\id COL - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h कलस्सैकरांस \toc1 पौलाचे कलस्सैकरांस पत्र \toc2 कलस्सैकरांस \toc3 कलस्सै \mt1 पौलाचे कलस्सैकरांस पत्र \c 1 \po \v 1 परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल व बंधू तीमथ्य यांच्याकडून, \po \v 2 कलस्सै शहरातील पवित्र लोक व ख्रिस्तामधील विश्वासू बंधू व भगिनीस, \po परमेश्वर आपले पिता\f + \fr 1:2 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa पिता आणि येशू ख्रिस्ताद्वारे\fqa*\f* यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो. \s1 उपकारस्तुती व प्रार्थना \p \v 3 आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करतो त्यावेळी परमेश्वराचे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे सतत आभार मानतो, \v 4 कारण ख्रिस्त येशूंमध्ये असलेला तुमचा विश्वास, आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले आहे. \v 5 विश्वास व प्रीती यामुळे निर्माण होणारी आशा जी स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवली आहे व ज्याबद्दल तुम्ही शुभवार्तेच्या सत्याचा संदेश आधी ऐकला आहे, \v 6 ज्या दिवसापासून तुम्ही ती शुभवार्ता ऐकली व परमेश्वराची कृपा तुम्हाला त्याद्वारे समजून आली व तुमच्यामध्येही ती वाढत आहे, त्याचप्रमाणे ती आता जगभर वृद्धिंगत होऊन फळ देत आहे. \v 7 आमचा अतिप्रिय सहकारी एपफ्रास याच्याकडून तुम्ही शिकला, तो आमच्यावतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक\f + \fr 1:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa गुलाम\fqa*\f* आहे. \v 8 पवित्र आत्म्यामध्ये तुमची प्रीती याबद्दलही त्यानेच आम्हाला सांगितले. \p \v 9 म्हणूनच आम्ही ज्या दिवशी तुमच्याविषयी ऐकले, तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही परमेश्वराजवळ सतत मागतो की त्यांनी तुम्हाला आत्म्याद्वारे दिले जाणारे सर्व ज्ञान व समज यांच्याद्वारे त्यांच्या इच्छेच्या ज्ञानाने भरावे; \v 10 त्यामुळे प्रभूला आवडेल असे योग्य जीवन तुम्ही जगावे व प्रत्येक बाबतीत त्यांना प्रसन्न करावे. चांगल्या कृत्यांद्वारे फळ देणारे, परमेश्वराच्या ज्ञानात वाढणारे, \v 11 धीर व सहनशक्ती ही अधिक रीतीने तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्वप्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि आनंदाने \v 12 त्या पित्याचे आभार मानणारे व्हा, ज्यांनी प्रकाशाच्या राज्यामध्ये असलेल्या पवित्र लोकांच्या वतनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पात्र ठरविले आहे. \v 13 कारण अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे, \v 14 त्यांच्यामध्ये आपणास खंडणी, अर्थात् पापांची क्षमा मिळाली आहे. \s1 परमेश्वराच्या पुत्राची सर्वश्रेष्ठता \p \v 15 त्यांचा पुत्र हे अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहेत, सर्व सृष्टीत प्रथम जन्मलेले आहेत. \v 16 त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी निर्माण झाल्या: स्वर्गातील गोष्टी आणि पृथ्वीवरील, दृश्य आणि अदृश्य, मग ती सिंहासने किंवा अधिपत्य किंवा शासक किंवा अधिकारी असोत, प्रत्येक गोष्ट त्यांच्याद्वारे व त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. \v 17 ते सर्व गोष्टींच्या पूर्वी आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी स्थिर राहतात, \v 18 आणि ते शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहेत, तेच प्रारंभ आहेत; आणि तेच मेलेल्यामधून प्रथम जन्मलेले आहेत, यासाठी की ते प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी सर्वश्रेष्ठ असावे. \v 19 कारण परमेश्वराची प्रसन्नता यामध्येच होती की, त्यांची सर्व परिपूर्णता येशूंच्या ठायी वसावी, \v 20 आणि त्यांच्या क्रूसावरील सांडलेल्या रक्ताद्वारे शांती प्रस्थापित करून स्वर्गात व पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा त्यांच्याद्वारे समेट व्हावा. \p \v 21 एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता. \v 22 परंतु आता त्यांनी ख्रिस्ताच्या भौतिक शरीराच्या मरणाद्वारे, तुमचा त्यांच्याशी समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक दोषरहित सादर करावे; \v 23 जर तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व त्या शुभवार्तेमधील आशेपासून तुम्ही ढळला नाही तर स्थिर राहाल. जी शुभवार्ता तुम्ही ऐकली होती आणि जिची घोषणा जाहीरपणे आकाशाखाली प्रत्येक व्यक्तीला करण्यात आली होती, मी पौल, त्या शुभवार्तेचा सेवक झालो आहे. \s1 पौलाचे मंडळीसाठी श्रम \p \v 24 आता तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंद आहे; कारण ख्रिस्ताने, त्यांचे शरीर म्हणजे मंडळी हिच्याकरिता सोसलेल्या दुःखातले जे अद्यापि अपूर्ण राहिलेले आहे, ते मी माझ्या शरीरामध्ये भरून काढत आहे. \v 25 तुम्हाला परमेश्वराचे वचन पूर्णतेने कळावे व ते सादर करता यावे म्हणून मी तिचा सेवक झालो असून माझी नेमणूक करण्यात आली आहे. \v 26 त्यांनी जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता ते प्रभूच्या लोकांना प्रकट केले आहे. \v 27 त्यांना परमेश्वराने यासाठी निवडले की, त्यांच्या गौरवाच्या संपत्तीचे रहस्य, म्हणजे तुमच्या गौरवाची आशा, जे ख्रिस्त तुम्हामध्ये आहेत, त्यांना गैरयहूद्यांमध्ये प्रकट करावे. \p \v 28 ते हेच आहे ज्याची आम्ही घोषणा करतो व बोध करून ज्ञानाने प्रत्येकास शिकवितो, यासाठी की प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये परिपक्व असे सादर करावे. \v 29 त्यांचे जे सामर्थ्य मजमध्ये अतिशय प्रबळरीत्या कार्य करते, त्यानुसार मी झटून परिश्रम करीत आहे. \c 2 \p \v 1 तुमच्यासाठी आणि लावदिकीया रहिवाशांसाठी, आणि ज्या सर्वांशी माझी वैयक्तिक भेट झाली नाही अशांसाठी, मी किती झटून श्रम करीत आहे हे तुम्हाला समजावे. \v 2 माझा उद्देश हाच आहे की त्यांच्या अंतःकरणास उत्तेजन मिळून ते प्रेमाने बांधले जावे, आणि त्यांना विपुलतेने पूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी की परमेश्वराची गुप्त योजना ख्रिस्त हे त्यांना समजावे, \v 3 आणि त्यांच्यामधेच सर्व बुद्धीची व ज्ञानाची भांडारे गुप्त ठेवलेली आहेत. \v 4 हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की प्रलोभन देणार्‍या भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये. \v 5 कारण जरी मी शरीराने दूर असलो, तरी आत्म्याने तुम्हाजवळ हजर आहे. तुम्ही शिस्तबद्ध आहात व ख्रिस्तावर तुमचा दृढविश्वास आहे, यात मी आनंद मानतो. \s1 ख्रिस्तामध्ये आत्मिक पूर्णता \p \v 6 तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा. \v 7 त्यांच्यामध्ये मुळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतीने भरून वाहणारे असा. \p \v 8 हे लक्षात असू द्या की पोकळ व फसवे तत्वज्ञान जे ख्रिस्तावर नव्हे तर मानवी परंपरा आणि ऐहिक तत्वांवर\f + \fr 2:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa मूलभूत धार्मिक तत्वावर\fqa*\f* आधारित आहे, याद्वारे कोणी तुम्हाला बंधनात पाडू नये म्हणून जपा. \p \v 9 कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सर्व परिपूर्णता शरीररूपाने राहते; \v 10 आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण केलेले आहात. ते सर्व सामर्थ्य आणि अधिकार यांचे मस्तक आहेत. \v 11 त्यांच्यामध्ये तुमची सुंता झाली आहे, मानवी हाताने केलेली नव्हे तर, ख्रिस्ताद्वारे तुमची जी सुंता झाली आहे त्याद्वारे तुमचा दैहिक पापी मूळस्वभाव काढून टाकण्यात आला आहे. \v 12 कारण तुम्ही बाप्तिस्म्यामध्ये त्यांच्यासह पुरला गेलात व ज्यांना त्यांनी मरणातून उठविले यांच्याबरोबर तुम्हीही परमेश्वराच्या कृतीवरील विश्वासाद्वारे उठविण्यात आले आहात. \p \v 13 जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली. \v 14 आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले, \v 15 आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला. \s1 मानवी नियमांपासून मुक्त \p \v 16 तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका. \v 17 हे सर्व केवळ येणार्‍या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते. \v 18 जो कोणी व्यर्थ नम्रतेचा देखावा करण्यात संतोष पावतो आणि देवदूतांची उपासना करतो, त्यांनी तुम्हाला अपात्र ठरवू नये. असा मनुष्य पाहिलेल्या गोष्टींचे विस्तारपूर्वक वर्णन करतो आणि दैहिक विचारांनी, आत्मिक नसलेल्या हृदयाने उगीचच फुगून जातो. \v 19 त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते. \p \v 20 तुम्ही ख्रिस्ताबरोबर जगाच्या प्राथमिक तत्वज्ञानास मरण पावलेले आहात, तरी देखील तुम्ही जणू काय जगाशी जोडलेले आहात व त्याच्या नियमांच्या अधीन आहात. \v 21 “हात लावू नको! चव घेऊ नको! स्पर्श करू नको!” \v 22 हे नियम मानवी शिकवण व आज्ञा यावर आधारित आहेत, ते वारंवार उपयोगात आणल्यामुळे नष्ट होणे स्वाभाविक आहे. \v 23 खरोखर या नियमांना ज्ञानाचा देखावा आहे, स्वनियमाने नेमलेली उपासना, खोटी नम्रता आणि देहाला कठोर कष्ट देणे या गोष्टी आहेत. परंतु दैहिक वासना नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचा काडी इतकाही उपयोग होत नाही. \c 3 \s1 ख्रिस्तामध्ये जिवंत असलेल्यांसारखे जगणे \p \v 1 यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा. \v 2 तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. \v 3 कारण तुम्ही मृत असून, आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे. \v 4 ख्रिस्त जे आपले\f + \fr 3:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa तुमचे\fqa*\f* जीवन आहेत, ते प्रकट होतील, तेव्हा तुम्हीही त्यांच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल. \p \v 5 म्हणून आपल्यातील ऐहिक स्वभाव कायमचा ठार करा: जसे लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, कामवासना, दुष्ट इच्छा आणि लोभ जी मूर्तिपूजा आहे. \v 6 यामुळे परमेश्वराचा क्रोध येणार आहे. \v 7 पूर्वी तुम्हीही याप्रकारे चालत होता व असेच जीवन जगत होता. \v 8 परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा. \v 9 एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे. \v 10 तुम्ही आता नवा मनुष्य धारण केला आहे, जो आपल्या उत्पन्न करणार्‍याच्या प्रतिमेमध्ये, ज्ञानामध्ये नवा होत आहे. \v 11 यामध्ये गैरयहूदी किंवा यहूदी, सुंती किंवा असुंती, बर्बर व स्कुथी, गुलाम किंवा स्वतंत्र असा फरक नाही, परंतु ख्रिस्तच सर्व आणि सर्वात आहेत. \p \v 12 यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा. \v 13 एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. \v 14 आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल. \p \v 15 ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा. \v 16 स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो. \v 17 आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा. \s1 ख्रिस्ती कुटुंबाकरिता नियम \p \v 18 पत्नींनो, जसे प्रभूला योग्य तसे तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. \p \v 19 पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी कठोरतेने वागू नका. \p \v 20 लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो. \p \v 21 वडिलांनो,\f + \fr 3:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa आईवडिलांनो\fqa*\f* तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल. \p \v 22 दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांचे प्रत्येक गोष्टीत आज्ञापालन करा, केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून नाही, तर सत्य मनाने प्रभूचे भय बाळगून करा. \v 23 जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा. \v 24 हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभूपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात. \v 25 अन्याय करणार्‍यास त्याच्या अन्यायाचे प्रतिफळ मिळेल, पक्षपात होणार नाही. \c 4 \p \v 1 धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे. \s1 पुढील सूचना \p \v 2 जागृत राहून आणि उपकारस्तुतीसह प्रार्थनेत तत्पर राहा. \v 3 ख्रिस्ताच्या रहस्याची घोषणा आम्हाला करता यावी याकरिता परमेश्वराने आमच्या संदेशासाठी दार उघडावे म्हणूनही प्रार्थना करा. त्याचकरिता मी या बंधनात आहे. \v 4 ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा. \v 5 बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. \v 6 तुमचे संभाषण सर्वदा कृपेने भरलेले, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळेल. \b \s1 अखेरच्या शुभेच्छा \p \v 7 तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी\f + \fr 4:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa गुलाम\fqa*\f* आहे. \v 8 मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे. \v 9 विश्वासू व अतिप्रिय बंधू अनेसिम, तुम्हामधील एक, यालाही मी तुम्हाकडे पाठवित आहे. तो व तुखिक तुम्हाला येथील सर्व अद्यावत बातम्या देतील. \b \p \v 10 माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा. \p \v 11 येशू म्हटलेला यूस्त देखील आपली शुभेच्छा पाठवित आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी हेच तेवढे यहूदी येथे माझे सहकारी आहेत आणि ते माझ्या सांत्वनाचे कारण झाले आहेत. \p \v 12 जो तुमच्यातील एक आणि ख्रिस्त येशूंचा दास, एपफ्रास, तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. तो तुमच्यासाठी नेहमी झटून प्रार्थना करून परमेश्वराजवळ मागतो, की परमेश्वराच्या इच्छेमध्ये तुम्ही परिपक्व व पूर्ण खात्री झालेले असे स्थिर उभे राहावे. \v 13 मी साक्ष देतो की, त्याने तुमच्यासाठी आणि लावदिकीया व हिरापोलिस येथील लोकांसाठी फार श्रम केले आहेत. \p \v 14 प्रिय वैद्य लूक आणि देमास आपली शुभेच्छा पाठवित आहेत. \p \v 15 लावदिकीया येथील विश्वासणार्‍या बंधुजनांस, नुंफा व तिच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या शुभेच्छा सांगा. \b \p \v 16 तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे. \b \p \v 17 अर्खिप्पाला सांगा, “प्रभूमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.” \b \p \v 18 मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो.