\id 2CO - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 2 करिंथकरांस \toc1 पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र \toc2 2 करिंथकरांस \toc3 2 करिंथ \mt1 पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र \c 1 \po \v 1 परमेश्वराच्या इच्छेने, ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तीमथ्य याजकडून, \po करिंथ येथील परमेश्वराची मंडळी आणि अखया प्रांतातील चहूकडील सर्व पवित्र लोकांस: \po \v 2 परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. \s1 सर्व सांत्वन करणार्‍या परमेश्वराची स्तुती \p \v 3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो. \v 4 ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे. \v 5 ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते. \v 6 जर आम्ही दुःखी आहोत तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी; जर आम्हाला सांत्वन लाभले आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी, यासाठी की जी दुःखे आम्ही सोसतो व जी तुम्हीही सोसत आहात, त्यामुळे तुम्हामध्ये धीर व सहनशीलता उत्पन्न व्हावी \v 7 आणि तुमच्याबद्दलची आमची आशा स्थिर आहे व जसे तुम्ही आमच्या दुःखामध्ये तसेच आमच्या सांत्वनातही सहभागी झाला आहात. \p \v 8 प्रिय बंधूंनो व भगिनींनो, आशिया प्रांतात ज्या दुःखाच्या अनुभवातून आम्हास जावे लागले, त्याबद्दल तुम्ही अज्ञानी असावे अशी आमची इच्छा नाही. आमच्या सहनशक्तीपलीकडे आम्ही ओझ्याखाली अगदी दबून गेलो की; आम्ही जीवनाची आशा सोडून दिली होती. \v 9 खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे. \v 10 त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील. \v 11 परंतु तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला मदत करावी. कारण जो कृपेचा अनुग्रह सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्हास मिळाला आहे, त्याबद्दल आमच्यावतीने अनेकजण परमेश्वराची स्तुती करतील. \s1 पौलाच्या बेतात बदल \p \v 12 हे आम्हाला गर्वाचे कारण आहे: आमच्या सर्व व्यवहारात आमच्या विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की या जगात आणि तुमच्या संबंधात, आम्ही पवित्र आणि ईश्वरी प्रामाणिकपणाने भरलेले होतो. हे ऐहिक ज्ञानावर नव्हे तर परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहिल्यामुळे आम्ही करू शकलो. \v 13 तुम्हाला जे समजत नाही किंवा वाचता येत नाही असे आम्ही काहीच लिहित नाही. आमची आशा आहे की, \v 14 जरी तुम्ही थोडेफार आम्हाला ओळखता आणि पुढे तुम्हाला पूर्णपणे कळून येईल की प्रभू येशूंच्या दिवशी जसा तुम्हाला आमचा अभिमान आहे, तसाच आम्ही पण तुमच्याविषयी अभिमान बाळगू. \p \v 15 या गोष्टीचा मला भरवसा होता की मी प्रथम तुमची भेट घ्यावी यासाठी की तुम्हाला दोनदा लाभ व्हावा. \v 16 मी मासेदोनियास जाताना, वाटेत थांबून तुम्हाला भेटावे आणि तसेच मासेदोनियाहून परत येतांना भेटावे आणि तुम्ही मला पुढे यहूदीयाकडे वाटेस लावले असते. \v 17 मी हे बेत चंचलवृतीने केले काय? मी ऐहिक रीतीने माझ्या योजना करतो काय किंवा “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो का? \p \v 18 ज्याप्रकारे परमेश्वर खात्रीने विश्वासू आहे, तेवढ्याच खात्रीने आमचा संदेश “होय” आणि “नाही” असा नाही. \v 19 तीमथ्य, सीला\f + \fr 1:19 \fr*\ft ग्रीक \ft*\fqa सिल्वानस\fqa*\f* व मी, तुम्हाला परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल संदेश सांगत आलो तो “नाही” आणि “होय” असा नाही, परंतु त्यांच्यामध्ये नेहमीच “होय” आहे. \v 20 परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती “होय” आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे “आमेन” म्हणतो. \v 21 आता हेच परमेश्वर जे तुम्हाला व आम्हाला असे आपणा दोघांना ख्रिस्तामध्ये स्थिर करतात. त्यांनी आमचा अभिषेक केला आहे, \v 22 त्यांच्या मालकीहक्काचा शिक्का आमच्यावर मारला आहे आणि आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ठेव म्हणून ठेवला आहे, जे येणार आहे त्याची हमी देत आहे. \p \v 23 परमेश्वराला मी माझा साक्षीदार म्हणून हाक मारतो—आणि माझे जीवन पणाला लावले आहे—तुमची गय करावी म्हणून मी करिंथास परतलो नाही. \v 24 तुमच्या विश्वासावर अधिकार दाखवावा म्हणून नव्हे, कारण विश्वासामुळेच तुम्ही स्थिर आहात, परंतु आम्ही तुमच्याबरोबर सहकर्मी होऊन आनंदासाठी परिश्रम करतो. \c 2 \nb \v 1 मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही. \v 2 कारण मी तुम्हाला दुःखी केले, तर मग ज्यांना मजकडून दुःख झाले आहे त्या तुमच्याशिवाय मला कोण आनंदित करेल? \v 3 मी लिहिल्याप्रमाणे केले, मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद मिळावा, त्यांच्याकडून मला दुःख होणार नाही. मला तुम्हा सर्वांवर भरवसा होता की तुम्ही सर्वजण माझ्या आनंदात सहभागी व्हाल. \v 4 तुम्हाला दुःखी करावे म्हणून नव्हे तर माझ्या प्रीतीची खोली तुम्हाला