\id DAN - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h दानीएल \toc1 दानीएलाची भविष्यवाणी \toc2 दानीएल \toc3 दानी \mt1 दानीएलाची भविष्यवाणी \c 1 \s1 दानीएलाचे बाबेल येथे प्रशिक्षण \p \v 1 यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला. \v 2 आणि प्रभूने यहूदीयाच्या राजा यहोयाकीमला परमेश्वराच्या मंदिरातील काही पात्रांसोबत त्याच्या हाती दिले. ती शिनार\f + \fr 1:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa बाबेल\fqa*\f* प्रांतातील त्याच्या दैवताच्या मंदिरासाठी नेली आणि त्याच्या दैवताच्या खजिन्यात नेऊन ठेवली. \p \v 3 मग राजाने आपल्या दरबारातील प्रमुख अधिकारी अश्पनजास राजघराण्यातील काही इस्राएली आणि कुलीन लोकांना राजाच्या सेवेत आणण्याचा आदेश दिला— \v 4 शारीरिक दोष नसलेले तरुण पुरुष, देखणे, सर्वप्रकारच्या विद्येत निष्णात, ज्ञानसंपन्न, समजण्यास त्वरित आणि राजाच्या महालात सेवा करण्यास पात्र. त्याने त्यांना खाल्डियन भाषा व विद्या शिकवावी. \v 5 राजाने स्वतःच्या भोजनातून रोजचे भोजन आणि द्राक्षारसातून देण्याचा आदेश दिला. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षित करावे आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेत आणावे. \p \v 6 जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह. \v 7 अश्पनज अधिकार्‍याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्‍याहला अबेदनगो. \p \v 8 पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली. \v 9 आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्‍याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले, \v 10 परंतु अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझे स्वामीराजाचे भय आहे, ज्यांनी मला तुमच्या खाण्या आणि पिण्याची देखरेख करण्यास नेमले आहे. तुमच्याबरोबरीच्या तरुणापेक्षा तुम्ही अशक्त का दिसावे? राजा तुमच्यामुळे माझे डोके उडवेल.” \p \v 11 दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्‍याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला, \v 12 “कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या. \v 13 मग आम्ही कसे दिसतो याची तुलना राजाच्या मेजवानीत भोजन करणार्‍या तरुणांशी करा आणि या तुमच्या सेवकांना तुमच्या दृष्टीस जे दिसेल त्याप्रमाणे वागवा.” \v 14 तो हे करण्यास सहमत झाला आणि त्याने त्यांना दहा दिवस पारखून पाहिले. \p \v 15 दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्‍या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले. \v 16 म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला. \p \v 17 परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत. \p \v 18 राजाने नेमून दिलेल्या वेळेनंतर प्रमुख अधिकार्‍याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरपुढे त्याच्या सेवेसाठी प्रस्तुत केले. \v 19 राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले. \v 20 बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या प्रत्येक बाबतीत ज्याबद्दल जेव्हा राजाने त्यांना विचारले, त्याला ते त्याच्या संपूर्ण राज्यातील सर्व जादूगार आणि ज्योतिषीच्या सल्ल्यापेक्षा दसपटीने चांगले आहेत, असे आढळून आले. \p \v 21 आणि कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत दानीएल राजाचा सल्लागार या पदावर होता. \c 2 \s1 नबुखद्नेस्सर राजाचे स्वप्न \p \v 1 आपल्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला स्वप्न पडले; त्याचे मन व्याकूळ झाले आणि त्याला झोप येत नव्हती. \v 2 म्हणून राजाने आदेश दिला की जादूगार, मांत्रिक, तांत्रिक आणि ज्योतिषी यांना बोलवावे आणि त्याला जे स्वप्न पडले ते सांगावे, जेव्हा ते आत आले आणि राजासमोर उभे राहिले, \v 3 तो राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे, ज्यामुळे मी व्याकूळ झालो आणि त्याचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे.” \p \v 4 त्या ज्योतिषांनी राजाला उत्तर दिले, “महाराज, चिरायू असा! आपले स्वप्न काय होते ते आपल्या सेवकांना सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” \p \v 5 त्यावर राजाने ज्योतिषांना उत्तर दिले, “मी हा दृढ निश्चय केले आहे: जर मला ते स्वप्न कोणते आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही सांगितले नाहीतर मी तुमचे तुकडे करेन आणि तुमच्या घरादारांचे उकिरडे केले जातील. \v 6 पण माझे स्वप्न काय होते, त्याचा अर्थ काय आहे, हे तुम्ही मला सांगितले, तर तुम्ही माझ्याकडून भेट व इनामे आणि मोठा सन्मान प्राप्त कराल. म्हणून मला माझे स्वप्न सांगा आणि त्या स्वप्नांचा अर्थ सांगा.” \p \v 7 त्यांनी पुन्हा उत्तर दिले, “महाराजांनी, स्वप्न आपल्या सेवकांना सांगावे आणि आम्ही त्याचा अर्थ सांगू.” \p \v 8 तेव्हा राजाने उत्तर दिले, मला आता खात्री झाली आहे की तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहात, कारण मी हा दृढ निश्चय केला आहे, हे तुम्हाला कळले आहे: \v 9 जर तुम्ही मला माझे स्वप्न सांगणार नाही, तर तुम्हासाठी फक्त एकच शिक्षा आहे. परिस्थिती बदलेल या आशेने तुम्ही मला भ्रामक आणि दुष्ट गोष्टी सांगण्याचा कट रचला आहे. म्हणून तुम्ही मला स्वप्न सांगा आणि मला कळेल की तुम्ही मला त्याचा परिणाम सांगू शकता. \p \v 10 ज्योतिषी लोकांनी राजाला उत्तर दिले, “पृथ्वीवर असा कोणताही व्यक्ती नाही, जे राजाने सांगितले आहे ते करू शकेल! कोणत्याही राजाने मग तो कितीही महान आणि पराक्रमी असला तरी जादूगार किंवा तांत्रिक किंवा ज्योतिषी यांना असे विचारले नाही. \v 11 महाराजाने जे विचारत आहेत ते अशक्य आहे. ज्या दैवतांचे राहणे मनुष्यात नाही, त्यांच्या खेरीज हे महाराजांना कोणीही प्रकट करू शकणार नाही.” \p \v 12 हे ऐकून राजाला क्रोध आला आणि तो संतप्त झाला आणि त्याने फर्मान काढले की बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांचा शिरच्छेद करा. \v 13 ज्ञानी लोकांना मारण्याचे फर्मान काढण्यात आले आणि दानीएल व त्याच्या मित्रांचा वध करण्यासाठी लोकांना पाठविण्यात आले. \p \v 14 जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला. \v 15 त्याने राजाच्या अधिकार्‍याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली. \v 16 ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल. \p \v 17 मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांना सांगितली. \v 18 दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये. \v 19 त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला. \v 20 आणि दानीएल म्हणाला: \q1 “परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो; \q2 कारण ज्ञान आणि सामर्थ्य हे त्यांचेच आहे. \q1 \v 21 ते समय व ॠतू बदलतात; \q2 ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. \q1 शहाण्यांना तेच शहाणपण देतात, \q2 सुज्ञांना बुध्दीही देतात. \q1 \v 22 गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात; \q2 अंधारात काय आहे हे ते जाणतात \q2 आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो. \q1 \v 23 हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, \q2 मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो: \q2 तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले, \q1 मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले, \q2 तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.” \s1 दानीएलकडून स्वप्नाचा खुलासा \p \v 24 बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करण्याचे काम अर्योकवर सोपविले होते. दानीएल त्याला जाऊन भेटला व म्हणाला, “बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करू नका. मला राजाकडे घेऊन चला आणि मी राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगेन.” \p \v 25 अर्योकने लगबगीने दानीएलला राजाकडे घेऊन गेला आणि म्हणाला, “यहूदी कैद्यांपैकी मला एक पुरुष सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल.” \p \v 26 राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?” \p \v 27 दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही, \v 28 परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्‍या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत: \p \v 29 “महाराज जेव्हा तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता, तुमचे मन होणार्‍या भावी घटनेकडे लागले आणि रहस्ये प्रकट करणार्‍यांनी तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे दाखविले आहे. \v 30 माझ्यासाठी, हे रहस्य मला उघड केले गेले कारण माझ्याकडे इतर जिवंत माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे म्हणून नाही, परंतु महाराजांना रहस्याचा अर्थ कळावा आणि तुमच्या मनात काय चालले आहे ते समजावे. \p \v 31 “महाराज, तुम्ही पाहिले की तुमच्यापुढे एक प्रचंड पुतळा उभा आहे—एक प्रचंड, चकाकदार पुतळा, दिसण्यात अद्भुत. \v 32 त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या, \v 33 त्याचे पाय लोखंडाचे होते आणि पावले लोखंडाची व त्यात काही अंश मातीचा होता. \v 34 तुम्ही पहात असताना, एका खडकाने कोणताही मानवी स्पर्श न होता स्वतःला छेदले आणि त्या मूर्तीच्या लोखंडी आणि मातीच्या पायावर अशा प्रकारे आदळले की त्याचा चुराडा झाला. \v 35 मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली. \p \v 36 “हे आपले स्वप्न आणि आता त्याचा अर्थ महाराजासाठी सांगतो. \v 37 महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे; \v 38 आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात. \p \v 39 “तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. \v 40 शेवटी, एक चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत असेल—कारण लोखंड सर्व गोष्टींचे तुकडे करतो आणि चुराडा करतो—आणि लोखंड ज्याप्रमाणे गोष्टींचे तुकडे करेल, त्याचप्रमाणे हे राज्य त्याचे तुकडे करून चुराडा करेल. \v 41 जसे तुम्ही पाहिले की पाय आणि बोटे काही प्रमाणात भाजलेल्या मातीची होती आणि काही प्रमाणात लोखंडाची होती, म्हणून ते एक विभाजित राज्य असेल; तरीही त्यात काही लोखंडी ताकद असेल, जसे तुम्ही लोखंड मातीत मिसळलेले पाहिले. \v 42 काही लोखंड व काही माती यांनी बनलेली पावले आणि बोटे आपल्याला दिसली म्हणजेच हे साम्राज्य काही मजबूत व काही दुबळी असतील. \v 43 आणि जसे तुम्ही लोखंडाला भाजलेल्या मातीत मिसळलेले पाहिले, तसे लोक मिसळले जातील, पण एकरूप होणार नाहीत, कारण लोखंड मातीत मिसळत नाही. \p \v 44 “त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील. \v 45 हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता. \p “महान परमेश्वराने महाराजांना भविष्यात काय घडणार आहे हे दाखवून दिले. हे स्वप्न खरे आहे आणि त्याचा अर्थ विश्वास ठेवण्यालायक आहे.” \p \v 46 मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलसमोर साष्टांग दंडवत घालत तो पालथा पडला आणि आज्ञा केली की त्याला अर्पणे व सुगंधी द्रव्ये सादर करावी. \v 47 राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.” \p \v 48 मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली. \v 49 मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला. \c 3 \s1 सोन्याचा पुतळा आणि तप्त भट्टी \p \v 1 नबुखद्नेस्सर राजाने एक सुवर्ण पुतळा घडविला. त्याची उंची साठ हात आणि रुंदी सहा हात\f + \fr 3:1 \fr*\ft अंदाजे 27 मीटर उंच आणि 2.7 मीटर रुंद\ft*\f* होती, आणि बाबेल प्रांतातील दूरा नावाच्या मैदानात हा पुतळा स्थापित केला. \v 2 मग नबुखद्नेस्सरने आपल्या साम्राज्यातील राजपुत्र, सर्व राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी या सर्वांना त्याने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी बोलाविले. \v 3 राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी नबुखद्नेस्सर राजाने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र झाले आणि त्या पुतळ्याच्या पुढे उभे राहिले. \p \v 4 तेव्हा ललकारी देणाऱ्याने मोठ्याने घोषणा केली, “अहो सर्व राष्ट्रातील आणि विविध भाषा बोलणारे लोकहो, तुम्हाला ही आज्ञा देण्यात येते: \v 5 शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच, तुम्हाला नबुखद्नेस्सर महाराजांनी उभारलेल्या या सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी लागेल. \v 6 जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.” \p \v 7 म्हणून जेव्हा त्यांनी कर्णे, बासरी, सतार, तंतुवाद्य, वीणा आणि सर्वप्रकारचे संगीत ऐकले, तेव्हा सर्व वंश आणि भाषांचे लोक पालथे पडले आणि त्यांनी राजा नबुखद्नेस्सरने प्रतिष्ठापन केलेल्या सोन्याच्या मूर्तीची आराधना केली. \p \v 8 यावेळी काही ज्योतिषी\f + \fr 3:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa खास्दी\fqa*\f* राजाकडे गेले व यहूदींवर आरोप लावला. \v 9 ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू असा! \v 10 महाराज तुम्ही आदेश दिला आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच सर्वांनी सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी, \v 11 आणि जो कोणी असे करणार नाही त्याला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात यावे. \v 12 परंतु काही यहूदी आहेत ज्यांना तुम्ही बाबेलच्या कारभारावर नेमलेले आहे—शद्रख, मेशख, व अबेदनगो—जे तुमच्या आज्ञेकडे लक्ष्य देत नाही. महाराज, यांनी आपली आज्ञा मानली नाही. ते तुमच्या दैवतांची सेवा करीत नाही किंवा आपण उभारलेल्या सुवर्ण पुतळ्याला नमनही करीत नाही.” \p \v 13 नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त झाला व शद्रख, मेशख व अबेदनगो यांना हजर करावे असा त्याने हुकूम दिला. तेव्हा या लोकांना राजासमोर आणण्यात आले, \v 14 नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “शद्रख, मेशख आणि अबेदनगो, तुम्ही माझ्या दैवतांची सेवा व मी स्थापन केलेल्या सुवर्ण पुतळ्याची उपासना करीत नाही, हे खरे आहे काय? \v 15 मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?” \p \v 16 शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही. \v 17 जर आम्हाला धगधगत्या भट्टीत टाकले, तर आमचे परमेश्वर ज्यांची आम्ही सेवा करतो ते आम्हाला तिच्यातून\f + \fr 3:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa धगधगत्या भट्टीतून\fqa*\f* सोडविण्यास समर्थ आहे आणि महाराज, तेच आम्हाला आपल्या हातून सोडवतील. \v 18 परंतु असे जरी झाले नाही, तरीही महाराज तुम्हाला हे कळावे की आम्ही तुझ्या दैवतांची सेवा करणार नाही किंवा आपण स्थापन केलेल्या या सुवर्ण पुतळ्याला नमनही करणार नाही.” \p \v 19 तेव्हा नबुखद्नेस्सर हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांच्यावर रागाने संतप्त झाला आणि त्याची त्यांच्याबद्दलीची भावना बदलली. नेहमीपेक्षा भट्टी सातपट तापवावी असा त्याने हुकूम सोडला, \v 20 आणि शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना बांधून भट्टीत फेकण्यासाठी त्याने आपल्या सैन्यातील बलदंड वीरांना