, ते असे म्हणतात: \q1 “पाहा, जो प्याला तुम्हाला धुंद करून अडखळवितो \q2 तो मी तुमच्या हातातून काढून घेतला आहे; \q1 त्या प्याल्यातून, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून \q2 तुम्ही यापुढे कधीही पिणार नाही. \q1 \v 23 तुमचा छळ करणाऱ्यांच्या हातात मी तो देईन, \q2 जे तुम्हाला म्हणाले, \q2 ‘भूमीवर पडा, म्हणजे आम्ही तुमच्यावरून चालत जाऊ.’ \q1 आणि तुम्ही तुमची पाठ जमिनीसारखी केली, \q2 जणू रस्ताच, ज्यावरून चालत जावे.” \b \b \c 52 \q1 \v 1 ऊठ, ऊठ, हे सीयोना, \q2 सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! \q1 यरुशलेम, हे पवित्र नगरी, \q2 आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. \q1 बेसुंती आणि भ्रष्ट \q2 यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत. \q1 \v 2 हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, \q2 ऊठ व सिंहासनारुढ हो. \q1 बंदिवान सीयोनकन्ये, \q2 दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो. \p \v 3 कारण याहवेह म्हणतात: \q1 “तुम्हाला विनामूल्य बंदिवासात विकले, \q2 आणि आता पैशावाचून तुम्हाला सोडविण्यात येईल.” \p \v 4 कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “प्रथम माझे लोक इजिप्त देशात राहवयास गेले; \q2 नंतर अश्शूरच्या लोकांनी त्यांचा छळ केला.” \p \v 5 याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? \q1 माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, \q2 आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास\f + \fr 52:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa आतंक\fqa*\f* करतात,” \q2 याहवेह घोषणा करतात, \q1 “संपूर्ण दिवसभर \q2 माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते. \q1 \v 6 माझे लोक माझे नाव जाणतील; \q2 म्हणून त्या दिवशी त्यांना समजेल \q1 कि ते भविष्यकथन करणारा तो मीच आहे. \q2 होय, तो मीच आहे.” \b \q1 \v 7 पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, \q2 जे आनंददायी वार्ता आणतात, \q1 जे शांतीची घोषणा करतात, \q2 जे शुभ संदेश आणतात, \q2 जे तारणाची घोषणा करतात, \q1 जे सीयोनास म्हणतात, \q2 “तुमचे परमेश्वर राज्य करतात!” \q1 \v 8 ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात; \q2 एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात. \q1 जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील, \q2 ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील. \q1 \v 9 यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो, \q2 सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा, \q1 कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, \q2 त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे. \q1 \v 10 याहवेह आपली पवित्र भुजा \q2 सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, \q1 आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत \q2 आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल. \b \q1 \v 11 निघा, निघा, इथून बाहेर पडा! \q2 अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! \q1 तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, \q2 इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा. \q1 \v 12 परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही \q2 वा घाईने निघावे लागणार नाही; \q1 कारण याहवेह तुमच्यापुढे जातील, \q2 आणि इस्राएलचे परमेश्वर तुमचे पाठीराखे असतील. \s1 सेवकाची पीडा व गौरव \q1 \v 13 पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वागेल\f + \fr 52:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa समृद्धी पावेल\fqa*\f*; \q2 तो उच्च केला जाईल व उत्कर्ष पावेल आणि त्याचे मोठे गौरव होईल. \q1 \v 14 जसे त्याला पाहताच अनेकजण विस्मित झाले होते— \q2 त्याचे स्वरूप मनुष्यप्राण्याच्या पलीकडे विद्रुप करण्यात आले होते \q2 आणि त्याचा आकार मानवसदृश्य राहिला नव्हता— \q1 \v 15 यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल,\f + \fr 52:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa अनेक राष्ट्रांना आश्चर्य वाटेल\fqa*\f* \q2 आणि त्याच्यामुळे राजे आपले मुख बंद करतील. \q1 कारण त्यांना पूर्वी कधी कोणी जे सांगितले नव्हते, ते आता बघतील, \q2 आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल. \b \c 53 \q1 \v 1 आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला \q2 आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? \q1 \v 2 त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, \q2 शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. \q1 आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, \q2 तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते. \q1 \v 3 मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले, \q2 कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता. \q1 जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी \q2 तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता. \b \q1 \v 4 तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, \q2 आणि आमचे क्लेश वाहिले, \q1 आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, \q2 त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली. \q1 \v 5 परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, \q2 तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; \q1 आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, \q2 आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. \q1 \v 6 आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, \q2 आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; \q1 आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष \q2 त्याच्यावर लादला. \b \q1 \v 7 त्याला छळले व जाचले, \q2 तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; \q1 वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, \q2 आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, \q2 तसेच त्याने आपले मुख उघडले नाही. \q1 \v 8 अत्याचार\f + \fr 53:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa कैद करून\fqa*\f* करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. \q2 तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? \q1 कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; \q2 माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली. \q1 \v 9 दुष्ट माणसांच्या सोबत त्याला कबर नेमून देण्यात आली, \q2 आणि श्रीमंताच्या कबरेमध्ये पुरण्यात आले, \q1 परंतु त्याने काहीही हिंसा केली नव्हती, \q2 आणि त्याच्या मुखात कोणतेही कपट नव्हते. \b \q1 \v 10 परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती, \q2 आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले, \q1 तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल, \q2 आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल. \q1 \v 11 वेदना सहन केल्यानंतर, \q2 तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; \q1 माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, \q2 आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल. \q1 \v 12 म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन, \q2 आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल. \q1 कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले, \q2 आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली. \q1 त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला, \q2 आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली. \c 54 \s1 सीयोनचे भावी वैभव \q1 \v 1 “हे वांझ स्त्रिये, \q2 तू जी कधीही प्रसवली नाही; \q1 उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, \q2 