कळावी, म्हणून हे पत्र मी तुम्हाला क्लेश आणि हृदयाच्या यातना आणि अनेक आसवे गाळून लिहिले आहे. \s1 पातक्यांना क्षमा \p \v 5 जर कोणी दुःख दिले, तर त्याने केवळ मलाच अधिक दुःख दिले असे नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दुःख दिले आहे—त्यापेक्षा अधिक कडक शब्दात बोलू इच्छित नाही. \v 6 तुम्ही सार्‍यांनी बहुमताने त्याला शिक्षा दिली ती पुरेशी आहे. \v 7 याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे. \v 8 आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या. \v 9 हे पत्र लिहिण्याचे दुसरे कारण आहे की तुम्ही परीक्षेत स्थिर आहात व प्रत्येक गोष्टीत आज्ञा पाळता हे अजमावून पाहावे. \v 10 तुम्ही एखाद्याला क्षमा करता, त्याला मीही क्षमा करतो. ज्याची मी क्षमा केली आहे आणि जर क्षमा करण्याचे बाकी आहे तर ती ख्रिस्ताच्या समक्ष तुमच्या हितासाठी केली आहे. \v 11 यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये; कारण त्याचे डाव आपल्याला कळत नाहीत असे नाही. \s1 नव्या कराराचे सेवक \p \v 12 मी त्रोवास शहरात ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यास आल्यावर, प्रभूंनी माझ्यासाठी द्वार उघडल्याचे मला आढळून आले. \v 13 परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो. \p \v 14 परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात. \v 15 ज्यांचे तारण होत आहे व ज्यांचा नाश होत आहे त्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वरासाठी ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत \v 16 एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्‍याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे? \v 17 आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो. \c 3 \p \v 1 आम्ही पुन्हा स्वतःची प्रशंसा करण्यास प्रांरभ केला आहे काय? आणि इतर काही लोकांसारखे शिफारसपत्र तुम्हासाठी व तुम्हापासून घेण्याची गरज आहे का? \v 2 आमच्या हृदयांवर लिहिलेले, सर्वांना माहीत असलेले व वाचले जाणारे असे तुम्ही स्वतः आमचे पत्र आहात. \v 3 तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा. \p \v 4 असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे. \v 5 आम्ही आमच्यामध्ये कार्यक्षम आहोत असे नाही किंवा आम्ही काही दावा करू शकतो असे आम्हाला वाटत नाही; कारण आमची कार्यक्षमता परमेश्वरापासून आहे. \v 6 नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो. \s1 नव्या कराराचे मोठे वैभव \p \v 7 आता जे अक्षर दगडावर कोरलेले असून ज्याचा परिणाम मरण होता, ती सेवा एवढी गौरवी होती, की जरी कमी होणार्‍या तेजामुळे इस्राएली लोकांना मोशेच्या चेहर्‍याकडे स्थिर पाहत राहणे अशक्य झाले होते, पण हळूहळू ते तेज कमी होत गेले. \v 8 पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय? \v 9 दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल! \v 10 खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही. \v 11 आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे. \p \v 12 आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे. \v 13 आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले. \v 14 परंतु त्यांची मने आता मंद झाली व जुना करार वाचला जात असताना आजही तेच आच्छादन आहे. ते फक्त ख्रिस्तामध्येच दूर केले जाईल. \v 15 आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते. \v 16 परंतु जेव्हा कोणी प्रभूकडे वळतो, त्यावेळी हे आच्छादन काढले जाते. \v 17 प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा तिथे स्वातंत्र्य आहे. \v 18 आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत. \c 4 \s1 सांप्रत दुर्बलता आणि पुनरुत्थित जीवन \p \v 1 यास्तव, परमेश्वराच्या दयेने आम्हालाही सेवा प्राप्त झाली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही. \v 2 आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो. \v 3 जरी आमची शुभवार्ता आच्छादिलेली असली, तर ती ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यापासूनच आच्छादिलेली आहे. \v 4 या जगाच्या अधिपतीने विश्वासणार्‍यांची मने आंधळी केली आहेत, म्हणून शुभवार्तेचा प्रकाश जो ख्रिस्ताचे गौरव आणि परमेश्वराची प्रतिमा प्रकट करतो, ते पाहू शकत नाहीत. \v 5 आम्ही स्वतःविषयी प्रचार करीत नाही, तर ख्रिस्त येशू हेच प्रभू आणि आम्ही येशूंसाठी तुमचे दास आहोत. \v 6 कारण, “अंधकारातून प्रकाश हो,”\f + \fr 4:6 \fr*\ft \+xt उत्प 1:3\+xt*\ft*\f* असे जे परमेश्वर बोलले, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मुखावरील ज्ञानाच्या तेजाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात दिला आहे. \p \v 7 तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे. \v 8 आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही. \v 9 छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही. \v 