\id GEN - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h उत्पत्ती \toc1 उत्पत्तीचे पुस्तक \toc2 उत्पत्ती \toc3 उत्प \mt1 उत्पत्तीचे पुस्तक \c 1 \s1 प्रारंभ \p \v 1 परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली. \v 2 आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. \b \p \v 3 नंतर परमेश्वराने म्हटले: “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. \v 4 परमेश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे आणि त्यांनी अंधारापासून प्रकाश वेगळा केला. \v 5 परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. \b \p \v 6 पुन्हा परमेश्वराने म्हटले, “जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलापासून जलांची विभागणी करो.” \v 7 परमेश्वराने अंतराळ निर्माण केले व अंतराळाच्या वरचे जल आणि खालचे जल अशी विभागणी केली आणि तसे घडून आले. \v 8 परमेश्वराने अंतराळास “आकाश” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. \b \p \v 9 नंतर परमेश्वराने म्हटले: “अंतराळाखालील जले एकत्र येवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे घडून आले. \v 10 परमेश्वराने कोरड्या जमिनीस “भूमी” व जलांच्या संचयास “सागर” अशी नावे दिली. परमेश्वराने पाहिले की, हे चांगले आहे. \p \v 11 मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्‍या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले. \v 12 भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. \v 13 आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा तिसरा दिवस. \b \p \v 14 त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत. \v 15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी त्या ज्योती आकाशमंडळात दीप होवोत” आणि तसे घडून आले. \v 16 परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले. \v 17 परमेश्वराने त्या ज्योती पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आकाशमंडळात ठेवल्या, \v 18 दिवसावर व रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी आणि प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी या ज्योती त्यांनी निर्माण केल्या. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. \v 19 आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस. \b \p \v 20 आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.” \v 21 सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. \v 22 परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.” \v 23 आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस. \b \p \v 24 मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले. \v 25 परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे. \p \v 26 मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू\f + \fr 1:26 \fr*\ft इतर काही हस्तलिखितांनुसार \ft*\fqa पृथ्वी\fqa*\f* आणि जमिनीवर सरपटणार्‍या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.” \q1 \v 27 याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली. \q2 त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले. \q2 पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले. \p \v 28 मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्‍या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा.” \p \v 29 मग परमेश्वर म्हणाले, “पाहा, भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळांमध्येच वृक्ष निर्माण करणारे बीज असलेले प्रत्येक फळझाड मी तुम्हाला दिले आहे. ती तुमचे अन्न होतील. \v 30 त्याप्रमाणे पृथ्वीतलावरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, तसेच जमिनीवर सरपटत जाणारा, जीवनाचा श्वास असलेला प्रत्येक प्राणी—यांना अन्न म्हणून मी हिरवी वनस्पती देत आहे” आणि तसे घडून आले. \p \v 31 परमेश्वराने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली आणि ती अतिशय चांगली होती आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा सहावा दिवस. \b \c 2 \p \v 1 अशा रीतीने आकाश, पृथ्वी व त्यातील सर्वांची निर्मिती पूर्ण झाली. \b \p \v 2 परमेश्वराने सातव्या दिवसापर्यंत त्यांचे काम संपविले, म्हणून सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून त्यांनी विश्रांती घेतली. \v 3 सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली. \s1 आदाम आणि हव्वा \p \v 4 याहवेह परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, त्याचा हा वृतांत आहे: जेव्हा याहवेह परमेश्वराने पृथ्वी व आकाशाची निर्मिती केली. \b \p \v 5 जमिनीवर अद्याप वनस्पती उगवली नव्हती, कारण याहवेह परमेश्वराने अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यासाठी कोणी मनुष्य नव्हता. \v 6 मात्र जमिनीवरून धुके\f + \fr 2:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa धुरासारखे जलबिंदूचे पटल\fqa*\f* वर जात असे आणि त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे. \v 7 मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य\f + \fr 2:7 \fr*\ft हिब्रूमध्ये \ft*\fqa मानव\fqa*\f* घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला. \p \v 8 नंतर याहवेह परमेश्वराने पूर्वेकडे, एदेनमध्ये एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. \v 9 याहवेह परमेश्वराने सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली—डोळ्यांना आनंद देणारे व खाण्यास उत्तम असलेले जीवनवृक्ष आणि बर्‍यावाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष हे देखील बागेच्या मध्यभागी लावले. \p \v 10 बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली व वाहू लागली आणि ती विभागून तिच्या चार नद्या झाल्या \v 11 पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते. \v 12 त्या प्रदेशातील सोने उत्तम प्रतीचे असून तिथे मोती\f + \fr 2:12 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa सुवासिक डिंक\fqa*\f* व गोमेद रत्नेही सापडतात. \v 13 दुसर्‍या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या\f + \fr 2:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa मेसोपोटेमिया\fqa*\f* सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते. \v 14 तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल\f + \fr 2:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्याला आज टायग्रीस म्हणून ओळखले जाते\fqa*\f* असून ती अश्शूरच्या पूर्वेस वाहत जाते; आणि चौथ्या नदीचे नाव फरात\f + \fr 2:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्याला आज युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते\fqa*\f* असे आहे. \p \v 15 याहवेह परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. \v 16 याहवेह परमेश्वराने मनुष्याला आज्ञा केली, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तू खुशाल खा; \v 17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.” \p \v 18 याहवेह परमेश्वर म्हणाले, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन.” \p \v 19 याहवेह परमेश्वराने भूमीपासून प्रत्येक जातीचे वन्यपशू, आकाशातील सर्व पक्षी निर्माण केले. त्यांना मानव कोणती नावे देतो हे पाहण्याकरिता त्याच्याकडे आणले; आणि त्याने जी नावे दिली तीच त्यांची नावे पडली. \v 20 याप्रकारे मानवाने सर्व पाळीव प्राण्यांना, आकाशातील पक्ष्यांना आणि जमिनीवरील सर्व पशूंना नावे दिली. \p परंतु आदामाला योग्य असा मदतनीस त्यांच्यामध्ये नव्हता. \v 21 नंतर याहवेह परमेश्वराने मानवाला\f + \fr 2:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa आदामाला\fqa*\f* गाढ निद्रा आणली आणि तो झोपेत असताना याहवेह परमेश्वराने त्याची एक फासळी काढली आणि ती जागा त्यांनी मांसाने भरून काढली. \v 22 याहवेह परमेश्वराने मानवाची जी फासळी काढली, त्याची त्यांनी एक स्त्री निर्माण केली आणि तिला त्यांनी मानवाकडे आणले. \p \v 23 तेव्हा मानव म्हणाला, \q1 “ही माझ्या हाडाचे हाड \q2 आणि मांसाचे मांस आहे; \q1 हिला नारी असे म्हणतील, \q2 कारण ती नरापासून बनविली आहे.” \m \v 24 या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील. \p \v 25 आदाम आणि त्याची पत्नी हे दोघेही नग्न होती, परंतु त्यांना लज्जा वाटत नव्हती. \c 3 \s1 मानवाचे पतन \p \v 1 आता याहवेह परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व वन्यप्राण्यांमध्ये सर्प सर्वात धूर्त होता. त्याने स्त्रीला म्हटले, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये असे परमेश्वराने खरोखरच म्हटले आहे काय?” \p \v 2 स्त्री सर्पाला म्हणाली, “आम्हाला बागेतील झाडांची फळे खाण्याची मुभा आहे. \v 3 पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ” \p \v 4 पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही, \v 5 कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.” \p \v 6 जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले. \v 7 पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली. \p \v 8 सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली. \v 9 परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?” \p \v 10 आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.” \p \v 11 याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?” \p \v 12 त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.” \p \v 13 तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?” \p त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.” \p \v 14 याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून, \q1 “तू सर्व पाळीव प्राण्यांहून, \q2 आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस! \q1 तू तुझ्या पोटावर सरपटशील \q2 आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस \q2 माती खाशील. \q1 \v 15 तू आणि स्त्री, \q2 तुझी संतती\f + \fr 3:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa बीज\fqa*\f* आणि तिची संतती यामध्ये \q2 मी शत्रुत्व निर्माण करेन; \q1 तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल\f + \fr 3:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa फोडेल\fqa*\f* \q2 आणि तू त्याची टाच फोडशील.” \p \v 16 नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, \q1 “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; \q2 वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, \q1 तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, \q2 आणि तो तुजवर सत्ता गाजवील.” \p \v 17 नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, \q1 “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; \q2 तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस \q2 अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील. \q1 \v 18 भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, \q2 आणि तू शेतातील पीक खाशील. \q1 \v 19 ज्यामधून तू घडविला गेलास \q2 त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत \q1 तू घाम गाळून अन्न खाशील, \q2 कारण तू माती आहेस \q2 आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.” \p \v 20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा\f + \fr 3:20 \fr*\ft संभावित अर्थ \ft*\fqa सजीव\fqa*\f* असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती. \p \v 21 याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली. \v 22 नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.” \v 23 म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले. \v 24 अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस\f + \fr 3:24 \fr*\ft किंवा \ft*\fqa च्या समोर\fqa*\f* करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली. \c 4 \s1 काईन आणि हाबेल \p \v 1 मग आदामाने आपली पत्नी हव्वा हिच्याशी प्रीती संबंध केला, तेव्हा ती गर्भवती झाली आणि तिने काईन\f + \fr 4:1 \fr*\fq काईन \fq*\ft अर्थात् \ft*\fqa प्राप्त केलेले\fqa*\f* नावाच्या मुलाला जन्म दिला. ती म्हणाली, “याहवेहच्या साहाय्याने मी एका पुरुषाला प्राप्त केले आहे.” \v 2 नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. \p हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता. \v 3 हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले. \v 4 हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले, \v 5 पण काईनाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले नाही, म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला. \p \v 6 याहवेहने काईनला विचारले, “तू का संतापलास? तुझ्या चेहर्‍यावर निराशा का दिसते? \v 7 तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.” \p \v 8 एके दिवशी काईन आपला भाऊ हाबेलास म्हणाला, “चल, आपण शेतात जाऊ.” त्याप्रमाणे शेतात गेल्यावर काईनाने आपल्या भावावर हल्ला करून त्याचा वध केला. \p \v 9 मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” \p “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” \p \v 10 याहवेह त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आता ऐक, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारीत आहे. \v 11 ज्या भूमीने तुझ्या भावाचे रक्त स्वीकारण्यास आपले मुख उघडले आहे, त्या भूमीतून तुला हद्दपार करण्यात आले आहे आणि तू शापित आहेस. \v 12 त्या भूमीवर तू कष्ट केलेस तरी ती तुला उपज देणार नाही. तू बेचैन असा पृथ्वीवर भटकशील.” \p \v 13 काईन याहवेहला म्हणाला, “मला मिळालेली शिक्षा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. \v 14 कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.” \p \v 15 यावर याहवेहने त्याला उत्तर दिले, “असे होणार नाही, जर कोणी काईनाचा जीव घेईल, तर त्याला मी तुला दिलेल्या शिक्षेपेक्षा सातपट शिक्षा देईन” आणि मग त्याचा वध कोणीही करू नये, असा इशारा देणारी एक खूण याहवेहने काईनावर केली. \v 16 मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद\f + \fr 4:16 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa भटकंती\fqa*\f* नावाच्या देशात वस्ती करून राहिला. \p \v 17 पुढे काईनाने त्याच्या पत्नीशी वैवाहिक प्रीती संबंधात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली. तिने हनोख नावाच्या पुत्राला जन्म दिला. त्यावेळी काईन एक नगर बांधत होता, त्याने आपल्या पुत्राचे, हनोख हे नाव त्या नगराला दिले. \v 18 हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता. \p \v 19 लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले. \v 20 आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्‍या व तंबू ठोकून राहणार्‍या लोकांचा मूळ पुरुष झाला. \v 21 त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. \v 22 लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती. \p \v 23 एके दिवशी लामेख आपल्या पत्नींना म्हणाला, \q1 आदाह व सिल्ला माझे ऐका, \q2 “लामेखाच्या पत्नींनो, माझे बोलणे ऐका. \q1 एका तरुणाने माझ्यावर हल्ला करून मला जखमी केले. \q2 पण त्या तरुणाला मी ठार मारले आहे. \q1 \v 24 जर काईनाबद्दल सातपट \q2 तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल.” \p \v 25 आदामाने हव्वेशी पुन्हा प्रीती संबंध केला आणि हव्वेने पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शेथ\f + \fr 4:25 \fr*\fq शेथ \fq*\ft म्हणजे \ft*\fqa बक्षीस दिलेला\fqa*\f* असे ठेवले, कारण ती म्हणाली, “काईनाने ठार केलेल्या हाबेल या माझ्या पुत्राच्या जागी परमेश्वराने मला दुसरा पुत्र दिला आहे.” \v 26 शेथ मोठा झाल्यावर त्यालाही एक पुत्र झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले. \p त्याच्या हयातीत लोकांनी याहवेहच्या नावाने आराधना करण्यास प्रारंभ केला. \c 5 \s1 आदाम ते नोआह पर्यंत \p \v 1 ही आदामाची लिखित वंशावळी आहे. \b \p जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले. \v 2 परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात”\f + \fr 5:2 \fr*\ft हिब्रूमध्ये \ft*\fqa आदाम\fqa*\f* असे नाव दिले. \b \li1 \v 3 आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले. \v 4 शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 5 आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 6 शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला. \v 7 अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 8 शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 9 अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला. \v 10 केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 11 अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 12 केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला. \v 13 महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 14 केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 15 महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला. \v 16 यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 17 महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 18 यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला. \v 19 हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 20 यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 21 हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला. \v 22 मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 23 हनोख एकंदर 365 वर्षे जगला. \v 24 हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले. \li1 \v 25 मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला. \v 26 लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 27 मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 28 लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला. \v 29 त्याने त्याचे नाव नोआह\f + \fr 5:29 \fr*\ft किंवा \ft*\fqa नोआह \fqa*\ft अर्थात् \ft*\fqa दिलासा किंवा विसावा\fqa*\f* असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.” \v 30 नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. \v 31 लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. \li1 \v 32 नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला. \c 6 \s1 जगातील दुष्टाई \p \v 1 पृथ्वीवर मानवाची संख्या खूप वाढू लागली आणि त्यांना कन्या झाल्या. \v 2 परमेश्वराच्या पुत्रांनी बघितले की मानवाच्या कन्या सुंदर आहेत; आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. \v 3 तेव्हा याहवेह म्हणाले, “माझा आत्मा मानवासोबत वादविवाद करीत राहणार नाही,\f + \fr 6:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझा आत्मा त्यांच्यात वसणार नाही\fqa*\f* कारण ते दैहिक\f + \fr 6:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa भ्रष्ट\fqa*\f* आहेत आणि त्यांचा जीवनकाल एकशेवीस वर्षे असेल.” \p \v 4 त्या दिवसात—आणि नंतरच्या काळातही—महाबलाढ्य मानव पृथ्वीवर वास करीत होते, जेव्हा परमेश्वराच्या पुत्रांनी मानवकन्यांशी विवाह केला, त्यांना संतती झाली. तेच जुन्या काळातील समर्थ आणि प्रसिद्ध मानव झाले. \p \v 5 पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले. \v 6 आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या. \v 7 म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.” \v 8 परंतु नोआहवर याहवेहची कृपादृष्टी झाली. \s1 नोआह आणि जलप्रलय \p \v 9 नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा. \b \p नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला. \v 10 नोआहला शेम, हाम व याफेथ हे तीन पुत्र झाले. \p \v 11 परमेश्वराच्या दृष्टीने पृथ्वी पापाने भ्रष्ट झालेली आणि हिंसाचाराने पूर्णपणे भरलेली होती. \v 12 जग किती पातकी झाले आहे आणि समस्त मानवजात किती भ्रष्ट झाली आहे हे परमेश्वराने पाहिले. \v 13 तेव्हा परमेश्वर नोआहला म्हणाले, “मी सर्व मनुष्यांचा नाश करेन, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरून गेली आहे. मी निश्चितपणे त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करणार आहे. \v 14 तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. \v 15 ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच\f + \fr 6:15 \fr*\ft अंदाजे 135 मीटर लांब, 23 मीटर रुंद, 14 मीटर उंच\ft*\f* असावे. \v 16 त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच\f + \fr 6:16 \fr*\ft अंदाजे 45 सें.मी.\ft*\f* असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर. \v 17 मी पृथ्वी महापुराने भरून टाकणार आहे आणि आकाशाखाली ज्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक सजीव प्राण्याचा मी नाश करणार आहे. पृथ्वीवर जे काही आहे त्याचा नाश होईल. \v 18 परंतु मी तुझ्यासोबत करार स्थापित करेन—तू आणि तुझे पुत्र आणि तुझी पत्नी व तुझ्या पुत्रांच्या पत्नी हे तारवात प्रवेश करतील. \v 19 तू प्रत्येक जातीचे दोन-दोन पशू, एक नर व एक मादी, अशा जोड्या जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात घेऊन ये. \v 20 प्रत्येक प्रकारचे पक्षी, प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्रत्येकी दोन-दोन प्राणी जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. \v 21 आणि खावयाचे सर्वप्रकारचे अन्न घे आणि ते स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी साठवून ठेव.” \p \v 22 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले. \c 7 \p \v 1 याहवेह नोआहला म्हणाले, “तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे. \v 2 तुझ्याबरोबर शुद्ध अशा प्राण्यांच्या प्रत्येक जातीच्या नर व मादी अशा सात जोड्या आणि अशुद्ध प्राण्यांच्या प्रत्येक जातीची नर व मादी अशी एकच जोडी ने, \v 3 आणि प्रत्येक जातीच्या पक्ष्याच्या नरमादीच्या सात जोड्या, म्हणजे पृथ्वीवर त्यांचे विविध प्रकार जिवंत राहतील. \v 4 आजपासून बरोबर सात दिवसानंतर मी पृथ्वीवर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पाडेन आणि मी निर्माण केलेल्या सर्व जिवंत प्राण्यांना पृथ्वीवरून नष्ट करून टाकेन.” \p \v 5 याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नोआहने सर्वकाही केले. \p \v 6 जलप्रलय आला, तेव्हा नोआह सहाशे वर्षांचा होता. \v 7 जलप्रलयापासून वाचण्यासाठी नोआह आणि त्याचे पुत्र आणि त्याची पत्नी, व पुत्रांच्या पत्नी यांनी तारवात प्रवेश केला. \v 8 तारवात त्याच्याबरोबर शुद्ध आणि अशुद्ध पशू, पक्षी व सरपटणारे प्राणी होते. \v 9 परमेश्वराने नोआहला आज्ञा दिल्याप्रमाणे ते सर्व प्राणी नर व मादी अशा जोडीने तारवात आले. \v 10 आणि सात दिवसानंतर पृथ्वीवर जलप्रलय आला. \p \v 11 नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्‍यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली. \v 12 आणि पृथ्वीवर आकाशातून चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला. \p \v 13 त्याच दिवशी नोआह आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांच्या पत्नी तारवात गेले. \v 14 त्यांच्याबरोबर प्रत्येक वन्यजातीचे प्राणी, सर्वप्रकारचे पाळीव पशू, जमिनीवर सरपटणारे प्राणी आणि प्रत्येक जातीचे, पंख असलेले सर्व पक्षी तारवात गेले. \v 15 ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक जातीच्या प्राण्यांची एकएक जोडी नोआहकडे आली आणि त्यांनी नोआहसोबत तारूत प्रवेश केला. \v 16 नर व मादी असे ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जोडीजोडीने आले. मग याहवेहने त्यांना आत ठेवून तारवाचे दार बंद केले. \p \v 17 जलप्रलय चाळीस दिवस चालू होता. यामुळे सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली आणि तारू पृथ्वीच्यावर पाण्यात तरंगू लागले. \v 18 पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले. \v 19 शेवटी पाणी इतके वाढले की, आकाशाखाली असलेले सर्व उंच पर्वतदेखील बुडून गेले. \v 20 पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा\f + \fr 7:20 \fr*\fq पंधरा हात \fq*\ft अंदाजे \ft*\fqa 6.8 मीटर\fqa*\f* जास्त खोलीपर्यंत झाकले. \v 21 पृथ्वीवर जिवंत असलेले सर्व प्राणी नष्ट झाले—त्यात आकाशातील पक्षी, पाळीव जनावरे, वन्यपशू, सरपटणारे प्राणी आणि अखिल मानवजात या सर्वांचा समावेश होता. \v 22 कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला. \v 23 पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले. \p \v 24 पृथ्वी पाण्याच्या पुराखाली दीडशे दिवस राहिली. \c 8 \p \v 1 परमेश्वराने नोआह आणि तारवातील सर्व पाळीव व वन्यप्राण्यांचे स्मरण केले. त्यांनी पृथ्वीवरून वाहण्यासाठी वारा पाठविला आणि पुराचे पाणी ओसरू लागले. \v 2 पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला. \v 3 पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले. \v 4 आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले. \v 5 पाणी ओसरू लागले व दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत होते आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांची शिखरे दिसू लागली. \p \v 6 आणखी चाळीस दिवसानंतर नोआहने तारवात बनविलेली खिडकी उघडली \v 7 आणि त्याने एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरील सर्व पाणी ओसरेपर्यंत तारवातून येणे जाणे करीत होता. \v 8 दरम्यान नोआहने एका कबुतराला, पृथ्वीवरील पाणी ओसरले की नाही हे पाहण्यासाठी बाहेर सोडले. \v 9 परंतु ते कबुतर त्याच्याकडे परत आले, कारण अजूनही पाणी पृथ्वीवर बरेच वर असल्यामुळे त्याला उतरावयाला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणून नोआहने आपला हात बाहेर काढून कबुतराला परत तारवात घेतले. \v 10 आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले. \v 11 संध्याकाळी कबुतर जेव्हा त्याच्याकडे परत आले, तेव्हा त्याच्या चोचीत एक ताजे जैतुनाचे पान होते! मग नोआहला समजले की पृथ्वीवरून पाणी ओसरले आहे. \v 12 मग आणखी सात दिवस थांबून त्याने ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले, परंतु यावेळी ते परत आले नाही. \p \v 13 नोआहच्या सहाशे एकाव्या वर्षी, पहिल्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पृथ्वीवरील पाणी वाळले. मग नोआहने तारवाचे दार उघडून बाहेर पाहिले, तेव्हा पृथ्वी कोरडी झाल्याचे त्याला दिसून आले. \v 14 दुसर्‍या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी पूर्णपणे कोरडी झाली. \p \v 15 मग परमेश्वराने नोआहला सांगितले, \v 16 “तू आणि तुझी पत्नी, तुझे पुत्र व त्यांच्या पत्नी असे सर्वांनी तारवाच्या बाहेर यावे. \v 17 प्रत्येक प्रकारचा सजीव प्राणी—पक्षी, पशू, सरपटणारे सर्व प्राणी—यांनाही बाहेर आणावे, म्हणजे त्यांची भरभराट होईल आणि ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.” \p \v 18 मग नोआह, त्याचे पुत्र व त्याची पत्नी आणि पुत्रांच्या पत्नी हे तारूच्या बाहेर आले. \v 19 यांच्याबरोबर पशू, सरपटणारे प्राणी व पक्षी—भूमीवर वावरणारे सर्वप्रकारचे प्राणी तारवातून उतरले. \p \v 20 मग नोआहने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशूतून काही घेतले आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. \v 21 तेव्हा याहवेह अर्पणाच्या सुगंधाने संतुष्ट झाले आणि आपल्या अंतःकरणात म्हणाले: “जरी लहानपणापासून मानवी हृदयाची प्रत्येक प्रवृत्ती वाईट आहे तरी मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा कधी शाप देणार नाही आणि जसा मी केला आहे, तसा सर्व जिवंत प्राण्यांचा नाश यापुढे कधीही करणार