बोलाविले. \v 21 तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासह बांधण्यात आले आणि धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले. \v 22 राजाची आज्ञा कडक होती आणि भट्टी अतिशय तापली होती यामुळे ज्या सैनिकांनी शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना भट्टीत टाकण्यासाठी उचलले होते, त्यांनाच अग्नीच्या ज्वालांनी ठार केले, \v 23 आणि हे तीन पुरुष शद्रख, मेशख व अबेदनगो घट्ट बांधलेले असे धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले. \p \v 24 नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन ताडकन उभा राहिला व आपल्या मंत्र्यांना विचारले, “आपण तीन माणसांना बांधून भट्टीत टाकले होते ना?” \p ते म्हणाले, “होय, निश्चित महाराज.” \p \v 25 तो म्हणाला, “इकडे पाहा! मी चार पुरुष अग्नीत फिरत असलेले पाहत आहे आणि त्यांचे बंध सुटलेले आहेत आणि त्यांना कोणतीच हानी झालेली नाही, आणि त्यातील चौथा तर देवपुत्रासारखा दिसत आहे.” \p \v 26 नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हणाला, “परमोच्च परमेश्वराचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेदनगो, बाहेर या! इकडे या!” \p तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो अग्नीतून बाहेर आले, \v 27 मग राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, सल्लागार इत्यादी सर्व त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांच्या शरीराला विस्तवाची झळ लागली नाही, अथवा त्यांच्या डोक्याचा एक केससुद्धा होरपळला नव्हता; त्यांचे कपडे काळवंडले नव्हते आणि त्याच्या अंगाला धुराचा वासही येत नव्हता, असे सर्वांनी पाहिले. \p \v 28 तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली. \v 29 म्हणून मी असे फर्मान काढतो की शद्रख, मेशख आणि अबेदनगोच्या परमेश्वराविरुद्ध कोणतेही राष्ट्र किंवा भाषा बोलणारे काहीही बोलतील तर त्यांचे तुकडे तुकडे करावेत आणि त्यांच्या घरादाराचेही उकिरडे करण्यात यावे. कारण परमेश्वर जसे सोडवितात, तसे दुसर्‍या कोणत्याही दैवताला करता येणार नाही.” \p \v 30 नंतर राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांतात बढती दिली. \c 4 \s1 नबुखद्नेस्सरचे झाडाचे स्वप्न \pmo \v 1 नबुखद्नेस्सर राजाने, \pmo जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्‍या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा: \pmo तुम्हा सर्वांची भरभराट होवो. \pm \v 2 परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे. \qm1 \v 3 किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे, \qm2 किती थोर त्यांनी केलेले चमत्कार! \qm1 त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे; \qm2 त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत. \pm \v 4 मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो. \v 5 मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो. \v 6 माझ्या स्वप्नाचा अर्थ काय ते कळावे या हेतूने मी बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांना आज्ञा दिली. \v 7 जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही. \v 8 अखेरीस दानीएल माझ्या उपस्थितीत आला आणि मी त्याला माझे स्वप्न सांगितले. (माझ्या देवाच्या नावावरून मी त्याचे बेलटशास्सर असे नाव ठेवले होते. याच माणसामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे.) \pm \v 9 मी म्हणालो, “हे बेलटशास्सर, धुरंधर जादुगारा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये आहे हे मला ठाऊक आहे आणि तुझ्यासाठी कोणतेच रहस्य कठीण नाही. माझे हे स्वप्न आहे; मला त्याचा अर्थ सांग. \v 10 मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता. \v 11 तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता. \v 12 त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे. \pm \v 13 “मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत\f + \fr 4:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa पहारेकरी\fqa*\f* खाली येत आहे. \v 14 त्याने मोठ्याने ओरडून सांगितले ‘हे वृक्ष तोडून टाका, फांद्या कापून टाका; पाने ओरबाडून काढा आणि फळे विखरून द्या. त्याच्या खालचे पशू निघून जावोत आणि फांद्यांवरील पक्षी उडून जावोत. \v 15 परंतु त्याचा बुंधा व मुळे लोखंड व कास्याने बांधून सभोवतालच्या गवतात जमिनीवरच राहू द्या. \pm “ ‘आकाशातील दव पडून त्यास भिजू द्या आणि त्याला भूमीवरील गवतामध्ये पशूंसोबत राहू द्या. \v 16 सात वर्षापर्यंत\f + \fr 4:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa सात वेळा\fqa*\f*, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो. \pm \v 17 “ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’ \pm \v 18 “हे स्वप्न आहे जे मी, राजा नबुखद्नेस्सरने पाहिले. हे बेलटशास्सर, आता याचा अर्थ काय तो मला सांग, कारण माझ्या राज्यात कोणताही ज्ञानी मनुष्य मला त्याचा अर्थ सांगू शकत नाही. फक्त तूच मला अर्थ सांगू शकशील, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्यामध्ये आहे.” \s3 दानीएल स्वप्नाचा अर्थ सांगतो \pm \v 19 नंतर दानीएल (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जात), काही वेळेसाठी व्याकूळ झाला आणि त्याचे विचार त्याला भयभीत करू लागले. म्हणून राजा म्हणाला, “हे बेलटशास्सर, माझे स्वप्न किंवा त्याचा अर्थ यामुळे भयभीत होऊ नको.” \pm तेव्हा बेलटशास्सराने (अर्थात् दानीएलाने) उत्तर दिले, “महाराज, जर हे स्वप्न तुमच्या शत्रूंवर आणि त्याचा अर्थ तुमच्या विरोधकांवर ओढवला असता, तर किती बरे झाले असते! \v 20 तुम्ही पाहिलेले वृक्ष, जे वाढले आणि मजबूत झाले, ज्याचे शिखर आकाशाला स्पर्श करू लागले आणि जे सर्व पृथ्वीवरून पाहिले जाऊ शकते, \v 21 ज्यामध्ये सुंदर पाने आणि विपुल फळे होती, ज्याने सर्वांना अन्न दिले, ज्याने वन्यपशूंना आश्रय दिला आणि ज्याच्या फांद्यांवर पक्षी घरटे बांधली; \v 22 महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे. \pm \v 23 “हे महाराज, नंतर आपणाला येणारा एक पवित्र दूत दिसला आणि तो म्हणत होता, ‘वृक्ष तोडा, त्याचा नाश करा, पण त्याचा बुंधा व मुळे तशीच जमिनीतील गवतात राखा. त्याच्याभोवती हिरवळ असेल व तो लोखंडाच्या आणि कास्याच्या पट्टयाने बांधलेला असेल. आकाशातील दवाने तो भिजून जावो! सात वर्षे मैदानातल्या पशूंसारखी त्याची गत होवो!’ \pm \v 24 “महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे: \v 25 तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात. \v 26 परंतु बुंधा व मुळे जमिनीतच ठेवण्याची आज्ञा देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही स्वीकाराल स्वर्ग राज्य करते तेव्हा तुमचे राज्य तुम्हाला परत केले जाईल. \v 27 म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.” \s3 स्वप्न पूर्ण झाले \pm \v 28 हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले. \v 29 बारा महिन्यानंतर राजा बाबेलमधील राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता, \v 30 मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?” \pm \v 31 तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो, तोच स्वर्गातून वाणी आली, “हे राजा नबुखद्नेस्सर, तुझ्यासाठी हे फर्मान घेण्यात आले आहे: तुझा राजेशाही अधिकार तुझ्यापासून काढून घेण्यात आला आहे. \v 32 तुला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तू वन्यप्राण्यांसह राहशील; तू बैलाप्रमाणे गवत खाशील. सात कालखंड संपेपर्यंत तू असे स्वीकारशील की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला राज्ये देतात.” \pm \v 33 नबुखद्नेस्सरबद्दल जे बोलण्यात आले होते ते त्याच घटकेला पूर्ण झाले. त्याला लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर दवाने भिजून ओलेचिंब झाले, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे लांब वाढले आणि पक्ष्यांच्या नखांसारखी त्याची नखे वाढली. \b \pm \v 34 निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, \qm1 त्यांची सत्ता शाश्वत आहे. \qm2 त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे. \qm1 \v 35 पृथ्वीवरील सर्व लोक \qm2 कवडीमोलाचे आहेत. \qm1 स्वर्गातील शक्तींमध्ये आणि \qm2 पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये \qm2 त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात. \qm1 त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही \qm2 अथवा त्यांना बोलू शकत नाही: “तुम्ही हे काय केले?” \pm \v 36 माझी बुद्धी मला परत लाभली. त्याचप्रमाणे माझा मान, वैभव आणि राज्य हेदेखील सर्व मला परत मिळाले. माझे मंत्री व अधिकारी माझ्याकडे परत आले, आणि मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मी पूर्वीपेक्षा अधिक महान झालो. \v 37 आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत. \c 5 \s1 भिंतीवरील लिखाण \p \v 1 बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्‍यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला. \v 2 बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता\f + \fr 5:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa पूर्वज\fqa*\f* नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील. \v 3 म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली. \v 4 द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले. \p \v 5 एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली. \v 6 तेव्हा राजाचा चेहरा पांढराफटक झाला आणि त्याला एवढा धसका बसला की त्याची कंबरच खचली आणि त्याचे गुडघे थरथर कापू लागले. \p \v 7 मग राजाने मांत्रिक, ज्योतिषी आणि दैवप्रश्न करणार्‍यांना बोलावून घेतले. नंतर तो बाबेलच्या ज्ञानी लोकांना म्हणाला, “जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला समजावून सांगेल, त्याला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तो तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होईल.” \p \v 8 नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना. \v 9 यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले. \p \v 10 राजा आणि अधिकार्‍यांचा आवाज ऐकून राणी\f + \fr 5:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa राजमाता\fqa*\f* मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका. \v 11 कारण ज्याच्यामध्ये पवित्र देवांचा आत्मा आहे असा एक मनुष्य आपल्या राज्यात आहे. तुमच्या पित्याच्या कारकिर्दीत हा मनुष्य जणू काय देवच आहे अशा ज्ञानाने व शहाणपणाने परिपूर्ण असून असे आढळून आले होते. तुमचा पिता नबुखद्नेस्सर राजाच्या कारकिर्दीत त्याला बाबेलमधील सर्व जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे या सर्वांवर प्रमुख नेमण्यात आले होते. \v 12 त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.” \p \v 13 तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता? \v 14 तुझ्यामध्ये देवांचा आत्मा आहे आणि प्रकाश, बुद्धी आणि उत्कृष्ट शहाणपण यांनी तू परिपूर्ण आहेस असे मी ऐकले आहे. \v 15 ज्ञानी लोकांनी आणि ज्योतिषांनी भिंतीवरील हे लिखाण वाचावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगावे म्हणून त्यांना माझ्यापुढे आणले पण ते अर्थ सांगू शकले नाही. \v 16 मी तुझ्याबद्दल ऐकले आहे की तू अर्थ सांगण्यात आणि कोडी सोडविण्यात सक्षम आहेस. जर तू हे लिखाण वाचशील आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगशील, तर तुला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तू तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होशील.” \p \v 17 दानीएलने राजाला उत्तर दिले. “आपल्या देणग्या आपल्याजवळच ठेवा आणि तुमचे पारितोषिक दुसर्‍या कोणाला द्या. तरीही मी हे लिखाण राजासाठी वाचेन आणि त्याचा अर्थ त्यांना सांगेन. \p \v 18 “महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते. \v 19 कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत. \v 20 परंतु जेव्हा त्यांचे अंतःकरण गर्विष्ठ झाले व गर्वाने फुगून ताठ झाले, तेव्हा त्यांना राजासनावरून काढण्यात आले व त्यांचे वैभवही हिरावून घेण्यात आले. \v 21 त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात. \p \v 22 “परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र\f + \fr 5:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa वारस\fqa*\f* असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. \v 23 त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही. \v 24 म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे. \p \v 25 “हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: \pc मने, मने तकेल, ऊ\f + \fr 5:25 \fr*\fq ऊ \fq*\ft इब्री भाषेत या शब्दाचा अर्थ \ft*\fqa आणि\fqa*\f* फारसीन. \p \v 26 “या शब्दांचा अर्थ हा असा: \p “\tl मने\tl*\f + \fr 5:26 \fr*\fq मने \fq*\ft अर्थात् \ft*\fqa मोजलेले \fqa*\ft किंवा \ft*\fqa मीना \fqa*\ft (पैशाचा भाग).\ft*\f*: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे. \p \v 27 “\tl तकेल\tl*\f + \fr 5:27 \fr*\fq तकेल \fq*\ft अर्थात् \ft*\fqa वजन केलेले \fqa*\ft किंवा \ft*\fqa शेकेल.\fqa*\f*: तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. \p \v 28 “\tl फारसीन\tl*\f + \fr 5:28 \fr*\fq फारसीन \fq*\ft (पेरेसचे अनेकवचन) अर्थात् \ft*\fqa दुभागलेले \fqa*\ft किंवा \ft*\fqa अर्धा मीना \fqa*\ft किंवा \ft*\fqa अर्धा शेकेल.\fqa*\f*: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.” \p \v 29 नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले. \p \v 30 त्याच रात्री खाल्डियन\f + \fr 5:30 \fr*\ft किंवा \ft*\fqa खास्दी\fqa*\f* लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला; \v 31 आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला. \c 6 \s1 सिंहाच्या गुहेमध्ये दानीएल \p \v 1 दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे, \v 2 व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा. \v 3 दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती. \v 4 यामुळे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलविरुद्ध राज्य कारभारातील दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळला नाही, कारण तो विश्वासू होता आणि तो भ्रष्ट नव्हता किंवा निष्काळजीपणाही करीत नव्हता. \v 5 शेवटी हे लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाविरुद्ध त्याच्या परमेश्वराच्या नियमाशिवाय कोणत्याही बाबतीत आरोपाचे कारण सापडणार नाही.” \p \v 6 तेव्हा अध्यक्ष आणि प्रांताधिकारी हे राजाकडे गेले आणि म्हणाले, “दारयावेश महाराज चिरायू होवोत! \v 7 आम्ही सर्वांनी म्हणजे अध्यक्ष, राज्यपाल, मंत्री नायब यांनी एकमताने ठरविले आहे की, महाराजांनी एक फर्मान काढावे व त्याचे पालन करण्यात यावे, त्यानुसार येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. \v 