\id 1SA - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h 1 शमुवेल \toc1 1 शमुवेल \toc2 1 शमुवेल \toc3 1 शमु \mt1 1 शमुवेल \c 1 \s1 शमुवेलाचा जन्म \p \v 1 एफ्राईम येथील डोंगराळ भागात रामाथाईम-सोफीम या गावात एलकानाह नामक एक मनुष्य राहत होता, जो यरोहामचा पुत्र होता, तो एलीहूचा पुत्र, तो तोहूचा पुत्र, तो सूफाचा पुत्र, तो एफ्राईम गोत्रातील होता. \v 2 त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते. \p \v 3 दरवर्षी हा मनुष्य त्याच्या नगरापासून शिलोह येथे सर्वसमर्थ याहवेहची उपासना आणि यज्ञ करण्यासाठी जात असे, जिथे एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे याहवेहचे याजक होते. \v 4 यज्ञ करण्यासाठी जेव्हा एलकानाहचा दिवस येत असे, तेव्हा तो आपली पत्नी पनिन्नाह आणि तिच्या सर्व मुलांना आणि मुलींना मांसाचा वाटा देत असे. \v 5 परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते. \v 6 कारण याहवेहने हन्नाहचे उदर बंद केले होते, यामुळे तिची सवत तिला चिडवून त्रास देत असे. \v 7 वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. जेव्हा हन्नाह याहवेहच्या मंदिरात\f + \fr 1:7 \fr*\ft हे शलमोनाने बांधलेले मंदिर नाही. \ft*\fqa याहवेहचे निवासस्थान\fqa*\f* जात असे, तेव्हा तिची सवत पनिन्नाह, ती रडेपर्यंत चिडवीत असे आणि मग ती काही खात नसे. \v 8 तिचा पती एलकानाह तिला म्हणत असे, “हन्नाह तू का रडत आहेस? तू काही का खात नाहीस? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?” \p \v 9 एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता. \v 10 तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली. \v 11 आणि तिने एक शपथ घेतली, ती म्हणाली, “हे सर्वसमर्थ याहवेह, जर तुम्ही तुमच्या दासीच्या दुर्दशेकडे लक्ष द्याल आणि माझी आठवण कराल आणि तुमच्या दासीला विसरणार नाही परंतु तिला एक पुत्र द्याल, तर मी त्याला त्याच्या आयुष्याचे सर्व दिवस याहवेहसाठी देईन आणि त्याच्या डोक्यावर कधीही वस्तरा फिरणार नाही.” \p \v 12 ती याहवेहकडे प्रार्थना करीत असता, एली तिच्या मुखाकडे पाहत होता. \v 13 हन्नाह तिच्या मनात प्रार्थना करीत होती, आणि तिचे ओठ हालत होते, परंतु तिचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. एलीला वाटले की ती नशेत आहे \v 14 आणि एली तिला म्हणाला, “किती वेळ तू नशेत राहशील? मद्यपान सोडून दे.” \p \v 15 “तसे नाही, माझ्या स्वामी,” हन्नाहने उत्तर दिले, “मी फार त्रस्त झालेली स्त्री आहे. मी द्राक्षारस किंवा मद्य घेतले नाही; मी माझे हृदय याहवेहकडे मोकळे करीत होते. \v 16 तुमच्या दासीला दुष्ट स्त्री असे समजू नका; मी या ठिकाणी वेदना आणि तीव्र दुःखाने प्रार्थना करीत आहे.” \p \v 17 तेव्हा एलीने उत्तर दिले, “शांतीने जा, आणि तू जे काही मागितले आहेस, ते इस्राएलचे परमेश्वर तुला देवो.” \p \v 18 ती म्हणाली, “तुमची दासी तुमच्या दृष्टीत कृपा पावो.” नंतर ती आपल्या मार्गाने निघून गेली आणि तिने अन्न सेवन केले आणि त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. \p \v 19 दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी उठून याहवेहची उपासना केली आणि परत रामाह येथे आपल्या घरी परतले. एलकानाहने आपली पत्नी हन्नाह हिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि याहवेहने तिची आठवण केली. \v 20 तेव्हा नेमलेल्या काळात हन्नाह गर्भवती झाली आणि एका पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शमुवेल\f + \fr 1:20 \fr*\fq शमुवेल \fq*\ft इब्री भाषेत याचा अर्थ \ft*\fqa परमेश्वराने ऐकलेला\fqa*\f* असे ठेवले, ती म्हणाली, “कारण याहवेहकडे मी याला मागितले होते,” \s1 हन्ना शमुवेलाचे समर्पण करते \p \v 21 जेव्हा तिचा पती एलकानाह त्याच्या सर्व कुटुंबाबरोबर याहवेहसाठी वार्षिक यज्ञ अर्पण करण्यासाठी आणि त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी गेला, \v 22 तेव्हा हन्नाह गेली नाही. ती तिच्या पतीला म्हणाली, “मुलाचे दूध तोडल्यानंतर, मी त्याला घेऊन जाईन आणि त्याला याहवेहसमोर सादर करेन आणि तो सदैव\f + \fr 1:22 \fr*\fq सदैव \fq*\ft मूळ प्रतींनुसार \ft*\fqa त्याच्या जीवनाच्या सर्व दिवसांपर्यंत मी त्याला नाजीर म्हणून समर्पण केले आहे.\fqa*\f* तिथेच राहील.” \p \v 23 “तुला जे उत्तम वाटते ते तू कर,” तिचा पती एलकानाह तिला म्हणाला. “त्याचे दूध तुटेपर्यंत तू येथेच राहा; याहवेह त्यांच्या वचनाप्रमाणे करो.” म्हणून ती स्त्री घरीच राहिली आणि मुलाचे दूध तोडेपर्यंत तिने त्याचे पालनपोषण केले. \p \v 24 त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल,\f + \fr 1:24 \fr*\ft मूळ प्रतीनुसार \ft*\fqa तीन बैल.\fqa*\f* एक एफा\f + \fr 1:24 \fr*\ft अंदाजे 16 कि.ग्रॅ.\ft*\f* सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले. \v 25 बैलाचा यज्ञ केल्यानंतर, त्यांनी त्या मुलाला एलीकडे आणले, \v 26 आणि हन्ना त्याला म्हणाली, “माझ्या स्वामी, मला क्षमा करा. तुमच्या जीविताची शपथ, मी तीच स्त्री आहे जी येथे तुमच्या बाजूला उभी राहून याहवेहकडे प्रार्थना करीत होती. \v 27 या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे. \v 28 तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली. \c 2 \s1 हन्नाहचे प्रार्थनागीत \p \v 1 तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: \q1 “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; \q2 याहवेहमध्ये माझे शिंग\f + \fr 2:1 \fr*\fq शिंग \fq*\ft येथे याचा अर्थ \ft*\fqa सामर्थ्य\fqa*\f* उंच केलेले आहे. \q1 माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, \q2 कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते. \b \q1 \v 2 “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; \q2 तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; \q2 आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही. \b \q1 \v 3 “फार गर्वाने बोलत राहू नका, \q2 किंवा तुमच्या तोंडाला उद्धट बोलणे करू देऊ नका, \q1 कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, \q2 आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात. \b \q1 \v 4 “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, \q2 परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत. \q1 \v 5 ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत, \q2 परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत. \q1 जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे, \q2 परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे. \b \q1 \v 6 “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; \q2 ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात. \q1 \v 7 गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; \q2 ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात. \q1 \v 8 ते दीनांस धुळीतून वर काढतात, \q2 आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात; \q1 ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, \q2 आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते. \b \q1 “कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे; \q2 त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे. \q1 \v 9 ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, \q2 परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. \b \q1 “कोणीही बळाने विजय पावत नाही; \q2 \v 10 जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. \q1 सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; \q2 पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. \b \q1 “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, \q2 आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.” \p \v 11 नंतर एलकानाह रामाह येथे त्याच्या घरी गेला, परंतु तो मुलगा शमुवेल एली याजकाच्या हाताखाली याहवेहसमोर सेवा करू लागला. \s1 एलीचे दुष्ट पुत्र \p \v 12 एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत. \v 13 याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे \v 14 आणि परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा टाकून जितके मांस त्या काट्याने वरती येईल याजक ते आपल्या स्वतःसाठी घेत असे, शिलोह येथे आलेल्या सर्व इस्राएल लोकांशी ते असाच व्यवहार करीत असत. \v 15 परंतु चरबी जळण्याच्या आधी, याजकाचा सेवक येऊन यज्ञ करीत असलेल्या व्यक्तीला म्हणत असे, “भाजून घेण्यासाठी याजकाला थोडे मांस दे; तो तुझ्याकडून शिजविलेले मांस स्वीकारणार नाही, तर कच्चेच मांस घेईल.” \p \v 16 जर तो व्यक्ती त्याला म्हणाला, “प्रथम चरबी जळू दे, त्यानंतर तुला हवे ते तू घे,” तो सेवक उत्तर देत असे, “नाही, ते आताच दे; जर तू दिले नाही, तर मी ते सक्तीने घेईन.” \p \v 17 या तरुणांचे हे पाप याहवेहच्या दृष्टीने फार मोठे होते, कारण लोकांना याहवेहच्या अर्पणाचा तिरस्कार येऊ लागला होता. \p \v 18 परंतु शमुवेल बालक तागाचे एफोद घालून याहवेहसमोर सेवा करीत होता. \v 19 प्रत्येक वर्षी जेव्हा त्याची आई तिच्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करण्यासाठी जात असे तेव्हा त्याच्यासाठी एक लहान झगा बनवून ती त्याला देत असे. \v 20 एलकानाह आणि त्याची पत्नी यांना एली आशीर्वाद देताना म्हणे, “या स्त्रीने ज्याच्यासाठी प्रार्थना केली आणि याहवेहला दिले त्याच्या बदल्यात या स्त्रीपासून याहवेह तुला लेकरे देवो.” त्यानंतर ते त्यांच्या घरी जात असे. \v 21 आणि हन्नाहवर याहवेहची कृपा होती\f + \fr 2:21 \fr*\fq हन्नाहवर याहवेहची कृपा होती \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa परमेश्वराने हन्नाला भेट दिली\fqa*\f*; तिने तीन मुलांना आणि दोन मुलींना जन्म दिला. याकाळात शमुवेल बाळ याहवेहच्या उपस्थितीत वाढत गेला. \p \v 22 आता एली, जो फार वृद्ध झाला होता, त्याची मुले सर्व इस्राएल लोकांशी कसा व्यवहार करीत होते आणि ज्या स्त्रिया सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सेवा करीत होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जे कुकर्म केले त्या सर्वांविषयी त्याने ऐकले. \v 23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कर्मे का करता? तुमच्या दुष्ट कृत्यांबद्दल सर्व लोकांकडून मी ऐकत आहे. \v 24 नाही, माझ्या मुलांनो; याहवेहच्या लोकांमध्ये पसरत असलेला अहवाल जो मी ऐकत आहे तो चांगला नाही. \v 25 जर एक व्यक्ती दुसर्‍याविरुद्ध पाप करते, तर परमेश्वर\f + \fr 2:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्यायाधीश\fqa*\f* त्या अपराध्यासाठी मध्यस्थी करतील; परंतु जर कोणी याहवेहविरुद्ध पाप केले तर त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” तरीही त्याच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या निषेधाकडे लक्ष दिले नाही, कारण त्यांना जिवे मारावे अशी याहवेहची इच्छा होती. \p \v 26 आणि शमुवेल बाळ याहवेहच्या आणि लोकांच्या कृपेत वाढत गेला. \s1 एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य \p \v 27 परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय? \v 28 माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएल लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले. \v 29 माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’ \p \v 30 “म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’ \v 31 अशी वेळ येत आहे की, मी तुझी आणि तुझ्या याजकीय घराण्याची शक्ती कमी करेन, म्हणजे त्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाही, \v 32 आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत. \v 33 तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील. \p \v 34 “ ‘आणि तुझे दोन पुत्र, होफनी आणि फिनहास यांच्यावर जे येईल, ते तुला एक चिन्ह असे असतील—ते दोघेही एकाच दिवशी मरण पावतील. \v 35 मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील. \v 36 नंतर तुझ्या घराण्यातील राहिलेला प्रत्येकजण येईल आणि चांदीच्या तुकड्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यासमोर वाकतील आणि विनंती करतील, “मला खाण्यासाठी अन्न असावे म्हणून माझ्यासाठी काही याजकीय पद द्या.” ’ ” \c 3 \s1 याहवेहचे शमुवेलाला पाचारण \p \v 1 शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत. \p \v 2 एका रात्री एलीची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फारसे दिसत नव्हते, तो त्याच्या नेहमीच्या जागी पडून होता. \v 3 परमेश्वराचा दीप अजूनही विझला नव्हता आणि शमुवेल याहवेहच्या घरात परमेश्वराचा कोश होता त्या ठिकाणी निजला होता. \v 4 तेव्हा याहवेहने शमुवेलाला हाक मारली. \p शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” \v 5 आणि तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” \p परंतु एली म्हणाला, “मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.” तेव्हा तो गेला आणि झोपला. \p \v 6 याहवेहने पुन्हा, “शमुवेल!” अशी हाक मारली आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” \p एली म्हणाला, “माझ्या मुला, मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.” \p \v 7 शमुवेलने तर अजूनही याहवेहला ओळखले नव्हते: याहवेहचे वचन आतापर्यंत त्याला प्रकट झाले नव्हते. \p \v 8 याहवेहने तिसर्‍यांदा हाक मारली, “शमुवेल!” आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” \p तेव्हा एलीला समजले की, याहवेह त्या बालकाला बोलावित होते. \v 9 म्हणून एलीने शमुवेलास सांगितले, “जा आणि झोप आणि जर त्यांनी पुन्हा तुला हाक मारली, तर म्हण, ‘याहवेह, बोला, कारण, तुमचा सेवक ऐकत आहे.’ ” तेव्हा शमुवेल गेला आणि त्याच्या जागेवर झोपला. \p \v 10 याहवेह आले आणि तिथे उभे राहिले आणि इतर वेळेप्रमाणे हाक मारली, “शमुवेल! शमुवेल!” \p तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोला, तुमचा सेवक ऐकत आहे.” \p \v 11 आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील. \v 12 एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललो होतो ते; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी करेन. \v 13 कारण मी त्याला सांगितले की, जे पाप त्याला माहीत होते त्यासाठी मी सर्वकाळ त्याच्या कुटुंबाचा न्याय करेन; त्याच्या पुत्रांनी परमेश्वराची निंदा केली आणि एली त्यांना आवरू शकला नाही. \v 14 म्हणून मी एलीच्या घराण्यासाठी अशी शपथ घेतली, ‘एलीच्या घराण्याच्या पापाचे प्रायश्चित यज्ञ किंवा अर्पणाने कधीही होणार नाही.’ ” \p \v 15 सकाळ होईपर्यंत शमुवेल झोपला आणि नंतर याहवेहच्या मंदिराची दारे उघडली. एलीला दृष्टान्त सांगण्यासाठी त्याला भीती वाटत होती, \v 16 परंतु एलीने त्याला बोलाविले आणि म्हटले, “शमुवेल, माझ्या मुला.” \p शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” \p \v 17 “याहवेह तुला काय म्हणाले?” एलीने विचारले. “माझ्यापासून ते लपवू नकोस. ज्यागोष्टी त्यांनी तुला सांगितल्या त्या जर तू माझ्यापासून लपवून ठेवल्या तर परमेश्वर तुला फार कठीण शिक्षा देवो.” \v 18 तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.” \p \v 19 शमुवेल वाढत असता याहवेह त्याच्याबरोबर होते आणि त्यांनी शमुवेलाचे कोणतेही शब्द वाया जाऊ दिले नाही. \v 20 आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सर्व इस्राएली लोकांनी ओळखले की शमुवेल याहवेहचा संदेष्टा होण्यास प्रमाणित केलेला आहे. \v 21 याहवेहचे शिलोह येथे दर्शन होत राहिले आणि तिथे त्यांच्या वचनाद्वारे त्यांनी स्वतःला शमुवेलास प्रकट केले. \c 4 \p \v 1 आणि शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलात पोहोचला. \s1 कराराच्या कोशावर पलिष्टी लोकांचा ताबा \p यावेळेस इस्राएली लोक पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी निघाले. इस्राएली लोकांनी एबेन-एजर येथे व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला. \v 2 पलिष्ट्यांनी इस्राएलशी युद्ध करण्यासाठी त्यांचे सैन्य तैनात केले आणि जसे युद्ध वाढत गेले तसा पलिष्ट्यांद्वारे इस्राएलचा पराभव झाला, त्यांच्यापैकी सुमारे चार हजार लोकांना युद्धभूमीवर मारले गेले. \v 3 जेव्हा सैनिक छावणीकडे परत आले तेव्हा इस्राएलच्या वडीलजनांनी विचारले, “याहवेहने आज पलिष्ट्यांसमोर आमचा पराभव का होऊ दिला? आपण शिलोह येथून याहवेहच्या कराराचा कोश घेऊन येऊ, यासाठी की ते आपल्याबरोबर जाऊन आपल्या शत्रूच्या हातातून आपल्याला वाचवतील.” \p \v 4 म्हणून लोकांनी शिलोह येथे माणसे पाठविली आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांच्या मध्ये आरूढ आहेत, त्यांच्या कराराचा कोश परत आणला. आणि एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते. \p \v 5 जेव्हा याहवेहच्या कराराचा कोश छावणीमध्ये आला, तेव्हा सर्व इस्राएली लोकांनी इतका मोठा जयघोष केला की, जमीन हादरली. \v 6 तो मोठा जयघोष ऐकून पलिष्ट्यांनी विचारले “इब्री लोकांच्या छावणीमध्ये हा कसला जयघोष होत आहे?” \p जेव्हा त्यांना कळले की, याहवेहचा कोश छावणीमध्ये आला आहे, \v 7 तेव्हा पलिष्टी लोक घाबरून गेले. “देव छावणीत आले आहेत,” ते म्हणाले, “अरेरे! असे अद्याप कधीच घडले नव्हते. \v 8 आम्हास हाय हाय! या शक्तिमान देवाच्या हातून आम्हास कोण सोडवेल? ते तेच देव आहेत ज्यांनी रानात इजिप्तच्या लोकांवर प्रत्येक प्रकारच्या पीडा आणून त्यांचा नाश केला. \v 9 पलिष्टी लोकांनो, शक्तिशाली व्हा! खंबीर पुरुषांसारखे व्हा, नाहीतर जसे ते तुमचे गुलाम होत आले तसे तुम्ही इब्री लोकांचे गुलाम व्हाल. खंबीर व्हा आणि युद्ध करा!” \p \v 10 तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले. \v 11 परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले. \s1 एलीचा मृत्यू \p \v 12 त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला. \v 13 जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा एली रस्त्याच्या कडेला त्याच्या आसनावर बसून पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशासाठी त्याचे हृदय कापत होते. जेव्हा तो मनुष्य नगरात आला आणि जे घडले ते सांगितले तेव्हा संपूर्ण नगरात मोठ्याने आकांत सुरू झाला. \p \v 14 एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?” \p तो मनुष्य घाईने एलीकडे गेला, \v 15 एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते. \v 16 त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.” \p एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?” \p \v 17 ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.” \p \v 18 जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले\f + \fr 4:18 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa न्याय\fqa*\f* होते. \p \v 19 त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली. \v 20 तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही. \p \v 21 त्या मुलाचे नाव ईखाबोद\f + \fr 4:21 \fr*\fq ईखाबोद \fq*\ft अर्थात् \ft*\fqa वैभव नाहीसे झाले\fqa*\f* असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. \v 22 ती म्हणाली, “इस्राएलमधून वैभव निघून गेले आहे, परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.” \c 5 \s1 अश्दोद आणि एक्रोन येथे कराराचा कोश \p \v 1 परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला. \v 2 नंतर पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश दागोनच्या मंदिरात नेला आणि दागोनच्या मूर्तीच्या बाजूला ठेवला. \v 3 जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्‍या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले. \v 4 परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते. \v 5 त्यामुळेच आजपर्यंत दागोनचे पुजारी किंवा जे अश्दोद येथे दागोनच्या मंदिरात जातात ते उंबरठ्यावर पाय ठेवीत नाहीत. \p \v 6 याहवेहचा हात अश्दोद व त्याच्या जवळच्या भागातील लोकांवर भारी होता; याहवेहने त्यांच्यावर विध्वंस आणला आणि त्यांना पीडेच्या गाठींनी\f + \fr 5:6 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa गाठी आणि उंदरांनी त्यांचा देश भरला, आणि शहरभर नाश आणि मृत्यू होता.