नाही. \q1 \v 22 “पृथ्वी अस्तित्वात आहे, \q1 तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, \q1 थंडी व उष्णता, \q1 हिवाळा व उन्हाळा, \q1 दिवस व रात्र \q1 ही व्हावयाची थांबणार नाहीत.” \c 9 \s1 परमेश्वराचा नोआहशी करार \p \v 1 परमेश्वराने नोआहला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन सांगितले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. \v 2 पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व दहशत वाटेल, कारण मी त्यांना तुमच्या ताब्यात दिले आहे; \v 3 जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो. \p \v 4 “परंतु ज्या मांसामध्ये जीवनदायी रक्त आहे, असे मांस तू खाऊ नकोस \v 5 आणि मी तुझ्या जीवनदायी रक्ताचा जाब निश्चितच मागेन. जो कोणी एखाद्या मनुष्याचा वध करेल, त्या प्रत्येक पशूकडून मी जीवनाचा जाब घेणार. प्रत्येक मनुष्याकडून दुसर्‍या मनुष्याच्या वधाचा मी जाब घेणार. \q1 \v 6 “जो कोणी मनुष्याचे रक्त वाहील, \q2 मनुष्याद्वारेच त्याचा रक्तपात करण्यात येईल; \q1 कारण परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात \q2 मानवाला निर्माण केले आहे. \m \v 7 तुम्ही तर फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका आणि तिच्यावर संपन्न व्हा.” \p \v 8 मग परमेश्वर नोआहला व त्याच्या पुत्रांना म्हणाले: \v 9 “आता मी तुझ्याशी व तुझ्या वंशजांशी करार स्थापित करतो. \v 10 तुम्ही तुमच्याबरोबर तारवातून आणलेल्या—पक्षी, गुरे आणि वन्यपशू—अशा सर्वप्रकारच्या सजीव प्राण्यांशी करार करतो. \v 11 यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो.” \p \v 12 आणि परमेश्वर म्हणाले, “माझ्या आणि तुझ्यामध्ये व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत आहेत त्यांच्यामध्ये सर्वकाळाच्या पिढ्यांपर्यंत जो करार मी करतो त्याची खूण हीच आहे: \v 13 पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह म्हणून माझे मेघधनुष्य मी मेघात ठेवले आहे \v 14 ज्यावेळी मी पृथ्वीवर मेघ आणेन, त्यावेळी हे धनुष्य मेघांत प्रगट होईल. \v 15 आणि पृथ्वीवर पुन्हा जलप्रलय येणार नाही आणि सर्व प्राणिमात्रांचा नाश होणार नाही, तुमच्याशी आणि प्रत्येक प्राण्याशी केलेल्या या कराराची मला आठवण होईल. \v 16 जेव्हा मी ते धनुष्य मेघांमध्ये पाहीन, तेव्हा परमेश्वर आणि पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राशी केलेल्या सार्वकालिक कराराची मला आठवण होईल.” \p \v 17 परमेश्वर नोआहस म्हणाले, “पृथ्वीवरील सर्व सजीव व माझ्याबरोबर स्थापित झालेल्या कराराचे हे चिन्ह असेल.” \s1 नोआहचे पुत्र \p \v 18 नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.) \v 19 हे नोआहचे तीन पुत्र होते आणि यांच्याद्वारे पृथ्वीवर मानवजात पसरली. \p \v 20 नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला. \v 21 एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला. \v 22 कनानचा पिता हाम याने आपल्या पित्याची नग्नता पाहिली आणि बाहेर जाऊन त्याने ही गोष्ट आपल्या दोन्ही भावांना सांगितली. \v 23 हे ऐकून शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला; आपल्या खांद्यांपर्यंत तो उंच धरून ते आपल्या पित्याची नग्नता झाकली जावी म्हणून उलट्या पावली चालत जाऊन, विरुद्ध दिशेला पाहत त्यांनी तो झगा त्याच्या अंगावर टाकला. \p \v 24 नोआह नशेतून शुद्धीवर आला आणि आपला धाकट्या पुत्राने काय केले हे त्याला समजले, \v 25 तो म्हणाला, \q1 “कनान शापित असो! \q2 तो आपल्या भावांच्या गुलामातील \q2 सर्वात कनिष्ठ गुलाम होवो.” \p \v 26 मग नोआह असेही म्हणाला, \q1 “शेमचे परमेश्वर याहवेह यांची स्तुती असो! \q2 कनान शेमचा गुलाम होवो. \q1 \v 27 परमेश्वर याफेथच्या\f + \fr 9:27 \fr*\fq याफेथ \fq*\ft अर्थात् \ft*\fqa विस्तार\fqa*\f* प्रदेशाचा विस्तार करोत; \q2 याफेथ शेमच्या तंबूत राहो, \q2 आणि कनान त्याचाही गुलाम होवो.” \p \v 28 जलप्रलयानंतर नोआह साडेतीनशे वर्षे जगला. \v 29 950 वर्षाचा होऊन नोआह मृत्यू पावला. \c 10 \s1 सर्व देशांचे पत्रक \lh \v 1 नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले. \s2 याफेथ \li1 \v 2 याफेथाचे पुत्र: \li2 गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास. \li1 \v 3 गोमेरचे पुत्र: \li2 आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह. \li1 \v 4 यावानाचे पुत्र: \li2 एलिशाह, तार्शीश, कित्तीम व दोदानीम. \v 5 या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्‍याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले. \s2 हाम \li1 \v 6 हामाचे पुत्र: \li2 कूश, इजिप्त, पूट व कनान. \li1 \v 7 कूशाचे पुत्र: \li2 सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. \li1 रामाहचे पुत्र: \li2 शबा व ददान. \lf \v 8 कूशचा पुत्र निम्रोद होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला. \v 9 तो याहवेहसमोर एक बलवान शिकारी होता; “याहवेहसमोर निम्रोदासारखा पराक्रमी शिकारी.” असा उल्लेख करण्याची प्रथा पडली होती. \v 10 शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती. \v 11 शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह,\f + \fr 10:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa शहराच्या नाक्यासहित\fqa*\f* रेहोबोथ ईर व कालह \v 12 व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते. \li1 \v 13 इजिप्तचे पुत्र: \li2 लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, \v 14 पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम. \li1 \v 15 कनान यांचा पिता होता: \li2 प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ, \v 16 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, \v 17 हिव्वी, आर्की, सीनी \v 18 अर्वादी, समारी व हमाथी. \li2 (नंतर कनानी वंशज विखुरले \v 19 आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्‍यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.) \lf \v 20 वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत. \s2 शेम \lh \v 21 याफेथचा\f + \fr 10:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa चा थोरला बंधू\fqa*\f* धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता. \li1 \v 22 शेमचे पुत्र: \li2 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. \li1 \v 23 अरामाचे पुत्र: \li2 ऊस, हूल, गेतेर व मेशेख.\f + \fr 10:23 \fr*\ft किंवा \ft*\fqa माश\fqa*\f* \li1 \v 24 अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला \li2 व शेलाह एबरचा पिता झाला. \li1 \v 25 एबरला दोन पुत्र झाले: \li2 एकाचे नाव पेलेग\f + \fr 10:25 \fr*\fq पेलेग \fq*\ft अर्थात् \ft*\fqa विभाजन\fqa*\f* ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव योक्तान होते. \li1 \v 26 योक्तानचे पुत्र: \li2 अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, \v 27 हदोराम, ऊजाल, दिक्लाह, \v 28 ओबाल, अबीमाएल, शबा, \v 29 ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते. \li2 \v 30 (ते मेशापासून सफार या पूर्वेकडील डोंगरापर्यंतच्या भागात राहत होते.) \lf \v 31 कुळे, भाषा, देश आणि राष्ट्रे अशाप्रकारे गोत्रानुसार विभागणी केलेले शेमचे हे वंशज होते. \b \lf \v 32 वर दिलेल्या यादीत नमूद केलेले सर्व लोक नोआहच्या अनेक पिढ्यांतील गोत्र होते. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रांत वस्ती केली. ही सर्व राष्ट्रे जलप्रलयानंतर पसरली. \c 11 \s1 बाबिलोन येथील बुरूज \p \v 1 त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती. \v 2 पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार\f + \fr 11:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa बाबिलोन\fqa*\f* प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली. \p \v 3 ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले. \v 4 मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.” \p \v 5 परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले, \v 6 तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही. \v 7 चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” \p \v 8 अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. \v 9 म्हणून त्या शहराला बाबिलोन\f + \fr 11:9 \fr*\ft किंवा \ft*\fq बाबिलोन \fq*\ft अर्थात् \ft*\fqa गोंधळ\fqa*\f* म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली. \s1 शेम ते अब्राम \p \v 10 शेमाची वंशावळी: \b \li1 अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता. \v 11 अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 12 अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला. \v 13 शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 14 जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला. \v 15 आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 16 एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता. \v 17 पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 18 पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता. \v 19 रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 20 रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता. \v 21 सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 22 सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता. \v 23 नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 24 नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला. \v 25 तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. \li1 \v 26 तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले. \s1 अब्रामाचे गोत्र \p \v 27 तेरहाच्या वंशजाचा तपशील: \b \p तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला. \v 28 पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला. \v 29 अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता. \v 30 सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती. \p \v 31 मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले. \p \v 32 तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला. \c 12 \s1 अब्रामास पाचारण \p \v 1 याहवेहने अब्रामाला सांगितले होते, “तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा. \q1 \v 2 “मी तुला एक मोठे राष्ट्र करेन, \q2 मी तुला आशीर्वाद देईन; \q1 आणि तुझे नाव महान करेन \q2 आणि तू एक आशीर्वाद असा होशील.\f + \fr 12:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुझ्याकडे आशीर्वाद म्हणून पाहिले जाईल\fqa*\f* \q1 \v 3 जे तुला आशीर्वाद देतील, \q2 त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील, \q1 त्यांना मी शाप देईन; \q2 आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”\f + \fr 12:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa आशीर्वाद देताना तुझ्या नावाचा उच्चार करतील\fqa*\f* \p \v 4 याहवेहने सूचना केल्याप्रमाणे अब्राम निघाला; आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राम हारान येथून निघाला त्यावेळी तो पंचाहत्तर वर्षांचा होता. \v 5 अब्राम आपल्याबरोबर आपली पत्नी साराय, त्याचा पुतण्या लोट, तसेच आपली धनदौलत म्हणजे हारानात मिळालेली गुरे व लोक घेऊन निघाला आणि कनान देशात पोहोचला. \p \v 6 अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते. \v 7 मग याहवेहने अब्रामाला दर्शन देऊन म्हटले, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे.” तेव्हा जे अब्रामाला प्रकट झाले त्या याहवेहसाठी त्याने एक वेदी बांधली. \p \v 8 तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली. \p \v 9 मग अब्राम निघाला आणि दक्षिणेच्या दिशेने चालू लागला. \s1 अब्रामाचे इजिप्त देशात वास्तव्य \p \v 10 त्यावेळी त्या देशात मोठा दुष्काळ पडला होता म्हणून अब्राम इजिप्तमध्ये राहण्यास गेला, कारण दुष्काळ फारच भयंकर होता. \v 11 परंतु इजिप्तच्या सीमेवर आल्यानंतर तो आपली पत्नी साराय हिला म्हणाला, “तू फार सुंदर आहेस, \v 12 आणि इजिप्तचे लोक तुला पाहतील व म्हणतील, ‘ही याची पत्नी आहे.’ मग ते मला मारून टाकतील आणि तुला जगू देतील. \v 13 तू माझी बहीण आहेस असे सांग, म्हणजे तुझ्यामुळे मला ते चांगले वागवतील आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचेल.” \p \v 14 अब्राम इजिप्तमध्ये आला तेव्हा इजिप्तच्या लोकांनी पाहिले की साराय ही अतिशय सुंदर स्त्री आहे. \v 15 जेव्हा फारोह राजाच्या सरदारांनी तिला पाहिले तेव्हा त्यांनी फारोहजवळ तिची प्रशंसा केली; आणि तिला राजवाड्यात नेण्यात आले. \v 16 मग फारोहने तिच्यामुळे अब्रामाला मेंढरे, बैल, गाढवे, उंट तसेच गुलाम स्त्री व पुरुष अशा पुष्कळ देणग्या दिल्या. \p \v 17 परंतु याहवेहने अब्रामाची पत्नी साराय तिथे असल्यामुळे फारोहच्या घरावर भयंकर पीडा पाठविली. \v 18 तेव्हा फारोहने अब्रामाला बोलाविले आणि म्हटले, “तू माझ्याशी हे काय केले आहेस? ती तुझी पत्नी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस? \v 19 ‘ती माझी बहीण आहे,’ असे तू का सांगितलेस? म्हणूनच तिला माझी पत्नी करण्यास मी तयार झालो होतो. ही तुझी पत्नी घे आणि येथून निघून जा!” \v 20 आणि फारोहने आपल्या अधिकार्‍यांना आदेश देऊन अब्रामाची पत्नी, कुटुंबीय मंडळी व मालमत्ता यासह त्याची देशाबाहेर रवानगी केली. \c 13 \s1 अब्राम आणि लोट विभक्त होतात \p \v 1 अशा रीतीने अब्रामाने आपली पत्नी, सर्व संपत्ती आणि लोटाला घेऊन इजिप्त देश सोडला आणि ते नेगेव, म्हणजे दक्षिण, येथे पोहोचले. \v 2 अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता. \p \v 3 नंतर ते नेगेवहून बेथेलच्या रोखाने उत्तरेकडे गेले. बेथेल व आय यांच्यामध्ये त्यांनी पूर्वी तळ दिला होता \v 4 व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली. \p \v 5 आता लोट, जो अब्रामासह फिरत होता, त्याच्याजवळही मेंढरे, गुरे आणि डेरे होते. \v 6 परंतु ते एकत्र राहत असताना ती जमीन त्यांना पुरेशी होऊ शकत नव्हती, कारण त्यांची संपत्ती इतकी मोठी होती की ते एकत्र राहू शकत नव्हते. \v 7 कनानी व परिज्जी हे लोक देखील तिथे राहत होते. अब्राम व लोट यांच्या गुराख्यामध्ये भांडणे होऊ लागली. \p \v 8 तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत. \v 9 तुझ्यापुढे संपूर्ण देश नाही काय? आपण विभक्त होऊ या. जर तू डावीकडे गेला तर मी उजवीकडे जाईन आणि जर तू उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईन.” \p \v 10 तेव्हा लोटाने आपली नजर सभोवार फिरविली आणि यार्देन नदीकडील सोअरकडे पाहिले की भरपूर पाणी असलेले, याहवेहच्या बागेसारखे आणि इजिप्त देशासारखे ठिकाण होते. (ही घटना याहवेहने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधीची आहे.) \v 11 मग लोटाने यार्देनेची सगळी तळवट निवडली आणि तो पूर्वेकडे निघाला. अशा रीतीने लोट व अब्राम विभक्त झाले. \v 12 अब्राम कनान देशात राहिला आणि लोटाने यार्देनेच्या पूर्वतीरावरील तळवटीतील शहरांमध्ये मुक्काम करीत सदोम शहरापाशी तळ दिला. \v 13 सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते. \p \v 14 लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक. \v 15 जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन. \v 16 मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल. \v 17 आणि मी जो देश तुला देणार आहे, त्याच्या लांबी व रुंदीपर्यंत चालत जा.” \p \v 18 मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली. \c 14 \s1 अब्राम लोटाची सुटका करतो \p \v 1 त्या काळात जेव्हा शिनारचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा केदोरलाओमेर व गोयीमाचा राजा तिदाल यांनी, \v 2 सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाहचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्याशी युद्ध केले. \v 3 दुसर्‍या गटाचे सर्व राजे सिद्दिमाच्या म्हणजे (मृत समुद्राच्या खोर्‍यात) एकत्र जमले. \v 4 बारा वर्षापर्यंत ते केदोरलाओमेर या राजाची सेवा करणारी प्रजा होते, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. \p \v 5 चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला \v 6 आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले. \v 7 पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला. \p \v 8 पण आता सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाहचा राजा, सबोईमचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी सिद्दीमच्या खोर्‍यात हल्ला करण्याची तयारी केली. \v 9 ते एलामाचा राजा केदोरलाओमेर, गोयीमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्याविरुद्ध लढले. ते पाच राजे विरुद्ध चार राजे असे लढले. \v 10 सिद्दीमच्या खोर्‍यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले. \v 11 चार राजांनी सदोम आणि गमोरा येथील मालमत्ता व अन्नसामुग्री लुटली आणि ते निघून गेले. \v 12 सदोम येथे राहणारा अब्रामाचा पुतण्या लोट यालाही त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंसह ते घेऊन गेले. \p \v 13 या लढाईत वाचलेला एक मनुष्य इब्री अब्रामाकडे पळून आला व त्याने ही बातमी त्याला सांगितली. त्यावेळी अब्राम, अमोरी मम्रे याच्या एला राईत तळ देऊन राहिला होता. अष्कोल व आनेर हे दोघे मम्रेचे भाऊ होते व त्यांनी अब्रामासोबत करार केला होता. \v 14 लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्‍या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला. \v 15 रात्रीच्या वेळी अब्रामाने युद्ध करण्यासाठी आपले सैन्य विभागले आणि त्याने या सैन्यावर यशस्वी हल्ला केला आणि त्याच्यापुढून पळून जाणार्‍या सैन्याचा त्याने दिमिष्काच्या उत्तरेकडे असलेल्या होबाह या शहरापर्यंत पाठलाग केला. \v 16 त्याने सर्व मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट, याची मालमत्ता, स्त्रिया आणि कैद करून पळविलेले लोटचे इतर लोकही परत मिळविले. \p \v 17 केदोरलाओमेर व त्याचे मित्र असलेल्या इतर राजांचा पराभव करून अब्राम परत चालला असताना सदोमचा राजा शावेहच्या खोर्‍यात (या खोर्‍यास पुढे राजांचे खोरे असे नाव पडले) त्याला भेटावयास आला. \p \v 18 शालेमचा राजा मलकीसदेक जो परात्पर परमेश्वराचा याजक होता, तो अब्रामाला भाकर व द्राक्षारस घेऊन आला. \v 19 आणि त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, \q1 “आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ते \q2 परात्पर परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो. \q1 \v 20 ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले \q2 ते परमेश्वर धन्यवादित असो.” \m मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला. \p \v 21 सदोमच्या राजाने अब्रामाला म्हटले, “लोक मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.” \p \v 22 यावर अब्रामाने सदोमाच्या राजाला उत्तर दिले, “आकाश व पृथ्वी यांना निर्माण करणारा परात्पर याहवेह परमेश्वर यांना मी हात उंच करून वचन दिले आहे, \v 23 ‘मी अब्रामाला श्रीमंत बनविले आहे,’ असे तुला कधीही म्हणता येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून सुतळीचा एक दोरा किंवा जोड्याचा बंदही घेणार नाही. \v 24 माझ्या या तरुण माणसांनी जेवढे अन्न खाल्ले आहे तेवढ्यांचाच मी स्वीकार करेन, मात्र माझे मित्र आनेर, अष्कोल आणि मम्रे यांना त्यांचा वाटा मिळो.” \c 15 \s1 याहवेहचा अब्रामाशी करार \p \v 1 या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: \q1 “अब्रामा, भिऊ नको; \q2 मीच तुझी ढाल,\f + \fr 15:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa सार्वभौम\fqa*\f* \q2 तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.” \p \v 2 यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?” \v 3 अब्रामाने असेही म्हटले, “तुम्ही मला पुत्र दिलेला नाही; म्हणून माझा सेवकच माझा वारस होईल.” \p \v 4 तेव्हा त्याच्याकडे याहवेहचे वचन आले, “तुझ्या मालमत्तेचा वारसदार हा मनुष्य होणार नाही, परंतु तुझे मांस व तुझे रक्त असलेला तुझा पुत्र तुझा वारस होईल.” \v 5 मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल.” \p \v 6 अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. \p \v 7 त्यांनी त्याला सांगितले, “मी याहवेह आहे. मी ही भूमी कायमची वतन करून देण्यासाठी तुला खास्द्यांच्या ऊर या शहरातून येथे आणले आहे.” \p \v 8 पण अब्रामाने विचारले, “सार्वभौम याहवेह, मला हे वतन मिळेल ते मी कसे समजू?” \p \v 9 मग याहवेह त्याला म्हणाले, “तू तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, तसेच एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घेऊन ये.” \p \v 10 अब्रामाने हे सर्व आणले आणि त्या प्राण्यांचा वध करून ते त्याने मधोमध कापले; व त्यांचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले; पण पक्षी मात्र विभागले नाही. \v 11 त्या प्राण्यांच्या मृतशरीरांवर गिधाडांनी झडप घातली, तेव्हा अब्रामाने गिधाडांना हुसकावून लावले. \p \v 12 सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला. \v 13 मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. \v 14 परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील. \v 15 पण तू चांगला म्हातारा होऊन मरण पावशील व शांतीने तुझ्या पूर्वजांबरोबर पुरला जाशील. \v 16 चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही\f + \fr 15:16 \fr*\fq अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही \fq*\ft म्हणजे \ft*\fqa अमोरी लोकांची पापे अद्याप त्यांचा नाश करण्याची हमी देत नाहीत\fqa*\f*.” \p \v 17 नंतर सूर्य मावळला आणि अंधार पडला तेव्हा अब्रामाने त्या प्राण्यांच्या मृतशरीराच्या दोन ढिगांमधून धुमसते अग्निपात्र आणि पेटलेली मशाल जाताना पाहिली. \v 18 त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात\f + \fr 15:18 \fr*\fq फरात \fq*\ft ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते\ft*\f* नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश— \v 19 केनी, कनिज्जी, कदमोनी, \v 20 हिथी, परिज्जी, रेफाईम, \v 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे.” \c 16 \s1 हागार आणि इश्माएल \p \v 1 अब्रामाला साराय आपली पत्नी हिच्यापासून मूलबाळ नव्हते. पण सारायला हागार नावाची इजिप्तची एक दासी होती; \v 2 सारायने अब्रामाला म्हटले, “याहवेहने मला मूलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर; म्हणजे तिच्यापासून माझी मुले होतील.” \p आणि अब्रामाने तिचा शब्द मानला. \v 3 अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले. \v 4 तो हागारसोबत निजला आणि ती गर्भवती झाली. \p जेव्हा तिला आपण गर्भवती झाल्याचे लक्षात आले, तेव्हा ती तिच्या मालकिणीचा तिरस्कार करू लागली. \v 5 मग साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्याशी होत असलेल्या अन्यायास तुम्ही जबाबदार आहात. वास्तविक, मी तिला तुमच्या हातात दिले आणि आता जेव्हा तिला कळले की ती गर्भवती आहे, ती मला तुच्छ मानू लागली आहे. याहवेह माझ्या व तुमच्यामध्ये न्याय करो.” \p \v 6 यावर अब्रामाने सारायला उत्तर दिले, “तुझ्या दासीवर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुला जे योग्य वाटेल ते तिच्याशी कर.” तेव्हा सारायने हागारची छळणूक केली; आणि हागार तिच्यापासून पळून गेली. \p \v 7 शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्‍याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली. \v 8 तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” \p हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.” \p \v 9 तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, “तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा.” \v 10 दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.” \p \v 11 याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले, \q1 “आता तू गर्भवती आहेस \q2 आणि तुला एक पुत्र होईल. \q1 तू त्याचे नाव इश्माएल\f + \fr 16:11 \fr*\fq इश्माएल \fq*\ft अर्थात् \ft*\fqa परमेश्वर ऐकतात\fqa*\f* असे ठेव, \q2 कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे. \q1 \v 12 तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल; \q2 त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल \q2 व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल; \q1 आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये \q2 शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.” \p \v 13 तिच्याशी बोलणार्‍या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.” \v 14 म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई\f + \fr 16:14 \fr*\fq बएर-लहाई-रोई \fq*\ft अर्थात् \ft*\fqa मला पाहणार्‍या जिवंत परमेश्वराची विहीर\fqa*\f* असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. \p \v 15 मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले. \v 16 हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला त्यावेळी अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता. \c 17 \s1 सुंतेचा करार \p \v 1 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ\f + \fr 17:1 \fr*\fq सर्वसमर्थ \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa एल-शद्दाय\fqa*\f* परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा. \v 2 मग मी माझ्या व तुझ्यामध्ये एक करार करेन आणि तुला बहुगुणित करेन.” \p \v 3 अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले, \v 4 “मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. \v 5 आता येथून पुढे तुझे नाव अब्राम\f + \fr 17:5 \fr*\fq अब्राम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa उदात्त पिता\fqa*\f* असे राहणार नाही, तर ते अब्राहाम\f + \fr 17:5 \fr*\fq अब्राहाम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa अनेक राष्ट्रांचा पिता\fqa*\f* असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. \v 6 मी तुला फलद्रूप करेन; मी तुझ्यापासून राष्ट्रे उदयास आणेल आणि तुझ्या संततीमधून राजे उत्पन्न होतील. \v 7 तुझ्या व तुझ्या येणार्‍या पिढीबरोबर मी असा शाश्वत करार स्थापित करेन की, तुझा व तुझ्यानंतर तुझ्या संतानांचा मी परमेश्वर होईन. \v 8 ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.” \p \v 9 मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्‍या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे. \v 10 तू आणि तुझ्या वंशजांशी हा माझा करार म्हणजे: तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची तुम्ही सुंता केली पाहिजे. \v 11 ही सुंता, तुझ्या आणि माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह होईल. \v 12 पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे. \v 13 तुझ्या घराण्यात जन्मलेल्या किंवा तू पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली जावो. तुझ्या शरीराशी केलेला हा करार सदासर्वकाळचा आहे. \v 14 सुंता न केलेल्या प्रत्येक पुरुषाला त्या समाजातून बेदखल करण्यात येईल कारण त्याने माझा करार मोडला आहे.” \p \v 15 मग परमेश्वराने अब्राहामालाही म्हटले, “तुझी पत्नी साराय हिचे नाव आता साराय राहणार नाही, तर तिचे नाव साराह\f + \fr 17:15 \fr*\fq साराह \fq*\ft म्हणजे \ft*\fqa राजकन्या\fqa*\f* असे होईल. \v 16 मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून तुला निश्चितच एक पुत्र देईन. मी तिला आशीर्वादित करेन आणि तिला अनेक राष्ट्रांची माता करेन; तिच्यातून लोकांचे राजे उत्पन्न होतील.” \p \v 17 अब्राहामाने लवून नमस्कार केला; आणि तो हसला व स्वतःशी म्हणाला, “शंभर वर्षांच्या माणसालाही मुले होतील का? नव्वद वर्षांच्या साराहच्या पोटी बाळ जन्माला येऊ शकेल काय?” \v 18 तेव्हा अब्राहामाने परमेश्वराला म्हटले, “केवळ इश्माएल तुमच्या आशीर्वादाखाली राहिला तरी पुरे!” \p \v 19 परमेश्वराने उत्तर दिले, “होय, परंतु तुझी पत्नी साराह हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि तू त्याचे नाव इसहाक\f + \fr 17:19 \fr*\fq इसहाक \fq*\ft म्हणजे \ft*\fqa तो हसतो\fqa*\f* असे ठेवावेस. मी त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांबरोबरही अनंतकाळचा करार स्थापित करेन. \v 20 इश्माएलाविषयी मी तुझी विनंती ऐकली आहे: मी त्याला निश्चितच आशीर्वाद देईन; त्याला फलद्रूप करेन व बहुगुणित करेन. तो बारा शासकांचा पिता होईल व मी त्याला एक महान राष्ट्र बनवेन. \v 21 पण माझा करार मी इसहाकाबरोबर स्थापित करेन. ज्याला पुढील वर्षी याच सुमारास साराह तुझ्यासाठी प्रसवेल.” \v 22 जेव्हा त्याने अब्राहामाशी बोलणे संपविले तेव्हा परमेश्वर अंतर्धान पावले. \p \v 23 त्याच दिवशी अब्राहामाने आपला पुत्र इश्माएल आणि आपल्या घरात जन्मलेले किंवा पैसे देऊन विकत घेतलेले सर्व पुरुष यांची परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंता केली. \v 24 अब्राहामाची सुंता झाली त्यावेळी तो नव्याण्णव वर्षांचा होता, \v 25 आणि त्याचा पुत्र इश्माएल तेरा वर्षांचा होता जेव्हा त्याची सुंता झाली. \v 26 अब्राहाम व त्याचा पुत्र इश्माएल या दोघांचीही सुंता एकाच दिवशी झाली. \v 27 अब्राहामाच्या घरातील सर्व पुरुष, त्याच्या घरात जन्मलेले व पैसे देऊन परदेशी व्यक्तीकडून खरेदी केली गुलाम यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली. \c 18 \s1 तीन पाहुणे \p \v 1 अब्राहाम मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ राहत असताना, मध्यान्हाच्या उन्हात आपल्या तंबूच्या दारापुढे बसला होता, तेव्हा याहवेहने त्याला दर्शन दिले. \v 2 अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले. \p \v 3 तो त्यांना म्हणाला, “माझ्या स्वामी, माझ्यावर आपली कृपा झाली असल्यास, माझ्या घरी न येता पुढे जाऊ नका. \v 4 मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या. \v 5 तुम्हाला ताजेपणा यावा म्हणून थोडे अन्नही आणतो मग तुम्ही पुढील प्रवासास निघा; तुम्ही तुमच्या या सेवकाकडे आला आहात.” \p “ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे कर.” त्यांनी उत्तर दिले. \p \v 6 मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ\f + \fr 18:6 \fr*\ft अंदाजे 16 कि.