\id ECC - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h उपदेशक \toc1 उपदेशक \toc2 उपदेशक \toc3 उपदे \mt1 उपदेशक \c 1 \s1 सर्वकाही व्यर्थ \p \v 1 यरुशलेम येथील दावीद राजाचा पुत्र, उपदेशकाची\f + \fr 1:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa सभेचा नायक\fqa*\f* वचने: \q1 \v 2 “व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!” \q2 उपदेशक म्हणतो. \q1 “निव्वळ व्यर्थ! \q2 सर्वकाही व्यर्थ आहे.” \b \q1 \v 3 या सूर्याखाली लोक जे कष्ट करतात, \q2 त्याचा त्यांना काय लाभ? \q1 \v 4 पिढ्या येतात आणि पिढ्या जातात, \q2 परंतु पृथ्वी सर्वकाळ अस्तित्वात राहते. \q1 \v 5 सूर्य उगवतो आणि अस्त पावतो, \q2 आणि आपल्या उगवतीच्या स्थानाकडे घाईने परत जातो. \q1 \v 6 वारा दक्षिणेकडे वाहतो \q2 आणि उत्तरेकडे वळतो; \q1 तो गोल गोल भ्रमण करीत \q2 आपल्या ठिकाणी परत जातो. \q1 \v 7 सर्व प्रवाह समुद्रास मिळतात, \q2 तरीही समुद्र कधी भरलेला नाही. \q1 नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात, \q2 जिथून त्यांचा उगम होतो, \q1 \v 8 सर्वकाही त्रासाने भरलेले आहे, \q2 जे कोणाला शब्दात सांगता येत नाही. \q1 नेत्र बघून कधी समाधानी होत नाहीत. \q2 कान सुद्धा ऐकून भरत नाहीत. \q1 \v 9 जे घडले ते पुन्हा एकदा होणार, \q2 जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल; \q2 सूर्याखाली नवे असे काही नाही. \q1 \v 10 “पाहा! हे काहीतरी नवे आहे, \q2 असे कोणी म्हणू शकेल काय?” \q1 हे तर पूर्वकाळापासूनच होते; \q2 आमच्या काळापूर्वीच ते होते. \q1 \v 11 पुढे येणार्‍या पिढीला, \q2 पूर्वीच्या पिढ्यांची आठवण नाही \q1 आणि पुढे येणार्‍या पिढीला सुद्धा \q2 त्याचे स्मरण नसेल. \s1 सुज्ञानाची व्यर्थता \p \v 12 मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो. \v 13 आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे! \v 14 सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्‍यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत. \q1 \v 15 जे वाकडे आहे, ते सरळ करता येत नाही; \q2 जी उणीव आहे, ती मोजता येत नाही. \p \v 16 मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.” \v 17 मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्‍याचा पाठलाग केल्यासारखे आहे. \q1 \v 18 कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते; \q2 जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख. \c 2 \s1 सुख-विलास निरर्थक आहेत \p \v 1 मी स्वतःशी म्हटले, “आता ये, चांगले काय आहे, ते शोधण्यासाठी आनंदाने मी तुझी पारख करतो.” पण ते देखील व्यर्थच असे सिद्ध झाले. \v 2 मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?” \v 3 मी स्वतःला द्राक्षारसाने हर्षित करण्याचा प्रयत्न केला व मूर्खता जवळ करून—तरीही माझे मन मला ज्ञानाने चालवित होते. मनुष्य या पृथ्वीवरील थोडक्या दिवसांमध्ये काय चांगले करू शकतो हे मला हे बघायचे होते. \p \v 4 मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले. \v 5 मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली. \v 6 त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले. \v 7 मी दास व दासी खरेदी केले आणि माझ्या घरात जन्मलेले इतर दास देखील होते. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये कोणाही कडे नव्हते इतके जास्त कळप आणि गुरे माझ्या मालकीचे होते. \v 8 मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी\f + \fr 2:8 \fr*\ft या वाक्यांचा हिब्रू अर्थ अनिश्चित आहे.\ft*\f* जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते. \v 9 माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले. \q1 \v 10 माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; \q2 माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. \q1 माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, \q2 हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता. \q1 \v 11 तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, \q2 आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, \q1 तर सर्वकाही व्यर्थ, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे होते; \q2 सूर्याखाली काहीच लाभले नाही. \s1 ज्ञान आणि मूर्खपणा निरर्थक आहे \q1 \v 12 मग मी सुज्ञान समजून घ्यावे, \q2 आणि वेडेपणा व मूर्खता हे सुद्धा कळावे म्हणून मी माझे विचार त्याकडे वळविले. \q1 जे गतकाळात केलेले आहे त्यापेक्षा अधिक \q2 एखाद्या राजाच्या नंतर येणारा पुरुष\f + \fr 2:12 \fr*\fq पुरुष \fq*\ft म्हणजे उत्तराधिकारी\ft*\f* काय करू शकतो? \q1 \v 13 मी पाहिले की सुज्ञान मूर्खतेपेक्षा अधिक चांगले आहे, \q2 जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे. \q1 \v 14 सुज्ञ व्यक्तीच्या