\id GAL - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h गलातीकरांस \toc1 पौलाचे गलातीकरांस पत्र \toc2 गलातीकरांस \toc3 गलाती \mt1 पौलाचे गलातीकरांस पत्र \c 1 \po \v 1 प्रेषित पौल, ज्याला मनुष्यांनी नाही किंवा एका मनुष्याने पाठवले नाही, परंतु येशू ख्रिस्त आणि परमेश्वर पिता ज्यांनी येशूंना मरणातून उठविले त्यांच्याद्वारे पाठवण्यात आलेला, त्या माझ्याकडून \v 2 आणि माझ्याबरोबर येथे असलेले सर्व बंधू आणि भगिनी यांच्याकडून, \po गलातीया येथील मंडळ्यांना: \po \v 3 परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. \v 4 ज्यांनी आपला परमेश्वर आणि पिता यांच्या इच्छेला अनुसरून आमच्या पापांसाठी स्वतःला दिले यासाठी की सध्याच्या दुष्ट जगापासून आम्हाला वाचवावे. \v 5 त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. \s1 दुसरी शुभवार्ता नाही \p \v 6 मला आश्चर्य वाटते की, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत जगण्यासाठी बोलाविले, त्यांना सोडून तुम्ही इतक्या लवकर वेगळ्या शुभवार्तेकडे वळत आहात, \v 7 जी खरोखर शुभवार्ता नाहीच. काही लोक उघडपणे तुम्हाला गोंधळात टाकीत आहेत आणि ख्रिस्ताच्या शुभवार्तेत बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. \v 8 परंतु ज्या शुभवार्तेचा प्रचार आम्ही तुम्हाला केला, त्या व्यतिरिक्त जर आम्ही किंवा स्वर्गातून एखादा देवदूतसुद्धा प्रचार करीत असेल तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप येवो! \v 9 जसे आम्ही पूर्वी सांगितलेले आहे, म्हणून मी आता पुन्हा सांगतो: जर कोणी तुम्हाला तुम्ही स्वीकारलेल्या शुभवार्ते व्यतिरिक्त दुसरा प्रचार करीत आहेत, तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप असो! \p \v 10 आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसेन. \s1 पौलाला परमेश्वराकडून पाचारण \p \v 11 बंधूंनो आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी केला ती मनुष्याकडून आलेली नाही. \v 12 कोणत्याही व्यक्तीकडून मी ते स्वीकारलेले नाही किंवा मला ते शिकविण्यात आलेले नाही; तर मला ही शुभवार्ता येशू ख्रिस्ताकडून प्रकटीकरणाद्वारे मिळाली आहे. \p \v 13 कारण तुम्ही ऐकलेच आहे की, यहूदी धर्मात असताना माझे पूर्वीचे जीवन कसे होते, कशाप्रकारे उग्र रूप धारण करून मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला आणि त्या मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न केला. \v 14 माझ्या लोकांमध्ये माझ्या वयाच्या पुष्कळांपेक्षा मी यहूदी धर्मसंप्रदायात अधिक पुढे जात होतो आणि माझ्या पूर्वजांच्या परंपरेविषयी अत्यंत आवेशी होतो. \v 15 परंतु जेव्हा परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरात असतानाच निवडले आणि त्यांच्या कृपेने मला बोलाविले, त्यांना हे योग्य वाटले की \v 16 त्यांच्या पुत्राला माझ्यामध्ये प्रकट करावे; यासाठी की गैरयहूदी लोकांमध्ये मी येशूंच्या शुभवार्तेची घोषणा करावी. अशी माझी त्वरित प्रतिक्रिया होती की कोणत्याही मनुष्याचा सल्ला घेऊ नये. \v 17 माझ्या आधी जे प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी मी यरुशलेमपर्यंत गेलो नाही, परंतु मी अरबस्थानात गेलो. नंतर मी दिमिष्कास परत आलो. \p \v 18 नंतर तीन वर्षानंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो. \v 19 प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्‍या प्रेषितांना मी भेटलो नाही. \v 20 मी परमेश्वरासमोर तुम्हाला खात्री देतो की, मी जे तुम्हाला लिहित आहे त्यामध्ये काही खोटे नाही. \p \v 21 नंतर मी सिरिया आणि किलिकिया येथे गेलो. \v 22 ख्रिस्तामध्ये असलेल्या यहूदीया येथील मंडळ्यांना त्यावेळेस माझी वैयक्तिक ओळख नव्हती. \v 23 त्यांनी फक्त एवढेच ऐकले होते, “ज्या मनुष्याने पूर्वी आमचा छळ केला तो आता त्या विश्वासाचा प्रचार करीत आहे ज्याचा नाश करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.” \v 24 माझ्यामुळे त्यांनी परमेश्वराचे गौरव केले. \c 2 \s1 इतर प्रेषित पौलाचा स्वीकार करतात \p \v 1 नंतर चौदा वर्षानंतर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो, यावेळेस बर्णबास माझ्याबरोबर होता. मी तीतालाही आमच्याबरोबर घेतले. \v 2 मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्‍यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो. \v 3 माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही. \v 4 हा प्रश्न खोट्या विश्वासणार्‍यांमुळेच उद्भवला कारण ख्रिस्त येशूंमध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आणि आम्हाला गुलाम बनविण्यासाठी काही खोटे विश्वासणारे आमच्यामध्ये घुसले होते. \v 5 आम्ही एक क्षणभर देखील त्यांना वश झालो नाही, यासाठी की शुभवार्तेचे सत्य तुमच्याजवळ कायम असावे. \p \v 6 ज्यांना अतिश्रेष्ठ म्हणून मानले जात होते ते काहीही करीत होते तरी मला काही फरक पडला नाही; परमेश्वर पक्षपात करीत नाही. त्यांनी माझ्या संदेशात काहीही भर घातली नाही. \v 7 याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या\f + \fr 2:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa परराष्ट्रीय\fqa*\f* लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते. \v 8 कारण जे परमेश्वर सुंता झालेल्यांसाठी प्रेषित पेत्रामध्ये करीत होते, तेच परमेश्वर गैरयहूदीयांसाठी मी जो प्रेषित आहे त्या माझ्यामध्ये सुद्धा करीत होते. \v 9 जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. \v 10 त्या सर्वांनी एकच अशी विनंती केली होती की गरिबांना साहाय्य करण्याची आम्ही सतत आठवण ठेवावी आणि तीच गोष्ट करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो. \s1 पौल पेत्राला विरोध करतो \p \v 11 जेव्हा केफा\f + \fr 2:11 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa पेत्र\fqa*\f* अंत्युखिया येथे आला, तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला विरोध केला, कारण तो दोषी होता. \v 12 याकोबाकडून काही लोक येण्यापूर्वी तो प्रथम गैरयहूदी लोकांबरोबर भोजन करीत असे. परंतु जेव्हा ते आले, तेव्हा त्याने मागे सरकण्यास सुरुवात केली आणि तो स्वतःला गैरयहूदीयांपासून वेगळे करू लागला, कारण सुंता झालेल्या गटातील लोकांचे त्याला भय वाटत होते. \v 13 बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली. \p \v 14 जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी प्रथा पाळण्यासाठी तू भाग पाडतोस? \p \v 15 “जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही. \v 16 हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने\f + \fr 2:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa विश्वासानुसार\fqa*\f* नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही. \p \v 17 “ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरावे असा प्रयत्न करीत असताना आपण यहूदीसुद्धा पापी लोकांमध्ये आहोत, त्याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात?\f + \fr 2:17 \fr*\fq ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात? \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa ख्रिस्त हा पापाचा सेवक आहे का?\fqa*\f* नक्कीच नाही. \v 18 जे मी उद्ध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो. \p \v 19 “नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे. \v 20 मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. \v 21 मी परमेश्वराच्या कृपेला वगळत नाही, कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने नीतिमत्व प्राप्त होत असते, तर ख्रिस्ताचे मरण व्यर्थ झाले असते.” \c 3 \s1 नियमशास्त्राचे पालन किंवा विश्वास \p \v 1 अहो मूर्ख गलातीकरांनो! तुम्हाला कोणी मोहात पाडले आहे? तुमच्या डोळ्यांसमोरच येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले असे स्पष्ट चित्रित केले होते. \v 2 तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट समजून घेणे मला आवडेल: नियमशास्त्राप्रमाणे कार्य केल्याने तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला किंवा जे काही तुम्ही ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने? \v 3 तुम्ही इतके मूर्ख आहात काय? जे आत्म्याद्वारे सुरू केले ते तुम्ही आता दैहिकरितीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात काय? \v 4 इतके अपार दुःख तुम्ही व्यर्थच अनुभवले आहे काय, जर ते खरोखरच व्यर्थ होते? \v 5 तर मी पुन्हा विचारतो, परमेश्वर त्यांचा आत्मा तुम्हाला देतात आणि चमत्काराचे कार्य तुम्हामध्ये नियमशास्त्राच्या कार्याद्वारे करतात किंवा तुम्ही जे ऐकले आहे त्यावर विश्वास ठेवण्याद्वारे? \v 6 त्याचप्रमाणे अब्राहामानेसुद्धा, “परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”\f + \fr 3:6 \fr*\ft \+xt उत्प 15:6\+xt*\ft*\f* \p \v 7 ज्यांनी विश्वास ठेवला तीच अब्राहामाची मुले आहेत, हे तुम्हाला स्पष्ट समजू द्या. \v 8 पवित्र शास्त्राने आधी सांगितले होते की परमेश्वर विश्वासाने गैरयहूदीयांना नीतिमान ठरवतील आणि त्यांनी अब्राहामास आधी शुभवार्तेची घोषणा केली: “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”\f + \fr 3:8 \fr*\ft \+xt उत्प 12:3; 18:18; 22:18\+xt*\ft*\f* \v 9 म्हणून जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामासोबत आशीर्वाद प्राप्त होतील. \p \v 10 जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.”\f + \fr 3:10 \fr*\ft \+xt अनु 27:26\+xt*\ft*\f* \v 11 यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”\f + \fr 3:11 \fr*\ft \+xt हब 2:4\+xt*\ft*\f* \v 12 नियम विश्वासावर आधारित नाही; याव्यतिरिक्त नियमशास्त्र म्हणते, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.”