\id 2TH - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 2 थेस्सलनीकाकरांस \toc1 पौलाचे थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र \toc2 2 थेस्सलनीकाकरांस \toc3 2 थेस्स \mt1 पौलाचे थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र \c 1 \po \v 1 परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस, \po पौल, सीलास व तीमथ्य यांच्याकडून: \po \v 2 परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. \s1 उपकारस्तुती आणि प्रार्थना \p \v 3 बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे. \v 4 यास्तव, तुम्ही सर्व छळांमध्ये आणि परीक्षांमध्ये जो धीर दाखविला आणि त्यामध्ये तुम्ही जी चिकाटी आणि विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या मंडळ्यांमध्ये अभिमानाने सांगतो. \p \v 5 परमेश्वराचा न्याय योग्य आहे, याचे हे सर्व प्रमाण आहे आणि याचा परिणाम म्हणजे ज्या परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्यासाठी तुम्ही पात्र ठरावे. \v 6 परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील. \v 7 प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्‍या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील. \v 8 जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील. \v 9 सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील. \v 10 त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना हर्षचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. \p \v 11 हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाच्या प्रत्येक कृत्याच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो. \v 12 प्रभू येशूंच्या नावाचे गौरव तुमच्यामध्ये आणि तुमचे त्यांच्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने व्हावे ही आमची प्रार्थना आहे. \c 2 \s1 अनिर्बंध पुरुष \p \v 1 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुन्हा येणे व आपले त्यांच्याजवळ एकवटणे यासंबंधी बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगतो, \v 2 आमच्याद्वारे दिलेल्या तथाकथित शिक्षणाद्वारे तुम्ही सहज अस्थिर किंवा गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, असे ठामपणे आपल्या संदेशाद्वारे किंवा बोलण्याद्वारे किंवा पत्राद्वारे सांगणार्‍यांना घाबरून जाऊ नका. \v 3 कोणी तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक करू नये, जोपर्यंत विश्वासाचे पतन होणार नाही आणि नियम नसलेला\f + \fr 2:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa पापी\fqa*\f* पुरुष म्हणजे नाशाचा पुरुष प्रकट होणार नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही. \v 4 तो तथाकथित देव किंवा भजनीय वस्तूंचा विरोध करेल व या सर्वांहून स्वतःला उंच करेल, तो परमेश्वराच्या मंदिरात बसेल व मीच परमेश्वर आहे, असे जाहीर करेल. \p \v 5 मी तुमच्याबरोबर तिथे असताना, हे सांगितल्याचे तुम्हाला आठवत नाही का? \v 6 आणि आता त्याने योग्य वेळेस प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणत्या गोष्टीचे अडखळण आहे हे तुम्हाला माहीत आहे. \v 7 कारण अधर्माचे गुप्त सामर्थ्य आधी कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे, तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे. \v 8 मग हा अधर्मी पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील. \v 9 सैतान कशाप्रकारे कार्य करतो त्यानुसार अनीतिमानाचे येणे असेल. तो विलक्षण सामर्थ्याच्याद्वारे खोटी चिन्हे आणि अद्भुते करून दाखवेल, \v 10 आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला. \v 11 या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील, \v 12 आणि ज्या सर्वांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुष्टपणात आनंद मानला, त्या सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. \s1 स्थिर उभे राहा \p \v 13 परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्‍या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ\f + \fr 2:13 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa कारण प्रारंभापासून परमेश्वराने तुम्हास निवडले\fqa*\f* म्हणून तारणासाठी निवडले आहे. \v 14 आमच्या शुभवार्तेद्वारे त्यांनी तुम्हाला यासाठी पाचारण केले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवात तुम्ही सहभागी व्हावे. \p \v 15 बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण\f + \fr 2:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa परंपरा\fqa*\f* आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा. \p \v 16 ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त, \v 17 तुमच्या अंतःकरणास प्रोत्साहित करोत आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि बोलण्यात तुम्हाला समर्थ करोत. \c 3 \s1 प्रार्थना विषयी विनंती \p \v 1 आता इतर गोष्टीसंबंधाने, बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूचा संदेश वेगाने पसरावा व त्यास सन्मान मिळावा. \v 2 दुष्ट व वाईट माणसांकडून आमची सुटका व्हावी म्हणूनही प्रार्थना करा, कारण प्रत्येकजण प्रभूवर विश्वास करणारा असतोच असे नाही. \v 3 परंतु प्रभू विश्वासू आहेत, ते तुम्हाला सामर्थ्यवान करतील आणि दुष्टापासून तुमचे रक्षण करतील, \v 4 आणि आम्हाला प्रभूमध्ये भरवसा आहे की आम्ही आज्ञापिलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि करीतच राहाल. \v 5 प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो. \s1 आळशाविषयी इशारा \p \v 6 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा असल्यास त्यापासून दूर राहा. \v 7 कारण तुम्हाला आमचे अनुकरण कसे करावयाचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहत असताना आळशी नव्हतो. \v 8 आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले. \v 9 याचा अर्थ तुमच्यापासून मदत मिळण्याचा अधिकार आम्हाला नाही असे नाही, परंतु आम्ही हे यासाठी केले की तुम्ही आमचे अनुकरण करावे म्हणून तुम्हाला आदर्श झालो. \v 10 आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.” \p \v 11 तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. \v 12 अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावे. \v 13 बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका. \p \v 14 जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा. \v 15 त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासी बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या. \b \s1 समाप्तीच्या शुभेच्छा \p \v 16 आता सर्व शांतीचे प्रभू स्वतः सर्ववेळी आणि सर्वप्रकारे आपली शांती तुम्हाला देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. \b \p \v 17 आता मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे, माझ्या सर्व पत्रात हे चिन्ह आहे आणि मी अशाप्रकारे लिहित असतो. \b \p \v 18 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांवर असो.