मस्तकावर नेत्र आहेत, \q2 तर मूर्ख अंधारात चालत असतो; \q1 परंतु मला समजले की \q2 अंतिम परिणाम त्या दोघांवर मात करतो. \p \v 15 मग मी स्वतःला म्हणालो, \q1 “जे मूर्खाचे नशीब आहे तेच माझेही असेल” \q2 “तर शहाणपणाने मी काय मिळविणार.” \q1 मी स्वतःला म्हणालो, \q2 “हे सुद्धा सर्व निरर्थक आहे.” \q1 \v 16 कारण सुज्ञसुद्धा मूर्खाप्रमाणे जास्त काळापर्यंत स्मरणात ठेवला जाणार नाही; \q2 असे दिवस आले आहेत, जेव्हा दोघांचाही विसर पडेल. \q1 मूर्खाप्रमाणे सुज्ञसुद्धा मरण पावेल! \s1 परिश्रम व्यर्थ आहे \p \v 17 म्हणून आता मला जीवनाचा वीट आला आहे, कारण सूर्याखाली जे काही केले जात आहे, ते मला दुःख देणारे आहे. ते सर्वकाही व्यर्थ, वार्‍यामागे धावण्यासारखे आहे. \v 18 या सूर्याखाली मी ज्याच्यासाठी कष्ट केले, त्या सर्वाचा मला द्वेष वाटू लागला, कारण जे लोक माझ्यानंतर येणार त्यांच्यासाठी ते मला सोडून द्यावे लागणार. \v 19 कोणाला माहीत की तो व्यक्ती सुज्ञ असेल वा मूर्ख? तरीही सूर्याखाली ज्यामध्ये मी माझे प्रयत्न आणि कौशल्य ओतले, त्या माझ्या या कष्टाच्या प्रतिफळांचा ताबा त्यांच्याकडे असेल. हे सुद्धा व्यर्थच आहे. \v 20 म्हणून या सूर्याखाली केलेल्या माझ्या सर्व श्रमाबद्दल माझे हृदय निराश होऊ लागले. \v 21 कारण एखादी व्यक्ती सुज्ञान, विद्या आणि कौशल्य यांच्या साहाय्याने कष्ट करते आणि ते अशा व्यक्तीच्या हाती सोडते, की ज्याने त्यासाठी काहीही श्रम केलेले नाहीत. हे सुद्धा निरर्थक आणि मोठ्या दुर्भाग्याचे आहेत. \v 22 सूर्याखाली त्या लोकांचे सर्व कष्ट, ज्यासाठी त्यांनी मनापासून परिश्रम केले त्याचे त्यांना काय मिळणार? \v 23 त्यांच्या सर्व दिवसांत, त्यांचे काम त्यांना दुःख आणि वेदना अशा आहेत; रात्रीच्या वेळीसुध्दा त्यांचे मन विश्रांती घेत नाही. हे सुद्धा व्यर्थच आहे. \p \v 24 खाणे आणि पिणे करून स्वतःच्या कष्टामधून समाधान मिळविणे यापेक्षा मानव अधिक चांगले काय करू शकतो आणि मी पाहतो की, हे सुद्धा परमेश्वराच्याच हातात आहे, \v 25 कारण परमेश्वराशिवाय कोण उत्तम भोजन करेल व कोणाला आनंदाचा उपभोग घेता येईल? \v 26 जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो, त्याला परमेश्वर ज्ञान, बुद्धी आणि आनंद देतात, परंतु पाप्यांना संपत्ती गोळा करून ती जो व्यक्ती परमेश्वराला प्रसन्न करतो त्याच्या हाती सोपविण्याचे कार्य दिले आहे. हे सुद्धा वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे व्यर्थ आहे. \c 3 \s1 प्रत्येक गोष्टींसाठी निर्धारित समय \q1 \v 1 प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे, \q2 आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो: \b \q2 \v 2 जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ, \q2 पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ, \q2 \v 3 ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे; \q2 विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे; \q2 \v 4 रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे; \q2 शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे; \q2 \v 5 दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ; \q2 आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ; \q2 \v 6 शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ; \q2 साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ; \q2 \v 7 फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ; \q2 मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ; \q2 \v 8 प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ; \q2 युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ. \p \v 9 कामकर्‍यांना त्यांच्या कष्टापासून काय मोबदला मिळतो? \v 10 परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे. \v 11 त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे.\f + \fr 3:11 \fr*\ft किंवा \ft*\fq तरीसुद्धा \fq*\fqa मानवी अंतःकरणात असे ज्ञान ठेवले, जेणेकरून\fqa*\f* तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत. \v 12 मला ठाऊक आहे की जिवंत असेपर्यंत मनुष्याने सुखी राहावे आणि दुसर्‍याचे हित करावे, यापेक्षा काहीही उत्तम नाही. \v 13 प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या कष्टाच्या कार्यात संतुष्ट राहावे—हे परमेश्वराने दिलेले दान आहे. \v 14 मला हे माहीत आहे की परमेश्वराने जे केले ते सर्वकाळ टिकणारे आहे; त्यात काही भर घालता येणार नाही किंवा त्यातून काही काढून घेता येणार नाही. मनुष्याने त्यांचे भय धरावे म्हणून परमेश्वर हे सर्व करतात. \q1 \v 15 जे आहे, ते सर्व यापूर्वी झालेलेच आहे; \q2 जे होणार, तेही होऊन गेले आहे. \q2 गतकाळात होऊन गेले तेच परमेश्वर पुन्हा घडवून आणतील.