\id 1TI 1TI- Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 1 तीमथ्य \toc1 पौलाचे तीमथ्याला पहिले पत्र \toc2 1 तीमथ्य \toc3 1 तीम \mt1 पौलाचे तीमथ्याला पहिले पत्र \c 1 \po \v 1 परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून, \po \v 2 विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास, \po परमेश्वर आपले पिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो. \s1 तीमथ्याला खोट्या शिक्षकांचा विरोध करण्याचे काम सोपविले जाते \p \v 3-4 मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्‍यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये. \v 5 आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी. \v 6 या गोष्टी सोडून अनेकजण निरर्थक बोलण्याकडे वळले आहेत. \v 7 ते नियमशास्त्राचे शिक्षक होण्यास अभिलाषी आहेत, परंतु ज्या गोष्टींबद्दल ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात आणि सांगतात त्या गोष्टी त्यांनाच समजत नाहीत. \p \v 8 आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र चांगले आहे—जर त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यात आला तर. \v 9 नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे \v 10 जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे. \v 11 जे धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाशी संबंधित शुभवार्तेला सुसंगत आहे, ते माझ्याकडे सोपविण्यात आले आहे. \s1 पौलाला प्रभूची कृपा \p \v 12 मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले. \v 13 मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले. \v 14 ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे. \p \v 15 ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे, की ख्रिस्त येशू पाप्यांना तारावयास जगात आले आणि त्या पातक्यांमध्ये सर्वात मोठा मीच आहे. \v 16 परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते. \v 17 जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन. \s1 तीमथ्याच्या कार्याचे नवीनीकरण \p \v 18 माझ्या मुला, तीमथ्या, माझी तुला ही आज्ञा आहे: संदेष्ट्यांच्याद्वारे तुझ्याविषयी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, तू त्यांच्याद्वारे उत्तम युद्ध करावे. \v 19 आणि विश्वास व चांगल्या विवेकशीलतेस घट्ट बिलगून राहा, ज्यांनी त्याचा नकार केला त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. \v 20 हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यामध्ये आहेत; त्यांनी ईश्वराची निंदा करू नये हे शिकावे, म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. \c 2 \s1 उपासनेबाबत सूचना \p \v 1 तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी. \v 2 अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे. \v 3 असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्‍याला संतोष होतो. \v 4 कारण सर्वांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे ज्ञान समजावे अशी त्यांची इच्छा आहे: \v 5 कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामध्ये मनुष्य ख्रिस्त येशू हेच एकमेव मध्यस्थ आहे. \v 6 त्यांनी सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून दिले ही साक्ष नेमलेल्या काळी देणे होय. \v 7 आणि या उद्देशाने त्यांनी मला या साक्षीसाठी घोषणा करणारा आणि प्रेषित म्हणून नियुक्त केले—मी खरे बोलतो, खोटे बोलत नाही—आणि गैरयहूदीयांचा विश्वासू आणि खरा शिक्षक म्हणून नेमलेला आहे. \p \v 8 म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. \v 9 स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे, \v 10 तर जे परमेश्वराची भक्ती करणार्‍यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे. \p \v 11 स्त्रियांनी\f + \fr 2:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa पत्नींनी\fqa*\f* शांतपणे व नम्रतेने शिकावे. \v 12 स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे. \v 13 कारण आदाम प्रथम घडविला गेला आणि नंतर हव्वा. \v 14 आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली. \v 15 म्हणून मुलांना जन्म देताना तिचे तारण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास, प्रीती आणि पवित्रपण यामध्ये राहिल्याने हे होईल. \c 3 \s1 मंडळीचे अध्यक्ष आणि सेवक याची गुणवैशिष्टे \p \v 1 हे वचन विश्वासयोग्य आहे की जर कोणी अध्यक्ष होण्याची इच्छा धरतो, तर तो उत्तम कामाची इच्छा बाळगतो. \v 2 तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा. \v 3 तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा. \v 