\id EZR - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h एज्रा \toc1 एज्रा \toc2 एज्रा \toc3 एज्रा \mt1 एज्रा \c 1 \s1 कोरेश बंदिवानांना परतण्यास मदत करतो \p \v 1 यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली. \pmo \v 2 “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: \pm “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. \v 3 तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहेत त्यांनी वर यहूदीयातील यरुशलेमास जाऊन याहवेह इस्राएलचे परमेश्वर, परमेश्वर जे यरुशलेमात आहेत त्यांचे मंदिर बांधावे आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत. \v 4 आणि उरलेले जे यहूदी लोक जिथे कुठे असतील त्यांनी यरुशलेमला जाणार्‍या यहूदी लोकांना सोने, चांदी, अन्य वस्तू आणि पशू, तसेच यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरासाठी स्वैच्छिक अर्पणेही पुरवावी.’ ” \p \v 5 नंतर परमेश्वराने यहूदाह व बिन्यामीन वंशांचे पुढारी आणि लेवी व याजक यांच्या मनामध्ये याहवेहचे मंदिर पुन्हा बांधण्यासाठी यरुशलेमला ताबडतोब जाण्याची उत्कट इच्छा निर्माण केली. \v 6 सर्व शेजाऱ्यांनी दिलेल्या स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांबरोबरच सोने, चांदी, गुरे याशिवाय इतर मोलवान भेटवस्तूही देऊन त्यांची मदत केली. \p \v 7 त्या शिवाय बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने यरुशलेम येथील याहवेहच्या मंदिरातून नेलेल्या ज्या वस्तू आपल्या दैवतांच्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या कोरेश राजाने बाहेर काढल्या. \v 8 कोरेश राजाने पर्शियाचा खजिनदार मिथ्रदाथला सूचना दिली की त्याने यहूदीयात परतणारा यहूद्यांचा पुढारी शेशबस्सरला सर्व वस्तू मोजून द्याव्या. \b \lh \v 9 यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश होता: \b \li1 सोन्याच्या पराती 30, \li1 चांदीच्या पराती 1,000, \li1 चांदीची पात्रे 29, \li1 \v 10 सोन्याचे कटोरे 30, \li1 चांदीचे कटोरे 410, \li1 इतर पात्रे 1,000. \b \lf \v 11 अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या. \b \p या सर्व वस्तू बंदिवासातील लोकांसह शेशबस्सरने बाबेल देशातून यरुशलेमला परत नेल्या. \c 2 \s1 यरुशलेमला परतलेल्या लोकांची यादी \lh \v 1 आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले. \v 2 जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, सेरायाह, रेएलायाह, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाअनाह): \b \lh यांच्यासोबत परतलेल्या इस्राएली पुरुषांची नावे ही: \li1 \v 3 पारोशचे वंशज 2,172, \li1 \v 4 शफाट्याहचे 372, \li1 \v 5 आरहचे 775, \li1 \v 6 पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,812, \li1 \v 7 एलामचे 1,254, \li1 \v 8 जत्तूचे 945, \li1 \v 9 जक्काईचे 760, \li1 \v 10 बानीचे 642, \li1 \v 11 बेबाईचे 623, \li1 \v 12 अजगादचे 1,222, \li1 \v 13 अदोनिकामचे 666, \li1 \v 14 बिग्वईचे 2,056, \li1 \v 15 आदीनचे 454, \li1 \v 16 हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98, \li1 \v 17 बेसाईचे 323, \li1 \v 18 योराहचे 112, \li1 \v 19 हाशूमचे 223, \li1 \v 20 गिब्बारचे 95, \li1 \v 21 बेथलेहेमचे 123, \li1 \v 22 नटोफाहचे 56, \li1 \v 23 अनाथोथचे 128, \li1 \v 24 अजमावेथचे 42, \li1 \v 25 किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743, \li1 \v 26 रामाह व गेबाचे 621, \li1 \v 27 मिकमाशचे 122, \li1 \v 28 बेथेल व आयचे 223, \li1 \v 29 नबोचे 52, \li1 \v 30 मग्बिशचे 156, \li1 \v 31 दुसऱ्या एलामचे 1,254, \li1 \v 32 हारीमचे 320, \li1 \v 33 लोद, हादीद व ओनोचे 725, \li1 \v 34 यरीहोचे 345, \li1 \v 35 सनाहाचे 3,630, \b \lh \v 36 याजकांचे वंशज: \li1 यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973, \li1 \v 37 इम्मेरचे 1,052, \li1 \v 38 पशहूरचे 1,247, \li1 \v 39 हारीमचे 1,017, \b \lh \v 40 लेवीचे वंशज: \li1 येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74, \b \lh \v 41 संगीतकार: \li1 आसाफचे वंशज 128, \b \lh \v 42 मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः \li1 शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139, \b \lh \v 43 मंदिराचे सेवकांचे वंशज: \li1 झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे, \li1 \v 44 केरोसचे, सीआहाचे, पादोनचे, \li1 \v 45 लबानाहचे, हगाबाहचे, अक्कूबचे, \li1 \v 46 हागाबचे, शलमाईचे, हानानचे, \li1 \v 47 गिद्देलचे, गहरचे, रेआयाहचे, \li1 \v 48 रसीनचे, नकोदाचे, गज्जामचे, \li1 \v 49 उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे, \li1 \v 50 अस्नाहचे, मऊनीमचे, नफूसीमचे, \li1 \v 51 बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे, \li1 \v 52 बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे, \li1 \v 53 बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे, \li1 \v 54 नसीयाहचे व हतीफाचे. \lh \v 55 शलोमोनच्या सेवकांचे वंशज: \li1 सोताईचे, हसोफरतचे, परूदाचे, \li1 \v 56 यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे, \li1 \v 57 शफाट्याहचे, हत्तीलचे, \li1 पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे व आमीचे. \lf \v 58 मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392. \b \lh \v 59 पर्शियाचे तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. \li1 \v 60 यांचे वंशज: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 652. \b \lh \v 61 आणि याजक पितृकुळातील वंशज: \li2 हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते.) \lf \v 62 यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले. \v 63 राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणांतील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही. \b \lf \v 64 सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते. \v 65 याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी व 200 गायक व गायिका होत्या. \v 66 त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 खेचरे, \v 67 435 उंट आणि 6,720 गाढवे आणली होती. \b \p \v 68 जेव्हा ते यरुशलेमात याहवेहच्या मंदिरात आले, काही कुलप्रमुखांनी परमेश्वराच्या भवनाची पुनर्बांधणी करण्यास त्या जागीच स्वेच्छेने दाने दिली. \v 69 प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार जितके देणे शक्य होते तितके दिले. या कामासाठी 61,000 दारिक सोने\f + \fr 2:69 \fr*\ft अंदाजे 500 कि.ग्रॅ.\ft*\f*, 5,000 मीना चांदी\f + \fr 2:69 \fr*\ft अंदाजे 2.8 मेट्रिक टन\ft*\f* व 100 याजकीय झगे भांडारात आणले. \p \v 70 इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएल लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले. \c 3 \s1 वेदीची पुनर्बांधणी \p \v 1 यहूदीयाला परतलेले सर्व इस्राएली लोक आपआपल्या शहरात स्थायिक झाल्यावर ते सातव्या महिन्यात यरुशलेममध्ये एकत्र आले. \v 2 नंतर योसादाकाचा पुत्र येशूआने आपल्या बरोबरीच्या याजकांना आणि शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व त्याच्या बंधूना बरोबर घेऊन इस्राएलांच्या परमेश्वराची वेदी पुन्हा बांधली आणि परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वेदीवर होमार्पणे वाहिली. \v 3 आसपासच्या राष्ट्रातील लोकांचे भय असून देखील ती वेदी आधीच्याच पायावर परत बांधण्यात आली आणि याहवेहस सकाळ संध्याकाळच्या होमार्पणांसाठी तिचा ताबडतोब उपयोग करण्यात आला. \v 4 मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी मंडपांचा सण पाळला व सणाच्या नियमानुसार प्रतिदिवसासाठी नेमलेले होमबली प्रत्येक दिवशी अर्पिले. \v 5 याशिवाय नेहमीचे होमबली आणि चंद्रदर्शनाचे व सर्व सणांचे बली, तसेच याहवेहच्या इतर वार्षिक उत्सवांचे बली व लोकांनी याहवेहसाठी स्वखुशीने आणलेले बली त्यांनी अर्पण केले. \v 6 याहवेहच्या मंदिराचा पाया अद्याप घातला गेला नव्हता, तरी सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी याहवेहला होमार्पणे करण्यास सुरुवात केली. \s1 मंदिराची पुनर्बांधणी \p \v 7 नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्‍याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले. \p \v 8 इस्राएली लोक यरुशलेमला परमेश्वराच्या भवनात आल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, योसादाकाचा पुत्र येशूआ व त्यांच्याबरोबर त्यांचे याजकबंधू व लेवीबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बंदिवासाहून परत आलेले सर्वजण कामास लागले. वीस वर्षे वा अधिक वयाच्या लेव्यांना याहवेहच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले. \v 9 परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाची सर्व देखरेख येशूआ व त्याचे बंधू व पुत्र, तसेच (यहूदाहचे\f + \fr 3:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa होदावीआह\fqa*\f* वंशज) कदमीएल व त्याचे पुत्र, हेनादादचे पुत्र व नातेवाईक यांच्यावर सोपविली होती. हे सर्वजण लेवी होते. \p \v 10 बांधकाम करणार्‍यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्‍या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली. \v 11 त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली: \q1 “याहवेह चांगले आहेत. \q2 इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.” \m याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली. \v 12 पण वयस्कर याजक, लेवी, व इतर पुढारी यातील पुष्कळजण, ज्या लोकांनी पूर्वीचे मंदिर बघितले होते ते शलोमोनाने बांधलेल्या सुंदर मंदिराची आठवण काढून एकीकडे मोठ्याने रडू लागले, तर दुसरीकडे त्यांच्यापैकी काही मोठ्या आनंदाने जयघोष करू लागले. \v 13 लोक इतक्या मोठ्याने जयघोष करीत होते की त्यांचा आवाज दूर अंतरावरूनही ऐकू येत होता आणि त्यामुळे रडण्याचा आवाज व आनंदाचा आवाज यातील फरक लोकांना समजत नव्हता. \c 4 \s1 बांधकामास विरोध \p \v 1 बंदिवासातून परत आलेले लोक याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधत आहेत, हे जेव्हा यहूदाह व बिन्यामीनच्या शत्रूंनी ऐकले, \v 2 तेव्हा ते जरूब्बाबेल व इतर पुढाऱ्यांकडे आले व म्हणाले, “आपण मिळून काम करू या. कारण तुमच्या परमेश्वराची तुम्हाला जितकी आस्था आहे, तितकीच आम्हालाही आहे. अश्शूरचा राजा एसरहद्दोनने आम्हाला येथे आणल्यापासून आम्ही याहवेहला अर्पणे करीत आहोत.” \p \v 3 पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्‍यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.” \p \v 4 नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला.\f + \fr 4:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्रास दिला\fqa*\f* \v 5 त्यांनी अधिकार्‍यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले. \s1 यरुशलेमच्या पुनर्बांधणीस विरोध \p \v 6 नंतर जेव्हा अहश्वेरोश\f + \fr 4:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa झेरेस\fqa*\f* राजाची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी त्याला यहूदीया व यरुशलेमच्या लोकांविरुद्ध आरोप करणारी काही पत्रे पाठविली. \p \v 7 राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीतही त्यांनी असेच केले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबील आणि त्यांचे साथीदार यांनी पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत व अरामी लिपीत पत्र पाठविले. \p \v 8 राज्यपाल रहूम, शिमशय लेखक यांनी यरुशलेमविरुद्ध पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत असे पत्र लिहिले: \pmo \v 9 राज्यपाल रहूम, शिमशय लेखक, तसेच अनेक न्यायाधीश, स्थानिक पुढारी आणि पर्शियाचे, बाबेलच्या येरेक आणि सुसा येथील एलामी लोक त्यात सामील होते. \v 10 तसेच इतर अनेक राष्ट्रांचे लोकही या पत्राच्या लेखनात गोवलेले होते. त्यांना महान आणि थोर आसनपर\f + \fr 4:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa अशुरबनीपल\fqa*\f* ने त्यांच्या स्वतःच्या देशातून काढून पुन्हा यरुशलेमात, शोमरोनात व फरात\f + \fr 4:10 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशांमध्ये वसविले होते. \p \v 11 अर्तहशश्त राजास त्यांनी पाठविलेल्या पत्रात असा मजकूर होता: \pmo अर्तहशश्त महाराज, \pmo फरात नदीच्या पश्चिमेला राहणार्‍या आपल्या विश्वासू प्रजाजनांकडून आपणास शुभेच्छा. \pm \v 12 कृपया राजास ही बाब विदित असावी की, बाबेलमधून यरुशलेमला पाठविलेले यहूदी लोक हे बंडखोर आणि दुष्ट शहर पुन्हा बांधत आहेत. ते या शहराचे कोट पुन्हा बांधत आहेत व मंदिराच्या पायाची दुरुस्तीही सुरू झाली आहे. \pm \v 13 परंतु हे शहर पुन्हा बांधले गेले, शहराचे कोट पुन्हा बांधले, तर त्यात महाराजांचे नुकसान आहे, कारण मग यहूदी लोक आपली खंडणी, नजराणे व कर भरण्यास नकार देतील. \v 14 आमचे आश्रयदाते म्हणून आम्ही आपले ॠणी आहोत आणि महाराजांच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेऊन, आपली अप्रतिष्ठा व्हावी, हे आम्हाला बघण्याची इच्छा नाही. म्हणून आम्ही ही बातमी महाराजांस पत्र पाठवून कळवीत आहोत. \v 15 आम्ही आपणास अशी विनंती करतो की आपण या शहराचा राजद्रोहाचा जुना इतिहास आपल्या पूर्वजांच्या जुन्या कागदपत्रात शोधून पाहावा, म्हणजे हे नगर मागील काळात किती बंडखोर होते हे आपणास आढळून येईल. राजांच्या विरुद्ध आणि त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रांविरुद्ध बंडाळी केल्यामुळेच या नगराचा नाश करण्यात आला होता. \v 16 आता आम्ही असे जाहीर करू इच्छितो की जर हे नगर परत बांधले गेले आणि त्याची तटबंदी पूर्ण झाली, तर फरात नदीच्या पलीकडील काहीही प्रदेश महाराजांच्या ताब्यात राहणार नाही. \p \v 17 नंतर राजाने उत्तर दिले: \pmo राज्यपाल रहूम व शिमशय लेखक व शोमरोनात राहणार्‍या व फरात नदीच्या पश्चिमेस राहणार्‍या सर्वांना, \pmo शुभेच्छा! \pm \v 18 आपण पाठविलेले पत्र भाषांतर करून मला वाचून दाखविण्यात आले. \v 19 जुन्या नोंदी तपासून पाहण्याचा मी हुकूम दिला आहे आणि गतकाळात यरुशलेम नगर खरोखरच अनेक राजांची मोठी डोकेदुखी होती असे मला आढळून आले आहे. वास्तविक पाहता बंडाळी व राजद्रोह या गोष्टी येथे नेहमीच्याच होत्या. \v 20 यरुशलेममध्ये असे बलवान राजे होते की त्यांनी फरात नदीच्या पलीकडील संपूर्ण प्रदेशात राज्य केले व त्यांना कर, खंडणी, नजराणे दिले जात असे. \v 21 म्हणून मी आज्ञा देतो की त्या लोकांनी नगर पुन्हा बांधण्याचे काम, मी पुन्हा हुकूम देईपर्यंत थांबवावे. \v 22 सावध असा आणि याकडे दुर्लक्ष करू नका. राजाला उपद्रव होईपर्यंत हा धोका का वाढू द्यावा? \p \v 23 राजा अर्तहशश्तचे हे पत्रे जेव्हा रहूम व शिमशय यांना वाचून दाखविण्यात आले, तेव्हा ते लगेचच यरुशलेमला गेले आणि यहूदी लोकांना जबरदस्तीने काम बंद करण्यास त्यांनी भाग पाडले. \b \p \v 24 अशा रीतीने यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचे बांधकाम पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षापर्यंत स्थगित झाले. \c 5 \s1 दारयावेश राजाला ततनइचे पत्र \p \v 1 आता यरुशलेम व यहूदीया येथे हाग्गय संदेष्टा आणि इद्दोचा वंशज जखर्‍याह संदेष्टा, यांनी आता यहूदीया आणि यरुशलेममधील यहूदी लोकांसाठी त्यांच्यावर असलेले इस्राएलचे परमेश्वराच्या नावाने भविष्यवाणी केली. \v 2 मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले. \p \v 3 परंतु फरातच्या\f + \fr 5:3 \fr*\fq फरातच्या \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* पश्चिमेकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ आणि शथर-बोजनइ व त्यांचे सोबती यरुशलेमात आले व त्यांनी विचारले, “हे मंदिर पुनर्बांधणीची व पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?” \v 4 त्यांनी हे देखील विचारले, “मंदिर बांधण्याचे काम करणार्‍या सर्व लोकांची नावे काय आहेत?” \v 5 पण त्यांच्या परमेश्वराची नजर यहूदी वडीलजन त्यांच्यावर होती, दारयावेश राजा त्याचे उत्तर देईपर्यंत त्यांचे काम त्यांना थांबविता आले नाही. \p \v 6 फरात नदीपलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सहकारी यांनी दारयावेश राजाला जे पत्र पाठविले त्याचा मजकूर असा होता: \v 7 त्यांनी जे पत्र पाठविले ते असे: \pmo दारयावेश महाराज, \pmo आपणास आमच्या शुभेच्छा! \pm \v 8 आमची राजाला हे कळविण्याची इच्छा आहे की, आम्ही यहूदीयाच्या महान परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्या