\id HOS - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h होशेय \toc1 होशेयाची भविष्यवाणी \toc2 होशेय \toc3 होशे \mt1 होशेयाची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा\f + \fr 1:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa येहोआश\fqa*\f* पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे: \b \s1 होशेयची पत्नी व मुले \p \v 2 जेव्हा याहवेहने प्रथम होशेयद्वारे बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “जा आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीबरोबर विवाह कर आणि तिच्यापासून लेकरे जन्माला घाल. कारण हा देश एका व्यभिचारी पत्नीप्रमाणे याहवेहशी अविश्वासूपणाचा दोषी आहे.” \v 3 म्हणून त्याने दिब्लाइमाची कन्या गोमेर हिच्याशी विवाह केला आणि ती गरोदर राहिली. तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. \p \v 4 तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन. \v 5 त्या दिवशी येज्रीलच्या खोर्‍यात मी इस्राएलचे धनुष्य मोडून टाकीन.” \p \v 6 गोमेर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने कन्येला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “हिचे नाव लो-रुहामा\f + \fr 1:6 \fr*\fq लो-रुहामा \fq*\ft म्हणजे अप्रिय\ft*\f* असे ठेव, कारण येथून पुढे त्यांना क्षमा करावी अशी प्रीती मी इस्राएलवर दाखविणार नाही. \v 7 पण मी यहूदीयाच्या वंशावर मी प्रीती करेन; आणि मी त्यांना वाचवेन—धनुष्य, तलवार किंवा युद्ध, किंवा घोडे आणि घोडेस्वार यांच्याद्वारे नाही, परंतु मी याहवेह त्यांचा परमेश्वर, त्यांना वाचवेन.” \p \v 8 लो-रुहामाचे दूध तोडल्यावर गोमेरने आणखी एका पुत्राला जन्म दिला. \v 9 तेव्हा याहवेह म्हणाले, “याचे नाव लो-अम्मी\f + \fr 1:9 \fr*\fq लो-अम्मी \fq*\ft म्हणजे \ft*\fqa माझे लोक नाहीत\fqa*\f* असे ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाहीत आणि मी तुमचा परमेश्वर नाही. \p \v 10 “तरीही इस्राएली लोक समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य असतील जी मापता येणार नाही किंवा मोजता येणार नाही, असे. ज्या ठिकाणी म्हटले होते, \q2 तुम्ही माझे लोक नाहीत, \q2 तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे म्हणतील \v 11 तेव्हा यहूदाहचे संतान व इस्राएलचे संतान एकत्र येतील; ते एक पुढारी नेमतील आणि देशातून एकत्र बाहेर येतील, कारण तो येज्रीलचा किती महान दिवस असेल. \c 2 \p \v 1 “तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक\f + \fr 2:1 \fr*\fq माझे लोक \fq*\ft म्हणजे अम्मी\ft*\f*’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’\f + \fr 2:1 \fr*\fq माझी प्रिय व्यक्ती \fq*\ft म्हणजे रुहामा\ft*\f* असे म्हणा. \s1 इस्राएलास शिक्षा आणि पुनर्स्थापना \q1 \v 2 “तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच, \q2 कारण ती माझी पत्नी नाही, \q2 आणि मी तिचा पती नाही. \q1 ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूप \q2 आणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो. \q1 \v 3 नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन, \q2 जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती; \q1 तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन, \q2 निर्जल भूमीसारखी ठेवेन \q2 व तिला तहानेने जिवे मारीन. \q1 \v 4 मी तिच्या मुलांच्या प्रती आपली प्रीती दाखविणार नाही, \q2 कारण ती मुले व्यभिचाराची आहेत. \q1 \v 5 कारण त्यांची आई अविश्वासू आहे \q2 आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. \q1 ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, \q2 जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, \q2 माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’ \q1 \v 6 म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन; \q2 मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही. \q1 \v 7 ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही. \q2 ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत. \q1 मग ती म्हणेल, \q2 ‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन, \q2 कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’ \q1 \v 8 तिने ओळखले नाही की, तो मीच होतो \q2 ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, \q1 ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; \q2 जे त्यांनी बआलसाठी वापरले. \b \q1 \v 9 “म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, \q2 आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. \q1 तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, \q2 मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन. \q1 \v 10 म्हणून मी आता तिची अश्लीलता \q2 तिच्या प्रियकरांसमोर उघडी करेन; \q2 माझ्या हातून तिला कोणीही वाचवू शकणार नाही. \q1 \v 11 मी तिचे सर्व उत्सव: \q2 तिचे वार्षिक सण, तिचे नवीन चंद्रदर्शन, \q2 तिचे शब्बाथाचे दिवस—नेमून दिलेले तिचे सर्व सण बंद करेन. \q1 \v 12 मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन, \q2 जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे; \q1 मी त्यांचे गर्द झाडी करेन \q2 व वनपशू ते खाऊन टाकतील. \q1 \v 13 जेव्हा तिने बआलसाठी धूप जाळला, \q2 तिला मी त्या दिवसांसाठी शिक्षा करेन; \q1 तिने स्वतःला अंगठ्यांनी आणि दागिन्यांनी सजविले, \q2 