\id 1KI - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 1 राजे \toc1 1 राजे \toc2 1 राजे \toc3 1 राजे \mt1 1 राजे \c 1 \s1 अदोनियाह स्वतःला राजा करतो \p \v 1 जेव्हा दावीद राजा फार वृद्ध झाला, तेव्हा त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येत नसे. \v 2 म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आपण एक तरुण कुमारी शोधू या. तिने त्यांच्याजवळ झोपावे म्हणजे आमच्या स्वामींना ऊब येईल.” \p \v 3 नंतर त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर तरुण कुमारीचा शोध केला आणि त्यांना शूनेमकरीण अबीशग आढळली, त्यांनी तिला राजाकडे आणले. \v 4 ती स्त्री खूप सुंदर होती; तिने राजाची काळजी घेतली आणि त्यांची सेवा केली, पण राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत. \p \v 5 त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे\f + \fr 1:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa रथस्वार\fqa*\f* तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली. \v 6 (“तू जे काही करतोस ते का करतोस?” असे त्याच्या वडिलांनी त्याला कधीही खडसावून विचारले नाही. तो सुद्धा फार रूपवान होता आणि अबशालोमच्या नंतर तो जन्मला होता.) \p \v 7 जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला. \v 8 परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला मिळाले नाही. \p \v 9 अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्‍यांना आमंत्रित केले, \v 10 परंतु त्याने नाथान संदेष्टा, बेनाइयाह, खास रक्षक व त्याचा भाऊ शलोमोन यांना आमंत्रित केले नाही. \p \v 11 तेव्हा शलोमोनची आई बथशेबा हिला नाथानाने विचारले, “हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा आता राजा झाला आहे, हे तू ऐकले नाही काय? आणि दावीद आमचे धनी यांना याविषयी काहीच माहिती नाही? \v 12 तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो. \v 13 दावीद राजाकडे जा आणि त्यांना सांग, ‘माझ्या स्वामी, आपण आपल्या दासीशी शपथ घेतली नव्हती काय, “खचितच माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन राजा होईल आणि तो माझ्या राजासनावर बसेल” तर मग अदोनियाह कसा राजा झाला?’ \v 14 तू राजाबरोबर अजूनही बोलत असतानाच मी आत येईन आणि तू जे सांगितले त्यामध्ये माझे शब्द घालेन.” \p \v 15 तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती. \v 16 बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले. \p राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?” \p \v 17 ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’ \v 18 परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे, आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही. \v 19 त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोन याला त्याने बोलाविले नाही. \v 20 माझे स्वामी, सर्व इस्राएली लोकांचे डोळे आपणाकडे लागले आहेत, की आपण हे घोषित कराल की माझ्या स्वामीनंतर तुमच्या सिंहासनावर कोण बसणार. \v 21 नाहीतर, माझे स्वामी त्यांच्या पूर्वजांबरोबर विसावा पावतील आणि मला आणि माझा पुत्र शलोमोनला दोषी असल्याची वागणूक दिली जाईल.” \p \v 22 ती राजाबरोबर बोलत असतानाच, नाथान संदेष्टा आला. \v 23 आणि राजाला सांगण्यात आले, “नाथान संदेष्टा आले आहेत.” म्हणून तो राजासमोर गेला आणि जमिनीपर्यंत लवून दंडवत केले. \p \v 24 नाथान संदेष्टा म्हणाला, “माझ्या स्वामी, अदोनियाह तुमच्यानंतर राजा होणार आणि तो तुमच्या राजासनावर बसणार अशी घोषणा तुम्ही केली आहे काय? \v 25 आज त्याने खाली जाऊन पुष्कळ संख्येने गुरे, पुष्ट वासरे आणि मेंढरांचा यज्ञ केला आहे. त्याने सर्व राजपुत्र, सैन्यांचे सेनापती आणि अबीयाथार याजक यांना आमंत्रित केले आहे. सध्या यावेळी ते त्याच्यासोबत खात व पीत आहेत आणि म्हणत आहेत, ‘राजा अदोनियाह चिरायू होवो!’ \v 26 परंतु मी आपला सेवक आणि सादोक याजक, आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, आणि आपला पुत्र शलोमोन यांना त्याने आमंत्रित केले नाही. \v 27 हे सर्व माझ्या स्वामीने त्यांच्यानंतर राजासनावर कोणी बसावे हे आपल्या सेवकाला न कळवताच केले आहे काय?” \s1 दावीद शलोमोनला राजा करतो \p \v 28 मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली. \p \v 29 तेव्हा राजाने शपथ वाहून म्हटले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले, त्या जिवंत याहवेहची शपथ, \v 30 याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने जे मी तुला शपथ घेऊन म्हटले होते की: तुझा पुत्र शलोमोन माझ्यानंतर राजा होईल आणि तोच माझ्या जागेवर माझ्या राजासनावर बसेल, ते मी आज खचितच पूर्ण करेन.” \p \v 31 तेव्हा बथशेबाने भूमीकडे आपले मुख लवून राजासमोर दंडवत घातले आणि म्हटले, “दावीद, माझे स्वामी सदा चिरायू होवोत!” \p \v 32 दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले, \v 33 राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा. \v 34 तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’ \v 35 नंतर तुम्ही त्याच्यासोबत वर जावे आणि त्याने येऊन माझ्या राजासनावर बसून माझ्या जागेवर राज्य करावे. मी त्याला इस्राएलचा आणि यहूदीयाचा राज्यकर्ता नेमले आहे.” \p \v 36 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत. \v 37 याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.” \p \v 38 तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले. \v 39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेलाचे शिंग घेतले आणि शलोमोनचा अभिषेक केला. नंतर त्यांनी कर्णे वाजविले आणि “शलोमोन राजा चिरायू असो! असा सर्व लोकांनी जयघोष केला.” \v 40 आणि सर्व लोक पावा वाजवित आणि मोठा आनंदोत्सव करीत त्याच्यामागे गेले, त्यांच्या घोषणांनी जमीन हादरली. \p \v 41 अदोनियाह आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व पाहुण्यांनी मेजवानी संपत असता हा आवाज ऐकला. कर्ण्यांचा आवाज ऐकताच योआबाने विचारले, “शहरात हा सर्व आवाज का येत आहे?” \p \v 42 तो हे बोलत असताच, अबीयाथार याजकाचा पुत्र योनाथान आला. अदोनियाह त्याला म्हणाला, “आत ये. तुझ्यासारख्या योग्य मनुष्याने चांगलीच बातमी आणली असणार.” \p \v 43 योनाथानने अदोनियाहास उत्तर दिले, “अजिबात नाही! दावीद आमच्या स्वामींनी शलोमोनास राजा केले आहे. \v 44 राजाने त्याच्यासोबत सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी आणि पलेथी यांना पाठविले आहे आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसविले आहे, \v 45 आणि सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा राजा म्हणून गीहोन येथे अभिषेक केला आहे. तिथून ते मोठ्या आनंदाने वर गेले आणि शहरात त्या आवाजाचा नाद होत आहे. तोच आवाज आपण ऐकत आहात. \v 46 शिवाय, शलोमोनने राजासनावरील आपले स्थान घेतले आहे. \v 47 तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले \v 48 आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ” \p \v 49 त्यावेळी, अदोनियाहचे सर्व पाहुणे घाबरून उठले आणि पांगून गेले. \v 50 परंतु अदोनियाहने शलोमोनच्या भीतीने जाऊन वेदीवरील शिंगे धरून ठेवली. \v 51 तेव्हा शलोमोनला सांगण्यात आले, “अदोनियाह शलोमोन राजाला घाबरत आहे आणि वेदीच्या शिंगांना धरून ठेवले आहे. तो म्हणतो की, ‘शलोमोन राजाने आज माझ्याशी शपथ घ्यावी की तो त्याच्या सेवकाला तलवारीने मारणार नाही.’ ” \p \v 52 शलोमोनने उत्तर दिले, “जर तो स्वतःस योग्य असा सिद्ध करेल, तर त्याच्या डोक्यावरील एक केससुद्धा जमिनीवर पडणार नाही; पण त्याच्या ठायी दुष्टाई आढळली, तर तो मरण पावेल.” \v 53 तेव्हा शलोमोन राजाने माणसे पाठवून त्याला वेदीवरून खाली आणले. आणि अदोनियाहने राजाकडे येऊन शलोमोन राजासमोर नमला आणि शलोमोन त्याला म्हणाला, “आपल्या घरी जा.” \c 2 \s1 शलोमोनला दावीदाच्या आज्ञा \p \v 1 जेव्हा दावीदाचा शेवट जवळ आला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनाला आज्ञा दिल्या. \p \v 2 दावीदाने म्हटले, “जगाच्या प्रथेनुसार आता माझी जाण्याची वेळ आली आहे, तर खंबीर हो आणि शुराप्रमाणे वाग. \v 3 आणि याहवेह तुझे परमेश्वर काय म्हणतात त्याकडे लक्ष दे: मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे याहवेहच्या आज्ञांचे पालन कर आणि त्यांचे नियम आणि आज्ञा, त्यांचे निर्णय आणि निर्बंध पाळ. असे केल्याने जे काही तू करशील आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील. \v 4 आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील, आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’ \p \v 5 “तर तू स्वतः समजून घे की जेरुइयाहचा पुत्र योआब माझ्याशी कसा वागला; इस्राएलच्या सैन्याचे दोन सेनापती, नेरचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना त्याने काय केले. त्याने त्यांना जसे युद्धकाळात मारावे तसे शांतीच्या काळात जिवे मारले आणि त्या रक्ताने त्याचा कंबरपट्टा आणि पायतणे डागाळली आहेत. \v 6 तुझ्या सुज्ञतेनुसार त्यांचे कर, परंतु त्याचे पिकलेले डोके शांतीने कबरेत जाऊ देऊ नकोस. \p \v 7 “परंतु गिलआदी बारजिल्लईच्या मुलांवर दया दाखव आणि त्यांना तुमच्या मेजावर भोजन करणाऱ्यांपैकी असू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळून गेलो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले. \p \v 8 “आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती. \v 9 परंतु त्याला निर्दोष समजू नको. तू सुज्ञ व्यक्ती आहेस; त्याचे काय करावे हे तुला कळेल. त्याचे पिकलेले डोके रक्ताळलेले असे कबरेत पाठव.” \p \v 10 यानंतर दावीद त्याच्या पूर्वजांसोबत विसावला आणि दावीदाच्या नगरात त्याला पुरले गेले. \v 11 दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. \v 12 मग शलोमोन आपला पिता दावीद याच्या राजासनावर बसला आणि त्याचे राज्य बळकट असे स्थापित झाले. \s1 शलोमोनचे सिंहासन स्थापित झाले \p \v 13 हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा शलोमोनची आई बथशेबाकडे आला. बथशेबाने त्याला विचारले, “तू शांतीने आला आहेस काय?” \p त्याने उत्तर दिले “होय, मी शांतीने आलो आहे.” \v 14 नंतर तो पुढे म्हणाला, “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” \p ती म्हणाली, “तू बोलू शकतो.” \p \v 15 तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला तर ठाऊकच आहे की वास्तविकता राज्य माझे होते. त्यांचा राजा म्हणून सर्व इस्राएलची नजर माझ्याकडे होती. परंतु ते पालटले, आणि राज्य माझ्या भावाकडे गेले आहे; कारण त्याला ते याहवेहकडून आले आहे. \v 16 तर आता मला तुमच्याकडे एक विनंती करावयाची आहे. मना करू नका.” \p ती म्हणाली, “बोल.” \p \v 17 तो पुढे म्हणाला, “शलोमोन राजा तुम्हाला मना करणार नाही; कृपया त्यांना विचार की त्यांनी शूनेमकरीण अबीशग ही मला पत्नी म्हणून द्यावी.” \p \v 18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी तुझ्या वतीने राजाशी बोलेन.” \p \v 19 जेव्हा बथशेबा शलोमोन राजाकडे त्याच्याशी अदोनियाहसाठी बोलण्यास गेली, तिला पाहताच राजा तिला भेटण्यास उभा राहिला, त्याने तिच्यापुढे डोके लवविले. राजाच्या आईसाठी आसन मागविले आणि ती त्याच्या उजवीकडे बसली. \p \v 20 ती म्हणाली, “मला तुझ्याकडे एक लहानशी विनंती करावयाची आहे, मला मना करू नकोस.” \p राजाने म्हटले, “माझ्या माते, माग, मी तुला मना करणार नाही.” \p \v 21 तेव्हा ती म्हणाली, “शूनेमकरीण अबीशग हिला तुझा भाऊ अदोनियाह याला पत्नी म्हणून दे.” \p \v 22 शलोमोन राजाने त्याच्या आईला उत्तर दिले, “तू अदोनियाहसाठी शूनेमकरीण अबीशग हिची विनंती का करतेस? तू त्याच्यासाठी राज्य मागू शकतेस; शेवटी तो माझा थोरला भाऊ आहे; होय, त्याच्यासाठी आणि अबीयाथार याजक व जेरुइयाहचा पुत्र योआब यांच्यासाठी देखील मागू शकतेस!” \p \v 23 तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो! \v 24 तर आता, ज्यांनी मला माझे पिता दावीदाच्या राजासनावर स्थापित केले आहे आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे माझे घराणे स्थापित केले आहे, ते याहवेह जिवंत आहेत; आज अदोनियाहला जिवे मारले जाईल!” \v 25 म्हणून शलोमोन राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला आज्ञा केली, आणि त्याने अदोनियाहवर वार केला आणि तो मेला. \p \v 26 राजा अबीयाथार याजकाला म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेताकडे परत जा. वास्तविक तू सुद्धा मरण्यास पात्र आहे, परंतु मी तुला आता मारणार नाही, कारण माझे पिता दावीद याच्यासमोर तू सार्वभौम याहवेहचा कोश वाहिला आणि माझे पिता दावीदाच्या सर्व कष्टांमध्ये तू सहभागी होतास.” \v 27 म्हणून शलोमोनने अबीयाथारला याहवेहच्या याजकपदावरून काढून टाकले, याप्रकारे एलीच्या घराण्याबद्दल याहवेहने शिलोह येथे बोललेले शब्द पूर्णतेस आले. \p \v 28 जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता. \v 29 शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.” \p \v 30 तेव्हा बेनाइयाह याहवेहच्या मंडपामध्ये गेला आणि योआबाला म्हणाला, “राजा म्हणतो ‘बाहेर ये!’ ” \p परंतु त्याने उत्तर दिले, “नाही, मी येथेच मरेन.” \p तेव्हा बेनाइयाहने राजाला कळवले, “योआबाने मला असे उत्तर दिले.” \p \v 31 तेव्हा राजाने बेनाइयाहला आज्ञा केली, “तो म्हणतो तसे कर. त्याला मारून त्याला गाडून टाक आणि योआबाने विनाकारण रक्त सांडल्याच्या दोषातून मला व माझ्या सर्व कुटुंबाला मुक्त कर. \v 32 त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते. \v 33 त्यांच्या रक्ताचा दोष योआबाच्या व त्याच्या वंशजांच्या माथ्यावर सर्वकाळ असो. परंतु दावीद व त्याचे वंशज, त्याचे घराणे आणि त्याचे राजासन यावर याहवेहची शांती सदा असो.” \p \v 34 तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने जाऊन योआबावर वार केला आणि त्याला मारून टाकले आणि त्याला रानात त्याच्या घरी पुरले. \v 35 मग राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला योआबाच्या जागी सैन्याचा अधिकारी म्हणून आणि अबीयाथाराच्या जागी सादोकला याजक म्हणून नेमले. \p \v 36 नंतर राजाने शिमीला बोलावून सांगितले, “तुझ्यासाठी यरुशलेमात घर बांध आणि तिथे राहा, इतर कुठेही जाऊ नकोस. \v 37 ज्या दिवशी तू निघून किद्रोनचे खोरे पार करशील, तेव्हा हे समज की तू खचितच मरशील; आणि तुझे रक्त तुझ्याच माथ्यावर असणार.” \p \v 38 शिमीने राजाला उत्तर दिले, “तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. माझे स्वामी जे म्हणतात त्याप्रमाणे आपला सेवक करेल.” आणि शिमी बराच काळ यरुशलेमात राहिला. \p \v 39 परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथचा राजा याच्याकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.” \v 40 हे ऐकताच, त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि त्याच्या गुलामांचा शोध करीत आखीशकडे गथ येथे गेला. शिमीने जाऊन गथवरून आपल्या गुलामांना परत आणले. \p \v 41 जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे. \v 42 तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले आणि त्याला म्हटले, “याहवेहसमोर तुझ्याकडून शपथ घेऊन तुला मी चेतावणी दिली नव्हती काय की, ‘तू यरुशलेम सोडून कुठेही जाशील त्या दिवशी खचितच तू मरशील’? त्यावेळी तू मला म्हणालास, ‘तुम्ही जे काही म्हणता ते बरे आहे, मी त्याप्रमाणे करेन.’ \v 43 तर मग तू याहवेहला दिलेली शपथ आणि मी दिलेली आज्ञा का पाळली नाही?” \p \v 44 पुढे राजा शिमीला म्हणाला, “माझे पिता दावीदाशी तू किती चुकीचा वागला हे तुला तुझ्या मनात ठाऊक आहे. याहवेहच तुला तुझ्या चुकीचा मोबदला देतील. \v 45 परंतु शलोमोन राजा आशीर्वादित राहील आणि दावीदाचे राजासन याहवेहसमोर सदा सुरक्षित राहील.” \p \v 46 तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला राजाने आज्ञा दिली आणि त्याने बाहेर जाऊन शिमीवर वार केला आणि तो मेला. \p आता शलोमोनच्या हातात राज्य प्रस्थापित झाले. \c 3 \s1 शलोमोन ज्ञान मागतो \p \v 1 शलोमोनने इजिप्तचा राजा फारोह याच्याशी सोयरीक केली व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्याने तिला दावीदाच्या शहरात आणले आणि आपला राजवाडा, याहवेहचे मंदिर, यरुशलेमच्या सभोवतीचा कोट बांधून होईपर्यंत त्याने तिला तिथेच ठेवले. \v 2 तथापि लोक अजूनही उच्च स्थानावर आपली यज्ञार्पणे करीत असत. कारण याहवेहच्या नावाचे मंदिर अजून बांधून झाले नव्हते. \v 3 उच्च स्थानावर जाऊन यज्ञार्पणे करणे व धूप जाळणे, याशिवाय आपला पिता दावीदाने दिलेल्या सूचनांनुसार शलोमोन चालला व त्याने याहवेहवरील त्याची प्रीती व्यक्त केली. \p \v 4 राजा गिबोन येथे यज्ञ करावयाला गेले, कारण ते सर्वात महत्त्वाचे उच्च स्थान होते आणि शलोमोनने त्या वेदीवर एक हजार होमार्पणे सादर केली. \v 5 गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.” \p \v 6 शलोमोनने उत्तर दिले, “आपला सेवक, माझे पिता दावीदाला आपण अपार दया दाखविली होती, कारण ते आपल्याशी विश्वासू होते, व हृदयाने नीतिमान व सरळ होते. आपण त्यांच्यावरील ही अपार दया पुढे चालू ठेवून आज त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक पुत्र दिला. \p \v 7 “तर आता हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, माझे पिता दावीदाच्या जागी आपण मला राजा केले आहे. परंतु मी एक लहान बालक आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडाव्या हे मला कळत नाही. \v 8 आपला सेवक तर आपण निवडलेल्या लोकांमध्ये आहे, जे इतके मोठे व अगणित आहेत. \v 9 म्हणून आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि बरे आणि वाईटाची पारख करण्यासाठी आपण आपल्या सेवकाला विवेकी हृदय द्यावे. कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकेल?” \p \v 10 शलोमोनाने हे मागितल्याने प्रभू परमेश्वर प्रसन्न झाले. \v 11 म्हणून परमेश्वराने त्याला म्हटले, “कारण तू तुझ्यासाठी दीर्घायुष्य किंवा संपत्ती किंवा तुझ्या शत्रूंचा नाश हे न मागता न्याय करण्यासाठी विवेक मागितला आहे, \v 12 त्यामुळे तू जे मागितले आहेस ते मी करेन. मी तुला ज्ञानी व विवेकी हृदय देईन, म्हणजे तुझ्यासारखा पूर्वी कधी कोणी नव्हता, ना कधी असेल. \v 13 याशिवाय, तू जे मागितले नाहीस ते म्हणजे संपत्ती आणि सन्मान हे देखील मी तुला देईन; आणि तुझ्या आयुष्याच्या दिवसांत राजांमध्ये तुझ्यासमान कोणीही नसेल. \v 14 आणि तुझा पिता दावीद करीत असे त्याचप्रमाणे जर तू माझ्या आज्ञेनुसार चालून माझे नियम आणि विधी पाळशील, तर मी तुला दीर्घायुष्य देईन.” \v 15 नंतर शलोमोन जागा झाला; आणि त्याला कळले की ते एक स्वप्न होते. \p तो यरुशलेमास गेला आणि प्रभू परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पण केली. नंतर त्याने आपल्या दरबारात मोठी मेजवानी दिली. \s1 एक सुज्ञ न्याय \p \v 16 आता दोन वेश्या राजाकडे येऊन त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या. \v 17 त्यांच्यापैकी एक म्हणाली, “माझे स्वामी, मला क्षमा करा. ही स्त्री आणि मी एकाच घरात राहतो आणि ती माझ्यासोबत असताना मला एक मूल झाले. \v 18 माझे मूल जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी, या स्त्रीला सुद्धा एक मूल झाले. आम्ही एकट्याच होतो; घरात आम्हा दोघींशिवाय अन्य कोणी नव्हते. \p \v 19 “रात्रीच्या वेळी या स्त्रीचे मूल मरण पावले, कारण ती त्याच्या अंगावर झोपली. \v 20 तेव्हा ती मध्यरात्री उठली आणि मी आपली दासी झोपेतच असताना माझ्याजवळ झोपलेले माझे मूल तिने घेतले आणि तिने ते तिच्या उराशी ठेवले व तिचे मेलेले मूल माझ्या उराशी ठेवले. \v 21 सकाळी मी माझ्या मुलाला दूध पाजण्यासाठी उठले; आणि तो मेलेला होता! परंतु दिवसाच्या उजेडात जेव्हा मी त्याला निरखून पाहिले, तेव्हा मला समजले की मी ज्याला जन्म दिला तो हा नव्हे.” \p \v 22 दुसरी स्त्री म्हणाली, “जिवंत असलेला मुलगा माझा आहे; मेलेला तुझा आहे.” \p परंतु पहिलीने हट्ट केला, “नाही! मेलेला तुझा आहे; जिवंत माझा आहे.” असा त्यांनी राजासमोर वादविवाद केला. \p \v 23 राजाने म्हटले, “एक म्हणते, ‘माझा मुलगा जिवंत आहे आणि तुझा मुलगा मेला आहे,’ तर दुसरी म्हणते, ‘नाही! तुझा मुलगा मेला आहे आणि माझा जिवंत आहे.’ ” \p \v 24 तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली. \v 25 नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.” \p \v 26 ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!” \p परंतु दुसरी म्हणाली, “तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!” \p \v 27 तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.” \p \v 28 राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे. \c 4 \s1 शलोमोनचे मंत्री व राज्याधिकारी \p \v 1 शलोमोन राजाने सर्व इस्राएलवर राज्य केले. \b \lh \v 2 हे सर्व मुख्य अधिकारी होते: \b \li1 सादोकाचा पुत्र अजर्‍याह याजक; \li1 \v 3 शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; \li1 अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा; \li1 \v 4 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, मुख्य सेनापती होता; \li1 सादोक व अबीयाथार, हे याजक होते. \li1 \v 5 नाथानचा पुत्र अजर्‍याह, हा राज्याधिकार्‍यांचा मुख्य होता. \li1 नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता; \li1 \v 6 अहीशार, राजवाड्या संबंधीच्या कामकाजाचा व्यवस्थापक होता. \li1 अब्दाचा पुत्र अदोनिराम हा मजुरांवर अधिकारी होता. \b \p \v 7 शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे. \b \lh \v 8 त्यांची नावे ही होती: \b \li1 बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर होता; \li1 \v 9 बेन-देकेर हा माकाज, शालब्बीम, बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर होता. \li1 \v 10 बेन-हेसेद हा अरुब्बोथवर होता (सोकोह आणि हेफेरचा सर्व प्रदेश त्याच्याकडे होता); \li1 \v 11 बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता); \li1 \v 12 अहीलुदचा पुत्र बाअना याच्याकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश; \li1 \v 13 बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती); \li1 \v 14 इद्दोचा पुत्र अहीनादाबकडे महनाईम. \li1 \v 15 अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता); \li1 \v 16 हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर; \li1 \v 17 पारुआहचा पुत्र यहोशाफाट हा इस्साखारमध्ये होता; \li1 \v 18 एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर. \li1 \v 19 उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता. \s1 शलोमोनचा रोजचा पुरवठा \p \v 20 इस्राएल आणि यहूदीयाच्या लोकांची संख्या समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित होती. ते खाऊन पिऊन मजेत होते. \v 21 आणि फरात\f + \fr 4:21 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि पुढे खाली इजिप्तच्या हद्दीपर्यंत या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते. या सर्व राष्ट्रांनी शलोमोनला कर दिला व शलोमोनच्या सर्व आयुष्यभर ते त्याच्या अधीन राहिले. \p \v 22 शलोमोनचा रोजचा पुरवठा तीस कोर\f + \fr 4:22 \fr*\ft अंदाजे 5000 कि.ग्रॅ.\ft*\f* सपीठ व साठ कोर\f + \fr 4:22 \fr*\ft अंदाजे 10,000 कि.ग्रॅ.\ft*\f* पीठ, \v 23 गोठ्यात चारलेले दहा बैल, कुरणात चरणारे वीस बैल आणि शंभर मेंढरे व बोकडे, याशिवाय हरिण, सांबरे, भेकरे आणि पुष्ट पक्षी. \v 24 कारण फरात नदीच्या पश्चिमेकडील तिफसाहपासून गाझापर्यंतच्या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते आणि सर्व बाजूने शांती होती. \v 25 शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते. \p \v 26 शलोमोनकडे रथाच्या घोड्यांसाठी चार\f + \fr 4:26 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa 40,000\fqa*\f* हजार तबेले आणि बारा हजार घोडे\f + \fr 4:26 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa रथस्वार\fqa*\f* होते. \p \v 27 जिल्हाधिकारी आपआपल्या महिन्यात शलोमोन राजाला व त्यांच्या मेजावर भोजन करणार्‍यांसाठी अन्नसामुग्रींचा पुरवठा करीत असत. कशाचीही वाण पडणार नाही याची ते दक्षता घेत असत. \v 28 त्याचप्रमाणे रथाच्या घोड्यांसाठी व इतर घोड्यांसाठी देखील जव व वैरण त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी आणत असत. \s1 शलोमोनचे ज्ञान \p \v 29 परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती. \v 30 पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते. \v 31 इतर मनुष्यांपेक्षा, म्हणजेच एज्रावासी एथान, माहोलचे पुत्र हेमान, कल्कोल व दारदा यांच्यापेक्षा शलोमोन ज्ञानी होता. आणि त्याची किर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पसरली. \v 32 शलोमोनने तीन हजार नीतिसूत्रे आणि एक हजार पाच गीते रचली. \v 33 लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्‍या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले. \v 34 शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत. \c 5 \s1 मंदिर बांधण्याची तयारी \p \v 1 त्याचे पिता दावीदाचा अभिषिक्त वारस म्हणून शलोमोनचा राज्याभिषेक झाला आहे असे जेव्हा सोरचा राजा हीरामाने ऐकले, तेव्हा त्याने शलोमोनकडे आपले राजदूत पाठवले, कारण दावीदाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते. \v 2 शलोमोनने हीरामास परत निरोप पाठवला: \pm \v 3 “आपणास तर माहीतच आहे की माझे पिता दावीदाला सर्व बाजूंनी युद्धाने घेरले होते आणि त्याच्या शत्रूंना याहवेहने त्याच्या पायाखाली देईपर्यंत याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावासाठी त्यांना मंदिर बांधता आले नाही. \v 4 परंतु आता माझ्या याहवेह परमेश्वराने सर्व बाजूंनी मला स्वस्थता दिली आहे. कोणी शत्रू किंवा अरिष्ट नाही. \v 5 जसे याहवेहने माझे पिता दावीदाला सांगितले होते, ‘तुझा पुत्र, ज्याला मी तुझ्या जागी तुझ्या राजासनावर बसवेन तो माझ्या नावासाठी मंदिर बांधेल.’ म्हणून याहवेह माझ्या परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर बांधावे अशी मी इच्छा बाळगतो. \pm \v 6 “तर आता लबानोनचे गंधसरू माझ्यासाठी कापले जावे अशी आज्ञा करा. माझी माणसे तुमच्या माणसांबरोबर काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी तुम्ही जी मजुरी ठरवाल ती मी तुम्हाला देईन. तुम्हाला माहीतच आहे की लाकडाचे काम करण्यात जी निपुणता सीदोनी लोकांमध्ये आहे ती आमच्यात कोणामध्ये नाही.” \p \v 7 शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.” \p \v 8 तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला: \pm “आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल. \v 9 माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.” \p \v 10 याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला. \v 11 आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर\f + \fr 5:11 \fr*\ft म्हणजे 3,250 मेट्रिक टन\ft*\f* गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर\f + \fr 5:11 \fr*\ft म्हणजेच 440,000 लीटर\ft*\f* दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला. \v 12 अभिवचन दिल्याप्रमाणे याहवेहने शलोमोनला ज्ञान दिले. हीराम आणि शलोमोन यांच्यात शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी शांतीचा करार केला. \p \v 13 शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले, \v 14 शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्‍यांवर अधिकारी होता. \v 15 डोंगराळ प्रदेशात शलोमोनचे सत्तर हजार ओझी वाहणारे आणि ऐंशी हजार दगड घडविणारे होते, \v 16 त्याचप्रमाणे शलोमोनचे तीन हजार तीनशे\f + \fr 5:16 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa 3,600\fqa*\f* मुकादम होते, जे प्रकल्पाची देखरेख करून कामगारांचे मार्गदर्शन करीत असत. \v 17 राजाच्या आज्ञेनुसार त्यांनी मंदिराच्या पायासाठी खाणीतून उच्च दर्जाचे मोठे दगडे काढले. \v 18 शलोमोनचे आणि हीरामाचे कारागीर व गिबली येथील कामकर्‍यांनी मंदिर बांधण्यासाठी लाकूड व दगडे कापून तयार केली. \c 6 \s1 शलोमोन मंदिर बांधतो \p \v 1 इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर चारशे ऐंशी वर्षानंतर, इस्राएलवर शलोमोनच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसर्‍या महिन्यात; म्हणजेच सीव महिन्यात, शलोमोनने याहवेहचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. \p \v 2 शलोमोन राजाने याहवेहसाठी जे मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात आणि उंची तीस हात\f + \fr 6:2 \fr*\ft म्हणजेच 27 मीटर लांबी, 9 मीटर रुंदी, 14 मीटर उंची\ft*\f* होती. \v 3 मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरच्या वर्‍हांड्याची रुंदी मंदिराच्या रुंदीएवढीच, म्हणजेच वीस हात होती, मंदिराच्या समोरील बाजूने त्याची रुंदी दहा हात\f + \fr 6:3 \fr*\ft म्हणजे 4.5 मीटर\ft*\f* होती. \v 4 त्यांनी मंदिराच्या वरील बाजूच्या भिंतींमध्ये अरुंद खिडक्या बनविल्या. \v 5 मुख्य खोली तसेच पवित्रस्थानाच्या आतील बाजूस त्याने मजले बांधले व त्यात खोल्या केल्या. \v 6 सर्वात खालचा मजला पाच हात\f + \fr 6:6 \fr*\ft अंदाजे 2.5 मीटर\ft*\f* रुंद, मधला मजला सहा हात\f + \fr 6:6 \fr*\ft अंदाजे 2.7 मीटर\ft*\f* आणि तिसरा मजला सात हात\f + \fr 6:6 \fr*\ft अंदाजे 3.2 मीटर\ft*\f*. त्याने मंदिराच्या बाहेरील बाजूस तोडे ठेवले म्हणजे मंदिराच्या भिंतींच्या पार काहीही घुसविले जावू नये. \p \v 7 मंदिराच्या बांधकामासाठी खाणीतूनच तयार केलेले दगड वापरण्यात आले होते आणि मंदिर बांधले जात असताना हातोडी, कुर्‍हाड किंवा इतर कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिराच्या परिसरात ऐकू आला नव्हता. \p \v 8 तळमजल्याचे प्रवेशद्वार मंदिराच्या दक्षिणेस होते; तिथून मधल्या मजल्यापर्यंत आणि तिथून पुढे तिसर्‍या मजल्यापर्यंत एक जिना होता. \v 9 त्याने गंधसरूच्या लाकडाच्या तुळया टाकून छप्पर टाकून, मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. \v 10 आणि त्याने मंदिराच्या सभोवतीच्या बाजूने पाच हात उंचीच्या खोल्या बांधल्या व त्या प्रत्येक खोली गंधसरूच्या तुळयांनी मंदिराशी जोडली. \p \v 11 तेव्हा याहवेहचे वचन शलोमोनकडे आले: \v 12 “तू बांधत असलेले हे जे मंदिर आहे त्याबाबत, जर तू माझ्या विधींचे अनुसरण केले, माझे नियम पाळले व माझ्या आज्ञा मानून त्यांचे पालन केले तर, तुझा पिता दावीदाला दिलेल्या अभिवचनांची मी तुझ्याद्वारे पूर्तता करेन. \v 13 आणि मी इस्राएली लोकांमध्ये राहीन आणि माझे लोक इस्राएल यांना मी सोडणार नाही.” \p \v 14 शलोमोनने मंदिर बांधून पूर्ण केले. \v 15 त्याने मंदिराच्या आतील भिंतींना, जमिनीपासून छप्परापर्यंत गंधसरूच्या पट्ट्या लावल्या व जमिनीला गंधसरूच्या फळ्या केल्या. \v 16 मंदिरामध्येच पवित्रस्थान व परमपवित्रस्थान असावे म्हणून मंदिराच्या मागील बाजूला जमिनीपासून छप्परापर्यंत देवदारूच्या फळ्या लावून त्याने तो वेगळा केला. \v 17 या खोलीच्या समोरची मुख्य खोली चाळीस हात\f + \fr 6:17 \fr*\ft अंदाजे 18 मीटर\ft*\f* लांब होती. \v 18 मंदिराचा आतील भाग गंधसरूचा होता व त्यावर कळ्या व उमललेली फुले कोरली होती. दगड दृष्टीस पडू नये, म्हणून सर्वकाही गंधसरूचे बनविले गेले होते. \p \v 19 याहवेहच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने मंदिराच्या आतील भागात पवित्रस्थान बनविले. \v 20 आतील पवित्रस्थान वीस हात लांब, वीस हात रुंद व वीस हात उंच होते. त्याच्या आतील भागावर व गंधसरूच्या वेदीला त्याने शुद्ध सोन्याचे आवरण दिले होते. \v 21 शलोमोनने मंदिराच्या आतील भागाला शुद्ध सोन्याचे आच्छादन घातले, आणि पवित्रस्थानाच्या समोरून आतील बाजूने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या, व त्यांना देखील सोन्याचे आवरण दिले. \v 22 अशाप्रकारे त्याने संपूर्ण मंदिर सोन्याने मढविले. आतील पवित्रस्थानातील वेदीला सुद्धा त्याने सोन्याचे आवरण दिले. \p \v 23 आतील पवित्रस्थानासाठी त्याने जैतून लाकडाचे दोन करूब तयार केले. प्रत्येक दहा हात उंच होते. \v 24 पहिल्या करुबाचे एक पंख पाच हात आणि दुसरे पंख पाच हात लांब होते; एका पंखाच्या टोकापासून दुसर्‍या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते. \v 25 दुसरा करूब सुद्धा दहा हाताच्या मापाचा होता, कारण दोन्ही करूब एकसारख्याच मापाचे व आकाराचे होते. \v 26 प्रत्येक करुबाची उंची दहा हात होती. \v 27 त्याने ते करूब, त्यांचे पंख पसरलेले असे मंदिराच्या अगदी आतील खोलीत ठेवले. एका करुबाचे पंख एका भिंतीला स्पर्श करत होते, तर दुसऱ्या करुबाचे पंख दुसर्‍या भिंतीला स्पर्श करत होते आणि त्यांचे पंख खोलीच्या मध्यभागी एकमेकांना स्पर्श करत होते. \v 28 त्याने करुबांना सोन्याचे