\id ACT - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h प्रेषित \toc1 प्रेषितांची कृत्ये \toc2 प्रेषित \toc3 प्रेषित \mt1 प्रेषितांची कृत्ये \c 1 \s1 येशू स्वर्गात घेतले जातात \p \v 1 थियफिल महोदय, मी माझ्या पहिल्या ग्रंथात, येशूंनी जे कार्य करण्यास आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून, \v 2 त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले, त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. \v 3 त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले. \v 4 अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा. \v 5 कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.” \p \v 6 मग ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?” \p \v 7 ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. \v 8 परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.” \p \v 9 असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले. \p \v 10 येशू जसे वर घेतले जात होते तसे त्यांचे शिष्य आकाशाकडे निरखून लावून पाहत होते, एकाएकी पांढरी वस्त्रे घातलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. \v 11 ते म्हणाले, “अहो गालीलातील मनुष्यांनो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हेच येशू, ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, जसे तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात तसेच परत येणार आहेत.” \s1 यहूदाच्या जागी मत्थियाची निवड \p \v 12 नंतर प्रेषित सुमारे शब्बाथ दिवसाच्या वाटचालीवर\f + \fr 1:12 \fr*\ft अंदाजे 1कि.मी.\ft*\f* अंतरावर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर होते तिथून ते यरुशलेमला परत आले. \v 13 तिथे पोहोचल्यावर, ते राहत होते त्या माडीवरील खोलीत गेले. तिथे जे शिष्य उपस्थित होते ते हे: \b \li1 पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया; \li1 फिलिप्प आणि थोमा; \li1 बर्थलमय आणि मत्तय; \li1 अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन कनानी आणि याकोबाचा पुत्र यहूदाह. \b \p \v 14 हे सर्वजण व येशूंची आई मरीया, त्यांचे भाऊ, इतर स्त्रिया एकत्र येऊन सतत प्रार्थनेत वेळ घालवित असत. \p \v 15 त्या दिवसांमध्ये पेत्र विश्वासणार्‍या लोकांमध्ये उभा राहिला (ते एकूण एकशेवीस लोक होते) आणि त्याने भाषण दिले. \v 16 तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते. \v 17 तो आपल्यापैकीच एक होता आणि त्याने आपल्या सेवाकार्यामध्ये भाग घेतला होता.” \p \v 18 यहूदाहने त्याला मिळालेल्या दुष्टाईच्या पैशाने शेत विकत घेतले; तिथे तो डोक्यावर पडला, त्याचे पोट फुटून सर्व आतडी बाहेर पडली. \v 19 ही वार्ता यरुशलेमात राहणार्‍या सर्वांना समजली, तेव्हापासून त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले. \p \v 20 “यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे: \q1 “ ‘त्याचे ठिकाण ओसाड पडो; \q2 व त्यात कोणीही वस्ती न करो,’\f + \fr 1:20 \fr*\ft \+xt स्तोत्र 69:25\+xt*\ft*\f* \m आणि, \q1 “ ‘त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.’\f + \fr 1:20 \fr*\ft \+xt स्तोत्र 109:8\+xt*\ft*\f* \m \v 21 यास्तव हे आवश्यक आहे की अशा व्यक्तींपैकी एकाची निवड आपण करावी की, जो प्रभू येशू आपल्यामध्ये राहत होते त्या वेळेपासून आतापर्यंत सर्व वेळ आपल्याबरोबर राहात आलेला आहे, \v 22 प्रारंभीपासून म्हणजे योहानाकडून येशूंचा बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून येशूंना स्वर्गात घेतले जाईपर्यंत, कारण यांच्यामधून एकाने आपल्याबरोबर येशूंच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार असणे आवश्यक आहे.” \p \v 23 तेव्हा त्यांनी यूस्त म्हटलेला योसेफ, ज्याला बारसब्बास देखील म्हणत असत आणि मत्थिया अशा दोन माणसांची नावे सुचविली. \v 24 नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा, \v 25 ही प्रेषितीय सेवा, नियोजित स्थानी गेलेल्या यहूदाहने सोडली.” \v 26 नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली. \c 2 \s1 पवित्र आत्मा पन्नासाव्या दिवशी उतरतो \p \v 1 जेव्हा पेंटेकॉस्टचा\f + \fr 2:1 \fr*\ft पेन्टेकॉस्ट वल्हांडण सण (\+xt निर्ग 12:1‑17; लेवी 23:15‑22\+xt*) झाल्यानंतरचा पन्नासावा दिवस. इकडे, येशू ख्रिस्तांना क्रूसावर दिल्यानंतरचा पन्नासावा दिवस\ft*\f* दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते. \v 2 एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्‍यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. \v 3 त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या. \v 4 तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत\f + \fr 2:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa जिभा \+xt 11|link-href="ACT 2:11"\+xt* व्या वचनातही\fqa*\f* बोलू लागले. \p \v 5 त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते. \v 6 जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने स्वतःची मातृभाषा बोलली जात असलेली ऐकले. \v 7 विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना? \v 8 तरीसुद्धा ते आमच्या मातृभाषांमध्ये बोलताना आम्ही ऐकत आहोत हे कसे? \v 9 आम्ही येथे पार्थी, मेदिया आणि एलामी लोक आहोत; मेसोपोटामिया रहिवासी, यहूदीया आणि कप्पदुकिया, पंत आणि आशिया,\f + \fr 2:9 \fr*\ft रोमी प्रांताचा एक विभाग\ft*\f* \v 10 फ्रुगिया आणि पंफुल्या, इजिप्त व कुरणेच्या जवळचा लिबिया; रोमहून आलेले पाहुणे \v 11 यहूदी व धर्मांतर झालेले यहूदी; क्रेतीय व अरब लोक हे देखील आमच्यात आहेत. तरी देखील परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमच्या भाषेमध्ये बोलताना ऐकत आहोत!” \v 12 ते चकित झाले व गोंधळून एकमेकांना विचारू लागले, “याचा अर्थ काय असेल?” \p \v 13 पण काहीजण थट्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाचे अति सेवन करून मस्त झाले आहे.” \s1 पेत्राचे जमावाला उद्देशून भाषण \p \v 14 त्यावेळी पेत्र अकरा प्रेषितांसह उभा राहून, त्या जमावाला उद्देशून मोठ्याने म्हणाला: “यरुशलेममधील यहूदी बंधूंनो आणि रहिवाशांनो, तुम्हाला या गोष्टी स्पष्ट समजणे आवश्यक आहे; म्हणून माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. \v 15 तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत! \v 16 तर पाहा याविषयी संदेष्टा योएलने असे भविष्य केले होते: \q1 \v 17 “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, \q2 मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. \q1 तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, \q2 व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, \q2 तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील. \q1 \v 18 माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, \q2 त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. \q2 आणि ते भविष्यवाणी करतील. \q1 \v 19 वर आकाशात व खाली पृथ्वीवर, \q2 रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी \q2 विलक्षण चिन्हे मी दाखवेन. \q1 \v 20 प्रभूचा महान व गौरवी दिवस \q2 येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व \q2 चंद्र रक्तमय होईल. \q1 \v 21 आणि जो कोणी प्रभूच्या नावाने \q2 त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’\f + \fr 2:21 \fr*\ft \+xt योएल 2:28‑32\+xt*\ft*\f* \p \v 22 “अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली. \v 23 परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या\f + \fr 2:23 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्यांना नियम नव्हता \fqa*\ft (विदेशी लोक)\ft*\f* मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. \v 24 परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते. \v 25 दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: \q1 “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. \q2 कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, \q2 मी डळमळणार नाही. \q1 \v 26 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; \q2 माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल, \q1 \v 27 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, \q2 किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही. \q1 \v 28 तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; \q2 तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’\f + \fr 2:28 \fr*\ft \+xt स्तोत्र 16:8\+xt*\ft*\f* \p \v 29 “प्रिय यहूदी बंधूंनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, आपला पूर्वज दावीद मरण पावला आणि त्याला पुरले व त्याची कबर आज देखील येथे आहे. \v 30 परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून असे अभिवचन दिले होते, त्याच्या वंशजांपैकी एकाला ते त्याच्या सिंहासनावर बसवतील. \v 31 पुढे होणार्‍या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही. \v 32 त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. \v 33 आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात. \v 34 कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला, \q1 “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: \q1 \v 35 “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत \q2 माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’\f + \fr 2:35 \fr*\ft \+xt स्तोत्र 110:1\+xt*\ft*\f* \p \v 36 “यास्तव इस्राएलातील सर्वजणांनी खात्री करून घ्यावीः ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर दिले होते, त्यांना परमेश्वराने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे.” \p \v 37 हे त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?” \p \v 38 पेत्राने उत्तर दिले, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. \v 39 हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.” \p \v 40 आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.” \v 41 ज्यांनी हा त्यांचा संदेश ग्रहण केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांची त्यांच्या संख्येत भर पडली. \s1 विश्वासणार्‍यांची सहभागिता \p \v 42 प्रेषितांद्वारे दिले जात असलेले शिक्षण आणि सहभागिता, भाकर मोडणे आणि प्रार्थना यासाठी ते स्वतः समर्पित झाले. \v 43 प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता. \v 44 तेव्हा सर्व विश्वासणारे एकत्र होते आणि त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही समाईक होते. \v 45 जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. \v 46 दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते, \v 47 परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली. \c 3 \s1 पेत्र पांगळ्या भिकार्‍याला बरे करतो \p \v 1 एके दिवशी दुपारी तीन वाजता, प्रार्थनेची वेळ असल्यामुळे पेत्र आणि योहान मंदिरात जात होते. \v 2 त्यावेळी जन्मापासून लंगडा असलेल्या एका मनुष्याला सुंदर नावे मंदिराच्या दरवाजाजवळ आणले जात होते, जिथे त्याला दररोज मंदिराच्या अंगणात जात असणार्‍यांकडे भीक मागण्यासाठी ठेवले जात होते. \v 3 जेव्हा त्याने पेत्र आणि योहानला तिथे प्रवेश करताना पाहिले, त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. \v 4 तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!” \v 5 त्यांच्याकडून काही मिळेल या अपेक्षेने त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले. \p \v 6 परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” \v 7 मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले. \v 8 तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला. \v 9 सर्व लोकांनी त्याला चालताना आणि परमेश्वराची स्तुती करताना पाहिले, \v 10 आणि जो मंदिराच्या सुंदर नावे दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे, तो हाच आहे अशी त्यांची ओळख पटली. त्याच्या बाबतीत जे काही घडले होते, त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. \s1 पाहणार्‍या लोकांसमोर पेत्राचे भाषण \p \v 11 मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्यचकित होऊन शलोमोनाच्या देवडीकडे धावत आले. \v 12 हे पाहून पेत्र त्या जमावाला म्हणाला: “अहो इस्राएली लोकांनो, याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काही कारण आहे का? आमच्याच शक्तीने किंवा सुभक्तीने या मनुष्याला चालावयास लावले आहे, अशा अर्थाने तुम्ही आम्हाकडे का पाहत आहात? \v 13 अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे परमेश्वर, जे आपल्या पूर्वजांचे परमेश्वर आहेत, त्यांनी त्यांचा सेवक येशूंना गौरविले आहे. त्याच येशूंना मारून टाकले जावे यासाठी तुम्ही त्यांना धरून दिले आणि पिलातासमोर तुम्ही त्यांना नाकारले. जरी पिलाताने त्यांना सोडून देण्याचा निश्चय केला होता, \v 14 तरी तुम्ही पवित्र व नीतिमानाशी संबंध ठेवण्यास नकार दिला व त्याऐवजी एका खुनी माणसाच्या मुक्ततेची मागणी केली. \v 15 तुम्ही प्रत्यक्ष जीवनाच्या निर्माणकर्त्यालाच जिवे मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुन्हा उठविले, याचे आम्ही साक्षी आहोत. \v 16 येशूंच्या नावावरील विश्वासामुळे हा मनुष्य ज्याला आपण पाहता व ओळखता तो आता बलवान झाला आहे. येशूंच्या नावावरील विश्वासाद्वारे तो पूर्ण बरा झालेला आहे, हे तुम्ही सर्वजण पाहतच आहात. \p \v 17 “आता, इस्राएली बंधूंनो, मला माहीत आहे की तुम्ही जे केले, ते अज्ञानाने केले आणि तुमच्या पुढार्‍यांनीही तेच केले. \v 18 परंतु ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे जे भाकीत केले होते, ते पूर्ण केले. \v 19 यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी, \v 20 आणि त्यांनी तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे, त्या येशूंना पाठवावे. \v 21 तरी ज्याविषयी फार पूर्वीपासून परमेश्वराने आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते की सर्व गोष्टींची पुनर्स्थापना होईपर्यंत, त्यांना स्वर्गामध्ये राहणे अगत्याचे आहे. \v 22 कारण मोशे म्हणाला, ‘प्रभू तुमचे परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील; तो सांगेल ते सर्वकाही तुम्ही ऐका. \v 23 जो कोणी संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.’\f + \fr 3:23 \fr*\ft \+xt अनु 18:15, 18, 19\+xt*\ft*\f* \p \v 24 “खरोखरच, शमुवेल संदेष्ट्याने आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक संदेष्ट्याने आजच्या या दिवसाबद्दल भविष्य सांगितलेले आहे. \v 25 तुम्ही संदेष्ट्यांचे वारसदार आहात आणि परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे भागीदार आहात. ते अब्राहामाला म्हणाले, ‘तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.’\f + \fr 3:25 \fr*\ft \+xt उत्प 22:18; 26:4\+xt*\ft*\f* \v 26 परमेश्वराने आपल्या सेवकाला उठविले, तेव्हा प्रथम तुमच्याकडे पाठविले, यासाठी की तुम्हा प्रत्येकाने तुमच्या दुष्ट मार्गापासून मागे वळून आशीर्वादित व्हावे.” \c 4 \s1 न्यायसभेपुढे पेत्र व योहान \p \v 1 पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना याजकगण, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख आणि काही सदूकी लोक त्यांच्याकडे आले. \v 2 ते अत्यंत अस्वस्थ झाले, कारण प्रेषित शिक्षण देत होते व येशूंच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होईल असे लोकांना जाहीरपणे सांगत होते. \v 3 त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशीही कैदेतच ठेवले. \v 4 त्यांच्यातील अनेकांनी संदेश ऐकला आणि विश्वास ठेवला; म्हणून विश्वास ठेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारापर्यंत गेली. \p \v 5 नंतर दुसर्‍या दिवशी असे झाले की शासक, वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक यरुशलेममध्ये एकत्रित भेटले. \v 6 महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते. \v 7 त्यांनी पेत्र व योहान यांना आपल्यासमोर बोलाविले व त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली: “तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा कोणाच्या नावाने हे केले आहे?” \p \v 8 नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो! \v 9 या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण तपासणी करीत असाल, \v 10 तर मला तुम्हाला आणि सर्व इस्राएली लोकांना सांगू द्या की, ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर चढवून ठार मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुनः उठविले, त्याच नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य येथे पूर्ण बरा होऊन तुमच्यासमोर उभा आहे.” \v 11 धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, \q1 “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, \q2 तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’\f + \fr 4:11 \fr*\ft \+xt स्तोत्र 118:22\+xt*\ft*\f* \m \v 12 तारण दुसर्‍या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.” \p \v 13 त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते. \v 14 आणि त्या बरे झालेल्या मनुष्याला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून, त्यांच्याने काही बोलवेना. \v 15 त्यावेळी त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि एकत्र चर्चा केली. \v 16 “आपण या मनुष्यांचे काय करावे?” ते म्हणाले, “यरुशलेमकरांना माहीत आहे की त्यांनी हा असाधारण चमत्कार करून दाखविला आहे आणि आम्ही हे नाकारू शकत नाही. \v 17 तरी या गोष्टी लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर काहीही बोलू नये.” \p \v 18 तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली. \v 19 परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहे याचा न्याय तुम्हीच करा! तुमचे ऐकावे की त्यांचे? \v 20 ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.” \p \v 21 अशी धमकी दिल्यानंतर, त्यांनी त्यांना जाऊ दिले. त्यांना कशी शिक्षा करावी, याचा निर्णय ते घेऊ शकले नाही, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक परमेश्वराचे गौरव करीत होते, \v 22 जो मनुष्य आश्चर्यकारक रीतीने बरा झाला होता, त्याचे वय चाळीस वर्षांहून अधिक होते. \s1 विश्वासणार्‍यांची प्रार्थना \p \v 23 पेत्र व योहानाची सुटका झाल्याबरोबर, ते दुसर्‍या शिष्यांकडे गेले आणि मुख्य याजकगण आणि वडीलजन जे काही म्हणाले, ते सर्व त्यांना सांगितले. \v 24 त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्‍यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू, तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. \v 25 पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीदाच्या मुखातून बोलला आहात: \q1 “ ‘राष्ट्रे कट का रचत आहेत \q2 आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत? \q1 \v 26 प्रभू आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध\f + \fr 4:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa ख्रिस्त\fqa*\f* \q2 पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी एकत्र येऊन उठाव करीत आहेत.’ \m \v 27 खरोखर हेरोद राजा आणि राज्यपाल पंतय पिलात आणि सर्व गैरयहूदी आणि त्याचप्रमाणे या शहरात राहणारे इस्राएली लोक तुमचे पवित्र सेवक येशू, ज्यांचा तुम्ही अभिषेक केला आहे, त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यास एकत्र आले. \v 28 तुमच्या शक्तीने आणि इच्छेने जे घडावे असे तुम्ही योजले होते तेच त्यांनी केले. \v 29 तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या. \v 30 तुमचे पवित्र सेवक येशूंच्या नावामध्ये आजार बरे होण्यासाठी चिन्हे आणि आश्चर्यकारक गोष्टी करून दाखविण्यासाठी तुम्ही आपला हात लांब करा.” \p \v 31 या प्रार्थनेनंतर ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले. \s1 विश्वासणारे त्यांची मालमत्ता एकमेकांना वाटून देतात \p \v 32 त्यावेळी सर्व विश्वासणारे एक हृदयाचे आणि एकमनाचे होते. त्यांच्यापैकी कोणीही त्यांची संपत्ती स्वतःची आहे असे हक्काने सांगत नव्हते, परंतु त्यांच्याकडे असलेले सर्वकाही त्यांनी समाईक मानले होते. \v 33 प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाविषयी प्रेषित मोठ्या शक्तीने सतत साक्ष देत राहिले आणि त्या सर्वांवर परमेश्वराची विपुल कृपा शक्तीने कार्य करीत होती. \v 34 त्यांच्यामध्ये गरजवंत असा कोणीही राहिला नव्हता. कारण घर व जमिनीचे जे मालक होते, ते त्यांची घरे व जमिनी विकून आलेले पैसे \v 35 प्रेषितांच्या चरणी आणून ठेवीत होते आणि जे कोणी गरजवंत होते, त्यांना वाटून देत. \p \v 36 योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते, \v 37 त्याने त्याच्या मालकीची शेतजमीन विकून मिळालेली रक्कम प्रेषितांच्या चरणी आणून ठेवली. \c 5 \s1 हनन्याह व सप्पीरा \p \v 1 आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला. \v 2 मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले. \p \v 3 परंतु पेत्र म्हणाला, “हनन्याह, सैतानाने तुझे हृदय एवढे कसे भरले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस व मालमत्ता विकून आलेल्या पैशातून काही पैसे तुझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेस? \v 4 संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.” \p \v 5 हे शब्द ऐकताच हनन्याह खाली कोसळला आणि मरण पावला. घडलेल्या गोष्टी ऐकून सर्वजण भयभीत झाले. \v 6 नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला. \p \v 7 सुमारे तीन तासानंतर त्याची पत्नी आत आली, काय घडले होते याची तिला कल्पना नव्हती. \v 8 पेत्राने तिला विचारले, मला सांग “तुला व हनन्याला जमिनीची इतकीच किंमत मिळाली काय?” \p तिने उत्तर दिले, “होय, तितकीच किंमत.” \p \v 9 मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.” \p \v 10 त्याच क्षणी ती त्याच्या पायावर कोसळली आणि मरण पावली आणि ते तरुण आत आले व तिचा मृत्यू झाल्याचे पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले. \v 11 सर्व मंडळी आणि ज्या सर्वांनी हे ऐकले ते सारे भयभीत झाले. \s1 प्रेषित अनेकांना बरे करतात \p \v 12 प्रेषित लोकांमध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करीत होते आणि सर्व विश्वासणारे एकत्रितपणे शलोमोनाच्या देवडीत जमत असत, \v 13 त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत सन्मान होता, परंतु त्यांच्यात सामील होण्याचे धैर्य कोणाला झाले नाही. \v 14 तरी देखील अधिकाधिक पुरुषांनी व स्त्रियांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या संख्येत वाढ झाली. \v 15 याचा परिणाम असा झाला की, पेत्र जवळून जात असताना निदान त्याची छाया तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी म्हणून आजारी लोकांना बाहेर रस्त्यावर आणून खाटांवर आणि अंथरुणावर ठेवीत असत. \v 16 यरुशलेमच्या आसपासच्या गावातून लोकसमुदाय येताना त्यांच्याबरोबर आजारी व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना आणत होते आणि ते सर्वजण बरे होऊन जात. \s1 प्रेषितांचा छळ होतो \p \v 17 नंतर महायाजक आणि त्यांचे सहकारी जे सर्व सदूकी पंथाचे सभासद होते, ते मत्सराने भरून गेले. \v 18 त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात डांबले. \v 19 परंतु रात्रीच्या समयी प्रभूच्या देवदूताने तुरुंगाचे दरवाजे उघडून त्यांना बाहेर काढले. \v 20 तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.” \p \v 21 ते पहाटेच मंदिराच्या आवारात गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. \p जेव्हा महायाजक व त्यांचे सहकारी आले, तेव्हा त्यांनी न्यायसभा व यहूदी वडीलमंडळीला एकत्र बोलाविले आणि प्रेषितांना तुरुंगातून चौकशीसाठी घेऊन यावे अशी आज्ञा केली. \v 22 तुरुंगामध्ये गेल्यानंतर, अधिकार्‍यांना तिथे प्रेषित आढळले नाहीत म्हणून ते परतले आणि त्यांना सांगितले की, \v 23 “तुरुंगाचे दरवाजे व्यवस्थित बंद केलेले होते आणि पहारेकरी दाराबाहेर उभे होते. परंतु आम्ही दरवाजे उघडले, तेव्हा आम्हाला कोणीही आढळले नाही.” \v 24 मंदिराच्या सुरक्षा अधिकार्‍याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले. \p \v 25 इतक्यात कोणीतरी येऊन सांगितले, “पाहा! ज्यांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ती माणसे मंदिराच्या आवारात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.” \v 26 तेव्हा सुरक्षा अधिकारी आपल्याबरोबर काही शिपाई घेऊन गेला आणि त्याने प्रेषितांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला धोंडमार करतील, अशी त्यांना भीती वाटत होती. \p \v 27 प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले. \v 28 ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.” \p \v 29 परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे. \v 30 तुम्ही येशूंना क्रूसावर टांगून मारल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने येशूंना मरणातून पुन्हा जिवंत केले. \v 31 आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा. \v 32 या गोष्टींचे आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मा, ज्याला परमेश्वराने जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना दिला आहे तोही साक्षी आहे.” \p \v 33 हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले. \v 34 परंतु गमालियेल नावाचा एक परूशी, जो शास्त्राध्यापक व सर्व लोकांमध्ये सन्मान्य मानलेला, न्यायसभेपुढे उभा राहिला आणि त्याने या माणसांना थोडा वेळ बाहेर न्यावे, अशी आज्ञा केली. \v 35 मग तो न्यायसभेला उद्देशून म्हणाला, “अहो इस्राएली लोकहो, या मनुष्यांच्या बाबतीत काही करण्याच्या तुमच्या उद्देशाचा काळजीपूर्वक विचार करा. \v 36 काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले. \v 37 त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली. \v 38 म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल. \v 39 परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.” \p \v 40 त्याच्या भाषणामुळे त्यांचे मन वळाले; त्यांनी प्रेषितांना आत बोलावून फटके मारविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा कधीही बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. \p \v 41 प्रेषित तर न्यायसभेतून आनंद करीत बाहेर पडले. कारण येशूंच्या नावाकरिता अप्रतिष्ठा सहन करण्यासाठी ते पात्र ठरविले गेले होते. \v 42 आणि प्रत्येक दिवशी मंदिराच्या आवारात व घरोघरी जाऊन “येशू हेच ख्रिस्त आहेत” याबद्दलचे शिक्षण देण्याचे व शुभवार्तेची घोषणा करण्याचे त्यांनी थांबविले नाही. \c 6 \s1 सात सेवकांची निवड \p \v 1 त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत असताना, त्यांच्यापैकी काही ग्रीक भाषिक यहूदी\f + \fr 6:1 \fr*\ft ज्या यहूदी लोकांनी ग्रीक भाषा व संस्कृती स्वीकारली होती.\ft*\f* लोकांनी इब्री भाषिक यहूदी लोकांविरुद्ध तक्रार केली की दररोजच्या भोजनाचे वाटप होत असताना त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे. \v 2 तेव्हा बारा प्रेषितांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून सांगितले, “आम्हास हे योग्य वाटत नाही की आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या सेवेकडे दुर्लक्ष करून अन्न वाटपाची सेवा करावी. \v 3 तर बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्यामधून जे आत्म्याने परिपूर्ण आणि सुज्ञ आहेत अशा सात माणसांची निवड करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून देऊ. \v 4 आणि मग प्रार्थनेकडे व वचनाची सेवा करण्याकडे आम्हाला आमचे लक्ष लावता येईल.” \p \v 5 गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते \v 6 या पुरुषांना प्रेषितांपुढे सादर करण्यात आले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्यावर आपले हात ठेवले. \p \v 7 मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले. \s1 स्तेफनाला पकडण्यात येते \p \v 8 आता स्तेफन परमेश्वराच्या कृपेने आणि सामर्थ्याने परिपूर्ण असा मनुष्य होता आणि त्याने लोकांमध्ये मोठी आश्चर्यकृत्ये व चिन्हे केली होती. \v 9 परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले. \v 10 परंतु स्तेफन जे आत्म्याच्या ज्ञानाद्वारे बोलला त्याला विरोध करण्यास ते समर्थ ठरले नाहीत. \p \v 11 मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.” \p \v 12 अशा रीतीने त्यांनी लोकांना व तसेच वडिलांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना चिथविले. त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने धरले व न्यायसभेपुढे आणले. \v 13 त्यांनी खोट्या साक्षीदारांना प्रस्तुत केले व त्यांनी अशी साक्ष दिली, “तो सतत पवित्र ठिकाणाविरुद्ध व नियमांविरुद्ध बोलतो. \v 14 ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उद्ध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.” \p \v 15 आणि न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे एकाग्रतेने पाहत असताना त्यांना स्तेफनाचा चेहरा देवदूताच्या चेहर्‍यासारखा दिसला. \c 7 \s1 स्तेफनाचे भाषण \p \v 1 तेव्हा महायाजकाने स्तेफनाला विचारले, “हे आरोप खरे आहेत काय?” \p \v 2 स्तेफनाने त्यावर असे उत्तर दिले: “बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका! आपला पिता अब्राहाम हारानात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असताना गौरवशाली परमेश्वर त्याला प्रकट झाले. \v 3 परमेश्वर त्याला म्हणाले, ‘तू आपला देश व आपले लोक सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.’\f + \fr 7:3 \fr*\ft \+xt उत्प 12:1\+xt*\ft*\f* \p \v 4 “तेव्हा त्याने खाल्डियनांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहिला. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, परमेश्वराने त्याला तुम्ही सध्या राहत आहात त्या भूमीत पाठविले. \v 5 परमेश्वराने त्याला येथेही वतन दिले नाही, पाऊल पडेल एवढी जमीनदेखील दिली नाही. परंतु त्यावेळी अब्राहामाला मूलबाळ नव्हते, तरी परमेश्वराने त्याला असे अभिवचन दिले की, हा देश त्याला आणि त्याच्या नंतरच्या संततीला वतन म्हणून दिला जाईल. \v 6 परमेश्वर त्याच्याशी अशा रीतीने बोलले: ‘तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. \v 7 परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’\f + \fr 7:7 \fr*\ft \+xt उत्प 15:13, 14\+xt*\ft*\f* \v 8 नंतर परमेश्वराने अब्राहामाला, सुंतेचा करार दिला आणि अब्राहाम इसहाकाचा पिता झाला आणि तो आठ दिवसांचा असतानाच त्याची सुंता झाली. पुढे इसहाक हा याकोबाचा पिता झाला आणि याकोब हा बारा पूर्वजांचा पिता झाला. \p \v 9 “कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते, म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होते, \v 10 आणि त्यांनी योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडविले. परमेश्वराने योसेफाला ज्ञान दिले आणि इजिप्तचा राजा फारोहची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. म्हणून फारोहने त्याची इजिप्तवर शासक आणि त्याच्या राजवाड्यातील सर्व कार्यभार पाहण्यासाठी नेमणूक केली. \p \v 11 “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. \v 12 जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, तेव्हा त्याने आपल्या पूर्वजांना प्रथम भेटीसाठी त्या देशात पाठविले. \v 13 त्यांच्या दुसर्‍या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले. \v 14 यानंतर, योसेफाने त्याचा पिता याकोबाला आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांनी बोलावून घेतले. ते सर्वजण मिळून पंचाहत्तर लोक होते. \v 15 नंतर याकोब खाली इजिप्तमध्ये आला आणि तिथेच तो आणि आपले पूर्वज मरण पावले. \v 16 त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले. \p \v 17 “अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती. \v 18 नंतर ‘एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला. त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.’\f + \fr 7:18 \fr*\ft \+xt निर्ग 1:8\+xt*\ft*\f* \v 19 हा राजा आपल्या लोकांशी दगाबाजीने व निष्ठुरपणाने वागला व त्याने त्यांची नवजात बालके जगू नयेत, म्हणून त्यांना बाहेर फेकण्यास भाग पाडले. \p \v 20 “याच सुमारास मोशेचा जन्म झाला आणि तो असाधारण बालक होता. तीन महिने त्याच्या घरातील लोकांनी त्याची काळजी घेतली, \v 21 त्याला बाहेर ठेवले असताना, फारोहच्या कन्येने त्याला घेतले आणि स्वतःचा पुत्र म्हणून त्याचे पालनपोषण करून त्याला वाढवले. \v 22 मोशेला इजिप्तमधील सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले व तो एक प्रभावी वक्ता आणि कृतीतही प्रभावी झाला. \p \v 23 “जेव्हा मोशे चाळीस वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने आपल्या इस्राएली बांधवांना भेटण्याचे मनात ठरविले. \v 24 तिथे त्याने पाहिले की, एका इस्राएली मनुष्यास इजिप्तचा मनुष्य अन्यायाने वागवित आहे, म्हणून मोशेने त्याचे रक्षण करण्यास त्या इजिप्तच्या माणसाची हत्या करून त्याचा सूड घेतला. \v 25 मोशेला वाटले की त्याच्या बांधवांस समजेल की परमेश्वर त्यांची सुटका करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे, परंतु ते त्यांना समजले नाही. \v 26 दुसर्‍या दिवशी मोशेला दोन इस्राएली माणसे एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांचा समेट करीत तो त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; तुम्ही एकमेकांबरोबर का भांडत आहात?’ \p \v 27 “परंतु जो मनुष्य दुसर्‍यावर अन्याय करीत होता, त्याने मोशेला बाजूला होण्यास सांगितले. ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? \v 28 काल जसे तू इजिप्त देशाच्या मनुष्याला मारून टाकलेस, तसे मलाही ठार करणार आहेस काय?’\f + \fr 7:28 \fr*\ft \+xt निर्ग 2:14\+xt*\ft*\f* \v 29 जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तिथे तो परकीय म्हणून राहिला आणि तिथे त्याला दोन पुत्र झाले. \p \v 30 “चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला. \v 31 मोशेने ते दृश्य पाहिले, तेव्हा त्याने आश्चर्य केले. ते नीट पाहण्याकरिता तो जवळ गेला, तेव्हा त्याने प्रभूची वाणी बोलताना ऐकली: \v 32 ‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे.’\f + \fr 7:32 \fr*\ft \+xt निर्ग 3:6\+xt*\ft*\f* हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तिथे पाहण्याचे धैर्य झाले नाही. \p \v 33 “मग प्रभूने त्याला म्हटले, ‘तुझी पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. \v 34 इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांचे अत्याचार मी खरोखरच पाहिले आहेत. त्यांचे कळवळणे मी ऐकले आहे आणि त्यांना त्यांच्या त्रासातून सोडविण्यासाठी मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्तकडे पाठवितो.’\f + \fr 7:34 \fr*\ft \+xt निर्ग 3:5, 7, 8, 10\+xt*\ft*\f* \p \v 35 “त्याच मोशेला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले?’ असे विचारून पूर्वी झिडकारीले होते, त्याला परमेश्वराने स्वतः शासक व मुक्त करणारा म्हणून झुडूपात प्रकट झालेल्या दूताच्या द्वारे त्यांच्याकडे परत पाठविले. \v 36 आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले. \p \v 37 “तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील.’\f + \fr 7:37 \fr*\ft \+xt अनु 18:15\+xt*\ft*\f* \v 38 तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली. \p \v 39 “परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. याव्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही, कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. \v 40 त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव—ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही!’\f + \fr 7:40 \fr*\ft \+xt निर्ग 32:1\+xt*\ft*\f* \v 41 त्याचवेळेस त्यांनी वासराच्या प्रतिरूपाची मूर्ती तयार केली. त्यांनी तिच्यासाठी बलिदान व अर्पणे आणली, स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कृती समोर ते मौज करू लागले. \v 42 म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना आकाशातील सूर्य, चंद्र व ताऱ्यांची पूजा करू दिली. संदेष्ट्याच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे: \q1 “ ‘अहो इस्राएली लोकहो, रानात असताना \q2 चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे व यज्ञे आणली काय? \q1 \v 43 तुम्ही मोलेख दैवताचा मंडप \q2 आणि शक्कुथ व तार्‍यांचे दैवत रेफान, \q2 उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या. \q1 म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’\f + \fr 7:43 \fr*\ft \+xt आमो 5:25‑27\+xt*\ft*\f* \p \v 44 “आपले पूर्वज रानातून जाताना त्यांच्याबरोबर कराराच्या साक्षीचा निवासमंडप होता. परमेश्वराने मोशेला दिलेल्या निर्देशानुसार व नमुन्याप्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती. \v 45 जेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्यांच्या समोरून हाकलून दिले तेव्हा त्यांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि आपल्या पूर्वजांनी यहोशुआच्या नेतृत्वाखाली जो निवासमंडप त्यांच्याबरोबर आणला तो त्या जमिनीवर दावीद राजाच्या काळापर्यंत तिथेच राहिला. \v 46 दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली. \v 47 परंतु तो शलोमोन होता ज्याने परमेश्वरासाठी भवन बांधले. \p \v 48 “तथापि, सर्वोच्च परमेश्वर मानवी हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाहीत. ज्याप्रमाणे संदेष्टा असे म्हणतो: \q1 \v 49 “ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे, \q2 आणि पृथ्वी माझे पादासन आहे. \q1 तर तुम्ही माझ्यासाठी कशाप्रकारचे घर बांधणार? \q2 असे प्रभू म्हणतात. \q2 माझे विश्रांतिस्थान कुठे असणार? \q1 \v 50 माझ्या हाताने हे सर्व घडवले नाही काय?’