\id HEB - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h इब्री \toc1 इब्री लोकांस पत्र \toc2 इब्री \toc3 इब्री \mt1 इब्री लोकांस पत्र \c 1 \s1 परमेश्वराचे अंतिम शब्द: त्यांचा पुत्र \p \v 1 भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले. \v 2 पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलले आहेत व त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे. \v 3 पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत. \v 4 अशा रीतीने ते देवदूतांपेक्षा अतिश्रेष्ठ झाले आणि जे नाव त्यांना बहाल केले ते देवदूतांच्या नावांहून अतिश्रेष्ठ आहे. \s1 पुत्र दूतांपेक्षा सर्वश्रेष्ठ \p \v 5 कारण परमेश्वराने असे कोणत्या देवदूताला कधी म्हटले, \q1 “तू माझा पुत्र आहेस; \q2 आज मी तुझा पिता झालो आहे”\f + \fr 1:5 \fr*\ft \+xt स्तोत्र 2:7\+xt*\ft*\f*? \m आणि पुन्हा एकदा, \q1 “मी त्याचा पिता होईन, \q2 आणि तो माझा पुत्र होणार”\f + \fr 1:5 \fr*\ft \+xt 2 शमु 7:14; 1 इति 17:13\+xt*\ft*\f*? \m \v 6 आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवर आणतो आणि म्हणतो, \q1 “परमेश्वराचे सर्व दूत त्याची उपासना करोत.”\f + \fr 1:6 \fr*\ft \+xt अनु 32:43\+xt*\ft*\f* \m \v 7 परमेश्वर ते आपल्या दूतांविषयी बोलताना म्हणतात, \q1 “तो वायूला आपले दूत, \q2 व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.”\f + \fr 1:7 \fr*\ft \+xt स्तोत्र 104:4\+xt*\ft*\f* \m \v 8 पण आपल्या पुत्राविषयी ते म्हणतात, \q1 “हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; \q2 न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील. \q1 \v 9 नीतिमत्व तुम्हाला प्रिय असून दुष्टाईचा तुम्ही द्वेष केला आहे. \q2 म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, हर्षाच्या तेलाने तुझा अभिषेक करून \q2 तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उंच ठिकाणी स्थिर केले आहे.”\f + \fr 1:9 \fr*\ft \+xt स्तोत्र 45:6\+xt*,7\ft*\f* \m \v 10 ते असेही म्हणाले, \q1 “हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, \q2 आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत. \q1 \v 11 ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; \q2 ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील. \q1 \v 12 तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार; \q2 आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील. \q1 परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, \q2 आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.”\f + \fr 1:12 \fr*\ft \+xt स्तोत्र 102:25‑27\+xt*\ft*\f* \m \v 13 आणि परमेश्वराने आपल्या कोणत्या दूतांविषयी असे म्हटले, \q1 “मी तुझ्या शत्रूंना \q2 तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत \q2 तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा”\f + \fr 1:13 \fr*\ft \+xt स्तोत्र 110:1\+xt*\ft*\f*? \m \v 14 कारण ज्यांना तारण मिळणार आहे, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व देवदूत म्हणजे सेवा करणारे म्हणून पाठविलेले आत्मे नाहीत काय? \c 2 \s1 लक्ष देण्याबाबत इशारा \p \v 1 आपण ऐकलेल्या गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यामुळे बहकून जाऊ नये. \v 2 कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्‍यांना योग्य शिक्षा मिळाली. \v 3 ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू? \v 4 परमेश्वराने चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार करून साक्ष दिली आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या इच्छेनुसार विशिष्ट दाने वाटून दिली आहेत. \s1 येशू परिपूर्ण मानव \p \v 5 ज्या येणार्‍या जगाबद्दल आपण बोलत आहोत, ते जग देवदूतांच्या हाती सोपवून दिलेले नाही. \v 6 परंतु एका ठिकाणी एकाने अशी साक्ष दिली आहे: \q1 “मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी, \q2 आणि मानवपुत्र कोण की त्याची काळजी करावी? \q1 \v 7 तुम्ही त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. \q2 गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्याच्या डोक्यावर ठेवला आहे, \q2 \v 8 आणि सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आहे.”\f + \fr 2:8 \fr*\ft \+xt स्तोत्र 8:4‑6\+xt*\ft*\f* \m सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या असताना, परमेश्वराने कोणतीच अशी गोष्ट ठेवली नाही की जी त्यांच्या स्वाधीन केली नाही. तरी सध्या हे सर्व स्वाधीन केल्याचे आपण अद्यापि पाहिले नाही. \v 9 पण फक्त काही काळ देवदूतांहून किंचित कमी असे केले होते, या येशूंना आता गौरवाने व सन्मानाने मुकुटमंडित केले आहे असे आपण पाहतो, कारण त्यांनी मरण सोसले, यासाठी की परमेश्वराच्या कृपेद्वारे त्यांनी प्रत्येकासाठी मरणाचा अनुभव घ्यावा. \p \v 10 हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या तारणाच्या उत्पादकाच्या दुःख सहनाद्वारे त्यांना परिपूर्ण करावे. \v 11 जो लोकांना पवित्र करतो आणि जे पवित्र झाले आहेत, ते दोन्ही एकाच कुटुंबातील आहेत. यामुळेच आपल्याला बंधू आणि भगिनी असे म्हणावयाला येशू लाजत नाही. \v 12 ते म्हणतात, \q1 “मी तुमचे नाव माझ्या बंधुभगिनींसमोर जाहीर करेन; \q2 मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन गाईन.”