\id EZK - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h यहेज्केल \toc1 यहेज्केलाची भविष्यवाणी \toc2 यहेज्केल \toc3 यहे \mt1 यहेज्केलाची भविष्यवाणी \c 1 \s1 यहेज्केलचा प्राथमिक दृष्टान्त \p \v 1 माझ्या तिसाव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, खेबर नदीजवळ मी निर्वासित लोकांबरोबर असताना, स्वर्ग उघडले आणि मी परमेश्वराचा दृष्टान्त पाहिला. \p \v 2 यहोयाकीन राजाच्या बंदिवासाच्या पाचव्या वर्षी; महिन्याच्या पाचव्या दिवशी; \v 3 बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता. \p \v 4 मी दृष्टी लावली आणि उत्तरेकडून तुफानी वारा, चकाकणार्‍या विजांसहित एक मोठा ढग प्रखर प्रकाशाने गुंडाळलेला असा मला दिसला. अग्नीचा मध्यभाग झळकत्या धातूसारखा होता, \v 5 आणि त्या अग्नीमध्ये चार जिवंत प्राण्यांसारखे काही होते. त्यांचे रूप मनुष्यांसारखे होते, \v 6 परंतु प्रत्येकाला चार मुखे व चार पंख होते. \v 7 त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते. \v 8 त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते. \v 9 एकाचे पंख दुसर्‍याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे. \p \v 10 त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते. \v 11 अशाप्रकारे त्यांची मुखे होती. प्रत्येकाचे वरच्या बाजूने पसरलेले पंख होते जे त्यांच्या बाजूला असलेल्या प्राण्याच्या पंखाला स्पर्श करीत होते; आणि प्रत्येकाला आणखी दोन पंख होते ज्यांनी त्यांचे अंग झाकले जाई. \v 12 आत्मा जाईल तिथे ते प्रत्येक सरळ पुढे जात असत आणि जात असताना ते अजिबात वळत नसत. \v 13 त्या जिवंत प्राण्यांचे रूप जळत्या निखार्‍यासारखे किंवा मशालीसारखे होते. अग्नी त्या प्राण्यांमधून पुढे मागे जात असे; तो प्रखर होता आणि त्यातून विजा चमकत होत्या. \v 14 ते प्राणी विजेच्या गतीने इकडून तिकडे धावत असे. \p \v 15 जेव्हा मी त्या जिवंत प्राण्यांकडे पाहात होतो, तेव्हा मला दिसले प्रत्येक प्राण्याजवळ त्यांच्या चार मुखांच्या बाजूला भूमीवर एकएक चाक होते. \v 16 त्या चाकांचे रूप व घडण अशाप्रकारे होते: ते पुष्कराजसारखे चमकत होते आणि चारही चाके सारखीच दिसत होती. ते असे दिसत होते की जसे एका चाकात दुसरे चाक आहे. \v 17 ते चालत असताना, ज्या दिशेकडे त्यांच्यापैकी एकाचे मुख आहे त्या कोणत्याही एका दिशेने चालत असत; आणि ते प्राणी जात असता चाकांनी आपली दिशा बदलली नाही. \v 18 त्यांच्या काठा उंच व भयावह होत्या आणि चारही कडांना सर्वत्र डोळे होते. \p \v 19 ते जिवंत प्राणी जसे पुढे जात, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात असत; आणि जेव्हा जिवंत प्राणी भूमीवरून उठत, चाकेही उठत असत. \v 20 जिथे कुठे आत्मा जाईल, तिथे ते जाई, आणि त्यांच्याबरोबर चाकेसुद्धा उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता. \v 21 जेव्हा प्राणी पुढे जात, तेव्हा ते देखील पुढे जात; जेव्हा प्राणी स्थिर उभे राहत, ते देखील स्थिर उभे राहत असत; आणि जेव्हा प्राणी भूमीवरून उठत, चाकेसुद्धा त्यांच्याबरोबर उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता. \p \v 22 त्या जिवंत प्राण्यांच्या डोक्यावर घुमटासारखे दिसणारे, स्फटिकासारखे चमकणारे अद्भुत असे काहीतरी होते. \v 23 त्या घुमटाखाली त्यांचे पंख एकमेकांकडे पसरलेले होते आणि प्रत्येकाचे दोन पंख त्यांचे अंग झाकीत होते. \v 24 ते प्राणी पुढे चालत, तेव्हा मी त्यांच्या पंखांचा आवाज ऐकला, तो जोरात वाहणार्‍या जलाशयासारखा, सर्वसमर्थाच्या\f + \fr 1:24 \fr*\ft इब्री भाषेत \ft*\fqa शद्दाय\fqa*\f* वाणीसारखा, लष्करी सेनेच्या घोषणेसारखा होता. जेव्हा ते स्थिर उभे राहत, तेव्हा ते त्यांची पंखे खाली करीत असत. \p \v 25 ते त्यांचे पंख खाली करून उभे असताना त्यांच्या डोक्यावरील घुमटामधून एक वाणी आली. \v 26 त्यांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमणी रत्नाच्या सिंहासनासारखे काहीतरी होते आणि त्या सिंहासनावर उंच मनुष्याच्या आकृतिसारखा कोणी होता. \v 27 त्याचा कमरेसारखा दिसणारा वरचा भाग चकाकत्या धातूसारखा, जणू काही अग्नीने प्रज्वलित झाला होता आणि कमरेपासून खालचा भाग अग्नीसारखा होता; आणि त्याच्याभोवती अप्रतिम प्रकाश झळकत होता. \v 28 पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्‍या मेघधनुष्यासारखे त्याच्या सभोवती तेज होते. \p याहवेहच्या वैभवासारखे त्याचे रूप होते. जेव्हा मी ते पाहिले, तेव्हा मी उपडा पडलो आणि बोलणार्‍याची वाणी मी ऐकली. \c 2 \s1 संदेष्टा होण्यास यहेज्केलला पाचारण \p \v 1 तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.” \v 2 तो बोलत असताना, आत्म्याने माझ्यामध्ये प्रवेश केला व मला माझ्या पायांवर उभे केले आणि तो माझ्याशी बोलताना मी ऐकले. \p \v 3 तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे. \v 4 ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ \v 5 ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे. \v 6 आणि हे मानवपुत्रा, त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना घाबरू नकोस. तुझ्याभोवती झुडपे व काटे असतील आणि तू विंचवांमध्ये राहशील तरी घाबरू नकोस. जरी ते बंडखोर लोक आहेत तरी ते काय बोलतात त्याला तू घाबरू नकोस किंवा त्यांना भयभीत होऊ नकोस. \v 7 तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत. \v 8 परंतु तू हे मानवपुत्रा, मी तुला जे सांगतो ते ऐक. त्या बंडखोर लोकांप्रमाणे तू बंड करू नकोस; तुझे तोंड उघड आणि मी तुला जे देतो ते खा.” \p \v 9 तेव्हा मी पाहिले, की एक हात माझ्याकडे पसरलेला होता आणि त्यात एक गुंडाळी होती, \v 10 ती त्याने माझ्यापुढे उघडली. त्याच्या दोन्ही बाजूंना विलाप आणि शोक आणि दुःखाचे शब्द लिहिलेले होते. \c 3 \p \v 1 आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.” \v 2 तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली. \p \v 3 तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली. \p \v 4 नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग. \v 5 अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे; \v 6 दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते. \v 7 परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत. \v 8 पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन. \v 9 मी तुझे कपाळ हिऱ्यापेक्षा अधिक कठोर, गारगोटीपेक्षा कठीण करेन, जरी ते बंडखोर लोक आहेत तरी त्यांना भयभीत होऊ नको; किंवा घाबरू नको.” \p \v 10 आणि तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुझ्याशी जी वचने बोलतो ती काळजीपूर्वक ऐक आणि आपल्या हृदयात जपून ठेव. \v 11 तर आता निर्वासित असलेल्या तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांच्याशी बोल. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात,’ मग ते तुझे ऐको किंवा न ऐकोत.” \p \v 12 मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले.\f + \fr 3:12 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa या स्थानातून याहवेहच्या वैभवाची स्तुती होवो\fqa*\f* \v 13 हा त्या जिवंत प्राण्यांच्या पंखांचा आवाज होता, जे एकमेकांच्या पंखांना घासत होते आणि त्याच्या बाजूंना असलेल्या चाकांचा मोठ्या गर्जनेचा आवाज होता. \v 14 तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता. \v 15 खेबर नदीजवळ तेल-अवीवकडे राहत असलेल्या निर्वासित लोकांकडे मी आलो आणि ते जिथे राहत होते, तिथे त्यांच्याबरोबर; मी अतिदुःखाने सात दिवस बसलो. \s1 यहेज्केलची पहारेकरी म्हणून कामगिरी \p \v 16 सात दिवसांच्या शेवटी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 17 “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. \v 18 जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. \v 19 परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या दुष्टाईपासून व त्यांच्या कुमार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील; परंतु तू स्वतः वाचशील. \p \v 20 “त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. \v 21 परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.” \p \v 22 त्या ठिकाणी याहवेहचा हात माझ्यावर होता, आणि ते मला म्हणाले, “ऊठ आणि मैदानाकडे जा, तिथे मी तुझ्याशी बोलेन.” \v 23 तेव्हा मी उठलो व मैदानाकडे गेलो. आणि मी खेबर नदीकाठी पाहिलेल्या वैभवासारखे याहवेहचे वैभव तिथे उभे होते आणि मी उपडा पडलो. \p \v 24 नंतर आत्मा माझ्यामध्ये आला आणि मला माझ्या पायावर उभे केले. याहवेह माझ्याशी बोलले आणि म्हणाले: “जा, स्वतःला आपल्या घरात बंद करून घे. \v 25 आणि तू हे मानवपुत्रा, ते तुला दोर्‍यांनी बांधतील; तू लोकांमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून तुला बांधले जाईल. \v 26 तू शांत असावे आणि त्यांचा निषेध करू नये म्हणून तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटेल असे मी करेन, कारण ते बंडखोर लोक आहेत. \v 27 परंतु मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा मी तुझे मुख उघडेन आणि तू त्यांना सांगशील, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ ज्याला ऐकावयाचे आहे ते ऐकतील आणि ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये; कारण ते बंडखोर लोक आहेत. \c 4 \s1 यरुशलेमच्या वेढ्याचे प्रतीक \p \v 1 “आता हे मानवपुत्रा, ओल्या मातीची एक वीट घे आणि ती तुझ्यापुढे ठेव व तिच्यावर यरुशलेम शहराचे चित्र काढ. \v 2 नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ. \v 3 नंतर एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व शहरामध्ये लोखंडी भिंतीप्रमाणे ठेव आणि आपले तोंड त्याकडे कर. ती वेढ्यात आहे आणि तू तिला वेढा देशील. हे इस्राएली लोकांस एक चिन्ह म्हणून असेल. \p \v 4 “त्यानंतर तू आपल्या डाव्या कूशीवर पड आणि इस्राएली लोकांचे पाप आपल्या स्वतःवर ठेव. जितके दिवस तू एका कूशीवर पडशील तितके दिवस त्यांच्या पापाचा भार तू वाहशील. \v 5 त्यांच्या पापाच्या वर्षांइतके दिवस मी तुला ठरवून देत आहे. म्हणून तीनशे नव्वद दिवस तू इस्राएली लोकांच्या पापाचा भार वाहशील. \p \v 6 “हे संपवल्यानंतर, परंतु यावेळी आपल्या उजव्या कूशीवर तू पुन्हा पड आणि यहूदीयाच्या लोकांच्या पापाचा भार वाहा. त्यासाठी प्रत्येक वर्षासाठी एक दिवस असे चाळीस दिवस मी तुला नेमून दिले आहेत. \v 7 मग तू यरुशलेमच्या वेढ्याकडे तोंड वळव आणि उघड्या हातांनी तिच्याविरुद्ध भविष्य सांग. \v 8 मी तुला दोर्‍यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्‍या कूशीवर वळू शकणार नाहीस. \p \v 9 “तू गहू, जव, शेंगा, डाळ, बाजरी आणि खपल्या गहू घे; आणि ते एका पात्रात साठव व त्याची भाकर बनवण्यासाठी त्याचा वापर कर. तुझ्या कूशीवर निजलेले असताना तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे. \v 10 प्रत्येक दिवसासाठी वीस शेकेल\f + \fr 4:10 \fr*\ft अंदाजे 230 ग्रॅ.\ft*\f* अन्न वजन करून खा आणि ते ठरविलेल्या वेळेतच खा. \v 11 त्याचप्रमाणे हिनाचा सहावा भाग\f + \fr 4:11 \fr*\ft अंदाजे 0.6 लीटर\ft*\f* पाणी घेऊन तेही नेमलेल्या वेळेतच पी. \v 12 जवाच्या भाकरीप्रमाणे ती तू खा; ती भाजण्यासाठी इंधन म्हणून तू ती मानवी विष्ठेवर लोकांसमोर भाज.” \v 13 याहवेह म्हणतात, “याप्रकारे ज्या राष्ट्रांमध्ये मी त्यांना घालवून देईन तिथे इस्राएली लोक अमंगळ अन्न खातील.” \p \v 14 तेव्हा मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, असे नको! मी स्वतःला कधी विटाळले नाही. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मेलेले किंवा जंगली जनावरांनी फाडलेले असे मी काहीही खाल्ले नाही. कोणतेही अशुद्ध मांस माझ्या मुखात कधीही गेले नाही.” \p \v 15 तेव्हा याहवेहने म्हटले, “तर मग ठीक आहे, मानवी विष्ठेऐवजी गाईच्या शेणावर आपली भाकरी भाजण्यास मी तुला परवानगी देतो.” \p \v 16 नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील. \v 17 कारण अन्नाची व पाण्याची तूट पडेल. ते एकमेकांना पाहून घाबरतील आणि आपल्या पापामुळे\f + \fr 4:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांच्या पापातच\fqa*\f* नाश पावतील. \c 5 \s1 परमेश्वराच्या न्यायाचा वस्तरा \p \v 1 “आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्‍या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर. \v 2 जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्‍यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन. \v 3 परंतु त्यातील काही केस घेऊन ते आपल्या कपड्यात खोचून ठेव. \v 4 पुन्हा त्यातून काही केस घे व ते अग्नीत जाळून टाक. तिथूनच सर्व इस्राएलमध्ये अग्नी पसरेल. \p \v 5 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेम आहे, ज्याला मी सर्व राष्ट्रांच्या मधोमध स्थापित केले, आणि तिच्याभोवती सर्व राष्ट्रे ठेवली. \v 6 तरीही आपल्या दुष्टतेने तिने माझे नियम व विधींचा तिच्याभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक विरोध केला आहे. तिने माझे नियम नाकारले व माझ्या विधींचे पालन केले नाही. \p \v 7 “यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत. \p \v 8 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन. \v 9 जे मी पूर्वी कधी केले नाही किंवा पुन्हा करणार नाही असे तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे तुला करेन. \v 10 म्हणून तुझ्यामधील आईवडील आपल्या लेकरांना खातील व लेकरे त्यांच्या आईवडिलांना खातील. मी तुमच्यावर न्यायशासन आणेन आणि बाकीच्यांना वार्‍यावर पसरवून टाकीन. \v 11 म्हणून सार्वभौम याहवेह असे घोषित करतात, की माझ्या जिवाची शपथ, तुम्ही तुमच्या व्यर्थ मूर्तींनी व अमंगळ कृत्यांनी माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, म्हणून मी स्वतः तुमचे मुंडण करेन; मी तुमच्यावर दया करणार नाही किंवा तुमची गय करणार नाही. \v 12 तुमच्यातील एकतृतीयांश लोक मरीने किंवा तुमच्यामध्ये येणार्‍या दुष्काळाने मरतील; एकतृतीयांश लोक तुझ्या भिंतींच्या बाहेर तलवारीने पडतील; आणि एकतृतीयांश मी वार्‍यावर पसरवीन व उपसलेल्या तलवारीने त्यांचा पाठलाग करेन. \p \v 13 “तेव्हा माझा राग शांत होईल आणि त्यांच्याविषयी असलेला क्रोध कमी होईल आणि माझा सूड पूर्ण होईल. जेव्हा त्यांच्यावरील माझा क्रोध संपेल, तेव्हा ते जाणतील की मी याहवेह आपल्या ईर्षेने बोललो आहे. \p \v 14 “तुझ्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांमध्ये आणि जे तुझ्याजवळून जातील त्यांच्या समक्ष मी तुझा नाश व तुला निंदा असे करेन. \v 15 जेव्हा मी माझा राग व क्रोधाच्या फटक्याने व निषेधाच्या आरोपाने तुला शासन करेन, तेव्हा तू तुझ्या सभोवतालच्या राष्ट्रांना निंदा व टोमणा, चेतावणी व भयाचा विषय होशील. मी याहवेह हे बोललो आहे. \v 16 जेव्हा मी तुझ्यावर दुष्काळाच्या घातक व नाशवंत बाणांनी वार करेन, ते मी तुझा नाश करण्यासाठी करेन. मी तुझ्यावर अधिक आणि अधिक दुष्काळ आणेन व तुझा अन्नपुरवठा संपुष्टात आणेन. \v 17 मी तुझ्याविरुद्ध दुष्काळ आणि जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुला अपत्यहीन करतील. मरी व रक्तपात तुमच्यात असतील, आणि तुझ्याविरुद्ध मी तलवार आणेन. मी याहवेह हे बोललो आहे.” \c 6 \s1 इस्राएलच्या पर्वतांचा नाश \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “हे मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे आपले मुख कर; आणि त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग \v 3 आणि सांग: ‘अहो इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्ही सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह पर्वतांना व डोंगरांना, झर्‍यांना व दर्‍यांना असे म्हणतात: मी तुमच्याविरुद्ध तलवार आणेन, आणि मी तुमची उंचावरील पूजास्थाने नष्ट करेन. \v 4 तुमच्या वेद्या फोडल्या जातील आणि तुमच्या धुपांच्या वेद्यांचा चुराडा करण्यात येईल; आणि तुमच्या मूर्तींपुढे तुमच्या लोकांना मी जिवे मारीन. \v 5 इस्राएली लोकांची प्रेते मी त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन आणि तुमची हाडे मी तुमच्या वेद्यांपुढे पसरवून टाकीन. \v 6 तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील. \v 7 तुमचे लोक तुमच्यामध्ये मारून पाडले जाईल आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \p \v 8 “ ‘परंतु मी काहींना वाचवेन, कारण जेव्हा तुम्ही देशात व राष्ट्रात पांगविले जाल तेव्हा तुमच्यातील काही तलवारीपासून वाचतील. \v 9 मग ज्या राष्ट्रांमध्ये ते निर्वासित म्हणून जातील व जे वाचतील ते माझे स्मरण करतील; त्यांचे व्यभिचारी हृदय, जे माझ्यापासून दूर वळले आहे आणि त्यांचे डोळे, जे त्यांच्या मूर्तीमागच्या वासनांनी पेटले आहे, त्याने मला किती दुःखी केले. त्यांनी जी वाईट कृत्ये केली आणि त्यांच्या अमंगळ कृत्यांमुळे ते स्वतःचीच घृणा करतील. \v 10 आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे; त्यांच्यावर हे अरिष्ट आणेन अशी धमकी मी निरर्थकच दिली नाही. \p \v 11 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांच्या सर्व दुष्ट व अमंगळ कृत्यांसाठी तुमचे हात एकमेकांवर मारा आणि “अरेरे!” असे म्हणत तुमचे पाय आपटून रडा, कारण ते तलवार, दुष्काळ व पीडा यांनी पडतील. \v 12 जो दूर असेल तो पीडेने मरेल आणि जो जवळ आहे तो तलवारीने मरेल आणि जो त्यातून वाचेल तो दुष्काळाने मरेल. याप्रकारे मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन. \v 13 त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. \v 14 मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या\f + \fr 6:14 \fr*\ft काही इब्री मूळ प्रतींनुसार \ft*\fqa रिबलाह\fqa*\f* वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ” \c 7 \s1 अंत आला आहे \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘अंत! देशाच्या चारही कोपर्‍यांवर \q2 शेवट आला आहे! \q1 \v 3 आता तुमचा शेवट आला आहे, \q2 आणि तुमच्याविरुद्ध मी माझा राग मोकळा सोडेन. \q1 तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन \q2 आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन. \q1 \v 4 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; \q2 मी तुमची गय करणार नाही. \q1 मी खचितच तुमच्या कृत्यांचे \q2 आणि तुमच्यातील अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन. \m तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ \b \p \v 5 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘विपत्ती! कधी ऐकली नाही\f + \fr 7:5 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa विपत्तीवर विपत्ती\fqa*\f* अशी विपत्ती \q2 पाहा, ती येत आहे! \q1 \v 6 अंत आला आहे! \q2 अंत आला आहे! \q1 तो स्वतः तुझ्याविरुद्ध उठला आहे. \q2 पाहा, तो येत आहे! \q1 \v 7 तुम्ही जे देशात राहतात, \q2 त्या तुमच्यावर विनाश आला आहे. \q1 समय आला आहे! दिवस जवळ आहे! \q2 डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे. \q1 \v 8 मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे \q2 आणि माझा राग तुमच्याविरुद्ध भडकणार आहे. \q1 तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन \q2 आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन. \q1 \v 9 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; \q2 मी तुमची गय करणार नाही. \q1 मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे \q2 आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन. \b \m “ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे. \q1 \v 10 “ ‘पाहा, तो दिवस! \q2 पाहा, तो येत आहे! \q1 विनाशाचा भडका उठला आहे, \q2 काठीला अंकुर फुटला आहे, \q2 अहंकार फुलला आहे! \q1 \v 11 हिंसा उदय पावली आहे, \q2 दुष्टाला शिक्षा करण्यास काठी उठली आहे. \q1 त्या लोकांतून कोणीही, \q2 त्या समुहातील कोणीही सुटणार नाही; \q1 त्यांच्या संपत्तीतील, \q2 कशाचे काहीही मोल राहणार नाही. \q1 \v 12 समय आला आहे! \q2 दिवस येऊन ठेपला आहे! \q1 विकत घेणार्‍याने आनंद करू नये \q2 किंवा विकत देणार्‍याने दुःखी होऊ नये, \q2 कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे. \q1 \v 13 जोपर्यंत विकत घेणारा व देणारा जिवंत आहे \q2 तोपर्यंत जी संपत्ती विकण्यात आली होती; \q2 त्याची फेड होणार नाही. \q1 कारण संपूर्ण समुहाविषयी असलेला दृष्टान्त \q2 पलटणार नाही. \q1 त्यांच्या पापामुळे त्यांच्यातील एकही व्यक्ती \q2 आपला जीव वाचविणार नाही. \b \q1 \v 14 “ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे, \q2 त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे, \q1 परंतु कोणी युद्धात जाणार नाही, \q2 कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे. \q1 \v 15 बाहेर तलवार आहे; \q2 व आत पीडा व दुष्काळ आहे. \q1 जे देशात राहतात \q2 ते तलवारीने मरतील; \q1 जे शहरात आहेत \q2 ते दुष्काळ व पीडांनी नाश पावतील. \q1 \v 16 आश्रयासाठी पळ काढणारे \q2 डोंगराकडे पळतील. \q1 खोर्‍यातील पारव्यांप्रमाणे, \q2 आपल्या स्वतःच्या पापाकरिता, \q2 ते सर्व शोक करतील. \q1 \v 17 प्रत्येक हात ढिले पडतील; \q2 प्रत्येक पाय लघवीने भिजेल. \q1 \v 18 ते गोणपाट नेसतील \q2 आणि भयाचे वस्त्र घालतील. \q1 प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल, \q2 आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल. \b \q1 \v 19 “ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील, \q2 आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल. \q1 याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी \q2 त्यांचे चांदी व सोने \q2 त्यांची सुटका करू शकणार नाही. \q1 ते त्यांची भूक मिटवणार नाही \q2 किंवा त्यांचे पोट भरणार नाही, \q2 कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे. \q1 \v 20 त्यांनी त्यांच्या सुंदर दागिन्यांविषयी गर्व केला \q2 आणि त्यांच्या अमंगळ मूर्ती बनवण्यास त्यांचा उपयोग केला. \q1 त्यांनी त्यांच्या व्यर्थ प्रतिमा बनविल्या; \q2 म्हणून ते दागिने मी त्यांच्यासाठी अशुद्ध करेन. \q1 \v 21 मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन \q2 आणि पृथ्वीतील दुष्ट ते लुबाडून घेतील, \q2 व ते भ्रष्ट करतील. \q1 \v 22 लोकांपासून मी आपले मुख वळवेन, \q2 आणि मी जतन केलेले माझे मौल्यवान स्थळ लुटारू अपवित्र करतील. \q1 ते त्यात शिरतील \q2 आणि त्यास भ्रष्ट करतील. \b \q1 \v 23 “ ‘साखळ्या तयार करा! \q2 कारण देश रक्तपाताने, \q2 आणि शहर हिंसेने भरले आहे. \q1 \v 24 सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन \q2 जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील. \q1 बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन, \q2 आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील. \q1 \v 25 जेव्हा आतंक येतो, \q2 ते व्यर्थच शांतीचा शोध करतील. \q1 \v 26 विपत्तीनंतर विपत्ती, \q2 आणि अफवांवर अफवा येतील. \q1 संदेष्ट्याकडून दृष्टान्ताचा शोध करतील, \q2 नियमशास्त्रातील याजकीय सूचना थांबतील, \q2 वडील लोकांच्या बोधप्रद मसलतीचा शेवट होईल. \q1 \v 27 राजा शोक करेल, \q2 राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल, \q2 आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील. \q1 त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन, \q2 आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन. \b \m “ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ” \c 8 \s1 मंदिरातील मूर्तिपूजा \p \v 1 सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला. \v 2 मी पाहिले, आणि मनुष्यासारखी\f + \fr 8:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa धगधगीत अग्नीसारखी\fqa*\f* दिसणारी एक आकृती मला दिसली. त्याच्या कमरेसारख्या दिसणार्‍या भागापासून खालचा भाग अग्नीसारखा होता आणि तिथून वरच्या भागाचे रूप तेजस्वी धातूसारखे प्रज्वलित होते. \v 3 हातांसारख्या दिसणार्‍या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती. \v 4 आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते. \p \v 5 तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली. \p \v 6 आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.” \p \v 7 मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले. \v 8 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आता भिंत खोद.” म्हणून मी भिंत खोदली आणि त्यात मला एक दरवाजा दिसला. \p \v 9 आणि तो मला म्हणाला, “आत जा आणि ते इथे करीत असलेले दुष्ट व अमंगळ कृत्ये पाहा.” \v 10 म्हणून मी आत गेलो आणि पाहिले की भिंतीवर सर्वत्र सर्वप्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अशुद्ध जनावरे व इस्राएलच्या मूर्तींची चित्रे बनविलेली मला दिसली. \v 11 त्याच्यासमोर इस्राएलचे सत्तर वडील उभे होते आणि शाफानचा पुत्र याजन्याह त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येकाच्या हातात धुपाटणे होते आणि सुगंधी धूपाचा ढग वर चढत होता. \p \v 12 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ” \v 13 तो पुन्हा म्हणाला, “यापेक्षाही अधिक अमंगळ कृत्ये करताना तू त्यांना पाहशील.” \p \v 14 मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराकडे आणले, तिथे मी स्त्रिया पाहिल्या ज्या बसून तम्मुत्स दैवतासाठी शोक करीत होत्या. \v 15 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय? यापेक्षा अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.” \p \v 16 मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते. \p \v 17 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस काय? या ज्या अमंगळ गोष्टी ते करतात ते यहूदाहसाठी क्षुल्लक आहेत काय? त्यांनी आतंकाने देश भरून सातत्याने माझा राग भडकवावा काय? त्यांच्याकडे पाहा, ते कशी आपल्या नाकाला फांदी लावत आहेत! \v 18 म्हणून मी त्यांच्याशी क्रोधाने वागेन; मी त्यांच्याकडे दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही. जरी ते माझ्या कानात रडतील, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.” \c 9 \s1 मूर्तिपूजकांचा न्याय \p \v 1 नंतर मी त्याला उंच आवाजात बोलताना ऐकले, “शहरावर न्यायनिवाडा आणण्यासाठी ज्यांना नेमले आहे त्यांना बोलवा, प्रत्येकाच्या हाती शस्त्र असावे.” \v 2 आणि वरील दरवाजा, ज्याचे मुख उत्तरेकडे होते त्या दिशेकडून सहा पुरुष येत असलेले मी पाहिले, प्रत्येकाच्या हाती घातक शस्त्रे होती. त्यांच्याबरोबर एक पुरुष होता ज्याने तागाची वस्त्रे घातली होती व त्याच्याकडे लेखन सामुग्री होती. ते येऊन कास्य वेदीजवळ उभे राहिले. \p \v 3 आता करुबांवर असलेले इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव तिथून वर जाऊन, मंदिराच्या उंबरठ्यावर आले. तेव्हा ज्या पुरुषाने तागाची वस्त्रे घातली होती व ज्याच्याकडे लेखन सामुग्री होती, त्याला याहवेहने बोलाविले \v 4 आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.” \p \v 5 मी हे ऐकत असताना, याहवेहने बाकीच्यांना म्हटले, “त्याच्यामागे शहरात जा आणि दया किंवा सहानुभूती न दाखविता त्यांना मारून टाका. \v 6 वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते. \p \v 7 मग तो म्हणाला, “मंदिर भ्रष्ट करा आणि वधलेल्यांनी अंगणे भरून टाका. जा!” तेव्हा ते बाहेर गेले आणि शहरात सर्वत्र लोकांना मारू लागले. \v 8 ते लोकांना मारीत असताना मी एकटाच होतो, मी उपडा पडून मोठ्याने रडलो, “हाय हाय, सार्वभौम याहवेह! यरुशलेमवर आपण आपला कोप ओतून उरलेल्या सर्वच इस्राएली लोकांचा नाश करणार आहात काय?” \p \v 9 याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’ \v 10 म्हणून मी त्यांना दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही, आणि त्यांनी जे काही केले आहे ते मी त्यांच्याच डोक्यावर आणणार आहे.” \p \v 11 तेव्हा लेखन सामुग्री जवळ असलेला, तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाने येऊन सांगितले, “आपण आज्ञापिल्याप्रमाणे मी केले आहे.” \c 10 \s1 परमेश्वराचे तेज मंदिरातून नाहीसे होते \p \v 1 मग मी पाहिले आणि करुबांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमण्यासारखे दिसणारे सिंहासन मला दिसले. \v 2 तेव्हा तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाला याहवेहने म्हटले, “करुबाखालच्या चाकांमधून जा आणि करुबांच्या मधील जळत्या निखार्‍यांनी आपली ओंजळ भर आणि ते शहरात पसरून टाक.” मी पाहत असता, तो आत गेला. \p \v 3 तो मनुष्य आत गेला, तेव्हा करूब मंदिराच्या दक्षिणेकडे उभे होते आणि आतील अंगण ढगांनी भरून गेले. \v 4 मग याहवेहचे वैभव करुबांवरून उठले आणि मंदिराच्या उंबरठ्याकडे गेले. मंदिर ढगांनी भरले आणि याहवेहच्या तेजाच्या प्रकाशाने अंगण भरले. \v 5 करुबांच्या पंखांचा आवाज बाहेरील अंगणात ऐकू येत होता, तो तर सर्वसमर्थ परमेश्वर\f + \fr 10:5 \fr*\ft इब्रीमध्ये \ft*\fqa एल-शद्दाय\fqa*\f* बोलतात असा त्यांच्या वाणीसारखा होता. \p \v 6 जेव्हा याहवेहने तागाची वस्त्रे परिधान केलेल्या पुरुषाला आज्ञा दिली, “चाकांच्या मधून, करुबांच्या मधून अग्नी घे,” तो पुरुष जाऊन एका चाकाच्या बाजूला उभा राहिला. \v 7 तेव्हा करुबातील एकाने त्यांच्यामध्ये जो अग्नी होता त्याकडे आपला हात लांब केला. त्याने त्यातील काही इंगळ घेतले व तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाच्या हातात ठेवले, त्याने ते घेतले आणि बाहेर गेला. \v 8 (करुबांच्या पंखाखाली मनुष्याच्या हातासारखे दिसणारे काहीतरी होते.) \p \v 9 मी पाहिले, करुबांच्या बाजूला चार चाके, प्रत्येक करुबाच्या बाजूला एक चाक; आणि ती चाके पुष्कराजसारखी चकाकत होती. \v 10 ती चारही चाके सारखीच दिसत होती; प्रत्येक चाक जसे दुसर्‍या चाकातून छेदून जात होती. \v 11 जेव्हा करूब पुढे जात असे, तेव्हा त्यांची तोंडे ज्या दिशेने होती त्या चार दिशांपैकी एका दिशेने चाके जात; करूब जात असताना चाके इकडे तिकडे वळत नसत\f + \fr 10:11 \fr*\ft किंवा बाजूला\ft*\f*. आणि ते ज्या दिशेने त्यांचे तोंड आहे त्याच दिशेने, कुठेही न वळता जात असत. \v 12 त्यांची पाठ, त्यांचे हात आणि त्यांचे पंख यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शरीरावर डोळे होते, त्यांच्या चाकांवर सुद्धा डोळे होते. \v 13 “गरगर फिरणारी चाके” असे त्या चाकांना म्हटले गेलेले मी ऐकले. \v 14 प्रत्येक करुबाला चार तोंडे होती: एक करुबाचे होते, दुसरे मनुष्याच्या तोंडासारखे, तिसरे सिंहासारखे व चौथे गरुडासारखे होते. \p \v 15 नंतर करूब वर उठले. हे तर तेच जिवंत प्राणी होते जे मी खेबर नदीकाठी पाहिले होते. \v 16 जेव्हा करूब पुढे निघाले, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात; आणि जमिनीवरून उठण्यासाठी जेव्हा करूब आपले पंख पसरवित असे, चाके आपली बाजू सोडत नसत. \v 17 करूब जेव्हा स्थिर उभे राहात, ते सुद्धा स्थिर उभे राहात असत; आणि जेव्हा करूब उठत असे, ते त्यांच्याबरोबर उठत, कारण जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता. \p \v 18 मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले. \v 19 मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते. \p \v 20 हे तेच जिवंत प्राणी होते ज्यांना मी इस्राएलच्या परमेश्वराच्या आसनाखाली खेबर नदीकाठी पाहिले होते, आणि मला समजले की हे तेच करूब आहेत. \v 21 प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते आणि त्यांच्या पंखाखाली मानवी हातांसारखे काहीतरी होते. \v 22 त्यांच्या मुखाचे स्वरूप तर मी खेबर नदीकाठी पाहिले होते तसेच होते. प्रत्येकजण पुढे सरळ चालत असे. \c 11 \s1 यरुशलेमवर परमेश्वराचा निश्चित न्याय \p \v 1 नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले. \v 2 याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात. \v 3 ते म्हणतात, ‘तुम्ही आपली घरांची हल्लीच पुनर्बांधणी केली नाही काय? हे शहर एक कढई व आपण त्यातील मांस असे आहोत.’ \v 4 म्हणून त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर.” \p \v 5 मग याहवेहचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला असे बोलावयास सांगितले: “याहवेह असे म्हणतात: इस्राएलाच्या पुढार्‍यांनो तुम्ही असेच म्हणतात, परंतु तुमच्या मनात काय सुरू आहे ते मी जाणतो. \v 6 तुम्ही या नगरामध्ये पुष्कळांना मारून टाकले आणि त्यातील रस्ते प्रेतांनी भरून टाकले. \p \v 7 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जी शरीरे तुम्ही तिथे टाकली आहेत ती मांस आहेत आणि हे शहर कढई असे आहे, परंतु मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेन. \v 8 तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात. \v 9 मी तुम्हाला शहरातून बाहेर घालवेन आणि तुम्हाला विदेशी लोकांच्या हाती देईन आणि तुमच्यावर शिक्षा आणेन. \v 10 तुम्ही तलवारीने पडाल आणि इस्राएलच्या सीमांवर मी तुमच्यावर न्याय आणेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 11 हे शहर तुम्हाला कढई असे असणार नाही किंवा तुम्ही त्यात मांसही नसाल; इस्राएलच्या सीमेवर मी तुमचा न्याय करेन. \v 12 आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.” \p \v 13 आता मी भविष्य सांगत असतानाच बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह मरण पावला. तेव्हा मी उपडा पडून मोठ्या आवाजात रडलो, “अरेरे, सार्वभौम याहवेह! इस्राएलच्या उरलेल्यांचा आपण सर्वनाश करणार काय?” \s1 इस्राएल परत येण्याचे अभिवचन \p \v 14 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 15 “मानवपुत्रा, यरुशलेमचे लोक तुमच्या निर्वासित भाऊबंदांविषयी व इतर सर्व इस्राएली लोकांविषयी म्हणाले, ‘ते याहवेहपासून फार दूर आहेत; हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला होता.’ \p \v 16 “म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जरी मी त्यांना राष्ट्रामध्ये दूर पाठवले आणि त्यांना देशांमध्ये पांगविले, तरीही ज्या देशांमध्ये ते गेले आहेत तिथे काही काळासाठी मी त्यांचे पवित्रस्थान होतो.’ \p \v 17 “म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुम्हाला राष्ट्रातून गोळा करेन आणि ज्या देशात तुम्ही पांगले आहात तिथून तुम्हाला परत आणेन आणि इस्राएल देश मी तुम्हाला परत देईन.’ \p \v 18 “ते तिथे परत येतील आणि त्यातील सर्व व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्ती काढून टाकतील. \v 19 मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन. \v 20 तेव्हा ते माझे विधी आचरणात आणतील व काळजीपूर्वक माझे नियम पाळतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. \v 21 परंतु ज्यांची हृदये त्यांच्या व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्तींकडे लागलेली आहेत, त्यांनी केलेल्या कृत्यांना मी त्यांच्याच डोक्यावर पाडीन, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.” \p \v 22 नंतर करुबांनी, त्यांच्या बाजूला असलेल्या चाकांबरोबर आपले पंख पसरले आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते. \v 23 नंतर याहवेहचे गौरव शहरातून वर निघाले व पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबले. \v 24 आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेल्या दृष्टान्तामध्ये, आत्म्याने मला वर उचलले आणि बाबेलच्या निर्वासित लोकांकडे आणले. \p तेव्हा जो दृष्टान्त मी पाहत होतो तो समाप्त झाला, \v 25 आणि याहवेहने मला जे दाखविले होते ते सर्व मी निर्वासित असलेल्यांना सांगितले. \c 12 \s1 बंदिवासाचे चिन्ह \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “हे मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांमध्ये राहत आहेस. पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत, ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत, कारण ते बंडखोर लोक आहेत. \p \v 3 “म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्‍या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील. \v 4 दिवसाच्या प्रकाशात, ते तुला पाहत असता निर्वासित म्हणून जाण्यास तू बांधलेले आपले सामान आण आणि संध्याकाळी ते पाहत असता, निर्वासित जाण्यास निघतात त्यांच्यासारखा तू बाहेर जा. \v 5 ते पाहत असताच भिंत खण व त्यातून आपले सामान बाहेर काढ. \v 6 ते पाहत असताच ते सामान आपल्या खांद्यावर घे आणि अंधार पडायला लागताच नीघ. तुला भूमी दिसू नये म्हणून आपला चेहरा झाक, कारण मी तुला इस्राएलसाठी एक चिन्ह केले आहे.” \p \v 7 मग मला आज्ञा दिली त्याप्रमाणे मी केले. निर्वासित म्हणून जाण्यासाठी दिवसाच्या वेळी मी माझे सामान बाहेर आणले. मग संध्याकाळी माझ्या हाताने मी भिंत खोदली. अंधार पडायला लागला तेव्हा लोक पाहत असता माझ्या खांद्यावर मी माझे सामान वाहून घेतले. \p \v 8 सकाळी याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 9 “हे मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांनी, त्या बंडखोर लोकांनी, ‘तू काय करीत आहेस’ असे विचारले नाही काय? \p \v 10 “त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ही भविष्यवाणी यरुशलेमातील राजपुत्र व तिथे राहत असलेल्या सर्व इस्राएली लोकांसाठी आहे.’ \v 11 त्यांना सांग, ‘तुमच्यासाठी मी चिन्ह आहे.’ \p “मी जसे केले आहे, तसेच त्यांचेही करण्यात येईल. ते निर्वासित कैद करून नेले जातील. \p \v 12 “त्यांच्यातील राजपुत्र आपले सामान आपल्या खांद्यावर घेऊन संध्याकाळच्या वेळी निघेल आणि त्याला जाण्यासाठी भिंतीत खोदून एक खिंडार खोदले जाईल. भूमी दिसू नये म्हणून तो आपला चेहरा झाकून घेईल. \v 13 त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो माझ्या पाशात अकडला जाईल; मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणेन, पण तो त्याला दिसणार नाही, तो तिथे मरून जाईल. \v 14 त्याच्या सभोवती असलेले; त्याचे कामकरी व त्याचे सैन्य मी वार्‍यावर पसरवीन; आणि उपसलेल्या तलवारीने मी त्यांचा पाठलाग करेन. \p \v 15 “जेव्हा मी त्यांना राष्ट्रांमध्ये पांगून टाकीन आणि देशांमध्ये त्यांना पसरवीन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. \v 16 परंतु त्यांच्यापैकी काहीं लोकांना तलवार, दुष्काळ व मरी यांच्यापासून वाचवेन, यासाठी की ज्या देशांत ते जातील तिथे त्यांची अमंगळ कृत्ये कबूल करतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.” \p \v 17 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 18 “मानवपुत्रा, थरथर कापत आपले अन्न खा आणि आपले पाणी पिताना ते भीतीने पी. \v 19 देशातील लोकांना सांग: ‘इस्राएल व यरुशलेमात राहणार्‍यांविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते त्यांचे अन्न चिंतेने खातील व आपले पाणी घाबरत पितील, कारण त्यात राहणार्‍या लोकांच्या क्रूरतेमुळे त्यांच्या देशात असलेले सर्वकाही काढून टाकले जाईल. \v 20 वसलेली नगरे ओसाड होतील आणि भूमी उजाड होईल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” \s1 उशीर होणार नाही \p \v 21 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 22 “मानवपुत्रा, इस्राएल देशात ही काय म्हण आहे: ‘दिवस निघून जातात आणि प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे’? \v 23 त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, या म्हणीचा मी शेवट करणार आहे आणि ते इस्राएलमध्ये पुन्हा तिचा उच्चार करणार नाहीत.’ त्यांना सांग, ‘प्रत्येक दृष्टान्ताची पूर्तता होण्याचे दिवस जवळ येत आहेत. \v 24 कारण इस्राएल लोकांमध्ये आणखी खोटे दृष्टान्त किंवा खुशामत करणारा जादूटोणा नसेल. \v 25 परंतु मी याहवेह, मला जे वाटते ते बोलेन आणि विलंब न करता ते पूर्ण होईल. कारण अहो बंडखोर लोकहो, तुमच्या याच दिवसात, मी जे बोलेन ते पूर्ण करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \p \v 26 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 27 “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक म्हणतात, ‘जो दृष्टान्त तो पाहतो तो यापुढील अनेक वर्षांसाठी आहे आणि तो दूरच्या काळाविषयी भविष्यवाणी करतो.’ \p \v 28 “म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझा कोणताही शब्द आणखी विलंब करणार नाही; जेव्हा मी ते बोलेन ते पूर्णतेस जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \c 13 \s1 खोट्या संदेष्ट्यांचा निषेध \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका! \v 3 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मूर्ख\f + \fr 13:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa दुष्ट\fqa*\f* संदेष्टे ज्यांनी काहीही पाहिले नाही तरी स्वतःच्याच आत्म्याचे अनुसरण करतात त्यांचा धिक्कार असो! \v 4 हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागेतील कोल्ह्यांसारखे आहेत. \v 5 याहवेहच्या दिवशी युद्धात टिकून उभे राहावे म्हणून इस्राएलच्या लोकांसाठी भिंतींच्या खिंडारांना दुरुस्त करावयाला तुम्ही वरती गेला नाही. \v 6 त्यांचे दृष्टान्त खोटे आहेत आणि त्यांचे शकुन लबाड आहेत. जरी त्यांना याहवेहने पाठवले नाही, तरी ते म्हणतात, “याहवेह जाहीर करतात,” आणि याहवेहने त्यांच्या शब्दाची पूर्तता करावी अशी अपेक्षा बाळगतात. \v 7 तुम्ही खोटे दृष्टान्त पाहिले नाही काय आणि मी बोललो नाही तरीही, “याहवेह हे जाहीर करतात,” असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही खोटा शकुन उच्चारला नाही काय? \p \v 8 “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमची खोटी वचने व लबाड दृष्टान्त यामुळे मी तुमच्याविरुद्ध आहे असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 9 जे खोटे दृष्टान्त पाहतात आणि लबाड शकुन उच्चारतात, मी माझा हात त्या संदेष्ट्यांच्या विरुद्ध उगारणार. ते माझ्या लोकांच्या बैठकीचा भाग नसतील किंवा इस्राएलच्या यादीत त्यांची नोंद केली जाणार नाही, ना ते इस्राएलच्या देशात प्रवेश करतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे. \p \v 10 “ ‘कारण जरी शांती नसली तरी ते माझ्या लोकांना, “शांती” असे म्हणत बहकवितात, कारण कच्ची भिंत बांधून ते त्यावर चुन्याचा लेप लावतात, \v 11 म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल. \v 12 जेव्हा भिंत कोसळेल तेव्हा, “तुम्ही दिलेला चुन्याचा लेप कुठे आहे” असे लोक तुम्हाला विचारणार नाहीत काय?” \p \v 13 “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या क्रोधाने तुफानी वारा सोडेन आणि माझ्या रागाने नाशाच्या संतापाने गारा व मुसळधार पाऊस पडेल. \v 14 तुम्ही चुन्याचा लेप लावलेली भिंत मी पाडून टाकेन आणि ती धुळीस मिळवेन, म्हणजे तिचा पाया उघडा पडेल. जेव्हा ती\f + \fr 13:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa शहर\fqa*\f* पडेल तेव्हा तिच्याबरोबर तुमचाही नाश होईल; आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 15 याप्रकारे त्या भिंतीविरुद्ध व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला त्यांच्याविरुद्ध मी माझा क्रोध ओतेन. मी तुम्हाला म्हणणार, “भिंत गेली व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला ते सुद्धा गेले, \v 16 इस्राएलचे ते संदेष्टे ज्यांनी यरुशलेमविषयी भविष्यवाणी केली आणि शांती नसतानाही शांती विषयी दृष्टान्त पाहिले त्यांच्याविषयी सार्वभौम याहवेह असे जाहीर करतात.” ’ \p \v 17 “तर आता हे मानवपुत्रा, आपल्यातील कन्या ज्या त्यांच्याच कल्पनेने भविष्य सांगतात, त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग \v 18 आणि सांग, “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या स्त्रिया आपल्या मनगटांवर जादूच्या ताईत शिवून बांधतात आणि लोकांना फसविण्यासाठी आपल्या डोक्यासाठी वेगवेगळ्या लांबीचे बुरखे तयार करतात, त्या स्त्रियांचा धिक्कार असो. आपला जीव वाचवावा म्हणून तुम्ही माझ्या लोकांचा जीव पाशात टाकता काय? \v 19 तुम्ही मूठभर जवासाठी आणि भाकरीच्या तुकड्यांसाठी माझ्या लोकांमध्ये मला अपवित्र केले आहे. जे माझे लोक लबाड्या ऐकतात, त्यांच्याशी तुम्ही खोटे बोलला आहात, ज्यांनी मरू नये अशांना तुम्ही मारून टाकले आणि ज्यांनी जगू नये अशांना तुम्ही वाचविले आहे. \p \v 20 “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जादूचे जे ताईत ज्याद्वारे तुम्ही माझ्या लोकांना पक्ष्यांसारखे फसविता, त्याविरुद्ध मी आहे आणि ते मी तुमच्या मनगटांवरून काढून टाकेन; तुम्ही पक्ष्यांप्रमाणे फसविलेल्या लोकांना मी मुक्त करेन. \v 21 मी तुमच्या डोक्यावरील बुरखे फाडून टाकीन आणि तुमच्या हातून माझ्या लोकांना वाचवेन आणि ते आणखी तुमच्या हाताच्या सामर्थ्याला बळी पडणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 22 कारण ज्या नीतिमानास मी दुखविले नाही, त्यांना तुम्ही तुमच्या लबाड्यांनी निराश केले आहे आणि दुष्टांनी त्यांच्या कुमार्गापासून वळू नये म्हणून तुम्ही त्यांना उत्तेजन देत त्यांचा जीव वाचविता, \v 23 म्हणून यापुढे तुम्ही खोटे दृष्टान्त पाहणार नाही किंवा शकुन करणार नाही. माझ्या लोकांना मी तुमच्या हातून सोडवेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” \c 14 \s1 मूर्तिपूजकांचा निषेध \p \v 1 इस्राएलच्या वडिलांपैकी काहीजण माझ्याकडे आले व माझ्यासमोर बसले. \v 2 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 3 “मानवपुत्रा, या माणसांनी आपल्या हृदयात मूर्ती बसविल्या आहेत आणि त्यांच्या मुखासमोर त्यांनी दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवले आहेत. त्यांना मी, मला प्रश्न विचारू द्यावा काय? \v 4 म्हणून त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलमध्ये जेव्हा कोणी आपल्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्यासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग संदेष्ट्याकडे जातात, मी सार्वभौम याहवेह, स्वतः त्यांची मोठी मूर्तिपूजा लक्षात ठेवून त्यांना उत्तर देईन. \v 5 आपल्या मूर्तींसाठी ज्यांनी मला सोडले आहे, त्या इस्राएल लोकांची मने पुन्हा फिरावी म्हणून मी असे करेन.’ \p \v 6 “म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पश्चात्ताप करा! तुमच्या मूर्तींपासून वळा आणि आपली अमंगळ कृत्ये टाकून द्या! \p \v 7 “ ‘जेव्हा इस्राएलातील किंवा इस्राएलमध्ये राहत असलेला कोणी परदेशी स्वतःला माझ्यापासून वेगळे करतात आणि त्यांच्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्या मुखासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग माझ्याविषयी विचारण्यास संदेष्ट्याकडे जातात, त्यांना मी याहवेह स्वतः उत्तर देईन. \v 8 मी आपले मुख त्यांच्याविरुद्ध करेन आणि त्यांना एक चिन्ह व निंदेचा एक विषय असे करेन. मी त्यांना माझ्या लोकांमधून नाहीसे करेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \p \v 9 “ ‘जर एखादा संदेष्टा भविष्य सांगण्यासाठी भुलविला गेला, तर त्याला मी याहवेहने भुलविले आहे आणि त्याच्याविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि माझ्या इस्राएली लोकांतून त्यांचा नाश करेन. \v 10 त्यांना आपला दोष वाहून घ्यावा लागेल; त्या संदेष्टाकडून सल्ला घेणारा जितका दोषी असणार, संदेष्टा सुद्धा तितकाच दोषी असेल. \v 11 तेव्हा इस्राएली लोक माझ्यापासून आणखी बहकून जाणार नाहीत किंवा ते स्वतःला आपल्या सर्व पापांनी आणखी विटाळविणार नाहीत. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \s1 यरुशलेमचा न्याय अटळ \p \v 12 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 13 “हे मानवपुत्रा, जर एखाद्या देशाने अविश्वासू राहून माझ्याविरुद्ध पाप केले आणि त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यास व त्यावर दुष्काळ आणून त्यातील लोक व जनावरे मारून टाकण्यास त्याविरुद्ध मी माझा हात लांब केला, \v 14 जरी नोआह, दानीएल\f + \fr 14:14 \fr*\fq दानीएल \fq*\ft पुरातन लेखातील प्रसिद्ध मनुष्य\ft*\f* व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 15 “किंवा त्या देशभरात मी जंगली जनावरे पाठवली आणि त्यांनी तो अपत्यहीन केला आणि जंगली जनावरांमुळे कोणीही त्यातून येणे जाणे करीत नाही, त्यामुळे देश ओसाड पडला, \v 16 तर सार्वभौम याहवेह घोषित करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते, परंतु देश ओसाड पडला असता. \p \v 17 “किंवा त्या देशाविरुद्ध तलवार आणली आणि म्हटले, ‘तलवार संपूर्ण देशभर चालो,’ आणि त्यातील सर्व लोकांना व जनावरांना मारून टाकले, \v 18 सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते. \p \v 19 “किंवा त्या देशावर मी मरी पाठवून त्यातील लोकांना व जनावरांना मारून रक्तपाताने माझा क्रोध त्यावर ओतला, \v 20 तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते. \p \v 21 “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते किती भयंकर असणार, जेव्हा मी माझ्या चार उग्र शिक्षा; तलवार व दुष्काळ व जंगली जनावरे आणि मरी यरुशलेमविरुद्ध आणेन व त्यातील लोक व त्यांची जनावरे मारून टाकेन! \v 22 तरीही त्यातून काही वाचतील; काही पुत्र व कन्या ज्यांना त्यातून बाहेर काढले जाईल. ते तुमच्याजवळ येतील आणि तुम्ही जेव्हा त्यांची वागणूक व त्यांची कृत्ये पाहाल, मी यरुशलेमवर आणलेल्या प्रत्येक अनर्थाविषयी तुम्ही सांत्वन पावाल. \v 23 तुम्ही जेव्हा त्यांचे वर्तन व त्यांची कृत्ये पाहाल तेव्हा तुमचे सांत्वन होईल, कारण तुम्ही जाणाल की मी त्यात विनाकारण असे काहीही केले नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \c 15 \s1 यरुशलेम एका निरुपयोगी द्राक्षवेलीसमान \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, द्राक्षवेलीचे लाकूड व वनातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये काय फरक आहे? \v 3 काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी तिचे लाकूड कधी घेतले गेले काय? वस्तू टांगून ठेवण्यासाठी लोक तिच्या खुंट्या बनवतात काय? \v 4 आणि जेव्हा तिला अग्नीत टाकले जाते व तिचे दोन्ही टोक जळून जातात आणि मधला भाग भस्म होतो, तेव्हा ते कोणत्या कामास योग्य असतात? \v 5 ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल? \p \v 6 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्‍या लोकांशी मी वागेन. \v 7 मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 8 ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \c 16 \s1 यरुशलेम एका व्यभिचारी पत्नीसमान \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, यरुशलेमच्या अमंगळ कृत्यांबद्दल तिचा विरोध कर \v 3 आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती. \v 4 तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी नाळ कापली नव्हती, ना तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले होते व तुला ना मिठाने चोळले होते, ना कापडाने गुंडाळले होते. \v 5 तुझ्याकडे कोणी दयेने पाहिले नाही किंवा तुझ्यासाठी यापैकी कोणतीही गोष्टी करावी म्हणून कोणाला सहानुभूती आली नाही. तर तुला मोकळ्या मैदानात टाकून दिले होते, तुझ्या जन्माच्या दिवशीच तू तुच्छ मानली गेली होती. \p \v 6 “ ‘तेव्हा मी तिथून जाताना तुला तुझ्या रक्तात लोळताना पाहिले आणि तू तिथे तुझ्या रक्तात पडलेली असताना मी तुला म्हटले, “जिवंत राहा!” \v 7 शेतातील रोपट्याप्रमाणे मी तुला वाढवले. तू वाढून मोठी होऊन वयात आलीस. तुझे स्तन विकसित झाले आणि तुझे केस वाढले, तरीही तू नग्नच होतीस. \p \v 8 “ ‘नंतर मी तिथून गेलो आणि जेव्हा मी तुला पाहिले आणि मला दिसले की तू प्रीती करण्याच्या वयात आली होतीस, तेव्हा मी आपल्या वस्त्राचा कोपरा तुझ्यावर पसरून तुझे नग्न शरीर झाकले. तुला मी आपली पवित्र शपथ देऊन तुझ्याशी करार केला आणि तू माझी झालीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 9 “ ‘पाण्याने तुला स्नान करवून तुझ्यावरील रक्त मी धुऊन टाकले आणि तुला तेल लावले. \v 10 तुला मी नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली आणि उत्तम चामड्याची पायतणे चढविली. तुझ्यावर मी उत्तम रेशमी कपडे व भरजरी वस्त्रे पांघरली. \v 11 मी तुला दागिन्यांनी सजविले: मी तुझ्या हातांवर बांगड्या व गळ्यात साखळी घातली, \v 12 आणि मी तुझ्या नाकात नथ, कानात कुंडली आणि तुझ्या डोक्यावर एक सुंदर मुकुट घातला. \v 13 याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस. \v 14 तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती अनेक देशांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या वैभवाने तुझे सौंदर्य परिपूर्ण झाले होते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 15 “ ‘परंतु तू आपल्याच सौंदर्यावर भरवसा केला आणि वेश्या होण्यास आपल्या सौंदर्याचा उपयोग केला. जे कोणी तुझ्या वाटेने गेले त्यांना तुझ्या सौंदर्याने तू भुरळ घातली आणि तुझे सौंदर्य त्याचे झाले. \v 16 आपली काही वस्त्रे घेऊन त्यांची भडक उच्च पूजास्थाने तू बनविली, तिथे तू आपला वेश्याव्यवसाय चालू ठेवला. तू त्याच्याकडे गेलीस आणि त्याने तुझ्या सौंदर्यावर कब्जा केला. \v 17 मी तुला दिलेले उत्तम दागिने तू घेतले, दागिने जे माझ्या सोन्याचांदीचे बनले होते, ते घेऊन तू त्याच्या पुरुषमूर्ती बनविल्या आणि त्यांच्याशी वेश्यावृत्ती करू लागली. \v 18 तू आपल्या नक्षीदार कापडाने त्यांना झाकले आणि मी तुला दिलेले तेल व अत्तर त्यांना अर्पण केले. \v 19 मी तुला दिलेले भोजन; म्हणजेच सपीठ, जैतुनाचे तेल आणि मध, जे मी तुला खायला दिले; ते तू सुवासिक धूप म्हणून त्यांना अर्पण केले. हे असेच घडले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 20 “ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय? \v 21 माझ्या लेकरांचा तू वध केला आणि मूर्तींना यज्ञ केला. \v 22 तुझी सर्व अमंगळ कृत्ये आणि तुझी वेश्यावृत्ती यामध्ये तुझे तारुण्यातील दिवस, जेव्हा तू नग्न व उघडी, तुझ्या रक्तात लोळत होती त्याची आठवण तुला राहिली नाही. \p \v 23 “ ‘धिक्कार! तुझा धिक्कार असो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुझ्या इतर दुष्टतेबरोबर, \v 24 तू स्वतःसाठी घुमट बांधले आणि प्रत्येक चौकात उच्च पूजास्थान बनविले. \v 25 प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला. \v 26 मोठ्या लैंगिक अवयवांचे इजिप्तचे लोक तुझे शेजारी, यांच्याशी तू वेश्यावृत्ती केली आणि तुझ्या या वाढत्या व्यभिचाराने तू माझा क्रोध भडकावला. \v 27 यामुळे मी माझा हात तुझ्याविरुद्ध पसरविला आणि तुझी सीमा कमी केली; मी तुला तुझ्या वैरिणी, म्हणजेच पलिष्टी स्त्रियांच्या हावेस स्वाधीन केले, ज्यांना तुझ्या या अश्लील वर्तनामुळे धक्का बसला आहे. \v 28 तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही. \v 29 तेव्हा तू आपली व्यभिचारी प्रवृत्ती वाढवली व बाबिलोन\f + \fr 16:29 \fr*\ft किंवा \ft*\fqa खास्दी\fqa*\f* जो व्यापाऱ्यांच्या देशाला सामील केले, परंतु त्यातही तू तृप्त झाली नाही. \p \v 30 “ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, जेव्हा तू या सर्व गोष्टी करीत एका निर्लज्ज वेश्येप्रमाणे वागतेस, तेव्हा मी तुझ्याविरुद्ध क्रोधाने भरतो\f + \fr 16:30 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुझे ह्रदय किती तापट आहे\fqa*\f*! \v 31 तू जेव्हा प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तुझी वेश्यागृहे आणि प्रत्येक चौकात तुझी उच्च पूजास्थाने बांधली, तू एका वेश्येप्रमाणे नव्हती, कारण तू मोबदला नाकारला. \p \v 32 “ ‘हे व्यभिचारी पत्नी! आपल्या पतीपेक्षा तुला अनोळखी लोक आवडतात! \v 33 प्रत्येक वेश्येस भेट मिळते, परंतु तू आपल्या सर्व प्रियकरांना भेट देतेस, त्यांनी चहूकडून तुझ्या अश्लील वासना पुरविण्यासाठी यावे म्हणून त्यांना लालूच देतेस. \v 34 म्हणून तुझ्या वेश्या व्यवसायाबाबत तू इतरांपेक्षा वेगळी आहेस; तू आवडते म्हणून कोणीही तुझ्यामागे धावत नाही. तू अगदी वेगळी आहेस, कारण तू वेतन देतेस आणि तुला काही मिळत नाही. \p \v 35 “ ‘म्हणून हे वेश्या, याहवेहचे वचन तू ऐक! \v 36 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू तुझी वासना ओतली आणि स्वैरपणाने तुझ्या प्रियकरांसमोर तुझे नग्न शरीर उघडे केले आणि तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे आणि तू तुझ्या लेकरांचे रक्त सांडले, \v 37 यामुळे ज्यांच्याठायी तुला सुख मिळाले त्या तुझ्या सर्व प्रियकरांना मी एकत्र करेन, ज्यांच्यावर तू प्रेम केले, तसेच ज्यांचा तू वीट केला. मी त्यांना चहूकडून तुझ्याविरुद्ध एकत्र करेन आणि त्यांच्यासमोर तुला नग्न करेन आणि ते तुझी पूर्ण नग्नता पाहतील. \v 38 ज्या स्त्रिया व्यभिचार करतात व रक्तपात करतात त्यांची शिक्षा मी तुला देईन; मी आपल्या कोपाने व ईर्ष्येच्या क्रोधाने तुझ्यावर रक्तदोष आणेन. \v 39 तेव्हा मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती स्वाधीन करेन आणि ते तुझे घुमट पाडतील आणि तुझ्या उच्च पूजास्थानांचा नाश करतील. ते तुझी वस्त्रे उतरवतील आणि तुझे उत्तम दागिने घेऊन तुला अगदी पूर्णतः नग्न करून सोडतील. \v 40 ते तुझ्या विरोधात टोळी आणतील, जे तुला धोंडमार करून आपल्या तलवारीने तुझे तुकडे करतील. \v 41 ते तुझी घरे जाळतील व अनेक स्त्रियांदेखत तुला शिक्षा करतील. मी तुझ्या वेश्यावृत्तीचा अंत करेन आणि यापुढे तू तुझ्या प्रियकरांना आणखी वेतन देणार नाहीस. \v 42 तेव्हा तुझ्यावरचा माझा कोप शांत होईल आणि माझा ईर्ष्येचा क्रोध निघून जाईल; मी शांत होईन व आणखी रागावणार नाही. \p \v 43 “ ‘तू आपल्या तारुण्यातील दिवसांची आठवण केली नाहीस तर ज्या सर्व कृत्यांनी मला चिडविले, तू केलेल्या कृत्यांचे प्रतिफळ मी खचितच तुझ्या माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तू तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये अश्लीलतेची भर घातली नाही काय? \p \v 44 “ ‘प्रत्येक व्यक्ती जे या म्हणींचा उपयोग करतात, ती तुझ्यासाठी हीच म्हण वापरतील: “जशी आई तशी लेक.” \v 45 तू तुझ्या आईची खरी मुलगी आहेस, जिने तिच्या नवर्‍याचा व तिच्या लेकरांचा धिक्कार केला; आणि तुझ्या बहिणींची तू सख्खी बहीण आहेस, ज्यांनी त्यांच्या पतींचा व त्यांच्या लेकरांचा धिक्कार केला. तुझी आई हिथी होती आणि तुझा पिता अमोरी होता. \v 46 शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे. \v 47 तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस. \v 