\id HAG - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h हाग्गय \toc1 हाग्गयाची भविष्यवाणी \toc2 हाग्गय \toc3 हाग्ग \mt1 हाग्गयाची भविष्यवाणी \c 1 \s1 याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीचे आव्हान \p \v 1 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन हाग्गय संदेष्ट्याला यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, व प्रमुख याजक, यहोसादाकाचा\f + \fr 1:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa योसादक\fqa*\f* पुत्र यहोशुआ यांना उद्देशून आला: \p \v 2 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे लोक म्हणतात, ‘याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीची योग्य वेळ अजून आलेली नाही.’ ” \p \v 3 मग हाग्गय संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले: \v 4 “भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?” \p \v 5 सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या. \v 6 तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.” \p \v 7 सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या. \v 8 पर्वतावर जा आणि लाकडे घेऊन या आणि माझे भवन बांधा. म्हणजे मी त्यात संतोष पावेन आणि गौरवित होईन,” असे याहवेह म्हणतात. \v 9 “तुम्ही पुष्कळाची आशा केली, परंतु पाहा, तुम्हाला किती थोडेसे मिळाले. तुम्ही जे घरी आणले, मी ते फुंकर घालून उडविले का? सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, कारण माझे भवन ओसाड पडलेले आहे आणि तुम्ही स्वतःच्या घरात व्यस्त आहात. \v 10 म्हणून तुमच्यामुळे आकाशाने त्याचे दव आणि पृथ्वीने तिची उपज आवरून धरले आहे. \v 11 मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.” \b \p \v 12 तेव्हा यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक, आणि देशातील अवशिष्ट लोकांनी त्यांचे परमेश्वर याहवेहच्या वाणीचे व हाग्गयाला मिळालेल्या संदेशाचे पालन केले, कारण त्यांचे परमेश्वर याहवेहनेच त्याला पाठविले होते आणि लोकांना याहवेहचे भय वाटू लागले. \p \v 13 मग याहवेहचा संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहने लोकांना संदेश पाठविला: “मी तुम्हाबरोबर आहे,” याहवेह जाहीर करतात. \v 14 याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली. \v 15 हे सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले. \s1 नवीन भवनाच्या गौरवाचे अभिवचन \p दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे घडले. \c 2 \nb \v 1 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी, हाग्गय संदेष्ट्याद्वारे याहवेहचे हे वचन आले: \v 2 शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, यहूदीयाचा राज्यपाल व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक आणि देशातील अवशिष्ट लोकांशी बोल. त्यांना विचार, \v 3 “या भवनाची पूर्वीची भव्यता कशी होती हे सांगण्यास तुमच्यातील कोणी उरले आहे काय? हे सध्याचे काहीच नाही असे तुम्हाला वाटते ना? \v 4 परंतु हे जरूब्बाबेला, बलवंत हो. हे प्रमुख याजका यहोशुआ, यहोसादाकाच्या पुत्रा बलवंत हो. या देशातील सर्व लोकहो, बलवंत व्हा आणि कामाला लागा, याहवेह जाहीर करतात. कारण ‘मी तुम्हाबरोबर आहे,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \v 5 ‘कारण तुम्ही इजिप्त देश सोडला, तेव्हाच मी तुम्हाला अभिवचन दिले होते की माझा आत्मा तुम्हामध्ये वास करेल. भिऊ नका.’ \p \v 6 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘थोड्या वेळात मी आकाश, पृथ्वी, सागर आणि कोरडी भूमी पुन्हा हलविणार आहे. \v 7 मी सर्व राष्ट्रे हलवेन आणि सर्व राष्ट्रांची जी इच्छा आहे ते येईल आणि मी गौरवाने हे स्थान भरेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. \v 8 ‘रुपे माझे आहे व सोनेही माझे आहे,’ सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. \v 9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, ‘सध्याच्या या भवनाचे वैभव पहिल्या भवनाच्या वैभवापेक्षा श्रेष्ठ असेल, या स्थळात मी शांती बहाल करेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.” \s1 भ्रष्ट लोकांसाठी आशीर्वाद \p \v 10 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहचे हे वचन आले: \v 11 “सर्वसमर्थ याहवेहचे असे म्हणणे आहे: ‘याजकांना विचार नियमशास्त्र काय म्हणते: \v 12 तुमच्यापैकी कोणी आपल्या झग्यामध्ये पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्यावेळी त्याच्या झग्याचा स्पर्श भाकर, द्राक्षारस अथवा मांस यांना झाला, तर स्पर्श झालेला पदार्थ पवित्र होईल काय?’ ” \p त्यावर याजकांनी उत्तर दिले, “नाही.” \p \v 13 मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” \p याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.” \p \v 14 नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात. \p \v 15 “ ‘आता तुम्ही आजपासून\f + \fr 2:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa मागील दिवसांचा\fqa*\f* गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती. \v 16 जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे. \v 17 तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात. \v 18 ‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा: \v 19 धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. \p “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ” \s1 जरूब्बाबेल याहवेहच्या बोटातील मुद्रेची अंगठी \p \v 20 त्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी याहवेहकडून हाग्गयला दुसऱ्यांदा वचन आले: \v 21 “यहूदीयाचा राज्यपाल जरूब्बाबेलला सांग, मी आकाश व पृथ्वी हलवून सोडणार आहे. \v 22 सर्व राष्ट्रांमधील राजासने उलथून टाकेन व परकियांचे सामर्थ्य डळमळीत करणार आहे. मी त्यांचे रथ व त्यांचे सारथी उलथून टाकेन; घोडे व त्यावरील स्वार पडतील, प्रत्येकजण त्याच्या भावाच्या तलवारीने पडेल. \p \v 23 “ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”