4 तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे. \v 5 (ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल?) \v 6 अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल. \v 7 तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये. \p \v 8 मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे. \v 9 ते विश्वासाचे गुप्त सत्य शुद्ध विवेकबुद्धीने राखणारे असावेत. \v 10 आणि त्यांची प्रथम चाचणी करणे आवश्यक आहे; नंतर निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवक म्हणून काम करावे. \p \v 11 त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील\f + \fr 3:11 \fr*\ft कदाचित सहकारी व्यक्तींच्या पत्नी, नाहीतर स्त्रिया ज्या सहकारी म्हणून आहेत\ft*\f* आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्‍या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात. \p \v 12 सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा. \v 13 ज्यांनी सेवकपणाची सेवा चांगली केली, त्यांना मान मिळतो आणि ख्रिस्त येशूंवरील त्यांची विश्वासात दृढता वाढते. \s1 पौलाकडून तीमथ्याला सूचना \p \v 14 तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा असूनही, या सर्वगोष्टी मी आताच तुला लिहित आहे, \v 15 जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे. \v 16 सुभक्तीचे रहस्य निर्विवाद गंभीर आहे: \q1 परमेश्वर मानव शरीरात प्रकट झाले, \q2 आत्म्यात नीतिमान ठरले; \q1 देवदूतांच्या पाहण्यात आले, \q2 राष्ट्रांमध्ये गाजविले गेले, \q1 जगात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला \q2 आणि गौरवात पुन्हा वर घेतले गेले. \c 4 \p \v 1 पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील. \v 2 ज्या लबाड बोलणार्‍या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे. \v 3 हे लोक विवाह करण्यास मनाई करतील, जे अन्न विश्वासणार्‍यांनी आणि सत्य जाणणार्‍यांनी उपकारस्तुती करून स्वीकार करावे म्हणून परमेश्वराने निर्माण केले आहे ते वर्ज्य करावे, असे ते म्हणतील. \v 4 परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले तर काहीही वर्ज्य नाही. \v 5 कारण परमेश्वराचे वचन आणि मध्यस्थी प्रार्थना यांनी ती समर्पित होते. \p \v 6 जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील. \v 7 मूर्ख कल्पना, खुळ्या लोककथा यापासून दूर राहा आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण घे. \v 8 शारीरिक व्यायाम योग्य आहे, परंतु आध्यात्मिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे, कारण हे सद्य जीवनाचे आणि भावी जीवनाचे अभिवचन देते. \v 9 ही गोष्ट विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. \v 10 याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे. \p \v 11 या गोष्टी आज्ञारूपाने सांग व शिकव. \v 12 कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्‍यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो. \v 13 मी तिथे येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन करण्यात, बोध करण्यात, शिक्षण देण्यात तत्पर राहा. \v 14 मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको. \p \v 15 तुझी प्रगती सर्वांच्या लक्षात येईल म्हणून या गोष्टींचे चिंतन कर, यामध्ये तत्पर राहा. \v 16 तू आपले जीवन आणि शिक्षण यावर नीट लक्ष ठेव. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण करशील. \c 5 \s1 विधवा, पाळक व दास याबाबत सल्ला \p \v 1 वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल. \v 2 वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे. \p \v 3 ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर. \v 4 परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो. \v 5 जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते. \v 6 परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. \v 7 त्यांनी निर्दोष असावे म्हणून या गोष्टी निक्षून सांग. \v 8 परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्‍यापेक्षा वाईट आहे. \p \v 9 जी विधवा साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, तिच्या पतीबरोबर विश्वासू राहिलेली आहे, \v 10 जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे. \p \v 11 परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात, \v 12 आणि म्हणून आपली पहिली प्रतिज्ञा मोडल्याबद्दल त्या आपल्यावर दंड ओढवून घेतात. \v 13 शिवाय, त्या आळशी बनण्यात व घरोघर फिरून गप्पागोष्टी करण्यात आणि इतर लोकांच्या कामकाजात लुडबुड करण्यात आपला वेळ घालविण्याची शक्यता