\id HAB - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h हबक्कूक \toc1 हबक्कूकची भविष्यवाणी \toc2 हबक्कूक \toc3 हब \mt1 हबक्कूकची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 संदेष्टा हबक्कूकला प्राप्त झालेली ही भविष्यवाणी आहे: \b \s1 हबक्कूकची तक्रार \q1 \v 2 हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? \q2 पण तुम्ही ऐकत नाहीत? \q1 मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” \q2 पण तुम्ही वाचवित नाहीत. \q1 \v 3 तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? \q2 तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? \q1 विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; \q2 वाद व कलह वाढत आहेत. \q1 \v 4 म्हणून कायदा नेभळा झाला आहे, \q2 आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही, \q1 दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे, \q2 म्हणून कायदा विपरीत केला जातो. \s1 याहवेहचे उत्तर \q1 \v 5 “देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ— \q2 आणि अत्यंत आश्चर्यचकित हो. \q1 कारण आता मी तुझ्या काळात जे कार्य करणार आहे \q2 जरी ते तुला सांगितले तरी \q2 त्यावर तुझा विश्वास बसणार नाही. \q1 \v 6 मी बाबेलच्या\f + \fr 1:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa खास्दी\fqa*\f* लोकांना उभारणार आहे, \q2 ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत, \q1 जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत \q2 ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील. \q1 \v 7 ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत; \q2 ते स्वतःचाच कायदा बनवितात \q2 आणि स्वतःचाच मान राखतात. \q1 \v 8 त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, \q2 संधिप्रकाशात फिरणार्‍या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. \q1 त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; \q2 त्यांचे स्वार दूर देशातून येतात. \q1 भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात; \q2 \v 9 हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात, \q1 वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते \q2 आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात. \q1 \v 10 ते राजांचा उपहास करतात \q2 आणि अधिपतींची चेष्टा करतात. \q1 त्यांच्या सर्व तटबंदीच्या नगरांचे हंसे करतात; \q2 ते मातीचे ढिगारे उभे करून किल्ले काबीज करतात. \q1 \v 11 वार्‍याप्रमाणे ते झपाट्याने येतात आणि पुढे निघून जातात— \q2 ते अपराधी लोक, ज्यांचे सामर्थ्य त्यांच्या दैवतांपासून आहे.” \s1 हबक्कूकची दुसरी तक्रार \q1 \v 12 हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? \q2 माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. \q1 हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; \q2 आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे. \q1 \v 13 तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; \q2 तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. \q1 मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? \q2 जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, \q2 तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता? \q1 \v 14 तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे, \q2 जसे काही समुद्री जीव, ज्यांचा कोणी शासक नसतो. \q1 \v 15 दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो, \q2 तो त्यांना जाळ्यात पकडतो, \q1 मग तो त्यांना त्याच्या अडणीजाळ्यात जमा करतो, \q2 आणि तो आनंदित व उल्हासित होतो. \q1 \v 16 म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो \q2 व अडणीजाळ्यापुढे धूप जाळतो, \q1 कारण त्याच्या जाळ्यामुळेच तो धनवान होतो \q2 आणि आपल्या मनपसंद भोजनाचा आस्वाद घेतो. \q1 \v 17 तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय, \q2 निर्दयीपणे देशांना नष्ट करीत राहणार आहे काय? \b \c 2 \q1 \v 1 मी पहारा देण्यासाठी उभा राहीन \q2 आणि टेहळणीच्या बुरुजावर चढेन; \q1 मी बघेन व ते मला काय उत्तर देतात हे पाहेन \q2 आणि या तक्रारीला मी काय उत्तर द्यावे ते पाहेन.\f + \fr 2:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझा निषेध झाला असता मी काय उत्तर द्यावे\fqa*\f* \s1 याहवेहचे उत्तर \p \v 2 तेव्हा याहवेहने उत्तर दिले: \q1 “हे प्रगटीकरण लिही \q2 आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही \q2 म्हणजे घोषणा करणारा\f + \fr 2:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa जो वाचत आहे\fqa*\f* धावतांनाही वाचू शकेल. \q1 \v 3 कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; \q2 ते अंत समयाबद्धल बोलते \q2 आणि ते खोटे ठरत नाही. \q1 जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; \q2 ते\f + \fr 2:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याची वाट पाहा\fqa*\f* निश्चितच येईल \q2 आणि त्याला उशीर होणार नाही. \b \b \q1 \v 4 “बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; \q2 त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— \q2 पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल. \q1 \v 5 खरोखर, मद्य त्यांचा घात करते; \q2 तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही. \q1 कारण तो कबरेसारखा लोभी आहे \q2 आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही, \q1 तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे, \q2 आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे. \p \v 6 “ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, \q1 “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो \q2 आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! \q2 हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’ \q1 \v 7 तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय? \q2 ते उठून तुमचा थरकाप करणार नाहीत काय? \q2 मग तुम्ही त्यांचे सावज बनाल. \q1 \v 8 कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे, \q2 मग जे राहिलेले लोक आहेत, ते तुमची लूट करतील. \q1 तुम्ही मनुष्यांचे रक्त वाहिले आहे; \q2 तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला. \b \q1 \v 9 “धिक्कार असो