\id EXO - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h निर्गम \toc1 निर्गमाचे पुस्तक \toc2 निर्गम \toc3 निर्ग \mt1 निर्गमाचे पुस्तक \c 1 \s1 इस्राएलाचा छळ \lh \v 1 याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत: \b \li1 \v 2 रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह; \li1 \v 3 इस्साखार, जबुलून आणि बिन्यामीन; \li1 \v 4 दान आणि नफताली; \li1 गाद व आशेर. \b \lf \v 5 याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता. \b \p \v 6 आता योसेफ आणि त्याचे सर्व भाऊ व ती सर्व पिढी मरण पावली. \v 7 परंतु इस्राएली लोक अत्यंत फलद्रूप झाले; ते बहुगुणित होऊन त्यांना पुष्कळ संतती झाली आणि त्यांची संख्या वाढून, लवकरच ते इतके असंख्य झाले की संपूर्ण देश त्यांनी व्यापून टाकला. \p \v 8 नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता. \v 9 त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत. \v 10 चला त्यांच्याशी चातुर्याने वागू या, नाहीतर त्यांची संख्या अजून वाढेल, आणि लढाई झाली तर ते आपल्या शत्रूंशी एक होतील आणि देश सोडून जातील.” \p \v 11 म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली. \v 12 परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले. \v 13 इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले. \v 14 विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले. \p \v 15 इजिप्तच्या राजाने शिफ्राह व पुआह नावाच्या दोन इब्री सुइणींना अशी सूचना दिली की, \v 16 “इब्री स्त्रियांची प्रसूतीच्या तिवईवर मदत करीत असताना जर मुलगा जन्मला तर त्याला मारून टाका, परंतु मुलगी असली तर तिला जगू द्या.” \v 17 पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले. \v 18 तेव्हा इजिप्तच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही मुलांना का जिवंत राहू दिले?” \p \v 19 सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.” \p \v 20 म्हणून परमेश्वराने त्या सुइणींना आशीर्वाद दिला आणि इस्राएली लोक बहुगुणित झाले व संख्येने फार अधिक झाले. \v 21 या सुइणींनी परमेश्वराचे भय धरल्यामुळे परमेश्वराने त्यांची कुटुंबे स्थापित केली. \p \v 22 मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.” \c 2 \s1 मोशेचा जन्म \p \v 1 लेवी वंशातील एका पुरुषाने लेवी तरुणीशी विवाह केला. \v 2 आणि ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. त्या बाळाचे रूप पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले. \v 3 पण त्यानंतर त्याला ती लपवू शकत नव्हती, तेव्हा तिने त्याच्यासाठी लव्हाळ्याची एक टोपली घेतली, व तिला डांबर आणि चुन्याचा लेप लावला. मग तिने आपल्या बाळाला त्या टोपलीत ठेवले व ती टोपली तिने नाईल नदीच्या काठी लव्हाळ्यात नेऊन ठेवली. \v 4 बाळाचे पुढे काय होते हे पाहण्यासाठी त्याची बहीण दुरून त्याच्यावर नजर ठेऊन उभी राहिली. \p \v 5 फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले. \v 6 तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. “हे बालक इब्री आहे,” ती म्हणाली. \p \v 7 तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?” \p \v 8 “होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले. \v 9 फारोहची कन्या तिला म्हणाली, “या बाळाला घेऊन जा आणि माझ्यासाठी त्याला दूध पाज; याचे वेतन मी तुला देईन.” ती बाई त्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेली व तिने त्याचे संगोपन केले. \v 10 पुढे बाळ मोठा झाल्यावर तिने त्याला फारोहच्या कन्येकडे आणले आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे\f + \fr 2:10 \fr*\fq मोशे \fq*\ft अर्थात् \ft*\fqa बाहेर काढलेला\fqa*\f* असे ठेवले, कारण ती म्हणाली, “मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.” \s1 मोशे मिद्यान देशास पळून जातो \p \v 11 मोशे तरुण झाल्यानंतर, एक दिवस तो आपल्या लोकांना भेटायला गेला असताना त्याने त्यांना कष्टाने राबत असताना बघितले. इजिप्तचा एक मनुष्य त्याच्या इब्री बांधवाला मारहाण करीत असल्याचे मोशेने पाहिले. \v 12 आपल्याला कोणीही पाहत नाही, हे बघून त्याने त्या इजिप्ती मनुष्याला ठार केले आणि त्याला वाळूत लपवून टाकले. \v 13 दुसर्‍या दिवशी तो बाहेर गेला आणि त्याला दोन इब्री पुरुष मारामारी करताना दिसले. तेव्हा ज्याची चूक होती त्याला तो म्हणाला, “तू आपल्या इब्री सोबत्याला का मारत आहेस?” \p \v 14 तो मनुष्य त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले? तू इजिप्त देशाच्या मनुष्याला जसे मारून टाकलेस, तसे मलाही मारून टाकायचा तुझा विचार आहे काय?” तेव्हा मोशे घाबरला आणि त्याला वाटले, “मी जे काही केले ते सर्वांना माहीत झाले असणार.” \p \v 15 जेव्हा फारोहने हे ऐकले, त्याने मोशेला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मोशे फारोहपासून पळून मिद्यानास राहवयाला गेला, तिथे जाऊन तो एका विहिरीजवळ बसला. \v 16 तिथे एका मिद्यानी याजकाच्या सात मुली होत्या, त्या आपल्या पित्याच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी, व कुंडे भरून घेण्यासाठी विहिरीवर आल्या. \v 17 पण तिथे काही धनगर आले आणि त्यांनी मुलींना तिथून हाकलून लावले. पण मोशे उठला व मुलींच्या मदतीस आला आणि त्यांच्या मेंढरांना पाणी पाजले. \p \v 18 जेव्हा मुली आपले वडील रऊएल\f + \fr 2:18 \fr*\ft इथ्रो\ft*\f* याकडे परत गेल्या, त्याने त्यांना विचारले, “आज इतक्या लवकर कशा आल्या?” \p \v 19 त्यांनी उत्तर दिले, “एका इजिप्ती व्यक्तीने आम्हाला मेंढपाळांपासून सोडविले; त्याने आमच्यासाठी विहिरीतून पाणी सुद्धा काढले आणि मेंढरांना पाजले.” \p \v 20 “तो कुठे आहे?” रऊएलाने आपल्या मुलींना विचारले, “त्याला तुम्ही का सोडून आला? काहीतरी खावे म्हणून त्याला आमंत्रण द्या.” \p \v 21 मोशेने त्या मनुष्यासह राहण्यास स्वीकारले. त्याने आपली मुलगी सिप्पोराह हिला मोशेची पत्नी म्हणून दिली. \v 22 सिप्पोराने एका मुलाला जन्म दिला आणि मोशेने त्याचे नाव गेर्षोम\f + \fr 2:22 \fr*\fq गेर्षोम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa परदेशी\fqa*\f* ठेवले, कारण मोशे म्हणाला, “मी विदेशात एक परदेशी झालो आहे.” \p \v 23 बराच काळ लोटल्यानंतर इजिप्तचा राजा मरण पावला. इस्राएली लोक क्लेशाने विव्हळत होते व आपल्या गुलामगिरीत रडून परमेश्वराचा धावा करीत होते; आणि त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतील त्यांचा धावा परमेश्वराकडे पोहोचला. \v 24 परमेश्वराने त्यांचे रडणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी त्यांनी केलेल्या कराराचे त्यांना स्मरण झाले. \v 25 परमेश्वराने इस्राएली लोकांना पाहिले आणि त्यांना त्यांची आस्था वाटली. \c 3 \s1 मोशे आणि जळते झुडूप \p \v 1 मोशे आपला सासरा, मिद्यानी याजक इथ्रो याची मेंढरे चारीत होता. तो ती मेंढरे घेऊन रानात, परमेश्वराचा डोंगर होरेबच्या मागच्या बाजूला गेला. \v 2 तिथे त्याला एका झुडूपात अग्निज्वालेमधून याहवेहचा दूत प्रकट झाला. झुडूप तर पेटले आहे, पण ते जळत नाही असे जेव्हा मोशेने पाहिले, \v 3 तेव्हा मोशेने विचार केला “ते झुडूप का जळत नाही, हे विचित्र दृश्य मी त्याजवळ जाऊन बघेन.” \p \v 4 मोशे ते झुडूप पाहण्यासाठी गेला हे याहवेहने पाहिले, तेव्हा परमेश्वराने त्याला झुडूपातून आवाज दिला, “मोशे, मोशे!” \p मोशे म्हणाला, “हा मी येथे आहे.” \p \v 5 परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.” \v 6 मग ते म्हणाले, “मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे, म्हणजे मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण परमेश्वराकडे पाहण्यास तो घाबरला. \p \v 7 नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे. \v 8 त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून चांगल्या व विस्तीर्ण देशात, दूध व मध वाहत्या देशात घेऊन जाण्यासाठी मी खाली आलो आहे. त्या देशात कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी हे लोक राहतात. \v 9 आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे. \v 10 तर आता जा, माझ्या इस्राएलच्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोहकडे पाठवित आहे.” \p \v 11 पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?” \p \v 12 परमेश्वराने म्हटले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला पाठविले आहे याचे चिन्ह हेच असणार: जेव्हा तू इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणशील, तेव्हा याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची उपासना कराल.” \p \v 13 परंतु मोशेने परमेश्वराला विचारले, “जर मी इस्राएली लोकांकडे गेलो आणि त्यांना सांगितले, तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने मला पाठविले आहे, तर ते मला विचारतील, त्यांचे नाव काय आहे? तर मी त्यांना काय सांगू?” \p \v 14 परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.” \p \v 15 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ \q1 “हेच माझे सनातन नाव आहे, \q2 आणि सर्व पिढ्यांपर्यंत \q2 याच नावाने तुम्ही मला हाक मारणार. \p \v 16 “जा आणि इस्राएलांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलव आणि त्यांना सांग, तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांचे परमेश्वर याहवेह हे मला प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्याकडे लक्ष दिले आहे आणि इजिप्तमध्ये तुमच्याबाबतीत जे काही घडत आहे ते मी पाहिले आहे. \v 17 आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे. \p \v 18 “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे. \v 19 पण मला माहीत आहे की, बलवान हाताने दबाव आणल्याशिवाय इजिप्तचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. \v 20 म्हणून मी आपला हात लांब करेन व माझ्या चमत्कारांनी इजिप्तवर प्रहार करेन. मग शेवटी तो तुम्हाला जाऊ देईल. \p \v 21 “आणि या लोकांवर इजिप्तच्या लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करेन म्हणजे तुम्ही रिक्तहस्ते बाहेर पडणार नाही. \v 22 इजिप्त देशातील स्त्रियांकडून व तुमच्या शेजारणीकडून प्रत्येक इस्राएली स्त्रीने सोन्याचे व चांदीचे दागिने व उत्तमोत्तम वस्त्रे मागून घ्यावीत व तुम्ही ते आपल्या मुलांवर व मुलींवर चढवावे, याप्रकारे तुम्ही इजिप्त देशातील लोकांना लुटाल.” \c 4 \s1 मोशेला देण्यात आलेली चिन्हे \p \v 1 मोशेने उत्तर दिले, “जर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही किंवा माझे ऐकले नाही आणि म्हणाले, ‘याहवेह तुला प्रकट झालेच नाही’ तर मी काय करावे?” \p \v 2 याहवेहने त्याला विचारले, “तुझ्या हातात काय आहे?” \p त्याने उत्तर दिले, “एक काठी!” \p \v 3 याहवेह त्याला म्हणाले, “ती जमिनीवर टाक.” \p मोशेने ती जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला आणि मोशे भिऊन त्यापासून दूर पळाला. \v 4 मग याहवेहने त्याला सांगितले, “हात लांब करून सापाचे शेपूट धर.” तेव्हा मोशेने त्या सापाला धरले आणि तो पुन्हा त्याच्या हातातील काठी झाला. \v 5 याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.” \p \v 6 मग याहवेह त्याला म्हणाले, “तुझा हात तुझ्या झग्याच्या आत घाल.” मग मोशेने आपला हात आपल्या झग्याच्या आत घातला आणि जेव्हा त्याने हात बाहेर काढला, त्याची कातडी कोडाने\f + \fr 4:6 \fr*\ft हा शब्द कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी वापरला जात असे\ft*\f* भरली; तो हिमासारखा पांढरा झाला होता. \p \v 7 “आता परत आपला हात झग्याच्या आत घाल,” याहवेह म्हणाले आणि मोशेने परत आपला हात झग्याच्या आत घातला, आणि जेव्हा तो बाहेर काढला, तो पूर्ववत त्याच्या शरीराच्या बाकीच्या कातडीप्रमाणे झाला. \p \v 8 तेव्हा याहवेह म्हणाले, “पहिले चिन्ह पाहून जर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर दुसरे चिन्ह पाहून कदाचित ते विश्वास ठेवतील. \v 9 पण या दोन्ही चिन्हांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर तू नाईल नदीचे पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत म्हणजे नदीतून घेतलेल्या पाण्याचे जमिनीवर रक्त होईल.” \p \v 10 मोशे याहवेहला म्हणाला, “आपल्या सेवकास क्षमा करावी, प्रभू मी चांगला वक्ता नाही, कधीही नव्हतो आणि आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलत होता तेव्हाही नाही. मी मुखदुर्बल व जिभेचा जड आहे.” \p \v 11 याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का? \v 12 आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.” \p \v 13 पण मोशे म्हणाला, “तुमच्या सेवकास क्षमा करावी, प्रभू. कृपा करून दुसर्‍या कोणाला पाठवा.” \p \v 14 तेव्हा मोशेविरुद्ध याहवेहचा राग भडकला, ते म्हणाले, “लेवी अहरोन, तुझा भाऊ, याच्याविषयी काय? मला ठाऊक आहे की तो चांगले बोलू शकतो. तो तुला भेटावे म्हणून मार्गावर आहे, तुला पाहून त्याला फार आनंद होईल. \v 15 तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी तुम्हा दोघांना बोलण्यास मदत करेन, आणि काय करावे हे शिकवेन. \v 16 तो तुझ्या वतीने लोकांबरोबर बोलेल, जसे तो तुझेच मुख आहे व तू त्याला परमेश्वरासारखा होशील असे मी करेन. \v 17 परंतु ही काठी आपल्या हातात घे, म्हणजे तिच्यायोगे तुला चिन्हे करता येतील.” \s1 मोशे इजिप्त देशास परत येतो \p \v 18 मग मोशे आपला सासरा इथ्रोकडे गेला आणि त्याला म्हणाला, “इजिप्त देशात असलेल्या माझ्या स्वकियांकडे परत जाऊन त्यातील कोणी जिवंत आहेत की नाही ते मला पाहू दे.” \p इथ्रोने उत्तर दिले, “जा. तुझे भले होवो.” \p \v 19 मिद्यानात याहवेहने मोशेला म्हटले, “इजिप्त देशास जा, कारण तुला ठार करावयास जे टपलेले होते, ते सर्व आता मरण पावले आहेत.” \v 20 तेव्हा मोशे आपली पत्नी व मुले यांना गाढवावर बसवून इजिप्तला परतला. त्याने आपल्या हाती परमेश्वराची काठी घेतली. \p \v 21 याहवेह मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात पोहोचल्यावर फारोहसमोर जाऊन, मी जे चमत्कार करण्याचे सामर्थ्य तुला दिले आहे, ते त्याच्यापुढे सादर कर. पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि तो लोकांना जाऊ देणार नाही. \v 22 मग तू फारोहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल माझा ज्येष्ठपुत्र आहे, \v 23 आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे, माझ्या पुत्राला माझी आराधना करण्यासाठी तू जाऊ द्यावेस. पण तू त्यांना पाठविण्यास नकार दिला; तर मी तुझा ज्येष्ठपुत्र मारून टाकीन.’ ” \p \v 24 मोशे आपल्या मार्गात एके ठिकाणी मुक्कामास असताना, जसे याहवेह त्याला मारणारच असे गाठले. \v 25 सिप्पोराहने एक धारदार गारेचा तुकडा घेऊन, आपल्या मुलाची अग्रत्वचा कापून त्याची सुंता केली व त्या अग्रत्वचेने तिने मोशेच्या पायांस स्पर्श केला आणि ती त्याला म्हणाली, “खरोखर तुम्ही माझे रक्ताचे वर आहात.” \v 26 नंतर याहवेहने त्याला सोडले. (“रक्ताचा वर” असे तिने सुंतेच्या बाबतीत म्हटले.) \p \v 27 आता याहवेहने अहरोनाला म्हटले, “मोशेला भेटण्यासाठी रानात जा.” तेव्हा अहरोन मोशेला परमेश्वराच्या पर्वतावर भेटला आणि त्याचे चुंबन घेतले. \v 28 तेव्हा याहवेहने जे काही सांगावयास त्याला पाठविले होते ते सर्व मोशेने अहरोनाला सांगितले आणि जी चिन्हे करावयास सांगितली आहेत, त्याविषयी सुद्धा त्याला सांगितले. \p \v 29 मग मोशे व अहरोन यांनी इस्राएलांच्या सर्व वडिलांना एकत्र बोलाविले, \v 30 आणि याहवेहने मोशेला जे सांगितले होते ते सर्वकाही अहरोनाने त्यांना सांगितले. मोशेने लोकांच्या देखत चिन्हे करून दाखविली. \v 31 तेव्हा या गोष्‍टीवर त्यांनी विश्वास केला. आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले की याहवेहने इस्राएली लोकांची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे, तेव्हा सर्वांनी नमन करून उपासना केली. \c 5 \s1 भुसारहित विटा \p \v 1 नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ” \p \v 2 यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.” \p \v 3 तेव्हा ते फारोहला म्हणाले, “इब्री लोकांच्या परमेश्वराने आम्हाला दर्शन दिले. आता आम्ही याहवेह, आमच्या परमेश्वराला यज्ञ करावा म्हणून आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊ दे. नाही तर परमेश्वर आम्हाला पीडांनी किंवा तलवारीने मारून टाकेल.” \p \v 4 यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!” \v 5 मग फारोह म्हणाला, “पाहा, देशाच्या लोकांची संख्या पुष्कळपटीने वाढली आहे आणि तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणत आहात.” \p \v 6 त्याच दिवशी फारोहने इस्राएलावर नेमलेल्या मुकादमांना व अधिकार्‍यांना हुकूम दिला: \v 7 “यापुढे लोकांना विटा तयार करण्यासाठी गवत देऊ नका; आपल्यासाठी गवत त्यांनी स्वतःच गोळा करावे. \v 8 तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत. \v 9 त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.” \p \v 10 तेव्हा मुकादम व पुढारी यांनी इस्राएली लोकांना सांगितले, “फारोहने असे सांगितले आहे की मी तुम्हाला यापुढे गवत देणार नाही. \v 11 तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.” \v 12 तेव्हा लोक गवत गोळा करून आणण्यासाठी इजिप्तभर पांगले. \v 13 मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.” \v 14 फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्‍यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?” \p \v 15 तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता? \v 16 तुमच्या दासांना गवत नाही, तरीही ‘विटा तयार करा!’ असे सांगितले जाते, तुमच्या सेवकांना मारहाण करण्यात येते, परंतु सगळा दोष तुमच्याच लोकांचा आहे.” \p \v 17 फारोहने उत्तर दिले, “तुम्ही आळशी लोक आहात—आळशी! म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला याहवेहपुढे यज्ञ करावयास जाऊ द्यावे.’ \v 18 आता आपले काम करा. तुम्हाला गवत पुरविले जाणार नाही, तरी नेमल्याप्रमाणेच विटा तयार करून द्याव्या लागतील.” \p \v 19 “तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले. \v 20 फारोहकडून आल्यावर, अहरोन व मोशे आपल्याशी बोलण्यास वाट पाहत आहेत असे त्यांनी पाहिले, \v 21 ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.” \s1 परमेश्वर सुटकेचे अभिवचन देतात \p \v 22 मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का? \v 23 मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.” \c 6 \p \v 1 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.” \p \v 2 परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे. \v 3 मी सर्वसमर्थ परमेश्वर\f + \fr 6:3 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa एल-शद्दाय\fqa*\f* म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रकट झालो होतो, परंतु माझ्या याहवेह या नावाने मी स्वतःची त्यांना ओळख करून दिली नव्हती. \v 4 ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला. \v 5 आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे. \p \v 6 म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन. \v 7 मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारेन आणि मी तुमचा परमेश्वर होईन, मग तुम्हाला कळून येईल की, तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून सोडविणारा परमेश्वर याहवेह मीच आहे. \v 8 आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.” \p \v 9 तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही. \p \v 10 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, \v 11 “जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.” \p \v 12 परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?” \s1 मोशे आणि अहरोन यांची वंशावळ \p \v 13 आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली. \b \lh \v 14 त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: \b \li1 इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: \li2 हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी. \lf हे रऊबेनाचे कूळ. \b \li1 \v 15 शिमओनाचे पुत्र हे: \li2 यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल. \lf हे शिमओनाचे कूळ होते. \b \li1 \v 16 लेवीच्या पुत्रांची ही क्रमानुसार नावे: \li2 गेर्षोन, कोहाथ व मरारी. \lf (लेवी एकशे सदतीस वर्षे जगला.) \li2 \v 17 गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही: \li3 लिब्नी व शिमी. \li2 \v 18 कोहाथाच्या पुत्रांची नावे: \li3 अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. \li2 (कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.) \li2 \v 19 मरारीच्या पुत्रांची नावे: \li3 महली व मूशी. \lf आपआपल्या वंशावळ्याप्रमाणे ही लेवीची कुळे. \b \li1 \v 20 अम्रामाने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याबरोबर विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे हे झाले. \lf (अम्राम हा एकशे सदतीस वर्षे जगला.) \li1 \v 21 इसहाराच्या पुत्रांची नावे: \li2 कोरह, नेफेग व जिक्री. \li1 \v 22 उज्जीएलाच्या पुत्रांची नावे: \li2 मिशाएल, एलसाफान व सिथ्री. \li1 \v 23 अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले. \b \li1 \v 24 कोरहाच्या पुत्रांची नावे: \li2 अस्सीर, एलकानाह व अबीयासाफ. \lf ही कोरही कुळे होती. \b \li1 \v 25 अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला. \b \lf हे आपआपल्या कुळाप्रमाणे लेवी वंशातील प्रमुख होते. \b \p \v 26 ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.” \v 27 हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले. \s1 अहरोन मोशेच्या वतीने बोलतो \p \v 28 जेव्हा मोशे इजिप्तमध्ये होता तेव्हा याहवेह त्याच्याशी बोलले, \v 29 याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.” \p \v 30 परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “कारण मी बोबड्या ओठांचा आहे, फारोह माझे कसे ऐकणार?” \c 7 \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “पाहा, मी तुला फारोहसाठी परमेश्वरासारखे केले आहे आणि तुझा भाऊ अहरोन तुझा संदेष्टा असेल. \v 2 तुला जे काही मी आज्ञापिणार आहे ते सर्व तू बोलावयचे आणि तुझा भाऊ अहरोन याने इस्राएली लोकांना त्याच्या देशातून जाऊ द्यावे असे फारोहला सांगावयाचे आहे. \v 3 पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि इजिप्तमध्ये जरी मी माझी चिन्हे व चमत्कार बहुगुणित करेन, \v 4 तरीही फारोह तुझे ऐकणार नाही. मग मी इजिप्तवर माझा हात उगारेन आणि मोठ्या पराक्रमी कृत्यांच्या न्यायाने मी माझे सैन्य, माझे इस्राएली लोक यांना बाहेर काढेन. \v 5 आणि जेव्हा मी माझा हात इजिप्तविरुद्ध उगारेन आणि इस्राएलास बाहेर आणेन, तेव्हा इजिप्तच्या लोकांना समजेल की मीच याहवेह आहे.” \p \v 6 मग मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. \v 7 जेव्हा ते फारोहपुढे जाऊन बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता. \s1 अहरोनाच्या काठीचा साप होतो \p \v 8 मग याहवेह मोशे व अहरोन यास म्हणाले, \v 9 “जेव्हा फारोह तुम्हाला म्हणेल, ‘चमत्कार करून दाखवा,’ तेव्हा अहरोनास सांग, ‘तुझी काठी घे आणि फारोहसमोर खाली टाक,’ आणि तिचा साप होईल.” \p \v 10 मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व याहवेहने त्यांना सांगितल्याप्रमाणेच केले. अहरोनाने आपली काठी फारोहसमोर व त्याच्या सेवकांसमोर खाली जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला. \v 11 तेव्हा फारोहने इजिप्तच्या ज्ञानी व मांत्रिकांना बोलाविले. त्यांनीही आपल्या गुप्त ज्ञानानुसार तसेच केले: \v 12 प्रत्येकाने आपआपली काठी खाली टाकली आणि त्यांचा साप झाला. पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या. \v 13 तरी देखील याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण झाले आणि त्याने त्यांचे ऐकले नाही. \s1 रक्ताची पीडा \p \v 14 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहचे हृदय कठीण आहे आणि तो इस्राएली लोकांना जाऊ देण्यास नाकारतो. \v 15 फारोह सकाळी बाहेर नदीकडे जात असताना त्याच्याकडे जा. नाईल नदीच्या काठावर जाऊन त्याची भेट घे आणि ज्या काठीचा साप झाला होता, ती काठी आपल्या हातात घे. \v 16 मग त्याला सांग, ‘याहवेह, इब्रींचे परमेश्वर यांनी मला हे सांगण्यासाठी तुझ्याकडे पाठविले आहे: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी रानात जाऊन माझी उपासना करावी, पण अजूनही तू ऐकले नाहीस. \v 17 याहवेह असे म्हणतात: यावरून मी याहवेह आहे हे तुला कळेल: माझ्या हातात जी काठी आहे, ती मी नाईल नदीच्या पाण्यावर मारीन, आणि तिचे रक्त होईल. \v 18 मग नाईल नदीतील मासे मरतील आणि नदीला दुर्गंध सुटेल; इजिप्तचे लोक ते पाणी पिऊ शकणार नाहीत.’ ” \p \v 19 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा\f + \fr 7:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांच्या मूर्तींवर\fqa*\f* रक्त असेल.” \p \v 20 मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी, फारोहच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष उंच केली आणि नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतील सर्व पाण्याचे रक्तात रूपांतर झाले. \v 21 नाईल नदीतील सर्व मासे मेले, व त्यामुळे पाण्याला इतकी दुर्गंधी सुटली की इजिप्तच्या लोकांना ते पाणी पीता येईना, इजिप्त देशात सर्वत्र रक्त झाले होते. \p \v 22 पण इजिप्तच्या जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने पाण्याचे रक्त केले. फारोहचे मन पुन्हा कठीण झाले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही. \v 23 आणि फारोहने हे मनावर न घेता, तो आपल्या राजवाड्यात परतला. \v 24 आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्‍यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते. \s1 बेडकांची पीडा \p \v 25 याहवेहने नाईलवर प्रहार करून सात दिवस लोटले. \c 8 \nb \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा आणि त्याला सांग, याहवेह असे म्हणतात, माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी. \v 2 तू जर त्यांना जाऊ देण्याचे नाकारलेस, तर तुझ्या संपूर्ण देशात मी बेडकांची पीडा पाठवेन. \v 3 नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील. \v 4 बेडूक तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर आणि तुझ्या सर्व अधिकार्‍यांवर येतील.” \p \v 5 यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.” \p \v 6 त्याप्रमाणे अहरोनाने इजिप्तच्या पाण्यावर आपला हात लांब केला आणि संपूर्ण देश बेडकांनी व्यापून गेला. \v 7 पण जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने तसेच केले व इजिप्त देशात बेडूक आणले. \p \v 8 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.” \p \v 9 मोशे फारोहला म्हणाला, “हा सन्मान मी तुला देतो, की मी तुझ्यासाठी, तुझ्या अधिकार्‍यांसाठी व लोकांसाठी विनंती करावी अशी वेळ तू नेमून ठेवावी, म्हणजे तुमच्यातून बेडूक नाहीसे होतील, नाईल नदीतील बेडके मात्र राहतील.” \p \v 10 फारोह मोशेला म्हणाला, “उद्या.” \p मोशेने उत्तर दिले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, अशासाठी की तू जाणावे की याहवेह आमचे परमेश्वर यासारखे इतर कोणीही नाही. \v 11 नाईल नदीतील बेडूक सोडून बाकीचे सर्व बेडूक तू, तुझे घर, तुझे सेवक व तुझ्या लोकांपासून निघून जातील.” \p \v 12 मग मोशे व अहरोन फारोहला सोडून गेल्यानंतर, जी बेडके याहवेहने फारोहवर आणली होती, त्याविषयी मोशेने याहवेहला विनंती केली. \v 13 मोशेने मागितल्याप्रमाणे याहवेहने केले; आणि घरातील, अंगणातील व शेतातील सर्व बेडूक मरून गेले. \v 14 त्यांचे ढीग जमा झाले, व देशात त्यांची दुर्गंधी पसरली. \v 15 पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही. \s1 चिलटांची पीडा \p \v 16 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी लांब कर व भूमीच्या धुळीवर आपट,’ आणि संपूर्ण इजिप्तभर या धुळीची चिलटे होतील.” \v 17 त्यांनी तसे केले, आणि जेव्हा अहरोनाने काठी घेऊन आपला हात लांब केला आणि भूमीच्या धुळीवर मारली, तेव्हा मनुष्य व जनावरे यावर चिलटे आली. इजिप्त देशभरातील सगळी धूळ चिलटे अशी झाली. \v 18 परंतु जेव्हा जादूगारांनी आपल्या गुप्तज्ञानाने तसेच करण्याचा प्रयत्न केला, ते करू शकले नाही. \p कारण सगळीकडे लोकांवर व जनावरांवर चिलटे आली होती, \v 19 तेव्हा ते जादूगार फारोहला म्हणाले, “ही परमेश्वराची अंगुली आहे.” पण याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण होते आणि त्याने त्यांचे ऐकले नाही. \s1 गोमाश्यांची पीडा \p \v 20 यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “पहाटे ऊठ व फारोह नदीवर जात असता त्याची भेट घे आणि त्याला सांग याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी माझी उपासना करावी. \v 21 जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझ्यावर आणि तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर व तुमच्या घरांमध्ये गोमाश्यांचे थवे पाठवेन. इजिप्त लोकांची घरे गोमाश्यांनी भरून जातील; व जमीन सुद्धा गोमाश्यांनी झाकली जाईल. \p \v 22 “पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे. \v 23 माझे लोक व तुझे लोक यांच्यामध्ये मी फरक करेन. हे चिन्ह उद्याच घडेल.” \p \v 24 आणि याहवेहने तसेच केले. आणि पाहा, फारोहचा राजवाडा, त्याच्या अधिकार्‍यांची घरे व इजिप्तच्या लोकांची सर्व घरे गोमाश्यांच्या दाट थव्यांनी भरून गेली; आणि गोमाश्यांनी देशाची नासाडी केली. \p \v 25 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.” \p \v 26 पण मोशे म्हणाला, “तसे करणे बरे नाही. याहवेह आमच्या परमेश्वराला जो यज्ञ आम्ही करतो तो इजिप्तच्या लोकांना किळसवाणा वाटेल. आणि असा यज्ञ ज्याची ते किळस करतात तो जर आम्ही केला, तर ते आम्हाला धोंडमार करणार नाही काय? \v 27 म्हणून आम्ही तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊन आमचे परमेश्वर याहवेह आज्ञा देईल त्याप्रमाणे आम्ही बळी अर्पण करू.” \p \v 28 फारोहने म्हटले, “तुमचा परमेश्वर याहवेह यास रानात जाऊन यज्ञ करावा म्हणून मी तुम्हाला जाऊ देतो, परंतु फार दूर जाऊ नका. आता माझ्यासाठी विनंती करा.” \p \v 29 मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्‍यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.” \p \v 30 मग मोशे फारोह पुढून निघून गेला व याहवेहकडे विनंती केली, \v 31 व मोशेने जे याहवेहपाशी मागितले त्याप्रमाणे याहवेहने केले. फारोह, त्याचे सेवक व त्याच्या लोकांपासून गोमाशा निघून गेल्या; एक सुद्धा गोमाशी बाकी राहिली नाही. \v 32 परंतु यावेळी सुद्धा फारोहने आपले हृदय कठीण केले आणि इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही. \c 9 \s1 पशूंमध्ये मरीची पीडा \p \v 1 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा व त्याला सांग, ‘इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, “माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.” \v 2 जर तू त्यांना जाण्यास नकार दिला आणि त्यांना धरून ठेवलेस, \v 3 तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल. \v 4 परंतु याहवेह इस्राएलची जनावरे व इजिप्तची जनावरे यात फरक करतील, असा की इस्राएली लोकांची जनावरे मरणार नाहीत.’ ” \p \v 5 याहवेहने समय नेमून ठेवला व म्हणाले, “याहवेह हे उद्या देशभर घडवून आणतील.” \v 6 आणि दुसर्‍या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही. \v 7 फारोहने शोध घेतला व जाणून घेतले की इस्राएलातील एकही जनावर मेले नाही, तरीसुद्धा फारोहचे मन बदलले नाही व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही. \s1 गळवांची पीडा \p \v 8 नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “भट्टीतून मूठभर राख घेऊन मोशेने ती फारोहच्या देखत हवेत उधळावी. \v 9 व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.” \p \v 10 तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली. \v 11 मांत्रिक मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत, कारण त्यांच्याही अंगावर व सर्व इजिप्तच्या लोकांवर गळवे फुटली होती. \v 12 पण याहवेहने फारोहचे मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही. \s1 गारांची पीडा \p \v 13 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अगदी पहाटेच ऊठ, फारोहची भेट घे आणि त्याला सांग, इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे. \v 14 नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही. \v 15 वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते. \v 16 परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे. \v 17 तू अजूनही माझ्या लोकांच्या विरोधात राहून त्यांना जाऊ देत नाहीस. \v 18 म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन. \v 19 म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.” \p \v 20 फारोहच्या ज्या अधिकार्‍यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली. \v 21 पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले. \p \v 22 मग याहवेहने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशाकडे उंच कर म्हणजे संपूर्ण इजिप्त देशावर—मनुष्य, जनावरे व शेतात जे काही आहे त्यावर—गारा पडतील.” \v 23 जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली. \v 24 गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले. \v 25 गारांनी इजिप्त देशाच्या शेतातील सर्वकाही; मनुष्य असो वा जनावरे यांचा नाश केला; शेतात पिकत असलेले पीक व रानातील प्रत्येक झाड नाहीसे केले. \v 26 फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते. \p \v 27 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून घेतले, व तो त्यांना म्हणाला, “यावेळी मी पाप केले आहे, याहवेह न्यायी आहेत, परंतु मी व माझे लोक चुकलो. \v 28 याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट\f + \fr 9:28 \fr*\fq मेघांचा हा गडगडाट \fq*\ft अक्षरशः \ft*\fqa परमेश्वराने वाजवलेली टाळी\fqa*\f* व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.” \p \v 29 मोशे म्हणाला, “शहराबाहेर जाताच प्रार्थनेत याहवेहकडे मी माझे हात पसरेन. मग गडगडाट थांबेल व गारांचा वर्षावही होणार नाही. यावरून तुला कळेल की, पृथ्वी याहवेहची आहे. \v 30 पण मला माहीत आहे की, तू व तुझे सेवक अजूनही याहवेह परमेश्वराचे भय बाळगत नाहीत.” \p \v 31 (आता जवस व सातू या पिकांचा पूर्णपणे नाश झाला होता, कारण सातू कापणीला आला होता व जवसाला फुले आली होती. \v 32 पण गहू व खपल्याचा गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अजून पिकले नव्हते.) \p \v 33 मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला. \v 34 पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले. \v 35 याहवेहने मोशेला सांगितल्याप्रमाणे फारोहने इस्राएली लोकांना जाऊ देण्याचे नाकारले, कारण त्याचे हृदय कठीण झाले होते. \c 10 \s1 टोळाची पीडा \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्‍यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे \v 2 व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.” \p \v 3 मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील. \v 4 तू जर त्यांना जाऊ दिले नाहीस, तर उद्या मी तुझ्या संपूर्ण देशावर टोळ आणेन. \v 5 ते तुझी भूमी आच्छादून टाकतील की, जमीन मुळीच दिसणार नाही, शेतात असलेल्या झाडांसह, गारांच्या व पावसाच्या मारातून जे पीक वाचले आहे त्याचा ते नाश करतील, एवढेच नव्हे तर वनात वाढणारी झाडेही ते खाऊन टाकतील. \v 6 ते तुझी घरे व तुझ्या अधिकार्‍यांची व सर्व इजिप्तच्या लोकांची घरे भरून टाकतील; इजिप्तच्या इतिहासात तुझे वडील व तुझे पूर्वज या देशाचे रहिवासी झाले तेव्हापासून आजपर्यंत असे झालेले त्यांनी कधी पाहिले नाही.’ ” मग मोशे वळून फारोहपासून निघून गेला. \p \v 7 फारोहचे अधिकारी त्याला म्हणाले, “किती काळ हा मनुष्य आम्हाला पाश म्हणून असणार? याहवेह त्यांचा परमेश्वर यांची उपासना करावी म्हणून या लोकांना जाऊ द्या. इजिप्तचा नाश झाला आहे याची तुम्हाला जाणीव नाही काय?” \p \v 8 मग मोशे व अहरोन यांना फारोहकडे पुन्हा बोलाविण्यात आले. फारोह त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचा परमेश्वर याची उपासना करावी म्हणून तुम्ही जा, पण कोण कोण जाणार हे मला सांग.” \p \v 9 मोशेने उत्तर दिले “आम्ही आमचे तरुण व वृद्ध, आमचे पुत्र व कन्या आणि आमची शेरडेमेंढरे व गुरे या सर्वांसह जाणार. कारण आम्ही सर्वांनीच याहवेहचा सण साजरा करणे आवश्यक आहे.” \p \v 10 तेव्हा फारोह त्यांना म्हणाला, “मी तुमच्या मुलाबाळांस व स्त्रियांना जाऊ दिले तर याहवेह तुम्हाबरोबर असो! खचितच तुम्ही दुष्टता योजली आहे.\f + \fr 10:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa सावध राहा, तुमच्यापुढे संकट आहे\fqa*\f* \v 11 नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले. \p \v 12 मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू आपला हात इजिप्त देशावर लांब कर म्हणजे टोळधाड येईल व गारांच्या वर्षावातून वाचलेली वनस्पती जी भूमीवर वाढत आहे त्या सर्वांचा ती नाश करेल.” \p \v 13 तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्‍याने टोळ आणले. \v 14 त्यांनी संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला व ते मोठ्या संख्येने देशाच्या प्रत्येक भागात जाऊन राहिले. इतिहासात अशी भयंकर टोळांची पीडा ना कधी आली होती ना पुढे कधी येणार. \v 15 कारण टोळांनी जमिनीचा पृष्ठभाग अगदी काळा होईपर्यंत झाकून टाकला व गारातून जे वाचले होते ते सर्वकाही—शेतातील सर्व पीक व झाडावरील प्रत्येक फळ त्यांनी फस्त केले. संपूर्ण इजिप्त देशात ना झाडे ना वनस्पती, काहीही हिरवे असे राहिले नाही. \p \v 16 मग फारोहने मोशे व अहरोन यांना त्वरेने बोलावून घेतले आणि म्हटले, “मी तुमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. \v 17 परत एकदा माझ्या पापाची मला क्षमा करा आणि तुमच्या याहवेह परमेश्वराने ही पीडा माझ्यापासून दूर करावी म्हणून त्यांच्याकडे विनंती करा.” \p \v 18 मग मोशे फारोह पुढून निघून गेला व त्याने याहवेहकडे प्रार्थना केली; \v 19 आणि याहवेहने पश्चिमेच्या दिशेने वार्‍याची दिशा बदलली व त्या वार्‍याने टोळांना एकवटून तांबड्या समुद्रात\f + \fr 10:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa लव्हाळ्याचा समुद्र\fqa*\f* टाकले. इजिप्तमध्ये एकही टोळ शिल्लक राहिला नाही. \v 20 पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही. \s1 अंधकाराची पीडा \p \v 21 नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.” \v 22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला. \v 23 कोणी कोणाला पाहू शकत नव्हते व तीन दिवस कोणी आपल्या ठिकाणाहून हलला नाही, परंतु जिथे इस्राएली लोक राहत होते तिथे मात्र प्रकाश होता. \p \v 24 तेव्हा फारोहने मोशेला बोलावून घेतले. तो म्हणाला, “जा, आणि याहवेहची उपासना करा. तुमच्या स्त्रिया व लेकरे सुद्धा तुमच्याबरोबर जाऊ शकतात; तुमची जनावरे व शेरडेमेंढरे मात्र सोडून जा.” \p \v 25 परंतु मोशे म्हणाला, “याहवेह, आमचा परमेश्वर यास आम्ही यज्ञ व होमबली अर्पण करावे म्हणून जाऊ दे. \v 26 आमची जनावरे सुद्धा आमच्याबरोबर गेली पाहिजेत; एक खूर देखील आम्ही मागे ठेवणार नाही. आम्हाला त्यांच्यापैकी काहींचा याहवेह आमचे परमेश्वर यांची उपासना करण्यास वापर करावयाचा आहे, आणि त्यात आम्ही काय वापरावे हे आम्ही त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्हाला समजणार नाही.” \p \v 27 पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले, व तो त्यांना जाऊ देण्यास मान्यता देईना. \v 28 फारोह मोशेला म्हणाला, “माझ्यासमोरून चालता हो! आपले तोंडसुध्दा मला पुन्हा दाखवू नकोस! ज्या दिवशी तू माझे तोंड पाहशील त्या दिवशी तू मरशील.” \p \v 29 “तू म्हणालास तसेच होईल,” मोशे म्हणाला. “मी पुन्हा तुझ्यासमोर उभा राहणार नाही.” \c 11 \s1 प्रथम जन्मलेल्यांवर पीडा \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “मी फारोह व इजिप्तवर आणखी एक पीडा आणेन. त्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणाहून जाऊ देईल आणि जेव्हा तो हे करेल तेव्हा तो तुम्हाला अक्षरशः देशातून घालवून देईल. \v 2 सर्व इस्राएली लोकांना सांग, की स्त्री व पुरुषांनी आपआपल्या शेजार्‍यांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने मागून घ्यावेत.” \v 3 (आता याहवेहने इजिप्तमधील लोकांची मने इस्राएलांना अनुकूल होतील असे केले, मोशे स्वतः इजिप्तमध्ये फारोहच्या सेवकांच्या व इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीत फार थोर झाला होता.) \p \v 4 मग मोशे म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मध्यरात्रीच्या सुमारास मी इजिप्तमधून फिरेन. \v 5 इजिप्त देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र मरण पावेल, फारोह जो राजासनावर बसतो त्याच्या प्रथम पुत्रापासून त्याच्या जात्यावर दळत बसणार्‍या गुलाम स्त्रीच्या प्रथम पुत्रापर्यंत आणि जनावरातील प्रथम जन्मलेले प्रत्येक वत्स मरेल. \v 6 संपूर्ण इजिप्त देशभर पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा आकांत होईल. \v 7 परंतु इस्राएली व्यक्तीवर किंवा पशूंवर कुत्रेदेखील भुंकणार नाही.’ यावरून मी याहवेह इजिप्त व इस्राएल यांच्यामध्ये कसा भेद करतो, हे तुम्हाला समजेल. \v 8 तुझे हे सर्व सेवक माझ्याकडे येतील व माझ्या पाया पडून मला म्हणतील, ‘तू व तुझे अनुसरण करणारे सर्व लोक निघून जा!’ त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतापून फारोहसमोरून निघून गेला. \p \v 9 याहवेहने मोशेला आधीच सांगितले होते, “इजिप्त देशात मी पुष्कळ चमत्कार करावे म्हणून फारोह तुमचे ऐकण्यास नाकारेल.” \v 10 मोशे व अहरोन यांनी फारोहसमक्ष हे सर्व चमत्कार केले, पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली नाही. \c 12 \s1 वल्हांडण व बेखमीर भाकरीचा सण \p \v 1 मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले, \v 2 “हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल. \v 3 तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू. \v 4 जर एखादे कुटुंब एका कोकराच्या मानाने लहान असले तर शेजारच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्यातील लोकांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती किती खाईल यानुसार अंदाज घेऊन, किती कोकरे लागतील हे ठरवावे. \v 5 एक वर्षाचे निर्दोष नर कोकरू असावे, आणि तुम्ही ते मेंढरांतून अथवा शेळ्यांतून घ्यावे. \v 6 या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत. \v 7 ज्या घरांमध्ये ते खातील त्या घराच्या दोन्ही दारपट्ट्यांना व कपाळपट्टीला त्या कोकराचे रक्त घेऊन ते लावावे. \v 8 त्या रात्री प्रत्येकाने त्या कोकर्‍याचे विस्तवावर भाजलेले मांस, बेखमीर भाकर व कडू भाजी यांच्याबरोबर खावे. \v 9 मांस कच्चे किंवा पाण्यात उकळून खाऊ नये, तर विस्तवावर भाजून, त्याचे डोके, पाय व आतड्यांसह खावे. \v 10 त्यातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये; जर काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. \v 11 तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण\f + \fr 12:11 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa पेसाह-ओलांडणे\fqa*\f* आहे. \p \v 12 “कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे. \v 13 तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही. \p \v 14 “हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा. \v 15 सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे. \v 16 पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये. \p \v 17 “बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा. \v 18 पहिल्या महिन्यात चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. \v 19 या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे. \v 20 खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.” \p \v 21 मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा. \v 22 एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये. \v 23 कारण याहवेह या देशात संचार करतील व इजिप्तवासियांचा संहार करतील. पण ज्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर रक्त दिसेल, याहवेह त्या घराला ओलांडून पुढे जातील व विनाशकाला तुम्हाला मारण्यास तुमच्या घरात येऊ देणार नाहीत. \p \v 24 “तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. \v 25 वचन दिल्याप्रमाणे जो देश याहवेह तुम्हाला देणार आहेत, त्या देशात तुम्ही जाल, तिथेही हा विधी पाळावा. \v 26 जेव्हा तुमची लेकरे तुम्हाला विचारतील, ‘या विधीचा अर्थ काय आहे?’ \v 27 तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली. \v 28 मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. \p \v 29 मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्‍या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले. \v 30 तेव्हा फारोह, त्याचे अधिकारी व सर्व इजिप्तचे लोक रात्री जागे झाले आणि इजिप्तमध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्या घरात मृत्यू झाला नाही, असे एकही घर नव्हते. \s1 निर्गम \p \v 31 तेव्हा फारोहने मोशे व अहरोन यांना रात्री बोलावून म्हटले, “उठा! तुम्ही व इस्राएली लोक माझ्या लोकांना सोडून जा! जा, आणि तुम्ही मागितल्याप्रमाणे याहवेहची उपासना करा. \v 32 तुमची शेरडेमेंढरे आणि गुरे घ्या आणि निघून जा आणि मलाही आशीर्वाद द्या.” \p \v 33 इस्राएली लोक देशाबाहेर त्वरेने जावे म्हणून इजिप्तच्या लोकांनी त्यांना विनंती केली. कारण ते म्हणाले, “नाहीतर आम्ही सर्व मरून जाऊ!” \v 34 मग इस्राएली लोकांनी खमीर घालण्यापूर्वी कणीक परातीसह कापडात बांधून खांद्यावर टाकली. \v 35 मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने व कपडे मागून घेतले. \v 36 इजिप्तचे लोक इस्राएली लोकांवर कृपादृष्टी करतील असे याहवेहने केले आणि जे काही त्यांनी मागितले ते सर्व त्यांनी त्यांना दिले; अशाप्रकारे त्यांनी इजिप्तच्या लोकांना लुटले. \p \v 37 इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते. \v 38 इतर पुष्कळ लोकसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले होते, त्याचप्रमाणे शेरडेमेंढरांचे कळप व जनावरेही होती. \v 39 जी कणीक इस्राएल लोकांनी इजिप्तमधून बरोबर आणली होती, त्याच्या त्यांनी भाकरी भाजल्या. ते कणीक बेखमीर होते, कारण जेव्हा त्यांना इजिप्तमधून घालवून दिले, स्वतःसाठी अन्न तयार करावयाला वेळ नव्हता. \p \v 40 इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहिले तो कालावधी चारशेतीस वर्षांचा होता. \v 41 चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला. \v 42 ही रात्र याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणण्यासाठी वेगळी करून ठेवली, ही रात्र इस्राएल लोकांनी पिढ्यान् पिढ्या याहवेहला सन्मान म्हणून पाळावी. \s1 वल्हांडणाचे नियम \p \v 43 नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “वल्हांडणाच्या भोजनाचे हे नियम आहेत: \p “कोणत्याही विदेशी व्यक्तीने ते खाऊ नये. \v 44 पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे. \v 45 पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये. \p \v 46 “ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये. \v 47 इस्राएलाच्या सर्व समुदायाने हा सण पाळावा. \p \v 48 “तुमच्याबरोबर राहणार्‍या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये. \v 49 तुमच्यामध्ये असलेले स्वदेशी असो वा तुमच्यामध्ये असलेले विदेशी असो, दोघांनाही एकच नियम असावा.” \p \v 50 तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. \v 51 याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले. \c 13 \s1 प्रथमपुत्राचे समर्पण \p \v 1 याहवेहने मोशेला सांगितले, \v 2 “इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले प्रत्येक नर मला समर्पित कर. उदरातून आलेले इस्राएलातील प्रत्येक प्रथम संतान माझ्या मालकीचे आहे, ते मनुष्याचे असो किंवा पशूंचे.” \p \v 3 तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा दिवस स्मरणात ठेवा, याच दिवशी याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने इजिप्त देशातून, गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर आणले. खमीर असलेले तुम्ही काहीही खाऊ नये. \v 4 आज, अवीव महिन्यात तुम्ही निघालात. \v 5 जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा. \v 6 सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेहचा उत्सव साजरा करावा. \v 7 या सात दिवसात बेखमीर भाकर खावी; खमीर असलेले काहीही तुमच्यात आढळू नये किंवा तुमच्या सीमेत कुठेही खमीर दृष्टीस पडू नये. \v 8 त्या दिवशी आपल्या लेकरांना सांगा, जेव्हा आम्ही इजिप्तमधून बाहेर आलो तेव्हा याहवेहने आमच्यासाठी जे केले, त्याचे चिन्ह म्हणून आम्ही हे करतो. \v 9 हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. \v 10 दरवर्षी हा सण तुम्ही ठराविक वेळी पाळावा. \p \v 11 “तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथेनुसार याहवेह तुम्हाला कनानी लोकांच्या देशात घेऊन जातील व तो देश तुम्हाला देतील, \v 12 तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत. \v 13 गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव. \p \v 14 “भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले. \v 15 जेव्हा फारोह हट्टाने आम्हाला जाऊ देत नव्हता, तेव्हा याहवेहने संपूर्ण इजिप्त देशातील लोकांचे व जनावरांचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. म्हणून प्रत्येक उदरातून प्रथम जन्मलेला नर आम्ही याहवेहला समर्पित करतो आणि ते आम्ही खंडणी भरून सोडवितो.’ \v 16 आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.” \s1 तांबडा समुद्र पार करतात \p \v 17 शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.” \v 18 म्हणून परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्राकडून रानाच्या मार्गाने नेले. इस्राएली लोक लढाईसाठी सज्ज होऊन इजिप्तमधून बाहेर पडले. \p \v 19 मोशेने योसेफाची हाडे आपल्याबरोबर घेतली. कारण, योसेफाने इस्राएली लोकांकडून शपथ घेतली होती. तो म्हणाला होता, “परमेश्वर खरोखर तुमच्या मदतीला येईल, तेव्हा तुमच्याबरोबर माझी हाडे या ठिकाणातून घेऊन जा.” \p \v 20 सुक्कोथ शहर सोडल्यावर त्यांनी वाळवंटाच्या सीमेवर एथाम येथे तळ दिला. \v 21 दिवस व रात्र ते प्रवास करू शकतील, म्हणून दिवसा मेघस्तंभातून त्यांचे मार्गदर्शन करीत व रात्री अग्निस्तंभातून प्रकाश देत याहवेह त्यांच्या पुढे चालले. \v 22 दिवसाचा मेघस्तंभ व रात्रीचा अग्निस्तंभ यांनी लोकांसमोरून आपले स्थान सोडले नाही. \c 14 \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांस सांग मागे फिरा आणि पी-हाहीरोथ जवळ, मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये, समुद्राजवळ तळ द्या, जो थेट बआल-सफोनासमोर आहे. \v 3 यामुळे फारोहला वाटेल की, इस्राएली लोक देशाभोवती गोंधळून भटकत आहेत, वाळवंटात अडकले आहेत. \v 4 मी फारोहचे मन कठीण करेन, म्हणजे तो त्यांचा पाठलाग करेल. पण फारोह व त्याच्या सैन्याकडून मी माझे गौरव करून घेईन आणि इजिप्तच्या प्रजेला समजेल की, मी याहवेह आहे.” मग इस्राएली लोकांनी तसे केले. \p \v 5 जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!” \v 6 मग त्याने ताबडतोब आपला रथ जोडून आपले सैन्य सोबत घेतले. \v 7 सहाशे सर्वात उत्तम असे रथ व त्याबरोबर इजिप्तचे बाकी सर्व रथ व त्यावरील अधिकारी त्याने घेतले. \v 8 याहवेहने इजिप्तचा राजा फारोह याचे हृदय कठीण केले म्हणून इस्राएली लोक जे मोठ्या धैर्याने इजिप्तमधून जात होते, त्यांचा त्याने पाठलाग केला. \v 9 इजिप्तच्या लोकांनी—फारोहचे सर्व घोडे व रथ, घोडेस्वार व सैन्य यांच्यासह—इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि बआल-सफोनासमोर असलेल्या पी-हाहीरोथ, जिथे ते तळ देऊन होते तिथे त्यांना गाठले. \p \v 10 फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली. \v 11 ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले? \v 12 आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!” \p \v 13 मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत. \v 14 याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.” \p \v 15 मग याहवेह मोशेला म्हणाले, “माझ्याकडे का रडतोस? इस्राएली लोकांना पुढे जायला सांग. \v 16 समुद्रातील पाणी दुभागावे म्हणून तुझ्या हातातील काठी समुद्रावर उगार म्हणजे इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून जातील. \v 17 मी इजिप्तच्या लोकांची मने कठीण करेन आणि ते त्यांच्यामागे समुद्राच्या आत येतील. मग फारोह, त्याचे सर्व सैनिक, रथ व घोडेस्वार यांच्याकडून मी माझे गौरव करून घेईन. \v 18 आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.” \p \v 19 मग परमेश्वराचा दूत, जो इस्राएलांपुढे प्रवास करीत होता, तो आता त्यांच्या मागच्या बाजूला गेला. मेघस्तंभ देखील त्यांच्यापुढून निघून त्यांच्यामागे गेला, \v 20 आणि इजिप्तचे सैन्य व इस्राएली लोक यांच्यामध्ये आला. त्या रात्रभर मेघांनी एका बाजूने प्रकाश तर दुसर्‍या बाजूने अंधकार आणला; म्हणून रात्रभर एक दल दुसर्‍यापर्यंत पोहोचला नाही. \p \v 21 मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले. \v 22 तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले. \p \v 23 इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि फारोहचे घोडे, रथ व स्वार त्यांच्यामागे समुद्राच्या मध्ये गेले. \v 24 पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला. \v 25 त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.” \p \v 26 मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.” \v 27 मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला आणि पहाटेच्या वेळी समुद्र त्याच्या ठिकाणी परत गेला. इजिप्तचे लोक त्याच्याकडे धावत असताना याहवेहने त्यांना समुद्रात बुडवून टाकले. \v 28 पाणी परत वाहू लागले व फारोहचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ—फारोहचे संपूर्ण सैन्य, ज्यांनी इस्राएली लोकांचा समुद्रामध्ये पाठलाग केला ते पाण्याखाली गेले. त्यांच्यातील एकही जिवंत राहिला नाही. \p \v 29 पण इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र पार करून गेले आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले. \v 30 त्या दिवशी याहवेहने इस्राएलला इजिप्तच्या हातातून सोडविले, इस्राएली लोकांनी इजिप्तचे मेलेले लोक समुद्रकिनार्‍यावर पडलेले पाहिले. \v 31 जेव्हा इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांविरुद्ध आलेला याहवेहचा पराक्रमी हात बघितला, त्यावेळी त्यांना याहवेहचे भय वाटले आणि त्यांनी याहवेह व त्यांचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला. \c 15 \s1 मोशे व मिर्यामचे गीत \p \v 1 नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले: \q1 “मी याहवेहला गीत गाईन, \q2 कारण ते अत्युच्च आहेत. \q1 घोडे व त्यांचे स्वार \q2 त्यांनी समुद्रात फेकले आहेत. \b \q1 \v 2 “याहवेह माझे सामर्थ्य व माझे संरक्षण\f + \fr 15:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa गीत\fqa*\f* आहेत; \q2 याहवेह माझे तारण झाले आहेत. \q1 तेच माझा परमेश्वर आहेत आणि मी त्यांची स्तुती करेन, \q2 माझ्या पूर्वजांचे परमेश्वर, मी त्यांचा महिमा वर्णीन. \q1 \v 3 याहवेह योद्धा आहेत; \q2 याहवेह त्यांचे नाव आहे. \q1 \v 4 फारोहचे रथ व सैन्य \q2 त्यांनी समुद्रात उलथून टाकले. \q1 फारोहचे सर्वोत्तम अधिकारी \q2 तांबड्या समुद्रात बुडून गेले. \q1 \v 5 खोल पाण्याने त्यांना झाकून टाकले; \q2 दगडाप्रमाणे ते खोल तळाशी बुडून गेले. \q1 \v 6 हे याहवेह, तुमचा उजवा हात, \q2 सामर्थ्याने ऐश्वर्यमान आहे. \q1 हे याहवेह तुमच्या उजव्या हाताने, \q2 शत्रूला हादरून टाकले. \b \q1 \v 7 “तुमच्या ऐश्वर्याच्या महानतेने \q2 तुमच्या विरोधकांना तुम्ही खाली पाडले. \q1 स्वैर सोडलेल्या तुमच्या क्रोधाने; \q2 भुशाप्रमाणे त्यांना भस्म केले. \q1 \v 8 तुमच्या नाकपुड्यांच्या श्वासाने \q2 जले एकत्र आली. \q1 पाण्याचे प्रवाह भिंतीप्रमाणे उभे राहिले; \q2 डोहातील पाणी समुद्राच्या मध्यभागी गोळा झाले. \q1 \v 9 शत्रूने फुशारकी मारीत म्हटले, \q2 ‘मी पाठलाग करून त्यांच्यावर मात करेन. \q1 मी लूट वाटून घेईन; \q2 त्यांच्या जिवावर मी तृप्त होईन. \q1 मी माझी तलवार उपसेन \q2 आणि माझ्या हाताने त्यांचा नाश होईल.’ \q1 \v 10 पण तुम्ही आपला श्वास फुंकला, \q2 आणि समुद्राने त्यांना झाकून टाकले. \q1 ते शीसाप्रमाणे \q2 महाजलात बुडून गेले. \q1 \v 11 सर्व दैवतांमध्ये \q2 हे याहवेह तुमच्यासारखे कोण आहे? \q1 पवित्रतेत ऐश्वर्यमान; \q2 वैभवात अद्वितीय, \q1 आश्चर्यकर्मे करणारे, \q2 असे तुमच्यासारखे कोण आहे?” \b \q1 \v 12 तुम्ही आपला उजवा हात उगारला, \q2 आणि पृथ्वीने तुमच्या शत्रूंना गिळून टाकले. \q1 \v 13 तुम्ही उद्धारलेल्या लोकांना \q2 आपल्या प्रेमदयेने चालविणार. \q1 आपल्या सामर्थ्याने तुम्ही त्यांना \q2 तुमच्या पवित्र निवासस्थानाकडे घेऊन जाणार. \q1 \v 14 राष्ट्रे हे ऐकून थरथर कापतील; \q2 पलिष्टी भीतीने ग्रासून जातील. \q1 \v 15 एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, \q2 मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, \q1 कनानातील लोक वितळून जातील; \q2 \v 16 तुमच्या बाहूच्या पराक्रमामुळे \q1 भीती व दहशत त्यांच्यावर येऊन पडेल. \q2 तुमचे लोक पार करेपर्यंत, हे याहवेह, \q1 जे लोक तुम्ही खंडून\f + \fr 15:16 \fr*\ft निर्माण केलेले\ft*\f* घेतले आहेत, ते पार होईपर्यंत \q2 ते दगडाप्रमाणे स्तब्ध राहतील. \q1 \v 17 तुम्ही त्यांना आत, \q2 तुमच्या वतनाच्या पर्वतावर आणून रोपणार; \q1 तेच ठिकाण याहवेह, जे तुम्ही आपल्या निवासासाठी तयार केले, \q2 ते पवित्रस्थान जे, हे प्रभू, तुमच्या हातांनी प्रस्थापित केले. \b \q1 \v 18 याहवेह सदासर्वकाळ \q2 राज्य करतील. \p \v 19 जेव्हा फारोहचे घोडे, रथ आणि घोडेस्वार समुद्रामध्ये गेले, तेव्हा याहवेहने समुद्राचे पाणी परत त्यांच्यावर आणले; परंतु इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या वाटेवरून चालले. \v 20 तेव्हा अहरोनाची बहीण, मिर्याम संदेष्टी, हिने हातात डफ घेतला आणि सर्व स्त्रिया तिच्यामागे हातात डफ घेऊन नाचू लागल्या. \v 21 मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले: \q1 “याहवेहप्रीत्यर्थ गीत गा, \q2 कारण ते अत्युच्च आहेत. \q1 घोडे व त्यांचे स्वार \q2 त्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.” \s1 मारा व एलीम येथील पाणी \p \v 22 मग मोशेने इस्राएली लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे शूर नावाच्या रानात आणले. तीन दिवसांच्या रानातील त्यांच्या प्रवासात त्यांना पाणी मिळाले नाही. \v 23 मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.) \v 24 “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली. \p \v 25 तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले. \p त्या ठिकाणी याहवेहने त्यांना पारखण्यासाठी नियम व सूचना दिल्या. \v 26 ते म्हणाले, “जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा\f + \fr 15:26 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa याहवेह रोफेखा\fqa*\f* आहे.” \p \v 27 मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. \c 16 \s1 मान्ना व लावे \p \v 1 इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला. \v 2 त्या रानात सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली. \v 3 इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.” \p \v 4 मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी तुमच्यासाठी स्वर्गातून भाकरीची वृष्टी करेन. लोकांनी दररोज बाहेर जाऊन त्या दिवसासाठी पुरेलसे गोळा करावे. म्हणजे ते माझ्या सूचनेप्रमाणे वागतात की नाहीत याची मला परीक्षा करता येईल. \v 5 सहाव्या दिवशी ते जे काही आत आणतील ते त्यांनी तयार करावे आणि दररोज ते जेवढे गोळा करतात त्यापेक्षा दुप्पट असावे.” \p \v 6 मग मोशे व अहरोन यांनी सर्व इस्राएली लोकांना सांगितले, “संध्याकाळच्या वेळी तुम्हाला समजेल की याहवेहनेच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. \v 7 आणि सकाळी तुम्ही याहवेहचे गौरव बघाल, कारण तुम्ही याहवेहविरुद्ध केलेली कुरकुर त्यांनी ऐकली आहे. आम्ही कोण आहोत की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?” \v 8 मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.” \p \v 9 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “संपूर्ण इस्राएली समुदायाला सांग, ‘याहवेहच्या समोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे.’ ” \p \v 10 अहरोन सर्व इस्राएली लोकांशी बोलत असताना, त्यांनी रानाकडे पाहिले आणि त्यांना याहवेहचे गौरव ढगात प्रकट होत असलेले दिसले. \p \v 11 याहवेह मोशेला म्हणाले, \v 12 “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग, ‘सायंकाळी तुम्ही मांस खाल, व सकाळी तुम्ही भाकरीने तृप्त व्हाल. मग तुम्हाला समजेल की, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” \p \v 13 त्या संध्याकाळी लावे पक्षी त्यांच्या वस्तीवर येऊन उतरले व त्यामुळे छावणी व सभोवतालची सर्व जमीन झाकली गेली आणि सकाळी छावणी सभोवती दवबिंदूंचा थर जमला होता. \v 14 जेव्हा दवबिंदू नाहीसे झाले, तेव्हा रानातील भूमीवर हिमकणांएवढे खवल्यांसारखे बारीक तुकडे पसरलेले दिसू लागले. \v 15 जेव्हा इस्राएली लोकांनी ते पाहिले, ते एकमेकास म्हणू लागले, “हे काय आहे?” कारण ते काय होते ते त्यांना ठाऊक नव्हते. \p मोशे त्यांना म्हणाला, “हीच ती भाकर आहे जी याहवेहने तुम्हाला खाण्यासाठी दिली आहे. \v 16 याहवेहने दिलेली आज्ञा ही: ‘प्रत्येकाने त्यांना लागते तेवढे गोळा करावे. तुमच्या तंबूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओमेर\f + \fr 16:16 \fr*\ft म्हणजे दीड कि.ग्रॅ.\ft*\f* एवढे घ्यावे.’ ” \p \v 17 इस्राएली लोकांनी जसे त्यांना सांगितले होते तसे केले; काहींनी अधिक तर काहींनी थोडे गोळा केले. \v 18 आणि जेव्हा त्यांनी ते ओमेरच्या मापाने मोजले, ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही. प्रत्येकाने त्यांना जितके लागत होते तितकेच गोळा केले होते. \p \v 19 मग मोशे त्यांना म्हणाला, “यातील काहीही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये,” \p \v 20 तरीही काहींनी मोशेच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही; व त्याचा काही भाग सकाळपर्यंत ठेवला, पण त्यात किडे पडून त्याला दुर्गंधी सुटली होती, तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला. \p \v 21 मग रोज सकाळी प्रत्येकाला लागते तेवढेच ते गोळा करीत असत आणि जेव्हा सूर्य प्रखर होई, तेव्हा ते वितळून जात असे. \v 22 आठवड्याच्या सहाव्या दिवशी ते रोजच्यापेक्षा दुप्पट—प्रत्येकी दोन ओमेर अन्न गोळा करीत—आणि सर्व इस्राएली वडीलमंडळींनी येऊन मोशेला याबद्दल हवाला दिला. \v 23 मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ” \p \v 24 म्हणून त्यांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ते सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्याला ना दुर्गंधी आली ना त्यात किडे पडले. \v 25 मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही. \v 26 सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.” \p \v 27 पण काही लोक सातव्या दिवशी सुद्धा ते गोळा करावयाला बाहेर गेले. पण त्यांना काहीही सापडले नाही. \v 28 मग याहवेहने मोशेला म्हटले, “किती काळ तुम्ही माझे नियम व माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार? \v 29 हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.” \v 30 म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला. \p \v 31 इस्राएली लोकांनी त्या भाकरीला मान्ना\f + \fr 16:31 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa हे काय आहे?