आवरण दिले. \p \v 29 मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या भिंतीवर सभोवार करूब, खजुरीची झाडे व उमललेली फुले कोरली होती. \v 30 त्याने मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या जमिनीला सुद्धा सोन्याचे आवरण दिले. \p \v 31 मंदिराच्या आतील प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाचे दरवाजे बनविले, ज्यांची रुंदी पवित्रस्थानाच्या पाचव्या भागाइतकी होती. \v 32 त्यातील जैतून लाकडाच्या दोन दारांवर सोन्याचे ठोकलेले करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली. \v 33 त्याच प्रकारे, मुख्य खोलीच्या प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाच्या कपाळपट्ट्या बनविल्या ज्यांची रुंदी भिंतीच्या चौथ्या भागाइतकी होती. \v 34 त्याने देवदारू लाकडाचे सुद्धा दोन दरवाजे बनविले, जे दोन्ही बाजूंनी दुमडले जात होते. \v 35 त्यावरही त्याने एकसारखे ठोकलेल्या सोन्याचे काम करून करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली. \p \v 36 आणि त्याने आतील अंगणात वळणदार दगडांच्या तीन रांगा आणि छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग बनविली. \p \v 37 चौथ्या वर्षी, सीव महिन्यात याहवेहच्या मंदिराचा पाया घातला गेला. \v 38 अकराव्या वर्षी, आठव्या महिन्यात; म्हणजे बूल महिन्यात, त्याच्या तपशील व नमुन्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम संपले. शलोमोनला मंदिर बांधण्यासाठी सात वर्षे लागली. \c 7 \s1 शलोमोन आपला राजवाडा बांधतो \p \v 1 शलोमोनच्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे लागली. \v 2 त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात,\f + \fr 7:2 \fr*\ft अंदाजे 45 मीटर\ft*\f* रुंदी पन्नास हात\f + \fr 7:2 \fr*\ft अंदाजे 23 मीटर\ft*\f* व उंची तीस हात\f + \fr 7:2 \fr*\ft अंदाजे 14 मीटर\ft*\f* होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या. \v 3 त्या खांबांवर एका ओळीत पंधरा तुळया; अशा पंचेचाळीस तुळया होत्या व त्यावर देवदारूच्या फळ्यांचे छत होते. \v 4 त्याच्या खिडक्या उंचावर समोरासमोर तीन अशा जोडीने बसविल्या होत्या. \v 5 सर्व दरवाजांना चौकट बाह्या होत्या; त्या समोरच्या बाजूने समोरासमोर तीन अशा जोडीने होत्या. \p \v 6 त्याने पन्नास हात लांब व तीस हात रुंद अशी खांबांची एक पंक्ती बनविली. त्याच्यासमोर एक द्वारमंडप होता व त्यासमोर खांब व त्यावर छत होते. \p \v 7 त्याने राजासनासाठी खोली बांधली, जी न्यायाची खोली, जिथे बसून तो लोकांचा न्याय करणार, त्या खोलीला जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या फळ्यांनी झाकले. \v 8 आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला. \p \v 9 या सर्व इमारती, बाहेरच्या बाजूपासून ते दरबारापर्यंत आणि त्यांच्या पायापासून छपराच्या वळचणीपर्यंत, उच्च प्रतीचे दगड घेऊन त्यांना आकारात कापून आतील व बाहेरील बाजूने त्यांना गुळगुळीत बनवून वापरले होते. \v 10 उत्तम दर्जाच्या मोठमोठ्या दगडांनी त्यांचा पाया घातला गेला. काही दगड दहा हात\f + \fr 7:10 \fr*\ft अंदाजे 4.5 मीटर\ft*\f* तर काही आठ हात\f + \fr 7:10 \fr*\ft अंदाजे 3.6 मीटर\ft*\f* लांबीचे होते. \v 11 त्याच्या वरच्या बाजूने योग्य आकारात कापलेले उच्च दर्जाचे दगड आणि गंधसरूच्या तुळया होत्या. \v 12 मोठ्या अंगणाच्या सभोवती घडलेल्या दगडांच्या तीन रांगा व छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती, याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणाला व द्वारमंडपालाही तसेच होते. \s1 मंदिराची सजावट \p \v 13 शलोमोन राजाने सोर येथून हीराम\f + \fr 7:13 \fr*\ft किंवा \ft*\fqa हुराम\fqa*\f* याला बोलावून घेतले. \v 14 त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली. \p \v 15 त्याने कास्याचे दोन खांब तयार केले, प्रत्येक खांबाची उंची अठरा हात\f + \fr 7:15 \fr*\ft अंदाजे 8.1 मीटर\ft*\f* आणि घेर बारा हात\f + \fr 7:15 \fr*\ft अंदाजे 5.4 मीटर\ft*\f* होती. \v 16 खांबांच्या शिखरांवर बसविण्यासाठी त्याने कास्याचे दोन ओतीव कळस केले; प्रत्येकाची उंची पाच हात\f + \fr 7:16 \fr*\ft अंदाजे 2.3 मीटर\ft*\f* होती. \v 17 खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या. \v 18 खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले. \v 19 द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या\f + \fr 7:19 \fr*\ft शोशांसारखे दिसणारे फूल\ft*\f* फुलांच्या आकाराचे, चार हात\f + \fr 7:19 \fr*\ft अंदाजे 1.8 मीटर\ft*\f* उंच होते. \v 20 दोन्ही खांबांच्या कळसांना लागून वाटीच्या आकाराच्या जाळीभोवती, दोनशे डाळिंबाच्या रांगा केलेल्या होत्या. \v 21 त्याने हे खांब मंदिराच्या द्वारमंडपाकडे ठेवले. दक्षिणेकडे ठेवलेल्या खांबाला त्याने याखीन\f + \fr 7:21 \fr*\fq याखीन \fq*\ft अर्थात् \ft*\fqa तो स्थापित करतो\fqa*\f* आणि उत्तरेकडील खांबाला बवाज\f + \fr 7:21 \fr*\fq बवाज \fq*\ft अर्थात् \ft*\fqa त्याच्या ठायी सामर्थ्य आहे\fqa*\f* असे नाव दिले. \v 22 खांबांवर असलेले कळस कमळांच्या आकाराचे होते. याप्रकारे खांबांचे काम पूर्ण झाले. \p \v 23 त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्‍या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात\f + \cat dup\cat*\fr 7:23 \fr*\ft अंदाजे 14 मीटर\ft*\f* दोरी लागत असे. \v 24 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर दहा काकड्या होत्या. या काकड्या हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या. \p \v 25 हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते. \v 26 त्याची जाडी चार बोटे\f + \fr 7:26 \fr*\ft अंदाजे 7.5 सें.मी.\ft*\f* होते, आणि पेल्याचा घेर, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ\f + \fr 7:26 \fr*\ft अंदाजे 44,000 लीटर\ft*\f* पाणी मावत असे. \p \v 27 त्याने कास्याचे दहा चौरंग बनविले; प्रत्येकाची लांबी चार हात, रुंदी चार हात आणि उंची तीन हात\f + \fr 7:27 \fr*\ft अंदाजे 1.4 मीटर\ft*\f* होती. \v 28 चौरंग याप्रकारे बनविले होते: त्याला बाजूने लाकडाच्या फळ्या जोडल्या होत्या. \v 29 फळ्यांच्या मध्यभागी व तिवडीवरही सिंह, बैल आणि करूब यांच्या आकृती कोरल्या होत्या आणि सिंहाच्या व बैलांच्या ठोकलेल्या लोंबत्या झालरी होत्या. \v 30 प्रत्येक चौरंगाला चार कास्याची चाके व कास्याच्या धुर्‍या होत्या आणि प्रत्येकाला गंगाळे होती, ज्याला आधार देण्यासाठी ओतीव स्तंभ असून त्यांच्या बाजूंनी लोंबत्या माळा होत्या. \v 31 तिवडीच्या आतील बाजूस त्याचे तोंड उघडे होते व त्याला एका हाताएवढी खोल गोलाकार पट्टी होती. हा उघडा भाग गोल होता, आणि त्याच्या व्यासाचे माप दीड हात होते. त्याच्या तोंडाभोवती कोरीव काम होते. तिवडीचे खांब गोल नसून चौकोनी होते. \v 32 चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्‍या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती. \v 33 ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्‍या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते. \p \v 34 प्रत्येक तिवडीला, चारही कोपर्‍यांना चार दांडे होते, जे तिवडीला अखंड असे होते. \v 35 तिवडीच्या वरच्या बाजूला अर्धा हात गोलाकाराची खोल पट्टी होती. त्याचे आधारस्तंभ आणि खांब तिवडीच्या वरच्या बाजूने जोडलेले होते. \v 36 आधारस्तंभाच्या आणि खांबांच्या पृष्ठभागावर करूब, सिंह आणि खजुरीची झाडे कोरली होती आणि सभोवार लोंबत्या माळा होत्या. \v 37 अशाप्रकारे त्याने या दहा तिवड्या तयार केल्या. त्या सर्व एकाच साच्यात तयार केलेल्या असून ते सारख्याच मापाच्या आणि आकाराच्या होत्या. \p \v 38 त्यानंतर त्याने कास्याची दहा गंगाळे बनविली, प्रत्येकात चाळीस बथ\f + \fr 7:38 \fr*\ft अंदाजे 880 लीटर\ft*\f* पाणी मावत असे आणि त्याचा व्यास चार हात होता, त्या दहा तिवडीतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते. \v 39 त्याने पाच तिवड्या मंदिराच्या दक्षिणेकडे ठेवल्या आणि पाच उत्तरेकडे. त्याने हौद मंदिराच्या दक्षिणेस; दक्षिणपूर्वेच्या कोपर्‍यात ठेवला. \v 40 त्याने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. \p हीरामाने याहवेहच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले हे सर्व काम पूर्ण केले: \b \li1 \v 41 दोन खांब; \li1 खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; \li1 खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच; \li1 \v 42 त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा); \li1 \v 43 दहा तिवड्या व त्यांची दहा गंगाळे; \li1 \v 44 हौद आणि त्याखालील बारा बैल; \li1 \v 45 भांडी, फावडे आणि शिंपडण्याच्या वाट्या. \b \p शलोमोन राजासाठी हीरामाने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या. \v 46 राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या. \v 47 शलोमोनने या सर्व वस्तूंचे वजन केले नाही, कारण ते पुष्कळ होते; कास्याचे वजन करणे शक्य नव्हते. \p \v 48 याहवेहच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: \b \li1 सोन्याची वेदी; \li1 मेजावर समक्षतेची भाकर ठेवली होती; \li1 \v 49 शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ (आतील पवित्रस्थानासमोर पाच उजवीकडे व पाच डावीकडे); \li1 सोन्याच्या फुलांची सजावट, दिवे आणि चिमटे; \li1 \v 50 शुद्ध सोन्याची गंगाळे, वाती कापण्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; \li1 आतील खोलीच्या, म्हणजेच परमपवित्रस्थानाच्या आणि मंदिराच्या मुख्य खोलीच्या दरवाजासाठी सोन्याच्या कड्या. \b \p \v 51 याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने आपला पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि पडदे; शलोमोनने त्या वस्तू याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवल्या. \c 8 \s1 मंदिरात कोश आणला \p \v 1 तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले. \v 2 इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले. \p \v 3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला, \v 4 आणि त्यांनी याहवेहचा कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजक व लेवी यांनी ती वाहून आणली, \v 5 राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती. \p \v 6 नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला. \v 7 करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे आच्छादले जात होते. \v 8 ते दांडे इतके लांब होते की, त्यांची टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असत, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ती दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत. \v 9 इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन दगडी पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते. \p \v 10 जेव्हा याजक पवित्रस्थानातून बाहेर आले, तेव्हा याहवेहचे मंदिर मेघाने भरले. \v 11 आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने याहवेहचे मंदिर भरले होते. \p \v 12 तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील; \v 13 खचितच मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.” \p \v 14 इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना, राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला. \v 15 तेव्हा राजाने म्हटले: \pm “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीद, यांना स्वतःच्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की, \v 16 ‘मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, तेव्हापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, परंतु माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करावे म्हणून मी दावीदाची निवड केली.’ \pm \v 17 “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते. \v 18 पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले. \v 19 तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’ \pm \v 20 “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे. \v 21 आमच्या पूर्वजांना जेव्हा याहवेहने इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांच्याशी याहवेहने जो करार केला तो ज्यात आहे त्या कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे.” \s1 शलोमोनची समर्पण प्रार्थना \p \v 22 नंतर शलोमोनने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत याहवेहच्या वेदीसमोर उभे राहून वर स्वर्गाकडे आपले हात पसरले \v 23 आणि म्हटले: \pm “हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, वर स्वर्गात किंवा खाली पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात. \v 24 आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे. \pm \v 25 “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीद यांना आपण जे वचन दिले होते ते आपण पाळावे, आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर विश्वासूपणे चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही खुंटणार नाही.’ \v 26 तर आता, हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीद यांना जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे. \pm \v 27 “पण परमेश्वर खचितच पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? \v 28 तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या. \v 29 ‘माझे नाव या ठिकाणी राहेल’ असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. \v 30 आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंती करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या, व ती ऐकून त्यांना क्षमा करा. \pm \v 31 “जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली, तर ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, \v 32 तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा. \pm \v 33 “आपल्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा आपले इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातात आणि जेव्हा ते आपल्याकडे पुन्हा वळतात व आपल्या नावाची थोरवी गाऊन, या मंदिरात आपल्याकडे प्रार्थना व विनंती करतात, \v 34 तेव्हा स्वर्गातून ऐकून आपल्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश आपण त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे. \pm \v 35 “आपल्या लोकांनी आपल्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील आणि आपल्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, \v 36 तेव्हा त्यांची विनंती ऐकून आपले सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा व जो देश आपण आपल्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा. \pm \v 37 “जेव्हा देशावर दुष्काळ किंवा पीडा येते किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूने त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला, \v 38 आणि आपल्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश जाणून प्रार्थना किंवा विनंती केली आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील; \v 39 तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार त्यांना करा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण आपणास त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ आपणच प्रत्येक मानवाचे हृदय जाणणारे आहात), \v 40 यासाठी की जो देश आपण आमच्या पूर्वजांना दिला, त्यात जितका काळ ते राहतील त्यांनी तुमचे भय बाळगावे. \pm \v 41 “असा कोणी परदेशी जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही परंतु आपल्या नावास्तव लांबच्या देशातून आला; \v 42 कारण त्यांनी आपले महान नाव आणि आपला पराक्रमी हात व आपला लांबविलेला बाहू याबद्दल ऐकले; व जेव्हा ते येऊन या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, \v 43 तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान तिथून आपण त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही आपल्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी आपले नाव ओळखावे व आपल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपले भय धरावे व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर आपले नाव आहे. \pm \v 44 “जेव्हा आपले लोक आपण जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे याहवेहची प्रार्थना करतील, \v 45 तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. \pm \v 46 “जेव्हा ते आपणाविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून आपण त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून त्यांच्या जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले; \v 47 आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’; \v 48 आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, \v 49 तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. \v 50 आणि ज्या आपल्या लोकांनी आपणाविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करावी. त्यांनी आपणाविरुद्ध केलेल्या सर्व अपराधांची त्यांना क्षमा करा व त्यांना कैद करून नेणार्‍यांनी त्यांच्यावर दया दाखवावी असे आपण करावे; \v 51 कारण ते तुमचे लोक आणि तुमचे वतन आहेत, ज्यांना तुम्ही इजिप्त देशातून, त्या लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढले आहे. \pm \v 52 “तुमचे कान आपल्या सेवकाच्या व आपल्या इस्राएली लोकांच्या विनंतीकडे असावे आणि जेव्हा ते आपल्याकडे आरोळी करतील तेव्हा त्यांचे ऐकावे. \v 53 कारण हे सार्वभौम याहवेह, आपण जेव्हा आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर काढले त्यावेळी तुमचा सेवक मोशेद्वारे तुम्ही जसे जाहीर केले, त्यानुसार त्यांना आपले वतन व्हावे म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतून तुम्ही त्यांना वेगळे केले आहे.” \p \v 54 शलोमोनने वेदीसमोर गुडघे टेकून व स्वर्गाकडे हात पसरून याहवेहची प्रार्थना करून संपविल्यावर तो याहवेहच्या वेदीपुढून उठला. \v 55 त्याने उभे राहून सर्व इस्राएली मंडळीला उंच आवाजात असे म्हणत आशीर्वाद दिला: \pm \v 56 “याहवेह धन्यवादित असोत, त्यांनी आपल्या अभिवचनानुसार त्यांच्या इस्राएली लोकांना विसावा दिला आहे. त्यांचा सेवक मोशेद्वारे जी चांगली अभिवचने याहवेहने दिली त्यातील एकही निष्फळ झाले नाही. \v 57 याहवेह आमचे परमेश्वर जसे आमच्या पूर्वजांसह होते तसेच ते आम्हासोबतही असो; त्यांनी कधीही आमचा त्याग करू नये. \v 58 आम्ही त्यांच्या मार्गात चालावे आणि आमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा व विधी आम्ही पाळावे म्हणून त्यांनी आमची मने आपल्याकडे वळवावी. \v 59 आणि ज्या या शब्दांनी मी याहवेहसमोर प्रार्थना केली आहे त्या याहवेह आमच्या परमेश्वरापुढे रात्रंदिवस असो, यासाठी की रोजच्या गरजेनुसार ते आपल्या सेवकाला व आपल्या इस्राएली लोकांना साहाय्य करो. \v 60 म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांनी ओळखावे की याहवेह हेच परमेश्वर आहेत आणि दुसरा कोणीही नाही. \v 61 आणि आज आहे त्याप्रमाणे तुम्ही याहवेहच्या विधीनुसार राहावे व त्यांच्या आज्ञा पाळाव्या म्हणून तुमची मने याहवेह आमच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित असावी.” \s1 मंदिराची प्रतिष्ठापना \p \v 62 नंतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेहसमोर यज्ञे अर्पण केली. \v 63 शलोमोनने शांत्यर्पणासाठी जी अर्पणे केली ती: बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे होती. याप्रकारे राजाने व सर्व इस्राएली लोकांनी याहवेहच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. \p \v 64 त्याच दिवशी राजाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधला भाग पवित्र केला आणि तिथे त्याने होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे ही अर्पण केली, कारण याहवेहपुढे जी कास्याची वेदी होती ती होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे यासाठी फार लहान होती. \p \v 65 तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर त्यावेळी सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे रहिवासी आले होते. त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वरापुढे सात दिवस व आणखी सात दिवस असे मिळून चौदा दिवस उत्सव साजरा केला. \v 66 आठव्या दिवशी त्याने लोकांना रवाना केले. तेव्हा त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आणि याहवेहने आपला सेवक दावीद व इस्राएलच्या लोकांसाठी जी सर्व चांगली कृत्ये केली त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता. \c 9 \s1 शलोमोनला याहवेहचे दर्शन \p \v 1 शलोमोनने जेव्हा याहवेहचे मंदिर व राजमहाल बांधण्याचे काम संपविले, आणि त्याला जे काही करावयाचे मनोरथ होते ते साधल्यानंतर, \v 2 याहवेहने शलोमोनला जसे गिबोन येथे दर्शन दिले होते, तसे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले. \v 3 याहवेह शलोमोनला म्हणाले: \pm “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनंती मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहे तिथे सर्वकाळासाठी माझे नाव देऊन मी ते पवित्र केले आहे. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील. \pm \v 4 “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, \v 5 तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’ \pm \v 6 “पण जर तू किंवा तुझी संतती माझ्यापासून दूर वळली आणि मी तुला दिलेल्या आज्ञा व विधी पाळले नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली, \v 7 तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील. \v 8 हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’ \v 9 तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ” \s1 शलोमोनचे इतर कार्य \p \v 10 शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले. \v 11 शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते. \v 12 परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही. \v 13 तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावा, ही कशी नगरे तू मला दिलीस?” आणि त्याने त्यास काबूल\f + \fr 9:13 \fr*\fq काबूल \fq*\ft अर्थात् \ft*\fqa निकामी\fqa*\f* प्रांत असे नाव दिले, ते नाव आजही प्रचलित आहे. \v 14 हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत\f + \fr 9:14 \fr*\ft सुमारे 4 मेट्रिक टन\ft*\f* सोने पाठवले होते. \p \v 15 शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम\f + \fr 9:15 \fr*\ft किंवा इब्री भाषेत \ft*\fqa मिल्लो ज्याचा अर्थ स्पष्ट नाही\fqa*\f*, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे. \v 16 (इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले. \v 17 आणि शलोमोनने गेजेर नगराची पुनर्बांधणी केली.) त्याने खालचे बेथ-होरोन बांधले, \v 18 वाळवंटातील देशाच्या हद्दीतील बालाथ आणि तदमोर\f + \fr 9:18 \fr*\ft किंवा इब्री भाषेत \ft*\fqa तामार\fqa*\f* बांधली, \v 19 त्याचप्रमाणे शलोमोनचे रथ व त्याचे घोडे\f + \fr 9:19 \fr*\ft किंवा \ft*\fqa रथस्वार\fqa*\f* यांच्यासाठी सर्व शहरे व नगरे; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व प्रदेशात त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले. \p \v 20 अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते). \v 21 या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएल लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत. \v 22 परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते. \v 23 शलोमोनच्या प्रकल्पांवर जे मुख्य अधिकारीसुद्धा होते, ते पाचशे पन्नास जण होते, जे माणसांवर देखरेख ठेवणारे मुकादम होते. \p \v 24 फारोहची कन्या दावीदाचे शहर सोडून शलोमोनने तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आली, मग त्याने स्तरीय बांधकाम केले. \p \v 25 याहवेहसाठी बांधलेल्या वेदीवर शलोमोन वर्षातून तीन वेळा होमार्पणे, शांत्यर्पणे करून त्याबरोबर धूप जाळत असे, अशाप्रकारे त्याने मंदिराची कर्तव्ये पूर्ण केली. \p \v 26 शलोमोन राजाने एदोम देशात तांबड्या समुद्रतीरी एलोथजवळ एजिओन-गेबेर येथे सुद्धा गलबते बांधली. \v 27 आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले. \v 28 त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत\f + \fr 9:28 \fr*\ft अंदाजे 14 मेट्रिक टन\ft*\f* सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले. \c 10 \s1 शबाच्या राणीची शलोमोनास भेट \p \v 1 जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली. \v 2 मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली. \v 3 शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही राजासाठी कठीण नव्हते. \v 4 जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला, \v 5 त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे झगे, त्याचे प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेले होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली. \p \v 6 ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे. \v 7 परंतु मी येथे येऊन या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत त्यावर मी विश्वास ठेवला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे. \v 8 तुमचे लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील! \v 9 याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.” \p \v 10 आणि तिने राजाला एकशेवीस तालांत\f + \fr 10:10 \fr*\ft अंदाजे 4 मेट्रिक टन\ft*\f* सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला इतकी सुगंधी द्रव्ये आणली की त्यानंतर तेवढी द्रव्ये परत कोणी आणली नाहीत. \p \v 11 (त्याचप्रमाणे हीरामच्या गलबतांवर ओफीर येथून सोने व मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड\f + \fr 10:11 \fr*\fq चंदनाचे लाकूड \fq*\ft मूळ भाषेत \ft*\fqa अलमद\fqa*\f* व मोलवान रत्ने आणली. \v 12 शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.) \p \v 13 शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, त्या शिवाय राजाच्या खजिन्यातूनही राजाने तिला भेटी दिल्या. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली. \s1 शलोमोनचे वैभव \p \v 14 शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत\f + \fr 10:14 \fr*\ft अंदाजे 23 मेट्रिक टन\ft*\f* होते, \v 15 याशिवाय व्यापारी आणि सावकार, अरब देशाचे राजे व देशाच्या राज्यपालांपासून येणारी महसूल ती वेगळीच होती. \p \v 16 शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल\f + \fr 10:16 \fr*\ft अंदाजे 6.9 कि.ग्रॅ.\ft*\f* ठोकलेले सोने लागले होते. \v 17 तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीन मीना\f + \fr 10:17 \fr*\ft अंदाजे 1.7 कि.ग्रॅ.\ft*\f* सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या. \p \v 18 नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले. \v 19 सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याच्या मागचा भाग गोलाकार होता. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह केलेले होते. \v 20 प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते. \v 21 शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. \v 22 हीरामच्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा\f + \fr 10:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa तार्शीशची गलबते\fqa*\f* समुद्रावर तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर\f + \fr 10:22 \fr*\ft या इब्री शब्दाचा मूळ अर्थ अनिश्चित आहे\ft*\f* घेऊन परत येत असत. \p \v 23 संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. \v 24 परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व लोक येत असत. \v 25 आणि जे लोक येत असत, ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत. \p \v 26 शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती. \v 27 राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. \v 28 शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे\f + \fr 10:28 \fr*\ft किंवा \ft*\fqa सिलिसिआ\fqa*\f* वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असत. \v 29 त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी\f + \cat dup\cat*\fr 10:29 \fr*\ft अंदाजे 1.7 कि.ग्रॅ.\ft*\f* इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते पाठवित असत. \c 11 \s1 शलोमोनच्या स्त्रिया \p \v 1 शलोमोन राजा, फारोहच्या कन्येशिवाय मोआबी, अम्मोनी, एदोमी, सीदोनी व हिथी या परदेशीय स्त्रियांवर देखील प्रेम करत होता. \v 2 हे ते राष्ट्र होते ज्याविषयी याहवेहने इस्राएल लोकांना सांगितले होते, “तुम्ही त्यांच्याशी विवाह करू नये, कारण ते खचितच तुमची मने त्यांच्या दैवतांकडे वळवतील.” तरीही, शलोमोन त्या स्त्रियांच्या प्रेमात फार जडला होता. \v 3 त्याला राजकीय घराण्यातील सातशे पत्नी आणि तीनशे उपपत्नी होत्या व त्याच्या पत्नींनी त्याला बहकविले. \v 4 तो उतार वयाचा होईपर्यंत, त्याच्या पत्नींनी त्याचे हृदय इतर दैवतांकडे वळविले आणि त्याचा पिता दावीदाप्रमाणे शलोमोनचे हृदय आता संपूर्णपणे याहवेह त्याच्या परमेश्वरास समर्पित नव्हते. \v 5 शलोमोन सीदोन लोकांची देवी अष्टारोथ आणि अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलेख याची उपासना करू लागला. \v 6 याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते शलोमोनने केले; त्याचा पिता दावीदाने केले त्याप्रमाणे शलोमोन याहवेहला पूर्णपणे अनुसरला नाही. \p \v 7 शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली. \v 8 आपल्या परदेशीय स्त्रिया, ज्या धूप जाळून आपआपल्या दैवतांना यज्ञ अर्पण करीत होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्याने तसेच केले. \p \v 9 शलोमोनचे हृदय याहवेह इस्राएलचे परमेश्वर, ज्यांनी त्याला दोनदा दर्शन दिले होते त्यांच्यापासून दूर वळले होते, म्हणून याहवेह शलोमोनवर रागावले. \v 10 जरी याहवेहने इतर देवांचे अनुसरण करण्यास मना केली होती, तरी शलोमोनने याहवेहची आज्ञा मानली नाही. \v 11 म्हणून याहवेहने शलोमोनला म्हटले, “तुझी ही वृत्ती आहे, आणि मी तुला लावून दिलेल्या माझ्या कराराचे व विधींचे पालन तू केले नाही, मी खचितच तुझे राज्य तुझ्यापासून हिसकावून घेईन व ते तुझ्या हाताखालच्या मनुष्याला देईन. \v 12 तथापि, तुझा पिता दावीद याच्याप्रीत्यर्थ, ते मी तुझ्या जीवनकाळात करणार नाही. ते मी तुझ्या पुत्राच्या हातून हिसकावून घेईन. \v 13 तरीही, संपूर्ण राज्यच मी त्याच्यापासून हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद व यरुशलेम ज्यांना मी निवडले, याच्याप्रीत्यर्थ एक गोत्र मी तुझ्या पुत्राच्या हाती देईन.” \s1 शलोमोनचे शत्रू \p \v 14 नंतर याहवेहने एदोमी राजघराण्यातील एदोम हदाद याला शलोमोनचा शत्रू म्हणून उभे केले. \v 15 काही वर्षापूर्वी योआबाचा सेनापती एदोम, जो मृतांना पुरण्यास गेला होता, तेव्हा दावीदाने त्याच्याशी युद्ध केले होते आणि एदोमातील सर्व पुरुषांना मारून टाकले होते. \v 16 एदोमातील सर्व पुरुषांना मारेपर्यंत योआब व सर्व इस्राएली लोक सहा महिने तिथेच राहिले. \v 17 परंतु हदाद, जो अजूनही कोवळा मुलगा होता, काही एदोमी अधिकारी, ज्यांनी त्याच्या पित्याची सेवा केली होती, त्यांच्याबरोबर इजिप्तमध्ये पळून गेला. \v 18 ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला. \p \v 19 फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली. \v 20 तहपनीसच्या बहिणीकडून त्याला गेनुबाथ नावाचा एक पुत्र झाला, ज्याचे संगोपन तहपनीसने राजवाड्यात केले. गेनुबाथ तिथे स्वतः फारोहच्या लेकरांबरोबर राहिला. \p \v 21 इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.” \p \v 22 फारोहने त्याला विचारले, “येथे तुला काय कमी आहे की तू आपल्या देशाला जाऊ इच्छितोस?” \p हदाद म्हणाला, “काही कमी नाही, पण मला जाऊ द्यावे!” \p \v 23 परमेश्वराने शलोमोनविरुद्ध आणखी एक शत्रू उभा केला, तो एलयादाचा पुत्र रेजोन होता, जो त्याचा मालक सोबाहचा राजा हादादेजर याच्यापासून पळून गेला होता. \v 24 जेव्हा दावीदाने जोबाहच्या सैन्याचा नाश केला, रेजोनने त्याच्यासोबत काही लोक जमा केले व तो त्यांचा पुढारी झाला; ते पुढे दिमिष्कास गेले, तिथे स्थायिक होऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला. \v 25 शलोमोन जिवंत होता तोपर्यंत हदादने दिलेल्या त्रासात भर असे रेजोनने देखील इस्राएलशी वैर केले. तेव्हा रेजोनने अरामात राज्य केले व इस्राएलला विरोध केला. \s1 यरोबोअम शलोमोनविरुद्ध बंड करतो \p \v 26 जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते. \p \v 27 त्याने राजाविरुद्ध बंड कसे केले त्याचा वृत्तांत असा: शलोमोनने स्तरीय बांधकाम व त्याचा पिता दावीदाच्या शहराच्या भिंतीची खिंडारे दुरुस्त केली. \v 28 यरोबोअम एक शूरवीर होता. या तरुणाने आपले काम किती उत्तम प्रकारे केले आहे, हे शलोमोनने पाहिले, तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या गोत्रातील सर्व मजूर कामगारांवर मुख्य असे नेमले. \p \v 29 त्याच दरम्यान यरोबोअम यरुशलेमातून बाहेर जात असताना, शिलोनी अहीयाह नावाचा संदेष्टा, नवीन झगा घातलेला असा त्याला वाटेत भेटला. ते त्या मैदानात दोघेच होते, \v 30 अहीयाहने घातलेला आपला नवीन झगा घेऊन तो फाडून त्याचे बारा तुकडे केले. \v 31 आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन. \v 32 पण माझा सेवक दावीद आणि यरुशलेम शहर ज्याची मी इस्राएलच्या सर्व गोत्रांतून निवड केली त्याच्याप्रित्यर्थ, शलोमोनच्या हातात एक गोत्र राहील. \v 33 मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत. \p \v 34 “ ‘परंतु मी शलोमोनच्या हातून आताच संपूर्ण राज्य हिसकावून घेणार नाही; माझा सेवक दावीदाप्रीत्यर्थ मी त्याला त्याच्या जीवनभर अधिकारी असे नेमले आहे, कारण मी दावीदाला निवडले व त्याने माझ्या आज्ञा व विधींचे पालन केले. \v 35 परंतु मी शलोमोनच्या पुत्राच्या हातून राज्य काढून दहा गोत्र तुला देईन. \v 36 मी शलोमोनच्या पुत्राला एक गोत्र देईन, यासाठी की ज्या यरुशलेम नगरास मी माझ्या नावासाठी निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद याचा दीप सदा माझ्यासमोर पेटलेला असेल. \v 37 आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुला मनास वाटेल त्यावर तू राज्य करशील; इस्राएलवर तू राज्य करशील. \v 38 मी तुला दिलेल्या आज्ञांनुसार जर तू करशील, माझा सेवक दावीदाने केले त्याप्रमाणे माझ्या आज्ञेत चालशील व माझे विधी व आज्ञा पाळून माझ्या दृष्टीत जे योग्य ते करशील, तर मी तुझ्याबरोबर राहीन. दावीदाचे जसे मी कायमचे राज्य स्थापले आहे, तसेच तुझी व तुझ्या राज्याची स्थापना मी करेन व इस्राएल तुझ्या हाती देईन. \v 39 असे करून मी दावीदाच्या वंशजांना नम्र बनवीन, पण सर्वकाळासाठी नव्हे.’ ” \p \v 40 शलोमोनने यरोबोअमला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण यरोबोअम इजिप्त देशाचा राजा शिशाककडे पळून गेला आणि शलोमोनचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिला. \s1 शलोमोनचा मृत्यू \p \v 41 शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटना; त्याची कृत्ये व त्याने दाखविलेले ज्ञान हे शलोमोनच्या पुस्तकात लिहिलेले नाहीत का? \v 42 शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. \v 43 नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले आणि रेहोबोअम राजा म्हणून त्याचा वारस झाला. \c 12 \s1 इस्राएली लोकांचे रेहोबोअमविरुद्ध बंड \p \v 1 रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले. \v 2 जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो शलोमोन राजापासून पळून अजूनही इजिप्त देशातच होता). तो इजिप्तवरून परत आला. \v 3 तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि इस्राएलची सर्व मंडळी रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले: \v 4 “तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू आपण हलके करावे, म्हणजे आम्ही आपली सेवा करू.” \p \v 5 रेहोबोअमने उत्तर दिले, “तीन दिवसांसाठी माघारी जा आणि परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले. \p \v 6 तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?” \p \v 7 त्यांनी उत्तर दिले, “आज जर तुम्ही त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा केली व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.” \p \v 8 पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला. \v 9 त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?” \p \v 10 त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुला म्हणाले आहेत की, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू आपण हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे. \v 11 माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ” \p \v 12 तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” \v 13 वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत राजाने लोकांना कठोरपणे उत्तर दिले, \v 14 तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.” \v 15 अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या. \p \v 16 राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: \q1 “आम्हाला दावीदामध्ये, \q2 इशायच्या मुलाशी आमचा काय वाटा, \q1 इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! \q2 दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” \m असे म्हणत इस्राएलचे लोक परत घरी गेले. \v 17 परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले. \p \v 18 अदोनिराम\f + \fr 12:18 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अदोराम\fqa*\f* जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु सर्व इस्राएलने त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला. \v 19 याप्रकारे इस्राएली लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे. \p \v 20 यरोबोअम इजिप्त देशातून परत आला आहे हे सर्व इस्राएल लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्या मंडळीत बोलावून घेतले व त्याला सर्व इस्राएलवर राजा केले. केवळ यहूदाहचे गोत्र दावीदाच्या घराण्याशी विश्वासू राहिले. \p \v 21 जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते. \p \v 22 परंतु परमेश्वराचा मनुष्य शमायाह याच्याकडे परमेश्वराचे वचन आले: \v 23 “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग, \v 24 ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल जे तुमचे बांधव आहेत त्यांच्याविरुद्ध लढाईस जाऊ नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे माझ्यापासून आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि याहवेहने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपआपल्या घरी परत गेले. \s1 बेथेल आणि दान येथील सोन्याची वासरे \p \v 25 तेव्हा यरोबोअमने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम शहर बांधले व तिथे राहिला. तिथून पुढे त्याने पेनुएल\f + \fr 12:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa पेनुएल\fqa*\f* बांधले. \p \v 26 यरोबोअमने स्वतःशी विचार केला, “राज्य कदाचित दावीदाच्या घराण्याकडे परत जाईल. \v 27 जर या लोकांनी यरुशलेमात जाऊन याहवेहच्या मंदिरात यज्ञार्पणे केली व त्यांचा स्वामी यहूदीयाचा राजा रेहोबोअम याच्याप्रीत्यर्थ आपली निष्ठा पुन्हा दाखविली, तर ते मला जिवे मारतील व त्यांचा राजा रेहोबोअम याच्याकडे वळतील.” \p \v 28 आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतर, राजाने दोन सोन्याची वासरे बनविली. तो लोकांना म्हणाला, “तुम्ही वर यरुशलेमकडे जाणे तुम्हाला अतिशय कठीण आहे, हे इस्राएला, ही पाहा तुमची दैवते, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.” \v 29 एक वासरू त्याने बेथेलमध्ये व दुसरे दानमध्ये प्रतिष्ठापीत केले. \v 30 आणि ही बाब पाप अशी झाली; एका वासराची उपासना करण्यासाठी काही लोक बेथेलात येत होते आणि दुसर्‍या वासराची उपासना करण्यासाठी काही दूर दानपर्यंत गेले. \p \v 31 यरोबोअमने उच्च स्थानावर मंदिरे बांधली आणि जरी ते लेवी घराण्यातील नव्हते, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून याजक नेमले. \v 32 आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले. \v 33 आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली. \c 13 \s1 यहूदीयातील परमेश्वराचा संदेष्टा \p \v 1 याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता. \v 2 याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ” \v 3 त्याच दिवशी परमेश्वराच्या मनुष्याने एक चिन्ह दिले: “याहवेहने हेच चिन्ह जाहीर केले आहे: वेदी दुभागली जाईल आणि त्यावरील राख ओतली जाईल.” \p \v 4 जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना. \v 5 आणि याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराच्या मनुष्याने जे चिन्ह दिले त्यानुसार वेदी दुभागली व वेदीवरील राख ओतली गेली. \p \v 6 तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला. \p \v 7 राजा त्या परमेश्वराच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर भोजन करण्यास घरी चल आणि मी तुला एक भेट देईन.” \p \v 8 परंतु परमेश्वराच्या मनुष्याने राजाला उत्तर दिले, “तू जरी मला तुझी अर्धी संपत्ती दिली, तरीही मी तुझ्याबरोबर जाणार नाही, या ठिकाणी ना मी भाकर खाणार, ना पाणी पिणार. \v 9 कारण याहवेहच्या वचनाने मला आज्ञा दिली आहे: ‘तू तिथे ना भाकरी खावी ना पाणी प्यावे किंवा ज्या वाटेने तू जातोस त्या वाटेने परत येऊ नये.’ ” \v 10 म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्‍या मार्गाने रवाना झाला. \p \v 11 तेव्हा बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता, त्याच्या मुलांनी येऊन त्याला परमेश्वराच्या मनुष्याने त्या दिवशी जे केले ते सर्वकाही सांगितले. आणि तो राजाला जे काही बोलला ते देखील सांगितले. \v 12 त्यांच्या पित्याने त्यांना विचारले, “तो कोणत्या मार्गाने गेला?” आणि परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आलेला होता तो ज्या मार्गाने गेला होता तो त्यांनी त्याला सांगितला. \v 13 तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला.” आणि त्यांनी तसे केल्यानंतर तो गाढवावर बसला \v 14 आणि परमेश्वराच्या मनुष्याचा पाठलाग करीत गेला. तो त्याला एका एलाच्या वृक्षाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला तो तूच आहेस काय?” \p तो म्हणाला, “होय, तो मीच आहे.” \p \v 15 त्या संदेष्ट्याने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर घरी चल आणि भोजन कर.” \p \v 16 परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “मी मागे वळून तुझ्याबरोबर जाऊ शकत नाही, ना मी तुझ्याबरोबर या ठिकाणी भाकर खाऊ शकत ना पाणी पिऊ शकत. \v 17 याहवेहच्या वचनाद्वारे मला सांगितले गेले: ‘तू तिथे भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये किंवा ज्या मार्गाने तू आलास, त्याने परत जाऊ नये.’ ” \p \v 18 त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.) \v 19 म्हणून परमेश्वराचा मनुष्य त्याच्याबरोबर माघारी गेला व त्याच्या घरी खाणेपिणे केले. \p \v 20 ते मेजावर जेवायला बसले असताना, याहवेहचे वचन त्या वृद्ध संदेष्ट्याकडे आले, ज्याने त्याला माघारी आणले होते. \v 21 तो परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला होता त्याला ओरडून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तू याहवेहच्या वचनाचा अवमान केला आहेस आणि याहवेहने तुला दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही. \v 22 माघारी येऊन, ज्या ठिकाणी तू भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये असे याहवेहने तुला सांगितले होते, तिथे तू खाणेपिणे केले. म्हणून तुझ्या पूर्वजांच्या कबरेत तुझे शरीर पुरले जाणार नाही.’ ” \p \v 23 परमेश्वराच्या मनुष्याचे खाणेपिणे झाल्यानंतर, ज्या संदेष्ट्याने त्याला माघारी आणले होते त्याने त्याच्यासाठी गाढवावर खोगीर घातले. \v 24 त्याच्या वाटेने जात असताना, त्याला वाटेत एका सिंहाने गाठले व त्याला मारून टाकले आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडून राहिले असून, त्याच्या एका बाजूला सिंह व दुसर्‍या बाजूला गाढव उभे राहिले. \v 25 जे लोक त्या रस्त्याने येणे जाणे करीत होते त्यांनी त्याच्या शरीराच्या बाजूला सिंह उभा आहे असे पाहिले आणि त्यांनी शहरात जाऊन ज्या ठिकाणी वृद्ध संदेष्टा राहत होता तिथे ही बातमी सांगितली. \p \v 26 त्याला त्याच्या प्रवासातून माघारी आणलेल्या त्या संदेष्ट्याने त्याविषयी ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराचा मनुष्य, ज्याने याहवेहच्या वचनाचा अवमान केला तो हाच. याहवेहने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले व त्याने त्याला फाडून मारून टाकले, याहवेहने त्याला चेतवणी दिल्यानुसार ते घडले आहे.” \p \v 27 तेव्हा त्या संदेष्ट्याने त्याच्या मुलांना म्हटले, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला,” त्यानुसार त्यांनी केले. \v 28 तेव्हा तो गेला आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडलेले व त्याच्या बाजूला गाढव व सिंह उभे असलेले आढळले. सिंहाने ना त्याचे शरीर खाऊन टाकले होते ना त्या गाढवाला फाडले होते. \v 29 मग त्या संदेष्ट्याने परमेश्वराच्या मनुष्याचे शरीर उचलून गाढवावर ठेवले आणि त्याच्यासाठी शोक करावा व त्याला पुरावे म्हणून आपल्या शहरात आणले. \v 30 मग त्याने त्याचे शरीर आपल्याच कबरेत ठेवले व म्हणाला, “अरेरे, माझ्या भावा!” \p \v 31 त्याला पुरल्यानंतर, संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “मी मेल्यावर, परमेश्वराच्या मनुष्याला ज्या कबरेत पुरले आहे तिथेच मलाही ठेवा; त्याच्या हाडांजवळ माझी हाडे असू द्या. \v 32 कारण बेथेलमधील वेदी व शोमरोन नगरातील उच्च स्थानावरील मंदिरांविरुद्ध याहवेहच्या वचनानुसार त्याने जे काही जाहीर केले ते निश्चितच घडून येणार.” \p \v 33 यानंतरही, यरोबोअमने त्याचे दुष्टमार्ग सोडले नाही व पुन्हा प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून पूजास्थानांसाठी याजकांची नेमणूक केली. ज्या कोणाला याजक होण्यास इच्छा होईल त्यांना त्याने पूजास्थानांसाठी वेगळे केले. \v 34 यरोबोअमचे घराण्याचे हे पाप त्यांच्या पतनास व पृथ्वीवरून त्यांच्या नाशास कारण झाले. \c 14 \s1 अहीयाहचे यरोबोअमविरुध्द भविष्य \p \v 1 त्या काळात यरोबोअमचा पुत्र अबीयाह आजारी पडला, \v 2 आणि यरोबोअम आपल्या पत्नीस म्हणाला, “यरोबोअमची पत्नी म्हणून तुला कोणी ओळखू नये म्हणून आपला वेष पालट. मग शिलोह येथे जा. मी या लोकांचा राजा होईल असे ज्या व्यक्तीने मला सांगितले असा अहीयाह नावाचा संदेष्टा तिथे आहे. \v 3 तुझ्याबरोबर दहा भाकरी, काही वड्या आणि मधाची एक कुपी घेऊन त्याच्याकडे जा आणि मुलाचे काय होईल ते तो तुला सांगेल.” \v 4 म्हणून यरोबोअमच्या पत्नीने त्याने सांगितल्याप्रमाणे केले व शिलोह येथे अहीयाहच्या घरी गेली. \p अहीयाह तर आता त्याच्या वयामुळे पाहू शकत नव्हता; त्याची दृष्टी मंद झाली होती. \v 5 परंतु याहवेहने अहीयाहला आधी सांगून ठेवले होते, “यरोबोअमची पत्नी तिच्या मुलाबद्दल तुला विचारण्यास येत आहे, कारण तो आजारी आहे आणि तू तिला असे उत्तर द्यावे. जेव्हा ती आत येईल तेव्हा ती कोणी दुसरीच स्त्री असल्याचे ढोंग करेल.” \b \p \v 6 जेव्हा अहीयाहने दाराजवळ तिच्या पावलांचा आवाज ऐकला, तेव्हा तो म्हणाला, “यरोबोअमचे पत्नी, आत ये. हे सोंग तू का घ्यावे? दुःखाची बातमी घेऊन मला तुझ्याकडे पाठविले गेले आहे. \v 7 जा, यरोबोअमला सांग, याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुला लोकांमधून वर काढले आणि माझ्या इस्राएली लोकांवर त्यांचा अधिकारी असे नेमले. \v 8 दावीदाच्या घराण्यापासून राज्य फाडून ते मी तुला दिले, पण तू माझा सेवक दावीदाप्रमाणे नाहीस, त्याने माझ्या आज्ञा पाळल्या व त्याच्या आयुष्यभर त्यांचे अनुसरण केले आणि केवळ जे माझ्या दृष्टीने योग्य ते त्याने केले. \v 9 पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुष्कर्मे केली आहेस. तू आपल्यासाठी इतर दैवत घडविलेस, धातूच्या मूर्ती बनविल्यास; तू माझा क्रोध पेटविला आहेस आणि माझ्याकडे पाठ केली आहेस. \p \v 10 “ ‘यामुळे यरोबोअमच्या घरावर मी अरिष्ट आणणार आहे. मी इस्राएलातून यरोबोअमच्या घराण्याचा प्रत्येक शेवटचा पुरुष नष्ट करेन; मग तो गुलाम असो वा मोकळा असो. यरोबोअमचे घराणे संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत शेणाप्रमाणे जाळून टाकीन. \v 11 यरोबोअमच्या घराण्यातील जे कोणी शहरात मरण पावतील त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खाऊन टाकतील. याहवेहने हे म्हटले आहे!’ \p \v 12 “तर तू आता ऊठ, परत घरी जा. शहरात तुझे पाऊल पडताच तुझा मुलगा मरण पावेल. \v 13 सर्व इस्राएली त्याच्यासाठी शोक करून त्याला पुरतील. यरोबोअमच्या घराण्यातील तो एकटाच आहे जो पुरला जाईल, कारण तो एकटाच आहे ज्याच्या ठायी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराला काहीतरी चांगले आढळले आहे. \p \v 14 “याहवेह स्वतःच आपल्यासाठी इस्राएलवर असा राजा उभा करतील जो यरोबोअमच्या कुटुंबाचा उच्छेद करेल. ते आताच घडण्यास सुरुवात होत आहे. \v 15 याहवेह इस्राएलवर असा वार करतील की ते वाहत्या पाण्यावरील बोरूप्रमाणे होतील. जी चांगली भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली, त्यातून मी त्यांना उपटून टाकीन व फरात\f + \fr 14:15 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीपलीकडे त्यांना पांगून टाकीन, कारण त्यांनी अशेराची खांब तयार करून याहवेहला क्रोधित केले आहे. \v 16 यरोबोअमने जी पापे केली व इस्राएलला सुद्धा करण्यास भाग पाडले यामुळे याहवेह त्यांचा त्याग करतील.” \p \v 17 तेव्हा यरोबोअमची पत्नी तिथून उठून तिरजाह येथे गेली. तिने उंबरठ्यावर पाऊल टाकताच, तिचा मुलगा मेला. \v 18 अहीयाह आपला सेवक जो संदेष्टा याच्याद्वारे याहवेहने जे सांगितले त्याप्रमाणे, त्यांनी त्याला पुरले व सर्व इस्राएलने त्याच्यासाठी शोक केला. \p \v 19 यरोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने कसे राज्य केले व कशा लढाया लढल्या हे सर्व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिले आहे. \v 20 यरोबोअमने बावीस वर्षे राज्य केले आणि तो त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. त्याचा पुत्र नादाब त्याचा वारस झाला. \s1 यहूदीयाचा राजा रेहोबोअम \p \v 21 त्यावेळी शलोमोनचा पुत्र रेहोबोअम हा यहूदीयाचा राजा होता. तो राजा झाला त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. \p \v 22 याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते यहूदीयाच्या लोकांनी केले. आणि जी पापे त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांपेक्षा त्यांनी याहवेहला अधिक क्रोधित केले. \v 23 प्रत्येक पसरलेल्या झाडाखाली त्यांनी त्यांच्यासाठी पूजास्थाने, पवित्र धोंडे व अशेराची खांब बनविली. \v 24 त्यावेळी देशात मंदिरामध्ये पुरुषगामीही होती; जे सर्व याहवेहने इस्राएलातून काढून टाकले होते, त्या सर्वप्रकारच्या अमंगळ कृत्यांमध्ये लोक भाग घेत होते. \p \v 25 रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, इजिप्तचा राजा शिशाकने यरुशलेमवर हल्ला केला. \v 26 त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले. \v 27 म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती त्या स्वाधीन केल्या. \v 28 जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन उभे राहत असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत. \p \v 29 रेहोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने केलेली कृत्ये यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत की नाही? \v 30 रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले. \v 31 रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्यात आले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. त्याचा पुत्र अबीयाह\f + \fr 14:31 \fr*\ft काही इब्री मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अबीयाम\fqa*\f* राजा म्हणून त्याचा वारस झाला. \c 15 \s1 यहूदीयाचा राजा अबीयाह \p \v 1 नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह\f + \fr 15:1 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अबीयाम\fqa*\f* यहूदीयाचा राजा झाला, \v 2 त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह होते जी अबशालोमची कन्या होती. \p \v 3 त्याच्या वडिलांनी त्याच्यापूर्वी जी पापे केली होती ती सर्व पापे त्याने केली; त्याचा पूर्वज दावीदाप्रमाणे त्याचे हृदय याहवेह त्याच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित नव्हते. \v 4 तरीपण दावीदाप्रित्यर्थ याहवेह त्याचे परमेश्वर यांनी त्याला त्याचा वारस म्हणून यरुशलेमात त्याला दीप दिला व यरुशलेमास बलवान बनविले. \v 5 कारण दावीदाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले होते आणि उरीयाह हिथीची घटना वगळता, दावीद आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात याहवेहची कोणतीही आज्ञा पाळण्यापासून मागे वळला नाही. \p \v 6 अबीयाहच्या जीवनभर यरोबोअम आणि रेहोबोअम\f + \fr 15:6 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अबीयाह\fqa*\f* यांच्यामध्ये युद्ध होत राहिले. \v 7 अबीयाहच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले ते सर्व यहूदीया देशाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? अबीयाह व यरोबोअम यांच्यातील युद्ध सुरूच होते. \v 8 मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा राजा म्हणून त्याचा वारस झाला. \s1 यहूदीया राजा आसा \p \v 9 इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदीयाचा राजा झाला, \v 10 आणि त्याने यरुशलेमात एकेचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माकाह होते ती अबशालोमची कन्या होती. \p \v 11 आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. \v 12 त्याने मंदिरातून पुरुषगामी करणार्‍यांना देशाबाहेर घालवून दिले आणि त्याच्या पूर्वजांनी केलेल्या मूर्ती देखील काढून टाकल्या. \v 13 त्याने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली, \v 14 जरी त्याने पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते. \v 15 त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने याहवेहच्या मंदिरात आणले. \p \v 16 यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले. \v 17 यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशाने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली. \p \v 18 त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले. \v 19 आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोन्याची भेट पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.” \p \v 20 बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला. \v 21 बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबवून तिरजाह येथे राहिला. \v 22 मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले. \p \v 23 आसाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याचे सर्व पराक्रम, जे सर्वकाही त्याने केले व जी शहरे त्याने बांधली, ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? पण त्याच्या वृद्धापकाळात तो पायाच्या आजाराने त्रस्त झाला. \v 24 मग आसा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरला गेला. आणि त्याचा पुत्र यहोशाफाट राजा म्हणून त्याचा वारस झाला. \s1 इस्राएलचा राजा नादाब \p \v 25 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यरोबोअमचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. \v 26 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपल्या पित्याचे अनुसरण करीत, त्याच्या पित्याने इस्राएली लोकांना जी पापे करण्यास लावले होते, त्याच मार्गाला तो लागला. \p \v 27 इस्साखार गोत्रातील अहीयाहचा पुत्र बाशाने नादाबाविरुद्ध कट केला, नादाब व सर्व इस्राएली लोकांनी गिब्बथोनला वेढा घातला असता, त्याने त्याला पलिष्ट्यांच्या गिब्बथोन नगरात मारून टाकले. \v 28 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबला ठार केले व तो स्वतः त्याच्या जागी राजा झाला. \p \v 29 त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला. \v 30 जी पापे यरोबोअमने केली आणि इस्राएली लोकांना देखील करावयाला लावली आणि त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा राग भडकाविला म्हणून हे सगळे घडले. \p \v 31 नादाबच्या राज्याच्या इतर घटना, आणि जे सर्वकाही त्याने केले ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेल्या नाहीत काय? \v 32 यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले. \s1 इस्राएलचा राजा बाशा \p \v 33 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी अहीयाहचा पुत्र बाशा हा तिरजाह येथे इस्राएलचा राजा झाला. त्याने चोवीस वर्षे राज्य केले. \v 34 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याने यरोबोअमच्या मार्गाचे अनुसरण करून जी पापे त्याने इस्राएलास करण्यास लावले, तीच पापे बाशानेही केली. \c 16 \p \v 1 हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे: \v 2 “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांवर अधिकारी नेमले, परंतु तू यरोबोअमचा मार्ग अनुसरला आहेस व माझ्या इस्राएली लोकांना पाप करावयाला भाग पाडले आणि त्यांच्या पापामुळे माझा क्रोध भडकविला आहे. \v 3 म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन. \v 4 बाशाच्या मालकीचा जो कोणी शहरात मरेल त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खातील.” \p \v 5 बाशाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली कृत्ये व त्याची यशप्राप्ती, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही? \v 6 बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला. \p \v 7 त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला. \s1 इस्राएलचा राजा एलाह \p \v 8 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. \p \v 9 जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता. \v 10 तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले. \p \v 11 तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही. \v 12 याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला; \v 13 कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता. \p \v 14 एलाहच्या कारकिर्दीच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? \s1 इस्राएलचा राजा जिम्री \p \v 15 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती. \v 16 जिम्रीने राजाविरुद्ध कट करून त्याला ठार मारले असे जेव्हा छावणीतील इस्राएली सैन्याने ऐकले, तेव्हा त्यांनी त्याच दिवशी सेनापती ओमरीला इस्राएलचा राजा म्हणून छावणीतच घोषित केले. \v 17 तेव्हा ओमरी व त्याच्या बरोबरच्या इस्राएली लोकांनी गिब्बथोन सोडून तिरजाह नगराला वेढा दिला. \v 18 शहर हस्तगत झाले आहे असे जेव्हा जिम्रीने पाहिले, तेव्हा तो राजवाड्याच्या किल्ल्यात गेला आणि त्यात स्वतःभोवती आग लावली आणि तो मेला. \v 19 कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करून त्याने पाप केले आणि यरोबोअमचे अनुसरण करीत त्याने जी पापे केली, ती केली व इस्राएली लोकांना सुद्धा ती पापे करावयाला भाग पाडले. \p \v 20 जिम्रीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली बंडखोरी, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही? \s1 इस्राएलचा राजा ओमरी \p \v 21 आता इस्राएली लोक दोन भागात विभागले गेले; अर्ध्या लोकांनी गीनाथचा पुत्र तिबनी याला पाठिंबा दिला, तर अर्ध्यांनी ओमरीला राजा होण्यासाठी पाठिंबा दिला. \v 22 परंतु गीनाथचा पुत्र तिबनी याच्या समर्थकांपेक्षा ओमरीचे समर्थक अधिक प्रबळ झाले; म्हणून तिबनी मेला व ओमरी राजा झाला. \p \v 23 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी ओमरी इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने बारा वर्षे राज्य केले, त्यापैकी सहा वर्षे तिरजाह येथे राज्य केले. \v 24 त्याने शेमेर नावाच्या व्यक्तीकडून शोमरोन डोंगर चांदीचे दोन तालांत\f + \fr 16:24 \fr*\ft सुमारे 68 कि.ग्रॅ.\ft*\f* देऊन विकत घेतले आणि त्या डोंगरावर नगर बांधले व त्या डोंगराचा आधीचा मालक शेमेर याच्या नावानुसार शोमरोन असे नाव दिले. \p \v 25 पण ओमरीने सुद्धा याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले आणि त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्यांपेक्षा अधिक पाप केले. \v 26 त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला. \p \v 27 ओमरीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेल्या गोष्टी व त्याची यशप्राप्ती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही? \v 28 ओमरी आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला शोमरोनात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र अहाब त्याचा वारस म्हणून राजा झाला. \s1 इस्राएलचा राजा अहाब \p \v 29 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी ओमरीचा पुत्र अहाब इस्राएलवर राज्य करू लागला. त्याने शोमरोन येथे इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले. \v 30 ओमरीचा पुत्र अहाबाने त्याच्या आधी होऊन गेलेल्यांपेक्षा याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. \v 31 नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पापांना क्षुल्लक समजून त्याचे अनुसरण केले; इतकेच नाही, तर त्याने सीदोनी राजा एथबालची कन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आणि बआलची सेवा व उपासना करू लागला. \v 32 शोमरोनात त्याने बआलासाठी जे मंदिर बांधले होते त्यात बआलासाठी एक वेदी उभारली. \v 33 अहाबाने अशेरा देवीचे स्तंभही उभारले आणि असे करून त्याच्या आधी होऊन गेलेल्या राजांपेक्षा याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या क्रोधाला अधिक भडकाविले. \p \v 34 अहाबाच्या काळात, बेथेलचा हिएल याने यरीहोची पुनर्बांधणी केली. त्याने त्याचा पाया घातला, तेव्हा त्याचा प्रथमपुत्र अबीराम मरण पावला आणि जेव्हा त्याची फाटके उभारली तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब मरण पावला; नूनाचा पुत्र यहोशुआच्या द्वारे याहवेहने सांगितलेल्या वचनानुसार हे सर्व घडले. \c 17 \s1 एलीयाहद्वारे मोठ्या दुष्काळाची घोषणा \p \v 1 गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह\f + \fr 17:1 \fr*\fq एलीयाह \fq*\ft मूळ प्रतीमध्ये बहुतेक ठिकाणी हे नाव एलीयाहू असे लिहिलेले आहे\ft*\f* तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.” \s1 कावळ्यांद्वारे एलीयाहचे पोषण \p \v 2 तेव्हा याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: \v 3 “येथून निघून पूर्वेकडे जा आणि यार्देनेच्या पूर्वेस केरीथ ओहळाकडे लपून राहा. \v 4 त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.” \p \v 5 म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला. \v 6 सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे. \s1 एलीया आणि सारेफथची विधवा \p \v 7 काही काळानंतर ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता. \v 8 मग याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: \v 9 “सीदोनजवळच्या सारेफथ नगराकडे जा आणि तिथे राहा. तिथे मी एका विधवेला आज्ञा दिली आहे की तिने तुला अन्नपुरवठा करावा.” \v 10 तेव्हा तो सारेफथला गेला. जेव्हा तो नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा काटक्या गोळा करीत असलेली एक विधवा तिथे होती. त्याने तिला बोलावून विचारले, “एका भांड्यात मला पिण्यासाठी पाणी आणशील काय?” \v 11 ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, “आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये.” \p \v 12 ती म्हणाली, “याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ.” \p \v 13 एलीयाह तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव. \v 14 कारण याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘याहवेह देशात पाऊस पाठवेपर्यंत, तुझ्या भांड्यातील पीठ संपणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कोरडी होणार नाही.’ ” \p \v 15 ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे. \v 16 एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही. \p \v 17 काही काळानंतर जी घर मालकीण स्त्री होती तिचा मुलगा आजारी पडला. त्याचा आजार वाढतच गेला आणि त्याचा श्वास थांबला. \v 18 ती एलीयाहला म्हणाली, “अहो परमेश्वराच्या मनुष्या, तुम्ही माझ्याविरुद्ध आहात काय? माझ्या पापाची मला आठवण करून द्यायला व माझ्या मुलाला मारून टाकण्यास आला आहात काय?” \p \v 19 एलीयाह म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” त्याने त्याला तिच्या हातून घेतले आणि माडीवरील खोलीत जिथे तो राहत होता तिथे नेऊन आपल्या बिछान्यावर ठेवले. \v 20 मग त्याने याहवेहचा धावा करीत म्हटले, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी या विधवेच्या घरात राहत आहे, तिच्या मुलाला मारून आपण तिच्यावर अरिष्ट आणले काय?” \v 21 मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि याहवेहकडे आरोळी केली, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, या मुलाचा जीव पुन्हा त्याच्यात येऊ द्यावा!” \p \v 22 याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला. \v 23 मग एलीयाहने मुलाला उचलून त्या खोलीतून खाली आणले. त्याने त्याला त्याच्या आईच्या हाती दिले आणि म्हटले, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे!” \p \v 24 तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, “आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे.” \c 18 \s1 एलीयाह आणि ओबद्याह \p \v 1 काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्या वर्षी याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: “जा आणि अहाबाच्या समोर हजर हो, आणि मी देशावर पाऊस पाठवेन.” \v 2 म्हणून एलीयाह अहाबासमोर हजर झाला. \p याकाळात शोमरोनामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ पडला होता, \v 3 आणि अहाबाने आपल्या राजवाड्याचा कारभारी ओबद्याहला बोलाविले. (ओबद्याह याहवेहचे फार भय बाळगणारा होता. \v 4 जेव्हा ईजबेल याहवेहच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, तेव्हा ओबद्याहने शंभर संदेष्ट्यांना प्रत्येकी पन्नास असे दोन गुहांमध्ये लपविले होते, आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.) \v 5 अहाबाने ओबद्याहला म्हटले, “देशातील सर्व झरे व ओढे शोध, घोडे व खेचरे जिवंत राहावे म्हणून कदाचित आपल्याला थोडे गवत मिळेल म्हणजे आपल्याला त्यांना मारून टाकावे लागणार नाही.” \v 6 मग ज्या प्रदेशात फिरायचे आहे त्या भागाचे त्यांनी दोन भाग केले, अहाब एका दिशेने जाणार व ओबद्याह दुसर्‍या बाजूने. \p \v 7 ओबद्याह वाटेने चालत असता, त्याला एलीयाह भेटला. ओबद्याहने त्याला ओळखले व जमिनीकडे लवून त्याला दंडवत घालत म्हटले, “माझे स्वामी, एलीयाह ते आपणच आहात काय?” \p \v 8 एलीयाह म्हणाला, “होय, जा, तुझ्या धन्याला सांग एलीयाह येथे आहे.” \p \v 9 तेव्हा ओबद्याहने विचारले, “माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे, की तुम्ही आपल्या सेवकाला मारून टाकावे म्हणून अहाबाच्या स्वाधीन करीत आहात? \v 10 याहवेह, आपल्या जिवंत परमेश्वराची शपथ, आपला शोध करण्यासाठी माझ्या धन्याने लोक पाठवले नाही असा एकही देश किंवा राज्य नाही. आणि त्या देशात किंवा राज्यात एलीयाह नाही असे कोणी सांगितले, तर एलीयाह त्यांना सापडला नाही असे त्यांना शपथ घेऊन सांगावे लागत असे. \v 11 परंतु आता आपण मला सांगता त्याला जाऊन सांग, ‘एलीयाह येथे आहे.’ \v 12 मी तुम्हाला सोडून गेल्यावर याहवेहचा आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे मला ठाऊक नाही. पण जर मी जाऊन अहाबाला सांगितले आणि त्याला तुम्ही सापडला नाही, तर तो मला मारून टाकील. मी तर आपला सेवक, माझ्या बालपणापासून याहवेहची उपासना करीत आलो आहे. \v 13 ईजबेल राणी प्रभूच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा मी काय केले हे तुम्ही ऐकले नाही काय? एका गुहेत पन्नास असे शंभर याहवेहच्या संदेष्ट्यांना मी दोन गुहांमध्ये लपविले आणि त्यांना अन्नपाणी पुरविले. \v 14 आणि आता तुम्ही मला म्हणता, जाऊन माझ्या धन्याला मी सांगावे, ‘एलीयाह येथे आहे,’ तो मला मारून टाकील!” \p \v 15 एलीयाह म्हणाला, “ज्या सर्वसमर्थ याहवेहची मी सेवा करतो त्या जिवंत परमेश्वराची शपथ, आज मी खचितच अहाबासमोर हजर होईन.” \s1 एलीयाह कर्मेल पर्वतावर जातो \p \v 16 तेव्हा ओबद्याह अहाबाला भेटायला गेला आणि त्याला सांगितले आणि अहाब एलीयाहला भेटायला गेला. \v 17 एलीयाहला पाहताच अहाब म्हणाला, “इस्राएलची छळणूक करणारा तो तूच आहेस काय?” \p \v 18 एलीयाहने उत्तर दिले, “इस्राएलला छळणारा मी नाही, तर तू व तुझ्या पित्याचे घराणे आहे. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळण्याचे सोडून बआलाचे अनुसरण केले आहे. \v 19 आता सर्व इस्राएली लोकांना माझ्यासमोर कर्मेल डोंगरावर बोलावून घे. आणि जे ईजबेलच्या मेजावर भोजन करतात असे बआलाचे चारशे पन्नास संदेष्टे व अशेराचे चारशे संदेष्टे, त्यांनाही बोलावून घे.” \p \v 20 म्हणून अहाबाने सर्व इस्राएली लोकांना बोलाविणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमविले. \v 21 एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” \p परंतु लोक काही बोलले नाही. \p \v 22 मग एलीयाह त्यांना म्हणाला, “याहवेहचा संदेष्टा म्हणून मी एकटाच उरलो आहे, परंतु बआलाचे तर चारशे पन्नास संदेष्टे आहेत. \v 23 आमच्यासाठी दोन बैल आणा. त्यातील एक बआलच्या संदेष्ट्यांनी त्यांच्यासाठी निवडावा आणि त्याचे तुकडे कापून ते लाकडांवर ठेवावे परंतु त्याला अग्नी लावू नये. मी दुसरा बैल तयार करेन आणि लाकडांवर ठेवेन आणि ते पेटविणार नाही. \v 24 मग तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, आणि मी माझ्या याहवेहचा धावा करेन. मग जो देव अग्नीद्वारे उत्तर देईल; तोच खरा परमेश्वर.” \p मग लोक म्हणाले, “तू जे बोलतो ते बरोबर आहे.” \p \v 25 एलीयाह बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही बैल निवडून घ्या आणि तो तयार करा, कारण तुम्ही संख्येने अधिक आहात. तुमच्या देवाचा धावा करा, परंतु अग्नी लावू नये.” \v 26 म्हणून त्यांना दिलेला बैल घेऊन त्यांनी तयार केला. \p मग त्यांनी सकाळपासून मध्यान्हापर्यंत बआलच्या नावाचा धावा केला. आणि ओरडत म्हणाले, “हे बआला, आम्हाला उत्तर दे!” परंतु काही प्रत्युत्तर आले नाही; कोणीही उत्तर दिले नाही. आणि जी वेदी त्यांनी केली होती त्याभोवती ते नाचत होते. \p \v 27 मध्यान्हाच्या वेळी एलीयाह त्यांची थट्टा करीत म्हणू लागला, “अधिक मोठ्याने ओरडा, खचित तो देव आहे! कदाचित तो विचारात गढून गेला असेल किंवा व्यस्त किंवा प्रवास करीत असेल किंवा झोपला असेल आणि त्याला जागे केले पाहिजे.” \v 28 म्हणून ते मोठ्याने ओरडू लागले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे तलवारी व भाल्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत स्वतःला घाव करू लागले. \v 29 दुपार सरून गेली आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत ते अजूनही वेड्यासारखे भविष्यवाणी करीत होते. परंतु काहीही प्रत्युत्तर आले नाही, कोणी काही बोलले नाही, कोणी लक्ष दिले नाही. \p \v 30 तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली. \v 31 “तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले. \v 32 त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह\f + \fr 18:32 \fr*\ft सुमारे 11 कि.ग्रॅ.\ft*\f* बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली. \v 33 त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.” \p \v 34 तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले. \p त्याने आदेश दिला, “तिसर्‍यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्‍यांदाही होमार्पणावर पाणी टाकले. \v 35 पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली. \p \v 36 यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत. \v 37 मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.” \p \v 38 तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले. \p \v 39 जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!” \p \v 40 मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला. \p \v 41 आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.” \v 42 म्हणून अहाब खाण्यापिण्यास गेला, परंतु एलीयाह कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले. \p \v 43 तो आपल्या सेवकास म्हणाला, “जा आणि समुद्राकडे दृष्टी लाव.” तेव्हा तो गेला आणि त्याने पाहिले. \p तो म्हणाला, “काही दिसत नाही.” \p सात वेळा एलीयाह म्हणाला, “परत जा.” \p \v 44 सातव्या वेळेस सेवकाने सांगितले, “मनुष्याच्या हाताएवढा लहानसा ढग समुद्रातून वर येत आहे.” \p एलीयाह म्हणाला, “जा आणि अहाबाला सांग, ‘पावसाने तुला थांबविण्याआधी, रथ जुंपून खाली जा.’ ” \p \v 45 थोड्याच वेळात, आकाश काळ्या ढगांनी भरले, वारा वाहू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अहाब रथात बसून येज्रील येथे निघाला. \v 46 याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला. \c 19 \s1 एलीयाह होरेबला पळून जातो \p \v 1 एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले. \v 2 तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.” \p \v 3 एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले, \v 4 तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.” \v 5 नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला. \p अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.” \v 6 त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्‍यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला. \p \v 7 याहवेहचा दूत परत दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.” \v 8 तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला. \v 9 तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला. \s1 एलीयाहला याहवेहचे दर्शन \p आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?” \p \v 10 एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.” \p \v 11 याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” \p तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्‍याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्‍यात नव्हते. त्या वार्‍यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते. \v 12 भूमिकंपानंतर अग्नी आला, परंतु त्या अग्नीतही याहवेह नव्हते. आणि त्या अग्नीनंतर एक शांत वाणी झाली. \v 13 जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. \p मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?” \p \v 14 एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मलाही मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.” \p \v 15 याहवेहने त्याला म्हटले, “तू आलास त्या मार्गाने परत दिमिष्काच्या वाळवंटाकडे जा. आणि तिथे जाशील तेव्हा हजाएलचा अरामचा राजा म्हणून अभिषेक कर. \v 16 आणि निमशीचा पुत्र येहूचा सुद्धा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर व आबेल-महोलाह येथील शाफाटचा पुत्र अलीशाचा तुझा वारस म्हणून संदेष्टा होण्यास अभिषेक कर. \v 17 हजाएलच्या तलवारीपासून जो कोणी निसटेल त्याला येहू मारून टाकेल आणि जे येहूच्या तलवारीपासून निसटतील त्यांना अलीशा जिवे मारेल. \v 18 तथापि बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत किंवा आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, असे सात हजार लोक मी इस्राएलात राखून ठेवले आहेत.” \s1 अलीशाला पाचारण \p \v 19 म्हणून एलीयाह तिथून निघाला आणि त्याला शाफाटचा पुत्र अलीशा दिसला. नांगराला बारा बैल जुंपून तो नांगरणी करीत होता आणि तो स्वतः बाराव्या बैलाच्या जोडीवर होता. एलीयाह त्याच्याकडे गेला व आपला झगा त्याच्यावर टाकला. \v 20 तेव्हा अलीशाने आपले बैल सोडले आणि एलीयाहच्या मागे धावून गेला. तो म्हणाला, “मला माझ्या आईपित्याचे चुंबन घेऊ दे, मग मी आपल्याबरोबर येईन.” \p एलीयाहने उत्तर दिले, “परत जा, मी तुला काय केले?” \p \v 21 तेव्हा अलीशा त्याच्यापासून निघून परतला. त्याने आपल्या बैलाची एक जोडी घेतली आणि ती कापली. त्याने नांगरणीची साधने पेटवून त्यावर मांस शिजविले आणि लोकांना दिले आणि त्यांनी ते खाल्ले. मग तो एलीयाहचा अनुयायी होण्यास निघाला आणि त्याचा सेवक झाला. \c 20 \s1 बेन-हदाद शोमरोनावर हल्ला करतो \p \v 1 अरामचा राजा बेन-हदादाने आपले सैन्य एकत्र केले. त्याच्याबरोबर बत्तीस राजे आपआपले घोडे व रथ घेऊन त्यांनी शोमरोनला वेढा घालून त्यावर हल्ला केला. \v 2 त्याने इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे शहरात असे सांगत दूत पाठवले, \v 3 “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझे चांदी व सोने माझे आहेत, तुझ्या उत्तम स्त्रिया आणि लेकरे ही सुद्धा माझी आहेत.’ ” \p \v 4 इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “माझ्या स्वामी, आपल्या म्हणण्याप्रमाणे मी व माझे जे काही आहे ते सर्व आपलेच आहे.” \p \v 5 दूत पुन्हा येऊन म्हणाले, “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझी चांदी व सोने, तुझ्या स्त्रिया व लेकरे यांना माझ्या स्वाधीन करावे म्हणून सांगितले होते. \v 6 परंतु उद्या याच वेळी तुझ्या राजवाड्यात व तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात शोध करावा म्हणून मी माझे अधिकारी पाठवेन. तुझे जे काही मौल्यवान आहे ते सर्व ते घेऊन जातील.’ ” \p \v 7 तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातील वडील लोकांना बोलाविले व म्हटले, “पाहा हा मनुष्य कसा त्रास देऊ इच्छित आहे! त्याने जेव्हा माझ्या स्त्रिया आणि माझी लेकरे, माझी चांदी व सोने मागवून घेतली, मी त्याला नकार दिला नाही.” \p \v 8 वडील आणि सर्व लोकांनी उत्तर दिले, “आपण त्याचे ऐकू नये किंवा त्याच्या मागण्यांना सहमत होऊ नये.” \p \v 9 तेव्हा त्याने बेन-हदादच्या दूतांना उत्तर दिले, “माझ्या स्वामीला सांगा, ‘पहिल्याने आपण जी मागणी केली होती त्यानुसार आपला हा सेवक करेल, परंतु ही मागणी मी पूर्ण करू शकत नाही.’ ” त्यांनी परत जाऊन हा संदेश बेन-हदादकडे पोहोचविला. \p \v 10 तेव्हा बेन-हदादने अहाबास आणखी एक संदेश पाठवला: “जर माझ्या माणसांसाठी शोमरोनात मूठभर माती जरी पुरेशी पडली तरी देव माझे तसे किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो.” \p \v 11 इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “त्याला सांगा: ‘युद्धासाठी शस्त्रधारण करणार्‍याने शस्त्र उतरविणार्‍याप्रमाणे फुशारकी मारू नये.’ ” \p \v 12 बेन-हदाद आणि इतर राजे आपल्या तंबूंमध्ये मद्य पीत असताना त्याने ही बातमी ऐकली आणि त्याने त्याच्या माणसांना आज्ञा दिली: “हल्ल्यासाठी तयारी करा.” म्हणून शहरावर हल्ला करण्यास त्यांनी तयारी केली. \s1 अहाब बेन-हदादचा पराजय करतो \p \v 13 त्या दरम्यान इस्राएलचा राजा अहाबकडे एक संदेष्टा आला व त्याने असे जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘हे मोठे सैन्य तू पाहतोस काय? आज ते मी तुझ्या हाती देईन, मग तू जाणशील की मी याहवेह आहे.’ ” \p \v 14 “परंतु हे कोण करेल?” अहाबाने विचारले. \p संदेष्ट्याने उत्तर दिले, “याहवेह असे म्हणतात: ‘राज्यपालांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ सैनिक हे करतील.’ ” \p अहाबाने विचारले, “आणि युद्धाची सुरुवात कोण करणार?” \p संदेष्ट्याने म्हटले, “सुरुवात तू करणार.” \p \v 15 तेव्हा अहाबाने राज्यपालांच्या हाताखाली असलेल्या दोनशे बत्तीस कनिष्ठ सैन्यांना बोलावून घेतले. मग त्याने सर्व इस्राएली लोकांना जमा केले, ते सर्व सात हजार होते. \v 16 मध्यान्हाच्या वेळी, बेन-हदाद आणि त्याच्याबरोबर हात मिळविलेले बत्तीस राजे त्यांच्या तंबूंमध्ये मद्यधुंद झालेले होते. \v 17 राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक प्रथम बाहेर पडले. \p आता बेन-हदादने टेहळणीसाठी पाठविलेल्या सैनिकांनी येऊन सांगितले, “शोमरोनातून माणसे निघाली आहेत.” \p \v 18 तेव्हा तो म्हणाला, “जर ते शांतीने येत आहेत तर त्यांना जिवंत पकडा; जर ते युद्धासाठी येत आहेत तरीही त्यांना जिवंत पकडा.” \p \v 19 तेव्हा राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक नगरातून बाहेर पडले आणि त्यांच्यामागे सैन्य निघाले. \v 20 आणि त्या प्रत्येकाने आपआपल्या विरोधकांना मारून टाकले; आणि अरामी लोकांनी पळ काढला आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पण अरामचा राजा बेन-हदाद आपल्या काही घोडेस्वारांबरोबर घोड्यावर स्वार होऊन निसटून गेला. \v 21 इस्राएलच्या राजाने जाऊन त्यांच्या घोड्यांना व रथांना गाठले आणि अराम्यांचे मोठे नुकसान केले. \p \v 22 त्यानंतर, संदेष्ट्याने इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हटले, “आपणास बळकट करा आणि काय करावे हे जपून पाहा, कारण पुढील वसंतऋतूमध्ये अरामचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करेल.” \p \v 23 त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू. \v 24 मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा. \v 25 तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले. \p \v 26 पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले. \v 27 जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते. \p \v 28 परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” \p \v 29 सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले. \v 30 बाकीचे लोक अफेक शहरात पळून गेले, तिथे सत्तावीस हजार लोकांवर भिंत कोसळून पडली आणि बेन-हदाद शहरात पळून जाऊन एका आतील खोलीत लपून राहिला. \p \v 31 त्याचे अधिकारी त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकले आहे की इस्राएली राजे फार दयाळू असतात. तर आपण आपल्या कंबरेस गोणपाट नेसून आणि आपल्या डोक्याला दोरी बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ, कदाचित तो तुझा जीव वाचवेल.” \p \v 32 तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ” \p राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.” \p \v 33 त्या माणसांनी हे चांगले चिन्ह असे समजून अहाबाचा शब्द चटकन पकडून ते म्हणाले, “होय, आपला भाऊ बेन-हदाद!” \p राजाने म्हटले, “जा आणि त्याला घेऊन या,” जेव्हा बेन-हदाद बाहेर आला, अहाबाने त्याला आपल्या रथात घेतले. \p \v 34 बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.” \p अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले. \s1 संदेष्टा अहाबाचा निषेध करतो \p \v 35 याहवेहच्या शब्दानुसार संदेष्ट्यांच्या एका मंडळीतील एक संदेष्टा आपल्या साथीदाराला म्हणाला, “आपल्या शस्त्राने माझ्यावर वार कर,” परंतु त्याने नकार दिला. \p \v 36 तेव्हा संदेष्टा म्हणाला, “कारण तू याहवेहचा शब्द मानला नाहीस, तू माझ्यापासून जाताच एक सिंह तुला मारून टाकील.” आणि तो मनुष्य जाताच सिंहाने त्याला गाठले व मारून टाकले. \p \v 37 मग संदेष्ट्याने आणखी एका मनुष्याला म्हटले, “कृपया माझ्यावर वार कर.” तेव्हा त्या मनुष्याने त्याच्यावर वार करून त्याला जखमी केले. \v 38 नंतर संदेष्टा जाऊन राजाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा राहिला. त्याने आपल्या पागोट्याने आपले डोळे झाकून घेऊन आपले रूप बदलले होते. \v 39 राजा जवळून जात असता, संदेष्ट्याने त्याला हाक मारीत म्हटले, “आपला सेवक युद्धभूमीवर गेला असता, एक मनुष्य एका कैद्याला माझ्याकडे घेऊन आला व म्हणाला, ‘या माणसावर लक्ष ठेव, तो जर गायब झाला, तर त्याच्या जिवासाठी तुला आपला जीव द्यावा लागेल, नाहीतर त्याचा मोबदला म्हणून तुला चांदीचा एक तालांत\f + \fr 20:39 \fr*\ft सुमारे चौतीस कि.ग्रॅ.\ft*\f* भरावा लागेल.’ \v 40 आपला सेवक इकडे तिकडे व्यस्त असताना, तो मनुष्य गायब झाला.” \p “आपली शिक्षा हीच असणार,” इस्राएलचा राजा म्हणाला. “तू आपल्याच मुखाने ती सांगितली आहे.” \p \v 41 तेव्हा संदेष्ट्याने चटकन आपल्या डोळ्यांवरील पागोटाची पट्टी काढली, आणि तो संदेष्ट्यांपैकी एक आहे असे इस्राएलच्या राजाने ओळखले. \v 42 संदेष्टा राजाला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘ज्या मनुष्याने मरावे असे मी योजले होते, त्याला तू मोकळे सोडले आहे. त्यामुळे त्याच्या जिवाबद्दल तुझा जीव, त्याच्या लोकांसाठी तुझे लोक जातील.’ ” \v 43 तेव्हा इस्राएलचा राजा खिन्न व रागाने भरून शोमरोनातील आपल्या राजवाड्याकडे गेला. \c 21 \s1 नाबोथचा द्राक्षमळा \p \v 1 काही काळानंतर, येज्रीली नाबोथच्या द्राक्षमळ्यासंबंधी एक घटना घडली, हा द्राक्षमळा अहाब राजाच्या शोमरोनातील येज्रील राजवाड्याजवळ होता. \v 2 अहाब नाबोथला म्हणाला, “तुझ्या द्राक्षमळ्यात मला भाजीपाल्याची बाग करू दे, कारण तो माझ्या राजवाड्याजवळ आहे. त्याचा मोबदला म्हणून मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देईन किंवा तुझी इच्छा असली तर त्याचे योग्य मोल मी तुला देईन.” \p \v 3 परंतु नाबोथने अहाबाला उत्तर दिले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला द्यावे असे याहवेह माझ्या हातून कधी न घडवो.” \p \v 4 त्यामुळे अहाब खिन्न व रागाने भरून आपल्या घरी गेला कारण येज्रीली नाबोथने त्याला म्हटले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला देणार नाही.” अहाब रुसून व अन्न खाण्यास नाकारीत आपल्या बिछान्यावर पडून राहिला. \p \v 5 तेव्हा त्याची पत्नी ईजबेल आत आली व त्याला विचारले, “तुम्ही इतके खिन्न का आहात? तुम्ही अन्न का खात नाही?” \p \v 6 तो तिला म्हणाला, “कारण येज्रीली नाबोथला मी म्हणालो, ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे; नाहीतर तुझी इच्छा असली तर, त्याबदल्यात त्याच किमतीत मी तुला दुसर्‍या ठिकाणी द्राक्षमळा देईन.’ परंतु तो म्हणाला, ‘मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही.’ ” \p \v 7 त्याची पत्नी ईजबेल म्हणाली, “इस्राएलचा राजा असताना तुमचे वर्तन असे असावे काय? उठा आणि भोजन करा! आपले मन आनंदित करा. येज्रीली नाबोथचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देईन.” \p \v 8 मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली, त्यावर त्याचा शिक्का मारला आणि नाबोथच्या शहरात त्याच्याबरोबर राहत असलेले वडीलजन व प्रतिष्ठित लोकांकडे ती पाठवली. \v 9 त्या पत्रांमध्ये तिने लिहिले: \pm “शहरात उपास जाहीर करा आणि नाबोथला सर्वात महत्त्वाच्या स्थळी बसवा. \v 10 परंतु त्याच्यासमोर दोन अधम व्यक्तींना बसवावे आणि ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला त्यांना व राजाला शाप दिल्याचा आरोप त्याच्यावर आणावा. मग त्याला बाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार करा.” \p \v 11 तेव्हा नाबोथच्या शहरात राहत असलेल्या वडीलजन व प्रतिष्ठित लोकांनी ईजबेलने लिहिलेल्या पत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे केले. \v 12 त्यांनी उपास जाहीर केला व लोकांमधील अगदी महत्त्वाच्या स्थळी नाबोथला बसविले. \v 13 मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली. \v 14 नंतर त्यांनी ईजबेलला निरोप पाठवून म्हटले: “नाबोथला धोंडमार करून जिवे मारले आहे.” \p \v 15 येज्रीली नाबोथला धोंडमार करून मारले आहे हे ईजबेलने ऐकताच, ती अहाबाला म्हणाली, “उठा आणि ज्या येज्रीली नाबोथने तुम्हाला आपला द्राक्षमळा पैसे घेऊन देण्यास नाकारले त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या. तो आता जिवंत नाही, तो मेला आहे.” \v 16 येज्रीली नाबोथ मेला आहे असे जेव्हा अहाबाने ऐकले, तेव्हा तो उठला व नाबोथचा द्राक्षमळा ताब्यात घेण्यास निघाला. \p \v 17 त्यानंतर तिश्बीचा एलीयाहकडे याहवेहचे वचन आले: \v 18 “खाली जाऊन इस्राएलचा राजा अहाब, जो शोमरोनमध्ये राज्य करतो त्याला भेट, आता तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा म्हणून तो तिथे गेला आहे. \v 19 त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू एका मनुष्याचा खून करून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली नाही काय?’ तेव्हा त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचे रक्त चाटले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझे रक्त; होय, तुझेच रक्त चाटतील!’ ” \p \v 20 अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!” \p तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस. \v 21 याहवेह म्हणतात, ‘मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. मी तुझी संतती नष्ट करून टाकीन व इस्राएलात अहाबाच्या कुटुंबातून प्रत्येक शेवटचा पुरुष; तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, तो मी उपटून टाकीन. \v 22 मी तुझ्या कुटुंबाचे नेबाटाचा पुत्र यरोबोअम व अहीयाहचा पुत्र बाशा यांच्याप्रमाणे करेन, कारण तू माझा क्रोध भडकविला आहेस आणि इस्राएलास पाप करण्यास भाग पाडले आहे.’ \p \v 23 “आणि ईजबेलविषयी याहवेह म्हणतात: ‘येज्रीलच्या भिंतीजवळ\f + \fr 21:23 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa तिच्या भूमीवर\fqa*\f* ईजबेलला कुत्रे खातील.’ \p \v 24 “अहाबाच्या संबंधातील लोक जे शहरात मरतील त्यांना कुत्रे खातील, आणि वेशीच्या बाहेर जे मरतील त्यांना आकाशातील पक्षी खातील.” \p \v 25 (अहाबासारखा कोणी कधीही झाला नाही, ज्याने आपली पत्नी ईजबेल हिच्या सांगण्यानुसार, याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले. \v 26 याहवेहने इस्राएली लोकांच्या पुढून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या मागे लागून अमंगळ कृत्ये केली.) \p \v 27 अहाबाने जेव्हा हे शब्द ऐकले, त्याने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून उपास केला. तो गोणपाटात राहून दीनपणे जगू लागला. \p \v 28 नंतर एलीयाह तिश्बीकडे याहवेहचे वचन आले: \v 29 “अहाब माझ्यासमोर कसा नम्र झाला आहे हे तुला दिसते का? कारण त्याने स्वतःला नम्र केले आहे, म्हणून हे अरिष्ट मी तो जिवंत असताना आणणार नाही, परंतु ते मी त्याच्या घराण्यावर त्याच्या पुत्राच्या काळात आणेन.” \c 22 \s1 मिखायाह अहाबाविरुध्द भविष्य सांगतो \p \v 1 पुढील तीन वर्षात अराम व इस्राएलमध्ये युद्ध झाले नाही. \v 2 पण तिसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा यहोशाफाट इस्राएलच्या राजाला भेटण्यास गेला. \v 3 इस्राएलचा राजा आपल्या अधिकार्‍यांना म्हणाला, “रामोथ गिलआद आपलेच आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तरीही अरामाच्या राजाकडून ते परत घेण्यास आपण काहीही का करत नाही?” \p \v 4 तेव्हा त्याने यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध युद्ध करण्यासाठी जाल का?” \p यहोशाफाटने इस्राएलच्या राजाला उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत, जसे माझे घोडे तसेच ते तुमचेही घोडे आहेत.” \v 5 परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.” \p \v 6 तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” \p ते म्हणाले, “जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देतील.” \p \v 7 परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?” \p \v 8 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” \p यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.” \p \v 9 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्‍याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.” \p \v 10 इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते. \v 11 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ” \p \v 12 इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो, कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.” \p \v 13 जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.” \p \v 14 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.” \p \v 15 तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?” \p त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण याहवेह ते राजाच्या हाती देईल.” \p \v 16 राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?” \p \v 17 तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ” \p \v 18 इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?” \p \v 19 मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या सभोवती डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला. \v 20 आणि याहवेहने म्हटले, ‘अहाबाने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ \p “तेव्हा एकाने एक तर दुसर्‍याने दुसरी मसलत दिली. \v 21 तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोहात पाडेन.’ \p \v 22 “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’ \p “तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’ \p “याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील. जा आणि तसे कर.’ \p \v 23 “तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.” \p \v 24 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?” \p \v 25 मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.” \p \v 26 तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा \v 27 आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ” \p \v 28 तेव्हा मिखायाह म्हणाला, “तू जर सुखरुप परत आलास तर याहवेह माझ्याद्वारे बोललेच नाही असे समजावे.” तो पुढे म्हणाला, “लोकांनो, तुम्ही सर्वजण हे लक्षात ठेवा!” \s1 रामोथ-गिलआदमध्ये अहाबाचा मृत्यू \p \v 29 यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले. \v 30 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला. \p \v 31 आता अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.” \v 32 रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा खचितच इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण जेव्हा यहोशाफाट मोठ्याने रडला, \v 33 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले. \p \v 34 पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखतामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.” \v 35 तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि अराम्यांचा सामना करीत राजा रथातच राहिला. त्याच्या जखमेतून रक्त वाहत रथाच्या तळाशी साचले आणि त्या संध्याकाळी तो मरण पावला. \v 36 सूर्य मावळत असताना, सैन्यात एकच घोषणा झाली: “प्रत्येकाने आपआपल्या नगरात जावे, प्रत्येकाने आपआपल्या देशात जावे!” \p \v 37 राजा मरण पावला आणि त्याला शोमरोनात आणले व तिथे त्याला पुरण्यात आले. \v 38 शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत),\f + \fr 22:38 \fr*\ft किंवा \ft*\fqa जिथे शस्त्रे धुतली जात असे\fqa*\f* आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले. \p \v 39 अहाबाच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, हस्तिदंताने मढविलेला जो राजवाडा त्याने बांधला, व ज्या शहरांचे तट त्याने बांधले ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेले नाही काय? \v 40 अहाब आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पुत्र अहज्याह त्याचा वारस म्हणून राजा झाला. \s1 यहूदाचा राजा यहोशाफाट \p \v 41 इस्राएलचा राजा अहाबाच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदीयाचा राजा झाला. \v 42 यहोशाफाट राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती. \v 43 त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत. \v 44 यहोशाफाट व इस्राएलचा राजा यांच्यात शांती होती. \p \v 45 यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना, त्याने हस्तगत केलेल्या गोष्टी, त्याचे लष्करी कार्य या सर्वांचे वर्णन यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात केलेले नाही काय? \v 46 त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले. \v 47 त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता. \p \v 48 ओफीर शहरातून सोने आणता यावे म्हणून यहोशाफाटने व्यापारी जहाजे\f + \fr 22:48 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa तार्शीशची गलबते\fqa*\f* बांधली होती. पण ती एजिओन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती समुद्राची वाटचाल करू शकली नाहीत. \v 49 तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्याह यहोशाफाटला म्हणाला, “माझ्या माणसांना आपल्या माणसांबरोबर जाऊ द्या.” पण यहोशाफाटने त्यास नकार दिला. \p \v 50 त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला. \s1 इस्राएलचा राजा अहज्याह \p \v 51 यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या राज्याच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्याह हा शोमरोनात इस्राएलचा राजा झाला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले. \v 52 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले. \v 53 त्याने बआलची सेवा व उपासना केली आणि आपल्या पित्याप्रमाणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.