10 आम्ही नेहमीच येशूंच्या मरणाला आमच्या शरीरात घेऊन वावरतो यासाठी की येशूंचे जीवनसुद्धा आमच्या शरीरांमध्ये प्रकट व्हावे. \v 11 म्हणून आम्ही, जे जिवंत आहोत ते येशूंप्रीत्यर्थ मरणासाठी सोपवून दिलेले आहोत, यासाठी की आमच्या मर्त्य देहांमध्ये सुद्धा त्यांचे जीवन प्रकट व्हावे. \v 12 आमच्यामध्ये मृत्यू कार्य करतो, परंतु तुम्हामध्ये जीवन कार्य करते. \p \v 13 असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला आहे म्हणून मी बोललो,”\f + \fr 4:13 \fr*\ft \+xt स्तोत्र 116:10\+xt*\ft*\f* त्याप्रमाणे आमच्याजवळ सारखाच विश्वासाचा आत्मा\f + \fr 4:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa आत्म्याद्वारे दिलेले\fqa*\f* आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवतो आणि बोलतो. \v 14 आम्हाला हे माहीत आहे की, ज्यांनी प्रभू येशूंना मेलेल्यांमधून जिवंत केले, तेच आम्हालाही येशूंबरोबर पुन्हा जिवंत करतील आणि तुमच्याबरोबरच आम्हाला स्वतःपुढे सादर करतील. \v 15 हे सर्व तुमच्या भल्यासाठी आहे, जितके अधिक लोक त्यांच्या कृपेने त्यांच्याजवळ येतील, तितके त्यांच्या अपार दयेबद्दल त्यांचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल. \p \v 16 यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत. \v 17 आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही. \v 18 म्हणून ज्यागोष्टी दृश्य आहेत त्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित करत नाही, परंतु जे अदृश्य आहे त्यावर करतो, कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते सार्वकालिक आहे. \c 5 \s1 नवे शरीर मिळण्याची खात्री \p \v 1 आम्हास ठाऊक आहे की ज्या ऐहिक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे. \v 2 या गृहामध्ये असताना स्वर्गीय गृहाचे पांघरूण घालण्याची इच्छा धरून आपण एवढे कण्हत आहोत. \v 3 कारण आम्ही वस्त्रे धारण केली तर नग्न असे सापडणार नाही. \v 4 या तंबूमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही कण्हतो व थकलेले आहोत, वस्त्रे परिधान करू नये असे आम्हास वाटत नाही, परंतु स्वर्गीय निवासस्थान धारण करावे, यासाठी की जे मर्त्य ते जीवनाने गिळंकृत करावे. \v 5 ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे. \p \v 6 यास्तव आता खात्रीपूर्वक आपण जाणून घ्यावे की जोपर्यंत आपण शारीरिक घरामध्ये आहोत, तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर असतो. \v 7 आम्ही विश्वासाने जगतो, प्रत्यक्ष पाहण्याने नव्हे. \v 8 आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा. \v 9 तेव्हा, आम्ही येथे या शरीरामध्ये असू अथवा या शरीरापासून दूर असू, आम्ही करतो त्या सर्व गोष्टींत प्रभूंना संतोष देणे, हेच आमचे ध्येय आहे. \v 10 कारण आपल्या सर्वांनाच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहावे लागणार आहे. या शरीरामध्ये असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या अथवा वाईट गोष्टी केल्या असतील, त्यांचे आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य ते प्रतिफळ मिळेल. \s1 समेटाची सेवा \p \v 11 प्रभूची भीती बाळगणे हे काय आहे हे आपणास माहीत आहे, त्यामुळेच इतरांना वळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो! आम्ही कोण आहोत हे परमेश्वरापुढे स्पष्ट आहे आणि मी आशा धरतो की, तुमच्या विवेकबुद्धीनेही तुम्ही हे निश्चित जाणता. \v 12 पुन्हा स्वतःचीच प्रशंसा करण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. तर तुम्हाला आमच्यासाठी अभिमान बाळगण्याची संधी देत आहोत, यासाठी की जे हृदयातील गोष्टींचा नव्हे तर बाह्य गोष्टींचा अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. \v 13 जर “आम्ही वेडे असलो,” जसे काही लोक म्हणतात तर ते परमेश्वरासाठी आहोत. जर आम्ही भानावर असलो, तर ते तुमच्यासाठी आहोत. \v 14 ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते कारण आम्हास खात्री आहे की, ज्याअर्थी एक आपल्या सर्वांसाठी मरण पावला तर आपण सर्वजण मेलो आहोत. \v 15 ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे. \p \v 16 येथून पुढे ऐहिक दृष्टीने आम्ही कोणाकडे पाहत नाही. आम्ही ख्रिस्ताकडे त्यादृष्टीने पाहत होतो पण आता तसे पाहत नाही. \v 17 जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे. \v 18 हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. \v 19 परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे. \v 20 आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवितो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या. \v 21 ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पाप\f + \fr 5:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa पापार्पण\fqa*\f* असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे. \c 6 \p \v 1 परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका. \v 2 कारण ते म्हणतात, \q1 “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. \q2 तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.”