त्याचा, जो अन्यायाच्या कमाईने त्याचे घर बांधतो, \q2 विनाशापासून पळ काढावा म्हणून \q2 जो उंच ठिकाणी आपले घरटे बांधतो! \q1 \v 10 तुम्ही अनेक लोकांच्या नाशाचे कारस्थान करून, \q2 व घराचे दार इतरांकरिता बंद करून, स्वतःचा जीव गमाविला. \q1 \v 11 खुद्द तुमच्या घरातील भिंतीचे दगडच आक्रोश करतील, \q2 आणि छताच्या तुळया तो प्रतिध्वनित करतील. \b \q1 \v 12 “धिक्कार असो, जो रक्तपात करून शहरे बांधतो \q2 आणि अन्यायाने नगर वसवितो! \q1 \v 13 लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे, \q2 आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे \q2 असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय? \q1 \v 14 कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे \q2 तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल. \b \q1 \v 15 “धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो, \q2 ते मद्यधुंद होईपर्यंत थेट पखालीतून ओतून पाजतो, \q2 म्हणजे तो त्यांची विवस्त्र शरीरे पाहू शकेल! \q1 \v 16 तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. \q2 आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या\f + \fr 2:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa झोकांड्या घ्या\fqa*\f*! \q1 याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, \q2 आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल. \q1 \v 17 लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल, \q2 आणि तुम्ही केलेला प्राण्यांचा नाश तुम्हाला भयभीत करेल, \q1 कारण तुम्ही मनुष्याचे रक्त वाहिले आहे; \q2 तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला आहे. \b \q1 \v 18 “मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे? \q2 किंवा प्रतिमा, जी असत्य शिकविते? \q1 स्वतःच्या हस्तकृतीवर भरवसा ठेवणारे; \q2 तो मूर्ती घडवितो जी बोलू शकत नाही. \q1 \v 19 धिक्कार असो, जो लाकडाला म्हणतो, ‘जिवंत हो!’ \q2 किंवा निर्जीव दगडाला म्हणतो, ‘जागा हो!’ \q1 ते मार्गदर्शन करू शकतात काय? \q2 त्या सोन्याने व रुप्याने मढविलेल्या आहेत; \q2 पण त्यांच्यात श्वास नाही.” \b \q1 \v 20 परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; \q2 सर्व पृथ्वी त्यांच्या पुढे स्तब्ध राहो. \c 3 \s1 हबक्कूकची प्रार्थना \d \v 1 ही हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना. शिगयोनोथच्या शैलीत. \q1 \v 2 हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे; \q2 मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे. \q1 आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा, \q2 आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या; \q2 क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या. \b \q1 \v 3 परमेश्वर तेमान वरून आले, \q2 परमपवित्र पारान पर्वतावरून आले. \qs सेला\qs*\f + \fr 3:3 \fr*\fq सेला \fq*\ft या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे\ft*\f* \q1 त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे \q2 व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे. \q1 \v 4 त्यांचे तेज सूर्योदयेसारखे होते; \q2 किरणे त्यांच्या हातांतून चकाकत बाहेर निघत होती, \q2 जिथे त्यांचे सामर्थ्य लपलेले होते. \q1 \v 5 महामारी त्यांच्या पुढे चालते; \q2 घातकी रोग त्यांच्यामागे चालतात. \q1 \v 6 ते थांबले व त्यांनी पृथ्वीस हालवून टाकले; \q2 त्यांनी बघितले व देशास थरकाप आणला. \q1 पुरातन पर्वतांचा चुराडा झाला \q2 प्राचीन डोंगर ढासळले— \q2 परंतु ते सर्वकाळ मार्गस्थ आहेत. \q1 \v 7 कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, \q2 व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले. \b \q1 \v 8 हे याहवेह, तुम्ही नद्यांवर संतापला होता काय? \q2 झऱ्यांविरुद्ध तुमचा कोप होता काय? \q1 जेव्हा जय मिळविण्यासाठी तुम्ही अश्वारूढ झालात \q2 व तुमच्या रथात स्वार झालात, \q2 तेव्हा तुम्ही समुद्राविरुद्ध क्रोधित झाला होता काय? \q1 \v 9 तुम्ही तुमचे धनुष्य बाहेर काढले, \q2 व अनेक बाण मागविले. \qs सेला\qs* \q1 नद्यांनी भूमी विभागली; \q2 \v 10 पर्वतांनी हे पाहिले आणि ते कंपित झाले. \q1 पाण्याचा प्रखर प्रवाह झपाट्याने आला; \q2 खोल समुद्र गरजला \q2 आणि त्याने आपल्या लाटा उंच उफाळल्या. \b \q1 \v 11 तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने \q2 विजेप्रमाणे चकाकणार्‍या तुमच्या भाल्याच्या प्रकाशाने \q2 सूर्य व चंद्र आकाशात स्तब्ध उभे राहिले. \q1 \v 12 क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला \q2 आणि संतापाने तुम्ही राष्ट्रांना पायदळी तुडविले. \q1 \v 13 तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व \q2 अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात. \q1 तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला \q2 आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले. \qs सेला\qs* \q1 \v 14 आमची दाणादाण करण्यासाठी त्यांचे योद्धे धावून आले, \q2 तेव्हा त्याने स्वतःच्याच भाल्याने आपले मस्तक छेदून घेतले, \q1 लपलेल्या दुष्टास जणू तो गिळंकृत करेल \q2 अशा हावरटपणाने तो आला. \q1 \v 15 तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले, \q2 की महाजलाशय घुसळले. \b \q1 \v 16 मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, \q2 भीतीने माझे ओठ कापू लागले; \q1 माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, \q2 आणि माझे पाय थरथरू लागले. \q1 तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर \q2 येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन. \q1 \v 17 अंजिरांची झाडे ना बहरली \q2 आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, \q1 जैतुनाचे सर्व पीक बुडाले \q2 आणि शेते नापीक झाली, \q1 जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, \q2 गोठ्यात गुरे नाहीत, \q1 \v 18 तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; \q2 मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन. \b \q1 \v 19 सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; \q2 मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास \q2 ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील. \d गायकवर्गाच्या संचालकास सूचना: हे कवन गाताना तंतुवाद्यांची साथ असावी.