कारण विवाहित स्त्रीपेक्षा, \q1 तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, \q2 त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 2 “आपले तंबू प्रशस्त कर, \q2 तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, \q2 हात आवरू नको; \q1 दोरबंद लांब कर, \q2 खुंट्या मजबूत कर. \q1 \v 3 कारण तू उजवीकडे व डावीकडे पसरशील; \q2 तुझे वंशज इतर राष्ट्रांना हुसकावून लावतील \q2 आणि त्यांची उजाड झालेली नगरे पुन्हा वसवतील. \b \q1 \v 4 “भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही. \q2 अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही. \q1 तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील \q2 आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही. \q1 \v 5 कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— \q2 सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— \q1 इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; \q2 त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात. \q1 \v 6 याहवेह तुला माघारी बोलावतील \q2 जणू काही तू त्याग केलेली व दुःखी आत्म्याची पत्नी होतीस— \q1 केवळ टाकून देण्याकरिता \q2 जी तारुण्यात विवाहित झाली होती,” असे तुझे परमेश्वर म्हणतात. \q1 \v 7 “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता, \q2 पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन. \q1 \v 8 क्षणिक रागाच्या भरात \q2 मी थोडा वेळ माझे मुख तुझ्यापासून लपविले होते, \q1 परंतु आता सर्वकाळच्या प्रीतीने \q2 मी तुझ्यावर करुणा करेन,” \q2 असे याहवेह तुझे उद्धारकर्ता म्हणतात. \b \q1 \v 9 “हे माझ्याकरिता नोआहच्या दिवसासारखे आहे, \q2 मी पृथ्वी पुन्हा नोआहच्या जलाने आच्छादित करणार नाही, \q2 अशी मी शपथ वाहिली होती. \q1 आता ही शपथ वाहतो, यापुढे तुझ्यावर क्रोधित होणार नाही, \q2 तुला पुन्हा कधीही रागविणार नाही. \q1 \v 10 कारण पर्वत हलतील \q2 व टेकड्या काढून टाकल्या जातील, \q1 परंतु तुझ्यावरील माझी अढळ प्रीती कधीही हलणार नाही \q2 वा माझा शांतीचा करार कधीही भंग होणार नाही,” \q2 असे याहवेह, तुझ्यावर करुणा करणारे म्हणतात. \b \q1 \v 11 “हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो, \q2 पाचूरत्नांनी मी तुमची पुन्हा उभारणी करेन, \q2 व तुमचा पाया मौल्यवान नीलमणींवर करेन. \q1 \v 12 अगे यरुशलेमे, मी तुझे बुरूज गोमेद रत्नांनी बांधीन आणि तुझ्या \q2 वेशी चकाकणार्‍या रत्नांच्या \q2 व तुझ्या सर्व भिंती मौल्यवान रत्नांच्या करेन. \q1 \v 13 तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील, \q2 व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल. \q1 \v 14 तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल: \q1 जुलूमशाही तुमच्यापासून दूर राहील; \q2 तुम्हाला काहीही भयभीत करू शकणार नाही. \q1 दहशत तुमच्यापासून दूर करण्यात येईल; \q2 ती तुमच्याजवळ येणार नाही. \q1 \v 15 जर कोणी तुमच्यावर हल्ला केला, तर ती माझी करणी नसेल; \q2 जे कोणी तुमच्यावर हल्ला करतील, ते तुम्हाला शरण जातील. \b \q1 \v 16 “पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या \q2 व कामास येणारी शस्त्रास्त्रे घडविणाऱ्या लोहाराला \q2 मीच उत्पन्न केले आहे. \q1 व आपत्ती करणाऱ्या विनाशकाची उत्पत्तीही मीच केली आहे; \q2 \v 17 तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही \q2 आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल. \q1 याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे, \q2 हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,” \q2 अशी याहवेह घोषणा करतात. \c 55 \s1 तहानलेल्यांना आमंत्रण \q1 \v 1 “तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो, \q2 पाण्याजवळ या; \q1 आणि तुम्ही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, \q2 या, घ्या व खा! \q1 या, द्राक्षारस अथवा दूध घ्या \q2 पैसे न देता व विनामूल्य घ्या. \q1 \v 2 जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे, \q2 आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी कष्ट का करावे? \q1 ऐका, माझे ऐकून घ्या आणि जे चांगले आहे ते खा, \q2 आणि हे उत्तम अन्नपदार्थ खाऊन तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल. \q1 \v 3 माझे ऐका आणि मजकडे या; \q2 लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. \q1 मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन, \q2 माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे. \q1 \v 4 पाहा, मी त्याला लोकांसमोर साक्षीदार, \q2 एक शासनकर्ता व लोकांचा अधिकारी बनविले. \q1 \v 5 निश्चितच ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा राष्ट्रांना बोलवाल, \q2 आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशी राष्ट्रे तुमच्याकडे पळत येतील, \q1 कारण याहवेह, तुमचे परमेश्वर, \q2 इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, \q2 त्यांनी तुम्हाला गौरवाने संपन्न केले आहे.” \b \q1 \v 6 याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या. \q2 ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा. \q1 \v 7 दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे \q2 अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. \q1 त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, \q2 आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील. \b \q1 \v 8 “जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत, \q2 माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत.” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 9 “कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे, \q2 तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून उच्च आहेत \q2 आणि माझे विचार तुमच्या विचाराहून उच्च आहेत. \q1 \v 10 आकाशातून पाऊस व हिम \q2 ज्याप्रमाणे खाली पडतात \q1 आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय \q2 परत जात नाहीत \q1 आणि तिला अंकुरतात व बहरतात, \q2 जेणेकरून पेरणार्‍यासाठी बीज निपजते व खाणार्‍याला भाकर मिळते, \q1 \v 11 त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते: \q2 ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही, \q1 पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते \q2 व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते. \q1 \v 12 तुम्ही आनंदाने प्रस्थान कराल \q2 व शांतीने मार्गदर्शित व्हाल; \q1 पर्वते आणि टेकड्या, \q2 तुमच्यापुढे उचंबळून गीते गातील, \q1 आणि रानातील सर्व वृक्ष \q2 टाळ्या वाजवतील. \q1 \v 13 काटेरी झुडपांच्या ऐवजी तिथे, सुरूचे वृक्ष वाढतील, \q2 आणि तिथे रिंगणीच्या जागी मेंदीची झाडे वाढतील. \q1 हे याहवेहच्या नामाच्या थोरवीकरिता असेल \q2 जे अनंतकाळपर्यंत टिकेल, \q2 असे ते सर्वकाळचे चिन्ह होईल.” \c 56 \s1 यहूदीतर लोकांसाठी तारण \p \v 1 याहवेह असे म्हणतात: \q1 “न्यायीपणाने वागा, \q2 जे योग्य तेच करा, \q1 कारण माझे तारण अगदी हाताशी आलेले आहे \q2 आणि माझे नीतिमत्व लवकरच प्रगट होणार आहे. \q1 \v 2 जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, \q2 अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, \q1 या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, \q2 जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.” \b \q1 \v 3 जो विदेशी मनुष्य याहवेहशी एकनिष्ठ राहतो, त्याने असे म्हणू नये, \q2 “याहवेह निश्चितच मला त्यांच्या लोकांमघून वगळतील.” \q1 आणि कोणत्याही षंढाने अशी तक्रार करू नये, \q2 “मी तर केवळ एक शुष्क वृक्ष आहे.” \p \v 4 तर याहवेह असे म्हणतात: \q1 “जे षंढ माझे शब्बाथ पवित्रपणे पाळतात, \q2 जे मला आवडणार्‍या गोष्टीच निवडतात, \q2 आणि माझा करार दृढ धरून राहतात— \q1 \v 5 त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत \q2 पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे \q2 संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. \q1 त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, \q2 जे नाव कधीही नाहीसे होणार नाही. \q1 \v 6 आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, \q2 जे त्यांची सेवा करतात, \q1 त्यांच्या नावावर प्रीती करतात, \q2 आणि त्यांचे सेवक झाले आहेत, \q1 जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, \q2 आणि माझा करार दृढ धरून राहतात— \q1 \v 7 अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन \q2 आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. \q1 त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा \q2 माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; \q1 कारण माझ्या घराला \q2 सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.” \q1 \v 8 जे इस्राएलच्या निर्वासित झालेल्यांना एकत्र करतात, \q2 ते सार्वभौम याहवेह अशी घोषणा करतात— \q1 “ज्यांना पूर्वी एकत्र करण्यात आले आहे, त्या लोकांशिवाय \q2 इतर लोकांनाही मी त्यांच्यात गोळा करेन.” \s1 दुर्जनांविरुद्ध परमेश्वराचे आरोप \q1 \v 9 या, कुरणातील सर्व पशूंनो, \q2 या, रानातील सर्व हिंस्र श्वापदांनो, येऊन आधाशीपणे खा! \q1 \v 10 इस्राएलचे पहारेकरी आंधळे आहेत, \q2 ते सर्व ज्ञानशून्य आहेत; \q1 ते सर्व मुके कुत्रे आहेत, \q2 त्यांना भुंकता येत नाही; \q1 ते पडून राहतात व स्वप्ने पाहतत, \q2 त्यांना झोपायला फार आवडते. \q1 \v 11 ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत; \q2 त्यांची तृप्ती कधीही होत नाही. \q1 ते असमंजस मेंढपाळ आहेत; \q2 ते सर्व आपल्याच मर्जीने चालतात, \q2 केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेतात. \q1 \v 12 प्रत्येकजण म्हणतो, “या, मला मद्य आणू द्या! \q2 चला, मद्य पिऊन आपण धुंद होऊ या! \q1 आणि उद्याचा दिवसही आजसारखाच असेल, \q2 किंबहुना याहून जास्त चैनीचा असेल.” \b \b \c 57 \q1 \v 1 नीतिमान नष्ट होतात, \q2 आणि ते कोणीही मनावर घेत नाही; \q1 दयाळू माणसे उचलून घेतली जातात, \q2 आणि कोणालाही हे उमगत नाही \q1 कि भावी काळातील अनर्थापासून \q2 राखण्यासाठीच त्यांना नेण्यात येते. \q1 \v 2 जे नीतिमार्गाने चालतात \q2 ते शांती पावतात; \q2 त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो. \b \q1 \v 3 “पण तुम्ही—अहो चेटकिणीच्या पुत्रांनो, \q2 जारकर्मींच्या व वेश्यांच्या संतानांनो, तुम्ही इकडे या! \q1 \v 4 तुम्ही कोणाची चेष्टा करता? \q2 कोणाकडे पाहून नाके मुरडता \q2 व आपल्या जिभा दाखविता? \q1 तुम्ही बंडखोरांची पिल्ले \q2 व लबाडांची संतती नाही काय? \q1 \v 5 एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत \q2 तुम्ही कामांध होता; \q1 खोल दर्‍यात, खडकांच्या कड्याखाली \q2 नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता. \q1 \v 6 खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत; \q2 खरोखर, हाच तुझा भाग आहे. \q1 होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते \q2 आणि अन्नार्पणे करते. \q2 हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का? \q1 \v 7 डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस; \q2 तिथे वर जाऊन तू तुझी अर्पणे वाहिली. \q1 \v 8 बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर \q2 तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस. \q1 माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस, \q2 त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस; \q1 ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे, \q2 आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते. \q1 \v 9 मोलखाला\f + \fr 57:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa राजा\fqa*\f* तू जैतुनाचे तेल वाहिले \q2 व तुझी सुगंधी अत्तरे वाढवून अर्पण केलीस. \q1 तू तुझ्या दूतांना\f + \fr 57:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa मूर्त्या\fqa*\f* दूरवर पाठविले; \q2 अगदी प्रत्यक्ष मृतलोकांच्या राज्यापर्यंत गेलीस. \q1 \v 10 हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले, \q2 पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’ \q1 स्वतःला नव्या बलाने संचारित केले, \q2 म्हणून तू मूर्छित झाली नाही. \b \q1 \v 11 “इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते \q2 कि तू माझ्याशी असत्याने वागते, \q1 तू माझे स्मरण केले नाही \q2 कि हे मनावरही घेतले नाही? \q1 मी बराच काळ निःशब्द राहिलो आहे \q2 म्हणून का तुला माझा धाक वाटत नाही? \q1 \v 12 मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन, \q2 आणि ती तुला लाभदायक होणार नाही. \q1 \v 13 जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील, \q2 तुझ्या संग्रहातील मूर्तींना तुझा बचाव करू दे! \q1 वारा त्या सर्वांना उडवून नेईल, \q2 श्वासाच्या एका फुंकराने त्या उडून जातील. \q1 परंतु जो कोणी माझा आधार घेतो \q2 तो या भूमीचा ताबा घेईल \q2 व माझ्या पवित्र पर्वताचा स्वामी होईल.” \s1 पश्चात्ताप करणाऱ्याचे सांत्वन \p \v 14 आणि असे म्हणण्यात येईल: \q1 “बांधा, बांधा, महामार्ग बांधा! \q2 माझ्या लोकांच्या वाटेतील सर्व अडथळे बाजूला करा.” \q1 \v 15 जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे \q2 जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात— \q1 “मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो, \q2 परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो, \q1 मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो \q2 व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो. \q1 \v 16 मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही, \q2 नेहमीच क्रोध प्रकट करणार नाही, \q1 नाहीतर मी प्रत्यक्ष माझ्या हातांनी घडवले लोक \q2 माझ्यामुळे मूर्छित होतील. \q1 \v 17 मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो; \q2 आणि त्यांना ताडण केले व माझे मुख रागाने लपविले, \q2 तरी त्यांनी स्वेच्छेने करण्याचे सोडले नाही. \q1 \v 18 त्यांची वर्तणूक मी पाहिली आहे, तरीही मी त्यांना निरोगी करेन; \q2 मी त्यांचे मार्गदर्शन करेन व इस्राएलच्या दुःखितांचे सांत्वन परत देईन, \q2 \v 19 त्यांच्या ओठांवर प्रशंसा निर्माण करेन. \q1 शांती, शांती, दूरच्या व जवळच्या सर्वांना शांतीचा लाभ होवो, \q2 आणि मी त्या सर्वांना बरे करेन.” \q1 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 20 परंतु दुष्ट लोक खवळलेल्या सागरांसारखे आहेत, \q2 ज्याला विसावा नसतो, \q2 ज्याच्या लाटा उसळून चिखल व गाळ बाहेर टाकतात. \q1 \v 21 माझे परमेश्वर म्हणतात, “दुष्टांना शांती नसते.” \c 58 \s1 खरा उपवास \q1 \v 1 “उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका. \q2 रणशिंगाच्या निनादाप्रमाणे तुमचा आवाज उंच करा. \q1 माझ्या लोकांची बंडखोरी \q2 आणि याकोबाच्या वंशजांना त्यांची पापे जाहीर करा. \q1 \v 2 दिवसेन् दिवस ते माझा शोध घेतात; \q2 माझे मार्ग जाणून घेण्याचा कसून प्रयत्न करीत असल्याचा दिखावा करतात, \q1 जणू काही ते राष्ट्र सर्वकाही यथायोग्य करते \q2 आणि त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी फेटाळल्या नाहीत. \q1 ते मला रास्त निर्णय मागतात \q2 आणि परमेश्वराने त्यांच्या निकट यावे म्हणून आतुर आहेत असे दर्शवितात. \q1 \v 3 ते म्हणतात, ‘आम्ही उपास केला, \q2 पण तुम्ही बघितलेही नाही? \q1 आम्ही नम्र झालो, \q2 आणि तुम्ही त्याकडे लक्षही दिले नाही?’ \b \q1 “तरी तुमच्या उपासाच्या दिवशी, तुम्ही मनाला वाटेल तसे करता \q2 आणि तुमच्या कामगारांची पिळवणूक करता. \q1 \v 4 तुमचे उपास कलह व भांडणाने \q2 आणि एकमेकांशी दुष्टपणे मारामारी करण्याने संपतात. \q1 तुम्ही जसा उपास करता, तसा आता करून \q2 तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकला जाईल अशी अपेक्षा करता. \q1 \v 5 असा उपास मी निवडला आहे काय, \q2 लोकांनी नम्र होण्याचा एक दिवस? \q1 केवळ वार्‍याने लवणार्‍या लव्हाळ्याप्रमाणे वाकण्याकरिता, \q2 आणि गोणपाट नेसून राख फासण्याकरिता? \q1 यालाच तुम्ही उपास म्हणता का, \q2 याहवेहला असा दिवस मान्य असेल काय? \b \q1 \v 6 “मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: \q1 अन्यायाची बंधने तुटली जावी \q2 आणि जोखडाचे बंद सोडावे, \q1 पीडितांना मुक्त करावे \q2 आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा? \q1 \v 7 भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय \q2 व निराश्रितांना आश्रय द्यावा— \q1 जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला, \q2 आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का? \q1 \v 8 मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल, \q2 आणि तुमचे आरोग्य लगेच तुम्हाला प्राप्त होईल; \q1 तुमची धार्मिकता तुमच्यापुढे चालेल, \q2 आणि याहवेहचे गौरव तुमची पाठराखण करेल. \q1 \v 9 मग तुम्ही हाक माराल आणि याहवेह त्यास उत्तर देतील; \q2 तुम्ही मदतीसाठी धावा कराल व ते म्हणतील: हा मी येथे आहे. \b \q1 “जर तुम्ही पीडितांना जोखडातून मुक्त कराल, \q2 एखाद्याकडे बोट रोखून आरोप लादण्याचे आणि द्वेषयुक्त बोलणे थांबवाल, \q1 \v 10 भुकेल्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचे जीवन खर्ची घालाल, \q2 पीडितांच्या गरजांचा पुरवठा कराल, \q1 तर तुमचा प्रकाश अंधारातून झळकेल \q2 आणि तुमची रात्र मध्यान्हासारखी उजळेल. \q1 \v 11 याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील; \q2 सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील \q2 व तुमच्या हाडांना बळकट करतील. \q1 मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे, \q2 कधीही पाणी न आटणाऱ्या झर्‍याप्रमाणे व्हाल. \q1 \v 12 तुमचे लोक पुरातन भग्नावशेषांची पुनर्बांधणी करतील \q2 आणि प्राचीन पाये पुन्हा उभारतील; \q1 भग्न झालेली तटबंदी दुरुस्त करणारे, \q2 बांधकाम व रस्ते पूर्वस्थितीत आणणारे असे तुम्ही म्हणविले जाल. \b \q1 \v 13 “जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल \q2 आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, \q1 जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल \q2 आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, \q1 आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल \q2 आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही, \q1 \v 14 तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, \q2 आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन \q2 आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.” \q1 ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत. \c 59 \s1 पाप, पश्चात्ताप आणि उद्धार \q1 \v 1 निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही, \q2 वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत. \q1 \v 2 परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला \q2 तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे; \q1 तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे, \q2 जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही. \q1 \v 3 कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, \q2 तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. \q1 तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, \q2 आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते. \q1 \v 4 कोणी न्यायाने वागत नाही; \q2 कोणीही सत्याने खटला लढत नाही. \q1 ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात; \q2 ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात. \q1 \v 5 ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात \q2 आणि मकडीचे जाळे विणतात. \q1 जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल \q2 आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो. \q1 \v 6 त्यांनी विणलेले जाळे वस्त्र बनविण्याच्या उपयोगाचे नसते; \q2 त्यांनी जे बनविले त्याने ते स्वतःला पांघरू शकत नाहीत. \q1 त्यांच्या कृती दुष्टतेच्या कृती आहेत, \q2 हिंसात्मक कृती करणे हेच त्यांच्या हातात आहे. \q1 \v 7 पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात; \q2 निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात. \q1 ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात; \q2 हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात, \q1 \v 8 आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही; \q2 त्यांच्या वाटेवर न्याय नसतो. \q1 त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत; \q2 त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही. \b \q1 \v 9 याकारणास्तव न्याय आमच्यापासून लांब असतो, \q2 आणि धार्मिकतेचा आम्हाला बोध मिळत नाही. \q1 आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो, पण सर्वत्र अंधकारच असतो; \q2 तेजस्वीपणाची अपेक्षा करतो, पण गडद सावलीत चालतो. \q1 \v 10 आंधळ्याप्रमाणे आम्ही भिंती लगत चाचपडत चालतो, \q2 दृष्टिहीनांप्रमाणे स्पर्शाद्वारे मार्ग चाचपडतो. \q1 मध्यान्हात आम्ही संधिप्रकाशात असल्याप्रमाणे अडखळतो; \q2 बलवानांमध्ये आम्ही मेलेल्यांसारखे असतो. \q1 \v 11 आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो; \q2 कबुतरांप्रमाणे शोकाने हुंकारतो. \q1 आम्ही न्यायाचा शोध घेतो, पण तो सापडत नाही; \q2 सुटकेसाठी धडपडतो, पण ती फार दूर गेलेली असते. \b \q1 \v 12 कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत, \q2 आणि आमची पापेच आमच्याविरुद्ध साक्ष देतात. \q1 आमचे अपराध सतत आमच्यासह असतात \q2 आमचे हे घोर अन्याय आम्ही कबूल करतो: \q1 \v 13 याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी, \q2 परमेश्वराकडे फिरविलेली पाठ, \q1 बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे, \q2 आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य. \q1 \v 14 म्हणून न्याय मागे सरला आहे, \q2 आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; \q1 सत्य रस्त्यावर अडखळले आहे, \q2 प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही. \q1 \v 15 सत्य कुठेही शोधून सापडत नाही, \q2 आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो. \b \q1 याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले \q2 कारण न्याय्य कुठेही नाही. \q1 \v 16 त्यांनी बघितले की कोणीही नाही, \q2 कोणीच मध्यस्थी करणारा नाही, हे पाहून ते अस्वस्थ झाले; \q1 म्हणून स्वतःच्या भुजेने त्यांनी त्यांच्याप्रीत्यर्थ तारण निर्माण केले, \q2 आणि स्वतःच्या नीतिमत्वाने त्यांना आधार दिला. \q1 \v 17 त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले \q2 आणि त्यांच्या मस्तकावर तारणाचे शिरस्त्राण घातले; \q1 सूडरूपी वस्त्र परिधान केला \q2 आवेश हा अंगरखा म्हणून स्वतःला पांघरले. \q1 \v 18 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात \q2 ते परतफेड करतील. \q1 त्यांच्या शत्रूंचा क्रोध \q2 आणि शत्रूंच्या अपराधाबद्दल योग्य शिक्षा देतील; \q2 द्वीपांची त्यांच्या कृत्यानुसार ते परतफेड करतील. \q1 \v 19 पश्चिमेकडील लोक याहवेहच्या नावाचे भय धरतील, \q2 आणि सूर्योदयाकडील लोक त्यांच्या वैभवाचा गौरव करतील. \q1 ज्याला याहवेहचा श्वास जोराने पुढे नेतो \q2 तसे ते कोंडलेल्या महापूरासारखे येतील.