\f + \fr 6:2 \fr*\ft \+xt यश 49:8\+xt*\ft*\f* \m मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे. \s1 पौलाचे कष्ट \p \v 3 आम्ही कोणाच्याही मार्गात अडखळण होत नाही, जेणेकरून आम्ही करीत असलेली सेवा दोषी ठरविली जाऊ नये. \v 4 आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो. \v 5 आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास; \v 6 शुद्धतेने, बुद्धीने, धीराने आणि दयेने; पवित्र आत्म्याने आणि खर्‍या प्रीतीने भरलेले; \v 7 सत्याचे भाषण, आणि परमेश्वराचे सामर्थ्य; उजव्या आणि डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे धारण करून करीत असतो. \v 8 गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले; \v 9 प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्यूपासून राखलेले \v 10 व्यथित परंतु सतत आनंदित; गरीब परंतु इतरांना धनवान बनविणारे; मालकीचे काहीही नाही आणि तरी सर्वकाही असल्यासारखे असे आहोत. \p \v 11 करिंथकरांनो आम्ही तुमच्यापासून काहीच न लपविता आमचे हृदय तुमच्यासमोर मोकळे केले आहे. \v 12 आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे. \v 13 तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा. \s1 मूर्तिपूजेविरुद्ध इशारा \p \v 14 विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय? \v 15 तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासी मनुष्य विश्वासहीन मनुष्य यामध्ये साम्य आहे का? \v 16 आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: \q1 “मी त्यांच्यामध्ये राहीन \q2 आणि त्यांच्यामध्ये चालेन; \q1 मी त्यांचा परमेश्वर होईन \q2 आणि ते माझे लोक होतील.”\f + \fr 6:16 \fr*\ft \+xt लेवी 26:12; यिर्म 32:38; यहे 37:27\+xt*\ft*\f* \m \v 17 यास्तव, \q1 “त्यांच्यामधून निघा \q2 आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; \q2 प्रभूने म्हटले आहे \q1 त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, \q2 म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”\f + \fr 6:17 \fr*\ft \+xt यश 52:11; यहे 20:34, 41\+xt*\ft*\f* \m \v 18 आणि \q1 “मी तुमचा पिता होईन \q2 आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल \q2 असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतात.”\f + \fr 6:18 \fr*\ft \+xt 2 शमु 7:14; 7:8\+xt*\ft*\f* \c 7 \p \v 1 यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्‍या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या. \s1 मंडळीने पश्चात्ताप केल्याबद्दल पौलाला आनंद \p \v 2 तुमच्या हृदयात आमच्यासाठी जागा करा. आम्ही कोणाविरुद्ध अन्याय केला नाही. आम्ही कोणालाही मार्गभ्रष्ट केले नाही किंवा कोणाचा गैरफायदा घेतला नाही. \v 3 तुम्हाला दंडाज्ञा व्हावी म्हणून मी हे सांगत नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या हृदयात स्थान आहे आणि आम्ही जगू किंवा मरू तेव्हा तुमच्याबरोबर असू. \v 4 मी अगदी मोकळेपणाने तुमच्याबरोबर बोलतो; मला तुमचा अतिशय अभिमान आहे. मी खूप उत्तेजित झालो आहे; आमच्या या सर्व दुःखात माझ्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही. \p \v 5 मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते. \v 6 मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्‍या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले. \v 7 त्याच्या केवळ येण्याने नव्हे परंतु तुम्ही त्याचे जे सांत्वन केले त्यामुळेही, माझ्यासंबंधाने तुमची उत्सुकता, तुमचे अति दुःख, तुमची माझ्यावरील आस्था या सर्वगोष्टी त्याने मला सांगितल्या, तेव्हा माझा आनंद पूर्वीपेक्षाही ओसंडून वाहू लागला. \p \v 8 जरी माझ्या पत्रामुळे मी तुम्हाला दुःख दिले याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. याबद्दल निश्चितच मला दुःख झाले खरे, पण माझ्या पत्राने तुम्हाला थोडाच काळ दुःखी केले हे मी समजतो. \v 9 तुम्हाला दुःखी केले म्हणून नव्हे, तर त्या दुःखाने तुम्ही पश्चात्तापाकडे वळलात म्हणून मला आनंद वाटतो. तुमचे दुःखी होणे हे परमेश्वराच्या इच्छेनुसार झाले आणि यामुळे आमच्यामुळे तुमची कोणतीही हानी झाली नाही. \v 10 कारण दैवी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु ऐहिक दुःखाने मरण येते. \v 11 या दैवी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे. \v 12 मी तुम्हाला पत्र लिहिले ते, ज्याने चूक केली त्याच्यासाठी नव्हे आणि ज्याच्याविरुद्ध चूक केली त्यांच्यासाठी सुद्धा नव्हे, तर परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही किती समर्पित आहात हे स्पष्ट करण्यासाठी लिहिले. \v 13 या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले. \p परंतु याहून अधिक आनंद