\f + \fr 2:12 \fr*\ft \+xt स्तोत्र 22:22\+xt*\ft*\f* \m \v 13 आणि पुन्हा, \q1 “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” \m आणि आणखी ते म्हणाले, \q1 “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”\f + \fr 2:13 \fr*\ft \+xt यश 8:17, 18\+xt*\ft*\f* \p \v 14 आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे. \v 15 मृत्यूच्या भयामुळे सर्व आयुष्यभर दास्यत्वाच्या गुलामगिरीत राहणार्‍यांची त्यांना सुटका करता येईल. \v 16 हे निश्चित आहे की ते देवदूतांच्या नव्हे तर अब्राहामाच्या संततीची मदत करतात. \v 17 या कारणासाठी त्यांना आपल्यासारखे म्हणजे बंधूसारखे होणे व पूर्ण मानव होणे अगत्याचे होते, कारण त्यामुळेच त्यांना परमेश्वरासमोर आपला कृपाळू व विश्वासू याजक होता आले आणि मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित करता आले. \v 18 कारण त्यांनी स्वतःची परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्याअर्थी आपलीही परीक्षा होत असताना आपल्याला साहाय्य करावयास ते समर्थ आहेत. \c 3 \s1 येशू मोशेहून श्रेष्ठ \p \v 1 यास्तव, पवित्र बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जे स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहात, ते तुम्ही आपले विचार येशूंवर केंद्रित करा, त्यांना आम्ही आमचा प्रेषित आणि महायाजक म्हणून कबूल करतो. \v 2 कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते. \v 3 कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्‍याला, घराला लाभणार्‍या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत. \v 4 कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे. \v 5 जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”\f + \fr 3:5 \fr*\ft \+xt गण 12:7\+xt*\ft*\f* \v 6 परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत. \s1 अविश्वासाबद्दल इशारे \p \v 7 ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो: \q1 “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, \q2 \v 8 तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका, \q1 जशी रानात परीक्षा होत असताना \q2 तुम्ही बंडखोरी केली होती. \q1 \v 9 जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती \q2 तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले. \q1 \v 10 आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो; \q2 मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत, \q2 आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही. \q1 \v 11 मी रागाने शपथ घेतली की, \q2 ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”\f + \fr 3:11 \fr*\ft \+xt स्तोत्र 95:7‑11\+xt*\ft*\f* \p \v 12 बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा. \v 13 अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही. \v 14 जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे. \v 15 ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: \q1 “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, \q2 तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, \q2 तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”\f + \fr 3:15 \fr*\ft \+xt स्तोत्र 95:7, 8\+xt*\ft*\f* \p \v 16 ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का? \v 17 आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली? \v 18 ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले, ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यांना नाही तर कोणाला बोलत होते? \v 19 आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत. \c 4 \s1 परमेश्वराच्या लोकांना शब्बाथाचा विसावा \p \v 1 यास्तव, ज्याअर्थी त्यांच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या. \v 2 कारण ही शुभवार्ता जशी त्यांना तशी आपल्यालाही सांगितली होती; पण जो संदेश त्यांनी ऐकला त्यामुळे त्यांचे काहीही भले झाले नाही, कारण ज्यांनी आज्ञापालन केले त्यांच्या विश्वासात ते सहभागी झाले नाहीत.\f + \fr 4:2 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa ज्यांनी ऐकले परंतु विश्वासात जोडले नाही\fqa*\f* \v 3 ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले, \q1 “मी रागाने शपथ घेतली की, \q2 ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.”\f + \fr 4:3 \fr*\ft \+xt स्तोत्र 95:11\+xt*; आणि वचन 5\ft*\f* \m जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहेत व त्यांची वाट पाहत आहेत. \v 4 कारण सातव्या दिवसाबद्दल असे कुठेतरी लिहिले आहे, “परमेश्वराने सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”\f + \fr 4:4 \fr*\ft \+xt उत्प 2:2\+xt*\ft*\f* \v 5 अजून वरील भागात परमेश्वर म्हणतात, “ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” \p \v 6 तरी, ते अभिवचन कायम असून काहीजण त्या विसाव्यात जातात, पण पहिल्यांदा ज्यांना शुभवार्ता ऐकण्याची संधी मिळाली तरी त्यांनी आज्ञा मोडल्यामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत. \v 7 परंतु विसाव्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने दुसरी वेळ नेमली आहे आणि त्याला “आज” असे म्हटले. हे ते फार पूर्वी दावीदाच्या मुखाद्वारे बोलले होते, आधीच नमूद केलेल्या शब्दांत ते म्हणाले, \q1 “आज तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर किती बरे, \q2 आपली अंतःकरणे कठीण करू नका.”