\f + \fr 3:12 \fr*\ft \+xt लेवी 18:5\+xt*\ft*\f* \v 13 ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”\f + \fr 3:13 \fr*\ft \+xt अनु 21:23\+xt*\ft*\f* \v 14 हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे. \s1 नियम आणि अभिवचन \p \v 15 प्रिय बंधू व भगिनींनो, रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. मानवी करार जो प्रस्थापित केलेला आहे त्यात कोणी वेगळे करू शकत नाही किंवा त्यामध्ये भर घालू शकत नाही त्याप्रमाणे हे आहे. \v 16 ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,”\f + \fr 3:16 \fr*\ft \+xt उत्प 12:7; 13:15; 24:7\+xt*\ft*\f* म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे. \v 17 मला म्हणावयाचे ते हे: चारशेतीस वर्षानंतर देण्यात आलेले नियमशास्त्र, परमेश्वराने आधी कायम केलेल्या कराराला वेगळे करू शकत नाही व दिलेले वचन रद्द करू शकत नाही. \v 18 कारण जर वारसा नियमशास्त्रावर अवलंबून आहे, तर ते अभिवचनांवर अवलंबून नाही. परंतु परमेश्वराने अब्राहामाला आपल्या कृपेने, अभिवचनाद्वारे वारसाहक्क दिला. \p \v 19 तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आले? ज्या संतानाला त्यांचे अभिवचन दिलेले होते, त्यांचे आगमन होईपर्यंत उल्लंघन काय आहे हे समजण्यासाठी हे लावून दिले होते. आपले नियम देवदूतांद्वारे मध्यस्थाला सोपवून दिले. \v 20 मध्यस्थ म्हणजे एकापेक्षा अधिक पक्षाचा असतो; पण परमेश्वर एक आहे. \p \v 21 तर मग नियमशास्त्र आणि परमेश्वराची अभिवचने परस्परविरोधी आहेत काय? मुळीच नाही! नियमशास्त्र दिल्याने जीवन मिळत असले, तर नीतिमत्व नियमापासून आले असते. \v 22 पूर्ण जग पापाच्या नियंत्रणात आहे असे शास्त्रलेखाने स्पष्ट केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांाठी जे अभिवचन मिळणार होते, ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना दिले जावे. \s1 परमेश्वराची लेकरे \p \v 23 हा विश्वास येण्यापूर्वी, आपण नियमशास्त्राच्या पहार्‍यात होतो आणि आपण पहार्‍यात राहू जोपर्यंत तो विश्वास प्रकट होत नाही. \v 24 विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते. \v 25 पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही. \p \v 26 कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत. \v 27 ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे. \v 28 आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत, \v 29 जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत. \c 4 \p \v 1 आता मी असे म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे, तोपर्यंत तो सर्व मालमत्तेचा धनी असूनही, दासापेक्षा वेगळा नाही. \v 2 पित्याने ठरविलेल्या वेळेपर्यंत, त्याला त्याचे पालक व कारभारी सांगतील तसे वागावे लागते. \v 3 जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली\f + \fr 4:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa सामान्य तत्वांच्या दबावाखाली\fqa*\f* होतो. \v 4 परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते. \v 5 जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे. \v 6 कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.” \v 7 आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे. \s1 पौलाची गलातीकरांबद्दलची आस्था \p \v 8 तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता. \v 9 पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता? \v 10 तुम्ही विशेष दिवस, महिने, ॠतू आणि वर्ष हे पाळता! \v 11 तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते. \p \v 12 प्रिय बंधू व भगिनींनो, माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा झालो आहे. तुम्ही माझे काही नुकसान केले नाही. \v 13 वास्तविक माझ्या शारीरिक आजारात मी तुम्हाला प्रथम शुभवार्तेचा प्रचार केला होता. \v 14 माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो. \v 15 तुमची माझ्याविषयीची आशीर्वादाची वृत्ती आता कुठे आहे? मी साक्ष देतो, की शक्य झाले असते तर तुम्ही स्वतःचे डोळेदेखील काढून मला दिले असते. \v 16 आता सत्य बोलून मी तुमचा शत्रू झालो काय? \p \v 17 ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात. \v 18 आस्था असणे आणि उद्देश चांगला असणे गरजेचे आहे, केवळ मी तुमच्याबरोबर आहे तेव्हाच नव्हे तर नेहमीच असे असणे आवश्यक आहे. \v 19 माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील. \v 20 आताच मी तिथे तुमच्याबरोबर असतो व माझा सूर बदलू शकलो असतो, तर बरे झाले असते, कारण मी तुमच्या संदर्भात गोंधळात आहे. \s1 हागार व सारा \p \v 21 मला सांगा, तुम्ही जे नियमांच्या अधीन राहू इच्छिता, त्या तुम्हाला नियम काय म्हणतात याची जाणीव नाही का? \v 22 असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. \v 23 त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला. \p \v 24 अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे. \v 25 आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे. \v 26 परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे. \v 27 जसे यशायाहने लिहिले आहे: \q1 “हे वांझ स्त्रिये, \q2 तू जी कधीही प्रसवली नाही; \q1 उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, \q2 कारण विवाहित स्त्रीपेक्षा, \q1 तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, \q2 त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,”\f + \fr 4:27 \fr*\ft \+xt यश 54:1\+xt*\ft*\f* \p \v 28 आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत. \v 29 त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे. \v 30 पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.”