आम्हाला मिळाला तो तीताच्या आनंदाने! कारण तुम्ही त्याच्या आत्म्याला ताजेतवाने केले. \v 14 मला तुमच्याबद्दल केवढा अभिमान आहे, हे मी त्याला सांगितले होते आणि तुम्ही मला मुळीच निराश केले नाही. जे काही आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व खरे होते, तसेच मी तीतापुढे काढलेले तुमच्याबद्दलचे अभिमानाचे शब्दही खरे ठरले आहेत! \v 15 ज्या रीतीने भयाने व थरथर कापत तुम्ही सर्वांनी आज्ञांकितपणा दाखवून त्याचा स्वीकार केला, या सर्वगोष्टी आठवून, तुमच्याविषयीची त्याची प्रीती अधिक वाढली आहे. \v 16 तुमच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो याचा मला आनंद आहे. \c 8 \s1 प्रभूच्या लोकांसाठी वर्गणी \p \v 1 आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. \v 2 अनेक भीषण परीक्षेमध्ये, त्यांचा ओसंडणारा आनंद आणि कमालीच्या दैनावस्थेत त्यांची उदारता प्रत्यक्षात आली. \v 3 त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो. \v 4 प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली. \v 5 आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले. \v 6 म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे. \v 7 तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे. \p \v 8 याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे. \v 9 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. \p \v 10 या गोष्टीसंबंधाने जे तुमच्यासाठी योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतो: मागील वर्षी तुम्हीच असे होता की ज्यांनी प्रथम देण्यास आरंभ केला. इतकेच केवळ नव्हे, परंतु तशी इच्छाही बाळगण्यामध्ये तुम्ही पुढे होता. \v 11 मग एवढ्या इच्छेच्या उत्साहाने आरंभ केलेले हे कार्य ते समाप्त होईपर्यंत तुमच्याजवळ जे असेल ते देऊन पूर्ण करा. \v 12 जर देण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर जे तुमच्याकडे आहे, त्या आधारावर तुमचे दान स्वीकारले जाईल, जे तुमच्याजवळ नाही त्याप्रमाणे नाही. \p \v 13 आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते. \v 14 या वेळेला सध्या तुमच्या विपुलतेतून ज्याकाही त्यांच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील, पुढे त्यांच्या विपुलतेतून ज्या तुमच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील. आमचे ध्येय समानता असावी असे आहे. \v 15 याबाबतीत शास्त्रलेख काय म्हणतो: “ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही.”\f + \fr 8:15 \fr*\ft \+xt निर्ग 16:18\+xt*\ft*\f* \s1 वर्गणी गोळा करण्यास तीताची रवानगी \p \v 16 जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. \v 17 त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे. \v 18 शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे. \v 19 खरे म्हणजे, आम्ही कृपेचे दान घेऊन येत असताना आमच्याबरोबर प्रवास करण्यासाठी या बंधुची मंडळ्यांमधून निवड झाली होती. यामुळे केवळ प्रभूचे गौरव होईल व साहाय्य करण्याविषयीची आमची मदत करण्याची आस्था सर्वांना दिसून येईल. \v 20 कारण ही उदारतेने साहाय्यता म्हणून दिलेली देणगी आम्ही कशी हाताळतो याबाबतीत कोणालाही टीका करण्याचा प्रसंग मिळू नये, म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत. \v 21 फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो. \p \v 22 मी तुमच्याकडे आणखी एका बंधूला पाठवित आहे. तो पुष्कळ प्रकारे आस्थेवाईक असल्याचे आम्हाला अनुभवाने माहीत आहे, कारण त्याचा तुमच्यावर अधिक भरवसा आहे. \v 23 तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत. \v 24 कृपा करून ती प्रीती या बंधुंवरही करा आणि तुम्ही ते सर्व त्यांच्यासाठी कराल असे मी अभिमानाने व जाहीरपणे म्हटले आहे. ते सर्व मंडळ्यांनी पाहावे. \c 9 \p \v 1 प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही. \v 2 कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली. \v 3 या गोष्टीबाबतीत तुमच्याबद्दलचा माझा अभिमान व्यर्थ ठरू नये म्हणून मी या भावांना पाठवित आहे, यासाठी की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार असावे. \v 4 मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल. \v 5 म्हणून मला असे वाटले, हे आवश्यक आहे की, बंधूंना अशी विनंती करावी की त्यांनी प्रथम तुमची भेट घ्यावी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार उदारतेने देत असलेल्या देणगीची व्यवस्था पूर्ण करावी. तेव्हा ती एक मुक्तहस्ताने दिलेली भेट अशी असेल, असंतुष्टतेने देणार्‍यासारखी ती नसेल. \s1 उदारहस्ते पेरणे \p \v 6 परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल. \v 7 आपण किती द्यावे हे ज्याने त्याने स्वतः मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, हे भाग पाडते म्हणून किंवा बळजबरीने नव्हे, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो. \v 8 परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील. \v 9 हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: \q1 “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; \q2 त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.”\f + \fr 9:9 \fr*\ft \+xt स्तोत्र 112:9\+xt*\ft*\f* \m \v 10 कारण तो पेरणार्‍यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल. \v 11 होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे. \p \v 12 म्हणजे तुमच्या या सेवेमुळे केवळ प्रभूंच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास साहाय्य होते असे नाही तर परमेश्वराप्रती उपकारस्तुती ओसंडून वाहू लागते. \v 13 तुम्ही करीत असलेले सेवाकार्य यामुळे तुम्ही सिद्ध करून दाखविले आहे की, तुम्ही ख्रिस्ताच्या शुभवार्तेला कबूल करून आज्ञाधारक राहिला, तसेच तुम्ही त्यांच्या व सर्वांच्याप्रती उदारता दाखविली म्हणून इतरजण परमेश्वराची स्तुती करतील, \v 14 आणि परमेश्वराची अद्भुत कृपा तुमच्यावर प्रकट झाली म्हणून त्यांची मने तुम्हाकडे लागली आहेत व ते तुमच्यासाठी उत्कंठेने प्रार्थना करतात. \v 15 परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो. \c 10 \s1 पौल आपल्या सेवेचे समर्थन करतो \p \v 1 ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो. \v 2 मी तुम्हाला विनंती करतो की मी तिथे आलो की ज्याकाही लोकांना वाटते की आमची जीवनशैली ऐहिक आहे, त्यांच्याविरुद्ध कठोर होण्याची गरज भासणार नाही, अशी माझी आशा आहे. \v 3 आम्ही या जगामध्ये राहतो तरीपण ऐहिक लोक जसे युद्ध करतात तसे आम्ही करीत नाही. \v 4 जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे. \v 5 आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो. \v 6 तुमचे आज्ञापालन पूर्ण झाल्यावर, जे आज्ञा न पाळणारे आहेत आम्ही त्यांना दंड करण्यास तयार आहोत. \p \v 7 तुम्ही बाहेरील रूप\f + \fr 10:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa उघड वस्तुस्थितीकडे\fqa*\f* पाहून न्याय करता. जर कोणाला असा भरवसा असेल की ते ख्रिस्ताचे आहेत, तर त्यांनी याबद्दल पुन्हा विचार करावा की जसे आम्ही ख्रिस्ताचे आहोत तसे तेही आहेत. \v 8 हा अधिकार प्रभूने तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला विकसित करण्यासाठी आम्हाला दिला आहे, आणि जरी मी त्याविषयी थोडाफार अभिमान दाखविला, तरी मला त्याची लाज वाटणार नाही. \v 9 तुम्हाला असा भास होऊ नये की घाबरून सोडण्याच्या उद्देशाने मी पत्रे लिहित आहे. \v 10 काहीजण म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व प्रभावी आहेत परंतु व्यक्ती म्हणून त्याचा प्रभाव पडत नाही आणि त्याच्या भाषणात काही तथ्य नाही.” \v 11 अशा लोकांना हे समजावे की आम्ही अनुपस्थितीत असताना आमच्या पत्राद्वारे जे काही आम्ही आहोत, तेच उपस्थित असताना आमच्या कृतीद्वारे आहोत. \p \v 12 जे स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याशी तुलना करण्याचे धैर्य आम्ही करीत नाही. ते स्वतःचे आपसात मोजमाप करतात व आपसातच तुलना करतात, ते शहाणे नाहीत. \v 13 आम्ही मर्यादेच्या बाहेर प्रौढी मिरविणार नाही, तर जी सेवा परमेश्वराने आम्हास नेमून दिली आहे व जी मर्यादा परमेश्वराने आम्हास लावून दिली आहे, त्या मर्यादेतच आम्ही प्रौढी मिरवू आणि त्यात तुमचाही समावेश आहे. \v 14 ख्रिस्ताविषयीची शुभवार्ता तुमच्याकडे पोहोचविणारे आम्हीच पहिले होतो. म्हणून अधिक प्रौढी मिरवून मर्यादेचे उल्लंघन करीत नाही, जर आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नसतो तर आम्ही मर्यादेचे उल्लंघन करीत आहोत हे बोलणे ठीक असते. \v 15 जे कार्य दुसर्‍यांनी केले आहे त्याबद्दल आम्ही मर्यादा सोडून अभिमान बाळगत नाही. तुमचा विश्वास जसजसा वाढत जाईल तसेच आमच्या कार्याचे क्षेत्र तुम्हामध्ये खूप वाढावे, अशी आमची आशा आहे. \v 16 त्यानंतर तुमच्यापलीकडे, दूरवर असलेल्या प्रांतात आम्हाला शुभवार्ता गाजविता येईल आणि इतर लोकांच्या क्षेत्रात जे काम आधी केले आहे त्याबद्दल अभिमान बाळगण्याचे आम्हास कारण उरणार नाही. \v 17 “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.”\f + \fr 10:17 \fr*\ft \+xt यिर्म 9:24\+xt*\ft*\f* \v 18 कोणी स्वतःची प्रशंसा करतो तर त्यास मान्यता मिळेल असे नाही, परंतु ज्याची प्रशंसा प्रभू करतात त्यास मान्यता मिळेल. \c 11 \s1 पौल आणि खोटे प्रेषित \p \v 1 माझी आशा आहे की तुम्ही माझा थोडा मूर्खपणा सहन करून घ्याल. हो, कृपा करून सहन करून घ्या. \v 2 तुम्हासाठी माझी जी आस्था आहे ती दैवी आस्था आहे. मी तुम्हाला एक पती, ख्रिस्त त्यांचे वचन दिले होते, म्हणजे मी तुम्हाला एक शुद्ध कुमारी म्हणून त्यांना सादर करावे. \v 3 परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते. \v 4 जर कोणी तुम्हाकडे येऊन आम्ही प्रचार करतो त्या येशूंऐवजी दुसर्‍या येशूंचा प्रचार करतो किंवा तुम्ही जो आत्मा स्वीकारला होता त्याऐवजी दुसरा आत्मा स्वीकारला, किंवा