\id EST - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h एस्तेर \toc1 एस्तेर \toc2 एस्तेर \toc3 एस्तेर \mt1 एस्तेर \c 1 \s1 वश्ती राणीची पदच्युति \p \v 1 भारतापासून कूशपर्यंत\f + \fr 1:1 \fr*\ft नाईल नदीचा वरील भाग\ft*\f* पसरलेल्या व एकशे सत्तावीस प्रांत असलेल्या या विस्तृत साम्राज्याचा बादशहा राजा अहश्वेरोश\f + \fr 1:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa झेरेस\fqa*\f* च्या कारकिर्दीत हे घडले: \v 2 त्याकाळी राजा अहश्वेरोश शूशनच्या सिंहासनावर विराजमान होता. \v 3 त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपल्या सर्व प्रतिष्ठित लोकांना व अधिकार्‍यांना तिथे भरविलेल्या महोत्सवाचे राजवाड्यात आमंत्रण दिले. या प्रसंगासाठी पर्शिया व मेदियातील लष्करी अधिकारी, सरदार आणि त्या प्रांतातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. \p \v 4 सतत 180 दिवस त्याने याच्या साम्राज्याच्या दौलतीचे, महिमा व वैभवाचे प्रदर्शन केले. \v 5 हे दिवस संपल्यानंतर, राजाने शूशन राजवाड्यातील लहानापासून थोरापर्यंत सर्वांना राजवाड्याच्या अंगणातील बागेत मेजवानी दिली, जी सात दिवस चालली. \v 6 सजावटीचे पडदे पांढर्‍या आणि निळ्या रंगांचे होते आणि ते पांढर्‍या रंगाच्या कापडी फितींनी व जांभळ्या कापडांनी रुपेरी कड्यांना बसविलेल्या संगमरवरी खांबांना बांधलेले होते. संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर सोन्याचे व रुप्याची लाल-जांभळी रत्ने, संगमरवरी, मौल्यवान मोती व इतर रत्नजडित आसने ठेवलेली होती. \v 7 निरनिराळे नक्षीकाम केलेल्या सुवर्णपात्रांतून पेय दिले जात होते आणि शाही मद्य राजाच्या औदार्यास साजेल असे विपुलतेने दिले जात होते. \v 8 राजाच्या हुकुमानुसार प्रत्येक पाहुण्याच्या मद्य पिण्यावर कोणतेही बंधन नव्हते, राजाने मद्य वाढणाऱ्या अधिकार्‍यांना सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या इच्छेस येईल ते मद्य पिण्याची पूर्ण मुभा होती. \p \v 9 वश्ती राणीनेही अहश्वेरोश राजाच्या शाही महालातील स्त्रियांना मेजवानी दिली. \p \v 10 सातव्या दिवशी, अहश्वेरोश राजा मद्य पिऊन पूर्णपणे उल्लसित झाला असताना त्याने त्याच्या तैनातीस असलेल्या खोजांना—महूमान, बिजथा, हरबोना, बिग्था, अबग्था, जेथर व कर्खस यांना— \v 11 राणी वश्तीला मस्तकावर राजमुकुट घालून आपणाकडे आणण्यास सांगितले. हेतू हा की जमलेले सर्व लोक व प्रतिष्ठितांसमोर तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करावे, कारण ती एक अतिशय सुंदर स्त्री होती. \v 12 परंतु राजाची आज्ञा जेव्हा खोजांनी वश्ती राणीला कळविली, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे राजा अहश्वेरोश संतापला व त्याचा क्रोधाग्नी भडकला. \p \v 13 परंतु चालीरीतींना अनुसरून राजाने कायदा व न्यायात पारंगत व्यक्तीचा सल्ला घेतला. ते ज्ञानी गृहस्थ होते व त्यांना त्या काळाच्या परिस्थितीचे योग्य आकलन होते. \v 14 शिवाय जे राजाचे जिवलग मित्र होते—कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सेना व ममुकान—ते पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील सात प्रतिष्ठित लोक व सर्वात उच्चाधिकारी होते, ज्यांना राजाच्या सानिध्यात प्रवेश करण्याची खास मुभा होती. \p \v 15 राजाने त्यांना विचारले, “कायद्यानुसार, वश्ती राणीच्या बाबतीत काय करावे? खोजाद्वारे पाठविलेली अहश्वेरोश राजाची आज्ञा तिने पाळली नाही.” \p \v 16 राजा व प्रतिष्ठितांच्या समक्षतेत ममुकानाने उत्तर दिले, “वश्ती राणीने चूक केली आहे, केवळ राजाच्याच विरुद्ध नव्हे तर अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रतिष्ठित व नागरिकांच्या विरुद्ध केली आहे. \v 17 कारण राणी वश्तीची वागणूक सर्व ठिकाणच्या स्त्रियांना समजल्यावर त्याही आपआपल्या पतीची अवज्ञा करून म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने वश्ती राणीस त्याच्या समक्षतेत आणण्याची आज्ञा दिली होती, पण ती आली नाही.’ \v 18 आजच्या दिवशी पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील प्रतिष्ठितांच्या स्त्रिया राणीच्या आचरणाबद्धल ऐकून राजाच्या सर्व प्रतिष्ठितांना असाच प्रतिसाद देतील. संपूर्ण साम्राज्यात अपमान व मतभेदाचा अंत राहणार नाही. \p \v 19 “यास्तव, जर महाराजांना मान्य असेल, तर त्यांनी राजाज्ञा द्यावी व तो मेदिया व पर्शिया या प्रांतातील एक न बदलणारा कायदा म्हणून काढावा, त्यात हे नोंदलेले असावे की वश्तीने राजा अहश्वेरोश यांच्या समक्षतेत पुन्हा कधीही येऊ नये. आणि तिच्या जागी हे शाही स्थान ग्रहण करण्यास तिच्यापेक्षा चांगल्या राणीची राजाने निवड करावी. \v 20 तुमच्या या विशाल साम्राज्यातून ही राजाज्ञा प्रसिद्ध झाली तर सर्व ठिकाणच्या पतीचा, मग तो लहान असो वा थोर त्यांच्या पत्नीकडून आदर केला जाईल!” \p \v 21 राजा आणि त्याचे सर्व प्रतिष्ठित या सल्ल्याने प्रसन्न झाले, म्हणून राजाने ममुकानच्या सल्ल्याप्रमाणे केले. \v 22 त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांना सर्व स्थानिक भाषेत, प्रत्येक व्यक्तीस त्याच्या भाषेत कळेल असे पत्र पाठविले. ज्याद्वारे जाहीर करण्यात आले की त्यांच्यामधून प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि आपल्या अधिकाराची अंमलबजावणी आपल्या मातृभाषेत करावी. \c 2 \s1 एस्तेरला राणी करण्यात येते \p \v 1 अहश्वेरोश राजाचा संताप शांत झाल्यानंतर त्याला वश्तीचे स्मरण झाले आणि तिने काय केले व त्याने तिच्याविरुद्ध कोणता कायदा बनविला हे कळून आले. \v 2 तेव्हा त्याच्या तैनातीतील सेवकांनी त्याला सूचना केली, “एक सुंदर व तरुण कुमारिका राजासाठी शोधण्यात यावी. \v 3 राजाने याकरिता कारभारी नेमले जेणेकरून प्रत्येक प्रांतातील सुंदर व तरुण कुमारिकांना शूशनच्या राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात यावे. त्यांना अंतःपुराचा प्रमुख खोजा हेगाइकडे सोपविण्यात यावे, जो त्यांच्यावर सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करेल. \v 4 मग जी तरुणी तुम्हाला अधिक प्रसन्न करेल ती वश्तीच्या जागी राणी केली जाईल.” या सूचनेने राजा अतिशय संतुष्ट झाला आणि त्याने ती योजना अंमलात आणली. \p \v 5 बिन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शिमीचा पुत्र याईर, याचा पुत्र मर्दखय हा यहूदी मनुष्य शूशन राजवाड्यात कामास होता. \v 6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह\f + \fr 2:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa यहोयाखीन\fqa*\f* च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले. \v 7 मर्दखयाला एक चुलतबहीण होती, तिचे नाव हदस्साह होते, जिला त्याने वाढविले होते, कारण तिला आईवडील नव्हते. या तरुणीस एस्तेरही म्हणत असत, जी बांधेसूद व देखणी होती. एस्तेरचे आईवडील मरण पावल्यामुळे मर्दखयने तिला आपल्या कुटुंबात स्वतःच्या मुलीसारखे वाढविले होते. \p \v 8 जेव्हा आता राजाची आज्ञा जाहीर करण्यात आली, तेव्हा अनेक तरुण कुमारिका शूशन राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात आल्या व हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आल्या. एस्तेरलाही राजवाड्यात आणून अंतःपुराचा अधिकारी हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आले. \v 9 एस्तेरला पाहून अंतःपुराचा अधिकारी हेगाइची कृपादृष्टी तिच्यावर झाली; आणि लगेचच तिच्यासाठी त्याने सौंदर्यप्रसाधनांची व खास भोजनपदार्थांची व्यवस्था केली. राजवाड्यातील सात दासी तिच्या तैनातीला त्याने दिल्या व तिला त्यांच्यासह अंतःपुरातील सर्वात उत्तम दालनात हालविले. \p \v 10 एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती कोणालाही सांगितली नाही, कारण मर्दखयाने तिला ते सांगू नये असे बजावले होते. \v 11 एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे. \p \v 12 अहश्वेरोश राजाच्या शयनमंदिरात नेण्यापुर्वी प्रत्येकीवर बारा महिने सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करण्यात येत, सहा महिने गंधरसाच्या तेलाचा उपचार व सहा महिने खास सुवासिक द्रव्ये व प्रसाधनांचा उपचार केला जाई. \v 13 मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती. \v 14 तिला संध्याकाळी नेण्यात येई आणि दुसर्‍या दिवशी सकाळी राजाच्या उपपत्नी राहत, त्या अंतःपुराच्या दुसर्‍या भागात ती जाई. तिथे ती राजाच्या खोजांपैकी शाशगज नावाच्या खोजाच्या देखरेखीखाली असे. राजाने तिचे नाव घेऊन तिला परत बोलाविले नाही, तर राजाकडे तिला पुन्हा पाठविले जात नसे. \p \v 15 राजाकडे जाण्याची एस्तेरची (मर्दखयाने दत्तक घेतलेली, त्याचे काका अबीहाईलच्या कन्याची) पाळी आली, तेव्हा तिने अंतःपुराचा प्रमुख हेगाइचा सल्ला स्वीकारून त्याच्या सूचनेप्रमाणे वस्त्रे परिधान केली आणि ज्यांनीही तिला पाहिले, त्यांची कृपादृष्टी तिच्यावर झाली. \v 16 तेव्हा एस्तेरला अहश्वेरोश राजाच्या महालात त्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या दहाव्या म्हणजे, तेबेथ\f + \fr 2:16 \fr*\ft अंदाजे जानेवारी महिना\ft*\f* महिन्यात नेण्यात आले. \p \v 17 इतर सर्व स्त्रियांपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली, त्याने