जागी गेलो. ते मंदिर मोठमोठ्या पाषाणांनी बांधले जात आहे आणि भिंतीत लाकडे घातली जात आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बांधकामाची अतिशय उत्साहाने आणि यशस्वी रीतीने प्रगती होत आहे. \pm \v 9 आम्ही पुढार्‍यांना विचारले, “या मंदिराची पुनर्बांधणीची करून ते पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?” \v 10 आम्ही त्यांची नांवे विचारली, कारण आम्ही त्यांच्या पुढाऱ्यांची नावे लिहून तुमच्या माहिती करिता तुम्हास कळवावी. \pm \v 11 त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले: \b \pm “आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराचे सेवक आहोत. या ठिकाणी पुष्कळ शतकांपूर्वी एका महान इस्राएली राजाने जे मंदिर बांधून पूर्ण केले होते, त्याची आम्ही पुनर्बांधणी करीत आहोत. \v 12 कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले. \pm \v 13 “बाबेलच्या कोरेश राजाने त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी हे परमेश्वराचे मंदिर बांधले जावे असा हुकूम केला. \v 14 नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात\f + \fr 5:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa राजवाड्यात\fqa*\f* ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली. \v 15 त्याने त्याला सूचना दिली, ‘ही पात्रे घ्यावी आणि यरुशलेमच्या मंदिरात ठेवावी. परमेश्वराचे मंदिर पूर्वी होते त्याच ठिकाणी पुन्हा बांधले जावे.’ \pm \v 16 “म्हणून शेशबस्सर आला व त्याने यरुशलेमच्या मंदिराची पायाभरणी केली त्या वेळेपासून लोक मंदिराचे बांधकाम करीत आहेत, पण ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.” \b \pm \v 17 आम्ही विनंती करतो की बाबेलचे राजकीय दप्तर तपासले जावे व कोरेश राजाने परमेश्वराच्या मंदिराची यरुशलेममध्ये पुनर्बांधणी करावी अशी आज्ञा दिली होती की नाही हे पाहावे व मग आपली या प्रकरणी काय इच्छा आहे हे आम्हाला कळवावे. \c 6 \s1 दारयावेश राजाचा हुकूम \p \v 1 म्हणून दारयावेश राजाने आज्ञा दिली की, जिथे कागदपत्रे राखून ठेवली जात त्या बाबेलच्या दप्तरखान्यात कसून शोध केला जावा. \v 2 शेवटी त्या चर्मपत्राची गुंडाळी मेदिया प्रांतातील अखमथा नगरातील राजवाड्यात सापडली, त्यात असे लिहिले होते: \pmo लेखात म्हटले होते: \pm \v 3 कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, यरुशलेम येथील परमेश्वराच्या मंदिरासंबंधी एक हुकूमनामा पाठविला गेला होता: \b \pm तिथे अर्पणे करण्याकरिता ते मंदिर परत बांधले जावे आणि त्याची पायाभरणी करावी. त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात\f + \fr 6:3 \fr*\ft अंदाजे 27 मीटर\ft*\f* असावी. \v 4 पायांमध्ये मोठ्या दगडांचे तीन थर असतील व त्यांच्यावर एक लाकडाचा थर असेल. त्याचा सर्व खर्च राजकीय खजिन्यातून दिला जाईल; \v 5 आणि जी सोन्याचांदीची पात्रे नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिरातून बाबेलला नेली होती, ती सर्व यरुशलेमला परत नेण्यात येतील व पूर्वीसारखी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली जातील. \b \pm \v 6 म्हणून फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्या प्रदेशाच्या इतर अधिकाऱ्यांना सांगण्यात येते की, या स्थानापासून दूर राहा. \v 7 परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामात अडथळे आणू नका. यहूदीयाचा राज्यपाल आणि इतर यहूदी पुढाऱ्यांनी पूर्वीच्याच जागेवर ते मंदिर बांधावे. \pm \v 8 एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो: \pm मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही. \v 9 स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्‍हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत. \v 10 मग ते त्यांच्या स्वर्गातील परमेश्वराला मान्य होतील अशी अर्पणे देऊ शकतील आणि राजा व त्याच्या पुत्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू शकतील. \pm \v 11 कोणी या संदेशातील मजकूर कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्या घराच्या तुळया उपसून काढल्या जातील व त्या तुळयांवर त्याला फाशी देण्यात येईल आणि त्याच्या घराचा उकिरडा केला जाईल. \v 12 ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्‍या व मंदिराचा नाश करणार्‍या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील. \pm मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी. \s1 कार्यसमाप्ती व मंदिराचे समर्पण \p \v 13 फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दारयावेश राजाच्या या हुकुमाची अंमलबजावणी तातडीने केली. \v 14 म्हणून यहूदी पुढार्‍यांनी त्यांचे काम पुढे चालविले आणि त्यांना संदेष्टा हाग्गय व इद्दोचा पुत्र जखर्‍याहच्या उपदेशामुळे चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शेवटी इस्राएलाच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व पर्शियाचे राजे, कोरेश, दारयावेश आणि अर्तहशश्त यांच्या फर्मानाप्रमाणे मंदिराचे काम पूर्ण झाले. \v 15 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी, अदार महिन्याच्या तिसऱ्या दिवशी हे काम पूर्ण झाले. \p \v 16 याजकांनी, लेव्यांनी व सर्व इस्राएली लोकांनी अत्यंत हर्षाने मंदिराचा समर्पणविधी साजरा केला. \v 17 या समर्पणविधीमध्ये शंभर बैल, दोनशे मेंढे आणि चारशे नरकोकरे अर्पण केली गेली, आणि इस्राएलांच्या बारा वंशासाठी बारा बोकडे पापार्पण म्हणून बळी दिले गेले. \v 18 मग त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे यरुशलेममध्ये परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपआपल्या विभागांसाठी याजक आणि लेवींचीही नियुक्ती केली. \s1 वल्हांडण सण \p \v 19 वल्हांडण सण पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी साजरा करण्यात आला. \v 20 तोपर्यंत याजक आणि लेवी यांनी विधीनियमाप्रमाणे स्वतःला शुद्ध करून घेतले होते. लेव्यांनी वल्हांडण सणाच्या अर्पणासाठी बंदिवासातून परत आलेल्या लोकांसाठी आणि याजकांसाठी व स्वतःसाठी वल्हांडणाची मेंढरे वधली. \v 21 बंदिवासातून परत आलेल्या यहूदी आणि यहूदीयात वस्ती करून राहिलेले इस्राएली लोक मूर्तिपूजक परकीय लोकांच्या अशुद्ध चालीरीतींना सोडून, याहवेह परमेश्वराच्या भक्तीमध्ये सामील झाले. \v 22 बेखमीर भाकरीचा सण सात दिवस हर्षभराने पाळण्यात आला. सर्व देशभर आनंदोत्सव होता, कारण याहवेहने अश्शूरच्या राजाला इस्राएलाशी कनवाळूपणे वागण्यास आणि इस्राएलाच्या परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामामध्ये मदत करण्यास प्रवृत्त केले. \c 7 \s1 एज्रा यरुशलेमला येतो \p \v 1 या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा हिल्कियाहचा पुत्र होता. \v 2 हिल्कियाह हा शल्लूमचा पुत्र होता. शल्लूम हा सादोकाचा पुत्र होता. सादोक हा अहीतूबचा पुत्र होता. \v 3 अहीतूब हा अमर्‍याहचा पुत्र होता. अमर्‍याह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा मरायोथाचा पुत्र होता. \v 4 मरोयाथ जरह्याहचा पुत्र होता. जरह्याह उज्जीचा पुत्र होता. उज्जी बुक्कीचा पुत्र होता. बुक्की अबीशूवाचा पुत्र होता. \v 5 अबीशूवा फिनहासाचा पुत्र होता. फिनहास एलअज़ाराचा पुत्र होता. एलअज़ार अहरोनाचा पुत्र होता. अहरोन मुख्य याजक होता— \v 6 हा एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. इस्राएली लोकांना याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राचा एज्रा पारंगत शिक्षक होता. त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्याला दिले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर होता. \v 7 काही इस्राएली लोक व तसेच याजक, लेवी, गायक, द्वारपाल व मंदिरातील सेवक यांनीही त्याच्याबरोबर प्रवास केला व ते अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमला पोहोचले. \p \v 8 राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातील पाचव्या महिन्यात ते यरुशलेमला पोहोचले. \v 9 पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी बाबेल सोडले, पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते यरुशलेमला पोहोचले, कारण परमेश्वराचा वरदहस्त त्यांच्यावर होता. \v 10 कारण एज्रा याहवेहच्या नियमांचा अभ्यास करण्यास, ते पाळण्यास, व ते नियम इस्राएली लोकांना शिकविण्यासाठी समर्पित होता. \s1 अर्तहशश्त राजाचे एज्राला पत्र \p \v 11 ही पत्राची प्रत आहे जी अर्तहशश्त राजाने नियमशास्त्राचा शिक्षक आणि इस्राएलसाठी याहवेहच्या आज्ञा आणि नियमांचा अभ्यासक एज्रा याजकाला दिली होती: \pmo \v 12 राजांचा राजा, जो अर्तहशश्त याजकडून, \pmo स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक एज्रा याजक यास: \pmo शुभेच्छा. \pm \v 13 मी असे फर्मावतो की, माझ्या राज्यातील कोणीही इस्राएली, याजक आणि लेवी यांच्यासह त्यांना तुझ्याबरोबर यरुशलेमला स्वेच्छेने जाता येईल. \v 14 राजा आणि त्याचे सातजणांचे सल्लागार मंडळ तुला सूचना देत आहोत की, तुझ्याजवळ असलेल्या परमेश्वराच्या नियमानुसार यहूदीया व यरुशलेमबद्दल समाचार घेण्यासाठी तुला पाठविण्यात येते. \v 15 शिवाय, राजा आणि त्याच्या सल्लागारांनी यरुशलेममध्ये ज्यांचे वास्तव्य आहे, त्या इस्राएलाच्या परमेश्वराला दिलेले सोने-चांदी तू बरोबर घेऊन जा. \v 16 सर्व बाबेल प्रांतामध्ये तू गोळा केलेले सोने व चांदी, तसेच यरुशलेममधील आपल्या यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरासाठी इस्राएली लोक व त्यांच्या याजकांनी स्वखुशीने दिलेली अर्पणेही बरोबर घेऊन जावी. \v 17 या पैशाचा उपयोग बैल, मेंढे, कोकरे, अन्न व पेय विकत घेण्यासाठी करून यरुशलेम येथील तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या वेदीवर या सर्वांचे अर्पण करावे. \pm \v 18 उरलेली रक्कम तू आणि तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल त्याप्रकारे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे खर्च करावी. \v 19 तुझ्याबरोबर सोन्याची पात्रे व इतर वस्तूही आम्ही देत आहोत. ही यरुशलेमातील तुमच्या परमेश्वराच्या उपासनेसाठी आहेत. \v 20 मंदिराच्या बांधकामाला अथवा तशाच प्रकारच्या कामासाठी तुम्हाला पैसा कमी पडला तर राजकीय खजिन्यातून निधी मागून घे. \pm \v 21 आता, मी राजा अर्तहशश्त, हा हुकूमनामा फरात\f + \fr 7:21 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीच्या पश्चिमेकडील प्रांतातील सर्व खजिनदारांकडे पाठवित आहे. स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक व याजक एज्रा जी विनंती करेल व जे तुमच्याकडे मागेल ते त्याला द्यावे— \v 22 ते पुढे नमूद केलेल्या शंभर तालांत\f + \fr 7:22 \fr*\ft अंदाजे 3.4 मेट्रिक टन\ft*\f* पर्यंत चांदी, शंभर कोर\f + \fr 7:22 \fr*\ft अंदाजे 16 मेट्रिक टन\ft*\f* गहू, शंभर बथ द्राक्षारस, शंभर बथ\f + \fr 7:22 \fr*\ft अंदाजे 2,200 लीटर\ft*\f* जैतुनाचे तेल व मीठ लागेल तेवढे द्यावे. \v 23 स्वर्गातील परमेश्वराच्या आज्ञेनुसार लागेल ते सर्व काळजीपूर्वकपणे पुरवावे. कारण स्वर्गातील