आणि तिच्या प्रियकरांच्या मागे गेली, \q2 परंतु मला मात्र ती विसरून गेली,” असे याहवेह घोषित करतात. \b \q1 \v 14 “म्हणून तिला मी भुलविणार; \q2 तिला रानात घेऊन जाईन \q2 आणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन. \q1 \v 15 तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, \q2 आणि अखोरचे खोरे\f + \fr 2:15 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa दुःखाची दरी\fqa*\f* तिला आशेचे द्वार असे देईन. \q1 जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात \q2 जसे उत्तर देत होती तसेच उत्तर\f + \fr 2:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa गीत गाईल\fqa*\f* देईल. \b \q1 \v 16 “त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल; \q2 यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल\f + \fr 2:16 \fr*\ft धनी\ft*\f*’ असे म्हणणार नाही, \q2 याहवेह असे घोषित करतात. \q1 \v 17 मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; \q2 यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही. \q1 \v 18 त्या दिवशी मी त्यांच्यासाठी \q2 रानातील पशू, आकाशातील पक्षी \q2 आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन. \q1 धनुष्य आणि तलवार आणि लढाया \q2 मी देशातून काढून टाकेन, \q2 म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल. \q1 \v 19 मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन; \q2 मी तुम्हाला नीतिमत्व आणि न्याय, \q2 प्रीती आणि करुणा यामध्ये वाग्दत्त करेन. \q1 \v 20 विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन, \q2 आणि याहवेहची ओळख तुला होईल. \b \q1 \v 21 “त्या दिवशी मी प्रतिसाद देईन; \q2 मी आकाशाला प्रतिसाद देईन \q1 आणि ते पृथ्वीला प्रतिसाद देतील;” \q2 याहवेह अशी घोषणा करतात. \q1 \v 22 “आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल \q2 यांना प्रतिसाद देईल, \q2 आणि ते येज्रीलास\f + \fr 2:22 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa परमेश्वर रोपण करतात\fqa*\f* प्रतिसाद देतील. \q1 \v 23 मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; \q2 ‘माझी प्रिया नाही\f + \fr 2:23 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa लो-रुहामाह\fqa*\f*’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. \q1 जे ‘माझे लोक नाहीत,\f + \fr 2:23 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa लो-अम्मी\fqa*\f*’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; \q2 आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ” \c 3 \s1 होशेयचा आपल्या पत्नीशी समेट \p \v 1 मग याहवेह मला म्हणाले, “जा आणि आपल्या पत्नीस आपली प्रीती पुनः प्रकट कर, जरी तिला दुसरा कोणता पुरुष प्रीती करतो आणि ती एक व्यभिचारिणी आहे. जरी ते इतर दैवतांकडे वळले असून पवित्र मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी याहवेह इस्राएली लोकांवर प्रीती करतात.” \p \v 2 तेव्हा मी तिच्या सुटकेसाठी चांदीची पंधरा शेकेल\f + \fr 3:2 \fr*\ft अंदाजे 170 ग्रॅ.\ft*\f* व एक होमेर व एक लेथेक\f + \fr 3:2 \fr*\ft अंदाजे 195 कि.ग्रॅ.\ft*\f* जव देऊन तिला विकत घेतले. \v 3 मग मी तिला म्हणालो, “तुला अनेक दिवस माझ्याबरोबर राहवयाचे आहे; जारकर्म करू नकोस अथवा इतर पुरुषांकडे जाऊ नकोस, आणि मीही तुझ्यासोबत तसाच वागेन.” \p \v 4 कारण दीर्घकाळापर्यंत इस्राएली लोक राजा अथवा राजपुत्र, यज्ञ अथवा पवित्र दगड, एफोद अथवा कुलदैवतांशिवाय राहतील. \v 5 त्यानंतर इस्राएली लोक परत येतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराला आणि त्यांचा राजा दावीदाचा शोध घेतील. अखेरच्या काळात याहवेहकडे ते थरथर कापत आणि त्यांच्या आशीर्वादासाठी येतील. \c 4 \s1 इस्राएलविरुद्ध केलेले आरोप \q1 \v 1 इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. \q2 या देशात राहणार्‍यांवर \q2 याहवेहचा आरोप आहे: \q1 या देशात विश्वासूपणा नाही, \q2 प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही. \q1 \v 2 या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, \q2 चोरी आणि व्यभिचार आहे; \q1 सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, \q2 आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो. \q1 \v 3 म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, \q2 येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; \q1 रान पशू, आकाशातील पक्षी \q2 आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत. \b \q1 \v 4 परंतु कोणीही आरोप करू नका, \q2 तुम्ही इतरांवर आळ घेऊ नका, \q1 कारण तुमचे लोक असे आहेत \q2 जे याजकांवर दोष लावतात. \q1 \v 5 तुम्ही दिवस व रात्र अडखळता, \q2 आणि संदेष्टेही तुमच्याबरोबर अडखळतात. \q1 म्हणून मी तुमच्या आईचा नाश करेन— \q2 \v 6 ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे, \b \q1 “कारण, तुम्ही ज्ञानाला नाकारले आहे, \q2 म्हणून मी तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारत आहे; \q1 कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे, \q2 म्हणून मी सुद्धा तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करेन. \q1 \v 7 जितकी याजकांची संख्या वाढत गेली, \q2 तितकी अधिक पापे त्यांनी माझ्याविरुद्ध केली; \q2 त्यांच्या वैभवशाली परमेश्वराच्या बदल्यात\f + \fr 4:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa मी त्यांचे वैभव बदलेन\fqa*\f* त्यांनी लाजिरवाणी गोष्ट स्वीकारली. \q1 \v 8 माझ्या लोकांच्या पापांवर ते पोषण करतात \q2 आणि त्यांच्या दुष्टतेचा आनंद घेतात. \q1 \v 9 आणि असे होईल की: जसे लोक तसे याजक होतील. \q2 मी दोघांनाही त्यांच्या आचरणामुळे शासन करेन \q2 आणि त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना परतफेड करेन. \b \q1 \v 10 “ते खातील परंतु ते तृप्त होणार नाहीत; \q2 ते व्यभिचार करतील परंतु त्यांची भरभराट होणार नाही, \q1 कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला आहे \q2 आणि स्वतःस वेश्या व्यवसायास सोपविले आहे. \v 11 जुना द्राक्षारस \q1 आणि नवीन द्राक्षारस \q2 त्यांचा समंजसपणा दूर करतात. \q1 \v 12 माझे लोक लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात \q2 आणि दैवप्रश्न करणाऱ्यांची काठी त्यांचे भविष्य सांगते. \q1 व्यभिचाराचा आत्मा त्यांना भरकटवितो; \q2 ते त्यांच्या परमेश्वराला विश्वासू राहिले नाहीत. \q1 \v 13 एला वृक्ष, हिवर आणि एला या झाडांखाली, \q2 जिथे सुखदायक सावली असते \q1 तिथे पर्वतांच्या शिखरांवर यज्ञ करतात \q2 आणि टेकड्यांवर ते होमार्पण करतात. \q1 म्हणून तुमच्या कन्या वेश्याव्यवसायाकडे वळतात \q2 आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात. \b \q1 \v 14 “जेव्हा त्या वेश्याव्यवसायाकडे वळतात, \q2 अथवा तुमच्या सुना \q1 त्या व्यभिचार करतात, \q2 मी तुमच्या कन्यांना शासन करणार नाही, \q1 कारण पुरुष स्वतः वेश्यांबरोबर सहवास करतात \q2 आणि पवित्र स्थळी असलेल्या देवदासींबरोबर बलिदान करतात— \q2 समंजसपणा नसलेल्या लोकांचा नाश होईल! \b \q1 \v 15 “हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, \q2 तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. \b \q1 “गिलगालकडे जाऊ नका; \q2 वर बेथ-आवेन\f + \fr 4:15 \fr*\fqa बेथ-अव्हेन \fqa*\ft दुष्टतेचे घर \ft*\ft बेथेल \ft*\fqa परमेश्वराचे घर याचे अपमानास्पद नाव\fqa*\f* येथे जाऊ नका. \q2 आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका. \q1 \v 16 जशी कालवड हट्टी असते, \q2 तसे इस्राएली लोक हट्टी आहेत. \q1 मग जशी कोकरे कुरणात चरतात, \q2 त्याप्रमाणे याहवेह त्यांना कुरणात कसे नेतील? \q1 \v 17 एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे, \q2 त्याला एकटे सोडून द्या! \q1 \v 18 जेव्हा त्यांचे मद्य संपते तेव्हा सुद्धा, \q2 ते त्यांचा वेश्याव्यवसाय चालू ठेवतात; \q2 त्यांचे शासक लज्जास्पद कृतिंवर अधिक प्रीती करतात. \q1 \v 19 एक वावटळ त्यांना वाहून नेईल, \q2 आणि त्यांच्या अर्पणांमुळे त्यांना लाज वाटेल. \c 5 \s1 इस्राएलविरुद्ध न्याय \q1 \v 1 “तुम्ही याजकांनो, हे ऐका! \q2 अहो इस्राएलाच्या घराण्यांनो, लक्ष द्या! \q1 राजघराणे, ऐका! \q2 हा न्याय तुमच्याविरुद्ध आहे: \q1 मिस्पाह येथे तुम्ही पाश झाला आहात, \q2 ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात. \q1 \v 2 बंडखोरांनी भयंकर कत्तल केली आहे, \q2 मी त्या सर्वांना शिस्त लावेन. \q1 \v 3 एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे; \q2 इस्राएल माझ्यापासून लपलेले नाही. \q1 हे एफ्राईमा, तू आता वेश्याव्यवसायाकडे वळला आहेस; \q2 इस्राएल भ्रष्ट झालेला आहे. \b \q1 \v 4 “त्यांची कर्मे त्यांना पुन्हा \q2 त्यांच्या परमेश्वराकडे येऊ देत नाहीत. \q1 वेश्यावृत्तीचा आत्मा त्यांच्या अंतःकरणात आहे; \q2 ते याहवेहला ओळखत नाहीत. \q1 \v 5 इस्राएलचा उन्मत्तपणाच त्यांच्याविरुद्ध साक्ष देतो; \q2 इस्राएल आणि एफ्राईम सुद्धा आपल्या पापात अडखळतात; \q2 यहूदीया देखील त्यांच्यासोबत अडखळतो. \q1 \v 6 जेव्हा ते आपले मेंढरांचे व गुरांचे कळप घेऊन \q2 याहवेहच्या शोधात फिरतील, \q1 ते त्यांना सापडणार नाही; \q2 कारण त्यांनी स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहेत. \q1 \v 7 ते याहवेहशी अविश्वासू राहिले; \q2 ते अनौरस लेकरांना जन्म देतात. \q1 जेव्हा ते अमावस्येचा उत्सव साजरा करतील, \q2 तेव्हा ते त्यांच्या शेताला गिळून\f + \fr 5:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa नाश करतील\fqa*\f* टाकतील. \b \q1 \v 8 “तुम्ही गिबियाहात शिंग फुंका, \q2 रामाह येथे कर्णा वाजवा. \q1 बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा; \q2 बिन्यामीन आमचे नेतृत्व करा. \q1 \v 9 एफ्राईम शासनाच्या \q2 दिवशी ओसाड पडेल. \q1 इस्राएली गोत्रात जे निश्चितच होणार \q2 त्याची घोषणा करणार. \q1 \v 10 यहूदाहचे पुढारी \q2 सीमारेषांचे दगड हालविणारे झाले आहेत. \q1 एखाद्या जलप्रलयाप्रमाणे \q2 मी माझा संताप त्यांच्यावर ओतेन. \q1 \v 11 एफ्राईम चिरडला गेला आहे, \q2 न्यायात चेंगरलेला आहे. \q2 कारण मूर्तीच्या मागे जाण्याचा त्याचा निश्चय आहे. \q1 \v 12 एफ्राईमाला मी कसर, \q2 आणि यहूदाहसाठी सडीचा रोग आहे. \b \q1 \v 13 “ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला, \q2 आणि यहूदाहने त्याची जखम पाहिली, \q1 तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे वळला, \q2 आणि महान राजाकडे मदतीसाठी विनंती केली. \q1 परंतु तो तुला बरे करू शकत नाही, \q2 तुझ्या जखमाही बर्‍या करू शकत नाही. \q1 \v 14 कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा, \q2 व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन. \q1 मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन; \q2 मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल. \q1 \v 15 ते आपला अपराध कबूल करेपर्यंत \q2 व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत \q2 मी आपल्या गुहेत परत जाईन— \q1 कारण संकट आल्याबरोबर, \q2 ते माझा शोध कळकळीने करतील.” \c 6 \s1 लोकांचा खोटा पश्चात्ताप \q1 \v 1 “चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. \q1 त्यांनी आम्हाला फाडले आहे, \q2 व तेच आम्हाला बरे करतील; \q1 त्यांनी आम्हाला जखम केली आहे, \q2 व आता तेच पट्टी बांधतील. \q1 \v 2 ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; \q2 तिसर्‍या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, \q2 जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू. \q1 \v 3 चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; \q2 चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. \q1 सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, \q2 तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; \q1 हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, \q2 पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.” \b \q1 \v 4 “एफ्राईमा मी तुमचे काय करू? \q2 यहूदाह मी तुमचे काय करू? \q1 कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे, \q2 पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते. \q1 \v 5 म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे, \q2 माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले— \q2 तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो. \q1 \v 6 कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे, \q2 आणि होमार्पण पेक्षा परमेश्वराचे ज्ञान प्रिय आहे. \q1 \v 7 आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे; \q2 तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते. \q1 \v 8 गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे, \q2 त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत. \q1 \v 9 जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात, \q2 तसेच याजकांच्या टोळ्या \q1 शेखेमाच्या वाटेवर वध करतात, \q2 ते आपल्या दुष्ट योजना पूर्ण करतात. \q1 \v 10 मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे: \q2 एफ्राईम वेश्याव्यवसाय करण्यास दिला आहे, \q2 इस्राएल अपवित्र झाला आहे. \b \q1 \v 11 “हे यहूदाह, तुझ्यासाठी \q2 हंगामाची वेळ नेमलेली आहे. \b \q1 “जेव्हा मी माझ्या लोकांना जुन्या दिवसात पुनर्स्थापित करेन, \c 7 \q2 \v 1 जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो, \q1 तेव्हा एफ्राईमचे पाप \q2 आणि शोमरोनचे अपराध प्रकट होतात. \q1 ते लबाडी करतात, \q2 चोर घरात चोरी करतात, \q2 लुटारू रस्त्यावर लूटमार करतात; \q1 \v 2 परंतु त्यांना हे कळत नाही \q2 की त्यांची सर्व वाईट कृत्ये मला स्मरण आहेत. \q1 त्यांच्या पापकर्मांनी त्यांना घेरले आहे; \q2 ते नेहमी माझ्यासमोर असतात. \b \q1 \v 3 “ते राजाला आपल्या दुष्टाईने, \q2 अधिपतीला आपल्या लबाड्यांनी हर्षित करतात. \q1 \v 4 ते सर्वच व्यभिचारी आहेत; \q2 रोटी भाजणार्‍याच्या सतत \q1 पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत. \q2 पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो. \q1 \v 5 आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी \q2 अधिपती द्राक्षारसाने धुंद होतात, \q2 आणि त्याने आपला हात कुचेष्टा करणार्‍यांबरोबर मिळविला आहे. \q1 \v 6 कारस्थाने करताना त्यांची हृदये \q2 तापलेल्या भट्टीसारखी होतात. \q1 त्यांची उत्कटता रात्रभर धुमसत असते; \q2 सकाळी तो प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो. \q1 \v 7 ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत; \q2 ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात. \q1 त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, \q2 त्यातील कोणी मला हाक मारीत नाही. \b \q1 \v 8 “एफ्राईम गैर यहूदीयांसोबत मिसळतो; \q2 एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे. \q1 \v 9 परकीय लोक त्याच्या शक्तीचे शोषण करतात, \q2 पण त्याला हे कळत नाही \q1 त्याचे केस पांढरे होत चालले आहेत, \q2 पण तो त्याची नोंद घेत नाही. \q1 \v 10 इस्राएलचा उन्मत्तपणाच त्याच्याविरुद्ध साक्ष देतात, \q2 हे सर्व असूनही \q1 तो याहवेह त्याच्या परमेश्वराकडे वळत नाही, \q2 किंवा त्यांचा शोध घेत नाही. \b \q1 \v 11 “एफ्राईम एखाद्या खुळ्या पारव्यासारखा \q2 बुद्धिहीन आणि सहज फसणारा आहे— \q1 तो आता इजिप्तला हाक मारतो; \q2 आता तो अश्शूराकडे धाव घेतो. \q1 \v 12 जेव्हा ते जातील तेव्हा मी माझे जाळे त्याच्यावर फेकेन; \q2 मी त्यांना आकाशातील पक्ष्याप्रमाणे खाली आणेन. \q1 जेव्हा मी ऐकेन की ते एकत्र होत आहेत, \q2 तेव्हा मी त्यांना पकडेन. \q1 \v 13 ते माझ्यापासून बहकले आहेत \q2 म्हणून त्यांचा धिक्कार असो! \q1 त्यांचा नाश होवो, \q2 कारण त्यांनी माझ्याविरुद्ध विद्रोह केला आहे. \q1 मला त्यांचा उद्धार करावयाची इच्छा होती, \q2 पण ते माझ्याबद्दल खोटे बोलतात. \q1 \v 14 ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत, \q2 परंतु त्यांच्या बिछान्यांवर विलाप करतात. \q1 ते धान्य आणि नवीन द्राक्षारसासाठी \q2 त्यांच्या दैवतांकडे भीक मागून स्वतःला जखमा करतात,\f + \fr 7:14 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa भीक मागत एकत्र येतात\fqa*\f* \q2 पण ते माझ्यापासून दूर राहतात. \q1 \v 15 मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे, \q2 परंतु ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात. \q1 \v 16 ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत; \q2 तर ते सदोष धनुष्यांसारखे आहेत. \q1 उर्मट शब्दांमुळे त्यांचे पुढारी \q2 तलवारीला बळी पडतील. \q1 यामुळे इजिप्त देशात \q2 त्यांची थट्टा करण्यात येईल. \c 8 \s1 इस्राएल वावटळीची कापणी करतात \q1 \v 1 “तू कर्णे आपल्या मुखाला लाव! \q2 याहवेहच्या भवनावर एक गरुड आहे, \q1 कारण लोकांनी माझा करार मोडला आहे \q2 आणि माझ्या नियमशास्त्राविरुद्ध बंड केले आहे. \q1 \v 2 इस्राएल माझा धावा करून आता म्हणतो, \q2 ‘आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचा स्वीकार करतो!’ \q1 \v 3 इस्राएलने जे उत्तम ते नाकारले आहे; \q2 शत्रू त्याचा पाठलाग करतील. \q1 \v 4 त्यांनी माझ्या संमतीशिवाय राजे नेमले आहेत; \q2 ते माझ्या मान्येतेशिवाय अधिपतींना निवडतात. \q1 त्यांनी आपले चांदी आणि सोने घेऊन \q2 स्वतःच्या नाशाकरिता \q2 मूर्ती बनविल्या आहेत. \q1 \v 5 हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे! \q2 त्यांच्याविरुद्ध माझा राग पेटला आहे. \q1 ते अजून किती काळ शुद्ध होण्यास असमर्थ राहतील? \q2 \v 6 ते इस्राएलाकडून आहे! \q1 हे वासरू—एका कारागिराने बनविले आहे; \q2 तो परमेश्वर नाही. \q1 शोमरोनाच्या या वासराचे \q2 तुकडे तुकडे करण्यात येतील. \b \q1 \v 7 “ते वारा पेरतात \q2 आणि ते वावटळीची कापणी करतात. \q1 त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत; \q2 त्यातून पीठ तयार होत नाही. \q1 जर त्यातून अन्न तयार झाले \q2 तर परकीय ते गिळून टाकतील. \q1 \v 8 इस्राएलास गिळून टाकण्यात आले आहे; \q2 राष्ट्रांमध्ये ती कोणासही \q2 आवडत नाही. \q1 \v 9 एकाकी भटकणार्‍या रानगाढवासारखे ते वर \q2 अश्शूराकडे गेले आहे. \q2 एफ्राईमने स्वतःस तिच्या प्रियकरांना विकले आहे. \q1 \v 10 जरी त्यांना स्वतःला राष्ट्रांमध्ये विकले असेल, \q2 तरीही आता मी त्यांना एकत्र करेन. \q1 बलाढ्य राजाच्या अत्याचाराने \q2 ते नष्ट होऊ लागतील. \b \q1 \v 11 “एफ्राईमने पापार्पण करण्यास पुष्कळ वेद्या बांधल्या आहेत, \q2 पण ते पाप करण्याच्या वेद्या झाल्या आहेत. \q1 \v 12 मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्राच्या पुष्कळ गोष्टी लिहिल्या, \q2 पण त्यांनी ते परकीय मानले. \q1 \v 13 जरी ते त्यांचे यज्ञार्पण मला भेटस्वरूप अर्पितात, \q2 आणि तरीही ते मांस खातात, \q2 याहवेह त्यांच्याशी प्रसन्न नाही. \q1 आता ते त्यांचा दुष्टपणा स्मरणार \q2 आणि त्यांच्या पापांची शिक्षा देणार: \q2 ते इजिप्तला परततील. \q1 \v 14 कारण इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे \q2 आणि राजवाडे बांधले; \q2 यहूदाहने अनेक तटबंदीची नगरे बांधली आहेत. \q1 पण मी त्यांच्या नगरांवर अग्नी पाठवून \q2 त्यांचे किल्ले भस्म करेन.” \c 9 \s1 इस्राएलास शासन \q1 \v 1 हे इस्राएला, आनंद करू नकोस; \q2 इतर राष्ट्रांसारखे उल्लासू नकोस, \q1 कारण तू तुझ्या परमेश्वराशी अविश्वासू झाला आहेस; \q2 धान्याच्या प्रत्येक खळ्यावर \q2 वेश्याव्यवसाय करून मिळणारी कमाई तुला आवडते. \q1 \v 2 खळे आणि द्राक्षकुंड लोकांना खाऊ घालणार नाही; \q2 नवा द्राक्षारस त्यांना दगा देईल. \q1 \v 3 याहवेहच्या देशात ते राहणार नाहीत; \q2 एफ्राईम इजिप्त देशात परत जाईल \q2 आणि अश्शूर येथे अशुद्ध भोजन खाईल. \q1 \v 4 ते याहवेहला द्राक्षारसाची पेयार्पणे करू शकणार नाही, \q2 किंवा त्यांच्या यज्ञार्पणाने याहवेहला संतोष होणार नाही. \q1 कारण असे यज्ञ त्यांच्यासाठी शोक करणाऱ्यांच्या अन्नासारखे होईल; \q2 त्यास खाणारे सर्वजण अमंगळ होतील. \q1 ते भोजन त्यांच्यासाठीच असेल; \q2 ते याहवेहच्या मंदिरात आणता येणार नाही. \b \q1 \v 5 मग तू ठरविलेल्या उत्सवाच्या दिवशी, \q2 याहवेहच्या सणाच्या दिवशी काय करशील? \q1 \v 6 जरी ते नाशापासून सुटले तरी \q2 इजिप्त त्यांना गोळा करेल, \q2 आणि मेम्फीस त्यांना मूठमाती देतील. \q1 काटेकुसळे त्यांच्या चांदीच्या वस्तू नेतील, \q2 आणि त्यांच्या तंबूत काटेरी झाडे उगवतील. \q1 \v 7 शासन करण्याची वेळ जवळ आली आहे; \q2 प्रतिफळ घेण्याचे दिवस जवळ आले आहेत. \q2 इस्राएलला हे समजून यावे. \q1 कारण तुमची पापे अधिक आहेत \q2 आणि तुमचे शत्रुत्व जास्त आहे, \q1 संदेष्टा मूर्ख ठरत आहे, \q2 प्रेरित वेडा समजला जातो. \q1 \v 8 संदेष्टा माझ्या परमेश्वरासोबत, \q2 एफ्राईमचा पहारेकरी आहे, \q1 तरीही त्याच्या सर्व मार्गात सापळा त्याची वाट पाहत आहे, \q2 आणि परमेश्वराच्या भवनात शत्रुत्व आहे. \q1 \v 9 जसे गिबियाहमधील दिवसात केले \q2 तसे त्यांनी स्वतःला अधिक भ्रष्ट केले आहे. \q1 परमेश्वर त्यांचे दुष्कर्म स्मरणात ठेवतील \q2 आणि त्यांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करतील. \b \q1 \v 10 “जेव्हा मला इस्राएल आढळला, \q2 तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते; \q1 जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले, \q2 ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते. \q1 पण जेव्हा ते बआल-पौराला आले \q2 तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले \q2 आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले. \q1 \v 11 एफ्राईमचे वैभव पक्ष्याप्रमाणे उडून जाईल— \q2 जन्म नाही, गर्भधारणा नाही, गर्भसंभव नाही. \q1 \v 12 जरी त्यांनी मुलांचे संगोपन केले, \q2 तरी मी त्यांना