तिला इतर सर्व कुमारिकांपेक्षा जास्त पसंत केले, तो तिच्यावर इतका प्रसन्न झाला की त्याने तिच्या मस्तकांवर राणीचा राजमुकुट ठेवला आणि वश्तीच्या जागी एस्तेरला राणी केले. \v 18 हा प्रसंग साजरा करण्यासाठी, राजाने आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सेवकांना एस्तेरसाठी एक भव्य मेजवानी दिली. त्यावेळी त्याने सर्व प्रांतांत रजा जाहीर केली आणि शाही उदारतेने देणग्या दिल्या. \s1 मर्दखय कट उघडकीस आणतो \p \v 19 त्यानंतर जेव्हा सर्व कुमारिका पुन्हा एकत्र आणल्या गेल्या, मर्दखय राजमहालाच्या व्दारात बसला होता. \v 20 एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती मर्दखयाच्या सूचनेनुसार कोणालाही सांगितली नव्हती. कारण मर्दखयाच्या घरी असताना ती ज्याप्रमाणे आज्ञा पाळीत असे, त्याचप्रमाणे ती अद्यापही त्याच्या आज्ञा पाळीत होती. \p \v 21 एके दिवशी मर्दखय राजवाड्याच्या द्वारात बसलेला असताना, राजाचे दोन अधिकारी बिग्थान\f + \fr 2:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa बिग्थाना\fqa*\f* व तेरेश, जे राजवाड्याच्या द्वारी द्वारपाल होते, ते राजावर संतापले आणि अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा त्यांनी कट केला. \v 22 मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले. \v 23 जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ते दोन अधिकारी दोषी असल्याचे आढळून आले, तेव्हा त्यांना सुळावर चढविण्यात आले. हे सर्व वृत्त राजाच्या समक्षतेत कारकिर्दीच्या इतिहासग्रंथात नोंदण्यात आले. \c 3 \s1 यहूद्यांचा नाश करण्यासाठी हामानाचा कट \p \v 1 त्यानंतर अहश्वेरोश राजाने अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा बहुमान करून त्याची इतर प्रतिष्ठितांपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणून नेमणूक केली. \v 2 आता राजाज्ञेप्रमाणे राजद्वारावरील सर्व अधिकारी हामानाला अतिशय आदराने गुडघे टेकवून मुजरा करू लागले. परंतु मर्दखयाने गुडघे टेकवून मुजरा करण्याचे नाकारले. \p \v 3 मग राजद्वारावरील सर्व अधिकारी मर्दखयाला विचारू लागले, “तू राजाची आज्ञा का पाळीत नाहीस?” \v 4 दररोज लोक त्याला सांगत असत, परंतु तरीही त्याने ते करण्याचे नाकारले. शेवटी त्याला या राजाज्ञेपासून सूट मिळू शकते की काय हे पाहण्यासाठी ते हामानाशी बोलले, कारण आपण यहूदी असल्याचे मर्दखयाने त्यांना सांगितले होते. \p \v 5 जेव्हा हामानाने पाहिले की मर्दखया गुडघे टेकवित नाही व मुजराही करीत नाही, तेव्हा त्याला अतिशय संताप आला. \v 6 परंतु मर्दखया कोणत्या समाजातून आला आहे हे कळल्यावर, एकट्या मर्दखयावर हात टाकण्याचा विचार त्याला कमीपणाचा वाटला. याउलट अहश्वेरोश राजाच्या संपूर्ण साम्राज्यातील मर्दखयाच्या समाजाच्या सर्व लोकांचा म्हणजे यहूद्यांचा नायनाट करण्याचा हामान मार्ग शोधू लागला. \p \v 7 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षाच्या निसान\f + \fr 3:7 \fr*\ft अंदाजे एप्रिल महिना\ft*\f* महिन्यात, हामानाच्या समक्षतेत, योग्य दिवस व महिना कोणता हे ठरविण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकण्यात आल्या. चिठ्ठ्यांद्वारे या कामासाठी बारावा, अदार\f + \fr 3:7 \fr*\ft अंदाजे मार्च महिना\ft*\f* महिना निवडण्यात आला. \p \v 8 आता हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, “सर्व प्रांतात एका विशिष्ट जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. त्यांचे रीतिरिवाज इतर लोकांपासून भिन्न आहेत, हे लोक राजाचे कायदे पाळत नाहीत; म्हणून या लोकांचे असे वागणे सहन करणे राजाच्या हिताचे नाही. \v 9 जर हे राजास योग्य वाटले तर, या लोकांचा नाश करण्याची राजाज्ञा देण्यात यावी, म्हणजे दहा हजार तालांत\f + \fr 3:9 \fr*\ft अंदाजे 340 मेट्रिक टन\ft*\f* चांदी मी स्वतः राजाच्या खजिन्यात भरेन.” \p \v 10 तेव्हा राजाने आपल्या बोटातील मुद्रा काढून ती यहूद्यांचा शत्रू, अगागी लोकातील हम्मदाथाचा पुत्र हामानाच्या स्वाधीन केली. \v 11 राजा हामानाला म्हणाला, “पैसे तुझ्याजवळच ठेव व या लोकांचे तुला योग्य वाटेल तसे कर.” \p \v 12 नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्‍यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली. \v 13 मग ती पत्रे साम्राज्याच्या सर्व प्रांतांकडे संदेशवाहकांच्या हस्ते पाठविण्यात आली. त्या पत्रांमध्ये अशी राजाज्ञा होती की, तरुण व वृद्ध, स्त्रिया व मुले अशा सर्व यहूदी लोकांना—एकाच दिवशी, बारावा महिना, अदार महिन्याच्या तेरा तारखेस ठार करण्यात यावे