\fqa*\f* पीडले. \v 7 जे घडत होते ते अश्दोदच्या लोकांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश येथे आमच्यामध्ये असू नये, कारण त्यांचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर भारी आहे.” \v 8 तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” \p त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला. \p \v 9 परंतु त्यांनी कोश हालविल्यानंतर, याहवेहचा हात त्या शहराच्या विरुद्ध उठला आणि ते फार घाबरून गेले. परमेश्वराने त्या शहरातील लहान मोठ्यांना पीडेच्या गाठींनी\f + \fr 5:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa मांडीच्या सांध्यांवर गाठी आल्या\fqa*\f* पीडले. \v 10 म्हणून त्यांनी परमेश्वराचा कोश एक्रोन येथे पाठविला. \p परमेश्वराचा कोश एक्रोनमध्ये प्रवेश करताच एक्रोनचे लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “आम्हाला आणि आमच्या लोकांनी मारावे म्हणून त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश आमच्याकडे आणला आहे.” \v 11 तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि म्हटले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश दूर पाठवून द्या; त्याच्या मूळ ठिकाणी त्याला जाऊ द्या, नाहीतर तो\f + \fr 5:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa परमेश्वर\fqa*\f* आम्हाला आणि आमच्या लोकांना जिवे मारेल.” कारण शहरात मृत्यूमुळे भय पसरले होते; परमेश्वराचा हात त्यावर फार भारी होता. \v 12 जे मरण पावले नाही ते पीडेच्या गाठींनी पीडित झाले होते व त्या शहराचा आक्रोश स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचला. \c 6 \s1 कोश इस्राएलात परत येतो \p \v 1 याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता, \v 2 तेव्हा पलिष्ट्यांनी याजकांस आणि दैवप्रश्न पाहणार्‍यांस बोलाविले आणि विचारले, “आम्ही याहवेहच्या कोशाचे काय करावे? त्याच्या मूळ ठिकाणी आम्ही तो कसा पाठवावा.” \p \v 3 ते म्हणाले, “जर तुम्ही इस्राएलच्या परमेश्वराचा कोश परत पाठवित आहात, तर तो त्यांच्याकडे भेटीशिवाय पाठवू नये! दोषार्पण तर अवश्य पाठवा. म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि त्यांचा हात तुमच्यापासून का दूर होत नाही हे तुम्हाला समजेल.” \p \v 4 पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?” \p त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्‍यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्‍यांना त्याच पीडांनी पीडले आहे. \v 5 ज्यामुळे देशाचा नाश होत आहे त्या पीडेच्या गाठींच्या आणि उंदरांच्या प्रतिमा तयार करा आणि इस्राएलच्या देवाला गौरव द्या. कदाचित तुमच्यावरून आणि तुमच्या दैवतावरून आणि तुमच्या देशावरून ते त्यांचा हात काढून घेतील. \v 6 फारोह व इजिप्तच्या लोकांनी केली तशी तुम्ही तुमची हृदये कठीण का करता? इस्राएलच्या याहवेहने त्यांना कठोरपणाने वागविले होते, म्हणून इस्राएली लोकांना त्यांनी जाऊ दिले नव्हते का? \p \v 7 “तर आता एक नवीन गाडी तयार करा व दोन दुभत्या गाई ज्यांच्या मानेवर कधीही जू ठेवलेले नाही घेऊन त्यांना त्यास जुंपा, परंतु त्यांची वासरे त्यांच्यापासून काढून त्यांना गोठ्यात ठेवा. \v 8 याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या, \v 9 परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.” \p \v 10 तेव्हा त्यांनी हे केले. त्यांनी तशा दोन दुभत्या गाई घेतल्या आणि त्यांना गाडीला जुंपले आणि त्यांच्या वासरांना गोठ्यामध्ये ठेवले. \v 11 त्यांनी याहवेहचा कोश गाडीवर ठेवला आणि त्याबरोबरच्या पेटीत सोन्याचे उंदीर आणि पीडेच्या गाठींच्या सोन्याच्या प्रतिमा ठेवल्या. \v 12 तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले. \p \v 13 यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला. \v 14 ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला. \v 15 लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले. \v 16 पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्‍यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले. \p \v 17 पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या. \v 18 आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्‍यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे. \p \v 19 परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला. \v 20 आणि बेथ-शेमेश येथील लोकांनी विचारले, “याहवेहच्या उपस्थितीत, या पवित्र परमेश्वरासमोर कोणी उभे राहावे? येथून हा कोश पुढे कोणाकडे जाईल?” \p \v 21 तेव्हा त्यांनी किर्याथ-यआरीमच्या लोकांकडे हा संदेश देत दूत पाठविले, “पलिष्ट्यांनी याहवेहचा कोश परत केला आहे. इकडे या आणि तो तुमच्या नगराकडे घेऊन जा.” \c 7 \nb \v 1 म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले. \v 2 कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ; म्हणजेच वीस वर्षे राहिला. \s1 शमुवेलाचा मिस्पाह येथे पलिष्ट्यांवर विजय \p तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले. \v 3 आणि शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने याहवेहकडे परत वळत आहात, तर तुम्ही अन्य दैवते व अष्टारोथचा त्याग करा; आणि याहवेहकडे चित्त लावून केवळ त्यांचीच सेवा करा; म्हणजे याहवेह तुम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून सोडवतील.” \v 4 त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्या अष्टारोथ व बआलांच्या मूर्ती टाकून दिल्या आणि केवळ याहवेहची सेवा केली. \p \v 5 तेव्हा शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएली लोकांना मिस्पाह येथे जमा करा, म्हणजे मी याहवेहकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करेन.” \v 6 जेव्हा ते मिस्पाह येथे एकत्र जमले, तेव्हा त्यांनी पाणी काढले व ते याहवेहसमोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास करून कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” त्यावेळी शमुवेल मिस्पाहमध्ये इस्राएलचा पुढारी\f + \fr 7:6 \fr*\ft किंवा \ft*\fqa न्यायाधीश\fqa*\f* म्हणून सेवा करीत होता. \p \v 7 इस्राएल लोक मिस्पाह येथे जमले आहेत, हे जेव्हा पलिष्ट्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले. हे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले. \v 8 इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून वाचवावे म्हणून आमच्यासाठी मध्यस्थी करावयाचे थांबवू नको.” \v 9 मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेतले व त्याचा याहवेहला संपूर्ण होमार्पण म्हणून यज्ञ करून, इस्राएलच्या वतीने याहवेहकडे विनंती केली आणि याहवेहने ती ऐकली. \p \v 10 शमुवेल होमार्पण करत असताना, पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी युद्ध करावयाला जवळ आले. तेव्हा याहवेहने प्रचंड गडगडाटाने गर्जना करून पलिष्ट्यांना असे भयभीत केले की, इस्राएली लोकांपुढे त्यांचा बीमोड झाला. \v 11 तेव्हा इस्राएली लोक मिस्पाहातून पलिष्ट्यांचा पाठलाग करीत बाहेर आले आणि बेथ-कार पर्यंत त्यांना जिवे मारीत गेले. \p \v 12 नंतर शमुवेलाने एक दगड घेतला आणि तो मिस्पाह आणि शेन यांच्यामध्ये उभारला. “येथपर्यंत याहवेहने आमचे साहाय्य केले आहे” असे म्हणत त्याने त्याला एबेन-एजर\f + \fr 7:12 \fr*\fq एबेन-एजर \fq*\ft म्हणजे \ft*\fqa साहाय्याचा दगड\fqa*\f* असे नाव दिले. \p \v 13 अशाप्रकारे पलिष्टी लोक पराभूत झाले आणि त्यांनी इस्राएलच्या सीमेवर पुन्हा हल्ला केला नाही आणि शमुवेलच्या सर्व जीवनकाळात याहवेहचा हात पलिष्ट्यांविरुद्ध होता. \v 14 एक्रोनपासून गथपर्यंत पलिष्ट्यांनी जी नगरे इस्राएलपासून ताब्यात घेतली होती ती इस्राएली लोकांस परत मिळाली आणि इस्राएली लोकांनी आसपासच्या प्रदेश सोडवून घेतला. व इस्राएली व अमोरी लोकात शांतता होती. \p \v 15 शमुवेल आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसांत इस्राएलचा शास्ता होऊन न्याय करीत होता. \v 16 प्रतिवर्षी तो बेथेल, गिलगाल, मिस्पाह येथे अनुक्रमाने इस्राएलचा न्याय करीत फिरत असे. \v 17 पण तो रामाह येथे, जिथे तो राहत होता तिथे परत जात असे आणि तिथेही तो इस्राएलचा न्याय करीत असे. आणि त्याने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली होती. \c 8 \s1 इस्राएली लोक राजा मागतात \p \v 1 जेव्हा शमुवेल उतार वयाचा झाला, तेव्हा त्याने त्याच्या मुलांना इस्राएलचे पुढारी\f + \fr 8:1 \fr*\ft मुळात \ft*\fqa न्यायाधीश\fqa*\f* म्हणून नेमले. \v 2 त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्‍याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली. \v 3 परंतु त्याच्या पुत्रांनी त्याचे अनुकरण केले नाही. ते अप्रामाणिकपणे लाभ मिळविण्याच्या मागे लागले आणि लाच स्वीकारून विपरीत न्याय करत. \p \v 4 म्हणून इस्राएलचे सर्व पुढारी एकत्र झाले आणि रामाह येथे शमुवेलकडे आले. \v 5 ते शमुवेलला म्हणाले, “तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत; तर आता जसे इतर राष्ट्रांना आहे त्याप्रमाणे आमचेही नेतृत्व करण्यासाठी एक राजा नेमून द्यावा.” \p \v 6 परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली. \v 7 तेव्हा याहवेहने शमुवेलला सांगितले: “लोक तुला जे सांगत आहेत ते सगळे ऐक; त्यांनी तुझा नकार नाही तर त्यांचा राजा म्हणून त्यांनी माझा नकार केला आहे. \v 8 मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी असेच केले आहे, त्यांनी माझा त्याग करून इतर दैवतांची सेवा केली, तसेच ते तुझ्याशीही करीत आहेत. \v 9 आता त्यांचे ऐकून घे; परंतु त्यांना गंभीरपणे चेतावणी दे, जो राजा त्यांच्यावर राज्य करेल तो त्यांच्याकडून त्याला हवे ते हक्काने मागेल हे त्यांना माहीत होऊ दे.” \p \v 10 शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते. \v 11 शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील. \v 12 त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील. \v 13 तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्‍या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल. \v 14 तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल. \v 15 तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल. \v 16 तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू\f + \fr 8:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa तरुण पुरुष\fqa*\f* व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल. \v 17 तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल. \v 18 जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.” \p \v 19 परंतु लोकांनी शमुवेलाचे ऐकण्यास नकार दिला. “नाही!” ते म्हणाले, “आम्हाला आमच्यावर राजा पाहिजेच. \v 20 म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आमचा राजा आमचे नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी युद्ध करण्यास आमच्यापुढे जाईल.” \p \v 21 लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्यांनी याहवेहला सांगितले. \v 22 याहवेहने उत्तर दिले, “त्यांचे ऐकून घे आणि त्यांना एक राजा नेमून दे.” \p नंतर शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या नगराकडे परत जा.” \c 9 \s1 शौलाचा अभिषेक \p \v 1 बिन्यामीन वंशातील एक मनुष्य होता, त्याचे नाव कीश होते, तो अबीएलचा पुत्र होता, तो सरोराचा पुत्र, तो बेकोराथचा पुत्र, तो अफिया याचा पुत्र होता. तो बिन्यामीन घराण्यातील असून सन्माननीय मनुष्य होता. \v 2 कीशला शौल नावाचा एक पुत्र होता, त्याच्यासारखा देखणा तरुण पुरुष इस्राएलमध्ये कोणीही नव्हता आणि तो सर्वांपेक्षा उंच होता. \p \v 3 शौलाचा पिता कीशची गाढवे हरवली होती आणि कीश त्याचा पुत्र शौलास म्हणाला, “सेवकांपैकी एकाला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि गाढवांचा शोध कर.” \v 4 तेव्हा तो एफ्राईमच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात आणि शलीशाह भागाच्या सभोवती फिरला, परंतु त्यांना ते सापडले नाहीत. ते तसेच पुढे शालीम प्रांतात गेले, परंतु गाढवे तिथेही नव्हती. नंतर तो बिन्यामीनच्या हद्दीतून फिरला परंतु त्यांना ते सापडले नाहीत. \p \v 5 जेव्हा ते सूफ प्रांतात पोहोचले, तेव्हा शौल त्याच्याबरोबर असलेल्या सेवकाला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ या, नाहीतर माझा पिता गाढवांचा विचार करण्याचे सोडून आपलीच काळजी करू लागेल.” \p \v 6 परंतु सेवक म्हणाला, “पाहा, या शहरात परमेश्वराचा एक मनुष्य आहे; तो फार सन्माननीय आहे आणि जे काही तो सांगतो ते खरे होते. तर चल, आपण तिकडे जाऊ. कदाचित आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो आपल्याला सांगेल.” \p \v 7 शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “जर आपण जात आहोत, तर आपण त्याला काय द्यावे? आपल्या पिशवीतील खाद्य तर संपले आहे. परमेश्वराच्या मनुष्याला देण्यासाठी आपल्याकडे काही बक्षीस नाही. आपल्याकडे काय आहे?” \p \v 8 तो सेवक पुन्हा शौलाला म्हणाला, “पाहा, माझ्याजवळ पाव शेकेल\f + \fr 9:8 \fr*\ft अंदाजे \ft*\fqa 3 ग्रॅम\fqa*\f* चांदी आहे. मी ते परमेश्वराच्या मनुष्याला देईन म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला सांगेल.” \v 9 त्याकाळी इस्राएलमध्ये जर कोणी परमेश्वराविषयी चौकशी करण्यास गेला तर ते म्हणत असत, “चला, आपण पाहणार्‍याकडे जाऊ,” कारण आज ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पाहणारा असे संबोधले जाई. \p \v 10 “ठीक आहे,” शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “चल, जाऊ या.” असे म्हणत ज्या नगरात परमेश्वराचा मनुष्य राहत होता त्याकडे ते निघाले. \p \v 11 जसे ते डोंगर चढून त्या गावाकडे जात होते, त्यांना काही तरुणी भेटल्या ज्या पाणी काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या आणि त्यांनी त्यांना विचारले, “येथे कोणी संदेष्टा आहे काय?” \p \v 12 “होय तो आहे,” त्यांनी उत्तर दिले. “तो तुमच्यापुढेच जात आहे. आता घाई करा; तो आजच आमच्या गावात आला आहे, कारण लोक उच्च स्थानावर यज्ञ करणार आहेत. \v 13 तुम्ही शहरामध्ये प्रवेश करताच उंच टेकड्यावर भोजन करण्यास जाण्याआधी तो तुम्हाला सापडेल. तो येईपर्यंत लोक भोजन करीत नाहीत, कारण त्याने यज्ञाला आशीर्वाद दिल्यानंतरच, ज्यांना आमंत्रित केले आहे ते भोजन करतील. आता वर जा; आताच तो तुम्हाला सापडेल.” \p \v 14 ते वर नगरापर्यंत गेले आणि जसे ते त्यात प्रवेश करीत होते, तिथे शमुवेल होता, तो उंच टेकड्यावर जात असताना ते शौलाच्या दिशेने येत होते. \p \v 15 शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते: \v 16 “याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएल लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.” \p \v 17 जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.” \p \v 18 शौलाने नगराच्या प्रवेशद्वारातच शमुवेलकडे जाऊन विचारले, “संदेष्ट्याचे घर कुठे आहे हे मला कृपा करून सांगाल काय?” \p \v 19 “मीच पाहाणारा आहे,” शमुवेलने शौलास उत्तर दिले. “माझ्यापुढे वर उंचस्थानी जा, कारण आज तुला माझ्याबरोबर भोजन करावयाचे आहे आणि सकाळी मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून देईन आणि जे तुझ्या अंतःकरणात आहे ते मी तुला सांगेन. \v 20 आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती, त्यांची काळजी करू नकोस; ती सापडली आहेत. इस्राएलची सर्व इच्छा कोणाकडे वळली आहे, तुझ्याकडे व तुझ्या संपूर्ण कुटुंबाकडे ती वळली नाही काय?” \p \v 21 शौलाने उत्तर दिले, “परंतु मी बिन्यामीन गोत्र जे इस्राएलचे सर्वात लहान, त्यातील नाही काय आणि माझे कूळ बिन्यामीनच्या गोत्रातील सर्वात लहान कूळ नाही काय? तर मग तुम्ही मला असे का बोलत आहात?” \p \v 22 नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले. \v 23 शमुवेल आचार्‍याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.” \p \v 24 तेव्हा आचार्‍याने मांडीचा भाग\f + \fr 9:24 \fr*\ft लेवी \ft*\fqa मांडीचा भाग\fqa*\f* आणि त्याच्याबरोबर जे होते ते उचलून शौलासमोर मांडले. शमुवेल म्हणाला, “हे तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे. हे खा, कारण मी जेव्हा म्हणालो, ‘मी पाहुण्यांना आमंत्रित केले आहे,’ तेव्हापासून हे तुझ्यासाठी या प्रसंगासाठी बाजूला राखून ठेवण्यात आले होते.” त्या दिवशी शौलाने शमुवेलबरोबर भोजन केले. \p \v 25 उच्च स्थानावरून खाली नगराकडे आल्यानंतर, शमुवेल त्याच्या घराच्या धाब्यावर शौलाबरोबर बोलला. \v 26 पहाटेच ते उठले आणि शमुवेलने शौलाला धाब्यावर बोलाविले, “तयार हो, म्हणजे मी तुला तुझ्या मार्गाने पाठवेन.” जेव्हा शौल तयार झाला, तो आणि शमुवेल एकत्र बाहेर पडले. \v 27 नगराच्या कडेने चालत असताना, शमुवेल शौलास म्हणाला, “सेवकाला सांग, की त्याने आपल्यापुढे चालावे.” आणि सेवकाने त्याप्रमाणे केले; “परंतु तू थोडा वेळ येथेच राहा म्हणजे मी परमेश्वराचा संदेश तुला देईन.” \c 10 \p \v 1 नंतर शमुवेलने जैतून तेलाची एक कुपी घेतली आणि शौलाच्या डोक्यावर ओतली, त्याचे चुंबन घेत म्हणाला, “याहवेहने तुला त्यांच्या वतनावर\f + \fr 10:1 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa इस्राएल लोकांवर\fqa*\f* अधिकारी म्हणून अभिषेक केला नाही काय? \v 2 आज तू माझ्याकडून गेल्यावर, बिन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्सेह येथे राहेलच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील. ते तुला सांगतील, ‘ज्या गाढवांच्या शोधात तू बाहेर पडला होता ती सापडली आहेत आणि आता तुझ्या वडिलांनी त्यांच्याबद्दलचा विचार करण्याचे थांबविले आहे आणि तुझ्याबद्दल काळजी करीत आहेत. ते म्हणत आहेत मी, “माझ्या मुलाविषयी काय करावे?” ’ \p \v 3 “नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल. \v 4 ते तुला अभिवादन करतील आणि तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्याकडून स्वीकारशील. \p \v 5 “त्यानंतर तू परमेश्वराच्या गिबियाकडे, जिथे पलिष्ट्यांची चौकी आहे तिथे जाशील. त्या नगरात जाताच, संदेष्ट्यांची एक मिरवणूक सतार, डफ, सनई आणि वीणा ही वाद्ये वाजवित उच्च स्थानावरून खाली उतरत असताना आणि भविष्यवाणी करत असताना तुला आढळतील. \v 6 याहवेहचा आत्मा सामर्थ्याने तुझ्यावर येईल आणि तू त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करशील; आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा व्यक्ती होशील. \v 7 ही चिन्हे पूर्ण होतील तेव्हा जे काही तुझ्या हाती येईल ते तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. \p \v 8 “माझ्यापुढे तू गिलगाल येथे जा. होमार्पणे आणि शांत्यर्पणे करण्यासाठी मी खचित खाली तुझ्याकडे येईल, परंतु मी तुझ्याकडे येऊन तू काय करावे ते मी तुला सांगेपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.” \s1 शौलाला राजा केले जाते \p \v 9 शमुवेलपासून निघून जाण्यासाठी शौल वळताच, परमेश्वराने शौलाचे हृदय बदलले आणि त्याच दिवशी ही सर्व चिन्हे पूर्ण झाली. \v 10 जेव्हा शौल आणि त्याचा सेवक गिबियाहकडे आले तेव्हा संदेष्ट्यांची मिरवणूक त्याला भेटली; तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर उतरला आणि तो त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करू लागला. \v 11 सर्व लोक जे शौलाला पूर्वीपासून ओळखीत होते, जेव्हा त्यांनी त्याला संदेष्ट्यांबरोबर भविष्यवाणी करताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणू लागले, “कीशच्या मुलाला हे काय झाले आहे? शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?” \p \v 12 तिथे राहत असलेल्या एका मनुष्याने उत्तर दिले, “त्यांचा पिता\f + \fr 10:12 \fr*\ft त्या काळात संदेष्ट्यांच्या प्रमुख शिक्षकाला पिता म्हटले जात असे.\ft*\f* कोण आहे?” यावरून अशी म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी आहे काय?” \v 13 शौलाने भविष्यवाणी करण्याचे थांबविल्यानंतर तो उच्चस्थानी गेला. \p \v 14 तेव्हा शौलाच्या काकाने त्याला आणि त्याच्या सेवकाला विचारले, “तुम्ही कुठे गेला होता?” \p तो म्हणाला, “गाढवांना शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु ती आम्हाला सापडत नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलकडे गेलो.” \p \v 15 शौलाचे काका म्हणाले, “शमुवेल तुला काय म्हणाले ते मला सांग.” \p \v 16 शौलाने उत्तर दिले, “गाढवे सापडली आहेत याची त्यांनी आम्हाला खात्री दिली.” परंतु राजपदाबद्दल शमुवेलने जे सांगितले होते ते त्याने त्याच्या काकांना सांगितले नाही. \p \v 17 शमुवेलने इस्राएली लोकांना याहवेहकडे मिस्पाह येथे बोलाविले \v 18 आणि त्यांना म्हटले, “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, असे म्हणतात: ‘मी इस्राएलास इजिप्तमधून बाहेर आणले आणि तुम्हाला इजिप्तच्या सत्तेपासून आणि ज्या सर्व राष्ट्रांनी तुम्हाला अन्यायाने वागवले, त्यांच्यापासून मी तुम्हाला सोडविले.’ \v 19 परंतु तुम्ही आता तुमच्या परमेश्वराला नाकारले आहे, जे तुम्हाला तुमच्या सर्व अरिष्टांपासून आणि संकटांपासून वाचवितात. आणि तुम्ही म्हणाला, ‘नको, आता आमच्यावर एक राजा नेम.’ तर आता तुमच्या गोत्रानुसार व कुळांनुसार याहवेहसमोर हजर व्हा.” \p \v 20 जेव्हा शमुवेलने सर्व इस्राएलला त्यांच्या गोत्राप्रमाणे पुढे आणले, बिन्यामीन गोत्राची चिठ्ठी निघाली. \v 21 नंतर त्याने बिन्यामीन गोत्राला कुळानुसार पुढे आणले आणि मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली. शेवटी कीशाचा पुत्र शौल याची निवड झाली. परंतु जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला, तेव्हा तो कुठेच सापडला नाही. \v 22 तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” \p आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.” \p \v 23 तेव्हा त्यांनी पळत जाऊन त्याला बाहेर आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला, तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यापर्यंतच होते. \v 24 शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “याहवेहने निवडलेल्या या मनुष्याला तुम्ही पाहत आहात काय? सर्व लोकांमध्ये त्याच्यासारखा कोणीही नाही.” \p तेव्हा लोकांनी मोठ्याने घोषणा दिली, “राजा चिरायू होवो!” \p \v 25 शमुवेलने राजपदाचे हक्क आणि कर्तव्ये लोकांना समजावून सांगितली. त्याने ती एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहून ठेवली आणि ती याहवेहसमोर ठेवली. नंतर शमुवेलने लोकांना आपआपल्या घरी पाठवून दिले. \p \v 26 शौलसुद्धा ज्यांच्या हृदयास परमेश्वराने स्पर्श केला होता अशा शूर पुरुषांबरोबर गिबियाह येथे आपल्या घरी गेला. \v 27 परंतु काही अधर्मी लोक म्हणाले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याच्यासाठी भेटी आणल्या नाहीत. परंतु शौल शांत राहिला. \c 11 \s1 शौल याबेश शहराची सुटका करतो \p \v 1 अम्मोनी नाहाश\f + \fr 11:1 \fr*\fq नाहाश \fq*\fqa अम्मोनी राजा ज्याने गाद व रऊबेनी लोकांचे उजवे डोळे उपटले आणि इस्राएलमध्ये आतंक आणि भय पसरवून त्यांचा फार छळ केला.\fqa*\f* याने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.” \p \v 2 परंतु अम्मोनी नाहाश म्हणाला, “मी एकाच अटीवर तुमच्याशी करार करेन की मी तुम्हा प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून संपूर्ण इस्राएलवर अप्रतिष्ठा आणेन.” \p \v 3 याबेशचे वडील त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.” \p \v 4 जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला. \v 5 त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले. \p \v 6 जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला. \v 7 त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले. \v 8 बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते. \p \v 9 जे निरोप घेऊन आले होते त्यांना त्यांनी सांगितले, “याबेश-गिलआदच्या पुरुषांना सांगा, ‘उद्या सूर्य तापलेला असेल, त्या वेळेपर्यंत तुमची सुटका केली जाईल.’ ” जेव्हा निरोप्यांनी जाऊन हे वर्तमान याबेशच्या लोकांना सांगितले तेव्हा ते आनंदित झाले. \v 10 याबेशवासी अम्मोनी लोकांना म्हणाले, “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या स्वाधीन करू आणि तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आमचे करा.” \p \v 11 दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले. \s1 शौलाची राजा म्हणून स्थापना \p \v 12 तेव्हा लोक शमुवेलास म्हणाले, “ते कोण होते ज्यांनी विचारले होते, ‘शौल आमच्यावर राज्य करेल काय?’ त्या माणसांना आमच्याकडे आणा, म्हणजे आम्ही त्यांना जिवे मारू.” \p \v 13 परंतु शौल म्हणाला, “आज कोणालाही जिवे मारले जाणार नाही, कारण आज याहवेहने इस्राएलची सुटका केली आहे.” \p \v 14 नंतर शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आपण गिलगालास जाऊ आणि तिथे राजपदाची पुनर्स्थापना करू.” \v 15 तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले आणि त्यांनी याहवेहच्या उपस्थितीत शौलाला राजा केले. तिथे त्यांनी याहवेहसमोर शांत्यर्पणाचे यज्ञ केले आणि शौलाने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोठा उत्सव साजरा केला. \c 12 \s1 शमुवेलचे समर्पणाचे भाषण \p \v 1 शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही मला जे काही सांगितले ते ऐकून मी तुमच्यावर राजा नेमून दिला आहे. \v 2 आता तुमचा पुढारी म्हणून तुमच्याकडे राजा आहे. मी तर उतार वयाचा होऊन माझे केस पांढरे झाले आहेत, आणि माझी मुले येथे तुमच्याबरोबर आहेत. माझ्या तरुणपणाच्या दिवसापासून आजपर्यंत मी तुमचा पुढारी आहे. \v 3 मी येथे तुमच्यापुढे उभा आहे. याहवेहच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या उपस्थितीत माझ्याविरुद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला आहे? मी कोणाचा गाढव घेतला आहे? मी कोणाला फसविले आहे? मी कोणावर अत्याचार केला आहे? न्याय विपरीत करण्यासाठी मी कोणाच्या हातून लाच घेतली आहे? यापैकी कोणतीही गोष्ट जर मी केली असेल तर त्याची मी भरपाई करेन.” \p \v 4 त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही आम्हाला कधीही फसविले नाही किंवा आमच्यावर अत्याचार केला नाही, कोणाच्याही हातून तुम्ही काहीही घेतलेले नाही.” \p \v 5 शमुवेल त्यांना म्हणाला, “याहवेह तुमच्याविरुद्ध साक्षी आहे आणि आज याहवेहचा अभिषिक्त सुद्धा साक्षी आहे की, माझ्यामध्ये तुम्हाला कोणताही दोष सापडला नाही.” \p ते म्हणाले, “होय, याहवेह साक्षी आहे.” \p \v 6 तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्यांनी मोशे आणि अहरोन यांना नेमले, आणि तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले ते याहवेहच होते. \v 7 तर आता येथे उभे राहा, कारण याहवेहने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी केलेली सर्व नीतिमान कृत्ये त्याविषयी मी तुम्हाला याहवेहसमोर बोध करतो.” \p \v 8 याकोबाने इजिप्तमध्ये प्रवेश केल्यानंतर साहाय्यासाठी ते याहवेहकडे रडले आणि याहवेहने मोशे आणि अहरोन यांना पाठविले, त्यांनी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणले आणि त्यांना या ठिकाणी वसविले. \p \v 9 “परंतु याहवेह त्यांचा परमेश्वर यांना ते विसरले; म्हणून याहवेहने त्यांना हासोरचा सेनापती सिसेरा याच्या हाती आणि पलिष्ट्यांच्या हाती आणि मोआबच्या राजाच्या हाती विकून टाकले आणि ते त्यांच्याशी लढले. \v 10 तेव्हा त्यांनी रडून याहवेहचा धावा करीत ते म्हणाले, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही याहवेहचा त्याग केला आहे आणि बआल व अष्टारोथ यांची सेवा केली आहे. परंतु आता आमच्या शत्रूंच्या हातातून आमची सुटका करा आणि आम्ही तुमची सेवा करू,’ \v 11 तेव्हा याहवेहनी यरूब्बआल\f + \fr 12:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa गिदोन\fqa*\f*, बाराक\f + \fr 12:11 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa बेदान\fqa*\f*, इफ्ताह आणि शमुवेल\f + \fr 12:11 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa शमशोन\fqa*\f* यांना पाठविले आणि त्यांनी सभोवतालच्या तुमच्या शत्रूपासून तुमची सुटका केली, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहिला. \p \v 12 “परंतु जेव्हा तुम्ही पाहिले की, अम्मोन्यांचा राजा नाहाश तुमच्याविरुद्ध चाल करून येत आहे, तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचा राजा असतानाही, तुम्ही मला म्हणाला, ‘नाही, आमच्यावर राज्य करण्यासाठी आम्हाला राजा पाहिजे.’ \v 13 तर आता तुम्ही निवडून घेतलेला राजा येथे आहे, जो तुम्ही मागून घेतला आहे; पाहा, याहवेहने तुमच्यावर राजा नेमला आहे. \v 14 जर तुम्ही याहवेहचे भय धरून त्यांची सेवा कराल, त्यांचे आज्ञापालन कराल आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करतो तो तुमचा राजा व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुसरण कराल, तर बरे! \v 15 परंतु जर तुम्ही याहवेहचे ऐकणार नाही, आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड कराल, तर याहवेहचा हात जसा तुमच्या पूर्वजांच्या विरुद्ध होता, तसाच तुमच्याही विरोधात जाईल. \p \v 16 “तर आता, शांत उभे राहा आणि याहवेह तुमच्या नजरेसमोर जे महान कृत्य करणार आहे ते पाहा! \v 17 हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.” \p \v 18 तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले. \p \v 19 सर्व लोक शमुवेलला म्हणाले, “याहवेह तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही, कारण राजाची मागणी करून आम्ही आमच्या इतर सर्व पापांमध्ये भर घातली आहे.” \p \v 20 “भिऊ नका,” शमुवेलने उत्तर दिले. “तुम्ही हे सर्व वाईट केले आहे; तरी आता याहवेहपासून दूर वळू नका, परंतु तुमच्या सर्व हृदयाने याहवेहची सेवा करा. \v 21 निरुपयोगी मूर्तीच्या मागे लागू नका. ते तुमचे काहीही भले करू शकत नाहीत किंवा ते तुम्हाला वाचवूही शकत नाहीत, कारण त्या निरुपयोगी आहेत. \v 22 आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला आपले स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले. \v 23 माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुम्हासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देण्याने मी याहवेहविरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. आणि मी तुम्हाला जो चांगला व खरा मार्ग तो शिकवेन. \v 24 परंतु याहवेहचे भय धरून प्रामाणिकपणे तुमच्या सर्व हृदयाने त्यांची सेवा करण्याविषयी खात्री बाळगा; त्यांनी तुम्हासाठी जी महान कृत्ये केली आहेत ती लक्षात ठेवा. \v 25 परंतु तुम्ही पाप करीत राहाल, तर तुम्ही आणि तुमचा राजा नाश पावाल.” \c 13 \s1 शमुवेल शौलाचा निषेध करतात \p \v 1 शौल राजा झाला तेव्हा तो तीस वर्षांचा होता आणि त्याने बेचाळीस वर्षे इस्राएलवर राज्य केले. \p \v 2 शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले. \p \v 3 गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!” \v 4 तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले. \p \v 5 तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्‍यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला. \v 6 आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले. \v 7 काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. \p परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते. \v 8 शमुवेलने वेळ ठरविल्याप्रमाणे शौलाने सात दिवस वाट पाहिली; परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि शौलाची माणसे विखरू लागली. \v 9 तेव्हा तो म्हणाला, “होमार्पण आणि शांत्यर्पणे माझ्याकडे आणा.” आणि शौलाने होमार्पण केले. \v 10 त्याने होमार्पणाची समाप्ती करताच शमुवेल आला आणि शौल त्याला अभिवादन करण्यास बाहेर गेला. \p \v 11 तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?” \p शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते, \v 12 मला वाटले, ‘आता पलिष्टी लोक गिलगाल येथे माझ्याविरुद्ध चाल करून येतील आणि मी अजूनही याहवेहकडून साहाय्यासाठी विनंती केली नाही.’ म्हणून होमार्पण करणे मला भाग पडले.” \p \v 13 शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझा परमेश्वर यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते. \v 14 परंतु आता तुझे राज्य टिकणार नाही; याहवेहने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे आणि आपल्या लोकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले आहे. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही.” \p \v 15 नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती. \s1 निःशस्त्र इस्राएली लोक \p \v 16 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि त्यांच्याबरोबर असलेले पुरुष बिन्यामीन प्रांतामध्ये गेबा\f + \fr 13:16 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa गेबा\fqa*\f* येथे राहिले. आणि पलिष्टी लोकांनी मिकमाश येथे तळ दिला. \v 17 छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली, \v 18 दुसरी बेथ-होरोनकडे आणि तिसरी रानासमोर असलेले सेबोईम खोर्‍याच्या सीमेकडे गेली. \p \v 19 त्या दिवसांत संपूर्ण इस्राएली देशात लोहार सापडत नव्हते, कारण पलिष्टी लोक म्हणाले होते, “कदाचित इब्री लोक तलवारी किंवा भाले तयार करतील!” \v 20 म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्‍हाडी किंवा विळे\f + \fr 13:20 \fr*\ft किंवा \ft*\fqa नांगराच्या टोकांना\fqa*\f* यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत. \v 21 नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल\f + \fr 13:21 \fr*\ft अंदाजे 8 ग्रॅ.\ft*\f*, व कुर्‍हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल\f + \fr 13:21 \fr*\ft अंदाजे 4 ग्रॅ.\ft*\f* असा दर होता. \p \v 22 म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती. \s1 योनाथान पलिष्ट्यांवर हल्ला करतो \p \v 23 तेव्हा पलिष्टी सैन्यांची एक तुकडी मिकमाशाच्या घाटाकडे गेली होती. \c 14 \nb \v 1 एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण पलिष्ट्यांच्या चौकीच्या पलीकडील बाजूला जाऊ.” परंतु त्याने त्याच्या वडिलांना हे सांगितले नाही. \p \v 2 शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते. \v 3 त्यापैकी एक एफोद घातलेला अहीयाह होता. तो शिलोहमध्ये जो याहवेहचा याजक होता त्या एलीचा पुत्र फिनहास, याचा पुत्र ईखाबोद, याचा भाऊ अहीतूब याचा पुत्र होता. योनाथान गेला आहे, हे कोणालाही माहीत नव्हते. \p \v 4 ज्या घाटांनी योनाथानने पलिष्ट्यांच्या चौकीवर जाण्याची योजना केली होती त्याच्या दोन्ही बाजूंनी शिखरे होती; एका शिखराचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेनेह होते. \v 5 एक शिखर उत्तरेकडे मिकमाशासमोर आणि दुसरे दक्षिणेकडे गेबासमोर होते. \p \v 6 योनाथान त्याच्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंती लोकांच्या चौकीकडे जाऊ या. कदाचित याहवेह आपल्या बाजूने कार्य करतील, कारण याहवेहने आमचे तारण करू नये म्हणून त्यांना कोण अडखळविणार? मग ते पुष्कळांद्वारे असो किंवा थोडक्यांद्वारे.” \p \v 7 त्याचा शस्त्रवाहक म्हणाला, “तुझ्या मनामध्ये जे आहे ते कर, पुढे जा; मी माझ्या पूर्ण मनाने व जिवाने तुझ्याबरोबर आहे.” \p \v 8 योनाथान म्हणाला, “चल, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या दृष्टीस पडू. \v 9 जर ते आपल्याला म्हणतील, ‘आम्ही तुमच्याकडे येईपर्यंत तिथेच थांबा,’ तर आपण जिथे आहोत तिथेच थांबू आणि त्यांच्यापर्यंत जाणार नाही. \v 10 परंतु जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण चढून जाऊ, कारण याहवेहने त्यांना आपल्या हाती दिले आहे याचे ते चिन्ह असेल.” \p \v 11 जेव्हा ते दोघेजण पलिष्ट्यांच्या चौकीवर त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा पलिष्टी लोक म्हणाले, “पाहा, इब्री लोक ज्या बिळांमध्ये लपले होते त्यातून आता बाहेर येत आहेत.” \v 12 चौकीवरील लोक योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाला ओरडून म्हणाले, “इकडे आमच्याकडे वर या, म्हणजे आम्ही तुम्हाला धडा शिकवू.” \p तेव्हा योनाथान शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, माझ्यामागे वर ये; कारण याहवेहने त्यांना इस्राएलच्या हाती दिले आहे.” \p \v 13 योनाथान आपल्या हातापायांचा वापर करीत वर चढला, त्याच्यामागे त्याचा शस्त्रवाहक चढत गेला. पलिष्टी लोक योनाथानसमोर पडले व त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागे पलिष्ट्यांना मारत त्यांच्यामागे गेला. \v 14 त्या पहिल्या हल्ल्यात योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाने सुमारे अर्ध्या एकर जमिनीवर वीस माणसे मारली. \s1 इस्राएली पलिष्ट्यांची दाणादाण करतात \p \v 15 छावणीत व शेतात, चौकीवर व छापा टाकणारे अशा संपूर्ण सैन्यामध्ये भय निर्माण झाले; आणि भूमी हादरली, ते परमेश्वराकडून पाठविलेले भयंकर भय होते. \p \v 16 इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे. \v 17 तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते. \p \v 18 शौल अहीयाहला म्हणाला, “परमेश्वराचा एफोद\f + \fr 14:18 \fr*\fq एफोद \fq*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa कोश\fqa*\f* इकडे आण,” (कारण त्यावेळी तो इस्राएली लोकांसोबत होता.) \v 19 शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!\f + \fr 14:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa आपला हात बाजूला काढून घे.\fqa*\f*” \p \v 20 तेव्हा शौल व त्याचे लोक एकत्र जमा होऊन युद्धास निघाले. त्यांना पलिष्टी लोक मोठ्या गोंधळात, त्यांच्याच तलवारीने एकमेकास मारत असलेले दिसले. \v 21 जे इब्री लोक आधी पलिष्ट्यांबरोबर होते व त्यांच्याबरोबर त्यांच्या छावणीत गेले होते, ते आता जे इस्राएली लोक शौल व योनाथान बरोबर होते त्यांच्याकडे गेले. \v 22 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात जे इस्राएली लोक लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिष्ट्यांनी पळ काढला आहे त्यांनीही त्याच ईर्षेने युद्धात भाग घेतला. \v 23 अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले. \s1 योनानाथ मध खातो \p \v 24 त्या दिवशी इस्राएल कष्टात होते, कारण शौलाने लोकांना असे म्हणत शपथबद्ध केले होते, “दिवस मावळण्यापूर्वी व मी माझ्या शत्रूंवर सूड घेईपर्यंत, जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!” त्यामुळे सैन्यातील कोणीही अन्न चाखले नाही. \p \v 25 सर्व सैन्य जेव्हा रानात गेले, त्यावेळी जमिनीवर मध पडलेले होते. \v 26 जेव्हा ते आत जंगलात गेले, तेव्हा त्यांनी मध वाहत असलेले पाहिले; परंतु कोणीही आपला हात तोंडाला लावला नाही, कारण त्यांना शपथेचे भय होते. \v 27 परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले. \v 28 नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.” \p \v 29 योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत. \v 30 आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?” \p \v 31 त्या दिवशी मिकमाशपासून अय्यालोन पर्यंत पलिष्ट्यांना त्यांनी मारले होते, त्यामुळे ते अतिशय थकले होते. \v 32 तेव्हा ते लुटीवर तुटून पडले, त्यांनी मेंढरे, गुरे व वासरे घेऊन त्यांना जमिनीवर कापले आणि ते रक्तासहित खाल्ले. \v 33 मग कोणी शौलाला सांगितले, “पाहा, रक्तासहित मांस खाऊन लोक याहवेहविरुद्ध पाप करीत आहेत.” \p “तुम्ही विश्वासघात केला आहे,” तो म्हणाला, “एक मोठा दगड इकडे लवकर लोटत आणा.” \v 34 तेव्हा शौल म्हणाला, “लोकांमध्ये जा आणि त्यांना सांग, ‘तुमच्यातील प्रत्येकाने तुमचे गुरे व मेंढरे माझ्याकडे आणा आणि त्यांना या ठिकाणी कापून खा. रक्तासहित मांस खाऊन याहवेहविरुद्ध पाप करू नका.’ ” \p तेव्हा सर्वांनी आपआपले बैल आणून त्या रात्री तिथे ते कापले. \v 35 नंतर शौलाने याहवेहसाठी एक वेदी बांधली. शौलाने बांधलेली ही पहिलीच वेदी होती. \p \v 36 शौल म्हणाला, “चला, आपण रात्री खाली जाऊन पलिष्ट्यांचा पहाटेपर्यंत पाठलाग करू आणि त्यांच्यातील एकालाही जिवंत सोडू नये.” \p लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.” \p परंतु याजकाने म्हटले, “याबाबत आपण परमेश्वराला विचारू.” \p \v 37 तेव्हा शौलाने परमेश्वराला विचारले, “मी खाली जाऊन पलिष्ट्यांचा पाठलाग करावा काय? त्यांना तुम्ही इस्राएलच्या हाती देणार काय?” परंतु परमेश्वराने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही. \p \v 38 तेव्हा शौल म्हणाला, “जे सेनानायक आहात ते तुम्ही माझ्याकडे या आणि आज कोणते पाप घडले हे आपण शोधू. \v 39 इस्राएलचा उद्धार करणारा याहवेह यांची शपथ, पापाचा दोष जरी माझा पुत्र योनाथान याच्यावर असला, तरी त्याने मरावे.” परंतु कोणीही काही बोलले नाही. \p \v 40 तेव्हा शौल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही एका बाजूला उभे राहा; मी व माझा पुत्र योनाथान या बाजूला उभे राहतो.” \p लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.” \p \v 41 शौलाने याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, “तुम्ही आपल्या सेवकाला आज उत्तर का दिले नाही? जर मी किंवा माझा पुत्र योनाथान दोषी आहे तर उरीमद्वारे ते दाखवावे, परंतु जर इस्राएलचे लोक दोषी आहेत, तर थुम्मीमद्वारे ते दाखवावे.” योनाथान व शौलाची चिठ्ठी निघाली आणि लोक त्यातून सुटले. \v 42 शौल म्हणाला, “आता माझ्या व माझा पुत्र योनाथानवर चिठ्ठ्या टाका,” तेव्हा योनाथानची चिठ्ठी निघाली. \p \v 43 शौलाने योनाथानला विचारले, “तू काय केलेस ते मला सांग.” \p योनाथानने उत्तर दिले, “माझ्या काठीच्या टोकावर घेऊन मी थोडा मध खाल्ला; परंतु आता मला मरणे भाग आहे.” \p \v 44 शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.” \p \v 45 परंतु सैनिकांनी शौलाला म्हटले, “ज्याने इस्राएली लोकांस हा मोठा उद्धार आणला आहे, तो योनाथान मरावा काय? कदापि नाही! जिवंत याहवेहची शपथ, त्याच्या डोक्यावरील एक केसही खाली पडणार नाही, कारण त्याने आज जे केले ते परमेश्वराच्या साहाय्याने केले आहे.” याप्रकारे लोकांनी योनाथानला सोडविले आणि त्याला मृत्युदंड दिला नाही. \p \v 46 यानंतर शौलाने पलिष्ट्यांचा पाठलाग करणे थांबविले आणि ते आपापल्या ठिकाणी परतले. \p \v 47 इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई\f + \fr 14:47 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa शिक्षा दिली.\fqa*\f*. \v 48 तो शौर्याने लढला आणि त्याने अमालेक्यांचा पराभव केला आणि ज्यांनी इस्राएलला लुटले होते त्यांच्या हातूनही त्यांची सुटका केली. \s1 शौलाचे घराणे \p \v 49 शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते. \v 50 त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता. \v 51 शौलाचा पिता कीश व अबनेरचा पिता नेर अबीएलचे पुत्र होते. \p \v 52 शौलाच्या सर्व कारकिर्दीत इस्राएल व पलिष्ट्यांमध्ये घनघोर युद्ध होते, आणि जेव्हा शौलाला एखादा पराक्रमी किंवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या सेवेत सामील करीत असे. \c 15 \s1 परमेश्वर शौलाला राजा म्हणून नाकारतात \p \v 1 शमुवेल शौलास म्हणाला, “इस्राएल लोकांवर राजा म्हणून तुझा अभिषेक करण्यास याहवेहने मलाच पाठवले होते; तर आता याहवेहचा संदेश ऐक. \v 2 सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार. \v 3 तर आता तू जा, अमालेक्यांवर हल्ला कर आणि त्यांचे जे काही आहे त्या सर्वांचा सर्वस्वी नाश कर. त्यांची गय करू नको; त्यांचे पुरुष व स्त्रिया, लेकरे व तान्ही बाळे, गुरे व मेंढरे, उंट व गाढवे हे सर्व मारून टाक.’ ” \p \v 4 तेव्हा शौलाने आपले सैन्य बोलाविले व तेलाईम येथे त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ व यहूदीयातील दहा हजार सैनिक होते. \v 5 शौल अमालेक्यांच्या शहरात जाऊन तिथे खोर्‍यात दबा धरून राहिला. \v 6 मग शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही निघून जा, अमालेक्यांना सोडून जा, यासाठी की त्यांच्याबरोबर मी तुमचा नाश करू नये; कारण इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी दयेने वागला.” तेव्हा केनी लोक अमालेक्यांमधून निघून गेले. \p \v 7 तेव्हा शौलाने हवीलापासून इजिप्तच्या पूर्वेकडील सीमेवरील शूरपर्यंत अमालेक्यांना मारले. \v 8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले, आणि त्याच्या लोकांचा तलवारीने सर्वनाश केला. \v 9 परंतु शौलाने व त्याच्या सैन्याने अगाग राजाला जिवंत ठेवले, तसेच उत्तम मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे\f + \fr 15:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa संपूर्ण वाढ झालेले\fqa*\f* व कोकरे; व सर्वकाही जे चांगले होते त्यांचा नाश करावा असे त्यांना वाटले नाही, म्हणून त्यांनी ते राखून ठेवले. मात्र जे टाकाऊ व कुचकामी होते त्यांचा त्यांनी नाश केला. \p \v 10 तेव्हा याहवेहचे वचन शमुवेलकडे आले: \v 11 “मी शौलास राजा केले याबद्दल मला पश्चाताप होत आहे, कारण तो माझ्यापासून फिरला आहे आणि त्याने माझ्या आज्ञांचे पालन केले नाही.” शमुवेल फार संतापला आणि रात्रभर याहवेहकडे रडला. \p \v 12 सकाळी, अगदी पहाटे उठून शमुवेल शौलाला भेटायला निघाला, पण त्याला कोणी सांगितले, “शौल कर्मेलास गेला आहे. तिथे त्याने आपल्या स्वतःच्या आदरार्थ एक स्तंभ उभारला आहे आणि तिथून पुढे तो खाली गिलगालास गेला आहे.” \p \v 13 जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.” \p \v 14 परंतु शमुवेलने म्हटले, “तर मग मेंढरांचे बेंबावणे व बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?” \p \v 15 शौलाने उत्तर दिले, “सैन्याच्या लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे याहवेह तुमचा परमेश्वर यांच्या यज्ञासाठी राखून ठेवले आहेत, परंतु बाकीच्या सर्वांचा आम्ही पूर्णपणे नाश केला आहे.” \p \v 16 तेव्हा शमुवेल शौलास म्हणाले, “पुरे! काल रात्री याहवेहने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो.” \p “सांगा,” शौल म्हणाला. \p \v 17 शमुवेल म्हणाले, “एकेकाळी तू आपल्याच दृष्टीने लहान होतास, तरी इस्राएलच्या गोत्रांचा पुढारी तू झाला नाहीस काय? याहवेहने तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. \v 18 आणि याहवेहने तुला एका कामगिरीवर पाठवित म्हटले, ‘जा आणि त्या दुष्ट अमालेक्यांचा पूर्णपणे नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याविरुद्ध युद्ध कर.’ \v 19 तू याहवेहच्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? लुटीवर झडप घालून तू याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” \p \v 20 शौल शमुवेलला म्हणाला, “पण मी याहवेहचे आज्ञापालन केले, याहवेहने मला दिलेल्या कामगिरीवर मी गेलो, अमालेक्यांचा मी पूर्णपणे नाश केला आणि अगाग त्यांचा राजा याला मी घेऊन आलो. \v 21 सैनिकांनी त्या लुटीतील मेंढरे व गुरे घेतली व त्यातील जे उत्तम ते गिलगालात याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासाठी यज्ञ करावे म्हणून राखून ठेवली आहेत.” \p \v 22 परंतु शमुवेलने उत्तर दिले: \q1 “त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो \q2 तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय? \q1 यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले, \q2 आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. \q1 \v 23 कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे, \q2 आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे. \q1 तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे, \q2 त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.” \p \v 24 शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले. \v 25 आता मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या पापाची क्षमा करा आणि मी याहवेहची उपासना करावी म्हणून परत माझ्याबरोबर या.” \p \v 26 परंतु शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही. तू याहवेहच्या वचनाचा धिक्कार केला आहे आणि याहवेहनेही तुला इस्राएलचा राजा म्हणून धिक्कारले आहे.” \p \v 27 आणि शमुवेल जाण्यास वळला, तेव्हा शौलाने त्यांच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला. \v 28 तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे. \v 29 जे परमेश्वर इस्राएलचे वैभव आहेत, ते असत्य बोलत नाहीत किंवा आपले मन बदलत नाही; कारण आपले मन बदलण्यास ते मानव नाहीत.” \p \v 30 शौलाने उत्तर दिले, “मी पाप केले आहे, तरीही माझ्या लोकांच्या वडीलजनांसमोर व इस्राएलसमोर माझा मान राखा; माझ्याबरोबर परत या, म्हणजे मी याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना करेन.” \v 31 तेव्हा शमुवेल शौलाबरोबर परत गेले आणि शौलाने याहवेहची उपासना केली. \p \v 32 नंतर शमुवेल म्हणाला, “अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्याकडे घेऊन या.” \p अगाग साखळ्यांनी बांधलेला असा शमुवेलकडे आला आणि त्याला वाटले, “मरणाचे संकट खात्रीने टळले आहे.” \p \v 33 परंतु शमुवेलने म्हटले, \q1 “जसे तुझ्या तलवारीने अनेक स्त्रियांना अपत्यहीन केले, \q2 तसेच तुझी आई स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” \m आणि शमुवेलने याहवेहसमोर गिलगालात अगागाला मारून टाकले. \p \v 34 नंतर शमुवेल रामाह येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिबियाहकडे परतला. \v 35 शमुवेल आपल्या मरण्याच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला गेला नाही, परंतु शमुवेलने त्याच्यासाठी शोक केला. आणि आपण शौलाला इस्राएलवर राजा केले म्हणून याहवेहला पश्चाताप झाला. \c 16 \s1 दावीदाचा अभिषेक \p \v 1 याहवेह शमुवेलला म्हणाले, “मी शौलाला इस्राएलाचा राजा म्हणून नाकारले आहे, तर तू कुठवर त्याच्यासाठी शोक करीत राहणार? तुझे शिंग तेलाने भर आणि चल; मी तुला बेथलेहेमकर इशाय याच्याकडे पाठवित आहे. मी त्याच्या एका पुत्राला राजा म्हणून निवडले आहे.” \p \v 2 परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.” \p याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’ \v 3 इशायला यज्ञासाठी आमंत्रित कर आणि तू काय करावे ते मी तुला दाखवेन. ज्याला मी सूचित करेन त्याला तू माझ्यासाठी अभिषिक्त कर.” \p \v 4 याहवेहने सांगितल्याप्रमाणे शमुवेलने केले. जेव्हा शमुवेल बेथलेहेमला पोहोचला, तेव्हा त्या नगराचे वडीलजन थरथर कापत त्यांना भेटले. त्यांनी विचारले, “आपण शांतीने आला आहात काय?” \p \v 5 शमुवेलने उत्तर दिले, “होय, मी शांतीने आलो आहे; मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे. आपणास शुद्ध करा आणि माझ्याबरोबर यज्ञाला या.” मग शमुवेलने इशाय व त्याच्या पुत्रांना शुद्ध केले आणि त्यांना यज्ञासाठी आमंत्रण दिले. \p \v 6 ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.” \p \v 7 परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.” \p \v 8 नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.” \v 9 नंतर इशायाने शम्माहला चालविले, परंतु शमुवेल म्हणाला, “हा सुद्धा याहवेहने निवडलेला नाही.” \v 10 इशायाने त्याचे सात पुत्र शमुवेलसमोर चालविले, परंतु शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने यांना निवडले नाही.” \v 11 तेव्हा त्यांनी इशायला विचारले, “तुझे पुत्र येण्याचे पूर्ण झाले काय?” \p इशायाने उत्तर दिले, “अजून एक जो सर्वात लहान आहे, तो रानात मेंढरे राखीत आहे.” \p शमुवेल म्हणाले, “त्याला बोलाविणे पाठव; कारण तो येईपर्यंत आम्ही बसणार नाही.” \p \v 12 तेव्हा इशायाने त्याला बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला देखणा असा होता. \p तेव्हा याहवेह म्हणाले, “ऊठ आणि त्याला अभिषिक्त कर, हाच तो आहे.” \p \v 13 तेव्हा शमुवेलने तेलाचे शिंग घेतले व त्याच्या भावांदेखत दावीदाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून याहवेहचा आत्मा सामर्थ्याने दावीदावर आला. नंतर शमुवेल रामाह येथे परत गेला. \s1 शौलाच्या सेवेस दावीद \p \v 14 आता याहवेहचा आत्मा शौलापासून निघून गेला होता आणि याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा\f + \fr 16:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa इजा करणारा\fqa*\f* त्याला बाधा करू लागला. \p \v 15 शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, “पाहा, परमेश्वराकडून पाठविलेला हा दुष्ट आत्मा तुम्हाला बाधा करीत आहे. \v 16 आमच्या धन्याने त्याच्या या सेवकांना आज्ञा द्यावी की एक उत्कृष्ट वीणावादकाचा शोध करावा, म्हणजे जेव्हा परमेश्वराकडून येणारा दुष्ट आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तो वीणा वाजवेल, आणि तुम्हाला बरे वाटेल.” \p \v 17 तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक चांगला वीणावादक शोधून त्याला माझ्याकडे आणा.” \p \v 18 त्यापैकी एका सेवकाने उत्तर दिले, “मी बेथलेहेमकर इशायाचा पुत्र पाहिला आहे, तो वीणा वादनात निपुण आहे. तो शूर व योद्धा आहे, तो उत्तम वक्ता व रूपवान आहे; व याहवेह त्याच्याबरोबर आहेत.” \p \v 19 तेव्हा शौलाने इशायाकडे निरोप पाठवून म्हटले, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत आहे त्याला माझ्याकडे पाठव.” \v 20 तेव्हा इशायाने आपला पुत्र दावीदाबरोबर भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू लादलेले एक गाढव शौलाकडे पाठविले. \p \v 21 दावीद शौलाकडे आला व त्याच्या सेवेस हजर झाला. शौलाला तो अतिशय आवडला व दावीद त्याचा एक शस्त्रवाहक झाला. \v 22 नंतर शौलाने इशायला संदेश पाठवून सांगितले, “दावीदाला माझ्या सेवेत असू दे. कारण मी त्याच्यावर प्रसन्न आहे.” \p \v 23 ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे. \c 17 \s1 दावीद आणि गल्याथ \p \v 1 पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली. \v 2 शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्‍यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले. \v 3 पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्‍यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते. \p \v 4 तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.\f + \fr 17:4 \fr*\ft सुमारे तीन मीटर\ft*\f* \v 5 त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते\f + \fr 17:5 \fr*\ft अंदाजे 58 कि.ग्रॅ.\ft*\f*; \v 6 त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व त्याच्या कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती. \v 7 विणकर्‍याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते.\f + \fr 17:7 \fr*\ft अंदाजे 7 कि.ग्रॅ.\ft*\f* त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला. \p \v 8 गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. \v 9 जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.” \v 10 तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” \v 11 पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले. \p \v 12 दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता. \v 13 इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते. \v 14 दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले, \v 15 परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे. \p \v 16 तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे. \p \v 17 एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा. \v 18 त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये. \v 19 ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्‍यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.” \p \v 20 सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्‍याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईच्या स्थानी जात होते. \v 21 इस्राएली आणि पलिष्टी सेना समोरासमोर उभ्या राहिल्या. \v 22 दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्‍याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले. \v 23 तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले. \v 24 त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत. \p \v 25 इस्राएली लोक म्हणत होते, “तुम्ही हा मनुष्य बाहेर येताना पाहता ना? तो इस्राएली लोकांना चेतावणी देण्यासाठी बाहेर येतो. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला राजा मोठी संपत्ती देईल, तो त्याला त्याची कन्या देईल व इस्राएलात त्याचे कुटुंब करमुक्त होईल.” \p \v 26 दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?” \p \v 27 ते जे काही म्हणत आले होते ते त्यांनी त्याला पुन्हा सांगितले आणि म्हणाले, “जो मनुष्य त्याला ठार मारेल त्याचे असे करण्यात येईल.” \p \v 28 जेव्हा दावीदाचा थोरला भाऊ एलियाब याने दावीदाला या लोकांबरोबर बोलत असताना पाहिले, तेव्हा तो त्याच्यावर रागाने भडकला आणि त्याला विचारले, “तू येथे का आलास? आणि ती थोडीशी मेंढरे रानात तू कोणाबरोबर सोडली आहेत? तू किती गर्विष्ठ आहेस आणि तुझे हृदय किती दुष्ट आहे हे मी जाणतो; तू येथे खाली केवळ युद्ध पाहायला आला आहेस.” \p \v 29 दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?” \v 30 नंतर तो दुसर्‍या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले. \v 31 दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले. \p \v 32 दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.” \p \v 33 शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.” \p \v 34 परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले, \v 35 मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले. \v 36 आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे. \v 37 ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.” \p शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.” \p \v 38 शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला. \v 39 दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. \p तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला. \v 40 नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला. \p \v 41 त्या दरम्यान पलिष्टी गल्याथही दावीदाच्या जवळ येऊ लागला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. \v 42 पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले. \v 43 तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला. \v 44 तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “इकडे ये, म्हणजे मी तुझे मांस पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईल.” \p \v 45 दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो. \v 46 आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत. \v 47 येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील.” \p \v 48 पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला. \v 49 दावीदाने आपल्या बटव्यातील एक दगड घेऊन, तो गोफणीत घातला व तो त्या पलिष्ट्याच्या कपाळावर मारला. तो दगड त्याच्या कपाळात शिरला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला. \p \v 50 अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले. \p \v 51 दावीद धावत जाऊन त्याच्यावर उभा राहिला, त्याने त्या पलिष्ट्याच्या म्यानातून तलवार काढून त्या तलवारीनेच त्याचे डोके कापले. \p जेव्हा पलिष्ट्यांनी पाहिले की त्यांचा नायक मरण पावला त्यांनी तिथून पळ काढला. \v 52 तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ\f + \fr 17:52 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa एक खोरे\fqa*\f* व एक्रोन येथवर पडलेले होते. \v 53 इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली. \p \v 54 दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली. \p \v 55 शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?” \p अबनेरने उत्तर दिले, “महाराज चिरायू होवो, मला माहीत नाही.” \p \v 56 राजा म्हणाला, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे त्याचा तपास कर.” \p \v 57 दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते. \p \v 58 शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?” \p दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.” \c 18 \s1 दावीदाविषयी शौलाची भीती वाढली \p \v 1 दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली. \v 2 त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही. \v 3 आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली. \v 4 योनाथानने आपल्या अंगातील झगा काढून तो दावीदाला दिला. आपला अंगरखा, तलवार, धनुष्य व कंबरपट्टा सुद्धा दावीदाला दिले. \p \v 5 शौलाने दावीदाला कोणत्याही कामगिरीवर पाठविले तरी त्यात दावीद यशस्वी होत असे, म्हणून शौलाने त्याला आपल्या सैन्यात उच्च हुद्दा दिला. ते सर्व सैनिकांना व शौलाच्या अधिकार्‍यांनाही आवडले. \p \v 6 दावीदाने पलिष्टी गल्याथाला ठार मारल्यानंतर ज्यावेळी लोक परत घरी येत होते, त्यावेळी इस्राएलच्या सर्व नगरांतून प्रत्येक गावातून स्त्रिया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांजा वाजवित शौल राजाला भेटायला आल्या. \v 7 नाचत असताना त्यांनी गीत गाईले: \q1 “शौलाने त्याच्या हजारास वधले, \q2 दावीदाने त्याचे दहा हजार वधले.” \p \v 8 यामुळे शौल अतिशय रागावला; गीतांच्या या ओळींनी तो असंतुष्ट झाला. तो म्हणाला, “त्यांनी दावीदाला दहा हजारांचे श्रेय दिले आणि मला केवळ हजारांचे. राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?” \v 9 आणि तेव्हापासून शौलाने दावीदावर पाळत ठेवली. \p \v 10 दुसर्‍या दिवशी परमेश्वराकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर जोराने उतरला, तेव्हा तो आपल्या घरात भविष्यवाणी करू लागला. दावीद रोजच्याप्रमाणे आपली वीणा वाजवित होता व शौलाच्या हाती भाला होता \v 11 “मी दावीदाला भिंतीशी खिळून टाकीन” असे म्हणत शौलाने भाला फेकला, परंतु दावीदाने त्याला दोनदा चुकविले. \p \v 12 शौलाला दावीदाची भीती वाटत होती, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते परंतु शौलाला याहवेहने सोडले होते. \v 13 तेव्हा शौलाने दावीदाला आपल्या पुढून घालवून दिले व हजारांचा सेनापती म्हणून नेमले आणि दावीदाने त्या सैनिकांचे युद्धात नेतृत्व केले. \v 14 प्रत्येक कामात दावीद यशस्वी होत असे, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते. \v 15 दावीद किती यशस्वी होतो हे जेव्हा शौलाने पाहिले, तेव्हा त्याला दावीदाची अधिक भीती वाटू लागले. \v 16 परंतु सर्व इस्राएली व यहूदीयाचे लोक दावीदावर प्रीती करीत होते. कारण तो त्यांचे युद्धात नेतृत्व करीत असे. \p \v 17 एके दिवशी शौल दावीदास म्हणाला, “माझी थोरली कन्या मेरब तुला मी पत्नी म्हणून देईन, केवळ शौर्याने माझी सेवा कर व याहवेहच्या लढाया लढ.” कारण शौल स्वतःशी म्हणाला, “मी दावीदावर हात टाकणार नाही, पलिष्ट्यांनी ते करावे.” \p \v 18 परंतु दावीद शौलाला म्हणाला, “राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे, माझे कुटुंब काय आहे किंवा इस्राएलातील माझे कूळ काय आहे?” \v 19 तरीही जेव्हा शौलाची कन्या मेरबचा विवाह दावीदाशी होण्याची प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा तिचा विवाह महोलाथी अद्रीएल याच्याबरोबर झाला. \p \v 20 या दरम्यान शौलाची कन्या मीखल हिचे दावीदावर प्रेम जडले, हे ऐकून शौलाला आनंद झाला. \v 21 त्याने विचार केला, “मी तिला दावीदाला देईन, अशासाठी की ती त्याला पाश अशी होईल व पलिष्ट्यांचा हात त्याच्याविरुद्ध येईल.” तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझा जावई होण्यासाठी तुला अजून एक संधी आहे.” \p \v 22 तेव्हा शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली: “दावीदाशी गुप्तपणे बोलून सांगा की राजाला तू आवडतोस आणि त्याच्या सर्व सेवकांची तुझ्यावर प्रीती आहे; म्हणून राजाचा जावई हो.” \p \v 23 हे शब्द शौलाच्या सेवकांनी दावीदाला सांगितले. परंतु दावीद म्हणाला, “मी केवळ एक गरीब व अप्रसिद्ध मनुष्य आहे, राजाचा जावई होणे तुम्हाला फार हलकी गोष्ट वाटते काय?” \p \v 24 दावीद जे काही म्हणाला ते शौलाच्या सेवकांनी जेव्हा शौलाला कळविले, \v 25 शौलाने उत्तर दिले, “दावीदाला सांगा राजाला हुंडा म्हणून काही नको, मात्र राजाच्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून शंभर पलिष्ट्यांची अग्रत्वचा पाहिजे.” दावीद पलिष्ट्यांच्या हाती मरून जावा यासाठी ही शौलाची योजना होती. \p \v 26 सेवकांनी ज्यावेळी या गोष्टी दावीदाला सांगितल्या, तो राजाचा जावई होण्यास आनंदाने तयार झाला, ठरविलेल्या वेळे आधी \v 27 दावीदाने आपली माणसे आपल्याबरोबर घेतली व जाऊन दोनशे पलिष्ट्यांना मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणल्या, दावीद राजाचा जावई व्हावा म्हणून त्यांनी त्या मोजल्या. मग शौलाने आपली कन्या मीखल दावीदाला त्याची पत्नी म्हणून दिली. \p \v 28 जेव्हा शौलाला लक्षात आले की याहवेह दावीदाबरोबर होते आणि त्याची कन्या मीखल हिची दावीदावर प्रीती होती, \v 29 तेव्हा शौलाला दावीदाचे अधिकच भय वाटू लागले व तो त्याच्या आयुष्यभर दावीदाचा वैरी म्हणून राहिला. \p \v 30 पलिष्ट्यांच्या सरदारांनी बाहेर जाऊन युद्ध सुरूच ठेवले आणि जेव्हा ते असे करीत, त्या त्यावेळी शौलाच्या बाकीच्या सैन्यापेक्षा दावीदाला अधिक यश मिळे, आणि तो प्रसिद्ध होत गेला. \c 19 \s1 शौल दावीदाचा वध करावयास पाहतो \p \v 1 शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे \v 2 म्हणून त्याने दावीदाला सावध केले, “माझा पिता शौल तुला मारण्याची संधी शोधत आहे. तर उद्या सकाळपर्यंत तू सावध राहा; गुप्त ठिकाणी जा व तिथेच लपून राहा. \v 3 तू जिथे आहेस तिथे बाहेर मैदानात माझ्या पित्याबरोबर मी उभा राहीन; त्याच्याशी मी तुझ्याविषयी बोलेन आणि जे मला समजेल ते मी तुला कळवेन.” \p \v 4 योनाथान त्याचा पिता शौल याच्याशी दावीदाबद्दल चांगले बोलत म्हणाला, “राजाने त्यांचा सेवक दावीद याचे काही वाईट करू नये; त्याने तुमचे काही वाईट केले नाही आणि त्याने जे काही केले त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा झाला आहे. \v 5 त्याने त्याचा जीव मुठीत घेऊन त्या पलिष्ट्याला मारले. याहवेहने सर्व इस्राएलसाठी मोठा विजय मिळवून दिला आणि तुम्हाला ते पाहून आनंद झाला होता. तर मग दावीदासारख्या निर्दोष व्यक्तीला विनाकारण मारून तुम्ही पाप का करावे?” \p \v 6 शौलाने योनाथानचे बोलणे ऐकले आणि शपथ घेतली: “खचितच जिवंत याहवेहची शपथ, दावीदाला जिवे मारले जाणार नाही.” \p \v 7 तेव्हा योनाथानने दावीदाला बोलाविले आणि झालेले सर्व संभाषण त्याला सांगितले. त्याने त्याला शौलाकडे नेले आणि नेहमीप्रमाणे दावीद शौलापुढे राहिला. \p \v 8 त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आणि दावीद जाऊन पलिष्ट्यांशी लढला, त्याने त्यांना असे मारले की ते त्याच्यापुढून पळून गेले. \p \v 9 परंतु शौल आपल्या घरी हातात भाला घेऊन बसला असता दावीद त्याच्यापुढे वीणा वाजवित होता, तेव्हा याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर आला, \v 10 शौलाने दावीदाला आपल्या भाल्याने भिंतीशी खिळण्याचा प्रयत्न केला, परंतु दावीद तिथून निसटला आणि भाला भिंतीत शिरला. त्या रात्री दावीद निसटला. \p \v 11 शौलाने दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारावे म्हणून माणसे पाठवली. परंतु दावीदाची पत्नी मीखल हिने त्याला सावध केले, “जर आज रात्री तू आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नाही तर उद्या सकाळी तू मारला जाशील.” \v 12 तेव्हा मीखलने दावीदाला खिडकीतून खाली उतरविले आणि तो पळून गेला. \v 13 मीखलने एक मूर्ती घेऊन ती पलंगावर ठेवली, उशाकडे शेळीचे केस लावून ते एका वस्त्राने झाकले. \p \v 14 जेव्हा शौलाने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, तेव्हा मीखल म्हणाली, “तो