\id 2SA - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 2 शमुवेल \toc1 2 शमुवेल \toc2 2 शमुवेल \toc3 2 शमु \mt1 2 शमुवेल \c 1 \s1 दावीद शौलाच्या मृत्यूविषयी ऐकतो \p \v 1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला. \v 2 तिसर्‍या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले. \p \v 3 “तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. \p त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.” \p \v 4 दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, \p “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.” \p \v 5 तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?” \p \v 6 तो तरुण मनुष्य म्हणाला, “मी सहज गिलबोआच्या डोंगरावर होतो आणि तिथे शौल त्याच्या भाल्यावर टेकलेला आणि रथाचा सारथी आणि त्यांचे स्वार जोरात त्याचा पाठलाग करीत होते असे मला दिसले. \v 7 जेव्हा तो मागे वळला आणि त्याने मला पाहिले व मला बोलाविले आणि मी म्हणालो, ‘मी काय करू शकतो?’ \p \v 8 “त्याने मला विचारले, ‘तू कोण आहेस?’ \p “ ‘मी अमालेकी आहे.’ मी उत्तर दिले. \p \v 9 “तेव्हा तो मला म्हणाला, ‘येथे माझ्या बाजूला उभा राहा आणि मला मारून टाक! मी मृत्यूच्या यातनेत आहे, परंतु अजूनही मी जिवंतच आहे.’ \p \v 10 “तेव्हा मी त्याच्या बाजूला उभा राहिलो आणि त्याला मारून टाकले, कारण मला माहीत होते की, भाल्यावर पडल्याने तो जगू शकला नसता. आणि जो राजमुकुट त्याच्या डोक्यावर होता आणि त्याच्या बाहुंवरचा कडा मी येथे माझ्या धन्याजवळ आणले आहेत.” \p \v 11 तेव्हा दावीदाने आणि त्याच्या बरोबरच्या माणसांनी आपली वस्त्रे धरली व फाडली. \v 12 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि याहवेहचे सैन्य आणि इस्राएली राष्ट्र यांच्यासाठी त्यांनी शोक केला आणि ते रडले आणि संध्याकाळपर्यंत उपास केला कारण ते तलवारीने मारले गेले होते. \p \v 13 नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” \p त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.” \p \v 14 दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?” \p \v 15 तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांतील एकाला बोलाविले आणि म्हटले, “जा, त्याला मारून टाक!” तेव्हा त्याने त्याच्यावर वार केला आणि तो मनुष्य मरण पावला. \v 16 कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.” \s1 शौल आणि योनाथान यांच्यासाठी दावीदाचा विलाप \p \v 17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याविषयी दावीदाने हे विलापगीत रचले, \v 18 आणि यहूदीयाच्या लोकांना हे धनुष्याचे विलापगीत शिकविले जावे असा आदेश दिला (ते याशेरच्या पुस्तकात लिहिलेले आहे): \q1 \v 19 “हे इस्राएला, तुझ्या डोंगरांवर जसे एक चपळ हरिण\f + \fr 1:19 \fr*\fq हरिण \fq*\ft इथे याचा अर्थ मानव सन्मान आहे.\ft*\f* मरून पडते, \q2 तसे शूरवीर पडले आहेत! \b \q1 \v 20 “गथमध्ये हे सांगू नका, \q2 अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, \q1 नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, \q2 बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील. \b \q1 \v 21 “गिलबोआच्या डोंगरांनो, \q2 तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; \q2 तुमच्या उतरणीच्या शेतांवर\f + \fr 1:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa जी शेते अर्पणाचा उपज उगवते\fqa*\f* पावसाच्या सरी न पडोत. \q1 कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, \q2 शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही. \b \q1 \v 22 “वध केलेल्यांच्या रक्तापासून \q2 शूरवीरांच्या मांसापासून \q1 योनाथानचा बाण मागे फिरला नाही, \q2 शौलाची तलवार असमाधानाने परत आली नाही. \q1 \v 23 शौल आणि योनाथान, \q2 जिवंत असता प्रिय व आवडते होते, \q2 मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. \q1 ते गरुडांपेक्षा वेगवान होते, \q2 सिंहांपेक्षा बलवान असे होते. \b \q1 \v 24 “अहो, इस्राएलच्या कन्यांनो, \q2 शौलासाठी रुदन करा, \q1 ज्यांनी तुम्हाला किरमिजी रंगाची आणि भरजरीत कपडे घातली, \q2 ज्यांनी तुमची वस्त्रे सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केली. \b \q1 \v 25 “हे बलवान युद्धात कसे पडले! \q2 योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे. \q1 \v 26 योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; \q2 तू मला फार प्रिय होतास. \q1 माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, \q2 स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते! \b \q1 \v 27 “पाहा, बलवान कसे पडले आहेत! \q2 युद्धाची शस्त्रे नष्ट झाली आहेत!” \c 2 \s1 दावीद यहूदीयाचा अभिषिक्त राजा \p \v 1 त्या दरम्यान, दावीदाने याहवेहला विचारले, “यहूदीयाच्या एखाद्या गावात मी जाऊ काय?” \p तेव्हा याहवेह म्हणाले, “जा.” \p दावीदाने विचारले, “मी कुठे जावे?” \p याहवेहने उत्तर दिले, “हेब्रोनास जा.” \p \v 2 तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला. \v 3 दावीद त्याच्या बरोबरच्या प्रत्येक माणसांना त्यांच्या कुटुंबासह घेऊन गेला आणि त्यांनी हेब्रोन व तेथील गावांमध्ये वस्ती केली. \v 4 तेव्हा यहूदीयातील माणसे हेब्रोनास आली व तिथे त्यांनी दावीदाचा यहूदाहच्या गोत्राचा राजा म्हणून अभिषेक केला. \p जेव्हा दावीदाला सांगण्यात आले की, ज्या लोकांनी शौलाला पुरले ते याबेश-गिलआदचे लोक होते, \v 5 तेव्हा दावीदाने याबेश-गिलआदवासियांकडे दूत पाठवून म्हटले, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो, कारण तुम्ही आपला धनी शौल यांना पुरून त्यांच्याप्रित्यर्थ दया दाखविली आहे. \v 6 तर आता याहवेह आपली दया व विश्वासूपणा तुम्हाला प्रगट करो आणि तुम्ही हे केले आहे म्हणून मी सुद्धा अशीच कृपा तुम्हावर करेन. \v 7 तर आता हिंमत ठेवा आणि धैर्य धरा, कारण शौल तुमचा धनी मरण पावला आहे आणि यहूदीयाच्या लोकांनी त्यांचा राजा म्हणून माझा अभिषेक केला आहे.” \s1 दावीदाचे घराणे आणि शौलाचे घराणे यांच्यामध्ये लढाई \p \v 8 त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले. \v 9 त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले. \p \v 10 शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले. \v 11 हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता. \p \v 12 नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले. \v 13 जेरुइयाहचा पुत्र योआब आणि दावीदाची माणसे बाहेर पडली आणि गिबोनाच्या तळ्याकडे भेटली. एक गट तळ्याच्या एका बाजूला खाली बसला आणि दुसरा गट तळ्याच्या दुसर्‍या बाजूला बसला. \p \v 14 तेव्हा अबनेर योआबाला म्हणाला, “काही तरुण पुरुषांनी उठून आमच्यापुढे समोरासमोर लढाई होऊ करावी.” \p “ठीक आहे, त्यांनी तसे करावे,” योआब म्हणाला. \p \v 15 म्हणून ते उभे राहिले आणि त्यांची मोजणी करण्यात आली; बिन्यामीन आणि शौलाचा पुत्र इश-बोशेथ यांच्यातील बारा माणसे आणि बारा माणसे दावीदासाठी पुढे आले. \v 16 नंतर प्रत्येकाने त्याच्या विरोधकाचे डोके पकडले आणि आपला सुरा विरोधकाच्या कुशीत खुपसला आणि ते मिळून पडले. म्हणून गिबोनातील त्या जागेला हेलकाथ-हज्जूरीम\f + \fr 2:16 \fr*\fq हेलकाथ-हज्जूरीम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa धारदार सुर्‍यांचे मैदान\fqa*\f* हे नाव पडले. \p \v 17 त्या दिवशी तीव्र युद्ध झाले आणि अबनेर व इस्राएली सैन्य यांचा दावीदाच्या माणसांनी पराभव केला. \p \v 18 जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता. \v 19 असाहेलने अबनेरचा पाठलाग केला, त्याचा पाठलाग करताना तो उजवीकडे किंवा डावीकडे वळला नाही. \v 20 अबनेरने मागे वळून पाहिले आणि विचारले, “तू असाहेल आहेस काय?” \p “होय, मी आहे,” त्याने उत्तर दिले. \p \v 21 तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळ; एखाद्या तरुण पुरुषाला पकड आणि त्याची शस्त्रे काढून घे.” परंतु असाहेल त्याचा पाठलाग करण्याचे थांबवेना. \p \v 22 अबनेरने पुन्हा असाहेलला चेतावणी दिली, “माझा पाठलाग करण्याचे थांबव! मी तुला का मारून टाकावे? तुझा भाऊ योआब याला मी आपले तोंड कसे दाखवू?” \p \v 23 परंतु असाहेलने पाठलाग करण्याचे थांबविण्यास नाकारले; तेव्हा अबनेरने त्याच्या भाल्याचा दांडा असाहेलच्या पोटात खुपसला आणि तो भाला त्याच्या पोटातून जाऊन पाठीतून बाहेर आला. तो पडला आणि तिथेच मरण पावला. आणि प्रत्येकजण जे तिथून येत होते, ते असाहेल पडून मेला होता, तिथे थांबले. \p \v 24 परंतु आता योआब आणि अबीशाई यांनी अबनेरचा पाठलाग केला, ते गिहाजवळच्या गिबोनच्या वाळवंटाकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या अम्माहच्या डोंगरावर येऊन पोहोचले तेव्हा सूर्यास्त होत होता. \v 25 तेव्हा बिन्यामीनचे लोक अबनेरच्या मागे गेले. त्यांनी आपला एक गट तयार केला आणि एका टेकडीच्या शिखरावर उभे राहिले. \p \v 26 अबनेरने योआबाला हाक मारत म्हटले, “तलवारीने सर्वकाळ नाश करावा काय? तुला समजत नाही काय की याचा शेवट कटुत्वात होणार? आपल्या सोबतीच्या इस्राएली लोकांचा पाठलाग करण्याचे थांबविण्यास तुझ्या लोकांस तू आज्ञा कधी देणार?” \p \v 27 योआबने उत्तर दिले, “जिवंत परमेश्वराची शपथ, तू जर बोलला नसतास, तर माणसे सकाळपर्यंत त्यांचा पाठलाग करीत राहिली असती.” \p \v 28 तेव्हा योआबने कर्णा वाजविला आणि सर्व सैन्य थांबले; त्यांनी पुढे इस्राएलचा पाठलाग केला नाही किंवा ते त्यांच्याशी पुन्हा लढलेही नाही. \p \v 29 अबनेर आणि त्याची माणसे रात्रभर अराबाहमधून चालत गेली. त्यांनी यार्देन नदी पार केली, सकाळपर्यंत तसेच पुढे चालत राहिले आणि महनाईम येथे येऊन पोहोचले. \p \v 30 नंतर योआबने अबनेरचा पाठलाग करण्याचे थांबविले आणि संपूर्ण सैन्याला एकत्र जमविले. असाहेल शिवाय दावीदाची एकोणवीस माणसे गहाळ होती. \v 31 परंतु दावीदाच्या माणसांनी अबनेर बरोबर असलेल्या तीनशे साठ बिन्यामीन लोकांना मारले होते. \v 32 त्यांनी असाहेलला घेतले आणि बेथलेहेम येथे त्याच्या वडिलांच्या कबरेत पुरले. नंतर योआब आणि त्याच्या माणसांनी रात्रभर प्रवास केला आणि पहाटेस हेब्रोनास येऊन पोहोचले. \c 3 \p \v 1 शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले. \b \lh \v 2 हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: \b \li1 त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता; \li1 \v 3 त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; \li1 तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला; \li1 \v 4 चौथा पुत्र अदोनियाह हा हग्गीथपासून जन्मला; \li1 पाचवा पुत्र शफाट्याह हा अबीटालपासून झाला; \li1 \v 5 आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाह हिच्यापासून झाला. \b \lf हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र हे होते. \s1 अबनेर दावीदाकडे जातो \p \v 6 दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता. \v 7 रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर का संबंध केला?” \p \v 8 तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे! \v 9 याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराचे तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत. \v 10 आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.” \v 11 इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता. \p \v 12 नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.” \p \v 13 दावीद म्हणाला, “ठीक आहे, मी तुझ्याबरोबर एक करार करेन. परंतु मी तुझ्याकडून एका गोष्टीची मागणी करतो: जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा शौलाची कन्या मीखल हिला घेऊन आल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नकोस.” \v 14 नंतर दावीदाने शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “माझी पत्नी मीखल मला दे, जिला मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा किंमत देऊन वाग्दत्त करून घेतली.” \p \v 15 तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएल याच्यापासून आणले. \v 16 तरीही तिचा पती रडत तिच्यामागे बहूरीमपर्यंत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत घरी जा!” तेव्हा तो परत गेला. \p \v 17 अबनेरने इस्राएलच्या पुढार्‍यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती. \v 18 आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ” \p \v 19 अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले. \v 20 जेव्हा अबनेर त्याच्या बरोबरच्या वीस माणसांना घेऊन दावीदाकडे हेब्रोनास आला, तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी मेजवानी तयार केली. \v 21 तेव्हा अबनेर दावीदाला म्हणाला, “मी जाऊन माझ्या धनीराजासाठी सर्व इस्राएली लोकांना एकत्र करेन, यासाठी की त्यांनी तुमच्याबरोबर एक करार करावा, मग आपल्या मनास येईल त्यांच्यावर आपण राज्य करावे” तेव्हा दावीदाने अबनेरला रवाना केले आणि तो शांतीने गेला. \s1 योआब अबनेरचा वध करतो \p \v 22 त्याचवेळेस दावीदाची माणसे आणि योआब छापा घालून परतले आणि आपल्याबरोबर मोठी लूट आणली. परंतु अबनेर दावीदाबरोबर हेब्रोनमध्ये नव्हता, कारण दावीदाने त्याला रवाना केले होते आणि तो शांतीने गेला होता. \v 23 जेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सर्व सैनिक आले तेव्हा त्याला सांगितले गेले की, नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता आणि राजाने त्याला परत पाठवून दिले आणि तो शांतीने गेला होता. \p \v 24 तेव्हा योआब राजाकडे गेला आणि म्हणाला, “आपण हे काय केले? पाहा, अबनेर आपणाकडे आला होता. आपण त्याला का जाऊ दिले? आता तो गेला आहे! \v 25 आपणास नेराचा पुत्र अबनेर कसा आहे हे माहीत आहे; तो आपणास फसवायला आणि आपल्या हालचाली पाहण्यासाठी आणि आपण जे करता त्याचा अंदाज घेण्यासाठी आला होता.” \p \v 26 नंतर योआब दावीदाकडून निघाला आणि त्याने अबनेरच्या मागे निरोप्यांना पाठवले आणि त्यांनी त्याला सिराहच्या विहिरीपासून परत आणले. परंतु दावीदाला हे माहीत नव्हते. \v 27 जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला. \p \v 28 नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत. \v 29 त्याचे रक्तदोष योआब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर असो! योआबच्या कुटुंबात स्रावी, महारोगी,\f + \fr 3:29 \fr*\fq महारोगी \fq*\ft हा शब्द कातडीच्या वेगवेगळ्या आजारांसाठी वापरला जात असे.