ग्रॅ.\ft*\f* सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.” \p \v 7 नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले. \v 8 मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला. \p \v 9 त्यांनी विचारले, “तुझी पत्नी, साराह कुठे आहे?” \p अब्राहामाने उत्तर दिले, “ती तंबूत आहे.” \p \v 10 मग त्यापैकी एकजण म्हणाला, “पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी साराहला एक पुत्र होईल.” \p त्याच्यामागे, तंबूच्या दारातून साराह हे ऐकत होती. \v 11 आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता; \v 12 म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, “मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?” \p \v 13 तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, “ ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली? \v 14 याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.” \p \v 15 साराह घाबरली, म्हणून ती खोटे बोलत म्हणाली, “मी हसले नाही.” \p परंतु ते म्हणाले, “होय, तू हसलीस.” \s1 सदोम शहरासाठी अब्राहामाची मध्यस्थी \p \v 16 जेव्हा ते पुरुष पुढील प्रवासास जाण्यास उठले आणि त्यांनी खाली सदोमाच्या दिशेने पाहिले. अब्राहाम त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडी वाट चालून गेला. \v 17 मग याहवेह म्हणाले, “अब्राहामापासून मी माझा संकल्प गुप्त ठेवावा काय? \v 18 कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित\f + \fr 18:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याचे नाव आशीर्वाद म्हणून वापरले जाईल\fqa*\f* होतील. \v 19 कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.” \p \v 20 मग याहवेहने म्हटले, “सदोम आणि गमोरा विरुद्ध आक्रोश खूप वाढला आहे आणि त्यांचे पाप गंभीर आहे. \v 21 मी खाली जाऊन बघेन, मग त्यांनी जे केले आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आक्रोशाएवढे वाईट आहे की नाही हे मला समजेल.” \p \v 22 त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला. \v 23 अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय? \v 24 जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय? \v 25 ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?” \p \v 26 याहवेहने उत्तर दिले, “त्या सदोम शहरात मला जर पन्नास नीतिमान लोक आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सर्व शहराची गय करेन.” \p \v 27 मग अब्राहाम पुन्हा म्हणाला, “मी धूळ आणि राख असून, मी प्रभूशी बोलण्याचे धैर्य केले आहे, \v 28 जर नीतिमानांची संख्या पाच कमी पन्नास असली तर काय? पाच लोक कमी आहेत म्हणून तुम्ही त्या संपूर्ण शहराचा नाश करणार काय?” \p याहवेहने उत्तर दिले “मला तिथे पंचेचाळीस भेटले, तरी मी त्याचा नाश करणार नाही.” \p \v 29 अब्राहाम पुन्हा याहवेहला म्हणाला, “तिथे फक्त चाळीस असले तर काय?” \p याहवेहने उत्तर दिले, “त्या चाळिसांसाठी, मी नाश करणार नाही.” \p \v 30 मग तो म्हणाला, “प्रभूला राग येऊ नये, पण मला बोलू द्यावे. फक्त तीसच मिळाले तर?” \p याहवेहने उत्तर दिले, “तिथे तीस सापडले, तरी मी नाश करणार नाही.” \p \v 31 मग अब्राहाम म्हणाला, “मी प्रभूशी बोलण्याचे खूप धैर्य केले आहे, तिथे जर वीसच नीतिमान लोक असले तर?” \p त्यांनी म्हटले, “त्या विसांसाठी मी त्यांचा नाश करणार नाही.” \p \v 32 मग तो म्हणाला, “प्रभूला राग न येवो, पण मला एकदाच बोलू द्यावे. तिथे फक्त दहाच सापडले तर?” \p याहवेहने उत्तर दिले, “त्या दहांच्यासाठी मी त्याचा नाश करणार नाही.” \p \v 33 जेव्हा याहवेहने अब्राहामाशी आपले बोलणे संपविले, ते निघून गेले आणि अब्राहाम घरी परतला. \c 19 \s1 सदोम आणि गमोराचा नाश \p \v 1 त्याच संध्याकाळी ते दोन दूत सदोमास पोहोचले. लोट नगराच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि आपले डोके भूमीकडे लववून त्याने दंडवत घातले. \v 2 लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” \p ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.” \p \v 3 पण लोटाने फारच आग्रह केल्यामुळे ते त्याच्याबरोबर त्याच्या घरात गेले. त्याने त्यांच्यासाठी बेखमीर भाकरीचे भोजन तयार केले, आणि ते जेवले. \v 4 ते झोपण्याच्या आधी, सदोम शहराच्या प्रत्येक भागातील सर्व पुरुषांनी—तरुणांपासून वृद्धांपर्यंत—लोटाच्या घराला वेढा घातला. \v 5 लोटाला ते ओरडून म्हणाले, “जे पुरुष तुझ्याकडे आज रात्री आले ते कुठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.” \p \v 6 लोट त्यांच्याबरोबर बोलण्यास बाहेर गेला आणि आपल्यामागे दार लावून घेतले. \v 7 “आणि म्हणाला, नाही माझ्या मित्रांनो, असे भयंकर दुष्कर्म करू नका. \v 8 पाहा, मला दोन कन्या आहेत ज्या अजून कुमारिका आहेत. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करतो; त्यांच्याशी तुम्हाला पाहिजे तसे वागा, पण या दोन माणसांच्या वाटेला जाऊ नका, कारण ते माझ्या आश्रयाला आले आहेत.” \p \v 9 “आमच्या मार्गातून दूर जा,” ते म्हणाले. “हा मनुष्य इथे परदेशी म्हणून आला होता आणि आता त्याला न्यायाधीशाची भूमिका करावयाची आहे! आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा वाईट वागवू.” ते लोटावर दबाव टाकत राहिले आणि दार तोडण्यासाठी पुढे गेले. \p \v 10 पण आतील त्या पुरुषांनी लोटाला घरात ओढून घेतले आणि दार बंद केले. \v 11 मग तरुण आणि वृद्ध पुरुष जे घराच्या दरवाजात होते, त्यांना त्यांनी अंधत्वाचा असा फटका दिला की त्यांना दरवाजा सापडेना. \p \v 12 ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “या ठिकाणी तुझे जावई, मुले किंवा मुली किंवा अजून कोणी या शहरात जे तुझे आपले असे आहे काय? त्यांना येथून बाहेर काढ, \v 13 कारण आम्ही या शहराचा नाश करणार आहोत. याहवेहपर्यंत या लोकांविरुद्ध आलेला आक्रोश इतका मोठा आहे की त्यांनी आम्हाला त्याचा नाश करण्यासाठी पाठविले आहे.” \p \v 14 तेव्हा लोट आपल्या जावयांकडे गेला, जे त्याच्या मुलींशी विवाह करण्यास वचनबद्ध\f + \fr 19:14 \fr*\fq वचनबद्ध \fq*\ft अर्थात् \ft*\fqa मागणी झालेले\fqa*\f* होते. तो म्हणाला, “घाई करा आणि या ठिकाणातून बाहेर चला, कारण याहवेह या शहराचा नाश करणार आहेत!” पण त्याच्या जावयांना वाटले की, तो विनोद करीत आहे. \p \v 15 पहाट होताच, दूत लोटाला आग्रह करीत म्हणाले, “त्वरा कर! तुझी पत्नी व तुझ्या दोन कन्या ज्या इथे आहेत त्यांना घेऊन नीघ, नाहीतर या नगराचा नाश होत असताना तुझाही नाश होईल.” \p \v 16 पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती. \v 17 दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!” \p \v 18 यावर लोट विनवणी करीत म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून असे करू नका! \v 19 तुम्ही तुमच्या सेवकाशी इतके दयाळूपणाने वागला आहात व तुम्ही माझा जीव वाचविला आहे. परंतु मला डोंगरावर पाठवू नका; तिथे कदाचित माझ्यावर काही अरिष्ट येईल आणि मी मरेन. \v 20 पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.” \p \v 21 तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही. \v 22 पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर\f + \fr 19:22 \fr*\fq सोअर \fq*\ft अर्थात् \ft*\fqa लहान\fqa*\f* नगरी असे पडले.) \p \v 23 सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला. \v 24 मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला; \v 25 आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला. \v 26 परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली. \p \v 27 दुसर्‍या दिवशी अब्राहाम पहाटेच उठला आणि ज्या ठिकाणी तो याहवेहसमोर उभा राहिला होता त्या ठिकाणी आला. \v 28 त्याने मैदानापलीकडे असलेल्या सदोम आणि गमोरा याकडे नजर टाकली, भट्टीतून निघाल्यासारखे धुरांचे लोटच्या लोट त्या नगरातून उसळून वर येत आहेत, असे त्याला दिसले. \p \v 29 मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले. \s1 लोट आणि त्याच्या कन्या \p \v 30 पुढे लोटाने सोअरमधील लोकांच्या भीतीमुळे ते गाव सोडले व तो आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगरातील एक गुहेमध्ये जाऊन राहिला. \v 31 एके दिवशी थोरली मुलगी धाकट्या बहिणीला म्हणाली, “आपले वडील म्हातारे झाले आहेत आणि आजूबाजूला एकही पुरुष नाही की जो आपल्याला मूल देईल—जशी पृथ्वीवरील प्रथा आहे. \v 32 तेव्हा चल, आपण त्यांना खूप द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश आपल्या वडिलांद्वारे कायम राहील.” \p \v 33 त्या रात्री त्यांनी लोटाला भरपूर मद्य पाजले. मग थोरली आत गेली आणि तिने आपल्या वडिलांबरोबर शय्या केली; ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते! \p \v 34 दुसर्‍या दिवशी सकाळी थोरली मुलगी आपल्या धाकट्या बहिणीस म्हणाली, “काल रात्री मी आपल्या वडिलांबरोबर शय्या केली, आज रात्रीही आपण त्यांना भरपूर मद्य पाजू आणि मग तू त्यांच्याशी शय्या कर म्हणजे अशा रीतीने आपला वंश आपल्या वडिलांद्वारे पुढे चालेल.” \v 35 त्याप्रमाणे त्या रात्री त्यांनी आपल्या वडिलांना पुन्हा भरपूर मद्य पाजले. मग धाकटी मुलगी आत गेली आणि त्याच्यासोबत शय्या केली. ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते! \p \v 36 अशा रीतीने लोटाच्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गर्भवती झाल्या. \v 37 थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब\f + \fr 19:37 \fr*\fq मोआब \fq*\ft अर्थात् \ft*\fqa पित्याद्वारे\fqa*\f* असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. \v 38 धाकट्या मुलीलासुद्धा पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव बेनअम्मी\f + \fr 19:38 \fr*\fq बेनअम्मी \fq*\ft अर्थात् \ft*\fqa माझ्या पित्याच्या लोकांचा पुत्र\fqa*\f* असे ठेवले, तो अम्मोनी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. \c 20 \s1 अब्राहाम आणि अबीमेलेख \p \v 1 आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला, \v 2 साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले. \p \v 3 पण एका रात्री परमेश्वर स्वप्नात अबीमेलेखकडे आले आणि त्याला म्हणाले, “आता तुझा अंत झाल्यासारखाच आहे, कारण जी स्त्री तू आणली आहेस, ती विवाहित आहे.” \p \v 4 पण अबीमेलेखाने तिला अद्याप स्पर्श केला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तुम्ही एक निरपराधी राष्ट्राचा अंत कराल काय? \v 5 खुद्द अब्राहामानेच मला सांगितले नव्हते का की ती माझी बहीण आहे? आणि तिनेही सांगितले नव्हते का तो माझा भाऊ आहे? मी हे शुद्ध हृदयाने आणि शुद्ध हातांनी केले आहे.” \p \v 6 परमेश्वराने त्याला स्वप्नात म्हणाले, “होय, ते मला माहीत आहे; ते तू शुद्ध हृदयाने केले आहे आणि म्हणूनच मी तुला पाप करण्यापासून रोखून धरले आणि तिला स्पर्शही करू दिला नाही. \v 7 आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.” \p \v 8 दुसर्‍या दिवशी सकाळीच अबीमेलेखाने आपल्या सर्व अधिकार्‍यांना बोलाविले आणि काय घडले हे त्याने सांगितले, तेव्हा सर्व लोक फार घाबरले. \v 9 मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.” \v 10 मग अबीमेलेखाने अब्राहामास विचारले, “तू हे असे करण्याचे काय कारण आहे?” \p \v 11 अब्राहाम म्हणाला, “मी मनात विचार केला, ‘या शहरात कोणीही परमेश्वराला भीत नाही आणि माझ्या पत्नीमुळे ते माझा वध करतील.’ \v 12 असे असूनही, ती माझी बहीण आहे, माझ्या वडिलांची मुलगी आहे, परंतु माझ्या आईची मुलगी नाही; आणि ती माझी पत्नी झाली. \v 13 परमेश्वराने माझ्या वडिलांचे घर सोडून मला प्रवासास पाठविले, तेव्हा मी तिला म्हटले की, ‘जिथेही आपण जाऊ तिथे मी तुझा भाऊ आहे असे सांगून तू माझ्यावरील तुझी प्रीती मला दाखव.’ ” \p \v 14 मग अबीमेलेखाने अब्राहामाला मेंढरे, बैल आणि स्त्री व पुरुष गुलाम दिले आणि त्याची पत्नी साराहदेखील त्याला परत केली. \v 15 आणि अबीमेलेख म्हणाला, “माझा देश तुमच्यासमोर आहे. तुम्हाला आवडेल तिथे राहा.” \p \v 16 मग साराहला तो म्हणाला, “तुझ्या भावाला मी चांदीचे एक हजार शेकेल\f + \fr 20:16 \fr*\ft अंदाजे 12 कि.ग्रॅ.\ft*\f* देत आहे. मी तुझ्यावर केलेल्या गुन्ह्याबद्दल तुझ्याबरोबरच्या लोकांसमोर ही भरपाई आहे; तू पूर्णपणे निर्दोष आहे.” \p \v 17 यानंतर अब्राहामाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वराने अबीमेलेख राजा, राणी व त्याच्या दासी यांना आरोग्य दिले आणि त्यांना परत मुले होऊ लागली. \v 18 कारण अब्राहामाची पत्नी साराह हिच्यामुळे याहवेहनी अबीमेलेखाच्या घराण्यातील सर्व स्त्रियांची गर्भधारणा बंद केली होती. \c 21 \s1 इसहाकाचा जन्म \p \v 1 यानंतर याहवेहने आपल्या म्हणण्याप्रमाणे साराहवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले. \v 2 साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला. \v 3 अब्राहामाने साराहपासून जन्मलेल्या पुत्राचे नाव इसहाक असे ठेवले. \v 4 इसहाक जन्मल्यानंतर आठ दिवसांनी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, अब्राहामाने त्याची सुंता केली. \v 5 जेव्हा इसहाकाचा जन्म झाला, त्यावेळी अब्राहाम शंभर वर्षांचा होता. \p \v 6 साराह म्हणाली, “परमेश्वराने मला हसविले आहे आणि जे याबद्दल ऐकतील, ते माझ्याबरोबर आनंद करतील.” \v 7 आणि ती अजून म्हणाली, “अब्राहामाला कोणी सांगितले असते काय की साराह तिच्या बाळाला स्तनपान करेल? तरीही मी अब्राहामाला त्याच्या म्हातारपणी एक अपत्य दिले आहे.” \s1 हागार आणि इश्माएल यांना घालवून देणे \p \v 8 ते बाळ वाढू लागले आणि ज्या दिवशी इसहाकाचे दूध तोडण्यात आले, त्या दिवशी अब्राहामाने एक मोठी मेजवानी दिली. \v 9 परंतु अब्राहामाला इजिप्त देशाची स्त्री हागार, हिच्यापासून झालेला पुत्र, इसहाकाला चिडवीत असताना साराहने पाहिले. \v 10 तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या; कारण त्या स्त्रीचा पुत्र कधीही माझा पुत्र इसहाक याच्याबरोबर वारसा वाटून घेणार नाही.” \p \v 11 ही बाब अब्राहामाला खूप त्रास देत होती कारण ती त्याच्या मुलाची होती. \v 12 तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती\f + \fr 21:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa बीज\fqa*\f* वाढेल. \v 13 त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.” \p \v 14 दुसर्‍या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली. \p \v 15 जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले, \v 16 आणि ती त्याच्यापासून सुमारे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, “माझ्या बाळाचा मृत्यू मला पाहावयाला नको आहे,” असे म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली. \p \v 17 मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे. \v 18 ऊठ, त्याला उचलून घे, कारण मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन.” \p \v 19 मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले. \p \v 20 परमेश्वर त्या मुलासोबत होते. तो पारानच्या रानात लहानाचा मोठा होऊन एक तरबेज तिरंदाज झाला; \v 21 पुढे तो पारानच्या रानात राहत असताना त्याच्या आईने त्याचा इजिप्त देशातील एका मुलीसह विवाह करून दिला. \s1 अबीमेलेखाचा अब्राहामाशी करार \p \v 22 याच सुमारास अबीमेलेख राजा व त्याचा सेनापती पीकोल. हे अब्राहामाकडे आले, ते त्याला म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात परमेश्वर तुला साहाय्य करतात. \v 23 तर परमेश्वराच्या नावाने तू मला असे वचन दे की, तू माझ्याशी, माझ्या मुलांशी किंवा वंशजांशी कपटनीतीने वागणार नाहीस. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी मित्रत्वाने वागलो आहे, त्याप्रमाणेच तूही माझ्या देशाशी मित्रत्वानेच वागशील.” \p \v 24 अब्राहाम म्हणाला, “ठीक आहे, मी तुला शपथ देतो.” \p \v 25 “पण तुझ्या सेवकांनी माझ्या नोकरांपासून जबरदस्तीने एक विहीर हिरावून घेतली आहे त्याचे काय?” अब्राहामाने अबीमेलेखकडे तक्रार केली. \v 26 “हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” अबीमेलेख राजाने उद्गार काढले, “आणि याला कोण जबाबदार आहे याची मला काहीच कल्पना नाही. हे तू मला आधी का सांगितले नाहीस?” \p \v 27 मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला. \v 28 पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या, \v 29 तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?” \p \v 30 यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.” \p \v 31 म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा\f + \fr 21:31 \fr*\fq बेअर-शेबा \fq*\ft अर्थात् \ft*\fqa शपथेची विहीर\fqa*\f* पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता. \p \v 32 बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले. \v 33 अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली. \v 34 आणि अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात दीर्घकाल राहिला. \c 22 \s1 अब्राहामाची परीक्षा \p \v 1 काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” \p “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला. \p \v 2 मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” \p \v 3 अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला. \v 4 तिसर्‍या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले. \v 5 तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” \p \v 6 अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले, \v 7 इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?” \p “काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले. \p “आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?” \p \v 8 अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले. \p \v 9 परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले; \v 10 मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला. \v 11 त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” \p “हा मी इथे आहे,” तो उत्तरला. \p \v 12 “मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.” \p \v 13 अब्राहामाची नजर झुडूपात शिंगे अडकलेल्या एका एडक्याकडे गेली. त्याने तो एडका धरला आणि आपल्या पुत्राच्या जागी त्याने त्या एडक्याचा होमार्पण म्हणून बळी दिला. \v 14 म्हणून अब्राहामाने त्या जागेचे नाव “याहवेह यिरेह”\f + \fr 22:14 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa याहवेह पुरवून देतील\fqa*\f* आजपर्यंत “याहवेहच्या डोंगरावर पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. \p \v 15 नंतर याहवेहच्या दूताने अब्राहामाला स्वर्गातून दुसर्‍यांदा हाक मारली. \v 16 ते म्हणाले, “मी याहवेह, स्वतःचीच शपथ घेऊन तुला सांगतो की, कारण तू हे केलेस आणि स्वतःच्या पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला अर्पण करण्यास तू नाकारले नाहीस, \v 17 म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल, \v 18 आणि तू माझ्या आज्ञा पाळल्या आहेस, म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या वंशजापासून आशीर्वादित होतील.” \p \v 19 यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते सर्वजण बेअर-शेबा येथे आपल्या घरी परतले आणि अब्राहाम बेअर-शेबा येथे राहिला. \s1 नाहोराचे पुत्र \li1 \v 20 काही वेळेनंतर अब्राहामाला सांगण्यात आले, “त्याचा भाऊ नाहोर याची पत्नी मिल्का हिलाही मुले झाली आहेत: \li2 \v 21 ऊस हा त्याचा प्रथमपुत्र, त्याचा भाऊ बूज व \li2 कमुवेल (अरामचा पिता) \li2 \v 22 आणि केसद, हजो, पिलदाश, यिदलाप व बेथुएल.” \li3 \v 23 बेथुएल रिबेकाहचा पिता झाला. \lf अब्राहामाचा भाऊ नाहोराची पत्नी मिल्का हिला हे आठ पुत्र झाले. \b \li1 \v 24 नाहोराची उपपत्नी रेऊमा हिलाही पुत्र झाले: \li2 तेबाह, गहाम, तहश व माकाह. \c 23 \s1 साराहचा मृत्यू \p \v 1 साराह एकशे सत्तावीस वर्षे जगली. \v 2 साराह ही कनान देशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) येथे मरण पावली. अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास गेला. \p \v 3 आणि साराहच्या मृतदेहाजवळ उभे राहून अब्राहाम हेथीच्या लोकांना म्हणाला, \v 4 “या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.” \p \v 5 हेथी लोकांनी अब्राहामाला उत्तर दिले, \v 6 “महाराज, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक पराक्रमी राजपुत्र आहात. तुम्ही आपल्या मृतांसाठी स्वतःच कबर निवडून त्यांना मूठमाती द्या. आपली खाजगी कबर तुम्हाला देण्यास आमच्यातील कोणीही नकार देणार नाही.” \p \v 7 हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला, \v 8 “मी आपल्या मयतास पुरावे अशी तुमची इच्छा असेल तर माझे ऐका, जोहराचा पुत्र एफ्रोन, \v 9 याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.” \p \v 10 एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला, \v 11 “नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला\f + \fr 23:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa विकत\fqa*\f* देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.” \p \v 12 अब्राहामाने त्या देशातील लोकांना पुन्हा लवून मुजरा केला \v 13 आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे ऐका, मला ती जागा तुझ्याकडून विकत घेऊ दे; त्या शेताची सर्व किंमत मी तुला देईन. मग मी माझ्या मृताला तिथे मूठमाती देईन.” \p \v 14 हे ऐकून एफ्रोन अब्राहामाला म्हणाला, \v 15 “महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल\f + \fr 23:15 \fr*\ft अंदाजे 4.6 कि.ग्रॅ.\ft*\f* आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.” \p \v 16 तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्‍यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली. \p \v 17 अशाप्रकारे मम्रेजवळील मकपेला येथे असलेले एफ्रोनाचे शेत आणि शेताच्या शेवटच्या टोकाला असलेली गुहा आणि त्याच्या चतुःसीमातील प्रत्येक झाड अब्राहामाने विकत घेण्याचा करार केला. \v 18 हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले. \v 19 त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी साराह हिला कनान देशात मम्रे (म्हणजे हेब्रोन) जवळ असलेल्या मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले. \v 20 याप्रमाणे, हेथी लोकांनी स्मशानभूमी म्हणून शेत व त्यातील गुहा अब्राहामाच्या मालकीची झाल्याचा करार केला. \c 24 \s1 इसहाक आणि रिबेकाह \p \v 1 अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. \v 2 अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्‍या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. \v 3 स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस, \v 4 याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.” \p \v 5 सेवकाने अब्राहामाला विचारले, “पण समजा, आपले घर सोडून इतक्या दूर येण्यास ती स्त्री तयार नसेल तर मी इसहाकाला जो देश तुम्ही सोडून आला त्या देशात घेऊन जावे काय?” \p \v 6 “माझ्या मुलाला तिकडे कधीही नेऊ नको,” अब्राहाम त्याला म्हणाला. \v 7 “कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल. \v 8 पण स्त्री येथे येण्यास तयार झाली नाही, तर तू आपल्या वचनातून मुक्त होशील. फक्त माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस.” \v 9 तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली. \p \v 10 मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम\f + \fr 24:10 \fr*\fq अराम-नहराईम \fq*\ft किंवा \ft*\fqa मेसोपोटेमिया\fqa*\f* मधील नाहोराच्या नगरास गेला. \v 11 तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या. \p \v 12 त्यावेळी त्या सेवकाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझ्या धन्याच्या परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्यावर दया करा आणि ज्या उद्देशाने मी हा प्रवास केला तो सफल करा. \v 13 पाहा, मी येथे विहिरीजवळ उभा आहे व पाणी नेण्याकरिता नगरातील कन्या येत आहेत. \v 14 माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.” \p \v 15 त्याची प्रार्थना समाप्त होण्यापूर्वी रिबेकाह खांद्यावर घागर घेऊन तिथे आली. ती नाहोर आणि मिल्का यांचा पुत्र बेथुएल याची कन्या होती. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ होता. \v 16 ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली. \p \v 17 अब्राहामाचा सेवक तिच्याकडे धावत गेला आणि तो तिला म्हणाला, “कृपया मला तुझ्या घागरीतील थोडे पाणी दे.” \p \v 18 “प्या, माझ्या स्वामी,” असे म्हणून तिने लगेच आपली घागर वाकवून त्याला प्यायला पाणी दिले. \p \v 19 त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.” \v 20 तिने आपल्या घागरीतील पाणी कुंडात ओतले आणि ती पुन्हा पाणी काढण्याकरिता विहिरीकडे धावत गेली आणि त्याच्या सर्व उंटांना पुरेल इतके पाणी तिने काढले. \v 21 ती पाणी काढीत असताना, तो सेवक एक शब्दही न बोलता, तिचे बारकाईने निरीक्षण करीत होता की याहवेहने त्याचा प्रवास सफल केला की नाही. \p \v 22 शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका\f + \fr 24:22 \fr*\ft अंदाजे 5.7 ग्रॅ.\ft*\f* वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल\f + \fr 24:22 \fr*\ft अंदाजे 115 ग्रॅ.