\f + \fr 3:15 \fr*\fr 3:15 \fr*\ft किंवा \ft*\fq परमेश्वर \fq*\fqa गतकाळात होऊन गेले\fqa*\f* \p \v 16 मग मी सूर्याखाली आणखीही काही बघितले: \q1 दुष्टाईने—न्यायाचे स्थान घेतले होते. \q2 आणि न्यायीपणाच्या ठिकाणीसुद्धा—दुष्टताच होती. \p \v 17 मी स्वतःला म्हटले, \q1 “परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट \q2 या दोघांचाही न्याय करणार, \q1 कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार, \q2 प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ.” \p \v 18 मी स्वतःशी हे सुद्धा म्हणालो, “परमेश्वर मानवाची परीक्षा यासाठी घेतात की त्यांना हे समजावे की ते पशुवत् आहेत. \v 19 खरोखर मानवाचे नशीब हे इतर प्राण्यांप्रमाणे आहे; सारखेच नशीब हे दोघांसाठी वाट पाहत असते: जसा एक मरतो, तसाच दुसराही मरतो. सर्वांना सारखाच श्वास\f + \fr 3:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa श्वास\fqa*\f* आहे; इतर प्राण्यांपेक्षा मानवाला अधिक लाभ नाही. सर्वकाही व्यर्थ आहे. \v 20 सर्वकाही एकाच ठिकाणी जाणार आहेत; सर्व मातीतून येतात आणि पुन्हा मातीत जाऊन मिळतात. \v 21 मनुष्याचा आत्मा वर घेतल्या जातो आणि जनावराचा प्राण भूतलात जातो, हे कोणाला माहीत आहे?” \p \v 22 मी हे पहिले की मानवांनी स्वतःच्या कामात आनंद मानावा, यापेक्षा त्यांच्यासाठी अधिक काही चांगले नाही, कारण हेच विधिलिखित आहे. ते गेल्यानंतर काय घडेल ते पाहण्यासाठी त्यांना कोण परत आणणार? \c 4 \s1 जुलूम, कष्ट, मैत्रीहीनता \p \v 1 मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: \q1 पीडितांचे अश्रू मी पाहिले— \q2 आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. \q1 छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते— \q2 आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते. \q1 \v 2 यावरून मी घोषित केले, \q2 मृत असलेल्या व्यक्ती, \q1 जिवंत असलेल्या माणसांपेक्षा \q2 अधिक संतुष्ट आहेत. \q1 \v 3 परंतु त्या दोघांपेक्षाही जो \q2 जन्मालाच आला नाही तो अधिक बरा. \q1 सूर्याखाली असलेले जे वाईट \q2 ते त्यांच्या पाहण्यात आले नाही. \p \v 4 आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्‍याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्‍यामागे धावल्यासारखे आहे. \q1 \v 5 मूर्ख तर हात बांधून बसतात \q2 आणि स्वतःचा नाश करून घेतात. \q1 \v 6 अधिक कष्ट करून वार्‍याच्या मागे धावून, \q2 दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, \q2 शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे. \p \v 7 पुन्हा एकदा या सूर्याखाली निरर्थक असे काहीतरी मी पाहिले: \q1 \v 8 एक एकटाच मनुष्य होता; \q2 त्याला ना मुलगा होता ना भाऊ. \q1 त्याच्या श्रमाला अंत नव्हता, \q2 तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती. \q1 तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,” \q2 “आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?” \q1 हे सुद्धा व्यर्थ आहे— \q2 ही दैन्यावस्था आहे. \b \q1 \v 9 एकापेक्षा दोघेजण बरे! \q2 कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल: \q1 \v 10 दोघांपैकी एकजण पडला, \q2 तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, \q1 परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला \q2 तर ते दयनीय आहे. \q1 \v 11 जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, \q2 पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार? \q1 \v 12 एकट्या व्यक्तीवर मात करता येते, \q2 दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, \q1 तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही. \s1 प्रगती निरर्थक आहे \p \v 13 मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले. \v 14 तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल. \v 15 मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत. \v 16 त्यांच्या पूर्वी असंख्य लोक होते. परंतु जे नंतर आले ते त्या उत्तराधिकाऱ्याशी संतुष्ट नव्हते. हे सर्वसुद्धा व्यर्थच, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे आहे. \c 5 \s1 परमेश्वराला बोललेला नवस पूर्ण करा \p \v 1 परमेश्वराच्या मंदिरात जाताना तू तुझी पावले सांभाळ. बोध ऐकण्यासाठी परमेश्वराच्या समीप जा, मूर्ख लोकांसारखे यज्ञबली देण्यापेक्षा बरे, कारण आपण चूक करीत आहोत, हे त्यांना कळत नाही. \q1 \v 2 बोलण्यात उतावळा असू नको, \q2 परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास \q2 आपल्या मनात घाई करू नकोस. \q1 कारण परमेश्वर स्वर्गात आहे \q2 आणि तू तर पृथ्वीवर आहेस, \q2 म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे. \q1 \v 3 अनेक चिंता असल्यास स्वप्न पडते, \q2 आणि जास्त बडबड करण्याने मूर्ख ओळखला जातो. \p \v 4 परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक. \v 