\f + \fr 4:30 \fr*\ft \+xt उत्प 21:10\+xt*\ft*\f* \v 31 प्रिय बंधू व भगिनींनो, आपण दासीपुत्र नाही, तर आपण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. \c 5 \s1 ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य \p \v 1 ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जोखडाखाली सापडू नका. \p \v 2 माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. \v 3 मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. \v 4 तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात. \v 5 आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत. \v 6 ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा. \p \v 7 तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले? \v 8 हे मन वळविण्याचे काम ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे त्याच्याकडून होत नाही. \v 9 “थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते.” \v 10 मला प्रभूमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल. \v 11 बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते. \v 12 जे तुम्हाला हैराण करणारे आहेत, त्यांनी स्वतःला पूर्णरीतीने नपुंसक करून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे. \s1 आत्म्याने प्रेरित जीवन \p \v 13 बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलाविले आहे. पण तुमचे स्वातंत्र्य देहवासना पूर्ण करण्यासाठी वापरू नका, तर प्रीतीने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करा. \v 14 कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.”\f + \fr 5:14 \fr*\ft \+xt लेवी 19:18\+xt*\ft*\f* \v 15 तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा. \p \v 16 मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, मग तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. \v 17 दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये. \v 18 जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. \p \v 19 देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा, \v 20 मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट, \v 21 हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. \p \v 22 परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, \v 23 सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. \v 24 जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे. \v 25 जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. \v 26 तर आता आपण गर्विष्ठ होऊ नये व एकमेकांना चीड आणू नये. \c 6 \s1 सर्वांचे भले करावे \p \v 1 प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल. \v 2 एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. \v 3 आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो. \v 4 प्रत्येकाने आपल्या कृतींची परीक्षा करावी, कारण मगच त्याला स्वतःबद्दल आढ्यता बाळगता येईल आणि स्वतःची इतरांबरोबर तुलना करण्याची गरज वाटणार नाही. \v 5 आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे. \v 6 ज्यांना परमेश्वराच्या वचनातून शिक्षण मिळाले आहे, त्यांनी शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या गोष्टींचा वाटा द्यावा. \p \v 7 फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो! \v 8 जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. \v 9 योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू. \v 10 म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्‍यांच्या कुटुंबाचे चांगले करावे. \b \s1 सुंता नव्हे परंतु नवी उत्पत्ती \p \v 11 मी स्वतःच्याच हाताने मोठ्या अक्षरांनी तुम्हाला लिहित आहे! \b \p \v 12 जे दैहिकरितीने लोकांवर छाप पाडावयास पाहतात ते तुम्ही सुंता करून घ्यावी यासाठी दबाव टाकतात. ते एकाच कारणामुळे की ख्रिस्ताच्या क्रूसामुळे होणारा छळ त्यांना टाळता यावा. \v 13 ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; तरी देखील तुमची सुंता व्हावी ही त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरविता येईल. \v 14 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय इतर कशाचीही प्रौढी मिरवावी असे माझ्याकडून न होवो त्याद्वारे मी जगाला व जग मला क्रूसावर खिळलेले आहे. \v 15 सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; नवी उत्पत्ती हेच महत्त्वाचे आहे. \v 16 जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो. \b \p \v 17 येथून पुढे मला कोणी त्रास देऊ नये, कारण माझ्या शरीरावर मी येशूंची चिन्हे वागवितो. \b \p \v 18 बंधू भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो, आमेन.