\id 2KI - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h 2 राजे \toc1 2 राजे \toc2 2 राजे \toc3 2 राजे \mt1 2 राजे \c 1 \s1 अहज्याहवरील याहवेहचा न्याय \p \v 1 अहाब राजा मरण पावल्यानंतर मोआबाने इस्राएलविरुद्ध बंड केले. \v 2 अहज्याह, शोमरोन येथील आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून खाली पडून जखमी झाला होता. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हे सांगून पाठविले, “जा आणि एक्रोनचे दैवत बाल-जबूबला विचारा की मी या दुखण्यातून बरा होईन की नाही.” \p \v 3 परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राज्याच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’ \v 4 म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला. \p \v 5 जेव्हा दूत राजाकडे परत गेले, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का परत आलात?” \p \v 6 त्यांनी उत्तर दिले, “वाटेत आम्हाला एक मनुष्य भेटण्यास आला, तो म्हणाला, ‘ज्या राजाने तुम्हाला पाठविले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, “याहवेहचा हा संदेश आहे: इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारतोस? म्हणून तू ज्या अंथरुणावर पडून आहेस, त्या अंथरुणावरून उठणार नाहीस. तू खात्रीने मरशील!” ’ ” \p \v 7 राजाने त्यांना विचारले, “कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती होता जो तुम्हाला भेटण्यास आला आणि हे तुम्हाला सांगितले?” \p \v 8 त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा\f + \fr 1:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa तो केसाळ व्यक्ती होता\fqa*\f* घातला होता आणि चामाड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.” \p राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.” \p \v 9 नंतर राजाने आपल्या एका सेनाधिकार्‍याला पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी एलीयाहकडे गेला जो एका डोंगराच्या शिखरांवर बसलेला होता आणि त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘खाली या!’ ” \p \v 10 एलीयाहने सेनाधिकार्‍याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्‍यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले. \p \v 11 तेव्हा राजाने आणखी दुसर्‍या एका सेनाधिकार्‍यास पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘लवकर खाली उतरून या!’ ” \p \v 12 एलीयाहने उत्तर दिले, “मी परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला, व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” मग परमेश्वराचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि त्याला व त्याच्या पन्नास माणसांना भस्म केले. \p \v 13 यानंतर राजाने तिसर्‍या सेनाधिकार्‍यास त्याच्या पन्नास लोकांसोबत पाठविले. हा सेनाधिकारी वर गेला आणि एलीयाहपुढे गुडघे टेकून त्याला विनंती केली. “हे परमेश्वराच्या मनुष्या, तुमच्या दृष्टीत माझा जीव आणि या पन्नास माणसांचा, जे तुमचे सेवक आहेत त्यांचा जीव मोलवान असो! \v 14 पाहा, स्वर्गातून अग्नी येऊन पहिल्या दोन्ही सेनाधिकार्‍यांना आणि त्यांच्या सर्व माणसांना भस्म केले. परंतु आता तुमच्या दृष्टीत माझा जीव मोलवान असो!” \p \v 15 याहवेहच्या दूताने एलीयाहला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, त्याच्यासोबत खाली जा.” तेव्हा एलीयाह उठला आणि त्याच्यासोबत राजाकडे गेला. \p \v 16 एलीयाहने राजाला सांगितले, याहवेह हे म्हणतात: “इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारण्यास दूत पाठविले होते काय? हे कृत्य केल्यामुळे तू या दुखण्यातून उठणार नाहीस; यातच तुला खात्रीने मरण येईल.” \v 17 एलीयाहद्वारे याहवेहने भविष्य केल्याप्रमाणे अहज्याह मरण पावला. \p अहज्याहला पुत्र नव्हता म्हणून त्याचा भाऊ योराम राजा झाला. ही घटना यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोरामच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी घडली. \v 18 अहज्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि जे काही त्याने केले ते इस्राएलांच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवलेले नाही का? \c 2 \s1 एलीयाहचे स्वर्गारोहण \p \v 1 जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते. \v 2 एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.” \p परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले. \p \v 3 तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” \p अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.” \p \v 4 नंतर एलीयाह त्याला म्हणाला, “अलीशा तू येथेच राहा; कारण याहवेह मला यरीहोस पाठवित आहे.” \p आणि त्याने म्हटले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघेही यरीहोला गेले. \p \v 5 तिथे यरीहोच्या संदेष्ट्यांचा एक समूह अलीशास म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला याहवेह तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” \p त्याने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.” \p \v 6 मग एलीयाह अलीशास म्हणाला, “तू येथेच राहा; कारण याहवेह मला यार्देनला पाठवित आहेत.” \p आणि त्याने उत्तर दिले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो कीस मी तुम्हाला सोडणार नाही.” मग ते दोघेही पुढे चालले. \p \v 7 संदेष्ट्यांच्या सभेतील पन्नास लोकांचा समूह त्यांच्याजवळ आला आणि दूर थांबला व जिथे एलीयाह आणि अलीशा यार्देनजवळ थांबले होते, त्या दिशेने तोंड करून उभा राहिला. \v 8 तिथे एलीयाहने आपल्या झग्याची घडी केली आणि ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत पैलतीराला गेले. \p \v 9 ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” \p “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.” \p \v 10 एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.” \p \v 11 ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला. \v 12 अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्यांना पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले. \p \v 13 तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला. \v 14 त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला. \p \v 15 यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले. \v 16 ते त्याला म्हणाले, “पाहा, तुमच्या सेवकांकडे पन्नास बळकट पुरुष आहेत. त्यांना जाऊ द्या आणि तुमच्या स्वामीचा शोध घेऊ द्या. याहवेहच्या आत्म्याने त्यांना एखाद्या पर्वतशिखरावर, नाहीतर एखाद्या दरीत नेऊन टाकले असेल.” \p अलीशा म्हणाला, “नको, त्यांना पाठवू नका.” \p \v 17 परंतु त्यांनी त्याला लाज वाटेपर्यंत आग्रह केला. तेव्हा तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” आणि त्यांनी पन्नास पुरुषांना पाठविले, ज्यांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला, परंतु ते त्याला शोधू शकले नाही. \v 18 जेव्हा ते अलीशाकडे परत आले, तेव्हा अलीशा यरीहोतच होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊ नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय?” \s1 अलीशा पाणी शुद्ध करतो \p \v 19 शहरातील लोक अलीशाला म्हणाले, “आमच्या प्रभू, जसे तुम्ही पाहत आहात, नगर उत्तम वसलेले आहे, परंतु पाणी वाईट आहे आणि भूमी नापीक आहे.” \p \v 20 तो म्हणाला, “मला एका नव्या वाटीत मीठ भरून आणून द्या.” त्याप्रमाणे त्यांनी ते त्याच्याकडे आणून दिले. \p \v 21 मग तो पाण्याच्या झर्‍याजवळ गेला आणि ते मीठ पाण्यात टाकून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मी या पाण्याला बरे केले आहे. येथून पुढे या पाण्यामुळे मृत्यू येणार नाही किंवा भूमी नापीक राहणार नाही.’ ” \v 22 आणि अलीशाने म्हटल्याप्रमाणे ते पाणी शुद्ध झाले आणि आजवरही तसेच आहे. \s1 अलीशाची टिंगल \p \v 23 नंतर अलीशा वर बेथेलला गेला. तो रस्त्याने जात असताना, त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याकडे पाहून नगरातील काही मुले त्याची टिंगल करून त्याला “अरे टकल्या, चालता हो! अरे टकल्या, चालता हो!” असे म्हणून चिडवू लागली. \v 24 तेव्हा तो वळला आणि त्याने याहवेहच्या नावाने त्या मुलांना शाप दिला. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वली बाहेर आल्या आणि त्यांनी त्या मुलांपैकी बेचाळीस मुलांना फाडून टाकले. \v 25 तो तिथून निघून कर्मेल डोंगराकडे गेला आणि तिथून शोमरोनास माघारी गेला. \c 3 \s1 इस्राएलविरुद्ध मोआबाचे बंड \p \v 1 यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या शासनकाळात अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम हा शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला. त्याने बारा वर्षे राज्य केले. \v 2 याहवेहच्या दृष्टीत त्याने जे वाईट ते केले, परंतु त्याने आपल्या आई वडिलांसारखे केले नाही. त्याने त्याच्या पित्याने उभारलेला बआलचा मूर्तिस्तंभ पाडून टाकला. \v 3 तरीपण, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएली लोकांना जे पाप करावयाला लावले, त्या पापास तो चिकटून राहिला; त्याने ती पापे सोडली नाही. \p \v 4 मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे. \v 5 परंतु अहाबाच्या मृत्यूनंतर मोआबाच्या राजाने इस्राएलविरुद्ध बंड पुकारले. \v 6 तेव्हा यहोराम राजा शोमरोनातून बाहेर निघाला आणि सर्व इस्राएली लोकांना एकत्र केले. \v 7 यहूदीयाचा राजा यहोशाफाटला हा निरोप पाठविला: “मोआबाच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड पुकारले आहे. तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यास माझ्यासोबत येशील काय?” \p यहोशाफाटने उत्तर दिले, “मी तुझ्यासोबत येईन. जसा तू तसा मी, जे माझे लोक ते तुझे लोक, जे माझे घोडे ते तुझे घोडे.” \p \v 8 यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?” \p योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.” \p \v 9 त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदीयाचा राजा आणि एदोमाचा राजा यांच्यासोबत निघाला. सात दिवसाच्या फेरीनंतर, सैनिकांजवळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्राण्यांसाठी पाणी उरले नाही. \p \v 10 “हे काय!” इस्राएलाचा राजा म्हणाला. “याहवेहने आम्हा तीन राजांना मोआबाच्या हातात देण्यासाठी एकत्र केले आहे का?” \p \v 11 परंतु यहोशाफाटने विचारले, “याहवेहचा एखादा संदेष्टा इथे नाही काय, म्हणजे आपण याहवेहला विचारू शकू?” \p तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या अधिकार्‍याने उत्तर दिले, “शाफाटाचा पुत्र अलीशा इथे आहे. जो एलीयाहच्या हातावर पाणी घालत असे.\f + \fr 3:11 \fr*\ft म्हणजे तो एलीयाचा वैयक्तिक सेवक होता.\ft*\f*” \p \v 12 यहोशाफाटने म्हटले, “याहवेहचे वचन त्याच्यासोबत आहे.” मग इस्राएलाच्या राजा आणि यहोशाफाट व एदोम हे राजे त्याला भेटण्यास गेले. \p \v 13 अलीशाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “तुम्ही माझ्याकडे का आला? तुम्ही तुमच्या वडिलांच्या संदेष्ट्याकडे जा आणि तुमच्या आईच्या संदेष्ट्याकडे जा.” \p तेव्हा इस्राएलाच्या राजाने उत्तर दिले, “नाही! कारण याहवेहनेच आमचा पराभव मोआबाच्या राजाच्या हातून व्हावा म्हणून आम्हा तीन राजांना इकडे आणले आहे.” \p \v 14 अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्यांच्या सान्निध्यात मी उभा राहतो, जर मला यहूदीयाचा राजा यहोशाफाट याच्याबद्दल आदर नसता तर मी तुमच्याकडे लक्ष दिले नसते. \v 15 परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.” \p हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला \v 16 आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन. \v 17 कारण याहवेह असे म्हणतात: तुम्हाला वारा किंवा पाऊस दिसणार नाही, तरीही ही दरी पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमचे गुरे आणि इतर जनावरे ते पाणी पितील. \v 18 हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील. \v 19 तुम्ही त्यांची सर्वोत्तम शहरे, तसेच तटबंदी असलेली शहरेही जिंकून घ्याल. प्रत्येक उत्तम झाड तुम्ही कापाल, सर्व झर्‍यांचे पाणी तुम्ही अडवाल आणि दगड पसरून त्यांच्या सुपीक जमिनीची नासाडीही कराल.” \p \v 20 दुसर्‍या दिवशी सकाळी यज्ञार्पणाच्या वेळी—पाण्याचा लोंढा एदोमाच्या दिशेने वाहत आला व संपूर्ण भूमी पाण्याने भरून गेली. \p \v 21 राजे त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास येत आहेत हे मोआबातील लोकांना समजले, तेव्हा त्यांनी लगेच प्रत्येक तरुण व वयस्क पुरुषांनाही सैन्यात दाखल करून घेतले आणि सीमेवर आपली छावणी केली. \v 22 जेव्हा ते मोठ्या पहाटेस उठले तेव्हा सूर्य पाण्यावर तळपत होता. ते पाणी मोआबी लोकांना दुरून रक्तासारखे दिसू लागले. \v 23 ते म्हणाले, “हे रक्त आहे! त्या राजांनी एकमेकांसह युद्ध केले असेल आणि त्यांनी एकमेकांना ठार मारले असेल. तेव्हा आता, मोआब्यांनो चला, त्यांचे सर्वकाही लुटून आणू.” \p \v 24 पण जेव्हा मोआबी लोक इस्राएलांच्या छावणीकडे आले न आले तोच इस्राएलचे सैन्य उठले आणि ते पळेपर्यंत त्यांच्याशी युद्ध केले आणि त्वेषाने तुटून पडले व त्यांचा संहार करू लागले; आणि मोआबाचे सैन्य इस्राएलांपासून पळू लागले. इस्राएलांनी त्यांच्या देशात प्रवेश केला आणि मोआबी लोकांची कत्तल करत गेले. \v 25 त्यांनी मोआबाची शहरे उद्ध्वस्त केली. सर्व सुपीक जमिनीत एकएकाने दगडधोंड फेकून ती भरून टाकली. पाण्याच्या विहिरीतील झरे बुजविले आणि सर्व उत्तम झाडे तोडून टाकली. फक्त कीर-हरेसेथ येथील दगड राहू दिले, परंतु गोफणदारांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. \p \v 26 आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. \v 27 म्हणून त्याने आपला ज्येष्ठपुत्र, जो त्याच्यानंतर राजा होणार होता, त्याला धरून ठार मारले व शहराच्या तटावरच त्याचे होमार्पण केले. ही घटना पाहून इस्राएली सैन्यास जबरदस्त धक्का बसला; किळस येऊन ते माघारी आपल्या देशाला परतले. \c 4 \s1 विधवेचे जैतून तेल \p \v 1 संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचा भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.” \p \v 2 अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?” \p ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.” \p \v 3 अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्‍यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको. \v 4 आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.” \p \v 5 तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली. \v 6 जेव्हा प्रत्येक भांडे भरले गेले. ती तिच्या मुलाला म्हणाली, “आणखी काही भांडी माझ्याकडे आण.” \p पण त्याने म्हटले, “आता एकही भांडे शिल्लक राहिले नाही.” तेव्हा तेल वाहणे बंद झाले. \p \v 7 ती परमेश्वराच्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तो म्हणाला, “आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड. जे शिल्लक राहिलेले आहे त्यावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह कर.” \s1 शूनेम गावच्या स्त्रीचा मृत पुत्र जिवंत केला जातो \p \v 8 एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे. \v 9 ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे. \v 10 तेव्हा त्यांच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करू. तिथे त्यांच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक दिवा ठेवू. म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा इथे राहू शकतील.” \p \v 11 एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला. \v 12 त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली. \v 13 अलीशा गेहजीला म्हणाला, “तिला सांग, ‘तू आमच्यासाठी या सर्व त्रासातून गेली आहेस. आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? राजापुढे किंवा सेनाधिकार्‍यांपुढे तुझ्या वतीने बोलावे काय?’ ” \p तिने उत्तर दिले, “मी तर माझ्या लोकांमध्येच राहते.” \p \v 14 अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?” \p गेहजी म्हणाला, “तिला मूल नाही व आता तिचा पती वृद्ध झाला आहे.” \p \v 15 मग अलीशाने म्हटले, “तिला बोलावून आण.” म्हणून त्याने तिला बोलाविले आणि ती दारातच उभी राहिली. \v 16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वर्षी यावेळेस तू आपल्या पुत्रास उराशी धरशील.” \p ती म्हणाली, “माझ्या स्वामी, नाही, परमेश्वराच्या मनुष्या, कृपया तुम्ही मला अशी खोटी अाशा देऊ नका!” \p \v 17 पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला. \p \v 18 पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्‍यांसोबत होता. \v 19 तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!” \p त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” \v 20 सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला. \v 21 ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली. \p \v 22 तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.” \p \v 23 त्याने विचारले, “आजच त्याच्याकडे का जात आहे? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” \p ती म्हणाली, “हा ठीक आहे.” \p \v 24 मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.” \v 25 ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. \p जेव्हा त्याने तिला दुरून पहिले, तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “बघ, ती शूनेमकरीण! \v 26 धावत पुढे जा आणि तिला विचार, ‘तू ठीक आहे काय? तुझे पती ठीक आहेत काय? तुझे लेकरू ठीक आहे काय?’ ” \p ती म्हणाली, “होय, सर्वकाही ठीक आहे.” \p \v 27 जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.” \p \v 28 ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुमच्याजवळ पुत्र मागितला होता काय? आणि त्यावेळी मी तुम्हाला, ‘मला निरर्थक आशा देऊ नका, असे म्हटले नव्हते का?’ ” \p \v 29 अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी तुझ्या हातात घे आणि धाव. मार्गात तुला कोणी भेटला तर अभिवादन करू नको आणि जर तुला कोणी अभिवादन केले तर त्यांना उत्तर देऊ नकोस. माझी काठी मुलाच्या तोंडावर ठेव.” \p \v 30 परंतु मुलाची आई म्हणाली, “याहवेहची आणि तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही.” म्हणून तो उठला आणि तिच्यामागून निघाला. \p \v 31 गेहजी पुढे गेला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडाला काठीचा स्पर्श केला, पण कोणताच आवाज नाही वा प्रतिसाद मिळाला. म्हणून गेहजी परत अलीशाला भेटण्यास गेला आणि त्याला सांगितले, “मुलगा जागा झाला नाही.” \p \v 32 अलीशा घरात गेला, तो त्याला मुलगा मृत होऊन त्याच्या खाटेवर पडला आहे असे दिसले, \v 33 तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली. \v 34 मग अलीशा मुलाच्या शरीरावर, तोंडावर तोंड, डोळ्यांवर डोळे, हातांवर हात, अशाप्रकारे उपडा पडला. त्यामुळे मुलाच्या शरीरात पुन्हा ऊब येऊ लागली. \v 35 मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्‍या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले. \p \v 36 मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटले, “शूनेमकरीणीला बोलव.” त्याने तिला बोलविल्यावर, तो तिला म्हणाला, “हा घे, तुझ्या पुत्र!” \v 37 ती आत आली, त्याच्या पायावर पडली आणि जमिनीपर्यंत लवून तिने त्याला नमन केले. मग तिने आपल्या मुलाला घेतले आणि ती बाहेर पडली. \s1 अलीशा अन्नातील विष नाहीसे करतो \p \v 38 अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.” \p \v 39 त्यांच्यातील एकजण शाकभाजी आणावयास एका शेतात गेला आणि त्याला रानटी द्राक्षे दिसली आणि त्याने आपल्या कापडात जितकी फळे त्याला उचलता येतील तितकी त्याने उचलली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने त्याचे तुकडे करून भांड्यात टाकले, परंतु ते काय आहे याची काहीच कल्पना कोणालाही नव्हती. \v 40 शाकभाजी माणसांना वाढण्यात आली, पण जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली, ते खाताच ओरडू लागले, “परमेश्वराच्या मनुष्या, या भांड्यामध्ये मृत्यू आहे!” आणि ते भोजन करू शकले नाही. \p \v 41 तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” त्याने ते भांड्यात टाकले आणि म्हणाला, “हे लोकांना खाण्यास वाढा.” आणि भांड्यात काहीही अपायकारक राहिले नाही. \s1 शंभरांना जेवू घालणे \p \v 42 एके दिवशी बआल-शालीशाह येथून एका मनुष्याने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवाच्या वीस भाकरी एका पिशवीत घालून परमेश्वराच्या मनुष्याकडे आणल्या. तेव्हा तो म्हणाला, “लोकांना खाण्यास दे.” \p \v 43 त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” \p परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ” \v 44 मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले. \c 5 \s1 नामान कुष्ठरोगातून बरा होतो \p \v 1 नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग\f + \fr 5:1 \fr*\fq कुष्ठरोग \fq*\ft कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी हा शब्द वापरला जात असे.\ft*\f* झाला होता. \p \v 2 आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली. \v 3 एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.” \p \v 4 ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले. \v 5 तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत\f + \fr 5:5 \fr*\ft जवळपास 340 कि.ग्रॅ.\ft*\f*, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी\f + \fr 5:5 \fr*\ft जवळपास 69 कि.ग्रॅ.\ft*\f* आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला. \v 6 त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.” \p \v 7 इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!” \p \v 8 इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.” \v 9 तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला. \v 10 अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.” \p \v 11 परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील. \v 12 दिमिष्कमधील अमानाह व परपर या नद्या इस्राएलातील जलांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यामध्ये स्नान करून मी स्वतःला शुद्ध करू शकतो की नाही?” मग तो मागे फिरला आणि क्रोधाने निघून केला. \p \v 13 नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?” \v 14 मग तो खाली गेला आणि परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सात वेळा बुड्या मारल्या आणि त्याचे शरीर पूर्ववत् होऊन लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध झाले. \p \v 15 नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.” \p \v 16 तेव्हा संदेष्ट्याने उत्तर दिले, “ज्यांची मी सेवा करतो त्या जिवंत याहवेहची शपथ, मी काहीही स्वीकार करणार नाही.” आणि नामानाने त्याला फार आग्रह केला, पण त्याने नकार दिला. \p \v 17 नामान म्हणाला, “तुम्हाला नजराणे नको असतील तर घेऊ नका, पण निदान माझ्यावर थोडी कृपा करा आणि बरोबर नेण्यासाठी मला दोन खेचरांवर लादून नेता येईल एवढी येथील माती तरी द्या, कारण येथून पुढे याहवेहशिवाय मी इतर कोणत्याही दैवताला कधीही होमार्पण किंवा यज्ञार्पण करणार नाही. \v 18 मात्र एक गोष्टींसाठी याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी: माझा धनी, म्हणजे राजा, रिम्मोन मंदिरात नमन करण्यास जातात, त्यावेळी त्यांना माझ्या हाताच्या आधाराची गरज पडते आणि त्याच्याबरोबर मलाही नमन करावे लागते—जेव्हा मी रिम्मोन मंदिरात नमन करतो, तेव्हा याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी.” \p \v 19 अलीशा म्हणाला, “शांतीने जा.” \p मग नामान काही प्रवास केल्यानंतर, \v 20 इकडे परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजी स्वतःस म्हणाला, “माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून नजराणे न स्वीकारता त्याला असेच जाऊ दिले. जिवंत याहवेहची शपथ, आता मी स्वतः त्याच्यामागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेईन.” \p \v 21 गेहजी नामानाच्या मागे धावला. नामानाने जेव्हा त्याला त्याच्याकडे धावत येताना पाहिले, तो आपल्या रथातून खाली उतरून त्यास भेटण्यास गेला. नामानाने विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?” \p \v 22 गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने मला तुमच्याकडे हे सांगण्यास पाठविले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ भागातून संदेष्ट्यांच्या समुहातून दोन तरुण संदेष्टे आताच आले आहेत. कृपया त्यांना देण्यासाठी चांदीची एक तालांत व पोशाखांचे दोन जोड हवे आहेत.’ ” \p \v 23 नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले. \v 24 जेव्हा गेहजी डोंगराजवळ आला तेव्हा त्याने सेवकांकडून त्या थैल्या घेतल्या आणि त्या आपल्या घरी ठेवून दिल्या. त्याने त्या माणसांना परत पाठवून दिले आणि ते निघून गेले. \p \v 25 गेहजी आपल्या धन्याच्या पुढे जाऊन उभा राहिला, तेव्हा अलीशाने त्याला विचारले, “गेहजी, तू कुठे गेला होतास?” \p गेहजीने उत्तर दिले, “तुमचा सेवक कुठेच गेला नव्हता.” \p \v 26 परंतु अलीशा त्याला म्हणाला, “तो मनुष्य तुला भेटण्यास आपल्या रथावरून उतरला, तेव्हा माझा आत्मा तुझ्याबरोबर नव्हता काय? पैसा किंवा पोशाख, जैतुनाची शेते आणि द्राक्षमळे किंवा मेंढरे आणि गुरे किंवा दास आणि दासी मागून घेण्याचा हा समय आहे काय? \v 27 तुला व तुझ्या संतानाला नामानाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील.” तेव्हा गेहजी अलीशाच्या सान्निध्यातून निघून गेला आणि त्याच्या त्वचेवर कोड फुटले होते—आणि त्याची त्वचा हिमासारखी पांढरी झाली होती. \c 6 \s1 कुर्‍हाड पाण्यावर तरंगते \p \v 1 संदेष्ट्यांचा समूह अलीशाला म्हणाला, “पाहा, आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतो ती जागा आमच्यासाठी फार लहान आहे. \v 2 चला आपण यार्देन नदीवर जाऊ या, जिथे प्रत्येक आपल्यासाठी खांब घेईल; आणि भेटण्यासाठी आपण एक स्थान तयार करू या.” \p आणि तो म्हणाला, “जा.” \p \v 3 त्यापैकी एकाने म्हटले, “कृपया तुम्ही तुमच्या सेवकासोबत येणार काय?” \p अलीशाने उत्तर दिले, “मी तुमच्याबरोबर येतो.” \v 4 आणि तो त्यांच्यासोबत गेला. \p ते यार्देनकडे गेले आणि झाडे तोडू लागले. \v 5 त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्‍हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्‍हाड उसनी मागून आणली होती!” \p \v 6 परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, “ते कुठे पडले?” तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्‍हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले. \v 7 तो म्हणाला, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली. \s1 अलीशा आंधळ्या अराम्यांना जाळ्यात अडकवितो \p \v 8 त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्‍यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.” \p \v 9 परमेश्वराच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठविला: “सावध राहा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण अरामी सैनिक त्या ठिकाणी दबा धरून बसले आहेत.” \v 10 परमेश्वराच्या मनुष्याने सांगितलेले ठिकाण इस्राएलच्या राजाने पडताळून पाहिले. अलीशाने राजाला वारंवार सावध केले, जेणेकरून तो अशा ठिकाणी सावध राहिला. \p \v 11 तेव्हा अरामचा राजा संतप्त झाला. त्याने आपल्या अधिकार्‍यांना बोलाविले आणि मागणी केली, “आपल्यापैकी कोण इस्राएलाच्या राजाच्या बाजूने आहे?” \p \v 12 तेव्हा एका अधिकार्‍याने म्हटले, “माझे स्वामी महाराज, आपल्यापैकी कोणीही नाही, परंतु इस्राएलमधील अलीशा जो संदेष्टा, तो इस्राएलाच्या राजाला तुम्ही तुमच्या विश्रांतिगृहात उच्चारलेले प्रत्येक शब्द कळवितो.” \p \v 13 राजाने आदेश दिला, “तो कुठे आहे शोधून काढा, म्हणजे मी माणसे पाठवितो आणि त्याला कैद करतो.” त्याच्याकडे बातमी परत आली: “तो दोथान येथे आहे.” \v 14 मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला. \p \v 15 दुसर्‍या दिवशी पहाटेच परमेश्वराच्या मनुष्याचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैनिकांनी रथ आणि घोडे यासह शहराला वेढा दिला आहे, हे त्याला दिसले. तेव्हा तो ओरडला, “माझ्या स्वामी, आता आपण काय करावे?” \p \v 16 संदेष्ट्याने उत्तर दिले, “भिऊ नकोस, कारण हे त्यांच्यासोबत जे आहेत त्यांच्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत ते अधिक आहेत.” \p \v 17 मग अलीशाने ही प्रार्थना केली, “हे याहवेह, याचे डोळे उघडा, म्हणजे तो पाहू शकेल.” तेव्हा याहवेहने त्या सेवकाचे डोळे उघडले, आणि त्याने दृष्टी वर केली आणि पाहिले की, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे आणि रथ यांनी भरलेला आहे. \p \v 18 जेव्हा शत्रू खाली त्याच्याकडे आले, तेव्हा अलीशाने याहवेहकडे प्रार्थना केली, “कृपा करून या सर्व लोकांना आंधळे करून टाका.” अलीशाने विनंती केल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आंधळे केले. \p \v 19 मग अलीशा त्यांना म्हणाला, “हा तो रस्ता नाही आणि हे ते नगरही नाही. माझ्यामागे या म्हणजे जो मनुष्य तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन.” आणि त्याने त्यांना शोमरोनात नेले. \p \v 20 शोमरोनात प्रवेश केल्यानंतर, अलीशाने प्रार्थना केली, “हे याहवेह, आता या माणसांचे डोळे उघडा म्हणजे ते पाहू शकतील.” तेव्हा याहवेहने त्यांचे डोळे उघडले, आणि त्यांनी पाहिले की ते इस्राएलची राजधानी शोमरोनामध्ये आहेत. \p \v 21 जेव्हा इस्राएलाच्या राजाने त्यांना पहिले, तेव्हा त्यांनी अलीशाला विचारले, “मी त्यांचा घात करू काय, माझ्या पित्या, मी त्यांचा घात करू काय?” \p \v 22 अलीशाने उत्तर दिले, “त्यांचा घात करू नको. तुम्ही आपल्या तलवारीने किंवा धनुष्याने पकडलेल्यांना माराल का? त्यांच्यापुढे अन्न व पाणी ठेवा म्हणजे ते खाऊन पिऊन तृप्त होतील आणि नंतर त्यांच्या स्वामीकडे परत जातील.” \v 23 तेव्हा राजाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी केली, आणि त्यांचे खाणेपिणे झाल्यानंतर त्यांना पाठवून दिले आणि ते आपल्या स्वामीकडे परत आले. त्यानंतर अरामाच्या टोळ्यांनी इस्राएली देशावर हल्ला करण्याचे थांबविले. \s1 वेढलेल्या शोमरोनात दुष्काळ \p \v 24 काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला. \v 25 शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला\f + \fr 6:25 \fr*\ft अंदाजे 920 ग्रॅ.\ft*\f* आणि कबुतराची एक पावशेर\f + \fr 6:25 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fq एक पावशेर \fq*\ft अंदाजे 100 ग्रॅ\ft*\f* विष्ठा\f + \fr 6:25 \fr*\fq विष्ठा \fq*\ft कदाचित् एक प्रकारची भाजी\ft*\f* पाच शेकेलला\f + \fr 6:25 \fr*\ft अंदाजे 58 ग्रॅ.\ft*\f* विकली गेली. \p \v 26 एके दिवशी इस्राएलाचा राजा तटावरून फेर्‍या मारीत असताना, एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “माझे स्वामी महाराज, मला साहाय्य करा!” \p \v 27 राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?” \v 28 मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?” \p स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’ \v 29 तेव्हा आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्ले. दुसर्‍या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे आपण त्याला खाऊ,’ पण तिने त्याला कुठेतरी लपवून ठेवले.” \p \v 30 जेव्हा राजाने स्त्रीचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने आपला अंगरखा फाडला. त्याला तटावरून फिरत असता लोकांनी पाहिले आणि त्यांच्या नजरेस आले की त्याच्या अंगरख्या खाली त्याने गोणपाट गुंडाळलेले आहे. \v 31 तो म्हणाला, “मी जर आज शाफाटाचा पुत्र अलीशाचे शिर उडविले नाही, तर परमेश्वर माझे त्याहूनही अधिक वाईट करो.” \p \v 32 अलीशा आपल्या घरात बसलेला होता आणि वडीलजन त्याच्यासोबत बसलेले होते. राजाने आपल्यापुढे दूत पाठविला, पण तो येण्यापूर्वी अलीशा वडीलजनांना म्हणाला, “या खुनी मनुष्याने माझा शिरच्छेद करण्यासाठी कोणाला तरी पाठविले आहे, हे तुम्ही पाहिले काय? पाहा, जेव्हा दूत येईल तेव्हा दार बंद करून त्याला बाहेरच ठेवा, कारण त्याच्या पाठोपाठ त्याच्या धन्याच्या पावलांचा आवाज आहे की नाही?” \v 33 अलीशा हे सांगत असतानाच तो दूत खाली त्याच्याजवळ आला. \p राजा म्हणाला, “हे अरिष्ट याहवेहकडून आहे. तेव्हा मी याहवेहची अजून वाट का पाहावी?” \c 7 \p \v 1 अलीशाने उत्तर दिले, “याहवेहचे वचन ऐका. याहवेह असे म्हणतात: उद्या याच सुमारास शोमरोनच्या वेशीत तुम्हाला एका शेकेलला\f + \fr 7:1 \fr*\ft अंदाजे 12 ग्रॅ.\ft*\f* एक सिआ\f + \fr 7:1 \fr*\ft अंदाजे 5.5 कि.ग्रॅ.\ft*\f* सपीठ आणि एका शेकेलला दोन सिआ\f + \fr 7:1 \fr*\ft अंदाजे 9 कि.ग्रॅ.\ft*\f* सातू मिळेल.” \p \v 2 ज्या कारभाऱ्याच्या हातावर राजा टेकायचा तो परमेश्वराच्या मनुष्याला म्हणाला, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” \p अलीशाने त्याला उत्तर दिले, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!” \s1 वेढा उठविण्यात येतो \p \v 3 त्यावेळी शहराच्या वेशीजवळ चार कुष्ठरोगी बसले होते. त्यांनी एकमेकास म्हटले, “आपण मरेपर्यंत इथे का राहावे? \v 4 जर आपण म्हणालो, ‘आपण शहरात जाऊ,’ तर तिथे दुष्काळ आहे आणि आपण तर मरणारच. येते बसून राहिलो तरीही आपण मरणारच आहोत. तर मग आपण अरामी सैन्याच्या छावणीत जाऊ आणि शरण घेऊ. त्यांनी आपल्याला जीवदान दिले, तर जिवंत राहू आणि मारून टाकले, तर आपण मरू, तर त्यात काही हरकत नाही.” \p \v 5 संध्याकाळी ते उठले आणि अरामी सैन्याच्या छावणीत गेले, पण जेव्हा ते छावणीच्या सीमेवर आले तेव्हा तिथे एकही मनुष्य नव्हता, \v 6 कारण प्रभू परमेश्वराने अरामी सेनेला रथांचा आणि घोड्यांचा आणि मोठ्या सैन्याचा आवाज ऐकविला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, आमच्यावर हल्ला चढविण्यासाठी इस्राएलाच्या राजाने पैसे देऊन हिथी व इजिप्ती राजे बोलाविले आहे.” \v 7 तेव्हा ते उठले आणि संध्याकाळी पळून गेले. त्यांनी आपले तंबू, घोडे, गाढवे यांचा त्याग केला. आपले तंबू तसेच सोडून प्राण वाचविण्यासाठी त्यांनी पलायन केले. \p \v 8 जेव्हा हे कुष्ठरोगी अरामी छावणीच्या सीमेजवळ आले, तेव्हा त्यांनी एका तंबूत घुसून खाणेपिणे केले. त्यांनी चांदी, सोने आणि कपडे गोळा करून ते लपवून ठेवले. ते परत येऊन दुसर्‍या तंबूत गेले आणि त्यातून काही वस्तू घेतल्या आणि त्यादेखील लपवून ठेवल्या. \p \v 9 तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “आपण जे करत आहोत ते योग्य नाही. हा आनंदाच्या शुभवार्तेचा दिवस आहे आणि ती आपण स्वतःजवळच ठेवीत आहोत. जर आपण सकाळ होईपर्यंत थांबून राहिलो तर आपण दंडपात्र होऊ. तेव्हा चला, आपण राजवाड्यात जाऊन ही बातमी सांगू.” \p \v 10 नंतर ते गेले आणि शहराच्या पहारेकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी छावणीत गेलो होतो आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता—कोणाचाही शब्द नाही—तेथील घोडे व गाढवे बांधून ठेवली आहेत आणि तंबूही जसेच्या तसे आहेत.” \v 11 तेव्हा पहारेकर्‍यांनी ओरडून ही बातमी सांगितली आणि राजवाड्यात कळविली. \p \v 12 तेव्हा राजा रात्री उठला आणि आपल्या सेवकांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो की अरामी लोकांनी आपल्यासोबत काय केले आहे. आपण भुकेने मरत आहोत हे त्यांना माहीत आहे; म्हणून ते आपली छावणी सोडून आजूबाजूला मैदानात दबा धरून बसले आहे. त्यांना वाटते की, ‘ते खात्रीने बाहेर पडतील आणि मग आपण त्यांना जिवंत पकडू आणि त्यांच्या शहरात प्रवेश करू.’ ” \p \v 13 तेव्हा त्याच्या एका अधिकार्‍याने उत्तर दिले, “शहरात शिल्लक राहिलेले पाच घोडे घेण्यास काही माणसांना सांगा. तसेही त्यांची अवस्था येथे उरलेल्या सर्व इस्राएली लोकांपेक्षा काही वेगळी नाही—होय, ते केवळ ज्यांचा नाश झाला आहे, त्या सर्व इस्राएली लोकांप्रमाणेच असतील. म्हणून काय झाले आहे हे पाहण्यास काही लोकांना पाठवू द्या.” \p \v 14 म्हणून त्यांनी दोन रथ घोड्यांसहित घेतले आणि राजाने त्यांना अरामी सैन्याच्या मागे पाठविले. त्याने त्यांना आदेश दिला, “जा आणि काय झाले ते पाहून या.” \v 15 ते यार्देनपर्यंत त्यांच्यामागे गेले आणि अरामी लोकांचे कपडे व सामान मार्गावर पसरलेले त्यांना आढळले, जे अरामी लोकांनी पळून जात असता फेकून दिले होते. दूत परत आले आणि राजाला हे वर्तमान कळवले. \v 16 मग लोक बाहेर निघाले आणि अरामी लोकांची छावणी लुटली. याहवेहच्या वचनानुसार एका शेकेलास एक सिआ सपीठ, आणि एका शेकेलास सातूच्या दोन सेआ विकत मिळू लागले. \p \v 17 राजा ज्या अधिकार्‍याच्या दंडावर टेकीत होता त्याला वेशीवर नियुक्त केले होते आणि लोकांनी त्याला वेशीवर तुडविले व तो मरण पावला, ज्याप्रमाणे परमेश्वराच्या मनुष्याने सांगितले होते, जेव्हा राजा खाली त्याच्याकडे गेला होता. \v 18 परमेश्वराच्या मनुष्याने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले: “शोमरोनच्या वेशीजवळ एका शेकेलास एक सिआ सपीठ आणि एका शेकेलास दोन सिआ सातू विकत मिळू लागेल.” \p \v 19 त्या अधिकार्‍याने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले होते, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले होते, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!” \v 20 त्याच्यासोबत असेच घडले, कारण लोकांनी त्याला वेशीजवळ तुडविले आणि तो मरण पावला. \c 8 \s1 शूनेम येथील स्त्रीची भूमी परत मिळवून दिली \p \v 1 अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.” \v 2 त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले. \p \v 3 सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली. \v 4 त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.” \v 5 जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती. \p गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री, आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.” \v 6 राजाने त्याबद्दल स्त्रीला विचारले आणि तिने त्याला सर्व सांगितले. \p मग त्याने आपल्या एका अधिकार्‍याला तिच्या मदतीसाठी नेमून दिले आणि त्याला म्हटले, “तिचे जे काही होते, ते सर्व तिला परत द्या, तिने देश सोडल्यापासून आजपर्यंत तिच्या मालकीचे सर्वकाही, अगदी तिच्या जमिनीचे सर्व उत्पन्न तिला परत करा.” \s1 हजाएल बेन-हदादचा वध करतो \p \v 7 अलीशा दिमिष्क येथे गेला आणि अरामचा राजा बेन-हदाद आजारी होता. जेव्हा राजाला सांगण्यात आले, “परमेश्वराचा मनुष्य येथे वर आलेला आहे,” \v 8 राजाने हजाएलला म्हटले, “एखादी भेट घेऊन परमेश्वराच्या मनुष्याला भेटण्यास जा आणि त्याच्याद्वारे याहवेहस विचार, ‘मी या आजारातून बरा होईन की नाही?’ ” \p \v 9 हजाएल त्याच्यासोबत दिमिष्कच्या सर्व उत्तम भेटवस्तू चाळीस उंटावर लादून अलीशाला भेटण्यासाठी गेला. तो गेला आणि त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हटले, “तुमचा पुत्र, अरामचा राजा बेन-हदाद, यांनी मला आपल्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, मी या आजारातून बरा होईन की नाही?” \p \v 10 अलीशाने उत्तर दिले, “जा आणि त्याला सांग, ‘तू नक्कीच बरा होशील.’ परंतु याहवेहने मला स्पष्ट दाखविले आहे की तो अवश्य मरेल.” \v 11 यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला. \p \v 12 हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” \p अलीशाने उत्तर दिले, “कारण मला माहीत आहे की तू इस्राएली लोकांचे वाईट करणार आहेस, तू त्यांच्या तटबंदीच्या ठिकाणास आग लावशील, त्यांच्या तरुण पुरुषांना तलवारीने ठार मारशील, त्यांच्या बालकांना आपटून मारशील आणि गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.” \p \v 13 हजाएल म्हणाला, “कसे काय तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट करणार काय?” \p अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,” \p \v 14 त्यानंतर हजाएल अलीशाला सोडून गेला आणि आपल्या स्वामीकडे परत आला. जेव्हा बेन-हदादने विचारले, “अलीशाने तुला काय सांगितले?” हजाएलाने उत्तर दिले, “त्यांनी मला सांगितले की तुम्ही नक्कीच बरे होणार.” \v 15 परंतु दुसर्‍या दिवशी त्याने एक रजई पाण्यात भिजविली आणि ती राजाच्या तोंडावर पसरली, त्यामुळे राजा मरण पावला. त्यानंतर हजाएल त्याच्या ठिकाणी राजा झाला. \s1 यहूदाचा राजा योराम \p \v 16 अहाबाचा पुत्र, इस्राएलाचा राजा योरामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोराम राज्य करू लागला. \v 17 तो वयाच्या बत्तीसाव्या वर्षी राजा झाला, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले. \v 18 अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. \v 19 तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने यहूदाहचा नाश केला नाही. कारण त्यांनी दावीदाच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते. \p \v 20 यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला. \v 21 मग यहोराम आपले रथ घेऊन साईर येथे गेला. ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. आणि लोक आपल्या डेर्‍यांत पळून गेले. \v 22 तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले. \p \v 23 यहोरामाच्या बाकीच्या कामगिरीचा तपशील आणि त्याची सर्व कामे यहूदीयाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात केलेली नाही काय? \v 24 यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला. \s1 यहूदाचा राजा अहज्याह \p \v 25 इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा पुत्र अहज्याह यहूदीयाचा राजा म्हणून राज्य करू लागला. \v 26 वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, ती इस्राएलाचा राजा ओमरीची नात होती. \v 27 तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते. \p \v 28 अरामचा राजा, हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला; \v 29 रामाह\f + \fr 8:29 \fr*\ft किंवा \ft*\fqa रामोथ\fqa*\f* येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. \p यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह हा अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता. \c 9 \s1 इस्राएलाचा राजा म्हणून येहूचा अभिषेक \p \v 1 इकडे अलीशा संदेष्ट्याने एका तरुण संदेष्ट्याला संदेष्ट्यांच्या समुहातून बोलाविले आणि त्याला म्हटले, “तू आपली कंबर बांध, जैतून तेलाची कुपी बरोबर घे आणि रामोथ गिलआद येथे जा. \v 2 जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा निमशी यहोशाफाटाचा पुत्र येहूचा शोध घे व त्याला त्याच्या मित्र मंडळीपासून दूर एका खाजगी खोलीत घेऊन जा, \v 3 मग कुपी घे आणि तेल त्याच्या मस्तकांवर ओत आणि जाहीर कर, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.’ नंतर दार उघड आणि पळ; उशीर करू नकोस!” \p \v 4 मग तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलआद येथे गेला. \v 5 जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सेना अधिकारी सोबत बसलेले आहेत. तो म्हणाला, “सेनापती महोदय, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे.” \p येहूने विचारले, “आमच्यापैकी कोणासाठी?” \p त्याने उत्तर दिले, “सेनापती महोदय तुमच्यासाठी.” \p \v 6 मग येहू उठला आणि तो आत घरात गेला. नंतर संदेष्ट्याने येहूच्या मस्तकांवर तेल ओतले आणि जाहीर केले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: ‘मी तुझा याहवेहची प्रजा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो. \v 7 तुला आपला स्वामी अहाबाच्या घराण्याचा नाश करावयाचा आहे. ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांना आणि याहवेहच्या इतर सेवकांना ठार मारलेल्यांचा सूड तुला उगवावयाचा आहे. \v 8 कारण अहाबाच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल. मी अहाबाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष इस्राएल राष्ट्रातून मिटवून टाकीन तो दास असो किंवा स्वतंत्र. \v 9 नेबाटाचा पुत्र यरोबोअम आणि अहीयाहचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करेन. \v 10 ईजबेलला येज्रीलच्या भूमीत कुत्री फाडून खातील आणि तिला कोणीही मूठमाती देणार नाही.’ ” मग त्या तरुणाने दार उघडले आणि पळाला. \p \v 11 येहू आपल्या सोबतच्या अधिकार्‍यांकडे परत आला. त्यापैकी एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? हा वेडा तुझ्याकडे का आला होता?” \p येहूने उत्तर दिले, “तो कोण होता व त्याचे बोलणे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.” \p \v 12 तेव्हा ते म्हणाले, “हे सत्य नाही, खरे काय आहे ते आम्हाला सांग.” \p येहूने म्हटले, “त्याने मला म्हटले: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा होण्यासाठी अभिषेक करत आहे.’ ” \p \v 13 हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्‍यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.” \s1 योराम व अहज्याह यांचा वध येहू करतो \p \v 14 निमशीचा पुत्र यहोशाफाटचा पुत्र येहूने योराम राजाविरुद्ध बंड पुकारले. (त्यावेळेस योराम राजा सर्व सैन्यानिशी रामोथ गिलआद येथे अरामचा राजा हजाएलविरुद्ध इस्राएलांच्या बाजूने लढत होता. \v 15 पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्‍या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.” \v 16 मग येहू रथात बसला आणि येज्रीलास गेला, कारण योराम तिथे विसावा घेत होता आणि यहूदीयाचा राजा अहज्याह त्याला भेटण्यास खाली गेला होता. \p \v 17 येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.” \p यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?” \p \v 18 तेव्हा एक घोडेस्वार येहूला भेटण्यास गेला आणि म्हणाला, “राजाने असे म्हटले आहे: ‘तुम्ही शांतीने आला आहात का?’ ” \p येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!” \p तेव्हा पहारेकर्‍याने बातमी दिली, “आपला दूत तिथे पोहोचला, तो येणार्‍यांना भेटला, पण तो परत येत नाही.” \p \v 19 मग राजाने दुसर्‍या घोडेस्वाराला पाठविले. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, राजाने असे म्हटले आहे: तुम्ही शांतीने आला आहात का? \p येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!” \p \v 20 पहारेकर्‍याने बातमी दिली, “तो तिथे पोहोचला, पण तो ही परत येताना दिसत नाही. त्याचे घोडे हाकणे तर निमशीचा पुत्र येहूसारखे आहे—तो घाईने हाकीत आहे.” \p \v 21 यहोरामाने फर्मान दिला, “माझा रथ तयार करा.” मग इस्राएलाचा राजा योराम आणि यहूदीयाचा राजा अहज्याह आपआपल्या रथात बसून येहूला भेटावयास निघाले. ते येहूला येज्रीली नाबोथच्या शेतात भेटले. \v 22 जेव्हा यहोरामाने येहूस पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “येहू, तुम्ही शांतीने आला आहात का?” \p येहूने उत्तर दिले, “कशी राहील शांती, जेव्हा तुमची आई ईजबेलचे व्यभिचार आणि चेटके एवढे अधिक आहेत तोपर्यंत कशी शांती असेल?” \p \v 23 ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!” \p \v 24 येहूने आपला धनुष्य सर्व शक्तिनिशी ओढला आणि यहोरामाच्या दोन्ही बाहूंच्यामध्ये मारला. बाण त्याच्या हृदयात शिरला, आणि तो रथातच कोसळून पडला. \v 25 तेव्हा येहूने आपला साथीदार बिदकर याला म्हटले, “त्याला उचल आणि येज्रीली नाबोथच्या भूमीत फेकून दे, कारण स्मरण कर की मी आणि तू मिळून त्याचा पिता अहाब याच्यामागून रथामधून चाललो असताना याहवेहने ही भविष्यवाणी त्याच्या विरोधात केली होती: \v 26 याहवेह जाहीर करतात, ‘मी काल नाबोथचे रक्त आणि त्याच्या पुत्रांचे रक्त पाहिले आहे आणि याच भूमीवर मी याची परतफेड करेन, असे याहवेह जाहीर करतात. वध केल्याबद्दल मी त्याचा बदला अहाबाला या नाबोथच्याच भूमीवर देईन.’ म्हणून आता याहवेहच्या वचनानुसार, त्याला उचल आणि त्याला त्या भूमीवर फेकून दे.” \p \v 27 काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्‍या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला. \v 28 त्याच्या सेवकांनी त्याला रथामधूनच यरुशलेमास नेले व दावीदनगरीत त्याच्या पूर्वजांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली. \v 29 (अहाबाचा पुत्र योरामच्या अकराव्या वर्षी अहज्याह यहूदीयाचा राजा झाला होता.) \s1 ईजबेलचा वध \p \v 30 नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली. \v 31 जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?” \p \v 32 त्याने वर खिडकीकडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाला, “माझ्या बाजूचे कोण आहेत? कोण?” तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे डोकावून पाहिले. \v 33 येहूने म्हटले, “तिला खिडकीतून खाली ढकलून द्या.” तेव्हा त्यांनी तिला खाली ढकलून दिले, आणि तिच्या रक्ताच्या काही चिरकांड्या भिंतीवर आणि घोड्यांवर पडल्या आणि घोड्यांनी तिला पायाखाली तुडविले. \p \v 34 येहू आत गेला आणि त्याने खाणेपिणे केले. तो म्हणाला, “त्या शापित स्त्रीची काळजी घ्या आणि तिला मूठमाती द्या. कारण ती एका राजकन्या होती.” \v 35 परंतु जेव्हा ते तिला मूठमाती देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिची फक्त कवटी व हात आणि पायच सापडले. \v 36 ते परत गेले आणि येहूला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “याहवेहचे वचन जे त्यांनी आपला सेवक एलीयाह तिश्बी याच्यामार्फत सांगितले होते ते हेच होते; येज्रीलच्या शेतात कुत्री ईजबेलचे मांस खातील. \v 37 आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.” \c 10 \s1 अहाबाच्या घराण्याचा वध \p \v 1 शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते, \v 2 “तुमच्यासोबत तुमच्या धन्याचे पुत्र आहेत आणि तुमच्याजवळ रथ आणि घोडे, तटबंदी असलेले शहर आणि हत्यारेही आहेत, जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळताच, \v 3 आपल्या धन्याच्या पुत्रांपैकी सर्वोत्तम आणि सर्वात योग्य निवडा आणि त्याला त्याच्या पित्याच्या सिंहासनावर बसवा. मग तुमच्या धन्याच्या घरासाठी लढा.” \p \v 4 परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?” \p \v 5 मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.” \p \v 6 मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.” \p आता सत्तर राजपुत्र शहराच्या प्रमुख व्यक्तीबरोबर होते, जे त्यांचे संगोपन करत होते. \v 7 जेव्हा त्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी राजपुत्रांना घेतले आणि सर्व सत्तर पुत्रांना ठार केले. त्यांनी त्यांची शिरे टोपल्यांमध्ये भरून ती येहूला येज्रीलमध्ये पाठवून दिली. \v 8 जेव्हा दूत त्याच्याकडे आला, त्याने येहूला सांगितले, “त्यांनी राजपुत्रांची शिरे आणली आहेत.” \p तेव्हा येहूने आदेश दिला, “ती शिरे मुख्य वेशीजवळ, त्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत ठेवावी.” \p \v 9 दुसर्‍या दिवशी सकाळी येहू बाहेर आला. तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व निर्दोष आहात. मी आपल्या धन्याच्या विरुद्ध षडयंत्र केले आणि त्याला ठार मारले, पण या सर्वांना कोणी मारले? \v 10 तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.” \v 11 असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही. \p \v 12 यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला, \v 13 त्याची भेट यहूदीयाचा राजा अहज्याहच्या काही नातेवाईकांसह झाली आणि येहूने त्यांना विचारले, “तुम्ही कोण आहात?” \p ते म्हणाले, “आम्ही अहज्याहचे नातेवाईक आहोत आणि आम्ही राजा आणि राजमातेच्या कुटुंबीयांनी अभिवादन करण्यासाठी खाली आलो आहोत.” \p \v 14 तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही. \p \v 15 तो तिथून निघाला आणि त्याची भेट रेखाबाचा पुत्र यहोनादाबासोबत झाली, जो त्यालाच भेटावयाला येत होता. येहूने त्याला अभिवादन केले आणि म्हणाला, “जसा मी तुझ्या सहमत आहे, तसा तूही माझ्याशी सहमत आहेस काय?” \p यहोनादाबाने उत्तर दिले, “होय निश्चित!” \p तेव्हा येहू म्हणाला, “तर मग आपला हात मला दे.” आणि त्याने तसेच केले, आणि येहूने त्याला आपल्या रथामध्ये घेण्यास मदत केली. \v 16 येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला. \p \v 17 जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला. \s1 येहू बआलच्या सेवकांचा वध करतो \p \v 18 नंतर येहूने सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना म्हणाला, “अहाबाने बआलची थोडी सेवा केली; येहू त्याच्याहून अधिक सेवा करेल. \v 19 म्हणून बआल दैवताच्या सर्व संदेष्ट्यांना आणि सर्व सेवकांना आणि सर्व याजकांना एकत्र बोलवा. कोणीही अनुपस्थित राहू नये याची खबरदारी घ्या, कारण मी बआलसाठी मोठा यज्ञ करणार आहे. जो कोणी येणार नाही त्याला ठार मारण्यात येईल.” परंतु बआलच्या सर्व भक्तांचा संहार करण्याच्या हेतूनेच येहूने ही योजना आखली होती. \p \v 20 येहूने म्हटले, “बआलच्या आदरासाठी सभा बोलवा.” अशी त्यांनी त्याची घोषणा केली. \v 21 नंतर येहूने सर्व इस्राएलात संदेश पाठविला आणि बआलचे सर्व सेवक आले; कोणीही मागे राहिला नाही. ते बआलचे मंदिर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरेपर्यंत गर्दी करत राहिले. \v 22 आणि येहूने वस्त्र भांडाराच्या प्रमुखाला म्हटले, “बआलच्या सर्व सेवकांसाठी झगे घेऊन ये.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी झगे आणले. \p \v 23 यानंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब मंदिरात गेले. येहू बआलच्या सेवकांना म्हणाला, “सभोवती दृष्टी टाका आणि पाहा की याहवेहची सेवा करणारा कोणीही तुमच्याबरोबर नाही—फक्त बआलचे सेवक आहेत.” \v 24 म्हणून ते यज्ञार्पण व होमार्पण करण्यास आत गेले. आता येहूने ऐंशी माणसांना बाहेर ही ताकीद देऊन उभे केले होते: “जी माणसे तुमच्या तावडीत दिलेली आहेत, त्यातून एकही निसटून जायला नको, जर एकही तुमच्या तावडीतून निसटला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत मोजावी लागेल.” \p \v 25 येहूने होमार्पण करण्याचे संपविले त्याने ताबडतोब आपल्या पहारेकरी व अधिकाऱ्यांना आदेश दिला: “आता नगरात जा आणि त्यांना मारा; कोणीही निसटून जाऊ नये.” मग त्यांनी त्या सर्वांना तलवारीने मारले. पहारेकरी व अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर फेकले आणि नंतर ते बआलच्या मंदिराच्या गाभार्‍यात गेले. \v 26 बआलच्या मंदिरातून पवित्र स्तंभ बाहेर काढला आणि तो जाळून टाकला. \v 27 त्यांनी बआलचा पवित्र स्तंभ नष्ट केला आणि बआलच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्याचे सार्वजनिक शौचालय असा लोक आजही उपयोग करतात. \p \v 28 याप्रमाणे येहूने इस्राएलमधून बआलची उपासना नष्ट केली. \v 29 तरी देखील नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेली पातके यापासून येहू फिरला नाही—त्याने बेथेल व दान येथील वासरांच्या सोन्याच्या मूर्तीची उपासना केली. \p \v 30 याहवेह येहूला म्हणाले, “माझ्या दृष्टीने तू जे योग्य ते केले आहे आणि जे माझ्या मनात अहाबाचा घराण्याविषयी होते ते तू सर्व केले, म्हणून चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.” \v 31 परंतु येहू याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे नियम आपल्या पूर्ण अंतःकरणाने पाळण्यात काळजीपूर्वक राहिला नाही. यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेल्या पातकांपासून तो मागे फिरला नाही. \p \v 32 त्या दिवसात याहवेह इस्राएलची घट करू लागले. हजाएलने इस्राएलाच्या सर्व सीमांवर त्यांचा पराभव केला. \v 33 यार्देनच्या पूर्वेकडील भागापासून संपूर्ण गिलआद (गाद, रऊबेन आणि मनश्शेहचा भाग), आर्णोन खोर्‍याच्या जवळील अरोएरापासून गिलआद व बाशानपर्यंतचे सर्व प्रदेश जिंकले. \p \v 34 येहूच्या बाकीच्या कारकिर्दीची नोंद इस्राएलाच्या राजाचा इतिहास या ग्रंथात नमूद केली नाही काय? \p \v 35 येहू मरण पावल्यानंतर त्याला शोमरोन येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोआहाज राज्य करू लागला. \v 36 येहूने इस्राएलाचा राजा म्हणून शोमरोनात अठ्ठावीस वर्षे राज्य केले. \c 11 \s1 अथल्याह आणि योआश \p \v 1 जेव्हा अहज्याहची आई अथल्याह हिने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती राजघराण्याचा नाश करण्यास निघाली. \v 2 परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही. \v 3 अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत तो व त्याच्या दाईस याहवेहच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते. \p \v 4 सातव्या वर्षी यहोयादाने शंभर तुकड्यांचे सरदार, गारदी आणि पहारेकरी यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपल्यासोबत याहवेहच्या मंदिरात नेले. याहवहेच्या मंदिरात त्यांच्याशी करार आणि शपथ घेऊन त्यांना राजाचा पुत्र दाखविला. \v 5 त्यांना आदेश देत तो म्हणाला, “तुम्ही असे करावे: शब्बाथ दिवशी तुमच्यापैकी जे पहार्‍यावर असतील त्यातील—एकतृतीयांश राजमहालावर पहारा देतील. \v 6 आणि एकतृतीयांश सूर वेशीवर आणि एकतृतीयांश पहारेकर्‍यांच्या मागच्या वेशीवर, जे वेळोवेळी मंदिराची रक्षा करीत होते— \v 7 आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे. \v 8 तुम्ही सर्व आपआपली शस्त्रे हातात घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी तुमच्या रांगेच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.” \p \v 9 यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे शताधिपतींनी केले. प्रत्येकाने आपआपली माणसे घेतली—जे शब्बाथाच्या दिवशी सेवेला येणार होते आणि जे सेवा संपवून जात होते—ते सर्व यहोयादा याजकाजवळ आले. \v 10 याहवेहच्या मंदिरामधील दावीद राजाचे जे भाले व ढाली होत्या, त्या अधिकाऱ्यांच्या हाती दिल्या. \v 11 प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन पहारेकरी राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे राहिले. \p \v 12 मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!” \p \v 13 जेव्हा अथल्याहने पहारेकर्‍यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली. \v 14 तिने बघितले की रीतीनुसार राजा खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक आनंद करीत कर्णे वाजवित होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी रे, फितुरी!” \p \v 15 यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्‍यांना आदेश दिला: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारले जाऊ नये.” \v 16 म्हणून ती घोडे जिथून राजवाड्याच्या मैदानात प्रवेश करतात तिथे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे तिला जिवे मारण्यात आले. \p \v 17 मग यहोयादाने याहवेह आणि राजा आणि प्रजा यांच्यात एक करार केला की ते याहवेहची प्रजा असणार. त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही एक करारही केला. \v 18 देशातील सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून त्याचे तुकडे केले आणि बआलचा पुजारी मत्तानचा वेदींसमोर वध केला. \p मग यहोयादा याजकाने याहवेहच्या मंदिरावर पहारेकरी नेमले. \v 19 त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, गारदी, पहारेकरी आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि एकत्र जाऊन याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले आणि पहारेकर्‍यांच्या द्वारातून प्रवेश करीत राजवाड्यात गेले. मग राजाने राजासनावर आपले स्थान घेतले. \v 20 राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण राजवाड्यात अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता. \p \v 21 वयाच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला. \c 12 \s1 योआश मंदिराची डागडुजी करतो \p \v 1 येहूच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला आणि त्याने यरुशलेमात चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या होते; ती बेअर-शेबा येथील होती. \v 2 याजक यहोयादाने जितके वर्षे जे मार्गदर्शन केले होते तितकी वर्षे याहवेहच्या दृष्टीने योग्य ते यहोआशाने केले. \v 3 तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत. \p \v 4 यहोआश याजकांना म्हणाला, “याहवेहच्या मंदिरात पवित्र अर्पण म्हणून आणलेले सर्व पैसे, शिरगणतीत जमा केलेले पैसे, वैयक्तिक नवसातून मिळालेले पैसे आणि मंदिरात स्वेच्छेने आणलेले सर्व पैसे जमा करा. \v 5 प्रत्येक याजकाने त्याच्या खजिनदारांपैकी एकाकडून पैसे घ्यावे आणि नंतर मंदिरात जी काही मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करावी.” \p \v 6 परंतु यहोआश राजाच्या कारकिर्दीतील तेवीस वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची डागडुजी केली नव्हती. \v 7 तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजकांना बोलाविले आणि विचारले, “तुम्ही मंदिराची डागडुजी अजूनही का केली नाही? तुमच्या खजिनदारांकडून आणखी पैसे घेऊ नका, तर तो पैसा आता मंदिराच्या डागडुजीसाठी देण्यात यावा.” \v 8 मग याजकांनी सहमती दर्शविली की ते लोकांकडून आता पैसा घेणार नाही आणि तसेच ते मंदिराची डागडुजी देखील करणार नाही. \p \v 9 यहोयादा याजकाने एक पेटी घेतली व तिच्या झाकणाला एक छिद्र पाडले. ती पेटी त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वेदीच्या उजव्या बाजूला ठेवली. प्रवेशद्वाराचे पहारेकरी याजक याहवेहच्या मंदिरात आणलेले सर्व पैसे पेटीत घालू लागले. \v 10 जेव्हाही ते पाहत की पेटीमध्ये अधिक पैसा जमा झाला आहे, तेव्हा राजाचा चिटणीस आणि प्रमुख याजक येत आणि याहवेहच्या मंदिरात आलेला पैसा मोजून पिशव्यांत भरून ठेवीत असे. \v 11 रक्कम मोजून आणि तोलून झाल्यानंतर मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या माणसांना पैसे देण्यात येत असत. त्याद्वारे त्यांनी याहवेहच्या मंदिरावर काम करणारे सुतार आणि बांधकाम करणारे, \v 12 गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले. \p \v 13 जो पैसा मंदिरामध्ये आणत होते याच्यात याहवेहच्या मंदिरात वापरण्यात येणारे चांदीचे पेले, कातऱ्या, वाट्या, कर्णे किंवा सोन्या-चांदीच्या इतर साहित्य यावर खर्च करण्यात आला नाही; \v 14 तर हा पैसा कामगारांना पुरविला जात होता जे याहवेहच्या मंदिराची डागडुजी करीत होते. \v 15 ज्याच्या स्वाधीन हा पैसा कामगारांना देण्यासाठी होता त्यांच्याकडून पैशाचा हिशोब घेण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले. \v 16 त्याचप्रमाणे दोषार्पणाचा आणि पापार्पणाचा\f + \fr 12:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्धतेचे अर्पण\fqa*\f* पैसा याहवेहच्या मंदिरात आणला नाही; तो याजकांचा होता. \p \v 17 या वेळेला अरामचा राजा हजाएलाने गथ शहरावर स्वारी केली आणि ते काबीज केले. मग यरुशलेमावर स्वारी करण्यासाठी त्याने कूच केले. \v 18 तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला. \p \v 19 योआशाचा बाकीचा इतिहास, यहूदीयाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात नमूद केला नाही काय? \v 20 योआशाच्या अधिकार्‍यांनीच त्याच्याविरुद्ध कट रचला आणि सिल्लाकडे खाली जाणार्‍या रस्त्यावर बेथ मिल्लो येथे त्याचा वध केला. \v 21 ज्या अधिकार्‍यांनी त्याचा वध केला ते शिमाथाचा पुत्र योजाखार व शोमेराचा पुत्र यहोजाबाद हे होते. तो मरण पावला आणि त्याला दावीदनगरीत पूर्वजांच्या सोबत मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र अमस्याह हा त्याच्या जागी राजा झाला. \c 13 \s1 इस्राएलाचा राजा यहोआहाज \p \v 1 यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र योआशच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनमध्ये इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सतरा वर्षे राज्य केले. \v 2 पण त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलांकडून जी पातके करविली ती त्याने अनुसरली आणि त्यापासून तो मागे