\id AMO - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h आमोस \toc1 आमोसाची भविष्यवाणी \toc2 आमोस \toc3 आमो \mt1 आमोसाची भविष्यवाणी \c 1 \p \v 1 तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश\f + \fr 1:1 \fr*\fq योआश \fq*\ft किंवा \ft*\fqa येहोआश\fqa*\f* चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे. \b \b \p \v 2 त्याने म्हटले: \q1 “याहवेह सीयोनातून गर्जना करतात \q2 आणि यरुशलेमातून गडगडाट करतात; \q1 मेंढपाळांची कुरणे सुकून जातात, \q2 आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.” \s1 इस्राएलच्या शेजाऱ्यांचा न्याय \p \v 3 याहवेह असे म्हणतात: \q1 “दिमिष्कच्या तीन नव्हे \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. \q1 कारण तिने गिलआदला \q2 मळणी करण्याच्या लोखंडी काट्यांनी मळले आहे, \q1 \v 4 म्हणून मी हजाएलच्या घरावर अग्नी पाठवेन \q2 व बेन-हदादच्या किल्ल्याला भस्म करेन. \q1 \v 5 दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन; \q2 आणि आवेन\f + \fr 1:5 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa क्रूर\fqa*\f* खोर्‍यातील राजा\f + \fr 1:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa खोर्‍यातील रहिवासी\fqa*\f* \q1 आणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन. \q2 अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.” \q2 याहवेह असे म्हणतात. \p \v 6 याहवेह असे म्हणतात: \q1 “गाझाच्या तीन नव्हे \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. \q1 कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले \q2 आणि त्यांना एदोमला विकले, \q1 \v 7 म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेन \q2 आणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन. \q1 \v 8 मी अश्दोदच्या राजाचा \q2 आणि अष्कलोनचा राजदंड धरणार्‍याचा नाश करेन. \q1 शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाही \q2 तोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,” \q2 असे सार्वभौम याहवेह म्हणतात. \p \v 9 याहवेह असे म्हणतात: \q1 “सोरच्या तीन नव्हे \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. \q1 कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले \q2 आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे. \q1 \v 10 म्हणून मी सोरच्या तटांवर अग्नी पाठवेन \q2 आणि तिच्या किल्ल्यांना भस्म करेन.” \p \v 11 याहवेह असे म्हणतात: \q1 “एदोमच्या तीन नव्हे \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. \q1 कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला \q2 आणि देशातील स्त्रियांचा वध केला, \q1 कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, \q2 आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला, \q1 \v 12 म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन \q2 आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.” \p \v 13 याहवेह असे म्हणतात, \q1 “अम्मोनच्या तीन नाही \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. \q1 कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठी \q2 गिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले, \q1 \v 14 म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेन \q2 आणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील. \q1 महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावा \q2 तसा भयानक रणगर्जना होतील; \q1 \v 15 आणि तिचा राजा\f + \fr 1:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa मोलेख राजा\fqa*\f* \q2 आणि राजाचे अधिपती बरोबरच बंदिवासात जातील.” \q2 याहवेहने म्हटले. \c 2 \p \v 1 याहवेह असे म्हणतात, \q1 “मोआबच्या तीन नव्हे \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. \q1 कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून \q2 त्याची राख केली आहे. \q1 \v 2 मी मोआबावर अग्नी पाठवेन \q2 तो करीयोथच्या किल्ल्याला\f + \fr 2:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa तिच्या शहरांना\fqa*\f* भस्म करेन. \q1 युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब \q2 प्रचंड नाशाने खाली जाईल. \q1 \v 3 मी तिच्या शासकाचा नाश करेन \q2 आणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्‍यांना मारून टाकेन.” \q2 असे याहवेह म्हणतात. \p \v 4 याहवेह असे म्हणतात: \q1 “यहूदीयाच्या तीन नव्हे \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही. \q1 कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे \q2 व त्यांचे विधी पाळले नाही. \q1 ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते \q2 त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी\f + \fr 2:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa खोटेपणाने\fqa*\f* त्यांची दिशाभूल केली होती, \q1 \v 5 म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेन \q2 आणि यरुशलेमचे किल्ले भस्म करेन.” \s1 इस्राएलचा न्याय \p \v 6 याहवेह असे म्हणतात, \q1 “इस्राएलला तीन नव्हे \q2 तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. \q1 चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, \q2 आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात. \q1 \v 7 ते गरिबांच्या डोक्याला \q2 भूमिवरील धुळीत पायदळी तुडवितात \q2 आणि दीनदुबळ्यांचा न्याय करीत नाही. \q1 मुलगा व पिता एकाच तरुणीकडे जाऊन \q2 माझ्या पवित्र नामाला काळिमा लावतात. \q1 \v 8 प्रत्येक वेदीजवळ \q2 गहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतात \q1 आणि आपल्या दैवतांच्या घरात \q2 दंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात. \b \q1 \v 9 “जरी ते गंधसरूंसारखे उंच \q2 व एलावृक्षांसारखे मजबूत होते, \q2 तरी मी त्यांच्यासमोर अमोरी लोकांचा संहार केला. \q1 मी वरून त्यांचे फळ \q2 व खालून त्यांचे मूळ नासविले. \q1 \v 10 अमोर्‍यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून \q2 मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले \q2 व चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले. \b \q1 \v 11 “तुमच्या मुलांपैकी काहींना संदेष्टे म्हणून \q2 आणि तरुणांतील काहींना नाजीर होण्याकरिता वाढवले आहे. \q1 अहो इस्राएलच्या लोकांनो, हे खरे नाही काय?” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \q1 \v 12 “पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यास \q2 आणि संदेष्ट्यांना भविष्य न सांगण्याची आज्ञा दिली. \b \q1 \v 13 “म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते, \q2 तसे मी तुम्हाला दाबेन आणि तुम्ही कण्हाल. \q1 \v 14 चपळ निसटून जाणार नाहीत, \q2 शक्तिमानाला आपले सामर्थ्य लावता येणार नाही, \q2 आणि वीराला आपला जीव वाचविता येणार नाही. \q1 \v 15 धनुर्धार्‍याला आपल्या भूमीवर उभे राहता येणार नाही, \q2 अत्यंत वेगाने धावणारा सैनिक सुटणार नाही, \q2 आणि घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही. \q1 \v 16 वीरांपैकी महाधैर्यवानही \q2 त्या दिवशी वस्त्रे टाकून पळतील.” \q2 याहवेह असे जाहीर करतात. \c 3 \s1 इस्राएलविरुद्ध साक्षीदार बोलाविण्यात येतात \p \v 1 इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे: \q1 \v 2 “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून \q2 मी फक्त तुझीच निवड केली आहे; \q1 म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल \q2 मी तुला शिक्षा करेन.” \b \q1 \v 3 दोन व्यक्ती एकमताचे झाल्यावाचून \q2 ते सोबत चालू शकतील काय? \q1 \v 4 शिकार नसली तर \q2 सिंह गर्जना करेन काय? \q1 काही धरल्याशिवाय \q2 तो त्याच्या गुहेत गुरगुरणार काय? \q1 \v 5 अमिष नसताना पक्षी \q2 भूमीवरील सापळ्यात अडकतो काय? \q1 जर सापळ्यात काही अडकले नसेल \q2 तर ते भूमीवरून उडेल काय? \q1 \v 6 नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, \q2 तेव्हा लोक घाबरत नाही काय? \q1 शहरात विपत्ती आली तर, \q2 ती याहवेहने घडवून आणली नाही काय? \b \q1 \v 7 सार्वभौम याहवेह \q2 आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय \q2 निश्चितच काहीही करणार नाही. \b \q1 \v 8 सिंहाने गर्जना केली आहे— \q2 कोण भिणार नाही? \q1 सार्वभौम याहवेहने बोलले आहेत; \q2 तर मग संदेश दिल्यावाचून कोणी राहील काय? \b \q1 \v 9 अश्दोदच्या गडांना \q2 आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा: \q1 “शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा; \q2 तिच्यामधील गोंधळ \q2 आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.” \b \q1 \v 10 “जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, \q2 “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल \q2 त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.” \p \v 11 यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात, \q1 “एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल, \q2 तो तुमचे किल्ले कोसळून टाकेल \q2 आणि तुमचे गड लुटेल.” \p \v 12 याहवेह असे म्हणतात: \q1 “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून \q2 केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो, \q1 तसे शोमरोनातील इस्राएल लोक \q2 जे पलंगाच्या शीरपट्टीने \q2 आणि बिछान्यावरील\f + \fr 3:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa जे इस्राएली लोक शमरोनात बसून आहेत\fqa*\f* रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.” \p \v 13 “हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात: \q1 \v 14 “ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन, \q2 त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन; \q1 वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतील \q2 आणि ती जमिनीवर पडतील. \q1 \v 15 मी ग्रीष्मकालीनघर \q2 आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन; \q1 हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल \q2 भवने जमीनदोस्त होतील,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \c 4 \s1 इस्राएल परमेश्वराकडे परतले नाही \q1 \v 1 शोमरोनच्या डोंगरावर राहणार्‍या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, \q2 तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता \q2 आणि आपल्या नवर्‍यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!” \q1 \v 2 सार्वभौम याहवेहने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन म्हटले आहे: \q2 “खचितच अशी वेळ येईल \q1 जेव्हा तुम्हाला आकड्यांनी आणि तुमच्यातील शिल्लक राहिलेल्यांना \q2 मासे धरण्याच्या गळांनी\f + \fr 4:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa माशांच्या टोपलीत\fqa*\f* ओढून नेतील. \q1 \v 3 तुमच्यातील प्रत्येक \q2 भिंतीच्या भगदाडातून सरळ निघून जाल. \q1 तुम्ही हर्मोनात\f + \fr 4:3 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa तू अत्याचार करणार्‍या पर्वता\fqa*\f* आपणाला टाकाल.” \q2 असे याहवेह म्हणतात. \q1 \v 4 “बेथेलास जा आणि पाप करा; \q2 गिलगालास जाऊन आणि अधिक पाप करा. \q1 रोज सकाळी आपली अर्पणे, \q2 दर तीन वर्षांनी\f + \fr 4:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa दिवसांनी\fqa*\f* आपला दशांश आणा. \q1 \v 5 उपकारस्तुती म्हणून खमिराची भाकरी जाळून टाका \q2 आणि तुमच्या स्वैच्छिक अर्पणांची फुशारकी मारा; \q1 इस्राएली लोकहो तुम्ही याविषयी बढाई मिरवा, \q2 कारण असेच करणे तुम्हाला आवडते.” \q2 असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 6 “मी तुम्हाला प्रत्येक शहरात उपाशी पोटी ठेवले \q2 आणि प्रत्येक नगरात भाकरीची कमतरता केली, \q1 तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 7 “हंगामाच्या आधी तीन महिने \q2 मी पाऊस रोखून धरला. \q1 मी एका नगरावर पाऊस पाडला, \q2 पण दुसर्‍यावर पाडला नाही. \q1 एका शेतावर पाऊस पडला; \q2 दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले. \q1 \v 8 पाण्यासाठी लोक नगरोनगरी भटकले \q2 परंतु त्यांना पिण्यास पुरेसे मिळाले नाही, \q1 तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 9 “मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा \q2 आणि भेरड हे रोग पाठविले; \q1 टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, \q2 आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 10 “इजिप्तमध्ये पाठविल्या \q2 तशा पीडा मी तुमच्यामध्ये पाठविल्या. \q1 मी तुमच्या तरुणांना \q2 तुमच्या लुटलेल्या घोड्यांसहित तलवारीने मारून टाकले. \q1 तुमच्या छावणीतील दुर्गंध तुमच्या नाकात भरला, \q2 तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 11 “तुमच्यातील काहींचा नाश असा केला \q2 जसा मी, परमेश्वराने, सदोम आणि गमोराचा केला. \q1 तुम्ही अग्नीच्या भट्टीतून ओढून काढलेल्या जळत्या काठीप्रमाणे होता, \q2 तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” \q2 असे याहवेह जाहीर करतात. \b \q1 \v 12 “म्हणून हे इस्राएला, मी तझ्यासोबत असेच करणार आहे, \q2 कारण मी तुझ्याशी असे करणार आहे, \q2 म्हणून तुझ्या परमेश्वराला भेटण्यास तयार हो.” \b \q1 \v 13 ज्यांनी पर्वतांची रचना केली, \q2 ज्यांनी वारे निर्माण केले, \q2 आणि जे आपले विचार मानवजातीला प्रकट करतात, \q1 जे प्रभात समयाला अंधकारात बदलतात \q2 आणि पर्वताला आपल्या पायाखाली तुडवितात; \q2 याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, हे त्यांचे नाव आहे. \c 5 \s1 विलापगीत आणि पश्चात्तापासाठी आव्हान \p \v 1 हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो: \q1 \v 2 “इस्राएलची कुमारी पडली आहे, \q2 ती पुन्हा कधीही उठणार नाही, \q1 तिच्या स्वतःच्या भूमीत उजाड आहे, \q2 तिला उठविणारा कोणीही नाही.” \p \v 3 कारण सार्वभौम याहवेह इस्राएलास असे म्हणतात: \q1 “तुमच्या शहरातून एक हजार शूर निघतात, \q2 त्यातील शंभरच उरतील; \q1 तुमच्या शहरातून शंभर निघतात, \q2 त्यातील दहाच उरतील.” \p \v 4 याहवेह इस्राएलाच्या लोकांना असे म्हणतात, \q1 “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. \q2 \v 5 बेथेलचा\f + \fr 5:5 \fr*\fq बेथेल \fq*\ft बेथ-आवेनचा संकेत\ft*\f* शोध करू नका, \q1 गिलगाल येथे जाऊ नका, \q2 किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका. \q1 कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल, \q2 आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल” \q1 \v 6 याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल, \q2 नाहीतर याहवेह योसेफाच्या गोत्रावर अग्नीसारखे भडकतील; \q1 आणि त्याला भस्म करून टाकील, \q2 आणि बेथेलमध्ये त्याला विझवणारा कोणीही नसेल. \b \q1 \v 7 असे लोक आहेत जे न्यायाला कडूपणात बदलतात \q2 आणि नीतिमत्ता धुळीस मिळवितात. \b \q1 \v 8 ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले, \q2 जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात, \q2 आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात, \q1 जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात \q2 आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात— \q2 याहवेह, हे त्यांचे नाव आहे. \q1 \v 9 अंधारी आणणाऱ्या क्षणिक प्रकाशाने ते किल्ला उद्ध्वस्त करतात \q2 आणि तटबंदी असलेल्या शहराचा नाश करतात. \b \q1 \v 10 असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्‍यांचा द्वेष \q2 आणि सत्य बोलणार्‍यांचा तिरस्कार करतात. \b \q1 \v 11 तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. \q2 म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील \q1 तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, \q2 किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय \q1 जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला \q2 तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही. \q1 \v 12 कारण तुमचे अपराध किती अधिक \q2 आणि तुमची पातके किती घोर आहेत हे मला माहीत आहे. \b \q1 निरपराधांवर अत्याचार करून लाच घेतात \q2 व गरिबांना न्यायालयात न्याय मिळण्यापासून वंचित करतात असेही लोक आहेत. \q1 \v 13 अशा वेळी जे शहाणे आहेत ते मौन धरतात, \q2 कारण वेळ वाईट आहे. \b \q1 \v 14 वाईट नको, तर चांगले ते शोधा, \q2 म्हणजे तुम्ही जगाल. \q1 तुम्ही जसे ते म्हणतात त्याचप्रमाणे \q2 याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर तुमच्यासोबत असतील. \q1 \v 15 दुष्टाईचा द्वेष करा, चांगल्यावर प्रीती करा; \q2 न्यायालयात न्याय स्थापित करा. \q1 मग कदाचित याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर \q2 योसेफाच्या उरलेल्या लोकांवर दया करतील. \p \v 16 यास्तव प्रभू, याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर असे म्हणतात: \q1 “सर्व रस्त्यांवर विलाप होईल \q2 आणि प्रत्येक चौकात आक्रंदन होईल. \q1 तुमच्याबरोबर शोक करण्यासाठी शेतकर्‍यांनाही बोलाविले जाईल; \q2 रडण्यासाठी शोक करणार्‍यांना बोलाविले जाईल. \q1 \v 17 प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल, \q2 कारण मी तुमच्यामधून जाईन,” \q2 असे याहवेह म्हणतात. \s1 याहवेहचा दिवस \q1 \v 18 जे याहवेहच्या दिवसाची इच्छा बाळगतात \q2 त्यांच्या धिक्कार असो! \q1 तुम्ही याहवेहच्या दिवसाची इच्छा का बाळगता? \q2 कारण तो दिवस प्रकाशाचा नाही तर अंधाराचा असेल. \q1 \v 19 जसे काय एखादा मनुष्य सिंहापासून पळाला \q2 आणि त्याला अस्वलाने गाठले, \q1 किंवा जसे काय आपल्या घरात येऊन त्याने \q2 हात भिंतीला टेकविला \q2 आणि त्याला साप चावला. \q1 \v 20 याहवेहचा दिवस हा प्रकाशाचा नसून अंधकाराचा दिवस असेल; \q2 गडद अंधकार, प्रकाशाचा एकही किरण नसेल? \b \q1 \v 21 “मला तुमच्या धार्मिक उत्सवांचा तिरस्कार वाटतो; \q2 तुमच्या सभा माझ्यासाठी दुर्गंधीप्रमाणे आहेत. \q1 \v 22 तुमची गोऱ्ह्यांची होमार्पणे व उपकारस्तुतीची अर्पणे आणली तरीही \q2 मी स्वीकारणार नाही. \q1 तुमच्या उत्तम शांत्यर्पणामुळे \q2 मी संतुष्ट होणार नाही. \q1 \v 23 तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा! \q2 मी तुमच्या वीणांचे संगीत ऐकणार नाही. \q1 \v 24 परंतु न्याय नदीप्रमाणे \q2 व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहू द्या! \b \q1 \v 25 “अहो इस्राएल लोकहो, रानात असताना \q2 चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे आणली व होम केले काय? \q1 \v 26 तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा, \q2 तुमच्या काइवान\f + \fr 5:26 \fr*\fq काइवान \fq*\ft किंवा \ft*\fqa किय्यून\fqa*\f* मूर्तीची बैठक, \q2 तुमच्या दैवताचा तारा\f + \fr 5:26 \fr*\fq दैवताचा तारा \fq*\ft किंवा \ft*\fqa तुमचा राजा साक्कुथ आणि तुमचे दैवत रेफानचा तारा\fqa*\f* उंचाविला; \q2 जो तुम्ही तुमच्यासाठी बनविला. \q1 \v 27 म्हणून मी तुम्हाला, दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन,” \q2 असे याहवेह म्हणतात, ज्यांचे नाव सर्वसमर्थ परमेश्वर आहे. \c 6 \s1 ऐषोरामी इस्राएलचा धिक्कार \q1 \v 1 तुम्ही जे सीयोनेत आरामात राहता, \q2 आणि शोमरोनच्या पर्वतावर निश्चिंत असण्याचा विचार करता की \q1 तुम्ही जे राष्ट्रातील मुख्य लोक आहात, \q2 ज्यांच्याजवळ इस्राएलचे लोक येतात, त्या तुमचा धिक्कार असो! \q1 \v 2 कालनेह येथे जा आणि तिला पाहा; \q2 तिथून महान हमाथास जा, \q2 आणि तिथून खाली पलिष्ट्यांच्या गथ येथे जा. \q1 हे तुमच्या दोन राज्याहून अधिक उत्तम आहेत काय? \q2 त्यांचा देश तुमच्या देशाहून मोठा आहे काय? \q1 \v 3 तुम्ही विपत्तीचे दिवस बाजूला सारता, \q2 आणि दहशतीचे राज्य जवळ आणता. \q1 \v 4 तुम्ही हस्तिदंतांनी सजविलेल्या पलंगावर लोळता; \q2 आणि तुम्ही अंथरुणावर पडून