आणि त्यांच्या मालमत्तेची लूट करणार्‍यात यावी. \v 14 या राजाज्ञेचा उतारा प्रत्येक प्रांतात कायदा म्हणून जाहीर केला जावा आणि प्रत्येक राज्यातील रहिवाशास त्याची माहिती दिली जावी, म्हणजे नेमलेल्या दिवशी आपले कर्तव्य करण्यास ते तयार राहतील. \p \v 15 राजाज्ञा प्रथम शूशन शहरात जाहीर करण्यात आली, मग ती घेऊन संदेशवाहक निघाले. राजा आणि हामान मद्याची मौज लुटण्यास बसले, पण शूशन शहरात गोंधळ पसरून गेला. \c 4 \s1 मदतीसाठी मर्दखयाची एस्तेरला विनंती \p \v 1 जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला. \v 2 तो राजद्वारापर्यंतच जाऊ शकला, कारण गोणपाट पांघरूण राजवाड्यात प्रवेश करण्याची कोणाला परवानगी नसे. \v 3 साम्राज्यातील सर्व प्रांतांत जिथेही राजाज्ञा जाहीर झाली, तेथील यहूदी लोक उपवास व अत्यंत विलाप करीत, रडून आक्रोश करू लागले. अनेकजण गोणपाट नेसून राखेत पडून राहिले. \p \v 4 एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले. \v 5 मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले. \p \v 6 तेव्हा हथाक मर्दखयाला भेटण्यास राजद्वारासमोरील शहराच्या चौकात गेला. \v 7 मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले. \v 8 मर्दखयाने त्याला शूशनमध्ये जाहीर करण्यात आलेली, सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याच्या राजाज्ञेची एक प्रतही दिली आणि ती प्रत एस्तेरला दाखवून त्यासंबंधी सर्वकाही सविस्तर कळविण्यासही सांगितले. तसेच एस्तेरला तिने राजाकडे जावे आणि तिच्या लोकांसाठी तिने राजाजवळ दयेसाठी रदबदली करावी आणि त्याला विनवणी करावी, अशा सूचनेचा निरोपही त्याने त्याच्याजवळ दिला. \p \v 9 मग हथाक परत आला व त्याने एस्तेरला मर्दखयाने सांगितलेला अहवाल दिला. \v 10 एस्तेरने हथाकाला मर्दखयाकडे पुढील निरोप देऊन पाठविले, \v 11 “राजाच्या सर्व अधिकाऱ्यांना व शाही प्रांतातील लोकांना माहीत आहे की एखादी व्यक्ती, मग ती पुरुष असो वा स्त्री, राजाच्या आतील चौकात बोलाविल्यावाचून गेली, तर त्यांच्यासाठी एकच कायदा आहे: त्यांना प्राणदंड देण्यात यावा. पण जर राजाने आपला सोन्याचा राजदंड त्यांच्यापुढे केला तरच त्यांना जीवदान मिळते. आता तीस दिवस होऊन गेले आहे, पण राजाने मला आपल्याकडे बोलावलेले नाही.” \p \v 12 तेव्हा एस्तेरचा हा निरोप मर्दखयाच्या कानी घालण्यात आला. \v 13 मर्दखयाने हे प्रत्युतर एस्तेरला पाठविले: “असा विचार करू नको की तिथे राजवाड्यात आहेस म्हणून इतर सर्व यहूदी मारले जात असताना तू एकटी वाचशील. \v 14 अशा प्रसंगी तू जर शांत राहशील, तर दुसर्‍या मार्गाने यहूदी लोकांकरिता मुक्ती व उद्धार येईल, परंतु तू आणि तुझ्या वडिलाचे कुटुंब नाश पावेल. पण कोणजाणे कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला हे शाही पद मिळाले असेल का?” \p \v 15 तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठविले: \v 16 “जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.” \p \v 17 तेव्हा मर्दखया तिथून गेला व एस्तेरच्या सूचनेप्रमाणे सर्व त्याने केले. \c 5 \s1 एस्तेरची राजाला विनंती \p \v 1 मग तिसऱ्या दिवशी एस्तेरने तिची शाही वस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतील अंगणात, राजदरबाराच्या अगदी समोर, जाऊन उभी राहिली. राजा राजदरबारात आपल्या राजासनावर, प्रवेशद्वाराच्या सन्मुख बसला होता. \v 2 जेव्हा त्याने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तिला बघून तो प्रसन्न झाला, तेव्हा त्याने आपला सोन्याचा राजदंड तिच्या दिशेने पुढे करून तिचे स्वागत केले, म्हणून एस्तेर जवळ गेली आणि तिने राजदंडाच्या टोकास स्पर्श केला. \p \v 3 मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय हवे आहे? तुझी काय मागणी आहे? मी तुला सांगतो की ती मागणी अर्ध्या राज्याची असली, तरी मी ती पुरवेन!” \p \v 4 त्यावर एस्तेरने उत्तर दिले, “महाराजांच्या मर्जीस आले, तर मी तयार केलेल्या मेजवानीला आपण व हामानाने आज यावे, अशी माझी इच्छा आहे.” \p \v 5 “जा, हामानाला लगेच घेऊन या.” राजा म्हणाला, “म्हणजे एस्तेर जे सांगते ते करता येईल.” \p मग राजा व हामान एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला गेले. \v 6 मेजवानीत मद्य पुरविले जात असताना राजा परत एस्तेरला म्हणाला, “आता तुझी काय विनंती आहे? ते तुला देण्यात येईल. तुला काय पाहिजे? तुझी मागणी अर्ध्या राजाची असली, तर ती पूर्ण करण्यात येईल.” \p \v 7 एस्तेर उत्तरली, “माझी याचना आणि माझी मागणी ही आहे: \v 8 महाराजांची मजवर कृपा असेल आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, माझी विनंती मान्य करा, आपण उद्या पुन्हा हामानाला बरोबर घेऊन आपल्यासाठी मी तयार करणार असलेल्या मेजवानीला यावे; आणि मग उद्या मी महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” \s1 मर्दखयाविरुद्ध हामानाचा संताप \p \v 9 मेजवानीवरून घरी परतल्यावर हामान खूपच आनंदात होता. परंतु राजवाड्याच्या दाराजवळ बसलेल्या मर्दखयास बघितले व आपल्यासमोर तो उठून उभा राहिला नाही, घाबरला नाही, हे पाहून हामान संतापाने भरून गेला. \v 10 तरी, हामानाने स्वतःला आवरले व तो घरी गेला. \p त्याने आपले मित्र व आपली पत्नी जेरेश यांना एकत्र बोलाविले. \v 11 त्यांच्यापुढे आपल्या संपत्तीची, आपल्या अनेक मुलांची, राजाने दिलेल्या बहुमानाची आणि संपूर्ण राज्यात इतर प्रतिष्ठित व अधिकाऱ्यांपेक्षा आपण सर्वात उच्च कसे झालो या सर्वांची हामान बढाई मारू लागला. \v 12 मग हामान पुढे म्हणाला, “आणि एवढेच नव्हे, एस्तेर राणीने आज राजाबरोबर केवळ मलाच तिने तयार केलेल्या मेजवानीला बोलाविले होते आणि उद्याही पुन्हा आम्हाला तिच्या मेजवानीचे आमंत्रण आहे!” \v 13 परंतु मी राजद्वारासमोर बसणार्‍या व मला मुजरा करण्याचे नाकारणार्‍या यहूदी मर्दखयाला पाहतो, तेव्हा ते मला मुळीच समाधान देत नाही. \p \v 14 तेव्हा त्याची पत्नी जेरेश हिने आणि त्याच्या सर्व मित्रांनी त्याला सुचविले, “पन्नास हात\f + \fr 5:14 \fr*\ft अंदाजे 23 मीटर\ft*\f* उंचीचा एक खांब तयार करून घ्या आणि सकाळीच मर्दखयाला त्या खांबावर देण्याची परवानगी राजाजवळ मागून घ्या. हे साध्य करून घेतल्यावर, राजाबरोबर खुशाल आनंदाने मेजवानीला जा.” या सूचनेने हामान प्रसन्न झाला आणि त्याने खांब तयार करून घेतला. \c 6 \s1 मर्दखयाचा सन्मान \p \v 1 त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले. \v 2 ग्रंथाचे वाचन चालू असताना, राजवाड्याचे दोन खोजे, द्वाररक्षक बिग्थाना व तेरेश यांनी अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा कट मर्दखय याने कसा उघडकीस आणला होता, ही संपूर्ण हकिकत नोंदविण्यात आल्याचे कळले. \p \v 3 तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?” \p “त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले. \p \v 4 राजाने विचारले, “राजदरबारात कोण आहे?” त्याचवेळी हामानाने नुकताच राजदरबाराच्या बाहेरच्या चौकात प्रवेश केला. आपण उभ्या केलेल्या सुळावर मर्दखयाला फाशी देण्याची परवानगी राजापाशी मागण्यासाठी तो आलेला होता. \p \v 5 तेव्हा राजदरबारी उत्तरले, “हामान राजदरबारात उभा आहे.” \p “त्याला आत आणा,” राजाने फर्माविले. \p \v 6 मग हामान आत आल्यावर, राजाने त्याला विचारले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास काय करावयाला हवे?” \p आता हामानाने स्वतःबद्दल विचार केला, “राजाच्या मर्जीत सन्मानास योग्य असणारा माझ्याशिवाय दुसरा कोण असेल?” \v 7 म्हणून हामानाने राजाला उत्तर दिले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास, \v 8 राजाने स्वतः परिधान केलेला पोशाख व राजाने स्वारी केलेला घोडा मागवावा आणि राजमुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा. \v 9 आणि राजाच्या अत्यंत थोर सरदाराला तो पोशाख व घोडा द्यावा. आणि राजा ज्याचा सन्मान करू इच्छितो त्याच्या अंगावर ते कपडे चढवावे, आणि त्याच्यापुढे हे जाहीर करीत जावे, ‘राजाला जे प्रसन्न करतात, त्यांचा सन्मान राजा अशा रीतीने करतो!’ ” \p \v 10 राजाने हामानाला फर्माविले, “आता त्वरा कर आणि माझा पोशाख आणि माझा घोडा घे आणि तू सांगितलेस अगदी त्याप्रमाणे राजद्वारी बसणारा यहूदी मर्दखयाच्या बाबतीत कर. तू सुचवलेल्या कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करू नको.” \p \v 11 मग हामानाने राजाचा पोशाख व घोडा घेतला व तो पोशाख मर्दखयाला घातला, राजाच्या घोड्यावर बसवून, शहराच्या रस्त्यांमधून त्याला मिरवणुकीने नेले आणि त्यावेळी त्याच्यापुढे तो ललकारत होता, “जे राजाला प्रसन्न करतात, त्यांचा अशा रीतीने सन्मान केला जातो.” \p \v 12 नंतर मर्दखय राजद्वारी परत आला, परंतु हामान घाईघाईने, आपले मस्तक अत्यंत शोकाने झाकून घरी परतला. \p \v 13 मग हामानाने घडलेल्या गोष्टीची संपूर्ण हकिकत त्याची पत्नी जेरेश व त्याच्या सर्व मित्रांना सांगितली. त्याचे सल्लागार व पत्नी जेरेश त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल, तर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. तुम्ही त्याच्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही—आता तुमचा निश्चितच नाश होणार!” \v 14 ते त्याच्याबरोबर