\id 2CH - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 2 इतिहास \toc1 2 इतिहास \toc2 2 इतिहास \toc3 2 इति \mt1 2 इतिहास \c 1 \s1 ज्ञानासाठी शलमोनाची प्रार्थना \p \v 1 दावीद राजाचा पुत्र शलोमोनाने स्वतःस इस्राएलच्या राज्यावर भक्कमपणे स्थापित केले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराने त्याला अत्यंत महान बनविले होते. \p \v 2 मग शलोमोन संपूर्ण इस्राएलास म्हणाला—फौजेचे सहस्त्राधिपती व शताधिपती, न्यायाधीश, इस्राएलातील सर्व पुढारी, कुटुंबप्रमुख— \v 3 शलोमोन व संपूर्ण सभा गिबोनच्या उच्चस्थानी गेले, कारण याहवेहचा सेवक मोशेने अरण्यवासात परमेश्वराचा सभामंडप उभारला होता. \v 4 दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता. \v 5 परंतु हूरचा पुत्र, उरीचा पुत्र बसालेलाने गिबोनात कास्याच्या धातूची वेदी याहवेहच्या कोशासमोर बनविली होती; आता शलोमोन व सर्व लोक त्यांची इच्छा जाणून घेण्यास आले. \v 6 शलोमोन याहवेहच्या समक्षतेत सभामंडपात गेला व त्याने कास्याच्या वेदीवर एक हजार होमबली अर्पिले. \p \v 7 त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.” \p \v 8 शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले. \v 9 आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले. \v 10 या लोकांना मार्गदर्शन करण्यास मला सुज्ञता व ज्ञान द्या, कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकणार?” \p \v 11 तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस, \v 12 तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.” \p \v 13 नंतर शलोमोन गिबोनाच्या उच्च स्थानावरील सभामंडपावरून निघून यरुशलेमास गेला आणि इस्राएलावर राज्य करू लागला. \p \v 14 शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे,\f + \fr 1:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa घोडेस्वार\fqa*\f* जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती. \v 15 राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. \v 16 शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे\f + \fr 1:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa सिलिसिआ\fqa*\f* वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असे. \v 17 त्यांनी सहाशे शेकेल चांदी\f + \fr 1:17 \fr*\ft अंदाजे 6.9 कि.ग्रॅ.\ft*\f* देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी\f + \fr 1:17 \fr*\ft अंदाजे 1.7 कि.ग्रॅ.\ft*\f* इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते निर्यात करीत असे. \c 2 \s1 मंदिर बांधण्याची तयारी \p \v 1 शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली. \v 2 या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली. \p \v 3 शलोमोनाने सोरचा राजा हीराम\f + \fr 2:3 \fr*\fq हीराम \fq*\fqa हुरामचे \fqa*\ft दुसरे रूप\ft*\f* याच्याकडे हा निरोप पाठविला: \pm “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे. \v 4 आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत. \pm \v 5 “मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत. \v 6 परंतु ज्यांना स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्ग सुद्धा अपुरा आहे, त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास कोण समर्थ आहे? तर मग मंदिर बांधणारा मी कोण? केवळ त्यांच्या पुढे अर्पणे करण्यासाठी स्थान मी बांधत आहे. \pm \v 7 “म्हणून या कामासाठी सोने, चांदी, कास्य व लोखंड या कामात एक कुशल व हुशार कारागीर, जांभळ्या, किरमिजी व निळ्या रंगांचे कापड विणण्यात आणि उत्तम नक्षीचे कोरीव काम करण्यात तरबेज कारागीर माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ यहूदीयात व यरुशलेममध्ये, माझे पिता दावीदाने निवडलेले जे निपुण कारागीर आहेत, त्यांच्याबरोबर तो काम करेल. \pm \v 8 “याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील. \v 9 जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल. \v 10 तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर\f + \fr 2:10 \fr*\ft अंदाजे 3,200 मेट्रिक टन\ft*\f* झोडलेला गहू, वीस हजार कोर\f + \fr 2:10 \fr*\ft अंदाजे 2,700 मेट्रिक टन\ft*\f* जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ\f + \fr 2:10 \fr*\ft अंदाजे 440,000 लीटर\ft*\f* व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.” \p \v 11 सोरचा राजा हीरामाने शलोमोन राजाच्या पत्रास असे उत्तर पाठविले: \pm “कारण याहवेह आपल्या लोकांवर प्रेम करतात, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला त्यांचा राजा केले आहे.” \p \v 12 हीराम पुढे हे देखील म्हणाला, \pm “इस्राएलचे परमेश्वर याहवेह धन्यवादित असो, ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली! त्यांनी दावीद राजाला तुमच्यासारखा सुज्ञ, बुद्धिमान व समजूतदार पुत्र दिला, जो याहवेहचे मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधेल. \pm \v 13 “माझ्याकडे असलेला अत्यंत निष्णात असा हुराम-आबी हा कारागीर मी तुमच्याकडे पाठवित आहे. \v 14 त्याची आई दान येथील एक इस्राएली स्त्री असून त्याचा पिता सोरचा आहे. सोन्याचांदीच्या कामाची तसेच कास्य व लोखंडी, दगडकाम, सुतारकी, जांभळा, निळा व किरमिजी रंगाच्या सुताचे व तलम कापडाच्या विणकामाची त्याला संपूर्ण माहिती आहे. तो उत्तम कोरीव काम जाणणारा असून त्याला देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. तो तुमच्याकडील कामगार आणत असे तुमचे पिता व माझा प्रभू दावीद राजे यांनी नेमणूक केलेल्या तुमच्या कारागिरांबरोबर काम करेल. \pm \v 15 “आता माझ्या स्वामींनी कबूल केलेले गहू, जव, द्राक्षारस व जैतुनाचे तेल पाठवून द्या. \v 16 आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.” \p \v 17 शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले. \v 18 त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली. \c 3 \s1 शलोमोन मंदिर बांधतो \p \v 1 मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती. \v 2 शलोमोन राजाने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बांधकामास सुरुवात केली. \p \v 3 परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात\f + \fr 3:3 \fr*\ft अंदाजे 27 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद\ft*\f* होती. \v 4 मंदिरापुढील द्वारमंडपाची लांबी मंदिराच्या रुंदीएवढीच म्हणजेच वीस हात व उंचीही वीस हात होती. \p त्याच्या आतील भाग शुद्ध सोन्याने मढविलेला होता. \v 5 मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते. \v 6 मंदिर मोलवान रत्नांनी सजविले होते. परवाईम नामक ठिकाणी मिळणारे सोने वापरण्यात आले होते. \v 7 त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली. \p \v 8 त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत\f + \fr 3:8 \fr*\ft अंदाजे 21 मेट्रिक टन\ft*\f* शुद्ध सोन्याने मढविला. \v 9 त्यात पन्नास शेकेल\f + \fr 3:9 \fr*\ft अंदाजे 575 ग्रॅ.\ft*\f* वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता. \p \v 10 मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले. \v 11 करुबांच्या पंखांची एकूण लांबी वीस हात होती. पहिल्या करुबाचा एक पंख पाच हात लांब होता आणि तो मंदिराच्या भिंतीला लागून होता, तर त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात\f + \fr 3:11 \fr*\ft अंदाजे 2.3 मीटर\ft*\f* लांब असून दुसऱ्या करुबाच्या पंखाला लागून होता. \v 12 त्याचप्रमाणे दुसऱ्या करुबांचा एक पंख पाच हात लांब आणि मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागून होता आणि त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब आणि पहिल्या करुबाच्या पंखाला लागून होता. \v 13 या करुबांचे पंख वीस हात पसरलेले होते. मुख्य दिवानखाण्याकडे\f + \fr 3:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa आतील बाजूस\fqa*\f* तोंड करून ते त्यांच्या पायांवर उभे होते. \p \v 14 त्याने करुबांच्या आकाराची कशिदा केलेले निळ्या, जांभळ्या व किरमिजी धाग्यांचे आणि तागाच्या कापडाचे पडदे तयार केले. \p \v 15 मंदिराच्या समोरील भागासाठी त्याने दोन आधारस्तंभ तयार केले जे एकत्र मिळून पस्तीस हात\f + \fr 3:15 \fr*\ft अंदाजे 16 मीटर\ft*\f* लांब होते, प्रत्येक स्तंभावर पाच हात उंचीचा कळस होता. \v 16 त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले. \v 17 त्याने मंदिराच्या समोर आधारस्तंभ बांधले, एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे असे ते उभारले. दक्षिणेकडील खांबाला त्याने याखीन\f + \fr 3:17 \fr*\fq याखीन \fq*\ft अंदाजे अर्थ \ft*\fqa तो स्थापित करतो\fqa*\f* असे नाव दिले आणि उत्तरेकडील खांबाला बवाज\f + \fr 3:17 \fr*\fq बवाज \fq*\ft अंदाजे अर्थ \ft*\fqa त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे\fqa*\f* असे नाव दिले. \c 4 \s1 मंदिराची सजावट \p \v 1 त्याने वीस हात लांब आणि वीस हात रुंद आणि दहा हात उंच\f + \fr 4:1 \fr*\ft अंदाजे 9 मीटर लांब आणि रुंद व 4.5 मीटर उंच\ft*\f* अशी कास्याची एक वेदी तयार केली. \v 2 त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्‍या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात\f + \fr 4:2 \fr*\ft अंदाजे 14 मीटर\ft*\f* दोरी लागत असे. \v 3 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या\f + \fr 4:3 \fr*\ft अंदाजे 45 सें.मी\ft*\f* अंतरावर बैलाच्या आकृती होत्या. हे बैल हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या. \p \v 4 हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते. \v 5 त्याची जाडी चार बोटे\f + \fr 4:5 \fr*\ft अंदाजे 7.5 सें.मी.\ft*\f* होती आणि पेल्याचा घेर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ\f + \fr 4:5 \fr*\ft अंदाजे 66,000 लीटर\ft*\f* पाणी मावत असे. \p \v 6 होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे. \p \v 7 दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्याने सोन्याच्या दहा समया तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये पाच दक्षिण बाजूच्या भागावर आणि पाच उत्तर बाजूच्या भागावर ठेवल्या. \p \v 8 त्याने दहा मेज तयार केले आणि ते मंदिरात ठेवले, पाच दक्षिणेकडे आणि पाच उत्तरेकडे. पाणी शिंपडणारे सोन्याचे शंभर कटोरे सुद्धा तयार केले. \p \v 9 नंतर त्याने याजकांसाठी एक अंगण व जनतेसाठी एक मोठे अंगण तयार केले व त्यांचे दरवाजे कास्य धातूने मढविले. \v 10 त्याने पाण्याचा हौद दक्षिण बाजूला, दक्षिणपूर्व दिशेच्या कोपऱ्यावर ठेवला. \p \v 11 आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. \p हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले: \b \li1 \v 12 दोन खांब; \li1 खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; \li1 खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच; \li1 \v 13 त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा); \li1 \v 14 तिवड्या व त्यांची गंगाळे; \li1 \v 15 हौद आणि त्याखालील बारा बैल; \li1 \v 16 भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. \b \p शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या. \v 17 राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान\f + \fr 4:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa जेरेदाह\fqa*\f* प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या. \v 18 या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते. \p \v 19 परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: \b \li1 सोन्याची वेदी; \li1 मेज, ज्यांच्यावर समक्षतेची भाकर ठेवली होती; \li1 \v 20 नेमून दिल्याप्रमाणे आतील पवित्रस्थानासमोर जाळण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्यांचे दिवे; \li1 \v 21 सोन्याच्या फुलांची सजावट आणि दिवे आणि चिमटे (ते शुद्ध सोन्याचे होते); \li1 \v 22 दिव्याच्या वाती कापण्याची शुद्ध सोन्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; मंदिराचा सोन्याचा प्रवेशभाग: मुख्य द्वार, परमपवित्रस्थानाची आतील दारेसुध्दा सोन्याची होती. \b \c 5 \p \v 1 याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने त्याचा पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि इतर सामान—शलोमोनाने त्या वस्तू परमेश्वराच्या मंदिराच्या भांडार्‍यात ठेवल्या. \s1 कोश मंदिरात आणतात \p \v 2 तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले. \v 3 आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले. \p \v 4 जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला, \v 5 आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेव्यांनी ती वाहून आणली, \v 6 राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचे आणि गुरांचे बळी देत होते की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती. \p \v 7 नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला. \v 8 करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते. \v 9 ते दांडे इतके लांब होते की, त्यांची कोशालगत असलेली टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असे, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ते दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत. \v 10 इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते. \p \v 11 त्यानंतर याजक पवित्रस्थानापासून मागे निघाले. तिथे असलेल्या सर्व याजकांनी त्यांच्या वर्गाकडे लक्ष न देता स्वतःस पवित्र करून घेतले होते. \v 12 सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले. \v 13 रणशिंग वाजविणारे आणि संगीतकार याहवेहस्तव एकसुरात स्तुतिगान आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसहित गायकांनी याहवेहची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचाविला व ते गाईले: \q1 “ते चांगले आहेत; \q2 त्यांचे प्रेम सर्वकाळ टिकते.” \p तेव्हा याहवेहचे मंदिर मेघांनी भरून गेले, \v 14 आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते. \c 6 \s1 मंदिराचे समर्पण \p \v 1 तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील; \v 2 मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.” \p \v 3 इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला. \v 4 मग राजा म्हणाला: \pm “याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीदाला आपल्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की, \v 5 ‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही. \v 6 परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’ \pm \v 7 “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते. \v 8 पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले. \v 9 तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’ \pm \v 10 “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे. \v 11 तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.” \s1 शलमोनाची समर्पणाची प्रार्थना \p \v 12 नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले \v 13 शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच\f + \fr 6:13 \fr*\ft अंदाजे 2.3 मीटर लांब आणि रुंद आणि 1.4 मीटर उंच\ft*\f* असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले. \v 14 तो म्हणाला: \pm “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात. \v 15 आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे. \pm \v 16 “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीदाला आपण जे वचन दिले होते ते पाळावे. आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर माझ्या नियमानुसार चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही कमी पडणार नाही.’ \v 17 तर आता, याहवेह हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीदाला जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे. \pm \v 18 “पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? \v 19 तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या. \v 20 आपण आपले नाव देणार असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. \v 21 आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंत्या करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या व ती ऐकून त्यांना क्षमा करा. \pm \v 22 “जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली आणि ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, \v 23 तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा. \pm \v 24 “तुमच्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा तुमचे इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातील आणि जेव्हा ते तुमच्याकडे पुन्हा वळतील व आपल्या नावाची थोरवी गाऊन या मंदिरात तुमच्यापुढे प्रार्थना व विनंती करतील, \v 25 तेव्हा स्वर्गातून ऐकून तुमच्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश तुम्ही त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे. \pm \v 26 “तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही, आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील, आणि तुमच्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, \v 27 तेव्हा त्यांची विनंती ऐकून तुमचे सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा, व जो देश तुम्ही तुमच्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा. \pm \v 28 “जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला, \v 29 आणि तुमच्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश आणि वेदना जाणून प्रार्थना किंवा विनंती करतील आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील; \v 30 तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार घडवून आणा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण तुम्हाला त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ तुम्हीच मानवाचे हृदय जाणणारे आहात), \v 31 यासाठी की जो देश तुम्ही आमच्या पूर्वजांना दिला त्यात जितका काळ ते राहतील, त्यांनी तुमचे भय बाळगावे व तुमच्या आज्ञेत राहावे. \pm \v 32 “असा कोणी परदेशी, जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही, परंतु तुमचे महान नाव आणि तुमची पराक्रमी भुजा आणि तुमचा लांबवलेला बाहू यामुळे तिथे दूरवरील देशातून आले व त्यांनी मंदिराकडे वळून प्रार्थना केली, \v 33 तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे, तिथून तुम्ही त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही तुमच्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी तुमचे नाव ओळखावे व तुमच्या इस्राएली लोकांप्रमाणे तुमचे भय धरावे, व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर तुमचे नाव आहे. \pm \v 34 “जेव्हा तुमचे लोक तुम्ही जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे तुमची प्रार्थना करतात, \v 35 तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. \pm \v 36 “जेव्हा ते तुमच्याविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणीही मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून तुम्ही त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले; \v 37 आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्या देशात तुमच्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत आणि आम्ही दुष्टतेने वागलो आहोत,’ \v 38 आणि त्यांना कैद करून नेलेल्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने तुमच्याकडे वळले आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर तुम्ही निवडले आणि मी तुमच्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, \v 39 तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंत्या ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. आणि ज्या तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करा. \pm \v 40 “माझ्या परमेश्वरा, आता तुमचे डोळे उघडे असावेत आणि तुमचे कान या ठिकाणी केल्या जाणार्‍या प्रार्थनांकडे लागावे. \qm1 \v 41 “याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह, \qm2 तुमच्या विश्रामस्थानी या. \qm1 याहवेह परमेश्वरा, तुमचे याजक तारणाचे वस्त्र परिधान करतील, \qm2 तुमचे विश्वासू लोक तुमच्या चांगुलपणामध्ये आनंद करतील. \qm1 \v 42 हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका. \qm2 तुमचा सेवक दावीदाला दिलेल्या महान प्रीतीच्या अभिवचनाची आठवण ठेवा.” \c 7 \s1 मंदिराचे समर्पण \p \v 1 शलोमोनाने जेव्हा प्रार्थना करण्याचे संपविले, तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्याने होमार्पणे आणि बलिदाने भस्मसात करून टाकली आणि याहवेहच्या गौरवाने मंदिर भरून गेले. \v 2 याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते. \v 3 जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला, \q1 “ते चांगले आहेत; \q2 त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” \m \v 4 नंतर राजा आणि सर्व लोकांनी याहवेहसमोर होमार्पणे केली. \v 5 शलोमोन राजाने बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे अर्पण केली. याप्रकारे राजाने व सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. \v 6 याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते. \p \v 7 शलोमोनाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधील भाग पवित्र केला, आणि तिथे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणाचे मांदे ही अर्पण केली, कारण जी कास्याची वेदी त्याने बनविली होती त्यात होमार्पणे, धान्यार्पणे व मांदे मावत नव्हते. \p \v 8 तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर सात दिवस सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे राहिवासी आले होते. \v 9 आठव्या दिवशी त्यांनी सभा भरविली, कारण त्यांनी सात दिवस वेदीवर समर्पण आणि आणखी सात दिवस उत्सव साजरा केला होता. \v 10 सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी त्याने लोकांना त्यांच्या घरी रवाना केले, याहवेहने दावीद आणि शलोमोन आणि त्यांच्या इस्राएली लोकांसाठी जी चांगली कृत्ये केली, त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता. \s1 शलमोनाला याहवेहचे दर्शन \p \v 11 शलोमोनाने याहवेहचे मंदिर आणि राजमहालाचे काम संपविले आणि याहवेहच्या मंदिरात व आपल्या राजवाड्यात जे काही करावे असे त्याचे मनोरथ होते ते सर्व करण्यात तो यशस्वी झाला. \v 12 रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले: \pm “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी स्वतःकरिता हे ठिकाण यज्ञांसाठी मंदिर म्हणून निवडले आहे. \pm \v 13 “जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन, \v 14 जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन. \v 15 आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील. \v 16 मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील. \pm \v 17 “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, \v 18 तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’ \pm \v 19 “परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली, \v 20 तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन. \v 21 हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’ \v 22 तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर ज्यांनी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून त्यांनी त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ” \c 8 \s1 शलमोनाची इतर कार्ये \p \v 1 शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले. \v 2 शलोमोनाने त्याला हीरामकडून\f + \fr 8:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa हुराम\fqa*\f* मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली. \v 3 नंतर शलोमोन हमाथ-सोबाहकडे गेला आणि ते ताब्यात घेतले \v 4 त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली. \v 5 त्याने वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन ही तटबंदीची शहरे, मोठ्या भिंती आणि प्रवेशद्वारांची धातूंचे गज बसवून पुनर्बांधणी केली, \v 6 त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले. \p \v 7 हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते. \v 8 या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएल लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे. \v 9 परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते. \v 10 शलोमोन राजाचे ते मुख्य अधिकारीसुद्धा होते, माणसांवर देखरेख ठेवणारे दोनशे पन्नास अधिकारी होते. \p \v 11 शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.” \p \v 12 याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले, \v 13 शब्बाथ, अमावस्या आणि वर्षातून तीन वेळा सण यासाठी मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे अर्पणे करण्यासाठी रोजच्या गरजेनुसार शलोमोनाने त्यावर याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले—बेखमीर भाकरीचा सण, आठवड्यांचा सण आणि मंडपांचा सण असे ते तीन सण. \v 14 त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली. \v 15 राजाने याजकांना किंवा लेवीय यांना दिलेल्या कोणत्याही आज्ञेपासून तसेच भंडाराच्या अंतर्भूत विषयामधील आज्ञेपासून ते विचलित झाले नाहीत. \p \v 16 ज्या दिवसापासून याहवेहच्या मंदिराची पायाभरणी केली गेली, त्या दिवसापासून ते होईपर्यंत शलोमोनचे सर्व कार्य पूर्ण झाले. याहवेहचे मंदिरही पूर्ण झाले. \p \v 17 नंतर शलोमोन एदोम या बंदरावर असलेल्या एजिओन-गेबेर आणि एलोथ येथे गेला. \v 18 आणि हीरामाने त्याला आपल्या माणसांबरोबर म्हणजेच त्याच्या अनुभवी खलाश्यांनी चालविलेली जहाजे पाठविली. त्यांनी शलोमोनच्या माणसांबरोबर ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे पन्नास तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.\f + \fr 8:18 \fr*\ft अंदाजे 15 मेट्रिक टन\ft*\f* \c 9 \s1 शेबाच्या राणीची भेट \p \v 1 जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनच्या किर्तीविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती यरुशलेमास आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली. \v 2 शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही त्याच्यासाठी कठीण नव्हते. \v 3 जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला, \v 4 त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे अंगरखे, प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेली होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली. \p \v 5 ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे. \v 6 परंतु त्यांनी मला जे सांगितले त्यावर मी येथे येऊन या गोष्टी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत विश्वास केला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले ते अर्धे देखील नाही; त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे. \v 7 आपले लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील! \v 8 याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला याहवेह तुमचे परमेश्वरासाठी राजा म्हणून आपल्या राजासनावर अधिकार करण्यास ठेवले. कारण तुमच्या परमेश्वराचे इस्राएलवर असलेले प्रेम आणि त्यांना सर्वकाळ पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा, यासाठी त्यांनी तुम्हाला त्यांच्यावर राजा केले, यासाठी की न्याय आणि धार्मिकता टिकवून धरावी.” \p \v 9 नंतर तिने राजाला एकशेवीस तालांत सोने,\f + \fr 9:9 \fr*\ft अंदाजे 4 मेट्रिक टन\ft*\f* पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये आणली त्यासारखी त्यानंतर परत कधी नव्हती. \p \v 10 (हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन\f + \fr 9:10 \fr*\fq चंदन \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa अलमद\fqa*\f* आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली. \v 11 शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात पायर्‍या बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. यहूदीयामध्ये त्यासारखे कधीही पाहण्यात आले नव्हते.) \p \v 12 शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, तिने त्याच्यासाठी जितके आणले होते, त्यापेक्षा जास्त त्याने तिला दिले. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली. \s1 शलोमोनचे ऐश्वर्य \p \v 13 शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत\f + \fr 9:13 \fr*\ft अंदाजे 23 मेट्रिक टन\ft*\f* होते, \v 14 व्यापारी आणि सावकार यांच्यापासून येणारा महसूलचा यात समावेश नाही. तसेच अरब देशाचे सर्व राजे आणि शासनाच्या अंतर्गत प्रदेशाचे राज्यपाल शलोमोनासाठी सोने आणि चांदी आणत होते. \p \v 15 शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे फार मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल\f + \fr 9:15 \fr*\ft अंदाजे 6.9 कि.ग्रॅ.\ft*\f* ठोकलेले सोने लागले होते. \v 16 तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीनशे शेकेल\f + \fr 9:16 \fr*\ft अंदाजे 3.5 कि.ग्रॅ.\ft*\f* सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या. \p \v 17 नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले. \v 18 त्या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याला जोडूनच पाय ठेवण्यासाठी सोन्याचे पायदान होते. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह उभे केले होते. \v 19 प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते. \v 20 शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. \v 21 हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत. \p \v 22 संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. \v 23 परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व राजे येत असत. \v 24 आणि जे लोक येत असत ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत. \p \v 25 शलोमोनाकडे घोड्यांसाठी आणि रथांसाठी चार हजार तबेले होते आणि बारा हजार घोडे होते, जे त्याने रथाच्या नगरांमध्ये आणि यरुशलेममध्ये राजाने स्वतःजवळ ठेवले होते. \v 26 फरात\f + \fr 9:26 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीपासून ते पलिष्टी लोकांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत असलेल्या सर्व राजांवर त्याने राज्य केले. \v 27 राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. \v 28 शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि इतर सर्व देशातून केलेली होती. \s1 शलोमोनाचा मृत्यू \p \v 29 शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते नाथान संदेष्ट्याच्या नोंदीमध्ये, शिलोनी अहीयाहच्या भविष्यवाणीमध्ये आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमविषयी इद्दो संदेष्ट्याच्या दृष्टान्तात लिहिलेल्या नाहीत का? \v 30 शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. \v 31 नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा वारस रेहोबोअम राजा झाला. \c 10 \s1 इस्राएलचे रेहोबोअमविरुद्ध बंड \p \v 1 रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते. \v 2 जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो अजूनही इजिप्त देशातच होता तिथे तो शलोमोन राजापासून पळून गेला होता), तो इजिप्तवरून परत आला होता. \v 3 तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि संपूर्ण इस्राएल रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले: \v 4 “तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू तुम्ही हलके करावे, म्हणजे आम्ही तुमची सेवा करू.” \p \v 5 रेहोबोअमने उत्तर दिले, “माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले. \p \v 6 तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?” \p \v 7 त्यांनी उत्तर दिले, “जर तुम्ही या लोकांना दया दाखविली आणि त्यांना संतुष्ट केले व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.” \p \v 8 पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला. \v 9 त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?” \p \v 10 त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुम्हाला म्हणाले आहेत की, ‘तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू तुम्ही हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे. \v 11 माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ” \p \v 12 तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” \v 13 वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत रेहोबोअम राजाने त्यांना कठोरपणे उत्तर दिले, \v 14 तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.” \v 15 अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे परमेश्वराने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या. \p \v 16 राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: \q1 “दावीदामध्ये आमचा काय वाटा, \q2 इशायच्या मुलाशी आमचा काय भाग, \q1 इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! \q2 दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” \m असे म्हणत इस्राएलचे सर्व लोक परत घरी गेले. \v 17 परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले. \p \v 18 हदोराम\f + \fr 10:18 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अदोनिराम\fqa*\f* जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला. \v 19 याप्रकारे इस्राएल लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे. \c 11 \p \v 1 जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करणारे आणि रेहोबोअमला राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते. \p \v 2 परंतु परमेश्वराचा मनुष्य शमायाह याच्याकडे याहवेहचे वचन आले: \v 3 “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअमला व यहूदीयातील सर्व इस्राएली व बिन्यामीनच्या लोकांना सांग, \v 4 ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएली जे तुमचे बांधव आहेत, त्यांच्याविरुद्ध युद्ध करू नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे मी सांगत आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि आणि यरोबोअमच्या विरुद्ध युद्ध करण्यापासून माघार घेतली. \s1 रेहोबोअमची यहूदीयाला तटबंदी \p \v 5 रेहोबोअम यरुशलेममध्ये राहिला आणि यहूदीयामध्ये त्याने संरक्षणासाठी या नगरांची बांधणी केली: \v 6 बेथलेहेम, एटाम, तकोवा, \v 7 बेथ-सूर, सोकोह, अदुल्लाम, \v 8 गथ, मारेशाह, जीफ, \v 9 अदोराईम, लाखीश, अजेकाह, \v 10 सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती. \v 11 त्याने त्या नगरांची संरक्षणव्यवस्था मजबूत केली आणि त्यांच्यामध्ये सेनापती ठेवले आणि त्यांना अन्न, जैतुनाचे तेल आणि द्राक्षारसाचा पुरवठा केला. \v 12 त्याने तेथील प्रत्येक नगरात ढाली आणि भाले ठेवले आणि त्यांना फारच सामर्थ्यवान केले. म्हणून यहूदीया