\ft*\f* कुबडीवर टेकलेला, तलवारीने पडणारा, अन्नावाचून राहणारा असा कोणी ना कोणी असल्याशिवाय राहणार नाही.” \p \v 30 योआब व त्याचा भाऊ अबीशाई यांनी अबनेरला मारून टाकले, कारण त्याने गिबोनच्या लढाईत त्यांचा भाऊ असाहेलला मारले होते. \p \v 31 नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला. \v 32 त्यांनी अबनेरास हेब्रोनमध्ये पुरले आणि राजाने अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने आकांत केला. सर्व लोकसुद्धा रडले. \p \v 33 राजाने अबनेरसाठी हे विलापगीत गाईले: \q1 “मूर्खाने मरावे तसे अबनेरने मरावे काय? \q2 \v 34 तुझे हात बांधलेले नव्हते, \q2 तुझ्या पायसुद्धा बेड्यांमध्ये नव्हते. \q1 दुष्टासमोर एखादा पडावा तसा तू पडला.” \p आणि सर्व लोक त्याच्यासाठी पुन्हा रडले. \p \v 35 नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!” \p \v 36 सर्व लोकांनी हे लक्षात घेतले आणि त्यांना समाधान वाटले; राजाने जे सर्वकाही केले त्यात ते खचितच समाधानी झाले. \v 37 त्या दिवशी तिथे असलेल्या सर्व लोकांना आणि सर्व इस्राएलला लक्षात आले की, नेराचा पुत्र अबनेर याला ठार मारण्यात राजाचा काही भाग नव्हता. \p \v 38 नंतर राजा आपल्या माणसांना म्हणाला, “तुम्हाला लक्षात येत नाही काय की आज इस्राएलमध्ये एक सेनापती, एक महान पुरुष पडला आहे? \v 39 आणि आज, मी अभिषिक्त राजा असूनही, निर्बल आहे आणि जेरुइयाहचे हे पुत्र माझ्यासाठी फारच शक्तिमान आहेत. याहवेह वाईट कृत्य करणाऱ्यास त्याच्या दुष्कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देवो!” \c 4 \s1 इश-बोशेथ याचा वध \p \v 1 जेव्हा शौलाचा पुत्र इश-बोशेथ याने ऐकले की, अबनेर हेब्रोन येथे मरण पावला आहे, तेव्हा त्याचे धैर्य सुटले आणि सर्व इस्राएली सावध झाले. \v 2 इकडे शौलाच्या पुत्राकडे दोन माणसे होती, ते छापा घालणाऱ्या तुकड्यांचे पुढारी होते. एकाचे नाव बाअनाह आणि दुसऱ्याचे रेखाब असे होते; ते बिन्यामीन गोत्रातील, बैरोथ वंशाच्या रिम्मोनचे पुत्र होते, बैरोथ हा बिन्यामीनचा भाग समजला जातो, \v 3 कारण बैरोथ येथील लोक गित्ताइमला पळून गेले आणि आजपर्यंत परदेशी म्हणून तिथेच निवासी झाले आहेत. \p \v 4 (शौलाचा पुत्र योनाथानचा एक पुत्र होता तो दोन्ही पायांनी अधू होता. येज्रील येथून शौल आणि योनाथान यांच्याविषयी वर्तमान आले, तेव्हा तो पाच वर्षाचा होता. त्याची दाई त्याला घेऊन पळाली, परंतु ती निघण्याच्या घाईत असताना तो पडला आणि अपंग झाला. त्याचे नाव मेफीबोशेथ असे होते.) \p \v 5 आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले. \v 6 गहू घेत आहेत असे दाखवित ते घराच्या आतील भागात गेले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. नंतर रेखाब आणि त्याचा भाऊ बाअनाह तिथून निसटून गेले. \p \v 7 ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके छेदले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले. \v 8 त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे डोके. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.” \p \v 9 दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ, \v 10 आपण चांगले वर्तमान आणले आहे हे समजून मला एका व्यक्तीने सांगितले, ‘शौल मेला आहे’ तेव्हा मी त्याला सिकलाग येथे धरून मारून टाकले. त्याने आणलेल्या वर्तमानासाठी त्याला मी हे प्रतिफळ दिले! \v 11 तर आता दुष्ट पुरुषांनी एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या घरात, त्याच्याच पलंगावर जिवे मारले आहे; मी किती विशेषकरून तुमच्या हातून त्याच्या रक्ताचा जाब घ्यावा आणि तुम्हाला या पृथ्वीतून नष्ट करावे!” \p \v 12 तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले. \c 5 \s1 दावीद इस्राएलवर राजा होतो \p \v 1 इस्राएलच्या सर्व गोत्रांचे लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत. \v 2 मागील काळात, जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेहने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ” \p \v 3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. \p \v 4 दावीद तीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने चाळीस वर्षे राज्य केले. \v 5 त्याने हेब्रोन येथून यहूदीयावर सात वर्षे आणि सहा महिने राज्य केले आणि सर्व इस्राएल व यहूदाह यांच्यावर यरुशलेमात तेहतीस वर्षे राज्य केले. \s1 दावीद यरुशलेमवर विजय मिळवितो \p \v 6 राजा आणि त्यांची माणसे यरुशलेममध्ये राहत असलेल्या यबूसी लोकांवर हल्ला करण्यासाठी निघाले. यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही; येथील आंधळे आणि लंगडेही तुम्हाला बाहेर हाकलून लावतील.” त्यांना वाटले, “दावीद येथे आत येऊ शकणार नाही.” \v 7 तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे. \p \v 8 त्या दिवशी दावीदाने म्हटले होते, “जो कोणी यबूसी लोकांवर विजय मिळवील त्याने पाण्याच्या झोताकडून जाऊन ‘आंधळे व लंगडे’ अशा दावीदाच्या शत्रूंवर\f + \fr 5:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa ज्या लोकांचा दावीद द्वेष करीत असे.\fqa*\f* हल्ला करावा म्हणूनच असे म्हटले जाते, ‘आंधळे आणि लंगडे’ राजवाड्यात प्रवेश करणार नाहीत.” \p \v 9 दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून\f + \fr 5:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa मिल्लो बुरूज\fqa*\f* आतील भागापर्यंत तट बांधले. \v 10 आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्याबरोबर होते. \p \v 11 आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले, त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे व सुतार आणि गवंडी पाठवले आणि त्यांनी दावीदासाठी एक राजवाडा बांधला. \v 12 तेव्हा दावीदाने जाणले की, याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य उंच केले आहे. \p \v 13 दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. \v 14 यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन, \v 15 इभार, एलीशुआ, नेफेग, याफीय, \v 16 एलीशामा, एलयादा व एलिफेलेत. \s1 दावीद पलिष्ट्यांचा पराभव करतो \p \v 17 इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो खाली गडाकडे गेला. \v 18 इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईमच्या खोर्‍यात पसरले. \v 19 तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” \p याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.” \p \v 20 तेव्हा दावीद बआल-पेरासीम येथे गेला आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे याहवेह माझ्या शत्रूंवर माझ्यासमोर तुटून पडले.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम\f + \fr 5:20 \fr*\fq बआल-पेरासीम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa तुटून पडणारा धनी\fqa*\f* हे नाव पडले. \v 21 पलिष्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या तिथेच टाकून दिल्या आणि दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या आपल्याबरोबर नेल्या. \p \v 22 पुन्हा एकदा पलिष्टी लोक आले आणि रेफाईमच्या खोर्‍यात पसरले. \v 23 तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले आणि त्यांनी उत्तर दिले, “सरळ वरती जाऊ नको, परंतु त्यांच्यामागून वळसा घे आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर. \v 24 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, त्वरित पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी याहवेह तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.” \v 25 तेव्हा दावीदाने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून\f + \fr 5:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa गेबा\fqa*\f* गेजेरपर्यंत त्याने पलिष्टी सैन्यांना मारून टाकले. \c 6 \s1 कोश यरुशलेम आणला जातो \p \v 1 दावीदाने पुन्हा इस्राएलातील सर्व सक्षम तरुण माणसांना एकत्र आणले, ते तीस हजार होते. \v 2 दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह\f + \fr 6:2 \fr*\ft म्हणजेच किर्याथ-यआरीम\ft*\f* येथून परमेश्वराचा कोश जो सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले. \v 3 त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते \v 4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता. \v 5 दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर चिपळ्या,\f + \fr 6:5 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa गाणे गात\fqa*\f* सनोवर लाकडापासून बनविलेले वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा वाजवित आनंद करीत होते. \p \v 6 जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. \v 7 त्याच्या या आदरहीन कृत्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला; म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले आणि तो तिथे परमेश्वराच्या कोशाच्या बाजूला मरण पावला. \p \v 8 तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह\f + \fr 6:8 \fr*\fq पेरेस-उज्जाह \fq*\ft अर्थात् \ft*\fqa उज्जाहविरुद्ध उद्रेक\fqa*\f* असे म्हणतात. \p \v 9 त्या दिवशी दावीदाला याहवेहचे भय वाटले आणि तो म्हणाला, “आता याहवेहचा कोश माझ्याकडे कसा येणार?” \v 10 याहवेहचा कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात घेऊन जाण्यास त्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी, त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला. \v 11 याहवेहचा कोश गित्ती ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराण्यास आशीर्वाद दिला. \p \v 12 दावीद राजाला असे सांगण्यात आले की, “याहवेहने ओबेद-एदोमच्या घराण्यास व त्याचे जे काही आहे त्यास, परमेश्वराच्या कोशामुळे आशीर्वादित केले आहे,” तेव्हा परमेश्वराचा कोश ओबेद-एदोमच्या घरापासून दावीदाच्या नगरात आणावा म्हणून दावीद आनंद करीत गेला. \v 13 याहवेहचा कोश वाहून नेणारे जेव्हा सहा पावले पुढे गेले, तेव्हा त्याने एक बैल आणि एक पुष्ट वासरू यांचा यज्ञ केला. \v 14 तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता, \v 15 दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते. \p \v 16 याहवेहचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर उड्या मारत आणि नाचत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला. \p \v 17 त्यांनी याहवेहचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला, आणि दावीदाने याहवेहसमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली. \v 18 होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर, दावीदाने लोकांना सर्वसमर्थ याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला. \v 19 नंतर त्याने तिथे जमलेल्या इस्राएली लोकांच्या समुदायातील प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप, मनुक्याची एक वडी दिली, मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले. \p \v 20 दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!” \p \v 21 दावीद मीखलला म्हणाला, “ते याहवेहच्या समोर झाले, ज्यांनी तुझ्या पित्याच्या किंवा त्याच्या घराण्यातील इतर कोणाच्या ऐवजी माझी निवड करून याहवेहच्या इस्राएली लोकांवर मला राज्यकर्ता म्हणून नेमले; तर मी याहवेहसमोर आनंद साजरा करेन. \v 22 मी यापेक्षाही अधिक अप्रतिष्ठित होईन आणि मी माझ्या स्वतःच्या दृष्टीने अपमानित होईन. परंतु या गुलाम मुलींद्वारे ज्यांच्याबद्दल तू बोललीस, त्या माझा सन्मान करतील.” \p \v 23 आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही. \c 7 \s1 दावीदाला परमेश्वराचे अभिवचन \p \v 1 राजा आपल्या राजवाड्यात राहत असताना व याहवेहने त्याला त्याच्या चहूकडील सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर, \v 2 राजाने नाथान संदेष्ट्याला म्हटले, “पाहा, मी येथे गंधसरूच्या भवनात राहतो आणि परमेश्वराचा कोश एका तंबूत आहे!” \p \v 3 नाथानाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या मनात जे काही आहे, त्यानुसार करा, कारण याहवेह तुम्हाबरोबर आहेत.” \p \v 4 परंतु त्याच रात्री याहवेहचे वचन नाथानाकडे आले, ते असे: \pm \v 5 “जा आणि माझा सेवक दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार काय? \v 6 इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्‍यातूनच फिरत आलो आहे. \v 7 जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या इस्राएली लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही अधिकार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही” असे कधी म्हटले काय?’ \pm \v 8 “तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले. \v 9 जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन. \v 10 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये. \v 11 मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी\f + \fr 7:11 \fr*\ft परंपरेनुसार \ft*\fqa न्यायाधीश\fqa*\f* नेमले तेव्हापासून त्यांनी तसेच केले आहे. मी तुलासुद्धा तुझ्या सर्व शत्रूंपासून विसावा देईन. \pm “ ‘याहवेह असे जाहीर करतात, की याहवेह स्वतः तुझ्यासाठी घर स्थापित करतील: \v 12 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन. \v 13 तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन. \v 14 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन. \v 15 परंतु तुझ्यासमोरून काढून टाकलेल्या शौलावरची प्रीती मी जशी दूर केली, तशी तुझ्या संतानावरची माझी प्रीती काढून टाकली जाणार नाही. \v 16 तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ” \p \v 17 या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला. \s1 दावीदाची प्रार्थना \p \v 18 नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले: \pm “हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे? \v 19 आणि हे सार्वभौम याहवेह, जणू हे आपल्या दृष्टीने पुरेसे नव्हते म्हणून आपण आपल्या सेवकाच्या घराण्याच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे आणि हे याहवेह परमेश्वरा हा करार केवळ एका मनुष्यासाठी आहे! \pm \v 20 “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. \v 21 आपल्या वचनासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे महान कार्य केले आहे व आपल्या सेवकाला ते कळविले आहे. \pm \v 22 “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही किती थोर आहात! तुमच्यासारखा कोणीही नाही, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार, तुमच्याशिवाय दुसरे कोणी परमेश्वर नाही. \v 23 आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहेत—पृथ्वीवरील असे एक राष्ट्र ज्यांनी आपले लोक व्हावे म्हणून परमेश्वर त्यांना खंडून घेण्यास व आपले नाव प्रसिद्ध करण्यासाठी गेले; आणि ज्या तुमच्या लोकांना तुम्ही इजिप्त देशातून,\f + \fr 7:23 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांच्या दैवतांपासून\fqa*\f* म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले? \v 24 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना स्वतःचे खास लोक म्हणून सर्वकाळासाठी स्थापित केले आहे आणि हे याहवेह, तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात. \pm \v 25 “तर आता, हे याहवेह परमेश्वरा, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळपर्यंत पूर्ण करावे, आपण म्हटल्याप्रमाणे आपण करावे, \v 26 यासाठी की तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्या दृष्टीत स्थापित व्हावे. \pm \v 27 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या सेवकाला हे प्रकट केले आहे की, ‘मी तुझे घर बांधीन.’ त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे ही प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे. \v 28 सार्वभौम याहवेह, तुम्ही परमेश्वर आहात! तुमचा करार विश्वासयोग्य आहे आणि तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे. \v 29 तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद द्या, म्हणजे त्यांनी तुमच्या दृष्टीपुढे सदैव राहावे; कारण, सार्वभौम याहवेह, तुम्ही हे बोलला आहात आणि आपल्या आशीर्वादाने तुमच्या सेवकाचे घराणे सदैव आशीर्वादित व्हावे.” \c 8 \s1 दावीदाने मिळविलेले विजय \p \v 1 काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर कब्जा केला आणि त्याने मेथेग-अम्माह पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतले. \p \v 2 दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला. त्याने त्यांना जमिनीवर झोपविले आणि दोरीच्या अंतराने त्यांचे मोजमाप केले. जे दोन दोर्‍या भरले त्यांना मारून टाकले आणि जे एक दोरी भरले त्यांना जिवंत सोडले. याप्रकारे मोआबी लोक दावीदाच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. \p \v 3 याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची पुनर्स्थापना\f + \fr 8:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa ताबा घेण्यास\fqa*\f* करण्यास फरात\f + \fr 8:3 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजरचा पराभव केला. \v 4 दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार\f + \fr 8:4 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa एक हजार सातशे\fqa*\f* आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या. \p \v 5 जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना मारून टाकले. \v 6 नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथे कुठे गेला, तिथे तिथे याहवेहने त्याला विजय दिला. \p \v 7 हादादेजरच्या अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. \v 8 हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ\f + \fr 8:8 \fr*\fqa तेबाह \fqa*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa बेताह\fqa*\f* आणि बीरोथाई येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. \p \v 9 हमाथाचा राजा तोई\f + \fr 8:9 \fr*\fq तोई \fq*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa तोऊ\fqa*\f* याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, \v 10 तेव्हा त्याने आपला पुत्र योरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोई यांच्यातही युद्ध होते. योरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या वस्तू आणल्या. \p \v 11 दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: \v 12 अराम\f + \fr 8:12 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa एदोम\fqa*\f* व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली. \p \v 13 क्षार खोर्‍यातील अठरा हजार अरामी\f + \fr 8:13 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa एदोमी\fqa*\f* लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले. \p \v 14 त्याने एदोमात सर्वठिकाणी ठाणे बसविले आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथे कुठे गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला. \s1 दावीदाचे अधिकारी \p \v 15 दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे. \v 16 जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता. \v 17 अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता; \v 18 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार\f + \fr 8:18 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa याजक\fqa*\f* होते. \c 9 \s1 दावीद आणि मेफीबोशेथ \p \v 1 दावीदाने विचारले, “योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?” \p \v 2 शौलाच्या घराण्यातील सीबा नावाचा एक सेवक होता. दावीदासमोर येण्यासाठी त्यांनी त्याला बोलावून घेतले आणि राजा त्याला म्हणाला, “तू सीबा आहेस काय?” \p त्याने उत्तर दिले, “मी तुमच्या सेवेस हजर आहे,” \p \v 3 राजाने विचारले, “मी परमेश्वराची कृपा दाखवावी असा शौलाच्या घराण्यातील कोणीही जिवंत नाही काय?” \p सीबाने राजाला उत्तर दिले, “योनाथानचा एक पुत्र अजूनही जिवंत आहे; तो दोन्ही पायांनी अधू आहे.” \p \v 4 “तो कुठे आहे?” राजाने विचारले. \p सीबाने उत्तर दिले, “तो लो-देबार येथे अम्मीएलचा पुत्र माखीर याच्या घरी आहे.” \p \v 5 तेव्हा दावीद राजाने त्याला लो-देबार येथून अम्मीएलाचा पुत्र माखीरच्या घरून बोलावून आणले. \p \v 6 जेव्हा शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ दावीदाकडे आला तेव्हा त्याच्या आदरार्थ त्याने खाली वाकून दंडवत घातले. \p दावीद म्हणाला, “मेफीबोशेथ!” \p “मी तुमच्या सेवेस हजर आहे,” त्याने उत्तर दिले. \p \v 7 दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.” \p \v 8 मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?” \p \v 9 नंतर राजाने शौलाचा सेवक सीबा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “शौलाचे व त्याच्या घराण्याचे जे काही होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या नातवाला दिले आहे. \v 10 तू, तुझे पुत्र आणि तुझे चाकर यांनी त्याच्यासाठी त्या जमिनीची मशागत करावी आणि तुझ्या धन्याच्या नातवाला पुरवठा असावा म्हणून ते पीक आणावे. आणि मेफीबोशेथ, तुझ्या धन्याचा नातू, नेहमीच माझ्या मेजावर भोजन करेल.” (सीबाची पंधरा मुले आणि वीस चाकर होते.) \p \v 11 तेव्हा सीबा राजाला म्हणाला, “माझ्या धनीराजाने आपल्या सेवकाला दिलेल्या आज्ञेनुसार आपला सेवक करेल.” याप्रमाणे राजाच्या पुत्रांसारखा मेफीबोशेथ दावीदाच्या मेजावर भोजन करीत असे. \p \v 12 मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते. \v 13 आणि मेफीबोशेथ यरुशलेम येथे राहिला कारण तो नेहमी राजाच्या मेजावर भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी अधू होता. \c 10 \s1 दावीद अम्मोनी लोकांचा पराभव करतो \p \v 1 कालांतराने, अम्मोन्यांचा राजा मरण पावल्यानंतर, त्याचा पुत्र हानून राजा झाला. \v 2 तेव्हा दावीदाने विचार केला, “जशी त्याचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी त्याचा पुत्र हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. \p जेव्हा दावीदाची माणसे अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले, \v 3 तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?” \v 4 तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येक मनुष्याच्या अर्ध्या दाढीचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले. \p \v 5 जेव्हा दावीदाला याबाबतीत सांगितले गेले, तेव्हा दावीदाने त्या माणसांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.” \p \v 6 जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा त्यांनी बेथ-रहोब व अराम-झोबाह येथून वीस हजार अरामी पायदळ, तसेच माकाहच्या राजाबरोबर एक हजार लोक आणि तोब कडून बारा हजार माणसे भाड्याने आणली. \p \v 7 हे ऐकून, दावीदाने युद्ध करणाऱ्या माणसांच्या संपूर्ण सैन्यासह योआबाला पाठवले. \v 8 तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगरवेशीच्या दरवाजाजवळ येऊन थांबले आणि अराम-झोबाह आणि रहोबचे अरामी आणि तोब आणि माकाहची माणसे मोकळ्या प्रदेशात एकटीच होती. \p \v 9 शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले. \v 10 बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले. \v 11 योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करण्यास यावे; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन. \v 12 खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.” \p \v 13 तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले पण ते त्याच्यापुढून पळून गेले. \v 14 जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा ते अबीशाईपुढून पळून शहरात गेले. तेव्हा योआब अम्मोनी सैन्याबरोबर युद्ध करून यरुशलेमास आला. \p \v 15 नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा ते पुन्हा एकत्र झाले. \v 16 हादादेजरने फरात नदीपलीकडून अरामी सैन्य आणले; हादादेजरच्या सैन्याचा सेनापती शोबाक याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम येथे गेले. \p \v 17 याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले, यार्देन नदी पार करून ते हेलामकडे गेले. अरामी सैन्याने दावीदाला भेटण्यासाठी त्यांच्या युद्धाच्या रांगा तयार केल्या आणि त्याच्याविरुद्ध युद्ध केले. \v 18 परंतु अरामी इस्राएली समोरून पळून गेले आणि दावीदाने त्यांच्यातील सातशे रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना\f + \fr 10:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa घोडेस्वारांना\fqa*\f* ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोबाक याला सुद्धा मारले आणि तो तिथेच मरण पावला. \v 19 जे सर्व राजे हादादेजरचे जहागीरदार होते, यांनी इस्राएलपुढे झालेला आपला पराभव पाहून, इस्राएलशी करार केला व त्यांच्या अधीन झाले. \p त्यानंतर पुढे अरामी लोक अम्मोनी लोकांना मदत करण्यास घाबरले. \c 11 \s1 दावीद आणि बथशेबा \p \v 1 त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला. \p \v 2 एके संध्याकाळी दावीद त्याच्या बिछान्यावरून उठला आणि आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरू लागला. गच्चीवरून त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले. ती स्त्री फार सुंदर होती, \v 3 दावीदाने तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणा एकाला पाठवले. तो मनुष्य म्हणाला, “ती एलीयामची कन्या, हिथी उरीयाहची पत्नी, बथशेबा आहे.” \v 4 तेव्हा दावीदाने दूत पाठवून तिला बोलावून घेतले. ती त्याच्याकडे आली आणि त्याने तिच्याशी संबंध केला. (यावेळी ती तिच्या मासिक अशुद्धतेपासून शुद्ध होत होती.) नंतर ती परत तिच्या घरी गेली. \v 5 ती स्त्री गर्भवती झाली आणि तिने दावीदाकडे निरोप पाठवित म्हटले, “मी गर्भवती आहे.” \p \v 6 मग दावीदाने योआबाला निरोप पाठवला: “उरीयाह हिथी याला माझ्याकडे पाठव.” आणि योआबाने त्याला दावीदाकडे पाठवले. \v 7 जेव्हा उरीयाह त्याच्याकडे आला, तेव्हा दावीदाने त्याची विचारपूस करत विचारले योआब कसा आहे, शिपाई कसे आहेत आणि युद्ध कसे चालले आहे. \v 8 नंतर दावीद उरीयाहला म्हणाला, “तुझ्या घरी जा आणि आपले पाय धू.” तेव्हा उरीयाह राजवाड्यातून निघाला आणि त्याच्यामागोमाग राजाकडून एक बक्षीस पाठवले गेले. \v 9 परंतु उरीयाह राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच त्याच्या धन्याच्या सेवकांबरोबर झोपला, तो त्याच्या घरी गेला नाही. \p \v 10 दावीदाला कोणी सांगितले, “उरीयाह घरी गेला नाही.” तेव्हा त्याने उरीयाहाला विचारले, “तू आताच लष्कराच्या मोहिमेवरून आलास नाही काय? तू घरी का गेला नाहीस?” \p \v 11 उरीयाह दावीदाला म्हणाला, “कोश आणि इस्राएल आणि यहूदीया हे तंबूत\f + \fr 11:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa सुक्कोथमध्ये\fqa*\f* राहत आहेत आणि माझा सेनापती योआब आणि माझ्या धन्याची माणसे उघड्या मैदानात तळ देऊन आहेत. तर मी माझ्या घरी जाऊन खाणेपिणे आणि माझ्या पत्नीशी प्रेम कसे करू शकतो? तुमच्या जिवाची शपथ, मी अशी गोष्ट करणार नाही!” \p \v 12 तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “आणखी एक दिवस येथेच राहा, उद्या मी तुला परत पाठवेन.” त्याप्रमाणे उरीयाह तो दिवस आणि दुसरा दिवस यरुशलेममध्ये राहिला. \v 13 दावीदाने त्याला आमंत्रण दिल्यावरून त्याने त्याच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तो मस्त होईपर्यंत दावीदाने त्याला मद्य पाजले. परंतु संध्याकाळी उरीयाह त्याच्या धन्याच्या सेवकांमध्ये त्याच्या चटईवर झोपण्यासाठी गेला; तो घरी गेला नाही. \p \v 14 सकाळी दावीदाने योआबाला एक पत्र लिहिले आणि ते उरीयाहच्या हाती पाठवले. \v 15 त्यात त्याने असे लिहिले, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाहला ठेवा; आणि त्याच्यापासून मागे या म्हणजे त्याच्यावर वार होईल व तो मरण पावेल.” \p \v 16 म्हणून जिथे योआबने शहराला वेढा घातला होता, तेव्हा त्याला माहीत होते की, शूर योद्धे कुठे असतील तिथे त्याने उरीयाहला ठेवले. \v 17 जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला. \p \v 18 योआबने दावीदाकडे लढाईचा संपूर्ण वृतांत पाठवला. \v 19 त्याने संदेशवाहकाला सूचना दिली: “राजाला या लढाईचा वृत्तांत दिल्यानंतर, \v 20 राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय? \v 21 यरुब्बशेथचा\f + \fr 11:21 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa गिदोन\fqa*\f* पुत्र अबीमेलेख याला कोणी मारले? एका स्त्रीने जात्याची तळी भिंतीवरून टाकून तेबेस येथे त्याला मारले नाही काय? तुम्ही त्या भिंतीच्या इतक्या जवळ का गेला?’ जर राजा तुला असे विचारतील, तेव्हा त्यांना सांग, ‘तुमचा सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.’ ” \p \v 22 त्याप्रमाणे संदेशवाहक निघाला आणि पोहोचल्यानंतर त्याने दावीदाला ते सर्वकाही सांगितले जे सांगण्यासाठी योआबने त्याला पाठवले होते. \v 23 संदेशवाहक दावीदाला म्हणाला, “ती माणसे आमच्यावर प्रबळ झाली आणि मोकळ्या मैदानात त्यांनी आमच्यावर हल्ला केला, परंतु आम्ही त्यांना शहराच्या प्रवेशद्वाराकडे परत लावून दिले. \v 24 तेव्हा तिरंदाजांनी वेशीच्या तटांवरून तुमच्या सेवकांवर बाणांनी हल्ला केला आणि राजाची काही माणसे मारली गेली. याशिवाय, आपला सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.” \p \v 25 दावीदाने त्या संदेशवाहकाला म्हटले, “योआबाला सांग, ‘यामुळे तू निराश होऊ नकोस, कारण तलवार जसे एकाचा तसेच दुसर्‍याचाही नाश करते. त्या शहराविरुद्ध अधिक नेटाने हल्ला करा आणि त्याचा नाश करा.’ योआबाला उत्तेजित करण्यासाठी हे तू त्याला सांग.” \p \v 26 जेव्हा उरीयाहच्या पत्नीने ऐकले की, तिचा पती मारला गेला, तिने त्याच्यासाठी शोक केला. \v 27 शोककाळ संपल्यानंतर दावीदाने तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि ती त्याची पत्नी झाली आणि तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. परंतु दावीदाने जे केले होते त्यामुळे याहवेह असंतुष्ट झाले होते. \c 12 \s1 नाथानचा दावीदाला निषेध \p \v 1 नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब. \v 2 श्रीमंत माणसाजवळ पुष्कळ मेंढरे व गुरे होती, \v 3 परंतु गरीब मनुष्याकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढीशिवाय काहीच नव्हते. त्याने ती वाढवली, ती त्याच्याबरोबर आणि त्याच्या लेकरांबरोबर वाढली. तिने त्याच्या अन्नामधून खाल्ले, त्याच्या प्याल्यातून पाणी प्याले आणि त्याच्या बाहूंमध्येच ती झोपी जात असे. त्याला ती आपल्या मुलीप्रमाणेच होती. \p \v 4 “त्या श्रीमंत मनुष्याकडे एक पाहुणा आला. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने त्या पाहुण्यासाठी भोजन बनवावे म्हणून त्याच्याकडील असलेल्या मेंढरे किंवा गुरातून घेतले नाही, त्याऐवजी त्याने त्या गरीब माणसाची ती लहान मेंढी घेऊन त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.” \p \v 5 हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे! \v 6 त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.” \p \v 7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले. \v 8 तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते. \v 9 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस. \v 10 तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’ \p \v 11 “याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील. \v 12 तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ” \p \v 13 नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” \p नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस. \v 14 परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर\f + \fr 12:14 \fr*\ft जुन्या इब्री प्रतींमध्ये \ft*\fqa शत्रूंपुढे अनादर\fqa*\f* केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.” \p \v 15 नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला. \v 16 दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला. \v 17 त्याच्या घरातील वडील लोक त्याला जमिनीवरून उठविण्यासाठी त्याच्या बाजूला उभे राहिले, परंतु त्याने नकार दिला आणि त्याने त्यांच्याबरोबर काहीही अन्न खाल्ले नाही. \p \v 18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.” \p \v 19 आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?” \p “होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले. \p \v 20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले. \p \v 21 त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.” \p \v 22 त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’ \v 23 परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.” \p \v 24 नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली; \v 25 कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह\f + \fr 12:25 \fr*\fq यदीदियाह \fq*\ft म्हणजे \ft*\fqa याहवेहला प्रिय\fqa*\f* असे ठेवले. \p \v 26 त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांचा राब्बाह नगर याच्याविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले. \v 27 नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे. \v 28 तर आता उरलेले सैन्य गोळा करा आणि शहराला वेढा घाला आणि ते ताब्यात घ्या. नाहीतर मी ते शहर घेईन आणि ते माझ्या नावावर होईल.” \p \v 29 त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले. \v 30 दावीदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरून मुकुट काढून घेतला आणि तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याचे वजन सोन्याचा एक तालांत\f + \fr 12:30 \fr*\ft अंदाजे \ft*\fqa 34 कि.ग्रॅ.\fqa*\f* होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती. दावीदाने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली \v 31 आणि त्या शहरातील लोक जे तिथे होते त्यांना त्याने बाहेर आणले, व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयास लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या नगरांचे असे केले. नंतर तो व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले. \c 13 \s1 अम्नोन आणि तामार \p \v 1 काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोम याची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला. \p \v 2 अम्नोन त्याच्या बहिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला की, तो आजारी पडला. तामार कुमारी होती आणि तिच्याशी काही करणे हे त्याला अशक्य होते. \p \v 3 दावीदाचा भाऊ शिमिआह, याचा पुत्र योनादाब अम्नोनाचा सल्लागार असून अतिशय धूर्त होता. \v 4 त्याने अम्नोनास विचारले, “तू जो राजाचा पुत्र असून दिवसेंदिवस असा क्षीण का दिसतोस? तू मला सांगणार नाहीस काय?” \p तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामारवर मी प्रेम करतो.” \p \v 5 यहोनादाब म्हणाला, “तुझ्या पलंगावर जा आणि आजारी असल्याचे ढोंग कर, जेव्हा तुझे वडील तुला पाहायला येतील, तेव्हा त्यांना सांग, ‘माझी बहीण तामारने माझ्याकडे येऊन मला काहीतरी खावयास द्यावे. तिने ते भोजन माझ्या दृष्टीसमोर तयार करावे म्हणजे मी तिला पाहीन आणि नंतर ते तिच्या हातून खाईन.’ ” \p \v 6 तेव्हा अम्नोन पडून राहिला आणि आजारी असल्याचे ढोंग केले. जेव्हा राजा त्याच्या भेटीस आला, तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझी बहीण तामार हिने येऊन माझ्या दृष्टीसमोर विशेष भाकरी बनविल्या तर मला आवडेल, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.” \p \v 7 दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.” \v 8 तेव्हा तामार तिचा भाऊ अम्नोन याच्या घरी गेली, तो तर बिछान्यावर पडून होता. तिने थोडे पीठ घेतले, ते मळले, आणि त्याच्या दृष्टीसमोर भाकरी तयार केल्या आणि त्या भाजल्या. \v 9 नंतर तिने ताट घेतले आणि त्याला भाकर वाढली परंतु त्याने खाण्यास नकार दिला. \p अम्नोन म्हणाला, “प्रत्येकाला येथून बाहेर घालवून द्या.” तेव्हा प्रत्येकजण त्याच्यापासून निघून गेले. \v 10 नंतर अम्नोन तामारला म्हणाला, “भाकरी माझ्या झोपण्याच्या खोलीकडे घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हाताने ती खाईन.” तेव्हा तिने बनविलेल्या भाकरी घेऊन तामार आपला भाऊ अम्नोनच्या खोलीकडे आली. \v 11 परंतु त्याने भाकरी खाव्या म्हणून जेव्हा ती भाकरी घेऊन त्याच्याजवळ गेली, तेव्हा त्याने तिला पकडले आणि म्हटले, “माझ्या बहिणी, माझ्याबरोबर पलंगावर ये.” \p \v 12 ती त्याला म्हणाली, “नाही, माझ्या भावा! माझ्यावर जबरदस्ती करू नकोस! इस्राएलमध्ये अशी गोष्ट होऊ नये! अशी घृणास्पद गोष्ट करू नकोस. \v 13 माझ्याबद्दल विचार कर, मी या बेअब्रू पासून कशी वाचेन? आणि तुझ्याबद्दल काय? इस्राएलमधील मूर्ख व दुष्टासारखा तू होशील? म्हणून कृपा करून राजाकडे बोलणे कर; ते मला तुझ्याशी लग्न करण्यापासून थांबविणार नाहीत.” \v 14 परंतु त्याने तिचे ऐकण्यास नकार दिला आणि तो तिच्यापेक्षा बलवान असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार केला. \p \v 15 नंतर अम्नोनाला तिचा तीव्र तिरस्कार वाटू लागला. वास्तविकता त्याने तिच्यावर जितके प्रेम केले होते, त्यापेक्षाही त्याला अधिक तिचा तिरस्कार वाटला. नंतर अम्नोन तिला म्हणाला, “ऊठ आणि चालती हो!” \p \v 16 “नाही!” ती त्याला म्हणाली, “तू मला पाठवून देणे हे, जे वाईट कृत्य तू आधी केले आहे त्यापेक्षाही भयंकर आहे.” \p परंतु तो तिचे ऐकेना. \v 17 त्याने त्याच्या खासगी सेवकाला बोलावून सांगितले, “या स्त्रीला माझ्या नजरेपासून बाहेर काढ आणि तिच्यामागे दाराला कडी लाव.” \v 18 तेव्हा त्याच्या सेवकाने तिला बाहेर काढले आणि तिच्यामागे दार बंद केले. राजाच्या कुमारी कन्या घालत असत त्याप्रकारचा पायघोळ झगा तिने घातला होता. \v 19 तामारने तिच्या डोक्यावर राख घातली आणि जो पायघोळ झगा तिने घातला होता तो तिने फाडला. तिने तिचे हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि मोठ्याने रडत ती निघून गेली. \p \v 20 तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, “तुझा भाऊ अम्नोन तुझ्याबरोबर होता काय? तर आता माझ्या बहिणी, शांत हो, तो तुझा भाऊ आहे. ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस.” आणि तामार तिचा भाऊ अबशालोम याच्या घरात एकाकी अशी राहू लागली. \p \v 21 जेव्हा दावीद राजाने हे सर्व ऐकले, तेव्हा त्याला संताप आला. \v 22 आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते. \s1 अबशालोम अम्नोनाचा वध करतो \p \v 23 दोन वर्षानंतर, जेव्हा एफ्राईमच्या सीमेवर बआल-हासोर येथे अबशालोमच्या मेंढरांची लोकर कातरणी होती, तेव्हा त्याने राजांच्या सर्व पुत्रांना तिथे येण्यास आमंत्रण दिले. \v 24 अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?” \p \v 25 राजाने उत्तर दिले, “नाही, माझ्या पुत्रा, आम्ही सर्वांनीच जाऊ नये; आम्ही तुझ्यासाठी केवळ भार होऊ.” जरी अबशालोमाने त्याला आग्रह केला, तरीही राजाने जाण्यास नकार दिला परंतु त्याने त्याला आशीर्वाद दिला. \p \v 26 तेव्हा अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही, तर माझा भाऊ अम्नोन याला आमच्याबरोबर येऊ द्या.” \p राजाने त्याला विचारले, “त्याने तुमच्याबरोबर का जावे?” \v 27 परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले. \p \v 28 अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.” \v 29 तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले. \p \v 30 ते त्यांच्या मार्गावर असता, दावीदाकडे निरोप आला: “अबशालोमने राजाच्या सर्व पुत्रांना मारून टाकले आहे; त्यांच्यातील एकही जिवंत राहिलेले नाही.” \v 31 तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले. \p \v 32 परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता. \v 33 माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.” \p \v 34 तोपर्यंत अबशालोम पळून गेला होता. \p पहार्‍यावर असलेल्या मनुष्याने वर दृष्टी करून पाहिले आणि त्याला रस्त्याच्या पश्चिमेकडून डोंगरावरून खाली पुष्कळ लोक येताना दिसले. पहारेकर्‍याने जाऊन राजाला सांगितले, “होरोनाइमच्या दिशेकडे डोंगराच्या वरील बाजूला मला लोक दिसत आहेत.” \p \v 35 योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजपुत्र आले आहेत; तुमचा सेवक जसे म्हणाला तसेच घडले आहे.” \p \v 36 त्याचे बोलणे संपताच, राजाचे पुत्र मोठ्याने आक्रोश करीत आत आले. राजा आणि त्याचे सर्व सेवक मोठ्या दुःखाने रडले. \p \v 37 अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला. \p \v 38 अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला. \v 39 आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते. \c 14 \s1 अबशालोम यरुशलेमकडे परत येतो \p \v 1 जेरुइयाहचा पुत्र योआब याला माहीत होते की, अबशालोमला भेटावे असे राजाला वाटते. \v 2 तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर. \v 3 मग राजाकडे जा आणि असे बोल.” आणि काय बोलावे ते योआबाने तिला सांगितले. \p \v 4 जेव्हा तकोवा येथून आलेली स्त्री राजाकडे गेली, राजाला सन्मान देण्यासाठी तिने तोंड भूमीकडे लवून दंडवत केले, आणि म्हणाली, “महाराज, माझी मदत करा!” \p \v 5 राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?” \p ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे. \v 6 आपल्या सेविकेला दोन मुले होती. शेतामध्ये ती दोघे भांडू लागली आणि ते भांडण मिटविण्यास तिथे कोणी नव्हते. एकाने दुसर्‍यावर वार केला आणि त्याला जिवे मारले. \v 7 आता संपूर्ण कुटुंब आपल्या सेविकेविरुद्ध उठले आहे; ते म्हणतात, ‘ज्याने त्याच्या भावाला मारले त्याला आमच्या हाती सोपवून दे, म्हणजे त्याच्या भावाच्या जिवाबद्दल ज्याला त्याने मारून टाकले त्याचा आम्ही नाश करू; म्हणजे जो वारस राहिला आहे त्याच्यापासूनसुद्धा आमची सुटका होईल.’ याप्रकारे जो माझा एकमात्र निखारा राहिलेला आहे, तो सुद्धा ते विझवतील, व या भूतलावर माझ्या पतीचे ना नाव ना वारस राहील.” \p \v 8 राजा त्या स्त्रीला म्हणाला, “घरी जा, आणि मी तुझ्याबाजूने आदेश देईन.” \p \v 9 परंतु तकोवाची ती स्त्री राजाला म्हणाली, “माझ्या धनीराजाने मला आणि माझ्या कुटुंबाला क्षमा करावी, आणि राजा आणि त्याचे सिंहासन निर्दोष असो.” \p \v 10 राजाने उत्तर दिले, “तुला जर कोणी काही म्हटले, तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये, आणि ते पुन्हा तुला त्रास देणार नाहीत.” \p \v 11 ती म्हणाली, “तर मग राजाने याहवेह आपल्या परमेश्वराला विनंती करावी, म्हणजे रक्ताचा सूड घेणार्‍याला हानी करण्यापासून प्रतिबंध करावा, म्हणजे माझ्या मुलाचा नाश होणार नाही.” \p तो म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, तुझ्या मुलाच्या डोक्यावरील एक केसही जमिनीवर पडणार नाही.” \p \v 12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.” \p राजाने म्हटले, “बोल,” \p \v 13 ती स्त्री म्हणाली, “तर मग परमेश्वराच्या लोकांविरुद्ध आपण अशी योजना का केली? जेव्हा राजा असे म्हणतो, कारण राजाने स्वतः घालवून दिलेल्या आपल्याच मुलाला परत आणले नाही, तेव्हा तो स्वतःलाच दोषी ठरवीत नाही का? \v 14 जसे जमिनीवर सांडलेले पाणी पुन्हा गोळा करता येत नाही, तसेच आपणही मेले पाहिजे. परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही; तर घालवून दिलेला व्यक्ती कायमचा त्यांच्यापासून घालवून दिला जाऊ नये अशी योजना परमेश्वर करतात. \p \v 15 “आणि आता मी माझ्या धनीराजाला हे सांगण्यासाठी आले आहे, कारण लोकांनी मला भयभीत केले आहे. आपल्या सेविकेने विचार केला, ‘मी राजाशी बोलेन; कदाचित ते आपल्या सेविकेची विनंती मान्य करतील. \v 16 कदाचित, राजा त्यांच्या सेविकेला त्या माणसाच्या हातून सोडविण्यास मान्य होतील, जो मला आणि माझ्या मुलाला परमेश्वराच्या वतनापासून वंचित ठेवेल.’ \p \v 17 “आणि आता आपली सेविका म्हणते की, ‘माझ्या राजाचा, स्वामीचा शब्द माझे वतन सुरक्षित ठेवो, कारण माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूतासारखी चांगले आणि वाईट याची ओळख आहे. याहवेह आपला परमेश्वर आपल्याबरोबर असो.’ ” \p \v 18 तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तुला मी जे काही विचारणार आहे, त्याचे उत्तर माझ्यापासून लपवू नकोस.” \p ती स्त्री म्हणाली, “माझ्या धनीराजाने बोलावे.” \p \v 19 राजाने विचारले, “या सर्व गोष्टींमध्ये योआबाचा हात नाही काय?” \p त्या स्त्रीने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाच्या जीविताची शपथ, माझे धनीराजा जे सांगतात त्यापासून कोणीही उजवी किंवा डावीकडे वळू शकत नाही. होय, तो आपला सेवक योआब होता ज्याने मला हे करण्यास सुचविले व आपल्या सेविकेच्या मुखात शब्द घातले. \v 20 आपला सेवक योआब याने सध्याची परिस्थिती बदलावी म्हणून असे केले. माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूताप्रमाणे ज्ञान आहे; देशात जे काही घडते ते सर्व आपणास ठाऊक आहे.” \p \v 21 तेव्हा राजाने योआबाला म्हटले, “ठीक आहे, मी त्याप्रमाणे करेन, जा आणि त्या तरुण अबशालोमास परत घेऊन ये.” \p \v 22 योआबाने राजाला सन्मान व आशीर्वाद देण्यासाठी भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. योआब म्हणाला, “आज आपल्या सेवकास समजले की त्याच्या धनीराजाच्या नजरेत तो कृपा पावला आहे, कारण राजाने आपल्या सेवकाची विनंती मान्य केली आहे.” \p \v 23 मग योआबाने गशूरला जाऊन अबशालोमला यरुशलेमास परत आणले. \v 24 तेव्हा राजाने म्हटले, “त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे, त्याने माझे मुख पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहिला व त्याने राजाचे मुख पाहिले नाही. \p \v 25 सर्व इस्राएलात सुंदरतेविषयी प्रशंसनीय असा अबशालोमसारखा कोणी नव्हता. डोक्याच्या माथ्यापासून तळपायापर्यंत त्याच्या ठायी काही दोष नव्हता. \v 26 वर्षातून एकदा तो आपल्या डोक्यावरील केस कापत असे कारण ते त्याच्यासाठी फार भारी होत असत. जेव्हा तो केस कापीत असे; त्याचे वजन केले जात असे, आणि राजकीय मापानुसार त्याचे वजन दोनशे शेकेल\f + \fr 14:26 \fr*\ft अंदाजे \ft*\fqa 2.3 कि.