जी शुभवार्ता तुम्ही स्वीकारली त्या शुभवार्तेहून भिन्न अशी शुभवार्ता तुम्ही स्वीकारली, तर तुम्ही हे सहजपणे स्वीकारता व सहन करून घेता. \p \v 5 जे “उच्च संदेष्टे”\f + \fr 11:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa प्रख्यात प्रेषित\fqa*\f* आहेत त्यांच्यापेक्षा मी कमी प्रतीचा आहे असे मी समजत नाही. \v 6 मी अशिक्षित वक्ता असेन, परंतु मला ज्ञान आहे आणि ते आम्ही अनेक प्रकारे पटवून दिले आहे. \v 7 परमेश्वराच्या शुभवार्तेचा संदेश तुम्हाला फुकट सांगितला व यात मी स्वतःला हीन केले व तुम्हाला उच्च केले तर यात मी पाप केले काय? \v 8 इतर मंडळ्यांचे वेतन घेऊन मी जणू काय त्यांनाच लुबाडले यासाठी की मला तुमची सेवा करता यावी. \v 9 आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन. \v 10 जोपर्यंत ख्रिस्ताचे सत्य मजमध्ये आहे, तोपर्यंत अखया प्रांतातील कोणीही मी करीत असलेल्या अभिमानास प्रतिबंध करू शकणार नाही \v 11 का? कारण मी तुमच्यावर प्रीती करीत नाही? मी प्रीती करतो हे परमेश्वराला माहीत आहे! \p \v 12 मी जे करतो ते करीत राहीन, यासाठी की जे आम्ही त्यांच्या समान आहोत असे मानतात व त्याबाबत प्रौढी मिरविण्याची संधी शोधतात त्यांना ती मिळू नये. \v 13 कारण असे लोक खोटे प्रेषित, फसविणारे कामकरी, ख्रिस्ताचे प्रेषित आहोत असा समज करून फसविणारे आहेत. \v 14 यात आश्चर्य वाटत नाही! कारण स्वतः सैतानही प्रकाशाचा दूत असे रूप धारण करतो. \v 15 मग त्याचे सेवकही नीतिमान असल्याचे ढोंग करतात यात काही नवल नाही. त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा शेवट होईल. \s1 पौल आपल्या दुःखसहनाची प्रौढी मिरवितो \p \v 16 पुन्हा मी तुम्हाला सांगतो: मला मूर्ख समजू नका; आणि तसे तुम्ही मला समजत असाल तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा, यासाठी की मला थोडा गर्व करण्याचा प्रसंग मिळेल. \v 17 जसे प्रभू बोलतात तसा मी बोलत नाही, परंतु माझ्या स्वविश्वासाच्या प्रौढीमध्ये मूर्खपणाने बोलतो. \v 18 देहाला अनुसरून अनेक लोक प्रौढी मिरवितात, मग मी सुद्धा प्रौढी मिरवीन. \v 19 तुम्ही फार शहाणे आहात म्हणून तुम्ही मूर्खांचे आनंदाने सहन करून घेता. \v 20 खरे पाहता, जे तुम्हाला गुलाम बनवितात किंवा तुमचे हिरावून घेतात किंवा गैरफायदा घेतात, स्वतःस उच्च करतात किंवा तुमच्या तोंडात चापट मारतात, तरी तुम्ही या गोष्टी सहन करून घेता. \v 21 मला सांगावयास लाज वाटते की याबाबतीत आम्ही दुर्बल आहोत! \p जर कशाबद्दल कोणी गर्व करण्याचे धैर्य करीत असेल तर मला देखील गर्व करण्याचे धैर्य होईल. हे मी पुन्हा मूर्खासारखा बोलत आहे. \v 22 ते इब्री आहेत का? तर मी पण आहे. ते इस्राएली आहेत का? मग मी देखील आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत ना? मग, मी देखील आहे. \v 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत ना? मी अधिक आहे. असे मी वेड्यासारखे बोलतो! अधिक श्रम केले आहे, वारंवार तुरुंगात पडलो आहे, तीव्र फटके खाल्ले आणि अनेक वेळा मृत्यूला तोंड दिले. \v 24 यहूद्यांनी पाच वेळेला एक कमी चाळीस फटक्यांची मला शिक्षा दिली. \v 25 तीन वेळा मला छड्यांनी मारण्यात आले. एकदा मला धोंडमार झाला. तीन वेळा माझे तारू फुटले, एक रात्र आणि एक दिवस मी समुद्रात घालविला. \v 26 मी सतत प्रवास केले आहेत आणि नद्यांची संकटे, लुटारूंची संकटे, यहूदी लोकांची संकटे, गैरयहूदी लोकांची संकटे, शहरातील संकटे, गावातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या विश्वासणार्‍यांपासून संकटे. \v 27 मी श्रम व कष्ट केले आणि अनेकदा झोपेशिवाय राहिलो आहे. अनेक वेळा मी उपाशी व तान्हेला होतो; पुष्कळदा भोजनाशिवाय राहिलो आहे; मी थंडीने कुडकुडलो व नग्न होतो. \v 28 मग याव्यतिरिक्त, दररोज सर्व मंडळ्यांच्या चिंतेचे ओझे माझ्यावर आहे. \v 29 जर कोणी अशक्त आहे, तर मला अशक्तपणा जाणवत नाही का? कोणी पापात अडखळविला गेला, तर त्याचे मला दुःख होणार नाही काय? \p \v 30 जर मला अभिमान मिरवायचा असेल, तर ज्या गोष्टींमध्ये माझा दुबळेपणा दिसून येतो त्यांचा मी अभिमान मिरवीन. \v 31 परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता, ज्यांची युगानुयुग स्तुती असो, त्यांना ठाऊक आहे की मी लबाडी करीत नाही. \v 32 उदाहरणार्थ, दिमिष्क शहरात अरीतास राजाच्या राज्यपालाने मला पकडण्यासाठी वेशींमध्ये पहारे बसविले होते; \v 33 परंतु मला एका टोपलीत बसविले ती टोपली शहराच्या भिंतीच्या एका झरोक्यातून खाली सोडण्यात आली आणि अशा रीतीने मी तिथून निसटलो. \c 12 \s1 पौलाला झालेला दृष्टान्त व त्याचा काटा \p \v 1 मी प्रौढी मिरवित जाणारच. यामुळे काही निष्पन्न होणार नाही, तरी प्रभूपासून मला जे दृष्टान्त आणि प्रकटीकरणे झाली; त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगत जातो. \v 2 मला एक मनुष्य ख्रिस्तामध्ये माहीत आहे, त्याला चौदा वर्षांपूर्वी तिसर्‍या स्वर्गात वर उचलून नेण्यात आले होते. तो शरीराने किंवा शरीराविरहित मला ते माहीत