8 तर आता महाराज, या फर्मानावर शिक्कामोर्तब करा आणि ते लिखित स्वरुपात द्या म्हणजे ते बदलता येणार नाही—म्हणजे मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.” \v 9 तेव्हा दारयावेश राजाने या फर्मानावर सही केली. \p \v 10 जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले. \v 11 नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले. \v 12 मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे? \p राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.” \p \v 13 नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.” \v 14 जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. \p \v 15 नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.” \p \v 16 तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!” \p \v 17 आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्‍यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये. \v 18 मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती. \p \v 19 राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला. \v 20 जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?” \p \v 21 तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो! \v 22 माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.” \p \v 23 तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता. \p \v 24 नंतर राजाने आज्ञा केली त्याप्रमाणे दानीएलवर खोटे आरोप करणार्‍यांना पकडण्यात आले व त्यांच्या पत्नी व मुलांसहित त्या सर्वांना सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. आणि ते गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सिंहांनी प्रबळ होऊन झेप घातली आणि त्यांच्या सर्व हाडांचे तुकडे केले. \p \v 25 नंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आणि सर्व भाषा बोलणार्‍यांना लोकांना लिहिले: \pmo “तुमची भरपूर उन्नती होवो! \pm \v 26 “माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा. \qm1 “कारण ते जिवंत परमेश्वर आहे \qm2 आणि ते सर्वकाळ टिकणारे आहेत; \qm1 त्यांच्या राज्याचा कधीच नाश होणार नाही \qm2 व त्यांचे प्रभुत्व कधीही संपणारे नाही. \qm1 \v 27 ते सुटका करतात व ते वाचवितात; \qm2 ते आकाशात आणि पृथ्वीवर \qm2 चिन्ह आणि चमत्कार करतात. \qm1 त्यांनीच दानीएलला \qm2 सिंहांच्या तावडीतून सोडविले आहे.” \p \v 28 याप्रमाणे दारयावेश राजाच्या आणि कोरेश पारसीच्या कारकिर्दीत दानीएल समृद्ध झाला. \c 7 \s1 दानीएलला झालेला चार पशूंचा दृष्टान्त \p \v 1 बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या बिछान्यावर पडला असताना त्याने स्वप्न पाहिले व मनात दृष्टान्त पाहिला. त्याने आपल्या स्वप्नाचा सारांश लिहून ठेवला. \p \v 2 दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले. \v 3 चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता. \p \v 4 “पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले. \p \v 5 “आणि तिथे मी माझ्यापुढे दुसरा पशू पाहिला, जो अस्वलासारखा दिसत होता. त्याच्या शरीराची एका बाजू वर उचललेली होता. त्याने आपल्या दातांमध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले, ‘ऊठ! पोटभर मांस खा!’ \p \v 6 “यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता. \p \v 7 “यानंतर रात्री मी दृष्टान्तात पाहत होतो आणि तिथे माझ्यापुढे चौथा पशू होता—तो भयंकर आणि विक्राळ आणि फार बलिष्ठ होता. त्याला मोठे लोखंडी दात होते; त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. पूर्वीच्या सर्व पशूपेक्षा हा पशू वेगळा होता. त्याला दहा शिंगे होती. \p \v 8 “या शिंगांविषयी मी विचार करीत असता, त्या शिंगांमध्ये आणखी एक लहान शिंग उगवले आणि आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगांना या नव्या शिंगाने मुळासकट उपटून टाकले. या शिंगाला माणसासारखे डोळे होते आणि बढाई करणारे तोंडही होते. \p \v 9 “जसे मी पाहिले, \q1 “सिंहासने मांडली गेली \q2 आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे. \q1 त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती; \q2 त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. \q1 त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते, \q2 आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती. \q1 \v 10 अग्नीची नदी निघून वाहत होती \q2 जी त्याच्यामधून बाहेर येत होती. \q1 हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते; \q2 कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. \q1 न्यायालयाचे कामकाज सुरू झाले \q2 आणि पुस्तके उघडली गेली. \p \v 11 “मग मी सतत त्याच्याकडे पाहत होतो कारण ते शिंग फुशारकीचे शब्द बोलत होते. मी सतत पाहत राहिलो जोपर्यंत चौथ्या पशूचे वध करण्यात आले नाही आणि त्याचे शरीर अग्निज्वालांमध्ये फेकण्यात आले नाही. \v 12 (इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.) \p \v 13 “नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले. \v 14 त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही. \s1 स्वप्नाचा उलगडा \p \v 15 “मी, दानीएल, माझ्या आत्म्यात खूप व्यथित झालो आणि मी माझ्या मनात जो दृष्टान्त पाहिला, त्यामुळे मी गोंधळून गेलो. \v 16 मी तिथे उभ्या असलेल्यांपैकी एकाकडे गेलो आणि मी त्याला या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे विचारले. \p “मग त्याने मला सांगितले व गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला: \v 17 ‘हे चार महाकाय पशू म्हणजे पृथ्वीवर उदय पावणारे चार राजे आहेत. \v 18 तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’ \p \v 19 “मग मला चौथ्या प्राण्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता, जो इतर सर्व पशूंपेक्षा वेगळा होता. तो आपल्या लोखंडी दातांनी आणि कास्याच्या नखांमुळे अति भयानक होता—त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. \v 20 मला हे देखील जाणून घ्यायचे होते की त्याच्या डोक्यावर असलेली दहा शिंगे आणि दुसरे शिंग जे बाहेर आले, त्यापैकी तीन शिंगे बाहेर आल्यावर पडली. मला त्या दहा शिंगांविषयी आणि जे शिंग नंतर आले, ज्याच्या येण्याने तेथील तीन शिंगे तुटून पडली—ते शिंग जे इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसले आणि ज्याला डोळे होते व फुशारकी मारणारे बढाईखोर तोंड होते, मला हे जाणून घ्यायचे होते. \v 21 मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले, \v 22 जोपर्यंत सनातन पुरुष येईपर्यंत आणि परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांच्या बाजूने निर्णय घोषित होईपर्यंत, त्यांनी राज्य ताब्यात घेण्याची वेळ आली. \p \v 23 “त्याने मला हे स्पष्टीकरण दिले: ‘हा चौथा पशू म्हणजे हे चौथे राज्य होईल जे पृथ्वीवर प्रकट होईल. ते सर्व राज्याहून निराळे होईल आणि ते संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करेल, तिला तुडवून टाकेल, आणि तिचे तुकडे करेल. \v 24 ती दहा शिंगे म्हणजे दहा राजे. जे या राज्यातून येतील. यानंतर आणखी एक राजा येईल, जो आधीच्या राजांपेक्षा भिन्न असणार; तो या तिघांना वश करेल. \v 25 तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.