आजारी आहे.” \p \v 15 तेव्हा शौलाने दावीदाला पाहण्यासाठी माणसे परत पाठवली आणि त्यांना सांगितले, “त्याच्या पलंगासहित त्याला घेऊन या म्हणजे मी त्याला ठार मारेन.” \v 16 परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस. \p \v 17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?” \p मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ” \p \v 18 जेव्हा दावीद निसटून पळाला तेव्हा तो रामाह येथे शमुवेलकडे गेला आणि शौलाने त्याच्याशी केले ते सर्वकाही त्यांना सांगितले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले. \v 19 दावीद रामाहतील नायोथ येथे असल्याचे शौलाला कळले; \v 20 तेव्हा त्याने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, परंतु जेव्हा त्यांनी संदेष्ट्यांचा घोळका भविष्यवाणी करीत आणि शमुवेल त्यांचे पुढारी म्हणून तिथे उभे आहेत असे पाहिले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा शौलाच्या माणसांवर आला आणि ते सुद्धा भविष्यवाणी करू लागले. \v 21 जे झाले याविषयी शौलाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजून माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. शौलाने तिसर्‍यांदा माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. \v 22 शेवटी, शौल स्वतः रामाहास निघाला व सेखू येथील मोठ्या विहिरीपर्यंत पोहोचल्यावर, त्याने विचारले, “दावीद व शमुवेल कुठे आहेत?” \p ते म्हणाले, “रामाहतील नायोथ येथे ते गेले आहेत.” \p \v 23 शौल रामाहतील नाइयोथकडे निघाला. परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरही आला आणि नायोथपर्यंत पोहोचेपर्यंत भविष्यवाणी करीत चालत गेला. \v 24 त्याने आपली वस्त्रे काढली आणि शमुवेलपुढे भविष्यवाणी करू लागला. तो संपूर्ण दिवस व ती रात्र शौल उघडा पडला. त्यावरूनच लोक म्हणतात, “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?” \c 20 \s1 दावीद आणि योनाथान \p \v 1 नंतर दावीद रामाहतील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानकडे जाऊन त्याने विचारले, “मी काय केले आहे? माझा अपराध काय आहे? तुझ्या पित्याशी मी काय चुकीचे वागलो आहे की, ते मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत?” \p \v 2 “कधीच नाही!” योनाथानने उत्तर दिले. “तू मरणार नाहीस! माझा पिता कोणतेही काम; लहान किंवा मोठे, ते मला सांगितल्याशिवाय करीत नाही. तर ते माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवतील? हे खरे आहे ना!” \p \v 3 परंतु दावीदाने शपथ घेतली आणि म्हणाला, “तुझ्या पित्याला चांगलेच माहीत आहे की, मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे आणि ते स्वतःशी म्हणाले आहेत, ‘योनाथानला हे माहीत होऊ नये नाहीतर तो दुःखी होईल.’ तरीपण जिवंत याहवेहची व तुझ्या जिवाची शपथ की, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर आहे.” \p \v 4 योनाथान दावीदाला म्हणाला, “तुला वाटेल, ते मी तुझ्यासाठी करेन.” \p \v 5 तेव्हा दावीद म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे आणि मला राजाबरोबर चंद्रदर्शनाचे भोजन करावयाचे आहे; पण मला जाऊ दे म्हणजे मी परवाच्या संध्याकाळपर्यंत शेतात लपून राहीन. \v 6 जर माझी अनुपस्थिती तुझ्या पित्याला जाणवली, तर त्यांना सांग, ‘दावीदाला त्याच्या गावाकडे, बेथलेहेमकडे तातडीने जायचे होते, कारण त्याच्या संपूर्ण कुळासाठी वार्षिक यज्ञ आहे.’ \v 7 जर ते म्हणाले, ‘ठीक आहे,’ तर तुझा सेवक सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा संयम सुटला तर खात्री करून घे की, मला इजा करण्याचा त्यांचा हेतू आहे. \v 8 तर, तुझ्या सेवकावर दया दाखव, कारण तू त्याला याहवेहसमोर तुझ्याशी करार करून घेतले आहेस. जर मी दोषी आहे, तर तू स्वतःच मला मार! तुझ्या पित्याच्या हाती मला का स्वाधीन करावे?” \p \v 9 “कधीच नाही!” योनाथान म्हणाला. “जर मला थोडीतरी कल्पना असती की, माझ्या पित्याने तुला इजा करावयाचे योजले आहे, तर मी तुला सांगणार नाही काय?” \p \v 10 दावीदाने योनाथानाला विचारले, “जर तुझ्या पित्याने तुला कठोर उत्तर दिले तर मला कोण सांगणार?” \p \v 11 योनाथान दावीदाला म्हणाला, “चल, आपण बाहेर मैदानात जाऊ.” तेव्हा ते मिळून तिकडे गेले. \p \v 12 नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांची मी शपथ घेतो की, परवा या सुमाराला मी खात्रीने माझ्या पित्याचे मनोगत समजून घेईन, जर तुझ्या हिताचे काही असले तर ते मी तुला कळविणार नाही काय? \v 13 परंतु जर तुला इजा करावी असा माझ्या पित्याचा हेतू असला आणि जर त्याविषयी मी तुला कळवले नाही आणि तुला शांतीने पाठवले नाही, तर याहवेह योनाथानशी असेच किंवा त्याहून अधिक कठोरपणे वागो. याहवेह जसे माझ्या पित्याबरोबर आहेत तसेच तुझ्याबरोबरही असोत. \v 14 आणि जशी याहवेहची अटळ दया तशी मी जिवंत असेपर्यंत माझ्यावर असू दे, म्हणजे मी मरणार नाही, \v 15 एवढेच नाही तर, याहवेहने दावीदाच्या प्रत्येक शत्रूंना पृथ्वीच्या पाठीवरून काढून टाकले तरीसुद्धा माझ्या कुटुंबावरील तुझी दया कधीही काढू नकोस.” \p \v 16 तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, “आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो.” \v 17 आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली. \p \v 18 नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे. तुझी अनुपस्थिती जाणवेल, कारण तुझे आसन रिकामे असणार. \v 19 परवाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तू त्या ठिकाणी जाऊन लप, जिथे आधी हा त्रास सुरू झाला तेव्हा लपला होता आणि एझेल दगडाकडे वाट पाहा. \v 20 मी निशाणा साधित आहे असे दाखवित त्या दगडाच्या दिशेने तीन बाण मारेन. \v 21 नंतर मी एका मुलाला पाठवेन आणि सांगेन, ‘जा, बाणांचा शोध कर.’ जर मी त्याला म्हटले, ‘पाहा, बाण तुझ्या अलीकडच्या बाजूला आहेत; ते इकडे घेऊन ये,’ तेव्हा तू ये, कारण खचितच जिवंत याहवेहची शपथ, तू सुरक्षित आहेस; तुला धोका नाही.” \v 22 पण जर मी त्या मुलाला म्हटले, “पाहा, बाण तुझ्या पलीकडे आहेत, तेव्हा तू निघून जा, कारण याहवेह तुला दूर पाठवित आहेत. \v 23 आणि ज्या विषयाबद्दल तू आणि मी चर्चा केली आहे, ते लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये याहवेह सर्वकाळ साक्षी आहे.” \p \v 24 तेव्हा दावीद शेतात जाऊन लपला आणि चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसले. \v 25 राजा नेहमीप्रमाणे आसनावर योनाथानच्या समोरच्या भिंतीजवळ बसले होते आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाचे आसन रिकामेच होते. \v 26 शौल त्या दिवशी काही बोलले नाही, कारण त्यांना वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.” \v 27 परंतु दुसर्‍या दिवशी, त्या महिन्याच्या दुसर्‍या दिवशी दावीदाचे स्थान पुन्हा रिकामे होते. तेव्हा शौलाने त्यांचा पुत्र योनाथान याला विचारले, “इशायाचा पुत्र काल आणि आजही भोजनास का आला नाही?” \p \v 28 योनाथानने शौलास उत्तर दिले, “दावीदाने बेथलेहेमला जाण्यासाठी मला आग्रहाने परवानगी मागितली. \v 29 तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, कारण माझे घराणे नगरामध्ये यज्ञ करीत आहेत आणि मी तिथे असावे असा माझ्या भावाने हुकूम केला आहे. जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली, तर मला माझ्या भावांना भेटण्यासाठी जाऊ दे.’ त्यामुळे तो राजाच्या मेजवानीस आला नाही.” \p \v 30 शौलाचा राग योनाथानवर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “भ्रष्ट आणि फितुरी स्त्रीच्या मुला! तू तुझ्या स्वतःची व जिने तुला जन्म दिला त्या तुझ्या आईची बेअब्रू करून त्या इशायच्या पुत्राच्या बाजूने आहेस हे मला माहीत नाही काय? \v 31 जोपर्यंत इशायाचा पुत्र या पृथ्वीवर जिवंत आहे, तोपर्यंत तू किंवा तुझे राज्य स्थापित होणार नाही. आताच कोणाला तरी त्याच्याकडे पाठवून त्याला माझ्याकडे घेऊन ये, कारण त्याने अवश्य मरावे!” \p \v 32 योनाथानने आपला पिता शौल याला विचारले, “त्याला मारून टाकावे असे त्याने काय केले आहे?” \v 33 परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे. \p \v 34 योनाथान रागाने संतप्त होऊन मेजावरून उठला; चंद्रदर्शन सणाच्या दुसर्‍या दिवशी त्याने भोजन केले नाही; कारण दावीदाप्रित्यर्थ आपल्या पित्याची लज्जास्पद वागणूक पाहून त्याला फार वाईट वाटले. \p \v 35 सकाळी योनाथान एका लहान मुलाला घेऊन दावीदाची भेट घेण्यासाठी शेतात गेला. \v 36 आणि तो त्या मुलाला म्हणाला, “मी बाण मारतो, तू पळत जाऊन ते बाण शोध.” तो मुलगा पळू लागला, तेव्हा योनाथानने त्याच्या पलीकडे बाण मारला. \v 37 जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?” \v 38 तेव्हा योनाथान ओरडला, “घाई कर. लवकर जा! थांबू नकोस!” त्या मुलाने बाण उचलला आणि त्याच्या धन्याकडे परतला. \v 39 (त्या मुलाला या सर्व गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते; फक्त योनाथान आणि दावीद यांनाच ते माहीत होते.) \v 40 नंतर योनाथानने आपली शस्त्रे त्या मुलाकडे देत म्हटले, “जा, हे घेऊन परत नगराकडे जा.” \p \v 41 तो मुलगा निघून गेल्यानंतर, दावीद त्या दगडाच्या दक्षिण बाजूने उठला आणि योनाथानसमोर भूमीवर उपडे पडून तीन वेळेस नमन केले. नंतर त्या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले आणि एकत्र रडले—परंतु दावीद अधिक रडला. \p \v 42 योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा, कारण याहवेहच्या नावाने आपण एकमेकांशी मैत्रीची शपथ घेतली आहे, आपण असे म्हटले आहे, ‘तुझ्या आणि माझ्यामध्ये आणि तुझे वंशज आणि माझे वंशज यामध्ये याहवेह साक्षी आहेत.’ ” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि योनाथान नगराकडे परत गेला. \c 21 \s1 नोब येथे दावीद \p \v 1 दावीद नोब येथे अहीमेलेख याजकाकडे गेला. अहीमेलेख भीतीने कापत दावीदाला भेटला आणि विचारले, “तू एकटाच का आहेस? तुझ्याबरोबर कोणीच का नाही?” \p \v 2 दावीदाने अहीमेलेख याजकाला उत्तर दिले, “राजाने मला एका कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले, ‘ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे त्याबद्दल कोणालाही माहीत होऊ नये.’ आणि माझ्या माणसांनी मला मी एका ठराविक ठिकाणी भेटावे असे मी त्यांना सांगितले आहे. \v 3 तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.” \p \v 4 परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.” \p \v 5 दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!” \v 6 तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे. \p \v 7 त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता. \p \v 8 दावीदाने अहीमेलेखास विचारले, “येथे तुझ्याकडे एखादा भाला किंवा तलवार आहे काय? कारण राजाची कामगिरी इतकी तातडीची होती, मी माझी तलवार किंवा दुसरे कोणतेही शस्त्र आणलेले नाही.” \p \v 9 याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्‍यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” \p दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.” \s1 गथ येथे दावीद \p \v 10 त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला. \v 11 परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: \q1 “शौलाने हजारांना वधले, \q2 आणि दावीदाने दहा हजार वधले?” \p \v 12 हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली. \v 13 म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला. \p \v 14 आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले? \v 15 माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?” \c 22 \s1 अदुल्लाम आणि मिस्पाह येथे दावीद \p \v 1 दावीदाने गथ सोडले आणि पळून जाऊन अदुल्लाम येथील गुहेकडे गेला. जेव्हा त्याच्या भावांनी आणि त्याच्या पित्याच्या घराण्यातील लोकांनी याबद्दल ऐकले तेव्हा ते त्याच्याकडे गेले. \v 2 जे सर्व निराशेत किंवा कर्जात किंवा असमाधानी होते ते त्याच्याभोवती गोळा झाले आणि दावीद त्यांचा सेनापती झाला. सुमारे चारशे लोक त्याच्याबरोबर होते. \p \v 3 तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?” \v 4 तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले. \p \v 5 परंतु गाद संदेष्टा दावीदाला म्हणाला, “गडांमध्ये राहू नकोस; यहूदीयाच्या प्रदेशामध्ये जा.” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि हेरेथ नावाच्या जंगलात गेला. \s1 शौल नोब येथील याजकाचा वध करतो \p \v 6 आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या\f + \fr 22:6 \fr*\ft इब्री भाषेत \ft*\fqa एशेल झाड\fqa*\f* झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले. \v 7 शौल त्यांना म्हणाला, “बिन्यामीन पुरुषांनो, ऐका! इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते आणि द्राक्षमळे देणार काय? तो तुम्हाला हजारांचे किंवा शंभरांचे सेनापती करणार काय? \v 8 याच कारणामुळे तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे काय? माझ्या पुत्राने इशायच्या पुत्राबरोबर करार केला तेव्हा कोणीही मला सांगितले नाही. तुमच्यापैकी कोणालाही माझी काळजी नाही किंवा जसे आज केले तसे माझ्याच मुलाने माझ्या सेवकाला माझ्यासाठी दबा धरून बसविले आहे याविषयी कोणी मला सांगितले नाही.” \p \v 9 परंतु शौलाच्या अधिकार्‍यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले. \v 10 अहीमेलेखने त्याच्यासाठी याहवेहकडे चौकशी केली; त्याने त्याला काही अन्नसामुग्री व पलिष्टी गल्याथाची तलवार सुद्धा दिली.” \p \v 11 तेव्हा राजाने अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याजक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष, जे नोब येथे याजक होते यांना बोलाविणे पाठविले आणि ते सर्व राजाकडे आले. \v 12 शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.” \p तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.” \p \v 13 शौल त्याला म्हणाला, “तू माझ्याविरुद्ध कट का केलास, तू इशायच्या पुत्राला भाकर आणि तलवार देऊन त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली, ज्यामुळे त्याने माझ्याविरुद्ध बंड केले आहे आणि तो आज माझ्यासाठी दबा धरून बसला आहे?” \p \v 14 अहीमेलेखाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या सर्व सेवकांपैकी राजाचा जावई दावीद याच्याइतका विश्वासू असा दुसरा कोण आहे जो तुमच्या अंगरक्षकांचा प्रमुख आणि तुमच्या घराण्यात सर्वाधिक आदरणीय आहे? \v 15 केवळ त्याच दिवशी मी त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली काय? नक्कीच नाही! राजाने आपल्या सेवकावर किंवा त्याच्या पित्याच्या घराण्यातील कोणावरही आरोप करू नये, कारण आपल्या सेवकाला या सर्व प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाही.” \p \v 16 परंतु राजा म्हणाला, “अहीमेलेख, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब, तुम्ही खात्रीने मराल.” \p \v 17 नंतर राजाने त्याच्या बाजूला असलेल्या अंगरक्षकांना हुकूम दिला: “पुढे येऊन याहवेहच्या याजकांना जिवे मारा, कारण ते सुद्धा दावीदाच्या बाजूने आहेत. दावीद माझ्यापासून पळून चालला होता, हे त्यांना माहीत होते, तरी त्यांनी मला सांगितले नाही.” \p परंतु याहवेहच्या याजकांवर हात उगारण्यास अंगरक्षकांची इच्छा नव्हती. \p \v 18 तेव्हा राजाने दवेगला आज्ञा केली, “तू मागे वळ आणि याजकांना मारून टाक.” तेव्हा एदोमी दोएग फिरला आणि त्यांना मारून टाकले. त्या दिवशी तागाचे एफोद वस्त्र घातलेल्या पंचाऐंशी पुरुषांना त्याने मारून टाकले. \v 19 त्याने याजकांचे शहर नोब, यातील पुरुष आणि स्त्रिया, लेकरे आणि तान्ही बालके, आणि तेथील गुरे, गाढवे आणि मेंढरे सुद्धा तलवारीने मारून टाकले. \p \v 20 परंतु अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याचा एक पुत्र अबीयाथार निसटून दावीदाकडे पळून गेला. \v 21 अबीयाथारने दावीदाला सांगितले की, शौलाने याहवेहच्या याजकांना मारून टाकले आहे. \v 22 तेव्हा दावीद अबीयाथारला म्हणाला, “त्या दिवशी, एदोमी दवेग तिथे होता, मला माहीत होते की, तो नक्कीच शौलाला सांगेल. तुझ्या सर्व घराण्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे. \v 23 माझ्याबरोबर राहा; घाबरू नकोस. जो मनुष्य तुला मारण्याचा प्रयत्न करत आहे, तो मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत आहे. तू माझ्याबरोबर सुरक्षित राहशील.” \c 23 \s1 दावीद कईलाहचे रक्षण करतो \p \v 1 जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.” \v 2 तेव्हा त्याने याहवेहला विचारले, “मी तिकडे जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” \p याहवेहने दावीदाला उत्तर दिले, “जा, पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाहला वाचव.” \p \v 3 परंतु दावीदाची माणसे त्याला म्हणाली, “येथे यहूदीयाच्या प्रदेशामध्ये असतानाच आम्हाला भीती वाटते, जर कईलाहकडे जाऊन आम्ही पलिष्ट्यांच्या सैन्याविरुद्ध गेलो तर किती अधिक धोका असेल!” \p \v 4 दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.” \v 5 तेव्हा दावीद आणि त्याची माणसे कईलाहकडे गेली, पलिष्ट्यांशी लढले आणि त्यांची गुरे नेली. त्याने पलिष्टी लोकांचे मोठे नुकसान केले आणि कईलाहच्या लोकांना वाचविले. \v 6 (आता अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार दावीदाकडे कईलाह येथे पळून येताना त्याने आपल्याबरोबर एफोद आणला होता.) \s1 शौल दावीदाचा पाठलाग करतो \p \v 7 शौलाला कोणी सांगितले की, दावीद कईलाह येथे गेला आहे आणि तो म्हणाला, “परमेश्वराने त्याला माझ्या हाती दिले आहे, कारण ज्या नगरास वेशी व भिंती आहेत त्यात जाऊन दावीदाने स्वतःला कैद करून घेतले आहे.” \v 8 तेव्हा कईलाहास जाऊन दावीदाला व त्याच्या माणसांना