नाही; परमेश्वराला माहीत आहे. \v 3 आणि मला माहीत आहे की हा मनुष्य शरीराने किंवा शरीराविरहित हे मला माहीत नाही, परमेश्वराला माहीत आहे, \v 4 स्वर्गामध्ये घेतला गेला, आणि ज्या गोष्टींचे वर्णन करून सांगता येणार नाही अशा गोष्टी ऐकल्या. त्या गोष्टी दुसर्‍यांना सांगण्याची परवानगी नाही. \v 5 मी अशा मनुष्याबद्दल प्रौढी मिरवीन, मी स्वतःबद्दल तर नाही, परंतु फक्त माझ्या दुबळेपणाची प्रौढी मिरवीन. \v 6 मी प्रौढी मिरवावी असे ठरविले तर तसे केल्याने मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी सत्य बोलत आहे, परंतु मी तसे करणार नाही. कारण मी करतो व बोलतो त्यापेक्षा कोणीही मला जास्त मानू नये, अशी माझी इच्छा आहे. \v 7 मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला. \v 8 मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली. \v 9 त्यांनी म्हटले, “माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील. \v 10 ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो. \s1 पौलाची करिंथकरांबद्दलची आस्था \p \v 11 अशा रीतीने प्रौढी मिरवायला लावून, मी स्वतःला मूर्ख बनविले आहे आणि तुम्ही मला तसे वागायला भाग पाडले आहे. खरेतर तुम्ही माझी प्रशंसा करावयास पाहिजे होती, जरी मी तुच्छ असलो तरी त्या “उच्च प्रेषितांच्या” तुलनेत मी कमी नाही. \v 12 मी तुमच्याबरोबर राहत असताना मी निश्चित प्रेषित आहे, याचा पुरावा धीराने तुमच्यामध्ये अनेक चमत्कार, चिन्हे आणि महत्कृत्ये केली यामधून दिसून येते. \v 13 मी माझे ओझे तुमच्यावर टाकले नाही तर इतर मंडळ्यांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीत तुम्ही कमी भरला? या चुकीबद्दल तुम्ही मला कृपा करून क्षमा करा! \p \v 14 आता मी तिसर्‍यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे. \v 15 मी तुम्हासाठी जे काही आहे ते आनंदाने सर्व खर्च करण्यासाठी तयार आहे आणि मला स्वतःसही खर्च करण्यास तयार आहे. जर मी तुमच्यावर अधिक प्रीती करतो, तर तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता का? \v 16 काही असो, मी तुमच्यावर ओझे झालो नाही. तरीही, मी धूर्त आहे आणि मी आपल्याला फसविले असे तुम्हाला वाटते का? \v 17 ज्या लोकांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्याद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला का? \v 18 तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का? \p \v 19 आम्ही स्वतःच्या बचावासाठी हे करतो असे तुम्हाला वाटते का? आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहोत. प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे. \v 20 कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल. \v 21 होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल. \c 13 \s1 अखेरचे इशारे \p \v 1 तुमच्या भेटीला येण्याची ही माझी तिसरी वेळ राहील. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.”\f + \fr 13:1 \fr*\ft \+xt अनु 19:15\+xt*\ft*\f* \v 2 मी तुमच्याबरोबर दुसर्‍या खेपेला तिथे असताना आधी इशारा दिलाच आहे. आणि आता मी अनुपस्थित असतानाही सांगतो: मी परत आलो तर ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्या सर्वांची गय करणार नाही \v 3 ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतात या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. ते तुम्हाविषयी अशक्त नाही, तर ते तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी अशक्त नाही तर सामर्थी असे आहेत. \v 4 त्यांना अशक्तपणात क्रूसावर खिळले गेले, तरी परमेश्वराच्या शक्तीने ते जिवंत आहेत. त्यासारखेच आम्ही त्यांच्यामध्ये अशक्त आहोत, तरी परमेश्वराच्या शक्तीने तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी जिवंत आहोत. \p \v 5 तुम्हीच स्वतःचे परीक्षण करा. तुम्ही निश्चित विश्वासात आहात की नाही; तुमची परीक्षा करून पाहा. ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे हे तुम्हाला कळत नाही तर कदाचित तुम्ही परीक्षेत उतरला नाहीत? \v 6 या कसोटीत आम्ही अयशस्वी झालो नाही हे तुम्हाला आढळून येईल, असा विश्वास धरतो. \v 7 आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे. \v 8 आपण सत्याविरूद्ध काही करू शकत नाही, परंतु सत्यासाठीच करू शकतो. \v 9 तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे. \v 10 मी या गोष्टी माझ्या अनुपस्थित लिहितो ते या आशेने की, तिथे आल्यावर जो अधिकार प्रभूने मला दिला त्याचा कठीण रीतीने वापर करून तुम्हाला पाडण्यासाठी नव्हे तर तुमची वृद्धी करण्यासाठी करू. \b \s1 शेवटच्या शुभेच्छा \p \v 11 शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो. \b \p \v 12 एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा. \p \v 13 या ठिकाणी असणारे परमेश्वराचे सर्व लोक तुम्हाला शुभेच्छा पाठवित आहेत. \b \p \v 14 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.