\f + \fr 4:7 \fr*\ft \+xt स्तोत्र 95:7, 8\+xt*\ft*\f* \m \v 8 जर यहोशुआने त्यांना विसावा दिला असता, तर परमेश्वराने यानंतर दुसर्‍या दिवसाविषयी बोलले नसते. \v 9 तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. \v 10 जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून\f + \fr 4:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa कष्ट\fqa*\f* विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे. \v 11 यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये. \p \v 12 कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे. \v 13 संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्यांना आपण हिशोब देणे आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही अनावृत व उघडे आहे. \s1 येशू सर्वश्रेष्ठ महायाजक \p \v 14 यास्तव, स्वर्गमंडलातून पार गेलेले परमेश्वराचे पुत्र येशू महान महायाजक आपणास आहेत, म्हणून आम्ही विश्वासाचा पत्कर केलेला आहे तो दृढ धरून ठेऊ या. \v 15 ते असे महायाजक नाहीत जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु असे आहेत जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले. \v 16 तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या. \c 5 \p \v 1 प्रत्येक महायाजक परमेश्वर विषयक गोष्टींबाबत लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व पापांसाठी देणग्या आणि यज्ञे अर्पण करण्यासाठी निवडला जातो. \v 2 तो स्वतः निर्बलतेच्या अधीन असल्यामुळे अज्ञानी व भटकलेल्या लोकांबरोबर सौम्यतेने वागू शकतो. \v 3 या कारणासाठीच त्याला स्वतःच्या पापांसाठी आणि लोकांच्या पापांसाठी यज्ञ करावा लागत असे. \v 4 आणि कोणीही हा सन्मान स्वतःहून घेऊ शकत नाही, ज्यांना परमेश्वराने अहरोनासारखे पाचारण केले आहे त्यांनाच तो प्राप्त होतो. \p \v 5 त्याच प्रकारे ख्रिस्तानेही स्वतःला महायाजक होण्यासाठी गौरविले नाही. परंतु परमेश्वर त्याला म्हणाले, \q1 “तू माझा पुत्र आहे; \q2 आज मी तुझा पिता झालो आहे.”\f + \fr 5:5 \fr*\ft \+xt स्तोत्र 2:7\+xt*\ft*\f* \m \v 6 आणखी दुसर्‍या ठिकाणी ते असे म्हणाले, \q1 “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे \q2 तू सदासर्वकाळचा याजक आहे.”\f + \fr 5:6 \fr*\ft \+xt स्तोत्र 110:4\+xt*\ft*\f* \p \v 7 येशू त्या दिवसात पृथ्वीवर देहामध्ये असताना, स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यास जे समर्थ आहेत, त्यांच्याजवळ त्यांनी अश्रू गाळीत आणि आत्म्यात मोठ्या आक्रोशाने विनवणी करीत प्रार्थना केली आणि त्यांची प्रार्थना त्याच्या आदरयुक्त अधीनतेमुळे ऐकण्यात आली. \v 8 ते पुत्र होते, तरी त्यांनी सोसलेल्या दुःख सहनाद्वारे ते आज्ञापालन शिकले. \v 9 आणि परिपूर्ण केल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्‍या सर्वांचे अनंतकाळचे तारणकर्ता झाले, \v 10 आणि परमेश्वराद्वारे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. \s1 मार्गभ्रष्ट न होण्याबाबत इशारा \p \v 11 याबाबतीत आम्हाला खूप सांगावेसे वाटते, परंतु हे तुम्हाला स्पष्ट करून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. \v 12 वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे! \v 13 आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाच्या शिक्षणाविषयी अपरिचित आहे. \v 14 परंतु जड अन्नाचे सेवन परिपक्वांसाठी असते, जे सतत योग्य व अयोग्य यामधील फरक समजण्याचा सराव करून स्वतःला प्रशिक्षित करतात. \c 6 \p \v 1 यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यर्थ प्रथांबद्धल पश्चात्ताप आणि परमेश्वरावरील विश्वास यात परिपक्व होऊ या. \v 2 शुद्धतेच्या प्रथांबाबत, बाप्तिस्म्यांविषयी, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्याय अशा विषयांचा पाया पुन्हा घालू नका. \v 3 आणि परमेश्वर परवानगी देतील, तर आपण तसे करू. \p \v 4 ज्यांना एकदा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे सहभागी झाले, \v 5 ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्‍या जगाच्या महान सामर्थ्याचा अनुभव घेतला, \v 6 जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे. \v 7 जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. \v 8 परंतु जी भूमी काटे आणि कुसळे उपजविते, ती कुचकामी व शापित होण्याच्या बेतात आहे; तिचा अंत जळण्याने होईल. \p \v 9 जरी आम्ही असे बोलत असलो तरी, प्रिय मित्रांनो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा चांगल्या व तारणाबरोबर येणार्‍या गोष्टींची खात्री आहे. \v 10 कारण परमेश्वर अन्यायी नाहीत. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत. \v 11 आमची इच्छा आहे की तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत असाच उत्साह दाखवावा, म्हणजे जी आशा तुम्ही बाळगता ती पूर्ण होईल. \v 12 तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत. \s1 परमेश्वराच्या अभिवचनाची निश्चितता \p \v 13 जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्यांचे वचन दिले, तेव्हा त्यांना शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे ते स्वतःचीच शपथ वाहून, \v 14 म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.”\f + \fr 6:14 \fr*\ft \+xt उत्प 22:17\+xt*\ft*\f* \v 15 मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले. \p \v 16 लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांची शपथ वाहतात आणि जे काही म्हटले आहे शपथ त्याचे समर्थन करते आणि सर्व वादांचा शेवट करते. \v 17 कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला. \v 18 परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्‍या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे व आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो, त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे. \v 19 आम्हाला ही आशा जिवासाठी नांगर असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे. \v 20 जिथे येशूंनी आपला अग्रदूत मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, सदासर्वकाळचा महायाजक म्हणून आपल्यावतीने प्रवेश केला आहे. \c 7 \s1 याजक मलकीसदेक \p \v 1 हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला.\f + \fr 7:1 \fr*\ft \+xt उत्प 14:18‑19\+xt*\ft*\f* \v 2 तेव्हा अब्राहामाने सर्वांचा दहावा भाग त्याला दिला. प्रथम मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ, “नीतिमत्वाचा राजा” असा आहे; आणि, “शालेमचा राजा” म्हणजे “शांतीचा राजा” असा आहे. \v 3 त्याची आई किंवा वडील, वंशावळी, जीवनाचा उगम अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याविषयी काही माहिती नाही, तरी परमेश्वराच्या पुत्रासमान तो युगानुयुग याजक राहतो. \p \v 4 तर तो केवढा थोर आहे याचा विचार करा: कुलपिता अब्राहामाने लुटीचा दहावा हिस्सा त्याला दिला. \v 5 लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो. \v 6 परंतु हा मनुष्य लेवी वंशातील नव्हता, त्याने अब्राहामापासून दशांश गोळा केला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. \v 7 हे निर्विवाद सत्य आहे की मोठ्यांकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो. \v 8 या एका संदर्भात, याजक जे मर्त्य मानव आहेत, त्यांच्याद्वारे दशांश गोळा केल्या जातो, परंतु दुसर्‍या संदर्भात, तो जिवंत आहे असे त्याच्याविषयी जाहीर केले आहे. \v 9 दशांश गोळा करणार्‍या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल. \v 10 कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला, तेव्हा लेवी पूर्वजाच्या शरीरात होता. \s1 येशू मलकीसदेकासारखे \p \v 11 जर लेवी याजकपणाच्या संबंधात लोकांना खरोखर नियमशास्त्र प्राप्त झाले होते व त्यामुळे पूर्णता प्राप्त झाली असती, याजकपण स्थिर करता आले असते तर दुसर्‍या याजकाची गरज का होती, की जो मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आणि अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नसावा? \v 12 जेव्हा याजकपण बदलले, तेव्हा नियमात सुद्धा बदल होणे आवश्यक आहे. \v 13 कारण ज्याच्याबद्दल या गोष्टी सांगितल्या होत्या तो एका असामान्य, वेगळ्या वंशातील होता; त्या वंशातल्या कोणीही वेदीवर सेवा केली नव्हती. \v 14 हे स्पष्ट आहे की आपले प्रभू यहूदाहच्या वंशातून आले आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही. \v 15 आणि जे काही आम्ही म्हटले ते अधिक स्पष्ट आहे की मलकीसदेकासारखा दुसरा याजक प्रकट होईल. \v 16 ते पूर्वजांच्या नियमानुसार नव्हे, तर ज्या जीवनाचा अंत होऊ शकत नाही अशा जीवनापासून वाहणार्‍या सामर्थ्याच्या आधारावर याजक झाले; \v 17 हे असे जाहीर करते: \q1 “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे \q2 तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”\f + \fr 7:17 \fr*\ft \+xt स्तोत्र 110:4\+xt*\ft*\f* \p \v 18 पूर्वीचा नियम बाजूला ठेवण्यात आला, कारण तो कमकुवत व निरुपयोगी होता. \v 19 (कारण नियमशास्त्राने काहीही परिपूर्ण केले नाही), आणि अधिक चांगल्या आशेची ओळख झाली आहे, ज्याद्वारे आपण परमेश्वराजवळ जातो. \p \v 20 आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले. \v 21 परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, \q1 “प्रभूने शपथ घेतली आहे \q2 आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: \q2 ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”\f + \cat dup\cat*\fr 7:21 \fr*\ft \+xt स्तोत्र 110:4\+xt*\ft*\f* \m \v 22 कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत. \p \v 23 आता असे पुष्कळ याजक होऊन गेले, जे मृत झाल्यामुळे त्यांची सेवा सातत्याने करू शकले नाहीत. \v 24 पण येशू सदासर्वकाळ जिवंत आहेत; त्यांचे याजकपण युगानुयुगचे आहे. \v 25 यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्‍या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत. \p \v 26 असे महायाजक खरोखर आपल्या गरजा भागविण्यास समर्थ आहेत—ते पवित्र, निर्दोष, शुद्ध, आणि पापी माणसांपासून वेगळे केलेले, स्वर्गाहून अधिक उंच केलेले आहेत. \v 27 त्यांना त्या महायाजकांप्रमाणे प्रथम स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी दिवसेंदिवस यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्यांनी त्यांच्या पापासाठी एकदाच यज्ञ करून स्वतःला अर्पण केले. \v 28 नियमशास्त्र दुर्बलतेने भरलेल्या माणसांना महायाजक नेमते; पण नियमशास्त्रानंतर आलेली शपथ ती जो युगानुयुग परिपूर्ण आहे त्या पुत्राला नेमते. \c 8 \s1 नव्या कराराचा महायाजक \p \v 1 आमच्या म्हणण्याचा मुख्य मुद्दा हाच आहे: आम्हाला असे एक महायाजक आहेत, जे स्वर्गामध्ये वैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे. \v 2 प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत. \p \v 3 आणि ज्याअर्थी प्रत्येक महायाजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे. \v 4 जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे याजक आधी नेमलेले असतात. \v 5 जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.”\f + \fr 8:5 \fr*\ft \+xt निर्ग 25:40\+xt*\ft*\f* \v 6 परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित असलेल्या नवीन कराराचे ते मध्यस्थ आहेत. \p \v 7 जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती. \v 8 परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: \q1 “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, \q2 असे दिवस येतील जेव्हा, \q2 इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी \q1 मी एक नवीन करार करेन. \q1 \v 9 मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून \q2 त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, \q1 तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या \q2 कराराप्रमाणे हा करार नसेल. \q1 ते माझ्या कराराशी विश्वासू राहिले नाही, \q2 आणि मी त्यांच्यापासून दूर गेलो, \q2 असे प्रभू म्हणतात. \q1 \v 10 परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा \q2 प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर \q1 मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, \q2 आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन \q1 मी त्यांचा परमेश्वर होईन, \q2 आणि ते माझे लोक