\f + \fr 7:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa एक वर्ष, दोन वर्षे आणि अर्धे वर्ष\fqa*\f* \p \v 26 “ ‘परंतु न्यायसभा बसेल आणि त्याचे सामर्थ्य काढून घेण्यात येईल आणि त्याचा कायमचा नाश करण्यात येईल. \v 27 मग परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांना आकाशाखाली असलेल्या राज्यांचे सार्वभौमत्व, सामर्थ्य आणि महानता देण्यात येईल. त्यांचे राज्य सनातन राज्य आहे आणि सर्व शासक त्यांची सेवा करतील व त्यांच्या आज्ञा पाळतील.’ \p \v 28 “येथे हा विषय समाप्त होतो. मी दानीएल, आपल्या विचारांनी व्याकूळ झालो. आणि माझा चेहरा पांढराफटक पडला, परंतु मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.” \c 8 \s1 दानीएलास मेंढा आणि बोकड यांचा दृष्टान्त \p \v 1 बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी, मी जो दानीएलने पहिल्यासारखाच आणखी एक दृष्टान्त पाहिला. \v 2 माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो. \v 3 मी आपले डोळे वर करून पाहिले की नदीच्या काठावर उभा असलेला एक मेंढा दिसला, त्याला दोन शिंगे होती आणि ती शिंगे लांब होती. एक शिंग दुसर्‍यापेक्षा अधिक लांब होते परंतु नंतर ते वाढले. \v 4 मी पाहिले की तो मेंढा पश्चिमेकडे, उत्तरेकडे, आणि दक्षिणेकडे धडक मारीत होता. दुसर्‍या कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभा राहू शकला नाही आणि त्याच्या सामर्थ्यापासून वाचू शकला नाही. त्याला ज्यात संतोष वाटला, ते त्याने केले आणि तो महान झाला. \p \v 5 जेव्हा मी याचा विचार करीत होतो, तेव्हा मी पाहिले की एक बोकड त्याचे पाय जमिनीवर ठरत नव्हते, जो सर्व पृथ्वीला पार करून आला. या बोकडाला डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते. \v 6 तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला. \v 7 मी पाहिले की त्याने फार क्रोधित होऊन मेंढ्यावर हल्ला केला आणि धडक देत त्याचा दोन्ही शिंगांना मोडून टाकले. मेंढा त्याच्या विरोधात उभा राहण्यास शक्तिहीन होता; बोकडाने त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली तुडविले आणि त्याच्या शक्तीपासून मेंढ्याला कोणालाही सोडविता आले नाही. \v 8 तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली. \p \v 9 त्यांच्यापैकी एकामधून दुसरे शिंग फुटले, लहान म्हणून त्याचा प्रारंभ झाला, परंतु दक्षिण, पूर्व आणि वैभवी देशाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढले. \v 10 तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले. \v 11 त्याने स्वतःला याहवेहच्या अधिपतीप्रमाणे उच्च केले; त्याने दररोज याहवेहला अर्पण केले जाणारे यज्ञ काढून घेतले आणि त्यांचे पवित्रस्थान पाडून टाकले. \v 12 दैनंदिन यज्ञ बंडखोरीमुळे याहवेहचे लोक\f + \fr 8:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa सैन्य\fqa*\f* त्याच्या हाती देण्यात आले. त्याने जे काही केले त्यात उन्नती केली आणि सत्य मातीला मिळविले. \p \v 13 नंतर एका पवित्रजनाला बोलताना मी ऐकले आणि दुसरा पवित्रजन त्याला म्हणाला, “दृष्टान्त पूर्ण होण्यास किती काळ लागेल—त्या दृष्टान्तामध्ये रोजचे अर्पण, विध्वंसक पातक ज्यामुळे ओसाडी येते, पवित्रस्थानाचे समर्पण आणि याहवेहच्या लोकांना पायदळी तुडविले जाणे हे दाखविले आहे?” \p \v 14 तो मला म्हणाला, “यासाठी 2,300 संध्याकाळ आणि सकाळ लागतील; नंतर पवित्रस्थान शुद्ध करण्यात येईल.” \s1 दृष्टान्ताचा उलगडा \p \v 15 मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला. \v 16 आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.” \p \v 17 जिथे मी उभा होतो त्या जागेजवळ तो आला, तेव्हा मला धडकी भरली व मी जमिनीवर पालथा पडलो. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हे दृष्टान्त शेवटच्या काळाशी संबंधित आहे हे समजून घे.” \p \v 18 तो माझ्याशी बोलत असतानाच मी जमिनीकडे तोंड करून गाढ झोपी गेलो. तेव्हा त्याने स्पर्श करून मला जागे केले व मला माझ्या पायांवर उभे केले. \p \v 19 तो म्हणाला: “क्रोधाच्या अखेरच्या समयात काय घडणार आहे हे मी तुला सांगणार आहे, कारण हा दृष्टान्त नेमलेल्या काळाच्या समाप्तीच्या संबंधी आहे. \v 20 जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत. \v 21 तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय. \v 22 तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्‍या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल. \p \v 23 “त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्‍न समजणारा तज्ञ असेल. \v 24 त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल. \v 25 तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही. \p \v 26 “संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्‍या भविष्यकाळाशी संबंधित आहे.” \p \v 27 मग मी दानीएल, बेशुद्ध झालो आणि पुढेही कित्येक दिवस आजारी होतो. पुढे मी उभा झालो आणि राजाचा कारभार पाहू लागलो. परंतु या दृष्टान्तामुळे मी विस्मित झालो, माझे अंतःकरण फार अस्वस्थ झाले; ते समजण्यापलीकडे होते. \c 9 \s1 दानीएलची प्रार्थना \p \v 1 अहश्वेरोशचा पुत्र दारयावेशच्या कारकिर्दीचे ते पहिलेच वर्ष होते. दारयावेश हा मेदिया वंशातील होता, तो खाल्डियन राज्यावर राजा करण्यात आला होता; \v 2 त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील. \v 3 तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली. \p \v 4 याहवेह माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि पापे कबूल केली: \pm “हे याहवेह, महान व प्रतापी परमेश्वरा, तुमच्यावर प्रीती करणार्‍यांना आणि तुमच्या आज्ञा पाळणार्‍यांकरिता तुम्ही केलेला तुमच्या प्रीतीचा करार पाळता, \v 5 परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत. \v 6 आम्ही तुमचे सेवक संदेष्टे जे तुमच्या नावाने आमचे राजे, आमचे राजपुत्र आणि आमचे पूर्वज आणि देशातील सर्व लोकांना तुमच्या नावाने संदेश देत असत, त्यांचे आम्ही ऐकले नाही. \pm \v 7 “हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले. \v 8 हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. \v 9 जरी आम्ही त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली, तरीही याहवेह आमचे परमेश्वर दयाळू आणि क्षमा करणारे आहेत; \v 10 आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांनी आपल्या सेवक संदेष्ट्यांच्या मार्फत दिलेले नियम आम्ही पाळले नाही. \v 11 सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. \pm “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. \v 12 आमच्यावर मोठी संकटे आणून तुम्ही आम्हाला आणि आमच्या अधिपतींविरुद्ध दिलेले वचन पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वर्गाच्या खाली असे काहीही झाले नाही, जसे यरुशलेमसोबत करण्यात आले. \v 13 मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही. \v 14 म्हणूनच याहवेहने कोणताही संकोच बाळगता आमच्यावर संकटे पाठविली, कारण याहवेह आमचे परमेश्वर जे काही करतात त्यामध्ये ते नीतिमान आहेत; तरीही आम्ही त्यांच्या आज्ञा पाळल्या नाहीत. \pm \v 15 “आणि आता याहवेह आमच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या महान हातांनी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आपल्या नावाची महिमा प्रस्थापित केली, जी आजपर्यंत आहे. आम्ही पाप केले आणि आम्ही चूक केली. \v 16 हे प्रभू, तुमच्या पूर्ण न्यायकृत्यांप्रमाणे तुमच्या यरुशलेम नगरांवरून, तुमच्या पवित्र डोंगरावरील तुझ्या विश्वसनीय करुणेमुळे यरुशलेमवरील, तुझ्या स्वतःच्या नगरीवरील, तुझ्या पवित्र डोंगरावरील, तुमचा क्रोध आणि राग दूर करा. कारण आमच्या पातकांमुळे आणि आमच्या पूर्वजांच्या अपराधांमुळे यरुशलेम आणि तुमचे लोक सभोवतालच्या सर्वांना निंदा असे झालो आहोत. \pm \v 17 “आता हे आमच्या परमेश्वरा, आपल्या दासाची प्रार्थना आणि विनवणी ऐका. याहवेह, उजाड झालेल्या तुमच्या पवित्रस्थानावर तुमचे मुखतेज पडू द्या. \v 18 हे आमच्या परमेश्वरा कान द्या आणि ऐका; आपले डोळे उघडा आणि ज्या नगरास तुमचे नाव दिले आहे ते कसे उद्ध्वस्त झाले आहे ते पाहा. आम्ही नीतिमान आहोत म्हणून विनवणी करीत आहोत असे नाही, परंतु तुमची दया विपुल आहे. \v 19 हे याहवेह, ऐका! हे याहवेह, क्षमा करा! हे याहवेह, ऐका आणि कृती करा. अहो माझ्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या स्वतःकरिता विलंब करू नका, कारण तुमच्या नगराला आणि तुमच्या लोकांना तुमचे नाव दिले आहे.” \s1 सत्तर “सप्तके” \p \v 20 जेव्हा मी माझे पाप आणि आपल्या इस्राएली लोकांचे पाप कबूल करीत बोलत आणि प्रार्थना करीत होतो आणि याहवेह माझ्या परमेश्वर यांची त्यांच्या पवित्र डोंगरासाठी प्रार्थना करीत होतो; \v 21 जेव्हा मी प्रार्थना करीतच होतो, गब्रीएल ज्याला मी आधीच्या दृष्टान्तात पाहिले होते, संध्याकाळच्या अर्पणासमयी माझ्याकडे आला; \v 22 त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे. \v 23 ज्या क्षणाला तू प्रार्थना करण्यास सुरुवात केलीस, त्याच क्षणाला एक आज्ञा देण्यात आली, ती काय आहे हे तुला सांगण्यासाठीच मी आलो आहे. कारण तू अतिशय प्रिय आहेस. म्हणून या गोष्टींचा विचार कर आणि दृष्टान्त नीट समजून घे: \p \v 24 “तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’\f + \fr 9:24 \fr*\ft किंवा \ft*\fqa सप्तके\fqa*\f* निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा. \p \v 25 “हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल, \v 26 बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे. \v 27 तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.” \c 10 \s1 दानीएलला झालेला एका मनुष्याचा दृष्टान्त \p \v 1 पर्शियाचा राजा कोरेश\f + \fr 10:1 \fr*\ft किंवा \ft*\fqa सायप्रस\fqa*\f* च्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असे म्हटले जाते) एक प्रकटीकरण झाले. तो संदेश खरा असून त्याचा संबंध मोठ्या युद्धाशी होता. संदेशाचा समज दृष्टान्ताद्वारे त्याच्याकडे आला. \p \v 2 त्यावेळेस मी, दानीएल, तीन आठवडे शोक करीत होतो. \v 3 मी माझे आवडते भोजन केले नाही; मी मांस खाल्ले नाही वा द्राक्षारस आपल्या ओठाला लावले नाही; तीन आठवडे पूर्ण होईपर्यंत मी तेलाचा अभ्यंगसुद्धा केले नाही. \p \v 4 पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदी फरातच्या तीरावर उभा होतो, \v 5 तेव्हा मी वर पाहिले आणि एक तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेला उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा पुरुष उभा होता. \v 6 त्याची त्वचा तेजस्वी होती, त्याचा चेहरा विजा चमकाव्यात तसा लखलखत होता. त्याचे डोळे अग्नीच्या ज्योतीसारखे होते. त्यांचे बाहू आणि पाय उज्ज्वल कास्यासारखे चमकत होते आणि त्याची वाणी फार मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखी प्रचंड होती. \p \v 7 हा दृष्टान्त केवळ मला, दानीएललाच दिसला; जे माझ्याबरोबर होते, त्यांना तो दिसला नाही, परंतु त्यांना अतिशय भीतीने ग्रासले व लपण्यासाठी ते पळून गेले. \v 8 मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो. \v 9 नंतर मी त्याला बोलताना ऐकले आणि मी जमिनीवर पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली. \p \v 10 परंतु एका हाताने त्याने मला स्पर्श केला आणि माझ्या थरथर कापत असणार्‍या मला हातांवर व गुडघ्यांवर ठेवले. \v 11 त्याने म्हटले, “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी जी काही वचने तुला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि नीट उभा राहा, कारण मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे.” आणि जेव्हा त्याने हे म्हटले, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. \p \v 12 तो पुढे म्हणाला, “दानीएला, भिऊ नकोस. कारण ज्या पहिल्या दिवशी तू समजून घेण्यास आणि स्वतःला आपल्या परमेश्वरासमोर नम्र करण्यास मन लावलेस, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आहे आणि आणि मी त्यांना प्रतिसाद म्हणून आलो आहे. \v 13 परंतु पर्शिया राज्याच्या राजपुत्राने माझी वाट एकवीस दिवस अडविली. नंतर मिखाएल, स्वर्गातील राजपुत्रांपैकी एक, माझ्या साहाय्यासाठी आला, कारण पर्शियाच्या राजाकडे मला अडविण्यात आले होते. \v 14 आता मी येथे भविष्यात तुझ्या लोकांसोबत काय होणार आहे ते समजविण्यासाठी आलो आहे, कारण हा दृष्टान्त पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.” \p \v 15 तो माझ्यासोबत हे बोलत असता, मी माझे तोंड जमिनीकडे केले आणि मी काही बोलू शकलो नाही. \v 16 तेव्हा कोणीतरी जो मानवासारखा दिसणाऱ्याने\f + \fr 10:16 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa मानवी हातासारखे दिसणारे असे काही\fqa*\f* माझ्या ओठांना स्पर्श केला आणि मी माझे मुख उघडले आणि मी बोलू लागलो. जो माझ्यापुढे उभा होता त्याला म्हटले, “प्रभू या दृष्टान्तामुळे मी मनोवेदनांनी ग्रस्त झालो आहे; आणि माझ्यात काही बळ उरले नाही. \v 17 माझ्या प्रभू, मी तुमचा सेवक, मी तुमच्यासोबत कसे बोलू शकतो? माझी शक्ती नष्ट झाली आहे. मला श्वासही घेववत नाही.” \p \v 18 तेव्हा मानवासारख्या दिसणार्‍या पुरुषाने मला पुन्हा स्पर्श केला आणि मला शक्ती दिली. \v 19 “भिऊ नको, तू फार परमप्रिय आहेस,” तो म्हणाला. “तुला शांती लाभो! आता बलवान हो; बलवान हो!” \p जेव्हा त्याने हे म्हटले तेव्हा मला सामर्थ्य आले आणि मी त्याला म्हटले, “माझ्या प्रभू बोला, कारण तुम्ही मला सामर्थ्य दिले आहे.” \p \v 20 तेव्हा तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? फार लवकर, मी पर्शियाच्या राजपुत्राशी लढायला परत येईन आणि मी निघून गेल्यावर ग्रीसचा राजपुत्र येईल; \v 21 परंतु सत्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते मी तुला प्रथम सांगतो. (तुमचा राजपुत्र मिखाएलाशिवाय त्यांच्याविरुद्ध माझी मदत करणारा कोणीही नाही. \c 11 \nb \v 1 मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.) \s1 दक्षिणेचा राजा आणि उत्तरेचा राजा \p \v 2 “आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्‍या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल. \v 3 तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल. \v 4 त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल. \p \v 5 “दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल. \v 6 काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती\f + \fr 11:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa संतती\fqa*\f* टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील. \p \v 7 “तिच्या कुळातील एकाचा उदय होईल जो तिची जागा घेईल. तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करेल आणि त्याच्या किल्ल्यात प्रवेश करेल; तो त्यांच्याशी युद्ध करेल आणि विजयी होईल. \v 8 तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल. \v 9 मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल. \v 10 त्याचे पुत्र युद्धाची तयारी करतील आणि प्रचंड सैन्य गोळा करतील. जे एका अप्रतिकार्य पुरासारखे पुढे जातील आणि युद्ध त्याच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातील. \p \v 11 “नंतर दक्षिणेचा राजा क्रोधिष्ट होऊन पुढे जाईल आणि उत्तरेच्या राजाशी युद्ध करेल, जो एक मोठे सैन्य उभारेल, परंतु त्याचा पराभव होईल. \v 12 जेव्हा सैन्याचा नाश होईल, तेव्हा दक्षिणेचा राजा गर्वाने धुंद होऊन जाईल आणि अनेक हजारो लोकांचा वध करेल, तरीही तो विजयी होणार नाही. \v 13 कारण उत्तरेचा राजा दुसरे सैन्य उभे करेल, जे त्याच्या आधीच्या सैन्यापेक्षा मोठे असेल; आणि बर्‍याच वर्षानंतर तो पूर्ण तयारीने मोठ्या सैन्यासह पुढे जाईल. \p \v 14 “त्या काळात अनेक दक्षिणेच्या राजाविरुद्ध उभे राहतील. तुझ्या स्वतःच्या लोकांपैकीच काही बंडखोर विचारांचे हिंसक लोकसुद्धा दृष्टान्त पूर्णतेसाठी विद्रोह करतील, परंतु ते अपयशी होतील. \v 15 नंतर उत्तरेचा राजा येईल आणि आणि वेढा बांधून तटबंदी असलेले शहर ताब्यात घेईल. दक्षिणेकडील सैन्यांना प्रतिकार करण्यास शक्ती राहणार नाही; त्यांच्या सर्वोत्तम सैन्यालाही सामना करण्याची ताकद नसेल. \v 16 आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल. \v 17 तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही. \v 18 यानंतर तो आपले लक्ष किनारपट्टीवरील शहरांकडे वळवील व त्यातील अनेक जिंकून घेईल. परंतु एक सेनापती त्याला प्रतिकार करेल व त्याला लाजिरवाणी माघार घ्यावी लागेल. \v 19 यानंतर तो आपल्या स्वतःच्या देशातील दुर्गाकडे मोर्चा फिरवेल, पण तो ठेच लागून पडेल व त्याचे अस्तित्व सापडणार नाही. \p \v 20 “त्याच्या जागी एकजण येईल, जो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवेल. काही वर्षात, त्याचा नाश केला जाईल, तरीही त्याचा नाश क्रोधाने किंवा युद्धात होणार नाही. \p \v 21 “त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल. \v 22 मग त्याच्यापुढे मोठ्या सैन्याचा नाश होईल; तो आणि कराराचा राजपुत्र दोघेही नष्ट होतील. \v 23 त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल. \v 24 जेव्हा श्रीमंतांना राज्य सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो त्यांच्यावर आक्रमण करेल आणि असे यश प्राप्त करेल की, त्याच्या पित्याने किंवा त्याच्या पित्याच्या पित्याने प्राप्त केले नसेल. तो धन, लूट आणि संपत्ती आपल्या अनुयायांमध्ये वाटून देईल. तो किल्ले पाडण्याचा कट रचेल—पण फक्त काही काळासाठी. \p \v 25 “प्रचंड सैन्य घेऊन तो दक्षिणेच्या राजाविरुद्ध आपले सामर्थ्य आणि धाडस उत्तेजित करेल. दक्षिणेचा राजाही प्रचंड आणि बलाढ्य सैन्यासह लढेल, परंतु त्याच्याविरुद्ध रचलेल्या कटामुळे तो तोंड देऊ शकणार नाही. \v 26 जे राजाच्या मेजावर भोजन करीत असे ते त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील; त्याच्या सैन्याचा नाश होईल आणि बरेच लोक युद्धात मारले जातील. \v 27 दोन्ही राजे मनात वाईट गोष्टी घेऊन एकाच मेजावर बसतील आणि एकमेकांशी खोटे बोलतील, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, कारण अंत ठरलेल्या वेळी होईल. \v 28 उत्तरेचा राजा पुष्कळ धनसंपत्ती घेऊन आपल्या देशात परत येईल, परंतु त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध राहील. त्याच्या मनाला वाटेल तसा तो वागेल आणि मग आपल्या देशात परत येईल. \p \v 29 “निर्धारित वेळी तो पुन्हा दक्षिणेवर आक्रमण करेल, परंतु पहिल्या दोन प्रसंगी झाले त्याहून अगदी वेगळे परिणाम आता होतील. \v 30 पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्‍यांवर कृपा दाखवेल. \p \v 31 “त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील. \v 32 जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील. \p \v 33 “जे ज्ञानी आहेत ते पुष्कळांना शिक्षण देतील, जरी काही काळासाठी, ते तलवारीने मारले जातील किंवा जाळले जातील किंवा पकडले जातील किंवा लुटले जातील. \v 34 जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील. \v 35 सुज्ञानी लोकांपैकी काही अडखळतील, यासाठी की शेवटच्या वेळेपर्यंत ते स्वच्छ, शुद्ध आणि निर्दोष राहतील, कारण अंत नेमलेल्या वेळी होईल. \s1 स्वतःला श्रेष्ठ करणारा राजा \p \v 36 “राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल. \v 37 तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांचा आदर करणार नाही, किंवा स्त्रियांच्या इच्छांची पर्वा करणार नाही, किंवा कोणत्याही दैवताचा आदर करणार नाही, परंतु तो स्वतःला त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरवेल. \v 38 पण त्यांच्याऐवजी तो दुर्गदैवतांचा सन्मान करेल; जे दैवत त्याच्या पूर्वजांना माहीत नव्हते त्यांचा सन्मान तो सोने, चांदी, मौल्यवान रत्ने आणि किमती देणग्या यांनी करेल. \v 39 तो या परकीय दैवतांच्या साहाय्याने मजबूत किल्ल्यांवर आक्रमण करेल आणि जे त्याचा राजा म्हणून स्वीकार करतील त्यांचा आदर करेल. तो त्यांना अनेक लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त करेल आणि बक्षीस म्हणून त्यांना जमीन वाटून देईल.\f + \fr 11:39 \fr*\ft किंवा \ft*\fqa प्रतिफळ म्हणून देईल\fqa*\f* \p \v 40 “अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्‍या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल. \v 41 तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील. \v 42 तो अनेक देशांवर आपल्या शक्तीचा विस्तार करेल; इजिप्त देश देखील सुटणार नाही. \v 43 तो इजिप्त देशामधील सोन्याच्या व चांदीच्या खजिन्यांवर व सर्व मौल्यवान वस्तूंवर ताबा मिळवेल, लिबिया व कूशी हे देश त्याचे दास होतील. \v 44 परंतु पूर्वेकडून व उत्तरेकडून येणार्‍या बातम्यांनी तो अस्वस्थ होईल आणि मोठ्या क्रोधाने पुष्कळांचा नाश आणि अनेकांना नाहीसे करण्यास बाहेर पडेल. \v 45 समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सुंदर पवित्र पर्वताजवळ तो आपला शाही तंबू उभारेल. तरीही त्याचा अंत होईल आणि त्याच्या साहाय्यासाठी कोणीही नसेल. \c 12 \s1 शेवटचा काळ \p \v 1 “त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल. \v 2 पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील. \v 3 जे सुज्ञ आहेत\f + \fr 12:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa जे ज्ञान वाटतात\fqa*\f* ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील. \v 4 पण हे दानीएला, गुंडाळीतील ही वचने गुप्त ठेव आणि गुंडाळी शेवटच्या काळासाठी मोहोरबंद करून ठेव. पुष्कळजण इकडून तिकडे फिरतील आणि ज्ञान वाढत जाईल.” \b \p \v 5 तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले. \v 6 त्यांच्यातील एकाने तागाची वस्त्रे नेसलेल्या व आता नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाला विचारले, “आधी सांगितलेल्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती काळ लागेल?” \p \v 7 तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय.\f + \fr 12:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa एक वर्ष, दोन वर्षे आणि अर्धे वर्ष\fqa*\f* शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.” \p \v 8 हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?” \p \v 9 त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे. \v 10 पुष्कळ लोक शुद्ध, निष्कलंक आणि निर्मळ केले जातील, परंतु दुष्ट आपल्या दुष्टपणातच मग्न राहतील; एकाही दुष्टाला या गोष्टी समजणार नाही, परंतु जे सुज्ञ आहेत त्यांनाच याचा अर्थ काय ते समजेल. \p \v 11 “रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील. \v 12 धन्य ते जे 1,335 दिवस वाट पाहत राहतील आणि शेवट पाहतील. \p \v 13 “आता तू शेवटपर्यंत तुझ्या मार्गाने जा. तू विसावा घेशील आणि तुझ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले तुझे संपूर्ण वतन घेण्यासाठी तू पुन्हा उठशील.”