\f + \fr 59:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa पलायन करावास लावतो\fqa*\f* \b \q1 \v 20 “याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे, \q2 सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,” \q2 अशी याहवेह घोषणा करतात. \p \v 21 याहवेह म्हणतात, “माझ्याबाबतीत म्हणाल, तर त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे. माझा पवित्र आत्मा जो तुमच्यावर आहे, तो तुमचा त्याग करणार नाही आणि माझे वचन जे मी तुमच्या मुखात घातले आहे, ते सदोदित तुमच्या ओठांवर, तुमच्या संततीच्या ओठांवर आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर; आतापासून आणि सदासर्वकाळ राहील,” असे याहवेह म्हणतात. \c 60 \s1 सीयोनचे गौरव \q1 \v 1 “ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, \q2 आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे. \q1 \v 2 पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे, \q2 आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे, \q1 परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे, \q2 आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे. \q1 \v 3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील, \q2 आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील. \b \q1 \v 4 “आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा: \q2 सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे; \q1 तुझे पुत्र दूरवरून येत आहेत, \q2 तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत. \q1 \v 5 मग तू ते बघशील व उल्हासित होशील, \q2 तुझे अंतःकरण स्पंदेल व आनंदाने फुगून जाईल; \q1 सागराची संपत्ती तुझ्याकडे आणण्यात येईल, \q2 अनेक देशांची समृद्धी तुझ्याकडे येईल. \q1 \v 6 उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, \q2 तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. \q1 आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन \q2 तुझ्याकडे येतील. \q2 आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल. \q1 \v 7 केदारचे सर्व कळप तुला दिले जातील \q2 व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; \q1 ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, \q2 आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन. \b \q1 \v 8 “मेघाप्रमाणे उडणारे हे कोण आहे, \q2 जणू घरट्यांकडे परतणारी कबुतरे? \q1 \v 9 निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात; \q2 सर्वात पुढे तार्शीशची गलबते\f + \fr 60:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa व्यापारी जहाजे\fqa*\f* आहेत, \q1 तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत, \q2 त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे, \q1 इस्राएलचे पवित्र परमेश्वर \q2 याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी \q2 त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे. \b \b \q1 \v 10 “परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील, \q2 राजे तुझी सेवा करतील. \q1 जरी मी माझ्या क्रोधाने तुला फटकारले, \q2 तरी आता कृपावंत होऊन मी तुझ्यावर दया करेन. \q1 \v 11 तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, \q2 त्या रात्री वा दिवसा, बंद केल्या जाणार नाहीत, \q1 जेणेकरून अनेक देशातून लोक तुझ्याकडे संपत्ती आणू शकतील— \q2 त्यांचे राजे विजयोत्सवाने मिरवणूक चालवितील. \q1 \v 12 जी राष्ट्रे वा देश तुझ्या अधीन होण्याचे नाकारतील, \q2 ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. \b \q1 \v 13 “लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल, \q2 सुरू, देवदारू व भद्रदारू \q1 माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील; \q2 आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील. \q1 \v 14 तुमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; \q2 जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. \q1 ते तुला याहवेहचे शहर, \q2 आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील. \b \q1 \v 15 “जरी तुझा तिरस्कार व त्याग करण्यात आला होता, \q2 तुझ्यामधून कोणीही प्रवास करीत नसत, \q1 तरी मी तुला कायमचे अभिमानास्पद स्थान बनवेन, \q2 आणि सर्व पिढ्यांकरिता हर्षदायक करेन. \q1 \v 16 तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील \q2 आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल. \q1 तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता \q2 मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे. \q1 \v 17 कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने, \q2 तुझ्या लोखंडाच्या ऐवजी चांदी आणेन, \q1 लाकडाच्या ऐवजी कास्य, \q2 आणि तुझ्या दगडांच्या ऐवजी लोखंड आणेन. \q1 शांतता हे तुझ्यावरील अधिकारी, \q2 व कल्याण हे तुझ्यावरील शासक नियुक्त करेन. \q1 \v 18 यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार, \q2 किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही, \q1 परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण \q2 व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील. \q1 \v 19 यापुढे दिवसा सूर्यप्रकाश \q2 व चंद्राचे तेज तुझ्यावर पडणार नाही, \q1 कारण तुझे याहवेहच तुझा अक्षय प्रकाश होतील \q2 व तुझे परमेश्वर तुझा गौरव होतील. \q1 \v 20 तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही, \q2 आणि तुझ्या चंद्राचा कधी ऱ्हास होणार नाही. \q1 कारण याहवेहच तुझा सर्वकाळचा प्रकाश असतील; \q2 आणि तुझे शोकाचे दिवस संपतील. \q1 \v 21 मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील \q2 आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील. \q1 कारण ते मी रोपलेली फांदी आहेत, \q2 माझा गौरव प्रकट करण्यासाठी \q2 माझी हस्तकृती आहेत. \q1 \v 22 तुमच्यातील सर्वात कनिष्ठ, हजारोंच्या संख्येत बहुगुणित होतील, \q2 सर्वात लहान एक बलाढ्य राष्ट्र होईल, \q1 मी याहवेह आहे; \q2 योग्य त्या समयी, मी हे सर्व वेगाने घडवेन.” \c 61 \s1 याहवेहच्या कृपेचे वर्ष \q1 \v 1 सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, \q2 कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी \q2 याहवेहने माझा अभिषेक केला आहे. \q1 भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, \q2 कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी \q2 व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे. \q1 \v 2 याहवेहच्या कृपेचे वर्ष \q2 आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, \q1 आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे. \q2 \v 3 सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— \q1 राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, \q2 विलापाऐवजी \q1 आनंदाचे तेल, \q2 निराशेच्या आत्म्याऐवजी \q1 स्तुतीचे वस्त्र \q2 बहाल करण्यासाठी. \q1 कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी \q2 ते नीतिमत्तेचे एला वृक्ष \q2 याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील. \b \q1 \v 4 ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतील \q2 फार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील; \q1 ते पुरातन पडीक नगरांचा, \q2 जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील. \q1 \v 5 अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; \q2 विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील. \q1 \v 6 तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतील \q2 तुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल. \q1 राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल, \q2 व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल. \b \q1 \v 7 लज्जेच्या ऐवजी \q2 तुम्ही दुपटीने सन्मान मिळवाल, \q1 आणि अप्रतिष्ठे ऐवजी \q2 तुम्हाला तुमच्या वतनात आनंद प्राप्त होईल. \q1 आणि तुम्ही दुपटीने तुमच्या वतनभूमीचे वारसदार व्हाल, \q2 आणि तुम्ही अनंतकाळचा आनंद प्राप्त कराल. \b \q1 \v 8 “कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे; \q2 चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे. \q1 माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईन \q2 आणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन. \q1 \v 9 राष्ट्रांमध्ये त्यांच्या वंशजांचा लौकिक होईल, \q2 आणि त्यांची संतती लोकांमध्ये बहुमानीत होतील. \q1 जे सर्व त्यांना बघून हे कबूल करतील की \q2 ते याहवेहचे