फिरला नाही. \v 3 त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले. \p \v 4 तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले. \v 5 याहवेहने इस्राएली लोकांना सोडविणारा पाठविला आणि त्यांची अरामी लोकांपासून सुटका झाली. त्यानंतर इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपआपल्या घरात राहू लागले. \v 6 परंतु ते यरोबोअमाच्या घराण्याच्या पातकांपासून मागे फिरले नाहीत; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती. शोमरोनात अशेरा मूर्तीचे स्तंभ देखील उभे होते. \p \v 7 यहोआहाजाकडे पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजार पायदळ याशिवाय काही शिल्लक राहिले नाही, कारण अरामी राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा पायांखालील धुळीच्या कणांप्रमाणे संहार केला होता. \p \v 8 यहोआहाजाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने जे सर्व केले आणि त्याचे पराक्रम इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केलेले नाहीत काय? \v 9 यहोआहाज आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला शोमरोनात मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र योआश त्याच्या जागी राज्य करू लागला. \s1 इस्राएलाचा राजा यहोआश \p \v 10 यहूदीयाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या सदतिसाव्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र योआश शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सोळा वर्षे राज्य केले. \v 11 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पातकांपासून मागे फिरला नाही; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती, ती तो करत राहिला. \p \v 12 योआशाच्या कारकिर्दीचा बाकीचा इतिहास आणि यहूदीयाचा राजा अमस्याह याच्याबरोबर झालेले त्याचे युद्ध व त्याचे पराक्रम यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहास या ग्रंथात केला नाही काय? \v 13 योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली. \p \v 14 आता अलीशा ज्या आजाराने मरणार होता त्या आजाराने तो ग्रस्त झाला. इस्राएलाचा राजा योआश त्याला भेटावयाला खाली आला आणि त्याच्यासाठी रडला. तो रडत म्हणाला, “माझ्या पित्या! माझ्या पित्या! तुम्ही इस्राएलचे रथ आणि त्याचे स्वार!” \p \v 15 अलीशा म्हणाला, “एक धनुष्य व काही बाण घे.” आणि त्याने तसेच केले. \v 16 “आपल्या हातात धनुष्य घे,” तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला. जेव्हा त्याने ते आपल्या हातात घेतले, तेव्हा अलीशाने आपला हात राजाच्या हातावर ठेवला. \p \v 17 “पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.” \p \v 18 नंतर त्याने म्हटले, “बाण घे,” आणि राजाने बाण घेतले. अलीशा इस्राएलच्या राजाला म्हणाला, “ते बाण जमिनीवर मार.” त्याने ते बाण तीन वेळा जमिनीवर मारले आणि थांबला. \v 19 परमेश्वराचा मनुष्य त्याच्यावर रागावला आणि म्हणाला, “तू पाच किंवा सहा बाण जमिनीवर सोडावयास हवे होतेस; तेव्हा तू अरामचा पराभव आणि पूर्ण नाश केला असतास. परंतु आता तू फक्त तीन वेळाच त्यांचा पराभव करशील.” \p \v 20 अलीशा मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली. \p मोआबातील लुटारूंच्या टोळ्या प्रत्येक वसंतॠतूत देशावर हल्ला करीत असत. \v 21 एके दिवशी काही इस्राएली लोक एका व्यक्तीला मूठमाती देत असताना त्यांनी लुटारूंची टोळी पाहिली; म्हणून त्यांनी त्या मनुष्याचा मृतदेह अलीशाच्या कबरेत लोटून दिला. त्या मृत शरीराला अलीशाच्या अस्थींचा स्पर्श होताच, तो मृत मनुष्य जिवंत झाला आणि आपल्या पायांवर उभा राहिला. \p \v 22 यहोआहाज राजाच्या संपूर्ण कारकिर्दीत अरामचा राजा हजाएल इस्राएली लोकांचा छळ करीत राहिला. \v 23 परंतु याहवेहची कृपा इस्राएली लोकांवर होती आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या करारामुळे त्यांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांची काळजी घेतली. आजपर्यंत त्यांचा नाश करण्याची किंवा त्यांना त्यांच्या उपस्थितीतून घालवून देण्याची त्यांची इच्छा नव्हती. \p \v 24 अरामचा राजा हजाएल मरण पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या जागी राज्य करू लागला. \v 25 मग यहोआहाजचा पुत्र यहोआशने हजाएलचा पुत्र बेन-हदादच्या हातून त्याचा पिता यहोआहाजशी केलेल्या युद्धात घेतलेली नगरे परत हस्तगत केली. योआशाने त्याचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलाची नगरे परत घेतली. \c 14 \s1 यहूदीयाचा राजा अमस्याह \p \v 1 यहोआहाजचा पुत्र इस्राएलाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह राज्य करू लागला. \v 2 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती. \v 3 त्याने याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले, परंतु त्याचा पिता दावीदासारखे नव्हे. त्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा पिता योआशचे अनुकरण केले. \v 4 तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत. \p \v 5 राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला. \v 6 परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, कारण नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.” \p \v 7 त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते. \p \v 8 मग अमस्याहने इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाजचा पुत्र यहोआशला दूतांच्या द्वारे संदेश पाठवून असे आव्हान केले, “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.” \p \v 9 परंतु इस्राएलचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अमस्याहला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले. \v 10 खचितच तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि त्यामुळे तू उन्मत्त झाला आहेस. त्याचे गौरव करीत तू घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश का करावा?” \p \v 11 परंतु अमस्याहने ऐकले नाही, तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. त्याने आणि यहूदीयाच्या राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला. \v 12 इस्राएलने यहूदाहचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले. \v 13 इस्राएलाचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र, योआशाचा पुत्र अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआश यरुशलेमास गेला आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब\f + \fr 14:13 \fr*\ft अंदाजे 180 मीटर\ft*\f* होती. \v 14 याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या तिजोरीतून सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, त्याने कैद्यांना सुद्धा घेतले आणि तो शोमरोनास परतला. \p \v 15 यहोआशाचा बाकीचा इतिहास, त्याने काय केले आणि त्याचे पराक्रम, तसेच यहूदीयाच्या अमस्याह राजाबरोबर झालेले त्याचे युद्ध यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेली नाही काय? \v 16 यहोआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला इस्राएली राजांसोबत शोमरोनात मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र यरोबोअम हा त्याच्या जागी राज्य करू लागला. \p \v 17 इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र यहोआशच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह पंधरा वर्षे जगला. \v 18 अमस्याहाच्या राज्यकाळातील इतर घटना, यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय? \p \v 19 त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले. \v 20 त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यरुशलेममध्ये दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले. \p \v 21 मग यहूदीयाच्या सर्व लोकांनी अजर्‍याह\f + \fr 14:21 \fr*\fq अजर्‍याह \fq*\ft त्याचे दुसरे नाव \ft*\fqa उज्जीयाह\fqa*\f* ला घेतले, जो सोळा वर्षाचा होता आणि त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा केले. \v 22 राजा अमस्याह आपल्या पूर्वजांना मिळाल्यानंतर अजर्‍याहाने एलाथ नगर पुन्हा वसविले व ते यहूदीयाला जोडले. \s1 इस्राएलाचा राजा दुसरा यराबास याची कारकीर्द \p \v 23 यहूदीयाचा राजा योआशाचा पुत्र अमस्याहच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा योआशचा पुत्र यरोबोअम शोमरोनात राज्य करू लागला आणि त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले. \v 24 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही. \v 25 त्याने इस्राएलाची सीमा लेबो हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत\f + \fr 14:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa मृत समुद्र\fqa*\f* पुनः स्थापित केली. याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे गथ-हेफेर येथील संदेष्टा अमित्तयाचा पुत्र योनाहद्वारे हे भविष्य केले होते. \p \v 26 इस्राएलातील प्रत्येकजण, मग तो गुलाम असो वा स्वतंत्र असो, त्यांचा फार छळ\f + \fr 14:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa ते कष्टात होते कारण त्यांना पुढारी नव्हता\fqa*\f* होत आहे हे याहवेहने पाहिले; त्यांना साहाय्य करणारे कोणीही नव्हते. \v 27 आणि इस्राएलचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकीन असे याहवेहने कधीच म्हटले नाही, मग याहवेहने योआशाचा पुत्र यरोबोअमद्वारे त्यांची सुटका केली. \p \v 28 यरोबोअमचे बाकीचे जीवनचरित्र, त्याने केलेली कृत्ये, त्याचे थोर सामर्थ्य, त्याचे युद्ध आणि त्याने पूर्वी यहूदीयाने काबीज केलेले दिमिष्क व हमाथ परत कसे मिळविले या सर्व हकिकतीचे वर्णन, इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवले नाही काय? \v 29 यरोबोअम त्याचे पूर्वज इस्राएली राजांना मिळाला. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र जखर्‍याह त्याच्या जागी इस्राएलावर राज्य करू लागला. \c 15 \s1 अजर्‍याह यहूदाचा राजा \p \v 1 इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्‍याह राज्य करू लागला. \v 2 तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती. \v 3 त्याने त्याचा पिता अमस्याहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. \v 4 तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत. \p \v 5 याहवेहने राजाला पीडले आणि तो मरेपर्यंत त्याला कुष्ठरोग होता. तो वेगळ्या घरात\f + \fr 15:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa जिथून तो आपली जबाबदाऱ्या पार पाडत होता\fqa*\f* राहिला. राजाचा पुत्र योथामाकडे राजवाड्याचा कारभार होता आणि तो देशाच्या जनतेवर शासन करीत असे. \p \v 6 अजर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय? \v 7 अजर्‍याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला. \s1 जखर्‍याह इस्राएलाचा राजा \p \v 8 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्‍याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले. \v 9 आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही. \p \v 10 याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्‍याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. \v 11 जखर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय? \v 12 याहवेहने येहूला दिलेले वचन पूर्ण झाले: “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.” \s1 शल्लूम इस्राएलचा राजा \p \v 13 यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या एकोणचाळिसाव्या वर्षी याबेशाचा पुत्र शल्लूम इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले. \v 14 नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. \p \v 15 शल्लूम राजाच्या इतर घटना आणि त्याने केलेला कट यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात केलेली नाही काय? \p \v 16 त्यावेळी, तिरजाहपासून निघालेल्या मनाहेमाने तिफसाह आणि शहरातील आणि सीमेच्या क्षेत्रातील सर्वांवर हल्ला केला, कारण त्यांनी आपली वेस उघडण्यास नकार दिला. त्याने त्यांना मार दिला आणि सर्व गरोदर महिलांना चिरून टाकले. \s1 मनाहेम इस्राएलचा राजा \p \v 17 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी गादीचा पुत्र मनाहेम हा इस्राएलाचा राजा झाला, त्याने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले. \v 18 याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली, त्या पातकांपासून तो मागे फिरला नाही. \p \v 19 तेव्हा अश्शूरचा राजा पूल\f + \fr 15:19 \fr*\ft दुसरे नाव \ft*\fqa तिग्लथ-पिलेसर\fqa*\f* ने देशावर हल्ला केला आणि मनाहेमने त्याचा पाठिंबा मिळावा आणि आपले राज्य स्थिर व्हावे यासाठी त्याला चांदीचे हजार तालांत\f + \fr 15:19 \fr*\ft अंदाजे 34 मेट्रिक टन\ft*\f* दिले. \v 20 मनाहेमाने हा पैसा इस्राएलमधून वसूल केला. अश्शूरच्या राजाला द्यायला प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने पन्नास चांदीचे शेकेल\f + \fr 15:20 \fr*\ft अंदाजे 575 ग्रॅ.\ft*\f* द्यायचे होते. मग अश्शूरचा राजा मागे फिरला आणि देशात राहिला नाही. \p \v 21 मनाहेमाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले हे इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात नमूद करून ठेवलेले नाही काय? \v 22 मनाहेम आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र पेकाहियाह हा राज्य करू लागला. \s1 इस्राएली राजा पेकाहियाह \p \v 23 यहूदीयाचा राजा अजर्‍याहाच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी मनाहेमचा पुत्र पेकाहियाह शोमरोनात इस्राएलवर राज्य करू लागला, त्याने दोन वर्षे राज्य केले. \v 24 पेकाहियाहने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली होती, तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही. \v 25 त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला. \p \v 26 पेकाहियाह राजाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात लिहून ठेवलेले नाही काय? \s1 पेकह इस्राएलाचा राजा \p \v 27 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या बावन्नाव्या वर्षी रमाल्याहचा पुत्र पेकह शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने वीस वर्ष राज्य केले. \v 28 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही. \p \v 29 इस्राएलचा राजा पेकहा याच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर\f + \fr 15:29 \fr*\fq तिग्लथ-पिलेसर \fq*\ft याला \ft*\fqa तिग्लथ-पिल्नेसर \fqa*\ft म्हणूनही ओळखले जाते\ft*\f* याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग त्याने जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले. \v 30 नंतर एलाहचा पुत्र होशेने रमाल्याहचा पुत्र पेकहाच्या विरुद्ध कट रचला. त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले व त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. ही घटना उज्जीयाहचा पुत्र योथामाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी घडली. \p \v 31 पेकहच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले ते इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय? \s1 यहूदाचा राजा योथाम \p \v 32 इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह याच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा उज्जीयाह याचा पुत्र योथाम राज्य करू लागला. \v 33 तो पंचवीस वर्षांचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती. \v 34 आपल्या पिता उज्जीयाह प्रमाणे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले, \v 35 तथापि उच्च स्थाने काढली गेली नव्हती; लोकांनी त्यांची अर्पणे व धूप जाळणे सुरूच ठेवले. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला. \p \v 36 योथामाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? \v 37 (त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.) \v 38 योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ, त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र आहाज राजा झाला. \c 16 \s1 यहूदाचा राजा आहाज \p \v 1 इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदीयाचा राजा योथामचा पुत्र आहाज राज्य करू लागला. \v 2 वयाच्या विसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे वडील दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही. \v 3 त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि आपल्या पुत्राचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला. \v 4 त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला. \p \v 5 मग अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह यांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि आहाजाला वेढा दिला, परंतु ते त्याच्यावर विजय प्राप्त करू शकले नाहीत. \v 6 त्यावेळी अरामचा राजा रसीनने एलाथ हे शहर जिंकून घेतले आणि त्याने यहूद्यांना हुसकावून लावले. ते अरामात सामील केले. त्या शहरातून व एदोमी लोकांनी येऊन एलाथ येथे वस्ती केली आणि आजही अरामी लोक तिथे राहत आहेत. \p \v 7 आहाज राजाने अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसरकडे आपले दूत पाठवून त्याला संदेश दिला, “मी तुमचा दास आणि पुत्र आहे. वर येऊन अरामी राजा आणि इस्राएली राजा यांच्यापासून माझा बचाव करा, ज्यांनी माझ्यावर आक्रमण केले आहे.” \v 8 आणि आहाजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील भांडारांतील चांदी आणि सोने घेतले आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या. \v 9 अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले. \p \v 10 मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला. \v 11 आहाज राजाने दिमिष्क येथून पाठविलेल्या सर्व आराखड्यानुसार उरीयाह याजकाने एक वेदी बांधली आणि राजा आहाज परत येण्यापूर्वी ती पूर्ण केली. \v 12 जेव्हा राजा दिमिष्क येथून परत आला आणि त्याने वेदी पाहिली, तो वेदीजवळ गेला आणि त्यावर त्याने अर्पण सादर केले. \v 13 त्याने वेदीवर त्याचे होमार्पण आणि अन्नार्पण अर्पण केले, त्याने आपले पेयार्पण अर्पण ओतले, आणि शांत्यर्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले. \v 14 मग त्याने कास्य वेदी जी याहवेहच्या समोर होती, ती त्याने मंदिराच्या पुढून आणली—नवीन वेदी आणि याहवेहच्या मंदिराच्या मधून आणली—आणि नवीन वेदीच्या उत्तरेस ठेवली. \p \v 15 मग आहाज राजाने उरीयाह याजकाला हे आदेश दिले: “या नव्या मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, राजाची होमार्पण, अन्नार्पण आणि देशातील सर्व लोकांची होमार्पण, आणि त्यांची पेयार्पण ही अर्पण करीत जा. होमार्पणाचे सर्व रक्त आणि यज्ञाचे सर्व रक्त या वेदीवर शिंपडावे. कास्याची जुनी वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.” \v 16 आहाज राजाने आदेश दिल्याप्रमाणे उरीयाह याजकाने केले. \p \v 17 आहाज राजाने बैठकीवरचे नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावरील पाण्याची टाकी आणि त्यांचे आधार काढून टाकले. कास्याच्या बैलांच्या पाठीवर बसविलेले हौदही त्याने काढले आणि ते दगडाच्या ओट्यावर ठेवले. \v 18 अश्शूरच्या राजामुळे त्याने शब्बाथ दिवशी वापरल्या जाणाऱ्या याहवेहच्या मंदिरातील द्वारमंडप\f + \fr 16:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa सिंहासनाचे व्यासपीठ\fqa*\f* आणि राजासाठी बाहेरचा दरवाजा काढून टाकला. \p \v 19 आहाजाच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? \v 20 आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. त्याचा पुत्र हिज्कीयाह वारस म्हणून राजा झाला. \c 17 \s1 इस्राएलाचा शेवटचा राजा होशे \p \v 1 यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले. \v 2 त्याने याहवेहच्या दृष्टीत वाईट ते केले, परंतु त्याच्यापूर्वी जे इस्राएलचे राजा होऊन गेले त्यांच्याइतके केले नाही. \p \v 3 अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला. \v 4 परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो\f + \fr 17:4 \fr*\fq सो \fq*\ft किंवा \ft*\fqa ओसोक्रोन नावाचे संक्षिप्त रूप\fqa*\f* याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले. \v 5 आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला. \v 6 होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले. \s1 इस्राएल पापांमुळे बंदिवासात जाते \p \v 7 हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली \v 8 आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले. \v 9 इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली. \v 10 त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले. \v 11 ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली. \v 12 याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली. \v 13 याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.” \p \v 14 परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले, \v 15 त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले. \p \v 16 त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली. \v 17 त्यांनी आपल्या पुत्रकन्यांचे अग्नीत अर्पण केले. ज्योतिष्यांचा सल्ला घेतला. शकुनविद्येचा उपयोग केला व याहवेहच्या दृष्टीने जे वाईट त्याकरिता त्यांनी स्वतःला विकून त्यांचा क्रोध आपल्यावर भडकविला. \p \v 18 म्हणून याहवेह इस्राएलावर फार संतापले आणि त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले. फक्त यहूदाहचे गोत्र तेवढेच राहिले, \v 19 परंतु यहूदीयानेही याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी इस्राएलींनी सुरू केलेल्या पद्धतींचे पालन केले. \v 20 यामुळे याहवेहने सर्व इस्राएली लोकांचा त्याग केला; त्यांनी त्यांना पीडा देऊन लुटणार्‍यांच्या हाती दिले व आपल्या उपस्थितीतून काढून टाकले. \p \v 21 जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराबामास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले. \v 22 इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही, \v 23 जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे. \s1 शोमरोनात पुनर्वसन झाले \p \v 24 मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले. \v 25 जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले. \v 26 अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.” \p \v 27 तेव्हा अश्शूरच्या राजाने हे फर्मान काढले: “शोमरोनामधून बंदिवान करून आणलेल्या याजकांपैकी एका याजकाला तिथे पाठवा, जेणेकरून तो तिथे राहील आणि लोकांना त्या देशातील देवाला काय हवे ते शिकविल.” \v 28 म्हणून शोमरोनातून बंदिवासात पाठविलेला एक याजक बेथेल येथे राहायला आला आणि त्याने त्यांना याहवेहची उपासना कशी करावी हे शिकविले. \p \v 29 तरीसुद्धा, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपले दैवत बनविले, आणि शोमरोनी लोकांनी बांधलेल्या उच्चस्थानी त्यांची स्थापना केली, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपल्या नगरात असेच केले. \v 30 बाबेलमधील लोकांनी सुक्कोथ-बनोथ मूर्ती केली. कूथमधील लोकांनी नेरगल केला व हमाथातील लोकांनी अशीमा केली; \v 31 अव्वी लोकांनी निभज व तर्ताक केले आणि सफरवी लोकांनी तर अद्राम्मेलेक व अनम्मेलेक या आपल्या दैवतांच्या वेद्यांवर आपल्या मुलामुलींचे अग्नीत बळी दिले. \v 32 त्यांनी याहवेहची उपासना केली, परंतु त्यांनी त्यांच्या लोकांची उच्च स्थानावरील मंदिरांमध्ये याजक म्हणून नियुक्त केले. \v 33 ते याहवेहची उपासना करीत असले, तरी ज्या देशातून ते आले होते, त्या देशाच्या चालीरीतींप्रमाणे ते आपल्या स्वतःच्या दैवतांची उपासना करीत असत. \p \v 34 ते आजवर याहवेहची उपासना करीत नाही किंवा याहवेहने ज्यांचे नाव इस्राएल असे ठेवले त्या याकोबाच्या वंशजांना जे विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा दिल्या त्याचे ते पालन करत नाहीत. \v 35 जेव्हा याहवेहने इस्राएली लोकांसोबत करार केला, तेव्हा त्यांनी त्यांना आज्ञा केली: “इतर दैवतांची उपासना करू नका किंवा त्यांना नमन करू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांना यज्ञार्पणे करू नका. \v 36 परंतु ज्या याहवेहने आपल्या अलौकिक सामर्थ्याने आणि वाढविलेल्या भुजांनी इजिप्तमधून त्यांना बाहेर आणले होते केवळ त्याच याहवेहची तुम्ही उपासना करावी. त्यांनाच तुम्ही नमन करावे आणि त्यांनाच यज्ञार्पणे अर्पण करावी. \v 37 त्यांनी लिहून दिलेल्या विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा यांचे तुम्ही खात्रीने नेहमी काळजीपूर्वक पालन करावे. इतर दैवतांची उपासना करू नका. \v 38 मी तुमच्याशी केलेला करार विसरू नका आणि इतर दैवतांची उपासना करू नका. \v 39 तुम्ही फक्त याहवेह तुमच्या परमेश्वराचीच उपासना करावी; तेव्हा ते तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवितील.” \p \v 40 त्यांनी याहवेहचे ऐकले नाही, परंतु त्यांच्या आधीच्या रीतींना ते चिकटून राहिले. \v 41 हे लोक याहवेहची उपासना करीत असतानाही ते त्यांच्या मूर्तीची सेवा करीत होते. आजवर त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्या पूर्वजांनी केले तसेच करीत आहेत. \c 18 \s1 यहूदीयाचा राजा हिज्कीयाह \p \v 1 इस्राएलचा राजा, एलाहचा पुत्र होशेच्या तिसर्‍या वर्षी, यहूदीयाचा राजा आहाजाचा पुत्र हिज्कीयाह राज्य करू लागला. \v 2 हिज्कीयाह पंचवीस वर्षाचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह,\f + \fr 18:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa अबी\fqa*\f* ती जखर्‍याहची कन्या होती. \v 3 त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. \v 4 त्याने उच्च स्थाने काढून टाकली, पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्याने मोशेने तयार केलेला कास्याच्या सापाचे तुकडे केले, कारण तोपर्यंत इस्राएली लोक त्याच्यापुढे धूप जाळत होते. (त्याला नहुशतान\f + \fr 18:4 \fr*\fq नहुशतान \fq*\ft कास्याचा साप\ft*\f* असे म्हणत होते.) \p \v 5 हिज्कीयाहचा याहवेह इस्राएलांच्या परमेश्वरावर भरवसा होता. म्हणून यहूदीयाच्या सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर झाला नाही. \v 6 तो याहवेहला धरून राहिला आणि त्यांचे अनुसरण करण्यापासून मागे फिरला नाही; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे तो पालन करीत राहिला. \v 7 आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही. \v 8 त्याने गाझा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ट्यांना पराभूत केले, त्याने पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले. \p \v 9 हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला. \v 10 तिसर्‍या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले. \v 11 मग अश्शूरच्या राजाने इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये नेले व त्यांना हलह येथे, गोजानातील हाबोर नदीकिनारी व मेदिया लोकांच्या नगरात ठेवले. \v 12 हे अशासाठी झाले कारण त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराची आज्ञा पाळली नाही व त्यांचा करार मोडला; याहवेहचा सेवक मोशेने जे सर्व आज्ञापिले होते, ते त्यांनी ऐकले नाही किंवा त्याचे पालन केले नाही. \p \v 13 हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली \v 14 म्हणून यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने लाखीश येथे अश्शूरच्या राजाला हा संदेश पाठविला: “माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यापासून परत जा, आणि तुम्ही जी काही खंडणी मागाल ती मी देईल.” अश्शूरच्या राजाने तडजोडीसाठी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहकडून चांदीचे तीनशे तालांत\f + \fr 18:14 \fr*\ft अंदाजे 10 मेट्रिक टन\ft*\f* आणि सोन्याचे तीस तालांत\f + \fr 18:14 \fr*\ft अंदाजे 1 मेट्रिक टन\ft*\f* यांची मागणी केली. \v 15 तेव्हा हिज्कीयाह राजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील तिजोरीत असलेली सर्व चांदी त्याला दिली. \p \v 16 यावेळी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिराची दारे व खांबावर मढविलेले सोने काढले व ते अश्शूरच्या राजाला दिले. \s1 सन्हेरीबची यरुशलेमला धमकी \p \v 17 अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले. \v 18 त्यांनी राजाला बोलाविले; तेव्हा त्याच्या राजवाड्याचा कारभारी एल्याकीम जो हिल्कियाहचा पुत्र, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र होता हे त्याच्याकडे गेले. \p \v 19 तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: \pm “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस? \v 20 तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस? \v 21 पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते. \v 22 पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही यरुशलेममधील याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय”? \pm \v 23 “ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: तुमच्याकडे दोन हजार घोडेस्वार जरी असले तरी मी तुला दोन हजार घोडे देईन! \v 24 रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार? \v 25 शिवाय, मी याहवेहशिवाय या ठिकाणावर हल्ला करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलो आहे काय? याहवेहने स्वतःच मला या देशावर हल्ला करण्यास आणि त्याचा नाश करण्यास सांगितले आहे.’ ” \p \v 26 तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम, शेबना आणि योवाह हे सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.” \p \v 27 परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगावयास पाठविले होते, ते काय फक्त तुमच्या धन्याला आणि तुम्हाला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुमच्यासारखीच स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?” \p \v 28 मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरच्या राजाचे ऐका! \v 29 राजा असे म्हणतात: हिज्कीयाहस तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही. \v 30 ‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवतील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ असे म्हणून हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका. \p \v 31 “हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे राजा असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल, \v 32 जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या, जैतून तेलाची झाडे आणि मधाच्या देशात नेत नाही तोपर्यंत. जीवन निवडा, मृत्यू नव्हे! \p “हिज्कीयाहचे ऐकू नका, कारण ‘याहवेह आम्हाला सोडवतील’ असे सांगून तो तुमची दिशाभूल करीत आहे. \v 33 कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय? \v 34 हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाहची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय? \v 35 या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्याच्या देशाला माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?” \p \v 36 परंतु लोक गप्प राहिले आणि उत्तर देण्यासाठी काहीच बोलले नाहीत, कारण राजाने आज्ञा केली होती, “त्याला उत्तर देऊ नका.” \p \v 37 यानंतर हिल्कियाहचा पुत्र राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले. \c 19 \s1 यरुशलेमच्या सुटकेची भविष्यवाणी \p \v 1 जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला. \v 2 त्याने राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडील याजक यांना गोणपाट नेसून आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याकडे पाठविले. \v 3 ते त्याला म्हणाले, “हिज्कीयाह असे म्हणतो: आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमानाचा दिवस आहे, कारण लेकरे होण्याची वेळ आली परंतु ते प्रसवण्याची शक्ती नाही. \v 4 कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे सर्व शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” \p \v 5 जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले, \v 6 यशायाह त्यांना म्हणाला, “तुमच्या धन्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: तुम्ही जे ऐकले आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका—त्या शब्दांनी अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी माझी निंदा केली आहे. \v 7 ऐका! जेव्हा तो एक ठराविक अहवाल ऐकेल, तेव्हा मी त्याला त्याच्या स्वतःच्या देशात परत जाण्याची इच्छा व्हावी असे करेन आणि तिथे तो तलवारीने वधला जाईल असे मी करेन.’ ” \p \v 8 जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला. \p \v 9 आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्याच्या तयारीत आहे. म्हणून त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले: \v 10 “यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणून तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका. \v 11 अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्रांचा नाश कसा केला, हे तुम्ही ऐकलेच आहे. मग तुमची सुटका होईल काय? \v 12 माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय? \v 13 हमाथ नगरीचा राजा किंवा अर्पादचा राजा हे कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाह यांचे राजे कुठे आहेत?” \s1 हिज्कीयाहची प्रार्थना \p \v 14 हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले. \v 15 आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: “अहो याहवेह इस्राएलांचे परमेश्वर, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे. \v 16 हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे शब्द ऐका. \p \v 17 “हे याहवेह, हे खरे आहे की अश्शूरच्या राजांनी या राष्ट्रांचा आणि त्यांच्या भूमीचा नाश केला आहे. \v 18 आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते. \v 19 आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवा, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.” \s1 सन्हेरीबाच्या पतनाची भविष्यवाणी \p \v 20 मग आमोजाचा पुत्र यशायाहने हिज्कीयाह राजाला हा संदेश पाठविला: “इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात: अश्शूरचा राजा सन्हेरीबविषयीची तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. \v 21 त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: \q1 “सीयोनाची कुमारी कन्या \q2 तुझा उपहास आणि तिरस्कार करते. \q1 यरुशलेम कन्या \q2 तुझे पलायन बघून आपले डोके हालविते. \q1 \v 22 तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? \q2 तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास \q1 व गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? \q2 इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस! \q1 \v 23 तुझे दूत पाठवून \q2 तू प्रभूची चेष्टा केली. \q1 आणि तू म्हणतोस, \q2 ‘मी माझ्या अनेक रथांनी \q1 उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, \q2 लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. \q1 मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, \q2 निवडक गंधसरू तोडले. \q1 मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो \q2 तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो. \q1 \v 24 अनेक परकीय देशात मी विहिरी खणल्या \q2 आणि तेथील पाणी प्यालो. \q1 माझ्या पावलाच्या तळव्याने \q2 मी मिसरचे सर्व झरे आटवून टाकले.’ ” \b \q1 \v 25 “ ‘हे तू ऐकले नव्हते काय? \q2 याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. \q1 या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; \q2 आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, \q1 जी तटबंदीची शहरे तू \q2 उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास. \q1 \v 26 त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली, \q2 ते निराश व लज्जित झालेले आहेत. \q1 ते शेतातील पिकासारखे, \q2 कोवळी पाने आलेल्या रोपासारखे, \q1 छतावर उगविलेल्या गवतासारखे, \q2 पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते. \b \q1 \v 27 “ ‘परंतु मी जाणतो तू कुठे आहेस \q2 तू कधी जातो व येतो \q2 आणि तू माझ्यावर कसा संतापतोस. \q1 \v 28 कारण तू माझ्यावर संतापतो \q2 व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, \q1 मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन \q2 व तुझ्या तोंडात लगाम घालेन \q1 आणि मग तू आलास त्याच वाटेने \q2 तुझ्याच देशात तुला परत नेईन.’ \p \v 29 “हिज्कीयाह, तुझ्यासाठी हे चिन्ह असेल: \q1 “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, \q2 तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. \q1 परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, \q2 द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल. \q1 \v 30 पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक \q2 जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल. \q1 \v 31 यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, \q2 सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. \q1 सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने \q2 हे सर्व घडून येईल. \b \p \v 32 “म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: \q1 “ ‘तो या शहरात प्रवेश करणार नाही \q2 किंवा एखादा बाणही सोडणार नाही. \q1 तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही \q2 किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही. \q1 \v 33 ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; \q2 तो या शहरात प्रवेश करणार नाही, \q2 असे याहवेह घोषित करतात. \q1 \v 34 माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीदाच्या स्मरणार्थ, \q2 मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!’ ” \p \v 35 त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तर त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती. \v 36 म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला. \p \v 37 एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला. \c 20 \p \v 1 त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझ्या घराची आवराआवर कर, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.” \p \v 2 हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली, \v 3 “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला. \p \v 4 यशायाह नगरीच्या राजवाड्याच्या आवाराबाहेर जाण्यापूर्वीच याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: \v 5 “परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्‍या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन. \v 6 आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. माझ्या नावाच्या गौरवासाठी व माझा सेवक दावीदासाठी मी या शहराचे रक्षण करेन.’ ” \p \v 7 तेव्हा यशायाहने म्हटले, “अंजिराचा लेप तयार करा.” त्यांनी तसे केले आणि त्याच्या गळवावर लावला आणि तो बरा झाला. \p \v 8 हिज्कीयाहने यशायाहास विचारले, “याहवेह मला बरे करतील व मी आजपासून तीन दिवसांनी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?” \p \v 9 यशायाहने उत्तर दिले, “याहवेहचे हे चिन्ह तुझ्यासाठी आहे, जे अभिवचन याहवेहने दिले आहे त्याप्रमाणे ते करतील: तू सांग, सावली दहा पावले पुढे जावी कि दहा पावले मागे जावी?” \p \v 10 हिज्कीयाह म्हणाला, “सावली पुढेच जात असते ही साधारण गोष्ट आहे, तेव्हा ती मागे जावी असे करा!” \p \v 11 मग यशायाह संदेष्ट्याने याहवेहला हाक मारली, आणि याहवेहने आहाजाच्या सूर्य घड्याळावर सावली दहा पावले मागे सरकविली. \s1 बाबिलोनचे राजदूत \p \v 12 त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादाना\f + \fr 20:12 \fr*\ft इतर हस्तलिखितांमध्ये \ft*\fqa बरोदाख-बलादान\fqa*\f* ने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजाराबद्दल ऐकले होते. \v 13 हिज्कीयाहने राजदूतांचे स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते सर्व दाखविले—चांदी, सोने, मसाले, आणि उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते. \p \v 14 तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” \p हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून आले आहेत.” \p \v 15 संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” \p हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.” \p \v 16 तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “याहवेहचे वचन ऐका: \v 17 अशी वेळ निश्चितच येईल जेव्हा तुमच्या राजवाड्यामधील सर्वकाही आणि तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलला नेले जाईल. काहीही सोडले जाणार नाही, असे याहवेह म्हणतात. \v 18 आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.” \p \v 19 हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभरात शांती आणि सुरक्षितता नसणार काय?” \p \v 20 हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना, त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल आणि त्याने तळी व पाट खणून शहरात पाणी कसे आणले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केल्या नाहीत काय? \v 21 हिज्कीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला. \c 21 \s1 यहूदीयाचा राजा मनश्शेह \p \v 1 वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबाह होते. \v 2 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले. \v 3 त्याचे वडील हिज्कीयाहने नष्ट केलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; इस्राएलचा राजा अहाबने केल्याप्रमाणे त्यानेही बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली. \v 4 त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्याबद्धल याहवेहने म्हटले होते, “मी यरुशलेमात माझे नाव ठेवेन.” \v 5 याहवेहच्या मंदिराच्या दोन अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या. \v 6 त्याने आपल्याच पुत्राचे अग्नीत अर्पण केले, जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट तसे पुष्कळ काही करून याहवेहचा राग पेटविला. \p \v 7 त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन. \v 8 जर ते केवळ माझा सेवक मोशेने दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांचे पाय भटकू देणार नाही.” \v 9 परंतु लोकांनी ऐकले नाही. मनश्शेहने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणून त्यांनी ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता अशा राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला. \p \v 10 त्यावेळी याहवेहने आपले सेवक संदेष्ट्यांद्वारे म्हटले होते: \v 11 “यहूदीयाचा राजा मनश्शेह यानेही अमंगळ कृत्ये केली आहेत. एवढेच नाही, त्याने त्याच्या आधीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्ट कर्मे केली आहेत आणि त्याने यहूदी लोकांना आपल्या मूर्तींसाठी तेच पाप करण्यास लावले. \v 12 म्हणून याहवेह इस्राएलांचे परमेश्वर म्हणतात: पाहा, मी यरुशलेम व यहूदीया यांच्यावर असे भयंकर संकट आणेन की, त्याबद्दल जे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील. \v 13 मी यरुशलेमावर शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा ताणीन. जसा कोणी भांडे पुसून पालथे करून ठेवतो तसेच मी यरुशलेमाचे करेन. \v 14 मी माझ्या वतनातील उर्वरित लोकांना नाकारीन आणि त्यांना शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि ते त्यांचे भक्ष्य असे होतील; \v 15 त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केले आहे आणि माझा क्रोध भडकविला आहे.” \p \v 16 शिवाय, मनश्शेहने इतके निष्पाप रक्त सांडले की यरुशलेम पूर्ण रक्ताने भरून गेले—त्याने यहूदाहला जे पाप करावयाला लावले होते त्या शिवाय त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. \p \v 17 मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले आणि त्याने जे पाप केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिल्या नाहीत काय? \v 18 मनश्शेह आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला त्याच्या राजवाड्याच्या बागेत, उज्जाच्या बागेत पुरण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या पुत्र आमोन राज्य करू लागला. \s1 आमोन यहूदीयाचा राजा \p \v 19 वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव मेशुल्लेमेथ असे होते, ती यटबाह हारूसची कन्या होती. \v 20 त्याने आपला पिता मनश्शेहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \v 21 त्याचा पिता ज्या मार्गात चालला त्याचे त्याने पूर्णतः पालन केले, ज्या मूर्तीची उपासना त्याचा पिता करीत असे, त्याच मूर्तीची त्यानेही उपासना केली आणि त्यांना नमन केले. \v 22 त्याने याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराला सोडले आणि त्यांच्या मार्गात चालला नाही. \p \v 23 आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाची त्याच्या राजवाड्यात हत्या केली. \v 24 तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाहला त्याच्या जागेवर राजा केले. \p \v 25 आमोनाच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, हे यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय? \v 26 उज्जाच्या बागेत त्याला त्याच्याच कबरेत मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र योशीयाह राजा झाला. \c 22 \s1 नियमशास्त्राचे पुस्तक सापडते \p \v 1 वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यदीदाह होते. ती बसकाथ येथील अदायाहची कन्या होती. \v 2 याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याने त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले. \p \v 3 त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाह राजाने मशुल्लामचा पुत्र, अजल्याहचा पुत्र व त्याचा चिटणीस शाफानला याहवेहच्या मंदिरात पाठवले. त्याने म्हटले: \v 4 “मुख्य याजक हिल्कियाहकडे जा व याहवेहच्या मंदिरात आलेले पैसे, जे द्वारपालांनी गोळा केले होते ते याजकांनी तयार ठेवावे. \v 5 त्यांनी ते मंदिरातील कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या पुरुषांकडे सोपवावे. आणि या लोकांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करणार्‍या कामगारांना द्यावे— \v 6 सुतार, बांधकाम करणारे, गवंडी यांना द्यावा आणि मंदिराच्या डागडुजीसाठी लागणारी लाकडे व घडीव दगड विकत घेण्यात यावे. \v 7 परंतु ज्यांच्याजवळ पैसा देण्यात आलेला आहे त्यांचा हिशोब ठेवण्याची गरज नव्हती, कारण ते विश्वासूपणे कार्य करीत आहेत.” \p \v 8 मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले. \v 9 मग शाफान चिटणीस राजाकडे गेला आणि त्याला अहवाल दिला: “तुझ्या सेवकांना जे पैसे याहवेहच्या मंदिरासाठी मिळाले, त्यांनी ते मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्‍यांच्या हाती दिले आहेत.” \v 10 मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले. \p \v 11 जेव्हा राजाने नियमशास्त्रातील वचने ऐकली, तेव्हा त्याने दुःखाने आपली वस्त्रे फाडली. \v 12 त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला: \v 13 “जा आणि माझ्यासाठी आणि लोकांसाठी आणि सर्व यहूदीयासाठी, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर पेटला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.” \p \v 14 याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती. \p \v 15 ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा, \v 16 ‘याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने वाचलेल्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे त्यानुसार मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन. \v 17 कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हातांनी तयार केलेल्या सर्व मूर्तींमुळे त्याने माझा राग पेटविला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’ \v 18 ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले आहे त्या यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ‘जे वचन तुम्ही ऐकले त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: \v 19 कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात. \v 20 म्हणून मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” \p तेव्हा त्यांनी परत जाऊन तिचे उत्तर राजाला सांगितले. \c 23 \s1 योशीयाह कराराचे नूतनीकरण करतो \p \v 1 नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले. \v 2 यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि संदेष्टे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले. \v 3 राजा त्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराची पुष्टी केली. नंतर सर्व लोकांनी आपणास त्या कराराशी वचनबद्ध केले. \p \v 4 राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली. \v 5 यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता. \v 6 त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली. \v 7 याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत. \p \v 8 यहूदीयाच्या इतर शहरांमध्ये राहणार्‍या याजकांना योशीयाह राजाने यरुशलेमास परत आणले. पर्वतांवरील सर्व मंदिरे तसेच गेबापासून बेअर-शेबा पर्यंतची सर्व मंदिरे त्याने पाडून भ्रष्ट केली. यरुशलेम नगरवेशीजवळील डाव्या बाजूला नगराध्यक्ष यहोशुआच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी असलेली मंदिरेही त्याने नष्ट केली. \v 9 जरी उच्च स्थानांच्या मंदिराचे याजक यरुशलेमातील याहवेहच्या वेदीवर सेवा करीत नसत, तरीही ते इतर याजकांच्या बेखमीर भाकरीचे भोजन करावयास बसत असत. \p \v 10 कोणीही आपला पुत्र अथवा कन्या यांचा मोलख दैवताला अग्नीत होम करू नये म्हणून राजाने बेन हिन्नोम खोर्‍यातील तोफेत\f + \fr 23:10 \fr*\fq तोफेत \fq*\ft म्हणजे \ft*\fqa अग्निकुंड\fqa*\f* अशुद्ध केले. \v 11 त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले. \p \v 12 यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली. \v 13 पुढे शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील आणि विध्वंसगिरीच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरील मंदिरे काढून टाकली. ही मंदिरे इस्राएलचा राजा शलोमोनाने सीदोन्यांच्या अष्टारोथ, मोआबाच्या कमोश आणि अम्मोन्यांच्या मिलकाम या अमंगळ दैवतांसाठी बांधली होती. \v 14 योशीयाहने मूर्तिस्तंभ पाडले आणि अशेराच्या ओंगळ मूर्ती फोडल्या, नंतर ते ठिकाण मानवांच्या हाडांनी भरून ठेवले. \p \v 15 बेथेल येथे उभारलेली वेदी, टेकड्यांवरील मंदिरे, नेबाटाचा पुत्र यरोबोअमद्वारे तयार करण्यात आलेली वेदी, ज्याद्वारे इस्राएली लोकांनी पाप केले होते ती आणि टेकड्यांवरील मंदिरे पाडून टाकली. त्याने त्या मंदिराचे धोंडे जमीनदोस्त करून त्याचा भुगा केला आणि अशेराची ओंगळ मूर्ती जाळून भस्म केली. \v 16 योशीयाहने चौफेर नजर फिरविली, तेव्हा त्याला डोंगराच्या बाजूला कित्येक कबरा आढळल्या, त्याने आपल्या सेवकांना आज्ञा केली की त्या कबरांमधील हाडे जमा करून ती बेथेलमधील वेदीवर जाळून ती वेदी भ्रष्ट करावी. जेव्हा यरोबोअम सणाच्या वेळी वेदीजवळ उभा राहिला होता तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहच्या संदेशानुसार भविष्यवाणी केली होती तसेच हे घडले. \p \v 17 राजाने विचारले, “पलीकडे जे कबरेचे स्मारक दिसते ते कोणाचे आहे?” \p तेव्हा शहरातील लोकांनी त्याला सांगितले, “हे परमेश्वराच्या संदेष्ट्याचे स्मारक आहे, जो यहूदीयातून आला होता आणि बेथेलच्या वेदीची नुकतीच जी पाडापाड केली, त्यासंबंधीचे भाकीत ज्या संदेष्ट्याने केले होते, त्याची ती कबर आहे.” \p \v 18 तेव्हा राजा म्हणाला, “त्याच्या स्मारकाला धक्का लावू नका. त्याच्या हाडांना सुद्धा धक्का लावू नका.” राजाज्ञेवरून त्यांनी त्याच्या आणि शोमरोनातील संदेष्ट्याच्या अस्थी जाळल्या नाहीत. \p \v 19 त्याने योशीयाहने बेथेलप्रमाणेच शोमरोनाच्या नगराच्या टेकड्यांवरील सर्व मंदिरे नष्ट केली. इस्राएलाच्या निरनिराळ्या राजांनी ती बांधली होती. यामुळे याहवेहला या गोष्टीचा फार क्रोध आलेला होता. \v 20 योशीयाहने जे याजक वेदीवर उच्चस्थानी होते त्यांना त्या वेद्यांवरच जिवे मारले. नंतर त्या वेद्यांवर लोकांची हाडे जाळून त्याने त्या भ्रष्ट केल्या. मग तो यरुशलेमात परतला. \p \v 21 राजाने सर्व लोकांना आदेश दिला: “कराराच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे याहवेह तुमच्या परमेश्वराकरिता वल्हांडण सण साजरा करा.” \v 22 इस्राएलच्या शास्त्यांच्या काळापासून आणि इस्राएलचे राजे आणि यहूदीयातील राजांच्या दिवसात सुद्धा असा वल्हांडण सण साजरा केला नव्हता. \v 23 हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या अठराव्या वर्षी यरुशलेममध्ये याहवेहसाठी साजरा करण्यात आला. \p \v 24 योशीयाहने यहूदीया व यरुशलेममधील प्रेत साधक, भूतविद्या करणारे, कुलदैवते व मूर्ती, आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद वस्तू काढून टाकल्या. हिल्कियाह याजकाला याहवेहच्या मंदिरात आढळलेल्या नियमांच्या पुस्तकात जे लिहिले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले. \v 25 योशीयाह सारखा कोणीही राजा त्याच्या आधी व त्याच्यानंतर झाला नाही ज्याने याहवेहकडे वळून मोशेचे नियमशास्त्र पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्णशक्तीने पाळले. \p \v 26 इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही. \v 27 म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’\f + \fr 23:27 \fr*\ft \+xt 1 राजे 8:29\+xt*\ft*\f* त्यांचा त्याग करेन.” \p \v 28 योशीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, ते यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथामध्ये नमूद केलेले नाही काय? \p \v 29 योशीयाह राजा असताना, इजिप्तचा राजा फारोह नखो हा अश्शूरच्या राजाला मदत करण्यासाठी फरात\f + \fr 23:29 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीजवळ गेला. योशीयाह राजा त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला, परंतु नखो राजाने त्याचा सामना केला आणि मगिद्दो येथे त्याला मारून टाकले. \v 30 योशीयाहच्या सेवकांनी त्याचे प्रेत रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमास आणले आणि त्याला त्याच्या कबरेत पुरण्यात आले. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजचा अभिषेक करून त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले. \s1 यहूदीयाचा राजा यहोआहाज \p \v 31 वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती. \v 32 त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \v 33 त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी\f + \fr 23:33 \fr*\ft अंदाजे 3.4 मेट्रिक टन\ft*\f* आणि एक तालांत सोने\f + \fr 23:33 \fr*\ft अंदाजे 34 कि.ग्रॅ.\ft*\f* असा कर लादला. \v 34 फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला. \v 35 यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले. \s1 यहूदीयाचा राजा यहोयाकीम \p \v 36 वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती. \v 37 त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \c 24 \p \v 1 यहोयाकीमच्या कारकिर्दीत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने देशावर स्वारी केली, आणि यहोयाकीम तीन वर्षे त्याचा ताबेदार राहिला. पण नंतर तो नबुखद्नेस्सरच्या विरोधात गेला आणि त्याने बंड पुकारले. \v 2 याहवेहने यहूदाहचा नाश करण्यासाठी यहूदीयावर खास्द्यांच्या, अरामी, मोआबी व अम्मोनी यांच्या टोळ्या पाठविल्या, असे घडणार हे भविष्य याहवेहने आपल्या संदेष्ट्याद्वारे आधी केलेले होते. \v 3 निश्चितच याहवेहच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना आपल्या उपस्थितीतून घालून द्यावे म्हणून हे संकट यहूदीयावर आले, कारण मनश्शेहचे पाप आणि त्याने जे सर्व केले, \v 4 त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले. \p \v 5 यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने सर्व जे केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? \v 6 यहोयाकीम आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला. \p \v 7 इजिप्तचा राजा पुन्हा कधीही आपल्या देशातून बाहेर आला नाही, कारण बाबेलच्या राजाने इजिप्तच्या ओहोळापासून फरात नदीपर्यंतचा त्याचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला होता. \s1 यहूदीयाचा राजा यहोयाखीन \p \v 8 वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला, आणि त्याने यरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा होते. ती एलनाथानची कन्या असून यरुशलेमची होती. \v 9 त्याने त्याच्या पित्याप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \p \v 10 त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला, \v 11 आणि त्याचे अधिकारी हा वेढा घालत असताना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर स्वतः शहरात आला. \v 12 यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. \p बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले. \v 13 याहवेहने घोषणा केल्याप्रमाणे, नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व संपत्ती लुटून नेली आणि इस्राएलाच्या शलोमोन राजाने याहवेहच्या मंदिरासाठी ठेवलेले सोन्याचे कटोरे तोडून त्यांचे तुकडे केले. \v 14 यरुशलेम येथील लोक त्याने बंदिवासात नेले: सर्व अधिकारी आणि लढाऊ पुरुष आणि सर्व कुशल कामगार आणि कारागीर—एकूण दहा हजार. देशात फक्त सर्वात गरीब लोक उरले. \p \v 15 नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बंदी करून बाबेलला घेऊन गेला. त्याने राजाची आई, त्याच्या पत्नी, त्याचे अधिकारी आणि देशातील प्रतिष्ठित लोकांना देखील यरुशलेमहून बाबेलला नेले. \v 16 बाबेलच्या राजाने युद्धासाठी सक्षम आणि बलवान योद्धांचे संपूर्ण सात हजार सैन्य आणि एक हजार कुशल कारागीर आणि लोहार बाबेलला नेले. \v 17 बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याहला त्याच्या ठिकाणी राजा केले आणि त्याने त्याचे नाव बदलून ते सिद्कीयाह असे ठेवले. \s1 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह \p \v 18 सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती. \v 19 यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \v 20 यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. \s1 यरुशलेमेचे पतन \p आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले. \c 25 \s1 यरुशलेमचा पाडाव \p \v 1 म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर आक्रमण केले व त्याच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले. \v 2 सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता. \p \v 3 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही. \v 4 तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही त्यांनी रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या\f + \fr 25:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa यार्देनचे खोरे\fqa*\f* दिशेने पळ काढला, \v 5 परंतु बाबेलच्या\f + \fr 25:5 \fr*\fq बाबेलच्या \fq*\ft म्हणजे खास्द्यांच्या\ft*\f* सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि सिद्कीयाह राजाला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते, \v 6 आणि तो पकडला गेला. \p त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. \v 7 त्यांनी सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या पुत्रांचा वध केला. मग त्यांनी त्याचे डोळे काढले व त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. \p \v 8 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला. \v 9 त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली. \v 10 रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटबंदी पाडून टाकली. \v 11 नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने शहराच्या विध्वंसातून वाचलेल्या आणि बाबेलच्या राजाला शरण गेलेल्या लोकांना बंदिवासात नेले. \v 12 परंतु अधिकार्‍याने देशातील काही अत्यंत गरीब लोकांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले. \p \v 13 बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि ते कास्य बाबेलास घेऊन गेले. \v 14 त्यांनी भांडी, फावडे, चिमटे आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली. \v 15 रक्षक दलाच्या अधिकार्‍याने अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते, काढून घेतली. \p \v 16 याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते. \v 17 प्रत्येक खांब अठरा हात\f + \fr 25:17 \fr*\ft अंदाजे 8.1 मीटर\ft*\f* उंच होता. एका खांबावर कास्याचा कळस होता जो तीन हात\f + \fr 25:17 \fr*\ft अंदाजे 1.4 मीटर\ft*\f* उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. नक्षीसह दुसरा खांबही तसाच होता. \p \v 18 रक्षक दलाच्या अधिकार्‍याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपालांना बंदिवान म्हणून नेले. \v 19 जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि पाच राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने नेले. \v 20 रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले. \v 21 हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. \p याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले. \p \v 22 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने शाफानचा पुत्र अहीकामचा पुत्र गदल्याहला, यहूदीयाहमध्ये उरलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त केले. \v 23 जेव्हा सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने गदल्याहची राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कारेहचा पुत्र योहानान, नटोफाथी तन्हुमेथचा पुत्र सेरायाह आणि माकाथीचा पुत्र याजन्याह आणि त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले. \v 24 त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी गदल्याहने शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांना भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा आणि तुमचे बरे होईल.” \p \v 25 परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याहचा पुत्र इश्माएल जो राजघराण्यातील एक होता, आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन आला आणि त्याने गदल्याह व यहूदी लोकांना व बाबेलच्या लोकांना जे मिस्पाह येथे होते त्यांना ठार मारले. \v 26 मग सेनाधिकार्‍यांसह, लहानमोठे सर्व लोक खास्द्यांच्या भीतीने इजिप्तला पळून गेले. \s1 यहोयाखीनची सुटका \p \v 27 यहूदीयाचा राजा यहोयाखीनच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनची बंदिवासातून सुटका केली. त्याने हे बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी केले. \v 28 तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबेल येथे होते, त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले. \v 29 यहोयाखीनने तुरुंगातील कपड्यांचा त्याग केला आणि आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले. \v 30 यहोयाखीन जिवंत असेपर्यंत राजा त्याला प्रती दिवस नियमित पुरवठा करीत असे.