\id 2TI - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 2 तीमथ्य \toc1 पौलाचे तीमथ्याला दुसरे पत्र \toc2 2 तीमथ्य \toc3 2 तीम \mt1 पौलाचे तीमथ्याला दुसरे पत्र \c 1 \po \v 1 ख्रिस्त येशूंमधील जीवनाच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून, \po \v 2 माझा प्रिय पुत्र तीमथ्य यास: \po परमेश्वर पिता आणि ख्रिस्त येशू आपले प्रभू, यांची कृपा, दया आणि शांती असो. \s1 उपकारस्तुती \p \v 3 मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो. \v 4 त्यावेळचे तुझे अश्रू मला आठवतात. तुला पुन्हा भेटण्यास मी किती उत्कंठित झालो आहे, जेणे करून माझा आनंद पूर्ण होईल. \v 5 तुझी आई युनीके आणि तुझी आजी लोईस यांचा प्रभूवर जितका दृढविश्वास आहे आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. \s1 शुभवार्ता आणि पौल यांच्याशी निष्ठा ठेवण्यास आठवण \p \v 6 म्हणूनच तुझ्यावर मी हात ठेवल्याने, परमेश्वराची जी देणगी तुला मिळाली, त्या देणगीला तू नव्याने प्रज्वलित केले पाहिजे. याची मी तुला आठवण देत आहे. \v 7 कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे. \v 8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास आणि जो मी त्यांचा बंदिवान, त्या माझ्याविषयी तू लाज वाटून घेऊ नकोस, तर शुभवार्तेसाठी परमेश्वराच्या सामर्थ्याने तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे. \v 9 त्यांनीच आपले तारण केले आणि पवित्र जीवनासाठी आपल्याला पाचारण केले हे त्यांनी आपण काही केले म्हणून नव्हे, तर स्वतःच्या हेतूसाठी व कृपेमुळे केले. ही कृपा आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये युगाच्या पूर्वी दिलेली होती. \v 10 तर आता आपला तारणारा ख्रिस्त येशूंच्या देखाव्याने प्रकट झाली आहे, ज्यांनी एकीकडे मृत्यूचा नाश केला आणि दुसरीकडे ईश्वरीय शुभवार्तेद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशित केले. \v 11 मला त्या शुभवार्तेची घोषणा करणारा, प्रेषित आणि शिक्षक म्हणून निवडले आहे. \v 12 याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे. \p \v 13 जो चांगल्या शिक्षणाचा नमुना तू माझ्याकडून ऐकला, तो ख्रिस्त येशूंमधील विश्वास आणि प्रीती याबरोबर दृढ धरून राहा. \v 14 आमच्या ठायी वस्ती करीत असलेल्या पवित्र आत्म्याकडून मिळालेली चांगली ठेव सांभाळ. \s1 निष्ठा आणि अनिष्ठा यांचे उदाहरणे \p \v 15 आशियातील सर्व विश्वासी माझ्यापासून दूर गेले आहे, हे तुला माहीतच आहे. त्यामध्ये फुगलस आणि हर्मगनेस हे देखील आहेत. \p \v 16 अनेसिफर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर प्रभू दया करो, कारण त्याने अनेक वेळा मला उत्तेजन दिले आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची कधीच लाज वाटली नाही. \v 17 जेव्हा तो रोममध्ये आला, तेव्हा त्याने सर्वत्र माझा कसून शोध केला आणि शेवटी मला शोधून काढले. \v 18 त्या दिवशी प्रभूपासून त्याला दया मिळेल असे प्रभू करो! इफिसमध्ये त्याने मला किती प्रकारे मदत केली, हे तुला चांगले माहीत आहे. \c 2 \s1 आव्हानाचे नूतनीकरण \p \v 1 माझ्या मुला, ख्रिस्त येशूंच्या ठायी जी कृपा आहे, तिच्यात सबळ हो. \v 2 ज्यागोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांच्या समोर माझ्याकडून ऐकल्या, त्या विश्वासू माणसांच्या स्वाधीन कर. जे इतरांनाही शिकविण्यास समर्थ आहेत. \v 3 येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल, \v 4 कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे. \v 5 एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही. \v 6 परिश्रम करणार्‍या शेतकर्‍याने पिकाचा पहिला वाटा घेणे योग्य आहे. \v 7 जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो. \p \v 8 येशू ख्रिस्त, जे दावीदाचे वंशज, मृतांतून उठविले गेले याची आठवण ठेव, हीच माझी शुभवार्ता. \v 9 या ईश्वरीय शुभवार्तेकरिता मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे साखळीने बांधलेला असून मला दुःख भोगावे लागत आहे, तरी परमेश्वराचे वचन साखळीने जखडलेले नाही. \v 10 परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांना माझ्या दुःखसहनाकडून ख्रिस्त येशूंमध्ये तारण आणि सार्वकालिक गौरव मिळणार असेल, तर मी ती दुःखे आनंदाने सोशीन. \p \v 11 ही बाब विश्वासयोग्य आहे की \q1 त्यांच्याबरोबर आपण मेलो तर \q2 त्यांच्याबरोबर जिवंतही राहू. \q1 \v 12 जर आपण धीराने दुःख सहन करतो तर \q2 त्यांच्याबरोबर राज्यही करू, \q1 जर आपण त्यांना नाकारतो तर \q2 तेही आपल्याला नाकारतील. \q1 \v 13 जर आपण अविश्वासी झालो, \q2 तरी ते विश्वासू राहतात, \q2 कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही. \s1 खोट्या शिक्षकांशी व्यवहार \p \v 14 परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्‍यांचा नाश होतो. \v 15 तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर. \v 16 भक्तिहीन वादविवाद टाळा, कारण जे त्यात गुंततात ते अधिकाधिक भक्तिहीन होतील. \v 17 आणि याप्रकारचे शिक्षण कुजलेल्या जखमेसारखे पसरेल. हुमनाय व फिलेत, ती दोघे अशा प्रकारची माणसे आहेत. \v 18 त्यांनी सत्याचा मार्ग सोडला आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे, अशी घोषणा करीत अनेकांचा विश्वास नष्ट केला आहे. \v 19 परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे\f + \fr 2:19 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa याहवेह\fqa*\f* आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्‍यांनी अधर्मापासून दूर राहावे.” \p \v 20 मोठ्या घरात