आशीर्वादित लोक आहेत.” \b \q1 \v 10 मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; \q2 माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. \q1 जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, \q2 किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, \q1 तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत \q2 आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे. \q1 \v 11 जशी माती अंकुराला उगविते \q2 आणि बाग बीज वाढविते \q1 तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व \q2 आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील. \c 62 \s1 सीयोनचे नवे नाव \q1 \v 1 सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, \q2 मी निःशब्द राहणार नाही, \q1 व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, \q2 मी शांत राहणार नाही. \q1 \v 2 राष्ट्रे तुझा निर्दोषपणा, \q2 आणि सर्व राजे तुझे वैभव बघतील; \q1 याहवेहच्या मुखाने बहाल केलेल्या \q2 नवीन नावाने तुला संबोधण्यात येईल. \q1 \v 3 तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, \q2 आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील. \q1 \v 4 यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत, \q2 अथवा तुझ्या भूमीला ओसाड असे म्हणणार नाही. \q1 पण हेफसीबा\f + \fr 62:4 \fr*\fq हेफसीबा \fq*\ft म्हणजे \ft*\fqa तिच्यामध्ये मला आनंद आहे\fqa*\f* हे तुझे नवे नाव असेल \q2 आणि तुझ्या भूमीला बिऊला\f + \fr 62:4 \fr*\fq बिऊला \fq*\ft म्हणजे \ft*\fqa विवाहित\fqa*\f* म्हणतील; \q1 कारण याहवेहला तुझ्यामुळे आनंद होईल, \q2 आणि तुझी भूमी विवाहित होईल. \q1 \v 5 जसा एक तरुण एका तरुणीशी विवाह करतो, \q2 तसाच तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करेल; \q1 जसा एखाद्या वराला आपल्या वधूविषयी आनंद होतो, \q2 तसाच तुझ्या परमेश्वराला तुझ्यामुळे आनंद होईल. \b \q1 \v 6 अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; \q2 ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. \q1 तू जी याहवेहचा धावा करते, \q2 स्वतःला विसावा देऊ नको, \q1 \v 7 आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत \q2 व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, \q2 परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको. \b \q1 \v 8 आपल्या उजव्या हाताने \q2 आणि त्यांच्या सामर्थ्यशाली भुजेने याहवेहने शपथ वाहिली आहे: \q1 “यापुढे मी कधीही तुझे धान्य, त्यांचे अन्न म्हणून \q2 तुझ्या शत्रूंच्या स्वाधीन करणार नाही, \q1 आणि तू परिश्रम करून काढलेला नवा द्राक्षारस, \q2 परकीय येऊन कधीही पिणार नाहीत. \q1 \v 9 परंतु जे पीक काढतील, तेच ते खाईल \q2 आणि याहवेहची स्तुती करतील, \q1 आणि जे द्राक्ष गोळा करतील, \q2 तेच पवित्रस्थानाच्या आवारात द्राक्षारस पितील.” \b \q1 \v 10 बाहेर पडा! वेशींच्या बाहेर पडा! \q2 माझ्या लोकांसाठी मार्ग तयार करा. \q1 बांधा, महामार्ग बांधा! \q2 दगडधोंडे काढून टाका. \q1 राष्ट्रांकरिता ध्वज उंच फडकवा. \b \q1 \v 11 याहवेहनी पृथ्वीच्या \q2 दिगंतापर्यंत घोषणा केली आहे: \q1 “सीयोनकन्येला सांगा, \q2 ‘पाहा, तुझे उद्धारकर्ता येत आहेत! \q1 पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याकडे आहे, \q2 आणि त्यांची भरपाई त्यांच्यासोबत आहे.’ ” \q1 \v 12 त्यांना पवित्र लोक, \q2 याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, \q1 आणि तुला खूप मागणी असलेला देश, \q2 कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील. \c 63 \s1 परमेश्वराच्या सुडाचा आणि उद्धाराचा दिवस \q1 \v 1 एदोमाहून व बस्रा शहराहून, \q2 किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, \q1 वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत \q2 येणारे हे कोण आहेत? \b \q1 “विजयाची घोषणा करीत, \q2 तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.” \b \q1 \v 2 तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्‍यांसारखी \q2 लाल रंगाची का आहेत? \b \q1 \v 3 “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले; \q2 राष्ट्रातून माझ्यासोबत कोणी नव्हते. \q1 माझ्या क्रोधाने मी ती तुडविली \q2 आणि त्यांना आपल्या संतापाने चिरडले; \q1 त्यांचेच रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, \q2 म्हणून माझी सर्व वस्त्रे माखली. \q1 \v 4 माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; \q2 आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते. \q1 \v 5 मी शोधले, परंतु तिथे साहाय्याला कोणीही नव्हते, \q2 कोणी मदतीला नसल्यामुळे मला धक्का बसला; \q1 तेव्हा माझ्या स्वतःच्या बाहूने माझ्याकरिता मी उद्धार मिळविला, \q2 आणि माझ्या स्वतःच्या क्रोधाने मला राखले. \q1 \v 6 क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले; \q2 माझ्या संतापाच्या भरात मी त्यांना मद्यधुंद केले \q2 आणि त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.” \s1 स्तुती आणि प्रार्थना \q1 \v 7 मी याहवेहच्या दयाळूपणाबद्दल \q2 त्यांनी केलेल्या सर्व स्तुतिपात्र कृत्यांबद्दल सांगेन, \q2 जे सर्व याहवेहनी आमच्यासाठी केले— \q1 होय, ज्या अनेक गोष्टी \q2 त्यांच्या करुणेने व विपुल दयेने, \q2 त्यांनी इस्राएलसाठी केल्या. \q1 \v 8 ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत, \q2 जी लेकरे माझ्याशी एकनिष्ठ राहतील;” \q2 म्हणून ते त्यांचे तारणकर्ता झाले. \q1 \v 9 त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, \q2 आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने\f + \fr 63:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa याहवेहच्या स्वतःच्या समक्षतेने त्यांना वाचविले\fqa*\f* इस्राएलचा उद्धार केला. \q1 याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; \q2 व त्यांना उचलून \q2 प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला. \q1 \v 10 तरीही त्यांनी बंड केले \q2 व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. \q1 म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले \q2 आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला. \b \q1 \v 11 मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले, \q2 मोशे आणि त्यांच्या लोकांचे दिवस— \q1 ज्यांनी त्यांच्या मेंढपाळासह पूर्ण कळपाला \q2 समुद्रमार्गी बाहेर काढले, ते कुठे आहेत? \q1 त्यांच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठविणारे \q2 ते कुठे आहेत? \q1 \v 12 मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी \q2 आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, \q1 त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून \q2 अजरामर किर्ती मिळविली, \q1 \v 13 समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले? \q1 उघड्या रानात असणार्‍या घोड्यांप्रमाणे, \q2 ते कधी अडखळले नाहीत; \q1 \v 14 जशी गुरे सपाटीवर जातात, \q2 तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. \q1 आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून \q2 तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले. \b \q1 \v 15 हे याहवेह, स्वर्गातून अवलोकन करा व पाहा, \q2 तुमच्या भव्य, पवित्र, गौरवी सिंहासनावरून खाली पाहा. \q1 तुमचा तो आवेश व तुमचे सामर्थ्य कुठे आहेत? \q2 तुमची आमच्यावरील कोमलता व करुणा आम्हाला देण्याचे तुम्ही आवरून धरले आहे. \q1 \v 16 परंतु तुम्हीच आमचे पिता आहात, \q2 जरी अब्राहाम आम्हाला ओळखत नाही \q2 इस्राएलने आम्हाला नाकारले आहे; \q1 तरी तुम्ही, हे याहवेह, आमचे पिता आहात, \q2 आमचे युगायुगांचे उद्धारकर्ता, हेच तुमचे नाव आहे. \q1 \v 17 हे याहवेह, तुम्ही आम्हाला तुमच्या मार्गावरून भटकून का जाऊ दिले? \q2 आणि आम्ही तुमचा सन्मान करणार नाही, अशी आमची अंतःकरणे कठीण का केली? \q1 जे वंशज तुमचे वारस आहेत, \q2 त्या तुमच्या सेवकांप्रीत्यर्थ परत या. \q1 \v 18 थोड्या काळाकरिता