\ft*\f* वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या. \v 23 नंतर त्याने तिला विचारले, “तू कोणाची कन्या आहेस? कृपया मला सांग की रात्री मुक्काम करण्यासाठी आम्हाला तुझ्या वडिलांच्या घरी जागा मिळू शकेल काय?” \p \v 24 तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.” \v 25 आणि ती पुढे हे म्हणाली, “आमच्या घरी रात्री मुक्काम करण्यासाठी खोली आणि उंटांसाठीही भरपूर गवत व चारा आहे.” \p \v 26 तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लवविले आणि याहवेहची आराधना केली. \v 27 तो म्हणाला, “माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहची स्तुती असो, माझ्या धन्याबरोबर तुम्ही इतक्या प्रेमाने आणि विश्वासूपणाने वागता म्हणून मी तुमचे आभार मानतो. माझ्या धन्याच्या नातेवाईकांच्या कुटुंबात तुम्ही मला सरळ घेऊन आला म्हणूनही मी तुमचे आभार मानतो.” \p \v 28 तेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या कुटुंबातील लोकांना ही बातमी सांगण्यासाठी धावतच घरी गेली. \v 29 रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला; \v 30 त्याने तिची नथ व तिच्या हातातील बांगड्या पाहिल्या आणि रिबेकाहच्या तोंडची हकिकत ऐकली, तेव्हा तो विहिरीकडे गेला आणि पाहिले की तो मनुष्य अद्यापही आपल्या उंटांपाशी विहिरीजवळच उभा आहे. \v 31 त्याने म्हटले, “या, तुम्ही जे याहवेहद्वारे आशीर्वादित आहात, बाहेर का उभे आहात? तुम्हाला राहण्यास खोली आणि उंटांकरिता मी जागा तयार केली आहे.” \p \v 32 मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले. \v 33 यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.” \p लाबान म्हणाला, “ठीक आहे, आम्हाला सांग.” \p \v 34 तेव्हा तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे. \v 35 याहवेहने माझ्या धन्याला फार आशीर्वाद दिले आहेत आणि तो थोर पुरुष झाला आहे. त्यांनी त्याला मेंढरांचे कळप, गुरांची खिल्लारे, सोने चांदी, पुष्कळ दास आणि दासी, उंट आणि गाढवे दिली आहेत. \v 36 माझ्या धन्याला त्याची पत्नी साराह हिच्यापासून वृद्धापकाळात एक पुत्र झाला. माझ्या धन्याने त्याचे सर्वस्व त्याला दिले आहे. \v 37 त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे. \v 38 माझ्या वडिलांच्या कुटुंबात जावे आणि माझ्या स्वतःच्या घराण्यातील लोकांकडे जाऊन माझ्या मुलासाठी येथील मुलगी निवडून मी आणावी, असे त्याने मला बजावले आहे. \p \v 39 “मग मी माझ्या धन्यास विचारले, ती मुलगी माझ्याबरोबर परत आली नाही तर? \p \v 40 “यावर त्याने उत्तर दिले, ‘ती खात्रीने येईल, कारण ज्या याहवेहच्या समक्षतेत मी चालतो ते त्यांचा दूत तुझ्याबरोबर पाठवतील आणि तुझी यात्रा सिद्धीस नेतील. माझ्या नातेवाईकांकडे जाऊन माझ्या वडिलाच्या घराण्यातील एक मुलगी शोधून आण. \v 41 याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’ \p \v 42 “आज मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी अशी प्रार्थना केली की, माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेह, कृपया माझी यात्रा तुम्ही यशस्वी करा. \v 43 पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा असताना पाणी भरण्यास आलेल्या एखाद्या मुलीला म्हणेन, ‘तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला प्यावयास दे,’ \v 44 आणि यावर ती मला म्हणेल, ‘अवश्य महाराज, आणि मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजीन,’ तीच मुलगी माझ्या धन्याच्या पुत्राची पत्नी होण्यासाठी याहवेहने निवडलेली आहे असे होऊ द्या. \p \v 45 “माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’ \p \v 46 “मला पाणी पिता यावे म्हणून तिने आपल्या खांद्यावरील घागर झटकन खाली उतरविली आणि ती मला म्हणाली, ‘अवश्य महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.’ मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले. \p \v 47 “मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ \p “ती म्हणाली, ‘मी नाहोराचे पुत्र बेथुएलाची, ज्यांची माता मिल्का आहे, त्यांची कन्या आहे.’ \p “हे ऐकून मी तिच्या नाकात नथ आणि हातात पाटल्या घातल्या. \v 48 माझ्या धन्याच्या भावाची नात शोधून काढण्यास मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे मस्तक लवविले आणि माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहचे मी स्तवन केले. \v 49 तर आता माझ्या धन्यावर दया आणि विश्वासूपणा दाखवून जे योग्य ते करण्याची तुमची तयारी आहे की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मला ठरविता येईल.” \p \v 50 यावर लाबान आणि बेथुएल यांनी उत्तर दिले, “हे याहवेहकडूनच आहे; हे अगदी उघड आहे. तेव्हा आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट कसे काय बोलावे? \v 51 ही रिबेकाह तुमच्यापुढे आहे, तिला घेऊन जा. याहवेह परमेश्वराने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिला तुमच्या धन्याच्या पुत्राची पत्नी होऊ द्या.” \p \v 52 जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे ऐकले, त्याने याहवेहपुढे गुडघे टेकले. \v 53 मग त्या सेवकाने रिबेकाहला सोने आणि चांदीचे दागिने आणि कपडे दिले; तसेच त्याने तिच्या आईसाठी आणि भावासाठीही पुष्कळ मौल्यवान वस्तू दिल्या. \v 54 यानंतर त्यांनी संध्याकाळचे भोजन केले आणि तो सेवक व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाणेपिणे करून रात्री तिथेच मुक्काम केला. \p दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे परत जाण्यास मला निरोप द्या.” \p \v 55 परंतु तिची आई व भाऊही म्हणाला, “मुलीने आमच्याजवळ कमीतकमी दहा दिवस राहावे अशी आमची इच्छा आहे; नंतर तुम्ही जावे.” \p \v 56 पण विनंती करीत तो म्हणाला, “कृपा करून माझ्या परतण्यात अडथळा आणू नका. कारण याहवेहने माझी यात्रा यशस्वी केली आहे; मला माझ्या मार्गावर पाठवा म्हणजे मी माझ्या धन्याकडे परत जाईन.” \p \v 57 तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून विचारतो” \v 58 त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?” \p तिने उत्तर दिले, “होय, मी जाईन.” \p \v 59 तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली. \v 60 एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: \q1 “आमच्या भगिनी, \q2 तू लक्षावधींची माता हो; \q1 तुझी संतती \q2 त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.” \p \v 61 नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला. \p \v 62 दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता. \v 63 एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले. \v 64 रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली \v 65 आणि सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास येत असलेला तो पुरुष कोण आहे?” \p “ते माझे स्वामी आहेत.” सेवकाने उत्तर दिले. तेव्हा तिने आपले मुख बुरख्याने झाकून घेतले. \p \v 66 आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला. \v 67 मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले. \c 25 \s1 अब्राहामाचा मृत्यू \p \v 1 अब्राहामाने दुसरी पत्नी केली होती, तिचे नाव केटूराह होते. \v 2 तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले. \v 3 योक्षान हा शबा आणि ददान यांचा पिता; अश्शूरी, लटूशी आणि लऊमी हे ददानाचे गोत्र होते. \v 4 एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते. \p \v 5 अब्राहामाने आपली सर्व मालमत्ता इसहाकाच्या नावावर केली. \v 6 परंतु अब्राहाम जिवंत असताना त्याने आपल्या दासीपुत्रांनाही देणग्या दिल्या आणि त्याने त्यांना इसहाकापासून दूर, पूर्वेकडे पाठवून दिले. \p \v 7 अब्राहाम एकशे पंचाहत्तर वर्षे जगला. \v 8 मग अब्राहामाने अखेरचा श्वास घेतला आणि एका वृद्धावस्थेत, परिपूर्ण वयाचा होऊन मरण पावला; आणि मग तो त्याच्या लोकांना जाऊन मिळाला. \v 9 त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले, \v 10 हे अब्राहामाने हेथच्या लोकांकडून विकत घेतलेले शेत. तिथे अब्राहामाला त्याची पत्नी साराहजवळ मूठमाती देण्यात आली. \v 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने इसहाकाला आशीर्वाद दिला, जो नंतर बएर-लहाई-रोई या ठिकाणी राहवयास गेला. \s1 इश्माएलाचे गोत्र \p \v 12 ही अब्राहामाचा पुत्र इश्माएलची वंशावळ आहे, जो साराहची इजिप्तमधील दासी हागारेपासून जन्मला. \b \lh \v 13 ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: \b \li1 इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, \li1 नंतर केदार, अदबील, मिबसाम, \li1 \v 14 मिश्मा, दूमाह, मस्सा, \li1 \v 15 हदद, तेमा, यतूर, \li1 नापीश आणि केदमाह. \b \lf \v 16 हे इश्माएलाचे पुत्र होते आणि त्यांच्या गावांवरून आणि छावण्यांनुसार हे बारा वंशाचे प्रधान झाले. \b \p \v 17 इश्माएल एकशे सदतीस वर्षे जगला. त्याने आपला शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला आणि तो आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. \v 18 त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश इजिप्त देशाच्या सीमेवर अश्शूरच्या बाजूला आहे. ते एकमेकांशी वैराभावाने\f + \fr 25:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांच्या पूर्व दिशेकडे\fqa*\f* राहत होते. \s1 याकोब व एसाव \p \v 19 अब्राहामाचा मुलगा इसहाक याची वंशावळ अशी आहे: \b \p अब्राहाम हा इसहाकाचा पिता झाला, \v 20 जेव्हा इसहाकाने रिबेकाहशी विवाह केला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता. रिबेकाह पद्दन-अराम येथील अरामी बेथुएलाची कन्या आणि लाबानाची बहीण होती. \p \v 21 इसहाकाने याहवेहची प्रार्थना करून रिबेकाहला मूल देण्याची विनंती केली, कारण तिला मूल नव्हते. याहवेहने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची पत्नी रिबेकाह गर्भवती झाली. \v 22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली. \p \v 23 याहवेहने तिला सांगितले, \q1 “तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत, \q2 तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील; \q1 एकजण दुसर्‍यापेक्षा बलवान होईल, \q2 मोठा लहान्याची सेवा करेल.” \p \v 24 तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला तेव्हा पाहा, तिला जुळे पुत्र झाले. \v 25 पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसाव\f + \fr 25:25 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa केसाळ\fqa*\f* असे ठेवले. \v 26 मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोब\f + \fr 25:26 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa फसविणारा\fqa*\f* असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता. \p \v 27 हळूहळू ती मुले वाढली. एसाव एक तरबेज शिकारी झाला, खुल्या मैदानातील फिरणारा मनुष्य होता, पण याकोब तसा शांत स्वभावाचा असून त्याला तंबूतच राहण्यास आवडे. \v 28 इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता. \p \v 29 एकदा याकोब वरण शिजवित असताना एसाव शिकारीहून खूप थकूनभागून आला. \v 30 तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम\f + \fr 25:30 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa तांबडा\fqa*\f* असेही म्हणतात.) \p \v 31 याकोबाने उत्तर दिले, “प्रथम तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे.” \p \v 32 एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” \p \v 33 परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला. \p \v 34 तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला. \p अशा रीतीने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला. \c 26 \s1 इसहाक आणि अबीमेलेख \p \v 1 त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला. \v 2 याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा. \v 3 या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन. \v 4 मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्‍यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. \v 5 कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.” \v 6 म्हणून इसहाक गरारातच राहिला. \p \v 7 जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” कारण “ती माझी पत्नी आहे” असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, “या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे.” \p \v 8 तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे. \v 9 अबीमेलेखाने इसहाकाला बोलाविणे पाठविले आणि त्याला म्हणाला, “निश्चितच ही तुझी पत्नी आहे, ‘तर ती माझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” \p इसहाकाने उत्तर दिले, “तिच्यामुळे माझा कोणी वध करेल अशी मला भीती वाटली.” \p \v 10 अबीमेलेखाने उद्गार काढले, “तू आमच्यासोबत असे का केले? माझ्या लोकांपैकी कोणीही तिच्यासोबत निजला असता आणि तू आमच्यावर दोष आणला असतास.” \p \v 11 यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.” \p \v 12 इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले. \v 13 तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला. \v 14 त्याच्याकडे इतके मेंढ्या, गुरे आणि नोकर होते की पलिष्ट्यांनी त्याचा हेवा केला. \v 15 म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या. \p \v 16 तेव्हा अबीमेलेखाने इसहाकाला म्हटले, “तू आमच्यापासून दूर निघून जा; तू आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहेस.” \p \v 17 तेव्हा इसहाकाने ते ठिकाण सोडले आणि गरारच्या खोर्‍यात तळ देऊन राहू लागला. \v 18 इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली. \p \v 19 इसहाकाच्या नोकरांनी खोर्‍यात एक नवी विहीर खणली आणि तिथे त्यांना गोड पाण्याचा एक झरा सापडला. \v 20 मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक\f + \fr 26:20 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa मतभेद\fqa*\f* असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले. \v 21 मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह\f + \fr 26:21 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa आक्षेप\fqa*\f* असे ठेवले. \v 22 यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ\f + \fr 26:22 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa विस्तीर्ण जागा\fqa*\f* असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.” \p \v 23 पुढे इसहाक तिथून बेअर-शेबाला गेला; \v 24 त्याच रात्री याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा पिता अब्राहामाचा परमेश्वर आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन आणि तुझा वंश वाढवेन.” \p \v 25 मग इसहाकाने तिथे एक वेदी बांधली आणि याहवेहची उपासना केली. त्याने तिथे वस्ती केली आणि तिथे त्यांच्या नोकरांनी एक विहीर खणली. \p \v 26 एके दिवशी त्याला भेटण्यासाठी गरारहून अबीमेलेख, त्याचा सल्लागार अहुज्जाथ आणि त्याचा सेनापती पीकोल हे आले. \v 27 “तुम्ही येथे का आला?” इसहाकाने त्यांना विचारले, “कारण तुम्ही मला द्वेषाने वागवून हाकलून दिले होते.” \p \v 28 यावर ते म्हणाले, “आम्हाला हे स्पष्टपणे दिसत आहे की, याहवेह तुला आशीर्वादित करीत आहेत; तुझ्याशी —तुझ्या आणि आमच्यामध्ये एक करार करावा असे आम्हाला वाटले. म्हणून आम्हाला तुमच्याबरोबर करार करू द्यावा. \v 29 आम्ही जसा तुला कसलाही उपद्रव दिला नाही, तसा तू आम्हाला कसलाही उपद्रव देणार नाहीस, असे वचन दे. उलट आम्ही तुझे भलेच केले आणि तुला शांतीने जाऊ दिले; आणि आता तू याहवेहद्वारे आशीर्वादित झाला आहे.” \p \v 30 इसहाकाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांनी खाणेपिणे केले. \v 31 पहाटेस उठल्याबरोबर त्यांनी एकमेकांशी करार केला. नंतर इसहाकाने त्यांना निरोप दिला व ते शांतीने परतले. \p \v 32 त्या दिवशी इसहाकाचे नोकर त्याच्याकडे येऊन त्याला सांगू लागले. “आम्ही खणीत असलेल्या विहिरीला पाणी लागले आहे!” \v 33 त्याने तिला शिबाह\f + \fr 26:33 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa सात \fqa*\ft किंवा \ft*\fqa शपथ\fqa*\f* म्हटले, आणि आजपर्यंत या नगराचे नाव बेअर-शेबा असे आहे. \s1 याकोब एसावाचा आशीर्वाद घेतो \p \v 34 एसावाने त्याच्या चाळिसाव्या वर्षी यहूदीथ नावाच्या बवरी हिथीच्या मुलीसोबत आणि एलोन हिथी याची कन्या बासमाथ हिच्याबरोबरही विवाह केला. \v 35 त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या. \c 27 \p \v 1 इसहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा एके दिवशी त्याने आपला ज्येष्ठपुत्र एसाव याला हाक मारली व म्हटले, “माझ्या मुला.” \p “बाबा, काय आज्ञा,” तो उत्तरला. \p \v 2 तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “मी आता वृद्ध झालो आहे, आणि माझ्या मृत्यूचा दिवस मला माहीत नाही. \v 3 तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण. \v 4 मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर आणि मला खाण्यासाठी ते इकडे घेऊ ये, म्हणजे मरण्यापूर्वी मी माझा आशीर्वाद तुला देईन.” \p \v 5 इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला, \v 6 रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले, \v 7 एखाद्या वनपशूची शिकार करून आण, मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर, म्हणजे मरण्यापूर्वी याहवेहच्या सानिध्यात जो आशीर्वाद आहे, तो मी तुला देईन, हे सांगताना मी ऐकले.” \v 8 ती म्हणाली, “आता माझ्या मुला, नीट लक्ष देऊन ऐक व मी सांगते तसेच कर: \v 9 बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन, \v 10 मग ते तू आपल्या वडिलांकडे घेऊन जा. म्हणजे मृत्यूपूर्वी ते तुला आशीर्वाद देतील.” \p \v 11 याकोब त्याची आई रिबेकाहला म्हणाला, “पण माझा भाऊ एसाव तर केसाळ आहे आणि माझी कातडी अगदी केसरहित आहे. \v 12 वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.” \p \v 13 तेव्हा रिबेकाह म्हणाली, “माझ्या बाळा, ते शाप माझ्यावर पडोत. मी सांगते त्याप्रमाणे तू कर, बाहेर जा आणि करडे घेऊन ये.” \p \v 14 तेव्हा याकोबाने करडे कापून, स्वच्छ करून आपल्या आईकडे आणली, आणि तिने त्याच्या वडिलांना आवडणारे रुचकर भोजन तयार केले. \v 15 मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले. \v 16 तिने त्याचा हात आणि मानेवरचा गुळगुळीत भाग करडांच्या कातड्याने झाकला. \v 17 नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली. \p \v 18 आपल्या वडिलाजवळ जाऊन याकोब म्हणाला, “बाबा.” \p तो म्हणाला, “काय माझ्या बाळा? तू कोण आहेस?” \p \v 19 तेव्हा याकोबाने उत्तर दिले, “मी एसाव, तुमचा ज्येष्ठपुत्र आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. कृपया उठून बसा आणि तुमच्यासाठी शिकार करून आणलेले भोजन खा, म्हणजे तुम्ही मला तुमचे आशीर्वाद द्या.” \p \v 20 त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” \p तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.” \p \v 21 मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.” \p \v 22 तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” \v 23 त्याने त्याला ओळखले नाही, कारण त्याचे हात एसावाच्या हातांसारखे केसाळ होते. तो याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी तयार झाला, \v 24 त्याने विचारले, “तू खरोखर माझा पुत्र एसावच आहेस काय?” \p तो म्हणाला “होय, मीच आहे.” \p \v 25 मग इसहाक त्यास म्हणाला, “त्या शिकारीचे भोजन इकडे आण. मी ते खाईन आणि माझे आशीर्वाद तुला देईन.” \p तेव्हा याकोबाने जेवणाचे ताट आणले, तो जेवला आणि मग द्राक्षारस त्याच्याकडे आणले, तेही तो प्याला. \v 26 मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.” \p \v 27 तो आपल्या पित्याजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. जेव्हा इसहाकाला त्याच्या वस्त्रांचा वास आला, तेव्हा त्याला आशीर्वाद देत तो म्हणाला, \q1 “अहा, माझ्या पुत्राचा सुगंध, \q2 जसा याहवेहने आशीर्वादित केलेल्या शेताचा. \q1 \v 28 परमेश्वर तुला आकाशातील दव \q2 आणि पृथ्वीची समृद्धी देतील, \q2 भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील. \q1 \v 29 राष्ट्रे तुझी सेवा करोत, \q2 आणि लोक तुझ्यापुढे नमोत. \q1 तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. \q2 तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. \q1 जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, \q2 आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.” \p \v 30 इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला \v 31 त्यानेही आपल्या पित्यासाठी रुचकर भोजन तयार केले आणि त्याच्याकडे ते घेऊन आला व म्हणाला, “बाबा, हे पाहा मी शिकार घेऊन आलो आहे. उठून बसा आणि हे खा म्हणजे मला तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ शकाल.” \p \v 32 हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” \p त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.” \p \v 33 त्याचवेळी इसहाकाच्या शरीराला भयंकर कंप सुटला आणि तो म्हणाला, “तर मग आताच शिकार घेऊन माझ्याकडे आला होता तो कोण होता? तू येण्यापूर्वी मी तर ते खाल्ले आणि माझे आशीर्वादही त्याला दिले. होय, त्याला ते आशीर्वाद आता मिळणारच.” \p \v 34 जेव्हा एसावाने आपल्या पित्याचे हे शब्द ऐकले, तेव्हा तो अतिदुःखाने हंबरडा फोडून आपल्या पित्यास म्हणाला, “बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या.” \p \v 35 परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.” \p \v 36 यावर एसावाने म्हटले, “त्याचे नाव याकोब योग्यच नाही काय? त्याने दुसर्‍यांदा मला फसविले आहे. त्याने माझा जन्मसिध्द हक्क घेतला आणि आता माझा आशीर्वादही चोरला आहे.” नंतर त्याने विचारले, “माझ्यासाठी तुम्ही एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?” \p \v 37 परंतु इसहाकाने एसावास उत्तर दिले, “मी त्याला तुझा धनी आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना त्याचे नोकर करून ठेवले आहे. मी त्याला भरपूर धान्य आणि द्राक्षारस यांची हमी दिली आहे. आता देण्याचे काय शिल्लक राहिले आहे, माझ्या मुला?” \p \v 38 एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला. \p \v 39 त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले, \q1 “तुझे वास्तव्य \q2 सुपीक प्रदेशापासून दूर \q2 आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल. \q1 \v 40 तलवारीच्या जोरावर तू जगशील \q2 तू आपल्या भावाची सेवा करशील, \q1 परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, \q2 तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू \q2 तू तुझ्यावरून झुगारून देशील.” \p \v 41 एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.” \p \v 42 परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे. \v 43 तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा. \v 44 तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा. \v 45 तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?” \p \v 46 नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.” \c 28 \p \v 1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस. \v 2 तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर. \v 3 सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो. \v 4 अब्राहामाला जे आशीर्वाद परमेश्वराने दिले, ते तुझ्या वंशजाला लाभोत, ज्या भूमीवर तू आता परदेशी म्हणून राहत आहेस, ती भूमी तुझ्या मालकीची होवो, कारण परमेश्वराने ती अब्राहामाला दिलेली आहे.” \v 5 अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले. \p \v 6 एसावाला समजले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पद्दन-अराम येथे पत्नी करण्यासाठी पाठविले आहे, आणि जेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा त्याला आज्ञा दिली की तू कनानी मुलीशी विवाह करू नको, \v 7 आणि याकोब आपल्या पित्याची व आईची आज्ञा पाळून पद्दन-अराम येथे गेला. \v 8 तेव्हा एसावाला समजले की, त्याचे वडील इसहाकाला कनानी मुली अजिबात आवडत नाहीत. \v 9 म्हणून एसाव अब्राहामाचा पुत्र इश्माएलच्या घरी गेला आणि तिथे त्याने त्याची कन्या, नबायोथाची बहीण माहलथशी विवाह केला आणि माहलथ त्याच्या पूर्वीच्या पत्नींमध्ये सामील झाली. \s1 याकोबाला बेथेल येथे पडलेले स्वप्न \p \v 10 याकोब बेअर-शेबा सोडून हारानास जाण्यास निघाला. \v 11 त्या रात्री सूर्य मावळल्यावर तो मुक्कामास एके ठिकाणी थांबला असताना, त्याने एक धोंडा उशासाठी घेतला आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला. \v 12 तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याने पृथ्वीवर उभी केलेली व तिचे वरचे टोक स्वर्गाला टेकलेले आहे अशी एक शिडी पाहिली. परमेश्वराचे दूत त्या शिडीवरून वर जाताना व खाली उतरतांना त्याने पाहिले. \v 13 शिडीच्या वरच्या टोकाला याहवेह उभे राहून त्यास म्हणाले, “मी याहवेह, तुझा पिता अब्राहाम व इसहाक यांचा परमेश्वर आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन. \v 14 तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव\f + \fr 28:14 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa पश्चिम\fqa*\f* पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. \v 15 पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.” \p \v 16 मग याकोब झोपेतून जागा झाला, त्याने विचार केला, “निश्चितच याहवेहची उपस्थिती या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हते. \v 17 तो भयभीत झाला आणि म्हणाला, हे किती अद्भुत स्थळ आहे! हे परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही; हे स्वर्गाचे द्वार आहे.” \p \v 18 दुसर्‍या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले. \v 19 त्याने त्या जागेचे नाव बेथेल\f + \fr 28:19 \fr*\fq बेथेल \fq*\ft अर्थात् \ft*\fqa परमेश्वराचे घर\fqa*\f* असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते. \p \v 20 नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील, \v 21 व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील \v 22 आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.” \c 29 \s1 याकोब पदनअराम येथे येतो \p \v 1 प्रवास करीत याकोब पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात आला. \v 2 त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते. \v 3 सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत. \p \v 4 याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?” \p ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.” \p \v 5 तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?” \p “हो, आम्ही ओळखतो,” त्यांनी उत्तर दिले. \p \v 6 यावर याकोबाने त्यांना विचारले, “ते बरे आहेत काय?” \p “तो बरा आहे, ती पाहा, त्याची कन्या राहेल मेंढरांचा कळप घेऊन इकडेच येत आहे.” ते म्हणाले. \p \v 7 याकोबाने म्हटले, “पाहा सूर्य अजून मावळला नाही; कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झालेली नाही. त्यांना पाणी पाजून पुन्हा चरावयास घेऊन जा.” \p \v 8 आम्ही तसे करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिले, “सगळे कळप येथे जमल्यानंतर आम्ही विहिरीवरील दगड बाजूला काढतो आणि कळपांना पाणी पाजतो.” \p \v 9 त्यांचे संभाषण चालू असताना राहेल आपल्या पित्याची मेंढरे घेऊन तिथे आली, कारण ती मेंढपाळ होती. \v 10 जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले. \v 11 नंतर याकोबाने राहेलचे चुंबन घेतले आणि तो मोठ्याने रडू लागला. \v 12 याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली. \p \v 13 लाबानाला आपल्या बहिणीचा मुलगा याकोबाची बातमी कळताच तो त्याला लगबगीने भेटावयाला आला. त्याने