सर्वांपासून दूर करेन. \q1 मी त्या लोकांपासून निघून जाईन, \q2 तेव्हा त्यांचा धिक्कार असो. \q1 \v 13 सोर जसा सुखदायी ठिकाणी लावलेला मी पाहिला, \q2 तसाच एफ्राईम आहे, \q1 परंतु एफ्राईम आपल्या मुलांना \q2 वध करणार्‍याकडे घेऊन येईल.” \b \q1 \v 14 हे याहवेह, त्यांना द्या— \q2 तुम्ही त्यांना काय द्याल? \q1 त्यांना वांझ गर्भाशये \q2 आणि शुष्क स्तने द्या. \b \q1 \v 15 “गिलगालात त्यांची सर्व दुष्कृत्ये आहेत, \q2 मी त्यांचा तिथेच द्वेष केला. \q1 त्यांच्या पापी कृत्यांमुळे, \q2 मी त्यांना माझ्या घरातून हाकलून देईन. \q1 मी यापुढे त्यांच्यावर प्रीती करणार नाही; \q2 त्यांचे सर्व पुढारी बंडखोर आहेत. \q1 \v 16 एफ्राईम नाश पावला आहे. \q2 त्यांची मुळे सुकून गेली आहेत. \q2 ते फळ देत नाही. \q1 जरी ते मुलांना जन्म देतील, \q2 तर मी त्यांचे प्रिय मूल मारून टाकेन.” \b \q1 \v 17 माझा परमेश्वर त्यांना नाकारील \q2 कारण त्यांनी त्यांची आज्ञा पाळली नाही; \q2 ते देशादेशातून भटकत राहतील. \b \c 10 \q1 \v 1 इस्राएल एक पसरणारा द्राक्षवेल होता. \q2 त्याने स्वतःसाठी फळे आणली. \q1 जसे त्याचे फळ वाढले, \q2 तसे त्याने आणखी वेद्या बांधल्या; \q1 जसा त्याचा देश समृद्ध झाला, \q2 तसे त्याने त्याच्या पवित्र दगडांना सुशोभित केले. \q1 \v 2 त्यांचे अंतःकरण फसवणूक करणारे आहे, \q2 आणि आता त्यांना त्यांचे अपराध भोगावेच लागतील. \q1 याहवेह त्यांच्या वेद्या पाडून टाकतील \q2 आणि त्यांच्या पवित्र दगडांचे तुकडे करतील. \b \q1 \v 3 मग ते म्हणतील, “आम्हाला राजा नाही \q2 कारण आम्ही याहवेहचा आदर केला नाही. \q1 पण आमचा राजा असला तरी \q2 त्याने आमच्यासाठी काय केले असते?” \q1 \v 4 ते अनेक अभिवचने देतात, \q2 खोट्या शपथा घेतात \q2 आणि करार करतात; \q1 त्यामुळे नांगरलेल्या शेतात उगविलेल्या \q2 विषारी तणाप्रमाणे खटले सुरू होतात. \q1 \v 5 शोमरोनात राहणारे लोक \q2 बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. \q1 त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील \q2 आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, \q1 जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. \q2 कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे. \q1 \v 6 महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी \q2 ते अश्शूरला नेले जातील. \q1 एफ्राईमला लज्जित केले जाईल; \q2 बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल. \q1 \v 7 शोमरोनच्या राजाचा नाश होईल, \q2 पाण्याच्या पृष्ठभागावर पडलेली डहाळी जशी वाहून जाते, तसा तो वाहून जाईल. \q1 \v 8 दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा\f + \fr 10:8 \fr*\ft हिब्रू भाषेत \ft*\fqa आवेन, \fqa*\ft बेथ-आवेनचा संकेत (बेथेलसाठी अपमानास्पद नाव)\ft*\f* नाश केला जाईल— \q2 हे इस्राएलचे पाप आहे. \q1 काटेरी झाडे आणि कुसळे उगवतील \q2 आणि त्यांच्या वेद्या झाकून घेतील. \q1 मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाकून टाका!” \q2 आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” \b \q1 \v 9 “हे इस्राएला, गिबियाहतील दिवसापासून तू पाप करीत आला आहेस \q2 आणि तू तिथेच राहिला. \q1 गिबियाहच्या दुष्कृत्य करणाऱ्या \q2 विरुद्ध पुन्हा युद्ध भडकणार नाही काय? \q1 \v 10 जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी त्यांना दंड देईन; \q2 त्यांनी केलेल्या दोन्ही पापांसाठी \q2 त्यांना बेड्या टाकण्यासाठी राष्ट्रे त्यांच्याविरुद्ध एकत्र होतील. \q1 \v 11 एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. \q2 तिला मळणी करण्याची आवड आहे; \q1 म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर \q2 जू ठेवेन. \q1 मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, \q2 यहूदाहला नांगरणी करणे \q2 व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे. \q1 \v 12 तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, \q2 न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, \q1 आणि पडीक जमीन नांगरून टाका; \q2 जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर \q1 नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, \q2 याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे. \q1 \v 13 पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे \q2 आणि अन्यायाचे पीक काढले आहे, \q2 तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. \q1 कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर \q2 आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे, \q1 \v 14 तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल, \q2 जेणेकरून तुझ्या सर्व गडांचा नाश होईल; \q1 जसे शलमनाने युद्धाच्या दिवशी बेथ-आर्बेलाचा नाश केला, \q2 जेव्हा मातेला तिच्या मुलांसहित आपटून ठार मारण्यात आले. \q1 \v 15 तसेच बेथेल तुझ्यासोबत होईल, \q2 कारण तुझी दुष्टता फार अधिक आहे. \q1 तेव्हा त्या दिवशी सकाळच्या प्रहरी \q2 इस्राएलाच्या राजाचा पूर्णरीतीने नाश केला जाईल. \c 11 \s1 याहवेहची इस्राएलसाठी प्रीती \q1 \v 1 “इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, \q2 आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले. \q1 \v 2 पण त्यांना जितके जास्त बोलाविले, \q2 तितके ते माझ्यापासून दूर गेले. \q1 त्यांनी बआलापुढे बळी दिले \q2 आणि त्यांनी मूर्तीला धूप जाळला. \q1 \v 3 मी तोच होतो ज्याने