आहे. \v 14 म्हणून माझी इच्छा आहे की तरुण विधवांनी विवाह करावा, मुलांना जन्म द्यावा व कुटुंब चालवावे; विरोध करणार्‍याला निंदा करण्याचे कोणतेही निमित्त सापडू नये. \v 15 कारण असे करून काही विधवा यापूर्वीच मागे फिरून सैतानाच्या मागे गेल्या आहेत. \p \v 16 जर कोणी विश्वासी स्त्री विधवांची काळजी घेत आहे, तर तिने त्यांची मदत करीत राहावे आणि मंडळीवर त्यांचे ओझे टाकू नये म्हणजे ज्या विधवा खरोखर गरजवंत आहेत, त्यांना मंडळी मदत करू शकेल. \p \v 17 जे वडीलजन आपला अधिकार चांगल्या प्रकारे चालवितात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण याविषयी परिश्रम घेतात, त्यांना दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. \v 18 कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको”\f + \fr 5:18 \fr*\ft \+xt अनु 25:4\+xt*\ft*\f* आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”\f + \fr 5:18 \fr*\ft \+xt लूक 10:7\+xt*\ft*\f* \v 19 दोन किंवा तीन साक्षीदारांनी आरोप ठेवल्याशिवाय वडिलांविरुद्धच्या तक्रारीकडे लक्ष देऊ नये. \v 20 जे वडील पाप करीत असतात त्यांचा सर्वांच्यासमक्ष निषेध कर म्हणजे इतरांना त्याचे भय राहील. \v 21 परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आणि निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, या सूचना कोणताही भेदभाव न करता पाळ. पक्षपाताने काहीही करण्यात येऊ नये. \p \v 22 अध्यक्ष निवडण्यात कधीही घाई करू नको. इतरांच्या पापात सहभागी होऊ नको आणि तू स्वतःस शुद्ध राख. \p \v 23 यापुढे पाणीच पीत राहू नकोस, तर कधीकधी तू थोडासा द्राक्षारस घेत जा, कारण पोटाच्या विकाराने तू वारंवार आजारी असतोस. \p \v 24 अनेक माणसांची पापे आधीच उघड होतात आणि न्यायनिवाड्यासाठी त्यांच्यापुढे जातात आणि कित्येकांची पापे त्यांच्यामागून जातात. \v 25 अशाच प्रकारे काही चांगली कार्ये आधी उघड होतात आणि जी इतर प्रकारची आहेत, ती कायमची गुप्त राहू शकत नाहीत. \c 6 \p \v 1 जे दास म्हणून जुवाखाली आहेत त्यांनी आपआपल्या धन्यास सर्व सन्मानास योग्य मानावे, यासाठी की परमेश्वराच्या नावाची आणि शिकवणीची निंदा होऊ नये. \v 2 त्यांचा धनी विश्वासी असल्यास त्यांना ते बंधूसारखे आहेत, त्यांनी त्यांचा अवमान करू नये, उलट जास्त आदराने सेवा करावी, कारण जे तुमच्या सेवेचा लाभ घेणारे आहेत ते विश्वासणारे व प्रिय आहेत. \s1 खोटे शिक्षक \p या गोष्टी त्यांना शिकवून पालन करण्यास सांग. \v 3 जर कोणी, इतर कोणतेही मत शिकवितो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य बोध आणि सुभक्तीचे शिक्षण मान्य करीत नाही, \v 4 तर तो अहंकारी आहे व त्याला काहीच समजत नाही. त्याला शब्दयुद्ध व वादविवाद यांची विकृत आवड आहे. यांच्यापासूनच हेवा, कलह, कोणाची बदनामी होईल असे बोलणे, दुष्ट संशय, \v 5 आणि ज्यांच्यापासून सत्य हिरावून घेतले आहे आणि ज्यांना भक्ती द्रव्यलोभाचे एक साधन वाटते, अशा भ्रष्ट मनाच्या माणसांमध्ये सतत भांडणे होतात. \p \v 6 परंतु संतोषासहित असणारी सुभक्ती ही मोठीच मिळकत आहे. \v 7 कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. \v 8 म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे. \v 9 जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात. \v 10 कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे. \s1 तीमथ्याला शेवटचा कार्यभार \p \v 11 परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. \v 12 विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे. \v 13 सर्वांना जीवन देणार्‍या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्‍या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो \v 14 आपले प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत या आज्ञा दोषरहित आणि निर्दोष ठेव. \v 15-16 परमेश्वर जे योग्य समयी त्याला पूर्ण करतील, परमेश्वर जे धन्यवादित व एकच सर्वसमर्थ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जे अगम्य प्रकाशात राहतात, ज्यांना कोणीही पाहिले नाही, आणि कोणीही पाहू शकत नाही; त्यांना सदासर्वकाळ गौरव आणि चिरकाल सामर्थ्य असो. आमेन. \p \v 17 जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा. \v 18 त्यांना चांगले ते करण्यासाठी, सत्कर्माविषयी धनवान व गरजवंतांना औदार्याने देणे व परोपकारी असण्याविषयी आज्ञा द्या. \v 19 अशाप्रकारे, ही संपत्ती त्यांच्या भावी युगाच्या पायाभरणीसाठी खर्च केली जाईल, जेणेकरून जे जीवन जगू शकतील ते वास्तव आहे. \p \v 20 हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर. \v 21 कित्येक ती स्वीकारून विश्वासापासून ढळले आहेत. \b \b \p परमेश्वराची कृपा तुझ्याबरोबर असो.