त्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले आणि त्याला आपल्या घरी आणले आणि तिथे याकोबाने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. \v 14 तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तू माझे स्वतःचे मांस व रक्त आहेस.” \s1 लेआ व राहेल यांच्याशी याकोब विवाह करतो \p याकोबाला तिथे राहून सुमारे एक महिना झाल्यानंतर, \v 15 लाबान त्याला म्हणाला, “आपण एकमेकांचे नातेवाईक असलो तरी त्यामुळे तू माझ्यासाठी फुकट काम करावे हे योग्य नाही. तू वेतन म्हणून काय घेशील?” \p \v 16 लाबानाला दोन कन्या होत्या. वडील कन्येचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल. \v 17 लेआचे डोळे निस्तेज\f + \fr 29:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa नाजूक\fqa*\f* होते पण राहेल बांधेसूद व दिसायला सुंदर होती. \v 18 याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.” \p \v 19 लाबान म्हणाला, “परकीय मनुष्याला तिला देण्यापेक्षा ती तुला देणेच उत्तम आहे. माझ्यासोबत इथे राहा.” \v 20 याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली. \p \v 21 तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.” \p \v 22 तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली. \v 23 परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली. \v 24 आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली. \p \v 25 पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?” \p \v 26 लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही. \v 27 लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.” \p \v 28 याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली. \v 29 लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली. \v 30 मग याकोबाने राहेलचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. तो तिच्यावर लेआपेक्षा अधिक प्रेम करी आणि तिच्यासाठी आणखी सात वर्षे तिथे राहून त्याने काम केले. \s1 याकोबाची संतती \p \v 31 याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली. \v 32 लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन\f + \fr 29:32 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa पाहा, एक पुत्र\fqa*\f* असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.” \p \v 33 लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन\f + \fr 29:33 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa ऐकणारा\fqa*\f* असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.” \p \v 34 मग ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला; आणि ती म्हणाली, “यावेळी माझे पती माझ्याशी पुन्हा जोडले जातील, कारण मी त्यांना तीन पुत्र दिले.” म्हणून त्याचे नाव लेवी\f + \fr 29:34 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa जोडलेला\fqa*\f* असे ठेवण्यात आले. \p \v 35 ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक पुत्र झाला तिने त्याचे नाव यहूदाह\f + \fr 29:35 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa स्तुती\fqa*\f* असे ठेवले, कारण ती म्हणाली, “आता मी याहवेहची स्तुती करेन.” यानंतर तिला मूल होण्याचे थांबले. \c 30 \p \v 1 राहेलने पाहिले की याकोबाला तिच्यापासून मूल होत नाही, तेव्हा ती आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली. “मला मूल द्या, नाहीतर मी मरून जाईन,” ती याकोबास म्हणाली. \p \v 2 त्यामुळे याकोब संतापून राहेलला म्हणाला, “मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे, ज्यांनी तुला मूल होण्यापासून रोखले आहे?” \p \v 3 मग ती म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार करा. जेणेकरून ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल आणि मीही तिच्याद्वारे कुटुंब तयार करू शकेन.” \p \v 4 याप्रमाणे तिने आपली दासी बिल्हा, त्याला पत्नी म्हणून दिली, आणि याकोबाने तिचा स्वीकार केला, \v 5 आणि बिल्हा गर्भवती झाली व याकोबाच्या पुत्राला जन्म दिला, \v 6 राहेलने त्याचे नाव दान\f + \fr 30:6 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa न्याय\fqa*\f* असे ठेवले, कारण ती म्हणाली, “परमेश्वराने मला न्याय दिला आहे; त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि मला एक पुत्र दिला आहे.” \p \v 7 राहेलची दासी बिल्हा ही पुन्हा गर्भवती झाली आणि तिने याकोबाच्या अजून एका पुत्राला जन्म दिला. \v 8 राहेलने त्याचे नाव नफताली\f + \fr 30:8 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa माझा संघर्ष\fqa*\f* असे ठेवले. कारण ती म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जोरदार संघर्ष करून विजयी झाले आहे.” \p \v 9 आपण पुन्हा गर्भवती होत नाही, हे लक्षात घेऊन लेआने आपली दासी जिल्पा याकोबाला पत्नी म्हणून दिली. \v 10 याकोबापासून लेआची दासी जिल्पाने एका पुत्राला जन्म दिला. \v 11 लेआ म्हणाली, “हा किती आशीर्वाद आहे!” म्हणून तिने त्याचे नाव गाद\f + \fr 30:11 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa माझे भाग्य उजळले \fqa*\ft किंवा \ft*\fqa सैन्य\fqa*\f* असे ठेवले. \p \v 12 लेआची दासी जिल्पाला याकोबापासून दुसरा पुत्र झाला. \v 13 लेआने त्याचे नाव आशेर\f + \fr 30:13 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa धन्य\fqa*\f* ठेवले. कारण ती म्हणाली. “मी किती आनंदी आहे! स्त्रिया मला धन्य म्हणतील.” \p \v 14 गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात काम करताना एके दिवशी त्याला पुत्रदात्रीची फळे\f + \fr 30:14 \fr*\fq पुत्रदात्रीची फळे \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa दूदाईम\fqa*\f* सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेलने लेआजवळ विनंती केली, “तुझ्या मुलाने पुत्रदात्रीची फळे आणली आहेत, त्यातील काही मला दे.” \p \v 15 पण लेआ तिला म्हणाली, “माझा पती घेतलास तेवढे पुरे झाले नाही काय? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देखील तू घेशील काय?” \p राहेल म्हणाली, “ठीक आहे. तुझ्या पुत्रदात्रीच्या फळांच्या मोबदल्यात, याकोब आज रात्री तुझ्याकडे येईल.” \p \v 16 जेव्हा संध्याकाळी याकोब शेतातून आला, लेआ त्याला भेटण्यासाठी बाहेर गेली. ती म्हणाली, “आज तुम्ही माझ्याबरोबर निजावे, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हाला त्या मोबदल्यात घेतले आहे.” त्याप्रमाणे त्या रात्री तो तिच्यासोबत निजला. \p \v 17 परमेश्वराने लेआचे ऐकले आणि ती पुन्हा गर्भवती होऊन तिने याकोबाच्या पाचव्या पुत्राला जन्म दिला. \v 18 तिने त्याचे नाव इस्साखार\f + \fr 30:18 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa बक्षीस\fqa*\f* असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.” \p \v 19 नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला. \v 20 तिने त्याचे नाव जबुलून\f + \fr 30:20 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa आदर\fqa*\f* असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “परमेश्वराने माझ्या पतीसाठी मला चांगल्या देणग्या दिल्या आहेत. कारण मी त्याच्या सहा पुत्रांना जन्म दिला आहे, आता ते मला माझा आदर करतील.” \p \v 21 काही वेळेनंतर तिने एका कन्येला जन्म दिला आणि तिचे नाव दीना असे ठेवले. \p \v 22 तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले. \v 23 ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.” \v 24 तिने त्याचे नाव योसेफ\f + \fr 30:24 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa ते वृद्धी करोत.\fqa*\f* असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.” \s1 याकोबाच्या कळपात वाढ \p \v 25 राहेलने योसेफास जन्म दिल्यानंतर याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी माझ्या देशाला जाईन. \v 26 माझ्या स्त्रिया व मुले यासह मला जाऊ द्या. त्यांच्यासाठी मी तुमची किती सेवा केली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे.” \p \v 27 पण लाबान त्याला म्हणाला, “माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर कृपया थांब. तुझ्यामुळे याहवेहने मला आशीर्वाद दिला आहे हे मला भविष्यकथनाने कळले आहे. \v 28 तुला किती वेतन हवे ते मला सांग म्हणजे मी तुला तेवढे देईन.” \p \v 29 याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची चाकरी कशी केली आणि तुमची गुरे माझ्या देखरेखीखाली कशी राहिली हे तुम्हाला माहीत आहे. \v 30 मी येण्यापूर्वी तुमच्याकडे जे होते ते खूप वाढले आहे आणि मी जिथे होतो तिथे याहवेहने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. पण माझ्या स्वतःच्या कुटुंबीयांकडे मी केव्हा लक्ष देणार?” \p \v 31 “मी तुला काय देऊ?” त्याने विचारले. \p “मला काहीही देऊ नका,” याकोबने उत्तर दिले. “पण जर तुम्ही माझ्यासाठी हे केले तर मी तुमच्या कळपांचे पालन करेन आणि त्यांचा सांभाळ करेन: \v 32 आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल. \v 33 आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.” \p \v 34 लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.” \v 35 त्याच दिवशी लाबान आपल्या कळपात गेला आणि त्याने पट्टेदार आणि ठिपके असलेली बोकडे व डाग आणि ठिपके असलेल्या शेळ्या (ज्यांच्यावर पांढरा डाग होता) आणि गडद रंगांची मेंढरे वेगळी करून आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केली. \v 36 नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला. \p \v 37 मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या. \v 38 त्या काठ्या त्याने कळपाच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात ठेवल्या, जेणेकरून जेव्हा ते पाणी पिण्याकरिता येतील तेव्हा ते थेट कळपांसमोर असतील. \v 39 त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत. \v 40 मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही. \v 41 जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी. \v 42 पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत. \v 43 याचा परिणाम असा झाला की, याकोब खूप श्रीमंत झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट आणि गाढवे त्याच्या मालकीची झाली. \c 31 \s1 याकोबाचे लाबानापासून पलायन \p \v 1 याकोबाने लाबानाच्या पुत्रांचे म्हणणे ऐकले, “आमच्या वडिलांचे जे सर्वकाही होते ते याकोबाने घेतले आहे आणि ही सर्व संपत्ती त्याला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांची होती.” \v 2 आणि याकोबाला दिसून आले की लाबानची त्याच्याबद्दलची वृत्ती आता पूर्वीसारखी राहिली नाही. \p \v 3 तेव्हा याहवेह याकोबाशी बोलले आणि म्हणाले, “तू आता आपल्या वडिलांच्या व नातलगांच्या देशात परत जा आणि मी तुझ्याबरोबर असेन.” \p \v 4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना ज्या शेतात तो कळप राखीत होता तिथे बोलावून घेतले. \v 5 तो त्यांना म्हणाला, “मी पाहतो की तुमच्या वडिलांची वृत्ती माझ्याशी पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण माझ्या वडिलांचे परमेश्वर माझ्याबरोबर आहेत. \v 6 मी तुमच्या वडिलांची आपल्या सर्व शक्तिनिशी सेवा केली हे तुम्हाला माहीत आहे; \v 7 तरीपण तुमच्या वडिलांनी माझ्या वेतनाबाबत केलेला करार दहा वेळा बदलून मला फसविले आहे, तरी परमेश्वराने त्यांना माझे काही वाईट करू दिले नाही. \v 8 कारण ज्यावेळी त्यांनी म्हटले की, डाग असलेल्या शेळ्यामेंढ्या तुझ्या, त्यावेळी सर्व कळपांना डाग असलेली करडे होत. जेव्हा ते आपले मन बदलून म्हणत, पट्टेदार शेळ्यामेंढ्या तुझ्या, तेव्हा त्यांना सर्व पट्टेदार करडे होत. \v 9 अशा रीतीने तुमच्या वडिलांच्या शेळ्यामेंढ्या त्यांच्यापासून काढून परमेश्वराने ती मला दिली आहेत. \p \v 10 “कळप फळावयाच्या ॠतूत मला स्वप्नात दिसले की, कळप फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. \v 11 मग स्वप्नामध्ये परमेश्वराच्या दूताने मला बोलावून म्हटले, ‘याकोबा,’ मी उत्तर दिले, ‘हा मी इथे आहे.’ \v 12 आणि त्यांनी मला सांगितले, ‘तुझी नजर वर कर आणि पाहा की, फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. कारण लाबानाने तुझ्याशी कसा व्यवहार केला हे सर्व मी पाहिले आहे. \v 13 मीच तुला बेथेलमध्ये भेटलेला परमेश्वर आहे. त्या ठिकाणी तू स्तंभाला तैलाभ्यंग करून शपथ वाहिली होती. आता तू हा देश सोडून आपल्या मायदेशी परत जा.’ ” \p \v 14 तेव्हा राहेल आणि लेआ यांनी उत्तर दिले, “आता आमच्या वडिलांच्या संपत्तीत आमचा काही वाटा राहिला आहे काय? \v 15 ते आम्हाला परकियांसारखी वागणूक देत नाहीत काय? त्यांनी आम्हाला केवळ विकलेच नाही, तर आमच्याबद्दल मिळालेला सर्व मोबदला वापरून संपविला आहे. \v 16 आमच्या वडिलांकडून परमेश्वराने हे धन काढून घेतले आहे, ते निश्चितच आमचे आणि आमच्या मुलाबाळांचे धन आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे तसे करा.” \p \v 17 मग याकोबाने आपल्या पत्नी व मुलांना उंटांवर बसविले \v 18 आणि त्याने आपल्यापुढे कळप हाकीत, पद्दन-अराम येथे मिळालेली सर्व मालमत्ता घेऊन त्याचे वडील इसहाक याचा देश कनान इथे जाण्यास निघाला. \p \v 19 जेव्हा लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला असताना, राहेलने आपल्या वडिलांच्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरल्या. \v 20 याकोब अरामी लाबानाला काहीही न सांगता त्याला फसवून पळाला. \v 21 अशा रीतीने आपली सर्व चीजवस्तू घेऊन, फरात नदी ओलांडून ते सर्वजण गिलआद डोंगराळ प्रदेशाच्या वाटेला लागले. \s1 लाबान याकोबाचा पाठलाग करतो \p \v 22 याकोब पळून गेला आहे, हे लाबानाला तिसर्‍या दिवशी सांगण्यात आले. \v 23 तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले. \v 24 पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.” \p \v 25 लाबानाने याकोबास गाठले तेव्हा याकोब गिलआद डोंगरमाथ्यावर तळ देऊन राहिला होता. मध्यंतरीच्या काळात लाबानानेदेखील आपला तळ डोंगराच्या पायथ्याशी दिला. \v 26 लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस? \v 27 असे गुप्तपणे पळून तू मला का फसविले? तू मला का सांगितले नाही, जेणेकरून झांज व वीणेचे गायन-वादन करून समारंभाने आनंदाने निरोप देण्याची मला संधी मिळाली असती? \v 28 माझ्या नातवंडाचा निरोप घेण्यापूर्वी, तू मला त्यांची चुंबने देखील घेऊ दिली नाहीस. ही मूर्खपणाची वागणूक आहे. \v 29 मी तुझे नुकसान करू शकलो असतो, पण तुझ्या पूर्वजांचे परमेश्वर काल रात्री मला म्हणाले, ‘सावध राहा, तू याकोबला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.’ \v 30 आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?” \p \v 31 याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल. \v 32 पण ज्याच्याकडून तुम्हाला तुमची कुलदैवते मिळतील, तो जिवंत राहणार नाही. आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, माझ्याबरोबर येथे तुमचे काही आहे की नाही ते स्वतःच पाहा; आणि असल्यास, ते घ्या.” राहेलने त्या मूर्ती चोरल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते. \p \v 33 लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला. \v 34 आता राहेलने त्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरून आपल्या उंटाच्या खोगिरामध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्या खोगिरावर बसली होती. लाबानाने तिच्या तंबूमध्ये कसून शोध केला तरी त्याला त्या सापडल्या नाहीत. \p \v 35 राहेल त्याला म्हणाली, “बाबा मी तुमच्यापुढे उभी राहू शकत नाही कारण मी ॠतुमती आहे.” अशाप्रकारे त्याने शोध केला, परंतु त्याला कुलदैवतांच्या मूर्ती आढळल्या नाही. \p \v 36 तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात? \v 37 माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या. \p \v 38 “वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही. \v 39 मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले. \v 40 माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे. \v 41 अशा स्थितीत मी वीस वर्षे काढली. चौदा वर्षे तुमच्या दोन मुली मिळविण्याकरिता आणि सहा वर्षे कळप मिळविण्याकरिता आणि तेवढ्या काळात तुम्ही दहा वेळेस माझ्या वेतनात फेरबदल केला. \v 42 जर माझे पिता इसहाकाचे परमेश्वर, अब्राहामाचे परमेश्वर आणि इसहाकास ज्यांचे भय वाटते, ते माझ्यासह नसते, तर तुम्ही मला रिकामी हाताने पाठवून दिले असते. पण परमेश्वराने माझे परिश्रम व माझ्या हातांनी केलेले कष्ट पाहिले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला काल रात्री दर्शन देऊन धमकाविले.” \p \v 43 यावर लाबानाने याकोबास उत्तर दिले, “या स्त्रिया माझ्या मुली आहेत; ही मुलेबाळेही माझी आहेत; हे कळप व तुझे जे आहे ते सर्व माझेच आहे. तेव्हा माझ्या कन्या व त्यांची संतती यांचे मी आता करू? \v 44 तर चल, आपण दोघे म्हणजे तू आणि मी शांतीचा करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष होवो.” \p \v 45 तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला; \v 46 आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले. \v 47 मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद\f + \fr 31:47 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa साक्षीची रास\fqa*\f* असे नाव दिले. \p \v 48 लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात. \v 49 यावरून तिला मिस्पाह\f + \fr 31:49 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa टेहळणीचा बुरूज\fqa*\f* असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.” \v 50 तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.” \p \v 51 लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे. \v 52 हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे. \v 53 अब्राहामाचे परमेश्वर आणि नाहोराचे परमेश्वर आणि त्याच्या पित्याचे परमेश्वर, आमच्यामध्ये न्याय करोत.” \p मग याकोबाने त्याचे वडील इसहाकाला ज्यांचे भय होते त्यांच्या नावाने शपथ घेतली. \v 54 नंतर याकोबाने डोंगराच्या माथ्यावर परमेश्वराला एक अर्पण वाहिले. त्याने आपल्या सर्व नातलगांना मेजवानीस बोलाविले आणि त्यांनी भोजन करून ती सर्व रात्र त्या डोंगरावर घालविली. \p \v 55 लाबान दुसर्‍या दिवशी सकाळीच उठला व त्याने आपल्या कन्यांची व नातवंडांची चुंबने घेतली, त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो घरी परत गेला. \c 32 \s1 याकोब एसावला भेटण्याची तयारी करतो \p \v 1 याकोब आपल्या वाटेने जात असता परमेश्वराचा दूत त्यास भेटले. \v 2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम\f + \fr 32:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa दोन सैन्यतळ\fqa*\f* असे ठेवले. \p \v 3 याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले; \v 4 आणि त्याने दूतांना आज्ञा दिली की, तुम्ही माझा धनी एसाव याला जाऊन सांगा: “तुमचा सेवक याकोब म्हणतो, मी आतापर्यंत आपले मामा लाबान यांच्याकडे राहत होतो. \v 5 आता मी गुरे, गाढवे, मेंढरे, पुष्कळ स्त्रीपुरुष चाकर यांचा धनी झालो आहे. मी हा निरोप तुमच्याकडे पाठवित आहे कि तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्यावी.” \p \v 6 निरोप्यांनी परत येऊन याकोबास सांगितले की, “आपला भाऊ एसाव चारशे लोक बरोबर घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.” \p \v 7 हे ऐकताच याकोबाने भीतीने व व्याकूळ होऊन आपले कुटुंबीय, गुरे, शेरडेमेंढरे आणि उंट यांची दोन गटांमध्ये\f + \fr 32:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa छावण्या\fqa*\f* विभागणी केली. \v 8 त्याने विचार केला, “एसावाने एका गटावर हल्ला केला तर दुसर्‍या गटाला कदाचित निसटून जाता येईल.” \p \v 9 मग याकोबाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझे पिता अब्राहाम, आणि माझे पिता इसहाक यांच्या परमेश्वरा, तुम्ही मला माझ्या देशात आणि नातलगात परत येण्यास सांगितले व मला समृद्ध करण्याचे वचन दिले आहे. \v 10 तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत. \v 11 तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल. \v 12 परंतु तुम्ही मला समृद्ध करण्याचे आणि माझे वंशज समुद्रातील वाळूप्रमाणे अगणित करण्याचे वचन दिले आहे.” \p \v 13 त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली: \v 14 त्यासाठी त्याने दोनशे शेळ्या, वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, \v 15 तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली. \v 16 प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.” \p \v 17 पहिला कळप नेणार्‍या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’ \v 18 त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ” \p \v 19 याकोबाने दुसर्‍या, तिसर्‍या आणि इतर कळप हाकणार्‍याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे. \v 20 हे निश्चित बोला, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’ ” कारण त्याने विचार केला, “मी एसावाला समोरासमोर भेटण्यापूर्वी त्याला भेटी देऊन संतुष्ट करेन; मग तो जेव्हा मला भेटेल, तेव्हा तो माझा स्वीकार करेल.” \v 21 म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली. \s1 याकोबाने केलेली झुंज \p \v 22 परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्‍याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले \v 23 त्याने त्यांना नदीच्या पलीकडे पाठविल्यावर त्याची सर्व संपत्तीही त्यांच्या पाठोपाठ पलीकडे पाठविली. \v 24 तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली. \v 25 याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला. \v 26 मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” \p पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.” \p \v 27 मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?” \p तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.” \p \v 28 यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल\f + \fr 32:28 \fr*\fq इस्राएल \fq*\ft अर्थात् \ft*\fqa परमेश्वराशी झुंज करणारा\fqa*\f*’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.” \p \v 29 मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.” \p तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला. \p \v 30 मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल\f + \fr 32:30 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa परमेश्वराचे मुख\fqa*\f* असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी परमेश्वराचे मुख पाहिले आणि तरीही मी जिवंत राहिलो.” \p \v 31 जेव्हा याकोब पेनुएल\f + \fr 32:31 \fr*\ft किंवा \ft*\fqa पनीएल\fqa*\f* मधून निघाला त्यावेळी सूर्य उगवला होता आणि त्याच्या जांघेचा सांधा उखडल्यामुळे तो लंगडत होता. \v 32 याच कारणास्तव इस्राएलचे लोक अजूनही जनावरांच्या जांघेतील धोंडशिरा खात नाहीत, कारण त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायुला स्पर्श केला होता. \c 33 \s1 याकोब आणि एसाव यांची भेट \p \v 1 नंतर दूर अंतरावरून एसाव आपल्या चारशे माणसांबरोबर येत आहे असे याकोबाने पाहिले, तेव्हा त्याने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली. \v 2 सर्वात पुढे त्याने आपल्या दासी आणि त्यांची मुले; त्यांच्यामागे लेआ व तिची मुले आणि त्यांच्यानंतर राहेल व योसेफ अशा रीतीने त्यांना ठेवले. \v 3 तो स्वतः सर्वांच्या पुढे चालला आणि आपल्या भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने त्याला भूमीपर्यंत लवून सात वेळा मुजरा केला. \p \v 4 एसाव हा याकोबास भेटण्यास धावत आला; त्याने त्याला आलिंगन दिले; त्याला कवेत घेऊन त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले. \v 5 एसावाने दृष्टी वर करून त्या स्त्रिया व मुलांकडे पाहिले तेव्हा त्याने विचारले, “तुजबरोबर हे लोक कोण आहेत?” \p याकोब म्हणाला, “परमेश्वराने कृपा करून तुमच्या दासाला दिलेली ही माझी मुले आहेत.” \p \v 6 तेव्हा याकोबाच्या दासी आणि त्यांची मुले पुढे आली आणि त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. \v 7 त्यानंतर लेआ व तिची मुले आली, शेवटी राहेल आणि योसेफ पुढे आली. त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. \p \v 8 एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?” \p याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.” \p \v 9 यावर एसाव म्हणाला, “भाऊ, माझ्याजवळ भरपूर आहे; तुझे आहे ते तुलाच राहू दे.” \p \v 10 “नाही, नाही!” याकोब म्हणाला, “जर तुमची माझ्यावर कृपा झाली असल्यास या भेटींचा तुम्ही स्वीकार करा. कारण तुम्ही आता मला स्वीकारले आहे म्हणून तुमचे मुख बघून परमेश्वराचे मुख बघितल्यासारखे वाटते. \v 11 माझ्या देणग्यांचा कृपया स्वीकार करा, कारण परमेश्वराने माझ्यावर दया केली आहे आणि त्यांनी मला सर्वकाही भरपूर दिले आहे.” याकोबाने फारच आग्रह केल्यामुळे एसावाने शेवटी त्या भेटींचा स्वीकार केला. \p \v 12 मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आता आपण वाटेस लागून पुढे जाऊ या. मी तुझ्यासोबत चालतो.” \p \v 13 पण याकोब त्यास म्हणाला, “काही मुले फार लहान आहेत हे माझ्या स्वामीला दिसतच आहे आणि दूध पाजणार्‍या शेळ्या, मेंढ्या व गाई यांचेही मला पाहिले पाहिजे. त्यांना मी दिवसभर असेच हाकीत नेले तर ती जनावरे मरून जातील. \v 14 म्हणून मी माझ्या स्वामींना विनंती करतो की, आपण आपल्या सेवकापुढे जावे. आम्ही त्यांच्यामागे त्यांना चालवेल तसे हळूहळू चालत येऊन सेईर येथे तुम्हाला भेटू.” \p \v 15 मग एसाव म्हणाला, “माझी काही माणसे तुमच्याबरोबर ठेवू द्या.” \p “पण हे का करावे?” याकोब म्हणाला, “माझ्या स्वामींची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे.” \p \v 16 तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरला परत जाण्यास निघाला. \v 17 दरम्यान याकोब सुक्कोथ येथे गेला. तिथे त्याने स्वतःसाठी तंबू आणि आपल्या गुरांसाठी निवारा बांधला. म्हणूनच त्या ठिकाणाला सुक्कोथ\f + \fr 33:17 \fr*\fq सुक्कोथ \fq*\ft म्हणचे \ft*\fqa आश्रय\fqa*\f* असे नाव पडले. \p \v 18 यानंतर याकोब पद्दन-अरामचा प्रवास पूर्ण करून कनान देशातील शेखेम नावाच्या शहरात सुखरुपपणे पोहोचला आणि शहराच्या बाहेर त्याने आपला तळ दिला. \v 19 जिथे त्याने तळ दिला होता तेथील जमिनीचा काही भाग त्याने शेखेमचा पिता हमोर याच्याकडून शंभर चांदीची नाणी\f + \fr 33:19 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa केसिताह \fqa*\ft या पैशाचे वजन किंवा मोल अज्ञात आहे\ft*\f* देऊन विकत घेतला. \v 20 मग तिथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव त्याने एल एलोहे इस्राएल\f + \fr 33:20 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa इस्राएलचे पराक्रमी परमेश्वर\fqa*\f* असे ठेवले. \c 34 \s1 दीनाच्या भ्रष्टतेबद्दल घेतलेला सूड \p \v 1 एके दिवशी याकोबापासून झालेली लेआची कन्या दीना त्या देशातील मुलींना भेटावयास गेली. \v 2 तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा पुत्र शेखेम, याने तिला पाहिले, तेव्हा तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला भ्रष्ट केले. \v 3 याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला. \v 4 मग शेखेमने आपले वडील हमोर यांना म्हणाला, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.” \p \v 5 आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही. \p \v 6 मग जेव्हा शेखेमचा बाप हमोर याकोबाकडे आपल्या मुलाच्या विवाहासंबंधी बोलणी करावयास आला. \v 7 तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते. \p \v 8 हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या. \v 9 आमच्याशी सोयरीक करा; आम्हाला तुमच्या मुली द्या आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या. \v 10 आमच्याबरोबर राहा; हा देश तुमच्यासमोर मोकळा आहे, त्यात राहा आणि व्यापार\f + \fr 34:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa मोकळे फिरा\fqa*\f* करा आणि मालमत्ता प्राप्त करा.” \p \v 11 मग शेखेम, दीनाचे वडील व भाऊ यांना उद्देशून म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा, तुम्ही जे मागाल ते मी देईन. \v 12 तुम्ही वधूबद्दल वाटेल तितका हुंडा आणि भेट मागा, मी ती तुम्हाला देईन, पण ती मुलगी मला पत्नी म्हणून द्या.” \p \v 13 आपली बहीण दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले म्हणून याकोबाच्या पुत्रांनी शेखेम आणि त्याचा पिता हमोर यांच्याशी मनात कपट धरून बोलणी केली. \v 14 ते म्हणाले, “आमची बहीण शेखेमाला देणे आम्हाला जमणार नाही, कारण तुमची सुंता झालेली नाही. अशा बेसुंती मनुष्याबरोबर विवाह केल्यास आमचा अपमान होईल. \v 15 आता आपण एक करार करू: जर तुमच्या देशातील प्रत्येक पुरुष आपली सुंता करून घेईल, \v 16 तर तुमच्या मुली आम्ही करू व आमच्या मुली तुम्हाला देऊ व आम्ही तुमच्यामध्ये स्थायिक होऊ आणि तुमच्याबरोबर एक लोक होऊ. \v 17 जर तुम्ही सुंता करण्यास तयार होणार नाही तर आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन आमची वाट धरू.” \p \v 18 त्यांचा प्रस्ताव हमोर आणि त्याचा मुलगा शेखेम यांना चांगला वाटला. \v 19 तो तरुण, जो त्याच्या वडिलांच्या घराण्यात सर्वात आदरणीय होता, त्याने जे सांगितले ते करण्यात वेळ घालविला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे खूप मन बसले होते. \v 20 म्हणून हमोर आणि शेखेम यांनी त्या शहरातील वेशीकडे जाऊन लोकांपुढे सुंतेची ही सूचना मांडली. \v 21 ते म्हणाले, “हे लोक आपले मित्र आहेत. त्यांना आपण आपल्यात राहण्याचे आमंत्रण देऊ आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ; कारण आपला देश त्यांनाही पुरेल इतका मोठा असून त्यांना येथे सहज राहता येईल आणि त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ. \v 22 परंतु ते लोक आपल्यात राहून राष्ट्राशी एकरूप होण्यास एकाच अटीवर तयार आहेत. ती अट म्हणजे आपल्यातील प्रत्येक पुरुषाने त्यांच्याप्रमाणेच स्वतःची सुंता करून घेतली पाहिजे. \v 23 तेव्हा त्यांची ही अट आपण मान्य करू या, म्हणजे ते आपल्यामध्ये वस्ती करतील. आपण हे केले तर त्यांची शेरडेमेंढरे, गुरे व मालमत्ता ते सर्व आपले होणार नाही का?” \p \v 24 हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली. \p \v 25 परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली. \v 26 हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले. \v 27 यानंतर याकोबाचे सर्व पुत्र शहरात गेले आणि त्यांनी ते संपूर्ण शहर लुटले, जिथे त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते. \v 28 त्यांनी त्यांचे कळप, गुरे, गाढवे आणि त्यांच्या नगरात व शेतात असलेले सर्वकाही त्यांनी नेले. \v 29 तसेच त्यांच्या घरातील सर्व संपत्ती आणि त्यांच्या सर्व स्त्रिया व लेकरे, त्यांना जे काही घरात सापडले ते सर्व त्यांनी लुटले. \p \v 30 तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.” \p \v 31 यावर त्यांनी प्रत्युत्तर केले, “त्याने आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे व्यवहार करावा काय?” \c 35 \s1 याकोब बेथेल येथे परत येतो \p \v 1 मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.” \p \v 2 म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला. \v 3 चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.” \v 4 तेव्हा त्या सर्वांनी आपल्याकडील इतर दैवताच्या मूर्ती व कर्णफुले याकोबाला दिली व त्याने ती शेखेमजवळ असलेल्या एका एला वृक्षाखाली पुरून टाकली. \v 5 मग ते पुन्हा पुढे निघाले आणि त्यांच्याभोवती असलेल्या सर्व नगरांवर परमेश्वराचे भय पडले, त्यामुळे त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही. \p \v 6 शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले. \v 7 त्या ठिकाणी याकोबाने एक वेदी उभारली व त्या वेदीचे नाव त्याने एल बेथेल\f + \fr 35:7 \fr*\fq एल बेथेल \fq*\ft अर्थात् \ft*\fqa बेथेलचे परमेश्वर\fqa*\f* असे ठेवले; कारण तो एसावापासून पळून जात असता परमेश्वराने येथेच त्याला दर्शन दिले होते. \p \v 8 यानंतर लवकरच रिबेकाहची वृद्ध दाई दबोरा, ही मरण पावली आणि बेथेलच्या खोर्‍यात एका एला वृक्षाखाली तिला मूठमाती देण्यात आली. तेव्हापासून त्या वृक्षाला अल्लोन-बकूथ\f + \fr 35:8 \fr*\fq अल्लोन-बकूथ \fq*\ft अर्थात् \ft*\fqa विलापाचा एलावृक्ष\fqa*\f* असे नाव पडले. \p \v 9 याकोब पद्दन-अराम वरून बेथेल येथे आला तेव्हा परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. \v 10 परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल\f + \fr 35:10 \fr*\fq इस्राएल \fq*\ft म्हणजे \ft*\fqa परमेश्वराशी झुंज करणारा\fqa*\f* असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले. \p \v 11 परमेश्वर त्याला म्हणाले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर\f + \fr 35:11 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa एल-शद्दाय\fqa*\f* आहे; फलद्रूप हो आणि तुझी संख्या अनेक पटीने वाढो. तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून मी तुझी वृद्धी करेन. पुष्कळ राजे तुझ्या वंशजातून उदय पावतील. \v 12 अब्राहाम व इसहाक यांना जो देश मी दिला तो मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना देईन.” \v 13 ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणाहून परमेश्वर वर निघून गेले. \p \v 14 नंतर याकोबाने ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणी एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर परमेश्वराला पेयार्पण\f + \fr 35:14 \fr*\fq पेयार्पण \fq*\ft अर्थात् \ft*\fqa द्राक्षारस ओतला\fqa*\f* ओतले आणि त्या स्तंभावर तैलाभ्यंग केला. \v 15 ज्या स्थानी परमेश्वर त्याच्याशी बोलले होते. त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल\f + \fr 35:15 \fr*\ft परमेश्वराचे घर\ft*\f* असे ठेवले. \s1 राहेलचा व इसहाकाचा मृत्यू \p \v 16 मग ते बेथेलमधून पुढे निघाले. तरी एफ्राथाहपासून काही अंतरावर असतानाच राहेलला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिला अतिशय कष्ट झाले. \v 17 अतिशय त्रासदायक प्रसूती होताना सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस; कारण तुला आणखी एक पुत्र झाला आहे.” \v 18 तिने अखेरचा श्वास घेतला—कारण ती मृतवत झाली होती—तिने तिच्या मुलाचे नाव बेन-ओनी\f + \fr 35:18 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa माझ्या कष्टाचा पुत्र\fqa*\f* ठेवले पण त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बिन्यामीन\f + \fr 35:18 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa माझ्या उजव्या हाताचा पुत्र\fqa*\f* ठेवले. \p \v 19 अशाप्रकारे राहेल मरण पावली आणि एफ्राथच्या (म्हणजे बेथलेहेमकडे) जाणार्‍या वाटेवर तिला मूठमाती देण्यात आली. \v 20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक दगडी स्मारक उभारले, ते स्मारक आजही राहेलच्या कबरेचे खूण म्हणून तिथे उभे आहे. \p \v 21 मग इस्राएल पुढे प्रवास करीत निघाला आणि त्याने एदेरच्या बुरुजापलीकडे आपला तळ दिला. \v 22 तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले. \b \lh याकोबाला बारा पुत्र होते: \b \li1 \v 23 लेआचे पुत्र: \li2 याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन, \li2 मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून. \li1 \v 24 राहेलचे पुत्र: \li2 योसेफ व बिन्यामीन हे होते. \li1 \v 25 राहेलची दासी बिल्हा हिचे पुत्र: \li2 दान व नफताली हे होते. \li1 \v 26 लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र: \li2 गाद व आशेर हे होते. \b \lf हे सर्व पुत्र याकोबाला पद्दन-अराम येथे झाले. \b \p \v 27 अशा रीतीने शेवटी याकोब किर्याथ-अर्बा म्हणजे हेब्रोन येथील मम्रे या ठिकाणी आपला पिता इसहाक याच्याकडे येऊन पोहोचला. याच ठिकाणी अब्राहामही राहिला होता. \v 28 इसहाक एकशेऐंशी वर्षे जगला. \v 29 तो परिपक्व वयाचा वयोवृद्ध होऊन मरण पावला आणि त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्याला मूठमाती दिली. \c 36 \s1 एसावाचे गोत्र \p \v 1 एसाव म्हणजे एदोम याची वंशावळ ही: \b \p \v 2 एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह \v 3 आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ. \p \v 4 एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला. \v 5 एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले. \p \v 6 मग एसाव\f + \fr 36:6 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa एदोम\fqa*\f* आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला. \v 7 कारण त्या दोघांकडे इतकी अधिक धनसंपत्ती होती की त्यांच्या गुरांना पुरतील इतकी कुरणे तिथे नव्हती. \v 8 म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली. \b \lh \v 9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी. \b \li1 \v 10 एसावाच्या पुत्रांची नावे: \li2 एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल. \li1 \v 11 एलीफाजचे पुत्र: \li2 तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते. \v 12 एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती. \li1 \v 13 रऊएलाचे पुत्र: \li2 नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती. \li1 \v 14 एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, \li2 यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. \b \lh \v 15 एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले: \li1 एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: \li2 त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज, \v 16 कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते. \li1 \v 17 एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: \li2 नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे. \li1 \v 18 एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: \li2 यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले. \lf \v 19 हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते. \b \li1 \v 20 एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही: \li2 लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, \v 21 दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले. \li1 \v 22 लोटानाचे पुत्र: \li2 होरी व होमाम\f + \fr 36:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa हेमाम\fqa*\f*. तिम्ना लोटानाची बहीण होती. \li1 \v 23 शोबालाचे पुत्र: \li2 अलवान, मानहथ, एबाल, शेफो व ओनाम. \li1 \v 24 सिबोनाचे पुत्र: \li2 अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.) \li1 \v 25 अनाहचा पुत्र: \li2 दिशोन असून त्याची कन्या ओहोलीबामाह ही होती. \li1 \v 26 दिशोनाचे पुत्र: \li2 हेमदान, एश्बान, इथरान व करान. \li1 \v 27 एसराचे पुत्र: \li2 बिल्हान, जावान व आकान. \li1 \v 28 दिशोनाचे पुत्र: \li2 ऊस व अरान. \li1 \v 29 होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही: \li2 लोटान, शोबाल, सिबोन, अना, \v 30 दिशोन, एसर व दीशान. \lf ते सेईर देशातील होरींचे प्रमुख होते. \s1 एदोम देशाचे राजे \lh \v 31 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते: \li1 \v 32 बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते. \li1 \v 33 बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 34 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 35 हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते. \li1 \v 36 हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 37 सामलाह मेल्यावर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातील शौल त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 38 शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 39 अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती. \b \lh \v 40 एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता: \li1 तिम्ना, आल्वा, यतेथ, \li1 \v 41 ओहोलीबामाह, एलाह, पीनोन, \li1 \v 42 केनाज, तेमान, मिब्सार, \li1 \v 43 मग्दीएल व ईराम. \lf हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी बनले. त्यांनी ज्या जागेचा ताबा घेतला होता त्याप्रमाणे. \b \lf हा सर्व एदोमाचा पिता एसावाचा वंश आहे. \c 37 \s1 योसेफ आणि त्याचे भाऊ \p \v 1 कनान देशात ज्या ठिकाणी आपला पिता वस्ती करून राहिला होता, त्या ठिकाणी याकोब जाऊन स्थायिक झाला. \b \p \v 2 याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे: \b \p योसेफ सतरा वर्षांचा तरुण असताना आपल्या भावांबरोबर, त्याच्या वडिलांच्या पत्नी बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्रांबरोबर कळप चारीत असे, तेव्हा योसेफाने, त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी वडिलांकडे आणल्या. \p \v 3 इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला. \v 4 जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते. \p \v 5 एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. \v 6 योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझे स्वप्न ऐका: \v 7 आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेवढ्यात माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या सर्वांच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती गोळा होऊन उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला नमन केले.” \p \v 8 तेव्हा त्याच्या भावांनी त्याची हेटाळणी करून त्याला म्हटले. “काय! तू आमचा राजा होणार? तू आम्हावर सत्ता चालविणार?” आणि त्याच्या स्वप्नामुळे व त्याने त्याचे कथन केल्यामुळे ते त्याचा अधिक द्वेष करू लागले. \p \v 9 पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.” \p \v 10 त्याने आपले स्वप्न आपल्या भावांबरोबर आपल्या वडिलांनाही सांगितले, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला धमकावून विचारले, “हे काय बोलतोस? मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्याकडे येऊन तुला भूमीपर्यंत लवून नमन करणार आहोत काय?” \v 11 या कारणामुळे त्याच्या भावांचा द्वेष अधिक तीव्र झाला; परंतु त्याच्या वडिलांनी ही बाब आपल्या मनात ठेवली. \s1 योसेफाचे भाऊ त्याला विकतात \p \v 12 योसेफाचे भाऊ आपल्या वडिलांची मेंढरे शेखेम येथे चारावयास घेऊन गेले होते. \v 13 इस्राएलने योसेफाला म्हटले, “तुझे भाऊ शेखेम येथे मेंढरे चारावयास गेले आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे.” \p योसेफ म्हणाला, “ठीक आहे.” \p \v 14 याकोबाने योसेफास म्हटले, “तू शेखेमला जा आणि तुझ्या भावांचे सर्वकाही ठीक आहे का व कळपांची स्थिती कशी आहे, हे पाहून मला येऊन सांग.” नंतर याकोबाने त्याला हेब्रोन खोर्‍यातून पाठवले. \p आणि तो शेखेमास पोहोचला. \v 15 तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?” \p \v 16 योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधीत आहे. ते कुठे कळप चारीत आहे, हे मला सांगाल का?” \p \v 17 तेव्हा तो मनुष्य म्हणाला, “होय, पण आता ते येथे नाहीत, ‘आपण दोथानला जाऊ’ तुझ्या भावांना असे बोलताना मी ऐकले.” \p तेव्हा योसेफ भावांच्या मागे दोथानला गेला आणि ते त्याला तिथे आढळले. \v 18 त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला. \p \v 19 ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा स्वप्नदर्शी येत आहे. \v 20 चला आपण याला ठार करू. त्याला एखाद्या विहिरीत फेकून देऊ आणि आपल्या वडिलांना सांगू की त्याला हिंस्र पशूने खाऊन टाकले आहे; मग त्याच्या स्वप्नांचे काय होते ते आपण पाहू.” \p \v 21 जेव्हा रऊबेनने हे ऐकले तेव्हा त्याने योसेफाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; तो म्हणाला, “आपण त्याला जिवे मारणार नाही; \v 22 आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे. \p \v 23 योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला, \v 24 आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिले, ती विहीर रिकामी होती, तिच्यात पाणी नव्हते. \p \v 25 मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते. \p \v 26 तेव्हा यहूदाह आपल्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला मारून त्याचा रक्तपात झाकून आपल्याला काय फायदा? \v 27 चला आपण योसेफाला इश्माएली लोकांना विकून टाकू या, त्याला हात लावू नका, तो आपला भाऊच आहे, आपल्याच रक्तमांसाचा आहे.” त्या सर्व भावांना त्याचे म्हणणे पटले. \p \v 28 मिद्यानी व्यापार्‍यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल\f + \fr 37:28 \fr*\ft अंदाजे \ft*\fqa 230 ग्रॅ.\fqa*\f* चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्‍यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले. \p \v 29 जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली. \v 30 तो रडत आपल्या भावांना म्हणाला, “मुलगा विहिरीत नाही; आता मी कुठे जाऊ?” \p \v 31 मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला, एक बोकड मारला आणि त्याच्या रक्तात तो झगा बुडवला. \v 32 तो झगा त्यांनी आपल्या वडिलांकडे आणून म्हटले, “हा झगा आम्हास सापडला आहे; हा तुमच्या मुलाचा झगा आहे की नाही ते पाहा!” \p \v 33 त्याने तो झगा ओळखला आणि म्हणाला, “होय, हा माझ्या मुलाचाच झगा आहे; त्याला वनपशूने खाऊन टाकले असावे. योसेफाचे त्याने फाडून तुकडे केले आहे यात शंका नाही.” \p \v 34 यानंतर याकोबाने आपली वस्त्रे फाडली आणि गोणपाट नेसून त्याने मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. \v 35 त्याचे सर्व पुत्र आणि कन्या आले आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो म्हणत असे, “मी पुत्र शोकानेच मरेन आणि अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” अशा रीतीने तो त्याच्यासाठी दुःखाने रडत असे. \p \v 36 दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले. \c 38 \s1 यहूदाह आणि तामार \p \v 1 याच सुमारास यहूदाह आपल्या भावांना सोडून अदुल्लाम येथे आला आणि हीरा नावाच्या एका मनुष्याबरोबर राहू लागला. \v 2 तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला; \v 3 ती गर्भवती झाली, तिला पुत्र झाला. त्याचे नाव एर ठेवण्यात आले. \v 4 ती पुन्हा गर्भवती झाली, तिला पुत्र झाला, त्याचे नाव ओनान ठेवण्यात आले. \v 5 तिने आणखी एका पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव शेलाह ठेवले, ते कजीब येथे राहत असताना तिने त्याला जन्म दिला. \p \v 6 यहूदाहने आपला ज्येष्ठपुत्र एर याचा विवाह तामार नावाच्या एका स्त्रीशी करून दिला. \v 7 परंतु यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर, याहवेहच्या नजरेत एक दुष्ट मनुष्य होता म्हणून याहवेहने त्याला ठार मारले. \p \v 8 तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.” \v 9 ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये. \v 10 हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले. \p \v 11 यहूदाह आपली सून तामारला म्हणाला, “माझा पुत्र शेलाहचे विवाहाचे वय होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरात विधवा म्हणून राहा.” यहूदाहला भीती वाटत होती की हा मुलगाही आपल्या भावांप्रमाणे मरेल. मग तामार तिच्या वडिलांच्या घरी गेली. \p \v 12 कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे तिम्ना येथे गेला. \p \v 13 “तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले. \v 14 तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही. \p \v 15 तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे, \v 16 म्हणून तो तिच्याजवळ जाऊन थांबला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्याशी रत होण्याची माझी इच्छा आहे.” अर्थात् ती आपली सून आहे, हे त्याला माहीत नव्हते. \p यावर तिने विचारले, “याबद्दल तुम्ही मला काय द्याल?” \p \v 17 त्याने म्हटले, “मी तुला माझ्या कळपातून एक कोवळी शेळी पाठवून देईन.” \p तेव्हा तिने विचारले, “ती पाठवेपर्यंत तुम्ही माझ्याकडे कोणते तारण ठेवणार आहात?” \p \v 18 “तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले. \p तिने उत्तर दिले, “तुमची मुद्रिका, गोफ आणि हातातील काठी.” याप्रमाणे त्याने या वस्तू तिला दिल्या आणि तिने त्याला आपल्याशी रत होऊ दिले, परिणामी ती गर्भवती झाली. \v 19 यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले. \p \v 20 यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही. \v 21 म्हणून त्याने एनाईम गावातील काही लोकांना विचारले, “गावाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर बसलेली देवदासी कुठे राहते?” \p “आमच्या गावात तर कोणी देवदासी राहत नाही,” त्यांनी त्याला उत्तर दिले. \p \v 22 तेव्हा तो यहूदाहकडे परत गेला आणि त्याने त्याला सांगितले, “मला ती कुठेच सापडली नाही, तसेच तेथील लोकांनी सांगितले की आमच्या गावात कोणी देवदासी राहत नाही.” \p \v 23 यावर यहूदाह म्हणाला, “मग त्या वस्तू तिच्याकडेच राहू दे. नाहीतर तेथील लोकांसाठी आपण उपहासाचा विषय होऊ. मी तर तुझ्यामार्फत तिच्यासाठी ही कोवळी शेळी पाठविली होती, पण ती तुला आढळली नाही.” \p \v 24 सुमारे तीन महिन्यानंतर, “तुझी सून तामार ही वेश्याकर्मामुळे गर्भवती झाली आहे,” अशी बातमी यहूदाहच्या कानावर गेली. \p यहूदाह म्हणाला, “तिला बाहेर काढा आणि जाळून टाका!” \p \v 25 त्याप्रमाणे ते तिला जाळून टाकण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तिने आपल्या सासर्‍याला निरोप पाठविला, “ही मुद्रिका, हा गोफ आणि ही काठी ज्याची आहे, त्याच्यापासून मला गर्भ राहिलेला आहे. तुम्ही या वस्तू ओळखता काय?” \p \v 26 यहूदाहने त्या वस्तूंना ओळखले आणि म्हटले, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे, कारण माझा पुत्र शेलाह तिला पती म्हणून दिला नाही.” यानंतर त्याने कधीही तिच्याशी शरीरसंबंध ठेवला नाही. \p \v 27 योग्य वेळी तामारेचे दिवस भरले आणि तिला जुळे पुत्र झाले. \v 28 त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.” \v 29 परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस\f + \fr 38:29 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa वाट काढणारा\fqa*\f* ठेवले. \v 30 यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह\f + \fr 38:30 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa चमकदार\fqa*\f* असे ठेवण्यात आले. \c 39 \s1 योसेफ आणि पोटीफराची पत्नी \p \v 1 इकडे योसेफाला इजिप्तमध्ये आणले. फारोह अंमलदार व अंगरक्षकांचा प्रमुख पोटीफराने इश्माएली लोकांपासून योसेफास विकत घेतले. \p \v 2 याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे. \v 3 पोटीफराने पाहिले की याहवेह योसेफाबरोबर आहेत आणि जे काही तो करतो त्यामध्ये याहवेह त्याला यश देतात, \v 4 त्यामुळे साहजिकच योसेफ त्याचा आवडता झाला व त्याचा व्यक्तिगत सेवक बनला. लवकरच पोटीफराच्या घराची व्यवस्था व त्याचे सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात देण्यात आले. \v 5 जेव्हापासून त्याने योसेफाला त्याच्या घरावर, व त्याचे जे काहीही होते त्या सर्वांवर अधिकारी म्हणून नेमले, तेव्हापासून योसेफामुळे याहवेहने त्या इजिप्तच्या धन्याला आशीर्वादित केले; पोटीफराचे जे काही होते, त्याचे कुटुंब व शेती यावर याहवेहचा आशीर्वाद होता. \v 6 म्हणून पोटीफराने आपले सर्वकाही योसेफाला सोपवून दिले. आपण काय खावे यापलीकडे त्याने कशाचीच काळजी केली नाही. \p योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. \v 7 काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!” \p \v 8 योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे. \v 9 या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.” \v 10 ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले. \p \v 11 एके दिवशी असे घडून आले की, तो कामानिमित्त घराच्या आत आला असताना, घरात दुसरे कोणतेही सेवक नव्हते; \v 12 तिने त्याच्या झग्याला पकडले आणि म्हणाली, “माझ्याबरोबर नीज!” पण त्याने त्याचा झगा तिच्या हातातच सोडला आणि घराबाहेर पळाला. \p \v 13 त्याचा झगा आपल्याच हातात आहे आणि तो पळून गेला आहे हे तिच्या लक्षात आले, \v 14 तेव्हा तिने घरातील सेवकांना बोलाविले. ती म्हणाली, “आमच्या घराचा उपमर्द करण्यासाठीच हा इब्री गुलाम घरात आणला आहे! त्याने माझ्यासोबत निजण्याचा प्रयत्न केला, पण मी किंचाळले. \v 15 जसे त्याने माझे किंचाळणे ऐकले तसे तो स्वतःचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.” \p \v 16 तिने तिचा धनी घरी येईपर्यंत तो झगा आपल्याजवळच ठेवला. \v 17 नंतर तिने त्याला आपली कथा सांगितली: “जो इब्री गुलाम तुम्ही इकडे आणला आहे, त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. \v 18 पण जसे मी मदतीसाठी किंचाळले, त्याचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.” \p \v 19 “तुमचा गुलाम माझ्याशी असा वागला.” असे म्हणून पत्नीने सांगितलेला वृतांत ऐकताच त्याचा धनी रागाने बेभान झाला. \v 20 योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले, \p परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता, \v 21 याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्‍याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले. \v 22 तुरुंगाच्या अधिकार्‍याने तुरुंगाचा सर्व कारभार योसेफाच्या हाती दिला आणि सर्व कैदीही योसेफाच्या ताब्यात दिले. \v 23 त्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्‍याला कसलीच काळजी उरली नाही, कारण याहवेह योसेफाबरोबर होते आणि तो जे काही करत असे त्यामध्ये ते त्याला यश देत. \c 40 \s1 प्यालेबरदार व रोटी भाजणारा \p \v 1 काही काळानंतर असे झाले की, इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार यांनी त्यांच्या धन्याच्या, म्हणजे इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला. \v 2 फारोह आपला रोटी भाजणारा प्रमुख व प्यालेबरदारचा प्रमुख या दोन्ही सरदारांवर रागावला \v 3 आणि त्याने त्या दोघांना सुरक्षादलाचा प्रमुख, याच्या वाड्यात म्हणजे जिथे योसेफ होता, त्याच वाड्यातील तुरुंगात टाकले. \v 4 तुरुंगाच्या अधिकार्‍याने योसेफाला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले आणि त्याने त्यांची देखरेख केली, \p काही काळ ते तुरुंगात राहिल्यानंतर, \v 5 एके रात्री दोघांनाही—इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार, ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते—स्वप्ने पडली आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशिष्ट अर्थ होता. \p \v 6 दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा योसेफ त्यांना भेटला, तेव्हा ते दोघेही खिन्न असल्याचे त्याच्या लक्षात आले. \v 7 योसेफाने त्याच्यासोबत त्याच्या धन्याच्या वाड्यात तुरुंगात असलेल्या त्या फारोहच्या अधिकार्‍यांना विचारले, “आज तुम्ही इतके खिन्न का आहात?” \p \v 8 त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” \p यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.” \p \v 9 मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली. \v 10 तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले. \v 11 माझ्या हातात फारोहचा प्याला होता, त्यात ती द्राक्षे पिळून मी रस काढला आणि तो प्याला फारोह राजाला प्यावयास दिला.” \p \v 12 तेव्हा योसेफ म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ असा: तीन फांद्या म्हणजे तीन दिवस. \v 13 