\id 2JN - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 2 योहान \toc1 योहानाचे दुसरे पत्र \toc2 2 योहान \toc3 2 योहा \mt1 योहानाचे दुसरे पत्र \c 1 \po \v 1 मंडळीचा वडील याजकडून, \po एक स्त्री जिची परमेश्वराकडून निवड झालेली आहे, ती आणि तिची मुले यांच्यासाठी ज्यांच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो आणि केवळ मीच नाही परंतु ते सर्वजण ज्यांना सत्याची ओळख झाली आहे, \v 2 कारण जे सत्य आमच्यामध्ये राहते आणि तेच आमच्याबरोबर कायम राहील. \po \v 3 परमेश्वर जे पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील. \b \p \v 4 पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. \v 5 आता, हे प्रिय स्त्रिये, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु तीच जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. \v 6 प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे. \p \v 7 मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळजण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे. \v 8 आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा. \v 9 जे कोणी सर्वांच्या पुढे जात राहतात आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाहीत त्यांच्याकडे परमेश्वर नाही; जो कोणी या शिक्षणात राहतो त्यांच्याकडे पिता आणि पुत्र दोघेही आहेत. \v 10 जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका. \v 11 तुम्ही जर त्यांचे स्वागत केले, तर तुम्ही त्यांच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हाल. \b \b \p \v 12 तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते कागद आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. त्याऐवजी तुमची भेट घ्यावी आणि समोरासमोर तुमच्याबरोबर बोलावे अशी आशा करतो म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. \b \p \v 13 जिला परमेश्वराने निवडले आहे, त्या तुझ्या बहिणीची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात.