\id 1PE - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 1 पेत्र \toc1 पेत्राचे पहिले पत्र \toc2 1 पेत्र \toc3 1 पेत्र \mt1 पेत्राचे पहिले पत्र \c 1 \po \v 1 पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून, \po पंत, गलातीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात हद्दपार होऊन विखुरलेल्या आणि परमेश्वराच्या निवडलेल्यांना, \v 2 जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले: \po तुम्हाला भरपूर कृपा व शांती असो. \s1 जिवंत आशेबद्दल परमेश्वराची स्तुती \p \v 3 परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे. \v 4 हे वतन अविनाशी असून कधीही नाश होत नाही किंवा कुजत नाही; आणि हे वतन तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवले आहे. \v 5 जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते तुम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावे याकरिता विश्वासाद्वारे परमेश्वराच्या शक्तीने तुम्ही सुरक्षित ठेवलेले आहात. \v 6 त्याविषयी तुम्ही खूप उल्लास करता, तरी आता थोडा वेळ वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग पडत आहे. \v 7 ही तुमच्या विश्वासाची सिद्ध निष्ठा सोन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे, जे अग्नीने शुद्ध केलेले असूनही नाश पावते. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा त्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होऊ शकेल. \v 8 त्यांना पाहिले नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता; ते दिसत नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि अवर्णनीय गौरवी आनंदाने उल्हासता, \v 9 कारण त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे पुढे मिळणारे तुमच्या आत्म्याचे तारण हे तुमचे प्रतिफळ आहे. \p \v 10 तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने, \v 11 त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला. \v 12 ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती. \s1 पवित्र व्हा \p \v 13 म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा. \v 14 आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका. \v 15 परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा. \v 16 कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे.”\f + \fr 1:16 \fr*\ft \+xt लेवी 11:44, 45; 19:2\+xt*\ft*\f* \p \v 17 तुम्ही ज्यांना पिता म्हणून हाक मारता, ते प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा निःपक्षपातीपणाने न्याय करतात, म्हणून या जगात तुमचे जीवन परदेशीयांसारखे आदरयुक्त भीतीने व्यतीत करा. \v 18 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही, \v 19 परंतु निष्कलंक आणि निर्दोष कोकरा, जे ख्रिस्त त्यांच्या मौल्यवान रक्ताने झाली. \v 20 या जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्यांची निवड झाली होती, परंतु या शेवटच्या काळात ते तुमच्यासाठी प्रकट झाले. \v 21 त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले, म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे. \p \v 22 आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून\f + \fr 1:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa शुद्ध ह्रदयाने\fqa*\f* प्रीती करावी. \v 23 कारण नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, जिवंत आणि सर्वकाळ टिकणार्‍या परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमचा नवीन जन्म झाला आहे. \v 24 कारण, \q1 “सर्व लोक गवतासारखे आहेत, \q2 आणि त्यांचे सौंदर्य वनातील फुलांसारखे आहे. \q1 गवत सुकते आणि फूल कोमेजते. \q2 \v 25 परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.”\f + \fr 1:25 \fr*\ft \+xt यश 40:6‑8\+xt*\ft*\f* \m आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता. \c 2 \p \v 1 यास्तव, सर्व वैरभाव आणि सर्व खोटेपणा, ढोंग, मत्सर आणि प्रत्येक प्रकारच्या दुर्भाषणाचा त्याग करा. \v 2 नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल. \v 3 कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे. \s1 जिवंत दगड आणि निवडलेले राष्ट्र \p \v 4 जो जिवंत दगड बांधणार्‍यांनी नाकारला, परंतु परमेश्वराने निवडलेला आणि त्यांना मोलवान असलेल्या ख्रिस्ताकडे तुम्ही आला आहात. \v 5 तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर\f + \fr 2:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa आत्म्याचे मंदिर\fqa*\f* म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. \v 6 कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: \q1 “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो \q2 निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, \q1 त्यांच्यावर विश्वास ठेवणारा \q2 कधीही लज्जित होणार नाही.”