तुमच्या लोकांनी तुमच्या पवित्र भूमीचा ताबा घेतला, \q2 परंतु आता आमच्या शत्रूंनी तुमच्या पवित्रस्थानास तुडविले आहे. \q1 \v 19 तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहात; \q2 पण तुम्ही त्यांच्यावर राज्य केले नाही, \q2 ते तुमच्या नावाने संबोधले जात नाहीत\f + \fr 63:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa असे लोक ज्यांच्यावर तुम्ही कधीही राज्य केले नाही\fqa*\f*. \b \b \c 64 \q1 \v 1 अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, \q2 तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते! \q1 \v 2 जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो, \q2 व ज्यामुळे पाणी उकळले जाते, \q1 तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या \q2 ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील! \q1 \v 3 जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, \q2 तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले. \q1 \v 4 प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही, \q2 कोणत्याही कानावर ते पडले नाही, \q1 कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो, \q2 जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात. \q1 \v 5 जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते, \q2 त्यांच्या मदतीसाठी तुम्ही येता. \q1 परंतु जेव्हा आम्ही तुमच्याविरुद्ध सतत पाप करत राहिलो, \q2 तेव्हा तुमचा क्रोध आम्हावर भडकला. \q2 आता आमचा उद्धार कसा होणार? \q1 \v 6 आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत. \q2 आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत; \q1 आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो, \q2 वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात\f + \fr 64:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa आमच्या पापांमुळे आम्ही वितळून गेलो आहोत\fqa*\f*. \q1 \v 7 तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही \q2 किंवा तुमचा ध्यास घेत नाही; \q1 कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे \q2 आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे. \b \q1 \v 8 परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात. \q2 आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात; \q2 आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत. \q1 \v 9 हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका; \q2 आमची पापे सदासर्वकाळ आठवू नका. \q1 हे याहवेह, आम्ही प्रार्थना करतो, आमच्यावर कृपादृष्टी करा, \q2 कारण आम्ही सर्व तुमचेच लोक आहोत. \q1 \v 10 तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत; \q2 सीयोनही ओसाड झाले आहे, यरुशलेम तर उजाड रान झाले आहे. \q1 \v 11 जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली, \q2 ते आमचे पवित्र व वैभवी मंदिर बेचिराख झाले आहे, \q2 आणि आम्ही जोपासलेल्या सर्व वस्तूंची राखरांगोळी झाली आहे. \q1 \v 12 हे सर्व होऊनही याहवेह, आम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही स्वतःस रोखणार? \q2 तुम्ही स्तब्ध राहून आम्हाला प्रमाणाबाहेर शिक्षा करणार काय? \c 65 \s1 न्याय आणि तारण \q1 \v 1 “ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले; \q2 ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे. \q1 ज्या राष्ट्रांनी माझा धावा केला नाही \q2 त्यांना मी म्हटले, ‘पाहा मी इथे आहे, मी इथे आहे.’ \q1 \v 2 ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, \q2 जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— \q1 त्या हट्टी लोकांसाठी, \q2 मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत, \q1 \v 3 हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, \q2 माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. \q1 बागांमध्ये अर्पणे वाहतात \q2 आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात; \q1 \v 4 जे कबरांच्या मध्ये जाऊन बसतात \q2 आणि गुप्तते मध्ये जागरण करण्यात रात्र घालवितात; \q1 जे डुकरांचे मांस खातात, \q2 आणि त्यांच्या भांड्यात निषिद्ध मांसाचा रस्सा असतो; \q1 \v 5 जे म्हणतात, ‘दूर हो; माझ्याजवळ येऊ नकोस, \q2 कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे!’ \q1 असे लोक माझ्या नाकातील धूर आहेत, \q2 एक अग्नी, जो संपूर्ण दिवस जळत असतो. \b \q1 \v 6-7 “पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: \q2 मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; \q2 तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, \q1 प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला \q2 आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. \q1 मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन \q2 त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.” \p \v 8 याहवेह असे म्हणतात: \q1 “कारण द्राक्षांच्या घोसात थोडाफार रस शिल्लक असतो \q2 आणि लोक म्हणतात, ‘यांचा नाश करू नका, \q2 त्यात अजूनही आशीर्वाद बाकी आहे,’ \q1 त्याप्रमाणे मी माझ्या सेवकांप्रीत्यर्थ करेन; \q2 मी त्या सर्वांचा नाश करणार नाही. \q1 \v 9 मी याकोबाचे वंशज पुढे आणेन, \q2 आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील; \q1 माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील, \q2 व तिथे माझे सेवक वसती करतील. \q1 \v 10 माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी \q2 शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, \q2 आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल. \b \q1 \v 11 “पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता \q2 आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता, \q1 जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता \q2 आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता, \q1 \v 12 तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन, \q2 आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल; \q1 कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही, \q2 मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही. \q1 तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले \q2 मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.” \p \v 13 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “माझ्या सेवकांना अन्न मिळेल, \q2 पण तुम्ही उपाशी राहाल; \q1 माझ्या सेवकांना पेय मिळेल, \q2 पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल. \q1 माझे सेवक हर्षोल्हास करतील, \q2 पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल. \q1 \v 14 त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्‍या आनंदाने \q2 माझे सेवक गाणी गातील, \q1 पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल \q2 आणि भग्नहृदयी होऊन \q2 हृदयाच्या वेदनेने आकांत कराल. \q1 \v 15 माझ्या निवडलेल्या लोकांमध्ये तुमचे नाव \q2 शापवचन असे होईल; \q1 सार्वभौम याहवेह तुम्हाला ठार करतील, \q2 परंतु आपल्या सेवकांना नवीन नावाने संबोधतील. \q1 \v 16 जो कोणी या भूमीवर आशीर्वादासाठी धावा करतो \q2 तो खऱ्या परमेश्वराद्वारेच करेल; \q1 जो कोणी या भूमीवर शपथ घेतो \q2 तो खऱ्या परमेश्वराचीच घेईल. \q1 कारण जुने त्रास विसरण्यात येतील, \q2 आणि माझ्या नजरेपासून लपविल्या जातील. \s1 नवे आकाश व नवी पृथ्वी \q1 \v 17 “कारण पाहा, \q2 मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन. \q1 पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही, \q2 मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही. \q1 \v 18 परंतु मी जी निर्मिती करेन \q2 त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा. \q1 कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय \q2 व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन. \q1 \v 19 मी यरुशलेमसाठी आनंद करेन \q2 आणि माझे लोक मला आनंददायी होतील; \q1 यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी \q2 कधीही कानांवर पडणार नाही. \b \q1 \v 20 “यापुढे तान्ही बाळे \q2 कधीही मृत्युमुखी पडणार नाहीत. \q2 आणि वयातीत मनुष्य त्याची पूर्ण वर्षे जगेल; \q1 यापुढे शंभर वर्षाचा मनुष्य मृत झाल्यास \q2 तो किती बालवयातच मृत झाला असे म्हणण्यात येईल; \q1 जो कोणी त्याची शंभरी पार न करता मृत झाल्यास \q2 तो शापित समजल्या जाईल. \q1 \v 21 त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील; \q2 ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील. \q1 \v 22 त्यांनी घरे बांधावी आणि इतरजण त्यात येऊन राहतील, \q2 किंवा ते पेरतील आणि इतरजण खातील, असे आता कदापि होणार नाही, \q1 कारण जितका जीवनकाल वृक्षाचा असेल, \q2 तसेच माझे लोक दीर्घायुषी होतील; \q1 माझे निवडलेले लोक त्यांच्या हाताने मिळविलेले प्रतिफळ \q2 सुखाने बहुतकाळ उपभोगतील. \q1 \v 23 त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, \q2 त्यांची मुले दुर्दैवास सामोरी जाण्यासाठी जन्मणार नाहीत. \q1 कारण ते लोक आणि त्यांचे वंशज \q2 याहवेहने आशीर्वादित लोक असे होतील. \q1 \v 24 मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; \q2 ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन. \q1 \v 25 लांडगा व कोकरू एकत्र चरतील. \q2 सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल \q2 आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल. \q1 माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते \q2 इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,” \q2 असे याहवेह म्हणतात. \c 66 \s1 न्याय आणि आशा \p \v 1 याहवेह असे म्हणतात: \q1 “स्वर्ग माझे सिंहासन आहे \q2 आणि पृथ्वी माझे पादासन आहे. \q1 तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? \q2 माझे विश्रांतिस्थान कुठे असणार? \q1 \v 2 माझ्या हाताने हे सर्व घडवले \q2 आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?” \q2 अशी याहवेह घोषणा करतात. \b \q1 “ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात: \q2 जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत, \q2 आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात. \q1 \v 3 परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो, \q2 त्याने ते अर्पण नरबली देण्यासारखेच असते, \q1 जो कोणी वेदीवर कोकर्‍याचे होमार्पण करतो \q2 तो अशा व्यक्तीसारखा आहे, जो कुत्र्याची मान मोडतो; \q1 जो कोणी अन्नार्पण करतो, \q2 तो डुकराचे रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे, \q1 आणि जो कोणी स्मरणार्थ धूप जाळतो \q2 तो एखाद्या मूर्तिपूजकासारखा आहे. \q1 त्यांनी आपले मार्ग निवडले आहेत, \q2 ते त्यांच्या घृणास्पद गोष्टी करण्यामध्ये धन्यता मानतात; \q1 \v 4 म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे \q2 ज्याची त्यांना धास्ती वाटते, तेच मी त्यांच्यावर पाठवेन. \q1 कारण मी जेव्हा त्यांना हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही, \q2 मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही. \q1 त्यांनी माझ्यासमक्ष दुष्कृत्ये केली \q2 आणि मला वीट आणणार्‍या गोष्टी करणे निवडले.” \b \q1 \v 5 याहवेहची वचने ऐकून कंपित होणार्‍या लोकांनो, \q2 याहवेहची वचने ऐका: \q1 “तुमचे भाऊबंद जे तुमचा द्वेष करतात, \q2 आणि माझ्या नामाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तुम्हाला वाळीत टाकतात, \q2 ते थट्टेने म्हणतात, \q1 ‘याहवेहचा गौरव असो, \q2 जेणेकरून, आम्ही तुमचा हर्षोल्हास बघू!’ \q2 पण ते फजीत केले जातील. \q1 \v 6 शहरामध्ये चाललेला आरडाओरडा ऐका, \q2 मंदिरातून येणारा गलबला ऐका! \q1 आपल्या शत्रूंची यथायोग्य परतफेड करणाऱ्या \q2 याहवेहचा हा ध्वनी आहे. \b \q1 \v 7 “प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच \q2 तिची प्रसूती होईल; \q1 वेणा येण्यापूर्वीच \q2 ती पुत्र प्रसवेल. \q1 \v 8 असे झालेले कोणी कधी ऐकले आहे का? \q2 असे कोणी कधी पाहिले आहे का? \q1 एका दिवसात एखादे राष्ट्र जन्मास येते \q2 किंवा एका क्षणात एखादे राष्ट्र उत्पन्न होते? \q1 तरी देखील सीयोनाच्या प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच \q2 ती तिच्या संततीस जन्म देते. \q1 \v 9 जन्म देण्याच्या क्षणापर्यंत आणल्यावर, \q2 मी प्रसूत करणार नाही काय?” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 “प्रसूतीस आणल्यावर \q2 मी उदर बंद करतो काय?” \q2 असे परमेश्वर म्हणतात. \q1 \v 10 “यरुशलेमवर प्रीती करणार्‍यांनो, \q2 तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; \q1 तिच्यासाठी शोक करणार्‍या सर्व लोकांनो, \q2 तिच्याबरोबर मोठा उल्हास करा. \q1 \v 11 कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने \q2 तुमचे संगोपन होऊन तुम्ही तृप्त व्हाल; \q1 तान्हेबाळ मनमुरादपणे मातेचे स्तनपान करते, तसे तुम्हीही तिच्या \q2 ओसंडून वाहणाऱ्या विपुलतेत आनंद कराल.” \p \v 12 कारण याहवेह असे म्हणतात: \q1 “मी तिच्या शांततेस नदीप्रमाणे वाढवेन, \q2 आणि राष्ट्रांची समृद्धी ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यांसारखी करेन; \q1 तुमचे संगोपन होईल व तुम्ही तिच्या कडेवर बसून फिराल, \q2 आणि तिच्या मांडीवर जोजवले जाल. \q1 \v 13 जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते, \q2 तसे मी तुमचे सांत्वन करेन; \q2 आणि तुम्ही यरुशलेमाप्रीत्यर्थ सांत्वन पावाल.” \b \q1 \v 14 हे तुमच्या नजरेस पडताच, तुम्हाला आनंदाचे भरते येईल \q2 व तुम्ही गवतासारखे बहरून जाल; \q1 याहवेहचा कल्याणकारी हात त्यांच्या सेवकांस प्रकट होईल, \q2 पण त्यांच्या शत्रूंना त्यांचा क्रोध दाखविण्यात येईल. \q1 \v 15 पाहा, याहवेह आपल्या क्रोधाग्नीसह येत आहेत, \q2 आणि त्यांचे रथ वावटळीसारखे आहेत; \q1 त्यांचा क्रोध ते प्रकोपासह आणतील, \q2 आणि त्यांचे फटकारणे अग्निज्वालांसह असेल. \q1 \v 16 कारण अग्नीने व आपल्या तलवारीने \q2 याहवेह सर्व लोकांवरील त्यांचा न्याय अंमलात आणतील, \q2 आणि अनेकजण याहवेहद्वारे वधल्या जातील. \p \v 17 “जे स्वतःला पवित्र व शुद्ध करतात, ते बागेत जातील, मात्र जे डुकरे, उंदीर यासारखे इतर प्रकारचे निषिद्ध मांस खातात—अशा सर्व लोकांचा भयानक शेवट त्यांनी अनुसरलेल्या लोकांसह होईल,” अशी याहवेह घोषणा करतात. \p \v 18 “यास्तव मी सर्व राष्ट्रांतील लोकांना आणि भाषिकांना एकत्र करेन, कारण त्यांनी कोणती योजना केली व कोणती कृत्ये केली आहेत, ते सर्व तिथे येतील व त्यांना माझे गौरव दिसेल. \p \v 19 “मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल\f + \fr 66:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa लिबियाचे\fqa*\f*, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील. \v 20 आणि सर्व राष्ट्रातून, तुमच्या सर्व लोकांना ते यरुशलेममधील माझ्या पवित्र पर्वतावर—घोड्यांवरून, रथातून, डोल्यांतून, खेचरांवरून व उंटावरून याहवेहसाठी अर्पण म्हणून आणतील,” असे याहवेह म्हणतात. “इस्राएल लोक ज्याप्रमाणे अन्नार्पण करतात त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात विधिपूर्वक शुद्ध पात्रात आणतील. \v 21 आणि परत येणार्‍या या लोकांमधून काहींची माझे याजक व लेवी व्हावे म्हणून मी त्यांची नेमणूक करेन,” असे याहवेह म्हणतात. \b \p \v 22 “मी निर्माण केलेले नवे आकाश व पृथ्वी जसे टिकून राहतील,” याहवेह घोषित करतात, “तसेच तुमचे नाव व तुमची संतती सदासर्वकाळ टिकून राहील. \v 23 एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसर्‍या नवचंद्राच्या दिवसापर्यंत आणि एका शब्बाथ दिवसापासून दुसर्‍या शब्बाथ दिवसापर्यंत सर्व मानवजात माझ्यापुढे उपासना करण्यास येतील,” असे याहवेह म्हणतात. \v 24 “ते बाहेर जातील आणि माझ्याविरुद्ध बंड केलेल्यांची प्रेते पाहतील; कारण त्यांना खाणारे किडे कधी मरणार नाही, त्यांना पेटवणारा अग्नी कधीही विझणार नाही, आणि सर्व मानवजातीला ते अमंगळ दृश्य पाहून किळस येईल.”