वेढावे म्हणून शौलाने त्याच्या संपूर्ण सैन्याला युद्धासाठी बोलाविले. \p \v 9 जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.” \v 10 दावीद म्हणाला, “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, शौल माझ्यामुळे या कईलाह नगराचा नाश करण्यास पाहत आहे, असे तुमच्या दासाने नक्की ऐकले आहे. \v 11 कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.” \p आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.” \p \v 12 पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाहचे लोक मला आणि माझ्या माणसांना शौलाच्या स्वाधीन करतील काय?” \p आणि याहवेह म्हणाले, “होय, ते करतील.” \p \v 13 तेव्हा दावीद आणि त्याची सुमारे सहाशे माणसे यांनी कईलाह सोडले आणि ते ठिकठिकाणी फिरत राहिले. जेव्हा शौलाला सांगण्यात आले की, दावीद कईलाहतून निसटून गेला आहे, तो तिकडे गेला नाही. \p \v 14 दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही. \p \v 15 दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले\f + \fr 23:15 \fr*\ft किंवा \ft*\fqa घाबरला होता\fqa*\f* की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे. \v 16 आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले. \v 17 तो म्हणाला, “भिऊ नकोस, माझा पिता शौल तुझ्यावर हात टाकणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील आणि मी तुझा दुय्यम होईन, हे माझा पिता शौलसुद्धा जाणून आहे.” \v 18 तेव्हा त्या दोघांनी याहवेहसमोर एक करार केला. नंतर योनाथान घरी गेला, परंतु दावीद होरेश येथेच राहिला. \p \v 19 जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “होरेशच्या गडांमध्ये, हकीलाहच्या डोंगरात, यशीमोनच्या दक्षिणेकडे दावीद आमच्यामध्ये लपून राहत नाही काय? \v 20 तर आता, महाराज, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा खाली या आणि त्याला तुमच्या हाती देण्याची जबाबदारी आमची असेल.” \p \v 21 शौलाने उत्तर दिले, “तुम्ही माझ्यावर जी दया दाखविली त्यामुळे याहवेह तुमचे कल्याण करो. \v 22 जा आणि अधिक माहिती मिळवा. दावीद नेहमी कुठे जातो आणि त्याला तिकडे कोणी पाहिले, याचा शोध करा. मला समजले की तो फारच धूर्त आहे. \v 23 लपण्यासाठी ज्या ठिकाणांचा तो उपयोग करतो त्यांचा शोध करा आणि निश्चित माहिती घेऊन माझ्याकडे परत या. मग मी तुमच्याबरोबर जाईन; जर तो त्याच भागात असेल, तर यहूदाहच्या सर्व कुळांमधून मी त्याला शोधून काढेन.” \p \v 24 तेव्हा ते बाहेर पडले आणि शौलाच्यापुढे जीफकडे गेले. आता दावीद आणि त्याची माणसे यशीमोनच्या दक्षिणेकडील अराबाह येथे माओनच्या वाळवंटात होती. \v 25 शौल आणि त्याच्या माणसांनी शोध सुरू केला आणि जेव्हा दावीदाला याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो खाली खडकाकडे गेला आणि माओनच्या वाळवंटात राहिला. जेव्हा शौलाने हे ऐकले तेव्हा तो दावीदाचा पाठलाग करीत माओनच्या वाळवंटात गेला. \p \v 26 शौल डोंगराच्या एका बाजूने जात होता तर दावीद आणि त्याची माणसे दुसर्‍या बाजूला होती, शौलापासून दूर जाण्याची ते घाई करत होते. कारण शौल आणि त्याचे सैनिक दावीद व त्याच्या माणसांना पकडण्यास जवळ येत होते, \v 27 एक संदेशवाहक शौलाकडे आला, व म्हणाला, “लवकर या! पलिष्ट्यांनी देशावर हल्ला केला आहे.” \v 28 तेव्हा शौलाने दावीदाचा पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि तो पलिष्ट्यांशी लढण्यास गेला. याच कारणामुळे या ठिकाणाला सेला-हम्माहलेकोथ\f + \fr 23:28 \fr*\fq सेला-हम्माहलेकोथ \fq*\ft अर्थात् \ft*\fqa निसटून जाण्याचा खडक\fqa*\f* असे म्हटले जाते. \v 29 नंतर दावीद तिथून पुढे गेला आणि एन-गेदीच्या गडांमध्ये राहिला. \c 24 \s1 दावीद शौलाला वाचवितो \p \v 1 पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.” \v 2 तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्‍यांच्या खडकाळ भागात गेले. \p \v 3 रस्त्याने फिरत तो मेंढवाड्याच्या जवळ आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशेस गेला, दावीद आणि त्याची माणसेही त्या गुहेत अगदी लांब आतील बाजूस होती. \v 4 दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला. \p \v 5 त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले. \v 6 तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहे.” \v 7 या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला. \p \v 8 नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले. \v 9 तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’? \v 10 आज तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, कशाप्रकारे याहवेहने गुहेमध्ये तुम्हाला माझ्या हाती दिले होते. तुम्हाला मारून टाकावे असे काहीजण म्हणाले, परंतु मी तुम्हाला सोडले; मी म्हणालो, ‘मी माझ्या धन्यावर हात टाकणार नाही, कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.’ \v 11 पाहा, माझ्या पित्या, तुमच्या झग्याचा तुकडा माझ्या हातात आहे तो पाहा! मी तुमच्या झग्याचा काठ कापून घेतला परंतु तुम्हाला मारून टाकले नाही. यावरून माझ्याकडे दुष्ट किंवा फितुरी असल्याचा दोष नाही. मी तुमच्याशी चुकीचे वागलो नाही, तरीही तुम्ही माझ्या जिवाची शिकार करण्यास टपला आहात. \v 12 याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही. \v 13 जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही. \p \v 14 “इस्राएलचा राजा कोणाविरुद्ध बाहेर आला आहे? तुम्ही कोणाचा पाठलाग करीत आहात? एका मेलेल्या कुत्र्याचा? एखाद्या पिसवाचा? \v 15 याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.” \p \v 16 जेव्हा दावीदाने त्याचे हे बोलणे संपविले तेव्हा शौलाने विचारले, “दावीदा, माझ्या पुत्रा, हा तुझाच आवाज आहे काय?” आणि शौल मोठ्याने रडला, \v 17 तो दावीदाला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहेस, तू माझ्याशी सदाचाराने वागलास, परंतु मी तुझ्याशी वाईट वागलो. \v 18 तू माझ्याशी चांगले वागतोस ते तू आताच मला दाखवून दिले आहेस; याहवेहने मला तुझ्या हाती दिले होते, परंतु तू मला मारून टाकले नाहीस. \v 19 कोणा मनुष्याला त्याचा शत्रू सापडला तेव्हा त्याला इजा केल्याशिवाय जाऊ देईल काय? ज्याप्रकारे तू आज माझ्याशी वागलास त्याचे चांगले प्रतिफळ याहवेह तुला देवो. \v 20 मला माहीत आहे की, तू खरोखर राजा होशील आणि इस्राएलचे राज्य तुझ्या हातात स्थापित होईल. \v 21 तेव्हा आता मला याहवेहची शपथ घेऊन सांग की, माझ्या वंशजांचा तू नाश करणार नाहीस किंवा माझ्या पित्याच्या घराण्यातून माझे नाव पुसून टाकणार नाहीस.” \p \v 22 तेव्हा दावीदाने शौलास शपथेने वचन दिले; नंतर शौल घरी गेला, परंतु दावीद आणि त्याची माणसे गडाकडे गेली. \c 25 \s1 दावीद, नाबाल आणि अबीगईल \p \v 1 शमुवेल मरण पावले तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्यांच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्यांना रामाह येथील त्यांच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या\f + \fr 25:1 \fr*\ft काही मूळ प्रतींमध्ये \ft*\fqa माओन\fqa*\f* वाळवंटात गेला. \p \v 2 माओन येथे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्याची कर्मेलमध्ये मालमत्ता होती, त्याच्याकडे एक हजार बोकडे आणि तीन हजार मेंढरे होते आणि तो कर्मेलमध्ये लोकर कातरत होता. \v 3 त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती तो कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता. \p \v 4 आणि नाबाल मेंढरांची कातरणी करीत आहे असे दावीदाने रानात ऐकले. \v 5 तेव्हा दावीदाने दहा तरुण पुरुष पाठवित म्हटले, “कर्मेल येथे नाबालकडे जा आणि माझ्या नावाने त्याला अभिवादन करा. \v 6 त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो! \p \v 7 “ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही. \v 8 आपल्या चाकरांना ते विचार आणि ते तुला सांगतील. म्हणून आता माझ्या माणसांवर कृपादृष्टी कर, कारण आम्ही सणाच्या वेळेस आलो आहोत, तर कृपा करून जे काही तुझ्या हाती येईल ते तुझ्या सेवकांना आणि तुझा पुत्र दावीद यांना दे.’ ” \p \v 9 जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले. \p \v 10 नाबालने दावीदाच्या सेवकांना उत्तर दिले, “कोण हा दावीद? कोण हा इशायाचा पुत्र? आजकाल पुष्कळ सेवक त्यांच्या मालकांपासून पळून जात आहेत. \v 11 जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?” \p \v 12 तेव्हा दावीदाची माणसे परत त्यांच्या वाटेने गेली. आणि पोहोचल्यावर प्रत्येक शब्दाचा अहवाल दावीदाला दिला. \v 13 तेव्हा दावीद त्याच्या माणसांना म्हणाला, “प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधा,” आणि त्यांनी तसे केले आणि दावीदानेसुद्धा त्याची तलवार कंबरेस बांधली. सुमारे चारशे पुरुष दावीदाबरोबर गेले आणि दोनशे पुरुष सामानाजवळ राहिले. \p \v 14 चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्याने त्यांचा अपमान केला. \v 15 तरीही ही माणसे आमच्याबरोबर चांगलीच होती. ते आमच्याशी वाईट वागले नाहीत आणि संपूर्ण वेळ आम्ही शेतामध्ये त्यांच्याजवळ होतो तेव्हा आमचे काहीही हरवले नाही. \v 16 जेव्हा आम्ही आमची मेंढरे त्यांच्याबरोबर राखीत होतो, तेव्हा रात्रंदिवस ते भिंतीसारखे आमच्या सभोवती होते. \v 17 आता काय करावे याचा तू विचार कर, कारण आमच्या मालकावर आणि त्याच्या संपूर्ण घराण्यावर संकट येत आहे. तो इतका दुष्ट मनुष्य आहे की, त्याच्याबरोबर बोलण्यास कोणी धजत नाही.” \p \v 18 तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह\f + \fr 25:18 \fr*\ft अंदाजे 27 कि.ग्रॅ.\ft*\f* भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले. \v 19 आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही. \p \v 20 ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या बाजूने येत होती व ती त्यांना भेटली. \v 21 दावीद नुकताच म्हणाला होता, “त्याचे काही हरवू नये म्हणून मी रानात या लोकांच्या मालमत्तेवर पहारा ठेवला ते व्यर्थ गेले. त्याने मला चांगल्याची फेड वाईटाने केली आहे. \v 22 उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!” \p \v 23 जेव्हा अबीगईलने दावीदाला पाहिले, तेव्हा ती घाईने गाढवावरून उतरली आणि तिने दावीदासमोर तोंड जमिनीकडे करून अभिवादन केले. \v 24 ती त्याच्या पायावर पडली आणि म्हणाली, “माझ्या धन्या, आपल्या सेवकाच्या अपराधांची क्षमा करा, आणि मला तुमच्याशी बोलू द्या; तुमच्या दासीचे बोलणे ऐकून घ्या. \v 25 माझ्या धन्या, तो दुष्ट मनुष्य नाबाल याच्याकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे, त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. परंतु ज्या पुरुषांना माझ्या धन्याने पाठवले त्यांना मी पाहिले नाही.” \v 26 तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो. \v 27 आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो. \p \v 28 “तुमच्या दासीच्या उद्धटपणाची कृपा करून क्षमा कर. याहवेह तुमचा परमेश्वर खचितच माझ्या धन्याचे राजघराणे कायमचे स्थापित करेल, कारण आपण याहवेहच्या लढाया लढत आहात आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठायी दुष्टता आढळणार नाही. \v 29 जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहेल, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील. \v 30 याहवेहने माझ्या धन्यासाठी जे चांगले सांगितले आहे ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर, \v 31 तेव्हा माझ्या धन्याने विनाकारण रक्तपात केल्याविषयी किंवा सूड घेतल्याविषयी तुमच्या मनाला टोचणी लागणार नाही किंवा लटपटणारे ओझे असे असणार नाही. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला यश मिळवून देतील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.” \p \v 32 दावीद अबीगईलला म्हणाला, “ज्यांनी तुला आज माझी भेट घेण्यासाठी पाठवले, ते याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत. \v 33 तुझ्या उत्तम निर्णयामुळे व तू मला आज रक्तपातापासून आणि माझ्या हाताने सूड घेण्यापासून दूर ठेवले त्यामुळे तू आशीर्वादित असो. \v 34 नाहीतर जिवंत याहवेह इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला तुझा नाश करण्यापासून आवरले त्यांची शपथ, जर तू त्वरा करून माझी भेट घेण्यास आली नसतीस तर पहाटेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता.” \p \v 35 नंतर तिने जे काही त्याच्यासाठी आणले होते ते तिच्या हातून दावीदाने स्वीकारले आणि म्हणाला, “शांतीने घरी जा. मी तुझे म्हणणे ऐकले आहे आणि तुझी विनंती मान्य केली आहे.” \p \v 36 जेव्हा अबीगईल नाबालाकडे गेली तेव्हा तो घरात होता, त्याने एका राजासारखी मेजवानी आयोजित केली होती. आणि मद्यपान करून तो फार नशेत होता, म्हणून सकाळ होईपर्यंत तिने त्याला काहीही सांगितले नाही. \v 37 नंतर सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर, त्याच्या पत्नीने त्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या, ते सर्व नाबालाला सांगितले. तेव्हा त्याच्या हृदयाला धक्का बसला आणि तो दगडासारखा झाला. \v 38 सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला. \p \v 39 जेव्हा दावीदाला कळले की, नाबाल मरण पावला आहे, तेव्हा तो म्हणाला, “ज्यांनी माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्यांनी आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरले आहे त्या याहवेहची स्तुती असो. याहवेहने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर आणली आहे.” \p नंतर अबीगईलने त्याची पत्नी व्हावे म्हणून दावीदाने तिच्याकडे संदेश पाठवला. \v 40 त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुझ्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुला त्याची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.” \p \v 41 तिने तिचे मस्तक जमिनीपर्यंत लवून म्हणाली, “मी तुमची दासी आहे मी तुमची सेवा करण्यास व माझ्या धन्याच्या सेवकांचे पाय धुण्यास तयार आहे.” \v 42 अबीगईल त्वरित गाढवावर बसली आणि तिच्या पाच दासी व दावीदाच्या निरोप्यांबरोबर गेली आणि त्याची पत्नी झाली. \v 43 दावीदाने येज्रीलची अहीनोअम हिच्याशीही विवाह केला होता आणि त्या दोघी त्याच्या पत्नी होत्या. \v 44 परंतु शौलाने त्याची कन्या मीखल, जी दावीदाची पत्नी होती तिला लईशाचा पुत्र पालती\f + \fr 25:44 \fr*\ft किंवा \ft*\fqa पलतीएल\fqa*\f* याला दिले होते, जो गल्लीम येथील होता. \c 26 \s1 दावीद शौलाला पुन्हा वाचवितो \p \v 1 जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?” \p \v 2 तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला. \v 3 शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून, \v 4 दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली. \p \v 5 नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता. \p \v 6 तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” \p अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.” \p \v 7 तेव्हा दावीद आणि अबीशाई रात्रीच्या वेळेस सैन्याकडे गेले आणि शौल तिथे छावणीच्या आतमध्ये झोपलेला होता, त्याच्या उशाशी त्याचा भाला जमिनीमध्ये रोवलेला होता. अबनेर आणि सैनिक त्याच्याभोवती झोपलेले होते. \p \v 8 अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्‍यांदा वार करावा लागणार नाही.” \p \v 9 परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?” \v 10 दावीद म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह स्वतः त्याला मारतील, किंवा त्याची वेळ येईल आणि त्याचा मृत्यू होईल, किंवा तो युद्धात जाईल आणि त्याचा नाश होईल. \v 11 परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा असे याहवेह माझ्या हातून घडवून न आणो. तर आता त्याच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण जाऊ या.” \p \v 12 तेव्हा दावीदाने शौलाच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घेतला आणि ते निघून गेले. कोणीही ते पाहिले नाही किंवा कोणाला ते कळले नाही, किंवा कोणी उठले नाही. ते सर्व झोपी गेले होते, कारण याहवेहकडून त्यांना गाढ निद्रा लागली होती. \p \v 13 नंतर दावीद पलीकडे गेला आणि डोंगराच्या उंच टोकावर अंतरावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते. \v 14 दावीदाने सैन्याला आणि नेरचा पुत्र अबनेर यांना मोठ्याने विचारले, “अबनेर, तू मला उत्तर देणार नाहीस काय?” \p अबनेरने उत्तर दिले, “तू कोण आहेस, राजाला कोण हाक मारत आहे?” \p \v 15 दावीद अबनेरास म्हणाला, “तू एक पुरुष आहेस, नाही का? आणि इस्राएलमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? तू तुझा धनी, म्हणजेच राजाचे रक्षण का केले नाहीस? कोणीतरी तुझ्या धनी राजाचा वध करण्यास आला होता. \v 16 तू जे केलेस ते चांगले नाही. जिवंत याहवेहची शपथ, तू आणि तुझी माणसे मेलीच पाहिजेत, कारण तू तुझ्या मालकाचे, याहवेहच्या अभिषिक्ताचे रक्षण केले नाहीस. तुझ्या सभोवती पाहा. राजाचा भाला आणि पाण्याचा चंबू जे त्यांच्या उशाशी होते ते कुठे आहेत?” \p \v 17 शौलाने दावीदाचा आवाज ओळखला आणि म्हणाला, “दावीदा माझ्या मुला, हा तुझाच आवाज आहे काय?” \p दावीदाने उत्तर दिले, “होय, माझ्या धन्या, माझ्या राजा, हा माझाच आवाज आहे.” \v 18 आणि तो पुढे म्हणाला, “माझा धनी आपल्या सेवकाचा पाठलाग का करीत आहे? मी काय केले आहे आणि कोणत्या बाबतीत दोषी आहे? \v 19 तर आता माझ्या धन्याने, राजाने आपल्या सेवकाचे म्हणणे ऐकावे. जर याहवेहने तुम्हाला माझ्याविरुद्ध चेताविले आहे, तर आपण अर्पण स्वीकारावे. परंतु जर लोकांनी हे केले आहे, तर ते याहवेहसमोर शापित केले जावोत! कारण मला आज याहवेहच्या वतनाचा वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर घालवून म्हटले, ‘जा, इतर दैवतांची सेवा कर.’ \v 20 आता याहवेहच्या समक्षतेपासून दूर माझे रक्त भूमीवर पडू नये. जसे कोणी डोंगरामध्ये तीतराची शिकार करावी, तसा इस्राएलचा राजा पिसवा शोधायला बाहेर आला आहे.” \p \v 21 तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. दावीदा, माझ्या पुत्रा, परत ये. कारण आज तू माझ्या जिवास मौल्यवान समजलेस, मी पुन्हा तुला इजा करणार नाही. खरोखरच मी मूर्खासारखा वागलो आणि फार चुकीचे वागलो.” \p \v 22 दावीदाने उत्तर दिले, “हा पाहा, राजाचा भाला, तुमच्या तरुण पुरुषांपैकी एकाने इकडे येऊन तो घेऊन जा. \v 23 याहवेह प्रत्येकाला आपआपल्या नीतिमत्तेची व विश्वासूपणाचे प्रतिफळ देवो. याहवेहने आज तुम्हाला माझ्या हाती दिले होते, परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकणार नाही. \v 24 जसा आज तुमचा जीव मला मोलाचा वाटला, तसेच याहवेहला माझाही जीव मोलाचा वाटो आणि ते सर्व संकटांपासून मला वाचवो.” \p \v 25 तेव्हा शौल दावीदास म्हणाला, “दावीदा, माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील; तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील.” \p तेव्हा दावीद त्याच्या मार्गाने निघून गेला आणि शौल घरी परतला. \c 27 \s1 दावीद पलिष्ट्यांमध्ये जातो \p \v 1 परंतु दावीदाने आपल्या मनात म्हटले, “कधी तरी मी शौलाच्या हातून मरणारच आहे. पलिष्ट्यांच्या देशात पळून जाणे उत्तम आहे. मग शौल इस्राएलमध्ये माझा शोध करण्याचे सोडून देईल आणि मी त्याच्या हातातून निसटून जाईन.” \p \v 2 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले. \v 3 दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या. \v 4 जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही. \p \v 5 नंतर दावीद आखीश राजास म्हणाला, “जर आपल्या दृष्टीत मी कृपा पावत असलो तर, मला देशातील एका गावात जागा द्या म्हणजे मी तिथे राहीन. आपल्या सेवकाने या राजकीय शहरात तुमच्याबरोबर का राहावे?” \p \v 6 म्हणून आखीशने त्या दिवशी त्याला सिकलाग हे शहर दिले. आणि तेव्हापासून ते यहूदीयाच्या राजांचे आहे. \v 7 दावीद पलिष्ट्यांच्या हद्दीमध्ये एक वर्ष चार महिने राहिला. \p \v 8 नंतर दावीद आणि त्याच्या माणसांनी गशूरी, गिरजी आणि अमालेकी या लोकांवर छापा टाकला. (पुरातन काळापासून हे लोक शूर शहरापासून इजिप्तपर्यंत वाढत गेलेल्या प्रदेशात राहत होते.) \v 9 जेव्हा दावीद कोणत्याही प्रांतावर हल्ला करीत असे तो एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत सोडत नसे, परंतु तेथील मेंढरे, गुरे, गाढवे व उंट आणि वस्त्रे यांची लूट घेत असे. नंतर तो आखीशकडे परत आला. \p \v 10 जेव्हा आखीशने विचारले, “आज तुम्ही कोणत्या प्रांतावर स्वारी केली?” दावीद त्याला उत्तर देत असे, “यहूदीयाच्या नेगेव विरुद्ध” किंवा “यरहमेल्यांच्या नेगेव विरुद्ध” किंवा “केनीयांच्या नेगेव विरुद्ध.” \v 11 त्याने गथ येथे आणण्यासाठी एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नव्हते, कारण त्याला वाटले, “ते आमच्याबद्दल सांगतील आणि म्हणतील, ‘दावीदाने असे केले आहे.’ ” आणि जोपर्यंत तो पलिष्ट्यांच्या सीमेत राहिला तोपर्यंत तो असेच करीत असे. \v 12 आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, “तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील.” \c 28 \p \v 1 त्या दिवसांमध्ये इस्राएलविरुद्ध युद्ध करावे म्हणून पलिष्ट्यांनी त्यांचे सैन्य एकत्र केले. आखीश दावीदाला म्हणाला, “तू हे खचित समज की, तू आणि तुझी माणसे माझ्याबरोबर सैन्यात येतील.” \p \v 2 दावीद म्हणाला, “तर आपला दास काय करू शकतो, हे आपण पाहाल.” \p आखीशने उत्तर दिले, “फार चांगले, मी तुला आयुष्यभर माझा अंगरक्षक करेन.” \s1 एनदोर येथे शौल आणि चेटकीण\f + \fr 28:3 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa अशी व्यक्ती जी मृत व्यक्तीच्या आत्म्याला बोलाविते\fqa*\f* \p \v 3 शमुवेल तर मरण पावले होते आणि सर्व इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शोक केला होता आणि त्यांना त्यांच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते. \p \v 4 पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली. \v 5 जेव्हा शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले, तेव्हा तो घाबरला; त्याचे हृदय भीतीने भरून गेले. \v 6 शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही. \v 7 तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, “माझ्यासाठी एक स्वामिनी शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाईन आणि तिला विचारेन.” \p ते म्हणाले, “एक स्त्री एनदोर येथे आहे.” \p \v 8 तेव्हा शौलाने आपला वेश बदलून वेगळे कपडे घातले आणि दोन माणसे घेऊन रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीकडे गेला. आणि म्हणाला, “माझ्यासाठी एक आत्म्याला विचार आणि मी ज्याचे नाव सांगतो त्याला माझ्यासाठी वर आण.” \p \v 9 परंतु ती स्त्री त्याला म्हणाली, “तुला नक्कीच माहीत आहे की, शौलाने काय केले आहे. चेटकीण आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांना त्याने या देशातून घालवून टाकले आहे. मी मरावे म्हणून माझ्या जिवासाठी तू सापळा का टाकतोस?” \p \v 10 शौलाने तिला याहवेहची शपथ घातली, “जिवंत याहवेहची शपथ, यासाठी तुला शिक्षा होणार नाही.” \p \v 11 तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू?” \p तो म्हणाला, “शमुवेलला वर आण.” \p \v 12 जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!” \p \v 13 शौल राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” \p ती स्त्री म्हणाली, “जमिनीतून एक भुतासारखी आकृती\f + \fr 28:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa आत्मे \fqa*\ft किंवा \ft*\fqa दैवते\fqa*\f* वर येताना दिसत आहे.” \p \v 14 “तो कसा दिसतो?” त्याने विचारले. \p “झगा घातलेला एक वृद्ध पुरुष वर येत आहे,” ती म्हणाली. \p तेव्हा शौलाने ओळखले की तो शमुवेल होता आणि त्याने स्वतः त्याचे तोंड खाली जमिनीकडे करून दंडवत घातले. \p \v 15 शमुवेल शौलास म्हणाला, “मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?” \p शौलाने उत्तर दिले, “मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे.” \p \v 16 शमुवेल म्हणाला, “याहवेहने तुला सोडले आहे आणि ते तुझा शत्रू झाले आहे, तर तू माझा सल्ला का घ्यावा? \v 17 याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्‍यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे. \v 18 कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही किंवा अमालेकी लोकांविरुद्ध याहवेहचा क्रोध उगारला नाही, म्हणून याहवेहने आज हे तुझ्यासाठी केले आहे. \v 19 याहवेह इस्राएली लोकांना आणि तुला पलिष्ट्यांच्या हाती देणार आहे आणि उद्या तू आणि तुझी मुले माझ्याबरोबर असतील. आणि याहवेह इस्राएलच्या सैन्याला पलिष्ट्यांच्या देईल.” \p \v 20 शौल लगेच तसाच जमिनीवर पडला, शमुवेलने सांगितलेल्या शब्दांमुळे तो फार भयभीत झाला. त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण त्याने दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्ले नव्हते. \p \v 21 जेव्हा ती स्त्री शौलाकडे आली आणि तिने पाहिले की तो फारच हादरून गेला होता, ती म्हणाली, “पाहा, तुझ्या दासीने तुमचा शब्द मानला आणि माझा जीव मुठीत घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले. \v 22 तर आता माझा शब्द माना, मी तुम्हाला थोडे अन्न वाढते ते खा म्हणजे आपल्या वाटेने जाण्यास तुम्हाला शक्ती असावी.” \p \v 23 तो ते नाकारत म्हणाला, “मी खाणार नाही.” \p परंतु त्याच्या माणसांनीही त्या स्त्रीबरोबर त्याला आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे मानले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला. \p \v 24 त्या स्त्रीच्या घरी एक लठ्ठ वासरू होते, ते तिने लवकर कापले. तिने थोडेसे पीठ घेतले, ते मळले आणि खमीर न घालता भाकरी भाजल्या. \v 25 नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले. \c 29 \s1 आखीश दावीदाला सिकलाग येथे परत पाठवितो \p \v 1 पलिष्ट्यांनी त्यांचे सर्व सैन्य अफेक येथे जमविले आणि इस्राएली सैन्याने त्यांची छावणी येज्रीलच्या झर्‍याजवळ दिली. \v 2 पलिष्टी सरदार आपआपल्या शंभराच्या आणि हजारांच्या तुकड्यांबरोबर निघाले आणि त्यांच्यामागे दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर चालू लागले. \v 3 तेव्हा पलिष्ट्यांच्या सेनाधिकार्‍यांनी विचारले, “या इब्री लोकांचे येथे काय काम?” \p आखीशने उत्तर दिले, “हा दावीद नाही काय, जो इस्राएलचा राजा शौल याच्याकडे अधिकारी होता? तो आता एक वर्षाहून अधिक काळ माझ्याबरोबर आहे, आणि त्याने शौलाला सोडले तेव्हापासून आजपर्यंत, मला त्याच्यामध्ये काही दोष सापडला नाही.” \p \v 4 परंतु पलिष्ट्यांचे सेनापती आखीशवर रागावले होते आणि ते म्हणाले, “त्या मनुष्याला परत पाठवून दे, म्हणजे जे ठिकाण तू त्याला दिले आहेस तिथे त्याने परत जावे. त्याने आपल्याबरोबर लढाईमध्ये जाऊ नये, नाहीतर लढाई होत असताना तो आपल्याविरुद्ध लढेल. आपल्याच लोकांचे डोके कापण्यापेक्षा, त्याच्या धन्याची कृपा मिळविणे हे किती चांगले असेल? \v 5 हाच तो दावीद नाही काय, ज्याच्याविषयी नृत्य करताना त्यांनी गाईले: \q1 “ ‘शौलाने त्याच्या हजारांना मारले, \q2 आणि दावीदाने त्याच्या दहा हजारांना मारले?’ ” \p \v 6 तेव्हा आखीशने दावीदाला बोलावून म्हटले, “जिवंत याहवेहची शपथ, तू विश्वसनीय आहेस आणि सैन्यामध्ये तू माझ्याबरोबर सेवा करावी यात मला आनंद आहे. ज्या दिवशी तू माझ्याकडे आलास तेव्हापासून आजपर्यंत मला तुझ्यामध्ये काही दोष सापडला नाही, परंतु सरदार तुला अनुमती देत नाहीत. \v 7 आता तू मागे वळ आणि शांतीने जा; पलिष्टी सरदारांना असंतुष्ट वाटेल असे काहीही करू नकोस.” \p \v 8 दावीदाने आखीशला विचारले, “परंतु मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या दासामध्ये काही दोष आढळला आहे काय? माझ्या राजाच्या, मी जाऊन स्वामीच्या शत्रूशी का लढू नये?” \p \v 9 आखीशने दावीदाला उत्तर दिले, “मला माहीत आहे तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा आहेस; परंतु पलिष्टी सेनापती म्हणतात, ‘त्याने आमच्याबरोबर युद्धास जाऊ नये.’ \v 10 तर सकाळी लवकर ऊठ आणि तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत, त्यांच्याबरोबर पहाट होताच निघून जा.” \p \v 11 तेव्हा दावीद आणि त्याची माणसे पहाटेच उठून पलिष्ट्यांच्या प्रदेशाकडे जाण्यासाठी निघाली आणि पलिष्टी सैन्य येज्रीलपर्यंत गेले. \c 30 \s1 दावीद अमालेक्यांचा नाश करतो \p \v 1 तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते, \v 2 आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते. \p \v 3 जेव्हा दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसून आले की, त्या शहराचा अग्नीने नाश झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले व मुली कैद करून नेलेली आहेत. \v 4 तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही. \v 5 दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते. \v 6 दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली. \p \v 7 तेव्हा दावीद अहीमेलेख याचा पुत्र अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आणा.” तेव्हा अबीयाथारने ते त्याच्याकडे आणले, \v 8 आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?” \p याहवेहने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, ते खात्रीने तुझ्या हाती लागतील आणि त्यांची सुटका करण्यात यश पावशील.” \p \v 9 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्‍याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले. \v 10 त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला. \p \v 11 रस्त्याने जाता जाता, त्यांना एका शेतात इजिप्त देशाचा एक पुरुष भेटला. त्याला त्यांनी दावीदाकडे आणले. त्याला त्यांनी प्यायला पाणी व खायला भाकर दिली; \v 12 त्यांनी त्याला अंजिरांच्या ढेपेचा एक तुकडा व खिसमिसचे दोन घड दिले. ते खाऊन तो ताजातवाना झाला. कारण त्याने तीन दिवस व तीन रात्र काहीही खाल्ले नव्हते किंवा पाणी प्याले नव्हते. \p \v 13 दावीदाने त्याला विचारले, “तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास?” \p त्याने उत्तर दिले, “मी इजिप्त देशाचा असून अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपासून मी आजारी असल्यामुळे माझ्या धन्याने मला सोडून दिले. \v 14 आम्ही नेगेवातील करेथी प्रांत, यहूदीयाचा काही प्रांत आणि कालेबाचा नेगेव यावर छापा टाकला आणि सिकलाग जाळून टाकले.” \p \v 15 दावीदाने विचारले, “छापा टाकलेल्या त्या टोळीकडे मला नेशील काय?” \p तो म्हणाला, “तुम्ही मला मारून टाकणार नाही किंवा मला माझ्या धन्याच्या स्वाधीन करणार नाही, अशी परमेश्वरापुढे शपथ घ्या, मग मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन.” \p \v 16 मग त्याने दावीदाला तिथे नेले, तेव्हा पाहा, ते त्या भागात सर्वत्र पसरले होते. खात, पीत व मौजमजा करीत होते, कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या व यहूदीयाच्या देशातून मोठी लूट आणली होती. \v 17 दावीद त्यांच्याशी त्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत लढला आणि त्यांच्यातील जे चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळाले त्यांच्याशिवाय एकही सुटला नाही. \v 18 दावीदाने आपल्या दोन स्त्रिया व अमालेकी लोकांनी जे सर्व लुटून नेले होते ते परत मिळविले. \v 19 लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली, लूट किंवा जे काही त्यांनी नेले त्यातील काहीही गहाळ राहिले नाही. दावीदाने सर्वकाही परत आणले. \v 20 त्याने सर्व मेंढरे व गुरे घेतली, आणि त्याच्या माणसांनी ती इतर पशूंच्या पुढे हाकीत नेत म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.” \p \v 21 नंतर जी दोनशे माणसे अतिशय थकल्यामुळे त्याच्याबरोबर जाऊ शकली नव्हती, आणि जे बेसोर खोर्‍याजवळ राहिले होते, त्यांच्याजळ दावीद आला. आणि ते दावीदाला व त्याच्याबरोबर असलेल्या माणसांना भेटायला बाहेर आले. दावीद व त्याची माणसे जवळ जाताच दावीदाने त्यांना अभिवादन केले. \v 22 परंतु दावीदाचे काही दुष्ट व त्रासदायक अनुयायी म्हणाले, “हे लोक आपल्याबरोबर आले नाही, म्हणून आपण सोडवून आणलेल्या लुटीतील वाटा त्यांना आम्ही देणार नाही. तथापि, त्यांनी त्यांच्या स्त्रिया व लेकरे घेऊन निघून जावे.” \p \v 23 तेव्हा दावीद म्हणाला, “नाही, माझ्या बंधूंनो! याहवेहने आपणास जे काही दिले आहे त्याचे आम्ही असे करू नये. याहवेहने आम्हाला सुरक्षित ठेवले आहे आणि छापा टाकलेली टोळी, आमचे शत्रू जे आमच्या विरोधात उठले त्यांना याहवेहने आमच्या हाती दिले. \v 24 याबाबत तुमचे कोण ऐकणार? जो मनुष्य सामानाजवळ राहतो त्याचा वाटा तेवढाच असणार जेवढा लढाईवर गेलेल्या व्यक्तीचा असणार. सर्वांना सारखाच वाटा मिळणार.” \v 25 तेव्हापासून आजपर्यंत दावीदाने हा नियम व विधी सर्व इस्राएली लोकांस लावून दिला. \p \v 26 दावीद जेव्हा सिकलाग येथे पोहोचला, तेव्हा त्याने लुटीतील काही भाग यहूदीयातील वडीलजनांस पाठवला आणि म्हटले, “याहवेहच्या शत्रूंच्या लुटीतून तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवित आहे.” \p \v 27 बेथेल, नेगेवमधील रामोथ व यत्तीर येथील लोकांना; \v 28 आणि अरोएर, सिपमोथ, एशतमोआ येथील लोकांना \v 29 व राकाल, यरहमेल व केनी नगरातील लोकांना; \v 30 होरमाह, बोर-आशान, अथाक येथील लोकांना \v 31 आणि हेब्रोन व इतर ठिकाणी जिथे तो व त्याची माणसे फिरत असे तेथील लोकांना दावीदाने त्या भेटी पाठविल्या. \c 31 \s1 शौल आत्महत्या करतो \p \v 1 पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले. \v 2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले. \v 3 शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धरांनी त्याला गाठले व गंभीररित्या जखमी केले. \p \v 4 तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” \p परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला. \v 5 जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि त्याच्याबरोबर मरण पावला. \v 6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र आणि त्याचा शस्त्रवाहक आणि त्याची सर्व माणसे त्याच दिवशी एकत्र मरण पावले. \p \v 7 जेव्हा खोर्‍याच्या बाजूने आणि यार्देनेच्या पलीकडे असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की, इस्राएली सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पळून गेले. आणि पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली. \p \v 8 दुसर्‍या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे तीन पुत्र पडलेले सापडले. \v 9 त्यांनी शौलाचे शिर छेदले आणि त्याचे शस्त्र काढून घेतले आणि त्यांनी ही बातमी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींच्या मंदिरात आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले. \v 10 त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शरीर बेथ-शान नगराच्या भिंतीवर टांगले. \p \v 11 पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या लोकांनी ऐकले, \v 12 तेव्हा त्यांचे सर्व शूरवीर रात्रभर चालून बेथ-शान येथे गेले. त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह बेथ-शानच्या भिंतीवरून खाली उतरविले आणि याबेश येथे आणले व तिथे त्यांनी ते जाळून टाकले. \v 13 त्यानंतर त्यांनी त्यांच्या अस्थी याबेश येथे चिंचेच्या झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.