\fqa*\f* असे नाव दिले. ते धण्याच्या बीजाप्रमाणे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पापडीप्रमाणे होती. \v 32 मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्‍या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ” \p \v 33 मोशेने अहरोनाला सांगितले, “एक पात्र घे व त्यात एक ओमेर मान्ना घाल. मग तो पुढे येणार्‍या पिढ्यांसाठी याहवेहसमोर ठेव.” \p \v 34 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे, अहरोनाने तो मान्ना कराराच्या पाट्यांबरोबर ठेवला, अशासाठी की तो राखून ठेवला जाईल. \v 35 इस्राएली लोक स्थायिक असलेल्या भूमीवर येईपर्यंत, त्यांनी चाळीस वर्षे मान्ना खाल्ला; ते कनान देशाच्या सीमेवर पोहोचेपर्यंत त्यांनी मान्ना खाल्ला. \p \v 36 (एक ओमेर हा एका एफाचा दहावा भाग आहे.) \c 17 \s1 खडकातून पाणी \p \v 1 सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते. \v 2 तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” \p मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?” \p \v 3 पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?” \p \v 4 मग मोशेने याहवेहकडे आरोळी मारली, “मी या लोकांचे काय करू? ते तर मला धोंडमार करण्याच्या तयारीत आहेत.” \p \v 5 मग याहवेहने मोशेला सांगितले, “लोकांच्या समोर जा. काही इस्राएली वडिलजनांना आपल्याबरोबर घे आणि नाईल नदीवर ज्या काठीने मारले ती आपल्या हाती घे आणि नीघ. \v 6 होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले. \v 7 मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा\f + \fr 17:7 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa परीक्षा\fqa*\f* व मरीबाह\f + \fr 17:7 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa भांडण\fqa*\f* असे ठेवले; कारण इस्राएली लोकांनी भांडण केले आणि याहवेह आमच्यामध्ये आहेत की नाहीत? असे म्हणून याहवेहची परीक्षा घेतली. \s1 अमालेकांवर विजय \p \v 8 नंतर अमालेकी आले व त्यांनी इस्राएली लोकांवर रफीदीम येथे हल्ला केला. \v 9 मोशे यहोशुआला म्हणाला, “आपल्यातून काही माणसे निवड आणि बाहेर जाऊन अमालेक्यांशी युद्ध करा. उद्या मी परमेश्वराची काठी माझ्या हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन.” \p \v 10 मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले. \v 11 जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे. \v 12 जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. \v 13 आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले. \p \v 14 मग याहवेह मोशेला म्हणाले, “या घटनेची आठवण रहावी म्हणून तू ती ग्रंथात लिहून ठेव आणि ते यहोशुआच्या कानी पडेल याची खात्री कर, कारण मी पृथ्वीवरून अमालेकांचा संपूर्णपणे नाश करणार.” \p \v 15 मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधली व त्या ठिकाणाचे नाव याहवेह निस्सी\f + \fr 17:15 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa याहवेह आमचे ध्वज\fqa*\f* असे ठेवले. \v 16 तो म्हणाला, “कारण याहवेहच्या राजासनाविरुद्ध हात उगारले गेले, म्हणून याहवेह पिढ्यान् पिढ्या पर्यंत अमालेक्यांशी युद्ध करतील.” \c 18 \s1 इथ्रो मोशेला भेटतो \p \v 1 आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले. \p \v 2 मोशेने आपली पत्नी सिप्पोराहला व त्याच्या दोन मुलांना आपला सासरा इथ्रो याच्याकडे सोडले होते, \v 3 मोशेच्या एका मुलाचे नाव गेर्षोम\f + \fr 18:3 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa परकीय\fqa*\f* असे होते; कारण मोशे म्हणाला, “मी परक्या देशात विदेशी झालो आहे.” \v 4 दुसर्‍या मुलाचे नाव एलिएजर\f + \fr 18:4 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa माझे परमेश्वर माझे साहाय्य आहेत\fqa*\f* असे ठेवले होते. कारण मोशे म्हणाला, “माझ्या वडिलांचे परमेश्वर माझे साहाय्य झाले; व त्यांनी मला फारोहच्या तलवारीपासून सोडविले.” \p \v 5 इथ्रो, मोशेचा सासरा, मोशेची पत्नी व मुलांसोबत, परमेश्वराच्या डोंगराजवळ रानात जिथे त्यांनी तळ दिला होता तिथे आला. \v 6 इथ्रोने मोशेला निरोप पाठविला, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी पत्नी व दोन मुले घेऊन तुझ्याकडे येत आहे.” \p \v 7 तेव्हा मोशे त्याच्या सासर्‍याला भेटायला बाहेर आला आणि नमन करून त्याचे चुंबन घेतले. ते एकमेकांना अभिवादन करून तंबूत गेले. \v 8 मोशेने आपल्या सासर्‍याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली. \p \v 9 इजिप्तच्या लोकांच्या हातातून इस्राएलची सुटका करण्यासाठी याहवेहने जी चांगली कृत्ये केली, ती ऐकून इथ्रोला फार आनंद झाला. \v 10 इथ्रो म्हणाला, “याहवेहचे नाव धन्यवादित असो, ज्यांनी तुला इजिप्त व फारोहच्या तावडीतून सोडविले आणि ज्यांनी लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातातून सोडविले. \v 11 आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.” \v 12 मग मोशेचा सासरा इथ्रोने परमेश्वरासाठी होमार्पण व इतर अर्पणे आणली आणि अहरोन व इस्राएली लोकांचे सर्व वडील मोशेच्या सासर्‍याबरोबर भोजन करावयास परमेश्वराच्या समक्षतेत आले. \p \v 13 दुसर्‍या दिवशी मोशे इस्राएली लोकांचा न्याय करावयाला त्याच्या आसनावर बसला आणि लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याभोवती उभे राहिले. \v 14 जेव्हा मोशे लोकांसाठी जे सर्व करीत होता ते त्याच्या सासर्‍याने पाहिले, तो म्हणाला, “हे तू लोकांसाठी काय करीत आहेस? तू एकटाच न्यायाधीश म्हणून का बसतोस व ते सर्व लोक दिवसभर तुझ्याभोवती उभे असतात?” \p \v 15 मोशे त्याला म्हणाला, “कारण लोक परमेश्वराची इच्छा जाणावी म्हणून माझ्याकडे येतात. \v 16 जेव्हा त्यांच्यात वाद होतात, ते माझ्याकडे आणतात आणि मी त्यांचा निर्णय करतो आणि त्यांना परमेश्वराचे विधी व नियम याबद्दल सांगतो.” \p \v 17 मोशेच्या सासर्‍याने उत्तर दिले, “तू जे करतोस ते बरोबर नाही. \v 18 तू व हे लोक जे तुझ्याकडे येतात, सर्वजण थकून जाल. हे काम तुझ्यासाठी खूप जड आहे; तू एकट्यानेच ते करणे तुला जमणार नाही. \v 19 तर आता तू माझे ऐक आणि मी तुला सल्ला देतो आणि परमेश्वर तुझ्याबरोबर असो. तू परमेश्वरासमोर या लोकांचा प्रतिनिधी म्हणून राहा आणि त्यांचे वाद परमेश्वरासमोर आण. \v 20 परमेश्वराचे विधी व नियम त्यांना शिकव आणि ज्या मार्गाने त्यांनी चालावे आणि त्यांचे वर्तन कसे असावे हे त्यांना दाखव. \v 21 पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर. \v 22 त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील. \v 23 जर तू असे केले आणि परमेश्वराने तुला आज्ञा केली, तर तुला सोपे जाईल आणि हे लोकसुद्धा समाधानी होऊन घरी जातील.” \p \v 24 मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून सर्वकाही त्याने सांगितल्याप्रमाणे केले. \v 25 मोशेने संपूर्ण इस्राएलातून सक्षम अशी माणसे निवडली व त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले. \v 26 त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले. \p \v 27 मग मोशेने आपल्या सासर्‍याचा निरोप घेतला आणि इथ्रो त्याच्या देशास परत निघून गेला. \c 19 \s1 सीनाय पर्वतावर मोशे \p \v 1 इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यावर तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी; याच दिवशी ते सीनायच्या रानात आले. \v 2 रफीदीम येथून निघाल्यावर, त्यांनी सीनायच्या रानात प्रवेश केला आणि इस्राएल त्या ठिकाणी रानात पर्वतापुढे तळ देऊन राहिले. \p \v 3 नंतर मोशे परमेश्वराकडे गेला आणि याहवेहने पर्वतावरून त्याला आवाज देऊन म्हटले, “याकोबाच्या वंशजांना, म्हणजेच इस्राएली लोकांना तू हे सांगावे: \v 4 ‘मी इजिप्तच्या लोकांचे काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर माझ्याकडे कसे वाहून आणले, ते तुम्ही स्वतःच पाहिले आहे. \v 5 आता जर तुम्ही पूर्णपणे माझे आज्ञापालन केले आणि माझा करार पाळला, तर सर्व राष्ट्रात तुम्ही माझे मोलवान धन व्हाल. जरी सर्व पृथ्वी माझी आहे, \v 6 तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.” \p \v 7 तेव्हा मोशेने इस्राएली पुढार्‍यांना बोलावून ज्यागोष्टी याहवेहने सांगाव्या म्हणून आज्ञापिल्या होत्या, त्या त्यांना सांगितल्या. \v 8 तेव्हा सर्व लोक एकत्र प्रतिसाद देत म्हणाले, “जे काही याहवेहने सांगितले, ते सर्व आम्ही करू.” मग मोशेने जाऊन लोकांचे म्हणणे याहवेहला कळविले. \p \v 9 मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी घनदाट मेघातून तुझ्याकडे येईन, अशासाठी की मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील.” मग मोशेने लोक काय म्हणाले ते याहवेहला सांगितले. \p \v 10 आणि याहवेह मोशेला म्हणाले, “लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावे, \v 11 आणि तिसर्‍या दिवशी तयार असावे, कारण त्या दिवशी याहवेह सर्व लोकांसमक्ष सीनाय पर्वतावर उतरून येतील. \v 12 लोकांसाठी पर्वताच्या सभोवती सीमारेषा आख आणि त्यांना सांग, ‘कोणीही पर्वताकडे जाऊ नये किंवा त्याच्या पायथ्यालाही कोणी स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्यावी. जे कोणी पर्वताला हात लावतील त्यांना मारून टाकावे.’ \v 13 त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.” \p \v 14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरून लोकांकडे गेला, त्याने त्यांना शुद्ध केले व लोकांनी आपले कपडे धुतले. \v 15 मग तो लोकांना म्हणाला, “तिसर्‍या दिवसासाठी आपली तयारी करा, लैंगिक संभोगापासून दूर राहा.” \p \v 16 तिसर्‍या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले. \v 17 मग मोशेने लोकांना परमेश्वराला भेटण्यासाठी छावणीच्या बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. \v 18 सीनाय पर्वत धुराने झाकून गेला होता, कारण याहवेह अग्निरुपात पर्वतावर उतरले होते. भट्टीतून निघावा तसा धूर उठला होता आणि सगळा पर्वत जोरात थरथरत होता. \v 19 कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते. \p \v 20 याहवेह सीनाय पर्वतावर उतरले व मोशेला पर्वतावर बोलाविले. मग मोशे वर गेला, \v 21 आणि याहवेह मोशेला म्हणाले. “खाली जा व लोकांना सांग की याहवेहला पाहण्यासाठी त्यांनी सीमा ओलांडू नये आणि पुष्कळांचा नाश होऊ नये. \v 22 याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.” \p \v 23 तेव्हा मोशे याहवेहला म्हणाला, “लोक सीनाय पर्वताजवळ येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही स्वतःच आम्हाला ताकीद दिली आहे, ‘पर्वताभोवती सीमा आखून आम्ही त्याला पवित्र ठेवावे.’ ” \p \v 24 याहवेहने उत्तर दिले, “खाली जा आणि अहरोनाला तुझ्याबरोबर घेऊन ये. परंतु याजकांनी व लोकांनी याहवेहकडे सीमा ओलांडून येऊ नये, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.” \p \v 25 मग मोशे खाली लोकांकडे गेला व त्यांना हे सर्व सांगितले. \c 20 \s1 दहा आज्ञा \p \v 1 आणि परमेश्वर ही सर्व वचने बोलले: \b \lh \v 2 “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे. \b \li1 \v 3 “माझ्यासमोर\f + \fr 20:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa शिवाय\fqa*\f* तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.” \li1 \v 4 तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका. \v 5 तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो. \v 6 परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो. \li1 \v 7 याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत. \li1 \v 8 शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा. \v 9 सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी. \v 10 परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये. \v 11 कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला. \li1 \v 12 आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल. \li1 \v 13 तुम्ही खून करू नका. \li1 \v 14 तुम्ही व्यभिचार करू नका. \li1 \v 15 तुम्ही चोरी करू नका. \li1 \v 16 तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका. \li1 \v 17 तुमच्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका. \b \p \v 18 जेव्हा लोकांनी विजा पाहिल्या आणि गडगडाट व तुतारीचा आवाज ऐकला आणि धुराने भरलेला पर्वत पाहिला, ते भीतीने कंपित झाले व दूर उभे राहिले \v 19 आणि ते मोशेला म्हणाले, “तुम्ही स्वतः आमच्याशी बोला आणि आम्ही ऐकू. पण परमेश्वराला मात्र आमच्याशी बोलू देऊ नका, नाहीतर आम्ही मरून जाऊ.” \p \v 20 मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.” \p \v 21 परमेश्वर होते तिथे मोशे दाट अंधकारात गेला असताना, लोक दूर अंतरावर उभे राहिले. \s1 मूर्ती व वेद्या \p \v 22 मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांस हे सांग: ‘मी तुमच्याशी स्वर्गातून बोललो हे तुम्ही स्वतः पाहिले आहे: \v 23 माझ्या खेरीज इतर कोणतेही देव बनवू नका; तुमच्यासाठी चांदीच्या किंवा सोन्याच्या मूर्त्या बनवू नका. \p \v 24 “ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन. \v 25 तुम्ही माझ्यासाठी जर दगडाची वेदी बांधली, तर त्यासाठी घडविलेले दगड वापरू नयेत. त्यावर कोणतेही हत्यार वापरले तर तुम्ही त्यास विटाळून टाकाल. \v 26 आपली नग्नता उघडी पडू नये म्हणून माझ्या वेदीवर पायर्‍या चढून जाऊ नका.’ \c 21 \p \v 1 “तू त्यांच्यासमोर मांडावयाचे नियम हे आहेत: \s1 इब्री गुलाम \p \v 2 “तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला, तर त्याने तुमची सहा वर्षे सेवा करावी. परंतु सातव्या वर्षी तो काहीही भरपाई न घेता स्वतंत्र होईल. \v 3 जर तो एकटाच आला, तर तो एकटाच स्वतंत्र जाईल; परंतु तो आपल्या पत्नीसोबत आला तर तीसुद्धा त्याच्याबरोबर जाईल. \v 4 जर गुलाम असताना त्याच्या मालकाने त्याचे लग्न करून दिले आणि त्याला मुले व मुली झाले, तर ती स्त्री व तिची लेकरे त्या मालकाच्या हक्काची राहतील आणि तो मनुष्य एकटाच स्वतंत्र केला जाईल. \p \v 5 “पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही, \v 6 तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर\f + \fr 21:6 \fr*\ft म्हणजे परमेश्वरासमोर\ft*\f* आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील. \p \v 7 “एखाद्या मनुष्याने आपली मुलगी गुलाम म्हणून विकली, तर पुरुष केले जातात त्याप्रमाणे ती स्वतंत्र केली जाणार नाही. \v 8 ज्याने तिला आपल्यासाठी निवडून घेतले होते, त्या आपल्या मालकाला जर ती संतुष्ट करीत नाही, तर त्याने तिची खंडणी भरून तिला जाऊ द्यावे; तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही, कारण त्याने तिचा विश्वास तोडला आहे. \v 9 पण आपल्या मुलासाठी जर तो तिची निवड करतो, तर त्याने आपल्या मुलीचे हक्क तिला द्यावे. \v 10 जर तो दुसर्‍या स्त्रीशी विवाह करतो, तर त्याने पहिल्या पत्नीला अन्न, वस्त्र, आणि वैवाहिक हक्क यापासून वंचित ठेऊ नये. \v 11 जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते. \s1 वैयक्तिक इजा \p \v 12 “जर कोणी एखाद्यावर प्राणघातक हल्ला केला तर त्याला मृत्युदंड द्यावा. \v 13 जरी ते मुद्दाम केलेले नाही, पण परमेश्वरानेच ते घडवून आणले, तर मी नेमलेल्या ठिकाणी त्यांनी पळून जावे. \v 14 पण कोणी जर कपटाने एखाद्याचा वध केला, तर त्याला माझ्या वेदीकडे नेऊन मृत्युदंड द्यावा. \p \v 15 “जे कोणी आपला पिता किंवा आईला जिवे मारतात\f + \fr 21:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa हल्ला करतात\fqa*\f* त्यांना जिवे मारावे. \p \v 16 “जो कोणी एखाद्याचे अपहरण करतो त्याला जिवे मारावे, पीडित व्यक्ती त्याच्या ताब्यात असो किंवा कोणाला विकलेली असो. \p \v 17 “जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे. \p \v 18 “जर लोक आपसात भांडत असताना एकाने दुसर्‍याला दगडाने किंवा बुक्कीने मारले आणि पीडित व्यक्ती मेली नाही, परंतु आपले अंथरूण धरून राहिली, \v 19 आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा. \p \v 20 “जो कोणी आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाला काठीने मारेल व त्यामुळे गुलाम मरण पावला, तर त्या धन्याला शिक्षा व्हावी. \v 21 पण जर गुलाम एक किंवा दोन दिवसात बरा झाला तर त्यांना पैशाची शिक्षा होणार नाही, कारण गुलाम त्यांच्या मालकीचा आहे. \p \v 22 “कोणी मारामारी करीत असताना एखाद्या गरोदर स्त्रीला धक्का लागला व त्यामुळे तिचा गर्भपात झाला, पण तिला गंभीर इजा झाली नाही, तर तिचा पती मागेल व न्यायाधीश मान्य करेल तितकी रक्कम अपराध्याने द्यावी. \v 23 परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव, \v 24 डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, \v 25 चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम किंवा इजेबद्दल इजा द्यावी. \p \v 26 “एखाद्या धन्याने आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाच्या डोळ्यांवर मारून तो फोडला तर डोळ्याची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे. \v 27 एखादा धनी जो आपल्या गुलाम पुरुष किंवा स्त्रीचा दात पाडतो, तर दाताची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे. \p \v 28 “एखाद्या बैलाने एखाद्या पुरुष किंवा स्त्रीस हुंदडून जिवे मारले, तर त्या बैलास धोंडमार करून ठार मारावे व त्याचे मांस खाऊ नये. परंतु बैलाचा मालक निर्दोष असून जबाबदार असणार नाही. \v 29 पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे. \v 30 परंतु जर त्याच्याकडून खंडणी मागितली असेल, तर जेवढी रक्कम मागितली ती देऊन तो मालक आपला जीव वाचवू शकतो. \v 31 एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला बैलाने हुंदडून मारले, तरी हाच नियम लागू व्हावा. \v 32 पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी. \p \v 33 “जर कोणी एखादा खड्डा उघडला किंवा खणला व तो झाकला नाही आणि त्यात बैल किंवा गाढव पडले, \v 34 तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे. \p \v 35 “जर कोणाच्या बैलाने दुसर्‍याच्या बैलाला हुंदडून मारले, तर त्या दोघांनी जिवंत असलेला बैल विकून आलेली रक्कम व मेलेला बैल यांचा सारखा वाटा करून घ्यावा. \v 36 पण आपला बैल मारका आहे हे त्या बैलाच्या मालकाला माहिती असूनही, त्याने त्या बैलाला बांधले नाही, तर त्याच्या धन्याने जनावराबद्दल भरपाई करावी व मेलेले जनावर घ्यावे. \c 22 \s1 संपत्तीच्या संरक्षणासंबंधी \p \v 1 “जर एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले व ते कापले किंवा विकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे परत करावीत. \p \v 2 “एखादा चोर घरफोडी करताना सापडला व त्याला मारत असताना तो मेला, तर मारणारा रक्तदोषी राहणार नाही. \v 3 पण ते जर सूर्योदय झाल्यावर घडले, तर मारणारा रक्तदोषी ठरेल. \p “ज्याने चोरी केली त्याने खचितच भरपाई करून द्यावी, पण त्याच्याकडे काहीही नसले, तर त्याला चोरीची भरपाई म्हणून विकून टाकावे. \v 4 त्याने चोरलेले बैल, गाढव किंवा मेंढरू त्याच्याजवळ जिवंत सापडले; तर त्याने त्याची दुपटीने भरपाई करावी. \p \v 5 “जर कोणी व्यक्ती आपली जनावरे दुसर्‍याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरण्यासाठी मोकळी सोडतो, तर त्याने आपल्या स्वतःच्या शेतातील व द्राक्षमळ्यातील सर्वोत्तम पीक देऊन भरपाई करावी. \p \v 6 “कोणी जर विस्तव पेटविले आणि चुकून तो काट्यांच्या झुडूपात पसरून दुसर्‍याच्या धान्याची कोठारे किंवा उभे पीक किंवा संपूर्ण शेत जळून जाते, तर ज्याने विस्तव पेटविले त्याने नुकसान भरपाई करून द्यावी. \p \v 7 “जर कोणी चांदी किंवा सामान सुरक्षित राहावे म्हणून आपल्या शेजार्‍याकडे ठेवले आणि त्याची चोरी झाली, जर चोराला पकडले तर त्या चोराने त्या सामानाची दुप्पट भरपाई करून द्यावी. \v 8 पण जर चोर सापडला नाही तर घरमालकाने न्यायाधीशासमोर\f + \fr 22:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa परमेश्वरासमोर\fqa*\f* हजर व्हावे आणि शेजार्‍याच्या सामानावर त्याने हात टाकला नाही हे सिद्ध करावे. \v 9 एखादे बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा एखादी हरवलेली वस्तू असे काहीही असो, ज्याबद्दल कोणी कलहाने बेकायदेशीरपणे म्हणतो की, ‘हे माझे आहे,’ तर त्या दोघांचाही वाद न्यायाधीशासमोर\f + \cat dup\cat*\fr 22:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa परमेश्वरासमोर\fqa*\f* आणावा. ज्या कोणाला न्यायाधीश दोषी ठरवेल त्याने दुसर्‍याला दुपटीने परत करावे. \p \v 10 “जर कोणी आपले गाढव, बैल, मेंढरू किंवा कोणतेही जनावर आपल्या शेजार्‍याकडे सुरक्षित राहावे म्हणून ठेवले आणि ते मेले किंवा त्याला काही इजा झाली किंवा त्याच्यावर नजर नसताना त्याला कोणी घेऊन गेले, \v 11 तर शेजार्‍याने दुसर्‍याच्या जनावरावर हात टाकला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याहवेहसमोर शपथ घ्यावी. मालकाला यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही रक्कम भरून द्यायची गरज नाही. \v 12 पण ते जनावर जर शेजार्‍याकडून चोरीला गेले, तर त्याने मालकाला भरपाई करून द्यावे. \v 13 जर एखाद्या जंगली श्वापदाने ते जनावर फाडून टाकले, तर त्या शेजार्‍याने त्या जनावराचे पार्श्वशरीर पुरावा म्हणून समोर आणावे आणि त्या फाडलेल्या जनावराची फेड करून देऊ नये. \p \v 14 “जर कोणी आपल्या शेजार्‍याकडून जनावर उसने घेतो व जनावराचा मालक तिथे नसताना ते जनावर जखमी झाले किंवा मेले, तर त्याने त्याची भरपाई त्याला द्यावी. \v 15 पण मालक जनावराबरोबर असला, तर भाडेकरूने त्याची भरपाई करू नये. जर त्याने ते भाड्याने