या तीन दिवसात फारोह तुला तुरुंगातून सोडून देईल आणि तू स्वतः परत राजाच्या हाती प्याला देशील, जसा तू आधी प्यालेबरदार म्हणून देत होता. \v 14 पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ. \v 15 कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.” \p \v 16 त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या. \v 17 सर्वात वरच्या टोपलीमध्ये फारोहसाठी भटारखान्यातील सर्वप्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ होते; परंतु पक्षी येऊन माझ्या डोक्यावरील टोपलीतून ते पदार्थ खाऊ लागले.” \p \v 18 योसेफाने अर्थ सांगताना म्हटले, “या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस होत. \v 19 आजपासून तीन दिवसांनी फारोह तुझा शिरच्छेद करेल व तुझा मृतदेह सुळावर ठेवेल आणि पक्षी येऊन तुझे मांस टोचून खातील.” \p \v 20 आता तिसर्‍या दिवशी फारोहचा वाढदिवस होता आणि त्याने आपल्या सर्व सरदारांसाठी मेजवानी दिली. त्याने आपल्या सरदारांसमोर मुख्य प्यालेबरदार आणि प्रमुख रोटी भाजणारा यांचे मस्तक उंचावले: \v 21 यावेळी त्याने मुख्य प्यालेबरदारला त्याच्या कामावर पुन्हा नेमले, तो फारोहच्या हाती पुन्हा प्याला देऊ लागला— \v 22 परंतु प्रमुख रोटी भाजणार्‍याला योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे सुळावर चढविण्याची शिक्षा दिली. \p \v 23 मुख्य प्यालेबरदाराला योसेफाचे स्मरण राहिले नाही; त्याला तो विसरला. \c 41 \s1 फारोहचे स्वप्न \p \v 1 दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एके रात्री फारोहला स्वप्न पडले. तो नाईल नदीच्या काठावर उभा होता. \v 2 तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या. \v 3 नंतर नाईलमधून दुसर्‍या सात गाई आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या आणि नदीकाठी असलेल्या गाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. \v 4 मग त्या सात दुबळ्या गाईंनी त्या धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. यावर फारोहची झोपमोड झाली. \p \v 5 यानंतर तो पुन्हा झोपी गेला आणि त्याला पुन्हा दुसरे स्वप्न पडले: एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे त्याने पाहिली. \v 6 मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली होती. \v 7 या सात अशक्त कणसांनी टपोर्‍या दाण्यांची ती भरदार कणसे गिळून टाकली. नंतर फारोह जागा झाला आणि हे सर्व स्वप्न होते हे त्याला समजले. \p \v 8 दुसर्‍या दिवशी सकाळी, स्वप्नांचा विचार करता फारोह चिंताक्रांत झाला. मग त्याने इजिप्तमधील सर्व ज्योतिष्यांना व ज्ञानी पुरुषांना बोलाविले आणि त्यांना आपले स्वप्न सांगितले. परंतु त्यापैकी एकालाही त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे सांगता येईना. \p \v 9 मुख्य प्यालेबरदार फारोहला म्हणाला, “आज मला माझ्या चुकीची आठवण होत आहे. \v 10 काही काळापूर्वी फारोह माझ्यावर आणि प्रमुख रोटी भाजणार्‍यावर रागावून त्यांनी आम्हाला सुरक्षादलाच्या अधिकार्‍याच्या घरातील बंदिवासात ठेवले होते. \v 11 त्यावेळी प्रमुख रोटी भाजणार्‍याला आणि मला एकाच रात्री स्वप्ने पडली, दोन्ही स्वप्नांचा अर्थ वेगळा होता. \v 12 त्या ठिकाणी एक इब्री तरुण होता; तो सुरक्षादलाच्या अधिकार्‍याचा गुलाम होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली आणि त्याने आम्हाला आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार त्याच्या अर्थ सांगितला. \v 13 आणि त्याने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडली: प्यालेबरदाराच्या जागी माझी पुन्हा नेमणूक झाली आणि प्रमुख रोटी भाजणार्‍याला फाशी देण्यात आली.” \p \v 14 तेव्हा फारोहने योसेफाला बोलाविणे पाठविले. योसेफाला लगेच तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले आणि योसेफ मुंडण करून व कपडे बदलून फारोहपुढे दाखल झाला. \p \v 15 फारोह योसेफास म्हणाला, “मला एक स्वप्न पडले, पण येथे असलेल्या कोणाही मनुष्याला त्याचा अर्थ काय असेल हे सांगता येत नाही. पण मी असे ऐकले आहे की तू स्वप्न ऐकताच, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो.” \p \v 16 योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.” \p \v 17 तेव्हा फारोहने योसेफाला सांगितले, “मी स्वप्नात नाईल नदीच्या काठावर उभा होतो; \v 18 तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या. \v 19 नंतर दुसर्‍या सात गाई वर आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या. सर्व इजिप्त देशात अशा अशक्त गाई मी कधीही पाहिल्या नाहीत. \v 20 या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या पहिल्या सात धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. \v 21 असे असूनही त्यांनी त्या सात धष्टपुष्ट गाई कशा खाल्ल्या हे समजू शकले नाही; पण धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकल्यानंतरही त्या अशक्त गाई अशक्तच राहिल्या आणि मग मी जागा झालो. \p \v 22 “मग मला परत स्वप्नात, एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे दिसली. \v 23 मग त्याच ताटातून सात वाळलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली कणसे निघाली. \v 24 या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.” \p \v 25 स्वप्ने ऐकून योसेफ फारोहला म्हणाला, “फारोहला पडलेल्या या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. परमेश्वर काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रगट केले आहे. \v 26 या दोन्हीचा अर्थ एकच आहे, सात लठ्ठ गाई म्हणजे सात वर्षांचा काळ आणि सात भरदार कणसे यांचाही अर्थ पुढील सात वर्षांचा काळ; जो अतिशय समृद्धीचा असेल. \v 27 त्या सात अशक्त गाई म्हणजे या सात वर्षानंतर येणारी सात वर्षे आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली सात सुकलेली कणसे दुष्काळाची सात वर्षे दर्शवितात. \p \v 28 “मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे. \v 29 पुढील सात वर्षांचा काळ संपूर्ण इजिप्त देशासाठी अतिशय समृद्धीचा काळ असेल. \v 30 पण त्यानंतरच्या सात वर्षांच्या काळात इजिप्त देशामध्ये इतका मोठा दुष्काळ पडेल की, आधीच्या सात वर्षांतील सर्व समृद्धी आणि भरभराट विसरली जाईल. दुष्काळ देशाचा विध्वंस करेल. \v 31 तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत. \v 32 आता हे स्वप्न फारोहला दोन स्वरुपात पडले, याचा अर्थ असा की परमेश्वराने दुष्काळाची बाब निश्चित केली आहे आणि परमेश्वर त्याप्रमाणे लवकरच घडवून आणतील. \p \v 33 “म्हणून आता फारोहने एक सुज्ञ आणि शहाणा मनुष्य शोधला पाहिजे आणि त्याला इजिप्त देशावर अधिकारी केले पाहिजे. \v 34 फारोह राजाने इजिप्त देशावर अधिकार्‍यांची नेमणूक करून सात वर्षांच्या समृद्धीच्या काळात सर्व वरकड धान्याचा पाचवा भाग गोळा करावा. \v 35 समृद्धीच्या वर्षात अन्नसामुग्री एकत्र करून सर्व शहरात फारोहच्या अधिकारातील धान्य कोठारात साठविण्याचे व्यवस्थापन करावे. \v 36 ही सर्व अन्नसामुग्री राखीव म्हणून संपूर्ण देशाकरिता साठवून ठेवल्यास नंतर दुष्काळाची सात वर्षे इजिप्त देशावर आली म्हणजे खाण्यासाठी पुरेसे अन्नधान्य राहील, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.” \p \v 37 तेव्हा फारोह व त्याच्या अधिकार्‍यांना ही योजना योग्य वाटली. \v 38 फारोहने त्यांना विचारले, “परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला या माणसासारखा दुसरा कोणी सापडेल का?” \p \v 39 मग फारोह योसेफाला म्हणाला, “ज्याअर्थी परमेश्वराने तुला या स्वप्नांचा अर्थ प्रगट केला आहे, त्याअर्थी देशामध्ये तुझ्यासारखा चतुर आणि सुज्ञ मनुष्य कोणीच नाही. \v 40 म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” \s1 योसेफ इजिप्तचा अधिकारी \p \v 41 मग फारोह योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तुला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे.” \v 42 फारोहने आपली स्वतःची राजमुद्रा योसेफाच्या बोटात घातली. त्याला रेशमी तागाची वस्त्रे घातली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली. \v 43 फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले. \p \v 44 फारोहने योसेफास म्हटले, “मी इजिप्त देशाचा राजा फारोह आहे, पण संपूर्ण इजिप्त देशभर तुझ्या परवानगीशिवाय कोणीही त्याचा हात किंवा पाय उचलणार नाही.” \v 45 फारोहने त्याला सापनाथ-पानेह\f + \fr 41:45 \fr*\fq सापनाथ-पानेह \fq*\ft अर्थात् \ft*\fqa परमेश्वर बोलतात आणि जगतात\fqa*\f* हे नाव दिले, आणि त्याला ओन\f + \fr 41:45 \fr*\fq ओन \fq*\ft दुसरे नाव \ft*\fqa हेलिओपोलिस\fqa*\f* येथील पोटीफेरा याजकाची कन्या आसनथ ही पत्नी करून दिली. योसेफ संपूर्ण इजिप्त देशभर फिरला. \p \v 46 योसेफाने फारोह राजाच्या सेवेत प्रवेश केला, तेव्हा तो तीस वर्षाचा होता. नंतर राजधानी सोडून तो इजिप्त देशभर प्रवास करू लागला. \v 47 पुढील समृद्धीच्या सात वर्षात देशात चहूकडे भरघोस पीक आले. \v 48 या समृद्धीच्या सात वर्षांच्या काळात योसेफाने इजिप्तमध्ये प्रत्येक शहराच्या भोवताली असलेल्या शेतात जे अन्नधान्य पिकले ते सर्व त्याने त्या भागाच्या जवळ असलेल्या शहरात साठवून ठेवले. \v 49 योसेफाने समुद्राच्या वाळूप्रमाणे धान्याचा मोठा साठा केला; ते इतके होते की त्याने नोंदी ठेवणे बंद केले, कारण ते मोजण्यापलीकडे होते. \p \v 50 याकाळात, दुष्काळाची वर्षे येण्यापूर्वी योसेफाला ओन येथील याजक पोटीफेराची कन्या आसनथ हिच्या पोटी दोन पुत्र झाले. \v 51 योसेफाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनश्शेह\f + \fr 41:51 \fr*\fq मनश्शेह \fq*\ft अर्थात् \ft*\fqa विस्मरण\fqa*\f* असे ठेवले आणि तो म्हणाला, परमेश्वराने माझ्या सर्व यातना आणि आपल्या वडिलांच्या घराला मुकण्याचे दुःख, यांचा विसर पाडला आहे. \v 52 त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव एफ्राईम\f + \fr 41:52 \fr*\fq एफ्राईम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa फलद्रूप\fqa*\f* असे ठेवले आले. कारण योसेफ म्हणाला, “परमेश्वराने माझ्या यातनेच्या या देशामध्ये मला फलद्रूप केले आहे.” \p \v 53 इजिप्त देशातील समृद्धीची सात वर्षे संपत आली. \v 54 मग योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली. इजिप्त देशाच्या सभोवती असलेल्या सर्व देशांमध्ये सुद्धा दुष्काळ पडला; परंतु इजिप्तमध्ये अन्न होते. \v 55 इजिप्ती लोकांची उपासमार होऊ लागली, तेव्हा लोक फारोहजवळ अन्न मागू लागले आणि फारोहने त्यांना योसेफाकडे पाठविले व त्यांना सांगितले, “योसेफ सांगेल त्याप्रमाणे करा.” \p \v 56 तेव्हा आता सर्व देशभर दुष्काळ पसरला असताना योसेफाने धान्याची कोठारे उघडली आणि तो इजिप्त देशाच्या लोकांना धान्य विकू लागला, कारण इजिप्तचा दुष्काळ अत्यंत भयानक होता. \v 57 जगभर दुष्काळ पडल्यामुळे संपूर्ण जगातील लोक इजिप्तमध्ये येऊन योसेफाकडून धान्य विकत घेऊ लागले. \c 42 \s1 योसेफाचे भाऊ इजिप्त देशात जातात \p \v 1 इजिप्त देशामध्ये धान्य मिळते, हे जेव्हा याकोबाच्या कानी गेले, तेव्हा तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “एकमेकांच्या तोंडाकडे नुसते पाहत का उभे राहिलात?” \v 2 मग त्याने पुढे म्हटले, “इजिप्तमध्ये धान्य मिळत आहे, असे मी ऐकले आहे. तुम्ही तिथे जा आणि आपल्यासाठी थोडे धान्य विकत घेऊन या, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” \p \v 3 मग योसेफाचे दहा भाऊ, धान्य विकत घेण्यासाठी इजिप्तमध्ये गेले. \v 4 परंतु याकोबाने योसेफाचा भाऊ बिन्यामीन याला, त्यांच्याबरोबर पाठविले नाही, कारण त्याला काही अपाय होईल अशी त्याला भीती वाटत होती. \v 5 अशा रीतीने इस्राएलचे पुत्र इतर लोकांबरोबर इजिप्तमध्ये धान्य खरेदीसाठी आले, कारण दुष्काळ कनान देशातही पडला होता. \p \v 6 योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला. \v 7 योसेफाने त्यांना बघताच ओळखले तरी अपरिचितासारखे वागून दरडावून विचारले, “तुम्ही कुठून आला आहात?” \p त्यांनी त्याला उत्तर दिले, “कनान देशाहून आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलो आहोत.” \p \v 8 योसेफाने तर त्याच्या भावांना ओळखले, पण त्या भावांनी त्याला ओळखले नाही. \v 9 यावेळी योसेफाला आपल्याला पूर्वी पडलेल्या स्वप्नांची आठवण झाली, आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! आणि आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठी आला आहात.” \p \v 10 ते म्हणाले, “नाही, नाही महाराज, आपले सेवक फक्त धान्य खरेदीसाठी आले आहेत. \v 11 आम्ही भाऊ एकाच पित्याचे पुत्र आहोत, तुमचे सेवक प्रामाणिक पुरुष आहेत, आम्ही हेर नाही.” \p \v 12 “नाही,” तो त्यांना म्हणाला, “आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठीच तुम्ही आला आहात.” \p \v 13 परंतु ते म्हणाले, “महाराज, आपले हे सेवक बारा भाऊ आहेत; एकाच पित्याचे पुत्र आहोत, जे कनान देशात आहेत; आमचा धाकटा भाऊ आमच्या पित्यासोबत आहे आणि आमचा एक भाऊ आता जीवित नाही.” \p \v 14 योसेफ म्हणाला, “म्हणूनच मी म्हणतो: तुम्ही हेर आहात! \v 15 आणि अशा प्रकारे तुम्हाला पडताळून पाहू: फारोहच्या जिवाची शपथ, तुमचा धाकटा भाऊ इकडे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही. \v 16 तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!” \v 17 आणि त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात ठेवले. \p \v 18 तिसर्‍या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला, “जर जीवित राहवयाचे असेल तर तुम्ही हे करा, कारण मी परमेश्वराचे भय धरणारा आहे. \v 19 तुम्ही प्रामाणिक लोक आहात तर तुमच्या एका भावाला तुरुंगात राहू द्या, बाकीच्यांना कुटुंबीयांची उपासमार निवारण्यासाठी धान्य घेऊन जाऊ द्या. \v 20 परंतु तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या. अशा रीतीने तुमचे शब्द खरे होतील आणि तुमचा मृत्यू टळेल.” मग त्यांनी तेच केले. \p \v 21 ते एकमेकांना म्हणाले, “आम्ही आमच्या भावाविषयी दोषी आहोत. जेव्हा त्याने आपल्या जिवाची विनवणी केली तेव्हा तो किती व्यथित होता हे आम्ही पाहिले, पण आम्ही ऐकले नाही; त्यामुळेच हे संकट आमच्यावर आले आहे.” \p \v 22 रऊबेन म्हणाला, “त्या मुलाविरुद्ध असे पाप करू नका, हे मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पण तुम्ही माझे ऐकले नाही! आम्हाला त्याच्या रक्तपाताचा हिशोब द्यावा लागेल.” \v 23 योसेफाला आपले बोलणे समजत असेल असे त्यांना वाटले नाही, कारण तो दुभाषी वापरत होता. \p \v 24 तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले. \p \v 25 नंतर योसेफाने आपल्या नोकरांना त्यांची पोती धान्याने भरण्यास सांगितले; पण त्याचवेळी त्याने प्रत्येक भावाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या पोत्यात ठेवून द्यावे अशी सूचना दिली. त्याने आपल्या भावांना प्रवासासाठी अन्नसामुग्री देण्याचा आदेश दिला. \v 26 शेवटी त्यांनी धान्याची पोती गाढवांवर लादली आणि ते घरी जाण्यास निघाले. \p \v 27 परंतु ते रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असताना त्यांच्यापैकी एकाने गाढवांना देण्यासाठी थोडे धान्य काढले. धान्य काढीत असताना आपले पैसे पोत्याच्या तोंडाशी असलेले त्याला दिसले. \v 28 तो आपल्या भावांना म्हणाला, “अरे हे काय? माझे पैसे माझ्या पोत्यातच आहेत!” \p ते सर्वजण भयभीत झाले. भयाने थरथर कापत ते एकमेकास म्हणाले, “परमेश्वराने आपल्याशी हे काय केले?” \p \v 29 कनान देशात ते आपले पिता याकोबाकडे आले आणि इजिप्तमध्ये जे काही घडले त्याची सर्व हकिकत त्यांनी त्याला सांगितली. \v 30 ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी अत्यंत कठोरतेने बोलला, त्याने आम्हाला हेर असल्यासारखे वागविले.” \v 31 आम्ही त्याला म्हटले, “आम्ही हेर नाहीत; आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. \v 32 आम्ही बारा भाऊ असून एकाच पित्याचे पुत्र आहोत. आमचा एक भाऊ मरण पावला आहे, आणि धाकटा भाऊ कनान देशामध्ये आमच्याच पित्याजवळ राहिला आहे.” \p \v 33 तेव्हा त्या देशाचा अधिपती आम्हाला म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक माणसे आहात की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी मी असे ठरविले आहे: तुमच्यापैकी एका भावाला येथे तुरुंगात ठेवावे; बाकीच्यांनी तुमच्या कुटुंबीयांसाठी धान्य घेऊन घरी जावे. \v 34 पण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या; मगच तुम्ही हेर नाहीत, तर प्रामाणिक माणसे आहात हे मला समजेल. तर मी तुमचा भाऊ तुम्हाला परत देईन व तुम्ही या देशात व्यापार\f + \fr 42:34 \fr*\ft किंवा \ft*\fqa मोकळेपणाने फिरू शकाल\fqa*\f* करू शकाल.” \p \v 35 त्यांनी त्यांची धान्याची पोती रिकामी केली तो, प्रत्येकाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांनी दिलेले पैसे होते असे त्यांना दिसून आले! भयाने त्यांचा व त्यांच्या वडिलांचाही थरकाप उडाला. \v 36 मग याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या मुलांना हिरावून घेतले आहे. योसेफ राहिला नाही, शिमओन गेला; आता तुम्ही बिन्यामीनालाही नेणार; सर्वकाही माझ्या विरुद्धच घडत आहे.” \p \v 37 तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.” \p \v 38 पण याकोबाने उत्तर दिले, “माझा मुलगा तुमच्याबरोबर तिथे जाणार नाही; त्याचा भाऊ योसेफ मरण पावला आणि आता तो एकटाच राहिला आहे; त्याला काही कमीजास्त झाले तर या म्हातारपणात दुःखाने माझा प्राण जाईल\f + \fr 42:38 \fr*\fq म्हातारपणात दुःखाने माझा प्राण जाईल \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa पिकलेले केस दुःखाने पाताळात जाईल\fqa*\f*!” \c 43 \s1 इजिप्त देशाचा दुसरा प्रवास \p \v 1 परंतु देशात दुष्काळ तीव्र होता. \v 2 इजिप्तमधून त्यांनी आणलेले धान्य संपले तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये पुनः जाऊन आपल्यासाठी थोडे धान्य विकत आणा.” \p \v 3 तेव्हा यहूदाह त्यास म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हाला चेतावणी दिली होती की, ‘तुमच्या भावास सोबत आणल्याशिवाय तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ \v 4 जर तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तरच आम्ही जाऊन धान्य विकत घेऊ. \v 5 जर तुम्ही त्याला पाठवित नसाल तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला म्हटले, ‘जर तुम्ही तुमच्या भावास सोबत आणले नाही तर तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ ” \p \v 6 इस्राएल म्हणाला, “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे तुम्ही त्याला सांगून माझ्यावर हे अनर्थ का आणले?” \p \v 7 यावर ते म्हणाले, “पण त्या मनुष्याने आपल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाची खोल चौकशी केली. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचे वडील अजून जिवंत आहेत काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय?’ आम्ही सहजपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘तुमच्या भावाला घेऊन या’ असे तो म्हणेल, असे आम्हाला कसे ठाऊक असणार?” \p \v 8 तेव्हा यहूदाह आपला पिता इस्राएलला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, आम्ही लगेच जाऊ, म्हणजे तुम्ही, आम्ही व आमची मुले जगणार आणि मरणार नाही. \v 9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील. \v 10 जर आम्ही उशीर केला नसता तर इतक्या दिवसात आम्ही तिकडे दोनदा जाऊन आलो असतो.” \p \v 11 नंतर त्यांचे वडील इस्राएल त्यांना म्हणाले, “जर असेच असेल तर मग हे करा: या देशात उत्पादन होणारे सर्वोत्तम पदार्थ—थोडे औषधी बलसान, थोडे मध, मसाले, गंधरस, पिस्ते व बदाम आपल्या गोण्यात घ्या आणि या वस्तू त्या मनुष्याला देणगी म्हणून घेऊन जा. \v 12 दुप्पट चांदी सोबत घेऊन जा म्हणजे तुमच्या पोत्याच्या तोंडाशी असलेला चांदीचा पैसाही तुम्हाला परत करता येईल. कदाचित काही तरी चूक झाली असेल. \v 13 तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा. \v 14 त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्‍या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.” \p \v 15 मग त्यांनी भेट व दुप्पट चांदी आणि बिन्यामीनाला सोबत घेतले आणि खाली इजिप्तला गेले आणि योसेफापुढे उपस्थित झाले. \v 16 बिन्यामीन त्यांच्याबरोबर आहे हे योसेफाने पाहिले, तेव्हा तो आपल्या घराच्या कारभार्‍याला म्हणाला, “या माणसांना माझ्या घरी घेऊन जा, पशू मार आणि भोजन तयार कर; ते दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.” \p \v 17 त्या मनुष्याने योसेफाच्या सांगितल्याप्रमाणे केले आणि त्याने माणसांना योसेफाच्या घरी नेले. \v 18 त्यांना योसेफाच्या घरी नेल्यावर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “पहिल्यांदा आपल्या पोत्यात जी चांदी टाकण्यात आली होती त्यासाठी आपल्याला इथे आणण्यात आले आहे. आपल्यावर हल्ला करून आपल्यावर विजय मिळवून आपल्याला गुलाम करावे व आपल्या गाढवांना हस्तगत करावे असा त्याचा बेत असावा.” \p \v 19 घराच्या दाराशी आल्यानंतर ते योसेफाच्या घरकारभार्‍याकडे गेले; \v 20 आणि त्याला म्हणाले, “महाराज, पहिल्या फेरीत आम्ही इथे धान्य खरेदीसाठी आलो होतो. \v 21 तेव्हा परत घरी जाताना आम्ही रात्री जिथे थांबलो आणि आमची पोती उघडली तेव्हा आम्हा प्रत्येकाचा पोत्यात त्याची चांदी—अचूक वजनाची—पोत्याच्या तोंडाशी सापडली. आम्ही ती परत देण्यासाठी बरोबर आणली आहे. \v 22 या रकमेबरोबरच धान्य विकत घेण्यासाठी आम्ही वेगळी चांदी आणली आहे. आमच्या पोत्यांमध्ये आमची चांदी कोणी ठेवली हे आम्हाला माहीत नाही.” \p \v 23 “ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले. \p \v 24 नंतर घरकारभार्‍याने त्यांना योसेफाच्या घरात नेले, त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि त्यांच्या गाढवांना चाराही दिला. \v 25 योसेफ दुपारी येणार त्यावेळी त्याला देण्यासाठी त्यांनी आपली भेट तयार करून ठेवली, कारण त्यांना तिथेच भोजन करावयाचे आहे असे सांगण्यात आले होते. \p \v 26 योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या. \v 27 त्याने त्यांना अभिवादन केले, मग त्याने विचारले, “त्या वृद्ध माणसाविषयी तुम्ही बोलला, ते तुमचे वडील कसे आहेत? ते अजून जिवंत आहेत काय?” \p \v 28 “होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला. \p \v 29 त्याने आपली नजर वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, बिन्यामीनाकडे पाहून त्याने विचारले, “हाच का तुमचा धाकटा भाऊ, याच्याचविषयी तुम्ही मला सांगत होता ना?” आणि तो म्हणाला, “माझ्या मुला, परमेश्वर तुजवर कृपा करो.” \v 30 नंतर योसेफ घाईघाईने बाहेर जाऊन रडण्यासाठी जागा शोधत होता, कारण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला होता, तो आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन रडला. \p \v 31 मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.” \p \v 32 योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत. \v 33 प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले. \v 34 योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले. \c 44 \s1 योसेफाचा चांदीचा प्याला \p \v 1 आता योसेफाने आपल्या घरकारभार्‍यास आदेश दिला: “माणसांच्या पोत्यात त्यांना वाहून नेण्याइतके अन्न भरावे आणि प्रत्येक माणसाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांची चांदी ठेवावी. \v 2 याखेरीज धाकट्याच्या पोत्यामध्ये धान्याच्या पैशाबरोबरच माझा चांदीचा प्यालाही ठेवा.” असे सांगितले आणि घरकारभार्‍याने योसेफाच्या आदेशाप्रमाणे केले. \p \v 3 पहाट होताच त्या माणसांना त्यांच्या गाढवांसोबत मार्गस्थ करण्यात आले. \v 4 पण ते शहराच्या बाहेर पडतात न पडतात तोच योसेफ त्याच्या कारभार्‍यास म्हणाला, “त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना थांबवून विचारा, ‘तुम्ही चांगल्याची फेड वाईटाने का केली? \v 5 हाच तो चांदीचा प्याला नाही का जो माझे स्वामी स्वतः पिण्याकरिता वापरतात आणि ज्याच्यामधून ते शकुनही पाहत असतात? हे तुमचे कृत्य किती वाईट आहे!’ ” \p \v 6 त्याप्रमाणे त्याने त्यांना गाठले आणि सांगितल्याप्रमाणे तो त्यांना बोलला. \v 7 पण ते त्याला म्हणाले, “महाराज असे का बोलतात? तुमच्या सेवकांपासून असे काही करणे दूरच असो! \v 8 मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती? \v 9 आमच्यापैकी कोणाच्याही जवळ जर तो प्याला सापडला तर त्याला मृत्यू येवो; आणि आम्ही सर्वजण तुझ्या धन्याचे गुलाम होऊ.” \p \v 10 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ठीक आहे, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे होईल; परंतु ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तोच माझ्या धन्याचा गुलाम होईल; बाकीचे दोषापासून मुक्त होतील.” \p \v 11 आपल्या पोती त्यांनी लगबगीने खाली जमिनीवर ठेऊन ती उघडली; \v 12 त्या कारभार्‍याने वडील भावापासून आरंभ करून धाकट्या भावाच्या पोत्यापर्यंत शोध केला; आणि तो प्याला बिन्यामीनच्या पोत्यामध्ये सापडला. \v 13 हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले. \p \v 14 यहूदाह आणि त्याचे भाऊ आले, त्यावेळी योसेफ घरीच होता आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले. \v 15 योसेफाने विचारले, “तुम्ही हे काय केले? माझ्यासारखा मनुष्य शकुन पाहून या गोष्टी जाणून घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती नव्हते का?” \p \v 16 यहूदाहने उत्तर दिले, “आमच्या स्वामीपुढे आम्ही काय बोलावे? आमची निर्दोषता आम्ही कशी सिद्ध करावी? परमेश्वराने तुमच्या दासांचे अपराध उघडे केले आहे. महाराज, आम्ही सर्वजण आणि ज्याच्या पोत्यात प्याला सापडला तो देखील तुमचे गुलाम आहोत.” \p \v 17 योसेफ म्हणाला, “अशी गोष्ट माझ्याकडून कधीही न होवो! ज्या मनुष्याकडे माझा प्याला मिळाला, तोच माझा गुलाम होईल बाकीचे तुम्ही तुमच्या वडिलांकडे शांतीने परत जा.” \p \v 18 तेव्हा यहूदाह पुढे सरसावून म्हणाला, “महाराज, तुमच्या सेवकाला क्षमा करा, मला एक शब्द बोलू द्या, क्षणभर माझे ऐकून घ्या. कृपया, आपल्या सेवकावर रागावू नका, कारण तुम्ही प्रत्यक्ष फारोहसमान आहात. \v 19 महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का? \v 20 आणि आम्ही आमच्या प्रभूला उत्तर दिले की, ‘आम्हाला वृद्ध वडील आहेत आणि अशा वृद्धापकाळातच त्यांना एक पुत्र झाला. त्याचा भाऊ मरण पावला आहे आणि त्याच्या आईला झालेल्या पुत्रांपैकी तो एकटाच उरलेला आहे आणि त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रीती करतात.’ \p \v 21 “तेव्हा तुम्ही तुमच्या सेवकांना म्हणाले, ‘त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी त्याला पाहू शकेन.’ \v 22 आणि आम्ही आमच्या महाराजास म्हणालो, ‘तो मुलगा आपल्या वडिलांना सोडू शकत नाही; जर त्याने वडिलांना सोडले तर त्याचे वडील मरतील.’ \v 23 पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’ \v 24 जेव्हा आम्ही परत तुमचा सेवक आमच्या पित्याकडे जाऊन पोहोचलो, आम्ही त्यांना महाराज काय म्हणाले ते सांगितले. \p \v 25 “आमच्या वडिलांनी म्हटले, ‘परत जा आणि थोडे धान्य विकत घेऊन या.’ \v 26 परंतु आम्ही म्हणालो, ‘आम्ही खाली जाऊ शकत नाही, जर आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असला तरच आम्ही जाणार. आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असल्याशिवाय आम्ही त्या मनुष्याचे मुख पाहू शकणार नाही.’ \p \v 27 “मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला. \v 28 त्यापैकी एक माझ्यापासून दूर गेला तेव्हा मी म्हणालो, “त्याला एखाद्या श्वापदाने फाडून त्याचे तुकडे केले असावेत,” त्यानंतर मी त्याला पहिले नाही. \v 29 जर यालाही तुम्ही माझ्यापासून घेऊन जाल आणि त्याच्यावरही संकट आले तर तुम्ही माझ्या पिकलेल्या केसाला दुःखाने कबरेत लोटण्यास कारणीभूत व्हाल.’ \p \v 30 “आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो, \v 31 आणि मुलगा आमच्याबरोबर नाही असे जर त्यांनी पाहिले तर ते प्राण सोडतील आणि त्यांच्या पिकलेल्या केसांना दुःखात व कबरेत लोटण्यास आम्ही कारणीभूत होऊ. \v 32 तुमच्या सेवकाने आमच्या वडिलांना अभिवचन दिले आहे की, मुलाची मी काळजी घेईन. मी त्यांना सांगितले की, ‘मी जर त्याला परत आणले नाही तर त्याचा दोष माझ्या जीवनात सदैव माझ्या माथ्यावर राहील!’ \p \v 33 “म्हणून महाराज, कृपा करा आणि त्या मुलाऐवजी मलाच येथे तुमचा गुलाम म्हणून राहू द्या आणि मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या. \v 34 कारण मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी माझ्या वडिलांकडे कसे जाऊ शकतो? माझ्या वडिलांना होणारे दुःख मला पाहवणार नाही.” \c 45 \s1 योसेफ आपल्या भावांना ओळख देतो \p \v 1 आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले. \v 2 मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले. \p \v 3 तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना. \p \v 4 तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे! \v 5 तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले. \v 6 दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही. \v 7 परंतु पृथ्वीवर जे उरले आहेत, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी आणि मोठ्या मुक्तिद्वारे तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने मला तुमच्या आधी इथे पाठवले आहे. \p \v 8 “म्हणजे आता तुम्ही नव्हे तर खुद्द परमेश्वरानेच मला इकडे पाठविले. त्यांनीच मला फारोहचा सल्लागार, त्याच्या घराण्याचा व्यवस्थापक आणि संपूर्ण इजिप्त देशाचा अधिपती केले आहे. \v 9 आता त्वरा करा आणि माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगा की, तुमचा पुत्र योसेफ असे म्हणतो: ‘परमेश्वराने मला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे, म्हणून आता क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडे येथे या. \v 10 म्हणजे तुम्ही, तुमची मुले व तुमची नातवंडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि जे सर्वकाही तुमचे आहे, त्यासह तुम्हाला येथे गोशेन प्रांतात राहता येईल. \v 11 मी तुमची या ठिकाणी काळजी घेईन, कारण आपल्यापुढे दुष्काळाची अजून पाच वर्षे आहेत आणि तुम्ही इकडे आला नाही तर, तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबासह निराधार व्हाल.’ \p \v 12 “तुम्ही हे स्वतः बघत आहात व माझा भाऊ बिन्यामीनही बघत आहे, की खरोखर मीच तुमच्याशी बोलत आहे. \v 13 आपल्या वडिलांना इजिप्तमध्ये मला देण्यात आलेला आदर आणि जे सर्वकाही तुम्ही पाहिले ते सांगा आणि त्यांना माझ्याकडे तत्परतेने घेऊन या.” \p \v 14 मग आनंदाने रडू येत असतानाच, त्याने बिन्यामीनाला मिठी मारली आणि बिन्यामीनही रडू लागला. \v 15 मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांच्यासह रडला आणि नंतर त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले. \p \v 16 योसेफाचे भाऊ आले आहेत ही बातमी फारोहपर्यंत पोहोचली, तेव्हा ती ऐकून फारोहला आणि त्याच्या अधिकार्‍यांना अतिशय आनंद झाला. \v 17 फारोह योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग, ‘आपली जनावरे लादा आणि झटपट कनान देशातील आपल्या घरी जा, \v 18 आणि तुमचे वडील व सर्व कुटुंबीय मंडळी यांना इजिप्तमध्येच राहण्यासाठी घेऊन या. त्यांना सांगा, फारोह तुम्हाला इजिप्त देशातील सर्वात सुपीक प्रदेश बहाल करेल म्हणजे या देशातील उत्तम पदार्थ तुम्हाला खावयास मिळतील.’ \p \v 19 “आणि तुझ्या भावांना असेही सांग, ‘तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमचे वडील यांना घेऊन येण्यासाठी इजिप्तमधून गाड्या घेऊन जा. \v 20 तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका, कारण इजिप्त देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच होईल.’ ” \p \v 21 इस्राएलच्या पुत्रांनी तसेच केले. फारोहच्या आज्ञेप्रमाणे योसेफाने त्यांना सामान आणण्यासाठी गाड्या दिल्या; तसेच प्रवासासाठी अन्नधान्यही दिले. \v 22 त्याने त्या प्रत्येकाला नवीन पोशाख दिला, परंतु बिन्यामीनाला त्याने पाच नवीन पोशाख आणि तीनशे शेकेल चांदी\f + \fr 45:22 \fr*\ft अंदाजे 3.5 कि.ग्रॅ.\ft*\f* दिली. \v 23 त्याने आपल्या वडिलांसाठी इजिप्तमधील सर्वोत्तम वस्तूंनी लादलेली दहा गाढवे पाठवली. प्रवासासाठी धान्य व खाद्यपदार्थ यांनी लादलेल्या दहा गाढवीही रवाना केल्या. \v 24 अशा रीतीने त्याने त्याच्या भावांची रवानगी केली. त्यांना प्रत्यक्ष निरोप देताना तो त्यांना म्हणाला, “रस्त्याने जाताना भांडू नका!” \p \v 25 निरोप घेऊन ते इजिप्तमधून निघाले व कनान देशात आपले वडील याकोब याच्याकडे आले. \v 26 ते त्यांना म्हणाले, “योसेफ अजून जिवंत आहे! तो इजिप्त देशाचा अधिपती झाला आहे.” हे ऐकून याकोब अवाक झाला; त्याचा त्याच्या पुत्रांच्या बातमीवर विश्वास बसेना. \v 27 परंतु जेव्हा त्यांनी त्याला योसेफाचा निरोप सांगितला आणि योसेफाने पाठविलेल्या धान्याच्या गाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा त्यांचा पिता याकोब याच्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त झाले. \v 28 आणि इस्राएलने म्हटले, “माझी खात्री झाली आहे! माझा पुत्र योसेफ जिवंत आहे, आता मृत्यूपूर्वी मी स्वतः त्याला जाऊन भेटेन.” \c 46 \s1 याकोब इजिप्त देशास येतो \p \v 1 अशा रीतीने इस्राएल आपले सर्वस्व घेऊन निघाला आणि बेअर-शेबा येथे पोहोचल्यावर त्याने आपला पिता इसहाक याच्या परमेश्वराला अर्पणे वाहिली. \p \v 2 त्या रात्री परमेश्वराने इस्राएलला स्वप्नात दर्शन दिले व त्याला म्हटले, “याकोबा! याकोबा!” \p याकोब म्हणाला, “काय आज्ञा?” \p \v 3 परमेश्वराने म्हटले, “मी परमेश्वर, मी तुझ्या पित्याचा परमेश्वर आहे; खाली इजिप्त देशात जाण्यास भिऊ नको, कारण तिथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन. \v 4 मी स्वतः तुझ्याबरोबर खाली इजिप्तला जाईन, आणि तुला तिथून निश्चितच परत आणेन. योसेफाचे हात तुझे डोळे बंद करतील.” \p \v 5 तेव्हा याकोब बेअर-शेबाहून निघाला; त्याला नेण्यासाठी फारोहने पाठविलेल्या गाड्यांमधून इस्राएलाच्या पुत्रांनी, त्याला व आपल्या पत्नींना आणि मुलांबाळांना इजिप्तमध्ये आणले. \v 6 मग याकोब त्याची सर्व संतती आणि आपली गुरे व कनान देशामध्ये मिळविलेली संपत्ती घेऊन इजिप्तला गेला. \v 7 याप्रमाणे याकोबाने त्याचे पुत्र, नातवंडे आणि त्याच्या मुली आणि नातवंडांना—त्याची सर्व संतती इजिप्तमध्ये आणली. \b \lh \v 8 इजिप्तला गेलेल्या इस्राएलाच्या पुत्रांची (याकोब आणि त्याचे वंशज) ही नावे आहेत: \b \li1 रऊबेन हा याकोबाचा प्रथम जन्मलेला. \li1 \v 9 रऊबेनाचे पुत्र: \li2 हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. \li1 \v 10 शिमओनाचे पुत्र: \li2 यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल. \li1 \v 11 लेवीचे पुत्र: \li2 गेर्षोन, कोहाथ व मरारी. \li1 \v 12 यहूदाहचे पुत्र: \li2 एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). \li2 परेसाचे पुत्र: \li3 हेस्रोन आणि हामूल. \li1 \v 13 इस्साखारचे पुत्र: \li2 तोला, पुवाह, योब व शिम्रोन. \li1 \v 14 जबुलूनाचे पुत्र: \li2 सेरेद, एलोन व याहलेल हे होते. \lf \v 15 म्हणजे याकोब आणि लेआ यांची सर्व संतती मिळून तेहतीस होती. यातच त्यांना पद्दन-अराम येथे झालेली कन्या दीना हिचाही समावेश आहे. \b \li1 \v 16 गादाचे पुत्र: \li2 सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली. \li1 \v 17 आशेराचे पुत्र: \li2 इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह; त्यांची बहीण सेराह. \li2 बरीयाहचे पुत्र: \li3 हेबेर व मालकीएल. \lf \v 18 हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले. \b \li1 \v 19 याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र: \li2 योसेफ व बिन्यामीन. \li3 \v 20 योसेफाचे पुत्र मनश्शेह व एफ्राईम हे इजिप्तमध्ये ओन\f + \fr 46:20 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa हेलिओपोलिस\fqa*\f* नगरचा याजक पोटीफेरा याची कन्या आसनथपासून जन्मले. \li1 \v 21 बिन्यामीनचे पुत्र: \li2 बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम व आर्द हे होते. \lf \v 22 हे चौदाजण म्हणजे याकोब व राहेल यांची संतती होती. \b \li1 \v 23 दानचा पुत्र: \li2 हुशीम. \li1 \v 24 नफतालीचे पुत्र: \li2 याहसेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम. \lf \v 25 लाबानाने आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिलेली स्त्री बिल्हा हिच्यापासून याकोबाला सात पुत्र झाले. \b \lf \v 26 याप्रमाणे याकोबाच्या पुत्राच्या स्त्रियांच्या व्यतिरिक्त इजिप्तमध्ये गेलेल्या त्याच्या संतानात एकूण सहासष्ट व्यक्ती होत्या. \v 27 योसेफाला इजिप्तमध्ये झालेल्या दोन पुत्रांचा यामध्ये समावेश केला तर इजिप्तमध्ये आलेल्या याकोबाच्या कुटुंबाचे एकूण सत्तरजण\f + \fr 46:27 \fr*\fq सत्तरजण \fq*\ft यामध्ये याकोब आणि योसेफ व योसेफाचे दोन पुत्र समाविष्ट आहेत\ft*\f* होते. \b \p \v 28 याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले, \v 29 योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले. \p \v 30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मला खुशाल मरण येवो, कारण तू जिवंत आहेस हे मी स्वतः पाहिले आहे.” \p \v 31 योसेफ आपल्या भावांना आणि पित्याच्या कुटुंबातील सर्वांना म्हणाला, “मी वर जाऊन फारोहला सांगेन की, ‘माझे भाऊ व माझ्या पित्याचे संपूर्ण कुटुंब कनान देशातून मजकडे आले आहेत. \v 32 मी त्याला सांगेन, हे मेंढपाळ आहेत; त्यांनी त्यांच्याबरोबर आपली शेरडेमेंढरे, गुरे व त्यांचे सर्वस्व आणले आहे.’ \v 33 म्हणून फारोह जेव्हा तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुमचा व्यवसाय काय आहे?’ \v 34 तेव्हा तुम्ही असे उत्तर द्यावे, ‘आमच्या वडीलांप्रमाणे तुझ्या सेवकांनी लहानपणापासून गुरे पाळली आहेत.’ म्हणजे तो तुम्हाला येथेच गोशेन प्रांतात राहू देईल, कारण इजिप्तमध्ये मेंढपाळांना तुच्छ मानले जाते.” \c 47 \p \v 1 योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.” \v 2 त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना निवडले आणि फारोहपुढे उपस्थित केले. \p \v 3 फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?” \p त्यांनी फारोहला उत्तर दिले, “तुमचे सेवक आमच्या पूर्वजांप्रमाणेच मेंढपाळ आहोत.” \v 4 ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.” \p \v 5 फारोह योसेफाला म्हणाला, “तुझे वडील व भाऊ तुझ्याकडे आले आहेत, \v 6 आणि संपूर्ण इजिप्त देश तुझ्यासमोर आहे; या देशातील उत्तम भागात तुझ्या पित्याला आणि भावांना राहण्यास दे. त्यांना गोशेन येथे राहू दे. आणि त्यांच्यापैकी कोणी विशेष क्षमता असणारे असतील तर त्यांच्यावर माझ्याही गुरांची जबाबदारी सोपवून दे.” \p \v 7 मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद\f + \fr 47:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa अभिवादन केले\fqa*\f* दिला. \v 8 फारोहने त्याला विचारले, “तुमचे किती वय आहे?” \p \v 9 आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.” \v 10 नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला. \p \v 11 याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली. \v 12 योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले. \s1 योसेफ आणि दुष्काळ \p \v 13 मात्र, दुष्काळ उग्र असल्याने संपूर्ण प्रदेशात अन्न नव्हते; दुष्काळामुळे इजिप्त आणि कनान दोन्ही देश कष्टमय झाले. \v 14 योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला. \v 15 जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?” \p \v 16 यावर योसेफाने उत्तर दिले, “तुमचे पैसे संपले आहेत, तर मग तुमची गुरे मला द्या आणि त्यांच्या मोबदल्यात मी तुम्हाला अन्नधान्य देतो.” \v 17 त्याप्रमाणे अन्नधान्यासाठी लोकांनी आपले सर्व घोडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि गाढवे योसेफाकडे आणली आणि त्याने त्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य दिले. \p \v 18 ते वर्ष संपल्यावर, पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “आम्ही धन्यापासून हे सत्य लपवू शकत नाही की आमचा पैसा संपला आणि आमची गुरे तुमची झाली आहेत आणि आता आमच्याजवळ आमच्या धन्यासाठी फक्त आमची शरीरे व आमच्या जमिनी राहिल्या आहेत. \v 19 आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का? आता आम्हाला आमच्या जमिनीसह विकत घ्या म्हणजे आम्ही फारोहचे गुलाम होऊ. अन्नासाठी आम्ही स्वतःचा विक्रय केला तरच आम्ही जगू आणि जमिनीही मोकळ्या राहणार नाहीत.” \p \v 20 याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली, \v 21 तसेच योसेफाने इजिप्त देशातील एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतच्या शहरातील सर्व लोकांना गुलाम बनविले. \v 22 याजकांच्या जमिनी मात्र योसेफाने विकत घेतल्या नाहीत, कारण फारोहकडून त्यांना निर्धारित अन्नधान्य पुरविले जात असे आणि त्यामुळे त्यांनी जमिनी विकल्या नाही. \p \v 23 मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा. \v 24 ज्यावेळी तुम्ही कापणी कराल. त्यावेळी तुमच्या उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोहला द्यावा. राहिलेले चार हिस्से पुढील वर्षाच्या बियाण्यांसाठी आणि तुम्हासाठी, तुमचे कुटुंब व मुलाबाळांच्या खाण्यासाठी ठेवा.” \p \v 25 लोक म्हणाले, “तुम्ही आमचे प्राण वाचविले आहेत, आमच्या धन्याच्या दृष्टीत आम्हाला दया प्राप्त होवो; आम्ही फारोहच्या गुलामगिरीत राहू.” \p \v 26 म्हणून योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी शिवाय इतर सर्व जमिनीतील पिकांचा पाचवा हिस्सा फारोहला देण्यात यावा, असा इजिप्त देशभर कायदा केला. हा कायदा आजवर चालू आहे. \p \v 27 अशा रीतीने इस्राएली इजिप्तच्या गोशेन प्रांतात राहू लागले, आणि त्यांनी तिथे जमीनजुमला संपादन केला व ते फलद्रूप होऊन संख्येने खूप वाढले. \p \v 28 इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती. \v 29 इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस, \v 30 परंतु जेव्हा मी माझ्या पूर्वजांसोबत झोपी जाईन, मला इजिप्तमधून बाहेर ने आणि त्यांना जिथे पुरले आहे, तिथे मला मूठमाती दे.” \p त्याने म्हटले, “तुम्ही जसे सांगितले आहे तसेच मी करेन.” \p \v 31 “मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली. \c 48 \s1 एफ्राईम व मनश्शेह \p \v 1 काही दिवसानंतर योसेफाला कळविण्यात आले, “तुझे वडील आजारी आहेत.” तेव्हा तो मनश्शेह व एफ्राईम या आपल्या दोन पुत्रांना आपल्यासोबत घेऊन निघाला. \v 2 जेव्हा याकोबाला सांगण्यात आले, “तुझा पुत्र योसेफ तुझ्याकडे आला आहे,” तेव्हा इस्राएल आपली सर्व शक्ती एकवटून उठून बिछान्यावर बसला. \p \v 3 याकोब हा योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वराने मला कनान देशात लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला \v 4 आणि मला म्हणाले, ‘मी तुला फलद्रूप करेन आणि तुझी संख्या वाढवेन. मी तुला लोकांचा समुदाय करेन आणि तुझ्यानंतर हा देश तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन.’ \p \v 5 “आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे. \v 6 परंतु यानंतर तुला जी मुलेबाळे होतील ती तुझी होतील. त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. \v 7 मी पद्दन-अराम येथून परत येत होतो आणि कनान देशात एफ्राथपासून थोड्याच अंतरावर होतो, तेव्हा राहेलच्या मृत्यूचे दुःख माझ्यावर पडले आणि मी तिला एफ्राथ गावाच्या थोड्या अंतरावर पुरले” (म्हणजे बेथलेहेम). \p \v 8 जेव्हा इस्राएलने योसेफाच्या पुत्रांना पाहिले, त्याने विचारले, “ही कोण आहेत?” \p \v 9 योसेफाने त्याच्या पित्याला म्हटले, “परमेश्वराने मला इथे दिलेले हे माझे पुत्र आहेत.” \p इस्राएल त्याला म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण आणि म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.” \p \v 10 इस्राएलाची दृष्टी म्हातारपणामुळे अशक्त झाली होती, त्यामुळे तो नीट पाहू शकत नव्हता, म्हणून योसेफाने त्यांना त्याच्याजवळ आणले आणि त्याच्या पित्याने त्यांचे चुंबन घेतले व त्यांना कवटाळले. \p \v 11 इस्राएल योसेफाला म्हणाला, “मी तुला परत पाहीन असे मला कधीच वाटले नव्हते, पण परमेश्वराने मला तुझे पुत्रही पाहू दिलेत.” \p \v 12 नंतर योसेफाने त्यांना इस्राएलाच्या मांडीवरून बाजूला केले आणि जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. \v 13 मग योसेफाने दोघांना घेतले आणि एफ्राईमला योसेफाच्या उजव्या व इस्राएलाच्या डाव्या हातास आणि मनश्शेहला योसेफाच्या डाव्या आणि इस्राएलाच्या उजव्या हातास असे त्याच्याजवळ नेले. \v 14 परंतु इस्राएलने त्याचा उजवा हात पुढे केला आणि तो एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला, जरी तो धाकटा होता आणि हात ओलांडून त्याने आपला डावा हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवला, जरी मनश्शेह प्रथम जन्मलेला होता. \p \v 15 नंतर त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, \q1 “ज्या परमेश्वरापुढे माझे पूर्वज \q2 अब्राहाम आणि इसहाक विश्वासाने चालले, \q1 तेच परमेश्वर आजपर्यंत माझ्या जीवनाचे \q2 मेंढपाळ राहिले आहे, \q1 \v 16 ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, \q2 ते या मुलांना आशीर्वादित करोत. \q1 माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव \q2 या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, \q1 त्यांना पुष्कळ मुलेबाळे व \q2 गोत्र लाभोत.” \p \v 17 त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला. \v 18 योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.” \p \v 19 परंतु त्याच्या वडिलांनी ते नाकारले आणि ते म्हणाले, “मला माहीत आहे, माझ्या मुला, मला माहीत आहे. त्याचीही कुळे होतील आणि तो देखील महान होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्याच्याहीपेक्षा थोर होईल आणि त्याचे लोक राष्ट्रांचे समुदाय बनतील.” \v 20 त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, \q1 “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: \q2 ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” \m अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले. \p \v 21 नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील. \v 22 आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.” \c 49 \s1 याकोब आपल्या मुलांना आशीर्वाद देतो \p \v 1 नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन. \q1 \v 2 “एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो; \q2 तुमचा पिता इस्राएल याचे ऐका. \b \q1 \v 3 “रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, \q2 पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. \q2 प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस. \q1 \v 4 तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, \q2 तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, \q2 माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले. \b \q1 \v 5 “शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत, \q2 त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे. \q1 \v 6 मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये, \q2 त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये, \q1 कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला, \q2 आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली. \q1 \v 7 त्यांचा क्रोध शापित असो, \q2 आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! \q1 मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, \q2 आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन. \b \q1 \v 8 “हे यहूदाह,\f + \fr 49:8 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa स्तुती\fqa*\f* तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; \q2 तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; \q2 तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील. \q1 \v 9 यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. \q2 माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. \q1 सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, \q2 सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार? \q1 \v 10 यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, \q2 किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, \q1 ज्याचे जे आहे\f + \fr 49:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याच्यापासून त्याचे संतान\fqa*\f* तो येईपर्यंत, \q2 राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील. \q1 \v 11 तो आपले गाढव द्राक्षवेलीला, \q2 गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे; \q1 आपला झगा द्राक्षारसात, \q2 आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे. \q1 \v 12 त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील, \q2 त्याचे दात दुधापेक्षाही पांढरे होतील. \b \q1 \v 13 “जबुलून समुद्रकिनारी राहील \q2 आणि तो जहाजांचे बंदर होईल. \q2 त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल. \b \q1 \v 14 “इस्साखार बळकट गाढव आहे. \q2 तो मेंढवाड्यांमध्ये दबून बसला आहे. \q1 \v 15 त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे \q2 आणि तिकडचा प्रदेश किती आल्हाददायक आहे, \q1 हे पाहून तो आपल्या खांद्याला भार वाहण्यासाठी वाकवेल \q2 आणि मजुरीचा दास होऊन जाईल. \b \q1 \v 16 “दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, \q2 इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल. \q1 \v 17 दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल, \q2 तो वाटेवरील विषारी सर्प बनेल, \q1 जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल \q2 व घोडेस्वार खाली कोसळेल. \b \q1 \v 18 “हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे. \b \q1 \v 19 “एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल, \q2 पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल. \b \q1 \v 20 “आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; \q2 आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल. \b \q1 \v 21 “नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, \q2 त्याला सुंदर पाडसे होतील. \b \q1 \v 22 “योसेफ हा फलवंत वेल आहे, \q2 पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, \q2 तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत. \q1 \v 23 कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; \q2 त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले. \q1 \v 24 परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, \q2 त्याचे बाहू मजबूत राहिले, \q1 याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, \q2 ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत. \q1 \v 25 कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, \q2 कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, \q1 वरून स्वर्गातील आशीर्वाद, \q2 खोलातील डोहातून निघणार्‍या झर्‍यातील आशीर्वाद, \q2 स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो. \q1 \v 26 तुझ्या पित्याचे आशीर्वाद \q2 पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, \q2 ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. \q1 हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, \q2 जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत. \b \q1 \v 27 “बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; \q2 तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, \q2 आणि संध्याकाळी लूट वाटतो.” \p \v 28 हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला. \s1 याकोबाचा मृत्यू \p \v 29 नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या. \v 30 कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे. \v 31 तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली. \v 32 ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.” \p \v 33 आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला. \c 50 \p \v 1 योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. \v 2 नंतर योसेफाने वैद्यास त्याचा पिता इस्राएल याच्या मृतदेहात मसाला भरण्याची आज्ञा दिली. मग वैद्यांनी मृतदेहात सुगंधी द्रव्याचा मसाला भरला. \v 3 मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. \p \v 4 शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली. \v 5 “माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.” \p \v 6 फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.” \p \v 7 मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित— \v 8 तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली. \v 9 अशाप्रकारे योसेफाबरोबर रथ, घोडेस्वार गेले. तो मोठा समुदाय होता. \p \v 10 जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला. \v 11 जेव्हा तिथे राहणाऱ्या कनानी लोकांनी अटादच्या खळ्यावर शोक करताना पाहिले, यार्देनजवळच्या त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव ठेवले. कारण ते म्हणाले, “इजिप्तच्या लोकांची ही मोठा शोक करण्याची जागा आहे.” \p \v 12 इस्राएलने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी सर्वकाही केले: \v 13 त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली. \v 14 आपल्या वडिलांना मूठमाती दिल्यानंतर, योसेफ आपले भाऊ आणि आपल्या वडिलांच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेलेले लोक यासह इजिप्त देशास परत आला. \s1 योसेफाचे आपल्या भावांना आश्वासन \p \v 15 जेव्हा योसेफाच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील मरण पावले, ते म्हणाले, “आपण योसेफाला जी वाईट वागणूक दिली होती, त्याची जर त्याने वाईटाने आपल्याला परतफेड केली तर?” \v 16 म्हणून त्यांनी योसेफाला निरोप पाठविला, “मरण्यापूर्वी तुझ्या वडिलांनी अशी सूचना दिली होती: \v 17 ‘तुम्हाला हे योसेफाला बोलायचे आहे: आम्ही तुझ्याशी जे अतिदुष्टाईचे वर्तन केले त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागावी.’ त्याप्रमाणे आम्ही तुझ्या पित्याच्या परमेश्वराचे सेवक तुझी क्षमा मागत आहोत.” जेव्हा हा संदेश योसेफाकडे आला, तेव्हा योसेफ रडला. \p \v 18 नंतर त्याचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्याच्यापुढे पालथे पडून त्याला म्हणाले, “आम्ही तुझे गुलाम आहोत.” \p \v 19 पण योसेफ त्यांना म्हणाला, “भीती बाळगू नका. मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे? \v 20 तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत. \v 21 म्हणून तुम्ही घाबरू नका; मी स्वतः तुमचा आणि तुमच्या मुलाबाळांचा पुरवठा करेन.” अशाप्रकारे त्यांच्याशी अतिशय ममतेने बोलून त्याने त्यांचे समाधान केले. \s1 योसेफाचा मृत्यू \p \v 22 योसेफ, इजिप्त देशात आपल्या पित्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहिला. तो एकशे दहा वर्ष जगला \v 23 आणि योसेफाने त्याचा पुत्र एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली. तसेच मनश्शेहचा पुत्र माखीरला जन्मतः त्याच्या मांडीवर ठेवण्यात आले. \p \v 24 नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,” \v 25 नंतर योसेफाने इस्राएली लोकांना शपथ देऊन म्हटले, “परमेश्वर तुमच्या मदतीला येतील आणि मग तुम्ही निश्चितच माझ्या अस्थी या जागेवरून घेऊन जाल.” \p \v 26 अशा रीतीने योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला. मग त्याच्या प्रेतात मसाला भरण्यात आला आणि ते एका शवपेटीत घालून इजिप्तमध्ये ठेवण्यात आले.