राहतात. \q1 उत्तम कोकरे \q2 आणि चरबीयुक्त वासरे खाता. \q1 \v 5 तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता, \q2 आणि दावीदासारखे आहोत याची भ्रामक कल्पना करता. \q1 \v 6 तुम्ही वाट्या भरून द्राक्षारस पिता. \q2 उत्तम तेलांनी स्वतःला माखता, \q2 परंतु तुम्ही योसेफाच्या नाशाबद्दल दुःख करत नाही. \q1 \v 7 म्हणून तुम्ही प्रथम बंदिवासात जाल; \q2 आणि तुमची चैनबाजी आणि मौज मस्ती नाहीशी होईल. \s1 याहवेह इस्राएलाच्या गर्विष्ठपणाचा तिरस्कार करतात \p \v 8 सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात: \q1 “याकोबाच्या गर्वाचा मी तिरस्कार करतो \q2 आणि त्यांचे किल्ले मी घृणास्पद मानतो; \q1 मी या शहराला आणि तिच्यातील सर्वकाही \q2 शत्रूंच्या हाती देईन.” \p \v 9 जर एका घरात फक्त दहाच लोक उरले असले तरीही ते सर्व मरतील. \v 10 आणि मृतदेह जाळण्यासाठी\f + \fr 6:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa मृत व्यक्तीच्या सन्मानार्थ\fqa*\f* घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.” \q1 \v 11 कारण याहवेहने अशी आज्ञा दिली आहे, \q2 आणि ते मोठ्या घरांचे तुकडे तुकडे \q2 आणि लहान घरांना चक्काचूर करतील. \b \q1 \v 12 घोडे खडकाळ कडांवर पळतात काय? \q2 बैल घेऊन कोणी समुद्र नांगरतो काय? \q1 पण तुम्ही न्यायाला विषामध्ये \q2 आणि नीतिमत्तेच्या फळाला कडवटपणामध्ये बदलले आहे; \q1 \v 13 लो-देबारला\f + \fr 6:13 \fr*\fq लो-देबार \fq*\ft म्हणजे \ft*\fqa क्षुल्लक\fqa*\f* आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही आनंद मानता \q2 आणि म्हणता, “आम्ही स्वतःच्या बळाने करनाईम\f + \fr 6:13 \fr*\fq करनाईम \fq*\ft म्हणजे \ft*\fqa शिंग\fqa*\f* घेतला नाही काय?” \b \q1 \v 14 याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वर जाहीर करतात, \q2 “हे इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध एक राष्ट्र उठवेन, \q1 लेबो हमाथपासून अराबाच्या ओहोळापर्यंत \q2 ते तुझ्यावर जुलूम करेल.” \c 7 \s1 टोळधाड, अग्नी व ओळंबा \p \v 1 सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते. \v 2 जेव्हा त्यांनी जमीन साफ केली, तेव्हा मी मोठ्याने ओरडलो, “सार्वभौम याहवेह, क्षमा करा! याकोब कसा टिकू शकेल? तो फार लहान आहे!” \p \v 3 तेव्हा याहवेहचे मन द्रवले, \p “पुन्हा हे घडणार नाही,” याहवेह असे म्हणाले. \p \v 4 सार्वभौम याहवेहने हे मला दाखविले: सार्वभौम याहवेहने अग्नीला न्याय करण्यास बोलाविले; त्यांनी खोल समुद्र कोरडा केला आहे आणि त्यांनी भूमी गिळंकृत केली आहे. \v 5 तेव्हा मी म्हणालो, “अहो सार्वभौम याहवेह, मी तुम्हाला विनंती करतो, थांबा! याकोब कसा वाचेल? तो फार लहान आहे!” \p \v 6 मग याहवेहचे मन द्रवले. \p आणि सार्वभौम याहवेह म्हणाले, “हे देखील घडणार नाही.” \b \p \v 7 त्यांनी मला हे दाखविले: ओळंबा लावून बांधलेल्या एका भिंतीच्या जवळ, प्रभू हातात ओळंबा घेऊन उभे होते. \v 8 आणि याहवेहने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?” \p मी म्हणालो, “ओळंबा!” \p नंतर प्रभू म्हणाले, “पाहा मी माझे लोक इस्राएल यांच्यामध्ये ओळंबा धरणार आहे; यापुढे मी त्यांची गय करणार नाही. \q1 \v 9 “इसहाकाचे उच्च पूजास्थाने नाश करण्यात येतील \q2 आणि इस्राएलची पवित्रस्थाने पाडण्यात येतील; \q2 मी माझ्या तलवारीने यरोबोअमाच्या विरुद्ध उठेन.” \s1 आमोस आणि अमस्याह \p \v 10 तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत. \v 11 कारण आमोस असे म्हणत आहे: \q1 “ ‘यरोबोअम हा तलवारीने मरणार आहे, \q2 आणि इस्राएल खात्रीने, \q2 आपल्या भूमीवरून दूर बंदिवासात जाईल.’ ” \p \v 12 नंतर अमस्याह आमोसला म्हणाला, “हे संदेष्ट्या, येथून यहूदीया प्रांतात परत जा आणि तिथे जाऊन आपली भाकर कमव आणि तुझे संदेश तिथे सांगत राहा! \v 13 याच्यापुढे बेथेल येथे संदेश देऊ नकोस, कारण हे राजकीय भवन आहे आणि राज्याचे मंदिर आहे.” \p \v 14 आमोसने अमस्याहला उत्तर दिले, “मी तर संदेष्टा नाही आणि मी संदेष्ट्याचा पुत्रही नाही, मी तर मेंढपाळ आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो. \v 15 परंतु मी गुरांची राखण करीत असताना याहवेहने मला दूर नेले आणि मला म्हणाले, ‘जा, आणि माझ्या इस्राएली लोकांना संदेश सांग.’ \v 16 म्हणून आता तुम्ही याहवेहचे वचन ऐका, व तुम्ही म्हणतात, \q1 “ ‘इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस, \q2 आणि इसहाकाच्या घराण्याविरुद्ध प्रचार करणे थांबव.’ \p \v 17 “म्हणून याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘तुझी पत्नी शहरात वेश्या होईल, \q2 तुझे पुत्र व कन्या तलवारीने मरतील, \q1 तुझी जमीन मोजण्यात येईल आणि सूत्राने विभागली जाईल, \q2 आणि तू स्वत: अपवित्र देशात मरशील. \q1 इस्राएलचे लोक निश्चितच आपल्या \q2 देशातून दूर बंदिवासात गुलाम म्हणून जातील.’ ” \c 8 \s1 पिकलेल्या फळांची टोपली \p \v 1 सार्वभौम याहवेहने मला हे दाखविले: पिकलेल्या फळांनी भरलेली एक टोपली दाखविली. \v 2 “आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले. \p मी उत्तर दिले, “मला पिकलेल्या फळांची एक टोपली दिसते.” \p मग याहवेह मला म्हणाले, “माझ्या इस्राएली लोकांचा समय परिपक्व झाला आहे; मी त्यांची गय करणार नाही.” \p \v 3 सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन.\f + \fr 8:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa मंदिरात गीत गाणारे आकांत करतील\fqa*\f* सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!” \q1 \v 4 जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात \q2 आणि देशाच्या गरिबांना दूर लोटता, \p \v 5 असे म्हणता, \q1 “अमावस्या केव्हा निघून जाईल \q2 म्हणजे आम्ही धान्य विकू शकू? \q1 आणि शब्बाथ केव्हा निघून जाईल, \q2 म्हणजे आम्ही धान्याचे कोठार उघडू?” \q1 तराजूत लबाडी करून, \q2 लबाडीच्या मापाने, \q2 किंमत वाढवू. \q1 \v 6 म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना \q2 आणि पायतणाच्या एका जोडीसाठी गरजूंना विकत घेऊ, \q2 आणि गव्हाचा भुसाही विकायचा. \p \v 7 याकोबाचे वैभव असलेले याहवेह यांनी स्वतःची शपथ घेऊन सांगितले आहेः “मी त्यांनी जे केले ते कधीही विसरणार नाही! \q1 \v 8 “यामुळे पृथ्वी थरथर कापणार नाही काय, \q2 आणि तिच्यात राहणारे सर्व शोक करणार नाहीत काय? \q1 संपूर्ण पृथ्वी नाईल नदीसारखी उठेल; \q2 ती नील नदीप्रमाणे खवळेल \q2 आणि मग इजिप्तच्या नदीप्रमाणे बुडून जाईल. \p \v 9 “त्या दिवशी,” सार्वभौम याहवेह घोषणा करतात, \q1 “दुपारच्या वेळी मी सूर्यास्त करेन \q2 आणि भरदिवसा पृथ्वीला अंधकारमय करेन. \q1 \v 10 मी तुमचे धार्मिक उत्सव शोकामध्ये उलटवेन \q2 आणि तुमची सर्व गीते विलापात बदलून टाकीन. \q1 मी तुम्हा सर्वांना गोणपाट घालेन \q2 आणि तुमचे मुंडण करेन. \q1 मी तो काळ एकुलत्या एक मुलासाठी विलाप करण्यासारखा \q2 आणि त्याचा शेवट कडू दिवसासारखा करेन. \b \q1 \v 11 “असे दिवस येत आहेत,” सार्वभौम याहवेह घोषित करतात, \q2 “मी देशावर दुष्काळ आणेन— \q1 तो अन्नाचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान नव्हे, \q2 तर याहवेहचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पाडेन— \q1 \v 12 आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात \q2 समुद्रापासून समुद्रापर्यंत \q1 आणि उत्तरेपासून पूर्वेकडे भटकतील, \q2 पण त्यांना ते सापडणार नाही. \p \v 13 “त्या दिवसात \q1 “तहानेने व्याकूळ होऊन सुंदर कुमारी \q2 आणि उमदे तरुण निस्तेज होऊन जातील. \q1 \v 14 जे शोमरोनच्या पापाची शपथ घेतात; \q2 जे म्हणतात, ‘हे दान, तुझ्या दैवतेची शपथ’ \q2 किंवा ‘बेअर-शेबाच्या दैवतेची\f + \fr 8:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa मार्गाची\fqa*\f* शपथ,’— \q2 ते असे पडतील की पुन्हा कधीही उठणार नाहीत.” \c 9 \s1 इस्राएलचा नाश करण्यात येईल \p \v 1 मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि ते म्हणाले: \q1 “खांबांच्या वरच्या भागावर प्रहार करा \q2 म्हणजे उंबरठे हलतील. \q1 आणि ते सर्व लोकांच्या डोक्यावर खाली पाड; \q2 जे त्यातून वाचतील त्यांना मी तलवारीने मारून टाकीन. \q1 एक सुद्धा वाचणार नाही, \q2 कोणीही निसटणार नाही. \q1 \v 2 खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले, \q2 तरी तिथे जाऊन माझ्या हात त्यांना वर ओढून आणेन; \q1 वर चढत ते आकाशापर्यंत आले, \q2 तरी तिथूनही मी त्यांना खाली आणेन. \q1 \v 3 कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले, \q2 तरी मी त्यांची शिकार करून त्यांना पकडेन. \q1 ते महासागराच्या तळाशी माझ्या दृष्टिआड लपून बसले तरी, \q2 मी सर्पाला त्यांना चावा घेण्याची आज्ञा देईन. \q1 \v 4 जरी शत्रूंनी त्यांना कैद करून बंदिवासात नेले, \q2 तरी मी तलवारीला त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईन. \b \q1 “मी त्यांच्यावर माझी नजर ठेवेन \q2 ती तर हानीसाठी असणार भल्यासाठी नाही.” \b \q1 \v 5 प्रभू, सेनाधीश याहवेह— \q1 भूमीला स्पर्श करतात आणि ती विरघळून जाते, \q2 आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक शोक करतात. \q1 संपूर्ण देश नाईल नदीसारखा वर येतो \q2 आणि इजिप्तच्या नदीप्रमाणे खाली बुडतो; \q1 \v 6 ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात \q2 आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात; \q1 ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात \q2 आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात; \q2 याहवेह हे त्यांचे नाव आहे. \b \q1 \v 7 “तुम्ही इस्राएली लोक \q2 माझ्यासाठी कूशी लोकांसारखेच नाहीत काय?” \q2 असे याहवेह घोषित करतात. \q1 “मी इस्राएल लोकांना इजिप्त देशातून, \q2 पलिष्ट्यांना कफतोरातून \q2 आणि अरामी लोकांना कीर देशातून बाहेर काढले नाही काय? \b \q1 \v 8 “खचितच, सार्वभौम याहवेहची दृष्टी \q2 या पापी राज्यावर आहे. \q1 आणि मी त्यांचा \q2 पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नाश करेन; \q1 तरीसुद्धा मी याकोबाच्या संतानांचा \q2 कायमचा नाश करणार नाही,” \q2 असे याहवेह घोषित करतात. \q1 \v 9 “तर पाहा, मी आज्ञा करेन \q2 आणि जसे चाळणीने धान्य चाळावे \q2 त्याप्रमाणे इस्राएलला \q1 इतर राष्ट्रांनी चाळावे, \q2 पण त्याचा एक खडाही भूमीवर पडणार नाही. \q1 \v 10 माझ्या लोकांतील \q2 जे सर्व पापी म्हणतात, \q1 ‘संकटे आमच्यावर येणार नाही वा आम्हाला गाठणार नाहीत, \q2 ते तलवारीने मरतील.’ \s1 इस्राएलचे पुनर्वसन \p \v 11 “त्या दिवशी \q1 “दावीदाचा पतन झालेला आश्रय मी पुनर्स्थापित करेन; \q2 मी तिची तुटलेली तटबंदी दुरुस्त करेन, \q2 आणि तिचे अवशेष दुरुस्त करेन— \q2 आणि पूर्वीसारखीच तिची पुनर्बांधणी करेन, \q1 \v 12 यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर \q2 व माझे नाव धारण करणार्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घ्यावा,\f + \fr 9:12 \fr*\ft मुळात \ft*\fqa जी राष्ट्रे माझे नाव धारण करतात ते माझा शोध करो\fqa*\f*” \q2 ही कार्ये करणारे याहवेह ही घोषणा करतात. \p \v 13 “ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात, \q1 “जेव्हा नांगरणारा कापणी करणार्‍याला \q2 आणि द्राक्षे तुडविणारा बी पेरणार्‍याला मागे टाकेल. \q1 नवीन द्राक्षारस पर्वतांवरून गळू लागेल \q2 आणि ते सर्व टेकड्यांवरून वाहू लागेल, \q2 \v 14 मी माझ्या इस्राएली लोकांना बंदिवासातून परत आणेन.\f + \fr 9:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa माझ्या इस्राएल लोकांची समृद्धी मी परत आणेन\fqa*\f* \b \q1 “ते त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या नगरांची पुनर्बांधणी करून त्यात राहतील. \q2 ते द्राक्षमळे लावतील आणि त्याचा द्राक्षारस पितील; \q2 ते बागा लावतील आणि त्याची फळे खातील. \q1 \v 15 मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्ये पेरीन, \q2 मी त्यांना दिलेल्या भूमीतून त्यांना पुन्हा उपटून \q2 टाकण्यात येणार नाही.” \m असे याहवेह तुमचे परमेश्वर म्हणतात.