5 नवस करून न फेडण्यापेक्षा, तो न केलेला बरा. \v 6 तुझ्या मुखाने तुला पाप करावयास लावू नये. “मी चुकून नवस केला” असे मंदिराच्या दूताला सांगून निषेध करू नकोस. तू जे बोलतो त्याबद्दल परमेश्वराने रागावून तुझ्या हाताचे कार्य नष्ट का करावे? \v 7 पुष्कळ स्वप्ने बघणे व अधिक शब्द वापरणे व्यर्थ आहे. म्हणून परमेश्वराचे भय बाळग. \s1 धनाची व्यर्थता \p \v 8 आपल्या नगरात गरिबांवर अत्याचार होत असताना किंवा त्यांना न्याय आणि त्यांचे हक्क नाकारले जात असताना दिसल्यास त्याबद्दल आश्चर्य बाळगू नकोस; एक अधिकाऱ्याचे निरीक्षण करणारा वरिष्ठ अधिकारी आहे, आणि दोघांवर त्यांचा उच्चाधिकारी आहे. \v 9 भूमीचे फळ तर सर्वांसाठी आहे; राजासुद्धा त्याद्वारे नफा मिळवितो. \q1 \v 10 पैशावर प्रेम असणार्‍याला पैसा कधीच पुरेसा नसतो; \q2 जो कोणी संपत्तीवर प्रेम करतो, तो कधीही आपल्या मिळकती मध्ये समाधानी नसतो, \q2 हे सुद्धा व्यर्थच आहे. \b \q1 \v 11 संपत्ती वाढली म्हणजे, \q2 तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात. \q1 आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त \q2 त्या मालकाला काय लाभ? \b \q1 \v 12 खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो \q2 कष्टकर्‍याला सुखाची झोप लागते. \q1 परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती \q2 त्यांना रात्री झोप येऊ देत नाही. \p \v 13 सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली: \q1 जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती, \q2 \v 14 किंवा काही दुर्दैवी व्यवहारामध्ये तो सर्व पैसा गमावून बसतो \q1 आणि शेवटी मुलाबाळांकडे \q2 वारसाहक्काने मिळण्यास काहीही शिल्लक नसते. \q1 \v 15 प्रत्येकजण आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, \q2 आणि जसे सर्वजण येतात, तसेच ते परत जातात. \q1 त्यांचे कष्टार्जित असे काहीही \q2 त्यांच्या हातात घेऊन ते जाऊ शकत नाहीत. \p \v 16 ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे: \q1 सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात, \q2 आणि वार्‍यासाठी कष्ट करून \q2 त्यांना काय मिळते? \q1 \v 17 त्यांच्या सर्व दिवसांत ते अंधारात राहून \q2 अत्यंत निराशा, यातना आणि क्रोधासह अन्न खातात, \p \v 18 तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे. \v 19 आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे. \v 20 असे करणार्‍याला आपल्या भूतकाळाचे मनन करावे लागत नाही, कारण परमेश्वर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून ठेवतो. \c 6 \p \v 1 सूर्याखाली आढळणारी आणखी एक वाईट गोष्ट मला दिसली, जी मानवावर अतिशय भारी आहे: \v 2 परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे. \p \v 3 एखाद्या व्यक्तीला शंभर लेकरे असतील आणि तो दीर्घायुषी जगला; तरी तो आपल्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकत नसेल आणि त्याला योग्य रीतीने मूठमाती मिळत नाही, तर मी असे म्हणतो की, त्याच्यापेक्षा मृत जन्मलेला गर्भ बरा. \v 4 ते बाळ व्यर्थच जन्मते आणि अंधारात विलीन होते आणि अंधारातच त्याचे नाव नाहीसे होऊन जाते. \v 5 जरी त्याने न कधी सूर्याला बघितले ना त्याविषयी काही जाणले, त्या मनुष्यापेक्षा त्याला अधिक विसावा आहे. \v 6 जरी तो हजार किंवा दोन हजार वर्षे जगला व त्याला संपत्तीसुखाचा आनंद लाभला नाही. सर्वजण एकाच ठिकाणी जात नाही काय? \q1 \v 7 प्रत्येक मनुष्य आपल्या पोटासाठी कष्ट करतो, \q2 परंतु त्यांची भूक कधीही तृप्त होत नाही. \q1 \v 8 शहाण्या लोकांना मूर्ख लोकांपेक्षा काय फायदा? \q1 दुसर्‍या लोकांसमोर कसे वागावे हे जाणून \q2 गरिबांना काय फायदा? \q1 \v 9 ज्यागोष्टी निरर्थक \q2 वार्‍याचा पाठलाग करण्यासारख्या आहेत, \q1 वासनेमागे धावण्यापेक्षा, आपल्या दृष्टीसमोर आहे, \q2 त्यात संतुष्ट असणे बरे. \b \q1 \v 10 जे काही अस्तित्वात आहेत त्याला आधी नाव दिलेले आहे, \q2 आणि मानवता तर ओळखीची होती; \q1 कोणीही जो आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे \q2 त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. \q1 \v 11 जेवढे जास्त शब्द \q2 तेवढा अर्थ कमी होतो, \q2 मग उगाच बोलण्याने मनुष्यास काय लाभ? \p \v 12 वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल? \c 7 \s1 सुज्ञान \q1 \v 1 सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे, \q2 आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे. \q1 \v 2 मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा \q2 शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, \q1 प्रत्येक मनुष्याने\f + \fr 7:2 \fr*\fq प्रत्येक मनुष्याने \fq*\ft अर्थात् जीवितांनी\ft*\f* ही गोष्ट लक्षात ठेवावी; \q2 मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे. \q1 \v 3 विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, \q2 कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे. \q1 \v 4 सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते, \q2 परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते. \q1 \v 5 सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे \q2 मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे. \q1 \v 6 मूर्खाचे हसणे हे \q2 पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे, \q2 हे सुद्धा व्यर्थ आहे. \b \q1 \v 7 पिळवणूक सुज्ञानी मनुष्याला मूर्ख बनविते, \q2 आणि लाच हृदयाला भ्रष्ट करते. \b \q1 \v 8 एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, \q2 आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी. \q1 \v 9 क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस, \q2 क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो. \b \q1 \v 10 असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?” \q2 कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे. \b \q1 \v 11 सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे, \q2 आणि ज्यांना सूर्य दिसतो\f + \fr 7:11 \fr*\ft अर्थात् जे जिवंत आहेत\ft*\f* त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे. \q1 \v 12 जसे धन तसेच \q2 सुज्ञान हे एक आश्रयस्थान आहे, \q1 परंतु सुज्ञानाचा फायदा हा आहे: \q2 ज्ञान ज्यांच्या मालकीचे आहे, त्यांचे रक्षण करते. \p \v 13 परमेश्वराच्या कामावर मनन करा: \q1 त्यांनी जे वाकडे केले आहे \q2 ते कोण सरळ करू शकतो? \q1 \v 14 जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा; \q2 परंतु जेव्हा वेळ प्रतिकूल असते, तेव्हा हे लक्षात घ्या: \q1 परमेश्वराने जशी अनुकूल वेळ निर्माण केली \q2 तशी प्रतिकूल वेळही त्यांनीच निर्माण केली, \q1 म्हणून कोणा व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल \q2 जाणून घेता येत नाही. \p \v 15 या व्यर्थ जीवनामध्ये मी दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत: \q1 नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्वात नाहीसे होतात, \q2 आणि दुष्ट त्यांच्या दुष्टपणात दीर्घायुष्य जगतात. \q1 \v 16 अति नीतिमान होऊ नका, \q2 किंवा अति सुज्ञानीही असू नका— \q2 तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा? \q1 \v 17 अति दुष्ट होऊ नका, \q2 आणि मूर्खही असू नका— \q2 तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे? \q1 \v 18 पहिल्याला घट्ट धरून ठेवणे, \q2 आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे. \q2 जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.\f + \fr 7:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्या दोन्हीना अनुसरतील\fqa*\f* \b \q1 \v 19 सुज्ञान एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला \q2 एका शहराच्या दहा शासकांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते. \b \q1 \v 20 खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही, \q2 असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही. \b \q1 \v 21 लोकांच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देऊ नका, \q2 नाहीतर तुमचा चाकरसुद्धा तुम्हाला शाप देताना तुम्ही ऐकाल— \q1 \v 22 कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला \q2 हे तुम्हाला तुमच्या मनातच ठाऊक आहे. \p \v 23 सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले, \q1 “मी सुज्ञानी होण्याचे ठरविले आहे”— \q2 परंतु हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होते. \q1 \v 24 जे काही अस्तित्वात आहे ते खूपच दूर आणि सखोल आहे, \q2 त्याचा शोध कोणाला घेता येईल? \q1 \v 25 ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी \q2 आणि दुष्टतेची मूर्खता \q1 व मूर्खतेचा वेडेपणा समजण्यासाठी \q2 मी माझे मन वळविले. \b \q1 \v 26 मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की, \q2 एक स्त्री जी एक पाश आहे, \q1 जिचे हृदय एक सापळा आहे \q2 जिचे हात साखळीप्रमाणे आहेत. \q1 जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील, \q2 परंतु पापींना ती पाशात अडकवेल. \p \v 27 “पाहा,” शिक्षक\f + \fr 7:27 \fr*\ft किंवा \ft*\fqa मंडळीचा उपदेशक\fqa*\f* असे म्हणतो, “या गोष्टींचा मी शोध लावला आहे: \q1 “रचनेच्या पध्दती समजण्यासाठी मी एक गोष्ट दुसरीत मिळविली— \q2 \v 28 जेव्हा मी शोध घेत होतो \q2 मला काही निष्पन्न झाले नाही— \q1 हजारांमध्ये एक नीतिमान मनुष्य होता. \q2 परंतु त्या सर्वांमध्ये एकही स्त्री नीतिमान नव्हती. \q1 \v 29 एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: \q2 परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली, \q2 परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.” \b \c 8 \q1 \v 1 सुज्ञासारखा कोण आहे? \q2 गोष्टींचे स्पष्टीकरण कोणाला माहीत आहे? \q1 मनुष्यांचे सुज्ञान त्यांचे मुख उजळून टाकते \q2 आणि त्यांचे कठोर स्वरूप बदलते. \s1 राजाचे आज्ञापालन \p \v 2 मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे. \v 3 राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो. \v 4 कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार? \q1 \v 5 त्याच्या आज्ञांचे पालन करणार्‍यांना इजा होणार नाही, \q2 आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल. \q1 \v 6 जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात, \q2 तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते. \b \q1 \v 7 जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते, \q2 तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार? \q1 \v 8 जसे कोणत्या मनुष्याला वार्‍यावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य नाही, \q2 तसेच त्यांच्या मृत्यूच्या वेळेवरही कोणाला अधिकार नाही. \q1 जसे कोणालाही युद्धाच्या वेळी सुट्टी नसते, \q2 तसेच दुष्टता करणाऱ्यांना ती त्यातून सुटका देत नाही. \p \v 9 मी हे सर्व पाहिले, सूर्याखाली होत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे माझे चित्त लावले. अशीही एक वेळ आहे, जेव्हा एखादा व्यक्ती दुसर्‍यावर स्वतःच्याच यातनेमुळे अधिकार चालवितो. \v 10 जे पवित्रस्थानात येत-जात होते आणि या नगरीत त्यांची उगीच स्तुती केली जात असे, अशा दुष्टांना पुरले जात असताना सुद्धा मी पहिले; हे देखील अर्थहीन आहे. \p \v 11 जर एखाद्या अपराधासाठी त्वरित शिक्षा करण्यात आली नाही, तर लोकांचे हृदय चुकीचे कार्य करण्याच्या योजनेने भरतात. \v 12 जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल. \v 13 दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही. \p \v 14 पृथ्वीवर आणखी काही घडत आहे जे निरर्थक आहे: जे दुष्टासाठी निर्धारित असते ते नीतिमानाला मिळते व नीतिमानाच्या वाट्याचे दुष्टाला मिळते. मी म्हणतो हे सुद्धा अर्थहीन आहे. \v 15 म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल. \p \v 16 सुज्ञानाला जाणावे व पृथ्वीवर केलेले परिश्रम पाहावे—लोक जे अहोरात्र झोप न घेता करतात—म्हणून मी माझे चित्त लावले, \v 17 तेव्हा मी परमेश्वराने केलेले सर्वकाही पाहिले. सूर्याखाली होणार्‍या कार्याला कोणीही समजू शकत नाही. शोध घेण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही त्याचा अर्थ कळू शकत नाही. जरी सुज्ञ लोक ते माहीत असल्याचा दावा करतात, तरी त्यांनाही ते खचितच समजू शकत नाही. \c 9 \s1 सर्वांसाठी सारखेच विधिलिखित \p \v 1 मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते. \v 2 सर्वांची नियती एकच आहे—नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, जे यज्ञार्पण करतात व जे करीत नाहीत. \q1 जसे चांगल्या व्यक्तीबरोबर, \q2 तसेच पापी व्यक्तीबरोबर; \q1 जसे शपथ घेणार्‍यांशी, \q2 तसेच जे ती शपथ घ्यायला घाबरतात त्यांच्याशी. \p \v 3 सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हे वाईट आहे: एकसमान नियती सर्वांवर मात करते. शिवाय, लोकांची अंतःकरणे दुष्टाईने भरलेली आहेत आणि जिवंत असताना त्यांच्या अंतःकरणात वेडेपणा आहे आणि नंतर ते मृतांमध्ये सामील होतात. \v 4 जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा! \q1 \v 5 जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, \q2 पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; \q1 त्यांना पुढे काही मोबदला नाही \q2 आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही. \q1 \v 6 त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष \q2 आणि त्यांचा हेवा हे सर्व फार पूर्वीच नाहीसे झाले आहे; \q1 सूर्याखाली घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीत \q2 पुन्हा त्यांचा वाटा नसेल. \p \v 7 जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे. \v 8 तुमची वस्त्रे सर्वदा शुभ्र असावीत व तुमच्या डोक्याला नेहमी तेलाभिषेक असावा. \v 9 सूर्याखाली परमेश्वराने तुला देऊ केलेल्या अर्थहीन जीवनाच्या आपल्या सर्व दिवसांत आपली पत्नी, जिच्यावर तू प्रेम करतो, तिच्याबरोबर या निरर्थक जीवनाचा आनंद उपभोग. कारण सूर्याखाली तुझ्या जीवनाचा व श्रमाचा हाच वाटा आहे. \v 10 जे काम तुझ्या हाताला सापडते, ते तुझ्या सर्व शक्तीने कर, कारण मृतलोकामध्ये, जिथे तुला जायचे आहे, तिथे ना काम आहे, ना योजना, ना विद्या, ना सुज्ञान. \p \v 11 मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले: \q1 शर्यत वेगवानांसाठी नाही, \q2 किंवा युद्ध बलवानाचे नाही, \q1 सुज्ञानी लोकांनाच भोजन मिळते असे नाही \q2 किंवा बुद्धिमानाला धन