घेतले असेल, तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते. \s1 सामाजिक जबाबदारी \p \v 16 “जर एखादा मनुष्य मागणी न झालेल्या कुमारीला भुलवितो आणि तिचा विनयभंग करतो, तर त्याने वधूकिंमत द्यावी आणि ती त्याची पत्नी होईल. \v 17 पण जर तिच्या वडिलांनी ती त्याला देण्यास नाकारले, तरीही त्याने कुमारिकेची वधूकिंमत द्यावी. \p \v 18 “चेटकिणीला मुळीच जिवंत राहू देऊ नये. \p \v 19 “पशुशी लैंगिक संबंध करणार्‍याला अवश्य जिवे मारावे. \p \v 20 “याहवेह परमेश्वराशिवाय इतर दैवतांना अर्पणे करणार्‍यांचा नाश करून टाकावा. \p \v 21 “परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता. \p \v 22 “विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये. \v 23 तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन. \v 24 मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील. \p \v 25 “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका. \v 26 तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा, \v 27 कारण तुमच्या शेजार्‍याजवळ पांघरावयाला तेवढेच असेल, तर ते रात्री काय घेऊन झोपतील? आणि जेव्हा ते माझ्याकडे धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन, कारण मी दयाळू आहे. \p \v 28 “तुम्ही परमेश्वराची\f + \fr 22:28 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्यायाधीशांची\fqa*\f* निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये. \p \v 29 “आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. \p “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा. \v 30 बैल व मेंढे यांच्याविषयी सुद्धा असेच करावे. त्यांना सात दिवस त्यांच्या आईजवळ राहू द्यावे, परंतु आठव्या दिवशी ते मला द्यावे. \p \v 31 “तुम्ही माझे पवित्र लोक असावे. यास्तव हिंस्र श्वापदाने मारून टाकलेल्या प्राण्याचे मांस खाऊ नये; ते तुम्ही कुत्र्यांना घालावे. \c 23 \s1 न्याय आणि दयेविषयी नियम \p \v 1 “तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये. \p \v 2 “दुष्कृत्य करण्याकरिता जमावाला अनुसरू नका आणि त्या जमावाशी एक होऊन न्यायवादात आपली साक्ष फिरवू नका, \v 3 आणि गरिबाच्या न्यायवादात तो दोषी असता, त्यावर दया दाखवू नये. \p \v 4 “तुमच्या वैर्‍याचा बैल किंवा गाढव भटकलेला असा तुमच्या नजरेस पडला, तर ते तुम्ही अवश्य माघारी आणून परत करावे. \v 5 जे तुमचा द्वेष करतात त्यांचे गाढव ओझ्याखाली पडलेले तुम्हाला दिसले, ते तसेच सोडू नये; त्यांना अवश्य मदत करावी. \p \v 6 “तुमच्यातील गरिबांच्या न्यायवादात त्यांचा न्याय नाकारला जाऊ नये. \v 7 खोट्या आरोपांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि निरपराधी किंवा प्रामाणिक व्यक्तीला मरणदंड देऊ नये, कारण मी दोषी व्यक्तीला सोडणार नाही. \p \v 8 “तुम्ही लाच घेऊ नये, कारण लाच डोळस व्यक्तीस आंधळे करते व निरपराध्याचे शब्द विपरीत करते. \p \v 9 “परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता. \s1 शब्बाथाचे नियम \p \v 10 “सहा वर्षे आपल्या भूमीत तुम्ही पेरणी करावी आणि पीक गोळा करावे, \v 11 परंतु सातव्या वर्षी जमीन नांगरू नये आणि न वापरता तशीच पडीक राहू द्यावी. मग तुमच्यातील गरीब लोकांना त्यातील अन्न मिळेल आणि त्यातूनही उरलेले वनपशू खातील. तुमचे द्राक्षमळे व जैतुनाच्या बागांविषयी सुद्धा असेच करावे. \p \v 12 “सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल. \p \v 13 “जे काही मी तुम्हाला सांगितले आहे ते काळजीपूर्वक पाळावे. इतर दैवतांचा धावा करू नये; तुमच्या मुखांनी त्यांचे नावही घेऊ नये. \s1 तीन वार्षिक सण \p \v 14 “वर्षातून तीन वेळा तुम्ही माझ्यासाठी सण पाळावेत. \p \v 15 “बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला. \p “माझ्यासमोर कोणीही रिकाम्या हाताने येऊ नये. \p \v 16 “जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात पेरलेल्या पिकाचा हंगाम करता, तेव्हा त्याच्या प्रथमफळाने हंगामाचा सण पाळावा. \p “वर्षाच्या शेवटी आपल्या शेतातून तुम्ही हंगाम गोळा करता, तेव्हा संग्रहाचा सण पाळावा. \p \v 17 “वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह यांच्यासमोर हजर व्हावे. \p \v 18 “अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये. \p “मला अर्पण केलेल्या यज्ञपशूंची चरबी सकाळपर्यंत राहू देऊ नये. \p \v 19 “तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा. \p “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. \s1 परमेश्वराचा दूत मार्ग तयार करणार \p \v 20 “पाहा, मार्गात तुझे रक्षण करावे व जो देश मी तुमच्यासाठी तयार करून ठेवला आहे, त्यात तुम्हाला घेऊन यावे म्हणून तुमच्यापुढे मी एक दूत पाठवित आहे. \v 21 त्याच्यापुढे सावध असा आणि तो जे काही सांगेल ते ऐका. त्याच्याविरुद्ध बंड करू नका; तो तुझ्या अपराधांची क्षमा करणार नाही, कारण माझे नाव त्याच्यामध्ये आहे. \v 22 जर तुम्ही काळजीपूर्वक त्याचे ऐकाल आणि मी जे सांगतो ते कराल, तर मी तुमच्या शत्रूंचा शत्रू होईन आणि जे तुमचा विरोध करतात, त्यांचा मी विरोधक होईन. \v 23 माझा दूत तुमच्यापुढे जाईल आणि तुम्हाला अमोरी, हिथी, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात पोहचवेल आणि मी त्या सर्वांचा नाश करेन. \v 24 त्यांच्या दैवतांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये किंवा त्यांच्या चालीरीतींचे अनुसरण करू नये. तुम्ही त्या मोडून टाकाव्यात आणि त्यांच्या पवित्र दगडांचा चुरा करावा. \v 25 तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन, \v 26 तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही, ना कोणी वांझ राहणार. तुमचा जीवनकाळ मी पूर्ण करेन. \p \v 27 “तुम्ही जो देश जिंकून घ्याल त्यात मी आपले भय पाठवेन व त्यात गोंधळ निर्माण करेन. तुमचे शत्रू पाठ दाखवून पळ काढतील असे मी करेन. \v 28 हिव्वी, कनानी, हिथी या लोकांनी तुमच्या मार्गातून बाजूला व्हावे म्हणून मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवेन. \v 29 पण एका वर्षातच मी त्यांना घालवून देणार नाही, कारण देश ओसाड होईल आणि वनपशू तुमच्यासाठी पुष्कळ होतील. \v 30 तुमची संख्या वाढून तुम्ही त्या देशाचा ताबा घेईपर्यंत थोडेथोडे असे मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देईन. \p \v 31 “तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत\f + \fr 23:31 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa भूमध्य समुद्रापर्यंत\fqa*\f* व वाळवंटापासून फरात\f + \fr 23:31 \fr*\fq फरात \fq*\ft ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते\ft*\f* नदीपर्यंत मी तुमची सीमा स्थापित करेन. त्या देशात राहणारे लोक मी तुमच्या हाती देईन आणि तुम्ही त्यांना आपल्या पुढून घालवून टाकाल. \v 32 त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये. \v 33 त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नये, नाहीतर ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतील, कारण त्यांच्या दैवतांची उपासना करणे तुमच्यासाठी खचितच पाश असे होईल.” \c 24 \s1 कराराची पुष्टी \p \v 1 मग याहवेहने मोशेला म्हटले, “तू आणि अहरोन, नादाब आणि अबीहू व इस्राएलींचे सत्तर वडील याहवेहकडे वर या. तुम्ही दुरूनच उपासना करावी, \v 2 परंतु मोशेने एकटेच याहवेहजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये. लोकांनी त्यांच्याबरोबर वर येऊ नये.” \p \v 3 मग मोशेने जाऊन याहवेहचे शब्द व नियम लोकांना सांगितले, त्यांनी एका आवाजात प्रतिसाद देत म्हटले, “याहवेहने जे सर्वकाही सांगितले त्याप्रमाणे आम्ही करू.” \v 4 मग याहवेहने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व त्याने लिहून ठेवले. \p दुसर्‍या दिवशी अगदी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा गोत्रानुसार बारा खांब उभे केले. \v 5 मग त्याने इस्राएलचे तरुण पुरुष पाठविले व त्यांनी याहवेहला होमार्पणे व गोर्‍हे अर्पून शांत्यर्पण केले. \v 6 मोशेने त्यातील अर्धे रक्त वाटीत घेतले व अर्धे वेदीवर शिंपडले. \v 7 मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.” \p \v 8 मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.” \p \v 9 मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले. \v 10 आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते. \v 11 परंतु त्या इस्राएलाच्या वडिलांविरुद्ध परमेश्वराने आपला हात उगारला नाही; त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि त्यांनी खाणेपिणे केले. \p \v 12 मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.” \p \v 13 मग मोशे व त्याचा मदतनीस यहोशुआ उठले आणि मोशे पर्वतावर परमेश्वराकडे गेला. \v 14 तो वडीलजनांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत येथेच थांबा, जर कोणाचा काही वाद असला तर त्यांनी अहरोन आणि हूर तुमच्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जावे.” \p \v 15 जेव्हा मोशे पर्वतावर गेला, मेघांनी पर्वत झाकून गेले, \v 16 आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला. \v 17 इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे दिसले. \v 18 मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला. \c 25 \s1 निवासमंडपासाठी द्यावयाची अर्पणे \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “इस्राएली लोकांना सांग की, त्यांनी मला अर्पण आणावे. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून ते तू माझ्यावतीने स्वीकारावे. \b \lh \v 3 “त्यांच्यापासून तू जी अर्पणे स्वीकारावी ती ही आहेत: \b \li1 “सोने, चांदी आणि कास्य; \li1 \v 4 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग, \li1 बोकडाचे केस; \li1 \v 5 लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म;\f + \fr 25:5 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa तहशाची कातडी\fqa*\f* \li1 बाभळीचे लाकूड; \li1 \v 6 दिव्यासाठी जैतुनाचे तेल; \li1 अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले; \li1 \v 7 एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने. \b \p \v 8 “मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे. \v 9 हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी. \s1 कराराचा कोश \p \v 10 “त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.\f + \fr 25:10 \fr*\ft म्हणजे 110 सें.मी. लांब, 68 सें.मी. रुंद व उंच\ft*\f* \v 11 त्याला आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याच्याभोवती सोन्याचा काठ करावा. \v 12 त्यासाठी सोन्याच्या चार कड्या बनवून कोशाच्या चार पायांना, दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्‍या बाजूला अशा त्या बसवाव्यात. \v 13 मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे. \v 14 कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या. \v 15 या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये. \v 16 मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात. \p \v 17 “प्रायश्चिताचे झाकण शुद्ध सोन्याचे बनवावे—ते अडीच हात लांब व दीड हात रुंद असावे. \v 18 मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत. \v 19 एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब असावे; ते करूब झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घ्यावे. \v 20 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादले जावे. करुबाचे मुख समोरासमोर असून, त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे असावी. \v 21 हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात. \v 22 तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन. \s1 भाकरीचा मेज \p \v 23 “बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनवा; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात\f + \fr 25:23 \fr*\ft म्हणजे 90 सें.मी. लांब, 45 सें.मी. रुंद, 68 सें.मी. उंच\ft*\f* उंच असावा. \v 24 त्याला शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे आणि त्याभोवती सोन्याचा काठ करावा. \v 25 मेजाच्या सभोवती चार बोटे\f + \fr 25:25 \fr*\ft अंदाजे 7.5 सें.मी.\ft*\f* रुंदीएवढी पट्टी बनवून त्यावर सोन्याचा काठ करावा. \v 26 मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या कराव्‍यात आणि त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर लावाव्या. \v 27 मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ असाव्यात. \v 28 दांडे बाभळीच्या लाकडाचे असावेत, त्यांना सोन्याचे आवरण द्यावे आणि मेज वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग करावा. \v 29 आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील ताटे, पात्रे, तसेच त्याचे कलश व वाट्या हे शुद्ध सोन्याचे असावे. \v 30 त्या मेजावर माझ्यासमोर समक्षतेची भाकर नेहमी ठेवलेली असावी. \s1 दीपस्तंभ \p \v 31 “शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत. \v 32 दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाव्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला. \v 33 एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे. \v 34 आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले त्याच्या कळ्या व फुले बनवावे. \v 35 दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी असावी, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस, आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली असावी; सर्व मिळून सहा फांद्या असाव्या. \v 36 या सर्व कळ्या व फांद्या शुद्ध सोन्याच्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून असाव्या. \p \v 37 “मग त्याचे सात दिवे तयार करून ते दीपस्तंभावर असे ठेवावे की त्यांचा प्रकाश त्यांच्यासमोर पडेल. \v 38 त्यांच्या वातीचे चिमटे व ते ठेवण्याची तबके शुद्ध सोन्याची असावी. \v 39 दीपस्तंभ व इतर उपकरणांसाठी एक तालांत\f + \fr 25:39 \fr*\ft अंदाजे 34 कि.ग्रॅ.\ft*\f* शुद्ध सोन्याचा उपयोग करावा. \v 40 मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे बनवावे.” \c 26 \s1 निवासमंडप \p \v 1 “निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे. \v 2 सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात\f + \fr 26:2 \fr*\ft अंदाजे 13 मीटर लांब व 1.8 मीटर रुंद\ft*\f* असावी. \v 3 पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे. \v 4 जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनवावे आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच करावे. \v 5 एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत पन्नास फासे करावे, हे फासे समोरासमोर असावेत. \v 6 मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल. \p \v 7 “निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत. \v 8 सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात.\f + \fr 26:8 \fr*\ft अंदाजे 13.5 मीटर लांब व 1.8 मीटर रुंद\ft*\f* असावी. \v 9 पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा. \v 10 जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्‍या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा. \v 11 मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल. \v 12 तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा. \v 13 तंबूचे पडदे दोन्ही बाजूंनी एकएक हात\f + \fr 26:13 \fr*\ft अंदाजे 45 सें.मी.\ft*\f* अधिक लांब असावे; उरलेला पडदा निवासमंडपाला झाकेल असा लोंबत ठेवावा. \v 14 तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन करावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे\f + \fr 26:14 \fr*\fq टिकाऊ चर्म \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa तहशाची कातडी\fqa*\f* आच्छादन करावे. \p \v 15 “निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार कराव्‍यात. \v 16 प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद असावी.\f + \fr 26:16 \fr*\ft अंदाजे 4.5 मीटर लांब व 67.5 सें.मी. रुंद\ft*\f* \v 17 एक फळी दुसर्‍या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे असावी. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला अशाप्रकारे कुसे बनवावी. \v 18 निवासमंडपाच्या दक्षिणेस वीस फळ्या बसवाव्यात. \v 19 आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्‍यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक. \v 20 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला, म्हणजे उत्तरेला वीस फळ्या बनवाव्या \v 21 आणि प्रत्येक फळीखाली दोन अशा चांदीच्या चाळीस बैठका कराव्या. \v 22 निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस सहा फळ्या तयार कराव्या, \v 23 आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्‍यांसाठी दोन फळ्या तयार कराव्या. \v 24 या दोन कोपर्‍यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी जोडीने एकाच कडीत जोडाव्यात; दोन्ही कोपर्‍यांच्या फळ्या एकसारख्याच असाव्यात. \v 25 एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका असतील. \p \v 26 “बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करा: निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे, \v 27 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे. \v 28 मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे असावे. \v 29 फळ्यांना सोन्याचे आवरण लावावे आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या बनवाव्या. आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण द्यावे. \p \v 30 “मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा. \p \v 31 “निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या कातलेल्या रेशमी तागाचा पडदा करून त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावेत. \v 32 हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा. \v 33 पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल. \v 34 प्रायश्चिताचे झाकण\f + \fr 26:34 \fr*\ft किंवा दयासन\ft*\f* परमपवित्रस्थानात कराराच्या कोशावर ठेवावे. \v 35 निवासमंडपाच्या पडद्याच्या बाहेर उत्तर दिशेला मेज ठेवावा आणि त्यासमोर दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवावा. \p \v 36 “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा बनवावा. \v 37 या पडद्यासाठी सोन्याचे आकडे आणि सोन्याचे आवरण दिलेले बाभळीच्या लाकडाचे पाच खांब तयार करावेत आणि त्यांच्यासाठी कास्याच्या पाच बैठका तयार कराव्‍यात.” \c 27 \s1 होमवेदी \p \v 1 “बाभळीच्या लाकडाची वेदी तयार करावी, ती तीन हात उंच, पाच हात लांब व पाच हात रुंद\f + \fr 27:1 \fr*\ft अंदाजे 1.4 मीटर उंच, 2.3 मीटर लांब व रुंद\ft*\f* असून ती चौकोनी असावी. \v 2 तिच्या चार कोपर्‍यांना प्रत्येकी एक शिंग बनवावे, शिंगे व वेदी अखंड असावी. वेदीला कास्याचे आवरण द्यावे. \v 3 वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत. \v 4 तिच्यासाठी कास्याची जाळी तयार करावी आणि जाळीच्या चारही बाजूला कास्याच्या चार कड्या तयार कराव्या. \v 5 वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी. \v 6 वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण द्यावे. \v 7 दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील. \v 8 फळ्या लावून वेदी आतून पोकळ बनवावी. ती तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणेच बनवावी.” \s1 निवासमंडपाचे अंगण \p \v 9 “निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात\f + \fr 27:9 \fr*\ft अंदाजे 45 मीटर\ft*\f* लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत, \v 10 आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या. \v 11 उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या. \p \v 12 “अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात\f + \fr 27:12 \fr*\ft अंदाजे 23 मीटर\ft*\f* रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या. \v 13 सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे. \v 14 प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात\f + \fr 27:14 \fr*\ft अंदाजे 7 मीटर\ft*\f* लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या. \v 15 आणि दुसर्‍या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या. \p \v 16 “अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात\f + \fr 27:16 \fr*\ft अंदाजे 9 मीटर\ft*\f* लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या. \v 17 अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या. \v 18 अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या. \v 19 निवासमंडपातील सेवेसाठी लागणारी सर्व पात्रे व उपकरणे, त्यांच्या मेखा व अंगणाच्या सर्व मेखा कास्याच्या असाव्यात.” \s1 दिव्यासाठी तेल \p \v 20 “इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे. \v 21 सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.” \c 28 \s1 याजकीय वस्त्रे \p \v 1 “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे. \v 2 अहरोन तुझा भाऊ याला सन्मान आणि गौरव मिळावा म्हणून त्याच्यासाठी पवित्र वस्त्रे तयार करावी. \v 3 ज्यांना अशा बाबतीत मी ज्ञान दिले आहे, त्या सर्व कुशल कारागिरांना सांग की अहरोनाच्या पवित्रीकरणासाठी त्यांनी वस्त्रे बनवावी, यासाठी की त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी. \v 4 त्यांनी जी वस्त्रे बनवावी ती ही: ऊरपट, एफोद, एक झगा, भरतकाम केलेला अंगरखा, फेटा व कमरबंद. त्यांनी ही पवित्र वस्त्रे तुझा भाऊ अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी बनवावी, यासाठी की याजक म्हणून त्यांनी माझी सेवा करावी. \v 5 त्यांनी सोन्याचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचा व रेशमी तागाचा वापर करावा. \s1 एफोद \p \v 6 “एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा, कुशल कारागिराच्या हातांनी बनवा. \v 7 त्याच्या दोन कोपर्‍यांना दोन खांदेपट्ट्या जोडलेल्या असाव्या, म्हणजे ते बांधता येईल. \v 8 कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच असावा; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा असावा. \p \v 9 “दोन गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावीत. \v 10 एका रत्नावर सहा व दुसर्‍यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार ती असावी. \v 11 मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी. \v 12 आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी. \v 13 सोन्याचे खाचे बनव \v 14 आणि पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या तयार करून खांदेपट्ट्यांवरील आकड्यात अडकवाव्या.” \s1 ऊरपट \p \v 15 “मग निर्णय घेण्यासाठी कुशल कारागिरांकडून ऊरपट तयार करून घ्यावा. एफोदाप्रमाणे सोन्याची जर असलेला, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा असावा. \v 16 तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला असावा व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत\f + \fr 28:16 \fr*\ft अंदाजे 23 सें.