परमेश्वराचा क्रोध राजावर आणि त्याच्या पुत्रांवर येण्याचा धोका आपण का पत्करावा? \v 24 मी अशीही आज्ञा देतो की याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरात काम करणारे आणि मंदिरातील इतर कामगार यांच्यापासून कुठलाही कर, जकात वा चुंगी घेण्याचा तुला अधिकार नाही. \pm \v 25 आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे. \v 26 तुमच्या परमेश्वराची आज्ञा न मानणार्‍यांना आणि राजांचे नियम मोडणार्‍यांना ताबडतोब मृत्यू, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती, किंवा तुरुंगवास यापैकी कोणतीही शिक्षा द्यावी. \p \v 27 तेव्हा एज्रा म्हणाला, “याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती असो! कारण त्यांनी राजाच्या अंतःकरणात यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरास याप्रकारे सन्मान देण्याचे सुचविले, \v 28 आणि त्यांनी राजासमोर व त्याच्या सात जणांच्या सल्लागार मंडळासमोर व सरदारांसमोर माझ्यावर मेहेरबानी केली. याहवेह माझ्या परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त माझ्यावर असल्यामुळेच मी धाडस करून काही इस्राएली पुढार्‍यांना मजबरोबर यरुशलेमला येण्यासाठी जमा केले.” \c 8 \s1 एज्राबरोबर परतलेल्या कुलप्रमुखांची यादी \lh \v 1 अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्‍यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे: \b \li1 \v 2 फिनहासाच्या कुळातील: \li2 गेर्षोम; \li1 इथामाराच्या कुळातील: \li2 दानीएल; \li1 दावीदाच्या कुळातील: \li2 हट्टूश \v 3 हा शखन्याहच्या कुळातील; \li1 पारोशच्या कुळातील: \li2 जखर्‍याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली; \li1 \v 4 पहथ-मोआबच्या कुळातील: \li2 जरह्याहचा पुत्र एलिओएनाइ व इतर 200 पुरुष; \li1 \v 5 जट्टूच्या कुळातील: \li2 यहजिएलाचा पुत्र शखन्याह व इतर 300 पुरुष; \li1 \v 6 आदीनाच्या कुळातील: \li2 योनाथानाचा पुत्र एबेद व इतर 50 पुरुष; \li1 \v 7 एलामाच्या कुळातील: \li2 अथल्याहचा पुत्र यशायाह व इतर 70 पुरुष; \li1 \v 8 शफाट्याहच्या कुळातील: \li2 मिखाएलचा पुत्र जबद्याह व इतर 80 पुरुष; \li1 \v 9 योआबाच्या कुळातील: \li2 यहीएलाचा पुत्र ओबद्याह व इतर 218 पुरुष; \li1 \v 10 बानीच्या कुळातील: \li2 योसिफ्याचा पुत्र शेलोमीथ व इतर 160 पुरुष; \li1 \v 11 बेबाई कुळातील: \li2 बेबाईचा पुत्र जखर्‍याह व इतर 28 पुरुष; \li1 \v 12 अजगादाच्या कुळातील: \li2 हक्काटानाचा पुत्र योहानान व इतर 110 पुरुष; \li1 \v 13 अदोनिकामच्या कुळातील: \li2 शेवटचे लोक ज्यांची नावे एलिफेलेत, ईयेल व शमायाह होते, आणि त्यांच्याबरोबर इतर 60 पुरुष; \li1 \v 14 बिग्वईच्या कुळातील: \li2 ऊथय व जक्कूर आणि इतर 70 पुरुष. \s1 यरुशलेमला परतणे \p \v 15 अहवाकडे जाणाऱ्या कालव्याजवळ मी सर्वांना एकत्र केले आणि तिथे तीन दिवस आम्ही तळ दिला. तिथे आलेल्या लोकांची व याजकांची पाहणी केली, तेव्हा लेवी वंशातील कोणीही मला आढळला नाही. \v 16 म्हणून मी निरोप पाठवून एलिएजर, अरीएल, शमायाह, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍याह आणि मशुल्लाम या लेवी पुढार्‍यांना बोलाविले. मी योयारीब व एलनाथान या दोघा शिक्षकांनाही बोलाविणे पाठविले. \v 17 मी त्यांना कासिफ्या नावाच्या ठिकाणी असलेल्या यहूद्यांचा पुढारी इद्दो आणि मंदिरात काम करणारे त्याचे लेवीबंधू याजकडे अशी विनंती करण्यासाठी पाठविले की त्यांनी यरुशलेमातील आमच्या परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसाठी सेवेकरी पाठवावेत. \v 18 परमेश्वराच्या कृपेचा हात आमच्यावर असल्याने त्यांनी आम्हाकडे इस्राएलचा पुत्र लेवीचा वंशज, महलीचा पुत्र शेरेब्याह नावाचा एक सुज्ञ मनुष्य पाठविला. त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व भाऊ मिळून एकूण 18 जण होते. \v 19 हशब्याहसह मरारीचा वंशज यशायाहलाही त्याचे पुत्र व बंधू अशा 20 जणांसह पाठविले. \v 20 दावीदाने व अधिकार्‍यांनी जे लेव्यांच्या सेवेसाठी नेमले होते, असे 220 मंदिरसेवकही आणले, ज्यांची नांवे नोंदण्यात आली. \p \v 21 आम्ही अहवा कालव्याच्या किनारी असतानाच मी जाहीर केले की सर्वांनी उपवास करावा, म्हणजे आपल्या परमेश्वरासमोर आपण स्वतःला नम्र करून, त्यांनी आमचे व आमच्या मुलाबाळांचे व मालमत्तेचे प्रवासात संरक्षण करावे अशी प्रार्थना करावी. \v 22 कारण प्रवासात शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून राजाजवळ सैनिक व स्वार मागण्याची मला लाज वाटली. आम्ही राजाला आधीच सांगितले होते, “जे आमच्या परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असतो आणि जे त्यांना सोडतात, त्यांच्यावरच अरिष्ट येते.” \v 23 म्हणून आम्ही उपास केला आणि आमची काळजी घेण्याबद्दल परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्यांनी आमचे रक्षण केले. \p \v 24 मी याजकातून बारा पुढार्‍यांची नेमणूक केली ते शेरेब्याह, हशब्याह व इतर दहा याजकबंधू होते. \v 25 राजा, त्याचे कारभारी मंडळ, पुढारी आणि इस्राएली लोक यांनी परमेश्वराच्या मंदिरासाठी अर्पण केलेले सोने, चांदी, सोन्याची पात्रे व इतर वस्तू मोजून दिले व ते यरुशलेमला नेण्याची जबाबदारी मी त्या बारा पुढार्‍यांवर टाकली. \v 26 याप्रकारे मी त्यांचे वजन केले, 650 तालंत\f + \fr 8:26 \fr*\ft अंदाजे 22 मेट्रिक टन\ft*\f* चांदी, 100 तालंत चांदीची पात्रे, 100 तालंत\f + \fr 8:26 \fr*\ft अंदाजे 3.4 मेट्रिक टन\ft*\f* सोने, \v 27 1,000 दारिक\f + \fr 8:27 \fr*\ft अंदाजे 8.4 कि.ग्रॅ.