\f + \fr 2:6 \fr*\ft \+xt यश 28:16\+xt*\ft*\f* \m \v 7 आता जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत, \q1 “जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, \q2 तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.”\f + \fr 2:7 \fr*\ft \+xt स्तोत्र 118:22\+xt*\ft*\f* \m \v 8 आणि, \q1 “लोकांना ठेच लागण्याचा एक दगड \q2 व अडखळण्याचा एक खडक ठेवतो.”\f + \fr 2:8 \fr*\ft \+xt यश 8:14\+xt*\ft*\f* \m ते अडखळतात, कारण ते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत, ज्या शिक्षेसाठी ते पूर्वीच नेमलेले सुद्धा होते. \p \v 9 परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी. \v 10 पूर्वी तुम्ही ते लोक नव्हता परंतु आता तुम्ही परमेश्वराचे लोक आहात; पूर्वी तुम्हाला दया प्राप्त झाली नव्हती, परंतु आता तुम्हाला दया प्राप्त झाली आहे. \s1 अनीतिमान लोकांमध्ये नीतिमत्वेचे जीवन जगणे \p \v 11 प्रिय मित्रांनो, जे तुम्ही या जगात परदेशीय व बंदिवासात आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की, ज्या पापी वासना तुमच्या आत्म्याविरुद्ध लढतात त्यापासून दूर राहा. \v 12 अनीतिमान लोकांमध्ये अशा प्रकारचे चांगले जीवन जगा, की अयोग्य कृत्ये करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील, तरी ते तुमची चांगली कामे पाहतील आणि परमेश्वराच्या येण्याच्या दिवशी ते त्यांचे गौरव करतील. \p \v 13 तुम्ही प्रभूकरिता मनुष्यांमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकार्‍याच्या अधीन असा: मग तो सर्वोच्च अधिकारी म्हणून राजासुद्धा असेल \v 14 अथवा राज्यपाल असेल, कारण जे अयोग्य गोष्टी करतात त्यांना शिक्षा करण्यासाठी आणि जे योग्य गोष्टी करतात, त्यांची प्रशंसा करण्यासाठी ते परमेश्वराकडून पाठविलेले आहेत. \v 15 कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत. \v 16 तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमचे स्वातंत्र्य वाईट कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी वापरू नका, तर परमेश्वराच्या दासासारखे जगा. \v 17 प्रत्येकाला योग्य आदर दाखवा. विश्वासणार्‍यांच्या कुटुंबावर प्रीती करा. परमेश्वराचे भय बाळगा व राजाचा मान राखा. \p \v 18 दासांनो, आदराने परमेश्वराचे भय बाळगून तुम्ही स्वतःला तुमच्या धन्याच्या अधीन करा, फक्त जे चांगले आणि कृपाळू आहेत अशांच्याच नाही, तर जे कठोर आहेत अशा धन्यांच्यासुद्धा अधीन राहा. \v 19 कारण त्याला परमेश्वराची जाणीव असल्यामुळे जर कोणी मनुष्य अन्यायी दुःखाच्या वेदना सहन करतो, तर ते प्रशंसनीय आहे. \v 20 परंतु चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही सहन केली तर त्यात काय मोठेपणा आहे? परंतु जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख भोगले आणि ते सहन केले तर हे परमेश्वराच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे. \v 21 यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे, यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे. \q1 \v 22 “त्यांनी कधीही पाप केले नाही; \q2 आणि त्यांच्या मुखात कोणतेही कपट आढळले नाही.”\f + \fr 2:22 \fr*\ft \+xt यश 53:9\+xt*\ft*\f* \m \v 23 जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले. \v 24 त्यांच्या शरीरामध्ये त्या क्रूसावर, “त्यांनी स्वतः आमची पापे वाहिली” यासाठी की, आपण पापी स्वभाव सोडून नीतिमत्वासाठी जीवन जगावे; “त्यांना झालेल्या जखमांच्याद्वारे तुम्ही बरे झाले आहात.” \v 25 कारण “मेंढरांप्रमाणे तुम्ही परमेश्वरापासून बहकून दूर गेला होता,”\f + \fr 2:25 \fr*\ft \+xt यश 53:4, 5, 6\+xt*\ft*\f* परंतु आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे आणि तुमच्या आत्म्याच्या रक्षकाकडे परत आला आहात. \c 3 \p \v 1 पत्नींनो याचप्रकारे तुम्ही तुमच्या पतीच्या आज्ञेत राहा, म्हणजे त्यांच्यापैकी कोणी जर परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवीत नाहीत, तर ते वचनाशिवाय त्यांच्या पत्नींच्या वर्तणुकीद्वारे जिंकले जाऊ शकतात; \v 2 कारण ते तुमच्या जीवनातील शुद्धता आणि आदर पाहतात. \v 3 जसे की केशरचना आणि सोन्याचे दागदागिने घालणे किंवा आकर्षक वस्त्रे घालणे या बाह्य गोष्टींवर तुमचे सौंदर्य केवळ अवलंबून नसावे, \v 4 तर याउलट ते तुमच्या अंतःकरणाच्या, न झिजणार्‍या पण सौंदर्यपूर्ण शांत आणि सौम्य आत्म्याचे असावे, जे परमेश्वराच्या दृष्टीने अति मोलवान आहे. \v 5 कारण पूर्वीच्या काळातील पवित्र स्त्रिया ज्यांची परमेश्वरावर आशा होती, त्या अशाच प्रकारे स्वतःला सजवित असत. त्यांनी स्वतःला त्यांच्या पतीच्या अधीन केले होते, \v 6 ज्याप्रमाणे सारा अब्राहामाच्या आज्ञेत राहिली आणि त्याला तिचा प्रभू असे म्हणाली. जर तुम्ही भीती न बाळगता जे चांगले ते करीत आहात, तर तुम्ही तिच्या मुली आहात. \p \v 7 पतींनो, त्याच प्रकारे तुम्ही आपल्या पत्नीबरोबर राहत असताना त्या नाजूक आहेत म्हणून सुज्ञतेने राहा, तुमच्याबरोबर त्यादेखील कृपेच्या जीवनाच्या देणग्यांच्या वतनदार आहेत, म्हणून त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. \s1 चांगले करण्यासाठी दुःख सहन करणे \p \v 8 सारांश, तुम्ही सर्व एकचित्ताने एकमेकांवर खर्‍या प्रीतीने व सहानुभूतीने बंधुप्रीती करणारे, दयाळू व नम्र असे व्हा. \v 9 वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. \v 10 कारण, \q1 “जो जीवनावर प्रीती करतो \q2 आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, \q1 तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून \q2 आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे. \q1 \v 11 त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; \q2 त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे. \q1 \v 12 कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, \q2 आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. \q1 परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.”\f + \fr 3:12 \fr*\ft \+xt स्तोत्र 34:12‑16\+xt*\ft*\f* \p \v 13 चांगले करण्याची आस्था असेल, तर सहसा कोणी तुम्हाला अपाय करणार नाही. \v 14 जर तुम्ही चांगले केल्याबद्दल सहन करता, तर तुम्ही आशीर्वादित आहात. “त्यांच्या अफवांना भिऊ नका आणि घाबरू नका.”\f + \fr 3:14 \fr*\ft \+xt यश 8:12\+xt*\ft*\f* \v 15 ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना. तुमच्यामध्ये जी आशा आहे व ती का आहे, याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व आदरपूर्वक करा. \v 16 आदरयुक्त, शुद्ध विवेकबुद्धीला अनुसरून राहा, म्हणजे ख्रिस्तामधील तुमच्या चांगल्या वागणुकीविरुद्ध जे लोक द्वेषभावाने बोलतात, त्यांना निंदानालस्तीची लाज वाटेल. \v 17 तुम्ही दुःख सोसावे अशी परमेश्वराची इच्छा असेल, तर वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा, चांगले करून दुःख सोसणे, अधिक चांगले आहे! \v 18 नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते. \v 19 जिवंत झाल्यानंतर येशू गेले आणि बंदीशाळेतील आत्म्यांना संदेश दिला \v 20 ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते. \v 21 ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र आहे, ते शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने आता तुम्हालासुद्धा वाचविते. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचविते. \v 22 ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून सर्व स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत. \c 4 \s1 परमेश्वरासाठी जगणे \p \v 1 म्हणून, ज्याअर्थी ख्रिस्ताने त्यांच्या शरीरामध्ये दुःख सहन केले, त्याअर्थी तुम्ही सुद्धा तीच मनोवृत्ती धारण केली पाहिजे, कारण जो कोणी शरीरामध्ये दुःख सहन करतो तो पापाचा त्याग करतो. \v 2 याचा परिणाम असा होतो की, त्यांचे उरलेले ऐहिक जीवन ते मानवाच्या वाईट इच्छेप्रमाणे नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतात. \v 3 कारण गैरयहूदी लोकांप्रमाणे व्यभिचार, कामातुरपणा, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली आणि घृणित मूर्तिपूजा करण्यात तुम्ही बराच वेळ घालविला. \v 4 त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही आता त्यांच्या बेपर्वा, वाईट जीवनात सामील होत नाही आणि ते तुमची निंदा करतात. \v 5 पण एवढे लक्षात ठेवा की, त्यांना त्यांचा हिशोब त्या परमेश्वराला द्यावा लागेल जे जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास सिद्ध आहेत. \v 6 याच कारणासाठी शुभवार्तेचा