आणि बिन्यामीन त्याच्याकडेच राहिले. \p \v 13 संपूर्ण इस्राएलमधील सर्व जिल्ह्यातील याजक आणि लेवींनी त्याची बाजू घेतली. \v 14 लेवीय लोकांनी त्यांची कुरणे आणि मालमत्तासुद्धा सोडली आणि ते यहूदीया आणि यरुशलेमेत आले, कारण यरोबोअम आणि त्याच्या मुलांनी त्यांना याहवेहचे याजक म्हणून नाकारले होते, \v 15 जेव्हा त्याने उच्चस्थानांसाठी आणि वासराच्या आणि बोकडाच्या मूर्ती तयार करून त्यासाठी स्वतःचे याजक नेमले. \v 16 इस्रायलच्या प्रत्येक वंशातील ज्या लोकांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या शोधात त्यांचे अंतःकरण लावले होते, ते लेवीय लोकांच्या मागे यरुशलेमकडे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहसाठी यांच्या बलिदानांचे अर्पण करण्यासाठी गेले. \v 17 त्यांनी यहूदीयाचे राष्ट्र बळकट केले आणि शलोमोनचे पुत्र रेहोबोअमला तीन वर्षे पाठिंबा दिला, याकाळात त्यांनी दावीद आणि शलोमोनच्या मार्गाचे अनुसरण केले. \s1 रेहोबोअमचे कुटुंब \p \v 18 रेहोबोअमने महालाथ बरोबर विवाह केला, जी दावीदाचा पुत्र यरिमोथ आणि अबीहाईल, इशायाचा पुत्र एलियाबची कन्या होती. \v 19 तिने त्याच्या या मुलांना जन्म दिला: यऊश, शमरियाह आणि जाहम. \v 20 नंतर त्याने अबशालोमची कन्या माकाह हिच्याशी विवाह केला, जिने अबीयाह, अत्तय, जीजा आणि शेलोमीथ यांना जन्म दिला. \v 21 रेहोबोअमने त्याच्या इतर पत्नी आणि उपपत्नींपेक्षा अबशालोमची कन्या माकाहवर जास्त प्रीती केली. त्याला एकूण अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी, अठ्ठावीस मुले आणि साठ मुली होत्या. \p \v 22 रेहोबोअमने माकाहचा मुलगा अबीयाह याला राजा करण्यासाठी त्याच्या सर्व भावांमध्ये राजपुत्र म्हणून त्याची नेमणूक केली. \v 23 तो फार हुशारीने वागला आणि त्याच्या काही मुलांना यहूदीया आणि बिन्यामीन प्रांतात आणि सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये पांगविले. त्याने त्यांना विपुल पुरवठा दिला आणि त्यांच्यासाठी अनेक पत्नी केल्या. \c 12 \s1 शिशाकची यरुशलेमवर स्वारी \p \v 1 राजा म्हणून रेहोबोअमचे स्थान स्थापित झाल्यानंतर आणि तो बलवान झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेह यांचे नियम सोडून दिले. \v 2 याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला. \v 3 बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी\f + \fr 12:3 \fr*\ft किंवा नाईल नदीच्या वरच्या भागात राहणारे लोक\ft*\f* चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले. \v 4 त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली शहरे काबीज केली आणि ते यरुशलेमपर्यंत आले. \p \v 5 नंतर शमायाह संदेष्टा रेहोबोअम आणि शिशाकच्या भयाने यरुशलेममध्ये जमलेल्या यहूदीयाच्या पुढाऱ्यांकडे आला आणि त्यांना म्हणाला, “याहवेह असे म्हणतात, तुम्ही मला सोडून दिले आहे; त्यामुळेच मी आता तुम्हाला शिशाककडे सोडून देतो.” \p \v 6 तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!” \p \v 7 जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही. \v 8 तथापि, ते त्याच्या अधीन होतील, म्हणजे माझी सेवा करणे आणि दुसऱ्या देशातील राजांची सेवा करणे यातील फरक त्यांना समजून येईल.” \p \v 9 इजिप्तचा राजा शिशाक याने जेव्हा यरुशलेमवर हल्ला केला, त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले. \v 10 म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती स्वाधीन केल्या. \v 11 जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत. \p \v 12 रेहोबोअमने स्वतःला नम्र केले त्यामुळे, याहवेहचा राग त्याच्यापासून दूर वळला आणि तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. खरोखरच, यहूदीयामध्ये काही चांगलेही होते. \p \v 13 रेहोबोअम राजाने स्वतःला यरुशलेममध्ये स्थिर केले आणि राजा म्हणून राहिला. त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. \v 14 त्याने दुष्ट कृत्य केले, कारण याहवेहचा शोध घ्यावा याकडे त्याने त्याचे अंतःकरण लावलेले नव्हते. \p \v 15 रेहोबोअमच्या कारकिर्दीतील घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शमायाह संदेष्टा आणि इद्दो द्रष्टा यांनी तयार केलेल्या वंशावळीत त्या लिहिलेल्या नाहीत काय? रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले. \v 16 रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र अबीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला. \c 13 \s1 यहूदीयाचा राजा अबीयाह \p \v 1 इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला. \v 2 त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह\f + \fr 13:2 \fr*\ft मूळ भाषेत \ft*\fqa मिखायाह\fqa*\f* होते. ती गिबियाह येथील उरीएल याची कन्या होती. \p अबीयाह व यरोबोअम यांच्यामध्ये युद्ध झाले. \v 3 अबीयाहने चार लाख सक्षम योद्धे घेतले, यरोबोअम आठ लाख संख्या असलेले सक्षम सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्धरेषेवर जाऊन थांबला. \p \v 4 अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका! \v 5 तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे\f + \fr 13:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa कधीही न मिटणारा करार\fqa*\f* इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे? \v 6 तरीसुद्धा दावीदाचा पुत्र शलोमोनचा अधिकारी, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने त्याच्या धन्याच्या विरोधात बंड केले. \v 7 कुचकामी गुंडांची टोळी त्याच्या सभोवती गोळा झाली व त्यांनी शलोमोनचा पुत्र रेहोबोअमचा विरोध केला, जो तेव्हा बालक असून व निर्णयक्षमता नसलेला होता व त्यांचा सामना करण्यास असमर्थ होता. \p \v 8 “आणि आता तुम्ही याहवेहच्या राज्याला, जे दावीदाच्या वंशजांच्या हातात आहे, विरोध करण्याची योजना केली आहे. तुमचे खरोखरच प्रचंड सैन्य आहे आणि तुमच्याकडे यरोबोअमने तुमची दैवते केलेली सोन्याची वासरे आहेत. \v 9 तुम्ही याहवेहचे याजक अहरोनाचे पुत्र आणि लेवी यांना हाकलून दिले आणि स्वतःचे याजक तयार केले, जसे इतर देशातील लोक करत नाहीत का? जो कोणी एक तरुण बैल आणि सात मेंढे घेऊन स्वतःला पवित्र करण्यासाठी येतो, तो जी दैवते नाहीत अशांचा पुजारी होऊ शकतो. \p \v 10 “आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात. \v 11 रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे. \v 12 परमेश्वर आम्हाबरोबर आहेत; ते आमचे नेतृत्व करतात. त्यांचे याजक तुझ्याविरुद्ध युद्धाचे रणशिंग वाजवितील. इस्राएलच्या लोकांनो, तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह, यांच्याविरुद्ध लढाई करू नका, कारण तुम्ही यशस्वी होणार नाही.” \p \v 13 यरोबोअमने पाठीमागील सर्व बाजूंनी सैन्य पाठवले होते, म्हणजे तो यहूदीयाच्या पुढे असताना, ते त्यांच्यामागे दबा धरून बसले होते. \v 14 यहूदीयांनी सभोवार पाहिले, तेव्हा आपण मागे व पुढे वेढले गेलो आहोत असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी मदतीकरिता याहवेहचा धावा केला आणि याजक रणशिंग वाजवू लागले. \v 15 जेव्हा यहूदी लोकांनी रणगर्जना केली, तेव्हा परमेश्वराने यरोबोअम आणि संपूर्ण इस्राएली सैन्याचा अबीयाह आणि यहूदीयासमोर नायनाट केला. \v 16 इस्राएली लोक यहूदीयांसमोरून पळून गेले आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या हाती दिले. \v 17 अबीयाह आणि त्याच्या सैन्याने त्यांचे इतके मोठे नुकसान केले की, इस्राएलच्या सक्षम लोकांमधील पाच लाख लोक मारले गेले. \v 18 त्या प्रसंगी इस्राएल लोकांचा पराभव झाला आणि यहूदीयाचे लोक विजयी झाले, कारण ते याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर यांच्यावर विसंबून राहिले होते. \p \v 19 अबीयाहने यरोबोअम याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून बेथेल, यशनाह आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आजूबाजूची गावे घेतली. \v 20 इस्राएलचा राजा यरोबोअम अबीयाहच्या हयातीत परत सत्ता मिळवू शकला नाही. शेवटी याहवेहने त्याला ताडण केले आणि तो मरण पावला. \p \v 21 इकडे यहूदीयाचा राजा अबीयाह फारच बलशाली झाला. त्याला चौदा पत्नी, बावीस पुत्र व सोळा कन्या होत्या. \p \v 22 अबीयाह याच्या शासनकाळातील इतर घटना, त्याने काय केले आणि तो काय म्हणाला, हे सर्व इद्दो संदेष्ट्याने लिहिलेल्या इतिहासात नमूद केलेले आहे. \c 14 \p \v 1 मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा त्याचा वारस म्हणून राजा झाला. त्याच्या कारकिर्दीच्या दहा वर्षे राज्यात शांतता होती. \s1 यहूदीयाचा राजा आसा \p \v 2 आसाने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले आणि योग्य होते ते केले. \v 3 उच्च स्थानावरील परदेशीय दैवतांच्या वेदीचा त्याने नाश केला, पवित्र दगडांचे तुकडे केले आणि अशेरा मूर्तिस्तंभ कापून टाकले. \v 4 त्याने यहूदीयाला त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेण्याची आणि त्यांचे नियम आणि आज्ञा पाळण्याची आज्ञा दिली. \v 5 त्याने यहूदीयाच्या प्रत्येक नगरातील उच्च स्थाने व धूप जाळण्याची प्रत्येक वेदी उद्ध्वस्त केली आणि त्याच्या काळात राज्यास शांतता लाभली. \v 6 त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली नगरे बांधली, कारण देशात शांतता होती. त्या वर्षांमध्ये त्याच्याबरोबर युद्ध करणारा कोणी नव्हता, कारण याहवेहनी त्याला विश्रांती दिली होती. \p \v 7 तो यहूदीयांना म्हणाला, “चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे.” म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले. \p \v 8 आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते. \p \v 9 जेरह कूशी याने हजारोंच्या हजार संख्येने सैन्य आणि तीनशे रथ बरोबर घेऊन त्यांच्याविरुद्ध चढाई केली आणि तो मारेशाहपर्यंत आला. \v 10 आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले. \p \v 11 तेव्हा आसाने त्याचे परमेश्वर याहवेहना हाक मारली आणि म्हणाला, “याहवेह, दुर्बल लोकांना पराक्रमी लोकांविरुद्ध मदत करणारे तुमच्यासारखे कोणी नाही. आमच्या परमेश्वरा, याहवेह आम्हाला मदत करा, कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि तुमच्याच नावामध्ये आम्ही या विशाल सैन्याविरुद्ध आलो आहोत. याहवेह, तुम्ही आमचे परमेश्वर आहात; मर्त्य मानवांनी तुमच्यावर विजयी होऊ नये.” \p \v 12 तेव्हा याहवेहनी आसा आणि यहूदीया यांच्यासमोर कूशी लोकांना तडाखा दिला. कूशी लोक पळून गेले, \v 13 आणि आसा आणि त्याच्या सैन्याने गरारपर्यंत त्यांचा पाठलाग केला. एवढ्या मोठ्या संख्येने कूशी पडले की ते परत स्वतःला उभारू शकले नाहीत; याहवेह आणि त्यांच्या सैन्यासमोर त्यांचा चुराडा झाला. यहूदीयाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट करून नेली. \v 14 गरारच्या सभोवतालची सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली, कारण याहवेहची दहशत त्यांच्यावर पसरली होती. त्यांनी ही सर्व गावे लुटली, कारण तिथे लुटण्यासारखी पुष्कळ सामुग्री होती. \v 15 त्यांनी गुरांच्या छावण्यांवरही हल्ला केला आणि मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचे कळप उचलून नेले. नंतर ते यरुशलेमकडे परतले. \c 15 \s1 आसाच्या सुधारणा \p \v 1 नंतर परमेश्वराचा आत्मा ओदेदाचा पुत्र अजर्‍याहवर आला. \v 2 तो आसाला भेटण्यासाठी गेला आणि त्याला म्हणाला, “आसा आणि सर्व यहूदाह व बिन्यामीन माझे ऐका, याहवेह तुमच्याबरोबर आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहाल. जर तुम्ही त्यांचा शोध घ्याल, तर ते तुम्हाला सापडतील, परंतु जर तुम्ही त्यांना सोडाल, तर ते तुम्हाला सोडतील. \v 3 आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते. \v 4 तरीपण संकटसमयी ते इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे वळले व त्यांनी त्यांचा शोध केला, तेव्हा त्यांनी त्यांची मदत केली. \v 5 त्या दिवसांमध्ये प्रवास करणे सुरक्षित नव्हते, कारण तेथील सर्व रहिवाशांमध्ये मोठा गोंधळ माजला होता. \v 6 एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडून आणि एक शहर दुसऱ्या शहराकडून चिरडले जात होते, कारण परमेश्वर त्यांना सर्वप्रकारच्या संकटांनी त्रास देत होते. \v 7 परंतु तुम्ही तर खंबीर व्हा आणि हार मानू नका, कारण तुम्हाला तुमच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.” \p \v 8 जेव्हा आसाने हे शब्द आणि ओदेद संदेष्ट्याचा पुत्र अजऱ्याहची भविष्यवाणी ऐकली तेव्हा त्याला धीर आला. त्याने यहूदाह आणि बिन्यामीनच्या संपूर्ण देशातील आणि त्याने ताब्यात घेतलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गावांमधील अमंगळ मूर्ती काढून टाकल्या. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशमंडपासमोर याहवेहची जी वेदी होती, तिची दुरुस्ती केली. \p \v 9 नंतर त्याने सर्व यहूदीया आणि बिन्यामीन आणि एफ्राईम, मनश्शेह आणि शिमओन येथील लोकांना जमविले, जे त्यांच्यामध्ये स्थायिक झाले होते, कारण त्याचे परमेश्वर याहवेह त्याच्याबरोबर आहेत हे पाहून इस्राएलमधून मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले होते. \p \v 10 ते आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी तिसऱ्या महिन्यात यरुशलेम येथे जमले. \v 11 त्यावेळेस त्यांनी परत आणलेल्या लुटीतून याहवेहसाठी सातशे गुरे आणि सात हजार मेंढ्या व शेळ्यांचे बलिदान केले. \v 12 त्यांनी त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि जिवाने त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घ्यावा, असा करार केला. \v 13 जे इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घेणार नाहीत, त्या सर्वांना, लहान किंवा मोठे, पुरुष किंवा स्त्रीस जिवे मारण्यात येईल. \v 14 त्यांनी मोठ्याने गर्जना करून, कर्णे व शिंगे वाजवून याहवेहची शपथ घेतली. \v 15 यहूदीया येथील सर्व लोकांनी या शपथेबद्दल आनंद केला, कारण त्यांनी संपूर्ण अंतःकरणापासून ती शपथ घेतली होती. त्यांनी उत्सुकतेने परमेश्वराचा शोध घेतला आणि ते त्यांना सापडले. त्यामुळे याहवेहनी त्यांना सर्व बाजूंनी विश्रांती दिली. \p \v 16 आसा राजाने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडून फोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली. \v 17 जरी त्याने इस्राएलातील पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते. \v 18 त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणले. \p \v 19 आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत लढाई झाली नाही. \c 16 \s1 आसाची अखेरची वर्षे \p \v 1 आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशा याने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली. \p \v 2 त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले. \v 3 आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.” \p \v 4 बेन-हदाद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठवले. त्यांनी इय्योन, दान, आबेल-माईम\f + \fr 16:4 \fr*\ft किंवा \ft*\fqa बेथ-माकाह\fqa*\f* आणि नफतालीचे सर्व भांडारशहरे ही जिंकून घेतली. \v 5 बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबविले आणि ते अर्धवट टाकून दिले. \v 6 नंतर आसा राजाने यहूदीयातील सर्व पुरुषांना आणले आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने गेबा आणि मिस्पाह हे बांधले. \p \v 7 त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे. \v 8 कूशी लोक आणि लिबियाचे लोक हे मोठ्या संख्येने रथ आणि घोडेस्वार असलेले बलाढ्य सैन्य नव्हते का? तरीसुद्धा जेव्हा तुम्ही याहवेहवर भरवसा ठेवला, तेव्हा त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. \v 9 कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.” \p \v 10 यामुळे आसा संदेष्ट्यावर रागावला; तो इतका संतापला की त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याचवेळेस आसाने काही लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले. \p \v 11 आसाच्या कारकिर्दीच्या घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. \v 12 त्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी आसा पायाच्या आजाराने त्रस्त झाला. त्याचा आजार गंभीर स्वरुपाचा होता, तरी त्या आजारपणातही त्याने याहवेहकडून मदत घेतली नाही, परंतु फक्त वैद्यांचीच मदत घेतली. \v 13 नंतर आसा त्याच्या कारकिर्दीच्या एकेचाळीसाव्या वर्षी मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. \v 14 त्यांनी त्याला दावीदाच्या नगरात, त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या कबरेत पुरले. त्यांनी त्याला मसाले आणि विविध मिश्रित अत्तरांनी झाकलेल्या शवपेटीत ठेवले आणि त्याच्या सन्मानार्थ प्रचंड अग्नी पेटविला. \c 17 \s1 यहूदीयाचा राजा यहोशाफाट \p \v 1 त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट हा राजा झाला. त्याने इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यासाठी स्वतःला सशक्त केले. \v 2 त्याने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्याचा तळ दिला आणि त्याचा पिता आसाने काबीज केलेल्या यहूदीया आणि एफ्राईमच्या नगरांमध्ये सैन्यांच्या छावण्या टाकल्या. \p \v 3 याहवेह यहोशाफाटबरोबर होते, कारण त्याने त्यांच्यासमोर त्याचा पिता दावीदाच्या मार्गाचे अनुसरण केले. त्याने बआल दैवतांचा सल्ला घेतला नाही. \v 4 परंतु इस्राएलच्या रीतिरिवाजा ऐवजी, त्याच्या पित्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले. \v 5 याहवेहनी त्याचे राज्य त्याच्या नियंत्रणाखाली स्थापन केले; आणि यहूदीयाच्या सर्व लोकांनी यहोशाफाटकडे भेटवस्तू आणल्या, त्यामुळे त्याला मोठी संपत्ती आणि सन्मान मिळाला. \v 6 त्याचे अंतःकरण याहवेहच्या मार्गाकडे समर्पित होते; याशिवाय, त्याने यहूदीयामधून उच्च स्थाने आणि अशेरा खांब काढून टाकले. \p \v 7 