ही चर्चा करीत असतानाच, राजाचे खोजा आले व एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीस हामानाला घाईघाईने घेऊन गेले. \c 7 \s1 हामानाला सुळावर दिले जाते \p \v 1 मग राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीला गेले. \v 2 दुसऱ्या दिवशी ते मद्य पीत असताना, राजाने परत एस्तेरला विचारले, “एस्तेर राणी, तुझी विनंती काय आहे? ती तुला देण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याची असली तरी, पूर्ण करण्यात येईल.” \p \v 3 तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे. \v 4 कारण मी व माझे लोक, आमचा नाश, कत्तल व नामशेष करणार्‍यांना विकले गेलो आहोत. स्त्री व पुरुषांची केवळ गुलाम म्हणून विक्री झाली असती, तर कदाचित मी गप्प राहिले असते. त्यामुळे राजास कष्ट देण्याची गरज पडली नसती\f + \fr 7:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa परंतु कितीही मोठ्या रकमेने त्या नुकसानीची भरपाई करता आली नसती\fqa*\f*.” \p \v 5 तेव्हा अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “तो कोण आहे? कुठे आहे तो—जो असे काही करण्याचे धाडस करेल?” \p \v 6 त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” \p तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला. \v 7 हे ऐकताच राजा तीव्र संतापाने एकदम उठला आणि त्याचे मद्य सोडून बाहेर राजवाड्याच्या बागेत गेला. इकडे हामान, राजाने आता आपले भवितव्य ठरविले आहे, हे ओळखून आपले प्राण वाचवावे म्हणून एस्तेर राणीजवळ विनवणी करण्यासाठी तिथेच थांबला. \p \v 8 एस्तेर राणी ज्या आसनावर रेलून बसली होती, त्या आसनावर हामान वाकलेला होता आणि नेमक्या त्याच क्षणी राजवाड्याच्या बागेत गेलेला राजा परतला. \p तेव्हा संतापाने राजा ओरडला, “अरे, ती माझ्यासह इथे घरात असताना देखील हा राणीवर बलात्कार करू पाहतो काय?” \p राजाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताक्षणी राजसेवकांनी हामानाचा चेहरा झाकून टाकला. \v 9 मग राजाच्या खोजापैकी हरबोना नावाचा सेवक म्हणाला, “महाराज, पन्नास हात उंचीचा खांब हामानाच्या घराजवळ उभा करण्यात आला आहे. राजाला मदत करण्यासाठी ज्या मर्दखयाने सूचना दिली होती, त्याला फाशी देण्यासाठी याने तो तयार करवून घेतलेला आहे.” \p तेव्हा राजा म्हणाला, “त्यावर यालाच फाशी द्या!” \v 10 त्याप्रमाणे त्यांनी हामानाला मर्दखयासाठी तयार केलेल्या खांबावर फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोध शांत झाला. \c 8 \s1 यहूद्यांच्या वतीने राजाज्ञा \p \v 1 त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू हामानची मालमत्ता एस्तेर राणीला दिली. नंतर मर्दखयाला राजापुढे आणण्यात आले, कारण एस्तेरने मर्दखया कसा आपला नातेवाईक आहे राजाला सांगितले होते. \v 2 तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले. \p \v 3 आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती. \v 4 राजाने पुन्हा आपली सोनेरी राजदंड एस्तेरपुढे धरला, तेव्हा ती उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. \p \v 5 ती म्हणाली, “महाराज, आपल्या मर्जीस येत असेल व मजवर आपली कृपादृष्टी असेल, व ते योग्य वाटत असेल, आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, सर्व प्रांतांतील यहूद्यांचा नायनाट करण्याविषयीचा अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा हुकूम रद्द करणारे फर्मान काढून ते सर्वत्र पाठविण्यात यावे. \v 6 कारण माझ्या लोकांची कत्तल आणि नायनाट झालेला पाहणे, मला कसे सहन होईल? माझ्या कुटुंबाचा नाश पाहणे मी कसे सहन करेन?” \p \v 7 मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहूदी मर्दखयाला म्हणाला, “कारण हामानाने यहूद्यांवर हल्ला केला, म्हणून मी हामानाची संपत्ती एस्तेरला दिली आहे आणि त्याला त्यानेच उभ्या केलेल्या फासावर लटकावले. \v 8 आता तुम्ही राजाच्या नावाने यहूद्यांच्या वतीने तुम्हाला योग्य वाटेल तशी दुसरी राजाज्ञा लिहा आणि त्यावर राजाची मोहोर लावा—कारण राजाच्या नावाने लिहिलेले व राजाची मोहोर लावलेले पत्र कधीही रद्द होत नाही.” \p \v 9-10 तेव्हा ताबडतोब राजाच्या चिटणीसांना बोलाविण्यात आले—तो तिसऱ्या, म्हणजे सिवान\f + \fr 8:9‑10 \fr*\ft अंदाजे जून महिना\ft*\f* महिन्याचा, तेविसावा दिवस होता. त्यांनी मर्दखयाने भारतापासून कूशपर्यंतच्या 127 प्रांतातील यहूद्यांना, प्रांतप्रमुखांना, राज्यपालांना, व प्रतिष्ठितांना पाठविण्यासाठी फर्मान लिहून घेतले. राज्यातील विविध लोकांच्या विविध भाषांमधून व लिप्यांमधून, तसेच यहूद्यास त्यांच्या भाषेत व लिपीत ते फर्मान लिहिण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्र लिहून, ते बंद करून त्यावर राजाच्या मुद्रेची मोहोर लावली. मग ती पत्रे राजाच्या निरोपासाठी वापरले जाणारे खास वाढविलेले वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठविली. \p \v 11 या फर्मानाद्वारे सर्व नगरात राहत असलेल्या यहूद्यांना आपल्या प्राणाच्या व कुटुंबाच्या रक्षणार्थ एकजूट होण्याची व त्यांचा नाश, कत्तल व नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या, कोणत्याही राज्याच्या व प्रांताच्या सशस्त्र लोकांना, त्यांच्या स्त्रिया व लेकरांना नष्ट करून त्यांची घरेदारे घेण्याची परवानगी देण्यात आली. \v 12 हे सर्व करण्यासाठी अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांसाठी एक दिवस म्हणजे बारावा म्हणजे अदार महिन्याचा तेरावा दिवस निवडण्यात आला. \v 13 त्या पत्राच्या प्रतिद्वारे प्रत्येक प्रांतातील सर्व जातीच्या नागरिकांना कळविण्यात आले, हे फर्मान सर्वत्र कायदा म्हणून मान्य करण्यात यावे की आपल्या शत्रूचा सूड घेण्यासाठी या दिवशी यहूदी लोक सज्ज राहतील. \p \v 14 अशा रीतीने संदेशवाहकांनी शाही वेगवान घोड्यांवर स्वार होऊन व राजाज्ञेनुसार राज्यात सर्वत्र पत्र नेले. हे फर्मान शूशन राजवाड्यात काढण्यात आले. \s1 यहूद्यांचा विजय \p \v 15 जेव्हा मर्दखया राजाच्या उपस्थितीतून बाहेर गेला, तेव्हा त्याने निळ्या व पांढर्‍या रंगांची राजकीय वस्त्रे परिधान केले होते व डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून आणि व जांभळ्या रंगाचा व तलम वस्त्राचा झगा घातला होता. आणि शूशन शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. \v 16 यहूद्यांकरिता हा समय उल्लास व आनंद, हर्ष व सन्मान साजरा करण्याचा होता. \v 17 राजाचे फर्मान ज्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक प्रांतात जाऊन पोहोचले तेव्हा तेथील सर्व यहूद्यांनी मेजवान्या देऊन उत्सव साजरा करून आपला हर्ष व उल्हास प्रकट केला. इतर देशातील अनेक लोक यहूदी बनले, कारण यहूदी आपला जबरदस्तीने ताबा घेतील अशी त्यांना भीती वाटली. \c 9 \p \v 1 बाराव्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी, राजाची दोन्हीही फर्माने अंमलात यावयाची होती. त्या दिवशी यहूद्यांचे शत्रू यहूद्यांना धुळीस मिळविण्याची आशा बाळगून होते. परंतु प्रत्यक्षात अगदी उलटेच घडले. सर्व प्रांतांतील यहूदी लोक, त्यांना उपद्रव देणाऱ्यांना वरचढ झाले. \v 2 त्या शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपआपल्या शहरांमध्ये एकत्र आले. परंतु त्यांना कोणीही उपद्रव दिला नाही, कारण सर्व जातीच्या लोकांना यहूद्यांची धास्ती वाटू लागली होती. \v 3 सर्व प्रांतांच्या अधिपतींनी म्हणजे राज्यपाल, प्रांतप्रमुख, प्रतिष्ठित व सरकारी कर्मचाऱ्यांनी यहूद्यांनाच मदत केली, कारण ते मर्दखयाच्या भीतीने ग्रासून गेले होते. \v 4 मर्दखया राजवाड्यात एक महत्त्वाचा व्यक्ती होता; त्याची किर्ती सर्व प्रांतात पसरली होती व तो आता अत्यंत प्रबळ झालेला होता. \p \v 5 त्या नेमलेल्या दिवशी यहूदी लोकांनी आपल्या शत्रूंची कत्तल करून संहार केला व त्यांचा नाश केला आणि जे त्यांचा तिरस्कार करीत असत, त्यांना आवडेल तसे वागविले. \v 6 यहूद्यांनी शूशन राजधानीत पाचशे पुरुष ठार करून नष्ट केले. \v 7-10 त्यांनी यहूद्यांचा शत्रू म्हणजे हम्मदाथाचा पुत्र हामानच्या पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा, पोराथा, आदल्या, अरीदाथा, पर्माश्ता, अरीसई, अरीदय व वैजाथा या दहा पुत्रांनाही ठार केले. परंतु त्यांनी त्यांच्या मालमत्तेवर हात टाकला नाही. \p \v 11 शूशन राजधानीत ठार झालेल्यांची संख्या राजाला त्याच दिवशी कळविण्यात आली, \v 12 तेव्हा त्याने एस्तेर राणीला बोलाविले व तो म्हणाला, “शूशन राजधानीतच यहूद्यांनी पाचशे लोक ठार केले आहेत आणि हामानाच्या दहा पुत्रांचाही संहार केला आहे. तर राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल? आता तुझी काय मागणी आहे? ते तुला दिले जाईल. तुझी काय विनंती आहे? ते देखील करण्यात येईल.” \p \v 13 तेव्हा एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस येत असेल तर, येथे शूशन शहरातील यहूद्यांना उद्याही राजाज्ञेप्रमाणे करण्याची परवानगी द्यावी आणि हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर टांगण्यात यावी.” \p \v 14 तेव्हा राजाने हे सर्व करण्याची आज्ञा दिली. फर्मान शूशन शहरात प्रसिद्ध करण्यात आले व हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर लटकविण्यात आली. \v 15 मग अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशन शहरातील यहूदी एकत्र गोळा झाले व त्यांनी शूशन शहरात आणखी तीनशे पुरुष ठार केले. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही. \p \v 16 इकडे राजाच्या सर्व प्रांतातील इतर यहूदी लोक स्वतःच्या संरक्षणार्थ एकवटले आणि त्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा संहार केला. त्यांनी पंचाहत्तर हजार लोकांचा वध केला. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही. \v 17 हे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी घडले, मग चौदाव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला. \p \v 18 परंतु शूशन शहरातील यहूदी तेराव्या व चौदाव्या दिवशी एकत्र आले व पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला. \p \v 19 आणि म्हणूनच नगराच्या ग्रामीण भागातील यहूदी लोक अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी आनंद करून व एकमेकांना भेटी देऊन उत्सव साजरा करतात. \s1 पुरीम उत्सवाची संस्थापना \p \v 20 मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली. \v 21 या पत्रांच्या द्वारे अदार महिन्याच्या चौदाव्या व पंधराव्या दिवशी वार्षिक आनंदोत्सव म्हणून जाहीर केला. \v 22 कारण त्या दिवशी यहूदी लोकांचे त्यांच्या शत्रूपासून रक्षण झाले आणि त्यांच्या दुःखाचे हर्षात आणि त्यांच्या शोकाचे आनंदोत्सवात रूपांतर झाले. आणि हा दिवस मेजवान्या देऊन व एकमेकांना सर्व प्रकाराच्या भेटी देऊन व गोरगरिबांना दानधर्म करून आनंदाने साजरा करावा असे त्याने पत्राद्वारे त्यांना कळविले. \p \v 23 तेव्हा यहूदी लोकांनी मर्दखयाने लिहिल्यानुसार सूचना स्वीकारली आणि हा उत्सव सुरू केला. \v 24 कारण अगागी हम्मदाथाचा पुत्र हामान, यहूद्यांच्या शत्रूने सर्व यहूदी लोकांचा विध्वंस करून नाश करण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकून कट केला होता. \v 25 या कटाचे प्रकरण राजापुढे आले,\f + \fr 9:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa जेव्हा एस्तेर राजासमोर आली\fqa*\f* तेव्हा राजाने फर्मान काढले की यहूदी लोकांविरुद्ध रचलेला हामानाचा कट त्याच्याच डोक्यावर उलटविण्यात यावा आणि मग हामान व त्याचे पुत्र यांना फासावर लटकविण्यात यावे. \v 26 (म्हणून या दिवसांना पूर वरून “पुरीम” हे नाव पडले.) जे घडले त्या सर्वांची या पत्रात नोंद करण्यात आली, कारण जे काही घडले व जे सर्व त्यांनी बघितले होते. \v 27 राज्यातील सर्व यहूद्यांनी हा उत्सव सुरू करण्यास व आपल्या वंशजांनी आणि यहूदी होणार्‍या सर्वांनी न चुकता प्रत्येक वर्षी हे दोन दिवस योग्य वेळी साजरे करण्याचा संकल्प केला. \v 28 आणि साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व शहरांमधील, प्रत्येक पिढीतील प्रत्येक कुटुंबात यहूदी लोक हे दोन दिवस वार्षिक उत्सवाचे प्रसंग म्हणून साजरे करतील. आणि हे पुरीम उत्सवाचे दोन दिवस साजरे करण्यास कधीही चुकू नये—यहूदी वंशातून या दिवसांची आठवण कधीही पुसली जाऊ नये. \p \v 29 दरम्यानच्या काळात, अबीहाईलची कन्या एस्तेर राणीने व यहूदी मर्दखयासह आपल्या पूर्ण अधिकाराने पुरीमची सूचना देण्यासाठी दुसरे पत्र लिहिले. \v 30 याशिवाय, यहूदी मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व एकशे सत्तावीस प्रांतातील यहूद्यांना सदिच्छा व्यक्त करणारी पत्रे पाठविली. \v 31 एस्तेर राणी व यहूदी मर्दखयाने यांनी पुरस्कृत केलेल्या पुरीम सणाचे हे दोन दिवस वार्षिक सण म्हणून साजरे करण्याचे फर्मान काढले, ज्याप्रकारे राष्ट्रीय उपासाचा आणि प्रार्थनेचा सण पाळल्या जातो, त्याच प्रकारे पुरीमचा सणही पाळण्यात यावा. \v 32 अशा रीतीने एस्तेरच्या आज्ञेने या दोन दिवसांच्या तारखा निश्चित करण्यात झाल्या आणि ग्रंथात त्यांची नोंद झाली. \c 10 \s1 मर्दखयाची थोरवी \p \v 1 अहश्वेरोश राजाने आपल्या संपूर्ण साम्राज्याच्या मुख्य भूमीवर व समुद्रकिनाऱ्यावरील बेटांवर कर लावला. \v 2 मर्दखय यहूदीस उच्चपद प्रदान केले, मर्दखयाची थोरवी, त्याची महान कृत्ये आणि त्याचप्रमाणे त्याला राजाकडून प्राप्त झालेले सन्मान यांची साद्यंत हकिकत मेदिया व पर्शियाच्या राजाच्या इतिहासग्रंथात लिहिलेली नाही काय? \v 3 खुद्द अहश्वेरोश राजाच्या खालोखाल मर्दखयचे पद होते. अर्थात्, तो यहूदी लोकांमध्ये अतिशय थोर होता आणि त्याचे सर्व देशबांधव त्याचा फार आदर करीत, कारण तो आपल्या लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खूप झटत असे व त्यांच्या हितासाठी रदबदली करीत असे.