प्रचार जे आता मृत झाले आहेत त्यांना करण्यात आला होता, यासाठी की देहामध्ये त्यांचा न्यायनिवाडा मनुष्याच्या प्रमाणानुसार व्हावा परंतु आत्म्यामध्ये त्यांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जिवंत राहवे. \p \v 7 सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल. \v 8 सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते. \v 9 कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा. \v 10 परमेश्वराच्या कृपेच्या वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वराचे एकनिष्ठ कारभारी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही विशेष कर्तृत्वदान मिळाले आहे त्याचा उपयोग करा. \v 11 जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन! \s1 विश्वासी असल्यामुळे होणारा छळ \p \v 12 प्रिय मित्रांनो, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर आलेल्या अग्नीसारख्या वाईट अनुभवांबद्दल आश्चर्यचकित होऊ नका, जसे की तुमच्यासाठी काहीतरी विचित्रच घडत आहे. \v 13 परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल. \v 14 जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे. \v 15 जर तुम्ही दुःख भोगता तर खुनी किंवा चोर, किंवा कोणताही गुन्हेगार किंवा लुडबुड्या म्हणून सुद्धा दुःख भोगू नये. \v 16 तरीपण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही दुःख सहन केले तर लाज मानू नका, तर परमेश्वराची स्तुती करा की तुम्ही ते नाव धारण केले आहे. \v 17 कारण ही वेळ न्यायनिवाडा करण्याची आहे आणि त्याची सुरुवात परमेश्वराच्या घराण्यातील लोकांपासून होत आहे; आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली तर, जे परमेश्वराच्या शुभवार्तेप्रमाणे चालत नाहीत त्यांचे काय होईल? \v 18 आणि, \q1 “जर नीतिमान लोकांचे तारण कष्टाने होते, \q2 तर अनीतिमान व पापी लोकांचे काय होईल?”\f + \fr 4:18 \fr*\ft \+xt नीती 11:31\+xt*\ft*\f* \p \v 19 म्हणून जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांनी स्वतःला त्यांच्या विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवून द्यावे आणि नेहमी चांगली कामे करीत राहवे. \c 5 \s1 वडीलमंडळीसाठी आणि इतर लोकांसाठी \p \v 1 तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो: \v 2 तुमच्या देखरेखीखाली असलेल्या परमेश्वराच्या कळपाचे पालनपोषण करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला हे काम करावेच लागते अशा दृष्टीने नाही तर तुम्ही स्वखुशीने हे काम करा, ही परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे; अप्रामाणिक लाभ मिळविण्यासाठी नाही परंतु सेवा करण्यास उत्सुक असा; \v 3 जो कळप तुमच्या हाती सोपविला आहे त्यांच्यावर प्रभुत्व दाखवू नका, परंतु लोकांसमोर उदाहरण म्हणून राहा. \v 4 जेव्हा मुख्य मेंढपाळ येतील, तेव्हा गौरवाचा मुकुट तुम्हाला मिळेल, तो कधीच झिजणार नाही. \p \v 5 त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्‍यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण, \q1 “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात \q2 परंतु नम्रजनावर कृपा करतात.”\f + \fr 5:5 \fr*\ft \+xt नीती 3:34\+xt*\ft*\f* \m \v 6 परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील. \v 7 तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात. \p \v 8 सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो. \v 9 विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासी लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. \p \v 10 तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचे परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील. \v 11 त्यांना सदासर्वकाळ अधिकार असो. आमेन. \b \s1 शेवटच्या शुभेच्छा \p \v 12 ज्याला मी एकनिष्ठ भाऊ मानतो, त्या सीलासच्या मदतीने मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे, तुम्हाला उत्तेजित करतो आणि अशी साक्ष देतो की, हीच परमेश्वराची खरी कृपा आहे. यामध्येच स्थिर राहा. \b \p \v 13 जी बाबेलमध्ये आहे ती, तुमच्याबरोबर एकत्र निवडलेली, तुम्हाला तिच्या शुभेच्छा पाठविते आणि माझा पुत्र मार्क तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. \p \v 14 एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने अभिवादन करा. \b \p तुम्ही जे ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हा सर्वांना शांती असो.