त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याचे अधिकारी बेन-हेल, ओबद्याह, जखर्‍याह, नथानेल आणि मिखायाह यांना यहूदीयाच्या गावांमध्ये शिकविण्यासाठी पाठवले. \v 8 त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते. \v 9 त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले. \p \v 10 यहूदीयाच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सर्व राज्यांवर याहवेहचे भय आले, म्हणून ते यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी गेले नाहीत. \v 11 काही पलिष्ट्यांनी यहोशाफाट याला भेटवस्तू आणि खंडणी म्हणून चांदी आणली आणि अरब लोकांनी त्याच्यासाठी कळप आणले: सात हजार सातशे मेंढ्या आणि सात हजार सातशे शेळ्या. \p \v 12 यहोशाफाट अधिकाधिक शक्तिशाली होत गेला; त्याने यहूदीयामध्ये किल्ले आणि भांडाराची शहरे बांधली \v 13 आणि यहूदीयाच्या नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य साठविले. त्याने यरुशलेममध्ये अनुभवी योद्धेसुद्धा ठेवले. \v 14 कुटुंबाद्वारे त्यांची नावनोंदणी अशाप्रमाणे होती: \b \li1 यहूदीयाकडून, 1,000 पथकांचे सेनापती: \li2 अदनाह हा 3,00,000 लढवय्ये पुरुषांचा सेनापती; \li2 \v 15 त्यानंतर यहोहानान हा 2,80,000 सैनिकांवर सेनापती; \li2 \v 16 त्यानंतर, जिक्रीचा पुत्र अमस्याहने स्वतःला स्वेच्छेने याहवेहच्या सेवेसाठी अर्पण केले होते, त्याच्याबरोबर 2,00,000 लोक होते. \li1 \v 17 बिन्यामीनकडून: \li2 एलयादा, हा शूर सैनिक, त्याच्याबरोबर धनुष्‍यबाण आणि ढाल घेऊन सज्ज असलेले 2,00,000 पुरुष; \li2 \v 18 त्यानंतर यहोजाबाद, त्याच्याबरोबर युद्धासाठी सज्ज असलेले 1,80,000 पुरुष. \b \m \v 19 या पुरुषांनी राजाची सेवा केली, यांच्याशिवाय त्याने संपूर्ण यहूदीयामध्ये तटबंदी केलेल्या नगरांमधील छावण्यामध्ये सैनिक तैनात केले. \c 18 \s1 मिखायाहचा अहाबाविरुध्द भविष्यवाणी \p \v 1 आता यहोशाफाटजवळ मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने स्वतःला अहाबाशी विवाहाद्वारे जोडून घेतले. \v 2 काही वर्षानंतर तो शोमरोनला अहाबाला भेटण्यास गेला. अहाबाने त्याच्यासाठी व त्याजबरोबर आलेल्या लोकांसाठी अनेक मेंढरे व गुरे कापली व त्याने रामोथ-गिलआदवर हल्ला करावा अशी त्याला विनंती केली. \v 3 इस्राएलचा राजा अहाबाने यहूदीयाचा राजा यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध जाल का?” \p यहोशाफाटने उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत; आम्ही तुमच्या युद्धात सहभागी होऊ.” \v 4 परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.” \p \v 5 तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” \p त्यांनी उत्तर दिले, “जा, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.” \p \v 6 परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?” \p \v 7 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” \p यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.” \p \v 8 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्‍याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.” \p \v 9 इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते, आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते. \v 10 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती, आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ” \p \v 11 इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.” \p \v 12 जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे, आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.” \p \v 13 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.” \p \v 14 तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?” \p त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण त्यांना तुमच्या हाती दिले जाईल.” \p \v 15 राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?” \p \v 16 तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ” \p \v 17 इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?” \p \v 18 मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला. \v 19 आणि याहवेहने म्हटले, ‘इस्राएलचा राजा अहाब याने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ \p “तेव्हा एकाने एक तर दुसर्‍याने दुसरी मसलत दिली. \v 20 तेव्हा एक आत्मा पुढे आला, आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालेन.’ \p “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’ \p \v 21 “तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’ \p “याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील, जा आणि तसे कर.’ \p \v 22 “तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.” \p \v 23 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?” \p \v 24 मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.” \p \v 25 तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा, \v 26 आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ” \p \v 27 तेव्हा मिखायाह म्हणाला, “तू जर सुखरुप परत आलास तर याहवेह माझ्याद्वारे बोललेच नाही असे समजावे.” तो पुढे म्हणाला, “लोकांनो, तुम्ही सर्वजण हे लक्षात ठेवा!” \s1 आहाबचा रामोथ गिलआद येथे मृत्यू \p \v 28 यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले. \v 29 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला. \p \v 30 आता अरामाच्या राजाने आपल्या रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.” \v 31 रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण यहोशाफाटने मोठ्याने धावा केला, आणि याहवेहने त्याला मदत केली. परमेश्वराने त्यांना त्याच्यापासून दूर नेले, \v 32 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले. \p \v 33 पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखत आणि कमरेचा पट्टा यामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.” \v 34 तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि इस्राएलचा राजा संध्याकाळपर्यंत अराम्यांचा सामना करीत रथातच राहिला, आणि सूर्यास्ताच्या वेळी तो मरण पावला. \c 19 \p \v 1 जेव्हा यहूदीयाचा राजा यहोशाफाट सुखरुपपणे त्याच्या राजवाड्यात यरुशलेम येथे परत आला, \v 2 तेव्हा हनानीचा पुत्र येहू संदेष्टा त्याला भेटण्यासाठी गेला आणि यहोशाफाट राजाला म्हणाला, “तुम्ही दुष्टाला मदत करावी आणि जे याहवेहचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम\f + \fr 19:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa सोयरीक\fqa*\f* करावे काय? याच कारणामुळे याहवेहचा क्रोध तुमच्यावर आहे. \v 3 कसेही असले तरी, तुमच्यामध्येही काही चांगले आहे, कारण तुम्ही अशेरा खांब देशातून काढून टाकले आहेत आणि परमेश्वराचा शोध घेण्याकडे तुमचे अंतःकरण लावले आहे.” \s1 यहोशाफाट न्यायाधीशांची नेमणूक करतो \p \v 4 यहोशाफाट यरुशलेममध्ये राहिला आणि तो पुन्हा बेअर-शेबा पासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये गेला आणि त्यांना त्यांच्या याहवेह पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळविले. \v 5 त्याने यहूदीयाच्या प्रत्येक तटबंदीच्या शहरांमध्ये न्यायाधीशांची नेमणूक केली. \v 6 त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही काय करता ते नीट विचार करा, कारण तुम्ही केवळ मर्त्यांसाठी न्याय करीत नाही, परंतु याहवेहसाठी निर्णय घेता. जेव्हा तुम्ही जे काही करीत असता तेव्हा ते तुमच्याबरोबर आहेत. \v 7 आता याहवेहचे भय तुम्हावर असू द्या, काळजीपूर्वक न्याय करा, कारण आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे अन्याय किंवा पक्षपात किंवा लाचलुचपत असे काही चालत नाही.” \p \v 8 यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते. \v 9 त्याने त्यांना असे आदेश दिले: “तुम्ही याहवेहचे भय बाळगूनच विश्वासूपणाने आणि संपूर्ण अंतःकरणाने सेवा करावी. \v 10 शहरात राहणाऱ्या तुमच्या लोकांकडून तुमच्यासमोर येणार्‍या प्रत्येक बाबतीत—मग तो रक्तपात असो किंवा कायद्याच्या संबंधात, आज्ञा, हुकूम किंवा नियम—तुम्ही याहवेहविरुद्ध पाप करू नका अशी ताकीद तुम्ही त्यांना द्यावी; नाहीतर त्यांचा राग तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर येईल. हे असे करा म्हणजे तुम्ही पातक करणार नाही. \p \v 11 “याहवेह संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर मुख्य याजक अमर्‍याह तुमच्यावर असेल आणि राजाच्या संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर यहूदीयाच्या वंशाचा प्रमुख इश्माएलचा मुलगा जबद्याह तुमच्यावर असेल आणि लेवी तुमच्यापुढे अधिकारी म्हणून काम करतील. धैर्याने वागा आणि जे चांगले काम करतात त्यांच्याबरोबर याहवेह असतील.” \c 20 \s1 यहोशाफाट मोआब आणि अम्मोन यांचा पराभव करतो \p \v 1 यानंतर, मोआबी आणि अम्मोनी सैन्य काही मऊनी लोकांना बरोबर घेऊन यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी आले. \p \v 2 काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम\f + \fr 20:2 \fr*\ft एदोम\ft*\f* येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी). \v 3 धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली. \v 4 त्याप्रमाणे यहूदीयाचे लोक याहवेहची मदत घेण्यास एकत्र आले; निश्चितच, यहूदीयाच्या प्रत्येक शहरातील लोक त्यांच्या साहाय्यासाठी आले. \p \v 5 नंतर यहोशाफाट याहवेहच्या मंदिराजवळ नवीन अंगणासमोर यहूदीया आणि यरुशलेम यांच्या सभेमध्ये उभा राहिला \v 6 आणि म्हणाला: \pm “याहवेह, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, तुम्ही स्वर्गातील परमेश्वर नाही का? तुम्ही राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर राज्य करता. सत्ता आणि सामर्थ्य तुमच्या हातात आहे, आणि कोणीही तुमचा सामना करू शकत नाही. \v 7 आमच्या परमेश्वरा, या प्रदेशातील रहिवाशांना तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिले आणि तो प्रदेश तुमचे मित्र अब्राहामच्या वंशजांना कायमचा दिला नाही का? \v 8 त्यांनी या प्रदेशात वास्तव्य केले आहे आणि त्यामध्ये तुमच्या नामासाठी पवित्रस्थान बांधले आहे, ते म्हणाले, \v 9 ‘जर आमच्यावर संकटे आली, मग ती न्यायाची तलवार असो किंवा मरी असो किंवा दुष्काळ, तर आम्ही तुमच्या उपस्थितीत तुमचे नाव धारण करणाऱ्या या मंदिरापुढे उभे राहू आणि आमच्या संकटात तुमचा धावा करू आणि तुम्ही आमचे ऐकाल आणि आम्हाला वाचवाल.’ \pm \v 10 “परंतु आता येथे अम्मोन, मोआब आणि सेईर पर्वताकडील लोक आहेत, जेव्हा ते इजिप्तकडून आले तेव्हा तुम्ही इस्राएली लोकांना त्यांच्या प्रदेशावर आक्रमण करू देत नव्हता; म्हणून ते त्यांच्यापासून दूर गेले आणि त्यांचा नाश केला नाही. \v 11 आता पाहा, तुम्ही आम्हाला वारसा म्हणून दिलेल्या वतनदत्त प्रदेशातून बाहेर काढायला येऊन ते आमची कशी परतफेड करत आहेत. \v 12 आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांचा न्याय करणार नाही का? कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्या या विशाल सैन्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे शक्ती नाही. काय करावे हे आम्हाला कळत नाही, परंतु आमची दृष्टी तुमच्याकडे लागली आहे.” \p \v 13 यहूदीयाचे सर्व पुरुष, त्यांच्या पत्नी, मुले आणि शिशू यांच्या समवेत याहवेहसमोर उभे राहिले. \p \v 14 तेव्हा जखर्‍याहचा मुलगा यहजिएल, जो बेनाइयाहचा पुत्र, जो ईयेलचा पुत्र, जो मत्तन्याहचा पुत्र, लेवी आणि आसाफ याचा वंशज त्याच्यावर याहवेहचा आत्मा आला व तो सभेमध्ये उभा राहिला. \p \v 15 तो म्हणाला, “ऐका, राजा यहोशाफाट आणि जे यहूदीया आणि यरुशलेममध्ये राहतात ते सर्वजण! याहवेह तुम्हाला असे म्हणतात: ‘या विशाल सैन्याला घाबरू नका किंवा निराश होऊ नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, तर परमेश्वराचे आहे. \v 16 उद्या त्यांच्या विरोधात हल्ला करा. जीजच्या खिंडीने ते वर चढत असतील आणि यरुएलच्या वाळवंटातील खिंडीच्या शेवटी तुम्हाला ते सापडतील. \v 17 तुम्हाला हे युद्ध करावे लागणार नाही. तुम्ही तुमचे स्थान ग्रहण करा; खंबीरपणे उभे राहा. यहूदीया आणि यरुशलेम पहा, याहवेह तुम्हाला सुटकारा देतील. घाबरू नका; निराश होऊ नका. उद्या त्यांचा सामना करण्यासाठी बाहेर पडा, आणि याहवेह तुमच्याबरोबर असतील.’ ” \p \v 18 यहोशाफाट त्याचे मुख जमिनीकडे करून नतमस्तक झाला आणि यहूदीया आणि यरुशलेमच्या सर्व लोकांनी याहवेहपुढे खाली पडून उपासना केली. \v 19 नंतर कोहाथी आणि कोरही लोकांमधील काही लेवी उभे राहिले आणि त्यांनी उच्चस्वरात याहवेहची, इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती केली. \p \v 20 पहाटे ते तकोवाच्या वाळवंटाकडे निघाले. ते बाहेर पडले असताना यहोशाफाट उभा राहिला आणि म्हणाला, “यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांनो, माझे ऐका! याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे समर्थन केले जाईल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.” \v 21 लोकांबरोबर सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने पुरुषांची नियुक्ती केली, याहवेहची स्तुती गाण्यासाठी आणि त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करण्यासाठी जेव्हा ते सैन्याचे प्रमुख म्हणून निघाले तेव्हा ते म्हणाले: \q1 “याहवेहचे आभार माना, \q2 कारण त्यांचे प्रेम अनंतकाळ टिकते.” \p \v 22 जेव्हा त्यांनी गाणे गाण्यास आणि स्तुती करण्यास सुरुवात केली लागले, तेव्हा याहवेहनी यहूदीयावर आक्रमण करणारे अम्मोनी, मोआब आणि सेईर पर्वताच्या लोकांवर दबा धरून हल्ला केला आणि शत्रूचा पराभव झाला. \v 23 अम्मोनी आणि मोआबी लोक सेईर पर्वतावरील लोकांवर त्यांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचा समूळ उच्छेद करण्यासाठी उठले. सेईर येथील माणसांची कत्तल करून झाल्यावर त्यांनी एकमेकांचा नाश करण्यास सुरुवात केली. \p \v 24 जेव्हा यहूदीयाचे लोक जिथून वाळवंटातील दृश्य दिसत होते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रचंड सैन्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना जमिनीवर फक्त मृतदेह पडलेले दिसले; त्यातून कोणीही सुटला नव्हता. \v 25 तेव्हा यहोशाफाट आणि त्याची माणसे त्यांची लूट घ्यायला निघाले, त्यांना त्याच्यामध्ये बरीच उपकरणे, वस्त्रे आणि मौल्यवान वस्तू सापडल्या—त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त तिथे होते. इतकी लूट होती की, ती गोळा करावयाला तीन दिवस लागले. \v 26 चौथ्या दिवशी ते बेराखाह खोऱ्यात एकत्र जमले, जिथे त्यांनी याहवेहला धन्यवाद दिला. म्हणून आजही त्या ठिकाणाला बेराखाहचे\f + \fr 20:26 \fr*\fqa बेरेख्याह अर्थात् \fqa*\fqa स्तुती\fqa*\f* खोरे असे म्हणतात. \p \v 27 नंतर यहोशाफाटच्या नेतृत्वाखाली, यहूदीया आणि यरुशलेम येथील सर्व पुरुष आनंदाने यरुशलेमकडे परतले, कारण याहवेहनी त्यांना त्यांच्या शत्रूवर आनंद करण्याचे कारण दिले होते. \v 28 त्यांनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि वीणा आणि कर्णे बरोबर घेऊन ते याहवेहच्या मंदिरात गेले. \p \v 29 इस्राएलच्या शत्रूविरुद्ध याहवेहनी कसे युद्ध केले, हे ऐकून आजूबाजूच्या सर्व राज्यात परमेश्वराचे भय निर्माण झाले. \v 30 आणि यहोशाफाटच्या राज्यात शांतता होती, कारण त्याच्या परमेश्वराने त्याला सर्व बाजूंनी विसावा दिला होता. \s1 यहोशाफाटच्या कारकिर्दीचा शेवट \p \v 31 तेव्हा यहोशाफाटने यहूदीयावर राज्य केले. यहूदीयाचा राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती. \v 32 आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. \v 33 तरी, डोंगरावरील मंदिरे नष्ट केली नव्हती आणि लोकांनी अजूनही त्यांची अंतःकरणे त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे लावली नव्हती. \p \v 34 यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या घटना हनानीचा पुत्र येहू याच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत, ज्याची नोंद इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात आहेत. \p \v 35 नंतर, यहूदीयाचा राजा यहोशाफाटने इस्राएलचा राजा अहज्याह याच्याशी मैत्री केली, ज्याचे मार्ग दुष्ट होते. \v 36 व्यापारी जहाजांच्या\f + \fr 20:36 \fr*\ft किंवा \ft*\fqa तार्शीशला जाणाऱ्या\fqa*\f* ताफ्यांची बांधणी करण्यासाठी तो त्याच्याशी सहमत झाला. नंतर ती एजिओन-गेबेर येथे बांधली गेली, \v 37 मारेशाहवासी दोदावाहूचा पुत्र एलिएजर याने यहोशाफाटविरुद्ध भविष्यवाणी केली, “तुम्ही अहज्याहशी युती केल्यामुळे, तुम्ही जे काय केले आहे त्याचा याहवेह नाश करतील.” ही जहाजे उद्ध्वस्त झाली आणि व्यापाराच्या प्रवासाला तार्शीशला घेऊन जाण्यासाठी ती सक्षम नव्हती. \c 21 \p \v 1 त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला. \v 2 यहोरामचे भाऊ अजर्‍याह, यहीएल, जखर्‍याह, अजर्‍याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते. \v 3 त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि सोने, मौल्यवान वस्तू, तसेच यहूदीयामधील तटबंदीची शहरे दिली होती, परंतु त्याने यहोरामला राज्य दिले कारण तो त्याचा प्रथमपुत्र होता. \s1 यहोराम यहूदीयाचा राजा \p \v 4 जेव्हा यहोरामने त्याच्या वडिलांच्या राज्यावर स्वतःला ठामपणे प्रस्थापित केले, तेव्हा त्याने इस्राएलच्या काही अधिकाऱ्यांसह त्याच्या सर्व भावांना तलवारीने मारले. \v 5 जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले. \v 6 अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. \v 7 तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने दावीदाच्या घराण्याचा नाश केला नाही. कारण त्यांनी त्याच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते. \p \v 8 यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला. \v 9 मग यहोराम आपले अधिकारी व सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. रात्रीच्या वेळी त्याने उठून ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, परंतु रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. \v 10 आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. \p त्याचवेळेस लिब्नाहने बंड केले, कारण यहोरामने त्याच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता. \v 11 त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते. \p \v 12 यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते: \pm “तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही. \v 13 परंतु तुम्ही इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि अहाबाच्या घराण्याने जसे केले त्याप्रमाणे तुम्ही यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले आहे. तुम्ही स्वतःच्या भावांची, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची, तुमच्यापेक्षा चांगले असलेल्या पुरुषांचीही हत्या केली आहे. \v 14 तर आता याहवेह तुमच्या लोकांवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या स्त्रियांवर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर जोरदार प्रहार करणार आहेत. \v 15 तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.” \p \v 16 याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्‍या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले. \v 17 त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता. \p \v 18 हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले. \v 19 याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते. \p \v 20 यहोराम राजा झाला तेव्हा तो बत्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. तो मरण पावला याचे कोणालाही दुःख वाटले नाही आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरला गेला, परंतु राजांच्या कबरेत पुरले नाही. \c 22 \s1 यहूदीयाचा राजा अहज्याह \p \v 1 यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा धाकटा मुलगा अहज्याहला त्याच्या जागी राजा केले, कारण हल्ला करणारे जे लोक अरब लोकांबरोबर छावणीमध्ये आले होते त्यांनी सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता, म्हणून यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याहने राज्य करण्यास सुरुवात केली. \p \v 2 वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, जी ओमरीची नात होती. \p \v 3 तो सुद्धा अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण त्याच्या आईने त्याला दुष्टतेने वागण्यास प्रोत्साहन दिले. \v 4 अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या अपयशाचे ते सल्लागार झाले. \v 5 त्याने त्यांच्या सल्ल्याप्रमाणेसुद्धा केले जेव्हा तो अरामचा राजा हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र यहोराम\f + \fr 22:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa योराम\fqa*\f* च्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला; \v 6 रामाह\f + \fr 22:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa रामोथ\fqa*\f* येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. \p यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह\f + \fr 22:6 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa अजर्‍याह\fqa*\f* अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता. \p \v 7 अहज्याहची यहोरामाशी भेट यामधून परमेश्वराने अहज्याहचा नाश केला. जेव्हा अहज्याह तिथे आला तेव्हा तो योरामबरोबर निमशीचा पुत्र येहूला भेटण्यासाठी गेला, ज्याला अहाबाच्या घराण्याचा नाश करण्यासाठी याहवेह यांनी अभिषेक केला होता. \v 8 येहू अहाबाच्या घराण्याचा न्यायनिवाडा करीत असताना, त्याला यहूदाहचे अधिकारी आणि अहज्याहकडे सेवा करण्याकरिता आलेले अहज्याहच्या नातेवाईकांची मुले भेटली तेव्हा त्याने त्यांना ठार मारले. \v 9 त्यानंतर तो अहज्याहचा शोध घेत गेला आणि त्याच्या माणसांनी त्याला पकडले तेव्हा तो शोमरोनमध्ये लपला होता, त्याला येहूकडे आणण्यात आले आणि ठार मारण्यात आले. त्यांनी त्याला पुरले, कारण ते म्हणाले, “तो यहोशाफाटचा पुत्र होता, ज्याने त्याच्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचा सल्ला घेतला होता.” त्यामुळे अहज्याहच्या घरात राज्य टिकवून ठेवण्याइतके सामर्थ्य कोणातही नव्हते. \s1 अथल्याह आणि योआश \p \v 10 जेव्हा अहज्याहची आई अथल्याह हिने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती यहूदीयाच्या सर्व राजघराण्याचा नाश करण्यास निघाली. \v 11 परंतु यहोशेबा,\f + \fr 22:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa येहोशाबेथ\fqa*\f* यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही. \v 12 अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत त्याला परमेश्वराच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते. \c 23 \p \v 1 सातव्या वर्षी यहोयादाने त्याचे सामर्थ्य दाखविले. त्याने शंभर तुकड्यांचे सरदार यांच्यासोबत करार केला: यरोहामचा पुत्र अजऱ्याह, यहोहानानचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजर्‍याह, अदायाहचा पुत्र मासेयाह आणि जिक्रीचा पुत्र अलीशाफाट. \v 2 त्यांनी यहूदीयामध्ये सर्वत्र फिरून सर्व गावातून लेवी आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना एकत्र केले. जेव्हा ते यरुशलेमकडे आले, \v 3 तेव्हा सर्व मंडळीने परमेश्वराच्या मंदिरात राजाबरोबर एक करार केला. \p यहोयादा त्यांना म्हणाला, “याहवेहनी दावीदाच्या वंशजांविषयी वचन दिल्याप्रमाणे राजाचा पुत्र राज्य करेल. \v 4 आता तुम्ही असे करावे: तुमच्यापैकी एकतृतीयांश याजक आणि लेवी जे शब्बाथ दिवशी कर्तव्य बजावत आहेत, त्यांनी दारांवर पहारा ठेवावा, \v 5 तुमच्यापैकी एकतृतीयांश राजवाड्यात आणि एकतृतीयांश लोकांनी पायाभरणीचे प्रवेशद्वार आणि इतर सर्वांनी याहवेहच्या मंदिराच्या प्रांगणात असावे. \v 6 कार्यासाठी नियुक्त केलेले याजक व लेवी हे शुद्ध केलेले आहेत म्हणून यांच्याशिवाय याहवेहच्या मंदिरात कोणी प्रवेश करू नये; परंतु प्रवेश करू नये ही याहवेहची आज्ञा इतर सर्वांनी पाळावी. \v 7 प्रत्येक लेवींनी हातात शस्त्र घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.” \p \v 8 यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेवी आणि यहूदीयाच्या सर्व पुरुषांनी केले. प्रत्येकाने आपआपली माणसे घेतली; जे शब्बाथाच्या दिवशी सेवेला येणार होते आणि जे सेवा संपवून जात होते—कारण यहोयादा याजकाने कोणत्याही विभागांना सुट्टी दिली नव्हती. \v 9 यहोयादा याजकाने परमेश्वराच्या मंदिरामधील दावीद राजाचे भाले व मोठ्या आणि लहान ढाली होत्या, त्या शताधिपतींच्या हाती दिल्या. \v 10 त्याने सर्व पुरुषांना प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे केले. \p \v 11 मग यहोयादाने व त्याच्या पुत्रांनी राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्यांनी त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!” \p \v 12 जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली. \v 13 तिने बघितले राजा प्रवेशद्वाराच्या खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक हर्षोल्हास करीत कर्णे वाजवित आणि वादक त्यांच्या वाद्यांसह स्तुती करीत होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी, फितुरी!” \p \v 14 यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्‍यांना बाहेर पाठवले, आणि त्यांना सांगितले: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारू नये.” \v 15 म्हणून ती राजवाड्याच्या मैदानात, घोड्यांच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे त्यांनी तिला ठार मारले. \p \v 16 मग यहोयादाने एक करार केला की तो, लोक आणि राजा याहवेहची प्रजा असणार. \v 17 सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून टाकल्या आणि बआलचा याजक मत्तान याचा वेदीसमोर वध केला. \p \v 18 नंतर दावीदाने ज्यांची मंदिरात होमार्पणे करण्यासाठी नेमणूक केली होती, त्या याजकीय लेव्यांच्या हाती यहोयादाने याहवेहच्या मंदिराची देखरेख सोपविली. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, दावीदाने सांगितल्याप्रमाणे ते आनंद करीत होते आणि गाणी गात होते. \v 19 त्याने याहवेहच्या मंदिराच्या वेशींवर द्वारपालसुद्धा नेमले, ज्यामुळे कोणत्याही प्रकाराने अशुद्ध व्यक्तीने प्रवेश करू नये. \p \v 20 त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, लोकांचे राज्यकर्ते आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले. ते वरच्या दरवाज्याने राजवाड्यात गेले आणि राजाला राजासनावर बसविले. \v 21 राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता. \c 24 \s1 योआश मंदिराची दुरुस्ती करतो \p \v 1 जेव्हा योआश राजा झाला तेव्हा तो सात वर्षांचा होता. आणि त्याने चाळीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिबियाह होते; ती बेअर-शेबा येथील होती. \v 2 यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले. \v 3 यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या. \p \v 4 काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले. \v 5 त्याने याजकांना आणि लेवींना एकत्र बोलाविले आणि त्यांना सांगितले, “यहूदीयाच्या गावांकडे जा आणि तुमच्या परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी सर्व इस्राएल लोकांकडून वार्षिक देय रक्कम गोळा करा. आताच हे करा.” परंतु लेवी लोकांनी त्यावर तत्काळ हालचाल केली नाही. \p \v 6 तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “याहवेहचा सेवक मोशे आणि इस्राएलच्या सभेचे लोक यांनी लावलेला करार नियमांच्या तंबूसाठी लावलेला कर यहूदीया आणि यरुशलेममधून आणण्याची मागणी तुम्ही लेवींकडे का केली नाही?” \p \v 7 आता अथल्याह या दुष्ट स्त्रीच्या मुलांनी परमेश्वराचे मंदिर तोडून त्यात प्रवेश केला होता आणि याहवेहच्या घराच्या सर्व पवित्र वस्तूंचा सुद्धा बआल दैवतांसाठी वापर केला होता. \p \v 8 राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली. \v 9 तेव्हा यहूदीया आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा देण्यात आली की, परमेश्वराचा सेवक मोशे याने अरण्यात इस्राएलचा जो कर मागितला होता तो त्यांनी याहवेहकडे आणावा. \v 10 सर्व अधिकारी आणि सर्व लोकांनी आनंदाने त्यांची वर्गणी आणली आणि ती पेटी पूर्ण भरेपर्यंत त्यात टाकत राहिले. \v 11 जेव्हाही लेवी लोकांद्वारे पेटी राजाच्या अधिकाऱ्यांकडे आणली जात होती आणि त्यांनी पाहिले की, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे होते, तेव्हा राजेशाही सचिव आणि मुख्य याजकाचा अधिकारी येत असत आणि पेटी रिकामी करीत आणि पुन्हा ती पेटी घेऊन तिच्या जागेवर ठेवीत. त्यांनी हे नियमितपणे केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. \v 12 राजा आणि यहोयादा यांनी ते याहवेहच्या मंदिरासाठी आवश्यक ते काम करणाऱ्यांना दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि सुतार आणि लोखंडी आणि कास्यकाम करणारे कामगार ठेवले. \p \v 13 कामाची जबाबदारी सांभाळणारे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या हाताखाली दुरुस्तीचे काम चालू होते. त्यांनी परमेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ रचनेनुसार पुन्हा बांधले आणि ते भरभक्कम केले. \v 14 जेव्हा त्यांनी ते काम संपविले, त्यांनी उरलेले पैसे राजा आणि यहोयादा यांच्याकडे आणले आणि त्यातून याहवेहच्या मंदिरासाठी वस्तू बनविल्या: विधीसाठी आणि होमार्पणासाठी वस्तू, आणि ताटेसुद्धा व सोन्या-चांदीच्या इतर वस्तू. जोपर्यंत यहोयादा जिवंत होता, तोपर्यंत याहवेहच्या मंदिरात निरंतर होमार्पण केले जात होते. \p \v 15 यहोयादा आता पूर्ण वयस्कर झाला होता आणि तो वयाच्या एकशे तिसाव्या वर्षी मरण पावला. \v 16 इस्राएलमध्ये परमेश्वरासाठी आणि त्यांच्या मंदिरासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे, त्याला दावीदाच्या नगरात राजांबरोबर पुरण्यात आले. \s1 योआशची दुष्टाई \p \v 17 यहोयादाच्या मृत्यूनंतर, यहूदीयाचे अधिकारी आले आणि त्यांनी राजाला आदरयुक्त वंदन केले आणि त्याने त्यांचे ऐकले. \v 18 त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे मंदिर सोडून दिले, आणि अशेरा खांब आणि मूर्त्या यांची पूजा केली. त्यांच्या या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला. \v 19 जरी याहवेहनी लोकांना त्यांच्याकडे परत आणण्यासाठी संदेष्टे पाठवले आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली, तरी त्यांनी ऐकले नाही. \p \v 20 मग यहोयादा याजकाचा मुलगा जखर्‍याह याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला. तो लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “परमेश्वर, असे म्हणतात, ‘तुम्ही याहवेहच्या आज्ञांचे पालन का करीत नाही? तुमची भरभराट होणार नाही. कारण तुम्ही याहवेह यांना सोडले आहे, म्हणून त्याने तुमचा त्याग केला आहे.’ ” \p \v 21 परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले. \v 22 जखर्‍याहचे वडील यहोयादा याने त्याच्यावर जो दयाळूपणा केला होता त्याची राजा योआशाने आठवण केली नाही, परंतु त्याने त्याच्या पुत्राला ठार मारले, जो त्याच्या मरणाच्या अवस्थेत म्हणाला, “याहवेह हे पाहतील आणि तुला त्याचा हिशोब मागतील.” \p \v 23 वर्षाच्या शेवटी,\f + \fr 24:23 \fr*\ft अंदाजे वसंत ऋतूत\ft*\f* अरामच्या सैन्याने योआशविरुद्ध युद्धासाठी कवायत केली; त्याने यहूदीया आणि यरुशलेमवर आक्रमण केले आणि लोकांच्या सर्व नेत्यांना ठार केले. त्यांनी लूट केलेला सर्व माल दिमिष्कातील त्यांच्या राजाकडे पाठवला. \v 24 जरी अरामी सैन्य थोडीच माणसे बरोबर घेऊन आले होते, तरी याहवेहनी त्यांच्या हाती पुष्कळ मोठे सैन्य दिले. कारण यहूदाहने त्यांच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेह यांना सोडले होते, योआशवर न्यायदंडाची कारवाई करण्यात आली. \v 25 जेव्हा अरामी लोक मागे फिरले, तेव्हा त्यांनी योआशला गंभीर जखमी करून सोडले. यहोयादा या याजकाच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांनी त्याला त्याच्या पलंगावर ठार मारले. म्हणून तो मरण पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले, परंतु राजांच्या कबरेत नव्हे. \p \v 26 ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद\f + \fr 24:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa योशाबाद\fqa*\f* आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा\f + \fr 24:26 \fr*\ft किंवा \ft*\fqa शोमेर\fqa*\f* पुत्र. \v 27 त्याच्या पुत्राचा वृत्तांत, त्याच्याविषयीच्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेची नोंद राजांच्या पुस्तकावरील टिप्पणीत लिहिली आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अमस्याह हा राजा झाला. \c 25 \s1 यहूदीयाचा राजा अमस्याह \p \v 1 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अमस्याह राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती. \v 2 त्याने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते ते केले, परंतु संपूर्ण अंतःकरणापासून नाही. \v 3 राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला. \v 4 परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, तर नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात जे लिहिले आहे, त्यानुसार वागले, याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरेल.” \p \v 5 अमस्याहने यहूदीयाच्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सर्व यहूदाह आणि बिन्यामीनसाठी त्यांच्या कुटुंबांप्रमाणे हजारोंचे सेनापती आणि शंभराचे सेनापती नियुक्त केले. त्यानंतर त्याने वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकत्र केले आणि त्याला असे दिसून आले की लष्कराच्या सेवेसाठी योग्य असे तीन लाख पुरुष आहेत, भाला आणि ढाल हाताळण्यास ते सक्षम आहेत. \v 6 त्याने शंभर तालांत चांदी\f + \fr 25:6 \fr*\ft अंदाजे 3.4 मेट्रिक टन\ft*\f* देऊन इस्राएलमधून एक लाख लढाऊ माणसेसुद्धा भाड्याने घेतली. \p \v 7 परंतु परमेश्वराचा एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “महाराज, इस्राएलकडून आलेल्या या सैन्याने तुमच्याबरोबर जाऊ नये, कारण याहवेह इस्राएलबरोबर नाहीत; एफ्राईमच्या कोणत्याही लोकांबरोबर नाहीत. \v 8 जरी तुम्ही जाल आणि धाडसाने युद्ध कराल, तरी परमेश्वर तुम्हाला शत्रूसमोर उलथून पाडतील, कारण कोणाला मदत करावी किंवा कोणाला उलथून पाडावे यासाठी परमेश्वर सामर्थ्यशाली आहेत.” \p \v 9 अमस्याहने परमेश्वराच्या मनुष्याला विचारले, “परंतु मी या इस्राएली सैन्यासाठी शंभर तालांत चांदी दिली आहेत त्याचे काय?” \p परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले, “याहवेह, तुम्हाला त्याच्यापेक्षाही अधिक देऊ शकतात.” \p \v 10 तेव्हा अमस्याहने एफ्राईमहून त्याच्याकडे जे सैन्य आले होते त्यांना काढून त्यांच्या घरी परत पाठविले. ते यहूदीयावर खूप रागावले आणि संतापाने घरी निघून गेले. \p \v 11 अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्‍यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले. \v 12 यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले. \p \v 13 दरम्यान, अमस्याहने ज्या सैन्याला परत पाठवले होते आणि युद्धात भाग घेऊ दिला नव्हता, त्यांनी शोमरोनपासून बेथ-होरोनपर्यंत तेथील यहूदीयाच्या नगरांवर हल्ला केला. त्यांनी तीन हजार लोकांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात लूट घेऊन गेले. \p \v 14 अमस्याह जेव्हा एदोमी