ग्रॅ.\fqa*\f* इतके भरत असे. \p \v 27 अबशालोमास तीन पुत्र व एक कन्या झाली. त्याच्या कन्येचे नाव तामार असे होते. ती फार सुंदर होती. \p \v 28 अबशालोम यरुशलेमात राजाचे मुख न पाहता दोन वर्षे राहिला. \v 29 तेव्हा योआबाला राजाकडे पाठवावे म्हणून अबशालोमाने योआबाला बोलाविणे पाठवले, परंतु योआबाने त्याच्याकडे येण्यास नकार दिला. त्याने दुसर्‍यांदा बोलाविणे पाठवले, परंतु पुन्हा योआबाने येण्यास नकार दिला. \v 30 तेव्हा अबशालोम आपल्या सेवकांस म्हणाला, “पाहा, योआबाचे शेत माझ्या शेताला लागून आहे, त्यात त्याने जव लावले आहे. जा आणि त्याला आग लावा.” त्याप्रमाणे अबशालोमच्या सेवकांनी शेताला आग लावली. \p \v 31 नंतर योआब अबशालोमच्या घरी गेला, आणि त्याला म्हणाला, “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला का आग लावली?” \p \v 32 अबशालोम योआबाला म्हणाला, “पाहा, मी तुला बोलाविणे पाठवित म्हटले, ‘येथे ये म्हणजे मी तुला राजाकडे हे विचारण्यास पाठवेन, “गशूरहून मी का आलो? मी अजूनही तिथेच असतो तर ते माझ्यासाठी बरे झाले असते!” ’ तर आता मला राजाला भेटावयाचे आहे, जर माझ्याठायी काही दोष असेल, तर त्यांनी मला जिवे मारावे.” \p \v 33 तेव्हा योआबाने राजाकडे जाऊन हे सर्व सांगितले. मग राजाने अबशालोमला बोलावून घेतले आणि तो आला व राजापुढे भूमीकडे लवून दंडवत घातले आणि राजाने अबशालोमचे चुंबन घेतले. \c 15 \s1 अबशालोमचा कट \p \v 1 त्यानंतरच्या काळात, अबशालोमने स्वतःसाठी एक रथ आणि घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे ठेवली. \v 2 तो सकाळी लवकर उठत असे आणि शहराच्या वेशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थांबत असे. जेव्हा कोणी राजाकडे तक्रार आणत असे तेव्हा अबशालोम त्याला बोलावून विचारत असे, “तू कोणत्या नगराचा आहेस?” तो उत्तर देत असे, “आपला सेवक इस्राएलातील गोत्रांपैकी एका गोत्राचा आहे.” \v 3 तेव्हा अबशालोम त्याला म्हणत असे, “पाहा, तुझे दावे कायदेशीर आणि यथायोग्य आहेत, परंतु तुझे ऐकण्यासाठी राजाचा कोणीही प्रतिनिधी तिथे नाही.” \v 4 अबशालोम आणखी असेही म्हणे, “जर या देशात न्यायाधीश म्हणून माझी नेमणूक झाली! तर प्रत्येकजण ज्याची काही तक्रार किंवा खटला आहे तो माझ्याकडे आला असता व मी त्यांना न्याय मिळवून दिला असता.” \p \v 5 जेव्हा कोणी खाली लवून मुजरा करावयाला जवळ आला, तेव्हा अबशालोम पुढे जाऊन त्याचा हात पकडून त्याचे चुंबन घेत असे. \v 6 जे कोणी राजाकडे न्याय मागण्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम असा वागत असे, अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांची मने जिंकून घेतली. \p \v 7 चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन. \v 8 आपला सेवक अराम येथील गशूर या ठिकाणी राहत असताना मी हा नवस केला होता: ‘जर याहवेह मला परत यरुशलेमास घेऊन जातील, तर मी हेब्रोन येथे याहवेहची उपासना करेन.’ ” \p \v 9 राजा त्याला म्हणाला, “शांतीने जा.” तेव्हा तो हेब्रोनकडे गेला. \p \v 10 नंतर अबशालोमने इस्राएलच्या सर्व गोत्रांकडे गुप्त संदेशवाहक असे सांगत पाठवले, “रणशिंगांचा आवाज ऐकताच तुम्ही म्हणा, ‘हेब्रोनमध्ये अबशालोम राजा आहे.’ ” \v 11 यरुशलेममधून दोनशे लोक अबशालोमबरोबर आले होते. त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते आणि ते अगदी निरागसपणे गेले, त्यांना याबाबतीत काहीही माहीत नव्हते. \v 12 अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. \s1 दावीद पळ काढतो \p \v 13 तेव्हा एका संदेशवाहकाने येऊन दावीदाला सांगितले, “इस्राएलच्या लोकांची मने अबशालोमशी जडली आहेत.” \p \v 14 तेव्हा दावीद त्याच्याबरोबर यरुशलेमात असलेल्या आपल्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “चला! आपण पळून जाऊ या, नाहीतर आपल्यातील कोणीही अबशालोमच्या हातून वाचणार नाही. आपण लवकर निघाले पाहिजे, नाहीतर तो त्वरेने आपल्याला गाठून आपल्यावर अरिष्ट आणेल व तलवारीने शहराचा नाश करेल.” \p \v 15 राजाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “आमचे स्वामी जे काही करण्याचे ठरवतील ते करण्यास आम्ही तयार आहोत.” \p \v 16 राजा आपल्या घरातील सर्व लोकांबरोबर बाहेर पडला; परंतु त्याने त्याच्या दहा उपपत्नींना राजवाड्याची देखरेख करण्यास मागे सोडले. \v 17 अशा प्रकारे राजा बाहेर पडला व सर्व लोक त्याच्यामागे निघाले आणि ते शहराच्या सीमेवर थांबले. \v 18 त्याची सर्व माणसे करेथी आणि पलेथी व सर्व सहाशे गित्ती लोक जे दावीदाबरोबर गथवरून आले होते ते त्यांच्याबरोबर राजापुढे चालत होते. \p \v 19 राजा गित्ती इत्तय याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येत आहे? परत जा आणि अबशालोम राजाबरोबर राहा. तू तर परदेशीय, तुझ्या जन्मभूमीतून बाहेर आलेला आहेस. \v 20 तू कालचा आलेला मनुष्य, मी कुठे जातो ते मला स्वतःला माहीत नाही, तेव्हा मी तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे का फिरवू? परत जा आणि आपले लोक सोबत घेऊन जा. याहवेह तुला दया व विश्वासूपण\f + \fr 15:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa दया व विश्वासूपण तुझ्यावर असो\fqa*\f* दाखवो.” \p \v 21 परंतु इत्तयने उत्तर दिले, “जिवंत याहवेहची आणि माझ्या राजाच्या जीविताची शपथ, माझे स्वामी कुठेही असतील, मग ते जीवन किंवा मरण असले तरी तिथे आपला सेवक असणार.” \p \v 22 दावीद इत्तयला म्हणाला, “पुढे जा, चालत राहा.” तेव्हा गित्ती इत्तय पुढे चालत गेला. त्याची सर्व माणसे व त्याचे घराणे त्याच्याबरोबर होते. \p \v 23 जेव्हा लोक देश पार करीत होते, तेव्हा सर्व देशवासी मोठ्याने रडू लागले. राजाने सुद्धा किद्रोनचे खोरे पार केली आणि सर्व लोक अरण्याच्या वाटेने पुढे गेले. \p \v 24 सादोक सुद्धा तिथे होता आणि सर्व लेवी लोक जे त्याच्याबरोबर होते ते परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेत होते. त्यांनी परमेश्वराचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोकांनी शहर सोडण्याचे पूर्ण होईपर्यंत अबीयाथारने यज्ञार्पणे केली. \p \v 25 नंतर दावीद राजाने सादोकाला म्हटले, “परमेश्वराचा कोश परत शहरात घेऊन जा. जर याहवेहच्या दृष्टीत मी कृपा पावलो असलो तर याहवेह मला परत आणतील यासाठी की मी कोश व याहवेहचे निवासस्थान पुन्हा पाहू शकेल. \v 26 परंतु जर याहवेहने म्हटले, ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मी तयार आहे; त्यांना जे बरे वाटते तसे याहवेह माझे करो.” \p \v 27 राजाने सादोक याजकाला आणखी पुढे म्हटले, “तुला कळते की नाही? माझ्या आशीर्वादासह नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमाज आणि अबीयाथारचा पुत्र योनाथान यांना सोबत घेऊन जा. तू आणि अबीयाथार तुमच्या दोन्ही पुत्रांसह परत जा. \v 28 मला कळविण्यासाठी तुझा संदेश येईपर्यंत मी रानाकडील मैदानात वाट पाहीन.” \v 29 त्याप्रमाणे सादोक व अबीयाथार यांनी परमेश्वराचा कोश परत यरुशलेमास नेला व ते तिथेच राहिले. \p \v 30 परंतु दावीद जैतुनाच्या डोंगराकडे रडत रडतच चालत चढत होता; त्याने आपले मस्तक झाकून घेतले होते व अनवाणी चालत होता. त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांनीसुद्धा आपले मस्तक झाकून ते रडत रडत वर चढले. \v 31 “अहीथोफेल अबशालोमबरोबर कट रचणाऱ्यांपैकी एक आहे” असे कोणी दावीदाला सांगितले, तेव्हा दावीदाने प्रार्थना केली, “हे याहवेह, अहीथोफेलचा सल्ला मूर्खपणा असे होऊ द्या.” \p \v 32 दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता. \v 33 दावीद त्याला म्हणाला, “तू जर माझ्याबरोबर आलास, तर तू मला भार मात्र होशील. \v 34 तर तू परत शहराकडे जा आणि अबशालोमास म्हण, ‘महाराज, मी आपला सेवक होईन; आधी मी तुमच्या पित्याचा सेवक होतो, परंतु आता मी तुमचा सेवक होईन,’ असे केल्यास अहीथोफेलचा सल्ला निष्फळ करून तू मला मदत करशील. \v 35 सादोक याजक व अबीयाथार हे तिथे तुझ्याबरोबर असणार नाहीत काय? तू जे काही राजाच्या राजवाड्यात ऐकशील ते जाऊन त्यांना सांग. \v 36 त्यांचे दोन पुत्र, सादोकचा पुत्र अहीमाज व अबीयाथारचा पुत्र योनाथान त्यांच्याबरोबर आहेत. जे काही तू ऐकशील ते मला सांगण्यास त्यांना माझ्याकडे पाठव.” \p \v 37 तेव्हा अबशालोम शहरात प्रवेश करीत असताना, दावीदाचा मित्र हूशाई यरुशलेमात पोहोचला. \c 16 \s1 दावीद आणि सीबा \p \v 1 जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता. \p \v 2 राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?” \p सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.” \p \v 3 तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?” \p सीबा त्याला म्हणाला, “तो यरुशलेमात राहत आहे, कारण त्याला असे वाटते, ‘इस्राएलचे लोक मला माझ्या आजोबांचे राज्य आज परत मिळवून देतील.’ ” \p \v 4 तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “मेफीबोशेथच्या मालकीचे जे सर्व आहे ते आता तुझे आहे.” \p सीबा म्हणाला, “मी विनम्र अभिवादन करतो, माझ्या स्वामीची माझ्यावर कृपादृष्टी असो.” \s1 शिमी दावीदाला शाप देतो \p \v 5 दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला. \v 6 त्याने दावीद व राजाच्या सर्व अधिकार्‍यांवर धोंडमार केली, सर्व सैन्यदल व विशेष अंगरक्षक दावीदाच्या उजव्या व डाव्या बाजूंना होते. \v 7 शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो! \v 8 ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!” \p \v 9 तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.” \p \v 10 परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?” \p \v 11 तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे. \v 12 मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.” \p \v 13 दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता. \v 14 राजा व त्याच्या बरोबरचे सर्व लोक थकलेले असे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि तिकडे त्याने विसावा घेतला. \s1 हूशाई आणि अहीथोफेल यांचा सल्ला \p \v 15 त्या दरम्यान अबशालोम व इस्राएलचे सर्व लोक यरुशलेमास आले आणि अहीथोफेल त्याच्याबरोबर होता. \v 16 तेव्हा दावीदाचा मित्र हूशाई अर्की अबशालोमकडे गेला व त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! राजा चिरायू होवो!” \p \v 17 अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?” \p \v 18 हूशाई अबशालोमला म्हणाला, “नाही, याहवेहने आणि या लोकांनी, आणि सर्व इस्राएलच्या लोकांनी ज्याला निवडले आहे; मी त्याचा आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार. \v 19 आणि मी कोणाची सेवा करावी? जशी मी आपल्या पित्याची सेवा केली तशीच मी त्यांच्या पुत्राची करू नये काय? म्हणून मी तुमची सेवा करणार.” \p \v 20 अबशालोम अहीथोफेलला म्हणाला, “आम्हाला तुझा सल्ला दे, आम्ही काय करावे?” \p \v 21 अहीथोफेलने अबशालोमास सल्ला दिला, “तुझ्या पित्याच्या उपपत्नी, ज्यांना तो राजवाड्याच्या देखरेखीसाठी सोडून गेला त्यांच्यापाशी जाऊन नीज. तेव्हा सर्व इस्राएलास समजेल की तू तुझ्या पित्याची किती घृणा करतो आणि तुझ्याबरोबर काम करीत असलेल्या प्रत्येकाचा हात बळकट होईल.” \v 22 तेव्हा त्यांनी अबशालोमसाठी छतावर एक तंबू उभारला आणि तो सर्व इस्राएलच्या लोकांच्या नजरेपुढे त्याच्या पित्याच्या उपपत्नींपाशी जाऊन निजला. \p \v 23 त्या दिवसांमध्ये अहीथोफेलने दिलेला कोणताही सल्ला जणू काय परमेश्वराकडे विचारल्याप्रमाणे होता. व त्याप्रमाणेच दावीद व अबशालोम त्याचा सल्ला मानीत असत. \c 17 \p \v 1 अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे. \v 2 जेव्हा तो थकलेला आणि दुर्बल असेल तेव्हा मी त्याच्यावर हल्ला करेन. मी त्याला भीतीचा धक्का देईन आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक पळून जातील. मी केवळ राजावरच वार करेन \v 3 आणि सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणेन. ज्या मनुष्याचे मरण तू इच्छितो, तो मेला म्हणजे सर्व लोक सुरक्षित परत येतील; कोणालाही हानी होणार नाही.” \v 4 अबशालोमला आणि इस्राएलच्या सर्व वडिलांना ही योजना चांगली वाटली. \p \v 5 परंतु अबशालोम म्हणाला, “हूशाई अर्कीलासुद्धा बोलावून घ्या, म्हणजे त्याचे म्हणणे काय आहे ते आम्ही पाहू.” \v 6 जेव्हा हूशाई त्याच्याकडे आला, तेव्हा अबशालोम म्हणाला, “अहीथोफेलने हा सल्ला दिला आहे. तो जे म्हणतो ते आपण करावे काय? नाहीतर तुझा सल्ला आम्हाला दे.” \p \v 7 हूशाईने अबशालोमला उत्तर दिले, “अहीथोफेलने जो सल्ला दिला आहे, तो यावेळेसाठी बरा नाही. \v 8 हूशाईने पुढे म्हटले, तुझे वडील आणि त्याची माणसे यांना तू चांगले ओळखतोस; ते योद्धे आहेत, रानटी अस्वलाची पिल्ले कोणी नेली तेव्हा ती कशी चवताळते त्यासारखे ते आहेत, तुझे वडील अनुभवी योद्धा आहेत; आणि तो सैन्याबरोबर रात्र घालविणार नाही. \v 9 यावेळेस सुद्धा ते गुहेत किंवा कुठे दुसर्‍या ठिकाणी लपले असतील. जर त्यांनी तुझ्या सैन्यावर प्रथम हल्ला केला, तर कोणीही त्याबद्दल ऐकून म्हणेल, ‘अबशालोमच्या मागे जाणार्‍यांचीच हत्या होत आहे.’ \v 10 तेव्हा सर्वात धैर्यशाली शिपाई, ज्याचे हृदय एखाद्या सिंहासारखे आहे तो भीतीने गळून जाईल, कारण सर्व इस्राएली लोकांना माहीत आहे की, तुझा पिता योद्धा आहे आणि त्याच्याबरोबर असणारे सर्व शूर आहेत. \p \v 11 “म्हणून मी तुला सल्ला देतो: दानपासून बेअर-शेबापर्यंत असलेल्या सर्व असंख्य इस्राएली लोकांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुझ्याकडे गोळा कर, आणि तू स्वतः युद्धाचे नेतृत्व कर. \v 12 मग तो सापडेल तिथे आपण त्याच्यावर हल्ला करू, आणि जसे जमिनीवर दव येऊन पडते तसे आपण त्याच्यावर पडू. मग तो किंवा त्याच्या माणसांपैकी कोणीही जिवंत सोडला जाणार नाहीत. \v 13 जर तो शहरात निघून गेला, तर सर्व इस्राएली लोक त्या शहराकडे दोऱ्या आणतील आणि तिथे एकही खडा राहणार नाही तोपर्यंत आम्ही ते खाली दरीत ओढून नेऊ.” \p \v 14 तेव्हा अबशालोम आणि सर्व इस्राएली लोक म्हणाले, “हूशाई अर्कीचा सल्ला अहीथोफेलच्या सल्ल्यापेक्षा अधिक बरा आहे.” कारण अबशालोमवर अरिष्ट आणावे म्हणून अहीथोफेलचा चांगला सल्ला विफल करण्याची याहवेहने योजना केली होती. \p \v 15 हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे. \v 16 आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ” \p \v 17 आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली गेली. \v 18 परंतु एका तरुण मनुष्याने त्यांना पाहिले आणि त्याने जाऊन अबशालोमला सांगितले. तेव्हा दोघेजण त्वरित बहूरीम येथे एका माणसाच्या घरी गेले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, तिच्यात ते उतरले. \v 19 त्याच्या पत्नीने विहिरीच्या तोंडावर एक झाकण टाकले व त्यावर धान्य पसरले. त्याबद्दल कोणालाही काहीही कळले नाही. \p \v 20 अबशालोमाच्या माणसांनी जेव्हा त्या बाईच्या घरी येऊन विचारपूस केली, “अहीमाज व योनाथान कुठे आहेत?” \p तिने उत्तर दिले, “ते ओढ्यापलीकडे गेले आहेत.”\f + \fr 17:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa मेंढवाड्याजवळून पाण्याकडे गेले.\fqa*\f* त्या माणसांनी शोध केला, पण त्यांना ते सापडले नाही. म्हणून ते यरुशलेमास परत गेले. \p \v 21 ते तिथून निघून गेल्यानंतर, दोघेजण विहिरीतून बाहेर आले आणि दावीद राजाला जाऊन सांगितले, ते त्याला म्हणाले, “लवकर निघा आणि नदी पार करा; अहीथोफेलने तुमच्याविरुद्ध अमुक सल्ला दिला आहे.” \v 22 तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांनी यार्देन नदी पार केली. दिवस उजाडेपर्यंत यार्देन पार केली नाही असा कोणीही मागे राहिला नाही. \p \v 23 इकडे अबशालोमने आपल्या सल्ल्यानुसार केले नाही असे अहीथोफेलने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या जन्मगावी, आपल्या घराकडे निघून गेला. त्याने आपले घर नीटनेटके करून फाशी घेतली. तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पित्याच्या कबरेत पुरले. \s1 अबशालोमचा मृत्यू \p \v 24 नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला. \v 25 अबशालोमने योआबाच्या जागी अमासाची सेनापती म्हणून नेमणूक केली. अमासा हा इथ्रा\f + \fr 17:25 \fr*\fqa येथेरचे वेगळे रूप\fqa*\f* इश्माएली\f + \fr 17:25 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa इस्राएली\fqa*\f* याचा पुत्र असून, नाहाशाची कन्या, जेरुइयाहची बहीण योआबाची आई अबीगईल हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. \v 26 अबशालोम व इस्राएली सैन्याने गिलआद देशात तळ दिला. \p \v 27 दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी \v 28 दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी, \v 29 मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.” \c 18 \p \v 1 दावीदाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना एकत्र करून त्यांची मोजणी केली आणि त्यांच्या हजारांवर सेनापती आणि शंभरांवर सेनापती नेमले. \v 2 दावीदाने एकतृतीयांश लोक योआबाच्या हाताखाली, एकतृतीयांश सैन्य योआबाचा भाऊ, जेरुइयाहचा पुत्र अबीशाईच्या हाताखाली आणि एकतृतीयांश इत्तय गित्तीच्या हाताखाली असे आपले सैन्य पाठवले. राजाने सैन्यास सांगितले, “मी स्वतः अवश्य तुम्हाबरोबर चालत जाईन.” \p \v 3 परंतु लोकांनी म्हटले, “तुम्ही बाहेर जाऊ नये; जर आम्हाला पळून जावे लागले, तरी त्यांना आमचे काही वाटणार नाही. जरी आमच्यातील अर्धे लोक मरण पावले, त्याचीही त्यांना काळजी वाटणार नाही; परंतु तुमचे मोल आमच्यातील दहा हजारांप्रमाणे आहे. तुम्ही आम्हाला शहरात राहूनच पाठिंबा दिला तर ते उत्तम होईल.” \p \v 4 राजाने उत्तर दिले, “तुम्हाला जे योग्य वाटते तेच मी करेन.” \p म्हणून राजा वेशीजवळ उभे राहिला आणि त्यांचे सर्व सैनिक शंभराच्या व हजारांच्या टोळीने बाहेर पडले. \v 5 राजाने योआब, अबीशाई व इत्तय यांना आज्ञा दिली, “माझ्यासाठी त्या तरुण अबशालोमशी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमविषयी प्रत्येक सेनापतीला दिलेली ही आज्ञा सर्व सैनिकांनी ऐकली. \p \v 6 दावीदाचे सैनिक इस्राएलशी युद्ध करण्यास शहराच्या बाहेर पडले आणि एफ्राईमच्या जंगलात युद्धास सुरुवात झाली. \v 7 दावीदाच्या सैन्यापुढे इस्राएली सैन्याचा मोड झाला आणि त्या दिवशी वीस हजार लोक मरण पावले. \v 8 संपूर्ण देशभर युद्ध पसरले, त्या दिवशी तलवारीपेक्षा घनदाट जंगलामुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला. \p \v 9 यावेळी अचानक अबशालोमची दावीदाच्या माणसांशी गाठ पडली. तो त्याच्या खेचरावर बसून जात असता, खेचर एका मोठ्या एला झाडाच्या दाट फांद्यांखालून गेले आणि अबशालोमचे केस त्यात अडकले. तो हवेत लटकत राहिला आणि त्याचे खेचर ज्यावर तो बसला होता ते पुढे चालत राहिले. \p \v 10 जेव्हा दावीदाच्या एका मनुष्याने जे झाले ते पाहिले व त्याने ते योआबाला सांगितले, “अबशालोमला एलाच्या झाडाला लटकत असलेले मी पाहिले.” \p \v 11 ज्या मनुष्याने त्याला हे सांगितले, त्याला योआब म्हणाला, “काय! तू त्याला पाहिले? तू त्याला तिथेच मारून जमिनीवर का पाडले नाही? मी तुला चांदीची दहा शेकेल\f + \fr 18:11 \fr*\ft अंदाजे 115 ग्रॅ.\ft*\f* आणि योद्ध्याचा कंबरपट्टा दिला असता.” \p \v 12 पण त्या मनुष्याने योआबाला उत्तर दिले, “जरी माझ्या हातावर चांदीची हजार शेकेल\f + \fr 18:12 \fr*\ft अंदाजे 12 कि.ग्रॅ.\ft*\f* वजन करून ठेवली, तरी मी राजपुत्रावर हात टाकणार नाही. कारण राजाने तुला, अबीशाईला व इत्तयला आज्ञा देताना आम्ही असे ऐकले की, ‘माझ्यासाठी तरुण अबशालोमचे रक्षण करा.’ \v 13 आणि असे करून जरी मी माझा जीव धोक्यात घातला असता; तरी राजापासून काही गुप्त राहत नाही; आणि तू सुद्धा माझ्यापासून दूर राहिला असता.” \p \v 14 योआब म्हणाला, “मी असा तुझ्यासाठी थांबणार नाही.” असे म्हणत त्याने आपल्या हाती तीन भाले घेतले आणि अबशालोम एलाच्या झाडाला अजूनही जिवंत असा लटकलेला असताना त्याने त्याच्या छातीत ते भोसकले. \v 15 त्यानंतर योआबाचे दहा शस्त्रवाहक अबशालोमच्या सभोवती जमले, त्याच्यावर वार केला आणि त्याला मारून टाकले. \p \v 16 नंतर योआबाने रणशिंग फुंकले, तेव्हा सैनिकांनी इस्राएलचा पाठलाग करण्याचे थांबविले, कारण योआबाने त्यांना थांबविले. \v 17 त्यांनी अबशालोमला घेऊन, जंगलात एका खड्ड्यात फेकून टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली, त्या दरम्यान सर्व इस्राएली लोक आपआपल्या घरी पळून गेले. \p \v 18 अबशालोमने आपल्या कारकिर्दीत राजाच्या खोर्‍यात स्वतःच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारला. कारण तो स्वतःशी म्हणाला, “माझे नाव पुढे चालविण्यासाठी मला पुत्र नाही.” म्हणून त्याने त्या स्तंभाला अबशालोमचे स्मारक असे नाव दिले होते. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते. \s1 दावीद शोक करतो \p \v 19 तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.” \p \v 20 पण योआब त्याला म्हणाला, “तू आज ही बातमी घेऊन जाणार नाहीस, तू ही बातमी दुसर्‍या एखाद्या दिवशी घेऊन जा, परंतु आज ती तू नेऊ नये, कारण राजाचा पुत्र मेला आहे.” \p \v 21 नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला. \p \v 22 सादोकाचा पुत्र अहीमाज योआबाला म्हणाला, “जे होईल ते होवो, मला कूशी मनुष्याच्या मागे धावू दे.” \p योआबाने उत्तर दिले, “माझ्या मुला, तुला का जायचे आहे? तुला बक्षीस मिळवून देईल अशी बातमी तुझ्याजवळ नाही.” \p \v 23 तो म्हणाला, “जे होईल ते होवो, मला धावायचे आहे,” \p तेव्हा योआब म्हणाला, “धाव!” तेव्हा अहीमाज मैदानाच्या\f + \fr 18:23 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa यार्देनेचे मैदान\fqa*\f* मार्गाने धावू लागला आणि कूशी माणसाच्या पुढे गेला. \p \v 24 दावीद शहराच्या आतील व बाहेरील वेशीच्या मध्ये बसलेला असता. पहारेकरी भिंतीवरून वेशीच्या छपरावर चढून गेला, तेव्हा त्याने पाहिले की एक मनुष्य एकटाच धावत येत आहे. \v 25 पहारेकर्‍याने राजाला आवाज देऊन ते सांगितले. \p राजाने म्हटले, “जर तो एकटाच आहे म्हणजे त्याच्याकडे चांगली बातमी असणार.” तो मनुष्य धावत जवळ जवळ येत होता. \p \v 26 तेव्हा पहारेकर्‍याने अजून एक मनुष्य धावत येताना पाहिला आणि त्याने द्वारपालाला आवाज दिला, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.” \p राजाने म्हटले, “तो देखील चांगली बातमी आणत असणार.” \p \v 27 पहारेकरी म्हणाला, “पहिला मनुष्य सादोकाचा पुत्र अहीमाज, याच्यासारखा धावत आहे असे मला वाटते,” \p राजाने म्हटले, “तो चांगला मनुष्य आहे. तो चांगलीच बातमी घेऊन येत असणार.” \p \v 28 तेव्हा अहीमाजने राजाला आवाज देत म्हटले, “सर्वकाही ठीक आहे!” त्याने आपले मुख जमिनीपर्यंत खाली लववून म्हटले, “याहवेह, आपला परमेश्वर धन्यवादित असो! माझ्या धनीराजाविरुद्ध हात उचलणार्‍यांना याहवेहने आपल्या हाती घेतले आहे.” \p \v 29 राजाने विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे काय?” \p अहीमाज म्हणाला, “योआब जेव्हा राजाचा सेवक व आपला सेवक म्हणजेच मला पाठवित होता त्यावेळी फार गोंधळ मी पाहिला, परंतु ते काय होते ते मला कळले नाही.” \p \v 30 राजाने म्हटले, “येथे बाजूला वाट पाहत उभा राहा,” तेव्हा तो बाजूला सरकून उभा राहिला. \p \v 31 नंतर कूशी मनुष्य येऊन पोहोचला आणि म्हणाला, “माझे राजा, माझे स्वामी, चांगली बातमी ऐका! आपल्याविरुद्ध उठलेल्या लोकांच्या हातातून याहवेहने तुम्हाला सोडवून तुमची सुटका केली आहे.” \p \v 32 राजाने कूशी मनुष्याला विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे का?” \p त्या कूशी मनुष्याने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाला जे सर्व इजा करण्यास आपणाविरुद्ध उठतात त्या आपल्या सर्व शत्रूंचे त्या तरुणाप्रमाणेच होवो.” \p \v 33 तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!” \c 19 \p \v 1 “अबशालोमसाठी राजा रडत आहे आणि शोक करीत आहे हे योआबाला सांगण्यात आले.” \v 2 आणि त्या दिवशी संपूर्ण सैन्याचा विजय, शोकात बदलला, कारण त्या दिवशी त्या सैन्याने ऐकले, “राजा आपल्या पुत्रासाठी शोक करीत आहे.” \v 3 युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली. \v 4 तेव्हा राजाने आपला चेहरा झाकला आणि मोठ्याने रडला, “हे माझ्या पुत्रा, अबशालोमा! हे अबशालोमा माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!” \p \v 5 नंतर योआब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला, “आज तुम्ही तुमच्या सर्व सैन्याला अपमानित केले आहे, ज्यांनी तुमचा जीव वाचविला आणि तुमची मुले, मुली, तुमच्या पत्नी व उपपत्नींना वाचविले आहेत. \v 6 तुमचा द्वेष करणार्‍यांवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर प्रेम करणार्‍यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही हे स्पष्ट केले आहे की, सेनापती आणि त्यांची माणसे यांचे तुम्हाला काही वाटत नाही. मला तर असे वाटते की आज जर आम्ही सर्व मेलो असतो आणि अबशालोम जिवंत असता तर तुम्हाला आनंद झाला असता. \v 7 तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.” \p \v 8 तेव्हा राजा उठला आणि शहराच्या वेशीकडे आपल्या स्थानी जाऊन बसला. जेव्हा माणसांना सांगण्यात आले, “राजा वेशीकडे बसला आहे,” तेव्हा ते सर्वजण त्याच्यासमोर आले. \p या दरम्यान इस्राएली लोक त्यांच्या घरांकडे पळून गेले. \s1 दावीद यरुशलेमास परत येतो \p \v 9 इस्राएलच्या सर्व गोत्रातील लोकांचा आपसात वाद चालू होता, ते म्हणत होते, “राजाने आम्हाला आमच्या शत्रूच्या हातातून सोडविले आहे; तोच आहे ज्याने पलिष्ट्यांच्या हातातून आमची सुटका केली. परंतु आता अबशालोममुळे तो देशातून पळून गेला आहे; \v 10 आणि अबशालोम ज्याला आम्ही आमच्यावर राज्य करण्यासाठी अभिषेक केला, तो युद्धात मारला गेला आहे. तेव्हा राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काहीच का बोलत नाही?” \p \v 11 दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात? \v 12 तुम्ही माझे नातेवाईक आहात, माझ्या हाडामांसाचे आहात. तेव्हा राजाला परत आणण्यास तुम्ही मागे का असावे?’ \v 13 आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ” \p \v 14 अशाप्रकारे दावीदाने यहूदाह गोत्राच्या लोकांची मने जिंकून त्यांना एकमत केले. त्यांनी राजाकडे निरोप पाठवला, “तुम्ही आणि तुमची सर्व माणसे, परत या.” \v 15 नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला. \p यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले. \v 16 यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला. \v 17 त्याच्याबरोबर बिन्यामीन कुळातील एक हजार माणसे होती, त्याचप्रमाणे शौलाच्या घराचा कारभारी सीबा आणि त्याचे पंधरा पुत्र आणि वीस सेवक हे त्याच्याबरोबर होते. यार्देनेकडे जिथे राजा होता तिथे ते घाईने गेले. \v 18 राजाच्या घराण्याला घेण्यासाठी आणि राजाला हवे त्याप्रमाणे करण्यास, ते नदीचे पात्र पार करून आले. \p जेव्हा गेराचा पुत्र शिमी यार्देन पार करून आला, तेव्हा तो राजासमोर उपडा पडला. \v 19 आणि तो राजाला म्हणाला, “माझ्या स्वामीने माझा दोष मोजू नये. माझ्या स्वामीने ज्या दिवशी यरुशलेम सोडले, तेव्हा आपल्या दासाने केलेल्या वाईट कृत्याचे आपण स्मरण करू नये. राजाने ते आपल्या मनातून काढून टाकावे. \v 20 कारण आपल्या सेवकाला (म्हणजे मला) माहीत आहे की, मी पाप केले आहे, परंतु आज योसेफाच्या गोत्रातील मी पहिलाच माझ्या स्वामीस भेटावयास आलो आहे.” \p \v 21 तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?” \p \v 22 तेव्हा दावीद म्हणाला, “जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला त्याचे काय? तुम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार कोणी दिला? इस्राएलमध्ये आज कोणाचा मृत्यू व्हावा काय? आज मी इस्राएलचा राजा आहे हे मला समजत नाही काय?” \v 23 तेव्हा राजाने शिमीला म्हटले, “तू मरणार नाहीस.” आणि राजाने त्याला शपथ घेऊन अभिवचन दिले. \p \v 24 शौलाचा नातू, मेफीबोशेथ सुद्धा राजाला भेटण्यास गेला. राजा यरुशलेम सोडून गेल्यापासून सुरक्षित परत येईपर्यंत त्याने आपल्या पायांची काळजी घेतली नव्हती, किंवा दाढी केली नव्हती किंवा कपडे धुतले नव्हते. \v 25 जेव्हा तो यरुशलेमातून राजाला भेटायला आला, त्याला राजाने विचारले, “मेफीबोशेथ, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?” \p \v 26 तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी आपला सेवक अपंग आहे, मी म्हणालो, ‘मी माझ्या गाढवावर खोगीर घालून त्यावर बसून माझ्या राजाबरोबर जाईन.’ परंतु माझा सेवक सीबा याने मला फसविले. \v 27 परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे. \v 28 माझ्या आजोबांचे सर्व वारसदार माझ्या स्वामीकडून मरणास पात्र होते, परंतु आपण आपल्या सेवकाला आपल्या मेजावर बसणार्‍यांसह पंक्तीस बसविले. त्यामुळे राजासमोर आणखी काही विनंती करण्याचा मला काय अधिकार आहे?” \p \v 29 राजाने त्याला म्हटले, “आणखी काही का बोलावे? माझी आज्ञा आहे की तू व सीबाने जमीन वाटून घ्यावी.” \p \v 30 मेफीबोशेथ राजाला म्हणाला, “ती सर्व जमीन सीबालाच देऊन टाका, आता माझे स्वामी सुखरुप आले आहे.” \p \v 31 बारजिल्लई गिलआदी हा सुद्धा रोगलीम येथून दावीद राजाबरोबर यार्देन पार करून देण्यास आणि तिथून त्यांना त्यांच्या मार्गी लावण्यास आला होता. \v 32 बारजिल्लई फार उतार वयाचा झाला होता, तो ऐंशी वर्षाचा होता. महनाईम येथे असताना त्याने राजाला सामुग्री पुरविली होती, कारण तो फार धनवान मनुष्य होता. \v 33 राजाने बारजिल्लईस म्हटले, “माझ्याबरोबर पार चल आणि यरुशलेममध्ये माझ्याजवळ राहा आणि मी तुझे पालनपोषण करेन.” \p \v 34 पण बारजिल्लईने राजाला उत्तर दिले, “मी अजून किती वर्षे जगणार, की मी राजाबरोबर यरुशलेमास जावे? \v 35 मी ऐंशी वर्षाचा आहे. कोणत्या गोष्टी मला आनंद देतील आणि कोणत्या नाही यातील फरक मला सांगता येईल काय? आपला सेवक जे काही खातो किंवा पितो याची चव तरी त्याला कळते काय? गाणारे पुरुष किंवा स्त्रियांचा आवाज मला अजूनही ऐकायला येतो काय? माझ्या स्वामीला त्यांचा सेवक एक ओझे म्हणून का असावा? \v 36 आपला सेवक काही अंतरापर्यंत आपणाबरोबर यार्देन नदी पार करेल, पण राजाने मला त्याचा मोबदला याप्रकारे का द्यावा? \v 37 आपल्या सेवकाला परत जाऊ द्या, की मी माझ्या नगरात, माझ्या पित्याच्या व आईच्या कबरेजवळ पुरला जाईन. परंतु आपला सेवक किमहाम येथे आहे. त्याला माझ्या स्वामीबरोबर पार जाऊ द्यावे, व आपणास जे योग्य वाटेल ते आपण त्याचे करावे.” \p \v 38 राजाने म्हटले, “किमहाम माझ्याबरोबर पार जाईल आणि तुझ्या इच्छेनुसार मी त्याचे करेन. आणि जे मी तुला करावे असे तुला वाटते ते मी तुझ्यासाठी करेन.” \p \v 39 तेव्हा सर्व लोकांनी यार्देन पार केली आणि मग राजाने पार केली. राजाने बारजिल्लईचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिला आणि बारजिल्लई आपल्या घरी परत गेला. \p \v 40 जेव्हा राजा यार्देन पार करून गिलगालकडे गेला, किमहाम सुद्धा त्यांच्याबरोबर गेला. यहूदाहचे सर्व सैन्य आणि इस्राएलच्या अर्ध्या सैन्यांनी दावीदाला पार नेले. \p \v 41 लवकरच सर्व इस्राएली लोक दावीद राजाकडे येऊन त्यांना म्हणू लागले, “आमचे भाऊबंद, यहूदीयाचे लोक यांनी राजाला का चोरून नेले आणि त्यांना व त्यांच्या घराण्याला, त्यांच्या सैन्यासह यार्देन पार करून नेले?” \p \v 42 यहूदीयाच्या सर्व लोकांनी इस्राएली लोकांना उत्तर दिले, “आम्ही असे केले, कारण राजा आमचा जवळचा नातेवाईक आहे. तुम्हाला त्याविषयी का राग यावा? राजाच्या सामुग्रीतील आम्ही काही खाल्ले आहे काय? आमच्यासाठी आम्ही काही घेतले आहे काय?” \p \v 43 यावर इस्राएली लोकांनी यहूदीयाच्या लोकांना उत्तर दिले, “राजामध्ये आम्हाला दहा हिस्से आहेत; म्हणून दावीदावर तुमच्यापेक्षा आमचा हक्क मोठा आहे. मग तुम्ही आम्हाला का तुच्छ लेखता? आमच्या राजाला परत आणण्याविषयी प्रथम आम्ही बोलणे केले नाही काय?” \p परंतु यहूदीयाच्या माणसांनी इस्राएलच्या लोकांपेक्षा अधिक जोराने दावा केला. \c 20 \s1 दावीदाविरुद्ध शबाचे बंड \p \v 1 बिन्यामीन गोत्रातील बिकरीचा पुत्र शबा जो फार त्रासदायक होता, तो तिथे आला. त्याने रणशिंग फुंकले आणि ओरडून म्हणाला, \q1 “आम्हाला दावीदाबरोबर वाटा नाही, \q2 इशायच्या पुत्रामध्ये काही भाग नाही! \q1 इस्राएलातील प्रत्येकाने आपल्या तंबूत जावे!” \p \v 2 तेव्हा बिकरीचा पुत्र शबाच्या मागे जाण्यासाठी इस्राएलच्या सर्व पुरुषांनी दावीदाला सोडून दिले. परंतु यार्देनपासून यरुशलेमपर्यंतचे यहूदाह गोत्राचे लोक त्यांच्या राजाबरोबर राहिले. \p \v 3 दावीद जेव्हा यरुशलेमात त्याच्या राजवाड्यात परतला, तेव्हा त्याने राजवाड्याची व्यवस्था पाहण्यासाठी मागे ठेवलेल्या त्याच्या दहा उपपत्नींना घेऊन एका घरात देखरेखीत ठेवले आणि त्यांना सामुग्री पुरविली परंतु त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाही. त्यांच्या मरणाच्या दिवसापर्यंत, विधवांप्रमाणे बंदिवासात ठेवले. \p \v 4 नंतर राजाने अमासाला म्हटले, “तीन दिवसात यहूदीयाच्या लोकांना माझ्याकडे जमा कर आणि तू स्वतः देखील हजर हो.” \v 5 परंतु जेव्हा अमासा यहूदीयाच्या लोकांना जमा करण्यास गेला, तेव्हा राजाने त्याला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्याने घेतला. \p \v 6 तेव्हा दावीदाने अबीशाईला म्हटले, “अबशालोमाने केलेल्या हानीपेक्षा बिकरीचा पुत्र शबा आपल्याला अधिक नुकसान करेल. तू तुझ्या स्वामीच्या माणसांना घे आणि त्याचा पाठलाग कर, नाहीतर त्याला तटबंदीची शहरे सापडतील आणि तो आपल्यापासून निसटून जाईल.”\f + \fr 20:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa आम्हाला गंभीररित्या जखमी करतात\fqa*\f* \v 7 मग योआबाची माणसे आणि करेथी व पेलेथी आणि सर्व शूर योद्धे अबीशाईच्या नेतृत्वाखाली बाहेर निघाले. बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमातून बाहेर पडले. \p \v 8 ते गिबोनातील मोठ्या खडकाजवळ आले, तेव्हा अमासा त्यांना भेटण्यास आला. योआबाने त्याचा लष्करी अंगरखा घातला होता आणि वरून कंबरपट्टा व म्यानात खंजीर होता. जसा तो पुढे गेला, त्याच्या म्यानातून खंजीर बाहेर पडला. \p \v 9 योआब अमासाला अभिवादन करीत म्हणाला, “माझ्या भावा तू कसा आहेस?” असे म्हणत त्याने अमासाची दाढी उजव्या हाताने पकडून त्याचे चुंबन घेतले. \v 10 अमासा योआबाच्या हातातील खंजिराविषयी सावध नव्हता आणि योआबाने तो त्याच्या पोटात खुपसला आणि त्याच्या आतड्या जमिनीवर पडल्या. पुन्हा वार न करताच अमास मरण पावला. नंतर योआब आणि त्याचा भाऊ अबीशाई यांनी बिकरीचा पुत्र शबाचा पाठलाग केला. \p \v 11 तेव्हा योआबाच्या पुरुषांपैकी एकजण अमासाच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला, “जो कोणी योआबाचे समर्थन करतो आणि जो कोणी दावीदाच्या बाजूने आहे, त्याने योआबाच्या मागे यावे!” \v 12 अमासा भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात लोळत होता आणि त्या मनुष्याने पाहिले की, सर्व सैन्य स्तब्ध उभे होते. जेव्हा त्याला समजले की, प्रत्येकजण अमासापर्यंत येऊन थांबत होते, तेव्हा त्याने त्याला रस्त्यावरून ओढून शेतात नेले आणि त्याच्यावर एक वस्त्र टाकले. \v 13 अमासाला रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर, सर्वजण योआबाबरोबर बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी निघाले. \p \v 14 शबा इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून आबेल बेथ-माकाहपर्यंत व बेर्‍याच्या\f + \fr 20:14 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa बिकर्यांच्या\fqa*\f* प्रदेशातून गेला आणि ते एकत्र येऊन त्याच्यामागे गेले. \v 15 योआबाबरोबरच्या सर्व सैन्याने येऊन शबाला आबेल-बेथ-माकाह येथे वेढा दिला. त्यांनी शहरापर्यंत जोडणार्‍या उतरणीपर्यंत मोर्चा लावला आणि तो बाहेरील तटबंदीच्या समोर होता. तट पाडण्यासाठी ते त्यावर वार करीत होते, \v 16 नगरातून एका शहाण्या स्त्रीने आवाज दिला, “ऐका! ऐका! योआबाला इकडे येण्यास सांगा म्हणजे मी त्याच्याशी बोलेन.” \v 17 तेव्हा तो तिच्याकडे गेला, आणि तिने विचारले, “तू योआब आहेस काय?” \p तो उत्तरला, “होय, मीच आहे.” \p ती म्हणाली, “तुझ्या दासीला जे सांगायचे आहे ते ऐक.” \p “मी ऐकत आहे,” तो म्हणाला. \p \v 18 ती पुढे म्हणाली, “प्राचीन काळी असे म्हटले जात असे की, ‘आबेलातून सल्ला घ्यावा,’ आणि समस्या पूर्णपणे सोडविली जात असे. \v 19 आम्ही शांतताप्रिय आणि इस्राएलचे विश्वासू लोक आहोत. तुम्ही इस्राएलातील मातृनगराचा नाश करण्याचा प्रयत्न का करीत आहात? याहवेहच्या वतनाचा तुम्ही का नाश करावा?” \p \v 20 यावर योआबाने उत्तर दिले, “मी त्याचा नाश किंवा त्याचा विध्वंस करावा हे माझ्यापासून अगदी दूर असो. \v 21 पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” \p ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.” \p \v 22 ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर छेदून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला. \s1 दावीदाचे अधिकारी \li1 \v 23 योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; \li1 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता; \li1 \v 24 अदोनिराम\f + \fr 20:24 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अदोराम\fqa*\f* वेठबिगारी करणार्‍यांचा अधिकारी होता; \li1 आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता; \li1 \v 25 शेवा सचिव होता; \li1 सादोक व अबीयाथार याजक होते; \li1 \v 26 आणि याईरचा\f + \fr 20:26 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa इथ्री\fqa*\f* वंशज ईरा दावीदाचा याजक होता. \c 21 \s1 गिबियोनी लोकांचा सूड \p \v 1 दावीदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता; म्हणून दावीद याहवेहसमोर गेला. याहवेह म्हणाले, “हे शौल आणि त्याच्या रक्तदोषी घराण्यामुळे आहे; कारण त्याने गिबोनी लोकांना मारले होते.” \p \v 2 तेव्हा राजाने गिबोनी लोकांस बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले. (गिबोनी लोक इस्राएलचा भाग नव्हते, परंतु अमोरी लोकांतून उरलेले लोक होते; त्यांना जिवंत ठेवावे अशी इस्राएली लोकांनी शपथ घेतली होती, परंतु इस्राएल आणि यहूदाह यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या आवेशामुळे शौलाने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.) \v 3 दावीदाने गिबोनी लोकांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे? कशाप्रकारे मी प्रायश्चित करावे की तुम्ही याहवेहच्या वतनाला आशीर्वाद द्याल?” \p \v 4 गिबोनी लोकांनी राजाला उत्तर दिले, “शौल आणि त्याच्या घराण्याकडून आम्ही चांदी किंवा सोन्याची मागणी करावी असा अधिकार आम्हाला नाही, किंवा इस्राएलातील कोणालाही जिवे मारण्याचा अधिकार आम्हाला नाही.” \p दावीदाने विचारले, “मग तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” \p \v 5 त्यांनी राजाला उत्तर दिले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला आणि आमची संख्या कमी व्हावी आणि इस्राएलमध्ये कुठेही आम्हाला स्थान नसावे म्हणून आमच्याविरुद्ध योजना केली, \v 6 तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” \p तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.” \p \v 7 शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली. \v 8 परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल\f + \fr 21:8 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa मेरब\fqa*\f* हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लई याचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले. \v 9 त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती. \p \v 10 तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही. \v 11 अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले, \v 12 दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.) \v 13 तेव्हा दावीदाने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी तिथून आणल्या आणि ज्यांना मारून टाकून डोंगरावर प्रदर्शित केले होते त्यांच्या अस्थी सुद्धा गोळा केल्या. \p \v 14 त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले. \s1 पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध \p \v 15 पुन्हा एकदा पलिष्टी आणि इस्राएल यांच्यामध्ये युद्ध झाले. दावीद आपल्या सैन्याला घेऊन पलिष्ट्यांशी लढण्यास गेला आणि तो थकून गेला. \v 16 इशबी-बेनोब नावाचा राफाह वंशातील एक पुरुष, ज्याचा कास्याचा भाला तीनशे शेकेल\f + \fr 21:16 \fr*\ft अंदाजे 3.5 कि.ग्रॅ.\ft*\f* वजनाचा होता आणि तो नवीन तलवार घेऊन सज्ज होत म्हणाला, की तो दावीदाला जिवे मारेल. \v 17 परंतु जेरुइयाहचा पुत्र अबीशाई दावीदाचा बचाव करण्यासाठी आला; त्याने त्या पलिष्ट्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले. तेव्हा दावीदाच्या लोकांनी दावीदाला शपथ घेत सांगितले, “येथून पुढे पुन्हा आपण आमच्याबरोबर युद्धासाठी येणार नाही, म्हणजे इस्राएलचा दिवा विझणार नाही.” \p \v 18 कालांतराने पलिष्ट्यांबरोबर गोब येथे पुन्हा दुसरे युद्ध झाले. त्यावेळेस हुशाथी सिब्बखय याने राफाह वंशातील साफ याला ठार मारले. \p \v 19 गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा\f + \fr 21:19 \fr*\ft इब्री \ft*\fqa यारे-ओरेगीम\fqa*\f* पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्‍याच्या काठीसारखी होती. \p \v 20 आणखी दुसर्‍या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. \v 21 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले. \p \v 22 हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले. \c 22 \s1 दावीदाचे स्तुतिगान \p \v 1 जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. \v 2 तो म्हणाला: \q1 “याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे आहेत; \q2 \v 3 माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, \q2 तेच माझी ढाल\f + \fr 22:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa सार्वभौम\fqa*\f* आणि माझ्या तारणाचे शिंग आहे. \q1 ते माझे गड, माझे शरणस्थान आणि माझे तारणारा आहे; \q2 हिंसक लोकांपासून याहवेह, तुम्ही मला वाचवितात. \b \q1 \v 4 “स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, \q2 आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली. \q1 \v 5 मृत्यूच्या लाटांनी मला घेरले; \q2 नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले. \q1 \v 6 मृतलोकाच्या दोर्‍यांनी मला सभोवती घेरले; \q2 मृत्यूचे भय मला सामोरे आले, \b \q1 \v 7 “मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; \q2 मी माझ्या परमेश्वराचा धावा केला. \q1 आणि त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; \q2 माझा धावा त्यांच्या कानी पडला. \q1 \v 8 तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, \q2 आकाशाचे\f + \fr 22:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa डोंगरांचे\fqa*\f* पाये हादरले; \q2 याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले. \q1 \v 9 त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; \q2 भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, \q2 जळते निखारे त्यातून निघाले. \q1 \v 10 आकाशाला विभागून याहवेह खाली आले; \q2 घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते. \q1 \v 11 करुबावर आरूढ होऊन ते उडून गेले; \q2 वार्‍याच्या पंखांवर त्यांनी भरारी\f + \fr 22:11 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa सामोरे आले\fqa*\f* मारली. \q1 \v 12 अंधकार, व आकाशातील काळे मेघ; \q2 यांचा त्यांनी आपल्या सभोवती मंडप केला आहे. \q1 \v 13 त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून \q2 विजा\f + \fr 22:13 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa धगधगते निखारे पेटले\fqa*\f* लखलखल्या. \q1 \v 14 याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; \q2 परात्पराच्या वाणीचा नाद झाला. \q1 \v 15 त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, \q2 मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले. \q1 \v 16 याहवेहच्या धमकीने \q2 त्यांच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने \q1 समुद्राचे तळ उघडकीस आले \q2 आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले. \b \q1 \v 17 “वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; \q2 खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले. \q1 \v 18 माझ्या बलवान शत्रूपासून \q2 माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले. \q1 \v 19 माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, \q2 परंतु याहवेह माझे आधार होते. \q1 \v 20 त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले; \q2 त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता. \b \q1 \v 21 “याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; \q2 माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे. \q1 \v 22 कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; \q2 माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही. \q1 \v 23 त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; \q2 मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही. \q1 \v 24 मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे \q2 आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे. \q1 \v 25 याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, \q2 त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे. \b \q1 \v 26 “विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, \q2 व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता, \q1 \v 27 शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, \q2 परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता. \q1 \v 28 नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, \q2 परंतु उन्मत्त लोकांवर नजर ठेवून तुम्ही त्यांचा अधःपात करतात. \q1 \v 29 हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात; \q2 याहवेह माझ्या अंधाराचा प्रकाश करतात. \q1 \v 30 तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो\f + \fr 22:30 \fr*\ft किंवा \ft*\fqa अडथळ्यातून जाऊ शकतो\fqa*\f*; \q2 माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो. \b \q1 \v 31 “परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. \q2 याहवेहचे वचन दोषरहित आहे; \q2 जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत. \q1 \v 32 याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? \q2 आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे? \q1 \v 33 परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात\f + \fr 22:33 \fr*\ft काही हस्तलिखितांमध्ये \ft*\fqa परमेश्वरच माझा दृढ आश्रय आहे\fqa*\f*, \q2 आणि माझे मार्ग सरळ ठेवतात. \q1 \v 34 तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात; \q2 कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात. \q1 \v 35 ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; \q2 माझे हात कास्य धनुष्य वाकवितात. \q1 \v 36 माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे; \q2 तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे. \q1 \v 37 माझी पावले घसरू नयेत, \q2 म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही विस्तृत मार्ग केला आहे. \b \q1 \v 38 “मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला; \q2 त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही. \q1 \v 39 मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही; \q2 ते माझ्या पायाखाली पडले. \q1 \v 40 तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; \q2 माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले. \q1 \v 41 तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, \q2 आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला. \q1 \v 42 त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; \q2 त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. \q1 \v 43 पृथ्वीच्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; \q2 रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना मी कुटून आणि तुडवून टाकले. \b \q1 \v 44 “लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; \q2 राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला राखून ठेवले. \q1 ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात, \q2 \v 45 परदेशी माझ्यासमोर भीतीने वाकतात; \q2 माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात. \q1 \v 46 त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, \q2 ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात. \b \q1 \v 47 “याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! \q2 माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत! \q1 \v 48 परमेश्वरच आहे जे माझ्यासाठी सूड घेतात, \q2 ते राष्ट्रांना माझ्या अधीन आणतात, \q2 \v 49 ते मला माझ्या वैर्‍यांपासून मुक्त करतात. \q1 तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे; \q2 हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले. \q1 \v 50 म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; \q2 मी तुमच्या नावाची स्तुती गाईन. \b \q1 \v 51 “ते आपल्या राजाला महान विजय\f + \fr 22:51 \fr*\fq महान विजय \fq*\ft किंवा \ft*\fqa तारणाचा बुरूज\fqa*\f* देतात; \q2 ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर \q2 आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा कृपा करतात.” \c 23 \s1 दावीदाचे शेवटचे शब्द \p \v 1 दावीदाचे शेवटचे शब्द हे आहेत: \q1 “इशायाचा पुत्र दावीदाचे प्रेरित शब्द, \q2 परात्पराने ज्याला उंच केले त्याचे हे शब्द, \q1 याकोबाच्या परमेश्वराद्वारे ज्याचा अभिषेक झाला, \q2 जो इस्राएलच्या गीतांचा नायक: \b \q1 \v 2 “याहवेहचा आत्मा माझ्याद्वारे बोलला आहे; \q2 त्यांचे वचन माझ्या जिभेवर होते. \q1 \v 3 इस्राएलचे परमेश्वर बोलले, \q2 इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: \q1 ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, \q2 जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो, \q1 \v 4 तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा \q2 निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा, \q1 पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे \q2 जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’ \b \q1 \v 5 “जर माझे घराणे परमेश्वराशी सरळ नसते, \q2 तर खचितच त्यांनी माझ्याशी सर्वकाळचा करार, \q2 सर्वप्रकारे सुव्यवस्थित व निश्चित केला नसता, \q1 खचितच त्यांनी माझे तारण सफल करून \q2 माझी प्रत्येक आकांक्षा पूर्ण केली नसती. \q1 \v 6 परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील, \q2 जे हाताने गोळा करता येत नाहीत. \q1 \v 7 जे कोणी काट्यांना गोळा करतात \q2 ते लोखंडी साधन किंवा भाल्याचा दांडा वापरतात; \q2 ते जागीच भस्म केले जातात.” \s1 दावीदाचे पराक्रमी योद्धे \p \v 8 दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे ही: \p तहकेमोनचा\f + \fr 23:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa हखमोनचा\fqa*\f* योशेब-बश्शेबेथ\f + \fr 23:8 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa याशोबीम किंवा इश-बोशेथ\fqa*\f* तीन सेनापतींचा प्रमुख होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात आठशे लोकांना मारून टाकले. \p \v 9 त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी दोदोचा पुत्र एलअज़ार होता. तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. पस-दम्मीम येथे युद्धासाठी एकत्र आलेल्या पलिष्ट्यांना टोमणे मारत जो दावीदाबरोबर होता. तेव्हा इस्राएल लोक माघारी गेले होते, \v 10 परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला. \p \v 11 त्याच्यानंतर अगी हरारी याचा पुत्र शम्माह होता. मसूरांनी भरलेले शेत असलेल्या एका ठिकाणी पलिष्टी एकत्र जमले तेव्हा इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता. \v 12 परंतु शम्माह त्या शेताच्या मध्यभागी उभा राहिला, त्याचा बचाव त्यांनी केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला. \p \v 13 हंगामाच्या वेळी, जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती, तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेकडे आले. \v 14 त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती. \v 15 दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!” \v 16 तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले. \v 17 दावीद म्हणाला, “मी असे करणे माझ्यापासून दूर असो, हे याहवेह! ज्या पुरुषांनी आपला जीव धोक्यात घालून आणले, त्यांचे ते रक्त नाही काय?” म्हणून दावीद ते पाणी प्याला नाही. \p अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती. \p \v 18 जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता. \v 19 या तिघांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला नाही काय? तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. \p \v 20 कबसेल येथील एक शूर मनुष्य होता, जो यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे बर्फाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले. \v 21 त्याने एका बलाढ्य इजिप्ती मनुष्याला सुद्धा जिवे मारले होते. जरी त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, बेनाइयाह केवळ आपली काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला मारून टाकले. \v 22 यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती. \v 23 इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले. \b \lh \v 24 तीस जण येणेप्रमाणे होते: \b \li1 योआबाचा भाऊ असाहेल, \li1 बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान, \li1 \v 25 हरोदी शम्माह, \li1 हरोदी एलीका, \li1 \v 26 पालती हेलेस, \li1 तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा, \li1 \v 27 अनाथोथचा अबिएजेर, \li1 हुशाथचा सिब्बखय,\f + \fr 23:27 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa मबुन्ने\fqa*\f* \li1 \v 28 अहोह येथील सलमोन, \li1 नटोफाथी माहाराई, \li1 \v 29 नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेब,\f + \fr 23:29 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa हेलेद\fqa*\f* \li1 गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तई, \li1 \v 30 पिराथोनचा बेनाइयाह, \li1 गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दै,\f + \fr 23:30 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa हुराई\fqa*\f* \li1 \v 31 अर्बाथचा अबी-अल्बोन, \li1 बहरहूमचा अजमावेथ, \li1 \v 32 शालबोनचा एलीहबा, \li1 याशेनाचे पुत्र, \li1 योनाथान \v 33 हरार येथील शम्माहचा पुत्र, \li1 हरार येथील शारारचा\f + \fr 23:33 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa साकार\fqa*\f* पुत्र अहीयाम, \li1 \v 34 माकाथी अहसबैचा पुत्र एलिफेलेत, \li1 गिलोनी अहीथोफेलचा पुत्र एलीयाम, \li1 \v 35 कर्मेलचा हेस्रो, \li1 अर्बी येथील पारई, \li1 \v 36 सोबाह येथील हागरीचा\f + \fr 23:36 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa हाग्गादी\fqa*\f* पुत्र, \li1 नाथानचा पुत्र इगाल, \li1 गादी बानी;\f + \fr 23:36 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa हागरीचा पुत्र \fqa*\ft पहा \+xt 1 इति 11:38\+xt*\ft*\f* \li1 \v 37 अम्मोनी सेलेक, \li1 बैरोथचा नाहाराई, जो जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक होता, \li1 \v 38 इथ्री येथील ईरा, \li1 इथ्री येथील गारेब \li1 \v 39 आणि उरीयाह हिथी. \b \lf हे सर्व मिळून सदतीस जण होते. \c 24 \s1 दावीद योद्धे पुरुषांची नोंदणी करतो \p \v 1 इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.” \p \v 2 म्हणून राजाने योआब व त्याच्या बरोबरच्या सेनापतींना सांगितले, “दानपासून बेअर-शेबापर्यंत इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून फिरून, लढाऊ पुरुषांची नोंदणी करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.” \p \v 3 परंतु योआबाने राजाला उत्तर दिले, “याहवेह आपले परमेश्वर आपल्या सैन्यातील संख्या शंभरपटीने वाढवो आणि माझे स्वामी ते आपल्या डोळ्यांनी पाहो. परंतु गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात?” \p \v 4 तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; तेव्हा ते इस्राएलच्या लढाऊ पुरुषांची गणती करण्यासाठी राजापुढून निघून गेले. \p \v 5 यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्‍यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले. \v 6 नंतर ते गिलआद व तहतीम होदशी या प्रांतात गेले व तिथून दान यअनकडून वळसा घेऊन सीदोनकडे गेले. \v 7 नंतर ते सोरच्या किल्ल्याकडे आणि हिव्वी व कनानी यांच्या सर्व नगरांकडे व शेवटी ते यहूदीयाच्या नेगेवप्रांतातील बेअर-शेबापर्यंत गेले. \p \v 8 नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले. \p \v 9 योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते. \p \v 10 योद्धे पुरुषांची गणती केल्यानंतर दावीदाचे मन त्याला टोचू लागले आणि त्याने याहवेहला म्हटले, “मी जे केले ते करून मी पाप केले आहे. तर आता हे याहवेह, मी आपणास विनंती करतो की आपल्या सेवकाचा दोष दूर करा; मी मूर्खपणा केला आहे.” \p \v 11 दुसर्‍या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले: \v 12 “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर, जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ” \p \v 13 तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “तुमच्यासमोर देशभर तीन\f + \fr 24:13 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa सात वर्षे\fqa*\f* वर्षांचा दुष्काळ असावा? किंवा शत्रूकडून तुमचा पाठलाग होत असताना तीन महिने तुम्ही त्यांच्यापासून पळ काढावा? किंवा तुमच्या देशात तीन दिवस पीडा यावी? तर आता यावर विचार करून ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.” \p \v 14 दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.” \p \v 15 तेव्हा याहवेहने इस्राएल देशात त्या सकाळपासून नेमलेल्या वेळेपर्यंत मरी पाठवली आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सत्तर हजार लोक मरण पावले. \v 16 जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता. \p \v 17 दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्‍या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.” \s1 दावीद वेदी बांधतो \p \v 18 त्या दिवशी गाद दावीदाकडे आला आणि त्याला म्हणाला, “जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.” \v 19 तेव्हा गादद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेनुसार दावीद वर गेला. \v 20 राजा व त्याची माणसे आपल्याकडे येत आहेत असे जेव्हा अरवनाहने पाहिले, तेव्हा त्याने राजासमोर जाऊन भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. \p \v 21 अरवनाहने विचारले, “माझे स्वामी आपल्या सेवकाकडे का आले आहेत?” \p दावीदाने उत्तर दिले, “मी तुझे खळे विकत घेण्यासाठी आलो आहे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन.” \p \v 22 अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे. \v 23 महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.” \p \v 24 परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” \p म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल\f + \fr 24:24 \fr*\ft अंदाजे 575 ग्रॅ.\ft*\f* देऊन विकत घेतले. \v 25 नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.