होतील. \q1 \v 11 कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, \q2 किंवा ‘प्रभूला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, \q1 कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण \q2 मला ओळखतील, \q1 \v 12 मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन \q2 व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”\f + \fr 8:12 \fr*\ft \+xt यिर्म 31:31‑34\+xt*\ft*\f* \p \v 13 त्यांनी या करारास “नवा” असे म्हणून जुना करार कालबाह्य ठरविला आहे; आणि जो कालबाह्य व जुना आहे तो लवकर नाहीसा होईल. \c 9 \s1 पृथ्वीवरील मंदिरातील उपासना \p \v 1 पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते. \v 2 एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत. \v 3 दुसर्‍या पडद्याच्या मागे एक खोली होती; तिला परमपवित्रस्थान म्हणत असत. \v 4 त्यात सोन्याची धूपवेदी सोन्याने आच्छादलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना असलेले एक सुवर्णपात्र, अंकुर फुटलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. \v 5 आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे. \p \v 6 या गोष्टींची अशी व्यवस्था लावल्यानंतर, आपले सेवाकार्य करण्यासाठी याजक नियमितपणे या बाहेरील खोलीत प्रवेश करीत, \v 7 पण आतील खोलीत फक्त महायाजकच प्रवेश करीत असे आणि तेही वर्षातून एकदाच. तो स्वतःसाठी आणि लोकांनी अजाणतेने केलेल्या पापांसाठी रक्त अर्पण करत असतो आणि रक्ताशिवाय तो इथे कधीही प्रवेश करीत नाही. \v 8 या सर्व गोष्टींवरून पवित्र आत्मा आपल्याला हे निदर्शनास आणून देतात की जोपर्यंत जुना मंडप आणि त्यातील कार्यक्रम चालू होते तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता. \v 9 हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तिथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही. \v 10 हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत. \s1 ख्रिस्ताचे रक्त \p \v 11 परंतु जेव्हा चांगल्या गोष्टी ज्या आता येथे आहेत\f + \fr 9:11 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa ज्या पुढे घडणार आहेत\fqa*\f* त्यांचा महायाजक म्हणून ख्रिस्त आले होते, जो मानवी हाताने केलेला नाही व जो या सृष्टीचा भाग नाही, अशा अधिक महान व अधिक परिपूर्ण मंडपाद्वारे आत गेले. \v 12 त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली. \v 13 जर शेळ्यांचे आणि बैलांचे रक्त किंवा कालवडींची राख विधिपूर्वक अशुद्ध असलेल्यांवर शिंपडल्यास ते बाह्यतः शुद्ध केले जाते. \v 14 तर, सनातन आत्म्याद्वारे ज्याने परमेश्वराला स्वतःस निष्कलंक असे अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त मृत्यूस कारणीभूत असणारी कामे केल्याच्या टोचणीपासून आपल्या विवेकबुद्धीला शुद्ध करून परमेश्वराची सेवा करण्यास किती अधिक प्रवृत्त करेल! \p \v 15 याकारणास्तव ख्रिस्त हे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत, ज्यांना पाचारण झाले आहे, त्यांनी जुन्या करारानुसार जी पापे केली, त्यांच्या शिक्षेपासून मुक्ती मिळावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून त्यांना सोडवावे व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या वारसाचे अभिवचन मिळावे. \p \v 16 कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे. \v 17 मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही. \v 18 या कारणासाठीच पहिला करार रक्ताशिवाय अंमलात आला नाही. \v 19 जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले. \v 20 मग तो म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, तो पाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा दिली आहे.”\f + \fr 9:20 \fr*\ft \+xt निर्ग 24:8\+xt*\ft*\f* \v 21 आणि त्याच प्रकारे त्याने दोन्ही मंडप व विधींसाठी जी उपकरणे वापरली जात, त्यावरही रक्तसिंचन केले. \v 22 खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. \p \v 23 मग हे आवश्यक होते की, स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे होते, परंतु स्वर्गीय गोष्टी याहून चांगल्या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे अगत्य होते. \v 24 ख्रिस्ताने मानवी हाताने बांधलेल्या पवित्र मंदिरात प्रवेश केला नाही कारण ते खर्‍या मंदिराची केवळ नक्कल होती; आपल्यावतीने परमेश्वराच्या समक्षतेत उपस्थित राहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गात प्रवेश केला आहे. \v 25 आणि जसा महायाजक प्रतिवर्षी जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्यांना स्वर्गात जाऊन वारंवार स्वतःचे रक्त अर्पण करावयाचे नव्हते. \v 26 तसे करणे आवश्यक असते, तर त्यांना जगाच्या स्थापनेपासून अनेकदा दुःख सहन करावे लागले असते. पण आता ते एकदाच युगाच्या समाप्तीस स्वयज्ञ करून प्रकट झाले आणि त्यांनी पापाची सत्ता नष्ट केली. \v 27 जसे माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्यायाला तोंड देणे हे नेमून ठेवले आहे, \v 28 तसेच अनेकांचे पाप वाहून नेण्यासाठी बली म्हणून ख्रिस्त एकदाच मरण पावले आणि ते दुसर्‍या वेळेस प्रकट होणार, ते पाप वाहण्यासाठी नाही, तर जे त्यांची धीराने वाट पाहतात, त्यांचे तारण आणण्यासाठी येतील. \c 10 \s1 ख्रिस्ताचा आत्मयज्ञ एकदाचा व अखेरचा \p \v 1 नियमशास्त्र ज्या येणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी येणार्‍यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही. \v 2 तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती. \v 3 पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली. \v 4 कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. \p \v 5 यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, \q1 “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, \q2 परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले; \q1 \v 6 होमार्पण व पापार्पण यांनी \q2 तुम्हाला संतोष झाला नाही. \q1 \v 7 मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे, \q2 हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ”\f + \fr 10:7 \fr*\ft \+xt स्तोत्र 40:6‑8\+xt*\ft*\f* \m \v 8 ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते. \v 9 नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली. \v 10 आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत. \p \v 11 प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. \v 12 परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत. \v 13 आणि त्या वेळेपासून त्यांचे शत्रू त्यांचे पायासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. \v 14 कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे. \p \v 15 याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटले: \q1 \v 16 “मी त्यांच्याबरोबर करार करेन तो असा, \q2 प्रभू म्हणतात त्या वेळेनंतर, \q1 मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन \q2 आणि ते मी त्यांच्या हृदयावर लिहेन.”\f + \fr 10:16 \fr*\ft \+xt यिर्म 31:33\+xt*\ft*\f* \m \v 17 मग पुढे ते म्हणतात, \q1 “त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये \q2 यापुढे मी स्मरणार नाही.”\f + \fr 10:17 \fr*\ft \+xt यिर्म 31:34\+xt*\ft*\f* \m \v 18 आणि जिथे क्षमा झालेली आहे, तिथे पापांसाठी आणखी यज्ञ करण्याची मुळीच गरज नाही. \s1 धीराने विश्वासात टिकून राहण्यासाठी आवाहन \p \v 19 म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते. \v 20 आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्यांच्या शरीराद्वारे उघडला आहे. \v 21 आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत, \v 22 म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ. \v 23 आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत. \v 24 आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या. \v 25 आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे. \p \v 26 सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही, \v 27 पण राहिले ते भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच. \v 28 मोशेने दिलेले नियमशास्त्र एखाद्याने नाकारले तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. \v 29 तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते? \v 30 कारण “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,”\f + \fr 10:30 \fr*\ft \+xt अनु 32:36; स्तोत्र 135:14\+xt*\ft*\f* आणि आणखी, “प्रभू त्यांच्या लोकांचा न्याय करतील,” असे जे म्हणाले, ते आपल्याला माहीत आहे. \v 31 जिवंत परमेश्वराच्या हातात सापडणे फार भयंकर आहे. \p \v 32 जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा. \v 33 कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्‍यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. \v 34 बंदिवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही स्वतःच्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली. \v 35 तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. \p \v 36 तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे. \v 37 कारण, \q1 “अगदी थोड्या वेळात, \q2 जो येणार आहे तो येईल \q2 आणि उशीर करणार नाही.”\f + \fr 10:37 \fr*\ft \+xt यश 26:20\+xt*\ft*\f* \m \v 38 आणि, \q1 “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. \q2 आणि माघार घेणार्‍यामध्ये \q2 मला संतोष वाटणार नाही.”\f + \fr 10:38 \fr*\ft \+xt हब 2:4\+xt*\ft*\f* \m \v 39 माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत. \c 11 \s1 कृतिशील विश्वास \p \v 1 विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्‍या गोष्टींबद्दलची खात्री आहे. \v 2 पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते. \p \v 3 विश्वासाद्वारे आपल्याला कळते की सर्व जग परमेश्वराच्या शब्दाने निर्माण झाले; म्हणजे जे दिसते ते दृश्य गोष्टींपासून निर्माण झालेले नाही. \p \v 4 विश्वासाद्वारे हाबेलाने काईनापेक्षा उत्तम अर्पण परमेश्वराकडे आणले. परमेश्वराने त्याची प्रशंसा करून त्याला नीतिमान गणले, आणि हाबेल जरी मरण पावला आहे, तरी विश्वासाद्वारे तो आजही बोलतो. \p \v 5 विश्वासाद्वारे हनोख जिवंत असताना परमेश्वराने त्याला स्वर्गात नेले, त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही: “तो एकाएकी दिसेनासा झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.”\f + \fr 11:5 \fr*\ft \+xt उत्प 5:24\+xt*\ft*\f* हे घडण्यापूर्वी परमेश्वर म्हणाले होते की ते हनोखाच्या बाबतीत अतिशय संतुष्ट होते. \v 6 विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध घेणार्‍यांना ते प्रतिफळ देतात. \p \v 7 विश्वासाद्वारे नोआहने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोआहने विश्वासामुळेच जगाचा धिक्कार केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले. \p \v 8 जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले. \v 9 तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले. \v 10 विश्वासाद्वारे अब्राहाम परमेश्वराने योजलेल्या व पाया बांधून घडविलेल्या शहराची आशेने वाट पाहत होता. \v 11 विश्वासाद्वारे सारा देखील वृद्धापकाळात माता होऊ शकली. परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणे करतीलच हे तिला माहीत होते. \v 12 आणि याप्रमाणे वृद्धापकाळामुळे मूल होण्याची शक्यता नसलेल्या अब्राहामापासून आकाशातील तारे व समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित संख्या असलेल्या वंशजांचा जन्म झाला. \p \v 13 ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते. \v 14 त्यांच्या या बोलण्यावरून ते आपल्या खर्‍या देशाची वाट पाहत होते असे ते दाखवितात. \v 15 त्यांची इच्छा असती तर त्यांनी मागे सोडलेल्या देशात ते परत जाऊ शकले असते, \v 16 पण ते त्यापेक्षाही उत्तम अशा स्वर्गीय देशाची आशा धरून होते आणि म्हणून मी त्यांचा परमेश्वर आहे, असे म्हणण्याची परमेश्वराला लाज वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक शहर सिद्ध केलेले आहे. \p \v 17 परमेश्वर अब्राहामाची परीक्षा घेत असताना त्याने इसहाकाचे अर्पण केले आणि ज्याला वारसाचे वचन प्राप्त झाले होते तो अब्राहाम यज्ञवेदीवर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध करण्यासाठी सिद्ध झाला; \v 18 जरी परमेश्वराने अभिवचन दिले होते: “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.”\f + \fr 11:18 \fr*\ft \+xt उत्प 21:12\+xt*\ft*\f* \v 19 अब्राहामाने तर्क केला की इसहाक मरण पावला तरी परमेश्वर त्याला पुन्हा जिवंत करतील; आणि तसे म्हणावे तर त्याला इसहाक मरणातून पुन्हा जिवंत मिळाला. \p \v 20 विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला. \p \v 21 याकोबानेही, तो वृद्ध झालेला व मृत्युशय्येवर असतानाही उठून व आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने उपासना केली व विश्वासाने प्रार्थना करून योसेफाच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला. \p \v 22 जेव्हा योसेफाचा शेवट जवळ आला, तेव्हा तोही विश्वासाद्वारे बोलला की परमेश्वर इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करतील; त्याने त्याच्या अस्थी संस्काराबद्दल सूचना दिली! \p \v 23 विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही. \p \v 24 मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले, \v 25 व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. \v 26 इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता. \v 27 विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले. \v 28 म्हणूनच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वल्हांडण सण विश्वासाद्वारे साजरा केला आणि कोकराचे रक्त लावले, यासाठी की मृत्युदूताने इस्राएली लोकांच्या ज्येष्ठ मुलांना स्पर्श न करता निघून जावे. \p \v 29 विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले. \p \v 30 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्‍या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली. \p \v 31 विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्‍या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही. \p \v 32 तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही. \v 33 विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली; \v 34 आणि अग्निज्वालांच्या प्रकोपाला थंड केले; काहींचा तलवारीच्या धारेपासून बचाव झाला; काहीजण जे अशक्त होते, ते सबळ झाले; इतरांना लढाईमध्ये मोठे बळ प्राप्त झाले; त्यांनी परकीय सैन्ये परतवून व पळवून लावली. \v 35 काही स्त्रियांना विश्वासाद्वारे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत मिळाले. पण दुसर्‍या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत छळ सोसावा लागला, तरीही सुटका करून घेण्यापेक्षा पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल, असा त्यांचा विश्वास होता. \v 36 काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून तुरुंगात टाकण्यात आले. \v 37 काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण मेंढरांची व बकर्‍याची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले होते. \v 38 हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहेत आणि बिळात राहत असत. \p \v 39 या माणसांनी विश्वासाद्वारे परमेश्वराची मान्यता मिळविली, तरीपण त्यांच्यापैकी कोणालाही परमेश्वराच्या वचनांची फळे मिळाली नाहीत; \v 40 कारण परमेश्वराने आपल्यासाठी ज्या अधिक चांगल्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत त्यामध्ये त्यांनीही वाटेकरी व्हावे, अशी परमेश्वराची योजना होती. \c 12 \p \v 1 यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. \v 2 आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे. \v 3 ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्‍यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही. \s1 परमेश्वर आपल्या लेकरांना शिस्त लावतात \p \v 4 पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही. \v 5 आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले, \q1 “माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस, \q2 त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस, \q1 \v 6 कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात, \q2 आणि ज्या प्रत्येकाला पुत्र म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात.”\f + \fr 12:6 \fr*\ft \+xt नीती 3:11, 12\+xt*\ft*\f* \p \v 7 तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? \v 8 जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत. \v 9 आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे! \v 10 त्यांनी थोडे दिवस त्यांना योग्य वाटली तशी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. \v 11 कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते. \p \v 12 यास्तव, आपले गळणारे हात व निर्बल गुडघे सशक्त करा. \v 13 “आणि तुमच्या पावलांसाठी मार्ग सरळ करा,”\f + \fr 12:13 \fr*\ft \+xt नीती 4:26\+xt*\ft*\f* म्हणजे लंगडे पडून अपंग होणार नाही, उलट बरे होतील. \s1 सतर्कतेचा इशारा व प्रोत्साहन \p \v 14 सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही. \v 15 परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा. \v 16 कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपल्या ज्येष्ठत्वाच्या वतनाचा हक्क विकला, त्या एसावासारखे अनीतिमान होऊ नये, म्हणून लक्ष द्या. \v 17 तुम्हाला माहीत आहे की, त्यानंतर तो हा ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असतानाही त्याचा नकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी जे काही त्याने केले होते ते त्याला बदलता आले नाही. \s1 भयाचा पर्वत आणि हर्षाचा पर्वत \p \v 18 पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही. \v 19 तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.