लोकांचा वध करून परत आला, तेव्हा त्याने सेईरच्या लोकांची दैवते सोबत आणली, त्यांच्यापुढे लवून नमन केले आणि त्यांच्यासाठी होमार्पणे केली. \v 15 याहवेहचा राग अमस्याहवर भडकला आणि त्यांनी त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठविले, तो म्हणाला, “या लोकांच्या दैवतांचा तू सल्ला का घेतोस, जे स्वतःच्या लोकांना तुझ्या हातातून वाचवू शकले नाहीत?” \p \v 16 तो बोलत असतानाच राजा त्याला म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार नेमला आहे का? थांब! का बरे तू मारला जावास?” \p तेव्हा तो संदेष्टा थांबला व म्हणाला, “मला माहीत आहे की परमेश्वराने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू असे केलेस आणि माझा सल्ला ऐकला नाहीस.” \p \v 17 यहूदीयाचा राजा अमस्याहने त्याच्या सल्लागारांशी सल्लामसलत केली, त्याने हे आव्हान इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाज याचा पुत्र यहोआश\f + \fr 25:17 \fr*\ft किंवा \ft*\fqa योआश\fqa*\f* याच्याकडे पाठविले: “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.” \p \v 18 परंतु इस्राएलचा राजा योआश याने यहूदीयाचा राजा अमस्याह याला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले. \v 19 तू स्वतःला म्हणतोस की, तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि आता तू उद्धट व गर्विष्ठ झाला आहेस. परंतु घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश तू का करावा?” \p \v 20 परंतु अमस्याहने ऐकले नाही, कारण परमेश्वराने तसेच केले की, ते त्याला यहोआशच्या हाती सोपवून देणार होते, कारण त्यांनी एदोमाच्या दैवतांचा सल्ला घेतला होता. \v 21 तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. तो आणि यहूदीयाचा राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला. \v 22 इस्राएलने यहूदीयाचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले. \v 23 इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा\f + \fr 25:23 \fr*\fq यहोआहाजचा \fq*\ft म्हणजे \ft*\fqa अहज्याहचा\fqa*\f* पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब\f + \fr 25:23 \fr*\ft अंदाजे 180 मीटर\ft*\f* होती. \v 24 परमेश्वराच्या मंदिरातील सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, जी ओबेद-एदोमच्या देखरेखीखाली होते. आणि राजवाड्याच्या तिजोरीसह कैद्यांना घेऊन तो शोमरोनास परतला. \p \v 25 इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र योआश याच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा अमस्याह पंधरा वर्षे जगला. \v 26 अमस्याहच्या राज्यकाळातील इतर घटना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, यहूदीयाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीत काय? \v 27 अमस्याह याहवेहचे अनुसरण करण्यापासून दूर गेला, तेव्हापासून त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले. \v 28 त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यहूदीयाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले. \c 26 \s1 यहूदीयाचा राजा उज्जीयाह \p \v 1 तेव्हा यहूदीयाच्या सर्व लोकांनी उज्जीयाहला घेतले, जो सोळा वर्षांचा होता, त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा म्हणून निवडले. \v 2 अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता. \p \v 3 उज्जीयाह राजा झाला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येकोल्याह. ती यरुशलेम येथील होती. \v 4 त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. \v 5 जखर्‍याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले. \p \v 6 तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली. \v 7 परमेश्वराने त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध आणि गुर-बाल येथे राहणार्‍या अरब लोकांविरुद्ध आणि मऊनीमी लोकांविरुद्ध लढण्यास मदत केली. \v 8 अम्मोनी लोकांनी उज्जीयाहकडे खंडणी आणली आणि त्याची किर्ती इजिप्तच्या सीमेपर्यंत पसरली, कारण तो खूप शक्तिशाली झाला होता. \p \v 9 उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली. \v 10 त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती. \p \v 11 उज्जीयाहकडे एक प्रशिक्षित सैन्य होते, हनन्याह हा राजेशाही अधिकाऱ्यांपैकी एक होता, याच्या मार्गदर्शनाखाली सचिव ईयेल आणि मासेयाह या अधिकाऱ्याने जमविलेल्या संख्येनुसार विभाग करून ते युद्ध करण्यास सुसज्जित होते. \v 12 योद्धे पुरुषांच्या कुटुंब प्रमुखांची एकूण संख्या 2,600 होती. \v 13 त्यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी प्रशिक्षित झालेल्या पुरुषांचे सैन्य 3,07,500 होते, राजाला त्याच्या शत्रूविरुद्ध आधार देण्यासाठी ते एक शक्तिशाली सैन्य होते. \v 14 उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला. \v 15 यरुशलेममध्ये त्याने बुरुजावर आणि कोपऱ्यांवरील संरक्षणांसाठी वापर करण्यासाठी शोध लावलेली उपकरणे बनविली. ज्यामुळे सैनिक बाण मारू शकतील आणि भिंतीवरून मोठे दगड फेकू शकतील. त्याची किर्ती दूर पसरली, कारण तो सामर्थ्यशाली होईपर्यंत त्याला खूप मदत झाली होती. \p \v 16 परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला. \v 17 अजर्‍याह याजका बरोबर याहवेहचे इतर ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यामागे आले. \v 18 ते उज्जीयाह राजास भेटले आणि म्हणाले, “उज्जीयाह, याहवेहसाठी धूप जाळणे तुला योग्य नाही. धूप जाळण्यासाठी अहरोनाचे वंशज, याजकांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्या पवित्रस्थानातून बाहेर पड, कारण तू विश्वासू राहिला नाहीस आणि परमेश्वर याहवेह यांच्याकडून तुझा सन्मान केला जाणार नाही.” \p \v 19 उज्जीयाह धूप जाळण्यासाठी त्याच्या हातात धूपदान घेऊन तयार होता, तो याजकांवर रागावला. याहवेहच्या मंदिरातील धूपवेदीसमोर पुजाऱ्यांवर तो रागावत असताना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग आला. \v 20 जेव्हा अजर्‍याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते. \p \v 21 उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात\f + \fr 26:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa जिथून तो त्याच्या जबाबदारीतून मोकळा करण्यात आला होता\fqa*\f* तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले. \p \v 22 उज्जीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याद्वारे लिहून ठेवल्या आहेत. \v 23 उज्जीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि राजांच्या मालकीच्या स्मशानभूमीत त्याला पुरण्यात आले, कारण लोक म्हणाले, “त्याला कुष्ठरोग झाला होता.” आणि त्याचा वारस त्याचा पुत्र योथाम राजा झाला. \c 27 \s1 यहूदीयाचा राजा योथाम \p \v 1 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती. \v 2 त्याचे पिता उज्जीयाहने जसे केले तसे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले; परंतु त्याने याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला नाही. तथापि लोकांनी त्यांचे भ्रष्ट व्यवहार सुरूच ठेवले. \v 3 योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले. \v 4 त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले. \p \v 5 योथामाने अम्मोन्यांच्या राजाशी युद्ध करून त्यांना जिंकले. त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर तालांत\f + \fr 27:5 \fr*\ft अंदाजे 3.4 मेट्रिक टन\ft*\f* चांदी, दहा हजार कोर\f + \fr 27:5 \fr*\ft अंदाजे 1,600 मेट्रिक टन\ft*\f* गहू आणि दहा हजार कोर\f + \fr 27:5 \fr*\ft अंदाजे 1,350 मेट्रिक टन\ft*\f* जव दिले. अम्मोनी लोकांनी दुसऱ्या आणि तिसर्‍या वर्षी देखील त्याच प्रमाणात वस्तू आणल्या. \p \v 6 योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला. \p \v 7 योथामच्या राज्यकाळातील इतर घटना, त्याने केलेली सर्व युद्धे आणि इतर गोष्टी इस्राएलचे राजे आणि यहूदीयाचे राजे यांच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत. \v 8 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. \v 9 योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याचा पुत्र आहाज त्याचा वारस म्हणून राजा झाला. \c 28 \s1 यहूदीयाचा राजा आहाज \p \v 1 वयाच्या वीसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे पिता दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही. \v 2 त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि पूजा करण्यासाठी बआल दैवतांच्या मूर्तीसुद्धा बनविल्या. \v 3 त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला. \v 4 त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला. \p \v 5 त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले. \p त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली. \v 6 रमाल्याह याचा पुत्र पेकहने एका दिवसात यहूदीयामधील एक लाख वीस हजार सैनिकांना ठार केले—कारण यहूदीयाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता. \v 7 एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले. \v 8 इस्राएली लोकांनी यहूदीया येथून आलेल्या त्यांच्या बंधूइस्राएली लोकांमधून दोन लाख स्त्रिया, पुत्र आणि कन्यांना कैद केले. त्यांनी पुष्कळ लूट घेतली व ती शोमरोनला नेली. \p \v 9 परंतु ओदेद नावाचा याहवेह यांचा एक संदेष्टा तिथे होता आणि जेव्हा सैन्य शोमरोनकडे परत आले, तेव्हा तो त्यांची भेट घेण्यासाठी निघाला. तो त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यहूदीयावर रागावले होते म्हणून त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. परंतु इतक्या क्रोधाने तुम्ही त्यांची कत्तल केली आहे की, त्याचे पडसाद स्वर्गापर्यंत पोहोचले. \v 10 आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का? \v 11 आता माझे ऐका! तुम्ही कैदी म्हणून आणलेल्या तुमच्या सहइस्राएली लोकांना परत पाठवा, कारण याहवेहचा क्रोधाग्नी तुमच्यावर भडकलेला आहे.” \p \v 12 नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्‍याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला. \v 13 ते म्हणाले, “तुम्ही त्या कैद्यांना इकडे आणू नये, नाहीतर याहवेहसमोर आपण दोषी ठरले जाऊ. आपल्या पापामध्ये आणि दोषामध्ये आणखी भर घालण्याचा तुमचा विचार आहे काय? कारण आधीच आमचे पाप मोठे आहे आणि त्यांचा क्रोधाग्नी आम्हा इस्राएलींवर भडकलेला आहे.” \p \v 14 त्यामुळे शिपायांनी अधिकारी आणि जमलेल्या सर्व मंडळीच्या उपस्थितीत लूट आणि कैदींना सोडून दिले. \v 15 ज्या माणसांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांनी कैद्यांना घेतले आणि जे वस्त्रहीन होते त्या सर्वांना कपडे घातले. त्यांनी त्यांना कपडे आणि पायताणे, अन्न आणि पेय आणि बरे होण्यासाठी मलम हे सर्व दिले. जे अशक्त होते त्या सर्वांना त्यांनी गाढवावर बसविले. तेव्हा ते त्यांना त्यांच्या इस्राएली बांधवांकडे यरीहो, खजुरीचे नगर येथे घेऊन गेले आणि ते शोमरोनकडे परत आले. \p \v 16 त्यावेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजांकडे मदतीसाठी बोलाविणे पाठविले होते. \v 17 एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले. \v 18 त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली. \v 19 इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला. \v 20 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर\f + \fr 28:20 \fr*\fq तिग्लथ-पिलेसर \fq*\ft याला \ft*\fqa तिग्लथ-पिल्नेसर \fqa*\ft म्हणूनही ओळखले जाते\ft*\f* त्याच्याकडे आला, परंतु त्याने त्याला मदत करण्याऐवजी त्याला त्रास दिला. \v 21 आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. \p \v 22 त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला. \v 23 त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते. \p \v 24 आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातील इतर वस्तू एकत्र केल्या आणि कापून त्याचे तुकडे केले. त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे बंद केले आणि यरुशलेममधील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात वेद्या बसविल्या. \v 25 यहूदीयामधील प्रत्येक गावात त्याने इतर दैवतांना बलिदाने अर्पिण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि याहवेहच्या, त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वराच्या रागाला चेतावणी दिली. \p \v 26 त्याच्या राज्यकाळातील इतर घटना आणि त्याचे सर्व मार्ग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. \v 27 आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला यरुशलेम शहरात पुरण्यात आले, परंतु त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत ठेवण्यात आले नाही. त्याचा पुत्र हिज्कीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला. \c 29 \s1 हिज्कीयाह मंदिराचे शुद्धीकरण करतो \p \v 1 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हिज्कीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्‍याहची कन्या होती. \v 2 त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. \p \v 3 त्याच्या राज्यकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली. \v 4 त्याने याजकांना आणि लेवींना आणले आणि त्यांना पूर्व बाजूला असलेल्या चौकात एकत्र जमविले. \v 5 आणि म्हणाला: “लेवींनो, माझे ऐका! आता तुम्ही स्वतःला पवित्र करा आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर यांचे मंदिर पवित्र करा. सर्व अशुद्धता या पवित्रस्थानातून काढून टाका. \v 6 आमचे पालक अविश्वासू होते; त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि त्यांचा त्याग केला. त्यांनी याहवेहच्या निवासस्थानापासून त्यांचे मुख फिरविले आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली. \v 7 त्यांनी अंगणाचे दरवाजे बंद केले आणि दिवे विझविले. त्यांनी धूप जाळला नाही किंवा त्या पवित्रस्थानात इस्राएलच्या परमेश्वराला कोणतेही होमार्पण दिले नाही. \v 8 त्यामुळेच याहवेहचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला आहे; त्यांनी त्यांना भयप्रद व दहशत निर्माण करणारे आणि तिरस्काराचा विषय असे केले आहे, जसे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. \v 9 याकारणामुळेच आपले पूर्वज तलवारीने मारले गेले आणि आपले पुत्र आणि कन्या आणि आपल्या स्त्रिया बंदिवासात ठेवलेल्या आहेत. \v 10 आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल. \v 11 माझ्या मुलांनो, आता निष्काळजी राहू नका, कारण याहवेहनी तुम्हाला त्यांच्यासमोर उभे राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे सेवक होण्यासाठी आणि धूप जाळण्यासाठी निवडले आहे.” \b \lh \v 12 तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली: \b \li1 कोहाथी वंशातील: \li2 अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल; \li1 मरारी वंशातील: \li2 अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्‍याह; \li1 गेर्षोनी वंशातील: \li2 जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन; \li1 \v 13 एलीजाफानच्या वंशातील: \li2 शिम्री आणि ईयेल; \li1 आसाफाच्या वंशातील: \li2 जखर्‍याह आणि मत्तन्याह; \li1 \v 14 हेमानच्या वंशातील: \li2 यहीएल आणि शिमी; \li1 यदूथूनच्या वंशातील: \li2 शमायाह आणि उज्जीएल. \b \p \v 15 जेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या लेवींना एकत्र जमविले आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले, तेव्हा ते याहवेहच्या वचनाचे पालन करून, राजाज्ञेनुसार याहवेहच्या मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी मंदिरात गेले. \v 16 याजक याहवेहच्या पवित्रस्थानात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आत गेले. त्यांना याहवेहच्या मंदिरात जे काही अशुद्ध सापडले ते सर्व त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या अंगणात आणले. लेव्यांनी ते घेतले आणि किद्रोन खोऱ्याकडे नेऊन फेकले. \v 17 पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शुद्धीकरण सुरू केले आणि पहिल्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते याहवेहच्या मंदिराजवळ पोहोचले. आणखी आठ दिवस त्यांनी पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी काम पूर्ण करून याहवेहचे मंदिर पवित्र केले. \p \v 18 मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत. \v 19 राजा आहाज राजा असताना त्यांच्या अविश्वासूपणामध्ये त्यांनी काढून टाकलेल्या सर्व वस्तू आम्ही तयार केल्या आहेत आणि पवित्र केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता याहवेहच्या वेदीसमोर आहेत.” \p \v 20 दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला. \v 21 त्यांनी सात गोर्‍हे, सात मेंढे, सात नरकोकरे आणि सात बोकडे हे राष्ट्राच्या पापार्पणासाठी\f + \fr 29:21 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्धीकरणाचे अर्पण\fqa*\f*, पवित्रस्थानासाठी आणि यहूदीयासाठी आणले. राजाने याजकांना, अहरोनाच्या वंशजांना हे सर्व याहवेहच्या वेदीवर अर्पण करण्यास सांगितले. \v 22 तेव्हा त्यांनी गोर्‍ह्यांचा वध केला आणि याजकांनी रक्त घेऊन वेदीवर शिंपडले; नंतर त्यांनी मेंढ्यांची कत्तल केली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. त्यानंतर त्यांनी कोकऱ्यांचा वध केला आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. \v 23 पापार्पणासाठी असलेले बोकड राजा आणि जमलेल्या मंडळीसमोर आणले आणि त्यांनी त्यांचे हात त्यांच्यावर ठेवले. \v 24 याजकांनी नंतर बोकडांचा वध केला आणि त्यांचे रक्त सर्व इस्राएलसाठी प्रायश्चिताचे पापार्पण म्हणून वेदीवर अर्पण केले, कारण राजाने सर्व इस्राएलसाठी