सोन्याचांदीची, तशीच काही लाकडाची व मातीची बनविलेली पात्रे असतात. काही विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी आहेत. \v 21 म्हणूनच, जो स्वतःला त्यापासून दूर राहून शुद्ध करतो, तो सन्मानास नेमलेले, पवित्र, स्वामीसाठी उपयुक्त आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी तयार केलेले पात्र मानला जाईल. \p \v 22 तारुण्यातील वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात त्यांच्यासोबत नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्यामागे लाग. \v 23 परंतु मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वादात गुंतला जाऊ नकोस, कारण त्याद्वारे भांडणे होतात हे तुला ठाऊक आहे. \v 24 प्रभूचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत. \v 25 विरोध करणार्‍यांना नम्रतेने शिकविण्याचा प्रयत्न कर, कदाचित परमेश्वर त्यांना सत्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पश्चात्ताप देईल. \v 26 सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी कैद करून ठेवले आहे. ते शुद्धीवर येतील आणि सैतानाच्या सापळ्यातून सुटतील. \c 3 \p \v 1 हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसांमध्ये कठीण संकटाचे काळ येतील. \v 2 लोक स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, बढाईखोर, परमेश्वराचा उपहास करणारे, मातापित्यांची अवज्ञा करणारे, दयाहीन, अपवित्र, \v 3 ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे, \v 4 विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी, परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे होतील. \v 5 ते भक्तीचा देखावा करतील, परंतु त्याच्या सामर्थ्याला नाकारतील, अशा सर्व लोकांपासून दूर राहा. \p \v 6-7 ते अशा प्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील. \v 8 यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धीचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत. \v 9 परंतु हे फार काळ चालणार नाही. कारण जसा त्यांचा मूर्खपणा उघड झाला होता, तसेच यांचाही मूर्खपणा प्रत्येकाला कळून येईल. \s1 तीमथ्याला सोपविलेला अंतिम कार्यभार \p \v 10 परंतु माझी शिकवण, वागणूक, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर \v 11 आणि अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या शहरात आलेली संकटे आणि माझा झालेला छळ हे तुला पूर्ण माहीत आहे. परंतु या सर्वांतून प्रभूनेच मला सोडविले. \v 12 खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल. \v 13 परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्‍यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील. \v 14 परंतु तुझ्यासाठी, तू ज्यागोष्टी शिकलास, ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे, त्या धरून राहा; कारण त्या तू कोणापासून शिकलास तुला माहीत आहे. \v 15 लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते. \v 16 संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे. \v 17 यासाठी की, परमेश्वराचा सेवक\f + \fr 3:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa तू जो परमेश्वराचा व्यक्ती आहेस\fqa*\f* पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. \c 4 \p \v 1 परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की: \v 2 तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर. \v 3 कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील. \v 4 ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील. \v 5 परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर. \p \v 6 कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे. \v 7 मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. \v 8 पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल. \s1 पौलाची परिस्थिती \p \v 9 शक्य तितक्या लवकर माझ्याकडे येण्याचा प्रयत्न कर, \v 10 कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत. \v 11 केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला घेऊन ये, कारण माझ्या सेवेत तो उपयोगी आहे. \v 12 मीच तुखिकास इफिसास पाठविले \v 13 माझा अंगरखा जो त्रोवासात बंधू कार्पूसजवळ राहिला आहे, तो तू येतांना घेऊन ये, सोबत माझी पुस्तके व विशेषकरून चर्मपत्रेही आण. \p \v 14 आलेक्सांद्र तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याला त्याच्या कामाचे योग्य फळ देतील, \v 15 परंतु तू पण त्याच्यापासून सावध राहा; कारण आम्ही जे बोललो, त्या सर्व बोलण्यास त्याने जोरदार विरोध केला. \p \v 16 माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी कोणीही माझ्याबरोबर नव्हते, प्रत्येकाने माझा त्याग केला; याचा दोष त्यांच्यावर येऊ नये. \v 17 परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले. \v 18 प्रभू सर्व वाईटापासून मला सोडवतील आणि मला त्यांच्या स्वर्गीय राज्यात सुरक्षित आणतील. परमेश्वराला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. \b \s1 अंतिम शुभेच्छा \p \v 19 प्रिस्किल्ला, अक्विला आणि अनेसिफराच्या कुटुंबीयांनी माझा सलाम सांग. \b \p \v 20 एरास्त करिंथमध्येच राहिला आणि त्रोफिम आजारी झाला. त्याला मिलेता येथेच ठेऊन मी आलो. \v 21 हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर. \b \p युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात. \b \p \v 22 प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हा सर्वांवर कृपा असो.