\f + \fr 7:50 \fr*\ft \+xt यश 66:1‑2\+xt*\ft*\f* \p \v 51 “अहो ताठ मानेच्या लोकांनो! तुमची अंतःकरणे व कानांची सुंता अजूनही झालेली नाही. तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखे आहात: तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता! \v 52 तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का? जो नीतिमान आहे व त्यांच्या आगमनाचे भविष्य वर्तविणार्‍यांना देखील तुम्ही जिवे मारले आणि आता तुम्ही त्यांचा विश्वासघात करून त्यांनाच जिवे मारले \v 53 आणि देवदूतांद्वारे मिळालेल्या परमेश्वराच्या नियमांचाही तुम्ही जाणूनबुजून भंग केला.” \s1 स्तेफनावर दगडफेक \p \v 54 सभागृहातील यहूदी पुढार्‍यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले. \v 55 परंतु स्तेफन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला व त्याने वर स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे गौरव बघितले आणि येशू परमेश्वराच्या उजवीकडे उभे आहेत असे त्याला दिसले. \v 56 तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभे असलेले मला दिसत आहे.” \p \v 57 मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले, \v 58 त्यांनी स्तेफनाला शहराबाहेर ओढीत नेले आणि त्याला धोंडमार करू लागले. त्याचवेळी, इकडे साक्षीदारांनी काढून ठेवलेले त्यांचे अंगरखे शौल म्हटलेल्या एका तरुण माणसाच्या पायाजवळ ठेवले होते. \p \v 59 ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.” \v 60 आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला. \c 8 \p \v 1 स्तेफनाच्या वधाला शौलाने मान्यता दिली. \s1 ख्रिस्ती लोकांचा छळ आणि पांगापांग \p त्या दिवसापासून यरुशलेम येथील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला आणि प्रेषितांशिवाय सर्व विश्वासणारे यहूदीया व शोमरोन या प्रांतात पांगले. \v 2 भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला \v 3 परंतु शौलाने मंडळीचा नाश करण्यास सुरुवात केली. तो घरोघरी जाऊन, स्त्री व पुरुष दोघांनाही खेचून तुरुंगात घालीत असे. \s1 शोमरोनात फिलिप्प \p \v 4 आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला. \v 5 फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली. \v 6 ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले. \v 7 अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत. \v 8 त्या शहरात मोठा आनंद झाला होता. \s1 जादूटोणा करणारा शिमोन \p \v 9 आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे. \v 10 म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते. \v 11 ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते. \v 12 परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला. \v 13 शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला. \p \v 14 यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले. \v 15 ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्‍यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली, \v 16 कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. \v 17 मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. \p \v 18 शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले \v 19 आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.” \p \v 20 पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला! \v 21 या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही. \v 22 तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील; \v 23 कारण तू कडूपणाने भरलेला आणि पापाचा दास आहेस असे मला दिसते.” \p \v 24 तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.” \p \v 25 आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली. \s1 फिलिप्प व इथिओपियातील खोजा \p \v 26 आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.” \v 27 तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा\f + \fr 8:27 \fr*\ft दक्षिणेकडील नाईल प्रांत\ft*\f* एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता, \v 28 आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. \v 29 तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.” \p \v 30 मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, “आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?” \p \v 31 तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे. \p \v 32 शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: \q1 “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, \q2 आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, \q2 तसेच त्याने आपले मुख उघडले नाही. \q1 \v 33 त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. \q2 त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? \q2 कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”\f + \fr 8:33 \fr*\ft \+xt यश 53:7‑8\+xt*\ft*\f* \p \v 34 षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?” \v 35 तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली. \p \v 36 तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?” \v 37 फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.”\f + \fr 8:37 \fr*\ft हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही\ft*\f* आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.” \v 38 मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला. \v 39 ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला. \v 40 फिलिप्प, अजोत या शहरात दिसून आला आणि पुढे प्रवास करीत कैसरीया येथे पोहोचेपर्यंत त्याला वाटेत लागलेल्या सर्व गावांमध्ये त्याने शुभवार्ता सांगितली. \c 9 \s1 शौलाचे परिवर्तन \p \v 1 इकडे शौल अजूनही प्रत्येक श्वासागणीक प्रभूच्या शिष्यांचा घात करण्याच्या धमक्या देत होता. तो महायाजकाकडे गेला \v 2 आणि दिमिष्क येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेमेत न्यावे. \v 3 तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला. \v 4 तो जमिनीवर पडला आणि त्याच्याशी बोलणारी एक वाणी त्याने ऐकली, ती म्हणाली, “शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस?” \p \v 5 शौलाने विचारले, “प्रभूजी, आपण कोण आहात?” \p “ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे, \v 6 तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.” \p \v 7 शौलाच्या बरोबर प्रवास करणारे निःशब्द होऊन उभे राहिले; त्यांनी आवाज ऐकला खरा, परंतु त्यांनी कोणाला पाहिले नाही \v 8 मग शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नव्हते. मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्क या ठिकाणी नेले. \v 9 तिथे तो तीन दिवस आंधळा होता आणि त्याने अन्न व पाणी सेवन केले नाही. \p \v 10 आता दिमिष्क येथे हनन्याह नावाचा येशूंचा एक शिष्य होता. दृष्टान्तामध्ये प्रभूने त्याला हाक मारली, “हनन्याह!” \p हनन्याह उत्तर देत म्हणाला, “आज्ञा प्रभूजी.” \p \v 11 प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे. \v 12 त्याने दृष्टान्तात पहिले आहे की, हनन्याह नावाचा कोणी एक मनुष्य येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.” \p \v 13 हनन्याह म्हणाला, “प्रभूजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे. \v 14 आणि तुमच्या नावाचा धावा करणार्‍या सर्वांना अटक करण्याचा अधिकार त्याला महायाजकाकडून मिळाला आहे.” \p \v 15 परंतु प्रभू हनन्याला म्हणाले, “जा! कारण गैरयहूदी व त्यांचे राजे आणि त्याचप्रमाणे इस्राएली लोक यांच्याकडे माझे नाव जाहीर करण्यासाठी तो माझे निवडलेले पात्र आहे. \v 16 माझ्या नावासाठी किती त्रास सहन करावा लागेल, हे मी त्याला दाखवेन.” \p \v 17 नंतर हनन्याह त्या घरी गेला आणि त्याने घरात प्रवेश केला. त्याचे हात शौलावर ठेवीत त्याने म्हटले, “बंधू शौल, तू वाटेने येत असताना ज्या प्रभू येशूंनी तुला दर्शन दिले, त्यांनी मला यासाठी पाठविले आहे की, तुला आपली दृष्टी परत यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस.” \v 18 त्याच क्षणी, त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काहीतरी पडले आणि शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला, \v 19 त्याने थोडेसे अन्न घेतल्यानंतर, त्याला पुन्हा शक्ती प्राप्त झाली. \s1 शौल दमास्कस व यरुशलेममध्ये \p शौलाने दिमिष्कमध्ये अनेक दिवस शिष्यांच्या बरोबर घालविले. \v 20 ताबडतोब तो सभागृहात गेला आणि येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा उपदेश करू लागला. \v 21 ज्यांनी त्याची शुभवार्ता ऐकली, ते सर्वजण आश्चर्याने थक्क झाले आणि विचारू लागले, “यरुशलेममध्ये येशूंच्या नावाने धावा करणार्‍यांची धूळधाण करणारा मनुष्य तो हाच नव्हे काय आणि तो येथे त्यांना कैद करून महायाजकांकडे नेण्यासाठी आलेला होता, हे खरे आहे ना?” \v 22 तरी शौल अधिक सामर्थ्यवान होत गेला आणि येशू हेच ख्रिस्त आहेत असे सिद्ध करून दिमिष्कमध्ये राहणार्‍या यहूद्यांस त्याने निरुत्तर केले. \p \v 23 यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला, \v 24 परंतु शौलाला त्यांची योजना समजली. त्याला मारून टाकण्यासाठी रात्रंदिवस ते शहराच्या द्वारावर नजर ठेऊन होते. \v 25 परंतु त्याच्या अनुयायांनी त्याला रात्रीच नेऊन टोपलीत बसविले आणि शहराच्या भिंतीतील झरोक्यातून खाली उतरविले. \p \v 26 तो यरुशलेममध्ये आल्यावर, येशूंच्या शिष्यांबरोबर सामील होण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्या सर्वांना त्याचे भय वाटत होते, कारण तो खरोखर शिष्य आहे, या गोष्‍टीवर त्यांचा विश्वास नव्हता. \v 27 परंतु बर्णबाने त्याला प्रेषितांपुढे आणले आणि कशाप्रकारे दिमिष्क रस्त्यावर शौलाला प्रभूचे दर्शन झाले आणि प्रभूने त्याला काय सांगितले आणि दिमिष्क येथे त्याने निर्भयपणाने येशूंच्या नावामध्ये शुभवार्ता कशी सांगितली, हे सर्व त्यांना कथन केले. \v 28 शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला. \v 29 तो ग्रीक यहूद्यांशी बोलत असे व वादविवाद करीत असे, परंतु त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. \v 30 जेव्हा इतर विश्वासणार्‍यांनी यासंबंधी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला कैसरीयास नेले आणि नंतर तिथून तार्सस येथे त्याची रवानगी केली. \p \v 31 नंतर यहूदीया, गालील आणि शोमरोन या प्रांतातील सर्व मंडळ्यांना शांतता लाभली आणि ते विश्वासात दृढ झाले. प्रभूचे भय धरून राहिल्यामुळे आणि पवित्र आत्म्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाली. \s1 एनियास आणि दुर्कस \p \v 32 पेत्र त्या देशात प्रवास करीत असताना, प्रभूच्या लोकांना भेटण्यासाठी तो लोद गावात आला. \v 33 तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता. \v 34 पेत्र त्याला म्हणाला, “एनियास, येशू ख्रिस्ताने तुला बरे केले आहे. ऊठ आणि आपले अंथरूण गुंडाळ.” तेव्हा एनियास तत्काळ उठला. \v 35 लोद व शारोन या शहरात राहणार्‍या सर्व लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभूकडे वळले. \p \v 36 आता योप्पामध्ये टबीथा या नावाची शिष्या राहत होती, ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते; ती सदैव गरिबांची मदत व चांगली कृत्ये करीत असे. \v 37 याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता. \v 38 लोद योप्पाच्या जवळ होते; जेव्हा शिष्यांनी ऐकले की पेत्र लोद गावी आला आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे दोन माणसे पाठवून, “ताबडतोब या” अशी त्याला विनवणी केली. \p \v 39 पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो आल्यावर त्याला माडीवरील खोलीत नेण्यात आले. सर्व विधवा तिच्याभोवती उभ्या राहून शोक करीत होत्या आणि दुर्कस जिवंत असताना तिने त्यांच्यासाठी तयार केलेले अंगरखे आणि इतर वस्त्रे त्यांनी पेत्राला दाखविली. \p \v 40 पेत्राने सर्वांना खोली बाहेर जाण्यास सांगितले; मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृत स्त्रीकडे वळून तो म्हणाला, “टबीथा, ऊठ.” तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. \v 41 त्याने आपला हात पुढे करून तिला पायांवर उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणार्‍यांना, विशेषकरून विधवांना आत बोलाविले आणि त्यांच्यापुढे तिला जिवंत सादर केले. \v 42 ही घटना योप्पामध्ये समजली आणि अनेकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. \v 43 पेत्र योप्पा येथे शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी बरेच दिवस राहिला. \c 10 \s1 कर्नेल्याचे पेत्रास आमंत्रण \p \v 1 कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य, जो इटलीच्या पलटणीचा शताधिपती होता. \v 2 तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे. \v 3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!” \p \v 4 कर्नेल्याने त्याच्याकडे टक लावून पाहिले व भयभीत झाला. त्याने विचारले, “काय प्रभूजी?” \p देवदूत उत्तरला, “तुझ्या प्रार्थना आणि गरिबांसाठी केलेल्या दानधर्माची परमेश्वराला आठवण आहे. \v 5 आता योप्पा येथे माणसे पाठवून, शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. \v 6 ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.” \p \v 7 जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला तो गेल्यानंतर, कर्नेल्याने आपल्या दोन नोकरांना आणि धर्मनिष्ठ शिपायास, जो त्याच्या वैयक्तिक सेवकांपैकी एक होता त्याला बोलाविले. \v 8 घडलेली सर्व हकिकत त्याने त्यांना सांगितली आणि त्यांना योप्पाकडे पाठवून दिले. \s1 पेत्राचा दृष्टान्त \p \v 9 दुसर्‍या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला. \v 10 त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले. \v 11 त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे. \v 12 तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती. \v 13 मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.” \p \v 14 “खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.” \p \v 15 दुसर्‍या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.” \p \v 16 असे तीन वेळा झाले, मग लागलीच ती चादर पुन्हा स्वर्गात वर घेतली गेली. \p \v 17 त्या दृष्टान्ताचा काय अर्थ असावा याविषयी पेत्र विचारात पडला असता, कर्नेल्याने पाठविलेल्या माणसांना शिमोनाचे घर सापडले आणि ती बाहेर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. \v 18 त्यांनी हाक मारून अशी विचारणा केली, “शिमोन, ज्याला पेत्र असेही म्हणतात, येथेच राहत आहेत काय?” \p \v 19 इकडे पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करीत असताना, आत्मा त्याला म्हणाला, “शिमोना, तीन माणसे तुला शोधत आहेत. \v 20 म्हणून ऊठ आणि खाली जा. त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको, कारण मीच त्यांना पाठविले आहे.” \p \v 21 पेत्र खाली गेला आणि त्या माणसांना म्हणाला, “मी तोच आहे ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. तुम्ही कशासाठी आला आहात?” \p \v 22 त्या माणसांनी उत्तर दिले, “आम्ही कर्नेल्य शताधिपतीकडून आलो आहोत. ते नीतिमान आणि परमेश्वराला भिऊन वागणारे मनुष्य आहेत, सर्व यहूदी लोकांकडून सन्मानित झालेले आहेत. एका पवित्र दूताने त्यांना सांगितले की तुम्ही पेत्राला तुमच्या घरी बोलवावे म्हणजे तुमच्याकडील संदेश त्यांना ऐकता येईल” \v 23 तेव्हा पेत्राने त्या माणसांना पाहुणे म्हणून घरात बोलाविले. \s1 कर्नेल्याच्या घरी पेत्र \p दुसर्‍या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला, योप्पातील काही विश्वासी बंधूही त्याच्याबरोबर गेले. \v 24 दुसर्‍या दिवशी ते कैसरीयास पोहोचले. कर्नेल्य त्यांची वाटच पाहत होता, त्याने आपले नातेवाईक व जवळचे मित्र यांना एकत्रित बोलाविले होते. \v 25 पेत्राने घरात प्रवेश करताच, कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि आदराने त्याच्या पाया पडला. \v 26 परंतु पेत्राने त्याला उभे केले व म्हणाला, “उभे राहा, मी स्वतः तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे.” \p \v 27 त्याच्याशी बोलत असताना, पेत्र आत गेला आणि तिथे त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळले. \v 28 तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला: “माझ्यासारख्या यहूदी व्यक्तीने गैरयहूदीयाला भेटणे व त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु परमेश्वराने मला दाखवून दिले आहे की, मी कोणालाही अपवित्र किंवा अशुद्ध लेखू नये. \v 29 म्हणूनच मला बोलाविणे आल्याबरोबर, काहीही हरकत न घेता मी लगेच आलो. आता तुम्ही मला कशासाठी बोलाविले ते सांगा?” \p \v 30 कर्नेल्याने उत्तर दिले: “तीन दिवसांपूर्वी माझ्या घरी याच वेळेस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, मी प्रार्थना करीत होतो. तेव्हा तेजस्वी झगा घातलेला एक पुरुष एकाएकी माझ्यासमोर उभा राहिला. \v 31 आणि मला म्हणाला, ‘कर्नेल्या, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू गरिबांना केलेल्या दानधर्माची त्यांनी आठवण केली आहे. \v 32 आता योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. ज्याचे घर समुद्राकाठी आहे त्या शिमोन चांभाराच्या घरी तो पाहुणा आहे.’ \v 33 म्हणून मी ताबडतोब तुम्हाला बोलावून घेतले आहे, तुम्ही आला हे बरे झाले. आपण सर्व येथे परमेश्वराच्या समक्षतेत आहोत आणि प्रभूने जे सर्वकाही सांगण्याची आज्ञा देऊन तुम्हाला पाठविले आहे ते सांगा.” \p \v 34 मग पेत्र बोलू लागला: “मला अगदी स्पष्टपणे कळून आले आहे की परमेश्वर पक्षपात करीत नाहीत, \v 35 परंतु प्रत्येक राष्ट्रांमध्ये जे त्यांचे भय धरतात व योग्य तेच करतात त्या सर्वांना ते स्वीकारतात. \v 36 तुम्हाला माहीत आहे की, परमेश्वराने इस्राएलच्या लोकांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे जे सर्वांचे प्रभू आहेत, शांतीच्या शुभवार्तेची घोषणा करीत त्यांचा संदेश पाठविला. \v 37 योहानाने बाप्तिस्म्याबद्दल संदेश दिल्यानंतर गालीलापासून सुरुवात होऊन संपूर्ण यहूदीयामध्ये काय घडून आले हे तुम्हाला चांगले माहीत आहे, \v 38 कशाप्रकारे परमेश्वराने नासरेथकर येशूंना पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि ते सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत होते, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते. \p \v 39 “त्या यहूदीयांच्या देशामध्ये व यरुशलेममध्ये त्यांनी ज्या सर्वगोष्टी केल्या त्यांचे आम्ही साक्षी आहोत. त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले, \v 40 परंतु परमेश्वराने तीन दिवसानंतर त्यांना मरणातून पुन्हा जिवंत केले व लोकांसमोर प्रकट केले. \v 41 जरी ते सर्व लोकांसमोर प्रकट झाले नाहीत, परंतु जे ज्यांना परमेश्वराने पूर्वीच निवडून ठेवले होते त्या साक्षीदारांसमक्ष म्हणजे आम्हाला, मरणातून उठल्यानंतर ते प्रकट झाले व त्यांनी आमच्याबरोबर खाणेपिणे केले. \v 42 त्यांनी आम्हाला अशी आज्ञा केली आहे की, लोकांस उपदेश करा व साक्ष द्या, परमेश्वराने नेमलेले जिवंतांचे व मेलेल्यांचे न्यायाधीश हेच आहेत. \v 43 सर्व संदेष्ट्यांनी येशूंबद्दल अशी साक्ष दिली आहे की जो प्रत्येकजण त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्यांच्या नावाने पापक्षमा मिळते.” \p \v 44 पेत्र हे वचन बोलत असतानाच, सर्व संदेश ऐकणार्‍यांवर पवित्र आत्मा उतरला. \v 45 पेत्राबरोबर आलेले विश्वासणारे, ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे. \v 46 कारण त्यांनी त्यांना अन्य भाषांमधून बोलताना आणि परमेश्वराची स्तुती करताना ऐकले. \p मग पेत्र म्हणाला, \v 47 “त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा करण्यास निश्चितच कोणीही हरकत घेणार नाही, कारण पवित्र आत्मा जसा आपल्याला मिळाला, तसा त्यांनाही मिळालेला आहे.” \v 48 मग त्याने आज्ञा केली की येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा करावा. मग पेत्राने त्यांच्याबरोबर काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. \c 11 \s1 पेत्र आपल्या कृतीचे स्पष्टीकरण करतो \p \v 1 गैरयहूदी लोकांनीही परमेश्वराचे वचन ग्रहण केले हे प्रेषितांच्या आणि यहूदीया प्रांतातील विश्वासणार्‍यांच्या कानी गेले. \v 2 मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्‍यांनी त्याच्यावर टीका केली \v 3 ते म्हणाले, “तू असुंती लोकांच्या घरी गेलास आणि त्यांच्याबरोबर भोजन केले.” \p \v 4 त्यावर पेत्राने सुरुवातीपासून, सर्वगोष्टी सविस्तर सांगितल्या: \v 5 तो म्हणाला, “मी योप्पा शहरात प्रार्थना करीत असताना, माझे देहभान सुटले तेव्हा मी दृष्टान्त पाहिला. त्यामध्ये मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून आकाशातून खाली सोडले जात आहे आणि मी जिथे होतो तिथे ते खाली आले. \v 6 मी त्यामध्ये डोकावून पाहिले मला पृथ्वीवरील चतुष्पाद प्राणी, श्वापदे, सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे दिसली. \v 7 तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, ‘पेत्रा, ऊठ व मारून खा.’ \p \v 8 “मी उत्तर दिले, ‘प्रभू खात्रीने नाही! कारण अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही माझ्या तोंडात गेलेले नाही.’ \p \v 9 “स्वर्गातून दुसर्‍या वेळेस वाणी ऐकू आली, ‘परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध असे म्हणू नकोस.’ \v 10 असे तीन वेळा झाले आणि ते सर्व परत स्वर्गाकडे घेतले गेले. \p \v 11 “नेमक्या याच वेळी कैसरीयाहून मजकडे पाठविलेली तीन माणसे मी राहत होतो त्या घराच्या समोर येऊन उभी राहिली. \v 12 तेव्हा आत्मा मला म्हणाला त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको. मजबरोबर सहा बंधूही सोबतीला होते आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरी प्रवेश केला. \v 13 त्याने आम्हाला सांगितले की परमेश्वराचा दूत त्याच्या घरात प्रकट झाला आणि म्हणाला, ‘योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. \v 14 तो तुला संदेश सांगेल त्याद्वारे तुझे आणि तुझ्या सर्व घराण्याचे तारण होईल.’ \p \v 15 “मी बोलण्यास सुरुवात केली, तेव्हाच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, जसा तो सुरुवातीला आपल्यावर उतरला होता. \v 16 तेव्हा मला आठवण झाली की, प्रभू येशूंनी काय सांगितले होते: ‘योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.’ \v 17 म्हणून जर परमेश्वराने तेच दान त्यांना दिले, जे आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा आपल्याला मिळाले, तर परमेश्वराला विरोध करणारा मी कोण?” \p \v 18 त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांच्याकडे आणखी काही प्रश्न राहिले नाहीत आणि ते परमेश्वराची स्तुती करू लागले व म्हणाले, “तर आता परमेश्वराने गैरयहूदीयांनाही पश्चात्ताप करण्याची संधी दिली आहे ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त होईल.” \s1 अंत्युखिया येथील मंडळी \p \v 19 स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले. \v 20 तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली. \v 21 तेव्हा प्रभूचे सामर्थ्य त्यांच्यावर होते, म्हणून लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला आणि ते प्रभूकडे वळले. \p \v 22 यरुशलेम येथे असलेल्या मंडळीने जेव्हा ही बातमी ऐकली, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठविले. \v 23 जेव्हा तो तिथे आला आणि परमेश्वराच्या कृपेमुळे जे काही झाले होते ते पाहून तो आनंदित झाला आणि त्या सर्वांनी पूर्ण मनाने प्रभूबरोबर एकनिष्ठ राहावे असे त्याने त्या सर्वांना उत्तेजन दिले. \v 24 बर्णबा एक चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने भरलेला आणि विश्वासात परिपूर्ण असा होता आणि फार मोठ्या संख्येने लोकांना प्रभूकडे आणले. \p \v 25 त्यानंतर शौलाचा शोध घेण्यासाठी बर्णबा पुढे तार्ससला गेला, \v 26 जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले. \p \v 27 याकाळात काही संदेष्टे यरुशलेमकडून खाली अंत्युखियास आले. \v 28 त्यांच्यामधील अगब नावाचा एकजण उभा राहिला आणि आत्म्याच्या साहाय्याने त्याने असे भविष्य सांगितले की, सर्व रोमी साम्राज्यात मोठा दुष्काळ पडणार आहे. (क्लौडियसच्या कारकिर्दीत हे झाले.) \v 29 तेव्हा शिष्यांनी असे ठरविले की, प्रत्येकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहूदीयामध्ये राहणार्‍या बंधू भगिनींना मदत करावी. \v 30 त्याप्रमाणे त्यांनी केले, त्यांच्या देणग्या तेथील वडीलमंडळींना पाठविण्यासाठी त्यांनी शौल व बर्णबाच्या स्वाधीन केल्या. \c 12 \s1 पेत्राची तुरुंगातून अद्भुतरित्या सुटका \p \v 1 त्याच सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही लोकांना छळावे म्हणून बंदिस्त केले. \v 2 त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला. \v 3 या कृत्याने यहूदी प्रसन्न झाल्याचे पाहून, हेरोद पेत्रालासुद्धा अटक करण्यास पुढे आला. हे बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस घडले. \v 4 पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर चार शिपायांच्या चार दलांचा पहारा बसविला. वल्हांडण सण झाल्यावर त्याला बाहेर आणून समुदायापुढे चौकशी करावी असा हेरोदाचा हेतू होता. \p \v 5 पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती. \p \v 6 हेरोद त्याला चौकशीसाठी बाहेर आणणार होता त्या आधीच्या रात्री, पेत्र दोन बेड्या घातलेला, दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता आणि पहारेकरी प्रवेशद्वारापुढे रक्षण करीत उभे होते. \v 7 तेव्हा अकस्मात तुरुंगाच्या कोठडीत प्रकाश पडला आणि पाहा, प्रभूचा दूत पेत्राजवळ प्रकट झाला. त्या दूताने पेत्रावर हात ठेऊन त्याला जागे केले व म्हटले, “लवकर, ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील बेड्या गळून पडल्या. \p \v 8 मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.” \v 9 पेत्र तुरुंगातून निघून त्याच्यामागे चालू लागला, परंतु देवदूत जे करीत होता ते सर्व खरोखर घडत होते याची त्याला कल्पना नव्हती; तो एक दृष्टान्त पाहत आहे असे त्याला वाटले. \v 10 त्यांनी पहिल्या व दुसर्‍या पहारेकर्‍यांना ओलांडले आणि ते शहरात जाण्याच्या लोखंडी द्वारापर्यंत पोहोचले. त्यावेळी तो दरवाजा त्यांच्यासाठी आपोआपच उघडला गेला आणि त्यातून ते बाहेर पडले. जेव्हा पुढे एका रस्त्याइतके अंतर चालून गेल्यानंतर अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. \p \v 11 पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला निश्चित कळून आले की प्रभूने त्यांचा देवदूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करीत होते त्यापासून मला सोडविले आहे.” \p \v 12 हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असेही म्हणतात त्याची आई मरीयाच्या घरी गेला. तिथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. \v 13 त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली. \v 14 तिने पेत्राचा आवाज ओळखला, तेव्हा तिला एवढा आनंद झाला की दरवाजा न उघडता ती पुन्हा आत धावत गेली आणि, “पेत्र दारात आहे!” असे तिने सांगितले. \p \v 15 ते तिला म्हणाले, “तुझे मन ठिकाण्यावर नाही,” परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत असावा.” \p \v 16 परंतु पेत्र ठोठावीत राहिला आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला व त्याला पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. \v 17 पेत्राने त्यांना आपल्या हाताने खुणावून शांत केले आणि प्रभूने त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढले, हे त्यांना सविस्तर सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “याकोब आणि बंधू भगिनींना याबद्दल सांगा,” मग तो दुसर्‍या स्थळी निघून गेला. \p \v 18 पहाट झाल्यावर, पेत्राचे काय झाले असावे या विचाराने सैनिकांमध्ये एकच गडबड उडाली. \v 19 हेरोदाने त्याचा पूर्ण शोध करूनही तो सापडला नाही, तेव्हा त्याने त्या सोळा पहारेकर्‍यांची उलट तपासणी करून त्यांना मरणदंडाच्या शिक्षेचा आदेश दिला. \s1 हेरोदाचा मृत्यू \p यानंतर हेरोद यहूदीयातून कैसरीयात गेला व तिथे राहिला. \v 20 तो सोर व सीदोन येथील लोकांबरोबर भांडण करीत होता; ते आता एकत्र झाले आणि त्यांनी त्याच्याबरोबर विशेष भेट ठरविली. राजाचा विश्वासू वैयक्तिक सेवक ब्लस्तचा पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांनी शांततेची मागणी केली, कारण ही शहरे त्यांच्या अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी हेरोद राजाच्या देशावर अवलंबून होती. \p \v 21 नेमलेल्या दिवशी हेरोद, आपली राजवस्त्रे परिधान करून राजासनावर बसला आणि त्यांच्यापुढे जाहीर भाषण करू लागला. \v 22 ते ओरडले, “ही मनुष्याची नव्हे परंतु परमेश्वराची वाणी आहे.” \v 23 हेरोदाने परमेश्वराला गौरव दिले नाही, म्हणून प्रभूच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले व तो मरण पावला. \p \v 24 परंतु परमेश्वराचे वचन पसरत राहिले आणि वाढत गेले. \s1 बर्णबा आणि शौल यांना निरोप \p \v 25 जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले. \c 13 \nb \v 1 आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल. \v 2 हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.” \v 3 तेव्हा उपास आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी आपले हात त्यांच्यावर ठेवले व त्यांना निरोप दिला. \s1 सायप्रसकडे \p \v 4 पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले. \v 5 सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता. \p \v 6 त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला. \v 7 सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती. \v 8 परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. \v 9 मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले, \v 10 “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय? \v 11 तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” \p तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला. \v 12 राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला. \s1 पिसिदियातील अंत्युखियामध्ये पौल \p \v 13 आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला. \v 14 ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले. \v 15 नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्‍यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.” \p \v 16 पौल उठून उभा राहिला व त्याने हाताने खुणावले आणि म्हणाला: “अहो इस्राएली लोकहो आणि परमेश्वराची उपासना करणारे गैरयहूदी, माझे ऐका! \v 17 या इस्राएली राष्ट्राच्या परमेश्वराने आपल्या पूर्वजांना निवडून घेतले आणि इजिप्तमध्ये राहत असताना त्यांना फलद्रूप केले. परमेश्वराने आपल्या महान बलाने त्यांना त्या देशातून व गुलामगिरीतून बाहेर आणले; \v 18 रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले;\f + \fr 13:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांची काळजी घेतली\fqa*\f* \v 19 त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली. \v 20 हे सर्व घडून येण्यास सुमारे चारशे पन्नास वर्षे लागली. \p “त्यानंतर, परमेश्वराने त्यांना शमुवेल संदेष्टा येईपर्यंत न्यायाधीश नेमून दिले. \v 21 यानंतर लोकांनी राजा मागितला आणि परमेश्वराने त्यांना बन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शौलाला राजा म्हणून दिले, त्याने चाळीस वर्षे राज्य केले. \v 22 शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्‍या प्रत्येक गोष्टी तो करेल.’ \p \v 23 “परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे. \v 24 येशू येण्यापूर्वी, योहानाने सर्व इस्राएली लोकांना पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा उपदेश केला. \v 25 योहानाचे कार्य संपत आलेले असताना, योहानाने विचारले: ‘मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? तुम्ही ज्याची वाट पाहता तो मी नाही. परंतु जो माझ्यामागून येत आहे, त्याच्या पादत्राणाचे बंद सोडण्याइतकी सुद्धा माझी योग्यता नाही.’ \p \v 26 “अब्राहामाची संतान, माझ्या प्रिय भावांनो आणि परमेश्वराचे भय धरणार्‍या गैरयहूदीयांनो, तारणाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. \v 27 यरुशलेममधील लोकांनी व त्यांच्या शासकांनी येशूंना ओळखले नाही, त्यांना दोषी ठरवून संदेष्ट्यांच्या त्या शब्दांची पूर्तता केली, ज्या शब्दांचे वाचन प्रत्येक शब्बाथ दिवशी त्यांच्यामध्ये केले जात होते. \v 28 त्यांना जिवे मारण्यासाठी एकही योग्य पुरावा त्यांना सापडला नाही, तरी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी पिलाताकडे केली. \v 29 त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरविले व कबरेत ठेवले. \v 30 परंतु परमेश्वराने त्यांना मृतांतून उठविले, \v 31 जे गालीलाहून प्रवास करीत यरुशलेमला त्यांच्याबरोबर आले होते, त्यांना पुष्कळ दिवस ते प्रकट झाले. तेच आता आपल्या लोकांस त्यांचे साक्षीदार आहेत. \p \v 32 “यासाठी, आम्ही तुम्हाला शुभवार्ता सांगतो की: \v 33 परमेश्वराने ते वचन त्यांनी येशूंना मरणातून उठवून आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या संतानासाठी पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे दुसर्‍या स्तोत्रसंहितेमध्ये असे लिहिले आहे: \q1 “ ‘तू माझा पुत्र आहे \q2 आज मी तुझा पिता झालो आहे.’\f + \fr 13:33 \fr*\ft \+xt स्तोत्र 2:7\+xt*\ft*\f* \m \v 34 त्यांना कुजण्याचा अनुभव कधीही येऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना मरणातून जिवंत केले. परमेश्वर असे म्हणाले, \q1 “ ‘दावीद राजाला पवित्र व निश्चित आशीर्वाद देण्याचे वचन मी दिले होते.’\f + \fr 13:34 \fr*\ft \+xt यश 55:3\+xt*\ft*\f* \m \v 35 म्हणून दुसर्‍या एका ठिकाणीही असे लिहिले आहे, \q1 “ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’\f + \fr 13:35 \fr*\ft \+xt स्तोत्र 16:10\+xt*\ft*\f* \p \v 36 “दावीदाने परमेश्वराच्या उद्देशाप्रमाणे आपल्या पिढीची सेवा केल्यानंतर तो मरण पावला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर पुरले आणि त्याचे शरीर कुजले. \v 37 परंतु ज्याला परमेश्वराने मृतातून उठविले आणि त्याचे शरीर कुजले नाही. \p \v 38 “यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे. \v 39 जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते. \v 40 यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्याबाबतीत होऊ नये: \q1 \v 41 “ ‘निंदा करणार्‍यांनो, पाहा, \q2 विस्मित होऊन नष्ट व्हा, \q1 कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, \q2 त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी \q2 त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’\f + \fr 13:41 \fr*\ft \+xt हब 1:5\+xt*\ft*\f*” \p \v 42 पौल व बर्णबा सभागृह सोडून जात होते त्यावेळी पुढील शब्बाथ दिवशी या गोष्टींबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली. \v 43 मग सभा संपल्यावर अनेक यहूदी आणि यहूद्यांच्या संस्कृतीप्रमाणे धर्मांतर करून आलेले भक्त पौल व बर्णबा यांच्यामागे गेले व त्यांच्याबरोबर बोलणे केले. त्यांनी परमेश्वराच्या कृपेमध्ये सतत वाढत राहावे असे पौल आणि बर्णबाने त्यांना उत्तेजन दिले. \p \v 44 पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले. \v 45 परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली. \p \v 46 मग पौल आणि बर्णबा हे निर्भयपणे बोलले: “हे परमेश्वराचे वचन प्रथम तुम्हाला देण्याचे अगत्य होते. ज्याअर्थी तुम्ही ते नाकारले आहे आणि सार्वकालिक जीवनाकरिता तुम्ही स्वतः योग्य नाहीत असे दाखविले आहे, त्याअर्थी आम्ही गैरयहूदीयांकडे वळतो. \v 47 यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: \q1 “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, \q2 म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”\f + \fr 13:47 \fr*\ft \+xt यश 49:6\+xt*\ft*\f* \p \v 48 गैरयहूदीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते आनंदित झाले आणि त्यांनी प्रभूच्या वचनाचा सन्मान केला व आणि ज्यांना सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त करण्यात आले होते त्या सर्वांनी विश्वास ठेवला. \p \v 49 प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरले. \v 50 परंतु यहूदी पुढार्‍यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले. \v 51 तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले. \v 52 आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. \c 14 \s1 इकुन्यामध्ये \p \v 1 इकुन्या येथे पौल व बर्णबा नेहमीप्रमाणे यहूदी सभागृहामध्ये गेले. तिथे ते इतक्या प्रभावीपणाने बोलले की, यहूदी व गैरयहूदी लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला. \v 2 परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले त्यांनी इतर गैरयहूद्यांना चिथावणी देऊन बंधुवर्गाविरुद्ध त्यांची मने विषाने भरली. \v 3 तरी देखील पौल व बर्णबाने तिथे बराच काळ घालविला, ते धैर्याने प्रभूसाठी बोलत राहिले, त्यांनी कृपेचा संदेश चिन्हे व अद्भुते यांच्याद्वारे सिद्ध केला. \v 4 मग त्या शहरातील लोकांमध्ये दोन गट झाले; काही यहूदीयांच्या तर काही प्रेषितांच्या बाजूने झाले. \v 5 त्यांना अन्यायाने धोंडमार करण्यासाठी गैरयहूदी, यहूदी, व त्यांचे पुढारी मिळून कट करीत होते. \v 6 हे त्यांना समजल्यावर ते लुकाओनियानच्या प्रांतातील लुस्त्र, दर्बे व सभोवतालच्या देशामध्ये पळून गेले, \v 7 आणि तिथे शुभवार्तेचा प्रचार करीत राहिले. \s1 लुस्त्र व दर्बे येथे \p \v 8 त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता. \v 9 पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले. \v 10 तेव्हा त्याने मोठ्याने म्हटले, “तुझ्या पायांवर उठून उभा राहा!” त्याच क्षणाला त्या मनुष्याने उडी मारली आणि तो चालू लागला. \p \v 11 पौलाने केलेले कृत्य पाहून जमाव लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “परमेश्वर आमच्यामध्ये मनुष्य रूपाने उतरून आले आहेत!” \v 12 बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले. \v 13 शहराच्या बाहेर असलेल्या झूस मंदिरातील पुजार्‍याने, बैल आणि फुलांच्या माळा घेतल्या व शहराच्या वेशीजवळ आले, कारण त्याला आणि जनसमुदायाला, त्यांना यज्ञार्पणे करावयाची होती. \p \v 14 परंतु ज्यावेळी प्रेषित बर्णबा व पौल यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी स्वतःची वस्त्रे फाडली व धावत लोकांमध्ये शिरून ते ओरडून म्हणाले: \v 15 “मित्रांनो, तुम्ही हे कशासाठी करीत आहात? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्ही तुमच्यासाठी जी शुभवार्ता आणली आहे ती तुम्हाला सांगतो, यासाठी की तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून देऊन, ज्याने आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले त्या जिवंत परमेश्वराकडे वळावे. \v 16 मागील काळात, त्यांनी सर्व राष्ट्रांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू दिले; \v 17 तरी त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची साक्ष दिली: त्यांच्याच दयेने तुमच्यासाठी आकाशातून पाऊस पाडतात, ऋतूमध्ये पीक देतात; ते तुम्हाला भरपूर अन्न पुरवितात आणि तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतात.” \v 18 परंतु इतके बोलल्यानंतरही, लोकांना यज्ञ करण्यापासून आवरणे त्यांना अत्यंत कठीण गेले. \p \v 19 तेव्हा काही यहूदी अंत्युखिया आणि इकुन्या येथून आले आणि त्यांनी समुदायाला त्यांच्या बाजूने करवून घेतले. त्यांनी पौलाला धोंडमार केला आणि तो मरण पावला आहे असे समजून त्याला शहराबाहेर फरफटत ओढून नेले. \v 20 परंतु शिष्य त्याच्या अवतीभोवती उभे राहिले, तेव्हा तो उठला आणि पुन्हा त्या शहरात गेला. दुसर्‍या दिवशी तो आणि बर्णबा दर्बेकडे निघून गेले. \s1 सीरियातील अंत्युखियास परतणे \p \v 21 त्यांनी त्या शहरात शुभवार्तेचा प्रचार करून मोठ्या संख्येने शिष्य बनविले. नंतर ते लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया या शहरात परत आले. \v 22 त्यांनी शिष्यांना बळकटी येण्यासाठी आणि विश्वासात एकनिष्ठतेने टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले, कारण “परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून गेले पाहिजे,” असे ते म्हणाले. \v 23 पौल आणि बर्णबाने प्रत्येक मंडळीमध्ये वडिलांची नेमणूक केली आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्या प्रभूला त्यांचे समर्पण केले. \v 24 नंतर पिसिदियामधून जात असताना ते पंफुल्यात आले, \v 25 आणि पेर्गा येथे वचनाचा प्रचार केल्यानंतर ते खाली अत्तलिया येथे गेले. \p \v 26 अत्तलियाहून ते तारवात बसून अंत्युखियास आले, आता जे कार्य त्यांनी पूर्ण केले होते त्यासाठी याच ठिकाणी त्यांना परमेश्वराच्या कृपेवर सोपविण्यात आले होते. \v 27 तिथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्याद्वारे केले व गैरयहूदीयांसाठी देखील विश्वासाचे दार कसे उघडले, याचा अहवाल सादर केला. \v 28 आणि तिथे ते शिष्यांबरोबर पुष्कळ दिवस राहिले. \c 15 \s1 यरुशलेम येथील सभा \p \v 1 यहूदीया येथून काही माणसे अंत्युखियास आली व विश्वासणार्‍यांना शिकवू लागली: “मोशेने शिकविलेल्या नियमशास्त्राप्रमाणे जोपर्यंत तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचे तारण होणे शक्य नाही.” \v 2 पौल आणि बर्णबाचा त्यांच्याबरोबर प्रखर मतभेद व वादविवाद झाला. शेवटी पौल आणि बर्णबाबरोबर इतर काही विश्वासणार्‍यांची नेमणूक करण्यात आली व या प्रश्नांसंबंधी यरुशलेम येथे प्रेषित व वडीलजनांना भेटावे म्हणून त्यांना पाठविण्यात आले. \v 3 नंतर मंडळीने त्यांना निरोप देऊन पाठविले आणि जसे ते फेनिके आणि शोमरोनामधून प्रवास करीत गेले, गैरयहूदीयांचे कसे परिवर्तन झाले हे त्यांनी तेथील लोकांना सांगितले. या बातमीने सर्व विश्वासणार्‍यांना अतिशय आनंदित केले. \v 4 जेव्हा ते यरुशलेममध्ये आले, तेथील मंडळी, प्रेषित व वडीलजनांनी त्यांचे स्वागत केले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्या सेवेद्वारे केले होते, याची सविस्तर माहिती पौल व बर्णबाने त्यांना दिली. \p \v 5 परूशी लोकांच्या पंथातील काही विश्वासू सभासद उठून उभे राहिले व म्हणाले, “गैरयहूदी लोकांची सुंता झालीच पाहिजे व मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे.” \p \v 6 प्रेषित आणि पुढारी या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी एकत्रित भेटले. \v 7 बरीच चर्चा झाल्यानंतर, पेत्र उभा राहिला व त्यांना उद्देशून म्हणाला: “बंधूंनो, हे आपणा सर्वांस माहीत आहे की गैरयहूदीयांनी विश्वास ठेवावा व माझ्याद्वारे शुभवार्तेचा संदेश त्यांना कळावा यासाठी फार काळापूर्वी परमेश्वराने माझी निवड केली होती. \v 8 परमेश्वर अंतःकरणे ओळखतो, त्यांनी आपल्याप्रमाणेच गैरयहूदी लोकांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांचाही स्वीकार केला आहे, असे स्पष्ट दाखविले आहे. \v 9 त्याने त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसलाही भेदभाव केलेला नाही, कारण त्याने त्यांची मने विश्वासाद्वारे शुद्ध केली आहेत. \v 10 तेव्हा आता, जे जू आपल्याला व आपल्या पूर्वजांना वाहवयास अशक्य होते, ते गैरयहूद्यांना वाहवयास लावून तुम्ही जणू परमेश्वराची परीक्षा पाहता काय? \v 11 नाही! आमचा विश्वास आहे की प्रभू येशूंच्या कृपेद्वारे आपल्याप्रमाणे त्यांनाही तारण मिळाले आहे.” \p \v 12 तेव्हा बर्णबा व पौल यांच्याद्वारे गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराने जी चिन्हे व अद्भुते केली यांचे वर्णन ऐकत असताना सर्व सभा स्तब्ध राहिली. \v 13 मग त्यांचे बोलणे आटोपल्यावर याकोब म्हणाला, “बंधूंनो, माझे ऐका. \v 14 परमेश्वराने प्रथम मध्यस्थी करून गैरयहूदी लोकांमधून आपल्या नावासाठी लोक निवडून घेतले हे शिमोनाने वर्णन करून आपल्याला सांगितले आहे. \v 15 संदेष्ट्यांचे शब्द याच्याशी सहमत आहे, असे लिहिले आहे: \q1 \v 16 “ ‘यानंतर मी पुन्हा येईन \q2 आणि दावीदाचे पतन झालेले मंडप \q1 पुनर्स्थापित करेन, तिच्या अवशेषांची पुनर्बांधणी करेन, \q2 आणि तिची पुनर्स्थापना करेन. \q1 \v 17 म्हणजे उरलेली मानवजात प्रभूचा शोध करेल, \q2 माझे नाव धारण करणारे सर्व गैरयहूदी देखील, \q1 ही कार्ये करतात ते प्रभू असे म्हणतात,’\f + \fr 15:17 \fr*\ft \+xt आमो 9:11, 12\+xt*\ft*\f* \q2 \v 18 प्रारंभीच्या काळापासून या गोष्टी प्रकट करणारे परमेश्वर असे म्हणतात.\f + \fr 15:18 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa गोष्टी पुष्कळ काळापासून परमेश्वराचे कार्य त्यांना माहीत आहे\fqa*\f* \p \v 19 “माझा न्याय असा आहे की, जे गैरयहूदी परमेश्वराकडे वळत आहेत, त्यांच्यासाठी कठीण होईल असे आपण करू नये. \v 20 फक्त त्यांना एवढेच लिहून कळवावे की, त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून आणि गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि रक्ताचे सेवन करण्यापासून स्वतःला दूर ठेवावे. \v 21 कारण प्राचीन काळापासून मोशेच्या नियमशास्त्राचा प्रत्येक शहरामध्ये प्रचार केला जाऊ लागला आणि प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये त्याचे वाचन होऊ लागले.” \s1 गैरयहूदी विश्वासणार्‍यांना सभेकडून पत्र \p \v 22 मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्‍यामधील पुढारी होते. \v 23 त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता: \pmo प्रेषित, वडीलजन आणि बंधुवर्ग यांच्याकडून, \pmo अंत्युखिया, सिरिया व किलिकिया येथील गैरयहूदी विश्वासणार्‍यांना: \pmo सलाम. \pm \v 24 आमच्यामधून काहीजण आमच्या परवानगीशिवाय तिथे येऊन तुम्हाला गोंधळात पाडत आहेत आणि त्यांच्या बोलण्याने तुमची मने विचलित करीत आहेत असे आमच्या ऐकण्यात आले आहे. \v 25 तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे. \v 26 या लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. \v 27 यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील. \v 28 पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत: \v 29 मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. \pmc निरोप द्यावा. \p \v 30 ती माणसे तिथून खाली अंत्युखियात आली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व मंडळीला एकत्र जमवून ते पत्र त्यांच्याकडे सोपविले. \v 31 लोकांनी ते वाचले आणि त्यातील उत्तेजनपर संदेशाने ते आनंदित झाले. \v 32 मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्‍यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले. \v 33 तिथे काही काळ राहिल्यानंतर, तेथील विश्वासणार्‍यांनी त्यांना शांतीचा आशीर्वाद देऊन, ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे परत पाठविले. \v 34 परंतु सीला\f + \fr 15:34 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये हे समाविष्ट केले आहे, \ft*\fqa पण सीलास ने तिथेच राहण्याचे ठरविले.\fqa*\f* तिथेच राहिला. \v 35 पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली. \s1 पौल व बर्णबा यांच्यात मतभेद \p \v 36 काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्‍यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी.” \v 37 बर्णबाला हवे होते की योहान, ज्याला मार्क असेही म्हणत, त्यालाही आपल्याबरोबर न्यावे. \v 38 परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती. \v 39 याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले, \v 40 परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्‍यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले. \v 41 तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला. \c 16 \s1 पौल व सीलाला तीमथ्य येऊन मिळतो \p \v 1 पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती, परंतु त्याचे वडील ग्रीक होते. \v 2 लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते. \v 3 त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते. \v 4 गावागावातून प्रवास करीत असताना, त्यांनी यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन यांनी जे निर्णय ठरविले होते त्याचे पालन लोकांनी करावे, असे सांगितले. \v 5 म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली. \s1 मासेदोनियाच्या मनुष्याचा पौलाला दृष्टान्त \p \v 6 त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते. \v 7 मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही. \v 8 म्हणून ते मुसिया प्रांतातून खाली त्रोवास येथे गेले. \v 9 रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.” \v 10 पौलाने हा दृष्टान्त पाहिल्यानंतर आपल्याला परमेश्वराने यांच्यामध्ये शुभवार्ता प्रचार करावयास बोलाविले आहे, असे समजून लगेच आम्ही मासेदोनियास जाण्याची तयारी केली. \s1 फिलिप्पै येथे लुदियाचे परिवर्तन \p \v 11 आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस येथे गेलो. \v 12 तिथून आम्ही प्रवास करून फिलिप्पै, जे रोमी वसाहतीत असून मासेदोनियाच्या शहरामधील एक महत्त्वाचे नगर होते\f + \fr 16:12 \fr*\ft त्या राज्याचे प्रख्यात शहर\ft*\f* तिथे गेलो. तिथे आम्ही बरेच दिवस राहिलो. \p \v 13 मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तिथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तिथे बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली. \v 14 त्या ऐकणार्‍या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले. \v 15 मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला व तिने आम्हाला तिच्या घरी बोलाविले. ती म्हणाली, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर, या आणि माझ्या घरी राहा.” तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले. \s1 पौल व सीला तुरुंगात \p \v 16 एकदा आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना, आम्हाला एक गुलाम मुलगी भेटली जिच्यामध्ये अशुद्ध आत्मा असून त्याच्या साहाय्याने ती भविष्य सांगत असे. भविष्यकथन करून ती आपल्या धन्यांना खूप पैसा मिळवून देत असे. \v 17 ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.” \v 18 असे ती पुष्कळ दिवस करत होती. शेवटी पौल अत्यंत त्रस्त झाला आणि तिच्याकडे वळून तिच्यातील आत्म्याला म्हणाला, “मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा करतो की तिच्यातून बाहेर नीघ!” आणि त्या क्षणी तो आत्मा तिच्यातून निघून गेला. \p \v 19 आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले. \v 20 त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत \v 21 आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.” \p \v 22 मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला. \v 23 त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्‍याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला. \v 24 असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले. \p \v 25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते. \v 26 अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले. \v 27 तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता. \v 28 परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!” \p \v 29 तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला. \v 30 त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?” \p \v 31 त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” \v 32 तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. \v 33 मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. \v 34 त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते. \p \v 35 पहाट झाल्यानंतर, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकार्‍यांना त्या तुरुंगाच्या नायकाकडे पाठवून त्यांना हुकूम दिला: “त्या माणसांना सोडून द्या.” \v 36 तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.” \p \v 37 परंतु पौल अधिकार्‍यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.” \p \v 38 अधिकार्‍यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले. \v 39 आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली. \v 40 तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पौल व सीला हे लुदियेच्या घरी गेले आणि बंधू भगिनींना भेटून त्यांना उत्तेजित केले. नंतर ते तिथून निघाले. \c 17 \s1 थेस्सलनीका येथे पौल \p \v 1 जेव्हा पौल व त्याचे सहकारी प्रवास करीत अंफिपुली व अपल्लोनिया या शहरांमधून जात होते तेव्हा ते थेस्सलनीका येथे आले, ज्या ठिकाणी यहूद्यांचे सभागृह होते. \v 2 आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला, \v 3 त्याने त्यांना स्पष्टीकरण करून पटवून दिले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तो त्यांना म्हणाला, “या येशूंची मी तुम्हाला घोषणा करीत आहे, तेच ख्रिस्त आहेत.” \v 4 ऐकणार्‍यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्‍या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या. \p \v 5 परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे\f + \fr 17:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa लोकांच्या जमावाकडे\fqa*\f* आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले. \v 6 पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्‍यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत; \v 7 आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.” \v 8 शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली. \v 9 मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले. \s1 बिरुया \p \v 10 रात्र झाल्याबरोबर विश्वासणार्‍यांनी पौल व सीला यांना बिरुयास पाठविले. तिथे पोहोचल्यावर ते यहूदी सभागृहामध्ये गेले. \v 11 आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत. \v 12 याचा परिणाम असा झाला की अनेकांनी विश्वास ठेवला, यामध्ये बर्‍याच संख्येने प्रमुख ग्रीक स्त्रिया व अनेक ग्रीक पुरुष देखील होते. \p \v 13 थेस्सलनीकातील यहूद्यांनी पौल बिरुया येथे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करीत आहे असे ऐकले, तेव्हा काहीजण तिथे गेले आणि त्यांनी तिथेही समुदायामध्ये चळवळ व खळबळ उडवून दिली. \v 14 विश्वासणार्‍यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले. \v 15 पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली. \s1 ॲथेन्समध्ये पौल \p \v 16 त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला. \v 17 म्हणून तो सभागृहामध्ये यहूदी आणि परमेश्वराचे भय धरणारे गैरयहूदी या दोघांबरोबर चर्चा करण्यासाठी जाऊ लागला आणि दररोज सार्वजनिक चौकात जे येत होते त्या सर्वांशी वादविवाद करू लागला. \v 18 तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता. \v 19 नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर चर्चेसाठी बैठकीत आणले व ते त्याला म्हणाले, “तू हे जे नवीन शिक्षण देत आहेस, ते काय आहे, हे आम्हाला समजेल का? \v 20 कारण तू आम्हाला अपरिचित असलेल्या गोष्टी ऐकवीत आहेस व त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.” \v 21 सर्व ॲथेन्सचे नागरिक व तिथे राहणारे परदेशी लोक, इतर काहीही न करता नव्या गोष्टी सांगणे किंवा ऐकणे यामध्ये आपला वेळ घालवित असत. \p \v 22 पौल अरीयपगाच्या बैठकीमध्ये मध्यभागी उभा राहून म्हणाला: “ॲथेन्सच्या नागरिकांनो! आपण सर्व दृष्टीने अतिशय धार्मिक वृत्तीचे आहात, ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. \v 23 कारण मी बाहेर फिरत असताना, तुमच्या पूजेच्या वस्तूंकडे मी काळजीपूर्वक पाहिले, मला एक वेदीसुद्धा दिसून आली जिच्यावर असा शिलालेख होता: \pc अज्ञात परमेश्वराला. \m म्हणजे ज्या परमेश्वराला तुम्ही ओळखत नाही त्याची तुम्ही उपासना करता आणि आता त्यांच्याविषयीच मी तुम्हाला सांगत आहे. \p \v 24 “ज्या परमेश्वराने जग व त्यातील सर्वकाही निर्माण केले ते आकाशाचे व पृथ्वीचे प्रभू आहेत, म्हणून ते हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीत; \v 25 मानवी हात त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, कारण त्यांना कशाचीही गरज नाही. ते प्रत्येकाला जीव आणि श्वास व लागणारे सर्वकाही पुरवितात. \v 26 त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी आधी नेमल्या होत्या. \v 27 परमेश्वराने हे यासाठी केले की, लोक त्यांचा शोध करतील आणि कसेही करून त्यांना प्राप्त करून घेतील, वास्तविक ते आपल्यातील कोणापासूनही फार दूर नाहीत. \v 28 ‘कारण त्यांच्यामध्ये आपण जगतो, वागतो आणि आपले अस्तित्व आहे.’ प्रत्यक्ष तुमच्या कवींपैकी काहींनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपण त्यांची संतती आहोत.’ \p \v 29 “यास्तव जर आपण परमेश्वराची संतती आहोत, तर मग आपण असा विचार कधीही करू नये की परमेश्वर म्हणजे मानवाच्या कलाकृतीने व कौशल्याने, सोने किंवा चांदी या धातूपासून अथवा दगडापासून तयार केलेल्या प्रतिमेसारखा आहे. \v 30 पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे. \v 31 कारण त्यांनी असा एक दिवस ठरविला आहे, त्या दिवशी ते त्यांनी नियुक्त केलेल्या मनुष्याच्या द्वारे या जगाचा न्याय नीतीने करतील. त्यांना त्यांनी मरणातून जिवंत करून या गोष्टींबाबत प्रत्येकाला खात्री करून दिली आहे.” \p \v 32 मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्‍यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.” \v 33 त्यामुळे, पौल त्यांना सोडून निघून गेला. \v 34 काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री व इतर काहीजण होते. \c 18 \s1 पौल करिंथमध्ये \p \v 1 यानंतर, पौलाने ॲथेन्स सोडले व तो करिंथ येथे गेला. \v 2 तिथे त्याला पोनतस गावाचा अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची पत्नी प्रिस्किल्लाला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तिथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला, \v 3 जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले. \v 4 प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे. \p \v 5 जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते. \v 6 परंतु जेव्हा ते पौलाला विरोध करून शिवीगाळ करू लागले, तेव्हा पौलाने याच्या निषेधार्थ त्याचे वस्त्र झटकून टाकले आणि म्हणाला, “तुमच्या विनाशासाठी तुम्हीच जबाबदार आहात! मी निर्दोष आहे. येथून पुढे मी गैरयहूदीयांकडे जाईन.” \p \v 7 नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे. \v 8 त्या सभागृहाचा प्रमुख क्रिस्प आणि त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि करिंथमधील अनेकांनी पौलाचे ऐकून विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला. \p \v 9 एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टान्तात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस. \v 10 मी तुझ्याबरोबर आहे आणि कोणीही तुझ्यावर हल्ला वा तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे अनेक लोक आहेत.” \v 11 तेव्हा पौल त्यांना करिंथ येथे दीड वर्ष परमेश्वराचे वचन शिकवीत राहिला. \p \v 12 गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल झाला, तेव्हा पौलाला तिथून घालवून द्यावे म्हणून करिंथ येथील यहूद्यांनी एकजूट होऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला न्यायालयात आणले. \v 13 त्यांनी पौलावर असा आरोप केला, “हा मनुष्य, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.” \p \v 14 पौल आता बोलणार होता इतक्यातच, गल्लियो त्यांना म्हणाला, “जर तुम्ही यहूदी गंभीर गुन्हा किंवा दुराचाराची तक्रार करीत असाल, तर तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी काहीतरी कारण असते. \v 15 परंतु ज्याअर्थी हा वाद निव्वळ शब्दांचा आणि नावांचा आणि तुमच्या नियमशास्त्राबद्दलचा आहे, त्याअर्थी तुम्हीच हे प्रकरण मिटवा. अशा प्रकारच्या वादांचा न्यायनिवाडा करण्याचे मी साफ नाकारतो.” \v 16 असे म्हणून त्याने त्यांना न्यायालयासमोरून घालवून दिले. \v 17 त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्‍यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही. \s1 प्रिस्किल्ला, अक्विला आणि अपुल्लोस \p \v 18 पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्‍या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता. \v 19 इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला. \v 20 जेव्हा त्यांनी पौलाला विनंती केली की, त्याने त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवावा, परंतु पौलाने ते नाकारले. \v 21 परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला. \v 22 जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तिथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला. \p \v 23 अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तिथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले. \p \v 24 त्याचवेळी आलेक्सांद्रियाचा रहिवासी, अपुल्लोस नावाचा यहूदी इफिस येथे आला होता. तो एक विद्वान मनुष्य होता आणि त्याला शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते. \v 25 प्रभूच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आलेले होते आणि तो आवेशाने बोलत होता, जरी त्याला फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती होती, तरी येशूंबद्दल अचूक शिक्षण देत होता. \v 26 तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला. \p \v 27 जेव्हा अपुल्लोसला अखया येथे जायचे होते, तेव्हा बंधू व भगिनींनी त्याला उत्तेजन दिले व अखया येथील शिष्यांनी त्याचे स्वागत करावे असे विनंती पत्र त्याच्या हाती देऊन त्याचा निरोप घेतला. जेव्हा तो तिथे आला, तेव्हा कृपेद्वारे ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना त्याची फार मोठी मदत झाली. \v 28 कारण सार्वजनिक वाद करून त्याने अतिशय सशक्तपणे यहूदीयांच्या सर्व वादांचे खंडन केले आणि शास्त्राच्या आधाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, येशू हेच ख्रिस्त आहेत. \c 19 \s1 इफिसमध्ये पौल \p \v 1 अपुल्लोस करिंथ येथे असताना, पौल अंतर्भागातून प्रवास करीत इफिस येथे आला. तिथे त्याला काही शिष्य आढळले. \v 2 त्याने त्यांना विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळी, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?” \p त्यांनी उत्तर दिले, “नाही, पवित्र आत्मा काय आहे हे आम्ही ऐकले देखील नाही.” \p \v 3 तेव्हा पौलाने त्यांना विचारले, “तर मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” \p “योहानाचा बाप्तिस्मा,” ते उत्तरले. \p \v 4 मग पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता. त्याने लोकांना जो त्याच्यामागून येणार होता त्या येशूंवर विश्वास ठेवण्यास सांगितले.” \v 5 हे ऐकल्यानंतर, त्यांचा प्रभू येशूंच्या नावात बाप्तिस्मा करण्यात आला. \v 6 मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेवले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले. \v 7 ते सर्व बारा पुरुष होते. \p \v 8 मग पौलाने सभागृहामध्ये प्रवेश केला आणि अतिशय धैर्याने परमेश्वराच्या राज्याविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने चर्चा करीत राहिला. \v 9 परंतु काहीजण हटवादी झाले; त्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले आणि जाहीरपणे द्वेषाच्या भावनेने त्या मार्गाविषयी विषयी बोलू लागले. तेव्हा पौल त्यांच्यामधून निघून गेला व शिष्यांना आपल्याबरोबर घेऊन त्याने तुरन्नाच्या व्याख्यानगृहात रोज संवाद केला. \v 10 असे दोन वर्षे ते सातत्याने करीत राहिले. त्यामुळे आशिया प्रांतात राहणार्‍या सर्व यहूदी व गैरयहूदी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. \p \v 11 परमेश्वराने पौलाद्वारे असाधारण अशी आश्चर्यकृत्ये केली, \v 12 त्यामुळे असे झाले की, ज्या रुमालांना आणि अंगावरील वस्त्रांना पौलाचा फक्त स्पर्श झाला होता, ते रुमाल व वस्त्र आजार्‍यांकडे नेले आणि त्यांचे आजार बरे झाले आणि दुरात्मे त्यांना सोडून गेले. \p \v 13 काही यहूदी प्रभू येशूंचे नाव घेऊन फिरत होते आणि ज्यांना दुरात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. ते असे म्हणत होते, “ज्या येशूंच्या नावाची पौल घोषणा करीत आहे, त्या नावाने मी तुला आज्ञा करतो की याच्यामधून बाहेर नीघ.” \v 14 स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते. \v 15 एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, “येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?” \v 16 मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. \p \v 17 या घटनेची वार्ता लागलीच सर्व इफिसमध्ये राहणारे यहूदी व ग्रीक यांना कळली, तेव्हा त्या सर्वांमध्ये भीती निर्माण झाली आणि प्रभू येशूंचे नाव अत्यंत आदरणीय मानले गेले. \v 18 ज्या अनेकांनी विश्वास ठेवला होता ते आता पुढे आले आणि जे काही त्यांनी केले होते त्याची जाहीर कबुली दिली. \v 19 अनेक लोक जे जादूटोणा करीत होते, त्यांनी त्यांची पुस्तके एकत्रित आणली आणि ती सर्व लोकांसमोर जाळून टाकली. त्यांनी त्या पुस्तकांची किंमत मोजली, तेव्हा ती पन्नास हजार चांदीची नाणी\f + \fr 19:19 \fr*\ft हे एक चांदीचे नाणे असून ती एका दिवसाची मजुरी होती\ft*\f* एवढी झाली. \v 20 या रीतीने प्रभूचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले. \p \v 21 हे सर्व झाल्यानंतर, मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमला जावे, असे पौलाने आपल्या मनात\f + \fr 19:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa आत्म्यात\fqa*\f* ठरविले व म्हटले, “तिथे गेल्यानंतर, मी रोम या ठिकाणीही भेट दिली पाहिजे.” \v 22 त्याने आपले दोन मदतनीस, तीमथ्य व एरास्तला मासेदोनियास पुढे पाठविले आणि तो आणखी काही काळ आशिया प्रांतात राहिला. \s1 इफिसमध्ये दंगा \p \v 23 त्याच सुमारास, या मार्गाविषयी फार मोठी खळबळ उडाली. \v 24 देमेत्रिय नावाच्या चांदीच्या कारागिराने अर्तमीस देवीचे चांदीचे देव्हारे तयार करून तेथील कारागिरांना पुष्कळ उद्योग मिळवून दिला होता. \v 25 एकदा त्याने या सारखाच व्यवसाय करणार्‍या कारागिरांनादेखील एकत्र बोलाविले आणि तो त्यांना म्हणाला: “माझ्या मित्रांनो, या धंद्यात आपल्याला चांगला फायदा होत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. \v 26 तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत. \v 27 आता यामध्ये धोका हा आहे की, आपल्या धंद्याचे चांगले नाव नाहीसे होईल, इतकेच नव्हे तर महादेवी अर्तमीसच्या मंदिराची सुद्धा अपकीर्ती होईल आणि ही देवता, जिची उपासना सर्व आशियामध्ये व जगामध्ये केली जाते, तिचे दैवी वैभव लुटून नेले जाईल.” \p \v 28 त्यांनी हे ऐकले, तेव्हा ते क्रोधाविष्ट झाले व मोठमोठ्याने ओरडू लागले: “इफिसकरांची अर्तमीस थोर आहे!” \v 29 लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले. \v 30 समुदायापुढे स्वतः जावे, असे पौलाच्या मनात होते, परंतु शिष्य त्याला तसे करू देईनात. \v 31 त्या प्रांतातील काही अधिकारी, पौलाचे मित्र, यांनी देखील त्याला निरोप पाठविला व नाटकगृहात प्रवेश करू नये अशी त्याला विनंती केली. \p \v 32 सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते. \v 33 काही यहूद्यांनी आलेक्सांद्राला पुढे ढकलले, मग आलेक्सांद्राने लोकांपुढे बचावाचे भाषण करण्यासाठी, शांत व्हावे म्हणून हाताने खुणावले. \v 34 परंतु तो यहूदी आहे हे समजल्यावर, सुमारे दोन तास, “इफिसकरांची अर्तमीस थोर!” अशी आरोळी ते एका सुरात मारीत राहिले. \p \v 35 सरतेशेवटी नगर लेखनिकाने जमावाला शांत करून म्हटले: “इफिसच्या नागरिकांनो, स्वर्गातून खाली पडलेल्या त्या थोर अर्तमीसच्या मूर्तीचे व मंदिराचे संरक्षक इफिस शहर आहे, हे सर्व जगाला माहीत नाही का? \v 36 तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका. \v 37 तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही. \v 38 जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात. \v 39 जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील. \v 40 वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.” \v 41 असे बोलून त्याने सभा बरखास्त केली. \c 20 \s1 मासेदोनिया, ग्रीस व त्रोवास येथे पौल \p \v 1 जेव्हा गडबड शांत झाली, तेव्हा पौलाने शिष्यांना बोलाविले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर, त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जाण्यास निघाला. \v 2 त्या भागातून प्रवास करून त्याने लोकांना अनेक उत्तेजनपर शब्द सांगितले आणि शेवटी तो ग्रीसमध्ये आला, \v 3 तिथे तो तीन महिने राहिला. पुढे सीरियाला जलमार्गाने जाण्याची तो तयारी करीत असताना, यहूदी कट कारस्थान करीत आहेत, हे त्याच्या नजरेस आले, तेव्हा मासेदोनियामधून जाण्याचे त्याने ठरविले. \v 4 त्याच्याबरोबर बिरुया मध्ये राहणारा पुर्राचा पुत्र सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस व तीमथ्य देखील, तसेच आशिया प्रांतातील तुखिक व त्रोफिम होते. \v 5 ते पुढे जाऊन त्रोवास येथे आमची वाट पाहत होते. \v 6 परंतु आम्ही बेखमीर भाकरीच्या सणानंतर फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसानंतर त्रोवास येथे एकत्रित जमलो. तिथे आम्ही सात दिवसांचा मुक्काम केला. \s1 त्रोवास येथे युतुखला मेलेल्यातून उठविले जाते \p \v 7 आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्‍या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला. \v 8 वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमलो होतो, तिथे पुष्कळ दिव्यांचा प्रकाश होता. \v 9 तेव्हा पौल बोलत राहिल्यामुळे युतुख नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता, त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तो गाढ झोपेत असताना, तिसर्‍या मजल्यावरून खाली जमिनीवर पडला आणि त्यास उचलले तेव्हा तो मरण पावला आहे असे दिसून आले. \v 10 तेव्हा पौल खाली गेला आणि त्या तरुणावर पाखर घालून आपल्या हाताने कवटाळले व म्हणाला, “भयभीत होऊ नका, तो जिवंत आहे!” \v 11 मग तो पुन्हा वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाकर मोडून खाल्ली. पहाट होईपर्यंत बोलत राहिल्यावर तो रवाना झाला. \v 12 लोक त्या तरुणाला जिवंत घरी घेऊन आले म्हणून त्यांना अतिशय समाधान वाटले. \s1 इफिस येथील वडीलजनांना निरोप \p \v 13 पौल अस्सोस नगराकडे पायी जाणार होता म्हणून त्याने असे ठरविले की, आम्ही तारवात बसून अस्सोसला पुढे जावे आणि तिथे पोहोचल्यावर त्याला तारवात घ्यावे. \v 14 त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो. \v 15 दुसर्‍या दिवशी तारवात बसून आम्ही खियोस बंदर पार केले. त्यानंतरच्या पुढील दिवशी सामोस बंदर पार केले, मग दुसर्‍या दिवशी मिलेतास आलो. \v 16 आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस शहराच्या पुढे जाण्याचे पौलाने ठरविले होते, कारण शक्य झाल्यास पेन्टेकॉस्टच्या दिवसांच्या वेळी यरुशलेममध्ये पोहोचावे, या दृष्टीने तो घाई करीत होता. \p \v 17 मिलेताहून पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडीलजनांना निरोप पाठविला. \v 18 ते आल्यानंतर त्याने त्यांना म्हटले, “मी आशियात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून पूर्णवेळ तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो व कसा राहिलो, याची तुम्हाला जाणीव आहे. \v 19 म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि माझ्या यहूदीयांच्या कटांमुळे मजवर आलेली अतिशय कठीण परीक्षा व संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला माहीत आहे. \v 20 जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले. \v 21 त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे. \p \v 22 “आणि आता, जसे आत्म्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तिथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही. \v 23 मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे. \v 24 तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय. \p \v 25 “आणि आता मला माहीत झाले आहे की ज्या तुम्हामध्ये मी परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करीत फिरत होतो, त्या तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही. \v 26 यास्तव, मी आज तुम्हाला जाहीर करतो की तुमच्यापैकी कोणाच्याही रक्ताबाबत मी निर्दोष आहे. \v 27 कारण परमेश्वराचे संपूर्ण मनोरथ सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. \v 28 तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या\f + \fr 20:28 \fr*\ft किंवा \ft*\fqa प्रभूच्या\fqa*\f* मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा. \v 29 मला हे माहीत आहे की मी गेल्यानंतर, क्रूर लांडगे येतील व तुम्हामध्ये शिरतील आणि ते कळपालाही सोडणार नाहीत. \v 30 प्रत्यक्ष तुमच्या गटामधून काही माणसे उठतील व त्यांना अनुयायी मिळावेत व त्यांचे शिष्य व्हावेत म्हणून सत्य विपरीत करतील. \v 31 म्हणून आता तुम्ही सावध राहा! मी तुमच्याबरोबर तीन वर्षे रात्रंदिवस आसवे गाळून तुम्हा प्रत्येकाला सावध राहण्याविषयी सूचना देण्याचे केव्हाही थांबविले नाही, याची आठवण ठेवा. \p \v 32 “आणि आता मी तुम्हाला परमेश्वरावर व त्यांच्या कृपेच्या वचनांवर सोपवितो, ते वचन तुमची वृद्धी करण्यास आणि पवित्र केलेल्या सर्वांमध्ये वतन द्यावयास समर्थ आहे. \v 33 मी कोणाच्याही सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. \v 34 तुम्हा स्वतःस माहीत आहे की माझ्या या हातांनी माझ्या गरजा आणि माझ्याबरोबर असणार्‍यांच्याही गरजा भागविण्यासाठी कष्ट केले आहेत. \v 35 मी केलेल्या सर्व गोष्टीत मी तुम्हाला निदर्शनास आणून दिले आहे की, अशाप्रकारे श्रम करून आपण अशक्तांना साहाय्य करावे व प्रभू येशू जे शब्द स्वतः बोलले होते ते स्मरणात ठेवा: ‘घेण्यापेक्षा देणे यात अधिक धन्यता आहे.’ ” \p \v 36 पौलाचे बोलणे संपल्यावर त्याने सर्वांबरोबर गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. \v 37 तेव्हा त्या सर्वांनी फार मोठा आकांत केला व त्यांनी पौलाच्या गळ्यात मिठी मारून त्याची चुंबने घेतली. \v 38 तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहणार नाही हे जे वाक्य त्याने म्हटले होते, याचे त्या सर्वात जास्त दुःख झाले होते. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचविले. \c 21 \s1 यरुशलेमकडे \p \v 1 शेवटी आम्ही अतिदुःखाने रडून त्यांचा निरोप घेतल्यावर, जहाजातून प्रवास करीत सरळ कोस येथे गेलो. दुसर्‍या दिवशी आम्ही रुदा येथे गेलो आणि तिथून पातराला गेलो. \v 2 तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो. \v 3 जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते. \v 4 तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला. \v 5 परंतु जेव्हा आम्हाला जाण्याची वेळ आली, तेव्हा तेथील सर्वजण पत्नी आणि लेकरांसोबत आमच्याबरोबर चालत शहराच्या सीमेपर्यंत आले आणि तिथे समुद्रकिनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. \v 6 एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले. \p \v 7 सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो. \v 8 दुसर्‍या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता. \v 9 त्याला चार अविवाहित कन्या होत्या, त्या भविष्यवाणी करीत असत. \p \v 10 आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला. \v 11 आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ” \p \v 12 हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली. \v 13 पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.” \v 14 त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.” \p \v 15 यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो. \v 16 कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता. \s1 पौलाचे यरुशलेम येथे आगमन \p \v 17 आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्‍यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. \v 18 दुसर्‍या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते. \v 19 क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला. \p \v 20 त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत. \v 21 तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्‍या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस. \v 22 तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील, \v 23 तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत. \v 24 तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही. \v 25 गैरयहूदी विश्वासणार्‍यांबद्दल म्हणशील तर आम्ही आमचा निर्णय त्यांना लिहून कळविला आहे की त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्त सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून स्वतःला दूर ठेवावे.” \p \v 26 दुसर्‍या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला. \s1 पौलाला अटक \p \v 27 ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले, \v 28 ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.” \v 29 या आधी त्यांनी पौलाला इफिस येथील त्रोफिमबरोबर शहरात पाहिले होते आणि पौलाने त्याला मंदिरात आणले असावे असा त्यांचा समज झाला होता. \p \v 30 तेव्हा सर्व शहर खळबळून गेले आणि सर्व बाजूंनी लोक धावत आले. पौलाला जबरदस्तीने पकडून मंदिरातून ओढून काढण्यात आले आणि तत्काळ दरवाजे बंद करण्यात आले. \v 31 ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे. \v 32 तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्‍यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्‍यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले. \p \v 33 सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली. \v 34 तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला. \v 35 पौल पायर्‍यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले. \v 36 त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!” \s1 पौलाचे जमावापुढे भाषण \p \v 37 पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले. \p “तुला ग्रीक भाषा येते काय? \v 38 ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?” \p \v 39 पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.” \p \v 40 सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्‍यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला: \c 22 \nb \v 1 “बंधूंनो व वडीलजनांनो, माझ्या बचावाचे भाषण ऐकून घ्या.” \p \v 2 तो इब्री भाषेत बोलत आहे, हे ऐकून स्तब्धता अधिकच वाढली. \p तेव्हा पौल बोलू लागला: \v 3 “मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेलच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो. \v 4 ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला. स्त्री व पुरुष या दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो. \v 5 महायाजक व येथे असलेले सर्व सभासद, ते स्वतः याबाबतीत साक्ष देऊ शकतात की, मी त्यांच्याकडून दिमिष्क येथील सभेच्या सदस्यांना दाखविण्यासाठी तशी पत्रेसुद्धा मिळविली होती आणि या लोकांना बंदिवान करून यरुशलेम येथे आणून त्यांना शिक्षा केली जावी यासाठी तिथे गेलो. \p \v 6 “दुपारच्या समयी मी दिमिष्कच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला. \v 7 मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’ \p \v 8 “ ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ मी विचारले. \p “प्रभूने मला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी नासरेथकर येशू आहे,’ \v 9 माझ्या सहकार्‍यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही. \p \v 10 “मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे?’ \p “प्रभू म्हणाले, ‘आता उठून उभा राहा आणि दिमिष्कमध्ये जा, जे काही तुला करावयाचे आहे, ते तुला तिथे सांगण्यात येईल.’ \v 11 त्या प्रखर प्रकाशामुळे मी आंधळा झालो होतो, म्हणून माझ्या सोबत्यांनी मला हाताला धरून दिमिष्कला नेले. \p \v 12 “हनन्याह नावाचा मनुष्य मला भेटावयास आला. तो नियमशास्त्राचे अचूक पालन करणारा होता व सर्व यहूदी लोकांचे त्याच्याबद्दल फारच चांगले मत होते. \v 13 तो माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी प्राप्त होवो!’ आणि त्याच क्षणाला मी त्याला पाहू शकलो. \p \v 14 “नंतर त्याने मला असे सांगितले: ‘आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुझी निवड यासाठी केली आहे की, तू त्यांची इच्छा जाणून घ्यावीस आणि जे नीतिमान आहेत त्यांना पाहावेस व त्यांच्या तोंडचे शब्द ऐकावेस. \v 15 तू जे पाहिले व ऐकले आहेस त्याविषयी तू सर्व मनुष्यांना साक्षी होशील. \v 16 आणि आता विलंब कशासाठी? जा आणि बाप्तिस्मा घे आणि त्यांच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’ \p \v 17 “यरुशलेमला परतल्यानंतर मी मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला तंद्री लागली, \v 18 आणि मी पाहिले की प्रभू माझ्याबरोबर बोलत आहेत. ते मला म्हणाले, ‘ताबडतोब यरुशलेम सोडून जा, कारण येथील लोक माझ्याबद्दल जी साक्ष तू देशील ती ते स्वीकारणार नाहीत.’ \p \v 19 “मी उत्तर दिले, ‘प्रभू, या लोकांना माहीत आहे की, मी एका सभागृहातून दुसर्‍या सभागृहात जाऊन विश्वासणार्‍यांना मार देऊन तुरुंगात टाकीत होतो. \v 20 आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’ \p \v 21 “नंतर प्रभू मला म्हणाले, ‘जा; कारण मी तुला फार दूर गैरयहूदीयांकडे पाठविणार आहे.’ ” \s1 पौल एक रोमी नागरिक \p \v 22 या वाक्यापर्यंत समुदायांनी पौलाचे ऐकले. नंतर त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आणि ओरडून म्हणाले, “हा मनुष्य जमिनीला भार असा आहे! हा जगण्यास योग्य नाही!” \p \v 23 ते ओरडत होते, आपले अंगरखे वर हवेत फेकीत होते व धूळ आकाशात उधळीत होते, \v 24 तेव्हा सेनापतीने पौलाला आत बराकीत आणण्याची आज्ञा केली. लोक त्याच्यावर इतके का ओरडत आहेत, हे समजावे म्हणून त्याने फटके मारून त्याची तपासणी करण्यास सांगितले. \v 25 जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?” \p \v 26 ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतीकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा मनुष्य तर रोमी नागरिक आहे.” \p \v 27 तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” \p त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.” \p \v 28 त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” \p “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले. \p \v 29 यामुळे जे त्याला प्रश्न विचारून त्याची तपासणी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते, तो फार घाबरून गेला. \s1 न्यायसभेपुढे पौल \p \v 30 सेनापतीला हे शोधून काढायचे होते की, खरोखर कोणत्या कारणाने यहूदी लोक पौलाला आरोपी ठरवीत आहेत. म्हणून त्याने दुसर्‍या दिवशी पौलाला मुक्त केले आणि मुख्य याजक व सर्व न्यायसभेचे सभासद यांना एकत्र होण्याचा हुकूम केला. त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणून उभे केले. \c 23 \p \v 1 मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सदसद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.” \v 2 यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला. \v 3 तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!” \p \v 4 पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!” \p \v 5 पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”\f + \fr 23:5 \fr*\ft \+xt निर्ग 22:28\+xt*\ft*\f* \p \v 6 नंतर पौलाला, समजले की तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही सदूकी आहेत आणि इतर परूशी आहेत, तेव्हा पौल न्यायसभेच्या समोर म्हणाला, “बंधूंनो, माझे पूर्वज परूशी होते, त्यांच्याप्रमाणे मी परूशी आहे आणि माझी आशा व मृतांचे पुनरुत्थान यामुळे माझी चौकशी होत आहे.” \v 7 तो हे बोलला तेव्हा परूशी व सदूकी यांच्यात कलह होऊन सभेत फूट पडली. \v 8 कारण सदूकी लोक म्हणत की पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मेही नाहीत, परंतु परूश्यांचा या सर्वांवर विश्वास होता. \p \v 9 तेव्हा मोठा गोंधळ सुरू झाला, काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते ते उठून उभे राहिले आणि जोरजोराने वादविवाद करू लागले. “आम्हाला या मनुष्यात काही अयोग्य असे आढळत नाही, ते म्हणाले, जर त्याच्याशी कदाचित एखादा आत्मा किंवा देवदूत बोलला असेल तर कसे समजावे?” \v 10 वादाने उग्र स्वरूप धारण केले, सरतेशेवटी सेनापतीला भीती वाटली की ते पौलाचे फाडून तुकडे करतील. तेव्हा त्याने त्याच्या सैनिकांना हुकूम दिला की, त्यांनी खाली जाऊन त्याला त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर करावे आणि पुन्हा बराकीत घेऊन यावे. \p \v 11 त्याच रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिले आणि त्याला म्हणाले, “धैर्य धर! येथे यरुशलेममध्ये तू माझ्याविषयी लोकांना जशी साक्ष दिलीस, तशीच साक्ष तुला रोममध्येही द्यावीच लागणार आहे.” \s1 पौलाला मारण्याचा कट \p \v 12 मग दुसर्‍या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत. \v 13 चाळीस किंवा त्याहून अधिक यहूदी या कटकारस्थानामध्ये सामील झाले. \v 14 नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे. \v 15 तर आता, त्याच्याविषयी आणखी काही विचारपूस बारकाईने करावयाची आहे, या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सेनापतीला सुचवावे. तो येथे येण्यापूर्वी त्याला ठार करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.” \p \v 16 परंतु पौलाच्या बहिणीच्या मुलाला त्यांचा हा कट समजला, तेव्हा बराकीत जाऊन त्याने पौलाला तसे कळविले. \p \v 17 तेव्हा पौलाने शताधिपतींपैकी एकाला बोलाविले व त्याला म्हणाला, “या तरुणाला सेनापतीकडे ने; या तरुणाला काहीतरी सांगावयाचे आहे.” \v 18 म्हणून त्याला सेनापतीकडे नेले. \p शताधिपती म्हणाला, “बंदिवान पौलाने, या मुलाला आपणास काही महत्त्वाचे सांगावयाचे आहे म्हणून आपणाकडे आणावे, अशी विनंती केली.” \p \v 19 तेव्हा सेनापतीने त्या तरुण मुलाचा हात धरून त्यास बाजूला नेऊन विचारले, “तुला मला काय सांगावयाचे आहे?” \p \v 20 तो म्हणाला: “पौलाकडून आणखी अधिक माहिती हवी आहे असे निमित्त सांगून उद्या आपण त्याला न्यायसभेपुढे आणावे, अशी विनंती काही यहूदी आपल्याला करणार आहेत. \v 21 परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.” \p \v 22 तेव्हा सेनापतीने, “तू मला हे सांगितले आहेस हे कोणालाही कळू देऊ नकोस.” असा इशारा देऊन त्या तरुणाला पाठवून दिले. \s1 पौलाला कैसरीयास पाठवितात \p \v 23 त्यानंतर त्याने आपल्या दोन शताधिपतींना बोलाविले व त्यांना हुकूम दिला, “आज रात्री नऊ वाजता कैसरीयास जाण्यासाठी दोनशे सैनिक, सत्तर घोडेस्वार आणि दोनशे भालेकरी तयार ठेव. \v 24 पौलाला प्रवासासाठी घोडे द्या व त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे बंदोबस्ताने सुरक्षित न्या.” \p \v 25 मग त्याने असे पत्र लिहिले: \pmo \v 26 महाराज, राज्यपाल फेलिक्स यास: \pmo क्लौडियस लुसियाचा: \pmo सलाम. \pm \v 27 या मनुष्याला यहूदी लोकांनी पकडले होते व ते त्याला ठार मारणार होते, तेव्हा तो रोमी नागरिक आहे हे समजल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी मी सैनिक पाठविले. \v 28 त्यांनी काय दोषारोप केला आहे हे समजून घ्यावयाचे होते म्हणून मी त्याला न्यायसभेपुढे आणले. \v 29 मला लवकरच समजून आले की त्यांच्यातील वाद हा नियमांविषयी होता आणि त्याबद्दल त्याला तुरुंगवास अथवा मरणाची शिक्षा देता येणार नाही. \v 30 परंतु या माणसाविरुद्ध कट रचण्यात येऊन तो अंमलात येण्याची शक्यता आहे असे मला समजले, तेव्हा त्याला ताबडतोब आपणाकडे पाठविले. त्याच्यावर आरोप करणार्‍यांनी ते तुमच्यासमोर मांडावेत असा मी त्यांना हुकूम केला. \p \v 31 म्हणून सैनिकांनी, हुकुमाप्रमाणे पौलाला घेऊन त्याच रात्री अंतिपत्रिसापर्यंत पोहोचविले. \v 32 दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर पुढे जाण्यास घोडदळाला त्याच्याबरोबर ठेऊन ते आपल्या बराकीत परतले. \v 33 ते घोडदळ कैसरीयास पोहोचले, तेव्हा त्यांनी ते पत्र राज्यपालांपुढे सादर केले आणि पौलाला त्याच्या स्वाधीन केले. \v 34 राज्यपालांनी पत्र वाचले आणि तो कोणत्या प्रांताचा आहे, असे विचारले. तो किलिकियाचा आहे, असे त्यास समजल्यावर, \v 35 राज्यपालांनी पौलाला सांगितले, “तुझ्यावर आरोप करणारे येथे आले की मी तुझे हे प्रकरण ऐकून घेईन.” नंतर राज्यपालांनी पौलाला हेरोदाच्या राजवाड्यातील पहार्‍यात ठेवण्याचा हुकूम दिला. \c 24 \s1 फेलिक्स राज्यपालापुढे पौलाची चौकशी \p \v 1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले. \v 2 पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत. \v 3 यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. \v 4 आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे. \p \v 5 “हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे \v 6 हा मंदिर अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत होता; म्हणून आम्ही त्याला अटक केली. आम्ही आमच्या नियमानुसार त्याचा न्याय करणार होतो \v 7 परंतु यरुशलेम येथील पलटणीचे सेनापती लुसिया आले आणि त्यांनी जबरदस्ती करून त्याला आमच्या हातातून काढून घेतले\f + \fr 24:7 \fr*\ft हे सर्वात जुन्या मूळ हस्तलिखितांमध्ये सापडत नाही.\ft*\f* \v 8 व आज्ञा केली की त्याच्यावर आरोप करणार्‍यांनी तुमच्यासमोर यावे. आता या माणसाची आपण स्वतः तपासणी करून या आरोपात तथ्य आहे की नाही, हे समजून घ्यावे.” \p \v 9 त्याचे बोलणे संपताच सर्व यहूद्यांनी एकसुरात अनुमोदन दिले की सांगण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे. \p \v 10 राज्यपालाने त्याला बोलण्यास खुणावले, पौलाने उत्तर दिले: “महाराज, आपण अनेक वर्षे या देशात न्यायाधीश म्हणून आहात; त्यामुळेच मी आनंदाने माझे बचावाचे भाषण आपणापुढे करीत आहे. \v 11 मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी मी यरुशलेममध्ये आलो याला बारा दिवसांहून अधिक कालावधी लोटला नाही, हे आपण सहज पडताळून पाहू शकाल. \v 12 आणि मंदिरात, सभागृहामध्ये किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकात अशांती माजविताना मजवर आरोप करणार्‍यांना मी आढळलो नाही. \v 13 त्यांनी जे आरोप मजवर केले आहेत ते तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकत नाहीत. \v 14 तरी एक गोष्ट कबूल करतो की मी आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराची उपासना करतो व त्या मार्गाचा अनुयायी आहे ज्याला हे लोक पंथ असे म्हणतात. त्याबरोबरच जे नियमशास्त्राला धरून आहे त्या प्रत्येक गोष्‍टीवर व संदेष्ट्यांच्या लिखाणात जे लिहिले आहे, त्या प्रत्येक वचनावर माझा विश्वास आहे, \v 15 परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल. \v 16 यामुळेच मी परमेश्वरासमोर आणि मनुष्यासमोर माझी विवेकबुद्धी सतत स्वच्छ ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतो. \p \v 17 “अनेक वर्षे बाहेर राहिल्यानंतर, मी गरीब लोकांना साहाय्य करण्यासाठी देणग्या व अर्पण वाहण्यासाठी यरुशलेमला परतलो. \v 18 यांनी मला मंदिराच्या अंगणात शुद्धीकरणाचा विधी पूर्ण करताना पाहिले. तिथे माझ्याभोवती जमाव नव्हता आणि मी कोणत्याही गोंधळात सहभागी झालो नव्हतो. \v 19 परंतु आशिया प्रांतातील काही यहूदीयांची माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल तर त्यांनी येथे हजर राहणे आवश्यक होते. \v 20 येथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या या लोकांना विचारा की त्यांच्या न्यायसभेपुढे मी उभा होतो तेव्हा त्यांना मजमध्ये कोणता अपराध आढळून आला, \v 21 ही केवळ एक गोष्ट सोडून मी त्यांच्यासमोर उच्च आवाजाने ओरडलो: ‘मृतांचे पुनरुत्थान यामुळे मी आज आपणापुढे चौकशीसाठी उभा आहे.’ ” \p \v 22 फेलिक्सला या मार्गाबद्दल चांगली माहिती होती, त्याने सुनावणी तात्पुरती थांबविली. “जेव्हा सेनापती लुसिया येईल, तेव्हा आपण या प्रकरणाचा निकाल लावू,” असे त्याने म्हटले. \v 23 त्याने शताधिपतीला हुकूम केला की, पौलावर पहारा ठेवावे परंतु त्याला थोडीफार स्वतंत्रता दिली जावी आणि त्याच्या मित्रांना त्याची सेवा करण्याची अधिकृत परवानगी द्यावी. \p \v 24 मग काही दिवसानंतर आपली यहूदी पत्नी द्रुसिल्लासह फेलिक्स आला. पौलाला बोलविल्यानंतर तो येशू ख्रिस्तावरील विश्वासासंबंधी जे बोलला ते त्यांनी ऐकले. \v 25 तो जेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन आणि भावी न्याय या गोष्टीसंबंधाने बोलत होता, तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि म्हणाला, “आतासाठी हे पुरे आहे! तू जाऊ शकतोस. मला पुढे अधिक सवड लाभली, तर मी तुला पुन्हा बोलावेन.” \v 26 त्याचवेळेस त्याने अशीही आशा बाळगली होती की पौल त्याला लाच देईल आणि म्हणून तो त्याला वारंवार बोलावून घेत होता व त्याच्याबरोबर बोलणे करीत होता. \p \v 27 दोन वर्षे निघून गेल्यानंतर, पुढे पुर्क्य फेस्त हा राज्यपाल म्हणून फेलिक्सच्या जागेवर आला. परंतु फेलिक्सला यहूदीयावर कृपादृष्टी दाखवायची होती म्हणून तो पौलाला कैदेतच ठेऊन निघून गेला. \c 25 \s1 फेस्तासमोर पौलाची चौकशी \p \v 1 तीन दिवसानंतर प्रांतात आल्यानंतर, फेस्त कैसरीयाहून यरुशलेम येथे वर गेला, \v 2 तेव्हा प्रमुख याजकांनी आणि यहूदी पुढार्‍यांनी त्याच्यासमोर पौलाविरुद्ध दोषपत्रे सादर केली. \v 3 त्यांनी फेस्ताला विनंती केली की, पौलाची बदली यरुशलेमकडे करावी आणि आम्हावर कृपादृष्टी दाखवावी, कारण पौलाला घेऊन जाताना वाटेत अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याची योजना ते करीत होते. \v 4 परंतु फेस्ताने त्यांना उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे कैदेत आहे व मी लवकरच स्वतः तिथे जाणार आहे. \v 5 तुमच्या काही पुढार्‍यांनी माझ्याबरोबर यावे आणि या मनुष्याने काही गुन्हा केला असेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध तसे आरोप तिथे सादर करावेत.” \p \v 6 त्यानंतर आठ किंवा दहा दिवस त्यांच्याबरोबर घालविल्यानंतर, फेस्त कैसरीयास खाली गेला. दुसर्‍याच दिवशी न्यायालय भरवून पौलाला आपल्यासमोर आणावे असा त्याने हुकूम दिला. \v 7 पौल आत आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहूदी लोक त्याच्याभोवती उभे राहिले. त्यांनी त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर असे आरोप लावले, परंतु ते आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. \p \v 8 पौलाने त्याच्या बचावासाठी उत्तर दिले, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध चुकीचे असे काहीही केलेले नाही.” \p \v 9 तेव्हा यहूदी लोकांना प्रसन्न करण्यास आतुर असलेल्या फेस्ताने पौलाला विचारले, “यरुशलेमला जाऊन तिथे माझ्यापुढे तुझी चौकशी व्हावी, यासाठी तू तयार आहेस काय?” \p \v 10 परंतु पौलाने त्याला उत्तर दिले: “मी कैसराच्या न्यायालयापुढे उभा आहे म्हणून इथेच माझा न्याय होईल. तुम्हाला चांगले ठाऊक आहे की, मी यहूदीयांच्या विरुद्ध काहीही उपद्रव केले नाही. \v 11 जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!” \p \v 12 त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!” \s1 फेस्त हा राजा अग्रिप्पाचा सल्ला घेतो \p \v 13 पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले. \v 14 ते तिथे अनेक दिवस वास्तव्य करीत असल्यामुळे, फेस्ताला राजाबरोबर पौलाच्या प्रकरणाची चर्चा करण्यास वेळ मिळाला. तो म्हणाला: “फेलिक्साने ज्याला कैदेत तसेच ठेवले होते असा एक मनुष्य येथे आहे. \v 15 मी यरुशलेम येथे गेलो होतो, तेव्हा तेथील प्रमुख याजकांनी व इतर यहूदी पुढार्‍यांनी त्याच्यावर दोषारोप करून त्याला शिक्षा द्यावी अशी मला विनंती केली. \p \v 16 “मी त्यांना सांगितले की, रोमी प्रथेनुसार आरोपी व वादी समोरासमोर येणे व आरोपीला स्वतः आरोपाचे खंडन करण्याची संधी मिळाल्याशिवाय कोणालाही दंड देणे योग्य नाही. \v 17 ते ज्यावेळी येथे चौकशीसाठी आले, त्यावेळी मी दुसर्‍याच दिवशी न्यायासनावर बसून तो वाद सुनावणीसाठी उशीर न करता घेतला व त्याला न्यायालयात आणण्याचा हुकूम केला. \v 18 परंतु त्याच्याविरुद्ध केलेले आरोप माझ्या कल्पनेप्रमाणे मुळीच नव्हते. \v 19 ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते. पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे. \v 20 अशा प्रकारच्या प्रकरणात कसा काय निर्णय द्यावा याविषयी मी गोंधळात पडलो. तेव्हा मी पौलाला या आरोपांची चौकशी यरुशलेममध्ये व्हावी यास त्याची मान्यता आहे का, असे विचारले. \v 21 परंतु पौलाने कैसराकडे न्याय मागितला, तेव्हा मी त्याला बादशहाकडे नेण्याची व्यवस्था होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा हुकूम दिला.” \p \v 22 त्यावर अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “मला स्वतः या माणसाचे म्हणणे ऐकायला आवडेल.” \p फेस्ताने उत्तर दिले. “तर उद्याच त्याचे भाषण ऐकावयास मिळेल.” \s1 अग्रिप्पा यांच्यापुढे पौल \p \v 23 तेव्हा दुसर्‍या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले. \v 24 मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये. \v 25 माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरविले आहे. \v 26 परंतु मी महाराजांना निश्चित काय लिहून कळवावे हे मला समजत नाही आणि म्हणूनच मी त्याला तुम्हासर्वांपुढे व विशेषकरून अग्रिप्पा राजांपुढे तपासणीसाठी आणले आहे, यासाठी की मला जे योग्य ते लिहिता येईल. \v 27 कारण एखाद्या कैद्यावर असलेल्या कोणत्याही आरोपाचे स्पष्ट वर्णन केल्याशिवाय त्याला रोमला पाठविणे योग्य होणार नाही.” \c 26 \p \v 1 अग्रिप्पा राजा पौलास म्हणाला, “तुला स्वतःविषयी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे.” \p तेव्हा पौलाने आपल्या हाताने खूण करून बचावाचे भाषण करण्यास सुरुवात केली: \v 2 तो म्हणाला “महाराज अग्रिप्पा, यहूदी लोक माझ्याविरुद्ध जे आरोप करीत आहेत, त्या सर्व आरोपांना मला माझे प्रत्युत्तर आपणापुढे सादर करता येत आहे याबद्दल मी स्वतःस धन्य समजतो, \v 3 कारण मला माहीत आहे की आपण यहूदी लोकांच्या रूढी व मतभेद यांचे तज्ञ आहात. आता कृपया माझे म्हणणे शांतचित्ताने ऐकून घ्या. \p \v 4 “मी लहानपणापासून स्वतःच्या देशात आणि यरुशलेममध्ये माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कसे जगलो हे सर्व यहूदीयांस चांगले माहीत आहे. \v 5 ते मला बर्‍याच काळापासून ओळखतात आणि त्यांना मान्य असेल तर माझ्याबद्दल साक्षही देऊ शकतील, की आपल्या धर्माच्या पंथाबाबतीत मी नेहमीच कट्टर परूशी म्हणून जीवन जगलो. \v 6 परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनांवर माझी आशा आहे म्हणून माझी आज चौकशी होत आहे व मी येथे उभा आहे. \v 7 आमचे बारा वंश अभिवचन पूर्ण होण्याची आशा बाळगत परमेश्वराची सेवा मनःपूर्वक रात्रंदिवस करीत आहेत. तरी महाराज अग्रिप्पा, त्याच आशेमुळे मजवर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे. \v 8 परंतु मृतांचे पुनरुत्थान हे तुम्हापैकी कोणालाही अविश्वसनीय का वाटावे? \p \v 9 “मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे. \v 10 आणि त्याप्रकारे मी यरुशलेममध्ये केले होते. तिथे प्रभूच्या अनेक लोकांना महायाजकाच्या अधिकाराने तुरुंगात डांबले आणि त्यांचा वध करण्याकरिता मी संमती देत असे. \v 11 अनेकदा मी एका सभागृहातून दुसर्‍या सभागृहात जात असे व त्यांना शिक्षा करून, बळजबरीने ईश्वरनिंदा करावयास भाग पाडीत असे. त्यांचा छळ करण्यास मी इतका झपाटलेला होतो की परकीय शहरात देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे. \p \v 12 “मी अशाच एका प्रवासात असताना दिमिष्कमधून महायाजकांचे अधिकारपत्र व नियुक्तपत्र बरोबर घेऊन जात होतो. \v 13 महाराज अग्रिप्पा, मी वाटेने जात असताना दुपारच्या सुमारास, सूर्यप्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या भोवती आकाशातून तळपताना मी पाहिला. \v 14 आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, तेव्हा अरामी भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली. ‘शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? पराणीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.’ \p \v 15 “मी विचारले, ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ \p “प्रभूने त्याला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे, \v 16 आता उठून आपल्या पायांवर उभा राहा. मी तुला यासाठी दर्शन दिले आहे की जे तू माझ्याविषयी पाहिले व जे प्रकट होणार आहे त्याविषयी तुला सेवक व साक्षी नेमावे. \v 17 मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे \v 18 यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’ \p \v 19 “अशा रीतीने, महाराज अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अव्हेर केला नाही आणि सांगितल्याप्रमाणे केले. \v 20 तर मी प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि यहूदीया प्रांतातील लोकांना व गैरयहूदी लोकांना असा प्रचार केला की त्या सर्वांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळावे व पश्चात्तापास योग्य अशी फळे द्यावी. \v 21 या कारणामुळे काही यहूद्यांनी मला मंदिराच्या अंगणात धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. \v 22 परंतु परमेश्वराने आजपर्यंत मला साहाय्य केले; म्हणूनच प्रत्येक लहानथोरास या गोष्टींची साक्ष सांगण्यास मी येथे उभा आहे व ज्यागोष्टी घडतील असे संदेष्टे व मोशे यांनी सांगितले होते, त्यापलीकडे मी दुसरे काहीही सांगितले नाही. \v 23 त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करतील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तेच प्रथम मरणातून पुन्हा उठतील.” \p \v 24 हे ऐकताच फेस्त मध्येच म्हणाला, “पौला, तुझे मन ठिकाण्यावर नाही. तुझ्या दीर्घकाळाच्या अभ्यासाने तुझे मन भ्रमिष्ट झाले आहे.” \p \v 25 परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे. \v 26 महाराजांना या गोष्टी माहीत आहेत आणि या गोष्टी मोकळेपणाने मी तुमच्याबरोबर बोलू शकतो. कारण माझी खात्री आहे की या सर्व घटना आपल्या परिचयाच्या आहेत, कारण या गोष्टी कुठे जगाच्या कानाकोपर्‍यात घडलेल्या नाहीत. \v 27 अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.” \p \v 28 अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?” \p \v 29 पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.” \p \v 30 तेव्हा राजा, राज्यपाल, बर्णीका व इतर सर्वजण जाण्यासाठी उभे राहिले. \v 31 आणि त्या दालनातून निघून गेल्यावर, त्यांचे एकमेकाशी असे एकमत झाले, “या मनुष्याला मरणदंडाची अथवा तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे त्याने काहीही केलेले नाही.” \p \v 32 अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.” \c 27 \s1 पौलाचा रोमकडे जलप्रवास \p \v 1 आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले. \v 2 तेव्हा आशियाच्या प्रांतातील किनार्‍यावरील अनेक बंदरावर थांबत जाणार्‍या व अद्रमुत्तीय शहरापासून निघालेल्या जहाजात बसून आम्ही समुद्राकडे निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथील रहिवासी अरिस्तार्ख नावाचा एक मनुष्य आमच्याबरोबर होता. \p \v 3 दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्‍यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील. \v 4 तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो. \v 5 आम्ही समुद्राची यात्रा करून किलिकिया व पंफुल्या या प्रांतांच्या किनार्‍याने जाऊन लुक्यातील मूर्या येथे जाऊन पोहोचलो. \v 6 तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले. \v 7 मग पुष्कळ दिवस आम्हाला मंद गतीने प्रवास करावा लागला आणि शेवटी आम्ही कनीदस बंदराजवळ आलो. वारा अद्याप तोंडासमोर येत असल्यामुळे क्रेताला वळसा घालून सलमोने शहराकडे जावे लागले. \v 8 पुढे वादळी वार्‍यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्‍याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो. \p \v 9 बराच वेळ व्यर्थ गेलेला होता आणि समुद्रावरून जाणे धोक्याचे झाले होते आणि आता प्रायश्चित्ताचा दिवस\f + \fr 27:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa योम किप्पूर\fqa*\f* होऊन गेला होता. तेव्हा पौलाने अधिकार्‍यांना इशारा दिला, \v 10 तो म्हणाला, “माणसांनो, आपला हा जलप्रवास भीषण आहे कदाचित आपले तारू फुटेल, मालाची हानी होईल आणि आपले जीवसुद्धा धोक्यात येतील.” \v 11 परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला स्वीकारला. \v 12 कारण हे बंदर खुले असून हिवाळा घालविण्यासाठी सुरक्षित नव्हते, म्हणून बहुतेकांनी सल्ला दिला की, प्रवास पुढे चालू ठेवावा आणि जमल्यास फेनिके बंदरात जाऊन तिथे हिवाळा घालवावा. ते बंदर क्रेता या ठिकाणी होते, दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम अशा दोन्ही दिशांकडे या बंदराचे तोंड होते. \s1 समुद्रातील वादळ \p \v 13 जेव्हा दक्षिणी वारा मंद गतीने वाहू लागला, तेव्हा त्यांना वाटले की आता योग्य संधी आहे; म्हणून त्यांनी नांगर उचलला आणि क्रेताच्या काठाकाठाने ते प्रवास करू लागले. \v 14 ते फारसे दूर गेलेही नव्हते तोच, युरकुलोन नावाचा ईशान्येकडील तुफानी वारा बेटावरून अतिशय झपाट्याने वाहू लागला. \v 15 या वादळामध्ये तारू सापडले आणि वारा नेईल तिकडे तारू वाहत जाऊ लागले. आम्हीही तारू वार्‍याबरोबर वाहू दिले. \v 16 आम्ही कौदा नावाच्या एका लहान बेटाजवळून जात असताना, मोठ्या प्रयासाने जीवनरक्षक होडी तारवाला बांधू शकलो, \v 17 मग ती होडीवर घेतल्यानंतर, तारवाचा खालील भाग मजबूत करण्यासाठी दोरांनी आवळून बांधले. कारण त्यांना असे भय वाटू लागले की तारू सुर्तीच्या किनार्‍यावर जाऊन वाळूत रुतून बसेल. म्हणून त्यांनी जहाजाचे शीड उतरविले आणि जहाजाला वाहवत जाऊ दिले. \v 18 दुसर्‍या दिवशी समुद्र अधिकच खवळला. तेव्हा तारू हलके करण्यासाठी खलाशी तारवातील माल समुद्रात टाकू लागले. \v 19 तिसर्‍या दिवशी त्यांनी तारवाची अवजारे आपल्या हाताने टाकून दिली. \v 20 त्या तुफानी वादळाचा भयंकर जोर होता आणि अनेक दिवस सूर्याचे व तार्‍यांचे दर्शनही आम्हास घडले नाही. शेवटी आता आमचा जीव वाचेल अशी सर्व आशा आम्ही सोडून दिली. \p \v 21 अनेक दिवस कोणी काहीही खाल्ले नव्हते, मग शेवटी पौल उभा राहून त्यांना म्हणाला: “माणसांनो, तुम्ही माझा सल्ला ऐकून क्रेता बंदर सोडले नसते, तर हे नुकसान व हानी टळू शकली असती. \v 22 तरी मी तुम्हाला विनंती करतो आता धैर्य सोडण्याची गरज नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही; फक्त जहाजाचेच नुकसान होईल. \v 23 जो माझा परमेश्वर आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याचा एक देवदूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहिला \v 24 आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्‍या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’ \v 25 यासाठी माणसांनो, धीर धरा, कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तसेच घडणार. \v 26 परंतु आपले जहाज एका बेटावर आदळून फुटणार आहे.” \s1 तारू फुटते \p \v 27 चौदाव्या रात्रीस अद्रिया\f + \fr 27:27 \fr*\ft जुन्या काळात या भागाचा उल्लेख दक्षिण इटली मध्ये समाविष्ट होता\ft*\f* सागराच्या लाटांनी हैराण होऊन हेलकावे खात असताना, मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांना वाटले की आपण एका जमिनीजवळ येत आहोत. \v 28 त्यांनी तळ पाहण्यासाठी पाण्यात बुडीद टाकले, तिथे पाणी अंदाजे 37 मीटर खोल असल्याचे समजले; पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा पाण्याची खोली 27 मीटर भरली. \v 29 आपले तारू खडकावर आपटेल असे भय वाटल्यामुळे, त्यांनी तारवाच्या मागच्या बाजूने चार नांगर टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करू लागले. \v 30 काही खलाश्यांनी होडी सोडून पळून जाण्याचा बेत केला. नाळीवरून म्हणजे जहाजाच्या पुढच्या बाजूने नांगर टाकीत आहोत, असा बहाणा करून त्यांनी होडी खाली सोडली. \v 31 परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.” \v 32 तेव्हा सैनिकांनी होडीचे दोर कापून ती जाईल तिकडे वाहू दिली. \p \v 33 पहाट होण्यापूर्वी पौलाने प्रत्येकाला अन्न खाण्यासाठी विनंती केली. तो म्हणाला, “आज चौदा दिवसापासून, अनिश्चित अशा मनःस्थितीत तुम्ही उपाशी राहिला आहात, काहीही खाल्ले नाही. \v 34 आता मी विनंती करतो की थोडेतरी खा म्हणजे तुमचा बचाव होईल कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या एकाही केसाचा नाश होणार नाही.” \v 35 हे म्हटल्यानंतर, मग त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले व ती मोडून खाल्ली. \v 36 ते सर्व उत्तेजित झाले व त्यांनी खाण्यास सुरुवात केली. \v 37 जहाजात आम्ही सर्वजण मिळून दोनशे शहात्तर लोक होतो. \v 38 त्यांनी जेवढे पाहिजे तेवढे खाल्यानंतर, खलाश्यांनी जहाजातील धान्य समुद्रात टाकले व जहाज आणखी हलके केले. \p \v 39 दिवस उजाडला, तरी त्यांना किनारा ओळखता आला नाही, परंतु एक खाडी व तिचा सपाट किनारा, त्यांच्या दृष्टीस पडला व मचव्याने किनार्‍यावर जाण्याचा त्यांनी निश्चय केला व जलयान तिथेच ठेवले. \v 40 सरतेशेवटी जेव्हा तसा प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले, तेव्हा त्यांनी नांगर कापून टाकून, ते समुद्रात राहू दिले सुकाणूची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वार्‍यावर सोडून किनार्‍याची वाट धरली. \v 41 परंतु जहाज पुढे जाऊन वाळूत रुतून बसले. नाळ घट्ट रुतली आणि वरामाचे म्हणजे जहाजाच्या मागील भागाचे आदळणार्‍या लाटांनी तुकडे तुकडे झाले. \p \v 42 तेव्हा कैदी पोहत जाऊन पळून जाऊ नयेत म्हणून सर्व कैद्यांना ठार मारावे, अशी योजना सैनिकांनी केली. \v 43 परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे. \v 44 त्याप्रमाणे बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर तर कोणी तारवाच्या तुकड्यावर बसून जावे. याप्रमाणे प्रत्येकजण किनार्‍यावर सुरक्षितपणे पोहोचला. \c 28 \s1 मलता येथे पौल \p \v 1 किनार्‍यावर सुरक्षित पोहोचल्यावर, आम्हाला समजले की त्या बेटाचे नाव मलता असे होते. \v 2 त्या बेटावरील लोकांनी आम्हाला असाधारण दया दाखविली. त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवून आमचे स्वागत केले कारण पाऊस असून थंडी पडली होती. \v 3 तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला. \v 4 त्या बेटावरील लोकांनी त्या सर्पाला त्याच्या हाताला झोंबलेले पाहिले, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “हा मनुष्य खात्रीने खुनी असला पाहिजे; तो जरी समुद्रातून वाचला, तरी न्याय देवी त्याला जगू देणार नाही.” \v 5 परंतु पौलाने तो साप झटकून अग्नीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही. \v 6 आता पौल सुजेल किंवा तत्काळ मरून पडेल अशी लोकांची अपेक्षा होती; परंतु पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर, काही विशेष झाले नाही हे दिसल्यावर, त्यांनी आपले मन बदलले आणि तो परमेश्वर असावा असे म्हणाले. \p \v 7 जवळच त्या बेटाच्या पुबल्य नावाच्या मुख्याधिकाऱ्याची मालमत्ता होती. त्याने त्याच्या घरी आमचे स्वागत केले आणि तीन दिवस आदरातिथ्य केले. \v 8 त्याचे वडील बिछान्यावर तापाने व जुलाबाने आजारी होते. पौल त्याला पाहावयास गेला आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचे हात त्याच्यावर ठेऊन त्याला बरे केले. \v 9 हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली. \v 10 अनेक प्रकारे त्यांनी आमचा सन्मान केला आणि जेव्हा आम्ही समुद्रप्रवासाला निघण्यास तयार झालो, त्यांनी आम्हाला लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला. \s1 रोमचा प्रवास पुढे सुरू \p \v 11 तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे जहाज हिवाळ्यासाठी थांबले होते त्याने आम्ही प्रवास सुरू केला. त्यावर त्याची निशाणी क्यास्टर व पोलक या जुळ्या दैवतांची मूर्ती बसवलेली होती. \v 12 सुराकूस येथे आम्ही तीन दिवस राहिलो. \v 13 तिथून आम्ही निघालो आणि रेगियमला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी दक्षिणेकडील वारा वाहू लागल्यावर, तिथून आम्ही निघालो व एका दिवसाच्या प्रवासानंतर पुत्युलास जाऊन पोहोचलो. \v 14 तिथे आम्हाला काही विश्वासी आढळले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर एक आठवडाभर राहण्याची विनंती केली. मग आम्ही रोमला आलो. \v 15 तेथील बंधुजनांनी आम्ही येणार असे ऐकले आणि ते प्रवास करून अप्पियाची पेठ व तीन उतार शाळा या ठिकाणी आम्हाला येऊन भेटले. त्यांना पाहून पौलाने परमेश्वराचे आभार मानले आणि त्याला प्रोत्साहन प्राप्त झाले. \v 16 पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे. \s1 पौल रोम येथे पहार्‍यात उपदेश करतो \p \v 17 तीन दिवसानंतर पौलाने स्थानिक यहूदी पुढार्‍यांना एकत्र बोलाविले. ते आल्यावर तो म्हणाला: “माझ्या बंधूंनो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या पूर्वजांच्या रूढींचे उल्लंघन केलेले नाही, तरी यरुशलेममध्ये मला बंदिवान करून रोमी सरकारच्या हवाली केले. \v 18 रोमी लोकांनी माझी तपासणी केली आणि मला सोडून देण्याची त्यांची इच्छा होती, कारण मरणदंडास पात्र असा गुन्हा मी केलेला नव्हता. \v 19 परंतु यहूद्यांनी माझ्या सुटकेला विरोध केल्यामुळे, कैसराजवळ न्याय मागण्याशिवाय मला दुसरा पर्यायच राहिला नाही. मला खरोखरच माझ्या लोकांविरुद्ध आरोप करावयाचे नव्हते \v 20 या कारणामुळे मी तुम्हाला आज येथे येण्याची विनंती केली की आपली प्रत्यक्ष भेट घ्यावी व आपल्याबरोबर बोलावे. कारण मी इस्राएलाच्या आशेमुळे या साखळीने बांधलेला आहे.” \p \v 21 तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तुमच्यासंबंधात आम्हाला यहूदीयातून पत्रेही आली नाहीत आणि तिथून आलेल्या आमच्या बांधवांकडून काही अहवाल कळविण्यात आला नाही \v 22 परंतु आम्हाला तुमचे विचार ऐकायला हवे आहेत, कारण या पंथाच्या विरुद्ध सर्वत्र लोक बोलत आहेत.” \p \v 23 तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरविला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्या ठिकाणी आले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला. \v 24 ऐकणार्‍यांपैकी काहींनी खात्रीपूर्वक विश्वास ठेवला, परंतु काहींनी ठेवला नाही. \v 25 त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे: \q1 \v 26 “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, \q2 ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत. \q1 \v 27 या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; \q2 त्यांचे कान मंद \q2 आणि त्यांचे डोळे बंद करा. \q1 नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, \q2 त्यांच्या कानांनी ऐकतील, \q2 अंतःकरणापासून समजतील, \q1 आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’\f + \fr 28:27 \fr*\ft \+xt यश 6:9, 10\+xt*\ft*\f* \p \v 28 “म्हणून तुम्हाला हे माहीत व्हावे की परमेश्वरापासून लाभणारे तारण गैरयहूदीयांसाठी देखील आहे व ते त्याचा स्वीकार करतील!” \v 29 हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी तीव्रपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले.\f + \fr 28:29 \fr*\ft हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही\ft*\f* \p \v 30 पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तिथेच त्याला भेटण्यास येणार्‍यांचे तो स्वागत करीत असे. \v 31 त्याने मोठ्या धैर्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे शिक्षण दिले!