होमार्पण आणि पापार्पण करण्याची आज्ञा दिली होती. \p \v 25 दावीद राजा, राजाचा संदेष्टा गाद आणि नाथान संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे झांजा, वीणा आणि तंतुवाद्ये घेऊन त्याने लेवींना याहवेहच्या मंदिरात ठेवले; अशी आज्ञा याहवेहनी त्यांच्या संदेष्ट्यांद्वारे दिली होती. \v 26 म्हणून लेवीय लोक दावीदाची वाद्ये आणि याजक तुतारी घेऊन तयार उभे राहिले. \p \v 27 हिज्कीयाहने वेदीवर बलिदानांचे होमार्पण करण्याची आज्ञा दिली. अर्पण सुरू झाले तेव्हाच इस्राएलचा राजा दावीदाची वाद्ये आणि कर्ण्यांसह याहवेहसाठी गीते गाण्यास सुरुवात झाली. \v 28 जमलेल्या संपूर्ण सभेतील लोकांनी वाकून आराधना केली, त्यावेळेस वादक वाद्य आणि कर्णे वाजवित होते. बलिदानांचे होमार्पण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सुरू होते. \p \v 29 जेव्हा अर्पणे करण्याचे संपले, तेव्हा राजा आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येकजणांनी गुडघे टेकले आणि आराधना केली. \v 30 राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली. \p \v 31 तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली. \p \v 32 तिथे जमलेल्या लोकांनी आणलेल्या होमार्पणांची संख्या सत्तर गोऱ्हे, शंभर मेंढे आणि दोनशे नरकोकरे होती; हे सर्व याहवेहसमोर होमार्पणासाठी आणले होते. \v 33 बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते. \v 34 तरीसुद्धा सर्व होमार्पणाची कातडी काढण्यासाठी याजक फारच कमी होते. म्हणून त्यांचे नातेवाईक लेवी लोकांनी त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर याजकांचे शुद्धीकरण होईपर्यंत मदत केली, कारण लेवी लोक स्वतःचे शुद्धीकरण करण्यामध्ये याजकांपेक्षा अधिक प्रामाणिक होते. \v 35 शांत्यर्पणाची चरबी आणि पेयार्पणे यांच्याबरोबरच होमार्पणे विपुल प्रमाणात होती. \p अशा रीतीने याहवेहच्या मंदिरातील सेवा पुन्हा प्रस्थापित झाली. \v 36 परमेश्वराने त्यांच्या लोकांसाठी हे त्वरित सिद्धीस नेले होते, म्हणून हिज्कीयाह आणि सर्व लोक आनंदित झाले. \c 30 \s1 हिज्कीयाह वल्हांडण सण साजरा करतो \p \v 1 हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा. \v 2 राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा. \v 3 नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते. \v 4 ही योजना योग्य आहे असे राजाला आणि संपूर्ण मंडळीला वाटले. \v 5 त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता. \p \v 6 राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्‍यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: \pm “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील. \v 7 तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात. \v 8 तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल. \v 9 जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.” \p \v 10 संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली. \v 11 तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले. \v 12 याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता. \p \v 13 दुसऱ्या महिन्यामध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेममध्ये बरेच लोक एकत्र आले. \v 14 त्यांनी यरुशलेममधील वेद्या काढून टाकल्या आणि धूपाच्या वेद्यांची जागा मोकळी केली आणि त्या किद्रोन खोऱ्यात फेकून दिल्या. \p \v 15 वल्हांडणाचा कोकरा त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापला. याजकांना आणि लेवीय लोकांना स्वतःची लाज वाटली आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले आणि याहवेहच्या मंदिरात होमार्पणे आणली. \v 16 नंतर त्यांनी परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची नियमित पदे स्वीकारली. लेव्यांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले. \v 17 जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला. \v 18 एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी. \v 19 जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.” \v 20 आणि याहवेहनी हिज्कीयाहचे ऐकले आणि लोकांना बरे केले. \p \v 21 यरुशलेममध्ये जे इस्राएली लोक उपस्थित होते, त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस मोठ्या आनंदात साजरा केला, तर लेवीय लोकांनी आणि याजकांनी याहवेहना समर्पित केलेल्या प्रतिध्वनीच्या वाद्यांसहित दररोज याहवेहची स्तुती केली. \p \v 22 ज्यांनी याहवेहच्या सेवेसाठी योग्य समज दाखविला, त्या सर्व लेवीय लोकांना हिज्कीयाहने प्रोत्साहित केले. सात दिवस त्यांना नेमून दिलेला त्यांचा भाग त्यांनी खाल्ला आणि शांत्यर्पणाचे अर्पण केले आणि त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती\f + \fr 30:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्यांच्या पापांची कबुली दिली\fqa*\f* केली. \p \v 23 तेव्हा संपूर्ण सभेने पुढे अधिक सात दिवस हा सण साजरा करण्याचे मान्य केले; त्यामुळे आणखी सात दिवस त्यांनी हा उत्सव आनंदाने साजरा केला. \v 24 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने या सभेसाठी एक हजार बैल आणि सात हजार मेंढ्या आणि शेळ्या दिल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यांना एक हजार बैल आणि दहा हजार मेंढ्या व शेळ्या दिल्या. तेव्हा मोठ्या संख्येने याजकांनी स्वतःला पवित्र केले. \v 25 यहूदीयाच्या संपूर्ण सभेने याजक आणि लेवीय आणि इस्राएलमधून जमलेले सर्व लोक, इस्राएलमधून आलेले परदेशी आणि यहूदीयामधील रहिवाशांनी आनंद साजरा केला. \v 26 त्यावेळेस तिथे यरुशलेममध्ये मोठा आनंद झाला होता, कारण इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनच्या दिवसांपासून यरुशलेममध्ये यासारखे काहीही घडले नव्हते. \v 27 याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली. \c 31 \p \v 1 जेव्हा हे सर्व समाप्त झाले, तेव्हा तिथे असलेले इस्राएली लोक बाहेर पडून यहूदीयाच्या नगरांमध्ये गेले व त्यांनी पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्यांनी यहूदीया, बिन्यामीन आणि एफ्राईम व मनश्शेह येथील उच्च स्थाने आणि वेद्या नष्ट केल्या. त्यांनी ते सर्व नष्ट केल्यानंतर, इस्राएली लोक स्वतःच्या गावी आणि स्वतःच्या वतनाकडे परत आले. \s1 उपासनेसाठी देणग्या \p \v 2 हिज्कीयाहने याजक आणि लेवी यांची निरनिराळ्या विभागांवर—त्यांच्यातील प्रत्येकाने याजक किंवा लेवी यांनी त्यांना दिलेल्या कार्यानुसार—होमार्पण आणि शांत्यर्पण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि याहवेहच्या निवासस्थानाच्या फाटकांजवळ उपकारस्तुती आणि स्तुतिगान करण्यासाठी नेमणूक केली. \v 3 राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले. \v 4 त्याने यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना याजक आणि लेवींना त्यांचा योग्य भाग देण्याची आज्ञा केली, ज्यामुळे ते स्वतःला याहवेहच्या नियमशास्त्रासाठी समर्पित करू शकतील. \v 5 आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला. \v 6 यहूदीयाच्या गावांमध्ये राहणाऱ्या इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांनीसुद्धा त्यांची गुरे आणि कळप यांचा दशांश आणि त्यांचा परमेश्वर याहवेहना समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशांश आणला आणि त्याचा ढीग रचला. \v 7 त्यांनी तिसऱ्या महिन्यात या कामाची सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात ते पूर्ण केले. \v 8 जेव्हा हिज्कीयाह आणि त्याचे अधिकारी आले आणि त्यांनी तो ढीग पाहिला, तेव्हा त्यांनी याहवेहची स्तुती केली आणि त्यांच्या इस्राएली लोकांना आशीर्वाद दिला. \p \v 9 हिज्कीयाहने याजकांना आणि लेवीय लोकांना ढिगाबद्दल विचारले; \v 10 आणि सादोकच्या घराण्यातील अजर्‍याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.” \p \v 11 हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिरात भांडारगृहे तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते काम पूर्ण झाले. \v 12 नंतर त्यांनी विश्वासूपणाने वर्गणी, दशांश आणि समर्पित भेटवस्तू आणल्या. कनन्याह नावाचा लेवी या सर्व गोष्टींचा प्रभारी पर्यवेक्षक होता आणि त्याचा भाऊ शिमी त्याच्या नंतरच्या श्रेणीतील अधिकारी होता. \v 13 यहीएल, अजज्याह, नहाथ, असाहेल, यरिमोथ, योजाबाद, एलीएल, इस्माकियाह, महथ आणि बेनाइयाह हे कनन्याह आणि त्याचा भाऊ शिमीचे सहायक होते. या सर्वांना राजा हिज्कीयाहने नियुक्त केल्यामुळे त्यांनी सेवा केली आणि अजर्‍याह परमेश्वराच्या मंदिराचा नियुक्त प्रभारी अधिकारी म्हणून सेवा करीत होता. \p \v 14 इम्नाह लेवीचा पुत्र कोरे, पूर्वेकडील वेशीचा रखवालदार, परमेश्वराला स्वैच्छिक अर्पणावरील याहवेहना मिळालेल्या वर्गणीचे वाटप करणे आणि पवित्र भेटवस्तू यावरील अधिकारी होता. \v 15 एदेन, मिन्यामीन, येशूआ, शमायाह, अमर्‍याह आणि शखन्याहनी त्याला विश्वासयोग्यतेने याजकांच्या गावांमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या वृद्ध आणि तरुण याजकांना त्यांच्या विभागानुसार वाटप करण्यासाठी मदत केली. \p \v 16 त्या शिवाय त्यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना ज्यांची नावे वंशावळीच्या नोंदींमध्ये होती त्यांना वाटप केले, जे सर्व लोक त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या विभागानुसार त्यांची रोजची वेगवेगळी नेमून दिलेली सेवा पार पाडण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश करतील. \v 17 आणि त्यांनी त्यांच्या घराण्यांनी नोंदविलेल्या वंशावळीतील याजकांना आणि त्याचप्रमाणे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लेवींना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि विभागणी यानुसार वाटून दिल्या. \v 18 त्यांनी सर्व लहान मुले, स्त्रिया आणि संपूर्ण समाजातील पुत्र व कन्या यांचा या वंशावळीच्या नोंदीमध्ये समावेश केला. कारण स्वतःला पवित्र करण्यामध्ये ते प्रामाणिक होते. \p \v 19 याजक, जे अहरोनाचे वंशज होते ते त्यांच्या गावांच्या आसपासच्या शेतजमिनीवर किंवा इतर कोणत्याही नगरांमध्ये राहत होते, त्यांच्यातील प्रत्येक पुरुषाला आणि लेव्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांची नोंद झाली होती, त्या सर्वांना भागांचे वाटप करण्यासाठी नावानुसार पुरुष नेमले गेले. \p \v 20 हिज्कीयाहने संपूर्ण यहूदीयामध्ये जे चांगले आणि योग्य होते तेच केले आणि त्याचे परमेश्वर याहवेहसमोर तो विश्वासू राहिला. \v 21 परमेश्वराच्या मंदिराचे जे काही सेवाकार्य त्याने हाती घेतले आणि नियम व आज्ञाचे पालन करण्यामध्ये त्याने त्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि संपूर्ण अंतःकरणापासून काम केले आणि त्यामुळे तो समृद्ध झाला. \c 32 \s1 सन्हेरीब यरुशलेमला धमकी देतो \p \v 1 हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी. \v 2 जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे, \v 3 तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्‍यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली. \v 4 त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?” \v 5 नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या. \p \v 6 त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले: \v 7 “बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे. \v 8 त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला. \p \v 9 नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले: \pm \v 10 “अश्शूरचा राजा सन्हेरीब असे म्हणतो: तुम्ही कशावर भरवसा टेकवून तुम्ही या वेढ्यात यरुशलेममध्ये राहिला आहात? \v 11 जेव्हा हिज्कीयाह म्हणतो, ‘याहवेह आमचे परमेश्वर हे आम्हाला अश्शूरच्या राजाच्या हातातून वाचवतील,’ तर तुम्ही भुकेले आणि तहानलेले असे होऊन मरावे म्हणून तो तुमची दिशाभूल करत आहे. \v 12 हिज्कीयाहने स्वतःच या दैवताची उच्च स्थाने आणि वेद्या काढून टाकून यहूदीया आणि यरुशलेमला सांगितले नाही का की, ‘तुम्ही एकाच वेदीसमोर आराधना करावी आणि तिच्यावर होमार्पणे करावी?’ \pm \v 13 “तुम्हाला हे माहीत नाही का, की मी आणि माझ्या आधीच्या लोकांनी इतर देशातील सर्व लोकांचे काय केले? त्या राष्ट्रांच्या दैवतांनी कधीतरी माझ्या हातातून त्यांच्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय? \v 14 माझ्या आधी या जागेवर काम करणाऱ्यांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला त्यांच्या सर्व दैवतांपैकी कोणीतरी त्याच्या लोकांना माझ्यापासून वाचवू शकले का? तर मग तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे बरे सोडवेल? \v 15 तर आता हिज्कीयाहने तुमची फसवणूक करू नये आणि तुमची अशाप्रकारे दिशाभूल करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही राष्ट्राचे किंवा राज्याचे कोणतेही दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून किंवा माझ्या पूर्वीच्या लोकांच्या हातातून सोडवू शकले नाही. तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे सोडवेल!” \p \v 16 सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले. \v 17 राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.” \v 18 तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले. \v 19 यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते. \p \v 20 राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली. \v 21 आणि याहवेह यांनी एक देवदूत पाठवला, त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व लढवय्ये, सेनापती आणि अधिकारी यांचा नाश केला. त्यामुळे तो अपमानित होऊन स्वतःच्या भूमीकडे मागे फिरला. आणि जेव्हा तो त्याच्या दैवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्या काही मुलांनी, जे त्याचे स्वतःचे रक्त आणि मांस होते, त्यांनी त्याला तलवारीने कापले. \p \v 22 अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला. \v 23 पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला. \s1 हिज्कीयाहचा गर्व, यश आणि मृत्यू \p \v 24 त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली ज्यांनी त्याला उत्तर दिले आणि एक आश्चर्यकारक चिन्ह दिले. \v 25 परंतु हिज्कीयाहचे मन गर्विष्ठ होते आणि त्याच्यावर दाखविलेल्या दयेला त्याने अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्यावर आणि यहूदीया व यरुशलेमवर याहवेहचा कोप आला होता. \v 26 तेव्हा हिज्कीयाहने त्याच्या अंतःकरणातील गर्वाबद्दल पश्चात्ताप केला; तसेच यरुशलेमच्या लोकांनीसुद्धा केले; त्यामुळेच हिज्कीयाहच्या कार्यकालामध्ये याहवेहचा क्रोध त्यांच्यावर आला नाही. \p \v 27 हिज्कीयाहकडे फार मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने त्याच्याकडे असलेले चांदी आणि सोने आणि मौल्यवान रत्ने, मसाले, ढाली आणि सर्वप्रकारच्या मौल्यवान वस्तूंसाठी भांडारे तयार केली. \v 28 हंगामाचे धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांचा साठा ठेवण्यासाठी त्याने इमारती बांधल्या; आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची गुरे आणि कळपांसाठी गोठे, मेंढवाडे बांधले. \v 29 त्याने गावे विकसित केली आणि अधिक संख्येने गुरे मिळविली, कारण परमेश्वराने त्याला खूप मोठी संपत्ती दिली होती. \p \v 30 हिज्कीयाहनेच गीहोन झर्‍याचा वर जाणारा मार्ग अडविला आणि पाण्याचा मार्ग दावीदाच्या नगरीच्या पश्चिमेकडे नेला. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो यशस्वी झाला. \v 31 परंतु त्या देशात घडलेल्या चमत्कारिक चिन्हाबद्दल त्याला विचारण्यासाठी बाबेलच्या राज्यकर्त्यांनी जेव्हा दूत पाठवले, तेव्हा परमेश्वराने त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या अंतःकरणातील सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्याला सोडून दिले. \p \v 32 हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना व त्याच्या श्रद्धेचे कार्य आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याच्या दर्शनात त्याने लिहिलेल्या यहूदीयाच्या व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. \v 33 हिज्कीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या वंशजांबरोबर डोंगरावरील कबरेत पुरण्यात आले. तो मरण पावला तेव्हा सर्व यहूदीया व यरुशलेमच्या लोकांनी त्याचा सन्मान केला. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला. \c 33 \s1 यहूदीयाचा राजा मनश्शेह \p \v 1 वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. \v 2 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले. \v 3 त्याचे वडील हिज्कीयाहने पाडून टाकलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; त्याने बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली. \v 4 त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्यासाठी याहवेहने म्हटले होते, “यरुशलेमात माझे नाव सर्वकाळासाठी राहील.” \v 5 याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या. \v 6 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, ज्योतिष आणि जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट अशा अनेक गोष्टी करून याहवेहचा राग पेटविला. \p \v 7 जी कोरीव मूर्ती त्याने घडविली होती, ती त्याने घेतली व परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी परमेश्वर, दावीद व त्याचा पुत्र शलोमोन यांना म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन. \v 8 जर ते फक्त मोशेद्वारे दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी तुमच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांची पावले भटकू देणार नाही.” \v 9 परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला. \p \v 10 याहवेह मनश्शेह आणि त्याच्या लोकांशी बोलले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. \v 11 तेव्हा याहवेहनी अश्शूर राजाच्या सेनापतींना त्यांच्याविरुद्ध केले, त्यांनी मनश्शेहला कैद केले, त्याच्या नाकात आकडा घातला, त्याला कास्य धातूच्या बेड्यांनी बांधले आणि बाबेलला नेले. \v 12 त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले. \v 13 आणि जेव्हा त्याने त्यांच्याकडे प्रार्थना केली, तेव्हा याहवेहना त्याच्या कळकळीच्या विनंतीमुळे दया आली आणि त्यांनी त्याची विनंती ऐकली; म्हणून त्यांनी त्याला यरुशलेम आणि त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा मनश्शेहला उमजले की, याहवेह हेच परमेश्वर आहेत. \p \v 14 नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले. \p \v 15 त्याने परकीय दैवते टाकून दिली आणि याहवेहच्या मंदिरातून मूर्ती काढून टाकली, तसेच मंदिराच्या टेकडीवर आणि यरुशलेममध्ये ज्या वेद्या त्याने बांधल्या होत्या त्या सर्व वेद्या काढल्या आणि त्या शहराबाहेर फेकून दिल्या. \v 16 नंतर त्याने याहवेहची वेदी पुनर्स्थापित केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्तुतीची अर्पणे केली आणि यहूदीयाला सांगितले की, त्यांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहचीच यांचीच सेवा करावी. \v 17 तरीसुद्धा लोकांनी उच्च स्थानावर जाऊन त्यांचे परमेश्वर याहवेह यांनाच अर्पणे करण्याचे कायम ठेवले. \p \v 18 मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने त्याच्या परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्या नावामध्ये संदेष्ट्यांनी सांगितलेली वचने ही इस्राएली राजांच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. \v 19 त्याची प्रार्थना आणि त्याच्या कळकळीच्या विनवणीमुळे परमेश्वर दयेने कसे हेलावून गेले, तसेच त्याची सर्व पापे आणि अविश्वासूपणा आणि जिथे घटनास्थळे आहेत, तिथे त्याने उच्च स्थाने बांधली आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती स्थापित केल्या, स्वतःला नम्र करण्याआधी केलेल्या या सर्व गोष्टी संदेष्ट्यांच्या घटनांची नोंद यामध्ये लिहिलेल्या आहेत. \v 20 मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला. \s1 यहूदीयाचा राजा आमोन \p \v 21 वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले. \v 22 त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली. \v 23 परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले. \p \v 24 आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्या राजवाड्यात त्याची हत्या केली. \v 25 तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाह याला त्याच्या जागेवर राजा केले. \c 34 \s1 योशीयाहने केलेल्या सुधारणा \p \v 1 वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. \v 2 याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याने त्याचे पूर्वज दावीदाच्या मार्गांचे पालन केले. \p \v 3 त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली. \v 4 त्याच्या मार्गदर्शनाखाली बआल दैवतांच्या वेद्या पाडण्यात आल्या; त्याने त्यावर ज्या धूपवेद्या होत्या, त्यांचे तुकडे केले आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती जमिनीवर पाडून फोडल्या. त्याचे त्याने बारीक तुकडे केले आणि ज्यांनी त्यांना बलिदान केले होते, त्यांच्या कबरेवर ते विखरून टाकले. \v 5 त्याने याजकांची हाडे त्यांच्या वेदींवर जाळली आणि अशाप्रकारे त्याने यहूदीया आणि यरुशलेम यांचे शुद्धीकरण केले. \v 6 मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये, \v 7 त्याने वेद्या आणि अशेराचे स्तंभ मोडून टाकले आणि मूर्तींचा चुरा करून पूड केली आणि संपूर्ण इस्राएलमधून सर्व धूपवेद्यांचे तुकडे केले. नंतर तो यरुशलेमकडे परत गेला. \p \v 8 योशीयाहच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, भूमी आणि मंदिर शुद्ध करण्यासाठी, त्याने अजल्याहचा पुत्र शाफान आणि त्या नगराचा अधिपती मासेयाह यांना, नोंद करणारा यहोआहाजचा पुत्र योवाहला त्याचे परमेश्वर याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी पाठविले. \p \v 9 ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले. \v 10 नंतर त्यांनी ते याहवेहच्या मंदिराच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या माणसांच्या हाती सोपविले. या पुरुषांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणाऱ्या कामगारांना ते पैसे दिले. \v 11 ज्या इमारती नाश होण्यासाठी यहूदीयाच्या राजांनी पडू दिल्या होत्या, त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी बांधकाम करणारे व सुतार यांना घडीव दगड आणि इमारतीचे वासे व तुळईची लाकडे खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे दिले. \p \v 12 कामगारांनी विश्वासयोग्यतेने काम केले. यहथ आणि ओबद्याह, मरारी वंशजातून आलेले लेवी आणि कोहाथी वंशजातून आलेले जखर्‍याह आणि मशुल्लाम हे त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे नियुक्त केले होते. सर्व लेवीय लोकांना—कुशल वाद्य वादक— \v 13 त्यांच्याकडे मजुरांची जबाबदारी आणि प्रत्येक कामावरील सर्व कामगारांवर मुकादम म्हणून देखरेख करण्याचे काम दिले होते. काही लेवी लोकांना सचिव, शास्त्री आणि द्वारपाल असे काम दिले. \s1 नियमशास्त्राचा ग्रंथ सापडतो \p \v 14 जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. \v 15 हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला. \p \v 16 तेव्हा शाफान याने तो ग्रंथ राजाकडे नेला आणि त्याला अहवाल दिला: “तुमचे अधिकारी ज्याकाही गोष्टी करण्यास वचनबद्ध आहेत, त्या सर्व गोष्टी ते करीत आहेत. \v 17 त्यांना जो पैसा याहवेहच्या मंदिरात मिळाला, त्यांनी तो मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्‍यांच्या हाती दिला आहे.” \v 18 नंतर सचिव शाफान याने राजाला कळविले, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने त्यामधून राजाच्या समोर वाचले. \p \v 19 जेव्हा राजाने नियमशास्त्राचे शब्द ऐकले तेव्हा त्याने त्याची वस्त्रे फाडली. \v 20 त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा\f + \fr 34:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa मिखायाहचा\fqa*\f* पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला: \v 21 “जा आणि माझ्यासाठी आणि इस्राएल आणि यहूदीयामध्ये जे लोक राहत आहेत, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर आला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.” \p \v 22 हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ\f + \fr 34:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa तिक्वाह\fqa*\f* चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती. \p \v 23 ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा, \v 24 ‘याहवेह असे म्हणतात: मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन आणि यहूदीयाच्या राजासमोर वाचलेल्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप आणेन. \v 25 कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’ \v 26 यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले होते, ‘जे वचन तू ऐकले होते त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: \v 27 कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे होते आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध तो जे काही बोलला ते तू ऐकले तेव्हा तू स्वतःला परमेश्वरासमोर नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात. \v 28 आता मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर आणि येथे राहणाऱ्यांवर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” \p तेव्हा त्यांनी तिचे उत्तर परत राजाला जाऊन सांगितले. \p \v 29 नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले. \v 30 यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि लेवी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले. \v 31 राजा त्याच्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि हुकूमनाम्याचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराचे नवीनीकरण केले. \p \v 32 नंतर त्याने यरुशलेममधील प्रत्येकाला आणि बिन्यामीन गोत्रांच्या लोकांना तसे वचन देण्यास लावले; यरुशलेमच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराबरोबर केलेल्या कराराप्रमाणे केले. \p \v 33 योशीयाहने इस्राएली लोकांच्या सर्व प्रदेशामधून सर्व घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या आणि इस्राएलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करावयास लावले. जोपर्यंत तो जिवंत होता, तोपर्यंत त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे अनुसरण करण्यास ते चुकले नाहीत. \c 35 \s1 योशीयाह वल्हांडण सण साजरा करतो \p \v 1 योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले. \v 2 त्याने याजकांना त्यांना दिलेल्या कामासाठी नियुक्त केले आणि याहवेहच्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहित केले. \v 3 ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा. \v 4 इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा. \p \v 5 “तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा. \v 6 वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.” \p \v 7 योशीयाहने तिथे असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी वल्हांडणाचे अर्पण म्हणून तीस हजार कोकरे आणि बोकडे आणि तीन हजार गुरे ही सुद्धा पुरविली, राजाच्या व्यक्तिगत मालमत्तेतून हे सर्व दिले गेले. \p \v 8 त्याच्या अधिकार्‍यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्‍याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली. \v 9 तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली. \p \v 10 सेवेची व्यवस्था करण्यात आली आणि राजाच्या आदेशानुसार याजकांनी लेवीय लोकांबरोबर आपले स्थान ग्रहण केले. \v 11 वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली. \v 12 मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे याहवेहना अर्पण देण्यासाठी लोकांच्या कुटुंबातील पोटविभागांनी याहवेहना अर्पण द्यावे यासाठी त्यांनी होमार्पण बाजूला ठेवले. त्यांनी गुरांच्या बाबतीतही तसेच केले. \v 13 त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे वल्हांडण सणाच्या प्राण्यांना अग्नीवर भाजून घेतले आणि पवित्र अर्पणे मडके, कढई आणि तव्यांत उकळले आणि ते सर्व लोकांना लगेच वाढले. \v 14 यानंतर, त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली, कारण याजक, अहरोनाचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पण आणि चरबीचे भाग अर्पण करत होते. म्हणून लेवींनी स्वतःसाठी आणि अहरोन वंशज याजकांसाठी तयारी केली. \p \v 15 दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती. \p \v 16 त्यावेळेस योशीयाह राजाच्या आदेशाप्रमाणे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आणि याहवेहच्या वेदीवर होमबलींचे अर्पण करण्यासाठी याहवेहची संपूर्ण सेवा पार पडली. \v 17 त्यावेळी जे इस्राएली लोक तिथे उपस्थित होते त्यांनी वल्हांडण सण साजरा केला आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस पाळला. \v 18 शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता. \v 19 हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला. \s1 योशीयाहचा मृत्यू \p \v 20 या सर्व गोष्टीनंतर, जेव्हा योशीयाहने मंदिराची सेवा व्यवस्थित केल्यानंतर तेव्हा इजिप्तचा राजा नखो फरात\f + \fr 35:20 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीवर असलेल्या कर्कमीश येथे त्याच्याशी लढण्यास गेला आणि योशीयाह त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला. \v 21 परंतु नखोने त्याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “यहूदीयाच्या राजा, तुझ्या आणि माझ्यामध्ये काय भांडण आहे? यावेळेस मी तुमच्यावर नव्हे तर या घराण्याबरोबर मी युद्ध करीत आहे, त्याच्यावर हल्ला करीत आहे. परमेश्वराने मला घाई करण्यास सांगितले आहे; म्हणून परमेश्वराला विरोध करणे थांबव, ते माझ्याबरोबर आहेत, नाहीतर ते तुझा नाश करतील.” \p \v 22 तरीसुद्धा, योशीयाह त्याच्यापासून मागे फिरला नाही, परंतु त्याला युद्धात गुंतवून ठेवण्यासाठी त्याने स्वतःचे वेषांतर केले. परमेश्वराच्या आज्ञेनुसार नखोने जे सांगितले, ते त्याने ऐकले नाही, परंतु तो मगिद्दोच्या मैदानावर त्याच्याबरोबर लढण्यासाठी गेला. \p \v 23 तेव्हा धनुर्धऱ्यांनी योशीयाह राजाला बाण मारला, त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले, “मला घेऊन जा; मी अत्यंत जखमी झालो आहे.” \v 24 तेव्हा त्यांनी योशीयाहला त्याच्या रथातून बाहेर काढले, त्याला त्याच्या दुसऱ्या रथात ठेवले आणि यरुशलेमास आणले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरांमध्ये पुरण्यात आले आणि सर्व यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांनी त्याच्यासाठी शोक केला. \p \v 25 यिर्मयाहने योशीयासाठी विलापगीत लिहिले आणि आजपर्यंत सर्व स्त्री-पुरुष गायक विलापामध्ये योशीयाहचे स्मरणोत्सव करतात. इस्राएलमध्ये ही एक परंपरा झाली आहे आणि विलाप गीतांमध्ये त्या लिहिलेल्या आहेत. \p \v 26 याहवेहच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे योशीयाहने केलेली भक्तीची कृत्ये आणि त्याच्या राजवटीतील इतर घटना \v 27 सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे सर्व इस्राएलचे आणि यहूदीयाचे राजे या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. \c 36 \nb \v 1 आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजला यरुशलेमात त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले. \s1 यहूदीयाचा राजा यहोआहाज \p \v 2 वयाच्या तेवीसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले. \v 3 इजिप्तच्या राजाने त्याला यरुशलेममध्ये राज्यपदावरून खाली पाडले आणि यहूदीयावर शंभर तालांत\f + \fr 36:3 \fr*\ft अंदाजे 3.4 मेट्रिक टन\ft*\f* चांदी आणि एक तालांत\f + \fr 36:3 \fr*\ft अंदाजे 34 कि.ग्रॅ.\ft*\f* सोने असा कर लादला. \v 4 इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले. \s1 यहूदीयाचा राजा यहोयाकीम \p \v 5 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \v 6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला कास्याच्या साखळदंडाने बांधले. \v 7 नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील वस्तूसुद्धा बाबेलमध्ये नेल्या आणि त्या तिथे त्याच्या मंदिरात\f + \fr 36:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa राजवाड्यात\fqa*\f* ठेवल्या. \p \v 8 यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने केलेल्या घृणास्पद गोष्टी आणि त्याच्याविरुद्ध जे काही होते, ते सर्व इस्राएली आणि यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला. \s1 यहोयाखीन यहूदीयाचा राजा \p \v 9 वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात तीन महिने दहा दिवस राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. \v 10 वसंतऋतूमध्ये राजा नबुखद्नेस्सरने त्याला बोलाविणे पाठवले आणि त्याला बाबेलमध्ये आणले, त्याचबरोबर याहवेहच्या मंदिरातील मौल्यवान वस्तू आणल्या आणि त्याने यहोयाखीनचा काका सिद्कीयाहला यहूदीया आणि यरुशलेमवर राजा केले. \s1 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह \p \v 11 सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. \v 12 त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि यिर्मयाह संदेष्टाने याहवेहचे वचन त्याला सांगितले, तरी त्यांच्यासमोर तो नम्र झाला नाही. \v 13 ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही. \v 14 याव्यतिरिक्त याजकांचे सर्व पुढारी आणि लोक अधिकच अविश्वासू झाले, त्यांनी इतर राष्ट्रांच्या सर्व घृणास्पद प्रथांचे पालन केले आणि यरुशलेममध्ये पवित्र केलेले याहवेह यांचे मंदिर त्यांनी अशुद्ध केले. \s1 यरुशलेमचा पाडाव \p \v 15 याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वरानी त्यांच्या संदेष्ट्यांच्याद्वारे त्यांना वारंवार संदेश पाठवले, कारण त्यांनी त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या निवासस्थानावर दया केली होती. \v 16 परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली. \v 17 याहवेहनी खाल्डियन लोकांच्या राजाला त्यांच्याविरुद्ध आणले, ज्यांनी त्यांच्या तरुण पुरुषांना मंदिरात तलवारीने मारले आणि तरुण पुरुष किंवा तरुण स्त्रिया, वृद्ध किंवा जे अशक्त होते त्यांनाही सोडले नाही. परमेश्वराने त्या सर्वांना नबुखद्नेस्सरच्या हाती दिले. \v 18 ज्याने परमेश्वराच्या मंदिरातील मोठ्या आणि लहान सर्व मौल्यवान वस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील खजिने आणि राजा आणि त्याचे अधिकारी, यांचे खजिने बाबेलला नेले. \v 19 त्यांनी परमेश्वराच्या मंदिराला आग लावली आणि यरुशलेमचे तट पाडून टाकले; त्यांनी सर्व राजवाडे जाळले आणि तेथील सर्व मौल्यवान वस्तूंचा नाश केला. \p \v 20 तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले. \v 21 भूमीने शब्बाथाच्या विश्रांतीचा आनंद घेतला; यिर्मयाहने सांगितलेल्या याहवेहच्या वचनाच्या पूर्णतेची सत्तर वर्षे होईपर्यंत त्या भूमीने तिच्या उजाडपणाच्या सर्व वेळेत विसावा घेतला. \p \v 22 यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली. \pmo \v 23 “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: \pm “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहात तुम्ही तिथे वर जाऊ शकता आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.’ ”