एफ्राईमला चालण्यास शिकविले, \q2 मी त्यांना कडेवर वागवले; \q1 तो मीच होतो ज्याने त्यांना आरोग्य दिले, \q2 परंतु हे त्यांना समजले नाही. \q1 \v 4 मी त्यांना मानवी दयाळूपणाच्या दोरीने \q2 आणि प्रीतीच्या बंधनाने चालविले. \q1 त्यांच्यासाठी मी एखाद्या लहान मुलाला \q2 गालापर्यंत उचलल्यासारखा होतो, \q2 आणि मी खाली वाकून त्यांना खायला घालत असे. \b \q1 \v 5 “ते इजिप्त देशात परत जाणार नाहीत काय \q2 आणि अश्शूर त्यांच्यावर राज्य करणार नाही काय \q2 कारण ते पश्चात्ताप करण्यास नकार देतात? \q1 \v 6 त्यांच्या शहरातून तलवार चमकेल; \q2 ती त्यांच्या खोट्या संदेष्ट्यांना मारून टाकेल \q2 व त्यांच्या योजनांचा अंत करेल. \q1 \v 7 माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे. \q2 त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी \q2 मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही. \b \q1 \v 8 “अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो? \q2 अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ? \q1 मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो? \q2 मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो? \q1 माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे; \q2 माझी सर्व करुणा जागृत झाली आहे. \q1 \v 9 मी माझ्या तीव्र रागाप्रमाणे वागणार नाही, \q2 मी एफ्राईमचा पुन्हा नाश करणार नाही. \q1 कारण मी तुमच्यामध्ये एक पवित्र परमेश्वर आहे. \q2 मनुष्य नाही. \q2 मी त्यांच्या शहरांविरुद्ध येणार नाही. \q1 \v 10 ते याहवेहला अनुसरतील; \q2 ते सिंहासारखी गर्जना करतील. \q1 जेव्हा ते गर्जना करतील, \q2 तेव्हा त्यांची मुले थरथर कापत पश्चिमेकडून परत येतील. \q1 \v 11 पक्ष्यांच्या थरथरणाऱ्या \q2 थव्याप्रमाणे ते इजिप्तकडून येतील, \q2 पारव्यांप्रमाणे पंख फडफडत अश्शूरहून येतील. \q1 आणि मी त्यांना त्यांच्या घरी स्थायिक करेन,” \q2 असे याहवेह घोषणा करतात. \s1 इस्राएलचे पाप \q1 \v 12 एफ्राईमने मला खोटेपणाने, \q2 इस्राएलने फसवेगिरीने वेढून टाकले आहे. \q1 आणि यहूदाह उद्धटपणाने परमेश्वराच्या विरोधात आहे, \q2 शिवाय जे परमेश्वर विश्वासू व पवित्र आहेत, त्यांच्याविरुद्ध आहे. \c 12 \q1 \v 1 एफ्राईम वाऱ्यावर चरतो; \q2 तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो \q2 आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. \q1 तो अश्शूरसोबत करार करतो \q2 आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो. \q1 \v 2 याहवेह यहूदीयाच्या विरुद्ध वाद आणत आहेत; \q2 याकोबाला\f + \fr 12:2 \fr*\fq याकोब \fq*\ft म्हणजे \ft*\fqa टाच धरणारा \fqa*\ft किंवा \ft*\fqa फसविणारा\fqa*\f* त्याच्या मार्गाप्रमाणे ते शासन करतील \q2 आणि त्याच्या कार्यानुसार त्याला प्रतिफळ देतील. \q1 \v 3 त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली; \q2 एका मनुष्य असून त्याने परमेश्वराशी झुंज केली. \q1 \v 4 तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; \q2 तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. \q1 बेथेलला ते त्याला भेटले \q2 आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला— \q1 \v 5 याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, \q2 याहवेह हे त्यांचे नाव! \q1 \v 6 पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; \q2 प्रीती आणि न्यायाचे पालन कर \q2 आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर. \b \q1 \v 7 व्यापारी चुकीचे माप वापरतो \q2 आणि त्याला लबाडी करणे आवडते. \q1 \v 8 एफ्राईम बढाई मारतो, \q2 “मी फार धनवान आहे; मी श्रीमंत झालो आहे. \q1 माझ्या सर्व संपत्तीसह त्यांना माझ्यामध्ये कोणताही \q2 अपराध किंवा पाप आढळणार नाही.” \b \q1 \v 9 “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून \q2 मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; \q1 तुझ्या नेमलेल्या उत्सवाच्या दिवसात \q2 मी तुला पुन्हा तंबूंमध्ये राहवयास लावेन. \q1 \v 10 मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, \q2 त्यांना अनेक दृष्टान्त दिले \q2 आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.” \b \q1 \v 11 गिलआद दुष्ट आहे काय? \q2 त्याचे लोक निरुपयोगी आहेत! \q1 ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? \q2 त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या \q2 ढिगार्‍यासारख्या असतील. \q1 \v 12 याकोब अराम देशात पळून गेला; \q2 इस्राएलने पत्नी मिळविण्यासाठी चाकरी केली \q2 आणि तिची किंमत चुकविण्यासाठी त्याने मेंढरे राखली. \q1 \v 13 याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला, \q2 एका संदेष्ट्याच्या मार्फत त्याची काळजी घेतली. \q1 \v 14 पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे; \q2 त्याचे प्रभू त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच राहू देतील \q2 आणि त्याला त्याच्या अपमानाची भरपाई देतील. \c 13 \s1 इस्राएलविरुद्ध याहवेहचा संताप \q1 \v 1 जेव्हा एफ्राईम बोलत असे, तेव्हा लोक थरथर कापत असत; \q2 कारण तो इस्राएलाचा अधिपती होता. \q2 पण तो बआल मूर्तीच्या उपासनेचा दोषी झाला आणि मरण पावला. \q1 \v 2 आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत; \q2 ते आपल्या चांदीपासून स्वतःसाठी मूर्ती बनवतात, \q1 हुशारीने तयार केलेल्या प्रतिमा, \q2 त्या सर्व कारागिरांची हस्तकृती आहेत. \q1 या लोकांबद्दल असे म्हटले जाते, \q2 “हे नरबली देतात! \q2 ते वासराच्या मूर्तीचे चुंबन\f + \fr 13:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa यज्ञ करणारे पुरुष\fqa*\f* घेतात!” \q1 \v 3 म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे, \q2 पहाटेच्या लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे, \q2 खळ्यातून उडून जाणार्‍या भुशासारखे, \q2 धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे होतील. \b \q1 \v 4 “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून \q2 मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; \q1 माझ्याशिवाय इतर कोणत्याही परमेश्वराला तू स्वीकारणार नाहीस, \q2 माझ्याशिवाय इतर कोणीही तारणारा नाही. \q1 \v 5 मी रानात, त्या तप्त उष्णतेच्या प्रदेशात, \q2 तुझी काळजी वाहिली. \q1 \v 6 जेव्हा मी त्यांना भोजन दिले ते तृप्त झाले; \q2 जेव्हा ते तृप्त झाले तेव्हा ते गर्विष्ठ झाले; \q2 नंतर ते मला विसरले. \q1 \v 7 म्हणून मी त्यांच्यासाठी सिंहासारखा होईन, \q2 चित्त्यासारखा त्यांच्या वाटेवर दबा धरून बसेन. \q1 \v 8 जिची पिल्ले हरण केली आहेत, अशा अस्वलीप्रमाणे \q2 मी त्यांच्यावर हल्ला करेन आणि त्यांचे तुकडे तुकडे करेन; \q1 मी त्यांना सिंहाप्रमाणे फाडून टाकेन— \q2 वनपशू त्यांना फाडून टाकतील. \b \q1 \v 9 “हे इस्राएला, तुझा नाश झाला आहे, \q2 कारण तू माझ्याविरुद्ध, तुझ्या साहाय्यकर्त्यांच्या विरुद्ध आहेस. \q1 \v 10 तुला वाचविणारा तुझा राजा कुठे आहे? \q2 ‘मला राजा व राजपुत्र द्या’ \q1 ज्यांच्याबद्दल तू असे म्हटले होते, \q2 ते तुझे सर्व नगरांचे अधिकारी कुठे आहेत? \q1 \v 11 म्हणून माझ्या रागात मी तुला राजा दिला \q2 आणि माझ्या क्रोधात त्याला मी काढून टाकले आहे. \q1 \v 12 एफ्राईमची पातके जमा केली आहेत, \q2 त्याची पापे साठवून ठेवली आहेत. \q1 \v 13 बाळंतपणात स्त्रीला होणारा त्रास त्याला होईल, \q2 पण तो बुद्धी नसलेला एक बालक आहे; \q1 जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा \q2 त्याला गर्भातून बाहेर येण्याचे ज्ञान नसते. \b \q1 \v 14 “मी या लोकांना कबरेच्या सामर्थ्यापासून सुटका देईन; \q2 मी त्यांना मृत्यूपासून वाचवेन. \q1 अरे मरणा, तुझ्या पीडा कुठे आहे? \q2 हे कबरे, तुझा नाश कुठे आहे? \b \q1 “मला काहीही कळवळा येणार नाही, \q2 \v 15 जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता, \q1 परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल, \q2 तो वाळवंटातून येईल; \q1 त्याचे झरे सुकून जातील \q2 आणि त्याची विहीर कोरडी पडेल. \q1 त्याच्या भांडारातील \q2 सर्व खजिना लुटला जाईल. \q1 \v 16 शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, \q2 कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. \q1 ते तलवारीने पडतील; \q2 त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, \q2 आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.” \c 14 \s1 आशीर्वाद प्राप्तीसाठी पश्चात्ताप \q1 \v 1 हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. \q2 कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे! \q1 \v 2 परमेश्वराच्या वचनांचे पालन कर \q2 आणि याहवेहकडे परत ये. \q1 त्यांना सांगा: \q2 “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, \q1 आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, \q2 म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.\f + \fr 14:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa आमचे ओठ अर्पण करू\fqa*\f* \q1 \v 3 अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; \q2 आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. \q1 हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही \q2 ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. \q2 कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.” \b \q1 \v 4 “मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन \q2 आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, \q2 कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे. \q1 \v 5 मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. \q2 तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल \q1 आणि त्याची मुळे लबानोनातील \q2 गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील; \q2 \v 6 त्याच्या फांद्या पसरतील. \q1 त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. \q2 त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल. \q1 \v 7 लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील; \q2 ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील, \q1 द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील— \q2 इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल. \q1 \v 8 हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे? \q2 मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन. \q1 मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे; \q2 तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.” \b \q1 \v 9 कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. \q2 कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. \q1 कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; \q2 नीतिमान त्यावरून चालतील, \q2 पण पातकी त्यावर अडखळून पडतील.