मी.\ft*\f* असावा. \v 17 मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी; \v 18 दुसर्‍या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे असावे; \v 19 तिसर्‍या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग ही असावीत; \v 20 चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे असावीत. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवावीत. \v 21 इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे. \p \v 22 “ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्या. \v 23 ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या. \v 24 त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या, \v 25 आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या. \v 26 सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या. \v 27 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या. \v 28 ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही. \p \v 29 “अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल. \v 30 जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्‍या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.” \s1 इतर याजकीय वस्त्रे \p \v 31 “एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनवावा. \v 32 डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा. \v 33 त्या झग्याच्या खालच्या घेर्‍यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे व त्यामध्ये सोन्याच्या घंट्या बनवाव्या. \v 34 सोन्याच्या घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने झग्याच्या घेराला लावावे. \v 35 अहरोनाने तो झगा सेवा करीत असताना घालावा. जेव्हा तो याहवेहसमोर पवित्रस्थानात जातो व बाहेर येतो त्यावेळी घंट्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणजे तो मरणार नाही. \p \v 36 “शुद्ध सोन्याची एक पाटी तयार करावी आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तशी ही अक्षरे कोरावीत: \pc याहवेहसाठी पवित्र. \m \v 37 आणि ती जोडता यावी म्हणून ती फेट्याला निळ्या दोरीने बांध. \v 38 ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.” \p \v 39 “तलम तागाचा झगा विणून घ्यावा आणि रेशमी तागाचा फेटा तयार करावा. कमरबंद भरतकाम केलेला असावा. \v 40 अहरोनाच्या पुत्रांचा मान व आदर राखला जावा, म्हणून त्यांच्यासाठी झगे, कमरबंद व टोप्या बनवाव्या. \v 41 तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांच्या अंगावर ही वस्त्रे घातल्यावर, त्यांचा अभिषेक आणि समर्पण कर. त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र कर. \p \v 42 “शरीराला झाकावे म्हणून तागाच्या कापडाचे, कंबरेपासून मांडीपर्यंत पोहोचेल अशी अंतर्वस्त्रे तयार करावी. \v 43 अहरोन व त्याचे पुत्र ज्यावेळी सभामंडपात येतील किंवा सेवेसाठी वेदीकडे पवित्रस्थानात जातील, त्यावेळी त्यांनी ती वस्त्रे घालावी, म्हणजे ते दोषी ठरून मरणार नाहीत. \p “अहरोन व त्याच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.” \c 29 \s1 याजकांचे पवित्रीकरण \p \v 1 “त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी असेच करावे: एक निर्दोष गोर्‍हा व दोन मेंढे घ्यावेत. \v 2 आणि उत्तम गव्हाच्या पिठाच्या दोन बेखमीर गोल भाकरी कराव्या, त्या बेखमीर भाकरी आणि जैतुनाचे तेल मिसळून केलेल्या असाव्यात आणि बेखमीर पिठाच्या व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी कराव्या. \v 3 त्यांना एका टोपलीत घालून, गोर्‍हा आणि दोन मेंढ्यांबरोबर सादर कराव्या. \v 4 मग अहरोन व त्याच्या पुत्रांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणून त्यांना पाण्याने धुवावे; \v 5 वस्त्रे घ्या आणि अहरोनास अंगरखा व त्याबरोबर एफोदाचा झगा, एफोद, ऊरपट हे परिधान करावे. त्यावर कुशलतेने विणलेल्या कमरपट्ट्याने एफोद बांधावा; \v 6 त्याच्या डोक्यावर फेटा घालावा व त्यास पवित्र मुद्रा जोडून घ्यावी. \v 7 मग अभिषेकाचे तेल घे व त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक करावा. \v 8 त्याच्या पुत्रांनाही झगे घालावे. \v 9 त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार. \p “मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा. \p \v 10 “मग सभामंडपाच्या समोर गोर्‍हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत. \v 11 सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्‍हा वधावा. \v 12 गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. \v 13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ आणि त्यांच्या चरबीसह दोन्ही गुरदे घेऊन ती वेदीवर जाळावी. \v 14 परंतु गोर्‍ह्याचे मांस व त्याची विष्ठा व त्याची आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकाव्या. ते पापार्पण\f + \fr 29:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्धीकरणाचे अर्पण\fqa*\f* आहे. \p \v 15 “मग त्यातील एक मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे. \v 16 मेंढ्याचा वध करावा व त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. \v 17 मेंढा कापून तुकडे करावेत आणि त्याचे आतील अवयव व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके इतर भागांबरोबर ठेवावे. \v 18 मग संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम कर. तो याहवेहसाठी होमार्पण आहे, ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे. \p \v 19 “मग दुसरा मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत. \v 20 मेंढ्याचा वध करून, त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्यांना, व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे, मग रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावे. \v 21 आणि वेदीवरील काही रक्त व अभिषेकाचे तेल घे व ते अहरोन व त्याच्या वस्त्रांवर व त्याचे पुत्र व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडावे. मग तो व त्याचे पुत्र आणि त्यांची वस्त्रे पवित्र होतील. \p \v 22 “मग त्या मेंढ्याची चरबी, त्याचे जाड शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजाची लांब पाळ, दोन्ही गुरदे व त्यावरील चरबी व उजवी मांडी घ्यावी; हा समर्पणाचा मेंढा आहे. \v 23 बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर आहे, त्यातून एक गोल भाकर घे, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घे. \v 24 हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवावे आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी करावी. \v 25 मग ते त्यांच्या हातातून घेऊन होमार्पणाबरोबर वेदीवर जाळावे, याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण असे सादर करावे. \v 26 मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील. \p \v 27 “समर्पणाच्या मेंढ्याचे ते भाग म्हणजेच, त्याचे ऊर ज्याची ओवाळणी केली होते व मांडीचा भाग जो सादर केला होता तो अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मालकीचे आहे, ते भाग पवित्र कर. \v 28 हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी. \p \v 29 “अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर त्याच्या वंशजांची व्हावीत अशासाठी की त्यामध्ये त्यांचा अभिषेक व समर्पण व्हावे. \v 30 त्याचा पुत्र जो याजक म्हणून त्याचा वारस होईल आणि सभामंडपात सेवा करण्यासाठी पवित्रस्थानात येईल त्याने ती वस्त्रे सात दिवस अंगात घालावी. \p \v 31 “समर्पणासाठी असलेला मेंढा घेऊन पवित्र जागी त्याचे मांस शिजवावे. \v 32 मग अहरोन व त्याच्या पुत्रांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते मेंढ्याचे मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावी. \v 33 त्यांचे समर्पण आणि पवित्रीकरण करण्यासाठी प्रायश्चित्त केलेले अर्पण त्यांनी खावे. परंतु कोणी परक्याने ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे. \v 34 आणि समर्पणाच्या मेंढ्याचे मांस व भाकरीतील काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे. \p \v 35 “मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी तू करावे, त्यांच्या समर्पणास सात दिवस घ्यावे. \v 36 पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्‍हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा. \v 37 सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. \p \v 38 “दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे. \v 39 एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे. \v 40 पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा\f + \fr 29:40 \fr*\fq एफा \fq*\ft अंदाजे 1.6 कि.ग्रॅ.\ft*\f* दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन\f + \fr 29:40 \fr*\fq हीन \fq*\ft अंदाजे 1लीटर\ft*\f* द्राक्षारस अर्पण करावे. \v 41 संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे. \p \v 42 “हे होमार्पण येणार्‍या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन. \v 43 तिथे मी इस्राएली लोकांना देखील भेटेन आणि ते ठिकाण माझ्या तेजाने पवित्र होईल. \p \v 44 “तर मी सभामंडप व वेदी पवित्र करेन आणि अहरोन व त्याचे पुत्र यांना याजक म्हणून माझी सेवा करावी यासाठी पवित्र करेन. \v 45 मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन. \v 46 त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.” \c 30 \s1 धूपवेदी \p \v 1 “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार करावी. \v 2 ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात\f + \fr 30:2 \fr*\ft अंदाजे 45 सें.मी. लांबी व रुंदी, 90 सें.मी. उंची\ft*\f* असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी. \v 3 तिचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याभोवती सोन्याचा काठ करावा. \v 4 वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या कराव्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या असाव्या. \v 5 दांडे बाभळीच्या लाकडाचे करून त्याला सोन्याचे आवरण द्यावे. \v 6 कराराच्या कोशासमोर लावलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूस, प्रायश्चिताचे झाकण जे कराराच्या नियमाच्या पाटींवर आहे; तिथे वेदी ठेवावी; तिथेच मी तुला भेटत जाईन. \p \v 7 “रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा. \v 8 पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्‍या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा. \v 9 या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये. \v 10 अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्‍या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.” \s1 प्रायश्चिताचा कर \p \v 11 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 12 “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही. \v 13 प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल\f + \fr 30:13 \fr*\fq शेकेल \fq*\ft अंदाजे 5.8 ग्रॅ.\ft*\f* द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे. \v 14 जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे. \v 15 जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये. \v 16 इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.” \s1 धुण्याचे गंगाळ \p \v 17 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 18 “तू कास्याचे गंगाळ व त्याची कास्याची बैठक तयार करावी. ते सभामंडप व वेदीच्या मध्ये ठेवून त्यात पाणी भरावे \v 19 अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्यातील पाण्याने आपले हात व पाय धुवावे. \v 20 जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात, \v 21 त्यांनी आपले हात व पाय धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत. हा नियम अहरोन व त्याच्या येणार्‍या वंशाच्या प्रत्येक पिढीसाठी असावा.” \s1 अभिषेकाचे तेल \p \v 22 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 23 “पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल\f + \fr 30:23 \fr*\ft म्हणजे5.8 कि.ग्रॅ.\ft*\f* गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड, \v 24 पाचशे शेकेल गोलाकार दालचिनी, सर्व पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार, व एक हीन\f + \fr 30:24 \fr*\fq हीन \fq*\ft अंदाजे 3.8लीटर\ft*\f* भरून जैतुनाचे तेल. \v 25 यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल. \v 26 त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश, \v 27 मेज व त्याचे सामान, दीपस्तंभ व त्याची उपकरणे, धूपवेदी, \v 28 होमार्पणाची वेदी, तिची सर्व पात्रे, बैठकासह गंगाळ यांचा अभिषेक करण्यासाठी करावा. \v 29 ते तू पवित्र करावे म्हणजे ते परमपवित्र होतील आणि ज्याला त्यांचा स्पर्श होईल ते पवित्र होईल. \p \v 30 “याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून त्यांना पवित्र कर. \v 31 इस्राएली लोकांना सांग, ‘येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझे पवित्र अभिषेकाचे तेल असावे. \v 32 इतर कोणत्याही मनुष्याच्या शरीरावर ते ओतू नये आणि या मिश्रणाचा वापर करून दुसरे तेल बनवू नये. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला पवित्र मानावे. \v 33 जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ” \s1 धूप \p \v 34 मग याहवेह मोशेला म्हणाले, “गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा व शुद्ध ऊद हे सुगंधी मसाले घे, हे सर्व समान प्रमाणात असावे, \v 35 सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे सुगंधी धूप बनव. तो मीठ घातलेला, शुद्ध आणि पवित्र असावा. \v 36 त्यातील काही कुटून त्याची बारीक भुकटी करावी व ती सभामंडपातील कराराच्या नियमाच्या कोशापुढे ठेवावी, जिथे मी तुला भेटत जाईन. ती तुमच्यासाठी परमपवित्र असावी. \v 37 या मिश्रणाचा वापर करून स्वतःसाठी धूप तयार करू नये; याहवेहसाठी तो पवित्र मानला जावा. \v 38 त्या सुगंधाचा आनंद घेण्यासाठी जो कोणी याप्रकारचा धूप बनवेल, त्याला आपल्या लोकांतून काढून टाकले जावे.” \c 31 \s1 बसालेल आणि ओहोलियाब \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 2 “पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे. \v 3 व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— \v 4 सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी; \v 5 आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी. \v 6 त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे. \b \lh “सर्व कुशल कामगारांना मी क्षमता दिली आहे, जेणेकरून तुला आज्ञापिलेले सर्वकाही त्यांनी करावे: \b \li1 \v 7 “जसे सभामंडप, \li1 कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण, \li1 आणि तंबूचे इतर सर्व साहित्य: \li2 \v 8 मेज व त्यावरील सर्व सामान, \li2 शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, \li2 व धूपवेदी, \li2 \v 9 होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे, \li2 गंगाळ व त्याची बैठक. \li1 \v 10 तसेच विणलेली वस्त्रे, \li2 अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे, \li2 व याजक म्हणून सेवा करतात तेव्हा त्याच्या पुत्रांसाठी वस्त्रे, \li1 \v 11 अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी धूप. \b \lf “जसे मी तुला आज्ञापिले आहे, त्यानुसारच त्यांनी ते तयार करावे.” \s1 शब्बाथ \p \v 12 मग याहवेह मोशेला म्हणाले, \v 13 “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझ्या व तुमच्यामध्ये चिन्ह राहील, यासाठी की तुम्ही जाणावे की जो तुम्हाला पवित्र करतो, तो मीच याहवेह आहे. \p \v 14 “ ‘शब्बाथ दिवस पाळावा, कारण तो तुम्हासाठी पवित्र आहे; जो कोणी तो अपवित्र करेल त्याला जिवे मारावे; जे कोणी त्या दिवशी काम करतील, त्यांना त्यांच्या लोकांतून काढून टाकले जावे. \v 15 सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे. \v 16 इस्राएली लोकांनी निरंतरचा करार म्हणून पिढ्यान् पिढ्या शब्बाथ पाळावा. \v 17 तो माझ्यामध्ये व इस्राएली लोकांमध्ये सदासर्वकाळचे चिन्ह असेल, कारण याहवेहने सहा दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि सातव्या दिवशी त्यांनी स्वस्थ राहून विसावा घेतला.’ ” \p \v 18 जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या. \c 32 \s1 सोन्याचे वासरू \p \v 1 मोशेला पर्वतावरून खाली येण्यास उशीर होत आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोना सभोवती गोळा झाले व म्हणाले, “ये, आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.” \p \v 2 अहरोनाने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या स्त्रिया, तुमचे पुत्र व तुमच्या कन्यांनी घातलेले कानातील सोन्याचे डूल काढून, ते माझ्याकडे आणा.” \v 3 म्हणून सर्व लोकांनी ते कानातील सोन्याचे डूल काढून ते अहरोनाकडे आणले. \v 4 लोकांनी जे अहरोनाच्या हातात दिले, ते घेऊन त्याने हत्याराने कोरून, वासराची ओतीव मूर्ती बनविली. मग ते म्हणाले, “हे इस्राएला, ही तुमचे दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.” \p \v 5 अहरोनाने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्याने त्या वासरासमोर एक वेदी बांधली व जाहीर केले, “उद्या याहवेहसाठी एक उत्सव करावयाचा आहे.” \v 6 म्हणून दुसर्‍या दिवशी लोक लवकर उठले आणि होमार्पणाचा यज्ञ केला व शांत्यर्पणे आणले. त्यानंतर त्यांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले. \p \v 7 मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत. \v 8 मी त्यांना दिलेल्या आज्ञांपासून ते फार लवकरच फिरले आहेत आणि आपल्यासाठी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आहे आणि यज्ञ करून म्हटले आहे, ‘हे इस्राएला, ही तुमची दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले आहे!’ ” \p \v 9 याहवेह मोशेला पुन्हा म्हणाले, “मी या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत. \v 10 तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन.” \p \v 11 पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा? \v 12 इजिप्तच्या लोकांनी असे का म्हणावे की, याहवेहने त्यांना डोंगरात मारून टाकावे व या पृथ्वीतून नाहीसे करावे अशा दुष्ट हेतूने बाहेर काढले? आपल्या तीव्र कोपापासून माघार घ्या; सौम्य व्हा आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणू नका. \v 13 आपले सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण करा, ज्यांच्याशी आपण स्वतःच्या नावाने शपथ घेतलीः ‘मी तुझे वंशज आकाशातील तार्‍यांइतके करेन, आणि त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा सर्व देश मी त्यांच्या वंशजांना देईन, आणि तो सदासर्वकाळासाठी त्यांचे वतन राहील.’ ” \v 14 तेव्हा याहवेहने त्याविषयी अनुताप केला व जी विपत्ती आपल्या लोकांवर आणण्याचे म्हटले होते ती आणली नाही. \p \v 15 मग मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर दोन्ही बाजूंनी, मागे व पुढे लेख कोरलेले होते. \v 16 त्या पाट्या परमेश्वराची कृती होती; तो लेख परमेश्वराची लेखणी होती, जी पाट्यांवर कोरलेली होती. \p \v 17 जेव्हा यहोशुआने लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकला, तो मोशेला म्हणाला, “छावणीत युद्धाचा आवाज आहे.” \p \v 18 मोशेने उत्तर दिले: \q1 “हा आवाज विजयाचा नाही, \q2 तो आवाज पराजयाचाही नाही; \q2 मला गाण्याचा आवाज ऐकू येत आहे.” \p \v 19 जेव्हा मोशे छावणीजवळ आला आणि वासरू व नृत्य पाहिले, तेव्हा त्याचा राग पेटला आणि आपल्या हातातील पाट्या फेकून, डोंगराच्या पायथ्याशी फोडून त्यांचा चुराडा केला. \v 20 आणि त्याने ते वासरू घेतले जे लोकांनी घडविले होते व ते अग्नीत जाळून टाकले; मग त्याने त्याची कुटून बारीक पूड केली, ती पाण्यात विरघळून इस्राएलच्या लोकांना प्यायला दिली. \p \v 21 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “या लोकांनी तुला काय केले, म्हणून तू त्यांना एवढ्या मोठ्या पापात आणले?” \p \v 22 अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामी, क्रोधित होऊ नको, तुला माहीत आहे की हे लोक कसे दुष्टतेकडे प्रवृत्त होतात. \v 23 ते मला म्हणाले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.’ \v 24 म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘ज्यांच्याकडे सोन्याचे दागिने आहेत ते त्यांनी काढावे.’ मग त्यांनी ते सोने मला दिले, आणि मी ते अग्नीत टाकले, आणि त्यातून हे वासरू बाहेर आले.” \p \v 25 मोशेने पाहिले की, लोक मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्या शत्रूंसमोर एक चेष्टेचे कारण बनावे असे अहरोनाने त्यांना मोकळे सोडले आहे. \v 26 म्हणून मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला व म्हणाला, “जे कोणी याहवेहच्या पक्षाचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवीचे सर्व लोक त्याच्याकडे आले. \p \v 27 मग मोशे त्यांना म्हणाला, “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर असे म्हणतात: ‘प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधावी. छावणीतून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत फिरत, प्रत्येकाने आपला भाऊ आणि मित्र व शेजारी यांना जिवे मारून टाकावे.’ ” \v 28 मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे लेवीच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अंदाजे तीन हजार लोक मरण पावले. \v 29 तेव्हा मोशे म्हणाला, “आज तुम्ही याहवेहसाठी वेगळे केले गेले आहात आणि याहवेहने आज तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, कारण तुम्ही आपले पुत्र, भाऊ यांच्याविरुद्ध गेलात.” \p \v 30 मग दुसर्‍या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही मोठे पाप केले आहे, पण आता मी वर याहवेहकडे जाईन; कदाचित मी तुमच्या पापासाठी प्रायश्चित करू शकेन.” \p \v 31 मग मोशे याहवेहकडे परत गेला आणि म्हणाला, “अरेरे, या लोकांनी केवढे मोठे पाप केले आहे! त्यांनी आपल्या स्वतःसाठी सोन्याचे दैवत केले आहेत. \v 32 परंतु आता कृपा करून त्यांच्या पापांची क्षमा करा—नाहीतर जे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, त्यातून माझे नाव मिटवून टाका.” \p \v 33 तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “ज्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, त्यांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून मिटवून टाकीन. \v 34 आता जा आणि ज्या ठिकाणाविषयी मी बोललो त्याकडे लोकांना चालव आणि माझा दूत तुमच्यापुढे जाईल. तथापि, जेव्हा शिक्षा करण्याची वेळ येईल, तेव्हा मी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देईन.” \p \v 35 अहरोनाने केलेल्या वासराशी लोकांनी जे केले होते त्यासाठी याहवेहने त्यांच्यावर पीडा आणून त्यांना शासन केले. \c 33 \p \v 1 नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “तू आणि ज्या लोकांना तू इजिप्तमधून बाहेर आणले त्यांना घेऊन या ठिकाणातून नीघ आणि मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना शपथ घेऊन अभिवचन दिले, ‘हा देश मी तुझ्या वंशजांना देईन’ त्या देशाकडे घेऊन जा. \v 2 मी तुमच्यापुढे एक दूत पाठवून कनानी, अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांना बाहेर हाकलून देईन. \v 3 दूध व मध वाहत असलेल्या देशाकडे जा. परंतु मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही ताठ मानेचे लोक आहात आणि कदाचित वाटेत मी तुमचा नाश करेन.” \p \v 4 जेव्हा लोकांनी हे निराशाजनक शब्द ऐकले, तेव्हा ते शोक करू लागले आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे दागिने घातले नाही. \v 5 कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “इस्राएलच्या लोकांना सांग, तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी एक क्षणभरही तुमच्याबरोबर गेलो तर कदाचित मी तुमचा नाश करेन. आता तुमचे दागिने काढा आणि तुमचे काय करावे हे मी ठरवेन.” \v 6 म्हणून इस्राएल लोकांनी होरेब पर्वताजवळ आपले दागिने काढून टाकले. \s1 सभामंडप \p \v 7 आता छावणीबाहेर थोड्या दूर अंतरावर मोशे एक तंबू उभारीत असे, त्याला तो “सभामंडप\f + \fr 33:7 \fr*\ft हा मंडप निवासमंडपाव्यतिरिक्त आहे\ft*\f* असे म्हणे.” ज्याला याहवेहशी बोलायचे असेल तो छावणीबाहेर असलेल्या त्या सभामंडपाकडे जात असे. \v 8 आणि जेव्हा मोशे बाहेर मंडपाकडे जाई, तेव्हा सर्व लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उठून उभे राहून मोशे मंडपामध्ये जाईपर्यंत त्याला पाहत असत. \v 9 आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे. \v 10 जेव्हा लोक मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी थांबलेला पाहत, ते सर्व आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून उपासना करीत असत. \v 11 जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे. \s1 मोशे आणि याहवेहचे गौरव \p \v 12 मग मोशे याहवेहशी बोलला, “तुम्ही मला सांगत आला, ‘या लोकांना चालव,’ परंतु माझ्याबरोबर तुम्ही कोणाला पाठविणार हे तुम्ही मला सांगितले नाही. तुम्ही म्हणाला, ‘मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीने कृपा पावला आहेस.’ \v 13 जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, तर मला तुमचे मार्ग शिकवा, यासाठी की मी तुम्हाला जाणून तुमच्या दृष्टीत कृपा पावावी. हे स्मरणात असू द्या की हे राष्ट्र तुमचे लोक आहेत.” \p \v 14 यावर याहवेहने उत्तर दिले, “माझी समक्षता तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन.” \p \v 15 मग मोशे याहवेहला म्हणाला, “जर तुमची समक्षता आमच्याबरोबर गेली नाही, तर आम्हाला येथून पुढे पाठवू नका. \v 16 तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?” \p \v 17 यावर याहवेहने मोशेला म्हटले, “जी गोष्ट तू माझ्याकडे मागितली आहे तीच मी करेन, कारण तुझ्यावर मी संतुष्ट आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.” \p \v 18 तेव्हा मोशेने विनंती केली, “आता मला तुमचे गौरव दाखवा.” \p \v 19 आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.” \v 20 याहवेह म्हणाले, “पण तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जगत नाही.” \p \v 21 मग याहवेह म्हणाले, “माझ्याजवळ एक जागा आहे, जिथे एका खडकावर तू उभा राहा. \v 22 माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन. \v 23 मग मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.” \c 34 \s1 नवीन दगडी पाट्या \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “पहिल्या पाट्यांसारख्याच दोन दगडी पाट्या तू घडव, मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होते ते मी त्यावर लिहेन. \v 2 तू सकाळी तयार राहा आणि मग सीनाय पर्वतावर ये. तिथे डोंगरमाथ्यावर माझ्यासमोर स्वतःला सादर कर. \v 3 तुझ्याबरोबर कोणीही येऊ नये किंवा डोंगरावर कुठेही इतर कोणी दृष्टीस पडू नये; गुरे आणि शेरडेमेंढरे यांनी सुद्धा डोंगरासमोर चरू नये.” \p \v 4 मग मोशेने पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडवून घेतल्या आणि त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोठ्या पहाटे सीनाय पर्वतावर गेला. \v 5 मग याहवेह ढगामध्ये खाली उतरले आणि तिथे मोशेसमोर उभे राहिले. तिथे त्यांनी याहवेह या आपल्या नावाची घोषणा केली. \v 6 आणि याहवेह मोशे समोरून जाताना घोषणा केली, “याहवेह, याहवेह, दयाळू व कृपाळू परमेश्वर, मंदक्रोध, प्रीती व विश्वासूपण यात उदंड, \v 7 हजारांवर प्रीती करणारे, दुष्टता, अपराध व पाप यांची क्षमा करणारे; तरीही याहवेह दोषीला निर्दोष असे सोडत नाहीत; तर आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततीवर, व त्यांच्या संततीच्या तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत देणारे आहे.” \p \v 8 तेव्हा मोशेने भूमीस लवून उपासना केली. \v 9 तो म्हणाला, “हे प्रभू, तुमच्या दृष्टीने मी जर कृपा पावलो असलो, तर प्रभूने आमच्याबरोबर जावे. जरी हे लोक ताठ मानेचे आहेत, तरी आमच्या दुष्टाईची व आमच्या पापाची क्षमा करून आपले वतन म्हणून आमचा स्वीकार करा.” \p \v 10 तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “मी तुझ्याशी एक करार करीत आहे. तुझ्या लोकांसमोर मी असे चमत्कार करेन की जे संपूर्ण पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात करण्यात आले नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहतो ते पाहतील की मी, याहवेहने तुझ्यासाठी केलेली कृत्ये किती भयावह आहेत. \v 11 मी तुला आज जे आज्ञापितो ते तू पाळावे. मी तुमच्यापुढून अमोरी, कनानी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांना घालवून देईन. \v 12 ज्या देशात तुम्ही जात आहात त्यात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा, नाहीतर ते तुमच्यासाठी पाश असे होतील. \v 13 त्यांच्या वेद्या मोडून टाका, त्यांच्या पवित्र पाषाणांचा चुरा करा आणि अशेराचे स्तंभ तोडून टाका. \v 14 इतर कोणत्याही दैवतांची उपासना करू नका, कारण याहवेह, ज्यांचे नाव ईर्ष्यावान आहे, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत. \p \v 15 “त्या देशात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा; कारण ते जेव्हा त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतात आणि त्यांना यज्ञ करतात, ते तुम्हाला आमंत्रित करतील आणि तुम्ही त्यांच्या यज्ञार्पणातील अन्न खाल. \v 16 आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यातील काही कन्या तुमच्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवडाल आणि त्या कन्या त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतील, त्या तुमच्या मुलांनाही तसेच करण्यासाठी प्रवृत्त करतील. \p \v 17 “तुम्ही आपल्यासाठी कोणतीही मूर्ती करू नका. \p \v 18 “बेखमीर भाकरीचा सण पाळा. मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अबीब महिन्यात नेमीत वेळी ते करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघाला होता. \p \v 19 “प्रत्येक उदरातील प्रथम जन्मलेला, तुमच्या गुरातील सर्व प्रथम जन्मलेले नर, मग ते खिल्लारातील असो किंवा मेंढरांतील असो माझे आहेत. \v 20 गाढवाचे प्रथमवत्स कोकरू देऊन खंडणी भरून सोडवून घ्यावा, परंतु तो जर तुम्ही खंडणी भरून सोडविला नाही तर, त्याची मान मोडावी. तुमच्या सर्व प्रथम पुत्रांना खंडणी भरून सोडवावे. \p “कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाताने येऊ नये. \p \v 21 “सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्यावा; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात सुद्धा तुम्ही विसावा घ्यावा. \p \v 22 “गव्हाच्या कापणीच्या वेळी प्रथम पिकाने सप्ताहाचा उत्सव साजरा करावा आणि वर्षाच्या शेवटी हंगामाचा सण पाळावा. \v 23 वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह, इस्राएलचे परमेश्वर यांच्यासमोर हजर व्हावे. \v 24 मी सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून टाकीन आणि तुमची सीमा वाढवेन आणि जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासमोर हजर होण्यासाठी जाल, त्यावेळी इतर कोणीही तुमच्या देशाचा लोभ धरणार नाही. \p \v 25 “अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये. आणि वल्हांडण सणाच्या यज्ञातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये. \p \v 26 “तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा. \p “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.” \p \v 27 मग याहवेह मोशेला म्हणाले, “हे शब्द लिही, कारण या शब्दांनुसार मी तुझ्याशी व इस्राएलाशी करार केला आहे.” \v 28 मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या. \s1 मोशेचा तेजस्वी चेहरा \p \v 29 जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही. \v 30 जेव्हा अहरोन व सर्व इस्राएल लोकांनी मोशेला पाहिले, त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि ते त्याच्याजवळ येण्यास घाबरत होते. \v 31 पण मोशेने त्यांना बोलाविले; म्हणून अहरोन व समुदायाचे वडीलजन परत त्याच्याजवळ गेले व तो त्यांच्याबरोबर बोलला. \v 32 यानंतर सर्व इस्राएली लोक त्याच्याजवळ आले आणि मोशेने त्यांना त्या सर्व आज्ञा दिल्या, ज्या याहवेहने सीनाय पर्वतावर त्याला दिल्या होत्या. \p \v 33 मोशेने लोकांशी आपले संभाषण संपविले व आपल्या चेहर्‍यावर पडदा घातला. \v 34 पण जेव्हा मोशे याहवेहबरोबर बोलण्यासाठी त्यांच्या समक्षतेत जात असे, बाहेर जाईपर्यंत तो पडदा काढत असे. जेव्हा तो बाहेर येई व त्याला जे काही आज्ञापिले गेले आहे ते तो इस्राएली लोकांना सांगत असे, \v 35 इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्‍यावर पडदा परत घालत असे. \c 35 \s1 शब्बाथाचे नियम \p \v 1 मग मोशेने इस्राएली लोकांच्या संपूर्ण समुदायाला बोलाविले व त्यांना म्हटले, “ज्यागोष्टी तुम्ही कराव्या अशी याहवेहनी आज्ञा दिली आहे, त्या या आहेत: \v 2 सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातवा दिवस तुमचा पवित्र दिवस असेल, हा याहवेहप्रीत्यर्थ शब्बाथ विसाव्याचा दिवस असावा. जो कोणी या दिवशी काम करेल, त्याला जिवे मारावे. \v 3 शब्बाथ दिवशी तुमच्या कोणत्याही घरामध्ये विस्तव पेटवू नये.” \s1 निवासमंडपासाठी सामुग्री \p \v 4 मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे: \v 5 तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे: \b \li1 “सोने चांदी आणि कास्य, \li1 \v 6 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग; \li1 बोकडाचे केस; \li1 \v 7 लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म\f + \fr 35:7 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa तहशाची कातडी\fqa*\f*; \li1 बाभळीचे लाकूड; \li1 \v 8 दिव्यासाठी जैतुनाचे तेल; \li1 अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले; \li1 \v 9 एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने. \b \p \v 10 “तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे: \b \li1 \v 11 “निवासमंडप, त्याचा तंबू आणि त्याचे आच्छादन, आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका; \li1 \v 12 कोश व त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण व त्याचा पडदा; \li1 \v 13 मेज व त्याचे दांडे आणि त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर; \li1 \v 14 प्रकाशासाठी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, दिवे आणि प्रकाशासाठी तेल; \li1 \v 15 धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप; \li1 निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा; \li1 \v 16 होमार्पणाची वेदी, तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; \li1 कास्याचे गंगाळ व त्याची बैठक; \li1 \v 17 अंगणाचे पडदे, त्यांच्या खुंट्या व बैठका आणि अंगणाच्या दाराचा पडदा; \li1 \v 18 निवासमंडप, त्याचे अंगण व त्यांच्या मेखा व त्यांच्या दोर्‍या; \li1 \v 19 पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे; आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.” \b \p \v 20 मग इस्राएलचा सर्व समुदाय मोशेच्या समक्षतेतून निघून गेला, \v 21 आणि ज्यांची इच्छा असेल व ज्यांच्या हृदयाला स्फूर्ती मिळाली त्यांनी सभामंडपाच्या कामासाठी व त्याच्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांची अर्पणे याहवेहसाठी आणली. \v 22 ज्या कोणाला इच्छा झाली, त्या स्त्री आणि पुरुषांनी येऊन सर्वप्रकारचे सोन्याचे दागिने, रत्नखचित पीना, कानातील डूल, अंगठ्या आणि दागिने आणले. त्या सर्वांनी आपले सोने याहवेहसाठी ओवाळणीचे अर्पण म्हणून दिले. \v 23 ज्यांच्याकडे निळे, जांभळे किंवा किरमिजी कापड किंवा रेशमी तागाचे होते किंवा बोकडाचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी किंवा टिकाऊ चर्म होते ते आणले. \v 24 चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्‍यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले. \v 25 प्रत्येक कुशल स्त्रीने निळे, जांभळे आणि किरमिजी सूत व रेशमी ताग जे तिने आपल्या हाताने विणले होते ते आणले. \v 26 आणि ज्या सर्व स्त्रियांना इच्छा झाली आणि ज्या सूतकताईत कुशल होत्या त्यांनी बोकडाचे केस कातले. \v 27 पुढार्‍यांनी एफोद व ऊरपट यावर लावण्यासाठी गोमेद व इतर रत्ने आणली. \v 28 त्याचप्रमाणे त्यांनी दिव्यासाठी आणि अभिषेकासाठी आणि सुवासिक धुपासाठी जैतुनाचे तेल व सुगंधी मसाले आणले. \v 29 याहवेहने मोशेद्वारे जे काम आज्ञापिले होते त्यासाठी इस्राएली लोकांमधील सर्व इच्छुक पुरुष व स्त्रियांनी याहवेहकरिता स्वखुशीने अर्पणे आणली. \s1 बसालेल व ओहोलियाब \p \v 30 मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे, \v 31 आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— \v 32 सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करावे, \v 33 आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे. \v 34 आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे. \v 35 याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे. \c 36 \nb \v 1 मग बसालेल, ओहोलियाब आणि सर्व निपुण व्यक्ती, ज्यांना याहवेहने कुशलता व पवित्रस्थानाचे बांधकाम करण्याचे कौशल्य आणि क्षमता दिली आहे, त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच काम करावे.” \p \v 2 मग बसालेल व ओहोलियाब व ज्यांना याहवेहने क्षमता दिली होती आणि ज्यांना येऊन काम करण्याची इच्छा होती त्यांना मोशेने बोलाविले. \v 3 पवित्रस्थानाच्या बांधकामासाठी इस्राएल लोकांनी आणलेली अर्पणे मोशेकडून त्यांनी घेतली. लोक दररोज सकाळी स्वैच्छिक अर्पणे आणत राहिले. \v 4 मग सर्व कुशल कारागीर जे पवित्रस्थानाचे काम करीत होते, त्यांनी ते पूर्वी करीत असलेले काम सोडले, \v 5 व मोशेला म्हणाले, “याहवेहने आज्ञापिलेल्या कामासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक सामुग्री लोक आणत आहेत.” \p \v 6 तेव्हा मोशेने आज्ञा दिली आणि सर्व छावणीत कळविण्यात आले: “कोणी पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी कोणतेही अर्पण करू नये.” अशाप्रकारे अधिक सामुग्री आणण्यापासून लोकांना थांबविण्यात आले, \v 7 कारण जी सामुग्री त्यांच्याजवळ होती, ती सर्व कामाच्या आवश्यकतेपेक्षा अधिक होती. \s1 निवासमंडप \p \v 8 सर्व कुशल कारागिरांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार केला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले. \v 9 सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती.\f + \fr 36:9 \fr*\ft अंदाजे 13 मीटर लांब आणि अंदाजे 2 मीटर रुंद\ft*\f* \v 10 त्यांनी पाच पडदे एकमेकांना जोडले व इतर पाच पडद्यांचेही तसेच केले. \v 11 जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर त्यांनी निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनविले आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच केले. \v 12 तसेच त्यांनी एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत तसेच पन्नास फासे केले, हे फासे समोरासमोर होते. \v 13 मग त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे तयार केले आणि त्याचा उपयोग पडद्याच्या दोन जोड्या एकत्र बांधण्यासाठी केला, यासाठी की निवासमंडप अखंड होईल. \p \v 14 निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी त्यांनी बोकडाच्या केसाचे पडदे तयार केले; ते अकरा पडदे होते. \v 15 सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.\f + \fr 36:15 \fr*\ft अंदाजे 14 मीटर लांब अंदाजे 2 मीटर रुंद\ft*\f* \v 16 त्यांनी पाच पडदे एकत्र जोडले आणि इतर सहा पडदे एकत्र जोडले. \v 17 जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्‍या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला. \v 18 मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला. \v 19 मग त्यांनी तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन केले आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन केले. \p \v 20 त्यांनी निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार केल्या. \v 21 प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद\f + \fr 36:21 \fr*\ft अंदाजे 4.5 मीटर लांब व 68 सें.मी. रुंद\ft*\f* होती. \v 22 एक फळी दुसर्‍या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे केली. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला त्यांनी अशाप्रकारे कुसे केली. \v 23 निवासमंडपाच्या दक्षिणेस त्यांनी वीस फळ्या तयार केल्या \v 24 आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका केल्या—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक. \v 25 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला, म्हणजे उत्तरेला त्यांनी वीस फळ्या तयार केल्या \v 26 आणि प्रत्येक फळीखाली दोन, अशा चांदीच्या चाळीस बैठका केल्या. \v 27 निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस त्यांनी सहा फळ्या तयार केल्या. \v 28 आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्‍यांसाठी त्यांनी दोन फळ्या तयार केल्या. \v 29 या दोन कोपर्‍यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी असून एकाच कडीत जोडल्या होत्या; दोन्ही कोपर्‍यांच्या फळ्या एकसारख्याच होत्या. \v 30 एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका होत्या. \p \v 31 त्याचप्रमाणे त्यांनी निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे पाच अडसर तयार केले, \v 32 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर होते. \v 33 मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे तयार केले. \v 34 त्यांनी फळ्यांना सोन्याचे आवरण लावले आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या केल्या. त्यांनी आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण दिले. \p \v 35 मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाचे पडदे बनविले व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले. \v 36 त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व त्यावर सोन्याचे आवरण घातले. त्यासाठी त्यांनी सोन्याच्या कड्या व चांदीच्या चार बैठका बनविल्या. \v 37 त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा तयार केला. \v 38 मग त्यांनी पाच खांब व त्यांच्या कड्या बनविल्या. त्या खांबांचा वरचा भाग व बांधे यांना सोन्याचे आवरण घातले आणि त्यांच्या कास्याच्या पाच बैठका बनविल्या. \c 37 \s1 कोश \p \v 1 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच\f + \fr 37:1 \fr*\ft अंदाजे लांबी 110 सें.मी. रुंदी व उंची 70 सें.मी. होती.\ft*\f* होता. \v 2 त्यावर त्याने आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याच्याभोवती सोन्याचा काठ केला. \v 3 त्याने त्यासाठी सोन्याच्या चार कड्या केल्या आणि त्याच्या चार पायांना दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्‍या बाजूला लावल्या. \v 4 मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले. \v 5 आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले. \p \v 6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे प्रायश्चिताचे झाकण बनविले; जे अडीच हात लांब व दीड हात रुंद होते. \v 7 झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले. \v 8 एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब बनविले; झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घेतले. \v 9 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती. \s1 भाकरीचा मेज \p \v 10 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनविला; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच\f + \fr 37:10 \fr*\ft अंदाजे 90 सें.मी. लांब, 45 सें.मी. रुंद व 68 सें.मी. उंच\ft*\f* होता. \v 11 मग त्यांनी त्याला शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याभोवती सोन्याचा काठ बनविला. \v 12 मग त्यांनी त्याच्याभोवती चार बोटे\f + \fr 37:12 \fr*\ft अंदाजे 7.5 सें.मी.\ft*\f* रुंदीएवढी पट्टी बनवून, त्यावर सोन्याचा काठ तयार केला. \v 13 मग त्यांनी मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या तयार करून त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर बसविल्या. \v 14 मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ लावल्या. \v 15 मेज वाहून नेण्यासाठी असलेले दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले होते व त्यांना सोन्याचे आवरण घातले होते. \v 16 आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील उपकरणे म्हणजे ताटे, पात्रे व वाट्या व त्याचे कलश हे त्यांनी शुद्ध सोन्याचे बनविले. \s1 दीपस्तंभ \p \v 17 मग त्यांनी शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ बनविला. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असा तयार केला. \v 18 दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला. \v 19 एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे. \v 20 आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले व त्याच्या कळ्या व फुले होती. \v 21 दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी होती, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली होती; सर्व मिळून सहा फांद्या होत्या. \v 22 या सर्व कळ्या व फांद्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून घडविल्या होत्या. \p \v 23 मग त्यांनी त्याचे सात दिवे बनविले व शुद्ध सोन्याचे वातीचे चिमटे आणि तबके सुद्धा बनविली. \v 24 त्यांनी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे एक तालांत\f + \fr 37:24 \fr*\ft अंदाजे 34 कि.ग्रॅ.\ft*\f* शुद्ध सोन्याने तयार केली. \s1 धूपवेदी \p \v 25 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती\f + \fr 37:25 \fr*\ft अंदाजे 45 सें.मी. लांबी व रुंदी आणि उंची 90 सें.मी.\ft*\f* व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती. \v 26 त्यांनी वेदीचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण घातले व त्याभोवती सोन्याचा काठ केला. \v 27 त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या. \v 28 त्यांनी ते दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले व त्यांना सोन्याचे आवरण घातले. \p \v 29 त्यांनी सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे पवित्र अभिषेकाचे तेल व शुद्ध, सुगंधी धूप बनविले. \c 38 \s1 होमवेदी \p \v 1 त्यांनी बाभळीच्या लाकडाची होमार्पणाची वेदी तयार केली. ती तीन हात उंच, पाच हात लांब, पाच हात रुंद\f + \fr 38:1 \fr*\ft अंदाजे 1.4 मीटर उंच, 2.3 मीटर लांबी आणि रुंदी\ft*\f* असून चौकोनी होती. \v 2 मग त्यांनी वेदीच्या चार कोपर्‍यांना प्रत्येकी एक शिंग बनविले, शिंगे व वेदी अखंड बनविली व वेदीला कास्याचे आवरण घातले. \v 3 वेदीची सर्व पात्रे, म्हणजे त्याचे भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे बनविले. \v 4 त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती. \v 5 त्यांनी कास्याच्या चाळणीच्या चार कोपर्‍यांना दांडे अडकविण्यासाठी ओतीव कास्याच्या कड्या तयार केल्या. \v 6 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण घातले. \v 7 त्यांनी ते दांडे कड्यात अडकविले, म्हणजे वेदी वाहून नेताना दांडे वेदीच्या दोन बाजूंनी असतील. वेदी लाकडाची असून ती आतून पोकळ बनविली. \s1 धुण्यासाठी गंगाळ \p \v 8 मग त्यांनी कास्याचे गंगाळ व त्याची बैठक सुद्धा कास्याची बनविली. सभामंडपाच्या दाराशी सेवा करणार्‍या स्त्रियांच्या आरशांचे ते बैठक होते. \s1 अंगण \p \v 9 मग त्यांनी अंगण तयार केले. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब\f + \fr 38:9 \fr*\ft अंदाजे 45 मीटर\ft*\f* होती व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे होते. \v 10 आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका होत्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या. \v 11 उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब होती आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका होत्या व खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या. \p \v 12 पश्चिमेकडील शेवटची बाजू पन्नास हात रुंदीची\f + \fr 38:12 \fr*\ft अंदाजे 23 मीटर\ft*\f* होती आणि त्याला पडदे लावलेले होते, त्याला दहा खांब व दहा बैठका असून खांबांना चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या. \v 13 सूर्योदयाकडील पूर्वेकडील बाजू पन्नास हात रुंद होती. \v 14 प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात\f + \fr 38:14 \fr*\ft अंदाजे 7 मीटर\ft*\f* लांबीचा पडदा होता. त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या, \v 15 आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या दुसर्‍या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे होते, त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या. \v 16 अंगणाच्या सर्व बाजूचे पडदे कातलेल्या रेशमी तागाचे होते. \v 17 खांबांच्या बैठका कास्याच्या होत्या. खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्यांच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते; अशाप्रकारे अंगणाच्या प्रत्येक खांबाला चांदीच्या पट्ट्या होत्या. \p \v 18 अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा होता व त्यावर भरतकाम केले होते. ते अंगणाच्या पडद्यासारखे वीस हात लांब\f + \fr 38:18 \fr*\ft अंदाजे 9 मीटर\ft*\f* होते आणि पाच हात\f + \fr 38:18 \fr*\ft अंदाजे 2.3 मीटर\ft*\f* उंच होते. \v 19 त्याला चार खांब व कास्याच्या चार बैठका होत्या. त्यांच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्याच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते. \v 20 निवासमंडप व अंगणाच्या सभोवती वापरलेल्या सर्व मेखा कास्याच्या होत्या. \s1 वापरलेली सामुग्री \p \v 21 मोशेच्या आज्ञेनुसार बनविलेले कराराच्या नियमाचे निवासमंडप यासाठी जी सामुग्री वापरली गेली, त्यांची मोजणी, अहरोन याजक याचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली लेव्यांच्या द्वारे केली गेली, ती अशी: \v 22 याहवेहने मोशेला जे सर्व आज्ञापिले होते ते यहूदाह वंशातील हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने तयार केले; \v 23 त्याच्याबरोबर दान वंशातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब होता; हा शिल्पकार व कुशल कारागीर, निळे, जांभळे आणि किरमिजी रंगाचे रेशमी ताग यावर भरतकाम करणारा होता. \v 24 हेलावणीच्या अर्पणातून पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी वापरलेले सोने हे पवित्रस्थानाच्या वजनानुसार एकोणतीस तालांत\f + \fr 38:24 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa किक्कार, अंदाजे 991 कि.ग्रॅ.\fqa*\f* व सातशे तीस शेकेल\f + \fr 38:24 \fr*\ft अंदाजे 1 मेट्रिक टन सोने\ft*\f* असे होते. \p \v 25 इस्राएली समुदायातील जनगणना झालेल्या लोकांपासून आलेली चांदी पवित्रस्थानाच्या वजनानुसार शंभर तालांत\f + \fr 38:25 \fr*\ft अंदाजे 3.4 मेट्रिक टन\ft*\f* आणि एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल\f + \fr 38:25 \fr*\ft अंदाजे 20 कि.ग्रॅ.\ft*\f* होती. \v 26 जनगणना झालेले वीस वर्ष व त्याहून अधिक वयाचे सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास पुरुष होते—त्याचा प्रत्येक पुरुषाकरिता एक बेका, म्हणजेच पवित्रस्थानाच्या वजनानुसार अर्धा शेकेल मिळाला होता. \v 27 शंभर तालांत चांदी पवित्रस्थानाच्या व पडद्याच्या ओतीव बैठका तयार करण्यासाठी वापरली; शंभर बैठकांसाठी शंभर तालांत, प्रत्येकी एका बैठकीसाठी एक तालांत वापरला. \v 28 खाबांच्या कड्यांसाठी, खांबांच्या वरील भागास आवरण देण्यासाठी व त्यांच्या पट्ट्या बनविण्यासाठी एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल वापरण्यात आले. \p \v 29 हेलावणीच्या अर्पणात सत्तर तालांत आणि दोन हजार चारशे शेकेल\f + \fr 38:29 \fr*\ft अंदाजे 2.4 मेट्रिक टन\ft*\f* कास्य होते. \v 30 त्याचा वापर त्यांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बैठका, कास्याची वेदी व त्याची कास्याची चाळणी व वेदीवरील उपकरणे बनविण्यासाठी केला, \v 31 निवासमंडपाच्या अंगणाभोवती व त्याच्या प्रवेशद्वारासाठी बैठका आणि निवासमंडपाच्या व अंगणाच्या सभोवती मेखा करण्यासाठी त्याचा वापर केला. \c 39 \s1 याजकीय वस्त्रे \p \v 1 पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली. \s1 एफोद \p \v 2 मग त्यांनी एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा वापर करून बनविला. \v 3 त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले. \v 4 एफोदासाठी त्यांनी दोन खांदेपट्ट्या बनविल्या, ज्या त्याच्या दोन कोपर्‍यांना बांधता येतील अशा जोडल्या. \v 5 कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच होता; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे तो बनविला होता. \p \v 6 त्यांनी गोमेद रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविले आणि त्यावर मुद्रा कोरावी अशी इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरली. \v 7 मग त्यांनी इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून ती रत्ने एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर लावली, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे त्यांनी हे केले. \s1 ऊरपट \p \v 8 कुशल कारागिरांच्या हस्तकृतीने त्यांनी ऊरपट बनविला. त्यांनी तो एफोदाप्रमाणेः सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा बनविला. \v 9 तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला होता व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत\f + \fr 39:9 \fr*\ft अंदाजे 23 सें.मी.\ft*\f* होती. \v 10 मग त्यांनी त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावली. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज, व माणिक \v 11 दुसर्‍या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे, \v 12 तिसर्‍या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग; \v 13 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे. त्यांना नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या कोंदणात लावले होते. \v 14 इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने होती. प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले. \p \v 15 त्यांनी ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या तयार केल्या. \v 16 त्यांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनविल्या, त्या दोन कोंदणांमध्ये घालून ऊरपटाच्या दोन्ही टोकास बसविल्या. \v 17 त्यांनी त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये बसविल्या, \v 18 आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडले. \v 19 त्यांनी सोन्याच्या दोन कड्या तयार केल्या व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडल्या. \v 20 मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनविल्या व त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून जोडल्या, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडल्या. \v 21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले. \s1 इतर याजकीय वस्त्रे \p \v 22 त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्‍याच्या कामाप्रमाणे विणला. \v 23 त्याच्या मधोमध चिलखताच्या गळ्याप्रमाणे त्या झग्याचे तोंड होते. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे गोट होता. \v 24 त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेर्‍यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या सुताची डाळिंबे बनविली. \v 25 डाळिंबांच्या मध्ये झग्याच्या घेरावर शुद्ध सोन्याच्या घंट्या बनवून लावल्या. \v 26 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले. \p \v 27 यानंतर त्यांनी अहरोन व त्याचे पुत्र यांच्यासाठी रेशमी तागाचे विणलेले अंगरखे तयार केले. \v 28 आणि रेशमी तागाचा फेटा व रेशमी तागाची टोपी आणि रेशमी तागाची अंतर्वस्त्रे केली. \v 29 कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते. \p \v 30 त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले: \pc याहवेहसाठी पवित्र. \m \v 31 ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते. \s1 मोशे निवासमंडपाचे परीक्षण करतो \p \v 32 याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले. \v 33 मग त्यांनी निवासमंडप मोशेकडे आणला: \b \li1 तंबू व त्याचे सर्व सामान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका; \li1 \v 34 मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा; \li1 \v 35 कराराच्या नियमाचा कोश, त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण; \li1 \v 36 मेज व त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर; \li1 \v 37 शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्याच्या दिव्यांची रांग व त्याची सर्व उपकरणे आणि प्रकाशासाठी जैतुनाचे तेल; \li1 \v 38 सोन्याची धूपवेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप व तंबूच्या प्रवेशद्वारासाठी पडदा; \li1 \v 39 कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; \li1 गंगाळ व त्याची बैठक; \li1 \v 40 अंगणाचे पडदे, खुंट्या व त्यांच्या बैठका आणि अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदे; \li1 दोर्‍या व अंगणासाठी तंबूच्या मेखा; \li1 निवासमंडप व सभामंडपा साठी लागणारे सर्व साहित्य; \li1 \v 41 पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे. \b \p \v 42 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती. \v 43 मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला. \c 40 \s1 निवासमंडपाची उभारणी \p \v 1 मग याहवेह मोशेला म्हणाले: \v 2 “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडप, सभामंडप उभा करावा. \v 3 त्यामध्ये कराराच्या नियमाचा कोश ठेवावा आणि कोश पडद्याने झाकावा. \v 4 मेज आत आणून त्यावरचे सामान व्यवस्थित लावावे. मग दीपस्तंभ आत आणावा व त्याचे दिवे लावावे. \v 5 कराराच्या नियमाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेवावी आणि निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा लावावा. \p \v 6 “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारापुढे, सभामंडपापुढे होमार्पणाची वेदी ठेवावी. \v 7 सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवून त्यात पाणी भरावे. \v 8 त्याभोवती अंगण करावे आणि त्या अंगणाच्या प्रवेशद्वारास पडदा लावावा. \p \v 9 “अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडप व त्यातील प्रत्येक वस्तूवर अभिषेक करावा, ते व त्यातील सर्व सामान वेगळे करावे म्हणजे ते पवित्र होईल. \v 10 मग होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे यांचा अभिषेक करावा; वेदीला पवित्र करावे म्हणजे ती वेदी परमपवित्र होईल. \v 11 मग गंगाळ व त्याच्या बैठकीस अभिषेक कर व ते समर्पित कर. \p \v 12 “अहरोन व त्याचे पुत्र यांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणावे व त्यांना पाण्याने धुवावे. \v 13 मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे. \v 14 त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे. \v 15 जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.” \v 16 जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले. \p \v 17 दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडपाची उभारणी करण्यात आली. \v 18 जेव्हा मोशेने निवासमंडपाची उभारणी केली, त्याने बैठका जागेवर लावल्या, फळ्या उभ्या केल्या, त्यात अडसर टाकले व खांब उभे केले. \v 19 मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते. \p \v 20 मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले. \v 21 मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला. \p \v 22 मोशेने सभामंडपामध्ये, निवासमंडपाच्या उत्तर दिशेला पडद्याच्या बाहेर मेज ठेवला \v 23 व मोशेने त्यावर याहवेहसमोर भाकर ठेवली, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते. \p \v 24 त्याने सभामंडपामध्ये मेजासमोर, निवासमंडपाच्या दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवला \v 25 आणि याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे याहवेहसमोर दिवे लावले. \p \v 26 मग मोशेने सभामंडपात, पडद्याच्या समोर सोन्याची वेदी ठेवली \v 27 व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला. \p \v 28 मग त्याने निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराला पडदे लावले. \v 29 मग मोशेने निवासमंडपाच्या, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होमार्पणाची वेदी ठेवली व त्यावर होमार्पण व अन्नार्पण केले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते. \p \v 30 नंतर मोशेने सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरून ठेवले, \v 31 आणि मोशे आणि अहरोन व अहरोनाचे पुत्र यांनी आपले हात व पाय धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर केला. \v 32 जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करीत किंवा वेदीजवळ जात, तेव्हा ते आपले हात व पाय धूत असत, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते. \p \v 33 मग मोशेने निवासमंडप व वेदी यांच्याभोवती अंगण केले आणि अंगणाच्या प्रवेशद्वारात पडदे लावले. अशाप्रकारे मोशेने सर्व काम पूर्ण केले. \s1 याहवेहचे तेज \p \v 34 मग मेघाने सभामंडप झाकले आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला. \v 35 मोशे सभामंडपात प्रवेश करू शकत नव्हता कारण त्यावर मेघ होता आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला होता. \p \v 36 इस्राएली लोकांच्या सर्व प्रवासात, जेव्हा निवासमंडपावरून मेघ वर जाई तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; \v 37 पण मेघ वर गेला नाही, तर तो वर जाईल त्या दिवसापर्यंत ते पुढे जात नसत. \v 38 त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले.