\id EPH - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h इफिसकरांस \toc1 पौलाचे इफिसकरांस पत्र \toc2 इफिसकरांस \toc3 इफिस \mt1 पौलाचे इफिसकरांस पत्र \c 1 \po \v 1 परमेश्वराच्या इच्छेने झालेला ख्रिस्त येशूंचा प्रेषित पौल याजकडून, \po इफिस शहरातील ख्रिस्त येशूंमधील विश्वासू असलेल्या परमेश्वराच्या पवित्र लोकांना, \po \v 2 परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. \s1 ख्रिस्तामधील आध्यात्मिक आशीर्वादासाठी स्तुती \p \v 3 परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. \v 4 आम्ही त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रीतीमुळेच निवडले. \v 5 त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून\f + \fr 1:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांच्या प्रीतीनुसार\fqa*\f* येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती; \v 6 त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी. \v 7 त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन \v 8 आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धीने, \v 9 त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे. \v 10 ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या. \p \v 11 कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो.\f + \fr 1:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa वारस केले गेलो\fqa*\f* \v 12 यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे. \v 13 जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला, \v 14 आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे. \s1 उपकारस्तुती आणि प्रार्थना \p \v 15 या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून \v 16 माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही. \v 17 माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. \v 18 मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे. \v 19 जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे \v 20 ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले, \v 21 जे स्थान सर्व शासन आणि अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुत्व व सध्याच्या युगात व येणार्‍या युगातील कोणत्याही नावांपेक्षाही सर्वोच्च आहे, \v 22 आणि परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आणि मंडळीसाठी प्रत्येक गोष्टींमध्ये मस्तक म्हणून नियुक्त केले. \v 23 मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात. \c 2 \s1 ख्रिस्तामध्ये जिवंत केलेले \p \v 1 तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता. \v 2 त्यामध्ये तुम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागत होता व आकाशमंडळातील शासक आत्मा जो प्रत्यक्ष या क्षणीही आज्ञा न पाळणार्‍यांमध्ये कार्य करीत आहे, त्याच्यामागे चालणारे होता. \v 3 एकेकाळी आपणही त्यामध्ये जगत होतो. आपल्यामधील दैहिक वासना आणि विचार यांचे अनुसरण करणार्‍यांप्रमाणेच नैसर्गिकरित्या परमेश्वराच्या क्रोधास पात्र होतो. \v 4 परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे, \v 5 आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. \v 6 आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे. \v 7 यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्‍या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. \v 8 कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, \v 9 कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही. \v 10 कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत. \s1 यहूदी आणि गैरयहूदीयांचा ख्रिस्तात समेट \p \v 11 यास्तव, आठवण ठेवा की जे आपण पूर्वी जन्माने गैरयहूदी व सुंता झालेल्याकडून असुंती समजले जात होतो, ती सुंता शरीरात मनुष्यांच्या हाताने केली जात असे. \v 12 लक्षात असू द्या, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त, इस्राएलाच्या नागरिकत्वापासून वेगळे केलेले, कराराच्या वचनाला परके, आणि जगात परमेश्वरावाचून व आशेवाचून जगत होता. \v 13 जे तुम्ही एकेकाळी खूप दूर होता, त्या तुम्हाला आता ख्रिस्त येशूंमध्ये, त्यांच्या रक्ताद्वारे निकट आणले आहे. \p \v 14-15 कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी. \v 16 कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला. \v 17 तुम्ही जे त्यांच्यापासून फार दूर होते आणि जे जवळ होते, अशा दोघांसाठी ते आले व त्यांनी शांतीचा प्रचार केला. \v 18 कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे. \p \v 19 या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. \v 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत. \v 21 त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे. \v 22 त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात. \c 3 \s1 गैरयहूदीयांसाठी परमेश्वराची अद्भुत योजना \p \v 1 याकारणास्तव, मी पौल, तुम्हा गैरयहूदीयांसाठी ख्रिस्त येशूंचा बंदिवान आहे. \p \v 2 तुम्हाकरिता परमेश्वराच्या कृपेची व्यवस्था जी मला देण्यात आली आहे याबाबत तुम्ही ऐकले आहे. \v 3 अर्थात् हे रहस्य मला प्रकटीकरणाद्वारे समजले, याबद्दल मी यापूर्वी थोडक्यात लिहिले आहे. \v 4 ते वाचल्यानंतर, ख्रिस्ताचे जे रहस्य आहे, त्याबद्दल मला झालेले ज्ञान तुम्हाला समजेल. \v 5 हे रहस्य इतर पिढींच्या लोकांना प्रकट केले गेले नव्हते, पण आता त्यांनी आपल्या पवित्र प्रेषित व संदेष्टे यांना परमेश्वराच्या आत्म्याद्वारे प्रकट केले आहे. \v 6 हे रहस्य असे आहे: शुभवार्तेद्वारे गैरयहूदीही इस्राएली लोकांबरोबर सहवारस, एका शरीराचे अवयव, आणि ख्रिस्त येशूंमध्ये अभिवचनाचे सहभागी असे आहेत. \p \v 7 परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे. \v 8 मी जो प्रभूच्या लोकांमध्ये लहानात लहान, त्या मला गैरयहूदीयांना ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या शुभवार्तेचा प्रचार करण्याची कृपा देण्यात आली. \v 9 ज्यांनी सर्वकाही निर्माण केले त्या परमेश्वरामध्ये युगानुयुगांपासून गुप्त ठेवलेले ते रहस्य प्रकट करण्याची व्यवस्था केली. \v 10 यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्‍यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता, \v 11 हा त्यांच्या युगानुयुगाचा उद्देश ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये पूर्ण व्हावा. \v 12 येशूंमध्ये आणि त्यांच्यावरील विश्वासाद्वारे आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने आणि आत्मविश्वासाने परमेश्वराजवळ जाऊ शकतो. \v 13 म्हणून तुमच्यासाठी जे दुःख मला सहन करावे लागत आहे यामुळे तुम्ही मुळीच निराश होऊ नका, कारण ते तुमचे गौरव आहे. \s1 इफिसकरांसाठी प्रार्थना \p \v 14 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, \v 15 स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला\f + \fr 3:15 \fr*\ft कुटुंब हा शब्द ग्रीक भाषेतील पिता या शब्दातून घेतला आहे\ft*\f* त्यांच्याद्वारे नाव देण्यात आले आहे. \v 16 मी प्रार्थना करतो की आपल्या गौरवशाली संपत्तीनुरूप आपल्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देऊन त्यांनी तुम्हाला अंतर्यामी शक्तिसंपन्न करावे. \v 17 ज्यामुळे ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या हृदयात राहतील व तुम्ही प्रीतीमध्ये खोल मुळावलेले व स्थिर व्हावे अशी मी प्रार्थना करतो, \v 18 आणि तुम्हाला प्रभूच्या सर्व पवित्र लोकांबरोबर ख्रिस्ताच्या प्रेमाची लांबी, रुंदी, खोली व उंची किती आहे हे समजून घेण्यास समर्थ होता यावे, \v 19 आणि ही प्रीती जी ज्ञानापलीकडे आहे, ती तुम्हाला समजावी, यासाठी की तुम्ही स्वतः परमेश्वराच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. \p \v 20 आता जे आपल्या सामर्थ्यानुसार आमच्यामध्ये कार्य करीत आहेत आणि आमच्या मागण्या किंवा कल्पना यांच्या पलीकडे अधिक विपुलतेने करण्यास समर्थ आहेत, \v 21 त्यांना मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूंमध्ये सर्व पिढ्यान् पिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. \c 4 \s1 मंडळीमध्ये ऐक्य व परिपक्वता \p \v 1 प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे. \v 2 पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा. \v 3 शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे. \v 4 जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते. \v 5 एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा; \v 6 एकच परमेश्वर असून ते सर्वांचे पिता आहेत. तेच सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहेत. \p \v 7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे. \v 8 यामुळे असे\f + \fr 4:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa परमेश्वराने\fqa*\f* म्हटले आहे: \q1 “जेव्हा त्यांनी उच्चस्थानी आरोहण केले, \q2 त्यांनी अनेक बंदिवान नेले \q2 आणि त्यांच्या लोकांना दाने दिली.”\f + \fr 4:8 \fr*\ft \+xt स्तोत्र 68:18\+xt*\ft*\f* \m \v 9 “त्यांचे आरोहण झाले” याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते. \v 10 जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले. \v 11 म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले, \v 12 हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे. \v 13 जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, परिपक्वता व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे दिले आहे. \p \v 14 आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्‍हेतर्‍हेच्या शिक्षणरूपी वार्‍याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये. \v 15 त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे. \v 16 त्यांच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याशी एकत्र जोडून धरले जाते, प्रत्येक अवयव आपले कार्य करतो व प्रीतीमध्ये शरीराची वाढ व बांधणी होते. \s1 ख्रिस्ती जीवनासंबंधी सूचना \p \v 17 प्रभूच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका. \v 18 कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत. \v 19 सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत. \p \v 20 पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर, \v 21 जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; \v 22 फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; \v 23 तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; \v 24 आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा. \p \v 25 यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्‍यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. \v 26 “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.”\f + \fr 4:26 \fr*\ft \+xt स्तोत्र 4:4\+xt*\ft*\f* तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. \v 27 आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका. \v 28 चोरी करणार्‍यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल. \p \v 29 आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्‍यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला. \v 30 परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात. \v 31 सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या. \v 32 एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. \c 5 \nb \v 1 परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा. \v 2 ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि स्वतःला आपल्यासाठी सुगंधी अर्पण व यज्ञ म्हणून परमेश्वराला दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीच्या