\f + \fr 12:19 \fr*\ft \+xt निर्ग 19:16‑25; 20:18‑20\+xt* पाहावे\ft*\f* \v 20 “एखाद्या पशूने त्या पर्वताला स्पर्श केला, तर त्याला मरेपर्यंत धोंडमार करावी,”\f + \fr 12:20 \fr*\ft \+xt निर्ग 19:12, 13\+xt*\ft*\f* ही परमेश्वराची आज्ञा त्यांच्या सहनशक्ती पलीकडे होती. \v 21 स्वतः मोशे देखील ते दृश्य पाहून इतका घाबरला की तो म्हणाला, “मी भीतीने थरथर कापत आहे.”\f + \fr 12:21 \fr*\ft \+xt अनु 9:19\+xt*\ft*\f* \p \v 22 परंतु तुम्ही सीयोन पर्वतावर, जिवंत परमेश्वराच्या शहरात, स्वर्गीय यरुशलेमात आणि असंख्य देवदूतांच्या आनंदी संमेलनात आला आहात. \v 23 मंडळीतील प्रथम जन्मलेले, ज्यांची नावे स्वर्गात नोंदलेली आहेत त्या मंडळीत तुम्ही आला आहात. सर्वांचा न्याय करणाऱ्या परमेश्वराजवळ, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांच्या आत्म्याजवळ तुम्ही आला आहात. \v 24 तुम्ही येशूंजवळ, जे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत आणि हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम वचन बोलणार्‍या, त्या शिंपडलेल्या रक्ताजवळ आला आहात. \p \v 25 तुमच्याशी जे बोलत आहेत, त्यांच्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळा. कारण जगातील संदेश देणार्‍याची आज्ञा न पाळल्यामुळे इस्राएली लोकांची शिक्षेपासून सुटका झाली नाही, मग स्वर्गातून ताकीद देणार्‍याचे आपण ऐकले नाही, तर आपण किती मोठ्या संकटात सापडू? \v 26 ते बोलले तेव्हा त्यांच्या आवाजाने पृथ्वी हलली, पण आता ते वचन देतात, “केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही पुन्हा हालविणार.”\f + \fr 12:26 \fr*\ft \+xt हाग्ग 2:6\+xt*\ft*\f* \v 27 “पुनः एकदा” चा अर्थ असाच दिसतो की अस्थिर—निर्माण केलेल्या—वस्तू ते काढून टाकतील व नाश होणार नाही अशाच अढळ गोष्टी टिकतील. \p \v 28 आपल्याला असे अविचल राज्य प्राप्त होणार आहे, तेव्हा कृतज्ञ अंतःकरणांनी आणि आदरयुक्त भय बाळगून आपण परमेश्वराची उपासना करू या. \v 29 कारण आपले “परमेश्वर भस्म करणारे अग्नी आहेत.”\f + \fr 12:29 \fr*\ft \+xt अनु 4:24\+xt*\ft*\f* \c 13 \s1 अखेरचा बोध \p \v 1 बंधुप्रीतिमध्ये जडून राहा. \v 2 अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे. \v 3 तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा. \p \v 4 विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्‍यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल. \v 5 द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे, \q1 “मी तुला कधीच सोडणार नाही \q2 व तुला कधीच टाकणार नाही.”\f + \fr 13:5 \fr*\ft \+xt अनु 31:6\+xt*\ft*\f* \m \v 6 म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: \q1 “प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. \q2 नश्वर मानव मला काय करणार?”\f + \fr 13:6 \fr*\ft \+xt स्तोत्र 118:6, 7\+xt*\ft*\f* \p \v 7 तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्‍या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. \v 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. \p \v 9 म्हणून कोणत्याही प्रकारच्या अनोळखी शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. जे खाऊन खाणार्‍याचा जीवनाला काहीच फायदा होत नाही असे विधिविषयक विशिष्ट पदार्थ खाण्याने नव्हे, तर तुमचे अंतःकरण कृपेने बळकट करणे चांगले आहे. \v 10 आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा, मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही. \p \v 11 वधलेल्या पशूंचे रक्त पापार्पण म्हणून महायाजक नियमानुसार परमपवित्रस्थानात नेत असत व नंतर त्या पशूंची शरीरे छावणीबाहेर जाळून टाकीत. \v 12 लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले. \v 13 तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या. \v 14 आपण तर स्वर्गातील भावी नगराची वाट पाहत आहोत, कारण आपल्याला या जगात स्थायी नगर नाही. \p \v 15 तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या. \v 16 चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात. \p \v 17 आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही. \p \v 18 आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे. \v 19 तुमच्याकडे मी लवकर परत यावे म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची विशेष गरज आहे. \s1 आशीर्वाद आणि अंतिम शुभेच्छा \p \v 20 आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत, \v 21 यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. \b \b \p \v 22 बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे. \b \p \v 23 बंधू तीमथ्य हा आता तुरुंगातून सुटला आहे, हे तुम्हाला माहीत असावे, अशी माझी इच्छा आहे; तो इकडे लवकर आला, तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन. \b \p \v 24 मंडळीतील तुमच्या सर्व वडीलजनांस व तेथील इतर पवित्र जणांना माझ्या शुभेच्छा सांगा. \p माझ्याबरोबर येथे इटलीमध्ये असलेले विश्वासी बांधव तुम्हाला शुभेच्छा सांगतात. \b \p \v 25 तुम्हा सर्वांवर परमेश्वराची कृपा असो.