मिळते असे ही नाही \q2 किंवा कुशल कारागिरांवरच अनुग्रह होईल, असे नाही; \q1 परंतु समय व प्रसंग सर्वांनाच येतो. \p \v 12 आपल्यावर कधी वेळ येणार हे कोणालाही ठाऊक नाही: \q1 जसा मासा त्या क्रूर जाळ्यात सापडतो, \q2 किंवा पक्षी फासात अडकला जातो, \q1 तसेच लोकसुद्धा त्यांच्यावर अचानक पडलेल्या \q2 वाईट समयात अडकले जातात. \s1 मूर्खतेपेक्षा सुज्ञान बरे \p \v 13 सुज्ञानाचे हे उदाहरण मी सूर्याखाली पाहून फार प्रभावित झालो: \v 14 एक छोटेसे शहर होते. त्यात थोडेच लोक राहत होते आणि एक अतिशय पराक्रमी राजा त्यांच्या विरोधात सैन्य घेऊन आला व त्या शहराला त्याने वेढा दिला आणि गराडा घातला. \v 15 त्या शहरात एक गरीब पण सुज्ञ मनुष्य होता, आणि आपल्या सुज्ञानाने त्याने शहर वाचविले. पण त्या गरीब माणसाची कोणी आठवण केली नाही. \v 16 म्हणून मी म्हणालो, “सुज्ञान बळापेक्षा बरे आहे.” परंतु गरीब मनुष्याचे ज्ञान तुच्छ लेखले गेले आणि त्याचा शब्द कोणी मानला नाही. \q1 \v 17 सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे \q2 हे मूर्खांच्या राजाचे ओरडणे ऐकण्यापेक्षा बरे. \q1 \v 18 युद्धाच्या शस्त्रांपेक्षा सुज्ञान बरे, \q2 पण एक पापी पुष्कळ चांगल्या गोष्टींचा नाश करतो. \b \c 10 \q1 \v 1 जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, \q2 तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते. \q1 \v 2 सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते, \q2 पण मूर्खाचे अंतःकरण त्याला डावीकडे, म्हणजे दुष्ट कृत्यांकडे ओढून नेते. \q1 \v 3 मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी, \q2 त्यांना बुद्धीचा अभाव असतो, \q2 आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत. \q1 \v 4 जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, \q2 तर आपले स्थान सोडू नकोस; \q2 विनम्रता मोठे अपराध शांतविते. \b \q1 \v 5 सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे, \q2 अशी चूक की जी अधिकार्‍यांकडून घडते. \q1 \v 6 मूर्खांना मोठी पदे दिले जातात, \q2 आणि श्रीमंतांना खालील स्थान दिले जाते. \q1 \v 7 गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे, \q2 आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात. \b \q1 \v 8 जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. \q2 जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल. \q1 \v 9 जो खडक खोदतो त्याला त्यापासून दुखापत होते; \q2 जो लाकडे फोडतो त्याला त्यापासून धोका होऊ शकेल. \b \q1 \v 10 जर कुर्‍हाड बोथट असली, \q2 आणि तिची धार तीक्ष्ण नसेल, \q1 तर श्रम अधिक लागते, \q2 परंतु निपुणता यश आणेल. \b \q1 \v 11 साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, \q2 तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही. \b \q1 \v 12 सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात, \q2 पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात. \q1 \v 13 त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते; \q2 आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो; \q2 \v 14 मूर्ख शब्द वाढवून बोलतात. \b \q1 पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही; \q2 त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय? \b \q1 \v 15 मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात; \q2 नगराकडे जाणारी वाट त्यांना ठाऊक नसते. \b \q1 \v 16 धिक्कार असो त्या देशाचा ज्याचा राजा एक दास\f + \fr 10:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa मूल\fqa*\f* आहे, \q2 आणि ज्या देशाचे राजपुत्र सकाळीच मेजवानी सुरू करतात. \q1 \v 17 धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे \q2 आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर \q2 शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात. \b \q1 \v 18 आळशीपणामुळे घराचे छत पडते; \q2 आळशाच्या हातांमुळे घर गळू लागते. \b \q1 \v 19 मनोरंजनासाठी मेजवानी असते, \q2 द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, \q2 आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते. \b \q1 \v 20 राजाला आपल्या मनात देखील शाप देऊ नको, \q2 श्रीमंताला सुद्धा आपल्या शयनकक्षातून शाप देऊ नकोस, \q1 कारण आकाशातील एक पक्षी तुझे शब्द घेऊन जाईल, \q2 आणि आपल्या पंखाने उडत जाऊन तू काय बोललास याचा अहवाल देईल. \c 11 \s1 अनेक उद्योगात निवेश कर \q1 \v 1 तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात\f + \fr 11:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa भाकर पाण्यावर टाक\fqa*\f* कर; \q2 पुष्कळ दिवसांनी त्याचा मोबदला तुला लाभेल. \q1 \v 2 सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर; \q2 कारण पृथ्वीवर कोणती