मार्गाने चला. \p \v 3 तुमच्यामध्ये लैंगिक पापे, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा लोभ यांची अप्रत्यक्ष सूचना देखील असू नये, कारण या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी अयोग्य आहेत. \v 4 आणि अश्लीलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी. \v 5 तुम्ही या गोष्टीविषयी खात्री बाळगा: व्यभिचारी, अशुद्ध किंवा लोभी असा व्यक्ती मूर्तिपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. \v 6 पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्‍यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो. \v 7 यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार सुद्धा होऊ नका. \p \v 8 कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा. \v 9 (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.) \v 10 प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या. \v 11 अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा. \v 12 अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल. \v 13 परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते. \v 14 त्यामुळेच असे म्हटले आहे: \q1 “अरे निद्रास्ता, जागा हो, \q2 मेलेल्यामधून ऊठ \q2 म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.” \p \v 15 म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या. \v 16 दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. \v 17 मुर्खासारखे वागू नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या. \v 18 मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा. \v 19 आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा. \v 20 आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना. \s1 ख्रिस्ती कुटुंबांसाठी सूचना \p \v 21 ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा. \p \v 22 पत्नींनो, जसे प्रभूच्या, तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. \v 23 कारण ज्याप्रमाणे पती हा पत्नीचे मस्तक आहे, तर ख्रिस्त हा त्यांचे शरीर म्हणजे, मंडळीचे मस्तक, तिचा तो उद्धारकर्ता आहे. \v 24 आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे. \p \v 25 पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले, \v 26 जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे; \v 27 आणि त्याने ती मंडळी गौरवी, डाग किंवा सुरकुती किंवा दोषरहित अशी आपणाला सादर करावी, ती पवित्र आणि निष्कलंक असावी. \v 28 याचप्रमाणे पतींनीही त्यांच्या पत्नीवर, त्या आपलेच शरीर आहेत, असे समजून प्रीती करावी. जो त्याच्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवर प्रीती करतो. \v 29 कोणी कधीही स्वतःच्याच शरीराचा द्वेष केला नाही, परंतु ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे संगोपन करून काळजी घेतात त्याप्रमाणे करतो. \v 30 कारण आपण त्यांच्या शरीराचे अवयव आहोत. \v 31 “या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.”\f + \fr 5:31 \fr*\ft \+xt उत्प 2:24\+xt*\ft*\f* \v 32 हे गूढ रहस्य आहे, परंतु मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे. \v 33 म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा. \c 6 \p \v 1 लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. \v 2 “तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. \v 3 “यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”\f + \fr 6:3 \fr*\ft \+xt अनु 5:16\+xt*\ft*\f* \p \v 4 पित्यांनो,\f + \fr 6:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa आईवडिलांनो\fqa*\f* तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा. \p \v 5 दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्‍या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा \v 6 केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांचे आज्ञापालन करू नका, तर मनापासून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे ख्रिस्ताचे दास असे व्हा. \v 7 ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा. \v 8 तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा. \p \v 9 आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही. \s1 परमेश्वराची शस्त्रसामुग्री \p \v 10 सर्वात शेवटी प्रभूच्या बळामध्ये आणि त्यांच्या पराक्रमी सामर्थ्याने सज्ज व्हा. \v 11 परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल. \v 12 कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे. \v 13 यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा. \v 14 म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा. \v 15 परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा. \v 16 या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल. \v 17 तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या. \p \v 18 सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभूच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा. \v 19 माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, की जेव्हाही मी बोलेन तेव्हा मला शब्द सुचावेत, व मी निर्भयपणे शुभवार्तेचे रहस्य स्पष्ट करून सांगावे. \v 20 त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे. \b \s1 शेवटच्या शुभेच्छा \p \v 21 येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल. \v 22 आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवित आहे. \b \p \v 23 बंधू व भगिनींना शांती असो आणि परमेश्वर जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला विश्वासाबरोबर प्रीती प्राप्त होवो! \b \p \v 24 आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर शाश्वत प्रीती करणार्‍या तुम्हा सर्वांवर कृपा असो.