48 सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, माझ्या जिवाची शपथ, तू व तुझ्या मुलींनी केलेली कृत्ये तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुलींनी केली नाहीत. \p \v 49 “ ‘तुझी बहीण सदोम हिचे अपराध हे होते: ती व तिच्या मुली अहंकारी, खादाड व इतरांची काळजी न करणार्‍या अशा होत्या; त्यांनी गरीब व गरजवंतांना मदत केली नाही. \v 50 त्या उन्मत्त असून माझ्यासमोर त्यांनी अमंगळ कृत्ये केली. म्हणून मी त्यांना माझ्यापासून दूर केले ते तर तू पाहिलेच आहे. \v 51 शोमरोनने तर तुझ्या तुलनेत अर्धीसुद्धा पातके केली नाहीत. तू त्यांच्यापेक्षा अधिक अमंगळ कृत्ये केली आहेत आणि तू अशी कृत्ये करून तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे. \v 52 आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींचे काही प्रमाणात समर्थन केले आहे. कारण तुझी पापे त्यांच्याहून अधिक घाणेरडी होती, तुझ्या बहिणी तुझ्यापेक्षा अधिक नीतिमान दिसतात. तर मग, लाज धर आणि आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे. \p \v 53 “ ‘तथापि, सदोम व तिच्या मुलींची संपत्ती मी पुनर्स्थापित करेन आणि शोमरोन व तिच्या मुली व त्यांच्याबरोबर तुझीही संपत्ती पुनर्स्थापित करेन, \v 54 यासाठी की त्यांचे सांत्वन करताना तू तुझा कलंक वाहून घेशील आणि तू केलेल्या कृत्यांची तुला लाज वाटेल. \v 55 तुझ्या बहिणी सदोम व तिच्या मुली आणि शोमरोन व तिच्या मुली, त्यांच्या पूर्वस्थितीत परत जातील; आणि तू व तुझ्या मुली सुद्धा तुमच्या पूर्वस्थितीत परत जाल. \v 56-57 तुझ्या गर्वाच्या दिवसात जेव्हा तुझी दुष्टता प्रगट झाली नव्हती, तेव्हा तू तर तुझी बहीण सदोमचे नाव देखील घेत नसे. त्याचप्रमाणे, आता, अरामाच्या\f + \fr 16:56‑57 \fr*\ft किंवा \ft*\fqa एदोमाच्या\fqa*\f* कन्या व त्यांचे सर्व शेजारी आणि पलिष्ट्यांच्या कन्या यांनी तुझी अप्रतिष्ठा केली—तुझ्या सभोवती असलेल्या सर्वांनी तुला तुच्छ मानले. \v 58 तुझ्या अश्लील व अमंगळ कृत्यांचे परिणाम तू भोगशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 59 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू ज्यास पात्र आहेस, तसा व्यवहार मी तुझ्याशी करेन, कारण करार मोडून तू माझी शपथ तुच्छ मानली आहेस. \v 60 तरीही तुझ्या तारुण्याच्या दिवसांत मी तुझ्याशी केलेला करार मी स्मरण करेन आणि तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार मी स्थापित करेन. \v 61 आणि तुझ्यापेक्षा थोरल्या व धाकट्या बहिणींचे तू स्वागत करशील, तेव्हा तुला तुझे मार्ग आठवतील व तुला लाज वाटेल. तुझ्याबरोबरच्या माझ्या करारानुसार नसले तरी मी त्यांना तुझ्या मुलींप्रमाणे तुला देईन. \v 62 तुझ्याशी मी आपला करार स्थापित करेन आणि मीच याहवेह आहे हे तू जाणशील. \v 63 तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \c 17 \s1 दोन गरुड आणि एक द्राक्षवेल \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “हे मानवपुत्रा, एक रूपक घे आणि ते दाखला म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग. \v 3 त्यांना म्हण, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्याचे पंख शक्तिशाली आहेत, लांब पिसांचा व निरनिराळ्या रंगाचा पिसारा असलेला एक गरुड लबानोनमध्ये आला व त्याने गंधसरूच्या टोकावरील फांदी पकडली, \v 4 त्याने त्यावरील अगदी वरचा कोंब तोडला, तो व्यापार्‍यांच्या देशात नेला आणि तिथे विक्रेत्यांच्या शहरात लावला. \p \v 5 “ ‘त्याने देशातील एक रोप घेतले आणि ते सुपीक भूमीत लावले. त्याने ते वाळुंजीप्रमाणे भरपूर पाण्याजवळ लावले, \v 6 आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या. \p \v 7 “ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या. \v 8 त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’ \p \v 9 “त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार. \v 10 तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ” \p \v 11 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 12 “बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले. \v 13 मग त्याने राजघराण्यातील एक सदस्य घेतला व त्याच्याशी करार केला आणि त्याला शपथेत बांधले. त्याने देशातील प्रमुख पुरुषांना देखील नेले, \v 14 म्हणजे राज्याचा पडाव होऊन ते पुन्हा उठू शकणार नाही आणि केवळ त्याचा करार पाळूनच वाचेल. \v 15 परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय? \p \v 16 “ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल. \v 17 पुष्कळ जिवांचा नाश करण्यासाठी जेव्हा मोर्चे बांधतील व बुरूज उभारतील, तेव्हा फारोह त्याच्या बलवान सैन्य व मोठ्या जमावाच्या मदतीने त्या युद्धात त्याचे साहाय्य करू शकणार नाही. \v 18 त्याने करार मोडून शपथ तुच्छ मानली आहे. कारण त्याने हातात हात देऊन प्रतिज्ञा केली आणि तरीही त्याने या सर्व गोष्टी केल्या, त्याचा निभाव होणार नाही. \p \v 19 “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जिवाची शपथ, माझी शपथ तुच्छ मानली व माझा करार मोडला, म्हणून मी त्याचा न्याय करेन. \v 20 त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो त्या पाशात पकडला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये आणेन आणि तिथे त्याच्यावर न्याय आणेन कारण तो माझ्याशी अविश्वासू राहिला. \v 21 त्याचे सर्व उत्तम सैन्य तलवारीने पडेल आणि त्यातून जे वाचतील ते वार्‍याच्या दिशेने पसरतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह हे बोललो आहे. \p \v 22 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी एका गंधसरूचा सर्वात उंच शेंडा घेऊन तो लावेन; मी त्याचा अगदी वरचा लवचिक शेंडा तोडेन आणि तो सर्वात उंच व मोठ्या पर्वतावर लावेन. \v 23 इस्राएलच्या उंच पर्वतावर मी तो लावेन; त्याला फांद्या फुटतील व ते फळ देईल आणि ते वैभवी गंधसरू बनेल. प्रत्येक प्रकारचे पक्षी त्यात घरटे बनवतील; त्यांना त्या गंधसरूच्या फांद्यांच्या छायेत आसरा मिळेल. \v 24 रानातील सर्व झाडे जाणतील की मी याहवेह उंच झाडांना वाकवितो आणि वाकलेल्या झाडांना उंच वाढवतो. हिरव्या झाडांना मी वाळवितो आणि वाळलेल्या झाडांना भरभराटीस आणतो. \p “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच.’ ” \c 18 \s1 जे पाप करतील ते मरतील \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही इस्राएल देशात ही म्हण वापरता: \q1 “ ‘आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली, \q2 आणि लेकरांचे दात आंबले’? \p \v 3 “सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ यापुढे तुम्ही इस्राएलमध्ये या म्हणीचा उपयोग करणार नाही. \v 4 कारण सर्वजण माझे आहेत, आईवडील व लेकरे; दोघेही एकसारखे माझेच आहेत. जे पाप करतील तेच मरतील. \q1 \v 5 “समजा एक नीतिमान मनुष्य आहे \q2 जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे. \q1 \v 6 तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही \q2 किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. \q1 तो आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही \q2 किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही. \q1 \v 7 तो कोणावर अत्याचार करीत नाही, \q2 तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. \q1 जो लुटत नाही \q2 तर आपले अन्न भुकेल्यांस देतो \q2 आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो. \q1 \v 8 व्याजावर कोणाला उसने देत नाही \q2 त्यांच्याकडून आपला नफा करून घेत नाही. \q1 वाईट करण्यापासून आपला हात आवरतो \q2 आणि दोन गटांमधील न्याय सत्याने करतो. \q1 \v 9 तो माझे विधी पाळतो \q2 आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो. \q1 तो मनुष्य\f + \fr 18:9 \fr*\fq तो मनुष्य \fq*\ft म्हणजेच \ft*\fqa ते स्त्रियांना सुद्धा लागू होते\fqa*\f* न्यायी आहे; \q2 तो निश्चित जगेल, \q2 असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 10 “समजा त्याच मनुष्याचा एक हिंसक मुलगा आहे, जो रक्तपात किंवा त्यासारख्या इतर गोष्टी\f + \fr 18:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa आपल्या भावास\fqa*\f* करतो \v 11 (जरी त्याच्या पित्याने त्यापैकी एकही केले नव्हते): \q1 “तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खातो. \q1 तो आपल्या शेजार्‍याची पत्नी भ्रष्ट करतो. \q1 \v 12 गरीब व गरजवंतावर तो अत्याचार करतो. \q1 तो इतरांना लुटतो. \q1 उसने देताना घेतलेले गहाण परत करीत नाही. \q1 तो मूर्तींकडे आपली नजर लावतो. \q1 तो अमंगळ कृत्ये करतो. \q1 \v 13 तो व्याजाने उसने देतो आणि नफा घेतो. \m असा मनुष्य जगेल काय? तो जगणार नाही! कारण त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत, तो मारला जाईल; आणि त्याचे रक्त त्याच्याच माथ्यावर राहील. \p \v 14 “परंतु समजा, या मनुष्याला एक मुलगा आहे जो आपला पिता करीत असलेली ही सर्व पापे पाहतो आणि जरी तो पाहतो, तरी त्या गोष्टी तो स्वतः करीत नाही: \q1 \v 15 “तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही \q2 किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. \q1 तो आपल्या शेजार्‍याची पत्नी भ्रष्ट करीत नाही. \q1 \v 16 तो कोणावर अत्याचार करीत नाही \q2 किंवा उसने देण्यासाठी गहाण ठेवून घेत नाही. \q1 तो लुटत नाही \q2 तर भुकेल्याला आपले अन्न देतो \q2 आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो. \q1 \v 17 तो गरिबांचे वाईट करण्यापासून आपला हात आवरतो \q2 आणि त्यांच्याकडून व्याज किंवा नफा घेत नाही. \q1 तो माझे नियम आचरतो व माझे विधी पाळतो. \m तो आपल्या पित्याच्या पापासाठी मरणार नाही; तर तो खचितच जगेल. \v 18 पण त्याचा पिता स्वतःच्या पापामुळे मरेल, कारण त्याने फसवणूक केली, आपल्या भावाला लुटले आणि जे चुकीचे ते आपल्या लोकांत केले. \p \v 19 “तरीही तुम्ही विचारता, ‘मुलगा आपल्या पित्याचा दोष का वाहत नाही?’ मुलाने जे सरळ व योग्य ते केले व काळजीपूर्वक माझे सर्व विधी आचरले, म्हणून तो खचितच जगेल. \v 20 जो पाप करतो तोच मरेल. आपल्या आईवडिलांचा दोष त्यांची संतती वाहणार नाही किंवा आईवडील आपल्या संततीचा दोष वाहणार नाहीत. नीतिमानाचे नीतिमत्व त्यांच्यासाठी मोजले जाईल आणि दुष्टाची दुष्टता त्यांच्याविरुद्ध मोजली जाईल. \p \v 21 “पण जर एखादा दुष्ट मनुष्य त्याने केलेल्या सर्व पापांपासून मागे फिरला आणि माझ्या सर्व विधींचे पालन केले आणि जे न्याय्य व योग्य ते केले, तो व्यक्ती खचित जगेल; तो मरणार नाही. \v 22 पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्याच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जी नीतिमान कृत्ये त्याने केली आहे त्यामुळे तो खचितच जगेल. \v 23 दुष्टाच्या मरणात मी आनंद पावतो काय? परंतु आपल्या मार्गापासून वळून ते जीवन जगतात त्यात मी संतुष्ट नाही काय? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 24 “परंतु जर कोणी नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतील आणि त्यांनी दुष्ट व्यक्तीसारखे पाप करून अमंगळ कृत्ये केली, तर ते जगतील काय? त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाहीत. अविश्वासूपणामुळे ते दोषी आहेत आणि त्यांनी केलेल्या पापामुळे, ते मरतील. \p \v 25 “तरीही तुम्ही म्हणता: ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकांनो ऐका: माझा मार्ग अन्यायी आहे काय? जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय? \v 26 जर कोणी नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि पाप करतात, त्यामुळे ते मरतील; जे पाप त्यांनी केले आहे, त्यामुळे ते मरतील. \v 27 परंतु जर एखादा दुष्ट व्यक्ती त्यांनी केलेल्या दुष्टाईपासून वळेल आणि जे न्याययुक्त व योग्य ते करेल, तर ते त्याचा जीव वाचवेल. \v 28 त्याने केलेली आपली सर्व पापे लक्षात आणून त्यापासून तो वळला, म्हणून ती व्यक्ती खचितच वाचेल; आणि मरणार नाही. \v 29 तरीही इस्राएल लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकहो, जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय? \p \v 30 “म्हणून, सार्वभौम याहवेह जाहीर करतात, तुम्ही अहो इस्राएल लोकहो, मी तुम्हा प्रत्येकाचा तुमच्या स्वतःच्या कृत्यांनुसार न्याय करेन. पश्चात्ताप करा! तुमच्या सर्व पापांपासून दूर वळा; म्हणजे तुमचे पाप तुमच्या पतनाचे कारण होणार नाही. \v 31 तुम्ही केलेले सर्व अपराध दूर टाकून द्या आणि नवीन हृदय व नवीन आत्मा घ्या. इस्राएल लोकहो, तुम्ही का मरावे? \v 32 कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा! \c 19 \s1 इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप \p \v 1 “इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप कर \v 2 आणि म्हण: \q1 “ ‘तुझी आई सिंहांमध्ये \q2 सिंहीण होती! \q1 ती त्यांच्यामध्ये वसत होती \q2 आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले. \q1 \v 3 तिच्या पिल्लांपैकी एकाला तिने वाढवले, \q2 आणि तो एक बलवान सिंह झाला. \q1 तो शिकार फाडण्यास शिकला \q2 आणि तो नर-भक्षक झाला. \q1 \v 4 तेव्हा राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले, \q2 आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला गेला. \q1 त्यांनी त्याला फासात अडकवून \q2 इजिप्त देशात नेले. \b \q1 \v 5 “ ‘जेव्हा त्या सिंहिणीने आपल्या भग्न होत असलेल्या आशा पहिल्या, \q2 तिच्या अपेक्षा गेल्या, \q1 तिने तिच्या पिल्लांमधून अजून एक पिल्लू घेतले \q2 आणि त्याला बलवान सिंह बनविले. \q1 \v 6 तो इतर सिंहांमध्ये फिरू लागला, \q2 कारण तो आता बलवान सिंह होता. \q1 तो शिकार फाडण्यास शिकला \q2 आणि तो नर-भक्षक झाला. \q1 \v 7 त्याने त्यांचे किल्ले मोडले\f + \fr 19:7 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa त्याने पाहिले\fqa*\f* \q2 आणि त्यांची नगरे उद्ध्वस्त केली. \q1 तो देश व त्यातील राहणारे सर्वजण \q2 त्याच्या गर्जनेने भयभीत झाले. \q1 \v 8 तेव्हा इतर राष्ट्र \q2 व सभोवतालचे प्रांत त्याच्याविरुद्ध आले, \q1 त्यांनी त्याच्यासाठी जाळे पसरले, \q2 आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला. \q1 \v 9 त्यांनी त्याला आकड्याने ओढून पिंजर्‍यात टाकले \q2 आणि त्याला बाबेलच्या राजाकडे आणले. \q1 त्याने त्याला तुरुंगात ठेवले, \q2 म्हणून इस्राएलच्या पर्वतांवर \q2 त्याची गर्जना पुन्हा ऐकू आली नाही. \b \q1 \v 10 “ ‘तुमची आई तुमच्या द्राक्षमळ्यात\f + \fr 19:10 \fr*\ft किंवा \ft*\fq तुमच्या \fq*\fqa रक्तात\fqa*\f* \q2 पाण्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे होती; \q1 विपुल पाण्यामुळे \q2 ती फलदायी व फांद्यांनी भरलेली होती. \q1 \v 11 तिच्या फांद्या मजबूत असून, \q2 अधिकार्‍याच्या राजदंडासाठी योग्य होत्या. \q1 झाडाच्या दाट पानांच्या वर \q2 त्या उंच वाढल्या, \q1 तिची उंची व तिच्या पुष्कळ फांद्यांमुळे \q2 ती उल्लेखनीय दिसत होती. \q1 \v 12 परंतु क्रोधामुळे ती समूळ उपटली जाऊन \q2 जमिनीवर फेकण्यात आली. \q1 पूर्वेकडील वार्‍याने ती वाळून गेली, \q2 तिची फळे गळून पडली; \q1 तिच्या मजबूत फांद्या वाळून गेल्या \q2 आणि अग्नीने त्या भस्म केल्या. \q1 \v 13 आता ती वेल वाळवंटात, \q2 कोरड्या व तहानेल्या भूमीवर लावली आहे. \q1 \v 14 तिच्या एका मुख्य फांदीमधून\f + \fr 19:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa च्या खालून\fqa*\f* अग्नी पसरला \q2 आणि तिचे फळ भस्म केले. \q1 अधिकार्‍याच्या राजदंडासाठी योग्य अशी \q2 एकही मजबूत फांदी तिच्यावर राहिली नाही.’ \m हे विलापगीत आहे आणि विलापगीत म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा.” \c 20 \s1 बंडखोर इस्राएल लोकांचे प्रायश्चित \p \v 1 सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, इस्राएलातील काही वडील लोक याहवेहकडून विचारण्यास आले आणि ते माझ्यापुढे बसले. \p \v 2 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 3 “मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्याकडून विचारपूस करण्यास तुम्ही आला आहात काय? माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ \p \v 4 “तू त्यांचा न्याय करशील काय? हे मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करशील काय? तर त्यांच्या पूर्वजांच्या अमंगळ कृत्यांविषयी त्यांचा निषेध कर \v 5 आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलची मी निवड केली, त्या दिवशी, मी शपथ घेतली व याकोबाच्या वंशजांकडे आपला हात उंच केला व मी स्वतः इजिप्तमध्ये त्यांना प्रकट झालो. उंचावलेल्या हाताने मी त्यांना म्हटले, “मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” \v 6 त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे. \v 7 आणि मी त्यांना म्हटले, “तुम्ही प्रत्येकाने ज्या घृणास्पद मूर्तींवर आपली नजर लावली आहे, त्या टाकून द्या, आणि इजिप्तच्या मूर्तींनी स्वतःस विटाळू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” \p \v 8 “ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन. \v 9 परंतु माझ्या नावासाठी मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. ज्या लोकांमध्ये ते राहिले आणि ज्यांच्यासमोर मी इस्राएली लोकांना प्रकट झालो, त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी असे केले \v 10 म्हणून त्यांना मी इजिप्तमधून काढले आणि त्यांना रानात आणले. \v 11 त्यांना मी माझे विधी दिले आणि त्यांना माझे नियम कळविले, ज्यामुळे जे लोक त्याचे पालन करतील ते जगतील. \v 12 त्याचप्रमाणे आमच्यामधील चिन्ह म्हणून मी त्यांना माझा शब्बाथ दिला, यासाठी की त्यांनी जाणावे की मी याहवेहने त्यांना पवित्र केले आहे. \p \v 13 “ ‘तरीही इस्राएली लोकांनी रानात माझ्याविरुद्ध बंड केले. त्यांनी माझे विधी पाळले नाही तर माझ्या नियमांचा धिक्कार केला; ज्यामुळे ज्यांनी नियमाचे पालन केले असते ते जगले असते; आणि त्यांनी माझ्या शब्बाथाला पूर्णपणे अपवित्र केले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात त्यांचा नाश करेन. \v 14 परंतु ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले. \v 15 आणि रानात माझा हात उंच करून मी त्यांच्याशी शपथ वाहिली की दूध व मध वाहणारा देश; जो सर्वात सुंदर देश मी त्यांना देऊ केला होतात, त्यात मी त्यांना नेणार नाही; \v 16 कारण त्यांनी माझ्या नियमांचा धिक्कार केला आणि माझ्या विधींचे पालन केले नाही आणि माझे शब्बाथ विटाळले. कारण त्यांचे हृदय त्यांच्या मूर्तींकडे लागलेले होते. \v 17 तरीही मी त्यांच्याकडे दयेने पाहिले आणि रानात मी त्यांचा नाश करून त्यांचा शेवट केला नाही. \v 18 त्यांच्या लेकरांना मी रानात म्हटले, “तुमच्या आईवडिलांच्या कायद्याचे अनुसरण करू नका किंवा त्यांचे नियम पाळू नका व त्यांच्या मूर्तींमुळे तुम्हास विटाळू नका. \v 19 मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्या विधींचे अनुसरण करा आणि काळजीपूर्वक माझे नियम पाळा. \v 20 माझे शब्बाथ पवित्र माना, यासाठी की ते आपल्यातील चिन्ह असावे. मग तुम्ही जाणाल की मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” \p \v 21 “ ‘परंतु त्यांच्या लेकरांनी माझ्याविरुद्ध बंड केले: त्यांनी माझ्या विधींचे अनुसरण केले नाही, माझे नियम त्यांनी काळजीपूर्वक पाळले नाही, ज्याविषयी मी म्हटले होते, “की जे त्याचे पालन करतील ते त्यानुसार जगतील,” आणि त्या लोकांनी माझे शब्बाथ विटाळले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात माझा कोप त्यांच्याविरुद्ध दाखवेन. \v 22 तरीही मी माझा हात आवरला आणि ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले. \v 23 आणि उंचावलेल्या हाताने मी त्यांच्याशी रानात शपथ वाहिली, की राष्ट्रांमध्ये मी त्यांची पांगापांग करेन आणि देशांमध्ये मी त्यांना विखरेन, \v 24 कारण त्यांनी माझे नियम पाळले नाहीत, तर माझ्या विधींचा धिक्कार केला व माझे शब्बाथ विटाळले आणि त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या मूर्तींची वासना बाळगली. \v 25 म्हणून मी त्यांना इतर जे चांगले नाहीत असे कायदे दिले आणि असे नियम ज्यामुळे ते जगणार नाहीत; \v 26 त्यांच्याच भेटींनी मी त्यांना अशुद्ध केले; म्हणजेच प्रत्येक प्रथम जन्मलेल्याचा यज्ञ अशासाठी की मी त्यांना भयाने भरावे, म्हणजे ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ \p \v 27 “म्हणून हे मानवपुत्रा, इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: याबाबतीत तुमच्या पूर्वजांनी सुद्धा माझ्याशी अविश्वासू राहून दुर्भाषण केले होते: \v 28 जो देश मी त्यांना शपथ वाहून देऊ केला होता, त्यात जेव्हा मी त्यांना आणले आणि त्यांनी एखादे उंच डोंगर किंवा दाट पानांनी भरलेले झाड पाहिले, तिथे त्यांनी यज्ञ केले, माझा राग पेटेल अशी अर्पणे त्यांनी केली, त्यांचे सुवासिक धूप सादर करीत त्यांची पेयार्पणे ओतली. \v 29 तेव्हा मी त्यांना म्हणालो: हे उच्च पूजास्थान जिथे तुम्ही जाता ते काय आहे?’ ” (आजवर त्या ठिकाणास बामाह\f + \fr 20:29 \fr*\fq बामाह \fq*\ft म्हणजे \ft*\fqa उच्च स्थान.\fqa*\f* म्हणतात.) \s1 बंडखोर इस्राएलचे नवीनीकरण \p \v 30 “म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमच्या पूर्वजांप्रमाणे तुम्हीदेखील स्वतःला अशुद्ध करून आणि त्यांच्या घृणास्पद मूर्तींची वासना बाळगणार काय? \v 31 जेव्हा तुम्ही तुमच्या भेटी सादर करता, म्हणजेच तुमच्या लेकरांचा अग्नीत यज्ञ करता; तुम्ही तुमच्या मूर्तींमुळे असेच स्वतःला अशुद्ध करीत राहता. अहो इस्राएल लोकहो, तुम्ही माझ्याकडे विचारपूस करावी असे मी होऊ द्यावे काय? सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही. \p \v 32 “ ‘तुम्ही म्हणता, “राष्ट्रांप्रमाणे, जगाच्या लोकांप्रमाणे आम्हाला व्हायचे आहे, जे लाकूड व दगडाची सेवा करतात.” परंतु तुमच्या मनात जे आहे, ते कधीही घडणार नाही. \v 33 सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधाची वृष्टी करीत मी तुमच्यावर राज्य करेन. \v 34 मी तुम्हाला राष्ट्रांमधून आणेन आणि ज्या ठिकाणी तुम्ही पांगला आहात त्या देशांमधून; बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधवृष्टी करीत मी तुम्हाला एकत्र करेन. \v 35 राष्ट्रांच्या रानात मी तुम्हाला आणेन आणि तिथे समोरासमोर मी तुमचा न्याय करेन. \v 36 इजिप्त देशाच्या रानात जसा मी तुमच्या पूर्वजांचा न्याय केला, तसाच मी तुमचा न्याय करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 37 माझ्या काठीखालून तुम्ही जात असता मी बारकाईने तुम्हाला पाहीन आणि तुम्हाला कराराच्या बंधनात आणेन. \v 38 जे माझ्याविरुद्ध उठतात आणि बंड करतात त्यांच्यापासून मी तुम्हाला वेगळे करेन. जरी ज्या देशात ते राहतात तिथून मी त्यांना बाहेर आणेन, तरीही इस्राएल देशात ते प्रवेश करणार नाहीत. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \p \v 39 “ ‘अहो इस्राएली लोकहो, तुमच्याविषयी म्हटले तर, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मूर्तींची सेवा करा! परंतु त्यानंतर तुम्ही खचितच माझे ऐकाल आणि तुमच्या भेटींनी व मूर्तींनी माझे नाव आणखी अपवित्र करणार नाही. \v 40 कारण सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलातील उंच पर्वतावर त्या भूमीवर इस्राएलचे सर्व लोक माझी सेवा करतील आणि तिथे मी त्यांचा स्वीकार करेन. तिथे तुमच्या सर्व पवित्र यज्ञांबरोबर तुमची अर्पणे व तुमच्या उत्तम भेटी\f + \fr 20:40 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमच्या प्रथमफळांच्या भेटी\fqa*\f* मी मागेन. \v 41 जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर आणेन आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली तिथून मी तुम्हाला एकत्र करेन, तेव्हा सुवासिक धुपाप्रमाणे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुमच्याद्वारे राष्ट्रांदेखत पवित्र मानला जाईन. \v 42 जेव्हा इस्राएल देश, जो देश मी माझा हात उंच करून तुम्हाला शपथ वाहून दिला होता त्यात मी तुम्हाला आणेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 43 तिथे तुम्ही तुमचे वर्तन व तुमची कृत्ये, ज्यामुळे तुम्ही स्वतःस भ्रष्ट केले त्यांची आठवण कराल आणि ज्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही केल्या त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट कराल. \v 44 इस्राएलाच्या घराण्या तुमचे वाईट मार्ग आणि दुष्कर्मांनुसार नाही तर माझ्या नामाकरिता मी तुमच्याशी वागेन, तेव्हा तुम्ही जाणाल मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \s1 दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी \p \v 45 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 46 “मानवपुत्रा, दक्षिणेकडे आपले तोंड कर; दक्षिणेविरुद्ध संदेश दे आणि दक्षिण भूमीच्या वनाविरुद्ध भविष्यवाणी कर. \v 47 दक्षिणेच्या वनाला सांग: ‘याहवेहचा शब्द ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यावर अग्नी पाठविणार आहे आणि तो तुझ्या सर्व झाडांना भस्म करेल, ते हिरवे असो वा वाळलेले. ती धगधगती आग विझणार नाही आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येक चेहरा त्यामुळे भाजेल. \v 48 प्रत्येकजण पाहील की मी याहवेहने अग्नी पेटविला आहे; तो विझणार नाही.’ ” \p \v 49 मग मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, माझ्याविषयी हे लोक म्हणतात, ‘हा केवळ दाखलेच सांगत नाही ना?’ ” \c 21 \s1 बाबेल: परमेश्वराच्या न्यायाची तलवार \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, यरुशलेमविरुद्ध आपले तोंड कर आणि पवित्रस्थानाविरुद्ध संदेश दे. इस्राएल देशाविरुद्ध भविष्यवाणी कर. \v 3 आणि इस्राएलाच्या भूमीला सांग: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध आहे. माझ्या म्यानातून मी माझी तलवार उपसून नीतिमान आणि दुष्ट अशा दोघांनाही तुझ्यातून छेदून टाकेन. \v 4 कारण मी नीतिमानास व दुष्टास छेदून टाकणार आहे, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येकाविरुद्ध माझी तलवार म्यानातून उपसली जाईल. \v 5 तेव्हा सर्व लोक जाणतील मी याहवेहने आपल्या म्यानातून तलवार उपसली आहे; ती परत त्यात जाणार नाही.’ \p \v 6 “म्हणून मानवपुत्रा, आक्रोश कर! भग्न हृदयाने व कष्टाने त्यांच्यासमोर उसासे टाक. \v 7 आणि जेव्हा ते तुला विचारतील, ‘तू उसासे का टाकतोस?’ तू सांग की, ‘जी वार्ता येणार आहे म्हणून प्रत्येक हृदय भीतीने विरघळेल आणि प्रत्येक हात लुळा पडेल; प्रत्येक आत्मा अशक्त होईल आणि प्रत्येक पाय मुत्राने भिजेल.’ ते येत आहे! ते नक्कीच घडणार, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \p \v 8 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 9 “मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘प्रभू असे म्हणतात: \q1 “ ‘एक तलवार, एक तलवार, \q2 धार लावलेली आणि चमकविलेली; \q1 \v 10 कत्तल करण्यास धार लावलेली, \q2 विजेप्रमाणे चमकणारी अशी केलेली! \p “ ‘माझ्या राजपुत्राच्या राजदंडामुळे आम्ही आनंद करावा काय? तलवार अशा प्रत्येक काठीला तुच्छ लेखते. \q1 \v 11 “ ‘हातात धरता यावी म्हणून, \q2 तलवार चमकण्यास नेमली आहे; \q1 ती धारदार व चमकविली गेली आहे, \q2 आणि कत्तल करणार्‍याच्या हातासाठी ती तयार केली गेली आहे. \q1 \v 12 हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, \q2 कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; \q2 ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. \q1 माझ्या लोकांसहित \q2 त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. \q1 म्हणून तू आपले ऊर बडव. \p \v 13 “ ‘कसोटी खचितच होणार आणि तलवारीने तुच्छ लेखलेला राजदंड पुढे चालला नाही तर काय होईल? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ \q1 \v 14 “तर हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर \q2 आणि तुझ्या हात हातावर मार. \q1 तलवार दोन वेळा वार करो, \q2 किंवा तीन वेळाही चालेल. \q1 ही तलवार कत्तल करण्यासाठी; \q2 तलवार जी मोठ्या वधासाठी आहे, \q2 जिने त्यांना चहूकडून घेरले आहे. \q1 \v 15 म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील \q2 आणि पुष्कळ पडतील, \q1 कत्तल करण्यासाठीच ही तलवार \q2 त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे. \q1 पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे, \q2 हत्येसाठी ती उपसली गेली आहे. \q1 \v 16 अगे तलवारी, उजवीकडे वार कर, \q2 मग डावीकडे वार कर, \q2 जिथे तुझे पाते फिरेल तिथे वार कर. \q1 \v 17 मी सुद्धा माझा हात हातावर मारीन, \q2 आणि माझा क्रोध शांत होईल. \q1 मी याहवेह हे बोललो आहे.” \p \v 18 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 19 “मानवपुत्रा, बाबेलच्या राजाच्या तलवारीसाठी दोन रस्ते आखून घे, दोन्ही एकाच देशातून निघतील. शहराकडे जाताना जिथे दुहेरी वाटा निघतात तिथे चिन्हस्तंभ लाव. \v 20 अम्मोन्यांच्या राब्बाहविरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी एक वाट आणि यहूदाह व तटबंदीच्या यरुशलेमच्या विरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी दुसरी वाट आखून ठेव. \v 21 कारण बाबेलचा राजा शकुन पाहण्यासाठी दुहेरी वाटेच्या मधोमध, त्या दोन वाटांच्या चौकात थांबेल: तो बाणांनी चिठ्ठ्या टाकेल, तो मूर्तींचा सल्ला घेईल आणि काळजाची परीक्षा करून शकुन पाहील. \v 22 त्याच्या उजव्या हातात यरुशलेमची चिठ्ठी निघेल, जिथे तो युद्धाची यंत्रे लावेल, यासाठी की वध करण्याची आज्ञा द्यावी, युद्धाची घोषणा करावी, द्वारांना युद्धाची यंत्रे लावावी, मोर्चे बांधावे व तट उभारावे. \v 23 ज्यांनी त्याच्याशी निष्ठेने शपथ वाहिली त्यांना तो शकुन खोटा वाटेल, परंतु तो त्यांना त्यांच्या दोषाची आठवण करून देईल व त्यांना कैद करून नेईल. \p \v 24 “यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही लोकांनी उघड बंड करून आणि तुम्ही जे काही करता त्याद्वारे तुमचे अपराध उघड करून, तुमच्या मनात दोष आणला आहे; आणि तुम्ही असे केले आहे म्हणून तुम्ही बंदिवासात नेले जाल. \p \v 25 “ ‘हे इस्राएलाच्या अपवित्र व दुष्ट राजपुत्रा, ज्याचा दिवस आला आहे, ज्याला दंड द्यायचा शेवटचा समय आला आहे, \v 26 त्या तुला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझा टोप उतरव, मुकुट काढून टाक. तो जसा होता तसा आता नसेल: जे नम्र ते उंच केले जातील व जे उंच ते नम्र केले जातील. \v 27 नाश! नाश! मी याचा नाश करेन! ज्याच्याकडे त्या मुकुटाचा खरा अधिकार आहे तो येईपर्यंत हा मुकुट पुनर्स्थापित होणार नाही; त्यालाच मी तो देईन.’ \p \v 28 “आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘एक तलवार, एक तलवार, \q2 कत्तल करण्यास उपसलेली, \q1 नाश करण्यास व विजेप्रमाणे; \q2 ती चमकविलेली व चमकणारी आहे! \q1 \v 29 जरी तुमच्याविषयीचे खोटे दृष्टान्त \q2 व तुमच्याबद्दलचे लबाड शकुन केले, \q1 तरीही ज्या दुष्टांचा नाश झाला पाहिजे \q2 म्हणून त्यांच्या मानेवर तलवार ठेवली जाईल, \q1 त्यांचा दिवस आला आहे, \q2 त्यांना दंड द्यायचा शेवटचा समय येऊन ठेपला आहे. \b \q1 \v 30 “ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या. \q2 ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली, \q1 तुझ्या पूर्वजांच्या भूमीत, \q2 मी तुझा न्याय करेन. \q1 \v 31 मी माझा क्रोध तुझ्यावर ओतेन \q2 आणि माझ्या कोपाचा अग्नी तुझ्यावर फुंकेन; \q1 क्रूर लोक जे नाश करण्यात निपुण आहेत, \q2 त्यांच्या हाती मी तुला सोपवेन. \q1 \v 32 तू अग्नीला इंधन अशी होशील, \q2 तुझे रक्त तुझ्याच देशात सांडेल, \q2 तुझी आठवण आणखी केली जाणार नाही; \q1 कारण मी याहवेह हे बोललो आहे.’ ” \c 22 \s1 यरुशलेमच्या पापांचा न्याय \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \b \p \v 2 “मानवपुत्रा, तू तिचा न्याय करशील काय? या रक्तपाती शहराचा न्याय तू करशील काय? तर तिच्या सर्व अमंगळ कृत्यांविषयी तिचा निषेध कर \v 3 आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे नगरी, तू रक्तपात करून व मूर्ती बनवून स्वतःला अशुद्ध करून आपला नाश ओढवून घेतला आहेस, \v 4 जो रक्तपात तू केलास त्यामुळे तू दोषी झालीस आणि ज्या मूर्ती तू बनविल्यास त्यामुळे तू विटाळली आहेस. तुझे दिवस जवळ आणले आहेस आणि तुझ्या वर्षांचा शेवट आला आहे. म्हणून मी तुला राष्ट्राकरिता निंदा व देशांसाठी हास्य असे करेन. \v 5 हे अपकीर्तिच्या, उपद्रवाने भरलेल्या नगरी, जे तुझ्याजवळ आहेत व जे दूर आहेत, ते सर्व तुझी थट्टा करतील. \p \v 6 “ ‘पाहा, इस्राएलचे प्रत्येक राजपुत्र त्यांच्या अधिकाराचा उपयोग कसा रक्तपातासाठी करीत आहेत. \v 7 तुझ्यातील आईवडिलांना त्यांनी तुच्छ मानले; त्यांनी तुझ्यातील विदेशीयांवर अत्याचार केला आणि अनाथ व विधवांना अयोग्य वागणूक दिली. \v 8 तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंचा अवमान केला आणि माझे शब्बाथ अपवित्र केले आहेत. \v 9 तुझ्यात निंदक राहतात, ज्यांचा कल रक्तपाताकडे आहे; तुझ्यात असे लोक आहेत जे डोंगरावरील पूजास्थानात प्रसाद खातात आणि अश्लील कृत्ये करतात. \v 10 तुझ्यात असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पित्याचा पलंग विटाळला आहे; जे मासिक पाळीच्या वेळी जेव्हा स्त्रिया विधीनुसार अशुद्ध असतात, तेव्हा त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतात. \v 11 तुझ्यातील एक पुरुष त्याच्या शेजार्‍याच्या पत्नीशी निंद्यकर्म करतो, तर दुसरा त्याच्या सुनेला भ्रष्ट करतो आणि अजून दुसरा त्याच्या बहिणीला, त्याच्याच पित्याच्या मुलीला भ्रष्ट करतो. \v 12 तुझ्यात लोक आहेत, जे रक्तपात करण्यास लाच घेतात; तू व्याज घेते आणि गरिबांकडून नफा करून घेतेस. तू आपल्या शेजार्‍याकडून जबरीने वसूल करून लाभ घेतेस. आणि तुला माझा विसर पडला आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 13 “ ‘अन्यायाने तू जो लाभ करून घेतला आहे, आणि तुमच्यात जो रक्तपात तू केला आहे, त्यामुळे संतापाने मी माझे हात एकत्र चालवेन. \v 14 मी तुझा झाडा घेईन त्या दिवशी तुझे धाडस टिकेल काय किंवा तुझे हात दृढ राहतील काय? मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच. \v 15 राष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग आणि देशांमध्ये तुम्हाला विखरून टाकीन; आणि तुमच्या अशुद्धतेचा शेवट मी करेन. \v 16 राष्ट्रांच्या नजरेत तू जेव्हा विटाळलेली\f + \fr 22:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa जेव्हा मी तुला तुझे वतन दिले असणार तेव्हा.\fqa*\f* ठरशील, तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ” \p \v 17 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 18 “मानवपुत्रा, इस्राएली लोक माझ्यासाठी गाळ असे झाले आहेत; ते सर्व भट्टीत राहिलेले कास्य, कथील, लोखंड व शिसे यासारखे आहेत. ते केवळ चांदीचा गाळ आहेत. \v 19 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही सर्वजण गाळ असे झाला आहात, म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये एकत्र करेन. \v 20 जसे चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील वितळण्यासाठी धगधगत्या आगीच्या भट्टीत टाकली जातात, तसेच मी तुम्हाला माझ्या रागाने व क्रोधाने एकत्र करेन आणि तुम्हाला शहरात ठेवून वितळवीन. \v 21 मी तुम्हाला एकत्र करेन व तुमच्यावर माझा क्रोधाग्नी फुंकेन, आणि तुम्ही त्या शहरात वितळून जाल. \v 22 जशी चांदी भट्टीत वितळली जाते, असेच तुम्ही त्या शहरात वितळून जाल आणि तुम्ही जाणाल की मी याहवेहने माझा कोप तुमच्यावर ओतला आहे.’ ” \p \v 23 याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले: \v 24 “मानवपुत्रा, या देशाला सांग, ‘तुम्ही असा एक देश आहात जो कोपाच्या दिवशी ना शुद्ध केला गेला ना ज्यावर पाऊस पडला.’ \v 25 तिच्यातील राजपुत्रांचा\f + \fr 22:25 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa संदेष्टे\fqa*\f* एक कट आहे, ते गर्जना करीत भक्ष फाडणार्‍या सिंहाप्रमाणे आहेत; ते लोकांना ग्रस्त करतात, ते खजिना व मोलवान वस्तू घेतात आणि त्यांच्यात पुष्कळांना विधवा बनवतात. \v 26 तिचे याजक माझ्या नियमाचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र करतात; पवित्र व सर्वसामान्य यात ते फरक ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध यात काही भेद नाही अशी शिकवण ते देतात आणि त्यांच्यात मी अपवित्र मानला जाईल म्हणून माझ्या शब्बाथांकडे दुर्लक्ष करतात. \v 27 तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात. \v 28 त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ \v 29 या देशातील लोक फसवणूक व लुटारूपण करतात; ते गरीब व गरजवंतावर अत्याचार करतात आणि विदेशी लोकांना न्याय न देता अन्यायाने वागवितात. \p \v 30 “या देशाचा मी नाश करू नये म्हणून तिच्यातील कोणी एक भिंत बांधेल आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभा राहील अशा व्यक्तीला मी त्यांच्यात शोधले, परंतु मला कोणी सापडला नाही. \v 31 म्हणून मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि माझ्या कोपाग्नीने त्यांना भस्म करेन त्यांनी जे काही केले ते मी त्यांच्याच माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \c 23 \s1 दोन व्यभिचारी बहिणी \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, दोन स्त्रिया होत्या, ज्या एकाच आईच्या मुली होत्या. \v 3 त्या इजिप्तमध्ये वेश्या होऊन, त्यांच्या तारुण्यापासून वेश्यावृत्ती करीत होत्या. त्या देशात त्यांची स्तने हाताळली गेली आणि त्यांच्या कुमारावस्थेतील छाती कुरवाळली गेली. \v 4 थोरलीचे नाव ओहोलाह होते आणि ओहोलीबाह तिची लहान बहीण होती. त्या माझ्या होत्या आणि त्यांनी मुलांना व मुलींना जन्म दिला. ओहोलाह ही शोमरोन आहे आणि ओहोलीबाह यरुशलेम आहे. \p \v 5 “ओहोलाह माझी असतानाच वेश्यावृत्ती करू लागली; आणि तिचे प्रियकर; म्हणजेच अश्शूरी योद्ध्यांची अभिलाषा करू लागली \v 6 ते निळी वस्त्रे घातलेले, राज्यपाल व सेनापती होते, ते सर्व सुंदर तरुण पुरुष घोडेस्वार होते. \v 7 तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले. \v 8 इजिप्तमध्ये सुरू केलेली वेश्यावृत्ती तिने सोडली नाही, जिथे पुरुष तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर झोपले तिच्या कुमारावस्थेतील छाती त्यांनी कुरवाळली आणि त्यांच्या वासना तिच्यावर ओतल्या. \p \v 9 “म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले. \v 10 त्यांनी तिला नग्न केले, तिची मुले व मुली घेऊन तिला तलवारीने मारून टाकले. स्त्रियांमध्ये ती म्हणीप्रमाणे झाली आणि तिला दंड देण्यात आला. \p \v 11 “तिची बहीण ओहोलीबाहने हे पाहिले, तरीही तिच्या वासना व वेश्यावृत्तीत ती तिच्या बहिणीपेक्षा अधिक व ती दुर्गुणी होती. \v 12 ती अश्शूरी लोकांच्या मागे वासनेने आसक्त झाली—राज्यपाल आणि सेनापती, गणवेष घातलेले योद्धे, घोडेस्वार आणि सर्व देखणे पुरुष होते. \v 13 मी पाहिले की तिने सुद्धा स्वतःला अपवित्र केले; त्या दोघीही एकाच मार्गाने गेल्या. \p \v 14 “परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती, \v 15 त्यांच्या कंबरेला पट्टे होते व त्यांच्या डोक्यावर सुंदर फेटे होते; ते सर्व बाबेलच्या रथ अधिकार्‍यांसारखे, खास्द्यांचे\f + \fr 23:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa बाबिलोनचे\fqa*\f* रहिवासी असे दिसत होते. \v 16 ती चित्रे पाहताच त्यांची वासना तिला झाली आणि खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे दूत पाठवले. \v 17 मग बाबेलचे लोक तिच्याकडे प्रेमाच्या पलंगावर आले, आणि त्यांच्या वासनांनी तिला भ्रष्ट केले, तेव्हा तिने तिचे मन त्यांच्यापासून घृणेने वळविले. \v 18 जेव्हा उघडपणे तिने तिची वेश्यावृत्ती केली आणि तिचे नग्न शरीर उघडे केले, तेव्हा जसे मी तिच्या बहिणीपासून झालो तसाच तिरस्काराने मी तिच्यापासून दूर झालो. \v 19 तरीही तारुण्याच्या दिवसांत इजिप्तमध्ये वेश्या होती त्या दिवसांची आठवण करीत ती अजूनच स्वैराचाराने वागू लागली. \v 20 तिथे ती वेश्या तिच्या प्रियकरांची वासना करू लागली, ज्यांचे जननेंद्रिय गाढवांप्रमाणे व त्यांचा स्त्राव घोड्यांसारखा होता. \v 21 याप्रकारे जेव्हा इजिप्तमध्ये तुझ्या छातीला कुरवाळले गेले व तुझे तरुण स्तन हाताळले गेले, त्या तुझ्या तारुण्यातील अश्लीलतेची अभिलाषा तू धरलीस. \p \v 22 “म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन; \v 23 बाबेल व खास्द्यांचे लोक, पकोड, शोआ व कोआतील पुरुष आणि त्यांच्यासह सर्व अश्शूरी, सुंदर तरुण पुरुष, त्यांचे राज्यपाल आणि सरदार, रथ अधिकारी, उच्च पदाधिकारी व घोडेस्वार. \v 24 हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील. \v 25 मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील. \v 26 ते तुझी वस्त्रे काढून घेतील व तुझे दागिने हिसकावून घेतील. \v 27 म्हणजे जी अश्लीलता व वेश्यावृत्ती तू इजिप्तमध्ये चालू केली तिचा शेवट मी करेन. या गोष्टींकडे तू पुन्हा पाहणार नाहीस आणि यापुढे इजिप्तचे स्मरण आणखी करणार नाहीस. \p \v 28 “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यांचा तू द्वेष करतेस, तिरस्काराने ज्यांच्यापासून तू दूर झालीस त्यांच्या हाती मी तुला देत आहे. \v 29 ते तुझ्याशी द्वेषाने वागतील आणि ज्यासाठी तू काम केले त्या सर्व गोष्टी ते तुझ्यापासून हिसकावून घेतील. ते तुला अगदी नग्न करतील आणि तुझ्या वेश्यावृत्तीची लाज उघडी पडेल. \v 30 तुझी अश्लीलता व दुराचारांनी हे सर्व तू तुझ्यावर ओढवून घेतले आहे, कारण तू राष्ट्रांची अभिलाषा धरलीस आणि त्यांच्या मूर्तींनी स्वतःला विटाळून टाकले. \v 31 तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन. \p \v 32 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील, \q2 जो पेला मोठा व खोल आहे; \q1 तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल, \q2 कारण त्यात पुष्कळ मावते. \q1 \v 33 नशा व दुःख यांनी तू भरशील \q2 हा पेला नाश व विध्वंसाचा आहे, \q2 तो पेला तुझी बहीण शोमरोन हिचा आहे. \q1 \v 34 तू तो पेला पिऊन कोरडा करशील \q2 आणि त्याचे तुकडे चावशील; \q2 आणि तू आपली छाती फाडशील. \m हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \b \p \v 35 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.” \p \v 36 याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ओहोलाह व ओहोलीबाहचा न्याय तू करशील काय? मग त्यांच्या अमंगळ कृत्यांबद्दल त्यांचा निषेध कर. \v 37 कारण त्यांनी व्यभिचार केला आहे आणि रक्त त्यांच्या हातावर आहे. त्यांनी त्यांच्या मूर्तींशी व्यभिचार केला; त्या मूर्तींना अन्न म्हणून ज्या लेकरांना त्यांनी माझ्यापासून जन्म दिला त्यांचा यज्ञ त्यांनी मूर्तींना केला. \v 38 त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले. \v 39 त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेकरांचे यज्ञ त्यांच्या मूर्तींना केले, ते माझ्या पवित्रस्थानात आले आणि ते अपवित्र केले. माझ्या घरात त्यांनी ही कृत्ये केली. \p \v 40 “जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले. \v 41 तू एका सुंदर पलंगावर बसलीस, ज्यापुढे एक मेज ठेवलास त्यावर जे माझे होते ते धूप व जैतुनाचे तेल ठेवले. \p \v 42 “चैनबाजी करणाऱ्या लोकांच्या गर्दीचा आवाज तिच्या आजूबाजूला होता; गोंधळी लोकांबरोबर दारूबाज लोक आणले गेले होते आणि त्यांनी स्त्रिया व त्यांच्या बहिणीच्या हातात बांगड्या आणि त्यांच्या डोक्यावर सुंदर मुकुट घातले. \v 43 तेव्हा जी स्त्री व्यभिचार करून निकामी झाली होती तिच्याविषयी म्हटले, ‘वेश्या म्हणून त्यांनी तिचा उपयोग करावा, कारण ती वेश्याच तर आहे.’ \v 44 आणि ते तिच्याबरोबर झोपले. पुरुष जसे वेश्यांबरोबर झोपतात तसेच ते त्या अश्लील स्त्रिया, ओहोलाह व ओहोलीबाह यांच्याबरोबर झोपले. \v 45 परंतु ज्या व्यभिचार करतात आणि रक्त सांडतात, त्या स्त्रियांना नीतिमान न्यायाधीश दंड देतील, कारण त्या व्यभिचारी आहेत आणि त्यांचे हात रक्ताने भरले आहेत. \p \v 46 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्यांच्याविरुद्ध मोठा जमाव आणा आणि त्यांना आतंक व लुटेच्या स्वाधीन करा. \v 47 लोकांचा जमाव त्यांना धोंडमार करतील आणि त्यांना तलवारीने कापतील; ते त्यांच्या मुलांना व मुलींना जिवे मारतील आणि त्यांची घरे जाळून टाकतील. \p \v 48 “देशातील अश्लीलतेचा मी शेवट करेन, म्हणजे सर्व स्त्रिया सावध राहतील आणि तुमच्याप्रमाणे त्या करणार नाही. \v 49 तुमच्या अश्लीलतेचा दंड तुम्ही भोगाल आणि तुमच्या मूर्तिपूजेच्या पापाचे परिणाम तुम्ही भोगाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.” \c 24 \s1 यरुशलेम एका कढईप्रमाणे \p \v 1 नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “हे मानवपुत्रा, ही तारीख, हा दिवस नोंदून ठेव, कारण आजच्याच दिवशी बाबेलच्या राजाने यरुशलेमला वेढा घातला. \v 3 या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव \q2 आणि त्यात पाणी ओत. \q1 \v 4 त्यात मांसाचे तुकडे टाक, \q2 सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा. \q1 यांच्या उत्तम हाडांनी कढई भर; \q2 \v 5 कळपातील उत्तम मेंढरू निवडून घे. \q1 हाडांसाठी कढईच्या खाली लाकडे ठेव; \q2 आणि ते उकळून \q2 त्यात हाडे शिजव. \b \m \v 6 “ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो, \q2 ज्या कढईला गंज लागला आहे, \q2 ज्याचा थर जाणार नाही! \q1 जसे काढता येईल \q2 तसा एकएक मांसाचा तुकडा काढून घ्या. \b \q1 \v 7 “ ‘कारण तिने सांडलेले रक्त तिच्यामध्येच आहे: \q2 ते तिने उघड्या खडकावर ओतले; \q1 तिने ते मातीने झाकले जाईल असे, \q2 जमिनीवर ओतले नाही. \q1 \v 8 कोप भडकवावा व सूड घ्यावा म्हणून \q2 मी तिचे रक्त उघड्या खडकावर ओतेन, \q2 म्हणजे ते झाकले जाणार नाही. \b \m \v 9 “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो! \q2 मी देखील लाकडाचा ढीग उंच करेन. \q1 \v 10 तर लाकडाचा ढीग करा \q2 आणि अग्नी पेटवा. \q1 मसाले मिसळून; \q2 मास चांगले शिजवून घ्या, \q2 हाडे पूर्णपणे जळू द्या. \q1 \v 11 मग रिकामी कढई निखार्‍यावर ठेवा \q2 ती गरम होऊन तिचे तांबे चमकू द्या, \q1 म्हणजे तिची अशुद्धता वितळून जाईल \q2 आणि त्याचा थर पूर्णपणे जळून जाईल. \q1 \v 12 परंतु सर्व प्रयत्न वाया गेले; \q2 तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही, \q2 तो अग्नीने देखील निघाला नाही. \p \v 13 “ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस. \b \p \v 14 “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \s1 यहेज्केलच्या पत्नीचा मृत्यू \p \v 15 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 16 “हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस. \v 17 शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.” \p \v 18 म्हणून सकाळी मी लोकांशी बोललो आणि संध्याकाळी माझी पत्नी मरण पावली. दुसर्‍या सकाळी मला आज्ञापिल्याप्रमाणे मी केले. \p \v 19 तेव्हा लोकांनी मला विचारले, “या सर्व गोष्टींचे आमच्याशी काय देणे घेणे आहे? तू असे का वागत आहेस?” \p \v 20 तेव्हा मी त्यांना म्हटले, “याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 21 इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझे पवित्रस्थान; तो बलवान गड ज्याविषयी तुम्ही अभिमान बाळगता, तुमच्या डोळ्यांचा आनंद, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, तो मी अपवित्र करणार आहे. तुमची मुले व मुली जे तुम्ही मागे सोडले ते तलवारीने पडतील. \v 22 आणि जसे मी केले तसेच तुम्हीही कराल. तुम्ही आपली मिशी आणि दाढी झाकणार नाही किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तुम्ही खाणार नाही. \v 23 तुम्ही आपले पागोटे आपल्या डोक्यावर आणि तुमची पायतणे तुमच्या पायात असू द्यावीत. तुम्ही शोक करू नये किंवा रडू नये, तर तुमच्या पापांमुळे तुम्ही झुराल व आपसातच कण्हाल. \v 24 यहेज्केल तुमच्यासाठी एक चिन्ह असा आहे; जसे त्याने केले तसेच तुम्हीही करा. हे जेव्हा घडेल, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ \p \v 25 “आणि तू, हे मानवपुत्रा, ज्या दिवशी मी त्यांचे बलवान दुर्ग, त्यांचा हर्ष आणि गौरव, त्यांच्या डोळ्यांचा आनंद, त्याच्या हृदयाची इच्छा आणि त्यांची मुले व मुली सुद्धा काढून घेईन; \v 26 त्या दिवशी एक फरार झालेला तुम्हाला वर्तमान सांगण्यास येईल. \v 27 त्यावेळी तुझे तोंड उघडेल; तू त्याच्याशी बोलशील, आणखी शांत बसणार नाही. याप्रकारे तू त्यांच्यासाठी एक चिन्ह असा असशील, आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.” \c 25 \s1 अम्मोनविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “हे मानवपुत्रा, अम्मोन्यांकडे आपले तोंड कर आणि त्यांच्याविषयी भविष्यवाणी कर. \v 3 अम्मोन्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जेव्हा माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, आणि इस्राएल देश ओसाड झाला व जेव्हा यहूदीयाचे लोक बंदिवासात गेले, तेव्हा तुम्ही “आहा!” असे म्हटले, \v 4 म्हणून तुमच्या पूर्वेस असलेल्या लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून तुम्हाला मी त्यांच्या स्वाधीन करेन. ते त्यांच्या छावण्या तुमच्यात उभारतील व त्यांचे तंबू तुमच्यात बांधतील; ते तुमची फळे खातील व तुमचे दूध पितील. \v 5 मी राब्बाह नगराला उंटांचा तबेला व अम्मोनला मेंढरांचे विश्रामस्थान असे करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 6 कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण तुम्ही टाळ्या वाजविल्या व उड्या मारल्या आणि इस्राएल देशाप्रती आपल्या हृदयात द्वेष ठेऊन आनंद केला, \v 7 आता मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन व तुला राष्ट्रांना लूट म्हणून देईन. राष्ट्रांतून मी तुला पुसून टाकेन आणि देशातून तुला नाहीसे करेन. मी तुझा नाश करेन आणि तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ” \s1 मोआबविरुद्ध भविष्यवाणी \p \v 8 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,” \v 9 म्हणून मी मोआबाची हद्द, त्याच्या सीमेवरील नगरे—बेथ-यशिमोथ, बआल-मेओन व त्या देशाचे वैभव किर्याथाईम उघडे करेन. \v 10 अम्मोनी लोकांबरोबर मोआबला सुद्धा मी पूर्वेकडील लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून स्वाधीन करेन, म्हणजे राष्ट्रांमध्ये अम्मोनी लोकांचे स्मरण केले जाणार नाही; \v 11 आणि मोआबाला मी शिक्षा करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ” \s1 एदोमाविरुद्ध भविष्यवाणी \p \v 12 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘एदोमने यहूदाहचा सूड घेतला आणि त्यामुळे तो अतिशय दोषी ठरला, \v 13 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील. \v 14 माझ्या इस्राएली लोकांच्या हातूनच मी एदोमवर माझा सूड घेईन, आणि माझा राग व क्रोधानुसार ते त्यांच्याशी वागतील; ते माझा सूड अनुभवतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \s1 पलिष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी \p \v 15 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘पलिष्टी लोक प्रतिकाराने वागले व निरंतरच्या वैरभावाने यहूदाहचा नाश करण्यासाठी आपल्या हृदयात द्वेषबुद्धी ठेऊन त्यांचा सूड घेतला आहे. \v 16 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पलिष्ट्यांविरुद्ध मी माझा हात उगाणार आहे आणि करेथी लोकांना नाहीसे करेन आणि समुद्रकिनार्‍यावर उरलेल्यांना नष्ट करेन. \v 17 मी त्यांच्यावर माझा सूड उगवेन आणि माझ्या क्रोधाने त्यांचा नाश करेन. जेव्हा मी त्यांचा सूड घेईन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ” \c 26 \s1 सोरविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 बाराव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’ \v 3 यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अगे सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि जशा समुद्राच्या लाटा उसळतात तसे अनेक राष्ट्र मी तुझ्याविरुद्ध आणेन. \v 4 ते सोरचे तट पाडतील व तिच्या बुरुजांचा विध्वंस करतील; मी तिची माती खरडून काढेन व तिला एक उघडा खडक करेन. \v 5 ती बाहेर समुद्रावर जाळे पसरण्याचे स्थान होईल, कारण मी हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात. ती राष्ट्रांसाठी लूट होईल, \v 6 आणि भूप्रदेशात असलेले तिचे लोक तलवारीने पडतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. \p \v 7 “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर\f + \fr 26:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa नबुखद्नेस्सर\fqa*\f* त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन. \v 8 भूप्रदेशात असलेल्या तुमच्या वस्त्यांचा तलवारीने तो नाश करेल; तो तुमच्याविरुद्ध घेराबंदी करेल, तुमच्या भिंतीस चढ बांधेल आणि तुझ्याविरुद्ध त्याची ढाल उंच करेल. \v 9 तो तुझ्या तटांसमोर युद्धाची यंत्रे लावेल व आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज नष्ट करेल. \v 10 त्याचे घोडे इतके असतील की त्यांनी उडविलेल्या धुळीने तू झाकला जाशील. युद्धाचे घोडे, गाडे व रथासह तो जेव्हा तुझ्या द्वारातून प्रवेश करेल आणि ज्या शहराच्या भिंती कोसळल्या आहेत, त्यातून त्याचे सैन्य प्रवेश करतील तेव्हा तुझ्या भिंती त्यांच्या मोठ्या आवाजाने थरकापतील. \v 11 त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी तुझे सर्व रस्ते तुडविले जातील; तो तुझ्या लोकांना तलवारीने मारेल आणि तुझे मजबूत स्तंभ जमिनीवर पडतील. \v 12 ते तुझी संपत्ती व व्यापारी वस्तू लुटून घेतील; ते तुझ्या भिंती फोडतील आणि तुझ्यातील सुंदर घरांचा ते नाश करतील व तुझे धोंडे, लाकूड व माती समुद्रात फेकतील. \v 13 तुझ्या गीतांचा आवाज मी बंद पाडेन आणि तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही. \v 14 मी तुला उघडे खडक बनवीन आणि तू मासेमारीचे जाळे पसरविण्याचे ठिकाण बनशील. तू कधीही पुनर्स्थापित होणार नाहीस, कारण मी याहवेह हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 15 “सोर शहरास सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी लोकांच्या कण्हण्याने आणि तुझ्यात होत असलेल्या कत्तलीमुळे समुद्रतटांचा थरकाप होणार नाही काय? \v 16 तेव्हा सर्व समुद्रतटाचे राजकुमार आपआपल्या राजासनांवरून खाली उतरतील आणि आपले झगे काढून बाजूला ठेवतील व आपली नक्षीदार वस्त्रे काढून टाकतील. भीतीची वस्त्रे घालून, प्रत्येक क्षणी थरथर कापत, तुझ्याविषयी भयभीत होऊन ते जमिनीवर बसतील. \v 17 मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील: \q1 “ ‘हे प्रसिद्ध शहरा, \q2 ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते! \q1 ज्या तुला समुद्रातही शक्ती होती, \q2 तू व तुझे रहिवासी; \q1 तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस \q2 त्या तुझा नाश कसा झाला. \q1 \v 18 आता तुझ्या पतनाच्या दिवशी \q2 समुद्रतट कापतात; \q1 तू कोसळून पडली म्हणून \q2 समुद्रातील द्वीपे भयभीत झाली आहेत.’ \p \v 19 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यामध्ये कोणी आणखी वस्ती करीत नाही, अशा शहरांसारखे जेव्हा मी तुला ओसाड शहर करेन आणि जेव्हा मी खोल समुद्र तुझ्यावर आणेन आणि त्याचे प्रचंड पाणी तुला झाकून टाकेल, \v 20 आणि जे खाली गर्तेत आधी गेले आहेत त्यांच्याजवळ मी तुला खाली आणेन. पृथ्वीच्या खाली, अधोलोकाच्या खोल गर्तेत जिथे पुरातन ओसाडी आहेत, जे तिथे खाली गर्तेत आहेत आणि जे परत येणार नाहीत किंवा या जिवंतांच्या भूमीवर तुझे स्थान घेणार नाहीत\f + \fr 26:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa आणि मी गौरव देईन\fqa*\f* अशा ठिकाणी मी तुला वसवीन. \v 21 मी तुझा भयंकर शेवट करेन आणि तुझे अस्तित्व मी नाहीसे करेन. तुझा शोध घेतला, तरी तू पुन्हा कधीही सापडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \c 27 \s1 सोरसाठी विलापगीत \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, सोरसाठी विलाप कर. \v 3 सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात: \q1 “ ‘अगे सोर, तू म्हणतेस, \q2 “मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.” \q1 \v 4 उंच समुद्रांवर तुझे राज्य होते; \q2 तुला बांधणार्‍यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले. \q1 \v 5 त्यांनी तुझ्या फळ्या \q2 सनीरच्या\f + \fr 27:5 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa हर्मोन पर्वत\fqa*\f* देवदारूच्या बनविल्या; \q1 त्यांनी लबानोनचे गंधसरू घेतले \q2 आणि डोलकाठी बनविली. \q1 \v 6 त्यांनी तुझी वल्ही \q2 बाशानच्या एला झाडाची बनविली; \q1 त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या \q2 आणि त्यांना हस्तिदंताने सजविले. \q1 \v 7 तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते \q2 ते तुझा झेंडा होते; \q1 तुझे छत एलिशाह द्वीपातील \q2 निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते. \q1 \v 8 सीदोन व आरवदचे पुरुष तुझे वल्हेकरी होते; \q2 हे सोर, तुझ्यातील कुशल लोक, जहाजावर तुझे खलाशी म्हणून होते. \q1 \v 9 गबालचे\f + \fr 27:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याला बिब्लोसही म्हटले जात\fqa*\f* अनुभवी वडील \q2 जहाजाची फूट दुरुस्ती करण्यास जहाजावर होते. \q1 समुद्रावरील सर्व जहाजे व त्यांचे खलाशी \q2 तुझ्या मालाचा व्यापार करण्यास तुझ्याजवळ आले. \b \q1 \v 10 “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी \q2 तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. \q1 त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून \q2 तुला वैभवी बनविले. \q1 \v 11 आरवद व हेलेकच्या माणसांनी \q2 चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले; \q1 गम्मादचे पुरुष \q2 तुझ्या बुरुजावर होते. \q1 त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या; \q2 त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले. \p \v 12 “ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली. \p \v 13 “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या. \p \v 14 “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत. \p \v 15 “ ‘ददानच्या\f + \fr 27:15 \fr*\ft मूळ प्रतींनुसार \ft*\fqa ह्रोदेस\fqa*\f* लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले. \p \v 16 “ ‘तुझ्याकडील पुष्कळ उत्पादनांमुळे अरामने\f + \fr 27:16 \fr*\ft मूळ प्रतींनुसार \ft*\fqa एदोम\fqa*\f* तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला नीलमणी, जांभळ्या तागाचे कापड, नक्षीकाम केलेले कापड, बारीक सूत, प्रवाळ व माणके दिली. \p \v 17 “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले. \p \v 18 “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर \v 19 आणि यावान\f + \fr 27:19 \fr*\ft वदान\ft*\f* येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली. \p \v 20 “ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे. \p \v 21 “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला. \p \v 22 “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले. \p \v 23 “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला. \v 24 तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्‍यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला. \q1 \v 25 “ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून \q2 तुझी सेवा करीत असत. \q1 तू समुद्रावर प्रवास करीत असता \q2 तू मालाने भरलेली असे. \q1 \v 26 तुझ्या वल्हेकर्‍यांनी \q2 तुला खोल समुद्रात आणले. \q1 परंतु त्या खोल समुद्रामध्ये \q2 पूर्वेकडील वारा तुझे तुकडे करेल. \q1 \v 27 तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, \q2 तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, \q1 तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, \q2 आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल \q1 तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती \q2 समुद्राच्या मधोमध बुडून जातील. \q1 \v 28 जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील \q2 तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल. \q1 \v 29 सर्व वल्हेकरी \q2 जहाज टाकून देतील; \q1 नावाडी आणि सर्व खलाशी \q2 किनार्‍यावर उभे राहतील. \q1 \v 30 आपला आवाज उंच करून \q2 तुझ्यासाठी हेल काढून रडतील; \q1 ते आपल्या डोक्यावर धूळ उडवतील \q2 व राखेत लोळतील. \q1 \v 31 तुझ्यासाठी ते आपली डोकी मुंडून \q2 गोणपाट नेसतील. \q1 ते आपल्या जिवाच्या आकांताने व अति शोकाने \q2 तुझ्यासाठी रडतील. \q1 \v 32 ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता, \q2 ते तुझ्यासाठी विलापगीत गातील: \q1 “सोर, जी समुद्रात निःशब्द झाली, \q2 तिच्याप्रमाणे अजून कोण आहे?” \q1 \v 33 जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे, \q2 तेव्हा तू पुष्कळ राष्ट्रांना संतुष्ट केले; \q1 तुझ्या महान संपत्ती व मालाने \q2 पृथ्वीवरील राजांना तू समृद्ध केलेस. \q1 \v 34 आता तू समुद्राकडून \q2 पाण्याच्या खोलीमध्ये तुटून गेली आहेस; \q1 तुझा माल व तुझे साथीदार \q2 तुझ्याबरोबर खाली बुडले आहेत. \q1 \v 35 समुद्रतटावर वसलेले \q2 तुला पाहून घाबरून जातात; \q1 त्यांचे राजे भीतीने कापतात \q2 आणि त्यांचे चेहरे भयाने काळवंडले आहेत. \q1 \v 36 राष्ट्रांचे व्यापारी तुझा धिक्कार करतात; \q2 तुझा भयंकर अंत झाला आहे \q2 आणि तुझे अस्तित्वच नाहीसे होणार आहे.’ ” \c 28 \s1 सोरच्या राजाविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने \q2 तू म्हणालास, “मी देव आहे; \q1 देवाच्या आसनावर \q2 समुद्राच्या हृदयात मी बसतो.” \q1 तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, \q2 परंतु तू मानव आहेस आणि देव नाही. \q1 \v 3 तू दानीएलापेक्षा\f + \fr 28:3 \fr*\ft पुरातन लेखनातील प्रख्यात मनुष्य\ft*\f* सुज्ञ आहेस काय? \q2 तुझ्यापासून काही गुपित नाही काय? \q1 \v 4 तुझी सुज्ञता व समज \q2 याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली \q1 आणि आपल्या खजिन्यात \q2 सोने आणि चांदीचा साठा केलास. \q1 \v 5 व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने \q2 तू आपले धन वाढविलेस, \q1 आणि तुझ्या संपत्तीमुळे \q2 तुझे हृदय गर्विष्ठ झाले आहे. \p \v 6 “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘कारण तू स्वतःला ज्ञानी, \q2 अगदी देवासारखे ज्ञानी समजतोस, \q1 \v 7 म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन, \q2 जे राष्ट्रांमध्ये सर्वात क्रूर आहेत; \q1 तुझे सौंदर्य व ज्ञान याविरुद्ध ते त्यांची तलवार उपसतील \q2 आणि ती तुझ्या चमकत्या वैभवाला भेदून जाईल. \q1 \v 8 ते तुला खाली गर्तेत आणतील, \q2 आणि तिथे समुद्राच्या मधोमध \q2 तुझा भयानक मृत्यू होईल. \q1 \v 9 तेव्हा जे लोक तुला मारतात \q2 त्यांच्यादेखत तू म्हणशील काय, “मी देव आहे?” \q1 जे तुझा वध करतात त्यांच्या हातात, \q2 तू केवळ मानव असशील, देव नाही. \q1 \v 10 परकीय लोकांच्या हातून \q2 तू बेसुंती लोकांसारखा मृत्यू पावशील. \m हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात.’ ” \b \p \v 11 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 12 “मानवपुत्रा, सोरच्या राजासाठी विलाप कर आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘तू पूर्णतेची मुद्रा होता, \q2 जो ज्ञानाने भरलेला व सौंदर्याने परिपूर्ण होता. \q1 \v 13 तू एदेन बागेत, \q2 परमेश्वराच्या बागेत होतास; \q1 प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजेच \q2 अलाक, पुष्कराज आणि हिरा, लसणा, \q2 गोमेद, यास्फे आणि नीलमणी, \q2 पाचू, माणिक व रत्ने अशांनी तू सजला होता. \q1 तुझ्या बैठकी व पाटे सोन्याच्या घडल्या होत्या; \q2 तू जन्मला त्याच दिवशी ते तयार केले होते. \q1 \v 14 संरक्षक करूब म्हणून तुला अभिषिक्त केले, \q2 म्हणून मी तुझी नेमणूक केली. \q1 परमेश्वराच्या पवित्र डोंगरावर होता; \q2 आणि तू अग्निपाषाणात फिरत असे. \q1 \v 15 तुझी निर्मिती झाली तेव्हापासून \q2 तुझ्यात दुष्टता आढळली तोपर्यंत \q2 तू तुझ्या मार्गात सरळ होता. \q1 \v 16 तुझ्या विस्तारित व्यापारामुळे \q2 तू आतंकाने भरला \q2 आणि तू पाप केले. \q1 म्हणून लज्जेने मी तुला परमेश्वराच्या डोंगरावरून लोटून दिले, \q2 आणि हे संरक्षक करुबा, \q2 मी तुला अग्निपाषाणातून काढून टाकले. \q1 \v 17 तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे \q2 अहंकारी झाले, \q1 आणि तुझ्या वैभवामुळे \q2 तू तुझ्या ज्ञानाला भ्रष्ट केले. \q1 म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिले; \q2 आणि राजांसमोर मी तुला तमाशा असे केले. \q1 \v 18 तुझ्या पुष्कळ पापाने व खोट्या व्यापारामुळे \q2 तू तुझी पवित्रस्थाने विटाळलीस. \q1 म्हणून तुझ्यातून अग्नी येईल \q2 आणि तुला भस्म करेल असे मी केले, \q1 आणि सर्व बघणार्‍यांच्या देखत \q2 मी तुला राखेत मिळविले. \q1 \v 19 ज्या सर्व राष्ट्रांना तुझी ओळख होती \q2 ते तुला पाहून भयभीत झाले आहेत; \q1 तुझा भयंकर अंत झाला आहे \q2 आणि तुझे अस्तित्व नाहीसे झाले आहे.’ ” \s1 सीदोनविरुद्ध भविष्यवाणी \p \v 20 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 21 “मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख कर; आणि तिच्याविषयी भविष्यवाणी कर \v 22 आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘हे सीदोन नगरी, मी तुझ्याविरुद्ध आहे, \q2 आणि तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन. \q1 जेव्हा मी तुला शिक्षेने पिडेन, \q2 आणि तुझ्यात मी पवित्र मानला जाईन \q2 तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे. \q1 \v 23 मी तुझ्यावर मरी पाठवेन \q2 आणि तुझ्या रस्त्यांवर रक्त वाहवीन. \q1 चहूकडून तुझ्याविरुद्ध चालविलेल्या तलवारीने वधलेले \q2 तुझ्यातच पडतील. \q1 तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \p \v 24 “ ‘इस्राएली लोकांना काटेरी झुडूपांसारखे आणि धारदार काट्यांप्रमाणे द्वेष्ट वृत्ती असलेले शेजारी आणखी नसतील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे. \p \v 25 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक पांगले आहेत तिथून मी त्यांना जेव्हा एकवट करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे राष्ट्रांच्या देखत मी पवित्र मानला जाईन. तेव्हा जो देश मी माझा सेवक याकोबाला देऊ केला होता, ते त्यांच्या त्या स्वदेशात राहतील. \v 26 ते तिथे सुरक्षित राहतील आणि घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. ते सुरक्षित असतील जेव्हा मी त्यांचे शेजारी ज्यांनी माझ्या लोकांची चहाडी केली त्यांना मी दंडाने पिडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.’ ” \c 29 \s1 इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी \s2 फारोहचा न्याय \p \v 1 दहाव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहकडे आपले तोंड कर आणि त्याच्या व सर्व इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी कर. \v 3 त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे, \q2 तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो. \q1 तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे; \q2 तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.” \q1 \v 4 मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन \q2 आणि तुझ्या प्रवाहातील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील असे मी करेन. \q1 मी तुला तुझ्या प्रवाहातून ओढून बाहेर काढेन \q2 आणि त्यातील सर्व मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. \q1 \v 5 मी तुला व तुझ्या प्रवाहातील सर्व माशांना \q2 वाळवंटात सोडून देईन. \q1 तू मोकळ्या मैदानात पडशील \q2 आणि तुला ना कोणी जवळ करणार ना उचलणार. \q1 पृथ्वीवरील प्राणी व आकाशातील पक्ष्यांसाठी \q2 तू खाद्य होशील. \m \v 6 तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे. \b \p “ ‘तू इस्राएल लोकांसाठी बोरूच्या काठीप्रमाणे होतास. \v 7 जेव्हा त्यांनी त्यांच्या हातांनी तुला पकडले, तू त्यांना खरडले व त्यांचे खांदे मोडले; जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तेव्हा तू मोडलास व त्यांच्या कंबरा खचविल्या. \p \v 8 “ ‘यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध तलवार आणेन, मनुष्य व जनावरे या दोघांनाही मारून टाकीन. \v 9 इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. \p “ ‘तू म्हणालास, “नाईल नदी माझी आहे; मी ती निर्माण केली,” \v 10 म्हणून मी तुझ्याविरुद्ध आणि तुझ्या प्रवाहांच्या विरुद्ध आहे आणि मिग्दोलपासून असवानपर्यंत, अगदी कूशच्या\f + \fr 29:10 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa नाईल नदीचा वरचा भाग\fqa*\f* सीमेपर्यंत मी इजिप्त देश ओसाड व वैराण करेन. \v 11 ना कोणी मनुष्य ना पशू त्यामधून जाईल; चाळीस वर्षे तिथे कोणी वस्ती करणार नाही. \v 12 उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन. \p \v 13 “ ‘तरीही, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: चाळीस वर्षे संपल्यावर जिथे ते विखुरले गेले त्या राष्ट्रांमधून इजिप्तच्या लोकांना मी एकवट करेन. \v 14 बंदिवासातून मी त्यांना इजिप्तच्या पथरोस भागात, त्यांच्या पूर्वजांचा देश पत्रोसला\f + \fr 29:14 \fr*\fq पत्रोसला \fq*\ft म्हणजे \ft*\fqa इजिप्तचा दक्षिणेकडील भाग\fqa*\f* परत आणेन, तिथे ते कमी दर्जाचे राज्य होईल. \v 15 ते सर्वात कमी दर्जाचे राज्य असतील आणि कधीही इतर राष्ट्रांच्या वर होणार नाहीत. मी त्याला इतके कमी करेन की ते राष्ट्रांवर पुन्हा राज्य करणार नाही. \v 16 इजिप्त यापुढे इस्राएल लोकांसाठी आणखी आधार नसतील परंतु त्यांच्या पापाची आठवण म्हणून ते त्यांच्याकडे मदतीसाठी जातील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ ” \s2 नबुखद्नेस्सरचे प्रतिफळ \p \v 17 सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 18 “मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही. \v 19 यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल. \v 20 त्याने केलेल्या परिश्रमासाठी मी त्याला इजिप्त देश त्याचे प्रतिफळ म्हणून दिला आहे, कारण त्याने व त्याच्या सैन्याने ते माझ्यासाठी केले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 21 “त्या दिवशी मी इस्राएलच्या घराण्याचे शिंग\f + \fr 29:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa सामर्थ्य\fqa*\f* लांब उगवेन आणि त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.” \c 30 \s2 इजिप्तसाठी विलाप \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘आक्रोश करून सांग, \q2 “त्या दिवसाला हाय हाय!” \q1 \v 3 कारण दिवस जवळ आहे, \q2 याहवेहचा दिवस जवळ आहे; \q1 तो आभाळाचा दिवस, \q2 राष्ट्रांच्या नाशाचा दिवस असेल. \q1 \v 4 इजिप्तविरुद्ध एक तलवार येईल \q2 आणि कूशवर वेदना येतील. \q1 जेव्हा वधलेले इजिप्तमध्ये पडतील, \q2 तिची संपत्ती काढून घेतली जाईल \q2 आणि तिचे पाये मोडून टाकले जातील. \m \v 5 कूश आणि लिबिया, लूद व संपूर्ण अरब, कूब आणि कराराच्या देशाचे लोक इजिप्तबरोबर तलवारीने पडतील. \p \v 6 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील \q2 तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. \q1 मिग्दोलपासून असवानपर्यंत \q2 सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, \q2 असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \q1 \v 7 सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये, \q2 ते ओसाड पडतील, \q1 आणि त्यांची शहरे \q2 उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये पडतील. \q1 \v 8 तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे, \q2 मी जेव्हा इजिप्तला आग लावेन, \q2 तेव्हा तिला मदत करणार्‍यांचाही चुरा होईल. \p \v 9 “ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे. \b \p \v 10 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हातून \q2 मी इजिप्तच्या टोळीचा अंत करेन. \q1 \v 11 तो व त्याचे सैन्य; जे राष्ट्रांमध्ये सर्वाधिक क्रूर आहेत; \q2 त्यांना इजिप्तचा नाश करण्यास आणले जाईल. \q1 ते इजिप्तविरुद्ध त्यांची तलवार उपसतील \q2 आणि वधलेल्यांनी देश भरून टाकतील. \q1 \v 12 नाईल नदीचे पाणी मी आटवून टाकेन \q2 आणि तो देश दुष्ट राष्ट्रांना विकून टाकेन; \q1 विदेशी लोकांच्या हातून \q2 मी तो देश व त्यातील सर्वकाही ओसाड करेन. \m मी याहवेह हे बोललो आहे. \b \p \v 13 “ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात: \q1 “ ‘मी मूर्तींचा नाश करेन \q2 आणि मेम्फीस\f + \fr 30:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa नोफ\fqa*\f* येथील प्रतिमांचा मी शेवट करेन. \q1 इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील, \q2 आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन. \q1 \v 14 इजिप्तचा पथरोस मी उजाड करेन, \q2 सोअन नगराला आग लावेन \q2 आणि नओ\f + \fr 30:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa थेबेस\fqa*\f* नगराला दंड देईन. \q1 \v 15 सीन\f + \fr 30:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa पेलुसीअम\fqa*\f* जो इजिप्तचा बळकट दुर्ग, \q2 यावर मी माझा कोप ओतेन, \q2 आणि नओचे सैन्य नष्ट करेन. \q1 \v 16 मी इजिप्तला आग लावेन; \q2 सीन वेदनांनी तळमळेल. \q1 नओ वादळात उडून जाईल; \q2 मेम्फीस\f + \cat dup\cat*\fr 30:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa नोफ\fqa*\f* सातत्याने कष्टात राहील. \q1 \v 17 ओन\f + \fr 30:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa हेलिओपोलिस\fqa*\f* व पी-बेसेथचे\f + \fr 30:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa बुबास्तिस\fqa*\f* तरुण पुरुष \q2 तलवारीने पडतील, \q2 आणि शहरे बंदिवासात जातील. \q1 \v 18 तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल \q2 जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन; \q2 तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन. \q1 ती ढगांनी झाकली जाईल, \q2 आणि तिची गावे बंदिवासात जातील. \q1 \v 19 याप्रकारे मी इजिप्तवर दंड आणेन \q2 आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ” \s2 फारोहचे हात मोडले जातात \p \v 20 अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 21 “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह याचा हात मी मोडला आहे. तो बरा व्हावा म्हणून त्याला पट्टी बांधली नाही किंवा तलवार धरता येईल इतकी शक्ती मिळावी म्हणून दोरीतही ठेवला नाही. \v 22 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात, मी इजिप्तचा राजा फारोह याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे हात म्हणजे जो अभंग आहे व जो मोडलेला आहे असे दोन्ही हात मोडेन, म्हणजे त्याच्या हातून तलवार गळून पडेल. \v 23 मी इजिप्तच्या लोकांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि इतर देशांमध्ये त्यांना विखरून टाकेन. \v 24 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन आणि माझी तलवार त्याच्या हाती देईन पण फारोहचे हात मोडेन आणि तो बाबेलच्या राजासमोर मरणपंथास टेकलेल्या घायाळ मनुष्याप्रमाणे कण्हेल. \v 25 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन, परंतु फारोहचे हात लुळे पडतील. जेव्हा मी बाबेलच्या राजाच्या हाती माझी तलवार देईन आणि जेव्हा तो ती इजिप्तविरुद्ध चालवील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. \v 26 इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये पांगवेन आणि इतर देशांमध्ये त्यांना विखरेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.” \c 31 \s2 लबानोनच्या तुटलेल्या गंधसरूप्रमाणे फारोह \p \v 1 अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व लोकांना सांग: \q1 “ ‘वैभवाबाबतीत तुझ्याशी कोणाची तुलना होऊ शकते? \q1 \v 3 अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला, \q2 ज्याच्या सुंदर फांद्या जंगलास झाकून देत असत; \q1 तो सर्वात उंच वाढून, \q2 त्याचा शेंडा दाट झाडींच्या वर जातो. \q1 \v 4 पाण्याने त्याला पोषण दिले, \q2 खोल झर्‍यांनी त्याला उंच वाढवले; \q1 त्याचे प्रवाह \q2 त्याच्या सभोवार वाहिले \q1 आणि त्याच्या धारा \q2 रानातील सर्व झाडांपर्यंत पाठविल्या. \q1 \v 5 म्हणून रानातील इतर सर्व झाडांपेक्षा; \q2 ते उंच वाढले. \q1 विपुल पाण्यामुळे \q2 त्याच्या डहाळ्या पसरल्या \q2 व त्याच्या फांद्या लांब वाढल्या. \q1 \v 6 आकाशातील सर्व पक्ष्यांनी \q2 त्याच्या फांद्यांमध्ये घरटी केली, \q1 जंगलातील प्राणी \q2 त्याच्या फांद्यांखाली आपल्या पिलांना जन्म देत असत; \q1 सर्व महान राष्ट्रे \q2 त्याच्या छायेत राहिली. \q1 \v 7 आपल्या पसरलेल्या फांद्या \q2 आणि वैभवाने तो सुंदर होता, \q1 कारण त्याची मुळे \q2 विपुल पाण्याकडे पोहोचली होती. \q1 \v 8 परमेश्वराच्या बागेतील देवदारू \q2 त्याच्याशी तुलना करू शकत नसे, \q1 गंधसरू त्याच्या फांद्यांची \q2 बरोबरी करू शकली नाही, \q1 ना अर्मोनवृक्षाची \q2 त्याच्या डहाळ्यांशी तुलना झाली; \q1 परमेश्वराच्या बागेतील कोणतेही वृक्ष \q2 त्याच्या सौंदर्याशी बरोबरी करू शकत नव्हते. \q1 \v 9 पुष्कळ फांद्यांनी \q2 मी त्याला सुंदर बनविले, \q1 परमेश्वराच्या बागेतील, \q2 एदेन बागेतील झाडे त्याचा हेवा करीत असत. \p \v 10 “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला, \v 11 त्याच्या दुष्टतेनुसार त्याला वागवावे म्हणून मी त्याला राष्ट्रांच्या अधिपतींच्या हातात दिले. मी त्याला सोडून दिले आहे, \v 12 आणि अधिक क्रूर विदेशी राष्ट्रांनी त्याचा छेद करून त्याला टाकून दिले. त्याच्या डहाळ्या डोंगरांवर व दर्‍यांमध्ये पडल्या; त्याच्या फांद्या देशाच्या सर्व झर्‍यांमध्ये तुटून पडल्या. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच्या सावलीतून बाहेर निघाले आणि त्यांनी त्याला टाकून दिले. \v 13 सर्व पक्षी पडलेल्या झाडावर वस्ती करू लागले आणि सर्व जंगली जनावरे त्याच्या फांद्यांमध्ये राहू लागले. \v 14 म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे. \p \v 15 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तो मृतलोकात आणला गेला, त्याच्यासाठी शोक करावा म्हणून खोल समुद्र मी झाकून टाकला; मी त्याचे प्रवाह थांबविले, आणि त्याचे विपुल पाणी मी रोखून ठेवले. त्याच्यामुळे मी लबानोनला दुःखित केले आणि रानातील प्रत्येक झाड वाळून गेले. \v 16 गर्तेत जाणार्‍यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले. \v 17 मोठ्या देवदारूप्रमाणे ते सुद्धा मृतलोकात, राष्ट्रांच्या लोकांमध्ये त्याच्या सावलीखाली राहत होते त्या हत्यारबंदी लोकांबरोबर तलवारीने मारले गेले. \p \v 18 “ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील. \p “ ‘हे फारोह व त्याच्या सैन्याबरोबर घडेल असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \c 32 \s2 फारोहसाठी विलापगीत \p \v 1 बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहसाठी विलाप कर आणि त्याला सांग: \q1 “ ‘राष्ट्रांमध्ये तू सिंहासारखा आहेस; \q2 तू समुद्रातील श्वापदासारखा आहेस, \q1 तुझ्या झर्‍यांमध्ये उसळ्या मारल्यास, \q2 आपल्या पायांनी पाणी घुसळले \q2 आणि झर्‍यात चिखल केलास. \p \v 3 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘लोकांच्या मोठ्या जमावाद्वारे \q2 माझे जाळे मी तुझ्यावर टाकेन, \q2 आणि ते तुला माझ्या जाळ्यात ओढून घेतील. \q1 \v 4 मी तुला जमिनीवर फेकून देईन \q2 आणि उघड्या मैदानात तुला टाकून देईन. \q1 आकाशातील सर्व पक्ष्यांना मी तुझ्यावर वसू देईन \q2 आणि जंगलातील सर्व प्राणी तुला लचके मारून खातील. \q1 \v 5 मी तुझे मांस डोंगरांवर पसरवीन \q2 आणि तुझ्या अवशेषाने खोरे भरेन. \q1 \v 6 तुझ्या वाहत्या रक्ताने \q2 अगदी डोंगरांपर्यंत मी देश भिजवेन \q2 आणि तुझ्या मांसाने ओहोळे भरतील. \q1 \v 7 जेव्हा मी तुझा नाश करेन, मी आकाशे झाकीन \q2 आणि त्यातील तारे अंधुक करेन; \q1 सूर्याला मी ढगांनी आच्छादेन \q2 आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही. \q1 \v 8 आकाशातील प्रत्येक चमकणारी ज्योत \q2 मी तुझ्यावर अंधार अशी करेन; \q2 मी तुझ्या देशावर अंधकार आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \q1 \v 9 जेव्हा जे देश व जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत \q2 त्यात मी तुझा नाश\f + \fr 32:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa राष्ट्रांमध्ये मी तुला बंदिवासात नेईन\fqa*\f* करेन, \q2 तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय कष्टी करेन. \q1 \v 10 अनेक लोक तुझ्याकडे पाहून भयचकित होतील असे मी करेन, \q2 जेव्हा त्यांच्यासमोर मी माझी तलवार चालवेन \q2 तेव्हा त्यांचे राजे तुझ्यामुळे भयाने कापतील, \q1 तुझे पतन होईल त्या दिवशी \q2 सर्वजण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी \q2 भयभीत होतील. \p \v 11 “ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘बाबेलच्या राजाची तलवार \q2 तुझ्याविरुद्ध येईल. \q1 \v 12 राष्ट्रांतील जे सर्वात क्रूर \q2 अशा बलवान मनुष्यांच्या तलवारीने \q2 मी तुझे सैन्य पाडून टाकीन. \q1 इजिप्तचा अहंकार ते मोडून टाकतील, \q2 आणि तिच्या सर्व सैन्यांचा नाश होईल. \q1 \v 13 पाण्याच्या प्रवाहांजवळ असणार्‍या तिच्या सर्व जनावरांचा \q2 मी नाश करेन. \q1 ती पुन्हा कोणत्याही मनुष्याच्या पायांनी तुडविली जाणार नाही \q2 ना पशूंच्या खुरांनी तिथे चिखल होणार. \q1 \v 14 तेव्हा मी तिचे पाणी स्थिर करेन \q2 आणि तिचे प्रवाह तेलाप्रमाणे वाहतील, \q2 असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \q1 \v 15 जेव्हा मी इजिप्त ओसाड करेन \q2 आणि देशात असलेले सर्वकाही काढून घेईन, \q1 जेव्हा तिथे वसत असलेल्या सर्वांचा मी नाश करेन, \q2 तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ \p \v 16 “तिच्यासाठी जे विलापगीत ते गातील ते हेच. राष्ट्रांच्या कन्या हे गातील; इजिप्त व तिच्या सर्व सैन्यासाठी त्या हे गातील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \s2 इजिप्तचे मृतलोकात उतरणे \p \v 17 बाराव्या वर्षी, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 18 “मानवपुत्रा, इजिप्तच्या सैन्यासाठी विलाप कर आणि तिला व शक्तिशाली राष्ट्रांच्या कन्यांना खाली गर्तेत जाणार्‍यांबरोबर पृथ्वीच्या खाली हवाली कर. \v 19 त्यांना सांग, ‘इतरांपेक्षा तू अधिक कृपा पावलेली आहेस काय? तर खाली जा आणि बेसुंत्यांबरोबर जाऊन पड.’ \v 20 जे तलवारीने पडले त्यांच्याबरोबर ते पडतील. तलवार उगारलेली आहे; तिच्या सर्व समूहास ओढून न्या. \v 21 मृतलोकातून इजिप्त व तिचे सहयोगी याबद्दल बलवान पुढारी म्हणतील, ‘ते खाली आले आणि तलवारीने पडलेल्या बेसुंतीबरोबर ते पडले आहेत.’ \p \v 22 “अश्शूर तिच्या संपूर्ण सैन्याबरोबर आहे; तिच्यातील वधलेले, जे तलवारीने पडले आहेत त्यांच्या कबरा तिच्याभोवती आहेत. \v 23 त्यांच्या कबरा खोल गर्तेत आहेत आणि तिचे सैन्य तिच्याच कबरेभोवती पडलेले आहेत. जिवंताच्या भूमीवर ज्यांनी आतंक पसरविला होता त्यांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत. \p \v 24 “एलाम तिथे आहे आणि तिच्याबरोबर तिचे मोठे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. त्या सर्वांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत. ज्या सर्वांनी जिवंताच्या भूमीवर आतंक पसरविला ते पृथ्वीच्या खाली बेसुंत्यांबरोबर अधोलोकात गेले आहेत. जे खाली गर्तेत गेले आहेत, त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत. \v 25 वधलेल्यांबरोबर तिचा बिछाना केलेला आहे आणि तिचे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. ज्यांना तलवारीने वधले आहे, ते सर्व बेसुंती आहेत, कारण जिवंतांच्या भूमीवर त्यांचा आतंक पसरला होता. जे खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत; वधलेल्यांबरोबर त्यांना ठेवले आहे. \p \v 26 “मेशेख व तूबाल तिथे आहेत आणि त्यांचे सैन्य त्यांच्याभोवती आहेत. जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला ते सर्व बेसुंती आहेत, म्हणून ते तलवारीने वधले आहेत. \v 27 परंतु त्यांच्या आधी मेलेल्या दुष्ट पुरातन बेसुंती योद्ध्यांबरोबर\f + \fr 32:27 \fr*\ft किंवा \ft*\fqa सुंता न झालेले\fqa*\f* ते निजलेले नाहीत, जे त्यांच्या युद्धाच्या शस्त्रांसह खाली अधोलोकात गेले; ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली व त्यांच्या ढाली\f + \fr 32:27 \fr*\ft किंवा \ft*\fqa शिक्षा\fqa*\f* त्यांच्या हाडांवर आहेत; या योद्ध्यांनी सुद्धा जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला होता. \p \v 28 “हे फारोह, तू सुद्धा मोडला जाशील व जे तलवारीने वधले आहे, त्या बेसुंत्यांबरोबर जाऊन पडशील. \p \v 29 “एदोम, तिचे राजे व तिचे सर्व राजपुत्र तिथे आहेत, ते बलवान असूनही, जे तलवारीने वधले आहेत ते बेसुंती लोकांबरोबर व जे खाली गर्तेत जातात त्यांच्याबरोबर पडले आहेत. \p \v 30 “उत्तरेकडील सर्व राजपुत्र आणि सर्व सीदोनी लोक तिथे आहेत; त्यांच्या बलाने जरी त्यांनी आतंक पसरविला तरीही ते वधलेल्यांबरोबर अप्रतिष्ठेने खाली गेले. जे तलवारीने वधले आहेत त्यांच्याबरोबर ते बेसुंती पडले आणि गर्तेत गेलेल्यांप्रमाणे ते लज्जित झाले आहेत. \p \v 31 “फारोह व त्याचे सर्व सैन्य त्यांना पाहतील आणि तलवारीने वधलेल्या त्याच्या सर्व सैन्यांसाठी तो सांत्वन पावेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 32 जरी जिवंताच्या भूमीवर फारोहचे भय मी पसरविले होते, तरीही फारोह व त्याचे सर्व सैन्य जे लोक तलवारीने वधलेले, सुंता न झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \c 33 \s1 यहेज्केलच्या पाचारणाचे नवीनीकरण \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, तुझ्या लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा मी एका देशावर तलवार आणतो, तेव्हा त्या देशाचे लोक त्यांच्या लोकांतील एकाची निवड करून त्याची पहारेकरी म्हणून नेमणूक करतात, \v 3 आणि ती तलवार देशावर येत आहे असे पाहताच लोकांना सावध करण्यासाठी तो कर्णा वाजवितो, \v 4 तेव्हा जर कोणी कर्ण्याचा आवाज ऐकूनही इशार्‍याकडे लक्ष देत नाही आणि तलवार येऊन त्यांचा जीव घेते, तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. \v 5 जरी त्यांनी कर्ण्यांचा आवाज ऐकला तरी इशार्‍याकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. जर ते सावध झाले असते, तर त्यांनी स्वतःस वाचविले असते. \v 6 परंतु तलवार येत आहे असे पाहूनही इशारा देण्यासाठी पहारेकरी कर्णा वाजवित नाही आणि तलवार येऊन त्यातील एकाचा जीव घेते, तर त्यांच्या पापामुळे त्या व्यक्तीचा जीव गेला तरी त्यांच्या रक्ताचा जाब मी त्या पहारेकर्‍याकडून घेईन.’ \p \v 7 “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. \v 8 जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘अरे दुष्टा, तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू सांगत नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. \v 9 परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या मार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील, परंतु तू स्वतः वाचशील. \p \v 10 “मानवपुत्रा, इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही असे म्हणता: “आमचे अपराध व पापे आम्हावर भारी आहेत आणि त्यामुळे आम्ही नाश पावत आहोत. मग आम्ही कसे जगू शकतो?” ’ \v 11 त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’ \p \v 12 “म्हणून, हे मानवपुत्रा, तुझ्या लोकांना सांग, ‘एखाद्या नीतिमान व्यक्तीने जर आज्ञाभंग केला, तर त्या व्यक्तीची पूर्वीची नीतिमत्ता मोजण्यात येणार नाही. आणि एखादा दुष्ट पश्चात्ताप करतो, त्या व्यक्तीची पूर्वीची दुष्टता त्याच्यावर दंड आणणार नाही. नीतिमान व्यक्ती जो पाप करतो, तो जरी पूर्वी नीतिमान असला तरी त्याला जगू दिले जाणार नाही.’ \v 13 जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील. \v 14 आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले; \v 15 गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत. \v 16 पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्यांच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जे न्याययुक्त व योग्य ते त्यांनी केले आहे; त्यामुळे ते खचितच जगतील. \p \v 17 “तरी तुझे लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु त्यांचेच मार्ग न्याययुक्त नाहीत. \v 18 जर नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि जे वाईट ते करतात, तर त्यामुळे ते मरतील. \v 19 आणि जर दुष्ट व्यक्ती त्यांच्या दुष्टाईपासून वळतील आणि जे न्याययुक्त व योग्य ते करतील, तर त्यामुळे ते जगतील. \v 20 तरीही तुम्ही इस्राएली लोक म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु तुम्हा सर्वांच्या मार्गांनुसार मी तुमचा न्याय करेन.” \s1 यरुशलेमच्या पतनाचे स्पष्टीकरण \p \v 21 बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, एक मनुष्य जो यरुशलेमहून निसटून आला होता, तो माझ्याकडे येऊन म्हणाला, “शहर पडले आहे!” \v 22 तो मनुष्य आला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, याहवेहचा हात माझ्यावर होता आणि याहवेहने सकाळी तो मनुष्य माझ्याकडे येण्यापूर्वी माझे तोंड उघडले. म्हणून माझे तोंड उघडलेले होते आणि मी आणखी शांत नव्हतो. \p \v 23 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 24 “मानवपुत्रा, इस्राएलात ओसाडीमध्ये राहत असलेले लोक म्हणतात, ‘अब्राहाम केवळ एक मनुष्य होता, तरीही त्याला देश वतन मिळाला. परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत; खचितच हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला आहे.’ \v 25 म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मांसात रक्त असताच तुम्ही ते खाता आणि रक्तपात करत तुमच्या मूर्तींकडे बघता, तर मग तुम्ही या देशाचे वतन मिळविणार काय? \v 26 तुम्ही तुमच्या तलवारीवर भिस्त ठेवता, तुम्ही अमंगळ कृत्ये करता, तुम्हातील प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करतो. तरी तुम्हाला देशाचे वतन मिळावे काय?’ \p \v 27 “त्यांना असे सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जीविताची शपथ, जे ओसाडीमध्ये उरलेले आहेत ते तलवारीने पडतील, जे शहराच्या बाहेर आहेत त्यांना जंगली जनावरांनी खावे म्हणून मी देऊन टाकेन, आणि जे गडात व गुहेत आहेत ते मरीने मरतील. \v 28 मी या देशास वैराण करेन आणि तिच्या अहंकारी बळाचा शेवट होईल आणि इस्राएलचे डोंगर ओसाड पडतील व त्यातून कोणी पार जाणार नाही. \v 29 त्यांनी केलेल्या अमंगळ कृत्यांमुळे जेव्हा मी हा देश ओसाड करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ \p \v 30 “मानवपुत्रा, तुझ्याविषयी म्हटले तर, तुझे लोक भिंतींजवळ व घरांच्या दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत व एकमेकांना म्हणत आहेत, ‘या आणि याहवेहकडून आलेला संदेश ऐका.’ \v 31 नियमाप्रमाणे येतात तसे माझे लोक तुझ्याकडे येतात आणि तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्यासमोर बसतात, परंतु ते त्याप्रमाणे अनुसरण करीत नाहीत. ते मुखाने प्रीतीविषयी बोलतात, परंतु त्यांची हृदये अन्यायाने लाभ मिळविण्यासाठी लोभी आहेत. \v 32 खरोखर, त्यांच्यासाठी तू केवळ मंजूळ आवाजात चांगले वाद्य वाजवित सुंदर प्रेमगीत गाणार्‍या एका मनुष्यासारखा आहेस, कारण ते तुझे वचन तर ऐकतात परंतु त्याचे अनुसरण करीत नाहीत. \p \v 33 “जेव्हा हे सर्वकाही घडेल; आणि ते खचितच घडेल; तेव्हा ते जाणतील की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.” \c 34 \s1 याहवेह इस्राएलचे मेंढपाळ होतील \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर; भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलच्या मेंढपाळांनो तुम्हास धिक्कार असो! तुम्ही केवळ स्वतःविषयी काळजी करता, मेंढपाळांनी आपल्या कळपाची काळजी घेऊ नये काय? \v 3 तुम्ही दही खाता, उत्तम मेंढरे कापून तुम्ही आपल्यावर लोकर पांघरता, परंतु तुम्ही आपल्या कळपाची काळजी घेत नाही. \v 4 तुम्ही अशक्तांस सशक्त केले नाही, ना रोग्याला आरोग्य दिले ना जखमेला पट्टी केली. भटकलेल्यास तुम्ही परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधून आणले नाही. तुम्ही त्यांच्यावर कठोर व क्रूरतेने राज्य केले. \v 5 म्हणून मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची पांगापांग झाली आणि जेव्हा ते पांगले गेले तेव्हा हिंस्र पशूंसाठी भक्ष्य झाले. \v 6 माझी मेंढरे सर्व डोंगरांवर व प्रत्येक उंच पर्वतांवर भटकली. संपूर्ण पृथ्वीभर ते पसरले आणि कोणी त्यांचा शोध केला नाही किंवा त्यांची नोंद घेतली नाही. \p \v 7 “ ‘म्हणून, तुम्ही मेंढपाळांनो, याहवेहचे वचन ऐका: \v 8 सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जीविताची शपथ, माझ्या कळपाला मेंढपाळ नाही आणि म्हणून त्यांची लूट झाली व हिंस्र श्वापदासाठी भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपाचा शोध केला नाही आणि कळपाची काळजी न घेता स्वतःचीच काळजी घेतली, \v 9 म्हणून मेंढपाळांनो, तुम्ही याहवेहचे वचन ऐका: \v 10 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी मेंढपाळांविरुद्ध आहे आणि माझ्या कळपाचा जाब त्यांच्यापासून घेईन. माझा कळप राखण्याचे काम मी त्यांच्यापासून काढून घेईन, म्हणजे मेंढपाळ पुन्हा स्वतःस पोसणार नाही. त्यांच्या तोंडातून मी माझ्या कळपाची सुटका करेन आणि यापुढे ते त्यांचा आहार होणार नाही. \p \v 11 “ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी स्वतः माझ्या मेंढरांचा शोध करेन आणि त्यांची काळजी घेईन. \v 12 मेंढपाळ जेव्हा आपल्या मेंढरांमध्ये राहून पांगलेल्या मेंढरांची काळजी घेतो, तसेच मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन. ढगाळ व अंधकाराच्या दिवसात ते पांगून गेले त्या सर्व ठिकाणातून मी त्यांना सोडवेन. \v 13 राष्ट्रांतून मी त्यांना आणेन आणि देशांमधून त्यांना एकवट करेन आणि मी त्यांना स्वदेशात आणेन. इस्राएलच्या डोंगरांवर, ओहोळात व देशाच्या सर्व वस्त्यांमध्ये मी त्यांना चारीन. \v 14 मी त्यांना उत्तम कुरणात पाळीन आणि इस्राएलच्या डोंगरांचे माथे त्यांची चरण्याची ठिकाणे होतील. तिथे ते चांगल्या कुरणात बसतील आणि तिथे इस्राएलच्या डोंगरांवर सर्वोत्तम कुरणात चरतील. \v 15 मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 16 जे हरवले आहेत त्यांचा शोध मी करेन आणि भटकून गेलेल्यांना मी परत आणेन. जखमी झालेल्यांची पट्टी करेन आणि दुबळ्यांना शक्ती देईन, परंतु पुष्ट व बलवानांना मी नष्ट करेन. मी कळपाला न्यायाने पाळीन. \p \v 17 “ ‘हे माझ्या कळपा, तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एक मेंढरू व दुसरे मेंढरू आणि एडके व बोकडे यामध्ये मी न्याय करेन. \v 18 चांगला चारा तुम्हाला खायला मिळाला ते तुम्हाला पुरेसे नाही काय? तुमचे बाकीचे कुरण तुम्ही तुमच्या पायाखाली तुडवावे काय? तुम्हाला पिण्यास स्वच्छ पाणी मिळाले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? बाकीचे पाणी तुम्ही तुमच्या पायांनी गढूळ करावे काय? \v 19 तुम्ही जे तुमच्या पायाखाली तुडविले ते माझ्या कळपाने खावे काय आणि जे तुमच्या पायांनी तुम्ही गढूळ केले ते पाणी त्यांनी प्यावे काय? \p \v 20 “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह त्यांना म्हणतात: मी स्वतः पुष्ट मेंढरे आणि दुबळी मेंढरे यांच्यात न्याय करेन. \v 21 अशक्त मेंढरांना तुम्ही तुमच्या बाजूंनी व खांद्यांनी धक्के दिले आणि त्यांना तुमच्या शिंगांनी ढकलत बाहेर हाकलून दिले, \v 22 म्हणून मी माझ्या कळपाला वाचवेन आणि त्यांची यापुढे लूट होणार नाही. मी एक मेंढरू व दुसऱ्या मेंढरांमध्ये न्याय करेन. \v 23 मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल. \v 24 मी याहवेह त्यांचा परमेश्वर होईन आणि माझा सेवक दावीद त्यांच्यात राजपुत्र असेल. मी याहवेह हे बोललो आहे. \p \v 25 “ ‘मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन आणि क्रूर श्वापदांपासून देशाची सुटका करेन म्हणजे ते अरण्यात राहू शकतील आणि जंगलात सुरक्षित झोपतील. \v 26 मी त्यांना आणि माझ्या डोंगराभोवती असलेल्या ठिकाणांना आशीर्वाद असे करेन.\f + \fr 34:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa ते व माझ्या डोंगराभोवती असलेले आशीर्वाद असे दिसावे असे मी करेन.\fqa*\f* मी नेमलेल्या ऋतूत पाऊस पाडेन; आशीर्वादाची वृष्टी असेल. \v 27 झाडे त्यांची फळे देतील आणि भूमी तिचे पीक उपजवेल; लोक त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. जेव्हा मी त्यांच्या जोखडाची बंधने तोडेन आणि ज्यांनी त्यांना गुलाम करून घेतले, त्यांच्या हातून त्यांना सोडवेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. \v 28 ते यापुढे राष्ट्रांची लूट होणार नाहीत व हिंस्र पशू त्यांना फाडून खाणार नाहीत. ते सुरक्षिततेत राहतील आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही. \v 29 आपल्या पिकासाठी प्रसिद्ध असणारा देश मी त्यांना देईन आणि यापुढे ते देशात दुष्काळाने पीडित होणार नाहीत किंवा राष्ट्रांची थट्टा त्यांना सोसावी लागणार नाही. \v 30 तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे आणि ते इस्राएली माझे लोक आहेत, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 31 तुम्ही माझी मेंढरे आहात, तुम्ही मानव माझ्या कुरणातील मेंढरे आहात आणि मी तुमचा परमेश्वर आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \c 35 \s1 एदोमविरुद्ध भविष्यवाणी \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, सेईर पर्वताकडे मुख करून त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर \v 3 आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि मी तुझ्याविरुद्ध माझा हात उगारेन आणि तुला ओसाड करेन. \v 4 मी तुझी नगरे निष्फळ करेन आणि तू उजाड होशील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \p \v 5 “ ‘कारण तुझ्याठायी तू निरंतर वैर ठेवले आणि संकटाच्या काळी, जेव्हा त्यांच्या शिक्षाकाळ कळसाला जाऊन पोहोचला, तेव्हा तू इस्राएली लोकांवर तलवार चालविली, \v 6 म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, मी तुला रक्तपाताच्या स्वाधीन करेन आणि रक्तपात तुमचा पाठलाग करेल. कारण तू रक्तपाताचा द्वेष केला नाही, म्हणून रक्तपात तुझा पाठलाग करेल. \v 7 मी सेईर पर्वताला ओसाड करेन आणि जे त्यावरून येणे जाणे करतात त्यांचा मी नाश करेन. \v 8 वधलेल्यांनी मी तुमचे पर्वत भरून टाकीन; जे तलवारीने मारले जातील ते तुझ्या टेकड्यांवर आणि तुझ्या खोर्‍यात आणि तुझ्या ओहोळात पडतील. \v 9 मी तुला कायमचे ओसाड करेन; तुझ्या नगरांत पुन्हा कोणीही वसणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \p \v 10 “ ‘कारण मी याहवेह तिथे होतो तरीही तुम्ही म्हटले, “हे दोन देश व राष्ट्रे आमची होतील आणि आम्ही त्याचे वतन पावू,” \v 11 म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, त्यांच्याप्रीत्यर्थ तुम्ही जो राग व हेवा प्रकट केला त्यानुसार मी तुमच्याशी वागेन आणि जेव्हा मी तुमचा न्याय करेन, तेव्हा मी स्वतःला त्यांच्यामध्ये प्रकट करेन. \v 12 तेव्हा तुम्ही जाणाल मी याहवेहने त्या तिरस्करणीय गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुम्ही इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध उच्चारल्या. तुम्ही म्हटले, “ते उजाड पडले आहेत आणि आम्ही गिळून टाकावे म्हणून त्यांना आमच्या हाती दिले आहे.” \v 13 तुम्ही माझ्याविरुद्ध फुशारकी मारली आणि संयम न ठेवता माझ्याविरुद्ध बोलला आणि ते मी ऐकले. \v 14 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुम्हाला उजाड करेन. \v 15 कारण जेव्हा इस्राएलचे वतन उजाड पडत होते तेव्हा तू हर्ष केला, त्याचप्रमाणे मी तुला वागवेन. हे सेईर पर्वता तू व संपूर्ण एदोम उजाड पडेल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” \c 36 \s1 इस्राएलाच्या पर्वतांसाठी आशा \p \v 1 “मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांना भविष्यवाणी करून सांग, ‘इस्राएलच्या पर्वतांनो, याहवेहचे वचन ऐका. \v 2 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: शत्रूंनी तुम्हाला म्हटले, “अाहा! पुरातन शिखरे आमचे वतन झाले आहे.” ’ \v 3 म्हणून भविष्यवाणी कर आणि सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही बाकीच्या राष्ट्रांचे वतन व्हावे व लोकांच्या द्वेष व निंदेचा विषय व्हावे म्हणून चहूकडून त्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला सर्व बाजूंनी ठेचले आहे, \v 4 यास्तव, इस्राएलच्या पर्वतांनो सार्वभौम याहवेहचे वचन ऐका: पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्‍यांना, ओसाड अवशेष व तुमच्या सभोवती असलेल्या बाकीच्या राष्ट्रांनी लुटून अपमानित केलेल्या उजाड नगरांना सार्वभौम याहवेह असे म्हणतात; \v 5 सार्वभौम याहवेह म्हणतात: माझ्या पेटलेल्या आवेशात बाकी राष्ट्रांच्या विरुद्ध, आणि एदोमविरुद्ध मी बोललो, कारण त्यांच्या हृदयातील उल्हास व द्वेषाने त्यांनी माझ्या देशातील कुरणे लुटावी म्हणून त्याला आपलेच वतन करून घेतले.’ \v 6 म्हणून इस्राएल देशासंबंधी भविष्यवाणी कर आणि पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्‍यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही राष्ट्रांचा अपमान सहन केला म्हणून मी माझ्या ईर्षेच्या क्रोधात बोलतो. \v 7 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या उंचावलेल्या हाताने मी शपथ घेतो की, तुमच्या सभोवती असलेली राष्ट्रे देखील अपमान सहन करतील. \p \v 8 “ ‘पण इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्हावर माझ्या इस्राएली लोकांसाठी फांद्या फुटून फळे येतील, म्हणजे माझे लोक लवकर घरी येतील. \v 9 मी तुझ्याविषयी विचार करतो आणि मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहीन; तुझ्यावर नांगरणी व पेरणी होईल, \v 10 आणि तुझ्यात, होय, सर्व इस्राएलात पुष्कळ लोक वसतील असे मी करेन. नगरे वसतील आणि भग्नावशेष पुन्हा बांधले जातील. \v 11 तुमच्यात राहणार्‍या लोकांची व प्राण्यांची संख्या मी वाढवेन आणि ते फलद्रूप होतील व संख्येने वाढतील. पूर्वीप्रमाणे मी तुझ्यावर लोकांना वसवीन आणि पूर्वीपेक्षा तुझी अधिक समृद्धी करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 12 लोकांनी, माझ्या इस्राएल लोकांनी तुम्हावर वस्ती करावी असे मी करेन. ते तुमचा ताबा घेतील आणि तुम्ही त्यांचे वतन व्हाल; तुम्ही पुन्हा त्यांना लेकरांपासून वंचित करणार नाही. \p \v 13 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण काहीजण तुम्हाला म्हणतात, “तुम्ही लोकांना गिळून टाकता आणि राष्ट्राला लेकरांपासून वंचित ठेवतात,” \v 14 यामुळे यापुढे तुम्ही लोकांना गिळणार नाही, ना राष्ट्राला अपत्यहीन ठेवाल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 15 मी तुम्हाला पुन्हा राष्ट्रांचे टोमणे ऐकू देणार नाही आणि तुम्ही पुन्हा लोकांचा अपमान सहन करणार नाही किंवा तुमच्या राष्ट्राचे पतन होऊ देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ” \s1 इस्राएलची पुनर्स्थापना निश्चित \p \v 16 याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले: \v 17 “मानवपुत्रा, इस्राएली लोक जेव्हा स्वदेशात राहत होते, तेव्हा त्यांनी तो त्यांच्या वर्तनाने व कृत्यांनी भ्रष्ट केला. त्यांची कृत्ये माझ्या दृष्टीत स्त्रियांच्या महिन्याच्या अशुद्धतेप्रमाणे होती. \v 18 म्हणून मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतला कारण त्यांनी देशात रक्तपात केला आणि त्यांनी देशाला त्यांच्या मूर्तींनी विटाळले. \v 19 म्हणून मी त्यांना राष्ट्रांमध्ये विखुरले आणि ते देशांमध्ये पांगले; मी त्यांचा त्यांच्या वर्तनानुसार आणि त्यांच्या कृत्यांनुसार न्याय केला. \v 20 आणि राष्ट्रांमध्ये ते जिथे कुठे गेले त्यांनी माझ्या पवित्र नावाला कलंक लावला, कारण त्यांच्याविषयी असे म्हटले गेले होते, ‘हे याहवेहचे लोक आहेत, तरीही याहवेहचा देश त्यांना सोडावा लागला.’ \v 21 माझ्या पवित्र नावाची मला काळजी होती, जे इस्राएली लोकांनी ते ज्या राष्ट्रांमध्ये गेले तिथे कलंकित केले होते. \p \v 22 “म्हणून इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांनो या गोष्टी मी तुमच्यासाठी नाही, तर जे नाव तुम्ही ज्या राष्ट्रांमध्ये गेला तिथे अपवित्र केले होते त्या माझ्या पवित्र नावासाठी करणार आहे. \v 23 मी माझ्या महान नावाचे पावित्र्य दाखवेन, जे राष्ट्रांमध्ये अपवित्र केले गेले, ते नाव त्यांच्यामध्ये तुम्ही अपवित्र केले आहे. जेव्हा तुमच्याद्वारे त्यांच्या दृष्टीत माझे नाव पवित्र मानले जाईल, तेव्हा राष्ट्रे जाणतील की मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 24 “ ‘कारण मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर काढेन; सर्व देशातून मी तुम्हाला एकवट करेन आणि तुम्हाला तुमच्या स्वदेशात आणेन. \v 25 मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन. \v 26 मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन. \v 27 आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन, तुम्ही माझे विधी आचारावे व माझे नियम काळजीपूर्वक पाळावे म्हणून मी तुम्हाला चालवेन. \v 28 तेव्हा तुमच्या पूर्वजांना जो देश मी देऊ केला त्यात तुम्ही वस्ती कराल; तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन. \v 29 मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून मुक्त करेन. मी धान्यास आज्ञा देईन आणि ते अनेकपट करेन आणि तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही. \v 30 तुमच्या झाडांची फळे व तुमच्या शेतातील पीक मी वाढवेन, यासाठी की तुम्ही दुष्काळामुळे राष्ट्रांमध्ये आणखी अपमान सहन करणार नाही. \v 31 तेव्हा तुम्हाला तुमचे कुमार्ग आणि दुष्कृत्यांची आठवण होईल आणि तुमच्या पापांमुळे व अमंगळ कामांमुळे तुम्हाला तुमचीच किळस वाटेल. \v 32 माझी इच्छा आहे तुम्ही हे जाणावे की हे मी तुमच्यासाठी करीत नाही, सार्वभौम याहवेह जाहीर करतात की अहो इस्राएली लोकांनो तुम्ही आपल्या वर्तनामुळे लाजिरवाणी व कलंकित असावे! \p \v 33 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध करेन, मी तुमची नगरे पुनर्स्थापित करेन आणि उद्ध्वस्त झालेल्याची पुनर्बांधणी करेन. \v 34 येजा करणार्‍यांच्या नजरेसमोर उजाडलेली भूमी वैराण पडण्याऐवजी तिची मशागत होईल. \v 35 ते म्हणतील, “ही भूमी जी ओसाड पडली होती ती एदेन बागेसारखी झाली आहे; शहरे जी उद्ध्वस्त, उजाड व ओसाड पडली होती, ती आता तटबंदीची होऊन त्यात वस्ती झाली आहे.” \v 36 तेव्हा तुमच्या सभोवती उरलेली राष्ट्रे जाणतील की मी याहवेहने उजाड झालेले पुन्हा बांधले आहे आणि ओसाड पडलेले होते त्याची पुन्हा लागवड केली आहे. मी याहवेह हे बोललो आहे, आणि ते मी करणारच.’ \p \v 37 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एकदा पुन्हा मी इस्राएलची विनंती मान्य करेन आणि त्यांच्यासाठी हे करेन: त्यांचे लोक मी मेंढरांसारखे असंख्य करेन, \v 38 तिच्या नेमलेल्या सणांच्या वेळी यरुशलेममध्ये अर्पणासाठी लागतील तेवढे असंख्य कळप मी करेन. म्हणजे पडीक असलेली शहरे लोकांच्या कळपांनी भरतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.” \c 37 \s1 शुष्क हाडांचे खोरे \p \v 1 याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्‍याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते. \v 2 त्याने मला त्यातून चहूकडून फिरविले आणि मी पाहिले की खोर्‍याच्या भूमीवर पुष्कळ हाडे होती, ती हाडे तर शुष्क होती. \v 3 याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?” \p मी म्हणालो, “सार्वभौम याहवेह, ते तर केवळ तुम्हीच जाणता.” \p \v 4 तेव्हा याहवेहने मला म्हटले, “या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका! \v 5 या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास\f + \fr 37:5 \fr*\ft या इब्री शब्दाचा दुसरा अर्थ \ft*\fqa वारा किंवा आत्मा\fqa*\f* घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. \v 6 मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” \p \v 7 तेव्हा मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. आणि मी भविष्यवाणी करीत असता, मोठा आवाज, खडखडाट झाला, तेव्हा एक हाड दुसऱ्या हाडाशी, अशी हाडे एकत्र जडली. \v 8 तेव्हा मी पाहिले, स्नायू आणि मांस त्यांच्यावर आले आणि कातडीने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास नव्हता. \p \v 9 तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ” \v 10 याहवेहने मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली आणि श्वास त्यांच्यात आला; ते जिवंत झाले आणि एक मोठे सैन्य त्यांच्या पायांवर उभे राहिले. \p \v 11 तेव्हा याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे इस्राएली लोक आहेत. ते म्हणतात, ‘आमची हाडे शुष्क झाली आहेत आणि आमची आशा नाहीशी झाली आहे; आम्ही नाश पावलो आहोत.’ \v 12 यास्तव भविष्यवाणी कर आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे; मी तुम्हाला इस्राएल देशात परत आणेन. \v 13 जेव्हा मी तुमच्या कबरा उघडेन आणि त्यातून तुम्हाला बाहेर आणेन तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. \v 14 मी माझा आत्मा तुमच्यात घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात स्थायिक करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह जे बोललो आहे, तेच मी केले आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ ” \s1 एक राष्ट्र, एक राजा \p \v 15 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 16 “मानवपुत्रा, लाकडाची एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘यहूदाह व त्याच्या सोबतीच्या इस्राएली लोकांचे.’ मग लाकडाची आणखी एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘योसेफ (म्हणजेच एफ्राईम) आणि त्याच्या सोबतीच्या सर्व इस्राएली लोकांचे.’ \v 17 या दोन काठ्यांना जोडून ती एक काठी दिसेल अशी ती तुझ्या हातात धर. \p \v 18 “जेव्हा तुझे लोक तुला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे हे तू आम्हाला सांगणार नाही काय?’ \v 19 त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: योसेफाची काठी; जी एफ्राईमच्या हातात आहे तिला व इस्राएलचे जे लोक त्याचे सोबती आहेत, त्यांना मी घेऊन यहूदीयाच्या काठीशी जोडीन. मी त्यांना लाकडाची एक काठी करेन आणि ते माझ्या हातात एक होतील.’ \v 20 ज्या काठ्यांवर तू लिहिले त्या काठ्या त्यांच्या नजरेसमोर धर \v 21 आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोक ज्या राष्ट्रांमध्ये गेले आहेत, तिथून मी त्यांना बाहेर काढेन. चहूकडून मी त्यांना एकवटेन आणि त्यांना स्वदेशात आणेन. \v 22 मी त्यांना या देशात, इस्राएलच्या पर्वतांवर एक राष्ट्र असे करेन. त्या सर्वांवर एक राजा असणार आणि ते यापुढे दोन राष्ट्र नसतील किंवा ते दोन राज्यांमध्ये विभागले जाणार नाहीत. \v 23 आणि ते पुन्हा त्यांच्या मूर्तींनी व अमंगळ प्रतिमांनी किंवा त्यांच्या पातकांनी यापुढे स्वतःला भ्रष्ट करणार नाहीत, कारण त्यांच्या सर्व पापमय घसरणीपासून\f + \fr 37:23 \fr*\ft काही इब्री मूळ प्रतींनुसार \ft*\fqa त्यांची निवासस्थाने जिथून त्यांनी पाप केले.\fqa*\f* मी त्यांना वाचवेन आणि मी त्यांना शुद्ध करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. \p \v 24 “ ‘माझा सेवक दावीद, त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमांचे अनुसरण करतील आणि माझे विधी काळजीपूर्वक पाळतील. \v 25 माझा सेवक याकोबाला मी दिलेल्या देशात, जिथे तुमचे पूर्वज राहिले तिथे ते राहतील. ते व त्यांची लेकरे आणि त्यांच्या लेकरांची लेकरे सर्वकाळ तिथे राहतील आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा राजपुत्र असेल. \v 26 मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन. \v 27 माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील. \v 28 जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ” \c 38 \s1 राष्ट्रांवर याहवेहचा मोठा विजय \p \v 1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: \v 2 “मानवपुत्रा, मागोग देशाचा रोष\f + \fr 38:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa गोगचा राजपुत्र\fqa*\f*, जो मेशेख व तूबाल यांचा राजपुत्र आहे त्याच्याकडे आपले मुख कर व त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर \v 3 आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख व तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष,\f + \fr 38:3 \fr*\ft गोग\ft*\f* मी तुझ्याविरुद्ध आहे. \v 4 मी तुला उपडे पाडेन, तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझे घोडे व संपूर्ण हत्यारबंद असलेले घोडेस्वार आणि मोठ्या व लहान ढाली घेतलेल्या लोकांचा मोठा समूह, सर्व धनुर्धारी यासर्वांसह मी तुला बाहेर काढेन. \v 5 पर्शिया, कूश\f + \fr 38:5 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa नाईल नदीचा वरचा भाग\fqa*\f* आणि पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरटोप यासह त्यांच्याबरोबर असतील. \v 6 गोमेर आपल्या सर्व सैन्यासह आणि उत्तरेकडील बेथ-तोगर्माह आपल्या पूर्ण सैन्यासह—अनेक राष्ट्रे तुझ्याबरोबर बाहेर निघतील. \p \v 7 “ ‘तू व तुझ्याकडे एकत्र झालेला समूह सिद्ध व्हा; तयार राहा आणि त्यांचा नायक हो. \v 8 पुष्कळ दिवस गेल्यानंतर तुला बोलाविण्यात येईल. येत्या काळात जो देश युद्धातून परत आलेला आहे, ज्याचे लोक पुष्कळ राष्ट्रांतून इस्राएलच्या पर्वतांकडे एकत्र केले आहेत. जो पुष्कळ काळ ओसाड पडला होता. त्यांना राष्ट्रांतून बाहेर आणले गेले आणि जे आता सुरक्षिततेत राहतात, तू त्या देशावर आक्रमण करशील. \v 9 तू आणि तुझे सर्व सैन्य व तुझ्याबरोबर अनेक राष्ट्रे वादळाप्रमाणे पुढे जातील; तुम्ही मेघांप्रमाणे देश झाकून टाकाल. \p \v 10 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल. \v 11 तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात. \v 12 मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध\f + \fr 38:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa पृथ्वीचा मध्य\fqa*\f* राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.” \v 13 शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’ \p \v 14 “यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय? \v 15 उत्तरेकडील तुझ्या स्थानातून तू येशील, तू आणि तुझ्याबरोबर पुष्कळ राष्ट्रे, त्यातील प्रत्येक घोड्यावर स्वार असलेले, मोठे दळ, मोठे सैन्य असेल. \v 16 मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील. \p \v 17 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तूच तो आहे, ज्याबद्दल मी पुरातन काळी माझ्या सेवकांद्वारे व इस्राएलच्या संदेष्ट्यांद्वारे बोललो होतो. त्यावेळी त्यांनी पुष्कळ वर्षे भविष्यवाणी केली की मी तुला त्यांच्याविरुद्ध आणेन. \v 18 त्या दिवशी असे होईल: जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करेल, तेव्हा माझा तापलेला क्रोध भडकेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 19 माझी ईर्षा व पेटलेल्या संतापाने मी जाहीर करतो की, त्यावेळी इस्राएल देशात मोठा भूकंप येईल. \v 20 समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रानातील पशू, भूमीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक माझ्या समक्षतेत थरथर कापतील. पर्वत कोसळतील, कडे खचतील आणि प्रत्येक भिंत जमिनीवर पडेल. \v 21 मी गोगविरुद्ध माझ्या सर्व पर्वतांवर तलवार बोलवेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. प्रत्येकाची तलवार आपआपल्या भावाविरुद्ध चालेल. \v 22 मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन. \v 23 अशाप्रकारे मी माझी महानता व पवित्रता दाखवेन, आणि अनेक राष्ट्रांदेखत मी स्वतःस प्रकट करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ \c 39 \p \v 1 “मानवपुत्रा, गोगविरुद्ध भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख आणि तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष\f + \fr 39:1 \fr*\ft गोग\ft*\f*, मी तुझ्याविरुद्ध आहे. \v 2 मी तुला उपडे पाडून तुला ओढत नेईन. मी तुला दूर उत्तरेकडून आणेन आणि इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध पाठवेन. \v 3 मग मी तुझ्या डाव्या हातातला धनुष्य मारीन आणि तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन. \v 4 तू इस्राएलच्या पर्वतांवर पडशील, तू व तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे सुद्धा पडतील. मी तुम्हाला सर्वप्रकारच्या मांसाहारी हिंस्र पक्ष्यांना व हिंस्र पशूंना भक्ष म्हणून देईन. \v 5 तू मोकळ्या रानात पडशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 6 मी मागोगवर आणि समुद्रकिनार्‍यावर सुरक्षितपणे राहणार्‍या लोकांवर अग्नी पाठवेन आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे. \p \v 7 “ ‘माझ्या इस्राएली लोकांमध्ये मी माझे पवित्र नाव प्रकट करेन. यापुढे मी माझ्या पवित्र नावाला कलंकित होऊ देणार नाही आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएलातील पवित्र मीच याहवेह आहे. \v 8 हे येत आहे! हे खचितच घडेल, हा तोच दिवस आहे ज्याबद्दल मी बोललो होतो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 9 “ ‘तेव्हा जे इस्राएलच्या नगरात राहतात ते बाहेर जातील आणि इंधन म्हणून आपली हत्यारे; म्हणजेच लहान व मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, युद्धाच्या बरच्या व भाले जाळतील. ते सात वर्षे इंधनासाठी त्यांचा उपयोग करतील. \v 10 रानातून लाकडे गोळा करण्याची किंवा जंगलातील झाडे तोडण्याची त्यांना गरज नसणार, कारण ते हत्यारांचा उपयोग इंधन म्हणून करतील आणि ज्यांनी त्यांची लूट घेतली त्यांना ते लुटतील आणि ज्यांनी त्यांना लुबाडले, त्यांना ते लुबाडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 11 “ ‘त्या दिवशी मी गोगला इस्राएलमध्ये मृतकांना पुरण्याचे एक ठिकाण देईन, जे समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणार्‍यांच्या खोर्‍यामध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट अडविली जाईल, कारण गोग आणि त्याचे सर्व सैन्य तिथे पुरले जातील. म्हणून त्याला हामोन-गोगचे\f + \fr 39:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa गोगचे सैन्य\fqa*\f* खोरे म्हटले जाईल. \p \v 12 “ ‘देश शुद्ध करण्यासाठी इस्राएली लोक त्या मृतकांना सात महिने पूरत राहतील. \v 13 देशातील सर्व लोक त्यांना पुरतील आणि मी माझे वैभव प्रकट करेन तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 14 देश सातत्याने शुद्ध करण्यासाठी लोकांना कामावर लावले जाईल. ते अजून इतर लोकांबरोबर देशभर पसरतील, जमिनीवर जे मृतदेह पडलेले असतील त्यांना ते पुरतील. \p “ ‘सात महिने संपल्यावर ते अजून बारीक शोध करतील. \v 15 जेव्हा ते देशभर फिरतील, तेव्हा ज्या कोणाला मानवी हाड सापडेल, तिथे ते चिन्ह करून ठेवतील आणि कबर खोदणारे त्यांना हामोन गोगच्या खोर्‍यात, \v 16 जे हामोनाह\f + \fr 39:16 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa समुदाय\fqa*\f* नगरात आहे तिथे पुरेपर्यंत असे होत जाईल. अशाप्रकारे ते देशाला शुद्ध करतील.’ \p \v 17 “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना बोलावून सांग: ‘एकवट व्हा आणि जो यज्ञ, एक मोठा यज्ञ मी इस्राएलच्या पर्वतांवर तयार करीत आहे त्यासाठी चहूकडून एकत्र या. तिथे तुम्ही मांस खाल व रक्त प्याल. \v 18 तुम्ही बलवान पुरुषांचे मांस खाल व पृथ्वीच्या राजपुत्रांचे रक्त प्याल, जणू ते बाशानातील पोसलेले सर्व प्राणी म्हणजेच मेंढे व कोकरे, बोकडे व वासरे आहेत. \v 19 जो यज्ञ मी तुम्हासाठी तयार करीत आहे, त्यात तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल व पिऊन मस्त होईपर्यंत रक्त प्याल. \v 20 माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, बलवान पुरुष आणि सर्वप्रकारच्या सैनिकांना खाऊन तुम्ही तृप्त व्हाल,’ असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 21 “राष्ट्रांमध्ये मी माझे वैभव प्रकट करेन आणि त्यांना मी केलेली शिक्षा आणि मी त्यांच्यावर उगारलेला हात, सर्व राष्ट्रे पाहतील. \v 22 त्या दिवसापासून पुढे इस्राएली लोक जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे. \v 23 आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएली लोक त्यांच्या पापामुळे निर्वासित झाले, कारण ते माझ्याशी अविश्वासू होते. म्हणून त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती सोपविले, आणि ते सर्व तलवारीने पडले. \v 24 त्यांच्या अशुद्धतेनुसार आणि पापांनुसार त्यांच्याशी व्यवहार केला आणि त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले. \p \v 25 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी याकोबाची संपत्ती परत करेन\f + \fr 39:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa याकोबाला निर्वासातून बाहेर आणेन\fqa*\f* आणि इस्राएलच्या सर्व लोकांवर दया करेन आणि माझ्या पवित्र नावासाठी ईर्षा बाळगेन. \v 26 जेव्हा ते त्यांच्या देशात सुरक्षित राहतील आणि त्यांना घाबरविण्यास कोणीही नसेल, तेव्हा त्यांची लज्जा व मला दाखविलेले सर्व अविश्वासूपण ते विसरून जातील. \v 27 जेव्हा मी त्यांना राष्ट्रांतून परत आणेन आणि त्यांच्या शत्रूंच्या देशांमधून त्यांना एकत्र करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे अनेक राष्ट्रांच्या दृष्टीत मी पवित्र मानला जाईन. \v 28 तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, कारण जरी राष्ट्रांमध्ये मी त्यांना निर्वासित असे पाठवले, तरी मी त्यांना त्यांच्या देशात एकत्र करेन, कोणीही मागे सोडला जाणार नाही. \v 29 यापुढे मी आपले मुख त्यांच्यापासून लपवणार नाही, कारण इस्राएली लोकांवर मी माझा आत्मा ओतेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \c 40 \s1 मंदिराच्या क्षेत्राची पुनर्स्थापना \p \v 1 आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले. \v 2 परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या. \v 3 याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता. \v 4 तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.” \s2 बाहेरील अंगणाचे पूर्वेकडील द्वार \p \v 5 मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात\f + \fr 40:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa 3.2 मीटर\fqa*\f* लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती. \p \v 6 मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्‍या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता. \v 7 पहारेकर्‍यांची चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद होती, आणि दोन्ही चौक्यांमध्ये पाच हात\f + \fr 40:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa 2.7 मीटर\fqa*\f* अंतर होते. आणि मंदिरासमोर असलेल्या देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एका मापन-दंडा इतका होता. \p \v 8 त्यानंतर त्याने मापन-दंडाने वेशीच्या देवडीचे माप घेतले; \v 9 ते आठ हात\f + \fr 40:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa 4.2 मीटर\fqa*\f* होते आणि त्याचे खांब दोन हात\f + \fr 40:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa 1 मीटर\fqa*\f* होते. वेशीची देवडी मंदिरासमोर होती. \p \v 10 पूर्वेकडील द्वाराच्या आतून प्रत्येक बाजूला तीन चौक्या होत्या; त्या तीनही एकाच मापाच्या होत्या आणि प्रत्येक बाजूच्या भिंतींचे माप सुद्धा सारखेच होते. \v 11 मग त्याने वेशीच्या प्रवेशद्वाराची रुंदी मापली; ती दहा हात होती आणि त्याची लांबी तेरा हात होती.\f + \fr 40:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa 5.3 रुंदी व 6.9 मीटर लांबी\fqa*\f* \v 12 प्रत्येक चौकीच्या समोर एक हात उंच भिंत होती आणि चौक्या दोन्ही बाजूंनी सहा हात होत्या. \v 13 मग त्याने एका चौकीच्या भिंतीच्या मागच्या बाजूच्या वरपासून दुसर्‍या भिंतीच्या वरपर्यंतचे वेशीचे माप घेतले; त्यातील अंतर एका कठड्यापासून दुसर्‍यापर्यंत पंचवीस हात\f + \fr 40:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa तेरा मीटर\fqa*\f* मापले. \v 14 त्याने वेशीच्या आतील बाजूने भिंतींचे सर्वबाजूंनी माप घेतले ते साठ हात\f + \fr 40:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa 32 मीटर\fqa*\f* होते. हे माप अंगणासमोरील देवडीपर्यंत होते. \v 15 वेशीच्या प्रवेशद्वारापासून तिच्या शेवटच्या देवडीपर्यंत तिचे माप पन्नास हात होते.\f + \fr 40:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa 27 मीटर\fqa*\f* \v 16 वेशीच्या आतील चौक्या आणि भिंतीच्या चहूबाजूंना झरोके असलेले कठडे होते, तसेच देवडींनाही आतील बाजूने झरोके होते. भिंती खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून सजविल्या होते. \s2 बाहेरील अंगण \p \v 17 मग त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले. तिथे अंगणाच्या सभोवती काही खोल्या व बांधलेली पाऊलवाट मी पाहिली; पाऊलवाटेच्या बाजूने तीस खोल्या होत्या. \v 18 त्या खोल्या वेशीच्या बाजूला लागूनच होत्या आणि जितकी त्यांची लांबी तितकीच त्यांची रुंदी होती; ही खालची पाऊलवाट होती. \v 19 मग त्याने खालच्या वेशीच्या आतील बाजूपासून आतील अंगणाच्या बाहेरच्या बाजूपर्यंतच्या अंतराचे माप घेतले; त्याचे माप पूर्वेकडून तसेच उत्तरेकडूनही शंभर हात\f + \fr 40:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa 53 मीटर\fqa*\f* होते. \s2 उत्तरेकडील द्वार \p \v 20 मग त्याने बाहेरील अंगणाकडे जाणाऱ्या उत्तरेकडील द्वाराची लांबी व रुंदी मापली. \v 21 त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन चौक्या होत्या; त्याच्या भिंती आणि देवडीचेही तेच माप होते जे पहिल्या वेशीचे होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते. \v 22 त्याचे झरोके, त्याची देवडी आणि त्याचे खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेली सजावट यांचे माप पूर्वेकडील द्वाराच्या मापाइतकेच होते. त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याची देवडी त्याच्यासमोर होती. \v 23 जसे पूर्वेच्या बाजूने होते तसेच आतील अंगणातही एक द्वार होते जे उत्तरेच्या बाजूने होते. त्याने एका द्वारापासून त्याच्या समोरील द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात मापले. \s2 दक्षिणेकडील द्वार \p \v 24 मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले आणि मी दक्षिणेच्या बाजूला द्वार पाहिले. त्याने त्याच्या खांबांचे व देवडीचे माप घेतले आणि इतर खांब व देवडींप्रमाणेच याचेही माप होते. \v 25 त्याच्या वेशी व देवडींना चहूकडून इतर वेशी व देवड्यांप्रमाणेच अरुंद झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. \v 26 त्याच्यावर जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याच्यासमोर देवडी होती; त्याच्या भिंतींच्या प्रत्येक बाजूला खजुरीच्या झाडाचे कोरीवकाम केलेली सजावट होती. \v 27 आतील अंगणात सुद्धा एक द्वार होते ज्याचे तोंड दक्षिणेच्या बाजूला होते, त्याने या द्वारापासून दक्षिणेच्या बाहेरच्या द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात होते. \s2 आतील अंगणाचे द्वार \p \v 28 त्यानंतर त्या मनुष्याने मला दक्षिणेकडील द्वारातून आतील अंगणात आणले आणि त्याने दक्षिणेकडील द्वार मापले; इतर द्वारांप्रमाणेच त्याचेही माप होते. \v 29 त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती. \v 30 (आतील अंगणाच्या चहूकडून वेशीच्या देवड्या पंचवीस हात रुंद आणि पाच हात खोल होत्या.) \v 31 त्याची देवडी बाहेरील अंगणासमोर होती; खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून त्याच्या खांबांना सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या. \p \v 32 त्यानंतर त्याने मला पूर्वेच्या बाजूने आतील अंगणात आणले, आणि त्याने वेशीचे माप घेतले; इतर वेशींप्रमाणेच हिचेही माप भरले. \v 33 त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती. \v 34 त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या. \p \v 35 नंतर त्याने मला उत्तरेच्या द्वाराकडे आणले व त्याचे माप घेतले. इतरांप्रमाणेच त्याचेही माप भरले. \v 36 त्याप्रमाणेच त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्या होत्या, आणि चहूकडून त्याला झरोके होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते. \v 37 त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या. \s2 अर्पणे तयारीच्या खोल्या \p \v 38 प्रत्येक आतील वेशीच्या देवडीकडे द्वार असलेली खोली होती, जिथे होमार्पणे धुतली जात असत. \v 39 वेशीच्या देवडीमध्ये दोन्ही बाजूंना दोन मेज होते, ज्यावर होमार्पणे, पापार्पणे\f + \fr 40:39 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्धार्पणे\fqa*\f* व दोषार्पणे वधली जात असत. \v 40 वेशीच्या देवडीच्या बाहेरील भिंतीजवळ, उत्तरेच्या वेशीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मेज होते आणि पायर्‍यांच्या दुसर्‍या बाजूने दोन मेज होते. \v 41 म्हणजेच वेशीच्या एका बाजूला चार मेज होते आणि दुसर्‍या बाजूला चार; असे एकूण आठ मेज होते; ज्यावर अर्पणे कापली जात असत. \v 42 होमार्पणासाठी कोरीव दगडाचे अजून चार मेज होते, जे प्रत्येकी दीड हात लांब, दीड हात रुंद आणि एक हात उंच होते.\f + \fr 40:42 \fr*\ft किंवा \ft*\fqa 80 सें.मी. लांबी व रुंदी आणि 53 सें.मी. उंची\fqa*\f* त्या मेजांवर होमार्पणांचा व इतर अर्पणांचा वध करण्यासाठी उपकरणे व पात्रे ठेवण्यात आली होती. \v 43 भिंतीच्या चहूकडून प्रत्येकी चार बोटे\f + \fr 40:43 \fr*\ft सुमारे \ft*\fqa 9 सें.मी.\fqa*\f* असे दुहेरी टोके असलेले आकडे अडकविले होते. ते मेज अर्पणाच्या मांसासाठी होते. \s2 याजकांसाठी खोल्या \p \v 44 आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणाच्या आत दोन खोल्या होत्या. उत्तरेच्या द्वाराजवळ दक्षिणेकडे तोंड केलेली एक खोली तर दुसरी खोली दक्षिणेच्या द्वाराजवळ उत्तरेकडे तोंड केलेली होती. \v 45 तो मनुष्य मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली खोली मंदिराचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे \v 46 आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.” \p \v 47 मग त्याने अंगणाचे माप घेतले: ते चौरस असून दोन्ही बाजूंनी शंभर हात लांब व शंभर हात रुंद होते आणि वेदी मंदिरासमोर होती. \s1 नवीन मंदिर \p \v 48 त्याने मला मंदिराच्या देवडीजवळ आणले आणि देवडीच्या खांबांचे माप घेतले; ते दोन्ही बाजूंनी पाच हात होते. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात\f + \fr 40:48 \fr*\ft किंवा \ft*\fqa 7.4 मीटर\fqa*\f* होती आणि त्याच्या भिंती\f + \fr 40:48 \fr*\ft किंवा \ft*\fqa प्रवेशद्वार\fqa*\f* दोन्ही बाजूंनी तीन हात\f + \fr 40:48 \fr*\ft किंवा \ft*\fqa 1.6 मीटर\fqa*\f* रुंद होत्या. \v 49 देवडी वीस हात\f + \fr 40:49 \fr*\ft किंवा \ft*\fqa 11 मीटर\fqa*\f* रुंद होती, आणि मागून पुढून बारा हात\f + \fr 40:49 \fr*\ft किंवा \ft*\fqa 6.4 मीटर\fqa*\f* होती. त्यावर जाण्यासाठी पुष्कळ पायर्‍या\f + \fr 40:49 \fr*\ft मूळ प्रतींनुसार \ft*\fqa 10 पायर्‍या\fqa*\f* होत्या आणि खांबांच्या प्रत्येक बाजूला खांब होते. \c 41 \p \v 1 नंतर त्या मनुष्याने मला मुख्य दिवाणखान्यात आणले आणि तेथील स्तंभ मापले; प्रत्येक बाजूंनी त्या खांबांची रुंदी सहा हात\f + \fr 41:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa 3.2 मीटर\fqa*\f* होती. \v 2 प्रवेशद्वार दहा हात\f + \fr 41:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa 5.3 मीटर\fqa*\f* रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने पाच हात\f + \fr 41:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa 2.7 मीटर\fqa*\f* होती. त्याने मुख्य दिवाणखाना देखील मापला; तो चाळीस हात लांब आणि वीस हात रुंद\f + \fr 41:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa 21 मीटर लांब आणि 11 मीटर रुंद\fqa*\f* होता. \p \v 3 मग तो आतील पवित्रस्थानात गेला आणि प्रवेशद्वाराच्या खांबांचे माप घेतले; प्रत्येक खांब दोन हात\f + \fr 41:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa 1.1 मीटर\fqa*\f* रुंद होते. प्रवेशद्वार सहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने सात हात\f + \fr 41:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa 3.7 मीटर\fqa*\f* होती. \v 4 आणि त्याने आतील पवित्रस्थानाची लांबी मापली; ती वीस हात होती आणि मुख्य दिवाणखान्याच्या शेवटपर्यंत त्याची रुंदी वीस हात होती. तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान आहे.” \p \v 5 नंतर त्याने मंदिराच्या भिंतीचे माप घेतले; ती सहा हात जाड होती आणि मंदिराच्या सभोवती असलेल्या खोल्या प्रत्येकी चार हात रुंद होत्या.\f + \fr 41:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa 2.1 मीटर\fqa*\f* \v 6 बाजूला असलेल्या खोल्या एकावर एक अशा तीन मजल्यांवर होत्या, प्रत्येक मजल्यावर तीस खोल्या होत्या. बाजूला असलेल्या खोल्यांना आधार असावा म्हणून मंदिराच्या सभोवती असलेल्या भिंतींना फळ्या होत्या, ज्या मंदिराच्या भिंतीमधून टाकल्या गेल्या नव्हत्या. \v 7 मंदिराच्या बाजूस असलेल्या खोल्या प्रत्येक मजल्यावर रुंद होत गेल्या. मंदिराच्या सभोवती असलेली इमारत चढत्या रचनेत बांधली होती, म्हणजे प्रत्येक मजल्यावरील खोल्या त्याच्या खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा रुंद होत्या. सर्वात खालच्या मजल्यापासून मधल्या मजल्यालगत जाऊन, सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पायर्‍या होत्या. \p \v 8 मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता. \v 9 बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंत पाच हात जाड होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्या \v 10 आणि याजकांच्या खोल्यामधील मोकळ्या जागेचे माप मंदिराच्या सभोवती वीस हात रुंद होते. \v 11 त्या मोकळ्या जागेकडून खोल्यांसाठी प्रवेशद्वार होते, एक उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे; आणि मोकळ्या जागेलगत सभोवार असलेला आधार पाच हात रुंद होता. \p \v 12 मंदिराच्या अंगणासमोरील पश्चिमेकडील इमारत सत्तर हात\f + \fr 41:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa 37 मीटर\fqa*\f* रुंद होती. सभोवार त्या इमारतीची भिंत पाच हात जाड होती आणि त्याची लांबी नव्वद हात\f + \fr 41:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa 48 मीटर\fqa*\f* होती. \p \v 13 त्यानंतर त्याने मंदिराचे माप घेतले; ते शंभर हात\f + \fr 41:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa 53 मीटर\fqa*\f* लांब होते आणि मंदिराचे अंगण व त्याच्या भिंतीसह इमारतीची लांबी देखील शंभर हात होती. \v 14 मंदिराच्या समोरच्या बाजूसह, पूर्वेच्या बाजूने मंदिराची रुंदी शंभर हात होती. \p \v 15 नंतर त्याने मंदिराच्या मागच्या बाजूच्या समोरच्या इमारतीची लांबी मापली, ती तिच्या दोन्ही बाजूंच्या सज्ज्यांसह शंभर हात होती. \p मुख्य दिवाणखाना, आतील पवित्रस्थान आणि अंगणासमोरील देवडी, \v 16 त्याचप्रमाणे उंबरठे आणि अरुंद खिडक्या आणि त्या सभोवार असलेले तीनही सज्जे; उंबरठा व त्याच्या पलीकडील सर्वकाही लाकडाने आच्छादले होते—जमीन, खिडक्यापर्यंतच्या भिंती आणि खिडक्या झाकलेल्या होत्या. \v 17 आतील पवित्रस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील वरचा भाग आणि आतील व बाहेरील पवित्रस्थानाच्या सभोवारच्या भिंतीवर टप्या टप्याने \v 18 करूब व खजुरीची झाडे कोरली होती. एका खजुरीच्या झाडानंतर एक करूब कोरले होते. प्रत्येक करुबाला दोन मुखे होती: \v 19 एका खजुरीच्या झाडाकडून मनुष्याचे मुख तर दुसर्‍या खजुरीच्या झाडाकडून सिंहाचे मुख, मंदिरात चोहीकडे ते कोरलेले होते. \v 20 मुख्य दिवाणखान्याच्या भिंतींवर जमिनीपासून प्रवेशद्वाराच्या वरच्या भागापर्यंत करूब आणि खजुरीची झाडे कोरली होती. \p \v 21 मुख्य दिवाणखान्याला चौरस द्वारपट्टी होती आणि ती परमपवित्रस्थानाच्या द्वारपट्टीसारखीच होती. \v 22 तिथे एक लाकडी वेदी होती ती तीन हात\f + \fr 41:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa 1.5 मीटर\fqa*\f* उंच आणि दोन हात लांब होती, तिचे कोपरे, तिची बैठक आणि तिच्या बाजू लाकडाच्या होत्या. तो मनुष्य मला म्हणाला, “हा तोच मेज आहे जो याहवेहसमोर असतो.” \v 23 मुख्य दिवाणखाना आणि परमपवित्रस्थानाला दुहेरी दरवाजे होते. \v 24 प्रत्येक द्वाराला दोन झडपा होत्या; प्रत्येक द्वाराला बिजागरी लावलेल्या दोन झडपा होत्या. \v 25 मुख्य दिवाणखान्याच्या द्वारावर त्यासारखीच करूब व खजुरीची झाडे कोरलेली होती आणि देवडीसमोर लाकडाच्या लोंबत्या तुळया होत्या. \v 26 देवडीच्या बाजूच्या भिंतींवर अरुंद खिडक्या होत्या, ज्यावर प्रत्येक बाजूंनी खजुरीची झाडे कोरली होती. मंदिराच्या बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये सुद्धा लोंबत्या तुळया होत्या. \c 42 \s1 याजकांसाठी खोल्या \p \v 1 मग त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरील अंगणात आणले आणि मंदिराच्या अंगणासमोर व उत्तरेच्या बाहेरील भिंतीच्या समोर असलेल्या खोल्यांमध्ये आणले. \v 2 या इमारतीचे द्वार जे उत्तरेकडे होते त्याची लांबी शंभर हात व रुंदी पन्नास हात होती.\f + \fr 42:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa 53 मीटर लांब व 27 मीटर रुंद\fqa*\f* \v 3 आतील अंगणापासून बाहेरील अंगणाच्या पाऊलवाटेच्या समोरपर्यंत दोन्ही वीस हाताच्या खंडात होते, तीन मजल्यांवर समोरासमोर सज्जे होते. \v 4 खोल्यांच्या समोर आतील मार्ग होता जो दहा हात रुंद आणि शंभर हात लांब होता. त्याच्या उत्तरेच्या बाजूने दरवाजे होते. \v 5 तळ आणि मधल्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा वरील मजल्यावरील खोल्या अरुंद होत्या, कारण सज्ज्यांनी अधिक जागा घेतली होती. \v 6 जसे अंगणात होते तसे वरच्या मजल्याच्या खोल्यांना खांब नव्हते; म्हणून तळ आणि मधल्या मजल्यांपेक्षा त्या मजल्याची जागा कमी होती. \v 7 खोल्या आणि बाहेरील अंगणाला समांतर अशी बाहेरून एक भिंत होती; ती खोल्यांच्या समोर पन्नास हाताइतकी पुढे गेली होती. \v 8 बाहेरील अंगणाच्या बाजूला असलेल्या खोल्यांची रांग पन्नास हात लांब होती आणि पवित्रस्थानाच्या अगदी जवळ असलेल्या खोल्यांची रांग शंभर हात लांब होती. \v 9 बाहेरील अंगणातून तळ मजल्यावरील खोल्यांमध्ये जाण्यार्‍यांसाठी पूर्वेकडून प्रवेशद्वार होते. \p \v 10 दक्षिणेच्या बाजूला बाहेरील अंगणाच्या भिंतीच्या लांबीलगत, मंदिराच्या अंगणाला जोडलेल्या आणि बाहेरील भिंतीसमोर खोल्या होत्या \v 11 ज्यांच्यासमोर एक पाऊलवाट होती. उत्तरेकडे असलेल्या खोल्यांप्रमाणेच या खोल्या होत्या; त्यांची लांबी व रुंदी सारखीच होती आणि बाहेर जाण्याचा मार्ग व त्याचा आकार उत्तरेला असलेल्या दरवाजा सारखाच होता. \v 12 दक्षिणेकडील खोल्यांचाही दरवाजा होता. खोल्यांमध्ये जाण्यास मार्गाच्या सुरुवातीला एक दरवाजा होता, हा मार्ग पूर्वेच्या बाजूने वाढत जाऊन त्या भिंतीला समांतर होत्या. \p \v 13 तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे\f + \fr 42:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्धार्पणे\fqa*\f* आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे. \v 14 जेव्हा कधी याजक पवित्रस्थानात प्रवेश करतात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करतात ती पवित्रस्थानात ठेवल्याशिवाय त्यांनी बाहेरील अंगणात जाऊ नये, कारण ती पवित्र वस्त्रे आहेत. लोकांकडे जाण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी जाण्याअगोदर याजकांनी दुसरी वस्त्रे घालावी.” \p \v 15 मंदिराच्या आतील भागात असलेल्या वस्तूंची मापे घेण्याचे संपविल्यावर, त्याने मला पूर्वेकडील द्वारातून बाहेर आणले आणि सभोवतालचा भाग मापला. \v 16 मापन-दंडाने त्याने पूर्वेकडील भाग मापला; तो पाचशे\f + \fr 42:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa 265 मीटर\fqa*\f* हात होता. \v 17 त्याने उत्तरेकडील भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात भरला. \v 18 त्याने दक्षिणेचा भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात होता. \v 19 मग त्याने वळून पश्चिमेचे माप घेतले; ते मापन-दंडाने पाचशे हात होते. \v 20 याप्रकारे त्याने चारही बाजूंचे माप घेतले. त्याच्याभोवती एक भिंत होती, जी पाचशे हात लांब आणि पाचशे हात रुंद असून पवित्रस्थानाला सर्वसाधारण स्थानापासून वेगळी करीत होती. \c 43 \s1 परमेश्वराचे वैभव मंदिरात परत येते \p \v 1 त्यानंतर त्या मनुष्याने मला पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराकडे आणले \v 2 आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली. \v 3 जो दृष्टान्त मी पाहिला तो त्या दृष्टान्तासारखा होता जेव्हा तो शहरास नष्ट करण्यास आला होता आणि जो दृष्टान्त मी खेबर नदीकिनारी पाहिला होता त्यासारखा होता, तेव्हा मी उपडा पडलो. \v 4 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वारातून याहवेहच्या वैभवाने मंदिरात प्रवेश केला. \v 5 तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात आणले आणि याहवेहच्या वैभवाने मंदिर भरले. \p \v 6 तो मनुष्य माझ्याशेजारी उभा असता, मंदिरातून कोणी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले. \v 7 परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या\f + \fr 43:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa स्मरणार्थ सभा\fqa*\f* अर्पणांद्वारे\f + \fr 43:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांची उच्च स्थाने\fqa*\f* माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत. \v 8 जेव्हा त्यांनी त्यांचे उंबरठे माझ्या उंबरठ्याशेजारी आणि त्यांच्या द्वाराच्या चौकटी माझ्या चौकटीशेजारी उभारल्या, माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती, त्यांच्या अमंगळ कृत्यांनी त्यांनी माझे पवित्र नाव कलंकित केले. म्हणून माझ्या रागाने मी त्यांचा नाश केला. \v 9 आता त्यांनी त्यांची वेश्यावृत्ती आणि त्यांच्या राजांसाठी अंत्यविधीची अर्पणे माझ्यापासून दूर करावी आणि मी सर्वकाळ त्यांच्यामध्ये राहीन. \p \v 10 “मानवपुत्रा, इस्राएलाच्या लोकांना मंदिराविषयी स्पष्ट कर, म्हणजे ते त्यांच्या पापाविषयी लज्जित होतील. त्यांनी त्यांच्या परिपूर्णतेबद्दल विचार करावा, \v 11 आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल जर त्यांना लाज वाटली, तर त्यांना मंदिराच्या आराखड्याबद्दल; म्हणजेच त्याची रचना, बाहेर जाण्याचा व प्रवेश करण्याचा मार्ग; त्याचा संपूर्ण आराखडा आणि त्याचे सर्व विधी नियम याची माहिती दे. ते त्यांच्यासमोर लिही म्हणजे ते त्याच्या आराखड्याशी विश्वासू राहतील आणि त्याचे सर्व नियम पाळतील. \p \v 12 “मंदिराचा हा नियम आहे: पर्वतांच्या माथ्याच्या सभोवतालचा सर्व भाग परमपवित्र असणार. मंदिराचा नियम असाच आहे. \s1 महान वेदीची पुनर्स्थापना \p \v 13 “वेदीच्या लांबीचे हाताने माप याप्रकारे आहेत, म्हणजेच एक हात आणि चार बोटे: त्याच्या तळभागाचे माप एक हात खोल आणि एक हात रुंद होती, त्याचा कड व काठ याचे माप एक वीत होते आणि ही वेदीची उंची होती: \v 14 भूमीवरील तळभागापासून वेदीच्या सभोवतालच्या खालच्या बैठकीपर्यंतची उंची दोन हात आणि बैठक एक हात\f + \fr 43:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa 105 सें.मी.उंच व 53 सें.मी. रुंद\fqa*\f* रुंद आहे. या खालच्या बैठकीपासून वरील बैठकीपर्यंत जे वेदीसभोवती जाते ती चार हात\f + \fr 43:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa 2.1 मीटर उंच\fqa*\f* उंच आणि ती सुद्धा एक हात रुंद आहे. \v 15 त्याच्यावरती, वेदीचा अग्निकुंड चार हात उंच, आणि वेदीच्या अग्निकुंडाला जोडून चार शिंगे वर निघाली होती. \v 16 वेदीचा अग्निकुंड चौरस असून तो बारा हात\f + \fr 43:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa 6.4 मीटर\fqa*\f* लांब आणि बारा हात रुंद आहे. \v 17 वरील बैठक सुद्धा चौरस असून ती चौदा हात\f + \fr 43:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa 7.4 मीटर\fqa*\f* लांब आणि चौदा हात रुंद आहे. वेदीच्या चहूकडील तळभाग एक हात व त्याचा काठ अर्धा हात\f + \fr 43:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa 27 सें.मी.\fqa*\f* आहे. वेदीच्या पायर्‍या पूर्वेकडे आहेत.” \p \v 18 तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे: \v 19 सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 20 तू त्याचे काही रक्त घेऊन वेदीच्या चार शिंगांना आणि वरील बैठकीच्या चारही कोपर्‍यांना आणि काठाला सर्वत्र लावावे आणि याप्रकारे वेदीला शुद्ध करून त्यासाठी प्रायश्चित कर. \v 21 पापार्पणासाठी तू गोर्‍हा घ्यावा आणि पवित्रस्थानाबाहेर मंदिराच्या नेमलेल्या ठिकाणी तो जाळून टाकावा. \p \v 22 “दुसर्‍या दिवशी पापार्पणासाठी निर्दोष बोकड घ्यावा आणि वेदी शुद्ध करावी, ज्याप्रकारे गोर्‍ह्याद्वारे शुद्ध केली होती. \v 23 ती शुद्ध केल्यानंतर, एक गोर्‍हा व मेंढरातील एका मेंढ्याचे अर्पण करावे, ते दोन्ही निर्दोष असावेत. \v 24 त्यांना तू याहवेहसमोर अर्पण करावे आणि याजकांनी त्यांच्यावर मीठ टाकावे आणि होमार्पण म्हणून याहवेहसमोर अर्पण करावे. \p \v 25 “सात दिवस प्रतिदिनी तू एक बोकड पापार्पण म्हणून अर्पण करावा; एक गोर्‍हा व मेंढरातील एक मेंढा आणावा, ते दोन्ही निर्दोष असावेत. \v 26 सात दिवस त्यांनी वेदीसाठी प्रायश्चित करून ती शुद्ध करावी; याप्रकारे ते वेदीचे समर्पण करतील. \v 27 हे दिवस समाप्त झाल्यानंतर, आठव्या दिवसापासून पुढे, याजकांनी तुमची होमार्पणे व शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करावी. तेव्हा मी तुमचा स्वीकार करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.” \c 44 \s1 याजकीयत्वाची पुनर्स्थापना \p \v 1 तेव्हा त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरील द्वाराकडे परत आणले, ज्याचे तोंड पूर्वेकडे होते आणि ते बंद होते. \v 2 याहवेहने मला म्हटले, “हे द्वार बंदच असावे. ते उघडले जाऊ नये; त्यातून कोणीही प्रवेश करू नये. ते बंदच असावे कारण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने त्यातून प्रवेश केला. \v 3 केवळ राजपुत्रच स्वतः द्वारात बसून याहवेहसमोर भोजन करू शकेल. त्याने देवडीच्या द्वारातून आत यावे आणि तिथूनच बाहेर जावे.” \p \v 4 नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडील द्वारातून मंदिरासमोर आणले. तेव्हा मंदिर याहवेहच्या वैभवाने भरत असताना मी पाहिले आणि मी तिथे उपडा पडलो. \p \v 5 याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा, जवळून ऐक आणि याहवेहच्या मंदिराविषयी जे सर्व नियम व सूचना मी तुला सांगतो त्या सर्वांकडे लक्ष दे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांकडे आणि पवित्रस्थानातून बाहेर जाण्याच्या मार्गांकडे लक्ष दे. \v 6 बंडखोर इस्राएलास सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अहो इस्राएली लोकांनो तुम्ही जी अमंगळ कृत्ये केली ती पुरे! \v 7 तुमच्या अमंगळ कृत्यांसह तुम्ही हृदयाने आणि शरीराने बेसुंती असे विदेशी लोक माझ्या पवित्रस्थानात आणले, अन्न, चरबी आणि रक्ताची अर्पणे करून तुम्ही माझे मंदिर भ्रष्ट केले आणि माझा करार मोडला. \v 8 माझ्या पवित्र वस्तूंबाबत तुमची जबाबदारी पार पाडण्याऐवजी, तुम्ही माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये इतरांना सोपविली. \v 9 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हृदयाने व शरीराने बेसुंती असे विदेशी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करणार नाहीत, जे विदेशी इस्राएलात राहतात त्यांनी सुद्धा येऊ नये. \p \v 10 “ ‘इस्राएली लोक बहकले तेव्हा जे लेवी माझ्यापासून भरकटले व दूर गेले आणि त्यांच्या मूर्तींच्या मागे गेले ते त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगतील. \v 11 मंदिराच्या द्वारांवर पहारा करीत तिथे माझ्या पवित्रस्थानात सेवा करू शकतील; लोकांसाठी होमार्पण व यज्ञाचे पशू ते कापतील आणि लोकांपुढे उभे राहून त्यांची सेवा करतील. \v 12 परंतु त्यांनी त्यांच्या मूर्तीसमोर लोकांची सेवा केली आणि इस्राएली लोकांना पाप करण्यास भाग पाडले, म्हणून मी उंचावलेल्या बाहूंनी शपथ घेतली आहे की त्यांनी त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 13 त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करण्यास जवळ येऊ नये किंवा माझ्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या किंवा परमपवित्र अर्पणांच्या जवळ येऊ नये; त्यांनी त्यांच्या अमंगळ कृत्यांची लाज भोगावी. \v 14 मंदिराची राखण करण्यासाठी व तिथे जी सर्व कामे केली जातात त्यावर मी त्यांची नेमणूक करेन. \p \v 15 “ ‘परंतु लेवी गोत्रातील याजक जे सादोकचे वंशज आहेत, इस्राएली लोक माझ्यापासून बहकून गेले होते, तेव्हा ज्यांनी माझ्या पवित्रस्थानाची राखण केली, ते माझ्यासमोर सेवा करण्यास जवळ येतील; चरबी व रक्ताची यज्ञे अर्पिण्यासाठी ते माझ्यासमोर उभे राहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 16 केवळ तेच माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करतील, केवळ तेच माझ्यासमोर सेवा करण्यास माझ्या मेजाजवळ येतील आणि पहारेकरी म्हणून माझी सेवा करतील. \p \v 17 “ ‘ते जेव्हा आतील अंगणाच्या द्वारातून प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे घालावी; आतील अंगणाच्या द्वारात किंवा मंदिरात सेवा करीत असताना त्यांनी कोणतेही लोकरीचे वस्त्र घालू नये. \v 18 त्यांनी आपल्या डोक्यावर तागाचे फेटे आणि आपल्या कंबरेभोवती तागाची अंतर्वस्त्रे घालावी. त्यांना घाम येईल अशी वस्त्रे त्यांनी घालू नये. \v 19 लोक आहेत तिथे बाहेरील अंगणात जेव्हा ते जातात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करीत होते ते काढून पवित्र खोलीत ते ठेवावे आणि दुसरे कपडे घालावे, म्हणजे त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करून लोकांनी पवित्र होऊ नये. \p \v 20 “ ‘त्यांनी आपल्या डोक्यांचे मुंडण करू नये किंवा आपले केस लांब वाढू देऊ नये, परंतु त्यांनी आपल्या डोक्यावरील केस कापावे. \v 21 आतील अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षारस पिऊ नये. \v 22 त्यांनी विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी विवाह करू नये; केवळ इस्राएली गोत्रातील कुमारिकांशी किंवा याजकाच्या विधवेशी विवाह करावा. \v 23 पवित्र व साधारण यातील फरक आणि शुद्ध व अशुद्ध यात कसा फरक करावा हे त्यांनी माझ्या लोकांना शिकवावे. \p \v 24 “ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे. \p \v 25 “ ‘मृत देहाकडे जाऊन याजकाने स्वतःस अशुद्ध करू नये; तरीही ती मृत व्यक्ती जर त्याचा पिता किंवा आई, मुलगा किंवा मुलगी, भाऊ किंवा अविवाहित बहीण असली, तर तो स्वतःस अशुद्ध करू शकतो. \v 26 शुद्धीकरण झाल्यावर त्याने सात दिवस थांबावे. \v 27 ज्या दिवशी पवित्रस्थानात सेवा करण्यास तो आतील अंगणात जातो, तेव्हा त्याने स्वतःसाठी पापार्पण\f + \fr 44:27 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्धीकरणाचे अर्पण\fqa*\f* करावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \p \v 28 “ ‘याजकांचे वतन केवळ मीच आहे. तुम्ही त्यांना इस्राएलमध्ये कोणताही वाटा देऊ नये; मीच त्यांचा वाटा आहे. \v 29 अन्नार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे यातून ते खातील; आणि जे सर्वकाही इस्राएल लोक याहवेहस समर्पित करतात ते याजकांच्या मालकीचे होईल. \v 30 प्रथमफळातील जे सर्वोत्तम आणि तुमच्या सर्व विशेष भेटी याजकांच्या होतील. तुमच्या भूमीतील प्रथम भाग याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराण्यावर आशीर्वाद राहेल. \v 31 मेलेला किंवा हिंस्र पशूने फाडलेला कोणताही मृत पक्षी किंवा पशू याजकांनी खाऊ नये. \c 45 \s1 इस्राएलची संपूर्ण पुनर्स्थापना \p \v 1 “ ‘जेव्हा तुम्ही भूमीची वतन म्हणून वाटणी कराल, तेव्हा तुम्ही भूमीचा एक भाग याहवेहसाठी एक पवित्र प्रदेश म्हणून समर्पित करावा, तो पंचवीस हजार\f + \fr 45:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa 13 कि.मी.\fqa*\f* हात लांब आणि वीस हजार\f + \fr 45:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa 11 कि.मी.\fqa*\f* हात रुंद असावा; तो संपूर्ण भाग पवित्र असावा. \v 2 यामधून, पाचशे हात\f + \fr 45:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa 265 मीटर\fqa*\f* समचौरस पवित्रस्थानासाठी असावा, आणि त्याच्याभोवती पन्नास हात\f + \fr 45:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa 27 मीटर\fqa*\f* मोकळी जागा सोडावी. \v 3 या पवित्र प्रदेशात, पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असा भाग मोजून घे. त्यात पवित्रस्थान, परमपवित्रस्थान असेल. \v 4 याजक जे पवित्रस्थानात सेवा करतात आणि याहवेहसमोर सेवा करण्यास जे जवळ येतात त्या याजकांसाठी भूमीचा हा भाग पवित्र असेल. त्याचप्रमाणे हे ठिकाण त्यांच्या घरांसाठी आणि पवित्रस्थानासाठी पवित्र ठिकाण असे असावे. \v 5 पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असलेला हा भाग, जे लेवी लोक मंदिरात सेवा करतात त्यांच्यासाठी त्यांचे वतन म्हणून त्यांना राहण्यासाठी नगरे अशी असतील.\f + \fr 45:5 \fr*\ft इब्री मूळ प्रतींनुसार \ft*\fqa 20 खोल्या त्यांचे वतन असे असणार\fqa*\f* \p \v 6 “ ‘पवित्र प्रदेशाला लागून पाच हजार हात रुंदीचा आणि पंचवीस हजार हात लांबीचा जो भाग आहे तो तुम्ही शहराची मालमत्ता म्हणून द्यावी; ती सर्व इस्राएलच्या हक्काची असणार. \p \v 7 “ ‘पवित्र प्रदेशाच्या भोवती व शहराची मालमत्ता याला लागून प्रत्येक बाजूची सीमा राजपुत्राची असेल. तिचा विस्तार पश्चिमेपासून पश्चिमेकडे आणि पूर्वेकडून पूर्वेकडे असून त्याची लांबी पश्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत एका गोत्राच्या भागाच्या समांतर अशी असेल. \v 8 ही भूमी इस्राएलमध्ये राजपुत्राचे वतन असेल. आणि यापुढे माझे राजपुत्र माझ्या इस्राएली लोकांवर अत्याचार करणार नाहीत, तर इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार देशाचे वतन घेऊ देतील. \p \v 9 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 10 तुम्ही अचूक काटा, अचूक एफाह\f + \fr 45:10 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa एक कोरडे माप घेण्याचे साधन ज्याची क्षमता 22 लीटरची होती.\fqa*\f* आणि अचूक बथ\f + \fr 45:10 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa एक द्रव पदार्थ मापण्याचे साधन ज्याची क्षमता 22 लीटरची होती.\fqa*\f* वापरावा. \v 11 एफाह आणि बथ एकाच मापाचे असावे, म्हणजे बथमध्ये होमेरचा दहावा भाग व एफाहमध्ये होमेरचा दहावा भाग असावा; होमेर हे दोन्ही मापांसाठी एकच माप असावे. \v 12 शेकेलमध्ये\f + \fr 45:12 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa 12 ग्रॅ.\fqa*\f* वीस गेराह असावे. वीस शेकेल आणि पंचवीस शेकेल आणि पंधरा शेकेल हे एक मीना\f + \fr 45:12 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa 60 शेकेल, पण साधारण मीना 50 शेकेल असे, 1 मीनाचे वजन 690 ग्रॅ.\fqa*\f* समान आहेत. \p \v 13 “ ‘तुम्ही अर्पण करावी ती विशेष भेट ही आहे: गव्हाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा\f + \fr 45:13 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa 2.7 कि.ग्रॅ.\fqa*\f* सहावा भाग आणि जवाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा\f + \fr 45:13 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa 2.3 कि.ग्रॅ.\fqa*\f* सहावा भाग. \v 14 बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत). \v 15 इस्राएलमधील पुष्कळ पाणी असलेल्या कुरणातील कळपातून दोनशे मेंढरांमागे एक मेंढरू द्यावे. याचा उपयोग लोकांचे प्रायश्चित करावे म्हणून धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे यासाठी केला जावा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \v 16 देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे. \v 17 हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे. \p \v 18 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक निर्दोष गोर्‍हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे. \v 19 याजकाने पापार्पणातील काही रक्त घेऊन मंदिराच्या द्वार पट्टीवर, वेदीच्या वरील बैठकीच्या चार कोपर्‍यांना आणि आतील अंगणाच्या द्वार पाट्यांवर लावावे. \v 20 त्याचप्रमाणे सातव्या दिवशी तुम्ही तसेच करावे जर कोणी नकळत भोळेपणाने किंवा अज्ञानात पाप केले; तर मंदिरासाठी तुम्ही ते प्रायश्चित करावे. \p \v 21 “ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडण सण पाळावा, तो सण सात दिवसांचा असावा, त्यात तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. \v 22 त्या दिवशी राजपुत्राने स्वतःसाठी व देशातील सर्व लोकांच्या पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा. \v 23 सणाच्या सात दिवसाच्या दरम्यान दररोज त्याने सात निर्दोष गोर्‍हे व सात एडके होमार्पण म्हणून याहवेहसमोर आणावे, त्याचप्रमाणे पापार्पणासाठी एक बोकड आणावे. \v 24 धान्यार्पण म्हणून त्याने प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर एक एफाह व एका मेंढ्याबरोबर एक एफाह द्यावा, त्याचबरोबर एका एफाहमागे एक हीन\f + \fr 45:24 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa 3.8 लीटर\fqa*\f* जैतुनाचे तेल आणावे. \p \v 25 “ ‘त्याचप्रमाणे सात दिवसांच्या सणाच्या दरम्यान, ज्याची सुरुवात सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी होते, त्याने पापार्पणे, होमार्पणे व धान्यार्पणे आणि तेल आणावे. \c 46 \p \v 1 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: आतील अंगणाचे पूर्वेकडील द्वार कार्याच्या सर्व सहा दिवसा दरम्यान बंद असावे, परंतु शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी ते उघडे असावे. \v 2 राजपुत्राने बाहेरून द्वाराच्या देवडीकडून जाणार्‍या मार्गाने प्रवेश करावा आणि चौकीकडे उभे राहावे. याजकांनी राजपुत्राच्या होमार्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञ करावा. त्याने द्वाराच्या उंबरठ्यावर उपासना करीत नमन करावे आणि त्यानंतर बाहेर जावे, परंतु संध्याकाळपर्यंत द्वार बंद करू नये. \v 3 शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी. \v 4 शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे. \v 5 एका एडक्यासह दिलेले अन्नार्पण एक एफाह असावे आणि कोकर्‍याबरोबरचे धान्य त्याच्या आवडीनुसार एका एफाहसाठी एक हीन जैतून तेलाबरोबर द्यावे. \v 6 अमावस्येच्या दिवशी त्याने एक गोर्‍हा, सहा कोकरे आणि एक एडका हे द्यावे, ते सर्व निर्दोष असावे. \v 7 त्याने एका गोर्‍ह्यामागे एक एफाह व एका एडक्यामागे एक एफाह असे धान्यार्पण आणावे, आणि कोकर्‍याबरोबर आपल्या आवडीनुसार एक एफाह एक हीन तेलाबरोबर आणावे. \v 8 जेव्हा राजपुत्र प्रवेश करतो, त्याने द्वाराच्या देवडीकडील मार्गाने जावे आणि त्याच मार्गाने त्याने परत यावे. \p \v 9 “ ‘नेमलेल्या सणाच्या वेळी जेव्हा देशातील लोक याहवेहसमोर येतात, तेव्हा जो कोणी उपासना करण्यासाठी उत्तरेकडील द्वाराने आत येईल, त्याने दक्षिणेकडील द्वाराने बाहेर जावे; आणि जो कोणी दक्षिणेकडील द्वाराने आत येईल त्याने उत्तरेकडील द्वाराने बाहेर जावे. ज्या द्वाराने ते आत आले त्या द्वाराने कोणीही परत जाऊ नये, तर त्यांनी त्या समोरच्या द्वाराने जावे. \v 10 राजपुत्राने देखील त्यांच्यासोबतच असावे, म्हणजेच लोक जेव्हा आत जातील तेव्हा आत जावे आणि बाहेर जातील तेव्हा त्यानेही बाहेर जावे. \v 11 मेजवान्या आणि नेमलेल्या सणांच्या वेळी, एका गोर्‍ह्यामागे एक एफाह, एका एडक्यामागे एक एफाह आणि कोकर्‍यांबरोबर त्याला आवडेल त्याप्रमाणे धान्य आणावे आणि एका एफाहमागे एक हीन तेल आणावे. \p \v 12 “ ‘जेव्हा राजपुत्र याहवेहला स्वैच्छिक अर्पण आणतो; ते होमार्पण असो वा शांत्यर्पण; त्याच्यासाठी पूर्वेकडील द्वार उघडावे. तो करतो त्याचप्रमाणे त्याचे होमार्पण किंवा शांत्यर्पण तो शब्बाथ दिवशी करेल. मग तो बाहेर जाईल आणि तो बाहेर गेल्यानंतर, द्वार बंद केले जाईल. \p \v 13 “ ‘तुम्ही दररोज एक वर्षाचे निर्दोष कोकरू होमार्पण म्हणून याहवेहला अर्पण करावे; तुम्ही ते दररोज सकाळी करावे. \v 14 तसेच त्याबरोबर रोज सकाळी एका एफाहचा सहावा भाग\f + \fr 46:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa 2.7 कि.ग्रॅ.\fqa*\f* व पीठ भिजवण्यासाठी हिनाचा तिसरा भाग\f + \fr 46:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa 1.3 लीटर\fqa*\f* धान्यार्पण म्हणून आणावे. याहवेहसमोर हे धान्यार्पण सादर करण्याचा नियम सर्वकाळासाठी असावा. \v 15 याप्रमाणे दररोज सकाळी नियमित होमार्पणासाठी कोकरू आणि धान्यार्पण आणि तेल आणावे. \p \v 16 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जर राजपुत्राने त्याच्या एका मुलासाठी आपल्या वतनातून काही भेट म्हणून दिली, ती त्याच्या वंशजांच्या मालकीची होईल; वारसानुसार ती त्यांची मालमत्ता होईल. \v 17 तथापि, जर त्याने आपल्या वतनातून त्याच्या एखाद्या चाकराला काही भेट म्हणून दिले, तो चाकर स्वतंत्र होण्याच्या वर्षापर्यंत ती भेट ठेवू शकतो; मग ती पुन्हा राजपुत्राची होईल. राजपुत्राचे वतन केवळ त्याच्या मुलांच्याच मालकीचे आहे; ते त्यांचेच आहे. \v 18 राजपुत्राने लोकांच्या वतनातून काही घेऊ नये, त्यांची मालमत्ता त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये. त्याने त्याच्या मुलांना त्यांचा वाटा स्वतःच्या मालमत्तेतून द्यावा, म्हणजे माझ्या लोकांतून कोणीही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित केला जाणार नाही.’ ” \p \v 19 त्यानंतर त्या मनुष्याने मला बाजूच्या द्वाराच्या प्रवेशद्वाराने उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकांच्या पवित्र खोल्यांकडे आणले आणि पश्चिमेच्या शेवटाकडे असलेली एक जागा दाखविली. \v 20 तो मला म्हणाला, “हे ते ठिकाण आहे जिथे याजकांनी दोषार्पण व पापार्पण शिजवावे आणि धान्यार्पण भाजावे, यामुळे बाहेरील अंगणात आणणे व लोकांना शुद्ध करण्याचे टाळता येईल.” \p \v 21 नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याच्या चारही कोपऱ्यातून फिरविले आणि प्रत्येक कोपर्‍यात आणखी एक अंगण मी पाहिले. \v 22 बाहेरील अंगणाच्या चार कोपर्‍यात चाळीस हात लांब आणि तीस हात रुंद\f + \fr 46:22 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa 21 मीटर लांब आणि 16 मीटर रुंद\fqa*\f* अंगणे मला दिसली; चार कोपर्‍यातील प्रत्येक अंगण एकाच मापाचे होते. \v 23 प्रत्येक अंगणाच्या आतील बाजूच्या कडेला दगडाची रांग होती, त्या काठांच्या खाली विस्तवासाठी चुली बांधलेल्या होत्या. \v 24 तो मला म्हणाला, “या स्वयंपाकाच्या खोल्या आहेत जिथे मंदिरात सेवा करीत असलेल्या याजकांनी लोकांसाठी करीत असलेली अर्पणे शिजवावी.” \c 47 \s1 मंदिरातून वाहत येणारी नदी \p \v 1 त्या मनुष्याने मला परत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आणले आणि मी मंदिराच्या उंबरठ्याखालून पूर्वेकडे पाणी बाहेर येत असताना पाहिले (कारण मंदिराचे तोंड पूर्वेकडे होते). मंदिराच्या दक्षिणेकडून, वेदीच्या दक्षिणेकडून पाणी खाली येत होते. \v 2 मग त्याने मला उत्तरेकडील द्वाराने बाहेर आणले, पूर्वेकडे तोंड असलेल्या बाहेरील द्वाराच्या सभोवार फिरविले, आणि पाण्याचे थेंब दक्षिणेच्या बाजूने पडत होते. \p \v 3 तो मनुष्य आपल्या हातात मापनदोरी घेऊन पूर्वेच्या दिशेने गेला, त्याने एक हजार हात\f + \fr 47:3 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa 530 मीटर\fqa*\f* मापले आणि घोट्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले. \v 4 त्याने आणखी हजार हात मापले आणि गुडघ्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले. त्याने आणखी हजार हात मापले आणि कंबरेपर्यंत खोल पाण्यातून मला नेले. \v 5 त्याने आणखी हजार हात मापले, परंतु आता ती अशी नदी होती जी मी पार करू शकलो नाही, कारण पोहून जाता येईल इतके ते पाणी वाढले होते; अशी नदी जी कोणीही पार करू शकत नव्हते. \v 6 त्याने मला विचारले, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय?” \p मग त्याने मला परत नदीच्या किनारी नेले. \v 7 जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा नदीच्या दोन्ही बाजूंना मी पुष्कळ झाडे पाहिली. \v 8 तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहत जाऊन खाली अराबाहमध्ये\f + \fr 47:8 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa यार्देनचे खोरे\fqa*\f* जाते, तिथे ते मृत समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा ते समुद्रात जाते, तेव्हा खारट पाणी गोड होते. \v 9 जिथे पाणी वाहील, तिथे जिवंत प्राण्यांचे थवे राहतील. तिथे पुष्कळ मासे असतील, कारण ते पाणी तिथे वाहत जाऊन खारट पाणी गोड करते; म्हणून जिथे नदी वाहते तिथे सर्वकाही जिवंत राहेल. \v 10 तिच्या किनारी मासेमारी करणारे उभे राहतील; एन-गेदीपासून एन-एग्लाइमपर्यंत जाळे पसरविण्यासाठी जागा असेल. भूमध्य समुद्रातील माशांप्रमाणे तिथे पुष्कळ प्रकारचे मासे असतील. \v 11 परंतु पानथळ आणि दलदल शुद्ध होणार नाही; ते खारटच राहतील. \v 12 नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.” \s1 देशाच्या सीमा \p \v 13 सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “देशाच्या या सीमा आहेत, जेव्हा इस्राएलच्या बारा गोत्रांना त्यांचे वतन म्हणून या देशाची तू विभागणी करशील, त्यात दोन भाग योसेफाचे असतील. \v 14 त्यांच्यात तो देश तू समानतेने वाटावा. कारण मी हात उंच करून शपथ घेतली होती की, मी हा देश तुमच्या पूर्वजांना देईन, हा देश तुमचे वतन होईल. \b \lh \v 15 “देशाची सीमा ही असावी: \b \li1 “उत्तरेस ती भूमध्य समुद्राकडून हेथलोन मार्गापलिकडे लबो-हमाथ पासून जेदादपर्यंत असेल, \v 16 बेरोथाह व सिबराईमपासून (जी दिमिष्क व हमाथाच्या मध्ये आहे), हाजेर-हत्तीकोनपर्यंत, जे हवरानच्या सीमेवर आहे. \v 17 ही सीमा समुद्रापासून हाजार-एनानपर्यंत\f + \fr 47:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa एनोन\fqa*\f* वाढेल, जी दिमिष्कच्या उत्तरेच्या सीमेपर्यंत असेल व उत्तरेस हमाथची सीमा आहे. ही उत्तरेची सीमा आहे. \li1 \v 18 पूर्वेकडील सीमा हवरान व दिमिष्कमधून जात, यार्देन नदीच्या बाजूने गिलआद व इस्राएल देशातून, मृत समुद्रापर्यंत जाईल आणि पुढे तामारपर्यंत. ही पूर्वेकडील सीमा. \li1 \v 19 दक्षिणेच्या बाजूने वतनसीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत असेल व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत. ही दक्षिणेकडील सीमा. \li1 \v 20 पश्चिमेच्या बाजूने भूमध्य समुद्रापासून लेबो हमाथाच्या समोरच्या भागापर्यंत. ही पश्चिमेकडील सीमा. \b \p \v 21 “इस्राएलच्या गोत्रानुसार हा देश तुम्ही आपसात वाटून घ्या. \v 22 तुम्ही तो तुमच्यासाठी व तुमच्यात राहणार्‍या विदेशी लोकांमध्ये व ज्यांना लेकरे आहेत, त्यांच्यासाठी वतन म्हणून वाटायचे आहे. तुम्ही त्यांना देशात जन्मलेल्या इस्राएली लोकांप्रमाणेच समजले पाहिजे; तुमच्याबरोबर त्यांनाही इस्राएलच्या गोत्रांमध्ये वतन वाटून द्यावे. \v 23 कोणत्याही गोत्रांमध्ये विदेशी राहत असेल, तिथे तू त्यांना त्यांचे वतन द्यावे,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \c 48 \s1 भूमीची विभागणी \lh \v 1 “यादीत दिलेल्या गोत्रांची नावे ही: \b \li1 “उत्तरेकडील सीमेपासून दानला एक भाग असेल; तो हेथलोन मार्गापासून लेबो हमाथ, हाजार-एनानपर्यंत आणि हमाथ आणि हमाथनंतरची दिमिष्काची उत्तरेकडील सीमा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत. \li1 \v 2 दानच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा आशेरचा एक भाग असेल. \li1 \v 3 आशेरच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा नफतालीचा एक भाग असेल. \li1 \v 4 नफतालीच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मनश्शेहचा एक भाग असेल. \li1 \v 5 मनश्शेहच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एफ्राईमचा एक भाग असेल. \li1 \v 6 एफ्राईमच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रऊबेनचा एक भाग असेल. \li1 \v 7 रऊबेनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत यहूदाहचा एक भाग असेल. \b \p \v 8 “यहूदीयाच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भाग तू विशेष भेट म्हणून द्यावा. तो पंचवीस हजार हात\f + \fr 48:8 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa 13 कि.मी.\fqa*\f* रुंद, आणि त्याची लांबी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत इतर गोत्रांना दिलेल्या भागासमान असावी; त्याच्या मधोमध पवित्रस्थान असेल. \p \v 9 “जो विशेष भाग तू याहवेहस अर्पण करावयाचा आहे, तो पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात\f + \fr 48:9 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa 5.3 कि.मी.\fqa*\f* रुंद असावा. \v 10 याजकांसाठी हा पवित्र भाग असणार. उत्तरेस त्याची लांबी पंचवीस हजार हात, पश्चिमेकडून रुंदी दहा हजार हात, पूर्वेकडून रुंदी दहा हजार हात आणि दक्षिणेकडून लांबी पंचवीस हजार हात. त्याच्या मधोमध याहवेहचे पवित्रस्थान असावे. \v 11 सादोकाच्या संतानातील पवित्र केलेले याजक, जे माझी सेवा करण्यात विश्वासू होते आणि जेव्हा इस्राएली लोक बहकून गेले, तेव्हा जसे लेवी लोक बहकले, तसे ते बहकले नाही. \v 12 देशाच्या पवित्र भागातून त्यांच्यासाठी ही एक विशेष भेट असेल, तो लेवी लोकांच्या सीमेला लागून आहे. \p \v 13 “याजकांच्या सीमेस लागून लेवी लोकांसाठी पंचवीस हजार हात लांबीचा व दहा हजार हात रुंदीचा प्रदेश द्यावा. त्याची एकूण लांबी पंचवीस हजार हात आणि रुंदी दहा हजार हात असावी. \v 14 त्यातील काहीही त्यांनी विकू नये किंवा बदलू नये. ही सर्वोत्तम भूमी आहे ती दुसर्‍या कोणाच्या हाती जाऊ देऊ नये, कारण ती याहवेहसाठी पवित्र आहे. \p \v 15 “उरलेला विभाग, जो पाच हजार हात\f + \fr 48:15 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa 2.7 कि.मी.\fqa*\f* रुंदीचा आणि पंचवीस हजार हात लांबीचा आहे, तो शहराच्या सर्वसाधारण उपयोगासाठी म्हणजेच घरे आणि कुरणे यासाठी असेल. त्याच्या मधोमध शहर वसणार \v 16 आणि त्याचे माप असे असावे: उत्तरेची बाजू चार हजार पाचशे हात,\f + \fr 48:16 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa सुमारे 2.4 कि.मी.\fqa*\f* दक्षिणेची बाजू चार हजार पाचशे हात आणि पश्चिमेची बाजू चार हजार पाचशे हात. \v 17 शहराचे कुरण उत्तरेकडे दोनशे पन्नास हात\f + \fr 48:17 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa 135 मीटर\fqa*\f* दक्षिणेकडे दोनशे पन्नास हात पूर्वेकडे दोनशे पन्नास हात व पश्चिमेकडे दोनशे पन्नास हात असावे. \v 18 पवित्र भागाच्या सीमेला लागून जो उरलेला भाग जो त्याच्याच लांबीचा आहे, तो पूर्वेकडून दहा हजार हात आणि पश्चिमेकडून दहा हजार हात आहे. त्या भूमीचे उत्पन्न शहरातील काम करणार्‍यांसाठी अन्न होईल. \v 19 शहरातील शेतीकाम करणारे कामकरी इस्राएलच्या सर्व गोत्रातील असतील. \v 20 तो संपूर्ण भाग चौरस असून प्रत्येक बाजूने पंचवीस हजार हात असेल. एक विशेष भेट म्हणून हा पवित्र भाग शहराच्या मालमत्तेपासून वेगळा ठेवावा. \p \v 21 “पवित्र भागाच्या दोन्ही बाजूला जो उरलेला भाग आहे तो आणि शहराची मालमत्ता राजपुत्राच्या हक्काची असेल. पवित्र भागाच्या पंचवीस हजार हाताच्या पूर्वेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत आणि पंचवीस हजार हाताच्या पश्चिमेपासून पश्चिमेच्या सीमेपर्यंत वाढेल. हे दोन्ही भाग जे इस्राएलच्या गोत्रांच्या भागाच्या लांबीइतकेच आहे, ते राजपुत्राच्या हक्काचे होतील आणि मंदिराच्या पवित्रस्थानासहित पवित्र भाग या सर्वांच्या मधोमध असावे. \v 22 याप्रकारे लेवी लोकांची मालमत्ता आणि शहराची मालमत्ता राजपुत्राच्या विभागाच्या मधोमध असेल. राजपुत्राचा भाग यहूदाहची सीमा व बिन्यामीनची सीमा यामध्ये असणार. \b \lh \v 23 “बाकीच्या गोत्रांसाठी: \b \li1 “पूर्वेच्या बाजूपासून पश्चिमेकडे जाणारा एक भाग बिन्यामीनचा. \li1 \v 24 बिन्यामीनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग शिमओनचा. \li1 \v 25 शिमओनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग इस्साखारचा. \li1 \v 26 इस्साखारच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग जबुलूनचा. \li1 \v 27 जबुलूनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग गादचा असणार. \li1 \v 28 गादची दक्षिणेकडील वतनाची सीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत जाईल. \b \lf \v 29 “हा देश तू इस्राएलच्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून द्यावे, आणि हे त्यांचे भाग असतील,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \s1 नवीन शहराची द्वारे \lh \v 30 “शहरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे असतील: \b \li1 “उत्तरेकडील सुरुवात जी चार हजार पाचशे हात लांब आहे, \v 31 शहराची द्वारे इस्राएल गोत्रांच्या नावानुसार असतील. उत्तरेकडील तीन द्वारे असतीलः रऊबेनचे द्वार, यहूदाहचे द्वार आणि लेवीचे द्वार असणार. \li1 \v 32 पूर्वेची बाजू जी चार हजार पाचशे हात लांब आहे, तिथे तीन द्वारे असतील: योसेफाचे द्वार, बिन्यामीनचे द्वार आणि दानचे द्वार. \li1 \v 33 दक्षिणेची बाजू जिचे माप चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: शिमओनचे द्वार, इस्साखारचे द्वार आणि जबुलूनचे द्वार. \li1 \v 34 पश्चिमेची बाजू जिची लांबी चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: गादचे द्वार, आशेरचे द्वार आणि नफतालीचे द्वार. \b \lf \v 35 “चोहीकडील अंतर अठरा हजार हात\f + \fr 48:35 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa 9.5 कि.मी.\fqa*\f* असणार. \b \p “आणि त्या काळापासून शहराचे नाव, ‘याहवेह-शाम्माह’\f + \fr 48:35 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa याहवेह तिथे आहे\fqa*\f* असे असणार.”