दुर्घटना घडेल, हे तुला ठाऊक नाही. \b \q1 \v 3 जर मेघ पाण्याने भरलेले आहेत, \q2 तर ते पृथ्वीवर पाऊस ओततात. \q1 झाड दक्षिणेला पडो की उत्तरेला, \q2 ज्या ठिकाणी ते पडते, तिथेच पडलेले राहते. \q1 \v 4 जो वार्‍याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही \q2 आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही. \b \q1 \v 5 जसे वार्‍याचे मार्ग, \q2 किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही, \q1 तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, \q2 त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत. \b \q1 \v 6 तू आपले बी सकाळी पेर, \q2 आणि संध्याकाळीही आपल्या हातांना विसावा देऊ नकोस. \q1 कारण त्यातील कोणते फलदायी होईल, \q2 हे किंवा ते, \q2 किंवा ते दोन्हीही चांगले फळ देतील, हे तुला ठाऊक नाही. \s1 तारुण्यात आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर \q1 \v 7 प्रकाश मधुर आहे, \q2 आणि सूर्य पाहणे डोळ्यांना रम्य आहे. \q1 \v 8 एखादा मनुष्य कितीही दीर्घायुष्य जगो, \q2 त्या सर्वांचा त्याने आनंद घ्यावा. \q1 परंतु त्यांनी अंधकाराचे दिवस आठवावे, \q2 कारण ते पुष्कळ असतील. \q2 येणारे सर्वकाही व्यर्थ आहे. \b \q1 \v 9 जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा, \q2 तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो. \q1 तुझे हृदय जे काही इच्छिते \q2 आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर, \q1 परंतु हे लक्षात असू दे \q2 की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल. \q1 \v 10 म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर \q2 आणि आपल्या देहातील वाईट गोष्टी काढून टाक, \q2 कारण तारुण्य आणि जोश निरर्थक आहेत. \b \c 12 \q1 \v 1 तुझ्या तारुण्याच्या दिवसात \q2 तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, \q1 आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत \q2 आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल, \q2 “मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”— \q1 \v 2 जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, \q2 आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, \q2 पावसानंतर ढग परत जात नाहीत; \q1 \v 3 जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, \q2 आणि बलवान पुरुष वाकून जातील, \q1 दळण करणार्‍या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, \q2 आणि खिडक्यांमधून पाहणार्‍यांची नजर अंधुक होईल; \q1 \v 4 जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील \q2 आणि जात्याचा आवाज मंद होईल; \q1 जेव्हा लोक पक्ष्यांच्या आवाजाने उठतील, \q2 परंतु त्यांची सर्व गीते शांत होतील; \q1 \v 5 जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची \q2 आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते; \q1 जेव्हा बदामाची झाडे फुलतात \q2 आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो \q2 आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही. \q1 तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात \q2 आणि शोक करणारे रस्त्यावर येतात. \b \q1 \v 6 आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, \q2 आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; \q1 झर्‍यावरील घागर फुटण्याआधी, \q2 आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी, \q1 \v 7 आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी, \q2 आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याकडे \q2 परतण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर. \b \q1 \v 8 उपदेशक\f + \fr 12:8 \fr*\ft किंवा \ft*\fq उपदेशक \fq*\fqa हे वचन 9 आणि 10 मध्ये आहे\fqa*\f* म्हणतो, निरर्थक! निरर्थक! \q2 सर्वकाही निरर्थक! \s1 विषयाचे प्रतिपादन \p \v 9 उपदेशक केवळ सुज्ञच नाही, तर त्याने लोकांनाही विद्या शिकवली. त्याने विचार करून शोध केला आणि अनेक म्हणी रचल्या. \v 10 उपदेशकाने योग्य शब्दांचा शोध केला आणि त्याने जे काही लिहिले ते यथार्थ व सत्य होते. \p \v 11 सुज्ञानाची वचने पराणीप्रमाणे आहेत, त्यांच्या शब्दांचा संग्रह एका मेंढपाळाने दिलेल्या घट्ट रोवलेल्या खिळ्यांप्रमाणे आहेत. \v 12 याव्यतिरिक्त असलेल्या शिक्षणापासून माझ्या मुला सावध राहा. \p अधिक पुस्तके लिहून ठेवायला अंत नाही आणि पुष्कळ अभ्यास केल्याने शरीर थकते. \q1 \v 13 आता सर्व ऐकून झाले; \q2 सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की: \q1 परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ, \q2 कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे. \q1 \v 14 कारण प्रत्येक गुप्त गोष्टीबद्दल, \q2 ती चांगली असो किंवा वाईट, \q2 त्याचा परमेश्वर न्याय करतील.