\ft*\f* वजनाचे वीस सोन्याचे कटोरे व उज्वल कास्याचे, सोन्याइतकेच मोलाचे दोन सुंदर कटोरेही होते. \p \v 28 मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही, तसेच याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराला वाहिलेली स्वैच्छिक अर्पणे म्हणजे सोने चांदी व सोन्याचांदीची पात्रे याहवेह परमेश्वराला समर्पित केलेली आहेत. \v 29 हे सर्व साठे याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवण्याकरिता तोलून यरुशलेमात नेतृत्व करीत असलेले याजक, लेवी व इस्राएलचे वडीलजन यांच्या स्वाधीन करण्याआधी यांचे काळजीपूर्वकरित्या रक्षण करा.” \v 30 तेव्हा याजक आणि लेवींनी तोलून दिलेले चांदी, सोने व पवित्र पात्रे यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली. \p \v 31 पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी अहवा कालव्यापासून तळ उठवून आम्ही यरुशलेमकडे निघालो. आमच्या परमेश्वराचा वरदहस्त आम्हावर होता आणि वाटेत त्यांनी शत्रू व लुटारू यांच्यापासून आमचे रक्षण केले. \v 32 अशा तर्‍हेने आम्ही यरुशलेमला पोहोचलो, तिथे तीन दिवस विश्रांती घेतली. \p \v 33 चवथ्या दिवशी उरीयाह पुत्र मरेमोथ याजकाच्या हाती, फिनहासाचा पुत्र एलअज़ार, येशूआचा पुत्र योजाबाद आणि बिन्नुईचा पुत्र नोअद्याह हे लेवी देखील त्याच्यासह असून रुपे, सोने व इतर मोलवान वस्तू यांचे परमेश्वराच्या मंदिरात वजन करून सोपविले. \v 34 प्रत्येक वस्तूची संख्या व वजन मोजण्यात आले आणि त्यावेळी त्या वजनाची नोंद करण्यात आली. \p \v 35 नंतर आमच्या पथकातील प्रत्येकाने इस्राएलाच्या परमेश्वराला पुढील होमार्पणे केली: इस्राएली राष्ट्रासाठी बारा गोर्‍हे, शहाण्णव एडके, सत्याहत्तर नरकोकरे आणि पापार्पण म्हणून बारा बोकडे. हे सर्व याहवेहस होमार्पण म्हणून वाहण्यात आले. \v 36 नंतर फरात नदीच्या पश्चिमेस असलेल्या सर्व प्रांताच्या प्रांतप्रमुखांना व राज्यपालांना राजाची फर्माने देण्यात आली. मग अर्थात्, त्यांनी परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधण्याच्या कार्यात आमच्याशी सहकार्य केले. \c 9 \s1 मिश्र विवाहांबाबत एज्राची प्रार्थना \p \v 1 या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही. \v 2 या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.” \p \v 3 जेव्हा मी हे ऐकले, तेव्हा मी माझा अंगरखा फाडला, डोक्याचे व दाढीचे केस उपटले आणि अत्यंत भयभीत मनस्थितीत मी खाली बसलो. \v 4 या विश्वासघातामुळे बंदिवासातून परतलेल्या इस्राएली लोकांच्या मनात परमेश्वराच्या वचनाचे भय उत्पन्न झालेले पुष्कळजण माझ्याभोवती गोळा झाले. सायंकाळच्या होमार्पणाची वेळ होईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो. \p \v 5 सरतेशेवटी, सायंकाळच्या होमार्पणाची वेळ झाल्यावर अत्यंत गोंधळलेल्या, माझा झगा व अंगरखा फाटलेल्या स्थितीतच मी गुडघे टेकले आणि याहवेह माझ्या परमेश्वराकडे हात उंचावले. \v 6 आणि त्यांचा धावा करून म्हटले: \pm “हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत. \v 7 आमच्या पूर्वजांपासून आजतागायत आमची अत्यंत घोर पापे झाली आहेत. आमच्या पातकांमुळेच, आम्ही, आमचे राजे, आमचे याजक, गैरयहूदी राजांच्या तलवारीने मारले गेले, आम्हाला कैद करण्यात आले, लुबाडण्यात आले व फजीत करण्यात आले. आजही आमची स्थिती अशीच आहे. \pm \v 8 “पण आता या थोड्या काळासाठी याहवेह आमच्या परमेश्वराने आमच्यावर कृपा करून आमच्यापैकी काही थोड्या लोकांना जिवंत राखले आणि त्यांच्या या पवित्रस्थानी आम्हाला स्थिर केले आहे. आमच्या परमेश्वराने आमच्या दृष्टीस प्रकाश दिला व आम्हाला गुलामगिरीतून थोडी विश्रांती दिली आहे. \v 9 आम्ही गुलाम आहोत, पण आमच्या परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतही सोडून दिले नाही. त्याऐवजी पर्शियाच्या राजाच्या नजरेत आम्हाला अशी कृपा दिली आहे: आमच्या परमेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला नवीन जीवन दिले आहे. आम्हाला यहूदीया आणि यरुशलेम येथे संरक्षणासाठी तटबंदी दिली आहे. \pm \v 10 “पण हे आमच्या परमेश्वरा, आता आम्ही तुमच्यापुढे काय बोलावे? कारण आम्ही तुमचे नियम मोडले आहेत. \v 11 तुमचे सेवक संदेष्टे, त्यांनी आम्हाला आधीच इशारा देऊन ठेवला होता: ‘जो देश आम्हाला वतन म्हणून मिळेल, तो देश तिथे राहणार्‍या लोकांच्या भयंकर अमंगळ चाली व कृत्ये यांनी भ्रष्ट झालेला असेल. खरोखरच आज देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यत तो अपवित्रतेने भरलेला आहे. \v 12 म्हणून आपल्या कन्या या राष्ट्रांच्या पुरुषांना देऊ नयेत आणि त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांना करून घेऊ नयेत. त्या राष्ट्रांशी कोणत्याही प्रकारे मैत्रीचा समेट करू नये. तरच तुम्ही सुदृढ होऊन तुम्हाला त्या भूमीचे उत्तम फळ लाभेल व ती समृद्धी आमच्या मुलाबाळांस सदासर्वकाळचे वतन म्हणून लाभेल.’ \pm \v 13 “तर सत्य हे आहे की ही परिस्थिती केवळ आपल्याच वाईट कृत्यांमुळे आणि घृणास्पद अपराधांमुळे आपल्यावर आली आहे. असे असूनही, आमच्या परमेश्वराने आमच्या अपराधास योग्य शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देऊन हा भाग आमच्या स्वाधीन केला आहेस \v 14 तरी आमच्या दुष्टपणामुळे आम्ही पुन्हा तुमच्या आज्ञाचा भंग करून जे लोक अमंगळ कृत्ये करतात, त्यांच्याशी मिश्रविवाह करावे काय? खरोखर आता तुमचा संताप आम्हाला नष्ट करून आणि वाचून आलेले अवशिष्ट इस्राएली लोकही नष्ट होणार नाहीत काय? \v 15 हे याहवेह, इस्राएलांच्या परमेश्वरा, तुम्ही नीतिमान आहात! आता आम्ही अवशेष असे उरलो आहोत. तुमच्या दृष्टीने आम्ही दोषी आहोत आणि आमच्या दोषांमुळेच तुमच्या समक्षतेत उभे राहणे आम्हांपैकी कोणालाही शक्य नाही.” \c 10 \s1 लोकांचा पापांगिकार \p \v 1 परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले. \v 2 मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे. \v 3 आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे. \v 4 तर आता ऊठ; या सर्वगोष्टी तुझ्या हातात आहेत. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, म्हणून धैर्य धर व योग्य ते कर.” \p \v 5 तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्‍यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली. \v 6 मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला. \p \v 7 मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे. \v 8 इस्राएलांच्या पुढार्‍यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल. \b \p \v 9 तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते. \v 10 मग एज्रा याजक उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे, कारण तुम्ही गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले आहेत आणि आपण इस्राएलचे पातक आणखीच वाढविले आहे. \v 11 आता याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराचा गौरव करा\f + \fr 10:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमची पापे पदरी घेऊन\fqa*\f* येथून पुढे त्यांच्याच इच्छेप्रमाणे करा. स्वतःला सभोवतालच्या लोकांपासून आणि या गैरयहूदी स्त्रियांपासून वेगळे करा.” \p \v 12 तेव्हा सर्वजण मोठ्याने उत्तर देत म्हणाले: “तुम्ही सांगता ते योग्य आहे! त्याप्रमाणे आम्ही करू. \v 13 पण इथे अनेकजण आहेत आणि आता इतका जोरदार पाऊस पडतो आहे की आम्ही येथे बाहेर आपल्या शक्तीने थांबूही शकत नाही. तसेच आम्ही इतके घोर पातक केले आहे की हे सर्व सुरळीत होण्यास एक दोन दिवस पुरेसे होणार नाहीत. \v 14 आमच्या पुढार्‍यांना न्यायदानाची व्यवस्था करू द्या. ज्याला गैरयहूदी पत्नी आहे असा प्रत्येकजण ठरलेल्या वेळी आपल्या नगराचे वडीलजन व न्यायाधीश यांच्यासह येईल. मग परिस्थिती निवळेल आणि आपल्या परमेश्वराचा भयंकर कोप आम्हांपासून दूर होईल.” \v 15 फक्त असाहेलचा पुत्र योनाथान, तिकवाहचा पुत्र यहज्याह, ज्यांना मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी या योजनेला विरोध दर्शविला. \p \v 16 तेव्हा बंदिवासातून परतलेल्यांना जी सूचना करण्यात आली होती त्यानुसार केले. एज्रा याजकाने प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करून सर्व पितृकुळांच्या पुढार्‍यातून एकास निवडले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते या बाबींची चौकशी करण्यास बसले. \v 17 आणि गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केलेल्या पुरुषांचा निवाडा करण्याचे काम पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी संपविले. \s1 मिश्रविवाहाचे दोषी \lh \v 18 ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे: \li1 योसादाकाचा पुत्र येशूआ व त्याचे भाऊबंद: \li2 मासेयाह, एलिएजर, यारीब व गदल्याह. \v 19 (त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.) \li1 \v 20 इम्मेराचे वंशज: \li2 हनानी व जबद्याह. \li1 \v 21 हारीमाचे वंशज: \li2 मासेयाह, एलीयाह, शमायाह, यहीएल व उज्जीयाह. \li1 \v 22 पशहूराचे वंशज: \li2 एलिओएनाइ, मासेयाह, इश्माएल, नथानेल, योजाबाद व एलासाह. \b \lh \v 23 लेवी मधून: \li2 योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर. \li1 \v 24 गायकांपैकी: \li2 एल्याशीब हा होता. \li1 द्वारपालापैकी: \li2 शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते. \b \lh \v 25 इतर इस्राएली लोकांपैकी: \li1 पारोशाच्या कुळातील: \li2 रमियाह, यिज्जीयाह, मल्कीयाह, मियामीन, एलअज़ार, मल्कीयाह व बेनाइयाह. \li1 \v 26 एलामाच्या कुळातील: \li2 मत्तन्याह, जखर्‍याह, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीयाह. \li1 \v 27 जत्तूच्या कुळातील: \li2 एलिओएनाइ, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद व अजीजा, \li1 \v 28 बेबाईच्या कुळातील: \li2 यहोहानान, हनन्याह, जब्बइ व अथलाइ. \li1 \v 29 बानीच्या कुळातील: \li2 मशुल्लाम, मल्लूख, अदायाह, याशूब, शेआल व रामोथ. \li1 \v 30 पहथ-मोआबाच्या कुळातील: \li2 अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह, \li1 \v 31 हारीमाच्या कुळातील: \li2 एलिएजर, इश्शीयाह, मल्कीयाह, शमायाह, शिमिओन, \v 32 बिन्यामीन, मल्लूख व शमरियाह. \li1 \v 33 हाशूमाच्या कुळातील: \li2 मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी. \li1 \v 34 बानीच्या कुळातील: \li2 मादइ, अम्राम, ऊएल, \v 35 बेनाइयाह, बेदयाह, कलूही, \v 36 वन्या, मरेमोथ, एल्याशीब, \v 37 मत्तन्याह, मत्तनई, यासय. \li1 \v 38 बानी, बिन्नुई कुळातील: \li2 शिमी, \v 39 शेलेम्याह, नाथान, अदायाह, \v 40 मखनदबइ, शेशय, शारइ, \v 41 अजरएल, शेलेम्याह, शमरियाह, \v 42 शल्लूम, अमर्‍याह व योसेफ. \li1 \v 43 नबोच्या कुळातील: \li2 ईयेल, मत्तिथ्याह, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बेनाइयाह. \b \lf \v 44 या पुरुषांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केला होता व त्यांच्यापैकी काहींना त्यांच्यापासून लेकरे झाली होती.\f + \fr 10:44 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांना त्यांच्या लेकरांसहित लावून दिले\fqa*\f*